अमेरिकेचे सरंक्षण सचिव ॲशटॉन कार्टर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
भारत आणि अमेरिके दरम्यानचे संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी सचिव कार्टर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी यावेळी त्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी यावेळी त्यांच्या यावर्षीच्या जून महिन्यातील अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्याची आठवण केली. अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन आणि बळकटी प्रदान करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा यावेळी त्यांनी पुनरुच्चार केला.
या वर्षीच्या जून महिन्यात घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी विषयी सचिव कार्टर यांनी पंतप्रधानांना थोडक्यात माहिती दिली.
त्यांनी यावेळी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मुद्दे आणि विकासाबाबत आपल्या मतांची देवाण- घेवाण देखील केली.