देशाचे पंतप्रधान असूनसुद्धा नरेंद्र मोदी नेहमीच साधेपणाचे उत्तम उदाहरण ठरले आहेत आणि ते भारताच्या सामान्य नागरिकांप्रमाणे वागले आहेत.
मेट्रोमधला त्यांचा प्रवास हा देखील त्यांच्या साधेपणाचेच प्रतिक आहे.
दिल्ली आणि एनसीआर परिसरात एखाद्या कार्यक्रमाला जातेवेळी पंतप्रधान मोदी मेट्रोमध्ये बसून बरोबर असलेल्या सहप्रवाशांशी गप्पा मारत आहेत हे चित्रं काही नवीन नाही.
पंतप्रधान मोदींनी अनेकदा मेट्रोतून प्रवास केला आहे. पंतप्रधान मेट्रोमध्ये असताना लोकांना त्यांच्याबरोबर सेल्फी, फोटो काढायचे असतात, त्यांच्याशी बोलायचे असते त्यामुळे त्यांचा मेट्रोप्रवास खूप उत्साहपूर्ण असतो. समाजातील सर्व घटकातील आणि सर्व वयोगटातील लोकांनी पंतप्रधानांना देशाने केलेल्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Cherished moments with a young friend on board the Delhi Metro. Watch this.
Posted by Narendra Modi on Wednesday, March 13, 2019
लोकांचा उत्साह बघून पंतप्रधान स्वतःच फोटोग्राफर बनतात, कधी त्यांना फोटो काढायला मदत करतात आणि लोकांचा प्रवास चिरस्मरणीय करतात.