रायसीना संवादादरम्यान विविध देशांच्या 12 मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
लॅटिव्हियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एडगर रिंकेविक्स, उज्बेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुलअज़ीज कॅल्व्होलो, हंगेरीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि व्यापार मंत्री पीटर ज़ीकार्टो, अफगानिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. हमदुल्ला मोहिब, चेक प्रजासत्ताकाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉमस पेट्रिसेक, मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्दुल्ला शाहिद, बांग्लादेशचे माहिती मंत्री डॉ. हसन महमूद, एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री उरवस रेनसालू, दक्षिण आफिकाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार्य मंत्री डॉ. नलेदी पेंडर, डेनमार्कचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जेपी कोफोड, राष्ट्रकुलच्या सरचिटणीस पेट्रिशिया स्कॉटलँड , शांघाय सहकार्य संघटनेचे सरचिटणीस व्लादिमीर नोरोव यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी या नेत्यांचे भारतात स्वागत केले आणि रायसीना संवाद 2020 मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. त्वरित आणि समग्र सामाजिक-आर्थिक विकासासाठीसरकार मोठ्या प्रमाणावर करत असलेल्या प्रयत्नांबाबत पंतप्रधानांनी चर्चा केली आणि जागतिक विकासातील आव्हाने कमी करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.