ओमान भारत संयुक्त व्यापार परिषदेच्या सुमारे 30 तरुण उद्योजकांच्या एका गटाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.74812300_1526473773_oman2.png)
उभय देशांदरम्यान दीर्घकालीन ऐतिहासिक आणि सागरी संबंधांबाबत त्यांनी आपले विचार मांडले.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.56889900_1526473790_oman1.png)
या संवादादरम्यान पंतप्रधानांनी उभय देशांदरम्यान ऊर्जा सुरक्षा आणि अन्न सुरक्षा सहकार्याची व्याप्ती अधोरेखित केली. त्यांनी ओमानच्या सुलतानांना शुभेच्छा दिल्यात, तसेच आजपासून सुरु झालेल्या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.