G7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती अल्बर्टो फर्नांडीझ यांची 26 जून 2022 रोजी म्युनिकमध्ये भेट घेतली.
या दोन्ही नेत्यांमधील ही पहिली द्विपक्षीय बैठक होती. 2019 मध्ये दोन्ही देशांमध्ये सुरु झालेल्या धोरणात्मक भागीदारीच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. यावेळी व्यापार, गुंतवणुकीसह इतर विविध विषयांवर चर्चा झाली; दक्षिण-दक्षिण सहकार्य, विशेषतः औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य ; हवामान विषयक कृती, नवीकरणीय ऊर्जा, आण्विक औषध, विद्युत गतिशीलता, संरक्षण सहकार्य, कृषी आणि अन्न सुरक्षा, पारंपारिक औषधे , सांस्कृतिक सहकार्य,तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये समन्वय इत्यादी विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला. भविष्यात या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर दोन्ही राष्ट्रांचे एकमत झाले.
Reviewed the full range of the India-Argentina friendship during the very productive meeting with President @alferdez in Munich. Stronger cooperation between our nations will greatly benefit our people. pic.twitter.com/bBe32Wg850
— Narendra Modi (@narendramodi) June 26, 2022