We will send you 4 digit OTP to confirm your number
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 'मन की बात' म्हणजे देशाच्या सामूहिक प्रयत्नांची गोष्ट, देशाच्या यशाची गोष्ट, लोकांच्या सामर्थ्याची गोष्ट, 'मन की बात' म्हणजे देशातील युवा वर्गाची स्वप्नं आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांबद्दलची गोष्ट! मी पूर्ण महिनाभर 'मन की बात' ची वाट पाहत असतो, जेणेकरून मला तुमच्याशी थेट संवाद साधता येईल. इतके संदेश, कितीतरी संदेश! मी शक्य तितके जास्तीत जास्त संदेश वाचण्याचा आणि तुमच्या सूचनांवर विचार करण्याचा प्रयत्न करत असतो.
मित्रांनो, आजचा दिवस खूप विशेष आहे - आज एनसीसी दिवस आहे. एनसीसी चा विषय निघताच आपले शाळा-महाविद्यालयांचे दिवस आठवतात. मी स्वतः देखील एनसीसी कॅडेट राहिलो आहे, त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की यातून मिळालेला अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहे. 'एनसीसी', तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की, कोणतीही आपत्ती आली असेल, मग ती पूरपरिस्थिती असो, भूकंप असो, कोणतीही दुर्घटना असो, एनसीसी चे कॅडेट्स मदतीला नक्कीच धावून जातात. आज देशात एनसीसी ला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत आहे. 2014 मध्ये, एनसीसीत सुमारे 14 लाख तरुण-तरुणी होते. आता 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक तरुण-तरुणी एनसीसी मध्ये आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता आणखी पाच हजार नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसी ची सुविधा उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी एनसीसी मध्ये कॅडेट्स म्हणून मुलींची संख्या फक्त 25 टक्क्यांच्या आसपास होती. आता एनसीसी मध्ये मुलींची संख्या जवळपास 40 टक्के झाली आहे. सीमाभागात राहणाऱ्या अधिकाधिक तरुण-तरुणींना एनसीसी मध्ये सामावून घेण्याची मोहीमही सातत्याने सुरू आहे. मी तरुण-तरुणींना एनसीसीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. तुम्ही असं पहा की… तुम्ही शिक्षणाची कोणतीही वाट निवडा, तुमचं व्यक्तीमत्व घडण्यासाठी एनसीसी ची खूप मदत होईल.
मित्रांनो, विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. जेव्हा तरुण मन एकत्र येऊन, देशाच्या भावी प्रवासाबाबत विचारमंथन करतं, चर्चा करतं, तेव्हा निश्चितच त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात. तुम्हाला माहीत आहे की, देश 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी 'युवा दिन' साजरा करतो. पुढील वर्षी स्वामी विवेकानंदांची 162 वी जयंती आहे. यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने 11-12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथे युवा विचारांचा महामेळावा होणार असून, 'विकसित भारत युवा नेते संवाद' असे या उपक्रमाचे नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार आहेत. गाव, ब्लॉक म्हणजे गट, जिल्हा, राज्य आणि तिथून निवडलेले असे दोन हजार तरुण-तरुणी भारत मंडपम इथे, 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' अर्थात विकसित भारत युवा नेते संवादा साठी जमतील. तुम्हाला आठवत असेल की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी अशा तरुण-तरुणींना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते, ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला, राजकीय पार्श्वभूमी नाही….तर अशा एक लाख तरुण-तरुणींना, नवोदीत तरुण-तरुणींना राजकारणात सामावून घेण्यासाठी देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' देखील असाच एक उपक्रम आहे. यासाठी देश-परदेशातील तज्ज्ञ येणार आहेत. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलयांकित मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. मीही त्यात यथाशक्ती जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहीन. तरुण-तरुणींना त्यांच्या कल्पना थेट आमच्यासमोर मांडण्याची संधी मिळेल. देश, या कल्पनांना कशाप्रकारे मूर्त स्वरूप देऊ शकेल…. कसा एक ठोस रोडमॅप- निश्चित कृती आराखडा तयार करता येईल….. याची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाईल… तेव्हा सज्ज व्हा…जे भारताचे भविष्य घडवणार आहेत, जे देशाची भावी पिढी आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा तरुणाईबद्दल बोलतो. असे अनेक तरुण-तरुणी आहेत जे निस्वार्थपणे समाजासाठी काम करत आहेत आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झटत आहेत. आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर आपल्याला असे अनेक लोक दिसतात ज्यांना कुठल्यातरी मदतीची किंवा कसल्यातरी माहितीची गरज असते. मला हे जाणून बरं वाटलं की काही तरुणांनी गट बनवून अशाही काही समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे…जसे की लखनऊचे वीरेंद्र म्हणून रहिवासी आहेत…ते डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला डिजिटल स्वरूपात मिळवून देण्याच्या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत करत असतात. तुम्हाला माहीत आहे की, नियमाप्रमाणे सर्व निवृत्तीवेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला जमा करायचा असतो. 2014 पर्यंत यासाठीची प्रक्रिया अशी होती की ज्येष्ठ नागरिकांना स्वतः बँकांमध्ये जाऊन हा दाखला जमा करावा लागत होता….. आपण कल्पना करू शकता की यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांची किती गैरसोय होत होती. आता ही प्रक्रिया बदलली आहे. आता, हयातीचे दाखले डिजिटल स्वरूपात मिळू लागल्यामुळे ही प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे… ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जावं लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाच्या वापरात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून वीरेंद्र सारखे अनेक तरुण योगदान देत आहेत. ते आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत जागृत करत असतात. एवढेच नाही… ते ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान स्नेही सुद्धा बनवत आहेत. अशाच प्रयत्नांमुळे आज डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला मिळवणाऱ्यांची संख्या 80 लाखाच्या वर गेली आहे… यापैकी दोन लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिक असे आहेत, ज्यांनी वयाची 80 वर्ष ओलांडली आहेत.
मित्रांनो, अनेक शहरांमध्ये युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी पुढे येत आहे. भोपाळच्या महेश यांनी आपल्या भागातील अनेक ज्येष्ठांना स्मार्ट फोनद्वारे आर्थिक व्यवहार करायला शिकवले आहे. या ज्येष्ठांकडे स्मार्टफोन तर होते, मात्र त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा हे त्यांना सांगणारं कुणी नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांमधून होणाऱ्या अटके सारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी सुद्धा अनेक तरुण-तरुणी पुढे आले आहेत. अहमदाबादचे राजीव, लोकांना डिजिटल अटकेच्या धोक्याबाबत जागरुक करत असतात. मी, 'मन की बात' च्या मागील भागात, डिजिटल अटकेबाबत चर्चा केली होती. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना, ज्येष्ठ नागरिकच जास्तीत जास्त बळी पडतात. अशा परिस्थितीत आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांना जागरूक केलं पाहिजे आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यात त्यांना मदत केली पाहिजे. आपल्याला लोकांना हे वारंवार समजवावं लागेल की सरकारी प्रक्रियेमध्ये डिजिटल अटक या प्रकाराची तरतूदच नाही. हे धादांत असत्य… लोकांना फसवण्याचे कारस्थान आहे. मला आनंद वाटतो की आपले तरुण मित्र या कामात पूर्ण संवेदनशीलतेने सहभागी होत आहेत आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. प्रयत्न हाच आहे की आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं. असंही म्हटलं जातं की पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगले मित्र असतात आणि आता ही मैत्री घट्ट करण्यासाठी ग्रंथालयापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती असेल? मी, चेन्नईचे एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. इथे मुलांसाठी असं एक वाचनालय तयार करण्यात आलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हे प्रकृत अरिवगम म्हणून ओळखलं जातं. या ग्रंथालयाची कल्पना, तंत्रज्ञानाच्या जगाशी निगडित असलेल्या श्रीराम गोपालनजींच्या योगदानातून साकारली आहे. परदेशात आपलं काम करताना ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडले गेले. मात्र सोबतच त्यांनी, मुलांमध्ये वाचनाची आणि शिकण्याची आवड रुजवण्याचाही विचार केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रकृत अरिवगम तयार केले. यात तीन हजारांहून अधिक पुस्तके आहेत, जी वाचण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागलेली असते. पुस्तकांशिवाय या ग्रंथालयात होणारे अनेक उपक्रमही मुलांना आकर्षित करतात. कथाकथनाची सत्रे असोत, कला कार्यशाळा असोत, स्मृती संवर्धन प्रशिक्षण वर्ग असोत, रोबोटिक्स म्हणजे यंत्रमानव तंत्राचे धडे असोत किंवा पब्लिक स्पीकिंग-सार्वजनिक संभाषण असो, प्रत्येकासाठी आनंद घेण्यासारखे काहीतरी आहे जे त्यांच्या आवडीचे आहे.
मित्रांनो, हैदराबादमध्येही ‘फूड फॉर थॉट’ फाऊंडेशनने अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. त्यांचाही जास्तीत जास्त प्रयत्न हाच असतो की मुलांना जास्तीत जास्त विषयांची ठोस माहिती असलेली पुस्तके वाचायला मिळावीत. बिहारमध्ये गोपालगंजच्या ‘प्रयोग लायब्ररी’ या ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागली आहे. या ग्रंथालयातून सुमारे 12 गावातील तरुण-तरुणींना पुस्तके वाचण्याची सुविधा मिळू लागली आहे, यासोबतच या वाचनालयाच्यावतीने इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही ग्रंथालये तर अशी आहेत जी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. हे पाहून खरोखरच खूप आनंद होतो की समाजाच्या सक्षमीकरणासाठी आज वाचनालयांचा खूप चांगला उपयोग होत आहे. तुम्हीही पुस्तकांशी मैत्री वाढवा, आणि पहा… तुमचे जीवन कसे बदलते!
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी परवा रात्रीच दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून परतलो आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर, गयानामध्येही एक 'मिनी भारत' वसला आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी गयानात, भारतातील लोकांना शेतात काम करण्यासाठी आणि इतर कामांसाठी नेण्यात आले होते. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक, राजकारण, व्यवसाय, शिक्षण आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात गयानाचे नेतृत्व करत आहेत. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली हे देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांना आपल्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. मी गयानामध्ये असताना माझ्या मनात एक विचार आला – जो मी तुम्हाला ‘मन की बात’ मध्ये सांगत आहे. गयानाप्रमाणेच जगातील डझनभर देशांमध्ये लाखो भारतीय आहेत. काही दशकांपूर्वीच्या, 200-300 वर्षांपूर्वीच्या… त्यांच्या पूर्वजांच्या… स्वतःच्या अशा कथा आहेत. भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवला याच्या कथा तुम्हाला सापडतील का! तिथल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कसा भाग घेतला! त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा सत्य कथा शोधाव्यात आणि त्या मला सांगाव्यात. तुम्ही या कथा नमो ॲपवर किंवा MyGov वर, #IndianDiasporaStories या हॅशटॅग वर देखील शेअर करू शकता.
मित्रांनो, ओमानमध्ये सुरू असलेला एक अनोखा प्रकल्पही तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल. ओमानमध्ये अनेक भारतीय कुटुंबे अनेक शतकांपासून राहत आहेत. त्यापैकी बहुतांश, गुजरातमधील कच्छमधून स्थायिक झाली आहेत. या लोकांनी व्यापाराचे महत्त्वाचे दुवे निर्माण केले होते. आजही त्यांच्याकडे ओमानी नागरिकत्व आहे, पण भारतीयत्व त्यांच्या नसानसात भिनले आहे. ओमानमधील भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकाने, या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यामध्ये रोजनिशी, खाते वही, लेजर- नोंदवही, पत्रे आणि तारा यांचा समावेश आहे. यातील काही कागदपत्रे 1838 सालातील देखील आहेत. ही कागदपत्रे भावनांनी ओथंबलेली आहेत. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ते ओमानला पोहोचले तेव्हा त्यांनी कोणत्या प्रकारचे जीवन अनुभवले, कोणत्या प्रकारच्या सुख-दुःखाचा सामना केला आणि ओमानच्या लोकांशी त्याचे संबंध कसे वाढले - हे सर्व या कागदपत्रां मध्ये सामावले आहे. ‘ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट’ हा मौखिक इतिहास प्रकल्प देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा आधार आहे. या उपक्रमात, तेथील ज्येष्ठांनी आपले अनुभव सांगितले आहेत. लोकांनी तिथल्या त्यांच्या राहणीमानाशी संबंधित गोष्टी, सविस्तरपणे सांगितल्या आहेत.
मित्रांनो, असाच एक 'ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट' भारतातही सुरू आहे. या प्रकल्पा अंतर्गत, देशाच्या फाळणीच्या काळात बळी गेलेल्यांचे अनुभव, इतिहासप्रेमी गोळा करत आहेत. आता देशात असे फार कमी लोक उरले आहेत ज्यांनी फाळणीची भीषणता पाहिली- अनुभवली आहे. अशा परिस्थितीत हा प्रयत्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे.
मित्रांनो, जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या सागरी प्रवासाच्या प्राचीन क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही देशात सुरू आहे. या अनुषंगाने लोथलमध्ये एक मोठे संग्रहालय देखील बनवले जात आहे, जर तुमच्याकडे कोणतेही हस्तलिखित, कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज, कोणत्याही हस्तलिखिताची प्रत असेल तर तुम्ही ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीने जतन करू शकता.
मित्रांनो, मला स्लोव्हाकियामध्ये होत असलेल्या अशाच आणखी एका प्रयत्नाची माहिती मिळाली आहे जो आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याशी संबंधित आहे. इथे प्रथमच, आपल्या उपनिषदांचा स्लोव्हाक भाषेत अनुवाद झाला आहे. या प्रयत्नांतून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.
या प्रयत्नांमधून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात करोडो लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मला तुमच्यासोबत देशाच्या अशा एक अशी कामगिरीबद्दल सांगायची आहे जे ऐकून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल आणि जर तो नाही वाटला तर कदाचित तुम्हाला पश्चातापही होईल. काही महिन्यांपूर्वी आपण ‘एक पेड माँ के नाम’ म्हणजेच 'एक वृक्ष आईच्या नावाने' ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या मोहिमेने १०० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 100 कोटी झाडे, तीही अवघ्या पाच महिन्यात, हे केवळ आपल्या देशवासीयांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. ‘एक वृक्ष आईच्या नावे' किंवा 'एक वृक्ष आईच्या नावाने' ही मोहीम आता जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. मी गयानामध्ये असताना तिथेही या मोहिमेचा मी साक्षीदार होतो. तिथे गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली, त्यांच्या पत्नीची आई आणि बाकीचे कुटुंब 'एक वृक्ष आईच्या नावे' या मोहिमेत माझ्या बरोबर सामिल झाले होते.
मित्रांनो, ही मोहीम देशाच्या विविध भागांमध्ये सातत्याने सुरू आहे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमे अंतर्गत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये वृक्षारोपणाचा विक्रम झाला आहे. येथे 24 तासांत 12 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. या मोहिमेमुळे इंदूरच्या रेवती हिल्सचा ओसाड भाग आता ग्रीन झोनमध्ये बदलून जाणार आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये या मोहिमेद्वारे एक अनोखा विक्रम रचला गेला. येथील महिलांच्या टीमने (गटाने) एका तासात 25 हजार झाडे लावली. मातांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आणि इतरांनाही प्रेरणा दिली. येथे पाच हजारांहून अधिक लोकांनी मिळून एकाच ठिकाणी वृक्षारोपण केले, हा देखील एक विक्रमच आहे. 'एक पेड माँ के नाम' किंवा 'एक वृक्ष आईच्या नावाने' या मोहिमेअंतर्गत अनेक सामाजिक संस्था स्थानिक गरजांनुसार वृक्षारोपण करत आहेत. जिथे जिथे झाडे लावली जातात तिथे संपूर्ण इको-सिस्टिमचा पर्यावरणपूरक विकास व्हावा, हा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे या संस्था काही ठिकाणी औषधी वनस्पती लावत आहेत तर काही ठिकाणी चिमण्या किंवा अन्य पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यासाठी झाडे लावत आहेत. बिहारमध्ये 'जीविका सेल्फ हेल्प ग्रुप'च्या महिला 75 लाख झाडे लावण्याची मोहीम राबवत आहेत. या महिलांचे विशेष लक्ष फळझाडांवर आहे, ज्या झाडांमुळे त्यांना भविष्यात उत्पन्न मिळू शकेल.
मित्रांनो, या मोहिमेत सहभागी होऊन कोणीही व्यक्ती आपल्या आईच्या नावाने एक झाड लावू शकते. जर तुमची आई तुमच्या सोबत असेल तर तुम्ही तिला सोबत घेऊन झाड लावू शकता, अन्यथा तिचा फोटो बरोबर घेऊन जात तुम्ही या मोहिमेचा भाग होऊ शकता. तुम्ही झाडासोबतचा तुमचा सेल्फी mygov.in वर देखील पोस्ट करू शकता. आईने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, परंतु तिच्या नावाने एक झाड लावून तिचे अस्तित्व कायम जिवंत ठेवू शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही सर्वांनी लहानपणी तुमच्या घराच्या छतावर किंवा झाडांवर चिमण्या चिवचिवाट करताना पाहिल्या असतील. चिमणीला तामिळ आणि मल्याळममध्ये कुरुवी, तेलुगूमध्ये पिचुका आणि कन्नडमध्ये गुब्बी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक भाषेत आणि संस्कृतीत चिमण्यांच्या कथा सांगितल्या जातात. आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या कामी चिमण्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु आज शहरांमध्ये चिमण्या क्वचितच दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या आहेत. आजच्या पिढीतील अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी चिमण्या फक्त चित्रात किंवा व्हिडीओमध्ये पाहिल्या आहेत. अशा मुलांच्या आयुष्यात हा लाडका पक्षी परत आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जात आहेत. चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेत शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. यामध्ये चिमण्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही घरटी कोणत्याही इमारतीच्या बाहेरील भिंतीवर किंवा झाडावर लावली जाऊ शकतात. या मोहिमेत मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची घरटी बनवायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत. कुदुगल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे. तुम्हीही तुमच्या अवतीभवती असे प्रयत्न केले तर चिमण्या पुन्हा आपल्या जीवनाचा एक भाग नक्कीच बनतील.
मित्रांनो, कर्नाटकातील म्हैसूर येथील एका संस्थेने लहान मुलांसाठी ‘अर्ली बर्ड’ नावाची मोहीम सुरू केली आहे. मुलांना पक्ष्यांबद्दलची माहिती सांगण्यासाठी ही संस्था खास प्रकारची लायब्ररी चालवते. एवढेच नाही तर मुलांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना जागृत करण्यासाठी ‘नेचर एज्युकेशन किट’ तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं, खेळ, विविध उपक्रम आणि कोडी आहेत. ही संस्था शहरातील मुलांना खेड्यापाड्यात घेऊन जाते आणि त्यांना पक्ष्यांबद्दल सांगते. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे मुले पक्ष्यांच्या अनेक प्रजाती ओळखू लागल्या आहेत. ‘मन की बात’ ऐकणारी मंडळी सुद्धा त्यांच्या मुलांमध्ये, अशी आजूबाजूला बघण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची वेगळी पद्धत मुलांमध्ये विकसित करू शकतात.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 'सरकारी कार्यालय' असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. तुम्ही चित्रपटांमध्येही असंच काहीबाही पाहिलं असेल. सरकारी कार्यालयातील या फायलींच्या ढिगाऱ्यांवर अनेक विनोद केले जातात, अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. झालं असं कि वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीने भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या मोहिमेमुळे सरकारी विभागांमध्ये आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. स्वच्छतेमुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी झाली आहे. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्यांमध्येही आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. कामाची जागा स्वच्छ ठेवण्याचे महत्व किंवा गांभीर्यही त्यांना कळून चुकले आहे.
मित्रांनो, जिथे स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं तुम्ही आपल्या वाडवडिलांना म्हणताना ऐकलं असेल, ‘कचऱ्यातून कांचन’ ही कल्पना आपल्याकडे खूप जुनी आहे. देशाच्या अनेक भागांत तरुण मंडळी निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून टाकाऊ पदार्थातून ‘कांचन’ बनवत आहेत. विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवत आहेत, शोध लावत आहेत. यातून ते पैसे कमवत आहेत आणि रोजगाराच्या संधी विकसित करत आहेत. हे तरुणही त्यांच्या प्रयत्नातून शाश्वत जीवनशैलीला चालना देत आहेत. मुंबईच्या दोन मुलींचा असा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. अक्षरा आणि प्रकृति नावाच्या या दोन मुली चिंध्यांपासून फॅशन आयटम बनवतात. शिवणकाम करताना कपडे कापताना बाहेर किंवा बाजूला पडणाऱ्या चिंध्या निरुपयोगी समजल्या जातात आणि फेकल्या जातात हेही तुम्हाला माहिती आहे. अक्षरा आणि प्रकृतीची टीम त्याच कपड्यांचा कचरा फॅशन उत्पादनांमध्ये रूपांतरित करते. चिंध्यांपासून बनवलेल्या टोप्या आणि पिशव्याही सहज सहज विकल्या जात आहेत.
मित्रांनो, यूपीच्या कानपूरमध्येही स्वच्छतेबाबत चांगले उपक्रम राबवले जात आहेत. येथे काही लोक रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि गंगेच्या घाटांवर पसरलेला प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करतात. या समूहाला ‘कानपूर प्लॉगर्स ग्रुप’ असे नाव देण्यात आले आहे. (प्लॉगिंग म्हणजे जॉगिंग करता करता पिकअप करणे). काही मित्रांनी मिळून ही मोहीम सुरू केली होती. हळूहळू ही लोकसहभागाची मोठी मोहीम बनली. शहरातील अनेक नागरिक त्यात सामील झाले आहेत. त्यांच्या सदस्यांनी आता दुकाने आणि घरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या कचऱ्यापासून रिसायकल प्लांटमध्ये ट्री गार्ड तयार केले जातात, म्हणजेच या गटातील लोक कचऱ्यापासून बनवलेल्या ट्री गार्डच्या सहाय्याने झाडांचे संरक्षणही करतात.
मित्रांनो, छोट्या छोट्या प्रयत्नातून किती मोठे यश मिळवता येते याचे उदाहरण म्हणजे आसामची इतिशा. इतिशाचे शिक्षण दिल्ली आणि पुण्यात झाले. कॉर्पोरेट जगतातील आकर्षण बाजूला सारून इतिशा अरुणाचलच्या सांगती खोरे स्वच्छता कामात व्यग्र आहे. पर्यटकांमुळे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचू लागला होता. एकेकाळी स्वच्छ असलेली तिथली नदी प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाली होती. इतिशा स्थानिक लोकांसोबत ते स्वच्छ करण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या ग्रुपचे लोक तिथे येणाऱ्या पर्यटकांना जागरूक करण्याचे काम करतात आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी संपूर्ण खोऱ्यात बांबूपासून बनवलेले डस्टबिन बसवतात.
मित्रांनो, अशा प्रयत्नांमुळे भारताच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते. ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे. तुमच्या आसपासही असं काही निश्चितच घडत असेल. अशा प्रयत्नांबद्दल तुम्ही मला जरूर कळवत रहा.
मित्रांनो, 'मन की बात' च्या या एपिसोडमध्ये सध्या एवढेच. मी संपूर्ण महिनाभर तुमच्या प्रतिसादांची, पत्रांची आणि सूचनांची वाट पाहत असतो. दर महिन्याला येणारे तुमचे संदेश मला आणखी किंवा अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहतात. तेव्हा, पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू, ‘मन की बात’ च्या दुसऱ्या अंकात. देश आणि देशवासियांच्या नवीन यशोगाथा किंवा विशेष कामांबद्दलची माहिती घेऊन, तोपर्यंत सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 'मन की बात' म्हणजे देशाच्या सामूहिक प्रयत्नांची गोष्ट, देशाच्या यशाची गोष्ट, लोकांच्या सामर्थ्याची गोष्ट, 'मन की बात' म्हणजे देशातील युवा वर्गाची स्वप्नं आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांबद्दलची गोष्ट! मी पूर्ण महिनाभर 'मन की बात' ची वाट पाहत असतो, जेणेकरून मला तुमच्याशी थेट संवाद साधता येईल. इतके संदेश, कितीतरी संदेश! मी शक्य तितके जास्तीत जास्त संदेश वाचण्याचा आणि तुमच्या सूचनांवर विचार करण्याचा प्रयत्न करत असतो.
मित्रांनो, आजचा दिवस खूप विशेष आहे - आज एनसीसी दिवस आहे. एनसीसी चा विषय निघताच आपले शाळा-महाविद्यालयांचे दिवस आठवतात. मी स्वतः देखील एनसीसी कॅडेट राहिलो आहे, त्यामुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की यातून मिळालेला अनुभव माझ्यासाठी अमूल्य आहे. 'एनसीसी', तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवते. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं असेल की, कोणतीही आपत्ती आली असेल, मग ती पूरपरिस्थिती असो, भूकंप असो, कोणतीही दुर्घटना असो, एनसीसी चे कॅडेट्स मदतीला नक्कीच धावून जातात. आज देशात एनसीसी ला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम होत आहे. 2014 मध्ये, एनसीसीत सुमारे 14 लाख तरुण-तरुणी होते. आता 2024 मध्ये 20 लाखांहून अधिक तरुण-तरुणी एनसीसी मध्ये आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता आणखी पाच हजार नवीन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एनसीसी ची सुविधा उपलब्ध आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी एनसीसी मध्ये कॅडेट्स म्हणून मुलींची संख्या फक्त 25 टक्क्यांच्या आसपास होती. आता एनसीसी मध्ये मुलींची संख्या जवळपास 40 टक्के झाली आहे. सीमाभागात राहणाऱ्या अधिकाधिक तरुण-तरुणींना एनसीसी मध्ये सामावून घेण्याची मोहीमही सातत्याने सुरू आहे. मी तरुण-तरुणींना एनसीसीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. तुम्ही असं पहा की… तुम्ही शिक्षणाची कोणतीही वाट निवडा, तुमचं व्यक्तीमत्व घडण्यासाठी एनसीसी ची खूप मदत होईल.
मित्रांनो, विकसित भारत घडवण्यात युवावर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. जेव्हा तरुण मन एकत्र येऊन, देशाच्या भावी प्रवासाबाबत विचारमंथन करतं, चर्चा करतं, तेव्हा निश्चितच त्यातून दिशा दाखवणारे ठोस मार्ग निघतात. तुम्हाला माहीत आहे की, देश 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंती दिवशी 'युवा दिन' साजरा करतो. पुढील वर्षी स्वामी विवेकानंदांची 162 वी जयंती आहे. यावेळी ही जयंती, विशेष प्रकारे साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने 11-12 जानेवारी रोजी दिल्लीतील भारत मंडपम इथे युवा विचारांचा महामेळावा होणार असून, 'विकसित भारत युवा नेते संवाद' असे या उपक्रमाचे नाव आहे. भारतभरातून कोट्यवधी तरुण-तरुणी यात सहभागी होणार आहेत. गाव, ब्लॉक म्हणजे गट, जिल्हा, राज्य आणि तिथून निवडलेले असे दोन हजार तरुण-तरुणी भारत मंडपम इथे, 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' अर्थात विकसित भारत युवा नेते संवादा साठी जमतील. तुम्हाला आठवत असेल की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी अशा तरुण-तरुणींना राजकारणात येण्याचे आवाहन केले होते, ज्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला किंवा संपूर्ण कुटुंबाला, राजकीय पार्श्वभूमी नाही….तर अशा एक लाख तरुण-तरुणींना, नवोदीत तरुण-तरुणींना राजकारणात सामावून घेण्यासाठी देशभरात विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत. 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' देखील असाच एक उपक्रम आहे. यासाठी देश-परदेशातील तज्ज्ञ येणार आहेत. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलयांकित मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत. मीही त्यात यथाशक्ती जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहीन. तरुण-तरुणींना त्यांच्या कल्पना थेट आमच्यासमोर मांडण्याची संधी मिळेल. देश, या कल्पनांना कशाप्रकारे मूर्त स्वरूप देऊ शकेल…. कसा एक ठोस रोडमॅप- निश्चित कृती आराखडा तयार करता येईल….. याची ब्ल्यू प्रिंट तयार केली जाईल… तेव्हा सज्ज व्हा…जे भारताचे भविष्य घडवणार आहेत, जे देशाची भावी पिढी आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा तरुणाईबद्दल बोलतो. असे अनेक तरुण-तरुणी आहेत जे निस्वार्थपणे समाजासाठी काम करत आहेत आणि लोकांच्या छोट्या छोट्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी झटत आहेत. आपण आपल्या आजूबाजूला बघितले तर आपल्याला असे अनेक लोक दिसतात ज्यांना कुठल्यातरी मदतीची किंवा कसल्यातरी माहितीची गरज असते. मला हे जाणून बरं वाटलं की काही तरुणांनी गट बनवून अशाही काही समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे…जसे की लखनऊचे वीरेंद्र म्हणून रहिवासी आहेत…ते डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजे हयातीचा दाखला डिजिटल स्वरूपात मिळवून देण्याच्या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत करत असतात. तुम्हाला माहीत आहे की, नियमाप्रमाणे सर्व निवृत्तीवेतनधारकांना वर्षातून एकदा हयातीचा दाखला जमा करायचा असतो. 2014 पर्यंत यासाठीची प्रक्रिया अशी होती की ज्येष्ठ नागरिकांना स्वतः बँकांमध्ये जाऊन हा दाखला जमा करावा लागत होता….. आपण कल्पना करू शकता की यामुळे आपल्या ज्येष्ठ नागरिकांची किती गैरसोय होत होती. आता ही प्रक्रिया बदलली आहे. आता, हयातीचे दाखले डिजिटल स्वरूपात मिळू लागल्यामुळे ही प्रक्रिया खूप सुलभ झाली आहे… ज्येष्ठ नागरिकांना बँकेत जावं लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञानाच्या वापरात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून वीरेंद्र सारखे अनेक तरुण योगदान देत आहेत. ते आपापल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना याबाबत जागृत करत असतात. एवढेच नाही… ते ज्येष्ठ नागरिकांना तंत्रज्ञान स्नेही सुद्धा बनवत आहेत. अशाच प्रयत्नांमुळे आज डिजिटल स्वरूपात हयातीचा दाखला मिळवणाऱ्यांची संख्या 80 लाखाच्या वर गेली आहे… यापैकी दोन लाखाहून जास्त ज्येष्ठ नागरिक असे आहेत, ज्यांनी वयाची 80 वर्ष ओलांडली आहेत.
मित्रांनो, अनेक शहरांमध्ये युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी पुढे येत आहे. भोपाळच्या महेश यांनी आपल्या भागातील अनेक ज्येष्ठांना स्मार्ट फोनद्वारे आर्थिक व्यवहार करायला शिकवले आहे. या ज्येष्ठांकडे स्मार्टफोन तर होते, मात्र त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा हे त्यांना सांगणारं कुणी नव्हतं. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल व्यवहारांमधून होणाऱ्या अटके सारख्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी सुद्धा अनेक तरुण-तरुणी पुढे आले आहेत. अहमदाबादचे राजीव, लोकांना डिजिटल अटकेच्या धोक्याबाबत जागरुक करत असतात. मी, 'मन की बात' च्या मागील भागात, डिजिटल अटकेबाबत चर्चा केली होती. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना, ज्येष्ठ नागरिकच जास्तीत जास्त बळी पडतात. अशा परिस्थितीत आपली ही जबाबदारी आहे की आपण त्यांना जागरूक केलं पाहिजे आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यात त्यांना मदत केली पाहिजे. आपल्याला लोकांना हे वारंवार समजवावं लागेल की सरकारी प्रक्रियेमध्ये डिजिटल अटक या प्रकाराची तरतूदच नाही. हे धादांत असत्य… लोकांना फसवण्याचे कारस्थान आहे. मला आनंद वाटतो की आपले तरुण मित्र या कामात पूर्ण संवेदनशीलतेने सहभागी होत आहेत आणि इतरांनाही प्रेरणा देत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. प्रयत्न हाच आहे की आपल्या मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं. असंही म्हटलं जातं की पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगले मित्र असतात आणि आता ही मैत्री घट्ट करण्यासाठी ग्रंथालयापेक्षा आणखी चांगली जागा ती कोणती असेल? मी, चेन्नईचे एक उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. इथे मुलांसाठी असं एक वाचनालय तयार करण्यात आलं आहे, जे सर्जनशीलता आणि शिकण्याचं केंद्र बनलं आहे. हे प्रकृत अरिवगम म्हणून ओळखलं जातं. या ग्रंथालयाची कल्पना, तंत्रज्ञानाच्या जगाशी निगडित असलेल्या श्रीराम गोपालनजींच्या योगदानातून साकारली आहे. परदेशात आपलं काम करताना ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जगाशी जोडले गेले. मात्र सोबतच त्यांनी, मुलांमध्ये वाचनाची आणि शिकण्याची आवड रुजवण्याचाही विचार केला. भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रकृत अरिवगम तयार केले. यात तीन हजारांहून अधिक पुस्तके आहेत, जी वाचण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ लागलेली असते. पुस्तकांशिवाय या ग्रंथालयात होणारे अनेक उपक्रमही मुलांना आकर्षित करतात. कथाकथनाची सत्रे असोत, कला कार्यशाळा असोत, स्मृती संवर्धन प्रशिक्षण वर्ग असोत, रोबोटिक्स म्हणजे यंत्रमानव तंत्राचे धडे असोत किंवा पब्लिक स्पीकिंग-सार्वजनिक संभाषण असो, प्रत्येकासाठी आनंद घेण्यासारखे काहीतरी आहे जे त्यांच्या आवडीचे आहे.
मित्रांनो, हैदराबादमध्येही ‘फूड फॉर थॉट’ फाऊंडेशनने अनेक अनोखी ग्रंथालये निर्माण केली आहेत. त्यांचाही जास्तीत जास्त प्रयत्न हाच असतो की मुलांना जास्तीत जास्त विषयांची ठोस माहिती असलेली पुस्तके वाचायला मिळावीत. बिहारमध्ये गोपालगंजच्या ‘प्रयोग लायब्ररी’ या ग्रंथालयाची चर्चा तर आसपासच्या अनेक शहरांमध्ये होऊ लागली आहे. या ग्रंथालयातून सुमारे 12 गावातील तरुण-तरुणींना पुस्तके वाचण्याची सुविधा मिळू लागली आहे, यासोबतच या वाचनालयाच्यावतीने इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काही ग्रंथालये तर अशी आहेत जी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. हे पाहून खरोखरच खूप आनंद होतो की समाजाच्या सक्षमीकरणासाठी आज वाचनालयांचा खूप चांगला उपयोग होत आहे. तुम्हीही पुस्तकांशी मैत्री वाढवा, आणि पहा… तुमचे जीवन कसे बदलते!
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी परवा रात्रीच दक्षिण अमेरिकेतील गयाना या देशातून परतलो आहे. भारतापासून हजारो किलोमीटर दूर, गयानामध्येही एक 'मिनी भारत' वसला आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी गयानात, भारतातील लोकांना शेतात काम करण्यासाठी आणि इतर कामांसाठी नेण्यात आले होते. आज गयानामधील भारतीय वंशाचे लोक, राजकारण, व्यवसाय, शिक्षण आणि संस्कृती या प्रत्येक क्षेत्रात गयानाचे नेतृत्व करत आहेत. गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली हे देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांना आपल्या भारतीय वारशाचा अभिमान आहे. मी गयानामध्ये असताना माझ्या मनात एक विचार आला – जो मी तुम्हाला ‘मन की बात’ मध्ये सांगत आहे. गयानाप्रमाणेच जगातील डझनभर देशांमध्ये लाखो भारतीय आहेत. काही दशकांपूर्वीच्या, 200-300 वर्षांपूर्वीच्या… त्यांच्या पूर्वजांच्या… स्वतःच्या अशा कथा आहेत. भारतीय स्थलांतरितांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आपला ठसा कसा उमटवला याच्या कथा तुम्हाला सापडतील का! तिथल्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी कसा भाग घेतला! त्यांनी आपला भारतीय वारसा कसा जिवंत ठेवला? माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अशा सत्य कथा शोधाव्यात आणि त्या मला सांगाव्यात. तुम्ही या कथा नमो ॲपवर किंवा MyGov वर, #IndianDiasporaStories या हॅशटॅग वर देखील शेअर करू शकता.
मित्रांनो, ओमानमध्ये सुरू असलेला एक अनोखा प्रकल्पही तुम्हाला खूप मनोरंजक वाटेल. ओमानमध्ये अनेक भारतीय कुटुंबे अनेक शतकांपासून राहत आहेत. त्यापैकी बहुतांश, गुजरातमधील कच्छमधून स्थायिक झाली आहेत. या लोकांनी व्यापाराचे महत्त्वाचे दुवे निर्माण केले होते. आजही त्यांच्याकडे ओमानी नागरिकत्व आहे, पण भारतीयत्व त्यांच्या नसानसात भिनले आहे. ओमानमधील भारतीय दूतावास आणि भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार यांच्या संयुक्त विद्यमाने एका पथकाने, या कुटुंबांचा इतिहास जतन करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत, हजारो कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत. यामध्ये रोजनिशी, खाते वही, लेजर- नोंदवही, पत्रे आणि तारा यांचा समावेश आहे. यातील काही कागदपत्रे 1838 सालातील देखील आहेत. ही कागदपत्रे भावनांनी ओथंबलेली आहेत. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ते ओमानला पोहोचले तेव्हा त्यांनी कोणत्या प्रकारचे जीवन अनुभवले, कोणत्या प्रकारच्या सुख-दुःखाचा सामना केला आणि ओमानच्या लोकांशी त्याचे संबंध कसे वाढले - हे सर्व या कागदपत्रां मध्ये सामावले आहे. ‘ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट’ हा मौखिक इतिहास प्रकल्प देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा आधार आहे. या उपक्रमात, तेथील ज्येष्ठांनी आपले अनुभव सांगितले आहेत. लोकांनी तिथल्या त्यांच्या राहणीमानाशी संबंधित गोष्टी, सविस्तरपणे सांगितल्या आहेत.
मित्रांनो, असाच एक 'ओरल हिस्ट्री प्रोजेक्ट' भारतातही सुरू आहे. या प्रकल्पा अंतर्गत, देशाच्या फाळणीच्या काळात बळी गेलेल्यांचे अनुभव, इतिहासप्रेमी गोळा करत आहेत. आता देशात असे फार कमी लोक उरले आहेत ज्यांनी फाळणीची भीषणता पाहिली- अनुभवली आहे. अशा परिस्थितीत हा प्रयत्न अधिक महत्त्वाचा ठरला आहे.
मित्रांनो, जो देश, जे स्थान, आपला इतिहास जपतात, त्यांचे भविष्यही सुरक्षित राहते. हाच विचार करून गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक डिरेक्टरी-निर्देशिका तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताच्या सागरी प्रवासाच्या प्राचीन क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही देशात सुरू आहे. या अनुषंगाने लोथलमध्ये एक मोठे संग्रहालय देखील बनवले जात आहे, जर तुमच्याकडे कोणतेही हस्तलिखित, कोणतेही ऐतिहासिक दस्तऐवज, कोणत्याही हस्तलिखिताची प्रत असेल तर तुम्ही ती भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीने जतन करू शकता.
मित्रांनो, मला स्लोव्हाकियामध्ये होत असलेल्या अशाच आणखी एका प्रयत्नाची माहिती मिळाली आहे जो आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याशी संबंधित आहे. इथे प्रथमच, आपल्या उपनिषदांचा स्लोव्हाक भाषेत अनुवाद झाला आहे. या प्रयत्नांतून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.
या प्रयत्नांमधून भारतीय संस्कृतीचा जागतिक प्रभावही दिसून येतो. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की जगभरात करोडो लोक आहेत ज्यांच्या हृदयात भारत वसतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मला तुमच्यासोबत देशाच्या अशा एक अशी कामगिरीबद्दल सांगायची आहे जे ऐकून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल आणि जर तो नाही वाटला तर कदाचित तुम्हाला पश्चातापही होईल. काही महिन्यांपूर्वी आपण ‘एक पेड माँ के नाम’ म्हणजेच 'एक वृक्ष आईच्या नावाने' ही मोहीम सुरू केली. या मोहिमेत देशभरातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या मोहिमेने १०० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. 100 कोटी झाडे, तीही अवघ्या पाच महिन्यात, हे केवळ आपल्या देशवासीयांच्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले आहे. याच्याशी संबंधित आणखी एक गोष्ट ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल. ‘एक वृक्ष आईच्या नावे' किंवा 'एक वृक्ष आईच्या नावाने' ही मोहीम आता जगातील इतर देशांमध्येही पसरत आहे. मी गयानामध्ये असताना तिथेही या मोहिमेचा मी साक्षीदार होतो. तिथे गयानाचे अध्यक्ष डॉ. इरफान अली, त्यांच्या पत्नीची आई आणि बाकीचे कुटुंब 'एक वृक्ष आईच्या नावे' या मोहिमेत माझ्या बरोबर सामिल झाले होते.
मित्रांनो, ही मोहीम देशाच्या विविध भागांमध्ये सातत्याने सुरू आहे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमे अंतर्गत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये वृक्षारोपणाचा विक्रम झाला आहे. येथे 24 तासांत 12 लाखांहून अधिक झाडे लावण्यात आली. या मोहिमेमुळे इंदूरच्या रेवती हिल्सचा ओसाड भाग आता ग्रीन झोनमध्ये बदलून जाणार आहे. राजस्थानमधील जैसलमेरमध्ये या मोहिमेद्वारे एक अनोखा विक्रम रचला गेला. येथील महिलांच्या टीमने (गटाने) एका तासात 25 हजार झाडे लावली. मातांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आणि इतरांनाही प्रेरणा दिली. येथे पाच हजारांहून अधिक लोकांनी मिळून एकाच ठिकाणी वृक्षारोपण केले, हा देखील एक विक्रमच आहे. 'एक पेड माँ के नाम' किंवा 'एक वृक्ष आईच्या नावाने' या मोहिमेअंतर्गत अनेक सामाजिक संस्था स्थानिक गरजांनुसार वृक्षारोपण करत आहेत. जिथे जिथे झाडे लावली जातात तिथे संपूर्ण इको-सिस्टिमचा पर्यावरणपूरक विकास व्हावा, हा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे या संस्था काही ठिकाणी औषधी वनस्पती लावत आहेत तर काही ठिकाणी चिमण्या किंवा अन्य पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यासाठी झाडे लावत आहेत. बिहारमध्ये 'जीविका सेल्फ हेल्प ग्रुप'च्या महिला 75 लाख झाडे लावण्याची मोहीम राबवत आहेत. या महिलांचे विशेष लक्ष फळझाडांवर आहे, ज्या झाडांमुळे त्यांना भविष्यात उत्पन्न मिळू शकेल.
मित्रांनो, या मोहिमेत सहभागी होऊन कोणीही व्यक्ती आपल्या आईच्या नावाने एक झाड लावू शकते. जर तुमची आई तुमच्या सोबत असेल तर तुम्ही तिला सोबत घेऊन झाड लावू शकता, अन्यथा तिचा फोटो बरोबर घेऊन जात तुम्ही या मोहिमेचा भाग होऊ शकता. तुम्ही झाडासोबतचा तुमचा सेल्फी mygov.in वर देखील पोस्ट करू शकता. आईने आपल्यासाठी घेतलेल्या कष्टांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही, परंतु तिच्या नावाने एक झाड लावून तिचे अस्तित्व कायम जिवंत ठेवू शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्ही सर्वांनी लहानपणी तुमच्या घराच्या छतावर किंवा झाडांवर चिमण्या चिवचिवाट करताना पाहिल्या असतील. चिमणीला तामिळ आणि मल्याळममध्ये कुरुवी, तेलुगूमध्ये पिचुका आणि कन्नडमध्ये गुब्बी म्हणून ओळखले जाते. प्रत्येक भाषेत आणि संस्कृतीत चिमण्यांच्या कथा सांगितल्या जातात. आपल्या सभोवतालची जैवविविधता टिकवून ठेवण्याच्या कामी चिमण्या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु आज शहरांमध्ये चिमण्या क्वचितच दिसतात. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्या आपल्यापासून दूर गेल्या आहेत. आजच्या पिढीतील अशी अनेक मुलं आहेत ज्यांनी चिमण्या फक्त चित्रात किंवा व्हिडीओमध्ये पाहिल्या आहेत. अशा मुलांच्या आयुष्यात हा लाडका पक्षी परत आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले जात आहेत. चेन्नईच्या कूदुगल ट्रस्टने चिमण्यांची संख्या वाढवण्याच्या मोहिमेत शाळकरी मुलांना सामावून घेतले आहे. संस्थेतील लोक शाळांमध्ये जाऊन मुलांना चिमणीचे दैनंदिन जीवनात किती महत्त्व आहे हे समजावून सांगतात. या संस्था मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याचे प्रशिक्षण देतात. यासाठी संस्थेतील लोकांनी लहान मुलांना लाकडी घरटी बनवायला शिकवले. यामध्ये चिमण्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही घरटी कोणत्याही इमारतीच्या बाहेरील भिंतीवर किंवा झाडावर लावली जाऊ शकतात. या मोहिमेत मुलांनी उत्साहाने भाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर चिमण्यांची घरटी बनवायला सुरुवात केली. गेल्या चार वर्षांत संस्थेने चिमण्यांसाठी अशी दहा हजार घरटी तयार केली आहेत. कुदुगल ट्रस्टच्या या उपक्रमामुळे आजूबाजूच्या परिसरात चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे. तुम्हीही तुमच्या अवतीभवती असे प्रयत्न केले तर चिमण्या पुन्हा आपल्या जीवनाचा एक भाग नक्कीच बनतील.
मित्रांनो, कर्नाटकातील म्हैसूर येथील एका संस्थेने लहान मुलांसाठी ‘अर्ली बर्ड’ नावाची मोहीम सुरू केली आहे. मुलांना पक्ष्यांबद्दलची माहिती सांगण्यासाठी ही संस्था खास प्रकारची लायब्ररी चालवते. एवढेच नाही तर मुलांमध्ये निसर्गाप्रती जबाबदारीची भावना जागृत करण्यासाठी ‘नेचर एज्युकेशन किट’ तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये मुलांसाठी गोष्टीची पुस्तकं, खेळ, विविध उपक्रम आणि कोडी आहेत. ही संस्था शहरातील मुलांना खेड्यापाड्यात घेऊन जाते आणि त्यांना पक्ष्यांबद्दल सांगते. या संस्थेच्या प्रयत्नांमुळे मुले पक्ष्यांच्या अनेक प्रजाती ओळखू लागल्या आहेत. ‘मन की बात’ ऐकणारी मंडळी सुद्धा त्यांच्या मुलांमध्ये, अशी आजूबाजूला बघण्याची आणि गोष्टी समजून घेण्याची वेगळी पद्धत मुलांमध्ये विकसित करू शकतात.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 'सरकारी कार्यालय' असं कोणी म्हटल्याबरोबर फायलींच्या ढिगाऱ्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. तुम्ही चित्रपटांमध्येही असंच काहीबाही पाहिलं असेल. सरकारी कार्यालयातील या फायलींच्या ढिगाऱ्यांवर अनेक विनोद केले जातात, अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. झालं असं कि वर्षानुवर्षे या फायली कार्यालयात पडून होत्या, धुळीने भरल्या होत्या, तेथे घाण होऊ लागली होती. अनेक दशके पडून असलेल्या जुन्या फायली आणि भंगार काढण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की या मोहिमेमुळे सरकारी विभागांमध्ये आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. स्वच्छतेमुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी झाली आहे. यामुळे कार्यालयात काम करणाऱ्यांमध्येही आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. कामाची जागा स्वच्छ ठेवण्याचे महत्व किंवा गांभीर्यही त्यांना कळून चुकले आहे.
मित्रांनो, जिथे स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीचा वास असतो, असं तुम्ही आपल्या वाडवडिलांना म्हणताना ऐकलं असेल, ‘कचऱ्यातून कांचन’ ही कल्पना आपल्याकडे खूप जुनी आहे. देशाच्या अनेक भागांत तरुण मंडळी निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वस्तूंचा वापर करून टाकाऊ पदार्थातून ‘कांचन’ बनवत आहेत. विविध प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवत आहेत, शोध लावत आहेत. यातून ते पैसे कमवत आहेत आणि रोजगाराच्या संधी विकसित करत आहेत. हे तरुणही त्यांच्या प्रयत्नातून शाश्वत जीवनशैलीला चालना देत आहेत. मुंबईच्या दोन मुलींचा असा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. अक्षरा आणि प्रकृति नावाच्या या दोन मुली चिंध्यांपासून फॅशन आयटम बनवतात. शिवणकाम करताना कपडे कापताना बाहेर किंवा बाजूला पडणाऱ्या चिंध्या निरुपयोगी समजल्या जातात आणि फेकल्या जातात हेही तुम्हाला माहिती आहे. अक्षरा आणि प्रकृतीची टीम त्याच कपड्यांचा कचरा फॅशन उत्पादनांमध्ये रूपांतरित करते. चिंध्यांपासून बनवलेल्या टोप्या आणि पिशव्याही सहज सहज विकल्या जात आहेत.
मित्रांनो, यूपीच्या कानपूरमध्येही स्वच्छतेबाबत चांगले उपक्रम राबवले जात आहेत. येथे काही लोक रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि गंगेच्या घाटांवर पसरलेला प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करतात. या समूहाला ‘कानपूर प्लॉगर्स ग्रुप’ असे नाव देण्यात आले आहे. (प्लॉगिंग म्हणजे जॉगिंग करता करता पिकअप करणे). काही मित्रांनी मिळून ही मोहीम सुरू केली होती. हळूहळू ही लोकसहभागाची मोठी मोहीम बनली. शहरातील अनेक नागरिक त्यात सामील झाले आहेत. त्यांच्या सदस्यांनी आता दुकाने आणि घरातून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या कचऱ्यापासून रिसायकल प्लांटमध्ये ट्री गार्ड तयार केले जातात, म्हणजेच या गटातील लोक कचऱ्यापासून बनवलेल्या ट्री गार्डच्या सहाय्याने झाडांचे संरक्षणही करतात.
मित्रांनो, छोट्या छोट्या प्रयत्नातून किती मोठे यश मिळवता येते याचे उदाहरण म्हणजे आसामची इतिशा. इतिशाचे शिक्षण दिल्ली आणि पुण्यात झाले. कॉर्पोरेट जगतातील आकर्षण बाजूला सारून इतिशा अरुणाचलच्या सांगती खोरे स्वच्छता कामात व्यग्र आहे. पर्यटकांमुळे खोऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा साचू लागला होता. एकेकाळी स्वच्छ असलेली तिथली नदी प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाली होती. इतिशा स्थानिक लोकांसोबत ते स्वच्छ करण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या ग्रुपचे लोक तिथे येणाऱ्या पर्यटकांना जागरूक करण्याचे काम करतात आणि प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी संपूर्ण खोऱ्यात बांबूपासून बनवलेले डस्टबिन बसवतात.
मित्रांनो, अशा प्रयत्नांमुळे भारताच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते. ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे. तुमच्या आसपासही असं काही निश्चितच घडत असेल. अशा प्रयत्नांबद्दल तुम्ही मला जरूर कळवत रहा.
मित्रांनो, 'मन की बात' च्या या एपिसोडमध्ये सध्या एवढेच. मी संपूर्ण महिनाभर तुमच्या प्रतिसादांची, पत्रांची आणि सूचनांची वाट पाहत असतो. दर महिन्याला येणारे तुमचे संदेश मला आणखी किंवा अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहतात. तेव्हा, पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू, ‘मन की बात’ च्या दुसऱ्या अंकात. देश आणि देशवासियांच्या नवीन यशोगाथा किंवा विशेष कामांबद्दलची माहिती घेऊन, तोपर्यंत सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.
मित्रांनो, भारतासमोर प्रत्येक युगात काही आव्हाने उभी राहिली आणि प्रत्येक युगात असे काही असामान्य भारतीय जन्माला आले ज्यांनी या आव्हानांचा सामना केला. आजच्या 'मन की बात' मध्ये मी धैर्य आणि दूरदृष्टी असणाऱ्या अशा दोन महान वीरांविषयी बोलणार आहे. देशाने त्यांची 150 वी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरदार पटेल यांच्या 150 व्या जयंती वर्षाला 31 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्या नंतर 15 नोव्हेंबरपासून भगवान बिरसा मुंडा यांचे 150 वे जयंती वर्ष सुरू होणार आहे. या दोन्ही महापुरुषांसमोर उभी ठाकलेली आव्हाने वेगवेगळी होती, पण दोघांची दृष्टी एकच होती, ती म्हणजे ‘देशाची एकता.
मित्रांनो, गेल्या काही वर्षांत देशाने अशा महान नायक-नायिकांची जयंती नव्या उत्साहाने साजरी करून नव्या पिढीला नवी प्रेरणा दिली आहे. आपल्याला आठवत असेल, जेव्हा आपण महात्मा गांधींची 150 वी जन्मजयंती साजरी केली होती, तेव्हा खूप विशेष घडून आले होते. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरपासून ते आफ्रिकेतील लहान गावांपर्यंत, जगभरातील लोकांनी सत्य आणि अहिंसेचा भारताचा संदेश समजावून घेतला, जाणून घेतला आणि तो संदेश प्रत्यक्ष आयुष्यात अंगिकारला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, भारतीयांपासून परदेशी लोकांपर्यंत सर्वांनीच गांधीजींची शिकवण नव्या संदर्भात समजून घेतली. नवीन जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ती शिकवण जाणून घेतली. जेव्हा आपण स्वामी विवेकानंदांची 150 वी जयंती साजरी केली, तेव्हा देशातील तरुणांना भारताची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती नवीन काळाच्या परिभाषेत समजून घेता आली. या योजनांमुळे आपल्याला जाणीव झाली की आपले महापुरुष भूतकाळाच्या ओघात हरवलेले नाहीत, तर त्यांचे जीवन आपल्या वर्तमानाला भविष्याचा मार्ग दाखवत आहे.
मित्रांनो, सरकारने जरी या महान व्यक्तींची 150 वी जयंती राष्ट्रीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी केवळ आपला सहभागच या मोहिमेला संजीवनी देईल आणि ती मोहीम जिवंत करेल. मी तुम्हा सर्वांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करतो. लोहपुरुष सरदार पटेल यांच्याविषयीचे तुमचे विचार आणि कार्य #Sardar150 ह्या हॅशटॅगसह लिहा आणि धरती-आबा बिरसा मुंडा ह्यांची प्रेरणा #BirsaMunda150 ह्या हॅशटॅगसह प्रसिद्ध करा. चला, आपण सगळे एकत्र येऊन हा उत्सव भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव करू या, आपल्या महान वारश्याचा आणि विकासाचा उत्सव करू या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला ते दिवस आठवत असतीलच जेव्हा टीव्हीवर “छोटा भीम” दिसायला सुरुवात झाली होती. मुले तर हे कधीच विसरणार नाहीत
'छोटा भीम' बद्दल किती उत्साह होता! आपल्याला आश्चर्य वाटेल की आज 'ढोलकपूर का ढोल' फक्त भारतातीलच नव्हे तर इतर अनेक देशांतील मुलांना आकर्षित करत आहे. त्याचप्रमाणे आपल्या इतर ॲनिमेटेड मालिका, ‘कृष्णा’, ‘हनुमान’, ‘मोटू-पतलू’ यांचेही जगभरात चाहते आहेत. भारतीय ॲनिमेशनपात्रे, आपले ॲनिमेशन चित्रपट त्यांच्या आशय आणि सर्जनशीलतेमुळे जगभर नावाजले जात आहेत. आपल्याला लक्षात आलेच असेल की स्मार्टफोनपासून ते सिनेमाच्या स्क्रीनपर्यंत, गेमिंग कन्सोलपासून ते व्हर्च्युअल रिॲलिटीपर्यंत सर्वत्र ॲनिमेशन आहे. ॲनिमेशनच्या विश्वात भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. भारतातील गेमिंग अवकाशही झपाट्याने विस्तारत आहे. भारतीय खेळही (गेम्सही)सध्या जगभरात लोकप्रिय होत आहेत. काही महिन्यांपूर्वी, मी भारतातील आघाडीच्या गेमर्सना भेटलो होतो, तेव्हा मला भारतीय गेम्सची (खेळांची) विस्मयकारक सर्जनशीलता आणि गुणवत्ता जाणून घेण्याची, समजून घेण्याची संधी मिळाली. खरंच, देशात सर्जनशील ऊर्जेची लाट आली आहे. ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव आहे. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आज भारतीय प्रतिभा आणि कौशल्य विदेशी निर्मितीचा एक महत्त्वाचा भाग बनत आहेत. आत्ताचा स्पायडर-मॅन असो वा ट्रान्सफॉर्मर्स, या दोन्ही चित्रपटांमधील हरिनारायण राजीव यांच्या योगदानाची लोकांनी भरपूर प्रशंसा केली आहे. भारतातील ॲनिमेशन स्टुडिओज, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या जगातील नावाजलेल्या निर्मिती संस्थांबरोबर काम करत आहेत.
मित्रांनो, आज आपले युवक असे मूळ भारतीय कंटेंट तयार करत आहेत, ज्यात आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. हे जगभरात पाहिले जात आहे. ॲनिमेशन क्षेत्र आज असा उद्योग झाला आहे जो इतर उद्योगांनाही बळ देत आहे, जसे की, सध्या VR पर्यटन ( आभासी सहल) खूप प्रसिद्ध होत आहे. तुम्ही आभासी पर्यटनाद्वारे अजिंठा लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या परिसरात फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांवर जाण्याचा आनंद घेऊ शकता. हे सर्व व्हीआर ॲनिमेशन भारतीय निर्मात्यांनी तयार केले आहेत. VR च्या माध्यमातून ही ठिकाणे पाहिल्यानंतर अनेकांना या पर्यटन स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण होते आहे, म्हणजे पर्यटन स्थळाची आभासी सहल हे लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचे माध्यम बनले आहे. आज, या क्षेत्रात, ॲनिमेटर्ससोबतच कथाकथनकार, लेखक, व्हॉइस-ओव्हर तज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर्स, VR आणि AR तज्ञांची मागणी देखील सातत्याने वाढते आहे. म्हणून, मी भारतातील तरुणांना म्हणेन - तुमची सर्जनशीलता वाढवा. कोणास ठाऊक, कदाचित जगातील पुढचे सुपरहिट ॲनिमेशन तुमच्या संगणकातून निर्माण होईल! भविष्यातील एखादा व्हायरल गेम तुमची निर्मिती असू शकेल! शैक्षणिक ॲनिमेशनमधील तुमचा नवा उपक्रम मोठे यश मिळवू शकेल. या 28 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या 'जागतिक ॲनिमेशन दिवस ' देखील साजरा केला जाणार आहे. चला, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंदांनी एकदा यशाचा मंत्र दिला होता, त्यांचा मंत्र होता- 'एक कल्पना घ्या, तिलाच आपले आयुष्य बनवा, तिचा विचार करा, तिचेच स्वप्न पहा आणि ती कल्पना प्रत्यक्षात जगा, प्रत्यक्षात आणा. आज आपले आत्मनिर्भर भारत अभियानही त्याच यशाच्या मंत्रानुसार सुरू आहे. हे अभियान आपल्या सामूहिक चेतनेचा एक भाग बनले आहे. सतत, पावलापावलांवर आमचे प्रेरणास्रोत बनले आहे. स्वावलंबन ( आत्मनिर्भरता ) हे आता आपले केवळ धोरण राहिलेले नाही तर ती आपली उत्कट आवड झाली आहे.
फार वर्षे झाली नाहीत, अगदी १० वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे, तेव्हा कोणी म्हणाले की भारतात काही क्लिष्ट तंत्रज्ञान विकसित करायचे आहे, तर अनेकांचा त्यावर विश्वास बसायचा नाही, कोणी कोणी तर चेष्टा देखील करायचे. पण आज तेच लोक भारताचे यश पाहिल्यानंतर चकित होत आहेत. स्वावलंबी होणारा भारत, प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करत आहे. तुम्हीच विचार करा, कोणे एके काळी मोबाईल फोनची आयात करणारा भारत आज मोबाईल फोनचा जगातला दुसरा क्रमांकाचा मोठा उत्पादक देश ठरला आहे. एकेकाळी संरक्षण सामुग्रीचा जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेला भारत आज 85 देशांमध्ये त्याची निर्यातही करत आहे. अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला आहे आणि एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे स्वावलंबनाची ही मोहीम आता केवळ सरकारी मोहीम राहिलेली नाही, तर आता आत्मनिर्भर भारत अभियान हे लोक अभियान झालं आहे - प्रत्येक क्षेत्रात यश मिळवते आहे.
उदाहरणार्थ, या महिन्यात आपण लडाखमधील हानले येथे आशियातील सर्वात मोठ्या 'इमेजिंग टेलिस्कोप MACE' चे उद्घाटन केले आहे. ही दुर्बीण 4300 मीटर उंचीवर आहे. त्यात अजून विशेष काय आहे हे सांगायचे झाले तर ही भारतात बनवलेली दुर्बीण आहे. ‘मेड इन इंडिया’ आहे. कल्पना करा, ज्या ठिकाणी उणे ३० अंश तापमान असते, कडाक्याची थंडी आहे, जिथे ऑक्सिजनचीही कमतरता आहे, तिथे आपल्या शास्त्रज्ञांनी आणि स्थानिक उद्योगांनी अशी कामगिरी करून दाखवली आहे जी आशियातील इतर कोणत्याही देशाने केलेली नाही. हानलेची दुर्बीण दूरच्या विश्वाकडे पाहत असेल, पण ती आपल्याला आणखी एक गोष्ट दाखवत आहे आणि ती म्हणजे आत्मनिर्भर भारताची शक्ती.
मित्रांनो, तुम्ही पण एक काम करावे अशी माझी इच्छा आहे. स्वावलंबी होणाऱ्या भारताची आणि अशा प्रयत्नांची जास्तीत जास्त उदाहरणे सामायिक करा. तुमच्या आसपासच्या परिसरात तुम्ही एखादा नवीन शोध पाहिला, कोणत्या स्थानिक स्टार्ट-अपने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केले, ही माहिती #AatmanirbharInnovation ह्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर लिहा आणि आत्मनिर्भर भारत उत्सव साजरा करा. सणासुदीच्या या काळात आपण सर्वांनी आत्मनिर्भर भारताच्या मोहिमेला आणखी बळ देऊया. लोकलसाठी व्होकल या मंत्रानुसार आपली खरेदी करू या.
हा असा नव भारत आहे जिथे अशक्य हे फक्त एक आव्हान आहे, जिथे मेक इन इंडिया आता मेक फॉर वर्ल्ड झाली आहे, जिथे प्रत्येक नागरिक एक कल्पक संशोधक (innovator) आहे, जिथे प्रत्येक आव्हान ही एक संधी आहे. आपल्याला भारताला केवळ स्वावलंबी बनवायचे नाही, तर संशोधनाचे (innovation) जागतिक शक्ती केंद्र (पॉवरहाऊस) म्हणून आपला देश मजबूत करायचा आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला एक ध्वनिमुद्रण ( ऑडियो) ऐकवतो.
फसवणूक करणारा कॉलर 1: हॅलो
पीडित : सर, नमस्कार सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: नमस्कार
पीडित : सर बोला सर
फसवणूक करणारा कॉलर 1: हे बघा, तुम्ही आम्हाला पाठवलेला हा एफआयआर नंबर आहे, या क्रमांकाविरुद्ध आमच्याकडे 17 तक्रारी आलेल्या आहेत, तुम्ही वापरता का हा नंबर ?
पीडित: मी हा वापरत नाही सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: तुम्ही आत्ता कुठून बोलत आहेस?
पीडित: सर कर्नाटक सर, मी आता घरी आहे.
फसवणूक करणारा कॉलर 1: ठीक आहे, चला, आता तुम्ही तुमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करा जेणेकरून हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. तुम्हाला भविष्यात कोणतीही समस्या येणार नाही, ठीक आहे?
पीडित : होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: आता मी हा फोन ज्याला जोडत आहे, तो तुमचा तपास करणारा अधिकारी आहे. कृपया तुमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करा जेणेकरून हा नंबर ब्लॉक केला जाऊ शकेल, ठीक आहे?
पीडित : होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: हां , मला सांगा, मी कोणाशी बोलत आहे? मला तुमचे आधार कार्ड दाखवा, त्याची सत्यता पडताळून पाहायची आहे.
पीडित: सर, माझ्याकडे आत्ता आधार कार्ड नाही आहे सर, कृपया सर.
फसवणूक करणारा कॉलर 1: फोन? तुमच्या फोनमध्ये आहे का?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: तुमच्या जवळ फोनमध्ये आधार कार्डचे छायाचित्र नाही का?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: तुम्हाला नंबर आठवतो का?
पीडित : सर, नाही, मला नंबरही आठवत नाही, सर.
फसवणूक कॉलर 1: आम्हाला फक्त पडताळणी करावी लागेल, ठीक आहे?
पीडित : नाही सर
फसवणूक करणारा कॉलर 1: घाबरू नका, घाबरू नका, जर तुम्ही काही केले नसेल तर घाबरू नका
पीडित : होय सर, होय सर
फसवणूक करणारा कॉलर 1: जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याची पडताळणी करण्यासाठी मला दाखवा.
पीडित : नाही सर, नाही सर, मी गावी आलो सर, ते तिकडे घरीच आहे.
फसवणूक करणारा कॉलर 1: ठीक आहे
दुसरा आवाज मे आय कम इन सर{ आत येऊ का सर}
फसवणूक करणारा कॉलर 1: आत या
फसवणूक करणारा 2: जय हिंद
फसवणूक करणारा 1: जय हिंद
फसवणूक करणारा कॉलर 1: प्रोटोकॉलनुसार या व्यक्तीचा एकतर्फी व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करा, ठीक आहे.
हे ध्वनिमुद्रण केवळ माहितीसाठी नाही, हा काही मनोरंजनासाठी केला गेलेला audio नाही आहे, हा audio एक गंभीर समस्या घेऊन आलेला आहे. आपण आत्ता जो संवाद एकलात तो digital arrest च्या फसवणुकीचा आहे. हा संवाद एक फसवला गेलेला आणि fraud करणारा यांच्यातला आहे. Digital Arrest च्या fraud मध्ये phone करणारे कधी पोलिस, कधी C.B.I., कधी Narcotics, कधी R.B.I., अशी वेगवेगळी label लावून तोतया अधिकारी बनून बोलतात आणि खूप आत्मविश्वासने ने बोलतात. मला अनेक श्रोत्यानी सांगीतलं की ‘मन की बात’ मध्ये याबाबत चर्चा होणे गरजेचे आहे. या मी तुम्हाला सांगतो या fraud करणाऱ्या टोळ्या कसं काम करतात, हा धोकादायक खेळ काय आहे ? तुम्हाला हे समजणे खूप गरजेचं आहे आणि इतरांना समजणेही तेवढंच आवश्यक आहे.
पहिला डाव - तुमची सर्व वैयक्तिक माहिती ते जमवतात “तुम्ही मागच्या महिन्यात गोव्याला गेला होतात, हो ना ? तुमची मुलगी दिल्लीला शिकते, हो ना ?” त्यांनी तुमच्याबाबतीत एवढी माहिती जमवलेली असते की तुम्ही अचंबित होता.
दुसरा डाव – भयभीत करुन सोडणे, पोषाख, सरकारी कार्यालयाचा set up, कायद्यातली कलमं, बोलता बोलता फोनवर ते तुम्हाला इतकं घाबरवतील की तुम्ही विचारही करु शकणार नाही. आणि मग त्यांचा तिसरा डाव सुरु होतो.
तिसरा डाव – वेळेचा धाक “आत्ताच निर्णय घ्यावा लागेल नाहीतर तुम्हाला अटक करावी लागेल.” हे लोक इतका मानसिक दबाव आणतात की ऐकणारा पूर्ण घाबरून जातो. Digital Arrest चे बळी सर्व वर्ग आणि सर्व वयोगटातील लोक आहेत. लोकानी आपल्या मेहनतीने कमवलेले लाखो रुपये घाबरून घालवले आहेत. कधीही आपल्याला असा call आला तर आपण घाबरायच नाही. तुम्हाला हे माहीत असायला हवं की पडताळणी यंत्रणा, phone call किंवा video call वर अशा प्रकारची चौकशी कधीच करीत नाही. मी तुम्हाला digital सुरक्षिततेच्या तीन पायऱ्या सांगतो. या तीन पायऱ्या म्हणजे – थांबा – विचार करा – कृती करा. Call येताच थांबा – घाबरु नका, शांत रहा, घाईघाईने कुठलंही पाऊल उचलू नका, कुणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नका, शक्य असेल तर screenshot घ्या आणि recording नक्की करा. यानंतरची दुसरी पायरी, पहिली पायरी होती थांबा, दुसरी पायरी आहे विचार करा. कोणतीही सरकारी यंत्रणा फोनवर अशी धमकी देत नाही, तसेच video call वर चौकशीही करीत नाही, आणि पैशाची मागणीही करीत नाही – जर भीती वाटली तर समजून जा की काहीतरी गडबड आहे. आणि पहिली पायरी, दुसरी पायरी आणि आता मी सांगतो तिसरी पायरी. पहिल्या पायरीत मी सांगितलं – थांबा, दुसऱ्या पायरीत मी सांगितलं – विचार करा, आता तिसरी पायरी सांगतो – कृती करा. राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा, cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा, परिवाराला आणि पोलिसांना सूचित करा, पुरावे सुरक्षित ठेवा. “थांबा”, नंतर “विचार करा”, आणि मग कृती करा या तीन पायऱ्या आपल्या डिजिटल सुरक्षेच्या रक्षक ठरतील.
मित्रांनो, मी पुन्हा सांगतो Digital arrest अशी कुठलीही व्यवस्था कायद्यात नाही, हा fraud आहे, फसवणूक आहे, खोटे आहे, बदमाशांचा घाला आहे, आणि जे लोक हे करतात ते समाजाचे शत्रू आहेत. Digital arrest च्या नावाने जी फसवणूक चाललेली आहे, त्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक शोध संस्था, राज्य सरकार बरोबर काम करीत आहेत. या संस्थांमध्ये ताळमेळ राहावा म्हणून National Cyber Co Ordination Centre ची स्थापना केली गेली आहे. एजन्सीज कडून अशा fraud video calling ID ला Block केले गेले आहे. लाखो Sim Card, Mobile Phone आणि Bank Accounts ना ही Block केले गेले आहे. एजन्सीज आपले काम करीत आहेत, पण Digital arrest च्या नावाने होणा-या scam पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाची जागरुकता, प्रत्येक नागरिकाची जागरुकता आवश्यक आहे. जे लोक या प्रकारच्या cybar fraud चे बळी ठरतात, त्यांनी जास्तीत जास्त लोकाना याबद्दल सांगायला हवे. तुम्ही जागरुकतेसाठी #safeDigitalIndia चा वापर करु शकता. मी शाळा आणि महाविद्यालयाना सांगीन की cyber scam च्या विरूद्धच्या मोहिमेत विद्यार्थ्यानाही सहभागी करून घ्यावे. समाजातील सगळ्याच्या प्रयत्नानेच आपण या आव्हानाच सामना करू शकतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपली बरीच शाळकरी मुले calligraphy म्हणजेच सुलेखन या विषयात रस घेतात. यामुळे आपले अक्षर साफ, सुंदर, आणि आकर्षक होते. आज जम्मू – काश्मीर मध्ये याचा उपयोग स्थानिक संस्कृतीला लोकप्रिय बनवण्यासाठी केला जात आहे. इथल्या अनंतनागच्या फिरदोसा बशीरजी यांनी calligraphy मध्ये नैपुण्य मिळवले आहे. या माध्यमातून त्या स्थानिक संस्कृतीतील कितीतरी पैलू समोर आणत आहेत. फिरदोसाजीच्या calligraphy ने स्थानिक लोक विशेषतः युवकाना आपल्याकडे आकर्षित केले आहे. असाच एक प्रयत्न उधमपूरचे गौरीनाथजीही करीत आहेत. एक शतकाहून अधिक जुन्या सारंगीच्या माध्यमातून ते डोगरा संस्कृति आणि परंपरेच्या विविध रुपाना जतन करीत आहेत. सारंगीच्या स्वरांनी ते आपल्या संस्कृतीतील प्राचीन कहाण्या आणि ऐतिहासिक घटनांना आकर्षक पद्धतीने सांगतात. देशातील वेगवेगळ्या भागातही तुम्हाला कितीतरी लोक सापडतील जे सांस्कृतिक परांपरांच्या संवर्धनासाठी पुढे येत आहेत. डी.वय्यकुंठम जवळ जवळ ५० वर्षापासून चेरियाल लोक कला (folk art) ला लोकप्रिय बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेलंगणाच्या या कलेला पुढे नेण्याचा त्यांचा हा प्रयत्न अद्भुत आहे. चेरियाल पेंटिंगस (paintings) तयार करण्याची प्रक्रिया खूपच वेगळी आहे. ही एक scroll च्या स्वरुपात ‘कहाण्याना’ समोर आणतात. यात आपल्या इतिहास आणि पुराण कथांची पूर्ण झलक मिळते. छत्तीसगढमध्ये नारायणपुर येथील बुटलूराम माथराजी अबुझ माडीया जनजातीच्या लोककलेला जतन करीत आहेत. मागील चार दशका पासून ते आपले हे व्रत चालवित आहेत. त्यांची ही कला ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ' आणि ‘स्वच्छ भारत’ सारख्या अभियानानमध्ये लोकाना सहभागी करून घेण्यासाठी खूप उपयुक्त ठरत आहे.
मित्रानो, आपण आत्ता बोलत होतो की काश्मीरच्या खोऱ्यापासून छत्तीसगढच्या जंगलांपर्यंत आपली कला आणि संस्कृती नवे नवे रंग उधळीत आहे, पण इथेच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या या कलांचा दरवळ दूर दूर पर्यंत पसरत आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील लोक भारतीय कला आणि संस्कृतीने मंत्रमुग्ध होत आहेत. जेव्हा मी तुम्हाला उधमपुर मधल्या सारंगीची गोष्ट सांगत होतो,
तेंव्हा मला आठवले की कसे हजारो मैल दूर, रशिया मधील याकूतस्क शहरातही भारतीय कलेच्या मधुर स्वरलहरी दुमदुमत आहे. कल्पना करा की, थंडीचा एखादा दिवस आहे, तापमान ऊणे 65 डिग्री, चारही बाजूला बर्फाची पांढरी चादर आणि तिथल्या एका प्रेक्षागृहामध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बघत आहेत – कालिदास यांचे “अभिज्ञान शाकुंतलम्”. तुम्ही विचार करू शकता भारतीय साहित्याची ऊब जगातील थंड शहर याकूतस्क मध्ये..! ही कल्पना नाही सत्य आहे – आपल्या सर्वाना अभिमान आणि आनंद देणारे सत्य.
मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी मी Laos मध्येही गेलो होतो. तो नवरात्रीचा काळ होता आणि मी तिथे काही अद्भुत पाहिले. स्थानिक कलाकार “फलक फलम” सादर करीत होते – ‘Laosच रामायण’.
त्यांच्या डोळ्यांमध्ये तिच भक्ति, त्यांच्या स्वरात तेच समर्पण, जे रामायणाच्या बाबतीत आपल्या मनात आहे. याच प्रकारे कुवेत मध्ये श्री अब्दुल्ला अल-बारून यांनी रामायण आणि महाभारताचा अरबी मध्ये अनुवाद केला आहे. हे कार्य म्हणजे केवळ अनुवाद नाही, तर दोन महान संस्कृतींमधील सेतू आहे. त्यांचा हा प्रयत्न अरब जगतात भारतीय साहित्याची एक नवीन समज विकसित करीत आहे. पेरू येथूनही आणखी एक उदाहरण आहे – एरलीनदा गारसिया (Erlinda Garcia) तेथील युवकाना भरतनाट्यम शिकवीत आहे. आणि मारिया वालदेस (Maria Valdez)
ओडिसी नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. या कलांनी प्रभावित होऊन दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशात ‘भारतीय शास्त्रीय नृत्या’चे पडघम वाजत आहेत.
मित्रानो, विदेशी धरतीवरील भारताची ही उदाहरणे दर्शवतात की भारतीय संस्कृतीची शक्ति किती अद्भुत आहे. ही जगाला आपल्याकडे आकर्षित करीत आहे.
“ जिथे जिथे कला आहे तिथे तिथे भारत आहे
“जिथे जिथे संस्कृती आहे तिथे तिथे भारत आहे “
आज जगभरातील लोक भारताला आणि भारतातील लोकांना जाणून घेऊ इच्छीत आहेत. म्हणूनच तुम्हा सर्वांना विनंती आहे की आपल्या आसपासच्या अशा सांस्कृतिक घडामोडीना #clultrualbridges चा भाग करा. ‘मन की बात’ मध्ये आपण अशा उदाहरणांची आपण पुढेही चर्चा करूयात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशातील मोठ्या भागात थंडीचा ऋतु सुरु झाला आहे, पण तंदुरुस्त राहण्याची तीव्र इछा, fit India चे चैतन्य यांना कोणत्याही ऋतूने काही फरक पडत नाही. ज्याला तंदुरुस्त राहायची सवय असते, तो थंडी, उन्हाळा, पावसाळा पाहत नाही. मला आनंद आहे की भारतात तंदुरुस्ती बाबत लोक जागरूक होत आहेत. आपल्या आसपासच्या बागामध्ये लोकांची संख्या वाढते आहे, हे आपणही पाहत असलाच. पार्क मध्ये फिरत असलेल्या वयोवृद्ध, तरुण आणि योग करणाऱ्या परिवारांना पाहून मला बरे वाटते. मला आठवते, जेव्हा मी योगदिनी श्रीनगरला होतो, तेव्हा पाऊस असूनही कितीतरी लोक योगसाधना करीत होते. आत्ता काही दिवसांपूर्वी श्रीनगर मध्ये जी मँरेथाँन (marathon) झाली त्यातही मला तंदुरुस्त राहण्याचा हाच उत्साह दिसून आला. Fit India ची ही भावना, आता एक सामाजिक चळवळ होत आहे.
मित्रांनो, मला हे बघूनही बरं वाटते की आपल्या शाळा मुलांच्या तंदुरुस्ती वर आता आणखी जास्त लक्ष देत आहेत. Fit India school Hours ही एक अभिनव कल्पना आहे. शाळा आपल्या पहिल्या तासाचा उपयोग वेगवेगळ्या व्यायाम प्रकारांसाठी करीत आहेत. कितीतरी शाळामध्ये कधी मुलांकडून योगासन करून घेतली जातात, तर कधी aerobics ची सत्र होतात, तर कधी क्रीडा नैपुण्या वर काम केले जाते, कधी खो खो आणि कब्बड्डी सारखे पारंपरिक खेळ खेळवले जातात, आणि यांचे परिणामही छान आहेत. उपस्थिती वाढत आहे, मुलांची एकाग्रता वाढत आहे आणि मुलांना मजाही येत आहे.
मित्रांनो, मी निरोगी राहण्याची ही ऊर्जा सगळीकडे पाहत आहे. ‘मन की बात’ च्या खूप श्रोत्यांनी मला आपले अनुभव पाठवले आहेत. काहीतर फारच अभिनव प्रयोग करीत आहेत. जसे एक उदाहरण आहे family fitness hour चा, म्हणजे एक परिवार, प्रत्येक आठवड्याच्या शेवटी एक तास कौटुंबिक तंदुरुस्ती साठी देत आहे. एक आणखी उदाहरण indigenous games revival चे आहे, म्हणजे काही परिवार आपल्या मुलांना पारंपरिक खेळ शिकवीत आहेत आणि खेळूनही घेत आहेत. आपणही तंदुरुस्ती वेळापत्रकाचा अनुभव #fitIndia च्या नावाने समाज माध्यमांवर आवर्जून सामायिक करा. मी देशातील लोकांना एक जरूरी माहितीही देऊ इच्छितो. यावेळी ३१ ऑक्टोबर ला सरदार पटेलजींच्या जयंतीच्या दिवशीच दीपावली पर्वही आहे. आपण दरवर्षी ३१ ऑक्टोबरला “राष्ट्रीय एकता दिनीच ‘Run for Unity’ चे आयोजन करतो. दिपावली मुळे यावेळी २९ ऑक्टोबर म्हणजेच मंगळवारी ‘Run for Unity’ चे आयोजन केले जाईल. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने यात भाग घ्या, देशाच्या एकतेच्या मंत्रा बरोबरच तंदुरुस्तीच्या मंत्रालाही सगळीकडे पसरवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये यावेळी एवढेच. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर पाठवत रहा. हा सणांचा काळ आहे. ‘मन की बात’च्या श्रोत्यांना धनत्रयोदशी, दिवाळी, छटपूजा, गुरुनानक जयंती आणि सर्व सणांच्या खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व पूर्ण उत्साहाने सण साजरे करा – vocal for local चा मंत्र लक्षात ठेवा, या सणांसाठी तुमच्या घरात स्थानिक दुकानदारांकडून खरेदी केलेले सामान येईल असा प्रयत्न करा. एकदा पुन्हा, तुम्हा सर्वांना येणाऱ्या सणांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद !
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.
मित्रांनो, मी आज दूरदर्शन, प्रसारभारती तसंच आकाशवाणीशी जोडल्या गेलेल्या सर्वांचंच कौतुक करतो. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे ‘मन की बात’ हा कार्यक्रम या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विविध दूरचित्रवाणी वाहिन्या, प्रादेशिक दूरचित्रवाणी वाहिन्या यांचा देखील मी आभारी आहे कारण या सर्वांनी हा कार्यक्रम सतत प्रसारित केला. ‘मन की बात’ मध्ये आपण ज्या विषयांवर चर्चा केली त्यांच्या संदर्भात अनेक माध्यम संस्थांनी मोहिमा देखील सुरु केल्या. या कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचवण्यात हातभार लावल्याबद्दल मी मुद्रित माध्यमांचे देखील आभार मानू इच्छितो. ‘मन की बात’ कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम करणाऱ्या युट्युबर्सचे देखील मी आभार मानतो. आपल्या देशातील 22 भाषांसह श्रोते 12 विदेशी भाषांमध्ये देखील हा कार्यक्रम ऐकू शकतात. जेव्हा लोक म्हणतात की आम्ही ‘मन की बात’ हा कार्यक्रम आमच्या स्थानिक भाषेत ऐकला तेव्हा मला अत्यंत आनंद होतो. तुमच्यापैकी अनेकांना हे माहित असेल की ‘मन की बात’ कार्यक्रमावर आधारित प्रश्नमंजुषा देखील सुरु करण्यात आली आहे आणि त्यात कोणतीही व्यक्ती भाग घेऊ शकते. Mygov.in वर जाऊन तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि पारितोषिक देखील जिंकू शकता. आजच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांकडून आशीर्वाद मागतो आहे. पवित्र मन आणि संपूर्ण समर्पित वृत्तीनं, मी अशाच पद्धतीने भारतातील लोकांच्या महानतेचे गीत गात राहीन. देशाच्या सामुहिक शक्तीचा आपण सर्वजण अशाच प्रकारे उत्सव साजरा करत राहू- हीच माझी देवाकडे आणि जनता जनार्दनाकडे प्रार्थना आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेले काही आठवडे, देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पावसाळ्याचे हे दिवस आपल्याला ‘जल-संरक्षण’ किती आवश्यक आहे तसंच पाण्याची बचत करणं किती गरजेचं आहे, याची आठवण करून देतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बचत करून साठवलेलं पाणी, टंचाईच्या महिन्यांमध्ये आपल्याला अत्यंत उपयोगी पडतं आणि ‘कॅच द रेन’ सारख्या अभियानांच्या मागे हीच संकल्पना आहे. जल संरक्षणाच्या संदर्भात अनेक जण नवनव्या उपक्रमांची सुरुवात करत आहेत याचा मला आनंद आहे. असाच एक उपक्रम उत्तर प्रदेशात झाशीमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला माहितच आहे की झाशी शहर बुंदेलखंडात आहे आणि, पाण्याची टंचाई ही या भागातली नेहमीची समस्या आहे. तर, या झाशी शहरात काही महिलांनी एकत्र येऊन घुरारी नदीला पुनरुज्जीवित केलं आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाशी जोडल्या गेलेल्या या महिलांनी ‘जल सहेली’ म्हणजेच ‘जल सखी’ बनून या अभियानाचे नेतृत्व केलं. मरणासन्न अवस्थेतल्या घुरारी नदीला या महिलांनी ज्या पद्धतीने वाचवलं त्याची कोणी कधी कल्पना देखील केली नसेल. या जल सख्यांनी पोत्यांमध्ये वाळू भरुन चेकडॅम म्हणजे बंधारा तयार केला, पावसाचे पाणी वाया जाण्यापासून अडवलं आणि नदीला पाण्यानं काठोकाठ भरून टाकलं. या महिलांनी शेकडो जलाशयांची निर्मिती करण्यात आणि त्यांना नवजीवन देण्यात देखील हिरिरीनं मदत केली आहे. यामुळे त्या भागातील जनतेचा पाण्याचा प्रश्न तर सुटलाच पण त्याच सोबत त्यांच्या चेहेऱ्यांवर आनंद देखील परत आला आहे.
मित्रांनो, काही ठिकाणी नारी शक्ती, जल शक्तीला पाठबळ देते तर काही ठिकाणी जलशक्ती देखील नारी शक्तीला मजबूत करते. मला मध्य प्रदेशातील दोन अत्यंत प्रेरणादायक उपक्रमांची माहिती मिळाली आहे. दिंडोरीच्या रयपुरा गावात एका मोठ्या तलावाच्या निर्मितीमुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावातील महिलांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. तेथील ‘शारदा आजीविका स्वयंसहाय्यता बचत गटा’तील महिलांना मत्स्यपालनाचा नवा व्यवसाय देखील मिळाला आहे. या महिलांनी फिश-पार्लर देखील सुरु केलं आहे आणि तिथे होणाऱ्या मत्स्यविक्रीतून या महिलांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर मधल्या महिलांनी देखील मोठा प्रशंसनीय उपक्रम राबवला आहे. तेथील खोंप गावातला एक मोठा तलाव जेव्हा कोरडा पडू लागला तेव्हा त्याला पुनरुज्जीवन देण्यासाठी या महिलांनी संकल्प केला. ‘हरि बगिया स्वयं सहाय्यता गटाच्या या सदस्य महिलांनी तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसला. तलावातून काढलेल्या गाळाचा उपयोग करून त्यांनी नापीक जमिनीवर फळबागा लावल्या. या महिलांच्या परिश्रमामुळे तलावात मोठा जल संचय तर झालाच शिवाय पिकांची उत्पादकता देखील मोठ्या प्रमाणात वाढली. देशाच्या काना-कोपऱ्यात जल संरक्षणासाठी केले जाणारे असे प्रयत्न पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील. तुम्ही सर्वजण तुमच्या परिसरात सुरु असलेल्या अशा उपक्रमांमध्ये नक्कीच सहभागी व्हाल असा विश्वास मला वाटतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तराखंडात उत्तरकाशी भागात ‘झाला’ नावाचं एक सीमावर्ती गाव आहे. या गावातल्या युवकांनी गावाच्या स्वच्छतेसाठी एक विशेष उपक्रम सुरु केला आहे. हे युवक त्यांच्या गावात ‘Thank you नेचर’ म्हणजेच ‘निसर्गाला धन्यवाद’ नामक अभियान चालवत आहेत. या उपक्रमाअंतर्गत गावात रोज दोन तास साफसफाई केली जाते. गावाच्या गल्ल्यांमध्ये पडलेला कचरा गोळा करुन, तो गावाबाहेर ठराविक ठिकाणी टाकला जातो. यातून झाला गाव देखील स्वच्छ होत आहे आणि गावातले लोक जागरुक देखील होऊ लागले आहेत. तुम्हीच विचार करा, जर अशा प्रकारे प्रत्येक गावाने, तेथील प्रत्येक गल्लीत-मोहल्ल्यात अशाच प्रकारे ‘Thank you’ अभियान सुरु केलं तर केवढं मोठं परिवर्तन होऊ शकेल.
मित्रांनो, पुदुचेरी भागात समुद्रकिनारी देखील एक मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. तिथे रम्या नावाची महिला, माहे महानगरपालिका आणि आसपासच्या परिसरातील युवकांच्या पथकाचे नेतृत्व करत आहे.या पथकातले लोक स्वतःच्या प्रयत्नांनी माहे परिसर आणि खास करून तिथल्या सागर किनाऱ्यांची संपूर्ण स्वच्छता करत आहेत.
मित्रांनो, मी इथे फक्त दोन उपक्रमांची चर्चा केली आहे. पण आपण आजूबाजूला पाहिलं तर देशाच्या प्रत्येक भागात, स्वच्छतेसंदर्भात काहीतरी अनोखा उपक्रम नक्कीच सुरु असलेला दिसेल. काही दिवसांतच, येत्या 2 ऑक्टोबरला ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीला 10 वर्षं पूर्ण होत आहेत. ज्यांनी या अभियानाला भारतीय इतिहासातल्या इतक्या मोठ्या लोक चळवळीचं रूप दिलं त्या सर्वांचं याप्रसंगी अभिनंदन. ज्या महात्मा गांधीजींनी त्यांचं संपूर्ण जीवन या उद्देशासाठी समर्पित केलं त्या गांधीजींना देखील ही खरी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो, आज जनतेमध्ये ‘कचऱ्यापासून संपत्ती’ हा मंत्र लोकप्रिय होत आहे हे ‘स्वच्छ भारत अभियाना’चंच यश आहे. लोक आता ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल’ संकल्पनेची चर्चा करू लागले आहेत, त्या संदर्भातली उदाहरणं देऊ लागले आहेत. मला नुकतीच केरळमधील कोझिकोडे येथे सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. तेथील 74 वर्षांचे सुब्रमण्यम यांनी 23 हजारांहून जास्त खुर्च्यांची दुरुस्ती करून त्यांना पुन्हा वापर करण्यायोग्य बनवलं. तिथले लोक तर त्यांना ‘रिड्यूस, रियुज आणि रिसायकल (ट्रिपल आर) चँपियन’ असही म्हणतात. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांचं मूर्त रूप कोझिकोडेचं नागरी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तसंच जीवन विमा निगमच्या कार्यालयात पाहायला मिळतं.
मित्रांनो, स्वच्छतेच्या संदर्भात सुरु असलेल्या मोहिमांमध्ये आपल्याला अधिकाधिक लोकांना सहभागी करून घ्यायचं आहे. आणि अशा मोहिमा एका दिवसाच्या,एका वर्षाच्या नसतात तर त्यासाठी सातत्याने निरंतर काम करावं लागतं. जोपर्यंत ‘स्वच्छता’ हा आपल्या स्वभावाचा भाग बनत नाही तोपर्यंत हे कार्य सुरूच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी देखील तुमची कुटुंबे, मित्रपरिवार, शेजारी आणि सहकाऱ्यांसह एकत्रितपणे स्वच्छता अभियानात नक्की सहभागी व्हा असा माझा आग्रह आहे. स्वच्छ भारत अभियाना’ला मिळालेल्या यशाबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांनाच आपल्या वारशाबाबत अभिमान आहे. आणि मी नेहमीच म्हणतो विकास वारसा. याचमुळे मी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्याच्या एका विशिष्ट पैलूबद्दल मला अनेक संदेश मिळत आहेत. आपल्या प्राचीन कलाकृतींची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. याबाबतीत तुम्हा सर्वांच्या भावना मी समजू शकतो आणि ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या श्रोत्यांना देखील याबाबत माहिती देऊ इच्छितो.
मित्रांनो, माझ्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या सरकारने भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी खूप आपलेपणाने डेलावेअर येथील त्यांच्या वैयक्तिक निवासात त्यापैकी काही कलाकृतींचं दर्शन घडवलं. परत करण्यात आलेल्या कलाकृती टेराकोटा, दगड, हस्तिदंत, लाकूड, तांबे आणि काशासारख्या साहित्यापासून घडवलेल्या आहेत. यापैकी काही कलाकृती तर चार हजार वर्ष जुन्या आहेत. चार हजार वर्ष प्राचीन कालाकृतींपासून 19 व्या शतकातील कलाकृतींपर्यंतच्या कालावधीतल्या अनेक कलाकृती अमेरिकेने परत केल्या- यामध्ये फुलदाण्या, देवी-देवतांच्या टेराकोटा पट्टिका, जैन तीर्थंकरांच्या प्रतिमा, शिवाय भगवान बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या मूर्तींचा देखील समावेश आहे. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये प्राणांच्या आकृत्या देखील आहेत. पुरुष आणि स्त्रियांची चित्र असलेली जम्मू-काश्मीरची टेराकोटा टाईल तर अत्यंत सुंदर आहे.यामध्ये काशापासून घडवलेल्या गणपतीच्या अनेक प्रतिमा आहेत ज्या मूळ दक्षिण भारतातल्या आहेत. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये भगवान विष्णूच्या तसबिरी मोठ्या प्रमाणात आहेत. या तसबिरी मुख्यतः उत्तर आणि दक्षिण भारतातल्या आहेत. आपले पूर्वज किती बारकाईने हे काम करत होते ते या कलाकृतींकडे पाहून आपल्या लक्षात येतं. कलेच्या संदर्भात ते खुप जाणकार होते. या कलाकृतींपैकी बऱ्याचशा कलाकृती तस्करी करून अथवा इतर अवैध मार्गांनी देशाबाहेर नेण्यात आल्या होत्या- हा एक गंभीर गुन्हा आहे, एका अर्थी हे आपला वारसा संपवण्यासारखे आहे. मात्र गेल्या दशकभरात अशा अनेक कलाकृती, आणि आपल्या अनेक प्राचीन वारसा विषयक वस्तू देशात परत आणण्यात आल्या आहेत याचा मला अत्यंत आनंद वाटतो. याच संदर्भात आज भारत अनेक देशांसह एकत्रितपणे काम करत आहे.
आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असतो, तेव्हा जगही त्याचा आदर करतं याची मला खात्री आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आज जगातले विविध देश आपल्याकडून गेलेल्या अशा कलाकृती आपल्याला परत करत आहेत.
माझ्या प्रिय मित्रांनो,
एखादं मूल कोणती भाषा अगदी सहज आणि पटापट शिकून घेतं असं विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल - मातृभाषा. आपल्या देशात जवळपास वीस हजार भाषा आणि बोली आहेत, आणि या सगळ्या भाषा कोणाची ना कोणाची तरी मातृभाषा आहेतच. काही भाषा बोलणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे. पण त्या भाषांच्या जपणुकीसाठीही आज आगळे वेगळे प्रयत्न होत आहेत हे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. अशीच एक भाषा आहे, आपली संथाली भाषा. संथालीला डिजिटल नवोन्मेषाच्या मदतीने नवी ओळख देण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. आपल्या देशात अनेक राज्यांमध्ये राहणारे संथाल जमातीच्या समुदायाचे बांधव संथाली भाषा बोलतात. भारताखेरीज बांग्लादेश, नेपाळ आणि भूटानमध्येही संथाली बोलणारे आदिवासी समुदाय राहतात. संथाली भाषेला ऑनलाईन ओळख निर्माण करून देण्यासाठी ओडिशातील मयूरभंजमध्ये राहणारे श्रीमान रामजीत टुडू यांनी एक मोहीम उघडली आहे. रामजीतजींनी संथाली भाषेशी संबंधित साहित्य वाचता येईल असा, आणि संथाली भाषा लिहिता येईल असा एक डिजिटल मंच तयार केला आहे. खरंतर काही वर्षांपूर्वी जेव्हा रामजीतजींनी मोबाईल वापरायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या मातृभाषेत संदेश पाठवता येत नाही याचा त्यांना खेद वाटला. मग त्यांनी 'ओल चिकी' ही 'संथाली भाषे'ची लिपी टाइप म्हणजे टंकित करण्याच्या शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली. आपल्या काही मित्रांच्या मदतीने त्यांनी 'ओल चिकी'मध्ये टंकलेखन करण्याचं तंत्र विकसित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज, संथाली भाषेत लिहिलेले लेख लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचत आहेत.
मित्रहो,आपल्या दृढसंकल्पाचा सामूहिक भागीदारीशी संगम होतो तेव्हा संपूर्ण समाजासाठी अद्भुत गोष्टी घडून आलेल्या दिसतात. याचं सगळ्यात ताजं उदाहरण म्हणजे, 'एक पेड माॅं के नाम' हे अभियान. जन-भागीदारीचं अतिशय प्रेरक असं उदाहरण म्हणजे हे अद्भुत अभियान. पर्यावरण संरक्षणासाठी सुरू केलेल्या या अभियानानं देशाच्या कानाकोपऱ्यात चमत्कार घडवून आणला आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांनी ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक संख्येने वृक्षारोपण करून नवा विक्रम केला आहे. या अभियानांतर्गत उत्तर प्रदेशात 26 कोटी पेक्षा जास्त रोपं लावण्यात आली. गुजरातच्या लोकांनी पंधरा कोटींपेक्षा अधिक रोपं लावली. राजस्थानमध्ये केवळ ऑगस्ट महिन्यातच सहा कोटींपेक्षा अधिक रोपं लावण्यात आली. देशातल्या हजारो शाळाही या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या आहेत.
मित्रांनो, आपल्या देशात झाडं लावण्याच्या अभियानाशी संबंधित कितीतरी उदाहरणं आढळून येतात. असंच एक उदाहरण आहे तेलंगणाच्या के.एन.राजशेखरजी यांचं. झाडं लावण्याप्रति त्यांची कटिबद्धता आपल्या सगळ्यांना थक्क करणारी आहे! जवळपास चार वर्षांपूर्वी त्यांनी झाडं लावण्याची मोहीम सुरू केली. रोज एक झाड नक्की लावायचंच, असा त्यांनी निश्चय केला. अगदी कठोर व्रताप्रमाणे त्यांनी याचं पालन केलं. आजवर त्यांची दीड हजाराहून अधिक झाडं लावून झाली आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट अशी की, यावर्षी एक दुर्घटना घडल्यानंतरही ते आपल्या संकल्पापासून ढळले नाहीत. अशा सर्व प्रयत्नांचं मला मनापासून कौतुक वाटतं. 'एक पेड मा के नाम' या पवित्र अभियानात अवश्य सहभागी व्हा, असा माझा तुम्हालाही आग्रह आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की, संकटकाळात हातपाय गाळून न बसता, त्यापासून शिकणारे असे काही लोक आपल्या आसपास असतात. अशाच एक महिला आहेत सुबाश्री. त्यांनी दुर्मिळ आणि अत्यंत उपयुक्त अशा वनौषधींची स्वकष्टांनी एक अद्भुत वाटिका तयार केली आहे. त्या तमिळनाडूमध्ये मदुरै इथे राहतात. तशा तर व्यवसायानं त्या शिक्षिका, परंतु औषधी वनस्पती, medical herbs विषयी त्यांना विलक्षण ओढ आहे. त्यांना ही ओढ लागली 80 च्या दशकात.. कारणही तसंच होतं. त्यांच्या वडिलांना विषारी सर्पानं दंश केल्यावर, त्यांची प्रकृती सुधारायला पारंपरिक वनौषधींचीच मोठी मदत झाली होती. या घटनेनंतर त्यांनी पारंपरिक औषधं आणि वनौषधींचा शोध घ्यायला सुरुवात केली. आज मदुरैच्या वेरीचियूर गावात त्यांची आगळीवेगळी 'वनौषधी वाटिका' आहे. त्यामध्ये पाचशेहून अधिक दुर्मिळ औषधी वनस्पती आहेत. या वाटिकेची निर्मिती करायला त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहेत. एक एक रोपटं मिळवायला त्यांनी दूरदूर प्रवास केला, माहिती गोळा केली, अनेकदा लोकांकडे मदतही मागितली. कोविडकाळात प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या वनौषधी त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या. आज त्यांची वनौषधी-वाटिका बघायला दूरवरून लोक येतात. त्या सर्वांनाच औषधी वनस्पतींची माहिती देतात आणि त्यांच्या उपयोगांबद्दल सांगतात. शेकडो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा एक भाग असणारा पारंपरिक वारसा सुबाश्री पुढे चालवत आहेत. त्यांचं हर्बल गार्डन म्हणजे वनौषधी वाटिका आपल्या भूतकाळाला भविष्याशी जोडत आहे. त्यांना आपल्या सर्वांकडून खूप शुभेच्छा.
मित्रहो, आजच्या बदलत्या काळात कामाचं स्वरूप बदलत चाललं आहे, आणि नवनवी क्षेत्रं उदयाला येत आहेत. उदाहरणार्थ गेमिंग, ॲनिमेशन, रील मेकिंग, फिल्म मेकिंग किंवा पोस्टर मेकिंग. यापैकी एखाद्या कामात आपण निपुण असाल आणि एखाद्या बँडशी संलग्न असाल किंवा कम्युनिटी रेडिओसाठी काम करत असाल तर आपल्या प्रतिभेला खूप मोठ्या मंचावर संधी मिळू शकते. तुमच्या प्रतिभेला आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं, 'Create in India' या मध्यवर्ती संकल्पनेअंतर्गत 25 चॅलेंजेस म्हणजे आह्वानांची आखणी केली आहे. ही आह्वानं तुम्हाला नक्कीच रोचक वाटतील. यापैकी काही आह्वानं तर संगीत, शिक्षण आणि अगदी Anti- Piracy वरही आधारीत आहेत. या उपक्रमात अनेक व्यावसायिक संघटनाही सहभागी आहेत आणि त्या या आव्हानांना पूर्ण पाठबळ देत आहेत. यात सहभागी होण्यासाठी आपण wavesindia.org वर लॉग इन करू शकता. देशभरच्या creators नी यात अवश्य भाग घ्यावा आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी असा माझा विशेष आग्रह आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,या महिन्यात आणखी एका महत्वपूर्ण अभियानाला दहा वर्षं पूर्ण झाली. या अभियानाच्या यशात, देशातल्या मोठ्या उद्योगांपासून छोट्या दुकानदारांपर्यंत सर्वांच्या योगदानाचा वाटा आहे. मी 'मेक इन इंडिया' बद्दल बोलतोय. गरीब, मध्यमवर्ग आणि MSME अशा सर्वांना या अभियानाचा खूप फायदा होत असल्याचं पाहून, मला खूप आनंद होत आहे. या अभियानानं प्रत्येक वर्गातल्या लोकांना आपली प्रतिभा जगासमोर आणण्याची संधी दिली आहे. आज भारत manufacturing powerhouse बनला आहे आणि देशाच्या युवाशक्तीमुळे, जगभरच्या नजरा आपल्यावर खिळल्या आहेत. वाहन-उद्योग असो की वस्त्रोद्योग, विमान-प्रवास असो, इलेक्ट्रॉनिक्स असो की संरक्षण असो, प्रत्येक क्षेत्रात देशाकडून होणारी निर्यात सतत वाढत आहे. देशात एफडीआयचं सातत्याने वाढतं प्रमाणही, आपल्या make in India मोहिमेचीच यशोगाथा सांगतं. आता मुख्यत्वे दोन गोष्टींवर आपला भर आहे. पहिली आहे गुणवत्ता, म्हणजे आपल्या देशात तयार झालेल्या गोष्टी जागतिक दर्जाच्या असाव्यात. दुसरी आहे व्होकल फोर लोकल, म्हणजे स्थानिक उत्पादनांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावं. 'मन की बात' मध्ये आपण #MyProductMyPride विषयीही चर्चा केली आहे. स्थानिक उत्पादनांना चालना देण्यामुळे देशातल्या लोकांचा कसा फायदा होतो हे एका उदाहरणाने समजून घेता येईल.
महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात वस्त्रउद्योगाची एक जुनी परंपरा आहे- भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम. टसर रेशमाची नक्षी, संरचना, रंग आणि मजबूती ही त्याची ओळख आहे. भंडाऱ्याच्या काही भागांतले 50 पेक्षा अधिक स्वयंसहायता गट याच्या जपणुकीचं काम करत आहेत. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. हे रेशीम जलद गतीने लोकप्रिय होत आहे आणि स्थानिक समुदायांना सक्षम करत आहे, आणि हाच तर 'मेक इन इंडिया'चा गाभा आहे.
मित्रहो,या सणासुदीच्या दिवसात आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या संकल्पाची अवश्य उजळणी केली पाहिजे. कोणतीही वस्तू खरेदी कराल तर ती 'मेड इन इंडिया'च असली पाहिजे, काही भेटवस्तू द्याल तर तीही 'मेड इन इंडिया'च असली पाहिजे. केवळ मातीचे दिवे खरेदी करणं म्हणजे व्होकल फोर लोकल नव्हे. आपल्या क्षेत्रात तयार होणाऱ्या स्थानिक उत्पादनांना आपण अधिकाधिक चालना दिली पाहिजे. ज्या उत्पादनासाठी भारतातल्या एखाद्या कारागिराने घाम गाळला आहे, जे भारतातल्या मातीपासून बनलं आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे. याच गौरवाला आपल्याला नेहमी झळाळी द्यायची आहे.
मित्रांनो, 'मन की बात'च्या या भागात आपण सर्वांना भेटून मला खूप छान वाटलं. या कार्यक्रमाविषयीचे आपले विचार आणि सूचना आम्हाला अवश्य कळवा. मी आपल्या पत्रांची आणि संदेशांची वाट पाहतो. काही दिवसातच सणावारांचं पर्व सुरू होत आहे. नवरात्रीपासून याचा प्रारंभ होईल आणि पुढचे दोन महिने पूजापाठ, व्रतवैकल्यं, आणि सगळीकडे उत्साहाचंच वातावरण पसरलं असेल. या आगामी सणासुदीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! आपल्या परिवार आणि प्रियजनांसह आपण सर्वांनी सणावारांचा मनसोक्त आनंद लुटा आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. पुढच्या महिन्यात आणखी काही नवे विषय घेऊन 'मन की बात'च्या माध्यमातून आपली भेट होईल. आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व कुटुंबियांचे स्वागत आहे.
आज पुन्हा एकदा आपण बोलू, देशाने साध्य केलेल्या यशाबद्दल आणि देशातील जनतेच्या सामुहीक प्रयत्नांबद्दल! 21 व्या शतकात भारतात एवढं काही घडत आहे, ज्यामुळे विकसित भारताचा पाया मजबूत होत आहे. जसे, या 23 ऑगस्टलाच आपण सर्व देशवासीयांनी पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी हा दिवस नक्कीच साजरा केला असेल, पुन्हा एकदा तुम्ही चंद्रयान-3 चे यश साजरे केले असेल. गेल्या वर्षी याच दिवशी चंद्रयान-3, चंद्राच्या दक्षिण भागात शिव-शक्ती पॉइंट या ठिकाणी यशस्वीपणे उतरले होते. भारत, हे गौरवास्पद यश मिळवणारा जगातील पहिला देश ठरला.
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.
पंतप्रधानजी: नमस्कार!
सर्व तरुण: नमस्कार!
पंतप्रधानजी: नमस्कार मंडळी!
सर्व तरुण (एकत्र): नमस्कार सर!
पंतप्रधानजी: बरं मित्रांनो, मला हे पाहून आनंद झाला की आय आय टी-मद्रासच्या महाविद्यालयीन कालखंडात निर्माण झालेली तुमची मैत्री आजही तेवढीच गाढ आहे. म्हणूनच तुम्ही एकत्र येऊन गॅलेक्स आय हा स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले. आणि आज मला त्याबद्दलही थोडे जाणून घ्यायचे आहे. याबद्दल मला जरा सांगा. सोबतच हे ही सांगा की तुमच्या तंत्रज्ञानाचा देशाला किती फायदा होणार आहे!
सुयश: हो सर, माझे नाव सुयश आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही एकत्र आहोत. सर्वजण आयआयटी-मद्रासमध्ये एकत्र भेटलो. आम्ही सगळे तिथे अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या वर्षात शिकत होतो. आणि त्यावेळी आम्ही असा विचार केला की हायपरलूप नावाचा एक प्रकल्प आहे, जो आम्हाला एकत्र करायचा होता. त्याच दरम्यान आम्ही एक चमू बनवला, त्याचे नाव होते 'आविष्कार हायपरलूप', यासोबत आम्ही अमेरिकेलाही गेलो. त्या वर्षी आमचा संघ आशियातील एकमेव संघ होता जो तिथे गेला आणि आपल्या देशाचा झेंडा….. आम्ही तिथे फडकवला. आणि आम्ही जगभरातील सुमारे 1500 (पंधराशे) संघांपैकी सर्वोत्तम 20 संघांमध्ये होतो.
पंतप्रधानजी: चला! पुढचे ऐकण्यापूर्वी यासाठी मला तुमचे अभिनंदन तर करु दे…
सुयश: खूप खूप आभार आपले! त्या यशप्राप्ती दरम्यान आमची मैत्री अधिक घट्ट झाली आणि अशा प्रकारचे अवघड प्रकल्प, आव्हानात्मक प्रकल्प करण्याचा आत्मविश्वासही आम्हाला आला. आणि त्याच वेळी, स्पेस एक्स पाहून आणि आपण अंतराळ क्षेत्राची दारं खाजगीकरणासाठी उघडण्याचा एक ऐतिहासिक निर्णय देखील 2020 मध्ये घेतला…तर आमचे एकंदर उत्साह खूप वाढला. आणि मी आता रक्षितला विनंती करतो की आम्ही आता काय निर्मिती करत आहोत आणि त्याचा फायदा काय आहे, हे त्याने सांगावे.
रक्षित: हो सर, तर माझे नाव रक्षित आहे. आणि या तंत्रज्ञानाचा आपल्याला कसा फायदा होईल, मी याचे उत्तर देतो.
पंतप्रधानजी: रक्षित, तुम्ही उत्तराखंड मधील नेमके कुठले आहात?
रक्षित: सर, मी अल्मोड्या चा आहे.
पंतप्रधानजी: अच्छा तर तुम्ही बाल मिठाईवाले आहात का?
रक्षित: हो सर! हो सर! आमची बाल मिठाई प्रसिद्ध आहे.
पंतप्रधानजी: आपले ते लक्ष्य सेन आहेत ना, ते मला नेहमी बालमिठाई खाऊ घालत असतात. बरं रक्षित, बोला!
रक्षित: तर आम्ही बनवत असलेले हे तंत्रज्ञान अंतराळातून ढगांच्या आरपार पाहू शकते आणि रात्रीही पाहू शकते, त्यामुळे आपण दररोज देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात वरुन स्पष्ट छबी टिपू शकतो. आणि यातून जी माहिती मिळेल ती आम्ही दोन क्षेत्रांच्या विकासासाठी वापरणार आहोत. एक म्हणजे भारताला अत्यंत सुरक्षित बनवणे. आपल्या सीमा, आपले महासागर, समुद्र, यांची आपण रोज टेहळणी करु शकतो. यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता येईल आणि आपल्या सशस्त्र दलांना गुप्त माहिती देता येईल. दुसरे क्षेत्र म्हणजे भारतातील शेतकऱ्यांना सक्षम करणे. म्हणून आम्ही भारतातील कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधीच एक उत्पादन तयार केले आहे जे त्यांच्या कोळंबी शेतीच्या खाचरातील पाण्याची गुणवत्ता अंतराळातून मापू शकेल, ते ही सध्याच्या खर्चाच्या एक दशांश दराने! आणि आमची अशी इच्छा आहे की याही पुढे जाऊन आपण जगासाठी सर्वोत्तम दर्जाच्या उपग्रह प्रतिमा उपलब्ध करून द्याव्यात आणि ग्लोबल वार्मिंग-जागतिक तापमान वाढीसारख्या जागतिक समस्यांशी लढण्यासाठी आपण जगाला सर्वोत्तम दर्जाची उपग्रह माहिती प्रदान करुन द्यावी.
पंतप्रधानजी: याचा अर्थ असा की तुमचा चमू जय जवान सुद्धा करणार आणि जय किसान सुद्धा करणार!
रक्षित: हो सर अगदी!
पंतप्रधानजी: मित्रांनो, तुम्ही एवढे छान काम करत आहात… मला हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे की तुम्ही बनवत असलेल्या तंत्रज्ञानाची अचूकता केवढी आहे?
रक्षित: सर, आपण 50 सेंटीमीटरपेक्षा कमी उकल काढू शकू…म्हणजे तेवढ्या रिझोल्यूशन पर्यंत जाऊ शकू. आणि आपण एका वेळी अंदाजे 300 चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्राची छबी टिपण्यात सक्षम होऊ.
पंतप्रधानजी: चला, मला वाटतं की जेव्हा देशवासीय हे ऐकतील तेव्हा त्यांना खूप अभिमान वाटेल. पण मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे.
रक्षित: होय सर.
पंतप्रधानजी: अंतराळ परिसंस्थेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आता यामध्ये आणखी कोणते बदल होतील, असे तुमच्या चमूला वाटते ?
किशन: माझे नाव किशन आहे, गॅलेक्स आय सुरु झाल्यापासून आम्ही ईन-स्पेस येताना पाहिले आहे आणि आम्ही 'जिओ-स्पेशियल डेटा पॉलिसी' आणि इंडिया स्पेस पॉलिसी' यासारखी अनेक धोरणे येताना पाहिली आहेत आणि आम्ही गेल्या 3 वर्षांत अनेक बदल होताना पाहिले आहेत आणि अनेक प्रक्रिया, अनेक पायाभूत सुविधा आणि अनेक सुविधा पाहिल्या आहेत….. त्या इस्रोने उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याही अतिशय चांगल्या पद्धतीने! आता हेच पहा… आपण इस्रोमध्ये जाऊन आपल्या हार्डवेअरची चाचणी करू शकतो, हे आता अगदी सहज करता येते. 3 वर्षांपूर्वी या प्रक्रिया फारशा नव्हत्या आणि त्या आमच्यासाठी आणि इतर अनेक स्टार्ट-अपसाठी खूप उपयुक्त आहेत. आणि अलीकडील थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणांमुळे आणि सुविधांच्या उपलब्धतेमुळे, स्टार्ट-अप्स सुरु करण्यासाठी भरपूर प्रोत्साहन मिळत आहे आणि असे स्टार्ट-अप्स येऊ शकतात आणि अशा क्षेत्रात अगदी सहज आणि चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात….ज्यामध्ये एरवी विकास साधणे सहसा खूप कठीण, खर्चिक आणि वेळखाऊ होऊन जाते. परंतु सध्याची धोरणे आणि इन-स्पेस आल्यानंतर, स्टार्ट-अपसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यावर माझा मित्र डेनिल चावडाही काही बोलू इच्छितो.
पंतप्रधानजी: डेनिल….बोला!
डेनिल: सर, आम्ही आणखी एक निरिक्षण केले आहे, आम्ही पाहिलंय… अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत आता बदल झाला आहे. पूर्वी त्यांना परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावेसे वाटायचे आणि तिथे जाऊन काम करावेसे वाटायचे…विशेष करुन अंतराळ क्षेत्रात! पण आता भारतात अंतराळ परिसंस्था खूप चांगल्या प्रकारे विकसित होत आहे हे बघता या मंडळींना भारतात परत येऊन या परिसंस्थेचा भाग व्हावेसे वाटत आहे. तर, हा असा खूप छान प्रतिसाद आम्हाला पहायला मिळतोय आणि यामुळेच आमच्याही कंपनीत असे काही लोक बाहेरुन परत येऊन काम करत आहेत.
पंतप्रधानजी: मला वाटते की, किशन आणि डेनिल यांनी या ज्या दोन्ही पैलूंचा उल्लेख केला, तुम्ही दोघांनीही उल्लेख केला….मला खात्री आहे की अनेकांचे याकडे लक्ष गेले नसेल की जेव्हा एका क्षेत्रात सुधारणा होते, तेव्हा त्या सुधारणांचे किती बहुविध परिणाम होतात! किती लोकांना फायदा होतो! आणि तुम्ही केलेल्या वर्णनावरून…कारण तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर तुमच्या हे नक्कीच लक्षात येते आणि तुम्ही हेही पाहिले आहे की, देशातील युवावर्गाला आता या क्षेत्रात आपले भविष्य आजमावायचे आहे…. आपल्या गुणवत्तेचा उपयोग करायचा आहे. तुमचे निरीक्षण खूप चांगले आहे. दुसरा प्रश्न मी विचारू इच्छितो की, ज्या तरुणांना स्टार्ट-अप्स आणि अंतराळ क्षेत्रामध्ये यश मिळवायचे आहे त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
प्रणित: मी प्रणित बोलतोय आणि मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे.
पंतप्रधानजी: हा प्रणित, बोला!
प्रणित: सर, माझ्या काही वर्षांच्या अनुभवावरून मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. सर्व प्रथम, जर तुम्हाला स्वतःला स्टार्ट-अप सुरु करायचा असेल, तर हीच संधी आहे….कारण संपूर्ण जगात, भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अमाप संधी आहेत. जसे…..वयाच्या 24 व्या वर्षी मला या विचारानेच अभिमान वाटतो की पुढच्या वर्षी आपला उपग्रह प्रक्षेपित होईल….ज्याच्या आधारावर आपले सरकार काही मोठे निर्णय घेईल आणि त्यात आमचाही छोटासा खारीचा वाटा असेल. अशा काही राष्ट्रीय प्रभावशाली प्रकल्पांवर काम करायला मिळावे…. हा असा उद्योग आहे आणि ही अशी वेळ आहे…..कारण या अंतराळ उद्योगाची आज ही सुरुवात होत आहे. त्यामुळे मी माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की ही संधी केवळ प्रभाव निर्माण करण्यासाठीच नाही तर त्यांच्या स्वत:च्या आर्थिक वृद्धीसाठी आणि जागतिक समस्या सोडवण्याची संधी आहे. तर आपण आपापसात बोलत असतो की आपण लहानपणी म्हणायचो….. आपण मोठे झाल्यावर नट, खेळाडू बनू….तर अशा अनेक इच्छा प्रदर्शित व्हायच्या. पण आज जर आपण ऐकले की कोणी म्हणतोय…मोठा झाल्यावर त्याला उद्योजक व्हायचे आहे, त्याला अंतराळ उद्योगात काम करायचे आहे….. तर हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे की या संपूर्ण परिवर्तनात आम्ही एक छोटीशी भूमिका बजावत आहोत.
पंतप्रधानजी: मित्रांनो, प्रणित, किशन, डेनिल, रक्षित, सुयश, तुमची मैत्री एक प्रकारे जितकी गाढ आहे तितकाच तुमचा स्टार्ट-अप प्रबळ आहे. म्हणूनच तुम्ही लोक इतके छान काम करत आहात. मला काही वर्षांपूर्वी आयआयटी-मद्रासला भेट देण्याची संधी मिळाली आणि त्या संस्थेच्या उत्कृष्टतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि अशीही आयआयटीबद्दल संपूर्ण जगात आदराची भावना आहे आणि जेव्हा इथून बाहेर पडणारे आपले लोक भारतासाठी काम करतात तेव्हा ते नक्कीच काहीतरी चांगले योगदान देतात. तुम्हा सर्वांना आणि अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या इतर सर्व स्टार्ट-अपना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुम्हा पाचही मित्रांशी बोलून मला खूप आनंद झाला. बरं चला, खूप खूप धन्यवाद मित्रांनो!
सुयश: खूप खूप धन्यवाद!
मित्रांनो, एक प्रकारे प्रणित, किशन रक्षित आणि डनिल आणि सुयश यांची जितकी मैत्री मजबूत आहे. तितकंच मजबूत आपलं स्टार्ट अपही आहे.
माझ्य़ा प्रिय देशवासियांनो, या वर्षी मी लाल किल्ल्यावरून राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एक लाख युवकांना राजकीय व्यवस्थेशी जोडलं जाण्याचं आवाहन केलं होतं. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि यावरून किती मोठ्य़ा संख्येने आपले युवक राजकारणात येण्यास तयार आहेत. हे लक्षात येत फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची योग्य संधीची गरज आहे. या विषयावर मला देशभरातील युवकांची पत्रे मिळाली आहेत. समाजमाध्यमांवर मला जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. लोकांनी मला अनेक प्रकारच्या सूचना पाठवल्या आहेत. काही युवकांनी मला पत्रात म्हटलं आहे की हे त्यांच्यासाठी खरोखरच अकल्पनीय आहे. आजोबा किंवा आईवडिलांचा राजकीय वारसा नसल्याने इच्छा असूनही ते राजकारणात येऊ शकत नव्हते. अनेक युवकांनी मला लिहीलें आहे की त्यांच्याकडे पायाभूत स्तरावरील काम करण्याचा चांगला अनुभव आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या समस्या सोडवण्याच्या कामी मदत करू शकतात. काही युवकांनी हेही लिहलं आहे की घराणेशाहीच राजकारण नव्या प्रतिभावान शक्तींना पुढे येऊ देत नाही. काही युवकांनी म्हटलं की अशा प्रकारच्या प्रयत्नांनी आपल्या लोकशाहीला आणखी बळकटी मिळेल. मी या विषयी सूचना पाठवणाऱ्या सर्वांना धन्यवाद देतो. मला आशा आहे की आता आपल्या सामूहिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले युवक सुद्धा राजकारणात पुढे येऊ शकतील. त्यांचा अनुभव आणि त्यांचा उत्साह देशाच्या उपयोगी पडेल.
मित्रांनो, स्वातंत्र्यसंग्रामात असे अनेक लोक प्रत्येक क्षेत्रात पुढे आले होते ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी स्वतःला देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिलं होते. आज आपल्याला विकसित भारत होण्याचं लक्ष्य़ साध्य़ करण्य़ासाठी पुन्हा त्याच प्रकारच्या भावनेची गरज आहे. मी आपल्या सर्व युवक मित्रांना सांगेन की त्यांनी या अभियानात स्वतःला जोडून घ्यावं. आपलं हे पाऊल आपलं आणि देशाचं भविष्य़ बदलवून टाकणारं ठरेल.
माझ्य़ा प्रिय देशवासियांनो, प्रत्येक घरी तिरंगा आणि संपूर्ण देशात तिरंगा या अभियानाने यावेळी अत्युच्य पातळी गाठली. देशाच्या कानाकोपऱ्यात या अभियानाशी संबंधीत छायाचित्र प्रचंड संख्येन आली आहेत आपण घरावर तिरंगा फडकलेला पाहिला, शाळा महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये तिरंगा फडकलेला पाहिला. लोकांनी आपल्या दुकानांमध्ये, कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवला. लोकांनी आपल्या डेस्क टॉप, गाड्या आणि मोबाईलवर तिरंगा लावला होता. जेव्हा लोक एकत्र येऊन आपल्या भावना प्रकट करतात तेव्हा या प्रकारची अभियाने प्रचंड यशस्वी होतात. आता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर जी छाय़ाचित्रे पहात आहात ती जम्मू काश्मीरच्या रियासीच इथे 750 मीटर लांब झेंड्यासहित तिरंगा रॅली काढण्यात आली आणि ही रॅली जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर काढण्यात आली होती. ज्यांनी ही छायाचित्र पाहिली त्याच मन आनंदाने भरून आलं. श्रीनगरच्या दाल सरोवरातील तिरंगा यात्रेची मनमोहक छाय़ाचित्र आपण सर्वांनी पाहिली. अरूणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातही 600 फूट लांब तिरंग्यासह रॅली काढण्यात आली. देशाच्या अन्य राज्यातही सर्व वयाचे लोक, अशाच प्रकारे तिरंगा यात्रांमध्ये सहभागी झाले. स्वातंत्र्य दिन आता एक सामाजिक पर्व होत आहे. आपणही अनुभव घेतला असेल. लोक आपल्याघरांना तिरंगी माळांनी सजवतात. स्वयंसहाय्यता समूहाशी जोडल्या गेलेल्या महिला लाखो झेंडे तयार करतात. ई कॉमर्स मंचावर तिरंग्याशी संबंधीत रंगाच्या सामानाची विक्री वाढते. स्वातंत्र्य दिनी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्थल, जल आणि नभ प्रत्येक ठिकाणी आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे तीन रंग दिसले. हर घर तिरंगा वेबसाईटवर पाच कोटीहून अधिक सेल्फी पोस्ट केल्या गेल्या. या अभियानानं संपूर्ण देशाला एका सूत्रानं बांधल आहे आणि हाच तर एक भारत श्रेष्ठ भारत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मनुष्य आणि प्राणी यांच्या प्रेमळ संबंधावर आधारित कितीतरी चित्रपट आपण पाहिले असतील. पण एक खरी गोष्ट आसामात घडतं आहे. आसामच्या तिनसुकिया जिल्ह्याच्या बोरेकुरी गावात मोरान समुदायाचे लोक राहतात आणि याच गावात राहतात हुलॉक गिबन. ज्यांना होलो बंदर असं म्हटले जात. हुलॉक गिबन्सनी याच गावाला आपलं घर मानलं आहे आणि आपल्याला हे जाणून अत्यंत आश्चर्य वाटेल की इथल्या माणसांचे गिबन्सशी घनिष्ट मैत्रीचे संबंध आहेत. गावातील लोक आजही आपली पारंपरिक मूल्य जपतात आणि म्ह्णून त्यांनी आपल्या कृतीतून गिबन्सशी सबंध आणखी मजबूत केले. जेव्हा ग्रामस्थांना समजलं की गिबन्सना केळी खूप आवडतात तेव्हा त्यांनी केळ्य़ांची शेती सुरू केली. याशिवाय त्यांनी हे निश्चित केलं की आपल्या नातेवाईकांच्या जन्म आणि मृत्युशी संबंधीत रीतीरिवाज गिबन्सच्या बाबतीतही पाळले जातील. त्यांनी गिबन्सना नावही दिली आहेत. नुकताच या गिबन्सना कमी उंचीवरून जाणाऱ्या विजेच्या तारांच्या संकटाचा सामना करावा लागत होता. या लोकांनी हे प्रकरण सरकारसमोर आणल आणि लवकरच त्यावर तोडगाही काढला. मला सांगण्यात आलं की आता हे गिबन्स छायाचित्रासाठी पोजही देतात.
प्राणिमात्रांवर प्रेम करण्यात आपले अरूणाचल प्रदेशातील युवक मित्रही अग्रेसर आहेत. अरूणाचलमध्ये काही युवक साथीदारांनी थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे का माहिती आहे कारण. शिंग आणि दात यासाठी होणाऱ्या शिकारी पासून त्या प्राण्यांना त्यांना वाचवायचा आहे नाबम बापू आणि लिखानाना यांच्या नेतृत्वाखाली हा चमू प्राण्यांच्या शिंग आणि दात अश्या वेगवेगळ्या अवयवांच्या 3D प्रतिमा तयार करत आहेत या प्रतिमा वापरुण टोपी आणि ड्रेस तयार केले जातात, अत्यंत कमालीचा हा पर्याय आहे ज्यात पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केला जातो. अशा अद्भुत प्रयत्नांची प्रशंसा करू तितकी कमीच आहे. मी तर असे म्हणेन की अधिकाधिक स्टार्ट अप्सनी या क्षेत्रात याव त्यामुळे आपल्या पशुप्राण्यांचं संरक्षणही होईल आणि परंपराही चालत राहील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात असे काही विशेष घडत आहे जे आपण अवश्य माहिती करून घ्यावं. तिथे आपल्या स्वच्छता कर्मचारी बंधुभगिनींनी कमाल केली आहे. या बंधुभगिनींनी आपल्याला कचऱ्यातून संपत्ती हा संदेश वास्तवात आणून दाखवला आहे. या टीमने झाबुआच्या पार्कमध्ये कचऱ्यापासून अद्भुत कलाकृती तयार केली आहे. आपल्या या कामात त्यांनी आसपासच्या क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा, वापरलेल्या बाटल्या, पाईप्स, टायर्स गोळा केले. या कलाकृतीत हेलिकॉप्टर्स, टायर आणि तोफांचाही समावेश आहे. सुंदर अश्या हॅगिंग फुलदाण्या तयार करण्यात आल्या आहेत. येथे वापरण्यात आलेल्या टायर्सचा उपयोग आरामशीर बाके बनवण्यासाठी केला गेला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या पथकाने रिड्यूस, रियूज आणि रिसायकलचा मंत्र अंगीकारला आहे. त्यांच्या प्रयत्नांनी बाग अत्यंत सुंदर दिसू लागली आहे. ती पाहण्यासाठी, स्थानिकांसमवेत आसपासच्या जिल्ह्यातील लोकही येऊ लागले आहेत.
मित्रांनो, मला आनंद आहे की आज आपल्या देशात अनेक स्टार्टअप टीम्स पर्यावरणाला चालना देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयत्नांत गुंतल्या आहेत. ई कॉन्शस नावाची एक टीम प्लॅस्टिक कचऱ्याचा उपयोग पर्यावरण स्नेही वस्तु तयार करण्या साठी करत आहे. ही कल्पना त्यांना आपली पर्यटन स्थळे विशेषतः पहाडी क्षेत्रात पसरलेला कचरा पाहून सुचली. अशाच लोकांच्या आणखी एका टीमने ईकोकारी नावाचं स्टार्ट अप सुरू केलं आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून वेगवेगळ्या सुंदर वस्तू ते तयार करतात. मित्रानो, खेळण्य़ांच रिसायलिंग हे असंच एक क्षेत्र आहे की ज्यात आपण सर्व मिळून काम करू शकतो. आपल्याला ही माहित असतं की खेळण्य़ांचा लवकरच मुलांना किती कंटाळा येतो. काही मुलं अशी असतात जी याच खेळण्यांची स्वप्ने पाहात असतात. ज्या खेळण्यांनी आता आपली मुलं खेळत नाहीत ती आपण जिथे त्यांचा उपयोग होईल अशा ठिकाणी देऊ शकतो. हा सुद्धा पर्यावरण रक्षणाचा उत्तम मार्ग आहे. आपण सर्वानी मिळून प्रयत्न केले तर पर्यावरणाच रक्षण होईल आणि देशही पुढे जाईल.
माझ्या प्रियदेशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच आपण 19 ऑगस्टला रक्षाबंधनचा हा सण साजरा केला. त्याच दिवशी जगभरात संस्कृत दिनही साजरा करण्य़ात आला. आजही देशविदेशात संस्कृत विषयी विशेष रुची असलेली आढळते. अनेक देशांमध्ये संस्कृत भाषेशी संबंधित संशोधन आणि प्रयोग होत आहेत या पुढची चर्चा करण्यापूर्वी मी आपल्याला एक लहानशी ध्वनीफीत ऐकवतो.
#AUDIO CLIP#
मित्रानो, या ध्वनीफीतीचा संबंध युरोपातील एक देश लिथुएनियाशी आहे. तेथील एक प्राध्यापक व्हायटिस व्हिटुनास यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आणि त्याला नाव दिलं आहे संस्कृत ऑन दि रिव्हर्स. काही लोकांचा एक समूह तेथे नेरिस नदीच्या किनारी जमला आणि त्यांनी वेदांच आणि गीतेच पठण केल. येथे असे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत. आपणही संस्कृतला प्रोत्साहन देण्यासाठी असेच प्रयत्न करत रहा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांच्या जीवनात तंदुरूस्तीला अत्यंत महत्व आहे. तंदुरूस्त रहाण्यासाठी आपल्याला आपले खाणे पिणे, राहणे याबाबतीत दक्ष राहावं लागतं. लोकांना फिटनेसे बद्दल जागरूक करण्यासाठीच तर आपण फिट इंडिया अभियान सुरू केलं. आरोग्य संपन्न राहण्यासाठी आज प्रत्येक वयोगटातील लोक, प्रत्येक वर्गातील लोक योगासनांचा आधार घेत आहेत. लोक आपल्या जेवणात सुपर फुड मिलेट्स म्हणजे श्रीअन्नाचा समावेश करू लागले आहेत. या सर्व प्रयत्नांचा असाच उद्देष्य आहे की प्रत्येक कुटुंब आरोग्यसंपन्न राहो. हाच या सगळ्या प्रयत्नांचा उद्देश आहे.
मित्रांनो, आपल कुटुंब, आपला समाज आणि आपला देश यांचं भविष्य आपल्या मुलांच्या भवितव्यावर अवलंबून आहे. आणि मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी त्यांना पोषणयुक्त आहार मिळणं गरजेचं आहे मुलांचं पोषण ही देशाची प्राथमिकता आहे. वास्तविक त्यांच्या पोषण आहारावर आपल सातत्यानं लक्ष असतं. परंतु देश त्यांच्या पोषण आहारावर एका विशिष्ट महिन्यात विशेष लक्ष देत असतो. या साठी प्रत्येक वर्षी देशभरात संपूर्ण सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. पोषणाबाबत लोकाना जागरूक करण्यासाठी पोषण मेळा, अनिमिया जागृती शिबीर, नवजात शिशुंच्या घरी भेट, वेबिनार, सेमिनार. असे अनेक उपाय अमलात आणले जातात. अनेक अंगणवाड्यांत आई आणि मुलांची समिती स्थापन केली गेली आहे. ही समिती कुपोषित मुलं, गर्भवती महिला आणि नवजात शिशुंच्या मातांवर देखरेख ठेवते. नवजात शिशुना सातत्यानं ट्रँक करून त्यांच्या पोषणाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यावर सातत्याने देखरेख केली जाते गेल्या वर्षी पोषण अभियानाला नव्या शिक्षण धोरणाशी जोडलें गेलं आहे. पोषण सुद्धा शिक्षण सुद्धा या अभियानाच्या अंतर्गत मुलांच्या संतुलित विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात आल आहे. आपल्यालाही आपल्या क्षेत्रातील पोषणाप्रती जागरूकता अभियानाशी अवश्य जोडले गेलं पाहिजे, आपल्या एका लहानशा प्रयत्नाने कुपोषणाच्या विरोधातील या लढाईला खूप मोठ बळ मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळच्या मन की बातमध्ये इतकंच. मन की बात मधून आपल्याशी संवाद साधल्यानं मला नेहमीच प्रसन्न वाटतं. असं वाटतं की मी माझ्या कुटुंबामध्ये बसून हलक्या फुलक्या वातावरणात आपल्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी बोलत आहे. तुमच्याशी मनाने जोडला जात आहे. आपल्या प्रतिक्रिया, आपल्या सूचना माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहेत. येत्या काही दिवसात अनेक सण येत आहेत. मी आपल्या सर्वांना त्यासाठी शुभेछा देतो. जन्माष्टमीचा सणही आहे. पुढच्या महिन्यात सुरूवातीला गणेशोत्सव आहे. ओणमचा सणही जवळच आहे. मिलाद- उन- नबीच्या सुद्धा शुभेच्छा देतो.
मित्रांनो, या महिन्याच्या 29 तारखेस तेलुगू भाषा दिनही आहे. ही खरोखरच अद्भुत भाषा आहे. जगभरातल्या सर्व तेलुगू भाषकांना तेलुगू भाषा दिनाच्या शुभेच्छा देतो.
प्रपंचं व्याप्तंगा उन्न
तेलुगू वारिकी,
तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलू
मित्रांनो या पावसाळ्याच्या दिवसात काळजी घेण्याबरोबरच वर्षा जलसंचयन मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं अशी मी आपल्याला पुनःपुन्हा विनंती करतो. एक पेड मा के नाम या अभियानाची मी आपणा सर्वांना आठवण करून देऊ इछितो, जास्तीत जास्त झाडं लावा आणि इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहन द्या. येत्या काही दिवसात पॅरिसमध्ये पॅरोऑलिम्पिक्स स्पर्धा होत आहे आपले दिव्यांग क्रीडापटू तिथे दाखल झाले आहेत एकशे चाळीस कोटी भारतीय या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. आपणही #CHEER4BHARAT# हँश टँग वापरुन आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्या पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटू आणि अनेक विषयांवर चर्चा करू तोपर्यंत मला निरोप द्या अत्यंत आभार नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुमचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन करतो आहे. सध्या संपूर्ण जगावर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धांची मोहिनी पसरलेली आहे. ऑलिम्पिक क्रीडास्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी देतात, देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची संधी देतात. तुम्ही सर्वांनी सुद्धा आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवा, भारताला पाठींबा द्या!!
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.
मित्रांनो, आजच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी या युवा विजेत्यांना विशेष आमंत्रण दिले आहे. हे सर्वजण दूरध्वनीवरून आपल्याशी जोडले गेले आहेत.
प्रधानमंत्री जी :- नमस्ते मित्रांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुम्हा सर्व मित्रांचे खूप खूप स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण?
विद्यार्थी :- आम्ही ठीक आहोत सर
प्रधानमंत्री जी :- बरं मित्रांनो, ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीय तुम्हा सर्वांचे अनुभव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मी आदित्य आणि सिद्धार्थ यांच्यापासून चर्चेची सुरुवात करतो. तुम्ही सध्या पुण्यात आहात, आधी मी तुमच्यापासूनच संवाद सुरु करतो. ऑलिम्पियाड स्पर्धेदरम्यान तुम्हांला जे अनुभव आले त्याविषयी आम्हां सर्वांना सांगा.
आदित्य :- मला गणित विषयाची लहानपणापासूनच खूप आवड होती.माझे शिक्षक, ओमप्रकाश सर यांनी 6वीत असताना स्टँडर्ड मॅथ्स हा विषय शिकवला होता आणि त्यांनी माझी गणितातील रुची देखील वाढवली होती. त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले आणि ही संधी देखील मिळाली.
प्रधानमंत्री जी :- तुझ्या मित्राचे काय म्हणणे आहे?
सिद्धार्थ :- सर, माझे नाव सिद्धार्थ आहे, मी पुण्याला राहतो.मी नुकतीच 12वी ची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. जागतिक गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भाग घेण्याची ही माझी दुसरी वेळ होती. जेव्हा मी 6 वीत होतो तेव्हा आदित्य सोबतच मला देखील ओमप्रकाश सरांनी प्रशिक्षित केले होते. आम्हांला त्या शिकवण्याची खूप मदत झाली. आता मी सीएमआय महाविद्यालयात गणित आणि संगणकशास्त्र या विषयांचा अभ्यास करतो आहे.
प्रधानमंत्री जी :- बरं, मला असं सांगण्यात आलं आहे की अर्जुन आत्ता गांधीनगरमध्ये आहे आणि कणव तर ग्रेटर नोईडाचाच रहिवासी आहे. अर्जुन आणि कणव, आपण ऑलिम्पियाड स्पर्धेविषयी चर्चा केली पण तुम्ही दोघांनी तुमच्या स्पर्धेच्या तयारीशी संबंधित एखादा विषय किंवा विशेष अनुभव आला असेल त्याविषयी सांगितलंत तर आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.
अर्जुन :- नमस्ते सर, जय हिंद. माझे नाव अर्जुन.
प्रधानमंत्री जी :- जय हिन्द अर्जुन |
अर्जुन :- सर, मी दिल्लीत राहतो. माझी आई श्रीमती आशा गुप्ता दिल्ली विद्यापीठात भौतिकशास्त्राची प्राध्यापक आहे तर माझे वडील श्री अमित गुप्ता चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. मी आत्ता माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्यांशी प्रत्यक्ष बोलत आहे हा मला स्वतःचा सन्मान वाटतो आहे आणि सर्वप्रथम मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना देऊ इच्छितो. मला असं वाटतं की जेव्हा एका कुटुंबातील एखादा सदस्य अशा स्पर्धेसाठी तयारी करत असतो तेव्हा हा संघर्ष केवळ त्या एकट्या सदस्याचा नसतो तर तो संपूर्ण कुटुंबाचा संघर्ष असतो.या स्पर्धेमध्ये आमची जी प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये तीन प्रश्न सोडवण्यासाठी आम्हांला साडेचार तासांचा अवधी दिला जातो. म्हणजेच एका प्रश्नासाठी दीड तासाचा वेळ असतो. म्हणजे आपण समजू शकतो की एक प्रश्न सोडवायला आमच्याकडे किती वेळ असतो. या स्पर्धेच्या तयारीसाठी आम्हाला घरी खूप अभ्यास करावा लागतो. प्रश्न सोडवण्यासाठी तासनतास प्रयत्न करावे लागतात. कधी कधी तर एक प्रश्न सोडवण्यासाठी एक संपूर्ण दिवस तर कधी तीन तीन दिवस देखील झगडावं लागतं. स्पर्धेच्या सरावासाठी आम्ही ऑनलाईन प्रश्न शोधतो. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले प्रश्न सोडवण्याचा सराव करतो. आणि अशाच पद्धतीने आम्ही हळूहळू अभ्यासावर मेहनत घेत राहतो, त्यातून आम्हाला चांगला अनुभव मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची प्रश्न सोडवण्याची क्षमता वाढत जाते. आणि ही गोष्ट केवळ गणितातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त ठरते.
प्रधानमंत्री: कणव, तू मला सांग ह्या स्पर्धेची तयारी करताना आलेला तुझा एखादा वेगळा अनुभव असेल, जो आमच्या तरुण मित्रांना ऐकायला फार छान वाटेल विशेष असा काही अनुभव सांगू शकतोस?
कणव तलवार : माझं नाव कणव तलवार आहे, मी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोईडा येथे राहतो. मी 11 व्या इयत्तेत शिकतो आणि गणित हा माझा सर्वात आवडता विषय आहे. गणित विषय मला लहानपणापासूनच खूप आवडतो. लहानपणी माझे वडील माझ्याकडून कोडी सोडवून घेत असत त्यामुळे माझी या विषयाची आवड वाढतच गेली. मी 7 वीत असल्यापासून ऑलिम्पियाड स्पर्धेची तयारी सुरु केली होती. माझ्या बहिणीने यात मला खूप मदत केली आहे. माझे आईवडील मला अभ्यासासाठी कायम प्रोत्साहित करत असत. ही ऑलिम्पियाड स्पर्धा एचबीसीएसईतर्फे आयोजित केली जाते. यासाठी पाच स्तरीय प्रक्रिया असते. गेल्या वर्षीच्या संघात माझी निवड होऊ शकली नाही. मी निवडीच्या निकषाच्या अगदी जवळ होतो आणि निवड न झाल्याने अत्यंत दुःखी झालो होतो. तेव्हा माझ्या पालकांनी मला सांगितलं की अशा वेळी आपण जिंकतो तरी किंवा काहीतरी शिकतो तरी. आणि या प्रक्रियेचा प्रवास महत्त्वाचा असतो, यश नव्हे. तेव्हा मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की- तुम्ही जे करत आहात ते आवडीनं करा आणि जे तुम्हाला आवडतं ते करत रहा. यशापेक्षा तिथे पोहोचण्याचा प्रवास महात्ग्वाचा आहे, आणि आपल्याला यश मिळेलच. आपण स्वतःच्या विषयाबाबत आवड निर्माण केली पाहिजे आणि या प्रवासाचा आनंद घेतला पाहिजे.
प्रधानमंत्री : तर कणव, तुला तर गणितात देखील रुची आहे आणि साहित्याची आवड असल्यासारखं तुझं बोलणं आहे.
कणव तलवार : हो सर. मी लहानपणापासून वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्वस्पर्धा यांच्या भाग घेत असे.
प्रधानमंत्री: चला, आता आपण आनंदोशी बातचीत करूया. आनंदो, तू आत्ता गुवाहाटीमध्ये आहेत आणि तुझा मित्र ऋषील मुंबईत आहे. मला तुम्हां दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे. बघा, मी परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम करत असतो आणि परीक्षा पे चर्चा या कार्याक्रमाशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये सुद्धा मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित विषयाची इतकी भीती वाटते की नाव घेतला तरी घाबरून जातात. तुम्ही मला सांगा, गणिताशी मैत्री कशी करावी?
ऋषील माथुर : सर, माझं नाव ऋषील माथुर आहे. आपण जेव्हा लहान असतो आणि आपण पहिल्यांदाच बेरीज शिकतो, तेव्हा आपल्याला हातचा धरायला सांगितलं जातं. पण कधीकधी आपल्याला हे कुणी सांगतच नाही की हातचा हा काय प्रकार असतो? जेव्हा आपण चक्रवाढ व्याज शिकतो तेव्हा हे कधीच विचारत नाही की चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आलं कुठून? मला असं वाटतं की गणित ही खरंतर विचार करण्याची आणि प्रश्न सोडवण्याची कला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की गणितात आपण आणखी एका प्रश्नाची भर घातली पाहिजे की आपण हे का करत आहोत? हे असं का असतं? मला वाटतं की यामुळे विद्यार्थ्यांची गणितातली रुची वाढू शकेल. कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजत नसते तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटायला लागते. याशिवाय मला असंही वाटतं की गणित हा एक तर्काचा विषय आहे असं सगळ्याचं मत आहे. पण खरंतर गणितात सर्जनशीलता देखील महत्त्वाची आहे, कारण सर्जनशीलतेमुळेच आपण चौकटीच्या बाहेरची उत्तरं शोधू शकतो. आणि म्हणूनच, गणित ऑलिम्पियाड स्पर्धेचं आयोजन ही देखील गणितातील रुची वाढवण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाची समयोचितता आहे.
प्रधानमंत्री : आनंदो, तुला काही सांगायचंय?
आनंदो भादुरी : प्रधानमंत्रीजी नमस्ते! मी गुवाहाटी येथून आनंदो भादुरी बोलत आहे. मी नुकतीच 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे. मी 6 वी आणि 7वीत असताना स्थानिक ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये भाग घेत असे. तिथूनच मला या विषयाची आवड निर्माण झाली. यावर्षी मी दुसऱ्यांदा आयएमओ मध्ये सहभागी झालो. दोन्ही आयएमओ मला छान वाटल्या. ऋषीलनं आत्ता जे सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे. आणि मला असं सांगावसं वाटतं की ज्यांना गणित विषयाची भीती वाटते त्यांनी खूप धैर्याने अभ्यास केला पाहिजे,कारण आपल्याला ज्या प्रकारे गणित शिकवलं जातं, होतं काय की एक ठराविक सूत्र दिलं जातं, ते पाठ करुन घेतात आणि मग याच सूत्राच्या आधारावर शंभर प्रश्न विचारले जातात. पण आधी ते सूत्र समजलं की नाही ते कोणीच बघत नाही. फक्त प्रश्न सोडवून घेण्याच्या मागे लागतात. सूत्र देखील पथ करायचं आणि परीक्षेत समजा ते आठवलं नाही तर काय करायचं? म्हणून मी सांगेन की सूत्र समजून घ्या, जे आत्ता ऋषील म्हणत होता. धिटाईने त्याला भिडा. जर सूत्र नीट लक्षात आला तर 100 प्रश्न विचारावेच लागणार नाहीत. एक दोन प्रश्नांमध्ये मुलांना समजेल आणि त्यांना गणित विषयाला घाबरावे देखील लागणार नाही.
प्रधानमंत्री जी :- आदित्य आणि सिद्धार्थ, आपण जेव्हा सुरुवातीला बोलत होतो तेव्हा नीट बोलणं झालं नाही. आता या सर्व मित्रांचं बोलणं ऐकून तुम्हांला नक्कीच वाटत असेल की तुम्हालाही काही सांगायचं आहे. तुम्ही तुमचे अनुभव अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता का?
सिद्धार्थ :- या स्पर्धेत अनेक देशांशी संवाद साधायला मिळाला, खूप वेगवेगळ्या संस्कृती होत्या, परदेशांतील विद्यार्थी होते त्यांच्याशी चर्चा करता आली. खूप प्रसिद्ध गणितज्ञ उपस्थित होते, त्यांना भेटायला मिळालं.
प्रधानमंत्री जी :- आदित्य, तू बोल.
आदित्य :- स्पर्धेचा अनुभव फार छान होता. आम्हाला बाथ शहर फिरवून दाखवण्यात आलं. तिथे खूप छान छान देखावे होते, आम्हांला बगीच्यांमध्ये घेऊन गेले. आणि आम्हांला ऑक्सफर्ड विद्यापीठात देखील घेऊन गेले होते. तो एक अत्यंत सुंदर अनुभव होता.
प्रधानमंत्री जी :- चला मित्रांनो, तुमच्याशी बोलून मला फार आनंद झाला. मी तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण मला माहित आहे की अशा प्रकारच्या स्पर्धांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते, मन एकाग्र करून अभ्यास करावा लागतो, बुद्धीचा कस लागतो. कधीकधी कुटुंबातले लोक देखील वैतागतात- हा काय सतत गुणाकार-भागाकार करत असतो म्हणतात. पण माझ्याकडून तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देशाचा मान वाढवला आहे, देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. मित्रांनो धन्यवाद.
विद्यार्थी :- तुमचे आभार! धन्यवाद!
प्रधानमंत्री जी :- धन्यवाद.
विद्यार्थी:- धन्यवाद सर, जय हिंद.
प्रधानमंत्री जी :- जय हिंद.. जय हिंद
तुम्हां सर्व विद्यार्थ्यांशी बोलून आनंद वाटला. ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार. गणित विषयातील या युवा महारथींचे विचार ऐकल्यानंतर इतर युवकांना सुद्धा गणित विषयातून आनंद घेण्याची प्रेरणा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता मी ‘मन की बात’ कार्यक्रमात अशा विषयावर बोलू इच्छितो जे ऐकून प्रत्येक भारतवासीयाची मान अभिमानाने ताठ होईल.मात्र, ही गोष्ट सांगण्यापूर्वी मी तुम्हांला एक प्रश्न विचारु इच्छितो. तुम्ही कधी चराईदेऊ मैदाम हे नाव ऐकलं आहे? जर नसेल ऐकलं तर आता हे नाव वारंवार तुमच्या कानावर पडणार आहे, आणि तुम्ही देखील हे नाव इतरांना सांगणार आहात.आसाम राज्यातील चराईदेऊ मैदामचा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. या यादीत समावेश होणारं भारतातलं हे 43 वं स्थळ असला तरी ईशान्य भारतातलं हे पहिलंच स्थळ असेल.
मित्रांनो हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की चरैदेउ मैदाम म्हणजे काय आणि ते इतकं विशेष का आहे. चरैदेउ म्हणजे शायनिंग सिटी ऑन द हील्स म्हणजेच टेकड्यांवर चमकणारं शहर. ही अहोम वंशाची पहिली राजधानी होती. अहोम घराण्यातील लोक परंपरेने त्यांच्या पूर्वजांचे मृतदेह आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू मैदाममध्ये ठेवतात. मैदाम ही एक ढिगासारखी रचना आहे, जी वर मातीने झाकलेली आहे आणि खाली एक किंवा अधिक खोल्या आहेत. ही मैदाम, अहोम राज्याच्या दिवंगत राजे आणि प्रतिष्ठित लोकांसाठी आदराचे प्रतीक आहे. आपल्या पूर्वजांना आदर दाखवण्याची ही पद्धत अतिशय अनोखी आहे. या ठिकाणी सामुदायिक पूजाही होत असे.
मित्रांनो, अहोम साम्राज्याबद्दल इतर माहिती तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. 13व्या शतकापासून सुरू झालेले हे साम्राज्य 19व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत टिकले. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी साम्राज्य टिकून राहणे ही मोठी गोष्ट आहे. कदाचित अहोम साम्राज्याची तत्त्वे आणि श्रद्धा इतकी मजबूत होती की त्यांनी ही राजवट इतके दिवस टिकवली. मला आठवते की, या वर्षी 9 मार्च रोजी, मला महान अहोम योद्धा लसिथ बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्याचा बहुमान मिळाला, जो अदम्य धैर्य आणि शौर्याचा प्रतीक आहे. या कार्यक्रमादरम्यान अहोम समाजाच्या अध्यात्मिक परंपरेचे पालन करताना मला एक वेगळा अनुभव आला. लसिथ मैदाम इथे अहोम समाजाच्या पूर्वजांना आदरांजली वाहण्याचा बहुमान मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता चरैदेऊ मैदाम हे जागतिक वारसा स्थळ बनले म्हणजे इथे अधिक पर्यटक येतील. तुम्ही तुमच्या भविष्यातील प्रवासाच्या योजनांमध्ये या स्थळाचा समावेश नक्कीच करा.
मित्रांनो, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूनच देश पुढे जाऊ शकतो. भारतातही असे अनेक प्रयत्न सुरू आहेत. असाच एक प्रयत्न आहे – प्रोजेक्ट परी… आता परी हा शब्द ऐकून तुम्ही गोंधळून जाऊ नका.. ही परी स्वर्गीय कल्पनेशी जोडलेली नसून पृथ्वीला स्वर्ग बनवत आहे. PARI म्हणजे पब्लिक आर्ट ऑफ इंडिया. सार्वजनिक कला लोकप्रिय करण्यासाठी उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी, प्रकल्प PARI हे एक प्रमुख माध्यम बनत आहे. तुम्ही बघितलेच असेल.. रस्त्याच्या कडेला, भिंतींवर आणि भुयारी मार्गांमध्ये खूप सुंदर चित्रे दिसतात. ही चित्रे आणि या कलाकृती त्याच कलाकारांनी बनवल्या आहेत जे PARI शी संबंधित आहेत. यामुळे आपल्या सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्य तर वाढतेच, शिवाय आपली संस्कृती अधिक लोकप्रिय होण्यास मदत होते. दिल्लीतील भारत मंडपमचेच उदाहरण घ्या. येथे तुम्हाला देशभरातील अप्रतिम कलाकृती पाहायला मिळतील. दिल्लीतील काही अंडरपास-भुयारी मार्ग आणि उड्डाणपूलांवरही तुम्ही अशी सुंदर लोक कला पाहू शकता. मी कला आणि संस्कृती प्रेमींना आवाहन करेन की त्यांनी पब्लिक आर्टवर लोककलेला अधिक काम करावे. यामुळे आपल्याला आपल्या मुळांचा अभिमान असल्याची सुखद अनुभूती मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 'मन की बात' मध्ये, आता 'रंगा' बद्दल बोलूया - असे रंग ज्यांनी हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यातील 250 हून अधिक महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरले आहेत. हातमाग उद्योगाशी निगडित या महिला पूर्वी छोटी दुकाने चालवून आणि छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र पुढे जाण्याची इच्छा प्रत्येकाला असते. म्हणून त्यांनी ‘उन्नती बचत गटा’ मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि या गटात सहभागी होऊन त्यांनी ब्लॉक प्रिंटिंग आणि डाईंगचे प्रशिक्षण घेतले. कपड्यांवर रंगांची जादू पसरवणाऱ्या या महिला आज लाखो रुपये कमवत आहेत. त्यांनी बनवलेल्या बेड कव्हर-चादरी, साड्या आणि दुपट्ट्यांना बाजारात मोठी मागणी आहे.
मित्रांनो, रोहतकमधील या महिलांप्रमाणेच देशाच्या विविध भागांतील कारागीर हातमाग लोकप्रिय करण्यात व्यग्र आहेत. ओदिशाची 'संबलपुरी साडी' असो, मध्यप्रदेशची 'माहेश्वरी साडी' असो, महाराष्ट्राची 'पैठणी' असो किंवा विदर्भाची 'हँड ब्लॉक प्रिंट' असो, हिमाचलच्या 'भुट्टीको'ची शाल आणि लोकरीचे कपडे असोत किंवा जम्मू-काश्मिरच्या कानी शाल असोत, देशाच्या कानाकोपऱ्यात हातमाग कारागिरांचे काम दिसून येते. आणि तुम्हाला हे माहीत असेलच की, काही दिवसांनी ७ ऑगस्टला आपण 'राष्ट्रीय हातमाग दिन' साजरा करणार आहोत.हल्ली हातमागाच्या उत्पादनांनी ज्या प्रकारे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे, ते खरोखरच खूप यशस्वी आणि जबरदस्त आहे. आता अनेक खाजगी कंपन्या AI च्या माध्यमातून हातमाग उत्पादने आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या फॅशनचा प्रचार करत आहेत. कोशा AI, हॅंडलूम इंडिया, डी-जंक, नोव्हाटॅक्स, ब्रम्हपुत्रा फेबल्स, असे अनेक स्टार्टअप्स देखील हातमाग उत्पादनांना लोकप्रिय करण्यात गुंतले आहेत. अनेक लोक अशा स्थानिक उत्पादनांना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून मलाही आनंद झाला. तुम्ही तुमची स्थानिक उत्पादने ‘हॅशटॅग माय प्रॉडक्ट माय प्राइड’ या नावाने समाज माध्यमावर टाकू शकता. तुमचा हा छोटासा प्रयत्न अनेकांचे आयुष्य बदलेल.
मित्रांनो, हातमागा बरोबरच मला खादीबद्दलही बोलायला आवडेल. तुमच्यामध्ये असे बरेच लोक असतील ज्यांनी खादीची उत्पादने यापूर्वी कधीही वापरली नाहीत, परंतु आज मोठ्या अभिमानाने खादी परिधान करतात. मला हे सांगायलाही आनंद होत आहे की खादी ग्रामोद्योगाची उलाढाल प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कल्पना करा, दीड लाख कोटी रुपये!! आणि खादीची विक्री किती वाढली आहे माहीत आहे का? 400 टक्के. खादी आणि हातमागाच्या या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण होत आहेत. बहुसंख्य महिला या उद्योगाशी निगडित आहेत आणि त्यामुळे त्यांनाच त्याचा सर्वाधिक फायदा होत आहे. माझी तुम्हाला पुन्हा एक विनंती आहे, तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे असलेच पाहिजेत, आणि जर तुम्ही आत्तापर्यंत खादीचे कपडे घेतले नसतील तर या वर्षापासून सुरुवात करा. ऑगस्ट महिना आला आहे, स्वातंत्र्याचा महिना आहे, क्रांतीचा महिना आहे. यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते खादी खरेदी करण्याची!
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुमच्याशी 'मन की बात'मध्ये अनेकदा अंमली पदार्थांच्या आव्हानावर चर्चा केली आहे. प्रत्येक कुटुंबाला काळजी असते की आपलं मूल अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडू नये. आता अशा लोकांना मदत करण्यासाठी सरकारने ‘मानस’ नावाचे विशेष केंद्र उघडले आहे. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईतील हे एक मोठे पाऊल आहे. ‘मानस’ ही हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. सरकारने '1933' हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावर फोन करून कोणीही आवश्यक सल्ला घेऊ शकतो किंवा पुनर्वसनाशी संबंधित माहिती मिळवू शकतो. जर कोणाकडे अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती असेल तर ते या नंबरवर कॉल करून 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो' सोबत शेअर करू शकतात. मानसला पुरवलेली माहिती गोपनीय राखली जाते. भारताला अंमली पदार्थ मुक्त बनवण्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांना, सर्व कुटुंबांना, सर्व संस्थांना माझी विनंती आहे की मानस हेल्पलाइनचा पुरेपूर वापर करा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या जगभरात व्याघ्र दिन साजरा होणार आहे. भारतामध्ये वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आपण सर्वजण वाघाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकतच लहानाचे मोठे झालो आहोत. जंगलासभोवतीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना वाघासोबत सहजीवन कसे जगायचे हे पक्के माहीत असते.अशी अनेक गावे आहेत, जिथे माणूस आणि वाघ यांच्यात कधीच संघर्ष होत नाही. मात्र जिथे असा संघर्ष उद्भवतो तिथे सुद्धा वाघांच्या संरक्षणासाठी मोठे प्रयत्न होत आहेत. लोकसहभागाचा असाच एक प्रयत्न म्हणजे "कुल्हाडी बँड पंचायत". राजस्थानातील रणथंबोरपासून सुरू झालेली ही मोहीम रंजक आहे. कुऱ्हाड घेऊन जंगलात जाणार नाही आणि झाडे तोडणार नाही, अशी शपथ स्थानिक समाजानेच घेतली आहे. या एका निर्णयामुळे येथील जंगले पुन्हा हिरवीगार होत असून वाघांसाठी चांगले वातावरण निर्माण होत आहे.
मित्रांनो, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या प्रमुख अधिवासांपैकी एक आहे. इथल्या स्थानिक समुदायांनी, विशेषत: गोंड आणि माना जमातींच्या आमच्या बंधू-भगिनींनी इको-टूरिझमच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत. त्यांनी जंगलावरील आपले अवलंबित्व कमी केले आहे जेणेकरून येथे वाघांच्या हालचाली वाढू शकतील. आंध्र प्रदेशातील नल्लामलाईच्या टेकड्यांवर राहणाऱ्या 'चेंचू' जमातीचे प्रयत्न पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. टायगर ट्रॅकर्स म्हणून त्यांनी जंगलातील वन्य प्राण्यांच्या हालचालींची प्रत्येक माहिती गोळा केली. यासोबतच त्यांनी परिसरातील अवैध कामांवरही लक्ष ठेवले आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे सुरू असलेला ‘बाग मित्र कार्यक्रम’ही खूप चर्चेत आहे. या अंतर्गत स्थानिक लोकांना 'बाग मित्र' म्हणजे व्याघ्रमित्र म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. वाघ आणि मानव यांच्यात संघर्ष होणार नाही याची हे 'वाघमित्र' पूर्ण काळजी घेतात. असे अनेक प्रयत्न देशाच्या विविध भागात सुरू आहेत. मी येथे फक्त काही प्रयत्नांची चर्चा केली आहे परंतु मला आनंद आहे की लोकसहभागामुळे वाघांच्या संवर्धनात खूप मदत होत आहे. अशा प्रयत्नांमुळे भारतातील वाघांची संख्या दरवर्षी वाढत आहे. जगातील 70 टक्के वाघ आपल्या देशात आहेत हे जाणून तुम्हाला आनंद आणि अभिमान वाटेल. विचार करा! ७० टक्के वाघ!! - त्यामुळेच आपल्या देशाच्या विविध भागात अनेक व्याघ्र अभयारण्य आहेत.
मित्रांनो, वाघांच्या वाढीसोबतच आपल्या देशातील वनक्षेत्रही झपाट्याने वाढत आहे. यामध्येही सामुदायिक प्रयत्नांमुळे मोठे यश मिळत आहे. मागच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मी तुमच्याशी ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमाबाबत चर्चा केली होती. देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने लोक या मोहिमेत सामील होत आहेत याचा मला आनंद आहे. काही दिवसांपूर्वीच स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या इंदूरमध्ये एक अप्रतिम कार्यक्रम झाला. येथे ‘एक पेड माँ के नाम’ या कार्यक्रमात एकाच दिवसात २ लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली. तुम्हीही तुमच्या आईच्या नावाने झाडे लावण्याच्या या मोहिमेत सहभागी व्हा आणि सेल्फी घ्या आणि सोशल मीडियावर पोस्ट करा. या मोहिमेत सामील होऊन तुम्हाला तुमची आई आणि पृथ्वी माता या दोघांसाठी काहीतरी खास केल्यासारखे वाटेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, १५ ऑगस्टचा दिवस आता फार दूर नाही. आणि आता 15 ऑगस्ट मध्ये आणखी एका मोहिमेची भर पडली आहे, 'हर घर तिरंगा अभियान'. गेल्या काही वर्षांपासून देशभरात 'हर घर तिरंगा अभियाना'साठी सर्वांचाच उत्साह आहे. गरीब असो, श्रीमंत, छोटं घर असो की मोठं घर, प्रत्येकाला तिरंगा फडकवताना अभिमान वाटतो. तिरंग्यासोबत सेल्फी काढण्याची आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचीही क्रेझ आहे. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा कॉलनीत किंवा सोसायटीतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकतो, तेव्हा काही वेळातच इतर घरांवरही तिरंगा दिसू लागतो. म्हणजेच ‘हर घर तिरंगा अभियान’ , तिरंग्याच्या अभिमाना मुळे एक अनोखा उत्सव बनला आहे. आता याबाबत विविध प्रकारचे नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. १५ ऑगस्ट जसजसा जवळ येतो तसतसे घर, कार्यालये, गाड्यांमध्ये तिरंगा लावण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने दिसू लागतात. काही लोक तर 'तिरंगा' त्यांच्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना वाटतात सुद्धा. हा आनंद, हा तिरंग्याबद्दलचा उत्साह आपल्याला एकमेकांशी जोडतो आहे.
मित्रांनो, पूर्वीप्रमाणे याही वर्षी तुम्ही ‘harghartiranga.com’ वर तुमचा तिरंग्यासोबतचा सेल्फी नक्कीच अपलोड कराल आणि मला तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी तुम्ही मला तुमच्या अनेक सूचना पाठवता. या वर्षीही तुम्ही मला तुमच्या सूचना जरूर पाठवा. तुम्ही तुमच्या सूचना MyGov किंवा NaMo App वर देखील पाठवू शकता. 15 ऑगस्ट रोजीच्या माझ्या भाषणात मी शक्य तितक्या सूचना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ च्या या भागात तुमच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. पुढच्या वेळी आपण पुन्हा भेटू, देशाच्या नवीन कामगिरीसह आणि लोकसहभागासाठी नवीन प्रयत्नांसह. कृपया 'मन की बात'साठी आपल्या सूचना पाठवत राहा. येत्या काळात अनेक सणही येत आहेत. तुम्हाला सर्व सणांच्या हार्दिक शुभेच्छा. कुटुंबासह सणांचा आनंद घ्या. देशासाठी सतत काहीतरी नवीन करण्याची उर्जा कायम ठेवा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार
आपण सगळे फेब्रुवारी पासून ज्या दिवसाची वाट पहात होतो तो दिवस आज आला. मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत, माझ्या कुटुंबियांसोबत संवाद साधत आहे. एक सुंदर म्हण आहे - ‘इति विदा पुनर्मिलनाय’ याचा अर्थ देखील तितकाच सुंदर आहे, मी रजा घेत आहे पुन्हा भेटण्यासाठी. याच भावनेने मी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सांगितले होते की, निवडणुकीच्या निकालानंतर मी तुम्हाला पुन्हा भेटेन; आणि आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज पुन्हा तुमच्या भेटीला आलो आहे. आशा आहे की तुम्ही सर्व ठीक असाल, घरातील सर्वांची तब्येत चांगली असेल; आता तर पावसाला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा का पाउस सुरु झाला की मन देखील प्रफुल्लीत होते. आजपासून पुन्हा एकदा 'मन की बात' मध्ये आपण अशा देशबांधवां विषयी चर्चा करणार आहोत जे आपल्या कार्यातून समाज आणि देशात बदल घडवून आणत आहेत. आपण आज आपली समृद्ध संस्कृती, गौरवशाली इतिहास आणि विकसित भारतासाठी केलेल्या प्रयत्नांवर चर्चा करणार आहोत.
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.
मित्रांनो, देशवासीयांनी आपली राज्यघटना आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासासाठी मी त्यांचे आभार मानतो. 24 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झाली नाही, ज्यात 65 कोटी लोकांनी मतदान केले. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 30 जून हा दिवस खूपच महत्वपूर्ण आहे. आपले आदिवासी बंधू-भगिनी आजचा हा दिवस ‘हूल दिवस’ म्हणून साजरा करतात. इंग्रजांच्या अत्याचाराला कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अदम्य धैर्याशी आजचा हा दिवस निगडीत आहे. शूर सिद्धो-कान्हूंनी हजारो संथाली सहकाऱ्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध प्राणपणाने लढा दिला आणि हे कधी घडले हे तुम्हाला माहीत आहे का? हे 1855 मध्ये घडले होते, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ही दोन वर्षे आधी. त्यावेळी झारखंडच्या संथाल परगणा मधील आपल्या आदिवासी बांधवांनी इंग्रजांविरुद्ध शस्त्रे उचलली होती. इंग्रजांनी आपल्या संथाली बंधू-भगिनींवर अनेक अत्याचार केले आणि त्यांच्यावर अनेक बंधनेही लादली होती. या लढ्यात अपार पराक्रम गाजवत शूर सिद्धो आणि कान्हू शहीद झाले. झारखंड भूमीच्या या अमर सुपुत्रांचे बलिदान आजही देशवासीयांना प्रेरणा देते. संथाली भाषेतील त्यांना समर्पित गाण्याचे एक कडवे आपण ऐकूया -
#Audio Clip#
माझ्या प्रिय मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारले की जगातील सर्वात मौल्यवान नाते कोणते , तर तुम्ही नक्कीच म्हणाल - "आई". आपल्या सर्वांच्या जीवनात ‘आई’ला सर्वोच्च स्थान आहे. प्रत्येक दुःख सहन करत आई आपल्या मुलाचे संगोपन करते. प्रत्येक आई आपल्या मुलावर प्रेम करते. आपल्या जन्मदात्या आईचे हे प्रेम म्हणजे आपण कधीही न फेडू शकणारे ऋण आहे. मी विचार करत होतो, आपण आईला काही देऊ शकत नाही, पण काहीतरी वेगळं करू शकतो का? याच विचारातून यावर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेचे नाव आहे - 'एक पेड माँ के नाम'. मी देखील माझ्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले आहे. मी सर्व देशवासियांना, जगातील सर्व देशांतील लोकांना, आपल्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे. आईच्या स्मरणार्थ किंवा तिच्या सन्मानासाठी वृक्षारोपण करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. लोकं त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या फोटोसोबत झाडे लावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रत्येकजण आपल्या आईसाठी झाडे लावत आहे - मग ती श्रीमंत असो वा गरीब, मग ती नोकरदार महिला असो वा गृहिणी. या मोहिमेमुळे प्रत्येकाला आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याची समान संधी मिळाली आहे. हे सगळे #Plant4Mother आणि #एक_पेड़_मां_के_नाम वर त्यांचे फोटो शेअर करून इतरांना प्रेरणा देत आहे.
मित्रांनो, या मोहिमेचा अजून एक फायदा होईल. पृथ्वी देखील आईसारखीच आपली काळजी घेत असते. धरणी माता ही आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा आधार आहे आणि म्हणूनच पृथ्वीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. माँ के नाम पेड़ या मोहिमेमुळे आपल्या आईचा सन्मान तर होईलच त्यासोबतच धरणी मातेचे रक्षण देखील होईल. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारतात गेल्या एका दशकात वनक्षेत्रात अभूतपूर्व विस्तार झाला आहे. अमृत महोत्सवादरम्यान, देशभरात 60 हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती देखील झाली आहे. आता आपल्याला माँ के नाम पर पेड़ या मोहिमेला अशीच गती द्यायची आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाच्या विविध भागात मान्सून वेगाने दाखल होत आहे आणि पावसाळ्यात प्रत्येकजण आपापल्या घरात एक गोष्ट नक्कीच शोधतात ती म्हणजे 'छत्री'. आज ‘मन की बात’ मध्ये मला तुम्हाला एका विशेष प्रकारच्या छत्र्यांबद्दल सांगायचे आहे. या छत्र्या आपल्या केरळमध्ये तयार केल्या जातात. वास्तविक, केरळच्या संस्कृतीत छत्र्यांचे विशेष महत्त्व आहे. छत्र्या हा तिथल्या अनेक परंपरा आणि धार्मिक विधींचा महत्वपूर्ण भाग आहे. पण मी ज्या छत्र्यांबद्दल बोलतोय त्या ‘कार्थुम्बी छत्र्या’ आहेत आणि त्या केरळमधील अट्टापडी येथे तयार केल्या जातात. या रंगीबेरंगी छत्र्या खूपच सुंदर दिसतात आणि विशेष म्हणजे आपल्या केरळच्या आदिवासी भगिनी या छत्र्या तयार करतात. आज देशभरात या छत्र्यांची मागणी वाढत आहे. त्यांची ऑनलाइन विक्रीही केली जात आहे. या छत्र्या 'वट्टलक्की सहकारी कृषी संस्थे'च्या देखरेखीखाली बनवल्या जात आहेत. या सोसायटीचे कामकाज आपल्या देशाची नारीशक्ती पाहत आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली अट्टापडी येथील आदिवासी समाजाने उद्योजकतेचे अप्रतिम उदाहरण सर्वांसमोर प्रस्थापित केले आहे. या सोसायटीने बांबू-हस्तकला युनिटही स्थापन केला आहे. रिटेल आउटलेट आणि पारंपरिक कॅफे उघडण्याच्या दिशेने आता या लोकांची वाटचाल सुरु आहे. केवळ आपल्या छत्र्या आणि इतर उत्पादनांची विक्री करणे हा त्यांचा उद्देश नसून ते जगाला त्यांच्या परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देत आहेत. आज कार्थुम्बीच्या छत्र्यांनी केरळमधील एका छोट्या गावातून बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. लोकलसाठी वोकल होण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण काय असू शकते?
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या महिन्यात यावेळेपर्यंत पॅरिस ऑलिम्पिक सुरू झाले असतील. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही सर्वजणही वाट पाहत असाल याची मला खात्री आहे की. मी भारतीय संघाला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. टोकियो ऑलिम्पिकच्या आठवणी आजही आपल्या सर्वांच्या मनात ताज्या आहेत. टोकियोमधील, आमच्या खेळाडूंच्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाची मने जिंकली होती. टोकियो ऑलिम्पिकपासून आमच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीची जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व खेळाडूंचा विचार केला तर या सर्वांनी जवळपास नऊशे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. हा आकडा खूप मोठा आहे.
मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच काही गोष्टी पाहायला मिळतील. नेमबाजीत आमच्या खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत. भारतीय शॉटगन संघात आमच्या नेमबाज मुलींचाही समावेश झाला आहे. यावेळी आमच्या संघाचे खेळाडू कुस्ती आणि घोडेस्वारी या प्रकारांमध्ये त्यांनी यापूर्वी कधीही भाग न घेतलेल्या प्रकारांमध्ये देखील भाग घेणार आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, यावेळी खेळात एक वेगळीच उत्कंठा पाहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघांनी सर्वोत्तम कामगिरी केली होती हे तुम्हाला आठवत असेल. बुद्धिबळ आणि बॅडमिंटनमध्येही आपल्या खेळाडूंनी झेंडा फडकावला आहे. आता संपूर्ण देशाला आशा आहे की आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्येही चांगली कामगिरी करतील. या खेळांमध्ये आम्ही पदके तर जिंकू आणि त्यासोबतच देशवासीयांची मनेही जिंकू. मला लवकरच भारतीय संघाला भेटण्याची संधी मिळणार आहे. मी त्यांना तुमच्या वतीने प्रोत्साहन देईन. आणि हो.. यावेळी आपला हॅशटॅग #Cheer4Bharat आहे. या हॅशटॅगद्वारे आपल्याला आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे आहे... त्यांना प्रोत्साहन देत राहायचे आहे. तेव्हा हा उत्साह कायम ठेवा... तुमचा हा उत्साह... भारताची जादू जगाला दाखवण्यात मदत करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी तुम्हा सर्वांसाठी एक छोटीशी ऑडिओ क्लिप ऐकवत आहे.
#Audio Clip#
हा रेडिओ कार्यक्रम ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, हो ना? तर चला, याच्या मागची संपूर्ण गोष्ट सांगतो. ही खरे तर कुवेत रेडिओच्या प्रसारणाची क्लिप आहे/ प्रसारणाचा एक भाग आहे. आता तुम्हाला वाटेल की कुवेतची गोष्ट असेल तर तिथे हिंदी कशी आली असेल? सांगायची बाब म्हणजे, कुवेत सरकारने त्यांच्या राष्ट्रीय रेडिओवर एक विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. आणि तोही हिंदी मध्ये!! प्रत्येक रविवारी अर्धा तास 'कुवैत रेडिओ'वर त्याचे प्रसारण केले जाते. त्यात भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा समावेश असतो. आपल्या चित्रपट आणि कलाविश्वाशी संबंधित बातम्या आणि कार्यक्रम तेथील भारतीय समुदायामध्ये खूप लोकप्रिय आहेत. मला तर असेही सांगितले गेले आहे की कुवेतमधील स्थानिक लोकही यामध्ये खूप रस घेत आहेत. मी कुवेत सरकार आणि जनतेचे, ज्यांनी ही शानदार सुरुवात केली आहे / हा अप्रतिम पुढाकार घेतला आहे, उपक्रम सुरु केला आहे, त्यांचे मनापासून आभार मानतो.
मित्रांनो, आज जगभरात ज्या प्रकारे आपल्या संस्कृतीचा गौरव होतो आहे, ते पाहून कोणत्या भारतीयाला त्याचा आनंद होणार नाही? आता उदाहरणच सांगायचे तर, तुर्कमेनिस्तानमध्ये, या वर्षी मे महिन्यात, तेथील राष्ट्रीय कवीची 300 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींनी जगभरातील 24 प्रसिद्ध कवींच्या पुतळ्यांचे अनावरण केले. यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथजी टागोर यांचाही पुतळा आहे. हा गुरुदेवांचा सन्मान आहे, भारताचाही सन्मान आहे.
तसेच जून महिन्यात दोन कॅरिबियन देशांनी, सुरीनाम आणि सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स ह्यांनी आपल्या भारतीय वारसा संपूर्ण उत्साहाने जोशात साजरा केला.
सुरीनाममध्ये दरवर्षी ५ जून हा दिवस भारतीय समुदाय आगमन दिवस आणि प्रवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. इथे तर हिंदीसोबतच भोजपुरी देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्समध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या आपल्या बंधू भगिनींची संख्या सुमारे सहा हजार आहे. या सर्वांना आपल्या वारशाचा खूप अभिमान आहे. 1 जूनला ह्या सगळ्यांनी आपला भारतीय समुदाय आगमन दिन ज्या उत्साहाने साजरा केला त्यात त्यांची ही भावना स्पष्टपणे दिसत होती. जगभरात झालेला भारतीय वारसा आणि संस्कृतीचा असा विस्तार पाहिल्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.
मित्रांनो, या महिन्यात जगभर 10 वा योग दिवस उत्साहाने जल्लोषात साजरा झाला.
मी देखील जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगरला आयोजित केलेल्या योग कार्यक्रमात सहभागी झालो होते. काश्मीरमध्ये तरुणांसोबतच भगिनी आणि मुलीही योग दिनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
जसजसे योग दिनाचे आयोजन रुळत आहे, आणखी पुढे जात आहे तसतसे नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. जगभरात योग दिनाच्या निमित्ताने अनेक अद्भुत गोष्टी घडल्या आहेत. सऊदी अरेबियात प्रथमच एक महिला- अल हनोफ सादजी ह्यांनी सामूहिक योग कार्यक्रमाचे नेतृत्व केले. एका सौदी महिलेने मुख्य योगासन सत्रांच संचालन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यावेळी योग दिनानिमित्त इजिप्तमध्ये छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाईल नदीकाठी, लाल समुद्राच्या किनाऱ्यावर आणि पिरॅमिड्सच्या पार्श्वभूमीवर योग करत असलेल्या लोकांचे छायाचित्रे खूपच प्रसिद्ध झाली.
म्यानमारचा माराविजया पॅगोडा कॉम्प्लेक्स तेथील संगमरवरी बुद्ध पुतळ्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. तेथे देखील 21जून रोजी एक शानदार योग सत्र आयोजित करण्यात आले होते.
बहरीन मध्ये दिव्यांग मुलांसाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्रीलंकेतील सुप्रसिद्ध युनेस्को हेरिटेज साइट असलेल्या गॉल किल्ल्यामध्ये देखील एक संस्मरणीय योग कार्यक्रमाचे आयोजन झाले.
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ऑबझर्वेशन डेकवर ही लोकांनी योगासने केली. मार्शल बेटांवरही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या गेलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात तिथल्या राष्ट्रपतींनीही भाग घेतला. भूतानमधील थिम्पू येथेही योग दिनाचा एक मोठा कार्यक्रम झाला, ज्यात माझे मित्र भूतानचे पंतप्रधान टोबगेदेखील सहभागी झाले होते. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात योगासने करणाऱ्या अनेक लोकांची विहंगम दृश्ये आपण सर्वांनी पाहिली. मी योग दिवसात सहभागी झालेल्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार मानतो.
माझी तुम्हाला नेहमीसाठीच एक विनंती आहे. आपण योगाचा फक्त एक दिवसच सराव करायचा नाही आहे तर नियमितपणे योगासने करायची आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील.
मित्रांनो, भारतातील अनेक उत्पादने अशी आहेत ज्यांना जगभरात खूप मागणी असते आणि जेव्हा आपण भारतातील कोणतेही स्थानिक उत्पादन विश्वपातळीवर लोकप्रिय झालेले बघतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटणे अगदी स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन आहे अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात अराकू कॉफीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ही कॉफी तिच्या अप्रतिम चवी साठी आणि सुगंधासाठी ओळखली जाते. अराकू कॉफीच्या लागवडीत सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे जोडली गेलेली आहेत. अराकू कॉफीच्या प्रसारामध्ये गिरीजन सहकारी संस्थेची महत्वाची भूमिका आहे. त्यांनी इथल्या शेतकरी बंधू-भगिनींना एकत्र आणले आणि अराकू कॉफीच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. कोंडा डोरा आदिवासी समुदायाला देखील याचा मोठा फायदा झाला आहे. आर्थिक कमाईसोबतच त्यांना आता एक सन्मानपूर्ण जीवन मिळाले आहे. मला आठवते आहे की एकदा विशाखापट्टणम मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गारू यांच्यासोबत मला ह्या कॉफीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली होती. ह्या कॉफीची चव तर काही विचारूच नका! कमालीची चविष्ट आहे ही कॉफी! अराकू कॉफीला अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीत झालेल्या G-20 शिखर परिषदेतही ह्या कॉफीचा बोलबाला झाला होता. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हीही अराकू कॉफीचा अवश्य आस्वाद घ्या.
मित्रांनो, स्थानिक उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यामध्ये आपले जम्मू-काश्मीरमधील लोकही मागे नाहीत. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरने जे करून दाखवले ते देशभरातील लोकांसाठी एक उदाहरण आहे. येथील पुलवामाहून लंडनला मटारची/ स्नोपीजची पहिली खेप पाठवण्यात आली. काही लोकांच्या मनात कल्पना आली की काश्मीरमध्ये वाढणाऱ्या विदेशी भाज्यांना जगाच्या नकाशावर आणता येईल.. आणि मग काय .. चाकुरा गावच्या अब्दुल रशीद मीरजी ह्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्यासोबतच गावातील इतर शेतकऱ्यांच्या जमिनी एकत्र करून त्यावर स्नोपीज / मटार ची लागवड करायला सुरुवात केली आणि लवकरच काश्मीरमधून स्नोपीज लंडनला पोहोचू लागले. या यशाने जम्मू-काश्मीरच्या जनतेसाठी समृद्धीचे नवीन दरवाजे उघडले आहेत. आपल्या देशात अश्या अद्वितीय उत्पादनांची कमतरता नाही. आपण अशी उत्पादने कृपया #myproductsmypride ह्या हॅशटॅगसह शेअर करा. मी आगामी ‘मन की बात’मध्येही या विषयावर चर्चा करणार आहे.
मम प्रिया: देशवासिन:
अद्य अहं किञ्चित् चर्चा संस्कृत भाषायां आरभे |
तुम्ही विचार करत असाल की 'मन की बात'मध्ये मी अचानक संस्कृतमध्ये का बोलायला लागलो? याचे कारण म्हणजे आज संस्कृतशी संबंधित एक विशेष निमित्त !
आज, ३० जूनला आकाशवाणीच्या संस्कृत वार्तापत्राचे प्रसारण सुरू झाल्याला 50 वर्षे पूर्ण झाली. ह्या वार्तापत्राने 50 वर्षांपासून कितीतरी लोकांना संस्कृतशी जोडून ठेवले आहे. मी आकाशवाणी परिवाराचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, प्राचीन भारतीय ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या प्रगतीमध्ये संस्कृतची मोठी भूमिका आहे. आजच्या काळाची मागणी आहे की आपण संस्कृतला सन्मान देऊ या आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील जोडू या. आजकाल बंगळुरूमध्ये बरेच लोक असेच प्रयत्न करत आहेत. बेंगळुरू मध्ये एक मोठी बाग आहे- कब्बन पार्क! या उद्यानात येथील लोकांनी एक नवीन परंपरा सुरू केली आहे. येथे आठवड्यातून एकदा, दर रविवारी मुले, तरुण आणि मोठी माणसे एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतात. एवढेच नाही तर इथे संस्कृतमध्ये अनेक वादविवाद सत्रे आयोजित केली जातात. त्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे – संस्कृत वीकेंड! याची सुरुवात एका वेबसाईटद्वारे ए समष्टी गुब्बी जी यांनी केली होती. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेला हा उपक्रम पाहता पाहता बेंगळुरूच्या लोकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. जर आपण सर्वांनी अशा प्रकारच्या प्रयत्नांना हातभार लावला तर जगातील प्राचीन आणि वैज्ञानिक अशा संस्कृत भाषेतून बरेच काही शिकता येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 'मन की बात' च्या या भागाद्वारे आपल्याशी संवाद साधताना खूप बरे वाटले. आता हा कार्यक्रम पूर्वीसारखाच सुरू राहील.
आजपासुन एक आठवड्याने पवित्र रथयात्रेला सुरुवात होणार आहे. महाप्रभू जगन्नाथांचा आशीर्वाद सर्व देशवासियांना निरंतर लाभो हीच सदिच्छा.अमरनाथ यात्राही सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत पंढरपूरची वारीही सुरू होणार आहे. मी या यात्रांमध्ये सामील होणाऱ्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो.
नंतर कच्छी नवीन वर्ष- आषाढी बीज हा देखील सण येतो आहे. या सर्व सण उत्सवांसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास वाटतो की सकारात्मकतेशी जोडलेल्या अशा लोकसहभागाच्या प्रयत्नांविषयी तुम्ही मला कळवत राहाल.
पुढच्या महिन्यात पुन्हा तुमच्याशी संवाद साधता येण्याची मी वाट पाहत आहे, तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद, नमस्कार!
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.
मित्रहो, काही दिवसांतच 8 मार्चला आपण 'महिला दिवस' साजरा करणार आहोत. हा विशेष दिवस म्हणजे, देशाच्या विकासयात्रेतल्या नारीशक्तीच्या योगदानाला वंदन करण्याची संधी! स्त्रियांना समान संधी मिळतील तेव्हाच जग समृद्ध होईल, असं आदरणीय महाकवी भारतीयार यांनी म्हणून ठेवलं आहे. आज भारताची नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात यशाची नवनवी शिखरं सर करते आहे. काही वर्षांपूर्वी कोणी विचार केला होता, की 'आपल्या देशात, खेड्यात राहणाऱ्या स्त्रियाही ड्रोन उडवतील' ! पण आज हे शक्य होत आहे. आज तर गावोगावी ड्रोनदीदीची इतकी चर्चा होते आहे, की प्रत्येकाच्या तोंडी नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी हाच घोष सुरू आहे. प्रत्येक जण त्यांच्याबद्दलच चर्चा करत आहे. ऐका खूप मोठ्या कुतूहलाने जन्म घेतला आहे, आणि म्हणूनच मीही विचार केला, की यावेळी 'मन की बात'मध्ये एखाद्या नमो ड्रोन दीदीशी का बोलू नये? उत्तर प्रदेशच्या सीतापूरच्या नमो ड्रोन दीदी सुनीताजी आत्ता आपल्याबरोबर आहेत. चला, त्यांच्याशी गप्पा मारूया..
मा.मोदी-: सुनीताजी, नमस्कार.
सुनीतादेवी -: नमस्ते सर.
मा. मोदी-: बरं, सुनीताजी आधी मला तुमच्याबद्दल माहिती हवी आहे, तुमच्या कुटुंबाविषयी माहिती हवी आहे. थोडं काही सांगा ना.
सुनीतादेवी -: सर, आमच्या कुटुंबात दोन मुलं आहेत, मी, माझे पती आणि माझी आई आहे.
मा.मोदी-: सुनीताजी, तुमचं शिक्षण किती झालंय?
सुनीतादेवी -: सर बीए फायनल.
मा.मोदी-: आणि घरी तसा व्यवसाय वगैरे काय?
सुनीतादेवी -: व्यवसाय म्हणजे शेतीवाडीशी संबंधित कामं करतो, शेती वगैरे..
मोदीजी -: बरं सुनीताजी, ड्रोन दीदी होण्याचा तुमचा प्रवास सुरू तरी कसा झाला? तुम्हाला प्रशिक्षण कुठे मिळालं, काय काय बदल घडून आले, काय घडलं.. मला सगळं पहिल्यापासून ऐकायचंय.
सुनीतादेवी -: हो सर, आमचं प्रशिक्षण फूलपुर IFFCO company मध्ये झालं होतं, अलाहाबादमध्ये. तिथेच आम्ही शिकलो.
मोदीजी -: मग तोपर्यंत तुम्ही कधी ड्रोनबद्दल ऐकलं होतं?
सुनीतादेवी -: सर, ऐकलं तर नव्हतं.. पण एकदा सीतापूरच्या कृषी विज्ञान केंद्रात बघितलं होतं. तेव्हा पहिल्यांदा ड्रोन बघितला होता.
मोदीजी -: सुनीताजी, मला असं सांगा, की समजा तुम्ही पहिल्या दिवशी तिथे गेलात..
सुनीतादेवी -: हो..
मोदीजी -: पहिल्या दिवशी तुम्हाला ड्रोन दाखवला असेल, मग फळ्यावर काहीतरी शिकवलं असेल, कागदावर शिकवलं असेल, मग मैदानात नेऊन सराव झाला असेल, काय काय झालं असेल! तुम्ही मला सगळं पूर्ण वर्णन करून सांगाल?
सुनीतादेवी -: हो, हो, सर. पहिल्या दिवशी आम्ही सगळे तिकडे पोहोचलो नि त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं प्रशिक्षण सुरू झालं. आधी तर थिअरी शिकवली. दोन दिवस वर्ग चालले. वर्गात खूप गोष्टी शिकवल्या- ड्रोनचे भाग कोणते, तुम्ही कसं-कसं काय-काय करायचं आहे, हे सगळं थिअरीमध्ये शिकवलं. तिसऱ्या दिवशी ना सर, आमची एक परीक्षा घेतली. नंतर सर परत computer वरही एक पेपर झाला. म्हणजे, आधी वर्ग झाला, मग परीक्षा घेतली. मग आमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेतलं- म्हणजे ड्रोन कसा उडवायचा, काय करायचं, नियंत्रण कसं करायचं, अशी प्रत्येक गोष्ट practical च्या माध्यमातून शिकवली गेली.
मोदीजी -: मग, ड्रोन काम काय करणार, ते कसं शिकवलं?
सुनीतादेवी -: सर, ड्रोन काम करणार म्हणजे जसं बघा की- आता पीक वाढतंय. पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा असं काही, पावसाळ्यात अडचणी येतात - आम्ही शेतात उभ्या पिकाच्या आत जाऊच शकत नाही, तर मग मजूर तरी कसा आत जाईल? अशा वेळी ड्रोनच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप फायदा होईल आणि शेतात शिरावंही लागणार नाही. आम्ही मजूर लावून जे काम करतो, ते काम ड्रोनच्या मदतीने बांधावर उभं राहून आपलं आपण होऊ शकतं. शेतात काही किडे वगैरे झाले तर त्यापासूनही आपल्याला सावध राहावं लागतं. मग काही त्रास होत नाही आणि शेतकऱ्यांना देखील हे आवडतंय. सर, आम्ही आतापर्यंत 35 एकरवर फवारणी केली आहे.
मोदीजी -: म्हणजे, शेतकऱ्यांनाही याचा फायदा पटतोय?
सुनीतादेवी -: हो सर, शेतकरीदेखील याबद्दल खूप समाधानी आहेत. खूप आवडतंय म्हणून सांगतात. "वेळही वाचतो. सगळी सोय तुम्ही स्वतः बघता, पाणी, औषधं सगळंच तुम्ही बरोबर घेऊन येता, आणि आम्हाला येऊन फक्त शेत दाखवायचं काम असतं- म्हणजे कुठून कुठपर्यंत माझं शेत आहे" बास. मग माझं सगळं काम अर्ध्या तासात आटोपतं.
मोदीजी-: मग, हे ड्रोन बघायला इतर लोकही येत असतील.. ना?
सुनीतादेवी -: हो सर, खूप गर्दी उसळते. ड्रोन बघायला खूप लोक येतात. मोठे मोठे शेतकरी नंबरपण घेऊन जातात, सांगतात- "आम्हीपण बोलवू तुम्हाला फवारणी करायला".
मोदीजी -: अच्छा! असं बघा, माझी एक मोहीम आहे - लखपती दीदी घडवण्याची. आज जर देशभरातल्या भगिनी ऐकत असतील, तर एक ड्रोन दीदी आज पहिल्यांदाच माझ्याशी गप्पा मारत आहे.. मग काय सांगाल तुम्ही?
सुनीतादेवी-: आज मी जशी एकटी ड्रोन दीदी आहे तशा हजारो भगिनी पुढे याव्यात म्हणजे त्याही माझ्यासारख्या ड्रोन दीदी होतील. मला खूप आनंद होईल, म्हणजे मी आत्ता एकटीच असले तरी पण माझ्यासोबत जेव्हा हजारो महिला उभ्या असतील तेव्हा छान वाटेल- की मी एकटी नाही खूप जणी माझ्याबरोबर ड्रोन दीदी म्हणून ओळखल्या जातायत.
मोदीजी -: चला सुनीताजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! या नमो ड्रोन दीदी आपल्या देशात शेतीला आधुनिक करण्यासाठी खूप मोठं माध्यम म्हणून काम करतायत. माझ्या खूप खूप शुभेच्छा !
सुनीतादेवी -: थॅंक यू, थॅंक यू सर !
मोदीजी -: थॅंक यू .
मित्रहो, आज देशात नारीशक्ती कुठेतरी मागे पडली आहे असं एकही क्षेत्र नाही. आणखी एका क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या नेतृत्व क्षमता खूप सुंदर पद्धतीने दाखवून दिल्या आहेत. ते क्षेत्र म्हणजे- नैसर्गिक शेती, जलसंवर्धन आणि स्वच्छता. रसायनांमुळे आपला धरतीमातेला जो त्रास होतोय, जी पीडा, जे दुःख होत आहे, ते समजून घेऊन धरणीमातेला वाचवण्यासाठी देशातली मातृशक्ती महत्त्वाची भूमिका बजावतेय. देशाच्या कानाकोपऱ्यात आता महिला नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत. आज जर देशात 'जल जीवन मिशन'च्या अंतर्गत इतकं काम होतान दिसत असेल, तर त्यामागे पाणी समित्यांची खूप मोठी कामगिरी आहे. या पाणी समित्यांचं नेतृत्व महिलांकडेच आहे. त्याखेरीज आपल्या भगिनी, कन्या जलसंवर्धनासाठी चहूबाजूंनी प्रयत्न करतच आहेत. आता अशाच एक ताई माझ्याबरोबर फोन लाईनवर आहेत त्यांचं नाव- कल्याणी प्रफुल्ल पाटील. त्या महाराष्ट्रात राहतात. चला, कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी बोलून त्यांचा अनुभव जाणून घेऊया.
पंतप्रधान - : कल्याणीजी, नमस्ते.
कल्याणीजी- : नमस्ते सरजी नमस्ते.
पंतप्रधान-: कल्याणीजी, आधी थोडंसं तुमच्याबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या कामाबद्दल थोडं जरा सांगा ना.
कल्याणीजी- : सर मी एमएससी मायक्रोबायोलॉजी केलं आहे. माझ्या घरी माझे पती , सासुबाई आणि माझी दोन मुलं आहेत. गेल्या तीन वर्षापासून मी आमच्या ग्रामपंचायतीत काम करते.
पंतप्रधान - : आणि मग गावात शेतीचं काम सुरू केलं? कारण तुमच्याकडे शेतीचं बेसिक ज्ञानसुद्धा आहे , तुमचं शिक्षणही या क्षेत्रात झालंय. आणि आता तुम्ही शेतीच्या कामाला लागला आहात, तर मग तुम्ही कोणते नवीन प्रयोग केलेत?
कल्याणीजी- : सर आमच्याकडच्या दहा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत, त्या एकत्रित करून त्यातून आम्ही ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय फवारणी तयार केली आहे. आपण एरवी जे कीटनाशक वगैरे मारतो त्यातून उपद्रवी किडीसह आपल्याला उपयोगी अशी मित्रकीडही नष्ट होते आणि आपल्या मातीचं प्रदूषण होतं. ती रसायनं पाण्यामध्ये मिसळल्यावर त्यांच्यामुळे आपल्या शरीरावरही हानिकारक परिणाम दिसून येतात. हे सगळं लक्षात घेऊन आम्ही पेस्टिसाइडचा कमीत कमी वापर करतो.
पंतप्रधान - : म्हणजे एक प्रकारे तुम्ही पूर्णपणे नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करत आहात.
कल्याणीजी- : हो आपली जी पारंपरिक शेती आहे, तशी केली आम्ही मागच्या वर्षी.
पंतप्रधान - : मग कसा अनुभव आला नैसर्गिक शेतीचा?
कल्याणीजी- : सर, आमच्या स्त्रियांना तो जो खर्च आला तो कमी वाटला. आणि जे उत्पादन मिळालं ना सर त्यातून समाधान मिळालं- आम्ही कीटकनाशक न वापरता हे केलं. कारण आता कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. शहरी भागात तर ते आहेच, पण गावांमध्येही त्याचं प्रमाण वाढतंय. तर मग त्याचा विचार केल्यास आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर हा मार्ग आवश्यक आहे. असा विचार करून त्या स्त्रियाही यामध्ये सक्रिय सहभागी होतायत.
पंतप्रधान - : बरं कल्याणी जी तुम्ही जलसंवर्धनातही काहीतरी काम केलंय ? काय केलं आहे त्यामध्ये तुम्ही?
कल्याणीजी- : सर, रेन वॉटर हार्वेस्टिंग. सर आमच्या इथल्या जेवढ्या शासकीय इमारती आहेत - जसं प्राथमिक शाळा ,अंगणवाडी, आमच्या ग्रामपंचायतीची वास्तू- तिथलं पावसाचं पाणी सगळं एकत्र करून आम्ही एका जागी गोळा केलंय. आणि रिचार्ज शाफ्ट असतो ना सर, तो वापरलाय. जेणेकरून पावसाचं पाणी जमिनीच्या आत झिरपलं पाहिजे. अशाप्रकारे आम्ही 20 रिचार्ज शाफ्ट आमच्या गावात बसवले आहेत आणि 50 रिचार्ज शाफ्टना मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच तेही काम चालू होईल.
पंतप्रधान - : वा कल्याणी जी, तुमच्याशी बोलून अगदी छान वाटलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
कल्याणीजी- : धन्यवाद धन्यवाद सर , मलाही तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. म्हणजे असं वाटतंय की माझं आयुष्य पूर्णपणे सार्थकी लागलं.
पंतप्रधान - : सेवा करत राहा, बस! .. चला तुमचं नावच कल्याणी आहे तर तुम्ही कल्याण तर नक्कीच करणार! धन्यवाद ताई , नमस्कार!
कल्याणीजी- : धन्यवाद सर, धन्यवाद !
मित्रहो, सुनीताजी असोत की कल्याणीजी, वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या नारीशक्तीच्या यशोगाथा अतिशय प्रेरणादायी आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या नारीशक्तीमधल्या या चैतन्याचं अंतःकरणापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचं महत्त्व खूप वाढलंय. मोबाईल फोन, डिजिटल उपकरणं ही आपल्या सर्वांच्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक बनलेत. पण आता वन्य प्राण्यांशी जुळवून घेण्याबद्दलही डिजिटल उपकरणांची मदत होते आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता? काही दिवसातच, तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे. वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे च्या मध्यवर्ती संकल्पनेत डिजिटल इनोव्हेशन म्हणजे डिजिटल अभिनवतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. गेल्या काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांनी देशात वाघांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपूर मधल्या टायगर रिझर्व मध्ये वाघांची संख्या अडीचशे पेक्षा जास्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मनुष्य विरुद्ध वाघ असा संघर्ष कमी करण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जात आहे. तिथे गाव आणि जंगलाच्या सीमेवर कॅमेरे लावण्यात आले आहेत. जेव्हा एखादा वाघ गावाजवळ येतो तेव्हा एआयच्या मदतीने स्थानिक लोकांच्या मोबाईलवर सावधगिरीचा इशारा पाठवला जातो. आज या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या तेरा गावांमध्ये, या व्यवस्थेतून लोकांचीही सोय झाली आहे आणि वाघांनाही सुरक्षा मिळाली आहे.
मित्रांनो,
आज युवा उद्योजकही वन्य जीव संरक्षण आणि पर्यावरण पर्यटन यासाठी नवोन्मेषी संकल्पना पुढे आणत आहेत. उत्तराखंडमध्ये रूडकीमध्ये ‘रोटोर प्रीसिझन ग्रुप्स‘नं वाइल्डलाइफ इन्स्टिट्युट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्यानं एक वैशिष्ट्यपूर्ण ड्रोन तयार केला आहे. त्या ड्रोनच्या मदतीनं केन नदीमधील मगरींवर लक्ष ठेवता येतं. अशाच पद्धतीनं बंगलुरूच्या एका कंपनीनं ‘बघिरा’ आणि ‘गरूड’ या नावांची अॅप तयार केली आहेत. बघीरा अॅपच्या माध्यमातून जंगल सफारीच्यावेळी वाहनाचा वेग आणि इतर कोणत्या गोष्टी केल्या जातात, त्यावर पाळत ठेवता येते. देशातील अनेक व्याघ्र संवर्धन प्रकल्पामध्ये त्याचा उपयोग केला जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांच्यावर आधारित गरूड अॅप एखाद्या सीसीटीव्हीला जोडल्यानंतर रियल टाइम अॅलर्ट म्हणजे अगदी त्या क्षणी सूचनेची घंटी मिळते. वन्य जीवांच्या संरक्षणासाठी अशा पद्धतीनं सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्यामुळे आपल्या देशाची जैव विविधता आणखी समृद्ध होत आहे.
मित्रांनो,
भारतामध्ये तर निसर्गाबरोबर समतोल साधणे, ही गोष्ट आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे. आपण हजारों वर्षांपासून निसर्ग आणि वन्यजीव यांच्याबरोबर सह-अस्तित्वाच्या भावनेनं वास्तव्य करीत आलो आहोत. जर तुम्ही कधी महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये गेलात तर तिथं या गोष्टीचा तुम्हाला अनुभव घेता येईल. या व्याघ्र प्रकल्पाजवळच खटकली गावामध्ये वास्तव्य करणा-या आदिवासी कुटुंबांनी सरकारच्या मदतीनं आपलं घर ‘होम स्टे’ बनवलं आहे. हे घर त्यांच्या उत्पन्नाचं मोठं साधन बनत आहे. याच गावामध्ये वास्तव्य करणा-या कोरकू आदिवासी समाजातील प्रकाश जामकर जी, यांनी आपल्या दोन हेक्टर जमिनीवर सात खोल्यांचं ‘होम स्टे’ तयार केलं आहे. त्यांच्याकडे मुक्कामाला येणा-या पर्यटकांच्या भोजनाची व्यवस्था जामकर कुटुंबीय करतात. आपल्या घराच्या सभोवती त्यांनी औषधी रोपांबरोबरच आंबा आणि कॉफीची झाडंही लावली आहेत. यामुळे पर्यटकांना आकर्षण वाटतं , त्याचबरोबर इतर लोकांनाही रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी पशुपालनाविषयी चर्चा केली जाते,त्यावेळी नेहमीच गाय, म्हैस यांच्यापर्यंतच ही चर्चा होते. परंतु बकरी सुद्धा एक महत्वपूर्ण पशूधन आहे. याविषयी फारशी चर्चा केली जात नाही. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये असंख्य लोक बकरी पालन व्यवसाय करतात. ओडिशातील कालाहांडीमध्ये बकरी पालन हा व्यवसाय, गावातील लोकांच्या उत्पन्नाचं साधन तर बनला आहेच, त्याचबरोबर त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्याच्या कामामध्ये मोठं , महत्वपूर्ण माध्यम बनत आहे. या प्रयत्नांमागे जयंती महापात्रा जी आणि त्यांचे पती बीरेन साहू जी यांनी घेतलेला एक मोठा निर्णय आहे. हे दोघेही बंगलुरूमध्ये मॅनेजमेंट प्रोफेशनल होते. परंतु त्यांनी या कामातून ब्रेक घेवून कालाहांडीच्या सालेभाटा या गावी येण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण भागातील समस्यांवर तोडगा निघावा, आणि त्याचबरोबर गामस्थ सशक्तही व्हावेत, यासाठी काहीतरी वेगळं, भरीव कार्य करण्याची या मंडळींची इच्छा होती. सेवा आणि समर्पण या भावनेनं विचार करून त्यांनी ‘माणिकास्तू अॅग्रो’ची स्थापना केली आणि शेतकरी बांधवांबरोबर काम सुरू केलं. जयंती आणि बीरेन यांनी एक अभिनव उपक्रम म्हणून – ‘माणिकास्तू गोट बॅंक’ ही सुरू केली. त्यांनी सामुदायिक स्तरावर बकरी पालनाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या गोट फार्ममध्ये सध्या जवळपास डझनभर बक-या आहेत. माणिकास्तू गोट बॅंकेनं शेतक-यांसाठी एक संपूर्ण कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यानुसार शेतक-यांना 24 महिन्यांसाठी दोन बक-या दिल्या जातात. दोन वर्षांमध्ये बक-या 9 ते 10 कोकरांना-करडूंना जन्म देतात . त्यापैकी 6 कोकरांना बॅंकेकडे ठेवलं जातं. आणि राहिलेल्या कोकरांना बकरी पालन करणा-या त्या परिवाराकडं सोपवलं जातं. इतकंच नाही, बक-यांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा- सेवाही पुरवल्या जातात. आज 50 गावातील एक हजारांपेक्षा जास्त शेतकरी ही योजना चालवणा-या दांपत्याबरोबर जोडले गेले आहेत. त्यांच्या मदतीनं गावातील लोक पशूपालन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करीत आहेत. विविध क्षेत्रातील यशस्वी व्यावसायिक लहान शेतक-यांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवनवीन गोष्टींचा अवलंब करीत आहेत, हे पाहून मला खूप चांगलं वाटतं. या मंडळींकडून केला जाणारा प्रयत्न प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संस्कृतीनं शिकवलं आहे की - ‘परमार्थ परमो धर्मः’ याचा अर्थ इतरांना मदत करणं हे, सर्वात महान कर्तव्य आहे. याच भावनेनं विचार करून, त्यानुसार जगणारी मंडळी आपल्या देशात अगणित आहेत. ही मंडळी निःस्वार्थ भावनेनं इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अशाच एक व्यक्तीविषयी थोडी माहिती देतो. हे आहेत - बिहारमधील भोजपूर इथं वास्तव्य करणारे भीम सिंह भवेश जी! त्यांच्या भागातल्या मुसहर जातीच्या लोकांमध्ये त्यांच्या कार्याची खूप चर्चा आहे. म्हणूनच आज त्यांच्याविषयी तुमच्याशी बोलावं, असं मला वाटलं. बिहारमध्ये मुसहर हा एक अतिशय वंचित राहिलेला समुदाय आहे. हा समाज खूप गरीब आहे. भीम सिंह भवेश जींनी या समुदायातील मुलांच्या शिक्षणावर आपलं ध्यान केंद्रीत केलं . शिक्षण घेतलं तर या मुलांचं भविष्य उज्ज्वल बनू शकेल, असा विचार त्यांनी केला. त्यांनी मुसहर जातीच्या जवळपास आठ हजार मुलांना शाळेत प्रवेश घेवून दिला. त्यांनी मुलांसाठी मोठं ग्रंथालयही तयार केलं. या ग्रंथालयामध्ये मुलांच्या शिक्षणाची- अभ्यासाची चांगली सुविधा केली. भीम सिंह जी, आपल्या समुदायातील सदस्यांची आवश्यक असणारी सर्व कागदपत्रं तयार करण्यासाठी तसंच त्यांचे अर्ज भरण्यासाठी मदत करतात. यामुळे आवश्यक गरजांची पूर्ती करणारी साधन सामुग्री गावातल्या लोकांपर्यंत पोहोवणं सुकर बनलं आहे. गावातल्या लोकांना वेगानं जीवनावश्यक सामुग्री मिळू शकते. यामुळे आता लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी झाल्या आहेत. लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी, त्यांनी 100 हून अधिक वैद्यकीय शिबिरे भरवली आहेत. ज्यावेळी कोरोना महामारीचं संकट आलं होतं, त्यावेळी भीम सिंहजी यांनी त्यांच्या क्षेत्रांतील सर्व लोकांनी लस घ्यावी, यासाठी खूप प्रोत्साहन दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये भीम सिंह भवेश जीं सारखे अनेक लोक आहेत, जे समाजामध्ये अशी अनेक चांगली कामं करण्यामध्ये गुंतली आहेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही आपल्या कर्तव्याचं पालन केलं तर, ती गोष्ट एक सशक्त राष्ट्र निर्मितीमध्ये खूप चांगली, मोठी मदत ठरणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, विविधता आणि आपल्या संस्कृतीचे वेगवेगळे रंग या गोष्टी भारताच्या सौंदर्यामध्ये सामावलेल्याच आहे. कितीतरी लोक निःस्वार्थ भावनेनं भारतीय संस्कृतीच्या संरक्षणाच्या कार्यामध्ये गुंतले आहेत आणि तिचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे पाहून मला खूप चांगलं वाटतं. तुम्हाला असं कार्य करणारे लोक भारताच्या प्रत्येक भागामध्ये असल्याचं दिसून येईल. यामध्ये भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांची संख्याही खूप मोठी आहे. जम्मू -काश्मीरमध्ये गान्दरबलचे मोहम्मद मानशाह हे गेल्या तीन दशकांपासून गोजरी भाषा संरक्षित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहेत. ते गुज्जर बकरवाल समुदायातील आले आहेत. हा समाज आदिवासी समाजांपैकी एक आहे. त्यांना शालेय वयामध्ये शिक्षण घेण्यासाठी अतिशय कठीण परिश्रम घ्यावे लागले. शिकायला जाण्यासाठी त्यांना रोज 20 किलोमीटर अंतर पायी जावं लागत होतं. अशा अनेक आव्हानांना तोंड देत त्यांनी मास्टर डिग्री मिळवली. शिकण्यासाठी संघर्ष करत असतानाच त्यांनी आपली भाषा संरक्षित करण्याचा दृढ निश्चय केला. साहित्य क्षेत्रामध्ये मानशाह जी यांनी केलेल्या कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की, त्यासाठी जवळपास 50 ग्रंथाची निर्मिती करून, त्यामध्ये त्यांचे कार्य जतन करून ठेवलं आहे. यामध्ये त्यांच्या कविता आणि लोकगीतंही आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद गोजरी भाषेत केला आहे.
मित्रांनो, अरूणाचल प्रदेशमध्ये तिरप इथले बनवंग लोसू हे शिक्षक आहेत. त्यांनी वांचो भाषेच्या प्रसारामध्ये आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. ही भाषा अरूणाचल प्रदेश, नागालॅंड आणि आसामच्या काही भागामध्ये बोलली जाते. त्यांनी एक भाषाशाळा बनविण्याचं काम केलं आहे. या वांचो भाषेची एक लिपीही त्यांनी तयार केली आहे. ही भाषा लुप्त होवू नये, तिचं संवर्धन व्हावं , यासाठी भावी पिढ्यांनाही वांचो भाषा ते शिकवतात.
मित्रांनो, गीत आणि नृत्य या माध्यमांतून आपली संस्कृती आणि भाषा जतन करण्याचं काम करणारी अनेक मंडळी आपल्या देशामध्ये आहेत. याबाबतीत कर्नाटकातील वेंकप्पा अम्बाजी सुगेतकर यांचं जीवनही खूप प्रेरणादायक आहे. बागलकोट इथं वास्तव्य करणारे सुगेतकर एक लोकगीत गायक आहेत. त्यांनी एक हजारांपेक्षा जास्त गोंधळी गाणी गायली आहेत. त्याचबरोबर, या भाषेमध्ये असलेल्या कथांचाही खूप प्रचार- प्रसार केला आहे. त्यांनी कोणतंही शुल्क न घेता, अगदी मोफत शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षणही दिलं आहे. भारतामध्ये आनंदी, उत्साही लोकांची कधीच कमतरता भासत नाही. अशा लोकांमुळे आपल्या संस्कृतीची धारा निरंतर वाहत असून, ती समृद्ध बनत आहे. तुम्हीही अशा मंडळींकडून प्रेरणा घ्यावी, आणि आपलं - वेगळं काहीकरण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला निखळ आनंद मिळत असल्याची प्रचिती येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोनच दिवस आधी मी वाराणसीमध्ये होतो. वाराणसीत मी एक अनोख्या छायाचित्रांचं प्रदर्शन पाहिलं. काशी आणि परिसरातील युवकांनी कॅम-यातून जी क्षणचित्रं टिपली होती, ती अतिशय अद्भूत होती. यामध्ये अनेक छायाचित्रे तर मोबाइल कॅमे-यानं टिपलेली होती. खरोखरीच, आज; ज्याच्या हातात मोबाइल आहे, ती व्यक्ती एक कन्टेट क्रिएटर म्हणजेच ‘आशय निर्माण करणारी‘ बनली आहे. लोकांसमोर आपल्यातील कौशल्य आणि प्रतिभेचं प्रदर्शन करण्यासाठी समाज माध्यमांनीही खूप मोठी मदत केली आहे. भारतातील आपले युवा सहकारी ‘कटेंट क्रिएशन’ म्हणजेच आशय निर्मिती क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करीत आहेत. मग यामध्ये कोणत्याही समाज माध्यमाचे व्यासपीठ असो, आपल्या वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळा आशय सामायिक करणारे आपले युवक सहकारी भेटतातच. पर्यटन असो, समाजकारण असो, सार्वजनिक सहभाग असो, अथवा एखादा प्रेरणादायक जीवन प्रवास असो, यांच्याशी संबंधित अनेक प्रकारचा मजकूर, आशय समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. अशा प्रकारे आशय निर्मिती करणा-या देशाच्या युवावर्गाचा आवाज आज खूप प्रभावी बनला आहे. त्यांच्या प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी देशामध्ये ‘नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड’ म्हणजेच राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार सुरू केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गाअंतर्गत आपल्या आशयामुळे परिवर्तन घडवून आणणा-यांचा सन्मान करण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये सामाजिक परिवर्तन घडून यावं, यासाठी प्रभावी आवाज बनला पाहिजेआणि त्यासाठी जे तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत, यांचा विचार पुरस्कारासाठी केला जाईल. ही स्पर्धा ‘माय गव्ह’ वर आहे. आणि या स्पर्धेमध्ये सर्व कंटेट क्रिएटर्सनी म्हणजेच आशय निर्मात्यांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. जर तुम्हाला अशा मनोरंजक, आकर्षक आशय निर्मिती करणा-यांविषयी काही माहिती असेल, तर त्यांचं नाव तुम्हीही ‘नॅशनल क्रिएटर्स अॅवॉर्ड’साठी पाठवू शकता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं ‘ मेरा पहला वोट - देश के लिए’ अशी आणखी एक मोहीम सुरू केली आहे, त्याचा मला आनंद वाटतो. या मोहिमेच्या माध्यमातून जी युवामंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांनी अधिकाधिक संख्येनं मतदान करण्याची विनंती केली आहे. अतिशय उत्साही, अतिशय जोशात असलेल्या आपल्या युवाशक्तीविषयी भारताला खूप अभिमान वाटतो. आपले युवा सहकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये जितक्या जास्त प्रमाणात सहभागी होतील, त्याचा परिणाम देशाच्या दृष्टीनं, तितका जास्त लाभदायक ठरेल. पहिल्यांदाच मतदान करणा-या सर्व मतदारांना माझी विनंती आहे की, त्यांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं. वयाची 18 वर्ष झाल्यानंतर तुम्हा युवकांना 18 व्या लोकसभेसाठी सदस्य निवडण्याची संधी मिळत आहे. याचा अर्थ 18 वी लोकसभासुद्धा युवकांच्या आकांक्षांचं प्रतीक असेल. म्हणूनच तुमच्या मताचं महत्व अधिक वाढलं आहे. सर्वसाधारण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तुम्ही तरूण मंडळींनी फक्त राजकीय कार्यक्रमांचा भाग बनलं पाहिजे, असं नाही तर या काळात होणा-या चर्चा आणि वादविवाद यांच्याविषयीही जागरूक बनावं. आणि एक महत्वाची गोष्ट स्मरणात ठेवावी - ‘मेरा पहला वोट -देश के लिए‘!! देशामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इन्फ्लूएन्सर म्हणजेच प्रभावक आहेत, अशा व्यक्तींनाही मी विनंती करतो. त्यांनी या मोहिमेमध्ये उत्साहानं सहभागी व्हावं. यामध्ये मग हे प्रभावक क्रीडा क्षेत्रातील असतील, सिने जगतातील असतील, साहित्य क्षेत्रातील असतील किंवा इतर व्यावसायिक असतील, किंवा आपल्या इन्स्टाग्रॅम आणि यूट्यूब माध्यमामध्ये प्रभावी
असतील, त्यांनीही या अभियानामध्ये सहभागी होवून पहिल्यांदाच मतदान करणा-याआपल्या मतदारांना प्रोत्साहन द्यावं.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या या भागामध्ये माझ्याकडून इतकंच! देशामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. आणि गेल्यावेळेप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये निवडणूक आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. ‘मन की बात‘ या कार्यक्रमांचे 110 भाग झाले. या कार्यक्रमावर सरकारची सावलीही पडणार नाही, इतका तो दूर ठेवला. ही गोष्ट म्हणजे, एक मोठं यश आहे. ‘मन की बात‘ मध्ये देशाच्या सामूहिक शक्तीविषयी चर्चा होते. देशानं केलेल्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची चर्चा होते. एक प्रकारे जनतेचा, जनतेसाठी, जनतेव्दारे तयार होणारा हा कार्यक्रम आहे. तरीही राजकीय मर्यादेचं पालन करताना लोकसभा निवडणुकीच्या या काळामध्ये आता आगामी तीन महिने ‘मन की बात’ चं प्रसारण होणार नाही. आता ज्यावेळी आपल्याबरोबर ‘मन की बात’ मध्ये संवाद साधला जाईल, तो ‘मन की बात’ चा 111वा भाग असेल. यानंतरच्या ‘मन की बात’चा प्रारंभ 111 या शुभ अंकानं होईल, यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असणार? तरीही, मित्रांनो, तुम्हा मंडळींना माझं एक काम करीत रहायचं आहे. ‘मन की बात’ भलेही तीन महिने थांबणार आहे, तरीही देशाची कामगिरी काही थांबणार नाही. म्हणूनच तुम्ही ‘मन की बात‘ हॅशटॅगवर (#) सह समाजाच्या कामगिरीची, देशानं मिळवलेल्या यशाची माहिती समाज माध्यमांवर पोस्ट करीत रहा. काही दिवसांपूर्वी एका युवकानं मला खूप चांगला सल्ला दिला होता. हा सल्ला असा होता की, ‘मन की बात’च्या आत्तापर्यंतच्या भागांचे लहान-लहान व्हिडीओ, यू ट्यूब शॉर्टस् या स्वरूपामध्ये सामायिक केले पाहिजेत. म्हणूनच मी ‘मन की बात’च्या श्रोत्यांना विनंती करतो की, असे शॉर्टस् तुम्ही भरपूर सामायिक करावेत.
मित्रांनो, ज्यावेळी पुढच्यावेळी आपल्याशी संवाद साधला जाईल, त्यावेळी पुन्हा एकदा नवीन चैतन्यानं, नवीन माहिती घेवून तुम्हाला भेटेन. तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी. खूप खूप धन्यवाद ! नमस्कार !!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 2024 मधील हा पहिला ‘मन की बात’ चा कार्यक्रम आहे. अमृतकालामध्ये एक नवा उत्साह, (आनंदाची, जल्लोषाची) नवी लाट जाणवते आहे. आपण सर्व देशवासीयांनी, दोन दिवसांपूर्वी, 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. या वर्षी आपल्या राज्यघटनेलाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि सर्वोच्च न्यायालयालाही 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या लोकशाहीचे हे सण, उत्सव, लोकशाहीची जननी म्हणून, भारताला अधिक बळकट करतात. इतके गहन विचारमंथन करून भारतीय संविधान,(भारताची घटना) तयार केली गेली आहे की तिला जिवंत दस्तावेज असे म्हणतात. या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये , तिसऱ्या प्रकरणात भारतातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे वर्णन करण्यात आले असून, हे खूपच लक्षणीय आहे की आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्या तिसऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या चित्रांना स्थान दिले आहे. प्रभू रामाचे राज्य आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठीही प्रेरणेचा स्त्रोत होते आणि म्हणूनच 22 जानेवारीला अयोध्येत बोलताना मी देव ते देश, राम ते राष्ट्र; या विषयावर बोललो होतो.
मित्रांनो, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामूळे देशातील कोट्यावधी लोक एका धाग्याने बांधले गेले आहेत असे दिसते आहे. सर्वांची भावना एक, सर्वांची भक्ती एक, सर्वांच्या बोलण्यात राम, सर्वांच्या हृदयात राम आहे.
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, यावेळची 26 जानेवारीची परेड फारच अद्भूत (अप्रतिम) होती, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती परेडमधील स्त्री शक्तीची, जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिस दलातील महिलांच्या तुकड्या कर्तव्य पथावर कदम ताल ( संचलन ) करू लागल्या, तेव्हा सर्वाना खूप अभिमान वाटला. महिलांचे घोष पथकासहित संचलन पाहून आणि त्यांचा जबरदस्त समन्वय पाहून देश-विदेशातील लोकांमध्ये जोश आणि उत्साह संचारला. या वेळी परेडमध्ये भाग घेतलेल्या 20 पथकांपैकी 11 पथके तर केवळ महिलांचीच होती. आपण पाहिले की शोभायात्रेत / चित्ररथात देखील सर्व महिला कलाकार होत्या. जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले त्यात सुमारे दीड हजार मुली सहभागी झाल्या होत्या. अनेक महिला कलाकार शंख, नादस्वरम आणि नगारा ही भारतीय संगीत वाद्ये वाजवत होत्या. डीआरडीओच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, भूमी , आकाश, सायबर आणि अवकाश या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचे रक्षण कसे करत आहे हे ह्या चित्ररथाच्या देखाव्यात सादर केले होते. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन 21व्या शतकातील भारत प्रगतीपथावर जात आहे.
मित्रांनो, तुम्ही काही दिवसांपूर्वीच अर्जुन पुरस्कार समारंभ पाहिला असेल. या समारंभात, देशातील अनेक होतकरू खेळाडू आणि ऍथलेट्स ना राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात आले. इथेही ज्या एका गोष्टीने लोकांचे लक्ष वेधून घेतले ती होती, अर्जुन पुरस्कार मिळालेल्या मुली आणि त्यांची जीवनयात्रा.
यावेळी 13 महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या महिला खेळाडूंनी जगभरातील अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजयश्री खेचून आणून भारताचा झेंडा फडकवला. शारीरिक आणि आर्थिक आव्हाने या धाडसी आणि प्रतिभावान खेळाडूंना अडवू शकली नाहीत. बदलत्या भारतात आपल्या मुली आणि देशातील महिला प्रत्येक क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करुन दाखवत आहेत.
जिथे महिलांनी आपला झेंडा फडकावला आहे असे आणखी एक क्षेत्र म्हणजे बचत गट. आज देशातील महिला बचत गटांची संख्याही वाढली आहे आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा देखील खूप विस्तार झाला आहे. तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला गावा गावातील शेतांमध्ये नमो ड्रोन दीदी, ड्रोनच्या माध्यमातून शेतीच्या कामांमध्ये मदत करताना दिसतील.
उत्तर प्रदेशातील बहराइच येथे स्थानिक घटकांचा वापर करून जैविक खाते - बायो-फर्टिलायझर आणि जैव- कीटकनाशके तयार करणाऱ्या महिलांविषयी मला माहिती मिळाली. निबिया बेगमपूर गावातील बचत गटांतील महिला, गायीचे शेण, कडुलिंबाची पाने आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून जैविक खत तयार करतात. त्याचप्रमाणे या महिला आले, लसूण, कांदा, मिरची ह्यांचे वाटण करून, सेंद्रिय कीटकनाशकही तयार करतात. या महिलांनी एकत्र येऊन ‘उन्नती बायोलॉजिकल युनिट’ नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था या महिलांना जैविक उत्पादने तयार करण्यात मदत करते. त्यांनी बनवलेल्या जैविक -खते आणि सैन्द्रिय कीटकनाशकांना असलेली मागणीही सातत्याने वाढत आहे. आज आसपासच्या गावातील ६ हजारांहून अधिक शेतकरी त्यांच्याकडून जैविक उत्पादने खरेदी करत आहेत. त्यामुळे बचतगटांतील महिलांचे उत्पन्न वाढले असून, त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये आपण अशा देशबांधवांच्या प्रयत्नांना देशासमोर आणतो, जे समाज आणि देश बळकट करण्यासाठी नि:स्वार्थपणे काम करत असतात. नुकतीच, तीन दिवसांपूर्वी देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली आहे, तेव्हा मन की बात मध्ये अशा लोकांची चर्चा होणे स्वाभाविक आहे.
यावेळीही अशा अनेक देशवासीयांना पद्म सन्मान देण्यात आला आहे, ज्यांनी स्वतःला तळागाळातील लोकांशी जोडून घेऊन, समाजात मोठे, हितकारक बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. या प्रेरणादायी लोकांच्या आयुष्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता देशभरात निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमांमधील प्रसिद्धीपासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून, बातम्यांपासून दूर राहिलेले हे लोक कोणत्याही प्रसिद्धीची, प्रकाशझोताची अपेक्षा न करता समाजाची सेवा करण्यात मग्न होते. याआधी, या लोकांबद्दल आपण क्वचितच काही वाचलेले किंवा ऐकलेले असेल, पण मला आनंद होतो आहे की आता , पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशा लोकांची सर्वत्र चर्चा होत आहे, लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी बहुतेक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम करीत आहेत. कुणी रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे, तर कुणी निराधारांच्या डोक्यावर छप्पर असावे म्हणून व्यवस्था करत आहे. असेही काही आहेत जे हजारो झाडे लावून निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नात मग्न आहेत. एकजण असेही आहेत जे तांदुळाच्या 650 हून अधिक जातींच्या, वाणांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करीत आहेत. एकजण असेही आहेत जे अमली द्रव्ये आणि दारूमुळे येणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात जनजागृती करत आहेत.
अनेक जण, लोकांना बचत गटांशी जोडण्यात गुंतलेले आहेत, विशेषत: स्त्री शक्ती अभियान चालवून महिला बचतगटांसाठी प्रयत्न करत आहेत. ह्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिलांचा समावेश असल्याने देशवासीयांनाही खूप आनंद झाला आहे. या महिला अगदी प्राथमिक स्तरावरील, तळागाळातील आपल्या कार्यातून समाज आणि देशाला प्रगती पथावर नेत आहेत.
मित्रांनो, पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी प्रत्येकाचेच योगदान देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. या वेळी सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, नाट्य आणि भजन ह्या क्षेत्रांत देशाचे नाव मोठे करणाऱ्यांचा बहुसंख्येने समावेश आहे. प्राकृत, माळवी आणि लंबाडी भाषांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. ज्यांचे कार्य भारतीय संस्कृती आणि परंपरेला गौरवाचे स्थान प्राप्त करून देत आहे अशा विदेशातील अनेकजणांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये फ्रान्स, तैवान,मेक्सिको आणि बांगलादेशच्या नागरिकांचाही समावेश आहे.
मित्रांनो, मला खूप आनंद होत आहे की गेल्या दशकात पद्म पुरस्कारांची व्यवस्था/ (रचना) पूर्णपणे बदलली आहे. आता ते लोकपद्म झाले आहे.पद्म पुरस्कार देण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. आता लोकांना पुरस्कारासाठी स्वतःचे नाव सुचविण्याची संधी मिळत आहे. यामुळेच 2014 च्या तुलनेत यावेळी 28 पट अधिक नामांकन आलेले आहेत. यावरून दिसून येते की पद्म पुरस्काराची प्रतिष्ठा, त्याची विश्वासार्हता आणि आदर दरवर्षी वाढत आहे. पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, असे म्हणतात की प्रत्येक जीवनाचे एक ध्येय असते, ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच प्रत्येकाचा जन्म झालेला असतो. यासाठी लोक निष्ठापूर्वक आपले कर्तव्य बजावतात. आपण पाहिले आहे की, काही लोक समाजसेवेच्या माध्यमातून, कोणी सैन्यात भरती होऊन, कोणी पुढच्या पिढीला शिक्षण देऊन, आपले कर्तव्य पार पाडतात. पण मित्रांनो, आपल्यामध्ये अशीही काही माणसे आहेत जी आयुष्य संपल्यानंतरही समाजाविषयीचे आपले कर्तव्य पार पाडत असतात. आणि त्यासाठी त्यांचे माध्यम अवयवदान हे आहे.
गेल्या काही काळात, देशात एक हजाराहून अधिक लोकांनी मृत्यूनंतर त्यांचे अवयव दान केलेले आहे. हा निर्णय सोपा नसतोच, पण ह्या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचतात. ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला त्या कुटुंबांचेही मी कौतुक करेन. आज देशातील अनेक संस्था संघटना या दिशेने खूप प्रेरणादायी प्रयत्न करत आहेत. काही संस्था अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत, तर काही संस्था अवयवदान करण्यास इच्छुक लोकांची नोंदणी करण्यासाठी मदत करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत देशात सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक लोकांचे प्राणही वाचत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता मी तुम्हाला भारताची एक अशी उपलब्धी सांगतो, ज्यामुळे रुग्णांचे जीवन सोपे होईल आणि त्यांच्या समस्या कमी होतील. तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील, जे आपल्या उपचारासाठी आयुर्वेद, सिद्ध किंवा युनानी पद्धतीची मदत घेतात. पण त्याच पद्धतीच्या इतर डॉक्टरांकडे गेल्यावर रुग्णांपुढे अडचणी निर्माण होतात. या वैद्यकीय प्रणालींमध्ये रोग, उपचार आणि औषधांच्या नावांसाठी समान भाषा वापरली जात नाही. प्रत्येक डॉक्टर रोगाचे नाव आणि उपचारांच्या पद्धतीतील बारकावे त्याच्या स्वत: च्या पद्धतीने लिहितो. काहीवेळा ते इतर डॉक्टरांना समजणे फार कठीण होऊन जाते. पण अनेक दशकांपासून त्रस्त करणाऱ्या या समस्येवर आता उपाय सापडला आहे. मला सांगायला आनंद होत आहे की आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचे वर्गीकरण केले आहे.
या कोडिंगच्या मदतीने आता सर्व डॉक्टरांना प्रिस्क्रीप्शन म्हणजेच आपल्या औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एकसमान भाषेत लिहिणं शक्य होईल. याचा एक फायदा असा होईल की, जर तुम्ही ती चिठ्ठी घेवून दुस-या डॉक्टरांकडे गेलात तर त्या डॉक्टरांनाही पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल. तुमचा आजार, त्यावर केलेले उपचार, कोण-कोणती औषधं सुरू आहेत, किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींची अॅलर्जी आहे, अशी सर्व माहिती त्या चिठ्ठीच्या मदतीने मिळू शकेल. याचा आणखी एक फायदा म्हणजे, जे लोक संशोधनाचं काम करत आहेत, त्या लोकांनाही होईल, इतर देशांतील संशोधकांनाही आजार, औषधे, त्यांचा प्रभाव यांची सविस्तर माहिती मिळू शकेल. संशोधन वाढल्यामुळे आणि अनेक संशोधक यामध्ये जोडले जावू शकत असल्यामुळे ही औषधोपचार पद्धती आणखी चांगले परिणाम देवू शकेल आणि अधिकाधिक लोकांचा या उपचार पद्धतीकडे कल झुकेल. मला विश्वास आहे, या आयुष पद्धतींशी जोडले गेलेले आमचे उपचार तज्ज्ञ, वैद्य, याचे अभ्यासक या कोडिंग पद्धतीचा लवकरात लवकर स्वीकार करून प्रत्यक्षात वापर सुरू करतील.
माझ्या मित्रांनो, आत्ता आयुष औषधोपचार पद्धतीविषयी बोलत असताना, माझ्या डोळ्यापुढे यानुंग जामोह लैगोकी यांची प्रतिमा येत आहे. श्रीमती यानुंग अरूणाचल प्रदेशात वास्तव्य करीत आहेत आणि त्या हर्बल औषधांमध्ये विशेषज्ञ आहेत. त्यांनी आदिवासी, जनजातीच्या पारंपरिक औषधोपचार प्रणालीला पुनर्जीवित करण्यासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यावर्षी पद्म पुरस्कारही दिला गेला आहे.
याचप्रमाणे यंदा छत्तीसगढचे हेमचंद मांझी यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे. वैद्यराज हेमचंद मांझी हे सुद्धा आयुष औषधोपचार पद्धतीच्या मदतीने लोकांवर उपचार करतात. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये पाच दशकांपेक्षाही जास्त काळापासून ते गरीब रूग्णांची सेवा करीत आहेत. आपल्या देशामध्ये आयुर्वेद आणि हर्बल औषधांचे जे प्रचंड भांडार आहे, त्याच्या संरक्षणाच्या कामामध्ये श्रीमती यानुंग आणि हेमचंद यांच्यासारख्या लोकांची खूप मोठी भूमिका आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपलं म्हणजे तुम्हां सर्वांचं आणि माझं जे नातं तयार झालं आहे, त्याला आता एक दशक झालं आहे. समाज माध्यमांच्या आणि इंटरनेटच्या या काळामध्येही रेडिओ हे संपूर्ण देशाला जोडणारे एक सशक्त माध्यम आहे. रेडिओची ताकद किती मोठे परिवर्तन घडवून आणू शकते, याचं एक अनोखं उदाहरण छत्तीसगडमध्ये पहायला मिळत आहे. गेल्या जवळपास 7 वर्षांपासूनच इथं रेडिओवर एका लोकप्रिय कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे. त्याचं नाव आहे,‘‘ हमर हाथी- हमर गोठ’ कार्यक्रमाचं..नाव ऐकून तुम्हाला वाटू शकतं की, रेडिओ आणि हत्ती यांचा काय बरं संबंध असू शकतो? मात्र हीच तर रेडिओची खुबी आहे. छत्तीसगडमध्ये आकाशवाणीच्या अंबिकापूर, रायपूर, बिलासपूर आणि रायगढ या चार केंद्रांवरून दररोज सायंकाळी या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. आणि तुम्हाला माहिती ऐकून नवल वाटेल, छत्तीसगडच्या जंगल आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारी मंडळी अतिशय लक्षपूर्वक हा कार्यक्रम ऐकतात. ‘हमर हाथी-हमर गोठ’ कार्यक्रमामध्ये सांगण्यात येत की, हत्तींचा कळप, जंगलाच्या कोणत्या भागातून वाटचाल करीत आहे. ही माहिती इथं वास्तव्य करणा-या लोकांना अतिशय उपयोगी ठरते. लोकांना रेडिओच्या माध्यमातून हत्तींचा कळप येणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे ते सावध होतात. ज्या मार्गावरून हत्ती जाणार असतात, त्या भागात जाणं टाळता येतं. यामुळे संभाव्य धोकाही टाळता येतो. यामुळे एकीकडे हत्तींच्या कळपामुळे होणा-या नुकसानाची शक्यता कमी होत आहे. त्याचबरोबर हत्तींविषयी सर्व डेटा म्हणजे माहिती जमा करण्यासाठी मदत मिळत आहे. या डेटाचा उपयोग भविष्यात हत्तींच्या संरक्षणासाठी करणं शक्य होणार आहे. इथं हत्तींविषयी मिळणारी सर्व माहिती समाज माध्यमांच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. यामुळे जंगलाच्या परिसरात वास्तव्य करणा-या लोकांना हत्तींच्या वेळांबरोबर समन्वय साधणं आता सुकर बनलं आहे. छत्तीसगडच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि त्यामुळे आलेल्या अनुभवांचा लाभ देशातल्या इतर वनक्षेत्रांमध्ये राहणा-या लोकांना घेता येवू शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यंदाच्या 25 जानेवारीला आपण सर्वांनी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ साजरा केला. हा आपल्या गौरवाशाली लोकशाही परंपरेसाठी एक महत्वाचा दिवस आहे. आज देशामध्ये जवळपास 96 कोटी मतदार आहेत. तुम्हाला ठावूक आहे, हा आकडा किती मोठा आहे? हा आकडा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जवळपास तिप्पट आहे. ही संख्या युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास दीडपट आहे. जर मतदान केंद्रांविषयी बोलायचं झालं तर, देशामध्ये आज त्यांची संख्या जवळपास साडेदहा लाख आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करता यावा, यासाठी ज्या ठिकाणी केवळ एक मतदार आहे, अशाही ठिकाणी आपल्या निवडणूक आयोगाकडून मतदानाचे केंद्र तयार केलं जातं. देशामध्ये लोकशाहीची मूल्यं बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणा-या निवडणूक आयोगाचं मी कौतुक करतो.
मित्रांनो, आज देशासाठी उत्साहाची गोष्ट अशीही आहे की, जगातील अनेक देशांमध्ये जिथं मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, त्या काळात भारतामध्ये मतदानाची टक्केवारी वाढत आहे. 1951-52 मध्ये ज्यावेळी देशामध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या, त्यावेळी जवळपास 45 टक्के मतदारांनीच मतदान केलं होतं. आज हा आकडा खूप वाढला आहे. देशामध्ये फक्त मतदारांची संख्याच वाढली नाही तर ‘टर्नआउट’ही वाढला आहे. आपल्या युवा मतदारांना मतदार सूचीमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अधिक संधी मिळावी, यासाठी सरकारने कायद्यामध्ये परिवर्तन केलं आहे. मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सामुदायिक स्तरावरही प्रयत्न केले जात आहेत, हे पाहूनही मला चांगलं वाटतं. काही ठिकाणी लोक घरांघरांमध्ये जावून मतदानाविषयी माहिती देत आहेत. तर काही ठिकाणी पेंटिंग बनवून,तसंच काही ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून युवकांना आकर्षित केलं जात आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रयत्नांमुळे, आपल्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये वेगवेगळे रंग भरले जात आहेत.
मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपल्या फर्स्ट टाइम व्होटर्सना म्हणजेच पहिल्यांदा मतदानासाठी पात्र ठरणा-या युवा मतदारांना सांगू इच्छितो की, मतदार यादीमध्ये आपलं नाव जरूर नोंदवावं. ‘नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल’ आणि ‘व्होटर हेल्पलाइन अॅप’ च्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजतेनं हे काम ऑनलाइन करू शकता. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी,तुमचं एक मत, देशाचं भाग्य बदलू शकतं. देशाचं भाग्य घडवू शकतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 28 जानेवारी, भारताच्या दोन अशा महान व्यक्तित्वांच्या जयंतीचा हा दिवस आहे की, ज्यांनी वेग-वेगळ्या कालखंडामध्ये देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. आज देश, पंजाब केसरी, लाला लजपतराय यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे. लाला जी, स्वातंत्र्य संग्रामातील असे सेनानी होते, ज्यांनी विदेशी सत्तेपासून देशाला मुक्ती मिळावी यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. लाला जी, यांच्या व्यक्तिमत्वाला फक्त स्वातंत्र्याच्या लढ्यापुरतंच मर्यादित ठेवता येवू शकत नाही. ते खूप दूरदर्शी होते. त्यांनी पंजाब नॅशनल बॅंक आणि इतर अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांचा उद्देश फक्त विदेशींना देशाबाहेर घालवणे हाच नव्हता, तर देशाला आर्थिकदृष्टीने बळकट करण्याची त्यांची दूरदृष्टी होती. याविषयी त्यांनी केलेलं चिंतन महत्वाचं होतं. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या बलिदानानं भगत सिंह यांना खूप प्रभावित केलं होतं.
फिल्ड मार्शल के.एम.करियप्पा जी यांनाही श्रद्धापूर्वक वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. त्यांनी इतिहासातील महत्वपूर्ण काळात आपल्या लष्कराचं नेतृत्व करून साहस आणि शौर्य यांचा सर्वोत्तम आदर्श घालून दिला.आपल्या लष्कराला शक्तिशाली बनविण्यामध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज क्रीडा क्षेत्रामध्ये भारत नित्य नवीन उंची गाठत आहे. क्रीडा जगतामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे ते, खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळण्याची आणि देशांमध्ये अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होण्याची! याचाच विचार करून आज भारतामध्ये नव-नवीन क्रीडा सामने आयोजित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये ‘खेलो इंडिया यूथ’ स्पर्धांचे उद्घाटन झालं. यामध्ये देशभरातून पाच हजारांपेक्षा जास्त क्रीडापटू सहभागी झाले आहेत. मला आनंद वाटतो की, आज भारतामध्ये सातत्यानं असे नवीन मंच तयार होत आहेत. त्यामध्ये क्रीडापटूंना आपलं सामर्थ्य दाखवण्याच्या संधी मिळत आहेत. असाच एक मंच तयार झाला आहे तो म्हणजे -बीच गेम्स! या खेळांचं आयोजन दीवमध्ये झालं होतं.तुम्हाला माहितीच असेल, दीव एक केंद्रशासित प्रदेश आहे. सोमनाथच्या अगदी जवळ आहे. यावर्षाच्या प्रारंभीच दीवमध्ये या बीच गेम्सचं आयोजन केलं होतं. हे भारताचं पहिलं ‘मल्टी-स्पोर्टस् बीच गेम्स’चं आयोजन होतं. यामध्ये टग ऑफ वॉर, सी स्विमिंग, पेनकॅकसिलट, मल्लखांब, बीच व्हॉलिबॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर आणि बीच बॉक्सिंग यांच्या स्पर्धा झाल्या. यामध्ये प्रत्येक खेळाडू स्पर्धकाला आपली प्रतिभा दाखवण्याची चांगली संधी मिळाली. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या स्पर्धांमध्ये अशा राज्यांतूनही अनेक खेळाडू आले होते, की ज्यांचा समुद्राबरोबर दूरदूरचाही संबंध नाही. या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदकं मध्य प्रदेशानं जिंकली. या राज्यात कुठंही समुद्र, सागरी किनारा, बीच नाही. खेळांच्या विषयी इतका उत्साह, अशी भावना कोणत्याही देशाला क्रीडा जगतामध्ये सर्वोच्च स्थान मिळवून देवू शकते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये यावेळी इतकंच!! फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा आपल्याबरोबर संवाद साधला जाईल. देशातील लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे,व्यक्तिगत प्रयत्नांमुळे , देश कशारितीने पुढे जात आहे, यावर आपलं लक्ष्य केंद्रीत असेल. मित्रांनो, उद्या 29 तारीख आहे. सकाळी 11 वाजता आपण ‘परीक्षा पे चर्चा‘‘ ही करणार आहोत. ‘परीक्षा पे चर्चा’’ या कार्यक्रमाची ही सातवी आवृत्ती असणार आहे. हा एक असा कार्यक्रम आहे की, त्याची मी नेहमीच वाट पाहत असतो. या कार्यक्रमामुळे मला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळते. आणि मी त्यांच्यावर परीक्षेविषयी असणारा तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करीत असतो. गेल्या 7 वर्षांपासून ‘परीक्षा पे चर्चा’, हे शिक्षण आणि परीक्षा यासंबंधी, अनेक मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक खूप चांगलं माध्यम बनलं आहे. मला आनंद वाटतो की, यावेळी सव्वा दोन कोटींपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नावनोंदणी केली आहे. आणि आपले योगदान ही दिलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा 2018 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता, त्यावेळी कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांचा आकडा फक्त 22,000 होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि परीक्षेच्या तणावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न करण्यात आले आहेत. मी तुम्हा सर्वांना, विशेषतः युवकांना, विद्यार्थ्यांना विनंती करतो की, त्यांनी उद्या विक्रमी संख्येनं या कार्यक्रमात सहभागी व्हावे. मलाही तुमच्याबरोबर संवाद साधताना खूप छान वाटेल. याच शब्दांबरोबर मी ‘मन की बात’ च्या या भागात आपला निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया ! धन्यवाद !!
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.
मित्रांनो, ‘मन की बात’ ऐकणाऱ्या अनेक श्रोत्यांनी मला पत्राद्वारे त्यांचे अविस्मरणीय क्षण लिहून पाठविले आहेत. आपल्या देशाने यावर्षी अनेक विशेष कामगिरी पार पाडल्या आहेत, ही या 140 कोटी लोकांची ताकदच आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारा ‘नारी शक्ती वंदन कायदा’ यावर्षी मंजूर झाला. भारत सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था झाल्याबद्दल अनेकांनी पत्र लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी मला G20 परिषदेच्या यशाची देखील आठवण करून दिली आहे. मित्रांनो, आज भारतातील प्रत्येक कानाकोपरा आत्मविश्वासाने भरलेला आहे, विकसित भारताच्या भावनेने, आत्मनिर्भरतेच्या भावनेने भारावलेला आहे. वर्ष 2024 मध्ये देखील आपल्याला हीच भावना आणि चालना कायम ठेवायची आहे. प्रत्येक भारतीय हा ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राला महत्व देत आहे हे दिवाळीतील विक्रमी व्यवसायाने सिद्ध केले आहे.
मित्रांनो,आजही मला अनेक लोकं चांद्रयान 3 च्या यशाबद्दल संदेश पाठवत आहेत. मला विश्वास आहे की माझ्याप्रमाणेच तुम्हांला देखील आपल्या शास्त्रज्ञांचा आणि विशेषतः महिला शास्त्रज्ञांचा विशेष अभिमान वाटत असेल.
मित्रांनो, जेव्हा नाटु-नाटु ला ऑस्कर मिळाला तेव्हा संपूर्ण देश आनंदाने नाचत होता . 'द एलिफंट व्हिस्परर्स' ला मिळालेल्या सन्मानाबद्दल ऐकून कोणाला बंर आनंद झाला नाही?यासगळ्यातून जगाने भारताची सर्जनशीलता पाहिली आणि पर्यावरणा बाबत असणारा आपला जिव्हाळा समजून घेतला. या वर्षी आमच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. आशियाई खेळांमध्ये आमच्या खेळाडूंनी 107 पदके आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये 111 पदके जिंकली. क्रिकेट विश्वचषकातील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. अंडर-19 T-20 विश्वचषक स्पर्धेत आपल्या महिला क्रिकेट संघाचा विजय खूपच प्रेरणादायी आहे. अनेक खेळांमधील खेळाडूंच्या कामगिरीने देशाचे नाव उंचावलं आहे. आणि आता 2024 मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.
मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण एकत्रित प्रयत्न केले, तेव्हा त्याचा आपल्या देशाच्या विकासच्या वाटचालीवर खूपच सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमा आपण यशस्वी होताना पाहिल्या आहेत. यामध्ये करोडो लोकांच्या सहभागाचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. 70 हजार अमृत तलावांचे निर्माण हे देखील आमचे सामूहिक यश आहे.
मित्रांनो, जो देश नाविन्याला महत्त्व देत नाही त्याचा विकास थांबतो यावर माझा विश्वास आहे. भारताचे इनोव्हेशन हब हे याचेच प्रतीक आहे की आपण आता कधीच थांबणार नाही. 2015 मध्ये आम्ही ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये 81 व्या क्रमांकावर होतो – आज आमचा क्रमांक 40 आहे. या वर्षी, भारतात दाखल केलेल्या पेटंटची संख्या जास्त आहे, त्यापैकी सुमारे 60% हे देशांतर्गत निधी तून उभे राहिले होते. यावेळी QS आशिया विद्यापीठ क्रमवारीत सर्वाधिक भारतीय विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. या यशांची यादी ही न संपणारी आहे. भारताची क्षमता किती प्रभावशाली आहे ही याची केवळ एक झलक आहे - देशाच्या या यशातून, देशातील जनतेच्या या कामगिरीपासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे, त्यांचा अभिमान बाळगायचा आहे, नवे संकल्प करायचे आहेत. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना वर्ष 2024 च्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो, आता आपण भारताबद्दल सर्वत्र असलेल्या आशा आणि उत्साहा विषयी चर्चा केली - ही आशा आणि अपेक्षा खूप चांगली आहे. भारताच्या विकासाचा सर्वाधिक फायदा तरुणांनाच होणार आहे; पण देशातील तरुण जेव्हा सुदृढ असतील तेव्हाच याचा अधिक फायदा तरुणांना होईल. आजकाल जीवनशैलीशी निगडित आजारांबद्दल चर्चा होताना आपण अनेकदा पाहिले आहे. ही आपल्या सर्वांसाठी, विशेषतः तरुणांसाठी चिंतेची बाब आहे. या ‘मन की बात’साठी मी तुम्हा सर्वांना फिट इंडियाशी संबंधित तुमचा अभिप्राय पाठवण्याची विनंती केली होती. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाने माझ्यात उत्साह संचारला आहे. नमो अॅपवर मलामोठ्या संख्येने स्टार्टअप्सनीही त्यांच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यांनी त्यांच्या अनेक अनोख्या प्रयत्नांची चर्चा केली आहे.
मित्रांनो, भारताच्या प्रयत्नांमुळे 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, यामध्ये लखनऊ मध्ये सुरू झालेल्या ‘किरोज फूड्स’, प्रयागराजच्या ‘ग्रँड-मा मिलेट्स’ आणि ‘न्यूट्रास्युटिकल रिच ऑरगॅनिक इंडिया’ सारख्या अनेक स्टार्टअप्सचा समावेश आहे. ‘अल्पिनो हेल्थ फूड्स’, ‘आर्बोरियल’ आणि ‘किरोस फूड’ शी निगडीत तरुण आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांबाबत नवनवीन पर्यायांचा विचार करत आहेत. बंगळूरूच्या अनबॉक्स हेल्थशी संबंधित तरुणांनी देखील सांगितले आहे की ते लोकांना त्यांचा आवडता आहार निवडण्यात कशाप्रकारे मदत करत आहेत ते सांगितलं आहे. शारीरिक आरोग्याची आवड जसजशी वाढत आहे, तसतशी या क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षकांची मागणीही वाढत आहे. "जोगो तंत्रज्ञान" सारखे स्टार्टअप ही मागणी पूर्ण करण्यात मदत करत आहेत.
मित्रांनो, आज शारीरिक आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत खूप चर्चा होत आहे, परंतु त्याच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मानसिक आरोग्य. मुंबईतील “Infi-heal” आणि “YourDost” सारखे स्टार्टअप्स मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी काम करत आहेत हे कळल्यावर मला अतिशय आनंद झाला. एवढेच नाही तर आज यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचाही वापर होत आहे. मित्रांनो, मी येथे फक्त काहीच स्टार्टअप्सची नावे घेऊ शकतो, कारण यादी खूप मोठी आहे. फिट इंडियाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने नाविन्यपूर्ण आरोग्यसेवा प्रदान करणाऱ्या स्टार्टअप्सबद्दल मला कळवत राहा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी बोलणार्या सुप्रसिद्ध लोकांचे अनुभवही मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत.
हा पहिला संदेश सद्गुरु जग्गी वासुदेवजींचा आहे.ते सुदृढता, विशेषत: मानसिक सुदृढता, म्हणजेच मानसिक आरोग्याबाबत त्यांचे मत मांडतील.
****Audio*****
या मन की बात मध्ये मानसिक आरोग्याविषयी चर्चा करणे हे आमच्यासाठी सौभाग्याचे आहे. मानसिक आजार आणि आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली कशी कार्यरत आहे याचा थेट संबंध आहे. आपली न्यूरोलॉजिकल प्रणाली किती स्थिर आणि अडथळा मुक्त आहे यावर आपण किती आनंददायी असू हे अवलंबून आहे. ज्याला आपण शांतता, प्रेम, आनंद, हर्ष, वेदना, नैराश्य, परमानंद म्हणतो या सर्वांचा रासायनिक आणि न्यूरोलॉजिकल आधार असतो.औषधशास्त्र मूलत: शरीरात बाहेरील रसायनांच्या सहाय्याने शरीरातील रासायनिक असंतुलन दूर करण्याचा प्रयत्न करते. मानसिक आजारावर अशा प्रकारे उपचार केले जातात परंतु एखादी व्यक्ती जेव्हा अत्यंत गंभीर परिस्थिती मध्ये असते केवळ तेव्हाच औषधांच्या स्वरूपात बाहेरून रसायने घेतली पाहिजेत ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. अंतर्गत मानसिक आरोग्यावर उपचार करताना किंवा समतुल्य रसायनशास्त्रासाठी कार्य करत असताना शांतता, आनंद आणि हर्षाचे हे रसायन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सामाजिक जीवन आणि जगभरातील देशांच्या संस्कृतींच्या आणि मानवतेच्या माध्यमाने आले पाहिजे. आपण आपले मानसिक आरोग्य समजून घेणे खूप महत्वाचे आहे, आपला विवेक हा एक नाजूक विशेषाधिकार आहे- आपण त्याचे संरक्षण केले पाहिजे, त्याचे पालनपोषण केले पाहिजे. यासाठी, योगिक प्रणालीमध्ये अनेक प्रकार आहेत, लोकं साध्या योग प्रकारांचा अवलंब करून त्यांचे आंतरिक आरोग्य तसेच शरीरारातील रासायनिक प्रक्रिया योग्य दिशेने करू शकतात; आणि यामुळे त्यांच्या न्यूरोलॉजिकल प्रणाली मध्ये सुधारणा होईल. आंतरिक आरोग्य सुदृढ राखण्याच्या या तंत्रज्ञानाला आपण योगिक विज्ञान म्हणतो त्याचा आपण प्रत्यक्ष जीवनात अवलंब करूया.
सद्गुरुजी त्यांचे विचार अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
चला, आता आपण प्रसिद्ध क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर यांचे विचार ऐकुया.
****Audio*****
नमस्कार ‘मन की बात’च्या माध्यमातून मला माझ्या देशवासीयांना काही सांगायचे आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया उपक्रमाने मला माझा आरोग्याचा मंत्र तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यास प्रोत्साहित केले आहे. तुम्हा सर्वांना माझी पहिली सूचना म्हणजे‘one cannot out-train a bad diet’ याचा अर्थ असा की तुम्ही कधी खाता आणि काय खाता याची खूप काळजी घ्यावी लागेल. अलीकडेच माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शाश्वत शेतीसाठी मदत होते आणि हे धान्य पचायलाही हलके असते. नियमित व्यायाम आणि 7 तासांची झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे आणि या सगळ्या बाबी शरीर सुदृढ राहण्यास मदत करते. यासाठी कठोर शिस्त आणि सातत्य आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला परिणाम मिळू लागतील, तेव्हा तुम्ही दररोज व्यायाम करायला सुरुवात कराल. मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची आणि माझा आरोग्याचा मंत्र सांगण्याची संधी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधानांचे खूप खूप आभार.
हरमनप्रीतजीनं सारख्या प्रतिभावान खेळाडूचे शब्द तुम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणा देतील.
चला, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांचे विचार आता आपण ऐकुया. ‘बुद्धिबळ’ या खेळासाठी मानसिक स्वास्थ्य किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
****Audio*****
नमस्ते, मी विश्वनाथन आनंद आहे, तुम्ही मला बुद्धिबळ खेळताना पाहिले आहे आणि अनेकदा मला विचारले जाते, तुमची फिटनेस दिनचर्या काय आहे? आता बुद्धिबळासाठी खूप एकाग्रता आणि संयम आवश्यक आहे, म्हणून मी खालील गोष्टी करतो ज्यामुळे मी तंदुरुस्त आणि चपळ राहते. मी आठवड्यातून दोन वेळा योगा करतो, आठवड्यातून दोनदा कार्डिओ करतो आणि आठवड्यातून दोनदा शारीरिक लवचिकता, स्ट्रेचिंग, भार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करतो आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेतो. या सर्व गोष्टी बुद्धिबळासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. 6 किंवा 7 तासांच्या मानसिक प्रयत्नांसाठी तुमच्याकडे क्षमता असणे खूप महत्वाचे आहे, परंतु तुम्हाला आरामात बसण्यासाठी तुमचे शरीर तितकेच लवचिक असणे देखील आवश्यक आहे आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रित करायचे असेल तेव्हा तुमच्या श्वासावरील नियंत्रण तुम्हाला शांत राहण्यास मदत करते आणि बुद्धिबळाच्या खेळात हेच महत्वाचे असते. शांत राहणे आणि पुढील कार्यावर लक्ष केंद्रित करणे हीच माझ्या ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना फिटनेस टीप आहे. माझ्यासाठी सर्वात महत्वाची फिटनेस टीप म्हणजे रात्रीची शांत झोप घेणे. रात्रीची चार ते पाच तासांची झोप ही अपुरी झोप असते, मला वाटते की रात्रीची किमान सात किंवा आठ तासांची झोप ही महत्वाची आहे त्यामुळे रात्री चांगली झोप घेण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत, कारण यामुळेच तुम्ही दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभर शांतपणे कार्यरत राहू शकता. तुम्ही आवेगपूर्ण निर्णय घेत नाही; तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण आहे. माझ्यासाठी झोप ही सर्वात महत्त्वाची फिटनेस टीप आहे.
चला, आता अक्षय कुमार यांचे मनोगत ऐकुया.
****ऑडियो*****
नमस्कार, मी अक्षय कुमार. सर्वप्रथम मी आपले आदरणीय पंतप्रधानांचे आभार माणू इच्छितो की त्यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात मला देखील माझ्या ‘मनातील गोष्ट’ तुम्हाला सांगण्याची एक छोटीशी संधी मिळाली आहे. तुम्हां सर्वांना माहितच आहे की तंदुरुस्तीची मला जितकी आवड आहे त्याहून कितीतरी अधिक आवड नैसर्गिक पद्धतीने तंदुरुस्त राहण्याची आहे. मला या भपकेदार व्यायामशाळा अजिबात आवडत नाहीत.त्यापेक्षा मला मोकळ्यावर पोहायला, बॅडमिंटन खेळायला, पायऱ्या चढायला, मुदगल घेऊन व्यायाम करायला, चांगले आरोग्यपूर्ण जेवण जेवायला अधिक आवडते. बघा, मला असं वाटतं की शुध्द तूप जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. पण मी बघतो की बरेचसे तरुण तरुण केवळ जाड होण्याच्या भीतीने तूप खात नाहीत. आपल्या तंदुरुस्तीसाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आपण समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमची जीवनशैली डॉक्टरांच्या सल्ल्याने बदला, एखाद्या अभिनेत्याची शरीरयष्टी पाहून तसे करू नका. अभिनेते जसे पडद्यावर दिसतात तसे ते अनेकदा प्रत्यक्षात असत नाहीत. चित्रपटात अनेक प्रकारचे फिल्टर आणि स्पेशल इफेक्ट्स यांचा वापर करण्यात येतो आणि आपण पडद्यावर जे दिसते त्यानुसार आपले शरीर घडवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने शॉर्टकटचा वापर करू लागतो. आजकाल खूप लोक स्टिरॉईड्सचे सेवन करून सिक्स पॅक, एट पॅक यांच्या मागे लागतात.
अशा शॉर्टकट्सचा वापर केल्यावर शरीर बाहेरून वाढलेले दिसते मात्र आतून पोकळच राहते. तुम्ही सर्वांनी हे नेहमी लक्षात ठेवा की शॉर्टकट तुमचे आयुष्य कमी करू शकतात. तुम्हाला शॉर्टकट नव्हे तर दीर्घकाळ टिकणारी तंदुरुस्ती हवी आहे.मित्रांनो, तंदुरुस्ती एक तपस्या आहे. ती काही इंस्टंट कॉफी किंवा दोन मिनिटात तयार होणारे नूडल्स नव्हे. म्हणून नव्या वर्षात स्वतःला वचन द्या, रसायने वापरायची नाहीत,शॉर्टकट्स वापरायचे नाहीत. व्यायाम, योग, चांगले अन्न, वेळेवर झोप, थोडे मेडिटेशन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जसे तुम्ही आहात तसे आनंदाने स्वीकारा. आजपासून फिल्टर असलेले जीवन नव्हे तर अधिक तंदुरुस्त जीवन जागा. काळजी घ्या. जय महाकाल.
या क्षेत्रात आणखी कितीत्तारी स्टार्ट अप उद्योग कार्यरत आहेत म्हणून मी विचार केला की या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या एका स्टार्ट अपच्या तरुण संस्थापकाशी देखील चर्चा करावी.
****ऑडियो*****
नमस्कार, माझे नाव ऋषभ मल्होत्रा आहे आणि मी बेंगळूरूचा रहिवासी आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात तंदुरुस्ती वर चर्चा होते आहे हे समजल्यावर मला अत्यंत आनंद झाला आहे. मी स्वतः तंदुरुस्तीच्या विश्वाशी संबंधित आहे आणि बेंगळूरूमध्ये आमचा ‘तगडा रहो’ नामक स्टार्ट अप उद्योग आहे.आमचा स्टार्ट अप भारतातील पारंपरिक व्यायाम प्रकारांना चालना देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.भारतातील पारंपरिक व्यायामांमध्ये एक अत्यंत अद्भुत व्यायाम प्रकार आहे ‘गदा व्यायाम’ यामध्ये आम्ही गदा आणि मुदगल यांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या व्यायामावर लक्ष केंद्रित केले आहे.लोकांना या गोष्टीचे अत्यंत आश्चर्य वाटते की संही गदेच्या सहाय्याने सगळे प्रशिक्षण कसे घेतो. मी तुम्हांला हे सांगू इच्छितो की गदा व्यायाम हा हजारो वर्ष प्राचीन व्यायाम प्रकार आहे आणि भारतात गेल्या हजारो वर्षांपासून तो केला जात आहे. तुम्ही लहानमोठ्या आखाड्यांमध्ये तुम्ही हा प्रकार पहिला असेल आणि आमच्या स्टार्ट अपच्या माध्यमातून आम्ही या प्रकाराला आधुनिक स्वरुपात पुन्हा घेऊन आलो आहोत. आम्हांला संपूर्ण देशभरातून खूप प्रेम आणि उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की या प्रकाराखेरीज देखील भारतात असे अनेक प्राचीन व्यायाम प्रकार आहेत जे आरोग्य आणि तंदुरुस्ती यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या पद्धती आहेत ज्या आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि जगाला त्या शिकवल्या देखील पाहिजेत. मी तंदुरुस्तीच्या जगात वावरतो, म्हणून तुम्हाला एक व्यक्तिगत सल्ला देऊ इच्छितो. गदा व्यायामाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे बळ, ताकद, शारीरिक स्थिती आणि श्वसनक्रिया देखील योग्य पद्धतीने करू शकता म्हणून गदा व्यायामाचा स्वीकार करा आणि त्याचा प्रसार करा. जय हिंद.
मित्रांनो, प्रत्येकाने आपापली मते मांडली आहेत पण सर्वांचा गुरुमंत्र एकच आहे – ‘निरोगी राहा, तंदुरुस्त राहा’. 2024 या वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्हा सर्वांकडे स्वतःच्या तंदुरुस्तीहून मोठा दुसरा कोणता संकल्प असणार.
माझ्या कुटुंबियांनो,काही दिवसांपूर्वी काशीमध्ये एक प्रयोग करण्यात आला होता त्याबद्दल मी ‘मन की बात’च्या श्रोत्यांना आवर्जून माहिती देऊ इच्छितो. तुम्हांला माहित आहेच की काशी-तमिळ संगमम मध्ये भाग घेण्यासाठी हजारो लोक तामिळनाडूहून काशीला पोहोचले होते. तिथे मी त्या लोकांशी संवाद साधण्यासाठी भाषिणी या AI टूल अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता साधनाचा सार्वजनिक पातळीवर पहिल्यांदाच वापर केला. मी व्यासपीठावरून हिंदीत भाषण करत होतो मात्र भाषिणी या साधनामुळे तिथे उपस्थित असलेल्या तामिळनाडूच्या लोकांना माझे तेच भाषण तमिळ भाषेत ऐकू येत होते. काशी-तमिळ संगमममध्ये आलेले लोक या प्रयोगामुळे अत्यंत आनंदित झाले.कोणत्याही एका भाषेत केलेलं भाषण जनता त्याच वेळी स्वतःच्या भाषेत ऐकू शकेल, असा दिवस आता फार दूर नाही. अशीच परिस्थिती चित्रपटांच्या बाबतीत देखील होऊ शकेल. चित्रपटगृहात प्रेक्षक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने संवादांचे स्वतःच्या भाषेत भाषांतर त्याच वेळी ऐकू शकाल.जेव्हा हे तंत्रज्ञान आपल्या शाळांमध्ये, रुग्णालयांमध्ये, आपल्या न्यायालयांमध्ये व्यापक प्रमाणात वापरले जाईल तेव्हा किती मोठे परिवर्तन घडून येईल याची आपण कल्पना करू शकता. मी आज तरुण पिढीला आवर्जून सांगु इच्छितो की वास्तव वेळी होणाऱ्या भाषांतराशी संबंधित कृत्रिम बुद्धीमत्ता साधनाला आणखी खोलवर समजून घ्या, त्याला शंभर टक्के निर्धोक रूप द्या.
मित्रांनो, बदलत्या काळात आपल्याला आपल्या भाषा वाचवायच्या आहेत आणि त्यांचे संवर्धन देखील करायचे आहे. आता मी तुम्हालाझारखंड राज्यातल्या एका आदिवासी गावाबाबत काही सांगू इच्छितो. या गावाने तेथील मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम राबवला आहे. गढवा जिल्ह्यातील मंगलो गावात मुलांना कुडूख भाषेत शिक्षण देण्यात येत आहे. या शाळेचे नाव आहे ‘कार्तिक उरांव आदिवासी कुडूख शाळा’. या शाळेत 300 आदिवासी मुळे शिक्षण घेत आहेत.कुडूख भाषा उरांव आदिवासी समाजाची मातृभाषा आहे. कुडूख भाषेला स्वतःची लिपी देखील आहे.या लिपीला ‘तोलंग सिकी’ या नावाने ओळखतात. ही भाषा हळूहळू लोप पावत चालली आहे म्हणून ही भाषा वाचवण्यासाठी या समाजाने मुलांना स्वतःच्या भाषेत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.ही शाळा सुरु करणारे अरविंद उरांव म्हणतात की आदिवासी मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण घेण्यात अडचणी होत्या म्हणून त्यांनी गावातील मुलांना आपल्या मातृभाषेत शिकवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नांचा चांगला परिणाम होऊ लागल्यावर इतर गावकरी देखील त्यांच्यासोबत या उपक्रमात सहभागी झाले.स्वतःच्या भाषेत शिक्षण मिळाल्यामुळे, मुलांचा शिकण्याचा वेग देखील वाढला आहे. आपल्या देशात अनेक मुलं भाषेच्या अडचणीमुळे शिक्षण मध्येच अर्धवट सोडून देतात. या समस्या सोडवण्यात नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची देखील मदत होत आहे. भाषा हा कोणत्याही मुलाचे शिक्षण तसेच प्रगती यांमधील अडथळा ठरू नये या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत.
मित्रांनो, आपल्या प्रत्येक कालखंडात देशाच्या असामान्य कन्यांनी अभिमानास्पद कामगिरी करून भारतभूमीला गौरवान्वित केलं आहे. सावित्रीबाई फुले आणि रानी वेलू नाचियार या देशाच्या अशाच असामान्य विभूती आहेत.त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एखाद्या प्रकाश स्तंभाप्रमाणे आहे, जे प्रत्येक युगात नारी शक्तीला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत राहणार आहे. आजपासून काही दिवसांनी, 3 जानेवारी रोजी आपण सर्वजण या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची जयंती साजरी करणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचे नाव घेताच सर्वात आधी आपल्याला शिक्षण तसेच समाज सुधारणेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान आठवते. त्यांनी नेहमीच स्त्रियांच्या आणि वंचितांच्या शिक्षणासाठी जोरदार आवाज उठवला.त्या त्यांच्या काळाच्या फार पुढे होत्या आणि चुकीच्या प्रथांचा विरोध करण्यात त्या नेहमीच आघाडीवर असत.शिक्षणाच्या मदतीने समाजाचे सशक्तीकरण करण्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. महात्मा फुले यांच्या साथीने त्यांनी मुलींसाठी अनेक शाळा सुरु केल्या. त्यांच्या कविता लोकांमध्ये जागरुकता आणि आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या असत. त्या लोकांकडे गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करण्याचा आणि निसर्गासह समरसतेने राहण्याचा आग्रह धरत असत. त्या किती दयाळू होत्या याचे वर्णन शब्दात करता येणारच नाही. जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्या वेळी सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी गरजूंसाठी स्वतःच्या घराची दारे खुली केली. सामाजिक न्यायाचे असे उदाहरण क्वचितच पाहायला मिळते. जेव्हा प्लेगची भयंकर साठ आली तेव्हा सावित्रीबाई यांनी स्वतःला लोकांच्या सेवेप्रती समर्पित केले. या दरम्यान त्या स्वतःदेखील या आजाराच्या विळख्यात सापडल्या. मानवतेला समर्पित असलेले त्यांचे जीवन आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे.
मित्रांनो, परदेशी सत्तेविरूद्ध संघर्ष करणाऱ्या देशातील अनेक महान व्यक्तिमत्त्वांमध्ये राणी वेलू नाचियार यांचा देखील समावेश होतो. तामिळनाडूमधील माझे बंधू-भगिनीआजही त्यांना वीरा मंगई म्हणजे वीर स्त्री या नावाने ओळखतात.राणी वेलू नाचियार यांनी इंग्रजांशी ज्या शौर्याने लढल्या आणि त्यांनी जो पराक्रम करून दाखवला तो अत्यंत प्रेरणादायक आहे. इंग्रजांनी शिवगंगा साम्राज्यावरील हल्ल्यात तेथील राजा असलेल्या त्यांच्या पतीची हत्या केली. राणी वेलू नाचियार आणि त्यांची कन्या शत्रूच्या तावडीतून कशाबशा बाहेर पडल्या. त्यानंतर अनेक वर्ष राणी वेलू नाचियार यांनी संघटना उभारण्यात आणि मरुदु ब्रदर्स म्हणजेच आपल्या कमांडरांच्या मदतीने सैन्य उभे करण्यासाठी कंबर कसली. राणीने संपूर्ण तयारीनिशी इंग्रजांविरुद्ध युध्द छेडले आणि अत्यंत हिंमतीने आणि निर्धाराने ती इंग्रजांशी लढली.ज्यांनी स्वतःकडील सैन्यात पहिल्यांदाच संपूर्णपणे स्त्रियांचा समावेश असलेली तुकडी उभारली अशा निवडक लोकांमध्ये राणी वेलू नाचियार हिचा समावेश होतो. मी या दोन्ही वीरांगनांना श्रद्धांजली वाहतो.
माझ्या कुटुंबियांनो, गुजरातमध्ये डायरा ची परंपरा आहे. हजारो लोक रात्रभर डायरा मध्ये सहभागी होऊन मनोरंजनासह ज्ञानार्जन करतात. या डायरा मध्ये लोकसंगीत, लोकसाहित्य आणि हास्य यांचा त्रिवेणी संगम प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद निर्माण करतो.या डायराचे एक प्रसिध्द कलाकार आहेत भाई जगदीश त्रिवेदी जी. हास्य कलाकार म्हणून भाई जगदीश त्रिवेदी यांनी गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ छाप पाडली आहे. नुकतेच भाई जगदीश त्रिवेदी यांचे एक पत्र मला मिळाले आणि त्यासोबत त्यांनी स्वतःचे पुस्तक देखील पाठवले आहे. पुस्तकाचे नाव आहे- सोशल ऑडिट ऑफ़ सोशल सर्विस. हे पुस्तक अत्यंत अनोखे आहे. यामध्ये हिशोब आहे, हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा ताळेबंद आहे. गेल्या ६ वर्षांमध्ये भाई जगदीश त्रिवेदी यांना कोणकोणत्या कार्यक्रमातून किती उत्पन्न मिळाले, आणि ते पैसे कुठे-कुठे खर्च झाले याचा संपूर्ण जमाखर्च आहे. हा ताळेबंद अशासाठी विलक्षण आहे कारण की, त्यांनी स्वतःचे संपूर्ण उत्पन्न, एक एक रुपया समाजासाठी – शाळा,रुग्णालये, वाचनालये, दिव्यांग व्यक्तींशी संबंधित संस्था आणि अशाच इतर समाजसेवेसाठी खर्च केला आहे- त्याचा संपूर्ण 6 वर्षांचा हिशोब या पुस्तकात आहे.उदाहरणार्थ, या पुस्तकात एका जागी लिहिले आहे की,2022 मध्ये त्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून त्यांना दोन कोटी, पस्तीस लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये मिळाले आणि त्यांनी शाळा, रुग्णालये, वाचनालये यांना दिले दोन कोटी, पस्तीस लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये. एक रुपयादेखील स्वतःसाठी ठेवला नाही. खरेतर या सगळ्याच्या मागे देखील एक मनोरंजक घटना आहे. तर झालं असं की,भाई जगदीश त्रिवेदी यांनी सांगितले की जेव्हा 2017 या वर्षी ते 50 वर्षांचे होतील, त्यानंतर ते त्यांच्या कार्यक्रमांचे उत्पन्न घरी देणार नाहीत तर समाजासाठी खर्च करणार आहेत. 2017 पासून आतापर्यंत विविध सामाजिक कार्यांसाठी त्यांनी सुमारे पावणेनऊ कोटी रुपये खर्च केले आहेत. इक विनोदी कलाकार स्वतःच्या किश्श्यांनी प्रत्येकाला हसवतो. मात्र, आतल्याआत किती भावनांच्या कल्लोळातून जात असतो हे भाई जगदीश त्रिवेदी यांचे आयुष्य पाहिल्यावर आपल्याला समजते. त्यांनी तीन वेळा पीएचडी मिळवली आहे हे समजल्यावर तुम्हांला आणखीनच आश्चर्य वाटेल. त्यांनी आतापर्यंत, 75 पुस्तके लिहिली आहेत आणि त्यातील अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी केलेल्या समाज कार्यासाठी देखील अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यत आला आहे. मी भाई जगदीश त्रिवेदी यांना त्यांच्या समाज कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबीयांनो, अयोध्येतील राम मंदिराविषयी संपूर्ण देशभरात हर्ष आणि उल्लास आहे. लोक आपल्या भावनांना विविध प्रकारे व्यक्त करत आहेत. तुम्ही पाहिलेच असेल की, गेल्या काही दिवसांमध्ये श्री राम आणि अयोध्या यांच्यावर आधारित अनेक नवी गीते, नवी भजने तयार करण्यात आली आहेत. अनेक लोक नव्या कविता देखील रचत आहेत. यामध्ये मोठमोठे अनुभवी कलाकार सहभागी झाले आहेत, तर नव्याने उदयाला येत असलेल्या तरुण मित्रांनी देखील मनमोहक भजनांची रचना केली आहे. यातील काही गाणी तसेच भजने मी माझ्या समाजमाध्यमांवर देखील सामायिक केली आहेत. असं वाटतंय की कलाविश्व स्वतःच्या वैशिष्टयपूर्ण शैलीसह या ऐतिहासिक क्षणांमध्ये सहभागी होत आहे.माझ्या मनात एक विचार आला आहे की आपण सर्वजण अशा सगळ्या रचनांना एका सामायिक हॅश टॅगसह सामायिक करूया. मी तुम्हां सर्वांना हे आवाहन करतो की हॅश टॅग श्री राम भजन (#shriRamBhajan) सह तुमच्या रचना समाज माध्यमांवर सामायिक कराव्या. हे संकलन म्हणजे भावनांचा, भक्तीचा एक असा ओघ बनेल की त्यात प्रत्येकजण राममय होऊन जाईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजच्या ‘मन की बात’ मध्ये इतकंच. 2024 उजाडायला आता काहीच तास बाकी उरले आहेत. भारताचे यश हे प्रत्येक भारतीयाचे यश आहे. आपल्याला पंच निर्धारांचे स्मरण ठेवून भारताच्या विकासासाठी निरंतर प्रयत्न करत राहायचे आहे. आपण कोणतेही काम करताना, कोणताही निर्णय घेताना, आपला पहिला निकष हाच असला पाहिजे की यातून देशाला काय मिळणार, देशाला कोणता लाभ होणार. सर्वप्रथम देश- नेशन फर्स्ट यापेक्षा मोठा कोणताही मंत्र नाही. याच मंत्राच्या आधाराने वाटचाल करत आपण सर्व भारतीय, आपल्या देशाला विकसित करणार आहोत, आत्मनिर्भर बनवणार आहोत. आपण सर्वजण 2024 मध्ये यशाच्या नव्या उंचीवर पोहोचावे, सर्वांनी निरोगी राहावे, तंदुरुस्त राहावे, अत्यंत आनंदी राहावे- हीच माझी प्रार्थना आहे. वर्ष 2024 मध्ये आपण पुन्हा एकदा देशवासीयांच्या नव्या यशोगाथांबद्दल बोलू या. खूप खूप धन्यवाद.
नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे. आज 26 नोव्हेंबर. हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी आपल्या देशावर सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबई आणि संपूर्ण देशच हादरवून टाकला होता. पण हेच भारताचे सामर्थ्य आहे की त्या हल्ल्यातून आपण सावरलो आणि आता अत्यंत धैर्याने दहशतवादाचा पाडाव करत आहोत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वाना मी श्रद्धांजली अर्पण करतो. या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या शूरवीरांचे आज देश स्मरण करत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
26 नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला होता. मला आठवते आहे की 2015 साली जेव्हा आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125 वी जयंती साजरी करत होतो, त्याच वेळी 26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करावा अशी कल्पना समोर आली. आणि तेव्हापासून आपण दरवर्षी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत आहोत. मी सर्व देशवासियांना संविधान दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देत, आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू.
मित्रांनो, संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले हे आपणा सर्वांना माहीती आहे. श्री सच्चिदानंद सिन्हाजी हे संविधान सभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य होते. 60 पेक्षा जास्त देशांच्या संविधानांचा अभ्यास करून आणि दीर्घ चर्चेनंतर आपल्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. मसुदा तयार झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्यात पुन्हा २ हजारांहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या. 1950 मध्ये राज्यघटना लागू झाल्यानंतरही, आत्तापर्यंत एकूण 106 वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. कालमान, परिस्थिती आणि देशाची आवश्यकता लक्षात घेऊन वेगवेगळ्या सरकारांनी निरनिराळ्या वेळी ह्या सुधारणा केल्या. पण ही दुर्दैवी गोष्ट आहे की राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती ही भाषणस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी केली गेली होती. 44 व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आणीबाणीच्या काळात केल्या गेलेल्या त्या चुका सुधारण्यात आल्या.
मित्रांनो, संविधान सभेचे काही सदस्य नामनिर्देशित करण्यात आले होते. हे देखील खूप प्रेरणादायी आहे की त्यापैकी 15 महिला होत्या. अशाच एक सदस्या, हंसा मेहताजी ह्यांनी महिलांच्या हक्क आणि न्यायासाठी आवाज उठवला होता. त्या वेळी भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी एक होता जिथे संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला होता. राष्ट्र उभारणीत सर्वांचा सहभाग असेल तरच सर्वांचा विकास होऊ शकतो. मला समाधान वाटते की संविधान निर्मात्यांच्या याच दूरदृष्टीचे पालन करत भारताच्या संसदेने आता 'नारी शक्ती वंदन कायदा' संमत केला आहे. ‘नारी शक्ती वंदन कायदा’ हा आपल्या लोकशाहीच्या संकल्प शक्तीचे उदाहरण आहे. आपल्या विकसित भारत ह्या संकल्पाला चालना देण्यासाठी देखील हा कायदा तितकाच उपयुक्त ठरेल.
माझ्या कुटुंबियांनो, जेव्हा देशातील जनता राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेते, तेव्हा विश्वातील कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतामध्ये देखील हे स्पष्टपणे आढळते आहे की देशातील अनेक बदलांचे नेतृत्व हे भारतातील 140 कोटी जनताच करीत आहे. ह्याचे एक प्रत्यक्ष उदाहरण आपण या सणासुदीच्या काळात पाहिले आहे. गेल्या महिन्यातील ‘मन की बात’ मध्ये मी ‘व्होकल फॉर लोकल’ अर्थात भारतीयांनी स्थानिक उत्पादने खरेदी करावी ह्यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसांत देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांच्या काळात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची व्यावसायिक उलाढाल झाली आहे. आणि ह्याच दिवसांत, लोकांनी भारतातील स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा प्रचंड उत्साह दाखवला. आता तर घरातील लहान मुलेदेखील दुकानातून काही खरेदी करताना त्या वस्तूंवर मेड इन इंडिया असे लिहिलेले आहे की नाही हे पाहू लागली आहेत. केवळ इतकेच नाही तर आता ऑनलाइन खरेदी करताना देखील लोक वस्तूचे country of origin , वस्तूंचे निर्मिती स्थान पाहायला विसरत नाहीत.
मित्रांनो, ज्याप्रमाणे 'स्वच्छ भारत अभियानाला ’ मिळणारे यश हेच त्या अभियानाचे प्रेरणास्थान बनत आहे, त्याचप्रमाणे ‘व्होकल फॉर लोकल ‘ अभियानाचे यश हेच विकसित भारत - समृद्ध भारत यशाचे महाद्वार उघडत आहे. ‘व्होकल फॉर लोकलचे ‘ हे अभियान संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहे. ‘वोकल फॉर लोकल अभियान’ ही देशवासियांना रोजगार मिळण्याची हमी आहे. हीच विकासाची हमी आहे, हीच देशाच्या समतोल विकासाची हमी आहे. ह्या अभियानामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही लोकांना समान संधी मिळते. ह्या अभियानामुळे स्थानिक उत्पादनांसाठी मूल्य वर्धनाचा मार्गही मोकळा होतो आणि जर कधी जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार झालेच तर व्होकल फॉर लोकल हा मंत्र आपल्या अर्थव्यवस्थेचेही संरक्षण करतो.
मित्रांनो, भारतीय उत्पादनेच खरेदी करायची हा विचार केवळ सणांच्या दिवसांपुरताच मर्यादित राहू नये. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. काही व्यापारी संस्थांच्या अंदाजानुसार या लग्नसराईत जवळपास 5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विवाहसमारंभासाठी खरेदी करताना देखील आपण सर्वांनी भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच महत्त्व द्यावे. आणि हो, जेव्हा लग्नाचा विषय निघालाच आहे तर सांगतो की एक गोष्ट मला खूप काळापासून सलते आहे आणि माझ्या मनातील वेदना, मी माझ्या कुटुंबियांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? जरा विचार करा, आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन विवाहसमारंभ साजरा करण्याची एक नवी पद्धत सुरु होते आहे. पण असे करणे आवश्यक आहे का?
जर आपण भारतातच, भारतातील आपल्या लोकांमध्ये विवाह समारंभ साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील. देशातील लोकांना तुमच्याकडील विवाहसमारंभात काही सेवा पुरवण्याची संधी मिळेल, अगदी गरीब लोकही आपल्या लहान लहान मुलांना तुमच्याकडील लग्नसमारंभाची वर्णने सांगतील. व्होकल फॉर लोकल या अभियानाला तुम्ही अशी साथ देऊन ते अभियान पुढे नेऊ शकता का? असे लग्न सोहळे आपण आपल्याच देशात का करू नयेत? कदाचित तुम्हाला हवी तशी व्यवस्था आज इथे उपलब्ध नसेल, अशीही शक्यता आहे. पण असे सोहळे आपण देशातच आयोजित केले तर आपल्या देशातील व्यवस्थाही विकसित होईल. हा खूप मोठ्या कुटुंबांशी संबंधित असा विषय आहे. मला आशा वाटते आहे की माझी वेदना त्या मोठ्या कुटुंबांपर्यंत नक्कीच पोहोचेल.
माझ्या कुटुंबियांनो, या सणासुदीच्या काळातच लोकांचा आणखी एक मोठा कल दिसला आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे की जेव्हा दिवाळीनिमित्त खरेदी करताना रोख रक्कम देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा कल हळूहळू कमी होत आहे. म्हणजेच आता लोक जास्तीत जास्त वेळा डिजिटल पेमेंट करत आहेत. हे खूप उत्साहवर्धक आहे. तुम्ही देखील आणखी एक गोष्ट करू शकता. तुम्ही ठरवू शकता की पुढचा महिनाभर तुम्ही फक्त UPI किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमातून पेमेंट कराल आणि रोख रक्कम देणार नाही. भारतातील डिजिटल क्रांतीच्या यशामुळे आता हे शक्य होणार आहे. आणि असा एक महिना पूर्ण झाल्यावर, तुम्ही कृपया आपले अनुभव आणि फोटो मला पाठवा. मी तुम्हाला आत्ताच पुढच्या महिन्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियांनो, आपल्या तरुण मित्रांनी देशाला आणखी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे, ज्यामुळे आपले मन अभिमानाने फुलून जाणार आहे. बुद्धिमत्ता, नूतन कल्पना आणि नवोन्मेष - ही आज भारतीय तरुणांची ओळख बनली आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीनेच त्यांच्या intellectual property मध्ये, बौद्धिक संपदेत देखील सतत वाढ होत राहणे, हीच मुळात देशाच्या क्षमता वाढवणारी महत्त्वाची प्रगती आहे. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की भारतीयांकडून केल्या गेलेल्या पेटंट अर्जांमध्ये 2022 मध्ये 31 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेने एक अतिशय मनोवेधक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल सांगतो की पेटंट दाखल करण्यात आघाडीवर असलेल्या टॉप-10 देशांमध्येही ह्या पूर्वी असे कधीच घडले नव्हते. या गौरवास्पद कामगिरीबद्दल मी माझ्या तरुण सहकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. मी माझ्या तरुण मित्रांना विश्वासाने सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक पाऊलामध्ये देश तुमच्या साथीला आहे. सरकारने ज्या प्रशासकीय आणि नियमांतील सुधारणा केल्या आहेत त्यानंतर आज आपली तरुणाई मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषात, नव्या संशोधनात गुंतली आहे. 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीशी तुलना केली, तर आज आमच्या पेटंटसना 10 पट अधिक मंजुरी मिळत आहे.
आपल्या सर्वांना माहितीच आहे की पेटंटसमुळे देशाची बौद्धिक संपदाच फक्त वाढते असे नाही, तर त्यामुळे आपल्यासाठी नवनवीन संधींची दारेदेखील खुली होतात. इतकेच नाही तर त्यामुळे आपल्या स्टार्ट-अपस ची ताकद आणि क्षमता देखील वाढते. आज आपल्या शाळकरी मुलांच्या मनात देखील नवीन संशोधनात आणि नवोन्मेषाच्या भावनेचा विकास केला जात आहे. अटल टिंकरिंग लॅब, अटल इनोव्हेशन मिशन, महाविद्यालयात इन्क्युबेशन सेंटर्स, स्टार्ट-अप इंडिया अभियान, अशा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे चांगले परिणाम देशवासियांसमोर दिसत आहेत. हे देखील भारताच्या युवा शक्तीचे, भारताच्या नाविन्यपूर्ण शक्तीचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. याच उत्साहाने आपण ह्या पुढेही चालत राहू व विकसित भारताचा आपला संकल्प निश्चित साध्य करून दाखवू आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा म्हणतो, 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान '.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की मी 'मन की बात' मध्येच, काही दिवसांपूर्वी भारतात मोठ्या संख्येने भरणाऱ्या मेळ्यांबद्दल, जत्रांबद्दल सांगितले होते. तेव्हा एका स्पर्धेची कल्पना समोर आली, ज्यामध्ये लोक मेळ्यांचे वा जत्रांशी संबंधित फोटो प्रसिद्ध करतील. सांस्कृतिक मंत्रालयाने ह्याच विषयी ‘ मेला मोमेंट्स स्पर्धेचे ; - मेळ्यातील क्षण ह्या स्पर्धेचे आयोजन केले होते. तुम्हाला हे ऐकून आनंद वाटेल की हजारो लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यातील अनेकांनी बक्षिसेही जिंकली. कोलकाता येथे राहणारे श्री. राजेश धरजी यांनी “चरक मेळा” मधील फुगे आणि खेळणी विकणाऱ्याच्या त्यांनी काढलेल्या अप्रतिम फोटोसाठी पुरस्कार मिळवला. ही जत्रा ग्रामीण बंगालमध्ये खूपच लोकप्रिय आहे. अनुपम सिंह जी यांना वाराणसीच्या होळी उत्सवाच्या फोटोसाठी “ मेळा पोर्ट्रेट पुरस्कार मिळाला. 'कुलसाई दसरा'शी संबंधित एक आकर्षक पैलू दाखविल्याबद्दल अरुण कुमार नलीमेलाजी यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच पंढरपूरमधील भक्तीभाव दाखवणारा एक फोटो लोकांना सर्वात जास्त आवडलेल्या फोटोमध्ये समाविष्ट झाला. तो फोटो पाठवला होता महाराष्ट्रातील श्री. राहुलजी ह्यांनी. या स्पर्धेत आलेले अनेक फोटो, जत्रेत मिळणाऱ्या स्थानिक पदार्थांचे, पक्वान्नांचे होते. यामध्ये पुरलिया येथे राहणारे आलोक अविनाश जी ह्यांनी पाठवलेल्या फोटोला पुरस्कार मिळाला. त्यांनी बंगालच्या ग्रामीण भागातील एका जत्रेमधील खाद्यपदार्थ दाखवले होते. प्रणव बसाकजींनी काढलेल्या फोटोलाही बक्षीस मिळाले. त्यांनी भगोरिया महोत्सवात कुल्फीचा आनंद घेणाऱ्या महिलांचा फोटो काढला होता. रुमेला जी ह्यांनी छत्तीसगडमधील जगदलपूर येथील गावातील जत्रेत भजी खाणाऱ्या महिलांचा फोटो पाठवला होता - त्यालाही बक्षीस मिळाले.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी आज प्रत्येक गावाला, प्रत्येक शाळेला , प्रत्येक पंचायतीला अशा स्पर्धा सातत्याने आयोजित करण्याची विनंती करेन. . आजकाल सामाजिक माध्यमांची शक्ती इतकी वाढली आहे, तंत्रज्ञान आणि मोबाईल फोन घरा घरात पोहोचले आहेत. मग तो तुमचा स्थानिक सण असो किंवा उत्पादन, ह्या द्वारे तुम्ही जगापर्यंत पोचू शकता.
मित्रांनो, जसं गावोगाव जत्रा भरतात, त्याचप्रमाणे इथल्या विविध नृत्यांचीही स्वतःची परंपरा आहे. झारखंड, ओडिशा आणि बंगालच्या आदिवासी भागात 'छऊ' नावाचे नृत्य अतिशय प्रसिद्ध आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत ‘ ह्या विचाराने, श्रीनगरमध्ये १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान 'छऊ' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वांनी 'छऊ' नृत्याचा आनंद लुटला. श्रीनगरमधील तरुणांना 'छऊ' नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. ह्याच प्रकारे, काही आठवड्यांपूर्वी कठुआ जिल्ह्यात 'बसोहली उत्सव' आयोजित करण्यात आला होता. हे स्थान जम्मूपासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. या महोत्सवात स्थानिक कला, लोकनृत्य आणि पारंपरिक रामलीलेचे आयोजन करण्यात आले होते.
मित्रांनो, भारतीय संस्कृतीचं सौदंर्य सौदी अरेबियातही अनुभवायला मिळालं. याच महिन्यात सौदी अरेबियात संस्कृत उत्सव नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम अत्यंत अनोखा होता आणि तो संपूर्ण कार्यक्रम संस्कृतमध्ये होता. संवाद, संगीत, नृत्य सारे काही संस्कृतमध्ये. त्यात स्थानिक लोकांचा सहभागही पहायला मिळाला.
माझ्या परिवारातील सदस्यांनो, स्वच्छ भारत आता तर संपूर्ण देशाचा प्रिय विषय बनला आहे. माझा तर तो आवडता विषय आहेच. आणि जेव्हा मला त्या विषयाशी एखादी जोडलेली बातमी मिळते तेव्हा माझं मन त्याकडे धावत जातं. आणि हे स्वाभाविक आहे की मन की बातमध्ये त्या बातमीला जागा मिळतेच. स्वच्छ भारत अभियानानं साफसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची मानसिकता बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचं प्रतीक बनला आहे, जिने करोडो देशवासियांचं जीवन सुखमय बनवलं आहे. या अभियानानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना खास करून युवकांच्या सामूहिक भागीदारीसाठी प्रेरित केलं आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न सूरतमध्ये पहायला मिळाला आहे. युवकांच्या एका संघानं इथं प्रोजेक्ट सुरत ची सुरूवात केली आहे. याचं लक्ष्य सुरतला एक आदर्श शहर बनवायचं आहे जे स्वच्छता आणि शाश्वत विकासांचं एक उत्कृष्ट उदाहरण बनले. सफाई संडे नावाच्या सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत सुरतचे युवक प्रथम सार्वजनिक जागा आणि ड्यूमास बीचची स्वच्छता करत असत. नंतर हे लोक तापी नदीच्या किनाऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी पूर्णपणे जोडले गेले आणि आपल्याला हे समजून आनंद होईल की पाहता पाहता या उपक्रमाशी जोडलेल्या लोकांची संख्या आता पन्नास हजारावर पोहचली आहे. लोकांकडून मिळालेल्या समर्थनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी कचरा गोळा करण्याचं कामही सुरू केलं. आपल्याला हे समजून संतोष वाटेल की या लोकांनी लाखो किलो कचरा हटवला आहे. जमिनी स्तरावरून केले जाणारे असे प्रयत्न खूप मोठे परिवर्तन घडवून आणणारे ठरतात.
मित्रांनो, गुजरातेतूनच एक माहिती हाती आली आहे. काही आठवडे अगोदर तेथे अंबाजीमध्ये भादरवी पून मेळ्याचं आयोजन केलं गेलं होतं. या मेळ्यात ५० लाखाहून अधिक लोक आले. हा मेळा दरवर्षी होत असतो. या मेळ्याची सर्वात खास बाब ही होती की मेळ्य़ासाठी आलेल्या लोकानी गब्बर हिल च्या एक मोठ्या भागात स्वच्छता मोहीम राबवली. मंदिरांच्या आसपासच्या सर्व जागेची स्वच्छता करण्याचं हे अभियान अत्यंत प्रेरक आहे.
मित्रानो, मी नेहमी हे सांगत असतो की हे स्वच्छता अभियान एका दिवसाचं किंवा एका आठवड्याचं अभियान नाही. तर ते एक जीवनात झोकून देण्याचं काम आहे. आम्ही आपल्या आसपास असे लोक पहातो की ज्यांनी आपलं पूर्ण जीवन स्वच्छतेशी संबंधित विषयातच घालवलं आहे. तामिळनाडूच्या कोईमतूर जिल्ह्यातील लोगानाथजी हे यांचं उदाहरण अजोड आहे. लहानपणी ते गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते व्यथित होत. त्यानंतर त्यांनी अशा मुलांना मदत करण्याचा निश्चय केला आणि आपल्या कमाईतील एक भाग ते या मुलांच्या मदतीसाठी दान करू लागले. पैसे कमी पडले तर लोगानाथनजी यांनी लोकांचे स्वच्छतागृहांचीही साफसफाई केली ज्यामुळे गरजू मुलांना मदत होईल. ते गेल्या २५ वर्षात पूर्णपणे समर्पित भावानं या कामाला जोडले गेले आहेत आणि आतापर्यंत १५०० हून अधिक मुलांची त्यांनी मदत केली आहे. मी पुन्हा एकदा अशा प्रयत्नांची प्रशंसा करतो. देशभरात होत असलेले असे अनेक प्रयत्न हे आम्हाला केवळ प्रेरणा देत नाहीत तर काही तरी नवीन करण्याची इच्छाशक्तीही आमच्यात जागवतात.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, २१व्या शतकातील आव्हानांपैकी एक आहे जल सुरक्षा. पाण्याचं संरक्षण करणं हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही. जेव्हा आम्ही सामूहिकतेच्या भावनेतून एखादं काम करतो. तेव्हा तर यशही मिळत असतं. याचं एक उदादरण देशातील प्रत्येक जिल्ह्यात तयार होत असलेल्या अमृतसरोवर हेही आहे. अमृत महोत्सव दरम्यान भारताने जी ६५ हजाराहून अधिक अमृत सरोवरं बनवली आहेत, ती येणाऱ्या पिढ्यांना लाभ देतील. आता आमची ही जबाबदारी आहे की जेथे जेथे अमृत सरोवरं बनली आहेत.त्यांची निरंतर देखभाल केली जावी. ते जल संरक्षणाचे प्रमुख स्रोत बनून रहावेत.
मित्रांनो, जल संरक्षणाच्या अशाच चर्चेमध्ये मला गुजरातच्या अमरेलीमध्ये झालेल्या जलउत्सवाबद्दलही समजलं. गुजरातेत बारा मास वाहणाऱ्या नद्यांचा अभाव आहे . त्यामुळे लोकांना जास्त करून पावसाच्या पाण्यावरच अवलंबून रहावं लागतं. गेल्या वीस पंचवीस वर्षात सरकार आणि सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांनंतरही तेथील स्थितीत परिवर्तन जरूर आलं आहे. म्हणून तेथे जलउत्सवाची प्रमुख भूमिका आहे. अमरेली मध्ये झालेल्या जल उत्सवाच्या दरम्यान जल संरक्षण आणि तलावाच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्यात वॉटर स्पोर्ट्सलाही उत्तेजन देण्यात आलं. जल सुरक्षेबाबत जाणकारांशी चर्चाही करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना तिरंग्याचा कारंजे फारच पसंत पडलं. या जल उत्सवाचं आयोजन सूरतमध्ये हिरे व्यवसायात नाव कमावलेल्या सावजी भाई ढोलकिया प्रतिष्ठाननं केलं होतं. मी तेथे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं
अभिनंदन करतो, जल संरक्षणासाठी असंच काम करत रहाण्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबीयांनो, आज जगभरात कौशल्य विकासासाठी स्वीकारार्हता मिळत आहे. जेव्हा आम्ही एखाद्याला कौशल्य शिकवतो तेव्हा त्याला त्याला एक हुनरच नाही तर उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देत असतो. जेव्हा मला हे समजलं की एक संस्था गेल्या चार दशकांपासून कौशल्य विकासाच्या कामात गुतलेली आहे, तर मला अधिकच चांगल वाटलं. ही संस्था आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलममध्ये आहे. आणि तिचं नाव बेल्जीपुरम यूथक्लब असं आहे. कौशल्य विकासावर फोकस करून बेल्जीपुरम यूथ क्लबनं जवळपास 7000 महिलांना सक्षम बनवलं आहें. यातील सर्वाधिक महिला आज स्वबळावर काही काम करत आहेत. या संस्थेनं बाल मजुरी करणाऱ्या मुलांनाही काही ना काही कौशल्य शिकवून त्यांना दुष्टचक्रातून बाहेर निघण्यास मदत केली आहे. बेल्जीपुरम यूथक्लबच्या टीमनं शेतकरी उत्पादन संघ म्हणजे एफपीओ शी जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांना नवीन कौशल्य शिकवलं आहे ज्यामुळे शेतकरी सक्षम झाले आहेत. हा यूथ क्लब स्वच्छतेबाबतही गावागावात जागृती करत आहे. संस्थेने अनेक शौचालयं निर्माण करण्यातही मदत केली आहे. मी कौशल्य विकासासाठी या संस्थेशी जोडल्या गेलेल्या सर्व लोकांचं अभिंनंदन करतो. त्यांची प्रशंसा करतो. देशाच्या गावागावात कौशल्य विकासासाठी अशा सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. मित्रांनो, जेव्हा एका लक्ष्यासाठी सामूहिक प्रयत्न होतो. तेव्हा, तेव्हा यशाची उंचीही अधिक होऊन जाते. मी आपल्यासर्वांना लद्दाखचे एक प्रेरक उदाहरण सांगू इच्छितो. आपण पश्मिना शालींच्याबात तर ऐकलंच असेल,गेल्या काही काळापासून लद्दाखी पश्मिना शालींची खूप चर्चा होत आहे. लद्दाखी पश्मिना लूम्स ऑफ लद्दाखनावाने जगभरात बाजारपेठांत जात आहे. हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की या शाली तयार करण्यात १५ गावांतील ४५० हून अधिक महिला सहभागी आहेत. सुरूवातीला त्या ही उत्पादने येथे आलेल्या पर्यटकांनाच विकत होत्या. पण आता डिजिटल भारतच्या या काळात त्यांनी बनवलेल्या या वस्तु देश आणि जगातील वेगवेगळ्या बाजारात पोहचत आहेत. म्हणजे आमचे लोकल आता ग्लोबल होत आहे.आणि यातून या महिलांचं उत्पन्न ही वाढलं आहे.
मित्रांनो, नारी शक्तीचं असं यश देशाच्या कानाकोप-यात आहे. अशा बाबी जास्तीत जास्त समोर आणण्याची आवश्यकता आहे. आणि हे सांगण्यासाठी मन की बातपेक्षा दुसरे अधिक चांगले व्यासपीठ काय असू शकते. तर आपणही अशा प्रकारची जास्तीत जास्त उदाहरणे माझ्यासोबत सामायिक करा ते सुद्धा आपल्यासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
माझ्या कुटुंबियांनो, मन की बातमध्ये आपण असे सामूहिक प्रयत्नांची चर्चा करत आहोत. ज्यांनी समाजात मोठमोठी बदल झाले आहेत. मन की बातचं एक यश हेही आहे की, याने घराघरात रेडिओला लोकप्रिय बनवलं आहे. माय गव्ह वर मला उत्तरप्रदेशच्या अमरोहाचे रामसिंह बौद्धजी यांचं पत्र मिळालं आहे. रामसिंह जी गेल्या अनेक वर्षापासून रेडिओंचा संग्रह करण्याच्या कामात जोडले आहेत. त्यांचे असं म्हणणं आहे की मन की बात कार्यक्रमानंतर त्यांचा रेडिओ म्युझियम संग्रह पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. असंच मन की बात ने प्रेरित होऊन अहमदाबादच्या जवळच तीर्थधाम प्रेरणा तीर्थनं एक मनोरंजक प्रदर्शन भरवलं आहे. यात देशविदेशातले १०० हून जास्त जुने रेडिओ ठेवले आहेत. इथं मन की बात चे सारे भाग ऐकले जाऊ शकतात. आणखी ही अशी उदाहरणे आहेत की जेथे मन की बात पासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे आपलं स्वतःचं काम सुरू केलं. असंच एक उदाहरण कर्नाटकच्या चामराजनगर च्या वर्षाजींचं आहे. ज्यांना मन की बातनं आपल्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित केलं. या कार्यक्रमातील एका एपिसोडपासून प्रेरणा घेऊन त्यांनी केळीपासून जैविक खत तयार करण्यास सुरूवात केली. निसर्गाशी अत्यंत जवळीक जपलेल्या वर्षाजींचा हा उपक्रम इतरांसाठीही रोजगाराची संधी घेऊन आला आहे.
माझ्या कुटुंबियांनो, उद्या २७ नोव्हेंबरला कार्तिक पूर्णिमेचं पर्व आहे. याच दिवशी देवदिवाळीही साजरी केली जाते. आणि माझं मन तर असं म्हणतं की काशीची देवदिवाळी जरूर पाहू. यावेळी मी काशीला तर जाऊ शकत नाही. परंतु बनारसच्या लोकांना मन की बातच्या माध्यमातून माझ्य़ा शुभकामना पाठवत आहे. यावेळीही काशीच्या घाटांवर लाखो दिवे पेटवले जातील. भव्य आरती होईल, लेसर शो होईल लाखांच्या संख्येने देशविदेशातील लोक येऊन देवदिवाळीचा आनंद लुटतील.
मित्रांनो, उद्या कार्तिक पोर्णिमेच्या दिवशीच गुरू नानकदेवजींचं प्रकाश पर्व आहे. गुरू नानकजींचे अनमोल संदेश भारताच नव्हे तर जगासाठी आजही प्रेरक आणि प्रासंगिक आहेत. ते आम्हाला साधेपणा, सद्भाव आणि दुस-यांप्रती समर्पित होण्यासाठी प्रेरित करतात. गुरू नानकदेवजी यांनी सेवाभावना आणि सेवाकार्याची जी शिकवण दिली आहे, तिचं पालन पूर्ण विश्वातली शीख बंधुभगिनी करताना दिसतात. मी मन की बातच्या सर्व श्रोत्यांना गुरू नानकदेवजीच्या प्रकाशपर्वबद्दल शुभेच्छा देतो.
माझ्या कुटुंबियानो, आज मन की बातमध्ये यावेळी इतकंच. पाहता पाहता वर्ष २०२३ समाप्तीच्या दिशेंनं निघालं आहे. प्रत्येकवर्षी प्रमाणेच आपण आणि मी विचार करत आहोत की अरे किती लवकर हे वर्ष संपलं. पण हेही सत्य आहे की हे वर्ष भारतासाठी असीम यशाचं राहिलं आहे. भारताचं यश हे प्रत्येक भारतीयांचं यश आहे. मला याचा आनंद आहे की मन की बात भारतीयांचं यश समोर आणण्याचं एक सशक्त माध्यम बनलं आहे. पुढील वेळेला देशावासियांच्या अनेक यशांबद्दल पुन्हा आपल्याशी चर्चा होईल. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद,
नमस्कार.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!
मित्रांनो,
सणांच्या या उत्साहातच मला ‘मन की बात’ची सुरुवात दिल्लीच्या एका बातमीनं करायची आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाली. इथे कॅनॉट प्लेस या ठिकाणी, एकाच खादीच्या दुकानात, लोकांनी एकाच दिवसात दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त सामानाची खरेदी केली. या महिन्यात सुरू असलेल्या खादी महोत्सवानं पुन्हा एकदा विक्रीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणून घेऊन खूप बरं वाटेल. दहा वर्षांपूर्वी देशात खादी उत्पादनांची विक्री ३० हजार कोटींपेक्षा कमी होती, आता ती वाढून सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. खादीची विक्री वाढली याचा अर्थ असा होतो की त्याचा फायदा शहरापासून खेड्यापर्यंत, समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचतो. आपले विणकर, हस्तकला कारागीर, आपले शेतकरी, आयुर्वेदिक वनस्पती लावणारे कुटीर उद्योग, सर्वांनाच या विक्रीचा लाभ मिळत आहे, आणि हीच 'वोकल फॉर लोकल' मोहिमेची, स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची ताकद आहे आणि याला हळूहळू तुम्हा सर्व देशबांधवांचा प्रतिसाद सुद्धा वाढत आहे.
मित्रांनो,
आज मला तुमच्या कडे आणखी एक विनंती पुन्हा करायची आहे आणि ती अगदी खूप आग्रहानं करायची आहे. आपण जेव्हा जेव्हा पर्यटनाला जाल, तीर्थयात्रेला जाल, तेव्हा तेव्हा तिथल्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, नक्की खरेदी करा. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या एकूण बजेटमध्ये, खर्चाच्या नियोजनामध्ये, स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला महत्त्वाचं प्राधान्य द्या. तुमचं बजेट 10 टक्के असो, 20 टक्के असो, तुम्ही त्यातून स्थानिक उत्पादनांचीच खरेदी करा, त्या त्या ठिकाणीच खरेदी करा.
मित्रहो,
दरवेळेप्रमाणेच याही वेळी आपल्या सण-उत्सवात आपलं प्राधान्य, आपला आग्रह, 'स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचाच राहू देत. आपलं स्वप्न आहे 'आत्मनिर्भर भारत', स्वावलंबी भारत आणि आपण सर्वजण मिळून ते स्वप्न पूर्ण करूया. यावेळेस अशाच उत्पादनानं घर सजवून टाका, ज्यात माझ्या कुणा देशबांधवाच्या घामाचा सुगंध आहे, माझ्या देशाच्या युवक-युवतीची गुणवत्ता ठासून भरली आहे, ज्या उत्पादनानं माझ्या देशवासीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नेहमीच्या आयुष्यातली कुठलीही गरज असो, ती गरज आपण स्थानिक उत्पादनानच पूर्ण करू. मात्र, तुम्हाला आणखी एका गोष्टीचा बारकाईनं विचार करावा लागेल. 'व्होकल फॉर लोकल' ही भावना केवळ सणासुदीच्या खरेदीपुरती मर्यादित नाही… आणि मी कुठेतरी पाहिलं आहे…लोक दिवाळीचे दिवे खरेदी करतात आणि नंतर समाज माध्यमावर, 'व्होकल फॉर लोकल' अशी टिप्पणी टाकतात. नाही मित्रांनो…ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, जीवनातली प्रत्येक गरज स्थानिक उत्पादनानच पूर्ण करायची आहे….आपल्या देशात, आता, सर्व काही उपलब्ध आहे. हा दृष्टीकोन फक्त लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही. आज भारत जगातलं सर्वात मोठं भव्य उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रँड, नामांकित उत्पादक, त्यांची उत्पादनं इथे तयार करत आहेत. जर आपण ती उत्पादनं स्वीकारली, तर मेक इन इंडियाला चालना मिळते, आणि हा सुद्धा एक प्रकारे लोकल साठी व्होकलच, स्थानिक उत्पादनांसाठीचा आग्रहच असतो.आणि हो, अशी उत्पादनं खरेदी करताना, UPI डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करा… आपल्या जीवनात ही सवय लावून घ्या आणि त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपलं सेल्फी छायाचित्र, नमो अॅप वर टाकून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून! मी यापैकी काही छायाचित्रं, काही टिप्पण्या समाजमाध्यमांवर टाकेन, जेणेकरून इतर लोकांनाही 'व्होकल फॉर लोकल'साठी प्रेरणा मिळेल.
मित्रांनो,
आपण जेव्हा भारतात तयार झालेल्या, भारतीयांनीच बनवलेल्या उत्पादनांनी आपली दिवाळी साजरी कराल, आपल्या कुटुंबाची प्रत्येक छोटी मोठी गरज स्थानिक उत्पादनानं पूर्ण कराल, तेव्हा दिवाळीचा झगमगाट तर आणखी जास्त वाढेलच वाढेल, शिवाय त्या कारागिरांच्या आयुष्यात एक नवी दिवाळी येईल, जीवनातली एक नवी पहाट उगवेल, त्यांचं जीवन शानदार बनेल! भारताला स्वावलंबी बनवा, नेहमी मेक इन इंडिया निवडत जा… यामुळे आपल्या सोबतच आपल्या कोट्यवधी देशवासीयांची दिवाळी बहारदार होईल, चैतन्यपूर्ण होईल, उजळून निघेल, मनोरंजक होईल.
माझ्या प्रिय देशावासीयानो,
31 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप विशेष असतो. याच दिवशी आपण लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करतो. आपण भारतवासीय कितीतरी कारणांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असतो आणि श्रद्धेनं त्यांना वंदन करत असतो. यातलं सगळ्यात मोठं कारण आहे… देशातल्या 580 हून जास्त संस्थानांचं, भारतात विलीनीकरण करण्यात त्यांनी बजावलेली अतुलनीय भूमिका! आपल्या सर्वांनाच हे माहित आहे… प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबरला गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेच्या पुतळ्याजवळ, एकता दिवसाशी निगडीत मुख्य कार्यक्रम होत असतो. या खेपेस या कार्यक्रमा व्यतिरिक्त दिल्लीत कर्तव्यपथावर, एक खूपच विशेष कार्यक्रम होणार आहे. आपल्याला आठवत असेल… मी, गेल्या काही दिवसात, देशातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून माती जमा करण्याचा आग्रह केला होता. प्रत्येक घरातून माती संकलित केल्यानंतर ती कलशात भरली गेली आणि मग अमृत कलश यात्रा निघाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र केलेली ही माती, या हजारो अमृत कलश यात्रा, आता दिल्लीत पोहोचत आहेत. इथे दिल्लीत ही सर्व माती, एका विशाल अशा भारत कलशात एकत्र केली जाईल आणि याच पवित्र मातीतून दिल्लीत अमृत वाटिका उभारली जाईल. अमृतवाटिकेच्या माध्यमातून ही माती, देशाच्या राजधानीच्या हृदयस्थानी, अमृत महोत्सवाचा एक भव्य वारसा म्हणून कायम अस्तित्वात राहील. 31 ऑक्टोबरलाच, देशात गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल. आपण सर्वांनी मिळून या महोत्सवाला, जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवापैकी एक बनवून टाकलं. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान असो किंवा प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम असो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. याच महोत्सवा दरम्यान सामुदायिक सेवेचं सुद्धा एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.
मित्रहो,
आज मी आपल्याला एक आणखी आनंदाची बातमी सांगणार आहे….विशेष करून माझ्या नवतरुण मुला-मुलींना, ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास आहे, स्वप्न आहेत, संकल्प आहेत. आनंदाची ही बातमी देशवासीयांसाठी तर आहेच आहे….. माझ्या नवतरुण मित्रांनो… आपल्यासाठी विशेष आहे. दोन दिवसानंतरच 31 ऑक्टोबरला, एक खूप मोठ्या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे आणि तो सुद्धा सरदार साहेबांच्या जयंतीदिनी! या संघटनेचं नाव आहे…माझा तरुण भारत…माय भारत! माय भारत संघटना, भारताच्या युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपली सक्रीय भूमिका बजावण्याची संधी मिळवून देईल. हा, विकसित भारताच्या निर्मितीत, भारताच्या युवाशक्तीची एकजूट घडवून आणण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. 'माझा युवा भारत' या संघटनेचं संकेतस्थळ…. माय भारत सुद्धा सुरू होणार आहे. मी युवा वर्गाला विनंती करतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो… की आपण सर्व… माझ्या देशाचे नवतरुण-तरुणी, आपण सर्व माझ्या देशाचे पुत्र आणि कन्या, 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' वर नोंदणी करा आणि विविध कार्यक्रमांसाठी तयार राहा. 31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींची पुण्यतिथी सुद्धा आहे. मी त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या कुटुंबियांनो,
आपलं साहित्य, लिटरेचर, 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला आणखी बळकट करण्याच्या सगळ्यात उत्तम अशा माध्यमांपैकी एक माध्यम आहे. मी आपल्याला तामिळनाडूच्या गौरवपूर्ण वारशाशी निगडीत अशा दोन खूपच प्रेरक उपक्रमांची माहिती देऊ इच्छितो. मला प्रसिद्ध तमिळ लेखिका भगिनी शिवशंकरीजी यांच्याबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी एक उपक्रम राबवला आहे ….नीट इंडिया, थ्रू लिटरेचर! म्हणजे याचा अर्थ असा आहे की साहित्याच्या माध्यमातून देशाला एका धाग्यात गुंफणं आणि जोडणं! त्या या प्रकल्पावर गेल्या सोळा वर्षांपासून काम करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 18 भारतीय भाषांमधल्या साहित्याचा अनुवाद केला आहे. त्यांनी कितीतरी वेळा, कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत आणि इंफाळपासून जैसलमेर पर्यंत, देशभर भेटी दिल्या आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांमधले लेखक आणि कवींशी त्यांना संवाद साधता येईल. शिवशंकरीजींनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटी, पर्यटन समालोचनासह, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. हे पुस्तक तमिळ आणि इंग्रजी, दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम, ही लेखन गाथा, चार मोठ्या खंडात उपलब्ध आहे आणि प्रत्येक खंड भारताच्या वेगवेगळ्या भागाला समर्पित आहे. मला त्यांच्या या दृढनिश्चयाचा खूप अभिमान वाटतो.
मित्रहो,
कन्याकुमारीच्या, थिरू ए के पेरुमलजी यांचं काम सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी, तामिळनाडूची कथाकथनाची परंपरा संरक्षित करण्याचं, जोपासण्याचं प्रशंसनीय काम केलं आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून आपला हा वसा चालवत आहेत. त्यासाठी ते तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करतात आणि त्या त्या भागातले लोककलांचे विविध प्रकार शोधून काढून त्याबद्दल पुस्तकात लिहितात. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की त्यांनी आतापर्यंत अशी जवळजवळ शंभर पुस्तकं लिहिली आहेत. त्याशिवाय पेरूमलजी यांना आणखी एक छंद आहे. तामिळनाडूच्या मंदिर संस्कृती बद्दल संशोधन करणं त्यांना खूप आवडतं. त्यांनी, लेदर पपेट्स या कळसुत्री बाहुल्यांच्या प्रकारावर सुद्धा खूप संशोधन केलं आहे आणि या संशोधनाचा लाभ तिथल्या स्थानिक लोककलावंतांना होत आहे. शिवशंकरीजी आणि ए.के. पेरूमलजी यांचे हे प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श उदाहरण आहेत, वस्तुपाठ आहे. आपल्या संस्कृती रक्षणाच्या अशा प्रत्येक प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, जे आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासोबतच, देशाचं नाव, देशाचा मान, सर्वच वाढवत असतात.
माझ्या कुटुंबियांनो,
येत्या 15 नोव्हेंबरला संपूर्ण देश, आदिवासी गौरव दिन साजरा करेल. हा विशेष दिवस, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीशी निगडीत आहे. भगवान बिरसा मुंडा आपल्या सर्वांच्याच हृदयात वसले आहेत. निस्सीम साहस काय असतं आणि आपल्या दृढनिश्चयावर कायम राहणं कशाला म्हणतात, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. त्यांनी परदेशी राजवट कधीही स्वीकारली नाही. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला थारा नसेल असा समाज त्यांना अभिप्रेत होता. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि समानतेचं जीवन लाभावं अशी त्यांची इच्छा होती. भगवान बिरसा मुंडा यांनी पर्यावरण पूरक, निसर्गाशी मैत्रीपूर्वक जीवन जगण्यावर नेहमी भर दिला. आपण आजही पाहतो की आपले आदिवासी बंधू-भगिनी निसर्गाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारे कसे समर्पित आयुष्य जगत असतात! आपल्या सर्वांसाठी, आपल्या आदिवासी बंधू-भगिनींचं हे काम खूप प्रेरणादायक आहे.
मित्रांनो,
उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबरला गोविंदगुरु जी यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. आपल्या गुजरात आणि राजस्थानच्या आदिवासी आणि वंचित समाजाच्या जीवनात, गोविंदगुरु जी यांचं महत्त्व खूपच विशेष असं आहे. गोविंदगुरुजीं ना सुद्धा मी आपली श्रद्धांजली अर्पण करतो. नोव्हेंबर महिन्यात आपण मानगढ नरसंहाराचा स्मृतिदिन सुद्धा पाळतो. मी त्या नरसंहारात हुतात्मा झालेल्या, भारतमातेच्या सर्व लेकरांना वंदन करतो.
मित्रांनो, भारताला आदिवासी शूरवीरांचा समृद्ध इतिहास आहे. याच भारतभूमीवर थोर तिलका मांझी यांनी अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. याच भूमीतून सिद्धो-कान्हूंनी समतेचा आवाज बुलंद केला. तंट्या भिल्ल हा योद्धा आपल्या मातीत जन्माला आला याचा आम्हाला अभिमान आहे. बिकट काळात आपल्या लोकांच्या पाठी उभे राहणाऱ्या शहीद वीर नारायण सिंह यांचे आम्ही श्रद्धापूर्वक स्मरण करतो. शूर रामजी गोंड असोत, शूर गुंडाधुर असोत, भीमा नायक असोत, त्यांचे शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासी बंधू-भगिनींमध्ये जी जागृती केली त्याचे देश आजही स्मरण करतो. ईशान्येतील किआंग नोबांग आणि राणी गैडिनलिऊ यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांकडूनही आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातूनच देशाला राजमोहिनी देवी, राणी कमलापती यांसारख्या वीरांगना मिळाल्या. आदिवासी समाजाला प्रेरणा देणार्या राणी दुर्गावतीजींची 500 वी जयंती देश सध्या साजरी करत आहे. मला आशा आहे की देशातील अधिकाधिक तरूण त्यांच्या भागातील आदिवासी व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती जाणून त्यांच्यापासून प्रेरणा घेतील. देशाचा स्वाभिमान आणि प्रगती शिरोधार्य मानणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाबद्दल देश कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, सणासुदीच्या या काळात देशात क्रीडा क्षेत्राचा झेंडाही फडकत आहे. अलीकडेच आशियाई खेळांनंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या खेळांमध्ये भारताने 111 पदके पटकावून नवा इतिहास रचला आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी खूप खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी खेळांकडेही मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. बर्लिनमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गतिमंद खेळाडूंची अद्भुत क्षमता समोर आणते. या स्पर्धेत भारतीय संघाने 75 सुवर्ण पदकांसह 200 पदके जिंकली. रोलर स्केटिंग असो, बीच व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो की लॉन टेनिस असो, भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला.
या पदकविजेत्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हरियाणाच्या रणवीर सैनीने गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. लहानपणापासूनच ऑटिझमने त्रस्त असलेल्या रणवीरसाठी कोणतेही आव्हान गोल्फची आवड कमी करू शकले नाही. त्याची आई तर म्हणते की आज कुटुंबातील प्रत्येकजण गोल्फपटू झाला आहे. पुद्दुचेरीच्या 16 वर्षीय टी-विशालने चार पदके जिंकली. गोव्याच्या सिया सरोदे यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदकांसह चार पदके पटकावली. वयाच्या 9 व्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतरही त्या निराश झाल्या नाहीत. छत्तीसगडच्या दुर्ग येथील रहिवासी असलेल्या अनुराग प्रसादने पॉवरलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे झारखंडच्या इंदू प्रकाशची, जिने सायकलिंगमध्ये दोन पदके पटकावली आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या इंदूने आपल्या यशासमोर गरिबीला कधीही अडसर बनू दिले नाही. मला विश्वास आहे की या खेळांमधील भारतीय खेळाडूंचे यश अध्ययन अक्षमतेचा सामना करत असलेल्या इतर मुलांना आणि कुटुंबांना देखील प्रेरणा देईल. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही तुमच्या गावातील, तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या भागातील अशा मुलांकडे कुटुंबासह जावे, ज्यांनी या खेळात भाग घेतला आहे किंवा विजयी झाले आहेत. त्यांचे अभिनंदन करा. आणि त्या मुलांसोबत काही क्षण घालवा. तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. त्यांच्यातल्या दैवी शक्तीची अनुभूती घेण्याची संधी तुम्हालाही मिळेल. नक्की जा.
माझ्या सुहृदांनो, तुम्ही सर्वांनी गुजरातच्या तीर्थक्षेत्र अंबाजी मंदिराबद्दल ऐकले असेलच. हे एक महत्त्वाचे शक्तीपीठ आहे, जिथे देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने अंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. येथे गब्बर पर्वताच्या वाटेवर तुम्हाला विविध प्रकारच्या योग मुद्रा आणि आसनांच्या मूर्ती दिसतील. या मूर्तींचे वैशिष्ट्य काय आहे माहीत आहे का? खरं तर ही रद्दीसामानापासून बनवलेली शिल्पे आहेत, एका प्रकारे भंगारापासून बनवलेली आहेत आणि ती अतिशय अद्भुत आहेत.
म्हणजे जुन्या वापरलेल्या आणि भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून या मूर्ती बनवल्या गेल्या आहेत. अंबाजी शक्तीपीठातील देवी मातेच्या दर्शनासोबतच या मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या प्रयत्नाला मिळालेले यश पाहून माझ्याही मनात एक कल्पना येत आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे कचऱ्यापासून अशा कलाकृती बनवू शकतात. त्यामुळे मी गुजरात सरकारला एक स्पर्धा भरवून अशा लोकांना आमंत्रित करण्याची विनंती करतो. हा प्रयत्न, गब्बर पर्वताचे आकर्षण वाढवण्याबरोबरच देशभरातील ‘वेस्ट टू वेल्थ’ मोहिमेसाठी लोकांना प्रेरित करेल.
मित्रांनो, जेव्हा जेव्हा स्वच्छ भारत आणि 'वेस्ट टू वेल्थ'चा मुद्दा येतो तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात. आसाममधील कामरूप महानगर जिल्ह्यातील अक्षर फोरम नावाची शाळा मुलांमध्ये शाश्वत विकासाची मूल्ये, संस्कार रुजवण्याचे रुजविण्याचे काम सातत्याने करत आहे. येथे शिकणारे विद्यार्थी दर आठवड्याला प्लॅस्टिक कचरा गोळा करतात, ज्याचा वापर विटा, आणि किचेन यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. याठिकाणी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचर्याचा पुनर्वापर आणि वस्तू बनवण्यास शिकवले जाते. लहान वयातच पर्यावरणाप्रती असलेली ही जाणीव या मुलांना देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्यास खूप मदत करेल.
माझ्या सुहृदांनो, आज जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपण स्त्री शक्तीचे सामर्थ्य अजमावू शकत नाही. या काळात, तिच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असताना, भक्तीचे सामर्थ्य दाखविणाऱ्या एका महिला संताचेही स्मरण आपल्याला करावे लागेल, ज्यांचे नाव इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये कोरले गेले आहे. यंदा देशभरात संत मीराबाई यांची 525 वी जयंती साजरी होत आहे. अनेक कारणांमुळे देशभरातील लोकांसाठी त्या एक प्रेरणादायी शक्ती ठरल्या आहेत. कुणाला संगीताची आवड असेल तर संगीताप्रती समर्पणाचे त्या उत्तम उदाहरण आहेत. कोणी कविताप्रेमी असेल, तर भक्तीरसात तल्लीन झालेली मीराबाईंची भजने त्याला वेगळाच आनंद देतात. जर कोणी दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असेल, तर मीराबाईचे श्रीकृष्णामध्ये लीन होणे त्याच्यासाठी मोठी प्रेरणा ठरू शकते. मीराबाई संत रविदासांना आपले गुरू मानत. त्या म्हणायच्या देखील -
गुरु मिलिया रैदास, दीन्ही ज्ञान की गुटकी |
मीराबाई आजही देशातील माता, भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्या काळातही त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. एक संत म्हणूनही त्या आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. देशावर अनेक प्रकारची आक्रमणं होत असताना भारतीय समाज आणि संस्कृती सक्षम करण्यासाठी त्या पुढे आल्या. साधेपणात किती सामर्थ्य आहे हे मीराबाईंच्या चरित्रातून लक्षात येते. मी संत मीराबाईंना नमन करतो.
माझ्या प्रिय सुहृदांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये एवढेच. तुमच्यासोबतचा प्रत्येक संवाद मला नवीन ऊर्जा देतो. आशा आणि सकारात्मकतेशी संबंधित शेकडो कथा तुमच्या संदेशांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आत्मनिर्भर भारत मोहिमेवर भर देण्याची मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. स्थानिक उत्पादने खरेदी करा, लोकल फॉर व्होकल व्हा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची घरे स्वच्छ ठेवता, तसाच तुमचा परिसर आणि शहर स्वच्छ ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे की, 31 ऑक्टोबर हा सरदार साहेबांचा जयंती दिवस देश एकता दिवस म्हणून साजरा करतो, देशात अनेक ठिकाणी एकता दौड चे आयोजन केले जाते. तुम्हीही 31 ऑक्टोबर रोजी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करा. तुम्हीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकतेचा संकल्प दृढ करा. मी पुन्हा एकदा आगामी सणांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा, निरोगी राहा, आनंदी राहा, हीच माझी कामना आहे. आणि हो, दिवाळीच्या वेळी कुठे आगीची घटना घडेल अशी चूक करू नये. जर एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही त्याला सांभाळा, स्वतःचीही काळजी घ्या आणि संपूर्ण परिसराची देखील काळजी घ्या. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय कुटुंबियांनो नमस्कार!
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.
माझ्या कुटुंबियांनो,
चंद्रयान-3च्या यशानंतर, जी-20च्या भव्य आयोजनाने प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित केला. भारत मंडपम तर स्वतःच एखाद्या सेलिब्रिटी-मान्यवरासारखा झाला आहे. लोक त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत आणि अभिमानाने ते पोस्ट करत आहेत. या शिखर परिषदेत भारतानं, आफ्रिकी महासंघाला जी-20 समुहाचा पूर्ण सदस्य बनवून आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्या काळात भारत खूप समृद्ध होता, त्या काळात आपल्या देशात आणि जगात, सिल्क रूट-रेशीम व्यापार मार्गाचा खूप बोलबाला होता. हा रेशीम मार्ग, व्यापार-आर्थिक उलाढालींचे प्रमुख माध्यम होता. आता आधुनिक काळात भारताने जी-20 परिषदेत, आणखी एक आर्थिक कॉरिडॉर सुचवला आहे. हा, भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात आर्थिक व्यवहार पट्टा आहे. हा कॉरिडॉर येणारी शेकडो वर्षे जागतिक व्यापाराचा आधारस्तंभ बनणार आहे आणि या कॉरिडॉरची सुरुवात भारतीय भूमीवर झाली, याची नोंद इतिहासात कायम राहील.
मित्रांनो,
आज जी-20च्या अध्यक्षीय कारकीर्दीदरम्यान भारताची युवा शक्ती या परिषदेसोबत ज्याप्रकारे कार्यरत राहिली, त्याबद्दल एक विशेष चर्चा आवश्यक आहे. वर्षभरात देशातील अनेक विद्यापीठांमध्ये जी-20शी संबंधित कार्यक्रम झाले. आता या मालिकेत दिल्लीत आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे - ‘जी-20 University Connect Programme’. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील विद्यापीठांमधले लाखो विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. आयआयटी, आयआयएम, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालये यांसारख्या अनेक प्रतिष्ठित शिक्षण संस्थाही यात सहभागी होणार आहेत. मला असं वाटतं की जर तुम्हीही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर, तुम्ही 26 सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम जरूर पहा आणि त्यात सहभागी व्हा. भारताच्या भविष्य काळाबाबत आणि तरुणांच्या भविष्यावर आधारीत अनेक रंजक गोष्टी, या कार्यक्रमात असणार आहेत. मी स्वतः या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. मी देखील माझ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी संवाद साधण्याची वाट पाहत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आजपासून दोन दिवसांनी 27 सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन' आहे. काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे एक माध्यम म्हणून पाहतात, मात्र पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी संबंधित आहे. असं म्हटलं जातं की, जर कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे कुठले क्षेत्र असेल तर ते आहे पर्यटन क्षेत्र! पर्यटन क्षेत्राची भरभराट करताना, कोणत्याही देशासाठी, या क्षेत्राबद्दल सद्भावना बाळगणे, वाढवणे आणि आकर्षण तसेच त्याची ख्याती वाढवणे खूप महत्त्वाचे ठरते. गेल्या काही वर्षांत भारताबद्दलचे आकर्षण खूप वाढले आहे आणि जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर जगभरातील लोकांचा भारतातील रस आणखी वाढला आहे.
मित्रांनो,
जी-20 परिषदेसाठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले. इथली विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारची खाणे-पिणे आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली. इथे आलेले प्रतिनिधी आपापल्या देशात परत जाताना आपल्या सोबत जे सुखद अनुभव घेऊन गेले आहेत, त्यामुळे भारतात पर्यटन आणखी वाढीला लागेल. आपणा सर्वांना माहितच आहे की भारतात एकापेक्षा एक सरस अशी जागतिक वारसा स्थळे आहेत आणि त्यांची संख्या सतत वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वीच शांतीनिकेतन आणि कर्नाटकातील पवित्र होयसडा मंदिरांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मी, हा शानदार असा मान मिळाल्याबद्दल, सर्व देशवासियांचं अभिनंदन करतो. मला 2018 मध्ये शांती निकेतनला भेट देण्याचं भाग्य लाभलं होतं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे शांती निकेतनशी निगडीत होते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका प्राचीन संस्कृत श्लोकातून शांतीनिकेतनचे ब्रीदवाक्य-ध्येयवाक्य घेतले होते. तो श्लोक असा आहे -
"यत्र विश्वं भवत्येक नीदम्"
म्हणजेच, एक लहान घरटे संपूर्ण जग सामावून घेऊ शकते.
युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेली कर्नाटकातील होयसडा मंदिरे, 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेसाठी ओळखली जातात. या मंदिरांना युनेस्कोकडून मान्यता मिळणे, हा देखील भारतीय मंदिर स्थापत्य शैलीच्या, भारतीय परंपरेचा सन्मान आहे. भारतातील जागतिक वारसा स्थळांची एकूण संख्या आता 42 झाली आहे. भारताचा हाच प्रयत्न आहे की आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे, जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की जेव्हा कधी तुम्ही कुठेतरी पर्यटनाला जाण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न नक्की करा. विविध राज्यांची संस्कृती समजून घ्या, वारसा स्थळे पहा. यामुळे आपण आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासाशी तर परिचित व्हालच, सोबत स्थानिक लोकांचं उत्पन्न वाढवण्याचं तुम्ही एक महत्त्वाचं माध्यम देखील ठराल.
माझ्या कुटुंबियांनो,
भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत आता जागतिक बनले आहे. जगभरातील लोकांचा त्यांच्याकडे असलेला ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. मी आपल्याला एका छानशा मुलीने केलेल्या सादरीकरणातील एक छोटीशी ध्वनीफीत ऐकवतो...
### (MKB EP 105 ऑडिओ बाइट 1) ###
हा आवाज ऐकून तुम्ही देखील चकीत झाला असाल ना? तिचा आवाज किती गोड आहे आणि प्रत्येक शब्दातून जे भाव व्यक्त होत आहेत, त्यातून तिचे देवाशी असलेले प्रेमपूर्वक नाते आपण अनुभवू शकतो. जर मी तुम्हाला सांगितले की हा मधुर आवाज जर्मनीतील मुलीचा आहे, तर कदाचित तुम्हाला आणखी आश्चर्य वाटेल. या मुलीचे नाव आहे - कैसमी! 21 वर्षांची कैसमी सध्या इंस्टाग्रामवर खूप गाजतेय. मूळची जर्मनीची असलेली कैसमी भारतात कधीच आलेली नाही, मात्र ती भारतीय संगीताची चाहती आहे. जिने भारत कधी पाहिलाही नाही, तिला भारतीय संगीताची असलेली आवड खूप प्रेरणादायी आहे. कैसमी जन्मापासूनच दृष्टीबाधित आहे, मात्र हे कठीण आव्हान तिला असामान्य कामगिरी करण्यापासून रोखू शकलेलं नाही. संगीत आणि सर्जनशीलतेचा तिला एवढा ध्यास होता की तिने बालवयापासूनच गाणे सुरू केले. आफ्रिकी ड्रमवादनाची सुरुवात तर तिने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी केली. भारतीय संगीताचा परिचय तिला 5-6 वर्षांपूर्वीच झाला. भारतीय संगीतानं तिला इतकी भुरळ घातली, इतकी भुरळ घातली, की ती त्यात पूर्णपणे लीन झाली. ती तबलावादनही शिकली आहे. सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे तिने अनेक भारतीय भाषांमध्ये गाण्यात प्रभुत्व मिळवले आहे. संस्कृत, हिंदी, मल्याळम, तामिळ, कन्नड, आसामी, बंगाली, मराठी, उर्दू, या सर्व भाषांमध्ये तिने आपले सूर आजमावले आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की एखाद्याला दुसऱ्या अनोळखी भाषेत दोन-तीन ओळी बोलायच्या असतील तर किती अवघड असते! पण कैसमीसाठी ही बाब म्हणजे हातचा मळ आहे. तुम्हा सर्वांसाठी मी, तिने कन्नडमध्ये गायलेले एक गाणे इथे वाजवत आहे.
###(MKB EP 105 ऑडिओ बाइट 2)###
भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल जर्मनीच्या कैसमीला असलेले हे वेड कौतुकास्पद आहे. मी मनापासून तिचे कौतुक करतो. तिचा हा प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकणारा आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आपल्या देशात शिक्षणाकडे नेहमीच एक सेवा म्हणून पाहिले जाते. मला उत्तराखंडमधील काही युवकांविषयी कळले आहे, जे याच भावनेने मुलांच्या शिक्षणासाठी काम करत आहेत. नैनिताल जिल्ह्यातील काही तरुणांनी मुलांसाठी अनोखे असे घोडा वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अगदी दुर्गमातील दुर्गम भागातील मुलांपर्यंत पुस्तके पोहोचत आहेत आणि एवढेच नाही तर ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे. आतापर्यंत या माध्यमातून नैनितालमधील 12 गावे सामावून घेण्यात आली आहेत. मुलांच्या शिक्षणाशी निगडीत या उदात्त कामात मदत करण्यासाठी स्थानिक लोकही स्वतःहून पुढे येत आहेत. या घोडा वाचनालयाच्या माध्यमातून, दुरदूरवरच्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त 'कविता', 'कथा' आणि 'नैतिक शिक्षणावरील' पुस्तके वाचण्याची संधी पूर्णपणे मिळावी, असा प्रयत्न केला जात आहे. हे अनोखे वाचनालय मुलांनाही खूप आवडते.
मित्रांनो, मला हैदराबादमधल्या ग्रंथालयाशी संबंधित अशाच एका अनोख्या प्रयत्नाची माहिती मिळाली. तिथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या 'आकर्षणा सतीश' या मुलीने चमत्कार केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी, ती मुलांसाठी एक- दोन नव्हे तर सात ग्रंथालये चालवत आहे. दोन वर्षांपूर्वी आकर्षणा, जेव्हा तिच्या आई वडिलांबरोबर कर्करोग रुग्णालयात गेली, तेव्हा आकर्षणाला याची प्रेरणा मिळाली. तिचे वडील गरजूंना मदत करण्यासाठी तिथे गेले होते. तेथील मुलांनी तिला 'रंगवण्याच्या पुस्तकांसंबंधी' विचारले आणि ही गोष्ट या गोंडस बाहुलीला इतकी भावली, की तिने विविध प्रकारची पुस्तके गोळा करण्याचा निर्णय घेतला. तिने तिच्या शेजारची घरे, नातेवाईक आणि मित्रांकडून पुस्तके गोळा करण्यास सुरुवात केली आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की त्याच कर्करोग रुग्णालयात मुलांसाठीचे पहिले ग्रंथालय उघडण्यात आले. या मुलीने आतापर्यंत गरजू मुलांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी उघडलेली सात ग्रंथालयांमध्ये आता सुमारे 6 हजार पुस्तके आहेत. छोट्याशा 'आकर्षणा'ने ज्या पद्धतीने मुलांच्या भविष्यासाठी मोठं काम केलं आहे, त्यापासून अनेकांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
मित्रांनो, हे खरे आहे की आजचे युग डिजिटल तंत्रज्ञान आणि ई-पुस्तकांचे आहे. पण तरीही पुस्तके नेहमीच आपल्या जीवनात चांगल्या मित्राची भूमिका बजावतात. त्यामुळे आपण मुलांना पुस्तके वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो, आपल्या शास्त्रात म्हटले आहे-
जिवेशू करुणा चापी, मैत्री तेशू विधियताम
म्हणजेच, सजीवांवर दया करा आणि त्यांना तुमचे मित्र बनवा. आपल्या बहुतेक देवी-देवतांचे वाहन प्राणी आणि पक्षी आहेत. अनेक लोक मंदिरात जातात आणि देवाचे दर्शन घेतात; पण त्यांचे वाहन असणाऱ्या प्राण्यांकडे फारसे लक्ष देत नाहीत. हे प्राणी आपल्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असले पाहिजेत, आणि आपण शक्य तितके त्यांचे संरक्षण देखील केले पाहिजे. गेल्या काही वर्षांत देशात सिंह, वाघ, बिबटे आणि हत्तींच्या संख्येत उत्साहवर्धक वाढ झाली आहे. या पृथ्वीवर राहणाऱ्या इतर प्राण्यांना वाचवण्यासाठी आणखीही अनेक प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. असाच एक अनोखा प्रयत्न राजस्थानातील पुष्कर येथे केला जात आहे. तिथे सुखदेव भट्टजी आणि त्यांची टीम वन्यजीव वाचवण्यात गुंतलेली आहे, आणि त्यांच्या टीमचे नाव काय आहे माहीत आहे? त्याच्या टीमचे नाव आहे- कोब्रा. हे धोकादायक नाव त्यांनी टीमला दिलय, कारण त्याची टीम या भागातील धोकादायक सापांना वाचवण्यासाठी देखील काम करते. या चमूशी मोठ्या संख्येने लोक जोडले गेले आहेत, जे केवळ एका फोन कॉलवर घटनास्थळी पोहोचतात आणि त्यांच्या मोहिमेत सामील होतात. सुखदेवांच्या या चमूने आतापर्यंत 30 हजारांहून अधिक विषारी सापांचे प्राण वाचवले आहेत. या प्रयत्नामुळे केवळ लोकांचा धोका दूर झाला नाही तर निसर्गाचे संवर्धनही होत आहे. हा गट इतर आजारी प्राण्यांची सेवा करण्याच्या कार्याशी देखील संबंधित आहे.
मित्रांनो,
तामिळनाडूतील चेन्नई इथले ऑटोचालक एम. राजेंद्र प्रसादजी देखील एक आगळेवेगळे काम करत आहेत. ते गेल्या 25-30 वर्षापासून कबुतरांची सेवा करत आहे. त्याच्या स्वतःच्या घरात 200 हून अधिक कबुतरे आहेत. ते पक्ष्यांचे अन्न, पाणी, आरोग्य यासारख्या प्रत्येक आवश्यकतांची काळजी घेतात. त्यासाठी त्याना खूप पैसेही मोजावे लागतात, पण ते त्याच्या कामासाठी वचनबद्ध आहेत.
मित्रांनो, लोक उदात्त हेतूने असे काम करताना पाहून खरोखरच खूप प्रेरणा आणि आनंद मिळतो. जर तुम्हालाही अशा काही अनोख्या प्रयत्नांची माहिती मिळाली, तर ती जरूर शेअर करा.
माझ्या प्रिय कुटुंबियानो,
स्वातंत्र्याचा हा अमृतकाळ हा देशासाठी प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याचा काळ देखील आहे. आपली कर्तव्ये पार पाडत असतानाच आपण आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो, आपल्या इतच्छित स्थानापर्यंत पोहोचू शकतो. कर्तव्याची भावना आपल्या सर्वांना एकत्र आणते. उत्तर प्रदेशच्या संभल मध्ये देशाने कर्तव्याचे जे उदाहरण पाहिले आहे, जे मला तुमच्यासोबतही शेअर करायचे आहे. कल्पना करा, 70 हून अधिक गावे आहेत, हजारो लोक आहेत आणि सगळे मिळून एक लक्ष्य, एक ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येतात, हे फार दुर्मिळ आहे, परंतु संभळच्या लोकांनी ते केले. या लोकांनी एकत्रितपणे लोकसहभाग आणि सामूहिक कामाचे एक उत्तम उदाहरण दाखवले आहे. खरे तर अनेक दशकांपूर्वी या भागात 'सोत' नावाची एक नदी होती. अमरोहापासून सुरू होऊन संभळमधून बदायूंला वाहणारी ही नदी एकेकाळी या प्रदेशाची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात असे. या नदीला पाण्याचा अखंड प्रवाह होता, जो येथील शेतकऱ्यांसाठी शेतीचा मुख्य आधार होता. कालांतराने, नदीचा प्रवाह कमी झाला, ज्या मार्गांवरून नदी वाहत होती त्यावर अतिक्रमण झालं आणि नदी नामशेष झाली. नदीला आपली माता मानणाऱ्या आपल्या देशात संभळच्या लोकांनी या सोत नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प केला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 70 हून अधिक ग्रामपंचायतींनी मिळून सोत नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. ग्रामपंचायतीतल्या लोकांनी सरकारी विभागांनाही बरोबर घेतले; आणि तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत या लोकांनी नदीचा 100 किलोमीटरहून अधिक भाग पुनरुज्जीवित केला होता. पावसाळा सुरू झाला तेव्हा येथील लोकांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि सोत नदी पाण्याने भरली गेली. इथल्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची घटना ठरली. लोकांनी नदीच्या काठावर 10 हजारांहून अधिक बांबूची रोपे लावली, ज्यामुळे तिचे किनारे पूर्णपणे सुरक्षित राहतील. डासांची पैदास होऊ नये म्हणून गांबुसियाचे तीस हजारांहून अधिक मासेही नदीच्या पाण्यात सोडले गेले आहेत. मित्रांनो, सोत नदीचे उदाहरण आपल्याला सांगते की जर आपण दृढनिश्चय केला तर आपण सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करू शकतो आणि मोठा बदल घडवून आणू शकतो. कर्तव्याच्या मार्गावर चालताना तुम्ही देखील तुमच्या सभोवतालच्या अशा अनेक बदलांचे माध्यम बनू शकता.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
जेव्हा हेतू दृढ असतो आणि काहीतरी शिकण्याचा उत्साह असतो, तेव्हा कोणतेही काम कठीण राहत नाही. पश्चिम बंगालच्या श्रीमती शकुंतला सरदार यांनी हे अगदी खरे असल्याचे सिद्ध केले आहे. ती इतर अनेक महिलांसाठी प्रेरणा बनली आहे. शकुंतलाजी जंगलमहालमधील सतनाला गावच्या रहिवासी आहेत. बऱ्याच काळापासून तिचे कुटुंब रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. तिच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करणेही कठीण होते. मग त्यांनी एका नवीन मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि यश मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यांनी हे कसे केले हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल! तर त्याचं उत्तर आहे- एक शिवण यंत्र. एका शिवण यंत्राच्या माध्यमातून त्यांनी 'साल'च्या पानांवर सुंदर डिझाईन्स बनवण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कौशल्याने संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलले. त्याने बनवलेल्या या अद्भुत हस्तकलेची मागणी सातत्याने वाढत आहे. शकुंतलाजी यांच्या या कौशल्याने केवळ त्यांचेच नव्हे तर 'साल' ची पाने गोळा करणाऱ्या अनेक लोकांचेही जीवन बदलले आहे. आता त्या अनेक महिलांना प्रशिक्षण देण्याचे कामही करत आहे. तुम्ही कल्पना करू शकता, एकेकाळी वेतनावर अवलंबून असलेले कुटुंब आता इतरांना रोजगारासाठी प्रेरित करत आहे. दैनंदिन वेतनावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाला तिने स्वतःच्या पायावर उभे केले आहे. यामुळे तिच्या कुटुंबाला इतर गोष्टींवरही लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, शकुंतलाजींची स्थिती सुधारताच त्यांनी बचत करायला सुरुवात केली. आता तिने जीवन विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे तिच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. शकुंतलाजी यांच्या कार्याची प्रशंसा करावी तितकी थोडीच. भारतातील लोक अशा प्रतिभांनी भरलेले आहेत- तुम्ही त्यांना संधी द्या आणि ते काय करतात ते पहा.
माझ्या कुटुंबातील सदस्यांनो,
दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेतले ते दृश्य कोण विसरू शकेल? जेव्हा अनेक जागतिक नेते राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र आले होते. बापूंचे विचार आजही जगभरात किती उपयुक्त आहेत, याचा हा एक मोठा पुरावा आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छतेशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा मला आनंद आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये 'स्वच्छता ही सेवा" मोहीम जोरात सुरू आहे. Indian Swachhata League मध्येही उत्तम सहभाग मिळतो आहे.
आज मी 'मन की बात' च्या माध्यमातून सर्व देशवासियांना एक विनंती करू इच्छितो - की दिनांक 1 ऑक्टोबरला, रविवारी सकाळी 10 वाजता स्वच्छतेवर एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आपणही आपला वेळ काढून स्वच्छतेशी संबंधित या मोहिमेत सहभागी होऊ शकता. तुम्ही तुमच्या रस्त्यावर, परिसरात, उद्यानात, नदीत, तलावात किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि जिथे जिथे अमृत सरोवर बांधले गेले आहेत तिथे तर स्वच्छता आवश्यकच आहे. ही स्वच्छता मोहीम गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल. गांधी जयंतीच्या या प्रसंगी खादीचे काहीना काही उत्पादन खरेदी करण्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे.
माझ्या कुटुंब सदस्यांनो,
आपल्या देशात सणांचा हंगामही सुरू झाला आहे. तुम्ही सर्वजण घरी काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल. काहीजण त्यांचे शुभ कार्य सुरू करण्यासाठी नवरात्रीची वाट पाहत असतील. उत्साह आणि आशादायक अशा वातावरणात आपण vocal for local हा मंत्र देखील जरूर लक्षात ठेवा. जिथे शक्य होईल तिथे आपण भारतात तयार झालेला माल खरेदी करा. भारतीय उत्पादनांचा वापर करा.आणि भेट देताना मेड इन इंडिया उत्पादनेच भेट द्या. तुमच्या छोट्याशा आनंदामुळे दुसऱ्याच्या कुटुंबाला देखील मोठा आनंद मिळेल. तुम्ही खरेदी करता त्या भारतीय वस्तूंचा थेट फायदा आमचे कामगार, मजूर, कारागीर आणि इतर विश्वकर्मा बंधू-भगिनींना होईल. आजकाल, अनेक स्टार्टअप्स स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देत आहेत. जर तुम्ही स्थानिक वस्तू खरेदी केल्या तर स्टार्ट अप्सच्या या तरुणांना देखील फायदा होईल.
माझ्या प्रिय कुटुंब जनहो,
'मन की बात' मध्ये आज इथेच थांबतो. पुढच्या वेळी जेव्हा मी तुम्हाला 'मन की बात' मध्ये भेटेन, तेव्हा नवरात्र आणि दसरा झाला असेल. या सणासुदीच्या काळात तुम्ही प्रत्येक सण उत्साहात साजरा करा. तुमच्या कुटुंबातला प्रत्येकजण आनंदी राहो- ह्याच माझ्या शुभेच्छा.
पुढच्या वेळी, नवीन विषय आणि देशबांधवांच्या नवीन यशोगाथांसह पुन्हा भेटूया. तुम्ही तुमचे संदेश मला पाठवत रहा, तुमचे अनुभव सांगण्यास विसरू नका. मी वाट बघेन. खूप खूप धन्यवाद. नमस्कार!
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.
आसमान में सर उठाकर,
घने बादलों को चीरकर
रोशनी का संकल्प ले,
अभी तो सुरज उगा है
दृढ निश्चय के साथ चलकर
हर मुश्किल को पार कर
घोर अंधेरे को मिटाकने
अभी तो सूरज उगा है
आसमान में सर उठाकर,
घने बादलों को चीरकर
अभी तो सुरज उगा है
माझ्या परिवारातील सदस्यांनो, २३ ऑगस्टला भारतानं आणि भारताच्या चंद्रयानानं हे सिद्ध केलं आहे की संकल्पाचे काही सूर्य चंद्रावरही उगवत असतात. मिशन चांद्रयान भारताच्या त्या प्रवृत्तीचं प्रतीक बनलं आहे. जिला जी कोणत्याही स्थितीत विजयी होव्हायचं आहे आणि जी कोणत्याही स्थितीत जिंकायचं कसं तेही जाणते. मित्रांनो या मोहिमेचा एक बाजू अशीही होती की मी त्याची चर्चा आज आपल्याशी विशेषत्वाने करू इच्छितो. आपल्याला आठवत असेलच की मी यावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हटलं होतं की आम्हाला महिला प्रणित विकासाला राष्ट्रीय चरित्राच्या स्वरूपात विकसित करायचं आहे. जेथे महिला शक्तीचं सामर्थ्य जोडलं जातं. तेथे अशक्यही शक्य करून दाखवलं जाऊ शकतं. भारताचं मिशन चांद्रयान नारीशक्तीचं ही जिवंत उदाहरण आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक महिला वैज्ञानिक आणि अभियंत्या जोडल्या गेल्या होत्या. त्यांनी विविध प्रणालींचे प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापिका, अशा महत्वपूर्ण जबादार्या सांभाळल्या होत्या. भारताच्या कन्या आता अनंत समजल्या जाणार्या आकाशाला आव्हान देऊ लागल्या आहेत. एखाद्या देशाच्या कन्या इतक्या महत्वाकांक्षी होतात तर त्या देशाला विकसित होण्यापासून कोण अडवू शकेल?
मित्रांनो, आपण इतकी उंच उड्डाण यासाठी घेतलं आहे कारण आपली स्वप्नंही मोठी आहेत आणि प्रयत्नही मोठे आहेत. चांद्र यान -३ च्या यशात आमच्या वैज्ञानिकांसोबतच इतर क्षेत्रांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यानाचे सर्व भाग आणि तांत्रिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कितीतरी देशवासियांनी योगदान दिलं आहे. जेव्हा सर्वांचे प्रयत्न लागले तेव्हा यशही मिळालं. हेच चांद्रयान ३चं सर्वात मोठं यश आहे. मी मनोकामना व्यक्त करतो की पुढेही आपलं अंतराळ क्षेत्र आणि सर्वांचे प्रयत्न असंच यश मिळवत राहील.
माझ्या परिवारातील सद्स्यांनो, सप्टेंबरचा महिना हा भारताचच्या सामर्थ्याचां साक्षीदार बनू पहात आहे. पुढील महिन्यात होणार्या जी २० नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी भारत पूर्णतः तयार आहे. या परिषदेत भाग घेण्यासाठी ४० देशांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक जागतिक संयोजक राजधानी दिल्ली इथं येत आहेत. जी २० च्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सहभाग असेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत भारताने जी २० ला जास्त समावेशक व्यासपीठ बनवलं आहे. भारताच्या निमंत्रणावरूनच आफ्रिकन संघ जी २० शी जोडला गेला आहे. आफ्रिकन लोकांचा आवाज जगातील महत्वच्या व्यासपीठावर पोहचला. मित्रांनो, गेल्या वर्षी बाली मध्ये भारताला जी २० चं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आतापर्यंत इतकं काही घडलं आहे की ते आपल्याला स्वाभिमानानं भरून टाकतं. मोठमोठे कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्याच्या परंपरेपासून वेगळं होऊन आपण ही परिषद देशातील ६० वेगवेगळ्या शहरांत नेली. देशातील ६० शहरांमध्ये या परिषदेशी संलग्न अशा २०० बैठकांचं आयोजन आम्ही केलं. जी २० प्रतिनिधी जिथं जिथं गेले, तेथे लोकांनी त्यांचे अतिशय उत्साहानं स्वागत केलं. हे प्रतिनिधी भारताची विविधता, आपली चैतन्यशील लोकशाही, पाहून खूपच प्रभावित झाले. भारतात असणाऱ्या विविध शक्यतांचा त्यांना अनुभव आला.
मित्रांनो, G20ची आपली अध्यक्षता ही लोकांची अध्यक्षता आहे, ज्यात लोकसहभागाची भावना सर्वात अग्रेसर आहे. जी २० चे जे ११ कार्यकारी गट होते, त्यात शिक्षणतज्ञ, महिला, नागरी समाज, युवावर्ग, व्य़ावसायिक, आपले संसद सदस्य आणि नागरी प्रशासन यांच्याशी जोडलेल्या लोकांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली. याच्यासशी संबंधित जे आयोजन केले जात आहेत, त्यात कोणत्या ना कोँणत्या स्वरूपात जवळपास दीडकोटीहून जास्त लोक जोडले गेले आहेत. लोकसहभागाच्या आपल्या या प्रयत्नात एक नाही तर दोन दोन जागतिक विक्रम स्थापित झाले आहेत. वाराणसीत झालेल्याजी २० प्रश्नमंजुषा कार्यक्रमात ८०० शाळांच्या सव्वालाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला हा विश्वविक्रम होता. तिथंच लंबानी कारागिरांनी कमाल केली. 450 कारागिरांनी 1800 अभूतपूर्व पॅचेसचं आश्चर्यजनक संकलन करून आपल्या कौशल्याचा आणि कलाकुसरीचा परिचय करून दिला. जी २० मध्ये आलेले सर्व प्रतिनिधी आपल्या कारागिरीतील वैविध्य पाहून आश्चर्यचकित झाले. असाच एक शानदारकार्यक्रम सुरत येथे आयोजित करण्यात आला. साडी वॉकॅथॉनमध्ये १५ शहरांतील १५००० महिलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे सुरतच्या वस्त्रोदयोगाला चालना तर मिळालीच, पण व्होकल फॉर लोकललाही बळ मिळालं आणि लोकलसाठी ग्लोबल होण्याचाही मार्ग सापडला. जी २० ची बैठक श्रीनगरमध्ये झाल्यानंतर तेथील पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. मी सर्वांना आवाहन करतो जी २० संमेलनाला यशस्वी करा, देशाचा मान वाढवा.
माझ्या परिवारातील सदस्यांनो, मन की बातच्या भागांमध्ये आपण नेहमीच आपल्या युवा पिढीच्या सामर्थ्याची चर्चा करत असतो. आज क्रीडा क्षेत्र असं आहे की ज्य़ात आपले युवक खेळाडू निरंतर नवीन यश मिळवत आहेत.
आज मन ती बात मध्य़े अशा एका क्रीडास्पर्धेची चर्चा करू या की ज्यात आपल्या खेळाडूंनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये विश्व विद्यापीठ स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत भारताची कामगिरी सर्वोत्कृष्ट राहिली. आपल्या खेळाडूंनी एकूण २६ पदकं जिंकली ज्यात ११ सुवर्ण पदकं होती. आपल्याला हे जाणून चांगलं वाटेल की १९५९ पासून आतापर्यंत जितके विश्व विद्यापीठ स्पर्धा झाल्या आहेत, त्यात आतापर्यंत जिंकलेल्या सर्व पदकांची संख्या मोजली तर ती १८ च होते. इतक्या दशकांत केवळ १८ पदकं तर आता यावेळी देशानं २६ पदकं जिंकली आहेत. म्हणून विश्वविद्यापीठ स्पर्धेत पदकं जिंकलेले काही खेळाडू,विद्यार्र्थी माझ्याशी फोन लाईनवर आहेत. सर्वात प्रथम आपल्याला सांगतो की उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रगतीने तिरंदाजीत पदक जिंकलं आहे. आसामचा रहिवासी असेलेल्या अम्लाननं अथलेटिक्समध्ये पदक जिंकलं आहे. उत्तरप्रदेशची रहिवासी असलेल्या प्रियांकानं रेसवॉकमध्ये पदक जिंकलं आहे. महाराष्ट्राची रहिवासी अभिज्ञानं नेमबाजीत पदक जिंकलं आहे.
पंतप्रधान मोदीः माझ्या प्रिय युवक खेळाडूंनो नमस्कार.
युवक खेळाडू: नमस्कार. सर.
मोदी जीः मला तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटत आहे. आपण भारताचं नाव जगात चमकवलं आहे, म्हणून मी आपलं अभिनंदन करतो. आपण विश्वविद्यापीठ स्पर्धेत आपल्या कामगिरीनं प्रत्येक देशवासियांचीं मान अभिनामानाननं ताठ केली आहे. तर मी आपल्याला सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो.
प्रगती, मी या चर्चेची सुरूवात तुझ्यापासून करतो. दोनपदकं जिंकल्यानंतर आपण इथून गेलात तेव्हा याबाबत विचार केला होता काय़.. आणि इतका मोठा विजय संपादन केला तर आता काय वाटतं आहे...
प्रगतीः सर मला खूप अभिमान वाटत होता. मी माझ्य़ा देशाचा झेंडा इतका उंच फडकवून आले आहे, यामुळे मला खूप छान वाटत होतं. सुवर्ण पदकासाठीच्या लढाईत आम्ही हरलो तेव्हा मला खूप खेद वाटत होता. आता काही झालं तरीही आम्ही लढत गमावणार नव्हतो. हेच आमच्या मनात होतं. दुसर्या वेळेला हेच मनात होतं की काहीही झालं तरीही या झेंड्याला आता खाली जाऊ द्यायचं नाहीये. दरवर्षी आम्हाला सर्वाच उंचावर झेंड़ा फडकवूनच यायचं आहे. जेव्हा आम्ही शेवटच्या लढाईत जिंकलो तेव्हाच आम्ही तेथेच विजय साजरा करून आलो होतो. तो क्षण खूपच छान होता. इतकाअभिमान वाटत होता की त्याचा काही हिशोबच नाही.
मोदी जीः प्रगती आपल्याला तर खूप शारीरिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यातून आपण मात करून वर आला आहात.
प्रगती : सर, मे २०२२ ला मला ब्रेन हमरेज झाला होता, मी व्हेनटीलेटर वर होते, मी वाचेन कि नाही याची काही शाश्वती नव्हती. पण इतक होत कि, मला पुन्हा मैदानावर जाऊन उभ राहायचं आहे याची आतून हिम्मत होती. मला वाचवण्यात सर्वात मोठा हात परमेश्वराचा आहे आणि त्यानंतर डॉक्टरांचा आहे आणि नंतर तिरंदाजीचा आहे.
मोदी : आपल्या बरोबर आमलान सुद्धा आहे. आमलान हे सांगा कि, अथलेटिक्समध्ये आपल्याला इतकी आवड कशी निर्माण झाली आणि आपण ती विकसित कशी केली.
आमलान: जी नमस्कार सर,
मोदी: नमस्कार नमस्कार
आमलान : सर,अथलेटिक्सममध्ये पहिल्यांदा इतकी आवड नव्हती. प्रथम मी फुटबॉल मध्ये जास्त रसघेत होतो. पण माझ्या भावाचा एक मित्र आहे त्याने मला सांगितले कि तुला अथलेटिक्सस्पर्धेत गेल पाहिजे, तर मी विचार केला ठीक आहे. राज्य स्पर्धा खेळलो, तिथे हरलो. पण मला पराभव चांगला वाटला नाही , अस करत करत मी अथलेटिक्समध्ये आलो. हळू हळू त्यातही मला आनद वाटू लागला, माझी आवड वाढली.
मोदी: आमलान जरा सांगा कि तुम्ही सराव कुठे केलात?
आमलान : जास्तीतजास्त सराव मी हैद्राबाद ला केला आहे. साई रेड्डी सरांच्या मार्ग्द्शानाखाली, त्यानंतर आम्ही भुवनेश्वरला स्तलांत्रित झालो. नंतर माझी व्यावसायिक सुरवात झाली.
मोदी: आपल्या बरोबर प्रियांका सुद्धा आहे, प्रियांका आपण वीस किलोमीटर रेसावाक संघाचा भाग होतात, सारा देश आपल्याला आज ऐकतो आहे. या क्रीडा प्रकाराबद्दल लोक आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितात. आम्हाला हे सांगा कि, या खेळासाठी कोणत्या प्रकारचे कौशल्य आवश्यक असत. आणि आपली कारकीर्द कुठून कुठे पोहचली आहे .
प्रियांका : माझा खेळ खूप अवघड आहे, कारण आमचे पाच परीक्षक उभे असतात , आम्ही पळालो तरीही ते आम्हाला काढून टाकतील, आम्ही गुढघा वाकवला तरी आम्हाला ते काढतील, मला तर वार्निंग आली होती. त्यानंतर मी माझ्या वेगाला इतक नियंत्रित केल कि मी ठरवले मला किमान इथून पदक तर जिंकायचं आहे कारण देशासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्हाला इथून रिक्त हस्ते जायचं नाही.
मोदी: जी पिताजी आणि भाऊ सर्व ठीक आहेत ना ?
प्रियांका : जी सर, सर्व छान आहेत, मी तर सर्वाना सांगते आपण इतक सर्वांना प्रेरित करता आम्हाला इतक छान वाटत. विश्व विद्यापीठ क्रीडाना देशात इतक कोणी महत्व देत नाही. पण इतका पाठींबा मिळत असेल अगदी ऑलिंपिकप्रमाणे, प्रत्येक जण ट्विट करत आहे, आम्ही इतकी पदकं जिंकली आहेत. याला पण इतकी चालना मिळत आहे.
मोदी जीः प्रियंका, माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आपण इतकं नाव झळकवलं आहे. या आता अभिज्ञाशी आपण चर्चा करू या.
मोदी जीः अभिज्ञा, सांगा आपल्याबद्दल.
अभिज्ञाः सर मूळची कोल्हापूर, महाराष्ट्राची आहे. नेमबाजीत २५ मीटर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुल दोन्ही क्रीडाप्रकारात भाग घेत असते. माझे आईवडील शाळेत शिक्षक आहेत. मी २०१५ मध्ये नेमबाजीची सुरूवात केली आणि तेव्हा इतक्या सुविधा कोल्हापुरात मिळत नव्हत्या. बसने वडगावहून कोल्हापूरला जाण्यासाठी दीड तास लागत असे. दीड तास परत येण्यासाठी आणि सराव चार तासाचा. सहा तास तर येण्याजाण्यात जायचे आणि माझी शाळाही बुडत होती. नंतर ममी पपा मला म्हणाले की आम्ही तुला शनिवारी रविवारी शुटिंगसाठी घेऊन जात जाऊ. उरलेल्या वेळात दुसरे खेळ करत जा. ममी पापा यांना खेळात खूप रस होता. पण ते काही करू शकले नाहीत. आर्थिक पाठिंबाही तितकासा नव्हता. तितकी माहिती ही नव्हती. माझ्या आईचं एक स्वप्न होत मी देशाच प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि मग देशासाठी पदकंही जिंकली पाहिजेत तर मी त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून खेळातही खूप रुची घेत असे. नंतर मी तायक्वांदो शिकले. मी ब्लॅकबेल्ट आहे. मुष्टीयुद्ध आणि जुडो, तलवारबाजी, थाळीफेक अशा खेळातही भाग घेऊन 2015 मध्ये नेमबाजीत आले. दोन तीन वर्षे मी खूप संघर्ष केला आणि मलेशियात माझी निवड झाली, मला तिथे कांस्य पदक मिळाले. तिथून मला खूप प्रोत्साहन मिळालं. माझ्या शाळेने माझ्यासाठी एक शुटींग रेंज बनवली . नंतर शाळेने मला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवलं. मी आता गगन नारंग प्रतिष्ठान मध्ये आहे. गगन सरांनी मला चांगला पाठिंबा दिला.
मोदीजी : बरं, तुम्हा चौघांनाही मला काही सांगायचं असेल तर मला ऐकायला आवडेल. प्रगती आहे, अम्लान आहे, प्रियांका आहे, अभिज्ञा आहे, तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडलेले आहात, त्यामुळे तुम्हाला काही सांगायचे असेल तर मी नक्की ऐकेन.
अम्लान : सर, मला एक प्रश्न आहे सर.
मोदीजी : होय.
अम्लान : सर तुम्हाला सर्वात जास्त कोणता खेळ आवडतो?
मोदीजी : भारताने क्रीडा क्षेत्रात खूप चमकले पाहिजे आणि त्यामुळे मी या गोष्टींचा भरपूर प्रचार करत आहे, पण हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे खेळ आपल्या मातीशी निगडीत आहेत. त्यामुळे त्यात तर आपण कधीही मागे राहता कामा नये. आणि मी पाहतोय की तिरंदाजी मध्ये, नेमबाजी मध्ये आपले खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आणि दुसरं मी पाहतो आहे ते म्हणजे आमच्या तरुणपणात आणि कुटुंबातही खेळाबद्दलची भावना पूर्वीसारखी राहिलेली नाही. पूर्वी मुलं खेळायला जायची तर घराचे लोक त्यांना अडवायचे. पण आता काळ खूप बदलला आहे आणि तुम्ही सगळे जे यश मिळवून आणत आहात, त्यामुळे सर्व परिवारांना प्रोत्साहन मिळते आहे. प्रत्येक खेळात आज आपली मुले कुठे कुठे जातात, देशासाठी काही न काही करून येतात. आणि ह्या बातम्या आज देशभरात ठळकपणे दाखवल्या जातात, सांगितल्या जातात आणि शाळा, महाविद्यालये ह्यातून ह्या बातम्यांविषयी चर्चा होत राहते. चला. तुमच्याशी बोलून मला खूप चांगले वाटले. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा.
युवा खेळाडू : खूप खूप धन्यवाद! धन्यवाद साहेब! धन्यवाद
मोदीजी : धन्यवाद! नमस्कार |
माझ्या कुटुंबियांनो, यावेळी 15 ऑगस्टला देशाने 'सबका प्रयास’ - सर्वांचे प्रयत्न ह्यातील सामर्थ्य पाहिले. सर्व देशवासीयांच्या प्रयत्नाने 'हर घर तिरंगा अभियान' प्रत्यक्षात 'हर मन तिरंगा अभियान' झाले. या मोहिमेदरम्यान अनेक विक्रमही झाले. देशवासीयांनी करोडोंच्या संख्येने तिरंगा खरेदी केला. सुमारे दीड लाख पोस्ट ऑफिसेस मधून दीड कोटी तिरंग्यांची विक्री झाली. ह्यातून आमचे कामगार, विणकर आणि विशेषतः महिलांनीही शेकडो कोटी रुपये कमावले आहेत.
यावेळी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट करण्याचा नवा विक्रम केला. गेल्या वर्षी १५ ऑगस्टपर्यंत सुमारे ५ कोटी देशवासियांनी तिरंग्यासोबत सेल्फी पोस्ट केल्या. या वर्षी त्या संख्येने 10 कोटींचा टप्पाही पार केला आहे.
मित्रांनो, सध्या देशात 'मेरी माती, मेरा देश' - ‘ माझी माती - माझा देश - ही देशभक्तीच्या भावनांना उजाळा देण्याची मोहीम जोरात सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात देशातील प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून माती गोळा करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. देशातील पवित्र माती हजारो अमृत कलशांमध्ये जमा केली जाईल. ऑक्टोबर अखेरीस हजारोंच्या संख्येने अमृत कलश यात्रा देशाची राजधानी दिल्लीला पोहोचतील. या मातीतून दिल्लीत अमृतवाटिका बांधण्यात येईल. मला विश्वास वाटतो आहे की प्रत्येक देशवासीयाच्या प्रयत्नांनी ही मोहीमही यशस्वी होईल.
माझ्या कुटुंबियांनो, यावेळी मला अनेक पत्रे संस्कृत भाषेतील मिळाली आहेत. याचे कारण म्हणजे श्रावण पौर्णिमा या तिथीला जागतिक संस्कृत दिन साजरा केला जातो.
सर्वेभ्य: विश्व-संस्कृत-दिवसस्य हार्द्य: शुभकामना: - सर्वांना जागतिक-संस्कृत-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणा सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे. तिला अनेक आधुनिक भाषांची जननी देखील म्हटले जाते. संस्कृत भाषा आपल्या प्राचीनतेबरोबरच, भाषेची वैज्ञानिकता आणि व्याकरण ह्या साठी देखील प्रसिद्ध आहे.
भारताचे हजारो वर्षांचे प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेतच जतन केले गेले आहे. योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञानासारख्या विषयांवर संशोधन करणारे लोक आता जास्त करून संस्कृत शिकत आहेत. अनेक संस्थाही या दिशेने चांगले काम करत आहेत. जसे की संस्कृत प्रमोशन फाउंडेशन, योगासाठी संस्कृत, आयुर्वेदासाठी संस्कृत आणि बौद्ध धर्मासाठी संस्कृत ह्या सारखे अनेक पाठ्यक्रम - कोर्सेस करून घेतात. लोकांना संस्कृत शिकवण्यासाठी 'संस्कृत भारती' मोहीम चालवते. यामध्ये आपल्याला 10 दिवसांच्या 'संस्कृत संभाषण शिबिरात सहभागी होता येईल. मला आनंद वाटतो आहे की आज लोकांमध्ये संस्कृत विषयी जागरूकता आणि अभिमानाची भावना वाढली आहे. ह्याच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांतील देशाच्या विशेष योगदानाचाही मोठा सहभाग आहे. जसे की तीन संस्कृत डीम्ड विद्यापीठांना 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठे करण्यात आली. वेग- वेगळ्या शहरांमध्ये संस्कृत विद्यापीठांची अनेक महाविद्यालये आणि संस्थादेखील चालू आहेत. आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांमध्ये संस्कृत केंद्रे बरीच लोकप्रिय होत आहेत.
मित्रांनो, अनेकदा तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल, आपल्या मुळांशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली माध्यम म्हणजे आपली मातृभाषा. जेव्हा आपण आपल्या
मातृभाषेशी जोडले जातो तेव्हा साहजिकच आपण आपल्या संस्कृतीशी जोडले जातो, आपल्या संस्कारांशी जोडले जातो, आपल्या परंपरांशी जोडले जातो. आपल्या चिरंतन प्राचीन भव्य वैभवाशी जोडले जातो.
अशीच भारतातील आणखी एक मातृभाषा आहे, तेलुगू भाषा. 29 ऑगस्ट हा दिवस तेलुगु दिवस म्हणून साजरा केला जातो.
अन्दरिकी तेलुगू भाषा दिनोत्सव शुभाकांक्षलु | तेलुगु दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
तेलुगू भाषेच्या साहित्यात आणि परंपरेत भारतीय संस्कृतीची अनेक मौल्यवान रत्ने दडलेली आहेत. तेलुगूच्या या वारशाचा लाभ संपूर्ण देशाला मिळावा यासाठी, अनेक प्रयत्नही केले जात आहेत.
माझ्या कुटुंबियांनो, 'मन की बात'च्या अनेक भागांमध्ये आपण पर्यटनाबद्दल बोललो आहोत. काही गोष्टी किंवा ठिकाणे स्वतः प्रत्यक्ष पाहणे, समजून घेणे आणि काही काळ तिथे घालवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. समुद्राचे कोणी कितीही वर्णन केले तरी समुद्र पाहिल्याशिवाय त्याची विशालता जाणवू शकत नाही. हिमालयाचे कोणी कितीही गुणगान करू दे, आपण प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याचे सौंदर्य समजू शकत नाही. म्हणूनच मी नेहमी सर्वांना विनंती करतो की, जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या देशातील सौंदर्य आणि विविधता पाहण्यासाठी अवश्य भेट दिलीच पाहिजे.
अनेकदा आपण आणखी एक गोष्ट पाहतो की आपण जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन येतो पण आपल्या स्वतःच्या शहर किंवा राज्यातील अनेक उत्तमोत्तम ठिकाणांविषयी आणि गोष्टींबद्दल आपण अनभिज्ञ असतो.
अनेक वेळा असे घडते की लोकांना त्यांच्याच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जास्त माहिती नसते. असेच काहीसे धनपालजींच्या सोबत झाले. धनपाल जी, बेंगळुरूमधील परिवहन कार्यालयात चालक म्हणून काम करायचे. सुमारे 17 वर्षांपूर्वी त्यांना साईटसीइंग विंग- स्थलदर्शन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यालाच आता सर्वजण बंगलोर दर्शनी या नावाने ओळखतात. धनपाल जी पर्यटकांना शहरातील विविध पर्यटनस्थळी घेऊन जायचे. अशाच एका सहलीच्या वेळी एका पर्यटकाने त्यांना विचारले की बंगळुरूमध्ये टाकीला सेनकी टाकी का म्हणतात? आपल्याला ह्याप्रश्नाचे उत्तर माहित नाही याचं त्यांना खूप वाईट वाटलं. मग असेच त्यांनी स्वतःचे ज्ञान वाढवण्यावर भर दिला. आपला वारसा जाणून घेण्याच्या वेडापायी त्यांना अनेक दगड आणि शिलालेख सापडले. धनपाल जींचे मन या कामात इतके रमले - इतके रमले की त्यांनी एपिग्राफी मध्ये म्हणजेच शिला लेखांशी संबंधित विषयांत डिप्लोमादेखील केला. जरी ते आता निवृत्त झाले असले तरीपण इतिहास शोधण्याचा त्यांचा छंद आजही अबाधित आहे.
मित्रांनो, मला ब्रायन डी. खारप्राण ह्याच्या विषयी सांगताना अत्यंत आनंद होत आहे. ते मेघालय इथले निवासी आहेत आणि त्यांना Speleology (स्पेलियो-लॉजी) मध्ये खूप रस आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याचा अर्थ आहे - गुहांचा अभ्यास. काही वर्षांपूर्वी ही आवड तेव्हा प्रथम निर्माण झाली जेव्हा त्यांनी अनेक कथांची पुस्तके वाचली. 1964 मध्ये त्यांनी शाळकरी मुलगा म्हणून आपली पहिली शोध मोहीम केली. 1990 मध्ये तो त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून एक संघटना स्थापन केली आणि त्याद्वारे मेघालयमधील अज्ञात गुहांची माहिती शोधू लागले. पाहता पाहता त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सोबत मेघालयातील 1700 हून अधिक गुंफा शोधल्या आणि मेघालय राज्याला जागतिक गुहा नकाशावर नेऊन ठेवले.
भारतातील काही सर्वात लांब आणि खोल गुहा मेघालयात आहेत. ब्रायन जी आणि त्यांच्या टीमने cave fauna म्हणजेच गुहांमधील अशा जीवसृष्टीचे दस्तऐवजीकरण केले आहे, जे इतरत्र जगात कोठेही आढळत नाहीत. या संपूर्ण टीमच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. त्या सोबतच मी आपणा सर्वांना मेघालयच्या लेण्यांना भेट देण्याची विनंती करतो.
माझ्या कुटुंबियानो, तुम्हा सर्वांना माहिती आहेच की डेअरी क्षेत्र, आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे. आपल्या माता आणि बहिणींच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्यात तर ह्या क्षेत्राची महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी मला गुजरातच्या बनास डेअरीच्या एका विशेष उपक्रमा विषयी माहिती मिळाली. बनास डेअरी, आशियातील सर्वात मोठी डेअरी मानली जाते. येथे सरासरी दररोज 75 लाख लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. या नंतर ते इतर राज्यांत देखील पाठवले जाते. इतर राज्यांमध्ये दूध वेळेवर पोचावे म्हणून, आतापर्यंत टँकर किंवा दुधाच्या गाड्यांची - मिल्क ट्रेन्स ची मदत घेतली जायची.पण ह्यांत देखील आव्हाने काही कमी नव्हती. एक म्हणजे लोडिंग आणि अनलोडिंगला खूप वेळ लागायचा.त्यात अनेक वेळा दूध खराबही व्हायचे. ह्या समस्येवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवा प्रयोग केला. रेल्वेने पालनपूर ते नवीन रेवाडीपर्यंत ट्रक-ऑन-ट्रॅक ही सुविधा सुरू केली. यामध्ये दुधाचे ट्रक थेट रेल्वेवर चढवले जातात. म्हणजेच त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या दूर झाली आहे. ट्रक ऑन ट्रॅक सुविधेचे परिणाम अतिशय समाधानकारक आहेत. पूर्वी दूध पोहोचायला जे 30 तास लागायचे ते आता निम्म्याहून कमी वेळात पोहोचत आहे. यामुळे एकीकडे इंधनामुळे होणारे प्रदूषण थांबले आहेच, तर दुसरीकडे इंधन खर्चातही बचत होत आहे. याचा मोठा फायदा ट्रक चालकांना होत आहे. त्यांचे जीवन सोपे झाले आहे.
मित्रांनो, सामूहिक प्रयत्नांमुळे आज आपल्या दुग्धशाळाही आधुनिक विचार करून पुढे जात आहेत. बनास डेअरीने पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने कसे एक पाऊल पुढे टाकले आहे ते सीडबॉल वृक्षारोपण अभियानातून कळून येते. वाराणसी मिल्क युनिअन - वाराणसी दूध संघ आपल्या डेअरी- (दुग्ध उत्पादक ) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी खत व्यवस्थापनावर काम करते आहे. केरळच्या मलबार दूध संघ डेअरीचा प्रयत्नही अद्वितीय आहे. प्राण्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे विकसित करण्यात ते मग्न आहेत.
मित्रांनो, आज अनेक लोक दुग्धव्यवसायाचा अवलंब करून त्यात विविधता आणत आहेत. राजस्थानमधील कोटा येथे डेअरी फार्म चालवत असलेल्या अमनप्रीत सिंगबद्दल तर तुम्ही अवश्य जाणून घ्यायला हवे. त्यांनी दुग्धव्यवसाया बरोबरच बायोगॅसवरही लक्ष केंद्रित करून दोन बायोगॅस प्रकल्प उभारले. त्यामुळे त्यांचा विजेवरील खर्च सुमारे ७० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांचा हा प्रयत्न देशभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा आहे. आज अनेक मोठ्या डेअरीज बायोगॅसवर भर देत आहेत. या प्रकारचे समुदाय चालित मूल्यवर्धनाचे प्रकल्प अतिशय उत्साहवर्धक आहेत. मला विश्वास वाटतो की असे प्रकल्प देशभर नेहमी चालू राहतील.
माझ्या कुटुंबियांनो, आज मन की बातमध्ये एवढेच. आता सणांचा मौसमही आला आहे. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या अग्रीम हार्दिक शुभेच्छा. उत्सव साजरा करताना व्होकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवायला हवा. 'आत्मनिर्भर भारत' अभियान ही प्रत्येक देशवासियाची स्वतःची मोहीम आहे. आणि जेव्हा सणासुदीचा काळ असतो तेव्हा तर आपण आपली श्रद्धास्थानं आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवलाच पाहिजे. पण कायमही स्वच्छ ठेवला पाहिजे. पुढच्या वेळी पुन्हा तुमच्यासोबत मन की बात होईल, काही नवीन विषय घेऊन भेटेन. आपल्या देशवासीयांच्या काही नवीन प्रयत्नांबद्दल, त्यांच्या यशाबद्दल तपशीलवार चर्चा केली जाईल. मग तो पर्यंत निरोप द्या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.
मित्रांनो, पावसाळ्याचा हा काळ ‘वृक्षारोपण आणि ‘जलसंरक्षण’ यांच्यासाठी देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’च्या दरम्यान निर्माण झालेले 60 हजारहून जास्त अमृत सरोवरांच्या परिसराची चमकदमक वाढली आहे. 50 हजाराहून अधिक अमृत सरोवरांच्या निर्मितीचे काम सुद्धा सुरु आहे. आपले देशवासीय संपूर्ण जागरुकता आणि जबाबदारीने जल संरक्षणा’साठी नवनवे प्रयत्न करत आहेत. तुमच्या लक्षात असेल, काही काळापूर्वी मी मध्यप्रदेशात शहडोल येथे गेलो होतो. तिथे माझी भेट पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींशी झाली.तिथेच माझी त्यांच्याशी निसर्ग आणि पाणी वाचवण्याबद्दल देखील चर्चा झाली. मला आत्ताच समजले आहे की पकरिया गावच्या आदिवासी बंधू- भगिनींनी या संदर्भात काम सूरू देखील केले आहे. तेथे, प्रशासनाच्या मदतीने लोकांनी सुमारे शंभर विहिरींचे जल पुनर्भरण यंत्रणेत रुपांतर केले. पावसाचे पाणी आता या विहिरींमध्ये पडते, विहिरींतील पाणी जमिनीच्या आत शिरते. यामुळे त्याभागातील भूजल स्तर देखील हळूहळू सुधारत जाईल. आता सगळ्या गावकऱ्यांनी त्या भागातील सुमारे 800 विहिरींना पुनर्भरण करण्यासाठी वापरण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. अशीच एक उत्साहवर्धक बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. काही दिवसांपूर्वी, उत्तर प्रदेशात, एका दिवसात 30 कोटी झाडे लावण्याचा विक्रम करण्यात आला. या अभियानाची सुरुवात राज्य सरकारने केली, आणि हे कार्य तेथील लोकांनी पूर्ण केले. असे उपक्रम म्हणजे लोकसहभागासह जनजागृतीची देखील उत्तम उदाहरणे आहेत.आपण सर्वांनीच झाडे लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नांचा भाग व्हावे अशी माझी इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या श्रावणाचा पवित्र महिना सुरु आहे. सदाशिव महादेवाच्या आराधनेसोबतच श्रावण महिना हिरवाई आणि आनंदाशी संबंधित असतो. म्हणूनच श्रावणाच्या अध्यात्मिक दृष्टीकोनाबरोबरच सांस्कृतिक दृष्टीकोनाचे देखील महत्त्व मोठे आहे. श्रावणातील झोपाळे, श्रावणातील मेंदी, श्रावणाचे उत्सव – म्हणजेच श्रावणाचा अर्थच आनंद आणि उत्साह असा होतो.
मित्रांनो, आपला हा विश्वास आणि या परंपरांची आणखी एक बाजू देखील आहे. आपले हे सण आणि परंपरा आपल्याला गतिमानता देतात. श्रावणात शंकराच्या आराधनेसाठी कितीतरी भक्त कावड यात्रेला जातात. ‘श्रावणा’मुळे या काळात 12 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर भाविक जात आहेत. वाराणसीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले हे ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. आता काशीला प्रत्येक वर्षी 10 कोटींहून अधिक पर्यटक पोहोचत आहेत. अयोध्या, मथुरा, उज्जैन यांसारख्या तीर्थक्षेत्री भेट देणाऱ्या भाविकांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. यातून लाखो गरीब लोकांना रोजगार मिळू लागला आहे, त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. हे सगळं, आपल्या सांस्कृतिक जन जागृतीचा परिणाम आहे.आपली तिर्थस्थळे पाहण्यासाठी आता संपूर्ण जगातून लोक भारतत येत आहे.मला अशाच दोन अमेरिकन मित्रांची माहिती मिळाली आहे. ते दोघे कॅलिफोर्नियाहून अमरनाथ यात्रा करण्यासाठी इथे आले होते. या विदेशी पाहुण्यांनी अमरनाथ यात्रेशी संबंधित स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांबद्दल काहीतरी ऐकले होते. त्यामुळे ते इतके प्रेरित झाले की स्वतःच अमरनाथ यात्रा करण्यासाठी भारतात आले. ते या सगळ्याला महादेवाचा आशीर्वाद मानतात. हीच तर भारताची खासियत आहे की हा देश सर्वांचा स्वीकार करतो, सर्वांना काहीनाकाही देतो.अशीच एक फ्रेंच वंशाची स्त्री आहे, शार्लोट शोपा.काही दिवसांपूर्वी मी जेव्हा फ्रान्सला गेलो होतो तेव्हा माझी त्यांच्याशी भेट झाली. शार्लोट शोपा एक योग अभ्यासक आहेत, योग शिक्षक आहेत आणि त्यांचे वय शंभर वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांनी शंभरी पार केली आहे.गेल्या 40 वर्षांपासून त्या योग्याभ्यास करत आहेत. स्वतःची तंदुरुस्ती आणि शंभर वर्षांच्या या वयाचे श्रेय त्या योगालाच देतात. त्या जगात भारताचे योग विज्ञान आणि त्याच्या सामर्थ्याचा एक प्रमुख चेहेरा झाल्या आहेत. प्रत्येकाने त्यांच्याकडे बघून शिकले पाहिजे. आपण आपल्या वारशाचा स्वीकार करायला हवा, इतकेच नव्हे तर जबाबदारीने हा वारसा जगासमोर मांडायला हवा. सध्या असाच एक प्रयत्न उज्जैनमध्ये सुरु आहे हे सांगताना मला आनंद होतो आहे. तिथे देशभरातील 18 चित्रकार, पुराणांतील गोष्टींवर आधारित आकर्षक चित्रकथा तयार करत आहेत. ही चित्रे, बुंदी शैली, नाथद्वारा शैली, पहाडी शैली तसेच अपभ्रंश शैली अशा काही विशिष्ट शैलींच्या वापरासह तयार करण्यात येतील. या चित्रकथा उज्जैनच्या त्रिवेणी संग्रहालयात मांडणार आहेत. म्हणजेच काही काळानंतर जेव्हा कधी तुम्ही उज्जैनला जाल तेव्हा महाकाल महालोक भगवानासोबत आणखी एका दिव्य स्थानाचे दर्शन तुम्ही घेऊ शकाल.
मित्रांनो, उज्जैन येथे तयार होत असलेल्या या चित्रांबाबत बोलताना मला दुसरे एक अनोखे चित्र आठवले. राजकोट येथील प्रभात सिंग मोडभाई या कलाकाराने हे चित्र तयार केले. ते चित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारलेले होते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कुलदेवता ‘तुळजा माते’चे दर्शन घेण्यासाठी जात असताना आजूबाजूचे वातावरण कसे होते याचे चित्रण कलाकार प्रभात भाई यांनी त्यांच्या चित्रात केले होते. आपल्या परंपरा, आपला वारसा यांना जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला त्यांना सजवावे लागते, त्यात जगावे लागते, पुढच्या पिढीला त्या शिकवाव्या लागतात.या दिशेने आज अनेक प्रयत्न होत आहेत हे पाहून मला आनंद होतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेकदा जेव्हा आपण, इकोलॉजी, फ्लोरा,फौना,बायोडायव्हर्सिटी असे शब्द ऐकतो तेव्हा काही लोकांना असे वाटते की ते काही वेगळे विषय आहेत, यांच्याशी संबंधित तज्ञांचे विषय आहेत, मात्र असे नाही आहे. कारण आपण खरोखरीच निसर्गावर प्रेम करत असू तर आपण आपल्या लहान लहान प्रयत्नांतून सुद्धा खूप काही साध्य करू शकतो. तामिळनाडूमधील वाडावल्ली येथील एक स्नेही आहेत, सुरेश राघवनजी. राघवन यांना चित्रकलेचा छंद आहे. तुम्हाला तर माहित आहेच की चित्रकला कॅनव्हासशी संबंधित काम आहे.पण राघवनजी यांनी ठरवले की ते त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून झाडे-झुडुपे आणि जीवजंतूंच्या माहितीचे जतन करतील. ते विविध फ्लोरा आणि फौना यांची चित्रे काढून त्यांच्याशी संबंधित माहितीचे संकलन करुन ठेवतात.आतापर्यंत त्यांनी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अशा शेकडो पक्षी, प्राणी, ऑर्किड्स यांची चित्रे काढली आहेत. कलेच्या माध्यमातून निसर्गाची सेवा करण्याचे हे उदाहरण खरोखरीच अद्भुत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,मी आज तुम्हांला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी, समाज माध्यमांवर एक अद्भुत पद्धतदिसली. अमेरिकेने आपल्याला शंभरहून अधिक दुर्मिळ आणि प्राचीन कलाकृती परत केल्या आहेत. ही बातमी समजल्यानंतर समाज माध्यमांवर या कलाकृतींच्या बाबतीत खूप चर्चा झाली. तरुणांमध्ये आपल्या वारशाबाबत अभिमानाची भावना दिसून आली. भारतात परत आलेल्या या मुर्त्या अडीच हजारांपासून अडीचशे वर्ष जुन्या आहेत. या दुर्मिळ वस्तूंचे नाते देशाच्या विविध क्षेत्रांशी आहे. या वस्तू टेराकोटा, दगड, धातू आणि लाकूड यांच्यापासून बनवलेल्या आहेत. यापैकी काही वस्तू अशा आहेत ज्या पाहून तुम्हांला आश्चर्य वाटेल. तुम्ही या वस्तू बघाल तर बघतच राहाल.यामध्ये 11 व्या शतकातील एक अत्यंत देखणी वालुकाश्म शिल्पकृती सुद्धा आहे. हे शिल्प म्हणजे नृत्य मुद्रेतील एक अप्सरा आहे आणि याचे नाते मध्य प्रदेशाशी आहे. यामध्ये चोल युगातील अनेक मुर्त्या देखील आहेत. देवी आणि भगवान मुरुगन यांच्या प्रतिमा तर 12 व्या शतकातील आहेत आणि त्या तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीशी संबंधित आहेत. गणपतीची सुमारे हजार वर्ष जुनी काशाची मूर्ती देखील भारताला परत करण्यात आली आहे.ललितासनात नंदीवर बसलेल्या उमा-महेश्वर यांची मूर्ती 11 व्या शतकातील आहे असे म्हणतात.दगडात कोरलेल्या जैन तीर्थंकरांच्या दोन मूर्ती देखील भारतात परत आल्या आहेत. सूर्य देवांच्या दोन मूर्ती तुमचे मन मोहून टाकतील. यातील एक मूर्ती वालुकाश्मापासून बनलेली आहे. परत करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये लाकडापासून बनवलेला एक तक्ता आहे ज्यावर समुद्रमंथनाची कथा रेखाटली आहे. 16 -17 व्या शतकातील या वस्तूचा सबंध दक्षिण भारताशी आहे.
मित्रांनो, मी इथे अगदी कमीच नावे घेतली आहेत, तसे बघायला गेले तर ही यादी बरीच मोठी आहे. भारताचा अनमोल वारसा आपल्याला परत करणाऱ्या अमेरिकी सरकारचे मी आभार व्यक्त करु इच्छितो. 2016 आणि 2021 मध्ये जेव्हा मी अमेरिकेला भेट दिली तेव्हा देखील अनेक कलाकृती भारताला परत करण्यात आल्या होत्या. अशा प्रयत्नांमुळे, आपल्या सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वस्तूंच्या चोरीसंदर्भात देशभरात जागरुकता निर्माण होईल. तसेच देशवासियांची आपल्या समृध्द वारशाप्रती ओढदेखील आणखी वाढेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, देवभूमी उत्तराखंडमधील काही माता आणि भगिनींनी मला जी पत्रे लिहिलीं आहेत ती मनाला भावूक करणारी आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला, स्वतःच्या भावाला अनेकानेक आशीर्वाद दिले आहेत. त्या लिहितात- त्यांनी कधी असा विचार देखील केला नव्हता की आपला सांस्कृतिक वारसा असलेले ‘भोजपत्र’ त्यांच्या उपजीविकेचे साधन होऊ शकते. तुम्ही विचार करत असाल की हे संपूर्ण बाब आहे तरी काय?
मित्रांनो, मला हीपत्रे लिहिली आहेत, चमोली जिल्ह्यातील नीती-माणा भागातील महिलांनी. या त्याच महिला आहेत ज्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये मला भोजपत्रावर एक अनोखी कलाकृती काढून पाठवली होती. हा उपहार मिळाल्यावर मी खूप भारावून गेलो. कारण, आपल्याकडे प्राचीन काळापासून आपली शास्त्रे आणि ग्रंथ अशाच भोजपत्रांवर जतन करून ठेवली जात आहेत. महाभारत देखील अशाच भोजपत्रांवर लिहिण्यात आले होते.
आज देवभूमीतील या महिला, भोजपत्रापासून अतिशय सुंदर सुंदर कलाकृती आणि स्मृतिचिन्हे तयार करत आहेत. माझ्या प्रवासात, माणा गावाला जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाचे मी कौतुक केले होते. मी देवभूमीला येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त स्थानिक उत्पादने खरेदी करा. त्याचा तेथे खूप चांगला परिणाम झाला आहे.
आज येथे येणाऱ्या प्रवाशांना भोजपत्राची उत्पादने खूप आवडत आहेत आणि ते ती चांगल्या किमतीला विकतही घेत आहेत. उत्तराखंडचा हा भोजपत्रांचा प्राचीन वारसा महिलांच्या आयुष्यात आनंदाचे नवनवे रंग भरतो आहे.मला हे जाणून आनंद झाला की राज्य सरकार भोजपत्रापासून नवीन उत्पादने बनवण्यासाठी महिलांना प्रशिक्षणही देत आहे. भोजपत्रातील दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी देखील राज्य सरकारने एक मोहीम सुरु केली आहे. एकेकाळी देशाचे शेवटचे टोक मानले गेलेले क्षेत्र, आता देशातील पहिले गाव मानून, त्याचा विकास होत आहे. आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यासोबतच ते आर्थिक प्रगतीचे साधनही बनत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये मला अनेक अशी पत्रेही मिळाली आहेत, जी मनाला खूप समाधान देतात.
नुकतीच हज यात्रा पूर्ण केलेल्या मुस्लिम महिलांनी ही पत्रे लिहिली आहेत.त्यांचा हा प्रवास अनेक अर्थाने विशेष आहे.या अशा महिला आहेत ज्यांनी कोणत्याही पुरुष सोबत्याशिवाय किंवा मेहरमशिवाय हजयात्रा केलीआणि ही संख्या पन्नास शंभर नाही तर 4 हजारांपेक्षाही जास्त आहे. हा एक मोठा बदल आहे. पूर्वी , मुस्लिम महिलांना मेहरमशिवाय 'हज' करण्याची परवानगी नव्हती. मी, 'मन की बात'च्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या सरकारचेही मनःपूर्वक आभार मानतो. मेहरमशिवाय हजला जाणाऱ्याया महिलांसाठी, खास महिला समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती.
मित्रांनो, गेल्या काही वर्षात हज धोरणात जे बदल केले गेले आहेत, त्यांचे खूप कौतुक होत आहे. आमच्या मुस्लिम माता आणि भगिनींनी मला याबद्दल खूप लिहिले आहे. आता, अधिकाधिक लोकांना 'हज'ला जाण्याची संधी मिळत आहे. 'हज यात्रा' करून परदेशातून परत आलेल्या लोकांनी विशेषतः आमच्या माता-भगिनींनी पत्रे लिहून जे आशीर्वाद दिले आहेत, ते खूपच प्रेरणादायी आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जम्मू-काश्मीरमधील संगीत संध्या असेल, उंच भागातील बाइक रॅली/ मोटारसायकल प्रवास असेल, चंदीगडमधील स्थानिक क्लब/ मंडळे असतील किंवा पंजाबमधील क्रीडाक्षेत्रातील अनेक गट असतील, ह्यांचा उल्लेख केला की वाटते ही करमणुकीची चर्चा आहे, साहसाची चर्चा चालू आहे. पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. ही सगळी आयोजने एका समान उद्दिष्टाने केली गेलेली आहेत. हे समान कारण आहे - ड्रग्ज विरुद्ध/ अंमली पदार्थांविरुद्धची जनजागृती मोहीम.
जम्मू-काश्मीरच्या तरुणांना अंमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न केले गेले आहेत. तिथे संगीत संध्या ( म्युझिकल नाईट), मोटारसायकल प्रवास (बाईक रॅलीज) ह्या सारखे कार्यक्रम होत आहेत. चंदीगडमध्ये हा संदेश पोचवण्यासाठी स्थानिक क्लब्सना/ मंडळांना त्याच्याशी जोडण्यात आले आहे. ते ह्याला VADA (वादा) क्लब/ मंडळ म्हणतात. VADA म्हणजे Victory Against Drugs Abuse.अंमली पदार्थांच्या गैरवापरावर विजय. पंजाब मध्ये असे अनेक क्रीडा गट देखील तयार केले गेले आहेत, जे फिटनेसवर/ तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. नशेविरुद्धच्या ह्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग खूप उत्साहजनक आहे. या सर्व प्रयत्नांमुळे भारतातील अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहीमेला बळकटी मिळणार आहे.
आम्हांला देशाच्या भावी पिढ्यांना वाचवायचे असेल तर त्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. याच विचाराने 15 ऑगस्ट 2020 रोजी 'नशा मुक्त भारत अभियान' सुरू झाले. ह्या मोहीमेमध्ये 11 कोटींहून अधिक लोक जोडले गेले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी भारताने अंमली पदार्थांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थांचा सुमारे दीड लाख किलोचा साठा जप्त करून नष्टही करण्यात आला. भारताने 10 लाख किलो अंमली पदार्थ नष्ट करण्याचा एक अनोखा विक्रम केला आहे. या औषधांची किंमत 12,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती. मी त्या सर्वांचे कौतुक करू इच्छितो जे व्यसनमुक्तीच्या या उदात्त मोहिमेला हातभार लावत आहेत. अंमली पदार्थांचे व्यसन हे केवळ कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठीच मोठी समस्या आहे. त्यामुळेच अशा परिस्थितीत, हा धोका कायमचा संपवण्यासाठी, आपण सर्वांनी संघटित होऊन या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अंमली पदार्थ आणि तरुणाईच्या विषयी बोलत आहोत तर मला तुम्हाला मध्य प्रदेशमधील एका प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगायचे आहे. हा प्रेरणादायी प्रवास आहे मिनी ब्राझीलचा. आता तुम्ही विचार करत असाल की मध्य प्रदेशात मिनी ब्राझील कुठून आले? हीच तर गंमत आहे. मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यामध्ये बिचारपूर नावाचे एक गाव आहे. बिचरपूरलाच मिनी ब्राझील म्हणतात. मिनी ब्राझील म्हणायचे कारण म्हणजे आज हे गाव फुटबॉलच्या उगवत्या ताऱ्यांचा बालेकिल्ला बनले आहे. काही आठवड्यांपूर्वी मी शहडोलला गेलो होतो, तेव्हा असे अनेक फुटबॉल खेळाडू मला भेटले. मी विचार केला की देशवासीयांना आणि विशेषत: तरुण मित्रांना ह्या सर्व फुटबॉलपटूंच्या विषयी कळायला हवे.
मित्रांनो, साधारण दोन अडीच दशकांपूर्वी बिचारपूर गावाचा मिनी ब्राझील होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. त्या काळात बिचारपूर गाव अवैध दारूचा अड्डा म्हणून कुप्रसिद्ध होते, नशेच्या आहारी गेले होते. ह्या वातावरणामुळे सर्वात जास्त नुकसान येथील तरुणांचे होत होते. माजी राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक रईस अहमद यांनी या तरुणांची प्रतिभा ओळखली. रईसजींच्याकडे फारशी संसाधने नव्हती, परंतु त्यांनी संपूर्ण समर्पण वृत्तीने तरुणांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. काही वर्षांतच इथे फुटबॉल इतके लोकप्रिय झाले की तीच बिचारपूर गावाची ओळख बनली. आता येथे फुटबॉल क्रांती नावाचा एक उपक्रमही चालू आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते आणि त्यांना प्रशिक्षण दिले जाते. हा उपक्रम इतका यशस्वी झाला आहे की बिचारपूरमधून 40 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ही फुटबॉल क्रांती आता हळूहळू आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशात पसरत आहे.
शहडोल आणि त्याच्या आजूबाजूचा मोठ्या परिसरात 1200 हून अधिक फुटबॉल क्लब तयार झाले आहेत. येथून बरेच असे खेळाडू उदयास येत आहेत जे आता राष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. अनेक माजी फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक, आज, येथे, तरुणांना प्रशिक्षण देत आहेत. जरा विचार करा, जे आदिवासी क्षेत्र बेकायदेशीर दारूसाठी कुप्रसिद्ध होते, व्यसनांसाठी कुप्रसिद्ध होते तेच आता देशाची फुटबॉल नर्सरी बनले आहे. म्हणूनच म्हणतात - जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच. आपल्या देशात प्रतिभेची कमतरता नाही. आवश्यकता आहे ती अशा प्रतिभावान मुलांना शोधण्याची आणि आकार देण्याची. मग नंतर हेच युवक देशाचे नाव मोठे करतात आणि देशाच्या विकासाला दिशा देतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्या निमित्ताने आपण सर्वजण ‘अमृत महोत्सव’ पूर्ण उत्साहात साजरा करत आहोत. 'अमृतमहोत्सवा'च्या निमित्ताने देशभरात सुमारे दोन लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम अनेक रंगानी सजले होते, वैविध्यपूर्ण होते. यामध्ये विक्रमी संख्येने तरुण सहभागी झाले होते हे देखील या कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते, सौंदर्य होते. ह्या कार्यक्रमांच्या दरम्यान तरुणांना देशातील महान व्यक्तिमत्त्वांबद्दल खूप काही जाणून घेता आले. गेल्या काही महिन्यांबद्दलच बोलायचे झाले तर लोकसहभागातून साजरे झालेले अनेक चांगले कार्यक्रम बघायला मिळाले. असाच एक कार्यक्रम होता दिव्यांग लेखकांसाठी 'लेखक मेळाव्या'चे आयोजन. ह्या कार्यक्रमात विक्रमी संख्येने लोक सहभागी झाले होते. तर आंध्र प्रदेशात तिरुपती येथे 'राष्ट्रीय संस्कृत परिषद' आयोजित करण्यात आली होती. आपल्या इतिहासात किल्ल्यांचे किती महत्त्व होते ते तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. याचेच चित्रण करणारी एक मोहीम होती 'किल्ले आणि कथा' म्हणजे किल्ल्यांशी संबंधित कथा, ती लोकांना खूप आवडली.
मित्रांनो, आज जेव्हा देशभरात सगळीकडे'अमृत महोत्सव' साजरा होत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. 15 ऑगस्ट अगदी जवळ आला आहे, तेव्हा देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हुतात्मा झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी ‘मेरी माती मेरा देश’ - ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू होणार आहे. ह्या अभियानाअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. ह्या विभूतींच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या अभियानात देशभरात ‘अमृत कलश यात्रा’ही काढण्यात येणार आहे. देशातील कानाकोपऱ्यातून, गावागावांतून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ही 'अमृत कलश' यात्रा देशाच्या राजधानी दिल्लीत पोहोचेल. ही यात्रा आपल्या सोबत देशाच्या विविध भागातून रोपेही आणेल. 7500 कलशातून आलेली माती आणि ही रोपे मिळून, नंतर राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ 'अमृत वाटिका' निर्माण करण्यात येणार आहे. ही 'अमृत वाटिका', म्हणजे 'एक भारत श्रेष्ठ भारत’ ह्या अभियानाचे भव्य प्रतीक बनेल. मी मागच्या वर्षी लाल किल्ल्यावरून पुढील 25 वर्षांसाठी, अमृतकालसाठी 'पंच प्रणांबद्दल बोललो होतो. 'मेरी माती मेरा देश' मोहिमेत सहभागी होऊन आम्ही हे ‘पंच प्राण’ पूर्ण करण्याची शपथही घेणार आहोत. आपण सगळे, देशाची पवित्र माती हातात घेऊन शपथ घेतानाचे सेल्फी काढा आणि yuva.gov.in वर अवश्य अपलोड करा.
गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी, 'हर घर तिरंगा अभियाना' च्या निमित्ताने जणू संपूर्ण देश एकत्र आला होता, त्याच पद्धतीने यावेळीही प्रत्येक घरात तिरंगा फडकवायचा आहे आणि ही परंपरा पुढे निरंतर चालवायची आहे. या प्रयत्नांमुळे आम्हाला आपल्या कर्तव्याची जाणीव होईल, देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिल्या गेलेल्या असंख्य बलिदानांची जाणीव होईल आणि स्वातंत्र्याचे मूल्य कळेल. त्यामुळे प्रत्येक देशवासीयाने या प्रयत्नात अवश्य सहभागी झाले पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 'मन की बात'मध्ये इतकेच.
आता थोड्याच दिवसांनी आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वात सामील होणार आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचे आहे, त्यांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि 'मन की बात' हे देशवासियांच्या या मेहनतीला, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचेच एक माध्यम आहे.
भेटू या पुढच्या वेळी, काही नवीन विषयांसह. खूप खूप आभार, नमस्कार!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार, ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुम्हां सगळ्यांचे स्वागत आहे. ‘मन की बात’ ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी असते, परंतु यावेळी एक आठवडा आधीच होत आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की, पुढच्या आठवड्यात मी अमेरिकेमध्ये असणार आहे आणि तिथे खूपच धावपळ देखील असेल आणि म्हणूनच मी विचार केला, तिथे जाण्याआधी तुमच्याशी चर्चा करूया, आणि याहून चांगले काय असणार आहे? जनतेचा आशीर्वाद, तुमची प्रेरणा, माझी उर्जा अधिकच वृद्धिंगत करते.
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.
मित्रांनो, नैसर्गिक आपत्तींवर कोणाचाच नियंत्रण नाही, परंतु, गेल्या काही वर्षांत भारताने विकसित केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाची ताकद आज एक उदाहरण बनत आहे. नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे - निसर्गाचे संरक्षण. आजकाल पावसाळ्यात आपली जबाबदारी अधिकच वाढते.त्या मुळेच आज ‘Catch the Rain’ सारख्या मोहिमेद्वारे देश सामूहिक प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात 'मन की बात' मध्ये आम्ही जलसंधारणाशी संबंधित स्टार्ट अप्सबद्दल चर्चा केली होती. यावेळीही मला अशा अनेक लोकांबद्दल पत्र लिहून माहिती दिली आहे जे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. असेच एक मित्र आहेत- उत्तरप्रदेश मधील बांदा जिल्ह्यातील तुलसीराम यादव. तुलसीराम यादव हे लुकतरा ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. बांदा आणि बुंदेलखंड भागात पाण्याची किती मोठी समस्या आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी तुलसीराम यांनी गावातील लोकांच्या मदतीने या भागात 40 हून अधिक तलाव तयार केले आहेत. शेतातील पाणी शेतात, गावातील पाणी गावात – हा तुलसीराम यांच्या मोहिमेचा मूलमंत्र आहे. आज त्यांच्या परिश्रमामुळेच त्यांच्या गावातील भू-जल पातळी वाढली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशातील हापुड जिल्ह्यातील लोकांनी एकत्र येऊन लुप्त झालेल्या एका नदीला पुरुज्जीवित केले आहे. फार वर्षांपूर्वी येथे नीम नावाची नदी वाहत होती. कालांतराने ही नदी लुप्त झाली, परंतु स्थानिक लोकांच्या आठवणींमध्ये आणि लोककथांमध्ये या नदीचा नेहमीच उल्लेख केला जायचा. अखेरीस, लोकांनी त्यांचा हा नैसर्गिक वारसा पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेतला. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आता 'नीम नदी' पुन्हा जिवंत होऊ लागली आहे. नदीचे उगमस्थान देखील अमृत सरोवर म्हणून विकसित केले जात आहे.
मित्रांनो, या नद्या, कालवे, तलाव हे केवळ जलस्रोत नाहीत, तर त्यांच्याशी जीवनाचे रंग आणि भावनाही जोडलेल्या आहेत. असेच एक दृश्य काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पाहायला मिळाले. हा भाग बहुतांश दुष्काळग्रस्त भाग आहे. पाच दशकांच्या प्रतिक्षेनंतर येथे निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण होत आहे. काही दिवसांपूर्वी चाचणी दरम्यान कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळची जी छायाचित्रे समोर आली ती खरच खूप भावूक करणारी होती. गावातील लोकं होळी-दिवाळी असल्यासारखी नाचत होती.
मित्रांनो, व्यवस्थापनाविषयी चर्चा होत असताना आज मला छत्रपती शिवाजी महाराजांचेही स्मरण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याबरोबरच त्यांची शासनपद्धती आणि व्यवस्थापन कौशल्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापन आणि नौदलाबाबत जे कार्य केले आहे, ते आजही भारतीय इतिहासाचा गौरव वृद्धिंगत करत आहेत. त्यांनी बांधलेले जलदुर्ग इतक्या शतकांनंतरही समुद्राच्या मध्यभागी अभिमानाने उभे आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा क्षण मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर त्यासंबंधी भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मला आठवते, खूप वर्षांपूर्वी, 2014 मध्ये रायगडावर जाऊन त्या पवित्र भूमीला नमन करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले होते. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जाणून घेणे, त्यांच्याकडून शिकणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे आपल्यामध्ये आपल्या वारशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण होईल आणि यातूनच भविष्यामध्ये आपली कर्तव्ये पार पाडण्याची प्रेरणाही मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही रामायणातील त्या छोट्याश्या खारी बद्दल नक्कीच ऐकले असेल जिने रामसेतू बांधण्यात मदत करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतला होता. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, जेव्हा हेतू स्वच्छ असतो, प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा कोणतेच ध्येय हे कठीण नसते. आज भारत देखील याच उद्दात हेतूने एका मोठ्या आव्हानाचा सामना करत आहे. हे आव्हान आहे- टी.बी. चे, ज्याला क्षयरोग देखील म्हंटले जाते. भारताला 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत बनविण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे, लक्ष्य खूप मोठे आहे. एक काळ असा होता जेव्हा एखाद्याला टी.बी. झाला आहे हे माहित झाल्यानंतर कुटुंबातील लोकच त्या व्यक्तीपासून लांब व्हायचे, परंतु आज काळ बदलला आहे, आता टी.बी. च्या रुग्णाला कुटुंबातीलच एक सदस्य समजून त्याची मदत केली जाते. क्षयरोगाचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी निक्षय मित्रांनी पुढाकार घेतला आहे. देशात मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक संस्था निक्षय मित्र बनल्या आहेत. खेड्या-पाड्यांमध्ये, पंचायती मध्ये हजारो लोकांनी स्वतः पुढे येऊन टी.बी. रुग्णांना दत्तक घेतले आहे. टीबी रुग्णांच्या मदतीसाठी अनेक मुले पुढ आली आहेत. लोकसहभाग हे या अभियानाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. या सहभागामुळेच आज देशात 10 लाखांहून अधिक टीबी रुग्णांना दत्तक घेण्यात आले असून सुमारे 85 हजार निक्षय मित्रांनी हे पुण्याचे काम केले आहे. मला आनंद आहे की देशातील अनेक सरपंचांनी, अगदी गावप्रमुखांनीही गावातून टी.बी. चे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला आहे.
नैनितालमधील एका गावातील निक्षय मित्र श्री. दिकार सिंग मेवाडी यांनी सहा टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे. त्याचप्रमाणे किन्नौरच्या ग्रामपंचायतीचे प्रमुख निक्षय मित्र श्री ग्यान सिंह यांनाही त्यांच्या भागातील टीबी रुग्णांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देत आहेत. भारताला टी.बी मुक्त करण्याच्या मोहिमेत आमची मुले आणि तरुण मित्रही उत्साहाने सहभागी होत आहेत. हिमाचल प्रदेशातील उना येथील 7 वर्षांच्या नलिनी सिंग हिने कौतुकास्पद काम केले आहे, नलिनीने तिच्या खाऊच्या पैशातून टी.बी. रुग्णांना मदत केली आहे. लहान मुलांना पैसे साठवायला (पिग्गी बँक) किती आवडते हे तुम्हाला माहीतच आहे, पण मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील 13 वर्षाची मीनाक्षी आणि पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथील 11 वर्षाचा बश्वर मुखर्जी ही दोन्ही मुलं वेगळी आहेत. या दोन्ही मुलांनी त्यांचे साठवलेले पैसे टी.बी. मुक्त भारताच्या मोहिमेसाठी दिले. ही सर्व उदाहरणे खूपच भावूक तसेच प्रेरणादायी आहेत. इतक्या लहान वयात एवढा मोठा विचार करणाऱ्या या सर्व मुलांचे मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नवीन कल्पनांचे स्वागत करण्यास सदैव तत्पर असणे हा आम्हा भारतीयांचा स्वभाव आहे. आपण आपल्या गोष्टींवर प्रेम करतो आणि नवीन गोष्टी आत्मसात देखील करतो. याचेच उदाहरण म्हणजे - जपानचे तंत्रज्ञान मियावाकी, जर एखाद्या ठिकाणची जमीन नापीक झाली असेल, तर मियावाकी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या भागाला पुन्हा हिरवेगार बनवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मियावाकी जंगले वेगाने पसरतात आणि दोन ते तीन दशकात जैवविविधतेचे केंद्र बनतात. आता भारताच्या विविध भागात देखील याचा प्रसार वेगाने होत आहे. केरळमधील शिक्षक श्री राफी रामनाथ यांनी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने येथील एका क्षेत्राचा कायापालट केला आहे. वास्तविक, रामनाथजी यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना निसर्ग आणि पर्यावरणाविषयी सखोलपणे समजावून सांगायचे होते. त्यासाठी त्यांनी वनौषधीची बागच फुलवली. त्यांची बाग आता जैवविविधता क्षेत्र बनले आहे. त्यांच्या या यशाने त्यांना आणखी प्रेरणा दिली. यानंतर रफीजींनी मियावाकीच्या तंत्रज्ञानाने एक छोटे जंगल बनवले आणि त्याला 'विद्यावनम' असे नाव दिले.आता एवढे सुंदर नाव फक्त एक शिक्षकच ठेवू शकतो - 'विद्यावनम'. रामनाथजींच्या या 'विद्यावनम'मध्ये छोट्या जागेत 115 जातींची 450 हून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. त्यांचे विद्यार्थीही त्यांना या झाडांच्या देखभालीसाठी मदत करतात. हे सुंदर ठिकाण पाहण्यासाठी आजूबाजूची शाळकरी मुले, सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होते.मियावाकी जंगल कुठेही, अगदी शहरांमध्येही सहज उगवता येते. काही दिवसांपूर्वी मी गुजरातमधील केवडिया, एकता नगर येथे मियावाकी जंगलाचे उद्घाटन केले होते. कच्छमध्येही 2001 च्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ मियावाकी शैलीत स्मारक वन तयार केले आहे.
कच्छसारख्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचे यश हेच दर्शवते की हे तंत्रज्ञान अत्यंत कठीण नैसर्गिक वातावरणातही किती प्रभावी आहे. याचप्रमाणे अंबाजी व पावागड येथेही मियावाकी पद्धतीने रोपे लावण्यात आली आहेत. लखनऊच्या अलीगंजमध्ये देखील एक मियावाकी उद्यान तयार होत असल्याची माहिती मला मिळाली आहे.मागील चार वर्षांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात अशा 60 हून अधिक जंगलांवर काम करण्यात आले आहे. आतातर या तंत्रज्ञानाला जगभरातून पसंती मिळाली आहे. सिंगापूर, पॅरिस, ऑस्ट्रेलिया, मलेशिया अशा अनेक देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मी देशवासीयांना, विशेषत: शहरांमध्ये राहणाऱ्यांना नागरिकांना मियावाकीच्या पद्धतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची विनंती करतो. याद्वारे तुम्ही तुमची पृथ्वी आणि निसर्गाला हिरवेगार आणि स्वच्छ करण्यात अमूल्य योगदान देऊ शकता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल आपल्या देशात जम्मू-काश्मीर बद्दल बरीच चर्चा होऊ लागली आहे. कधी वाढत्या पर्यटनाबाबत तर कधी जी-20 च्या भव्य आयोजनाबाबत. काश्मीरमधील ‘नादरु’ देशाबाहेर देखील कशा प्रकारे पसंती मिळू लागली आहे याबाबत मी ‘मन की बात’च्या मागच्या एका भागात तुम्हांला माहिती दिली होती.आत जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील लोकांनी एक आश्चर्यकारक गोष्ट करून दाखवली आहे. बारामुल्ला भागात बऱ्याच काळापासून शेती-भाती केली जात होती. मात्र या भागात दुधाची टंचाई जाणवत असे. बारामुल्लाच्या जनतेने हे आव्हान एक संधी म्हणून स्वीकारले. तेथील बऱ्याच लोकांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. या कामासाठी तेथील महिलांनी पुढाकार घेतला, त्यातल्याच एक भगिनी आहे-इशरत नबी. इशरत एक पदवीधारक महिला आहेत आणि त्यांनी ‘मीर सिस्टर्स डेरी फार्म’ या नावाने व्यवसाय सुरु केला आहे.त्यांच्या या डेरीफार्ममध्ये दररोज सुमारे दीडशे लिटर दुधाची विक्री होत आहे.असेच आपले सोपोर येथील सहकारी आहेत-वसिम इनायत.वसीम यांच्याकडे दोन डझन जनावरे आहेत आणि ते दररोज दोनशे लिटर दूध विकतात.आबिद हुसेन नावाचे युवा सहकारी देखील डेरीचा व्यवसाय आकारात आहेत.त्यांचे कामही अगदी जोरात सुरु आहे. अशा लोकांच्या कष्टांमुळे आज बारामुल्ला भागात रोज साडेपाच लाख लिटर दुधाचे उत्पादन होऊ लागले आहे. संपूर्ण बारामुल्ला परिसर एका नव्या श्वेतक्रांतीची ओळख बनला आहे. गेल्या अडीच-तीन वर्षांच्या काळात तेथे 500 हून अधिक दुग्धविकास एकके सुरु झाली आहेत. आपल्या देशातील प्रत्येक भाग किती शक्यतांनी भरलेला आहे याची साक्ष बारामुल्ला येथील दुग्धव्यवसाय क्षेत्र देत आहे. कोणत्याही प्रदेशातील जनतेची सामुहिक इच्छाशक्ती कोणतेही उद्दिष्ट्य साध्य करून दाखवू शकते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, याच महिन्यात क्रीडा विश्वातून भारतासाठी अनेक मोठमोठ्या शुभवार्ता आल्या आहेत. भारतीय संघाने प्रथमच महिलांच्या कनिष्ठ आशिया चषकावर आपले नाव कोरून तिरंग्याचा मान वाढवला आहे. याच महिन्यात आपल्या पुरुष हॉकी संघाने देखील कनिष्ठ आशिया चषक जिंकला आहे. या यशामुळे भारतीय संघ या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात अधिक विजय नोंदवणारा संघ झाला आहे. नेमबाजीतील कनिष्ठ वर्गाच्या विश्वचषक स्पर्धेत देखील आपल्या कनिष्ठ वयोगटातील संघाने चांगली कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत खेळाडूंसाठी एकूण जितकी सुवर्णपदके उपलब्ध होती त्यातील 20% सुवर्णपदके एकट्या भारताच्या खाती जमा झाली आहेत. याच जून महिन्यात 20 वर्षांखालील खेळाडूंसाठी आशियायी अथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा देखील झाली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 45 देशांच्या यादीत भारताने पदक तालिकेत सर्वोच्च तीन क्रमांकामध्ये स्थान मिळवले.
मित्रांनो, एकेकाळी आपल्याला आंतरराष्ट्रीयमध्ये स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाबाबत माहिती तर मिळत असे पण त्या स्पर्धेत भारताचे कुठेच नामोनिशाण नसे. आज मात्र,मी केवळ गेल्या काही आठवड्यांतील कामगिरीचा उल्लेख केला तर ती यादी कितीतरी मोठी झाली.हीच आपल्या युवकांची खरी ताकद आहे. असे कितीतरी क्रीडाप्रकार आणि क्रीडास्पर्धा आहेत ज्यांच्यामध्ये आज भारत पहिल्यांदाच उपस्थिती नोंदवत आहे. उदा. लांब उडी स्पर्धेत श्रीशंकर मुरली याने पॅरिस डायमंड लीग सारख्या मानाच्या स्पर्धेत देशाला कांस्यपदक मिळवून दिले. यास्पर्धेत भारताने मिळवलेले हे पहिले पदक आहे. किर्गीझीस्तान मध्ये देखील आपल्या सतरा वर्षांखालील महिला मुष्टियुध्द संघाने असेच चमकदार यश मिळवले आहे. देशातील या सर्व खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे तसेच प्रशिक्षकांचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो.
मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाला मिळालेल्या या यशाच्या पाठीमागे आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर केलेली कठोर मेहनत असते.देशभरातील विविध राज्यांमध्ये आज एका नव्या उत्साहाने खेळांचे आयोजन होत असते. त्यामुळे खेळाडूंना खेळ खेळण्यातून, जिंकण्या-हारण्यातून शिकण्याची संधी मिळते. जसे की, नुकतेच उत्तर प्रदेशात ‘खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धां’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये तरुण खेळाडूंचा उत्साह आणि जोम बघायला मिळाला. या स्पर्धेत आपल्या युवा खेळाडूंनी अकरा विक्रम मोडले आहेत. या स्पर्धेत, पंजाब विद्यापीठ अमृतसर येथील गुरु नानक देव विद्यापीठ आणि कर्नाटकचे जैन विद्यापीठ यांनी पदक तालिकेत पहिले तीन क्रमांक पटकावले.
मित्रांनो, अशा स्पर्धांचा सर्वात मोठा पैलू हा देखील असतो की या स्पर्धांमधून खेळाडूंच्या कित्येक प्रेरणादायक कथा आपल्यासमोर येतात.‘खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडास्पर्धां’मध्ये रोइंग क्रीडा प्रकारात सहभागी झालेला आसामच्या कॉटन विद्यापीठाचा अन्यतम कुमार हा या स्पर्धेत भाग घेणारा पहिला दिव्यांग विद्यार्थी ठरला. गुडघ्याला गंभीर जखम झालेली असताना देखील बर्कतुल्ला विद्यापीठाची निधी पवैया ही क्रीडापटू सुवर्णपदक जिंकण्यात यशस्वी ठरली. पुण्याच्या सावित्राबाई फुले विद्यापीठातील शुभम भंडारे याला घोट्याच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षी बेंगळूरु येथील स्पर्धेत निराश व्हावे लागले होते मात्र यावर्षी तो स्टीपलचेस मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. बरद्वान विद्यापीठाची विद्यार्थिनी सरस्वती कुंडू त्यांच्या कबड्डी संघाची कप्तान आहे. अनेक अडचणींवर मात करत ती इथवर पोहोचली आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना टॉप्स योजनेतून मोठी मदत मिळत आहे. आपले खेळाडू जितके अधिक खेळ खेळतील तितकेच अधिक त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलून येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 21 जून देखील जवळ येतो आहे. यावेळेस देखील जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उत्सुकतेने वाट पहात आहेत. या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना आहे – ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब’ या कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग.सर्वांना जोडून ठेवणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या योगाच्या भावनेला ही संकल्पना व्यक्त करते. दर वर्षीप्रमाणेच या वर्षी देखील देशभरात ठिकठिकाणी योगाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील.
मित्रांनो, यावेळेस मला संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क येथील मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मला दिसतंय की समाज माध्यमांवर देखील योग दिनाच्या संदर्भात भरपूर उत्साह दिसून येतो आहे.
मित्रांनो, तुम्हां सर्वांना माझी आग्रहपूर्वक विनंती आहे की तुम्ही तुमच्या जीवनात योगाचा स्वीकार करा, दिनचर्येत योगाचा समावेश करा. अजूनही तुम्ही योगसाधनेशी जोडले गेले नसाल तर आगामी 21 जून ही या संकल्पासाठी उत्तम संधी आहे. योग करण्यासाठी तसेही फारशा साधन सामुग्रीची गरज नसते. तुम्ही जेव्हा योग करणे सुरु कराल तेव्हा तुमच्या जीवनात किती मोठे परिवर्तन येईल ते तुम्ही बघालच.
माझ्या प्रिय देशवासियांनो, परवा म्हणजे 20 जून रोजी ऐतिहासिक रथयात्रा सुरु होते आहे. रथयात्रेला संपूर्ण जगात एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघते. ओदिशा राज्यातील पुरी येथे होणारी रथयात्रा तर अत्यंत अद्भुत असते. मी जेव्हा गुजरातेत होतो तेव्हा मला अहमदाबाद येथे निघणाऱ्या विशाल रथयात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असे. या देशभरातील रथयात्रांमध्ये ज्या प्रकारे सर्व समाजांचे, सर्व वर्गातील लोक सहभागी होतात ती अत्यंत अनुकरणीय पद्धत आहे. ही रथयात्रा लोकांच्या श्रद्धेसह ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ कल्पनेचे देखील प्रतिबिंब असते. या अत्यंत पवित्र प्रसंगी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.भगवान जगन्नाथ सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि सुख-समुद्धीचा आशीर्वाद देवो हीच सदिच्छा मी व्यक्त करतो.
मित्रांनो, भारतीय परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेल्या उत्सवांची चर्चा करताना मी, देशातील राजभवनांमध्येआयोजित करण्यात आलेल्या रोचक कार्यक्रमांचा देखील आवर्जून उल्लेख करू इच्छितो. आता आपल्या देशात, राजभवनांची ओळख सामाजिक आणि विकास कार्यांशी संबंधित संस्था अशी होऊ लागली आहे. आज आपले राजभवन क्षयरोग मुक्त भारत अभियान, नैसर्गिक शेतीशी संबंधित अभियान यांचे ध्वजवाहक होऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गुजरात असो, गोवा असो, तेलंगणा किंवा महाराष्ट्र असो, अथवा सिक्कीम असो, या सर्व राज्यांचे स्थापना दिन,विविध राजभवनांनी ज्याउत्साहाने साजरे केले ते खरोखरीच अनुकरणीय होते.‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक सशक्त बनवणारा हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे.
मित्रांनो, भारत लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीची माता आहे. आपण आपल्या प्रजासत्ताक आदर्शांना सर्वोच्च स्थान देतो, आपल्या संविधानाला सर्वोत्तम मानतो आणि म्हणूनच आपण 25 जून हा दिवस विसरू शकत नाही.याच दिवशी आपल्या देशावर आणीबाणी लागू करण्यात आली होती.भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला. लोकशाहीच्या समर्थकांवर त्या काळात इतके अत्याचार करण्यात आले, त्यांचा इतका छळ करण्यात आला की ते आठवून आजही मनाचा थरकाप होतो. या काळातील अत्याचारांवर आणि पोलीस तसेच प्रशासनाने दिलेल्या शिक्षांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली. मला देखील त्यावेळी ‘संघर्षमय गुजरात’ नामक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच, आणीबाणीच्या विषयावर लिहिलेले आणखी एक पुस्तक माझ्या वाचनात आले त्याचे नाव आहे – TORCHER OF POLITICAL PRISONER IN INDIA. आणीबाणीच्या काळात छापण्यात आलेल्या या पुस्तकात, तत्कालीन सरकार, लोकशाहीच्या रक्षकांना किती क्रूरपणे वागवत होते याचे वर्णन करण्यात आले आहे. या पुस्तकात अनेक घटनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे, अनेक छायाचित्रे आहेत. माझी अशी इच्छा आहे की आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा गुन्ह्यांची देखील नक्की माहिती करुन घ्या. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व समजून घेणे अधिक सोपे होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ हा कार्यक्रम म्हणजे रंगबिरंगी मोत्यांची बनलेली एक माळ आहे आणि त्यातला प्रत्येक मोती स्वतःच अद्वितीय आणि मौल्यवान आहे. या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग खूप सजीव असतो. हा कार्यक्रम आपणा सर्वांमध्ये सामूहिकतेच्या भावनेसह समाजाप्रती कर्तव्यभावना आणि सेवा भाव भरतो. येथे अशा विषयांवरचर्चा होते ज्यांच्याबद्दल आपल्याला सामान्यतःफार कमी वाचायला ऐकायला मिळते. ‘मन की बात’ मध्ये एखाद्या विषयाचाउल्लेख झाल्यानंतर अनेक देशवासियांना त्यातून कशा प्रकारे प्रेरणा मिळते हे आपल्याला नेहमीच दिसून येते. नुकतेच मला देशातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आनंदा शंकर जयंत यांचे एक पत्र मिळाले. या पत्रात त्यांनी ‘मन की बात’च्या ज्या भागात ‘गोष्टी सांगण्याच्या’ कलेबाबत चर्चा केली होती त्या भागाबद्दल लिहिले होते. ‘मन की बात’च्या त्या कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन आनंदा शंकर जयंत यांनी ‘कुट्टी कहानी’ तयार केली आहे. विविध भाषांतील गोष्टींचा लहान मुलांसाठी केलेला हा उत्तम संग्रह आहे. या उपक्रमामुळे आपल्या मुलांना आपली संस्कृतीची असलेली ओढ अधिक गहिरी होते आणि म्हणूनच हा उपक्रम खूप चांगला आहे. त्यांनी या गोष्टींचे काही रोचक व्हिडिओ त्यांच्या यु-ट्यूब वाहिनीवर देखील अपलोड केले आहेत. मी आनंदा शंकर जयंत यांच्या या उपक्रमाची खासकरून चर्चा यासाठी केली कारण की ते पाहून मला असे वाटले की काही देशवासीयांचे चांगले कार्य इतरांना देखील प्रेरित करत आहे. यातून शिकवण घेऊन ते देखील आपल्या अंगच्या गुणांतून देश आणि समाजासाठी काही चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या सर्व भारतवासीयांची हीच सामुहिक शक्तीदेशाच्या प्रगतीमध्ये नवी उर्जा भरत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या वेळच्या ‘मन की बात’ मध्ये माझ्यासोबत इतकेच. पुढच्या वेळी, नव्या विषयांसह तुमच्याशी पुन्हा संवाद होईल. पावसाचे दिवस आहेत म्हणून स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. समतोल आहार घ्या आणि निरोगी राहा. आणि हो, योगसाधना नक्की करा. आता अनेक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील संपत आल्या असतील. मी मुलांना देखील सांगेन की गृहपाठ शेवटच्या दिवसापर्यंत शिल्लक ठेवू नका. ते काम संपवून टाका आणि निश्चिंत व्हा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांत आपण ‘मन की बात’ मध्ये 'काशी-तमिळ संगम' बद्दल बोललो, 'सौराष्ट्र-तमिळ संगम'ची देखील चर्चा केली. काही काळापूर्वी, वाराणसी येथे, 'काशी-तेलुगु संगम' सुद्धा झाला. एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला बळ देणारा असाच आणखी एक प्रयत्न देशात झाला आहे, हा प्रयत्न आहे, 'युवा संगम'चा. मी असा विचार केला की, या अनोख्या प्रयत्नांमध्ये जे लोक सहभागी झाले होते त्यांनाच यासंदर्भातील तपशील विचारुया. त्यासाठी आत्ता माझ्यासोबत फोनच्या माध्यमातून दोघे तरुण जोडले गेले आहेत – त्यातील एक आहे अरुणाचल प्रदेशातील ग्यामर न्योकुमजी आणि दुसरी आहे बिहारची कन्या विशाखा सिंह. चला आपण सर्वप्रथम ग्यामर न्योकुम यांच्याशी बोलूया.
पंतप्रधान : ग्यामर जी, नमस्ते !
ग्यामर जी : नमस्ते मोदी जी !
पंतप्रधान : अच्छा, ग्यामर जी, सर्वप्रथम मी तुमच्याविषयी जाणून घेऊ इच्छितो.
ग्यामर जी – मोदीजी, सर्वात आधी तुम्ही माझ्याशी बोलण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ खर्च केल्याबद्दल मी तुमचे आणि भारत सरकारचे खूप खूप आभार मानतो. मी अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत मेकॅनिकल अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
पंतप्रधान: आणि कुटुंबात कोण कोण काय करतात, वडील काय करतात.
ग्यामर जी : माझे वडील लहान-मोठा व्यापार करतात आणि त्यानंतर थोडी शेती करतात.
पंतप्रधान: युवा संगमविषयी तुम्हाला कुठून माहिती मिळाली, युवा संगमसाठी कसे, कोठे गेला?
ग्यामर जी: माझा अनुभव मस्त होता, फारच छान होता. मोदी जी, युवा संगमची माहिती मला माझ्या एनआयटी या शिक्षणसंस्थेत मिळाली. त्यांनी सांगितले की, तुम्ही युवा संगम मध्ये सहभागी होऊ शकता. मी इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली तर मला समजले की, हा अत्यंत उत्तम कार्यक्रम आहे. याच्या माध्यमातून मी एक भारत,श्रेष्ठ भारत संकल्पनेत देखील योगदान देऊ शकतो. तसेच मला काही नव्या गोष्टींची माहिती मिळवण्याची संधी देखील यातून मिळेल. मग, मी लगेचच जाऊन नोंदणी केली.
पंतप्रधान: तुम्हाला काही पर्याय निवडावे लागले का?
ग्यामर जी : मोदीजी, जेव्हा त्यांच्या संकेतस्थळावर गेलो तेव्हा अरुणाचल प्रदेशातील लोकांसाठी दोन पर्याय होते, पहिला होता आंध्रप्रदेश ज्यात आयआयटी तिरुपती होते आणि दुसरा पर्याय होता राजस्थानचे केंद्रीय विद्यापीठ, म्हणून मी राजस्थानला पहिला पर्याय म्हणून निवडले आणि आयआयटी तिरुपती हा माझा दुसरा पसंतीचा पर्याय होता. राजस्थानसाठी माझी निवड झाली.त्यानंतर मी राजस्थानला गेलो.
पंतप्रधान: तुमची राजस्थान यात्रा कशी झाली? तुम्ही प्रथमच राजस्थानला जात होतात.
ग्यामर जी : खरंय, मी तेव्हा पहिल्यांदाच अरुणाचल प्रदेशाच्या बाहेर पाय ठेवला होता. मी राजस्थानला आलो तेव्हा तेथील किल्ले इत्यादी गोष्टी मी केवळ चित्रपटात आणि फोनमध्ये पाहिल्या होत्या, त्या प्रत्यक्ष बघायला मी गेलो. हा माझा पहिला अनुभव फारच चांगला ठरला. तेथील लोक स्वभावाने खूपच चांगले आहेत, त्यांनी मला अत्यंत उत्तम पद्धतीची वागणूक दिली. तेथे आम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या, राजस्थानातील मोठमोठ्या तलावांबाबत माहिती मिळाली. तिथले लोक ज्या पद्धतीने पर्जन्य जल संधारण करतात, त्याविषयी नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आधी या गोष्टी मला माहितच नव्हत्या, म्हणून राजस्थान भेटीचा हा कार्यक्रम फारच उत्तम वाटला.
पंतप्रधान: हे पहा, तुम्हाला तर सर्वाधिक लाभ झाला झाला आहे. अरुणाचल ही जशी वीरांची भूमी आहे तशीच राजस्थान देखील वीरांची भूमी आहे. राजस्थानातील खूप लोक सेनादलात कार्यरत आहेत आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जे सैनिक तैनात आहेत त्यामध्ये जेव्हा तुम्ही राजस्थानच्या लोक भेटतील तेव्हा तुम्ही त्यांच्याशी नक्की बोला, त्यांना सांगा की कसे तुम्ही राजस्थानला गेला होतात आणि तुम्हाला तिथे फार चांगला अनुभव आला. याबद्दल ऐकल्यानंतर त्या सैनिकांशी तुमची जवळीक वाढेल, तुम्ही एकदम जवळचे व्हाल. आणखी एक म्हणजे राजस्थानमध्ये तुम्हाला काही ओळखीच्या गोष्टी देखील दिसल्या असतील, तुम्हाला असे वाटले असेल की, अरे, अरुणाचल मध्ये देखील असे होते की.
ग्यामर जी : मोदी जी, मला एक समानता जाणवली ती अशी की जे देशप्रेम आहे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत संकल्पनेची जी दूरदृष्टी आहे आणि भावना आहे ती दोन्हीकडे समान आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता भारतीय असल्याचा अभिमान बाळगतात तशाच प्रकारे राजस्थानातील लोकांना सुद्धा स्वतःच्या मातृभूमीचा मोठा अभिमान आहे, ही गोष्ट मला फार जाणवली. मी तेथील खूप युवकांशी संवाद साधला तेव्हा मला आणखी समानता जाणवली आणि ती म्हणजे विशेष करून दोन्ही राज्यांतील युवा वर्ग भारतासाठी काहीतरी करू इच्छितात, हे जे देशाप्रती प्रेम आहे ते दोन्हीकडे समान आहे.
पंतप्रधान: तिकडे जे स्नेही झाले त्यांच्याशी ओळख वाढवली की इकडे आल्यावर त्यांना विसरून गेलात?
ग्यामर जी : नाही. नाही, मी त्यांच्याशी ओळख वाढवली.
पंतप्रधान: अच्छा, तुम्ही समाज माध्यमांवर सक्रीय आहात?
ग्यामर जी : हो मोदी जी, मी सक्रीय आहे.
पंतप्रधान: मग तुम्ही ब्लॉग लिहायला हवा. तुमचा युवा संगमचा अनुभव कसा होता, तुम्ही त्यात नोंदणी कशी केली, राजस्थानला गेल्यावर कसे अनुभव आले हे लिहायला हवे, जेणेकरून देशभरातील युवकांना एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची अधिक माहिती मिळेल, ही कोणती योजना आहे आणि युवकांना त्याचा लाभ कसा करून घेता येईल ते समजेल. तुम्ही तुमच्या अनुभवांचे वर्णन करणारा ब्लॉग लिहायला हवा, तो वाचून अनेक लोकांना फायदा होईल.
ग्यामर जी : हो, मी नक्की हे काम करीन.
पंतप्रधान: ग्यामर जी, तुमच्याशी गप्पा मारून छान वाटले. तुम्ही सर्व युवक देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहात, कारण आगामी 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत- देशासाठी देखील आणि तुमच्या स्वतःसाठी देखील. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
ग्यामर जी : तुम्हालाही धन्यवाद मोदी जी,
पंतप्रधान: नमस्कार मित्रा.
मित्रांनो, अरुणाचलातील लोकांमध्ये इतकी आत्मीयता असते की, त्यांच्याशी बोलून मला फार आनंद वाटतो. युवा संगममधील ग्यामर जी यांचा अनुभव तर अत्यंत उत्तम होता. चला आपण बिहारची कन्या विशाखा सिंह हिच्याशी बातचीत करूया.
पंतप्रधान: विशाखा जी, नमस्कार |
विशाखा जी : सर्वप्रथम, भारताच्या माननीय पंतप्रधांनांना माझा नमस्कार आणि माझ्यासह सर्व प्रतिनिधींकडून तुम्हाला वंदन
पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, आधी स्वतःबद्दल काहीतरी सांगा, मग मला युवा संगमबद्दल देखील जाणून घायचे आहे.
विशाखा जी : मी बिहारच्या सासाराम नामक शहराची रहिवासी आहे आणि माझ्या महाविद्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या संदेशाच्या माध्यमातून मला युवा संगम बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी अजून चौकशी केली, तपशील शोधले की हे काय आहे, तेव्हा मला समजले की हा एक भारत श्रेष्ठ भारत योजनेच्या माध्यमातून सुरु असलेला युवा संगम उपक्रम आहे. त्यानंतर मी अर्ज केला. यात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्सुक होते. मात्र, नंतर जेव्हा मी तामिळनाडूला जाऊन आले त्यातून मला जे अनुभव मिळाले त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो आहे. या कार्यक्रमात भाग घेऊन मला खूप आनंद झाला आहे आणि मी अगदी मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही आमच्यासारख्या तरुणांसाठी असा सर्वोत्कृष्ट उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण भारताच्या विविध भागांतील संस्कृतींची माहिती करून घेऊ शकतो.
पंतप्रधान: विशाखा जी, तुम्ही कोणते शिक्षण घेता आहात?
विशाखा जी : मी संगणक शास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमात दुसऱ्या वर्षात शिकते आहे.
पंतप्रधान: अच्छा, विशाखा जी, तुम्ही कोणत्या राज्यात जायचे आहे, कोठे संपर्क करायचा आहे हा निर्णय कसा घेतलात?
विशाखा जी : जेव्हा मी युवा संगम बद्दल गुगल वर शोध सुरु केला तेव्हा मला समजले की बिहारच्या प्रतिनिधींना तामिळनाडूच्या प्रतिनिधींसोबत अदलाबदल करायची आहे. तामिळनाडू हे आपल्या देशातील सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृध्द राज्य आहे त्यामुळे मला जेव्हा हे समजले की बिहारमधील विद्यार्थ्यांना तामिळनाडूला पाठवले जाणार आहे तेव्हा मला निर्णय घेण्यात मदत झाली. मला वाटले की मी अर्ज भरून तेथे जायला हवे. त्यावेळी मी या उपक्रमात सहभागी झाली याबद्दल मला आज खूप अभिमान वाटतो आहे.
पंतप्रधान: तुम्ही पहिल्यांदाच तामिळनाडूला गेलात का?
विशाखा जी: हो, मी प्रथमच तेथे गेले होते.
पंतप्रधान: अच्छा, तुम्हाला काही विशिष्ट आठवणीत राहिलेली गोष्ट सांगायची असेल तर काय सांगाल? देशातील युवक तुमचे बोलणे ऐकत आहेत.
विशाखा जी : खरे सांगायचे तर हा संपूर्ण प्रवासच माझ्यासाठी अत्यंत उत्कृष्ट ठरला. प्रत्येक ठिकाणी आम्ही खूप चांगल्या गोष्टी शिकलो आहोत. मी तामिळनाडूला जाऊन खूप उत्तम मित्र मिळवले. तेथील संस्कृती शिकून घेतली, तेथील लोकांना भेटले. तेथे घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इतर लोकांना जिथे जाणे अवघड असते, त्या इस्रोच्या केंद्रात जाण्याची संधी आम्हा प्रतिनिधींना देण्यात आली. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे आम्ही राजभवनामध्ये जाऊन तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेतली. या दोन घटना माझ्यासाठी अत्यंत विशेष ठरल्या. आणि आत्ता आम्ही ज्या वयात आहोत त्या वयातील मुलांना अशी संधी मिळत नाही ती आम्हाला युवा संगमच्या माध्यमातून मिळू शकली. हा माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण होता.
पंतप्रधान: बिहारमधील खाण्यापिण्याच्या पद्धती आणि तामिळनाडूमधील खाण्यापिण्याच्या पद्धती एकदम वेगवेगळ्या आहेत,
विशाखा जी : होय.
पंतप्रधान: मग त्या बाबतीत तुम्हाला समस्या नाही आली?
विशाखा जी : आम्ही जेव्हा तेथे गेलो, तेव्हा लक्षात आले, तामिळनाडूमध्ये दक्षिण भारतीय पद्धतीचे अन्न मिळते. आम्ही तेथे गेल्यावर आम्हाला डोसा, इडली, सांबार, उत्तपा, वडा, उपमा यांसारख्या पाककृती वाढण्यात आल्या होत्या, तर पहिल्यांदा जेव्हा आम्ही पहिल्यांदा चाखलं, तेव्हा तो अत्यंत सुंदर होता. तेथील जेवण अत्यंत आरोग्यसंपन्न होतं आणि वास्तवात अतिशय चविष्ट आहे. आमच्या उत्तरेतील खाद्यपदार्थापासून खूपच वेगळं आहे आणि तरी मला तेथले खाद्यपदार्थही खूप चांगले वाटले आणि तेथील लोकही खूप भले वाटले.
प्रधानमंत्री जीः तर आता खूप मित्रही झाले असतील तामिळनाडूत?
विशाखा जीः हो. आम्ही तेथे उतरलो होतो त्या एनआयटी त्रिचीमध्ये, नंतर आयआयटी मद्रासमध्ये तर दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी माझी चांगली मैत्री झाली आहे. शिवाय मध्ये सीआयआयचा स्वागत समारंभ होता, तर तेथे आजूबाजूच्या महाविद्यालयांतील खूप सारे विद्यार्थी आले होते. तेथे आम्ही त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्या लोकांना भेटून मला इतकं छान वाटलं. त्यातील अनेक लोक माझे मित्र सुद्धा झाले आहेत. आणि काही प्रतिनिधीही मला भेटले जे तामिळनाडूचे प्रतिनिधी बिहारमध्ये आले होते. त्यांच्याशी आमची चर्चाही झाली होती आणि आताही आम्ही जेव्हा आपसात गप्पा मारतो तेव्हा मला खूप छान वाटतं.
प्रधानमंत्री जीः तर विशाखा जी, आपण एक ब्लॉग लिहा आणि समाजमाध्यमांवर हा आपला संपूर्ण अनुभव सांगा. एक भारत श्रेष्ठ भारत चा युवा संगम आणि मग तामिळनाडूत आपल्याला जी आपुलकी मिळाली, जो आपला स्वागत सत्कार समारंभ झाला, तमिळ लोकांचंही आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्याबद्दलही लिहून या साऱ्या गोष्टी देशाला सांगा आपण. तर लिहाल आपण?
विशाखा जीः हो, अवश्य.
प्रधानमंत्री जीः तर माझ्यावतीनं आपल्याला खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.
विशाखा जीः जी धन्यवाद. नमस्कार.
ग्यामर आणि विशाखा, आपल्याला माझ्या खूप शुभेच्छा. युवा संगममध्ये आपण जे शिकलात, ते जीवनभर आपल्याबरोबर रहावं, ही माझी आपल्याप्रति शुभेच्छा आहे.
मित्रांनो, भारताची ताकद त्याच्या विविधतेत आहे. आमच्या देशात पहाण्यासारखं खूप काही आहे, हे लक्षात घेऊनच, शिक्षण मंत्रालयानं युवासंगम नावाचा एक उत्तम पुढाकार आयोजित केला. या पुढाकाराचा उद्देष्य नागरिकांमध्ये परस्पर संबंध वाढवण्याबरोबरच देशातील युवकांना आपसात मिळून मिसळून रहाण्याची संधी देणं हाही होता. वेगवेगळ्या राज्यांच्या उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांना यात जोडण्यात आलं आहे. युवासंगम मध्ये युवक दुसऱ्या राज्यांच्या शहरे आणि गावांमध्ये जातात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. युवा संगमच्या पहिल्या फेरीत जवळपास १२०० युवकांनी देशाच्या २२ राज्यांचा दौरा केला आहे. जे युवक याचा भाग बनले आहेत, ते आपल्यासमवेत अशा स्मृती घेऊन आले आहेत की ज्या स्मृती जीवनभर त्यांच्या ह्रदयात कायम रहातील. आम्ही पाहिलं आहे की, अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ, व्यावसायिक नेते यांनी बॅगपॅकर्सप्रमाणे भारतात वास्तव्य केलं आहे. मी जेव्हा दुसऱ्या देशांच्या नेत्यांना भेटतो, तेव्हा अनेकदा तेही सांगतात की, ते तरूण असताना भारतात फिरण्यासाठी आले होते. आमच्या भारतात इतकं काही पहाण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी आहे की आपली उत्सुकता प्रत्येक वेळा वाढतच जाते. मला आशा आहे की या रोमांचक अनुभवांना जाणून घेऊन आपल्यालाही देशाच्या वेगवेगळ्या भागांचा दौरा करण्यासाठी अवश्य प्रेरणा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवस अगोदर मी जपानच्या हिरोशिमामध्ये होतो. तेथे मला हिरोशिमा पीस मेमोरियल संग्रहालयात जाण्याची संधी मिळाली. तो एक भावविवश करणारा अनुभव होता. जेव्हा आम्ही इतिहासातील स्मृती जपून सुरक्षित ठेवतो, तेव्हा येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत सहाय्यकारी असतं ते. अनेकदा संग्रहालयात आम्हाला नवीन धडे मिळतात तर अनेकदा काही शिकायला मिळतं. काही दिवसांपूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय म्युझियम प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं होतं. त्यात जगातील १२०० हून अधिक वस्तुसंग्रहालयांच्या वैशिष्टयांचं प्रदर्शन केलं होतं. आमल्याकडे भारतात वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालये आहेत, जे आमच्या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या अनेक पैलुंचं प्रदर्शन करत असतात. जसे की गुरूग्राममध्ये एक आगळंवेगळं वस्तुसंग्रहालय आहे. म्युसिओ कॅमेरा ज्यात १८६० नंतरच्या ८ हजाराहूंन अधिक कॅमेऱ्यांचं संकलन केलं आहे. तामिळनाडूच्या म्युझियम ऑफ पॉसिबिलिटीजची रचना आमच्या दिव्यांगजनांना समोर ठेवून केली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय एक असंच संग्रहालय आहे ज्यात ७० हजाराहून अधिक वस्तु सुरक्षित ठेवल्या आहेत. सन २०१० मध्ये स्थापन करण्यात आलेल्या इंडियन मेमरी प्रोजेक्ट म्हणजे भारतीय स्मृती प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं ऑनलाईन संग्रहालय आहे. जगभरातून पाठवण्यात आलेली छायाचित्रं आणि कथांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली इतिहासाचे दुवे जोडण्याचं त्याचं कार्य सुरू आहे. देशाच्या फाळणीमुळे झालेल्या जखमांशी जोडलेल्या स्मृतींना समोर आणण्याचे प्रयत्न केले गेले आहेत. गेल्या काही वर्षात आम्ही भारतात नवनवीन प्रकारचे संग्रहालये आणि स्मारकं बनत असताना पाहिले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी बंधु आणि भगिनींच्या योगदानाला समर्पित नवीन संग्रहालये उभारली जात आहेत. कोलकताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लोबी दालन असो की मग जालियनवाला बाग मेमोरियलचा जीर्णोद्धार, देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांना समर्पित असं पीएम संग्रहालय आज दिल्लीच्या शोभेत भर घालत आहे. दिल्लीमध्येच राष्ट्रीय युद्ध स्मारक संग्रहालय आमि पोलिस स्मारक असून तेथे रोज अनेक लोक हुतात्मा झालेल्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. ऐतिहासिक दांडी यात्रेला समर्पित दांडी स्मारक असो की एकतेचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी स्मारक असो, पण मला इथंच थांबावं लागेल कारण देशभरातील संग्रहालयांची यादी खूप मोठी आहे आणि प्रथमच देशातील सर्व संग्रहालयातील माहिती एकत्र संकलित करण्यात आली आहे. संग्रहालय कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तेथे कोणत्या प्रकारच्या वस्तु ठेवल्या आहेत, तेथील संपर्काचा तपशील काय आहे- हे सारे काही एक ऑनलाईन डिरेक्टरीमध्ये समाविष्ट केले आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपल्याला जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आपण देशातील ही स संग्रहालये पहाण्यासाठी जरूर यावं. तेथे आपण आकर्षक छायाचित्रांना हॅशटॅग म्युझियम मेमरीज करून सामायिक करायलाही विसरू नका. यामुळे या वैभवशाली संस्कृतीच्या बरोबर आम्हा भारतीयांचे असलेले संबंध आणखी मजबूत होतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आम्ही सर्वांनी एक म्हण अनेकदा ऐकली असेल,. अनेकवार ऐकली असेल. बिन पानी सब सून. म्हणजे पाण्याविना जीवनात संकट कायम असतेच, व्यक्ती आणि देशाचा विकास ठप्प होत असतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेता, आज देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांचे निर्माण केले जात आहे. आमचे अमृत सरोवर, यासाठी विशेष आहे की, हे स्वातंत्र्याच्या अमृतकाळात तयार केले जात आहे आणि यात लोकांचे अमृत प्रयत्न लागले आहेत. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आतापर्यंत देशात ५० हजाराहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती झाली आहे. जल संरक्षणाच्या दिशेने हे एक खूप मोठं पाऊल आहे.
मित्रांनो, प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही पाण्याच्या टंचाईच्या आव्हानाशी जोडलेल्या गोष्टींबाबत चर्चा करत असतो. याही वर्षी आम्ही या विषयाला घेऊ पण यावेळी जल संरक्षणाशी संबंधित स्टार्ट अपबाबत चर्चा करू. एक स्टार्ट अप आहे फ्लक्सजेन. हा स्टार्ट अप आयओटी समर्थित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जल व्यवस्थापनाचे पर्याय देत असतो. हे तंत्रज्ञान पाण्याच्या वापराच्या पॅटर्न सांगून पाण्याच्या प्रभावी वापरासंबंधी सहाय्य करेल. आणखी एक स्टार्ट अप आहे LivNSense. ते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगवर आधारित असून असा मंच आहे. याच्या सहाय्यानं जल वितरणावर प्रभावी पद्धतीनं देखरेख केली जाऊ शकते. यातून कुठे किती पाणी वाया जात आहे, याचीही माहिती समजू शकते. आणखी एक स्टार्ट अप आहे कुंभी कागज. हा कुंभी कागज असा विषय आहे की आपल्यालाही खूप आवडेल असा मला पक्का विश्वास आहे. कुंभी कागज स्टार्ट अपने एक विशेष काम सुरू केलं आहे. त्यानं जलकुंभीपासून कागद बनवण्याचं काम सुरू केलं आहे, म्हणडे जी जलकुंभी कधी जलस्त्रोतांसाठी एक समस्या समजली जात होती, त्यापासून आता कागद बनवण्यात येत आहे.
मित्रांनो, अनेक युवक नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहेत, तर काही युवक असे आहेत की जे समाजाला जागरूक करण्याच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत जसे की छत्तीसगढच्या बालोद जिल्ह्यातील युवक आहेत. इथल्या युवकांनी पाणी वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. हे युवक घरोघरी जाऊन लोकांना पाणी वाचवण्याविषयक जागरूक करतात. जेथे कुठे विवाह समारंभांचं आयोजन केंलं जातं, तिथं या युवकांचा गट जाऊन पाण्याचा दुरूपयोग कसा रोखला जाऊ शकतो, यावर त्यांना माहिती देतात. पाण्याच्या सदुपयोगाशी जोडलेला एक प्रेरणादायक प्रयत्न झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातही होत आहे. खुंटीच्या नागरिकांनी पाणी संकटापासून वाचण्यासाठी बोरी बांधचा मार्ग काढला आहे, ज्याचा उपयोग गावातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातला जातो. या बांधांवर पाणी एकत्र आल्यानं तिथं भाजीपालाही तयार होऊ लागला आहे. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढत आहे आणि प्रदेशाच्या गरजांचीही पूर्तता होत आहे. लोकसहभागाचा कोणताही प्रयत्न कसा अनेक परिवर्तन घडवू शकतो, याचं खुंटी एक आकर्षक उदाहरण बनला आहे. मी तिथल्या लोकांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, १९६५ च्या युद्धाच्या वेळेस, आमचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. नंतर अटलजींनी त्याला जय विज्ञानही जोडलं होतं. काही वर्षांपूर्वी देशाच्या वैज्ञानिकांशी चर्चा करताना मी जन संशोधनचा उल्लेख केला होता. मन की बात मध्ये आज एका अशा व्यक्तीबद्दल, एक अशा संस्थेबद्दल जी जय जवान जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारहींचे प्रतिबिंह आहे. हे गृहस्थ आहेत महाराष्ट्रातील श्रीमान शिवाजी श्मामराव डोलेजी. शिवाजी डोले नाशिक जिल्हयातील एका लहान गावचे रहिवासी आहेत. ते गरीब आदिवासी शेतकरी परिवारातील असून माजी सैनिकही आहेत. सैन्यात असताना त्यांनी आपलं जीवन देशाच्या सेवेसाठी वाहून टाकलं. निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषीमध्ये पदविका घेतली. म्हणजे ते जय जवानपासून जय किसान कडे मार्गक्रमण करत चालले होते. आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त कसे योगदान दिलं जावं. आपल्या या मोहिमेत शिवाजो डोले यांनी २० लोकांची असं एक पथक बनवलं आणि काही माजी सैनिकांनाही त्यात सामिल करून घेतलं. त्यानंतर त्यांच्या या पथकानं वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन आपल्या हातात घेतलं. ही सहकारी संस्था निष्क्रीय पडून होती. तिचं पुनरूज्जीवन करण्याचा विडा त्यांनी उचलला. आज पहाता पहाता वेकंटेश्वरा को ऑपरेटिव्हचा विस्तार अनेक जिल्ह्यात झाला आहे. आज हे पथक महाराष्ट्र आणि कर्नाटकात काम करत आहे. तिच्याशी जवळपास १८ हजार लोक जोडले गेले आहेत आणि त्यात मोठ्या संख्येंनं आमचे पूर्व सैनिकही आहेत. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत आहेत. हे पथक जलसंरक्षणासाठी अनेक तलाव तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. खास गोष्ट तर ही आहे की, यांनी सेंद्रिय शेती आणि डेअरीही सुरू केली आहे. आता त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात आहेत. या पथकाची जी दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत, त्यात माझं लक्ष ज्यांनी वेधून घेतली ती आहेत जय विज्ञान आणि जय अनुसंधान. याचे सदस्य तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करत आहेत. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की निर्यातीसाठी आवश्यक प्रमाणीकरणावरही ते लक्ष केंद्रीत करत आहेत. सहकारातून समृद्धीच्या भावनेतून काम करणाऱ्या पथकातील लोकांची मी प्रशंसा करतो. या प्रयत्नामुळे केवळ मोठ्या संख्येनं लोकांचं सबलीकरण झालं नाही तर उपजीविकेसाठी अनेक साधनंही तयार झाली आहेत. मला आशा आहे की हा प्रयत्न प्रत्येक श्रोत्याला प्रेरित निश्चित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज २८ मे महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांची जयंती आहे. त्यांचा त्याग, धाडस आणि संकल्पशक्तीशी जोडलेली अनेक कथा आजही आम्हाला प्रेरित करत असतात. मी तो दिवस विसरू शकत नाही की जेव्हा मी अंदमानातील त्यांच्या कोठडीत गेलो होतो जिथं वीर सावरकरांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. वीर सावरकर यांचं व्यक्तिमत्व दृढता आणि विशालतेनं संपूर्ण युक्त होतं. त्यांच्या निर्भीड आणि स्वाभिमानी स्वभावाला गुलामीची मानसिकता अजिबात पंसत नव्हती. स्वातंत्र्य आंदोलनातच नव्हे तर सामाजिक समानता आणि सामाजिक न्यायासाठीही वीर सावरकर यांनी जितकं केलं, त्याच्या आठवणी आजही काढल्या जातात.
मित्रांनो, काही दिवसांनी ४ जूनला संत कबीरदास यांची जयंती आहे. कबीरदास यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे, तो आजही तितकाच उपयुक्त आहे. कबीरदास जी म्हणत असत,
कबीरा कुआं एक है, पानी भरे अनेक
बर्तन मेंही भेद है, पानी सब में एक
म्हणजे विहिरीवर वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाणी भरण्यासाठी आले तरीही विहीर कुणात भेदाभेद करत नाही. पाणी तर सर्व भांड्यांमध्ये एकच असतं. संत कबीरांनी समाजात विभाजन करणाऱ्या प्रत्येक वाईट चालीरितीला विरोध केला. समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. आज जेव्हा देश विकसित होण्याच्य संकल्पासह वाटचाल करत आहे, तेव्हा आम्हाला संत कबीरदास यांच्यापासून प्रेरणा घेऊन समाजाला मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न आणखी वाढवले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता देशातील एका अशा महान व्यक्तीमत्वाबद्दल चर्चा करणार आहे ज्यांनी राजकारण आणि चित्रपट जगतावर अद्भुत प्रतिभेच्या जोरावर अमीट ठसा उमटवला आहे. या महान व्यक्तीचं नाव आहे एन टी रामाराव ज्यांना आम्ही एनटीआर म्हणूनही ओळखतो. आज एनटीआर यांची शंभरावी जयंती आहे. आपल्या बहुसंचारी प्रतिभेच्या जोरावर त्यांनी केवळ तेलगु चित्रपटाचे महानायक बनले एवढेच नव्हे तर त्यांनी कोट्यवधी लोकांचं मनही जिंकलं होतं. आपल्याला हे माहीत आहे का त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटातून अभियन केला होता? त्यांनी अनेक ऐतिहासिक पात्रांना आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा जिवंत केलं होतं. भगवान कृष्ण, राम आणि अशा अनेक भूमिकांमध्ये एनटीआर यांचा अभिनय लोकांना इतका आवडला की आजही लोक त्यांची आठवण काढतात. एनटीआर यांनी चित्रपट जगतासह राजकारणातही आपली वेगळीच ओळख स्थापित केली होती. इथंही त्यांना लोकांचं भरपूर प्रेम आणि आशिर्वाद मिळाला. देश आणि दुनियेतील लाखो लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणारे एनटी रामाराव जींना मी श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी इतकंच. पुढच्या वेळेस काही नव्या विषयांसह आपल्याकडे येईन तेव्हा काही प्रदेशांत उष्मा आणखी वाढलेला असेल. कुठे कुठे पाऊसही सुरू होईल. आपल्याला हवामानाच्या प्रत्येक स्थितीत आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायचं आहे. २१ जूनला आम्ही जागतिक योगा दिन साजरा करू. त्याचीही देश आणि परदेशातही तयारी सुरू आहे. आपण या तयारीबाबत मला आपल्या मन की बातमध्ये मला लिहीत रहा. अन्य एखादा विषय किंवा माहिती मिळाली तर मला ही सांगा. जास्तीत जास्त सूचना 'मन की बात'मध्ये घेण्याचा माझा प्रयत्न राहील. पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू या. तोपर्यंत आता निरोप द्या. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज मन की बातचा शंभरावा भाग आहे. मला आपल्या सर्वांची हजारो पत्रं मिळाली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी असा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त पत्रे वाचेन, पाहीन आणि संदेशांना जरा समजण्याचा प्रयत्न करावा. आपली पत्रं वाचताना मी कित्येकदा तर अतिशय भावनावश झालो, भावनांनी ह्रदय उचंबळून आलं आणि भावनामध्ये वाहूनही गेलो आणि स्वतःला पुन्हा सावरलं. आपण माझं मन की बातच्या शंभराव्या भागासाठी अभिनंदन केलं आहे. परंतु मी खरोखर सांगतो की वास्तविक पहाता अभिनंदनास पात्र तर आपण सर्व मन की बातचे श्रोते आहात, आमचे देशवासी आहेत. मन की बात कोटी कोटी भारतीयांची मन की बात आहे त्यांच्या भावनांचं प्रकटीकरण आहे.
मित्रांनो, ३ ऑक्टोबर २०१४ या दिवशी विजयादशमीचं ते पर्व होतं आणि आम्ही सर्वानी मिळून विजया दशमीच्या दिवशीच मन की बात चा प्रवास सुरू केला होता. विजया दशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचं पर्व. मन की बात सुद्धा देशवासियांच्या भलेपणाचं, सकारात्मकतेचं एक आगळंवेगळं पर्व बनली आहे. एक असं पर्व की जे प्रत्येक महिन्याला येतं, ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच असते. यात आम्ही सकारात्मकता साजरी करतो. आम्ही यात लोक सहभागालाही साजरं करतो. अनेक वेळा मन की बात ने इतके महिने आणि इतके वर्षांचा प्रवास केला, यावर विश्वासच बसत नाही. प्रत्येक भाग अगदी खास होता. प्रत्येक वेळेस, नवीन उदाहरणांचं नाविन्य, प्रत्येक वेळेस देशवासियांच्या यशस्वीतेचा विस्तार. मन की बात कार्यक्रमाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जोडले गेले, प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक वर्गातील लोक जोडले गेले. बेटी बचाओ-बेटी पढाओची गोष्ट असो, स्वच्छ भारत अभियानाची गोष्ट असो, खादी प्रती प्रेम असो की निसर्गाबद्दल चर्चा असो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असो की मग अमृत सरोवर याची चर्चा, मन की बात ज्या विषयाशी जोडला गेला, तो लोक आंदोलनाचा विषय झाला आणि आपण लोकांनी त्याला तसा बनवला. जेव्हा मी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी मन की बात सामायिक केली होती, तेव्हा याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली.
मित्रांनो, मन की बात तर माझ्यासाठी दुसऱ्यांच्या गुणांची पूजा करण्यासारखीच आहे. माझे एक मार्गदर्शक होते-लक्ष्मणराव जी इनामदार. आम्ही त्यांना वकील साहेब म्हणत असू. ते नेहमी असं म्हणत की, कुणीही दुसऱ्यांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. समोर कुणीही असो, आपला साथीदार असो की आपला विरोधी गटातील असो, त्याचे चांगले गुण जाणण्याची, त्यांच्यापासून शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या शिकवणीने नेहमीच मला प्रेरणा दिली आहे. मन की बात दुसऱ्यांच्या गुणांपासून शिकण्याचं एक फार मोठं माध्यम बनलं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या कार्यक्रमानं मला कधीही आपल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. मला आठवतं की, जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा स्वाभाविकपणेच सामान्य जनांशी भेटणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं होतच होतं. मुख्यमंत्री पदाचं कामकाज आणि कार्यकाल असा असतो की लोकांना भेटण्याची खूप संधी मिळत असते. पण २०१४ मध्ये जेव्हा दिल्लीत आलो, तेव्हा मला असं आढळलं की येथील जीवन तर खूपच वेगळं आहे. कामाचं स्वरूप वेगळं आहे, जबाबदारी वेगळी आहे आणि स्थिती, परिस्थितीची बंधने, सुरक्षेचा बंदोबस्त, वेळेची मर्यादा सारं काही वेगळं आहे. सुरूवातीच्या दिवसात, काही वेगळेंपण जाणवत होतं. काहीतरी रितेपण वाटत होतं. पन्नास वर्षांपूर्वी मी यासाठी माझें घर सोडलं नव्हतं की आपल्याच देशवासियांशी संपर्क अवघड व्हावा. देशवासी माझ्यासाठी सर्वतोपरी आहेत, मी त्यांच्यापासून अलग होऊन मी जगूच शकत नाही. मन की बात ने मला या आव्हानावर उपाय दिला , सामान्य माणसांशी जोडलं जाण्याचा मार्ग दिला. पदभार आणि शिष्टाचार हा शासकीय व्यवस्थेपर्यंतच मर्यादित राहिला आणि लोकभावना, कोटी कोटी भारतीयांसोबत माझ्या भावविश्वाचं अतूट भाग बनून गेला. प्रत्येक महिन्याला मी देशातल्या लोकांची हजारो संदेश वाचतो, प्रत्येक महिन्याला देशवासियांच्या एकाहून एक अद्भुत स्वरूपाचं दर्शन घडतं. मी देशवासियांच्या तपश्चर्या आणि त्यागाची परिसीमा पहातो, ती मला जाणवते. मला असं वाटत नाही की मी आपल्यापासून थोडाही दूर अंतरावर आहे. माझ्यासाठी मन की बात एक कार्यक्रम नाही, तर माझ्यासाठी एक श्रद्धा, पूजा आणि व्रत आहे. जसे लोक ईश्वराची पूजा करण्यासाठी जातात तेव्हा प्रसादाची थाळी आणतात. माझ्यासाठी मन की बात कार्यक्रम ईश्वररूपी जनता जनार्दनाच्या चरणांच्या प्रसादाची थाळीसारखा आहे. मन की बात माझ्या मनाचा अध्यात्मिक प्रवास बनला आहे.
मन की बात स्वपासून ते समष्टीपर्यंतचा प्रवास आहे.
मन की बात अहंपासू ते वयम पर्यंतचा प्रवास आहे.
हा तर मी नाही तर तू ही याची संस्कार साधना आहे.
आपण कल्पना करा, एखादा माझा देशवासी ४०-४० वर्षांपासून निर्जन डोंगरी भाग आणि नापीक जमिनीवर वृक्ष लावतो आहे, कितीही लोक ३०-३० वर्षांपासून जल संरक्षणासाठी विहीरी आणि तलाव तयार करत आहेत आणि त्यांची स्वच्छता करत आहेत. कुणी २५ ते ३० वर्षांपासून निर्धन परिवारांतील मुलांना शिकवत आहे तर कुणी गरीबांच्या इलाजासाठी मदत करतो आहे. कित्येकदा मन की बात मध्ये याचा उल्लेख करताना मी भावविवश झालो आहे. किती वेळा याचं पुन्हा ध्वनीमुद्रण करावं लागलं आहे. आज मागचे कितीतरी भाग, पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. देशवासियांच्या या प्रयत्नांमुळे मला सातत्यानं स्वतःला कार्यरत रहाण्याची प्रेरणा दिली आहे.
मित्रांनो, मन की बात कार्यक्रमात मी ज्या लोकांचा उल्लेख करतो, ते सर्व आमचे हिरो आहेते, ज्यांनी या कार्यक्रमाला जिवंत बनवलं आहे. आज जेव्हा आम्ही १०० व्या भागाच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत, ते माझी ही इच्छा आहे की पुन्हा एकदा आम्ही त्या सर्व नायकांकडे जाऊन त्यांच्या प्रवासाच्या बाबत जाणून घ्यावं. आज आम्ही काही मित्रांशी पुन्हा चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याशी आता हरियाणातील सुनील जगलाल भाईजी जोडले जात आहेत. सुनील जगलानजी यांचा माझ्या मनावर इतका प्रभाव यासाठी पडला की हरियाणातील लिंगगुणोत्तराच्या व्यस्त प्रमाणावर जोरदार चर्चा होत असते आणि मी सुद्धा बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान हरियाणातूनच सुरू केलं होतं. याच दरम्यान, जेव्हा सुनील जी यांच्या सेल्फी विथ डॉटर मोहीमेकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. मी त्यांच्यापासून शिकलो आणि याचा मन की बातमध्ये समावेश केला. पहाता पहाता, सेल्फी विथ डॉटर एका जागतिक मोहीमेत परिवर्तित झाली. आणि यात मुद्दा सेल्फीचा नव्हता तर यात कन्येला प्रमुख स्थान दिलं होतं. जीवनात कन्येला किती मोठं स्थान आहे, हे या अभियानातून समोर आलं. अशाच अनेक् प्रयत्नांचा परिणाम असा झाला की आज हरियाणातील लिग गुणोत्तर खूपच सुधारलं आहे. या आपण आता सुनील जी यांच्याशी जरा गप्पा मारू या.
प्रधानमंत्री जी- नमस्कार सुनीलजी.
सुनीलः नमस्कार सर. आपला आवाज ऐकूनच माझा आनंद प्रचंड वाढला आहे सर.
प्रधानमंत्री जी- सुनील जी, सेल्फी विथ डॉटर प्रत्येकाला आठवणीत आहे. आज त्यावर पुन्हा चर्चा होत आहे तर आपल्याला कसं वाटत आहे?
सुनीलः प्रधानमंत्री जी, हे आपण जो हरियाणातील पानिपतच्या चौथं युद्ध मुलींच्या चेहऱ्यांवर स्मितहासय आणण्यासाठी सुरू केलं होतं, आणि ज्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण देशानं जितके प्रयत्न केले आहेत, तर खरोखरच माझ्यासाठी आणि प्रत्येक कन्या प्रेमींसाठी ही खूप मोठी बाब आहे.
प्रधानमंत्री जी- सुनील जी, आता आपली कन्या कशी आहे, आजकाल ती काय करते?
सुनीलः माझ्या दोन कन्या आहेत नंदनी आणि याचिका. त्यापैकी एक सातवी इयत्तेत शिकत आहे तर दुसरी चौथ्या इयत्तेत शिकते. आपली ती मोठी प्रशंसक आहे आणि आणि आपल्यासाठी तिने वास्तवात धन्यवाद प्रधानमंत्रीजी म्हणून तिनेच आपल्या वर्गसहकारी आहेत, त्यांच्याकडून तिने पत्रंही लिहीली होती तिने.
प्रधानमंत्री जी- वाहवा. आपल्या कन्येला माझ्याकडून आणि मन की बातच्या श्रोत्यांकडून खूप सारे आशीर्वाद द्या.
सुनील-खूप धन्यवादजी, आपल्यामुळेच देशाच्या कन्यांच्या चेहऱ्यांवर सातत्याने स्मितहास्य वाढत चाललं आहे.
प्रधानमंत्री जी- खूप खूप धन्यवाद, सुनील जी.
सुनील- जी धन्यवाद.
मित्रांनो,
मला या गोष्टीचा इतका आनंद आहे की मन की बातमधून आम्ही देशातील स्त्री शक्तीच्या शेकडो प्रेरणादायक कहाण्यांचा उल्लेख केला आहे. मग त्यात आमचं सैन्य असो की मग क्रीडा जगत असो. जेव्हा मी महिलांच्या यशाबद्दल उल्लेख केला आहे, त्यांची खूप प्रशंसा केली गेली आहे. जेव्हा आम्ही छत्तीसगढच्या देऊर गावातील महिलांची चर्चा केली होती. तेव्हा या महिला स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून गावातील चौक, रस्ते आणि मंदिरांमध्ये स्वच्छतेसाठी अभियान चालवत असतात. अशाच प्रकारे, तामिळनाडूतील त्या आदिवासी महिला ज्यांनी मातीचे हजारो पर्यावरणस्नेही कप निर्यात केले आणि त्यांच्यापासूनही देशानं खूप प्रेरणा घेतली. तामिळनाडूतील २० हजार महिलांनी एकत्र येऊन वेल्लोर इथं नाग नदीला पुनरूज्जीवित केलं होतं. अशा कितीतरी अभियानांना आमच्या स्त्री शक्तीनं प्रेरणा दिली आहे आणि मन की बात कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नांना समोर आणण्याचा मंच बनला आहे.
मित्रांनो, आता आमच्याबरोबर फोन लाईनवर आणखी एक सद्गृस्थ आले आहेत. त्यांचं नाव आहे मंजूर अहमद. मन की बात कार्यक्रमात जम्मू काश्मीरच्या पेन्सील पाट्या(पेन्सील स्लेट्स) बाबत माहिती देताना तेव्हा मंजूर अहमद जी यांचा उल्लेख झाला होता.
प्रधानमंत्री जी-मंजूर जी, कसे आहात आपण?
मंजूर जी- धन्यवाद सर, मजेत आहोत सर.
प्रधानमंत्री जी- मन की बातच्या १०० व्या भागात आपल्याशी चर्चा करताना खूप छान वाटत आहे.
मंजूर जी – धन्यवाद, सर |
प्रधानमंत्री जी- बरं, ते पेन्सील स्लेट्सचं काम कसं चालू आहे?
मंजूर जी – ते काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. जेव्हापासून सर आपण आमची ही गोष्ट मन की बात मध्ये सांगितली, तेव्हापासून खूप कामही वाढलं आहे. इतरांना रोजगारही खूप वाढला आहे या कामातून.
प्रधानमंत्री जी- किती जणांना रोजगार मिळत असेल?
मंजूर जी –आता माझ्याकडे २०० हून अधिक लोक आहेत.
प्रधानमंत्री जी- अरे वा, मला आनंद झाला हे ऐकून.
मंजूर जी – जी सर. आता एक दोन महिन्यातच याचा विस्तार करणार असून आणखी २०० लोकांना रोजगार मिळू लागेल सर.
प्रधानमंत्री जी- वाहवा. हे पहा मंजूर जी...
मंजूर जी- जी सर...
प्रधानमंत्री जी- मला बरोबर आठवतं की त्या दिवशी तुम्ही मला असं सांगितलं होतं की हे असं काम आहे की याची काही प्रसिद्घी नाही की स्वतःची काही ओळख नाही. आणि आपल्याला याचं दुःखंही होतं आणि याचमुळे आपण आपल्याला खूप अवघड परिस्थिती आहे, असं आपण म्हणत होता. आता तर ही ओळख बनली आहे आणि २०० हून अधिक लोकांना रोजगार पुरवत आहात.
मंजूर जी- जी सर... जी सर.
प्रधानमंत्री जी- आपण याचा विस्तार करत आहात आणि २०० लोकांना रोजगार देत आहात, ही तर खूप आनंदाची बातमी सांगितली आपण.
मंजूर जी- आणि सर, येथे जे शेतकरी आहेत, त्यांना याचा खूप मोठा लाभ मिळत आहे तेव्हापासून. २००० रूपयांना झाड विकत होते कघीकधी आता त्या झाडाची किमत ५००० रूपयांपर्यंत वर पोहचली आहे. मागणी इतकी वाढली आहे की तेव्हापासून आणि माझी ओळख बनली आहे. खूप मागण्या आपल्याकडे आल्या आहेत सर तेव्हापासून. मी आता एकदोन महिन्यात आणखी विस्तार करून दोन अडीचशे गावांमध्ये जितकी मुलं मुली आहेत, त्यांना यात सामावून घेता येईल सर आणि त्यांची उपजीविका यातून चालू शकते सर.
प्रधानमंत्री जी- पहा मंजूरजी, व्होकल फॉर लोकलची किती जबरदस्त शक्ती आहे हे आपण प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे.
मंजूर जी- जी सर|
प्रधानमंत्री जी- माझ्याकडून आपल्याला आणि गावातील सर्व शेतकरी आणि आपल्यासमवेत काम करत असलेल्या सर्व साधीदारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भैया.
मंजूर जी- धन्यवाद सर |
मित्रांनो, आमच्या देशात कितीतरी असे प्रतिभाशाली लोक आहेत, की जे आपल्या मेहनतीच्या जोरावर शिखऱस्थानावर पोहचले आहेत. मला आठवतं, विशाखापट्टणमचे वेंकट मुरली प्रसाद जी यांनी आत्मनिर्भर भारत विषयी एक तक्ता तयार केला होता. त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त भारतीय उत्पादनांचा उपयोग ते करतील. जेव्हा बेतिया चे प्रमोद जी यांनी एलईडी बल्ब बनवण्याचं छोटासा कारखाना सुरू केला, तेव्हा गढमुक्तेश्वर च्या संतोष जी यांनी चटया बनवण्याचं काम केलं आणि मन की बात कार्यक्रमच त्या सर्व उत्पादनांना सर्वाच्या समोर आणण्याचं एक साधन बनलां होता. आम्ही मेक इन इडियाच्या अनेक उदाहरणांपासून ते अंतराळ स्टार्ट अप्स पर्यंतची चर्चा मन की बात कार्यक्रमात केली आहे.
मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, मी काही भागांपूर्वी मणिपूरच्या भगिनी विजयशांती देवी यांचाही उल्लेख केला होता. विजयशांती देवी कमळाच्या तंतूंपासून कपडे बनवतात. मन की बात कार्यक्रमात या आगळ्यावेगळ्या पर्यावरणस्नेही कल्पनेची चर्चा झाली तेव्हा त्यांचं काम आणखीच लोकप्रिय झालं. आज विजयशांतीजी आमच्याबरोबर फोनवर आहेत.
प्रधानमंत्री जी- नमस्ते विजयशांतीजी, कशा आहात आपण?
विजयशांती जीः सर, मी मजेत आहे.
प्रधानमंत्री जी- आणि आपलं काम कसं चाललं आहे?
विजयशांती जीः माझ्या समवेत ३० महिलांसोबत अजूनही काम करत आहोत.
प्रधानमंत्री जी- इतक्या थोड्या कालावधी आपण ३० महिलांपर्यंत पोहचल्या आहात.
विजयशांती जीः होय सर. यावर्षी आणखी माझ्या भागातील शंभर महिलांना घेऊन विस्तार करणार आहे.
प्रधानमंत्री जी- तर आपलं लक्ष्य. १०० महिलांचं आहे.
विजयशांती जेः होय सर. १०० महिला.
प्रधानमंत्री जी- आणि आता लोकांना कमळाच्या खोडापासून बनवल्या जाणाऱ्ये तंतूचा चांगल्यापैकी परिचय झाला आहे.
विजयशांती जी- होय सर. प्रत्येकाला मन की बात कार्यक्रमापासूनच संपूर्ण भारतात याची माहिती झाली आहे.
प्रधानमंत्री जी- आता ते खूप लोकप्रियही झालं आहे.
विजयशांती जी- होय सर. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमापासून प्रत्येकाला कमलतंतूची (लोटस फायबर) माहिती झाली आहे.
प्रधानमंत्री जी- आता तुम्हाला बाजारपेठही मिळाली आहे?
विजयशांती जी- होय. मला अमेरिकेतूनही बाजारपेठ मिळाली आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करायची आहे. मी यावर्षापासून अमेरिकेलाही पाठवण्याचा विचार करते आहे.
प्रधानमंत्री जी- म्हणजे आता तुम्ही निर्यातदार झाला आहात.
विजयशांती जी- होय सर, मी यावर्षीपासून आमच्या कमलतंतूचे उत्पादन निर्यात करणार आहे.
प्रधानमंत्री जी- म्हणजे, जेव्हा मी म्हणतो की व्होकल फॉर लोकल आणि आता लोकल फॉर ग्लोबल.
विजयशांती जी- होय सर. मला माझं उत्पादन सर्व जगभरात पोहचलेलं हवं आहे.
प्रधानमंत्री जी- अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा.
विजयशांती जी- धन्यवाद सर.
प्रधानमंत्री जी- धन्यवाद, विजयशांती
विजयशांती जी- धन्यवाद सर.
मित्रांनो, मन की बातची अजून एक विशेषतः आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून अनेक लोकचळवळी जन्माला आल्या तसेच त्यांना गती देखील प्राप्त झाली. उदाहरणार्थ आपली खेळणी, आपल्या खेळण्यांच्या उद्योगाला पुनरुस्थापित करण्याचे मिशन ‘मन की बात’ पासूनच तर सुरु झाले होते. भारतीय प्रजातीचे श्वान, आपल्या देशी श्वानांबद्द्ल जागरुकता निर्माण करण्याच्या कामाची सुरुवात देखील ‘मन की बात’ पासूनच झाली होती. आपण आणखी एक मोहीम सुरु केली होती, गरीब लहान दुकानदारांसोबत घासाघीस करणार नाही, भांडण करणार नाही. जेव्हा ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरु झाली, तेव्हा देखील देशवासियांना या मोहिमेशी जोडण्यात ‘मन की बात’ ने महत्वाची भूमिका पार पाडली. असे प्रत्येक उदाहरण समाजात परिवर्तनाचे कारण बनले आहे. प्रदीप सांगवान जी यांनीही समाजाला प्रेरणा देण्याचा विडा उचलाल आहे. 'मन की बात' मध्ये, आम्ही प्रदीप सांगवान जी यांच्या 'हिलिंग हिमालय' मोहिमेची चर्चा केली होती. ते आपल्यासोबत फोन लाइनवर उपलब्ध आहेत.
मोदी जी – प्रदीप जी नमस्कार !
प्रदीप जी – सर जय हिंद |
मोदी जी – जय हिंद, जय हिंद ! तुम्ही कसे आहात?
प्रदीप जी- सर खूपच छान. आणि तुमचा आवाज ऐकून तर अजूनच छान.
मोदी जी- तुम्ही हिमालयाला स्वच्छ करण्याचा विचार केला.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी- मोहीम देखील राबवली. सध्या तुमची मोहीम कशी सुरु आहे?
प्रदीप जी- सर खूपच छान सुरु आहे. असे समजा की, 2020 पासून आम्हाला जे काम करायला पाच वर्ष लागायची तेच काम आता एका वर्षात पूर्ण होत आहे.
मोदी जी – अरे वाह !
प्रदीप जी- हो हो सर. सुरुवातीला मी खूप चिंतीत होतो, मी खूप घाबरलो होतो की मी आयुष्यभर हे काम करू शकेन की नाही. परंतु थोडा पाठिंबा मिळाला आणि 2020 पर्यंत आम्ही प्रामाणिकपणे खूपच संघर्ष करत होतो. खूपच कमी लोकं सहभागी होत होते, असे बरेच लोकं होते जे पाठिंबा देत नव्हते. आमच्या मोहिमेकडे तेवढे लक्षही देत नव्हते. पण 2020 नंतर जेव्हा 'मन की बात' मध्ये याचा उल्लेख झाला तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या.म्हणजे, पूर्वी आम्ही एका वर्षात 6-7 स्वच्छता मोहीम राबवायचो, आता आम्ही 10 स्वच्छता मोहीम राबवतो. आजच्या तारखेत वेगवेगळ्या ठिकाणांहून आम्ही दररोज पाच टन कचरा गोळा करतो.
मोदी जी- अरे वाह !
प्रदीप जी - सर, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर की एक वेळ अशी आली होती की मी जवळजवळ हर मानली होती, पण 'मन की बात' मध्ये उल्लेख झाल्यानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आणि गोष्टींना वेग आला. ज्याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता.मी तुमचा खरोखर आभारी आहे. मला माहित नाही की तुम्ही आमच्यासारखे लोक कसे शोधता. एवढ्या दुर्गम भागात कोण काम करत आहे, आम्ही हिमालयात जाऊन आम्ही काम करत आहोत. आम्ही या उंचीवर काम करत आहोत.त्या तिथे तुम्ही आम्हांला शोधलं. आमचे कार्य जगासमोर आणले. मी माझ्या देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलत आहे हा क्षण मझ्यासाठी तेव्हाही आणि आज देखील खूपच भावनिक क्षण आहे. माझ्यासाठी यापेक्षा भाग्याचे दुसरे काहीही असू शकत नाही.
मोदी जी – प्रदीप जी ! तुम्ही खर्या अर्थाने हिमालयाच्या शिखरांवर साधना करत आहात आणि मला खात्री आहे की लोकांना आता तुमचे नाव ऐकूनच तुम्ही पर्वतांच्या स्वच्छता मोहिमेत कसे सहभागी होता हे आठवेल.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी – आणि तुम्ही सांगितलेच आहे की आता तुमची खूप मोठी टीम तयार होत आहे आणि तुम्ही दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करत आहात.
प्रदीप जी – हो सर.
मोदी जी - आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या प्रयत्नांमुळे आणि त्याबद्दलच्या चर्चेमुळे अनेक गिर्यारोहकांनी आता स्वच्छतेशी संबंधित फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
प्रदीप जी – हो सर! खूपच !
मोदी जी- ही चांगली गोष्ट आहे, तुमच्या सारख्या मित्रांच्या प्रयत्नामुळे कचरा ही सुद्धा एक संपत्ती आहे, ही बाब आता लोकांच्या मनात रुजत आहे आणि आता पर्यावरणाचे देखील संरक्षण होत आहे आणि आपला अभिमान असणाऱ्या हिमालयाचे संवर्धन करण्यात सामान्य लोकं देखील सहभागी होत आहेत. प्रदीप जी मला खूप चांगले वाटले. खूप खूप धन्यवाद.
प्रदीप जी – धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद जय हिंद.
मित्रांनो, देशात पर्यटनाचा विकास वेगाने होत आहे. नद्या, पर्वत, तलाव हे आपले नैसर्गिक स्रोत असोत किंवा मग आपली तीर्थस्थाने असोत त्यांना स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला याची खूप मदत होईल. पर्यटनात आम्ही स्वच्छतेसोबतच अतुल्य भारत चळवळीविषयी देखील अनेकदा चर्चा केली आहे. या चळवळीमुळे लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या अशा अनेक ठिकाणांची माहिती झाली. मी नेहमी म्हणतो की परदेशात पर्यटनाला जाण्यापूर्वी आपण आपल्या देशातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे आणि ही स्थळे तुम्ही राहता त्या राज्यातील नसावीत, दुसऱ्या राज्यातील असली पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही स्वच्छ सियाचीन, सिंगल यूज प्लास्टिक आणि ई-कचरा यासारख्या गंभीर विषयांवर आम्ही सतत चर्चा केली आहे. आज ज्या पर्यावरणाच्या प्रश्नावर संपूर्ण जग चिंतेत असताना तो सोडवण्यासाठी 'मन की बात'चा हा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे.
मित्रांनो, यावेळी मला युनेस्को चे महासंचालक औद्रे ऑजुले यांनी 'मन की बात' विषयी एक विशेष संदेश पाठवला आहे. 100 भागांच्या या अद्भुत प्रवासासाठी त्यांनी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी काही प्रश्नही विचारले आहेत. प्रथम आपण युनेस्कोच्या महासंचालकांची मन की बात ऐकूया.
#Audio (UNESCO DG)#
युनेस्को महासंचालक - नमस्ते महामहिम, प्रिय पंतप्रधानजी, रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या 100 व्या भागात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मी युनेस्को च्या वतीने तुमचे आभार मानतो. युनेस्को आणि भारताचा इतिहास समान आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती आणि माहिती या सर्व क्षेत्रात आमची एकत्रित मजबूत भागीदारी आहे आणि मला मिळालेल्या या संधीच्या माध्यमातून आज शिक्षणाचे महत्त्व सांगायचे आहे.2030 पर्यंत जगातील प्रत्येकाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी UNESCO त्याच्या सदस्य राष्ट्रांसोबत काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेले आपण कोणते प्रयत्न करत आहात याबाबत माहिती द्याल का? युनेस्को संस्कृतीला पाठिंबा देण्याचे आणि वारशाचे संरक्षण करण्याचे देखील कार्य करते आणि भारत यावर्षी G-20 चे अध्यक्षस्थान भूषवत आहे.या कार्यक्रमासाठी जागतिक नेते दिल्लीत येणार आहेत. महामहिम, भारत आंतरराष्ट्रीय विषयसूचीमध्ये संस्कृती आणि शिक्षणाला कसे मांडणार आहे? या संधीसाठी मी पुन्हा एकदा तुमचा आभारी आहे आणि तुमच्या माध्यमातून भारतातील लोकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो.... लवकरच भेटू. खूप खूप धन्यवाद.
पंतप्रधान मोदी - धन्यवाद, महामहिम. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 100 व्या भागात तुमच्याशी संवाद साधताना मला आनंद होत आहे. शिक्षण आणि संस्कृती यासारखे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेत याचाही मला आनंद आहे.
मित्रांनो, युनेस्कोच्या महासंचालकांना शिक्षण आणि सांस्कृतिक संरक्षणा संदर्भातील भारताच्या प्रयत्नांबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे दोन्ही विषय 'मन की बात'चे आवडते विषय आहेत.
शिक्षण असो वा संस्कृती, तिचे जतन असो वा संवर्धन असो, ही भारताची प्राचीन परंपरा आहे. आज देश या दिशेने जे कार्य करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षणाचा पर्याय असो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा समावेश असो, असे अनेक प्रयत्न तुम्हाला दिसतील.काही वर्षांपूर्वीगुजरातमध्ये, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी 'गुणोत्सव आणि शाला प्रवेशोत्सव' यासारखे कार्यक्रम हे लोकसहभागाचे एक अद्भुत उदाहरण म्हणून स्थापित झाले होते. शिक्षणासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक लोकांच्या प्रयत्नांवर आम्ही 'मन की बात' मध्येप्रकाशझोत टाकला आहे. तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही ओदिशातील चहा विक्रेते स्वर्गीय डी. प्रकाश राव यांच्याबद्दल चर्चा केली होती, ज्यांनी गरीब मुलांना शिकवण्याची मोहीम सुरु केली होती.झारखंडच्या गावांमध्ये डिजिटल लायब्ररी चालवणारे संजय कश्यप असोत किंवा मग कोविडच्या काळात ई-लर्निंगद्वारे अनेक मुलांना मदत करणाऱ्या हेमलता एन.के. असोत अशा अनेक शिक्षकांची उदाहरणे आम्ही 'मन की बात'मध्ये घेतली आहेत. सांस्कृतिक संवर्धनाच्या प्रयत्नांनबद्दल देखील आम्ही 'मन की बात' मध्ये सतत चर्चा केली आहे.
लक्षद्वीपचा कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब असो, किंवा कर्नाटकचे ‘क्वेमश्री’ जी'कला चेतना' सारखे व्यासपीठ असोत, देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मला पत्र लिहून अशी उदाहरणे पाठवली आहेत. देशभक्तीवरील 'गीत', 'अंगाई’ आणि 'रांगोळी' या तीन स्पर्धांबद्दलही आम्ही बोललो होतो.तुम्हाला आठवत असेल, एकदा आम्ही देशभरातील कथाकारांसोबत कथाकथनाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतींवर चर्चा केली होती. सामूहिक प्रयत्नांमुळे मोठ्यातील मोठा बदल घडवून आणता येतो यावर माझा अढळ विश्वास आहे. या वर्षी, आपण स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असतानाच G-20 चे अध्यक्षपदही भूषवत आहोत. शिक्षणासोबत वैविध्यपूर्ण जागतिक संस्कृती समृद्ध करण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ होण्याचे हे देखील एक कारण आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या उपनिषदातील एक मंत्र शतकानुशतके आपल्या मनाला प्रेरणा देत आहे.
चरैवेति चरैवेति चरैवेति |
चालत राहा चालत राहा चालत राहा
चरैवेती चरैवेती याच भावनेने आज आम्ही 'मन की बात'चा 100 वा भाग पूर्ण करत आहोत. भारताची सामाजिक जडणघडण मजबूत करण्यामध्ये, 'मन की बात' हा माळेतील उभ्या आडव्या
धाग्यासारखा आहे जो प्रत्येक मणी एकत्र गुंफून ठेवण्यात मदत करतो. प्रत्येक भागात देशवासीयांची सेवा आणि शक्ती इतरांना प्रेरणा देत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक देशवासी इतर देशवासीयांसाठी प्रेरणा बनत आहे.एक प्रकारे, मन की बातचा प्रत्येक भाग पुढच्या भागासाठी पार्श्वभूमी तयार करतो. 'मन की बात' नेहमीच सद्भावना, सेवाभावनेने आणि कर्तव्यभावनेने पुढे गेली आहे.हीच सकारात्मकता स्वातंत्र्याच्या काळात देशाला पुढे नेईल, एका नव्या उंचीवर नेईल आणि मला आनंद आहे की 'मन की बात' ची जी सुरुवात झाली होती ती आज देशात एक नवीन परंपरा बनत आहे. एक अशी परंपरा ज्यामध्ये आपल्याला प्रत्येकाचे प्रयत्न दिसून येतात.
मित्रांनो, हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय संयमाने ध्वनिमुद्रित करणाऱ्या आकाशवाणीच्या सहकाऱ्यांचेही मी आज आभार मानू इच्छितो. अत्यंत कमी वेळात आणि अतिशय वेगाने 'मन की बात'चे विविध प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करणाऱ्या भाषांतरकारांचाही मी आभारी आहे. मी दूरदर्शन आणि MyGovच्या सहकाऱ्यांचेही आभार मानतो.कोणत्याही व्यावसायिक जाहिरातीशिवाय ‘मन की बात’ दाखवणाऱ्या देशभरातील सर्व वाहिन्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या लोकांचे मी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी, भारतातील लोक, भारतावर विश्वास ठेवणारे लोक ज्यांनी ‘मन की बात’ चे हे धनुष्य लीलया पेलले आहे, हे सर्व केवळ तुमची प्रेरणा आणि शक्तीमुळेच शक्य झाले आहे.
मित्रांनो, आज मला इतकं काही सांगायचं आहे की वेळ आणि शब्द दोन्ही कमी पडत आहेत. पण मला खात्री आहे की तुम्ही सर्व माझ्या भावना समजून घ्याल. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच तुमच्यामध्ये राहिलो आहे, राहणार आहे. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन देशवासीयांच्या यशाचा आनंद साजरा करूया, तोपर्यंत मला निरोप द्या आणि तुमची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद नमस्कार |
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज या चर्चेला सुरूवात करताना मनात किती प्रकारचे भाव दाटून येत आहेत. आपली आणि आमची ही ‘मन की बात’ मध्ये सुरू झालेली साथ आज ९९ व्या पायरीवर य़ेऊन पोहचली आहे. साधारणतः आपण नेहमी ऐकतो की ९९ वी फेरी खूप अवघड असते. क्रिकेटमध्ये तर नर्व्हस नाईंटीज म्हणजे नव्वदी ओलांडणे अत्यंत अवघड मुक्काम मानला जातो. परंतु, जेथे भारतात जनमानसात ‘मन की बात’ असते, तेथे प्रेरणा काही वेगळीच असते. मला या गोष्टीचा आनंद आहे की, ‘मन की बात’ च्या शंभराव्या भागाबाबत आज देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मला खूप सारे संदेश येत आहेत, दूरध्वनी येत आहेत. आज जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत, नव्या संकल्पांसह पुढे वाटचाल करत आहोत, तेव्हा शंभराव्या भागाबाबत आपल्या सूचना आणि मते जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आपल्या या सूचना आणि मते 30 एप्रिल रोजी होणाऱ्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला अधिकच संस्मरणीय बनवतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कार्यक्रमात आम्ही अशा हजारो लोकांची चर्चा केली आहे, जे इतरांची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करतात. अनेक लोक असे असतात की आपल्या कन्यांच्या शिक्षणासाठी आपलं संपूर्ण निवृत्तीवेतन पणाला लावतात, काही जण आपली सारी कमाई पर्यावरण आणि इतरांच्या जीव सेवेसाठी समर्पित करून टाकतात. आमच्या देशात परमार्थाला इतक्या उच्च स्थानी ठेवलं आहे की इतरांच्या सुखासाठी लोक आपलं सर्वस्व अर्पण करायला मागेपुढं पाहात नाहीत. यासाठी तर आम्हाला लहानपणापासून राजा शिबी आणि दधीच ऋषी यांच्यासारख्या देह दान करणाऱ्यांच्या कथा ऐकवल्या जातात.
मित्रांनो, आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या या टप्प्यात अवयव दान, एखाद्याला जीवन देणं हे एक मोठं माध्यम बनलं आहे. असं म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युनंतर त्याचं शरीर दान करते तेव्हा त्यातून ८ ते ९ जणांना एक नवं आयुष्य मिळायची शक्यता तयार होते. आनंदाची बाब ही आहे की आज देशात अवयव दान याप्रती जागरूकता वाढत चालली आहे. २०१३ या वर्षी, आमच्या देशात अवयव दानाच्या ५ हजारापेक्षाही कमी प्रकरणे होती. परंतु आज २०२२ मध्ये, त्यांची संख्या वाढून, १५ हजाराहून अधिक झाली आहे. अवयव दान करणाऱ्या व्यक्तींनी, त्यांच्या कुटुंबियांनी खरोखरच, खूप पुण्याचं काम केलं आहे.
मित्रांनो, प्रदीर्घ काळापासून मला वाटत होतं की असं पुण्य कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मन की बात मी जाणून घ्यावी आणि ती देशवासियांबरोबर सामायिक करावी. म्हणून आज, मन की बात मध्ये आमच्यासोबत एक गोंडस मुलगी. एक सुंदर बाहुलीसारख्या मुलीचे पिता आणि त्यांची आई आमच्याशी जोडली जात आहे. वडिलांचे नाव सुखबीर सिंह संधूजी आणि आईंचं नाव सुप्रीत कौर जी आहे आणि हा परिवार पंजाबातील अमृतसर मध्ये राहतो. खूप नवससायास केल्यावर त्यांना एक सुंदर बाहुलीसारखी कन्येची प्राप्ती झाली होती. घरातील लोकांनी तिचं नाव अत्यंत प्रेमानं ठेवलं होतं. अबाबत कौर. अबाबत याचा अर्थ आहे इतरांच्या सेवेशी जोडून घेणं, त्यांचे कष्ट दूर करण्याशी जोडून घेणं. अबाबत जेव्हा केवळ ३९ दिवसांची होती, तेव्हा ती हे जग सोडून गेली. परंतु सुखबीर सिंह संधूजी आणि त्यांची पत्नी सुप्रीत कौर जी यांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी एक अत्यंत प्रेरणादायक निर्णय घेतला. हा निर्णय होता, ३९ दिवसांच्या कन्येच्या अवयवांचं दान करणं. आमच्यासोबत आता फोन वर सुखबीर सिंह आणि त्यांच्या पत्नी उपस्थित आहेत. या, त्यांच्याशी चर्चा करू या.
पंतप्रधान: सुखबीर जी नमस्ते.
सुखबीर जीः नमस्ते माननीय प्रधानमंत्री जी,. सत श्री अकाल
पंतप्रधान : सत श्री अकाल जी, सत श्री अकाल जी. सुखबीर जी, मी आज मन की बातसंबंधी विचार करत होतो तेव्हा मला वाटलं की अबाबतची गोष्ट इतकी प्रेरणादायक आहे तर आपल्याच तोंडून ती ऐकावी. कारण घरात जेव्हा एखाद्या कन्येचा जन्म होतो तेव्हा अनेक स्वप्ने अनेक आनंद घेऊन येतात, परंतु जेव्हा कन्या लवकर गेली तर ते दुःख किती भयंकर असते, त्याचा अंदाज मी लावू शकतो. ज्या प्रकारे आपण निर्णय़ घेतला, त्याबाबत मी सारी गोष्ट आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.
सुखबीर जीः सर, ईश्वरानं आम्हाला खूप चांगली कन्या दिली होती. खूप लाडकी बाहुली आमच्या घरात आली होती. तिचा जन्म झाल्याबरोबरच आम्हाला कळलं की तिच्या मेंदूत एक असा मज्जातंतूंचा गुंता बनला आहे की त्यामुळे तिच्या ह्रदयाचा आकार मोठा होत आहे. आम्ही अस्वस्थ झालो की मुलीची प्रकृती तर इतकी चांगली आहे, इतकी सुंदर मुलगी आहे, आणि इतकी मोठी समस्या घेऊन जन्माला आली आहे. तर पहिले चोवीस दिवसांपर्यंत तर सर्व काही ठीक होतं. मुलगी एकदम सामान्य होती. अचानक तिच्या ह्रदयानं काम करणं थांबवलं. तर आम्ही तिला ताबडतोब रूग्णालयात घेऊन गेलो. तेथील ड़ॉक्टरांनी तिला पुनरूज्जीवित तर केलं, पण हे समजण्यास वेळ लागला की इतकी काय समस्या आली की, इतकी लहान मुलगी आणि अचानक तिला ह्रदयविकाराचा झटका आला. तिला आम्ही उपचारांसाठी चंडीगढला पीजीआय रूग्णालयात घेऊन गेलो. तेथे अत्यंत धाडसानं त्या मुलीनं उपचारांना प्रतिसाद देण्यासाठी संघर्ष केला. परंतु आजारच असा होता की, इतक्या लहान वयात तो शक्यच नव्हता. डॉक्टरांनी तिला पुन्हा जीवित करण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु ती सहा महिन्यांपर्यंत जगली असती तर तिच्यावर शस्त्रक्रियेचा विचार केला असता. परंतु ईश्वराच्या मनात भलतेच काही होते. केवळ ३९ दिवसांची झाली असतानाच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिला पुन्हा झटका आला आहे. आता मुलगी वाचण्याची आशा खूपच कमी आहे. तेव्हा आम्ही पती पत्नी रडत रडतच अशा निर्णयावर आलो. आम्ही ती शौर्यानं आजाराशी झगडत असताना आम्ही पाहिलं होतं. वारंवार असं वाटत होतं की ती आता जाईल आणि ती पुन्हा जीवित होत होती. आम्हाला असं वाटलं की आता या मुलीचा इथं येण्याचा काही उद्देश आहे. डॉक्टरानीही हात टेकले. तेव्हा आम्ही दोघांनी असं ठरवलं की या मुलीचे अवयव आम्ही दान का करू नयेत. कदाचित दुसऱ्या एखाद्याच्या जीवनात प्रकाश येईल. मग आम्ही पीजीआयचा जो प्रशासकीय विभाग आहे, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की इतक्या लहान मुलीची केवळ किडनीच दान केली जाऊ शकते. परमेश्वरानं आम्हाला हिमत दिली आणि गुरू नानक साहेब यांचं हेच तत्वज्ञान आहे. तेव्हा याच विचारात आम्ही तो निर्णय घेतला.
पंतप्रधान: गुरूंनी जी शिकवण दिली आहे, ती आपण प्रत्यक्षात अंगीकारून दाखवली आहे जी. सुप्रीत जी आहेत का. त्यांच्याशी बोलणं होऊ शकतं का?
सुखबीर जी– होय सर.
सुप्रीत जी– हॅलो
पंतप्रधान : सुप्रीत जी, मी आपल्याला प्रणाम करतो.
सुप्रीत जीः नमस्कार सर नमस्कार. सर आमच्यासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण आमच्याशी बोलत आहात.
पंतप्रधान : आपण इतकं मोठं काम केलं आहे आणि मी असं मानतो की पूर्ण देश जेव्हा ही सारी चर्चा ऐकेल तेव्हा कितीतरी लोक इतर कुणाचे जीव वाचवण्यासाठी पुढे येतील. अबाबतचं जे योगदान आहे, ते खूप मोठं आहे.
सुप्रीत जी: सर, गुरू नानक बादशहा यांची कृपाच होती की त्यांनी आम्हाला असा निर्णय घेण्याची हिमत दिली.
पंतप्रधान : गुरूकृपेशिवाय तर काहीच होऊ शकत नाही जी.
सुप्रीत जीः बिलकुल सर, बिलकुल |
पंतप्रधान : सुखबीर जी, आपण जेव्हा रूग्णालयात असाल आणि हा हादरवून टाकणारी बातमी डॉक्टरानी आपल्याला दिली त्यानंतरही आपण आणि आपल्या पत्नीनं अत्यंत धीरोदात्तपणे इतका मोठा निर्णय घेतला. गुरूंची शिकवण हीच असते की आपल्या मनात इतका मोठा उदार विचार आला आणि खरोखरच अबाबतचा अर्थ सामान्य भाषेत सांगायचा तर मदत करणारा असा आहे. हे काम आपण कसं केलं. त्या क्षणाला मी आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो.
सुखबीर जी– सर, वास्तवात आमच्या एक कौटुंबिक मित्र आहेत प्रिया जी. त्यांनी आपले अवयव दान केले होते. त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली तर तेव्हा तर आम्हाला वाटलं की हे जे शरीर आहे, ते तर पंचतत्वात विलीन होईल. जेव्हा कुणी कायमचा अंतरतो तेव्हा त्याचं शरीर जाळून टाकलं जातं किंवा दफन केलं जातं. परंतु त्याचे अवयव दुसर्या कुणाच्या उपयोगी आले तर हे भलाईचं काम आहे. आणि त्यावेळी आम्हाला अभिमान वाटला की जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की आपली कन्या, भारताची सर्वात लहान दाता बनली आहे. जिचे अवयवांचे यशस्वीपणे रोपण करण्यात आले आहेत. तर आमची मान अभिमानानं ताठ झाली. आम्ही आमच्या आईवडिलांचं नाव तर जीवनभर उजळवू शकलो नाही. पण आमच्या मुलीनं, इतक्या लहान मुलीनं आमचं नाव उजळून टाकलं. याहून मोठी गोष्ट ही आहे की आज या विषयावर आपल्याशी बोलणं होत आहे. आम्हाला अभिमान वाटत आहे.
पंतप्रधान : सुखबीर जी, आज आपल्या मुलीचां एक अवयव जिवंत आहे, असं नाही. आपली कन्या मानवतेच्या अमर कथेची अमर प्रवासी बनली आहे. आपल्या शरीरातील अंशरूपी अवयवाच्या रूपानं ती आज ही याच जगात आहे. या उदात्त कार्यासाठी मी आपली, आपल्या पत्नीची, आपल्या कुटुंबाची प्रशंसा करतो.
सुखबीर जीः थँक यू सर.
मित्रांनो, अवयव दानाची सर्वात मोठी भावना हीच असते की जाता जात इतर कुणाचं तरी भलं व्हावं, कुणाचा तरी जीव वाचावा. जे लोक, अवयव दानाची प्रतीक्षा करत असतात, त्यांना हे ठाऊक असतं की प्रतीक्षेचा एक एक क्षण व्यतीत करणं किती अवघड असतं. आणि अशात कुणी अवयव दान किंवा देहदान करणारा एखादा मिळतो, तेव्हा त्याच्यात त्यांना साक्षात ईश्वराचं रूपच दिसू लागतं.
झारखंडमध्ये राहणाऱ्या स्नेहलता चौधरी या अशाच होत्या ज्यानी ईश्वर होऊन इतरांना नवजीवन दिलं. ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरीजी, आपलं ह्दय, किडनी आणि यकृत दान करून गेल्या. आज मन की बात मध्ये, त्यांचे पुत्र अभिजीत चौधरी आमच्याबरोबर आहेत. या, त्यांच्याकडून ऐकू या.
पंतप्रधान : अभिजीत जी नमस्कार |
अभिजीत जीः प्रणाम सर |
पंतप्रधान : अभिजीत जी, आपण अशा मातेचे पुत्र आहात की ज्यांनी आपल्याला जन्म देऊन एक प्रकारे आपल्याला जीवन दिलंच आहे. पण मृत्युनंतरही आपल्या माताजींनी अनेक लोकांना जीवन देऊन गेल्या आहेत. एक पुत्र या नात्यानं आपल्याला निश्चितच त्यांचा अभिमान वाटत असणार.
अभिजीत जीः हो सर.
पंतप्रधान : आपण आपल्या माताजींबद्दल जरा सांगा. कोणत्या परिस्थितीत अवयव दानाचा निर्णय घेतला गेला?
अभिजीत जीः माझी आई सराईकेला म्हणून एक छोटंसं खेडं आहे झारखंडमध्ये. तेथे माझे मम्मी पपा रहात होते. ते गेल्या पंचवीस वर्षांपासून सकाळी चालण्याचा व्यायाम करत. आणि आपल्या सवयीनुसार ४ वाजता सकाळच्या फेरीला निघाले होते. त्यावेळी मोटरसायकल स्वारानं त्यांना मागून ठोकर दिली आणि माताजी तेथेच पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ताबडतोब आम्ही त्यांना सराईकेला इथल्या सदर रूग्णालयात घेऊन गेलो जेथे डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी केली. परंतु रक्तस्त्राव खूपच होत होता. आणि त्यांना कशाचीच जाणीव राहिली नव्हती. लगेच आम्ही त्यांना टाटा मुख्य रूग्णालयात घेऊन गेलो. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि ४८ तास त्यांचं निरीक्षण केल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचे वाचण्याची संधी खूपच कमी आहे. मग आम्ही त्यांना विमानानं दिल्ली एम्सला घेऊन आलो. इथं त्यांच्यावर जवळपास ७-८ दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर स्थिती एकदम चांगली होती. परंतु त्यांचा रक्तदाब इतका खाली आला की त्यानंतर असं समजलं की त्यांचा मेंदू मृत झाला आहे. तेव्हा डॉक्टर आम्हाला अवयव दानासंबंधी माहिती देत होते. आम्ही आमच्या वडलांना अवयव दान अशी काही गोष्ट असते, हे समजावून सांगू शकत नव्हतो. परंतु आम्हाला वाटलं की जी गोष्ट ते स्वीकारू शकणार नाहीत, तेव्हा असं काही चालू आहे, हे त्यांच्या मनातून आम्ही काढू पहात होतो. जसं आम्ही त्यांना सांगितलं की अवयव दानासंबंधी चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यांन सांगितलं की नाही, मम्मीची अशी खूप इच्छा होती आणि आम्हाला तसं करायचं आहे. मम्मी वाचणार नाही, हे समजेपर्यंत आम्ही खूप निराश होतो. पण जसं आम्हाला जेव्हा अवयव दानासंबंधी चर्चा सुरू झाली तेव्हा ही चर्चा सकारात्मक बाजूकडे गेली आणि आम्ही अत्यंत चांगल्या सकारात्मक वातावरणात आलो. ती प्रक्रिया चालू असतानाच पुन्हा रात्री ८ वाजता समुपदेशन पुन्हा झालं. दुसर्या दिवशी आम्ही अवयव दान केलं. त्यात मम्मीच्या विचारांचा भाग खूपच महत्वाचा होता. कारण त्या प्रथमपासूनच नेत्रदान आणि यासारख्या सामाजिक कार्यात खूपच सक्रीय होत्या. कदाचित याच विचारांनी हा इतका मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो. आणि माझ्या वडलांचा जो अंतिम निर्णय होता, त्यामुळे ही गोष्ट होऊ शकली.
पंतप्रधान : किती लोकांसाठी त्यांचे अवयव कामी आले?
अभिजीत जीः त्यांचं ह्रदय, दोन किडनी, यकृत आणि दोन नेत्र यांचं दान केलं गेलं आणि चार लोकांचे जीव वाचले तर दोघा जणांना नवी दृष्टी मिळाली.
पंतप्रधान: अभिजीत जी, आपले आई आणि वडिल दोघेही वंदनीय आहेत. मी त्यांना प्रणाम करतो. आपल्या पिताजींनी इतका मोठा निर्णय घेतला, कुटुबींयांचं नेतृत्व केलं, हे खरोखरच खूप प्रेरणादायक आहे आणि मी असं मानतो की आई तर आईच असते. आई ही स्वतःच एक प्रेरणादायक असते. परंतु परंपरांना छेद देऊन, प्रत्येक पिढ्यानुपिढ्या आई खूप मोठी शक्ती बनत जाते. अवयव दानासाठी आपल्या मातेची प्रेरणा आज देशापर्यंत पोहचत आहे. मी आपल्या या पवित्र कार्य आणि महान कार्यासाठी आपल्या संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. अभिजीत जी, धन्यवाद जी आणि आपल्या पिताजींना आमचा प्रणाम जरूर सांगा.
अभिजीत जीः अवश्य सर. धन्यवाद
मित्रांनो, ३९ दिवसांची अबाबत कौर असेल किंवा ६३ वर्षांच्या स्नेहलता चौधरी असतील, यांच्यासारखे दाते आपल्याला जीवनाचे महत्त्व पटवून देतात. आज आपल्या देशात असे अनेक गरजू लोक आहेत, जे निरामय जीवन लाभावे म्हणून मोठ्या आशेने अवयवदात्यांची वाट पाहत आहेत.
अवयव दानासाठी सुलभ कार्यप्रणाली असावी ह्यासाठी आणि लोकांना अवयव दान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशभरात समान धोरणा बाबत विचार केला जात आहे याबद्दल मला समाधान आहे. या दिशेने काम करताना, राज्यांच्या अधिवासाची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजेच आता रुग्ण देशाच्या कोणत्याही राज्यात जाऊन, अवयव मिळविण्यासाठी नोंदणी करू शकतील. पूर्वी अवयवदानासाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा होती, ती रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मी आपणां देशवासियांना विनंती करतो की आपण अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावे. तुमचा एक निर्णय अनेकांचे प्राण वाचवू शकतो, आयुष्य सुधारु शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे नवरात्रीचे पर्व आहे. शक्तीची उपासना करण्याचा काळ आहे. आज जी भारताची क्षमता नव्याने उजळून सामोरी येत आहे, त्यात आपल्या महिलांचा मोठा वाटा आहे. सध्या तर अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत.
तुम्ही सोशल मीडियावर आशियातील पहिली महिला रेल्वे लोको पायलट सुरेखा यादव जी यांना पाहिलं असेल. सुरेखा जी, अजून एक नवा मानदंड प्रस्थापित करत, वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या महिला लोको चालक झाल्या आहेत.
निर्मात्या गुनीत मोंगा आणि दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस ह्यांनी याच महिन्यात 'एलिफंट व्हिस्परर्स' या आपल्या माहितीपटासाठी ऑस्कर जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. देशासाठी आणखी एक गौरवाची बाब भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ, भगिनी ज्योतिर्मयी मोहंती जी यांनीही साध्य केली आहे. ज्योतिर्मयीजींना रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी क्षेत्रात IUPAC विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे
जर आपण राजकारणात बघितले तर नागालँडमध्ये एक नवी सुरुवात झाली आहे. नागालँडमध्ये 75 वर्षांत प्रथमच दोन महिला आमदार जिंकून विधानसभेत पोहोचल्या आहेत. यापैकी एक नागालँड सरकारमध्ये मंत्रीही झाल्या आहेत, म्हणजेच पहिल्यांदाच राज्यातील जनतेला एक महिला मंत्री मिळाल्या आहेत.
मित्रांनो, तुर्कस्थानमधील विध्वंसक/ विनाशकारी भूकंपानंतर तिथल्या लोकांच्या मदतीसाठी गेलेल्या धाडसी मुलींना मी काही दिवसांपूर्वी भेटलो. ह्या सगळ्या एनडीआरएफच्या पथकात समाविष्ट झाल्या होत्या. त्यांच्या धाडसाचे आणि कौशल्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताने यूएन मिशन अंतर्गत संपूर्णपणे महिलांची अशी एक तुकडी देखील तैनात केली आहे. आज आपल्या देशाच्या कन्या, तिन्ही सैन्यदलात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेत. ग्रुप कॅप्टन शालिजा धामी कॉम्बॅट युनिटमध्ये कमांड नियुक्ती मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी झाल्या आहेत. त्यांच्याकडे सुमारे 3000 उड्डाण तासांचा अनुभव आहे.
त्याचप्रमाणे भारतीय लष्कराच्या शूर कॅप्टन शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीनमध्ये, जेथे तापमान उणे साठ (-60) अंशांपर्यंत जाते तिथे शिवा चौहान तीन महिने तैनात असतील.
मित्रांनो, ही यादी इतकी मोठी आहे की सगळ्यांचा इथे उल्लेख करणे देखील अवघड आहे. अशा सर्व महिला, आमच्या मुली, आज, भारत आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा हाच विकसित भारतासाठी प्राणवायू आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल संपूर्ण जगभरात स्वच्छ ऊर्जा, अक्षय ऊर्जेबद्दल खूप चर्चा होते आहे. मी जेव्हा जगभरातील लोकांना भेटतो तेव्हा ते भारताच्या ह्या क्षेत्रातील अभूतपूर्व यशाविषयी नक्की चर्चा करतात. विशेषत: सौरऊर्जेच्या क्षेत्रात भारत ज्या वेगाने पुढे वाटचाल करतो आहे ती एक मोठीच उपलब्धी आहे. शतकानुशतके भारतातील लोकांचे सूर्याशी विशेष नाते आहे. आपल्या देशात सूर्याच्या शक्तीबद्दल जे वैज्ञानिक ज्ञान आहे, सूर्योपासनेची परंपरा आहे तसे इतर ठिकाणी फार क्वचित आढळते. मला आनंद आहे की आज प्रत्येक देशवासीय सौरऊर्जेचे महत्त्व जाणतो आहे आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरामध्ये आपले योगदान देत आहे.
सर्वांचे प्रयत्न / 'सबका प्रयास' चे तत्वच आज भारताला सौरऊर्जा अभियानात पुढे घेऊन जात आहे.
महाराष्ट्रातील पुण्यामधील अश्याच एका उत्कृष्ट प्रयत्नाने माझे लक्ष वेधून घेतले आहे. एमएसआर-ऑलिव्ह गृहसंकुलातील लोकांनी ठरवले की ते त्यांच्या सामूहिक वापराच्या गोष्टी म्हणजे पिण्याचे पाणी, लिफ्ट/ उदवाहक आणि विद्युत प्रकाश यंत्रे आता सौर उर्जेनेच चालवतील. यानंतर या सोसायटीतील सगळ्यांनी एकत्र येऊन सौर पॅनेल्स लावले. आज या सौर पॅनेलमधून दरवर्षी सुमारे ९० हजार किलोवॅट वीजनिर्मिती होत आहे. अंदाजे दर महिन्याला 40,000 रुपयांची बचत होते आहे. या बचतीचा फायदा गृहसंकुलातील सर्वाना होतो आहे.
मित्रांनो, पुण्याप्रमाणेच दमण आणि दीवमधील दीव, जो एक वेगळा जिल्हा आहे, तिथल्या लोकांनीही चांगले काम केले आहे. सोमनाथजवळ दीव आहे हे तुम्हाला माहीत असेलच. दीव भारतातील असा पहिला जिल्हा ठरला आहे, जिथे दिवसभरच्या संपूर्ण वापरासाठी 100% स्वच्छ ऊर्जा वापरली जात आहे. सर्वांचा प्रयत्न/ सबका प्रयास हाच दीव च्या या यशाचाही मंत्र आहे. कधीकाळी इथे वीज उत्पादनासाठी संसाधनांचे आव्हान होते. लोकांनी ह्या समस्येचा उपाय म्हणून सौर ऊर्जा निवडली. तिथे नापीक ओसाड जमीन आणि अनेक इमारतींवर सौर पॅनेल्स/ सौर पत्रे बसवण्यात आले. या पॅनेल्समुळे दिवसभरासाठी दीव ची जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जाशक्ती निर्माण होते आहे.या सौर प्रकल्पामूळे वीज खरेदीवर होणाऱ्या खर्चातील सुमारे 52 कोटी रुपये वाचले आहेत. ह्या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते आहे.
मित्रांनो, त्यांनी पुणे आणि दीवमध्ये केले तसे प्रयत्न देशभरात इतरही अनेक ठिकाणी होत आहेत. यावरून असे दिसून येते की आपण भारतीय लोक पर्यावरण आणि निसर्गाबाबत किती संवेदनशील आहोत आणि आपला देश भावी पिढीविषयी किती जागरूक आहे. अशा सर्व प्रयत्नांचे मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार अनेक परंपरा विकसित होतात. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीची शक्ती वाढवतात आणि तिला नित्यनूतन प्राणशक्ती प्रदान करतात. काही महिन्यांपूर्वी काशी मध्ये अशी एक परंपरा सुरू झाली.
काशी -तमिळ संगममध्ये, काशी आणि तामिळ प्रदेशाच्या दरम्यान शतकानुशतके असलेले जुने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध साजरे केले गेले. 'एक भारत-श्रेष्ठ भारत' ही भावना आपल्या देशाला शक्ती देते. जेव्हा आपण एकमेकांना ओळखतो, जाणतो तेव्हा एकात्मतेची भावना अधिक दृढ होते. एकात्मतेच्या ह्याच भावनेने पुढील महिन्यात गुजरातच्या विविध भागांमध्ये 'सौराष्ट्र-तमिळ संगम' होणार आहे.हा 'सौराष्ट्र-तमिळ संगम' 17 ते 30 एप्रिलपर्यंत चालेल. 'मन की बात'चे काही श्रोते विचार करत असतील, की गुजरातमधील सौराष्ट्राचा तामिळनाडूशी काय संबंध? खरं तर, अनेक शतकांपूर्वी सौराष्ट्रातील अनेक लोक तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले होते. हे लोक आजही 'सौराष्ट्री तमिळ' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खाण्याच्या सवयी, जीवनशैली, सामाजिक संस्कार ह्या सगळ्यांत आजही सौराष्ट्राची थोडीशी झलक पाहायला मिळते. मला तामिळनाडूतील अनेकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाची पत्रे पाठवली आहेत. मदुराईत राहणाऱ्या जयचंद्रन जी ह्यांनी अतिशय भावूक होऊन लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की - “हजारो वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणीतरी, सौराष्ट्र-तामिळ संबंधांचा विचार केला आहे. सौराष्ट्रातून तामिळनाडूत स्थायिक झालेल्या लोकांची विचारपूस केली आहे. जयचंद्रन यांचे हे शब्द हजारो तमिळ बंधू-भगिनींची भावना व्यक्त करीत आहेत.
मित्रांनो, मला 'मन की बात' च्या श्रोत्यांना आसामशी संबंधित एका बातमीबद्दल सांगायचे आहे. ही देखील 'एक भारत-श्रेष्ठ'भारत' ह्या भावनेला बळ देते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपण वीर लसीत बोरफुकन जी यांची ४०० वी जयंती साजरी करत आहोत. वीर लसीत बोरफुकन ह्यांनी जुलमी मुघल राजवटीच्या हातून सोडवून गुवाहाटी स्वतंत्र केली. आज देशाला या महान योद्ध्याचे अदम्य धैर्य माहिती होते आहे. काही दिवसांपूर्वी लसीत बोरफुकनच्या जीवनावर आधारित निबंध लिहिण्याची मोहीम/ योजना आखली गेली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यासाठी सुमारे 45 लाख लोकांनी निबंध पाठवले. आणि हे ही जाणून तुम्हाला आनंद होईल की हा एक गिनीज रेकॉर्ड तयार झाला आहे. आणि सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट ही आहे की वीर लसीत बोरफुकन यांच्यावर सुमारे 23 वेगवेगळ्या भाषांमध्ये निबंध लिहून पाठवले गेले आहेत. ह्या मध्ये आसामी भाषा तसेच हिंदी, इंग्रजी, बांगला, बोडो, नेपाळी, संस्कृत, संथाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकांनी निबंध पाठवले आहेत. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाचे मी मनापासून कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा काश्मीर किंवा श्रीनगरचा विषय येतो तेव्हा तर सर्वात आधी आपल्यासमोर काश्मीरमधील डोंगर दऱ्यांचे आणि दल सरोवराचे चित्र येते. आपल्यापैकी प्रत्येकजणच दल सरोवराच्या मनमोहक दृश्याचा आनंद घेऊ इच्छितो. पण, दल सरोवरात आणखी एक गोष्ट खास आहे. दल सरोवर, आपल्या मधुर कमल देठ किंवा कमल काकडीसाठी प्रसिद्ध आहे.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कमळाचे देठ वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. . काश्मीरमध्ये त्यांना नादरू म्हणतात. काश्मीरच्या नादरुंची मागणी सातत्याने वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन दल सरोवरात नादरुची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी एक एफपीओ तयार केला आहे. या एफपीओमध्ये सुमारे 250 शेतकरी सामील झाले आहेत. आज हे शेतकरी आपण लागवड केलेले नादरू परदेशात देखील पाठवत आहेत.
काही काळापूर्वीच या शेतकऱ्यांनी यूएईला दोनदा माल पाठवला होता. हे यश काश्मीरचे नाव तर उंचावत आहेच पण ह्या सोबतच शेकडो शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे.
मित्रांनो, काश्मीरमधील शेतीशी संबंधित लोकांचा आणखी एक प्रयत्न आजकाल आपल्या यशाचा सुगंध पसरवत आहे. मी यशाच्या सुगंधाविषयी का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! पण ती आहेच सुगंधाची गोष्ट! जम्मू-काश्मीर मधील दोडा जिल्ह्यातील भदरवाह हे एक शहर आहे. वास्तविक अनेक दशकांपासून येथील शेतकरी पारंपारिक मका शेती करत होते, पण काही शेतकऱ्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. फ्लोरिकल्चर, म्हणजे फुलांची लागवड, फुलांच्या शेतीकडे ते वळले. आज सुमारे अडीच हजार शेतकरी लॅव्हेंडरची लागवड करत आहेत.त्यांना केंद्र सरकारच्या सुगंध योजनेने देखील मदत केली आहे. या नवीन शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ केली आहे आणि आज लॅव्हेंडरसह, त्यांच्या यशाचा सुगंधही दूरवर पसरत आहे.
मित्रांनो, काश्मीरची गोष्ट असेल, कमळाचा विषय असेल, फुलाची बात असेल, सुगंधाची गोष्ट असेल तर कमळाच्या फुलावर विराजमान असणाऱ्या माता शारदेची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाडामध्ये शरद मातेच्या भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर त्याच मार्गावर बांधले गेले आहे जिथून पूर्वी लोक शारदा पीठाच्या दर्शनाला जात असत. स्थानिक लोकांनी ह्या मंदिराच्या उभारणीसाठी खूप मदत केली आहे. या शुभ कार्यासाठी मी जम्मू-काश्मीरच्या जनतेचे खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावेळी 'मन की बात' मध्ये इतकेच. पुढच्या वेळी, आपण ‘मन की बात’च्या 100 व्या भागात भेटू या. आपण सर्वांनी आपल्या सूचना जरूर पाठवाव्यात.
या मार्च महिन्यात आपण होळीपासून नवरात्रीपर्यंत अनेक सण, उत्सवात सहभागी झालो होतो. रमजानचा पवित्र महिनादेखील सुरू झाला आहे. लवकरच काही दिवसांत श्री रामनवमीचा महाउत्सवही येणार आहे. त्या नंतर महावीर जयंती, गुड फ्रायडे आणि इस्टरही येतील. एप्रिलच्या महिन्यात, आपण भारतातील दोन महान व्यक्तींच्या जयंती देखील साजऱ्या करतो. हे दोन महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर. या दोन्ही महापुरुषांनी समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात आपण अशा महान व्यक्तींकडून शिकण्याची आणि सतत प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपले कर्तव्य आपण अग्रस्थानी ठेवले पाहिजे. मित्रांनो, सध्या काही ठिकाणी कोरोना वाढत आहे. म्हणून तुम्ही सर्वानी सुरक्षिततेची आणि स्वच्छतेचीही काळजी घ्यायची आहे. पुढच्या महिन्यात, 'मन की बात' च्या शंभराव्या (100 व्या) भागात, आपण भेटू या. तोपर्यंत निरोप द्या.
धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ च्या या 98 व्या भागात तुम्हा सर्वांसोबत चर्चा करताना मला खूप आनंद होत आहे. 100 व्या भागाकडे वाटचाल करणाऱ्या या प्रवासात, ‘मन की बात’ ला तुम्ही सर्वांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे एक अप्रतिम व्यासपीठ बनविले आहे. प्रत्येक महिन्याला, लाखो संदेशांच्या माध्यमातून कित्येक लोकांची ‘मन की बात’ माझ्या पर्यंत पोहोचते. तुम्हाला तर तुमच्या मनाची ताकद माहीतच आहे, त्याचप्रमाणे समाजाच्या ताकदीने कशाप्रकारे देशाची ताकद वृद्धिंगत होते, हे आपण ‘मन की बात’ च्या वेगवेगळ्या भागांमधून पाहिले आहे, समजून घेतले आहे आणि मी याचा अनुभव घेतला आहे – स्वीकारले देखील आहे. मला तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही ‘मन की बात’ मध्ये भारतातील पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबाबत बोललो होतो. त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, त्यांचा आनंद घेण्याची, ते शिकण्याची एक लाट निर्माण झाली. ‘मन की बात’ मध्ये जेव्हा भारतीय खेळण्यांची चर्चा झाली, तेव्हा देशातील लोकांनी लगेचच याला देखील प्रोत्साहन दिले. आता तर भारतीय खेळण्यांची इतकी क्रेझ झाली आहे की परदेशात देखील याची मागणी खूपच वाढत आहे. जेव्हा आम्ही 'मन की बात' मध्ये कथा-कथनाच्या भारतीय शैलींबद्दल बोललो तेव्हा त्यांची कीर्तीही दूरवर पोहोचली. भारतीय कथा-कथन प्रकारांकडे लोक अधिकाधिक आकर्षित होत आहेत.
मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल, सरदार पटेल यांची जयंती अर्थात ‘एकता दिवस’ चे औचित्य साधत ‘मन की बात’ मध्ये आम्ही तीन स्पर्धांची घोषणा केली होती. या स्पर्धेत देशभक्तीपर 'गाणी’, 'अंगाई, आणि 'रांगोळी' यांचा समावेश होता. मला कळविण्यात आनंद होत आहे की, देशभरातील 700 हून अधिक जिल्ह्यांतील 5 लाखांहून अधिक लोकांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे. यामध्ये लहान मुले, युवक, ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि 20 हून अधिक भाषांमध्ये आपल्या प्रवेशिका पाठवल्या. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. तुमच्यातील प्रत्येकजण विजेता आहे, कलेचा उपासक आहे. देशाच्या विविधतेबद्दल आणि संस्कृतीबद्दल तुमच्या मनात किती प्रेम आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे.
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.
मित्रांनो, अंगाई लेखन स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील बी.एम. मंजुनाथजी यांनी पटकावले आहे. कन्नडमध्ये लिहिलेल्या‘ मलगू कन्दा’ (Malagu Kanda)या अंगाईसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ही अंगाई लिहिण्याची प्रेरणा त्यांना त्यांची आई आणि आजींनी गायलेल्या अंगाई मधून मिळाली आहे. ही अंगाई ऐकल्यावर तुम्हालाही तो आनंद मिळेल.
“निज रे माझ्या बाळा,
माझ्या शहाण्या बाळा, निज तू,
सांज होऊन मिट्ट काळोख पसरला आहे,
निद्र देवी येईल,
चांदण्याच्या बागेतून, स्वप्ने घेऊन येईल,
निज रे बाळा, निज रे बाळा,
जोजो...जो..जो..
जोजो...जो..जो..”
आसाममधील कामरूप जिल्ह्यातील दिनेश गोवाला यांनी या स्पर्धेत दुसरे पारितोषिक पटकावले आहे. त्यांनी लिहिलेल्या अंगाई मध्ये मातीची आणि धातूची भांडी बनवणाऱ्या स्थानिक कारागिरांच्या लोकप्रिय कलाकृतीचा ठसा आहे.
कुंभार दादा झोळी घेऊन आले आहेत,
झोळीमध्ये काय आहे?
कुंभाराची झोळी उघडून पाहिले तर,
झोळीत होती सुंदरशी वाटी!
आमच्या छकुलीने कुंभाराला विचारले,
कशी दिली ही छोटीशी वाटी!
गाणी आणि अंगाई प्रमाणेच रांगोळी स्पर्धाही खूप गाजली. सहभागींनी एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या काढून पाठवल्या. यामध्ये पंजाबच्या कमल कुमार विजेते ठरले. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अमर शहीद वीर भगतसिंग यांची अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. महाराष्ट्रातील सांगली येथील सचिन नरेंद्र अवसारी यांनी आपल्या रांगोळीत जालियनवाला बाग, तेथील हत्याकांड आणि शहीद उधम सिंग यांचे शौर्य चित्रित केले होते. गोव्याचे रहिवासी गुरुदत्त वांटेकर यांनी गांधीजींची रांगोळी काढली, तर पुद्दुचेरीतील मालतीसेल्वम यांनीही अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांवर लक्ष केंद्रित केले.देशभक्तीपर गीत स्पर्धेच्या विजेत्या टी. विजय दुर्गाजी या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांनी तेलुगुमध्ये प्रवेशिका पाठवली होती. त्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक नरसिंह रेड्डी गारू जी यांच्याकडून त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे. तुम्हीही ऐका विजय दुर्गाजींच्या प्रवेशिकेचा हा भाग
रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे तुम्ही अंकुर आहात, अंकुश आहात!
इंग्रजांच्या अन्यायकारक आणि निरंकुश दडपशाही पाहून
तुमचे रक्त खवळले आणि आगीचा डोंब उसळला!
रेनाडू प्रांताचा सूर्य,
हे शूर नरसिंहा !
तेलुगु नंतर आता मी तुम्हाला मैथिली मधील एक ध्वनिफीत ऐकवतो. ही दीपक वत्स जी यांनी पाठवली आहे. या स्पर्धेत त्यांनी देखील बक्षीस पटकावले आहे.
भारत जगाचा अभिमान आहे,
आपला देश महान आहे,
तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला,
उत्तरेकडे विशाल कैलाश आहे,
गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी,
कोशी, कमला बलान आहे,
आपला देश महान आहे.
तिरंग्यात आमचा प्राण आहे
मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे नक्की आवडले असेल. स्पर्धेत आलेल्या अशा प्रवेशिकांची यादी खूप मोठी आहे. तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जाऊन, तुमच्या कुटुंबासह या प्रवेशिका पहा आणि ऐका - तुम्हाला खूप प्रेरणा मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गोष्ट वाराणसीची असो, शहनाईबद्दल असो, उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल असो, माझे लक्ष त्याकडे जाणे स्वाभाविक आहे. काही दिवसांपूर्वी 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार' प्रदान केले. संगीत आणि प्रायोगिक कला (परफॉर्मिंग आर्ट्स) क्षेत्रातील उदयोन्मुख, प्रतिभावान कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात.हे पुरस्कार कला आणि संगीत जगताची लोकप्रियता वाढवण्यासोबतच त्यांना समृद्ध करण्यात देखील आपला हातभार लावत आहेत. काळानुसार ज्या वाद्यांची लोकप्रियता कमी होत चालली होती अशा वाद्यांना नव संजीवनी प्रदान करणाऱ्या कलाकारांचा देखील यात समावेश आहे. आता तुम्ही सर्व ही धून नीट ऐका.....
हे कोणते वाद्य आहे तुम्हाला माहीत आहे का? शक्यता फारच कमी आहे! या वाद्याचे नाव 'सुरसिंगार' असून ही धून जयदीप मुखर्जी यांनी संगीतबद्ध केली आहे. उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्काराने सन्मानित तरुणांमध्ये जयदीप जी यांचा समावेश आहे.50 आणि 60 च्या दशकापासूनच हे वाद्य ऐकायला मिळणे दुर्मिळ झाले होते, पण सुरसिंगारला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी जयदीप प्रयत्नशील आहेत.
त्याचप्रमाणे उप्पलपू नागमणी जी यांचा प्रयत्न देखील खूप प्रेरणादायी आहे, ज्यांना मँडोलिनमध्ये कर्नाटक शैलीतील वादनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुसरीकडे संग्रामसिंह सुहास भंडारे यांना वारकरी परंपरेतील कीर्तनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. या यादीत केवळ संगीताशी निगडीत कलाकार नाहीत - व्ही दुर्गा देवी जी यांना 'करकट्टम' या प्राचीन नृत्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या पुरस्काराचे आणखी एक विजेते, राज कुमार नायक जी यांनी तेलंगणातील 31 जिल्ह्यांमध्ये 101 दिवस चालणाऱ्या पेरीनी ओडिसीचे आयोजन केले होते. आज लोक त्यांना पेरिनी राजकुमार या नावाने ओळखतात. पेरिनी नाट्यम, शंकराला समर्पित एक नृत्य आहे जे काकतीय राजवटीत खूप लोकप्रिय होते. या घराण्याची मुळे आजच्या तेलंगणाशी संबंधित आहेत.साइखौमसुरचंद्रासिंहहे आणखी एक पुरस्कार विजेते आहेत. हे मैतेईपुंग वाद्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. हे वाद्य मणिपूरचे आहे. पूरण सिंग हा दिव्यांग कलाकार आहे, जो राजुला-मालुशाही, न्यौली, हुडका बोल, जागर अशा विविध संगीत प्रकारांना लोकप्रिय करत आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक ध्वनिफीत देखील त्यांनी तयार केल्या आहेत. पूरण सिंह जी यांनी उत्तराखंडच्या लोकसंगीतात आपली प्रतिभा दाखवून अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.वेळेच्या मर्यादेमुळे कदाचित सर्व पुरस्कार विजेत्यांबद्दल मला इथे बोलता येणार नाही, पण मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच वाचाल. मला आशा आहे की हे सर्व कलाकार,प्रयोगिक कलेला अधिक लोकप्रिय करण्यासाठी तळागाळातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वेगाने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक काना-कोपऱ्यात दिसत आहे. डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यात विविध अॅप्सचा मोठा वाटा आहे. असेच एक अॅप म्हणजे ई-संजीवनी. या अॅपवरून टेलि-कन्सल्टेशन, म्हणजे दूर बसून, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजाराबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.आतापर्यंत हे अॅप वापरणाऱ्या टेलि-कन्सल्टेशनची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 10 कोटी टेलि-कन्सल्टेशन! रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील अप्रतिम नाते –हे एक मोठे यश आहे. या यशाबद्दल मी सर्व डॉक्टर्स आणि या सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांचे अभिनंदन करतो.भारतातील लोकांनी तंत्रज्ञानाला कशाप्रकारे आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. आपण पाहिलं आहे की, कोरोनाकाळात ई-संजीवनी अॅपच्या माध्यमातून टेलि-कन्सल्टेशन लोकांसाठी एक उत्तम वरदान ठरलं. मलाही वाटले की, 'मन की बात'मध्ये आपण एक डॉक्टर आणि एका रुग्णाशी याविषयी बोलून, संवाद साधून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी. लोकांसाठी टेलि-कन्सल्टेशन किती प्रभावी ठरले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत सिक्कीमचे डॉ. मदन मणिआहेत. डॉ. मदन मणी सिक्कीममध्ये राहतात, परंतु त्यांनी धनबादमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एमडी केले. त्यांनी ग्रामीण भागातील शेकडो लोकांना त्यांनी टेलि-कन्सल्टेशनची सेवा दिली आहे.
पंतप्रधान : नमस्कार......नमस्कार मदन मणि जी.
डॉ. मदन मणि: नमस्कार सर.
पंतप्रधान : मी नरेंद्र मोदी बोलत आहे.
डॉ. मदन मणि : हो...हो सर.
पंतप्रधान : तुमचे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे.
डॉ. मदन मणि : हो, माझे शिक्षण वाराणसी मध्ये झाले आहे.
पंतप्रधान : तुमचे वैद्यकीय शिक्षण तिथेच झाले आहे.
डॉ. मदन मणि: हो....हो.
पंतप्रधान : तुम्ही जेव्हा वाराणसी मध्ये राहत होता तेव्हाचे वाराणसी आणि आजचे वाराणसी यातील बदल तुम्ही पाहायला की नाही.
डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, मी सिक्कीमला परत आल्यापासून मला तिथे जाणे शक्य झाले नाही, परंतु मी ऐकले आहे की खूपच बदल झाले आहेत.
पंतप्रधान : वाराणसी सोडून तुम्हाला किती वर्ष झाली?
डॉ. मदन मणि : सर, मी 2006 ला वाराणसी सोडले.
पंतप्रधान : ओह...मग तर तुम्हाला नक्कीच जायला हवे.
डॉ. मदन मणि: हो.....हो.
पंतप्रधान: अच्छा, मी तुम्हाला फोन याकरिता केला आहे की, तुम्ही सिक्कीम मधील दुर्गम डोंगराळ भागात राहून तिथल्या लोकांना टेली कन्सल्टेशनची उत्तम सेवा प्रदान करत आहात.
डॉ. मदन मणि: हो.
पंतप्रधान: मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना तुमचा अनुभव ऐकवू इच्छितो.
डॉ. मदन मणि: हो.
पंतप्रधान: मला तुमचा अनुभव सांगा.
डॉ. मदन मणि: पंतप्रधान जी, अनुभव खूपच सुंदर आहे. सिक्कीम मध्ये लोकांना अगदी जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी देखील कमीतकमी शंभर-दोनशे रुपयाचे गाडीभाडे लागते, आणि त्यानंतर देखील डॉक्टर मिळतील की नाही ही देखील एक समस्या असते. त्यामुळे टेलि कन्सल्टेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील लोकं थेट आमच्याशीसंपर्क साधतात. आरोग्य आणि कल्याण केंद्राचे सीएचओ त्यांना आमच्याशी जोडतात. आणि ते आम्हाला त्यांच्या जुन्या आजाराचे रिपोर्ट्स, त्यांची सध्याची स्थिती, सर्वकाही सांगतात.
पंतप्रधान : म्हणजे दस्तऐवज हस्तांतरित करता.
डॉ. मदन मणि: हो...हो. दस्तऐवज हस्तांतरित देखील करतात आणि जर हस्तांतरित नाही झाले तर ते आम्हांला वाचून दाखवतात.
पंतप्रधान: तिथल्या कल्याण केंद्राचे डॉक्टर सांगतात.
डॉ. मदन मणि: कल्याण केंद्रात जे CHO असतात सामुदायिक आरोग्य अधिकारी ते वाचून दाखवतात.
पंतप्रधान : आणि रुग्ण त्यांच्या समस्या थेट तुम्हाला सांगतात.
डॉ. मदन मणि:होय, रुग्ण आपल्या अडचणींबद्दल देखील सांगतो. मग जुन्या नोंदी पाहिल्यानंतर काही नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर. उदाहरणार्थ, एखाद्याचे पाय सुजले आहेत की नाही, एखाद्याची छाती स्टेथोस्कोपने तपासायची की नाही? जर सीएचओने ते तपासले नसेल, तर आम्ही त्यांना पाहायला सांगतो, सूज आहे की नाही हे पहा, डोळे तपासा, त्याला अशक्तपणा आहे की नाही, खोकला असेल तर छातीस्टेथोस्कोपने तपासा आणि तेथे आवाज आहे की नाही तपासा.
पंतप्रधान: तुम्ही Voice Call करता की व्हिडीओ कॉलचा देखील उपयोग करता?
डॉ. मदन मणि: होय, व्हिडीओ कॉलचा उपयोग करतो.
पंतप्रधान: म्हणजे तुम्ही देखील रुग्णाला बघता.
डॉ. मदन मणि: होय, आम्ही रुग्णाला देखील बघू शकतो.
पंतप्रधान: रुग्णाला काय वाटते?
डॉ. मदन मणि:रुग्णाला बरे वाटते कारण तो डॉक्टरांना जवळून पाहू शकतो. औषधाचा डोस वाढवायचा आहे की कमी करायचा आहे या संभ्रमात तो असतो, कारण सिक्कीममधील बहुतेक रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाबाचे आहेत आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे औषध बदलण्यासाठी डॉक्टर शोधण्यासाठी त्याला किती दूर जावे लागते. परंतु टेली कन्सल्टेशनद्वारे ते तिथेच उपलब्ध होते आणि आरोग्य आणि कल्याण केंद्रामध्ये मोफत औषध उपक्रमाद्वारे त्याला औषध देखील उपलब्ध होतात. त्यामुळे तो तेथूनच औषध घेतो.
पंतप्रधान: बरं मदनमणि जी,तुम्हाला तर माहिती आहेच की जोपर्यंत डॉक्टर येत नाही रुग्णाला तपासात नाहीत तोपर्यंत त्याचे समाधान होत नाही हा रुग्णाचा स्वभाव आहे. आणि डॉक्टरांनाही वाटतं की त्यांना रुग्णाला भेटावं लागेल, आता तिथे संपूर्ण टेलिकॉमकन्सल्टेशनद्वारे होते, मग डॉक्टरांना काय वाटते, रुग्णाला काय वाटते?
डॉ. मदन मणि: जी, आम्हालाही वाटतं की जर रूग्णांना असं वाटत असेल की डॉक्टरांनी पहावं, तर आम्हा लोकांना ज्या ज्या गोष्टी पहायच्या असतात, त्या आम्ही लोक सीएचओंना सांगून, व्हिडिओमध्येही आम्ही पहायला सांगतो. आणि कधी कधी तर रूग्णांना व्हिडिओमध्येच आम्ही जवळ जाऊन रूग्णांना जे त्रास सोसावे लागतात, किंवा काही त्वचेच्या समस्या असतात, कातडीच्या समस्या असतील तर आम्ही लोकांना व्हिडिओमध्येच ते दाखवून देतो. त्यामुळे ते लोक संतुष्ट असतात.
पंतप्रधान: आणि नंतर त्याच्यावर उपचार केल्यावर त्याला संतोष प्राप्त होतो, काय अनुभव येतो? रूग्ण बरे होत आहेत?
मदन मणि: जी, खूपच आनंद मिळतो. आम्हालाही आनंद होतो सर. कारण मी सध्या आरोग्य विभागात आहे आणि त्याबरोबरच मी टेलि कन्सलटेशनही करत असतो. त्यामुळे फाईलबरोबरच रूग्णाला पहाणे हाही माझ्यासाठी खूप छान, सुखद अनुभव असतो.
पंतप्रधान: सरासरी आपल्याकडे किती टेलि कन्सल्टेशनची प्रकरणे येत असतात?
डॉ. मदन मणि: आतापर्यंत मी 536 रुग्ण पाहिले आहेत.
पंतप्रधान: ओह... म्हणजे आपल्याला यात खूपच कौशल्य प्राप्त झालं आहे.
डॉ. मदन मणि: जी. चांगलं वाटतं रूग्णांना पहाण्यात.
पंतप्रधान: चला, मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण सिक्कीमसारख्या दूरवरच्या दुर्गम जंगलांमध्ये, डोंगरी भागात रहाणार्या लोकांची इतकी मोठी सेवा करत आहात. आणि आनंदाची बाब आहे की, आमच्या देशातील दुर्गम आणि दूरवरच्या भागांतही तंत्रज्ञानाचा इतका चांगला उपयोग केला जात आहे. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
डॉ. मदन मणि: धन्यवाद !
मित्रांनो, डॉक्टर मदन मणिजींच्या बोलण्यातून स्पष्ट होतं की इ संजीवनी अप कशा प्रकारे त्यांना सहाय्य करत आहे. डॉक्टर मदन जी यांच्यानंतर आता आपण आणखी एका मदनजींशी जोडले जात आहोत. ते उत्तरप्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील रहिवासी मदनमोहन लालजी आहेत. आता हाही एक योगायोग आहे की चंदौली सुद्धा बनारसला लागूनच आहे. या, आपण मदनमोहनजींकडून जाणून घेऊ या की इ संजीवनीच्या सहाय्याने त्यांचा एक रूग्ण म्हणून काय अनुभव आला आहे.
पंतप्रधान: मदन मोहन जी, नमस्कार!
मदन मोहन जी: नमस्कार, नमस्कार साहेब |
पंतप्रधान: नमस्कार! ठीक आहे, मला सांगण्यात आलं आहे की आपण मधुमेहाचे रूग्ण आहात.
मदन मोहन जी: जी |
पंतप्रधान: आणि आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून टेलि कन्सल्टेशनद्वारे आपल्या आजारासंबंधी वैद्यकीय मदत मिळवत असता.
मदन मोहन जी: हो|
पंतप्रधान: एक रूग्ण या नात्यानं, आपले अनुभव मी जाणून घेऊ इच्छितो. ज्यामुळे मी देशवासियांपर्यंत ही बाब पोहचवू शकेन की आजच्या तंत्रज्ञानामुळे आमचे गावात रहाणारे लोकही कशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतात. जरा सांगा तर कसं करतात ते.
मदन मोहन जी: असं आहे सर जी, रूग्णालये दूरवर असतात आणि जेव्हा मला मधुमेह झाला तेव्हा ५-६ किलोमीटर लांब जाऊन उपचार घ्यावे लागत होते, डॉक्टरांना दाखवावं लागत होतं. परंतु जेव्हापासून आपण ही व्यवस्था तयार केली आहे, आता आम्ही जेव्हा जातो, तेव्हा आमची तपासणी केली जाते, आमची बाहेरच्या डॉक्टरांशी बोलणंही करून दिलं जातं, आणि औषधंही दिली जातात. यामुळे आम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि लोकांनाही याचा खूप लाभ होतो.
पंतप्रधान:एकच डॉक्टर आपली तपासणी करतो की डॉक्टर सतत बदलत असतात?
मदन मोहन जी: त्यांना काही समजलं नाही तर डॉक्टरांना दाखवतात. त्याच बोलून दुसर्या डॉक्टरांशी आमचं बोलणं करून देतात.
पंतप्रधान: आणि जे डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यांच्यामुळे आपल्याला पूर्ण फायदा होतो.
मदन मोहन जी: आम्हाला फायदा होतोच होतो. आम्हाला तर त्यापासून खूपच मोठा फायदा होतो. आणि गावातल्या लोकांनाही त्यापासून खूप फायदा होतो. सर्व लोक तेथे विचारतात की भैया, आम्हाला रक्तदाब आहे, आम्हाला मधुमेह आहे, चाचणी करा, तपासणी करा आणि औषध योजना सांगा. आणि पहिल्यांदा तर ५-६ किलोमीटर दूरवर जात होतो. लांबलचक रांग लागत होती. पॅथॉलॉजी चाचणीसाठी रांग लागत असे. एक एक दिवस त्यातच जाऊन नुकसान व्हायचं.
पंतप्रधान: म्हणजे आता आपला वेळही खूप वाचतो.
मदन मोहन जी: आणि पैसाही खर्च होत होता आणि येथे सारी सेवा विनामूल्य दिल्या जात आहेत.
पंतप्रधान: जेव्हा आपण आपल्यासमोर डॉक्टरांना भेटतात तेव्हा एक विश्वास निर्माण होतो. चला, डॉक्टरांनी माझी नाडी तपासली आहे. डोळे तपासणी केली आहे, माझी जीभही तपासली आहे. तर एक वेगळीच भावना निर्माण होते. जसं टेलिकन्सल्टेशन करतत, तसाच आनंद मिळतो आपल्याला ?
मदन मोहन जी: हो, खूप आनंद होतो. के ते आमची नाडी धरून तपासत आहेत, स्टेथोस्कोप लावत आहेत, तर मला खूप बरं वाटतं आणि आम्हाला वेगळंच समाधान वाटतं. भई, इतकी चांगली व्यवस्था आपल्या द्वारे बनवली गेली आहे. ज्यामुळे आम्हाला खूप त्रास सोसून जावं लागत होतं, गाडी भाडं द्यावं लागत होतं, तेथे रांग लावावी लागत होती. आणि आता सार्या सुविधा घरबसल्याच मिळत आहेत.
पंतप्रधान: मदनमोहनजी, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वयाच्या या टप्प्यातही आपण तंत्रज्ञान शिकला आहात, तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहात. आणि इतरांनाही सांगा ज्यामुळे लोकांचाही वेळ वाचेल आणि पैसाही वाचेल तसेच त्यांना जे मार्गदर्शन मिळतं, त्यातून औषधयोजनाही चांगल्या प्रकारे होऊ शकते.
मदन मोहन जी: हो. आणखीन काय हवं.
पंतप्रधान: चला, माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला मदनमोहन जी.
मदन मोहन जी: बनारसला साहेब आपण काशी विश्वनाथ स्थानक तयार केलं. विकास केला तिथं. यापबद्दल आमच्याकडून आपलं अभिनंदन.
पंतप्रधान: मी आपल्याला धन्यवाद देतो. आम्ही काय बनवलं, बनारसच्या लोकांनी बनारसला तयार केलं आहे. नाही तर आम्ही काय, गंगामातेनं सेवेसाठी पाचारण केलं आहे आम्हाला, माता गंगेनं आम्हाला बोलवलं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा आपल्याला. प्रणाम जी.
मदन मोहन जी: नमस्कार सर !
पंतप्रधान: नमस्कार जी !
मित्रांनो, देशातील सामान्य लोकांसाठी, मध्यमवर्गासाठी, पहाडी क्षेत्रामध्ये रहाणार्या लोकांसाठी ई संजीवनी हे जीवनाचं संरक्षण करणारं अप तयार होत आहे. ही भारताची डिजिटल क्रांतीची शक्ती आहे. आणि हिचा प्रभाव आज सर्व क्षेत्रात आम्ही पहात आहोत. भारतातील यूपीआयची शक्ती आपण जाणताच. जगातील किती तरी देश त्याकडे आकर्षित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर यांच्यात यूपीआय पे नाऊ लिंक सुरू करण्यात आलं. आता सिंगापूर आणि भारतातील लोक आपापल्या मोबाईलवरून त्याच प्रकारे पैसे हस्तांतरित करत आहेत जसे ते आपल्या देशांतर्गत करत होते. मला याचा आनंद आहे की लोकांनी याचा लाभ घेण्यास सुरूवात केली आहे. भारताचं ई संजीवनी अप असो की हे यूपीआय, हे जीवन अधिक सुखमय करण्यासाठी अत्यंत सहाय्यकारी सिद्ध झालं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा एखाद्या देशात नष्ट होत चाललेल्या एखाद्या पक्षी प्रजातीला किंवा एखाद्या जीवजंतुला वाचवलं जातं, तेव्हा संपूर्ण जगात त्याची चर्चा होते. आमच्या देशात अशा अनेक महान परंपरा आहेत ज्या नष्ट झाल्या होत्या, पण लोकांच्या स्मरणातून त्या निघून गेल्या होत्या. परंतु आता लोकसहभागाच्या शक्तीतून त्यांना पुनरूज्जीवत करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी मन की बात यापेक्षा अधिक चांगला मंच कोणता असू शकेल?
आता मी आपल्याला जे सांगणार आहे, ते ऐकून आपल्याला खरोखरच खूप आनंद वाटेल आणि आपल्या परंपरेचा अभिमान वाटेल.
अमेरिकेत वास्तव्य करणार्या श्री. कंचन बॅनर्जी यांनी परंपरेच्या संरक्षणाशी जोडल्या गेलेल्या अशाच एका अभियानाच्या कडे माझं लक्ष वेधलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात बासबेरियामध्ये, या महिन्यात त्रिबेनी कुंभो मोहोत्शव यांचं आयोजन केलं होतं. त्यात आठ लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते. परंतु हे आपल्यला माहीत आहे का, की यात इतकं विशेष असं काय आहे. विशेष हे आहे की तब्बल 700 वर्षांनी ही प्रथा पुनरूज्जीवित केली आहे. तसं तर ही परंपरा हजारो वर्ष जुनी आहे. परंतु दुर्दैवानं ही बंगालच्या त्रिबेनीमध्ये होणारी ही प्रथा 700 वर्षांपूर्वी बंद झाली होती. तिला स्वातंत्र्यानंतर सुरू करायला हवं होतं. परंतु ते ही करण्यात आलं नाही. दोन वर्षांपूर्वी, स्थानिक लोक आणि त्रिबेनी कुंभो पॉरिचालोना शॉमितीच्या माध्यमातून हा महोत्सव पुन्हा सुरू झाला आहे. मी त्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व लोकांना शुभेच्छा देतो. आपण केवळ एक परंपरा पुनरूज्जीवित करत नाहीत तर आपण भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संरक्षणही करत आहात.
मित्रांनो, पश्चिम बंगालच्या त्रिबेनीला अनेक शतकांपासून एक पवित्रस्थळ म्हणून ओळखलं जातं. त्याचा उल्लेख, वेगवेगळ्या मंगलकाव्ये, वैष्णव साहित्य, शाक्त साहित्य आणि इतर बंगाली साहित्यिक कृतींमध्येही आढळतो. वेगवेगळ्या ऐतिहासिस दस्तऐवजांमधून याचा शोध लागतो की, एके काळी हे क्षेत्र संस्कृत, शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचं केंद्र होतं. अनेक संतांनी या क्षेत्राला माघ संक्रांतीमध्ये कुंभ स्नानासाठी पवित्र स्थान मानलं आहे. त्रिबेनीमध्ये आपल्याला गंगा घाट, शिवमंदिर आणि टेराकोटा वास्तुकलेनं सजलेली प्राचीन इमारती पहायला मिळतील. त्रिबेनीची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि कुंभ परंपरेचा गौरव पुनरूज्जीवित करण्यासाठी गेल्या वर्षी इथं कुंभ मेळ्याचं आयोजन केलं होतं. सात शतकांनंतर, तीन दिवस कुंभ महास्नान आणि मेळ्यानं, या क्षेत्रात एका नव्या उर्जेचा संचार केला आहे. तीन दिवस रोज होणारी गंगा आरती, रूद्राभिषेक आणि यज्ञात मोठ्या संख्येनं लोक सहभागी झाले. यावेळी महोत्सवात वेगवेगळे आश्रम, मठ आणि आखाडेही सहभागी झाले होते. बंगाली परंपरांशी जोडल्या गेलेल्या अनेक विधी जसे की कीर्तन, बाऊल, गोडियो नृत्ये, स्री खोल, पोटेर गान, छोऊ नृत्य, सायंकाळच्या कार्यक्रमांचं आकर्षणांचं केंद्र बनले होते. आमच्या युवकांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याचा हा एक स्पृहणीय प्रयत्न आहे. भारतात अशा कित्येक प्रथा आहेत, ज्यांना पुनरूज्जीवित करण्याची आवश्यकता आहे. मला आशा आहे की, याबाबत होणारी चर्चा लोकांना त्या दिशेनं वाटचाल करण्यास अवश्य प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छ भारत अभियानात आमच्या देशातील लोकसहभागानं त्याचे संदर्भच बदलून टाकले आहेत. देशात कुठेही काही नं काही स्वच्छतेशी जोडलेलं असतं, तेव्हा लोक मला त्याची माहिती कळवतातच. असंच माझं लक्ष हरियाणातील युवकांच्या स्वच्छता अभियानाकडे गेलं आहे. हरियाणातील एक गाव आहे दुल्हेडी. इथल्या युवकांनी असं ठरवलं की भिवानी शहराला स्वच्छतेच्या बाबतीत एक उदाहरण म्हणून स्थापित करायचं. त्यांनी युवा स्वच्छता आणि सेवा समिती नावाची एक संघटना स्थापन केली. त्या समितीशी संबंधित असलेले युवक पहाटे चार वाजता भिवानीला पोहचतात. शहरातील वेगवेगळ्या स्थळांवर जाऊन ते मिळून स्वच्छता अभियान राबवतात. या लोकांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कित्येक टन कचरा हटवला आहे.
मित्रांनो, स्वच्छ भारत अभियानाचा एक महत्वपूर्ण परिमाण कचर्यापासून संपत्ती(वेस्ट टु वेल्थ) हे ही आहे. ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भगिनी कमला मोहराना एक स्वयंसहाय्यता समूह चालवते. या समूहाच्या महिला दुधाची पिशवी आणि दुसर्या हातात प्लॅस्टिक पॅकिंगचे टोपले, तसेच मोबाईल ठेवण्याचे स्टँड अशा अनेक वस्तु तयार करतात. त्यांच्यासाठी हे स्वच्छतेच्या बरोबरीने उत्पन्न मिळवण्याचं एक साधनही झालं आहे. आम्ही निश्चय केला तर स्वच्छ भारतात खूप मोठं योगदान देऊ शकतो. कमीत कमी प्लॅस्टिकच्या पिशवीच्या ऐवजी, कपड्याची पिशवी वापरण्याच संकल्प आम्हाला सर्वांना केला पाहिजे. आपण पहाल, आपला हा संकल्प किती आनंद देईल, आणि दुसर्या लोकांनाही प्रेरित करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण एकत्र येऊन पुन्हा एकदा प्रेरणादायक विषयांवर चर्चा केली. कुटुंबाच्या बरोबर बसून आपण ऐकलंत आणि आता दिवसभर ती चर्चा गुणगुणत रहाल. आम्ही देशातील मेहनतीविषयक जितकी चर्चा करतो, तितकीच आम्हाला उर्जा मिळत असते. त्याच उर्जाप्रवाहाबरोबर वाटचाल करत, आज आम्ही मन की बातच्या 98 व्या आवृत्तीच्या मुक्कामापर्यंत पोहचलो आहोत. आजपासून काही दिवसांनी होळी सण आहे. आपल्याला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आम्हाला आपले सण व्होकल फॉर लोकल या संकल्पासहित साजरे करायचे आहेत. आपले अनुभव माझ्याशी सामायिक करायला विसरू नका. तोपर्यंत मला आता निरोप द्या. पुढच्या वेळेस पुन्हा नव्या विषयासहित भेटू या. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.
मित्रहो,
देहरादून येथील वत्सल जी यांनी मला लिहिले आहे की, मी नेहमी 25 जानेवारीची वाट बघतो, कारण त्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते आणि एका अर्थाने 25 तारखेची संध्याकाळ 26 जानेवारीसाठीचा माझा उत्साह वाढवते. समर्पण आणि सेवाभावनेसह तळागाळात काम करणाऱ्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या पीपल्स पद्म बद्दलच्या आपल्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगले प्रतिनिधित्व मिळाले आहे. आदिवासींचे जगणे शहरांमधल्या गजबजाटापेक्षा वेगळे असते, त्यांच्यासमोरची आव्हानेही वेगळी असतात. मात्र तरीही आदिवासी समाज आपल्या परंपरा जपण्यासाठी सदैव तत्पर असतात. आदिवासी समाजाशी संबंधित बाबींचे जतन आणि संशोधन करण्याचाही प्रयत्न केला जातो. हे लक्षात घेत, टोटो, हो, कुई, कुवी आणि मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.धानी राम टोटो, जानुम सिंग सोय आणि बी. रामकृष्ण रेड्डी जी यांची नावे आता संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहेत. सिद्धी, जारवा, ओंगे अशा आदीम आदिवासी जमांतींसोबत काम करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव करण्यात आला. जशा - हिराबाई लोबी, रतन चंद्र कार आणि ईश्वरचंद्र वर्मा जी. आदिवासी समाज हा आपल्या भूमीचा, आपल्या वारशाचा अविभाज्य घटक आहे. देशाच्या आणि समाजाच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केल्यास नव्या पिढीलाही प्रेरणा मिळेल. नक्षलग्रस्त असणाऱ्या भागांमध्येही यंदा पद्म पुरस्कारांचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखविणाऱ्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात कांकेरमध्ये लाकडावर कोरीव काम करणारे अजयकुमार मंडावी आणि गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील आपली संस्कृती जपणाऱ्या रामकुईवांगबे निउमे, बिक्रम बहादूर जमातिया आणि कर्मा वांगचू यांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
मित्रहो,
यंदा पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेल्यांमध्ये संगीतविश्व समृद्ध करणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत. संगीत आवडत नाही, असे कोण असेल? प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आवडत असू शकते, पण संगीत हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग असतो. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये संतूर, बम्हुम, द्वितारा अशी आपली पारंपारिक वाद्ये वाजवण्यात नैपुण्य असणाऱ्या कलाकारांचा समावेश आहे. गुलाम मोहम्मद ज़ाज़, मोआ सु-पोंग, री-सिंहबोर कुरका-लांग, मुनी-वेंकटप्पा आणि मंगल कांती राय अशी कित्येक नावे आहेत ज्यांची सगळीकडे चर्चा होते आहे.
मित्रहो,
पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी अनेक जण, आपल्यातील असे सहकारी आहेत ज्यांनी देशाला सर्वोच्च प्राधान्य दिले, राष्ट्र प्रथम या तत्त्वासाठी आपले आयुष्य समर्पित केले. ते सेवाभावनेने त्यांचे कार्य करत राहिले आणि त्यासाठी त्यांनी कधीही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. ज्यांच्यासाठी ते काम करत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. अशा समर्पित व्यक्तींचा गौरव करून आपणा संर्व देशवासीयांच्या अभिमानात भर पडली आहे. मला इथे सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घेता येणार नाहीत, पण मी तुम्हाला आग्रहपूर्वक विनंती करतो की पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा.
मित्रहो,
आज आपण स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवादरम्यान प्रजासत्ताक दिनाबद्दल चर्चा करत आहोत, तर आज मी इथे एका मनोरंजक पुस्तकाचाही उल्लेख करेन. काही आठवड्यांपूर्वी मला मिळालेल्या या पुस्तकात एका अतिशय रंजक विषयावर चर्चा करण्यात आली आहे. India - The Mother of Democracy असे या पुस्तकाचे नाव आहे आणि त्यात अनेक उत्कृष्ट निबंध आहेत. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि आपला देश, ही लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. लोकशाही आपल्या धमन्यांमध्ये आहे, ती आपल्या संस्कृतीमध्ये आहे - ती शतकानुशतके आपल्या कामकाजाचा अविभाज्य घटक आहे. स्वभावाने आपण लोकशाहीप्रधान समाज आहोत. डॉ.आंबेडकरांनी बौद्ध भिक्षू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती. त्यांनी एका अशा संस्थेचे वर्णन केले जिथे प्रस्ताव, ठराव, कोरम, मतदान आणि मतमोजणी यासाठी अनेक नियम होते. भगवान बुद्धांना तत्कालीन राजकीय व्यवस्थेतून याची प्रेरणा मिळाली असावी, असे बाबासाहेबांचे मत होते.
तामिळनाडूमध्ये उतीरमेरूर हे एक छोटेसे पण प्रसिद्ध गाव आहे. या गावातील अकराशे, बाराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख अवघ्या जगाला चकित करतो. हा शिलालेख एखाद्या संक्षिप्त संविधानासारखा आहे. ग्रामसभा कशी घेतली पाहिजे आणि सदस्य निवडीची प्रक्रिया कशी असावी, हे त्यात सविस्तरपणे सांगितले आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील लोकशाही मूल्यांचे आणखी एक उदाहरण म्हणजे 12 व्या शतकातील भगवान बसवेश्वर यांचा अनुभव मंडपम. येथे मुक्त वादविवाद आणि चर्चेला प्रोत्साहन दिले जात असे. हामॅग्ना कार्टाच्याही पूर्वीचा आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वारंगळच्या काकतीय वंशाच्या राजांच्या प्रजासत्ताक परंपराही खूप प्रसिद्ध होत्या. भक्ती चळवळीने पश्चिम भारतात लोकशाहीची संस्कृती वाढवली. सर्व संमतीसाठी गुरू नानक देव जी यांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकणारा, शीख पंथाच्या लोकशाही भावनेवर आधारित एक लेखही पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
या पुस्तकात मध्य भारतातील उरांव आणि मुंडा जमातींमधील समुदाय-प्रेरित आणि सहमतीने निर्णय घेण्याबाबतही चांगली माहिती देण्यात आली आहे. शतकानुशतके देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे, हे, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल. लोकशाहीची माता म्हणून आपण या विषयावर सातत्याने सखोल विचार केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि जगालाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. यामुळे देशातील लोकशाहीची भावना अधिक दृढ होईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
जर मी तुम्हाला विचारले की योग दिवस आणि आपली वेगवेगळ्या प्रकारची भरड धान्ये, यांच्यात काय साम्य आहे, तर तुम्ही विचार कराल की ही काय तुलना आहे? दोघांमध्ये खूप साम्य आहे, असे मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरे तर, भारताच्या प्रस्तावानंतरच संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय भरड धान्ये वर्ष या दोन्ही बाबतचा निर्णय घेतला आहे. दुसरे म्हणजे योगविद्येचा संबंध सुद्धा आरोग्याशी आहे आणि भरड धान्ये सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावतात. तिसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे - दोन्ही मोहिमांमध्ये लोकसहभागामुळे क्रांती होते आहे. ज्याप्रमाणे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग नोंदवून योगविद्या आणि तंदुरूस्तीला आपल्या जगण्याचा एक भाग बनवले आहे, त्याचप्रमाणे लोक मोठ्या प्रमाणावर भरड धान्यांचा अंगिकार करू लागले आहेत. लोक आता भरड धान्यांना आपल्या आहारात समाविष्ट करू लागले आहेत. या बदलाचा मोठा परिणामही दिसून येतो आहे. एकीकडे पारंपारिक पद्धतीने भरड धान्याचे उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत. जगाला आता भरड धान्यांचे महत्त्व कळू लागले आहे, याचा त्यांना मनापासून आनंद आहे. तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्ये बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आंध्र प्रदेशातील नांदयाल जिल्ह्यातील रहिवासी के.व्ही. रामा सुब्बा रेड्डी यांनी भरड धान्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडली. आईच्या हातच्या भरड धान्यांच्या पदार्थाना अशी चव होती की त्यांनी आपल्या गावात बाजरी प्रक्रिया एकक सुरू केले. सुब्बा रेड्डी जी लोकांना बाजरीचे फायदे देखील समजावून सांगतात आणि ते सहज उपलब्ध सुद्धा करून देतात. महाराष्ट्रात अलिबागजवळील केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल गेल्या वीस वर्षांपासून भरड धान्य उत्पादनात अनोख्या पद्धतीने योगदान देत आहेत. त्या शेतकऱ्यांना स्मार्ट शेतीचे प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भरड धान्यांचे उत्पादन वाढले आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
जर तुम्हाला छत्तीसगडमध्ये रायगड येथे जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तिथल्या मिलेट्स कॅफेला नक्की भेट द्या. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मिलेट्स कॅफेमध्ये चिला, डोसा, मोमोज, पिझ्झा आणि मंचुरियन असे पदार्थ चांगलेच लोकप्रिय होत आहेत.
मी तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारू का? तुम्ही उद्योजक हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण मिलेटप्रिन्युअर हा शब्द तुम्ही ऐकला आहे का? ओदिशातील मिलेटप्रिन्युअर सध्या चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. सुंदरगढ या आदिवासी जिल्ह्यातील सुमारे 1500 महिलांचा स्वयंसहायता बचत गट हा ओदिशा मिलेट्स मिशनशी संलग्न आहे. तिथल्या महिला भरड धान्यापासून बिस्कीटे, रसगुल्ला, गुलाब जामुन आणि केक सुद्धा तयार करत आहेत. बाजारपेठेत या पदार्थांना मोठी मागणी असल्यामुळे महिलांचे उत्पन्नही वाढत आहे.
कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथील आलंद भूताई मिलेट्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने गेल्या वर्षी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च या संस्थेच्या देखरेखीखाली काम सुरू केले. येथील खाकरा, बिस्किटे आणि लाडू लोकांना आवडत आहेत. कर्नाटकमधल्या बिदर जिल्ह्यात, हुलसूर मिलेट प्रोड्युसर कंपनीशी संबंधित महिला भरड धान्याची शेती करतात तसेच त्यांचे पीठही तयार करतात. त्यामुळे त्यांची कमाईही चांगलीच वाढली आहे. नैसर्गिक शेतीशी संबंधित छत्तीसगडमधले संदीप शर्माजी यांच्या FPO मध्ये 12 राज्यांमधले शेतकरी सहभागी झाले आहेत. बिलासपूरचा हा एफपीओ 8 प्रकारच्या भरड धान्याची पीठे आणि त्यांचे पदार्थ तयार करतो आहे.
मित्रहो,
आज भारताच्या कानाकोपऱ्यात जी-20 शिखर परिषदेच्या बैठका सातत्याने सुरू आहेत आणि मला आनंद वाटतो की, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, जिथे जिथे जी-20 शिखर परिषदेची बैठक होते आहे, तिथे भरड धान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. तिथे बाजरीची खिचडी, पोहे, खीर आणि रोटी, तसेच नाचणीपासून तयार केलेले पायसम, पुरी आणि डोसा असे पदार्थही वाढले जातात. G20 परिषदेच्या बैठका असलेल्या सर्व ठिकाणी भरड धान्य प्रदर्शनांमध्ये भरड धान्यांपासून तयार केलेली हेल्थ ड्रिंक्स, सीरियल्स आणि नूडल्स प्रदर्शित करण्यात आली. जगभरातील भारतीय मोहिमा सुद्धा त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. देशाचा हा प्रयत्न आणि जगामध्ये भरड धान्याची वाढती मागणी, आपल्या छोट्या शेतकऱ्यांना बळ देणार आहे, याची कल्पना तुम्ही करू शकता. भरड धान्यापासून बनवलेले नवनवीन पदार्थ तरुण पिढीला तितकेच आवडत आहेत हे पाहूनही मला आनंद होतो. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाची अशी अप्रतिम सुरुवात केल्याबद्दल आणि ते सतत पुढे नेल्याबद्दल मी 'मन की बात'च्या श्रोत्यांचेही अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, जेव्हा तुमच्याशी कोणी पर्यटन केंद्र असलेल्या गोव्याबद्दल बोलते, तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार येतो? स्वाभाविकपणे, गोव्याचे नाव येताच, सर्वात प्रथम इथली सुंदर किनारपट्टी, समुद्रकिनारे आणि गोव्यात मिळणारे आवडते पदार्थ आठवतात. पण या महिन्यात गोव्यात अशी घटना घडली जिची सर्वत्र चर्चा होते आहे. आज 'मन की बात' मध्ये, मी तुम्हा सर्वांना त्याविषयी सांगू इच्छितो. गोव्यात ‘पर्पल फेस्ट’ नावाचा कार्यक्रम झाला. पणजी येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केला गेलेला हा एक अनोखा प्रयत्न होता. आमचे जवळपास 50 हजारांहून अधिक बंधू-भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावरून तुम्ही सर्वजण अंदाज करू शकाल की ‘पर्पल फेस्ट’ किती मोठा कार्यक्रम होता. येथे आलेले लोक, आपण आता 'मीरामार बीच'ला भेट देऊन, समुद्रकिनाऱ्याच्या आनंद उपभोगू शकतो या विचाराने खूप उत्साहित झाले होते. आता गोव्यातील 'मीरामार बीच' हा, आमच्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी प्रवेशाला अनुकूल अशा समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा बनला आहे. येथे क्रिकेट स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा व मॅरेथॉनसोबतच एक मूकबधिर-अंध संमेलनही आयोजित करण्यात आले होते. इथे एका विशेष अशा पक्षी निरीक्षण कार्यक्रमा व्यतिरिक्त एक चित्रपटही दाखवण्यात आला. यासाठी अशी विशेष व्यवस्था करण्यात आली होती की ज्यामुळे आमचे सर्व दिव्यांग बंधू-भगिनी आणि मुले या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.
पर्पल फेस्टची एक खास गोष्ट म्हणजे देशातील खाजगी क्षेत्राचाही ह्यात सहभाग होता. त्यांच्या वतीने दिव्यांगांना सोयीस्कर अशा उत्पादने प्रदर्शित केली गेली. या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांच्या कल्याणासाठी जनजागृतीचे अनेक प्रयत्न केले गेले. पर्पल फेस्ट यशस्वी केल्याबद्दल,ह्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. यासोबतच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केला, त्या स्वयंसेवकांचे देखील अभिनंदन करतो. मला विश्वास वाटतो की सुलभ भारताची आमची संकल्पना साकार करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम खूप प्रभावी ठरतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता 'मन की बात'मध्ये मी अशा एका विषयावर बोलणार आहे , ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल, अभिमानही वाटेल आणि तुम्ही मनापासून म्हणाल , “व्वा! माझे मन प्रसन्न झाले आहे!”
देशातील सर्वात जुन्या विज्ञान संस्थांपैकी एक, अशी बेंगलुरू येथील भारतीय विज्ञान संस्था, म्हणजे IISc एक उत्तम उदाहरण घालून देत आहे. ‘मन की बात' मध्ये मी ह्या आधीही सांगितले होते की ह्या संस्थेच्या स्थापनेमागे भारतातील दोन महान व्यक्तिमत्वांची, जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंदांची प्रेरणा आहे. तर तुमच्या आणि माझ्या साठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 2022 ह्या वर्षामध्ये या संस्थेने आपल्या नावावर एकूण 145 पेटंट मिळवले आहेत. याचा अर्थ दर पाच दिवसांत दोन पेटंट!! हा विक्रम अद्भुत आहे. या यशासाठी मी IISc मधील सर्व चमूचे अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आज जगभरात पेटंट फाइलिंगमध्ये भारताचे 7वे स्थान आहे आणि ट्रेडमार्कमध्ये 5वे आहे. फक्त पेटंटविषयी बोलायचे तर, गेल्या पाच वर्षांत पेटंटसची संख्या सुमारे 50 टक्क्यांनी वाढली आहे. जागतिक नवोपक्रम/संशोधन निर्देशांकात/ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समधील भारताच्या क्रमवारीमध्ये, कमालीची सुधारणा झाली आहे आणि आता भारत 40 व्या स्थानावर आहे. 2015 मध्ये भारत जागतिक नवोपक्रम निर्देशांकात 80 व्या स्थानाच्या देखील मागे होता.
मला तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगायची आहे.
भारतात गेल्या 11 वर्षांत प्रथमच देशांतर्गत पेटंट दाखल करण्याची संख्या विदेशी पेटंट दाखल करण्याच्या संख्येपेक्षा जास्त दिसून आली आहे. हे भारताच्या वाढत्या वैज्ञानिक सामर्थ्याचे निदर्शक आहे.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहित आहेच की 21 व्या शतकात जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञानाला सर्वश्रेष्ठ महत्व आहे. मला विश्वास वाटतो आहे की भारताचे Techade चे स्वप्न संशोधकांच्या आणि त्यांच्या पेटंटसच्या बळावर नक्कीच पूर्ण होईल. यामुळे आपण सर्वजण आपल्या देशातल्या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आणि उत्पादनांचा पुरेपूर लाभ घेऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
NaMoApp वर मी तेलंगणातील अभियंते विजयजी ह्यांची पोस्ट पाहिली. यात विजयजींनी ई-कचऱ्याबद्दल सांगितले आहे. त्यांनी मला अशी विनंती केली आहे की 'मन की बात' मध्ये मी ह्याविषयी चर्चा करावी. या कार्यक्रमात यापूर्वीही आपण 'वेस्ट टू वेल्थ' म्हणजेच “कचऱ्यातून संपत्ती /सोने ‘ या विषयावर बोललो आहोत. पण चला, आज या विषयाशी संलग्न अशा ई-कचऱ्याविषयी बोलू या.
मित्रांनो,
आज प्रत्येक घरात मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट अशी उपकरणे सहजपणे आढळतात. देशभरात मिळून त्यांची संख्या कोट्यावधीनी असेल. पण आजची नवीन आणि अत्याधुनिक उपकरणे देखील भविष्यातील ई-कचराच आहेत. जेव्हा आपण कोणी नवीन उपकरण खरेदी करतो किंवा आपले जुने उपकरण डिव्हाइस बदलतो तेव्हा आधीच्या उपकरणाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जर ई-कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली नाही तर आपल्या पर्यावरणाचीही हानी होईल. पण, तेच जर का काळजीपूर्वक व्यवस्था केली गेली तर, चक्रीय/ स्थूल / circular अर्थव्यवस्थेमध्ये पुनर्नविनीकरण आणि पुनर्वापर ही एक मोठी शक्ती बनेल.
संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात असे म्हटले आहे की प्रत्येक वर्षी 50 दशलक्ष टन ई-कचरा टाकला जात आहे. आपण अंदाज करू शकता का की हा म्हणजे किती कचरा असेल? मानवी इतिहासात आत्तापर्यंत जितकी व्यावसायिक विमाने बनवली गेली आहेत, त्या सर्वांचे वजन जरी एकत्र केले तरी जितका ई कचरा टाकला जातो आहे, त्याची बरोबरी होणार नाही. हे म्हणजे असे आहे की प्रत्येक सेकंदाला 800 लॅपटॉप फेकले जात आहेत.
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की इ कचऱ्यावर विविध प्रक्रिया करून त्यापासून सुमारे 17 प्रकारचे मौल्यवान धातू काढता येतात. यामध्ये सोने, चांदी, तांबे आणि निकेल ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे ई-कचऱ्याचा योग्य उपयोग करणे हे 'कचऱ्यातून सोने’ बनवण्यासारखेच आहे.
आज अशा स्टार्ट अप्सची कमतरता नाही, जे या दिशेने संशोधनात्मक नाविन्यपूर्ण काम करत आहेत. आज, सुमारे 500 ई-कचरा पुनर्वापर करणारे या क्षेत्राशी निगडित आहेत आणि अजून अनेक नवीन उद्योजक देखील जोडले जात आहेत. या क्षेत्राने हजारो लोकांना रोजगारही दिला आहे.
बेंगळुरूचा ई-परिसरा हा असाच एक प्रयत्न आहे. त्यांनी मुद्रित सर्किट बोर्डमधून मौल्यवान धातू वेगळे करण्याची (/ वेगळे करून) स्वदेशी तंत्र प्रणाली विकसित केली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत काम करणाऱ्या इकोरेको (इको-रेको) ने ई-कचरा गोळा करण्यासाठी मोबाईल अँप वरून यंत्रणा तयार केली आहे. उत्तराखंडमधील रुडकीच्या अटेरो (एटेरो) रिसायकलिंगने तर या क्षेत्रात अनेक जागतिक पेटंट मिळवले आहेत. त्यांनी देखील स्वतःची ई-कचरा पुनर्वापर तंत्रप्रणाली विकसित करून खूप नाव कमावले आहे. भोपाळमध्ये 'कबाडीवाला' मोबाईलअँप आणि वेबसाइटद्वारे कित्येक टन ई-कचरा जमा केला जात आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व पर्यटन भारताला जागतिक पुनर्नविनीकरण केंद्र -ग्लोबल रिसायकलिंग हब म्हणून प्रस्थापित करण्यात मदत करत आहेत.
परंतु, ह्या सर्व उपक्रमांच्या यशासाठी एक अनिवार्य अट देखील आहे - ती म्हणजे ई-कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या उपयुक्त पद्धतींबद्दल लोकांना जागरूक करणे. त्यांना सतत ह्याची जाणीव करून देत राहिले पाहिजे. ई-कचरा क्षेत्रात काम करणारे लोक सांगतात की दरवर्षी केवळ 15-17 टक्के ई-कचऱ्याचे रिसायकल- पुनर्नविनीकरण केले जात आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज संपूर्ण जगात हवामान-बदल आणि जैवविविधतेच्या संवर्धनाबाबत बरीच चर्चा होत आहे. या दिशेने भारत करत असलेल्या ठोस प्रयत्नांबद्दल आपण नेहमी बोलत असतो. भारताने आपल्या पाणथळ ठिकाणांसाठी जे काम केले आहे ते ऐकून तुम्हाला देखील आनंद होईल. काही श्रोत्यांना प्रश्न पडला असेल की पाणथळ जागा म्हणजे काय?
पाणथळ जागा म्हणजेच पाणथळ माती असणारी ठिकाणे, जिथे वर्षभर जमिनीवर पाणी साचून राहते, दलदल असते. काही दिवसांनी, म्हणजे 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस आहे. आपल्या पृथ्वीच्या अस्तित्वासाठी पाणथळ जागा खूप महत्त्वाच्या आहेत कारण त्यावर अनेक जीवजंतू, पक्षी आणि प्राणी अवलंबून असतात. जैवविविधता समृद्ध करण्यासोबतच पूर-नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण सुनिश्चित करण्यात पाणथळ जागांची महत्वाची भूमिका असते.
आपल्यापैकी अनेकांना माहित असेल की रामसर साइट्स अशा पाणथळ जागा आहेत, ज्यांना आंतरराष्ट्रीय महत्त्व आहे. पाणथळ जागा कोणत्याही देशात असो, परंतु त्यांना अनेक आंतराष्ट्रीय निकष पूर्ण करावे लागतात, मगच त्यांना रामसर साइट म्हणून घोषित केले जाते. रामसर साइटवर 20,000 किंवा त्याहून अधिक पाणपक्षी असावेत. स्थानिक माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली असताना, स्वाधीनता अमृत महोत्सवादरम्यान मला तुम्हाला चांगली बातमी सांगायची आहे. आपल्या देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या आता 75 झाली आहे. तर 2014 पूर्वी देशात केवळ २६ रामसर स्थळे होती. ह्या साठी स्थानिक समुदायांचे अभिनंदन करायला हवे , ज्यांनी ही जैवविविधता जपली. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याच्या आपल्या जुन्या संस्कृती आणि परंपरेचाही हा सन्मान आहे. भारतातील या पाणथळ जागा आपल्या नैसर्गिक सामर्थ्याचेही उदाहरण आहेत. ओडिशातील चिलिका तलाव 40 पेक्षा जास्त जलपक्षी प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. कैबुल-लमजा, लोकटाक हे बारशिंगा ( swamp deer )चे एकमेव नैसर्गिक निवासस्थान मानले जाते. तामिळनाडूच्या वेदथंगलला 2022 मध्ये रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे. येथील पक्ष्यांची वस्ती जपण्याचे संपूर्ण श्रेय परिसरातील स्थानिक शेतकर्यांना जाते.
काश्मीरमधील पंजाथ नाग समाज आपल्या वार्षिक फळे बहार चा महोत्सवातील एक दिवस खास गावातील झऱ्यांची स्वच्छता करण्यासाठी राखून ठेवतो. जागतिक रामसर साइट्समध्ये जास्तकरून विशेष सांस्कृतिक वारसा देखील आहे. मणिपूरचे लोकटक आणि पवित्र रेणुका सरोवराशी तिथल्या संस्कृतींचे नाते जडलेले आहे. तसेच ‘सांभार’ हे दुर्गामातेचा अवतार असलेल्या शाकंभरी देवीशी संबंधित आहे. भारतात पाणथळ प्रदेशांचा हा विस्तार त्या लोकांमुळेच शक्य झाला आहे, जे रामसर साइट्सच्या आसपास राहतात. मला अशा सर्व लोकांचे खूप कौतुक वाटते, 'मन की बात'च्या श्रोत्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
यावेळी आपल्या देशात, विशेषतः उत्तर भारतात कडाक्याची थंडी होती. या हिवाळ्यात लोकांनी डोंगरावर जाऊन बर्फवृष्टीचाही आनंद लुटला. जम्मू-काश्मीरमधील अशीच काही छायाचित्रे आली ज्यांनी संपूर्ण देशाचे मन मोहून टाकले. सोशल मीडियावर/ समज माध्यमांवर तर जगभरातील लोकांना ही छायाचित्रे आवडत आहेत. हिमवृष्टीमुळे आपले काश्मीर खोरे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर झाले आहे. बनिहालहून बडगामला जाणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ तर लोकांना विशेष आवडत आहे. सुंदर हिमवर्षाव, आजूबाजूला पांढऱ्या शुभ्र चादरीप्रमाणे पसरलेला बर्फ. लोक म्हणत आहेत की ही दृश्ये परीकथेतील आहेत!! बरेच जण म्हणत आहेत की ही कोणत्याही परदेशातील नाही, तर आपल्याच देशातील काश्मीरची चित्रे आहेत. एका सोशल मीडिया यूजरने/ सामाजिक माध्यम वापरकर्त्याने लिहिले आहे की 'तो स्वर्ग याहून आणखी काय सुंदर असेल?' हे अगदी बरोबर आहे. म्हणूनच तर काश्मीरला धरतीवरचा स्वर्ग म्हणतात.
तुम्हीदेखील ही चित्रे पाहून काश्मीरच्या सहलीला जाण्याचा विचार करत असाल. मी तर म्हणेन की तुम्ही पण जा आणि तुमच्या मित्रांनादेखील सोबत घेऊन जा. काश्मीरमध्ये बर्फ़ाच्छादित पर्वत आणि नैसर्गिक सौंदर्य ह्या शिवाय देखील पाहण्यासारखे बरेच काही आहे. काश्मीरच्या सय्यदाबादमधील हिवाळी क्रीडा महोत्सव आयोजित केला होता. या खेळांची संकल्पना / थीम होती - स्नो क्रिकेट/ बर्फावरचे क्रिकेट ! तुम्ही विचार करत असाल की स्नो क्रिकेट हा अधिक रोमांचक खेळ असेल. तर तुमचा विचार अगदी बरोबर आहे. काश्मीरी तरुण बर्फावरील क्रिकेट अधिक रोमांचक बनवतात. याद्वारे काश्मीरमध्ये अशा युवा खेळाडूंचाही शोध सुरू आहे, जे नंतर टीम इंडियाचा/ भारतीय संघाचा भाग बनतील. हा एक प्रकारे खेलो इंडिया चळवळीचा विस्तार आहे. काश्मीरमधील तरुणांमध्ये खेळांविषयी उत्साह वाढतो आहे. आगामी काळात यातील अनेक युवक देशासाठी पदके जिंकतील, तिरंगा फडकवतील. मी तुम्हाला असे सुचवेन की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही काश्मीरच्या सहलीची योजना आखाल तेव्हा या प्रकारचे कार्यक्रम पाहण्यासाठी वेळ काढा. हे अनुभव तुमची सहल अधिक संस्मरणीय बनवतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
प्रजासत्ताक शक्तिशाली करण्यासाठी आमचे प्रयत्न निरंतर/ सतत चालत राहिले पाहिजे. प्रजासत्ताक मजबूत होते 'लोकसहभागाने’ 'सर्वांच्या प्रयत्नांनी ', 'देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याने ', आणि मला आनंद वाटतो आहे की, आपली 'मन की बात' म्हणजे अशा कर्तव्यनिष्ठ लढवय्यांचा बुलंद आवाज असतो. पुढच्या वेळी भेटू या अशाच कर्तव्यदक्ष लोकांच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी कथांसह.
खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शहाण्णव्या भागात संवाद साधत आहोत. ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पुढचा भाग हा 2023 या वर्षातला पहिला भाग असेल. तुम्ही सर्वांनी जे संदेश पाठवले आहेत, त्यात 2022 या सरत्या वर्षाबाबत बोलण्याचा आग्रहसुद्धा केला आहे. भूतकाळाचे अवलोकन आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी सज्ज राहण्याची प्रेरणा देत असते. 2022 या वर्षात देशातील लोकांचे सामर्थ्य, त्यांचे सहकार्य, त्यांचे संकल्प आणि त्यांच्या यशाची व्याप्ती इतकी जास्त होती की ‘मन की बात’ कार्यक्रमात त्या सर्वाचा आढावा घेणे खरोखरच कठीण होईल. 2022 हे वर्ष खरेच अनेक अर्थांनी खूप प्रेरणादायक आणि अद्भुत ठरले. या वर्षी भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि या वर्षी अमृतकाळ सुरू झाला. या वर्षी देशाच्या विकासाला नवा वेग प्राप्त झाला, सर्व देशवासीयांनी एकापेक्षा एक कामे केली. 2022 या वर्षातील चौफेर यशाने आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भारताने जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून प्राप्त केलेला दर्जा म्हणजे वर्ष 2022, भारताने 220 कोटी लसीकरणाचा अविश्वसनीय टप्पा ओलांडण्याचा विक्रम म्हणजे वर्ष 2022, भारताने 400 अब्ज डॉलर निर्यातीचा जादुई टप्पा ओलांडणे म्हणजे वर्ष 2022, देशातील प्रत्येक नागरिकाने ‘आत्मनिर्भर भारत’ हा संकल्प स्वीकारणे म्हणजे वर्ष 2022, आयएनएस विक्रांत या भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे स्वागत म्हणजे वर्ष 2022, अंतराळ, ड्रोन आणि संरक्षण क्षेत्रात भारताचा डंका म्हणजे वर्ष 2022, प्रत्येक क्षेत्रात भारताला मिळालेले यश म्हणजे वर्ष 2022. खेळाच्या मैदानात सुद्धा, मग ती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा महिला हॉकी संघाचा विजय असो, आपल्या तरुणाईने प्रचंड सामर्थ्य दाखवले आहे.
मित्रहो, या सर्व वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एका कारणासाठी 2022 हे वर्ष कायमचे लक्षात राहणार आहे, ते म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेचा विस्तार. देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन केले. मग ती गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग दिसून आले. 2022 या वर्षात देशवासियांनी आणखी एका अमर इतिहासाची नोंद केली आहे, ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा’ मोहिम कोण विसरू शकेल? देशवासियांच्या तना-मनावर रोमांच फुलवणारे ते क्षण होते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित या मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवले. स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव आता पुढच्या वर्षीसुद्धा असाच साजरा होत राहिल –अमृतकाळाची भक्कम पायाभरणी करत राहिल.
मित्रहो, या वर्षी G-20 समूहाच्या अध्यक्षतेची जबाबदारी सुद्धा भारताला मिळाली आहे. मागच्या वेळी मी याबाबत सविस्तर चर्चा सुद्धा केली होती. वर्ष 2023 मध्ये आपल्याला G-20 च्या उत्साहाला नव्या उंचीवर न्यायचे आहे, या आयोजनाला आता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जगभरात नाताळचा सणही थाटामाटात साजरा केला जातो आहे. येशू ख्रिस्ताचे जीवन आणि शिकवण लक्षात ठेवण्याचा हा दिवस आहे. मी तुम्हा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रहो, आपले सर्वांचे श्रद्धास्थान असणारे अटल बिहारी वाजपेयी जी यांचाही आज जन्मदिवस आहे. देशाला असामान्य नेतृत्व देणारे ते महान राजकारणी होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. मला कोलकाताहून आस्थाजींचे पत्र आले आहे. त्यांनी नुकतीच दिल्लीला भेट दिली, त्या भेटीचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. त्यांनी लिहिले आहे की यावेळी त्यांनी पीएम म्युझियमला भेट देण्यासाठी वेळ काढला. या संग्रहालयातील अटलजींचे दालन त्यांना खूप आवडले. तिथे अटलजींसोबत काढलेला फोटो त्यांच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. अटलजींनी देशासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाचे दर्शन आपल्याला त्या दालनात घडते. पायाभूत सुविधा असो, शिक्षण असो किंवा परराष्ट्र धोरण असो, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेण्याचे काम केले. मी पुन्हा एकदा अटलजींना हृदयापासून अभिवादन करतो.
मित्रहो, उद्या 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ आहे आणि त्यानिमित्त मला दिल्लीमध्ये साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांच्या हौतात्म्याला समर्पित एका कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. साहिबजादे आणि माता गुजरी यांचे बलिदान कायम देशाच्या स्मरणात राहिल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
सत्यम किम प्रमाणम, प्रत्यक्षम किम प्रमाणम |
अर्थात सत्याला पुराव्याची आवश्यकता नसते. जे प्रत्यक्ष आहे, त्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नसते, असे आपल्याकडे म्हटले जाते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राचा विचार केला तर पुरावा हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट ठरते. योगाभ्यास आणि आयुर्वेद हे शतकानुशतके आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मात्र पुराव्यावर आधारित संशोधनाचा अभाव, हे आपल्या या शास्त्रांसमोर नेहमीच एक आव्हान राहिले आहे. परिणाम दिसतात पण पुरावा नसतो. मात्र पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्राच्या आजच्या युगात, योगाभ्यास आणि आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या आणि कसोट्यांवर यशस्वी ठरत आहेत, याचा मला मनापासून आनंद होतो आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. संशोधन, नाविन्यता आणि कर्करोग संबंधी देखभालीच्या क्षेत्रात या संस्थेने चांगले नाव कमावले आहे. या केंद्राने केलेल्या सखोल संशोधनातून, स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी योगाभ्यास अत्यंत प्रभावी असल्याचे समोर आले आहे. स्तनाच्या कर्करोगाविषयी अमेरिकेत आयोजित अत्यंत प्रतिष्ठित परिषदेत, टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या संशोधनाचे परिणाम सादर केले आहेत. या परिणामांनी जगातल्यामोठमोठ्या तज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, रुग्णांना योगासनांचा कसा फायदा झाला, हे टाटा मेमोरियल सेंटरने पुराव्यासह सांगितले आहे. या केंद्राच्या संशोधनानुसार, नियमित योगाभ्यासामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना पुन्हा हा आजार होण्याचा आणि मृत्यूचा धोका 15 टक्क्यांनी कमी झाला आहे. अशाप्रकारे भारतीय पारंपारिक उपचार पद्धती, पाश्चात्य पद्धतींच्या कठोर मानकांनुसार पारखली जाण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. त्याचबरोबर स्तनाच्या कर्करोगाने ग्रासलेल्या महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगासने उपयुक्त ठरत असल्याचे सिद्ध करणारा, हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यास आहे. त्याचे दीर्घकालीन लाभही समोर आले आहेत. पॅरिसमध्ये आयोजित युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजी (ऑन्कॉलॉजी) परिषदेत टाटा मेमोरियल सेंटरने आपल्या अभ्यासाचे निकाल सादर केले आहेत.
मित्रहो, आजच्या युगात पुराव्यावर आधारित भारतीय वैद्यकीय पद्धती जितक्या जास्त असतील तितकी संपूर्ण जगात त्यांची स्वीकारार्हता वाढीला लागेल. याच विचारातून दिल्लीतील एम्समध्येही प्रयत्न सुरू आहेत. आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी सहा वर्षांपूर्वी एकात्मिक औषध आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. तिथे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन पद्धतींचा वापर केला जातो. या केंद्रातर्फे आतापर्यंत नामांकित आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 20 शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधामध्ये syncope–सिंकपी या आजाराच्या रुग्णांसाठी योगाभ्यासाच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे न्यूरोलॉजी विषयक नियतकालिकामधील शोधनिबंधामध्ये मायग्रेनच्या त्रासावर उपकारक ठरणाऱ्या योगाभ्यासाच्या फायद्यांबद्दल सांगितले आहे. त्याव्यतिरिक्त हृदयविकार, नैराश्य, निद्रानाश आणि गर्भधारणेदरम्यान महिलांना भेडसावणाऱ्या समस्या अशा इतरही अनेक त्रासांमध्ये उपकारक ठरणाऱ्या योगासनांच्या फायद्यांबाबत अभ्यास केला जातो आहे.
मित्रहो, काही दिवसांपूर्वीच जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी मी गोव्यामध्ये गेलो होतो. 40 पेक्षा जास्त देशांमधले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आणि 550 पेक्षा जास्त वैज्ञानिक शोधनिबंध सादर करण्यात आले. या परिषदेतील प्रदर्शनात भारतासह जगभरातील सुमारे 215 कंपन्यांनी आपापली उत्पादने प्रदर्शित केली. चार दिवस चाललेल्या या एक्स्पोमध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकांनी आयुर्वेदाशी संबंधित अनुभवांचा आस्वाद घेतला. या आयुर्वेद परिषदेत, जगभरातून जमलेल्या आयुर्वेद तज्ञांसमोरसुद्धा मी, पुराव्यावर आधारित संशोधनाच्या विनंतीचा पुनरुच्चार केला. कोरोना या जागतिक साथरोगाच्या काळात आपण सगळेच योगाभ्यास आणि आयुर्वेदाचे सामर्थ्य अनुभवतो आहोत, त्यामुळेत्यासंबंधी पुराव्यावर आधारित संशोधन खूप महत्त्वाचे ठरेल. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे योगाभ्यास, आयुर्वेद आणि आपल्या पारंपारिक वैद्यकीय पद्धतींशी संबंधित अशा प्रयत्नांबद्दल काही माहिती असेल, तर ती सोशल मीडियावर अवश्य शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांत आपण आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या आव्हानांवर मात केली आहे. याचे सगळे श्रेय आपले वैद्यकीय तज्ञ, शास्त्रज्ञ आणि देशवासीयांच्या इच्छाशक्तीला जाते. आपण भारतातून स्मॉलपॉक्स, पोलिओ आणि 'गिनी वर्म' या आजारांचे समूळ उच्चाटन करून दाखवले आहे.
आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या श्रोत्यांना मी आणखी एका आव्हानाबद्दल सांगू इच्छितो, जे आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.हे आव्हान, हा रोग आहे - 'कालाजार म्हणजेच काळा ताप'. सँड फ्लायहा समुद्रकिनारी आढळणारा एक किटक चावल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. एखाद्याला काळा ताप हा आजार झाला की महिनोन महिने ताप येतो, रक्ताची कमतरता भासू लागते, शरीर अशक्त होते आणि वजनही घटते. हा आजार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. मात्र सर्वांच्या प्रयत्नांमुळे काळा ताप नावाचा हा आजार आता झपाट्याने नष्ट होतो आहे. अलीकडेच 4 राज्यांमधल्या 50 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये काळ्या तापाची साथ आली होती, मात्र आता या काळ्या तापाचा प्रादुर्भाव बिहार आणि झारखंडमधल्या 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे. बिहार-झारखंडमधल्या लोकांचे सामर्थ्य आणि त्यांची जागरुकता या चार जिल्ह्यांमधूनही हा काळा ताप हद्दपार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत करेल, असा विश्वास मला वाटतो. काळ्या तापाचे रूग्ण असलेल्या भागातील जनतेने दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, असे मला सांगावेसे वाटते. एक म्हणजे - सँड फ्लाय किंवा वाळूवर आढळणाऱ्या माशांवर नियंत्रण आणि दुसरे म्हणजे या आजाराची लागण झाल्याचे लवकरात लवकर ओळखणे आणि त्यावर पूर्ण उपचार. काळ्या तापावरचे उपचार सोपे आहेत आणि उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधेही खूप प्रभावी आहेत. तुम्हाला फक्त सतर्क राहायचे आहे.ताप आला तर हलगर्जीपणा करू नका आणि सँड फ्लायला मारणाऱ्या औषधांची फवारणी करत रहा. जरा विचार करा, आपला देश या काळ्या तापापासून जेव्हा मुक्त होईल, तेव्हा आपल्या सर्वांसाठीच ती आनंदाची बाब असेल. ‘सबका प्रयास’ च्या या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंतभारताला टी.बी. मुक्त करण्यासाठी काम करत आहोत. तुम्ही पाहिले असेल, मागच्या काही दिवसांत जेव्हा टी.बी. मुक्त भारत मोहीम सुरू झाली, तेव्हा हजारो लोक, टी.बी. रुग्णांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. हे लोक ‘निक्षय’ मित्र होऊन टी.बी. रुग्णांची काळजी घेत आहेत, त्यांची आर्थिक मदत करत आहेत. लोकसेवेची आणि लोकसहभागाची हीच ताकद प्रत्येक अवघड उद्दिष्टसाध्य करून दाखवते आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपली परंपरा आणि संस्कृती यांचे गंगेशी अतूट नाते आहे. गंगा जल हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि आपल्या शास्त्रांमध्ये देखील म्हटलेच आहे:-
नमामि गंगे तव पाद पंकजं,
सुर असुरै: वन्दित दिव्य रूपम् |
भुक्तिम् च मुक्तिम् च ददासि नित्यम्,
भाव अनुसारेण सदा नराणाम् ||
अर्थात हे माता गंगा! तू तुझ्या भक्तांना त्यांच्या इच्छेनुसार ऐहिक सुख, आनंद आणि मोक्ष प्रदान करतेस. सर्व तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतात. मी देखील तुझ्या पवित्र चरणांवर नतमस्तक होतो. अशावेळी, शतकांपासून वाहणाऱ्या गंगा मातेला स्वच्छ ठेवणे हि आपली खूप मोठी जबाबदारी आहे. याच उद्देशाने आठ वर्षांपूर्वी आम्ही ‘नमामि गंगे अभियान’ सुरू केले. भारताच्या या उपक्रमाचे आज जगभरातून कौतुक होत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. संयुक्त राष्ट्राने 'नमामि गंगे' अभियानाचा समावेश हा पर्यावरण पुनर्संचयित करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे. जगभरातील अशा 160 उपक्रमांमध्ये 'नमामि गंगे'ला हा सन्मान मिळाला आहे, ही अजून एक आनंदाची बाब आहे.
मित्रांनो, लोकांचा निरंतर सहभाग ही ‘नमामि गंगे’ अभियानाची सर्वात मोठी उर्जा आहे. ‘नमामि गंगे’ अभियानात गंगा प्रहरी आणि गंगा दूत यांची भूमिका देखील महत्वाची आहे. वृक्षारोपण, घाटांची स्वच्छता, गंगा आरती, पथनाट्य, चित्रकला आणि कविता यांच्या माध्यमातून ते जनजागृतीचे काम करत आहेत. या अभियानामुळे जैवविविधतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा दिसून येत आहे. हिल्सा मासे, गंगेच्या पत्रातील डॉल्फिन आणि कासवांच्या विविध प्रजातींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गंगा स्वच्छ झाल्याने उपजीविकेच्या इतर संधीही वाढत आहेत. येथे मी जैवविविधता लक्षात घेऊन तयार केलेल्या 'जलचर आजीविका मॉडेल' ची चर्चा करू इच्छितो. ही पर्यटन आधारित बोट सफारी 26 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. साहजिकच 'नमामि गंगे' अभियानाचा विस्तार, त्याची व्याप्ती ही नदीच्या स्वच्छतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हे अभियान म्हणजे एकीकडे आपल्या इच्छाशक्तीचा आणि अथक प्रयत्नांचा प्रत्यक्ष पुरावा आहे, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने जगाला एक नवा मार्गही दाखवणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला संकल्प जर दृढ असेल तर मोठ्यातील मोठे आव्हान देखील सोपे होते. सिक्कीमच्या थेगू गावातील ‘संगे शेरपा’ यांनी याचे उत्तम उदाहरण प्रस्थापित केले आहे. मागील 14 वर्षांपासून ते 12,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर पर्यावरण संरक्षणाच्या कामात व्यस्त आहेत. संगे जी यांनी सांस्कृतिक आणि पौराणिक महत्त्व असलेले सोमगो सरोवर स्वच्छ ठेवण्याचा विडा उचलला आहे. आपल्या अथक परिश्रमाने त्यांनी या ग्लेशियर (हिम) सरोवराचे रूप पालटले आहे. 2008 मध्ये जेव्हा संगे शेरपा यांनी ही स्वच्छता मोहीम सुरू केली तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.मात्र अगदी कमी कालावधीतच त्यांच्या या उदात्त कार्यात युवक व ग्रामस्थांसह पंचायतीने देखील त्यांना सहकार्य करायला सुरुवात केली. आज तुम्ही सोमगो सरोवर बघायला गेलात तर आजूबाजूला मोठमोठे कचऱ्याचे डबे दिसतील. आता येथे जमा होणारा कचरा पुनर्वापरासाठी पाठवला जातो. येथे येणाऱ्या पर्यटकांना कापडापासून तयार केलेल्या कचऱ्याच्या पिशव्या देखील दिल्या जातात जेणेकरून त्यांनी इकडे-तिकडे कचरा फेकू नये. स्वच्छ झालेले हे सरोवर पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक येथे भेट देतात. सोमगो सरोवराच्या संवर्धनाच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नासाठी संगे शेरपा यांना अनेक संस्थांकडून सन्मानितही करण्यात आले आहे. अशा प्रयत्नांमुळेच आज सिक्कीमची गणना भारतातील स्वच्छ राज्यांमध्ये होते. संगे शेरपाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबतच, पर्यावरण संरक्षणाच्या उदात्त प्रयत्नात व्यस्त असलेल्या देशभरातील लोकांचेही मी मनापासून कौतुक करतो.
मित्रांनो, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘स्वच्छ भारत अभियान’ आहे याचा मला आनंद आहे. 2014 मध्ये हे जन आंदोलन सुरु झाल्यापासून या अभियानाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांनी अनेक आगळेवेगळे प्रयत्न केले आहेत आणि हे प्रयत्न केवळ समाजामध्येच नाही तर सरकारी पातळीवर देखील दिसून येत आहेत. कचरा काढल्याने, अनावश्यक वस्तू टाकून दिल्यामुळे कार्यालयांमध्ये बरीच जागा मोकळी होते, नवीन जागा उपलब्ध होते. पूर्वी जागेअभावी लांब कार्यालये भाड्याने घ्यावी लागत होती. आजकाल या स्वच्छतेमुळे एवढी जागा उपलब्ध होत आहे की, आता सर्व कार्यालये एकाच आली आहेत हे या सततच्या प्रयत्नांचे फलित आहे. मागील काही दिवसांमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मुंबई, अहमदाबाद, कोलकाता, शिलॉंग अशा अनेक शहरांमधील आपल्या कार्यालयांमध्ये खूप प्रयत्न केले आणि त्यामुळेच आज त्यांच्याकडे नवीन कामासाठी दोन, तीन मजले उपलब्ध झाले आहेत. या स्वच्छतेमुळेच, आम्हाला आमच्या स्रोतांच्या अधिकाधिक वापराचा उत्तम अनुभव मिळत आहे. हे अभियान देशासाठी, समाजासाठी, खेड्यापाड्यात, शहरांमध्ये आणि कार्यालयातही सर्वत्र उपयुक्त ठरत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या कला-संस्कृतीबद्दल आपल्या देशामध्ये एक नवीन जागरुकता, एक नव चेतना जागृत होत आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण अनेकदा अशा उदाहरणांची चर्चा देखील करतो. ज्याप्रमाणे कला, साहित्य आणि संस्कृती ही समाजाची सामूहिक पुंजी असते त्याचप्रमाणे त्यांचा विकास करणे ही देखील संपूर्ण समाजाची जबाबदारी असते. असाच एक यशस्वी प्रयत्न लक्षद्वीपमध्ये होत आहे. येथे कल्पेनी बेटावर एक क्लब आहे - कुमेल ब्रदर्स चॅलेंजर्स क्लब. हा क्लब तरुणांना स्थानिक संस्कृती आणि पारंपारिक कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देतो. येथे युवकांना कोलकली, परीचाकली, किलिप्पाट्ट आणि पारंपारिक गाण्यांचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजेच जुना वारसा नवीन पिढीच्या हातात सुरक्षित होत आहे, तो पुढे जात आहे आणि मित्रांनो, असे प्रयत्न देशातच नव्हे तर परदेशातही होत आहेत, याचा मला आनंद आहे. नुकतेच दुबईतील कलारी क्लबने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.दुबईच्या क्लबने विक्रम केला, मग त्याचा भारताशी काय संबंध? असा विचार कोणीही करेल. वास्तविक, हा विक्रम भारतातील प्राचीन मार्शल आर्ट कलारीपयट्टूशी संबंधित आहे. हा विक्रम म्हणजे एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांनी कलारीचे सादरीकरण करण्याच्या कामगिरीचा आहे.कलारी क्लब दुबईने दुबई पोलिसांसोबत याची योजना आखली आणि यूएईच्या राष्ट्रीय दिनी याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात 4 वर्षांच्या मुलांपासून ते 60 वर्षांच्या वृद्धांनी आपल्या क्षमतेनुसार कलारीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विविध पिढ्या एक प्राचीन परंपरा उत्साहाने कशी पुढे नेत आहेत, याचे हे एक अद्भुत उदाहरण आहे.
मित्रांनो, मी 'मन की बात' च्या श्रोत्यांना कर्नाटकातील गडक जिल्ह्यात राहणार्या ‘क्वेमाश्री'जीबद्दल देखील सांगू इच्छितो. दक्षिणेत कर्नाटकातील कला-संस्कृती पुनरुज्जीवीत करण्याच्या कार्यात 'क्वेमश्री' गेली 25 वर्षे सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची तपश्चर्या किती महान आहे याची तुम्ही कल्पना करू शकता. यापूर्वी ते हॉटेल मॅनेजमेंट या व्यवसायाशी संबंधित होते. पण, त्यांची संस्कृती आणि परंपरेसाठी असलेली ओढ इतकी खोल होती की त्यांनी यालाच आपले ध्येय बनवले. त्यांनी 'कला चेतना' नावाने व्यासपीठ सुरु केले. हे व्यासपीठ आज कर्नाटकातील आणि देश-विदेशातील कलाकारांचे अनेक कार्यक्रम आयोजित करते. यामध्ये स्थानिक कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण कामेही केली जातात.
मित्रांनो, देशवासीयांचा त्यांच्या कला आणि संस्कृतीबद्दलच्या या उत्साहातून आपल्या वारशाप्रती असलेली अभिमानाची भावना दिसून येते. आपल्या देशातील कानाकोपऱ्यात असे अनेक रंग विखुरलेले आहेत. त्यांना सजवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी आपल्याला देखील निरंतर काम केले पाहिजे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशातील अनेक भागात बांबूपासून अनेक सुंदर आणि उपयुक्त वस्तू बनवल्या जातात. विशेषत: आदिवासी भागात कुशल बांबूपासून वस्तू तयार करणारे कुशल कामगार, कुशल कलाकार आहेत. देशात बांबूशी संबंधित ब्रिटीशकालीन कायदे बदलल्यापासून त्याची मोठी बाजारपेठ विकसित झाली आहे. महाराष्ट्रातील पालघरसारख्या भागातही आदिवासी, बांबूपासून अनेक सुंदर वस्तू बनवतात. बांबूपासून तयार केलेले बॉक्स, खुर्च्या, चहाची भांडी, टोपल्या, ट्रे यांसारख्या गोष्टी खूप लोकप्रिय होत आहेत. एवढेच नाही तर हे लोक बांबू गवतापासून सुंदर कपडे आणि सजावटीचे सामान देखील तयार करतात. त्यामुळे आदिवासी महिलांना रोजगारही मिळत आहे आणि त्यांच्या कौशल्याला ओळख देखील प्राप्त होत आहे.
मित्रांनो, कर्नाटकातील एक जोडपे सुपारीच्या तंतुंपासून बनवलेली अनेक अनोखी उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत. कर्नाटकातील शिवमोगा येथील हे जोडपे आहे – श्री सुरेश आणि त्यांची पत्नी श्रीमती मैथिली. हे लोक सुपारीच्या तंतूपासून ट्रे, प्लेट्स आणि हँडबॅग्स सारख्या अनेक सजावटीच्या वस्तू बनवत आहेत. या तंतुंपासून बनवलेल्या चपलांनाही आज खूप पसंती मिळत आहे. आज त्यांची उत्पादने लंडन आणि युरोपातील इतर बाजारपेठांमध्ये विकली जात आहेत. हीच तर आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची आणि पारंपारिक कौशल्यांचे वैशिष्ट्य आहे, जे सर्वांनाच आवडत आहे. भारताच्या या पारंपारिक ज्ञानात जग शाश्वत भविष्याचा मार्ग पाहत आहे. आपल्याला देखील अधिकाधिक जागरुक होण्याची आवश्यकता आहे. आपण स्वतःही अशी देशी आणि स्थानिक उत्पादने वापरावीत आणि इतरांनाही भेट द्यावीत. यामुळे आपली एक ठळक ओळख निर्माण होईल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे भविष्य देखील उज्वल होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता आपण 'मन की बात' च्या अभूतपूर्व 100 व्या भागाच्या दिशेने हळूहळू वाटचाल करत आहोत. मला अनेक देशवासीयांची पत्रे मिळाली आहेत, ज्यात त्यांनी 100 व्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे. 100 व्या भागामध्ये आपण काय बोलले पाहिजे, त्याला कशाप्रकारे विशेष बनवायचे याबद्दल तुम्ही मला तुमच्या सूचना पाठवल्या तर त्या मला आवडतील. पुढच्या वेळी आपण 2023 मध्ये भेटू. 2023 सालासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. हे वर्षही देशासाठी खास जावो, देश नवनवीन उंची गाठत राहो, आपण सर्वांनी मिळून संकल्प करायचा आहे आणि प्रत्यक्षात त्याचे पालन देखील करायचे आहे. यावेळी अनेकजण सुट्टीच्या मूडमध्ये देखील आहेत. तुम्ही या सणांचा खूप आनंद घ्या, पण थोडं सावध देखील राहा. तुम्ही पाहत असाल कि, जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे मास्क आणि हात धुणे यासारख्या उपायांचे अधिकाधीक पालन करा. आपण सावध राहिलो तर आपण सुरक्षितही राहू आणि आपल्या आनंदात कोणताही अडथळा येणार नाही. याबरोबर, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.
मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरवात मी, एकाअनोख्या भेटवस्तूच्या चर्चेने करणार आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिर्सिल्ला जिल्ह्यात एक विणकर बंधू आहे - येल्धी हरिप्रसाद गारू. त्यांनी स्वतःच्या हाताने विणलेला हा जी-२०चा लोगो मला पाठवला आहे. ही अप्रतिम भेट पाहून मला आश्चर्य वाटलं. हरिप्रसादजींचे त्यांच्या कलेवर इतके प्रभुत्व आहे की, ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हरिप्रसादजी यांनी स्वतः विणलेल्या या जी-20 च्या लोगो सोबत मला एक चिठ्ठी देखील पाठवली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या जी-20 परिषदेचे आयोजन भारताने करणे हि भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले आहे. देशाच्या या यशस्वी कामगिरीच्या आनंदा प्रीत्यर्थ त्यांनी जी-20 चा हा लोगो स्वतःच्या हाताने तयार केला आहे. विणकामाच्या या महान प्रतिभेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे आणि आज ते तन्मयतेने आपले काम करत आहेत.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मला जी-20 चा लोगो आणि भारताच्या प्रेसिडेन्सीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला होता. या लोगोची निवड जाहीर स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली होती. हरिप्रसाद गारू यांनी पाठवलेली ही भेट जेव्हा मला मिळाली तेव्हा मनात आणखी एक विचार आला. तेलंगणाच्या एका जिल्ह्यातील व्यक्ती जी-20 सारख्या शिखर परिषदेशी जोडली जात आहे हे पाहून मला खूप आनंद झाला. आज हरिप्रसाद गारू यांच्यासारख्या अनेकांनी मला पत्र पाठवून कळविले आहे की, एवढ्या मोठ्या शिखर परिषदेचे यजमानपद आपला देश भूषवणार असल्यामुळे आमचे उर अभिमानाने भरून आले आहे. पुण्याचे रहिवासी सुब्बा राव चिल्लाराजी आणि कोलकात्याचे तुषार जगमोहन यांच्या पत्राचा देखील मी इथे नक्की उल्लेख करेन. जी-20 संदर्भातील भारताच्या सक्रिय प्रयत्नांचे त्यांनी खूप कौतुक केले आहे.
मित्रांनो, जी-20 ची जागतिक लोकसंख्येमध्ये दोन तृतीयांश, जागतिक व्यापारात तीन चतुर्थांश आणि जागतिक जीडीपीमध्ये 85% भागीदारी आहे. तुम्ही कल्पना करू शकता –भारत आजपासून बरोबर 3 दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबरला इतक्या मोठ्या समूहाचे, इतक्या शक्तिशाली समूहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी ही किती मोठी संधी चालून आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला ही जबाबदारी मिळाल्याने ही बाब अधिकच खास झाली आहे.
मित्रांनो, जी-20 चे अध्यक्षपद आमच्यासाठी एक मोठी संधी आहे. आपल्याला या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे. शांतता असो वा ऐक्य, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा मग शाश्वत विकास असो, भारताकडे या सर्वांशी निगडीत आव्हानांवर उपाय आहेत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) या विषयातून वसुधैव कुटुम्बकमप्रती आपली बांधिलकी दिसून येते, आपण नेहमी म्हणतो -
ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेषां शान्तिर्भवतु ।
सर्वेषां पुर्णंभवतु ।
सर्वेषां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
म्हणजे प्रत्येकाचे कल्याण होवो, प्रत्येकाला शांती मिळो, प्रत्येकाला पूर्णत्व प्राप्त होवो आणि सर्वांचे कल्याण होऊ दे. आगामी काळात देशाच्या विविध भागांमध्ये जी-20 शी संबंधित अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या काळात जगाच्या विविध भागांमधील लोकांना तुमच्या राज्यात येण्याची संधी मिळणार आहे. यावेळी तुम्ही आपल्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट रंग जगासमोर आणाल याची मला खात्री आहे आणि तुम्ही हि गोष्ट देखील विसरू नका की जी-20 मध्ये येणारे लोक, हे आता जरी प्रतिनिधी म्हणून आले असले, तरी तेही भविष्यातील पर्यटकच आहेत. माझी तुम्हा सर्वांना आणखी एक विनंती आहे, विशेषत: माझ्या तरुण सहका-यांना, तुम्ही देखील हरिप्रसाद गारू यांच्यासारखे कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा. कपड्यावर जी-20 चा भारतीय लोगो खूप मस्त पद्धतीने, स्टायलिश पद्धतीने छापता येईल. मी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना आवाहन करतो की, त्यांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद , स्पर्धा आयोजित कराव्यात. G20.in या संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या आवडीनुसार तिथे अनेक गोष्टी सापडतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने, भारताच्या खाजगी क्षेत्राने डिझाइन आणि निर्मित केलेले पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. 'विक्रम-एस' असे या रॉकेटचे नाव आहे. स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून, ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाचे शिर अभिमानाने उंचावले.
मित्रांनो, 'विक्रम-एस' रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनाने हलके आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्यातुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणे, ही आता, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटच्या निर्मितीमध्ये आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 'विक्रम-एस'च्या लाँच मिशन ला दिलेले 'प्रारंभ’ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. देशातील आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. आपण कल्पना करू शकता की जी मुले कधीकाळी कागदाचे विमान बनवून उडवायची त्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी मिळत आहे. आपण कल्पना करू शकता की एकेकाळी चंद्र आणि ताऱ्यांकडे पाहून आकाशात आकार तयार करणाऱ्या मुलांना आता भारतातच क्षेपणास्त्र बनविण्याची संधी मिळत आहे. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नंही प्रत्यक्षात उतरत आहेत. रॉकेटची निर्मिती करणारे हे तरुण जणू काही म्हणतायत - Sky is not the limit.
मित्रांनो, अंतराळ क्षेत्रातील आपले हे यश भारत आपल्या शेजारील देशांसोबत देखील सामायिक करीत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हा उपग्रह खूप उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवेल ज्यामुळे भूतानला त्याच्या नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिबिंब आहे.
मित्रांनो, 'मन की बात'च्या मागील काही भागांमध्ये आपण अवकाश, तंत्रज्ञान, नवनिर्मिती या विषयांवर खूप बोललो आहोत, हे तुमच्या लक्षात आले असेलच. याची दोन खास कारणे आहेत, एक म्हणजे आपली तरुणाई या क्षेत्रात उत्तम काम करत आहे. ते आता मोठा विचार करीत आहेत आणि मोठे यश संपादन करत आहेत. आता छोट्या छोट्या यशाने त्यांचे समाधान होणार नाही. दुसरं म्हणजे नाविन्य आणि मूल्यनिर्मितीच्या या रोमांचक प्रवासात ते त्यांच्या इतर तरुण सहकाऱ्यांना आणि स्टार्ट अप्सनाही प्रोत्साहन देत आहेत.
मित्रांनो, जेव्हा आपण तंत्रज्ञानाशी संबंधित नवनिर्मिती संदर्भात बोलत असतो, तेव्हा आपण ड्रोनला कसे विसरू शकतो? ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये कशाप्रकारे ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदांची वाहतूक केली हे आपण पाहिले. किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील दुर्गम जिल्हा असून या हंगामात येथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. अशा बर्फवृष्टीत किन्नौरचा उर्वरित राज्याशी कित्येक आठवडे संपर्क होणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत तेथून सफरचंदांची वाहतूक करणेही तितकेच कठीण आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे हिमाचलची चविष्ट किन्नौरी सफरचंदं लोकांपर्यंत लवकर पोहोचतील. यामुळे आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा खर्च कमी होईल - सफरचंद वेळेवर बाजारात पोहचेल, सफरचंदाची नासाडी कमी होईल.
मित्रांनो, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत आहेत. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही? अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. मला विश्वास आहे की, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही.
प्रिय देशवासियांनो, मी तुमच्यासाठी एक छोटेसे गाणे वाजवत आहे.
##(Song)##
तुम्ही सगळ्यांनीच हे गाणं कधीतरी नक्कीच ऐकलं असेल. हे बापूंचं आवडतं गाणं आहे, परंतु मी जर तुम्हाला सांगितले की या गाण्याचा गायक ग्रीक आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल! आणि ही गोष्ट तुमच्यासाठी अभिमानास्पद देखील असेल. हे गाणं गाणारा ग्रीसचा गायक आहे- 'कॉन्स्टँटिनोस कलाइत्झीस'. गांधीजींच्या 150 व्या जयंती उत्सवाच्या वेळी त्यांनी हे गाणे गायले होते. पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी याची चर्चा इथे करत आहे. त्यांना भारत आणि भारतीय संगीताची प्रचंड आवड आहे. त्यांना भारताची इतकी ओढ आहे की, गेल्या 42 (बेचाळीस) वर्षांत ते जवळजवळ दरवर्षी भारतात आले आहेत. भारतीय संगीताचे मूळ, विविध भारतीय संगीत, विविध प्रकारचे राग, ताल आणि रस तसेच विविध घराण्यांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींच्या योगदानाचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे, भारतातील शास्त्रीय नृत्यांचे विविध पैलू देखील त्यांनी बारकाईने समजून घेतले आहेत. भारताशी संबंधित या सर्व अनुभवांना त्यांनी आता एका पुस्तकात अतिशय सुंदरपणे गुंफले आहे. इंडियन म्युझिक नावाच्या त्यांच्या पुस्तकात सुमारे 760 छायाचित्रे आहेत. यातील बहुतांश छायचित्रे त्यांनी स्वत: काढलेली आहेत. इतर देशांमध्ये असलेला भारतीय संस्कृतीविषयीचा असा उत्साह आणि आकर्षण खरोखरच उल्हासित करणारा आहे.
मित्रांनो, काही आठवडे अगोदर एक बातमी आली होती ज्यामुळे आमची मान गर्वाने ताठ होणार आहे. आपल्याला हे जाणून खूप छान वाटेल की, गेल्या ८ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात तीन पटींनी वाढली आहे. विद्युत आधारे सगीत वाद्यांपुरते बोलायचं तर त्यांची निर्यात ६० पटींनी वाढली आहे. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत यांचे वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येईल. भारतीय संगीत वाद्यांचे सर्वात मोठे खरेदीदार अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंग्डम यासारखे विकसित देश आहेत. आमच्या देशाला संगीत, नृत्य आणि कलेची अत्यंत समृद्ध असा वारसा आहे, ही आमच्या सर्वांसाठीच सद्भाग्याची बाब आहे.
मित्रांनो, महान मनीषी कवी भर्तृहारी यांना त्यांनी रचलेल्या नीतीशतक या काव्यासाठी आम्ही सर्व ओळखतो. एका श्लोकात ते म्हणतात की, कला, संगीत आणि साहित्याप्रति असलेली आमची आवड ही मानवतेची खरी ओळख आहे. वास्तवात, आमची संस्कृती याला मानवतेच्याही वर अध्यात्मिकतेकडे घेऊन जाते. वेदांमध्ये सामवेदाला तर आमच्या विविध प्रकारच्या संगीतांचा स्त्रोत म्हणून म्हटलं आहे. माता सरस्वतीच्या हातातीतल वीणा असो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी असो, किंवा भोलनाथ यांच्या हातातील डमरू असो, आमच्या देवीदेवताही संगीतापासून अलग राहिलेल्या नाहीत. आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीत संगीताचा शोध घेत असतो. मग तो नदीच्या वाहत्या पाण्याचा झुळुझुळू वाहणारा नाद असो, पावसाच्या थेंबांचा स्वर असो, पक्ष्यांचा गुंजारव असो की हवेचा घुमणारा आवाज असो, आमच्या संस्कृतीमध्ये संगीत सर्वत्र भरून राहिलं आहे. हे संगीत केवळ शरिराला सुखद जाणीव देत नाही तर मनालाही उल्हसित करते. संगीत आमच्या समाजाला जोडतही असतं. जर भांगडा आणि लावणीमध्ये आनंदाची भावना आहे, तर रवींद्र संगीत आमच्या आत्म्याला आल्हाद देतं. देशभरातील आदिवासींची वेगवेगळ्या प्रकारांची संगीत परंपरा आहे. ती आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून रहाण्यासाठी आणि निसर्गासह रहाण्याची प्रेरणा देंत असते.
मित्रांनो, संगीताच्या वेगवेगळ्य़ा शैलीनं केवळ आमच्या संस्कृतीला समृद्ध केलं आहे असं नाही तर जगभरातील संगीतावर आपला कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे. भारतीय संगीताची ख्याती जगभरातील कानाकोपर्यात पसरली आहे. मी एका गीताची एक ध्वनिमुद्रिका आपल्याला ऐकवतो.
गीत...
आपण विचार करत असाल की, घराच्या जवळच कुठल्या तरी मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे. परंतु हा स्वर भारतापासून दूर हजारो मैल वसलेल्या दक्षिण अमेरिकेतील गयाना इथला आहे. १९ आणि २० व्या शतकात खूप मोठ्या संख्येनं आमचे लोक इथनं गयानात गेले होते. ते इथून भारताच्या अनेक परंपरा आपल्याबरोबर घेऊन गेले होते. उदाहरण पहायचं तर, जसे आम्ही भारतात होळी साजरी करतो, गयानामध्येही होळीचे रंग अत्यंत जोशात खेळले जातात. जिथं होळीचे रंग असतात, तेथे फगवा म्हणजे होळीचे संगीतही गायिलं जातं. गयानामध्ये फगवामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्या विवाहाशी संबंधित गीतं गाण्याची एक विशेष परंपरा आहे. या गीतांना चौताल असं म्हटलं जातं. या गीतांना त्याच प्रकारची चाल आणि वरच्या पट्टीत गायिलं जातं, जसं की आमच्या इथं गायलं जातं. इतकंच नव्हे तर, गयानात चौताल स्पर्धाही होत असते. याच प्रकारे, खूप सारे भारतीय विशेषतः उत्तरप्रदेश आणि बिहारमधनं लोक फिजीलाही गेले होते. ते पारंपरिक भजन कीर्तनं गात असत, ज्यात मुख्यतः रामचरित मानसमधील दोहे असत. त्यांनी फिजीमध्येसुद्धा भजन कीर्तनाशी जोडलेली अनेक मंडळं स्थापन केली. फिजीमध्ये रामायण मंडळं या नावाची आजसुद्धा दोन हजाराहून अधिक भजन कीर्तन मंडळं आहेत. ते आज प्रत्येक गाव आणि गल्लीत पहाता येतात. मी तर इथं केवळ काहीच उदाहरणं दिली आहेत. आपण पूर्ण जगभर पहाल तर भारतीय संगीताची आवड असलेल्या लोकांची यादी खूपच मोठी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमचा देश जगातील सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आम्ही खूप अभिमान बाळगतो. म्हणून, आम्ही आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं. ही आमची जबाबदारीसुद्धा आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न आमचे ईशान्येतील नागालँड राज्यामधील काही मित्र करत आहेत. मला हा प्रयत्न चांगला वाटला, म्हणून मी असा विचार केला की तो मन की बातच्या श्रोत्यांशी सामायिक करू.
मित्रांनो, नागालँडमध्ये नागा समाजाची जीवनशैली, त्यांची कला संस्कृती आणि संगीत, प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतं. हा आमच्या गौरवशाली वारशाचा महत्वपूर्ण भाग आहे. नागालँडच्या लोकांचं जीवन आणि त्यांचं कौशल्य शाश्वत जीवनशैलीसाठीही खूप महत्वपूर्ण आहे. या परंपरा आणि कौशल्य सांभाळून ठेवून पुढ्ल्या पिढीसाठी पोहचवण्यासाठी तिथल्या लोकांनी एक संस्था स्थापन केली आहे, जिचं नाव आहे लिडि-क्रो-यू. नागा संस्कृतीचे अत्यंत सुंदर आयाम हळूहळू विस्मृतीत चालले होते, लिडि-क्रो-यू संस्थेनं पुन्हा त्यांना पुनरूज्जीवित करण्याचं काम केलं आहे. उदाहरणार्थ, नागा लोकसंगीत स्वतःच एक समृद्ध शैली आहे. या संस्थेंनं नागा संगीताचे अल्बम आणण्याचं काम सुरू केलं आहे. आतापर्यंत असे तीन अल्बम बाजारात आणले गेले आहेत. हे लोक लोकसंगीत, लोकनृत्याशी संबंधित कार्यशाळाही आयोजित करत असतात. युवकांना या सर्व बाबींसाठी प्रशिक्षण दिलं जात असतं. इतकंच नाही तर, नागालँडच्या पारंपरिक शैलीमध्ये कपडे शिवणं, शिलाई आणि विणण्याचं जे काम आहे, त्याचंही प्रशिक्षण तेथील युवकांना दिलं जातं. ईशान्येत बांबूची कितीतरी उत्पादनं बनवली जातात. नव्या पिढीच्या युवकांना बांबू उत्पादनं बनवण्यासही शिकवलं जातं. यामुळे हे युवक आपल्या संस्कृतीशी जोडले जातातच, पण त्याचबरोबर त्यांच्या रोजगारासाठी नवीन संधीही तयार होतात. नागा लोकसंस्कृतीच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी, म्हणून लिडि-क्रो-यू ही संस्था प्रयत्न करत असते.
मित्रांनो, आपल्या प्रदेशातही अशा अनेक सांस्कृतिक वैशिष्ट्यं आणि परंपरा असतील. आपणही आपापल्या प्रदेशात अशा प्रकारचे प्रयत्न करू शकता. आपल्या माहितीत असा एखादा आगळावेगळा प्रयत्न होत असेल तर, आपण त्याची माहिती मला त्याची जरूर द्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या इथं असं म्हटलं गेलं आहे की,
विद्याधनं सर्वधनप्रधानम्
म्हणजे, कुणी विद्येचं दान करत असेल तर तो समाजाच्या हिताचं सर्वात मोठं काम करत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लावलेला एक लहानसा दिवाही पूर्ण समाजाला उजळून टाकू शकतो. आज देशभरात असे कितीतरी प्रयत्न केले जात आहेत, याचा मला मोठा आनंद होतो. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौपसून ७०-८० किलोमीटर अंतरावर हरदोईजवळ बानसा गाव वसलं आहे. मला या गावातील जतिन ललितसिंह यांच्याबाबत माहिती मिळाली आहे. जे शिक्षणाचं महत्व प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. जतिन जींनी दोन वर्षांपूर्वी इथं समुदायासाठी वाचनालय आणि साधनसंपत्ती केंद्र सुरू केलं होतं. त्यांच्या या केंद्रामध्ये हिंदी आणि इंग्रजी साहित्य, संगणक. कायदा आणि सरकारी परीक्षांच्या तयारीशी संबंधित तीन हजारहून अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. या वाचनालयात मुलांच्या आवडीची पूर्णपणे जाणीव ठेवली गेली आहे. इथं उपलब्ध कॉमिक्सची पुस्तकं असतील किंवा शैक्षणिक खेळणी असतील, मुलांना त्यांची खूप आवड निर्माण झाली आहे. लहान मुलं खेळता खेळताच इथं नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी येतात. शिक्षण ऑनलाईन असो की ऑफलाईन, जवळपास ४० स्वयंसेवक या केंद्रात विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी जुंपून घेतात. दररोज गावातील जवळपास ८० विद्यार्थी या वाचनालयात वाचण्यासाठी येतात.
मित्रांनो, झारखंडचे संजय कश्यप हेही गरीब मुलांच्या स्वप्नांना नवीन पंख लावण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनात संजय जी यांनी चांगल्या पुस्तकांच्या उणीवेचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांनी मनाशी असा निश्चय केला की, पुस्तकांची कमतरता असल्याने ते आपल्या प्रदेशातील मुलांचं भवितव्य अंधकारमय होऊ देणार नाही. आपल्या या मोहीमेच्या मुळे, ते आज झारखंडच्या अनेक जिल्हयांमध्ये मुलांसाठी लायब्ररी मॅन झाले आहेत. संजयजींनी जेव्हा आपल्या नोकरीस सुरूवात केली, तेव्हा पहिले पुस्तकालय त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जागेत सुरू केलं होतं. नोकरी करत असताना, त्यांची जिथं बदली होत असे, तिथं ते गरीब आणि आदिवासी मुलांसाठी वाचनालय उघडण्याच्या प्रयत्नांना लागत असत. असं करत करत त्यांनी झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी वाचनालयं सुरू केली आहेत. वाचनालय सुरू करण्याची त्यांच्या मोहीमेनं आज एका सामाजिक आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे. संजय जी असोत किंवा जतिनजी, त्यांच्या अनेक प्रयत्नांसाठी मी त्यांची विशेष प्रशंसा करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वैद्यकीय शास्त्राच्या जगानं संशोधन आणि नावीन्यपूर्णेतेच्या बरोबरीनंच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या सहाय्यानं खूपच प्रगती केली आहे. परंतु काही आजार;आजही आपणा सर्वांसाठी एक खूप मोठं आव्हान म्हणून आहे. असाच एक आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रोफी. हा एक स्नायुंचा आजार असून तो मुख्यतः अनुवंशिक आजार आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यात शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. रोग्याला आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज करणंही अवघड होतं. अशा रोग्यांवरील उपचार आणि त्यांच्या शुश्रुषेसाठी खूप मोठ्या सेवाभावाची आवश्यकता असते. आमच्या कडे हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये असं एक केंद्र आहे जे मस्क्युलर डिस्ट्रॉफी रोग्यांसाठी आशेंचा नवा किरण बनलं आहे. या केंद्राचं नाव आहे-मानव मंदिर. इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफी ही संस्था त्याचं संचालन करत असते. मानव मंदिर आपल्या नावाप्रमाणेच मानव सेवेचं अद्भुत उदाहरण आहे. इथं रूग्णांना ओपीडी आणि प्रवेशाची सेवा तीन चार वर्षे अगोदर सुरू झाली होती. मानव मंदिरात जवळपास ५० रोग्यांसाठी खाटांची सुविधाही आहे. फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी आणि हायड्रोथेरपी यांच्याबरोबरीनंच योग प्राणायामाच्या सहाय्यानं इथं रोगावर उपचार केले जातात.
मित्रांनो, सर्व प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधांच्या माध्यमातून या केंद्रात रोग्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे प्रयत्न होतात. मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी संबंधित आव्हानाच्या बाबतीत जागरूकतेचाही अभाव आहे. म्हणून, या केंद्रातर्फे हिमाचल प्रदेशातच नव्हे तर देशभरातील रोग्यांसाठी जनजागृती शिबीरे आयोजित केली जातात. या संस्थेचं व्यवस्थापनही या आजारानं त्रस्त लोकच करत असतात, ही सर्वात मोठी स्फूर्तीदायक बाब आहे. सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला बाल्दीजी, इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या अध्यक्ष संजना गोयलजी आणि या संघटनेच्या स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे विपुल गोयल जी या संस्थेसाठी अत्यंत महत्वपूर्ण काम करत आहेत. मानव मंदिरला रूग्णालय आणि संशोधन केंद्र या रूपात विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. यामुळे इथं रोग्यांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील. मी या दिशेनं प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांची मनापासून प्रशंसा करतो. त्याचबरोबर, मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगाचा सामना करत असलेल्या सर्व लोकांच्या आरोग्याची कामना करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये आम्ही देशवासियांच्या ज्या विधायक आणि सामाजिक कार्याची चर्चा केली, ते देशातील उर्जा आणि उत्साहाचे उदाहरण आहे. आज प्रत्येक देशवासी कोणत्या नं कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या चर्चेत आम्ही पाहिलं की, जी २० सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमात आमचे एक विणकर मित्रांनी आपली जबाबदारी ओळखून ते पुढे आले. याच प्रकारे, कुणी पर्यावरणासाठी प्रयत्न करत आहे तर कुणी पाण्यासाठी काम करत आहे. कितीतरी लोक शिक्षण, वैद्यकीय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते संस्कृती आणि परंपरापर्यंत असामान्य काम करत आहेत. आज आमचा प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे त्यामुळे हें होत आहे. अशी कर्तव्य भावना जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये येते, तेव्हा त्याचं सोनेरी भविष्य आपोआपच निश्चित होतं आणि देशाच्या सोनेरी भविष्यातच आमचंही सोनेरी भविष्य आहे. मी आपणा सर्व देशवासियांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल नमन करतो. पुढील महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच काही उत्साहवर्धक विषयांवर अवश्य चर्चा करू. आपल्या सूचना आणि विचार आम्हाल अवश्य पाठवत रहा. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
नमस्कार. आज देशाच्या अनेक भागात सूर्य उपासनेचा 'छठ' हा सण साजरा केला जातो आहे. या 'छठ' उत्सवात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक आपापल्या गावी, आपापल्या घरी, आपल्या कुटुंबाकडे पोहोचले आहेत. छठ मातेने सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना मी करतो.
मित्रहो,
सूर्यपूजेची ही परंपरा म्हणजे आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची नाळ निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे, याचा पुरावा आहे. या पूजेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात सूर्यप्रकाशाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर, चढउतार हा जगण्याचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत चित्त स्थिर ठेवले पाहिजे. छठ मातेच्या पूजेमध्ये वेगवेगळी फळे आणि ठेकुआचा नैवेद्य अर्पण केला जातो. हे व्रत एखाद्या कठीण साधनेसारखेच आहे. छठ पूजेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे पूजेसाठी वापरल्या जाणार्या वस्तू समाजातील वेगवेगळ्या लोकांनी मिळून तयार केलेल्या असतात. पूजेसाठी बांबूपासून बनवलेली टोपली किंवा सुपली वापरली जाते. मातीच्या दिव्यांचेही महत्त्व आहेच. या सणाच्या माध्यमातून हरभरा पिकवणारे शेतकरी आणि बत्तासे तयार करणारे लहान उद्योजक यांचे महत्त्व समाजात रुजवण्यात आलेआहे. त्यांच्या सहकार्याशिवाय छठ पूजा पूर्ण होऊ शकत नाही. हा सण आपल्या आयुष्यातील स्वच्छतेच्या महत्त्वावरसुद्धा भर देतो. या उत्सवाचे आगमन होताच रस्ते, नद्या, घाट, पाण्याचे विविध स्त्रोत या सर्वांची सामुदायिकरित्या स्वच्छता केली जाते. छठ हा सण हा'एक भारत- श्रेष्ठ भारत' चे सुद्धा उदाहरण आहे. आज बिहार आणि पूर्वांचलमधील लोक, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले तरी छठ मोठ्या थाटामाटात साजरी करत आहेत. दिल्ली तसेचमुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातमधील अनेक भागांमध्ये सुद्धा छठपुजेचे आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते आहे. मला आठवते की पूर्वी गुजरातमध्ये छठपूजा होत नसे. पण बदलत्या काळानुसार आज गुजरातमध्ये जवळपास सर्वत्रच छठपूजेचे रंग दिसू लागले आहेत. हे पाहून मलाही मनापासून आनंद होतो. परदेशात सुद्धा छठपूजेची किती भव्य चित्रे येतात, हे आपण पाहतो. म्हणजेच भारताचा हा समृद्ध वारसा, आपली श्रद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवते आहे. या महान उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला माझ्यातर्फे अनेकानेक शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.
तामिळनाडूमध्ये कांचीपुरम येथे एक शेतकरी आहेत, थिरू के. एझिलन. त्यांनी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्यांच्या शेतात दहा अश्वशक्ती क्षमतेचा सौर पंप संच बसवला. आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेसाठी काहीही खर्च करावा लागत नाही. आता ते शेतात सिंचन करण्यासाठी सरकारकडून होणाऱ्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत. त्याचप्रमाणे, राजस्थानमधील भरतपूर येथील कमलजी मीणा हे पीएम कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत. कमलजींनी शेतात सौर पंप बसवला, त्यामुळे त्यांचाही खर्च कमी झाला आहे. खर्च कमी झाला, त्यामुळे उत्पन्नही वाढले. कमलजी इतर अनेक लघु उद्योगांसाठीही सौर उर्जेचा वापर करत आहेत. त्यांच्या भागात लाकूडकाम केले जाते, गायीच्या शेणापासून उत्पादने तयार केली जातात, त्यासाठीही सौरऊर्जेचा वापर केला जातो आहे. त्याचबरोबरते 10-12 जणांना रोजगारही देत आहेत. म्हणजेच कमलजींनी कुसुम योजनेतून जी सुरूवात केली, त्याचा सुगंध आता अनेक लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे.
मित्रहो,
तुम्ही महिनाभर वीज वापराल आणि त्या विजेचे बिल येण्याऐवजी तुम्हाला विजेचे पैसे मिळतील, अशी कल्पना तुम्ही करू शकता का? सौरऊर्जेनेहे करूनदाखवले आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही गुजरातमधील मोढेरा, या देशातील पहिल्या सौर गावाबद्दल बरेच काही ऐकले असेल. मोढेरा यासौर गावातील बहुतांश घरांमध्ये सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. आता तिथल्या अनेक घरांमध्ये महिन्याच्या शेवटी विजेचे बिल येत नाही, उलट विजेच्या उत्पन्नाचे धनादेश येत आहेत. हे घडताना पाहून आता देशातील अनेक गावांमधले लोक मला पत्र लिहून, त्यांचे गाव सौर ग्राम व्हावे, अशी विनंती करत आहेत. भारतात लवकरच सौरगावांची उभारणी ही फार मोठी लोकचळवळ होईल, असे दिसते आहे. तो दिवस निश्चितच दूर नाही आणि मोढेरा गावातील लोकांनी त्याची सुरुवात केली आहे.
या, 'मन की बात'च्या श्रोत्यांना मोढेरा गावातील लोकांची ओळख करून देऊया. श्री विपिनभाई पटेल हे सध्या आमच्यासोबत फोनवर बोलत आहेत.
पंतप्रधान - विपिन भाई नमस्कार. बघा, आता मोढेरा गाव हे संपूर्ण देशासाठी आदर्श म्हणून समोर आले आहे. पण जेव्हा तुमचे नातेवाईक, ओळखीचे लोक तुम्हाला याबद्दल विचारतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगता, काय उपयोग झाला?
विपिन जी - सर, लोक आम्हाला विचारतात, तेव्हा आम्ही सांगतो की आम्हाला पूर्वी जे वीज बिल यायचे ते आता शून्य येते आणि कधी तरी 70 रुपये येते, पण आमच्या संपूर्ण गावाची आर्थिक परिस्थिती आता सुधारते आहे.
पंतप्रधान – म्हणजे आधी वीज बिलाची काळजी वाटायची, ती आता संपली आहे.
विपिन जी - हो सर, हे अगदी खरे आहे. सध्या संपूर्ण गावात काळजीचे वातावरण नाही. सगळे म्हणतात की सरांनी जे काही केले, ते खूप चांगले केले आहे. ते खुश आहेत सर. प्रत्येकजण आनंदात आहे.
पंतप्रधान - आता स्वत:च्याच घरात स्वत:च वीज कारखान्याचे मालक झालात. तुमच्याच घराच्या छतावर वीजनिर्मिती होते आहे.
विपिन जी - हो सर, खरे आहे सर.
पंतप्रधान - मग या बदलामुळे गावातील लोकांवर काय परिणाम झाला आहे?
विपिन जी - सर, गावातले सगळे लोक शेती करत आहेत, विजेबाबतच्या त्रासातून आमची सुटका झाली आहे. वीजेचे बिल भरायचे नाही, त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो आहोत सर.
पंतप्रधान - म्हणजे वीजेचे बिलही गेले आणि सोयही वाढली.
विपिन जी –सगळी कटकटच संपली सर. तुम्ही इथे आला होता आणि इथे थ्रीडी शोचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर मोढेरा गावाचे चित्रच बदलून गेले आहे सर. आणि सेक्रेटरी सुद्धा आले होते सर...
पंतप्रधान - हां, हां...
विपिन जी – आमचे गाव तर चांगलेच प्रसिद्ध झाले सर...
पंतप्रधान – हो ना. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस.. ही त्यांचीच इच्छा होती. त्यांनी मला अगदीच गळ घातली की भाई, हे एवढं मोठं काम केलं आहे, मला तिथे जाऊन बघायचे आहे. चला विपिन भाऊ, तुम्हाला आणि तुमच्या गावातील सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा. अवघ्या जगाने तुमच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि ही सौर ऊर्जा मोहीम घरोघरी जावी.
विपिन जी - ठीक आहे सर. आम्ही सुद्धा सर्व लोकांना सांगू कीसौर यंत्रणा लावा, स्वत:चे पैसे खर्चून सुद्धा लावा, त्यात खूप फायदा आहे.
पंतप्रधान – हो, लोकांना नक्की समजावून सांगा. चला, अनेकानेक आभार. धन्यवाद भाऊ.
विपिन जी :- धन्यवाद सर. तुमच्याशी बोलून माझे आयुष्य धन्य झाले.
पंतप्रधान:-विपिन भाईंचे मनापासून आभार.
या, आता आपण मोढेरा गावातील वर्षा ताईंशीही बोलूया.
वर्षाबेन – हॅलो, नमस्कार सर.
पंतप्रधान - नमस्कार - नमस्कार वर्षाबेन. तुम्ही कशा आहात ?
वर्षाबेन - आम्ही खुशाल आहोत सर, तुम्ही कसे आहात ?
पंतप्रधान – मी सुद्धा खुशाल आहे.
वर्षाबेन – तुमच्याशी बोलून अगदी धन्य वाटते आहे सर..
पंतप्रधान - अच्छा वर्षाबेन,
वर्षाबेन - हो सर...
पंतप्रधान – तुम्ही मोढेरा गावातल्या आहात, लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातल्या आहात.
वर्षाबेन - मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातली आहे सर. मी माजी सैनिकाची पत्नी आहे सर.
पंतप्रधान - मग यापूर्वी भारतात कुठेकुठे जाण्याची संधी मिळाली तुम्हाला?
वर्षाबेन - मी राजस्थानमध्ये गेले, गांधी नगर मध्ये गेले, जम्मू मध्ये कचरा कांझोर आहे, तिथे जाण्याची संधी मिळाली, सोबत राहता आले. तिथे अनेक सुविधा मिळत होत्या सर.
पंतप्रधान - हा, सैन्यात असल्यामुळे तुम्ही छान हिंदी बोलत आहात.
वर्षाबेन - हो, हो,शिकले आहे सर.
पंतप्रधान - मला सांगा,मोढेरामध्ये इतका मोठा बदल झाला आहे, तुम्ही हा सोलर रूफटॉप प्लांट बसवला. सुरुवातीला लोक बोलत असतील, तेव्हा तुमच्या मनात आलेच असेल, याचा काय उपयोग आहे? काय करत आहेत ? काय होईल ? अशी वीज मिळते का? असे अनेक विचार तुमच्या मनात आले असतील. आता तुमचा अनुभव काय आहे? याचा काय फायदा झाला आहे?
वर्षाबेन -खूपच फायदा झाला आहे सर. तुमच्यामुळे आमच्या गावात रोज दिवाळी साजरी होते. आम्हाला 24 तास वीज मिळते आहे, बिल तर येतच नाही. आमच्या घरात आम्ही सर्व इलेक्ट्रिक वस्तू आणल्या आहेत सर, त्या सर्व आम्ही वापरतो सर, फक्त तुमच्यामुळे. बिल येतच नाही, त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे सगळ्या वस्तू वापरू शकतो.
पंतप्रधान – हो, हे तर खरेच आहे. विजेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे तुम्ही ठरवले आहे तर.
वर्षाबेन – हो सर. आता आम्हाला कोणतीही अडचण नाही. या सर्व वस्तु आता आम्ही निर्धास्तपणे वापरू शकतो, वॉशिंग मशीन, एसी सगळे काही वापरू शकतोसर.
पंतप्रधान - आणि गावातले इतर लोकही यामुळे खुश आहेत का?
वर्षाबेन –खूपच खुश आहेत सर.
पंतप्रधान - बरं. तुमचे पती तर सूर्य मंदिरात काम करतात ना? तिथे लाईट शो चा किती मोठा कार्यक्रम झाला आणि आता जगभरातून पाहुणे येत आहेत.
वर्षा बेन - जगाच्या कानाकोपऱ्यातून परदेशी लोक येत असतात सर,, पण तुम्ही आमचे गाव जगभरात प्रसिद्ध केले आहे.
पंतप्रधान –मग आता तुमच्या पतीचे काम वाढले असेल, इतके पाहुणे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत.
वर्षा बेन – काहीच हरकत नाही. कितीही काम वाढले तरी हरकत नाहीसर, माझ्या नवऱ्याचीही हरकत नाही, फक्त तुम्ही आमच्या गावाचा विकास करत राहा.
पंतप्रधान –आता आपल्याला सर्वांना मिळून गावाचा विकास करायचा आहे.
वर्षा बेन – हो, हो, सर, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत.
पंतप्रधान - आणि मी मोढेरा गावातील लोकांचे अभिनंदन करू इच्छितो, कारण गावाने ही योजना स्वीकारली आणि आपण आपल्या घरात वीज बनवू शकतो, याची खात्री त्यांना वाटली.
वर्षा बेन - 24 तास सर ! आमच्या घरात वीज येते आणि आम्ही खूप आनंदात आहोत.
पंतप्रधान – चला तर. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे पैसे शिल्लक आहेत, ते मुलांच्या भल्यासाठी वापरा. त्या पैशाचा चांगला वापर करा म्हणजे तुम्हाला आयुष्यात फायदा होईल. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मोढेरावासीयांना माझा नमस्कार!
मित्रहो,
वर्षाबेन आणि विपीन भाई यांनी जे काही सांगितले ते संपूर्ण देशासाठी, गावांसाठी आणि शहरांसाठी प्रेरक आहे. मोढेराच्या या अनुभवाची देशभरात पुनरावृत्ती होऊ शकते. सूर्याच्या शक्तीमुळे आता पैशाची बचत होईल आणि उत्पन्नही वाढेल. मंजूर अहमद लर्हवाल हे जम्मू-काश्मीरमधीलश्रीनगर येथे राहणारे साथी आहेत. काश्मीरमध्ये थंड वातावरण असल्यामुळे विजेचा खर्च जास्त आहे. याच कारणामुळे मंजूर यांचे वीज बिल सुद्धा 4 हजार रुपयांपेक्षा जास्त येत असे. मात्र मंजूरजींनी त्यांच्या घरी सोलर रूफटॉप प्लांट लावला आणि त्यामुळे त्यांचा खर्च निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. त्याचप्रमाणे ओदीशातीलकुन्नी देउरी या मुलीने स्वत:बरोबरच इतर महिलांसाठी सुद्धा सौरउर्जेच्या माध्यमातून रोजगाराचे साधन प्राप्त केले आहे. कुन्नी ही ओदीशामधल्या केंदुझर जिल्ह्यातल्या करदापाल गावात राहते. ती आदिवासी महिलांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या रीलिंग मशीनवर रेशीम कातण्याचे प्रशिक्षण देते. सौर मशिनमुळे या आदिवासी महिलांना वीजबिलाचा भार सहन करावा लागत नाही, शिवाय त्यांना उत्पन्नही मिळते आहे. हे सूर्यदेवाच्या सौरऊर्जेचेच वरदान आहे. वरदान आणि प्रसादाचा लाभ जितक्या जास्त लोकांना मिळेल, तितके चांगले. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही यात सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी करून घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आत्ताच मी तुमच्यासोबत सूर्याबद्दल बोलत होतो. आता माझे लक्ष अवकाशाकडे वळते आहे, कारण आपला देश सौरऊर्जा क्षेत्राबरोबरच अवकाश क्षेत्रातही चमत्कार करून दाखवतो आहे. आज अवघे जग भारताची कामगिरी पाहून आश्चर्यचकित झाले आहे. त्यामुळे 'मन की बात'च्या श्रोत्यांनाही त्याबद्दल सांगून त्यांनाही आनंदात सहभागी करून घ्यावे, असे मला वाटले.
तुम्ही पाहिले असेल की आत्ता, काही दिवसांपूर्वीच भारताने एकाचवेळी 36 उपग्रहांचे अंतराळात प्रक्षेपण केले. दिवाळीच्या एक दिवस आधी मिळालेले हे यश म्हणजे एक प्रकारे आपल्या युवकांकडून देशाला मिळालेली ही विशेष दिवाळी भेट आहे. या प्रक्षेपणामुळे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा अशा संपूर्ण देशभरात डिजिटल संपर्क व्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. आणि याच्या मदतीने अगदी दुर्गम आणि दूरवरचे भाग देखील देशाच्या उर्वरित भागांशी सुलभतेने जोडले जातील. देश जेव्हा आत्मनिर्भर होतो तेव्हा तो यशाच्या नव्या उंचीवर कसा पोहोचतो याचे देखीलहे एक उदाहरण आहे. तुमच्याशी बोलत असताना मला जुने दिवस आठवत आहेत, तेव्हा भारताला क्रायोजेनिक रॉकेट तंत्रज्ञान द्यायला नकार देण्यात आला होता. पण, भारतातील वैज्ञानिकांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलेच आहे पण त्याच बरोबर या तंत्रज्ञानाच्या मदतीने आज भारत एकाच वेळी अनेक डझन उपग्रह अंतराळात पाठवत आहे. उपग्रहांच्या या प्रक्षेपणामुळे जागतिक वाणिज्य बाजारात भारताने स्वतःला अत्यंत सशक्तपणे उभे केले आहे. यामुळे अंतराळ क्षेत्रात भारतासाठी नव्या संधींची दारे देखील उघडली आहेत.
मित्रांनो,
विकसित भारताच्या निर्धारासह मार्गक्रमण करणारा आपला देश सर्वांच्या प्रयत्नांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य करू शकतो. पूर्वीच्या काळी, भारतात अंतराळ क्षेत्र सरकारी यंत्रणांच्या कक्षेत मर्यादित झाले होते. जेव्हा हे अंतराळ क्षेत्र, भारतातील युवकांसाठी, खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले तेव्हापासून या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल होऊ लागले आहेत.भारतातील उद्योग आणि स्टार्ट अप उद्योग या क्षेत्रात अनेक नवनवी अभिनव संशोधने आणि नवनवी तंत्रज्ञाने आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेषतः ‘इन-स्पेस’च्या सहकार्याने या क्षेत्रात मोठे बदल घडून येणार आहेत.इन-स्पेसच्या माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पे-लोड्स आणि उपग्रह यांचे प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मी अधिकाधिक स्टार्ट अप उद्योजक आणि संशोधकांना सांगू इच्छितो की त्यांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या मोठ्या संधींचा लाभ घ्यावा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
जेव्हा विद्यार्थ्यांचा, युवा शक्तीचा, नेतृत्व शक्तीचा विषय निघतो तेव्हा, असे दिसते की त्यांच्याबद्दल आपल्या मनात अनेक जुन्या-पुराण्या समजुती घट्ट बसून राहिल्या आहेत. अनेकदा आपण पाहतो की, विद्यार्थी शक्तीबाबत चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीशी जोडून या शक्तीचा परीघ मर्यादित केला जातो. पण, विद्यार्थी शक्तीचा आवाका फार मोठा, अति प्रचंड आहे. विद्यार्थी शक्ती हा भारताला सामर्थ्यशाली करण्यासाठीचा आधारस्तंभ आहे. शेवटी, आज जे युवावस्थेत आहेत तेच सर्वजण भारताला 2047 कडे घेऊन जाणार आहेत. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा वर्गाची ही शक्ती,त्यांचे कष्ट, त्यांचे श्रम, त्यांची प्रतिभा भारताला त्या नव्या उंचीवर घेऊन जाईल जी उंची गाठण्याचा निर्धार आज देशाने केला आहे. आपले युवक सध्या ज्या पद्धतीने देशासाठी कार्य करत आहेत, देश उभारणीच्या कामात एकाग्र झाले आहेत ते पाहून माझे मन अत्यंत विश्वासाने भरून गेले आहे. ज्या पद्धतीने आपले युवक हॅकेथॉन्समध्ये प्रश्नांची उत्तरे शोधतात, त्यासाठी रात्र-रात्र जागून काम करतात, त्यातून मोठी प्रेरणा मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या एका हॅकेथॉनमध्ये देशातील लाखो युवकांनी एकत्र येऊन अनेक आव्हानांची उत्तरे शोधली आणि देशाला अनेक समस्यांची नवी उत्तरे शोधून दिली आहेत.
मित्रांनो,
तुमच्या लक्षात असेल की मी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ‘जय अनुसंधान’चे आव्हान केले होते. मी, या दशकात भारताला टेकेड बनविण्याविषयी देखील बोललो होतो. मला हे पाहून फार आनंद झाला की या संदर्भात आपल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. याच महिन्यात 14-15 ऑक्टोबरला देशातील सर्व 23 आयआयटी संस्था आपापली अभिनव संशोधने आणि संशोधन प्रकल्प यांचे सादरीकरण करण्यासाठी एका मंचावर एकत्र झाले.या कार्यक्रमात देशभरातील निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी 75 पेक्षा जास्त उत्तमोत्तम प्रकल्प सादर केले.हे प्रकल्प आरोग्यसेवा, कृषी, रोबोटिक्स,सेमी कंडक्टर्स, 5 जी संपर्क यंत्रणा अशा विविध संकल्पनांवर आधारित होते. तसे पाहायला गेले तर हे सर्वच प्रकल्प एकाहून एक उत्कृष्ट होते, पण मी त्यातील काही प्रकल्पांकडे तुमचे लक्ष वेधून इच्छितो. उदाहरणार्थ, आयआयटी भुवनेश्वर येथील विद्यार्थ्यांच्या एका पथकाने नवजात अर्भकांसाठी पोर्टेबल व्हेंटीलेटर विकसित केले आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाचा वापर दुर्गम क्षेत्रातील अर्भकांसाठी अत्यंत सुलभतेने करता येऊ शकेल. ज्या बाळांचा जन्म विहित वेळेआधी झाला आहे अशांचा जीव वाचविण्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त ठरेल. आपले अनेक विद्यार्थी विजेच्या सहाय्याने प्रवास, ड्रोन तंत्रज्ञान, 5 जी यांच्याशी संबंधित नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी झटत आहेत. देशातील अनेक आयआयटी संस्था एकत्र येऊन एका बहुभाषिक प्रकल्पावर देखील काम करत आहेत. हा प्रकल्प, स्थानिक भाषा शिकण्यासाठी सोप्या पद्धती विकसित करण्यासंबंधी आहे. हा प्रकल्प, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देखील मदत करेल. आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूर या संस्थांनी एकत्र येऊन भारताचे स्वदेशी 5 जी टेस्ट बेड तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. ही खरोखरच एक मोठी सुरुवात आहे. येत्या काळात अशा प्रकारचे आणखी अनेक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील अशी मला आशा आहे. आयआयटी संस्थांकडून प्रेरणा घेऊन इतर शिक्षण संस्था देखील त्यांची संशोधन आणि विकासाशी संबंधित कार्ये अधिक वेगाने करतील अशी अपेक्षा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
पर्यावरणाप्रती संवेदनशीलता आपल्या समाजाच्या कणाकणात भरलेली आहे आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला ती जाणवते. पर्यावरण रक्षणासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींची आपल्या देशात कमतरता नाही.
कर्नाटकात बेंगळूरू येथे राहणारे सुरेश कुमार यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाची एक प्रबळ भावना त्यांच्यात दिसून येते. शहरातील सहकारनगर परिसरात असलेले जंगल पुन्हा हिरवेगार करण्याचा निश्चय त्यांनी 20 वर्षांपूर्वी केला. हे काम अत्यंत कठीण होते. पण, त्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेली रोपटी आज 40-40 फुटी विशालकाय वृक्ष झाले आहेत. त्यांच्या सौंदर्याने प्रत्येकाचे मन मोहित होते. यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांना देखील फार अभिमान वाटतो. सुरेशकुमारजी आणखी एक अनोखे कार्य देखील करतात. त्यांनी कन्नड भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहकारनगर मध्ये एक बस थांबा देखील तयार केला आहे. त्यांनी शेकडो लोकांना कन्नड भाषेतील वचने कोरलेल्या पितळेच्या ताटल्या भेटीदाखल दिल्या आहेत. पर्यावरण शास्त्र आणि संस्कृती दोन्हींची सोबतीने प्रगती व्हावी, संवर्धन व्हावे ही कल्पना किती महान आहे, तुम्हीच विचार करा.
मित्रांनो,
आजच्या काळात पर्यावरण-स्नेही निवास आणि पर्यावरण-स्नेही उत्पादने यांच्या बाबतीत लोकांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक जागरुकता निर्माण झाली आहे. तामिळनाडू येथे सुरु असलेल्या अशाच एका मनोरंजक उपक्रमाची माहिती मिळविण्याची संधी मला मिळाली.हा भव्य उपक्रम कोईम्बतूर येथील अनाईकट्टीमध्ये राहणाऱ्या आदिवासी महिलांच्या गटाने सुरु केला आहे. या महिलांनी निर्यातीसाठी टेराकोटा प्रकारच्या दहा हजार पर्यावरण-स्नेही चहाच्या कपांची निर्मिती केली. नवलाची गोष्ट अशी की हे टेराकोटा चहाचे कप बनविण्याची संपूर्ण जबाबदारी या महिलांनी स्वतःच निभावली. या महिलांनी मातीचे मिश्रण तयार करण्यापासून ते अखेरच्या पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक काम स्वतःच केले. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण देखील घेतले होते. या अद्भुत उपक्रमाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
मित्रांनो,
त्रिपुरामधील काही गावांनी देखील फार चांगली शिकवण दिली आहे. तुम्ही जैव-गाव या संकल्पनेबद्दल नक्कीच ऐकले असेल, पण त्रिपुरामधील काही गावांनी जैव-गाव संकल्पनेचा दुसराटप्पा देखील पार केला आहे.नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान कसे कमी करता येईल यावर जैव-गाव संकल्पनेच्या दुसऱ्या टप्प्यात भर दिला आहे. यामध्ये, विविध उपायांच्या मदतीने लोकांचे जीवनमान सुधारण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येते. या टप्प्यात सौर उर्जा,बायोगॅस, मधुमक्षिका पालन आणि जैविक खतांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले जाते. समग्र दृष्टीकोनातून पाहिले तर जैव-गाव 2 हवामान बदलाच्या दुष्परिणामांविरुद्ध सुरु असलेल्या अभियानाला आणखी बळकटी देणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वाढता उत्साह पाहून मला फारच आनंद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच भारतात, पर्यावरण संरक्षणाशी संबंधित मिशन लाईफ अर्थात जीवन अभियान सुरु करण्यात आले आहे. पर्यावरणाची हानी न करणाऱ्या, पर्यावरणाचे नुकसान न करणाऱ्या जीवनशैलीचा स्वीकार ही मिशन लाईफची साधी-सोपी संकल्पना आहे. तुम्ही सर्वांनी देखील या अभियानाची माहिती करून घ्या आणि अशी जीवन शैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे.
मित्रांनो,
उद्या 31 ऑक्टोबरला, राष्ट्रीय एकता दिवस, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा दिवस आहे. या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. हा उपक्रम, देशातील एकतेचे बंध मजबूत करतो, आपल्या युवकांना प्रोत्साहित करतो. काही दिवसांपूर्वीच आपल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या काळात देखील अशीच भावना सर्वत्र पाहायला मिळाली.’जुडेगा इंडिया तो जितेगा इंडिया’ या संकल्पनेसह राष्ट्रीय क्रीडास्पर्धांनी एकतेचा सशक्त संदेश तर दिलाच पण त्याचबरोबर भारताच्या क्रीडा संस्कृतीला देखील प्रोत्साहन देण्याचे काम केले.भारतात आयोजित करण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत्या हे ऐकल्यावर तुम्हांला देखील आनंद होईल. या स्पर्धांमध्ये 36 क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आणि त्यात 7 नव्या तसेच योगासने आणि मल्लखांब या दोन स्वदेशी क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला. सुवर्णपदकांच्या कमाईत सर्विसेसचे पथक आणि महाराष्ट्र तसेच हरियाणा यांची पथके असे तीन संघ आघाडीवर होते. या स्पर्धांमध्ये सहा राष्ट्रीय विक्रम आणि सुमारे साठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील विक्रम नव्याने प्रस्थापित झाले. या स्पर्धांतील पदक विजेत्या, नवे विक्रम स्थापित करणाऱ्या तसेच या खेळांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन करतो. तसेच या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील देतो.मित्रांनो, गुजरातमध्ये झालेल्या या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचे मी मनापासून कौतुक करतो.तुम्ही पाहिले असेल की गुजरातमध्ये नवरात्रीच्या काळात या स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. या स्पर्धांच्या आयोजनापूर्वी एकदा माझ्या मनात असाही विचार आला की या काळात संपूर्ण गुजरात राज्य उत्सवांमध्ये मशगुल असते. अशा वेळी तेथील जनता या खेळांचा आनंद कसा घेऊ शकेल? एकीकडे स्पर्धांसाठी एवढी मोठी व्यवस्था करणे आणि दुसरीकडे नवरात्रीचा गरबा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन. ही सगळी जबाबदारी गुजरात एकाचवेळी कशी पार पाडेल? पण गुजरातच्या जनतेने त्यांच्या आदरातिथ्याने सर्व पाहुण्यांना खुश केले. अहमदाबादमध्ये राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या कालावधीत ज्या प्रकारे या भागात कला, क्रीडा आणि संस्कृती यांचा संगम झाला त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडू देखील दिवसभर क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेत तर संध्याकाळी गरबा आणि दांडिया यांच्या रंगात रंगून जात.त्यांनी गुजराती पद्धतीचे जेवण आणि नवरात्रीची अनेक छायाचित्रे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात सामायिक केली.हे पाहणे अत्यंत आनंददायी होते. शेवटी अशा प्रकारच्या खेळांमुळे, भारताच्या विविध संस्कृतींची माहिती मिळत असते. हे खेळ ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला देखील आणखी सशक्त करतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला आपला देश आदिवासी गौरव दिन साजरा करणार आहे. गेल्या वर्षीपासून आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी आदिवासी वारसा आणि गौरव साजरा करण्याचीसुरुवात केली होती हे तुमच्या लक्षात असेलच. भगवान बिरसा मुंडा यांनी आपल्या लहानशा आयुष्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लाखो लोकांची एकजूट करण्यात यश मिळविले. भारताचे स्वातंत्र्य आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाकरिता त्यांनी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले. धरती आबा बिरसा मुंडा यांच्याकडून शिकण्यासारखे असे बरेच काही आहे. मित्रांनो, जेव्हा धरती आबा बिरसा मुंडा यांचा विषय निघतो, त्यांच्या लहानशा जीवनकालावधीकडे आपण पाहतो तेव्हा असे दिसते की आज देखील आपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि धरती आबा तर म्हणाले होते की – हीआपली भूमी आहे, आपण हिचे रक्षणकर्ते आहोत. त्यांच्या या वाक्यात मातृभूमीप्रती कर्तव्य भावना देखील आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव देखील आहे. आपल्याला आपल्या आदिवासी संस्कृतीचा विसर पडता कामा नये, आपण या संस्कृतीपासून दूर जाता कामा नये या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. आजच्या काळात देखील आपण आपल्या देशातील आदिवासी समाजांकडून निसर्ग आणि अपर्यावरण यांच्या बाबतीत खूप काही शिकू शकतो.
मित्रांनो,
गेल्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी मला रांची येथील भगवान बिरसा मुंडा वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. देशातील सर्व युवकांना माझा आग्रह आहे की त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांनी या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. मी तुम्हांला सांगू इच्छितो की परवा एक नोव्हेंबरला मी गुजरात-राजस्थान सीमेवरील मानगड या ठिकाणी असेन. भारताचे स्वातंत्र्य युध्द आणि आपल्या समृध्द आदिवासी वारशाच्या संदर्भात मानगडया ठिकाणाला विशिष्ट महत्त्व आहे. या ठिकाणी नोव्हेंबर 1913 मध्ये भयानक नरसंहार झाला होता आणि त्यावेळी इंग्रजांनी स्थानिक आदिवासींची निर्दयपणे हत्या केली होती. असे सांगितले जाते की या नरसंहारात एक हजारहून अधिक आदिवासींचे प्राण घेण्यात आले. या आदिवासी आंदोलनाचे नेतृत्व प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या गोविंद गुरुजींनी केले होते. आज मी त्या सर्व आदिवासी हुतात्म्यांना आणि गोविंद गुरुजींच्या अतुलनीय धाडसाला तसेच शौर्याला नमन करतो. या अमृत काळात भगवान बिरसा मुंडा, गोविंद गुरु आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या आदर्शांचे जितक्या निष्ठेने पालन करू तितका आपला देश नव्या उंचीवर जाईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
येत्या 8 नोव्हेंबरला गुरुपर्व आहे. गुरु नानक जी यांचे प्रकाश पर्व आपल्या श्रद्धेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, आपल्याला त्यातून खूप काही शिकायला मिळते. गुरु नानकजी यांनी आपले संपूर्ण जीवनभर मानवतेचा प्रकाश पसरविण्यासाठी व्यतीत केले. गेल्या काही वर्षांमध्ये देशाने गुरूंची शिकवण जनतेत पोहोचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आपल्याला गुरु नानकदेवजी यांचे 550वे प्रकाश पर्व देश-विदेशात व्यापक पातळीवर साजरे करण्याचे भाग्य लाभले होते. अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची निर्मिती होणे देखील तितकेच आनंददायी आहे. काही दिवसांपूर्वी मला हेमकुंड साहिब स्थानासाठी निर्माण होणाऱ्या रोपवे ची कोनशीला रचण्याची संधी प्राप्त झाली. आपल्याला आपल्या गुरूंच्या विचारांतून सतत शिकायचे आहे, त्यांच्याप्रती समर्पित राहायचे आहे. याच दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील आहे. या दिवशी आपण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, नदीत स्नान करतो, गरिबांची सेवा करतो, त्यांना दान देतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्ये त्यांचा राज्य दिन साजरा करणार आहेत.आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करेल, केरळ पिरावी साजरा होईल. कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाईल. याच प्रकारे, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हरियाणा ही राज्ये देखील त्यांचे स्थापना दिवस साजरे करतील. मी या सर्व राज्यांतील नागरिकांना शुभेच्छा देतो.आपल्या देशातील सर्व राज्यांमध्ये परस्परांकडून शिकण्याची, सहयोगाने वाटचाल करण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा जितकी सशक्त होईल तितकाच आपला देश प्रगती करेल. आपण या भावनेसह पुढील वाटचाल करू असा विश्वास मला वाटतो. तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या, निरोगी रहा. ‘मन की बात’मधील पुढच्या भेटीपर्यंत मला रजा द्या. नमस्कार, धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?
मित्रहो, एक कृती दल तयार केले आहे. हे कृती दल चित्त्यांवर लक्ष ठेवणार असून ते इथल्या वातावरणात किती सहज रूळतात, हे पाहणार आहे. त्यानुसार काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते बघता येतील. पण तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना काही कामे सोपवतो आहे.त्यासाठी MyGov मंचावर एक स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेचा एक भाग म्हणून लोकांनी काही गोष्टी शेअर कराव्यात, असे आवाहन मी करतो. चित्त्यांसाठी आपण जी मोहिम राबवतो आहोत, त्या मोहिमेला काय नाव देता येईल? या सर्व चित्यांना कोणत्या नावाने हाक मारता येईल, त्यांचे नामकरण करायचा विचारही आपण करू शकतो. पारंपारिक पद्धतीने आपण त्यांचे नामकरण करू शकलो तर ते उत्तम होईल, कारणआपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी, परंपरेशी आणि वारशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला स्वाभाविकपणे आकर्षित करते. इतकंच नाही तर माणसाने प्राण्यांशी कसं वागावं, हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्येही, प्राणीमात्रांना आदराने वागवण्यावर भर देण्यात आला आहे. तुम्ही या स्पर्धेत जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन मी तुम्हा सर्वांना करतो. कोणी सांगावं, कदाचित बक्षिस म्हणून चित्ता बघायची पहिली संधी तुम्हालाच मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 25 सप्टेंबर रोजी महान मानवतावादी, विचारवंत आणि देशाचे महान सुपुत्र दीनदयाल उपाध्यायजी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. कोणत्याही देशातील तरुणांना आपल्या स्वत्वाचा आणि वारशाचा अभिमान वाटू लागतो, तसतसे त्यांना आदिम कल्पना आणि तत्त्वज्ञानाचे आकर्षण वाटू लागते. दीनदयाळजींनी आपल्या आयुष्यात जगातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या होत्या, हे त्यांच्या विचारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. अनेक वैचारिक संघर्षांचे ते साक्षीदार होते. त्यामुळेच त्यांनी 'एकात्म मानवदर्शन' आणि 'अंत्योदया'ची संकल्पना देशासमोर ठेवली, जी पूर्णपणे भारतीय होती. दीनदयाळजींचे 'एकात्म मानवदर्शन' ही एक अशी संकल्पना आहे, जी विचारसरणीच्या नावाखालील संघर्ष आणि पूर्वग्रहांपासून आपल्याला मुक्त करते. अवघ्या मानवजातीला समान मानणारे भारतीय तत्वज्ञान त्यांनी पुन्हा एकदा जगासमोर आणले. 'आत्मवत् सर्वभूतेषु' अर्थात आपण सर्व जीवांना आपल्यासारखे मानले पाहिजे, आपल्यासारखेच वागवले पाहिजे, असे आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे. आधुनिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून भारतीय तत्त्वज्ञान जगाला कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकते, हे दीनदयाळजींनी आपल्याला शिकवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देशात एक प्रकारची न्यूनगंडाची भावना होती, त्यातून मुक्त करून त्यांनी आपली स्वतःची बौद्धिक जाणीव जागृत केली. आपली संस्कृती आणि अस्मिता आपण अभिव्यक्तकरू शकू, तेव्हाच आपले आपले स्वातंत्र्यसार्थ ठरू शकते, असे ते म्हणत. या कल्पनेच्या बळावर त्यांनी देशाच्या विकासाचा दृष्टीकोन निर्माण केला होता. देशाच्या तळागाळातील व्यक्तीच्या परिस्थितीवरून देशाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते, असे, दीनदयाळ उपाध्याय जी म्हणायचे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण दीनदयाळजींचे विचार जास्तीतजास्त समजून घेतले आणि त्यापासून शिकवण घेत राहिलो, तर आपल्याला सर्वांनाच देशाला पुढे नेण्याची प्रेरणा मिळत राहिल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून तीन दिवसांनंतर म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवातला एक विशेष दिवस येतो आहे. या दिवशी आपण, भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ काळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. मित्रहो, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या आदर्शांना अनुसरून त्यांच्या स्वप्नांमधला भारत आपण घडवूया, हीच त्यांना सार्थ श्रद्धांजली ठरेल. हुतात्म्यांची स्मारके, त्यांची नावे दिलेली स्थाने आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वीच कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून देशाने असाच एक प्रयत्न केला आहे आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित विशेष प्रसंग आपण साजरे करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने २८ सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करून पाहावे, असे मला वाटते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, खरे तर 28 सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचे आणखी एक कारण तुमच्याकडे आहे. काय, ते ठाऊक आहे का! मी फक्त दोन शब्द उच्चारतो, पण मला माहित आहे की ते ऐकल्यावर तुमचा उत्साह चार पटीने वाढेल. हे दोन शब्द आहेत - सर्जिकल स्ट्राइक. वाढला ना उत्साह! आपल्या देशात सुरु असलेल्या अमृत महोत्सवाची मोहीम उत्साहात साजरी करूया, आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेऊ या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, असे म्हणतात की आयुष्यातल्या संघर्षातून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या व्यक्तीसमोर कोणतेही संकट टिकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अनेक सहकाऱ्यांना बघतो, जे शारीरिक त्रुटींमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहेत. असे अनेक लोक आहेत, ज्यांना ऐकू येत नाही किंवा ते बोलू शकत नाहीत. अशा सहकाऱ्यांसाठी सांकेतिक भाषा हा सर्वात मोठा आधार आहे. मात्र भारतात वर्षानुवर्षे सांकेतिक भाषेसाठी कोणतेही हावभाव निर्धारित नव्हते, कोणतीही मानके नव्हती. या अडचणींवर मात करण्यासाठी 2015 साली भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या संस्थेने आतापर्यंत दहा हजार शब्द आणि हावभावांचा शब्दकोश तयार केला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.
दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिनानिमित्त अनेक शालेय अभ्यासक्रमही सांकेतिक भाषेत सुरू करण्यात आले आहेत. मानकांनुसार सांकेतिक भाषेचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही बराच भर देण्यात आला आहे. सांकेतिक भाषेचा जो शब्दकोश तयार करण्यात आला आहे, त्याचे व्हिडिओ तयार करून त्याचा सातत्याने प्रसार केला जातो आहे. अनेक लोकांनी, अनेक संस्थांनी यूट्यूबवर भारतीय सांकेतिक भाषेत आपल्या वाहिन्या सुरू केल्या आहेत; म्हणजेच 7-8 वर्षांपूर्वी सांकेतिक भाषेबद्दल देशात जी मोहीम सुरू झाली होती, त्याचा लाभ, आता माझ्या लक्षावधी दिव्यांग बंधू-भगिनींना मिळतो आहे. हरियाणाच्या रहिवासी असणाऱ्या पूजाजींनी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी त्यांना आपल्या मुलाशी संवाद साधता येत नव्हता. 2018 साली त्यांनी सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आणि त्य़ानंतर या मायलेकांचे जगणे सोपे झाले आहे. पूजाजींच्या मुलानेही सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आपल्या शाळेत कथाकथन स्पर्धेत बक्षीसही जिंकून दाखवले. टिंकाजी यांची सहा वर्षांची मुलगी आहे, तिला ऐकू येत नाही. टिंकाजींनी आपल्या मुलीला सांकेतिक भाषेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पाठवले, पण त्यांना स्वतःला सांकेतिक भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना आपल्या मुलीशी संवाद साधता येत नव्हता. आता टिंकाजींनी सुद्धा सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे आणि आता या माय लेकी सुद्धा एकमेकींशी भरपूर गप्पा मारतात. केरळमधल्या मंजूजीं यांनाही या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला आहे. मंजूजी यांना जन्मापासून ऐकू येत नाही, इतकेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचीही हीच परिस्थिती होती. अशात सांकेतिक भाषा हे या संपूर्ण कुटुंबासाठी संवादाचे साधन बनले आहे. आता तर मंजूजींनीही सांकेतिक भाषेच्या शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो, भारतीय सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता वाढली पाहिजे, म्हणूनसुद्धा मी ‘मन की बात’ कार्यक्रमात याबाबत चर्चा करतो आहे. या माध्यमातून आपण आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांची जास्तीत जास्त मदत करू शकू. बंधू आणि भगिनींनो, काही दिवसांपूर्वी मला ब्रेल लिपीतील हेमकोशाची प्रत सुद्धा मिळाली. हेमकोश हा आसामी भाषेतल्या सर्वात जुन्या शब्दकोशांपैकी एक आहे. तो एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता. सुप्रसिद्ध भाषातज्ञ हेमचंद्र बरुआ यांनी त्याचे संपादन केले होते. हेमकोशाची ब्रेल आवृत्ती सुमारे 10,000 पृष्ठांची आहे आणि ती 15 पेक्षा जास्त खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. यातीलएक लाखापेक्षा जास्त शब्दांचे भाषांतर करावे लागणार आहे. या संवेदनशील प्रयत्नाचे मी मनापासून कौतुक करतो. असे सर्व प्रयत्न, दिव्यांग सहकाऱ्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवण्यास मोठा हातभार लावतात. पॅरा स्पोर्ट्स क्षेत्रातही भारताच्या यशाचा ध्वज उत्तुंग फडकतो आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण सर्वच या यशाचे साक्षीदार ठरलो आहोत. आज तळागाळातील दिव्यांगांना फिटनेस कल्चर अर्थात तंदुरूस्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. यामुळे दिव्यांगांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी सुरत मधील अन्वीला भेटलो. या भेटीबद्दल मला 'मन कि बात' च्या सर्व श्रोत्यांना नक्कीच सांगायला आवडेल; कारण अन्वी आणि अन्वीचा योग यांच्यासोबाबत झालेली माझी भेट खूपच स्मरणीय होती. मित्रांनो, अन्वी जन्मतःच डाऊन सिंड्रोमची रुग्ण आहे आणि लहानपणापासूनच ती हृदयरोगाचा सामना करत आहे. ती केवळ तीन महिन्यांची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. इतकी सगळी संकटे येऊन देखील अन्वीने आणि तिच्या आई-बाबांनी कधीच हार मानली नाही. अन्वीच्या आई-वडिलांनी डाऊन सिंड्रोमबाबत सर्व माहिती गोळा केली आणि अन्वीला अधिकाधिक आत्मनिर्भर करण्याचा निश्चय केला. त्यांनी अन्वीला पाण्याचा ग्लास कसा उचलायचा, बुटांची नाडी (लेस) कशी बांधायची, कपडयांची बटणं कशी लावायची अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, चांगलया सवयी कोणत्या या सर्व गोष्टी त्यांनी तिला खूप धीराने शिकवल्या. अन्वीने या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी दाखवलेली इच्छाशक्ती, आपले कौशल्य यासगळ्यामुळे तिच्या आई-वडिलांना देखील खूप बळ मिळाले. त्यांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन्वी आपल्या दोन पायांवर देखील व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तिच्या आई-वडिलांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा जेव्हा ती योग शिक्षकांकडे गेली तेव्हा ते खूपच संभ्रमात होते की हि चिमुरडी योग करू शकेल की नाही; परंतु त्या शिक्षकांना अंदाज नव्हता की अन्वी किती जिद्दी आहे. तिने आपल्या आईसोबत योग अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तर ती योग निपुण झाली आहे. अन्वी आता देशभरात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते आणि पदक जिंकते. योगने अन्वीला नवीन आयुष्य प्रदान केले आहे. अन्वीने योग आत्मसात करून आयुष्य आत्मसात केले आहे. योगमुळे अन्वीच्या आयुष्यात अद्भुत बदल बघायला मिळाले आहेत असे अन्वीच्या आई-वडिलांनी मला सांगितले. आता तिचा आत्मविश्वास खूपच वृद्धिंगत झाला आहे. योगमुळे अन्वीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा झाली आहे आणि आता तिला खूपच कमी औषधे घ्यावी लागतात. योगमुळे अन्वीला झालेल्या लाभांचा, देश-परदेशातील 'मन कि बात' च्या श्रोत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. अन्वी हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. ज्यांना योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचे अध्ययन करावे आणि योगचे सामर्थ्य जगासमोर आणावे. असे कोणतेही संशोधन जगभरातील डाऊन सिंड्रोमने पीडित मुलांसाठी खूपच फायदेशीर ठरेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे हे आता सर्व जगाने मान्य केले आहे. विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडित समस्या सोडवण्यात योगची खूपच मदत होते. योगची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. आता संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अजून एका प्रयत्नाला अधोरेखित करून त्याला सन्मानित केले आहे; आणि तो प्रयत्न आहे 'भारतातील उच्चरक्तदाब नियंत्रण उपक्रम' या उपक्रमा अंतर्गत रक्तदाब पीडित रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात. या उपक्रमाने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे ते अभूतपूर्व आहे. ज्या लोकांवर उपचार करण्यात आले त्यापैकी जवळपास अर्ध्या लोकांचा रक्तदाब आता नियंत्रणात आहे ही आपल्यासाठी उत्सवर्धक बाब आहे. आपल्या अथक प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो, मानवी आयुष्याचा जीवन प्रवास हा निरंतर पाण्याशी जोडलेला आहे - मग तो समुद्र असो, नदी असो किंवा मग तलाव. जवळपास साडे सात हजार किलोमीटरहुन अधिक लांबीचा समुद्रकिनारा भारताला लाभल्यामुळे समुद्राशी आपले एक अतूट नाते आहे. अनेक राज्य आणि बेटांमधून हि सागरी सीमा जाते. भारतातील विविध समुदाय आणि विविधतेने नटलेली संस्कृती इथे विकसित होताना आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर या सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांची खाद्य संस्कृती देखील लोकांना आकर्षित करते. परंतु या सर्व रोचक बाबींसोबतच या सगळ्याचा एक दुखद पैलू देखील आहे. आपला हा सागरी क्षेत्र पर्यावरणाशी निगडित अनेक समस्यांचा सामना करत करत आहे. एकीकडे हवामान बदल, सागरी पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे तर दुसरीकडे आपल्या समुद्र किनाऱ्यावरील अस्वछता खूपच त्रासदायक आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी कठोर आणि निरंतर प्रयत्न करणे हि आपली जबाबदारी आहे. देशातील सागरी परिसर स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न - 'स्वच्छ सागर - सुरक्षित सागर' या विषयी मी आज इथे बोलू इच्छितो. ५ जुलै रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानाची १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिवशी सांगता झाली. याच दिवशी सागरी किनारा स्वछता दिन देखील होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुरु झालेली हि मोहीम ७५ दिवस सुरु होती. या मधील लोकसहभाग वाखाणण्याजोगा होता. या मोहिमे दरम्यान संपूर्ण अडीच महिने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गोव्यामध्ये एक मोठी मानवी शृंखला तयार करण्यात आली होती. काकीनाडा येथे गणपती विसर्जना दरम्यान लोकांना प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यात आली. 'एनएसएस'च्या अंदाजे ५००० तरुण विद्यार्थ्यांनी तर ३० टनांहून अधिक प्लास्टिक गोळा केले. ओदिशामध्ये २० हजारांहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबतच आपले कुटुंब आणि शेजारील लोकांना 'स्वच्छ सागर-सुरक्षित सागर' मोहिमेसाठी प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.
निवडून आलेले अधिकारी, विशेषतः शहरांचे महापौर आणि गावचे सरपंच यांच्यासोबत जेव्हा मी संवाद साधतो तेव्हा त्यांना स्वच्छता उपक्रमांमध्ये स्थानिक समुदाय आणि स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्याचा आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचा आग्रह करतो.
बंगळुरू मध्ये एक टीम आहे - युथ फॉर परिवर्तन. मागील आठ वर्षांपासून हि टीम स्वच्छता आणि इतर सामुदायिक उपक्रम राबवित आहे. त्याचे बोधवाक्य खूपच स्पष्ट आहे 'तक्रार करणे थांबवा कृती करा'. या टीमने आजवर शहरातील ३७० हुन अधिक जागांचे सौंदर्यीकरण केले आहे. प्रत्येक ठिकाणी युथ फॉर परिवर्तनाच्या अभियाननं शम्भर ते दीडशे नागरिकांना सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरु होऊन दुपारपर्यंत चालतो. या कार्यक्रमा दरम्यान स्वच्छता करण्यासोबतच भिंतींवर चित्र आणि कलात्मक रेखाटने केली जातात. अनेक ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तींची रेखाटने आणि त्यांची प्रेरणादायी वाक्य देखील पहायला मिळतील. बंगळुरूच्या युथ फॉर परिवर्तनाच्या प्रयत्नांनंतर मी आता तुम्हाला मेरठ मधील 'कबाड से जुगाड' या अभियानाबाबत देखील सांगू इच्छितो. हे अभियान पर्यावरण सुरक्षे सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाशी देखील निगडित आहे. या अभियानचे वैशीष्ट्य म्हणजे यामध्ये लोखंडी भंगार, टाकाऊ प्लास्टिक, जुने टायर आणि ड्रम यासारख्या निरुपयोगी झालेल्या वस्तूंचा उपयोग केला जातो. हे अभियान म्हणजे कमी खर्चात सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण कसे केले जावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. या अभियानाशी निगडित लोकांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, सध्या देशात सर्वत्र सणांचा उत्साह आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण 'माँ शैलपुत्री' या देवीच्या पहिल्या रूपाची पूजा करणार. इथून पुढे नऊ दिवस नियम-संयम, उपवासाचे आणि नंतर विजयादशमीचा उत्सव देखील साजरा होणार. एकप्रकारे आपल्या सणांमध्ये विश्वास आणि अध्यात्मासोबतच सखोल संदेश देखील दडलेला आहे. शिस्त आणि संयमाने सिद्धीची प्राप्ती आणि त्यानंतर विजयोत्सव, आपल्या आयुष्यात एखादे लक्ष्य साध्य करण्याचा हाच तर मार्ग आहे. दसऱ्यानंतर धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण देखील येणार आहेत.
मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत एक नवीन संकल्प देखील आपण घेतला आहे. तुम्हां सर्वांना माहीतच आहे, हा संकल्प आहे - 'व्होकल फॉर लोकल'. आता आपण आपल्या सणाच्या आनंदात आपल्या स्थानिक कारागिरांना, शिल्पकारांना आणि व्यापाऱ्यांना देखील सामावून घेत आहोत. आगामी २ ऑक्टोबर ला येणाऱ्या गांधी जयंतीचे औचित्य साधत हे अभियान मोठ्या स्तरावर राबविण्याचा संकल्प करूया. खादी, हातमाग, हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या. जेव्हा सगळे एखाद्या सणामध्ये सहभागी होतात तोच त्या सणाचा खरा आनंद आहे; म्हणूनच स्थानिक उत्पादनांशी निगडित लोकांना आपण पाठबळ दिले पाहिजे. आपण सणाच्यावेळी ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये अशा उत्पादनांचा समावेश करणे हा एक उत्तम, पर्याय आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे. स्वातंत्र्य वीरांना खऱ्या अर्थाने हि श्रद्धांजली असेल. यावेळी तुम्ही खादी, हातमाग, हस्तकलेची उत्पादने विकत घेण्याचे सर्व विक्रम मोडून काढा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सणांमध्ये पॅकिंग आणि पॅकेजिंगसाठी मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. स्वच्छतेच्या या अभियानात प्लास्टिकचा हानिकारक कचरा हा देखील आपल्या सणांच्यामागे असलेल्या भावनांच्या विरोधी आहे. म्हणूनच, आपण स्थानिक स्तरावर उत्पादित प्लास्टिक विरहित पिशव्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या इथे तागाच्या, सुती, केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे. सणाच्या निमित्ताने याला प्रोत्साहन देणे हि आपली जबाबदारी आहे आणि स्वच्छतेसोबतच आपली आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे-
'परहित सरिस धरम नहीं भाई'
याचाच अर्थ, दुसऱ्यांचे हित करण्यासमान, दुसऱ्यांची सेवा, उपकार करण्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही. मागील काही दिवसांमध्ये देशात, समाजसेवेच्या या भावनेची आणखी एक झलक आपल्याला पहायला मिळाली. लोक स्वःहून पुढाकार घेऊन एखाद्या क्षयरोग्याला दत्तक घेत आहेत हे तुम्ही पाहिलंच असेल, त्याला सकस आहार मिळण्याचा संकल्प करत आहेत. क्षयरोयमुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे ज्याचा मुख्य आधार हा लोकसहभाग आणि कर्तव्य भावना आहे. योग्य सकस आहार, वेळेवर औषधांनीच क्षयरोगाचे उपचार शक्य आहेत. लोकसहभागाच्या या ताकदीमुळे वर्ष २०२५ पर्यंत भारत नक्कीच क्षयरोग मुक्त होईल असा माझा विश्वास आहे.
मित्रांनो, दादर-नगर हवेली आणि दमन-दिव या केंद्रशासित प्रदेशातील एक हृदयस्पर्शी उदाहरण मला कळले आहे. इथल्या आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या जिनु रावतीया यांनी मला एक पत्र पाठविले आहे. त्यांनी या पत्रात लिहिले आहे कि, तिथे सुरु असलेल्या ग्राम दत्तक कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५० गावं दत्तक घेतली आहेत. यात जिनु यांचे गाव देखील आहे. हे वैद्यकीय विद्यार्थी गावक गावकऱ्यांना आजारा आणि त्याच्या उपचारां विषयी जागरूक करतात, आजारी व्यक्तींना देखील मदत करतात तसेच सरकारी योजनांची देखील माहिती देतात. परोपकाराच्या या भावनेमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आनंद निर्माण झाला आहे. यासाठी मी वैद्यकीय महाविद्यलयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.
मित्रानो, 'मन कि बात' मध्ये नवीन नवीन विषयांवर चर्चा होत असते. अनेकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या जुन्या विषयामध्ये अधिक सखोल अभ्यास करण्याची देखील संधी मिळते. मागील महिन्यातील 'मन कि बात' मध्ये मी भरड धान्य आणि वर्ष २०२३ ला 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून साजरे करण्याविषयी चर्चा केली होती. लोकांमध्ये या विषयाबाबत खूपच उत्सुकता आहे. लोकांनी कशाप्रकारे भरड धान्याला आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले आहे या संबंधित अनेक पत्र लोकांनी मला पाठवली आहेत. काही लोकांनी भरड धान्यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची देखील माहिती दिली आहे. हा एक मोठ्या बदलाचा संकेत आहे. लोकांचा उत्साह पाहता, आपल्याला एक ई-बुक तयार केली पाहिजे असे मला वाटते. ज्यामध्ये लोकं भरड धान्यांपासून बनणारे पदार्थ आणि आपले अनुभव लिहू शकतील. यामुळे 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' सुरु होण्यापूर्वीच आपल्याकडे भरड धान्याविषयी एक सार्वजनिक विश्वकोश देखील तयार असेल आणि त्यानंतर आपण तो MyGov पोर्टल वर प्रकाशित करू शकतो.
मित्रांनो, 'मन कि बात' मध्ये यावेळी इतकेच, परंतु जाता जाता मी तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी सांगू इच्छितो. २९ सप्टेंबर पासून गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. काही वर्षाच्या अंतराळानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे हि एक विशष संधी आहे. कोविड महामारीमुळे मागील आयोजन रद्द करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी यादिवशी मी देखील उपस्थित राहणार आहे. तुम्ही देखील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की बघा आणि आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढील महिन्याच्या 'मन कि बात' मध्ये नवीन विषयांसोबत पुन्हा आपली भेट होईल.
धन्यवाद.
नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. या ऑगस्ट महिन्यात, तुमच्या सर्वांच्या पत्रांनी, संदेशांनी आणि कार्ड्सनी माझ्या कार्यालयाला अगदी तिरंगामय केले आहे. तिरंगा नसलेले किंवा तिरंग्याचा आणि स्वातंत्र्याचा उल्लेखनसलेले पत्र माझ्याकडे आल्याचे मला फारसे आठवत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणियुवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधाराबरसते आहे. अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे. चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे. आपला एवढा मोठा देश, एवढी विविधता, पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते. तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत: पुढाकार घेतला. स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे. आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे. आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर, देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला. तिरंगा मोहिमेसाठी लोकांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनाही राबवल्या. कृष्णील अनिल जीहे आपले युवा सहकारी, एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे. कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला. आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वत:च्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला, तर इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला. चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला. या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे. हिमाचल प्रदेशच्या गंगोट पंचायतीमध्ये अशा प्रकारचं एक मोठं प्रेरक उदाहरणही पाहायला मिळालं. या ठिकाणी पंचायतीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता.
मित्रांनो,
अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही, तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले. बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75 गाणी गायली. विशेष म्हणजे हिंदी, पंजाबी, गुजराती, बंगाली, आसामी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली. दुसरीकडे नामिबियामध्ये भारत-नामिबिया यांच्यातील सांस्कृतिक-पारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.
मित्रांनो,
आणखी एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. काही दिवसांपूर्वीच मला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी दूरदर्शनवरील 'स्वराज' या मालिकेचे स्क्रीनिंग ठेवले होते. तो प्रीमियर पाहण्याची संधी मला मिळाली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायक-नायिकांच्या प्रयत्नांची ओळख, देशाच्या युवा पिढीला करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे. हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर प्रसारित होतो. तो 75 आठवडे चालणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. तुम्ही वेळात वेळ काढून हा कार्यक्रम स्वतः बघा आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही दाखवा, अशी विनंती मी तुम्हाला करतो. शाळा कॉलेजचे लोक तर हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतात आणि सोमवारी विद्यार्थ्यांना दाखवू शकतात जेणेकरून आपल्या देशात जागरुकता निर्माण होईल. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढील वर्षापर्यंत म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महानायकांची कहाणी अवघ्या देशापर्यंत पोहोचवावी यासाठी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमावरून एक विशेष कार्यक्रमही तयार करू शकतात. देशासाठी, स्वातंत्र्यसैनिकांसाठी, जे लेखन- आयोजन आपण करत आलो आहोत, ते काम आपल्याला यापुढेही करत राहायचे आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या पूर्वजांचे ज्ञान, आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि आपल्या पूर्वजांचे चिंतन आजही किती महत्त्वाचे ठरते आहे, हे आपल्याला समजते, जेव्हा आपण त्याबद्दल सखोल माहिती मिळवतो, तेव्हा आपण आश्चर्याने थक्क होतो. आपला ऋग्वेद तर हजारो वर्ष जुना आहे. ऋग्वेदात म्हटले आहे,
ओमान-मापो मानुषी: अमृक्तम् धात तोकाय तनयाय शं यो: |
यूयं हिष्ठा भिषजो मातृतमा विश्वस्य स्थातु: जगतो जनित्री: ||
अर्थात् -हे पाण्या, तू मानवतेचा सर्वात चांगला मित्र आहेस. तूच जीवन देणारा आहेस, तुझ्यापासूनच अन्न तयार होते आणि तुझ्यापासूनच आमच्या मुलांचे कल्याण होते. तू आमचा रक्षक आहेस आणि आम्हाला सर्व वाईटांपासून दूर ठेवणारा आहेस. तूच सर्वश्रेष्ठ औषध आहेस आणि तूच या विश्वाचे पालनपोषण करणारा आहेस.
विचार करा, हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीत जल आणि जल संरक्षणाचे महत्त्व सांगितले गेले आहे. हे ज्ञान आजच्या संदर्भात पाहिले की आपण रोमांचित होतो, पण जेव्हा हेच ज्ञान, आपले राष्ट्र आपली ताकद म्हणून स्वीकारते तेव्हा त्याची क्षमता अनेक पटींनी वाढते. तुम्हाला आठवत असेल, चार महिन्यांपूर्वी 'मन की बात'मध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघता-बघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे. जेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची प्रखर भावना मनात असते, कर्तव्याची जाणीव असते, येणाऱ्या पिढ्यांची काळजी असते, तेव्हा बळही मिळते आणि संकल्प उदात्त होऊन जातो. तेलंगणामधील वारंगल इथल्या अशाच एका चांगल्या कामाबद्दलची माहिती मला मिळाली आहे. त्या ठिकाणी एक नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून तिचे नाव 'मंगत्या-वाल्या थांडा' असे आहे. हे गाव वनक्षेत्रापासून जवळ आहे. या गावाजवळ एक अशी जागा होती, जिथे पावसाळ्यात भरपूर पाणी साचत असे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आता अमृत सरोवर अभियानांतर्गत ही जागा विकसित करण्यात येते आहे. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मंडला येथील मोचा ग्रामपंचायतीत बांधलेल्या अमृत सरोवराबद्दलही मला तुम्हाला सांगायचे आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळ हे अमृत सरोवर बांधण्यात आले असून त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. उत्तर प्रदेशात ललितपूर येथे नव्याने बांधलेले शहीद भगतसिंग अमृत सरोवरही लोकांना आकर्षित करते आहे. इथल्या निवारी ग्रामपंचायतीत बांधलेल्या तलावाने 4 एकरक्षेत्र व्यापले आहे. या तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्यामुळे त्याची शोभा वाढली आहे. सरोवराजवळ उभारलेला 35 फूट उंच तिरंगा पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. अमृत सरोवराची ही मोहीम कर्नाटकमध्येही जोरात सुरू आहे. तिथल्या बागलकोट जिल्ह्यात बिलकेरूर गावात लोकांनी अतिशय सुंदर असे अमृत सरोवर बांधले आहे. खरे तर या भागात डोंगरातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे, शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पिकांचेही नुकसान होत असे. अमृत सरोवर बनवण्यासाठी गावातील लोकांनी डोंगरावरून येणारे सर्व पाणी, चर खोदून एका बाजूला वळवले. त्यामुळे या परिसरातला पुराचा प्रश्नही सुटला. अमृत सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे. या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे. जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठी या अमृत सरोवरांचा उपयोग केला जात आहे. या तलावांमुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर या परिसरात सगळीकडे हिरवळही वाढते आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी लोक अमृत सरोवरात मत्स्यपालन करायच्या तयारीत आहेत. मी तुम्हा सर्वांना, विशेषत: माझ्या युवा सहकाऱ्यांना विनंती करतो की अमृत सरोवर मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या, ते यशस्वी करून दाखवा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आसाममधील बोंगई गावात एक रंजक प्रकल्प राबवला जात आहे - प्रकल्प संपूर्णा. कुपोषणाविरुद्ध लढा हा या प्रकल्पाचा उद्देश असून या लढ्याची पद्धतही अतिशय अभिनव आहे. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रातील एखाद्या सुदृढ बालकाची आई दर आठवड्याला एखादया कुपोषित बालकाच्या आईची भेट घेते आणि पोषणविषयक माहितीवर चर्चा करते. म्हणजेच एक आई दुसऱ्या आईची मैत्रीण होऊन तिला मदत करते, तिला शिकवते. या प्रकल्पाच्या मदतीने या भागात एका वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त बालकांचे कुपोषण दूर झाले आहे.
कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी गीत-संगीत आणि भजन यांचाही उपयोग होऊ शकतो, असा विचार तुम्ही करू शकता का? मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात "मेरा बच्चा अभियान"! ही अशा प्रकारची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले, त्यात पोषण गुरू असणाऱ्या शिक्षकांना पाचारण करण्यात आले. यावेळी मडके कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महिला, अंगणवाडी केंद्रात मूठभर धान्य आणतात आणि याच धान्याचा वापर करून शनिवारी 'बालभोज' कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची उपस्थिती वाढली आणि कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे. कुपोषणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी झारखंडमध्येही एक अनोखी मोहीम सुरू आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये साप-शिडीचा खेळ तयार करण्यात आला आहे. या खेळाच्या माध्यमातून मुले चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या, ते शिकत आहेत.
मित्रहो,
कुपोषणाशी संबंधित अनेक अभिनव प्रयोगांबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे, कारण येत्या महिनाभरात आपणा सर्वांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे. सप्टेंबर महिना हा सणांचा महिना असला तरी तो पोषणाशी संबंधित एका मोठ्या मोहीमेला समर्पित आहे. आपण दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करतो. कुपोषणाविरुद्ध देशभरात अनेक सर्जनशील आणि वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि लोकसहभाग हा पोषण अभियानाचा अविभाज्य घटक बनला आहे. देशातील लाखो अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपकरणे देण्यात आली आहेत तसेच अंगणवाडी सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर सुद्धा सुरू करण्यात आला आहे.
सर्व आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये, 14 ते 18 वयोगटातील मुलींना सुद्धा पोषण मोहिमेच्या कक्षेत सामावून घेतले आहे. कुपोषणाच्या समस्येच्या निराकरणाचे प्रयत्न या उपाययोजनांपुरतेच मर्यादित नाहीत. या लढ्यात इतर अनेक उपक्रमसुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे. जल जीवन मिशनचे उदाहरण घ्या. भारत कुपोषणमुक्त करण्याच्या कामी या मिशनचाही मोठा परिणाम दिसून येणार आहे. कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीच्या प्रयत्नांची भूमिका महत्वाची असते. येत्या पोषण महिन्यात कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हावे, अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे. त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल. येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे.
'मन की बात' च्या पुढच्या भागात तुम्ही यावर चर्चा करू शकता का? असे त्यांनी मला विचारले आहे. देशवासीयांच्या मनातला असा उत्साह पाहून मलाही मनापासून आनंद होतो. तुम्हाला आठवत असेल की संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे. मित्रहो, आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना, भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे.
आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की, जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात, राज्याचे प्रमुख भारतात येतात, तेव्हा भारतातील मिलेट्स/ तृणधान्यापासून, भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ त्यांना देण्यात/ वाढण्यात यावेत आणि असा अनुभव आला आहे की या मान्यवरांना, हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या भरडधान्याबद्दल, तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात. प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेतीचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे. आपल्या वेदांमध्ये तृणधान्यांचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे पुराणनुरु आणि टोलकप्पियममध्येही त्यांचा उल्लेख आहे.
तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथल्या लोकांच्याजेवणात तुम्हाला तृणधान्यांचे विविध प्रकार नक्कीच पाहायला मिळतील. आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृणधान्यांमध्येही खूप वैविध्य आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे , कंगणी, चेना, कोडो, कुटकी, कुट्टू, ही सर्व तृणधान्येच आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे, त्यामुळे हा उपक्रम/ हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे. आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवायची आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला तरचांगलंच माहिती आहे, तृणधान्ये शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहेत आणि तीही विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी. खरं तर, ही पिके खूप कमी वेळात तयार होतात, आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही. आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत. तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो.
आजकाल तरुण पिढी आरोग्यपूर्ण जीवन आणि अन्नाकडे खूप लक्ष देते. त्या दृष्टीने पाहिले तर तृणधान्यात भरपूर प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात. बरेच लोक तर याला सुपर फूड देखील म्हणतात.
तृणधान्याचे केवळ एक नव्हे तर अनेक फायदे आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासोबतच ते मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी करतात. यासोबतच ते पोट आणि यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.
कुपोषणाबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो. तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी देखील खूप उपयोगी आहेत, कारण ती ऊर्जा तसेच प्रथिनांनी परिपूर्ण आहेत. आज देशभरात तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही केले जात आहे. यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच FPOs ला प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून उत्पादन वाढवता येईल.
आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना माझी विनंती आहे की, तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा आणि त्याचा लाभ घ्या.
मला हे बघून खूप चांगले वाटते की आज असे अनेक स्टार्ट-अपस उदयाला येत आहेत, जे तृणधान्यावर काम करत आहेत. यापैकी काहीजण तृणधान्यांच्या कुकीज बनवत आहेत, तर काहीजण तृणधान्यांचा पॅन केक आणि डोसा देखील बनवत आहेत. असे काही आहेत जे तृणधान्यांचा एनर्जी बार आणि नाश्ता तयार करत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.
या सणासुदीच्या काळात आपण अनेक पक्वान्न आणि पदार्थांमध्ये तृणधान्ये वापरतो. तुम्ही आपल्या घरात बनवलेल्या अशा पदार्थांची छायाचित्रे सोशल समाज माध्यमांवर जरूर शेअर करा, त्यामुळे लोकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढण्यास मदत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
काही दिवसांपूर्वी मी अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील जोरसिंग गावातील एक बातमी पाहिली. ही बातमी अशा एका बदलाची होती ज्याची या गावातील लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. खरे तर जोरसिंग गावात या महिन्यात, स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून 4G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. जसे पूर्वी कधी खेड्यात वीज पोहोचली तेव्हा लोक खुश झाले होते, तसेच आता नवीन भारतात 4G पोहोचल्यावर लोकांना तसाच आनंद होतो आहे.
अरुणाचल आणि ईशान्येतील दुर्गम भागात 4G च्या रूपाने एक नवा सूर्योदय झाला आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीने नवी पहाट आणली आहे. ज्या सुविधा पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होत्या, त्या आता डिजिटल इंडियाने खेड्यापाड्यात आणल्या आहेत. त्यामुळे देशात नवीन डिजिटल उद्योजक तयार होत आहेत.
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सेता सिंह रावत जी 'टेलर ऑनलाइन' 'ई-स्टोअर' चालवतात. तुम्हाला वाटेल हे काय आहे, टेलर ऑनलाईन!!
वास्तविक, सेठा सिंह रावत हे कोविडपूर्वी टेलरिंगचे काम करायचे. जेव्हा कोविड आला तेव्हा रावतजींनी हे आव्हान संकट मानले नाही तर संधी म्हणून स्वीकारले. ते 'कॉमन सर्व्हिस सेंटर' म्हणजेच CSC ई-स्टोअरमध्ये सामील झाले आणि ऑनलाइन काम करू लागले.
त्यांनी पाहिले की ग्राहक मोठ्या संख्येने मास्कसाठी ऑर्डर देत आहेत. त्यांनी काही महिलांना कामावर घेतले आणि मास्क बनवायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'शिंपी /टेलर ऑनलाइन' नावाने आपले ऑनलाइन स्टोअर सुरू केले ज्यामध्ये त्यांनी इतरही अनेक प्रकारचे कपडे शिवून, विकण्यास सुरुवात केली. आज डिजिटल इंडियाच्या सामर्थ्याने सेता सिंह जींचे काम इतके वाढले आहे की आता त्यांना संपूर्ण देशभरातून ऑर्डरस मिळतात. त्यांनी शेकडो महिलांना आपल्या कंपनीत रोजगार दिला आहे.
डिजिटल इंडियाने उन्नाव, यूपी येथे राहणाऱ्या ओम प्रकाश सिंह जी यांना देखील डिजिटल उद्योजक बनवले आहे. त्यांनी आपल्या गावात एक हजाराहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन्स स्थापन केली आहेत. ओम प्रकाश जी यांनी त्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरभोवती मोफत वायफाय झोन देखील तयार केला आहे, ज्याची गरजू लोकांना खूप मदत होत आहे. ओम प्रकाश जी यांचे काम आता इतके वाढले आहे की त्यांनी 20 पेक्षा जास्त लोकांना कामावर घेतले आहे. हे लोक गावागावातील शाळा, रुग्णालये, तहसील कार्यालये, अंगणवाडी केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्शन देत असून त्यातून त्यांना रोजगारही मिळत आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरप्रमाणे, सरकारी ई-मार्केट प्लेस अर्थात जीईएम पोर्टलवर अशा किती यशोगाथा पाहायला मिळतात.
मित्रांनो,
मला गावोगावातून असे अनेक संदेश मिळतात, जे इंटरनेटमुळे झालेल्या बदलांच्या विषयी सांगतात. इंटरनेटमुळे आमच्या तरुण मित्रांचा अभ्यास आणि शिक्षणाची पद्धतच बदलली आहे. उदाहरणार्थ, यूपीच्या गुडिया सिंग जेव्हा उन्नावच्या अमोईया गावात आपल्या सासरच्या घरी आल्या तेव्हा त्यांना आपल्या अभ्यासाची काळजी वाटत होती. पण, भारतनेटने त्यांची चिंता दूर केली. गुडिया यांनी इंटरनेटद्वारे त्यांचा अभ्यास सुरू ठेवला आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले.
खेड्या-पाड्यातील अशा कितीतरी लोकांना डिजिटल इंडिया मोहिमेतून नवी शक्ती मिळत आहे. तुम्ही मला खेड्यापाड्यातील डिजिटल उद्योजकांबद्दल जमेल तितके जास्तीत जास्त कळवत जा आणि त्यांच्या यशोगाथा सामाजिक माध्यमांच्यावरही शेअर करा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
काही दिवसांपूर्वी मला 'मन की बात'चे हिमाचल प्रदेशातील श्रोते रमेश जी यांचे पत्र आले. रमेशजींनी त्यांच्या पत्रात पर्वतांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले की, डोंगरावरील वसाहती एकवेळ एकमेकांपासून दूर दूर असतीलही पण लोकांची मने मात्र एकमेकांच्या खूप जवळ आहेत.
खरंच, डोंगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो. पर्वतीय जीवनशैली आणि संस्कृतीतून आपल्याला पहिली शिकवण मिळते ती म्हणजे परिस्थितीचे आपण दडपण घेतले नाही तर आपण त्यावर सहज मात करू शकतो आणि दुसरी शिकवण म्हणजे स्थानिक साधनसंपत्तीने आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो.
ज्या पहिल्या शिकवणीचा मी उल्लेख केला होता, त्याचे एक सुंदर चित्र सध्या स्पिती प्रदेशात पाहायला मिळत आहे. स्पिती हा एक जनजातीय भाग आहे. इथे आजकाल मटार - वाटाणा तोडण्याचे काम चालते. डोंगरावरील शेतातले हे काम मोठे कष्टाचे आणि कठीण काम आहे. पण इथे गावातील स्त्रिया एकत्र जमतात, सर्वजणी एकमेकांच्या मदतीने शेतातून वाटाणे तोडतात. काम करता करता महिला 'छपरा माझी छपरा' हे स्थानिक गाणेही गातात. म्हणजेच परस्पर सहकार्य हा देखील इथल्या लोकपरंपरेचाच एक भाग आहे.
स्थानिक संसाधनांच्या वापराचे उत्तम उदाहरणदेखील स्पितीमध्ये आढळते. स्पितीमध्ये गायी पाळणारे शेतकरी, गाईचे शेण वाळवून गोणीत भरतात. हिवाळा आला की गायी ज्या ठिकाणी राहतात त्याला इथे खुड म्हणतात. तर त्या ठिकाणी या गोण्या टाकल्या जातात. बर्फवृष्टीच्या वेळी या गोण्या गायींना थंडीपासून संरक्षण देतात. हिवाळ्यानंतर हेच शेण शेतात खत म्हणून वापरले जाते. म्हणजेच प्राण्यांच्या शेणाच्या मदतीनेच त्यांचे संरक्षण, तसेच शेतासाठी खतदेखील. लागवडीचा खर्चही कमी व शेतात उत्पादनही जास्त. त्यामुळेच तर हा परिसर आजकाल नैसर्गिक शेतीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
मित्रांनो,
असेच अनेक स्तुत्य प्रयत्न आपल्या आणखी एका पहाडी राज्यात, उत्तराखंडमध्येही पाहायला मिळत आहेत. उत्तराखंडमध्ये अनेक प्रकारची औषधे आणि वनस्पती आढळतात. जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यापैकी एक फळ आहे - बेडू. त्याला हिमालयन अंजीर असेही म्हणतात. या फळामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. लोक याचे सेवन केवळ फळाच्या रूपातच करत नाहीत तर अनेक रोगांच्या उपचारातही यांचा वापर केला जातो.
या फळाचे हे सर्व गुण लक्षात घेऊन आता बेडू ज्यूस, फळापासून जाम, चटण्या, लोणचे आणि फळे सुकवून तयार केलेले ड्रायफ्रूट्स बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. पिथौरागढ प्रशासनाच्या पुढाकाराने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने बेडू फळाला वेगवेगळ्या स्वरूपात बाजारपेठेत पोहोचवण्यात यश आले आहे. पहाडी अंजीर असे ब्रँडिंग करून बेडू ऑनलाइन बाजारातही लाँच केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन तर मिळालेच, पण बेडूच्या औषधी गुणधर्माचे फायदे दूरदूरपर्यंत पोहोचू लागले आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
'मन की बात' च्या सुरुवातीला आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी बोललो. स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वासोबतच आगामी काळात आणखी अनेक सण येणार आहेत.
अवघ्या काही दिवसांनी श्रीगणेशाच्या पूजेचा सण गणेश चतुर्थी येत आहे. गणेश चतुर्थी, म्हणजेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा सण.
गणेश चतुर्थीच्या आधी ओणमचा सणही सुरू होत आहे. विशेषत: केरळमध्ये ओणम शांतता आणि समृद्धीच्या भावनेने साजरा केला जाईल.
हरतालिका तीजही 30 ऑगस्टला आहे. 1 सप्टेंबर रोजी ओडिशात नुआखाई हा सणही साजरा केला जाणार आहे. नुआखाई चा अर्थच आहे नवीन अन्नधान्य, खाद्यपदार्थ, म्हणजेच हा सण देखील इतर अनेक सणांप्रमाणेच आपल्या कृषी परंपरेशी निगडित सण आहे.
ह्याच दरम्यान, जैन समाजाचा संवत्सरी पर्वही येणार आहे. आपले हे सर्व सण आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे आणि ऊर्जेचे, चैतन्याचे प्रतीक आहेत.
या सणांसाठी आणि विशेष उत्सवाच्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. या उत्सवांसोबतच उद्या 29 ऑगस्ट ह्या दिवशी, मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनही साजरा केला जाणार आहे. आमचे युवा खेळाडू आमच्या तिरंग्याचा गौरव जागतिक मंचावर वाढवत राहोत, हीच ध्यानचंदजींना आमची श्रद्धांजली असेल.
आपण सर्वजण मिळून देशासाठी काम करत राहू या, देशाचा सन्मान वाढवत राहू या, अशी मी कामना करतो व हयासोबतच इथे थांबतो. पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा तुमच्याशी 'मन की बात' होईल. खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! “मन की बात’ चा हा 91 वा भाग आहे. आपण सगळ्यांनी याआधी खरंतर इतक्या विषयांवर भरपूर गप्पा मारल्या आहेत, पण तरीही, यावेळचं ‘मन की बात’ खूप विशेष आहे. याचे कारण आहे, यावर्षीचा आपला स्वातंत्र्यदिन. जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळे अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खूप मोठे सौभाग्य दिले आहे. आपणही विचार करा, जर आपण पारतंत्र्याच्या काळात जन्माला आलो असतो तर या दिवसाचं आपल्याला किती महत्त्व वाटलं असतं? आपल्या भावना कशा असत्या? पारतंत्र्यापासून मुक्ती मिळवण्याची ती आस, पराधीनतेच्या बेड्या तोडून स्वतंत्र होण्यासाठीची ती तडफड—किती मोठी असेल ! ते दिवस जेव्हा आपण, प्रत्येक दिवशी, लाखो देशबांधवांना स्वातंत्र्यासाठी लढा देतांना, कष्ट करतांना, बलिदान देतांना पहिले असते. जेव्हा आपण प्रत्येक सकाळी, आपल्या या एकाच स्वप्नासोबत जागे झालो असतो, की आपला हा भारत केव्हा स्वतंत्र होईल? आणि कदाचित असंही झालं असतं की आपल्या आयुष्यात तो ही दिवस आला असता, जेव्हा ‘वंदेमातरम’ आणि ‘भारत माता की जय’ असं म्हणत, आपणही आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले असते, आपले तारुण्य वेचले असते.
मित्रांनो,
31 जुलै म्हणजे आजच्याच दिवशी, आपण सर्व देशबांधव, शाहिद उधम सिंह जी यांच्या हौताम्याला वंदन करतो. मी अशा इतर सर्व महान क्रांतिकारकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, ज्यांनी देशासाठी आपले सर्वस्व वाहिले आहे.
मित्रांनो,
मला हे बघून खूप आनंद वाटतो, की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने आता एका लोकचळवळीचे रूप घेतले आहे. सर्व क्षेत्रे आणि समजाच्या प्रत्येक वर्गातील लोक, त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांत भाग घेत आहेत. असाच एक कार्यक्रम, या महिन्याच्या सुरुवातीला, मेघालय इथे झाला. मेघालयचे शूरवीर योद्धा, यू. टिरोत सिंह जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकांनी त्यांचे स्मरण केले. टिरोत सिंह जी यांनी खासी हिल्स वर नियंत्रण मिळवण्याच्या आणि तिथल्या संस्कृतीवर आक्रमण करण्याच्या ब्रिटिशांच्या कारस्थानाचा अतिशय ताकदीने विरोध केला होता. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी खूप सुंदर कार्यक्रम सादर केले. कलाविष्कारातून त्यांनी इतिहासच जिवंत केला. त्यावेळी एका आनंदमेळयाचे पण आयोजन करण्यात आले होते. यात, मेघालयाची महान संस्कृती अत्यंत सुरेख पद्धतीने दाखवण्यात आली होती. काही आठवड्यांपूर्वी, कर्नाटकात, अमृता भारती कन्नडार्थी या नावाने एक आगळावेगळा उपक्रम देखील राबवण्यात आला. यात, राज्यातील 75 जागांवर, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित अनेक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात कर्नाटकचया महान स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यासोबतच, स्थानिक साहित्यिकांच्या उपलब्धी समाजापुढे मांडण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
मित्रांनो,
याच जुलै महिन्यात आणखी एक अतिशय रोचक प्रयत्न देखील करण्यात आला, ज्याचे नाव आहे- ‘आझादी की रेलगाडी और रेल्वे स्टेशन” या प्रयत्नाचे उद्दिष्ट आहे, स्वातंत्र्यलढ्यात भारतीय रेल्वेचे योगदान जाणून घेणे. देशांत अशी अनेक रेल्वे स्थानके आहेत,जी स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत. आपल्यालाही या रेल्वे स्थानकांविषयी जाणून आश्चर्य वाटेल. झारखंडच्या गोमो जंक्शनला, आता अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन या नावाने ओळखले जाते. माहिती आहे का, का ते? कारण याच स्थानकावर, कालका मेल मध्ये बसून नेताजी सुभाष, ब्रिटिश अधिकाऱ्यांना गुंगारा देत, पळून जाण्यात यशस्वी होत असत. आपण सगळ्यांनी लखनौ जवळच्या काकोरी रेल्वे स्थानकाचे नावही नक्कीच ऐकले असेल. या स्थानकासोबत, राम प्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्लाह खान यांच्यासारख्या शूर क्रांतिकारकांची नावे जोडली गेली आहेत. इथून रेल्वेगाडीने जात असलेल्या इंग्रजांचा खजिना लूटून, वीर क्रांतिकारकांनी आपल्या ताकदीची चुणूक इंग्रजांना दाखवली होती. आपण जर कधी तामिळनाडूच्या लोकांशी संवाद साधला, तर आपल्याला थुथुकुडी जिल्हयातल्या वान्ची मणियाच्ची जंक्शन बद्दल माहिती मिळू शकेल. या स्थानकाला तमिळ स्वातंत्र्यसैनिक वान्चीनाथन जी यांचं नाव दिलेलं आहे. हे तेच रेल्वे स्थानक आहे, जिथे 25 वर्षांच्या युवा वान्ची यांनी ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याला त्याच्या कृत्याची शिक्षा दिली होती.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे. देशभरातल्या 24 राज्यांत विखुरलेली अशी 75 रेल्वे स्थानकं शोधून काढण्यात आली आहेत. या 75 स्थानकांची अतिशय सुरेख सजावट करण्यात आली आहे. तिथे अनेक प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत. आपण देखील, वेळात वेळ काढून आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकाला नक्की भेट द्यायला हवी.
आपल्याला स्वातंत्र्यसंग्रामाच्या अशा इतिहासाविषयी सविस्तर माहिती मिळेल, ज्यापासून आतापर्यंत आपण अनाभिज्ञ होते. मी, या स्थानका जवळच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही आग्रह करेन, शिक्षकांना आग्रह करेन, की त्यांनी आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना या स्थानकांवर नक्की घेऊन जावे आणि तिथे घडलेला संपूर्ण घटनाक्रम त्यांना समजावून सांगावा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट एक विशेष मोहीम- “हर घर तिरंगा- हर घर तिरंगा” चे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊ आपण सर्वांनी, 13 ते 15 ऑगस्ट या काळात, आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा. किंवा आपल्या घरात लावा. तिरंगा आपल्याला एका सूत्रात जोडतो. आपल्याला देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो. माझी एक अशीही सूचना आहे, की 2 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण सगळे आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल पिक्चर्स मध्येही तिरंगा लावू शकतो. तसं तुम्हाला माहिती आहे का, 2 ऑगस्ट चा आपल्या तिरंग्याशी एक विशेष संबंध देखील आहे. याच दिवशी, आपल्या राष्ट्रध्वजाचे रेखाटन करणाऱ्या पिंगली व्यंकय्या जी यांची जयंती देखील असते. मि त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्रध्वजाविषयी बोलतांना मी महान क्रांतिकारक, मादाम कामा यांचेही स्मरण करेन. तिरंग्याला आकार देण्यात त्यांनी पार पाडलेली भूमिका अतिशय महत्वाची होती.
माझी प्रिय देशबांधवांनो,
कोरोनाच्या विरोधात आपली सर्वांची लढाई अजूनही सुरु आहे. संपूर्ण जग आजही या आजाराशी लढा देत आहे. अशावेळी, सर्वंकष आरोग्याकडे लोकांचा वाढत असलेला कल आपल्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, जी यात भारतीय चिकित्सा परंपरा किती उपयुक्त ठरल्या आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत, आयुषने तर जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
जगभरात आयुर्वेद आणि भारतीय वैद्यकशास्त्राविषयीची रुचि वाढटे आहे. आयुष उत्पादनांच्या निर्यातीत विक्रमी वाढ होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे आणि या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप्स उदयास येत आहेत हे देखील अतिशय आनंददायी आहे. नुकतीच जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष परिषद झाली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, यामध्ये सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली आहे की, कोरोनाच्या काळात औषधी वनस्पतींवरील संशोधनात बरीच वाढ झाली आहे. याबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध होत आहेत. ही एक नक्कीच चांगली सुरुवात आहे.
मित्रांनो,
देशात वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आणि वनौषधींच्या बाबतीत एक उत्तम प्रयत्न झाला आहे. आता - आता जुलै महिन्यात भारतीय आभासी हर्बेरियम सुरु करण्यात आलं आहे. हे याचं देखील उदाहरण आहे, की आपण कसा डिजिटल जगाचा उपयोग आपल्या मुळाशी जोडण्यात करू शकतो. भारतीय आभासी हर्बेरियम, जतन केलेल्या रोपांचा किंवा रोपाच्या भागांच्या डिजिटल छायाचित्रांचा एक मनोरंजक संग्रह आहे, जो इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. या भारतीय आभासी हर्बेरियम मध्ये सध्या एक लाखापेक्षा जास्त नमुने आणि त्यांच्याशी निगडीत वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे. आभासी हर्बेरियममध्ये भारताच्या, वनस्पतीशास्त्र विविधतेचे समृद्ध चित्र देखील दिसून येते. मला विश्वास आहे, की भारतीय आभासी हर्बेरियम, भारतीय वनस्पतींवर संशोधन करण्यासाठी एक महत्वपूर्ण स्रोत बनेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
‘मन की बात’ मध्ये दर वेळेस आपण देशबांधवांच्या यशोगाथांची चर्चा करतो, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलते. जर कुठली यशोगाथा, गोड हास्य फुलवत असेल, आणि त्यामुळे तोंडाला गोड चव देखील येणार असेल तर तुम्ही याला नक्कीच दुग्ध शर्करा योगच म्हणाल. आपल्या शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळात मध उत्पादनात अशीच कमाल केली आहे. मधाची गोडी आपल्या शेतकऱ्यांचं आयुष्य देखील बदलत आहे, त्यांचे उत्पन्न वाढवत आहेत. हरियाणामध्ये, यमुनानगरला एक मधमाशी पालन करणारे सहकारी राहतात - सुभाष कांबोजजी. सुभाषजींनी वैज्ञानिक पद्धतीनं मधमाशी पालनाचं प्रशिक्षण घेतलं. या नंतर त्यांनी केवळ सहा बॉक्स सोबत आपलं काम सुरु केलं. आज ते जवळजवळ दोन हजार बॉक्स मध्ये मधमाशी पालन करत आहेत. त्याचं मध अनेक राज्यांत पाठवलं जातं. जम्मूच्या पल्ली गावात विनोद कुमारजी देखील दीड हजाराहून जास्त कॉलनीत मध माशी पालन करत आहेत. त्यांनी मघ्य वर्षी, राणी माशी पालन करण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. या कामातून ते वर्षाला 15 ते 20 लाख रुपये कमावत आहेत. कर्नाटकचे आणखी एक शेतकरी आहेत – मधुकेश्वर हेगडेजी. मधुकेश्वरजींनी सांगितलं की त्यांनी भारत सरकार कडून मधमाश्यांच्या 50 कॉलानीसाठी अनुदान घेतलं होतं. आज त्यांच्याकडे 800 पेक्षा जास्त कॉलनी आहेत, आणि ते अनेक टन मध विकतात. त्यांनी आपल्या कामात सुधारणा केल्या आहेत, आणि ते जांभूळ मध, तुळस मध, आवळा मध या सारखे वनस्पती मध देखील बनवत आहेत. मधुकेश्वरजी, मध उत्पादनात आपले संशोधन आणि सफलता आपले नाव देखील सार्थक करत आहेत.
मित्रांनो,
आपल्या सर्वांना माहितच आहे की, मधाला आपल्या पारंपारिक आरोग्य विज्ञानात किती महत्व दिले गेले आहे. आयुर्वेद ग्रंथांत तर मधला अमृत म्हटलं आहे. मधातून केवळ चव मिळत नाही, तर आरोग्य देखील मिळते. मध उत्पादनात आज इतक्या संधी आहेत की व्यावसायिक अभ्यास करणारा विद्यार्थी देखील यातून आपला स्वयंरोजगार तयार करत आहे. असेच एक युवक आहेत – उत्तर प्रदेशात गोरखपूरचे निमित सिंह. निमितजींनी बी. टेक. केलं. त्यांचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत, मात्र, शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याच्या ऐवजी निमितजींनी स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी मध उत्पादनाचे काम सुरु केले. त्याच्या दर्जाची चाचणी करता यावी म्हणून लखनौ येथे स्वतःची एक प्रयोगशाळा देखील स्थापन केली. निमितजी आता मध आणि बी-वॅक्स म्हणजेच मधमाशांनी तयार केलेले विशिष्ट प्रकारचे मेण यांच्या व्यवसायातून उत्तम उत्पन्न मिळवत आहेत आणि विविध राज्यांमध्ये जाऊन तेथील शेतकऱ्यांना या व्यवसायाचे प्रशिक्षण देखील देत आहेत. अशा तरुणांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज आपला देश एवढा मोठा मध उत्पादक देश होऊ लागला आहे. देशातून होणाऱ्या मधाच्या निर्यातीचे प्रमाण देखील वाढले आहे हे समजल्यावर तुम्हांला नक्कीच आनंद होईल.देशामध्ये राष्ट्रीय मधुमक्षिका पालन आणि मधु अभियानासारखे उपक्रम सुरु करण्यात आले, शेतकऱ्यांनी त्यात सहभागी होऊन परिश्रम केले आणि आपल्या देशातील मधाचा गोडवा जगात पोहोचू लागला. या क्षेत्रात अजूनही फार मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आपल्या युवकांनी या संधींची ओळख करून घेऊन त्यांचा लाभ घ्यावा आणि नव्या शक्यतांना आकार द्यावा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ कार्यक्रमाचे हिमाचल प्रदेशातील एक श्रोते आशिष बहल यांचे एक पत्र मला मिळाले आहे.त्यांनी या पत्रात चंबा येथील ‘मिंजर जत्रे’चा उल्लेख केला आहे. खरेतर मक्याच्या फुलांना मिंजर म्हणतात. जेव्हा मक्याच्या पिकांमध्ये मिंजर फुले फुलतात तेव्हा ही ‘मिंजर जत्रा’ आयोजित केली जाते आणि देशभरातील लांबलांबच्या ठिकाणांहून पर्यटक या जत्रेत सहभागी होण्यासाठी येतात. योगायोगाने सध्या ‘मिंजर जत्रा’ सुरु आहे. जर तुम्ही आत्ता हिमाचल प्रदेशात फिरायला गेला असाल तर ही जत्रा पाहायला चंबा येथे भेट देऊ शकता. चंबा हे गाव इतके सुंदर आहे की या भागातील लोकगीतांमध्ये अनेकदा म्हटले जाते -
“चंबे इक दिन ओणा कने महीना रैणा” |
म्हणजे, जे लोक एकदा चंबा येथे येतात ते इथले निसर्गसौंदर्य पाहून महिनाभर तरी मुक्काम करतात.
मित्रांनो,
आपल्या देशात मेळे किंवा जत्रा यांना फार मोठे सांस्कृतिक महत्त्व आहे. या जत्रा,लोकांना आणि त्यांच्या मनांना एकमेकांशी बांधून ठेवतात. हिमाचल प्रदेशात पावसाळ्यानंतर जेव्हा खरीपाची पिके तयार होतात तेव्हा,म्हणजे साधारण सप्टेंबर महिन्यात, सिमला, मंडी, कुल्लू आणि सोलन या भागांमध्ये सिरी किंवा सैर नावाचा उत्सव साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यातच जागरा सुद्धा येतो आहे. जागराच्या मेळाव्यांमध्ये महासू देवतेला आवाहन करून बिसू गीते गायली जातात.महासूदेवतेचा हा जागर हिमाचल मधील सिमला, किन्नौर आणि सिरमौरसह उत्तराखंड राज्यात देखील साजरा केला जातो.
मित्रांनो,
आपल्या देशात विविध राज्यांतील आदिवासी समाजांमध्ये देखील अनेक पारंपारिक उत्सव किंवा जत्रा साजऱ्या होतात. यापैकी काही उत्सव आदिवासी संस्कृतीशी संबंधित आहेत तर काहींचे आयोजन आदिवासी इतिहास आणि वारशाशी संबंधित आहे. उदा. तुम्हांला संधी मिळाली तर तेलंगणामधील मेदारमचा चार दिवस चालणारा समक्का-सरलम्मा जातरा मेळा पाहायला जरूर जा. या जत्रेला तेलंगणाचा महाकुंभ मेळा म्हटले जाते. समक्का आणि सरलम्मा या दोन आदिवासी महिला नेत्यांच्या सन्मानार्थ सरलम्मा जातरा मेळा साजरा करण्यात येतो.ही जत्रा केवळ तेलंगणाच्याच जनतेसाठी नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश मधील कोया आदिवासी समाजासाठी देखील अत्यंत श्रद्धेचे केंद्र आहे. आंध्रप्रदेशात मारीदम्मा ची जत्रा देखील आदिवासी समाजाच्या परंपरांशी जोडलेली एक मोठी जत्रा आहे. मारीदम्मा जत्रा ज्येष्ठ अमावास्येला सुरु होते आणि आषाढ अमावास्येला संपते. आणि आंध्रप्रदेशातील आदिवासी समाजाने या जत्रेचा संबंध शक्ती उपासनेशी जोडलेला आहे. आंध्रप्रदेशात गोदावरी नदीच्या पूर्वेला पेद्धापुरम येथे मरीदम्मा मंदिर देखील आहे. याच प्रकारे, राजस्थानच्या गरासिया जमातीचे लोक वैशाख शुक्ल चतुर्दशीला ‘सियावा चा मेळा’ किंवा ‘मनखां रो मेळा’ आयोजित केला जातो.
छत्तीसगडमधील बस्तर येथे नारायणपूरची ‘मावली जत्रा’ देखील वैशिष्ट्यपूर्ण असते. जवळच्या मध्य प्रदेशातील ‘भगोरिया जत्रा’ देखील फार प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, भगोरिया जत्रेची सुरुवात राजा भोजयाच्या काळात झाली आहे. तेव्हा कासूमरा आणि बालून या भिल्ल राजांनी आपापल्या राजधानीत पहिल्यांदा या जत्रेचे आयोजन केले होते. तेव्हापासून, आजपर्यंत या जत्रा तितक्याच उत्साहाने साजऱ्या होत आहेत. अशाच प्रकारे, गुजरातमधील तरणेतर आणि माधोपुर सारख्या ठिकाणच्या जत्रा अत्यंत प्रसिध्द आहेत. ‘मेळे’ किंवा ‘जत्रा’ या आपल्या समाजात, जीवनाच्या उर्जेचा फार मोठा स्त्रोत असतात.तुमच्या परिसरात, आसपासच्या ठिकाणी देखील अशाच जत्रा भारत असतील. आधुनिक काळात, समाजाच्या या जुन्या परंपरा ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ या भावनेला मजबूत करण्यासाठी फार आवश्यक आहेत. आपल्या तरुणांनी यांच्याशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. तुम्ही जेव्हा अशा जत्रांमध्ये जाल तेव्हा तेथील छायाचित्रे समाज माध्यमांवर नक्की सामायिक करा. तुम्हांला हवे तर तुम्ही विशेष हॅशटॅग चा देखील वापर करू शकता. यामुळे बाकीच्या लोकांना देखील त्या जत्रांबद्दल माहिती मिळेल. तुम्ही ही छायाचित्रे सांस्कृतिक मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देखील अपलोड करू शकता. येत्या काही दिवसांमध्ये सांस्कृतिक मंत्रालय एका स्पर्धेची सुरुवात करणार आहे. जत्रांच्या संदर्भातील सर्वात उत्तम छायाचित्रे पाठविणाऱ्यांना या स्पर्धेत पारितोषिक दिले जाणार आहे. मग उशीर करू नका,जत्रांमध्ये फिरा, तेथील छायाचित्रे सामायिक करा. कदाचित तुमच्या छायाचित्राला बक्षीस मिळून जाईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुमच्या लक्षात असेल, ‘मन की बात’च्या एका भागात मी म्हटले होते की भारतात खेळण्यांच्या निर्यातीचे पॉवर हाऊस होण्याची क्षमता आहे. मी क्रीडा आणि खेळांच्या बाबतीतभारताच्या समृद्ध वारशाची विशेष चर्चा केली होती. भारतातील स्थानिक खेळणी भारतीय परंपरा आणि निसर्ग अशा दोन्हींशी अनुरूप असतात, पर्यावरण-स्नेही असतात.मी आज तुम्हांला भारतीय खेळण्यांना मिळालेल्या यशाची माहिती देऊ इच्छितो. आपले युवक, स्टार्टअप्स आणि उद्योजक यांच्या बळावर आपल्या खेळणी उद्योगाने जी करामत करून दाखवली आहे, जेयश मिळविले आहे त्याची कल्पना सुद्धा यापूर्वी कोणीकेली नव्हती. आज जेव्हा भारतीय खेळण्यांचा विषय निघतो तेव्हा सगळीकडे ‘व्होकल फॉर लोकल’ चा उद्घोष ऐकू येऊ लागतो. तुम्हांला हे ऐकून खूप बरे वाटेल की आता विदेशातून भारतात येणाऱ्या खेळण्यांची संख्या सतत कमी होत आहे. पूर्वी 3 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याची खेळणी परदेशातून आयात होत असत, आता मात्र ही आयात 70%नी कमी झाली आहे. आणखी आनंदाची एक गोष्ट म्हणजे या काळात भारताने 2 हजार सहाशे कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या खेळण्यांची निर्यात केली आहे, पूर्वी केवळ 300-400 कोटी रुपयांची भारतीय खेळणी निर्यात होत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घडामोड कोरोना काळात झाली आहे. भारताच्या खेळणी निर्मिती क्षेत्राने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून दाखविले आहे.भारतीय खेळणी उत्पादक आता भारतीय पुराणकथा, इतिहास आणि संस्कृती यांवर आधारित खेळणी तयार करत आहेत. देशात खेळणी निर्मात्यांचे जे समूह आहेत, लहान-लहान खेळणी उत्पादक आहेत त्यांना याचा फार फायदा होतो आहे. या लहान उद्योजकांनी तयार केलेली खेळणी जगभरात पोहचत आहेत. भारतातील खेळणी उत्पादक जगातील मोठमोठ्या खेळण्यांच्या ब्रँडसोबत एकत्र येऊन काम करत आहेत. आपले स्टार्ट अप क्षेत्र देखील खेळण्यांच्या विश्वावर संपूर्ण लक्ष देत आहेत हे पाहून मला फार आनंद होतो आहे. हे उद्योजक या क्षेत्रात अनेक मनोरंजक गोष्टी देखील करत आहेत. बेंगळूरूमध्ये शूमी टॉइज नामक स्टार्ट अप उद्योग पर्यावरण-स्नेही खेळण्यांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. गुजरातमध्ये आर्किडझू कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फ्लॅश कार्डस तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गोष्टींची पुस्तके तयार करत आहे. पुण्याची फनव्हेंशन लर्निंग ही कंपनी खेळणी तसेच अॅक्टिव्हीटी कोड्यांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयांमध्ये मुलांची रुची वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. खेळण्यांच्या विश्वात असे उल्लेखनीय काम करत असणाऱ्या सर्व उत्पादकांचे, स्टार्ट अपचे मी खूप खूप अभिनंदन करतो. चला,आपण सर्वजण एकत्र येऊन भारतीय खेळण्यांना जगभरात आणखी लोकप्रियता मिळवून देऊया. मी मुलांच्या पालकांकडे देखील हा आग्रह धरू इच्छितो की तुम्ही मुलांसाठी अधिकाधिक प्रमाणात भारतीय खेळणी, कोडी आणि खेळ खरेदी करा.
मित्रांनो,
अभ्यासाचा वर्ग असो किंवा खेळाचे मैदान, आज आपले तरुण प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाची मान गौरवाने उंचावत आहेत. याच महिन्यात पी.व्हि.सिंधूने सिंगापूर खुल्या स्पर्धेत तिचे पहिले पारितोषिक मिळविले आहे. नीरज चोप्रा यानेदेखील अत्यंत उत्कृष्ट कामगिरी सुरु ठेवत जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत देशासाठी रौप्य पदक जिंकले आहे. आयर्लंड पॅराबॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देखील आपल्या खेळाडूंनी 11 पदकांची कमाई करून देशाचा मान वाढविला आहे. रोम येथे झालेल्या जागतिक कॅडेट कुस्ती विजेतेपद स्पर्धेत देखील भारतीय खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.सूरज या आपल्या खेळाडूने तर ग्रीको-रोमन स्पर्धेत कमालीची कामगिरी केली. 32 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत त्याने देशाला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.खेळाडूंसाठी तर हा संपूर्ण महिना अत्यंत वेगवान घडामोडींचा आहे. चेन्नईमध्ये 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे यजमानपद भूषविणे ही भारतासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. 28 जुलै रोजी या स्पर्धेला प्रारंभ झाला आहे आणि या स्पर्धेच्या उद्घाटनपर सोहोळ्यात उपस्थित राहण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. त्याच दिवशी युकेमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांची देखील सुरुवात झाली. उसळत्या उत्साहाने भरलेला युवा भारतीय संघ तिथे देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मी त्या सर्व खेळाडू आणि अॅथलिट्सना देशवासियांतर्फे शुभेच्छा देतो. मला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की यावर्षी 17 वर्षांखालील महिलांच्या फिफा विश्वचषक स्पर्धांचे देखील यजमानपद भारत भूषविणार आहे. देशातील सुकन्यांचा खेळांप्रती उत्साह वाढविणारी ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास होईल.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी देशभरात 10 वी आणि 12वी इयत्तांचे निकाल देखील घोषित झाले आहेत. कठोर परिश्रम आणि एकाग्रतेसह या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. महामारीच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांचा काळ अत्यंत आव्हानात्मक होता. अशा परिस्थितीला तोंड देत आपल्या युवा वर्गाने जे धाडस आणि संयम दाखविला तो अत्यंत कौतुकास्पद आहे. मी या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या प्रवासासह आपण आपल्या चर्चेची सुरुवात केली होती. पुढच्या वेळी आपण जेव्हा भेटू तेव्हा आपला आगामी 25 वर्षांचा प्रवास सुरु झालेला असेल. आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या घरांवर आपला लाडका तिरंगा फडकविण्यासाठी देखील आपल्याला एकत्र यायचे आहे. यावर्षीचा स्वातंत्र्यदिन तुम्ही कसा साजरा केलात, कोणत्या विशेष गोष्टी केल्या या सर्वांची माहिती मला जरूर कळवा. पुढच्या वेळेस, आपण, आपल्या या अमृतपरवाच्या विविध रंगांबद्दल पुन्हा चर्चा करू. तोपर्यंत मला अनुमती द्या. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार! ‘मन की बात’साठी मला आपल्या सर्वांकडून अनेक पत्रे मिळाली. समाज माध्यमं आणि नमो अॅपवरही अनेक संदेश आले आहेत. त्यासाठी मी आपल्या सर्वांचा खूप आभारी आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा प्रयत्न असतो की, एकमेकांनी केलेल्या प्रेरणादायी प्रयत्नांविषयी चर्चा व्हावी, जन-आंदोलनातून परिवर्तनाची गाथा संपूर्ण देशाला सांगितली जावी. याच शृंखलेमध्ये आज मी आपल्याबरोबर, देशात झालेल्या एका आशा लोक चळवळीविषयी चर्चा करू इच्छितो. मात्र त्याआधी मी आजच्या युवा पिढीला, 24-25 वर्षांच्या युवकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. आणि हा प्रश्न खूप गंभीर आहे. तसंच तुम्ही सर्वांनी माझ्या या प्रश्नावर जरूर विचार करावा, असं मला वाटतं. ज्यावेळी तुमचे आई-वडील तुमच्या वयाचे होते, त्यावेळी एकदा त्यांच्याकडून जगण्याचा अधिकारच काढून घेतला होता, हे तुम्हा मंडळींना माहिती आहे का? माझ्या नवतरूण मित्रांनो, आपल्या देशामध्ये मात्र, एकदा असे घडले होते. काही वर्षोंपूर्वी म्हणजेच, 1975 सालची ही गोष्ट आहे. जून महिन्यात, म्हणजे याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामध्ये देशातल्या नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यापैकीच एक अधिकार, जो घटनेतल्या कलम 21 अंतर्गत सर्व भारतीयांना मिळाला आहे- ‘राइट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी’- म्हणजेच ‘जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क! त्या काळी भारतातल्या लोकशाहीला पायदळी तुडविण्याचा प्रयत्न केला गेला. देशातली न्यायालये, प्रत्येक घटनादत्त संस्था, प्रकाशन संस्था - वर्तमानपत्रे, अशा सर्वांवर नियंत्रण, अंकूश लावण्यात आले होते. लावलेल्या सेन्सॉरशिपमुळे सरकारच्या स्वीकृतीविना काहीही छापणे, प्रसिद्ध करणे शक्य नव्हते. मला आठवतेय, त्याकाळामध्ये लोकप्रिय गायक किशोर कुमार यांनी सरकारची ‘‘वाहवाह’’, करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. असे अनेक प्रकारचे प्रयत्न केले, हजारो लोकांना अटक केली गेली आणि लाखों लोकांवर अत्याचार केल्यानंतरही भारतातल्या लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास डळमळीत झाला नाही की हा विश्वास कणभरही कमी झाला नाही. भारतातल्या आपल्या लोकांवर अनेक युगांपासून जे लोकशाहीचे संस्कार झाले आहेत, सर्वांमध्ये लोकशाहीची जी भावना नसा-नसांमध्ये भिनली आहे, शेवटी त्याच भावनेचा विजय झाला. भारतातल्या लोकांनी लोकशाही पद्धतीनेच आणीबाणी हटवून, पुन्हा एकदा लोकशाहीची स्थापना केली. हुकूमशाहीच्या मानसिकतेचा, हुकूमशाहीच्या वृत्ती-प्रवृत्तीचा लोकशाहीच्या पद्धतीने पराभव केला जाणे, असे उदाहरण संपूर्ण जगामध्ये पहायला मिळणे अवघड आहे. आणीबाणीच्या काळामध्ये देशवासियांच्या संघर्षाचे साक्षीदार होण्याचे, लोकशाहीचा एक सैनिक या नात्याने - या घटनेचा भागीदार होण्याचे भाग्य मलाही मिळायचे होते. आज, ज्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करीत आहे, त्यावेळीही आणीबाणीचा तो भयावह काळ आपण कधीच विसरून चालणार नाही. आगामी पिढ्यांनाही त्याचे विस्मरण होवू नये. अमृत महोत्सव म्हणजे शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून झालेल्या मुक्ततेची विजयी गाथाच आहे, असे नाही ; तर स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांच्या प्रवासाचाही त्यामध्ये सहभाग आहे. इतिहासाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यांकडून नवे काही शिकून, आपण पुढे जात असतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या जीवनात कधी ना कधी आकाशाशी संबंधित कोणती ना कोणती, कल्पना मनात आली नाही, असे फारच विरळा उदाहरण असेल. बहुतेक प्रत्येकाच्या मनात आकाशाशी संबंधित एखादी तरी कल्पना नक्कीच आली असणार. लहानपणी प्रत्येकालाच आकाशातल्या चंद्र-ता-यांच्या कथा आकर्षित करतात. युवकांना आकाशाला गवसणी घालत, स्वप्नांना साकार करण्याचा पर्याय असतो. आज आपला भारत ज्यावेळी इतक्या सा-या क्षेत्रांमध्ये यश मिळवून आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यावेळी आकाश, अथवा अंतराळ ही क्षेत्रे अस्पर्शित राहतील, हे कसे काय शक्य आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित अनेक मोठी कामे पार पडली आहेत. देशाच्या याच यशापैकी एक म्हणजे, ‘ इन-स्पेस’ या नावाच्या संस्थेची निर्मिती आहे. ही एक अशी एजन्सी आहे की, अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी असलेल्या नव्या संधींना प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. या कामासाठी प्रारंभीच देशातल्या युवा वर्गाला विशेषत्वाने आकर्षित केले आहे. या क्षेत्राशी जोडले गेलेल्या अनेक युवकांचे संदेश यावेळी मला मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मी ‘इन-स्पेस’च्या मुख्यालयाचे मी लोकार्पण करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी अनेक युवकांच्या स्टार्ट-अप्सच्या कल्पना, त्यांचा उत्साह पाहिला. त्यांच्याबरोबर मी बराच वेळ बोललो, त्यांच्याशी संवादही साधला. तुम्हालाही याविषयी, त्यांच्या कामाविषयी जाणून खूप नवल वाटेल. आता अंतराळसंबंधी स्टार्ट-अप्सची वाढणारी संख्या आणि या व्यवसायांचे होणारे वेगवान काम यांचा विचार केला तर लक्षात येते, काही वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये स्टार्ट-अप्सविषयी कोणीही साधा विचारही करीत नव्हते. आज त्यांची संख्या शंभराहून जास्त आहे. हे सर्व स्टार्ट-अप्स इतक्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर काम करीत आहेत, की त्याविषयी याआधी कोणी विचारही करीत नसायचे. त्याचबरोबर खाजगी क्षेत्रासाठी तर अशा गोष्टी करणे केवळ अशक्य आहेत, असेच मानले जात होते. याचे उदाहरण म्हणून चेन्नई आणि हैद्राबादच्या दोन स्टार्ट-अप्सचे देता येईल. ‘अग्निकुल’ आणि -‘स्कायरूट’ हे स्टार्ट-अप्स ‘लाँच व्हेईकल’ म्हणजेच ‘प्रक्षेपण वाहने’ विकसित करीत आहेत. त्यामुळे अंतराळामध्ये लहान ‘पेलोडस्’ घेवून जातील. यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा खर्च खूप कमी होईल, असा अंदाज आहे. अशाच प्रकारे हैद्राबादचे आणखी एक स्टार्ट अप्स - ध्रुव स्पेस, सॅटेलाइट डिप्लॉयर आणि सॅटेलाइटच्या उच्च तांत्रिक सौर पॅनल्सवर कार्यरत आहे. आणखी एका अंतराळाशी संबंधित स्टार्ट-अप्स- ‘दिगंतरा’चे तन्वीर अहमद यांना मी भेटलो होतो. ‘दिगंतरा’ व्दारे अंतराळ कक्षेतला कचरा चिहिृनीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता त्यांनी अंतराळामध्ये जमा होत असलेल्या
कच-याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी उपाय शोधण्याच्या तंत्रज्ञानावर काम करावे, असे आव्हानही मी दिले आहे. ‘दिगंतरा’ आणि ‘ध्रुव स्पेस’ या दोन्हींचे 30 जून रोजी इस़्रोच्या प्रक्षेपण वाहनाने आपले पहिले प्रक्षेपण करण्यात येणार आहे. याचप्रमाणे, बंगलुरूच्या एका अंतराळ स्टार्ट अप्स - अस्ट्रेमच्या स्थापनकर्त्या नेहा यांनी अतिशय कमालीच्या कल्पनेवर काम सुरू केले आहे. त्यासाठी त्यांना तुलनेनं खूपच कमी गुंतवणूक खर्च आला असेल. या तंत्रज्ञानाला संपूर्ण जगभरातून मागणी येवू शकते.
मित्रांनो,
इन- स्पेस कार्यक्रमामध्ये मेहसाणा इथल्या शाळेतली कन्या तन्वी पटेल, हिलाही मी भेटलो. ती एका खूप छोट्या उपग्रहाशी संबंधित काम करीत आहे. आगामी काही महिन्यांमध्येच तिचा उपग्रह अंतराळामध्ये प्रक्षेपित होणार आहे. तन्वीने मला गुजरातीमधून अतिशय सहजतेने स्वतः केलेल्या कामाविषयी माहिती दिली. तन्वीप्रमाणे देशातले जवळपास साडेसातशे शालेय विद्यार्थी, अमृत महोत्सवामध्ये अशाच 75 उपगृहावर काम करीत आहेत, विशेष आनंदाची बातमी म्हणजे, यामध्ये बहुतांश विद्यार्थी देशातल्या लहान-लहान शहरांतले आहेत.
मित्रांनो,
ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ मध्ये आता एका अशा विषयावर बोलणार आहे की, तो विषय ऐकून आपल्या सर्वांचे मन प्रफल्लित होईल आणि आपल्याला प्रेरणाही मिळेल. गेल्या काही दिवसांपूर्वी आपले ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोपडा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ऑलिपिंकनंतरही ते एकापाठोपाठ एक, यशाचे नव-नवीन विक्रम स्थापित करीत आहेत. इतकंच नाही, तर त्यांनी आपलाच ‘जॅव्हेलीन थ्रो’चा म्हणजेच भाला फेकीचा विक्रम मोडला आहे. क्यओर्तने क्रीडा स्पर्धेमध्ये नीरज यांनी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली आहे. क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी हवामान अतिशय प्रतिकूल असतानाही नीरज चोपडा यांनी हे सुवर्णपदक जिंकले. असे प्रचंड धैर्य दाखवणे, हीच आजच्या युवकाची खरी ओळख आहे. स्टार्ट-अप्सपासून ते क्रीडा जगतापर्यंत भारताचे युवक नव-नवीन विक्रम तयार करीत आहेत. अलिकडेच आयोजित केलेल्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’तही आपल्या खेळाडूंनी अनेक नवीन विक्रम नोंदवले आहेत, या खेळांमध्ये एकूण नवीन 12 विक्रम नोंदवले गेले. इतकेच नाही तर, यापैकी 11 विक्रम महिला खेळाडूंच्या नाववर जमा झाले आहेत, हे जाणून तुम्हा मंडळींना आनंद वाटेल. मणीपूरच्या एम. मार्टिना देवी यांनी भारत्तोलनमध्ये आठ विक्रम नोंदवले आहेत.
याचप्रमाणे संजना, सोनाक्षी आणि भावना यांनीही आपले वेगवेगळे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आगामी काळामध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पत- प्रतिष्ठा किती वाढणार आहे, हे या खेळाडूंनी आपल्या कठोर परिश्रमांनी दाखवून दिलं आहे. या सर्व क्रीडापटूंचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना भविष्यातल्या स्पर्धांसाठी शुभेच्छाही देतो. मित्रांनो, खेलो इंडिया युवा स्पर्धेची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, यावेळीही असे अनेक प्रतिभावान खेळाडू समोर आले की, त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप कठीण संघर्ष केला आणि यशोशिखर गाठले. त्यांच्या यशामध्ये, त्यांचे कुटुंबिय, आणि त्यांच्या माता-पित्यांचीही मोठी भूमिका आहे.
70 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा, श्रीनगरचा आदिल अल्ताफ याचे पिता टेलरिंगचे काम करतात. मात्र त्यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. आज आदिलने आपल्या पित्याची मान उंचावली आहे आणि संपूर्ण जम्मू-काश्मिरसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा चेन्नईचा एल. धनुषचे वडीलही साधे सुतारकाम करतात. सांगलीची कन्या काजोल सरगारचे वडील चहा विक्रीचे काम करतात. काजोल आपल्या वडिलांच्या कामात मदतही करते आणि ती वेटलिफ्टिंगचा सरावही करीत होती. तिने आणि तिच्या कुटुंबाने घेतलेले परिश्रम कारणी लागले आणि काजोलनं सर्वांकडून शाबासकी मिळवली. अगदी याचप्रमाणे नवलपूर्ण काम रोहतकच्या तनूने केलं आहे. तनूचे वडील राजबीर सिंह रोहतकमध्ये एका शाळेच्या बसचे चालक आहेत. तनूने कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं , आपल्या वडिलांचं स्वप्न सत्यामध्ये आणून दाखवलं .
मित्रांनो, क्रीडा जगतामध्ये आता भारतीय क्रीडापटूंचा दबदबा वाढतोय, त्याचबरोबर भारतीय क्रीडा प्रकारांनाही नवीन ओळख मिळत आहे. यंदा खेलो इंडिया युवा स्पर्धांमध्ये ऑलिपिंकमध्ये होणा-या स्पर्धांशिवाय पाच स्वदेशी क्रीडांच्या स्पर्धांचाही समावेश केला होता. हे पाच खेळ आहेत - गतका, थांग ता, योगासन, कलरीपायट्टू आणि मल्लखांब.
मित्रांनो,
भारतामध्ये अशा प्रकारची क्रीडास्पर्धा भरविण्यात येणार आहे की, ज्या खेळाचा जन्म अनेक युगांपूर्वी आपल्याच देशामध्ये झाला होता. या स्पर्धेचे आयोजन 28 जुलैपासून होत आहे. ही स्पर्धा आहे बुद्धिबळ ऑलिंपियाड! खेळ आणि तंदुरूस्ती या विषयावरची आजची आपली ही चर्चा आणखी एक व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होवू शकणार नाही. हे नाव आहे- तेलंगणाच्या पर्वतारोही पूर्णा मालावथ ! पूर्णा यांनी ‘सेवेन समिटस् चॅलेंज’ पूर्ण करून विजयाचा ध्वज फडकवला आहे. सेवेन समिटस् चॅलेंज म्हणजे जगातल्या सर्वात अवघड आणि सर्वात उंच सात पर्वतांवर चढाई करण्याचे आव्हान पूर्ण करणे. पूर्णा यांनी आपल्या दुदर्म्य धाडसाने उत्तर अमेरिकेतल्या सर्वात उंच पर्वतावर - ‘माउंट देनाली’वर चढाई यशस्वी करून दाखवली आणि देशाचा अभिमान वाढवला आहे. पूर्णा, या भारतकन्येने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचा पराक्रम केला आहे.
मित्रांनो,
आता खेळांचा विषय निघालाच आहे तर मी आज भारताच्या सर्वात प्रतिभावान क्रिकेट खेळाडूंपैकी एक असेलल्या, मिताली राज बद्दल काही बोलू इच्छितो. तिने याच महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आणि या बातमीने अनेक क्रीडारसिक भावूक झाले आहेत.मिताली केवळ एक अत्युत्कृष्ट खेळाडू नाहीये तर ती अनेक खेळाडूंसाठी प्रेरणेचा एक मोठा स्त्रोत देखील आहे. मी मितालीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपण मन की बात या कार्यक्रमात अधूनमधून ‘कचऱ्यापासून समृद्धी’ मिळविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल चर्चा करत असतो.असेच एक उदाहरण आहे, मिझोरम राज्याची राजधानी आईजवालचे. आईजवाल या शहरात ‘चिटे लुई’ नावाची एक सुंदर नदी आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्यामुळे ही नदी घाण आणि कचऱ्याचा ढीग बनली होती. गेल्या काही वर्षांपासून या नदीला वाचविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तेथील स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक रहिवासी एकत्र येऊन ‘सेव्ह चिटे लुई’ म्हणजे चिटे लुईनदीला वाचवण्यासाठीच्या कृती योजनेनुसार काम करत आहेत. नदीचा प्रवाह स्वच्छ करण्यासाठीच्या या मोहिमेने कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. खरेतर, या नदीच्या पात्रात आणि दोन्ही किनाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिक आणि पॉलिथिनचा इतर कचरा साठला होता. नदीचा प्रवाह मोकळा करणाऱ्या संस्थेने या पॉलिथिनचा वापर करून रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच नदीच्या पात्रातून काढण्यात आलेल्या कचऱ्यापासून मिझोरमच्या एका गावात, त्या राज्यातला सर्वात पहिला प्लॅस्टिकपासून निर्मित रस्ता तयार झाला. म्हणजेच स्वच्छता देखील झाली आणि विकास देखील झाला.
मित्रांनो,
पुदुचेरीच्या युवकांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असाच एक उपक्रम हाती घेतला आहे. पुदुचेरी हे शहर समुद्रकिनारी वसलेले आहे. तिथले देखणे किनारे आणि समुद्राचे देखावे पाहण्यासाठी फार मोठ्या संख्येने पर्यटक तिथे येतात.पुदुचेरीच्या समुद्र किनाऱ्यावर देखील प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे घाण वाढत चालली होती. आणि म्हणून आपला समुद्र, किनारे तसेच तिथली स्थानिक परिसंस्था वाचविण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांनी ‘रिसायक्लिंग फॉर लाईफ’ अभियान सुरु केले आहे. आज घडीला पुदुचेरीच्या कराईकल भागात रोज हजारो किलो संकलित केला जातो, त्याचे वर्गीकरण करण्यात येते. त्यातील जैविक कचऱ्याचा वापर खते निर्माण करण्यासाठी केला जातो. इतर गोष्टी वेगळ्या करून त्यांच्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येते. अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी तर आहेतच शिवाय ते भारताच्या ‘एकल वापराच्या प्लॅस्टिक’ विरुद्ध सुरु असलेल्या अभियानाला अधिक चालना देखील देतात.
मित्रांनो,
आज मी जेव्हा तुमच्याशी बातचीत करतो आहे त्याचवेळेस हिमाचल प्रदेशात एक अत्यंत अनोखी सायकल रॅली देखील सुरु आहे.त्याबद्दल आज मी तुम्हांला अधिक माहिती देणार आहे. स्वच्छतेचा संदेश घेऊन सायकलस्वारांचा एक गट सिमल्याहून मंडीला जाण्यासाठी निघाला आहे. हे लोक डोंगराळ भागातील अवघड रस्त्यांवरून सुमारे पावणेदोनशे किलोमीटरचे हे अंतर सायकलवरून पार करणार आहेत. या गटात लहान मुले देखील आहेत तसेच वरिष्ठ नागरिक देखील आहेत.आपले पर्यावरण स्वच्छ असले, आपले डोंगर, नद्या, समुद्र स्वच्छ असले तर आपले आरोग्य देखील अधिक उत्तम राहते. तुम्ही देखील या दिशेने सुरु असलेल्या तुमच्या प्रयत्नांची माहिती लिहून मला नक्की कळवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशात सध्या मान्सून हळूहळू जोर धरत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढते आहे. ही वेळ, ‘जल’ आणि ‘जल संरक्षण’ यांच्या संदर्भात विशेष प्रयत्न करण्याची देखील आहे. आपल्या देशात तर सर्व समाजाने मिळून शतकानुशतके ही जबाबदारी पेलली आहे. तुमच्या लक्षात असेल, की आपण ‘मन की बात’ मध्ये एका भागात स्टेप वेल म्हणजे विहिरींच्या वारशाबाबत चर्चा केली होती. ज्या मोठ्या आकाराच्या विहिरींच्या पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधून काढलेल्या असतात त्यांना बावडी असे म्हणतात. राजस्थानात उदयपुर येथे अशीच एक शेकडो वर्ष जुनी बावडी आहे – ‘सुलतान की बावडी’. राव सुलतान सिंह यांनी ती खोदून घेतली होती. मात्र, तिच्याकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे तो परिसर हळूहळू निर्जन होत गेला आणि तिथे कचरा-घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. एके दिवशी काही तरुण फिरतफिरत या जागेपर्यंत पोहोचले आणि या विहिरीची दशा पाहून अत्यंत दुःखी झाले. त्या तरुणांनी त्याच क्षणी सुलतान की बावडीचे रूप आणि नशीब बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या या मोहिमेला नाव दिले- ‘सुलतान से सूर-तान’. तुम्ही विचार कराल की हे सूर-तान काय आहे? तर या युवकांनी त्यांच्या प्रयत्नांतून केवळ या विहिरीचा कायाकल्प घडवून आणला नाही तर त्यांनी या विहिरीला संगीताच्या सूर आणि तालांशी जोडले. ‘सुलतान की बावडी’च्या साफसफाईनंतर तिचे सुशोभीकरण केले गेले आणि तिथे सुरांचा आणि संगीताचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळाली की आता परदेशातून देखील लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात. या यशस्वी अभियानाबाबतची एक विशेष गोष्ट अशी की या अभियानाची सुरुवात करणारे सर्व तरुण चार्टर्ड अकाउंटंट आहेत. योगायोगाने, येत्या काही दिवसांतच चार्टर्ड अकाउंटंट दिन येऊ घातला आहे. मी देशातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट ना यानिमित्त आत्ताच शुभेच्छा देतो. आपण आपल्या जल-स्त्रोतांना अशाच प्रकारे संगीत आणि इतर सामाजिक कार्यक्रमांशी जोडून घेऊन त्यांच्या बाबत जागरूकतेची भावना निर्माण करू शकतो. जल संरक्षण हे खरेतर जीवनाचे संरक्षण आहे. आजकाल कितीतरी नद्यांचे महोत्सव आयोजित होऊ लागले आहेत हे तुम्ही पाहिले असेल. तुम्ही सर्वांनी आपापल्या शहरांमध्ये अशा प्रकारचे जे जल-स्त्रोत असतील त्यांच्या परिसरात कोणत्या ना कोणत्या उपक्रमाचे आयोजन अवश्य करा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या उपनिषदांमध्ये एक जीवन मंत्र दिलेला आहे – चरैवेति-चरैवेति-चरैवेति. तुम्ही देखील हा मंत्र ऐकलेला असेल. त्याचा अर्थ आहे – चालत रहा- चालत रहा. हा मंत्र आपल्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे कारण सतत चालत राहणे, गतिशील असणे हा आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. एक देश म्हणून, आपण हजारो वर्षांची विकास यात्रा करून इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत. एक समाज म्हणून आपण नेहमीच नवे विचार, नवे बदल यांचा स्वीकार करून पुढे आलो आहोत. याच्या पाठीमागे आपली सांस्कृतिक गतिशीलता आणि तीर्थयात्रांचे फार मोठे योगदान आहे. आणि म्हणून तर आपल्या ऋषी-मुनींनी, तीर्थयात्रेसारख्या धार्मिक जबाबदाऱ्या आपल्यावर सोपविलेल्या आहेत.आपण सर्वजण वेगवेगळ्या तीर्थयात्रा करत असतो.यावर्षी चारधाम यात्रेमध्ये किती प्रचंड संख्येने भाविक सहभागी झाले ते तुम्ही सर्वांनी पाहिले असेलच.आपल्या देशात वेळोवेळी वेगवेगळ्या देवांच्या यात्रा देखील निघत असतात.देवांच्या यात्रा, म्हणजे केवळ भाविकच नव्हे तर आपले देव देखील यात्रेसाठी निघतात. आता काही दिवसांतच म्हणजे 1 जुलैपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होणार आहे. ओदिशामधील पुरीच्या या यात्रेची माहिती तर प्रत्येक देशवासियाला आहे. या प्रसंगी पुरीला जाता यावे असे प्रत्येक भाविकाला वाटत असते. इतर राज्यांमध्ये देखील अत्यंत उत्साहाने जगन्नाथाची यात्रा काढण्यात येते. आषाढ महिन्यातील द्वितीयेपासून भगवान जगन्नाथांची यात्रा सुरु होते. आपल्या ग्रंथांमध्ये ‘आषाढस्य द्वितीय दिवसे....रथयात्रा’ अशा प्रकारचे संस्कृत श्लोक आपल्याला वाचायला मिळतात. गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात देखील दर वर्षी आषाढ द्वितीयेपासून रथयात्रा सुरु होते. मी गुजरातेत असताना, मला देखील दर वर्षी या रथयात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभत होते. आषाढ द्वितीया, जिला आषाढ बीज देखील म्हणतात त्याच दिवशी कच्छ समाजाचे नववर्ष देखील सुरु होते. मी माझ्या सर्व कच्छी बंधू-भगिनींना नववर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. माझ्यासाठी ती तिथी अजून एका कारणासाठी विशेष महत्त्वाची आहे, मला आठवतंय, आषाढ द्वितीयेच्या एक दिवस आधी म्हणजे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आम्ही गुजरातमध्ये एका संस्कृत उत्सवाची सुरुवात केली होती. या उत्सवात संस्कृत भाषेतील गीत-संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाचे नाव आहे ‘आषाढस्य प्रथम दिवसे.’ या उत्सवाला हे विशिष्ट नाव देण्याचे देखील खास कारण आहे. खरेतर, संस्कृतभाषेतील महान कवी कालिदास यांनी आषाढ महिन्यापासून वर्ष ऋतूच्या आगमन प्रसंगी मेघदूत नावाचे महाकाव्य लिहिले होते. मेघदूतात एक श्लोक आहे – आषाढस्य प्रथम दिवसे, मेघम् आश्लिष्ट सानुम् म्हणजे आषाढ मासाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना वेधून बसलेल्या मेघा, आणि हाच श्लोक या उत्सवाच्या आयोजनाचा आधार झाला होता.
मित्रांनो,
अहमदाबाद असो वा पुरी, भगवान जगन्नाथ त्यांच्या या यात्रेच्या माध्यमातून आपल्याला अनेक सखोल मानवी शिकवण देत असतात.भगवान जगन्नाथ जगाचे स्वामी तर आहेतच, पण त्यांच्या या यात्रेत गरीब आणि वंचित समुदायांचा विशेष सहभाग असतो. प्रत्यक्ष भगवान देखील समाजाच्या प्रत्येक घटकासोबत आणि प्रत्येक व्यक्तीसोबत चालतात. अशाच प्रकारे आपल्या देशात ज्या विविध प्रकारच्या यात्रा होतात त्यांच्यामध्ये गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेदभाव बघायला मिळत नाही. या सर्व भेद्भावांपेक्षा अधिक उच्च पातळी गाठून यात्राच सर्वात महत्त्वाची ठरते. उदाहरण सांगायचे तर, महाराष्ट्रातल्या पंढरपूरच्या यात्रेबद्दल तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकले असेल. पंढरपूरच्या यात्रेत कोणी मोठा नसतो आणि कोणी लहान नसतो. यात्रेतला प्रत्येक जण वारकरी असतो, विठ्ठलाचा भक्त असतो. आता चारच दिवसांनी अमरनाथ यात्रा देखील सुरु होते आहे.संपूर्ण देशभरातील श्रद्धाळू भाविक, अमरनाथ यात्रेसाठी जम्मू-काश्मीरला पोहोचतात. जम्मू-काश्मीरची स्थानिक जनतादेखील तेवढ्याच उत्साहाने या तीर्थयात्रेची जबाबदारी पार पाडते आणि यात्रेकरूंची सर्व प्रकारे मदत करते.
मित्रांनो,
दक्षिण भारतात, शबरीमाला यात्रेला देखील असेच विशेष महत्त्व आहे. शबरीमालेच्या डोंगरावर असलेल्या भगवान अय्यप्पा यांचे दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचण्याचा मार्ग संपूर्णपणे घनदाट जंगलांनी वेढलेला होता त्या काळापासून ही यात्रा सुरु आहे. आजच्या काळात देखील जेव्हा लोक या यात्रेसाठी तिथे जातात तेव्हा त्यांच्या धार्मिक विधींपासून, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय करण्यापर्यंत, तेथील गरिबांना उपजीविकेच्या कितीतरी संधी निर्माण होतात. म्हणजेच, या तीर्थयात्रा प्रत्यक्षात आपल्याला गरिबांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देतात आणि गरिबांसाठी देखील त्या तितक्याच हितकारक ठरतात. म्हणूनच आज देश देखील आता या अध्यात्मिक यात्रांच्या आयोजनात, भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी इतके प्रयत्न करत आहे. तुम्ही देखील अशा एखाद्या यात्रेला जाल तेव्हा तुम्हांला अध्यात्मासोबत, एक भारत-श्रेष्ठ भारत याचे देखील दर्शन होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नेहमीप्रमाणेच या वेळी देखील ‘मन की बात’च्या माध्यमातून तुम्हां सर्वांशी जोडले जाण्याचा हा अनुभव अत्यंत सुखद होता.आपण देशवासीयांची यशस्वी कामगिरी आणि प्रगतीची चर्चा केली. या सर्वांसोबतच आपल्याला कोरोनाविरुध्द सावधगिरी बाळगण्याची देखील काळजी घ्यायची आहे. अर्थात, आपल्या देशाकडे कोरोनाप्रतिबंधक लसीचे संरक्षक कवच आहे ही सर्वात समाधानकारक गोष्ट आहे. आपण देशवासियांना या लसीच्या 200 कोटी मात्रा देण्याच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचतो आहोत. देशात सावधगिरीची मात्रा देण्याचे काम देखील वेगात सुरु आहे. जर लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर आता तुमच्या सावधगिरीच्या मात्रेची वेळ झाली असेल तर तुम्ही ही तिसरी मात्रा अवश्य घेतली पाहिजे. तुमच्या कुटुंबातील सर्वांना, विशेषतः वृद्धांना ही सावधगिरीची मात्रा अवश्य द्या. आपल्याला वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच मास्कचा योग्य वापर करणे या गोष्टी देखील पाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजूबाजूला पसरलेल्या घाणीमुळे जे रोग होऊ शकतात त्यापासून देखील आपल्याला सावध राहणे आवश्यक आहे. तुम्ही सर्वांनी सजग असा, निरोगी रहा आणि अशाच उत्साहाने पुढे जात रहा. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा एकदा भेटूच, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद, नमस्कार!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज पुन्हा एकदा ‘मन की बात’ च्या माध्यमातून आपणा सर्वांची, माझ्या कोट्यवधी कुटुंबियांची भेट घेण्याची संधी मला लाभली आहे. ‘मन की बात’ मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने एक अशी कामगिरी केली आहे, जी आपल्या सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. भारताच्या सामर्थ्याप्रती नवा आत्मविश्वास निर्माण करणारी अशी ही कामगिरी आहे. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाच्या कोणत्याही फलंदाजाने शतक फटकावल्याचे ऐकून तुम्हाला आनंद होत असेलच. यावेळी मात्र भारताने एका वेगळ्याच मैदानात शतक झळकावले आहे आणि ते खूपच विशेष असे आहे. या महिन्याच्या 5 तारखेला देशातील युनिकॉर्नची संख्या 100 वर पोहोचली आहे. एक युनिकॉर्न, म्हणजे किमान साडे सात हजार कोटींचा स्टार्टअप, हे तुम्हाला माहिती असेलच. या युनिकॉर्न्सचे एकूण मूल्य 330 अब्ज डॉलर्सपेक्षा म्हणजे 25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. आणखी एका गोष्टीचे तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती म्हणजे आपल्या एकूण युनिकॉर्नपैकी 44 युनिकॉर्न गेल्या वर्षीच तयार झाले होते. इतकेच नाही तर या वर्षातील 3-4 महिन्यांत आणखी 14 नवीन युनिकॉर्न तयार झाले. याचा अर्थ असा की जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे. येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत. ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्ट-अप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे. आज, भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहान नगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. भारतात ज्याच्याकडे नाविन्यपूर्ण कल्पना आहे, तो संपत्ती निर्माण करू शकतो, हे यावरून दिसून येते.
मित्रहो, देशाच्या या यशासाठी देशाची युवाशक्ती, देशातील प्रतिभा आणि देशाचे सरकार असे सर्व मिळून एकत्रित प्रयत्न करत आहेत, यात प्रत्येकाचे योगदान आहे. पण या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, स्टार्ट-अप जगतात योग्य मार्गदर्शन खूपच महत्वाचे आहे. एक चांगला मार्गदर्शक स्टार्टअपला यशाच्या नव्या शिखरांवर नेऊ शकतो. योग्य निर्णय घेण्यासाठी तो संस्थापकांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. भारतात असे अनेक मार्गदर्शक आहेत, ज्यांनी वाढत्या स्टार्ट-अप्ससाठी स्वतःला समर्पित केले आहे आणि याचा मला अभिमान वाटतो.
श्रीधर वेंबुजी यांना नुकताच पद्म पुरस्कार मिळाला आहे. ते स्वत: एक यशस्वी उद्योजक आहेत, पण आता त्यांनी आणखी काही उद्योजकांना घडविण्याचे कामही हाती घेतले आहे. श्रीधरजींनी आपल्या कामाची सुरुवात ग्रामीण भागातून केली आहे. गावातच राहून ग्रामीण तरुणांना या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. आपल्याकडे मदन पडाकी यांच्यासारखेही लोक आहेत, ज्यांनी ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी 2014 साली वन-ब्रिज नावाचा मंच तयार केला. आजघडीला दक्षिण आणि पूर्व भारतातील 75 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वन-ब्रिज उपलब्ध आहे. या मंचाशी निगडित असलेले 9000 पेक्षा जास्त ग्रामीण उद्योजक ग्रामीण भागातील ग्राहकांना आपली सेवा देत आहेत. मीरा शेनॉय हे सुद्धा असेच आणखी एक उदाहरण आहे. त्या ग्रामीण, आदिवासी आणि दिव्यांगयुवकांसाठी मार्केट लिंक्ड स्किल्स ट्रेनिंगच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. मी इथे अगदी मोजकीच नावे घेतली आहेत, पण आज आपल्याकडे गुरूंची कमतरता नाही. देशात स्टार्ट-अपसाठी संपूर्ण आधारभूत यंत्रणा तयार केली जाते आहे, ही आपल्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आगामी काळात स्टार्ट-अप जगतात आपल्यालाभारताच्या प्रगतीची नवीझेप पाहायला मिळेल, अशी खात्री मला वाटते.
मित्रहो, काही दिवसांपूर्वी मला एक मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट मिळाली, ज्यामध्ये देशवासीयांची सर्जनशीलता आणि कलात्मक प्रतिभा एकवटलेली आहे. तमिळनाडू येथील तंजावर मधल्या एका स्वयंसहायता गटाने ती भेट मला पाठवली आहे. या भेटीत भारतीयत्वाचा सुगंध आहे आणि मातृशक्तीचा आशीर्वाद आहे, माझ्याबद्दल त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना आहे. ही भेट म्हणजे तंजावरची एक खास बाहुली आहे, जिला भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग देखील मिळाला आहे. स्थानिक संस्कृतीशी नाळ जपणारी ही भेट मला पाठवल्याबद्दल मी तंजावरच्या स्वयं-सहायता गटाचे विशेष आभार मानतो. खरे तर मित्रहो, तंजावरची ही बाहुली सुंदर आहे आणि आपल्या या सौंदर्यासह ती स्त्री सक्षमीकरणाची नवी गाथाही लिहित आहे. तंजावरमध्ये महिला स्वयं-सहायता गटांची दुकाने आणि केंद्रेही सुरू होत आहेत. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांचे जीवनमान बदलले आहे. अशा केंद्रांच्या आणि स्टोअर्सच्या मदतीने महिला आता थेट ग्राहकांना आपली उत्पादने विकू शकतील.
या उपक्रमाला 'थरगाईगल कैविनाई पोरुत्तकल वीरप्पानई अंगडी' असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे 22 स्वयं-सहायता गट या उपक्रमाशी संलग्न आहेत. महिला स्वयं-सहायता गट तसेच महिला बचत गटांची ही दुकाने तंजावरमध्ये अतिशय मोक्याच्या जागी उघडली आहेत, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. या दुकानांची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारीही महिला घेत आहेत. महिलांचे हे बचत गट तंजावर बाहुली आणि कांस्याचे दिवे अशा जीआय उत्पादनांशिवाय खेळणी, चटई आणि कृत्रिम दागिने सुद्धा तयार करतात. अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही, तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे. 'मन की बात'च्या श्रोत्यांनाही माझी एक विनंती आहे. तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहिती देखील गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. असे केल्यानेतुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्यायोगे'आत्मनिर्भर भारत मोहिमेला' चालनाही मिळेल.
मित्रहो, आपल्या देशात अनेक भाषा, लिपी आणि बोलींचा समृद्ध खजिना आहे. वेगवेगळ्या प्रदेशातील वैविध्यपूर्ण पेहराव, खाद्यपदार्थ आणि संस्कृती ही आपली ओळख आहे. ही विविधता, हे वैविध्य, एक राष्ट्र म्हणून आपल्याला अधिक समर्थ करते आणि आपल्यातील एकजूट कायम राखते. याच्याशी संबंधित एक अतिशय प्रेरक उदाहरण सांगता येईल कल्पनाचे. तिच्याबद्दल मी तुम्हां सर्वांना सांगू इच्छितो. तिचे नाव कल्पना आहे, पण तिने घेतलेले प्रयास हे 'एक भारत श्रेष्ठ भारत' या वास्तविक भावनेने भारलेले आहेत. तर आपली ही कल्पना कर्नाटक राज्यातून नुकतीच 10 व्या इयत्तेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. पण तिच्या या यशाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे कल्पनाला काही काळापूर्वी कन्नड भाषा येत नव्हती. अवघ्या तीन महिन्यांत ती कन्नड भाषा तर शिकलीच, पण तिने चक्क 92 वा क्रमांकही पटकावला. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. तिच्याबद्दल अशा आणखीही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चकित करतील आणि प्रेरणाही देतील. कल्पना ही मूळची उत्तराखंडमधील जोशी मठची रहिवासी आहे. तिला याआधी टीबीचा आजार होता आणि तिसऱ्या इयत्तेत असताना तिची दृष्टीही गेली होती, पण म्हणतात ना, 'इच्छा तिथे मार्ग'. नंतरच्या काळात कल्पना म्हैसूरच्या रहिवासी असणाऱ्या प्रोफेसर तारमूर्ती यांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला केवळ प्रोत्साहनच दिले नाही तर सर्व प्रकारे मदतही केली. आज तिने निव्वळ मेहनतीच्या बळावर आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. कल्पनाच्या या धाडसाबद्दल मी तिचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे देशाच्या भाषिक वैविध्याला बळ देण्याचे काम करत आहेत. पश्चिम बंगालमधील पुरुलिया येथील श्रीपती तुडू जी हे असेच एक सहकारी आहेत. तुडू जी हे पुरुलियाच्या सिद्धो-कानो-बिरसा विद्यापीठात संथाली भाषेचे प्राध्यापक आहेत. संथाली समाजासाठी त्यांनी स्वतःच्या 'ओल चिकी' लिपीमध्ये देशाच्या संविधानाची प्रत तयार केली आहे. श्रीपती तुडूजी म्हणतात की आपली राज्यघटना आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपली राज्यघटना माहिती असलीच पाहिजे. याच विचारातून त्यांनी संथाली समाजासाठी स्वतःच्या लिपीत संविधानाची प्रत तयार करून ती भेट दिली. श्रीपतीजींच्या या विचारसरणीचे आणि त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेचे हे यथार्थ उदाहरण आहे. या भावनेला पुढे नेणाऱ्या अशा अनेक प्रयत्नांची माहिती तुम्हाला 'एक भारत-श्रेष्ठ भारत' या संकेतस्थळावर मिळेल. तिथे तुम्हाला खाद्य, कला, संस्कृती, पर्यटन अशा अनेक विषयांवरील उपक्रमांची माहिती मिळेल. तुम्हीही या उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकता, यामुळे तुम्हाला आपल्या देशाबद्दल माहिती मिळेल आणि आपल्या देशातील विविधतेचीही जाणीव होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या आपल्या देशात उत्तराखंडमध्ये 'चार-धाम'ची पवित्र यात्रा सुरू आहे. 'चार-धाम' आणि विशेषतः केदारनाथमध्ये दररोज हजारो भाविक दाखल होत आहेत. 'चार-धाम यात्रे'च्या आपल्या सुखद अनुभवांबद्दल ते सांगत आहेत. पण केदारनाथमध्ये काही यात्रेकरूंनी केलेल्या अस्वच्छतेमुळे भाविक खूप दुःखी आहेत, हे सुद्धा मी पाहिले आहे. सोशल मीडियावरसुद्धा अनेकांनी आपली मते मांडली आहेत. आपण पवित्र अशा यात्रेला जातो आणि तिथे घाणीचे, कचऱ्याचे ढीग असतात, हे योग्य नाही. पण मित्रहो, या तक्रारी येत असताना इतर अनेक ठिकाणी चांगले चित्रही पाहायला मिळते आहे. जिथे श्रद्धा आहे, तिथे सृजन आणि सकारात्मकता सुद्धा आहे. बाबा केदारजींच्या धामी पूजा-अर्चा करण्याबरोबरच स्वच्छतेची साधना करणारेही अनेक भक्त आहेत. कुणी मुक्कामाच्या ठिकाणी साफसफाई करत आहेत, तर कुणी प्रवाशांच्या मार्गावरील कचरा उचलत आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या चमूसोबत अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही तिथे काम करत आहेत. मित्रहो,आपल्याकडे तीर्थयात्रा महत्वाची आहे, त्याचप्रमाणे तीर्थ सेवेचेही महत्त्व सांगितले आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की तीर्थ सेवेशिवाय तीर्थयात्राही अपूर्ण आहे. देवभूमी उत्तराखंडमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांनी स्वत:ला स्वच्छता आणि सेवेच्या कामी वाहून घेतलेले आहे. रूद्र प्रयाग येथे राहणारे श्री. मनोज बैजवाल हे असेच एक प्रेरक व्यक्तिमत्व आहे. गेली 25 वर्षे त्यांनी पर्यावरणाची देखभाल करण्याचा विडा उचलला आहे. स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच पवित्र स्थळे प्लास्टिकमुक्त करण्याच्या कामीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. गुप्तकाशीमध्ये राहणारे सुरेंद्र बगवाडी जी यांनीही स्वच्छता हा आपला जीवन मंत्र असल्याचे मानले आहे. ते गुप्तकाशीमध्ये नियमितपणे स्वच्छता कार्यक्रम राबवतात, आणि माझ्या कानावर आले आहे की त्यांनी आपल्या या मोहिमेलाही 'मन की बात' असे नाव दिले आहे. अशाच प्रकारे देवर गावातील चंपादेवी गेल्या तीन वर्षांपासून आपल्या गावातील महिलांना कचरा व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. चंपाजींनीही शेकडो झाडे लावली आहेत आणि त्यांनी आपल्या मेहनतीमधून एक हिरवेगार वनक्षेत्रनिर्माण केले आहे. मित्रहो, अशा लोकांच्या प्रयत्नांमुळेच, देवभूमीचीआणि तीर्थक्षेत्रांची ती दिव्य अनुभूती टिकून राहिली आहे, जी अनुभवण्यासाठी आपण तिथे जातो. हे दिव्यत्व आणि अध्यात्मिकता जपण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपल्या देशात 'चारधाम यात्रेबरोबरच आगामी काळात 'अमरनाथ यात्रा', 'पंढरपूर यात्रा', 'जगन्नाथ यात्रा' अशा अनेक यात्रा होणार आहेत. श्रावण महिन्यात तर प्रत्येक गावात हमखास जत्रा असतेच.
मित्रांनो आपण कुठेही गेलो तरी या तीर्थक्षेत्रांचा सन्मान राखला पाहिजे. तेथील शुचिता, स्वच्छता, पवित्र वातावरण हे आपण कधीही विसरता काम नये, ते जपले पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वच्छतेचा संकल्प लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
आता काही दिवसांनी येणारा 5 जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिवस' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाबाबत आपण आपल्या आजूबाजूला सकारात्मक चळवळी उभारल्या पाहिजेत आणि हे काम निरंतर चालणारे असले पाहिजे. तुम्ही देखील ह्या वेळी सर्वांना आपल्या समवेत घेऊन स्वच्छता व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करा. स्वतः झाड लावा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील महिन्यात 21 जून रोजी आपण 8वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करणार आहोत. यावेळी 'योग दिवसाची संकल्पना आहे - “मानवतेसाठी योग”. मी तुम्हा सर्वांना 'योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन करतो. हो! पण कोरोनाविषयी काळजी घ्या. तशी तर आता संपूर्ण जगात परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली दिसत आहे, लसीकरणाची व्याप्ती अधिकाधिक वाढत असल्याने आता लोक पूर्वीपेक्षा जास्त बाहेर पडत आहेत, त्यामुळे जगभरात योग दिवसासाठी बरीच तयारी केली जात असल्याचे पाहायला मिळते आहे.
कोरोना महामारीने आपल्या सर्वांना याची जाणीव करून दिली आहे की आपल्या जीवनात आरोग्याचे किती जास्त महत्व आहे आणि त्यात योगाचा किती महत्वाचा वाटा आहे. योगामुळे शारीरिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक स्वास्थ्य निरामय राखण्यासाठी कशी चालना मिळते, हे लोकांना कळते आहे. जगातील नामांकित व्यावसायिक व्यक्तींपासून ते चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ते सामान्य माणसांपर्यंत, सर्वजण योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवत आहेत. मला खात्री आहे की जगभरात योगाची लोकप्रियता वाढत असलेली बघताना तुम्हा सर्वांनाच आनंद होत असेल.
मित्रांनो, यावेळी देश-विदेशात 'योग दिना'निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या काही अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मला माहिती मिळाली आहे. यापैकी एक म्हणजे ‘संरक्षक वलय’ guardian ring हा एक अतिशय अनोखा कार्यक्रम असेल. यामध्ये सूर्याचे भ्रमण साजरे केले जाईल, म्हणजेच सूर्य पृथ्वीच्या विविध भागातून जसे जसे भ्रमण करत जाईल, तिथे तिथे आपण योगाद्वारे त्याचे स्वागत करू.
विविध देशांतील भारतीय संस्था तेथील स्थानिक वेळेनुसार सूर्योदयाच्या वेळी योगाचे कार्यक्रम आयोजित करतील. एका पाठोपाठ एक असे विविध देशातून कार्यक्रम सुरू होतील. पूर्वेकडून पश्चिमेकडे असा हा निरंतर प्रवास चालेल, मग तसेच कार्यक्रम देखील पुढे जात राहतील. या कार्यक्रमांचे प्रक्षेपण देखील एकामागोमाग एक जोडले जाईल, म्हणजेच हा एक प्रकारचा ‘योग प्रक्षेपण साखळी कार्यक्रमच’ असेल. तुम्ही पण हा कार्यक्रम अवश्य पहा.
मित्रांनो, यावेळी आपल्या देशाचा 'अमृत महोत्सव' लक्षात घेऊन देशातील 75 प्रमुख ठिकाणी 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चे आयोजन केले जाणार आहे. या प्रसंगी, विविध संस्था आणि अनेक देशवासीय आपापल्या स्तरावर, आपल्या विभागातील विशेष स्थानांवर काही ना काही नाविन्यपूर्ण कार्यक्रम करण्याची तयारी करत आहेत.
मी तुम्हाला सुद्धा विनंती करतो की, यावेळी योग दिन साजरा करण्यासाठी तुमच्या शहरातील, गावातील किंवा विभागातील असे कोणतेही ठिकाण निवडा, जे सर्वात विशेष असेल. हे ठिकाण एखादे प्राचीन मंदिर किंवा पर्यटन केंद्र असू शकते किंवा ते एखाद्या प्रसिद्ध नदीचा, सरोवराचा किंवा तळ्याचा किनारा देखील असू शकेल. यामुळे योगाबरोबरच आपल्या परिसराची ओळखही वाढेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल.
सध्या 'योग दिना' संदर्भात 100 दिवसांची गणना (countdown) सुरू आहे, किंवा असे म्हणा ना की वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्नांतून योगसंबंधित कार्यक्रम तीन महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाले आहेत. जसे दिल्लीत 100 व्या आणि 75 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रम झाले आहेत. तसेच, शिवसागर, आसाम येथे 50 व्या आणि हैदराबादमध्ये 25 व्या दिवशी काउंटडाउन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुम्हीही 'योग दिना'ची तयारी आत्तापासूनच सुरू करावी असे मला वाटते. अधिकाधिक लोकांना भेटा, सर्वांना 'योग दिना'च्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करा, प्रेरणा द्या. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण 'योग दिना'मध्ये उत्साहाने सहभागी व्हाल, तसेच तुमच्या दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब कराल.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी जपानला गेलो होतो. माझ्या अनेक कार्यक्रमांमुळे मला काही महान व्यक्तिमत्त्वांना भेटण्याची संधी मिळाली. त्याच्याविषयी 'मन की बात'मध्ये मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. आहेत तर ते जपानी लोक, पण त्यांना भारताविषयी कमालीची ओढ आणि प्रेम आहे. यापैकी एक म्हणजे हिरोशी कोइके जी, जे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक आहेत. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्यांनीच महाभारत प्रोजेक्ट दिग्दर्शित केलेला आहे. ह्या प्रकल्पाची सुरुवात कंबोडियामध्ये करण्यात आली आणि गेल्या 9 वर्षांपासून तो अविरत सुरू आहे. हिरोशी कोइके अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे सर्व करतात. ते दरवर्षी आशिया खंडातील एका देशात जातात आणि तेथील स्थानिक कलाकार आणि संगीतकारांच्या साथीने महाभारतातील काही भाग तयार करतात. या प्रकल्पाद्वारे त्यांनी भारत, कंबोडिया आणि इंडोनेशियासह नऊ देशांमध्ये कार्यक्रमांची निर्मिती देखील केली आहे आणि रंगमंचावर कार्यक्रम देखील सादर केले आहेत.
हिरोशी कोइके जी शास्त्रीय आणि पारंपारिक आशियाई कला सादरीकरण करणाऱ्या आणि वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना एकत्र आणतात . त्यामुळे त्याच्या कामात विविध रंग छटा पाहायला मिळतात. इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि जपानमधील कलाकार जावा नृत्य, बालीनीज नृत्य, थाई नृत्याच्या माध्यमातून ते अधिक आकर्षक बनवतात. विशेष म्हणजे यातील प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेत बोलतो आणि नृत्य दिग्दर्शन देखील अतिशय सुंदरतेने हे वैविध्य दाखवते आणि संगीतातील विविधता तर ही निर्मिती अधिकच जिवंत करते. आपल्या समाजात विविधता आणि सह-अस्तित्वाचे किती महत्त्व आहे, शांतीचे वास्तविक स्वरूप नेमके कसे असावे, हे सर्वाना दाखवावे हा त्यांचा उद्देश आहे.
याशिवाय, मी जपानमध्ये ज्या दोन इतर लोकांना भेटलो ते म्हणजे आत्सुशी मात्सुओ-जी आणि केंजी योशी-जी. हे दोघेही टीईएम प्रॉडक्शन कंपनीशी संबंधित आहेत. ही कंपनी रामायणाच्या 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या जपानी ऍनिमेशन फिल्मशी संबंधित आहे. हा प्रकल्प जपानमधील अतिशय प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक युगो साकोशी ह्यांच्याशी संबंधित होता.
सुमारे 40 वर्षांपूर्वी 1983 मध्ये त्यांना पहिल्यांदा रामायणाची माहिती मिळाली. 'रामायण' त्यांच्या हृदयाला भिडले, त्यानंतर त्यांनी त्यावर अधिक बारकाईने संशोधन सुरू केले. इतकेच नाही तर त्यांनी रामायणाच्या जपानी भाषेतील 10 वेगवेगळ्या आवृत्त्या वाचल्या आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांना रामायणाचे ऍनिमेशन देखील करायचे होते. यामध्ये भारतीय ऍनिमेटर्सनीही त्यांना खूप मदत केली. त्यांना चित्रपटात दाखवलेल्या भारतीय चालीरीती आणि परंपरांबद्दल मार्गदर्शन केले. त्यांना भारतातील लोक धोतर कसे नेसतात, साडी कशी नेसतात, केशरचना कशी करतात हे सांगण्यात आले. कुटुंबात मुले सर्वांचा, एकमेकांचा आदर कसा करतात, आशीर्वादाची परंपरा काय असते? सकाळी उठणे, आपल्या घरातील ज्येष्ठांना नमस्कार करणे, त्यांचे आशीर्वाद घेणे या सर्व गोष्टी. आता 30 वर्षांनंतर हा ऍनिमेशन चित्रपट 4K मध्ये रुपांतरीत होत आहे. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर, जपानमध्ये बसलेले लोक, ज्यांना ना आपली भाषा येते , ना आपल्या परंपरांविषयी जास्त माहिती आहे, त्यांचे आपल्या संस्कृतीबद्दलचे समर्पण, श्रद्धा, आदर फारच प्रशंसनीय आहे. कोणत्या भारतीयाला ह्याचा अभिमान वाटणार नाही?
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘स्व’ च्या पुढे जाऊन समाजाची सेवा करण्याचा मंत्र, ‘समाजासाठी स्व’ हा मंत्र आपल्या संस्कारांचा भाग आहे. आपल्या देशातील असंख्य लोकांनी या मंत्राला आपले जीवन ध्येय बनवले आहे. आंध्र प्रदेशातील मरकापुरम येथे राहणारे आपले मित्र राम भूपाल रेड्डी यांच्याविषयी मला माहिती मिळाली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रामभूपाल रेड्डी जी यांनी निवृत्तीनंतर मिळालेली आपली सर्व कमाई मुलींच्या शिक्षणासाठी दान केली आहे. त्यांनी 'सुकन्या समृद्धी योजने' अंतर्गत सुमारे 100 मुलींसाठी खाती उघडली आणि त्यात 25 लाखांहून अधिक रक्कम जमा केली.
अशा सेवेचे आणखी एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या कचोरा गावातील. या गावात अनेक वर्षांपासून गोड्या पाण्याची टंचाई होती. दरम्यान, गावातील शेतकरी कुंवर सिंग यांना गावापासून 6-7 किमी अंतरावरील त्यांच्या शेतात गोडे पाणी लागले. त्यांच्यासाठी ही खूपच आनंदाची गोष्ट होती. या पाण्याने इतर सर्व गावकऱ्यांची सेवा का करू नये, असा विचार त्यांनी केला. पण, शेतापासून गावापर्यंत पाणी नेण्यासाठी 30-32 लाख रुपयांची आवश्यकता होती. काही काळानंतर कुंवर सिंह यांचे धाकटे बंधू श्याम सिंह सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले, तेव्हा त्यांना ही गोष्ट कळली. निवृत्तीनंतर त्यांना मिळालेले सर्व पैसे त्यांनी या कामासाठी दिले आणि शेतापासून गावापर्यंत पाईपलाईन टाकून गावकऱ्यांना गोड्या पाण्याचा पुरवठा केला.
ही उदाहरणे म्हणजे समर्पण भाव असेल, कर्तव्याविषयी गांभीर्य असेल, तर एकटा माणूसही संपूर्ण समाजाचे भविष्य कसे बदलू शकतो, ह्या विषयीची मोठी प्रेरणाच आहेत. कर्तव्याच्या मार्गावर चालूनच आपण समाजाला सक्षम बनवू शकतो, देशाला सक्षम बनवू शकतो. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवात हाच आपला संकल्प असावा आणि हीच आपली साधना असावी आणि त्याचा एकच मार्ग आहे - कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 'मन की बात' मध्ये आपण समाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. तुम्ही सगळे मला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित महत्त्वाच्या सूचना पाठवता आणि त्या आधारेच आपली चर्चा पुढे सरकते. 'मन की बात' च्या पुढील आवृत्तीसाठी देखील तुमच्या सूचना पाठवायला विसरू नका. सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासंबंधी जे कार्यक्रम सुरू असतील , ज्या कार्यक्रमात तुम्ही भाग घेत असाल, त्या विषयी मला अवश्य कळवा. नमो अँप आणि MyGov वर येणाऱ्या तुमच्या सूचनांची मी प्रतीक्षा करतो.
पुढच्या वेळी पुन्हा एकदा भेटू या, देशवासियांशी संबंधित अशाच विषयांवर पुन्हा बोलू या. तुम्ही, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व प्राण्यांची देखील काळजी घ्या. या उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना अन्न-पाणी पुरवण्याचे आपले माणुसकीचे कर्तव्यदेखील आपल्याला निभवायचे आहे हे लक्षात ठेवा, तोपर्यंत तुमचे खूप खूप आभार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
नवीन विषयांसह, नवीन प्रेरक उदाहरणांसह, नवे संदेश सोबत घेऊन, मी पुन्हा एकदा 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यासोबत संवाद साधायला आलो. यावेळी मला कोणत्या विषयासंदर्भात सर्वात जास्त पत्रे आणि संदेश आले आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? हा विषय असा आहे, जो इतिहास, वर्तमान आणि भविष्य या तिन्हीशी संबंधित आहेत. देशाला लाभलेल्या नव्या प्रधानमंत्री संग्रहालयाबद्दल मी बोलतो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी प्रधानमंत्री संग्रहालय लोकार्पण करण्यात आले. देशातील नागरिकांसाठी ते खुले करण्यात आले आहे. श्री सार्थक जी नावाचे एक श्रोता आहेत.सार्थक जी गुरुग्राममध्ये राहतात आणि पहिली संधी मिळताच ते प्रधानमंत्री संग्रहालय पाहून आले आहेत. नमो अॅपवर सार्थकजींनी मला पाठवलेला संदेश चांगलाच मनोरंजक आहे. त्यांनी लिहिले आहे की ते वृत्तवाहिन्या पाहतात, वर्तमानपत्रे वाचतात, वर्षानुवर्षे सोशल मीडियावरसुद्धा सक्रिय आहेत, त्यामुळे आपल्याकडे पुरेसे सामान्य ज्ञान आहे, असे त्यांना वाटत होते. पण जेव्हा त्यांनी प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली, तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले. आपल्याला आपल्या देशाबद्दल आणि देशाचे नेतृत्व करणाऱ्यांबद्दल फारशी माहिती नाही, हे त्यांच्या लक्षात आले. प्रधानमंत्री संग्रहालयातील अशा काही गोष्टींबद्दल त्यांनी लिहिले आहे, ज्या त्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या होत्या. लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी भेट म्हणून दिलेला चरखा पाहून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी शास्त्रीजींचे पासबुक देखील पाहिले आणि त्यांच्याकडे बचत म्हणून किती कमी रक्कम होती, हे सुद्धा त्यांनी पाहिले. स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यापूर्वी मोरारजीभाई देसाई हे गुजरातमध्ये डेप्युटी कलेक्टर होते, हेही आपल्याला माहीत नव्हते, असे सार्थकजींनी लिहिले आहे. ते प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवेत होते. चौधरी चरणसिंग जी यांच्याबद्दल सार्थकजी यांनी लिहिले आहे की जमीनदारी प्रथा निर्मूलनाच्या क्षेत्रात चौधरी चरणसिंग जी यांचे मोठे योगदान होते, हे त्यांना माहित नव्हते. जमीन सुधारणा क्षेत्रात श्री पी.व्ही. नरसिंह राव यांनी खूप रस घेतला होता, हे आपण प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट दिली, तेव्हा समजले, असे सार्थकजींनी लिहिले आहे. चंद्रशेखरजी यांनी 4 हजार किलोमीटरहून जास्त अंतर पायी चालत भारताचा ऐतिहासिक प्रवास केल्याचे आपल्याला या संग्रहालयात आल्यावरच कळले, असे सार्थकजींनी लिहिले आहे. अटलजींनी वापरलेल्या वस्तू त्यांनी संग्रहालयात पाहिल्या, त्यांची भाषणे ऐकली, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. या संग्रहालयात महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, जय प्रकाश नारायण आणि आपले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दलही खूप मनोरंजक माहिती असल्याचे सार्थकजींनी पुढे सांगितले आहे.
मित्रहो, देशाच्या पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव हाच सर्वात उचित काळ आहे, असे मला वाटते.स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवाला लोक चळवळीचे स्वरूप येते आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासाबद्दल लोकांची उत्सुकता बरीच वाढते आहे आणि अशा परिस्थितीत देशाच्या अनमोल वारशाशी जोडणारे हे प्रधानमंत्री संग्रहालय युवा वर्गासाठीही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
खरे तर मित्रहो, आता तुमच्याशी संग्रहालयाबद्दल इतके काही बोलतो आहे, तर त्याच विषयाशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारावेत, असे मला वाटते आहे. तुमचे सामान्य ज्ञान काय सांगते, ते पाहू. बघु या, तुम्हाला किती माहिती आहे. माझ्या युवा मित्रमंडळींनो, तयार आहात का तुम्ही, कागद पेन हातात घेतले का? मी आत्ता तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहे, त्यांची उत्तरे तुम्ही नमो अॅपवर किंवा सोशल मीडियावर #MuseumQuizसोबत शेअर करू शकता आणि नक्की करा. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यावीत, अशी आग्रहपूर्वक विनंती मी करतो. यामुळे देशभरातील लोकांच्या मनात संग्रहालयाविषयी उत्सुकता वाढीला लागेल. आपल्या देशातील कोणत्या शहरात प्रसिद्ध रेल्वे संग्रहालय आहे, जिथे गेली ४५ वर्षे लोकांना भारतीय रेल्वेचा वारसा पाहण्याची संधी मिळते आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?मी तुम्हाला आणखी एक संकेत देतो. तुम्ही या ठिकाणी फेयरी क्वीन, प्रिन्स ऑफ वेल्सचे सलून ते फायरलेस स्टीम लोकोमोटिव्ह अशा अनेक बाबी पाहू शकता. मुंबईत असे कोणते संग्रहालय आहे, जिथे आपल्याला चलनाचा प्रवास अतिशय मनोरंजक पद्धतीने पाहायला मिळतो? तुम्हाला ते ठाऊक आहे का? या ठिकाणी ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील नाणी आहेत आणि दुसरीकडे ई-मनी सुद्धा उपलब्ध आहे. आपला तिसरा प्रश्न 'विरासत-ए-खालसा' या संग्रहालयाशी संबंधित आहे. हे संग्रहालय पंजाबमधील कोणत्या शहरात आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला सगळ्यांना पतंग उडवायला आवडते. हो ना? पुढचा प्रश्न पतंगाशीच संबंधित आहे. देशातले एकमेव पतंग संग्रहालय कोठे आहे? चला, मी तुम्हाला एक संकेत देतो. या ठिकाणी ठेवलेल्या सर्वात मोठ्या पतंगाचा आकार 22 बाय 16 फूट आहे. काही आठवतंय का–बरं, नाही तर - आणखी एक गोष्ट सांगतो–हे संग्रहालय ज्या शहरात आहे, त्या शहराचे बापूंशी विशेष नाते आहे. लहानपणी सगळ्यांनाच टपाल तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. पण भारतातील टपाल तिकिटांशी संबंधित राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो. गुलशन महल नावाच्या इमारतीमध्ये कोणते संग्रहालय आहे? तुमच्यासाठी संकेत असा आहे की या संग्रहालयामध्ये तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शकही होऊ शकता, कॅमेरा, एडिटिंगचे बारकावेही पाहू शकता. बरं. भारताचा वस्त्रोद्योगाचा वारसा जपणारे संग्रहालय तुम्हाला माहीत आहे का? या संग्रहालयात मिनिएचर पेंटिंग्ज, जैन हस्तलिखिते, शिल्पे आणि असे बरेच काही आहे. हे संग्रहालय आपल्या उत्कृष्ट सादरीकरणासाठीही चांगलेच प्रसिद्ध आहे.
मित्रहो, तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे शोधणे खूपच सोपे आहे. आपल्या नवीन पिढीला संग्रहालयांबद्दल कुतूहल वाटले पाहिजे, या विचारातून मी हे प्रश्न विचारले. त्यांनी संग्रहालयांबद्दल जास्तीत जास्त वाचावे, तिथे भेट द्यावी, असे मला वाटते. संग्रहालयांचे महत्त्व ओळखून अनेक लोक स्वतः पुढाकार घेत आहेत आणि संग्रहालयांना मोठ्या प्रमाणावर देणग्याही देत आहेत. बरेच लोक आपले जुने संग्रह, तसेच आपल्याकडच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयांना दान करत आहेत. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुम्ही संपूर्ण तुमच्याकडचा सांस्कृतिक वारसा समाजापर्यंत पोहोचवता. भारतातही आता लोक यासाठी पुढाकार घेत आहेत. वैयक्तिक पातळीवरच्या अशा सर्व प्रयत्नांचे सुद्धा मी कौतुक करतो. आज बदलत्या काळात आणि कोविड संबंधी नियमांमुळे संग्रहालयांमध्ये नवीन पद्धतींचा अवलंब करण्यावर भर दिला जात आहे. संग्रहालयांमध्ये डिजिटायझेशनवरही भर देण्याचे प्रमाण वाढले आहे. 18 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा केला जाणार आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हे लक्षात घेत, मला माझ्या युवा सहकाऱ्यांना काही सुचवावेसे वाटते. येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसह स्थानिक संग्रहालयाला भेट देऊ शकता. तुमचा अनुभव #MuseumMemoriesसह शेअर करा. तुम्ही असे करू शकलात तर इतरांनाही संग्रहालयांविषयी कुतूहल वाटू लागेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा संकल्प केले असतील, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रमही केले असतील. मित्रांनो, अलीकडेच मला अशाच एका संकल्पाबद्दल माहिती मिळाली, जी खरोखरच अतिशय वेगळी आणि अनोखी होती. म्हणूनच 'मन की बात'च्या श्रोत्यांना त्याबद्दल सांगावं, असं मला वाटलं.
मित्रहो, कल्पना करा की एखादी व्यक्ती, आपण दिवसभर संपूर्ण शहरात फिरू आणि एकाही पैशाचा व्यवहार रोखीने करणार नाही, असा संकल्प करून आपल्या घरातून बाहेर पडेल. किती वेगळा संकल्प आहे ना हा? सागरिका आणि प्रेक्षा या दिल्लीतल्या दोन मुलींनी असाच कॅशलेस डे आऊटचा प्रयोग केला. सागरिका आणि प्रेक्षा दिल्लीत जिथे जिथे गेल्या, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना डिजिटल पेमेंटची सुविधा मिळाली. UPI QR कोडमुळे त्यांना पैसे काढण्याची गरजच भासली नाही. अगदी रस्त्यावरचे खाद्यपदार्थ आणि फिरत्या विक्रेत्यांकडेही त्यांनी ऑनलाइन व्यवहार सहज करता आले.
मित्रहो, एखाद्याला वाटेल की दिल्ली हे महानगर आहे, तिथे हे अगदी सहज शक्य आहे. पण आता UPI चा वापर फक्त दिल्लीसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित असावा, अशी परिस्थिती नाही. गाझियाबादहून आनंदिता त्रिपाठी यांचाही एक संदेश मला मिळाला आहे. आनंदिता गेल्याच आठवड्यात आपल्या पतीसोबत ईशान्य भागात गेल्या होत्या. आसाम ते मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातील तवांग पर्यंतच्या आपल्या प्रवासाचा अनुभव त्यांनी मला सांगितला. कित्येक दिवसांच्या या प्रवासात त्यांना अगदी दुर्गम भागातही पैसे देण्याची गरज भासली नाही, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ज्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी इंटरनेटचीही चांगली सुविधा नव्हती, तिथे आता UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. सागरिका, प्रेक्षा आणि आनंदिता यांचे अनुभव पाहता, मी तुम्हालाही कॅशलेस डे आऊटचा प्रयोग करून पाहण्याची विनंती करेन, तुम्ही हे नक्की करून बघा.
मित्रहो, गेल्या काही वर्षात भीम UPI हा अगदी झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPI च्या माध्यमातूनच व्यवहार करत आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेमधूनही देशात एक वेगळी संस्कृती आकार घेत आहे. गल्लीबोळातल्या छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंटमुळे अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले आहे. आता त्यांना सुट्ट्या पैशाचीही समस्या राहिली नाही. रोजच्या जगण्यात तुम्हाला सुद्धा UPI ची सोय जाणवली असेल. कुठेही जा, रोख पैसे बाळगण्याचा, त्यासाठी बँकेत जाण्याचा, एटीएम शोधण्याचा त्रास संपला आहे. मोबाईलवरूनच सगळे व्यवहार केले जातात.परंतु या लहान-सहान ऑनलाईन पेमेंटमुळे देशात किती मोठी डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आजघडीला आपल्या देशात दररोज सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे व्यवहार होत आहेत. गेल्या मार्च महिन्यात तर यूपीआयच्या माध्यमातून 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार झाले. यामुळे देशात सुविधा वाढत असून, प्रामाणिकपणाचे वातावरणही निर्माण होते आहे. आता फिन-टेकशी संबंधित अनेक नवीन स्टार्टअप्सही देशात पुढे येत आहेत. डिजिटल पेमेंट आणि स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या या सामर्थ्याशी संबंधित काही अनुभव तुमच्याकडे असल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवा, असे मी सांगू इच्छितो. तुमचे अनुभव इतर अनेक देशवासीयांसाठी प्रेरक ठरू शकतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तंत्रज्ञानाचे सामर्थ्य सर्वसामान्य लोकांच्या जीवनात कशा प्रकारे बदल घडवून आणत आहे, हे आपण आपल्या आजूबाजूला सतत पाहत असतो. तंत्रज्ञानाने आणखी एक उत्तम काम केले आहे. आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांच्या विलक्षण क्षमतेचा लाभ देशापर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. आपले दिव्यांग बंधु भगिनी काय करू शकतात हे टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपण पाहिले आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच, कला, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांत आपले दिव्यांग देशवासीउत्तम कामगिरी करत असतात.परंतु जेव्हा त्यांना तंत्रज्ञानाची साथ मिळते, तेव्हा ते आपल्या कार्यक्षेत्रात आणखी नवी उंची गाठतात. हेच लक्षात घेऊन,दिव्यांगांसाठी उपयुक्त स्रोत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी देश अलिकडच्या काळात सातत्याने प्रयत्न करत आहे. देशात असे अनेक स्टार्ट अप आणि संस्था आहेत, जे यासाठी प्रेरक कार्य करत आहेत. Voice of specially-abled people ही अशीच एक संस्था आहे, जी सहाय्यक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नव्या संधींना प्रोत्साहन देत आहे. जे कलाकार दिव्यांग आहेत, त्यांचे काम जगासमोर आणण्यासाठी एक अभिनव सुरुवात करण्यात आली आहे. Voice of specially-abled people ने अशा कलाकारांच्या चित्रांचे डिजिटल चित्रदालन तयार केले आहे. दिव्यांग व्यक्ती किती विलक्षण कला गुणांनी समृद्ध असू शकतात आणि त्यांच्यात किती असाधारण क्षमता असू शकते, याचे हे कलादालन उत्तम उदाहरण आहे. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात कोणती आव्हाने असतात, त्यातून बाहेर पडल्यानंतर ते किती प्रगती करू शकतात, अशा अनेक गोष्टी तुम्हाला ही चित्रे पाहताना प्रकर्षाने जाणवू शकतात. जर तुम्हीही एखाद्या दिव्यांग व्यक्तीला ओळखत असाल, त्यांच्यातले कलागुण ओळखत असाल, तर डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही त्यांना जगासमोर आणू शकता. जे दिव्यांग सहकारी आहेत, त्यांनीही अशा प्रयत्नात आवर्जून सहभागी व्हावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात बहुतेक भागात उन्हाळा खूपच वेगाने वाढतो आहे. सतत वाढणाराहा उन्हाळा, पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढवतो. तुम्ही आता जिथे आहात, तिथे कदाचित भरपूर पाणी उपलब्ध असेल. पण पाण्याची टंचाई असलेल्या भागात राहणार्या कोट्यवधी देशवासियांचाही विचार तुम्ही केला पाहिजे, ज्यांच्यासाठी पाण्याचा एक-एक थेंब अमृतासारखा असतो.
मित्रहो, स्वातंत्र्यप्राप्तीच्या या ७५ व्या वर्षात, स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जे संकल्प पूर्ण करण्याची ध्येय बाळगून देश आगेकूच करतो आहे, त्यात जलसंधारणाचा संकल्प महत्वाचा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवा दरम्यान देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरे बांधली जाणार आहेत. ही मोहीम किती मोठी आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता. तुमच्याच शहरात ७५ अमृत सरोवरे असतील, असा दिवस आता फार दूर नाही. या मोहिमेबद्दल तुम्ही सर्वांनी आणि विशेषत: युवा वर्गाने जाणून घ्यावे आणि त्याची जबाबदारीही घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. तुमच्या परिसरात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित काही इतिहास असेल, एखाद्या स्वांतंत्र्य सेनानीची आठवण असेल, तर तुम्ही ती अमृत सरोवराशी जोडू शकता. अमृत सरोवरांचा संकल्प केल्यानंतर अनेक ठिकाणी यासंदर्भात वेगाने काम सुरू झाले आहे, हे समजल्यावर मला मनापासून आनंद झाला. उत्तर प्रदेशातील रामपूरमधल्या पटवाई ग्रामपंचायतीबद्दल मला माहिती मिळाली आहे. तिथल्या ग्रामसभेच्या जागी तलाव होता, मात्र तो घाणीने आणि कचऱ्याने भरलेला होता. अथक परिश्रम घेऊन, स्थानिक लोकांच्या मदतीने, स्थानिक शाळकरी मुलांच्या मदतीने गेल्या काही आठवड्यांपासून त्या अस्वच्छ तलावाचा आता कायापालट झाला आहे. आता त्या तलावाच्या काठावर संरक्षक भिंत, कुंपण, फूड कोर्ट, कारंजे, दिवे अशा अनेक सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत. हे प्रयत्न करणाऱ्या रामपूरच्या पटवाई ग्रामपंचायतीचे, गावातील लोकांचे, तेथील मुलांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो, पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची कमतरता, यावरूनच कोणत्याही देशाची प्रगती आणि गती ठरते. तुमच्या हेही लक्षात आले असेल की 'मन की बात' या कार्यक्रमात स्वच्छतेसारख्या विषयांबरोबरच मी जलसंधारणावरही सातत्याने बोलत असतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तर अगदी स्पष्टपणे सांगितले आहे –
पानियम् परमम् लोके, जीवानाम् जीवनम् समृतम् ||
अर्थात, विश्वात पाणीच प्रत्येक जीवाचा, जीवनाचा आधार आहे आणि पाणीच सर्वात मोठे संसाधन देखील आहे, म्हणून तर आपल्या पूर्वजांनी पाण्याचे संरक्षण करण्यावर इतका भर दिला. वेदांपासून ते पुराणांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी पाणी वाचवणे, तलाव, सरोवर बांधणे हे मनुष्याचे सामाजिक आणि अध्यात्मिक कर्तव्य सांगितले गेले आहे. वाल्मिकी रामायणात जल स्रोतांना जोडण्यावर, पाण्याचे संरक्षण करण्यावर विशेष भर दिला गेला आहे.
त्याच प्रमाणे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, सिन्धु - सरस्वती आणि हडप्पा संस्कृतीच्या वेळी देखील भारतात पाण्यासंबंधी किती विकसित अभियांत्रिकी तंत्रज्ञान असायचे. प्राचीन काळात अनेक शहरात जलस्रोतांना एकमेकांना जोडणारी प्रणाली असायची आणि हा तो काळ होता जेव्हा लोकसंख्या इतकी नव्हती, नैसर्गिक संसाधनांची कमतरता देखील नव्हती, एक प्रकारची विपुलता होती, तरी देखील, जलसंरक्षणाच्या बाबतीत तेव्हा जागरूकता जास्त होती. पण आज परिस्थिती ह्याच्या उलट आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या परिसरातल्या अशा जुन्या तलाव, विहिरी आणि सरोवरांविषयी जाणून घ्यावे. अमृत सरोवर अभियानाच्या मुळे जल संरक्षणाच्या सोबतच आपल्या विभागाची ओळख पण निर्माण होईल. ह्यामुळे शहरातून, परिसरांतून स्थानिक पर्यटन स्थळे पण विकसित होतील., लोकांना हिंडायला एक नवीन जागा मिळेल.
मित्रानो, पाण्याशी जोडलेला प्रत्येक प्रयत्न आमच्या भविष्याशी जोडलेला आहे. ह्यात संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. ह्या साठी अनेक शतकांपासून वेगवेगळे समाज निरनिराळे प्रयत्न निरंतर करत आलेले आहेत. जसे, कच्छ च्या रणातील एक ‘मालधारी’ जनजाती जलसंरक्षणासाठी वृदास नावाचा प्रकार वापरते. ह्या प्रकारात लहान लहान विहिरी बनवल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणासाठी आजूबाजूला झाडेझुडपे लावली जातात.
ह्याच प्रमाणे मध्य प्रदेशातील भील्ल जनजातीने आपल्या एका हलमा नावाच्या ऐतिहासिक परंपरेचा जल संरक्षणा साठी उपयोग केला. ह्या परंपरेच्या अंतर्गत जनजातीचे लोक पाण्यासंबंधीच्या प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी एका ठिकाणी जमतात. हलमा परंपरेने सुचवलेल्या उपायांमुळे ह्या भागातील पाण्याचे संकट कमी झाले आणि भूजलाचा स्तरही वाढला.
मित्रांनो, अशीच कर्तव्यभावना जर सगळ्यांच्या मनात जागृत झाली तर पाणी संकटाविषयी असलेल्या मोठ्यातल्या मोठ्या आव्हानाचे देखील उत्तर सापडू शकेल. चला तर मग, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण जल संरक्षण आणि जीवन संरक्षणाचा संकल्प करू या. आपण पाण्याचा एक एक थेम्ब वाचवू आणि प्रत्येक जीवन वाचवू.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही पाहिले असेल की काही दिवसांपूर्वी मी आपल्या युवा मित्रांशी, विद्यार्थ्यांशी, ‘परीक्षेवर चर्चा’ केली होती. ह्या चर्चेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना परीक्षेत गणिताची भीती वाटते. त्याच प्रमाणे हीच गोष्ट अनेक विद्यार्थ्यांनी मला आपल्या संदेशात देखील पाठवली होती. त्यावेळी मी हे नक्की केले होते की ह्या वेळी मन की बात मध्ये मी ह्या विषयवार निश्चित चर्चा करेन.
मित्रानो, गणित हा असा विषय आहे जो भारतीय लोकांना सगळ्यात सोपा वाटायला हवा. कारण, संपूर्ण जगभरात गणितातले सर्वात जास्त शोध आणि योगदान भारतीयांनीच तर दिलेले आहे. शून्य म्हणजे झिरोचा शोध आणि त्याचे महत्व ह्या विषयी आपण पुष्कळ ऐकले असेल. अनेकदा आपण असे पण ऐकत असाल की जर शून्याचा शोध लागला नसता तर कदाचित आपण जगात इतकी वैज्ञानिक प्रगती देखील पाहू शकलो नसतो. कॅल्क्युलस पासून कॉम्प्युटर पर्यंत हे सगळे वैज्ञानिक शोध शून्यावरच तर आधारित आहेत. भारतातल्या गणितज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी असे देखील लिहून ठेवले की
यत किंचित वस्तु तत सर्वं, गणितेन बिना नहि !
अर्थात, ह्या संपूर्ण ब्रह्मांडात जे जे काही आहे ते सर्व गणितावर आधारलेले आहे. आपण विज्ञानाचा अभ्यास आठवलात तर ह्याचा अर्थ पण आपल्या लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रत्येक तत्वात एक गणितीय सूत्रच तर सांगितलेले असते. न्यूटनचे नियम असतील, आईनस्टाईन चे सुप्रसिद्ध समीकरण असेल, ब्रह्मांडाशी जोडलेले सगळे विज्ञान एक गणितच तर आहे. आता तर वैज्ञानिक देखील Theory of Everything विषयी चर्चा करतात, म्हणजेच असे एक सूत्र, ज्या द्वारे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त केले जाऊ शकेल. गणिताच्या साहाय्याने वैज्ञानिक जाणिवेच्या इतक्या विस्ताराची कल्पना आमच्या ऋषींनी नेहमीच केलेली आहे.
आम्ही शून्याचा शोध लावला आणि त्याच बरोबर अनंताला म्हणजेच infinite ला देखील व्यक्त केले. सर्वसाधारण चर्चांमध्ये आम्ही जेव्हा संख्यांची आणि आकड्यांची विषयी बोलतो तेव्हा दशलक्ष, अब्ज, ट्रिलियन पर्यंत बोलतो आणि विचार करतो. पण वेदात आणि भारतीय गणितात तर ही गणना खूप पुढेपर्यंत जाते. आमच्या कडे एक श्लोक प्रचलित आहे.
एकं दशं शतं चैव, सहस्रम् अयुतं तथा |
लक्षं च नियुतं चैव, कोटि: अर्बुदम् एव च ||
वृन्दं खर्वो निखर्व: च, शंख: पद्म: च सागर: |
अन्त्यं मध्यं परार्ध: च, दश वृद्ध्या यथा क्रमम् ||
ह्या श्लोकात संख्याचा क्रम सांगितला आहे. जसे की
एक, दहा, शंभर,हजार आणि अयुत !
लाख, नियुत आणि कोटि म्हणजे करोड़ |
ह्याच प्रमाणे ह्या संख्या शंख, पद्म आणि सागर पर्यंत जातात. एक सागर चा अर्थ होतो की 10 ची power 57 | केवळ हेच नाही तर ह्याच्या पुढे देखील आहे, ओघ और महोघ सारख्या संख्या असतात. एक महोघ म्हणजे – 10 ची power 62 च्या बरोबर, म्हणजे एकाच्या पुढे 62 शून्य, sixty two zero |आपण इतक्या मोठ्या संख्येचा नुसता विचार देखील डोक्यात करून पाहिला, तरी कठीण वाटतो. पण भारतीय गणितात ह्याचा उपयोग हजारो वर्षांपासून होत आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मला Intel कंपनी चे सीईओ भेटले होते. त्यांनी मला एक painting दिले होते ज्यात वामन अवताराच्या माध्यमातून अशाच एका एका गणनेच्या किंवा मापनाच्या भारतीय पद्धति चे चित्रण केलेले होते. Intel चे नाव आले की Computer आपल्या डोक्यात आपोआप आलाच असेल. Computerच्या भाषेत आपण binary system च्या विषयी देखील ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की आमच्या देशात आचार्य पिंगला सारखे ऋषि होऊन गेले, ज्यांनी binary ची कल्पना केली होती. ह्याच प्रमाणे आर्यभट्ट पासून ते रामानुजन सारख्या गणितज्ञांपर्यंत गणिताच्या अनेकानेक सिद्धांतांवर आमच्या इथेच काम झाले आहे.
मित्रानो, आम्हां भारतीयांसाठी गणित कधीच अवघड विषय नव्हता, ह्याचे एक कारण आमचे वैदिक गणित देखील आहे. आधुनिक काळात वैदिक गणिताचे श्रेय जाते – श्री भारती कृष्ण तीर्थ जी महाराजांना | त्यांनी गणनेच्या जुन्या पद्धतींचे पुनरुज्जीवन केले आणि त्याला वैदिक गणित असे नाव दिले. वैदिक गणिताची सर्वात विशेष गोष्ट ही आहे कि त्याच्या द्वारे आपण कठीणातील कठीण आकडेमोड निमिषार्धात मनातल्या मनात करू शकता. आजकाल तर social media वर वैदिक गणित शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कितीतरी युवकांच्या videos देखील आपण पाहिल्या असतील.
मित्रांनो, आज ‘मन की बात’ मध्ये वैदिक गणित शिकवणारे असेच एक मित्र आपल्यासोबत जोडले जात आहेत. हे मित्र आहेत कोलकाता चे गौरव टेकरीवाल जी | आणि ते गेल्या दोन अडीच दशकांपासून वैदिक गणिताच्या ह्या चळवळीत अत्यंत समर्पित भावनेने काम करीत आहेत. या, त्यांच्याशीच काही गोष्टी बोलू या.
मोदी जी – गौरव जी नमस्ते !
गौरव – नमस्ते सर !
मोदी जी – मी ऐकले आहे की वैदिक गणिताची आपल्याला खूप आवड आहे, त्या विषयी आपण बरेच काही करत असता. तर आधी मी आपल्याविषयी काही जाणून घेऊ इच्छितो आणि नंतर ह्या विषयाची आवड आपल्याला कशी लागली ते जरा मला सांगाल ?
गौरव – सर वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी Business School साठी अर्ज करत होतो, तेव्हा त्याची स्पर्धा परीक्षा असायची, जिचे नाव होते CAT | त्यात खूप सारे गणिताचे प्रश्न असायचे. जे खूप कमी वेळात करायला लागायचे. तर माझ्या आईने मला एक पुस्तक आणून दिले ज्याचे नाव होते - वैदिक गणित | स्वामी श्री भारतीकृष्णा तीर्थ जी महाराजांनी ते पुस्तक लिहिले होते. आणि त्यात त्यांनी 16 सूत्र दिली होती. ज्यात गणिते खूपच पटकन आणि सोपी होत असत. जेव्हा मी ते वाचले तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली आणि गणिताविषयी आवड देखील निर्माण झाली. माझ्या लक्षात आले हा विषय जो भारताची देणगी आहे, आपला वारसा आहे, तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला जाऊ शकतो. तेव्हा पासून मी हे आपले कार्य/ उद्देश्य ठरवले की गणिताला जगाच्या कान कोपरयात पोचवेन. कारण गणिताची भीती प्रत्येकाला सतावत असतेच. आणि वैदिक गणितापेक्षा जास्त सोपे काय असू शकेल!
मोदी जी – गौरव जी किती वर्षांपासून आपण ह्या विषयी काम करत आहांत ?
गौरव – मला आता जवळ जवळ २० वर्ष झाले सर ! मी त्यातच मग्न झालो आहे.
मोदी जी – आणि जागृतीसाठी साठी काय काय करता? काय प्रयोग करता? कसे जाता लोकांपर्यंत?
गौरव – आम्ही शाळांतून जातो, online शिकवतो. आमच्या संस्थेचे नाव आहे Vedic Maths Forum India | ह्या संस्थेमार्फत आम्ही internet च्या माध्यमातुन 24 तास Vedic Maths शिकवतो सर !
मोदी जी – गौरव जी आपल्याला तर माहितीच आहे, मी सतत मुलांसोबत गप्पा गोष्टी करणे पसंत करतो आणि तशी संधी शोधत असतो. आणि exam warrior ने तर एक प्रकारे मी त्याला संस्थात्मक रूप दिले आहे आणि माझा अनुभव आहे की जेव्हा मी मुलांशी गप्पा मारतो तेव्हा गणिताचे नाव ऐकताच ती पळून जातात. आणि माझा प्रयत्न असाच आहे की विनाकारण हा जो बागुलबुवा निर्माण झाला आहे त्याला पळवून लावावे, ही जी भीती निर्माण झाली आहे ती दूर व्हावी, आणि छोटी छोटी तंत्रे जी परंपरेने चालत आली आहेत, भारताला गणित विषयात काही नवीन नाही आहेत. बहुतेक जुन्या परंपरांमध्ये भारतात गणिताची परंपरा आहे, तर exam warrior ना भीती घालवायची असेल तर आपण काय सांगाल त्यांना ?
गौरव – सर हे तर मुलांसाठी सर्वात जास्त उपयोगी आहे. कारण परीक्षेची भीती, बागुलबुवा झाला आहे प्रत्येक घरात. परीक्षेसाठी मुले शिकवणी लावतात, पालक पण त्रस्त होतात. शिक्षक पण त्रासलेले असतात. तर वैदिक गणितामुळे हे सगळे छूमंतर होऊन जाते. साधारण गणितापेक्षा वैदिक गणित १५०० टक्के जलद होते. ह्यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येतो आणि मेंदू देखील जलद चालायला लागतो. जसे आम्ही वैदिक गणिताच्या सोबत योगाची पण ओळख करून देतो. ज्यामुळे मुलांना पाहिजे तर वैदिक गणिताद्वारे ते डोळे मिटून देखील गणिते करू शकतात.
मोदी जी – तसे तर ध्यान परंपरा आहे त्यात देखील ह्या प्रकारे गणिते करणे हा ध्यानाचा एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील असतो.
गौरव – Right Sir !
मोदी जी – चला, गौरव जी, खूप चांगले वाटले मला, आणि आपण हे जे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेष करून आपल्या आई आपल्याला एका गुरूच्या रूपात ह्या मार्गावर घेऊन गेल्या आहेत. आणि आज आपण लाखों मुलांना ह्या मार्गा वरून घेऊन जात आहात. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
गौरव – धन्यवाद सर ! मी आपले आभार मानतो सर ! की वैदिक गणिताला आपण महत्व दिले आणि मला निवडले सर! आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत सर!
मोदी जी - खूप खूप धन्यवाद | नमस्कार |
गौरव – नमस्ते सर |
मित्रांनो, गौरवजीनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले की वैदिक गणित गणिताला कसे अवघडापासून सोपे बनवते. केवळ हेच नाही तर वैदिक गणिताने आपण मोठमोठ्या वैज्ञानिक समस्या पण सोडवू शकता. माझी इच्छा आहे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांना वैदिक गणित जरुर शिकवावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, त्यांच्या मेंदूची विश्लेषणात्मक शक्ती देखील वाढेल. आणि हो, गणिताविषयी मुलांच्या मनात जी थोडी फार भीती असते ती देखील नाहीशी होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ मध्ये आज Museum/ संग्रहालयांपासून ते गणितापर्यंत अनेक ज्ञानवर्धक विषयांवर चर्चा झाली. हे सगळे विषय आपण सर्वांच्या सूचनांमधूनच ‘मन की बात’ चा हिस्सा बनतात. आपण ह्यापुढे देखील मला आपल्या सूचना Namo App आणि MyGov च्या माध्यमातून पाठवत राहा.
येणाऱ्या काही दिवसांत देशात ईद चा सण येणार आहे. ३ मे ला अक्षय तृतीया आणि भगवान परशुराम जयंती देखील साजरी होईल. काही दिवसांनी वैशाख बुद्ध पौर्णिमेचा उत्सव येईल. हे सगळे सण संयम, पवित्रता, दान आणि सौहार्दाचे उत्सव आहेत. आपणां सर्वाना ह्या उत्सवांच्या अग्रिम शुभेच्छा! हे सण खूप आनंदाने, सौहार्दाने साजरे करा. ह्या सगळ्यात आपल्याला कोरोनापासून पण सावध राहायला हवे. मास्क लावणे, थोड्या थोड्या वेळाने हात धूत राहणे, बचाव करण्यासाठी जे जे जरुरी उपाय असतील त्यांचे आपल्याला पालन करत राहायचे आहे. पुढच्या वेळी ‘मन की बात’ मध्ये आपण पुन्हा भेटू या आणि आपण पाठवलेल्या नव्या नव्या विषयांवर चर्चा करू या. तो पर्यंत आपला निरोप घेतो. खूप खूप धन्यवाद !
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार!
गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.
मित्रांनो,
देशाच्या कानाकोपऱ्यातून नवी नवी उत्पादने परदेशात जात आहेत, आसामच्या हैलाकांडीची चामड्याची उत्पादने असोत की उस्मानाबादची हातमाग उत्पादने,बीजापूरची फळे – भाज्या असोत की चंदौलीचा काळा तांदूळ, सर्वांची निर्यात वाढत आहे. आता आपल्याला लदाखचे जगप्रसिद्ध जर्दाळू दुबईत देखील मिळतील आणि सौदी अरबमध्ये तामिळनाडू मधून पाठवली गेलेली केळी मिळतील. आता सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, नवी नवी उत्पादने नव्या नव्या देशांत पाठवली जात आहेत. उदाहरणार्थ हिमाचल, उत्तराखंडमध्ये पिकवलेल्या भरड धान्याची पहिली खेप डेन्मार्कला निर्यात करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा आणि चित्तूर जिल्ह्यातले बेगमपल्ली आणि सुवर्णरेखा आंबे दक्षिण कोरियाला निर्यात करण्यात आले आहेत. त्रिपुरातून ताजे फणस, हवाई मार्गाने लंडनला निर्यात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे भालीया गव्हाची पहिली खेप गुजरातमधून केनिया आणि श्रीलंकेला निर्यात करण्यात आली. म्हणजे, आता तुम्ही दुसऱ्या देशांत जाल, तर मेड इन इंडिया उत्पादने पूर्वीपेक्षा जास्त बघायला मिळतील.
मित्रांनो,
ही यादी खूप मोठी आहे आणि जितकी मोठी ही यादी आहे, तितकीच मोठी ‘मेक इन इंडियाची’ शक्ती आहे, तितकंच विराट भारताचं सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्याचा आधार आहे – आपले शेतकरी, आपले कारागीर, आपले विणकर, आपले अभियंते, आपले लघु उद्योजक, आपलं एमएसएमई क्षेत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक, हे सगळे याची खरी ताकद आहेत. यांच्या मेहनतीमुळेच 400 अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य गाठू शकलो आहोत आणि मला आनंद आहे की भारताच्या लोकांचे हे सामर्थ्य आता जगाच्या कानाकोपऱ्यात, नव्या बाजारपेठांत पोहोचत आहे. जेव्हा एक – एक भारतीय, लोकल करता व्होकल होतो, म्हणजे स्थानिक उत्पादनांचा जगभर प्रचार करतो, तेव्हा लोकलला ग्लोबल व्हायला वेळ लागत नाही. चला, लोकलला ग्लोबल बनवूया आणि आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा आणखी वाढवूया.
मित्रांनो,
‘मन की बात’ च्या माध्यमातून श्रोत्यांना हे ऐकून आनंद वाटेल की देशांतर्गत पातळीवर देखील आपल्या लघुउद्योजकांचे यश आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरलेआहे. आज आपले लघुउद्योजक सरकारी खरेदीत Government e-Marketplace म्हणजेच GeMच्या माध्यमातून मोठी भागीदारी पार पाडत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पारदर्शक व्यवस्था उभी करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षात GeM पोर्टलच्या माध्यमातून सरकारने एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळ जवळ सव्वालाख लघुउत्पादकांनी, छोट्या दुकानदारांनी आपले सामान थेट सरकारला विकले आहे. एक काळ होता जेव्हा मोठ्या कंपन्याच सरकारला सामान विकू शकत असत. मात्र, आता देश बदलतो आहे, जुन्या व्यवस्था देखील बदलत आहेत. आता छोट्यातला छोटा दुकानदार देखील GeMपोर्टलवर सरकारला आपले समान विकू शकतो – हाच तर नवा भारत आहे. हा केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही, तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमत देखील दाखवतो, जिथे पूर्वी कोणीच पोचलं नव्हतं. याच साहसाच्या जोरावर आपण सर्व भारतीय मिळून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न देखील नक्की पूर्ण करू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
नुकत्याच पार पडलेल्या पद्म सन्मान सोहळ्यात आपण बाबा शिवानंद जी यांना नक्की बघितले असेल. 126 वर्षाच्या वृद्धाची चपळता बघून माझ्या प्रमाणेच प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला असेल आणि मी बघितलं, डोळ्याची पापणी लावते न लावते तोच, ते नंदी मुद्रेत प्रणाम करू लागले. मी देखील बाबा शिवानंद जी यांना पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला. 126 व्या वर्षी बाबा शिवानंद यांचे वय आणि सुदृढ प्रकृती दोन्ही, आज देशात चर्चेचा विषय आहे. मी समाज माध्यमांवर अनेक लोकांची प्रतिक्रिया बघितली, की बाबा शिवानंद, आपल्या वयाच्या चार पट कमी वयाच्या लोकांपेक्षाही सुदृढ आहेत. खरोखरच, बाबा शिवानंद याचं जीवन आपल्या सर्वांना प्रेरणा देणारं आहे. मी त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतो. त्यांच्यात योगाविषयी एक जिद्द आहे त्यांची जीवनशैली अतिशय सुदृढ आहे.
जीवेत शरदः शतम्.
आपल्या संस्कृतीत सर्वांना शंभर वर्ष निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपण 7 एप्रिलला ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा करणार आहोत. आज संपूर्ण जगात आरोग्याविषयी भारतीय चिंतन, मग ते योग असो की आयुर्वेद, याकडे ओढा वाढतो आहे. आत्ता आपण बघितले असेल की गेल्या आठवड्यात कतरमध्ये एक योग कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. यात 114 देशांच्या नागरिकांनी भाग घेऊन एक नवा जागतिक विक्रम बनवला. याचप्रमाणे आयुष उद्योगाची बाजारपेठ देखील सातत्याने वाढते आहेत. 6 वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ जवळपास 22 हजार कोटी रुपये इतकी होती. आज आयुष उत्पादन उद्योग, एक लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोचला आहे, म्हणजे या क्षेत्रात संधी सातत्याने वाढत आहेत. स्टार्टअप जगातही आयुष, आकर्षणाचा विषय बनत आहे.
मित्रांनो,
आरोग्य क्षेत्राच्या इतर स्टार्टअप्स विषयी तर मी आधीही अनेक वेळा बोललो आहे, मात्र या वेळी आयुष स्टार्टअप्स वर खास करून बोलणार आहे. एक स्टार्टअप आहे कपिवा (Kapiva!). याच्या नावातच याचा अर्थ लपलेला आहे. यात Ka चा अर्थ आहे – कफ, Pi चा अर्थ आहे – पित्त आणि Vaचा अर्थ आहे वात. ही स्टार्टअप कंपनी, आपल्या परंपरेनुसार उत्तम पोषक आहाराच्या सवयीवर आधारित आहे. आणखी एक स्टार्ट अप निरोग-स्ट्रीट देखील आहे, आयुर्वेद आरोग्यसेवा व्यवस्थेत एक नाविन्यपूर्णकल्पना आहे. याचे तंत्रज्ञान-आधारितव्यासपीठ, जगभरातील आयुर्वेदिक डॉक्टरांना थेट लोकांशी जोडून देतो. 50 हजार पेक्षा जास्त आयुर्वेदाचार्य याच्याशी जोडले गेले आहेत. याचप्रमाणे, ‘आत्रेय इनोव्हेशन्स,’एक आरोग्यसेवा तंत्रज्ञान स्टार्टअप आहे, जे सर्वंकष निरामयता या क्षेत्रात काम करत आहे. Ixoreal (इक्सोरियल) ने केवळ अश्वगंधाच्या उपयोगाविषयीच जागरूकता पसरविली नाही, तर उच्च दर्जा उत्पादन प्रक्रियेवर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. क्युरवेदा (Cureveda) ने वनौषधींच्या आधुनिक शोध आणि पारंपारिक ज्ञानाच्या संयोगातून सर्वंकष जीवनासाठी पोषक आहार तयार केला आहे.
मित्रांनो,
आता तर मी थोडीशीच नावं घेतली आहेत, ही यादी खूप मोठी आहे. हे भारताचे तरुण उद्योगपती आणि भारतात तयार होत असलेल्या संधींची काही प्रतीकात्मक उदाहरणे आहेत. मी आरोग्य क्षेत्रातल्या स्टार्टअप्स आणि विशेषतः आयुष स्टार्टअप्सना एक आग्रहाची विनंती देखील केली आहे. आपण कुठलेही ऑनलाईन संकेतस्थळ तयार करता, जी काही माहिती तयार करता, ती संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या सर्व भाषांमध्ये देखील बनवण्याचा प्रयत्न करा. जगात असे अनेक देश आहेत जिथे इंग्रजी भाषा फारशी बोलली जात नाही आणि समजतही नाही. अशा देशांचा विचार करुन, आपल्या माहितीचा प्रचार – प्रसार करा. मला खात्री आहे, लवकरच भारताचे आयुष स्टार्टअप्स उत्कृष्ट गुणवत्तेच्या उत्पादनांनी जगावर आपली छाप पाडतील.
मित्रांनो,
आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी देखील आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमी स्वच्छाग्रहींच्या प्रयत्नांविषयी नेहमीच बोलतो. असेच एक स्वछाग्रही आहेत चंद्रकिशोर पाटील. हे महाराष्ट्रात नाशिक इथे राहतात. चंद्रकिशोरजी यांनी स्वच्छतेचा फार मोठा संकल्प सोडला आहे. ते गोदावरी नदीजवळ उभे राहतात, आणि लोकांना नदीत घाण, कचरा न टाकण्याची विनंती करत असतात. जर कुणी असं करताना दिसला तर ते लगेच जाऊन त्याला थांबवतात. या कामात चंद्रकिशोर जी आपला खूप वेळ खर्च करतात. संध्याकाळ पर्यंत त्यांच्याकडे अशा गोष्टींचा ढीग जमा होतो, ज्या लोक नदीत फेकायला घेऊन आलेले असतात. चंद्रकिशोरजी यांचे हे प्रयत्न, जनजागृती देखील करतात आणि प्रेरणा देखील देतात. याच प्रमाणे आणखी एक स्वछाग्रही आहेत – ओडिशातील पुरीचे राहुल महाराणा. राहुल दर रविवारी सकाळी सकाळी पुरीच्या तीर्थस्थळांजवळ जातात, आणि तिथे प्लास्टिकचा कचरा साफ करतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो किलो प्लास्टिक कचरा आणि घाण साफ केली आहे. पुरीचे राहुल असोत किंवा नाशिकचे चंद्रकिशोर, हे आपल्याला फार मोठी शिकवण देतात. नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पडले पाहिजे, स्वच्छता असो, पोषण असो, किंवा मग लसीकरण, या सगळ्या प्रयत्नांनी देखील निरोगी राहायला मदत होते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
चला आता आपण बोलूया, केरळच्या के मुपट्टम श्री नारायणन यांच्याविषयी, त्यांनी एक अभियान सुरु केलं आहे, ज्याचं नाव आहे, ‘‘Pots for water of life’- (म्हणजे जीवन देणाऱ्या जलासाठीची भांडी). तुम्हाला जेव्हा या प्रकल्पाबद्दल कळेल, तेव्हा तुम्ही पण विचार कराल, की काय जोरदार काम आहे !
मित्रांनो,
मुपट्टम श्री नारायणन जी, उन्हाळ्यात, पशु-पक्ष्यांना तहान लागू नये, पाणी मिळावे यासाठी मातीची भांडी वाटण्याची मोहीम चालवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांना होणारा त्रास बघून तेही कासावीस होत असत. मग यावर उपाय म्हणून त्यांनी विचार केला की आपणच लोकांना मातीची भांडी पुरवली तर मग, लोकांना फक्त त्यात पाणी भरुन पशू-पक्ष्यांसाठी ठेवता येईल. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मित्रांनो, की नारायणन जी यांनी वाटप केलेल्या भांड्यांची संख्या आता एक लाखांपेक्षा अधिक होणार आहे. आपल्या या अभियानातलं एक लाखावं भांडं ते महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या साबरमती आश्रमात दान करणार आहेत. आता जेव्हा उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, अशावेळी नारायणन जी यांचे हे काम सर्वांना नक्कीच प्रेरणा देईल आणि आपणही या उन्हाळयात, आपल्या पशु-पक्षी मित्रांसाठी, पाण्याची व्यवस्था कराल.
मित्रहो,
‘मन की बात’च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी जलबचतीच्या संकल्पाचा पुनरूच्चार करावा. पाण्याचा अगदी थेंब न थेंब वाचविण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो, ते ते जरूर केले पाहिजे. याशिवाय पाण्याच्या पुनर्वापरावरही आपण तितकाच जोर देत राहिले पाहिजे. घरामध्ये काही कामांसाठी वापरण्यात येणारे पाणी, घरातल्या कुंड्यांना घालता येऊ शकत असेल, बगिचाला देता येऊ शकत असेल तर ते जरूर पुन्हा वापरले पाहिजे. अगदी थोडक्या प्रयत्नांमधून तुम्ही आपल्या घरामध्ये अशी व्यवस्था तयार करू शकता. रहीमदास जी, युगांपूर्वी काहीतरी विशिष्ट हेतूनं असं म्हणून गेले आहेत की, ‘‘रहिमन पानी राखिए, बिन पानी सब सून’’ आणि पाणी वाचविण्याच्या या कामामध्ये मला मुलांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. ज्याप्रमाणे स्वच्छतेला आमच्या मुलांनीच आंदोलन बनवले, त्याचप्रमाणे ही मुले आता ‘जल योद्धा’ बनून, पाणी वाचविण्यासाठी मदत करू शकतात.
मित्रांनो,
आपल्या देशामध्ये जल संरक्षण, जल स्त्रोतांचे रक्षण, अनेक युगांपासून समाजाच्या स्वभावाचा एक भाग आहे. मला आनंद होतो की, देशामध्ये अनेक लोकांनी जल संवर्धनाचे कार्य आपल्या जीवनाचे ‘मिशन’च बनविले आहे. जसे की, चेन्नईचे एक सहाकारी आहेत- अरूण कृष्णमूर्ती जी! अरूण जी यांनी आपल्या भागातल्या तलाव -तळ्यांची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी 150 पेक्षा जास्त तलाव -तळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी उचलली आणि ती यशस्वीपणे पूर्णही केली. याच प्रमाणे महाराष्ट्रातले रोहन काळे नावाचे एक कार्यकर्ते आहेत. रोहन व्यवसायाने ‘ एच.आर.’ विभागात आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या पाय-यांच्या शेकडो विहिरींचे संरक्षण करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अनेक विहिरी तर शेकडो वर्षे जुन्या, प्राचीन आहेत. अशा विहिरी जणू आपल्या वारशाच्या भाग आहेत. सिकंदराबादमध्ये बन्सीलालपेट इथे विहीर अशी एक पाय-यांची विहीर आहे, तिच्याकडे गेली अनेक वर्षे कुणाचं लक्ष नव्हतं, या उपेक्षेमुळे ही पाय-यांची विहीर माती आणि कच-यानं झाकून गेली होती. मात्र आता इथं या पाय-यांच्या विहिरीचे पुनरूज्जीवन करण्याची मोहीम लोकांच्या सहभागातून सुरू केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
ज्या भागात पाण्याची सदोदित टंचाई असते, अशा राज्यातून मी आलो आहे. गुजरातमध्ये अशा पाय-यांच्या विहिरींना ‘वाव’ असे म्हणतात. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाव खूप मोठी भूमिका पार पाडते. या विहिरी किंवा आडांच्या संरक्षणासाठी ‘जल मंदिर योजने’नं खूप महत्वाची भूमिका निभावली आहे. संपूर्ण गुजरातमधल्या अनेक विहिरींना, आडांना पुनर्जीवित करण्यात आले. यामुळे त्या त्या भागामध्ये जलस्तर वाढण्यासाठी चांगली मदत मिळाली. असेच अभियान तुम्हीही स्थानिक पातळीवर चालवू शकता. ‘चेक डॅम’ बनविण्याचं काम असो, रेन हारवेस्टिंग म्हणजेच पावसाचं पाणी जमिनी मुरवून पावसाच्या पाण्याची ‘शेती’ करायचं काम असो, यामध्ये वैयक्तिक पातळीवर केलेले प्रयत्नही महत्वाचे आहेत आणि संयुक्तपणे प्रयत्न करणेही गरजे आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 75 अमृत सरोवर बनवता येवू शकतील. काही जुन्या सरोवरांमध्ये सुधारणा केली जावू शकते. तसेच काही नवीन सरोवर बनविता येवू शकतील. या दिशेने आपण सगळेजण काही ना काही प्रयत्न जरूर कराल, असा मला विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’ची एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, आपल्याकडून मला अनेक भाषांमधून, अनेक बोलीं भाषांमधून संदेश येत असतात. काही लोक मायगव्हवर ‘ऑडिओ मेसेज’ ही पाठवत असतात. भारताची संस्कृती, आपल्या अनेक भाषा, आपल्या बोलीभाषा, आपले राहणे, वेशभूषा, खाण्याच्या -जेवणाच्या पद्धती यांचा विस्तार, अशा सर्व प्रकारची विविधता म्हणजे आपली एक प्रकारे खूप मोठी ताकद आहे. पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून ते दक्षिणे पर्यंत भारताची हीच विविधता, सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’बनवत आहे. यामध्येही आपली ऐतिहासिक स्थाने आणि पौराणिक कथा, अशा दोन्हींचे खूप मोठे योगदान आहे. आपण सर्वजण विचार करीत असणार की, या सर्व गोष्टी, मी आपल्यासमोर का मांडतोय? याचे कारण आहे, ‘माधवपूर जत्रा’ माधवपूरची जत्रा कुठे भरते, का भरते? वैविध्यपूर्णतेने नटलेली ही माधवपूर जत्रा भारताच्या विविधतेशी कशी जोडली गेली आहे, या जत्रेच्या आयोजनामागचे कारण जाणून घेणे ‘मन की बात’ च्या श्रोत्यांच्यादृष्टीने अतिशय रंजक ठरणार आहे.
मित्रांनो,
‘‘माधवपुर मेला’’ गुजरातमध्ये पोरबंदर इथं समुद्र किनारी वसलेल्या माधवपूर गावात भरतो. मात्र याचं नातं हिदुंस्तानच्या पूर्व किना-याशी जोडलं जातं . आता आपण विचार करीत असणार हे कसं शक्य आहे? तर याचंही उत्तर एका पौराणिक कथेमध्येच मिळतं. असं म्हणतात की, हजारों वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचा विवाह, ईशान्येकडील राजकुमारी रूक्मिणीबरोबर झाला होता. हा विवाह पोरबंदरच्या माधवपूरमध्ये साजरा झाला होता. आणि त्या विवाहाचे प्रतीक म्हणून आजही तिथे माधवपूर तिथं जत्रा भरविण्यात येते. पूर्व आणि पश्चिम यांचं घट्ट बनलेलं नातं म्हणजे, आपला संस्कृती वारसा आहे. काळाच्या बरोबर आता लोकांच्या प्रयत्नातून माधवपूर जत्रेमध्ये अनेक नवनवीन गोष्टी जोडल्या जात आहेत. आपल्याकडे वधुपक्षाला ‘घराती’ असे म्हणतात, आणि या जत्रेमध्ये आता ईशान्येकडून अनेक ‘घराती’ही येत आहेत. एक आठवडाभर चालणा-या या माधवपूर जत्रेमध्ये ईशान्येकडील सर्व राज्यांतून कलाकार येत आहेत. हस्तशिल्पी, हस्तकलाकार येत आहेत आणि ही मंडळी या मेळाव्यात अधिक बहार आणतात. एक आठवडाभर भारतातल्या पूर्व आणि पश्चिमेकडील संस्कृतींचा होणारा हा मेळ, म्हणजे माधवपूर जत्रा आहे आणि तो ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’चे सुंदर उदाहरण बनत आहे. तुम्हीही या मेळाव्याची, जत्रेची माहिती वाचून, जाणून घ्यावी, असा माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आता लोक सहभागाचे एक नवीन आदर्श उदाहरण बनले आहे. काही दिवसांपूर्वी 23 मार्चला हुतात्मा दिनी देशाच्या कानाकोप-यामध्ये अनेक कार्यक्रम झाले. देशानं आपल्या स्वातंत्र्यामधल्या नायक-नायिकांचं स्मरण केलं, श्रद्धापूर्वक स्मरण केलं. याच दिवशी मला कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये बिप्लाबी भारत दालनाचं लोकार्पण करण्याची संधी मिळाली. भारताच्या वीर क्रांतिकारकांना श्रद्धांजली देण्यासाठी हे एक अतिशय अव्दितीय, अद्भूत दालन आहे. जर संधी मिळाली तर, तुम्ही हे दालन पाहण्यासाठी जरूर जावे.
मित्रांनो,
एप्रिल महिन्यामध्ये आपण दोन महान विभूतींची जयंती साजरी करणार आहोत. या दोघांनीही भारतीय समाजावर आपला अमिट ठसा उमटवला आहे. या महान विभूती आहेत - महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर! महात्मा फुले यांची जयंती 11 एप्रिल रोजी आहे आणि बाबासाहेबांची जयंती आपण 14 एप्रिलला साजरा करणार आहोत. या दोन्ही महापुरूषांनी भेदभाव, असमानता यांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केल्या. बालिका हत्येच्याविरोधात आवाज उठवला. जल संकटातून मुक्ती मिळावी, यासाठीही त्यांनी मोठं अभियान चालविलं.
मित्रांनो,
महात्मा फुले यांच्याविषयी बोलताना सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करणं, तितकंच जरूरीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक सामाजिक संस्था स्थापन करण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली. एक शिक्षिका आणि एक समाज सुधारक या रूपानं त्यांनी समाजाला जागरूकही केलं आणि सर्वांना प्रोत्साहनही दिले. दोघांनी मिळून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लोकांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न केले. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामध्येही महात्मा फुले यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. ते म्हणायचे की, कोणत्याही समाजाच्या विकासाचे आकलन त्या समाजातल्या महिलांची स्थिती पाहून करता येते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून, सर्व माता-पिता आणि पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मुलींना जरूर शिकवावे. मुलींनी जास्तीत जास्त संख्येने शाळेत यावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कन्या शिक्षण प्रवेश उत्सवही सुरू केला आहे. ज्या मुलींचे शिक्षण काही कारणामुळे थांबलं असेल, राहिलं असेल तर त्यांना पुन्हा एकदा शाळेत आणण्यावर भर दिला जात आहे.
मित्रांनो,
बाबासाहेब यांच्याशी संबंधित पंचतीर्थाचं कार्य करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही आपल्या सर्वांसाठी सौभाग्याची गोष्ट आहे. त्यांचे जन्मस्थान -महू असो, मुंबईची चैत्यभूमी असो, अथवा दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या महा-परिनिर्वाणाचे स्थान, मला या सर्व स्थानांवर, सर्व तीर्थांवर जाण्याचं भाग्य लाभलं. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना मी आग्रह करतो की, त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व स्थानांचे दर्शन जरूर करावं. त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
‘मन की बात’मध्ये यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. पुढच्या महिन्यामध्ये अनेक सण-उत्सव येत आहेत. काही दिवसांनीच नवरात्र येत आहे. नवरात्रामध्ये आपण व्रत-उपवास, शक्तीची साधना करतो. शक्तीची पूजा करतो, याचाच अर्थ आपल्या परंपरा आपल्याला सणांचे उत्सवी स्वरूपही शिकवतात आणि संयम कसा बाळगायचा हेही शिकवतात. संयम आणि तप सुद्धा आपल्यासाठी एक पर्व आहे. म्हणूनच नवरात्राचे आपल्या सर्वांसाठी एक विशेष महत्व असते. नवरात्राच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्याचा सणही आहे. एप्रिलमध्ये ईस्टरही येतो आणि रमजानचा पवित्र महिनाही या दिवशी सुरू होत आहे. आपण सर्वांना बरोबर घेवून हे सर्व सण साजरे करावेत, भारताच्या विविधतेला सशक्त बनवावे, अशीच सर्वांची इच्छा आहे. यावेळी ‘मन की बात’ मध्ये इतकंच! पुढच्या महिन्यात तुमची पुन्हा एकदा भेट घेवून नवीन विषयांवर तुमच्याबरोबर संवाद साधला जाईल, खूप-खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे. आज मन की बातची सुरूवात आम्ही भारताच्या यशस्वीतेच्या उल्लेखानं करणार आहोत. या महिन्याच्या सुरूवातीला, भारत इटलीतून आपला एक बहुमूल्य असा वारसा आणण्यात यशस्वी झाला आहे. हा वारसा आहे अवलोकितेश्वर पद्मपाणिची हजार वर्षांहूनही प्राचीन अशी मूर्ति. ही मूर्ति काही वर्षांपूर्वी, बिहारच्या गयाजी मधील देवीचे स्थान कुंडलपूर मंदिरातनं चोरीस गेली होती. परंतु भरपूर प्रयत्न करून अखेर भारताला ही मूर्ति परत मिळाली आहे. अशीच काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या वेल्लूरहून भगवान अंजनेय्यर, हनुमानाची मूर्ति चोरीस गेली होती. हनुमानाची ही मूर्तिसुद्धा 600 ते 700 वर्ष प्राचिन होती. या महिन्याच्या सुरूवातीला, ऑस्ट्रेलियातून आम्हाला ही मूर्ति प्राप्त झाली असून आमच्या मोहिमेला ती मिळाली आहे.
मित्रांनो, हजारो वर्षांच्या आमच्या इतिहासात, देशाच्या कानाकोपऱ्यात एकाहून एक सुरेख मूर्ति बनवल्या गेल्या, त्यात श्रद्धा होती, शक्ति होती, कौशल्यही होते आणि वैविध्यपूर्णतेने भरलेल्या होत्या. आमच्या प्रत्येक मूर्तिमध्ये तत्कालिन काळाचा प्रभाव दिसून येतो. या भारताच्या मूर्ति मूर्तिकलेचे दुर्मिळ उदाहरण तर होतेच, परंतु आमची श्रद्धा तिच्याशी जोडलेली होती. परंतु इतिहासात कित्येक मूर्ति चोरी होऊन देशाबाहेर जात राहिल्या. कधी या देशात तर कधी त्या देशात या मूर्ति विकल्या जात राहिल्या आणि त्यांच्यासाठी तर त्या फक्त कलाकृति होत्या. त्यांना त्यांच्या इतिहासाशी काही देणेघेणे नव्हते न श्रद्धेचे काही महत्व होते. या मूर्ति परत आणणे हे भारतमातेच्या प्रति आमचे कर्तव्य आहे. या मूर्तिंमध्ये भारताचा आत्मा, श्रद्धेचा अंश आहे. या मूर्तिंचे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वही आहे. ही जबाबदारी समजून भारताने आपले प्रयत्न वाढवले. आणि यामुळे चोरी करण्याची प्रवृत्ती जी होती, त्यांच्यामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली. ज्या देशांमध्ये या मूर्ति चोरी करून नेल्या गेल्या, त्यांनाही असे वाटू लागले की, भारताशी संबंधांमध्ये सौम्य शक्तिचा जो राजनैतिक प्रवाह असतो, त्याचे महत्वही खूप असू शकते. कारण या मूर्तिंशी भारताच्या भावना जोडल्या आहेत, भारताची श्रद्धा जोडलेली आहे आणि एक प्रकारे लोकांचे परस्परांमधील संबंधांमध्ये मोठी शक्ति निर्माण करतात. आपण काही दिवसांपूर्वीच पाहिले असेल, काशीहून चोरीला गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ति सुद्धा परत आणली गेली होती. हे भारताप्रति बदलत चाललेल्या जागतिक दृष्टिकोनाचे उदाहरण आहे. 2013 पर्यंत जवळपास 13 मूर्ति भारतात आणल्या गेल्या होत्या. परंतु, गेल्या सात वर्षांत 200 हून जास्त अत्यंत मौल्यवान मूर्तिंना भारताने यशस्वीपणे मायदेशी परत आणले आहे. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, सिंगापूर अशा कितीतरी देशांनी भारताच्या या भावना समजून घेऊन मूर्ति परत आणण्यात आमची मदत केली आहे. मी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जेव्हा अमेरिकेत गेलो होतो, तेव्हा मला अनेक प्राचीन अशी कित्येक मूर्ति आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या अनेक वस्तु मिळाल्या. जेव्हा देशाचा मौल्यवान वारसा परत मिळतो, तेव्हा साहजिकच इतिहासावर श्रद्धा असलेले, पुराणवस्तु संग्रहावर श्रद्धा ठेवणारे, आस्था आणि संस्कृतिशी जोडलेले लोक आणि एक भारतीय या नात्याने आम्हाला सर्वांना आनंद होणे स्वाभाविक आहे.
मित्रांनो, भारतीय संस्कृति आणि आपल्या वारशाची चर्चा मी करतो तेव्हा आज आपल्याला मन की बातमध्ये दोन व्यक्तिंशी तुमची ओळख करून देऊ इच्छितो. आजकालच्या दिवसात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर टांझानियाचे दोन भाऊबहिण किली पॉल आणि त्यांची बहिण नीमा चर्चेत आहेत. आणि मला पक्का विश्वास आहे की, आपणही त्यांच्याबाबत जरूर ऐकलं असेल. त्यांच्यामध्ये भारतीय संगीताबाबत एक वेडच आहे, तीव्र आवड हे आणि याच कारणाने ते दोघेही अत्यंत लोकप्रिय आहेत. लिप सिंकच्या त्यांच्या पद्धतीवरून हे लक्षात येते की यासाठी ते किती प्रचंड प्रमाणात कष्ट घेतात. नुकतेच, आमच्या प्रजासत्ताक दिनी, आमचं राष्ट्रगीत जन गण मन गाताना त्यांचा व्हिडिओ भरपूर प्रमाणात पाहिला गेला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी लतादीदींचं गीत गाऊन त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली होती. मी या अद्भुत सर्जनशीलतेसाठी या दोघाही भाऊ बहिणींना किली आणि निमा यांची खूप प्रशंसा करतो. काही दिवसांपूर्वी, टांझानियामध्ये भारतीय वकिलातीत त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. भारतीय संगीताचीच ही जादू आहे की, सर्वांना तिची भुरळ पडते. मला आठवते, काही वर्षांपूर्वी जगात दीडशेहून अधिक देशांतल्या गायक आणि संगीतकारांनी आपापल्या देशांत, आपापल्या वेषभूषेमध्ये पूज्य बापूंना अत्यंत प्रिय असलेलं भजन वैष्णव जन गाण्याचा यशस्वी प्रयोग केला होता.
आज जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, तेव्हा देशभक्तिपर गीतांच्या संदर्भात असे प्रयोग केले जाऊ शकतात. जेथे परदेशी नागरिकांना, त्यांच्या प्रसिद्ध गायकांना, भारतीय देशभक्तिपर गीतं गाण्यासाठी आमंत्रित केलं जावं. इतकंच नव्हे तर, टांझानियामधील किली आणि निमा भारताच्या गीतांना या प्रकारे लिप सिंक करू शकतात तर काय माझ्या देशात, आमच्या अनेक भाषांमधील अनेक प्रकारची गीतं आहेत, आम्ही गुजराती मुलं तमिळ गीतांवर तसं करू शकत नाही का, केरळची मुलं आसामी गीतांवर तसं करू शकतात, कन्नड मुलं जम्मू-कश्मिरच्या गीतांवर लिप सिंक करू शकतात. असं एक वातावरण आपण बनवू शकतो, ज्यात एक भारत-श्रेष्ठ भारतचा अनुभव आम्ही घेऊ शकतो. इतकंच नव्हे तर, आम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव एक वेगळ्या पद्धतीनं अवश्य साजरा करू शकतो. मी देशातील नवतरूणांना आवाहन करतो की, या, भारतीय भाषांमधील जी लोकप्रिय गीतं आहेत, त्यावर आपण आपल्या पद्धतीनं व्हिडिओ बनवा, खूप लोकप्रिय होऊन जाल आपण. आणि देशातल्या वैविध्याची ओळख नव्या पिढीला होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच काही दिवसांपूर्वी आपण मातृभाषा दिन साजरा केला. जे विद्वान आहेत, ते मातृभाषा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती कशी झाली, यावर खूपशी पांडित्यपूर्वक माहिती देऊ शकतील. मी तर मातृभाषेबद्दल इतकंच म्हणेन की, जसे आपलं जीवन आपली आई घडवत असते, तसंच आपली मातृभाषा आपलं जीवन घडवत असते. आई आणि मातृभाषा, दोन्ही मिळून जीवनाचा पाया मजबूत करतात, चिरस्थायी करतात. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, तसंच आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही. मला खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आजही लक्षात आहे. जेव्हा मला अमेरिकेला जाणं भाग पडलं तेव्हा, वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जाण्याची संधी मिळत असे. एकदा मला तेलुगू कुटुंबात जाण्याची संधी मिळाली आणि मला एक आनंददायक दृष्य दिसलं. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही कुटुंबासाठी एक नियम तयार केला आहे. कितीही काम असो, परंतु आम्ही शहराच्या बाहेर जर आम्ही नसू तर कुटुंबातील सर्व सदस्य रात्रीचं जेवण टेबलवर एकत्र बसूनच घेणार. आणि दुसरा नियम म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या टेबलवर सारे सदस्य तेलुगूतच बोलतील. जी मुलं त्या कुटुंबात जन्माला आली होती, त्यांनाही हाच नियम लागू होता. आपल्या मातृभाषेप्रति त्यांचं हे प्रेम पाहून मी या कुटुंबामुळे खूपच प्रभावित झालो.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही काही लोक एक प्रकारच्या मानसिक द्वंद्वात जगत आहेत ज्यामुळे त्यांना आपली भाषा, आपला पोषाख, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी याबद्दल एक प्रकारचा संकोच वाटतो. जगात इतरत्र खरेतर असं कुठंच नाही. आमची मातृभाषा आहे, आम्ही ती गर्वानं बोलली पाहिजे. आणि आमचा भारत तर भाषांच्या बाबतीत इतका समृद्ध आहे की त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आमच्या भाषांचे सर्वात मोठं सौदर्य हे आहे की, कश्मिरहून कन्याकुमारीपर्यंत, कच्छहून कोहिमापर्यंत शेकडो भाषा, हजारो बोली भाषा या एकमेकांपेक्षा वेगळ्या असल्या तरीही एकदुसरीमध्ये रचलेल्या आणि समाविष्ट झालेल्या आहेत. भाषा अनेक आहेत पण भाव एकच आहे. कित्येक शतकांपासून आमच्या भाषा एक दुसऱ्याकडून स्वतःला अत्याधुनिक बनवत आल्या आहेत, एक दुसरीचा विकास करत आहेत. भारतातली तमिळ भाषा ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे आणि याचा प्रत्येक भारतीयाला गर्व असला पाहिजे की जगातील इतकी मोठी परंपरा आमच्याकडे आहे. याच प्रकारे जितके प्राचीन धर्मशास्त्रं आहेत, त्यांची अभिव्यक्तिसुद्धा आमची संस्कृत भाषाच आहे. भारतीय लोक जवळपास 121 मातृभाषांमध्ये जोडले गेले आहेत, याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि यातील 14 भाषा तर अशा आहेत ज्या एक कोटीहून अधिक लोक दैनंदिन आयुष्यात बोलतात. म्हणजे, जितकी युरोपियन देशांची एकूण लोकसंख्या नाही, त्यापेक्षा जास्त लोक आमच्या विविध 14 भाषांशी जोडले गेले आहेत. सन 2019 मध्ये, हिंदी जी जगातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ती भाषांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती. याचाही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. भाषा ही केवळ अभिव्यक्तिचं माध्यम नाही तर भाषा, समाजाची संस्कृति आणि परंपरांना वाचवण्याचं काम करत असते. आपल्या भाषेच्या परंपरेला वाचवण्याचं काम सुरीनामचे सुरजन परोहीजी करत आहेत. या महिन्याच्या 2 तारखेला ते 84 वर्षांचे झाले आहेत. त्यांचे पूर्वजही कित्येक वर्षे पूर्वी, हजारो कामगारांच्या बरोबर, रोजीरोटीसाठी सुरीनामला गेले होते. सुरजन परोही हिंदीमध्ये खूप चांगल्या कविता करतात आणि तेथे त्यांचं नाव राष्ट्रीय कविंमध्ये घेतलं जातं. म्हणजे, आजही त्यांच्या ह्रदयात भारत असतो आणि त्यांच्या कार्याला हिंदुस्तानी मातीचा सुगंध आहे. सुरीनामच्या नागरिकांनी सुरजन परोहीजी यांच्या नावे एक संग्रहालय बनवले आहे. 2015 मध्ये त्यांना सन्मानित करण्याची संधी मला मिळाली होती, ही माझ्यासाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे.
मित्रांनो, आजच्या दिवशी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन आहे. सर्व मराठी बंधु भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
हा दिवस मराठी कविवर्य विष्णु वामन शिरवाडकरजी, श्रीमान कुसुमाग्रज यांना समर्पित आहे. आजच कुसुमाग्रज यांची जयंतीही आहे. कुसुमाग्रज यांनी मराठीमध्ये कविता केल्या, अनेक नाटकं लिहीली आणि मराठी साहित्याला नवी उंची दिली.
मित्रांनो, आमच्याकडे भाषेची आपल्याच स्वतःची वैशिष्ट्ये आहेत, मातृभाषेचे स्वतःचे विज्ञान आहे. हे विज्ञान समजून घेऊन, राष्ट्रीय शिक्षण धोरणात स्थानिक भाषेतनं शिकण्यावर जोर दिला गेला आहे. आमचे व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे. हे स्वाभिमानाचं काम आहे. माझी अशी इच्छा आहे की, आपल्यातील जे कुणी मातृभाषा बोलतात, त्यांनी तिच्या वैशिष्ट्याबद्दल काही न काही जाणून घ्यावं आणि काही न काही तरी लिहावं.
मित्रांनो, काही दिवसांपूर्वी, माझी भेट माझे मित्र आणि केनियाचे माजी पंतप्रधान राईला ओडिंगाजी यांच्याशी झाली. ही भेट अत्यंत मनोरंजक तर होतीच पण अतिशय भावनाप्रधानही होती. आम्ही खूप चांगले मित्र झालो आणि मनमोकळेपणी खूप साऱ्या गप्पाही मारतो. जेव्हा आम्ही चर्चा करत होतो, तेव्हा ओडिंगाजींनी आपल्या कन्येच्या बाबतीत माहिती दिली. त्यांची कन्या रोझमेरीला मेंदूचा ट्यूमर झाला आणि यासाठी त्यांना आपल्या मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. परंतु त्याचा दुष्परिणाम असा झाला की, रोझमेरीच्या डोळ्यांतील दृष्टि जवळजवळ गेली आणि तिला दिसणंच बंद झालं. आता आपण कल्पना करू शकाल की, त्यांच्या कन्येचे काय हाल झाले असतील आणि एक वडिल म्हणून त्यांची मनःस्थितीचा अंदाज आपण लावू शकतो, त्यांच्या भावना समजू शकतो. त्यांनी जगभरातील रूग्णालयांमध्ये इलाज केले, जगातील एकही असा मोठा देश राहिला नसेल जेथे त्यांनी कन्येच्या इलाजासाठी भरपूर प्रयत्न केले नसतील. जगातील मोठमोठे देश त्यांनी पिंजून काढले, परंतु यश मिळालं नाही, एक प्रकारे त्यांनी साऱ्या आशा सोडल्या आणि संपूर्ण घरात निराशेचं वातावरण पसरलं होतं. यातच कुणीतरी त्यांना भारतातील आयुर्वेदाच्या उपचारांकरता येण्याचं सुचवलं आणि खूप काही केलं होतं, उपाय करून थकलेही होते. त्यांनी विचार केला, एक वेळेला प्रयत्न करायला काय हरकत आहे. ते भारतात आले , केरळात एका आयुर्वेदिक रूग्णालयात त्यांनी आपल्या कन्येचे उपचार सुरू केले. भरपूर काळ कन्या देशात राहिली. आयुर्वेदाच्या या उपचारांचा असा परिणाम झाला की रोझमेरीची दृष्टि बऱ्याचशा प्रमाणात परत आली आहे. आपण कल्पना करू शकता की, कसे एक नवं आयुष्य मिळालं आणि प्रकाश तर रोझमेरीच्या जीवनात आला. परंतु पूर्ण कुटुंबात एक प्रकाश परत आला आणि ओडिंगाजी इतके भावनावश होऊन मला ही गोष्ट सांगत होते. तसंच भारताच्या आयुर्वेदातील ज्ञान, विज्ञान केनियात नेण्याची त्यांची इच्छा आहे. जशा प्रकारे वनस्पती आयुर्वेदासाठी कामाला येतात, तसं त्या वनस्पतींची शेती करून त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देण्याकरता पूर्ण प्रयत्न करतील.
मला तर हीच खूप आनंदाची गोष्ट आहे की आमची धरती आणि आमच्या पंरंपरेनं एखाद्याच्या जीवनातील इतकं मोठं संकट दूर झालं. हे ऐकून आपल्यालाही आनंद झाला असेल. कोण भारतवासी नसेल की ज्याला याचा अभिमान नसेल? आपल्याला सर्वांना हे माहितच आहे की ओडिंगाजीच नव्हे तर जगातील लाखो लोक आयुर्वेदापासून असेच लाभ घेत आहेत.
आपल्या भूमीवरून आणि आपल्या परंपरेच्या माध्यमातून कोणाच्या तरी आयुष्यातून एवढं मोठं दुःख दूर झालं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे ऐकून तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. कुठल्या भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही? केवळ ओडिंगाजीच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोक आयुर्वेदापासून लाभान्वित होत आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे.
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स हे सुद्धा आयुर्वेदाचे मोठे चाहते आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटतो तेव्हा ते आयुर्वेदाचा उल्लेख नक्कीच करतात. भारतातील अनेक आयुर्वेदिक संस्थांचीही त्यांना माहिती आहे.
मित्रहो, गेल्या सात वर्षांत देशभरात आयुर्वेदाच्या प्रचारावर खूप लक्ष देण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्या स्थापनेमुळे आपली पारंपारिक औषधे आणि आरोग्य पद्धती लोकप्रिय करण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ झाला आहे. गेल्या काही वर्षांत आयुर्वेदाच्या क्षेत्रात अनेक नवीन स्टार्टअप उदयाला आले आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयुष स्टार्ट-अप चॅलेंज सुरू झाले. या क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्ट-अप्सना ओळखणे आणि त्यांना पाठिंबा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी विनंती मी त्यांना करतो.
मित्रहो, लोकांनी एकत्र येऊन काही करण्याचा निश्चय केला की ते विलक्षण गोष्टी अगदी सहजपणे करतात. समाजात असे अनेक मोठे बदल घडून आले आहेत, त्यात लोकसहभाग आणि सामूहिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. काश्मीरमधील श्रीनगरमध्ये ‘मिशन जल थल’ नावाची अशीच एक लोक चळवळ सुरू आहे. श्रीनगरमधील सरोवरे आणि तलाव स्वच्छ करून त्यांचे जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. “कुशल सार” आणि “गिल सार” वर“मिशन जल थल” उपक्रमाने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये लोकसहभागासोबत तंत्रज्ञानाचीही मोठी मदत घेतली जाते आहे. कुठे अतिक्रमण झाले आहे, कुठे बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, याची माहिती घेण्यासाठी या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले. प्लॅस्टिक कचऱ्याबरोबरच इतर कचराही स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या जलवाहिन्या आणि तलाव भरणारे 19 झरे पूर्ववत करण्यासाठीही खूप प्रयत्न करण्यात आले. या जीर्णोद्धार प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकांना आणि तरुणांना जलदूत बनवण्यात आले. आता येथील स्थानिक लोकही "गिल सार तलावामध्ये स्थलांतरित पक्षी आणि माशांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते पाहून आनंद होतो आहे. असे विलक्षण प्रयत्न करणाऱ्या श्रीनगरच्या जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,आठ वर्षांपूर्वी देशाने हाती घेतलेल्या'स्वच्छ भारत मोहिमेची व्याप्तीही काळाच्या ओघात वाढत गेली, नवनवीन शोधांचीही भर पडत गेली. तुम्ही भारतात कुठेही गेलात तरी प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेसाठी काही ना काही प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येईल. आसाममधील कोक्राझारमध्ये सुरू असलेल्या अशाच एका प्रयत्नाबद्दल मला माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकर्सच्या एका गटाने या भागात'स्वच्छ आणि हरित कोक्राझार' मोहिमेअंतर्गत एक अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या सर्वांनी नवीन उड्डाणपूल परिसरातील तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करून स्वच्छतेचा प्रेरक संदेश दिला. तसेच विशाखापट्टणममध्ये 'स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत पॉलिथिनऐवजी कापडी पिशव्यांचा प्रचार केला जात आहे. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी येथील लोक एकल वापर प्लॅस्टिकच्या उत्पादनांविरोधात मोहीम राबवत आहेत. त्याचबरोबर हे लोक घरातील कचऱ्याचे वर्गिकरण करण्यासाठी जनजागृती करत आहेत. मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही आपल्या स्वच्छता मोहिमेला सौंदर्यीकरणाची जोड दिली आहे. त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकाच्या भिंतींवर सुंदर चित्रे काढलीआहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूरमधल्या एका प्रेरणादायी उदाहरणाची माहितीही मला मिळाली आहे. तिथल्या तरुणांनी रणथंबोरमध्ये 'मिशन बीट प्लास्टिक' नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत रणथंबोरच्या जंगलातून प्लास्टिक आणि पॉलिथिन हद्दपार करण्यात आले आहे.प्रत्येकाने प्रयत्न करावेत, या भावनेतून देशात लोकसहभाग मजबूत होतो आणि जेव्हा लोकसहभाग असतो, तेव्हा मोठी उद्दिष्टे नक्कीच पूर्ण होतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून अवघ्या काही दिवसांनी 8 मार्च रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन'साजरा केला जाणार आहे. 'मन की बात' च्या माध्यमातून आम्ही महिलांच्या साहसाशी, कौशल्यांशी आणि प्रतिभेशी संबंधित अनेक उदाहरणे आपल्यासमोर आणत आहोत. आज स्किल इंडिया असो, सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा लहान-मोठे उद्योग असो, सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली आहे. जिथे पाहावे तिथे स्त्रिया जुने गैरसमज मोडीत काढत आहेत. आज आपल्या देशात संसदेपासून पंचायतीपर्यंत विविध क्षेत्रात महिला नवनवीन शिखरे गाठत आहेत. सैन्यातही आता मुली नव्या आणि मोठ्या भूमिकेत शिरून महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत आणि देशाचे रक्षण करत आहेत. अत्याधुनिक लढाऊ विमाने अगदी लिलया उडवणाऱ्या मुली आपण गेल्याच महिन्यात प्रजासत्ताक दिनी पाहिल्या आहेत. सैनिक शाळांमधील मुलींच्या प्रवेशावरील बंदीही देशाने हटवली असून, देशभरातील सैनिक शाळांमध्ये मुली प्रवेश घेत आहेत. स्टार्ट-अपच्या विश्वाकडे एक नजर टाका.गेल्या काही वर्षांमध्ये देशात हजारो नवीन स्टार्टअप सुरू झाले. यापैकी निम्म्या स्टार्टअप्समध्ये संचालकाच्या भूमिकेत महिला आहेत. अलीकडच्या काळात महिलांसाठी प्रसूती रजा वाढवण्यासारखे निर्णय घेतले गेले. मुलांना आणि मुलींना समान अधिकार देऊन लग्नाचे वय समान करण्याचा देश प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. देशात आणखी एक मोठा बदल होत असल्याचे तुम्ही पाहत असाल. हा बदल म्हणजे आपल्या सामाजिक मोहिमांचे यश आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' उपक्रमाचे यश बघा.आज देशातील लिंग गुणोत्तर सुधारले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींच्या प्रमाणातही सुधारणा झाली आहे. अशा वेळीआपल्या मुलींनी मध्येच शाळा सोडू नये, ही आपलीही जबाबदारी आहे. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत उघड्यावर शौचास जावे लागण्यापासून देशातील महिलांची सुटका झाली आहे. तिहेरी तलाकसारख्या सामाजिक कुप्रथाही संपुष्टात येत आहेत. तिहेरी तलाकविरोधात कायदा अस्तित्वात आल्यापासून देशात तिहेरी तलाकच्या प्रकरणांमध्ये 80 टक्के घट झाली आहे. इतक्या कमी वेळात हे सर्व बदल कसे घडत आहेत? हा बदल होतो आहे कारण आता आपल्या देशातील बदलाचे आणि प्रगतीशील प्रयत्नांचे नेतृत्व महिला स्वतः करत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्या 28 फेब्रुवारी हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' आहे. हा दिवस रामन इफेक्टच्या शोधासाठी देखील साजरा केला जातो. वैज्ञानिक क्षेत्रातील आपला प्रवास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सीव्ही रमण यांच्या बरोबरीने मी अशा सर्वच शास्त्रज्ञांना आदरांजली वाहतो. मित्रहो, तंत्रज्ञानाने आपले आयुष्य अधिक सोपे आणि सुलभ करून आपल्या आयुष्यात मोलाचे स्थान प्राप्त केले आहे. कोणते तंत्रज्ञान चांगले आहे, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर अधिक चांगला आहे, हे आपल्याला अगदी चांगले माहिती असते. पण त्या तंत्रज्ञानाला कशाचा आधार आहे, त्यामागचे शास्त्र काय आहे, हे आपल्या कुटुंबातील मुलांना समजले पाहिजे,याकडे आपले फारसे लक्ष जात नाही, हेही तितकेच खरे. या विज्ञान दिनानिमित्त मी सर्व कुटुंबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करण्यासाठी लहान प्रयत्नांपासून आवर्जून सुरूवात करावी.एखाद्याला दृष्टीदोष असेल आणि चष्मा लावल्यावर चांगले दिसू लागेल.मग अशा वेळी त्यामागे काय शास्त्र आहे, हे मुलांना सहज समजावून सांगता येईल. चष्मा लावला, आनंद झाला, इतके पुरेसे नाही. एका छोट्या कागदाचा वापर करून तुम्ही त्याला सांगू शकता. आता मुले मोबाईल फोन वापरतात, कॅल्क्युलेटर कसे काम करतो, रिमोट कंट्रोल कसे काम करते, सेन्सर्स म्हणजे काय, अशा विज्ञानाधारित गोष्टींचीही घरात चर्चा होते का? कदाचित घरातील रोजच्या वापरातील या गोष्टी आपण सहजपणे समजावून सांगू शकतो, आपण जे काही करत आहोत, त्यामागील शास्त्र काय आहे, ते सांगू शकतो. त्याचप्रमाणे, आपण मुलांना सोबत घेऊन आकाश पाहिले आहे का? रात्रीच्या वेळी ताऱ्यांबद्दल गप्पा झाल्याअसतील. आकाशात वेगवेगळी प्रकारची नक्षत्रे दिसतात, त्यांच्याबद्दल सांगा. असे करून तुम्ही मुलांमध्ये भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राबद्दल उत्सुकता निर्माण करू शकता. आजकाल अनेक अॅप्स देखील आहेत, ज्यावरून तुम्ही तारे आणि ग्रह शोधू शकता किंवा आकाशात दिसणारा तारा ओळखू शकता, त्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. आपल्या स्टार्ट-अप्सनी त्यांची कौशल्ये आणि वैज्ञानिक निपुणतेचा वापर राष्ट्र उभारणीशी संबंधित कामात करावा, असे मी सांगू इच्छितो. ही देशाप्रती आपली सामूहिक वैज्ञानिक जबाबदारी आहे. आभासी सत्याच्या आजच्या जगात आपले स्टार्टअप्स खूपच छान काम करत आहेत, हे मी पाहतो आहे. आभासी वर्गांच्या आजच्या या काळात मुलांना डोळ्यासमोर ठेवून अशीच एक आभासी प्रयोगशाळाही बनवता येईल. अशा आभासी विकल्पाच्या माध्यमातून आपण मुलांना रसायनशास्त्र प्रयोगशाळेचा अनुभव घरबसल्या देऊ शकतो. शिक्षकांनी आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि मुलांना प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे आणि त्यांच्यासोबत मिळून प्रश्नांची योग्य उत्तरे शोधावीत अशी विनंती मी करतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय शास्त्रज्ञांच्या भूमिकेचे आज मला कौतुक करायचे आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच भारतीय बनावटीची लस तयार करणे शक्य झाले, जी अवघ्या जगाच्या कामी आली. ही विज्ञानाने मानवाला दिलेली देणगी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळीही आपण अनेक विषयांवर चर्चा केली. येत्या मार्च महिन्यात अनेक सण येत आहेत - महाशिवरात्र आहे आणि आता काही दिवसांनी तुम्ही सर्वजण होळीच्या तयारीला लागाल. होळी हा सण आपल्याला एकत्र आणणारा सण आहे. या सणात आप-पर, राग-लोभ, लहान-मोठे असे सर्व भेदभाव विसरून लोक एकत्र येतात. त्यामुळेच होळीच्या रंगापेक्षा होळीच्या प्रेमाचा आणि समरसतेचा रंग अधिक गहिरा असतो, असे म्हटले जाते. होळीमध्ये मिष्टान्नांबरोबरच नात्यांचाही अनोखा गोडवा वाढीला लागतो. ही नाती आपल्याला आणखी दृढ करायची आहेत. आणि केवळ आपल्या कुटुंबातील लोकांशीच नाहीत तर आपल्या विशाल कुटुंबाचा भाग असणाऱ्या सर्वांबरोबरची नाती आपल्याला दृढ करायची आहेत. हे करण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. 'व्होकल फॉर लोकल' च्या माध्यमातून आपण आपले सण साजरे करायचे आहेत. आपण सण-उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादने खरेदी केली पाहिजेत, त्यामुळे आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या जीवनातही रंग भरले जातील, त्यांनाही चैतन्य लाभेल. ज्या उमेदीने आपला देश कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे आणि पुढे जात आहे, त्यामुळे सण साजरे करण्याचा उत्साहही अनेक पटींनी वाढला आहे. याच उमेदीसह आपण आपले सण साजरे करायचे आहेत आणि त्याच बरोबर पुरेशी काळजीही घ्यायची आहे. मी आपणा सर्वांना येणाऱ्या सणांच्या अनेक शुभेच्छा देतो. तुमच्यागोष्टींची, पत्रांची, संदेशांची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार ! यावेळी आपण सगळे 2021 ला निरोप आणि 2022 च्या स्वागताच्या तयारीत गुंतले असाल. नव्या वर्षात प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था, पुढच्या वर्षात आणखी काही अधिक उत्तम करण्याचा संकल्प करतात. गेल्या सात वर्षात, आपला हा ‘मन की बात’ कार्यक्रम देखील, व्यक्तीच्या, समाजातल्या, देशातल्या चांगुलपणाच्या, सकारात्मकतेच्या कथा सांगत, आपल्याला आणखी काही चांगले करण्याची, अधिक चांगले बनण्याची, प्रेरणा देत आला आहे. या सात वर्षात मी ‘मन की बात’ कथन करत असतांना, सरकारच्या कामगिरीवरही चर्चा करु शकलो असतो. कदाचित आपल्यालाही ते आवडलं असतं, आपणही त्याचं कौतुक केलं असतं. मात्र, माझा हा अनेक दशकांचा अनुभव आहे, की प्रसारमाध्यमांच्या झगमगाटापासून दूर, वर्तमानपत्रांच्या मथळ्यांपासून दूर, कोटी कोटी लोक आहे, जे फार उत्तम कामे करत आहेत.हे लोक देशाच्या उद्याच्या भविष्यासाठी, आपला ‘आज’ खर्च करत आहेत. ते देशाच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आज आपल्या कामांमध्ये आपले आयुष्य वेचत आहेत. अशा लोकांच्या कथा आपल्याला खूप समाधान देऊन जातात. खूप खोलवर प्रेरित करतात. माझ्यासाठी ‘मन की बात’ कायमच, अशाच लोकांच्या प्रयत्नांनी भरलेला, बहरलेला, सजलेला एक सुंदर बगिचा आहे. आणि ‘मन की बात’ मध्ये तर दर महिन्यात मला यावर विचार करावा लागतो, की या बागेतली कोणती फुले आज तुमच्यासाठी घेऊन येऊ.
मला आनंद आहे की आपल्या या बहुरत्ना वसुंधरेच्या पुण्य कार्यांचा अखंड प्रवाह निरंतर वाहता असतो. आणि आज जेव्हा देश ‘अमृत महोत्सव’ साजरा करत आहे, त्यावेळी ही जी लोकशक्ती आहे, एकेका माणसाची शक्ती आहे, त्या शक्तीचा उल्लेख, त्यांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, भारताच्या आणि एकूणच मानवतेच्या उज्ज्वल भविष्याची, एका अर्थाने हमी देणारे आहेत.
मित्रांनो, हे लोकशक्तीचेच सामर्थ्य आहे, सर्वांचे प्रयत्नच आहेत, ज्यामुळे भारत, 100 वर्षातल्या या सर्वात मोठ्या महामारीचा सामना करु शकला. आपण प्रत्येक संकटात, एकमेकांसोबत, एका कुटुंबासारखे उभे राहिलो. आपल्या वस्तीत किंवा शहरात, कोणाची मदत करायची असेल, तर ज्याला जे जे शक्य झाले, त्याने त्यापेक्षा अधिक करण्याचा प्रयत्न केला. आज जगात लसीकरणाचे जे आकडे आहेत, त्यांची भारताशी तुलना केली तर लक्षात येईल, की आपल्या देशाने किती अभूतपूर्व कामगिरी केली आहे. किती मोठे उद्दिष्ट पार केले आहेत. लसींच्या 140 कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार करणे, हे प्रत्येक भारतीयाचे स्वतःचे यश आहे. हा प्रत्येक भारतीयांचा, व्यवस्थेवर असलेला विश्वास दर्शवणारे आहे. आपल्या वैज्ञानिकांवर आपला विश्वास दर्शवणारे आहे. आणि समाजाच्या प्रति असलेली आपली जबाबदारी आपण कशाप्रकारे पार पाडत आहोत, या आपल्या इच्छाशक्तीचा हा पुरावाच आहे.
मित्रांनो,
आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे, की कोरोनाच्या आणखी एका नव्या प्रकारच्या विषाणूने आपल्या दारावर थाप दिली आहे. गेल्या दोन वर्षातला आपला अनुभव असा आहे, की या जागतिक महामारीचं पराभव करण्यासाठी, एक नागरिक म्हणून आपले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा जो नव्या स्वरूपाचा ओमायक्रॉन विषाणू आला आहे, आपले वैज्ञानिक सातत्याने त्याचे अध्ययन करत आहेत. त्यातून त्यांना योज नवी माहिती मिळते आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनंतर त्यावर काम केले जात आहे. अशावेळी,स्वयं सजगता, स्वयंशिस्त, ही कोरोनाच्या या स्वरूपाशी लढण्यासाठी, देशाची खूप मोठी ताकद आहे. आपली सामूहिक शक्ती कोरोनाचा पराभव करेल, याच जबाबदारीच्या जाणिवेसह, आपल्या सर्वांना 2022 या वर्षात प्रवेश करायचा आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
महाभारताच्या युद्धकाळात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले होते--नभः स्पृशं दीप्तम्’ म्हणजे अभिमानाने आकाशाला गवसणी घालणे. हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्यही आहे. भारतमातेच्या सेवेत गुंतलेले अनेक लोक रोज असेच अभिमानाने आकाश कवेत घेतात. असेच एक आयुष्य होते, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे. वरुण सिंह त्या हेलिकॉप्टरचे वैमानिक होते, ज्याला या महिन्यात तामिळनाडू इथे अपघात झाला. या भीषण अपघातात, आपण देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावले. वरुण सिंह यांनी देखील मृत्यूशी अनेक दिवस धैर्याने झुंज दिली. मात्र, नंतर तेही आपल्याला सोडून निघून गेले. वरुण जेव्हा रुग्णालयात होते,त्यावेळी मी सोशल मीडियावर असे काही पहिले, जे माझ्या मनाला स्पर्शून गेले.
या वर्षी, ऑगस्ट महिन्यातच त्यांना शौर्य चक्र दिले गेले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिले होते. हे पत्र वाचल्यावर माझ्या मनात पहिला विचार हाच आला की यशाची शिखरे गाठल्यानंतरही ते आपल्या मूळाची जपणूक करायला विसरले नव्हते. दुसरे, जेव्हा त्यांची आनंद साजरा करण्याची वेळ होती, तेव्हा त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता केली. त्यांची इच्छा होती, की ज्या शाळेत ते शिकले, तिथल्या विद्यार्थ्यांचे आयुष्यही एक ‘उत्सव’ बनावे. आपल्या पत्रात , वरुण जी यांनी आपल्या पराक्रमाचे वर्णन केलेले नही, तर आपल्या अपयशांविषयी ते बोलले आहेत. आपल्या कमतरतांना त्यांनी आपल्या यशात कसे रूपांतरित केले, याविषयी त्यांनी लिहिलं आहे. या पत्रात एके ठिकाणी त्यांनी लिहिलं आहे—“एक सामान्य व्यक्ती असण्यात काहीही गैर नाही. प्रत्येक व्यक्ती शाळेत सर्वोत्तम कामगिरी करु शकत नाही. आणि प्रत्येक विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवू शकत नाही. जर आपण हे करु शकलो, तर ती विलक्षण कामगिरी असेल आणि त्याचे कौतूक केलंच पाहिजे. मात्र, जर आपण ते करु शकलो नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्तीच राहणार आहात. कदाचित शाळेत तुम्ही एक सामान्य विद्यार्थी असाल, मात्र त्यावरून तुमच्या पुढच्या आयुष्याचे कुठल्याही अर्थाने मोजमाप केले जाऊ शकत नाही. तुमच्या अंतःप्रेरणेचा शोध घ्या; ती कदाचित एखादी कला असू शकेल, संगीत, ग्राफीक डिझाईन, साहित्य असं काहीही.. जे काही काम तुम्ही कराल, त्यात संपूर्ण समर्पण द्या. तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. कधीही नकारात्मक विचार करु नका, की मी आणखी प्रयत्न करु शकलो असतो.”
–(“It is ok to be mediocre. Not everyone will excel at school and not everyone will be able to score in the 90s. If you do, it is an amazing achievement and must be applauded. However, if you don’t, do not think that you are meant to be mediocre. You may be mediocre in school but it is by no means a measure of things to come in life. Find your calling; it could be art, music, graphic design, literature, etc. Whatever you work towards, be dedicated, do your best. Never go to bed thinking, I could have put-in more efforts.)
मित्रांनो सामान्यापासून असामान्य बनण्याचा जो मंत्र त्यांनी दिला आहे, तो देखील तितकाच महत्वाचा आहे. याच पत्रात वरुण सिंग यांनी लिहिलं आहे–
“कधीच आशा सोडू नका. कधीच असा विचार करू नका की तुम्हाला जे करायचं आहे त्यात तुम्ही कमी पडाल. ते सोपं असणार नाही, त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि परिश्रम करावे लागतील. मी अतिसामान्य होतो, आणि आज, मी माझ्या कारकीर्दीत अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. हा विचार करू नका की 12वी बोर्ड परीक्षेचे गुण हे ठरवतील की तुम्ही आयष्यात काय मिळवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा आणि यासाठी मेहनत करा.”
“Never lose hope. Never think that you cannot be good at what you want to be. It will not come easy, it will take sacrifice of time and comfort. I was mediocre, and today, I have reached difficult milestones in my career. Do not think that 12th board marks decide what you are capable of achieving in life. Believe in yourself and work towards it.”
वरुण यांनी लिहिलं होतं की ते एका जरी विद्यार्थ्याला जरी प्रेरणा देऊ शकले, तरी ते देखील खूप असेल. मात्र, आज मी सांगू इच्छितो – त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या पत्रात ते भलेही फक्त विद्यार्थ्यांशी बोलत आहे, पण त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला संदेश दिला आहे.
मित्रांनो, दर वर्षी मी अशाच विषयांवर विद्यार्थ्यांशी परीक्षेवर चर्चा करतो. या वर्षी देखील परीक्षांपुर्वी मी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा विचार करतो आहे. या कार्यक्रमासाठी दोन दिवसानंतर mygov.in वर नोंदणी देखील सुरु होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर पासून 20 जानेवारी पर्यंत चालेल. यात 9वी ते 12वी चे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ऑनलाईन स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. माझी इच्छा आहे की आपण सर्वांनी यात नक्की भाग घ्यावा. आपल्याला भेटण्याची संधी मिळेल. आपण सर्व मिळून परीक्षा, कारकीर्द, यश आणि विद्यार्थी जीवनाशी निगडीत अनेक पैलूंवर मंथन करू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात’ मध्ये मी आपल्या सर्वांना काही तरी ऐकवणार आहे, जे सीमेपलीकडून खूप दुरून आलं आहे. ते आपल्याला आनंदितही करेल आणि आश्चर्यचकित देखील करेल:
Vocal #(VandeMatram)
वन्दे मातरम् । वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् । वन्दे मातरम्
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।।
वन्दे मातरम् । वन्दे मातरम् ।
मला खात्री आहे की, हे ऐकून तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल अभिमान वाटला असेल. वन्दे मातरम् मध्ये जो भाव दडलेला आहे, तो आपल्यात अभिमान आणि जोश जागवतो.
मित्रांनो, आपण नक्कीच हा विचार करत असाल, की हा सुंदर व्हिडीओ आहे तरी कुठला, कुठल्या देशातून आला आहे? याचं उत्तर तुम्हाला आणखी आश्चर्यचकित करेल. वन्दे मातरम् सादर करणारे हे विद्यार्थी ग्रीसचे आहेत. तिथे ते इलियाच्या उच्च माध्यमिक शाळेत शिकतात. त्यांनी ज्या सुंदरतेने आणि भावनेने ‘वंदे मातरम्’ गायलं आहे, ते अद्भुत आणि प्रशंसनीय आहे. असेच प्रयत्न दोन देशांच्या लोकांना आणखी जवळ आणतात. मी ग्रीसच्या या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान केलेल्या त्यांच्या या प्रयत्नाची मी प्रशंसा करतो.
मित्रांनो, लखनौला राहणाऱ्या निलेशजींच्या एका पोस्टची देखील चर्चा करायची इच्छा आहे. निलेशजींनी लखनौ इथं झालेल्या एका आगळ्यावेगळ्या ड्रोन शो ची खूप प्रशंसा केली आहे. हा ड्रोन शो लखनौच्या रेसिडेन्सी भागात आयोजित केला गेला होता. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची साक्ष रेसिडेन्सीच्या भिंतींवर आजही बघायला मिळते. रेसिडेन्सी मध्ये झालेल्या ड्रोन शो मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे वेगवेगळे पैलू जिवंत केले गेले. मग ते ‘चौरी चौरा आन्दोलन’ असो, ‘काकोरी ट्रेन’ ची घटना असो किंवा मग नेताजी सुभाष यांचे दुर्दम्य साहस आणि पराक्रम असो, या ड्रोन शो ने सर्वांची मनं जिंकली. आपणही याप्रमाणे आपल्या शहरातील, गावातील, स्वातंत्र्य आंदोलनाशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण पैलू समोर आणू शकता. यात तंत्रज्ञानाची खूप मदत घेऊ शकता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृति जाग्या करण्याची संधी देतो, त्या अनुभवण्याची संधी देतो. देशासाठी नवे संकल्प करण्याची, काही तरी करण्याची इच्छाशक्ती दाखविण्याची हे प्रेरणादायी वेळ आहे, प्रेरणादायी उत्सव आहे. चला स्वातंत्र्यसंग्रामातल्या महान व्यक्तिमत्वांपासून प्रेरणा घेत राहू, देशासाठी आपले प्रयत्न आणखी मजबूत करूया.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपला भारत देश कितीतरी असामान्य प्रतिभांची खाण आहे, ज्यांचे कर्तृत्व इतरांना देखील काही तरी करून दाखविण्याची प्रेरणा देते. अशीच एक व्यक्ती आहे तेलंगणाचे डॉक्टर कुरेला विट्ठलाचार्य जी. त्याचं वय 84 वर्ष आहे. विट्ठलाचार्य जी याचं उदाहरण आहेत, की जेव्हा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची जिद्द असते, तेव्हा वय आडवं येत नाही. मित्रांनो, विट्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक इच्छा होती की एक मोठं वाचनालय सुरु करावं. देश तेव्हा गुलामीत होता, काही परिस्थितीमुळे त्यांचं ते स्वप्न तेव्हा स्वप्नच राह्यलं. काळ पुढे सरकत गेला तसे विट्ठलाचार्य जी प्राध्यापक झाले, त्यांनी तेलगु भाषेचा सखोल अभ्यास केला आणि त्यातच अनेक रचनांची निर्मिती देखील केली. 6-7 वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा आपलं स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. त्यांनी स्वतःची पुस्तकं वापरून वाचनालय सुरु केलं. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान देऊ लागले. यदाद्रि-भुवनागिरी जिल्ह्याच्या रमन्नापेट भागातल्याया वाचनालयात आज जवळजवळ २ लाख पुस्तकं आहेत. विट्ठलाचार्य जी म्हणतात अभ्यास करताना त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागलं ती वेळ कुणावरही यायला नको. त्यांना हे बघून आज खूप आनंद होतो की मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावातील लोक देखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत.
मित्रांनो, पुस्तकं -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकल मी पाहतो की, अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली हे अतिशय अभिमानानं सांगत असतात. तसंच आता यापुढे मला अमूक पुस्तकं वाचायची आहेत, असंही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे. मी ही ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
अलिकडेच माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या वेगळ्या प्रयत्नाकडे वेधलं गेलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय बनविण्यासाठी केला गेला आहे. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. तुम्हा लोकांना जाणून आश्चर्य वाटेल, हा अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झालाय, मात्र यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवला जातोय, तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला होता. ज्यावेळी भांडारकर संस्थेने यासंबंधित अभ्यासक्रम सुरू केला, त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या अभिनव उपक्रमाविषयी मी इथं चर्चा करतोय, याचं कारण म्हणजे, लोकांना समजलं पाहिजे की, आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केले जात आहेत. सातासमुद्रापल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा मिळू शकेल, यासाठीही नवोन्मेषी कल्पना, प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.
मित्रांनो, आज संपूर्ण विश्वामध्ये भारतीय संस्कृतीविषयी अधिकाधिक माहिती घेण्यामध्ये लोकांची उत्सुकता वाढतेय. वेगवेगळ्या देशांच्या लोकांना फक्त आपली संस्कृती जाणून घेण्यामध्येच उत्सुकता आहे असे नाही, तर तिचा विस्तार करण्यासाठीही हे लोक मदत करीत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे- सर्बियन स्कॉलर डॉक्टर मोमिर निकिच ! यांनी एक व्दिभाषी संस्कृत -सर्बियन शब्दकोश तयार केला आहे. या शब्दकोशामध्ये समाविष्ट केलेल्या संस्कृत 70 हजारपेक्षा जास्त शब्दांचा सर्बियन भाषेत अनुवाद केला गेला आहे. आपल्याला आणखी एक गोष्ट जाणून खूप नवल वाटेल, ते म्हणजे डॉक्टर निकिच यांनी वयाच्या 70 व्या वर्षी संस्कृत भाषा शिकली आहे. ते सांगतात की, त्यांनी महात्मा गांधी यांचे लेख वाचल्यामुळे, त्यांना संस्कृत भाषा शिकण्याची प्रेरणा मिळाली. अशाच प्रकारचं उदाहरण मंगोलियाचे 93 वर्षांचे प्राध्यापक जे गेंदेधरम यांचंही देता येईल. गेल्या चार दशकांमध्ये त्यांनी भारतातल्या जवळपास 40 प्राचीन ग्रंथ, महाकाव्ये आणि रचना यांचा मंगोलियन भाषेत अनुवाद केला आहे. आपल्या देशातही अशाप्रकारची जिद्द दाखवून कार्यरत असणारे अनेक लोक आहेत. मला गोव्यातल्या सागर मुळे जी यांच्या कामाविषयी, त्यांच्या प्रयत्नांविषयी माहिती घेण्याची संधी मिळाली. शेकडो वर्षांपूर्वीची प्राचीन ‘कावी’ ही चित्रशैली लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या ‘कावी’ चित्रशैलीचं जतन करण्याच्या कामाला त्यांनी जणू स्वतःला वाहून घेतलं आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर आपल्याला ‘कावी’ चित्रकला दिसून येते, परंतु आता ही चित्रशैली लूप्तप्राय झाली आहे. वास्तविक ‘काव’ याचा अर्थ आहे लाल माती! प्राचीन काळामध्ये या कलेत लाल मातीचा उपयोग केला जात होता. गोव्यामध्ये पोर्तुगाल शासनकाळात तिथून पलायन करणा-या लोकांनी इतर राज्यांमध्ये या अद्भूत चित्रकलेचा परिचय इतरांना करून दिला. काळाच्या ओघात ही चित्रकला लुप्त होत होती. मात्र सागर मुळे यांनी या कलेला आता नवसंजीवनी दिली आहे. त्यांच्या या प्रयत्नांचं खूप कौतुकही होत आहे. मित्रांनो, एक अल्पसा प्रयत्न, आपण उचललेलं एक छोटं पाऊलसुद्धा आपल्या समृद्ध कलांचं संरक्षण करण्यासाठी मोठं योगदान देवू शकतं. जर आपल्या देशातल्या लोकांनी दृढ निश्चय केला तर आपल्या प्राचीन समृद्ध कलांचे संवर्धन, जतन करण्यासाठी या प्रयत्नांना देशभरामध्ये एक जन आंदोलनाचं स्वरूप येवू शकतं. देशभरामध्ये अशा प्रकारे अनेक प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही याविषयी तुम्हाला असलेली माहिती नमो अॅपच्याव्दारे माझ्यापर्यंत जरूर पोहोचवावी.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, अरूणाचल प्रदेशातल्या लोकांनी एक वर्षापासून एक आगळं –वेगळं अभियान चालवलं आहे. आणि त्याला नाव दिले आहे ‘‘ अरूणाचल प्रदेश एयरगन सरेंडर अभियान’ या मोहिमेमध्ये लोक आपण स्वतःहून, स्वमर्जीनं आपली एयरगन समर्पित करीत आहेत. यामागे कारण काय आहे, माहिती आहे? अरूणाचल प्रदेशात होणारी पक्षांची बेहिशेबी शिकार रोखली जावी, हे यामागचे कारण आहे. मित्रांनो, अरूणाचल प्रदेशात 500 पेक्षांही अधिक प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास असतो. यापैकी काही प्रजातीचे पक्षी तर जगामध्ये इतरत्र कोणत्याही स्थानी सापडत नाहीत. मात्र हळूहळू आता जंगलांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘एयरगन सरेंडर’ मोहीम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये डोंगराळ भागापासून ते पठारी प्रदेशापर्यंत एका समाजापासून ते दुस-या समाजापर्यंत, राज्यामध्ये चौहो बाजूंच्या लोकांनी या अभियानाला अगदी मनापासून पाठिंबा, समर्थन दिलं आहे. अरूणाचलच्या लोकांनी स्वखुशीने आत्तापर्यंत 1600 पेक्षा जास्त एअरगन समर्पित केल्या आहेत. या कार्यासाठी मी अरूणाचलच्या लोकांचे कौतुक करतो. त्यांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आपल्या सर्वांकडून 2022 या वर्षासंबंधित असंख्य संदेश आणि शिफारसी, सल्लेही आले आहेत. एक विषय प्रत्येकवेळेप्रमाणे अधिकांश लोकांनी पाठवलेल्या संदेशांमध्ये आहे. हा विषय आहे, स्वच्छता आणि स्वच्छ भारताचा. स्वच्छतेचा हा संकल्प स्वयंशिस्तीनं , सजगतेनं आणि समर्पणानंच पूर्ण होवू शकणार आहे. आपण एनसीसीम्हणजेचराष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पुनीत सागर अभियानमध्ये याची झलक पाहू शकता. या अभियानामध्ये 30 हजारांपेक्षा जास्त एनसीसी कॅडेटस् सहभागी झाले आहेत. एनसीसीच्या या छात्रांनी अनेक ठिकाणी ......सफाई केली, प्लास्टिक कचरा काढून तो रिसायकलिंगसाठी एकत्रित केला. आपले ... आपले डोंगर, जर स्वच्छ असतील तरच ते फिरायला जाण्यालायक असतात. अनेक लोक काही विशिष्ट ठिकाणी फिरायला जाण्याचं स्वप्न आयुष्यभर पहात असतात. मात्र ज्यावेळी तिथं जातात, त्यावेळी समजून किंवा न समजून तिथे कचरा करून येतात. वास्तविक ही प्रत्येक देशवासियाची जबाबदारी आहे की, ज्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला खूप आनंद मिळतो, ते स्थान आपल्याकडून तरी अस्वच्छ, घाण केलं जावू नये.
मित्रांनो, मला ‘साफवॉटर’ या नावाच्या एका स्टार्टअपविषयी माहिती मिळाली आहे. हे स्टार्टअप काही युवकांनी सुरू केलं आहे. याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीनं चालतं. लोकांना त्यांच्या परिसरातल्या पाण्याची शुद्धता आणि गुणवत्ता यांच्यासंबंधी माहिती यातून मिळू शकते. ही गोष्ट म्हणजे स्वच्छता अभियानातला पुढचा टप्पा आहे. लोकांच्या स्वच्छ आणि आरोग्यदायी भविष्यासाठी या स्टार्टअपचं महत्व लक्षात घेवून त्याला एक जागतिक पुरस्कारही मिळाला आहे.
मित्रांनो, ‘एक पाऊल स्वच्छतेच्या दिशेने’ या प्रयत्नांमध्ये संस्था असो अथवा सरकार, सर्वांची भूमिका महत्वपूर्ण आहे. तुम्ही सर्व मंडळी जाणताच की, आधी सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या फायली आणि कागदपत्रांचा कितीतरी मोठा ढीग रचून ठेवलेला असायचा. ज्यावेळेपासून सरकारने जुनी कामाची पद्धत बदलण्यास प्रारंभ केला आहे, त्यावेळेपासून या फायली आणि कागदपत्रांचे ढीग डिजिटाईज होवून संगणकाच्या ‘फोल्डर’ मध्ये सामावले जात आहेत. जे काही जुने आणि प्रलंबित कामांचे साहित्य , कागदपत्रे आहेत, ते सर्व हटविण्यासाठी मंत्रालये आणि विभागांमध्ये विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. या सफाई मोहिमांमुळे काही रंजक गोष्टीही घडल्या आहेत. टपाल विभागानं ज्यावेळी असं स्वच्छता अभियान सुरू केलं त्यावेळी ‘जंकयार्ड’ पूर्णपणे मोकळं झालं. आता या जंकयार्डचं रूपांतर कोर्टयार्ड आणि कॅफेटेरिया मध्ये झालं आहे. आणखी एक जंकयार्ड मोकळं झाल्यानं ती जागा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वापरली जावू लागली. याचप्रमाणं पर्यावरण मंत्रालयानं आपल्याकडे मोकळ्या झालेल्या जंकयार्डच्या जागेचं वेलनेस केंद्रामध्ये रूपांतर केलं आहे. शहरी कार्य मंत्रालयानं तर एक स्वच्छ एटीएमही लावलं आहे. यामागे उद्देश असा आहे की, लोकांनी कचरा द्यावा आणि त्या बदल्यात रोख रक्कम घेवून जावी. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विभागांनी झाडांची पडणारी सुकलेली पाने आणि जैविक कचरा यांचं जैविक खत बनवण्यास प्रारंभ केला आहे. या विभागांनी वाया जाणा-या कागदांपासून लागणारी स्टेशनरीही बनवण्याचं काम सुरू केलं आहे. आमच्या सरकारी विभागांमध्येही स्वच्छतेसारख्या विषयांवर असंख्य प्रकारच्या नवसंकल्पना राबविल्या जावू शकतात, हे दिसून येतंय. काही वर्षांपूर्वी तर असे काही होवू शकेल, याविषयी कोणाला भरवसाही नव्हता. मात्र आज या सर्व गोष्टी व्यवस्थेचा हिस्सा बनत चालल्या आहेत. हाच तर देशाचा नवीन विचार आहे, आणि या विचाराचे नेतृत्व सर्व देशवासी मिळून करीत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात’मध्ये यावेळी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. प्रत्येकवेळे प्रमाणे एक महिन्यानंतर, आपण पुन्हा भेटणार आहोत. परंतु 2022 मध्ये! प्रत्येकवेळी नव्याने प्रारंभ करताना आपल्याला स्वतःचे सामर्थ्य ओळखण्याची एक संधी मिळत असते. जे लक्ष्य आपण गाठू अशी आपला आधी कल्पनाही करू शकलो नव्हतो, आज देश त्यासाठी प्रयत्न करीत आहे. आपल्याकडे असे म्हटले आहे की –
क्षणश: कणशश्चैव, विद्याम् अर्थं च साधयेत् |
क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम् ||
याचा अर्थ असा आहे की, ज्यावेळी आपल्याला विद्यार्जन करायचे असते, नवीन काही शिकायचे आहे, करायचे आहे, तर आपल्याला प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपल्यला धर्नाजन करायचे आहे, म्हणजेच आपल्याला उन्नती- प्रगती करायची असेल तर प्रत्येक कणाचा याचा अर्थ प्रत्येक स्त्रोतांचा, साधनांचा योग्यप्रकारे उपयोग केला पाहिजे. कारण क्षण वाया गेला तर विद्या आणि ज्ञान निघून जाईल आणि कण नष्ट झाला तर धन नष्ट होईल आणि प्रगतीचे मार्ग बंद होतील. ही गोष्ट आपणा सर्व देशबांधवांसाठी प्रेरणा देणारी आहे. आपल्याला तर आणखी खूप काही शिकायचं आहे. नवनवीन संकल्पना, नवोन्मेषी कल्पना राबवायच्या आहेत, नवनवीन लक्ष्य प्राप्त करायची आहेत. म्हणूनच आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. आपल्याला देशाला विकासाच्या नवीन उंचीवर घेवून जायचे आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येक स्त्रोतांचा, साधनसामुग्रीचा वापर करायचा आहे. हा तर एका दृष्टीने आत्मनिर्भर भारताचाही मंत्र आहे. कारण आपण ज्यावेळी आपल्या स्त्रोतांचा योग्यप्रकारे वापर करू, त्यांना वाया जावू देणार नाही, त्याचवेळी आपण स्थानिक गोष्टींची ताकद ओळखू शकणार आहोत. त्याचवेळी देश आत्मनिर्भर होणार आहे. म्हणूनच, चला तर मग, आपण आपल्या संकल्पांचे पुनरूच्चारण करू या. खूप भव्य, मोठा विचार करूया, मोठी स्वप्ने पाहूया आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करूया! आणि आपली स्वप्ने काही केवळ आपल्यापुरती मर्यादित असणार नाहीत. आपली स्वप्ने अशी असतील की, त्याच्याशी आपल्या समाजाचा आणि देशाचा विकास जोडला गेला पाहिजे. आपली प्रगती म्हणजे देशाच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करणारी असली पाहिजे. म्हणूनच आपल्याला आजच कामाला लागले पाहिजे. अगदी एक क्षण आणि एक कणही आपण गमावून चालणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की, या संकल्पाबरोबरच आगामी वर्षामध्ये देश खूप पुढे जाईल आणि 2022 हे वर्ष एका नव्या भारताच्या निर्माणाचे स्वर्णिम पृष्ठ बनेल. याच विश्वासाबरोबर आपल्या सर्वांना 2022 वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सीतापूरच्या ओजस्वींनी मला लिहिले आहे की, अमृत महोत्सवाशी संबंधित चर्चा त्यांना खूप आवडते. ते आपल्या मित्रांसोबत 'मन की बात' ऐकतात आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दल खूप काही जाणून घेण्याचा, शिकण्याचा सतत प्रयत्न करत करत असतात. मित्रांनो, अमृत महोत्सव हा शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याचीही प्रेरणा देतो आणि आता तर देशभरातील सामान्य जनता असो वा सरकारे असो, पंचायतीपासून संसदेपर्यंत सर्वत्र अमृत महोत्सवाचाच गाजावाजा सुरू आहे आणि या उत्सवाशी जोडलेले कार्यक्रम सतत सुरू आहेत. असाच एक रंजक कार्यक्रम नुकताच दिल्लीत पार पडला. “आजादी की कहानी-बच्चों की जुबानी” असे नाव असणाऱ्या या कार्यक्रमात मुलांनी स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित कथा अगदी मनापासून सादर केल्या. विशेष म्हणजे यात भारताबरोबरच नेपाळ, मॉरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी येथील विद्यार्थीही सहभागी झाले. ओएनजीसी ही आपल्या देशातील महारत्न कंपनी. ही ओएनजीसी कंपनीसुद्धा अभिनव पद्धतीनेअ मृत महोत्सव साजरा करत आहे. अलिकडे ओएनजीसी आपल्या विद्यार्थ्यांसाठी तेल क्षेत्रात अभ्यास दौरे आयोजित करत आहे. या दौऱ्यांमध्ये तरुणांना ओएनजीसी तेल क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली जात आहे. आमच्या नवोदित अभियंत्यांना राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नांमध्ये उत्साहाने आणि उत्कटतेने यात योगदान देता यावे, हा यामागचा उद्देश आहे.
मित्रहो, आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान लक्षात घेत देशाने आदिवासी गौरव सप्ताहसुद्धा साजरा केला आहे. देशाच्या विविध भागांत यासंबंधीचे कार्यक्रम सुद्धा झाले. अंदमान आणि निकोबार बेटांवर, जारवा आणि ओंगे अशा आदिवासी समुदायांच्या लोकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. हिमाचल प्रदेशातील उना येथील लघुलेखक राम कुमार जोशी यांनी सुद्धा एक अद्भुत काम केले आहे. त्यांनी टपाल तिकिटांवरच, म्हणजे इतक्या लहान टपाल तिकिटांवरच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची अनोखी रेखाचित्रे रेखाटली आहेत. हिंदीत लिहिलेल्या 'राम' या शब्दावर त्यांनी रेखाटने केली असून त्यात दोन्ही महापुरुषांचे चरित्रही थोडक्यात नोंदवले आहे. मध्य प्रदेशातील कटनी येथील काही सहकाऱ्यांनीसुद्धा एका अविस्मरणीय दास्तानगोई कार्यक्रमाची माहिती दिली आहे. यामध्ये राणी दुर्गावतीच्या दुर्दम्य साहसाच्या आणि त्यागाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. असाच एक कार्यक्रम काशीमध्ये सुद्धा आयोजित करण्यात आला. गोस्वामी तुलसीदास, संत कबीर, संत रविदास, भारतेंदू हरिश्चंद्र, मुन्शी प्रेमचंद आणि जयशंकर प्रसाद या महान व्यक्तींच्या स्मरणार्थ तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वांनी वेगवेगळ्या काळात देशात जनजागृती घडवून आणण्यात मोठी भूमिका निभावली आहे. तुम्हाला आठवत असेल की, 'मन की बात'च्या मागच्या भागात मी तीन स्पर्धांचा उल्लेख केला होता, पहिली म्हणजे देशभक्तीपर गीत लेखन, दुसरी म्हणजे देशभक्तीशी संबंधित, स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित घटनांवर आधारित रांगोळ्या काढणे आणि तिसरी म्हणजे आपल्या मुलांच्या मनात भव्य भारताची स्वप्ने जागवण्यासाठी अंगाई लिहिणे. या स्पर्धेसाठी तुम्ही सुद्धा निश्चितच प्रवेशिका पाठवल्या असतील, अशी आशा मला वाटते. तुम्ही विचार केला असेल आणि तुमच्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली असेल. भारताच्या कानाकोपऱ्यात तुम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने नक्कीच पुढे न्याल, अशी आशा मला वाटते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, या चर्चेतून आता मी तुम्हाला थेट वृंदावनात घेऊन जाणार आहे. वृंदावनाबद्दल असे म्हटले जाते की ते भगवंताच्या प्रेमाचे प्रत्यक्ष स्वरूप आहे. आपल्या संतांनीही म्हटले आहे,
यह आसा धरि चित्त में, यह आसा धरि चित्त में,
कहत जथा मति मोर |
वृंदावन सुख रंग कौ, वृंदावन सुख रंग कौ,
काहु न पायौ और |
म्हणजे वृंदावनाची महती, आपण सगळे आपापल्या कुवतीनुसार वर्णन करतो, पण वृंदावनाचे जे सुख आहे, इथला जो रस आहे, त्याचा अंत कोणालाही जाणता येणार नाही. येथील सुख अमर्याद आहे. त्यामुळेच वृंदावन जगभरातील लोकांना आकर्षित करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल.
पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ नावाचे एक शहर आहे. क्रिकेटप्रेमी या जगताशी चांगलेच परिचित असतील, कारण पर्थमध्ये वरचेवर क्रिकेटचे सामने होत असतात. पर्थमध्ये 'सॅक्रेड इंडिया गॅलरी' या नावाचे एक कलादालनही आहे. स्वान नामक दरीच्या सुंदर परिसरात हे कलादालन तयार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील रहिवासी जगत तारिणी दासी यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे. जगत तारिणी खरे तर ऑस्ट्रेलियाच्या आहेत. त्यांचा जन्मही तिथेच झाला, तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांनी 13 वर्षांपेक्षा जास्त काळ वृंदावनात व्यतीत केला. त्या म्हणतात की त्या ऑस्ट्रेलियात परतल्या, आपल्या देशात परतल्या, पण त्या वृंदावनाला विसरू शकल्या नाहीत. त्याचमुळे वृंदावन आणि तिथल्या आध्यात्मिक भावनेशी जुळल्यासारखे वाटत राहावे, या भावनेतून त्यांनी ऑस्ट्रेलियातच वृंदावन वसवले. आपल्या कलेच्याच माध्यमातून त्यांनी अद्भूत असे वृंदावन घडवले. येथे येणाऱ्या लोकांना विविध प्रकारच्या कलाकृती पाहण्याची संधी मिळते. त्यांना भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे - वृंदावन, नवाद्वीप आणि जगन्नाथपुरी येथील परंपरांचे आणि संस्कृतीचे दर्शन घडते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कलाकृतीही येथे प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. एका कलाकृतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आहे आणि त्याच्या खाली वृंदावनातील लोकांनी आश्रय घेतला आहे. जगत तारिणीजींचा हा अप्रतिम प्रयत्न, खरोखरच, आपल्याला कृष्णभक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतो. या प्रयत्नाबद्दल मी त्यांना अनेकानेक शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आताच मी ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ येथील वृंदावनबद्दल बोलत होतो. इतिहासातील आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आपल्या बुंदेलखंडच्या झाशीचेही एक वेगळे नाते आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा देत होत्या तेव्हा त्यांचे वकील जॉन लँग होते. हे जॉन लँग मूळचे ऑस्ट्रेलियाचे रहिवासी होते. भारतात राहून त्यांनी राणी लक्ष्मीबाईंचा खटला लढवला होता. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात झाशी आणि बुंदेलखंडचे योगदान आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई यांसारख्या विरांगनाही येथे घडल्या आणि मेजर ध्यानचंद यांच्यासारखी क्रीडारत्नेही या प्रदेशाने देशाला दिली आहेत.
मित्रांनो, शौर्य केवळ रणांगणावरच गाजवले जाते, असे नाही. शौर्य हे व्रत म्हणून स्वीकारले जाते आणि त्याचा विस्तार होत जातो, तेव्हा प्रत्येक क्षेत्रात अनेक कामे मार्गी लागतात. अशा शौर्याबाबत श्रीमती ज्योत्स्ना यांनी मला पत्र लिहिले आहे. जालौनमध्ये पुरातन काळापासून नून नावाची एक नदी होती. ही नदीच येथील शेतकर्यांसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत होती. मात्र कालांतराने ही नून नदी नामशेष होईल, असे चित्र दिसू लागले. या नदीचे जे लहानसे पात्र उरले होते, ते नाल्यासारखे होऊ लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी जालौनच्या लोकांनी पुढाकार घेतला. याच वर्षी मार्चमध्ये यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या मोहिमेत हजारो ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. येथील पंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने काम सुरू केले आणि आज एवढ्या कमी वेळात आणि अत्यंत कमी खर्चात नदीला पुन्हा जीवदान मिळाले आहे. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ होतो आहे. रणांगणाव्यतिरिक्त गाजवलेल्या शौर्याचे हे उदाहरण आपल्या देशवासीयांच्या संकल्प शक्तीचे दर्शन घडवते. आपण दृढनिश्चय केला तर अशक्य असे काहीच नाही, हेच यातून दिसून येते आणि यालाच मी म्हणतो - सर्वांचे प्रयत्न, सबका प्रयास.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आपण निसर्गाचे रक्षण करतो, त्या बदल्यात निसर्गही आपले संरक्षण करतो, आपल्याला सुरक्षा प्रदान देतो. अनेकदा वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हे अनुभवता येते. तामिळनाडूच्या जनतेने असाच एक आदर्श घालून दिला आहे. तामिळनाडूच्या तुतूकुडी जिल्ह्यातले हे उदाहरण आहे. आपल्याला ठाऊक आहे की किनारपट्टीच्या भागातील जमीन काही वेळा पाण्याखाली जाण्याची शक्यता असते. तुतूकुडीमध्येही अनेक छोटी बेटे आणि भूभाग होते, ज्यांना समुद्रात बुडण्याचा धोका वाढत होता. निसर्गाच्याच माध्यमातून या नैसर्गिक आपत्तीपासून कसा बचाव करायचा, हे येथील लोकांनी आणि तज्ज्ञांनी शोधून काढले. हे लोक आता या बेटांवर पाल्मिराची झाडे लावत आहेत. ही झाडे चक्रीवादळे आणि वादळातही ठाम उभी राहतात आणि जमिनीचे संरक्षण देतात. त्यामुळे आता हा परिसर वाचवता येईल, असा नवा विश्वास निर्माण झाला आहे.
मित्रहो, जेव्हा आपण निसर्गाचे संतुलन बिघडवतो किंवा त्याचे पावित्र्य नष्ट करतो, तेव्हाच आपल्याला निसर्गापासून धोका उद्भवतो. मातेप्रमाणे निसर्गही आपले पालन पोषण करतो आणि आपल्या जगात नवनवे रंग भरतो. अलिकडेच मी सोशल मीडियावर पाहत होतो. मेघालयातील एका होडीचा फोटो खूप व्हायरल होतो आहे. हे छायाचित्र आपले लक्ष वेधून घेते. तुमच्यापैकी बहुतेकांनी ते ऑनलाइन पाहिले असेल. हवेत तरंगणारी ही बोट जवळून पाहिल्यावर लक्षात येते की ती नदीच्या पाण्यात फिरते आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की आपल्याला तिचा तळ दिसतो आणि बोट हवेत तरंगत असल्याप्रमाणे दिसू लागते. आपल्या देशात अनेक राज्ये आहेत, अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांनी आपल्या नैसर्गिक वारशाच्या रंगांची जोपासना केली आहे. निसर्गाशी तादात्म्य पावणारी जीवनशैली या लोकांनी आजही जिवंत ठेवली आहे. आपल्या सर्वांसाठीही हे प्रेरक आहे. आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक स्रोत आहेत, ते आपण जपले पाहिजेत, त्यांना पुन्हा मूळ स्वरूपात आणले पाहिजे. यातच आपल्या सर्वांचे हित आहे, जगाचे हित आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा सरकार योजना बनवते, अर्थसंकल्पातून खर्च करते, प्रकल्प वेळेवर पूर्ण करते, तेव्हा लोकांना वाटते की ते काम करत आहे. मात्र अनेक सरकारी कामांमध्ये, विकासाच्या अनेक योजना राबविताना मानवी संवेदनांशी निगडित कामे नेहमीच अनोखा आनंद देतात. सरकारच्या प्रयत्नांमुळे, सरकारच्या योजनांमुळे जीवनात कसे बदल झाले, त्या बदललेल्या जगण्याचा अनुभव काय? हे ऐकून आपणही भावविभोर होतो. त्यातून मनाला समाधानही मिळते आणि ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही मिळते. म्हणजेच असे करणे एका अर्थाने 'स्वांत: सुखाय' आहे आणि म्हणूनच आज "मन की बात" मध्ये दोन सहकारी आज आपल्यासोबत आहेत जे निव्वळ हिमतीच्या बळावर एक नवे आयुष्य जिंकून आले आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या सहाय्याने त्यांनी उपचार केले आणि नव्या आयुष्याला सुरूवात केली. आमचे पहिले सहकारी आहेत, राजेश कुमार प्रजापती आहे, जे हृदयरोगाने त्रासले होते.
चला तर मग, राजेश जीं सोबत गप्पा मारूया -
पंतप्रधान – राजेश जी नमस्कार.
राजेश प्रजापती – नमस्कार सर नमस्कार.
पंतप्रधान – राजेश जी तुम्ही कशामुळे आजारी होता? मग तुम्ही कुठल्यातरी डॉक्टरकडे गेला असाल. जरा मला समजावून सांगा, स्थानिक डॉक्टरांनी काही सांगितले असले, मग तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे गेला असाल? मग तुम्हाला निर्णय घेता येत नसता, किंवा निर्णय देता आला असता तर काय केले असते? काय विचार केला होता तुम्ही?
राजेश प्रजापती – सर, माझ्या हृदयात दोष निर्माण झाला होता. माझ्या छातीत जळजळ होत असे. डॉक्टरना दाखवले तर आधी ते म्हणाले की बाळा, तुला पित्ताचा त्रास होत असे. मग त्यानंतर अनेक दिवस मी पित्ताच्या गोळ्या घेतल्या. पण मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. मग डॉक्टर कपूर यांना दाखवले तर ते म्हणाले की तुझी जी लक्षणे आहेत, त्यानुसार angiography केली तर दोष कळून येईल. त्यांनी मला श्री राम मूर्ति यांच्याकडे पाठवले. त्यानंतर अमरेश अग्रवाल यांची भेट घेतली आणि त्यांनी माझी angiography केली. ते म्हणाले की तुझ्या रक्तवाहिनीत ब्लॉकेज आहे. आम्ही विचारले की साहेब किती खर्च येईल? तर त्यांनी विचारले की आयुष्मान कार्ड आहे का तुझ्याकडे, जे पंतप्रधानांनी दिले आहे. मग मी म्हणालो की हो, माझ्याकडे कार्ड आहे. मग त्यांनी माझे ते कार्ड घेतले आणि माझे सर्व उपचार त्या कार्डाच्या माध्यमातूनच केले. सर आणि तुम्ही हे कार्ड खूप चांगल्या पद्धतीने बनवले आहे आणि ते आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी खूपच सोयीचे आहे. मी तुमचे आभार कसे मानू...
पंतप्रधान – राजेश जी, तुम्ही काय करता?
राजेश प्रजापती – सर, सध्या मी खाजगी नोकरी करतो.
पंतप्रधान – आणि तुमचे वय किती?
राजेश प्रजापती – मी एकोणपन्नास वर्षांचा आहे सर.
पंतप्रधान– इतक्या लहान वयात तुम्हाला हृदयाशी
संबंधित आजार झाला..
राजेश प्रजापती – हो सर. आता काय बोलायचे
पंतप्रधान – तुमच्या कुटुंबात तुमच्या आईला, वडीलांना
किंवा इतर कोणाला असा आजार होता का?
राजेश प्रजापती – नाही सर, कोणालाच नव्हता. मलाच पहिल्यांदा हा आजार झाला.
पंतप्रधान – हे आयुष्मान कार्ड. भारत सरकार हे कार्ड देते, गरीबांसाठी ही एक फार मोठी योजना आहे. तुम्हाला त्याबद्दल कसे समजले
राजेश प्रजापती – सर, ही एवढी मोठी योजना आहे, गरिबांना याचा खूप फायदा होतो आणि खूप आनंद होतो सर, या कार्डचा लोकांना किती फायदा होतो, हे आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिले आहे. जेव्हा रूग्ण डॉक्टरला सांगतात की माझ्याकडे कार्ड आहे, तेव्हा, सर, डॉक्टर म्हणतात ठीक आहे ते कार्ड घेऊन या. त्याच कार्डचा वापर करून मी तुमच्यावर उपचार करीन.
पंतप्रधान – बरं. कार्ड नसतं तर डॉक्टरने तुम्हाला किती खर्च सांगितला होता?
राजेश प्रजापती – डॉक्टर म्हणाले होते की बेटा खूप खर्च येईल. कार्ड नसेल तर. मग मी म्हणालो की सर माझ्याकडे एक कार्ड आहे. तर ते म्हणाले, लगेच दाखवा बरे. मग मी लगेच ते कार्ड दाखवले आणि त्याच कार्डवर सगळे उपचार झाले. माझा एक पैसाही खर्च झाला नाही, सर्व औषधेसुद्धा त्याच कार्डवरून मिळाली आहेत.
पंतप्रधान– मग राजेश, आता तुम्ही खुश आहात, तब्येत ठीक आहे तुमची?
राजेश प्रजापती – हो सर. तुमचे मनापासून आभार. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्हीच सतत सत्तेवर राहा. आणि आमच्या कुटुंबातले लोक सुद्धा तुमच्यावर इतके खुश आहेत की तुम्हाला काय सांगू?
पंतप्रधान - राजेशजी, तुम्ही मला सत्तेत राहण्यासाठी शुभेच्छा देऊ नका, मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेमध्ये जायची माझी इच्छा नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे, माझ्या साठी हे पद, हे पंतप्रधान या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीत, तर सेवेसाठी आहेत.
राजेश प्रजापति - आम्हा लोकांना सेवाच तर हवी आहे आणि काय
पंतप्रधान - बघा, गरीबांसाठीही आयुष्मान भारत योजना
राजेश प्रजापति - हो, सर, खूप चांगली गोष्ट आहे
पंतप्रधान - मात्र हे पहा, राजेशजी, तुम्ही आमचे एक काम कराल ?
राजेशप्रजापति - हो, नक्की करेन, सर
पंतप्रधान - हे पहा, होतं काय की लोकांना याची माहिती नसते, तुम्ही एक जबाबदारी पार पाडा,तुमच्या आजूबाजूला अशी जितकी गरीब कुटुंबे आहेत, त्यांना तुम्ही सांगा,तुम्हाला याचा कसा लाभ झाला, कशी मदत झाली ?
राजेश प्रजापति - हो, नक्की सांगेन, सर .
पंतप्रधान - आणि त्यांना सांगा की तुम्ही देखील असं कार्ड बनवून घ्या, कारण कुटुंबावर कधी कसे संकट कोसळेल सांगता येत नाही आणि आजच्या स्थितीत गरीब माणूस औषधांपासून वंचित राहणे हे बरोबर नाही. आता पैशांमुळे तो औषधे घेत नसेल किंवा आजारावर उपचार घेत नसेल तर ती मोठी चिंतेची बाब आहे. आणि गरीबांचे काय असतं, उदा. तुम्हाला हृदयरोगाचा त्रास आहे, तर किती महिने तुम्ही काम करू शकला नसाल.
राजेश प्रजापति - मी तर दहा पावलं देखील चालू शकत नव्हतो, जिने चढू शकत नव्हतो, सर .
पंतप्रधान - तर मग राजेशजी, तुम्ही माझे एक चांगले सहकारी बनून किती गरीबांना तुम्ही या आयुष्मान भारत योजने बाबत समजावू शकाल, अशा आजारी लोकांची मदत करू शकाल हे पहा, तुम्हालाही आनंद होईल आणि मला खूप आनंद होईल कि चला, राजेशजींची तब्येत तर सुधारली मात्र राजेशजींनी शेकडो लोकांची तब्येत सुधारण्यात मदत केली, ही आयुष्मान भारत योजना, ही
गरीबांसाठी आहे, मध्यमवर्गासाठी आहे, सामान्य कुटुंबासाठी आहे, त्यामुळे ती घरोघरी तुम्ही पोहचवाल.
राजेश प्रजापति – नक्की पोहचवेन, सर. मी तिथे रुग्णालयात तीन दिवस होतोना, तेव्हा सर, गरीब बिचारे खूप लोक तिथे आले होते, त्यांना सगळे फायदे सांगितले, कार्ड असेल तर मोफत उपचार होतील.
पंतप्रधान - चला, राजेशजी,तुम्ही स्वतःची तब्येत सांभाळा, थोडी शरीराची काळजी घ्या, मुलांची काळजी घ्या आणि खूप प्रगती करा, माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा.
मित्रांनो, आपण राजेशजी काय म्हणाले ते ऐकलं, चला आता आपल्याबरोबर सुखदेवीजी सहभागी होत आहेत, गुडघ्याच्या दुखण्याने त्या त्रस्त होत्या, चला आपण सुखदेवीजी यांच्याकडून त्यांच्या वेदना जाणून घेऊया आणि मग कसे बरं वाटलं ते समजून घेऊया.
मोदीजी – सुखदेवीजी नमस्कार! तुम्ही कुठून बोलत आहात ?
सुखदेवीजी – दानदपरा इथून .
मोदीजी – हे कुठे येतं ?
सुखदेवीजी – मथुरा मध्ये.
मोदीजी – मथुरा मध्ये, मग तर सुखदेवीजी, तुम्हाला नमस्कार देखील म्हणावं लागेल आणि त्याच बरोबर राधे-राधे देखील म्हणावं लागेल.
सुखदेवीजी – हो, राधे-राधे
मोदीजी – अच्छा आम्ही असे ऐकलं की तुम्हाला त्रास होत होता. तुमची कुठली शस्त्रक्रिया झाली का? जरा सांगाल का काय झालं होतं ?
सुखदेवीजी – हो, माझा गुडघा खराब झाला होता, त्यामुळे माझी शस्त्रक्रिया झाली. प्रयागरुग्णालयात.
मोदीजी – मचं वय किती आहे सुखदेवीजी ?
सुखदेवीजी – वय 40वर्षे.
मोदीजी – 40 वर्ष आणि सुखदेव नाव,आणि सुखदेवीला आजार जडला.
सुखदेवीजी – आजारतर मला 15-16 वर्षांपासून जडला होता.
मोदीजी – अरे बापरे! एवढ्या कमी वयात तुमचे गुडघे खराब झाले.
सुखदेवीजी – सांधे दुखी म्हणतात याला, सांध्यातील वेदनांमुळे गुडघे खराब झाले.
मोदीजी – म्हणजे 16 वर्ष ते 40 वर्षे वयापर्यंत तुम्ही यावर उपचार करून घेतले नाहीत.
सुखदेवीजी – नाही करून घेतले. वेदना शमवण्यासाठी गोळ्या खात राहिले, छोट्या-मोठ्या डॉक्टरांनी तर देशी औषधे आहेत, विदेशी औषधे आहेत असं सांगितलं. अशाने गुडघेच नव्हे तर पायदेखील दुखायला लागले. 1-2 किलोमीटर पायी चालले तर माझा गुडघा दुखावला गेला.
मोदीजी – तर सुखदेवीजी, शस्त्रक्रिया करून घेण्याचा विचार कसा आला? त्यासाठी पैशाची व्यवस्था कशी केली? कसे झालं हे सगळं ?
सुखदेवीजी – मी त्या आयुष्मान कार्डा द्वारे इलाज करून घेतला आहे.
मोदीजी – म्हणजे तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळाले होतं ?
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – आणि आयुष्मान कार्ड द्वारे गरीबांना मोफत उपचार मिळतात. हे माहित होतं ?
सुखदेवीजी – शाळेत बैठक सुरु होती. तिथे माझ्या नवऱ्याला समजले तेव्हा माझ्या नावाचं कार्ड बनवून घेतलं.
मोदीजी – अच्छा.
सुखदेवीजी – मग कार्ड वापरून इलाज करून घेतला आणि मला एकही पैसा द्यावा लागला नाही. कार्ड द्वारेच माझ्यावर उपचार झाले. खूप छान उपचार झाले आहेत.
मोदीजी – अच्छा, डॉक्टरांनी आधी कार्ड नव्हतं तेव्हा किती खर्च सांगितला होता ?
सुखदेवीजी – अडीच लाख रुपये, तीन लाख रुपये. 6-7 वर्षांपासून बिछान्यावर पडून आहे, देवाला म्हणत होते की मला घेऊन जा, मला जगायचं नाही.
मोदीजी – 6-7 वर्षांपासून बिछान्यावर होतात. बाप-रे-बाप.
सुखदेवीजी – हो.
मोदीजी – ओह.
सुखदेवीजी –अजिबात उठता-बसता येत नव्हतं.
मोदीजी – तर मग आता तुमचा गुडघा पूर्वीपेक्षा बरा झाला आहे ना ?
सुखदेवीजी – मी खूप फिरते. स्वयंपाक घरात काम करते. मुलांना जेवण बनवून वाढते.
मोदीजी – म्हणजे आयुष्मान भारत कार्डाने तुम्हाला खरोखरच आयुष्मान बनवलं.
सुखदेवीजी – खूप-खूप धन्यवाद. तुमच्या योजनेमुळे बरी झाले, आपल्या पायावर उभी राहिले .
मोदीजी – तर मग आता मुले देखील खूष असतील
सुखदेवीजी – हो. मुलांना तर खूपच त्रास व्हायचा. आई दुःखी असेल तर मुलंदेखील दुखी असतात.
मोदीजी – हे पहा, आपल्या आयुष्यात सर्वात मोठं सुख आपलं आरोग्य हेच असतं. हे सुखी जीवन सर्वांना मिळावं हीच आयुष्मान भारतची भावना आहे, चला,सुखदेवीजी, माझ्या तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुम्हाला राधे-राधे.
सुखदेवीजी- राधे- राधे, नमस्कार !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, युवकांनी समृद्ध प्रत्येक देशात तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि त्याच कधी-कधी युवकांची खरी ओळख बनतात. पहिली गोष्ट आहे– कल्पना आणि नाविन्य पूर्ण संशोधन. दुसरी आहे- जजोखीम घेण्याची भावना आणि तिसरी आहे मी करू शकते म्हणजे कुठलंही काम पूर्ण करण्याची जिद्द , मग परिस्थिती कितीही विपरीत का असेना जेव्हा या तीन गोष्टी परस्परांशी मिळतात,तेव्हा अभूतपूर्व परिणाम मिळतात.चमत्कार होतात.आजकाल आपण चोहो बाजुंनी ऐकत असतो Start-Up,Start-Up, Start-Up. खरी गोष्टही आहे हे Start-Upचं युग आहे, आणि हे देखील खरं आहे की Start-Upच्या जगात आज भारत जगात एक प्रकारे नेतृत्व करत आहे. वर्षानुवर्षे Start-Upला विक्रमी गुंतवणूक मिळत आहे. हे क्षेत्र अतिशय वेगाने पुढे जात आहे. इथपर्यंत की देशातल्या छोट्या-छोट्या शहरातदेखील Start-Upची व्याप्ती वाढली आहे. आजकाल ‘Unicorn’ शब्द खूप चर्चेत आहे. तुम्ही सर्वांनी याबाबत ऐकलं असेल. ‘Unicorn’ एक असा Start-Up असतो ज्याचं मूल्य किमान 1 अब्ज डॉलर असतं म्हणजे अंदाजे सात हज़ार कोटी रुपयांहून अधिक असतं.
मित्रांनो, वर्ष 2015 पर्यंत देशात मोठ्या मुश्किलीनं नऊ किंवा दहा Unicorns असायचे. तुम्हाला हे ऐकून खूप आनंद झाला असेल की आता Unicorns च्या जगातही भारत वेगाने भरारी घेत आहे. एका अहवालानुसार याच वर्षी एक मोठा बदल घडून आला आहे. केवळ दहा महिन्यातच भारतात प्रत्येक दहा दिवसात एक युनिकॉर्न तयार झाला आहे. ही यासाठी देखील मोठी गोष्ट आहे कारण आपल्या युवकांनी हे यश कोरोना महामारीच्या काळात प्राप्त केलं आहे. आज भारतात 70 हून अधिक Unicorns झाले आहेत. म्हणजे 70 पेक्षा अधिक Start-Up असे आहेत ज्यांनी 1 अब्जा पेक्षा अधिक मूल्य पार केले आहेत. मित्रांनो, Start-Upच्या यशामुळे प्रत्येकाचे त्याकडे लक्ष गेलं आणि ज्याप्रकारे देशातून, विदेशातून गुंतवणूकदारांचा त्याला पाठिंबा मिळत आहे. कदाचित काही वर्षांपूर्वी कुणी त्याची कल्पनाही करू शकलं नसतं. मित्रांनो, Start-Upsच्या माध्यमातून भारतीय युवा जागतिक समस्येवर तोडगा काढण्यात आपलं योगदान देत आहेत. आज आपण एक युवक मयूर पाटील यांच्याशी बोलूया. त्यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
मोदीजी – मयूरजी नमस्कार.
मयूर पाटील – नमस्ते सरजी
मोदीजी – मयूरजी तुम्ही कसे आहात ?
मयूर पाटील – एकदम छान, सर तुम्ही कसे आहात.
मोदीजी – मी खूप आनंदी आहे. अच्छा मला सांगा की आज तुम्ही एका Start-Upच्या जगात आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी – आणि कचऱ्या पासून संपत्ती देखील निर्माण करत आहात.
मयूर पाटील – हो.
मोदीजी - पर्यावरणासाठी देखील करत आहात. मला थोडं स्वतःविषयी सांगा. तुमच्या कामा बद्दल सांगा आणि हे काम करण्याचा विचार कसा आला ?
मयूर पाटील – सर, जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हाच माझ्याकडे मोटर सायकल होती. ज्याचे मायलेज खूप कमी होतं आणि उत्सर्जन खूप जास्त होतं. ती Two stroke Motorcycle होती. त्यामुळे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि तिचे मायलेज थोडे वाढवण्यासाठी मी प्रयत्न सुरु केले होते. साधारण 2011-12 मध्ये मी तिचे मायलेज अंदाजे 62 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं होतं. तर त्यातून मला प्रेरणा मिळाली कि एखादी अशी गोष्ट बनवावी जिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येईल जेणेकरून इतरांनादेखील त्याचा फायदा होईल, तर 2017-18 मध्ये आम्ही मित्रांनी त्याचे तंत्रज्ञान विकसित केलं आणि प्रादेशिक परिवहन महामंडळात आम्ही 10 बसेस मध्ये ते वापरलं. त्याचे परिणाम तपासण्यासाठी आणि आम्ही त्यांचे सुमारे चाळीस टक्के उत्सर्जन कमी केलं, बस मधले.
मोदीजी – हम्म! आता हे तंत्रज्ञान जे तुम्ही शोधले आहे, त्याचे पेटंट करून घेतलं का?
मयूर पाटील – हो. पेटन्ट झालं आहे. यावर्षी आम्हाला पेटंट मिळालं.
मोदीजी – आणि पुढे त्याचा विस्तार करण्याची तुमची काय योजना आहे? कशा प्रकारे करत आहात? जसे बसचे निष्कर्ष आले, त्याच्याही सर्व गोष्टी समोर आल्या असतील. तर पुढे काय विचार आहे?
मयूरपाटिल – सर, Start-Up India अंतर्गत नीति आयोगाचे अटल न्यू इंडिया चॅलेंजजे आहे त्यातून आम्हाला अनुदान मिळालं आहे आणि त्याअनुदानाच्या आधारे आम्ही मित्रांनी आता कारखाना चालू केला आहे जिथे आम्ही एअर फिल्टर्सची निर्मिती करू शकतो.
मोदीजी– तर भारत सरकारच्या वतीनं तुम्हाला किती अनुदान मिळालं?
मयूर पाटील – 90 लाख रुपये.
मोदीजी – 90 लाख .
मयूरपाटिल – हो सर.
मोदीजी – आणि त्यातून तुमचं काम झालं?
मयूर पाटील – हो आता तर चालू झालं आहे, प्रक्रिया सुरु आहे.
मोदीजी – तुम्ही किती मित्र मिळून करत आहात हे सगळं?
मयूरपाटिल – आम्ही चार मित्र आहोत,सर
मोदीजी – आणि चारही मित्र आधी पासून एकत्र शिकत होतात आणि त्यातूनच तुमच्या मनात एक विचार आला पुढेजाण्याचा.
मयूर पाटील – हो,हो. आम्ही महाविद्यालयातच एकत्र होतो आणि तिथेच आम्ही सर्वानी यावर विचार केला आणि ही माझी कल्पना होती की माझ्या मोटरसायकलमुळे किमान प्रदूषण कमी व्हावं आणि तिचं मायलेज वाढावं.
मोदीजी – अच्छा, प्रदूषण कमी करता आणि मायलेज वाढवता तर सरासरी खर्चाची किती बचत होईल ?
मयूर पाटील – सर, आम्ही लोकांनी मोटर सायकल वर चाचणी घेतली, तिचे मायलेज 25 किलोमीटर प्रति लिटर होतं, ते आम्ही 39 किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवलं म्हणजे अंदाजे 14 किलोमीटरचा फायदा झाला आणि त्यातलं 40 टक्के कार्बन उत्सर्जन कमी झालं आणि जेव्हा बसेस मध्ये केलं तेव्हा तिथं 10 टक्के इंधन कार्यक्षमतेत वाढ झाली आणि त्यातही 35-40 टक्के उत्सर्जन कमी झालं.
मोदीजी – मयूर, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या मित्रांचे माझ्या वतीनं अभिनंदन करा. महाविद्यालयीन जीवनात तुमची जी समस्या होती त्यावर तुम्ही तोडगा काढलात आणि त्यातून जो मार्ग निवडला त्याद्वारे पर्यावरण समस्या सोडवण्याचा विडा तुम्ही उचलला. आणि हे आपल्या देशातील युवकांचं सामर्थ्य आहे की कुठलंही मोठं आव्हान स्वीकारतात आणि मार्ग शोधतात. माझ्या कडून तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप-खूप धन्यवाद .
मयूर पाटील – धन्यवाद ,सर ! आभारी आहे !
मित्रांनो, काही वर्षांपूर्वी जर कुणी म्हटले असतं की त्याला व्यवसाय करायचा आहे किंवा एक नवी कंपनी सुरु करायची आहे, तर त्यावर कुटुंबातील वडीलधाऱ्यामंडळींचे उत्तर असायचं की – “तुला नोकरी का करायची नाही, नोकरी कर. नोकरीत सुरक्षितता असते, पगार मिळतो. कटकटी कमी असतात, मात्र आज जर कुणी स्वतःची कंपनी सुरु करू इच्छित असेल तर त्याच्या आसपासचे सगळेजण खूप उत्साहित होतात आणि यात त्याला सर्वतोपरी मदतही करतात.
मित्रांनो, भारताच्या विकास गाथेला इथेच वळण मिळालं आहे जिथे आता लोक केवळ नोकरी शोधण्याचे स्वप्न पाहत नाही तर रोजगार देणारे देखील बनत आहेत. यामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती आणखी मजबूत होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज ‘मनकीबात’ मध्ये आपण अमृत महोत्सवा बद्दल बोललो. अमृत काळात आपले देशबांधव कशा प्रकारे नवनवीन संकल्प पूर्ण करत आहेत, याची चर्चा केली आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सैन्याच्या शौर्याशी निगडित प्रसंगांचा देखील उल्लेख केला. डिसेंबर महिन्यातच एक आणखी मोठा दिवस आपल्या समोर येतो ज्या पासून आपण प्रेरणा घेतो. हा दिवस आहे 6 डिसेंबर. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथि. बाबासाहेबानी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी आपली कर्तव्ये बजावण्यात समर्पित केलं होतं. आपण देशवासियांनी हे कधीही विसरता कामा नये की आपल्या संविधानाची मूळ भावना, आपले संविधान आपणा सर्व देशवासियांकडून आपापली कर्तव्ये पार पाडण्याची अपेक्षा करतं - चला, आपणही संकल्प करू या कि अमृतमहोत्सवात आपण पूर्ण निष्ठेने कर्तव्य बजावण्याचा प्रयत्नकरू. हीच बाबासाहेबांप्रति आपली खरी श्रद्धांजली असेल.
मित्रांनो, आता आपण डिसेंबर महिन्यात प्रवेश करत आहोत, स्वाभाविक आहे, पुढली ‘मन की बात’ 2021 ची यावर्षाची अखेरची ‘मन की बात’ असेल. 2022 मध्ये पुन्हा प्रवास सुरु करू. आणि माझी तुमच्या कडून भरपूर सूचना आणि मते जाणून घेण्याची अपेक्षा असते आणि यापुढेही असेल. तुम्ही यावर्षाला कसा निरोप देत आहात, नव्या वर्षात काय करणार आहात हे देखील अवश्य सांगा आणि हो, हे कधीही विसरू नका की कोरोना अजून गेलेला नाही. सावधगिरी बाळगणेही आपली सर्वांची जबाबदारीआहे.
खूप-खूप धन्यवाद !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वाना नमस्कार| कोटी कोटी नमस्कार, आणि मी कोटी कोटी नमस्कार यासाठी म्हणत आहे कारण 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे, सर्वाच्या प्रयत्नांच्या मंत्रशक्तिचं प्रत्यंतर दाखवत आहे.
मित्रांनो, 100 कोटीचा आकडा खूप मोठा अवश्य आहे, परंतु त्याच्याशी अनेक लाखो लहान लहान प्रेरक आणि अभिमानास्पद असे अनेक अनुभव, उदाहरणं जोडली गेली आहेत. खूप लोक मला पत्र लिहून विचारतात की, लसीकरणाच्या सुरूवातीलाच या अभियानाला इतकं मोठं यश मिळेल, असा विश्वास आपल्याला कसा वाटत होता? मला हा विश्वास यासाठी वाटत होता कारण, मला आपला देश, आपल्या देशाच्या लोकांची क्षमता अगदी चांगली माहित आहे. मला माहित होतं की, आमचे आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. त्यांच्या बाबतीत तर अशी असंख्य उदाहरणं आहेत जी, त्यांनी कशी सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केलं, हे सांगतात. आम्ही अनेकदा वर्तमानपत्रांमध्ये वाचलं आहे, बाहेरही ऐकलं आहे की हे काम करण्यासाठी आमच्या लोकांनी किती कष्ट केले आहेत, एकापेक्षा एक प्रेरक उदाहरणं आमच्या समोर आहेत. मी आज मन की बातच्या श्रोत्यांची भेट उत्तराखंडच्या बागेश्वर इथली एक आरोग्य कर्मचारी पूनम नौटियाल हिच्याशी घडवू इच्छितो. मित्रांनो, बागेश्वर उत्तराखंडच्या त्या धरतीवर आहे. ज्या उत्तराखंडने शंभर टक्के पहिला डोस देण्याचे काम पूर्ण केलं आहे. उत्तराखंड सरकारही अभिनंदनाचं पात्र आहे कारण खूप दुर्गम क्षेत्र आहे, अतिशय अवघड आहे. तसंच, हिमाचलनंही अशा अडचणींवर मात करत शंभर टक्के डोस देण्याचं काम पूर्ण केलं आहे. मला असं सांगण्यात आलं आहे की, पूनमजींनी आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या लसीकरणासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, नमस्ते|
पूनम नौटियालः सर, प्रणाम|
प्रधानमंत्रिजीः पूनम जी, देशातल्या श्रोत्यांना जरा आपल्याबाबतीत थोडं सांगा.
पूनम नौटियालः सर, मी पूनम नौटियाल| सर, मी उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातल्या चानी कोराली केंद्रात कार्यरत आहे. मी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ (एएनएम) आहे, सर|
पंतप्रधान: पूनमजी, माझं सद्भाग्य आहे की मला बागेश्वर येण्याची संधी मिळाली होती. ते एक प्रकारे तीर्थक्षेत्रच आहे. तिथं प्राचीन मंदिर वगैरे आहे. मी ते पाहून खूप प्रभावित झालो. युगांपूर्वी कसं लोकांनी काम केलं असेल.
पूनम नौटियालः हांजी, सर
पंतप्रधान: पूनम जी, आपण आपल्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांचं लसीकरण करून घेतलं आहे का?
पूनम नौटियालःहांजी, सर. सगळ्या लोकांचं लसीकरण झालं आहे.
पंतप्रधान: आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं का?
पूनम नौटियालःहांजी, सर. जेव्हा पाऊस पडत असे तेव्हा रस्ता बंद होत असे आणि तेव्हा नदी पार करून गेलो आहोत आम्ही सर. आणि सर, आम्ही घरोघर गेलो आहोत जसे एनएचसीव्हीसीच्या अंतर्गत लोक घरोघर गेले होते. जे लोक वृद्ध आहेत, दिव्यांग लोक, तसेच गर्भवती महिला, या लोकांच्या घरी गेलो.
पंतप्रधान: परंतु तिथं तर पहाडी प्रदेशात खूप दूरदूर घरं असतात.
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: एका दिवसात किती मजल मारू शकत होतात आपण|
पूनम नौटियालः सर, किलोमीटरचा हिशोब पाहिला तर 10 किलोमीटर तर कधी 8 किलोमीटर.
पंतप्रधान: असो, हे तर मैदानी प्रदेशात रहाणारे लोक आहेत, त्यांना 8 ते 10 किलोमीटर काय असतं ते समजणार नाही . मला माहित आहे की, पहाडी प्रदेशात 8-10 किलोमीटर म्हणजे पूर्ण दिवस त्यातच जातो.
पूनम नौटियालः हांजी.
पंतप्रधान: परंतु एका दिवसात एवढं अंतर चालणं खूप मेहनतीचं काम आहे आणि त्यात पुन्हा लसीकरणाचं सामान उचलून बरोबर न्यायचं. आपल्या बरोबर कुणी सहाय्यक असायचे की नाही ?
पूनम नौटियालः हांजी. आमच्या पथकाचे सदस्य, आम्ही पाच लोक असायचो सर.
पंतप्रधान: हां.
पूनम नौटियालः त्यात डॉक्टर आले, मग एएनएम आले, आशा अंगणवाडी सेविका आली, औषधी तज्ञ असायचा आणि डेटा एंट्री ऑपरेटर असे.
पंतप्रधान: अच्छा त्या डेटा एंट्रीसाठी तिथं इंटरनेट कनेक्शन मिळत असे की बागेश्वरला परतल्यावर करत असायचा?
पूनम नौटियालः सर, कधी कधी मिळत असे नाही तर बागेश्वरला आल्यावर करत होतो आम्ही.
पंतप्रधान: पूनम जी, आपण अगदी चाकोरीच्या बाहेर जाऊन लोकांना लस दिली. ही कशी कल्पना आली, आपल्या मनात हा विचार कसा आला आणि कसं केलं आपण हे सर्व?
पूनम नौटियालः आम्ही लोकांनी, पूर्ण पथकानं एक निर्धार केला होता की कोणतीही व्यक्ति यातून सुटायला नको. आमच्या देशातनं कोरोना आजार दूर पळाला पाहिजे. मी आणि आशा वर्करनं प्रत्येक लसीकरणातून राहिलेल्या व्यक्तिची गावनिहाय एक यादी बनवली, मग त्यानुसार जे लोक केंद्रात आले, त्यांना केंद्रातच लस टोचली. जे लोक राहिले होते, केंद्रात येऊ शकत नव्हते त्यांच्या घरोघरी जाऊन दिली सर.
पंतप्रधान: अच्छा, लोकांना समजावून सांगावं लागत होतं?
पूनम नौटियालः हांजी, समजावून सांगितलं.
पंतप्रधान: लोकांमध्ये अजूनही लस घेण्यासाठी उत्साह आहे?
पूनम नौटियालः हांजी सर, हांजी. आता तर लोकांना कळलं आहे. पहिल्यांदा आम्हा लोकांना खूप अडचणी आल्या. लोकांना ही लस सुरक्षित आहे, प्रभावी आहे, आम्ही ही घेतली आहे, आम्ही अगदी ठीक आहोत, आपल्या समोर आहोत, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
पंतप्रधान: लस घेतल्यावर नंतर कुठून तक्रार आली?
पूनम नौटियालः नाही सर. असं तर काहीही झालं नाही .
पंतप्रधान: काहीही झालं नाही
पूनम नौटियालः जी.
पंतप्रधान: सर्व समाधानी होते की ठीक झालं आहे.
पूनम नौटियालः हांजी
पंतप्रधान: आपण एक खूप मोठं काम केलं आहे आणि मला माहित आहे, ते संपूर्ण क्षेत्र, पहाडी प्रदेशात पायी चालणं किती अवघड आहे. एका पहाडावर चढा, पुन्हा खाली उतरा, पुन्हा दुसरा पहाड चढा. घरंही पुन्हा दूरदूरच्या अंतरावर आहेत. असं असूनही आपण इतकं चांगलं काम केलं.
पूनम नौटियालःधन्यवाद सर. माझं सद्भाग्य आहे की आपल्याशी मी बोलू शकले.
आपल्यासारख्या लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमांमुळेच भारत 100 कोटीचा लसीकरणाचा टप्पा गाठू शकला आहे. आज मी केवळ आपले आभार मानत नाही तर प्रत्येक त्या भारतवासियाचे आभार मानतो,ज्यानं सर्वाना लस, विनामूल्य लस या अभियानाला इतक्या उंचीवर नेलं, यश दिलं. आपल्याला, आपल्या परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्याला माहित असेल की पुढच्या रविवारी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे. मन की बातच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं, मी लोहपुरूषाला नमन करतो. मित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो. एकतेचा संदेश देणाऱ्या कोणत्या नं कोणत्या उपक्रमाशी आपण जोडलं जावं, ही आपली जबाबदारी आहे. आपण पाहिलं असेल, नुकतंच गुजरात पोलिसांनी कच्छच्या लखपत किल्ल्यापासून स्टॅच्यु ऑफ युनिटीपर्यंत बाईक रॅली काढली. त्रिपुरा पोलिसांचे जवान तर एकता दिन साजरा करण्यासाठी त्रिपुराहून स्टॅच्यु ऑफ यूनिटीपर्यंत बाईक रॅली काढत आहेत. म्हणजे, पूर्वेक़डून निघून पश्चिमेपर्यंत देशाला जोडण्याचं काम करत आहेत. जम्मू काश्मीर पोलिसांचे जवानही उरीहून पठाणकोटपर्यंत बाईक रॅली काढून देशाच्या एकतेचा संदेश देत आहेत. मी या सर्व जवानांना प्रणाम करतो. जम्मू काश्मीरच्याच कुपवाडा जिल्ह्यातल्या अनेक भगिनींच्या बाबतीत मला माहिती मिळाली आहे. या भगिनी कश्मिरात लष्कर आणि सरकारी कार्यालयांसाठी तिरंगा शिवण्याचं काम करत आहेत. हे काम देशभक्तिच्या भावनेनं भरलेलं आहे. मी त्या भगिनींच्या उत्कट भावनांची प्रशंसा करतो. आपल्यालाही भारताची एकता, भारताचं श्रेष्ठत्व यासाठी काही नं काही अवश्य केलं पाहिजे. पहा, आपल्या मनाला किती आनंद मिळतो.
मित्रांनो, सरदार साहेब म्हणत असत की, आपण आपल्या एकजुटीनंच देशाला नव्या महान उंचीपर्यंत पोहचवू शकतो. जर आमच्यात ऐक्य झालं नाही तर आपण स्वतःला नवनवीन संकटांमध्ये ढकलून दिल्यासारखं होईल. म्हणजे राष्ट्रीय एकता आहे तरच उंची आहे, विकास आहे. आम्ही सरदार पटेल यांच्या जीवनातनं, विचारांपासून खूप काही शिकू शकतो. देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सरदार पटेल यांच्या जीवनावर एक चित्रमय चरित्रही प्रसिद्ध केलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवामित्रांनी ते जरूर वाचावं. त्यातनं आपल्याला सरदार साहेबांचं जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं घेण्याची संधी मिळेल.
प्रिय देशवासियांनो, जीवनाला निरंतर प्रगति हवी असते, विकास हवा असतो, नवनव्या उंची पार करायची असते. विज्ञान कितीही पुढे जाओ, प्रगतीची गती कितीही वाढो, भवन कितीही भव्य तयार होओत, परंतु जीवनात अपूर्णतेचा अनुभव येत असतो. परंतु जेव्हा यात गीत-संगीत, कला, नाट्य-नृत्य, साहित्य जोडलं जातं, तेव्हा त्याचा प्रकाश, जिवंतपणा अनेक पटींनी वाढत जातो. जीवनाला एक प्रकारे सार्थक बनवायचं असेल तर हे सर्व असणं तितकंच आवश्यक आहे, म्हणून असं म्हटलं जातं की, या साऱ्या कला आमच्या जीवनात एक उत्प्रेरकाचं काम करतात, आमची उर्जा वाढवण्याचं काम करतात. मानवी मनाच्या अंतर्मनाला विकसित करण्यात, आमच्या अंतर्मनाच्या प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यातही गीत-संगीत आणि वेगवेगळ्या कलांची खूप मोठी भूमिका असते आणि यांची एक मोठी शक्ति ही असते की, यांना न काळ बांधू शकतो नं मतमतांतरे बांधू शकतात. अमृत महोत्सवात आपली कला, संस्कृती, गीत, संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडले गेलेले अनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. मी त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे विचारार्थ पाठवल्या आहेत. मला याचा आनंद आहे की, मंत्रालयानं त्या गांभिर्यानं घेऊन त्यावर कामही केलं आहे. यातच एक सूचना अशी आहे की, देशभक्ति गीतांशी जोडली गेलेली स्पर्धा. स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्या भाषा, बोलीमधल्या देशभक्ति गीतांनी आणि भजनांनी पूर्ण देशाला एकत्र आणलं होतं. आता अमृतकाळात, आमचे युवक देशभक्तिवरील अशीच गीतं लिहून त्यांचं आयोजन करून उर्जा निर्माण करू शकतात. देशभक्तिची ही गीतं मातृभाषेत असू शकतील, राष्ट्रभाषेत असू शकतील किंवा इंग्रजीतही लिहू शकतात. परंतु या रचना नव्या भारताचा विचार असणारी, देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठी देशाला संकल्पित करणारी असली पाहिजेत, हे आवश्यक आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं तर तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली आहे.
मित्रांनो, मन की बातच्या एका श्रोत्यानं अशीही सूचना केली आहे की, अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या कल्पनांवर रांगोळ्या काढल्या जातात. म्हणून सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे. आपण कल्पना करा, जेव्हा स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी जोडलेली रांगोळी काढली जाईल, लोक आपल्या दारावर, भिंतीवर एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाचं चित्र काढतील, स्वातंत्र्याची घटना रंगांमध्ये दाखवतील, तर अमृत महोत्सवाच्या रंगांना आणखी बहार येईल.
मित्रांनो, आमच्याकडे अंगाईगीत ही ही एक पद्धत आहे. आमच्याकडे अंगाईगीताच्या माध्यमातून लहान मुलांवर संस्कार केले जातात, संस्कृतीशी त्यांचा परिचय करून दिला जातो. अंगाईगीतांची त्यांची स्वतःची विविधता आहे. तर, अमृतकाळात आम्ही या कलेलाही पुनर्जिवित करू आणि देशभक्तिशी जोडलेली अशी अंगाईगीतं,कविता, गीतं काही नं काही अवश्य लिहू जे प्रत्येक घरात माता अत्यंत सहजतेनं आपल्या लहान लहान मुलांना ऐकवू शकतील. या अंगाईगीतांमध्ये आधुनिक भारताचा संदर्भ असेल, २१ व्या शतकातल्या भारताच्या स्वप्नांचं दर्शन घडेल. आपल्या सर्व श्रोत्यांच्या सूचनांनंतर मंत्रालयानं याच्याशी जोडलेली स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो, या तिन्ही स्पर्धा 31 ऑक्टोबरला सरदार साहेबांच्या जयंतीदिनापासून सुरू होत आहेत. येत्या काही दिवसात सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी संबंधित सारी माहिती देईल. ही माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर असेल आणि समाजमाध्यमांवरूनही दिली जाईल. माझी इच्छा आहे की आपण साऱ्यांनी यात सहभागी व्हावं. आमच्या युवा साथीदारांनी आपल्या कलेचं, आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन अवश्य करावं. यातून आपल्या प्रदेशातली कला आणि संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल आणि आपल्या कहाण्या सारा देश ऐकेल.
प्रिय देशवासियांनो, यावेळी आम्ही अमृत महोत्सवात देशाचे वीर पुत्र आणि कन्यांच्या महान पुण्यात्म्यांचं स्मरण करत आहोत. पुढल्या महिन्यात १५ नोव्हेंबरला आमच्या देशाचे असेच महापुरूष वीर योद्धा भगवान बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो, हे आपल्याला माहित आहे का? याचा अर्थ आहे धरती पिता. भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृती, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं. परदेशी राजसत्तेनं किती त्यांना धमक्या दिल्या, किती दबाव टाकला, पण त्यांनी आदिवासी संस्कृती सोडली नाही. निसर्ग आणि पर्यावरणावर जर आम्हाला प्रेम करायला शिकायचं असेल तर धरती आबा भगवान बिरसा मुंडा आमची खूप मोठी प्रेरणा आहे.
परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे, अशा प्रत्येक धोरणाला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. गरीब आणि अडचणी-समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांनी सामाजिक कुरीती संपुष्टात आणण्यासाठी समाजाला जागृत करण्याचं काम केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं उलगुलान आंदोलन कोण विसरू शकते? या आंदोलनाने इंग्रजांना हलवून टाकलं होतं. त्यानंतर इंग्रजांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यावर खूप मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवलं होतं. ब्रिटीश सरकाने त्यांना कारागृहात टाकलं. आणि त्यांचा इतका छळ केला की, वयाने पंचविशी अद्याप पार केली नसतानाही इतक्या तरूण वयात ते आपल्याला सोडून गेले. ते आपल्याला सोडून गेले, ते केवळ शरीरानं!
जनसामान्यांमध्ये तर भगवान बिरसा मुंडा यांनी अढळ स्थान प्राप्त केलं आहे. लोकांसाठी त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरणा शक्ती बनले आहे. आजही त्यांची शौर्यगाथा आणि वीरतेने भरलेली लोकगीते आणि कथा मध्य भारतामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. मी ‘धरती बाबा’ बिरसा मुंडा यांना वंदन करतो आणि युवकांना माझा आग्रह आहे की, त्यांनी बिरसा मुंडा यांच्याविषयी वाचन करून त्यांच्या कार्याची माहिती आणखी जाणून घ्यावी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या आदिवासी समूहाने दिलेल्या वैशिष्टपूर्ण योगदानाविषयी तुम्ही जितकी माहिती घ्याल, तितक्याच प्रमाणात त्यांचे कार्य गौरवपूर्ण असल्याची अनुभूती तुम्हाला होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज 24 ऑक्टोबरला यूएन डे म्हणजेच ‘संयुक्त राष्ट्र दिवस‘ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेला हा दिवस आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेपासून भारत त्याच्याशी जोडला आहे. भारताने स्वांतत्र्याआधी 1945 मध्येच संयुक्त राष्ट्राच्या चार्टरवर म्हणजेच सनदीवर स्वाक्षरी केली होती, याविषयी तुम्हाला माहिती आहे? संयुक्त राष्ट्राशी संबंधित एका वेगळा पैलू असा आहे की, संयुक्त राष्ट्राचा प्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची- मोठी भूमिका बजावली आहे. 1947-48 मध्ये ज्यावेळी यूएन ह्मुमन राइटसचे- म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्यावतीने मानवाधिकाराचा वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होते, त्या घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होते की, ‘‘ ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’’ परंतु भारताच्या एका प्रतिनिधीने असे लिहिण्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आले की - ‘‘ऑल ह्युमन बीईग्स आर क्रिएटेड इक्वल’’ !! ही गोष्ट म्हणजेच स्त्री-पुरूष समानतेची बाब भारताच्या दृष्टीने अनेक युगांपासून चालत आलेल्या जुन्या परंपरेला अनुसरून होती. श्रीमती हंसा मेहता असे नाव त्या प्रतिनिधीचे होते. त्यांच्यामुळे अशी समानता घोषणापत्रात नमूद करणे शक्य झाले, ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे? त्याच काळामध्ये आणखी एक सदस्य श्रीमती लक्ष्मी मेनन यांनी स्त्री-पुरूष समानतेच्या मुद्यावर आपले मत अतिशय स्पष्टपणे मांडले होते. इतकेच नाही तर, 1953 मध्ये श्रीमती विजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षही बनल्या होत्या.
मित्रांनो, आपण त्याच भूमीचे लोक आहोत. जे असा विश्वास ठेवतात, जे अशी प्रार्थना करतात.
ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षँ शान्तिः,
पृथ्वी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः ।
वनस्पतयः शान्तिर्विश्र्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः,
सर्वशान्तिः शान्तिरेव शान्तिः, सा मा शान्तिरेधि।।
ओम शान्तिः शान्तिः शान्तिः ।।
भारताने सदैव विश्वाच्या शांतीसाठी काम केले आहे. 1950 च्या दशकापासून सातत्याने संयुक्त राष्ट्र शांती मोहिमेचा भारत एक हिस्सा बनला आहे, या गोष्टीचा भारताला अभिमान वाटतो. गरीबी हटविण्यासाठी, हवामान बदलाची समस्या आणि श्रमिकांसंबंधी प्रश्नांवर तोडगा काढण्याचा विषय असो, या सर्वांमध्ये भारताने अग्रणी भूमिका निभावत आहे. याशिवाय योग आणि आयुष यांना लोकप्रिय बनविण्यासाठी भारत डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेबरोबर काम करीत आहे. मार्च 2021 मध्ये डब्ल्यूएचओने घोषणा केली होती की, भारतामध्ये पारंपरिक औषधोपचार पद्धतीसाठी एक वैश्विक केंद्र स्थापन करण्यात येईल.
मित्रांनो, संयुक्त राष्ट्राविषयी बोलत असताना मला आज अटल जी यांचे शब्द आठवत आहेत. 1977 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये हिंदीमध्ये भाषण करून इतिहास निर्माण केला होता. आज मी ‘‘मन की बात’’ मध्ये श्रोत्यांना, अटल जींच्या त्या भाषणातला काही भाग ऐकवू इच्छितो. श्रोत्यांनी, अटल जींची ती ओजस्वी वाणी ऐकावी -
‘‘ इथे मी राष्ट्रांची सत्ता आणि महत्ता यांच्याविषयी विचार करीत नाही. त्यापेक्षा सर्व सामान्य माणसाची प्रतिष्ठा आणि प्रगती माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. अखेर, आपले यश आणि अपयश केवळ एकाच मापदंडाने मोजली गेली पाहिजे. आणि ते म्हणजे आपण संपूर्ण मानव समाज, वस्तूतः प्रत्येक नर-नारी आणि बालक यांना न्याय आणि प्रतिष्ठा देण्याविषयी आश्वस्त करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’’
मित्रांनो, अटल जी यांचे हे वक्तव्य आपल्याला आजही मार्गदर्शन करणारे आहे. या भूमीला, पृथ्वीला अधिक चांगले आणि सुरक्षित ग्रह बनविण्याच्या कार्यात भारताचे योगदान, संपूर्ण विश्वासाठी एक खूप मोठी प्रेरणा देणारे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अलिकडेच काही दिवस आधी 21 ऑक्टोबरला आपण पोलिस स्मृती दिवस पाळला. पोलिस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यांचे या दिवशी विशेषत्वाने स्मरण केले जाते. मी आज आपल्या या पोलिस कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या परिवारांचेही स्मरण करू इच्छितो. परिवाराचे सहकार्य आणि त्याग यांच्याशिवाय पोलिसासारखी कठिण सेवा करणे खूप अवघड आहे. पोलिस सेवेसंबंधित आणखी एक गोष्ट आहे, ती मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो. आधी अशी एक धारणा होती की, सेना-लष्कर आणि पोलिस यासारख्या सेवा केवळ पुरूषांसाठीच असतात. मात्र आज असे नाही. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटची आकडेवारी सांगते की, गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलिस कर्मचारी वर्गाची संख्या दुप्पट झाली आहे. डबल झाली आहे. 2014 मध्ये महिला पोलिसांची संख्या 1 लाख 5 हजारच्या जवळपास होती. तर 2020 पर्यंत ही संख्या वाढून ती दुपटीपेक्षा जास्त म्हणजे आता 2 लाख 15 हजारापर्यंत पोहोचली आहे. इतकंच नाही तर, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये गेल्या सात वर्षांमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. आणि मी केवळ वाढलेल्या आकडेवारीविषयी बोलत नाही. आज देशाच्या कन्या अवघडात अवघड कामही संपूर्ण ताकदीनिशी, मोठ्या धाडसाने करीत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर अनेक कन्या आता सर्वात कठिण असे मानले जाणारे प्रशिक्षण म्हणजे ‘स्पेशलाईज्ड जंगल वॉरफेअर कमांडोज’चे प्रशिक्षणही घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी आपल्या ‘कोब्रा बटालियन’ चा हिस्सा बनणार आहेत.
मित्रांनो, आज आपण विमानतळांवर जातो, मेट्रो स्थानकांवर जातो, किंवा सरकारी कार्यालयातही पाहतो, सीआयएसएफच्या बहादूर महिला प्रत्येक संवेदनशील स्थानांवर सुरक्षा व्यवस्था पहात असताना दिसतात. याचा सर्वात सकारात्मक परिणाम आपल्या पोलिस दलाबरोबरच समाजाच्या मानसिकतेवरही पडत आहे. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांना एकप्रकारची सहजता वाटते, विश्वास निर्माण होतो. त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो, स्वतःला त्यांच्याबरोबर जोडतात. महिलांमध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळेही लोकांना त्यांच्याविषयी जास्त भरवसा वाटतो. आपल्या या महिला पोलिस कर्मचारी देशातल्या इतर लाखो मुलींसाठी ‘रोल मॉडेल’ बनत आहेत. मी महिला पोलिस कर्मचा-यांना सांगू इच्छितो की, शाळा सुरू झाल्या की, त्यांनी आपल्या भागातल्या शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथल्या मुलींबरोबर संवाद साधावा. मला विश्वास आहे की, असा संवाद साधल्यामुळे आपल्या नवीन पिढीला एक वेगळी नवी दिशा मिळेल. इतकंच नाही तर यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वासही वाढेल. मी आशा करतो की, आगामी काळात आणखी जास्त संख्येने महिला पोलिस सेवेत सहभागी होतील, आपल्या देशाच्या ‘न्य एज पोलिसिंग’चे नेतृत्व करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने वाढत आहे, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावं, असं अनेक श्रोते नेहमीच लिहीत असतात. आज मी अशाच एका विषयाची चर्चा तुमच्याबरोबर करू इच्छितो. हा विषय आपल्या देशात, विशेषतः आपल्या युवकांच्या आणि लहान-लहान मुलांच्याही कल्पनाविश्वात असतो. हा विषय आहे- ड्रोनचा ! ड्रोन तंत्रज्ञानाचा !! काही वर्षांपूर्वी जर कधी चर्चेत ड्रोनचं नाव आलं तर लोकांच्या मनात पहिला भाव काय येत होता? तर लष्कराचे, सेनेचे, हत्यार, शस्त्रे, युद्ध... असे विचार येत होते. परंतु आज मात्र आपल्याकडे कोणाचा विवाह समारंभ असेल, वरात काढली जाणार असेल किंवा असाच काही कार्यक्रम असेले तर आपण ड्रोनने छायाचित्रे काढतो आणि व्हिडिओ बनवताना पाहतोय. ड्रोनची व्याप्ती, त्याची क्षमता, ताकद केवळ इतकी मर्यादित नाही. ज्या देशांनी ड्रोनच्या मदतीने आपल्या गावांतल्या जमिनींची डिजिटल नोंदणी करण्याचे काम करणारे जे पहिले काही देश आहेत, त्यापैकीच भारत एक आहे. भारत ड्रोनचा वापर वाहतुकीसाठी करता यावा, यासाठी अतिशय व्यापक पद्धतीने काम करत आहे. मग त्यामध्ये गावातल्या शेती असो अथवा घरामध्ये सामान पोहोचवणे असो. संकटाच्या काळात मदत पोहोचवायची असो किंवा कायदा सुव्यवस्थेची निगराणी करायची असो. आपल्या अशा अनेक गरजांची पूर्तता करण्यासाठी ड्रोन काम करू शकतो, हे पाहण्यासाठी आता आपल्याला फार काळ वाट पहावी लागणार नाही. यामध्ये अनेक गोष्टी ड्रोनमार्फत करण्यास प्रारंभही झाला आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातमधल्या भावनगर इथे ड्रोनच्या मदतीने शेतांमध्ये नॅनो-युरिया शिंपडण्यात आला. कोविड लसीकरण मोहिमेमध्ये ड्रोनही आपली भूमिका बजावत आहेत. याचे एक छायाचित्र आपण मणिपूरमध्ये पहायला मिळाले होते. तिथं एका बेटावर ड्रोनच्या माध्यमातून लस पोहोचविण्यात आली. तेलंगणामध्ये ड्रोनच्या मदतीने लस पोहोचवली गेली. इतकेच नाही तर आता पायाभूत सुविधांसाठी अनेक मोठया प्रकल्पांची देखरेख करण्यासाठी ड्रोनचा वापर होत आहे. मी एका अशा युवा विद्यार्थ्याविषयी वाचले आहे की, त्यानं ड्रोनच्या मदतीने मच्छीमारांचे जीव वाचविण्याचं काम केलंय.
मित्रांनो, आधी या क्षेत्रामध्ये इतके नियम, कायदे आणि प्रतिबंध लावण्यात आले होेते की, ड्रोनची नेमकी, योग्य क्षमता वापरणेच अशक्य होते. ज्या तंत्रज्ञानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे, त्याकडे संकट म्हणून पाहिले जात होते. जर आपल्याला कोणत्याही कामासाठी ड्रोन उडवावा लागणार असेल तर, त्यासाठी परवाना आणि परवानगी घेणे अतिशय गुंतागुंतीचे, त्रासदायक काम होते. त्यामुळे लोक ड्रोन म्हटलं की, नको रे बाबा म्हणत होते. आम्ही आता निश्चय केला आहे की, ही मानसिकता बदलून टाकली पाहिजे. आणि नवीन गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. म्हणूनच यावर्षी 15 ऑगस्टला देशाने एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलं आहे. ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा हिशेब लक्षात घेऊन हे धोरण निश्चित केले आहे. यामध्ये आता अनेक अर्ज भरावे लागणार नाहीत की, त्यांच्या मंजुरीसाठी फे-या माराव्या लागणार नाहीत. तसेच आधी द्यावी लागत होती, तितके शुल्कही लागणार नाही. मला एक गोष्ट आपल्याला सांगताना आनंद होताय की, नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्ट अप्समध्ये विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या ड्रोन निर्मितीचे प्रकल्पही उभे करीत आहेत. लष्कर, नौदल, वायूदलाने भारतीय ड्रोन कंपन्यांना 500 कोटी रूपयांपेक्षा जास्त मागणी नोंदवली आहे. आणि ही तर आत्ता कुठे सुरूवात झाली आहे. आपल्याला काही इथंच थांबायचं नाही. आपल्याला ड्रोन तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रणी बनवायचे आहे. म्हणूनच सरकार आवश्यक असणारी सर्व पावले उचलत आहे. मी देशाच्या युवकांनाही सांगू इच्छितो की, तुम्हीही ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ उठविण्याच्या दृष्टीने जरूर विचार करा, त्यासाठी पुढे या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथून ‘मन की बात’ च्या श्रोता श्रीमती प्रभा शुक्ला यांना मला स्वच्छतेसंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘भारतामध्ये सण-उत्सवांना आपण सर्वजण स्वच्छता साजरी करतो. तशाच प्रकारे जर आपण स्वच्छता, प्रत्येक दिवशी करून ती एक सवय बनवली तर संपूर्ण देश स्वच्छ होईल.’’ मला प्रभा जी यांचे म्हणणे अतिशय पसंत पडले. खरोखरीच जिथं स्वच्छता आहे, तिथं आरोग्य आहे. जिथं आरोग्य आहे, तिथं सामर्थ्य आहे, तिथं समृद्धी आहे. म्हणूनच तर देश स्वच्छ भारत मोहिमेवर इतका जोर देत आहे.
मित्रांनो, मला रांचीच्या अगदी जवळचे एक गाव आहे- सपारोम, नया सराय. इथली जी माहिती मिळाली, ती ऐकून खूप चांगले वाटले. या गावामध्ये एक तलाव होता. मात्र लोक या तलावाच्या जागेतच उघड्यावर शौच करीत होते. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ज्यावेळी सर्वांच्या घरांमध्येच शौचालये बनविण्यात आली तर गावकरी मंडळींनी विचार केला की, आपल्या गावाला स्वच्छ करण्याबरोबरच सुंदरही बनवू या. मग काय? सर्वांनी मिळून तलावाच्या मोकळ्या जागेत उद्यान बनवले. आज त्या जागी लोकांसाठी, मुलांसाठी, एक सार्वजनिक स्थान बनले आहे. यामुळे संपूर्ण गावाच्या जीवनमानातच खूप मोठे परिवर्तन घडून आले आहे. मी आपल्याला छत्तीसगडच्या देऊर गावातल्या महिलांविषयीही सांगू इच्छितो. इथल्या महिला एक स्वमदत समूह चालवतात. आणि सर्वजणी मिळून गावांतल्या चौक-चौरस्ते, इतर रस्ते आणि मंदिरांची सफाई करतात.
मित्रांनो, उत्तरप्रदेशच्या गाझियाबादच्या रामवीर तंवर जींना लोक पाँड मॅन (तलाव पुरूष) म्हणूनही ओळखतात. रामवीर जीं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरी करत होते. परंतु त्यांच्या मनात स्वच्छतेविषयी अशी चेतना निर्माण झाली की नोकरी सोडून ते तलाव स्वच्छ करण्याच्या कामात गुंतले. रामवीर जीनी आतापर्यत कितीतरी तलावांची स्वच्छता करून त्यांना पुनर्जिवित केलं आहे.
मित्रांनो, प्रत्येक नागरिक जेव्हा स्वच्छतेची आपली जबाबदारी ओळखेल, तेव्हाच स्वच्छतेचे प्रयत्न पूर्ण तर्हेनं यशस्वी होतात. आता दिवाळीला आम्ही आपल्या घराची साफसफाई करण्याच्या कामी तर लागणारच आहोत. परंतु या दरम्यान आम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की, आमच्या घराच्या बरोबरच आमचा शेजारही स्वच्छ राहिल. आम्ही आपलं घर तर स्वच्छ करू, पण आमच्या घरातील घाण आमच्या घराच्या बाहेर, आमच्या रस्त्यांवर जाईल, असं होऊ नये. आणि हां, मी जेव्हा स्वच्छतेविषयी बोलतो तेव्हा कृपा करून सिंगल युज प्लॅस्टिकपासून मुक्ति मिळवण्याची गोष्ट आपल्याला कधी विसरायची नाही. आम्ही हा निर्धार करू की, स्वच्छ भारत अभियानाचा उत्साह कमी होऊ देणार नाही . आम्ही सर्व मिळून आमचा देश संपूर्ण स्वच्छ करू आणि स्वच्छ राखू.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबरचा पूर्ण महिना सणांच्या रंगात रंगला आहे आणि आता काही दिवसांनी दिवाळी तर येतच आहे. दिवाळी, त्यानंतर गोवर्धन पूजा, नंतर भाऊबीज, हे तीन सण तर होतीलच, पण याच दरम्यान छटपूजाही होईल. नोव्हेंबरमध्येच गुरू नानकदेवजी यांची जयंतीही आहे. इतके सण एकाच वेळेस होत असतात तर त्यांची तयारीही खूप अगोदरपासून सुरू होते. आपण सर्व जण खरेदीचे प्लॅन करत असाल, परंतु आपल्याला व्होकल फॉर लोकल हे लक्षात आहे नं...आपण लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल. मला पूर्ण विश्वास आहे की, जी मोहिम आपण सर्वांनी मिळून सुरू केली आहे, ती या सणांच्या काळात आणखी मजबूत होईल. आपण आपल्या इथले जे स्थानिक उत्पादन खरेदी कराल, त्यांबद्दल समाजमाध्यमांमध्ये माहिती द्या. आपल्या बरोबरीच्या लोकांनाही सांगा. पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू.
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
तुम्हाला तर माहितीच आहे की एका आवश्यक कामासाठी मला अमेरिकेला जावे लागत आहे. म्हणून मी विचार केला की अमेरिकेला जाण्याच्या आधीच मी 'मन की बात' ध्वनिमुद्रित करून ठेवली तर चांगलं होईल.
सप्टेंबर मध्ये ज्या दिवशी 'मन की बात' आहे त्या तारखेलाच अजून एक महत्त्वपूर्ण दिवस असतो.
तसं तर आपण खूप सारे दिवस लक्षात ठेवतो, तऱ्हे तऱ्हेचे दिवस साजरे देखील करतो आणि जर आपल्या घरात तरुण मुलं- मुली असतील आणि त्यांना विचारलं तर वर्षभरात कुठला दिवस कधी येतो ह्याची संपूर्ण यादीच ते आपल्याला ऐकवतील, पण अजून एक दिवस असाही आहे की जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा आणि हा दिवस असा आहे जो भारताच्या परंपरांशी खूप सुसंगत आहे. अनेक शतकांपासून ज्या परंपरांशी आपण जोडले गेलो आहोत, त्यांच्याशीच आपल्याला जोडून ठेवणारा आहे. हा आहे 'वर्ल्ड रिवर डे ' म्हणजेच 'विश्व नदी दिवस'.
आपल्याकडे म्हटलं गेलं आहे -
" पिबन्ति नद्यः, स्वयमेव नाम्भः"
अर्थात नद्या आपलं पाणी स्वतः पीत नाहीत पण परोपकारासाठी देतात. आमच्या इथे नदी एक भौतिक वस्तू नाही आहे, आमच्यासाठी नदी एक जिवंत एकक आहे आणि म्हणूनच, म्हणूनच तर नद्यांना आम्ही आई म्हणतो. आपले कितीतरी पर्व असतील, सण असतील, उत्सव असतील, आनंद असेल, हे सगळं आपल्या या आयांच्या कुशीतच तर होत असतात.
आपणा सर्वांना तर माहितीच आहे की माघ महिना येतो तेव्हा आपल्या देशातील बरेच लोक, संपूर्ण एक महिनाभर गंगा मातेच्या किंवा कुठल्या अन्य नदीच्या किनाऱ्यावर कल्पवास करतात.
आता अशी परंपरा तर नाही राहिली पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचे स्मरण करण्याची परंपरा, भलेही आज लुप्त झाली असेल किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात, उरली असेल. पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच विशाल भारताची एक यात्रा घडवत असे, मानसिक यात्रा!
देशातल्या कानाकोपऱ्यांशी जोडले जाण्याची प्रेरणा बनत असे. आणि काय होती ती? भारतात स्नान करण्याच्या वेळी एक श्लोक म्हणण्याची परंपरा होती-
" गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति।
नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन् सन्निधिं कुरु।।"
पूर्वी आमच्या घरातील कुटुंबातील मोठी माणसे हा श्लोक लहान मुलांकडून पाठ करून घेत असत आणि ह्या मुळे आपल्या देशातील नद्यांच्याविषयी आस्था उत्पन्न होत असे. विशाल भारताचा एक नकाशा मनात कोरला जात असे. .नद्यांशी एक नाते जोडले जात असे. ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, पाहतो, जगतो, त्या नदीच्या विषयी एक आस्थेची भावना निर्माण होत असे. ही एक संस्कार प्रक्रिया होती.
मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या देशातील नद्यांच्या गौरवाविषयी बोलतो आहोत तर स्वाभाविकपणे कोणीही एक प्रश्न विचारेल आणि प्रश्न विचारण्याचा हक्कही आहे आणि याचे उत्तर देणे ही आपली जबाबदारी आहे. कोणीही प्रश्न विचारेल की भाऊ, तुम्ही नद्यांच्या विषयी इतकं गुणगान गात आहात, नदीला आई म्हणत आहात तर मग या नद्या प्रदूषित का होत आहेत ?
आमच्या शास्त्रांनी तर नदीला थोडे देखील प्रदूषित करणे हे चुकीचं आहे असं सांगितलं आहे. आमची परंपरा देखील अशी आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदुस्थानचा जो पश्चिमी भाग आहे, विशेष करून गुजरात आणि राजस्थान, तिथे पाण्याची खूप टंचाई आहे. खूप वेळा दुष्काळ पडत असतो. म्हणून तेथील समाजजीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे. जेव्हा गुजरातेत पावसाला सुरुवात होते तेव्हा गुजरातेत ' जल जीलनी एकादशी' साजरी केली जाते. याचा अर्थ असा - आजच्या काळात आपण ज्याला catch the rain वर्षाजलसंधारण म्हणतो तीच गोष्ट आहे की पाण्याचा एकेक/ प्रत्येक थेंब वाचवायचा -जल जीलनी.
त्याच प्रमाणे पावसाळ्याच्या नंतर बिहार आणि पूर्वेकडच्या भागात छठ चे महापर्व साजरे केले जाते. मला आशा आहे की छठपूजेची तयारी म्हणून नद्यांचे किनारे आणि घाटांची स्वच्छता आणि दुरुस्तीची तयारी सुरू झाली असेल.
आपण नद्यांच्या स्वच्छतेचे आणि त्यांना प्रदूषण मुक्त करण्याचे काम सर्वांच्या प्रयत्नांनी, सर्वांच्या सहकार्याने करूच शकतो. 'नमामि गंगे मिशन' पण आज प्रगती पथावर आहे, त्यात सर्व लोकांच्या प्रयत्नांची, एक प्रकारे जनजागृतीची, जनआंदोलनाची खूप मोठी भूमिका आहे.
मित्रांनो जेव्हा नदीविषयी बोलतो आहोत, गंगामातेविषयी बोलतो आहोत तेव्हा आणखी एका गोष्टीकडे देखील आपले लक्ष वेधले पाहिजे असे वाटते आहे.
जेव्हा 'नमामि गंगे' विषयीआपण बोलत होतो तेव्हा तर नक्कीच एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल आणि आमच्या तरुणांच्या तर अगदी नक्कीच लक्षात आली असेल. सध्या एक विशेष ई ऑक्शन, ई लिलाव चालू आहे. हा त्या वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक लिलाव होतो आहे ज्या मला वेळोवेळी लोकांनी दिलेल्या होत्या. या लिलावातून जो पैसा मिळेल तो ' नमामि गंगे 'अभियानासाठी समर्पित केला जाईल. आपण ज्या आत्मीय भावनेने मला भेटवस्तू देता, तीच भावना हे अभियान आणखी बळकट करते आहे.
मित्रांनो देशभरातील नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, पाण्याची स्वच्छता करण्यासाठी सरकार आणि समाजसेवी संघटना सतत काही ना काही तरी करत असतात. आजच नाही, अनेक दशकांपासून हे चालत आले आहे. काही लोकांनी तर अशा कामांसाठी स्वतःला समर्पित केलेले आहे आणि हीच परंपरा, हाच प्रयत्न, हीच आस्था आमच्या नद्यांचे रक्षण करते आहे. आणि हिंदुस्थानातील कोणत्याही कोपऱ्यातून जेव्हा अशी बातमी माझ्या कानांवर येते तेव्हा असे काम करणाऱ्यांच्या विषयी एक आदराचा भाव माझ्या मनात जागृत होतो आणि मलाही वाटतं की या बातम्या आपल्याला सांगाव्या.
आता बघा, तामिळनाडूच्या वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्याचे एक उदाहरण देऊ इच्छितो. इथे एक नदी वाहते, नागानधी. आता ही नागानधी अनेक वर्षांपासून कोरडी झालेली होती. या कारणामुळे तिथला जलस्तर देखील खूप खाली गेलेला होता. पण तिथल्या महिलांनी आपल्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचा विडाच उचलला. मग काय.. त्यांनी लोकांना एकत्र केलं, लोकसहभागातून कालवे खोदले.Check dam बनवले, जल साठा करण्यासाठी विहिरी बांधल्या. आपल्या सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल की मित्रांनो, आज ती नदी पाण्याने भरून गेली आहे! आणि जेव्हा नदी पाण्याने भरून जाते ना तेव्हा मनाला इतकी (शांतता), तृप्तता वाटते. मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलेला आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की ज्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर महात्मा गांधींनी साबरमती आश्रम स्थापन केला होता, ती साबरमती नदी गेल्या काही दशकांपासून आटत चालली होती, (कोरडी पडली होती.) वर्षातून सहा-आठ महिने तरी तिच्यात पाणी दिसतच नसे. पण नर्मदा नदी आणि साबरमती नदी जोडल्या गेल्या आणि आज आपण अहमदाबादला जाल तर साबरमती नदीतील पाणी आपले मन प्रसन्न करेल. याच प्रमाणे अनेक कामे, जशी तामिळनाडूतल्या आपल्या बहिणी करत आहेत तशी, देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात चालू आहेत. मला माहिती आहे की आमच्या धार्मिक परंपरांशी जोडलेले संत असतील, गुरुजन असतील, ते देखील आपल्या अध्यात्मिक यात्रेच्या सोबतच, पाण्यासाठी, नद्यांसाठी खूप काम करत आहेत. अनेक नद्यांच्या किनारी झाडे लावण्याचे अभियान चालू आहे तर कुठे नदीत सोडले जाणारे दूषित पाणी थांबवले जात आहे.
मित्रांनो, आज 'विश्व नदी दिवस" साजरा करताना, या कामासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना, देशवासीयांना मी विनंती करेन की भारतात, ठिकठिकाणी, वर्षातून एक वेळा तरी नदी उत्सव साजरा केलाच पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधीच लहान गोष्टीला, लहान वस्तूला, लहान/ (क्षुल्लक) मानण्याची चूक करू नये. लहान लहान प्रयत्नातून कधी कधी खूप मोठे परिवर्तन घडून येते आणि महात्मा गांधींच्या आयुष्याकडे आपण पाहिले तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवेल की लहान लहान गोष्टींना त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होते आणि लहान लहान गोष्टींना घेऊनच मोठे मोठे संकल्प त्यांनी कसे साकार केले. आमच्या आजच्या नौजवानांना हे नक्की माहिती असलं पाहिजे की स्वच्छता अभियानाने, स्वातंत्र्य आंदोलनाला, सतत एक ऊर्जा दिली होती. ते महात्मा गांधीच तर होते की ज्यांनी स्वच्छतेला जनआंदोलन बनवण्याचे काम केले. महात्मा गांधींनी स्वच्छतेला स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले. आज इतक्या दशकानंतर, पुन्हा एकदा, स्वच्छता आंदोलनाने देशाला, नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचे काम केले आहे आणि हे आमच्या सवयी बदलण्याचे देखील एक अभियान बनते आहे.
आम्हाला हे विसरून चालणार नाही की स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही, स्वच्छता ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संस्कार संक्रमण करण्याची जबाबदारी आहे आणि पिढ्यानपिढ्या स्वच्छता अभियान चालते तेव्हाच संपूर्ण समाजजीवनाचा स्वच्छता हा स्वभाव बनतो.
आणि म्हणूनच वर्ष- दोन वर्ष, एक सरकार- दुसरे सरकार असा हा विषय नाही तर पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वच्छतेच्या विषयी जागरूक राहून, अविरत, न थकता, न थांबता, श्रद्धापूर्वक काम करत राहायचे आहे आणि स्वच्छतेचे अभियान चालवायचे आहे.
आणि मी तर आधी देखील म्हटलं होतं की स्वच्छता ही पूज्य बापूंना, ह्या देशाने वाहिलेली, खूप मोठी श्रद्धांजली आहे आणि ही श्रद्धांजली आम्हाला दर वेळी द्यायची आहे, सतत देत राहायची आहे.
मित्रांनो, लोकांना माहिती आहे की स्वच्छतेच्या विषयी बोलण्याची संधी मी कधीच सोडत नाही आणि म्हणूनच, आपल्या ' मन की बात ' चे एक श्रोते, श्रीमान रमेश पटेलजी, यांनी लिहिले की आम्हाला बापूंकडून शिकवण घेऊन, स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवात' आर्थिक स्वच्छतेचा देखील संकल्प करायला हवा. ज्याप्रमाणे शौचालये निर्माण झाल्याने गरिबांची प्रतिष्ठा वाढली त्याप्रमाणे आर्थिक स्वच्छता गरिबांच्या अधिकारांची सुनिश्चिती करते, त्यांचे आयुष्य सोपे बनवते. आता आपल्याला माहिती आहे की जनधन खात्यांच्या विषयी देशाने अभियान सुरू केले. त्यामुळे आज गरिबांचा, त्यांच्या हक्काचा पैसा, थेट, सरळ त्यांच्याच खात्यात जातो आहे, त्यामुळे भ्रष्टाचारासारखे व्यत्यय, खूप प्रमाणात कमी झाले आहेत. ही गोष्ट खरीच आहे की आर्थिक स्वच्छतेत तंत्रज्ञानाची खूप मदत होऊ शकते. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज गावातून, खेड्यातून देखील फिन टेक युपीआय ( fin- tech UPI) ने डिजिटल देवाण घेवाण करण्यासाठी सामान्य लोक पण सामील होत आहेत. त्याचा वापर वाढत आहे.
आपल्याला मी एक आकडा सांगतो, आपल्याला पण अभिमान वाटेल. गेल्या ऑगस्ट महिन्यात, एका महिन्यात, युपीआय द्वारे 355 कोटी व्यवहार झाले. म्हणजेच जवळजवळ 350 कोटींपेक्षा जास्त व्यवहार. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑगस्ट महिन्यात तीनशे पन्नास कोटी पेक्षा जास्त वेळा, डिजिटल देवाण घेवाणीसाठी, यूपीआयचा वापर केला गेला. आज सरासरी सहा लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल पेमेंट, UPI द्वारा होते आहे. ह्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता आणि पारदर्शिता येते आहे आणि आम्हाला माहिती आहे की आता fin-tech चे महत्व खूप वाढते आहे.
मित्रांनो जसे बापूंनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडले होते तसेच खादीला स्वातंत्र्याची ओळख बनवलं होतं. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी, आज आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहोत, आज आपण आनंदाने म्हणू शकतो की स्वातंत्र्य आंदोलनात जसा खादीचा गौरव होता, तसाच गौरव, आज आमची युवा पिढी खादीला देते आहे.
आज खादी आणि हातमागाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आहे आणि मागणी देखील वाढली आहे. आपल्याला पण माहिती आहे की असे कितीतरी प्रसंग आले जेव्हा दिल्लीच्या खादी शोरुम मध्ये एका दिवसात, एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले. मी देखील पुन्हा आपल्याला सांगेन, की दोन ऑक्टोबर ला पूज्य बापूंच्या जयंतीच्या दिवशी आपण सगळे मिळून पुन्हा एकदा, एक नवा विक्रम स्थापित करू या. आपण आपल्या शहरात जिथे खादी विकली जात असेल, हातमाग उत्पादन विकले जात असेल, हस्तकला वस्तू विकल्या जात असतील, आणि दिवाळीचा सण जवळ आला आहे, सणांच्या दिवसातील आपली खादी, हातमाग आणि कुटिरोद्योग संबंधी सर्व खरेदी vocal for local ह्या अभियानाला बळकट करणारी असेल. जुने सर्व विक्रम मोडणारी असेल.
मित्रानो, अमृत महोत्सवाच्या ह्या काळात, देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील, आत्तापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गाथा, माणसा माणसा पर्यंत पोचविण्याचे देखील एक अभियान सुरू आहे. ह्या साठी नवोदित लेखकांना, देशातील आणि जगातील युवकांना आवाहन केले होते.
ह्या अभियानासाठी आत्तापर्यंत 13 हजाराहून जास्त लोकांनी नाव नोंदवले आहे, ते देखील 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की 20 हून जास्त देशातील, कितीतरी अप्रवासी भारतीयांनी देखील ह्या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एक अजून आकर्षक माहिती अशी आहे की 5000 हून जास्त नवोदित लेखक स्वातंत्र्य लढ्याच्या कथा शोधत आहेत. त्यांनी unsung heroes, अनाम वीरांच्या, ज्यांची नावे इतिहासाच्या पानांवर दिसत नाहीत, अशा अनाम वीरांच्या संकल्पनेवर, त्यांच्या आयुष्यावर, त्या घटनांवर काही लिहिण्याचा विडा उचलला आहे. म्हणजेच, त्या स्वातंत्र्य सेनानींचा, ज्यांच्या विषयी गेल्या 75 वर्षात काही बोललेच गेले नाही, त्यांचा इतिहास, देशासमोर आणण्याचा युवकांनी निश्चय केला आहे. सर्व श्रोत्यांना माझी विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांना माझी विनंती आहे. आपण देखील युवकांना प्रेरित करा. आपण पण पुढे व्हा आणि मला पक्का विश्वास आहे की स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचे काम करणारे लोक इतिहास घडवणारे देखील आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ,
सियाचीन ग्लेशियरबद्दल आपण सगळे जाणतोच. तिथली थंडी इतकी भयानक असते की, तिथे राहणं सामान्य माणसाला शक्य नाही. दूरवर पसरलेला बर्फच बर्फ आणि झाडाझुडपांचा काहीच पत्ता नाही. तिथलं तापमान उणे 60 डिग्री पर्यंत देखील जातं. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिव्यांग व्यक्तींच्याएका चमूने जो पराक्रम करून दाखवला आहे, तो प्रत्येक देशबांधवासाठी अभिमानास्पद आहे. या चमूने सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार फुटांपेक्षा देखील जास्त उंचीवर असलेल्या 'कुमार पोस्ट' वर आपला झेंडा फडकवून जागतिक विक्रम केला आहे. शारीरिक आव्हानं असून देखील आपल्या या दिव्यांग मित्रांनी जी कामगिरी करून दाखवली, ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे आणि जेव्हा या चमूबद्दल तुम्हाला माहिती मिळेल तेव्हा माझ्याप्रमाणेच तुमच्यात देखील हिंमत आणि आत्मविश्वास जागृत होईल. या शूर दिव्यांग मित्रांची नावं आहेत, महेश नेहरा, उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गवांडे, हरियाणाचे अजय कुमार, लडाखचे लोब्सांग चोस्पेल, तामिळनाडूचे मेजर द्वारकेश, जम्मू - कश्मीरचे इरफान अहमद मीर आणि हिमाचल प्रदेशचे चोंजिन एन्गमो. सियाचीन ग्लेशियर सर करण्याची ही मोहीम भारतीय सेनेच्या विशेष दलांच्या माजी अधिकाऱ्यांमुळे यशस्वी होऊ शकली. मी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी या चमूचे कौतुक करतो. ही कामगिरी आपल्या देशबांधवांची, "Can Do Culture", "Can Do Determination" "Can Do Attitude" (मी हे करू शकतो संस्कृती, करण्याचा निश्चय आणि करण्याची प्रवृत्ती) अशी प्रत्येक आव्हान पेलण्याची प्रवृत्ती दर्शवणारी आहे.
मित्रांनो, आज देशात दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. मला उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या अशाच एका One Teacher, One Call (वन टीचर-वन कॉल) उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. बरेली येथे सुरू असलेली ही नावीन्यपूर्ण मोहीम दिव्यांग मुलांना नव्या वाटा दाखवत आहे. या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत डभौरा, गंगापूर इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पांडेयजी. कोरोना काळात, या मोहिमेमुळे मोठ्या संख्येने मुलांना शाळेत प्रवेश घेणं शक्य झालं, एवढच नाही, तर यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त शिक्षक देखील या सेवाकार्याशी जोडले गेले आहेत. हे शिक्षक गावोगावी जाऊन दिव्यांग मुलांना साद घालतात, त्यांचा शोध घेतात आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या शाळेत प्रवेश मिळवून देतात. दिव्यांग व्यक्तींसाठी दीपमालाजी आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो. शिक्षणाच्या क्षेत्रातला असा प्रत्येक प्रयत्न आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करणार आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज आपलं आयुष्य असं झालं आहे, की दिवसातून हजारोवेळा कोरोना हा शब्द कानावर पडतो, 100 वर्षांनी आलेली ही जागतिक महामारी, कोविड-19 ने प्रत्येक देशबांधवाला खूप काही शिकवलं आहे. आरोग्य आणि निरामयता (wellness) याबद्दल आपली उत्सुकता वाढली आहे आणि जागरूकता देखील. आपल्या देशात पारंपरिक रुपात अशा नैसर्गिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, ज्या सुदृढ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. ओडिशाच्या कालाहांडीच्या नांदोल येथे राहणारे पतायत साहूजी या क्षेत्रात अनेक वर्षांपासून वैशिष्ट्यपूर्ण काम करत आहेत. त्यांनी दीड एकर जमिनीवर औषधी झाडे लावली आहेत. इतकंच नाही, तर साहूजींनी या औषधी वनस्पतींच्या नोंदी देखील ठेवल्या आहेत. मला रांचीच्या सतीशजींनी पत्र लिहून अशीच आणखी एक माहिती दिली आहे. सतीशजींनी झारखंडच्या एका कोरफड गावाकडे माझं लक्ष वेधलं आहे. रांचीजवळच्या देवरी गावच्या महिलांनी मंजू कच्छपजी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून अॅलोव्हेरा म्हणजेच कोरफड शेतीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरफडीची शेती सुरू केली. या शेतीने आरोग्य क्षेत्रालाच फायदा मिळाला नाही, तर या महिलांचे उत्पन्न देखील वाढले. कोविड महामारीच्या काळात देखील यांनी उत्तम कमाई केली. याचं एक मोठं कारण हे होतं की सॅनिटायझर बनविणाऱ्या कंपन्या थेट यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज सुमारे चाळीस महिलांचा चमू या कामात गुंतला आहे आणि अनेक एकरांवर कोरफडीची लागवड केली जात आहे. ओदिशाचे पतायत साहूजी असोत, किंवा मग देवरीतला या महिलांचा चमू, यांनी शेतीची ज्याप्रकारे आरोग्याशी सांगड घातली आहे, ते एक मोठं उदाहरण आहे.
मित्रांनो, येत्या दोन ऑक्टोबरला, लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आपल्याला हा एक दिवस शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांची आठवण करण्याचीही प्रेरणा देतो. औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात, स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी, मेडी-हब- टीबीआय च्या नावाने एक इन्क्युबेटर गुजरातच्या आणंद इथं कार्यरत आहे. औषधी आणि सुगंधी वनस्पतींशी संबंधित या इनक्यूबेटरच्या मार्फत अगदी थोड्या कालावधीत, 15 स्वयंउद्योजकांच्या उद्योगविषयक कल्पनांना पाठबळ देण्यात आले आहे. या इनक्यूबेटरच्या मदतीनेच, सुधा चेब्रोलू जी यांनी आपली स्टार्ट अप कंपनी सुरु केली. त्यांच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिले जाते आणि त्यांच्यावरच, वनौषधीची अभिनव सूत्रे तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आणखी एक स्वयंउद्योजिका, सुभाश्री जी यानांही याच औषधी आणि सुगंधी वनस्पती इन्क्यूबेटर केंद्रातून मदत मिळाली आहे. सुभाश्री जी यांची कंपनी, वनौषधींपासून तयार केलेल्या गृह आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेशनरचे उत्पादन आणि व्यवसाय करतात. त्यांनी वनौषधींचे एक टेरेस गार्डनही तयार केले आहे, ज्यात 400 पेक्षा अधिक औषधी वनस्पती आहेत.
मित्रांनो,
मुलांमध्ये औषधी आणि हर्बल वनस्पतींबाबत जागृती वाढावी, त्यांना माहिती मिळावी यासाठी आयुष मंत्रालयाने एक फारच रोचक उपक्रम सुरु केला आहे. आणि या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे, आपले प्राध्यापक आयुष्मान जी यांनी ! कदाचित तुम्ही विचार करत असाल, की हे प्रोफेसर आयुष्मान महोदय आहेत तरी कोण? तर प्रोफेसर आयुष्मान एका कॉमिक पुस्तकाचं नाव आहे. यात वेगवेगळ्या कार्टून व्यक्तिरेखांच्या माध्यमातून छोट्या-छोट्या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. त्यासोबतच, कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुलिंब, अश्वगंधा आणि ब्राह्मी अशा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पतींचे उपयोगही सांगितले आहे.
मित्रांनो, आजच्या परिस्थितीत, ज्या पद्धतीने, औषधी वनस्पती आणि इतर वनौषधींकडे, जगभरातल्या लोकांचा कल वाढतांना दिसतो आहे, त्यात भारतासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही काळात, आयुर्वेदिक आणि वनौषधींच्या निर्यातीतही खूप मोठी वाढ झाली आहे.
मी वैज्ञानिक, संशोधक आणि स्टार्ट अप्सच्या जगाशी संबंधित सर्व लोकांचे लक्ष अशा काही उत्पादनांकडे वेधू इच्छितो, जे लोकांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती तर वाढवतातच; शिवाय आपले शेतकरी आणि युवकांचे उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरु शकतात.
मित्रांनो, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जात, शेतीतच होणारे नवे प्रयोग, नवे पर्याय, सातत्याने स्वयंरोजगाराची साधने निर्माण करत आहेत. पुलवामा इथल्या दोन बंधूंची कथा देखील याचेच एक उत्तम उदाहरण आहे. जम्मू-कश्मीरच्या पुलवामा इथले बिलाल अहमद शेख आणि मुनीर अहमद शेख, यांनी ज्याप्रकारे आपल्यासाठी नव्या वाटा चोखाळल्या आहेत, ते म्हणजे नव्या भारताचेच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. 39 वर्षांचे बिलाल अहमद जी उच्चशिक्षित आहेत, त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. आपल्या उच्चशिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करत त्यांनी, कृषीक्षेत्रात, स्वत:ची स्टार्ट अप कंपनी सुरु केली आहे. बिलालजी यांनी आपल्या घरातच गांडूळ खताचा छोटासा प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीत तर फायदा होतो आहेच, त्याशिवाय, यातून काही रोजगारांच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. दर वर्षी या दोन्ही बंधूंच्या खत प्रकल्पातून शेतकऱ्यांना सुमारे तीन हजार क्विंटल गांडूळ खत मिळत आहे. आज त्यांच्या या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात, 15 जण काम करतात. त्यांचा हा प्रकल्प बघण्यासाठी दूरदुरून अनेक लोक येतात, आणि विशेष म्हणजे त्यात अशा युवकांचे प्रमाण अधिक आहे, ज्यांना कृषीक्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. पुलवामा इथल्या या शेख बंधूंनी ‘नोकरी शोधणारे’ होण्यापेक्षा ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ होण्याचा संकल्प केला, आणि ते केवळ जम्मू-काश्मीरच नाही, तर संपूर्ण देशालाच एक नवा मार्ग दाखवत आहेत, हा मार्ग इतर युवकांना प्रेरणा देतो आहे.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
25 सप्टेंबरला देशाचे थोर सुपुत्र पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती असते. दीनदयाल जी, गेल्या शतकातील सर्वात मोठ्या विचारवंतांपैकी एक होते. अर्थशास्त्र, समाजाला सक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणे, त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आजही तेवढाच प्रासंगिक तर आहेच, शिवाय अत्यंत प्रेरणादायी देखील आहे.
तीन वर्षांपूर्वी, 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत, जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना- आयुष्मान भारत लागू करण्यात आली होती. आज देशातील दोन सव्वा दोन कोटींपेक्षा अधिक गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळाले आहेत. गरिबांसाठीची ही इतकी मोठी योजना, दीनदयालजींच्या अंत्योदय तत्त्वज्ञानाला समर्पित आहे. आजच्या युवकांनी जर त्यांची मूल्ये आणि आदर्श प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणली, तर त्याची त्यांना खूप आयुष्यात खूप मदत होऊ शकेल. एकदा लखनौ इथे दीनदयालजी यांनी म्हटले होते, “किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहे, किती उत्तम गुण आहेत- हे सगळे आपल्याला समाजाकडूनच तर मिळत असते. आपल्याला समाजाचे ऋण फेडायचे आहे, अशाच प्रकारचा विचार करायला हवा.” म्हणजेच, दीनदयालजी यांनी आपल्याला शिकवण दिली, की आपण समाजाकडून सतत काही ना काही घेत असतो, अनेक गोष्टी घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे, ते देशामुळेच तर आहे. म्हणूनच, देशाप्रति असलेले आपले ऋण कसे फेडता येईल, याचा विचार करायला हवा. हा आजच्या युवकांसाठी खूप मोठा संदेश आहे.
मित्रांनो, दीनदयालजी यांच्या आयुष्यातून आपल्याला आणखी एक शिकवण मिळते- ती म्हणजे, कधीही हार मानायची नाही. राजकीय आणि वैचारिक परिस्थिती विपरीत असतांनाही, भारताच्या विकासासाठी स्वदेशी मॉडेलचा वापर करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते किंचितही ढळले नाहीत. आज खूप युवक-युवती मळलेल्या वाटेवरुन जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्यास इच्छुक आहेत, त्यांना परिस्थिती स्वतःला अनुकूल बनवायची आहे, अशा वेळी दीनदयालजी यांच्या आयुष्यातून खूप प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळू शकेल आणि म्हणूनच माझा युवकांना आग्रही सल्ला आहे, की त्यांच्याविषयीची माहिती नक्कीच जाणून घ्या.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण आज अनेक विषयांवर चर्चा केली. आपण बोलत होतो, त्याप्रमाणे, पुढचा काही काळ सणवारांचा आहे. संपूर्ण देश, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या ‘सत्याचा असत्यावर विजय’ सांगणारा विजयादशमीचा उत्सवही साजरा करणार आहे. मात्र, या उत्सवकाळातही आणखी एक लढा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. आणि तो लढा आहे कोरोनाविरुद्धचा! या लढाईत टीम इंडिया रोज नवनवे विक्रम रचत आहे. लसीकरणात देशाने अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत, ज्यांची चर्चा सगळ्या जगभरात सुरु आहे. या लढाईत प्रत्येक भारतीयाची भूमिका महत्वाची आहे.
आपल्याला आपली वेळ आली की लस तर घ्यायची आहेच, पण त्यासोबतच आपल्याला याकडेही लक्ष द्यायचे आहे, की या सुरक्षा चक्रातून कोणीही सुटणार नाही. आपल्या आसपासच्या भागात, ज्या कोणाचे लसीकरण झालेले नाही, त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचे आहे. आणि लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचे पालन करायचे आहे. मला आशा आहे की या लढाईत पुन्हा एकदा टीम इंडिया आपला झेंडा उंच फडकवणार आहे. आपण पुढच्या वेळी आणखी काही विषयांवर ‘मन की बात’ करुया. आपल्या सर्वांना, प्रत्येक देशबांधवाला येणाऱ्या सणवारांसाठी खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद !
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.
मित्रांनो,
ज्यावेळी खेळाविषयी बोलणं होतं, त्यावेळी तर स्वाभाविकतेनं आपल्या डोळ्यासमोर तरूण पिढी येते. आणि ज्यावेळी तरूण पिढीकडे अगदी लक्षपूर्वक न्याहाळून पाहिलं तर किती मोठं परिवर्तन झाल्याचं दिसून येत. युवावर्गामध्ये मनपरिवर्तन झालंय. आणि आजचा युवावर्ग जुन्या- पुराण्या पद्धतींपेक्षाही काही तरी नवीन करू इच्छितोय. आजच्या युवकांना काहीतरी वेगळं, नवं, करण्याची इच्छा आहे. ही नवीन पिढी नवीन मार्ग तयार करू इच्छित आहेत. अगदी अनोळख्या क्षेत्रामध्ये आजच्या नवतरूणांना पावले टाकायची आहेत. त्यांच्यादृष्टीनं लक्ष्य नवं, शिखरही नवं आहे आणि त्यासाठी स्वीकारला जाणारा मार्गही नवा आहे. त्यांच्या मनामध्ये नवनवीन आशा-आकांक्षा आहेत. आणि एकदा का मनानं निश्चय केला केला ना, की युवक अगदी आपलं सर्वस्व पणाला लावून निश्चयपूर्तीसाठी रात्रं-दिवस परिश्रम करतात. काही दिवसांपूर्वी तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, भारताने आपल्या अंतराळ क्षेत्राला मुक्त केलं आणि पाहता पाहता युवा पिढीनं ही संधी साधली. त्याचा लाभ उठवण्यासाठी महाविद्यालयांतले विद्यार्थी, विद्यापीठ, खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेलं नवतरूण अगदी हिरीरीनं पुढं आले आहेत. आगामी दिवसांमध्ये आमच्या युवकांनी, आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या महाविद्यालयांनी, आमच्या विद्यापीठांनी, प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी काम करून, असंख्य, म्हणजे- खूप मोठ्या संख्येनं उपग्रह बनवले आहेत, हे सर्वांना दिसून येईल, असा मला विश्वास आहे.
याचप्रमाणे, कुठंही पहा, कोणत्याही कुटुंबामध्ये गेलात, आणि कितीही संपन्न परिवार असो, शिक्षित कुटुंब असो, जर तुम्ही त्या कुटुंबातल्या युवा पिढीबरोबर बोललात तर आजच्या काळातला युवक म्हणतो की, त्याला परंपरागत जे काही चालून आलं आहे, त्यापेक्षा खूप काही वेगळं करायचं आहे. आजचा नवयुवक म्हणत असतो, मला स्टार्ट-अप करायचं आहे. स्टार्ट-अपमध्ये मी जाणार आहे. याचाच अर्थ असा की कोणताही धोका पत्करायला त्याचं मन तयार आहे. आज लहान-लहान शहरांमध्येही स्टार्ट-अप संस्कृतीचा विस्तार होतोय. आणि त्यामध्ये उज्ज्वल भविष्याचे संकेत मला स्पष्ट दिसत आहेत. अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या देशामध्ये खेळण्यांविषयी चर्चा होत होती. पाहता पाहता आपल्या देशातल्या युवकांचं लक्ष या विषयाकडं गेलं. त्यांनीही मनानं निश्चय केला की, दुनियेमध्ये भारताच्या खेळण्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून द्यायची. आणि नवनवीन प्रयोग सुरू केले आणि जगामध्ये खेळण्यांचं खूप प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. 6-7 लाख कोटींची ही बाजारपेठ आहे. त्यामध्ये भारताचा हिस्सा फारच कमी आहे. परंतु खेळणी कशी बनवली पाहिजेत, खेळण्यांमध्ये वैविध्य कसं असलं पाहिजे, खेळण्यांमध्ये तंत्रज्ञान नेमकं कसं, किती असावं, मुलांच्या मानसिकतेचा विचार करून, त्या अनुरूप खेळणं कसं असावं. या सर्व गोष्टींचा विचार आज आपल्या देशातले युवक करताहेत. आणि त्यावर लक्ष केंद्रीत करून काहीतरी भरीव कार्य करू इच्छित आहेत.
मित्रांनो, आणखी एक गोष्ट, मनाला खूप आनंद देणारी आहे. इतकंच नाही तर विश्वास अधिक दृढ करणारी आहे. ही गोष्ट कोणती, तुम्हा काही कधी जाणवलं का? सर्वसाधारणपणे आपला एक स्वभाव बनला होता, तो म्हणजे.... चालायचंच, असंच असतं.... परंतु मी आता या स्वभावामध्ये बदल घडून येत असल्याचं पाहतोय. माझ्या देशाचा युवक, आता सर्वश्रेष्ठतेच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी स्वतःचं मन केंद्रीत करत आहे. आपल्या देशाचे युवक आता सर्वोत्तम कार्य करू इच्छितात, तसंच कोणतंही काम सर्वोत्तम पद्धतीनं करू इच्छितात.हा ध्यास त्यांना लागला आहे, ही गोष्टही राष्ट्राच्या दृष्टीनं एक खूप मोठी शक्ती बनणार आहे.
मित्रांनो, यंदाच्या ऑलिंपिक स्पर्धांनी खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संपल्या आता दिव्यांगांच्या ऑलिपिंक स्पर्धा सुरू आहेत. क्रीडा जगतामध्ये आपल्या भारतानं जो काही पराक्रम केला तो विश्वाच्या तुलनेत भलेही कमी असो, परंतु या स्पर्धांनी आपल्या खेळाडूंमध्ये, युवापिढीमध्ये विश्वास निर्माण करण्याचं खूप मोठं काम केलं आहे. आज युवक फक्त खेळ, सामने फक्त पाहतोच असं नाही. तर त्याच्याशी संबंधित व्यवसायांमध्ये असलेल्या शक्यतांकडेही ते डोळसतेनं पहात आहेत. क्रीडा क्षेत्राशी संबंधित संपूर्ण इको सिस्टम अगदी बारकाईनं पहात आहे. या संपूर्ण व्यवस्थेचं सामर्थ्य किती आहे, हे युवक जाणून घेत आहेत. आणि कोणत्या ना कोणत्या रूपानं स्वतःला या व्यवस्थेशी जोडू इच्छित आहेत. आता ते पारंपरिक गोष्टींतून बाहेर पडून पुढे जावून नवीन व्यवस्था स्वीकारत आहेत. आणि माझ्या देशवासियांनो, आता इतकं परिवर्तन घडून आलं, इतकी चालना मिळाली आहे की, प्रत्येक परिवारामध्ये खेळ या विषयावर चर्चा सुरू झाली. आहे. आता मग, तुम्हीच मला सांगा, हे घडून आलेलं परिवर्तन, मिळत असलेली चालना थांबवली पाहिजे काय? अजिबात नाही! तुम्ही सर्वजणही माझ्याचप्रमाणं विचार करीत असणार. आता देशामध्ये खेळ, क्रीडा प्रकार, खिलाडूपणाचं चैतन्य, थांबून चालणार नाही. या परिवर्तनाला, चालनेला कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्राच्या जीवनामध्ये स्थायी बनवलं पाहिजे. यामध्ये अधिकाधिक ऊर्जा निर्माण केली पाहिजे, उत्साह आणला पाहिजे, क्रीडा विषयी सर्वांना निरंतर नव्यानं उत्साह वाटला पाहिजे. मग घरामध्ये असो, बाहेर असो, गाव असो, शहर असो, आपल्याकडची सर्व मैदानं खेळाडूंनी भरून गेली पाहिजेत. सर्वांनी खेळलं पाहिजे, आणि सर्वांनी फुललंही पाहिजे. आणि तुम्हा सर्वांना आठवत असेलही, मी लाल किल्ल्यावरून भाषण देताना म्हणालो होतो- ‘‘सबका प्रयास’’ - होय! ‘‘ सबका प्रयास’’ सर्वांच्या प्रयत्नांनीच भारत क्रीडा क्षेत्रामध्ये नवीन उंची प्राप्त करू शकेल. असा विक्रम निर्माण करण्याचा अधिकारही भारताला आहे. मेजर ध्यानचंद जी यांच्यासारख्या लोकांनी जो मार्ग दाखवला आहे, त्यावरून पुढची वाटचाल करण्याची जबाबदारी आपली आहे. अनेक वर्षांनी देश हा कालखंड पहात आहे, अनुभवत आहे. खेळ याविषयाच्याबाबतीत कुटुंब असो, समाज असो, राज्य असो, राष्ट्र असो - एक मनानं सर्व लोक जोडले जात आहेत.
माझ्या प्रिय नवयुवकांनो,
आपण सर्वांनी या संधीचा लाभ घेवून वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये कौशल्य प्राप्त केलं पाहिजे. गावां-गावांमध्ये वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचं निरंतर आयोजन केलं गेलं पाहिजे. अशा स्पर्धांमधूनच तर खेळाचा विस्तार होत असतो. खेळ विकसित होतो आणि खेळाडूही यामधूनच तयार होतात. चला तर मग, आपण सर्व देशवासीय या क्रीडा क्षेत्राशी निगडित झालेल्या परिवर्तनाला, जितकी चालना देता येईल, जितकं पुढं घेऊन जाता येईल तितकं जावूया. या परिवर्तनामध्येही आपण जितकं योगदान देऊ शकतो, तितकं देवून ‘सबका प्रयास’ हा मंत्र प्रत्यक्षात जगून दाखवू या!
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या जन्माष्टमीचा सणही आहे. जन्माष्टमीचा काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव. आपल्याला भगवान कृष्णाची सर्व रूपं चांगली ठाऊक आहेत. खोडकर कान्हापासून ते विराट रूप धारण करणा-या कृष्णापर्यंत, त्याच्या शास्त्र सामर्थ्यापासून ते शस्त्र सामर्थ्यापर्यंत! कला असो, सौंदर्य असो, माधुर्य असो, कुठं कुठं कृष्ण असतो. मात्र ही गोष्ट मी करतोय, याला कारण म्हणजे, जन्माष्टमीच्या अगदी काही दिवसच आधी, मी एका आगळ्या-वेगळ्या अनुभवाला सामोरा गेलो. हा अनुभव तुम्हाला सांगावा, असं माझ्या मनात आलंय. तुम्हा सर्वांना आठवत असेल, याच महिन्यात, 20 तारखेला भगवान सोमनाथ मंदिरानं केलेल्या काही विकास कामांचे लोकार्पण केलं गेलं. सोमनाथ मंदिरापासून 3-4 किलोमीटर अंतरावरच भालका तीर्थ नावाचं स्थान आहे. याच स्थानी भगवान श्रीकृष्णानं भूमीवरचे आपले अखेरचे क्षण व्यतीत केले होते. एक प्रकारे भूलोकी भगवंताच्या लीलांची समाप्ती या स्थानावर झाली, असं म्हणता येईल. सोमनाथ न्यासाच्यावतीनं या संपूर्ण क्षेत्रामध्ये अनेक विकास कामं केली आहेत. भालका तीर्थ आणि तिथं होत असलेल्या कामांविषयी मी विचार करत असतानाच माझं लक्ष एका सुंदरशा कलापुस्तकाकडे वेधलं गेलं. हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी माझ्यासाठी ठेवून गेलं होतं. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अनेक रूपांची अनेक भव्य छायाचित्रे होती. सर्व छायाचित्रे अतिशय मोहक होती. विशेष म्हणजे ती अर्थपूर्णही होती. पुस्तकाची पानं उलटायला मी प्रारंभ केला, या पुस्तकानं पाहता पाहता माझी जिज्ञासा अधिकच जागृत झाली. ज्यावेळी ते पुस्तक पाहिलं आणि त्यातली सर्व छायाचित्रं माझी पाहून झाली, त्यावेळी तिथं शेवटी माझ्यासाठी एक संदेश लिहिलेला असल्याचं दिसलं. तो संदेश वाचल्यानंतर मात्र माझ्या मनात ते पुस्तक घ्यावं, असा विचार आला. आणि जो कोणी हे पुस्तक माझ्या निवासस्थानाबाहेर ठेवून गेला आहे, त्या व्यक्तीला आपण भेटलंच पाहिजे, असंही माझ्या मनाला वाटायला लागलं. मी इच्छा व्यक्त केल्यानंतर आमच्या कार्यालयाकडून त्या व्यक्तीशी संपर्क साधला गेला आणि दुस-याच दिवशी त्या व्यक्तीला बोलावण्यात आलं. श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या रूपांना दर्शवणारा तो कलाग्रंथ पाहताना माझ्या मनात जी जिज्ञासा जागृत झाली होती, त्याच जिज्ञासेमुळे मला त्या ग्रंथाचा जनक- जदुरानी दासी जी यांना भेटण्याची इच्छा होती. त्या अमेरिकी आहेत. दासी जी यांचा जन्म अमेरिकेतला. त्यांचं पालन-पोषणही अमेरिकेत झालंय. जदुरानी दासी जी ‘इस्कॉन’बरोबर जोडल्या गेल्या आहेत. हरे कृष्णा चळवळीशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्याविषयी आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे त्या भक्ती कलेमध्ये निपुण आहेत. तुम्हाला माहितीच असेल, आता दोन दिवसांनीच म्हणजे, एक सप्टेंबरला इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद स्वामी जी यांची 125 वी जयंती आहे. जदुरानी दासी जी यासंबंधीच्या कार्यासाठीच भारतात आल्या होत्या. माझ्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला. ज्यांच्या जन्म अमेरिकेत झाला आहे, जी व्यक्ती भारतीय भाव, भारतीय मानस यांच्यापासून वास्तविक खूपच दूर आहे, तरीही त्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्णाची इतकी मनमोहक चित्र कशी काय बनवली असतील? मी त्यांच्याशी बराच वेळ बोललो. आमच्या चर्चेतला काही भाग तुम्हा मंडळींनीही ऐकावा, असं मला वाटतंय.
पंतप्रधान - जदुरानी जी, हरे कृष्ण!
भक्ती कला या विषयी मी थोडंफार वाचलं आहे, पण आमच्या श्रोत्यांना तुम्ही याविषयी आणखी थोडं सांगावं. भक्ती कलेविषयी तुम्हाला असलेली मनापासून आवड, त्यामधला रस हे सगळंच महान वाटतंय.
जदुरानी जी - भक्ती कला याविषयी मी एक लेखच लिहिला आहे. या कलेविषयी तपशीलात सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की, ही कला काही मनातून किंवा कल्पनेतून साकारली जात नाही. परंतु याविषयी ब्रह्म संहितेसारख्या प्राचीन वेदिक शास्त्रातून ही भक्ती कला आली आहे, हे समजतं. ‘‘वें ओंकाराय पतितं स्क्लितं सिकंद. तसंच वृंदावनच्या गोस्वामींना प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी ही कला दिली आहे, असं मानतात.
ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानन्द विग्रहः
देव बासुरी कशा पद्धतीनं वाजवायचे, कशी वागवायचे, त्यांची सर्व इंद्रियं कशा पद्धतीनं कार्यरत असायची आणि श्रीमद् भागवत यांची माहिती, त्यामध्ये आहे.
बर्हापींड नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं... असं अगदी सर्वकाही म्हणजे, ईश्वर आपल्या कानावर फूल कसं लावायचे, त्यामागे अर्थ काय होता, त्यांनी आपल्या पदकमलांचे ठसे वृंदावनाच्या भूमीवर कसे उमटवले, गोमाता त्यांच्या नादमाधुर्यानं कशा मंत्रमुग्ध होत असत, कान्हाच्या बासुरीनं सर्वांना कसं मोहित केलं होतं, सर्वांच्या हृदयामध्ये, मनामध्ये कशा पद्धतीनं कृष्णाचा वास असतो ... हे सगळं सगळं काही आपल्या प्राचीन वेदिक शास्त्रात नमूद केलं आहे. आणि ही सगळी शक्ती अतींद्रिय जागृत असलेल्या व्यक्तींकडून आली आहे. अगदी सच्च्या भक्तांना ही कला अवगत झाली. ही काही माझ्यातल्या कलेची जादू नाही. तर कायाकल्प घडवणारी शक्ती आहे.
पंतप्रधान - मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे. 1966 पासून तुमचा हा प्रवास सुरू आहे आणि 1976 मध्ये तुम्ही भारताशी प्रत्यक्ष जोडल्या गेल्या आहात. या दीर्घकाळाच्या अनुभवानंतर भारताचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, असं तुम्हाला वाटतं?
जदुरानी जी - पंतप्रधान जी, भारत माझ्यासाठी सर्वकाही, सर्वस्व आहे. काही दिवसांपूर्वीच मी माननीय राष्ट्रपतींना याविषयी बोलताना नमूद केलं असावं. आता भारत तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं खूपच आधुनिक होत आहे. आणि व्टिटर, इन्स्टाग्रॅम यांच्याबाबतीत म्हणायचं झालं तर भारत पश्चिमेचं अनुकरण करत आहे. आयफोन्स आणि मोठमोठ्या इमारती त्याचबरोबर खूप सा-या सुविधाही पश्चिमेसारख्या होत आहेत. परंतु मला पक्कं ठाऊक आहे की, हे काही भारताचं खरं वैभव नाही. या भारतभूमीमध्ये कृष्णासारख्या अवतारी पुरूषानं जन्म घेतला आहे, हेच खरं भारताचं वैभव आहे. विशेष म्हणजे एकच अवतार नाही तर अनेक अवतार या भूमीत अवतरले आहेत. इथं भगवान शिव अवतरले, इथं राम अवतरले, इथं पवित्र नद्या आहेत. वैष्णव संस्कृतीमधली अनेक पवित्र स्थानं इथं आहेत. त्यामुळंच संपूर्ण विश्वाच्या दृष्टीनं भारत विशेषतः वृंदावन हे सर्वात महत्वाचं स्थान आहे. वृंदावन हे संपूर्ण वैकुंठाचं स्त्रोत आहे. व्दारिका म्हणजेच भौतिक निर्मितीचं स्त्रोत आहे. त्यामुळंच मला भारत प्रिय आहे.
पंतप्रधान - जदुरानी जी आभार! हरे कृष्ण!!
मित्रांनो,
दुनियेतले लोक ज्यावेळी आज भारतीय अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्याविषयी इतका मोठा विचार करतात, तर आपलीही काही जबाबदारी आहे. आपण आपल्या या महान परंपरा अशाच पुढे नेल्या पाहिजेत. ज्या कालबाह्य परंपरा आहेत, त्या तर सोडल्याच पाहिजेत. मात्र ज्या कालातीत आहेत, त्यांना पुढे नेलेच पाहिजे. आपण आपले उत्सव, सण साजरे करताना, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेतला पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता संदेश आहे, कोणता ना कोणता संस्कार आहे. तो आपण जाणून घेतला पाहिजे. आणि तसंच वागलं, जगलंही पाहिजे. त्याचबरोबर आपल्या येणा-या पिढीकडे हा संस्कार वारसा म्हणून आपल्याला सोपवायचा आहे. सर्व देशवासियांना मी पुन्हा एकदा जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या कोरोना कालखंडामध्ये स्वच्छतेविषयी मला जितकं काही सांगायचं, बोलायचं होतं, ते थोडं कदाचित कमी झालं असावं, असं वाटतंय. स्वच्छता अभियानाकडे आपल्याला जराही दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रनिर्माणासाठी सर्वांच्या प्रयत्नांतूनच कसा सर्वांचा विकास होऊ शकतो, याचे उदाहरण आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरते आणि आपणही असेच काही करावं, यासाठी नवीन चैतन्यही निर्माण करते. नव्यानं विश्वास येतो. आणि हा विश्वासच आपल्या संकल्पाला नवसंजीवनी देत असतो. आता स्वच्छता अभियानाविषयी चर्चा सुरू झाली की इंदूरचं नाव घेतलं जातं, हे आपण सर्वजण चांगलंच जाणून आहोत. कारण इंदूरनं स्वच्छतेविषयी स्वतःची एक वेगळी आणि विशेष ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल इंदूरचे नागरिक अभिनंदनास पात्र आहेत. आपलं हे इंदूर शहर अनेक वर्षांपासून ‘स्वच्छ भारत क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. शहरानं आपलं पहिला क्रमांक कायम राखला आहे. आता इंदूरचे लोक स्वच्छ भारताच्या या क्रमवारीत पहिले येऊन आनंद मानून शांत बसू इच्छित नाहीत. तर त्यांना आणखी पुढं जायचं आहे. काही तरी नवीन करायचं आहे. आणि त्यांनी आता तसा मनोमन निश्चयही केला आहे. त्यांनी इंदूरला ‘वॉटर प्लस सिटी’ बनवायचं आहे. त्यासाठी इंदूरनिवासी सर्वतोपरी कार्य करत आहेत. ‘वॉटर प्लस सिटी’ याचा अर्थ असे शहर जिथं कोणत्याही प्रक्रियेविना कसल्याही प्रकारचे सांडपाणी कोणत्याही सार्वजनिक स्त्रोतांमध्ये सोडण्यात येणार नाही. इथल्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या सांडपाणी वाहिन्या सांडपाणी प्रक्रिया करणा-या प्रकल्पांना जोडल्या आहेत. स्वच्छता अभियानही सुरू ठेवलं आहे. आणि आता या कारणांमुळे सरस्वती आणि कान्ह या नद्यांमध्ये सोडले जाणारे दूषित पाणीही ब-याच प्रमाणात कमी झाले आहे. आता सुधारणा दिसून येत आहेत.
आज आपला देश स्वातंत्र्यप्राप्तीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वच्छ भारत मोहिमेचा संकल्प आपण पूर्णत्वाला न्यायचा आहे. आपल्या देशातील जितकी जास्त शहरे ‘Water Plus City’ असतील, त्याच प्रमाणात स्वच्छतेची व्याप्ती वाढेल, आपल्या नद्या स्वच्छ होतील आणि पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्याचे संस्कारसुद्धा आपसूक होतील.
मित्रहो, बिहारमधील मधुबनी येथील एक उदाहरण माझ्या समोर आले आहे. मधुबनी येथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठ आणि स्थानिक कृषी विज्ञान केंद्राने एकत्रितपणे एक चांगला उपक्रम राबवला आहे. शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळतो आहेच आणि त्याच बरोबर स्वच्छ भारत मोहिमेला सुद्धा चालना मिळते आहे. विद्यापीठाच्या या उपक्रमाचे नाव आहे "सुखेत मॉडेल". गावातले प्रदूषण कमी करणे हा या "सुखेत मॉडेल" चा उद्देश आहे. या मॉडेल अंतर्गत गावातल्या शेतकऱ्यांकडून शेण आणि शेतातला तसेच घरातला इतर कचरा गोळा केला जातो आणि त्याच्या मोबदल्यात गावकऱ्यांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी पैसे दिले जातात. गावातून जो कचरा गोळा केला जातो, त्यातून गांडूळ खत तयार केले जाते. म्हणजेच या "सुखेत मॉडेल" चे चार लाभ अगदी सहज दिसून येतात. एक तर गाव प्रदूषण मुक्त होते, दुसरे म्हणजे गाव घाणीपासून, कचऱ्यापासून मुक्त होते, तिसरे म्हणजे ग्रामस्थांना स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर साठी पैसे मिळतात आणि चौथा लाभ म्हणजे गावातल्या शेतकऱ्यांना जैविक खत उपलब्ध होतं. विचार करा, अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला नक्कीच सक्षम करू शकतो. हीच खरी आत्मनिर्भरता आहे. देशातल्या प्रत्येक पंचायतीला मी आवाहन करतो की अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याबाबत तुम्ही नक्की विचार करा. आणि मित्रहो, जेव्हा आपण एखादे लक्ष्य निर्धारित करून ते साध्य करण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा आपल्याला त्याचे फळ मिळतेच. तामिळनाडूमधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या कांजीरंगाल पंचायतीचे उदाहरण बघा ना.या लहानशा ग्रामपंचायतीने काय केले ठाऊक आहे का..? या ठिकाणी तुम्हाला ‘वेल्थ फ्रॉम वेस्ट’ चा एक अनोखा उपक्रम बघता येईल. इथल्या ग्रामपंचायतीने स्थानिक लोकांच्या मदतीने कचऱ्यापासून वीज तयार करण्याचा एक स्थानिक प्रकल्प आपल्या गावात सुरू केला आहे. सगळ्या गावातल्या कचरा एकत्र केला जातो, त्यापासून वीज तयार केली जाते आणि उर्वरित उत्पादनाची विक्री कीटकनाशक म्हणून केली जाते. गावातल्या या ऊर्जा प्रकल्पात प्रतिदिन दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून मिळणाऱ्या विजेचा वापर, गावातले पथदिवे आणि इतर गरजा भागवण्यासाठी केला जातो. या प्रकल्पामुळे पंचायतीच्या पैशांची बचत होते आहे आणि त्याचबरोबर तो पैसा विकासाच्या इतर कामी वापरला जातो आहे. आता मला सांगा, तमिळनाडू मधल्या शिवगंगा जिल्ह्यातल्या एका लहानशा पंचायतीने आपणा सर्व देशवासियांना काही नवे करण्याची प्रेरणा दिली आहे की नाही? त्यांनी खरोखरच कमाल करून दाखवली आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मन की बात कार्यक्रम आता भारताच्या सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात मन की बात कार्यक्रमावर चर्चा केली जाते. परदेशात राहणारे आपल्या भारतीय समुदायाचे लोकसुद्धा मला वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती देत असतात. आपल्या या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून मलासुद्धा परदेशात सुरू असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाबद्दल माहिती द्यायला मनापासून आवडते. आज सुद्धा मी तुमची ओळख अशाच काही लोकांशी करून देणार आहे. मात्र त्यापूर्वी मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवू इच्छितो. जरा लक्षपूर्वक ऐका.
##
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
नमोनमः सर्वेभ्यः | मम नाम गङ्गा | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ | अहम् एकतामूर्तेः मार्गदर्शिका एवं रेडियो-युनिटी-माध्यमे आर्.जे. अस्मि | अद्य संस्कृतदिनम् अस्ति | सर्वेभ्यः बहव्यः शुभकामनाः सन्ति| सरदार-वल्लभभाई-पटेलमहोदयः ‘लौहपुरुषः’ इत्युच्यते | २०१३-तमे वर्षे लौहसंग्रहस्य अभियानम् प्रारब्धम् | १३४-टन-परिमितस्य लौहस्य गलनं कृतम् | झारखण्डस्य एकः कृषकः मुद्गरस्य दानं कृतवान् | भवन्तः शृण्वन्तु रेडियो-युनिटी-नवति-एफ्.एम् –‘एकभारतं श्रेष्ठ-भारतम्’ |
[रेडियो युनिटी 90 एफ्.एम्.-2]
##
मित्रहो, ही भाषा तुम्ही नक्कीच ओळखली असेल. रेडिओवर संस्कृत भाषेत संवाद सुरू आहे आणि हा संवाद साधणाऱ्या आहेत आर जे गंगा. आर जे गंगा या गुजरातच्या रेडिओ जॉकी गटातल्या एक सदस्य आहेत. आर जे नीलम, आर जे गुरु आणि आर जे हेतल हे त्यांचे आणखी काही सहकारी आहेत. हे सर्वजण गुजरात मध्ये केवडिया इथे संस्कृत भाषेच्या सन्मानात भर घालायचे मोलाचे काम करत आहेत. केवडीया म्हणजे असे ठिकाण जिथे आपल्या देशाचा मानबिंदू असणारा जगातला सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा आहे. त्या केवडिया बद्दल मी बोलतो आहे. हे सर्व रेडिओ जॉकी एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका निभावत असतात. ते मार्गदर्शक म्हणून सेवा देतात आणि त्याच बरोबर कम्युनिटी रेडिओ इनिशिएटिव्ह रेडिओ युनिटी 90 एफ एम सुद्धा चालवतात. हे आर जे आपल्या श्रोत्यांसोबत संस्कृत भाषेत संवाद साधतात आणि संस्कृत भाषेतच माहिती सुद्धा देत असतात.
मित्रहो, आपल्याकडे संस्कृत बद्दल,
अमृतम् संस्कृतम् मित्र, सरसम् सरलम् वचः |
एकता मूलकम् राष्ट्रे, ज्ञान विज्ञान पोषकम् |
,असे म्हटले जाते.
अर्थात आपली संस्कृत भाषा सरस सुद्धा आहे आणि सरळ अर्थात सोपी सुद्धा आहे.
संस्कृत भाषा आपल्या विचारांच्या आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून ज्ञान,विज्ञान आणि राष्ट्राच्या एकतेचं पोषण करते, सक्षमीकरण करते. संस्कृत साहित्यातील मानवतेचे आणि ज्ञानाचे दिव्य दर्शन कोणालाही आकर्षित करू शकते. परदेशात संस्कृत शिकवण्याचे प्रेरक कार्य करणाऱ्या काही लोकांबद्दल मला नुकतीच माहिती मिळाली. आयर्लंडमध्ये राहणारे श्रीयुत रटगर कोर्टेनहॉर्स्ट संस्कृतचे विद्वान आणि शिक्षक आहेतआणि ते तिथल्या मुलांना संस्कृत भाषा शिकवतात. आपल्याकडे पूर्वेला भारत आणि थायलंड यांच्यातील सांस्कृतिक संबंध सक्षम करण्यात संस्कृत भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. चिरापत प्रपंडविद्या आणि डॉ. कुसुमा रक्षामणी थायलंडमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत. त्यांनी थाई आणि संस्कृत भाषेत तुलनात्मक साहित्याची रचना सुद्धा केली आहे. असेच आणखी एक प्रोफेसर आहेत श्रीयुत बोरीस जाखरीन. ते रशियामध्ये मॉस्को स्टेट विद्यापीठात संस्कृत शिकवतात. त्यांचे अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अनेक संस्कृत पुस्तकांचा रशियन भाषेत अनुवाद सुद्धा केला आहे. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा शिकवणार्या अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये ऑस्ट्रेलियामधल्या सिडनी संस्कृत स्कूलचा समावेश होतो. या सर्व संस्था मुलांसाठी संस्कृत व्याकरण शिबिरे, संस्कृत नाटक आणि संस्कृत दिवस अशा उपक्रमांचे आयोजन सुद्धा करत असतात.
मित्रहो, अलीकडच्या काळात संस्कृत भाषेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. आता आपणही त्यासाठी योगदान देण्याची वेळ आली आहे. आपला वारसा जोपासणे, सांभाळणे आणि नव्या पिढीकडे सोपवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे आणि भावी पिढीचा तो अधिकार आहे. या कामांसाठी सर्वांनीच एकत्रित प्रयत्न करण्याची आता गरज आहे. मित्रहो, अशाप्रकारचे प्रयत्न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल, अशा एखाद्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे असेल तर #celebratingSanskrit सह सोशल मीडिया वर अशा व्यक्तीशी संबंधित माहिती नक्की शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण लवकरच विश्वकर्मा जयंती साजरी करू. भगवान विश्वकर्मा यांना आपल्याकडे विश्वाच्या सृजनशक्तीचे प्रतीक मानले गेले आहे. आपल्या हाती असणार्या कौशल्यातून एखाद्या वस्तूची निर्मिती करणे, सृजन करणे, मग ते शिवणकाम किंवा विणकाम असो, सॉफ्टवेअर असो किंवा उपग्रहाशी संबंधित काम असो, या सर्वच कृतींमधून भगवान विश्वकर्मांचे अस्तित्व प्रतीत होत असते. जगात आज कौशल्यांचा उदोउदो केला जातो आहे. आपल्या ऋषी-मुनींनी मात्र हजारो वर्षांपूर्वीच कौशल्ये आणि प्रमाण या बाबींवर भर दिला होता. त्यांनी कौशल्ये आणि आस्था यांची सांगड घातली आणि कौशल्यांचा वापर हा आपल्या जगण्याचाच एक भाग झाला. आपल्या वेदांनीसुद्धा अनेक सूक्ते भगवान विश्वकर्मा यांना समर्पित केली आहेत. निसर्गातील कितीही मोठी रचना असो, जगात जी काही नवी आणि मोठी कामे झाली आहेत, त्या सर्वांचे श्रेय आपल्या शास्त्रांनी भगवान विश्वकर्मा यांनाच दिले आहे. जगात विकास आणि नाविन्याशी संबंधित जी काही कामे होतात, ती कौशल्यांच्याच माध्यमातून होतात, हे यावरून दिसून येते. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंती आणि पुजेमागे हीच भावना आहे. आपल्या शास्त्रात म्हटले आहे,
विश्वम कृत सन्म कर्मव्यापारः यस्य सः विश्वकर्मा |
अर्थात सृष्टी आणि निर्मितीशी संबंधित सर्व कामे जो करतो, तो विश्वकर्मा आहे. आपल्या शास्त्रांच्या मते, आपल्या अवतीभवती निर्मिती आणि सृजनात गुंतलेले जे कुशल लोक आहेत, ते सगळेच भगवान विश्वकर्मा यांचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा आपण करू शकणार नाही. विचार करून बघा. तुमच्या घरी विजेशी संबंधित काही अडचणी उद्भवल्या आहेत आणि त्या दुरुस्त करणारा भेटला नाही, तर काय होईल? तुम्ही किती त्रासून जाल. अशा अनेक कौशल्यपूर्ण लोकांमुळे आपले जगणे सुसह्य होत राहिले आहे. जरा आपल्या आजूबाजूला नजर टाका. लोहारकाम करणारे, मातीपासून भांडी तयार करणारे, लाकडी सामान तयार करणारे, विजेचे काम करणारे, घरात रंगकाम करणारे, स्वच्छता कर्मचारी किंवा मोबाईल लॅपटॉप दुरुस्त करणारे हे सर्वच घटक, आपल्या कौशल्यामुळे ओळखले जातात. हे सुद्धा आधुनिक विश्वकर्माच आहेत. मित्रहो, काळजी करण्यासारखा आणखी एक मुद्दा आहे. ज्या देशात, जिथल्या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये, विचारांमध्ये, कौशल्य आणि कुशल मनुष्यबळाची सांगड भगवान विश्वकर्मा यांच्याशी घालण्यात आली आहे, तिथली परिस्थिती बदलत गेल्याचे दिसून आले आहे. आपले कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, तसेच राष्ट्रीय जीवनावर कौशल्यांचा फार मोठा प्रभाव एके काळी होता. मात्र गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात कौशल्यांकडे आदराने पाहण्याची भावना हळूहळू विस्मृतीत गेली. कौशल्यांवर आधारित कामांकडे तुच्छ भावनेने पाहिले जाऊ लागले. आणि आज बघा, अवघे जग कौशल्यांवरच भर देते आहे. भगवान विश्वकर्मा यांची पूजा निव्वळ औपचारिकता नाही. आपण कौशल्यांबाबत आदराची भावना बाळगली पाहिजे, कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कष्ट केले पाहिजेत.आपल्या हाती कौशल्ये असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. जेव्हा आपण काही नवे करू, नावीन्यपूर्ण करू, ज्यामुळे समाजाचे हित होईल, लोकांचे जगणे सोपे होईल, तेव्हा आपली विश्वकर्मा पूजा खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. अंगी कौशल्ये असणाऱ्या लोकांसाठी आज जगात अनेक संधी उपलब्ध आहेत. अंगी कौशल्ये असणाऱ्यांसाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. चला तर मग, यावेळी आपण भगवान विश्वकर्मा यांच्या पूजेनिमित्त आस्थेच्या बरोबरीने त्यांचा संदेशही अंगीकारण्याचा संकल्प करूया. कौशल्यांचे महत्त्व ओळखू या, अंगी कौशल्य असणाऱ्या सर्वांना, कोणतेही काम कौशल्याने करणाऱ्या सर्वांना आदराची वागणूक देऊ, असा संकल्प आपण करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीचे हे 75 वे वर्ष आहे. या वर्षभरात आपण रोजच नवा संकल्प करायचा आहे, नवा विचार करायचा आहे आणि काही नवे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला भारत लवकरच स्वातंत्र्यप्राप्तीची शंभर वर्षे पूर्ण करणार आहे. आपण आज केलेले संकल्प, हे तेव्हाच्या यशाची पायाभरणी करणारे ठरणार आहेत. हे लक्षात ठेवून आपण या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. यासाठी आपण जास्तीत जास्त योगदान द्यायचे आहे. हे प्रयत्न करताना आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे, दवाई भी, कडाई भी. देशभरात 62 कोटी पेक्षा जास्त लसींचे डोस देण्यात आले आहेत. मात्र तरीसुद्धा आपण काळजी घ्यायची आहे, सतर्क राहायचे आहे. आणि हो, नेहमीप्रमाणे जेव्हा तुम्ही काही नवे कराल, नवा विचार कराल, तेव्हा मलाही विश्वासात घ्या, मलाही त्याबद्दल सांगा. तुमच्या पत्रांची आणि संदेशाची मी वाट बघतो आहे. तुम्हा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. मनापासून आभार.
नमस्कार.
माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार !
दोन दिवसांपूर्वीची काही अद्भुत छायाचित्रे, काही अविस्मरणीय क्षणांच्या ताज्या आठवणी आताही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे, यावेळच्या ‘मन की बात’ ची सुरुवात याच क्षणांनी करुया. टोक्यो ऑलिंपिक मध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालतांना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना म्हटले -
विजयी भव ! विजयी भव !
जेव्हा हे खेळाडू भारतातून गेले, त्याआधी मला त्यांच्याशी बोलण्याची, त्यांचे आयुष्य जाणून घेण्याची आणि देशालाही ते सांगण्याची संधी मिळाली होती. हे खेळाडू, आयुष्यातील अनेक आव्हानांवर मात करत, इथे पोहोचले आहेत.
आज त्यांच्याजवळ आपले प्रेम आणि सर्वांच्या पाठिंब्याची ताकद आहे- त्यामुळे चला, आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता व्हिक्टरी पंच कॅम्पेन म्हणजेच विजयी ठोसा अभियान सुरु झाले आहे. आपणही आपल्या चमू सोबत आपला व्हिक्टरी पंच शेयर करा, भारतासाठी चीयर करा !
मित्रांनो, जो देशासाठी तिरंगा हातात घेतो, त्याच्या सन्मानार्थ आपल्या भावना अभिमानाने उचंबळून येणं स्वाभाविक आहे. देशभक्तीची हीच भावना आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते. उद्या, म्हणजेच 26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, त्यामुळे तो आणखीनच विशेष आहे. माझी अशी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी कारगिल युद्धाची रोमांचकारी कथा नक्की वाचा. कारगिलच्या योद्ध्यांना आपण सर्व आधी वंदन करूया.
मित्रांनो
यावर्षी, 15 ऑगस्ट रोजी देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहे. आपले हे खूप मोठे भाग्य आहे की जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी , देशाने कित्येक शतके वाट पहिली, त्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असतांनाच्या क्षणांचे आपण साक्षीदार बनणार आहोत.
आपल्याला आठवत असेल, स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आपण 12 मार्चपासून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून केली होती. याच दिवशी, बापूंच्या दांडी यात्रेचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. तेव्हापासून, जम्मू-काश्मीर पासून ते पुडदूचेरीपर्यंत, गुजरातपासून ते ईशान्येकडील राज्यांपर्यंत अमृत महोत्सवासही संबंधित कार्यक्रम होत आहेत. अशा अनेक घटना, ज्यांचे योगदान तर खूप आहेच, मात्र त्यांची म्हणावी तेवढी चर्चा झाली नाही,- आज लोक त्यांच्याविषयीही जाणून घेत आहेत. आता जसे की मोईरांग डे चेच बघा ना! माणिपूरची छोटीशी वस्ती मोईरांग, कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय लष्कर म्हणजे आयएनएचे प्रमुख केंद्र होते. इथे स्वातंत्र्याच्या पहिल्याच लढाईआधी, आयएनएच्या शौकत मलिक जी यांनी भारताचा झेंडा फडकवला होता. या अमृत महोत्सवादरम्यान, 14 एप्रिल रोजी याच मोईरांग मध्ये पुन्हा एकदा तिरंगा फडकवण्यात आला. असे कितीतरी स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि महापुरुष आहेत ,ज्यांचे आपण यानिमित्ताने स्मरण करत आहोत. सरकार आणि सामाजिक संस्थांकडूनही सातत्याने याच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यंदाच्या 15 ऑगस्टलाही असेच एक आयोजन होणार आहे. हा एक प्रयत्न आहे- राष्ट्रगीताशी संबंधित. सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे की त्या दिवशी, जास्तीत जास्त भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायचे. यासाठी एक संकेतस्थळ देखील तयार करण्यात आले आहे- Rashtragaan.in
या संकेतस्थळाच्या मदतीने आपण राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करु शकाल आणि या अभियानात सहभागी होऊ शकाल. मला आशा आहे, आपण या विशेष उपक्रमात नक्की सहभागी व्हाल. अशाच प्रकारचे अनेक अभियान, अनेक उपक्रम आपल्याला येत्या काळात बघायला मिळणार आहेत. “अमृत महोत्सव’ हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही, तर हा कोट्यवधी भारतवासियांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना केलेले हे वंदन आहे. या महोत्सवाच्या मूळ भावनेचा विस्तार तर बराच मोठा आहे. –ही भावना आहे, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मार्गावरुन चालणे, त्यांच्या स्वप्नातल्या देशाची उभारणी करणे. जशाप्रकारे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते सगळे झपाटलेले लोक एकत्र होऊन लढले होते, तसेच आपल्याला देशाच्या विकासासाठी एकत्र यायचे आहे. आपल्याला देशासाठी जगायचे आहे, देशासाठी काम करायचे आहे. आणि या प्रवासात अगदी छोटी छोटी कामेदेखील मोठा प्रभाव पाडू शकतात. आपली दैनंदिन कामे करतांनाही आपण राष्ट्र निर्मितीचे काम करु शकतो. जसे की ‘व्होकल फॉर लोकल’. आपल्या देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणे, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग बनले पाहिजे. सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, 1905 साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती.
मित्रांनो,
आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात, हातमाग, उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. हे एक असे क्षेत्र आहे, ज्याच्याशी, लाखों महिला, लाखो विणकर, लाखो शिल्पकार जोडलेले आहेत. आपले छोटे छोटे प्रयत्न, वीणकरांमध्ये एक नवी उमेद जागवू शकतात. आपण स्वतः काही ना काही तरी खरेदी करा, आणि आपले अनुभव इतरांनाही सांगा. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशावेळी एवढे काम करणे आपली निश्चितच जबाबदारी आहे, मित्रांनो !
आपण पहिले असेल 2014 पासूनच आपल्या ‘मन की बात’ मध्ये आपण नेहमीच खादीवर चर्चा करतो. आपल्याच प्रयत्नांमुळे आज देशात खादीची विक्री कित्येक पटीने वाढली आहे. कोणी कधी विचार केला असेल का, की खादीच्या कुठल्या दुकानात एकाच दिवशी, एक कोटींपेक्षा अधिक विक्री होऊ शकते ! मात्र, आपण हे देखील करुन दाखवले आहे. आपण जेव्हाही कधी खादीचे कोणतेही उत्पादन खरेदी करता, तेव्हा त्याचा लाभ, आपल्या गरीब वीणकर बंधू-भगिनींना होतो.
यामुळेच, खादीची खरेदी करणे एकप्रकारे लोकसेवाही आहे आणि देशसेवाही आहे. माझी आपल्याला आग्रही विनंती आहे, की आपण सर्व, माझे प्रिय बंधू-भगिनी, ग्रामीण भागात तयार होणाऱ्या हातमागाच्या वस्तू जरूर खरेदी करा. आणि त्या वस्तू #MyHandloomMyPride वर शेयर करा.
मित्रांनो, जेव्हा आपण स्वातंत्र्य आंदोलन आणि खादीविषयी बोलतो आहोत, त्यावेळी बापूंचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. जसे बापूंच्या नेतृत्वाखाली ‘भारत छोडो आंदोलन’ झाले होते, तसेच आज प्रत्येक भारतीयाला ‘भारत जोडो’ आंदोलनाचे नेतृत्व करायचे आहे. हे आपले कर्तव्य आहे, की आपण आपले काम अशाप्रकारे करावे, जे विविधतांनी भरलेल्या आपल्या भारताला एकत्र आणण्यासाठी उपयुक्त ठरेल. चल तर मग, आपण अमृत महोत्सवानिमित्त हा अमृत संकल्प घेऊया, की देशच कायम आपली सर्वात मोठी ‘आस्था’ आणि सर्वात मोठी प्राथमिकता असेल. “Nation First, Always First”, हा मंत्र घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज मी ‘मन की बात’ ऐकणाऱ्या माझ्या युवा मित्रांचे विशेष आभार मानू इच्छितो. अगदी काही दिवसांपूर्वी, माय गव्ह च्या वतीने ‘मन की बात’ च्या श्रोत्यांविषयी एक अध्ययन करण्यात आले होते. या अध्ययनात असे आढळले की ‘मन की बात’ साठी संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये प्रामुख्याने कोणते लोक आहेत?
तर अध्ययनातून ही माहिती पुढे आली की, मला संदेश आणि सूचना पाठवणाऱ्या लोकांमध्ये सुमारे 75 टक्के लोक 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. म्हणजेच, भारताच्या युवा शक्तिच्या सूचना ‘मन की बात’ ला दिशा देत आहेत. मी हा खूप चांगला संकेत आहे, असे मानतो. ‘मन की बात’ हे एक असे माध्यम आहे, जिथे सकारात्मकता आहे, संवेदनशीलता आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण अनेक सकारात्मक गोष्टी करतो. या कार्यक्रमांचे स्वरूप एकोप्याचे आहे. सकारात्मक विचार आणि सूचनांसाठी, भारताच्या युवकांची सक्रियता मला आनंदीत करते आहे. मला याचाही आनंद आहे, की मन की बात च्या माध्यमातून मला युवकांचे मन जाणण्याची देखील संधी मिळते आहे.
मित्रांनो, आपल्याकडून मिळालेल्या सूचना, हीच ‘मन की बात’ ची खरी ताकद आहे. आपल्या सूचनाच, ‘मन की बात’ च्या माध्यमातून भारताची विविधता प्रकट करत असतात. भारतवासियांच्या सेवा आणि त्यागाचा सुगंध, चारी दिशांना पसरवत असतात. आपल्या परिश्रमी युवकांची संशोधने सर्वाना प्रेरित करत असतात. ‘मन की बात’ मध्ये आपण कितीतरी प्रकारच्या कल्पना पाठवत असता.आपण सर्वांवर तर चर्चा करु शकत नाही, मात्र त्यातील बहुतांश कल्पना मी संबंधित विभागांना नक्कीच पाठवत असतो. जेणेकरुन, त्या कल्पना प्रत्यक्षात अमलात आणल्या जाव्यात.
मित्रांनो, मी आज आपल्याला साई-प्रनीथ यांच्या प्रयत्नाविषयी सांगणार आहे. साई-प्रनीथ जी, एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, आंध्रप्रदेशचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पहिले की त्यांच्या भागात खराब हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. हवामान शास्त्र विषयात त्यांना पूर्वीपासूनच रस होता, आणि म्हणूनच, त्यांनी आपल्या या रुचिचा आणि कौशल्याचा वापर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेण्याचा निर्णय घेतला. ते आता वेगवेगळ्या डेटा स्त्रोतांकडून हवामानाचा डेटा विकत घेतात, त्याचे विश्लेषण करतात आणि स्थानिक भाषेत, वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक ती माहिती पोचवतात. हवामानाच्या माहितीशिवाय, प्रणीथजी वेगवेगळ्या हवामानात लोकांनी काय करायला हवे, याचेही मार्गदर्शन करतात. विशेषतः पूरापासून संरक्षण करण्यासाठी किंवा वादळ आणि वीज पडल्यावर, त्यापासून कसे संरक्षण करायचे, याची माहितीही ते लोकांना देतात.
मित्रांनो,
एकीकडे, या तरुण सॉफ्टवेअर अभियंत्याचा हा प्रयत्न मनाला स्पर्शून जाणारा आहे. तर दुसरीकडे आमच्या एका मित्राकडून होणारा तंत्रज्ञानाचा वापरही, आपल्याला थक्क करुन सोडेल.
हे मित्र आहेत, ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्यात एका गावात राहणारे श्री इसाक मुंडा जी. ईसाक जी एकेकाळी रोजंदारी स्वरुपात काम करत होते, मात्र आता ते इंटरनेटवर गाजत आहेत. त्यांच्या यू ट्यूब चॅनेल मधून ते उत्तम पैसे कमावत आहेत. ते आपल्या व्हिडिओ मधून स्थानिक पदार्थ, पारंपरिक स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती, आपले गाव, आपली जीवनशैली, कुटुंब आणि आहारविहाराच्या सवयी, अशा गोष्टी दाखवत असतात. एक YouTuber म्हणून त्यांनी आपला प्रवास, मार्च 2020 पासून सुरु केला होता. त्यावेळी, त्यांनी ओडिशातीळ सुप्रसिद्ध स्थानिक पदार्थ, ‘पखाल’ शी संबंधित, एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तेव्हापासून त्यांनी शेकडो व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांचा हा प्रयत्न अनेक कारणांनी सर्वात वेगळा आहे. विशेषतः यासाठी की या उपक्रमामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना ती जीवनशैली बघण्याची संधी मिळते, ज्याविषयी त्यांना विशेष काही माहिती नसते. ईसाक मुंडा जी संस्कृती आणि पदार्थ या दोघांना एकत्रित घेऊन, त्याचा उत्सव साजरा करतात आणि त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणाही देतात.
मित्रांनो, आता आपण जेव्हा तंत्रज्ञानाविषयी बोलतो आहोत, तेव्हा मी आणखी एका रोचक विषयावर चर्चा करु इच्छितो.
आपण अलीकडेच वाचले असेल, पहिले असेल की आयआयटी मद्रास च्या माजी विद्यार्थ्यानी स्थापन केलेल्या एक स्टार्ट-अप ने एक थ्री-डी प्रिंटेड हाऊस तयार केले आहे. या थ्री-डी प्रिंटिंग ने घराची निर्मिती कशी शक्य झाली? तर, या स्टार्ट अप ने सर्वात आधी, थ्री-डी प्रिंटर मध्ये एक त्रिमीतीय चित्र भरले आणि एका विशिष्ट प्रकारच्या काँक्रीटच्या माध्यमातून, थरावर थर चढवत, एक थ्री-डी संरचना तयार केली. आपल्याला हे जाणून अत्यंत आनंद होईल, की देशात अशाप्रकारचे अनेक प्रयोग सुरु आहेत. एक काळ असा होता, जेव्हा छोट्या छोट्या बांधकामालाही कित्येक वर्षे लागत असत. मात्र, आता तंत्रज्ञानामुळे भारतातील परिस्थिति बदलली आहे. काही काळापूर्वी, आपण जगभरातील अशा नवोन्मेषी कंपन्यांना आमंत्रित करण्यासाठी एक जागतिक गृहनिर्माण तंत्रज्ञान आव्हान स्पर्धा आयोजित केली होती. हा देशातील अशा वेगळ्या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता, ज्याला आम्ही लाईट हाऊस प्रयोग असे नाव दिले होते. सध्या देशात सहा विविध ठिकाणी, लाईट हाऊस प्रकल्पांवर अत्यंत वेगाने काम सुरु आहे. या लाईट हाऊस प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अभिनव कार्यपद्धतींचा वापर केला जातो. यामुळे बांधकामाचा कालावधी कमी होतो. त्यासोबतच, जी घरे तयार होतात, ती अधिक टिकावू, किफायतशीर आणि आरामदायी असतात. मी अलिकडेच, ड्रोन च्या माध्यमातून या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि त्यांच्या कामाची प्रगती देखील प्रत्यक्ष पाहिली.
इंदौरच्या प्रकल्पात विटा आणि सीमेंट काँक्रीटच्या भिंतीच्या ऐवजी प्री- फॅब्रिकेटेड सँडविच पॅनल सिस्टिमचा वापर केला जात आहे. राजकोट इथे, लाईट हाऊस फ्रेंच तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केले जात आहेत. ज्यात, बोगद्याच्या माध्यमातून, मोनोलिथिक काँक्रीट बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाने तयार झालेली घरे, संकटांचा सामना करण्यासाठी अधिक सक्षम असतील. चेन्नईत, अमेरिका आणि फिनलंडचे तंत्रज्ञान, प्री-कास्ट काँक्रीट सिस्टिमचा वापर होत आहे. त्यामुळे घरे लवकर बनतील आणि त्यासाठी खर्च देखील कमी येईल. रांची इथे जर्मनीच्या थ्री-डी बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करुन घरे बांधली जाणार आहेत. यात प्रत्येक खोली वेगवगेळया जागी बनवली जाईल. आणि त्यानंतर हे पूर्ण बांधकाम एकमेकांशी जोडले जाईल. अगरतला इथे न्यूझीलैंड च्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलादी चौकटी वापरुन घरे बनवली जात आहेत, ही घरे मोठ्या भूकंपाचाही सामना करु शकतील. तसेच, लखनौ इथे, कॅनडाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहेत, यात प्लास्टर आणि पेंटची गरज पडत नाही. आणि जलद गतीने घरे तयार करण्यासाठी आधीपासूनच तयार असलेल्या भिंतींचा वापर केला जात आहे.
मित्रांनो, आज देशात हे सगळे जे प्रयोग होत आहेत, ते प्रकल्प मूळ, इनक्युबेशन केंद्र म्हणून कामी येतील. यामुळे आमचे गृहनिर्माण नियोजनकर्ते, स्थापत्यतज्ञ, अभियंते आणि विद्यार्थी नवे तंत्रज्ञान समजू शकतील आणि त्याचे प्रत्यक्ष प्रयोगही करु शकतील. मी मुद्दामच या सगळ्या गोष्टी, युवकांना सांगतो आहे, जेणेकरुन आमचे युवक, राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांना प्रोत्साहन देऊ शकतील.
मी या गोष्टी विशेषत आपल्या युवकांसाठी सांगत आहे , जेणेकरून आपले युवक राष्ट्रहितासाठी तंत्रज्ञानाच्या नवनवीन क्षेत्रांकडे प्रोत्साहित होऊ शकतील . माझ्या प्रिय देश बांधवांनो,
तुम्ही इंग्रजीत एक म्हण ऐकली असेल – “To Learn is to Grow” अर्थात शिकणं म्हणजेच पुढे जाणे आहे. जेव्हा आपण काही नवीन शिकतो , तेव्हा आपल्यासाठी प्रगतीचे नवनवीन मार्ग आपोआप खुले होतात. जेव्हा कधी काहीतरी वेगळं नवीन करण्याचा प्रयत्न झाला आहे, मानवतेसाठी नवीन कवाडे खुली झाली आहेत, एका नवीन युगाचा प्रारंभ झाला आहे . आणि तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा काही नवीन घडते, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येकालाच आश्चर्यचकित करतो. आता जसे की मी तुम्हाला विचारलं की असं कोणते राज्य आहे , ज्याचा संबंध तुम्ही सफरचंदाशी जोडाल? सर्वांनाच माहित आहे , तुमच्या मनात सर्वप्रथम हिमाचल प्रदेश , जम्मू-काश्मीर , उत्तराखंडचे नाव येईल. मात्र जेव्हा मी म्हणेन की या यादीत तुम्ही मणिपूरला देखील जोडा तेव्हा कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल . काही तरी नवीन करण्याची उर्मी घेऊन युवकांनी मणिपूरमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. सध्या मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात सफरचंदाची शेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इथले शेतकरी आपल्या बागांमध्ये सफरचंद पिकवत आहेत. सफरचंद पिकवण्यासाठी इथल्या लोकांनी खास हिमाचल प्रदेशात जाऊन प्रशिक्षण देखील घेतले आहे. यापैकीच एक आहेत टी एस रिंगफामी योंग . योंग हे व्यवसायाने एरोनॉटिकल इंजिनीअर आहेत . त्यांनी पत्नी टी.एस. एंजेल यांच्या मदतीने सफरचंदाची शेती केली आहे . त्याचप्रमाणे अवुन्गशी शिमरे ऑगस्टीना यांनी देखील आपल्या बागांमध्ये सफरचंदाचे उत्पादन घेतले आहे . अवुन्गशी दिल्लीमध्ये नोकरी करत होत्या . ही नोकरी सोडून त्या आपल्या गावात परत गेल्या आणि सफरचंदाची शेती सुरू केली. मणिपूरमध्ये आज असे अनेक सफरचंद उत्पादक आहेत, ज्यांनी काही वेगळे आणि नवीन करून दाखवले आहे.
मित्रांनो आपल्या आदिवासी समुदायात बोरे खूप लोकप्रिय आहेत. आदिवासी समुदायाचे लोक नेहमीच बोरांची शेती करतात . मात्र कोविड -19 महामारी नंतर याची शेती विशेष वाढली आहे. त्रिपुराच्या उनाकोटी येथील असेच 32 वर्षांचे युवक मित्र आहेत विक्रमजीत चकमा. त्यांनी बोरांची लागवड करून खूप नफा कमावला आणि आता ते लोकांना बोरांचे पीक घेण्यासाठी देखील प्रेरित करत आहेत. राज्य सरकार देखील अशा लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहे सरकारकडून यासाठी अनेक विशेष बागा तयार केल्या जात आहेत, जेणेकरून बोरांच्या लागवडी संबंधित लोकांची मागणी पूर्ण करता येईल. शेती मध्ये संशोधन होत आहे, तर शेतीच्या इतर दुय्यम उत्पादनांमध्ये देखील सर्जनशीलता पाहायला मिळत आहे.
मित्रांनो मला उत्तर प्रदेशच्या लखीमपुर-खीरी मध्ये करण्यात आलेल्या एका प्रयत्नाबद्दल माहिती समजली आहे . कोविडच्या काळात लखीमपुर-खिरी मध्ये एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. तिथल्या महिलांना केळ्याच्या तणांपासून फायबर बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आले आहे . कचऱ्यापासून टिकाऊ सर्वोत्तम वस्तू बनवण्याचा मार्ग. केळ्यांचे तण कापून मशीनच्या मदतीने हे फायबर तयार केलं जातं , जे ज्यूट प्रमाणे असतं . या फायबरपासून हॅन्ड बॅग, सतरंजी असे कितीतरी वस्तू बनवल्या जातात .
यामुळे एक तर पिकांचा कचर्याचा वापर सुरू झाला आहे आणि दुसरीकडे गावात राहणाऱ्या आपल्या भगिनी आणि मुलींना उत्पन्नाचे एक साधन देखील मिळाले आहे . बनाना फायबरच्या या कामात एका स्थानिक महिलेची रोजची 400 ते 600 रुपये कमाई होते. लखीमपुर-खीरी मध्ये शेकडो एकर जमिनीवर केळ्याची शेती होते . केळ्यांचे पीक घेतल्यानंतर साधारणपणे शेतकऱ्यांना तण फेकण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत होता . आता त्यांचे पैसे देखील वाचतात. म्हणजेच आम के आम , गुठलियो के दाम ही म्हण इथे अगदी चपखल बसते.
मित्रांनो एकीकडे बनाना फायबर पासून वस्तू बनवल्या जात आहेत तर दुसरीकडे केळ्याच्या पिठापासून डोसे आणि गुलाबजाम सारखे स्वादिष्ट पदार्थ देखील तयार होत आहेत. कर्नाटकच्या उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये महिला हे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करत आहेत.
त्याची सुरुवात देखील कोरोना काळातच झाली . या महिलांनी केळ्याचा पिठापासून केवळ डोसा , गुलाबजाम सारखे पदार्थ नुसते बनवले नाहीत तर त्याची छायाचित्रे देखील सोशल मीडियावर शेअर केली आहेत . जेव्हा जास्तीत जास्त लोकांना या पीठाबाबत समजले तेव्हा त्यांची मागणी आणखी वाढली आणि या महिलांचे उत्पन्न देखील. लखीमपुर-खीरी प्रमाणेच इथेही ही नावीन्यपूर्ण कल्पना महिलाच राबवत आहेत.
मित्रांनो अशी उदाहरणे आयुष्यात काही तरी नवीन करण्याची प्रेरणा देतात . तुमच्या आसपास देखील असे अनेक लोक असतील. जेव्हा तुमचं कुटुंब मनातल्या गुजगोष्टी सांगत असेल तेव्हा तुम्ही या गोष्टीदेखील तुमच्या गप्पांमध्ये समाविष्ट करा.
कधीतरी वेळ काढून मुलांबरोबर असे उपक्रम पहायला जा आणि संधी मिळाली तर स्वतःदेखील असं काहीतरी करून दाखवा. आणि हो आणि हे सगळं तुम्ही माझ्याबरोबर NamoApp किंवा MyGov वर शेअर केलं तर मला खूप छान वाटेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये एक श्लोक आहे-
आत्मार्थम् जीव लोके अस्मिन्, को न जीवति मानवः |
परम् परोपकारार्थम्, यो जीवति स जीवति ||
अर्थात स्वतःसाठी या जगात प्रत्येक जण जगत असतो मात्र वास्तवात खरेतर ती व्यक्ती जगत असते जी परोपकारासाठी जगते. भारत मातेच्या सुपुत्रांच्या परोपकारी प्रयत्नांच्या गोष्टी हीच तर आहे मन की बात. आज देखील अशाच काही अन्य मित्रांबाबत आपण बोलणार आहोत . एक मित्र चंदीगड शहरातलेआहेत. चंदीगड मध्ये मी देखील काही वर्ष राहिलो आहे . खूपच आनंदी आणि सुंदर शहर आहे. तिथे राहणारे लोक देखील दिलदार आहेत . आणि हो, तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला आणखी मजा येईल. या चंदिगडमधील सेक्टर 29 मध्ये संजय राणा फुड स्टॉल चालवतात.
आणि सायकलवर छोले भटूरे विकतात. एक दिवस त्यांची मुलगी रिद्धिमा आणि भाची रिया एक कल्पना घेऊन त्यांच्याकडे आल्या. दोघींनीही त्यांना कोविड लस घेणाऱ्यांना मोफत छोले-भटूरे खायला द्यायला सांगितलं. ते आनंदाने तयार झाले आणि त्यांनी लगेच हे उत्तम आणि नेक कार्य सुरु केले. संजय राणा यांचे छोले-भटूरे मोफत खाण्यासाठी तुम्हाला दाखवावे लागेल कि तुम्ही त्यादिवशी लस घेतलेली आहे. लसीकरणाचा संदेश दाखवला की लगेचच ते तुम्हाला स्वादिष्ट छोले-भटूरे देतील. असे म्हणतात समाजाच्या कल्याणासाठी काम करण्यासाठी पैशांपेक्षा जास्त सेवाभाव, कर्तव्य भावनेची अधिक गरज असते . आपले संजय भाऊ हेच सिद्ध करत आहे.
मित्रांनो अशाच आणखी एका कामाची चर्चा मला करायची आहे. हे काम तामिळनाडूच्या निलगिरी मध्ये होत आहे. तिथे राधिका शास्त्री यांनी एम्बुरेक्स प्रकल्पाची सुरुवात केली आहे. डोंगराळ भागातल्या रुग्णांना उपचारासाठी सहजपणे वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. राधिका कून्नूरमध्ये एक कॅफे चालवतात . त्यांनी आपल्या कॅफेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने एम्बुरेक्स साठी निधी जमा केला. निलगिरी डोंगरावर आज सहा एम्बुरेक्स कार्यरत आहे आणि दुर्गम भागातल्या आपत्कालीन स्थितीत रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहेत. एम्बुरेक्समध्ये स्ट्रेचर, ऑक्सीजन सिलेंडर , फर्स्ट एड बॉक्स यासारख्या अनेक गोष्टींची व्यवस्था केली आहे.
मित्रांनो संजय असोत किंवा राधिका , त्यांच्या उदाहरणातून असं दिसून येतं की आपण आपलं कार्य आपला व्यवसाय , नोकरी करता करता सेवाकार्य देखील करू शकतो.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी एक खूपच रोचक आणि खूपच भावनिक घटना घडली, ज्यामुळे भारत जॉर्जिया मैत्रीला बळकटी मिळाली. या कार्यक्रमात भारताने सेंट क्वीन केटेवानच्या होली रेलिक म्हणजेच त्यांचे पवित्र स्मृतिचिन्ह जॉर्जियाचे सरकार आणि तिथल्या जनतेकडे सुपूर्द केले. यासाठी आपले परराष्ट्रमंत्री स्वतः तिथे गेले होते . अतिशय भावनिक वातावरणात झालेल्या कार्यक्रमात जॉर्जियाचे राष्ट्रपती, पंतप्रधान अनेक धर्मगुरू आणि मोठ्या संख्येने जॉर्जियाची जनता उपस्थित होती. या कार्यक्रमात भारताची प्रशंसा करताना जे गौरवोद्गार काढण्यात आले ते कायम स्मरणात राहतील . या एका कार्यक्रमाने दोन्ही देशांबरोबरच गोवा आणि जॉर्जिया दरम्यान संबंध देखील अधिक दृढ केले आहेत. असं यासाठी कारण सेंट क्वीन केटेवान यांचे हे अवशेष २००५ मध्ये गोव्याच्या सेंट ऑगस्टीन चर्च येथे सापडले होते .
मित्रानो, तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल हे सगळं काय आहे आणि हे सगळं केव्हा झाले? खरं तर ही चारशे पाचशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .क्वीन केटेवान जॉर्जियाच्या राज परिवारातील मुलगी होती . दहा वर्षांच्या तुरुंगवासानंतर १६२४ मध्ये ती शहीद झाली होती . एका प्राचीन पोर्तुगाल दस्तावेनुसार सेंट क्वीन केटेवानच्या अस्थी जुन्या गोव्याच्या सेंट ऑगस्टीन कॉन्व्हेंट मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. मात्र दीर्घकाळ असे मानले जात होते की गोव्यामध्ये दफन करण्यात आलेले तिचे अवशेष 1930 च्या भूकंपात गायब झाले होते .
भारत सरकार आणि जॉर्जियाचे इतिहासकार, संशोधक पुरातत्व शास्त्रज्ञ आणि जॉर्जियन चर्चच्या अनेक दशकांच्या अथक प्रयत्नानंतर 2005 मध्ये ते पवित्र अवशेष शोधण्यात यश मिळाले होते. हा विषय जॉर्जियाच्या लोकांसाठी खूपच भावनात्मक आहे . म्हणून त्यांचं ऐतिहासिक धार्मिक आणि अध्यात्मिक भावना लक्षात घेऊन भारत सरकारने या अवशेषांचा एक भाग जॉर्जियाच्या जनतेला भेट देण्याचा निर्णय घेतला. भारत आणि जॉर्जियाचा सामायिक इतिहासातील या बाबी जपून ठेवल्याबद्दल मी आज गोव्याच्या जनतेचे मनः पूर्वक आभार मानतो . गोवा अनेक महान आध्यात्मिक वारसांची भूमी आहे. सेंट ऑगस्टीन चर्च युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ (गोव्याचे चर्चेस आणि कॉन्व्हेंट) चा एक भाग आहे .
माझ्या प्रिय देश बांधवांनो, जॉर्जिया मधून आता मी तुम्हाला थेट सिंगापूरला घेऊन जातो , जिथे या महिन्याच्या सुरुवातीला आणखी एक गौरवशाली संधी समोर आली. पंतप्रधान आणि माझे मित्र ली सेन लुंग यांनी अलीकडेच नूतनीकरण केलेल्या सिलाट रोड गुरुद्वाराचे उद्घाटन केलं. त्यांनी पारंपारिक पगडी देखील घातली होती . हा गुरूद्वारा सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. आणि तिथे भाई महाराज यांना समर्पित स्मारक देखील आहे. भाई महाराजजी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले होते. आणि हा क्षण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना अधिक प्रेरक ठरतो. दोन्ही देशांदरम्यान लोकांमधील संबंध अशाच प्रयत्नांतून अधिक बळकट होतात. यातून हे देखील समजतं की सौहार्दपूर्ण वातावरणात राहणे आणि एक दुसऱ्याची संस्कृती समजून घेणे किती महत्त्वाचे आहे .
माझ्या देशबांधवांनो, आज मन की बात मध्ये आपण अनेक विषयांवर चर्चा केली. आणखी एक विषय आहे जो माझ्या मनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे .
हा विषय आहे जलसंरक्षणाचा . माझं बालपण जिथे गेलं तिथे पाण्याची नेहमी टंचाई असायची. आम्ही पावसासाठी आसुसलेले असायचो आणि म्हणूनच पाण्याचा एक एक थेंब वाचवणे आमच्या संस्कारांचा एक भाग बनला आहे . आता 'जन भागीदारीतून जल संरक्षण ' या मंत्राने तिथले चित्र पालटून टाकले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आणि पाणी कुठल्याही प्रकारे वाया जाणार नाही याची काळजी घेणे हा आपल्या जीवनशैलीचा एक सहज भाग असायला हवा. आपल्या कुटुंबाची परंपरा बनायला हवी ज्याचा प्रत्येक सदस्यांना अभिमान वाटेल .
मित्रानो, निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण भारताच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या दैनंदिन जीवनात वसलेले आहे. पाऊस हा नेहमीच आपले विचार, आपलं तत्वज्ञान आणि आपल्या संस्कृतीला आकार देत आला आहे. ऋतुसंहार आणि मेघदूत मध्ये महाकवी कालिदास यांनी पावसाचे खूप सुंदर वर्णन केलं आहे . साहित्यप्रेमीमध्ये या कविता आजही खूप लोकप्रिय आहेत. ऋग्वेदातील पर्जन्यसूक्त मध्ये देखील पावसाच्या सौंदर्याचे खूप सुंदर वर्णन केलं आहे. त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत मध्ये देखील काव्यात्मक स्वरूपात पृथ्वी, सूर्य आणि पाऊस यामधील संबंध विस्ताराने सांगितला आहे
अष्टौ मासान् निपीतं यद्, भूम्याः च, ओद-मयम् वसु |
स्वगोभिः मोक्तुम् आरेभे, पर्जन्यः काल आगते ||
अर्थात सूर्याने 8 महीने पाण्याच्या रूपात पृथ्वीच्या संपत्तीचा वापर केला होता. आता पावसाळ्याच्या ऋतूत सूर्य संचित संपत्ती पृथ्वीला परत करत आहे . खरंच पावसाचा ऋतू केवळ सुंदर आणि आनंददायी नाही तर पोषण देणारा, जीवन देणारा देखील असतो. पावसाचे पाणी जे आपल्याला मिळत आहे ते आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे हे आपण कधीही विसरू नये .
आज माझ्या मनात हा विचार आला कि रोचक संदर्भानेच मी आज आपली आजची मन कि बात समाप्त करावी. तुम्हा सर्वांना आगामी सण -उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा . सण उत्सवांच्या काळात हे जरूर लक्षात ठेवा की कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही. कोरोनाशी संबंधित नियम विसरायचे नाहीत. तुम्ही सगळे निरोगी आणि प्रसन्न रहा . खूप खूप धन्यवाद!
नमस्कार माझ्या प्रिय देशवासियांनो! नेहमीच 'मन की बात' मध्ये, आपल्या प्रश्नांचा वर्षाव होत असतो. ह्या वेळी मला वाटले, काहीतरी वेगळे करावे, मी आपल्याला प्रश्न विचारावे. तर माझे प्रश्न काळजीपूर्वक ऐका!
.... ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण होता?
.... ऑलिम्पिकच्या कोणत्या खेळात भारताने आतापर्यंत सर्वाधिक पदक जिंकले आहेत?
... ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
मित्रांनो, उत्तरे मला पाठवू नका, परंतु मायगव्ह मध्ये जर आपण ऑलिंपिकवर प्रश्नोत्तरी मधील प्रश्नांची उत्तरे दिली तर आपण खूप सारी बक्षीसे जिंकू शकाल. मायगव्हच्या 'रोड टू टोकियो' ( टोकियो ला जाण्याचा मार्ग ) ह्या प्रश्नोत्तरीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत. आपण 'रोड टू टोकियो’(टोकियो ला जाण्याचा मार्ग ) प्रश्नोत्तरी मध्ये भाग घ्या. भारताने यापूर्वी कशी कामगिरी केली आहे ? आता टोकियो ऑलिम्पिकसाठी आपली काय तयारी आहे? - हे सर्व स्वतः जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या प्रश्नोत्तरी स्पर्धेत नक्की भाग घ्या.
मित्रांनो, जेव्हा टोक्यो ऑलिम्पिकचा विचार आपण करत आहोत , तेव्हा मिल्खासिंगजीसारख्या दिग्गज खेळाडूला, (धावपटूला) कोण विसरु शकेल? काही दिवसांपूर्वीच कोरोनाने त्यांना आमच्यातून हिरावून नेले. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती.
त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक विनंती केली होती. मी म्हणालो की तुम्ही तर १९६४ मधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. म्हणून, यावेळी, जेव्हा आमचे खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला जात आहेत, तेव्हा आपण आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवावे, त्यांना आपल्या संदेशाद्वारे प्रेरित करावे. क्रीडा विषयासाठी ते इतके समर्पित आणि भावूक होते की आजारी असतानाही, त्यांनी त्वरित सहमती दर्शविली. पण दुर्दैवाने, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मला आजही आठवते की ते २०१४ मध्ये सुरतला आले होते. आम्ही एका नाईट मॅरॅथॉनचे उद्घाटन केले होते. त्यावेळी त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्या, खेळाविषयी बोलणे झाले, त्यातून मला देखील खूप प्रेरणा मिळाली होती.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की मिल्खा सिंहजी यांचे संपूर्ण कुटुंब खेळाविषयी समर्पित आहे, भारताचा गौरव वाढवत आहे.
मित्रांनो, जेव्हा प्रतिभा, निष्ठा, निश्चय आणि खिलाडू वृत्ती ( स्पोर्ट्समन स्पिरिट) एकत्र येते, तेव्हा कुठे एखादा ‘ विजेता’ तयार होतो. आपल्या देशात बहुतेक सगळे खेळाडू लहान शहरातून, भागातून ( कसब्यातून ),खेड्यातून येतात. आमचा जो ऑलिम्पिक चमू टोकियोला जात आहे, त्यात अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधवजींच्या बद्दल ऐकले तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण जी इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव जी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात.
ते तिरंदाजीतील उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडीलमजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची बाब/ गोष्ट आहे. तसंच,अजून एक खेळाडू आहेत, आमच्या नेहा गोयलजी. नेहा टोकियोला जाणाऱ्या महिला हॉकी संघाच्या सदस्य आहेत. त्यांची आई तसेच बहिणी सायकल कारखान्यात काम करून कुटुंबाचा खर्च चालवतात. नेहाप्रमाणेच दीपिका कुमारी ह्यांच्या आयुष्याचा प्रवासही चढउतारांनी भरलेला आहे. दीपिका ह्यांचे वडील ऑटो रिक्षा चालवितात आणि आई एक नर्स आहे, आणि आता बघा दीपिका, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे भाग घेणाऱ्या एकमेव महिला तिरंदाज आहेत . पूर्वी संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या, दीपिका ह्यांना आपल्या सगळ्यांच्याच खूप खूप शुभेच्छा आहेत.
मित्रांनो, आपण जीवनात कुठेही पोहोचलो , कोणतीही उंची प्राप्त केली तरी मातीशी असलेले हे नातेच आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते.
संघर्षाच्या दिवसांनंतर मिळालेल्या यशाचा आनंद काही आगळाच असतो. टोक्योला जाणाऱ्या आमच्या खेळाडूंनी, बालपणी असा साधना-संसाधनाच्या अभावाचा सामना केला, परंतु ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले, कष्ट करत राहिले.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरच्या प्रियंका गोस्वामीजी ह्यांचे जीवन देखील बरेच काही शिकवते. प्रियांका ह्यांचे वडील बस कंडक्टर आहेत. लहान असताना प्रियांकाला जी पदक जिंकणाऱ्या खेळाडूला मिळते ती बॅग खूप आवडायची. त्याच आकर्षणामुळे त्यांनी प्रथम रेस-वॉकिंग स्पर्धेत भाग घेतला. त्या आता आज, त्या खेळातील, मोठ्या विजेत्या बनल्या आहेत.
भाला फेकीत भाग घेणारे शिवपालसिंहजी बनारसचे रहिवासी आहेत. शिवपालजी यांचे संपूर्ण कुटुंब या खेळाशी जोडलेले आहे. त्यांचे वडील, काका आणि भाऊ, सर्वजण भालाफेकीत निष्णात आहेत. त्यांच्या परिवाराची ही परंपरा त्यांना टोकियो ऑलिम्पिकसाठी उपयोगी होणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकला जाणाऱ्या चिराग शेट्टी आणि त्यांचा साथीदार सात्विक साईराज ह्यांची हिंमत पण प्रेरणादायक आहे. अलीकडेच, चिरागच्या आजोबांचे कोरोनामुळे निधन झाले. गेल्या वर्षी स्वत: सात्विकही कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. परंतु, या अडचणी असूनही, हे दोघे, पुरुष दुहेरी शटल स्पर्धेत आपले सर्वोत्तम योगदान देण्याची तयारी करत आहेत.
अजून एका खेळाडूशी मी आपली ओळख करून देऊ इच्छितो, ते आहेत, भिवानी, हरियाणा येथील मनीष कौशिक. मनीषजी शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणी शेतात काम करता करता मनीष ह्यांना मुष्टियुद्धाची आवड निर्माण झाली. आज हीच आवड त्यांना टोकियोला घेऊन जात आहे.
आणखी एक खेळाडू आहेत सी.ए. भवानी देवी. नाव भवानी आहे आणि त्या तलवारबाजी मध्ये निष्णात आहेत. चेन्नईच्या रहिवासी असलेल्या भवानी ह्या ऑलिंपिकमध्ये पात्र ठरलेल्या पहिल्या तालवारबाज आहेत. मी कुठेतरी वाचले होते की भवानीजी यांचे प्रशिक्षण चालू राहावे म्हणून त्यांच्या आईने आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते.
मित्रांनो, अशी बरीच नावे आहेत. पण 'मन की बात' मध्ये, आज त्यातील फक्त काही नावे मी सांगू शकलो आहे. टोक्योला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे, अनेक वर्षांची मेहनत आहे. ते केवळ स्वतःसाठीच नाही तर देशासाठी जात आहेत. ह्या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे आणि लोकांचे हृदयही जिंकायचे आहे. आणि म्हणूनच मी माझ्या देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण जाणीवपूर्वक किंवा नकळत दबाव आणायचा नाही आहे तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, प्रत्येक खेळाडूचा उत्साह वाढवायचा आहे.
सामाजिक माध्यमांवर #cheer4India ह्या हॅशटॅग सह आपण सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊ शकता. ह्याशिवाय देखील आपल्याला काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण करायचे असेल तर तेही नक्कीच करा. आपल्याकडे अशी काही कल्पना असेल, जी आपल्या खेळाडूंसाठी, संपूर्ण देशाने एकत्र येऊन करायाची असेल, तर तुम्ही ती मला नक्की पाठवा. आपण सर्वजण मिळून टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना समर्थन देऊ या. Cheer4India!!!Cheer4India!!!Cheer4India!!!-
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण सर्व देशवासीय कोरोनाविरूद्ध लढत आहोत, पण या लढ्यात आपण सर्वानी एकत्र येऊन, काही विलक्षण साध्य केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्या देशाने अभूतपूर्व काम केले आहे. 21 जूनला लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाला आणि त्याच दिवशी देशातील ८६ लाखांहून अधिक लोकांनी, विनामूल्य लस घेऊन विक्रम केला व तो देखील एका दिवसात! इतक्या मोठ्या संख्येने भारत सरकारने विनामूल्य लसीकरण उपलब्ध केले आणि तेही एका दिवसात! साहजिकच ह्याविषयी बरीच चर्चा झाली आहे.
मित्रांनो, एक वर्षापूर्वी सर्वांसमोर एक प्रश्न होता की लस कधी येणार? आज आम्ही एका दिवसात, लाखो लोकांसाठी, 'भारतात बनवलेली’ लस विनामूल्य देत आहोत आणि हेच नवीन भारताचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो, देशातील प्रत्येक नागरिकास लसीची सुरक्षा मिळालीच पाहिजे, ह्या साठी आम्हाला सतत प्रयत्न करायचे आहेत. अनेक ठिकाणी लस घेण्याविषयीची, लोकांच्या मनातील दुविधा दूर करण्यासाठी अनेक संघटना, नागरी संस्थांतील लोक पुढे आले आहेत आणि ते सर्वजण मिळून खूप चांगले काम करत आहेत.
चला, आपण पण आज एका गावात जाऊ या आणि तेथील लोकांशी लसीविषयी बोलू या. आज जाऊया मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील डूलारिया गावात.
पंतप्रधान: हॅलो!
राजेश : नमस्कार !
पंतप्रधान : नमस्ते जी |
राजेश: माझे नाव राजेश हिरावे, ग्रामपंचायत दुलारिया, भीमपूर ब्लॉक |
पंतप्रधानः राजेश जी, आता आपल्या गावात कोरोनाची स्थिती काय आहे हे जाणून घ्यावे म्हणून मी फोन केला आहे.
राजेश: सर, इथे आता कोरोनाची परिस्थिती अशी काही नाही.
पंतप्रधान: सध्या लोक आजारी नाहीत?
राजेश: होय.
पंतप्रधान: गावाची लोकसंख्या किती? गावात किती लोक आहेत?
राजेश: गावात ४६२ पुरुष आणि 33२ महिला आहेत, सर.
पंतप्रधान: ठीक आहे! राजेश जी, तुम्ही लस घेतली आहे का?
राजेश: नाही सर, अजून घेतलेली नाही.
पंतप्रधान: अरे! का नाही घेतली?
राजेश: सर, इथल्या काही लोकांनी , व्हॉट्सअॅपवर काही खोटेनाटे पसरवले त्यामुळे लोक गोंधळात पडले आहेत, सर.
पंतप्रधान: मग तुमच्या मनात देखील भीती आहे का?
राजेश: हो सर, असा गोंधळ सगळ्या गावात पसरला होता सर.
पंतप्रधान: अरे रे, काय बोलता आहेत ? हे बघा राजेश जी ...
राजेश: होय.
पंतप्रधान: माझे तुम्हाला आणि गावातील सर्व बंधू भगिनींना
असे सांगणे आहे की जर मनात भीती असेल तर ती काढून टाका.
राजेश: होय.
पंतप्रधान: आपल्या संपूर्ण देशातील 31 कोटींपेक्षा जास्त लोकांनी लस टोचून घेतली आहे.
राजेश: होय.
पंतप्रधान: तुम्हाला माहिती आहे ना , मी स्वत: देखील दोन्ही डोस घेतले आहेत.
राजेश: हो सर.
पंतप्रधान: अरे माझी आई तर जवळजवळ 100 वर्षांची आहे. तिनेसुद्धा दोन्ही डोस घेतले आहेत. कधीकधी एखाद्याला ताप वगैरे येतो, परंतु हे अगदी किरकोळ आहे, काही तासांसाठीच होते. पण हे पहा, लस न घेणे खूप धोकादायक ठरू शकते.
राजेश: होय.
पंतप्रधान: ह्यामुळे तुम्ही स्वत: लाच केवळ धोक्यात टाकता असे नाही तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि गावाला धोक्यात टाकता.
राजेश: होय.
पंतप्रधान: म्हणून राजेश जी, लवकरात लवकर लस घ्या आणि गावातील प्रत्येकाला सांगा की भारत सरकार विनामूल्य लसीकरण करत आहे आणि 18 वर्षांच्या वरील सर्व लोकांसाठी हे विनामूल्य लसीकरण आहे.
राजेश: हो ...
पंतप्रधान: तर हे गावात लोकांना सांगा. आणि गावात भीतीचे वातावरण असायचे तर काही कारणच नाही.
राजेश: त्याचे कारण सर, काही लोक अशा खोट्या अफवा पसरवतात, ज्याच्यामुळे लोक घाबरून जातात. उदाहरण म्हणजे लसीकरण झाल्यावर येणारा ताप आणि रोगाचा फैलाव म्हणजे माणसाच्या मृत्यूच होतो, इथपर्यंत देखील अफवा पसरवत आहेत.
पंतप्रधान: अरेरे ... आज बऱ्याच रेडिओवर , बऱ्याच टीव्ही वर पहा, इतक्या सगळ्या बातम्या मिळतात आणि म्हणूनच लोकांना समजावून सांगणे फार सोपे झाले आहे.
आणि हे पहा, मी तुम्हाला सांगतो, भारतातील बरीच गावे अशी आहेत की जेथे सर्व लोकांना लस मिळाली आहे, म्हणजेच गावातील सगळे, अगदी शंभर टक्के लोक.
असं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ...
राजेश: होय.
पंतप्रधान: काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्हा आहे, या बांदीपुरा जिल्ह्यातल्या व्यवन (Weyan ) गावातील लोकांनी मिळून 100% लसीकरणाचे लक्ष्य ठरवले व ते पूर्णदेखील केले. आज काश्मीरच्या या गावातील 18 वर्षांवरील सर्व लोकांचे लसीकरण झालेलं आहे.
मला नागालँडच्या त्या तीन गावांविषयी देखील माहिती मिळाली आहे की जिथे सर्व लोकांचे, 100%लोकांचे लसीकरण झाले आहे.
राजेश - हो .. हो…
पंतप्रधान: राजेश जी, तुम्हीही तुमच्या आसपासच्या, आपल्या गावातल्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवली पाहिजे आणि जसं आपण भ्रम म्हणता. तर होय, हा फक्त एक भ्रम आहे.
राजेश: हो ...
पंतप्रधान: तर या गोंधळाचे उत्तर म्हणजे तुम्ही स्वत: चे लसीकरण करून घेऊनच प्रत्येकास समजावून सांगितले पाहिजे. कराल ना तुम्ही असे?
राजेश: हो सर.
पंतप्रधान: तुम्ही नक्की कराल का?
राजेश: हो सर, हो सर. मला तुमच्याशी बोलून मला असे वाटले की मी स्वतःही लस घेईन आणि लोकांनाही लस घ्यायला तयार करेन.
पंतप्रधान: बरं, गावात अजून कोणी आहे का ज्यांच्याशी मी बोलू शकेन?
राजेश: हो सर.
पंतप्रधान: कोण बोलणार?
किशोरीलाल: नमस्कार सर ...
पंतप्रधान: नमस्कार , आपण कोण बोलत आहात?
किशोरीलाल: सर, माझे नाव किशोरीलाल दुर्वे आहे.
पंतप्रधान: तर किशोरीलाल जी, मी आता राजेश जी यांच्याशी बोलत होतो.
किशोरीलाल : हो सर |
पंतप्रधान: आणि ते मोठ्या खिन्नतेने सांगत होते की लसीच्या विषयी लोक खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलतात.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: तुम्हीही ऐकलं आहे का?
किशोरीलाल: होय ... मी ऐकलं आहे सर ...
पंतप्रधान: तुम्ही काय ऐकले आहे?
किशोरीलाल: कारण हे सर … जवळच महाराष्ट्र आहे, तिथले काही नात्यातले, संबंधित लोक अशी अफवा पसरवत आहेत की लस घेतल्यावर लोक मरत आहेत, . कोणी आजारी पडत आहेत. खूप गोंधळ आहे सर, म्हणूनच लोक लस घेत नाहीत.
पंतप्रधान: नाही? .. मग काय म्हणतात?? आता कोरोना गेला आहे, असं म्हणतात का?
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: असं म्हणतात का की कोरोनाने काही होत नाही?
किशोरीलाल: नाही, कोरोना गेला आहे, असं नाही म्हणत सर, कोरोना तर आहे बोलतात. पण लस घेतली म्हणजे आजारपण येते, सगळे मरत आहेत, अशी परिस्थिती आहे असं म्हणतात ते सर.
पंतप्रधान: अच्छा? लसीमुळे मरत आहेत?
किशोरीलाल: आपले क्षेत्र आदिवासी-प्रदेश आहे, सर, तसेही येथील लोक घाबरतात, आणि अफवा पसरल्यामुळे लोक ते घेत नाहीत लस.
पंतप्रधान: हे पहा किशोरीलाल जी ...
किशोरीलाल: हो सर ...
पंतप्रधान: या अफवा पसरविणारे लोक सतत अफवा पसरवत राहतील.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आपल्याला तर आपले प्राण वाचवावे लागतील, ग्रामस्थांना वाचवावे लागेल, आपल्या देशवासीयांना वाचवावे लागेल. आणि असं कोणी म्हटलं की कोरोना गेला आहे तर या भ्रमात राहू नका.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: हा रोग असा आहे, हा बहुरूपी आहे.
किशोरीलाल: हो सर.
पंतप्रधान: तो रूप बदलतो ... तो नवनवे रूप घेऊन पोहोचतो आहे.
किशोरीलाल: होय.
पंतप्रधान: आणि त्यातून सुटण्यासाठी आपल्याकडे दोन मार्ग आहेत. एकतर कोरोनासाठी बनविलेले नियम, मास्क घालायचा , साबणाने वारंवार हात धुवायचे, अंतर ठेवायचे आणि दुसरा मार्ग म्हणजे ह्या बरोबरच लस देखील टोचुन घ्यायची , ही लस देखील चांगले सुरक्षा कवच आहे. तर त्याच्याबद्दल चिंता करा.
किशोरीलाल: होय.
प्रधानमंत्री : अच्छा किशोरीलाल जी मला सांगा
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री :जेव्हा लोक आपल्याशी बोलतात तेव्हा आपण लोकांना कसं समजावून सांगता ? आपण समजावून सांगता की आपणही अफवांवर विश्वास ठेवता ?
किशोरीलाल : समजावू काय ? असे लोक जास्ती असतील तर सर मलाही भीती वाटते सर.
प्रधानमंत्री : हे बघा किशोरीलाल जी, आज आपण बोललो, आपण माझे मित्र आहात.
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आपण स्वतः घाबरायचं नाही आणि लोकांची भीतीही दूर करायची आहे. कराल ?
किशोरीलाल : हो सर. लोकांच्या मनातली भीती दूर करेन सर,मी स्वतः ही लस घेईन
प्रधानमंत्री : हे पहा, अफवांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्याला माहित आहे, आपल्या वैज्ञानिकांनी किती परिश्रमाने ही लस तयार केली आहे.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : वर्षभर, अहोरात्र मोठ-मोठ्या वैज्ञानिकांनी काम केलं आहे,म्हणूनच आपला विज्ञानावर विश्वास हवा,वैज्ञानिकांवर विश्वास हवा आणि हे अफवा पसरवणाऱ्या लोकांना वारंवार समजवायला पाहिजे की असे होत नाही, इतक्या लोकांनी लस घेतली आहे, काही होत नाही.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि अफवांपासून सांभाळून राहायला हवं, त्यापासून दूर राहायला हवं आणि गावालाही अफवांपासून दूर ठेवत वाचवायला हवं.
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आणि राजेशजी,किशोरीलालजी,आपल्यासारख्या मित्रांना तर मी सांगेन की आपण केवळ आपल्या गावातच नव्हे तर आणखी इतर गावातही अशा अफवा रोखण्यासाठी काम करा आणि लोकांना सांगा की माझ्याशी याबाबत बोलणे झालं आहे म्हणून.
किशोरीलाल : हो सर.
प्रधानमंत्री : सांगा, माझं नाव सांगा त्यांना
किशोरीलाल : सांगू, सर आणि लोकांना सांगू आणि त्यांना समजावू आणि स्वतःही घेऊ
प्रधानमंत्री : पहा, आपल्या संपूर्ण गावाला माझ्याकडून शुभेच्छा द्या
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : आणि सर्वाना सांगा, जेव्हा आपला नंबर येईल...
किशोरीलाल : हो ...
प्रधानमंत्री : लस नक्की घ्या.
किशोरीलाल : ठीक आहे सर
प्रधानमंत्री : गावातल्या महिलांना,आपल्या माता- भगिनींचा ...
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : या कामात जास्तीत जास्त सहभागी करून घ्या आणि सक्रीय सहभागासह त्यांना आपल्या समवेत ठेवा
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : कधी कधी माता- भगिनी जे सांगतात ना ते लोकांना लवकर पटते
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या गावात लसीकरण पूर्ण झाल्यानंतर मला सांगाल ना ?
किशोरीलाल : हो, सांगेन सर
प्रधानमंत्री :नक्की सांगाल ?
किशोरीलाल : हो
प्रधानमंत्री : आपल्या पत्राची मी प्रतीक्षा करेन
किशोरीलाल : हो सर
प्रधानमंत्री : चला, राजेश जी, किशोर जी खूप- खूप धन्यवाद. आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.
किशोरीलाल : धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात. आपल्यालाही खूप- खूप धन्यवाद.
मित्रानो, कधी ना कधी,जगासाठी हा अभ्यासाचा विषय ठरेल की भारतातल्या गावातल्या लोकांनी,आपल्या वनवासी-आदिवासी बंधू- भगिनींनी कशा प्रकारे आपल्या समंजसपणाची , सामर्थ्याची प्रचीती दिली. गावातल्या लोकांनी विलगीकरण केंद्रे तयार केली, स्थानिक गरजा लक्षात घेऊन कोविड प्रोटोकॉल तयार केले. गावातल्या लोकांनी कोणाला उपाशी राहू दिले नाही, शेतीची कामेही खोळंबू दिली नाहीत. जवळच्या शहरात दररोज दुध-भाज्या पोहोचत राहतील याची काळजी घेतली. म्हणजेच स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही सांभाळले. लसीकरण अभियानातही आपल्याला असेच करायचे आहे. आपण जागरूक रहायचं आहे आणि जागरूक करायचंही आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे हे प्रत्येक गावाचे लक्ष्य असले पाहिजे. लक्षात ठेवा, आणि मी तर आपणाला विशेष करून सांगतो. आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारा – प्रत्येक जण यशस्वी होऊ इच्छितो मात्र निर्णायक यशस्वी होण्याचा मंत्र काय आहे ? निर्णायक सफलतेचा मंत्र आहे -निरंतरता. म्हणूनच आपल्याला शिथिल राहायचं नाही, कोणत्याही भ्रमात राहायचं नाही. आपल्याला अखंड प्रयत्न करत राहायचं आहे, कोरोनावर विजय मिळवायचा आहे.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
आपल्या देशात आता मान्सूनचा हंगाम आला आहे. ढग बरसू लागतात तेव्हा ते केवळ आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढीसाठीही बरसतात. पावसाचे पाणी जमिनीत मुरून साठते आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळीही सुधारते. म्हणूनच जल संरक्षण म्हणजे देश सेवेचेच एक रूप आहे असे मी मानतो. आपण पाहिले असेल की आपल्यापैकी अनेक लोक या पुण्य कामाला आपली जबाबदारी मानून हे काम करत आहेत. अशीच एक व्यक्ती आहे उत्तराखंड मधल्या पौड़ी गढ़वाल इथले सच्चिदानंद भारती जी. भारती जी एक शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातूनही लोकांना अतिशय उत्तम शिक्षण दिले आहे. त्यांच्या परिश्रमातूनच पौड़ी गढ़वाल मधल्या उफरैंखाल भागातले पाण्याचं मोठ संकट शमलं आहे. जिथे लोक पाण्याकडे डोळे लावून बसले होते तिथे आता वर्षभर पाण्याचा पुरवठा होत आहे.
मित्रहो,
डोंगराळ भागात जल संधारणाची पारंपारिक पद्धत आहे त्याला ‘चालखाल’ असेही म्हटले जाते. म्हणजे पाणी जमा करण्यासाठी मोठा खड्डा खोडणे. या परंपरेशी भारती जी यांनी आणखी नव्या पद्धतीची सांगड घातली.त्यांनी सातत्याने लहान-मोठे तलाव तयार केले. यातून उफरैंखाल इथला डोंगराळ भाग हिरवागार तर झालाच शिवाय लोकांचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटला. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारती जी यांनी असे 30 हजार पेक्षा जास्त तलाव तयार केले आहेत. 30 हजार ! त्यांचं हे भगीरथ कार्य आजही सुरूच असून अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मित्रहो,
अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाँदा जिल्ह्यातल्या अन्धाव गावातल्या लोकांनीही वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या अभियाना ला नावही मोठे मनोरंजक दिले आहे ,‘शेतातलं पाणी शेतात,गावाचं पाणी गावात.. या अभियानाअंतर्गत गावातल्या शंभर बिघा शेतात उंच- उंच बांध केले आहेत. यामुळे पावसाचे पाणी शेतात जमा व्हायला लागले आणि जमिनीत मुरायला लागले. आता हे लोक शेताच्या बांधावर झाडे लावण्याची योजना आखत आहेत. म्हणजेच आता शेतकऱ्याला पाणी, झाडे आणि पैसा तीनही मिळेल.आपल्या उत्तम कार्यामुळे त्यांच्या गावाची कीर्ती दूर-दूर पर्यंत पोहोचत आहे.
मित्रहो,
या सर्वांकडून प्रेरणा घेत आपण आपल्या आजू-बाजूला ज्या प्रकारे पाण्याची बचत करता येईल, आपण बचत करायला हवी. मान्सूनचा हा महत्वाचा काळ आपण वाया जाऊ देता कामा नये.
माझ्या प्रिय देश बांधवानो, आपल्या शास्त्रामध्ये म्हटल आहे,
“नास्ति मूलम् अनौषधम्” ||
म्हणजे या भूतलावर अशी कोणतीही वनस्पती नाही जिच्यामध्ये औषधी गुणधर्म नाही. आपल्या आजूबाजूला अशी अनेक झाडे- वनस्पती असतात ज्यांचे अद्भुत गुणधर्म असतात मात्र आपल्याला अनेकदा त्याबाबत माहिती नसते. नैनीताल मधून एका मित्राने भाई परितोष यांनी या विषयावर मला पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिले आहे की गुळवेल आणि दुसऱ्या आणखी काही वनस्पतींचे अद्भुत औषधी गुणधर्म आपल्याला कोरोना आल्यानंतरच समजले . आपण आपल्या आजूबाजूच्या वनस्पतीविषयी जाणून घ्यावे आणि दुसऱ्यांनाही त्याची माहिती द्यावी असे ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांना मी सांगावे असा आग्रह परितोष यांनी केला आहे. खर तर हा आपला शेकडो वर्षापासूनचा वारसा आहे आणि आपल्याला त्याची जोपासना करायची आहे. याच दिशेने मध्य प्रदेश मधल्या सतना इथले रामलोटन कुशवाहा जी,यांनी प्रशंसनीय काम केले आहे. रामलोटन यांनी आपल्या शेतात देशी संग्रहालय तयार केले आहे. या संग्रहालयात त्यांनी शेकडो औषधी वनस्पती आणि बियाण्यांचा संग्रह केला आहे. लांब-लांबच्या भागातून त्यांनी हे आणले आहे. याशिवाय ते दर वर्षी अनेक प्रकारच्या भारतीय भाज्याची लागवड करतात. रामलोटन यांची ही बाग, हे संग्रहालय बघायला लोक येतात आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीही शिकतात. खरंच हा अतिशय उत्तम प्रयोग आहे आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात असाच प्रयोग करता येऊ शकतो. आपणापैकी जे लोक अशा प्रकारचा प्रयत्न करू इच्छितात त्यांनी हा जरूर करावा अशी माझी इच्छा आहे. यातून उत्पन्नाचे नवे साधनही प्राप्त होऊ शकते. स्थानिक वनस्पतींच्या माध्यमातून आपल्या भागाची ओळख वाढेल असाही एक फायदा होऊ शकतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
काही दिवसानंतर 1 जुलैला आपण राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करू. देशाचे थोर डॉक्टर बीसी राय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना काळात डॉक्टरांनी दिलेल्या योगदानाबद्दल आपण सर्वजण त्यांचे आभारी आहोत. आपल्या डॉक्टरांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता आपली सेवा केली आहे. म्हणूनच या वेळी राष्ट्रीय डॉक्टर दिन विशेष महत्वाचा आहे.
मित्रहो, औषध जगतातल्या सर्वात आदरणीय लोकांपैकी एक असलेल्या हिप्पोक्रेट्स यांनी म्हटले होते
“Wherever the art of Medicine is loved, there is also a love of Humanity.”
म्हणजे जिथे Art of Medicine साठी प्रेम असते तिथे मानवतेसाठीही प्रेम असते. प्रेमाच्या याच सामर्थ्याने डॉक्टर आपली सेवा करू शकतात. म्हणूनच आपली जबाबदारी आहे की तितक्याच प्रेमाने आपण त्यांचे आभार मानूया त्यांचा उत्साह वाढवूया. आपल्या देशात असे लोकही आहेत जे डॉक्टरांना सहाय्य करण्यासाठी पुढे येऊन काम करत आहेत. श्रीनगर मधल्या अशाच एका प्रयत्नाबाबत मला माहिती मिळाली. इथे दल सरोवरात नावेमध्ये बोट अॅम्ब्युलन्स सेवा सुरु करण्यात आली. श्रीनगरच्या तारिक अहमद पातलू जी हे हाउस बोटचे मालक असून त्यानी ही सेवा सुरु केली. त्यांनी स्वतः कोरोना-19 शी झुंज दिली आहे आणि त्यातूनच त्यांना ही प्रेरणा मिळाली. त्यांच्या या अॅम्ब्युलन्समधून जन जागृतीचे अभियान चालवण्यात येते आणि ते सातत्याने अम्ब्युलन्समधून घोषणाही करत असतात. लोकांनी मास्कचा वापर करण्यापासून ते कोरोना संदर्भात इतरही आवश्यक काळजी घ्यावी हा यामागचा उद्देश आहे.
मित्रहो, डॉक्टर दिनाबरोबरच 1 जुलै हा दिवस चार्टड अकाउंटड दिन म्हणजे सनदी लेखापाल दिन म्हणूनही साजरा केला जातो.काही वर्षांपूर्वी मी देशातल्या सनदी लेखापालांकडून जागतिक स्तरावरच्या भारतीय ऑडिट कंपन्या तयार करण्याची भेट मागितली होती. आज मी त्यांना याचे स्मरण करून देऊ इच्छितो. अर्थव्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी सनदी लेखापाल चांगली आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतात. सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
कोरोना विरोधातल्या भारताच्या लढ्याचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. या लढ्यात देशातल्या प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका बजावली आहे. “मन की बात” मध्ये मी याचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र काही लोकांची तक्रार आहे की त्यांच्या बाबतीत मात्र तितकेसे बोलले जात नाही. बँकेचे कर्मचारी असोत, शिक्षक असोत, छोटे व्यापारी किंवा दुकानदार असोत, दुकानांमध्ये काम करणारे लोक असोत, फेरीवाले बंधू-भगिनी असोत, सुरक्षा कर्मचारी, पोस्टमन किंवा टपाल कार्यालयाचे कर्मचारी खर तर ही यादी खूपच मोठी आहे आणि प्रत्येकाने आपले काम चोखपणे बजावले आहे. शासन- प्रशासन स्तरावरही अनेक लोक वेगवेगळ्या स्तरावर कार्य करत आहेत.
मित्रहो, आपण कदाचित केंद्र सरकार मध्ये सचिव असणारे गुरु प्रसाद महापात्रा जी यांचे नाव ऐकले असेल. आज “मन की बात” मध्ये मी त्यांचाही उल्लेख करू इच्छितो. गुरुप्रसाद जी यांना कोरोना झाला होता आणि ते रुग्णालयात दाखल होते आणि आपले कर्तव्यही बजावत होते. देशात ऑक्सीजनचे उत्पादन वाढावे आणि दुर्गम भागापर्यंत ऑक्सीजन पोहोचावा यासाठी त्यांनी अहोरात्र काम केले. एकीकडे कोर्ट कचेरी, मिडीयाचा दबाव एकाच वेळी अनेक आघाड्यांवर ते लढत राहिले, आजारपणातही त्यांनी काम थांबवले नाही. येऊ नका असे सांगूनही ते हट्टाने ऑक्सीजन बाबतच्या पत्रकार परिषदाना उपस्थित राहत असत. इतकी त्यांना देशवासीयांची चिंता होती. रुग्णालयात असतानाही ते आपली चिंता न करता देशातल्या लोकांसाठी ऑक्सीजन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात गुंतले होते. आपल्या सर्वांसाठी दुःखाची बाब आहे की या कर्मयोग्यालाही देशाने गमावलं आहे, कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावलं आहे. असे असंख्य लोक आहेत ज्यांची कधी चर्चाही होऊ शकली नाही. कोविड विषयीच्या नियमांचं संपूर्ण पालन आणि लस घेणे हीच अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आपली श्रद्धांजली ठरेल.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
“मन की बात’ ची सर्वात चांगली बाब ही आहे की यात माझ्यापेक्षा आपणा सर्वांचे योगदान जास्त असते. आताच मी चेन्नईच्या थिरु आर. गुरुप्रसाद जी यांची MyGov मध्ये एक पोस्ट पाहिली. त्यांनी लिहिले आहे, “मन की बात”कार्यक्रमाचे ते नियमित श्रोता आहेत. गुरुप्रसाद जी यांच्या पोस्टमधल्या काही ओळी मी सांगतो. त्यांनी लिहिले आहे,
आपण जेव्हा तामिळनाडू विषयी बोलता तेव्हा माझी रुची अधिक वाढते. आपण तमिळ भाषा,तमिळ संकृतीची थोरवी, तमिळ सण आणि तामिळनाडूच्या प्रमुख स्थानांची चर्चा केली आहे.
गुरु प्रसाद जी आणखी लिहितात, “मन की बात” मध्ये तामिळनाडू मधल्या लोकांच्या कामगिरी बाबतही अनेकदा सांगितले आहे. तिरुक्कुरल बाबत आपला स्नेह आणि तिरुवल्लुवर जी यांच्या प्रती आपला आदर याबाबत तर काय वर्णावे ! म्हणूनच ‘मन की बात’ मध्ये आपण तामिळनाडूविषयी जे सांगितले आहे ते सर्व संकलित करून त्याचे ई- बुक तयार केले आहे. आपण या ई- बुक विषयी काही बोलाल का आणि नमो ऐप ते प्रकाशित कराल का ? धन्यवाद
हे मी गुरुप्रसाद जी यांचे पत्र आपल्याला वाचून दाखवत होतो.
गुरुप्रसाद जी, आपली ही पोस्ट वाचून खूप आनंद झाला. आपण आपल्या ई- बुक मध्ये एक आणखी पान जोडा.
..’नान तमिलकला चाराक्तिन पेरिये अभिमानी |
नान उलगतलये पलमायां तमिल मोलियन पेरिये अभिमानी |..’
उच्चारात काही दोष नक्कीच असेलही मात्र माझा प्रयत्न आणि माझा स्नेह कधीच कमी होणार नाही. जे तमिळ भाषक नाहीत त्यांना मी सांगू इच्छितो की मी गुरुप्रसाद जी यांना सांगितले आहे-
मी तमिळ संस्कृतीचा खूप मोठा प्रशंसक आहे.
जगातली सर्वात प्राचीन भाषा तमिळ चा मी मोठा प्रशंसक आहे.
मित्रहो, प्रत्येक हिंदुस्तानी व्यक्तीने जगातली सर्वात प्राचीन भाषा आपल्या देशात आहे, याचा गुण गौरव करायलाच हवा, त्याचा अभिमान बाळगायला हवा. मलाही तमिळ बाबत अतिशय अभिमान आहे. गुरु प्रसाद जी, आपला हा प्रयत्न माझ्यासाठी नवा दृष्टीकोन देणारा आहे. कारण मी जेव्हा ‘मन की बात’ मधून संवाद साधतो तेव्हा सहज सोप्या पद्धतीने माझे म्हणणे मांडतो. मला माहितही नव्हते की याचा हा ही एक घटक होता. आपण सगळ्या जुन्या गोष्टीचा संग्रह केला तेव्हा मीही एकदा नव्हे तर दोनदा त्या वाचल्या.गुरुप्रसाद जी आपले हे पुस्तक मी नमो ऐपवर नक्कीच अपलोड करेन. भविष्यातल्या प्रयत्नांसाठी आपल्याला खूप-खूप शुभेच्छा !
माझ्या प्रिय देश बांधवानो,
आज आपण कोरोना काळातल्या अडचणी आणि खबरदारी याबाबत बोललो, देश आणि देशवासीयांच्या कामगिरी बाबतही चर्चा केली. आता एक आणखी संधी आपल्या समोर आहे. 15 ऑगस्ट येणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा अमृत-महोत्सव आपणा सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आपण देशासाठी जगण्याचे शिकलो.स्वातंत्र्याचा लढा – देशासाठी बलिदान देणाऱ्यांची कथा आहे. स्वातंत्र्यानंतर या काळाला आपल्याला देशासाठी जगणाऱ्यांची कथा करायची आहे. आपला मंत्र असायला हवा -India First.
आपला प्रत्येक निर्णय, प्रत्येक निर्णयाचा आधार असला पाहिजे
- India First
मित्रहो,
अमृत महोत्सवा साठी देशाने काही सामुहिक उद्दिष्टेही निश्चित केली आहेत. आपल्या स्वातंत्र्य सेनानीचे स्मरण करतानाच त्यांचा संलग्न इतिहास पुनर्जीवित करायचा आहे. आपल्या स्मरणात असेल ‘मन की बात’ मध्ये मी युवकांना, स्वातंत्र्य लढ्यावर संशोधन करून इतिहास लिहिण्याचे आवाहन केले होते. युवकांच्या प्रतिभेला वाव मिळावा, युवा विचार समोर यावेत, नव्या उर्जेने युवकांनी लिखाण करावे असा त्यामागचा विचार होता. अतिशय कमी वेळेत आधीच हजाराहून जास्त युवक या कामासाठी पुढे आले आहेत हे पाहून मला अतिशय आनंद झाला. मित्रहो, मनोरंजक बाब ही आहे की 19 व्या 20 व्या शतकाच्या लढ्याची चर्चा होते मात्र 21 व्या शतकात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा माझ्या युवा मित्रांनी, 19 व्या 20 व्या शतकाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याची गाथा लोकांसमोर आणण्याची आघाडी सांभाळली आहे. या सर्व लोकांनी माय गव्ह वर याची संपूर्ण माहिती पाठवली आहे. हे लोक हिंदी, इंग्लिश, तमिळ, कन्नड, बांग्ला, तेलुगू, मराठी, मल्याळम, गुजराती, अशा देशाच्या वेगवेगळ्या भाषात स्वातंत्र्य लढ्यावर लिहिणार आहेत. कोणी स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित आपल्या आजूबाजूच्या स्थळांची माहिती गोळा करत आहे, तर कोणी आदिवासी स्वातंत्र्य सेनानीवर पुस्तक लिहित आहे. ही एक उत्तम सुरवात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जसे योगदान देता येईल त्याप्रमाणे जरूर द्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या पर्वाचे आपण साक्षीदार होत आहोत हे आपले भाग्य आहे. म्हणूनच पुढच्या वेळी ‘मन की बात’मध्ये आपल्याशी संवाद साधताना अमृत-महोत्सवाच्या आणखी तयारीबाबतही चर्चा करूया. आपण सर्व आरोग्यसंपन्न राहा, कोरोनाशी संबंधित नियमांचं पालन करत वाटचाल करा, आपल्या नव-नव्या प्रयत्नातून देशाच्या विकासाला अशीच गती देत राहा. या शुभेच्छांसह खूप-खूप धन्यवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!
कोविड-19 च्या विरोधात लढण्यासाठी देशानं आपली संपूर्ण ताकद कशा प्रकारे लावली आहे, हे आपण पहात आहोत. गेल्या शंभर वर्षामधली ही सर्वात मोठी महामारी आहे आणि या महामारीच्या काळातच भारतानं अनेक नैसर्गिक संकटांचाही दृढतेनं सामना केलाय. या काळात अम्फान चक्रीवादळ आलं, निसर्ग नावाचं चक्रीवादळ येवून गेलं. अनेक राज्यांमध्ये महापूर आले, लहान-मोठे अनेक भूकंप आले, भूस्खलन झालं. अगदी अलिकडंच गेल्या दहा दिवासांच्या काळात देशानं पुन्हा एकदा दोन मोठ्या चक्रीवादळांचा सामना केला. पश्चिमी किनारपट्टीवर ‘तौ-ते’ आणि पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळं येवून गेली. या दोन्ही चक्रीवादळांनी अनेक राज्यांवर परिणाम केला आहे. देश आणि देशाची जनता संपूर्ण ताकदीनिशी या संकटाशी झुंजला आणि कमीतकमी जीवितहानी सुनिश्चित केली. काही वर्षांपूर्वी अशा नैसर्गिक संकटांमध्ये होणा-या जीवितहानीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवले जावू शकतात, याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत. संकटाच्या या कठिण आणि अवघड परिस्थितीमध्ये चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यांच्या लोकांनी ज्या प्रकारे मोठे धाडस दाखवले, या विपदेच्या काळात अतिशय धैर्यानं, आपत्तीला तोंड दिलं त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं अगदी आदरपूर्वक आणि अगदी हृदयपूर्वक कौतुक करू इच्छितो. जे लोक पुढाकार घेऊन मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी झाले, त्या सर्व लोकांचं जितकं कौतुक करावं, तितकं कमीच आहे. या सर्व लोकांना मी सलाम करतो. केंद्र आणि राज्य सरकारांनी आणि स्थानिक प्रशासनाचे सर्वजण, एकत्रित येऊन या संकटाचा सामना करण्यासाठी कार्यरत आहेत.या वादळी संकटामध्ये ज्यांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावं लागलं, त्यांच्याविषयी मी आपल्या सहसंवेदना व्यक्त करतो. या संकटामध्ये ज्यांना नुकसान सोसावं लागतंय, त्या सर्वांच्याबरोबर आम्ही सर्वजण अगदी ठाम उभे आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आव्हान कितीही मोठं असो, भारतानं केलेला विजयाचा संकल्पही नेहमी तितकाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्याकडे असलेली सेवा भावना, यांच्यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला आहे. अलिकडेच्या दिवसातूच आपण पाहिलं की, आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेले योद्धे, यांची स्वतःची चिंता न करता, रात्रंदिवस काम केलं आणि आजही ही मंडळी काम करीत आहेत. या सर्वांमध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये लढा देताना खूप मोठी भूमिका बजावणारेही काही लोक आहेत. या योद्ध्यांविषयी ‘मन की बात’ मध्ये चर्चा करावी, असा आग्रह मला ‘नमोअॅप’वर आणि पत्राच्या माध्यमातून केला गेलाय.
मित्रांनो, ज्यावेळी दुसरी लाट आली, त्यावेळी अचानक ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली त्यामुळे खूप मोठे आव्हान निर्माण झाले. वैद्यकीय प्राणवायू देशाच्या अगदी लहान लहान गावांतल्या भागांपर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान होते. ऑक्सिजन वाहून नेणा-या टँकरचा वेग थोडा वाढला, अगदी लहानशी चूक झाली, तर त्या टँकरचा स्फोट होण्याचा धोका असतो. औद्योगिक ऑक्सिजनचं उत्पादन करणारे अनेक प्रकल्प देशाच्या पूर्व भागात आहे. तिथून दुस-या राज्यांमध्ये ऑक्सिजन पोहोचवायलाही काही दिवसांचा अवधी लागतो. देशासमोर आलेल्या आव्हानामध्ये देशाला मदत केली ती, क्रायोजेनिक टँकर चालविणा-या चालकांनी, ऑक्सिजन एक्सप्रेसने, हवाई दलाच्या वैमानिकांनी. अशा अनेक लोकांनी युद्धपातळीवर काम करून हजारो-लाखों लोकांचे प्राण वाचवले. आजच्या ‘मन की बात’ मध्ये आपल्याबरोबर असेच एक सहकारी जोडले जात आहेत. उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये वास्तव्य करणारे श्रीमान दिनेश उपाध्याय जी.
मोदी जी- दिनेश जी, नमस्कार!
दिनेश उपाध्याय जी- सर जी, प्रणाम!
मोदी जी- सर्वात आधी तुम्ही स्वतःविषयी काही माहिती जरूर द्यावी, असं मला वाटतं.
दिनेश उपाध्याय जी – सर, माझं नाव दिनेश बाबूलनाथ उपाध्याय आहे. मी जौनपूर जिल्ह्यातल्या जमुआ भागातल्या हसनपूर या गावात वास्तव्य करतो.
मोदी जी- उत्तर प्रदेशातले आहात का?
दिनेश – हो! होय! सर!
मोदी जी- बरं.
दिनेश – आणि सर मला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. घरी पत्नी आणि माता-पिता आहेत.
मोदी जी- आणि, तुम्ही काम काय करता?
दिनेश – सर, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतो… लिक्विड ऑक्सिजनचा.
मोदी जी- मुलांचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे ना?
दिनेश- हो सर! मुलं शिकताहेत. दोन्ही मुलीही शिकतात आणि माझा मुलगाही अभ्यास करतो सर.
मोदी जी- आता त्यांचं ऑनलाइन शिक्षणही व्यवस्थित सुरू आहे ना?
दिनेश – हो सर, अगदी चांगल्या पद्धतीनं शिक्षण सुरू आहे. आत्ताही माझ्या मुली अभ्यास करताहेत.
त्या ऑनलाईलच शिक्षण घेत आहेत. सर, 15 ते 17 वर्ष झाली, मी ऑक्सिजनचा टँकर चालवतोय.
मोदी जी- बरं! तुम्ही या 15-17 वर्षात केवळ ऑक्सिजन वाहून नेत आहात. याचा अर्थ काही तुम्ही फक्त मालमोटार चालकच आहे असे नाही. एका प्रकारे तुम्ही लाखो जणांचे प्राण वाचविण्याचं काम करीत आहात.
दिनेश- सर, माझं तर हे ऑक्सिजन टँकर चालवण्याचं काम आहे. आमची आयनॉक्स कंपनीही आम्हा लोकांची खूप काळजी घेते. आणि आम्ही कुठल्याही एखाद्या ठिकाणी ज्यावेळी ऑक्सिजनचा टँकर रिकामा करून देतो, त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो.
मोदी जी – परंतु सध्या कोरोनाच्या काळात तुम्हा सर्वांची जबाबदारी खूप वाढली आहे ना?
दिनेश – हो सर, खूप वाढली आहे.
मोदी जी – ज्यावेळी तुम्ही टँकरचा चालक म्हणून त्या जागेवर बसता, त्यावेळी तुमच्या मनात नेमक्या काय भावना निर्माण होतात? आधीच्या तुलनेत काही वेगळा अनुभव येतो का? खूप तणाव येत असेल ना? मानसिक ताणही येत असेल? कुटुंबाची काळजी, कोरोनाचं वातावरण, लोकांकडून येत असलेलं दडपण, वाढती मागणी, काय काय होत असेल?
दिनेश – सर, आम्हाला काही चिंता नसते. एकमात्र मनात असतं की, आपलं जे कर्तव्य आहे, ते नीट केलं म्हणजे जर आपण वाहून नेत असलेल्या ऑक्सिजनमुळं जर कोणाला जीवन मिळणार आहे, तर ती आमच्यासाठी खूप गौरवाची गोष्ट असते.
मोदी जी – तुम्ही आपल्या भावना खूप चांगल्या पद्धतीनं व्यक्त करीत आहात. आता जर सांगा- आज ज्यावेळी या महामारीच्या काळात लोकांना तुमच्या कामाचं महत्व जाणत आहेत, कदाचित या कामाचं महत्व यापूर्वी इतकं कुणाला जाणवलं नसेल. आता मात्र समजत आहे. त्यामुळे तुमच्याकडे आणि तुम्ही करत असलेल्या कामाविषयी त्यांच्या दृष्टीनं परिवर्तन आलं आहे?
दिनेश- हो सर जी! आधी आम्ही ऑक्सिजनचे चालक, कुठंही वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून पडायचो. आता मात्र प्रशासनही आम्हा लोकांना खूप मदत करत आहेत. आणि आपण किती लवकर पोहोचतोय आणि किती लोकांचे प्राण वाचवू शकतो, हे पाहण्याची आता आमच्या मनातही एकप्रकारची जिज्ञासा असते. अशा वेळी मग, वाटेत काही खायला मिळेल- किंवा नाही मिळेल, कोणतीही अडचण येवो, तरीही आम्ही रूग्णालयात शक्य तितक्या लवकर पोहोचतोच. ज्यावेळी टँकर घेऊन जातो, त्यावेळी रूग्णालयातले लोक, तिथं उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांचे नातलग, कुटुंबिय लोक सगळेजण आम्हाला हातांनी ‘व्ही’ असा इशारा करतात.
मोदी जी- अच्छा, हे लोक व्हिक्टरीचा ‘व्ही’ म्हणून असा इशारा करतात का?
दिनेश – हो सर, हातांनी ‘व्ही’ दाखवतात, काहीजण अंगठा दाखवतात. अशावेळी आम्हाला खूप बरं वाटतं. आयुष्यात मी काहीतरी चांगलं काम नक्कीच केलंय, त्यामुळंच आत्ताच्या संकटात मला अशा प्रकारे सेवा करण्याची संधी मिळतेय.
मोदी जी – टँकर चालवून आलेला थकवा दूर होत असेल?
दिनेश – हो सर ! हो सर!
मोदी जी – मग घरी आल्यानंतर मुलांबरोबर, याविषयी तुम्हा सर्वांच्या गप्पा होतात का?
दिनेश – नाही सर! माझी मुलं तर गावी राहतात. मी इथं आयनॉक्स एअर प्रॉडक्टमध्ये टँकर चालक म्हणून काम करतोय. आठ-नऊ महिन्यांनी घरी जात असतो.
मोदी जी – मग कधी फोनवर, मुलांबरोबर बोलत असणार ना?
दिनेश- हो सर! नेहमी बोलत असतो.
मोदी जी – मग त्यांच्या मनात येत असणार, बाबांनी, या काळात जरा संभाळून राहिलं पाहिजे.
दिनेश – हो सर, मुलं, घरची मंडळी सांगतात, बाबा, काम करा परंतु स्वतःला सांभाळून करा. आणि आम्हीही सुरक्षा लक्षात घेवूनच काम करतोय. आमचा मानगाव इथं प्रकल्पही आहे. आयनॉक्स आम्हा लोकांची खूप मदत करते.
मोदी जी- चला तर, दिनेश जी, तुमच्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं. तुमचं बोलणं ऐकून देशाच्या लक्षात येईल की, या कोरोनाच्या लढ्यात कोण-कोणते लोक कशा प्रकारे कार्यरत आहेत. केवळ लोकांचे जीव वाचले पाहिजेत, यासाठी तुम्ही नऊ नऊ महिने आपल्या मुलांना भेटलेले नाहीत. परिवाराची गाठ-भेट घेतलेली नाही. ज्यावेळी ही गोष्ट देश ऐकेल, त्यावेळी देशाला तुमचा अभिमान वाटेल. कोरोनाच्या विरोधातली लढाई आपण जिंकणारच आहोत, कारण दिनेश उपाध्याय यांच्यासारखे लाखों लाखो लोक जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत.
दिनेश – सर जी, आपण सर्वजण कोरोनाला एके दिवशी नक्कीच हरवणार आहोत सर!
मोदी जी – दिनेश जी, तुमची भावना हीच तर देशाची ताकद आहे. खूप-खूप धन्यवाद दिनेश जी! आणि तुमच्या मुलांना माझे आशीर्वाद सांगावेत.
दिनेश – ठीक आहे सर, नमस्कार!
मोदीजी – धन्यवाद!
दिनेश – प्रणाम प्रणाम!
मोदी जी- धन्यवाद!
मित्रांनो, दिनेश जी सांगत होते, त्याप्रमाणं ज्यावेळी एक टँकर चालक ऑक्सिजन घेऊन रूग्णालयामध्ये पोहोचतो, त्यावेळी तो ईश्वरानं पाठवलेला दूतच वाटतो. हे काम किती जोखमीचं आहे, आणि ते करताना किती मानसिक दडपण येत असणार हे आपण नक्कीच समजू शकतो.
मित्रांनो, आव्हानाच्या या काळामध्ये, ऑक्सिजनची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला. ऑक्सिजन एक्सप्रेस, ऑक्सिजन रेल्वेमुळे रस्ते मार्गावरून जाणा-या ऑक्सिजन टँकरपेक्षा कितीतरी जास्त मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचवला आहे. एक ऑक्सिजन एक्सप्रेस संपूर्णपणे महिला चालवित आहेत, हे जाणून माता-भगिनींना अभिमान वाटेल. देशाच्या प्रत्येक महिलेला या गोष्टीचा अभिमान वाटेल. इतकंच नाही, तर प्रत्येक हिंदुस्तानीला महिलेच्या या कार्याचा अभिमान वाटेल.
ऑक्सिजन एक्सप्रेस चालविणा-या लोको- पायलट शिरीषा गजनी जी यांना ‘मन की बात’मध्ये मी आमंत्रित केलं आहे.
मोदी जी – शिरीषा जी नमस्ते !
शिरीषा – नमस्ते सर! कसे आहात सर?
मोदी जी – मी ठीक आहे. शिरीषा जी, मी ऐकलं की, तुम्ही रेल्वे पायलट म्हणून काम करीत आहात. आणि तुम्ही सर्वजणी म्हणजे जणू महिला मंडळ मिळूनच ऑक्सिजन एक्सप्रेस चालवत आहात, असं मला सांगण्यात आलंय. शिरीषा जी, तुम्ही खूप शानदार काम करीत आहात. कोरोना काळामध्ये तुमच्याप्रमाणे अनेक महिलांनी पुढाकार घेऊन कोरोनाशी दोन हात करताना देशाला ताकद दिली आहे. तुम्ही म्हणजे स्त्री-शक्तीचं एक प्रमुख उदाहरण आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? याची जाणून घेण्याची देशाची आणि माझीही इच्छा आहे.
शिरीषा – सर, मला या कामासाठी माझ्या आई-वडिलांकडून प्रेरणा मिळते… सर, माझे वडील सरकारी कर्मचारी आहेत. खरंतर, मला आणखी दोन मोठ्या बहिणी आहेत. आम्ही घरामध्ये तिघी आहोत. तरीही माझे वडील कामासाठी प्रोत्साहन देत असतात. माझी मोठी बहीण सरकारी बँकेत नोकरी करते आणि मी रेल्वेमध्ये आहे. माझे पालकच मला कामासाठी प्रोत्साहन देतात.
मोदी जी- अरे वा, शिरीषा जी, तुम्ही सर्वसामान्य काळातही रेल्वेमध्ये नोकरी केली आहे. गाडी नेहमीप्रमाणे चालवली आहे. परंतु ज्यावेळी एकीकडे ऑक्सिजनची मागणी इतकी प्रचंड आहे. अशावेळी तुम्ही ऑक्सिजन घेऊन जाणारी गाडी चालवणं, म्हणजे थोडं जास्त जबाबदारीच काम असणार? सामान्य काळात माल, सामान वाहून नेणं वेगळी गोष्ट आहे. आणि ऑक्सिजनची वाहतूक करणं तसं खूपच नाजूक काम आहे, अशावेळी काय अनुभव आला होता?
शिरीषा – हे काम केल्यामुळं माझ्या मनाला फार आनंद वाटला. ऑक्सिजन स्पेशल गाडी चालवताना, सगळं काही पहावं लागतं. सुरक्षेचा विषय असो की फाॅर्मेशन असो अगदी कुठं गळती तर नाही ना, याचीही सारखी काळजी घ्यावी लागते. दुसरं म्हणजे भारतीय रेल्वेकडूनही खूप चांगली मदत, पाठिंबा मिळतो सर! ही ऑक्सिजन गाडी चालवण्यासाठी मला हरित मार्गिका दिली होती. या गाडीने आम्ही 125 किलोमीटरचं अंतर दीड तासात कापलं. इतक्या वेगानं ही गाडी धावली पाहिजे, यासाठी रेल्वेनंही खूप मोठी जबाबदारी घेतली होती. सर, म्हणून मीही ही जबाबदारी पेलायला तयार झाले.
मोदी जी – व्वा! व्वा! शिरीषाजी तुमचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमच्या माता-पित्यांना विशेष रूपानं प्रणाम करतो. ज्यांनी आपल्या तिनही मुलींना इतकं छान प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी खूप पुढं जावं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं धैर्य दिलं आहे, याबद्दल त्यांचं कौतुक आहे. मला वाटतं की, अशा माता-पित्यांनाही नमस्कार केला पाहिजे. तुम्हा सर्व भगिनींनाही नमस्कार. शिरीषा जी, तुम्ही वेगळे धाडस दाखवून, एक प्रकारे देशाची सेवा करीत आहात, खूप- खूप धन्यवाद शिरीषा जी!
शिरीषा – धन्यवाद सर! सर आभार! सर तुमचे मला आशीर्वाद हवेत.
मोदी जी – बस, परमात्म्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळत रहावा. तुमच्या माता-पित्यांचा आशीर्वाद मिळत रहावा. धन्यवाद !!
शिरीषा – धन्यवाद सर!
मित्रांनो, आपण आत्ताच शिरीषा जी यांचं बोलणं ऐकलं. त्यांचे अनुभव प्रेरणा देतात तसंच भावूकही करताहेत. वास्तवामध्ये ही लढाई इतकी मोठी आहे की, यामध्ये रेल्वेप्रमाणेच आपला देश, जल, थल, नभ अशा तीनही मार्गांनी कार्यरत आहे. एकीकडे रिकामे केलेले टँकर्स हवाई दलाच्या विमानांनी ऑक्सिजन प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडं नवीन ऑक्सिजन प्रकल्प उभे करण्याचं कामही पूर्ण केलं जात आहे. त्याचबरोबर परदेशातून ऑक्सिजन, ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स आणि क्रायोजेनिक टँकर्सही देशात आणले जात आहेत. या कामामध्ये नाविकदल गुंतलं आहे. हवाईदलही हे कार्य करीत आहे. लष्करानंही काही जबाबदारी स्वीकारून काम करीत आहे. ‘डीआरडीओ’ सारख्या आपल्या संस्था कार्यरत आहेत. आपले कितीतरी संशोधक, औद्योगिक क्षेत्रातले तज्ज्ञ, आणि तंत्रज्ञही युद्धपातळीवर काम करीत आहेत. ही मंडळी करीत असलेल्या कामाची माहिती घेण्याची, त्यांच्या कामाचं स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा सर्व देशवासियांच्या मनात आहे. म्हणूनच आज आपल्याबरोबर हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक जी बोलणार आहेत.
मोदी जी- पटनायक जी, जय हिंद !
ग्रुप कॅप्टन – सर जय हिंद! सर मी, ग्रुप कॅप्टन पटनायक हवाई दलाच्या हिंडन तळावरून बोलतोय.
मोदी जी- पटनायक जी, कोरोनाविरोधातल्या लढाईमध्ये तुम्ही मंडळी खूप मोठी, महत्वाची जबाबदारी सांभाळत आहात. जगभरामध्ये जाऊन टँकर आणणं, टँकर इथं पोहोचवण्याचं काम करीत आहात. एक फौजी-लष्करी या नात्यानं वेगळ्याच प्रकारचं काम तुम्ही केलं आहे. लढताना हौतात्म्य पत्करणं किंवा समोरच्या शत्रूला मारायचं, यासाठी तुमची धावपळ असते. आज मात्र तुम्ही जीवन वाचवण्यासाठी धावपळ करीत आहात. हा अनुभव तुमच्यासाठी कसा आहे, हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो.
ग्रुप कॅप्टन – सर, या संकटाच्या काळात आपल्या देशवासियांना आम्ही मदत करू शकतो, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हे जे काही मिशन आम्हाला मिळालं आहे, ते आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहोत. आम्हाला दिलं गेलेलं प्रशिक्षण आणि मिळत असलेल्या पुरक सेवा यांच्या मदतीनं काम सुरू आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर, या मिशनमुळं काम केल्याचं समाधान मिळतंय, ही खूप मोठी अगदी उच्च स्तरावरची बाब आहे. आणि म्हणूनच आम्ही या मिशनचं काम निरंतर करू शकतोय.
मोदी जी- कॅप्टन, तुम्ही या दिवसांमध्ये जे जे काही प्रयत्न केले आहेत आणि तेही कमीत कमी वेळेत सर्वकाही कामे करावी लागली आहेत. त्याविषयी या दिवसातला तुमचा काय अनुभव आहे?
ग्रुप कॅप्टन – सर, गेल्या एक महिन्यापासून आम्ही सातत्यानं ऑक्सिजन टँकर्स आणि द्रवरूप ऑक्सिजन कंटेनर्स, देशातून आणि देशाबाहेरून अशा दोन्ही ठिकाणांहून उचलून आणत आहोत. जवळपास सोळाशे साॅर्टिज्पेक्षाही जास्त हवाई दलाने वाहतूक केली आहे. आणि तीन हजार तासांपेक्षाही जास्त काळ उड्डाण केलं आहे. जवळपास 160 आंतरराष्ट्रीय मिशन पूर्ण केली आहेत. आधी आणि इतर देशांतर्गत कामासाठी टँकर्स आणत होतो, त्यावेळी दोन ते तीन दिवस लागत होते. मात्र सध्या ज्या कारणानं आम्ही प्रत्येक ठिकाणांवरून ऑक्सिजन टँकर्स आणतो, त्यासाठी आम्ही अवघ्या दोन ते तीन तासांमध्येच एका स्थानांवरून दुसरीकडे टँकर्स पोहोचवत आहोत. आणि आंतरराष्ट्रीय मिशन असेल तर अवघ्या 24 तासांमध्ये अगदी न थांबता, निरंतर कार्य सुरू ठेवून चोविस तासात हे काम फत्ते करतो. या मिशनसाठी संपूर्ण हवाई दल कार्यरत आहे. जितक्या लवकर आणि जितके जास्त टँकर्स आणता येतील तितके ते आणले जातात. देशाची शक्य तितकी जास्त मदत करायची, हाच विचार आमचा असतो, सर!
मोदी जी- कॅप्टन, आंतरराष्ट्रीय स्थानांवर तुम्हाला कुठं कुठं उड्डाणं करावी लागली?
ग्रुप कॅप्टन – सर, अगदी अल्पकालीन सूचनेनुसार आम्ही सिंगापूर, दुबई, बेल्जियम, जर्मनी आणि यू.के. या सर्व स्थानी वेगवेगळ्या तळांवर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी उड्डाण केलं, सर! आयएल 76, सी-17 आणि इतर सर्व विमानं गेली होती. सी-130 नं तर अतिशय कमी वेळेत मिळालेल्या सूचनेनुसार मिशनचं नियोजन केलं. आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आणि आमच्यामध्ये असलेला ‘जोश’ यामुळंच आम्ही अगदी वेळेत मिशन पूर्ण करू शकलो. सर!!
मोदी जी – लक्षात घ्या, देशाला तुमचा अभिमान आहे, जल असो, भूमी असो किंवा मग आकाश आमचे सर्व जवान ही कोरोना विरुद्धची लढाई लढत आहेत आणि कॅप्टन तुम्ही देखील तुमची जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे तुमचे देखील अभिनंदन.
Grp. Cpt.– सर, खूप खूप आभारी आहोत सर. आम्ही आमचे सर्वोत्तम द्यायचे प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नांमध्ये माझ्या सोबत माझी मुलगी अदिती देखील आहे.
मोदी जी- अरे वाह!
अदिती – नमस्कार मोदी जी
मोदी जी – नमस्कार , अदिती तू किती वर्षांची आहेस?
अदिती – मी 12 वर्षाची आहे आणि मी इयत्ता 8 वी मध्ये आहे.
मोदी जी – तुमचे वडील नेहमी बाहेर जातात, युनिफॉर्म मध्ये (गणवेशात) असतात.
अदिती – हा! मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, ते इतके महत्वपूर्ण काम करत आहेत. कोरोना पिडीत लोकांची मदत करत आहेत, आणि बाहेरील देशांमधून ऑक्सिजन टँकर आणि कंटेनर घेऊन येत आहेत.
मोदी जी – परंतु तू तुझ्या बाबांना खूप मिस करत असशील ना?
अदिती – हो, मी त्यांना खूप मिस करते. आजकाल ते खूप कमी वेळ घरी असतात. कोरोना बाधित लोकांना वेळेवर ऑक्सिजन मिळून त्यांचा जीव वाचवा यासाठी ते अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांद्वारे कंटेनर आणि टँकर त्यांच्या प्रोडक्शन प्लांट पर्यंत पोहोचवत आहेत.
मोदी जी – तुझे बाबा, लोकांना वेळेवर ऑक्सिजन पोहोचवून त्यांचे प्राण वाचविण्याचे काम करतात , ही गोष्ट आता सगळ्यांना माहित झाली असेल.
अदिती – हा
मोदी जी – तुझे वडील ऑक्सिजन सेवेत कार्यरत आहेत ही बाब जेव्हा तुझे मित्र-मंडळी, तुझ्या सोबत शिकणारे विद्यार्थी यांना कळली असेल तेव्हा त्या सगळ्यांना तुझ्या बद्दल देखील आदर वाटला असेल ना?
अदिती – हो, माझे मित्र-मैत्रिणी मला सांगतात की तुझे बाबा इतके महत्वाचे काम करतायत, त्याचा तुला देखील अभिमान वाटत असेल ना, हे ऐकल्यावर तर मला खूपच अभिमान वाटतो. आणि माझे सगळे कुटुंब आहे माझे दोन्ही आजी आजोबा सगळ्यांना माझ्या वडिलांचा खूप अभिमान वाटतो, माझी आई आणि बाकी सर्व देखील डॉक्टर आहेत, ते देखील दिवस-रात्र काम करत आहेत आणि सर्व सशस्त्र सेना, माझ्या वडिलांच्या स्क्वाड्रॉनचे सर्व काका आणि सर्व सैन्य अहोरात्र काम करीत आहे आणि मला खात्री आहे की सर्व प्रयत्नांनी आपण कोरोना विरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू.
मोदी जी – आपल्याकडे पूर्वापार असे बोलले जाते की, आपल्या मुलींच्या मुखात साक्षात सरस्वती विराजमान असते आणि आता अदिती बोलली आहे की आपण ही लढाई जिंकू म्हणजे ही एकप्रकारे देव वाणीच झाली आहे. अच्छा, अदिती, आता तर तू ऑनलाईन शिकत असशील.
अदिती – होय, आत्ता आमचे सर्व ऑनलाईन वर्ग चालू आहेत आणि आत्ता आम्ही घरी देखील संपूर्ण खबरदारी घेत आहोत आणि जर बाहेर जायचे असेल तर डबल मास्क घालतो आणि सर्व खबरदारी घेतो आणि वैयक्तिक स्वच्छतेची आणि इतर गोष्टींची देखील खबरदारी घेतो.
मोदी जी – अच्छ, तुला कोणते छंद आहेत? तुला काय आवडते?
अदिती – मला पोहायला आणि बास्केटबॉल खेळायला आवडते, परंतु आता हे सगळे बंद आहे आणि या लॉकडाउन आणि कोरोना कालावधी दरम्यान मला बेकिंग आणि स्वयंपाक करण्याची खूप आवड लागली आहे. आणि माझे बाबा जेव्हा कामावरून घरी येतात तेव्हा मी त्यांना त्यांच्यासाठी कुकीज आणि केक्स बनवते.
मोदी जी – वाह वाह वाह! चला, बर्याच दिवसानंतर तुला तुझ्या वडिलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. खूप छान वाटले आणि कॅप्टन मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो, परंतु जेव्हा मी कॅप्टनचे अभिनंदन करतो, तेव्हा ते केवळ त्या एकट्याचे नसते तर आपल्या सर्व सैन्याने, जल, भू, आकाश सगळीकडे कार्यरत असणाऱ्या सगळ्यांना माझा सलाम. धन्यवाद.
Grp. Cpt. – धन्यवाद सर.
मित्रांनो, आमच्या या जवानांनी, या योद्धांनी केलेल्या कार्यासाठी देश त्यांना अभिवादन करतो. तसेच लाखो लोक रात्रंदिवस कार्यरत आहेत. ते करीत असलेले काम हे त्यांच्या दैनंदिन कामाचा भाग नाही. शंभर वर्षांनंतर जगावर अशी आपत्ती आली आहे, शतकानंतर इतके मोठे संकट! म्हणून, या प्रकारच्या कामाचा कोणालाही अनुभव नव्हता. यामागे केवळ देशसेवा आणि संकल्पशक्ती आहे आणि याच्याच जोरावर देशाने ते करून दाखविले जे यापूर्वी कधीच केले नव्हते. आपण अंदाज लावू शकता की सामान्य दिवसात आपल्याकडे एका दिवसात 900 मेट्रिक टन द्रवरुपी वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती व्हायची. आता हे दहा पटीहून अधिक वाढून सुमारे 9500 मेट्रिक टन प्रतिदिन उत्पादन होते. आमचे योद्धे हा ऑक्सिजन देशाच्या काना कोप-यात पोहोचवत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी देशात इतके प्रयत्न केले गेले, इतके नागरिक या कामात जोडले गेले, एक नागरिक म्हणून ही सर्व कामे खूपच प्रेरणादायी आहेत. प्रत्येकाने एक संघ म्हणून आपले कर्तव्य बजावले आहे. मला बंगळुरू येथील उर्मिला जी यांनी सांगितले आहे की त्यांचे पती प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ आहे आणि इतकी आव्हाने असताना देखील ते टेस्टिंगचे काम अविरत करत आहेत.
मित्रांनो, कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात देशात फक्त एक चाचणी प्रयोगशाळा होती, परंतु आज अडीच हजाराहून अधिक प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सुरुवातीला एका दिवसात शंभर-एक चाचण्या घेण्यात आल्या, आता एका दिवसात २० लाखाहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. आतापर्यंत देशात 33 कोटींपेक्षा जास्त नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. या सगळ्या सहकाऱ्यांमुळेच हे इतके मोठे कार्य शक्य झाले. नमुने संकलनाच्या कामात अनेक आघाडीचे कामगार कार्यरत आहेत. संक्रमित रूग्णांमध्ये जायचे, त्यांचे नमुने घ्याचे ही खरच एक सेवा आहे. स्वत:चे रक्षण करण्यासाठी, या सहकाऱ्यांना एवढ्या उष्णतेमध्ये देखील सतत पीपीई किट घालावे लागते. त्यानंतर ते नमुने प्रयोगशाळेपर्यंत पोहोचतात. म्हणूनच जेव्हा मी तुमच्या सूचना आणि प्रश्न वाचत होतो, तेव्हा मी ठरविले की आमच्या या मित्रांसोबत देखील चर्चा केली पाहिजे. त्यांच्या अनुभवांमधून आपल्याला बरेच शिकायला मिळेल. चला तर दिल्लीत लॅब टेक्नीशियन म्हणून कार्यरत असणारे आपले सहकारी प्रकाश कांडपाल जी यांच्याशी बोलूया.
मोदी जी – प्रकाश जी नमस्कार.
प्रकाश जी- नमस्कार माननीय पंतप्रधान जी.
मोदी जी – प्रकाश जी, सर्वप्रथम 'मन की बात' च्या आपल्या सर्व श्रोत्यांना तुमच्याबद्दल सांगा. आपण कधीपासून हे काम करत आहात आणि कोरोनाच्या काळातील तुमचा अनुभव काय आहे , कारण देशातील लोकांना या सगळ्या गोष्टी टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात दिसत नाही. तुम्ही एका ऋषीप्रमाणे प्रयोगशाळेत काम करत आहात. तुम्ही जेव्हा तुमचे अनुभव सांगाल तेव्हा देशवासियांना देखील माहिती होईल की देशात कशाप्रकारे काम सुरु आहे.
प्रकाश जी – मी, दिल्ली सरकारची स्वायत्त संस्था असणाऱ्या Institute of Liver and Biliary Sciences नावाच्या रूग्णालयात मागील 10 वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. माझ्याकडे आरोग्य क्षेत्राचा 22 वर्षांचा अनुभव आहे. आयएलबीएस पूर्वीही मी अपोलो हॉस्पिटल, राजीव गांधी कॅन्सर हॉस्पिटल, दिल्लीमधील रोटरी ब्लड बँक यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम केले आहे. या सगळ्या संस्थांमध्ये मी ब्लड बँक विभागात सेवा बजावली आहे, परंतु गेल्या वर्षी 1 एप्रिल 2020 पासून मी आयएलबीएसच्या विषाणूविज्ञान विभागांतर्गत कोविड टेस्टिंग लॅबमध्ये कार्यरत आहे. निःसंशयपणे, कोविड साथीच्या काळात, आरोग्य आणि आरोग्याशी संबंधित सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण आला आहे. परंतु वैयक्तिकरित्या या संघर्षाच्या कालावधीला मी एक संधी मानतो. जेव्हा राष्ट्र, मानवता, समाज आपल्याकडून अधिक जबाबदारी, सहकार्य आणि अधिक सामर्थ्य आणि आपल्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतात. आणि सर, जेव्हा आपण देशाच्या, माणुसकीच्या, समाजाच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जेव्हा अगदी छोट्याश्या दवबिंदू इतके देखील काम करतो तेव्हा मी गोष्ट खूपच अभिमानस्पद असते. कधीकधी जेव्हा आमच्या कुटुंबातील सदस्य देखील थोडे साशंक असतात किंवा त्यांना देखील थोडी भीती वाटते अशावेळी मी त्यांना कठीण परिस्थितीमध्ये देशाचे संरक्षण करण्यासाठी सदैव आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या आपल्या देशातील सैनिकांची आठवण करून देतो. त्यांच्या तुलनेत तर आम्ही घेत असलेली जोखीम ही फारच कमी आहे. त्यांना देखील गोष्ट पटते आणि ते देखील मला सहकार्य करतात आणि या आपत्तीत त्यांच्याकडून जे काही सहकार्य शक्य आहे ते करतात.
मोदी जी – प्रकाश जी, या कोरोनाच्या काळात एकीकडे सरकार लोकांना शारीरिक अंतर ठेवण्यास सांगत आहे, एकमेकांपासून दूर रहाण्यास सांगत आहे. आणि आपल्याला मात्र कोरोना विषाणू मध्येच राहावे लागते. खरतर हे सगळे म्हणजे स्वतःचा जीव संकटात टाकण्यासारखे आहे अशावेळी कुटुंबाला तुमची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु तरीही, ही प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांची नोकरी ही सामान्य नोकरी आहे. आणि अशा साथीच्या परिस्थितीत अजून एक महत्वाची नोकरी आहे आणि आपण ती करत आहात. कामाचे तास देखील बरेच वाढले असतील? रात्रभर प्रयोगशाळेत थांबावे लागत असेल? कारण इतक्या कोट्यावधी लोकांची चाचणी घेतली जात आहे, तर मग ताणही वाढला असेल. परंतु तुम्ही तुमच्या सुरक्षेची खबरदारी घेता की नाही?
प्रकाश जी – हो सर नक्कीच घेतो. आमची आयएलबीएस प्रयोगशाळा डब्ल्यूएचओ द्वारे मान्यता प्राप्त आहे. सर्व प्रोटोकॉल आंतरराष्ट्रीय मानकांचे आहेत, आम्ही प्रयोगशाळेत जाताना त्रि-स्तरीय पोशाख घालून जातो आणि तो घालूनच काम करतो. आणि त्याचे विघटन करणे, लेबलिंग करणे आणि चाचणी या सर्व गोष्टी संपूर्ण प्रोटोकॉल नुसार केल्या जातात. सर,माझे कुटुंब आणि माझे बहुतेक परिचित ज्यांना अजून संसर्ग झाला नाही ही देवाची कृपा आहे. एक गोष्ट आहे की, आपण सावधगिरी बाळगली आणि संयम ठेवल्यास, आपण हे संकट थोडेसे टाळू शकता.
मोदी जी – प्रकाश जी, आपल्यासारखे हजारो लोक गेल्या एक वर्षापासून प्रयोगशाळेत कार्यरत आहेत आणि बरेच त्रास सहन करीत आहात. इतक्या लोकांना वाचवण्याचे काम करत आहात. देशाला आज हे माहिती होत आहे. प्रकाश जी, मी तुमच्या मार्फत तुमच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. देशवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि आपण निरोगी रहा. तुमचे कुटुंब निरोगी राहुदे . मी तुम्हाला शुभेच्छा देतो.
प्रकाश जी – धन्यवाद, पंतप्रधानजी. तुम्ही मला ही संधी दिली याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
मोदी जी – धन्यवाद.
मित्रांनो, मी एकप्रकारे संवाद तर प्रकाशजींशी साधला, पण त्यांच्या बोलण्यातून हजारो प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या सेवेचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचत आहे. या गोष्टींमधून हजारो-लाखो लोकांचा सेवाभाव तर दिसून येतोच, आपल्या सर्वांना आपली जबाबदारी देखील कळते. प्रकाश जी यांच्यासारखे आपले अनेक साथीदार ज्या परिश्रम आणि समर्पण वृत्तीने काम करत आहेत त्याच निष्ठेने त्यांना सहकार्य केल्यास कोरोनाला पराभूत करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता पण आपल्या कोरोना योध्यांबद्द्ल बोलत होतो. गेल्या दीड वर्षात आपण त्याचे समर्पण आणि परिश्रम पाहिले आहेत. पण या लढाईत देशातील इतर अनेक क्षेत्रातील अनेक योद्ध्यांचीही मोठी भूमिका आहे. तुम्ही विचार करा, आपल्या देशावर इतके मोठे संकट आले, त्याचा परिणाम देशातील प्रत्येक यंत्रणेवर झाला. कृषी-क्षेत्राने या हल्ल्यापासून बर्याच प्रमाणात स्वत: चे संरक्षण केले. केवळ सुरक्षितच ठेवले नाही, तर प्रगती देखील केली, आणि विकास देखील केला! आपणास माहिती आहे का की या साथीच्या रोगातही आपल्या शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन केले आहे. शेतकर्यांनी विक्रमी उत्पादन केल्याने देशाने देखील अन्नधान्याची विक्रमी खरेदी केली आहे. यावेळी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना मोहरीसाठी एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळाला आहे. अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे आपला देश प्रत्येक देशवासियाला देशाला आधार देण्यास सक्षम आहे. देशातील एकही गरीब कुटुंबात कोणीही कधीही उपाशी झोपू नये म्हणून आज या संकटकाळात 80 कोटी गरीब लोकांना मोफत शिधावाटप केले जात आहे.
मित्रांनो, आज आपल्या देशातील शेतकरी अनेक क्षेत्रातील नवीन व्यवस्थेचा फायदा घेत आहेत. अगरतलातील शेतकऱ्यांचेच उदाहरण घ्या! हे शेतकरी उत्तम दर्जाच्या फणसाचे उत्पन्न घेतात. त्याला देशात आणि परदेशात देखील चांगली मागणी येऊ शकते, म्हणूनच यावेळी आगरतळा येथील शेतकर्यांचे फणस रेल्वेने गुवाहाटी येथे आणले. हे फणस आता गुवाहाटीहून लंडनला पाठविण्यात येत आहेत. तसेच तुम्ही बिहारच्या 'शाही लीची' चे नाव देखील ऐकले असेलच. याची ओळख अधिक मजबूत होण्यासाठी आणि शेतकर्यांना अधिक फायदा होण्यासाठी 2018 मध्ये, सरकारने शाही लीचीला जीआय टॅग देखील दिला होता. यावेळी बिहारची ही 'शाही लीची' देखील हवाईमार्गे लंडनला रवाना झाली आहे. आपला देश पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा प्रकारच्या अद्वितीय स्वाद आणि उत्पादनांनी परिपूर्ण आहे. दक्षिण भारतात तुम्ही विजयनगरच्या आंब्याबद्दल ऐकले असेलच? आता हा आंबा कोणाला खायचा नसेल! त्यामुळे आता किसान रेल्वेतून शेकडो टन विजयनगरम आंबे दिल्लीला पोहोचत आहेत. दिल्ली आणि उत्तर भारतातील लोकांना विजयनगरमचा आंबा खायला मिळेल आणि विजयनगरमच्या शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळेल.किसान रेल्वेने आतापर्यंत सुमारे 2 लाख टन शेतमालाची वाहतूक केली आहे. आता शेतकरी देशाच्या इतर दुर्गम भागात फळ, भाज्या, धान्य फारच कमी किंमतीत पाठवू शकतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण 30 मे रोजी 'मन की बात' करत आहोत आणि योगायोगाने आजच सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षांमध्ये देशाने 'सबका साथ, सबका-विकास, सबका-विश्वास' या मंत्राचा अवलंब केला आहे. देशसेवेसाठी प्रत्येकाने प्रत्येक क्षण समर्पण भावनेने काम केले आहे. बर्याच सहका-यांनी मला पत्रे पाठवून सांगितले आहे की 'मन की बात' मध्ये मी आपल्या या 7 वर्षाच्या एकत्र प्रवासाबाबत देखील चर्चा केली पाहिजे. मित्रांनो, या 7 वर्षात जे काही साध्य झाले आहे ते देशाचे आहे, देशवासियांचे आहे. आम्ही या वर्षांमध्ये राष्ट्रीय अभिमानाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. आता भारतावर इतर देशांचा वैचारिक दबाव नाही, भारत आता स्वतःच्या संकल्पाने मार्गक्रमण करत आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. भारत आता आपल्याविरूद्ध कट रचणाऱ्याना सडेतोड उत्तर देत आहे हे बघताना आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करीत नाही, जेव्हा आपल्या सैन्यांची ताकद वाढते, तेव्हा आम्हाला वाटते की होय, आम्ही योग्य मार्गावर आहोत.
मित्रांनो, मला देशातील कानाकोपऱ्यातून अनेक देशवासींचे संदेश, त्यांची पत्रे येतात. बरेच लोक देशाचे आभार मानतात की 70 वर्षांनंतर त्यांच्या गावात पहिल्यांदाच वीज पोहोचली आहे, त्यांची मुले प्रकाशात पंख्याखाली बसून अभ्यास करत आहेत. कित्येक लोकं सांगतात की, त्यांचे गावही आता चांगल्या रस्त्याने शहराशी जोडले गेले आहे. मला आठवते की आदिवासी भागातील काही लोकांनी मला हा पत्र पाठवून सांगितले होते की रस्ता तयार झाल्यानंतर प्रथमच त्यांना उर्वरित जगाचा भाग असल्याचे वाटत आहे. त्याच प्रकारे, कोणी बँक खाते उघडण्याचा आनंद सामायिक करतो, तर कोणी वेगवेगळ्या योजनांच्या मदतीने नवीन रोजगार सुरु करण्याच्या आनंदात मला सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत घर मिळाल्यानंतर गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होण्याची अशी अनेक आमंत्रणे सतत मला आमच्या देशवासियांकडून येत आहेत. या 7 वर्षात मी तुमच्या सर्वांच्या अशा करोडो आनंदांमध्ये सहभागी झालो आहे. काही दिवसांपूर्वीच गावातील एका कुटूंबाने मला 'जल जीवन अभियान' अंतर्गत घरात बसविलेल्या पाण्याच्या नळाचा फोटो पाठविला. त्या फोटोचे कॅप्शन त्यांनी लिहिले होते – 'माझ्या गावाची जीवनधारा'. अशी बरीच कुटुंबे आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या 7 दशकांत आपल्या देशातील फक्त साडे तीन कोटी ग्रामीण कुटुंबांना पाण्याचे कनेक्शन दिले होते. परंतु गेल्या 21 महिन्यांतच केवळ साडेचार कोटी घरांना शुद्ध पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्यापैकी 15 महिने तर कोरोना कालावधीचे होते. देशात असाच विश्वास ‘आयुष्मान योजने’ च्या माध्यमातून देखील आला आहे. जेव्हा एखादा गरीब मोफत उपचार घेऊन बरा होऊन घरी येतो तेव्हा त्याला असे वाटते की त्याला एक नवीन जीवन मिळाले आहे. त्याला विश्वास आहे की देश त्याच्या पाठीशी आहे. अशा अनेक कुटुंबांच्या आशीर्वादाने, कोट्यावधी मातांच्या आशीर्वादाने आपला देश सामर्थ्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मित्रांनो, या 7 वर्षात भारताने 'डिजिटल व्यवहार' मध्ये जगाला एक नवीन दिशा प्रदान केली आहे. आज आपण कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे डिजिटल पेमेंट करतो, या कोरोनाच्या काळातही हे फार उपयुक्त ठरत आहे. आज देशवासी स्वच्छतेप्रती अधिक जागरूक आणि दक्ष होत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात उपग्रह देखील प्रक्षेपित करत आहोत आणि विक्रमी स्तरावर रस्ते देखील बनवत आहोत. या 7 वर्षात देशातील अनेक जुने वादही संपूर्ण शांतता व सामंजस्याने मिटविण्यात आले आहेत. ईशान्य ते काश्मीर पर्यंत शांतता व विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मित्रांनो, तुम्ही विचार केला आहे का की अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी या 7 वर्षात कशा झाल्या? हे सर्व शक्य झाले कारण या 7 वर्षात आम्ही सरकार आणि लोकांहून अधिक एक देश म्हणून काम केले, एक टीम म्हणून काम केले, 'टीम इंडिया' म्हणून काम केले. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी काही पावले उचलण्याचा प्रयत्न केला आहे. होय! जिथे यश असते तिथे परीक्षा देखील असतात. या 7 वर्षात आम्ही एकत्रित बर्याच कठीण परीक्षा दिल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यातून यशस्वीरीत्या बाहेर आलो आहोत. कोरोना साथीच्या स्वरूपात, इतकी मोठी परीक्षा तर सुरूच आहे. हे एक असे संकट आहे ज्याने संपूर्ण जगाला त्रास दिला आहे, अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मोठमोठे देशदेखील त्याच्या तडाख्यातून वाचलेले नाहीत. या जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत आहे. आम्ही पहिल्या लाटेत देखील जोमाने संघर्ष केला, यावेळी देखील विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत भारत विजयी होईल. 'सहा फुटाचे अंतर’ मास्कशी संबधित नियम किंवा मग लस संबंधीचे नियम असू देत आम्हाला निष्काळजीपणा करून चालणार नाही. हाच आपला विजयाचा मार्ग आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण 'मन की बात' मध्ये भेटू, तेव्हा आपण देशवासियांच्या बर्याच प्रेरणादायक उदाहरणांबद्दल आणि नवीन विषयांवर चर्चा करू. तुम्ही तुमच्या सूचना मला अशाच पाठवत रहा. तुम्ही सर्व जण निरोगी रहा, अशीच देशाची प्रगती करत रहा. खूप-खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज जेंव्हा आपल्या सर्वांचं धैर्य, दुःख सहन करण्याच्या मर्यादेची कोरोना परीक्षा पहात आहे, अशा वेळेस आपल्याशी मन की बात मधून संवाद साधत आहे. आपल्या सर्वांचे कित्येक जिवलग अकालीच आपल्याला सोडून गेले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशामध्ये खूप मोठी उमेद निर्माण झाली होती, आत्मविश्वासाने देश भारलेला होता, परंतु या कोरोनाच्या वादळाने देशाला हादरवून टाकलं आहे.
मित्रांनो गेल्या काही दिवसात, या संकटाचा मुकाबला करण्यासंदर्भात माझी, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या तज्ज्ञांबरोबर दीर्घ चर्चा झाली आहे. आमच्या औषध निर्माण उद्योगांच्या क्षेत्रातले लोक असोत की लस उत्पादनाशी संबंधित लोक असोत, ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोक असोत किंवा मग वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असोत, त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना सरकारला केल्या आहेत. यावेळी, आम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे. राज्यसरकारांच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी, भारत सरकार पूर्ण शक्तिनं त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. राज्य सरकारंही आपापली जबाबदारी निभावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
मित्रांनो, देशातले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विरोधात यावेळी खूप मोठ्या लढाईमध्ये गुंतले आहेत. या आजाराबाबत त्यांना गेल्या एक वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवही आले आहेत. आमच्याबरोबर, आता यावेळी मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशीजी जोडले गेले आहेत.
डॉक्टर जोशी जींकडे कोरोनावरील उपचार आणि त्यासंदर्भातल्या संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मोठा आहे, आणि ते इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्सचे अधिष्ठाताही राहिले आहेत. या आपण आता डॉ. शशांक यांच्याशी बातचीत करू या.
मोदी जीः नमस्कार, डॉ. शशांक जी.
डॉ० शशांक – नमस्कार सर |
मोदी जीः आता अलिकडेच काही दिवसांपूर्वीच आपल्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. आपले स्पष्ट विचार मला अत्यंत आवडले होते. मला असं वाटलं की, देशातल्या सर्व नागरिकांनी आपले विचार जाणून घ्यायला हवेत. ज्या गोष्टी हल्ली ऐकायला मिळतात, त्याबाबतच मी एक प्रश्न विचारू इच्छितो. डॉ. शशांक, आपण सर्व जण सध्या दिवसरात्र लोकांचे जीव वाचवण्याच्या कामात गुंतला आहात. सर्वात प्रथम आपण लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल सांगावं, असं मला वाटतं. वैद्यकीय दृष्ट्या ही लाट कशी वेगळी आहे आणि त्यासाठी काय खबरदारी आवश्यक आहे.
डॉ० शशांक – धन्यवाद, सर. ही दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन- तीन फरक आहेत. पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. आणि हे जे उत्परिवर्तन किंवा म्युटेशन वगैरेबाबत बोललं जातं, त्यामुळे घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. हे म्युटेशन्स होत राहतात अगदी आपण जसं कपडे बदलतो तसे विषाणुही आपलं रूप बदलत असतात आणि त्यामुळे मुळीच घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही या लाटेला परतवून लावू. लाटा येत जात राहतात आणि विषाणुही येत जात असतात आणि त्यांची लक्षणं वेगवेगळी असतात. वैद्यकीय दृष्ट्या आम्हाला सतर्क रहाण्याची गरज आहे. कोविडचा 14 ते 21 दिवसांचा कालावधी असून त्यात आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलं पाहिजे.
मोदी जीः डॉ. शशांक, आपण जे विश्लेषण सांगितलं, ते माझ्यासाठीही खूप महत्वाचं आहे. मला खूप पत्रं आली असून त्यात उपचारांबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. औषधांची मागणी काहीशी जास्त प्रमाणात आहे. म्हणून आपण कोविडवरील उपचारांबाबतही लोकांना माहिती द्यावी, असं मला वाटतं.
डॉ० शशांकः हां सर. लोक खूप उशिरानं क्लिनिकल उपचार सुरू करतात आणि आपोआप आजार जाईल, अशा विश्वासावर रहातात. तसंच मोबाईलवर येणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवतात. आणि, जर सरकारच्या कडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन केलं तर या संकटाचा सामना करण्याची वेळच येत नाही. कोविडमध्ये क्लिनिकल उपचारांबाबत नियमावली आहे आणि त्यात तीन प्रकारच्या तीव्रतेनुसार म्हणजे सौम्य कोविड, मध्यम किंवा माफक प्रमाणातला कोविड आणि तीव्र कोविड ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी हे नियम आहेत. जो सौम्य कोविड आहे,त्यासाठी आम्ही ऑक्सिजनवर नजर ठेवून असतो, तापावर देखरेख करत असतो आणि ताप वाढला तर पॅरासिटॅमॉलसारख्या औषधाचा वापर करतो. सौम्य कोविड किंवा मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचा असला तरीही, आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कोविड कोणत्याही स्वरूपाचा असला तरीही आपल्या डॉक्टरशी संपर्क ठेवणं खूप आवश्यक आहे. अगदी अचूक आणि स्वस्त औषधंही उपलब्ध आहेत. यामध्ये उत्तेजक म्हणजे स्टेरॉईड आहे, जे जीव वाचवू शकते. इनहेलर देता येतं तसंच टॅबलेटही देता येतात आणि त्याबरोबरच प्राणवायु द्यावा लागतो आणि त्यासाठी लहान लहान स्वरूपाचे उपचार आहेत. परंतु हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडेसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात राहण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं. ज्यांना प्राणवायुची आवश्यकता आहे,ते रूग्णालयात दाखल होतात. परंतु डॉक्टर सांगतील तेव्हाच बाहेरून प्राणवायु घेतला पाहिजे. लोकांनी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्राणायाम केला, आपल्या शरिरातल्या फुफ्फुसांना जरासं विस्तारित केलं, आणि शरिरातलं रक्त पातळ करणारी जी इंजेक्शन्स येतात, ती घेतली, ज्यांना आम्ही हेपरिन म्हणतो, या छोट्या छोट्या औषधांनीही 98 टक्के रूग्ण बरे होतात. शिवाय, लोकांनी सकारात्मक रहाणंही खूप आवश्यक आहे. उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महागड्या औषधांच्या मागं धावण्याची काहीच गरज नाही सर.
आपल्याकडे चांगले उपचार सुरू आहेत. प्राणवायु आहे, व्हेंटीलेटरची सुविधाही आहे आणि सर्व काही आहे. आणि जेंव्हा केंव्हा ही औषधे मिळतील तेंव्हा ती पात्र लोकांनाच दिली गेली पाहिजेत. आपल्याकडे याबाबतीत खूप गैरसमज पसरवले जात आहेत. यासाठी, आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत, हे मी स्पष्ट करु इच्छितो. आपण पाहू शकता की, भारतात रूग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) सर्वात चांगला आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत सर.
मोदी जीः डॉ. शशांक, आपले खूप खूप धन्यवाद. डॉ. शशांक यांनी जी माहिती आपल्याला दिली, ती खूप आवश्यक आहे आणि आपल्या सर्वांना उपयुक्त ठरेल.
मित्रांनो, आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल किंवा कोणतीही शंका असेल तर ती योग्य व्यक्तिकडूनच ती माहिती घ्या. आपले फॅमिली डॉक्टर्स असतील किवा आसपास जे डॉक्टर्स असतील, त्यांच्याकडून दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घ्या. आमचे खूप सारे डॉक्टर्स स्वतःच ही जबाबदारी घेत आहेत, हे ही मी पहात आहे. काही डॉक्टर्स समाजमाध्यमांच्या द्वारे लोकांना माहिती देत आहेत. फोनवर किंवा व्हॉट्सअपवर लोकांचे समुपदेशन करत आहेत. अनेक रूग्णालयांच्या वेबसाईट आहेत ज्यावरही माहिती उपलब्ध आहे. तेथे आपण डॉक्टर्सकडून सल्लाही घेऊ शकता, हे खूप प्रशंसनीय आहे.
माझ्या समवेत श्रीनगरचे डॉक्टर नाविद शाह जोडले गेले आहेत. डॉक्टर नाविद हे श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. नाविदजी यांनी आपल्या देखरेखीखाली अनेक कोरोना रूग्णांना बरं केलं आहे आणि रमजानच्या या पवित्र महिन्यातही डॉ. नाविद आपलं कार्य करत आहेत. त्यांनी आमच्याशी बातचीत करण्यासाठी वेळ काढला आहे. त्यांच्याशी आता चर्चा करू या.
मोदी जीः नाविद जी, नमस्कार.
डॉ. नावीदः नमस्कार सर |
मोदी जीः डॉक्टर नाविद, मन की बातच्या आमच्या श्रोत्यांनी या बिकट प्रसंगी घबराट व्यवस्थापन म्हणजे पॅनिक मॅनेजमेंटचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपण आपल्या अनुभवानुसार त्यांना काय सांगाल?
डॉ. नावीदः जेंव्हा कोरोना महामारी सुरू झाली तेव्हा सर्वप्रथम जे रूग्णालय कोविड़साठी विशेष रूग्णालय म्हणून नियुक्त करण्यात आलं, ते आमचं सिटी हॉस्पिटल होतं. जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येतं. त्यावेळेस एक दहशतीचं वातावरण होतं. कोविडचां संसर्ग ज्याला होतो, त्याच्यासाठी हे मृत्युचं आमंत्रणच आहे, असं लोक मानायचे आणि आमच्या रूग्णालयातले डॉक्टर आणि निम वैद्यकीय कर्मचार्यांमध्येही अशा रूग्णांना आम्ही सामोरं कसं जायचं, आम्हाला संसर्ग होण्याचा धोका तर नाहि, अशी दहशत होती. जसा काळ गेला तसं आम्ही पाहिलं की, संपूर्ण प्रकारचं संरक्षक साधनं आम्ही वापरून सुरक्षेची खबरदारी घेतली, तर आम्ही सुरक्षित राहू शकतो आणि आमचे बाकी कर्मचारीही सुरक्षित राहू शकतात. पुढे तर आम्ही पाहिलं की, काही रूग्ण किंवा जे आजारी लोक होते ते असिम्प्टोमॅटिक म्हणजे त्यांच्यात कोविडची कसलीच लक्षणं नव्हती. जवळपास 90 ते 95 टक्के उपचाराविनाही ठीक होतात, हेही आम्ही पाहिलं आणि जसा काळ गेला तसा लोकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत जी एक भीती होती ती खूपच कमी झाली. आज आमच्याकडे कोरोनाची दुसरी लाट आली आहे. परंतु यावेळीही आम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाहि. यावेळीही जे संरक्षक उपाय आहेत, मास्क वापरणं, सॅनिटायझरनं हात सतत धुणं आणि शारिरिक अंतर राखणं किंवा सामाजिक मेळावे टाळणं अशी जी आदर्श कार्यप्रणाली आहे तिचं पालन केलं तर आम्ही आपलं दैनंदिन काम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो आणि या आजारापासून संरक्षणही प्राप्त करू शकतो.
मोदी जीः डॉ. नाविद, लसीबाबतही लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. लसीपासून कितपत सुरक्षा मिळेल, लस घेतल्यानंतर किती प्रमाणात आश्वस्त राहू शकतो? आपण याबाबतीत काही सांगितलं तर श्रोत्यांना त्याचा खूप फायदा होईल.
डॉ० नावीदः आपल्याकडे कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं तेव्हापासून आजपर्यत आमच्याकडे कोविड-19 साठी कोणतेही परिणामकारक उपचार उपलब्ध नाहित. म्हणून, आम्ही या आजाराशी दोन प्रकारे लढा देऊ शकतो. एक म्हणजे प्रमुख संरक्षक उपाय आणि आम्ही प्रथमपासून हेच सांगत आलो आहोत की, जर एखादी परिणामकारक लस आमच्याकडे आली तर या आजारापासून आम्हाला मुक्ती मिळू शकते. यावेळी आमच्या देशात कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लस उपलब्ध आहेत. या दोन्ही लस याच देशात तयार झाल्या आहेत. आणि ज्या कंपन्यांनी ज्या चाचण्या घेतल्या आहेत, त्यातून असं पाहिलं गेलं आहे की, त्यांची परिणामकारकता 60 टक्क्याहून अधिक आहे. आणि जम्मू आणि काश्मीरबाबत बोलायचं तर, आमच्या केंद्रशासित प्रदेशात आतापर्यंत 15 ते 16 लाख लोकांनी लस घेतली आहे. एक आहे की, समाजमाध्यमांमध्ये या बद्दल खूप गैरसमज आहेत किंवा गृहितकं आहेत. लस घेतल्यानं दुष्परिणाम होतात वगैरे. तर आमच्याकडे ज्यांनी लस टोचून घेतली आहे, त्यांच्यात काहीही दुष्परिणाम दिसलेले नाहित. कोणत्याही नेहमीच्या लसीसोबत जे परिणाम संबंधित असतात म्हणजे ताप येणं, संपूर्ण अंगदुखी किंवा जेथे इंजेक्शन टोचलं जातं त्या भागात वेदना होणं हे दुष्परिणाम प्रत्येक रूग्णाच्या बाबतीत पाहिले आहेत. परंतु एकंदरीत कोणतेही विपरित परिणाम आम्ही पाहिलेले नाहित. दुसरी गोष्ट म्हणजे, काही लोक लसीकरणाच्या नंतर कोविड पॉझिटिव्ह झाले. याबाबतीत तर कंपन्यांनीच मार्गदर्शक तत्वांमध्ये जाहिर केलं आहे की, जर लस टोचून घेतल्यानंतर कुणाला संसर्ग झाला तर तो पॉझिटिव्ह असू शकतो. परंतु, त्या रूग्णांमध्ये आजाराची जी तीव्रता आहे ती तितकीशी रहाणार नाही म्हणजे ते पॉझटीव्ह असू शकतात परंतु तो आजार जीवघेणा सिद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे लसीबाबत जो आमच्या मनात गैरसमज आहे तो आपण काढून टाकला पाहिजे. आणि जे जे पात्र ठरतील त्यांनी लस टोचून घेतली पाहिजे. कारण एक मे नंतर देशात 18 वर्षावरील प्रत्येकाला लस टोचण्याचा कार्यक्रम सुरू होईल. म्हणून लोकांना हेच आवाहन करेन की, आपण लस टोचून घ्या आणि स्वतःला सुरक्षित करून घ्या. त्यामुळे एकंदरीत आमचा समाज, आमचा समुदाय कोविड-19 संसर्गापासून संरक्षित होईल.
मोदी जीः डॉ. नाविद, आपल्याला खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला रमजानच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा.
डॉ० नाविद: खूप खूप धन्यवाद.
मोदी जीः मित्रांनो, कोरोनाच्या या संकट काळात लसीचं महत्व तर सगळ्यांनाच पटलं आहे. म्हणून, लसीच्या बाबतीत कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असा माझा आग्रह आहे. आपल्याला सर्वांना माहितच असेल की, भारत सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता तर एक मेपासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे. आता देशातलं कॉर्पोरेट क्षेत्र, कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची मोहिम राबवण्यातील भागीदारीचं पालन करू शकतील. भारत सरकारकडून जो विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, तो पुढेही चालूच राहिल, हे ही मला सांगायचं आहे. माझा राज्यांना आग्रह आहे की, त्यांनी भारत सरकारच्या या विनामूल्य लसीकरण मोहिमेचा फायदा आपल्या राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावा.
मित्रांनो, आजाराच्या काळात, आपली तसंच आमच्या कुटुंबाची देखभाल करणं मानसिक स्तरावर किती अवघड असतं, हे आपणा सर्वाना माहितच आहे. परंतु, आमच्या रूग्णालयातील परिचारिकांना तर हेच काम सातत्यानं, अनेक रूग्णांसाठी एकाचवेळेस करावं लागतं. हा सेवाभाव आमच्या समाजाची खूप मोठी शक्ति आहे. परिचारिका ज्या प्रकारची सेवा देतात आणि कठोर कष्ट करतात, त्याबाबतीत तर सर्वात चांगल्या प्रकारे एखादी परिचारिकाच सांगू शकेल. म्हणून, मी रायपूरच्या डॉ. बी आर आंबेडकर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये सेवारत असलेल्या सिस्टर भावना ध्रुवजी यांना मन की बातमध्ये निमंत्रित केलं आहे. त्या अनेक कोरोना रूग्णांची शुश्रुषा करत आहेत. आता त्यांच्याशी बोलू या.
मोदी जीः नमस्कार भावना जी!
भावना: आदरणीय प्रधानमंत्री जी, नमस्कार !
मोदी जी: भावना जी...
भावना:- येस सर
मोदी जी: मन की बात ऐकणाऱ्यांना आपण हे सांगा की, आपल्या कुटुंबात इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच मल्टीटास्क करत असताना आपण कोविड रूग्णांच्या शुश्रुषेचं काम करत आहात. कोरोना रूग्णांबाबतीत आपला अनुभव देशवासियांना ऐकायला आवडेल कारण सिस्टर किंवा परिचारिका ही रूग्णाच्या सर्वात जवळ शिवाय सर्वात दीर्घकाळ असते. प्रत्येक गोष्ट ती बारकाईने समजून घेऊ शकते.
भावना: जी सर, कोविडच्या संदर्भात माझा एकूण अनुभव दोन महिन्यांचा आहे. आम्ही 14 दिवस ड्युटी करतो आणि 14 दिवस आम्हाला विश्रांती दिली जाते. नंतर दोन महिन्यांनी आमची कोविडची ड्युटी पुन्हा लावली जाते. जेंव्हा सर्वप्रथम माझी कोविड ड्युटी लागली तेव्हा मी आपल्या कुटुंबातील लोकांना कोविड ड्युटीबाबत सांगितलं. मे महिन्यातली ही गोष्ट आहे आणि मी जसं हे सांगितलं तसं सर्वजण घाबरले. व्यवस्थित काम कर, असं मला बजावत होते. तो एक भावनात्मक क्षण होता, सर. जेंव्हा माझी मुलगी मला म्हणाली, “ममा आप कोविड ड्युटीवर जा रहे हो”, तेंव्हा तो क्षण माझ्यासाठी खूपच भावनिक होता. परंतु, जेंव्हा मी कोविड रूग्णाच्या जवळ गेले तेंव्हा एक जबाबदारी घरी सोडून आले. जेंव्हा मी कोविड रूग्णाला भेटले तेंव्हा ते सर्वात जास्त घाबरले होते. कोविडच्या नावानेच सारे रूग्ण इतके घाबरले होते सर की, आपल्याला हे काय होत आहे, आपलं पुढे काय होणार आहे. हेच त्यांना समजत नव्हते. त्यांची भीती दूर करण्यासाठी आम्ही त्यांना एक चांगलं आरोग्यदायी वातावरण तयार केलं सर. आम्हाला जेव्हा कोविड ड्युटी करायला सांगण्यात आलं तेव्हा सर्वप्रथम आम्हाला पीपीई किट घालण्यास सांगण्यात आलं सर, पीपीई किट घालून काम करणं खूपच अवघड आहे. सर, आमच्यासाठी हे सारं खूप अवघड होतं, मी दोन महिन्याच्या ड्युटीमध्ये चौदा चौदा दिवस वॉर्डात, आयसीयू मध्ये आणि आयसोलेशनमध्ये ड्युटी केली, सर.
मोदी जी: म्हणजे एकूण आपण एक वर्षापासून याच प्रकारचे काम करत आहात.
भावना: येस सर. तिथं जाण्यापूर्वी मला माझे सहकारी कोण आहेत, हे माहित नव्हतं. आम्ही एका टीमप्रमाणे काम केलं. त्यांचे जे प्रश्न होते, ते सांगितले. आम्ही रूग्णांच्या बाबतीतील माहिती घेतली आणि त्यांच्यातील गैरसमज दूर केले. अनेक लोक कोविडच्या नावानेच घाबरत असत. जेंव्हा आम्ही त्यांची केस हिस्टरी घेत असू तेव्हा त्यांच्यात आम्हाला लक्षणं दिसत होती परंतु भीतीपोटी ते आपली चाचणी करायला धजावत नव्हते. तेंव्हा आम्ही त्यांना समजावून सांगत होतो आणि सर, जेंव्हा आजाराची तीव्रता वाढायची, तेव्हा त्यांची फुफ्फुसं संसर्गित झालेली असत. त्यांना आयसीयूची गरज लागे आणि तेंव्हा ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह येत. एक दोन प्रकरणात आम्ही हे पाहिलं सर आणि प्रत्येक वयोगटाबरोबर आम्ही काम केलं सर. ज्यात लहान मुलं होती, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक, सर्व प्रकारचे रूग्ण होते. त्या सर्वांशी आम्ही बोललो तेव्हा सर्वांनी हेच सांगितलं की, घाबरल्यामुळे आम्ही आलो नाही. सर्वांकडून आम्हाली हीच उत्तरं मिळाली सर. आम्ही त्याना समजावून सांगितलं की, भीती वगैरे काही नसते आणि आपण आम्हाला साथ द्या, आम्ही आपल्याला मदत करू. बस आपण कोविडच्या नियमावलीचं पालन करा आणि आम्ही त्यांच्याकडून हे करून घेऊ शकलो सर.
मोदी जीः भावना जी, आपल्याशी बोलल्यामुळे मला खूप छान वाटलं. आपण खूप चांगली माहिती दिली आहे. आपल्या स्वतःच्या अनुभवावरून दिली आहे. त्यामुळे देशवासियांना यातून एक प्रकारचा सकारात्मकतेचा संदेश जाईल . आपल्याला खूप खूप धन्यवाद भावना जी.
भावनाः धन्यवाद सर. जय हिंद सर.
भावना जी, नर्सिंग स्टाफचे आपल्यासारखेच लाखो बंधुभगिनी आपलं कर्तव्य अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत. आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या परिवाराचींही काळजी घ्या.
मित्रांनो, आपल्या सोबत आता बंगळूरू इथल्या सिस्टर सुरेखा जी आहेत. सुरेखा जी के सी सामान्य रुग्णालयात वरिष्ठ परिचारिका अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चला, त्यांचे अनुभवही जाणून घेऊया.
मोदीजी: नमस्कार सुरेखा जी
सुरेखा: देशाच्या पंतप्रधानांसोबत बोलण्याची संधी मला मिळाली. याचा मला अभिमान वाटतो आणि हा मी माझा गौरव समजते.
मोदीजी:सुरेखा जी, आपण आपल्या सहकारी परीचारिकांसोबत तसंच रुग्णालयातल्या इतर कर्मचाऱ्यांसोबत अत्यंत उत्कृष्ट काम करत आहात. भारत तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. कोविड-19 विरुद्धच्या या लढाईत देशातल्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल?
सुरेखा: हो सर. एक जवाबदार नागरिक म्हणून मला सर्वांना नक्कीच सांगयला आवडेल की, तुमच्या शेजाऱ्यांशी प्रेमाने वागा तसंच लवकर चाचण्या आणि संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांचा शोध आपल्याला मृत्यू दर कमी करण्यात नक्कीच मदत करेल. तसंच जर तुम्हाला कोविडची लक्षणं आढळली, तर स्वतःला वेगळं करा आणि जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन जितक्या लवकर शक्य आहे, तितक्या लवकर उपचार सुरु करा. सर्व लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती होणं गरजेचं आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. घाबरू नका आणि कुठलाच तणावही घेऊ नका. यामुळे रुग्णाची स्थिती आणखी ढासळू शकते. आणि आमच्या सरकारचे आभारी आहोत आणि आपल्या देशात लस उपलब्ध झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. मी स्वतः लस घेतली आणि माझ्या अनुभवावरून मला भारताच्या सर्व नागरिकांना सांगायचं आहे की कोणतीही लस तुमचं लगेचच 100% संरक्षण करू शकत नाही. आपल्यात रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हायला वेळ लागतो. लस घ्यायला अजिबात घाबरू नका. स्वतःचं लसीकरण करून घ्या. त्याचे अगदी किरकोळ दुष्परिणाम होतात आणि मला आणखी एक संदेश द्यायचा आहे की, घरी राहा, निरोगी राहा, आजारी लोकांसोबत संपर्क टाळा तसंच गरज नसताना नाक, डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका. शारीरिक अंतराचे नियम पाळा, मास्क योग्य प्रकारे लावा. आपले हात नियमितपणे स्वच्छ धुवा. आणि आपण घरी जे उपाय करू शकता ते अवश्य करा. आयुर्वेदीक काढा प्या, वाफ घ्या आणि दररोज गुळण्या करा. तसंच श्वसनाचे व्यायाम देखील तुम्ही करू शकता. आणखी एक शेवटची, मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कोरोना योद्धे आणि वैद्यकीय व्यावासायिकांबद्दल सहानुभूती असू द्या. आम्हाला आपला पाठिंबा आणि सहकार्याची गरज आहे. आपण एकत्र लढूया. आपण या महामारीतून निश्चित बाहेर पडू. हाच माझा लोकांसाठी संदेश आहे सर.
मोदीजी: धान्यवाद सुरेखा जी.
सुरेखा: धन्यवाद सर.
सुरेखाजी, खरंच या अत्यंत कठीण प्रसंगी आपण नेटाने मोर्चा सांभाळला आहे. आपण आपली काळजी घ्या आपल्या कुटुंबालाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. मी सर्व देशबांधवांनाही आग्रह करेन की, जसं भावना जी, सुरेखा जी यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं आहे, तसं कोरोनाशी लढण्यासाठी सकारात्मक उर्जा अत्यंत आवश्यक आहे. आणि देशबांधवांना ही ऊर्जा कायम ठेवायची आहे.
मित्रांनो,
डॉक्टर्स आणि परिचारिकांसोबतच या काळात प्रयोगशाळेतले तंत्रज्ञ आणि रुग्णवाहिकांचे चालक यांच्यासारखे पहिल्या फळीतले कोरोना योद्धे ही देवाप्रमाणेच काम करत आहेत. जेंव्हा एखादी रुग्णवाहिका रूग्णांना घ्याला येते, तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेचा चालक देवदूतासारखाच वाटतो. हे सर्व लोक करत असलेल्या सेवांविषयी, त्यांच्या अनुभवांविषयी देशाला नक्कीच कळायला हवं. माझ्यासोबत आता असेच एक सज्जन आहेत. श्री प्रेम वर्मा जी. हे एक रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या नावावरूनच जसं आपल्याला कळतं
तसं प्रेम वर्मा जी आपलं काम, आपलं कर्तव्य अत्यंत प्रेमानं आणि चिकाटीनं करत असतात. चला, आपण त्यांच्याशी बोलूया.
मोदी जी: नमस्कार प्रेमजी.
प्रेम जी: नमस्ते सर.
मोदी जी: भाई प्रेम
प्रेम जी: हो सर..
मोदी जी: आपण आपल्या कार्याविषयी...
प्रेम जी: हां सर...
मोदी जी: जरा विस्तारानं सांगा. आपल्याला जे अनुभव येतात ते ही सांगा.
प्रेम जी: सर, मी CATS रुग्णवाहिकामध्ये चालक म्हणून काम करतो. नियंत्रण कक्षातून जसा आमच्या टॅब वर कॉल येतो. 102 क्रमांकावरून जेंव्हा फोन येतो, त्यावेळी आम्ही आमच्या रुग्णाकडे जातो. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सातत्यानं हे काम करतो आहोत. आपली कीट घालून, हात मोजे, मास्क घालून रुग्णांना, ते जिथे घेऊन जायला सांगतात, मग ते कोणतेही रुग्णालय असो, आम्ही लवकरात लवकर त्यांना तिथे पोहोचवतो.
मोदी जी: आपण तर लसींच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील.
प्रेम जी: हो, नक्कीच सर.
मोदी जी: मग इतरांनी ही लस घ्यावी यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल?
प्रेम जी: हो सर, नक्कीच. सर्वांना लसीच्या मात्रा घ्यायला हव्यात. आपल्या कुटुंबासाठी हे लसीकरण हिताचेच आहे. आता माझी आई मला म्हणत असते की ही नोकरी सोडून दे. मी सांगितलं, आई, मी जर नोकरी सोडून घरी बसलो, तर सगळीकडे रुग्णांना सोडायला कोण जाणार? कारण आता कोरोना काळात तर सगळेच दूर पळताहेत. सगळे नोकरी सोडून जात आहेत. आई मलाही म्हणत असते की बेटा ही नोकरी सोडून दे. मात्र मी सांगितलं, आई मी नोकरी नाही सोडणार.
मोदी जी –प्रेम जी, आपल्या आईचे मान नाराज करु नका, त्यांना समजून घ्या.
प्रेम जी- हो, सर.
मोजी जी – पण ही जी आईची गोष्ट तुम्ही सांगितलीत ना....
प्रेम जी – हो सर,
मोदी जी –ती मनाला स्पर्शून जाणारी आहे.
प्रेम जी –हो, सर.
मोदी जी –आपल्या आईंनाही.....
प्रेम जी – हो सर,
मोदी जी- माझा नमस्कार सांगा.
प्रेम जी – बिलकूल !
मोदी जी – हो...
प्रेम जी – हो सर...
मोदी सर- आणि प्रेम जी, आपल्या माध्यमातून...
प्रेम जी—हो सर,
मोदी जी—हे रुग्णवाहिका चालवणारे सगळे चालक देखील ....
प्रेम जी—हो ...
मोदी जी --किती मोठा धोका पत्करून काम करत आहेत.
प्रेम जी---हो सर
मोदी जी —आणि प्रत्येकाची आई काय विचार करत असेल?
प्रेम जी –बिलकूल सर
मोदी जी—जेव्हा आपल्या श्रोत्यांपर्यंत हे तुमचं हे बोलणं पोहोचेल..
प्रेम जी—हो सर,
मोदी जी—मला निश्चित वाटतं की त्यांच्याही मनाला ही गोष्ट स्पर्शून जाईल.
प्रेम जी—हो सर..
मोदी जी—प्रेम जी, खूप खूप धन्यवाद ! आपण एकप्रकारे प्रेमाची गंगाच पुढे नेत आहात...
प्रेम जी –धन्यवाद सर !
मोदी जी- धन्यवाद भाऊ..
प्रेम जी—धन्यवाद !!
मित्रांनो,
प्रेम वर्मा जी आणि त्यांच्यासारखे हजारो लोक आज आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची सेवा करत आहेत. कोरोना विरुध्दच्या या लढाईत जितकी आयुष्ये वाचवली जात आहेत, त्यात या रुग्णवाहिका चालकांचेयोगदान खूप मोठे आहे.
प्रेम जी, आपल्याला आणि देशभरातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना मी खूप खूप साधूवाद देतो. आपण वेळेवर पोहोचत रहा, असेच लोकांचे जीव वाचवत रहा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, हे खरे आहे की सध्या कोरोनाचा संसर्ग खूप लोकांना होतो आहे. मात्र, कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांची संख्या देखील तितकीच जास्त आहे.
गुरूग्रामच्या प्रीती चतुर्वेदी जी यांनी अलीकडेच कोरोनावर मात केली आहे. प्रीती जी, ‘मन की बात’ मध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आल्या आहेत. त्यांचे अनुभव आपल्याला खूप उपयोगी पडतील.
मोदी जी-प्रीती जी, नमस्कार !
प्रीती—नमस्कार सर. कसे आहात आपण?
मोदी जी—मी तर ठीक आहे. सर्वात आधी मी कोविड-19 वर ...
प्रीती—जी
मोदी जी—यशस्वीपणे मात मिळवल्याबद्दल ..
प्रीती –जी
मोदी जी—आपलं कौतुक करतो.
प्रीती – धन्यवाद सर !
मोदी जी—आपले आरोग्य लवकरच सुदृढ, निरोगी व्हावे,याच शुभेच्छा !
प्रीती – धन्यवाद सर !
मोदी जी—प्रीती जी,
प्रीती—हो सर
मोदी जी—या कोविड लाटेत केवळ आपल्याला संसर्ग झाला की आपल्या कुटुंबांतल्या इतर व्यक्तीनांही त्याची बाधा पोहोचली?
प्रीती—नाही नाही सर, मला एकटीलाच संसर्ग झाला होता.
मोदी जी- चला, देवाची कृपा झाली. अच्छा, माझी अशी इच्छा आहे...
प्रीती—हो सर..
मोदी जी—की आपण जर आपल्या या त्रासाच्या काळातले काही अनुभव लोकांना सांगितले, तर कदाचित जे श्रोते आहेत, त्यांनाही अशा वेळी आपल्या स्वतःला कसं सांभाळायचं याविषयी मार्गदर्शन मिळू शकेल.
प्रीती—हो सर, नक्कीच ! सर सुरुवातीला मला खूप आळस... सुस्त सुस्त वाटतहोतं. त्यानंतर, माझ्या गळ्यात थोडीशी खवखव जाणवायला लागली. त्यावेळी, माझ्या असं लक्षात आलं की ही लक्षणे वाटताहेत, त्यामुळे मग मी चाचणी करुन घेतली आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आल्यावर मी पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. मग मी स्वतःला सर्वांपासून विलग केलं. एका वेगळ्या खोलीत गेले. डॉक्टरांचा सल्ला घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे सुरु केली.
मोदी – म्हणजे आपल्या या तत्परतेमुळे आपले कुटुंबीय सुरक्षित राहिले.
प्रीती- हो सर, इतरांचीही नंतर चाचणी केली. ते सगळे निगेटिव्ह होते. मी एकटीच पॉझिटिव्ह आले होते. आणि आधीच मी स्वतःला आयसोलेट केलं होतं, एका वेगळ्या खोलीत.
मला आवश्यक ते सगळं सामान ठेवून घेत,मी स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं होतं. त्यासोबतच मी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपाचार पण सुरु केले होते. सर, मी या औषधोपचारांसह योगाभ्यास, आयुर्वेदिक उपचारही सुरु केले होते.आणि त्यासोबतच, मी काढाही घ्यायला सुरुवात केली होती. माझी रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी सर, मी जेंव्हाही जेवत असे, त्यावेळी सकस अन्न घेत असे. प्रथिनयुक्त पदार्थ खात असे. मी खूप द्रवपदार्थ ही खात होते. मी वाफ घेत होते, गुळण्या करत होते आणि गरम पाणी पीत होते. रोज दिवसभर मी हेच सगळं करत होते. आणि सर, या दिवसांबद्दल सांगायचं ना, तर एक सर्वात मोठी गोष्ट मला सांगायची आहे ती अशी-, की अजिबात घाबरू नका. मानसिक शक्ती मजबूत असू द्यात. आणि यासाठी मला योगाभ्यासाची, श्वसनाच्या व्यायामांची खूपच मदत झाली. मला ते सगळं करतानांच खूप छान वाटत असे.
मोदी जी—हो. अच्छा,प्रीती जी, आता जेंव्हा तुमची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, आपण संकटांतून बाहेर पडलात ना ?
प्रीती – हो सर...
मोदी जी—मग आता आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय करताय?
प्रीती- सर, एकतर मी योगाभ्यास बंद केलेला नाही.
मोदी जी- हो..
प्रीती—त्यासोबतच, मी काढाही घेते आणि माझी रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी मी अजूनही उत्तम सकस आहार घेते आहे.
मोदी जी—हो, बरोबर
प्रीती—आधी मी स्वतःच्या प्रकृतीकडे फार दुर्लक्ष करत असे. आता मात्र मी त्याकडे नीट लक्ष देते.
मोदी जी—धन्यवाद प्रीती जी!
प्रीती—धन्यवाद सर !
मोदी जी—आपण आता जी माहिती आणि आपला अनुभव सांगितला तो अनेकांना उपयोगी पडेल असे मला वाटते. आपण निरोगी रहा, आपल्या कुटुंबातले लोक निरोगी राहावेत, यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले लोक, पहिल्या फळीत काम करणारे सर्व कर्मचारी, अहोरात्र सेवाकार्य करत आहेत. तसेच, समाजातले इतर लोकही, या काळात कुठेहही मागे नाहीत. देश पुन्हा एकदा एकजूट होऊन कोरोनाविरुध्द लढा देत आहेत. आजकाल मी पाहतो,
कोणी विलगीकरणात असलेल्या कुटुंबांपर्यंत औषधं पोहोचवत आहेत. कोणी भाज्या, दूध, फळे अशा गोष्टी पोहचवत आहेत. कोणी मोफत रुग्णवाहिका सेवा रूग्णांना देत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून या आव्हानात्मक काळात देखील अनेक स्वयंसेवी संस्था पुढाकार घेऊन इतरांची मदत करण्यासाठी जे जे करु शकतात, ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी, गावांमध्ये देखील नवी जागृती दिसते आहे. कोविड नियमांचं पालन कठोर पालन करत लोक आपापल्या गावांचं कोरोनापासून रक्षण करत आहेत. जे लोक बाहेरून येत आहेत, त्यांच्यासाठी योग्य त्या व्यवस्था तयार केल्या जात आहेत. शहरात देखील अनेक युवक मैदानात उतरले आहेत. ते आपापल्या भागात, कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी, स्थानिक रहिवाशांसोबत प्रयत्न करत आहेत. म्हणजे एकीकडे देश, दिवसरात्र रुग्णालये, व्हेंटीलेटर्स आणि औषधांसाठी काम करत आहे, तर दुसरीकडे, देशबांधव देखील प्राणपणाने कोरोनाच्या या आव्हानाचा सामना करत आहेत. ही भावना आपल्याला किती बळ देते ! केवढा विश्वास निर्माण करते. हे जे सगळे प्रयत्न सुरु आहेत, ते समाजाची खूप मोठी सेवा आहे. यातून समाजाची शक्ती वाढत असते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज ‘मन की बात’ मधली पूर्ण चर्चा आपण कोरोना महामारीवरच घेतली. कारण, आज आपली सर्वात मोठी प्राथमिकता आहे, या आजारावर मात करणे. आज भगवान महावीर जयंती देखील आहे. यानिमित्त मी सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो. भगवान महावीरांची शिकवण आपल्याला तप आणि आत्मसंयमाची प्रेरणा देते. सध्या रमझानचा पवित्र महिनाही सुरु आहे. पुढे बुद्धपौर्णिमा आहे. गुरु तेगबहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व देखील आहे. आणखी एक महत्वाचा दिवस म्हणजे- पोचीशे बोईशाक- टागोर जयंतीचा दिवस आहे. हे सगळे उत्सव आपल्याला प्रेरणा देतात.
आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची प्रेरणा देतात. एक नागरिक म्हणून आपण आपल्या आयुष्यात जेवढ्या कौशल्याने आपली कर्तव्ये पार पाडू, तेवढ्या लवकर आपण संकटातून मुक्त होत भविष्याच्या आपल्या मार्गांवर तितक्याच वेगाने आपण पुढे जाऊ. याच कामनेसह, मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रह करतो की लस आपण सर्वांनी घ्यायची आहे आणि पूर्णपणे सतर्कही राहायचं आहे. ‘औषधही –अनुशासन ही’. हा मंत्र कधीही विसरायचा नाही. आपण सगळे एकत्रितपणे या संकटातून बाहेर पडणार आहोत. याच विश्वासासह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद ! नमस्कार !!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! यावेळी, जेव्हा मी, 'मन की बात' साठी आलेली पत्रे, टिप्पण्या/ सूचना तसेच मिळालेली वेगवेगळी माहिती ह्यावर नजर टाकत होतो तेव्हा बऱ्याच लोकांनी एका महत्वाच्या गोष्टीची आठवण केली.
‘मायगव्ह’ येथे आर्यन श्री, बंगलोर येथील अनुप राव, नोएडाचे देवेश, ठाणे येथील सुजित, हे सर्वजण म्हणाले,” मोदी जी, यावेळी ‘मन की बात’चा 75 वा भाग आहे. ह्याबद्दल आपले अभिनंदन”.
मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो, तुम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवले आहे आणि 'मन की बात'चे अनुसरण केले आहे. ‘मन की बात’ शी जोडलेले राहिला आहात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कडून आपल्याला तर धन्यवाद आहेतच, मी ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांचे आभार मानतो. कारण आपल्या साथी शिवाय हा प्रवास शक्य नव्हता. असं वाटतंय..जणू ही आत्ता आत्ता आत्ताची गोष्ट आहे, जेव्हा आपण सर्वांनी एकत्रितपणे हा वैचारिक प्रवास सुरू केला होता.
तेव्हा 3 ऑक्टोबर 2014 ला ‘विजयादशमी’ हा पवित्र सण होता आणि योगायोग पहा की आज, ‘होलिका दहन’ आहे. “ दिव्याने व्हावा दुसरा दिवा प्रज्वलित, आपले राष्ट्र व्हावे उज्वल, प्रकाशित.” ह्याच भावनेनें आपण हा मार्ग चालतो आहोत.
आपण देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोललो, त्यांच्या विलक्षण कामांबद्दल जाणून घेतले. आपल्यालाही अनुभव आला असेल की देशाच्या दूरदूरच्या कोपऱ्यातही किती अभूतपूर्व क्षमता दडलेली आहे! भारत मातेच्या कुशीत कशी कशी रत्ने घडत आहेत! हा समाजाकडे बघण्याचा, समाजाला जाणून घेण्याचा, समाजाचे सामर्थ्य ओळखण्याचा माझ्यासाठी देखील एक अद्भुत अनुभव होता.
ह्या 75 भागांमध्ये आपण किती-किती विषय घेतले? कधी नदीची गोष्ट तर कधी हिमालयाच्या शिखरांची गोष्ट, कधी बाब वाळवंटाची तर कधी नैसर्गिक आपत्तीची, कधी कधी मानवी सेवेच्या असंख्य कथांचा साक्षात्कार तर कधी तंत्रज्ञानाचा अविष्कार, कधी तरी अज्ञात कोपऱ्यातील एखाद्याच्या, काही नवे करून दाखवण्याच्या अनुभवाची गोष्ट.
आता तुम्हीच पाहा ना , ती स्वच्छतेची गोष्ट असेल, आपला वारसा जतन करण्याची चर्चा असेल, एवढेच नव्हे तर, खेळणी बनविण्याची गोष्ट असेल, काय काय नव्हते ह्यात? आपण ज्या विषयांना स्पर्श केला आहे, तेसुद्धा असंख्य आहेत.
या काळात आपण वेळोवेळी थोर व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली, ज्यांनी भारत घडविण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांच्याविषयी जाणून घेतले. आपण बर्याच जागतिक मुद्द्यांवर देखील बोललो आहोत, त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तुम्ही मला बर्याच गोष्टी सांगितल्या, अनेक कल्पना दिल्या. एक प्रकारे, ह्या विचार प्रवासात आपण सोबतीने चाललो, एकमेकांशी जोडले गेलो आणि नविनही काही जोडत राहिलो.
मी आज, या 75 व्या पर्वाच्या वेळी, सर्वप्रथम, प्रत्येक श्रोत्याचे 'मन की बात' यशस्वी करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी आणि ह्या कार्यक्रमाशी जोडलेले राहण्यासाठी अनेक अनेक आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, किती सुखद योगायोग आहे ते पहा!
आज मला 75 व्या 'मन की बात' मध्ये बोलण्याची संधी आणि हा महिना, स्वातंत्र्याची 75- वर्षे, 'अमृत महोत्सव' सुरू होणारा महिना. अमृत महोत्सव दांडी यात्रेच्या दिवशी सुरु झाला आणि 15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. संपूर्ण देशभरात 'अमृत महोत्सवा शी' संबंधित कार्यक्रम सतत होत आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणाहून या कार्यक्रमांची छायाचित्रे, माहिती लोक शेअर करत आहेत, पाठवत आहेत. ‘नमोॲप’वरही अशा च काही छायाचित्रांसमवेत, झारखंडच्या नवीन ह्यांनी मला एक निरोप पाठविला आहे.
त्यांनी लिहिले आहे की त्यांनी 'अमृत महोत्सवा ' चे कार्यक्रम पाहिले आणि ठरवले की स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असलेल्या किमान दहा ठिकाणांना भेट द्यायची. त्यांच्या यादीतील पहिले नाव भगवान बिरसा मुंडांच्या जन्मस्थळाचे आहे. नवीन यांनी लिहिले आहे की झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा ते देशाच्या इतर भागात घेऊन जातील. नवीन दादा, तुमच्या ह्या विचारसरणीबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो.
मित्रांनो, एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या संघर्षाची गाथा म्हणा
एखाद्या जागेचा इतिहास म्हणा, देशाची एखादी सांस्कृतिक कथा म्हणा , 'अमृत महोत्सवाच्या’ दरम्यान आपण ते देशासमोर, देशवासियांच्या समोर आणू शकता. ह्या गोष्टींचा देशवासीयांशी संपर्क होण्याचे साधन बनू शकता. तुम्हाला दिसेल की बघता बघता 'अमृत महोत्सव' अशा बऱ्याच प्रेरणादायक अमृत बिंदूंनी भरून जाईल. आणि मग अशी अमृत धारा वाहू लागेल जी आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे झाली तरी प्रेरणा देत राहील. देशाला एका नवीन उंचीवर नेईल, काही न काही करण्याचा उत्साह निर्माण करेल.
स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अतोनात कष्ट सहन केले. कारण देशासाठी त्याग करणे, बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत.त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत आणि जसे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये म्हटले आहे,
“नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण: “
त्याप्रमाणे, त्याच भावनेने, आपण सर्वजण आपल्या नियत कर्तव्यांचे पूर्ण निष्ठेने पालन करू या. आणि स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवाचा’ अर्थ हाच आहे की आपण काहीतरी नवीन संकल्प करूया. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू या. संकल्प असा असावा, जो समाजाच्या हिताचा असेल देशाच्या भल्याचा असेल आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी असेल. संकल्प असा असावा, ज्यामध्ये माझी स्वतःची काही जबाबदारी असेल, माझे कर्तव्य त्याच्याशी जोडलेले असेल. माझा विश्वास आहे की गीता प्रत्यक्षात जगण्याची ही सुवर्णसंधीच आपल्याला मिळाली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मागील वर्षी हाच मार्च महिना होता, जेव्हा देशाने ‘जनता कर्फ्यू’ हा शब्द प्रथमच ऐकला होता. पण ह्या महान देशाच्या महान प्रजेच्या, महान सामर्थ्याचा अनुभव पहा, ‘जनता कर्फ्यू’ संपूर्ण जगासाठी एक आश्चर्य बनला.. शिस्तीचे हे एक अभूतपूर्व उदाहरण होते, येणाऱ्या अनेक पिढ्या, या गोष्टीचा, नक्कीच अभिमान बाळगतील.
त्याच प्रमाणे, आमच्या कोरोना योद्धांच्याविषयी सन्मान, आदर, थाळ्या वाजवणे, टाळ्या वाजवणे, दिवा लावणे…
आपल्याला कल्पना नाही, हे सगळे कोरोना योद्ध्यांच्या हृदयाला किती स्पर्शून गेले आणि तेच कारण आहे की पूर्ण वर्षभर ते, न थकता, न थांबता, चिकाटीने काम करत राहिले. देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी, पूर्ण शक्तीनिशी लढत राहिले.
गेल्या वर्षी यावेळी, प्रश्न होता की कोरोनाची लस कधी येणार? मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे. लसीकरण कार्यक्रमाच्या छायाचित्रांबद्दल भुवनेश्वरच्या पुष्पा शुक्ला यांनी मला लिहिले आहे. त्या म्हणतात की घरातील वडील माणसे लसीबद्दल जो उत्साह दाखवत आहेत, त्याविषयी मी ‘मन की बात’ मध्ये बोलावे.
मित्रांनो, बरोबरच आहे. देशाच्या कानाकोपऱ्या तून आपण अशा बातम्या ऐकत आहोत, छायाचित्रे पाहत आहोत, जी आपल्या अंतःकरणाला स्पर्श करत आहेत.
उत्तर प्रदेशच्या जौनपुरमधील 109 वर्षांच्या वयोवृद्ध माता राम दुलैया ह्यांनी लस घेतली आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीमध्ये देखील, 107 वर्षे वयाच्या, केवल कृष्णजी ह्यांनी पण लसीचा एक डोस घेतला आहे. हैदराबाद मध्ये 100 वर्षांच्या जय चौधरीजी ह्यांनी लस घेतली आणि इतर सर्वांनाही लस अवश्य घेण्याचे आवाहन केले.
मी ट्विटर-फेसबुकवर पाहत आहे की कसे लोक त्यांच्या घराच्या वडीलधाऱ्यांचे, लस घेतल्यानंतरचे फोटो अपलोड करीत आहेत. केरळमधील एक तरुण, आनंदन नायर ह्यांनी तर त्याला एक नवीन नाव दिले आहे – 'लस सेवा'.
असेच संदेश दिल्लीहून शिवानी, हिमाचल येथील हिमांशू आणि इतर अनेक तरुणांनीही पाठविले आहेत. मी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या विचारांचे कौतुक करतो.
ह्या सगळ्या दरम्यान, कोरोनाशी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा. 'दवाई भी – कडाई भी' ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही! आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, बोलायचे आहे, सांगायचे आहे आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला आज, इंदूरच्या रहिवासी असलेल्या सौम्या ह्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी एका विषयाकडे माझे लक्ष वेधले आणि ‘मन की बात’ मध्ये याचा उल्लेख करावा असे सांगितले. हा विषय आहे – भारताच्या क्रिकेटर मिताली राज जी ह्यांचा नवीन विक्रम. मिताली जी, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत.. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत सातहजार धावा काढणाऱ्या अशा त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत.
महिला क्रिकेट क्षेत्रात त्यांचे योगदान खूप प्रभावी आहे. दोन दशकांहूनही जास्त अशा आपल्या कारकीर्दीत मिताली राज ह्यांनी हजारो, लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे कठोर परिश्रम आणि यशोगाथा, फक्त महिला क्रिकेटपटूंसाठीच प्रेरणा नव्हे, तर पुरुष क्रिकेटपटूंसाठीही प्रेरणा आहे.
मित्रांनो, हे चित्तवेधक आहे, ह्या मार्च महिन्यात,जेव्हा आम्ही महिला दिवस साजरा करत होतो तेव्हाच अनेक महिला खेळाडूंनी पदके मिळवली आहेत, विक्रम प्रस्थापित केले आहेत.
दिल्लीत आयोजित नेमबाजीच्या ‘आयएसएसएफ विश्वचषकात’ भारताने अव्वल स्थान मिळविले. सुवर्ण पदकांच्या संख्येच्या बाबतीतही भारत जिंकला. हे भारतातील महिला व पुरुष नेमबाजांच्या उत्तम कामगिरीमुळेच शक्य झाले.
ह्या दरम्यान, ‘बीडब्ल्यूएफ स्विस ओपन सुपर 300 स्पर्धेत’ पी.व्ही. सिंधू जी ह्यांनी रौप्यपदक जिंकले. आज शिक्षणापासून उद्योजकतेपर्यंत, सशस्त्र सैन्यापासून विज्ञान आणि तंत्रज्ञानापर्यंत, सर्वत्र..देशातील मुली स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. मला विशेष आनंद ह्यामुळे आहे की मुली, खेळात स्वत: साठी एक नवीन स्थान बनवत आहेत.
खेळ ही एक व्यावसायिक निवड म्हणून उदयास येत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही काळापूर्वी झालेले मेरीटाईम इंडिया समिट तुम्हाला आठवते का? या शिखर परिषदेत मी काय बोललो हे तुम्हाला आठवते का? साहजिकच आहे, बरेच कार्यक्रम होत असतात, बर्याच गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्ट कुठे आपल्याला आठवते आणि तितके लक्ष तरी कुठे दिले जाते, – स्वाभाविक आहे.
पण मला हे आवडले की माझ्या एका विनंतीवर गुरु प्रसाद जी यांनी मनःपूर्वक अंमल केला. ह्या शिखर परिषदेत मी देशातील दीपगृह संकुलांच्या आसपास पर्यटन सुविधा विकसित करण्याविषयी बोललो होतो.
गुरु प्रसाद जी ह्यांनी तामिळनाडूमधील दोन दीपगृहांना, चेन्नई दीप गृह आणि महाबलीपुरम दीप गृह ह्यांना 2019 मध्ये भेट दिली होती, त्या प्रवासाचे अनुभव सांगितले आहेत. ज्या ऐकून मन की बात च्या श्रोत्यांनाही खूप आश्चर्य वाटेल अशा अतिशय मनोरंजक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.
चेन्नई दीपगृह हे जगातील, लिफ्ट असलेल्या काही मोजक्या दीपगृहांपैकी एक आहे. इतकेच नाही तर हे भारतातील एकमेव दीपगृह आहे जे शहरी भागात आहे. इथे विद्युत ऊर्जेसाठी सौर पॅनेल्स पण लावलेली आहेत. गुरु प्रसाद जी ह्यांनी दीपगृहाजवळ असलेल्या, सागरी सुचालनाचा इतिहास सांगणाऱ्या व वारसा जपणाऱ्या एका संग्रहालयाविषयी देखील सांगितले आहे. संग्रहालयात, तेलावर जळणारे मोठेमोठे दिवे, रॉकेलचे दिवे, पेट्रोलियमच्या गॅसबत्त्या व जुन्या काळी वापरले जाणारे विद्युत दिवे प्रदर्शित केलेले आहेत..
भारतातील सर्वात जुन्या दीपगृहाबद्दल- महाबलीपुरम दीपगृहाबद्दल देखील गुरु प्रसाद जी यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांचे म्हणणे आहे की ह्या दीपगृहाजवळ शेकडो वर्षांपूर्वी, ‘पल्लव राजा महेंद्र वर्मन प्रथम’ यांनी बांधलेले 'उलकनेश्वर' मंदिर आहे.
मित्रांनो, 'मन की बात' दरम्यान, मी पर्यटनाच्या विविध पैलूंविषयी बर्याच वेळा बोललो आहे, परंतु ही दीपगृहे पर्यटनाच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. त्याच्या भव्य रचनांमुळे दीपगृहे नेहमीच लोकांसाठी आकर्षण केंद्र असतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतातील एक्काहत्तर दीपगृहे चिन्हांकित केली गेली आहेत. या सर्व दीपगृहांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार वस्तूसंग्रहालय, अॅम्फी-थिएटर, खुला रंगमंच, उपाहार गृह, मुलांसाठी बाग , पर्यावरणस्नेही पर्णकुटी आणि landscaping केले जाईल.
तसेच, दीपगृहाबद्दलच चर्चा चालू आहे तर मी एका अद्वितीय दीपगृहाबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. हे दीपगृह गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्यात जिन्झुवाडा नावाच्या ठिकाणी आहे.
आपणास माहित आहे का की हे दीपगृह विशेष का आहे? हे विशेष आहे कारण जिथे हे दीपगृह आहे, तेथून समुद्री किनारा सध्या शंभर किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. या गावात तुम्हाला असे दगडही सापडतील, जे सांगतील की, इथे, कधीकाळी , एक गजबजलेले बंदर असावे.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की यापूर्वी किनारपट्टी जिन्झुवाड़ा पर्यंत होती. समुद्राची पातळी घटणे , वाढणे , मागे जाणे , एवढे दूर जाणे हे देखील त्याचे एक स्वरुप आहे. याच महिन्यात जपानमध्ये आलेल्या महाभयंकर सुनामीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या सुनामीत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अशीच एक सुनामी भारतात 2004 मध्ये आली होती. सुनामी दरम्यान आपण आपल्या लाईटहाऊसमध्ये काम करणारे आपले 14 कर्मचारी गमावले होते. अंदमान निकोबार मध्ये आणि तामिळनाडूत लाईटहाऊसवर ते आपले कर्तव्य बजावत होते. कठोर परिश्रम करणाऱ्या आपल्या या लाईट कीपर्सना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि लाईट कीपर्सच्या कामाची भरपूर प्रशंसा करतो.
प्रिय देशवासियांनो, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात, नावीन्य, आधुनिकता, अनिवार्य असते नाहीतर, तोचतोचपणा कधी-कधी आपल्यासाठी ओझे बनते. भारताच्या कृषी जगात आधुनिकता, ही काळाची गरज आहे. खूप उशीर झाला आहे. आपण खूप वेळ दवडला आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, पारंपरिक शेतीबरोबरच नवीन पर्याय, नवनवीन संशोधने स्वीकारणे देखील तितकेच आवश्यक आहे. श्वेत क्रांती दरम्यान देशाने याचा अनुभव घेतला आहे. आता मधमाशी पालन देखील असाच एक पर्याय बनून समोर आला आहे. मधमाशी पालन देशात मध क्रांति किंवा मधुर क्रांतीचा पाया रचत आहे. शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत, नवसंशोधन करत आहेत. उदा. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये एक गाव आहे गुरदुम . उंच पर्वत, भौगोलिक अडचणी, मात्र इथल्या लोकांनी मधमाशी पालनाचे काम सुरु केले आणि आज, या ठिकाणी तयार होणाऱ्या मधाला चांगली मागणी आहे.यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढत आहे. पश्चिम बंगालच्या सुंदरबन परिसरातील नैसर्गिक सेंद्रिय मध देश विदेशात प्रसिद्ध आहे. असाच एक वैयक्तिक अनुभव माझा गुजरातमधील आहे. गुजरातच्या बनासकांठा इथं 2016 मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात मी लोकांना सांगितले की इथे इतक्या क्षमता आहेत, तर बनासकांठा आणि आपल्याकडचे शेतकरी यांनी मधुर क्रांतीचा नवीन अध्याय लिहिला तर ? तुम्हाला हे ऐकून आनंद होईल , एवढ्या कमी वेळेत बनासकांठा, मध उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. आज बनासकांठाचे शेतकरी मध निर्मितीतून वर्षाला लाखो रुपये कमवत आहेत. असेच एक उदाहरण हरियाणाच्या यमुना नगरचे देखील आहे.
यमुना नगरमध्ये शेतकरी मधमाशी पालन करून वर्षाला शंभर टन मध तयार करत आहेत, आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतकऱ्यांच्या या मेहनतीचा परिणाम आहे की देशात मधाचे उत्पादन सातत्याने वाढत आहे. आणि वर्षाला अंदाजे सव्वा लाख टनावर पोहचले आहे. यापैकी मोठ्या प्रमाणात मध परदेशात निर्यात देखील केला जात आहे.
मित्रानो, मधमाशी पालनात केवळ मधातूनच कमाई होत नाही, तर मधाच्या पोळ्यातले मेण हे देखील उत्पन्नाचे एक खूप मोठे माध्यम आहे. औषध निर्मिती उद्योग, खाद्यपदार्थ उद्योग , वस्त्रोद्योग आणि कॉस्मेटिक उद्योग , प्रत्येक ठिकाणी या मेणाला मागणी आहे. आपला देश सध्या या मेणाची आयात करतो , मात्र आपले शेतकरी आता वेगाने ही परिस्थिती बदलत आहेत. म्हणजेच एक प्रकारे आत्मनिर्भर भारत अभियानात मदत करत आहेत. आज तर संपूर्ण जग आयुर्वेद आणि नैसर्गिक आरोग्य उत्पादनांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर मधाची मागणी आणखी वेगाने वाढत आहे. माझी इच्छा आहे की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि त्यांचे जीवन देखील सुमधुर होईल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आता काही दिवसांपूर्वी, जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला. स्पॅरो म्हणजे चिमणी. काही याला चकली म्हणतात, काही चिमणी म्हणतात , काही घान चिरिका म्हणतात. पूर्वी आपल्या घरांच्या भिंतींवर , आजूबाजूच्या झाडांवर चिमण्यांचा चिवचिवाट सुरु असायचा. मात्र आता लोक चिमण्यांची आठवण काढताना म्हणतात कि शेवटचे कितीतरी वर्षांपूर्वी चिमण्यांना पाहिले होते. आज त्यांना वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत. माझ्या बनारसचे एक मित्र इंद्रपाल सिंह बत्रा यांनी असे काम केले आहे जे मी ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना जरूर सांगू इच्छितो. बत्रा यांनी आपल्या घरालाच चिमण्यांचे घर बनवले आहे. त्यांनी आपल्या घरात लाकडाची अशी घरटी बनवली आहेत, ज्यात चिमण्या आरामात राहू शकतील. आज बनारसमधली अनेक घरे या अभियानाशी जोडली गेली आहेत. यामुळे घरांमध्ये एक अद्भुत नैसर्गिक वातावरण देखील निर्माण झाले आहे. मला वाटते निसर्ग, पर्यावरण, प्राणी, पक्षी ज्यांच्यासाठी म्हणून शक्य आहे , कमी-अधिक प्रयत्न आपण देखील करायला हवेत. असेच एक मित्र आहेत बिजय कुमार काबी. बिजय हे ओदिशाच्या केंद्रपाड़ा इथले रहिवासी आहेत. केंद्रपाड़ा समुद्र किनारी आहे. म्हणूनच या जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत ज्यांना समुद्राच्या उंच लाटा आणि चक्रीवादळाचा कायम धोका असतो. यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. बिजय यांना जाणवले की जर या नैसर्गिक आपत्तीला कुणी रोखू शकत असेल तर तो निसर्गच रोखू शकतो. मग काय , बिजय यांनी बड़ाकोट गावातून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी 12 वर्षे, मित्रानो, 12 वर्ष, मेहनत करून , गावाबाहेर, समुद्राजवळ 25 एकरचे कांदळवन उभे केले.
आज हे जंगल गावाचे संरक्षण करत आहे. असेच काम ओदिशाच्याच पारादीप जिल्ह्यातले एक इंजीनियर अमरेश सामंत यांनी केलं आहे. अमरेश यांनी छोटी छोटी जंगल उभारली आहेत, ज्यामुळे आज अनेक गावांचा बचाव होत आहे. मित्रानो, अशा प्रकारच्या कामांमध्ये जर आपण समाजाला सहभागी करून घेतलं तर मोठे परिणाम दिसून येतात. जसे तामिळनाडूच्या कोईमतूरमध्ये बस कन्डक्टरचे काम करणारे मरिमुथु योगनाथन आहेत. योगनाथान हे आपल्या बसमधील प्रवाशांना तिकीट देतात, तेव्हा त्याबरोबर एक रोपटे देखील मोफत देतात. अशा प्रकारे योगनाथन यांनी कितीतरी झाडे लावली आहेत. योगनाथन आपल्या वेतनाचा मोठा हिस्सा याच कामावर खर्च करत आले आहेत. आता हे ऐकल्यानंतर असा कोणता नागरिक असेल जो मरिमुथु योगनाथन यांच्या कामाची प्रशंसा करणार नाही. त्यांच्या या प्रेरणादायी कार्यासाठी मी मनापासून त्यांच्या या प्रयत्नांचे खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, Waste पासून Wealth म्हणजेच कचऱ्यापासून सोने बनवण्याबाबत आपण सर्वानी पाहिले देखील आहे, ऐकले देखील आहे, आणि आपणही इतरांना सांगत असतो. काहीसे अशाच प्रकारे कचऱ्याला मौल्यवान बनवण्याचे काम केले जात आहे. असेच एक उदाहरण केरळच्या कोच्चि मधील सेंट टेरेसा महाविद्यालयाचे आहे. मला आठवतंय कि 2017 मध्ये मी या महाविद्यालयाच्या संकुलात पुस्तक वाचनावरील एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. या महाविद्यालयाचे विद्यार्थी पुनर्वापर करता येईल अशी खेळणी सर्जनशील पद्धतीने बनवत आहेत. हे विद्यार्थी, जुने कपडे, टाकण्यात आलेले लाकडाचे तुकडे, बॅग आणि बॉक्सेसचा वापर खेळणी बनवण्यासाठी करत आहेत. काही विद्यार्थी कोडे तयार करत आहेत, तर काही कार आणि रेल्वेगाडी बनवत आहेत. इथे या गोष्टीबर विशेष लक्ष दिले जाते कि खेळणी सुरक्षित असण्याबरोबरच मुलांना खेळता येतील अशी असतील. आणि या संपूर्ण प्रयत्नांची एक चांगली गोष्ट ही देखील आहे की ही खेळणी अंगणवाडीतल्या मुलांना खेळण्यासाठी दिली जातात. आज जेव्हा भारत खेळणी उत्पादनात वेगाने पुढे जात असताना कचऱ्यातून मूल्य निर्मितीचे हे अभियान, हा अभिनव प्रयोग खूप महत्वाचा आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं एक प्राध्यापक श्रीनिवास पदकांडला म्हणून आहेत. ते खूपच रंजक काम करत आहेत. त्यांनी ऑटोमोबाईल मेटल स्क्रॅपमधून शिल्प बनवली आहेत. त्यांनी बनवलेली ही भव्य शिल्पे सार्वजनिक उद्यानांमध्ये बसवण्यात आली आहेत आणि लोक त्याकडे खूप उत्साहाने पाहत आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि ऑटोमोबाईल कचऱ्याच्या पुनर्वापराचा हा एक अभिनव प्रयोग आहे. मी पुन्हा एकदा कोच्चि आणि विजयवाड़ाच्या या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि आशा करतो की अशा प्रयत्नांमध्ये आणखी लोक पुढे येतील. |
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतीय लोक जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे जातात तिथे अभिमानाने सांगतात कि ते भारतीय आहेत. आपला योग, आयुर्वेद, तत्त्वज्ञान कायकाय नाही आपल्याकडे , ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो , अभिमानाच्या गोष्टी करतो, त्याचबरोबर आपली स्थानिक भाषा, बोली, ओळख, पेहराव खाणे-पिणे याचाही अभिमान बाळगतो. आपल्याला नवे हवे असते आणि तेच तर जीवन असते, मात्र त्याचबरोबर जुने गमवायचे नाही. आपल्याला अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या आजूबाजूला असलेल्या या सांस्कृतिक वारशाचे जतन करायचे आहे, नव्या पिढीपर्यंत पोचवायचे आहे. हेच काम, आज, आसाममध्ये राहणारे ‘सिकारी टिस्सौ’ अतिशय मनापासून करत आहेत. कार्बी अँग्लोन्ग जिल्ह्यातले ‘सिकारी टिस्सौ’ गेल्या 20 वर्षांपासून कार्बी भाषेचे दस्तऐवजीकरण करत आहेत . कोणे एके काळची एका युगातली ‘कार्बी आदिवासी’ बंधू-भगिनींची ‘कार्बी’ भाषा आज मुख्य प्रवाहातून गायब होत आहे.
‘सिकारी टिस्सौ’ यांनी हे ठरवले होते कि आपली ही ओळख ते कायम राखतील आणि आज त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्बी भाषेच्या बऱ्याच माहितीचे दस्तऐवजीकरण झाले आहे. या प्रयत्नांबद्दल त्यांचे अनेक ठिकाणी कौतुक देखील झाले आहे आणि पुरस्कार देखील मिळाला आहे. ‘मन की बात’ च्या माध्यमातून ‘सिकारी टिस्सौ’ यांचे मी अभिनंदन तर करत आहेच मात्र देशाच्या अनेक भागात अशा प्रकारचे अनेक साधक असतील, जे एक काम हाती घेऊन मेहनत करत असतील , त्या सर्वांचे देखील मी अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोणतीही नवी सुरुवात , नवा प्रारंभ नेहमीच खूप खास असतो. नवीन सुरुवातीचा अर्थ आहे नवीन शक्यता-नवीन प्रयत्न नवीन प्रयत्नांचा अर्थ आहे – नवी ऊर्जा आणि नवा जोश. हेच कारण आहे कि विविध राज्ये आणि क्षेत्रांमध्ये तसेच विविधतेने नटलेल्या आपल्या संस्कृतीत कुठलीही सुरुवात उत्सव म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. आणि ही वेळ नवीन सुरुवात आणि नव्या उत्सवांच्या आगमनाची आहे. होळी देखील वसंत हा उत्सव म्हणून साजरी करण्याची एक परंपरा आहे. ज्यावेळी आपण रंगांबरोबर होळी साजरी करत असतो, त्यावेळी वसंत देखील आपल्या चहूबाजूला नवीन रंग पसरवत असतो.
याच वेळी फुले उमलायला लागतात आणि निसर्ग जिवंत होतो. देशाच्या विविध भागात लवकरच नवीन वर्ष देखील साजरे केले जाईल. मग ते उगादी असेल, किंवा पुथंडू, गुढी पाडवा असेल किंवा मग बिहू, नवरेह असेल, किंवा पोइला, किंवा मग बोईशाख असेल किंवा बैसाखी – संपूर्ण देश, उमंग, उत्साह आणि नव्या आशेच्या रंगात रंगलेला दिसेल. याच काळात केरळ देखील सुंदर विशु उत्सव साजरा करते. त्यानंतर लगेचच चैत्र नवरात्रीचे पवित्र पर्व देखील सुरु होईल. चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी आपल्याकडे रामनवमीचा सण असतो. भगवान रामाच्या जन्मोत्सवाबरोबरच न्याय आणि पराक्रमाच्या एका नव्या युगाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. या काळात चोहोबाजूला उत्साहाबरोबरच भक्तिभावाने भारलेले वातावरण असते. जे लोकांना आणखी जवळ आणते, त्यांना कुटुंब आणि समाजाशी जोडते, परस्पर संबंध मजबूत करते. या सणांच्या निमित्ताने मी सर्व देशवासियांना शुभेच्छा देतो.
मित्रानो, याच दरम्यान 4 एप्रिलला देश ईस्टर देखील साजरा करेल. येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनाचा उत्सव म्हणून ईस्टरचा सण साजरा केला जातो. प्रतीकात्मक दृष्ट्या सांगायचे तर ईस्टर आयुष्याच्या नवीन सुरुवातीशी निगडित आहे. ईस्टर आशा पुनर्जीवित होण्याचे प्रतीक आहे.
या पवित्र आणि शुभ प्रसंगी मी केवळ भारतातील ख्रिस्ती समुदायाला नव्हे तर जगभरातील ख्रिस्ती बांधवांना देखील शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो , आज ‘मन की बात’ मध्ये आपण ‘अमृत महोत्सव’ आणि देशाप्रति आपल्या कर्तव्यांबाबत बोललो. आपण अन्य पर्व आणि सण -उत्सवांबाबतही चर्चा केली. याच दरम्यान आणखी एक पर्व येणार आहे जे आपल्या घटनात्मक अधिकार आणि कर्तव्यांचे स्मरण करून देते. ते आहे 14 एप्रिल – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म जयंती. यावेळी ‘अमृत महोत्सव’ मध्ये तर हा दिवस आणखी खास बनला आहे. मला विश्वास आहे , बाबासाहेबांची ही जन्म जयंती आपण नक्कीच संस्मरणीय बनवू, आपल्या कर्तव्यांचा संकल्प करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. याच विश्वासासह तुम्हा सर्वाना सणांच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही सर्व आनंदी रहा, निरोगी रहा, आणि उत्साहाने साजरे करा. याच कामनेसह पुन्हा एकदा आठवण करून देतो "दवाई भी – कड़ाई भी’ . खूप-खूप धन्यवाद .
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! काल माघ पौर्णिमेचा दिवस होता. माघ या महिन्याचा संबंध विशेषत्वानं नद्या, सरोवर आणि जलस्त्रोतांबरोबर असतो, असं मानलं जातं. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की –
‘‘माघे निमग्नाः सलिले सुशीते, विमुक्तपापाः त्रिदिवम् प्रयान्ति।।’’
याचा अर्थ असा आहे की, माघ महिन्यामध्ये कोणत्याही पवित्र जलाशयामध्ये स्नान करणं, पवित्र मानलं जातं. दुनियेतल्या प्रत्येक समाजामध्ये नदीशी संबंधित काही ना काहीतरी परंपरा असतातच. नदीकाठच्या भागांमध्येच अनेक संस्कृती, वसाहती विकसित झाल्या आहेत. आपली संस्कृती हजारो वर्षांची आहे, त्यामुळे तिचा विस्तार आपल्या इथं खूप जास्त झाला आहे.देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोप-यामध्ये पाण्याशी संबंधित एखादा उत्सव, सण नाही, असा भारतामध्ये एकही दिवस जाणार नाही. माघातल्या दिवसांमध्ये तर लोक आपलं घर, परिवार, घरातल्या सुख-सुविधा सोडून संपूर्ण महिनाभर नदीकिनारी ‘कल्पवास’ करण्यासाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. यंदा हरिव्दारमध्ये कुंभही होत आहे. आपल्यासाठी जल म्हणजे जीवन आहे. आस्था आहे आणि विकासाची धारासुद्धा आहे. एकप्रकारे पाणी हे परिसापेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. लोखंडाला जर परिसाच्या स्पर्श झाला, तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात. त्याचप्रमाणं पाण्याचा स्पर्श जीवनासाठी जरूरीचा आहे. विकासासाठीही पाण्याची गरज आहे.
मित्रांनो, माघ महिना आणि पाणी यांचा संबंध जोडला जाण्यामागं कदाचित आणखी एक कारण असू शकेल. माघानंतरच थंडी कमी होत जाते आणि उन्हं तापायला लागतं. यासाठी पाण्याच्या बचतीसाठी आपण आत्तापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. काही दिवसांनंतर म्हणजे दिनांक 22 मार्च या तारखेला ‘जागतिक जल दिन’ येत आहे.
उत्तर प्रदेशातल्या आराध्या जी यांनी मला लिहिलं आहे की, दुनियेमध्ये कोट्यवधी लोकांना आपल्या जीवनाचा खूप मोठा काळ पाण्याच्या कमतरतेची-अभावाची पूर्तता करण्यासाठीच घालवावा लागतो. ‘पाण्याविना सर्व काही व्यर्थ’ असं उगाच म्हटलेलं नाही. पाणीसंकट सोडविण्यासाठी एक खूप चांगला संदेश पश्चिम बंगालमधल्या उत्तर दीनाजपूर इथल्या सुजीत जी, यांनी मला पाठवला आहे. सुजीत यांनी लिहिले आहे की, निसर्गाने पाण्याच्या रूपानं आपल्या सर्वांना एक सामूहिक भेट दिली आहे. त्यामुळे ती भेट जपून खर्च करण्याची जबाबदारीही सामूहिक आहे. ज्याप्रमाणे सामूहिक भेट आहे, त्याप्रमाणे ती भेट सांभाळण्याची जबाबदारीही सामूहिक, ही गोष्ट तर अगदी योग्य आहे. सुजीत जी, यांचं म्हणणं, एकदम बरोबर आहे. नदी, तलाव, सरोवर, पावसाचं अथवा जमिनीतलं असं सर्व पाणी, प्रत्येकासाठी आहे.
मित्रांनो, एके काळी गावामध्ये असलेल्या विहिरी, वाव, पोखर, गावतळी यांची देखभाल सर्व गावकरी मिळून करीत असत. आत्ताही असाच प्रयत्न तामिळनाडूतल्या तिरूवन्नामलाई इथं होत आहे. इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या विहिरी संरक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. हे लोक आपल्या भागातल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या सार्वजनिक विहिरींना पुन्हा एकदा जीवंत करीत आहेत.
मध्य प्रदेशातल्या अगरोथा गावातल्या बबीता राजपूत जी जे काही करीत आहेत, त्यापासून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळेल. बबीताजींचे गाव बुंदलखंडात आहे. त्यांच्या गावाजवळच आधी एक खूप मोठा तलाव होता. तो तलाव सुकून गेला. त्यांनी गावातल्याच इतर महिलांना बरोबर घेऊन त्या तलावापर्यंत पाणी घेऊन जाण्यासाठी एक कालवा बनवला. या कालव्याच्या माध्यमातून पावसाचं पाणी थेट तलावामध्ये जायला लागलं. आता हा तलाव पाण्यानं भरलेला असतो.
मित्रांनो, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये वास्तव्य करणारे जगदीश कुनियाल जी यांनी केलेल्या कामातूनही खूप काही शिकता येणार आहे. जगदीशजी यांचं गाव आणि आजू-बाजूचा परिसर पाण्याची गरज भागविण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून होता. परंतु काही वर्षे झाली, हे नैसर्गिक स्त्रोत आटून गेले. यामुळं त्यांच्या संपूर्ण भागामध्ये पाण्याचं संकट अधिकाधिक बिकट बनायला लागलं. जगदीशजी यांनी या संकटावर उत्तर म्हणून वृक्षारोपण करण्याचा दृढनिश्चय केला. त्यांनी संपूर्ण परिसरामध्ये गावातल्या लोकांना बरोबर घेऊन हजारों रोपांची-वृक्षांची लागवड केली आणि आज त्यांच्या भागामध्ये जो आटलेला जलस्त्रोत होता, तो आता पुन्हा पाण्यानं भरला आहे.
मित्रांनो, पाण्याच्याबाबतीत आपण अशा पद्धतीनं आपली सामूहिक जबाबदारी जाणून घेतली पाहिजे. भारताच्या बहुतांश भागामध्ये मे-जूनमध्ये पावसाला प्रारंभ होतो. आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी आणि येणा-या पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच 100 दिवसांचं एखादं अभियान सुरू करू शकतो का? हाच विचार करून आता काही दिवसांतच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनंही जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ ही सुरू करण्यात येणार आहे. या अभियानाचा मूलमंत्र आहे, – ‘‘कॅच द रेन, व्हेअर इट फॉल्स, व्हेन इट फॉल्स’’ या मोहिमेसाठी आपण आत्तापासूनच काम सुरू करूया. आापल्याकडं ज्या आधीपासूनच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत, त्यांची दुरूस्ती करून घ्यायची आहे. गावांची, तलावांची, पोखर,वाव यांची स्वच्छता करून घेऊ. जलस्त्रोतांपर्यंत जात असलेल्या पाण्यामध्ये जर कुठे अडथळा येत असेल, तर ते दूर करूया आणि जास्तीत जास्त पावसाच्या पाण्याचा संचय कसा होईल, याकडे लक्ष देऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी माघ महिना आणि त्याच्या आध्यात्मिक, सामाजिक महत्वाची चर्चा होते, त्यावेळी ती चर्चा एक नावाशिवाय पूर्णच होत नाही. हे नाव आहे- संत रविदास जी यांचं! माघ पौर्णिमेला संत रविदास जी यांची जयंती असते. आजही संत रविदास जींचे शब्द, त्यांचे ज्ञान, आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यांनी म्हटलं होतं की –
एकै माती के सभ भांडे,
सभ का एकौ सिरजनहार।
रविदास व्यापै एकै घट भीतर,
सभ कौ एकै घडै़ कुम्हार ।।
याचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण एकाच मातीनं बनलेली भांडी आहोत. आपल्या सर्वांना एकानंच बनवलंय-घडवलंय. संत रविदासजी यांनी समाजामध्ये असलेल्या विकृतीविषयी नेहमीच मोकळेपणानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. त्यांनी त्या विकृती समाजासमोर मांडल्या. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मार्ग दाखवला आणि म्हणूनच मीरा जी यांनी रविदास यांच्याविषयी म्हटलं होतं –
‘‘गुरू मिलिया रैदास, दीन्हीं ज्ञान की गुटकी’’।
संत रविदास यांचं जन्मस्थान असलेल्या वाराणसी या क्षेत्राबरोबर माझा खूप मोठा संबंध आहे, हे मी स्वतःचं भाग्य मानतो. संत रविदास जी यांनी जीवनामध्ये गाठलेली आध्यात्मिक उंची आणि त्यांच्याठायी असलेली अपार ऊर्जा यांचा अनुभव मी वाराणसी या तीर्थक्षेत्री घेतला आहे. मित्रांनो, रविदास सांगत होते-
करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस।
कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास ।।
याचा अर्थ असा की, आपण निरंतर आपलं कर्म करीत राहिलं पाहिजे, मग त्याचं फळ तर नक्कीच मिळेल. म्हणजेच कर्मानं सिद्धी साध्य होतेच. संत रविदास यांची आणखी एक गोष्ट आजच्या युवावर्गानं जरूर शिकली पाहिजे. युवकांनी कोणतंही काम करताना, स्वतःला, जुन्या पद्धती, रिती यांच्यामध्ये स्वतःला अडकवून घेता कामा नये. आपल्या जीवनात, नेमकं कोणतं काम करायचंय , कसं करायचंय, हे स्वतःच ठरवावं. कामाची पद्धतही आपण स्वतःच निश्चित करावी. आपलं लक्ष्यही स्वतः ठरवावं. जर आपली सद्सद्विवेकबुद्धी आणि आत्मविश्वास मजबूत असेल तर मग तुम्हाला दुनियेतल्या कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. असं मी का सांगतोय, हे जाणून घ्या. पूर्वापार सुरू असलेल्या पद्धतीप्रमाणं काम करणं अनेकवेळा युवकांना खरोखरीच आवडत नाही, तरीही त्यामध्ये बदल कसा काय करायचा- असा विचार करून आपल्याकडचे युवक दबावामुळं मनपसंत काम करू शकत नाहीत, हे मी पाहिलं आहे. वास्तविक तुम्हा मंडळींना कधीही नवा विचार करणं, नवीन काही काम करणं यासाठी संकोच वाटता कामा नये. संत रविदास जी यांनी आणखी एक महत्वपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश आहे, तो म्हणजे- ‘‘आपल्या पायावर उभं राहणं’’ आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपण दुस-या कुणावर तरी अवलंबून रहावं, हे तर अजिबातच बरोबर नाही. जे काही- जसं आहे, तसंच सुरू रहावं, असं रविदासजींना कधीच वाटत नव्हतं. आणि आज आपण पाहतो की, देशातले युवकही असा विचार कधीच करणार नाहीत. आज ज्यावेळी देशातल्या युवकांमध्ये मी नवसंकल्पनांचे चैतन्य पाहतो, त्यावेळी वाटतं की, आमच्या युवकांविषयी संत रविदासजींना नक्कीच अभिमान वाटला असता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ही आहे. आजचा दिवस भारताचे महान वैज्ञानिक, डॉक्टर सी.व्ही. रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित आहे. केरळच्या योगेश्वरन यांनी ‘नमोॲप’वर लिहिलं आहे की, रमण इफेक्टच्या शोधामुळं संपूर्ण विज्ञानाची दिशाच बदलली गेली होती. यासंबंधित एक खूप चांगला संदेश मला नाशिकच्या स्नेहीलजी यांनीही पाठवला आहे. स्नेहीलजी यांनी लिहिलं आहे की, आपल्या देशात अगणित संशोधक आहेत, त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय विज्ञानामध्ये इतकी प्रगती झाली नसती. आपल्याला दुनियेतल्या इतर वैज्ञानिकांची माहिती असते, तशीच आपण भारतातल्या संशोधकांची माहितीही जाणून घेतली पाहिजे. ‘मन की बात’च्या या श्रोत्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मीही सहमत आहे. आपल्या युवकांनी भारतातल्या संशोधकांचा इतिहास- आमच्या वैज्ञानिकांनी केलेलं कार्य याविषयी माहिती वाचावी आणि त्यांना जाणून घ्यावं, अशी माझीही इच्छा आहे.
मित्रांनो, ज्यावेळी आपण विज्ञान-शास्त्र याविषयावर बोलतो, त्यावेळी लोकांना भौतिक-रसायन शास्त्र अथवा प्रयोगशाळा यांच्यापुरता हा विषय सीमित आहे असं वाटतं. मात्र विज्ञानाचा विस्तार त्यापेक्षा खूप प्रचंड आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये तर विज्ञानाच्या शक्तीचे खूप जास्त योगदानही आहे. आपण विज्ञानाला ‘लॅब टू लँड’ म्हणजेच ‘प्रयोगशाळेपासून ते भूमीपर्यंत’ असा मंत्र मानून पुढं नेलं पाहिजे.
यासंदर्भात उदाहरण म्हणून हैद्राबादच्या चिंतला वेंकट रेड्डी यांचं देता येईल. रेड्डी जी यांच्या एका डॉक्टर मित्रानं त्यांना एकदा ‘विटामिन-डी’ च्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि त्याचे धोके, यांच्याविषयी सांगितलं. रेड्डी जी शेतकरी आहेत. त्यांनी या समस्येवर उपाय योजना म्हणून आपण काय करू शकतो? यावर विचार करायला सुरूवात केली. त्यांनी खूप परिश्रम केले आणि गहू, तांदूळ या पिकांचे ‘विटामीन-डी’ युक्त वाण विकसित केलं. याच महिन्यामध्ये जिनिव्हाच्या ‘जागतिक बौद्धिक संपदा संघटनेकडून त्यांनी विकसित केलेल्या पिकांच्या वाणांचे बौद्धिक स्वामित्वही त्यांना मिळालं आहे. अशा संशोधक वेंकट रेड्डी यांना आमच्या सरकारनं गेल्या वर्षी पद्मश्रीचा पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
अशाच अनेक नवसंकल्पना प्रत्यक्षात आणून लडाखचे उरगेन फुत्सौग काम करीत आहेत. उरगेनजी इतक्या उंचस्थानीही सेंद्रीय पद्धतीने शेती करून जवळपास 20 प्रकारची पिके घेतात. चक्राकार पद्धतीनं ते शेती करतात. म्हणजेच एका पिकाच्या वाया जाणा-या कच-याचा ते दुस-या पिकासाठी खत म्हणून वापर करतात. आहे की नाही कमाल?
याच पद्धतीनं गुजरातमधल्या पाटण जिल्ह्यात कामराज भाई चौधरी यांनी घरामध्येच शेवग्याचं अतिशय चांगले बियाणं विकसित केलं आहे. शेवग्याला काही लोक सहजन किंवा सर्गवा, मोरिंगा असंही म्हणतात. इंग्लिशमध्ये याला ‘ड्रम स्टिक’ असं म्हणतात. जर चांगलं बियाणं असेल तर झाडाला खूप शेवग्याच्या शेंगा लागतात. शेंगांचा दर्जाही चांगला असतो. आपल्या शेवग्याच्या शेंगा आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाठवून त्यांनी उत्पन्न वाढवलंय.
मित्रांनो, आजकाल चिया सीडस् हे नाव तुम्ही लोकांनी खूप ऐकलं असेल. आरोग्याविषयी जे जागरूक आहेत, त्या लोकांना चिया सीडचं महत्व वाटतं. जगभरातून त्याला खूप मोठी मागणी आहे. भारतामध्ये बहुतांश प्रमाणात चिया सीड बाहेरून मागवले जाते. परंतु आता चिया सीडस् बाबतीत आत्मनिर्भर बनण्याचा संकल्पही अनेक लोकांनी केला आहे. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या हरिश्चंद्र जी यांनी चिया सीडस्ची शेती सुरू केली आहे. चिया सीडस्च्या शेतीमुळे त्यांच्या कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आणि आत्मनिर्भर भारत अभियानालाही मदत मिळणार आहे.
मित्रांनो, कृषी कच-यातून संपत्ती निर्माण करण्याचेही अनेक प्रयोग देशभरामध्ये यशस्वी होत आहेत. ज्याप्रमाणे मदुराईच्या मुरूगेसन जी यांनी केळाच्या कच-यापासून दोरखंड बनविण्याचे यंत्र तयार केलं आहे. मुरूगेसनजी यांच्या या नवसंकल्पनेमुळे पर्यावरण आणि कचरा यांच्या समस्येवर उपाय मिळणार आहे तसंच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा मार्गही मिळणार आहे.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना इतक्या सर्व लोकांविषयी माहिती देण्यामागं माझा हेतू हाच आहे की, आपण सर्वांनी या वेगळं काम करणा-या लोकांकडून प्रेरणा घ्यावी. ज्यावेळी देशाचा प्रत्येक नागरिक आपल्या जीवनामध्ये विज्ञानाचा विस्तार करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान येईल, त्यावेळी प्रगतीचे मार्गही मुक्त होणार आहेत आणि देश आत्मनिर्भर बनणार आहे. अशा अनेक गोष्टी देशाचा प्रत्येक नागरिक करू शकतो, असा मला विश्वास आहे.
माझ्या प्रिय मित्रांनो, कोलकाताचे रंजन जी यांनी आपल्या पत्रामध्ये खूप चांगला आणि मूलभूत म्हणावा असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्याचबरोबर एका चांगल्या पद्धतीनं त्या प्रश्नाला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला आहे. रंजन जी यांनी लिहिलं आहे, ज्यावेळी आपण आत्मनिर्भर होण्याची चर्चा करतो, त्यावेळी त्याचा आमच्यासाठी नेमका काय अर्थ असतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनीच पुढं लिहिलं आहे की, – ‘‘ आत्मनिर्भर भारत अभियान’ केवळ सरकारी धोरण नाही, तर एक राष्ट्रीय चैतन्य आहे. त्यांना असं वाटतं की, आत्मनिर्भर होण्याचा अर्थ असा आहे की, आपल्या नशीबाचा निर्णय स्वतः करणं-घेणं. याचाच अर्थ आपण स्वतःच आपल्या भाग्याचे नियंता होणं. आपल्या जीवनाचं शिल्पकार आपणच होणं. रंजनबाबू यांचं म्हणणं अगदी शंभर टक्के योग्य आहे. त्यांचं हे म्हणणं मी पुढे नेत असंही म्हणतो की, आत्मनिर्भरतेची पहिली अट असते – आपल्या देशाच्या वस्तूंविषयी, मालाविषयी अभिमान बाळगणे. आपल्या देशातल्या लोकांनी बनविलेल्या वस्तूंचा अभिमान वाटणं. ज्यावेळी प्रत्येक देशवासीयाला असा अभिमान वाटेल, त्यावेळी देशवासी त्या वस्तूशी जोडला जाईल आणि मग आत्मनिर्भर भारत बनेल. फक्त हे एक आर्थिक अभियान राहणार नाही. ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल. ज्यावेळी आपण आकाशामध्ये आपल्या देशामध्ये बनवलेल्या तेजस लढाऊ विमानांची उत्तुंग भरारी आणि कलाकारी पाहतो, ज्यावेळी भारतामध्ये बनलेले रणगाडे, भारतामध्ये बनलेली क्षेपणास्त्रे, पाहतो, त्यावेळी आपल्याला गौरव वाटतो. ज्यावेळी समृद्ध देशांमध्ये आपण मेट्रो ट्रेनमध्ये ‘मेड इन इंडिया’ असा शिक्का असलेले कोच पाहतो, ज्यावेळी डझनभर देशांमध्ये ‘मेड इन इंडिया’ कोरोनाची लस पोहोचताना पाहतो, त्यावेळी आमची मान अभिमानानं अधिक उंचावते. असं नाही की, मोठ-मोठ्या गोष्टींमुळेच भारताला आत्मनिर्भरता येईल. भारतामध्ये बनणारे कापड, भारतातल्या प्रतिभावंत कारागिरांनी बनविलेल्या हस्तकलेच्या वस्तू, भारतातली इलेक्ट्रॉनिक उपकरणं, भारतात बनणारे मोबाइल, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आपल्याला गौरव वाढवायचा आहे. ज्यावेळी आपण असा विचार करून पुढची वाटचाल करणार आहोत, त्याचवेळी ख-या अर्थाने देश आत्मनिर्भर बनणार आहे. आणि मित्रांनो, आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावां-गावांमध्ये पोहोचतोय, याचा मला आनंद होत आहे. बिहारमधल्या बेतियामध्येही असंच झालं आहे. याविषयीची माहिती मला प्रसार माध्यमांतून वाचायला मिळाली.
बेतियाचे रहिवासी प्रमोदजी दिल्लीत एका एलईडी बल्ब बनविणाऱ्या कारखान्यात तंत्रज्ञ म्हणून काम करायचे, कारखान्यात काम करत असताना त्यांनी ही संपूर्ण निर्मिती प्रक्रिया व्यवस्थित समजून घेतली. परंतु कोरोनना काळात प्रमोद जी यांना त्यांच्या घरी परत जावे लागले. प्रमोद जी घरी परत आल्यावर त्यांनी काय केले हे तुम्हाला माहित आहे का? त्यांनी एलईडी बल्ब तयार करण्याचा स्वतःचा एक छोटासा कारखाना सुरु केला. त्यांनी या कामात आपल्या परिसरातील काही तरुणांना सोबत घेतले घेतले आणि काही महिन्यांमध्येच कारखान्यात काम करणारा एक कामगार ते कारखान्याचा मालक असा प्रवास पूर्ण केला. तोही आपल्या स्वतःच्या घरात राहून.
अजून एक उदाहरण आहे- उत्तरप्रदेशातील गढमुक्तेश्वर मधील. गढमुक्तेश्वर येथे राहणाऱ्या संतोष जी यांनी कोरोना काळातील संकटाचे रूपातंर कसे संधीत केले हे त्यांनी एका पत्राद्वारे आम्हाला कळवले. संतोषजी यांचे पूर्वज हुशार कारागीर होते, ते चटई बनवायचे. कोरोना काळात जेव्हा सर्व कामकाज ठप्प झाले होते तेव्हा या लोकांनी उत्साहाने चटई बनविण्याचे काम सुरू केले. आणि अगदी अल्पावधीतच त्यांना केवळ उत्तर प्रदेशमधूनच नव्हे तर इतर राज्यांकडूनही त्यांच्या चटईला मागणी वाढू लागली. या भागातील शेकडो वर्ष जुन्या सुंदर कलेलाही यामुळे एक नवीन पाठबळ मिळाल्याचे संतोष जी यांनी सांगितले आहे.
मित्रांनो, देशभरात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे लोक 'आत्मनिर्भर भारत अभियान’ मध्ये अशाच प्रकारे आपले योगदान देत आहेत. आज सर्वसामान्यांच्या हृदयात वाहणारी ही एक भावना बनली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नामोॲपवर गुडगाव येथे राहणारे मयूर यांची एक मनोरंजक पोस्ट पहिली. ते पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमी आहेत. मी हरियाणामध्ये राहतो, परंतु, तुम्ही आसाम आणि विशेषतः काझीरंगा येथे राहणाऱ्या लोकांविषयी बोलावे अशी माझी इच्छा आहे असे त्यांनी पोस्ट मध्ये लिहिले आहे. मला वाटले मयूरजी तिथले गौरव असणाऱ्या गेंड्या (रिनोस) बद्दल बोलतील परंतु त्यांनी काझीरंगामधल्या पाण पक्षांच्या (वॉटर-फॉउल्स) वाढलेल्या आकड्यासाठी त्यांनी आसामच्या लोकांचे कौतुक केले. वॉटर-फॉउल्सला सोप्या शब्दात काय म्हणतात याचा मी शोध घेत होतो, तेव्हा मला एक शब्द सापडला – पाणपक्षी. असे पक्षी ज्यांचे घरटे झाडांवर नाही तर पाण्यावर आहेत, जसे बदके इत्यादी. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प प्राधिकरण मागील काही काळापासून पाण पक्ष्यांची वार्षिक गणना करत आहे. या गणनेत पाण पक्ष्यांची संख्या आणि त्यांचे आवडते निवासस्थान याची माहिती मिळते. दोन-तीन आठवड्यांपूर्वी पुन्हा सर्वेक्षण केले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी पाण पक्ष्यांची संख्या सुमारे एकशे पंचाहत्तर (175) टक्क्यांनी वाढली आहे हे जाणून तुम्हालाही आनंद होईल. या गणनेदरम्यान काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या एकूण 112 प्रजाती पाहायला मिळाल्या. यापैकी 58 प्रजाती या युरोप, मध्य आशिया आणि पूर्व आशियासह जगाच्या विविध भागांमधून आलेले हिवाळी स्थलांतरित पक्षी आहेत. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जलसाठा असण्या सोबतच मानवी हस्तक्षेप फारच कमी आहे. काही ठिकाणी, सकारात्मक मानवी हस्तक्षेप देखील खूप महत्वाचा आहे.
आसामचे जादव पायेंग यांचीच गोष्ट पहा. आपल्यातील काही लोकांना त्यांच्याबद्दल माहित देखील असेल. त्यांच्या कामांसाठी त्यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. जादव पायेंग यांनी आसाममधील माजुली बेटात सुमारे 300 हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण कार्यात सक्रिय योगदान दिले आहे. ते वन संवर्धनासाठी काम करतात तसेच ते लोकांना वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रेरित देखील करतात.
मित्रांनो, आसाममधील मंदिरे देखील निसर्ग संवर्धनात आपली स्वतःची एक वेगळी भूमिका बजावत आहेत, जर तुम्ही लक्षपूर्वक पहिले तर इथल्या प्रत्येक मंदिराच्या परिसरात तुम्हाला एक तलाव दिसेल. हाजो येथील हयाग्रीव मधेब मंदिर, सोनीतपूर येथील नागाशंकर मंदिर आणि गुवाहाटी येथील उग्रतारा मंदिराच्या जवळ अशी अनेक तळी आहेत. कासव्यांच्या नामशेष होत असलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी या तळ्यांचा उपयोग केला जात आहे. आसाममध्ये कासवांची सर्वाधिक प्रजाती आहेत. कासवांचे संवर्धन, प्रजनन व प्रशिक्षण यासाठी मंदिरांतील हे तलाव एक उत्कृष्ट स्थान बनू शकतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही लोकांना असे वाटते की नवनिर्मितीसाठी वैज्ञानिक असणे आवश्यक आहे, तर काहींना असे वाटते की इतरांना काहीतरी शिकवण्यासाठी शिक्षक असणे गरजेचे आहे. ज्यांना या विचाराला आव्हान देणारी लोकं नेहमीचे कौतुकास पात्र असतात. आता हेच बघा, एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला सैनिक बनण्याचे प्रशिक्षण देत असेल तर त्याचे स्वतःचे सैनिक असणे आवश्यक आहे का? तुम्ही विचार करत असाल, हो आवश्यक आहे. पण इथेच थोडीसी कलाटणी आहे.
कमलाकांत यांनी MyGov वर एक मीडिया रिपोर्ट सामायिक केला आहे ज्यामध्ये काहीतरी वेगळेच म्हटले आहे. ओडिशाच्या अरखुडा मध्ये एक गृहस्थ आहेत – नायक सर | त्याचे खरे नाव आहे सिलू नायक पण सर्वजण त्यांना नायक सर म्हणतात. वास्तविक ते मॅन ऑन अ मिशन आहेत. सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना ते मोफत प्रशिक्षण देतात. नायक सरांच्या संघटनेचे नाव महागुरु बटालियन असे आहे. इथे शारीरिक स्वास्थ्यापासून ते मुलाखती पर्यंत आणि लेखनापासून ते प्रशिक्षणा पर्यंत सर्व गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी ज्या लोकांना प्रशिक्षण दिले आहे त्यांनी सैन्य, नौदल, हवाई दल, सीआरपीएफ, बीएसएफ सारख्या दलांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिल्लू नायक यांनी स्वतः ओडिशा पोलिस दलात भरती होण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना यश मिळाले नाही, असे असूनही, त्यांनी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे अनेक तरुणांना देश सेवेसाठी पात्र केले आहे हे ऐकून देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल. चला, आपण सर्वजण नायक सरांना आपल्या देशासाठी आणखी नायक तयार करण्यासाठी शुभेच्छा देऊया.
मित्रांनो, कधीकधी अगदी छोटे आणि साधे प्रश्न देखील आपले मन विचलित करतात. हे प्रश्न फार खूप मोठे नसतात, अगदी सोपे असतात तरीदेखील ते आपल्याला विचार करायला भाग पाडतात. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या अपर्णा रेड्डी यांनी मला असाच एक प्रश्न विचारला. तुम्ही इतकी वर्षे पंतप्रधान आहात आहेत, इतकी वर्षे मुख्यमंत्री होता, तुम्हाला असे कधी वाटले का की काहीतरी उणीव राहिली आहे? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. अपर्णा जी यांचा प्रश्न अगदी सोपा पण तितकाच कठीण आहे. या प्रश्नावर मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, एक उणीव नक्की राहिली आहे, जगातील सर्वात जुनी भाषा तामिळ शिकण्यासाठी मी जास्त प्रयत्न केले नाहीत मी तामिळ शिकलो नाही. जगभरात लोकप्रिय असलेली ही एक सुंदर भाषा आहे. अनेकांनी मला तामिळ साहित्याचा दर्जा आणि त्यातील कवितांच्या सखोल भावार्थाबद्द्ल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपली संस्कृती आणि अभिमानाचे प्रतिक असणाऱ्या अशा अनेक भाषा भारतात आहेत. भाषेबद्दल बोलत असताना , मला तुम्हाला एक छोटीशी मनोरंजक क्लिप ऐकवायची आहे.
आता तुम्ही जे ऐकले ते सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल एक गाईड लोकांना संस्कृत भाषेतून माहिती देत आहे. केवडियामध्ये 15 हून अधिक गाईड आहेत जे अस्खलित संस्कृत भाषेतून लोकांना माहिती देतात. आता मी तुम्हाला आणखी एक आवाज ऐकवतो-
हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल! हे संस्कृत मधून केलेले क्रिकेटचे धावते समालोचन आहे. वाराणसीमध्ये संस्कृत महाविद्यालयांमध्ये क्रिकेटचे सामने होतात. ही महाविद्यालये आहेत – शास्त्रार्थ महाविद्यालय, स्वामी वेदांती वेद विद्यापीठ, श्री ब्रह्म वेद विद्यालय आणि आंतरराष्ट्रीय चंद्रमौली चैरिटेबल ट्रस्ट . या सामन्यांच्या वेळी संस्कृत भाषेतून देखील धावते समालोचन केले जाते. त्या धावत्या सामालोचनातील एक छोटासा भाग आता मी तुम्हाला ऐकवला. इतकेच नाही तर या स्पर्धेतील खेळाडू आणि समालोचक पारंपारिक वेषभूषा करतात. जर तुम्हाला उर्जा, जोश, थरार या सगळ्या गोष्टी एकाचवेळी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला या सामन्यांचे समालोचन ऐकले पाहिजे. टीव्ही. येण्यापूर्वी समालोचनाच्या माध्यमातूनच देशातील लोकांना क्रिकेट आणि हॉकीसारख्या खेळाचा थरार अनुभवायला मिळायचा. टेनिस व फुटबॉलच्या सामन्यांचे समालोचन देखील उत्तम प्रकारे सादर केले जाते. ज्या खेळांचे समालोचन उत्तम प्रकारे केले जाते त्या खेळांचा प्रचार खूप वेगाने होते हे आपण पाहिले आहे. आपल्याकडे अनेक भारतीय खेळ आहेत ज्यांच्यासाठी समालोचन केले जात नाही यामुळे हे खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वेगवेगळे खेळ आणि विशेषत: भारतीय क्रीडा प्रकारांचे समालोचन जास्तीत जास्त भाषांमध्ये व्हावे यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे असा विचार माझ्या मनात आला. क्रीडा मंत्रालय आणि खासगी संस्थेच्या सहकार्यांना याबद्दल विचार करण्याचे मी आवाहन करतो.
माझ्या प्रिय मित्रांनो, आगामी काही महिने तुमच्या आयुष्यातील महत्वाचे महिने आहेत. अनेकांच्या परीक्षा असतील. तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे ना तुम्हाला योद्धा बनायचे आहे, चिंता करणारे नाही, आपल्याला हसत हसत परीक्षेला जायचे आहे आणि हसत परत यायचे आहे. आपल्याला दुसऱ्या कोणाबरोबर नाही तर स्वतःशीच स्पर्धा करायची आहे. तसेच पुरेशी झोप घ्यायची आहे आणि वेळेचे योग्य नियोजन देखील कार्याचे आहे. खेळणे देखील थांबवायचे नाही कारण जे खेळतात तेच समृद्ध होतात. उजळणीच्या सुधारित आणि स्मार्ट पद्धती अवलंबल्या पाहिजेत, म्हणजे एकूणच काय तर या परीक्षांमध्ये तुम्हाला तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. या सगळ्याबाबत तुम्ही नक्कीच विचार करत असाल. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून यावर विचार करूया. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण 'परीक्षा पे चर्चा’ करणार आहोत. मार्च महिन्यात होणाऱ्या या ‘परीक्षा पे चर्चा’ आधी तुम्हा सर्व परीक्षा योद्धा, पालक आणि शिक्षक यांना मी विनंती करतो की तुम्ही तुमचे अनुभव आणि सूचना मला कळवा. आपण MyGov वर हे सामायिक करू शकता. तुम्ही NarendraModi App वर सामायिक करू शकता. यावेळी, तरुण विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांना देखील यावेळच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. सहभाग कसा घ्यायचा, बक्षीस कसे जिंकता येईल, माझ्याशी चर्चा करण्याची संधी कशी मिळवायची यासंबंधी सर्व माहिती आपल्याला MyGov वर मिळेल. आतापर्यंत एक लाखाहून अधिक विद्यार्थी, सुमारे 40 हजार पालक आणि सुमारे 10 हजार शिक्षक सहभागी झाले आहेत. तुम्हीही आजच सहभागी व्हा. या कोरोनाच्या काळात, मी थोडा वेळ काढून, exam warrior पुस्तकात काही मंत्र जोडले आहेत, आता पालकांसाठीही यात काही मंत्र जोडले आहेत. या मंत्रांशी संबंधित बरेच मनोरंजक उपक्रम NarendraModi App वर उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तुमच्यातील परीक्षा योद्धाला उत्तेजित करतील. तुम्ही नक्की हे करून पहा. सर्व तरुणांना आगामी परीक्षांसाठी अनेक शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मार्च महिना हा आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना देखील आहे, म्हणूनच, तुमच्यातील अनेक जण खूप व्यस्त देखील असतील. आता आपल्या देशातील आर्थिक उपक्रमांना वेग आला आहे त्यामुळे आपले व्यापारी आणि उद्योजक देखील खूपच व्यस्त असतील. या सर्व कामांमध्ये आपण कोरोना प्रतिबंधक सावधगिरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही सर्व निरोगी असाल, आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील.
तुम्हाला सर्व सण-उत्सवाच्या शुभेच्छा, कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. जेव्हा मी मन की बात करत असतो, तेव्हा असं वाटतं की, जणू आपल्यामध्ये, आपल्या कुटुंबातल्या सदस्याच्या रूपानं उपस्थित आहे. आमच्या लहान लहान गोष्टी, ज्या एकमेकांना काही तरी शिकवण देऊन जातात, जीवनातील आंबटगोड अनुभव, जे आयुष्य संपूर्णपणाने जगण्याची प्रेरणा बनतात, बस, हीच तर आहे मन की बात. आज, 2021 च्या जानेवारीचा अखेरचा दिवस आहे. आताच काही दिवसांपूर्वी तर 2021 वर्ष सुरू झालं होतं, माझ्याप्रमाणे आपणही असाच विचार करत आहात का? असं वाटतच नाही की, पूर्ण जानेवारी महिना संपून गेला आहे- काळाची गति यालाच तर म्हणतात. जेव्हा आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत होतो, नंतर आम्ही लोहडी सण साजरा केला, मकर संक्रांति साजरी केली, पोंगल, बिहु हे सण साजरे केले, या आताच काही दिवसांपूर्वीच्या घटना वाटतात. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सणांची धामधूम होती. 23जानेवारीला आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शानदार संचलनही पाहिलं. राष्ट्रपतीं महोदयांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधन केल्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनही सुरू झालं आहे. हे सर्व होत असतानाच, आणखी एक गोष्ट झाली, ज्याची आपणा सर्वांनाच प्रतिक्षा असते-आणि ती म्हणजे पद्म पुरस्कारांची घोषणा. असामान्य काम करणाऱ्या लोकांचा, त्यांची कामगिरी आणि मानवतेप्रति त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, देशानं गौरव केला. या वर्षीही, पुरस्कार मिळालेल्यांमध्ये, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्युत्कृष्ट काम केलं आहे, आपल्या काऱ्या नं लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं आहे, देशाला पुढे नेलं आहे, त्यांचा समावेश आहे. म्हणजे, प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या आणि कुठेही प्रसिद्धी न मिळालेल्या अशा अप्रसिद्ध नायकांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्याची जी परंपरा देशानं काही वर्षांपूर्वी सूरू केली होती, ती, या प्रकारे, यावर्षीही कायम राखण्यात आली आहे. माझा आपल्या सर्वांना विनंती आहे की, या लोकांबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल, आपण जरूर माहिती करून घ्या, कुटुंबात त्यांच्याबद्दल चर्चा करा. पहा, त्यापासून किती प्रेरणा मिळते.
या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आमच्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आमच्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी आहे. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, 26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथितही झाला आहे. आम्हाला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आम्हाला कठोर मेहनत करून आमच्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आमच्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षीच्या सुरूवातीलाच कोरोनाच्या विरोधातल्या आमच्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं आहे. ज्याप्रमाणे, कोरोनाच्या विरोधातली आमची लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आमचा लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आज भारत जगातला सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहे. आपल्याला माहित आहे, यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट ती कोणती? आम्ही सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आमच्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ 15 दिवसांमध्ये, भारतानं, आपल्या 30 लाखांहून अधिक, कोरोना योद्ध्यांचं लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी 18 दिवस लागले होते तर ब्रिटनला तब्बल 36दिवस लागले होते.
मित्रांनो, भारतात बनवलेली लस (मेड इन इंडिया) आज, भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे, भारताच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक आहे. नमो अपवर उत्तरप्रदेशातले भाई हिमांशु यादव यांनी लिहिलं आहे की, मेड इन इंडिया लसीमुळे मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मदुराईहून कीर्तिजी यांनी लिहिलं आहे की, त्यांचे अनेक परदेशी असलेले अनेक मित्र, त्यांना, संदेश पाठवून भारताचे आभार मानत आहेत. कीर्तिजींच्या मित्रांनी त्यांना लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, भारतानं ज्या प्रकारे कोरोनाविरोधातल्या लढ्यात जगाला मदत केली आहे, त्यामुळे भारताबद्दल त्यांच्या मनात असलेली प्रतिष्ठा आणि आदर आणखीच वाढला आहे. कीर्तिजी, देशाबद्दलचं हे गौरवगीत ऐकून, मन की बातच्या श्रोत्यांनाही अभिमान वाटतो.
सध्या मलाही वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि प्रधानमंत्र्याकडून भारताबद्दल असेच संदेश प्राप्त होत आहेत. आपण पाहिलंच असेल, अलिकडेच ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांनी, ट्विट करून ज्या पद्धतीनं भारताला धन्यवाद दिले आहेत, ते पाहून प्रत्येक भारतीयाला किती छान वाटलं. हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या, जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना रामायणातल्या त्या प्रसंगाची इतकी सखोल माहिती आहे, त्यांच्या मनावर इतका खोल प्रभाव आहे-हेच आमच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
मित्रांनो, या लसीकरण कार्यक्रमात, आपण, आणखी एका गोष्टीवर जरूर लक्ष केंद्रित केलं असेल. संकटाच्या घडीला, भारत आज जगाची सेवा करू शकत आहे, कारण, भारत, आज, औषधे आणि लसीच्या बाबतीत सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे. हाच विचार आत्मनिर्भर भारत अभियानाच्या मागेही आहे. भारत जितका अधिक सक्षम होईल, तितकी अधिक, मानवतेची सेवा करेल, तितका जास्त जगाला त्याचा लाभ होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रत्येक वेळेला आपली अनेक पत्रं मिळतात, नमो ॲप आणि मायगव्ह वर आपले संदेश येतात आणि फोन कॉल्सच्या माध्यमातून आपली मतं जाणून घेण्याची संधी मिळते. याच संदेशांमध्ये, एका संदेशानं माझं लक्ष वेधलं- हा संदेश भगिनी प्रियंका पांडेयजी यांचा आहे. 23 वर्षाच्या प्रियकांजी, हिंदी साहित्याच्या विद्यार्थिनी असून बिहारच्या सिवानमध्ये रहातात. प्रियंकाजी यांनी नमो ॲपवर लिहिलं आहे की, देशातल्या 15 पर्यटन स्थळांना भेटी देण्याच्या माझ्या सूचनेनं त्या अत्यंत प्रेरित झाल्या आणि म्हणून, एक जानेवारीला त्या अशा स्थळी निघाल्या जे अतिशय खास होतं. हे स्थळ होतं, देशाचे पहिले राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांचं वडलोपार्जित घर, जे त्यांच्या घरापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. प्रियंकाजी यांनी खूप सुंदर लिहिलं आहे की, आपल्या देशातल्या महान विभूतींना जाणून घेण्याच्या दृष्टिनं त्यांचं हे पहिलंच पाऊल होतं. प्रियंकाजी यांना तिथं डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं मिळाली, अनेक ऐतिहासिक छायाचित्रं मिळाली. खरोखर, प्रियंकाजी, तुमचा हा अनुभव, इतरांनाही, प्रेरित करेल.
मित्रांनो, यावर्षापासून भारत, आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव सुरू करत आहे. अशातच, आमच्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ आहे, ज्यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं.
मित्रांनो, आम्ही स्वातंत्र्याच आंदोलन आणि बिहारबद्दल चर्चा करत असताना, मी नमो ॲपवर करण्यात आलेल्या आणखी एका टिप्पणीबद्दल चर्चा करू इच्छितो. मुंगेरमध्ये रहाणारे जयराम विप्लव़जींनी मला तारापूर शहिद दिनाबद्दल लिहिलं आहे. 15 फेब्रुवारी, 1932 रोजी, देशभक्तांच्या एका गटामध्ये सामिल झालेल्या अनेक तरूण वीर जवानांची, इंग्रजांनी अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती. वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणा ते देत होते, एवढा एकच त्यांचा गुन्हा होता. मी त्या हुतात्म्यांना वंदन करतो आणि त्यांच्या धाडसाचं श्रद्धेनं स्मरण करतो. मी जयराम विप्लवजी यांना धन्यवाद देऊ इच्छितो. ज्या घटनेवर तितकीशी चर्चा झाली नाही , जी व्हायला हवी होती, अशी एक घटना त्यांनी देशासमोर आणली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या प्रत्येक भागात, प्रत्येक शहर, प्रत्येक कसबा आणि गावात स्वातंत्ऱ्या चा संग्राम अगदी संपूर्ण ताकदीनिशी लढला गेला होता. भारताच्या भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा महान सुपुत्र आणि वीरांगनांनी जन्म घेतला, ज्यांनी, राष्ट्रासाठी आपलं जीवन वाहून टाकलं, अशात, आम्ही त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या आठवणी काळजीपूर्वक जतन करणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यांच्याबाबतीत लिहून आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी त्यांच्या स्मृति चिरंतन ठेवू शकतो.
मी सर्व देशवासी आणि खासकरून युवक मित्रांना, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, स्वातंत्ऱ्या शी संबंधित घटनांबद्दल लिहावं, असं आवाहन करतो. आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं. आता, भारत आपल्या स्वातंत्ऱ्या ची पंचाहत्तरी साजरी करत असताना, आपलं लिखाण स्वातंत्र्य संग्रामातल्या नायकांच्या प्रति एक उत्तम श्रद्धांजलि ठरेल. तरूण लेखकांसाठी भारताच्या पंचाहत्तरीनिमित्त एक उपक्रम सुरू केला जात आहे. यातून सर्व राज्यं आणि भाषांमधील युवा लेखकांना प्रोत्साहन मिळेल. देशात अशा विषयांवर लिहिणारे लेखक मोठ्या प्रमाणात तयार होतील, ज्यांचा भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा सखोल अभ्यास असेल. आम्हाला अशा होतकरू प्रतिभावंतांना पूर्ण मदत करायची आहे. यामुळे भविष्याची दिशा निश्चित करणाऱ्या विचारवंत नेत्यांचा एक वर्गही तयार होईल. माझ्या युवा मित्रांना, या पुढाकाराचा भाग बनून आपल्या साहित्यिक कौशल्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. या पुढाकाराशी संबंधित माहिती शिक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये श्रोत्यांना काय आवडतं, हे आपल्यालाच अधिक चांगल्या प्रकारे माहित आहे.परंतु, मला मन की बात मध्ये सर्वात जास्त हे आवडतं की, मला खूप काही जाणून घ्यायला, शिकायला आणि वाचायला मिळतं. एक प्रकारे, प्रत्यक्षात, आपणा सर्वांमध्ये, सामिल होण्याची संधी मिळते. कुणाचा प्रयत्न, कुणाची उत्कट भावना, देशासाठी काही तरी करून जाण्याचं कुणाचं वेड- हे सारं, मला, खूप प्रेरित करतं आणि उर्जा देऊन जातं.
हैदराबादच्या बोयिनपल्लीमध्ये, एक स्थानिक भाजी मंडई, कशा प्रकारे आपली जबाबदारी पार पाडत आहे, हे वाचूनही मला खूप चांगलं वाटलं. आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे की, भाजी मंडईत अनेक कारणांनी भाजी खराब होत असते. ही भाजी इकडेतिकडे पडलेली असते, त्यामुळे दुर्गंधीही पसरलेली असते. परंतु, बोयिनपल्लीच्या भाजी मंडईनं, अशा पद्धतीनं दररोज उरलेली ही भाजी तशीच फेकायची नाही, असं ठरवलं. भाजी मंडईशी संबंधित लोकांनी या भाजीपासून वीज तयार करायची, असा निर्णय घेतला. खराब झालेल्या भाजीपासून वीज तयार करण्याबद्दल आपण क्वचितच ऐकलं असेल-हीच तर नाविन्यपूर्ण संशोधनाची शक्ति आहे. आज बोयिनपल्ली मंडईत जो कचरा होता, त्यापासून संपत्तीची निर्मिती होत आहे- हा कचऱ्यापासून सोनं बनवण्याचा प्रवास आहे. तिथं जो दररोज 10 टन कचरा निघतो, तो एका प्रकल्पात तो जमा केला जातो. प्रकल्पात या कचऱ्यापासून दररोज 500 युनिट वीज निर्माण केली जाते आणि जवळपास 30 किलो जैविक इंधनही तयार केलं जातं. याच विजेतून भाजी मंडई प्रकाशमान होते आणि जे जैविक इंधन तयार होतं, त्यावरच, मंडईतल्या कँटिनमध्ये खाण्याचे पदार्थ तयार केले जातात. आहे नं प्रयत्नांची कमाल!
अशीच एक प्रयत्नांची कमाल, हरियाणाच्या पंचकुलाच्या बडौत ग्रामपंचायतीनंही करून दाखवली आहे. या पंचायत क्षेत्रामध्ये पाण्याचा निचरा होण्याची समस्या होती. यामुळे गलिच्छ पाणी इकडेतिकडे पसरत होतं, त्यामुळे आजार बळावले होते. परंतु, बडौतच्या लोकांनी या वाया जाणाऱ्या पाण्यापासून संपत्ती निर्माण करू या, असं ठरवलं.
ग्रामपंचायतीनं पूर्ण गावात येणारं गलिच्छ पाणी एका ठिकाणी साठवून गाळायला सुरूवात केली आणि गाळलेलं हे पाणी आता गावातील शेतकरी, शेतातील सिंचनासाठी वापरत आहेत, म्हणजे, प्रदूषण, घाण आणि आजारांपासून सुटकाही मिळाली आणि शेताला पाणीही मिळालं.
मित्रांनो, पर्यावरण संरक्षणातून उत्पन्नाचे कसे मार्ग निघतात, याचं एक उदाहरण अरूणाचल प्रदेशाच्या तवांगमध्येही पहायला मिळालं आहे. अरूणाचल प्रदेशाच्या या पहाडी भागात मोन शुगु नावाचा कागद शतकांपासून बनवला जातो. हा कागद इथल्या स्थानिक शुगु शँग नावाच्या रोपाच्या सालीपासून बनवला जातो. म्हणून, हा कागद तयार करण्यासाठी या झाडांना तोडावं लागत नाही . याशिवाय, हा कागद बनवताना कोणत्याही रसायनाचा वापर करावा लागत नाही , म्हणजे हा कागद पर्यावरण दृष्ट्या आणि आरोग्यासाठीही अगदी सुरक्षित आहे. एक काळ असा होता की, जेव्हा या कागदाची निर्यात होत असे. पंरतु, जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानानं मोठ्या प्रमाणात कागदाचं उत्पादन होऊ लागलं, तेव्हा ही स्थानिक कला बंद पडण्याच्या बेतात आली. आता एक सामाजिक कार्यकर्ता, गोम्बू यांनी या कलेला पुनरूज्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे इथल्या आदिवासींना रोजगारही मिळत आहे.
मी केरळची एक बातमी पाहिली आहे, जी, आम्हा सर्वांना आमच्या जबाबदारीची जाणिव करून देते. केरळच्या कोट्टायममध्ये एक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आहेत-एन एस राजप्पन साहेब. राजप्पन जी पक्षाघाताचा झटका आल्यानं चालू शकत नाहीत, परंतु त्यामुळे, स्वच्छतेप्रति त्यांच्या समर्पित भावनेत काहीही उणिव आलेली नाही . गेल्या अनेक वर्षांपासून ते, वेम्बनाड तलावात जातात आणि तलावात फेकण्यात आलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बाहेर काढून घेऊन येतात. विचार करा, राजप्पनजी यांचे विचार किती उच्च दर्जाचे आहेत. आम्हालाही, राजप्पनजी यांच्यापासून प्रेरणा घेऊन, स्वच्छतेसाठी, जिथं शक्य असेल तिथं, आपलं योगदान दिलं पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो
काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं असेल, अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोहून बंगळुरू साठी उड्डाण केलेल्या एका नॉन स्टॉप विमानाची धुरा भारताच्या 4 महिला वैमानिकांनी सांभाळली होती. दहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त दूरचा प्रवास करून हे विमान सव्वा दोनशे पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन भारतात आलं. तुम्ही यावेळी 26 जानेवारीच्या संचलनातही पाहिलं असेल, भारतीय वायुदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी नवा इतिहास रचला आहे. क्षेत्र कुठलेही असो, आपल्या देशातल्या महिलांचं योगदान सातत्यानं वाढतच आहे. पण एक गोष्ट आपल्या नेहमीच लक्षात येत असेल की देशातल्या गावागावांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या बदल घडवणाऱ्या घडामोडी होत असतात, मात्र त्या बदलांची तेवढी चर्चा होत नाही. म्हणूनच मी जेव्हा मध्यप्रदेशच्या जबलपूर मधली एक बातमी पाहिली तेव्हा मला असं वाटलं की या बातमीचा उल्लेख मला मन की बात मध्ये नक्कीच करायला हवा. ही बातमी खूपच प्रेरणादायी आहे. जबलपूरच्या चिचगावात काही आदिवासी बायका एका राईस मिल म्हणजेच भाताच्या गिरणी मध्ये रोजंदारी वर काम करत होत्या. कोरोनाच्या जागतिक महासाथीनं जसं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रासलं त्याचप्रमाणे या महिलांना सुद्धा त्याची झळ पोहोचली. त्यांचं राईस मिलमधलं काम थांबलं. स्वाभाविकच आहे यामुळे त्यांच्या कमाईतही अडथळे येऊ लागले, पण त्यामुळे त्या निराश झाल्या नाहीत, त्यांनी हार मानली नाही. सगळ्या जणी एकत्र मिळून स्वतःची राईस मिल सुरू करूया, असं त्यांनी ठरवलं. त्या ज्या मिलमध्ये आधी काम करत होत्या त्या मालकालाही आपली यंत्रसामुग्री विकायचीच होती. या महिलांपैकी मीना रहांगडळेजींनी सर्व महिलांना एकत्र आणून स्वयंसहाय्यता गट तयार केला आणि सर्वजणींनी आपल्या आजवरच्या बचतीतून पैसे गोळा केले. जेवढे पैसे कमी पडले त्यासाठी आजीविका मिशन योजनेअंतर्गत बँकेतून कर्ज घेतलं आणि आता पहा या आदिवासी भगिनींनी तीच राईस मिल खरेदी केली, जिथे त्या कधी कामगार म्हणून काम करत होत्या. त्या आता आपली स्वतःची राईस मिल चालवत आहेत. या एवढ्या गेल्या काही दिवसात या मिलमधून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा नफा सुद्धा कमावला आहे. या नफ्यातून मीनाजी आणि त्यांच्या सहकारी महिला, सर्वात आधी बँक कर्ज चुकवून, नंतर आपला व्यापार आणखी वाढवण्याची तयारी करत आहेत. कोरोनानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली आहेत.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
बुंदेलखंड विषयी बोताना, बुंदेलखंड विषयी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लगेच आपल्या मनात येतील? इतिहासात रस असलेले लोक या भागाला झाशीची राणी लक्ष्मीबाईंशी जोडतील, तर काही लोक सुंदर आणि शांत अशा ओरछा या पर्यटनस्थळा विषयी विचार करतील. काहीजणांना या भागात जाणवणाऱ्या जबरदस्त अशा उकाड्याची आठवण येईल. पण सध्या इथे काही वेगळच होत आहे, जे खूप उत्साहवर्धक आहे आणि याविषयी आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला हवं. काही दिवसांपूर्वी झाशीत एक महिना चालणारा स्ट्रॉबेरी महोत्सव सुरू झाला. प्रत्येकाला आश्चर्य वाटेल, स्ट्रॉबेरी आणि बुंदेलखंड! पण हे सत्य आहे! आता बुंदेलखंडात स्ट्रॉबेरीची शेती करण्याबाबत उत्साह वाढतोय आणि यात खूप मोठी भूमिका निभावली आहे, झाशीची एक सुपुत्री गुरलीन चावला हिनं. कायद्याची विद्यार्थिनी असलेल्या गुरलीननं आधी आपल्या घरात आणि नंतर शेतात, स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून झाशीमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरी शेती होऊ शकते हा विश्वास जागवला आहे. झाशीचा स्ट्रॉबेरी महोत्सव, स्टे ॲट होम संकल्पनेवर भर देतो. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आणि युवावर्गाला, आपल्या घराच्या सभोवताली रिकाम्या जागेवर किंवा घराच्या गच्चीवर बागकाम करून स्ट्रॉबेरी पिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं असेच प्रयत्न देशाच्या इतर भागांमध्ये सुद्धा होत आहेत. डोंगराळ भागात थंड हवामानात घेतलं जाणारं पीक म्हणून स्ट्रॉबेरीची कधीकाळी ओळख होती. हीच स्ट्रॉबेरी आता कच्छच्या रेताड जमिनीत सुद्धा उगवायला लागली आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवत आहे.
मित्रांनो, स्ट्रॉबेरी महोत्सवासारखे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच, पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आमच्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे.मित्रांनो, शेतीला आधुनिक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बघितला. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या वेस्ट मिदनापूर इथल्या नया पिंगला या गावातले एक चित्रकार सरमुद्दीन यांच्याबाबत होता. रामायणावर बनवलेल्या त्यांच्या चित्राची दोन लाख रुपयांमध्ये विक्री झाल्याबद्दल, ते समाधान व्यक्त करत होते. यामुळे त्यांच्या गाववाल्यांनाही खूप आनंद झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याबाबत आणखी काही जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढली. अशाच प्रकारे मला पश्चिम बंगालशी संबंधित आणखी एका खूपच चांगल्या उपक्रमाविषयी माहिती मिळाली, ज्याबाबत तुमच्याशी बोलायला मला नक्कीच आवडेल. पर्यटन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाने या महिन्याच्या सुरुवातीलाच, बंगालमधल्या गावांमध्ये, 'इनक्रेडीबल इंडिया विकेंड गेटवेज' या उपक्रमाची सुरुवात केली. यामध्ये, पश्चिम मिदनापूर, बांकुरा, बीरभूम, पुरुलिया, पूर्व वर्धमान इथल्या हस्तशिल्प कलाकारांनी, तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हस्तकला कार्यशाळांचं आयोजन केलं. मला असंही सांगण्यात आलं की या इन्क्रेडिबल इंडिया विकेंड गेटवेज दरम्यान झालेली हस्त कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री, इथल्या हस्तकला कारागिरांना प्रोत्साहित करणारी ठरली. देशभरातले इतर भागातले लोक सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं आपली कला लोकप्रिय बनवत आहेत. ओदीशाच्या राऊरकेला मधल्या भाग्यश्री साहू यांनाच पहा. तशा त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आहेत, पण गेल्या काही महिन्यात त्यांनी पट्टचित्र कला शिकायला सुरुवात केली आणि त्यात नैपुण्यही मिळवलं. पण आपल्याला एक गोष्ट माहितेय की त्यांनी पेन्ट कुठे केलं! सॉफ्ट स्टोन्स, चक्क सॉफ्ट स्टोन्सवर! महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाग्यश्रीना हे सॉफ्ट स्टोन्स मिळाले, त्यांनी ते एकत्र केले, स्वच्छ केले. नंतर त्यांनी रोज दोन तास या दगडांवर पट्टचित्राच्या शैलीत पेंटिंग केलं. या दगडांवर चित्र रंगवून त्यांनी ते दगड आपल्या मित्र–मैत्रिणींना भेटवस्तू म्हणून द्यायला सुरुवात केली. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी बाटल्यांवर सुद्धा पेंटिंग करायला सुरुवात केली. आता तर त्या, ही कला शिकवण्यासाठी कार्यशाळा सुद्धा आयोजित करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त, भाग्यश्रींनी या दगडांवर आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या भविष्यातल्या अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आर्ट आणि कलर्स च्या माध्यमातून खूप काही ही नवं शिकता येऊ शकतं, करता येऊ शकतं. झारखंडच्या दुमका इथल्या अशाच एका सुंदर उपक्रमाबाबत मला माहिती मिळाली. इथल्या माध्यमिक शाळेच्या एका मुख्याध्यापकांनी मुलांना शिकवण्यासाठी, गावातल्या सगळ्या भिंतीच, इंग्रजी आणि हिंदी अक्षरांनी रंगवल्या, सोबत वेगवेगळ्या प्रकारची चित्रही रंगवली. त्यामुळे गावातल्या मुलांना शिक्षणाच्या दृष्टीनं मदत मिळत आहे. मी, असे उपक्रम राबवणाऱ्या सर्व लोकांचं अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
भारतापासून हजारो किलोमीटर दूर, अनेक महासागर–बेटांच्या पलीकडे चिली नावाचा एक देश आहे. भारतातून चिलीला पोहोचण्यासाठी खूप वेळ लागतो, मात्र भारतीय संस्कृतीचा सुगंध तिथे खूप आधीपासूनच पसरलेला आहे. आणखी एक विशेष गोष्ट अशी आहे, तिथे योग खूपच लोकप्रिय आहे. तुम्हाला नवल वाटेल, चिलीची राजधानी सॅन्टीयागोत तीस पेक्षा जास्त योग विद्यालयं आहेत. चिलीत आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मला असं समजलं की चिलीतल्या हाऊस ऑफ डेप्युटीजमध्ये योग दिवसाच्या निमित्तानं खूपच उत्साहानं भारलेलं वातावरण असतं. कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वर भर देणं, प्रतिकारशक्ती वाढवणं यासाठी योगाचा होणारा चांगला उपयोग लक्षात घेऊन, इथले लोक आता योगाला पहिल्या पेक्षाही खूप जास्त महत्त्व देत आहेत. चिलीच्या संसदेनं एक प्रस्तावही संमत केला आहे. तिथेच चार नोव्हेंबरला राष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपण विचार कराल, चार नोव्हेंबरमध्येच असं काय आहे? 4 नोव्हेंबर 1962 रोजी चीलीमध्ये, होजे राफाल एस्ट्राडा यांनी पहिली योग संस्था स्थापन केली होती. हा दिवस राष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करून एस्ट्राडाजींना श्रद्धांजली सुद्धा वाहण्यात आली आहे. चिली संसदेनं केलेला हा एक असा विशेष सन्मान आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. चिली संसदेशी संबंधित आणखी एक गोष्ट आपल्याला भावेल. चिली सिनेटच्या उपाध्यक्षांचं नाव रवींद्रनाथ क्विन्टेरॉस आहे. त्यांचं हे नाव जागतिक कवी गुरुदेव टागोर यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो
माय गोव्ह या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री आणि केरळच्या पलक्कड इथले प्रल्हाद राजगोपालन यांनी आग्रह केला आहे की मन की बात मध्ये मी आपल्या सर्वांशी रस्ते सुरक्षेविषयी चर्चा करावी. याच महिन्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी पर्यंत आपला देश, रस्ते सुरक्षा महिना म्हणजेच रोड सेफ्टी मंथ साजरा करत आहे. रस्ते अपघात केवळ आपल्याच देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. आज भारतात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे.
मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच सीमा रस्ते संघटना जे रस्ते बनवत आहे, त्या रस्त्यांवरून जाताना आपल्याला कितीतरी छान अशी नवनवीन स्लोगन्स म्हणजेच घोषवाक्य पाहायला मिळतात. धिस इज हाय वे–नॉट रन वे, किंवा मग, बी मिस्टर लेट दॅन लेट मिस्टर, अशी घोषवाक्य, रस्त्यांवर सावधगिरी बाळगण्यासाठी लोकांना जागृत करण्यात प्रभावशाली ठरतात. आता आपणही अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नव्या कल्पना, नवी घोषवाक्य माय गोव्ह वर पाठवू शकता. आपण पाठवलेल्या चांगल्या घोषवाक्यांचा वापरही होऊ शकतो.
मित्रांनो, रस्ते सुरक्षेबाबत बोलत असताना मी, नमो ॲप वर कोलकात्याच्या अपर्णा दासजी यांनी टाकलेल्या एका पोस्ट वर चर्चा करू इच्छितो. अपर्णाजींनी मला फास्टॅग सुविधेबाबत बोलण्याचा आग्रह केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की फास्टॅग मुळे प्रवासाची एकंदर व्याख्याच बदलली आहे. फास्टॅग मुळे वेळेची बचत तर होतेच, पण टोल नाक्यावर थांबून रोख रक्कम भरण्यात येत असलेला त्रास संपला आहे. अपर्णाजींचं म्हणणं बरोबरच आहे. यापूर्वी आपल्या टोलनाक्यांवर एका गाडीला सरासरी सात ते आठ मिनिटं लागत होती. पण आता फास्टॅग आल्यानंतर ही वेळ सरासरी दीड ते दोन मिनिटांवर येऊन ठेपली आहे. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्यात लागणारा वेळ कमी झाल्यानं गाडीच्या इंधनातही बचत होत आहे. यामुळे आपल्या देशवासीयांचे साधारण 21 हजार कोटी रुपये वाचत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे पैशांची बचत आणि वेळेचीही बचत. माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे की सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत आपण स्वतःकडे लक्ष द्या आणि दुसऱ्यांचा जीव सुद्धा वाचवा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
आपल्याकडे असं म्हणतात-' जलबिंदू निपातेन क्रमश: पूर्यते घट:'. अर्थात पाण्याच्या एकेका थेंबानच अखेर पूर्ण घडा भरतो. आपल्या एकेका प्रयत्नातूनच आपले मोठमोठे संकल्प पूर्ण होत असतात. म्हणूनच 2021 या वर्षाची सुरुवात, जी उद्दिष्ट ठेवून आपण केली आहे, ती सर्व उद्दिष्ट आपल्याला सर्वांनी मिळूनच गाठायची आहेत. तर चला, आपण सर्वजण मिळून हे वर्ष सार्थ ठरवण्यासाठी आपली पावलं उचलू या. आपण आपले संदेश, आपल्या कल्पना नक्की पाठवत रहा. पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया.
इति– विदा पुनर्मिलनाय!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज 27 डिसेंबर आहे. चार दिवसांनी 2021 सुरू होणार आहे. आजची 'मन की बात' ही एकप्रकारे 2020 ची शेवटची 'मन की बात' आहे. पुढील 'मन की बात' 2021 मध्ये सुरू होईल. मित्रांनो, माझ्यासमोर तुमची असंख्य पत्रे आहेत. आपण Mygov वर पाठविलेल्या सूचनासुद्धा माझ्यासमोर आहेत. अनेक लोकांनी दुरध्वनी करून आपले म्हणणे सांगितले आहे. बर्याच संदेशांमध्ये मागील वर्षाचे अनुभव आणि 2021 शी संबंधित संकल्प यांच्या बद्दल लिहिले आहे. अंजली जी यांनी कोल्हापूरहून लिहिले आहे की, आपण नेहमीच एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो, पण यावेळी आपण काहीतरी नवीन करूया. आपण यावर्षी आपल्या देशाला शुभेच्छा देऊया, त्याचे अभिनंदन करूया. अंजली जी, खरोखर ही एक चांगली कल्पना आहे. आपला देश, 2021 मध्ये यशाची नवी शिखरे पादाक्रांत करेल, संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचे स्थान अधिक सशक्त व्हावे, याहून अधिक मोठी इच्छा दुसरी कोणती असू शकते.
मित्रांनो,
मुंबईच्या अभिषेक जी यांनी नमोॲप वर एक संदेश पाठवला आहे. त्यांनी लिहिले आहे की 2020 ने आम्हाला जे काही दाखवले, जे शिकवले त्याचा कधी विचार देखील केला नव्हता. त्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. या सगळ्या पत्रांमध्ये, या संदेशांमध्ये, मला एक गोष्ट समान दिसून आली आहे, मला एक विशेष गोष्ट दिसते आहे, ती मी आज आपल्यासोबत सामायिक करू इच्छितो. बहुतेक पत्रांमध्ये लोकांनी देशाचे सामर्थ्य, देशवासीयांच्या सामूहिक शक्तीचे कौतुक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग जेव्हा संपूर्ण जगासाठी प्रेरणा बनला, देशवासीयांनी जेव्हा टाळ्या वाजवून, थाळ्या वाजवून आपल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करून आपली एकता दाखविली होती या सर्व गोष्टींचे लोकांनी स्मरण केले आहे.a
मित्रांनो,
देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.
मित्रांनो,
दिल्लीमध्ये राहणाऱ्या अभिनव बॅनर्जी यांनी त्यांचा जो अनुभव मला पाठविला आहे, तो खूप मनोरंजक आहे. अभिनव यांना आपल्या नातेवाईकांच्या मुलांना काही भेटवस्तू म्हणून काही खेळणी द्यायची होती, खेळणी खरेदी करण्यासाठी ते दिल्लीच्या झंडेवालान बाजारात गेले. आपल्यातील बर्याच जणांना हे माहित असेलच की दिल्लीमध्ये हा बाजार सायकल आणि खेळण्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पूर्वी महागड्या खेळण्यांचा अर्थ म्हणजे बाहेरून आयात केलेली खेळणी असाच होता आणि स्वस्त खेळणी देखील बाहेरून येत असत. पण, अभिनव यांनी पत्रात लिहिले आहे की, आता तिथले बरेच दुकानदार ग्राहकांना खेळणी विकताना खेळणी दाखवून असे सांगताना की ही खेळणी खूप छान आहेत, कारण ही 'मेड इन इंडिया' आहेत. ग्राहकही भारतात बनवलेल्या खेळण्यांची मागणी करत आहेत. विचारांमध्ये घडून आलेला हा खूप मोठा बदल आहे –आणि हा एक उत्तम पुरावा आहे. देशवासीयांच्या मानसिकतेत किती मोठा बदल घडून येत आहे आणि तोही एका वर्षाच्या आत. या बदलाचे मूल्यांकन करणे सोपे नाही. अर्थशास्त्रज्ञसुद्धा स्वतःचे आराखडे मांडून यांचे मोजमाप करू शकत नाहीत.
मित्रांनो,
विशाखापट्टणम मधून व्यंकट मुरलीप्रसाद यांनी मला पत्र पाठविले आहे, यामध्ये देखील एक वेगळी कल्पना आहे. व्यंकट यांनी लिहिले आहे की, मी तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी वन साठी दोन हजार एकवीस साठी माझा एबीसी जोडतो. मला सुरुवातीला काहीच कळले नाही, एबीसी म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचे आहे. मग मी पाहिले की वेंकटजींनी त्यांच्या पत्राला एक चार्ट देखील जोडला आहे. मी तो चार्ट नीट पहिला आणि मग मला एबीसी म्हणजे काय ते समजले –आत्मनिर्भर भारत चार्ट….एबीसी. हे खूप मनोरंजक आहे. व्यंकट यांनी त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंची एक यादी तयार केली होती. यात इलेक्ट्रॉनिक्स, स्टेशनरी, सेल्फ केअर आयटम आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. यात त्यांनी नमूद केले होते कि आपण कळत-नकळत अशी परदेशी उत्पादने वापरत आहेत ज्यांचे पर्याय भारतात सहज उपलब्ध आहेत. आता त्यांनी शपथ घेतली आहे की आपल्या देशवासीयांनी घाम गाळून कठोर परिश्रम करून तयार केलेली उत्पादनच वापरेन.
मित्रांनो,
परंतु, या सगळ्यासोबत त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली आहे जी मला खूप मजेशीर वाटते. त्यांनी लिहिले आहे की आम्ही आत्मनिर्भर भारताला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये असे त्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात यावे. ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. Zero effect, zero defect या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे. मी देशाच्या उत्पादक आणि उद्योजकांना विनंती करतो : देशातील लोकांनी ठोस पावले उचलली आहेत. Vocal for local हा मंत्र घराघरात गजबजत आहे.अशावेळी आपली उत्पादने जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली आहे. जे काही जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही भारतात उत्पादित करून दाखवू. यासाठी आमच्या उद्योजकांना पुढे यावे लागेल. स्टार्ट अपना देखीळ पुढे यावे लागेल. मी पुन्हा एकदा वेंकटजींचे त्यांच्या उत्तम प्रयत्नांसाठी अभिनंदन करतो.
मित्रांनो,
आपल्याला ही भावना कायम राखायची आहे, त्याचे जतन करायचे आहे आणि ही भावना वृद्धिंगत देखील करायची आहे. मी हे आधी देखील सांगितले आहे आणि मी देशवासियांना विनंती करतो. तुम्ही देखील एक यादी तयार करा. तुमच्या दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या गोष्टींची व्यवस्थित पडताळणी करा आणि लक्षपूर्वक बघा की, कळत-नकळत अशा कोणत्या परदेशी वस्तू आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे. एक प्रकारे, त्यांनी आपल्याला जखडून ठेवले आहे. त्या गोष्टींसाठी भारतात बनविलेले पर्याय शोधा आणि हेही ठरवा की आता आपण भारतात उत्पादित, भारतातील कष्टकरी लोकांनी त्यांच्या कष्टाने बनविलेल्या उत्पादनांचा वापर करू. आपण दरवर्षी नवीन वर्षाचा संकल्प करतो, यावेळी आपण आपल्या देशासाठी देखील एक संकल्प करणे आवश्यक आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अत्याचारी लोकांपासून आपल्या देशातील हजारो वर्ष जुनी संस्कृती, सभ्यता, आपल्या परंपरा वाचविण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, आजचा दिवस त्याचे स्मरण करण्याचा आहे. याच दिवशी, गुरु गोबिंद यांचे पुत्र, साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंग यांना जिवंत भिंतीत पुरले होते. साहिबजादे यांनी आपली शिकवण सोडून द्यावी, थोर गुरुपरंपरा सोडावी अशी या अत्याचारी लोकांची इच्छा होती. परंतु, आमच्या साहिबजादे यांनी इतक्या लहान वयात कमालीचे धैर्य व इच्छाशक्ती दाखविली. त्यांना भिंतीत पुरले जात होते, एकएक दगड लावला जात होता, भिंत वरवर बांधली जात होती, समोर मृत्यू दिसत होता, परंतु ते जरा देखील विचलित झाले नाहीत. या दिवशी गुरु गोविंदसिंग जी – यांची आई गुजरी या देखील शहीद झाल्या होत्या. साधारण आठवडाभरापूर्वी श्रीगुरू तेग बहादुर जी यांची पुण्यतिथी होती. मला दिल्ली येथील गुरुद्वारा रकबगंज येथे जाऊन गुरु तेग बहादुरजींचे दर्शन घेऊन त्यांची पुढे नतमस्तक होण्याची संधी मिळाली. याच महिन्यात श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या पासून प्रेरित होऊन अनेक लोक जमिनीवर झोपतात. श्री गुरु गोविंदसिंग जी यांच्या कुटुंबाने जे बलिदान दिले आहे त्याचे लोक आस्थेने स्मरण करतात. या बलिदानाने संपूर्ण मानवतेला, देशाला एक नवीन शिकवण दिली आहे. या बलिदानाने आपली संस्कृती सुरक्षित ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. आम्ही सर्व जण या बलीदानाचे ऋणी आहोत. मी पुन्हा एकदा श्री गुरु तेग बहादुर जी, माता गुजरी जी, गुरु गोविंदसिंग जी आणि चार साहिबजादे यांच्या बलिदानाला नमन करतो. त्याचप्रमाणे अनेक हुतात्म्यांनी आपल्या आजच्या या भारताच्या स्वरूपाचे रक्षण केले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी देखील व्हाल आणि तुम्हाला अभिमान देखील वाटेल. 2014-18 दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या 60 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. 2014 मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे 7,900 होती, तर 2019 मध्ये ही संख्या वाढून 12,852 झाली. जिम कॉर्बेटने बिबट्याबद्दल म्हटले आहे : “ज्यांनी बिबट्याला मुक्तपणे फिरताना पाहिले नाहीत, ते त्याच्या सौंदर्याची कल्पनाही करू शकत नाहीत. त्याच्या रंगांचे सौंदर्य आणि त्याच्या चालण्याच्या मोहकपणाची कल्पना करू शकत नाही. "देशातील बर्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षांपासून जगभरात बिबट्याला अनेक धोक्यांना सामोरे जावे लागत आहे, जगभरातील त्यांचे वास्तव्य धोक्यात आले होते. अशा वेळी बिबट्यांची संख्या सातत्याने वाढवून भारताने संपूर्ण जगाला एक मार्ग दाखविला आहे. तुम्हाला हेही ठाऊक असेल की गेल्या काही वर्षांत भारतातील सिंहांची संख्या देखील वाढली आहे, वाघांची संख्याही वाढली आहे, तसेच भारतीय वनक्षेत्रही वाढले आहे. केवळ सरकारच नाही तर बरेच लोक, नागरी संस्था आणि बर्याच संस्था देखील आपले वृक्ष आणि वन्यजीव यांच्या संरक्षणामध्ये सहभागी झाले आहेत यामुळे हे शक्य झाले आहे. हे सर्व अभिनंदनास पात्र आहेत.
मित्रांनो,
तामिळनाडूच्या कोयंबटूरमधील एका हृदयस्पर्शी प्रयत्नाबद्दल मी वाचले. सोशल मीडियावरही तुम्ही त्याचे व्हिज्युअल पाहिले असतीलच. आपण सर्वांनी माणसांसाठी वापरली जाणारी व्हीलचेयर पाहिली आहे, पण कोयंबटूर येथील गायत्री या मुलीने वडिलांसह एका पीडित कुत्र्यासाठी व्हीलचेयर बनविली आहे. ही संवेदनशीलता प्रेरणादायक आहे आणि व्यक्तीच्या मनात जेव्हा प्रत्येकासाठी दया आणि करुणा असेल तेव्हाच हे शक्य आहे. दिल्ली एनसीआर आणि देशातील इतर शहरांमध्ये कडाक्याच्या थंडीत बरेच लोक बेघर जनावरांची काळजी घेण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. ते त्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची आणि त्यांच्यासाठी स्वेटर आणि झोपण्याची व्यवस्था करत आहेत. काही लोक तर दररोज शेकडो प्राण्यांसाठी जेवण तयार करतात. अशा प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे. असेच काही उदात्त प्रयत्न उत्तर प्रदेशातील कौशांबी येथेही केले जात आहेत. तिथल्या कारागृहातील कैदी थंडीपासून गायींचे संरक्षण करण्यासाठी जुन्या व फाटलेल्या ब्लँकेपासून नवीन कवर तयार करत आहेत. हे ब्लँकेट कौशांबीसह इतर जिल्ह्यांच्या तुरूंगातून गोळा करून नंतर ते शिवून गोशाळेत पाठवले जातात. कौशांबी कारागृहातील कैदी दर आठवड्याला अनेक कवर तयार करत आहेत. इतरांची काळजी घेण्यासाठी सेवाभावनेतून केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहित करूया. खरंच हे एक असे पुण्य कर्म आहे जे समाजाच्या भावना बळकट करते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता जे पत्र माझ्यासमोर आहे, त्यात दोन मोठे फोटो आहेत. हे फोटो एका मंदिराचे आहेत आणि आधीचे आणि नंतरचे असे आहेत. या फोटोंबरोबर जे पत्र आहे, त्यामध्ये युवकांच्या अशा एका टीमबाबत सांगितले आहे, जे स्वतःला युवा ब्रिगेड असे म्हणतात. तर या युवा ब्रिगेडने कर्नाटकात, श्रीरंगपट्णच्या जवळ स्थित वीरभद्र स्वामी नावाच्या एका प्राचीन शिवमंदिराचा कायापालट केला आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वाळलेले गवत आणि झुडपांनी भरलेला होता, एवढा की वाटसरू देखील सांगू शकले नसते कि इथे मंदिर आहे. एके दिवशी काही पर्यटकांनी या विस्मृतीत गेलेल्या मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. युवा ब्रिगेडने जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला तेव्हा त्यांना राहवलं नाही. आणि मग या टीमनं एकत्रितपणे त्याचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंदिर परिसरात उगवलेली काटेरी झुडपे, गवत आणि रोपं बाजूला हटवली. जिथे दुरुस्ती आणि बांधकामाची गरज होती , ते केलं. त्यांचे चांगलं काम पाहून स्थानिक लोकांनीही मदतीचे हात पुढे केले. कुणी सिमेंट दिलं तर कुणी रंग दिला, अशा अनेक गोष्टींसह लोकांनी आपापलं योगदान दिल. हे सर्व युवक विविध व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यातून त्यांनी आठवड्याच्या शेवटी वेळ काढला आणि मंदिरासाठी काम केलं. युवकांनी मंदिरात दरवाजा बसवण्याबरोबरच विजेची जोडणी देखील केली. अशा प्रकारे त्यांनी मंदिराचं गतवैभव पुनर्स्थापित करण्याचं काम केलं. आवड आणि दृढ़निश्चय या अशा दोन गोष्टी आहेत ज्यामुळे लोक प्रत्येक लक्ष्य साध्य करू शकतात. जेव्हा मी भारताच्या युवकांना पाहतो, तेव्हा स्वतःला आनंदी आणि आश्वस्त जाणवतं. आनंदी आणि आश्वस्त अशासाठी कारण, माझ्या देशातील युवकांमध्ये ' करू शकतो ' हा दृष्टिकोन आहे, आणि 'करेन' ही भावना आहे. त्यांच्यासाठी कोणतंही आव्हान मोठं नाही. त्यांच्या आवाक्यापासून काहीही दूर नाही. मी तामिळनाडूच्या एका शिक्षिकेबाबत वाचलं होत. त्यांचं नाव हेमलता एन. के आहे, ज्या विडुपुरमच्या एका शाळेत जगातील सर्वात प्राचीन भाषा तामिळ शिकवतात. कोविड-19 महामारी देखील त्यांच्या अध्यापनाच्या कामाच्या आड येऊ शकली नाही. हो, त्यांच्यासमोर आव्हानं नक्कीच होती, मात्र त्यांनी एक अभिनव मार्ग काढला. त्यांनी, अभ्यासक्रमातील सर्व 53 (त्रेपन्न) धडे रेकॉर्ड केले , ऍनिमेटेड व्हिडिओ तयार केले, आणि ते एका पेन ड्राइव्ह मध्ये घेऊन आपल्या विदयार्थ्यांना वाटले. यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप मदत झाली. त्यांना ते बघूनही धडे समजायला लागले. त्याचबरोबर, त्या आपल्या विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून देखील बोलत असायच्या. यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास खूप रोचक झाला. देशभरात कोरोनाच्या या काळात शिक्षकांनी ज्या अभिनव पद्धती अवलंबल्या, अभ्यासक्रमाची सामुग्री सृजनात्मकरित्या तयार केली. ती ऑनलाईन शिक्षणाच्या या काळात अमूल्य आहे. माझी सर्व शिक्षकांना विनंति आहे की त्यांनी ही अभ्यास सामुग्री शिक्षण मंत्रालयाच्या दीक्षा पोर्टलवर नक्की अपलोड करावी. यामुळे देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थी-विद्यर्थिनीना बराच फायदा होईल.
मित्रांनो,
चला, आता बोलूया झारखंडच्या कोरवा जमातीच्या हीरामन यांच्याशी… हीरामन जी, गढ़वा जिल्ह्यातील सिंजो गावात राहतात. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की कोऱवाची लोकसंख्या केवळ 6 हजार आहे, जी शहरांपासून दूर डोंगर आणि जंगलांमध्ये वास्तव्य करते. आपल्या समाजाची संस्कृती आणि ओळख यांचं रक्षण करण्यासाठी हीरामनजी यांनी एक विडा उचलला आहे. त्यांनी 12 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर विलुप्त होत असलेल्या कोरवा भाषेचा शब्दकोष तयार केला आहे. त्यांनी या शब्दकोशात, घर-संसारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा वापर करून दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या कोऱवा भाषेतील अनेक शब्द अर्थासह लिहून काढले. कोरवा समुदायासाठी हीरामन यांनी जे करून दाखवलं आहे, ते देशासाठी एक उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
असे म्हणतात की अकबराच्या दरबारात एक प्रमुख सदस्य – अबुल फजल होते. त्यांनी एकदा काश्मीरच्या प्रवासानंतर म्हटलं होतं की काश्मीरमध्ये एक असे दृश्य आहे, ते पाहून चिडचिडे आणि रागावणारे लोक देखील आनंदाने नाचू लागतील. खरंतर, ते काश्मीरमध्ये केशराच्या शेतीचा उल्लेख करत होते. केशर कितीतरी शतकांपासून काश्मीरशी जोडलेले आहे. कश्मीरी केशर प्रामुख्याने पुलवामा, बडगाम आणि किश्तवाड़ सारख्या ठिकाणी उगवलं जातं. याच वर्षी मे महिन्यात काश्मिरी केशरला भौगोलिक संकेत टॅग म्हणजेच GI Tag देण्यात आले. याच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी केशराला एक जागतिक लोकप्रिय ब्रँड बनवू इच्छितो.
काश्मिरी केशर जागतिक स्तरावर एक असा मसाला म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत. ते अतिशय सुगंधी असतं, त्याचा रंग गडद असतो, आणि याचे धागे लांब आणि जाडे असतात, जे याचे औषधी मूल्य वाढवतात. ते जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतं. दर्जाबाबत बोलायचं तर काश्मीरचे केशर खूप वेगळं आहे,आणि इतर देशांच्या केशरापेक्षा अगदी वेगळं आहे, काश्मीरच्या केशरला GI Tag मान्यतेमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की काश्मीरी केशरला GI Tag चं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दुबईच्या एका सुपर मार्केटमध्ये ते सर्वप्रथम विकायला ठेवण्यात आलं. आता याची निर्यात वाढायला लागेल. ते आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देईल. केशराची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ होईल. पुलवामामध्ये त्रालच्या शार भागात राहणारे अब्दुल मजीद वानी यांचंच उदाहरण घ्या. ते आपलं GI Tagged केशर राष्ट्रीय केशर अभियानाच्या मदतीनं पम्पोरच्या व्यापार केंद्रात ई-व्यापाराच्या माध्यमातून विकत आहेत. त्यांच्यासारखे अनेक लोक काश्मीरमध्ये हे काम करत आहेत. पुढल्या वेळी जेव्हा तुम्हाला केशर खरेदी करायचं असेल तेव्हा काश्मीरचेच केशर खरेदी करण्याबाबत विचार करा. काश्मिरी लोकांचा उत्साह असा आहे की तिथल्या केशराचा स्वादच वेगळा असतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता दोन दिवसांपूर्वीच गीता जयंती होती. गीता, आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संदर्भात प्रेरणा देत असते. मात्र तुम्ही कधी असा विचार केला आहे का गीता एवढा अद्भुत ग्रंथ का आहे? ते यासाठी कारण ती स्वयं भगवान श्रीकृष्ण यांचीच वाणी आहे.
कारण गीतेचं वैशिष्ट्य हे देखील आहे कि ती जाणून घेण्याची जिज्ञासेपासून सुरु होते. प्रश्नापासून सुरुवात होते. अर्जुनाने भगवानांना प्रश्न केला, जिज्ञासा होती, त्यामुळेच तर गीतेचं ज्ञान जगाला मिळाले. गीतेप्रमाणेच आपल्या संस्कृतीत जेवढे काही ज्ञान आहे, सगळं जिज्ञासेतूनच सुरु होतं. वेदांतचा तर पहिला मंत्रच आहे – ‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’ म्हणजे, या आपण ब्रह्माबाबत जाणून घेऊया. म्हणूनच तर आपल्याकडे ब्रह्माच्या शोधाबाबत बोलले जातं जिज्ञासेची ताकदच अशी आहे. जिज्ञासा तुम्हाला नियमितपणे नव्यासाठी प्रेरित करते. लहानपणी आपण म्हणूनच तर शिकतो कारण आपल्या अंतर्मनात जिज्ञासा असते. म्हणजेच जोपर्यंत जिज्ञासा आहे, तोपर्यंत जीवन आहे. जोवर जिज्ञासा आहे, तोवर नवीन शिकण्याचा क्रम जारी आहे. यात कुठलंही वय, कुठलीही परिस्थिती याला महत्व नसत. जिज्ञासेच्या अशाच ऊर्जेचे एक उदाहरण मला समजलंय, तामिळनाडूचे ज्येष्ठ नागरिक टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी यांच्याविषयी. टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी 92 वर्षाचे आहेत. Ninety Two Years ते या वयातही संगणकावर आपले पुस्तक लिहीत आहेत, ते देखील स्वतःच टाईप करून. तुम्ही विचार करत असाल की पुस्तक लिहिणं ठीक आहे मात्र श्रीनिवासाचार्य यांच्या काळात तर संगणक नव्हता. मग त्यांनी संगणकाचे ज्ञान केव्हा मिळवलं? ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या महाविद्यालयीन काळात संगणक नव्हता. मात्र, त्यांच्या मनात जिज्ञासा आणि आत्मविश्वास अजूनही तेवढाच आहे, जेवढा आपल्या युवावस्थेत होता. खरंतर श्री निवासाचार्य स्वामी जी संस्कृत आणि तामिळचे विद्वान आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे 16 आध्यात्मिक ग्रंथ देखील लिहिले आहेत. मात्र संगणक आल्यानंतर त्यांना जेव्हा वाटलं की आता तर पुस्तक लिहिणं आणि छापण्याची पद्धतच बदलली आहे , तेव्हा वयाच्या 86 व्या वर्षी ते संगणक शिकले, आपल्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर शिकले. आता ते आपलं पुस्तक पूर्ण करत आहेत.
मित्रांनो,
श्री टी श्रीनिवासाचार्य स्वामी जी यांचं जीवन या गोष्टीचं प्रत्यक्ष उदाहरण आहे की जीवन, तोपर्यंत ऊर्जेने भरलेलं असतं, जोवर जीवनात जिज्ञासा कायम असते, शिकण्याची इच्छा कायम असते. म्हणूनच आपण कधीही असा विचार करू नये की आपण मागे राहिलो, आपलं चुकलं. मी सुद्धा हे शिकून घेतलं असतं तर. आपण हे देखील मनात आणू नये की आपण शिकू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता आपण जिज्ञासेने, काही नवीन शिकणं आणि करण्याबाबत बोलत होतो. नव्या वर्षानिमित्त नव्या संकल्पांबाबत देखील बोलत होतो. मात्र काही लोक असेही असतात जे सातत्याने काही ना काही नवीन करत असतात, संकल्प सिद्धीला नेत असतात. तुम्हाला देखील तुमच्या जीवनात जाणवलं असेल, जेव्हा आपण समाजासाठी काही करतो, तेव्हा बरेच काही करण्याची ऊर्जा समाज स्वतः आपल्याला देतो. सामान्य वाटणाऱ्या प्रेरणांमधून खूप मोठी कामं देखील होऊन जातात. असेच एक युवक आहेत श्रीमान प्रदीप सांगवान.
गुरुग्रामचे प्रदीप सांगवान 2016 पासून हिलिंग हिमालयाज नावाने अभियान राबवत आहेत. ते आपली टीम आणि स्वयंसेवकांसह हिमालयाच्या वेगवेगळ्या भागात जातात आणि जो प्लास्टिक कचरा पर्यटक टाकून गेलेले असतात, तो साफ करतात. प्रदीप यांनी आतापर्यंत हिमालयाच्या निरनिराळ्या पर्यटन ठिकाणांहून कित्येक टन प्लास्टिक गोळा केलं आहे. याचप्रमाणे , कर्नाटकचं एक युवा दाम्पत्य आहे , अनुदीप आणि मिनूषा. अनुदीप आणि मिनूषा यांनी आताच गेल्या नोव्हेंबर मध्ये लग्न केलं आहे. लग्नानंतर अनेक युवा फिरायला जातात, मात्र या दोघांनी काहीतरी वेगळं केलं. ही दोघे नेहमी पाहायची की लोक आपल्या घरातून बाहेर फिरायला तर जातात मात्र जिथे जातात तिथे मोठ्या प्रमाणात कचरा सोडून येतात. कर्नाटक मधल्या सोमेश्वर चौपाटीवर देखील हीच स्थिती होती. अनुदीप आणि मिनूषा यांनी ठरवलं की ते सोमेश्वर चौपाटीवर लोक जो कचरा टाकून गेले आहेत तो साफ करायचा. पतीपत्नी दोघांनी लग्नानंतर आपला पहिला संकल्प हाच केला. दोघांनी मिळून समुद्राच्या किनाऱ्यावरील बराचसा कचरा साफ केला.
अनुदीप यांनी आपला हा संकल्प सोशल मीडियावर देखील सामायिक केला. मग काय , त्यांच्या या शानदार विचाराने प्रभावित होऊन अनेक युवक त्यांच्याबरोबर सहभागी झाले. तुम्ही ऐकून हैराण व्हाल, या लोकांनी मिळून सोमेश्वर चौपाटीवरून 800 किलोपेक्षा अधिक कचरा उचलला.
मित्रांनो,
या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, आपल्याला हे देखील लक्षात घ्यायला हवं की हा कचरा या चौपाट्यांवर, या डोंगरांवर कसा पोहचतो ? शेवटी, आपल्यातलेच काही लोक हा कचरा तिथे टाकून येतात. आपल्याला प्रदीप आणि अनुदीप-मिनूषा यांच्याप्रमाणे स्वच्छता अभियान सुरु करायला हवं. मात्र त्याही आधी आपल्याला हा संकल्प देखील करावा लागेल की आपण कचरा करणारच नाही.
शेवटी, स्वच्छ भारत अभियानाचा देखील पहिला संकल्प हाच आहे. आणि हो, आणखी एका गोष्टीची मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे. कोरोनामुळे यावर्षी याची चर्चा तेवढी होऊ शकली नाही. आपल्याला देशाला एकदा वापरायच्या प्लॅस्टिकपासून मुक्त करायचेच आहे. हा देखील 2021 च्या संकल्पांपैकी एक आहे. शेवटी, मी तुम्हाला नवीन वर्षासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो. तुम्ही स्वतः तंदुरुस्त रहा, आपल्या कुटुंबाला तंदुरुस्त ठेवा. पुढल्या वर्षी जानेवारी महिन्यात नव्या विषयांवर ‘मन की बात’ होईल.
खूप-खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ च्या प्रारंभी आज, तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी देतोय. ही बातमी जाणून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणार आहे. आपली एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येतेय. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी म्हणजे 1913 च्या आसपास वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती. मूर्ती भारतात परत पाठवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सर्वतोपरी मदत केली, त्यांचे आणि कॅनडा सरकारचे मी अगदी सहृदयपूर्वक आभार व्यक्त करतो. माता अन्नपूर्णा आणि काशी यांच्यामध्ये विशेष संबंध आहे. आता मातेची प्राचीन मूर्ती मायदेशी परत येतेय, ही एक सुखद गोष्ट आहे. माता अन्नपूर्णेच्या मूर्तीप्रमाणेच आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांच्या शिकार होत आल्या आहेत. या टोळ्या, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अशा वस्तू खूप मोठ्या किंमतीला विकतात. आता, अशा टोळ्यांवर कठोर प्रतिबंध लावण्यात येत आहेत. या टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी भारताने आपले प्रयत्न वाढवले आहेत. अशा प्रयत्नांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये परदेशात गेलेल्या अनेक मूर्ती आणि कलाकृती भारतात परत आणण्यामध्ये यश मिळालंय. माता अन्नपूर्णेची मूर्ती परत येण्यासंबंधी एक योगायोगही आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक वारसा सप्ताह साजरा केला. जागतिक वारसा सप्ताह, संस्कृतीप्रेमींसाठी, प्राचीन काळामध्ये जाण्याची, इतिहासातल्या महत्वाच्या टप्प्यांची माहिती घेण्याच्या दृष्टीनं एक खूप चांगली संधी असते. कोरोना काळ असतानाही यावेळी अगदी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून या लोकांनी वारसा सप्ताह साजरा करताना आपण सर्वांनी पाहिलं. संकटाच्या काळात संस्कृती खूप कामी येत असते. संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावत असते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही संस्कृती आपल्याला भावनिक ‘रिचार्ज’ करण्याचं काम करते. आज देशामध्ये अनेक वस्तू संग्रहालयं आणि ग्रंथालयं आपल्या संग्रहालयांना पूर्णपणे डिजिटल करण्याचं काम करताहेत. दिल्लीमध्ये आपल्या राष्ट्रीय संग्रहालयानं याविषयी काही कौतुकास्पद प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय संग्रहालयाव्दारे जवळपास दहा ‘आभासी दीर्घा’ तयार करण्याच्या दिशेनं काम सुरू आहे. आहे ना, ही एक आगळी मजेदार, रंजक गोष्ट! आता तुम्ही घरामध्ये बसून दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या दीर्घेतून एक फेरफटका मारून येऊ शकता. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे, आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे. अलिकडेच, एका रंजक प्रकल्पाविषयी माहिती माझ्या वाचनात आली. नॉर्वेच्या उत्तरेकडे स्वालबर्ड नावाचे एक व्दीप आहे. या व्दीपामध्ये आर्कटिक वर्ल्ड आर्काईव्हचा प्रकल्प बनवण्यात आलाय. या आर्काईव्हमध्ये बहुमूल्य वारसाविषयक माहिती, अशा प्रकारे जतन करून ठेवण्यात आली आहे की, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकटाचा त्या माहितीवर प्रभाव पडू नये. अलिकडेच अशीही माहिती समजली की, अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल करून या प्रकल्पाचे जतन करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल. मित्रांनो, महामारीने एकीकडे आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे, तर दुसरीकडे निसर्गाला नव्या ढंगानं अनुभवण्याची संधीही दिली आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला आहे. ऋतुचक्रातल्या हिवाळ्याला आता प्रारंभ होत आहे. निसर्गामध्ये वेग-वेगळ्या रंगांची उधळण आपल्याला पहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून चेरी ब्लॉसमच्या व्हायरल फोटोंनी इंटरनेट व्यापून गेलं होतं. आता तुम्ही विचार करीत असणार की, मी चेरी ब्लॉसमविषयी बोलतोय, म्हणजे नक्कीच जपानची ओळख म्हणून असलेल्या चेरी ब्लॉसमची गोष्ट करतोय.- मात्र तसं काही नाहीए. हे काही जपानचे छायाचित्र नाही. हे छायाचित्र आपल्या मेघालयातल्या शिलाँगचे आहे. सध्याच्या दिवसात मेघालयाच्या सौंदर्यामध्ये या चेरी ब्लॉसमने अधिकच भर घातली आहे.
मित्रांनो, या महिन्यात म्हणजेच दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अली जी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे. संपूर्ण जगभरातल्या पक्षी निरीक्षकांना भारताकडे आकर्षितही केलं आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद जोपासणा-यांचं मी नेहमी कौतुक करतो. ही मंडळी खूप धैर्याने, अगदी चिकाटीनं अनेक तास, अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षी निरीक्षण करू शकतात. निसर्गातल्या अगदी अनोख्या दृष्यांचा आनंद घेऊ शकतात. इतकंच नाही तर त्यांच्याकडचं ज्ञान, आपल्या सारख्या लोकांपर्यंत पोहोचवत राहतात. भारतामध्येही अनेक पक्षी निरीक्षण संघटना सक्रिय आहेत. तुम्हीही जरूर या विषयाशी जोडलं जावं. माझ्या इतक्या धावपळीच्या दैनंदिन व्यवहारातही मला अलिकडेच केवडियामध्ये पक्ष्यांबरोबर काही वेळ घालवता आला, ती एक संस्मरणीय संधी होती. पक्ष्यांबरोबर घालवलेला काळ, वेळ तुमचे निसर्गाशी नाते जोडले जाऊन, पर्यावरणासाठी एक प्रेरणा देईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताची संस्कृती आणि शास्त्र नेहमीच संपूर्ण दुनियेच्या दृष्टीने आकर्षणाचं एक केंद्र आहे. अनेक लोक तर, याचा शोध घेण्यासाठी भारतामध्ये आले आणि मग ते इथंच कायम राहिले आहेत, असं तर नेहमीच होत असतं. अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात. मला जॉनस मसेट्टींच्या कामाविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांना ‘‘विश्वनाथ’’ या नावानंही ओळखलं जातं. जॉनस ब्राजीलमध्ये लोकांना वेदांत आणि गीता शिकवतात. ते विश्वविद्या नावाची एक संस्थाही चालवतात. रिया-दि-जेनेरोपासून साधारणपणे एक तासभराच्या अंतरावर असलेल्या पेट्रोपोलिस या डोंगरावर त्यांचं विश्वविद्येचं काम चालतं. जॉनस यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर स्टॉक मार्केटमधल्या आपल्या कंपनीमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांना भारतीय संस्कृतीचं आकर्षण निर्माण झालं. विशेष करून वेदांतामध्ये त्यांना अधिक रूची वाटायला लागली. स्टॉकपासून ते स्पिरिच्युॲलिटीपर्यंत, त्यांनी केलेला हा प्रवास वास्तवामध्ये खूप मोठा आहे. जॉनस यांनी भारतामध्ये वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणि चार वर्षे त्यांनी कोइंबतूरच्या आर्ष विद्या गुरूकुलममध्ये वास्तव्य केलं. जॉनस यांच्यामध्ये आणखी एक विशेष गुण आहे, तो म्हणजे आपला संदेश पुढे पोहोचवण्यासाठी ते तंत्रज्ञानाच्या माध्यमाचा उपयोग करतात. ते नियमित ऑनलाइन कार्यक्रम करतात. दररोज पॉडकास्ट करतात. गेल्या सात वर्षांमध्ये जॉनस यांनी वेदांत हा विषय दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवला आहे. ते या विषयाचा मोफत अभ्यासक्रम शिकवतात. वेदांत शिकवण्याचं जॉनस एक खूप मोठं काम करतातच शिवाय, ते ज्या भाषेत शिकवतात, ती भाषा समजणा-यांची संख्या खूप मोठी आहे. कोरोना आणि क्वारंटाइनच्या काळामध्ये वेदांत कशी मदत करू शकतो, या विषयी लोकांमध्ये रूची सातत्याने वाढतेय. ‘‘मन की बात’च्या माध्यमातून जॉनस यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या भविष्यातल्या कार्याला शुभेच्छा देतो.
मित्रांनो, अशा प्रकारे आणखी एका बातमीकडे तुमचे लक्ष नक्कीच गेलं असेल. न्यूझीलँडमध्ये नव्यानं निवडून आलेले संसद सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी या विश्वातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेतून शपथ घेतली. एक भारतीय म्हणून भारतीय संस्कृतीचा असा होत असलेला प्रचार आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी गौरव शर्मा जी, यांना शुभेच्छा देतो. त्यांनी न्यूझीलँडच्या लोकांची सेवा करताना नवीन यशोशिखर गाठावे, अशी कामना व्यक्त करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 30 नोव्हेंबरला आपण श्रीगुरू नानक देव जी यांचा 551 वा प्रकाश पर्व साजरे करणार आहोत. संपूर्ण दुनियेमध्ये गुरू नानक देवजींचा प्रभाव स्पष्ट रूपानं दिसून येतो.
व्हँन्कोवर ते वेलिंग्टनपर्यंत, सिंगापूर ते साउथ अफ्रिकेपर्यंत त्यांचे संदेश सर्व बाजूंनी ऐकायला येतात. गुरूग्रन्थ साहिबमध्ये म्हटले आहे की, ‘‘ सेवक को सेवा बन आइ’’ याचा अर्थ आहे, सेवकाचे काम, सेवा करणं आहे.’’ गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्वाचे टप्पे आले आणि एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाली. गुरू साहिबने आमच्याकडून ही सेवा करून घेतली. गुरूनानक देव जी यांचं हे 550 वे प्रकाश पर्व, श्री गुरू गोविंद सिंहजी यांचं 350 वे प्रकाश पर्व, पुढच्या वर्षी श्री गुरू तेग बहादूर जी यांचं 400 वे प्रकाश पर्व ही आहे. मला जाणवतं की, गुरू साहिबांची माझ्यावर विशेष कृपा असली पाहिजे, त्यांनी मला नेहमीच आपल्या कार्यांमध्ये अधिक जवळिकीने सामावून घेतलंय.
मित्रांनो, कच्छमध्ये एक गुरूव्दारा आहे, या लखपत गुरूव्दारा साहिब याविषयी तुम्ही काही जाणता का? श्री गुरू नानक जी आपल्या ‘उदासी’ च्या काळामध्ये लखपत गुरूव्दरा साहिबमध्ये वास्तव्य करीत होते. 2001च्या भूकंपामध्ये या गुरूव्दाराचंही नुकसान झालं होतं. गुरू साहिबांच्या कृपेमुळेच मी त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुनिश्चित करू शकलो. यावेळी केवळ गुरूव्दाराचा जीर्णोद्धार केला असं नाही तर तितक्याच गौरवानं आणि भव्यतेनं गुरूद्धाराची पुन्हा स्थापना करण्यात आली. आम्हा सर्वांना गुरू साहिबांचा खूप आशीर्वादही मिळाला. लखपत गुरूव्दाराच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना 2004 मध्ये युनेस्को एशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार म्हणून ‘ॲवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन’ दिलं गेलं. पुरस्कार देणा-या परीक्षकांनी जीर्णोद्धार करताना शिल्पाशी संबंधित सर्व गोष्टींकडे अगदी बारकाईने विशेष लक्ष दिलं आहे, हे जाणलं, आणि आपल्या परीक्षणाच्या टिपणीमध्ये नोंदवलं की, या गुरूव्दाराच्या पुनर्निर्माण कार्यामध्ये शीख समुदायानं केवळ सक्रिय भागीदारी नोंदवली असं नाही, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झालं आहे. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीही नव्हतो, त्यावेळीच लखपत गुरूव्दाराला जाण्याचे भाग्य मला लाभलं. तिथं जाऊन मला असीम ऊर्जा मिळत होती. या गुरूद्वारामध्ये जाऊन प्रत्येकाला धन्य झाल्याचं जाणवतं. गुरू साहिबांनी माझ्याकडून निरंतर सेवा करवून घेतली, याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच करतारपूर साहिब कॉरिडॉर मुक्त करणं ही ऐतिहासिक घटना झाली. या गोष्टीची आठवण मी अगदी जीवनभर मनाच्या कोप-यात साठवून ठेवणार आहे. आम्हा सर्वांचेच भाग्य थोर आहे, म्हणूनच आम्हाला श्रीदरबार साहिबांची सेवा करण्याची एक संधी मिळाली. परदेशात वास्तव्य करणा-या आमच्या शीख बंधू-भगिनींनीसाठी आता दरबार साहिबांच्या सेवेसाठी निधी पाठवणे आता अधिक सुलभ झालंय. या उपायांमुळे संपूर्ण विश्वभरातील संगत, दरबार साहिबाच्या अधिक जवळ आली आहे.
मित्रांनो, लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते. आणि आज आपण पाहिलं की, दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे. मानवतेची सेवा केली. ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते. आपण सर्वांनी सेवकाप्रमाणे काम करत रहावं, अशी माझी कामना आहे. गुरू साहिबांनी माझ्याकडून आणि देशवासियांकडून अशाच प्रकारे सेवा घ्यावी. पुन्हा एकदा गुरू नानक जयंतीनिमित्त, माझ्या खूप-खूप शुभेच्छा!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसांमध्ये देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची, त्यांच्या शैक्षणिक प्रवासातल्या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी आयआयटी गुवाहाटी, दिल्ली जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, गांधी नगरचे पेट्रोलियम विद्यापीठ,म्हैसूर विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधू शकलो. देशातल्या युवापिढीबरोबर संवाद साधून मी अगदी ताजातवाना झालो, हा अनुभव मला ऊर्जावान बनवणारा होता. विद्यापीठाचा परिसर म्हणजे तर एक प्रकारे मिनी इंडियाचे असतो. एकीकडे विद्यापीठ परिसरामध्ये भारताच्या विविधतेचे दर्शन होते तर तिथंच दुसरीकडे नवभारतासाठी मोठ मोठे परिवर्तन घडवून आणण्याचे ‘पॅशन’ही दिसते. कोरोनाच्याआधीच्या दिवसांमध्ये मी ज्यावेळी असा संवाद साधण्यासाठी कोणत्या संस्थेमध्ये जात होतो, त्यावेळी माझा आग्रह असायचा की, आजूबाजूच्या शाळांमधल्या गरीब मुलांनाही या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं जावं. ती मुलंच त्या कार्यक्रमामध्ये माझे विशेष पाहुणे बनून यायची. एक छोटासा मुलगा, त्या भव्य कार्यक्रमामध्ये कोणाही युवकाला डॉक्टर, इंजिनीअर, संशोधक बनताना पाहतो, कोणाला पदक स्वीकारताना पाहतो, त्यावेळी त्याच्याही मनामध्ये तो एक नवीन स्वप्न पहायला लागतो. आपणही असंच करू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्या मनात जागृत होतो. संकल्प करण्यासाठी त्याला एक प्रेरणा मिळते.
मित्रांनो, याशिवाय आणखी एक गोष्ट जाणून घेण्यात मला नेहमीच रूची असते, ती म्हणजे संस्थेच्या ‘अलूमिनी’विषयी; म्हणजेच त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कोण आहेत, त्या संस्थेने आपल्या माजी विद्यार्थी वर्गाशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी काही व्यवस्था केली आहे का? त्यांचे माजी विद्यार्थी संघटन, नेटवर्क किती जीवंत आहे….
माझ्या युवा मित्रांनो,आपण जोपर्यंत एखाद्या संस्थेत शिक्षण घेत असतो, तोपर्यंतच, आपण त्या संस्थेचे विद्यार्थी असतो, मात्र आपण आजन्म तिथले ‘माजी विद्यार्थी’ असतो. शाळा-कॉलेज संपल्यानंतरही दोन गोष्टी कधीही संपत नाहीत- एक आपल्या शिक्षणाचा आपल्यावरचा प्रभाव आणि दुसरी आपल्या शाळा-कॉलेजविषयी आपल्याला असलेली आत्मीयता! जेव्हा माजी विद्यार्थी आपापसांत गप्पा मारतात, तेव्हा शाळा-कॉलेजमधल्या दिवसांच्या आठवणी, पुस्तकं आणि अभ्यासापेक्षा कॉलेज परिसरात घालवलेला वेळ, आणि मित्र-मैत्रिणींना सोबतचे क्षण यांच्या आठवणीं वरच जास्त गप्पा होतात. आणि याच आठवणींमधून आपल्या संस्थेसाठी काहीतरी करण्याची भावना जन्माला येते.
जिथे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला आहे, त्या संस्थेच्या विकासासाठी काहीतरी करता येणं यापेक्षा आनंदाची गोष्ट आणखी काय असू शकते? मी अशा काही उपक्रमांविषयी ऐकलं आहे, जिथे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या शिक्षणसंस्थांसाठी खूप काही केलं आहे. आजकाल माजी विद्यार्थी याबाबतीत खूप उत्साहानं काम करतांना दिसतात. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थांना चर्चासत्र सभागृह, व्यवस्थापन केंद्र, इनक्युबेशन केंद्र अशा अनेक व्यवस्था स्वतः उभारून दिल्या. या सगळ्या उपक्रमांमुळे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होत जातो. आयआयटी दिल्लीने एका ‘देणगी निधी’ची सुरुवात केली आहे, जी अत्यंत उत्तम कल्पना आहे.जगातल्या अनेक नावाजलेल्या विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे ‘देणगी निधी’ स्थापन करण्यात आले आहेत, ज्यातून विद्यार्थ्यांना मदत मिळते. मला वाटतं, की भारतातील विद्यापीठे देखील अशा प्रकारची संस्कृती स्थापन करण्यासाठी सक्षम आहेत.
जेव्हा काही परतफेड करण्याची वेळ येते, तेव्हा काहीही कमी किंवा जास्त नसते. अशावेळी छोट्यात छोटी मदतही खूप महत्वाची असते. अनेकदा माजी विद्यार्थी आपल्या संस्थांमध्ये तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी किंवा कौशल्य विकासाचे उपक्रम सुरु करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतात. काही शाळांच्या माजी विद्यार्थी संघटनांनी ‘मार्गदर्शक कार्यक्रम’ देखील सुरु केले आहेत. यात ते वेगवेगळ्या तुकडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. तसंच, ते शिक्षणातल्या संधींवरही विद्यार्थ्यांशी चर्चा करतात. अनेक शाळांमध्ये, विशेषतः निवासी शाळांच्या माजी विद्यार्थी संघटना खूप भक्कम आणि सक्रीय आहेत, त्या क्रीडा स्पर्धा आणि समुदाय सेवा असे उपक्रमही आयोजित करतात. मी सर्व माजी विद्यार्थ्यांना आग्रह करेन, की त्यांनी ज्या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केलं आहे, त्यांच्याशी आपले बंध अधिक मजबूत करत राहा . मग ती शाळा असो, कॉलेज असो किंवा विद्यापीठ असो. माझी सर्व संस्थांनाही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. काही सृजनशील मंच विकसित करावेत, जेणेकरुन माजी विद्यार्थ्यांचा त्यात सक्रीय सहभाग असेल. मोठी महाविद्यालये आणि विद्यापीठेच नाहीत, तर आमच्या गावातील शाळांच्या माजी विद्यार्थ्यांची देखील एक मजबूत आणि सक्रीय अशी संघटना असायला हवी.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, पाच डिसेंबरला श्री अरविंदो यांची पुण्यतिथी आहे. श्री अरबिंदो यांच्याविषयी आपण वाचतो, तेवढी त्यांच्या विचारांची खोली आपल्याला जाणवत जाते. माझ्या युवा मित्रांनो, श्री अरबिंदो यांच्याविषयी तुम्ही जेवढं अधिक जाणाल, तेवढेच तुम्ही स्वतःला समजू शकाल, स्वतःला समृद्ध करु शकाल. आयुष्याच्या ज्या भावावस्थेत आपण आज आहात, जे संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात, त्यामध्ये, आपल्याला कायम श्री अरबिंदो यांच्याकडून एक नवी प्रेरणा मिळत राहील, एक नवा मार्ग सापडत राहील. जसे आज आपण सर्व जण, ‘लोकल साठी व्होकल’ ही मोहीम चालवतो आहोत, तर अशा वेळी श्री अरबिंदो यांचे स्वदेशीविषयीचे विचार आपल्याला मार्ग दाखवत आहेत. बांग्ला भाषेतली एक कविता अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणतात–‘छुई शुतो पॉय-मॉन्तो आशे तुंग होते |
दिय-शलाई काठि, ताउ आसे पोते ||
प्रो-दीप्ती जालिते खेते, शुते, जेते |
किछुते लोक नॉय शाधीन ||
याचा अर्थ, आपल्याकडे सुई, आणि आगपेटीची डबी अशा वस्तू सुद्धा परदेशी जहाजांमधून येतात. खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या, कोणत्याही बाबतीत लोक स्वतंत्र नाहीत.
ते म्हणतही असत, आपण आपल्या भारतीय कारागिरांनी, कामगारांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावे, असा स्वदेशीचा अर्थ आहे.
मात्र, श्री अरबिंदो यांचा परदेशांकडून काही शिकण्याला विरोध होता, असे अजिबात नाही. जिथे जे काही नवं आहे, ते आपण शिकावं, जे आपल्या देशासाठी चांगलं असेल, त्यात आपण सहकार्य करावं, प्रोत्साहन द्यावं, हाच तर आत्मनिर्भर भारत आणि ‘व्होकल फॉर लोकल’ या मंत्राचा मतितार्थ आहे. विशेषतः स्वदेशीचा वापर करण्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले आहेत, ते आज प्रत्येक भारतीयाने वाचायला हवेत. मित्रांनो, याचप्रमाणे शिक्षणाविषयी देखील,श्री अरबिंदो यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. ते शिक्षणाकडे केवळ पुस्तकी ज्ञान, पदवी आणि नोकरी मिळवण्याचं साधन, एवढ्याच मर्यादित अर्थाने बघत नसत. श्री अरबिंदो म्हणत- की आपले राष्ट्रीय शिक्षण, आपल्या युवा पिढीच्या मन आणि बुद्धीला प्रशिक्षित करणारे असायला हवे. बुद्धीचा वैज्ञानिक विकास होत रहावा, आणि मनात भारतीय भावना असाव्यात, तरच, एक युवक देश आणि समाजात एक उत्तम नागरिक म्हणून विकसित होऊ शकेल. श्री अरबिंदो यांनी शिक्षणाविषयी जी मते तेव्हा मांडली होती, ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या आज देशात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या रुपानं पूर्ण होत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात, शेती आणि त्याच्याशी सबंधित गोष्टींशी नवे आयाम जोडले जात आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांसाठी अनेक नव्या संधींची दारे उघडली गेली आहेत. गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, ज्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या न कोणत्या वेळी प्रत्येक राजकीय पक्षांनी त्यांना वचन दिलं होतं, त्या मागण्या आज पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यावर असलेली बंधने केवळ रद्दच होणार नाहीत, तर त्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत. या अधिकारांमुळे अगदी अल्पावधीतच, शेतकऱ्यांना होणारे त्रास कमी होऊ लागले आहेत.
महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांनी या नव्या कृषी कायदयाचा वापार कसा केला ते जाणून घेतले पाहिजे. त्यानी शेतात मका लावला आणि उत्तम किंमत मिळावी म्हणून तो मका व्यापाऱ्यांना विकण्याचे निश्चित केले. पिकाची एकूण किंमत 3 लाख 32 हजार इतकी निश्चित झाली. जितेंद्र भोई यांना पंचवीस हजार रुपये आगावू रक्कम म्हणून मिळाले. ठरलं असं होतं की उरलेले पूर्ण पैसे त्यांना पंधरा दिवसांत दिले जातील. मात्र नंतर अशी काही परीस्थिती निर्माण झाली, की त्यांना बाकीचे पैसे मिळालेच नाहीत. शेतकऱ्यांकडून माल विकत घ्यायचा मात्र महिनोन्महिने त्यांचे पैसे चुकवायचे नाहीत,-मकाखरेदीत कदाचित वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे व्यवहार होत असतील, त्याच परंपरेने ते ही वागत होते. अशाप्रकारे चार महिन्यांपर्यंत जितेंद्रजी यांचे पैसे मिळालेच नाहीत. अशा स्थितीत, केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले, ते त्यांच्या कामी आले. या कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे, की शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागतील. आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो.
या कायद्यात आणखी एक खूप महत्वाची गोष्ट आहे. या कायद्यात, अशी तरतूद करण्यात आली आहे की त्या भागातल्या, उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करावं लागेल. आता, जेव्हा अशा कायद्यांची ताकद आपल्या शेतकरी बंधूंजवळ होती, तेव्हा त्यांच्या तक्रारीचं निवारण तर निश्चित होणार होतं. जितेंद्रजी यांनी तक्रार केली आणि काही दिवसांतच त्यांचे पैसे त्यांना मिळाले. म्हणजेच, कायद्याची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ जितेंद्रजी यांची ताकद झाली. क्षेत्र कुठलेही असो, त्या प्रत्येक क्षेत्रात, भ्रम आणि अफवांपासून दूर राहत योग्य आणि खरी माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवणे ही खूप मोठी शक्ती असते. शेतकऱ्यांमध्ये अशीच जागृती करण्याचे काम, राजस्थान मधल्या बारां जिल्ह्यात राहणारे मोहम्मद असलम जी करत आहेत. ते शेतकरी उत्पादक संघटनेचे सीईओ, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत. होय, आपण बरोबर ऐकलंत- शेतकरी उत्पादक संघटनेचे सी ई ओ ! मला आशा आहे, की मोठमोठ्या कंपन्यांच्या सी ईओ ना हे ऐकून चांगलं वाटलं असेल की देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भागात काम करणाऱ्या शेतकरी संघटनांचे देखील सी ई ओ असतात. तर मित्रांनो, मोहम्मद असलम जी यांनी आपल्या भागातल्या अनेक शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवला आहे. या ग्रुपमध्ये ते दररोज, आसपासच्या बाजारमध्ये काय भाव सुरु आहे, त्याची माहिती शेतकऱ्यांना देत असतात. त्यांची स्वतःची संघटना देखील शेतकऱ्यांकडून शेतमाल विकत घेत असते. त्यामुळेच, त्यांच्या या उपक्रमामुळे, शेतकऱ्यांना मालविक्रीचा निर्णय घ्यायला मदत होते.
मित्रांनो, जागृती आहे, तर जिवंतपणा आहे. आपल्या जागरूकतेच्या प्रयत्नांतून हजारो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे एक कृषी उद्योजक आहेत, श्री वीरेंद्र यादव जी. वीरेंद्र यादव जी पूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असत. दोन वर्षांपूर्वी ते भारतात आले आणि आता हरियाणातल्या कैथल इथं राहतात. इतर शेतकऱ्यांसारखी त्यांना सुद्धा शेतातल्या तण-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही एक मोठी समस्या होती. यावर तोडगा काढण्यासाठी व्यापक स्तरावर काम सुरु आहे. मात्र आज, “मन की बात’ या कार्यक्रमात मी वीरेंद्र जी यांचा विशेष उल्लेख यासाठी करतो आहे कारण त्यांचे प्रयत्न वेगळे आहेत, एक नवी दिशा दाखवणारे आहेत. या पिकाच्या तण-अवशेषांवर तोडगा काढण्यासाठी वीरेंद्रजी यांनी या तणाचे गठ्ठे बांधणारी स्ट्रॉ बेलर मशीन विकत घेतली. त्यासाठी त्यांना कृषी विभागाकडून आर्थिक मदतही मिळाली. या मशीनने त्यांनी या तणाचे गठ्ठे तयार केलेत, गठ्ठे तयार केल्यावर त्यांनी हे तण ॲग्रो एनर्जी प्लांट आणि पेपर मिलला विकले. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की वीरेंद्र जी यांनी केवळ दोन वर्षात हे तण विकून दीड कोटींपेक्षा जास्त रुपयांचा व्यापार केला आहे आणि त्यातही सुमारे 50 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. याचा लाभ त्या शेतकऱ्यांनाही मिळाला आहे, ज्यांच्याकडचे तण वीरेंद्रजी यांनी घेतले आहे. आपण कचऱ्यातून सोनं हा वाक्प्रचार तर ऐकला होता. पण हे कृषी तण विकून पैसा आणी पुण्य दोन्ही मिळवण्याचं हे विशेष उदाहरण आहे. माझी युवकांना, विशेषतः कृषीविद्यापीठांमध्ये अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना ही आग्रही विनंती आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गावात जाऊन शेतकऱ्यांना आधुनिक कृषीविषयी, अलीकडेच झालेल्या कृषी सुधारणांविषयी माहिती द्यावी, जागृती करावी. यामुळे, देशात होत असलेल्या मोठ्या परिवर्तनात आपलाही सहभाग होऊ शकेल.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
“मन की बात’ कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या, विविध प्रकारच्या अनेक विषयांवर चर्चा करतो. मात्र, अशा एका गोष्टीला देखील आता जवळपास एक वर्ष होत आहे, जीची आपण कधीच आनंदाने आठवण करु इच्छित नाही. आता जवळपास एक वर्ष होत आले, जेव्हा जगात पहिल्यांदाच कोरोनाचा आजाराविषयी माहिती कळली होती. तेव्हापासून आजपर्यंत संपूर्ण जगानंच अनेक चढउतार पाहिलेत. लॉकडाऊनच्या काळातून बाहेर पडत, आता लसीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक आहे. आपल्याला, कोरोनाविरुद्धचा आपला लढा पुढेही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा आहे.
मित्रांनो, काही दिवसांनीच, सहा डिसेंबर रोजी, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी देखील आहे. हा दिवस बाबासाहेबांना श्रद्धांजली देण्यासोबतच, देशाविषयीचे आपले संकल्प, संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे, तिचे स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाच्या बहुतांश भागात, थंडीचा कडाका देखील वाढतो आहे.
अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील सुरु झाली आहे. या हवामानात, आपल्याला कुटुंबांतल्या मुलांची आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यायची आहे, स्वतः देखील सतर्क रहायचं आहे. जेव्हा लोक आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजूंची, गरिबांची काळजी करतात, तेव्हा ते बघून मला खूप आनंद होतो. उबदार कपडे देऊन लोक त्यांना मदत करतात. अनाथ प्राण्यांना देखील हिवाळ्यात थंडीमुळे खूप त्रास होतो.अनेक लोक त्यांची मदत करायला देखील पुढे येतात. आपली युवा पिढी अशा कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा आपण “मन की बात’ मध्ये भेटू, तेव्हा 2020 चे हे वर्ष संपत असेल. नवी उमेद, नवा विश्वास घेऊन आपण पुढे वाटचाल करुआपल्या ज्या काही सूचना असतील, कल्पना असतील, त्या माझ्यापर्यंत नक्की पोहचवा. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !!
आपण सर्व निरोगी रहा, देशासाठी काम करत रहा. खूप खूप धन्यवाद !!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज विजयादशमी म्हणजे दसऱ्याचा उत्सव आहे. या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याचा हा उत्सव, असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव आहे. परंतु, त्याबरोबरच, हा एक प्रकारे संकटांवर धैर्यानं मिळवलेल्या विजयाचाही उत्सवही आहे. आज, आपण सर्व जण खूप संयमानं जीवन जगत आहात, एका मर्यादेत राहून सण, उत्सव साजरे करत आहात, म्हणून, जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आमचा विजयही अगदी निश्चित आहे. पूर्वी, दुर्गादेवीच्या मंडपात, देवीमाँच्या दर्शनासाठी इतकी मोठी गर्दी होत असे की, एकदम, मेळ्यासारखं वातावरण तयार होत असे,परंतु यंदा असं होऊ शकलं नाही. पूर्वी, दसऱ्याचा दिवशीही मोठमोठे मेळावे आयोजित केले जात, परंतु यावेळी त्यांचं संपूर्ण स्वरूपच वेगळं आहे. रामलीलेचा सण, त्याचं फार मोठं आकर्षण होतं, परंतु त्यातही काही नं काही प्रमाणात बंदी लागू झाली आहे. पूर्वी, नवरात्रिमध्ये, गुजरातच्या गरब्याचा ठेका सर्वत्र व्यापून असायचा. यावेळी, मोठमोठे गरबा आयोजन बंद आहेत. अजून, पुढच्या काही दिवसात अनेक उत्सव येणार आहेत. अजून ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. कोरोनाच्या या संकटकाळात, आम्हाला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे.
मित्रांनो, जेव्हा आम्ही सणांची चर्चा करतो, तयारी करतो, तेव्हा, सर्वात अगोदर मनात हाच विचार येतो की, बाजारात कधी जायचं? कोणत्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खास करून, मुलांमध्ये तर यासाठी विशेषच उत्साह असतो- यावेळी सणाला नवीन काय मिळणार आहे? सणांनी जागवलेली ही उमेद आणि बाजारातील तेजी या एकदुसऱ्याशी जोडलेल्या आहेत. परंतु यावेळी आपण जेव्हा खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा व्होकल फॉर लोकल हा आपला संकल्प जरूर लक्षात ठेवा. बाजारातनं वस्तु खरेदी करताना, आम्हाला स्थानिक उत्पादनांना प्राधान्य द्यायचं आहे.
मित्रांनो, सणांच्या या जल्लोषातच लॉकडाऊनच्या काळाचीही आठवण ठेवली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये, आम्हाला समाजातील आमच्या त्या साथीदारांच्या आणखी निकट जायचं आहे, ज्यांच्याशिवाय आमचं जीवन अत्यंत अवघड झालं असतं- स्वच्छता कर्मचारी, घरात काम करणारे बंधुभगिनी, स्थानिक भाजी विक्रेते, दूध विक्रेते, सुरक्षा रक्षक, या सर्वांची आमच्या जीवनात काय भूमिका आहे, ते आम्हाला चांगलं जाणवलं आहे. अवघड काळात, हे आपल्याबरोबर होते, आम्हा सर्वांच्या समवेत होते. आता, आमच्या उत्सवात, आमच्या आनंदातही, त्यांना आमच्याबरोबर ठेवायचं आहे. माझा आग्रह आहे की, जितपत शक्य असेल, त्यांना आपल्या आनंदात जरूर सामिल करून घ्या. कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच त्यांना सहभागी करून घ्या, मग आपण पहा, आपला आनंद किती पटींनी वाढतो ते.
मित्रांनो, आम्हाला आमच्या जिगरबाज सैनिकांनाही लक्षात ठेवायचं आहे, जे या सणासुदीच्या दिवसांमध्ये सीमेवर देशाच्या रक्षणासाठी पाय रोवून उभे आहेत. भारतमातेची सेवा आणि संरक्षण करत आहेत. त्यांना स्मरणात ठेवूनच आम्हाला आमचे सण साजरे करायचे आहेत. आम्हाला आमच्या घरात एक दिवा, भारतमातेच्या या शूरवीर पुत्र आणि कन्यांच्या सन्मानार्थ लावायचा आहे. मी, आमच्या वीर जवानांना हे सांगू इच्छितो की, भलेही आपण सीमेवर तैनात आहात, परंतु पूर्ण देश आपल्याबरोबर आहे, आपल्यासाठी प्रार्थना करत आहे. ज्यांचे पुत्र आणि कन्या आज सीमांवर तैनात आहेत, त्या कुटुंबाच्या त्यागाला मी नमन करतो. जो कुणी प्रत्येक जण देशाशी संबंधित कोणत्या नं कोणत्या जबाबदारीमुळे आपल्या घरी नाही, आपल्या कुटुंबापासून दूर आहे, मी, त्यांचे मनापासून आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आम्ही लोकलसाठी व्होकल होत आहोत, तेव्हा जग आपल्या स्थानिक उत्पादनांचा चाहतं होत आहे. आमच्या कैक उत्पादनांमध्ये जागतिक म्हणजे ग्लोबल होण्याची खूप मोठी शक्ति आहे. जसं एक उदाहरण आहे – खादीचं. दीर्घकाळापासून खादी ही एक साधेपणाची ओळख बनून राहिली आहे, परंतु, आज आमची खादी, पर्यावरण स्नेही कापड म्हणून ओळखली जात आहे. आरोग्याच्या दृष्टीनं, ही खादी शरीरस्नेही आहे, सर्व हवामानातही उपयुक्त आहे आणि आज खादी ही फॅशन शैली म्हणून तर वापरली जात आहेच. खादीची लोकप्रियता तर वाढत आहेच, परंतु त्याबरोबरच, जगात अनेक ठिकाणी, खादी तयारही केली जात आहे. मेक्सिकोमध्ये एक ठिकाण आहे ओहाका. या क्षेत्रात अनेक गावं अशी आहेत की जिथं, स्थानिक ग्रामीण लोक, खादी विणण्याचं काम करतात. आज, इथली खादी ओहाका खादी म्हणून प्रसिद्धी पावली आहे. ओहाकामध्ये खादी पोहचली कशी, याची कथाही काही कमी रंजक नाही. प्रत्यक्षात, मेक्सिकोचा एक युवक मार्क ब्राऊन यानं एकदा महात्मा गांधी यांच्यावरील एक चित्रपट पाहिला. ब्राऊन हा चित्रपट पाहिल्यावर बापूंच्या कार्यानं इतके प्रभावित झाले की ते भारतात बापूंचा आश्रम पहाण्यास आले आणि बापूंच्या बाबतीत त्यांनी आणखी सखोल जात त्यांच्या कार्याबद्दल जाणून, समजून घेतलं. तेव्हा ब्राऊन यांना याची जाणिव झाली की, खादी हे काही केवळ एक कापड नाही तर संपूर्ण जीवनपद्धती आहे. खादीशी कशा प्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरता यांचं तत्वज्ञान जोडलेलं आहे, हे समजल्यानं ब्राऊन अत्यंत प्रभावित झाले. इथपासूनच ब्राऊन यांनी मेक्सिकोत जाऊन खादीचं काम सुरू करायचा निश्चय केला. त्यांनी, मेक्सिकोच्या ओहाकामध्ये ग्रामीण नागरिकांना खादीचं काम शिकवलं, त्यांना प्रशिक्षित केलं आणि आज ओहाका खादी एक ब्रँड बनली आहे. या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर असं लिहिलं आहे- द सिंबॉल ऑफ धर्मा इन मोशन म्हणजे गतिशील धर्माचं प्रतिक. या संकेतस्थळावर मार्क ब्राऊन यांची अत्यंत मनोरंजक मुलाखतही वाचायला मिळेल.ते सांगतात की, सुरूवातीला लोकांना खादीच्या बाबतीत शंका होत्या, परंतु नंतर लोकांचा खादीतला रस वाढला आणि खादीची बाजारपेठ तयार झाली. ते म्हणतात की, या गोष्टी रामराज्याशी जोडलेल्या आहेत, जेव्हा तुम्ही लोकांच्या गरजा पूर्ण करता, तेव्हा लोकही तुमच्याशी जोडले जाण्यासाठी पुढे येतात.
मित्रांनो, दिल्लीच्या कॅनॉट प्लेसवर असलेल्या एका खादीच्या दुकानात यावेळी गांधी जयंतीच्या दिवशी एकाच दिवसात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक खादीची खरेदी झाली. अशा तऱ्हेने, कोरोनाच्या काळातही खादीचे मास्क अत्यंत लोकप्रिय होत आहेत. देशात अनेक ठिकाणी स्वयंसहाय्यता गट आणि दुसर्या संस्था खादीचे मास्क बनवत आहेत. उत्तरप्रदेशात, बाराबंकीमध्ये, एक महिला आहे-सुमनदेवीजी. सुमनजी यांनी स्वयंसहाय्यता गटातल्या आपल्या महिला साथीदारांच्या समवेत मिळून मास्क बनवण्यास सुरूवात केली. हळूहळू अन्य महिलाही या कार्यात जोडल्या गेल्या, आता त्या सर्वजणी मिळून हजारो खादीचे मास्क बनवत आहेत. आमच्या स्थानिक उत्पादनांचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या समवेत नेहमी संपूर्ण तत्वज्ञान जोडलं गेलेलं असतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा आम्हाला आमच्या वस्तुंबद्दल अभिमान असतो तेव्हा, जगातही त्यांच्याप्रति उत्सुकता वाढत असते. जसे आमचं अध्यात्म, योग, आयुर्वेदानं सर्व जगाला आकर्षित केलं आहे. आमचे अनेक खेळ जगाला आकर्षित करत आहेत. आजकाल, आमचा मल्लखांबसुद्घा, अनेक देशांमध्ये प्रचलित होत आहे. अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली, तेव्हा, त्यांना याला इतकं यश मिळेल, याचा अंदाजही नव्हता. अमेरिकेत आज, अनेक ठिकाणी, मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत. अमेरिकेतला युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या खेळाशी जोडले जात आहेत, मल्लखांब शिकत आहेत.आज, जर्मनी असेल, पोलंड असेल, मलेशिया असेल, अशा जवळपास 20 देशांमध्ये मल्लखांब खूप लोकप्रिय होत आहे. आता तर, याची, जागतिक विजेतेपद स्पर्धाही सुरू करण्यात आली आहे, ज्यात, कित्येक देशांचे प्रतिस्पर्धी भाग घेतात. भारतात तर प्राचीन काळापासून असे अनेक खेळ खेळले जात आहेत, जे आमच्या अंतर्गत, असाधारण विकास करतात. आमचं मन, शरीर संतुलनाला एका वेगळ्याच मितीवर घेऊन जातात. परंतु कदाचित, आमच्या नव्या पिढीचे युवक साथीदारांना, मल्लखांब हा खेळ तितकासा माहित नसण्याची शक्यता आहे. आपण इंटरनेटवर त्याचा शोध घेऊन जरूर पहा.
मित्रांनो, आमच्या देशात किती प्रकारचे मार्शल आर्ट आहे. माझी इच्छा आहे की आमच्या युवक साथीदारांनी त्यांच्याबाबतीतही जाणून घ्यावं, ते शिकावेत, आणि, बदलत्या काळानुसार त्यात नवीन संशोधनही करावं. जेव्हा जीवनात मोठी आव्हानं नसतात, तेव्हा व्यक्तिमत्वातले सर्वश्रेष्ठ गुणही बाहेर येत नाहित. म्हणून आपण स्वतःला नेहमी आव्हान देत रहा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, असं म्हटलं जातं की, शिकणं हेच विकास होणं असतं. आज, मन की बात मध्ये, मी, आपली ओळख अशा एका व्यक्तिशी करून देईन जिच्यात एक वेगळ्याच प्रकारचं झपाटलेपण आहे. हे झपाटलेपण आहे दुसऱ्यांबरोबर वाचन आणि शिकून आनंदाचं वाटप करण्याचं. हे आहेत पोन मरियप्पन. पोन मरियप्पन तमिळनाडूच्या तुतुकुडीमध्ये रहातात. तुतुकुडीला पर्ल सिटी म्हणजे मोत्यांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. हे शहर कधी काळी पांडियन साम्राज्याचं एक महत्वपूर्ण केंद्र होतं. इथं रहाणारे माझे मित्र पोन मरियप्पन, केशकर्तनाच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत आणि एक केशकर्तनालय चालवतात. हे खूप छोटं सलून आहे. त्यांनी एक अनोखं आणि प्रेरणादायक काम केलं आहे. आपल्या सलूनच्या एका भागातच त्यांनी वाचनालय बनवलं आहे.
जर एखादी व्यक्ति सलूनमध्ये आपली पाळी येईपर्यंत प्रतिक्षा करत असताना काही वाचत असेल, आणि जे वाचलं त्याबाबतीत काही लिहून ठेवत असेल, तर तो पोन मरियप्पन त्या ग्राहकाला पैशात सवलत देतात. आहे नं मजेदार. या. पोन मरियप्पन यांच्याशी बातचीत करू या.
प्रधानमंत्रीः पोन मरियप्पन जी, वणक्कम… नल्ला इर किंगडा?
(प्रधानमंत्रीः पोन मरियप्पनजी, वणक्कम.. आपण कसे आहात?)
(पोन मरियप्पनः माननीय प्रधानमंत्रीजी, वणक्कम (नमस्कार)).
प्रधानमंत्रीः वणक्कम, वणक्कम. उंगलक्के इन्द लाईब्रेरी आयडिया येप्पडी वंददा
(प्रधानमंत्रीः वणक्कम, वणक्कम. आपल्याला या पुस्तकालयाची कल्पना आहे, ती कशी सुचली?)
(पोन मरियप्पन यांच्या उत्तराचा हिदी अनुवाद मी आठवी इयत्तेपर्यंत शिकलो आहे. त्याच्यापुढे मी कौटुंबिक परिस्थितीमुळे शिकू शकलो नाही. जेव्हा मी शिकलेल्या लोकांकडे पहातो, तेव्हा मला एक प्रकारची कमतरता जाणवत होती. म्हणून, माझ्या मनात आलं की आम्ही एक पुस्तकालय का सुरू करू नये, आणि त्याचा, खूप लोकांना लाभ होईल, हीच गोष्ट माझ्यासाठी प्रेरणा बनली.)
प्रधानमंत्रीः उंगलक्के येन्द पुत्तहम पिडिक्कुम?
(प्रधानमंत्रीः आपल्याला कोणतं पुस्तक जास्त आवडतं?
(पोन मरियप्पनः मला तिरूकुरूल खूप आवडतं.)
प्रधानमंत्रीः उंगकिट्ट पेसीयदिल येनक्क. रोम्बा मगिलची. नल वाड तुक्कल
(प्रधानमंत्रीः आपल्याशी बोलल्यामुळे मला अत्याधिक आनंद झाला आहे. आपल्याला खूप शुभेच्छा.
(पोन मरियप्पनः मलाही माननीय प्रधानमंत्र्यांशी बोलताना खूप खूप प्रसन्न वाटत आहे.)
प्रधानमंत्री नल वाड तुक्कल.(अनेकानेक शुभेच्छा.)
पोन मरियप्पनः धन्यवाद प्रधानमंत्री जी.
प्रधानमंत्री थँक यू.
आम्ही आताच पोन मरियप्पन यांच्याशी चर्चा केली. पहा, कसे ते लोकांच्या डोक्याची सजावट करताना त्यांना आपल्या जीवनाची सजावट करण्याचीही संधी देत आहेत. थिरूकुरूलच्या लोकप्रियतेच्याबाबतीत ऐकून खूप चांगलं वाटलं. थिरूकुरूलच्या लोकप्रियतेबद्दल आपण सर्वांनीही ऐकलं. आज भारताच्या सर्व भाषांमध्ये थिरूकुरूल उपलब्ध आहे. संधी मिळाली तर अवश्य वाचलं पाहिजे. जीवनासाठी ते एक प्रकारे ते मार्गदर्शक आहे.
मित्रांनो, आपल्याला हे जाणून आनंद होईल की संपूर्ण भारतात अनेक लोक असे आहेत की ज्यांना ज्ञानाच्या प्रसार केल्यानं अपार आनंद मिळतो. ये लोक असे आहेत की प्रत्येक जण वाचण्यासाठी प्रेरित होईल यासाठी नेहमी तत्पर असतात. मध्यप्रदेशच्या सिंगरौली इथल्या शिक्षिका, उषा दुबे जींनी तर आपल्या स्कूटीलाच फिरत्या पुस्तकालयात परिवर्तित केलं आहे. त्या दररोज आपल्या फिरत्या वाचनालयासहित कोणत्या नं कोणत्या गावात पोहचतात आणि तिथल्या मुलांना शिकवतात. मुलं त्यांना प्रेमानं पुस्तकवाली दीदी म्हणतात. यावर्षी अरूणाचल प्रदेशच्या निरजुलीच्या रायो गावात एक स्वयंसहाय्यता वाचनालय बनवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात, इथल्या मीना गुरूंग आणि दिवांग होसाई यांना जेव्हा त्या भागात वाचनालय नाही, असं समजलं तेव्हा त्यांनी त्याच्या निधीपुरवठ्यासाठी हात पुढे केला. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की या वाचनालयासाठी सदस्यत्व वगैरे काही नाही. कुणीही व्यक्ति दोन आठवड्यांसाठी पुस्तक घेऊन जाऊ शकतो. वाचल्यानंतर पुस्तक परत करावं लागतं. हे वाचनालय आठवड्याचे सातही दिवस आणि चोविस तास खुलं असतं. आसपासचे पालक त्यांची मुलं पुस्तकं वाचण्यात गुंग झाले आहेत, हे पाहून खुष आहेत.
खासकरून, जेव्हा शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. चंडीगढमध्ये एक एनजीओ चालवणारे संदीप कुमार जी यांनी एका मिनीव्हॅनमध्ये फिरतं ग्रंथालय तयार केलं आहे, याच्या माध्यमातनं गरिब मुलांना वाचण्यासाठी विनामूल्य पुस्तकं दिली जातात. यासह, गुजरातच्या भावनगरमध्येही दोन संस्थांची मला माहिती आहे की ज्या अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहेत. यापैकीच एक आहे विकास वर्तुल ट्रस्ट. ही संस्था स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सहाय्यकारी आहे. हा ट्रस्ट 1975 पासून काम करत आहे आणि पाच हजार पुस्तकांसह 140 हून अधिक मासिकं उपलब्ध करून देते. अशीच एक संस्था पुस्तक परब आहे. हा नाविन्यपूर्ण संशोधनाचा प्रकल्प आहे, ज्यात साहित्यिक पुस्तकांबरोबरच अन्य पुस्तकंही निःशुल्क उपलब्ध करून देतात. या वाचनालयात अध्यात्मिक, आयुर्वेदिक उपचार आणि अन्य कित्येक विषयांशी संबंधित पुस्तकांचाही समावेश आहे. आपल्यालाही जर अशा काही प्रयत्नांच्या बाबतीत माहिती असेल तर माझा आग्रह आहे की, समाजमाध्यमांवर तुम्ही त्याची जरूर माहिती द्या. हे उदाहरण केवळ पुस्तक वाचणं किंवा वाचनालय सुरू करणं यापुरतंच मर्यादित नाही तर, नव्या भारताच्या भावनेचं प्रतिक आहे, ज्यामुळे समाजाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्र आणि प्रत्येक स्तरातील लोक नवीन आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा स्विकार करत आहेत. गीतेत म्हटलं आहे
न हि ज्ञानेन सदृष्यं पवित्र मिह विद्यते
अर्थात, ज्ञानासारखं, जगात काहीच पवित्र नाही . ज्ञानाचा प्रसार करणारे, त्यासाठी
प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या सर्व महोदयांचं मी, मनापासून अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो काही दिवसातच सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, 31 ऑक्टोबर, आपण सर्व राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करू. मन की बात मध्ये याच्या आधीही आपण सरदार पटेलांवर विस्तारपूर्वक बोललो आहोत. त्या महान व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंवर आपण चर्चा केलेली आहे. वैचारिक सखोलता, नैतिक साहस, राजनैतिक विलक्षणता, कृषी क्षेत्राचे सखोल ज्ञान आणि राष्ट्रीय एकतेबद्दल समर्पण भाव- खूप कमी लोक सापडतील की ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतके सगळे गुण एकत्रित झालेले असतील.
सरदार पटेल यांची विनोदबुद्धी दाखवणारी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का? जरा कल्पना करा, लोह पुरुषाचे चित्र! राजेरजवाड्यांच्या बरोबर चर्चा करत आहेत, पूज्य बापूजींच्या बरोबर लोक अभियानाची व्यवस्था करत आहेत, त्याचबरोबर इंग्रजांशी पण लढत आहेत आणि ह्या सगळ्यात देखील त्यांची विनोदबुद्धी पूर्णपणे जागृत असायची !
बापूजींनी सरदार पटेल यांच्या विषयी म्हटलं होतं की त्यांच्या विनोदी गप्पा गोष्टी मला एवढ्या हसवतात की हसून हसून माझे पोट दुखायला लागते आणि असे एकदा नाही तर दिवस भरात कित्येकदा होते. याच्यात आपल्यासाठी पण एक शिकवण आहे. ती अशी की कितीही वाईट परिस्थिती असेल तरीही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवायला हवी. विनोद बुद्धी आपल्याला सहज/ स्वाभाविक तर ठेवतेच पण आपल्या समस्येवर आपण मार्ग देखील शोधू शकतो. सरदार साहेबांनी हेच तर केले होते.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण जीवन, देशाच्या एकतेसाठी समर्पित केले होते. त्यांनी भारतीय जनमानसाला, स्वतंत्रता आंदोलनाच्या सोबत जोडले. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडल्या/ स्वातंत्र्य आंदोलनाचा भाग बनवल्या. त्यांनी राजेरजवाड्यांना आपल्या राष्ट्रात सामील करण्यासाठी काम केले. ते प्रत्येक भारतीय मनात, ‘ विविधतेतून एकता’ हा मंत्र जागवत राहिले.
मित्रांनो आज आपल्याला, आपली वाणी, आपला व्यवहार, आपले काम, प्रत्येक क्षणी त्या सर्व गोष्टींना पुढे न्यायचे आहे ज्या आम्हाला एक करतील. ज्या देशाच्या एका भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात, अगदी दूर दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांच्या बाबत, आपलेपणाचा आणि सहजतेचा भाव निर्माण करतील.
आपल्या पूर्वजांनी अनेक शतकांपासून नेहमीच असे प्रयत्न केले आहेत. आता असे बघा, केरळ मध्ये जन्मलेल्या पूज्य आदी शंकराचार्यांनी भारताच्या चारी दिशांना चार महत्त्वपूर्ण मठांची स्थापना केली. उत्तरेतला बद्रिकाश्रम, पूर्वमध्ये पुरी, दक्षिणेत शृंगेरी आणि पश्चिमेला द्वारका. त्यांनी श्रीनगरची यात्रा देखील केली होती. म्हणूनच तिथे एक शंकराचार्य हिल/ टेकडी आहे.
ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांची साखळी भारताला एका सूत्रात बांधते. त्रिपुरा पासून गुजरात पर्यंत, जम्मू-काश्मीर पासून तामिळनाडू पर्यंत असलेली आमची श्रद्धास्थाने आम्हाला एक करतात. भक्तिमार्ग चळवळ संपूर्ण भारतात, एक लोक चळवळ बनली, ज्यांनी आम्हाला भक्तीच्या माध्यमातून एकत्र केले.
एकतेची ताकद असणाऱ्या गोष्टी आमच्या रोजच्या जीवनात देखील कशा मिसळल्या गेल्या आहेत?!! कोणत्याही अनुष्ठानाच्या आधी वेगवेगळ्या नद्यांना आवाहन केले जाते. यात अगदी सुदूर उत्तरेत असलेल्या सिंधू नदीपासून, दक्षिण भारताची जीवनदायिनी असलेल्या कावेरी नदी पर्यंत, सगळ्या नद्या सामील आहेत. नेहमी स्नान करताना, आपल्याकडे मोठ्या पवित्र भावनेने, एकतेचा मंत्रच तर म्हटला जातो!
गंगेच यमुने चैव गोदावरि सरस्वती I
नर्मदे सिन्धु कावेरि जलेSस्मिन् सन्निधिं कुरु II
अशाच प्रकारे शिखांच्या पवित्र स्थळात नांदेड साहेब गुरुद्वारा पण आहे आणि पटना साहेब गुरुद्वारा पण आहे. आमच्या शीख गुरूंनी देखील, आपल्या जीवन आणि आपल्या सत्कार्यांच्या माध्यमातून एकतेची भावना दृढ केली.
मागच्या शतकात, आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विभूती होऊन गेल्या, ज्यांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून एकत्र केले.
मित्रांनो,
unity is power, unity is strength
unity is progress, unity is empowerment
United we will scale new heights
तसेच अशाही काही शक्ती कार्यरत आहेत ज्या नेहमीच आमच्या मनात संशयाचे बीज पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाने देखील, अगदी प्रत्येक वेळी, त्यांच्या या वाईट उद्देशांना सडेतोड उत्तर दिलेले आहे. आम्हाला नेहमीच आपल्या सर्जनशीलतेने, प्रेमाने, प्रत्येक क्षणी, प्रयत्नपूर्वक, आपल्या छोट्या छोट्या कामांमधून, एक भारत श्रेष्ठ भारत, हे तत्व सुंदर रंगात साकार करायचे आहे. त्यात एकतेचे नवे रंग भरायचे आहेत आणि प्रत्येक नागरिकाला हे भरायचे आहेत! यासंदर्भात मी आपल्याला एक वेबसाईट /संस्थळ बघण्याची विनंती करेन ekbharat.gov.in (एक भारत डॉट गव डॉट इन) ह्या संस्थळावर, आपली राष्ट्रीय एकतेची मोहिम पुढे नेणारे अनेक प्रयत्न आपल्याला बघायला मिळतील.
त्यातीलच एक आकर्षक कोपरा आहे, आजचे वाक्य हा!! या भागात रोज एक वाक्य वेगवेगळ्या भाषेत कसे बोलले जाते तेआपण शिकू शकतो. आपण या संस्थळावर आपला सहभाग देखील द्या. जसे की वेगवेगळ्या राज्यातील, संस्कृतीतील, वेगवेगळ्या विशेष पाककृती असतील. स्थानिक स्तरावरील साहित्यापासून म्हणजे धान्य आणि मसाल्यांपासून त्या बनवल्या जातात. आपण या स्थानिक अन्नाच्या पाककृतीला, स्थानिक घटक पदार्थांच्या नावासकट, एक भारत श्रेष्ठ भारत, या संस्थळावर शेअर करू शकतो का? लिहू शकतो का?
एकता आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी याच्याहुन चांगला उपाय आणखी कोणता असू शकेल?
मित्रांनो, या महिन्याच्या 31 तारखेला, मला केवडियामध्ये ऐतिहासिक अशा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ स्थानावर होणाऱ्या, अनेक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. आपण देखील नक्की सहभागी व्हा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, 31 ऑक्टोबरला आपण वाल्मिकी जयंती देखील साजरी करतो. मी महर्षी वाल्मिकींना नमन करतो आणि ह्या विशेष प्रसंगी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. महर्षी वाल्मिकींचे महान विचार, करोडो लोकांना प्रेरणा देतात, शक्ती प्रदान करतात. ते विचार लाखो-करोडो गरीब आणि दलितांसाठी एक मोठी आशा आहेत. त्यांच्यात आशा आणि विश्वास ह्यांचा संचार होतो.
ते म्हणतात की “माणसाची इच्छाशक्ती जर त्याच्या बरोबर असेल, तर तो कोणतेही काम अगदी सहज करू शकतो”. ही इच्छाशक्तीच आहे की जी अनेक तरुणांना, असामान्य कार्य करण्याची शक्ती देते. महर्षी वाल्मिकी ह्यांनी सकारात्मक विचारांवर भर दिला आहे. त्यांच्यासाठी सेवा आणि माणसाचा आत्मसन्मान सर्वश्रेष्ठ आहे. महर्षी वाल्मिकी यांचे आचार विचार आणि आदर्श आज नव्या भारताच्या आमच्या संकल्पाची प्रेरणा आहेत आणि त्यासाठी मार्गदर्शक देखील आहेत. त्यांनी येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रामायणासारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, आम्ही महर्षी वाल्मिकी यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहू.
31 ऑक्टोबरला भारताच्या पूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना आपण गमावले. मी आदरपूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो आज काश्मीरमधील पुलवामा, संपूर्ण देशाला शिक्षण देण्यात एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आज देशभरात मुले आपला गृहपाठ करतात, नोट्स काढतात, तेव्हा कुठे न कुठे याच्यामागे पुलवामाच्या लोकांचे कठोर परिश्रम आहेत. कश्मीर खोरे, संपूर्ण देशभरातील, जवळजवळ 90 टक्के पेन्सिल स्लेट, लाकडी पट्टी ची मागणी पुरी करते आणि त्यात देखील खूप मोठा भाग पुलवामा चा आहे. एक काळ असा होता की जेव्हा आपण विदेशातून पेन्सिली साठी लाकूड मागवत होतो. पण आता आमचा पुलवामा, ह्या क्षेत्रात, देशाला आत्मनिर्भर बनवतो आहे. खरेतर पुलवामा च्या पेन्सिल सलेट्स राज्यांच्या मधली अंतर कमी करत आहेत.
खोऱ्यातील चिनारच्या लाकडामध्ये उच्च आर्द्रता प्रमाण असते तसेच कोमलता असते. त्यामुळे पेन्सिल तयार करण्यासाठी ते सर्वात सुयोग्य ठरते. पुलवामा मधील उक्खू हे गाव पेन्सिल ग्राम ह्या नावानेच ओळखले जाते. इथे पेन्सील स्लेट निर्माण करणारे अनेक गट आहेत, जे रोजगार उपलब्ध करुन देत आहेत आणि यात खूप मोठ्या संख्येने महिला काम करत आहेत.
मित्रांनो जेव्हा पुलवामा मधील लोकांनी काहीतरी नवे करायचे ठरवले, काम करण्याची जोखीम उचलली आणि स्वतःला कामासाठी पूर्णपणे समर्पित केले, तेव्हाच पूलवामाची ही ओळख निर्माण होऊ शकली.
अशाच मेहनती लोकांपैकी एक आहेत, मंजुर अहमद अलाई. आधी मंजूर भाई लाकूड कापणारे एक सामान्य मजूर होते. पण आपल्या येणाऱ्या पिढयांना गरीबीत जगायला लागू नये म्हणून मंजूर भाईंना काहीतरी नवे करायची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली वडिलोपार्जित जमीन विकली आणि सफरचंद ठेवण्यासाठीची लाकडी खोकी तयार करण्याचे युनिट सुरू केले.
ते आपल्या या छोट्याश्या उद्योगात व्यस्त असतानाच त्यांना माहिती मिळाली कि पेन्सिल तयार करण्यासाठी, poplar वूड म्हणजेच चिनारच्या लाकडाचा उपयोग करणे सुरू झाले आहे. ही माहिती मिळाल्यावर मंजूर भाईंनी, आपल्या उद्योगशीलतेचा परिचय देत, पेन्सिल तयार करणाऱ्या काही प्रसिद्ध गटांसाठी, पोपलार वुडन बॉक्स म्हणजे चिनारच्या लाकडी खोक्यांचा पुरवठा सुरू केला. मंजूर भाईंना हे खूप फायदेशीर वाटले, आणि त्यांची कमाई देखील चांगली वाढू लागली.
हळूहळू त्यांनी पेन्सिल स्लेट तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री देखील घेतली आणि त्या नंतर त्यांनी देशातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना पेन्सिल सलेट्सचा पुरवठा सुरू केला. आज मंजूर भाईंच्या या उद्योगाची उलाढाल करोडोंमध्ये आहे आणि ते जवळपास दोनशे लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.
आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून संपूर्ण देशवासीयांच्या वतीने मी मंजूर भाईंच्यासकट पुलवामातील मेहनती बंधू-भगिनींची आणि त्यांच्या परिवारांची प्रशंसा करतो. तुम्ही सगळ्यांनी देशातील तरुण मनांना शिक्षण देण्यासाठी, आपले बहुमूल्य योगदान दिलेले आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञान अधिष्ठित सेवा वितरणाचे, अनेक प्रयोग आपल्या देशात झाले आणि आता असे राहिलेले नाही की केवळ खूप मोठ्या तंत्रज्ञान आणि पुरवठा कंपनीच हे काम करू शकतात.
झारखंड मधील बचत गटातील काही महिलांनी देखील हे काम करून दाखवले आहे. या महिलांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाज्या आणि फळे थेट घरोघर पोचवली. या महिलांनी आजीविका फार्म फ्रेश नावानी एक ॲप बनवले ज्यावरून लोक अगदी सहज भाज्या मागवू शकतात. या संपूर्ण प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना आपल्या भाज्या आणि फळांचा चांगले मूल्य मिळाले आणि लोकांना ताज्या भाज्या मिळाल्या. तिथे आजीविका फार्म फ्रेशची कल्पना खूप लोकप्रिय होते आहे.लॉक डाऊन मध्ये त्यांनी पन्नास लाख रुपयांपेक्षाही जास्त किमतीच्या फळे आणि भाज्या लोकांपर्यंत पोहोचवल्या.
मित्रांनो शेती क्षेत्रात, नव्या नव्या शक्यता निर्माण होताना पाहून, आमचे तरुण देखील ह्यात, मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. मध्यप्रदेशातील बडवानीमधील अतुल पाटीदार यांनी इ प्लॅटफॉर्म फार्म कार्ड च्या माध्यमातून आपल्या भागातील चार हजार शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून जोडले आहे. हे शेतकरी अतुल पाटीदार यांच्या इ प्लॅटफॉर्म फार्म कार्ड च्या माध्यमातून शेतीचे सामान, खते, बियाणे कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादीं घरपोच मागवू शकतात. म्हणजेच शेतकऱ्यांच्या घरांपर्यंत त्यांना आवश्यक असणारे सामान पोहोचत आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधुनिक कृषी उपकरणे देखील भाड्याने मिळतात. लॉकडाऊनच्या काळात देखील, या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना कापूस आणि इतर भाज्यांची बियाणे असलेली, हजारो पाकिटे पोचवली गेली. अतुल जी आणि त्यांचा चमू शेतकऱ्यांना तंत्रज्ञान विषयी जागरूक करतो आहे, ऑनलाइन पेमेंट आणि खरेदी शिकवतो आहे.
मित्रांनो, अशातच महाराष्ट्रातील एका घटनेकडे माझे लक्ष गेले. तिथे एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीने मक्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मका खरेदी केला. कंपनीने या वेळी शेतकऱ्यांना मालाच्या किमती शिवाय, एक वेगळा बोनस देखील दिला. शेतकऱ्यांना सुखद आश्चर्य वाटले. जेव्हा त्यांनी कंपनीला विचारले तेव्हा कंपनीने सांगितले की भारत सरकारच्या नव्या शेती नियमानुसार, शेतकरी भारतात कुठेही आपले उत्पादन विकू शकतो आणि त्याची त्यांना चांगली किंमत मिळते आहे. म्हणून त्यांनी असा विचार केला की हा जास्तीचा मिळालेला नफा, शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यायला हवा. त्या नफ्यावर शेतकऱ्यांचा देखील हक्क आहे. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बोनस दिला आहे.
मित्रांनो, बोनस आत्ता कदाचित कमी देखील असेल. पण ही सुरुवात खूप मोठी आहे. यामुळे आपल्याला कळते आहे की तळागाळातील शेतकऱ्यांच्या हिताचे, अनेक बदल होण्याच्या कशा प्रकारच्या शक्यता, या नव्या शेतीविषयक कायद्यात आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो आज मन की बात च्या माध्यमातून देशवासीयांच्या यशोगाथासंबंधी, आमच्या देशाच्या, आमच्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या परिमाणावर आपल्या सगळ्यांशी बोलण्याची संधी मिळाली.
आमच्या देशात अनेक प्रतिभावंत लोक आहेत. जर तुम्हालाही असे लोक माहिती असतील तर त्यांच्या विषयी बोला, लिहा आणि त्यांच्या यशोगाथा सर्वांपर्यंत पोहोचवा.
येणार्या सण, उत्सवानिमित्त आपल्याला आणि आपल्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा! पण एक लक्षात ठेवा, सणांच्या काळात विशेष करून लक्षात ठेवा, की मास्क घालायचा आहे, हात साबणाने धुत राहायचे आहे आणि दोन गज अंतर ठेवायचे आहे!
मित्रांनो पुढच्या महिन्यात पुन्हा आपल्याशी ‘मन की बात’ होईल!
अनेक अनेक धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. कोरोनाच्या या काळात संपूर्ण जग अनेक बदल अनुभवते आहे. आज सार्वजनिक जीवनात वावरताना परस्परांपासून दोन मीटर अंतर राखणे, ही काळाची गरज झाली आहे, त्याच वेळी या कोरोना काळाने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम सुद्धा केले आहे. मात्र इतका दीर्घ काळ एकत्र राहायचे, कसे राहायचे, वेळ कसा घालवायचा, प्रत्येक क्षण आनंदात कसा घालवता येईल? खरे तर अनेक कुटुंबांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्याचे कारण होते, प्रत्येक कुटुंबात चालत आलेल्या परंपरा आणि संस्कारांची कमतरता. असे वाटते आहे की अशी अनेक कुटुंबे आहेत, ज्यांमध्ये यापैकी काहीच शिल्लक नाही आणि त्यामुळे, त्या अभावामुळे संकटाचा हा काळ व्यतीत करणे, काही कुटुंबांना थोडे कठीण जाते आहे, आणि, त्यात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? प्रत्येक कुटुंबात वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती गोष्टी सांगत असत आणि घराला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देत असत. आपल्या पूर्वजांनी ज्या प्रथा सुरू केल्या होता, त्या किती महत्त्वाच्या होत्या आणि जेव्हा आपण त्यांचे पालन करत नाही तेव्हा आपल्याला त्यांचा किती अभाव जाणवतो, याची जाणीव आपल्याला या काळात निश्चितच झाली असेल. अशीच एक प्रथा म्हणजे गोष्टी सांगण्याची कला. मित्रहो, मानवी संस्कृतीइतकाच कथा-कहाण्यांचा इतिहास जुना आहे.
'Where there is a soul, there is a story.'
गोष्टींमधून लोकांची सर्जनशील आणि संवेदनशील बाजू आपल्यासमोर येते, व्यक्त होते. गोष्टीची खरी ताकत अनुभवायची असेल तर एखादी आई आपल्या बाळाला झोपवताना किंवा जेवण भरवताना गोष्ट सांगत असते, तेव्हा निरीक्षण करा. मी आयुष्यात दीर्घकाळ परिव्राजक म्हणून भटकंती करत राहिलो आहे. भटकंती करणे हेच माझे आयुष्य होते. रोज नवे गाव, नवी माणसे, नवी कुटुंबे. या कुटुंबांसोबत मी राहत असे, तेव्हा मी तेथील बालकांसोबत गप्पा मारत असे आणि बरेचदा त्या बालकांना सांगत असे, चला, आता मला कोणीतरी गोष्ट सांगा बघू.. त्यांची उत्तरे ऐकून मला आश्चर्य वाटे. मुले मला सांगत, नाही काका, आम्ही गोष्ट नाही सांगणार, आम्ही किस्सा सांगतो. आणि ती मुले मला सुद्धा किस्सा सांगण्याचाच आग्रह करत असत. म्हणजेच गोष्ट या प्रकाराशी त्यांचा परिचयच नव्हता आणि त्यांचे अवघे आयुष्य अशा किश्श्यांनीच समृद्ध झाले होते.
मित्रहो, भारताला गोष्ट सांगण्याची किंवा किस्से सांगण्याची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. आम्ही अशा देशाचे नागरिक आहोत, जिथे हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा चालत आली आहे. विवेक आणि बुद्धिमत्ता यांचे महत्व पटवून द्यावे, यासाठी आमच्या गोष्टींमध्ये पशुपक्षी आणि पऱ्यांचे काल्पनीक विश्व रचले गेले. या परंपरेचा आम्हाला अभिमान आहे. आमच्याकडे कथा सांगण्याची परंपरा सुद्धा पूर्वापारपासून चालत आली आहे. धार्मिक गोष्टी सांगण्याची ही प्राचीन पद्धत आहे. यात 'कथाकालक्षेवम' सुद्धा समाविष्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या लोककथा सुद्धा प्रचलित आहेत. तमिळनाडू आणि केरळमध्ये अतिशय रोचक पद्धतीने गोष्ट सांगितली जाते. या पद्धतीला 'विल्लू पाट' असे म्हटले जाते. गोष्ट आणि संगीत यांचा सुंदर मेळ या पद्धतीत अनुभवायला मिळतो. भारतात कठपुतळी ही सुद्धा पारंपारिक कला आहे. अलीकडच्या काळात विज्ञान आणि विज्ञान संबंधित काल्पनिक कथा तसेच कथा सांगण्याच्या पद्धती लोकप्रिय होत आहेत. अनेक लोक किस्से सांगण्याची कला लोकप्रिय करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहे, हे मी पाहिले आहे. Gathastory.in सारख्या काही संकेतस्थळाबद्दल सुद्धा मला माहिती मिळाली, जिथे इतरांसोबत अमर व्यास यांच्या कथाही उपलब्ध आहेत. अमर व्यास हे आय आय एम अहमदाबाद येथून एम बी ए पूर्ण करून परदेशी निघून गेले होते, काही काळाने ते भारतात परतले. ते सध्या बेंगळुरू येथे राहतात आणि वेळात वेळ काढून अशा प्रकारचे गोष्टींशी संबंधित कौतुकास्पद कार्य करत आहेत. याव्यतिरिक्त सुद्धा असे अनेक प्रयत्न सुरू आहेत, जे ग्रामीण भारतातील कथा लोकप्रिय करत आहेत. वैशाली व्यवहारे देशपांडे यांच्यासारखे अनेक जण मराठी भाषेत सुद्धा हा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
चेन्नई येथील श्रीविद्या आणि राघवन सुद्धा आपल्या संस्कृतीशी संबंधित कथांचा प्रचार आणि प्रसार करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर कथालय आणि The Indian storytelling network ही दोन संकेतस्थळे सुद्धा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत आहेत. गीता रामानुजन यांनी kathalaya.org मध्ये कथा संकलित केल्या आहेत तर The Indian storytelling network च्या माध्यमातून कथाकार यांचे एक जाळे तयार केले जाते आहे. बंगळुरू मध्ये विक्रम श्रीधर नावाचे एक गृहस्थ आहेत, जे बापूंशी संबंधित कथा उत्कृष्ट पद्धतीने सादर करतात. त्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक लोक या क्षेत्रात काम करत असतील. आपण समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतच्या माहितीची देवाण-घेवाण अवश्य करा.
आज बंगळुरू story telling society च्या भगिनी अपर्णा अथ्रेया आणि इतर सदस्य सुद्धा आपल्या सोबत आहेत. या, त्यांच्यासोबत गप्पा मारूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया.
पंतप्रधान:- हॅलो
अपर्णा :- नमस्कार आदरणीय पंतप्रधानजी. आपण कसे आहात?
पंतप्रधान:- मी ठीक आहे आपण कशा आहात अपर्णा जी ?
अपर्णा :- मी सुद्धा छान आहे सर. आमच्यासारख्या कलाकारांना आपण या मंचावर आमंत्रित केले आणि आमच्या सोबत संवाद साधत आहात. त्याबद्दल सर्वात आधी Bangalore storytelling society तर्फे मी आपले आभार मानू इच्छिते.
पंतप्रधान:- मी ऐकले आहे की आज तुम्ही तुमच्या संपूर्ण चमू सह उपस्थित आहातअपर्णा :- हो सर
पंतप्रधान :- मग तुम्ही आपल्या चमूशी आमची ओळख करून द्या, म्हणजे मन की बात च्या श्रोत्यांची सुद्धा त्यांच्याशी ओळख होईल आणि आपण कशा प्रकारची मोहीम राबवीत आहात, हे समजू शकेल.
अपर्णा :- सर, माझे नाव अपर्णा अथ्रेय आहे. मी दोन मुलांची आई आहे. भारतीय वायुसेनेतील एका अधिकाऱ्याची मी पत्नी आहे आणि कथा सांगणे हा माझा छंद आहे. पंधरा वर्षांपूर्वी जेव्हा मी सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत होते, तेव्हा story telling ची सुरुवात झाली. CSR project अंतर्गत स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी मी गेले, तेव्हा हजारो बालकांना गोष्टींच्या माध्यमातून शिकवण्याची संधी मला मिळाली. ज्या गोष्टी मी त्या बालकांना सांगत होते, त्या मी माझ्या आजीकडून ऐकल्या होत्या. मी जेव्हा त्या बालकांना गोष्टी सांगत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहिला. तो आनंद पाहिला तेव्हाच story telling चे ध्येय मी निश्चित केले सर.
पंतप्रधान :- तुमच्या चमूमध्ये आणखी कोण आहे?
अपर्णा:- माझ्यासोबत शैलजा संपत आहेत
शैलजा:- नमस्कार सर
पंतप्रधान:- नमस्कार
शैलजा:- मी शैलजा संपत बोलते आहे. आधी मी शिक्षिका म्हणून कार्यरत होते. त्यानंतर माझी मुले मोठी झाली आणि मी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. मात्र अंतिमतः गोष्टी सांगण्यात मला सर्वात जास्त आनंद मिळाला.
पंतप्रधान:- धन्यवाद
शैलजा:- माझ्यासोबत सौम्या आहे
सौम्या:- नमस्कार सर !
पंतप्रधान:- नमस्कार
सौम्या:- माझे नाव सौम्या श्रीनिवासन आहे. मी एक मानसशास्त्रज्ञ आहे. माझ्या कामाचा एक भाग म्हणून लहान मुले आणि मोठी माणसे यांच्यासोबत संवाद साधताना मी कथांच्या माध्यमातून मानवी अंतरंगातील नवरसांना जागृत करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांच्या सोबत गप्पा सुद्धा मारते. Healing and transformative story telling, हे माझे उद्दिष्ट आहे.
अपर्णा:- नमस्कार सर
पंतप्रधान:- नमस्कार
अपर्णा: माझे नाव अपर्णा जयशंकर आहे. माझ्या दोन्ही आजी-आजोबांसोबत देशाच्या विविध भागांमध्ये माझे बालपण गेले, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्याचमुळे रामायण, पुराणे आणि भगवद्गीतेतील कथा मला प्रत्येक रात्री ऐकायला मिळत असत आणि Bangalore storytelling society सारखी संस्था लाभल्यानंतर मी story teller होणे स्वाभाविक होते. माझी सहकारी लावण्या प्रसाद माझ्या सोबत आहे.
प्रधानमंत्री:- लावण्या जी, नमस्कार !
लावण्या:- नमस्कार सर. मी खरे तर इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मात्र आता मी प्रोफेशनल स्टोरी टेलर म्हणून कार्यरत आहे. माझ्या आजोबांकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकत मी लहानाची मोठी झाले. मी ज्येष्ठ नागरिकांसोबत काम करते. 'रुट्स' या माझ्या विशेष प्रकल्पात ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबासोबतच्या जीवन कथा लिखित स्वरूपात तयार करण्यात मी त्यांची मदत केली आहे.
पंतप्रधान:- लावण्याजी आपले मनापासून अभिनंदन. आताच आपण सांगितले त्याच प्रमाणे मी सुद्धा एकदा मन की बात कार्यक्रमात सगळ्यांना सांगितले होते की जर आपल्या कुटुंबात आजी-आजोबा असतील तर त्यांना त्यांच्या बालपणीच्या गोष्टींबद्दल विचारा, त्या रेकॉर्ड करा. पुढच्या काळात त्या नक्कीच कामी येतील. आपण सर्वांनी आपला परिचय दिला, तो ऐकून मला आनंद झाला. आपल्या कलेबद्दल, आपल्या संवादकौशल्याबद्दल, अतिशय कमी शब्दात उत्तम प्रकारे आपण सर्वांनी स्वतःचा परिचय करून दिला, त्याबद्दल सुद्धा मी आपले अभिनंदन करतो.
लावण्या:- धन्यवाद सर, धन्यवाद !
पंतप्रधान:- आता आमचे जे मन की बात कार्यक्रमाचे श्रोते आहेत, त्यांना सुद्धा गोष्ट ऐकावीशी वाटत असेल. आपण 1-2 गोष्टी सांगाव्यात, अशी मी विनंती करू शकतो का?
समूह स्वर: का नाही सर, ती तर आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे.
चला तर मग, गोष्ट ऐकूया, एका राजाची. राजाचे नाव होते कृष्णदेवराय आणि राज्याचे नाव होते विजयनगर. महाराज होते आपले अतिशय गुणी. त्यांच्यात अगदी दोष काढायचाच झाला तर तो म्हणजे त्यांचे आपल्या मंत्र्यावर, तेनालीरामावर असलेले प्रेम आणि भोजनावर असलेले प्रेम. रोज दुपारच्या भोजनाची वेळ झाली की महाराजांना वाटे, आज नक्कीच काहीतरी छान खायला मिळेल आणि त्यांचे आचारी मात्र त्यांना खाऊ घालत भाज्या. तोंडली, दुधी, भोपळा, अरे देवा… रोज असे व्हायचे. एके दिवशी राजाने जेवता जेवता रागाने ताट फेकून दिले आणि आपल्या आचाऱ्याला आदेश दिला, एक तर उद्या एखादी चविष्ट भाजी तयार कर नाहीतर मी तुला फाशी देईन. आचारी बिचारा घाबरला. आता नवी भाजी आणायची कुठून? धावत धावत तो पोहोचला तेनालीरामाकडे आणि त्याला सगळा किस्सा सांगितला. तेनाली रामाने त्याचे बोलणे ऐकून घेतले आणि उपाय सुचवला. दुसऱ्या दिवशी राजा दुपारी जेवायला आला आणि आचाऱ्याला बोलावले. आज काही
चविष्ट भाजी शिजवली आहेस की तुला फाशी द्यायची आज? घाबरलेल्या आचाऱ्याने झटपट जेवणाचे ताट तयार केले आणि महाराजांना गरमागरम जेवण वाढले. ताटात नवी भाजी होती. महाराजांना आनंद झाला आणि त्यांनी भाजीची चव घेतली. अरे वा, किती छान भाजी होती. दोडक्या सारखी बेचव नव्हती, भोपळ्यासारखी गोड सुद्धा नव्हती. आचाऱ्याने जो मसाला तयार करून घातला होता, तो व्यवस्थित लागला होता.आनंदित झालेल्या राजाने आपली बोटे चाटत आचाऱ्याला बोलावले आणि विचारले की ही भाजी कुठली आहे, या भाजीचे नाव काय? पढवल्याप्रमाणे आचाऱ्याने उत्तर दिले, महाराज ही भाजी आहे मुकुटधर वांगे. महाराज तुमच्याप्रमाणेच ही भाजी सुद्धा भाज्यांमध्ये राजा आहे, म्हणूनच इतर सर्व भाज्यांनी वांग्याला मुकुट घातला आहे. राजाला आनंद झाला आणि त्याने घोषणा केली की आजपासून आम्ही मुकुटधर वांगेच खाणार आणि आम्हीच नाही तर आमच्या राज्यात सुद्धा केवळ वांग्याची भाजी केली जाईल. इतर कोणतीही भाजी केली जाणार नाही. राजा आणि प्रजा, दोघे आनंदात होते. अगदी सुरुवातीला नवी भाजी मिळाल्यामुळे सगळेच आनंदले होते. मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तस-तशी ही आवड कमी होऊ लागली. एका घरात वांग्याचे भरीत केले जात असे तर दुसरीकडे वांग्याची भाजी. एकीकडे आमटी तर दुसऱ्या घरात वांगीभात. एका वांग्याचे तरी किती प्रकार करायचे? हळूहळू राजाला सुद्धा कंटाळा आला. रोज तीच वांगी. मग एके दिवशी काय झाले, राजाने आचाऱ्याला बोलावे आणि चांगलेच सुनावले. कोणी सांगितले तुला की वांग्याच्या डोक्यावर मुकुट आहे? या राज्यात आता कोणीच वांगे खाणार नाही. उद्यापासून इतर कुठलीही भाजी बनवलीस तरी चालेल, पण वांगी बनवायची नाही. ठीक आहे महाराज,असे म्हणून आचारी थेट तेनालीरामाकडे पोहोचला. त्याचे पाय धरत आचारी म्हणाला, तुमच्या युक्तीमुळे आता आम्ही महाराजांना कोणतीही भाजी खाऊ घालू शकतो. हसत-हसत तेनाली रामा म्हणाला, महाराजांना खुश ठेवू शकत नसेल असा मंत्री काय कामाचा? अशाप्रकारे राजा कृष्णदेवराय आणि मंत्री तेनालीरामा यांच्या अनेक कथा तयार होत गेल्या आणि लोक ऐकत गेले.
धन्यवाद.
पंतप्रधान :- तुमच्या कथेमध्ये इतके बारकावे होते, इतकी अचूकपणे तुम्ही गोष्ट सांगितली की लहान-मोठे ज्यांनी कोणी ही गोष्ट ऐकली असेल, हे सगळे बारकावे सुद्धा त्यांच्या लक्षात राहतील. तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने गोष्ट सांगितली आणि योगायोग असा की देशात सध्या पोषण मास सुद्धा सुरू आहे आणि आपली कथा पोषणाशी संबंधित आहे
पंतप्रधान:- आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आपण जे कथाकार आहात आणि इतर सर्वच लोक, आपण आपल्या नव्या पिढीला आपल्या महापुरुषांबद्दल, महान माता आणि भगिनींबद्दल कथांच्या माध्यमातून माहिती देऊ शकतो. कथाशास्त्राचा अधिक प्रचार करावा, ते लोकप्रिय करावे आणि प्रत्येक घरात चांगल्या कथा सांगितल्या जाव्यात, मुलांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात, ही फार मोठी गोष्ट आहे. यासाठी पोषक वातावरण कशा प्रकारे तयार करता येईल, याचा विचार करून आपण सर्वांनी त्या दिशेने काम केले पाहिजे. आपणा सर्वांशी गप्पा मारून मला फार आनंद झाला. आपणा सर्वांना माझ्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
समूह स्वर: धन्यवाद सर
कथेच्या माध्यमातून संस्कारांचा प्रवाह पुढे नेणाऱ्या या भगिनींशी झालेला संवाद आपण आताच ऐकला. जेव्हा मी त्यांच्यासोबत फोनवर बोलत होतो, तेव्हा बराच वेळ आमचा संवाद सुरू होता. मला वाटले की मन की बात या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे माझा त्यांच्याशी जो काही संवाद झाला, तो संपूर्ण संवाद मी NarendraModiApp वर अपलोड करेन. संपूर्ण कथा तिथे तुम्ही नक्की ऐका. आता मन की बात कार्यक्रमात मी त्या संवादाचा एक लहानसा भाग ऐकवला. मात्र तुम्हा सर्वांना मी आग्रहाने विनंती करतो की घरात दर आठवड्याला या कथांसाठी थोडासा वेळ काढा. आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक आठवड्यासाठी, एक विषय निश्चित करू शकता. करुणा, संवेदनशीलता, पराक्रम, शौर्य अशी एखादी भावना. आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी त्या आठवड्यात त्या एकाच विषयावर आधारित वेगवेगळ्या कथा शोधाव्यात आणि कुटुंबातील प्रत्येकाने त्या एका विषयाशी संबंधित एक एक गोष्ट सांगावी.
बघता-बघता कुटुंबात अशा कथांचा एक मोठाच खजिना तयार होईल, संशोधनाचे एक उत्तम कार्य होऊन जाईल. सगळ्यांनाच आनंद मिळेल आणि संपूर्ण कुटुंबाला एक नवी ऊर्जा मिळेल. याच पद्धतीने आपण आणखी एक काम करू शकतो. कथा सांगणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो की आपण स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे पूर्ण करणार आहोत. आपण आपल्या कथांच्या माध्यमातून गुलामगिरीच्या काळातील सर्व प्रेरक घटनांचा प्रचार करू शकतो. विशेषतः 1857 ते 1947 या कालावधीतील प्रत्येक लहान-मोठ्या घटनेचा परिचय आता आपण आपल्या नव्या पिढीला करून देऊ शकतो. आपण हे काम निश्चितच कराल, असा विश्वास मला वाटतो. कथा सांगण्याची ही कला देशात अधिक सक्षम व्हावी, या कलेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, सहजतेने कथांचा प्रसार व्हावा, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या कथांच्या जगतातून आता आपण जाऊया सातासमुद्रापलीकडे. हा आवाज ऐका.
नमस्ते बंधू आणि भगिनींनो. माझे नाव सेदू देमबेले आहे. मी पश्चिम आफ्रिकेतील माली या देशाचा नागरिक आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतात आलो असता कुंभमेळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. माझ्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणे मला फारच आवडले आणि भारताची संस्कृती पाहून मला बरेच काही शिकता आले. मी विनंती करू इच्छितो की आम्हाला पुन्हा एकदा भारत पाहायची संधी दिली जावी, म्हणजे आम्हाला भारताबाबत आणखी बरेच काही शिकता येईल. नमस्कार.
गंमत वाटली ना हे ऐकून. हे होते माली मधील सेदू देमबेले. माली हा भारतापासून खूप अंतरावर पश्चिम आफ्रिकेतील एक मोठा देश आहे. सेदु देमबेले हे माली शहरातील किटा येथील एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना इंग्रजी, संगीत, चित्रकला आणि रंगकाम शिकवतात. त्यांची आणखी एक ओळख सुद्धा आहे. लोक त्यांना हिंदुस्थानचा बाबू या नावाने ओळखतात आणि त्याबद्दल त्यांना अतिशय अभिमान वाटतो. दर रविवारी दुपारनंतर ते मालीमध्ये एका तासाचा रेडिओ कार्यक्रम सादर करतात. या कार्यक्रमाचे नाव आहे Indian frequency on Bollywood songs. गेली तेवीस वर्षे ते हा कार्यक्रम सादर करत आले आहेत. या कार्यक्रमात ते फ्रेंच बरोबरच बमबारा या माली मधील लोकभाषेत सुद्धा संवाद साधतात आणि नाट्यपूर्ण पद्धतीने कार्यक्रम सादर करतात.भारताप्रति त्यांच्या मनात अतिशय प्रेम आहे. 15 ऑगस्ट रोजी त्यांचा जन्म झाला होता, हे त्यांच्या भारतावरील प्रेमाचे आणखी एक कारण आहे. सेदूजी यांनी आता दर रविवारी रात्री नऊ वाजतादोन तासांचा आणखी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात ते बॉलीवूडमधील एका संपूर्ण चित्रपटाची कथा फ्रेंच आणि बमबारा भाषेत ऐकवतात. अनेकदा भावनिक प्रसंग ऐकवताना ते स्वतः आणि त्यांचे श्रोतेसुद्धा रडू लागतात. सेदूजींच्या वडिलांनी भारतीय संस्कृतीशी त्यांची ओळख करून दिली होती. त्यांचे वडील चित्रपट आणि रंगभूमीसाठी काम करत असत आणि तेथे भारतीय चित्रपट दाखविले जात असत. या वर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांनी एका चित्रफितीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना हिंदी भाषेतून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आज त्यांची मुले अगदी सहजपणे भारताचे राष्ट्रगीत गातात. आपण हे दोन्ही व्हिडिओ नक्की पाहा आणि भारताप्रति त्यांचे प्रेम अनुभवा. सेदूजी जेव्हा कुंभ मेळ्यासाठी भारतात आले होते, त्यावेळी ते एका शिष्टमंडळात सहभागी होते. मी त्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. भारताप्रति त्यांचा हा स्नेह, ही आपुलकी आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपल्याकडे असे म्हटले जाते की ज्याची मुळे जमिनीशी जोडलेली असतात तो मोठ-मोठ्या वादळामध्ये सुद्धा ठामपणे उभा राहू शकतो. कोरोनाच्या या कठीण काळात आमचे कृषिक्षेत्र, आमचे शेतकरी हे याचे उत्तम उदाहरण आहे. संकटाच्या काळात सुद्धा आमच्या देशाच्या कृषी क्षेत्राने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. मित्रहो, देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, आमची गावे ही आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ही मजबूत असली तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल. मागच्या काही काळात या क्षेत्रांनी अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, अनेक बेड्या तोडायचा प्रयत्न केला आहे. मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, शेतकरी संघटनांशी चर्चा होत राहते.कृषी क्षेत्र कशा प्रकारे नवी शिखरे गाठत आहे,या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात. त्यांच्याकडून जे काही मी ऐकले आहे, इतरांकडून जे काही ऐकले आहे, त्याबद्दल आज मन की बात कार्यक्रमात काही गोष्टी आपल्याला सांगाव्यात, असे मला वाटते आहे. हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यात आमचे एक शेतकरी बंधू राहतात. त्यांचे नाव आहे श्री कंवर चौहान. ते म्हणतात की एक काळ असा होता, जेव्हा मंडईच्या बाहेर आपली फळे आणि भाज्या विकणे फारच कठीण होते. मंडईच्या बाहेर फळे आणि भाज्या विकायचा प्रयत्न केला तर अनेकदा त्यांची फळे, भाज्या आणि गाड्या सुद्धा जप्त केल्या जात असत. मात्र 2014 साली फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त करण्यात आले. त्याचा मोठा फायदा त्यांना तसेच इतर शेतकऱ्यांना सुद्धा झाला. चार वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या गावातील शेतकऱ्यांसोबत मिळून एक शेतकरी उत्पादक समूह स्थापन केला. आज गावातील शेतकरी स्वीट आणि बेबीकॉर्न या प्रकारच्या मक्याची शेती करतात. दिल्लीतील आजादपुर मंडी, मोठमोठी दुकाने तसेच फाइव स्टार हॉटेल्समध्ये त्यांची उत्पादने खरेदी केली जात आहेत. इतकेच नाही याच गावातील 60 पेक्षा जास्त शेतकरी नेट हाऊस, पॉलिहाऊस तयार करून टोमॅटो, सिमला मिरची, दुधी अशा भाज्यांच्या वेगवेगळ्या वाणांचे उत्पादन घेऊन दर वर्षी एकरी 10 ते 12 लाख रुपयांची कमाई करत आहेत. या शेतकऱ्यांचे वेगळेपण काय आहे? आपली फळे, भाज्या कुठेही, कोणालाही विकता येतात, हे वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण हाच त्यांच्या प्रगतीचा पाया आहे. आता देशातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा अधिकार मिळाला आहे. फळे आणि भाज्या, इतकेच नाही तर आपल्या शेतात घेतले गेलेले सर्व प्रकारचे उत्पादन, अन्नधान्य, गहू, ऊस, ज्याचे ते उत्पादन घेतील ते सगळे पीक शेतकऱ्यांना आपल्या इच्छेनुसार, जिथे त्यांना चांगला दर मिळेल तेथे विकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले आहे.
मित्रहो, तीन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. या बदलामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे सत्तर गावांमधील साडेचार हजार शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. अडते नाहीत. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होतो, गावातील युवकांना त्यामुळे रोजगार मिळतो.
आणखी एक उदाहरण आहे तमिळनाडूमधील थेनी जिल्ह्याचे.या जिल्ह्यात तामिळनाडू केला फार्मर प्रोड्यूसर कंपनी आहे. या नावात कंपनी आहे, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेला तो समूह आहे. या समूहाची व्यवस्था अतिशय लवचिक आहे आणि गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी तो स्थापन करण्यात आला. या शेतकरी समूहाने टाळेबंदीच्या काळात नजीकच्या गावांमधील शेकडो मेट्रिक टन भाज्या, फळे आणि केळी खरेदी केली आणि चेन्नई शहराला कॉम्बो किट प्रदान केले. विचार करा, किती तरुणांना त्यांनी रोजगार दिला असेल. आणि आनंदाची बाब म्हणजे अडते नसल्यामुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोघांनाही लाभ झाला.लखनौमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा असाच एक समूह आहे. त्या समूहाचे नाव आहे ईरादा फार्मर प्रोड्युसर. या समूहाने सुद्धा टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतांमधून थेट फळे आणि भाज्या विकत घेतल्या आणि थेट लखनौच्या बाजारात त्यांची विक्री केली. अडत्यांपासून मुक्ती मिळाली आणि त्यांना योग्य वाटेल त्या किमतीला त्यांना आपली उत्पादने विकता आली. मित्रहो, गुजरातमध्ये बनासकांठा येथील रामपुरा गावातील इस्माईल भाई हे आणखी एक शेतकरी आहेत. त्यांची गोष्टसुद्धा ऐकण्यासारखी आहे. इस्माईल भाई शेती करू इच्छित होते, मात्र हल्ली अनेक लोक विचार करतात, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा वाटत असे की इस्माईल भाईंचा विचार फारसा योग्य नाही. इस्माईल भाई यांचे वडील शेती करत होते, मात्र त्यांना त्यात नेहमीच नुकसान होत असे. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना नकार दिला. मात्र कुटुंबीयांचा नकार असतानासुद्धा शेतीच करायची, असे इस्माईल भाईंनी ठरवले. शेती करणे नुकसानाचे आहे, असा विचार लोक करत असतील, तर हा विचार आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती, दोन्ही बदलून दाखवायची, असा विचार इस्माईल भाई यांनी केला. त्यांनी शेती करायला सुरुवात केली, पण नव्या पद्धतीने, नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून. त्यांनी ठिबक सिंचन करून बटाट्याची शेती करायला सुरुवात केली आणि आज त्यांनी पिकवलेल्या बटाट्यांची स्वतंत्र ओळख तयार झाली आहे.अतिशय दर्जेदार बटाट्याचे पीक ते घेत आहेत. इस्माईल भाई थेट मोठमोठ्या कंपन्यांना या बटाट्याची विक्री करतात.अडत्यांची यात कोणतीही भूमिका नाही, त्यामुळे ते शेतीतून उत्तम नफा मिळवत आहेत. आता त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले सगळे कर्ज फेडून टाकले आहे आणि सर्वात मोठी गोष्ट सांगू का,इस्माईल भाई आज आपल्या भागातील शेकडो इतर शेतकर्यांची मदत करत आहेत, त्यांच्या आयुष्यातही बदल घडवून आणत आहेत.
मित्रहो, आजच्या तारखेला आपण शेतीसाठी जितके आधुनिक पर्याय वापरू, तितकीच शेती प्रगत होईल. त्यात नवनवीन पद्धती रूढ होतील, नाविन्यपूर्ण प्रयोग होत राहतील. मणिपुरमध्ये राहणाऱ्या बिजयशांती एका नव्या प्रयोगामुळे प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी कमळापासून धागा तयार करण्याचा स्टार्ट अप सुरू केला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे आज कमळाच्या शेतीमध्ये आणि पर्यायाने वस्त्रोद्योग क्षेत्रात एक नवाच प्रघात सुरू झाला आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी तुम्हाला भूतकाळातील एक किस्सा सांगू इच्छितो. 101 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. वर्ष होते 1919. इंग्रजांनी जालियनवाला बागेमध्ये निर्दोष नागरिकांवर बेछूट गोळीबार केला होता. या नरसंहारानंतर बारा वर्षांचा एक मुलगा त्या घटनास्थळी पोहोचला. हसरा आणि खेळकर असा तो मुलगा. मात्र त्याने जालियनवाला बागेत जे काही पाहिले, त्याने तो हादरून गेला. कोणीही इतक्या निर्दयपणे कसे वागू शकते, या विचाराने तो स्तब्ध झाला. निरागस असा तो कोवळा मुलगा क्रोधाने पेटून उठला. त्याच जालियनवाला बागेत त्याने इंग्रज सत्तेविरोधात लढा देण्याची शपथ घेतली. मी कोणाबद्दल बोलतो आहे, हे तुमच्या लक्षात आले का? हो, मी शहीद वीर भगतसिंग यांच्या बद्दल बोलतो आहे. उद्या, 28 सप्टेंबर रोजी आपण शहीद वीर भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. मी सर्व देशवासियांसह शौर्य आणि पराक्रमाचे प्रतिक असणारे शहीद वीर भगतसिंग यांना अभिवादन करतो. आपण विचार करू शकता का, एक अशी सत्ता जिने जगातील इतक्या देशांवर राज्य केले. यांच्या साम्राज्यात सूर्य कधीच मावळत नाही, असे म्हटले जात असे. अशा शक्तीशाली सत्तेला तेवीस वर्षांच्या एका युवकाने सळो कि पळो केले होते. शहीद भगतसिंग केवळ पराक्रमी नव्हते तर ते विद्वान सुद्धा होते, विचारी सुद्धा होते. आपल्या आयुष्याची तमा न बाळगता भगतसिंग आणि त्यांच्या शूर सहकाऱ्यांनी जी साहसी कृत्ये केली, त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीतील योगदान फार मोठे आहे. शहीद वीर भगतसिंग यांच्या जीवनातील आणखी एक सुंदर पैलू म्हणजे ते संघ भावनेचे महत्त्व जाणून होते. लाला लजपत राय यांच्या प्रती त्यांच्या मनातील समर्पण भावना असो किंवा चंद्रशेखर आझाद, सुखदेव,राजगुरू यांच्यासह क्रांतिकारकांप्रति त्यांच्या मनात असलेली स्नेहभावना असो. वैयक्तिक गुणगान त्यांच्यासाठी कधीच महत्त्वाचे नव्हते. आयुष्यभर ते एका निश्चित ध्येयासाठी जगले आणि त्याच ध्येयासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताला अन्यायापासून आणि इंग्रज सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. नमो ॲप वर हैदराबादचे अजयजी यांनी दिलेला एक प्रतिसाद मी वाचला. अजयजी लिहितात, आजचे युवक भगतसिंग यांच्यासारखे कसे काय होऊ शकतात? लक्षात घ्या. आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही. मात्र भगतसिंग यांच्यासारखेच देशप्रेम, देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे. शहीद भगतसिंग यांना हीच आपली सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल. चार वर्षांपूर्वी साधारण याच वेळी सर्जिकल स्ट्राइकच्या वेळी अवघ्या जगाने आमच्या जवानांचे शौर्य आणि निर्भयपणा पाहिला. आमच्या शूर सैनिकांचे एकच उद्दिष्ट होते, भारत मातेच्या गौरवाचे आणि सन्मानाचे रक्षण करणे. त्यांनी आपल्या आयुष्याची पर्वा केली नाही, आपल्या कर्तव्याच्या मार्गावर ते आगेकूच करत राहिले आणि विजयी होऊन परत आले. आपल्या भारत मातेच्या गौरवात त्यांनी भर घातली, हे आपण सर्वांनीच पाहिले.
माझ्या प्रिय देशवासियांनो, येणाऱ्या काही दिवसात आपण सगळेजण अशा अनेक महान व्यक्तींचे स्मरण करणार आहोत, ज्यांनी भारताच्या निर्मितीमध्ये दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. 2 ऑक्टोबर हा आपणा सर्वांसाठी पवित्र आणि प्रेरक असा दिवस असतो. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री अशा भारत मातेच्या दोन सुपुत्रांचे स्मरण करण्याचा हा दिवस असतो.
आदरणीय गांधीजींचे विचार आणि आदर्श आजघडीला समयोचित आहेत. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, त्यांचा गाभा जाणून घेतला असता, त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती. गांधीजींच्या आर्थिक विचारांमध्ये भारताची चांगली जाण दिसून येते, भारताचा सुगंध दरवळत राहतो. आदरणीय गांधीजींचे आयुष्य आपल्याला आठवण करून देते की आपल्या प्रत्येक कार्यातून गरिबातल्या गरीब व्यक्तीचे कल्याण व्हावे, हे आपण पाहिले पाहिजे. त्याच वेळी शास्त्रीजींचे आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देते. 11 ऑक्टोबर हा दिवस सुद्धा आपल्यासाठी विशेष असतो. या दिवशी आपण भारतरत्न लोकनायक जयप्रकाशजी यांचे,त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. जेपी यांनी आपल्या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यात अग्रणी भूमिका पार पाडली आहे. भारतरत्न नानाजी देशमुख यांचे सुद्धा आपण स्मरण करतो. त्यांची जयंती सुद्धा 11 ऑक्टोबर रोजी असते. नानाजी देशमुख हे जयप्रकाश नारायण यांचे जवळचे सहकारी होते. जेव्हा जेपी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत होते, तेव्हा पाटणा येथे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. तेव्हा नानाजी देशमुख यांनी तो वार स्वतःवर झेलला होता. या हल्ल्यात नानाजींवर झालेला वार प्राणघातक होता, मात्र त्यांनी जेपींचे आयुष्य वाचवले.12 ऑक्टोबर रोजी राजमाता विजयाराजे सिंधिया यांची सुद्धा जयंती आहे. त्यांनी आपले अवघे आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित केले. त्या राजघराण्यातील होत्या, संपत्ती, शक्ती आणि इतर सर्व स्रोतांची त्यांच्याकडे कमतरता नव्हती. तरीसुद्धा त्यांनी आपले अवघे आयुष्य एका मातेप्रमाणे, वात्सल्य भावाने लोकहितार्थ वाहिले. त्यांचे हृदय उदार होते. या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारंभाचा समारोप होईल आणि आज मी राजमाताजींबद्दल बोलतो आहे, तेव्हा मला एक अतिशय भावनापूर्ण प्रसंग
आठवतो आहे. खरे तर मला बराच काळ त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पण अनेक प्रसंग आठवत आहेत. एका प्रसंगाबद्दल आवर्जून सांगावे, असे मला वाटते. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आम्ही एकता यात्रा काढली होती. डॉक्टर मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली यात्रा सुरू होती. डिसेंबर-जानेवारी महिन्याचे कडाक्याच्या थंडीचे दिवस होते. रात्री सुमारे बारा-एकच्या सुमाराला आम्ही मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर जवळ शिवपुरी येथे पोहोचलो. मुक्कामी पोहोचल्यानंतर दिवसभराच्या थकव्यानंतर आंघोळ करून आम्ही झोपी जात असू आणि सकाळी तयारी करून रवाना होत असू. सुमारे दोन वाजता आंघोळ करून मी झोपायच्या तयारीत होतो, तेव्हा कोणी तरी माझा दरवाजा ठोठावला. मी दरवाजा उघडला, तेव्हा राजमाताजी समोर उभ्या होत्या. कडाक्याच्या थंडीमध्ये राजमाताजींना समोर पाहून मला आश्चर्य वाटले. मी त्यांना वंदन केले. मी म्हणालो,माताजी, अर्ध्या रात्री.. त्या म्हणाल्या, नाही बेटा तुम्ही एक काम करा. मोदीजी, हे दूध पिऊन घ्या. गरम दूध पिऊनच झोपा. हळद घातलेले दुध त्या स्वतः घेऊन आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आले की केवळ मलाच नाही तर आमच्या यात्रेत जे तीस-चाळीस लोक होते, त्यात वाहन चालक होते, कार्यकर्ते होते, त्या सगळ्यांच्या कक्षात जाऊन रात्री दोन वाजता राजमाताजींनी प्रत्येकाला दूध प्यायला दिले. आईचे प्रेम काय असते, कसे असते, वात्सल्य कसे असते, तो प्रसंग मला कधीच विसरता येणार नाही. अशा महान व्यक्तींनी आपल्या त्यागाने आणि तपश्चर्येने आपल्या या धरतीचे पालनपोषण केले आहे, हे आपले सौभाग्य आहे. या, आपण सगळे मिळून एका अशा भारताची निर्मिती करूया ज्या भारताबद्दल या महापुरुषांना अभिमान वाटेल. त्यांची स्वप्ने आपण आपले संकल्प म्हणून स्वीकारू या.
माझ्या प्रिय देशवासियांने,कोरोनाच्या या काळात मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो. मास्क अवश्य वापरा. चेहरा झाकून न घेता बाहेर पडू नका. दोन मीटर अंतराचा नियम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालासुद्धा वाचवू शकतो. हे असे काही नियम आहेत जे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये शस्त्र म्हणून उपयुक्त आहेत. प्रत्येक नागरिकाचे आयुष्य वाचविण्याचे साधन आहेत. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत औषध मिळत नाही तोपर्यंत हलगर्जीपणा करू नका. आपण निरोगी राहा, आपले कुटुंब निरोगी राहो.याच शुभेच्छांसह अनेकानेक आभार. नमस्कार!!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! साधारणपणे या काळात सण-उत्सव येतात. ठिकठिकाणी मेळे भरतात, धार्मिक पूजा-पाठ केले जातात. कोरोनाच्या या संकटकाळामध्ये लोकांमध्ये उमंग आहे, उत्साहही आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे दिसणा-या शिस्तीचाही आपल्या सर्वांच्या मनाला वेगळाच स्पर्श जाणवतोय. अगदी सरसकट पाहिल्यानंतर जे जाणवते ते म्हणजे, नागरिकांना आपल्या जबाबदारीचे, दायित्वाचे भान आले आहे. लोक आपली काळजी घेत आहेत, त्याचप्रमाणे रोजची कामे करीत आहेत आणि ते करताना दुस-यांना त्रास होवू नये, असेही त्यांना वाटतेय. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे. बहुतांश ठिकाणी पर्यावरणस्नेही गणेशाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत. मित्रांनो, अगदी बारकाईने पाहिलं, तर एक गोष्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात आली असेल, ती म्हणजे – आपले सण आणि पर्यावरण या दोन्हींमध्ये एक दृढ नाते आहे. आपल्या प्रत्येक सण-उत्सवाचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात जास्त मिळतो असा संदेश एकीकडे दिला जातो. आणि दुसरीकडे, आपले सगळे सण-उत्सव हे निसर्गाच्या रक्षणासाठीच साजरे केले जातात. ज्याप्रमाणे बिहारमधल्या पश्चिमी चंपारणमध्ये अगदी युगांयुगांपासून थारू आदिवासी समाजाचे लोक 60 तासांचा लॉकडाउन अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ‘60 घंटे का बरना’चे पालन करतात. निसर्गाच्या रक्षणासाठी थारू समाजाने ‘बरना’ पाळणे आपल्या परंपरेचा भाग बनवले आहे. आणि ही परंपरा ती मंडळी युगांपासून पाळत आहेत. या काळामध्ये गावामध्ये कोणी येत नाही. कोणी आपल्या घरामधून बाहेर पडत नाही. जर कोणी घराबाहेर पडले किंवा बाहेरून कोणी आले आणि लोकांनीही दैनंदिन कामकाज केले तर नवीन रोपांना-झाडांना नुकसान होवू शकते, असं हे लोक मानतात. ‘बरना’च्या प्रारंभी आपले सर्व आदिवासी बंधू-भगिनी एकत्र जमतात, मोठ्या प्रमाणावर पूजा-पाठ करतात आणि ज्यावेळी बरना समाप्ती होते त्यावेळी मोठ्या उत्साहात परंपरागत आदिवासी गीत, संगीत, नृत्य यांचा कार्यक्रम करतात.
मित्रांनो, या दिवसात ओणमचा सणही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण चिणगम महिन्यात येतो. या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आपल्या घरांची सजावट करतात, पक्क्लम बनवतात, ओणम-सादियाचा आनंद घेतात. वेगवेगळे खेळ, स्पर्धांचे आयोजनही केले जाते. ओणमचा उत्साह, आता दूर-सुदूर अगदी परदेशांमध्येही पोचला आहे. अमेरिका असो, यूरोप असो किंवा आखाती देश असो; ओणमचा उत्साह सगळीकडे पहायला मिळतोच. ओणम आता एक आंतरराष्ट्रीय सण बनत आहे.
मित्रांनो, ओणम आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत सण आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नवीन वर्षाच्या प्रारंभाचा हा काळ असतो. शेतकरी बांधवांच्या शक्तीवरच आपले जीवन, आपला समाज चालतो. शेतकरी बांधवांच्या परिश्रमामुळेच आमचे सण-समारंभ रंगबिरंगी बनतात. आमच्या या अन्नदात्याला, बळीराजाच्या जीवनदायिनी शक्तीला तर वेदांमध्येही अतिशय गौरवपूर्ण पद्धतीने वंदन केले आहे.
ऋग्वेदामध्ये एक मंत्र आहे-
अन्नानां पतये नमः क्षेत्राणाम पतये नमः ।
याचा अर्थ असा आहे की, अन्नदाता, तुला वंदन आहे, शेती करणा-याला नमस्कार असो.
आमच्या शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सात टक्के वाढ झाली आहे. धानच्या रोपणीमध्ये जवळपास 10 टक्के, डाळींच्या पेराक्षेत्रामध्ये जवळपास 5 टक्के आणि इतर अन्नधान्याच्या पेरणीत जवळपास 3 टक्के, तेलबियांच्या क्षेत्रात जवळपास 13 टक्के, कपासमध्ये जवळपास 3 टक्के जास्त पेरणी झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोनाच्या या कालखंडामध्ये अनेक आघाड्यांवर देश लढतोय. त्याचबरोबर अनेक वेळा मनात असाही प्रश्न उपस्थित होतो की, इतक्या दीर्घ काळापर्यंत घरामध्ये राहून माझी छोटी-छोटी बालमित्रमंडळी वेळ कसा घालवत असतील? या प्रश्नाला उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. गांधीनगरची ‘चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी’ मुलांसाठी आगळे-वेगळे प्रयोग करते. भारत सरकारचे महिला आणि बाल विकास मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या सर्वांच्या सहकार्याने मिळून आम्ही मुलांसाठी नेमके काय करता येईल, यावर विचार मंथन केले, चिंतन केले. माझ्यासाठी हे करणे अतिशय सुखद होते. लाभकारीही होते. कारण या प्रक्रियेतून मलाही काहीतरी नवीन माहिती मिळाली, नवं शिकण्याची संधी मिळाली.
मित्रांनो, आमच्या चिंतनाचा विषय होता- मुलांची खेळणी, मुलांच्या खेळांच्या वस्तू आणि विशेषतः भारतीय खेळ. आम्ही या गोष्टींवर मंथन केले. भारतातल्या मुलांना नवनवीन खेळणी कशी मिळू शकतील, खेळणी उत्पादन करण्यामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकेल, यावर आम्ही विचार मंथन केले. ‘मन की बात’ ऐकत असलेल्या मुलांच्या माता-पित्यांची मी आधीच क्षमा मागतो. कारण कदाचित आताची ही ‘मन की बात’ ऐकल्यानंतर खेळण्यांविषयीची नवीन मागणी येवू शकते आणि त्यांना एक नवीन काम लागू शकते.
मित्रांनो, कोणतेही खेळणे हे मुलांची अॅक्टिव्हिटी वाढवणारे असते. तसेच खेळणे आपल्या आकांक्षांना पंख लावणारेही असते. खेळणे केवळ मन रमवणारे किरकोळ साधन नाही. एखाद्या खेळण्यामुळे मन तयार होते, मुलांच्या मनामध्ये ध्येय निर्माण करण्याचे कामही होते. मुलांच्या खेळण्यांविषयी गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेले मी कुठंतरी वाचले आहे. टागोर म्हणाले होते की, जे खेळणे अपूर्ण आहे, ते सर्वात चांगले, उत्कृष्ट खेळणे असते. जे खेळणे अपूर्ण आहे आणि ते खेळणे मुलांनी मिळून खेळत-खेळत पूर्ण केले पाहिजे. गुरूदेव टागोर यांनी म्हटले होते की, ज्यावेळी ते लहान होते, त्यावेळी ते स्वतःच्या कल्पनेने, घरामध्येच असलेले सामान घेवून आपल्या मित्रमंडळींच्याबरोबर खेळणी आणि खेळ तयार करीत होते. परंतु, एक दिवस त्या बाळगोपाळांच्या मौज-मस्तीच्या क्षणांमध्ये मोठी मंडळी दाखल झाली. त्यांच्यातल्याच एका दोस्ताने एक मोठे आणि सुंदर, विदेशी खेळणे खेळण्यासाठी आणले. मित्र ते खेळणे घेवून ऐटीत मिरवत होता. त्यामुळं आता सर्व मित्रांचे लक्ष खेळामध्ये राहिलेच नाही तर त्या विदेशी खेळण्याकडे होते. प्रत्येकाच्या दृष्टीने खेळातली मौज संपली होती आणि ते खेळणे मात्र सर्वांना आकर्षित करीत होते. जो मुलगा कालपर्यंत अगदी सर्वांमध्ये मिळून मिसळून खेळत होता, सर्वांच्यामध्ये रहात होता, खेळामध्ये अगदी रममाण होत होता, तो मुलगा सर्वांपासून आता दूर राहू लागला. विदेशी खेळणे जवळ असलेल्या मुलाच्या मनात, एक प्रकारे इतर मुलांविषयी भेदाचा भाव निर्माण झाला. महागडे खेळणे आणण्यामध्ये काही विशेष नव्हते, तसंच त्यामध्ये शिकण्यासारखंही काही नव्हतं. फक्त एक आकर्षक रूप त्या खेळण्याचं होतं. त्या आकर्षक खेळण्याने एका उत्कृष्ट मुलाला कुठंतरी दाबून टाकलं, लपवून टाकलं, अगदी मलूल बनवून टाकलं. या खेळण्याने धनाचा, संपत्तीचा, मोठेपणाचा, बडेजाव यांचे प्रदर्शन तर केलं होतंच परंतु त्या मुलाची निर्मिती क्षमता, सर्जकता संपुष्टात आणली. निर्मितीच्या प्रक्रियेला मिळणारे प्रोत्साहनच थांबवले होते. म्हणजे खेळणे मिळाले परंतु खेळ मात्र संपुष्टात आला होता. त्यामुळे मुलाचे खेळातून उमलणेही कुठं तरी हरवून गेले. म्हणूनच गुरूदेव म्हणत होते की, मुलांना त्यांचे बालपण जगता यावे, असे खेळणे हवे आहे, मुलांमधल्या सर्जकतेला वाव देणारे खेळणे असले पाहिजे. मुलांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या पैलूंवर खेळण्यांचा प्रभाव पडत असतो. याविषयी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण निश्चित करतानाही खूप लक्ष देण्यात आले आहे. खेळ-खेळताना शिकणे, खेळणी-खेळ बनविण्यास शिकणे, ज्या ठिकाणी खेळणी बनवली जातात, त्या स्थानांना भेट देणे, या सर्व गोष्टींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आला आहे.
मित्रांनो, आपल्या देशामध्ये स्थानिक खेळण्यांची अतिशय समृद्ध परंपरा आहे. अनेक प्रतिभाशाली आणि कुशल कलाकार आहेत, ही मंडळी अतिशय सुंदर खेळणी बनविण्यात पारंगत आहेत. भारताच्या काही भागामध्ये ‘टॉय क्लस्टर’ म्हणजेच ‘खेळणी केंद्र’ म्हणूनही विकसित करण्यात येत आहेत. कर्नाटकमध्ये रामनगरममध्ये चन्नापटना, आंध्र प्रदेशातल्या कृष्णा इथं कोंडापल्ली, तामिळनाडूतल्या तंजौर, आसाममध्ये धुबरी, उत्तर प्रदेशात वाराणसी, अशी अनेक ठिकाणांची नावे घेता येतील. जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे. आता आपण विचार करा, ज्या देशाकडे इतकी समृद्ध परंपरा आहे, विविधता आहे, युवा लोकसंख्या आहे, तरीही खेळण्यांच्या बाजारपेठेत आपली भागीदारी अतिशय कमी आहे, ही चांगली गोष्ट वाटते का? नक्कीच नाही. हे ऐकूनही आपल्याला चांगले वाटणार नाही. मित्रांनो, असं आहे पहा, खेळणी उद्योग अतिशय व्यापक आहे. गृह उद्योग असो, लहान आणि छोटा उद्योग असो, एमएसएमई असो, त्याच्या जोडीला मोठे उद्योग आणि खाजगी उद्योगांच्या क्षेत्रांमध्ये येतात. सर्वांना पुढे जाण्यासाठी देशात सर्वांनी मिळून प्रयत्न, परिश्रम केले पाहिजेत. आता ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममध्ये सी.व्ही. राजू आहेत, त्यांच्या गावातले एति-कोप्पका खेळणे, एकेकाळी अतिशय प्रचलित होते. या खेळण्याचे खास वैशिष्ट म्हणजे, ही खेळणी लाकडापासून बनविली जात होती. आणखी एक गोष्ट म्हणजे, या खेळण्यामध्ये आपल्याला कुठंही कोणत्याही प्रकारचा अँगल म्हणजेच कोन मिळत नाही. हे खेळणे सर्व बाजूंनी गोलाकार होती. त्यामुळे मुलांना खेळणे हाताळताना लागण्याची, इजा होण्याचीही शक्यता नव्हती. सी.व्ही राजू यांनी एति-कोप्पका खेळण्यासाठी, आता आपल्या गावातल्या कलाकारांना मदतीला घेवून एक नवीन मोहीमच सुरू केली आहे. सर्वात उत्तम दर्जाचे एति-कोप्पका खेळणे बनवून सी.व्ही. राजू यांनी स्थानिक खेळण्याला पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. खेळण्यांच्याबरोबरच आपण दोन गोष्टी करू शकतो – आपल्या गौरवशाली भूतकाळाला पुन्हा आपल्या जीवनात आणू शकतो आणि आपले स्वर्णिम भविष्यही निर्माण करू शकतो. मी आपल्या स्टार्ट-अप मित्रांना, आपल्या नव उद्योजकांना सांगू इच्छितो की, ‘टीम अप फॉर टॉइज’-चला, सर्वजण मिळून खेळणी बनवूया! आता सर्वांसाठी ‘लोकल’-स्थानिक खेळण्यासाठी ‘व्होकल’ होण्याचा हा काळ आहे. चला, आपल्या छोट्या दोस्तांसाठी, काही नवीन प्रकारची, उत्तम दर्जाची खेळणी आपण बनवू या. ज्या खेळण्यामुळे मुलांचे बालपण समृद्ध होवून ती अधिक उमलून येईल, अशी खेळणी हवी आहेत. आपल्या पर्यावरणाला अनुकूल ठरतील, अशीच खेळणी आपण बनविणार आहोत.
मित्रांनो, याचप्रमाणे, आता संगणक आणि स्मार्टफोन यांच्या युगामध्ये कॉम्प्यूटर गेम्स खूप लोकप्रिय आहेत. हे खेळ मुलं तर खेळतातच आणि प्रौढही खेळत आहेत. परंतु या खेळांची जी थीम म्हणजे मूळ संकल्पना असते ती, बहुतांशी बाहेरची असते. आपल्या देशामध्ये कितीतरी कल्पना आहेत, कितीतरी संकल्पना आहेत, आपला इतिहास अतिशय समृद्ध आहे, मग आपण यांचा विचार करून असे कॉम्प्यूटर गेम्स तयार करू शकतो का? देशातल्या युवा मंडळींमध्ये असलेल्या प्रतिभेला माझे आवाहन आहे, आपणही असेच गेम्स भारतामध्ये बनवावेत आणि भारतीय संकल्पनेवर हे खेळ असावेत. असं म्हणतात की, ‘लेट द गेम्स बिगीन’! चला तर मग, खेळ सुरू करू या!!
मित्रांनो, आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आभासी खेळ असो खेळण्यांचे क्षेत्र असो, सर्वांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे आणि ही एक संधीही आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळी असहकाराचे आंदोलन सुरू झाले, त्यावेळी गांधीजींनी लिहिले होते की, – ‘‘ असहकार आंदोलन, देशवासियांमध्ये आत्मसन्मान आणि आपल्यामधल्या शक्तीचा परिचय करण्यासाठी एक प्रयत्न आहे.’’
आज, ज्यावेळी आपण देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यावेळी आपण सर्वांनी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जायचे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. असहकार आंदोलनाच्या रूपातून ते बीजारोपण झाले होते, त्याला आता, आत्मनिर्भर भारताच्या वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीयांच्या नवसंकल्पना आणि पर्याय देण्याची क्षमता अतिशय कौतुकास्पद आहे. आणि ज्यावेळी समर्पण भाव असेल, संवेदना असेल, तर ही एक- असीम शक्ती बनते. या महिन्याच्या प्रारंभीच, देशातल्या युवकांच्या समोर एक ‘अप्लिकेशन इनोव्हेशन चॅलेंज’ ठेवण्यात आले होते. या आत्मनिर्भर भारत अॅप नवसंकल्पना आव्हानाला आपल्या युवकांनी अतिशय उत्साहाजनक प्रतिसाद दिला. जवळपास सात हजार प्रवेशिका आल्या. त्यामध्ये जवळपास दोन तृतीयांश अॅप्स दुस-या आणि तिस-या श्रेणीतल्या शहरांमधल्या युवकांनी बनवले आहेत. हा आत्मनिर्भर भारतासाठी, देशाच्या भविष्यासाठी एक शुभ संकेत आहे. आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंजचा निकाल पाहून तुम्ही सर्वजण नक्कीच प्रभावित होणार आहे. अनेक प्रकारे तपासणी-पडताळणी केल्यानंतर वेगवेगळ्या वर्गांमध्ये जवळपास दोन डझन अॅप्सना पुरस्कारही देण्यात आले आहेत. आपण सर्वांनी या अॅप्सची माहिती घ्यावी आणि जरूर त्यांच्याशी जोडले जावे. कदाचित आपल्याला असे नवीन, वेगळे, उपयुक्त अॅप बनविण्याची प्रेरणा मिळू शकेल. यामध्येच एक अॅप आहे- कुटुकी! हे लहान मुलांच्या शिक्षणासाठी अॅप आहे. लहान मुलांशी संवाद साधणारे अॅप आहे. त्यामध्ये गाणी आणि कथा यांच्या माध्यमातून गप्पागोष्टी करीत मुलांना गणित आणि विज्ञान हे विषयातले खूप काही शिकवले जाते. यामध्ये अॅक्टिव्हिटी आहे, खेळही आहे. याचप्रमाणे एक मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचेही अॅप आहे. त्याचे नाव आहे ‘कूकू’ यामध्ये आपण आपल्या मातृभाषेमध्ये मजकूर, व्हिडिओ आणि ऑडिओ यांच्या माध्यमातून आपल्याला काय सांगायचे आहे, ते मांडू शकतो. संवादही साधू शकतो. याचप्रमाणे चिंगारी अॅपही युवा वर्गामध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहे. एक अॅप आहे- ‘आस्क सरकार’ यामध्ये चॅट बोटच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता आणि कोणत्याही सरकारी योजनेविषयी माहिती जाणून घेवू शकता. मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओ, या तीनही प्रकारांमध्ये ही माहिती मिळू शकते. हे अॅप आपल्याला खूप मदत करू शकते. आणखी एक अॅप आहे- स्टेप सेट गो. हे फिटनेस अॅप आहे. आपण नेमके किती चाललो, किती कॅलरीज बर्न झाल्या, यांचा सगळा हिशेब हे अॅप ठेवते. आपल्याला तंदुरूस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही अॅप करते. ही स्पर्धा जिंकणारी अशी अनेक अॅप्स आहेत. इथं मी काही उदाहरणे दिली आहेत. काही व्यावसायिक अॅप्स आहेत. गेम्सचे अॅप आहे. यामध्ये ‘इज इक्वल टू’, ‘बुक्स अँड एक्सपेंन्स’, ‘जोहो’, ‘वर्कप्लेस, एफटीसी टॅलेन्ट, आपण सर्वांनी याविषयी नेटवर सर्च करावे, तुम्हांला खूप माहिती मिळेल. आपणही असे अॅप बनविण्यासाठी पुढे यावे. नवीन काही करावे. आपण केलेले प्रयत्न आजचे लहान-लहान स्टार्ट अप्स उद्या मोठ-मोठ्या कंपनीत रूपांतरित होतील आणि जगामध्ये भारताची एक वेगळीच ओळख बनेल. आणखी एक आज संपूर्ण जगामध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या तुम्हाला दिसत आहेत, त्याही कोणे एके काळी अशाच स्टार्टअप होत्या, हे तुम्ही कधीच विसरू नका.
प्रिय देशवासियांनो, आपल्याकडे लहान मुले, आमचे विद्यार्थी, आपली संपूर्ण क्षमता दाखवू शकतील, आपले सामर्थ्य दाखवू शकतील, यासाठी सर्वात मोठी भूमिका असते ते पौष्टिकतेची! त्यांना मिळणा-या पोषणाची! संपूर्ण देशामध्ये सप्टेंबर महिना ‘पोषण माह’ म्हणून पाळण्यात येणार आहे. नेशन आणि न्यूट्रिशन यांचा अगदी खोलवर संबंध आहे. आमच्याकडे एक वाक्प्रचार प्रचलित आहे- ‘यथा अन्नम तथा मन्नम’’ म्हणजेच जसे अन्न ग्रहण केले जाते तसाच आमचा मानसिक आणि बौद्धिक विकासही होत असतो. तज्ज्ञ सांगतात की, अर्भकाला गर्भामध्ये असताना आणि बालपणी जितके चांगले पोषण मिळेल, तितका त्याचा चांगला मानसिक विकास होतो आणि ते बाळ स्वस्थ राहते. लहान मुलांच्या पोषणासाठी मातेलाही चांगला पोषक आहार मिळणे अतिशय गरजेचे आहे. पोषण अथवा न्यूट्रिशन याचा अर्थ आपण काय खातो, किती खातो आणि कितीवेळा अन्न ग्रहण करतो, इतकाच मर्यादित नाही. तर याचा अर्थ आहे, आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे आपण ग्रहण करीत असलेल्या अन्नातून मिळत आहेतका, हे पाहणे. आपल्याला आयर्न, कॅलशियम मिळते की नाही, सोडियम मिळते की नाही, व्हिटॅमिन्स मिळतात की नाही. या सर्वांचे पोषणामध्ये अतिशय महत्व आहे. पोषक आहार आंदोलनामध्ये लोकांचा सहभाग असणे महत्वाचे आणि जरूरी आहे. जन-भागीदारीच हे आंदोलन यशस्वी करू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये या दिशेने आपल्या देशात अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. विशेष करून आपल्या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सहभागाने हे जन आंदोलन बनविण्यात येत आहे. पोषण सप्ताह असो, पोषण महिना असो, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागरूकता निर्माण केली जात आहे. शाळांना यामध्ये जोडण्यात आले आहे. मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. पोषणाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. ज्याप्रमाणे एक वर्गामध्ये मॉनिटर असतो, त्याप्रमाणे न्यूट्रिशन मॉनिटरही असावा, प्रगती पुस्तकाप्रमाणे ‘न्यूट्रिशन कार्ड’ही बनविण्यात यावे, अशा गोष्टींनाही प्रारंभ करण्यात येत आहे. पोषण माह- न्यूट्रिशन मंथ’ या काळामध्ये माय गव्ह पोर्टलवर एक ‘फूड अँड न्यूट्रिशन क्विज’ आयोजित करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर एक मीम (meme) स्पर्धाही होणार आहे. आपण सर्वांनी यामध्ये भाग घ्यावा आणि इतरांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
मित्रांनो जर आपल्याला गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ स्मारकाला भेट देण्याची संधी मिळाली असेल तर तुम्ही पाहिले असेलच.आता कोविडनंतर हे स्मारक पर्यटकांच्या भेटीसाठी पुन्हा उघडले जाणार आहे, त्यावेळी जाण्याची संधी मिळाली तर तिथं एक अगदी वेगळे, अव्दितीय न्यूट्रिशन पार्क बनविण्यात आले आहे, ते पहा. अगदी खेळा-खेळातून न्यूट्रिशनविषयी शिक्षण मिळते. अगदी सहजतेने ज्ञान देणे, हे जणू आनंदाचे काम बनवले आहे, आपण सर्वजण हे पार्क जरूर पाहू शकता.
मित्रांनो, भारत एक विशाल देश आहे. आपल्याकडे खाद्यशैलीमध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. आपल्या देशामध्ये वेगवेगळे सहा ऋतू असतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तिथल्या हवामानानुसार अनेक वेगवेगळ्या गोष्टीं तयार होतात, उगवतात; म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातल्या हवामानाचा विचार करून तिथल्या ऋतुमानानुसार स्थानिक भोजन आणि तिथेच उगवणारे अन्न, फळे, भाज्या यांच्यानुसार एक पोषक, पोषण द्रव्यांनी समृद्ध असे आहार नियोजन केले जाते. आता ज्याप्रमाणे मिलेटस म्हणजे धान्य आहे- यामध्ये रागी आहे, ज्वारी आहे, ही धान्ये अतिशय उपयोगी आणि पोषक आहारात येतात. सध्या एक ‘‘भारतीय कृषी कोष’’ तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिके, उत्पादित होतात, त्यांच्यामध्ये किती पोषण मूल्य आहे, याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असणार आहे. हा आपल्या सर्वांसाठी अतिशय उपयोगी कोष ठरणार आहे. चला तर मग, या पोषण महिन्यामध्ये पौष्टिक अन्नाचे सेवन करणे आणि स्वस्थ राहण्यासाठी आपण सर्वाना प्रेरित करूया.
प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला, त्यावेळी एका अतिशय रंजक बातमीने माझं लक्ष वेधून घेतलं. ही बातमी आहे, आपल्या सुरक्षा दलातल्या दोन अतिशय धाडसी सदस्यांविषयी आहे. एक आहे सोफी आणि दुसरी विदा. सोफी आणि विदा हे दोन्ही भारतीय लष्कराचे श्वान आहेत. आणि त्यांना ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. सोफी आणि विदा यांना हा सन्मान यासाठी देण्यात आला की, त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करताना, आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टेने पार पाडले आहे. आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत. हे देशासाठी जगतात आणि देशासाठी आपले बलिदानही देतात. कितीतरी बॉम्बस्फोटांना, कितीतरी दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्वपूर्ण काम या बहादूर श्वानांनी केले आहे. देशाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये श्वानांची भूमिका किती महत्वाची असते, याची माहिती अगदी विस्ताराने घेण्याची संधी, मला काही दिवसांपूर्वीच मिळाली. यावेळी अनेक किस्सेही मी ऐकले. एका बलराम नावाच्या श्वानाने 2006 मध्ये अमरनाथ यात्रेच्या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, स्फोटके शोधून काढली होती. 2002 मध्ये भावना या श्वानांनी आयईडी शोधून काढले. आयईडी काढण्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि त्या स्फोटामध्ये हे श्वान शहीद झाले. दोन-तीन वर्षापूर्वी छत्तीसगडमधल्या बीजापूर इथं केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक ‘स्नीफर’श्वान क्रॅकर हा सुद्धा आयईडी स्फोटामध्ये शहीद झाला होता. काही दिवसांपूर्वी कदाचित आपण सर्वांनी टी.व्ही. वर एक खूप भावुक करणारे दृश्य पाहिले असेल. त्यामध्ये बीड पोलिसांनी आपला साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला होता. या रॉकीने 300 पेक्षा जास्त गुन्हे प्रकरणांची उकल करण्यासाठी पोलिसांना मदत केली होती. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यामध्येही श्वान खूप मोठी भूमिका पार पाडतात. भारतामध्ये तर राष्ट्रीय आपत्ती कृती दल- एनडीआरएफमध्ये अशा डझनभर श्वानांना विशेष प्रकारे प्रशिक्षित केले जाते. कुठे भूकंप आल्यानंतर, इमारत कोसळल्यानंतर, ढिगा-याखाली गाडले गेलेल्या जीवित लोकांना शोधून काढण्यात हे श्वान अतिशय तज्ज्ञ असतात.
मित्रांनो, भारतीय वंशाचे श्वानही अतिशय चांगले असतात, सक्षम असतात, अशी माहितीही मला सांगण्यात आली. भारतीय जातीमध्ये मुधोल हाउंड आहे, हिमाचली हाउंड या खूप चांगल्या जाती आहेत. राजापलायम, कन्नी, चिप्पीपराई आणि कोम्बाई या भारतीय जातीचे श्वानही चांगले आहेत. यांच्या पालनपोषणाचा खर्चही तुलनेने कमी असतो आणि हे श्वान भारतीय वातावरणात सामावलेही जातात. आता आपल्या सुरक्षा संस्थांनी या भारतीय वंशाच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकामध्ये समाविष्ट करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या काही काळामध्ये लष्कर, सीआयएसएफ, एनएसजी यांनी मुधोल हाउंड श्वानांना प्रशिक्षित करून श्वान पथकामध्ये सहभागी करून घेतले आहे. सीआरपीएफने कोम्बाई श्वानांना सहभागी करून घेतले आहे. भारतीय कृषी संशोधन मंडळाच्यावतीनेही भारतीय वंशाच्या श्वानांवर संशोधन करण्यात येत आहे. यामागे उद्दिष्ट असे आहे की, भारतीय जातीच्या श्वानांना अधिक चांगले बनवून त्यांना उपयोगी करणे.तुम्ही इंटरनेटवर श्वानांच्या या नावांचा शोध घेतला तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. या प्राण्यांचे देखणे रूप, त्यांच्यामध्ये असलेले गुण पाहून तर तुम्हाला खूप नवल वाटेल. जर तुम्ही कुत्रे पाळण्याचा विचार करणार असाल,तर यापैकीच कोणत्याही भारतीय वंशाच्या श्वानाला आपल्या घरी घेवून या. आत्मनिर्भर भारत, हा ज्यावेळी जन-मनाचा मंत्र बनतोय तर मग, कोणतेही क्षेत्र यातून मागे सुटून कसे काय चालणार!
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनीच म्हणजे पाच सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करणार आहे. सर्वजण आपल्या जीवनातल्या यशाला, तसंच आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतात, त्यावेळी त्यांना आपल्या कोणत्या ना कोणत्या शिक्षकाचे नक्कीच स्मरण होते. अतिशय वेगाने काळ बदलतोय आणि या कोरोना संकट काळामध्ये तर आपल्या शिक्षकांच्या समोर परिवर्तनाचे एक मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आपल्या सर्व शिक्षकांनी या आव्हानाला समस्या न मानता, त्याचा संधी म्हणून स्वीकार केला, याचा मला आनंद वाटतो. शिक्षणामध्ये आता तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग होत आहे. यासाठी नवीन पद्धतीचा स्वीकार त्यांनी केला आहे. विद्यार्थी वर्गाला कशी मदत करता येईल, याचा विचार आपल्या शिक्षकांनी सहजतेने केला आणि त्या पद्धतीचा स्वीकार करून मुलांना शिकवले. आज देशामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरी नवसंकल्पना रूजते आहे. शिक्षक आणि विद्यार्थी मिळून काहीतरी नवीन करीत आहेत. ज्या प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठे परिवर्तन घडून येत आहे, त्याचा लाभ विद्यार्थी वर्गापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे.
मित्रांनो आणि विशेष करून माझ्या शिक्षक साथीदारांनो, वर्ष 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करणार आहे. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी अनेक वर्षांपासून आपल्या देशाला स्वातंत्र्याच्या लढ्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. या काळामध्ये देशासाठी प्राणाचे बलिदान करणारे महान पुत्र देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात आहेत. या महान पुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे. आजच्या पिढीला, आमच्या विद्यार्थी वर्गाला, स्वातंत्र्याच्या लढ्यातल्या महान नायकांच्या परिचय करून देणे, या वीरपुत्रांची माहिती देणे अतिशय आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये, स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळामध्ये नेमके काय घडले, ते आंदोलन कसे केले, त्यावेळी कोणी हौतात्म्य पत्करले, किती जण त्यावेळी कारागृहामध्ये होते, या सर्व गोष्टी आजच्या विद्यार्थी वर्गाने जाणल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा नक्कीच प्रभाव पडेल. यासाठी अनेक कामे करणे सहज शक्य आहे. ही मोठी जबाबदारी आमच्या शिक्षकांची आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहे, त्या जिल्ह्यामध्ये गेल्या शताब्दीमध्ये स्वातंत्र्य लढ्याविषयी कोणती घटना घडली? याविषयी विद्यार्थी वर्गाकडून संशोधन करून घेणे शक्य आहे. त्या घटनेविषयीची माहिती शाळेच्या हस्तलिखित अंकाच्या रूपामध्ये तयार करणे शक्य आहे. आपल्या शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचा ज्याच्याशी संबंध आहे, असे कोणते स्थान असेल तर त्या स्थानी विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेवून जाता येईल. कोणा एखाद्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी निश्चय करावा आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त या लढ्यातल्या 75 नायकांवर कविता, नाट्य, कथा लेखन करण्यात यावे. तुम्ही असे प्रयत्न केले तर देशातल्या हजारो, लाखो, अनामिक नायकांचा महान त्याग लोकांसमोर येवू शकेल. या महान राष्ट्रपुत्रांची नावे काळाच्या ओघात विस्मृतीमध्ये गेली आहेत, त्यांनी देशासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. अशा महान व्यक्तिमत्वांना आपण लोकांसमोर आणले तर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी त्यांचे स्मरण करून त्यांना ख-या अर्थाने श्रद्धांजली अर्पण होवू शकेल. आता ज्यावेळी दिनांक 5 सप्टेंबरला शिक्षक दिवस साजरा करीत आहोत, त्यावेळी मी माझ्या शिक्षक साथीदारांना आग्रह करू इच्छितो की, त्यांनी यासाठी एक प्रकारे वातावरण निर्मिती करावी, सर्वांना जोडावे आणि सर्वांनी मिळून हे कार्य करावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, देश आज ज्या विकास मार्गाने वाटचाल करीत आहे, त्या मार्गामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक ज्यावेळी सहभागी होईल, त्यावेळी वाटचालीचे यश सुखद ठरणार आहे. या यात्रेचा यात्रिक व्हावे आणि या मार्गा वर सर्वांनी पांथस्त व्हावे; यासाठी या देशाचा प्रत्येक नागरिक आरोग्यदायी असला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. आपण सर्वजण मिळून कोरोनाची लढाई पूर्णपणे जिंकणार आहे. कोरोनाला हरवणार आहोत. ज्यावेळी आपण सुरक्षित असणार आहे, त्याचवेळी कोरोना हरणार आहे. ज्यावेळी आपण एकमेकांमध्ये दोन गज अंतर राखणार आहे, मास्क वापरणार आहे, त्याचवेळी कोरोना हरणार आहे. या संकल्पाचे पूर्णतेने सर्वांनी पालन करावे. आपण सर्वांनी स्वस्थ रहावे, सुखी रहावे, या शुभभावनेबरोबरच पुढच्या ‘मन की बात’ मध्ये पुन्हा भेटूया!
खूप खूप धन्यवाद! नमस्कार!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
आज 26 जुलै आहे आणि आजचा दिवस अगदी विशेष आहे. आज कारगिल विजय दिवस आहे. 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारगिल युद्धात आपल्या सैन्याने भारताच्या विजयाचा ध्वज फडकावला होता. मित्रहो, कारगीलचे युद्ध ज्या परिस्थितीत झाले, ती परिस्थिती भारताला कधीच विसरता येणार नाही. पाकिस्तानने मोठ-मोठे बेत रचून भारताची भूमी हिसकावून घेण्याचे आणि आपल्या अंतर्गत कलहापासून इतरांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नको ते दुस्साहस केले होते. पाकिस्तान सोबत चांगले संबंध ठेवावे यासाठी तेव्हा भारत प्रयत्नशील होता. पण म्हणतात ना..
“बयरू अकारण सब काहू सों | जो कर हित अनहित ताहू सों ||
अर्थात कारणाशिवाय एखाद्याशी वैर करणे, हा दुष्टांचा स्वभावच असतो. अशा स्वभावाचे लोक, आपले भले करणाऱ्याचे सुद्धा नुकसान व्हावे, अशी इच्छा बाळगतात. म्हणूनच भारताने मैत्रीचा हात पुढे केला असतानाही पाकिस्तानने पाठीत सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर भारताच्या शूर सैन्याने जो पराक्रम गाजवला, भारताने आपले जे सामर्थ्य दाखवले, ते संपूर्ण जगाने पाहिले. तुम्ही कल्पना करू शकता, उंच डोंगरांवर बसलेला शत्रू आणि खालून लढा देणारे आपले सैन्य. मात्र उंचावर बसलेल्या शत्रुचा विजय झाला नाही, विजय झाला तो भारतीय सैन्याच्या ठाम निर्धाराचा आणि खऱ्या शौर्याचा. मित्रहो, त्यावेळी मला सुद्धा कारगिलला जाण्याचे आणि आपल्या जवानांचे शौर्य पाहण्याचे भाग्य लाभले. तो दिवस माझ्या आयुष्यातल्या सर्वात अनमोल क्षणांपैकी एक आहे. मी बघतो आहे की आज देशभरातले लोक कारगिल विजयाची आठवण काढत आहेत. समाज माध्यमांवर #courageinkargil या हॅशटॅगसह लोक आपल्या वीर जवानांना वंदन करत आहेत, जे हुतात्मा झाले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
मी आज सर्व देशवासियांतर्फे आपल्या या शूर जवानांबरोबरच त्यांच्या वीर मातांना सुद्धा वंदन करतो, ज्यांनी भारतमातेच्या या सुपुत्रांना जन्म दिला. देशातील तरुणांना मी आग्रह करतो की त्यांनी आज दिवसभर कारगिल विजयाशी संबंधित आपल्या शूरवीरांच्या कथा तसेच वीरमातांचा त्याग याबद्दल त्यांनी परस्परांना माहिती द्यावी. मित्रहो, आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही www.gallantryawards.gov.inया संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळावर आपल्याला आपल्या पराक्रमी योद्ध्यांबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल सविस्तर माहिती मिळेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत त्याबाबत चर्चा कराल, तेव्हा तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल. तुम्ही नक्कीच या संकेतस्थळाला भेट द्या आणि मी तर म्हणेन की तुम्ही पुन्हा पुन्हा या संकेतस्थळाला भेट द्या.
मित्रहो, कारगिल युद्धाच्यावेळी अटलजींनी लाल किल्ल्यावरून जे सांगितले होते, ते आज सुद्धा आपणा सर्वांसाठी समयोचित आहे. तेव्हा अटलजींनी गांधीजींच्या एका मंत्राची आठवण करून दिली होती. महात्मा गांधीजींचा मंत्र होता की एखाद्याला आपण काय करावे, काय करू नये, हे कळत नसेल, मनस्थिती द्विधा होईल, तेव्हा त्या व्यक्तीने भारतातल्या सर्वात गरीब आणि असहाय व्यक्तीचा विचार केला पाहिजे. आपण जे काही करणार आहोत, त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होणार का, हा विचार केला पाहिजे. गांधीजींच्या या विचाराच्या पुढे जात अटलजी म्हणाले होते की कारगिल युद्धाने आम्हाला आणखी एक मंत्र दिला आहे. तो म्हणजे, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की आपण जो निर्णय घेणार आहोत, तो, दुर्गम डोंगरांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाच्या सन्मानाचा आदर करणारा आहे का.. या, अटलजींच्या आवाजात त्यांची ही भावना आपण ऐकूया, समजून घेऊया आणि काळाची मागणी आहे की आपण त्या भावनेचा स्वीकार करूया.
अटलजींचे भाषण आपणा सर्वांच्या लक्षात आहे की गांधीजींनी आपल्याला एक मंत्र दिला होता. ते म्हणाले होते की जेव्हा तुम्हाला काय करावे हे कळणार नाही, मनस्थिती द्विधा होईल, तेव्हा तुम्ही भारतातल्या सर्वात असहाय्य व्यक्तीचा विचार करा आणि स्वतःला विचारा की आपण जे करणार आहोत, त्यामुळे त्या व्यक्तीचे भले होईल का? कारगीलने आम्हाला दुसरा मंत्र दिला आहे , कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे की आपण जे करणार आहोत, त्यामुळे दुर्गम डोंगरांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकाचा आदर जपला जाणार आहे का?
मित्रहो, युद्ध सुरू असताना आपण जे काही बोलतो, जे काही करतो, त्याचा प्रभाव सीमेवर तैनात सैनिकाच्या मनोबलावर, त्याच्या कुटुंबाच्या मनोबलावर होत असतो. हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच आपले आचरण आपली वागणूक, आपली वाणी, आपले वक्तव्य, आपली मर्यादा आपली उद्दिष्टे आणि आपण जे काही करत आहोत, जे काही बोलत आहोत, त्यामुळे सैनिकांचे मनोबल दृढ होईल, त्यांचा सन्मान वाढेल हा विचार आपण कायम मनात बाळगला पाहिजे. राष्ट्र सर्वोपरी हा मंत्र घेऊन, एकतेच्या सूत्रात बांधलेले देशवासी आपल्या सैनिकांचे मनोगत हजार पटीने वाढवतात. आपल्याकडे म्हटले आहे, ‘संघे शक्ति कलौ युगे’
हे लक्षात न घेता आपण अनेकदा समाज माध्यमांवर अशा काही गोष्टींना प्रोत्साहन देतो, ज्या आपल्या देशाचे मोठे नुकसान करतात. अनेकदा उत्सुकतेपोटी आपण अनेक गोष्टी फॉरवर्ड करतो. असे करणे चुकीचे, आहे हे माहिती असते, तरीही ते करत राहतो. हल्ली युद्ध केवळ देशाच्या सीमेवर लढले जात नाही, देशात सुद्धा अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढले जाते आणि प्रत्येक नागरिकाला, त्या युद्धात आपली भूमिका ठरवावी लागते. आपल्याला सुद्धा देशाच्या सीमेवर दुर्गम परिस्थितीत लढणाऱ्या सैनिकांचे स्मरण ठेवत आपली भूमिका निश्चित करावी लागेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशाने एक होऊन ज्या पद्धतीने कोरोनाशी दोन हात केले आहेत, त्यामुळे अनेकांनी उपस्थित केलेल्या शंका चुकीच्या ठरल्या आहेत. आज आपल्या देशात या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू झाले आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू होणे सुद्धा दुःखद असते, हे खरे आहे. मात्र भारत, आपल्या लाखो नागरिकांचे प्राण वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. मित्रहो, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अनेक ठिकाणी तो वेगाने पसरत आहे. आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. सुरुवातीला कोरोना विषाणूचा संसर्ग जितका घातक होता, तितकाच तो आजही घातक आहे. म्हणूनच आपण पुरेपूर खबरदारी घेतली पाहिजे. चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे किंवा रुमालाने चेहरा झाकून घेणे, एकमेकांपासून किमान सहा फुटाचे अंतर राखणे, सतत हात स्वच्छ करणे, कोठेही न थुंकणे आणि आणि स्वच्छता राखणे ही हत्यारेच कोरोनापासून आपले रक्षण करू शकतील. अनेकदा आपल्याला मास्क लावल्यामुळे त्रास होऊ लागतो. खूपदा वाटते की चेहऱ्यावरून मास्क काढून टाकावा. आपण बोलू लागतो. जेव्हा मास्क वापरणे सगळ्यात जास्त गरजेचे असते, तेव्हाच आपण मास्क काढून टाकतो. अशावेळी मी तुम्हाला विनंती करतो की जेव्हा तुम्हाला मास्कचा त्रास वाटू लागेल, तो काढून ठेवावा, असे वाटेल, तेव्हा अगदी क्षणभर त्या डॉक्टरांना आठवून बघा, त्या परिचारिकांना आठवून बघा, आपल्या सर्व कोरोना योद्ध्यांना आठवून बघा. आपले सर्वांचे आयुष्य वाचवण्यासाठी ही सर्व मंडळी कित्येक तास मास्क लावून काम करत आहेत. आठ-दहा तास मास्क वापरत आहेत. त्यांना त्रास होत नसेल का? जरा त्यांना आठवून बघा. तुम्हालाही वाटेल की एक नागरिक म्हणून आपण या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये आणि इतर कोणालाही करू देऊ नये. एकीकडे आपल्याला कोरोना विरुद्धचे युद्ध सजग राहून आणि सतर्कतेने लढायचे आहे, त्याच वेळी कठोर मेहनत करत उद्योग, नोकरी, शिक्षण, जे काही आपले कर्तव्य आहे, ते पूर्ण करायचे आहे, त्यातही यशाची नवी शिखरे गाठायची आहेत. मित्रहो, कोरोनाच्या काळात आपल्या ग्रामीण क्षेत्राने संपूर्ण देशाला एक नवी दिशा दाखवली आहे. गावातल्या स्थानिक नागरिकांचे, ग्रामपंचायतींचे अनेक चांगले प्रयत्न सातत्याने समोर येत आहेत. जम्मूमध्ये त्रेवा नावाची एक ग्रामपंचायत आहे. बलबीर कौर जी तिथल्या सरपंच आहेत. मला सांगण्यात आले की बलबीर कौरजी यांनी आपल्या पंचायतीमध्ये 30 खाटांचे एक क्वारंटाईन केंद्र तयार केले आहे. पंचायतीत येण्याच्या रस्त्यावर पाण्याची सोय केली आहे. लोकांना सहजपणे हात धुता यावेत, याची सोय केली आहे. इतकेच नाही तर बलबीर कौरजी स्वतः आपल्या खांद्यावर स्प्रे पंप घेऊन, स्वयंसेवकांसोबत संपूर्ण पंचायतीमध्ये जवळपासच्या क्षेत्रात सॅनिटायझेशचे काम सुद्धा करतात. अशाच आणखी एक कश्मीरी महिला सरपंच आहेत गान्दरबलच्या चौंटलीवार येथील जैतुना बेगम. जैतुना बेगम यांनी निर्धार केला की त्यांची ग्रामपंचायत कोरोविरुद्ध लढा देईल आणि उपजीविकेच्या संधी सुद्धा निर्माण करेल. त्यांनी आपल्या संपूर्ण क्षेत्रात मोफत मास्क वाटले, मोफत रेशन वाटले. त्याचबरोबर त्यांनी लोकांना धान्याचे बियाणे सुद्धा वाटले, सफरचंदाची रोपे वाटली, जेणेकरून लोकांना शेती किंवा बागायती करण्यात अडचणी येऊ नये. मित्रहो, कश्मीर मधली आणखी एक प्रेरक घटना सांगतो. इथे अनंतनागमध्ये नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत श्री मोहम्मद इक्बाल. त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये सॅनिटायझेशनसाठी स्प्रेयरची आवश्यकता होती. त्यांनी माहिती गोळा केली तेव्हा समजले की आवश्यक यंत्र दुसऱ्या शहरातून आणावे लागेल आणि त्यासाठी सहा लाख रुपये मोजावे लागतील. श्री इक्बाल यांनी स्वतः प्रयत्न करून स्प्रेयर यंत्र तयार केले आणि ते सुद्धा अवघ्या पन्नास हजार रुपयांमध्ये. अशी अनेक उदाहरणे आहेत. संपूर्ण देशभरातून, कानाकोपऱ्यातून अशा अनेक प्रेरक घटना रोज समोर येतात. हे सर्व जण अभिनंदनास पात्र आहेत. आव्हान समोर आले, मात्र लोकांनी तितक्यात ताकदीने त्याचा मुकाबला केला.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, योग्य आणि सकारात्मक दृष्टिकोन असला तर संकटाच्या काळातही संकटाचे संधीत रूपांतर करणे शक्य होते. आता आपण कोरोनाच्या काळात सुद्धा पाहतो आहोत की आपल्या देशातील युवकांनी, महिलांनी, आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्याच्या बळावर काही नवे प्रयोग सुरू केले आहेत. बिहारमध्ये महिलांच्या अनेक स्वयंसहाय्यता गटांनी मधुबनी चित्रकला असणारे मास्क तयार करायला सुरुवात केली. बघता बघता ते प्रसिद्ध झाले आहेत. हे मधुबनी मास्क आपल्या परंपरेचा प्रचार करत आहेत, त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याची काळजी घेतानाच रोजगार सुद्धा उपलब्ध करून देत आहेत. ईशान्येकडच्या क्षेत्रात बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, हे आपल्याला माहिती आहे. आता याच बांबूचा वापर करून त्रिपुरा, मणिपूर आणि आसाममधल्या कारागीरांनी उच्च दर्जाच्या पाण्याच्या बाटल्या आणि डबे तयार करायला सुरुवात केली आहे. बांबूपासून तयार झालेल्या या वस्तूंचा दर्जा आपण बघाल तर बांबूपासून इतक्या सुंदर बाटल्या तयार करता येऊ शकतात, यावर सहजासहजी विश्वास ठेवता येणार नाही. या बाटल्या पर्यावरण स्नेही सुद्धा आहे. जेव्हा त्या तयार केल्या जातात, तेव्हा सर्वप्रथम कडूनिंब आणि इतर औषधी वनस्पतींसोबत बांबू उकळला जातो, त्यामुळे त्यात औषधी गुणधर्म सुद्धा उतरतात. लहान लहान स्थानिक उत्पादनांना मोठे यश कसे मिळते, याचे एक उदाहरण झारखंडमध्ये सुद्धा बघायला मिळाले. झारखंड मधील बिशनपुर येथे हल्ली 30 पेक्षा जास्त समूह एकत्र येऊन लेमन ग्रास अर्थात गवती चहाची शेती करत आहेत. लेमन ग्रास चार महिन्यात तयार होते आणि त्याच्या तेलाला बाजारात चांगली किंमत मिळते. सध्या त्याला बाजारपेठेत चांगली मागणी सुद्धा आहे.
देशातल्या आणखीन दोन भागाबद्दल मी सांगू इच्छितो. हे भाग परस्परांपासून शेकडो किलोमीटर दूर आहेत, पण ते आपापल्या परीने भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी जरा वेगळ्या प्रकारचे काम करत आहेत. एक भाग आहे लडाख आणि दुसरा आहे कच्छ. लेह आणि लडाखचे नाव घेतले तर सुंदर दऱ्या आणि उंच डोंगर असे निसर्गरम्य दृश्य आपल्या नजरेसमोर येते. ताज्या हवेची झुळूक जाणवू लागते. त्याच वेळी कच्छचे नाव घेतले तर नजरेसमोर येते दूरवर पसरलेले वाळवंट, जिथे एकही झाड दिसत नाही. लडाखमध्ये एक विशिष्ट फळ येते, ज्याचे स्थानिक नाव आहे चुली. आपण या फळाला जर्दाळू या नावाने ओळखतो. हे फळ या क्षेत्रातील अर्थव्यवस्था बदलण्यास सक्षम आहे, मात्र या फळपिकाला पुरवठा साखळी, हवामानातले बदल अशा अनेक आव्हानांचा मुकाबला करावा लागतो. या फळाचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी एका नाविन्यपूर्ण यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे. ही एक दुहेरी यंत्रणा आहे, जिचे नाव आहे solar apricot dryer and space heater. या यंत्रणेचा वापर करून जर्दाळू तसेच इतर फळे आणि भाज्यांना आवश्यकतेनुसार सुकवता येते आणि त्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी पद्धत वापरली जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा जर्दाळूची फळे शेताच्या जवळपास सुकवली जात, तेव्हा त्यातली अनेक फळे वाया जात असत, त्याचबरोबर धूळ आणि पावसाच्या पाण्यामुळे फळांचा दर्जा सुद्धा चांगला राहत नसे. आता वळू या कच्छकडे. कच्छमधले शेतकरी हल्ली ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी कौतुकास्पद प्रयत्न करत आहेत. अनेक लोक हे ऐकल्यानंतर आश्चर्य व्यक्त करतात, कच्छ आणि ड्रॅगन फ्रुट? मात्र तिथले अनेक शेतकरी सध्या हेच काम करत आहेत. फळाची गुणवत्ता टिकवून कमी जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासंदर्भात अनेक नवीन प्रयोग केले जात आहेत. मला सांगण्यात आले आहे की ड्रॅगन फ्रुटची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे. विशेषतः न्याहारीसाठी हे फळ वापरले जाते आहे. देशाला ड्रॅगन फ्रुटची आयात करावी लागू नये, असा संकल्प कच्छच्या शेतकऱ्यांनी केला आहे. हीच खरी आत्मनिर्भरता आहे.
मित्रहो, जेव्हा आपण काही नवीन करण्याचा विचार करतो, नावीन्यपूर्ण विचार करतो, तेव्हाच अशी कामे शक्य होतात, ज्यांची एरवी कोणी कल्पनाही केली नसेल. आता बिहारमधले काही युवकच बघा ना. आधी ते सगळेच नोकरी करत होते. एके दिवशी त्यांनी ठरवले की मोत्यांची शेती करायची. त्यांच्या भागात लोकांना याबाबत फारशी माहिती नव्हती. पण या लोकांनी आधी सगळी माहिती जमवली. जयपूर आणि भुवनेश्वर येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि आपल्याच गावात मोत्यांची शेती सुरू केली. आज ते स्वतः यातून चांगली कमाई करत आहेत, त्याचबरोबर त्यांनी मुजफ्फरपुर, बेगूसराय आणि पाटणा येथे इतर राज्यांतून परतलेल्या प्रवासी मजुरांना याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. यामुळे अनेक लोकांसाठी आत्मनिर्भरतेची द्वारे खुली झाली आहेत.
मित्रहो, येत्या लवकरच रक्षाबंधनचा सण येतो आहे. अलिकडे मी बघतो आहे की अनेक लोक आणि संस्था या वर्षी रक्षाबंधन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची मोहीम राबवत आहेत. अनेक लोक या सणाला vocal for local सोबत जोडत आहेत आणि हे योग्य सुद्धा आहे. आमचे सण आमच्या समाजाच्या, आपल्या घराच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीचा उद्योग विस्तारणारे असतील, त्यांचाही सण आनंदात साजरा होईल, अशावेळी त्या सणाचा आनंद आणखी वाढतो. सर्व देशवासियांना रक्षाबंधनाच्या अनेक शुभेच्छा.
मित्रहो, 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिवस आहे. भारताचा हातमाग, आपली स्वतःची हस्तकला. या कलेत शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास सामावलेला आहे. आपण सर्व भारतीयांनी हातमाग आणि हस्तकलांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल माहिती दिली पाहिजे. भारताचा हातमाग आणि हस्तकला किती समृद्ध आहे, त्यात किती वैविध्य आहे, हे जगातील जितक्या जास्त लोकांना कळेल, तितकाच त्याचा लाभ आमच्या स्थानिक कारागिरांना आणि विणकरांना मिळेल.
मित्रहो, विशेषतः माझ्या युवा सहकाऱ्यांनो, आपला देश बदलतो आहे. कसा बदलतो आहे? किती वेगाने बदलतो आहे? कोणत्या कोणत्या क्षेत्रात बदलतो आहे? सकारात्मक दृष्टीकोनासह एक नजर फिरवली तर आपण स्वतःच आश्चर्यचकित होऊ. एक काळ असा होता जेव्हा खेळापासून इतर सर्वच क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त लोक मोठ्या शहरांतले असत किंवा प्रतिष्ठित कुटुंबातले असत किंवा प्रसिद्ध शाळा – महाविद्यालयातले असत. आता देश बदलतो आहे. गावांमधून, लहान शहरांमधून सर्वसामान्य कुटुंबात मधून आमचा युवा वर्ग पुढे येत आहेत. यशाची नवी शिखरे कवेत घेत आहे. ही सर्व मंडळी संकटांचा सामना करत, नवीन स्वप्ने घेऊन आगेकूच करत आहेत.
अलीकडेच परीक्षांचे निकाल लागले, त्यात सुद्धा हे दिसून आले. आज मन की बात कार्यक्रमात आपण अशाच काही प्रतिभावंत मुला-मुलींसोबत संवाद साधूया. अशीच एक प्रतिभावंत मुलगी आहे, कृतिका नांदल. कृतिकाजी हरियाणा मधील पानिपत येथील रहिवासी आहेत.
मोदी जी – हॅलो, कृतिका जी नमस्ते.
कृतिका – नमस्ते सर.
मोदी जी – खूप चांगले गुण मिळाले आहेत तुम्हाला, तुमचे मनापासून अभिनंदन.
कृतिका – धन्यवाद सर.
मोदी जी – तुम्ही आता लोकांशी फोनवर बोलून सुद्धा थकून जात असणार, किती तरी लोकांचे फोन येत असतील.
कृतिका – हो सर.
मोदी जी – आणि शुभेच्छा देणाऱ्या लोकांनाही, ते तुम्हाला ओळखतात, याचा अभिमान वाटत असणार. तुम्हाला कसे वाटते आहे?
कृतिका – सर, खूप छान वाटते आहे. आई-वडीलांना अभिमान वाटतो, याचा मलाही अभिमान वाटतो आहे.
मोदी जी – बरं, मला सांगा, तुम्हाला कोणापासून प्रेरणा मिळते?
कृतिका – सर, माझी आईच माझी प्रेरणा आहे.
मोदी जी – अरे वा, तुम्ही तुमच्या आईकडून काय शिकता..
कृतिका – सर, तिने तिच्या आयुष्यात अनेक हाल अपेष्टा सोसल्या पण ती खूप ठाम आणि सक्षम आहे. तिला पाहून मला प्रेरणा मिळते की आपणही तिच्यासारखे झाले पाहिजे.
मोदी जी – आईचे शिक्षण किती झाले आहे..
कृतिका – सर, BA पर्यंत शिक्षण झाले आहे.
मोदी जी – BA केले आहे
कृतिका – हो सर
मोदी जी – छान, मग आई तुम्हाला शिकवत सुद्धा असेल.
कृतिका – हो सर. सगळ्या चालीरितीसुद्धा तीच शिकवते.
मोदी जी – मग तर रागावत सुद्धा असेल.
कृतिका – हो सर, ती रागावते सुद्धा.
मोदी जी – मला सांग बाळा, तुला पुढे काय करायची इच्छा आहे ?
कृतिका – सर मला डॉक्टर व्हायचे आहे.
मोदी जी – अरे वा !
कृतिका – MBBS
मोदी जी – बघ बाळा, डॉक्टर व्हायचे म्हणजे सोपे काम नाही.
कृतिका – हो सर.
मोदी जी – Degree तर तू मिळवशील कारण तू हुशार मुलगी आहेस. पण डॉक्टरचे आयुष्य समाजासाठी समर्पित असते.
कृतिका – हो सर.
मोदी जी – डॉक्टरला रात्री कधीच शांतपणे झोपता येत नाही. कधी रूग्णांचा फोन येतो तर कधी हॉस्पीटलमधून फोन येतो, मग धावपळ करावी लागते. म्हणजे अगदी बारा महिने, चोवीस तास डॉक्टर लोकांची सेवा करत असतात.
कृतिका – हो सर.
मोदी जी – आणि धोका सुद्धा आहे त्यात. हल्ली वेगवेगळे आजार समोर येत आहेत. डॉक्टर साठी तर धोका जास्त वाढतो.
कृतिका – हो सर
मोदी जी – अच्छा कृतिका, तुमचे हरयाणा तर अवघ्या भारताला क्रीडा प्रकारांमध्ये प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणारे राज्य आहे.
कृतिका – हो सर.
मोदी जी – मग तुम्ही खेळ खेळता की नाही? खेळ आवडतात की नाही.
कृतिका – सर, शाळेत असताना मी बास्केटबाल खेळत असे.
मोदी जी – बरं, किती उंच आहात तुम्ही, खूप उंच आहात का..
कृतिका – नाही सर. पाच फूट दोन इंच आहे उंची…
मोदी जी – अच्छा, तरीही तुम्हाला खेळांची आवड आहे ?
कृतिका – सर, ती तर फक्त आवड आहे. खेळते आवडीने, इतकंच..
मोदी जी – छान छान, चला कृतिकाजी, तुमच्या आईला माझा नमस्कार सांगा. त्यांनी तुम्हाला योग्य प्रकारे वाढवलं आहे. आपलं जीवन योग्य प्रकारे घडवलं आहे. आपल्या आईला नमस्कार आणि तुमचे मनापासून अभिनंदन, अनेकानेक शुभेच्छा.
कृतिका – धन्यवाद सर.
चला, आता जाऊया केरळमध्ये एर्नाकुलम मध्ये. आता आपण केरळच्या युवकासोबत गप्पा करूया.
मोदी जी – हॅलो
विनायक – हॅलो सर नमस्कार.
मोदी जी – विनायक, अभिनंदन.
विनायक – हो. धन्यवाद सर.
मोदी जी – शाबाश विनायक, शाबाश
विनायक – हो. धन्यवाद सर.
मोदी जी – How is the जोश
विनायक – High sir
मोदी जी – तुम्ही खेळ खेळता का?
विनायक – बॅडमिंटन.
मोदी जी – बॅडमिंटन
विनायक – हो सर.
मोदी जी – शाळेत की तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची संधीही मिळाली?
विनायक – नाही सर, शाळेतच थोडेफार प्रशिक्षण मिळाले.
मोदी जी – हम्म
विनायक – आमच्या शिक्षकांकडून.
मोदी जी – हम्म
विनायक – तिथून आम्हाला बाहेर खेळायचीही संधी मिळाली.
मोदी जी – अरे व्वा..
विनायक – शाळेकडूनच
मोदी जी – तुम्ही आजवर किती राज्ये पाहिली आहेत ?
विनायक – मी फक्त केरळ आणि तामीळनाडू ही दोनच राज्ये पाहिली आहेत.
मोदी जी – फक्त केरळ आणि तामीळनाडू
विनायक – हो सर
मोदी जी – तुम्हाला दिल्ली पाहायची आहे का ?
विनायक – हो सर, पुढच्या उच्च शिक्षणासाठी मी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
मोदी जी – वाह्, तर तुम्ही दिल्लीत येत आहात.
विनायक – हो सर.
मोदी जी – मला सांगा, ज्या विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगले गुण मिळवायचे आहेत त्यांना तुम्ही काही संदेश देऊ इच्छितो का..
विनायक – कठोर मेहनत आणि वेळेचे व्यवस्थापन
मोदी जी – तर वेळेचे चांगले व्यवस्थापन
विनायक – हो सर..
मोदी जी – विनायक तुमचे छंद काय आहेत..
विनायक – बॅडमिंटन आणि नौकानयन
मोदी जी – आणि तुम्ही समाज माध्यमांवर सुद्धा सक्रिय आहात …
विनायक – नाही सर आम्हाला शाळेत इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅजेट्स वापरण्याची परवानगी नाही.
मोदी जी – अरे वा, तुम्ही सुदैवी आहात.
विनायक – हो सर.
मोदी जी – छान विनायक, पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हाला अनेक शुभेच्छा.
विनायक – धन्यवाद सर.
चला तर मंडळी, आता जाऊ या उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशात अमरोहा इथल्या श्री उस्मान सैफी यांच्यासोबत गप्पा मारूया.
मोदी जी – हॅलो उस्मान, तुमचं मनापासून अभिनंदन.
उस्मान – धन्यवाद सर.
मोदी जी – अच्छा उस्मान मला सांगा, तुम्हाला या परीक्षेत अपेक्षेप्रमाणेच गुण मिळाले की कमी गुण मिळाले.
उस्मान – नाही सर, अपेक्षेप्रमाणेच गुण मिळाले. माझे आई-वडीलसुद्धा खुश आहेत.
मोदी जी – अरे वा. मला सांगा, तुमच्या कुटुंबात तुम्हीच इतके हुषार आहात की तुमचे भाऊसुद्धा हुषार आहेत.
उस्मान – नाही सर, मीच आहे. माझा भाऊ जरा मस्तीखोर आहे.
मोदी जी – अच्छा
उस्मान – पण माझ्यासाठी तो खुश असतो.
मोदी जी – छान, छान. अच्छा, तुम्ही अभ्यास करत होता, तेव्हा तुमचा आवडता विषय कोणता होता?
उस्मान – गणित
मोदी जी – अरे वा ! तर गणिताची आवड होती, कोणत्या शिक्षकांनी तुम्हाला प्रेरित केले?
उस्मान – सर, आमचे गणित विषयाचे एक शिक्षक आहेत, रजत सर. त्यांनी मला प्रेरणा दिली. ते खूप छान शिकवतात. माझा गणित विषय आधीपासून चांगला होता आणि तो खूप छान विषय आहे.
मोदी जी – हम्म
उस्मान – गणिते करत राहू, तशी आवड वाढत जाते. म्हणून तो माझा आवडता विषय आहे.
मोदी जी – हो, हो. तुम्हाला माहिती आहे का, वेदिक गणिताचे ऑनलाईन क्लास चालवले जातात…
उस्मान – हो सर.
मोदी जी – तुम्ही शिकायचा प्रयत्न केला आहे का?
उस्मान – नाही सर, अजून तरी नाही
मोदी जी – नक्की बघा. तुमच्या अनेक मित्रांना वाटेल की तुम्ही जादूगार आहात. कारण संगणकाच्या वेगाने तुम्हाला आकडेमोड करता येईल. वेदिक गणिताची तंत्रे खूपच सोपी आहेत आणि सध्या हे वर्ग ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहेत.
उस्मान – हो सर
मोदी जी – तुम्हाला गणिताची आवड आहे, तर तुम्ही नवनव्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील.
उस्मान – हो सर
मोदी जी – अच्छा उस्मान, तुम्ही मोकळ्या वेळात काय करता ?
उस्मान – मोकळ्या वेळात मी थोडंफार लेखन करतो सर. मला लिखाणाची आवड आहे…
मोदी जी – अरे वा ! म्हणजे तुम्हाला गणिताबरोबर साहित्याची सुद्धा आवड आहे.
उस्मान – हो सर
मोदी जी – काय लिहिता तुम्ही? कविता लिहिता, शायरी करता…
उस्मान – रोजच्या घडामोडींवर आधारित कोणत्याही विषयावर लिहित असतो.
मोदी जी – हो हो
उस्मान – नवनवी माहिती मिळत असते, GST, नोटबंदी असे बरेच काही..
मोदी जी – अरे वा ! आता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याबद्दल काय विचार आहे?
उस्मान – कॉलेजबद्दल सांगायचं तर सर मी JEE मुख्य परीक्षेचा first attempt clear केला आहे आणि आता सप्टेंबर महिन्यात second attempt देणार आहे. आधी आयआयटीमधून Bachelor पदवी घ्यायची आणि नंतर नागरी सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे, असा माझा विचार आहे.
मोदी जी – अरे वा ! मला सांगा, तुम्हाला तंत्रज्ञानाचीही आवड आहे का?
उस्मान – हो सर. म्हणून मी माहिती तंत्रज्ञान हा विषय निवडला आहे, first time best IIT साठी .
मोदी जी – छान. चला उस्मान, माझ्यातर्फे तुम्हाला अनेक शुभकामना. तुमचा भाऊ मस्तीखोर आहे, म्हणजे तुमचा वेळ छान जात असणार. तुमच्या आई-बाबांनाही माझा नमस्कार सांगा. त्यांनी तुम्हाला ही संधी दिली आहे, तुमच्या स्वप्नांना बळ दिलं आहे. अभ्यासाबरोबरच तुम्ही ताज्या घडामोडींचाही अभ्यास करता, लिखाणही करता याचा मला आनंद वाटला. लक्षात घ्या, लेखन केल्याचा फायदा असा होतो की तुमच्या विचारांना धार येते. लिखाण केल्याचे खूप फायदे आहेत. तुम्हाला माझ्यातर्फे अनेकानेक शुभेच्छा.
उस्मान – धन्यवाद सर
चला मंडळी, पुन्हा एकदा खाली दक्षिणेकडे वळू या. तमिळनाडू, नामाक्कलमधल्या कणिकासोबत गप्पा मारू या. कणिकासोबत गप्पा मारणे अगदी प्रेरक आहे.
मोदी जी : कणिका जी, वणक्कम
कणिका : वणक्कम सर
मोदी जी : कशा आहात तुम्ही
कणिका : छान सर
मोदी जी : सर्वात आधी तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो.
कणिका : धन्यवाद सर
मोदी जी : जेव्हा मी नामाक्कलबद्दल ऐकतो तेव्हा मला तिथल्या अंजनेयार मंदिराची आठवण येते.
कणिका : हो सर.
मोदी जी : आता मला तुमच्याशी मारलेल्या गप्पाही आठवत आहेत.
कणिका : हो सर.
मोदी जी : तर तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन.
कणिका : धन्यवाद सर.
मोदी जी : या परीक्षेसाठी तुम्ही नक्कीच भरपूर अभ्यास केला असणार. तुमचा परीक्षेसाठी तयारीचा अनुभव कसा होता..
कणिका : सर, मी अगदी सुरूवातीपासून भरपूर मेहनत केली. या निकालाची मी अपेक्षा केली नव्हती पण मी चांगल्या प्रकारे पेपर सोडवले आणि माझा निकाल चांगला लागला.
मोदी जी : तुम्हाला किती गुणांची अपेक्षा होती ?
कणिका : मला वाटले होते 485 किंवा 486 मिळतील…
मोदी जी : आणि आता
कणिका : 490
मोदी जी : मग, तुमच्या कुटुंबियांची आणि शिक्षकांनी भावना काय होती?
कणिका : सर, त्यांना खूप आनंद झाला आणि खूप अभिमान वाटला.
मोदी जी : तुमचा आवडता विषय कोणता आहे.
कणिका : गणित
मोदी जी : ओह्! आणि भविष्यात तुम्ही काय करायचे ठरवले आहे?
कणिका : सर, शक्य झाले तर मला AFMC मध्ये डॉक्टर व्हायचे आहे.
मोदी जी : आणि तुमच्या घरातले कोणी वैद्यकीय क्षेत्रात आहेत का?
कणिका : नाही सर, माझे वडील वाहनचालक आहेत पण माझी बहीण MBBS करते आहे.
मोदी जी : अरे वा ! सर्वात आधी मी तुमच्या वडीलांना अभिवादन करतो, जे तुमची आणि तुमच्या बहिणीची उत्तम प्रकारे काळजी घेत आहेत. ते खूपच चांगले काम करत आहेत.
कणिका : हो सर
मोदी जी : आणि ते सर्वांसाठी प्रेरक आहेत.
कणिका : हो सर
मोदी जी : तुमचे वडील तुमची बहीण आणि तुमच्या कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन.
कणिका : धन्यवाद सर.
मित्रहो, असे आणखी अनेक युवा मित्र आहेत, ज्यांच्या हिंमतीच्या आणि यशाच्या कथा आम्हाला सतत प्रेरणा देतात. माझी इच्छा होती की जास्तीत जास्त युवकांशी गप्पा मारण्याची संधी मिळावी. मात्र वेळेची मर्यादा लक्षात घ्यावी लागते. मी सर्व युवा सहकाऱ्यांना आग्रह करतो की अवघ्या देशाला प्रेरित करणारी त्यांची कहाणी त्यांनी स्वतः सर्वांना सांगावी.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, साता समुद्रा पलीकडे, भारतापासून हजारो मैल दूर एक लहानसा देश आहे, सुरिनाम. भारत आणि सुरिनाम यांच्यात निकटचे संबंध आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी भारतातील लोक तिथे गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांची चौथी- पाचवी पिढी सध्या तिथे आहे. आज सुरिनाम मधील एक चतुर्थांश पेक्षा जास्त लोक भारतीय वंशाचे आहे. तुम्हाला माहिती आहे का की तिथे सर्रास बोलली जाणारी ही सरनामी ही भोजपुरीचीच एक बोली भाषा आहे. या सांस्कृतिक संबंधांबाबत आम्हा भारतीयांना अभिमान वाटतो.
अलीकडेच श्री चन्द्रिका प्रसाद संतोखी सुरिनामचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. ते भारताचे मित्र आहेत. 2018 साली आयोजित Person of Indian origin – Parliamentary conference या परिषदेत ते सहभागी झाले होते. श्री चन्द्रिका प्रसाद संतोखी जी यांनी शपथ घेताना सुरुवातीला वेदमंत्रांचा उच्चार केला होता, जे संस्कृत भाषेत होते. त्यांनी वेदांचा उल्लेख केला आणि ओम शांती शांती असे म्हणत आपली शपथ पूर्ण केली. आपल्या हातात वेद घेऊन ते म्हणाले की, मी चन्द्रिका प्रसाद संतोखी, आणि पुढे.. शपथ घेताना ते पुढे काय म्हणाले.. त्यांनी वेदातील एका मंत्राचा उच्चार केला. ते म्हणाले,
ॐ अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि तच्छकेयम तन्मे राध्यताम |
इदमहमनृतात सत्यमुपैमि ||
अर्थात, हे अग्नी, संकल्पाच्या देवते, मी एक प्रतिज्ञा करत आहे. मला त्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य प्रदान कर. मला असत्यापासून दूर राहण्याचा आणि सत्याच्या दिशेने जाण्याचा आशीर्वाद प्रदान कर. खरोखरच ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे.
मी श्री चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे अभिनंदन करतो आणि आपल्या देशाची सेवा करण्यासाठी 130 कोटी भारतीयांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या पावसाळा सुरू आहे. मागच्या वेळी सुद्धा मी आपल्याला सांगितले होते की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अस्वच्छता आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढते, त्यामुळे आपण सर्वांनी स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे, आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करत रहावे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपण इतर आजारांपासून दूर राहिले पाहिजे. रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे.
मित्रहो, पावसाळ्याच्या ऋतूमध्ये देशाचा एक फार मोठा भाग पुराच्या संकटाचा सामना करत आहे. बिहार, आसाम सारख्या राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पुरामुळे खूप समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे एकीकडे कोरोना आहे तर दुसरीकडे हे आणखी एक आव्हान आहे. अशा वेळी सर्व सरकारे, एन डी आर एफ ची पथके, राज्यांची आपत्ती नियंत्रण पथके, स्वयंसेवी संस्था सर्वच एकत्र आले आहेत. सगळेजण एकत्र येऊन हरप्रकारे मदत आणि बचावाचे काम करत आहेत. या संकटाचा तडाखा बसलेल्या लोकांसोबत संपूर्ण देश उभा आहे.
मित्रहो, पुढच्या वेळी जेव्हा आपण मन की बात मध्ये भेटू, त्याआधीच 15 ऑगस्ट येत आहे. या वर्षी 15 ऑगस्ट सुद्धा वेगळ्या परिस्थितीत साजरा केला जाईल, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या या साथीच्या काळात साजरा केला जाईल.
माझ्या युवा सहकाऱ्यांना, देशवासीयांना मी विनंती करतो की स्वातंत्र्यदिनी आपण या साथीच्या रोगापासून मुक्त होण्याचा संकल्प करू, आत्मनिर्भर भारताचा संकल्प करू, काही नवीन शिकण्याचा आणि शिकविण्याचा संकल्प करू, आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा संकल्प करू. राष्ट्र निर्माणासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अनेक महान विभूतींच्या तपस्येमुळे आज आपला देश या उंचीपर्यंत पोहोचला आहे. अशा महान विभूतिंपैकी एक आहेत, लोकमान्य टिळक. येत्या 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे अवघे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. आपल्या सर्वांना त्यांच्याकडून बरेच काही शिकता येईल.
पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा खूप गप्पा मारू यां, एकत्र मिळून काही नव्या गोष्टी शिकू या आणि त्या सर्वांना सांगू या. आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि निरोगी रहा. सर्व देशवासियांना येणाऱ्या सर्व सणानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. अनेकानेक धन्यवाद..
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार!
‘मन की बात’ कार्यक्रमाने 2020 या वर्षातला अर्धा प्रवास आता पूर्ण केला आहे.या काळात आपण अनेक विषयांवर चर्चा केली.सध्या जो जागतिक साथीचा आजार पसरला आहे, मानवजातीवर जे संकट आलं आहे, त्यावर आपली चर्चा जरा जास्त झाली, आणि ते स्वाभाविकही आहे. मात्र, आजकाल मी एक बघतोय, लोकांच्या चर्चेमध्ये सारखा एकच विषय असतो,की हे वर्ष आता कधी संपणार? कोणी कोणाला फोन करत असेल, तर त्या फोनवर देखील, याच विषयाने बोलण्याची सुरुवात होते, की हे वर्ष लवकर संपत का नाहीये? कोणी काही लिहित असेल, मित्रांशी गप्पा मारत असेल, तर तेव्हाही लोक म्हणतात, हे वर्ष काही चांगलं नाही.कोणी म्हणतो, 2020 हे वर्ष शुभ नाही आहे. बस! लोकांना असंच वाटतय की काहीही करुन हे वर्ष लवकरात लवकर संपून जावं.
मित्रांनो,
कधी कधी मी विचार करतो, की असं काय होतंय, होऊ शकतं ज्यामुळे अशा प्रकारची चर्चा लोक करत आहेत, त्यामागे काय कारणं असतील? सहा-सात महिन्यांपूर्वी, आपल्याला तरी कुठे कल्पना होती, की कोरोनासारखं संकट येईल आणि त्या विरुद्धची लढाई इतकी दीर्घकाळ चालू राहील. हे संकट तर कायम आहेच, मात्र त्यासोबत देशात सतत नवनवी आव्हानं समोर येत आहेत. आता काही दिवसांपूर्वी देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ‘अम्फान‘ चक्रीवादळ आले होते, तर पश्चिम किनाऱ्यावर ‘निसर्ग‘ चक्रीवादळ धडकले होते. कितीतीरी राज्यात आपले शेतकरी टोळधाडीच्या हल्ल्यामुळे हैराण झाले आहेत. हे कमी कि काय, म्हणून देशाच्या छोट्या-मोठ्या भागात सुरु असलेले भूकंप काही थांबण्याचं नाव घेत नाहीत.या सगळ्यामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रांकडून ज्या काही कुरापती सुरु आहेत, त्या आव्हानांचाही देश सामना करतो आहे.
खरच! एकाच वेळी इतकी सगळी संकटं, या प्रकारची संकटं खूप कमी ऐकायला-बघायला मिळतात. सध्या तर अशी स्थिती आहे, कि एखादी छोटी-मोठी घटना घडली, तरीही, लोक त्याचा संदर्भ या आव्हानांशी जोडतात.
मित्रांनो,
अडचणी येतात, संकटे येतात, मात्र प्रश्न हा आहे, की आपत्तींमुळे आपण 2020 हे वर्षच वाईट आहे, असं म्हणणार का? आधीचे सहा महिने जसे जाताहेत, त्या कारणामुळे संपूर्ण वर्षच वाईट जाईल, असा विचार करणं योग्य आहे का?
नाही! माझ्या प्रिय देशबांधवांनो, बिलकूल नाही. एका वर्षात एक आव्हान येऊ द्या नाहीतर पन्नास आव्हानं येऊ द्या, केवळ संकटांच्या कमी-जास्त संख्येमुळे ते संपूर्ण वर्षच वाईट ठरत नाही. भारताचा इतिहासच आव्हानं आणि संकटातून तावून-सुलाखून अधिक झळाळून बाहेर पडण्याचा आहे. शेकडो वर्षे, अनेक आक्रमकांनी भारतावर आक्रमणं केलीत, भारताला संकटात लोटलं, लोकांना वाटलं होतं की भारताची संरचनाच तेव्हा नष्ट होईल, भारताची संस्कृतीच संपून जाईल. मात्र, या संकटांमधूनही भारत अधिकच भव्य आणि सक्षम होत बाहेर पडला.
मित्रांनो,
आपल्याकडे म्हटलं जातं- सृजन शाश्वत आहे, सृजन निरंतर प्रक्रिया आहे.
मला एका गीताच्या ओळी आठवतात —
यह कल-कल छल-छल बहती, क्या कहती गंगा धारा ?
युग-युग से बहता आता, यह पुण्य प्रवाह हमारा I
त्याच गाण्यात पुढच्या ओळी आहेत—
क्या उसको रोक सकेंगे, मिटनेवाले मिट जाएं,
कंकड़-पत्थर की हस्ती, क्या बाधा बनकर आए I
भारतातही, जिथे एका बाजूला मोठमोठी संकटे येत गेली, त्याचवेळी सर्व अडचणींना दूर करत अनेक गोष्टींची निर्मिती देखील झाली.
नवे साहित्य रचले गेले, नवे संशोधन झाले, नवे सिद्धांत मांडले गेले. म्हणजेच संकटाच्या काळातही, प्रत्येक क्षेत्रात सृजनाची प्रक्रिया सुरूच राहिली आणि आपली संस्कृती अधिकाधिक बहरत-फुलत राहिली, देश पुढे जात गेला. भारताने नेहमीच, संकटांचा उपयोग यशाची शिडी चढण्यासाठी केला आहे. याच भावनेनं आजही आपल्याला या संकटांमधून मार्ग काढत पुढे जायचे आहे. आपणही असाच विचार करुन पुढे आलात, 130 कोटी देशबांधवांनी पुढे पाउल टाकलं तर हेच वर्ष, देशासाठी नवनवे विक्रम रचणारे वर्ष सिध्द होईल. याच वर्षात, देश नवी उदिष्ट प्राप्त करेल, नवी भरारी घेईल, नव्या उंचीवर पोहोचेल. मला माझ्या 130 कोटी देशबांधवांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, तुम्हा सर्वांवर विश्वास आहे, देशाच्या महान परंपरेवर विश्वास आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
संकट कितीही मोठे का असेना, भारताचे संस्कार, निस्वार्थ भावनेनं सेवा करण्याची प्रेरणा देतात. भारताने ज्या प्रकारे या कठीण काळातही जगाला मदत केली, त्यातून आज शांतता आणि विकासाची भारताची भूमिका अधिक दृढ आणि भक्कम झाली आहे. जगाने, या काळात भारताच्या विश्वबंधुत्वाच्या भावनेचीही अनुभूती घेतली आणि त्याचसोबत, आपले सार्वभौमत्व आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी भारताची ताकद आणि भारताची कटिबद्धता देखील आपण पहिली आहे. लद्दाख इथं, भारताच्या भूमीकडे,वाकड्या नजरेने, बघणाऱ्या लोकांना चोख उत्तर मिळाले आहे. भारताला मैत्री जपणे माहित आहे, तर डोळ्याला डोळा भिडवून बघणे आणि योग्य उत्तर देणे, हेही माहित आहे.
आपल्या वीर जवानांनी दाखवून दिले आहे की ते कधीही भारतमातेच्या सन्मानाला काहीही झळ पोहचू देणार नाहीत.
मित्रांनो,
लद्दाख इथं आपले जे वीर जवान हुतात्मा झाले, त्यांच्या शौर्यापुढे आज संपूर्ण देश नमन करतो आहे, श्रद्धांजली देतो आहे, संपूर्ण देश त्यांच्यासमोर कृतज्ञ आहे, नतमस्तक आहे. या वीरांच्या कुटुंबियांप्रमाणेच, प्रत्येक भारतीयाच्या मनात, त्यांना गमावल्याचे दुःख आहे.आपल्या वीर सुपुत्रांच्या बलिदानाबद्दल, त्यांच्या नातेवाईकांच्या मनात जी अभिमानाची भावना आहे, देशाप्रती जो सन्मान आहे—तीच तर देशाची खरी ताकद आहे.
आपण बघितलं असेल, ज्यांच्या मुलांना हे वीरमरण आलं त्यांचे माता-पिता, आपल्या दुसऱ्या मुलांनाही, घरातल्या इतर मुलांनाही, सैन्यात दाखल करण्याविषयी बोलत आहेत. बिहारला राहणारे, शहीद कुंदन कुमार यांचे शब्द तर माझ्या कानात आजही घुमताहेत. ते म्हणत होते, ते आपल्या नातवालाही देशाच्या रक्षणासाठी, सैन्यात पाठवतील. हीच हिंमत प्रत्येक शहीदाच्या कुटुंबात आहे. खरंच, या कुटुंबियांचा त्याग वंदनीय आहे. भारतमातेच्या रक्षणाच्या ज्या दृढसंकल्पातून आपल्या जवानांनी बलिदान दिले आहे, तोच दृढ संकल्प आपल्याला आपल्या जीवनाचे ध्येय बनवायचे आहे, प्रत्येक देशबांधवाचे हे उद्दिष्ट असायला हवे. आपला प्रत्येक प्रयत्न याच दिशेने व्हायला हवा, ज्यामुळे, सीमांच्या रक्षणासाठी देशाची ताकद वाढेल, देश अधिक सक्षम बनेल, देश आत्मनिर्भर बनेल—हीच आपल्या हुतात्म्यांना देखील खरी श्रद्धांजली ठरेल. आसामच्या रजनी यांनी मला पत्रात लिहिलं आहे की पूर्व लद्दाख मध्ये जे काही झाले, ते बघून त्यांनी एक शपथ घेतली आहे—शपथ ही, की त्या यापुढे नेहमी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करतील, इतकेच नाही तर त्याचा प्रसार-प्रचारही करतील. असे संदेश, मला देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत, अनेक लोक, मला पत्र पाठवून सांगताहेत की त्यांनी या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रकारे, तामिळनाडूच्या मदुराई इथल्या मोहन रामामूर्ती यांनी लिहिलं आहे, की त्यांना भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर झालेलं बघायचं आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्यपूर्व काळात आपला देश, संरक्षण क्षेत्रात, जगातल्या कित्येक देशांच्या पुढे होता. आपल्याकडे अनेक आयुध निर्माण कारखाने होते. त्याकाळी, जे आपल्या खूप मागे होते, ते आज आपल्या पुढे आहेत. स्वातंत्र्यानंतर, संरक्षण क्षेत्रासाठी आपण जे प्रयत्न करायला हवे होते, आपल्या पूर्व-अनुभवांचा जेवढा उपयोग करुन घ्यायला हवा होता,तेवढा आपण घेऊ शकलो नाही. आज मात्र, संरक्षण क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, भारत पुढे जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. भारत स्वयंपूर्णतेच्या दिशेने पावले टाकतो आहे.
मित्रांनो,
कोणतेही अभियान, जनसहभागाविना पूर्ण होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या एका दिशेने, एक नागरिक म्हणून आपल्या सर्वांचा दृशनिश्चय, समर्पण आणि सहयोग अत्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आपण स्थानिक म्हणजे लोकल गोष्टी विकत घ्याल, त्यासाठी व्होकल होत, त्यांचा प्रचार कराल, तर असं समजा, की देश मजबूत बनवण्यात आपणही आपली भूमिका पार पाडत आहात. ही देखील, एकप्रकारे देशसेवाच आहे. आपण कोणत्याही व्यवसायात असा,प्रत्येक ठिकाणी देशसेवा करण्यासाठी भरपूर मार्ग असतात. देशाची गरज समजून घेत, जी कामे आपण करतो, ती देशसेवाच असते.आपली, हीच सेवा, देशाला कुठे ना कुठे ताकद देत असते. आणि आपल्याला हे ही लक्षात ठेवायचं आहे- आपला देश जितका जास्त मजबूत बनेल, तितकीच जगात शांतता नांदण्याची शक्यता अधिक दृढ होईल. आपल्याकडे म्हंटले जाते–
विद्या विवादाय धनं मदाय, शक्ति: परेषां परिपीडनाय |
खलस्य साधो: विपरीतम् एतत्, ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||
म्हणजेच, जर व्यक्तीचा स्वभाव वाईट असेल, तर विद्येचा उपयोग व्यक्ती वादविवाद करण्यात, धनाचा उपयोग गर्व करण्यात आणि शक्तीचा वापर, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करते. मात्र, सज्जनांची विद्या, ज्ञानासाठी असते, धन इतरांना मदत करण्यासाठी आणि ताकद, लोकांचं रक्षण करण्यासाठी उपयोगात आणली जाते. भारताने आपली ताकद, नेहमी याच भावनेने वापरली आहे, भारताचा संकल्प आहे- भारताचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्वाचे रक्षण. भारताचे लक्ष्य आहे—आत्मनिर्भर भारत. भारताची परंपरा आहे—विश्वास आणि मैत्री.भारताची भावना आहे- बंधुत्व. आपण याच आदर्शांसहित पुढे वाटचाल करत राहू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
कोरोनाच्या या संकटकाळात देश लॉकडाऊन मधून बाहरे पडला आहे. आता आपण ‘अनलॉक’ च्या काळात आहोत.अनलॉकच्या या काळात, आपल्याला दोन गोष्टींवर भर द्यायचा आहे- कोरोनाला हरवायचे आहे आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत बनवायचे आहे, तिला ताकद द्यायची आहे. मित्रांनो, लॉकडाऊनपेक्षा जास्त सतर्कता आपल्याला अनलॉकच्या काळात घ्यायची आहे.आपली सतर्कताच कोरोनापासून आपला बचाव करणार आहे. हे कायम लक्षात ठेवा, की जर तुम्ही मास्क वापरत नसाल, दोन मीटरचे अंतर ठेवत नसाल, किंवा मग इतर आवश्यक काळजी घेत नसाल, तर तुम्ही स्वतःसोबत इतरांच्या आयुष्याला, विशेषतः, घरातली मुले आणि ज्येष्ठांना संकटात टाकत आहात, म्हणूनच, सर्व देशबांधवांना माझे निवेदन आहे, आणि हे निवेदन मी वारंवार करतो, माझी विनंती आहे की तुम्ही निष्काळजीपणा करु नका. आपलीही काळजी घ्या आणि इतरांचीही!
मित्रांनो,
अनलॉकच्या काळात अशा गोष्टी देखील बंधमुक्त केल्या जात आहेत, ज्यात भारत गेल्या कित्येक दशकांपासून बांधला गेला होता. कित्येक वर्षे आपले खाणक्षेत्र लॉकडाऊनमध्येच होते. व्यवसायिक लिलावांसाठी परवानगी देण्याच्या एका निर्णयाने परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. काही दिवसांपूर्वीच अवकाश क्षेत्रात, ऐतिहासिक सुधारणा केल्या गेल्या. या सुधारणांमुळे, गेली कित्येक वर्षे बंधनात अडकलेले हे क्षेत्र आता मुक्त झाले आहे. या निर्णयांमुळे केवळ आत्मनिर्भर भारताला गती मिळणार नाही, तर देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अद्ययावत बनेल.आपल्या कृषीक्षेत्राकडे बघितले, तर या क्षेत्रातल्या अनेक गोष्टी देखील लॉकडाऊन मध्ये अडकल्या होत्या. या क्षेत्रालाही आता ‘अनलॉक’ केलं आहे. यामुळे, जिथे एकीकडे, शेतकऱ्यांना, आपला शेतमाल कुठेही, कोणालाही विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे,तेव्हाच, दुसरीकडे, त्यांना अधिक कर्ज मिळण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत, जिथे आपला देश आता या संकटकाळात, आपला देश ऐतिहासिक निर्णय घेत विकासाच्या नव्या वाटा उघडत आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
प्रत्येक महिन्यात आपण अशा बातम्या वाचतो आणि बघतो आहोत, ज्या आपल्याला भावूक बनवतील. आपल्याला या काळात बघायला मिळालं, की प्रत्येक भारतीय, एकमेकांची मदत करण्यासाठी कसे तत्पर असतात, जे जे शक्य असले, ते करण्यासाठी धडपड करत असतात.
अरुणाचल प्रदेशातील अशीच एक प्रेरक कथा, मला प्रसारमाध्यमांमध्ये वाचायला मिळाली. तिथे, सियांग जिल्ह्यातल्या मिरेम गावाने असे कौतुकास्पद काम केले, जे संपूर्ण भारतासाठी एक आदर्श ठरू शकेल. या गावातले अनेक लोक बाहेर राहून नोकरी करतात. कोरोना संकटाच्या काळात मात्र, हे सगळे लोक गावाकडे परत येत आहेत, हे गावकऱ्यांनी पाहिलं. अशा स्थितीत,
गावातल्या लोकांनी आधीच या लोकांसाठी गावाबाहेर विलगीकरण करण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकत्र येऊन, गावापासून थोडे दूर, 14 तात्पुरत्या झोपड्या बनवल्या, आणि हे ठरवलं की जेव्हा बाहेरचे लोक गावी परत येतील, तर याच झोपड्यांमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. या झोपड्यांमध्येच, शौचालये, वीज-पाणी आणि दैनंदिन उपयोगाच्या सर्व सुविधा आणि वस्तू उपलब्ध केल्या गेल्या. स्वाभाविकच, मिरेम गावाच्या या सामूहिक प्रयत्न आणि जागरुकते मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मित्रांनो, आपल्याकडे असे बोललं जातं–
स्वभावं न जहाति एव, साधु: आपद्रतोपी सन |
कर्पूर: पावक स्पृष्ट: सौरभं लभतेतराम ||
म्हणजेच, जसा कापूर, आगीत भस्मसात होऊनही आपला सुगंध सोडत नाही.तसेच, चांगली माणसं आपत्तीच्या काळात देखील आपले गुण, आपले स्वभाव सोडत नाहीत. आज आपल्या देशातील जी श्रमशक्ती आहे, जे श्रमिक सहकारी आहेत ते देखील याचे जिवंत उदाहरण आहे. तुम्ही बघितलं असेल, या काळात आमच्या स्थलांतरीत मजुरांच्या अशा अनेक कथा समोर आल्या आहेत, ज्या संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरल्या आहेत. उत्तरप्रदेशातल्या बाराबंकी गावात परत गेलेल्या मजुरांनी कल्याणी नदीचे नैसर्गिक रूप तिला परत मिळवून देण्यासाठी काम सुरु केले आहे. नदीचा उद्धार होतांना बघतांना आजूबाजूला असलेले शेतकरी, सर्वसामान्य माणसेही उत्साहात आहेत.
गावात आल्यावर विलगीकरणात असतांना, अलगीकरणात असतांना, आपल्या मजूर बांधवांनी ज्याप्रकारे आपल्या कौशल्याचा वापर करत, आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलली आहे, ती अद्भुत आहे. मात्र, मित्रांनो, असे कित्येक किस्से देशाच्या लाखो गावात घडत असतील,जे आपल्यापर्यंत पोहचत नाही.
आपल्या देशाचा जसा स्वभाव आहे, त्यावरुन मला विश्वास वाटतो मित्रांनो, की आपल्या गावात देखील, आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतील. जर, असे किस्से-घटना तुमच्या लक्षात आल्या तर, आपण अशा प्रेरक घटना मला जरुर कळवा. संकटाच्या या काळात, अशा सकारात्मक घटना, या कथा, इतरांना आणखीनच प्रेरणादायी ठरतील.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
कोरोना विषाणूने आपल्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीत निश्चितच बदल केला आहे. मी लंडन इथून प्रकाशित होणाऱ्या फायनान्शियल टाईम्समध्ये आलेला एक अत्यंत रोचक लेख वाचला. त्यात लिहिलं होतं की कोरोनाच्या काळा दरम्यान, आले, हळदी आणि इतर मसाल्यांची मागणी केवळ आशियातच नाही, तर अमेरिकेत देखील वाढली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या आपल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याकडे आली. प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या या गोष्टींचा संबंध आपल्या देशाशी आहे. आपल्याला त्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे गुण जगातील लोकांपर्यंत साध्या सहज भाषेत सांगायला हवेत, जे त्यांना सहजपणे समजू शकेल. आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, एक सुदृढ वसुंधरा बनवण्यासाठी आपले योगदान देऊ शकू.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
कोरोनासारखे संकट आले नसते, तर आयुष्य काय आहे, आयुष्य असे का आहे, जीवनाचा हेतू काय असे प्रश्न कदाचित आपल्याला पडले नसते.अनेक लोक केवळ याच कारणाने तणावात जगत असतात. तर दुसरीकडे, लोकांनी मला हेही लिहून पाठवलं आहे की कसे लॉकडाऊनच्या काळात, आनंदाचे छोटे छोटे प्रसंग-पैलू देखील त्यांनी आयुष्यात पुन्हा अनुभवले आहे. अनेकांनी मला घरातले पारंपारिक खेळ खेळणे आणि संपूर्ण कुटुंबासह त्याचा आनंद घेतल्याचे अनुभव देखील पाठवले आहेत.
मित्रांनो,
आपल्या देशात, पारंपरिक खेळांचा अत्यंत समृद्ध वारसा आहे. जसे की तुम्ही कदचित एका खेळाचे नाव ऐकलं असेल-पचीसी. हा खेळ, तामिळनाडूत ‘पल्लान्गुली’, कर्नाटकात, “अलि गुलि मणे’ आणि आंध्रप्रदेशात “वामन गुंतलू” अशा नावानं ओळखला आणि खेळला जातो. हा एकप्रकारचा स्ट्रेटेजी गेम आहे, जो बोर्डवर खेळला जातो. यात अनेक खाचा असतात, ज्यात असलेली गोटी किंवा बीज खेळणाऱ्याला, पकडावे लागतात. असं म्हणतात, की हा खेळ, दक्षिण भारतातून, दक्षिण पूर्व आशिया आणि तिथून संपूर्ण जगात पसरला.
मित्रांनो,
आज प्रत्येक मुलाला साप-शिडी हा खेळ माहित आहे. पण आपल्याला माहित आहे का?की हा ही एका पारंपारिक खेळाचेच रूप आहे, ज्याला मोक्ष-पाटम किंवा परमपदम असे म्हंटले जाते. आमच्याकडे आणखी एक पारंपरिक खेळ होता—गोट्या. मोठे लोक पण गोट्या खेळत आणि मुलं पण—फक्त एकाच आकाराच्या चार छोटया गोटया उचला. आपण गोटया खेळायला तयार! एक गोटी हवेत भिरकावली आणि ती हवेत असतांनाच आपल्याला जमिनीवर असलेल्या इतर गोटया उचलाव्या लागतात. साधारणपणे आपल्याकडे, घरात खेळायच्या खेळांसाठी काही मोठ्या साधनांची आवश्यकता नसते. कोणी एक खडू घेऊन येतो, त्याने जमिनीवर काही रेघोट्या ओढल्या की झाला खेळ सुरु !जे खेळ खेळण्यासाठी डाईस म्हणजे, दानाची गरज पडते, तिथे कवड्या आणि चिंचोकेही चालतात.
मित्रांनो,
मला माहिती आहे, की आज जेव्हा मी हे सगळं बोलतो आहे, तेव्हा कित्येक लोक आपल्या बालपणात रमले असतील, कित्येकांना आपल्या बालपणीच्या गोष्टी आठवल्या असतील. मग मी तुम्हाला असंच म्हणेन की ते दिवस तुम्ही विसरलेच कसे? ते खेळ आपण का विसरलात? घरातल्या आजी-आजोबांना, ज्येष्ठांना माझा आग्रह आहे की नव्या पिढीला जर आपण हे खेळ शिकवणार नाही, तर कोण शिकवणार? आज जेव्हा ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे, तेव्हा समतोल साधण्यासाठी आपल्याला ऑनलाईन खेळातून मुक्त व्हावे लागेल, आणि त्यासाठी घरातले खेळ शिकवावे लागतील. आपल्या युवा पिढीसाठी, आपल्या स्टार्ट-अप कंपन्यांसाठी देखील इथे एक संधी आहे आणि अगदी भक्कम संधी आहे. आपण भारतातले पारंपरिक घरगुती खेळ आणखी आकर्षक रुपात प्रस्तुत करावेत. त्याच्याशी संबधित वस्तू एकत्र करणारे, त्यांचा पुरवठा करणारे स्टार्ट-अप देखील खूप लोकप्रिय होतील, आणि आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे, की आपले भारतीय खेळ सुद्धा लोकल म्हणजे स्थानिकच आहेत, आणि लोकलसाठी व्होकल होण्याची शपथ तर आपण घेतलीच आहे. आणि माझे बालमित्र, सर्व घरातली छोटी-छोटी मुले, माझ्या या लहानग्या मित्रांना पण मी एक विशेष आग्रह करतो आहे. मुलांनो, तुम्ही माझा आग्रह ऐकाल ना? बघा, माझा आग्रह आहे की मी जे सांगतो आहे, ते तुम्ही नक्की करा. एक काम करा—जेव्हा थोडा वेळ मिळेल तेव्हा, आपल्या आई-बाबांना विचारुन मोबाईल हातात घ्या आणि आजी-आजोबा किंवा घरात इतर कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील, त्यांची मुलाखत रेकॉर्ड करा, आपल्या मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड करा. तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल ना, पत्रकार मंडळी कशा मुलाखती घेतात, बस, तशीच मुलाखत तुम्हीही घ्यायची आहे आणि, तुम्ही त्यांना काय प्रश्न विचाराल? मी जरा तुम्हाला सल्ला देतो. तुम्ही,त्यांना नक्की विचारा की लहानपणी त्यांचे राहणीमान कसे होते? ते कुठले खेळ खेळत असत, कधी नाटक, सिनेमा बघायला जात असत का?, कधी सुट्टीत मामाकडे जात असत, तर कधी शेतात जात असत… सणवार कसे साजरे करत? अशा खूपशा गोष्टी, तुम्ही त्यांना विचारू शकता.
त्यांनाही, 40-50 वर्षे, 60 वर्षे मागे भूतकाळात आपल्या आयुष्यात जाणे खूप आनंददायी ठरेल आणि तुम्हाला, 40-50 वर्षापूर्वीचा भारत कसा होता, तुम्ही आज जिथे राहताय, तो भाग आधी कसा होता, तिथे काय काय होते, लोकांच्या सवयी, पद्धती कशा होत्या.. या सगळ्या गोष्टी, अत्यंत सहज तुम्हाला शिकायला मिळतील, जाणून घेता येतील आणि, तुम्ही बघा, तुम्हाला खूप मजा येईल आणि कुटुंबांसाठी देखील एक खूप मस्त अमूल्य खजाना, एक छानसा व्हिडीओ अल्बम तयार होईल.
मित्रांनो,
हे खरं आहे की आत्मकथा किंवा जीवनचरित्र, म्हणजेच autobiography किंवा biography, इतिहासातल्या सत्याच्या जवळ जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. तुम्ही देखील तुमच्या घरातल्या ज्येष्ठांशी संवाद साधाल, तेव्हा, त्यांच्या काळातल्या गोष्टी, त्याचं बालपण, त्यांच्या तारुण्यातील गोष्टी आणखी सहजपणे समजू शकाल. ही एक उत्तम संधी आहे, जेव्हा वृध्द व्यक्तींनाही, आपल्या बालपणाविषयी, त्या काळाविषयीच्या गोष्टी, आपल्या घरातल्या मुलांना सांगता येतील.
मित्रांनो,
देशाच्या मोठ्या भागात, आता मोसमी पाऊस पोहोचला आहे. यावेळी पावसाबद्दल हवामान शास्त्रज्ञ देखील अत्यंत उत्साहात आहेत, त्यांना खूप अपेक्षा आहेत. पाऊस चांगला पडेल, तर आपल्या शेतकऱ्याचे पिकही उत्तम येईल, वातावरण देखील हिरवेगार होईल. पावसाळ्यात जणू निसर्ग स्वतःला पुनरुज्जीवित करत असतो. मानव, नैसर्गिक स्त्रोतांचा जेवढा वापर करतो, त्याची एक प्रकारे भरपाईच निसर्ग पावसाळ्यात करत असतो. मात्र, ही भरपाई देखील तेव्हाच होऊ शकेल, जेव्हा आपण आपल्या धरणी मातेला साथ देऊ, आपली जबाबदारी पार पाडू. आपल्याकडून केले गेलेले थोडेसे प्रयत्नही, निसर्गाला, पर्यावरणाला खूप मदत करतात. आपले अनके देशबांधव तर या क्षेत्रात खूप मोठे काम करत आहेत.
कर्नाटकच्या मंडावली भागात, एक 80-85 वर्षांचे वृद्ध आहेत, कामेगौडा. कामेगौडाजी एक सामान्य शेतकरी आहेत, मात्र त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत असामान्य आहे. त्यांनी एक असे काम केलं आहे, जे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. 80-85 वर्षांचे कामेगौडा आपल्या जनावरांना चरायला घेऊन जातात, मात्र, त्यासोबतच त्यांनी आपल्या क्षेत्रात, नवे तलाव बांधण्याचा निश्चय केला आहे. त्यांना त्यांच्या भागातली पाण्याची समस्या दूर करायची आहे, त्यासाठी जल-संधारणाच्या कामात, ते छोटे-छोटे तलाव बांधण्याचे काम करत आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 80-85 वर्षांच्या कामेगौडा यांनी आतापर्यंत 16 तलाव बांधले आहेत, आपल्या मेहनतीतून, आपल्या परिश्रमातून. शक्य आहे, की त्यांनी बांधलेले हे तलाव खूप मोठे मोठे नसतील, पण त्यांचा हा प्रयत्न मात्र खूप मोठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज त्या संपूर्ण भागाला नवसंजीवनी मिळाली आहे.
मित्रांनो,
गुजरातच्या वडोदऱ्याचे एक उदाहरण देखील खूप प्रेरक आहे. इथे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकांनी मिळून एक अत्यंत रोचक मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमुळे आज वडोदऱ्यातल्या एक हजार शाळांमध्ये रेन वाटर हार्वेस्टिंग सूरू झाले आहे. असा अंदाज आहे, की यामुळे दरवर्षी सुमारे 10 कोटी लिटर वाहून जाणारे पाणी वाचवता आणि साठवता येणार आहे.
मित्रांनो,
या पावसाळ्यात, निसर्गाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्यालाही अशाप्रकारचा काही विचार करण्याची, काही करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. जसे, अनेक ठिकाणी गणेश चतुर्थीची तयारी करणे सुरु झाले असेल. मग यावर्षी आपण असा प्रयत्न करुया का, की आपण गणेशाच्या पर्यावरण स्नेही मूर्ती तयार करु आणि त्यांचेच पूजन करु. अशा मूर्ती, ज्यांचे नदी-तलावात विसर्जन केल्यावर, त्या पाण्यासाठी, पाण्यात राहणाऱ्या जीवजंतूंसाठी संकट बनू शकतात, अशा मूर्ती बनवणे आणि त्यांचे पूजन करणे आपण टाळू शकतो का? मला विश्वास आहे, की आपण असे नक्की कराल. आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला हे ही लक्षात ठेवायचे आहे की पावसाळ्यात इतर अनेक आजार येतात, कोरोनाच्या काळात आपल्याला या आजारांपासून स्वतःचा बचाव करायचा आहे. आयुर्वेदिक औषधे, काढा, गरम पाणी या सगळ्याचा वापर करत रहा, निरोगी रहा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आज 28 जून रोजी भारत आपल्या एका माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहतो आहे, ज्यांनी देश अत्यंत नाजूक स्थितीत असतांना देशाचे नेतृत्व केले. आपले हे माजी पंतप्रधान, श्री पी व्ही नरसिंहरावजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज पहिला दिवस आहे. जेव्हा आपण पी व्ही नरसिंह राव यांच्याविषयी जेव्हा बोलतो, तेव्हा स्वाभाविकपणे एक राजनेता म्हणून त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र हे पण एक सत्य आहे की त्यांना अनेक भाषा येत असत, ते भारतीय आणि परदेशी भाषाही सहजपणे बोलत. एकीकडे, त्यांची जडणघडण भारतीय मुल्यांसोबत झाली होती, तर दुसरीकडे, त्यांना पाश्चात्य साहित्य आणि विज्ञानाचेही ज्ञान होते. ते भारतातील, सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक होते. त्यांचा आयुष्याचा आणखी एक महत्वाचा पैलू होता, आणि तो उल्लेखनीय आहे, तो ही आपल्याला माहिती असायला हवा. मित्रांनो, नरसिंह राव जी आपल्या तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते, जेव्हा हैदराबादच्या निजामाने, वंदे मातरम् गाण्यास परवानगी दिली नाही, तेव्हा त्याविरुध्च्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता, त्यावेळी त्यांचे वय फक्त १७ वर्षे होते. लहान वयातच, श्री नरसिंह राव, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर होते. आपला आवाज बुलंद करण्यात त्यांनी कधीही काही कसूर बाकी ठेवली नाही. नरसिंह राव यांना इतिहासाची देखील चांगली जाण होती. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून येऊन पुढे येणे, शिक्षणावर भर देणे, शिकण्याची प्रवृत्ती आणि त्यांची नेतृत्वक्षमता, सगळे काही संस्मरणीय आहे. माझा तुम्हाला आग्रह आहे, की नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षात, तुम्ही त्यांचे जीवनकार्य आणि विचार याबाबत अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
यावेळी “मन की बात’ मध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू, तेव्हा इतर काही नव्या विषयांवर बोलूया. तुम्ही तुमचे संदेश, तुमच्या नवनव्या कल्पना मला नक्की पाठवत रहा. आपण सर्व एकत्र पुढे जाऊ, आणि येणारे दिवस आणखी सकारात्मक होतील. जसे मी आज सुरुवातीला म्हणालो, की आपण याच वर्षी म्हणजे 2020 मध्येच, काहीतरी चांगले घडवूया, पुढे जाऊया आणि देशाला नव्या उंचीवर पोहचवू या.
मला विश्वास आहे, की २०२० हे वर्ष भारताला, या दशकात एक नवी दिशा देणारे वर्ष म्हणून सिध्द होईल. हाच विश्वास मनात बाळगत, तुम्ही सर्व लोक सुद्धा पुढे जा, निरोगी रहा, सकारात्मक रहा. याच शुभेच्छांसह, तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद !
नमस्कार !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात 2.0’ च्या 12 व्या भागाद्वारे देशाला संबोधित करताना सांगितले की, सामुहिक प्रयत्नांमधून देशात कोरोना विरुद्धचा लढा उभारला जात आहे. अर्थव्यवस्थेचा एक खूप मोठा हिस्सा सुरु होत असला तरीदेखील कोविड महामारीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी अधिक सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, श्रमिक विशेष गाड्या आणि विशेष गाड्यांमध्ये सावधगिरीच्या सर्व उपाययोजनांचे पालन करत रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाली आहे. ते पुढे म्हणाले की, विमान सेवा पुन्हा सुरु झाली आहे आणि उद्योग देखील आपल्या सामान्य परिस्थितीत येत आहेत. कोणीही निष्काळजीपणा करू नये असा इशारा देत त्यांनी लोकांना 6 फुट अंतर, चेहऱ्याला मास्क लावणे आणि शक्यतो घरीच राहायला सांगितले आहे. त्यांनी जोर देऊन सांगितले की, बऱ्याच कष्टानंतर देशाने ज्या पद्धतीने परिस्थिती सांभाळली आहे ती व्यर्थ होता कामा नये.
पंतप्रधानांनी लोकांनी दर्शविलेल्या सेवा भावनेचे कौतुक केले आणि हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, सेवा परमो धर्मः हे तर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे, सेवा म्हणजेच आनंद, सेवेमध्येच समाधान आहे. देशभरातील वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांबद्दल मनापासून विनम्रता व्यक्त करताना पंतप्रधानांनी देशातील डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कामगार, पोलिस कर्मचारी आणि प्रसार माध्यमातील व्यक्ती यांच्या सेवाभावनेचे कौतुक केले. या संकटाच्या काळात महिला बचत गटांद्वारे केल्या जाणाऱ्या उल्लेखनीय कामाचे देखील त्यांनी कौतुक केले.
त्यांनी यावेळी तामिळनाडूचे के.सी. मोहन, अगरतळाचे गौतम दास, पठाणकोट येथील दिव्यांग राजू अशा सर्वसामान्य देशवासीयांची उदाहरणे दिली; ज्यांनी त्यांच्याकडील मर्यादित स्रोतांमधून या संकटाच्या काळात इतरांना मदत केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला बचत गटाच्या जिद्दीच्या अनेक कथा समोर येत आहेत, असेही ते म्हणाले.
या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अतिशय सक्रिय भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्यांनी नाशिकच्या राजेंद्र यादव यांचे उदाहरण दिले ज्यांनी आपल्या ट्रॅक्टरला एक उपकरण बसवून स्वच्छता यंत्र तयार केले. अनेक दुकानदारांनी ‘6 फुटाच्या नियमा’ चे पालन करण्यासाठी त्यांच्या दुकानात मोठे पाईप बसविले आहेत.
साथीच्या आजारामुळे लोकांना होणारा त्रास आणि अडचणींबद्दल आपली वेदना मांडताना पंतप्रधान म्हणाले, कोरोना विषाणूमुळे समाजातील सर्व घटक त्रस्त आहेत पण वंचित मजूर व कामगार सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी केंद्र, राज्य सरकार, प्रत्येक विभाग आणि संस्था एकत्रित येऊन वेगाने काम करत आहेत. त्यांनी सांगितले की, ते कुठच्या परिस्थितीतून जात आहे याची संपूर्ण देशाला जाणीव आहे आणि केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनातील प्रत्येक जन त्यांच्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. रेल्वे आणि बसमध्ये लाखो मजुरांची सुरक्षितपणे वाहतूक करण्यात, त्यांच्या खाण्याची काळजी घेण्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात निरंतर प्रयत्न करत असलेल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले.
नवीन उपाययोजना शोधणे ही काळजी गरज असल्याचे अधोरेखित केले. सरकार त्यादिशेने अनेक पावले उचलत आहेत असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे गावांमध्ये रोजगार, स्वयंरोजगार, लघु उद्योगांशी संबंधित मोठ्या शक्यताही निर्माण झाल्या आहेत. या दशकात आत्मनिर्भर भारत अभियान देशाला अधिकाधिक उंचावर नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी पुन्हा सांगितले की सध्याच्या कोरोना साथीच्या काळात सर्वत्र लोकांना योग आणि आयुर्वेदाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे आणि ते जीवनशैली म्हणून स्वीकारण्याची इच्छा आहे. त्यांनी “समुदाय, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऐक्यासाठी” योग उत्तम असल्याचे सांगितले. ते म्हणाले की सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात ‘योग’ यासाठी देखील अधिक महत्वाचे आहे, कारण हा विषाणू आपल्या श्वसन प्रणालीवर सर्वाधिक परिणाम करतो. ‘योग’ मध्ये प्राणायामचे असे अनेक प्रकार आहेत जे आपली श्वसन प्रणाली मजबूत करतात ज्याचा परिणाम दीर्घकालीन राहतो.
शिवाय आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या ‘माय लाइफ, माय योग’ या आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉग स्पर्धेसाठी लोकांनी आपले व्हिडिओ सामायिक करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पंतप्रधान मोदींनी सर्वांना या या स्पर्धेत भाग घेऊन या नवीन मार्गाने आंतरराष्ट्रीय योग दिनात सहभागी होण्याची विनंती केली.
पंतप्रधानांनी या महामारीचा सामना करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि ‘आयुष्मान भारत’ योजनेतील लाभार्थींनी एक कोटीचा आकडा ओलांडल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांनी आयुष्मान भारतचे लाभार्थी तसेच साथीच्या आजारात रूग्णांवर उपचार करणार्या डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, एकीकडे आपण कोरोना विषाणूशी लढत आहोत तर दुसरीकडे अम्फान चक्रीवादळासारख्या आपत्तीचा देखील सामना करता आहोत. या अम्फान चक्रीवादळात पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या जनतेने ज्या धैर्याने आणि निर्भयतेने परिस्थितीचा सामना केला आहे त्याचे त्यांनी कौतुक केले. या राज्यातील शेतकऱ्यांनी या परिस्थितीचा ज्या धीराने सामना केला त्याबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या दृढनिश्चयाचे कौतुक करत त्यांना झालेल्या नुकसानाबद्दल पंतप्रधानांनी सहानुभूती व्यक्त केली.
मोदी म्हणाले की, चक्रीवादळाच्या आपत्ती व्यतिरिक्त देशातील बऱ्याच भागात टोळधाडीचे देखील संकट आले आहे. देशातील सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंच्या कमतरता भासू नये म्हणून सरकार या संकटाच्या काळात कसे कठोर परिश्रम करीत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. केंद्र व राज्य सरकारे, कृषी विभाग किंवा प्रशासन आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकजण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांना मदत करून या संकटामुळे पिकांचे नुकसान कमी करण्याच्या प्रयत्नांत आहे.
सध्याच्या पिढीला पाणी वाचवणे ही त्यांची जबाबदारी आहे हे पटवून देण्याची गरज आहे असे ते म्हणाले. पावसाचे पाणी वाचवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि ते म्हणाले की, जलसंधारणासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. या ‘पर्यावरण दिनाच्या’ दिवशी काही झाडे लावून निसर्गाची सेवा करण्यासाठी एखादा असा संकल्प करा ज्यामुळे तुमचे निसर्गाशी दैनंदिन नाते जपले जाईल अशी विनंती त्यांनी देशवासियांना केली. ते म्हणाले की लॉकडाउनमुळे आपल्या आयुष्याची गती थोडी कमी झाली आहे परंतु यामुळे आपल्याला निसर्गाकडे पाहण्याची संधी मिळाली आहे आणि वन्य प्राणी मुक्तपणे संचार करत आहेत.
निष्काळजीपणा आणि उदासीनता हा पर्याय असू शकत नाही असे सांगत पंतप्रधानांनी आपले भाषण संपविले. कोरोना विरुद्धचा लढा अजूनही तितकाच गंभीर आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. आपण सर्व या लॉकडाऊनमध्ये ही ‘मन की बात’ ऐकत आहात. या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या आपल्या सूचना, फोन कॉल्सची संख्या, सामान्यतः कितीतरी पटींनी जास्त आहे. आपल्या मनातील अनेक विषय, आपल्या मनातील गोष्टी माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. मी असा प्रयत्न केला आहे की, यातल्या जास्तीत जास्त वाचू शकेन, ऐकू शकेन. आपल्या चर्चेतून अशा अनेक पैलुंची माहिती मिळाली आहे की ज्यांच्याकडे या धकाधकीमध्ये लक्षच जात नाही. मला वाटतं की युद्धाच्या या परिस्थितीत या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्या काही पैलूंची माहिती देशवासियांना दिली पाहिजे.
मित्रांनो, भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या अर्थाने लोकांच्या नेतृत्वानेच लढली जात आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनते बरोबरीने एकत्रितपणे शासन, प्रशासन लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील असलेला भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. त्याच्याकडे, कोरोनाशी लढण्यासाठी आणि जिंकण्याचा हाच एक मार्ग आहे. आपण भाग्यवान आहोत की, आज संपूर्ण देश, देशाचा प्रत्येक नागरिक, जन जन, या लढाईचा सैनिक आहे, लढाईचं नेतृत्व करत आहे. आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. जेव्हा पूर्ण विश्व या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, त्याच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे. पूर्ण देशात, गल्ली आणि मोहल्ल्यांमध्ये, जागोजागी, आज लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गरिबांसाठी जेवणापासून, रेशनची व्यवस्था असेल, लॉकडाऊनचे पालन असेल, रूग्णालयांमध्ये व्यवस्था असेल, वैद्यकीय उपकरणांचं देशातच उत्पादन असेल, आज संपूर्ण देश, एक लक्ष्य, एक दिशा, घेऊन एकत्र वाटचाल करत आहे. टाळ्या, थाळ्या, दिवे, मेणबत्त्या, या साऱ्या वस्तुंनी ज्या भावनांना जन्म दिला, ज्या उत्कटतेनं देशवासियांनी, काही न काही करण्याचा निर्धार केला, प्रत्येकाला या गोष्टींनी प्रेरित केलं आहे. शहर असो की गाव, असं वाटतंय की, जसं देशात एक महायज्ञ सुरू झाल आहे, ज्यात, प्रत्येक जण आपलं योगदान देण्यासाठी आतूर झाला आहे. आपल्या शेतकरी बंधु-भगिनींकडेच पहा-एकीकडे ते या महामारीच्या संकटातच आपापल्या शेतांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत आणि देशात कुणी उपाशीपोटी झोपू नये, याचीही काळजी करत आहेत. प्रत्येक जण, आपापल्या शक्तिप्रमाणे, ही लढाई लढत आहे. कुणी भाडं माफ करत आहे, तर कुणी आपल्या संपूर्ण निवृत्तीवेतनाची मिळालेली रक्कम पीएम केअर्समध्ये जमा करत आहे. कुणी शेतातला संपूर्ण भाजीपाला दान देत आहे तर कुणी, दररोज शेकड़ो गरिबांना विनामूल्य जेवण पुरवत आहे. कुणी मास्क तयार करत आहे तर कुठं आमचे कामगार बंधु-भगिनी क्वारंटाईनमध्ये रहात असतानाच, ज्या शाळेत रहात आहेत, त्या शाळेची रंगरंगोटी करत आहेत.
मित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, आपल्या मनात, ह्रदयाच्या एखाद्या कोपऱ्यात, ही जी उचंबळून येणारी भावना आहे नं तीच भावना कोरोनाच्या विरूद्ध भारताच्या या लढ्याला ताकद देत आहे. तीच भावना, या लढाईला खऱ्या अर्थाने लोकांनी चालवलेली लढाई बनवत आहे. आम्ही असंही पाहिलं आहे की, गेल्या काही वर्षांत, आमच्या देशात ही जी एक मानसिकता बनली आहे आणि ती निरंतर मजबूत बनत चालली आहे. कोट्यवधी लोकांनी अनुदानित गॅस सिलिंडर सोडून देण्याचा विषय असो, लाखो ज्येष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रवासातील सवलत सोडून देण्याचा मुद्दा असो, स्वच्छ भारत अभियानाचं नेतृत्व स्विकारण्याचा विषय असो की शौचालय बनवण्याचा विषय असो, अशा अगणित गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींवरून एकच समजतं- आपल्या सर्वांना- एक मन, एका मजबूत धाग्यानं गुंफलं आहे. एक होऊन देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज पूर्ण नम्र होऊन, अत्यंत आदरानं, 130 कोटी देशवासियांच्या या भावनेला, नतमस्तक होऊ वंदन करतो. आपल्या भावनांना अनुरूप, देशासाठी आपल्या आवडीनुसार, आपल्या वेळेप्रमाणे, आपल्याला, काही तरी करणं शक्य होईल, यासाठी सरकारनं एक डिजिटल मंचही तयार केला आहे. हा मंच आहे कोविड्स वॉरिअर्स डॉट गव्ह डॉट इन! मी पुन्हा एकदा सांगतो की,कोविड्स वॉरिअर्स डॉट गव्ह डॉट इन.. सरकारनं या मंचाच्या माध्यमातुन तमाम सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, नागरी समाजाचे प्रतिनिधी, आणि स्थानिक प्रशासनाला एकमेकांशी जोडलं आहे. अगदी कमी कालावधीत, या पोर्टलशी सव्वाकोटी लोक जोडले गेले आहेत. यात डॉक्टर्स, परिचारिकांपासून ते आपल्या आशा कार्यकर्त्या, आपल्या एनसीसी, एनएसएसचे साथी, वेगवेगळ्या क्षेत्रांतले सर्व व्यावसायिक, त्यांनी, या मंचाला, आपला मंच बनवून टाकला आहे. हे लोक स्थानिक स्तरावर संकट व्यवस्थापन योजना बनवणाऱ्यांना तसंच त्यांची पूर्तता करण्यात खूप मदत करत आहेत. आपणही कोविड्स वॉरिअर्स डॉट गव्ह डॉट इन शी जोडून, देशाची सेवा करू शकता, कोविड योद्धा बनू शकता.
मित्रांनो, प्रत्येक बिकट परिस्थिती, प्रत्येक लढाई, काही न काही धडा शिकवत असते, काही न काही शिकवून जाते, शिकवण देते. काही शक्यतांचा मार्ग तयार करते आणि काही नव्या लक्ष्यांची दिशाही दाखवत असते. या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आपले व्यवसाय, आपले कार्यालये, आपले वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांना आत्मसात करीत आहे.. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तर असं वाटतंय की, देशातला प्रत्येक नाविन्यपूर्ण संशोधक नव्या परिस्थितीनुसार काही न काही निर्माण करत आहे.
मित्रांनो, देश जेव्हा एक टीम होऊन काम करतो, तेव्हा काय काय होऊ शकत याचा आम्ही अनुभव घेत आहोत. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांचा प्रत्येक विभाग आणि संस्था बचावकार्यासाठी एकत्र येऊन पूर्ण वेगानं काम करत आहेत. आपल्या नागरी उड्डाण विभागात काम करणारे लोक असतील, रेल्वे कर्मचारी असतील, हे दिवसरात्र मेहनत करत आहेत, ज्यामुळे देशवासियांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की, देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी ‘लाईफलाईन उडाण’ नावाची एक विशेष मोहिम राबवली जात आहे. आपल्या या साथीदारांनी, इतक्या कमी कालावधीत, देशातल्या देशातच, तीन लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि 500 टनापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे. याच प्रकारे, रेल्वेचे साथी, लॉकडाऊनमध्येही निरंतर मेहनत करत आहेत, ज्यामुळे देशातल्या सामान्यजनांना, अत्यावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही. या कामासाठी भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर 100 हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. याच प्रकारे, औषधांचा पुरवठा करण्यात, आपल्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आपले हे सर्व साथीदार, खऱ्या अर्थानं, कोरोनाचे योद्धेच तर आहेत.
मित्रांनो, प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत, गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. या सर्व कामांमध्ये, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचे लोक, बँकिंग क्षेत्रातले लोक, एका टीमप्रमाणे दिवसरात्र काम करत आहेत. आणि मी, आपल्या देशातल्या राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की, ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची, कोरोनाच्याविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
देशभरातल्या आरोग्य सेवेशी संबंधित लोकांनी, अगदी अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या अध्यादेशात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद केली आहे. आपले डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, समूह आरोग्य सेवक आणि असे सर्व लोक, जे देशाला कोरोना मुक्त करण्याच्या कामात दिवसरात्र गुंतले आहेत, त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
महामारीच्या विरोधातल्या या लढाईच्या दरम्यान, आपल्याला आयुष्य, समाज, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे एक नव्या ताज्या दृष्टिनं पहाण्याची संधीही मिळाली आहे, याचा आम्ही सर्वच अनुभव घेत आहोत. समाजाच्या दृष्टिकोनातही एक व्यापक परिवर्तन आलं आहे. आज आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या महत्वाची आपल्याला जाणीव होत आहे. आपल्या घरात काम करणारे लोक असतील, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणारे सामान्य कामगार असतील, शेजारच्या दुकानांमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांची किती मोठी भूमिका आहे, याचा आपल्याला अनुभव येत आहे. याचप्रकारे, अत्यावश्यक सेवाचं वितरण करणारे लोक, बाजारांमध्ये काम करणारे आमचे मजूर बंधु-भगिनी, आपल्या आसपासचे ऑटो चालक, रिक्षा चालक या सर्वांच्या शिवाय आमल आयुष्य किती अवघड होऊ शकतं, याचा आम्ही अनुभव घेत आहोत.
आजकाल सोशल मिडियामध्ये आम्ही सातत्यानं पहात आहोत की, लॉकडाऊनच्या काळात, लोक आपल्या या सर्व साथीदारांची केवळ आठवणच करत नाहीत तर त्यांच्या आवश्यकतांकडे लक्ष देत आहेत. उलट त्यांच्या बाबतीत आदरानं लिहितही आहेत. आज, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. याअगोदर, कदाचित आपण त्यांच्या कामाची दखलही घेत नव्हतो. डॉक्टर असो, स्वच्छता कामगार असो, इतर सेवा बजावणारे लोक असोत- इतकंच नाही, आपल्या पोलिस व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. याअगोदर, पोलिसांच्या बाबतीत, विचार करताना नकारात्मकतेशिवाय आम्हाला काही दिसतच नव्हतं. आमचे पोलिस आज गरिब, गरजवंतांना जेवण देत आहेत, औषधं पोहचवत आहेत. ज्या प्रकारे प्रत्येक बाबतीत मदत करण्यासाठी पोलिस पुढं येत आहेत, त्यामुळे पोलिसांची मानवीय आणि संवेदनशील बाजू आपल्या समोर आली आहे, तिनं आपल्या मनाला हलवून सोडलं आहे, आपल्या ह्रदयाला स्पर्श करून गेली आहे. एक असा काळ आहे की ज्यात सामान्य जन आणि पोलिस भावनात्मकरित्या एकमेकांशी जोडले जात आहेत. आपल्या पोलिसांनी, याला जनतेच्या सेवेसाठी मिळालेली संधी म्हणून मानलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की, या घटनांमुळे, येणार्या काळात, खर्या अर्थानं, खूपच सकारात्मक बदल होऊ शकतो. आपल्याला सर्वांनाच या सकारात्मकतेला कधीही नकारात्मकतेच्या रंगात रंगवायचं नाहीये.
मित्रांनो, आपण नेहमीच ऐकत आलो की प्रकृती, विकृती आणि संस्कृती, या शब्दांना एकत्रित अभ्यासाव आणि यामागे असलेल्या भावाकडे पाहिलं तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी एक नवीन दार उघडतांना दिसेल. जर, मानवी प्रकृतीची चर्चा करायची तर हे माझं आहे, मी याचा उपयोग करतो, याला आणि या भावनेला अत्यंत स्वाभाविक मानलं जातं. कुणाला यात काही गैर वाटत नाही. याला आम्ही प्रकृती म्हणू शकतो. पण जे माझं नाहीये, ज्यावर माझा हक्क नाहीये, आणि ते मी दुसऱ्याकडून हिसकावून घेऊन त्याचा उपयोग करतो, तेव्हा त्याला आम्ही विकृती म्हणू शकतो. या दोन्हीच्या पलीकडे जाऊन, प्रकृती आणि विकृतीपेक्षाही, जेव्हा एखादं संस्कारित मन विचार करतं किंवा व्यवहार करत असतं तेव्हा त्यात आपल्याला संस्कृती दिसते. जेव्हा कुणी आपल्या हक्काची वस्तु, आपल्या मेहनतीनं कमावलेली वस्तु, आपल्यासाठी आवश्यक असलेली वस्तु, कमी किंवा जास्त, याची पर्वा न करता, दुसऱ्या एखाद्या व्यक्तिची गरज पाहून, स्वतःची चिंता सोडून, आपला वाटा दुसऱ्याला देऊन त्याची गरज भागवतो, तीच तर संस्कृती आहे. मित्रांनो, जेव्हा कसोटीचा काळ असतो, तेव्हाच या गुणांची परिक्षा केली जाते.
आपण गेल्या काही दिवसांत पाहिलं असेल की, भारतानं आपल्या संस्कारांच्या अनुरूप, आपल्या विचारांच्या अनुसार, आपल्या संस्कृतीच्या अनुसार काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संकटाच्या या घडीला, जगासाठीही, समृद्ध देशांसाठीही, औषधांचं संकट खूप जास्त गंभीर राहिलं आहे. हा एक असा काळ आहे की, भारतानं जगाला औषधं पुरवली नसती तरीही कुणीही भारताला दोष दिला नसता. प्रत्येक देशाचे प्रथम प्राधान्य आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं हे समजून आहे. परंतु मित्रांनो, भारतानं प्रकृती आणि विकृतीपेक्षा वेगळा असा निर्णय घेतला. भारतानं आपल्या संस्कृतीच्या अनुरूप निर्णय घेतला. आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे करायचं आहे, त्याचे प्रयत्न तर वाढवले आहेतच, परंतु जगभरातनं येत असलेल्या मानवतेच्या रक्षणाच्या हाकेकडेही पूर्णपणे लक्ष दिलं. आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं. आज जेव्हा माझी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा होते, तेव्हा ते भारताच्या जनतेचे आभार जरूर मानतात. जेव्हा ते लोक म्हणतात थँक यू इंडिया, थँक यू पिपल ऑफ इंडिया, तेव्हा देशाबद्दल अभिमान आणखी वाढतो. अशा प्रकारे भारताच्या आणि योगाच्या महत्वाकडेही लोक मोठ्या विशेष वृत्तीनं पहात आहेत. सोशल मिडियावर पहा, सर्वत्र प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी, कशा प्रकारे भारताच्या आयुर्वेद आणि योगाची चर्चा होत आहे. कोरोनाच्या दृष्टिकोनातनं, आयुष मंत्रालयानं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो प्रोटोकॉल दिला आहे, आपण त्याचं पालन अवश्य़ करत असाल, असा मला विश्वास आहे. गरम पाणी, काढा आणि जे अन्य दिशानिर्देश, आयुष मंत्रालयानं जारी केले आहेत, त्यांचा आपण आपल्या दिनचर्येत समावेश केला तर आपल्याला खूप फायदा होईल.
मित्रांनो, हे खरंतर दुर्भाग्यच आहे की अनेकदा आम्ही आमच्या शक्ती आणि समृद्ध परंपरा यांना ओळखायलाच नकार देतो. परंतु, जेव्हा जगातला दुसरा एखादा देश, पुराव्यावर आधारित संशोधनानुसार तीच गोष्ट सांगतो. आमचंच सूत्र आम्हाला शिकवतो तेव्हा आम्ही त्याचा चटकन स्विकार करतो. शक्य आहे की, यामागे एक खूप मोठं कारण असू शकतं. शेकडो वर्षांचा आमचा गुलामीचा कालखंड राहिला आहे.या कारणानं कधी कधी, आपल्याला, आपल्याच शक्तिवर विश्वास उरत नाही. आपला आत्मविश्वास कमी वाटू लागतो. यामुळे, आपल्या देशाच्या चांगल्या गोष्टींना, पारंपरिक सिद्धांतांना, पुराव्यावर आधारित पुढे नेण्याऐवजी सोडून देतो, त्यांना हीन समजू लागतो. भारताच्या युवा पिढीला, आता या आव्हानाचा स्विकार करावा लागेल. जसं की, जगानं योगाचा आनंदानं स्विकार केला आहे, तसंच, हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदाच्या सिद्धांतांचाही जग अवश्य स्विकार करणार आहे. हा, यासाठी युवा पिढीला संकल्प करावा लागेल आणि जग जी भाषा समजतं त्याच वैज्ञानिक भाषेत समजावून सांगावं लागेल, काही तरी करून दाखवावं लागेल.
मित्रांनो, तसंतर कोविड 19 मुळे अनेक सकारात्मक बदल, कामाच्या पद्धती, जीवनशैली आणि सवयींमध्येही स्वाभाविक रूपानं आपलं स्थान बनवत आहेत. आपल्या सर्वांनाही याची जाणीव झाली असेल की या संकटात, कसं वेगवेगळ्या विषयांवर, आकलन आणि चेतनाशक्तिला जागृत केलं आहे. जो बदल, आपल्याला आमच्या आसपास पहायला मिळतो आहे, त्यात सर्वात पहिला आहे तो मास्क चढवून आपला चेहरा झाकलेला ठेवणं. कोरोनाच्या कारणानं, बदलत्या परिस्थितीत, मास्कही आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत.
तसंतर आम्हाला आपल्या आसपासचे सारे लोक मास्क चढवून पहायची कधीही सवय नव्हती, परंतु आता हेच होत आहे. हां, आता जे मास्क चढवतात, ते सारेच लोक आजारी आहेत, असा याचा अर्थ नाही, आणि जेव्हा मी, मास्कबद्दल बोलतो, तेव्हा मला जुनी गोष्ट आठवते. आपल्याला सर्वाना आठवण असेल. एक काळ होता जेव्हा आपल्या देशात असे अनेक भाग होते, जिथं कुणी नागरिक फळं विकत घेताना दिसला तर आसपासचे शेजारी लोक विचारायचे, घरात कुणी आजारी आहे का? म्हणजे, फळं खाणं हि भ्रामक कल्पना होती – म्हणजे फळं आजारातच खायची असतात, ही एक समजूतच बनून गेली होती. परंतु, काळ बदलला आणि ही धारणाही बदलली. तसंच मास्कबद्दलचीही धारणा बदलणार आहे. आपण पहाल, मास्क, आता सभ्य समाजाचं प्रतिक होईल. जर, आजारापासून स्वतःला वाचवायचं असेल, आणि दुसऱ्यांनाही वाचवायचं असेल, तर आपल्याला मास्क लावावाच लागेल, आणि माझी तर साधी सूचना अशी आहे की, उपरणं वापरा, पूर्ण चेहरा झाकला पाहिजे.
मित्रांनो, आपल्या समाजात आणखी एक मोठी जागरूकता आली आहे की आता लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यानं कशा प्रकारचे काय नुकसान होऊ शकतं, हे समजू लागले आहेत. इथंतिथं, कुठंही थुंकायचं, हा चुकीच्या सवयींचा भाग बनला होता. स्वच्छता आणि आरोग्याला तो एक मोठं आव्हानही देत होता. तसं एक प्रकारानं पाहिलं तर आपल्याला या समस्येची नेहमीच जाणीव होती, परंतु, ही समस्या नष्ट होण्याचं नावच घेत नव्हती. आता ती वेळ आली आहे की, या वाईट सवयीला कायमचं संपवलं पाहिजे. ‘बेटर लेट दॅन नेव्हर’ अशी म्हणही आहे. तर, उशिर झाला असला तरीही, आता ही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे. या गोष्टी जिथं प्राथमिक स्वच्छतेचा स्तर वाढवतील, तिथं, कोरोनाचं संक्रमण रोखण्यातही मदत करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज मी आपल्याशी मन की बात करतोय, हे अक्षय्य तृतीयेचे पवित्र पर्व आहे, हा एक सुखद योगायोग आहे. मित्रांनो, क्षय याचा अर्थ विनाश असा होतो परंतु जो कधी नष्ट होत नाही, जो कधी समाप्त होत नाही, तो अक्षय आहे. आपल्या घरांमध्ये आपण सर्व दरवर्षी हे पर्व साजरं करतो परंतु यावर्षी आपल्यासाठी याचं विशेष महत्व आहे. आजच्या बिकट काळात हा एक असा दिवस आहे की जो आपला आत्मा, आपल्या भावना अक्षय आहे, याचं स्मरण करून देतो. हा दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की, कितीही अडचणींनी तुमचा मार्ग रोखू दे, कितीही आपत्ती येऊ दे, कितीही आजारांचा सामना करावा लागू दे, –त्यांच्याशी लढण्यासाठी आणि झुंजण्यासाठी मानवाची भावना अक्षय आहे. असं मानलं जातं की हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशिर्वादानं पांडवांना अक्षयपात्र मिळालं होतं. ‘अक्षयपात्र’ म्हणजे असं भांडं की ज्यातलं अन्न कधी समाप्त होत नसे. आमचे अन्नदाता शेतकरी प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत देशासाठी, आपल्या सर्वांसाठी, याच भावनेनं परिश्रम करत असतात. यांच्याच परिश्रमानं, आज आपल्या सर्वांसाठी, गरिबांसाठी, देशाकडे अक्षय अन्नभांडार आहे.
या अक्षय तृतीयेला आम्हाला आपलं पर्यावरण, वनं, नद्या आणि पूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेच्या संरक्षणाबद्दल विचार केला पाहिजे, जे, आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आपल्याला अक्षय रहायचं असेल तर आपल्याला प्रथम आपली धरणी अक्षय राहिल, हे सुनिश्चित करावं लागेल.
आपल्याला माहित आहे का की अक्षय तृतियेचं हे पर्व, दानाची शक्ती म्हणजे देण्याची शक्ती यासाठीही एक संधी असते. ह्रदयापासूनच्या भावनेनं जे काही देतो, त्याचंच वास्तवात मह्त्व असतं. आपण काय देतो आणि किती देतो, हे महत्वाचं नाही. संकटाच्या या काळात आपल छोटासा प्रयत्न आपल्या आसपासच्या अनेक लोकांसाठी खूप मोठा आधार होऊ शकतो. मित्रांनो, जैन परंपरेतही हा एक खूप पवित्र दिवस आहे कारण पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जीवनात हा एक महत्वपूर्ण दिवस राहिला आहे. यामुळे जैन समाजात याला एक पर्व म्हणून साजरं केलं जातं आणि म्हणून या दिवशी लोक कोणतंही शुभ कार्य याच दिवशी सुरू करण्यास लोक पसंती का देतात, हे समजणं सोपं आहे.
जसं की, आज नवीन काही सुरू करण्याचा दिवस आहे, तर, आपण सर्व मिळून, आपल्या प्रयत्नांनी, आपली धरती अक्षय आणि अविनाशी बनवण्याचा संकल्प करू शकतो का? मित्रांनो, आज भगवान बसवेश्वरजी यांचीही जयंती आहे. मला भगवान बसवेश्वर यांच्या आठवणी आणि त्यांच्या संदेशाशी जोडलं जाण्याची, शिकण्याची संधी मिळाली, हे माझं सौभाग्य राहिलं आहे. देश आणि जगभरातल्या सर्व भगवान बसवेश्वर यांच्या अनुयायांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना.
मित्रांनो, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. जेव्हा गेल्या वेळेस रमजान साजरा केला गेला तेव्हा कुणी असा विचारही केला नसेल की यावर्षी रमजानमध्ये इतक्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. परंतु, आता जेव्हा की संपूर्ण जगभरात हे संकट आलंच आहे तर या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवावं, ही आमच्यासमोर संधी आहे. यावेळेला आम्ही, पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू की ईद येईपर्यत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आपण पहिल्यासारखेच आशा आणि उत्साहानं ईद साजरी करू शकू. मला विश्वास आहे की रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या दिशानिर्देशांचं पालन करत कोरोनाच्या विरोधातील सुरू असलेली ही लढाई आपण आणखी मजबूत करू. रस्त्यांवर, बाजारांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, शारिरिक अंतराचं पालन आता अत्यंत आवश्यक आहे. मी, आज त्या सर्व समाजाच्या नेत्यांचे आभार मानतो की जे दोन फूट अंतर राखण्याबाबत आणि घरातून बाहेर न पडण्याबाबत लोकांमध्ये जागृती करत आहेत. खरोखरच कोरोनानं यावेळी भारतासहित, जगभरात सण साजरे करण्याचं स्वरूपच बदलून टाकलं आहे, रंगरूप बदललं आहे. अलिकडे काही दिवसांपूर्वी, आपल्याकडे बिहू, बैसाखी, पुथंडू, विशू, ओडिया नववर्ष असे अनेक सण आले. आपण पाहिलं की लोकांनी कशा पद्धतीनं घरात राहूनच आणि अगदी साध्या पद्घतीनं आणि समाजाचं शुभचिंतन करत हे सण साजरे केले. सहसा, ते हे सण आपले मित्र आणि परिवारासहित पूर्ण उत्साह आणि आशेनं हा सण साजरा करत होते. घरातनं बाहेर पडून आपला आनंद एकमेकांत वाटून घेत होते. परंतु, यावेळेला, प्रत्येकानं संयम बाळगला. लॉकडाऊनच्या नियमांचं पालंन केलं. आपण पाहिलं आहे की यंदा आमच्या ख्रिश्चन मित्रांनी इस्टरही आपल्या घरीच साजरा केला. आपला समाज, आपल्या देशाप्रति ही जबाबदारी पार पाडणं ही आज खूप मोठी गरज आहे. तेव्हाच आपण कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ. कोरोनासारख्या जागतिक महामारीला पराभूत करू शकू.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं, आणि आपण सर्व माझ्या परिवारातलेच आहात, तेव्हा काही संकेत देणं, काही सूचना करणं, ही माझी जबाबदारी बनते. माझ्या देशवासियांना मी आग्रह करेन की, आपण अतिआत्मविश्वासात कधीही अडकणार नाही. आपल्या शहरात, आपल्या गावात, आपल्या गल्लीत, कार्यालयात, आतापर्यंत कोरोना पोहचलेला नाही, म्हणून आता पोहचणार नाही, असा विचार कधीही मनात आणू नका. असा चुकीचा समज कधीही मनात बाळगू नका. जगातला अनुभव आम्हाला खूप काही सांगतो आहे. आणि, आपल्याकडे तर असं वारंवार म्हटलं जातं,-सावधानी हटी तो दुर्घटना घटी. लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी आम्हाला या सार्या विषयांबाबत खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या पूर्वजांन म्हटलं आहे
‘अग्नि: शेषम् ऋण: शेषम्,
व्याधि: शेषम् तथैवच |
पुनः पुनः प्रवर्धेत,
तस्मात् शेषम् न कारयेत ||
अर्थात, किरकोळ म्हणून सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार, संधी मिळताच पुन्हा वाढून धोकादायक बनतात. म्हणून त्यावर पूर्ण पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. म्हणून, अतिउत्साहात, स्थानिक स्तरावर कोणतीही बेपर्वाई केली जाऊ नये. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि, मी पुन्हा एकदा म्हणेन, दोन फुट अंतर ठेवा, स्वतःला निरोगी ठेवा, दो गज दूरी, बहुत है जरूरी. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करत, मी माझी ही मन की बात संपवत आहे. पुढली मन की बात च्या वेळेस जेव्हा भेटू, तेव्हा या जागतिक महामारीतनं मुक्तिच्या वार्ता जगभरातनं येतील, मानवजात या संकटातून बाहेर येईल, या प्रार्थनेसह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद !
माझ्या प्रिय देशवासियांनो, सहसा मन की बात मध्ये मी अनेक नव्या विषयांना घेऊन येत असतो. पण आज देश आणि जगाच्या मनात केवळ आणि केवळ एकच गोष्ट आहे- कोरोना जागतिक महामारीमुळे आलेले भयंकर संकट.
अशात मी दुसऱ्या काही गोष्टींबद्दल बोललो तर ते योग्य होणार नाही. खूप काही महत्वपूर्ण गोष्टी बोलायच्या आहेत, पण माझं मन मला सांगत आहे की या महामारीच्या संदर्भातील काही गोष्टी सांगू.
पण सर्वात आधी सर्व देशवासियांची माफी मागतो. आणि माझा आत्मा मला सांगत आहे की आपण मला जरूर क्षमा कराल कारण असे काही निर्णय घ्यावे लागत आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खास करून माझ्या गरिब बंधुभगिनींना पहातो तेव्हा असं जरूर वाटतं की हा कसा प्रधानमंत्री आहे, आम्हाला संकटात टाकलं आहे, असं त्यांना वाटत असेल. त्यांची सुद्धा मी विशेषत्वाने माफी मागतो.
असंही होऊ शकतं की, खूपसे लोक माझ्यावर नाराजही झाले असतील की असं कसं सगळ्यांना घरात बंद करून ठेवलं आहे. मी आपल्या अडचणी समजू शकतो, आपल्याला होणारा त्रास समजू शकतो, परंतु भारतासारख्या 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला, कोरोनाच्या विरूद्घ लढाईसाठी, हे पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणता मार्गच नव्हता.
कोरोनाच्या विरोधातील लढा, हा जीवन आणि मृत्यु यांच्यातील लढाई आहे आणि या लढाईत आम्हाला जिंकायचं आहे आणि यासाठीच ही कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक होतं. अशी पावलं उचलायला कुणाचीच इच्छा नसते, पण जगातील परिस्थिती पाहता असं वाटतं की हाच एक मार्ग उरला आहे. आपल्याला, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा, आपली जी गैरसोय झाली, अडचण झाली आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. मित्रांनो, आमच्याकडे असं म्हटलं गेलं आहे- एवं एवं विकारः, अपि तरून्हा साध्यते सुखं म्हणजे आजार आणि त्याच्या प्रकोपाचा निपटारा त्याच्या सुरूवातीलाच केला पाहिजे. नंतर रोग असाध्य होतात आणि तेव्हा उपचार करणंही अवघड होऊन बसतं. आणि आज संपूर्ण हिंदुस्थान, प्रत्येक हिंदुस्थानी हेच करत आहे. भाऊ, बहिणी, माता, ज्येष्ठांना, कोरोना विषाणुनं जगाला कैद करून ठेवलं आहे. हे ज्ञान, विज्ञान, गरिब, श्रीमंत, दुर्बल, सामर्थ्यवान प्रत्येकाला आव्हान देत आहे. हा ना राष्ट्रांच्या सीमांमध्ये बांधला गेला आहे, हा विषाणु ना कोणता विभाग पहातोय आणि ना कोणता ऋतु. हा विषाणु मनुष्याला मारण्याची, त्याला संपवण्याची जिद्द घेऊन बसला आहे आणि त्यासाठी सर्व नागरिकांनी, पूर्ण मानवजातीला या विषाणुला नष्ट करण्यासाठी एकजूट होऊन संकल्प करावाच लागेल. काही लोकांना असं वाटतं की, ते लॉकडाऊनचं पालन करत आहेत म्हणजे असं करून ते इतरांची मदत करत आहेत. अरे बाबांनो, या गैरसमजात रहाणं योग्य नाही. हा लॉकडाऊन आपल्या स्वतःच्या बचावासाठी आहे. आपल्या स्वतःचा बचाव करायचा आहे, आपल्या परिवाराला वाचवायचं आहे. आता आपल्याला येणारे अनेक दिवस याच प्रकारचे धैर्य दाखवावंच लागणार आहे, लक्ष्मणरेषेचं पालन करायचंच आहे.
मित्रांनो,
मला हेही माहित आहे की कायदा तोडण्याची, नियमाचा भंग करायची कुणाचीच इच्छा नसते पण काही लोक असं करत आहेत कारण अजूनही ते परिस्थितीचं गांभीर्य समजू शकत नाहीयेत. अशा लोकांना मी हेच सांगेन की, लॉकडाऊनचे नियम तोडाल तर कोरोना विषाणुपासून वाचणं अवघड होईल. जगभरातल्या अनेक लोकांचाही असाच गैरसमज होता.आज त्या सर्वांना पश्चात्ताप होत आहे.
मित्रांनो,
आपल्याकडे असं म्हटलं गेलं आहे-आर्योग्यम परं भाग्यम, स्वास्थ्यं सर्वार्थ साधनं अर्थात आरोग्य हेच सर्वात मोठं भाग्य आहे. जगातल्या सर्व सुखांचं साधन, आरोग्यच आहे. अशात नियम तोडणारे आपलं आयुष्य धोक्यात घालत आहेत. मित्रांनो, या लढाईत अनेक योद्धे असे आहेत की जे घरांमध्ये नाहीत, घरांच्या बाहेर राहून कोरोना विषाणुचा सामना करत आहेत. ते आपले आघाडीवरील सैनिक आहेत. खासकरून आमच्या परिचारिका भगिनी आहेत, परिचारिकांची कामं करणारे भाऊ आहेत, डॉक्टर आहेत, निमवैद्यकीय कर्मचारी आहेत. असे मित्र, ज्यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे. आज आम्हाला त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायची आहे. गेल्या काही दिवसांत मी अशा काही लोकांशी दूरध्वनीवरून बोललो आहे, त्यांचा उत्साह वाढवला आहे आणि त्यांच्याशी बोलण्यानं माझाही उत्साह वाढला आहे. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. माझी खूप इच्छा होती म्हणून यावेळी मन की बात मध्ये अशा मित्रांचे अनुभव, त्यांच्याशी झालेली बातचीत त्यातील काही गोष्टी तुमच्यासमोर सांगाव्यात. सर्वप्रथम आमच्याशी जोडले जातील ते रामगम्पा तेजा जी. तसं तर ते एक व्यावसायिक आहेत, या त्यांचे अनुभव ऐकू या.
हां राम
रामगम्पा तेजाः नमस्ते जी.
मोदीजीः कोण, राम बोलत आहेत काय?
रामगम्पा तेजाः हो साहेब. राम बोलतोय.
मोदीजीः हा राम, नमस्ते.
रामगम्पा तेजाः नमस्ते, नमस्ते!
मोदीजीः मी ऐकलं आहे की आपण कोरोना विषाणुच्या गंभीर संकटातून बाहेर पडला आहात?
राम गम्पा तेजा: हो, खरं आहे|
मोदी जी: मला आपल्याशी काही बोलायचं होतं. आपण सांगा, या साऱ्या संकटातून बाहेर निघालात, तर आपला अनुभव मला ऐकायची इच्छा होती.
राम गम्पा तेजा: मी आयटी क्षेत्राचा कर्मचारी आहे. कामानिमित्तानं मी दुबईला, एका मीटिंगसाठी गेलो होतो. पण तिथं कळत नकळत असं घडून गेलं होतं. परत आल्याआल्या, ताप आणि ते सर्व काही लक्षणं सुरू झाली. तेव्हा पाच सहा दिवसांनी डॉक्टर्सनी कोरोना विषाणुची चाचणी केली आणि तेव्हा निकाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा गांधी रूग्णालय, हैदराबादचं सरकारी रूग्णालयात मला दाखल केलं होतं आणि त्यानंतर 14 दिवसांच्या उपचारानंतर मी बरा झालो. आणि मला रूग्णालयातनं डिस्चार्ज दिला. तर, हे सारं थोडं घाबरवणारं होतं.
मोदी जी: म्हणजे, आपल्याला जेव्हा संसर्ग झाल्याचं समजलं.
राम गम्पा तेजा: हो|
मोदी जी: आणि त्याच्या अगोदर तुम्हाला हा विषाणु अतिशय भयंकर आहे, त्रासदायक आहे, असं तुम्हाला वाटत असेल.
राम गम्पा तेजा: हो.
मोदी जी: तर, जेव्हा आपल्याबाबतीत असं घडलं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय होती?
राम गम्पा तेजा: पहिल्यांदा तर खूपच घाबरून गेलो होतो मी, प्रथम तर माझा हे कसं झालं,यावर विश्वासच बसत नव्हता. कारण तेव्हा भारतात दोन ते तीन लोकांनाच त्याची लागण झाली होती, त्यावेळी त्याच्याबाबतीत काहीच माहिती नव्हती. रूग्णालयात जेव्हा मला दाखल केलं तेव्हा मला विलगीकरण कक्षात ठेवलं होतं. तेव्हा तर, पहिले दोन दिवस तर असेच गेले. परंतु तिथले डॉक्टर्स आणि परिचारिका ज्या आहेत..
मोदी जी: हा
राम गम्पा तेजा: ते माझ्याशी अतिशय चांगले वागले. दर रोज मला कॉल करून माझ्याशी बोलत होते आणि काही होणार नाही, असा धीर देत होते.
तुम्ही बरे व्हाल, अशा गोष्टी करत असायचे. दिवसात, दोन तीन वेळा डॉक्टर बोलायचे, परिचारिकाही बोलत असायच्या. तर, पहिल्यांदा जी भीती होती, त्यानंतर असं वाटलं की इतक्या चांगल्या लोकांबरोबर मी आहे. त्यांना काय करायचं आहे हे माहित आहे आणि मी चांगला होईनच,असं वाटू लागलं होतं.
मोदी जी: कुटुंबातल्या लोकांची मनःस्थिती कशी होती?
राम गम्पा तेजा: जेव्हा मी रूग्णालयात दाखल झालो, तेव्हा पहिल्यांदा तर सारेच तणावाखाली होते. आणि माध्यमांचीही थोडी समस्या होती तिथं. जास्त लक्ष देणं वगैरे होतं. परंतु, सर्वप्रथम परिवारातल्या लोकांचीही चाचणी केली गेली होती. त्यांच्या चाचणीचे निकाल निगेटिव्ह आले होते. तो आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, त्यावेळी माझ्या आसपास होते त्या सर्वासाठी, सर्वात मोठं वरदान होतं. त्यानंतर तर प्रत्येक दिवशी सुधारणा दिसत होती. डॉक्टर आमच्याशी बोलत होते आणि ते कुटुंबावाला माहिती देत होते.
मोदी जी: आपण स्वतः काय काय खबरदारी घेतली होती, आपल्या परिवारानं काय खबरदारी घेतली?
राम गम्पा तेजा: कुटुंबियांना तर प्रथम जेव्हा समजलं तेव्हा मी विलगीकरण कक्षात होतो. पण क्वारंटाईननंतरसुद्धा डॉक्टरांनी सांगितलं होतं की, आणखी 14 दिवस घरातच रहायचं आहे आणि आपल्या खोलीतच रहायचं तसंच स्वतःला घरात कुटुंबापासून वेगळं ठेवायचं अस डॉक्टर बोलले होते. तेव्हा आल्यापासून मी माझ्या घरातच आहे. बहुतेक वेळ माझ्याच खोलीत रहातो. मास्क घालूनच असतो दिवसभर आणि बाहेर जेव्हा काही खाद्यपदार्थ असतील तर हात धुणं तर सर्वात महत्वाचं आहे.
मोदी जी: चला राम, आपण ठीक होऊन आला आहात. आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत|
राम गम्पा तेजा: धन्यवाद.
मोदी जी : पण माझी इच्छा आहे की आपला हा अनुभव..
राम गम्पा तेजा: हो
मोदी जी: आपण तर आयटी व्यवसायात आहात ना
राम गम्पा तेजा: हो
मोदी जी: तर ध्वनिफित बनवून
राम गम्पा तेजा: हां
मोदी जी: लोकांना सांगा. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार करा. त्यामुळे लोक घाबरणारही नाहीत आणि त्याचवेळेस, काळजी कशी घ्यायची, कोरोनापासून हेही अगदी व्यवस्थितरित्या लोकांपर्यत जाईल.
राम गम्पा तेजा: हां जी. असं आहे की मी बाहेर येऊन पहातो तेव्हा विलगीकरण कक्षात जाणं म्हणजे जणू तुरूंगात जाण्यासारखं आहे, असा विचार लोक करू लागले आहेत. असं नाहीय. सर्वांना याची माहिती झाली पाहिजे की, सरकारी क्वारंटाईन त्यांच्यासाठी आहे, त्यांच्या परिवारासाठी आहे. त्याबाबतीत जास्तीत जास्ता लोकांना सांगू इच्छितो की चाचणी करून घ्या, क्वारंटाईन याचा अर्थ घाबरू नका. कुणी क्वारंटाईनमध्ये असेल याचा अर्थ त्याच्यावर तो शिक्का बसू नये.
मोदी जी: चला राम, खूप खूप शुभकामना आपल्याला.
राम गम्पा तेजा: धन्यवाद,सर .
मोदी जी: धन्यवाद
मित्रांनो, जसं की राम यांनी सांगितलं की त्यांनी कोरोनाची शंका आल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या प्रत्येक निर्देशाचं पालन केलं, आणि त्यामुळेच आज ते व्यवस्थित होऊन पुन्हा निरोगी जीवन जगत आहेत. आपल्याबरोबर असे आणखी एक मित्र जोडले गेले आहेत ज्यांनी कोरोनाला पराभूत केलं आहे आणि त्यांचं तर पूर्ण कुटुंबच या संकटात अडकलं होतं. तरूण मुलगाही अडकला होता. या आग्रा इथले श्रीमान अशोक कपूर यांच्याशी आपण बोलू या.
मोदी जी: अशोक जी नमस्ते-नमस्ते |
अशोक कपूर: नमस्कार जी | माझं सौभाग्य आहे की मी आपल्याशी बोलतो आहे.
मोदी जी: आमचंही सौभाग्य आहे. मी फोन यासाठी केला की कारण आपल्या संपूर्ण कुटुंबवर हे संकट आलं होतं.
अशोक कपूर: हो, हो.|
मोदी जी: तर मला हे अवश्य जाणून घ्यायचं आहे की ही समस्या, या संसर्गाची माहिती आपल्याला कशी झाली?काय झालं?रूग्णालयात काय झालं? ज्यामुळे मी आपले अनुभव ऐकून काही गोष्टी देशाला सांगण्यासारख्या असतील तर त्यांचा उपयोग मी करेन.
अशोक कपूर: बिलकुल साहेब| माझी दोन मुलं आहेत. ते इटलीला गेले होते. तिथं, एक प्रदर्शन होतं बुटांचं. आम्ही इथं बूट बनवण्याचं काम करतो. कारखाना आहे. उत्पादन करतो.
मोदी जी: हां.
अशोक कपूर: तर तिथं इटलीला प्रदर्शनात गेलो होतो. जेव्हा ती परत आली नं.
मोदी जी: हां.
अशोक कपूर: आमचे जावईही गेले होते, ते दिल्लीला राहतात. त्यांना थोडी समस्या झाली तर ते राम मनोहर लोहिया रूग्णालयात गेले
मोदी जी: हां
अशोक कपूर: तेव्हा त्यांना कोरोना पॉझिटिव्ह सांगण्यात आलं. त्यांना नंतर तिथनं सफदरजंगला हलवण्यात आलं.
मोदी जी: हां.
अशोक कपूर: आम्हाला तिथनं दूरध्वनी आला की आपणही त्यांच्यबरोबर गेला होता. आपणही चाचणी करून घ्या. तेव्हा दोन्ही मुलं गेली चाचणी करायला. इथंच आग्रा जिल्हा रूग्णालयात त्यांना सांगण्यात आलं की आपण आपल्या कुटुंबातल्या सर्वाना बोलवून घ्या. कुणाचीही चाचणी राहून जाऊ नये. शेवटी आम्ही सर्व जण गेलो.
मोदी जी: हां
अशोक कपूर: तर दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आपण जे सहाजण आहात, माझी दोन मुलं, मी, माझी पत्नी, मी तसाही ७३ वर्षांचा आहे, माझ्या मुलाची पत्नी आणि माझा नातू जो सोळा वर्षांचा आहे. आम्हा सर्वांना त्यांनी पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं. आपल्याला दिल्लीला जायचं आहे, असंही सांगितलं.
मोदी जी: ओ माय गॉड
अशोक कपूर: पण सर आम्ही घाबरलो नाही. आम्ही म्हटलं, चला चांगलं आहे की कोरोना असल्याचं कळलं तरी. आम्ही दिल्लीला सफरदरजंग रूग्णालयात गेलो. आग्रा रूग्णालयानंच आम्हाला रूग्णवाहिका दिली. त्यांनी तिचं काही भाडं घेतलं नाही. आग्र्याचे डॉक्टर्स, प्रशासनाची कृपा आहे. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं.
मोदी जी: रूग्णवाहिकेतनं आलात आपण?
अशोक कपूर: हो साहेब, रूग्णवाहिकेतनं. व्यवस्थित होतो, जसं त्यात बसून येतात तसंच आलो. आम्हाला त्यांनी रूग्णवाहिका दिली. बरोबर डॉक्टरही होते.आणि आम्हाला त्यांनी सफदरजंग रूग्णालयात आणून सोडलं.
सफदरजंग रूग्णालयात जे फाटकापाशीच डॉक्टर उभे होते त्यांनी आम्हाला आमच्या वॉर्डमध्ये हलवलं. आम्हा सहाही जणांना वेगवेगळ्या खोल्या दिल्या. चांगल्या खोल्या होत्या, सर्वकाही तिथं होतं. सर, आम्ही 14 दिवस रूग्णालयात तिथं एकटे रहात होतो. आणि डॉक्टरांपुरतं सांगायचं तर त्यांचं सहकार्य खूप होतं. त्यांची आणि कर्मचाऱ्यांचीही वागणूक खूप चांगली होती. ते आपले ड्रेस घालून येत नसत त्यामुळे सर, डॉक्टर आहेत की वॉर्डबॉय हेच कळत नसायचं. आणि ते जे काही सांगत होते ते मान्य करत होतो. तिथं आम्हाला अगदी एक टक्कासुद्धा अडचण झाली नाही.
मोदी जी: आपला आत्मविश्वासही खूप पक्का दिसतोय.
अशोक कपूर: सर, आम्ही अगदी व्यवस्थित आहोत. मी तर सर माझ्या गुडघ्यांवर शस्त्रक्रियाही करून घेतली आहे. तरीही मी व्यवस्थित आहे.
मोदी जी: ते नाही. पण इतकं मोठं संकट आपल्या कुटुंबावर आलं आणि 16 वर्षाच्या मुलापर्यंत पोहचलं, तेव्हा
अशोक कपूर: त्याची परिक्षा होती सर. आयसीएसईची परिक्षा सुरू होती नं तेव्हा. तर त्याची परिक्षा होती. तर त्याने पेपर दिला नाही. म्हटलं नंतर बघू. आयुष्य राहिलं तर सगळे पेपर देता येतील. काही हरकत नाही.
मोदी जी: खरी गोष्ट आहे. चला आपला अनुभव यात कामाला आला. आपण सर्व कुटुंबाला विश्वास दिला, धीर दिला.
अशोक कपूर: जी, आमच्या पूर्ण कुटुंबाला तिथं एकमेकांचा आधार राहिला. आम्ही भेटत नव्हतो. पण फोनवरून बोलत होतो. एकमेकांशी भेटू शकत नव्हतो आणि डॉक्टरांनी आमची पूर्ण काळजी घेतली- जितकी घ्यायला हवी. आम्ही त्यांचे आभारी आहोत त्यानी आम्हाला छान सहकार्य केलं. जे कर्मचारी, परिचारिका होत्या, त्यांनी आम्हाला पूर्ण सहयोग दिला.
मोदी जी: चला, माझ्या आपल्याला आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
अशोक कपूर: धन्यवाद जी, धन्यवाद | आपल्याशी बोलणं झालं यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत.
मोदी जी: नाही, आम्ही सुद्धा.
अशोक कपूर: यानंतरही सर, आम्ही कुठंही जनजागृतीसाठी कुठं जायचं असेल तर आम्ही सतत तयार आहोत.
मोदी जी: नाही. आपण आपल्या पद्धतीनं आग्र्यामध्ये करा. कुणी उपाशी असेल तर त्याला जेवण द्या. गरिबाची चिंता करा, आणि नियमांचं लोकांनी पालन केलं पाहिजे. लोकांना समजवा की आपला परिवार या आजारात फसला होता, पण आपण नियमांचं पालन केल्यानं आपल्या परिवाराला वाचवलं. सर्व लोकांनी नियमांचं पालन केलं तर देश वाचेल.
अशोक कपूर: आम्ही मोदी सर,आमचा व्हिडिओ बनवून चॅनल्समध्ये दिला आहे.
मोदी जी: अच्छा |
अशोक कपूर: लोकांमध्ये जागृती रहावी म्हणून त्यानी तो दाखवलाही आहे.
मोदी जी: सोशल मीडियात खूप लोकप्रिय केला पाहिजे.
अशोक कपूर: जी जी, आणि आम्ही आमच्या कॉलनीत जिथं रहातो ती अतिशय स्वच्छ कॉलनी आहे. आम्ही सर्वाना सांगितलं आहे, की पहा आम्ही आलो आहोत यावरून घाबरायचं काहीच कारण नाही. कुणाला काही समस्या असेल तर जाऊन चाचणी करून या. आणि जे लोक आम्हाला भेटले होते त्यांनीही चाचणी करून घ्यावी. ईश्वराच्या दयेनं सर्व ठीक आहे,सर.
मोदी जी: चला खूप शुभकामना आपल्याला.
मित्रांनो, आपण अशोकजी आणि त्यांच्या कुटुंबाच्या दिर्घआयुष्यासाठी कामना करुया. जसं त्यांनी सांगितलं की न घाबरता, कोणत्याही भीतीशिवाय त्यांनी योग्य पावलं उचलून, वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधला आणि योग्य सावधानता बाळगली तर या महामारीला हरवता येतं. मित्रांनो, वैद्यकीय स्तरावर आम्ही या महामारीचा कसा मुकाबला करत आहोत, याचे अनुभव जाणून घेण्यासाठी मी काही डॉक्टरांशीही बोललो आहे, जे या लढाईत आघाडीच्या फळीत आहेत. त्यांचा दिनक्रम याच रूग्णांबरोबर सुरू असतो. आता आपल्यासोबत दिल्लीचे डॉक्टर नितेश गुप्ता जोडले गेले आहेत.
मोदी जी: नमस्ते डॉक्टर |
डॉ० नीतेश गुप्ता: नमस्ते सर
मोदी जी: नमस्ते नितीश जी, आपण तर अगदी आघाडीची फळी सांभाळत आहात. मला जाणून घ्यायचंय की, रूग्णालयातल्या आपल्या बाकी साथीदारांची मनःस्थिती कशी आहे? काय आहे जरा सांगा तर
डॉ० नीतेश गुप्ता: सर्वांची मनःस्थिती चांगली आहे. आपला आशिर्वाद सर्वाच्या सोबत आहे. आपण सर्व रूग्णालयाला जो काही पाठिंबा देत आहात, ज्या वस्तु आम्ही मागत आहोत, त्या सर्व आपण पुरवत आहात. तर आम्ही सर्वजण लष्कर सीमेवर कसं लढतं तसंच आम्ही इथे लढा देत आहोत. आणि, आमचं साऱ्यांचं एकच ध्येय आहे की रूग्ण ठीक होऊन घरी गेला पाहिजे.
मोदी जी: आपलं म्हणणं खरं आहे. ही युद्धासारखीच स्थिती आहे आणि आपण सर्व आघाडीवर आहात.
डॉ० नीतेश गुप्ताः हो सर.
मोदी जी: आपल्याला तर उपचारांबरोबर रूग्णांचं समुपदेशन पण करावं लागत असेल?
डॉ० नीतेश गुप्ता: हो सर, ते सर्वात जास्त गरजेचं आहे. कारण रूग्ण, एकदम ऐकून घाबरतो की आपल्याबरोबर हे काय होत आहे, असं त्याला वाटत असतं. त्याला समजवावं लागतं की यात काहीच नाही. पुढल्या 14 दिवसात तुम्ही ठीक होणार आहात. तुम्ही आपल्या घरी जाल अगदी. अशा पद्घतीनं आम्ही 16 रूग्णांना घरी पाठवलं आहे.
मोदी जी: जेव्हा आपण बोलत असता तेव्हा एकंदरीत आपल्यासमोर काय येतं, जेव्हा घाबरलेले लोक असतात, तेव्हा त्यांना कशाची चिंता सतावत असते?
डॉ० नीतेश गुप्ता: त्यांना हेच वाटत असंत की पुढं काय होईल? आता काय होईल? एकदम बाहेरच्या जगात ते पाहत असतात की इतके लोक मरत आहेत, आपल्याही बाबतीत असंच होईल का, असं त्यांना वाटतं. तेव्हा आम्ही त्यांना समजावतो की, कोणती अडचण किती दिवसात ठीक होईल. आपली केस अगदी सौम्य स्वरूपाची आहे. साधी सर्दी पडसं होतं तशीच ही केस आहे. तो जसा पाच सात दिवसात ठीक होतो तसंच तुम्हीही व्हाल. नंतर आम्ही तुमच्या चाचण्या करू आणि त्या निगेटिव्ह आल्या तर आपल्याला घरी पाठवता येईल. म्हणूनच वारंवार, दोन तीन चार तासात त्यांच्याजवळ जातो, त्यांना भेटतो , त्यांची चौकशी करतो. त्यांना बरं वाटतं. दिवसभरात त्याना चांगलं वाटतं.
मोदी जी: त्यांचा आत्मविश्वास वाढतो. सुरूवातीला तर घाबरून जात असतील नं?
डॉ० नीतेश गुप्ता: सुरूवातीला तर ते घाबरतात,पण जेव्हा आम्ही त्यांना समजावतो तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना स्वतःलाच बरं वाटायला लागतं. त्यानाही वाटू लागतं की आपण ठीक होऊ शकतो.
मोदी जी: पण सर्व डॉक्टरांना असं वाटतं की जीवनातला सर्वात मोठया सेवा भावाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. ही सर्वांची भावना असते का?
डॉ० नीतेश गुप्ता: हां जी, अगदी तशीच भावना असते. आम्ही आमच्या टीमला नेहमी प्रोत्साहन देत असतो की घाबरण्याची काही गरज नाही. आपण जर पूर्ण काळजी घेतली तर., रूग्णाला चांगल्या तर्हेने समजावलं की आपल्याला असं करायचं आहे, तर सारं काही ठीक होईल.
मोदी जी: चला डॉक्टर. आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर रूग्ण येत असतील आणि आपण तर अगदी तनमनानं सेवा करत आहात. आपल्याशी बोलून छान वाटलं या लढाईत मी आपल्याबरोबर आहे. आपण ही लढाई सुरू ठेवा.
डॉ० नीतेश गुप्ता: आपला आशीर्वाद रहावा, हीच आमची इच्छा आहे.
मोदी जी: खूप-खूप शुभकामना, भैया|
डॉ० नीतेश गुप्ता: सर धन्यवाद.
मोदी जी: थँक यू. नितीश जी आपल्याला खूप खूप धन्यवाद. आपल्यासारख्या लोकांच्या प्रयत्नांनीच भारत कोरोनाच्या विरोधातली ही लढाईमध्ये जरूर जिकणार आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की आपण आपली सतत काळजी घ्या. आपल्या साथीदारांची काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. जगातल्या अनुभवानं हेच दाखवून दिलं आहे की या आजारानं संसर्ग झालेल्या व्यक्तिंची संख्या अचानक वाढते. अचानक होणारऱ्या या वाढीच्या कारणामुळे परदेशात आम्ही चांगल्यातली चांगली आरोग्य सेवा अपयशी ठरत असल्याचं पहात आहोत. भारतात अशी स्थिती येऊ नये, यासाठी आम्हाला सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत. आणखी एक डॉक्टर आमच्याशी पुण्याहून जोडले जात आहेत.
श्रीमान डाक्टर बोरसे
मोदी जी: नमस्ते डॉक्टर |
डॉक्टर: नमस्ते | नमस्ते |
मोदी जी: नमस्ते | आपण तर अगदी एक ‘जन-सेवा, प्रभु-सेवा’ च्या पद्धतीनं कामात गुंतला आहात. मी आज आपल्याशी काही गोष्टी बोलू इच्छितो, ज्या देशवासियांसाठी संदेश ठरतील. एक तर अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की केव्हा डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे आणि केव्हा त्यांनी कोरोना चाचणी करायची आहे? एक डॉक्टर या नात्यानं आपण संपूर्णपणे आपल्याला या कोरोनाच्या रूग्णांसाठी समर्पित केलं आहे. तर आपल्या संदेशात मोठी ताकद आहे तो मी ऐकू इच्छितो.
डॉक्टर: सर जी, इथल्या बी जे मेडिकल कॉलेजात मी प्राध्यापक आहे. आणि आमच्या पुणे महानगरपालिकेचं रूग्णालय आहे नायडू हॉस्पिटल. तिथं जानेवारी 2020 पासून तपासणी केंद्र सुरू केलं आहे. तिथं आजपर्यंत 16 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी आम्ही उपचार करून, त्यांना क्वारंटाईन करून, त्यांचं विलगीकरण करून, उपचारांद्वारे 7 जणांना डिस्चार्ज दिला आहे. आणि बाकीच्या ज्या 9 केसेस आहेत, त्या रूग्णांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे आणि ते चांगला प्रतिसाद देत आहेत. ते विषाणु शरिरात असतानाही बरे होत आहेत, कोरोना विषाणुपासून ते बरे होत आहेत. आता इथं सँपल साईझ लहान आहे, सर 16 रूग्णच आहेत. परंतु असं दिसतंय की तरूणांनाही संसर्ग होत आहे. त्यांना होणार संसर्ग जास्त गंभीर नाहीये सर.
तो सौम्य आजार आहे आणि रूग्ण पूर्ण तंदुरूस्त होत आहेत सर. आणि हे 9 रूग्ण आहेत तेही 4 ते 5 दिवसांत ठीक होणार आहेत, त्यांची प्रकृती आता ढासळणार नाहीये, त्यांच्यावर आम्ही रोज लक्ष ठेवून आहोत. जे लोक आमच्याकडे संशयित म्हणून येतात, आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत आणि जे संपर्कात आले आहेत, अशा लोकांचा सर आम्ही स्वॅब घेत आहोत सर. त्यांच्या श्वासनलिकेचा स्वॅब, नासिकेचा स्वॅब घेत आहोत आणि नासिकेच्या स्वॅबचा अहवाल आल्यावर जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्यांना पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये दाखल करतो. निगेटिव्ह निकाल आला तर त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा संदेश देऊन, होम क्वारंटाईन कसं करायचं आहे, घरी गेल्यावर काय करायचं आहे, असा सल्ला देऊन त्यांना आम्ही घरी पाठवत आहोत.
मोदी जी: आपण काय समजावता त्यांना? घरी रहाण्यासाठी काय काय त्यांना समजावता आपण जरा सांगा.
डॉक्टर: सर, एकतर आपण घरी राहिला तर आपल्याला घरातही क्वारंटाईन करायचं आहे. आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे 6 फूट अंतर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला मास्क वापरायचा आहे आणि वारंवार हात स्वच्छ करायचे आहेत. जर आपल्याजवळ सॅनिटायझर नाही तरीही आपण साध्या साबणानं आणि पाण्यानं हात स्वच्छ करायचा आहे आणि तेही वारंवार हात धुवायचे आहेत. जर आपल्याला खोकला आला किंवा शिंक आली तर रूमाल घेऊन साधा रूमाल लावून त्यावरच खोकायचं आहे. त्यामुळे जे काही तुषार उडतील ते जास्त दूर जाऊ शकणार नाहीत आणि जमिनीवर ते पडणार नाहीत. जमिनीवर न पडल्याने हात लागला तरीही विषाणुचा प्रसार शक्य होणार नाही. हे आम्ही समजावतो आहोत सर. दुसरी गोष्ट अशी समजावतो आहोत की त्यांना होम क्वारंटाईनमध्ये रहायचं आहे. त्यांना घरातून बाहेर पडायचं नाहीये. आता तर लॉकडाऊन झालं आहे. खरंतर. या विशिष्ट स्थितीत त्यांनी होम क्वारंटाईनमध्ये किमान 14 दिवस रहायचं आहे. अशी सूचना आम्ही त्यांना देत आहोत.
मोदी जी: चला डॉक्टर. आपण तर खूप चांगली सेवा करत आहात आणि समर्पण भावनेनं करत आहात. आपली पूर्ण टीम यात गुंतली आहे. मला विश्वास आहे की आमचे जितके रूग्ण आले आहेत, सर्व जण सुरक्षित होऊन आपल्या घरी जातील आणि देशातही आपल्या सर्वांच्या मदतीनं या लढाईत आपण जिंकूच.
डॉक्टर: सर, आम्हाला विश्वास आहे की आम्ही जिंकू. ही लढाई आम्ही जिंकणार आहोत.
मोदी जी: खूप खूप शुभकामना डॉक्टर आपल्याला. धन्यवाद डॉक्टर|
डॉक्टर: थँक यू सर.
मित्रांनो, आमचे हे सर्व साथी, आपल्याला, पूर्ण देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी गुंतले आहेत. ते ज्या गोष्टी आपल्याला सांगत आहेत त्या केवळ ऐकायच्याच नाहीत तर जीवनात अमलात आणायच्या आहेत. आज मी जेव्हा डॉक्टरांचा त्याग, तपस्या, समर्पण पहातो तेव्हा मला आचार्य चरक यांनी सांगितलेली गोष्ट आठवते. आचार्य चरक यांनी डॉक्टरांसाठी अगदी स्पष्ट सांगितलं होतं आणि आज ते आम्ही डॉक्टरांच्या जीवनात पहात आहोत. आचार्य चरक यांनी म्हटलं आहे
न आत्मार्थम् न अपि कामार्थम् अतभूत दयां प्रति ||
वतर्ते यत् चिकित्सायां स सवर्म इति वर्तते ||
अर्थात, धन आणि एखाद्या खास कामनेसाठी नव्हे तर केवळ रूग्णाच्या सेवेसाठी, दयाभाव ठेवून कार्य करतो तो सर्वश्रेष्ठ चिकित्सक असतो.
मित्रांनो,
मानवतेने भरलेल्या प्रत्येक परिचारिकेला आज मी नमन करतो. आपण सर्व ज्या सेवाभावानं काम करता, तो अतुलनीय आहे. हाही योगायोग आहे की यावर्षी 2020 ला संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय परिचारिका आणि दाई वर्ष म्हणून साजरं करत आहे. याचा संबंध 200 वर्षांपूर्वी 1820 मध्ये जन्मलेल्या फ्लोरेन्स नायटिंगलशी आहे. ज्यांनी मानवसेवेला, नर्सिंगला एक नवी ओळख दिली. एका नव्या उंचीवर नेऊन पोहचवलं. जगातल्या प्रत्येक परिचारिकेच्या सेवाभावानं समर्पणभावनेला समर्पित हे वर्ष निश्चितपणानं नर्सिंग समुदायासाठी एक मोठा कसोटीचा काळ म्हणून समोर आला आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व या परिक्षेत यशस्वी व्हाल इतकंच नव्हे तर अनेक जीवही वाचवाल.
आपल्यासाऱख्या सर्व साथीदारांचा निर्धार आणि भावनांच्यामुळेच ही इतकी मोठी लढाई आम्ही लढू शकत आहोत. आपल्यासारखे साथी जसे की डॉक्टर असो, परिचारिका असो, निमवैद्यकीय कर्मचारी, आशा, एएनएम कार्यकर्ता,सफाई कामगार, आपल्या आरोग्याची देशाला खूप चिंता आहे. हे लक्षात घेऊनच, अशा जवळपास 20 लाख मित्रांसाठी 50 लाख रूपयांपर्यत आरोग्य विमा योजनेची घोषणा सरकारने केली आहे, ज्यामुळे आपण या लढाईत अधिक आत्मविश्वासानं देशाचं नेतृत्व करू शकाल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, कोरोना विषाणुच्या या लढाईत आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत जे समाजातील खरे नायक आहेत आणि या परिस्थितीत सर्वात पुढे उभे आहेत. मला NarendraModi App वर, नमो App वर बंगळुरूच्या निरंजन सुधाकर हेब्बाले यांनी लिहिलं आहे की असे लोक दैनंदिन जीवनातील नायक आहेत. ही गोष्ट खरीही आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्यामुळे आमचं दैनंदिन आयुष्य सहजपणे सुरू राहतं. आपण कल्पना करा एक दिवस आपल्या घरी नळाला येणारं पाणी बंद होतं किंवा आपल्या घरातील विजपुरवठा अचानक खंडित होतो. तेव्हा हे दैनंदिन आयुष्यातले नायकच आमच्या अडचणी दूर करतात. आपण जरा आपल्या घराच्या शेजारी असलेलं किराणा दुकानाचा विचार करा. आज इतक्या अवघड काळात तो जोखिम पत्करतो आहे. अखेर कशासाठी? यासाठीच नं की आपल्याला
गरजेच्या वस्तु मिळण्यात काही अडचण होऊ नये. अगदी याच प्रकारे, ते चालक, ते कामगार यांच्याबद्दल विचार करा जे न थांबता आपल्या कामात गुंतलेले आहेत ज्यामुळे देशात आवश्यक वस्तूंच्या पुरवठा साखळीत व्यत्यय येणार नाही. आपण पाहिलं असेल, बँकिंग सेवा सरकारनं सुरू ठेवली आहे. बँकिंग क्षेत्रातले आमचे लोक पूर्ण चिकाटीनं, मनापासून या लढाईचं नेतृत्व करत बँकांना सांभाळत आहेत, आपल्या सेवेत उपस्थित आहेत. आजच्या घडीला ही सेवा लहान नाही. त्या बँक कर्मचाऱ्यांना आम्ही जितके धन्यवाद देऊ तितके कमीच आहेत. मोठ्या संख्येनं आमचे साथी ई कॉमर्स कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉय. म्हणून काम करत आहेत.हे लोक या अवघड काळातही गृहोपयोगी वस्तुंचं वितरण करण्याच्या कामाला लागले आहेत. जरा विचार करा आपण लॉकडाऊनच्या काळात जो दूरचित्रवाणी पाहू शकत आहात, घरात राहूनही फोन आणि इंटरनेटचा वापर करत आहात, त्या सर्वांना व्यवस्थित ठेवण्यासाठी कुणी ना कुणी तरी खपत आहे. या काळात आपल्यातील बहुतांश लोक डिजिटल पेमेंट सहजपणे करू शकत आहात, त्यामागे खूप लोक काम करत आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान हेच लोक आहेत की जे देशाचं कामकाज पहात आहेत. आज सर्व देशवासियांच्या वतीनं, मी त्यां सर्व लोकांचे आभार मानतो. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतःसाठी सर्व प्रकारची खबरदारी घ्यावी. स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबियांची काळजी घ्यावी.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला काही अशा घटना समजल्या आहेत की ज्यात कोरोना विषाणुच्या संशयितांना ज्यांना होम क्वारंटाईनमध्ये रहाण्यास सांगितलं आहे, त्यांच्याबरोबर काही लोक वाईट वर्तन करत आहेत. अशा गोष्टी ऐकून मला अतिशय दुःख झालं आहे. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्हाला हे समजून घ्यायला हवं की, सध्याच्या परिस्थितीत आम्हाला केवळ एक दुसऱ्यापासून सामाजिक अंतर राखायचं तर आहेच, पण भावनिक किंवा मानवी अंतर राखायचं नाही. असे लोक कुणी गुन्हेगार नाहीत केवळ ते विषाणुचे संशयित पीडित आहेत. या लोकांनी दुसऱ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी स्वतःला अलग केलं आहे आणि क्वारंटाईनमध्ये रहात आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी आपली जबाबदारी गांभिर्यानं घेतली आहे. इथपर्यंत की काहींनी तर विषाणुची कोणतीही लक्षणं दिसत नसतानाही स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. त्यांनी असं यासाठी केलं आहे की ते परदेशातनं परतले आहेत आणि दुहेरी सावधानता बाळगत आहेत.
ते हे सुनिश्तिच करू पहात आहेत की, कोणत्याही परिस्थितीत दुसरी व्यक्ति त्यांच्यामुळे विषाणुनं संसर्गित होऊ नये. म्हणून हे लोक इतकी जबाबदारी दाखवत आहेत तर त्यांच्याबरोबर वाईट वर्तणूक कोणत्याही पद्धतीने योग्य नाही. त्यांच्याप्रति सहानुभूतीपूर्वक सहयोग आवश्यक आहे.
कोरोना विषाणुशी लढण्याची सर्वात परिणामकारक पद्धत सोशल डिस्टन्सिंग हीच आहे, पण, आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की, सोशल डिस्टन्सिंग याचा अर्थ सामाजिक संवाद संपवणं हा नाही. वास्तवात, ही वेळ, आता सर्व जुन्या सामाजिक नात्यांमध्ये जीव ओतण्याची आहे. त्या नात्यांना नव्यानं ताजं करण्याची आहे. एक प्रकारे ही वेळ आम्हाला हे सांगत आहे की सोशल डिस्टन्सिंग वाढवा मात्र भावनिक अंतर कमी करा. मी पुन्हा सांगतो की, सोशल डिस्टन्सिंग वाढवा आणि भावनिक अंतर कमी करा. कोटाहून यशवर्धन यांनी NarendraModi Appवर लिहिलं आहे की ते लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचे बंध मजबूत करत आहेत. मुलांबरोबर बोर्ड गेम्स आणि क्रिकेट खेळत आहेत. स्वंयपाकगृहात नवे नवे पदार्थ बनवत आहेत. जबलपूरच्या निरूपमा हर्षेय जी NarendraModi App वर लिहितात की त्यांना प्रथम रजई बनवण्याचा आपला छंद पूर्ण करण्याची संधी मिळाली. इतकंच नाही तर बागकामाचा छंद त्या पूर्ण करत आहेत. तर रायपूरचे परिक्षित, गुरूग्रामचे आर्यमन आणि झारखंडचे सूरजजी यांची पोस्ट वाचायला मिळाली. ज्यात त्यांनी आपल्या शाळेतील मित्रांबरोबर पुनर्भेटीबद्दल चर्चा केली आहे. त्यांची ही कल्पना खूप मनोरंजक आहे. असं होऊ शकतं की, आपल्याला आपल्या दशकांपासून आपली शाळा, महाविद्यालय आणि मित्रांशी बोलण्याची संधी मिळाली नसेल. आपणही कल्पना अमलात आणून पहा. भुवनेश्वरचे प्रत्युष देवाशिष आणि कोलकत्याच्या वसुधा माधोगडिया यांनी सांगितलं की, आजकाल त्या पुस्तकं वाचत आहेत की जी त्या इतके दिवस वाचू शकल्या नव्हत्या. सोशल मिडियामध्ये मी पाहिलं की, काही लोकांनी, वर्षांपासून घरात पडलेले तबले, वीणा अशी अनेक संगीत वाद्ये काढून रियाज सुरू केला आहे. आपणही असं करू शकता. यामुळे, आपल्याला संगीताचा आनंद तर मिळेलच पण जुन्या आठवणीनांही उजाळा मिळेल. म्हणजे या बिकट प्रसंगात असा एक क्षण मुश्किलीने मिळाला आहे ज्यात, आपल्याला आपल्याशी जोडले जाण्याची संधी मिळेल, उलट आपण आपल्या आवडीच्या छंदाशी जोडले जाल. आपल्याला, आपले जुने मित्र आणि कुटुंबियांशी जोडण्याची पूर्ण संधी मिळेल.
नमो app वर मला रूडकीच्या शशिजी यांनी विचारलं आहे की लॉकडाऊनच्या काळात, मी माझ्या फिटनेससाठी काय करतो? या परिस्थितीत मी नवरात्रिचे उपास कसे करतो? मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुम्हाला घराबाहेर पडण्याची मनाई केली आहे पण आपल्याला आपल्या अंतर्मनात डोकावण्याची संधीही दिली आहे. ही संधी आहे, बाहेर निघू नका, आपल्या अंतरात प्रवेश करा आणि स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करा.
नवरात्रीच्या उपासाबाबत सांगायचं तर तो मी आणि माझी शक्ती, भक्ति यांच्यातील विषय आहे. तंदुरूस्तीची गोष्ट आहे तर मला वाटतं की चर्चा फार लांबेल. मी असं करतो की मी सोशल मिडियात मी काय करत आहे असे काही व्हिडिओ अपलोड करेन. NarendraModi App वर आपण ते व्हिडिओ जरूर पहा. जे मी करतो त्यातील काही गोष्टी कडाचीय आपल्या उपयोगाला येतील.पण एक गोष्ट समजून घ्या की मी काही फिटनेस तज्ञ नाही. ना ही मी योगशिक्षक आहे. मी केवळ सराव करणारा आहे. हा, मी हे जरूर मानतो की, योगाच्या काही आसनांचा मला लाभ झाला आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान आपल्याला यातल्या काही गोष्टी कामाला येतील.
मित्रांनो, कोरोनाच्या विरोधातील हे युद्ध अभूतपूर्व आहे आणि आव्हानात्मकही आहे. म्हणून, या दरम्यान काही निर्णय असे घेतले जात आहेत की, जे जगाच्या इतिहासात कधीही पहायला आणि ऐकायला मिळणार नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी भारतवासियांनी जी काही पावलं उचलली आहेत, जे प्रयत्न आपण करत आहोत, ते भारताला कोरोना महामारीवर विजय मिळवून देतील. प्रत्येक भारतीयाचा संयम आणि
संकल्प आपल्याला या अवघड स्थितीतून बाहेर काढेल. त्याबरोबर गरिबांप्रती आपल्या संवेदना अधिक तीव्र असल्या पाहिजेत. आपली माणुसकी यातच आहे की कुणी गरिब, दुःखी, उपाशी दिसतो तेव्हा या संकटाच्या घडीला आम्ही प्रथम त्याचे पोट भरू आणि त्याच्या गरजेची चिंता करू. हे भारत करू शकतो.हे आमचे संस्कार आहेत, ही आमची संस्कृती आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्रत्येक भारतीय, आपल्या आयुष्याच्या रक्षणासाठी आपल्या घरात बंद आहे. पण येणाऱ्या काळात हाच भारतीय आपल्या देशाच्या विकासासाठी सर्व भिंती तोडून पुढे जाईल, देशाला पुढे घेऊन जाईल. आपण, आपल्या कुटुबियांसमवेत घरातच रहा, सुरक्षित आणि सावध रहा, आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे. जरूर जिंकणार. खूप खूप धन्यवाद, मन की बातसाठी, पुन्हा पुढच्या महिन्यात भेटू आणि तोपर्यंत या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी होऊ, याच एका भावनेसह, याच शुभकामनेसह, आपल्या सर्वांना धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’च्या माध्यमातून मला कच्छपासून ते कोहिमापर्यंत आणि काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या नागरिकांना पुन्हा एकदा नमस्कार करण्याची संधी मिळतेय, हे माझं सौभाग्य आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार! आपल्या देशाची विशालता आणि विविधता यांचं स्मरण करणं, त्याला वंदन करणं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. आणि या विविधतेचा अनुभव करण्याची संधी तर नेहमीच आगळी अनुभूती देणारी, भावविभोर करणारी असते, आनंददायी असते, तो अनुभव म्हणजे एक प्रकारे प्रेरणापुष्प असतो. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीमधल्या हुन्नर हाटमध्ये म्हणजे एका छोट्याशा स्थानी, आपल्या देशाची विशालता, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि भावभावना यांच्यामधल्या विविधतेचं जणू दर्शन घेतलं. पारंपरिक वस्त्र, हस्तशिल्प, जाजम- गालिचे, वेगवेगळी भांडी आणि पितळी वस्तू, पंजाबची फुलकारी, आंध्र प्रदेशचे शानदार लेदरकाम, तामिळनाडूची सुंदर पेटिंग्स, उत्तर प्रदेशची पितळी उत्पादनं, भदोहीचे गालिचे, कच्छमधल्या तांब्याच्या वस्तू, अनेक प्रकारची संगीत वाद्ययंत्रे, अशा अगणित वस्तू तिथं होत्या. त्यामधून समग्र भारताची कला आणि संस्कृती यांची झलक दिसत होती. इतकंच नाही तर या वस्तू बनवण्याच्यामागे शिल्पकारांची असलेली साधना, त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि आपल्यामध्ये असलेल्या हुन्नर विषयी त्यांना असलेलं प्रेम, यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं, हे सगळं काही खूप प्रेरणादायी आहे. हुन्नर हाटमध्ये एका दिव्यांग महिलेचं बोलणं ऐकून खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं की, आधी त्या फूटपाथवर आपली चित्र- पेंटिंग्स विकत होत्या. परंतु हुन्नर हाटबरोबर जोडल्यानंतर त्यांचं तर जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आजमितीला त्या केवळ आत्मनिर्भर नाहीत तर त्यांनी स्वतःचं एक घरकूलही खरेदी केलं आहे. हुन्नर हाटमध्ये मला अनेक शिल्पकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. हुन्नर हाटमध्ये सहभागी होणा-या कारागिरांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिला कलाकार आहेत, अशी माहिती मला यावेळी दिली गेली. आणि गेल्या तीन वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून जवळपास तीन लाख कारागिर, शिल्पकार मंडळींना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत.
हुन्नर हाट म्हणजे कलेच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ तर आहेच, आणि त्याच्याच जोडीला हाटमुळे लोकांच्या स्वप्नांनाही पंख देण्याचं काम होत आहे. एकाच स्थानी दिसत असलेल्या आपल्या देशाच्या विविधतेकडं दुर्लक्ष करणं कुणालाही अशक्य आहे. अर्थात प्रत्येकाची नजर या दुर्लभ विविधतेकडं जाणारच आहे. शिल्पकला तर आहेच आहे, त्याच्याच जोडीला खाद्यपदार्थांचीही विविधता आहे. तिथं एका रांगेमध्ये इडली-डोसा, छोले-भटुरे, दाल-बाटी, खमण-खांडवी, आणखी असे कितीतरी अगणित पदार्थ होते. मी, स्वतः तिथं बिहारच्या लिट्टी-चोखा या चविष्ट पदार्थाचा आनंद घेतला. खूप चवीनं आणि खुशीनं हा पदार्थ मी खाल्ला. भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारचे मेळावे, जत्रा, प्रदर्शनं यांचं आयोजन करण्यात येत असतं. भारत नेमका कसा आहे, हे समजून घेण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी ज्या ज्यावेळी आपल्याला संधी मिळते, त्या त्यावेळी जरूर गेलं पाहिजे.
‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपले योगदान देवू शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनीजरूर जावं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशाला महान परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला आहे, जे शिक्षण दिलं आहे आणि आपल्याला जी दीक्षा मिळाली आहे. त्यामध्ये प्रत्येक जीवमात्रांविषयी दयेचा भाव आहे, निसर्गाविषयी अपार प्रेम आहे, या सर्व गोष्टी एकप्रकारे आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. भारतातल्या या वातावरणाचे आतिथ्य घेण्यासाठी संपूर्ण दुनियाभरातले विविध प्रजातींचे पक्षीही दरवर्षी आपल्या देशात येतात. त्यामुळेच संपूर्ण वर्षभर भारत स्थलांतरीत पक्षांचे घरकूल बनत असतो. भारतामध्ये जवळपास पाचशेंपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या, जातींचे पक्षी दरवर्षी देशाच्या विविध भागांमध्ये येत असतात, असं सांगण्यात येतं. गेल्या काही दिवसांत गांधीनगरमध्ये ‘कॉप-13 कन्व्हेन्शन’ झालं. त्यामध्ये या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर चिंतन झालं, मनन झालं, मंथनही झालं. आणि भारताने जे जे प्रयत्न केले आहेत, त्याचं खूप कौतुकही झालं. मित्रांनो, आगामी तीन वर्षांपर्यंत स्थलांतरीत पक्षी यांच्याविषयी होणा-या ‘कॉप-कन्व्हेन्शन’चे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला ही जी संधी मिळाली आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे, याविषयी तुम्हाला काही सुचवायचं असल्यास जरूर कळवा.
कॉप कन्व्हेन्शनविषयी आत्ता आपली चर्चा सुरू आहेच, त्यामुळं माझं लक्ष मेघालयाशी संबंधित एका महत्वाच्या माहितीकडं गेलं. अलिकडेच जीवशास्त्रज्ञांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीचे मासे मेघालयामधल्या गुहांमध्येच सापडतात, असा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे. हे मासे गुहांमधल्या जमिनीच्या आत वास्तव्य करणा-या जल-जीवांमध्ये सर्वात मोठे आहेत, असं सांगण्यात आलं. हे मासे जमिनीच्या खाली अगदी खोल-खोल अंधा-या गुहांमध्ये राहतात. त्यांच्यापर्यंत प्रकाशकिरणे फार क्वचित पोहोचतात. इतक्या खोल गुहांमध्ये इतके मोठे मासे कसे काय जीवंत राहू शकतात, याचं संशोधकांनाही खूप नवल वाटतंय.
एकूणच काय आपला भारत आणि विशेष करून मेघालय म्हणजे दुर्मिळ प्रजातींचं घर आहे, असं म्हणता येईल, आणि अर्थातच ही खूप सुखद गोष्ट आहे. हे मासे सापडणे म्हणजे भारतातल्या जैव-विविधतेला एक नवे परिमाण देणारी घटना आहे. आपल्या आजू-बाजूला अशा खूप सा-या नवलपूर्ण गोष्टी असतात. त्या अजूनही आपल्याला सापडलेल्या नसतात. त्यामुळे अशा आश्चर्यजनक गोष्टींचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी संशोधनाची उर्मी असणं गरजेचं आहे.
महान तमिळ कवियत्री अव्वैयार यांनी लिहिलं आहे.
कट्टत केमांवु कल्लादरू उडगडवु,
कड्डत कयिमन अडवा कल्लादार ओलाआडे !!
याचा अर्थ असा आहे की, आपण जे काही जाणतो ते मुठीतल्या अवघ्या वाळूच्या एका कणाएवढंच आहे. आणि आपल्याला जे माहिती नाही, ते मात्र एकूणच या संपूर्ण ब्रह्मांडासमान आहे. या देशाच्या विविधेतेविषयीही अगदी असंच आहे. आपण जितकं जाणून घेवू, तितकं कमीच आहे. आपली जैवविविधता म्हणजे तर संपूर्ण मानवतेसाठी अनोखे भंडार आहे. आपण हा खजिना जतन केला पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि तो ‘एक्सप्लोअर’ही करण्याची, अनुभवण्याची गरज आहे.
माझ्या प्रिय युवा मित्रांनो,
अलिकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या मुलांमध्ये, युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी आवड सातत्यानं वाढतेय. अंतराळामध्ये उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण केलं जात आहे. या क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे.आपल्या अंतराळ मोहिमा म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, गर्वाचा विषय बनल्या आहेत. ज्यावेळी चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाच्यावेळी मी बंगळुरूमध्ये होतो, त्यावेळी पाहिलं की, तिथं उपस्थित असलेल्या मुलांमध्ये असलेला उत्साह वाखाणण्यासारखा होता. अपरात्रीही झोपेचं नामोनिशाण त्यांच्या डोळ्यावर नव्हतं. जवळपास पूर्ण रात्रभर ही मुलं एकप्रकारे जागीच होती. त्यांच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांच्याविषयी किती उत्सुकता होती, हे पाहिलेलं, मी कधीच विसरू शकणार नाही. मुलांच्या, युवकांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातल्या वैज्ञानिकाला अधिक पोषण देण्यासाठी आता आणखी एक नवीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता तुम्ही श्रीहरिकोटा इथून होणा-या रॉकेटचं लॉचिंग अगदी समोर बसून पाहू शकणार आहात. अलिकडेच, ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खास ‘व्हिजिटर गॅलरी’ म्हणजेच अभ्यागतांचा कक्ष बनवण्यात आला आहे. या कक्षामध्ये दहा हजार लोकांना बसण्याची सुविधा आहे.
इस्त्रोच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आता ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे. अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना रॉकेट लॉचिंग दाखवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहलही घेवून जात आहेत, अशी माहिती मला दिली आहे. सर्व शाळांच्या प्राचार्यांना आणि शिक्षकांना माझा आग्रह आहे की, आगामी काळात त्यांनी या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
मित्रांनो, आज मी आपल्याला आणखी एक रोमांचक माहिती देवू इच्छितो. नमो अॅपवर झारखंडमधल्या धनबादचे रहिवासी पारस यांनी नोंदवलेलं मनोगत मी वाचलं. इस्त्रोच्या ‘युविका’ या कार्यक्रमाविषयी मी, आपल्या युवा-मित्रांना काही सांगावं, असं पारस यांना वाटतंय. युवावर्गाला विज्ञानाशी जोडण्यासाठी ‘युविका’ हा इस्त्रोनं अतिशय प्रशंसनीय उपक्रम सुरू केला आहे. 2019मध्ये हा कार्यक्रम शालेय वर्गातल्या मुलांसाठी सुरू केला होता.‘युविका’ याचा अर्थ आहे, ‘युवा विज्ञानी कार्यक्रम’!! हा कार्यक्रम म्हणजे आमचं ‘व्हिजन’ आहे. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन’ याला अनुरूप या कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे.
या कार्यक्रमामध्ये तुमची परीक्षा झाल्यानंतर, म्हणजे मुलांना सुट्टी असते तेव्हा इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जावून अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षात केला जाणारा वापर, यांच्याविषयी शिक्षण, माहिती घेता येणार आहे. जर तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी आणखी काही माहिती हवी असेल, आणि असे प्रशिक्षण घेणे किती रोमांचक आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर मागच्यावर्षी ज्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली आहे, त्यांचे अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की वाचावेत. जर तुम्हालाही या प्रशिक्षण वर्गाला जाण्याची इच्छा असेल तर ‘इस्रो’शी संबंधित ‘युविका’च्या संकेतस्थळी जावून स्वतःची नोंदणीही करू शकता. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, आपल्यासाठी मी सांगतो की, या संकेतस्थळाचं नाव तुम्ही लिहून घ्या आणि आजच जरूर या संकेतस्थळाला भेटही द्या – www..yuvika.isro.gov.in लिहून घेतलं ना?
माझ्या प्रिय देशवासियांनो,
दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी लडाखच्या अतिशय सुंदर डोंगर द-यांच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली. लेह इथल्या कुशोक बाकुला रिम्पोची या विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या एएन 32 विमानानं ज्यावेळी हवेत उड्डाण केलं, त्यावेळी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. या विमानामध्ये दहा टक्के भारतीय होते.
बायो-जेट इंधनाचं मिश्रण वापरण्यात आलं होतं. विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये अशा प्रकारच्या इंधनाचं मिश्रण पहिल्यांदाच वापरण्यात आलं. इतकंच नाही तर, लेहमधल्या ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं, ते विमानतळ भारतातच नाही तर संपूर्ण दुनियेतल्या उंचावरच्या विमानतळांपैकी सर्वाधिक उंचीवरचं आहे. या घटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विमानात वापरलेलं बायो-जेट इंधन हे झाडांच्या अखाद्य तेलापासून बनवण्यात आलेलं आहे. भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासी भागातून हे विशिष्ट इंधन खरेदी केलं आहे. या नवीन प्रयोगामुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे, असं नाही; तर कच्चे तेल आयात करण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून रहावं लागतं. आता देशाची ही निर्भरता कमी होवू शकणार आहे. इतकं प्रचंड काम करण्यासाठी अथक प्रयत्न करीत असलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो. विशेष म्हणजे डेहराडूनच्या भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जैवइंधन वापरून विमान उडवण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवले आहे, त्यांचे तर खास अभिनंदन. त्यांच्या या प्रयत्नांमुळे ‘मेक इन इंडिया’ अधिक सशक्त होणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपला नवा भारत आता जुन्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी तयार नाही. विशेष म्हणजे, नवभारतामधल्या आमच्या भगिनी आणि माता तर त्यांच्यासमोर येत असलेल्या सर्व आव्हानांशी अगदी सहज दोन हात करताहेत. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन पहायला मिळत आहे. बिहारमधल्या पूर्णियाची ही कथा, देशभरातल्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. या भागाला अनेक दशकांपासून महापूर, अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त बसतो. इथले लोक अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात शेती करण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी साधनसामुग्री जमा करणं , खूप अवघड काम आहे. मात्र या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णियाच्या काही महिलांनी एक वेगळाच मार्ग
स्वीकारला. मित्रांनो, आधी या भागातल्या महिला तूती किंवा मलबेरी यांच्या झाडांवर रेशम कीड्यांचे पालन करून कोकून तयार करीत होत्या. आणि ते विकत होत्या. त्यांना त्याचे खूपच कमी पैसे मिळत होते. मात्र त्यांच्याकडून घेतलेल्या कोकूनपासून रेशमाचा धागा बनवून चांगला नफा कमावणारी मंडळी होती. परंतु आज पूर्णियाच्या महिलांनी एक नवी सुरूवात केली आणि या भागाचं चित्रंच पालटवून टाकलं.
या महिलांनी सरकारच्या मदतीनं मलबरी-उत्पादन समूह बनवले. त्यानंतर तूतीवर रेशम कीडेपालन करून त्यापासून रेशम धागे तयार केले, इतकंच नाही तर या रेशमी धाग्यांपासून स्वतःच साड्या तयार करायलाही प्रारंभ केला. आधी ज्या महिलांना कोकून विकून अगदी किरकोळ रक्कम हातात मिळत होती, त्याच कोकूनपासून बनवलेली साडी आता हजारो रुपयांमध्ये विकली जात आहे. ‘आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहा’च्या या दीदींनी जी कमाल करून दाखवली आहे, त्याचा परिणाम आता अनेक गावांमध्येही पहायला मिळतोय. पूर्णियामधल्या अनेक गावच्या शेतकरी दीदी, आता केवळ साड्या बनवत नाही तर अनेक मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये आपले स्टॉल लावून आपला मालही विकत आहेत. आजच्या महिला म्हणजे नवशक्ती आहेत, नवीन विचारांच्या बरोबरीने त्या नवनवीन लक्ष्यं प्राप्त करीत आहेत, याचं हे उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशाच्या महिला, आमच्या कन्या उद्यमशील आहेत, त्यांच्याकडे असलेलं धाडस हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे तुम्हाला दिसतील. त्यावरूनच लक्षात येतं की, आजच्या कन्या जुन्या अनावश्यक बंधनांना बाजूला सारून नवीन उंची प्राप्त करत आहेत. आज, मी आपल्याबरोबर बारा वर्षांची कन्या काम्या कार्तिकेयन हिच्या यशाविषयी चर्चा करू इच्छितो. काम्याने फक्त बारा वर्ष वय असताना माउंट अंकागुआ शिखर सर करण्यात यश मिळवलं आहे. हे दक्षिण अमेरिकेमधलं सर्वात उंच पर्वतशिखर आहे. या पर्वतशिखराची उंची जवळपास सात हजार मीटर आहे. या महिन्याच्या प्रारंभी या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तिथं आपला तिरंगा तिनं फडकवला. याचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. देशाला गौरवान्वित करणारी काम्या आता एका नवीन मोहिमेवर आहे, त्या मोहिमेचं नाव आहे- ‘मिशन साहस’! अशी माहिती मला मिळाली आहे. या मोहिमेमध्ये सर्व खंडातल्या सर्वात उंच पर्वत शिखरे सर करण्याचं काम ती करणार आहे. या अभियानामध्ये तिला उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्किईंगही करावं लागणार आहे. काम्याच्या या मिशन साहसला मी शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर काम्यानं जे यश मिळवलं आहे, ते आपल्या सर्वांना ‘फिट’; राहण्यासाठीही प्रेरणा देणारे आहे. इतक्या कमी वयामध्ये काम्या ज्या उंचीवर पोहोचली आहे, त्यासाठी ‘फिटनेस’ असणं खूप महत्वाचं आहे.
‘ए नेशन दॅट इज फिट, विल बी ए नेशन इज हिट’ म्हणजेच जो देश फिट आहे, तोच नेहमी हिट होणार. तसं पाहिलं तर आगामी महिने धाडसी, साहसी खेळांसाठी खूपच उपयुक्त आहेत. भारताची भौगोलिक रचना अशी आहे की, आपल्या देशात साहसी क्रीडा प्रकारांना अनेक संधी आहेत. एकीकडे उंच-उंच डोंगर आणि दुसरीकडे दूर-दूरपर्यंत पसरलेलं वाळवंट आहे. एकीकडे अगदी घनदाट जंगल आहे तर दुसरीकडे समुद्राचा अथांग विस्तार आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, आपल्याला जी कोणती जागा आवडेल, जे करावसं वाटेल, ते निवडा आणि आपल्या जीवनाला धाडस, साहसाची जरूर जोड द्या. आयुष्यात साहसीपणा तर असलाच पाहिजे. तसं पाहिलं तर मित्रांनो, अवघी बारा वर्षांची कन्या- काम्या हिच्या साहसाची, यशाची कथा ऐकल्यानंतर आता ज्यावेळी तुम्ही 105 वर्षांच्या भागीरथी अम्मा यांची यशोगाथा ऐकाल तर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. मित्रांनो, जर आपण जीवनात प्रगती करू इच्छिता, विकास करू इच्छिता, काही विशेष करून दाखवू इच्छित असाल तर सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे, आमच्यामध्ये असलेला विद्यार्थी कधीच मारून टाकता कामा नये. आता तुम्ही विचार करत असणार की, या भागीरथी अम्मा कोण बरं?
भागीरथी अम्मा केरळमधल्या कोल्लममध्ये वास्तव्य करतात. खूप लहान असतानाच त्या आईविना पोरक्या झाल्या. अगदी लहान वयातच विवाह झाला. नंतर पतीचेही निधन झाले. परंतु भागीरथी अम्माने या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं. कधीच रडत बसल्या नाहीत. अगदी दहा वर्षांपेक्षा लहान असतानाही त्यांना आपली शाळा सोडावी लागली. वयाच्या 105 व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा शालेय शिक्षण घ्यायला प्रारंभ केला. इतकं वय झालेलं असलं तरीही अम्मांनी चैाथीची परीक्षा दिली आणि परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहू लागल्या. त्यांना परीक्षेत 75 टक्के मिळाले. इतकंच नाही तर गणितामध्ये त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. आता अम्मांना आणखी पुढची परीक्षा देण्याची इच्छा आहे. जाहीर आहे, भागीरथी अम्मा यांच्यासारखे लोक, तर या देशाची ताकद आहेत. असे लोक तर प्रेरणेचे खूप मोठे स्त्रोत असतात. आजमी या भागीरथी अम्मांना विशेष प्रणाम करतो.
मित्रांनो, जीवनात काही विपरीत प्रसंग आले तर आपल्याकडे असलेलं धैर्य, आपल्याकडे असलेली इच्छाशक्ती कोणतीही परिस्थिती बदलवून टाकते. अलिकडेच मी एक अशीच कथा वाचली, ती आपल्याशी ‘शेअर’ करू इच्छितो.
ही कथा आहे, मुरादाबादच्या हमीरपूर या गावामध्ये राहणा-या सलमानची. सलमान जन्मापासूनच दिव्यांग आहे. त्याचे पाय काही त्याला साथ देत नाहीत. हा त्रास असतानाही सलमान यानं हार मानली नाही. त्यानं स्वतःचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर असाही निश्चय केला की, यापुढे आपल्यासारख्या दिव्यांग मित्रांनाही मदत करायची. एकदा ठरवलं की मग काय? सलमाननं आपल्या गावामध्येच चप्पल आणि डिटर्जंट बनवण्याचं काम सुरू केलं. पाहता पाहता त्याच्या जोडीला 30 दिव्यांग साथीदारही आले. इथं एक गोष्ट नमूद करावी वाटते, सलमानला स्वतःला चालायला त्रास होत होता. तरीही त्यानं इतरांना चालायला कोणताही त्रास होवू नये, इतरांचं चालणं सोपं व्हावं, अशी चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलमाननं आपल्या बरोबरच्या दिव्यांगजनांना स्वतःच प्रशिक्षणही दिलं. आता या सर्वांनी मिळून चप्पलांची निर्मिती सुरू केली आहे. आणि तयार मालाचे विपणनही ते करत आहेत. स्वतः परिश्रम करून या लोकांनी केवळ स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून घेतला नाही तर आपल्या कंपनीला नफ्यामध्ये आणलं आहे. आता हे सर्व लोक मिळून दिवसभरामध्ये दीडशे जोडी चपला तयार करतात. सलमानने यावर्षी 100 दिव्यांगांना रोजगार देण्याचा संकल्पही केला आहे.
सलमान आणि सहकारी मंडळींचे धैर्य, त्यांची उद्यमशीलता यांना मी सलाम करतो. अशीच संकल्पशक्ती गुजरातमधल्या कच्छ भागातल्या अजरक गावातल्या लोकांनीही दाखवली आहे. सन 2001 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर सर्व लोक गांव सोडून जात होते. त्याचवेळी इस्माईल खत्री नावाच्या व्यक्तीने गावांमध्येच राहून ‘अजरक प्रिंट’ ही आपली पारंपरिक कला जोपसण्याचा, तिचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. मग काय? पाहता पाहता नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून बनलेली अजरक कला सर्वांना मोहवून टाकू लागली. आता हे संपूर्ण गाव हस्तशिल्पाच्या आपल्या पारंपरिक कृतीनं जोडलं गेलं आहे. गावकरी वर्गानं केवळ शेकडो वर्षांची आपली जुनीकला जोपासली आहे, असं नाही तर त्याला आता आधुनिक फॅशनचीही जोड दिली आहे. आता खूप मोठ- मोठे, नामांकित डिझायनर, मोठमोठी संस्थाने, अजरक प्रिंटचा वापर करायला लागले आहेत. या गावातल्या परिश्रमी लोकांमुळे आज अजरक प्रिंट एक मोठा ब्रँड बनत आहे. संपूर्ण जगभरातून मोठे मोठे खरेदीदार या प्रिंटचे कापड खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
अलिकडेच देशभरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व साजरं केलं. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादानं देशाचं चैतन्य जागृत व्हावं. महाशिवरात्रीला भोले बाबांनी दिलेल्या आशीर्वादाची कृपा आपल्या सर्वांवर कायम रहावी, आपल्या सर्व मनोकामना शिवजींनी पूर्ण कराव्यात, आपण सर्वजण ऊर्जावान, आरोग्यदायी रहावं, सुखी रहावं आणि देशाविषयी आपल्या कर्तव्याचं सर्वांनी पालन करीत रहावं.
मित्रांनो, महाशिवरात्रीबरोबरच आता वसंत ऋतूची बहार दिवसांगणिक वाढत जाणार आहे. आगामी काही दिवसातच होळीचा सण आहे. त्यानंतर लगेचच गुढी-पाडवाही येणार आहे. नवरात्रीचे पर्वही त्याला जोडून येणार आहे. राम-नवमीचा उत्सव येणार आहे. उत्सव आणि सण आपल्या देशाच्या सामाजिक जीवनाचे अभिन्न भाग आहेत. प्रत्येक सणाच्यामागे कोणता-ना-कोणता सामाजिक संदेश दडलेला असतोच. हाच संदेश केवळ समाजालाच नाही तर, संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवतो. होळीनंतर चैत्र शुक्ल- प्रतिपदेपासून भारतीय विक्रम नव-वर्षाचा प्रारंभही होत असतो. त्यासाठीही, म्हणजेच, भारतीय नव-वर्षाच्याही मी आपल्या सर्वांना आधीच शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
पुढच्या ‘मन की बात’पर्यंत तर मला वाटतं, कदाचित विद्यार्थी परीक्षेत व्यग्र असणार. ज्यांच्या परीक्षा झालेल्या असतील, ते अगदी मस्त असतील. म्हणून जे व्यस्त आहेत आणि जे मस्त आहेत, त्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा देतो. चला, यापुढची ‘मन की बात’ करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा नक्की भेटू.
खूप-खूप धन्यवाद ! नमस्कार !!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा!! 2020 मध्ये आज आपण पहिल्यांदाच ‘मन की बात’च्या माध्यमातून भेटत आहोत. या वर्षातला हा पहिलाच कार्यक्रम आहे. तसं पाहिलं तर या दशकातलाही हा पहिला कार्यक्रम आहे. मित्रांनो, यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामुळे आपल्याशी ‘मन की बात’ करण्यासाठी जी नियमित वेळ असते, त्यामध्ये परिवर्तन करणं योग्य वाटलं. आणि एक वेगळी वेळ निश्चित करून आत्ता आपल्याबरोबर ‘मन की बात’ करत आहे.
मित्रांनो, दिवस बदलत राहतात, आठवडे जातात, महिनेही बदलत राहतात, वर्ष बदलतात. परंतु भारतातल्या लोकांचा उत्साह आणि ‘आपणही काही कमी नाहीत, आम्हीही काहीतरी करूनच दाखवू’ ‘कॅन डू -आम्ही करू शकतो! ही ‘कॅन डू’ची जी भावना आहे ना, तो आता दृढसंकल्प बनून सामोरी येत आहे. देश आणि समाज यांच्यासाठी काही करण्याची प्रबळ इच्छा, मनापासूनची भावना प्रत्येक दिवशी पहिल्यापेक्षा अधिकाधिक बळकट होत आहे.
मित्रांनो, ‘मन की बात’ च्या व्यासपीठावर आपण सर्वजण आज पुन्हा एकदा एकत्रित आलो आहोत. नवनवीन विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि देशवासियांना नवनवीन गोष्टीं साज-या करण्यासाठी, एकूण ‘भारत’साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलो आहोत. ‘मन की बात’ म्हणजे ‘‘शेअरींग, लर्निंग आणि ग्रोईंग टुगेदर’’ यांचं एक खूप चांगलं आणि सहज व्यासपीठ बनलं आहे. दर महिन्याला हजारोंच्या संख्येनं लोक आपले विचार, मते, आपण करीत असलेले प्रयत्न, आपले अनुभव ‘शेअर’ करत असतात. त्यांच्यामधून समाजाला प्रेरणा देणा-या काही गोष्टी, लोकांनी केलेले असामान्य प्रयत्न यावर चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळते.
आता ‘‘कोणी तरी ही गोष्ट करून दाखवली आहे’’ मग आपण का बरं ती गोष्ट करू शकणार नाही? हीच गोष्ट जर संपूर्ण देशामध्ये केली तर एक मोठे परिवर्तन घडून येवू शकते का? या सकारात्मक गोष्टीचे सर्वत्र अनुकरण करणे म्हणजे समाजाची एक सहज सवय बनावी, म्हणून ती विकसित करता येईल का? हे घडून येत असलेले परिवर्तन- लोकांचा स्थायीभाव बनू शकेल का? अशाच काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत घेत, दर महिन्याला ‘मन की बात’ मध्ये काही अपिल म्हणजेच आवाहन केले जाते आणि काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प केला जातो…हे असंच छान सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनेक लहान-लहान संकल्प केले असणार. जसं की- ‘नो टू सिंगल यूज प्लास्टिक’ म्हणजेच एकदाच वापरू शकणा-या पर्यावरणाला धोका असलेल्या प्लास्टिक वापराला नकार देणे. ‘खादी’ आणि स्थानिक स्तरावर बनत असलेल्या वस्तूंचा वापर करणे, स्वच्छतेची गोष्ट असो, कन्यावर्गाचा सन्मान आणि अभिमानाची गोष्ट असो, कमीत कमी रोकड वापरण्याचा आग्रह करणे- हा एक नवा पैलू असो, अशा अनेक संकल्पांचा जन्म या हलक्या-फुलक्या ‘मन की बात’ मधून झाला आहे. आणि विशेष म्हणजे या संकल्पांना दृढ करण्याचं कामही तुम्ही लोकांनीच केलं आहे.
अलिकडेच मला एक खूप छान, ममतामयी पत्र मिळालंय. बिहारचे श्रीमान शैलेश यांनी ते लिहिलं आहे. वास्तविक शैलेशजी सध्या बिहारमध्ये वास्तव्य करीत नाहीत. त्यांनी सांगितलंय की, ते दिल्लीमध्ये राहून एका एनजीओ म्हणजेच स्वयंसेवी संस्थेचे काम करत आहेत. श्रीमान शैलेश जी यांनी लिहिलंय – ‘‘मोदीजी, तुम्ही प्रत्येक ‘मन की बात’ मध्ये काही ना काही आवाहन करीत असता. त्यापैकी अनेक आवाहनांचे मी मनापासून पालन केलं आहे. या थंडीच्या दिवसांत मी लोकांकडे जावून कपडे जमा केले आणि ते सर्व ज्यांना या कपड्यांची आवश्यकता आहे, अशा लोकांना वाटले. ‘मन की बात’ मध्ये ऐकून मी अनेक गोष्टी करायला प्रारंभ केला आहे. परंतु, हळूहळू काही गोष्टी मी विसरून जायला लागलो आणि काही गोष्टी तर आपोआपच सुटून गेल्या. मात्र या नवीन वर्षात मी ‘मन की बात’ या विषयी एक ‘चार्टर’च बनवला आहे. त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्यांची एक सूचीच तयार केली आहे. लोक नव्या वर्षात ज्याप्रमाणे ‘न्यू इयर रिझोल्यूशन’- नवीन वर्षाचा संकल्प बनवतात, तसंच या नव्या वर्षातला माझा हा ‘सोशल रिझोल्यूशन’ – ‘सामाजिक संकल्प’ आहे. या सगळ्या खूप लहान-लहान गोष्टी आहेत, मात्र या संकल्पांमुळेच खूप मोठे परिवर्तन घडून येवू शकतं , असं मला मनापासून वाटतं. पत्रासोबत मी पाठवलेल्या ‘चार्टर’वर आपण स्वाक्षरी करून मला परत पाठवू शकणार?’’ शैलेश जी- तुमचं खूप-खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छाही! नवीन वर्षात केलेल्या सामाजिक संकल्पासाठी ‘मन की बात चार्टर’ ही अतिशय उत्तम नवकल्पना आहे. त्यासाठी माझ्यातर्फे मनापासून सदिच्छा लिहून हे चार्टर मी आपल्याला जरूर परत पाठवतो. मित्रांनो, हे ‘मन की बात चार्टर’ ज्यावेळी मी वाचत होतो, त्यावेळी खरोखरीच खूप आश्चर्य वाटलं. कितीतरी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. कितीतरी हॅशटॅग आहेत. आणि आपण सर्वांनी मिळून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही केले आहेत. कधी आपण ‘संदेश- टू सोल्जर्स’असं आवाहन केलं होतं. आणि आपल्या जवानांबरोबर भावानात्मक रूपानं दृढ नातं तयार करण्याचं अभियान चालवलं होतं. ‘खादी फॉर नेशन- खादी फॉर फॅशन’ मोहीम सुरू केली होती. यानंतर खादीच्या विक्रीने नवीन विक्रम प्रस्थापित केला. ‘स्थानिक उत्पादन खरेदी करण्याचा मंत्र आपण सर्वांनी स्वीकारला. तसंच ‘आपण फिट तर भारत फिट’ असं आवाहन करून फिटनेसविषयी जागरूकता वाढवली. ‘माय क्लिन इंडिया’ तसंच ‘स्टॅच्यू क्लिनिंग’ यामधून सर्व पुतळे-प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी जनतेची चळवळ सुरू केली. हॅश-टॅग नो टू ड्रग्स, हॅश-टॅग भारत की लक्ष्मी, हॅश-टॅग सेल्फफॉरसोसायटी, हॅश-टॅग सुरक्षा बंधन, हॅश-टॅग डिजिटल इकॉनॉमी, हॅश-टॅश रोड सेफ्टी…. ओ हो हो हो!! अगणित आहेत….!!
शैलेश जी, तुमच्या या मन की बात चार्टरला पाहून मला जाणवलं की, ही सूची तर खरोखरीच खूप मोठी आहे. चला तर मग, हा प्रवास असाच सुरू ठेवूया! यावेळच्या ‘मन की बात चार्टर’मध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही एखाद्या नवीन गोष्टीची जोड द्या. हॅश-टॅग वापरून सर्वांच्या सहकार्याने आणि अभिमानाने आपलं योगदान सर्वांबरोबर जरूर ‘शेअर’ करा. आपल्या मित्रांना, कुटुंबातल्या सर्व सदस्यांना यासाठी प्रेरित करा. ज्यावेळी प्रत्येक भारतवासी एक पाऊल पुढे टाकतो, त्यावेळी आपला देश 130 कोटी पावलं पुढे जात असतो. म्हणूनच चरैवेति-चरैवेति-चरैवेति अर्थातच चालत रहा- चालत रहा- चालत रहा… हा मंत्र स्वीकारून आपले प्रयत्न अखंड सुरू ठेवले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण आत्ताच ‘मन की बात चार्टर’ याविषयी चर्चा केली. स्वच्छतेनंतर जनसहभागीतेची भावना, ‘पार्टिसिपेटिव्ह स्पिरीट’ आज आणखी एका क्षेत्राविषयी वेगाने वाढतेय, हे इथं नमूद करावंसं वाटतंय. हे क्षेत्र आहे- जल संरक्षण ! जल संरक्षणासाठी अनेक व्यापक आणि नवनवीन संकल्पना देशभरातल्या प्रत्येक कानाकोप-यात राबवल्या जात आहेत. गेल्या मौसमी पावसाला ज्यावेळी प्रारंभ झाला, त्यावेळी जल संरक्षणाच्या मोहिमेलाही प्रारंभ झाला, हे सांगताना मला खूप आनंद होतोय. जन भागीदारीमुळे हे ‘जल शक्ती अभियान’ अतिशय यशस्वी होण्याच्या दिशेने पुढं जात आहे. देशात मोठ्या संख्येने तलावांची तसंच जलसाठ्यांची निर्मिती झाली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अभियानामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी आपआपल्या परीने योगदान दिलं. आता, राजस्थानातल्या झालोर जिल्ह्यातलं काम पहा. इथल्या दोन ऐतिहासिक बावडी म्हणजे विहिरी या कचरा, घाण यांचं साम्राज्य बनल्या होत्या. भद्रायू आणि थानवाला पंचायतीमध्ये शेकडो लोकांनी ‘जलशक्ती अभियाना’अंतर्गत या विहिरी पुनर्जीवित करण्याचा संकल्प केला. एकदा लोकांनी ठरवलं की, मग काय पाहिजे? पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सर्व लोकांनी मिळून या बावडींमध्ये जमा असलेले घाण पाणी, कचरा, असं सगळं काही स्वच्छ केलं. या अभियानासाठी कोणी श्रमदान केलं तर कोणी धनदान केलं. आणि त्याचाच चांगला परिणाम म्हणजे या दोन्ही बावडी आज तिथल्या जीवनरेखा बनल्या आहेत. थोडीफार अशीच गोष्ट उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथली आहे. इथं 43 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारलेला सराही तलाव जणू अखेरच्या घटका मोजत होता. परंतु ग्रामीण भागातल्या जनतेनं आपल्या संकल्पशक्तीने या तलावामध्ये नवीन प्राण आणले. इतक्या मोठ्या अभियानाच्या आड इथल्या जनतेनं कोणालाही येवू दिलं नाही की, हे काम थांबवलं नाही. एकापाठोपाठ एक अनेक गावांना आपल्याशी जोडून घेतलं. गावकरी मंडळींनी सराही तलावाच्या सर्व बाजूने एक मीटर उंचीची तटभिंतच बांधून काढली. आता तलाव पाण्यानं भरगच्च भरला आहे. आजू-बाजूला स्वच्छ छान परिसर निर्माण झाला आहे… पक्ष्यांच्या कलरवानं इथला आसमंत भरून गेला आहे.
उत्तराखंडमधल्या अलमोडा -हलव्दानी महामार्गाला लागून असलेल्या सुनियाकोट गावामध्येही जन भागीदारीतून असेच एक उदाहरण सामोरं आलं आहे. पाणी टंचाईच्या संकटाशी सामना करताना आपणच गावापर्यंत पाणी आणण्याचा निर्धार गावकरी मंडळींनी केला. एकदा ठरवलं की काय होणार नाही? लोकांनी मिळून निधी जमा केला. योजना तयार केली. सर्वांनी श्रमदान केलं आणि जवळपास एक किलोमीटर अंतरावरून गावापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली. पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आलं आणि पहाता पहाता दोन दशकापासून असलेली पाण्याची समस्या कायमची संपुष्टात आली. याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये बोअरवेललाच ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चं साधन बनवण्याची नवीन संकल्पना अतिशय उपयुक्त ठरत असल्याचं दिसून येतंय. देशभरामध्ये जल संरक्षणाविषयी केलेल्या प्रयोगांच्या अगणित कहाण्या सांगण्यासारख्या आहेत. यामुळे नव भारताच्या संकल्पाला बळकटी मिळत आहे. आज आपल्या जलशक्ती चँपियन्सच्या कथा ऐकण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. जल-संचय आणि जल संरक्षण याविषयी आपण जर काही प्रयोग केले असतील, किंवा आपल्या आजूबाजूला असे काही प्रयोग होत असतील, तर त्यांची माहिती, छायाचित्र किंवा व्हिडिओ ‘‘हॅश-टॅग जलशक्तीफॉरइंडिया’’ यावर जरूर शेअर करावी, असं मी आपल्याला आवाहन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि विशेष करून माझ्या युवा मित्रांनो, आज ‘मन की बात’च्या माध्यमातून मी आसामच्या सरकारचे आणि आसामच्या लोकांचे ‘खेलो इंडिया’चे यजमानपद शानदारपणे भूषवल्याबद्दल खूप-खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, दि. 22 जानेवारी रोजी गुवाहाटीमध्ये तिस-या ‘खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धांचा समारोप झाला. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या जवळपास सहा हजार क्रीडापटूंनी भाग घेतला होता. खेळांच्या या महोत्सवामध्ये जुने 80 विक्रम मोडले. आणि विशेष म्हणजे यामध्ये 56 विक्रम मोडण्याचे काम तर आमच्या कन्यांनी केलं. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. ही सिद्धी, ही कमाल आमच्या मुलींनी करून दाखवली आहे. या क्रीडा स्पर्धेतल्या प्रत्येक खेळाडूचे आणि विजेत्या सर्व स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. त्याच जोडीला ‘खेलो इंडिया’च्या यशस्वी आयोजनामध्ये सहभागी झालेल्या सर्व लोकांचे, प्रशिक्षकांचे आणि तांत्रिक अधिकारी वर्गाचे आभार व्यक्त करतो. दरवर्षी ‘खेलो इंडिया’ या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत असलेल्या क्रीडापटूंची संख्या सातत्याने वाढते आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप सुखद गोष्ट आहे. यामुळे शालेय वयातच मुलांचा कल आता खेळ प्रकारांमध्ये किती वाढतोय, हे दिसून येत आहे. 2018मध्ये ज्यावेळी ‘खेलो इंडिया’ क्रीडास्पर्धा प्रारंभ झाल्या, त्यावर्षी साडे तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. परंतु अवघ्या तीन वर्षांमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंची संख्या सहा हजारांपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास दुप्पट झाली आहे. इतकंच नाही तर, केवळ तीन वर्षांमध्ये ‘खेलो इंडिया गेम्स’च्या माध्यमातून बत्तीसशे प्रतिभाशाली मुले समोर आली आहेत. यामध्ये अनेक मुले गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातली आहेत. ‘खेलो इंडिया गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या मुलांचे आणि त्यांच्या माता-पित्यांचे धैर्य आणि दृढ संकल्प यांच्या कथाही अशाच ऐकण्यासारख्या आहेत. त्या प्रत्येक हिंदुस्तानीला प्रेरक ठरतील. आता गुवाहाटीच्या पूर्णिमा मंडल हिची कहाणी घ्या- ती स्वतः गुवाहाटी नगरपालिकेमध्ये एक सफाई कर्मचारी आहे. परंतु त्यांची कन्या मालविकाने फुटबॉलमध्ये आपलं कौशल्य दाखवलं तर त्यांचा मुलगा सुजीत यानं खो-खो खेळात तर दुसरा मुलगा प्रदीप यानं हॉकीमध्ये आसामचं प्रतिनिधित्व केलं.
अशाच प्रकारची कथा तामिळनाडूच्या योगानंथनची आहे. योगानंथन स्वतः तामिळनाडूमध्ये विड्या वळण्याचे काम करतात. परंतु त्यांची कन्या पूर्णाश्री हिनं वेट लिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून सर्वांची मनं जिंकली. ज्यावेळी मी डेव्हिड बेकहॅमचं नाव घेतो, त्यावेळी तुम्ही सगळे लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुटबॉलर असं नक्कीच म्हणणार. परंतु आता आपल्याकडेही एक डेव्हिड बेकहॅम आहे आणि त्यानं गुवाहाटीच्या युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. तेही सायकलिंग स्पर्धेमध्ये 200 मीटरच्या स्प्रिंट इव्हेंटमध्ये! माझ्यासाठी आनंद साजरा करण्याचे आणखी एक कारण आहे. काही दिवसांपूर्वी मी ज्यावेळी अंदमान-निकोबारला गेलो होतो, तिथं कार-निकोबार या व्दीपावर डेव्हिड वास्तव्य करतो. तो लहान असतानाच त्याच्या डोक्यावरच मातापित्यांचं छत्र हरपलं. त्याचे काका त्याला फुटबॉलर बनवू इच्छित होते, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव प्रसिद्ध फुटबॉलरवरून डेव्हिड ठेवलं. परंतु या डेव्हिडचं मन तर सायकलिंगमध्ये रमलं. ‘खेलो इंडिया’ या योजनेमध्ये त्याची निवडही झाली. आणि आज पहा, सायकलिंगमध्ये डेव्हिडनं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला.
भिवानीचा प्रशांतसिंह कन्हैया याने पोल व्हॉल्ट या इव्हेंटमध्ये स्वतःचा विक्रम मोडतानाच, नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. 19 वर्षाचा प्रशांत एका शेतकरी कुटुंबातून आला आहे. प्रशांत पोल व्हॉल्टचा सराव मातीमध्ये करत होता, हे जाणून आपल्या सर्वांना नवल वाटेल. त्याच्याविषयी ही माहिती मिळाल्यानंतर क्रीडा विभागाने त्याच्या प्रशिक्षकाला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये क्रीडा अकादमी चालवण्यासाठी मदत केली आणि आज प्रशांत तिथंच प्रशिक्षण घेतोय.
मुंबईची करीना शांक्ता हिची कहाणीही वेगळीच आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही, हा तिचा स्वभाव प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. करीनाने स्विमिंगमध्ये 100 मीटर ब्रेस्ट-स्ट्रोक स्पर्धेत भाग घेतला. 17 वर्षाच्या आतल्या गटामध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकून नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवला. इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या करीनाला एका अतिशय अवघड प्रसंगाला सामोरं जावं लागलं. तिच्या गुडघ्याला जखम झाल्यामुळं तिला स्विमिंगचं प्रशिक्षण अर्ध्यावरच सोडावं लागलं होतं. परंतु करीना आणि तिच्या आईनं या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं आणि आज त्याचे सुपरिणाम आपल्या सर्वांसमोर आहेत. या सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो. ज्या पालकांनी गरीबी म्हणजे आपल्या मुलांच्या प्रगतीमधला आणि भविष्यामधला अडथळा आहे, असं कधीच मानलं नाही. अशा सर्व खेळाडूंच्या पालकांनाही देशवासियांच्यावतीने नमन करतो. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आपला नेमका कल कशाकडे आहे, हे समजतं , आपल्यातलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळते त्याचबरोबर इतर दुस-या राज्यांच्या संस्कृतीची ओळखही होते, हे आपल्याला माहिती आहेच. म्हणूनच आम्ही ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या धर्तीवरच दरवर्षी ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो, पुढच्या महिन्यात दिनांक 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ओडिशातल्या कटक आणि भुवनेश्वर इथं पहिल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे आयोजन केलं जात आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तीन हजारांपेक्षा जास्त क्रीडापटूंनी पात्रता फेरी पूर्ण केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, परीक्षेचा हंगाम आता जवळ आला आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थी आता आपआपल्या परीक्षेच्या तयारीला अंतिम रूप देण्यात नक्कीच गर्क असतील. देशातल्या कोट्यवधी विद्यार्थी मित्रांबरोबर ‘परीक्षा पे चर्चा’या कार्यक्रमाचा अनुभव घेतल्यानंतर मी आता मोठ्या विश्वासानं सांगतो की, या देशातल्या युवावर्गामध्ये आत्मविश्वास अगदी पूर्णपणे भरला आहे. आणि हे युवक प्रत्येक आव्हान पेलण्यास समर्थ आहेत.
मित्रांनो, एकीकडे परीक्षा आणि दुसरीकडे कडक थंडीचा काळ, अशा वातावरणामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की, तुम्ही स्वतःला फिट ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडाफार व्यायाम जरूर करावा, थोडावेळ खेळावं. कोणताही खेळ खेळणं म्हणजे फिट राहण्याचा मूलमंत्र आहे. तसं पाहिलं तर अलिकडच्या काळामध्ये ‘फिट इंडिया’ अभियानामध्ये अनेक कार्यक्रम होत असलेले दिसून येतात. 18 जानेवारी रोजी देशभरातल्या युवकांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये लाखो देशवासियांनी फिटनेसचा संदेश दिला. आपला नव भारत संपूर्णपणे फिट असावा, यासाठी प्रत्येक पातळीवर जे प्रयत्न केले जात आहेत, ते पाहून उत्साह निर्माण होतो. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली ‘फिट इंडिया स्कूल’ या मोहिमेला आता चांगलंच यश मिळत आहे. आत्तापर्यंत 65हजारांपेक्षा जास्त शाळांनी या मोहिमेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ‘फिट इंडिया स्कूल’चे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. देशातल्या उर्वरित सर्व शाळांनाही माझा आग्रह आहे की, त्यांनी फिजिकल ॲक्टिव्हीटी म्हणजे शारीरिक कसरती-कवायती आणि क्रीडा यांची सांगड शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर घालावी आणि आपली शाळा ‘फिट स्कूल’ बनवावी. याचबरोबर सर्व देशवासियांना माझं आवाहन आहे की, आपल्या दिनचर्येमध्ये शारीरिक व्यायामाचा अधिकाधिक समावेश करावा, कसरती करण्याला प्राधान्य द्यावं. आपण सर्वांनी रोज स्वतःला एकदा स्मरण द्यावं की, ‘आपण फिट असू तर इंडिया फिट’ असणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन आठवड्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे सण साजरे करण्याचा धडाका सुरू होता. ज्यावेळी पंजाबात लोहडीचा जोश आणि उत्साह होता, त्याचवेळी तामिळनाडूतल्या आपल्या बंधू-भगिनी पोंगलचा सण साजरा करत होते. कुठं तिरूवल्लुवर जयंतीनिमित्त कार्यक्रम होत होता. आसाममध्ये बिहूची मनोहारी छटा पहायला मिळत होती. गुजरातमध्ये चैाहीकडे उत्तरायणची धूम सुरू होती आणि संपूर्ण आकाश पतंगांनी भरून गेलं होतं. याच काळात राजधानी दिल्ली एका ऐतिहासिक घटनेची साक्षीदार बनली! दिल्लीमध्ये एका अतिशय महत्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. या करारामुळे जवळपास 25 वर्षे जुनी ब्रू-रियांग रेफ्यूजी क्रायसेस संपुष्टात आले. एका वेदनादायी प्रकरणाचा अंत झाला. हे क्लेशकारक प्रकरण कायमचे समाप्त झाले. आपण सर्वजण खूप बिझी असता तसंच सण समारंभाचा काळ असल्यामुळे कदाचित तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक कराराविषयी विस्तारपूर्वक माहिती मिळू शकली नसेल. म्हणून आपण याविषयी ‘मन की बात’मध्ये अवश्य चर्चा करावी, असा मी विचार केला. ही समस्या 90 च्या दशकातली आहे. 1997मध्ये जातीय तणावाच्या कारणामुळे ब्रू-रियांग जनजातीच्या लोकांना मिझोराममधून बाहेर पडून त्रिपुरामध्ये शरणार्थी बनावं लागलं. या शरणार्थींना उत्तर त्रिपुरातल्या कंचनपूरस्थित हंगामी शिबिरांमध्ये ठेवलं होतं. ब्रू रियांग समुदायाने आपल्या आयुष्यातला खूप मोठा कालखंड या तात्पुरत्या शिबिरामध्ये घालवून शरणार्थी म्हणून राहताना त्यांचा आयुष्याचा महत्वपूर्ण काळ जणू हरवलाच होता. त्यांच्यासाठी अशा शिबिरामध्ये जीवन कंठणं म्हणजे प्रत्येक पायाभूत सुविधेपासून वंचित राहणं होतं. 23 वर्षे आपलं घर नाही की, आपल्या कुटुंबासाठी जमीन नाही, आजारी पडलो तर औषधोपचाराची काहीही तजवीज नाही. मुलांच्या शिक्षणाची, भविष्याची चिंता तर होतीच. जरा विचार करा, 23 वर्षे अशा निर्वासितांच्या शिबिरामध्ये अतिशय कठिण परिस्थितीमध्ये जीवन जगणे त्यांच्यासाठी दुष्कर झालं असेल. जीवनाच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवसाला अनिश्चित भविष्य बरोबर घेवून जगणं किती कष्टप्रद असणार. अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु या लोकांची पीडा काही कमी झाली नाही. त्यांच्या समस्या काही सुटल्या नाहीत. इतक्या प्रकारचे कष्ट सोसत असतानाही भारतीय घटना आणि संस्कृती यांच्यावर त्यांचा असलेला विश्वास ठाम होता. आणि याच विश्वासाचा चांगला परिणाम म्हणजे आज त्यांच्या जीवनामध्ये एक नवी पहाट उगवली. सामंजस्य करारामुळे आता त्यांना मानानं जीवन जगण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत. अखेर 2020चे नवीन दशक, ब्रू- रियांग समुदायाच्या जीवनामध्ये आकांक्षापूर्तीचे, नवीन आशेचे किरण घेवून आले आहे. जवळपास 34 हजार ब्रू- रियांग शरणर्थीयांना त्रिपुरामध्ये वसवण्यात येणार आहे. इतकंच नाही तर त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने जवळपास 600 कोटी रूपयांची मदतही जाहीर केली आहे. प्रत्येक विस्थापित कुटुंबाला भूखंड देण्यात येणार आहे. घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. त्याचबरोबर त्यांना लागणा-या अन्नधान्य पूर्ततेची हमी सरकारनं घेतली आहे. या समाजातल्या लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्यास जन -कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे. हा सामंजस्य करार अनेक गोष्टींचा विचार करता खूप विशेष आहे. यामधून ‘को-ऑपरेटिव्ह फेडरॅलिझम’ म्हणजेच सहकारी संघराज्यीय भावनेचे दर्शन होते. या सामंजस्य कराराच्यावेळी मिझोराम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. हा सामंजस्य करार दोन्ही राज्यातल्या जनतेच्या सहमतीमुळे आणि शुभेच्छांमुळेच होवू शकला. या कराराबद्दल मी दोन्ही राज्यांची जनता, तिथले मुख्यमंत्री यांचे विशेष आभार व्यक्त करतो. हा सहकार्य करार भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव असलेल्या करूणाभाव आणि सुहृदयता प्रकट करतो. सर्वांना आपलं मानून पुढे जाणे आणि एकजूट बनून राहणे, हे आपल्या या पवित्र भूमीतल्या संस्कारांमध्येच अंतर्भूत आहे. पुन्हा एकदा मी या राज्यातल्या जनतेचे आणि ब्रू- रियांग समुदायाच्या लोकांचे विशेष अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘खेलो इंडिया गेम्स’चं यशस्वी आयोजन करणा-या आसाममध्ये आणखी एक मोठं काम झालं आहे. तुम्ही सर्वांनी याविषयी आलेली बातमी पाहिली असेलही. काही दिवसांपूर्वी आसाममध्ये वेगवेगळ्या आठ दहशतवादी गटातल्या 644 लोकांनी आपल्याकडच्या हत्यारांसहित आत्म-समर्पण केलं. हे सर्व लोक आधी हिंसेच्या मार्गावरून जात होते. त्यांनीच आता शांतीमार्गावर आपला विश्वास आहे आणि देशाच्या विकासकार्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व लोक समाजाच्या मुख्य धारेमध्ये परत आले आहेत. गेल्या वर्षी, त्रिपुरामध्येही 80 पेक्षा जास्त लोक हिंसेचा मार्ग सोडून मुख्यधारेत परतले होते. कोणत्याही समस्येवर हिंसा करूनच उत्तर मिळते, असा विचार करून ज्यांनी हत्यार उचलले होते, त्यांनाही आता हिंसक कृत्यांमागच्या फोलपणाची जाणीव झाली आहे. शांती आणि एकजूटता दाखवली तर कोणत्याही समस्येवर चर्चेने तोडगा निघू शकतो, हे सर्वांना जाणवले आहे. ईशान्य भागातली बंडखोरी आता खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, हे जाणून देशवासियांना नक्कीच खूप आनंद होईल. हिंसक कारवाया, बंडखोरी कमी होण्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्राविषयी असलेला प्रत्येक मुद्दा तसंच प्रश्न शांतीने आणि प्रामाणिकपणाने चर्चा करून सोडवला जात आहे. देशाच्या कोणत्याही कानाकोप-यात आजही हिंसा आणि हत्यार यांच्या बळावर समस्येचे उत्तर शोधणा-या लोकांना आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र काळात आवाहन करतो की, तुम्ही मागे फिरा, परत या!! कोणत्याही मुद्यांवर शांतीपूर्ण पद्धतीने चर्चा करून प्रश्नाचा गंुता सोडवण्याच्या आपल्या आणि या देशाच्या क्षमतेवर भरवसा ठेवा. आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो आहोत. सध्याचे युग हे ज्ञान-विज्ञानाचे आणि लोकशाहीचे युग आहे. हिंसा घडवून आणून तिथल्या लोकांचे जीवन चांगले झाले, अशी एखादी जागा या जगाच्या पाठीवर आहे, असं तुम्ही कधी तरी ऐकलं आहे का? ज्या ठिकाणी शांती आणि सद्भाव जीवन जगण्यासाठी प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत, अशी कुठंतरी जागा आहे का? हिंसा कोणत्याही समस्येवर तोडगा असूच शकत नाही. दुनियेतल्या कोणत्याही एका प्रश्नाची उकल करताना, आणखी एक नवा प्रश्न निर्माण करणे म्हणजे मूळ समस्येवर तोडगा काढल्यासारखे अजिबात नसते. उलट आहे त्या समस्येवर उत्तर शोधणे, हाच पर्याय असू शकतो. चला तर मग, या!! आपण सर्वजण मिळून एका नव भारताच्या निर्माणाच्या कामाला लागू या. इथं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा आधार शांती असेल, असा नवीन भारत आपण सर्वजण मिळून घडवू या! एकजूट होवून प्रत्येक समस्येला तोंड देताना समाधान मिळवण्याचा प्रयत्नही करूया. आणि आपल्यातला बंधुभावच प्रत्येक विभाजनाचा प्रयत्न हाणून पाडू शकणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज प्रजासत्ताक दिवसाच्या पवित्र काळामध्ये मला ‘गगनयान’विषयी बोलताना अपार आनंद होत आहे. देशाने, या क्षेत्रात नवीन दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. 2022 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि त्यावेळी आपण ‘गगनयान मिशन’बरोबर एक भारतवासी अंतराळामध्ये घेवून जाण्याचा संकल्प सिद्ध करायचा आहे. ‘गगनयान मिशन’, म्हणजे 21व्या शतकामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भारताने केलेला ऐतिहासिक पराक्रम असेल. नवीन भारतासाठी हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल.
मित्रांनो, या मिशनमध्ये अॅस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीरासाठी चार उमेदवारांची निवड करण्यात आली आहे, हे आपल्याला ठावूक असेलच. हे चारही युवा भारतीय वायूसेनेचे वैमानिक आहेत. हे बुद्धिमान युवक, भारतातल्या कुशल, प्रतिभावान, साहसी, धाडसी युवकांचे जणू प्रतीक आहेत. आमचे चारही मित्र आगामी काही दिवसातच विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला रवाना होत आहेत. मला विश्वास आहे की, भारत आणि रशिया यांच्या दरम्यान असलेल्या मैत्री आणि सहकार्याचा एक नवा सोनेरी अध्याय या मिशनमुळे सुरू होईल. या चारही मित्रांना तिथं एका वर्षापेक्षा जास्त काळ प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर देशाची आशा आणि आकांक्षा यांना घेवून अंतराळामध्ये भरारी मारण्याची जबाबदारी या चारपैकी कोणा एकावर सोपवण्यात येईल. आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभसमयी या चारही युवकांना आणि या मोहिमेशी जोडले गेलेले भारत आणि रशियाच्या सर्व वैज्ञानिक तसेच अभियंत्यांना मी शुभेच्छा देतो. सर्वांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या मार्चमध्ये एक व्हिडिओ, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवर चर्चेचा विषय बनला होता. चर्चेचा विषय असा होता की, एकशे सात वय वर्षे असलेल्या एका वृद्ध आजीबाईंनी राष्ट्रपती भवनातल्या समारंभामध्ये सर्व सुरक्षा नियम, प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपतीजींना आशीर्वाद दिले होते. ही महिला होती सालूमरदा थिमक्का. या आजीबाईंना कर्नाटकमध्ये ‘वृक्ष माता’ या नावानं ओळखलं जातं. राष्ट्रपती भवनात त्यावेळी पद्म पुरस्कार वितरण समारंभ सुरू होता. अतिशय सामान्य पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या थिमक्कांचं काम मात्र असामान्य आहे. त्यांनी वृक्षसंगोपनामध्ये केलेल्या कामाचं योगदान संपूर्ण देशानं जाणलं. त्यावेळीच त्यांना पद्मश्री सन्मान बहाल करण्यात येत होता.
मित्रांनो, आज भारत आपल्या या महान विभूतींचे कार्य पाहून अभिमानाची भावना अनुभवत आहे. या मातीशी घट्ट जोडले गेलेल्या लोकांचा गौरव करताना देशही गौरवान्वित होत असल्याची भावना निर्माण होत असते. प्रत्येक वर्षाप्रमाणे काल सायंकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माझा आग्रह आहे की, आपण सर्वांनी या पुरस्कारप्राप्त लोकांविषयी माहिती जरूर जाणून घ्यावी. त्यांनी दिलेल्या योगदानाची, त्यांच्या कार्याची आपल्या परिवारामध्ये चर्चा करावी. 2020च्या पद्म पुरस्कारांसाठी यावर्षी 46 हजारांपेक्षा जास्त नामांकने प्राप्त झाली. ही संख्या 2014च्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. हे आकडे जनांचा विश्वास दर्शवणारी आहे. आता पद्म पुरस्कार हा ‘जन-पुरस्कार’ बनला आहे. आज पद्म पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पाडली जाते. यापूर्वी काही वर्षे आधी निर्णय सीमित लोकांकडून घेतले जात होते. आज मात्र सर्व प्रक्रिया लोकांमार्फतच केली जाते. त्यामुळेच पद्म पुरस्कारांविषयी आता देशामध्ये एक नवीन विश्वास आणि सन्मान निर्माण झाला आहे. आता सन्मान मिळवणा-यांपैकी अनेक लोक परिश्रमाची पराकाष्ठा करीत या जमिनीतून वर आलेले असतात. मर्यादित साधन सामुग्रीचा अडथळा आणि आपल्या आजूबाजूला असलेले घनघोर निराशेचे वातावरण, यांच्यातून मार्ग काढत हे लोक पुढं आलेले असतात. वास्तविक त्यांची दृढ इच्छाशक्ती, सेवेची भावना आणि निस्वार्थ भाव आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे असते. सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांनी या पद्म पुरस्कार विजेत्यांची माहिती जरूर घ्यावी, त्यांच्या कार्याविषयी वाचावं, असा विशेष आग्रह करतो. त्यांच्या जीवनाची असामान्य कहाण्या समाजाला ख-या अर्थाने प्रेरणा देत राहणार आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा! हे संपूर्ण दशक आपल्या जीवनामध्ये, भारताच्या जीवनामध्ये नवीन संकल्पाचे बनावे, नवीन सिद्धी मिळणारे बनावे. आणि संपूर्ण विश्वाच्या भारताकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्याचे सामर्थ्य भारताला प्राप्त व्हावे. याच एका विश्वासाने आपण सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने नवीन दशकाचा प्रारंभ करू या! नवीन संकल्पांबरोबरच माँ भारतीसाठी आपण कार्यरत राहू या! खूप-खूप धन्यवाद ! नमस्कार !!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. 2019 चे शेवटचे काही दिवस आपल्या समोर आहेत. तीन दिवसांमध्ये 2019 हे वर्ष संपेल आणि आपण केवळ 2020 मध्ये प्रवेश करणार नाही तर नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत, नवीन दशकात प्रवेश करू, 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार आहोत. मी, सर्व देशवासियांना 2020 साठी हार्दिक शुभेच्छा देतो. या दशकात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे, यात 21 व्या शतकात जन्मलेले लोक देशाच्या विकासाला गती देण्यास सक्रिय भूमिका बजावतील- जे या शतकातील महत्त्वाच्या प्रश्नांना समजून मोठे होत आहेत. अशा तरूणांना, आज वेगवेगळ्या शब्दांनी ओळखले जातात. कोणी त्यांना मिलेनियल म्हणून ओळखतात, कोणी त्यांना जनरेशन झेड किंवा जेन झेड असे म्हणतात. आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट तर अगदी पक्की बसली आहे की ही सोशल मिडिया पिढी आहे. ही पिढी खूप प्रतिभावान आहे याचा अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतो. ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचे, वेगळे करण्याचे स्वप्न बघतात. त्यांची स्वतःची मत देखील आहेत आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे, आणि विशेषतः मी भारताविषयी हे सांगू इच्छितो की, आज जर आपण युवकांना पाहिलंत तर त्यांना आजची व्यवस्था आवडत आहे. एवढेच नाहीतर व्यवस्थेचे अनुसरण करायला देखील आवडते. आणि कधी कुठे एखादी व्यवस्था योग्य रीतीने काम करत नसेल तर ते अस्वस्थ देखील होतात आणि धैर्याने व्यवस्थेला जाब देखील विचारतात. मला हे चांगले वाटते. एक गोष्ट अगदी निश्चित आहे की आपल्या देशातील तरुणांच्या मनात अराजकतेविषयी राग आहे. अनागोंदी कारभार, अस्थिरता यासगळ्या बद्दल त्यांना खूप चीड आहे. त्यांना घराणेशाही, जातिवाद, आपले-परके, स्त्री-पुरुष हे भेदभाव आवडत नाही. कधीकधी आपण पाहतो की विमानतळावर किंवा अगदी सिनेमागृहात, जर कोणी रांगेत उभे असेल आणि कोणीतरी रांगेत मध्येच घुसत असेल तर त्याला सर्वात आधी विरोध करणारे तरुणच असतात. आणि आपण पाहिले आहे की अशी कोणतीही घटना घडत असेल तर दुसरा एखादा तरुण लगेच आपला मोबाइल फोन काढून त्याचा व्हिडिओ बनवतात आणि हा व्हिडिओ लगेच व्हायरल देखील होतो. आणि ज्याची चूक आहे त्याला कळते की काय झाले आहे! तर, एक नवीन प्रकारची प्रणाली, नवीन प्रकारचे युग, नवीन प्रकारचे विचार हे आपल्या तरुण पिढीला प्रतिबिंबित करतात. भारताला आज या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. या तरुणांना देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते – “My Faith is in the Younger Generation, the Modern Generation, out of them, will come my workers”. ते म्हणाले होते – ‘मला तरुण पिढीवर, या आधुनिक पिढीवर विश्वास आहे आणि त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला होता की, यातूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील’. तरूणांविषयी बोलताना ते म्हणाले – “तारुण्याचे मोल कोणी लावू शकत नाही आणि याचे वर्णनही करता येत नाही.” हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ आहे. तुम्ही आपल्या तारुण्याचा उपयोग कशाप्रकारे करता यावर तुमचे भविष्य आणि तुमचे जीवन अवलंबून आहे. विवेकानंद यांच्या म्हणण्यानुसार, जो उर्जेने आणि गतीशिलतेने भरलेला आहे आणि ज्यात बदलण्याची शक्ती आहे तो खरा युवक. मला विश्वास आहे की, भारतात हे दशक, हे दशक केवळ तरुणांच्या विकासासाठीच नव्हे तर तरूणांच्या क्षमतेने देशाचा विकास साध्य करण्याचे देखील सिद्ध होईल आणि ही पिढी भारताच्या आधुनिकतेत खूप मोठी भूमिका बजावणार आहे, हे मला स्पष्टपणे जाणवत आहे. येत्या 12 जानेवारीला विवेकानंद जयंती दिनी, जेव्हा देश युवा दिन साजरा करेल, तेव्हा या दशकातील प्रत्येक तरुणाने आपल्या या जबाबदारीवर चिंतन केले पाहिजे आणि या दशकासाठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कन्याकुमारी मध्ये ज्या खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती, तिथे जे विवेकानंद यांचे स्मारक आहे, त्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या पाच दशकांत हे स्थान भारताचे गौरवस्थान राहिले आहे. कन्याकुमारी, देश आणि जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. ज्या कोणाला देशभक्तीने भारावलेल्या आध्यात्मिक चेतनेचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांचासाठी हे तीर्थस्थान आहे, श्रद्धास्थान आहे. स्वामीजींच्या या स्मारकामुळे प्रत्येक पंथातील, प्रत्येक वयोगटातील लोकांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली आहे.’गरीब नारायणांची सेवा’ हा मंत्र जगण्याचा मार्ग दाखविला आहे. जो कोणी तिथे गेला, त्याच्यात शक्तीचा संचार होणे, सकारात्मकता जागृत होणे, देशासाठी काहीतरी करण्याची भावना जागृत होणे – हे अगदी स्वाभाविक आहे.
आमच्या माननीय राष्ट्रपतींनीही या पन्नास वर्ष जुन्या रॉक स्मारकाला भेट दिली आहे आणि मला आनंद आहे की आमचे उपराष्ट्रपतीही गुजरातमधील कच्छ मध्ये आयोजित झालेल्या महत्वपूर्ण अशा रणमहोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. जेव्हा आमचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती देखील भारतात अशा महत्त्वपूर्ण पर्यटनस्थळांना भेट देतात, तेव्हा देशवासियांना यातून नक्कीच प्रेरणा मिळते – तुम्हीही नक्की जा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये शिकतो हे खरं, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा एक अतिशय आनंददायी क्षण असतो आणि माजी विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यात सर्व तरुण एकत्र येवून जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात, आयुष्य 10 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे मागे जाते. परंतु, कधीकधी माजी विद्यार्थ्यांचा असा मेळावा विशेष आकर्षणाचे कारण बनतो, त्याकडे लक्ष दिले जाते आणि देशवासीयांचे लक्ष देखील तिथे जाणे फार महत्वाचे आहे. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, खरं म्हणजे, जुन्या मित्रांना भेटणे, आठवणींना उजाळा देणे, या सगळ्याचा स्वतःचा एक वेगळा आनंद असतो आणि या सगळ्या सोबत काही खास सामायिक उद्देश असेल, एखादा संकल्प असेल, काही भावना जोडलेल्या असतील, मग तर ते अगदी इंद्रधनुष्यासारखे होते. आपण पाहिले असेलच की कधी कधी हे माजी विद्यार्थी त्यांच्या शाळांसाठी काहीतरी योगदान देतात. काही संगणकीकृत करण्यासाठी व्यवस्था स्थापित करतात, काही चांगले वाचनालय उभारतात, काही पिण्याच्या पाण्याची सोय करतात तर काही नवीन खोल्या बांधण्यासाठी तर काही क्रीडा संकुलासाठी योगदान देतात. काही नं काही तरी करतातच. ज्या ठिकाणी आपले आयुष्य घडले त्यासाठी आयुष्यात काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि असे वाटले देखील पाहिजे आणि यासाठी लोकं पुढाकार देखील घेतात. परंतु, आज मी तुमच्यासमोर एक खास प्रसंग सांगू इच्छित आहे. अलीकडेच प्रसार माध्यमांमध्ये जेव्हा बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील भैरवगंज आरोग्य केंद्राची कथा मी ऐकली तेव्हा मला खूप चांगले वाटले आणि ही गोष्ट तुम्हाला सांगितल्याशिवाय मी राहू शकत नाही. या भैरवगंज आरोग्य केंद्रात, विनामूल्य आरोग्य तपासणीसाठी जवळपासच्या गावातील हजारो लोकांनी गर्दी केली. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला वाटत असेल यात काय नवीन आहे? आली असतील लोकं! तर असे नाही! यात बरेच नवीन आहे. हा कार्यक्रम सरकारी नव्हता, किंवा सरकारचा उपक्रम देखील नव्हता. हे तिथल्या के.आर.हायस्कूल, हा त्याच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, ज्यांतर्गत त्यांनी हे पाऊल उचलले होते आणि त्याला नाव दिले होते ‘संकल्प 95’. ‘संकल्प 95’ चा अर्थ आहे – त्या उच्च माध्यमिक शाळेच्या 1995 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांचा संकल्प! या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला आणि काहीतरी वेगळे करण्याचा विचार केला. यात माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सार्वजनिक आरोग्य जनजागृतीची जबाबदारी स्वीकारली. ‘संकल्प 95’च्या या मोहिमेमध्ये बेतियाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बरीच रुग्णालयेही सहभागी झाली. त्यानंतर, सार्वजनिक आरोग्याबाबत एक मोहीमच सुरू झाली. विनामूल्य तपसणी असो, मोफत औषध देणे असो किंवा जनजागृती करणे असो, ‘संकल्प 95’ हा सर्वांसाठी एक उदाहरण बनला आहे. आपण बऱ्याचदा असे म्हणतो की जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा हा देश 130 कोटी पावले पुढे जातो. जेव्हा अशा गोष्टी समाजात प्रत्यक्षात दिसतात तेव्हा प्रत्येकाला आनंद, समाधान मिळते आणि आयुष्यात काहीतरी करण्याची प्रेरणा देखील मिळते. एकीकडे बिहारच्या बेतीयात माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने आरोग्य सेवा करण्याचा विडा उचलला तर दुसरीकडे उत्तर प्रदेशामधील फुलपूरमधील काही महिलांनी आपल्या उपजीविकेद्वारे संपूर्ण प्रदेशाला प्रेरित केले. जर सगळ्यांनी एकत्र येवून एखादा संकल्प केला तर परिस्थिती बदलण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही हे या महिलांनी सिद्ध केले आहे. काही काळापूर्वी पर्यंत फुलपूरच्या या स्त्रिया आर्थिक अडचणी आणि दारिद्रयामुळे त्रस्त होत्या, परंतु, आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांचात हिंमत होती. या महिला, कादीपूरच्या बचत गटात सहभागी होऊन चप्पल बनवण्याचे कौशल्य शिकल्या, यामुळे त्यांनी केवळ त्यांच्या पायाला टोचलेले हतबलतेचे काटेच काढून टाकले नाहीत तर परंतु स्वावलंबी बनून त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण देखील केले. ग्रामीण उपजीविका मिशनच्या मदतीने आता येथे एक चप्पल बनवण्याचा कारखाना देखील उभारण्यात आला आहे, जिथे आधुनिक मशीनद्वारे चप्पल बनवल्या जात आहेत. मी विशेषत: स्थानिक पोलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो, त्यांनी स्वत:साठी आणि त्यांच्या कुटूंबियांकरिता या महिलांनी बनवलेल्या चप्पल खरेदी करुन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आज या महिलांच्या संकल्पामुळे त्यांच्या केवळ त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीच बळकट झाली नाही तर जीवनस्तरही सुधारला आहे. जेव्हा मी फुलपूरमधील पोलिस कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची चर्चा ऐकतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासीयांना एका गोष्टीची विनंती केली होती आणि मी सांगितले की आपण सर्व देशवासीयांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे. आज पुन्हा एकदा मी सुचवितो, आपण स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊ शकतो? आपण आपल्या खरेदीमध्ये त्यांना प्राधान्य देऊ शकतो? स्थानिक उत्पादनांना आम्ही आमची प्रतिष्ठा आणि अभिमाना सोबत जोडू शकतो? या भावनेने आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचे माध्यम बनू शकतो का? मित्रांनो, कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात प्रकाश देणारा दीपक या भावनेने महात्मा गांधी स्वदेशीकडे पाहत होते. गोरगरीबांच्या जीवनात समृद्धी आणतो. शंभर वर्षांपूर्वी गांधीजींनी एक मोठे जनआंदोलन सुरू केले होते. भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे लक्ष्य होते. गांधीजींनी, स्वावलंबी होण्याचा हा मार्ग दाखविला होता. 2022 मध्ये आपण आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू. ज्या स्वतंत्र भारतात आपण श्वास घेत आहोत, त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लक्ष्यावधी पुत्रांनी, माता-भगिनींनी, अनेक अत्याचार सहन केले आहेत, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. लाखो लोकांचा त्याग, तपश्चर्या, बलिदान यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, ज्या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत, आपण स्वतंत्र आयुष्य जगत आहोत आणि देशासाठी मरणारे, देशासाठी प्राण पणाला लावणारे, ज्ञात-अज्ञात, असंख्य लोक, आपल्याला फारच थोड्या लोकांची नावे माहित असतील-पण त्यांनी त्याग केला आहे – स्वतंत्र भारताचे स्वप्न बघत – समृद्ध, सुखी, संपन्न, स्वतंत्र भारतासाठी!
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत आहेत, कमीतकमी या दोन-तीन वर्षांत आपण स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आग्रह करू शकतो का? भारतात तयार झालेल्या, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेल्या, ज्याला आपल्या देशवासियांच्या घामाचा सुंगंध येत आहे, आपण अशा वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरू शकतो का? मी फार जास्त कालावधीसाठी हे म्हणत नाही, स्वातंत्र्याच्या 75 वर्षापर्यंत, केवळ 2022 पर्यंत मी हे बोलत आहे. आणि हे काम सरकारी नसावे, ठिकठिकाणी तरुणांनी पुढे यावे, लहान लहान संघटना तयार कराव्यात, लोकांना प्रोत्साहन द्यावे, समजावून सांगा आणि निर्णय घ्या – चला, आपण स्थानिक उत्पादनांची खरेदी करू, स्थानिक उत्पादनांवर भर देऊ, ज्यात देशवासीयांच्या घामाचा सुगंध आहे – तोच माझ्या स्वतंत्र भारताचा आनंदी क्षण आहे, चला हे स्वप्न बघत आपण पुढे जाऊया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, देशातील नागरिकांनी स्वावलंबी बनून सन्मानाने आपले जीवन जगावे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचे आहे. अशा एका उपक्रमाबद्दल मी चर्चा करू इच्छितो ज्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि तो उपक्रम म्हणजे जम्मू-काश्मीर आणि लडाखचा ‘हिमायत कार्यक्रम’. हिमायत प्रत्यक्षात कौशल्य विकास आणि रोजगार यांच्याशी संबंधित आहे. यात, 15 ते 35 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले आणि तरूण सहभागी होतात. हे जम्मू-काश्मीरचे ते लोकं आहेत ज्यांचे काही कारणास्तव शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही, ज्यांना अर्ध्यावर शाळा आणि महाविद्यालय सोडावे लागले.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला हे ऐकून खूप आनंद होईल की मागील दोन वर्षांत या उपक्रमांतर्गत अठरा हजार युवकांना वेगवेगळ्या 77 व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात आले. यापैकी सुमारे पाच हजार लोक कुठेतरी नोकरी करत आहेत आणि बऱ्याच जणांनी स्वयंरोजगाराच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. हिमायत कार्यक्रमाद्वारे आपले जीवन बदलून टाकणाऱ्या या लोकांच्या कथा खरोखर माझ्या मनाला भिडणाऱ्या आहेत.
परवीन फातिमा – तमिळनाडूच्या तिरुपुरात गारमेंट युनिटमध्ये पदोन्नतीनंतर सुपरवायझर-कम-कोऑर्डिनेटर बनली आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत ती कारगिलच्या एका छोट्याशा गावात राहत होती. आज तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला आहे, तिला आत्मविश्वास आला आहे – ती स्वावलंबी झाली आहे आणि तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी देखील तिने आर्थिक विकासाची संधी आणली आहे. परवीन फातिमा प्रमाणेच, हिमायत कार्यक्रमामुळे, लेह-लडाख भागातील अन्य मुलींचे, रहिवाशांचे नशीब बदलले आहे आणि ते सर्व आज तामिळनाडूमध्ये एकाच कंपनीत काम करत आहेत. त्याचप्रमाणे डोडाच्या फियाज अहमदसाठी हिमायत वरदान ठरले. फियाजने 2012 मध्ये 12 वीची परीक्षा दिली, परंतु आजारपणामुळे तो त्याचे शिक्षण पुढे पूर्ण करू शकला नाही. फियाज, दोन वर्षांपासून हृदयरोगाशी झुंज देत होता. दरम्यान, त्याचा एक भाऊ आणि एक बहिणीचाही मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर एक प्रकारे संकटांचा डोंगर कोसळला. अखेरीस त्यांना हिमायतकडून मदत मिळाली. त्यांनी हिमायतमार्फत आयटीईएस म्हणजेच माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा यामध्ये प्रशिक्षण घेतले आणि आज तो पंजाबमध्ये नोकरी करत आहे.
फियाज अहमद यांनी पदवीचे शिक्षण त्यांनी सुरु ठेवले होते, ते ही आता पूर्ण होईल. अलीकडेच हिमायातच्या एका कार्यक्रमात त्यांना आपला अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आपली गोष्ट सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याचप्रमाणे अनंतनागचा रकीब-उल-रहमान आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकला नाही. एके दिवशी, रकीबला त्याच्या विभागातील मोबिलायझेशन शिबिरातून हिमायत कार्यक्रमाची माहिती मिळाली. रकीबने लगेच रिटेल टीम लीडर कोर्समध्ये प्रवेश घेतला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आज तो एका कॉर्पोरेट हाऊसमध्ये नोकरी करत आहेत. ‘हिमायत मिशन’ च्या लाभ प्राप्त झालेले, प्रतिभावान युवकांची अशी अनेक उदाहरणे आहेत जे जम्मू-काश्मीरच्या परिवर्तनाचे प्रतिक बनले आहेत. हिमायत कार्यक्रम सरकार, प्रशिक्षण भागीदार, नोकरी देणाऱ्या कंपन्या आणि जम्मू-काश्मीरमधील लोक यांच्यात असलेल्या ताळमेळाचे एक आदर्श उदाहरण आहे. या कार्यक्रमामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुणांमध्ये नवा आत्मविश्वास जागृत झाला आहे आणि प्रगतीचा पुढील मार्गही प्रशस्त झाला आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 तारखेला आपण या दशकातील शेवटचे सूर्यग्रहण पाहिले. कदाचित या सूर्यग्रहणामुळेच, रिपुनने Mygov वर एक अतिशय रोचक प्रतिक्रिया लिहिली आहे. तो लिहितो … ‘नमस्कार सर, माझे नाव रिपुन आहे. मी ईशान्य भारतातील आहे पण सध्या मी दक्षिणेत काम करतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मला आठवतंय की आमच्याकडे आभाळ स्वच्छ असल्यामुळे आम्ही तासन् तास आकाशातील ताऱ्यांकडे पहात रहायचो. ताऱ्यांकडे टक लावून बघायला मला खूप आवडायचे. आता मी एक व्यावसायिक आहे आणि माझ्या दैनंदिन कामांमुळे, मी या गोष्टींसाठी आता वेळ देऊ शकत नाही … आपण या विषयाबद्दल थोडेसे बोलू शकता का? विशेषतः तरुणांमध्ये खगोलशास्त्र कसे लोकप्रिय होऊ शकते? ‘
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला बऱ्याच सूचना येत असतात, परंतु या प्रकारची सूचना कदाचित प्रथमच माझ्याकडे आली आहे असे मी म्हणू शकतो. तसे पहिले तर, विज्ञानावर, बऱ्याच बाबींवर बोलण्याची मला संधी मिळाली आहे. विशेषत: तरुण पिढीच्या विनंती वरून मला बोलण्याची संधी मिळाली आहे. परंतु या विषयावर कधी बोलणेच झाले नाही आणि आता 26 तारखेलाच सूर्यग्रहण झाले आहे, त्यामुळे कदाचित आपल्यालाही या विषयामध्ये रस असेल असे वाटते. सर्व देशवासीयांप्रमाणे, विशेषत: माझ्या तरुण मित्रांप्रमाणे, मी देखील 26 तारखेला, सूर्यग्रहण होते, तेव्हा देशवासियांप्रमाणेच मला देखील आणि माझ्या तरुण पिढीच्या मनातील उत्साहाप्रमाणे माझ्या मनात देखील उत्साह होता आणि मलासुद्धा सूर्यग्रहण पहायचे होते, पण दुर्दैवाने त्या दिवशी दिल्लीत आकाश ढगाळ होते आणि मला त्याचा आनंद घेता आला नाही, परंतु, टीव्हीवर कोझिकोड आणि भारताच्या इतर भागात दिसणारी सूर्यग्रहणाची सुंदर छायाचित्रे बघायला मिळाली. सूर्य एका चमकणाऱ्या अंगठीच्या आकाराचा दिसत होता. आणि त्या दिवशी मला या विषयातील काही तज्ञांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळाली आणि ते सांगत होते की चंद्र पृथ्वीपासून फारच दूर आहे म्हणून हे घडते आणि म्हणूनच त्याचा आकार सूर्याला पूर्णपणे व्यापत नाही. अशाप्रकारे, एका अंगठीचा आकार तयार होतो. हे सूर्यग्रहण, एक वार्षिक सूर्यग्रहण ज्याला खंडग्रास ग्रहण देखील म्हणतात. ग्रहण आपल्याला आपण पृथ्वीवर राहत असून अंतराळात फिरत असल्याची आठवण करून देते. सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांसारखेच अवकाशात अनेक ग्रह फिरत असतात. चंद्राच्या सावलीमुळेच आपल्याला ग्रहणांचे विविध प्रकार दिसतात. मित्रांनो, भारताला खगोलशास्त्राचा खूप प्राचीन आणि गौरवशाली इतिहास आहे. आकाशातील चमकणाऱ्या ताऱ्यांशी आपला संबंध आपल्या संस्कृतीइतकाच जूना आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित असेल की भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय भव्य जंतर-मंतर आहेत, जे पाहण्यासारखे आहेत. आणि, या जंतर-मंतरचा खगोलशास्त्राशी थेट संबंध आहे. आर्यभट्टांच्या महान प्रतिभेबद्दल कोणाला माहिती नाही! आपल्या कारर्किदित त्यांनी सूर्यग्रहणासह चंद्रग्रहणाची सविस्तर व्याख्या दिली आहे. तात्विक आणि गणितीय दोन्ही दृष्टीकोनातून ही व्याख्या केली आहे. पृथ्वीच्या सावलीच्या आकाराची गणना कशी करावी हे त्यांनी गणिताच्या आधारे स्पष्ट केले. त्यांनी ग्रहण कालावधी आणि त्याची गणना करण्यासाठी अचूक माहिती दिली. भास्कर यांच्यासारख्या त्यांच्या शिष्यांनी ही प्रेरणा आणि हे ज्ञान पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पुढे, चौदाव्या – पंधराव्या शतकात, केरळमधील, संगम गावचे माधव, यांनी ब्रह्मांडात अस्तित्वात असणाऱ्या ग्रहांची स्थिती मोजण्यासाठी कॅल्क्युलसचा वापर केला. रात्रीचे आकाश हा केवळ कुतूहलाचा विषय नव्हता तर तो गणिताच्या दृष्टीने विचार करायला लावणारा आणि शास्त्रज्ञांसाठी एक महत्त्वाचा स्त्रोत होता. काही वर्षांपूर्वी मी ‘प्री-मॉडर्न कच्छी नॅव्हिगेशन टेक्निक अँड वॉयजेस’ या पुस्तकाचे अनावरण केले होते. हे पुस्तक एक प्रकारे ‘मालमची डायरी’ आहे. मालम याने खलाशी म्हणून त्याने अनुभवलेल्या प्रसंगांची आपल्या शब्दात डायरीत नोंद करून ठेवली आहे. आधुनिक युगात, त्याच मालमच्या पोथींचा संग्रह आणि तो देखील गुजराती हस्तलिखित संग्रह आहे, ज्यामध्ये पुरातन नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे वर्णन केले आहे आणि आकाश, तारे, ताऱ्यांच्या हालचालींचे वर्णन ‘मालम नि पोथी’ मध्ये केले आहे;आणि हे स्पष्टपणे सांगितले आहे की समुद्रात प्रवास करताना, ताऱ्यांच्या मदतीने दिशा निश्चित केली जाते. तारे इच्छितस्थळी पोहोचण्याचा मार्ग दाखवतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, खगोलशास्त्राच्या क्षेत्रात भारत खूपच पुढे आहे आणि आपले उपक्रम, पथप्रवर्तक देखील आहेत. आपल्याकडे पुण्याजवळ एक विशालकाय मीटरवेव्ह दुर्बीण आहे. एवढेच नव्हे तर कोडाईकनाल, उदगमंडलम, गुरु शिखर आणि हणले लडाख इथेही शक्तिशाली दुर्बिणी आहेत. 2016 मध्ये बेल्जियमचे तत्कालीन पंतप्रधान आणि मी नैनितालमध्ये 6.6 मीटर देवस्थल ऑप्टिकल दुर्बिणीचे उद्घाटन केले होते. ही आशियातील सर्वात मोठी दुर्बीण आहे. इस्रोकडे एस्ट्रोसॅट नावाचा एक खगोलशास्त्रीय उपग्रह आहे. सूर्याबद्दल संशोधन करण्यासाठी इस्रो ‘आदित्य’ या नावाने आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. खगोलशास्त्राविषयी, आपले प्राचीन ज्ञान असो की आधुनिक यश, आपण त्यांना समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा अभिमान बाळगला पाहिजे. आज, आपल्या तरुण शास्त्रज्ञांमध्ये, केवळ त्यांचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याची तीव्र इच्छा नाही, तर त्यांच्यात खगोलशास्त्राच्या भविष्याबद्दल देखील एक दृढ इच्छाशक्ती आहे.
आपल्या देशातील तारामंडळ रात्रीचे आकाश समजावून घेण्याबरोबरच स्टार गेझिंगला देखील छंद म्हणून विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. बरेच लोक छत किंवा बाल्कनीमध्ये दुर्बिणी छंद म्हणून ठेवतात. स्टार गेझिंगमुळे/ताऱ्यांचे निरीक्षण करण्याच्या सवयीमुळे ग्रामीण शिबिरे आणि ग्रामीण सहलीला देखील चालना मिळू शकते. आणि अशी अनेक शाळा-महाविद्यालये आहेत जी खगोलशास्त्र क्लब स्थापन करतात आणि हा प्रयोग पुढे सुरु ठेवला पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या संसदेला आपण लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखतो. आज मला एक गोष्ट अभिमानाने सांगायची आहे की आपण ज्या प्रतिनिधींची निवड करुन त्यांना संसदेत पाठविले आहे, त्या प्रतिनिधींनी गेल्या 60 वर्षातील सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या सहा महिन्यांत 17 व्या लोकसभेत दोन्ही अधिवेशने खूपच यशस्वी ठरली. लोकसभेने 114 टक्के काम केले, तर राज्यसभेने 94 टक्के काम केले आणि त्याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जवळपास 135 टक्के काम झाले होते. रात्री उशिरापर्यंत संसदेचे काम सुरु होते. मी हे यासाठी सांगत आहे कारण यासाठी सर्व खासदार अभिनंदनास पात्र आहेत. आपण ज्या लोकप्रतिनिधींना संसदेत पाठविले त्यांनी साठ वर्षांचे सर्व विक्रम मोडले आहेत. इतके काम होणे हे भारतीय लोकशाहीची ताकद आणि लोकशाहीप्रती असलेला विश्वास दाखवणारा आहे. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांच्या सक्रिय सहभागाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सूर्य, पृथ्वी, चंद्राची गती फक्त ग्रहण निश्चित करत नाही तर बऱ्याच गोष्टी देखील याच्याशी निगडीत आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की जानेवारीच्या मध्यावर, सूर्याच्या गतीवर अवलंबून असणारे वेगवेगळे सण भारतभर साजरे केले जातील. पंजाब ते तामिळनाडू आणि गुजरात ते आसामपर्यंत लोक अनेक सण साजरे करतील. जानेवारीत मोठ्या उत्साहात मकरसंक्रांत आणि उत्तरायण साजरे केले जातात. त्यांना उर्जेचे प्रतीक देखील मानले जाते. याचदरम्यान, पंजाबमध्ये लोहड़ी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आणि आसाममध्ये माघ-बिहू हे सण साजरे केले जातील. या सणांचं शेतकरी आणि शेतीशी खूप जवळच नातं आहे. हे सण आपल्याला भारताचे ऐक्य आणि विविधता याची आठवण करून देतात. पोंगलच्या शेवटच्या दिवशी आपल्याला तिरूवल्लुवर जयंती साजरी करण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हा दिवस महान लेखक-विचारवंत संत तिरुवल्लुवर यांच्या जीवनासाठी समर्पित आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2019 ची ही शेवटची ‘मन की बात’ आहे. 2020 मध्ये आपण पुन्हा भेटू. नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह – चला पुढे जाऊया. संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्ती एकत्र करूया. खूप दूरवर जायचे आहे, बरेच काही करायचे आहे, देशाला नवीन उंचीवर न्यायचे आहे. 130 कोटी देशवासीयांच्या प्रयत्नांवर, त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या संकल्पावर, विश्वास ठेवून मार्गक्रमण करूया. मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप – खूप शुभेच्छा !!!
माझ्या प्रिय देशवासीयांनो, ‘मन की बात’ मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज ‘मन की बात’ ची सुरुवात युवा देशाच्या युवकांपासून.. तो उत्साह, ती देशभक्ती, सेवेच्या रंगात रंगलेले ते नौजवान. तुम्हाला माहिती आहे ना? नोव्हेंबर महिन्याचा चौथा रविवार दरवर्षी एनसीसी डे म्हणजेच राष्ट्रीय छात्रसेना दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. साधारणपणे आमच्या तरुण पिढीला फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री दिन अगदी नक्की लक्षात राहतो पण खूप लोक असेही आहेत की ज्यांना राष्ट्रीय छात्र सेना दिवस पण तेवढाच लक्षात राहतो. तर चला, आज एनसीसीच्या विषयी काही बोलू या. मला पण काही आठवणी ताज्या करण्याची संधी मिळेल. सर्वात आधी तर, राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व माजी व आजी छात्रसैनिकांना राष्ट्रीय छात्र सेना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी पण आपल्यासारखाच एक छात्र सैनिक राहिलेलो आहे आणि मनाने आजदेखील स्वत:ला छात्र सैनिक मानतो. हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, एनसीसी, नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. भारतातील राष्ट्रीय छात्र सेना हि जगभरातल्या सर्वात मोठ्या गणवेशधारी युवा संघटनांपैकी एक आहे. हि एक त्रिदलीय सेवा संघटना आहे, ज्यात सेना, नौ सेना आणि वायुसेना तीनही सामील आहेत. नेतृत्व, देशभक्ती, निस्वार्थ सेवा, शिस्त, परिश्रम हे सर्व गुण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनवण्याचा, आपली सवय बनवण्याचा एक रोमांचक प्रवास म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना. या प्रवासाविषयी आणखी काही बोलण्यासाठी फोनवरून भेटूयात काही नौजवानांना, ज्यांनी एनसीसी मध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. चला तर, या, त्यांच्याशी गप्पा मारुया !
पंतप्रधान: मित्रांनो, आपण सगळे कसे आहात?
तरन्नुम खान: जय हिंद, प्रधानमंत्रीजी !
पंतप्रधान: जय हिंद!
तरन्नुम खान: सर, माझं नाव ज्युनिअर अंडर ऑफिसर तरन्नुम खान आहे.
पंतप्रधान: तरन्नुम, आपले गाव कोणते आहे?
तरन्नुम खान: मी दिल्लीला राहते, सर.
पंतप्रधान: अच्छा! तर मग एनसीसीचा किती वर्षांचा अनुभव आहे आपल्याला?
तरन्नुम खान: सर, मी एनसीसी मध्ये 2017 मध्ये भरती झाले आणि ही तीन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात चांगली तीन वर्ष आहेत.
पंतप्रधान: ऐकून खूप आनंद झाला.
तरन्नुम खान: सर, मला तुम्हाला सांगायला आवडेल की
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले. तेहरा म्हणतात त्या नृत्याला आणि त्यांनी मला मेखला नेसायला पण शिकवलं. खरं सांगते, मेखला नेसून आम्ही सगळे दिल्ली वाले तसेच आमच्या नागालँडच्या मैत्रिणी पण खूप सुंदर दिसत होतो. आम्ही त्यांना दिल्ली दर्शन ला घेऊन गेलो. त्यांना नॅशनल वॉर मेमोरियल आणि इंडिया गेट दाखवलं. तिथे मी त्यांना दिल्लीची चाट पण खायला घातली. भेळपुरी पण दिली पण त्यांना ती थोडी तिखट लागली. त्यांनी आम्हाला सांगितलं की जास्तकरून ते सूप पिणं पसंत करतात. थोड्या उकडलेल्या भाज्या खातात. म्हणून त्यांना इथले खाणे एवढं आवडलं नाही. याशिवाय आम्ही त्यांच्याबरोबर खूप फोटो काढून घेतले. एकमेकांचे अनुभव जाणून घेतले.
पंतप्रधान: अजूनही आपण त्यांच्या संपर्कात आहात का?
तरन्नुम खान: हो सर, आम्ही अजूनही संपर्कात आहोत.
पंतप्रधान: चला, हे छान केलं तुम्ही.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: अजून कोण कोण साथी आहेत आपल्यासोबत?
श्री हरी जी वी: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद!
श्री हरी जी. वी.: मी सिनिअर अंडर ऑफिसर श्री हरी जी वी बोलतोय मी बंगळुरु, कर्नाटकचा राहणारा आहे.
पंतप्रधान: कुठे शिकता तुम्ही?
श्री हरी जी वी.: सर, बंगळुरु मधल्या क्रिस्तू जयंती कॉलेजमध्ये.
पंतप्रधान : अच्छा, बंगळुरूमध्येच आहे.
श्री हरी जी वी : हो सर
पंतप्रधान: बोला
श्री हरी जी वी : सर, मी कालच युथ एक्सचेंज प्रोग्राममधून , सिंगापूरहून परत आलो
पंतप्रधान: अरे वा!
श्री हरी जी वी : हो सर
पंतप्रधान: तुम्हाला संधी मिळाली तर तिथे जाण्याची !
श्री हरी जी वी: हो सर
पंतप्रधान: कसा होता सिंगापूरचा अनुभव?
श्री हरी जी वी: तिथे युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका, सिंगापूर, ब्रूनेई, हाँगकाँग आणि नेपाळ असे सहा देश आले होते. तिथे आम्ही ही कॉम्बॅट लेसन्स आणि इंटरनॅशनल मिलिटरी एक्सरसाइज मधील एक एक्सचेंज शिकलो. इथे आमची कामगिरी काही वेगळीच होती, सर. आम्हाला ह्यातील वॉटर स्पोर्ट्स आणि एडवेंचर ऍक्टिव्हिटीज शिकवली होती आणि वॉटर पोलो टूर्नामेंटमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला सर. आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आम्ही सादरीकरण केले सर. आमची कवायत आणि 95 ऑफ कमांड त्यांना खूप चांगली वाटली सर.
पंतप्रधान: तुम्ही किती जण होतात?
श्री हरी जी वी: आम्ही वीसजण होतो सर. आम्ही दहा मुलं आणि दहा मुली होत्या सर
पंतप्रधान: भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून होत्या का ?
श्री हरी जी वी: हो सर
पंतप्रधान: चला, तुमचे सगळे मित्र तुमचे अनुभव ऐकण्यासाठी आतुर झालेले असतील. मला पण छान वाटले. अजून कोण आहे आपल्या बरोबर?
विनोले किसो: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद!
विनोले किसो: माझं नाव सिनिअर अंडर ऑफिसर विनोले किसो. मी ईशान्य भाग -नागालँड राज्यातून आलो आहे सर.
पंतप्रधान: हं, विनोले किसो, तुमचा अनुभव काय आहे?
विनोले किसो: सर, मी सेंट जोसेफ कॉलेज जकहामा ( स्वायत्त) मध्ये शिकतो. बी. ए इतिहास (ऑनर्स) शिकतो आहे. मी 2017 ह्या वर्षी एनसीसीत सहभागी झालो आणि हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि चांगला निर्णय होता सर.
पंतप्रधान: एनसीसी मुळे हिंदुस्थानात कुठे कुठे फिरण्याची संधी मिळाली?
विनोले किसो: सर, एनसीसीमध्ये सहभागी झालो आणि खूप शिकायला मिळालं. खूप संधीही मिळाल्या. माझा एक अनुभव आहे सर, जो मी आपल्याला सांगू इच्छितो. याच वर्षी म्हणजे 2019 च्या जून महिन्यात मी एका शिबिरात सहभागी झालो होतो. तो होता कंबाइंड ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प आणि तो सॅझोली कॉलेज कोहिमा येथे घेण्यात आला. या कॅम्प मध्ये चारशे छात्र सहभागी झाले होते.
पंतप्रधान: तर मग नागालँड मधले सगळे मित्र तुम्ही हिंदुस्थानात कुठे गेलात, काय पाहिलं, हे ऐकायला उत्सुक असतील. तुम्ही आपले अनुभव सांगता का सगळ्यांना?
विनोले किसो: हो सर
पंतप्रधान: अजून कोण आहे आपल्या बरोबर?
अखिल: जय हिंद सर! माझं नाव ज्युनिअर अंडर ऑफिसर अखिल आहे.
पंतप्रधान: हं, अखिल बोला.
अखिल: मी रोहतक हरियाणा चा राहणारा आहे सर
पंतप्रधान: हं
अखिल : दयाल सिंह कॉलेज दिल्ली विश्व विद्यापीठात भौतिक शास्त्र (ऑनर्स) करत आहे सर.
पंतप्रधान: हं हं……
अखिल: सर, मला एनसीसी मधली शिस्त सगळ्यात जास्त आवडते सर.
पंतप्रधान: व्वा!
अखिल: त्यामुळे मी जास्त जबाबदार नागरिक बनलो आहे सर. राष्ट्रीय छात्र सेनेतील सैनिकांची कवायत आणि गणवेश मला खूप आवडतो.
पंतप्रधान: किती शिबिरांना जाण्याची संधी मिळाली? कुठे कुठे जाण्याची संधी मिळाली?
अखिल: सर, मी तीन शिबिरांना गेलो आहे सर. नुकताच मी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकॅदमी अटॅचमेंट कॅम्पला जाऊन आलो.
पंतप्रधान: किती कालावधीचे होतं हे शिबिर?
अखिल: सर, हे शिबिर 13 दिवसांचं होतं.
पंतप्रधान: अच्छा!
अखिल: सर, भारतीय सेनेतील अधिकारी कसे तयार होतात हे तिथे मला अगदी जवळून बघायला मिळालं आणि त्यानंतर भारतीय सेनेतील अधिकारी बनण्याचा माझा संकल्प अधिकच दृढ झाला सर.
पंतप्रधान: व्वा!
अखिल: आणि सर मी भारतीय गणतंत्र दिवसाच्या परेडमध्ये पण भाग घेतला होता आणि ती माझ्यासाठी तसेच माझ्या परिवारासाठी खूपच अभिमानाची गोष्ट होती.
पंतप्रधान: शाब्बास!
अखिल: माझ्यापेक्षा माझी आई जास्त खुश होती सर! जेव्हा आम्ही पहाटे दोन वाजता उठून राजपथावर सरावाला जायचो तेव्हा आमचा उत्साह बघण्याजोगा असायचा. इतर सैन्यदलातले लोक तर आम्हाला इतकं प्रोत्साहन द्यायचे. राजपथावर संचलन करताना आमच्या अंगावर रोमांच उभे राहायचे सर.
पंतप्रधान: चला तुम्हा चौघांशी गप्पा मारायची संधी मिळाली आणि ती पण राष्ट्रीय छात्रसेना दिवस असताना. माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी भाग्यवान होतो कारण मला लहानपणी आमच्या गावच्या शाळेत राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्रसैनिक होता आले. म्हणून मला माहिती आहे ही शिस्त, हा गणवेश आणि त्यामुळे वाढणारा आत्मविश्वास. या सगळ्या गोष्टी लहानपणी मला राष्ट्रीय छात्र सेना कॅडेटच्या रूपात अनुभवण्याची संधी मिळाली होती.
विनोले किसो: प्रधानमंत्री जी माझा एक प्रश्न आहे.
पंतप्रधान: हं, विचारा.
तरन्नुम खान: तुम्ही पण एनसीसीत सहभागी झाला होतात..
पंतप्रधान: कोण विनोले बोलत आहे का?
विनोले किसो: हो सर.. हो सर
पंतप्रधान: हं.. बोला विनोले
विनोले: तुम्हाला कधी शिक्षा झाली होती का?
पंतप्रधान: ( हसून) याचा अर्थ तुम्हा लोकांना शिक्षा मिळते तर!
विनोले: हो सर
पंतप्रधान: नाही, मला कधी मिळाली नाही. कारण मी खूपच शिस्त पाळणारा छात्र होतो. पण एका वेळी गैरसमज मात्र नक्की झाला होता. एकदा आम्ही शिबिरात होतो तेव्हा मी एका झाडावर चढलो होतो. तर सुरुवातीला असंच वाटलं कि मी काही नियम तोडलेला आहे. पण नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं कि तिथे पतंगाच्या दोरात एक पक्षी अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी मी झाडावर चढलो होतो. तर, सुरुवातीला तर वाटलं होतं कि माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल पण नंतर मात्र माझे खूप कौतुक झाले. अशाप्रकारे मला एक वेगळाच अनुभव मिळाला.
तरन्नुम खान: हो सर हे ऐकून खूपच चांगले वाटले सर.
पंतप्रधान: धन्यवाद!
तरन्नुम खान: मी तरन्नुम बोलते आहे.
पंतप्रधान: हा बोला.
तरन्नुम खान: आपली परवानगी असेल तर मला एक प्रश्न विचारायचा आहे.
पंतप्रधान: हो विचारा ना.
तरन्नुम खान: सर, आपण आपल्या संदेशात आम्हाला सांगितलं आहे कि प्रत्येक भारतीय नागरिकांनी तीन वर्षात कमीत कमी पंधरा ठिकाणी तरी जायलाच हवं. तर तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की आम्ही कुठे जावे आणि तुम्हाला कोणत्या जागी जाऊन सर्वात चांगले वाटले होते?
पंतप्रधान: तसं तर मी नेहमी हिमालय जास्त पसंत करतो.
तरन्नुम खान: हो
पंतप्रधान: तरीपण मी भारतीय लोकांना आग्रह करेन कि जर का तुम्हाला निसर्गाविषयी प्रेम असेल.
तरन्नुम खान: हां
पंतप्रधान: घनदाट जंगल, झरे, एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण बघायचं असेल तर मी म्हणेन की आपण ईशान्य भारतात नक्की जा.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: हे मी नेहमी सांगतो आणि त्यामुळे ईशान्य भारतातील पर्यटन खूप वाढेल, अर्थव्यवस्थेला पण बराच फायदा होईल आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या स्वप्नाला अजून बळकटी मिळेल.
तरन्नुम खान: हो सर
पंतप्रधान: पण हिंदुस्थानात प्रत्येक ठिकाणी खूप काही बघण्याजोगे आहे, शिकण्याजोगे आहे आणि एका प्रकारे मन प्रसन्न करण्याजोगे आहे.
श्री हरी जी वी : प्रधानमंत्रीजी, मी श्री हरी बोलतो आहे.
पंतप्रधान: हां, हरी बोला
श्री हरी जी वी: मी आपल्याकडून जाणू इच्छितो, आपण जर का एक राजकारणी झाला नसतात तर काय झाला असता?
पंतप्रधान: हा तर खूपच अवघड प्रश्न कारण प्रत्येक मुलाच्या आयुष्यात अनेक टप्पे येतात. कधी हे व्हावे असं वाटतं तर कधी ते व्हावं असं वाटतं. पण ही गोष्ट मात्र खरी आहे की मला कधीही राजकारणात जावं असं वाटलं नव्हतं. कधी मी तसा विचारही केला नव्हता. पण आता जेव्हा पोहोचलोच आहे तर सर्वस्वाने देशाच्या कामी कसा येईन त्याचाच विचार करत राहतो आणि म्हणूनच तर आता, ‘मी इथे नसतो तर कुठे असतो’ असा विचारच मला करायला नको. आता तर तनामनाने जिथे आहे तिथेच मनःपूर्वक जगायला पाहिजे, सर्वस्व अर्पण केले पाहिजे आणि देशासाठी खूप काम केलं पाहिजे. ना दिवस बघायचा आहे न रात्र. याच एका उद्देशाने मी स्वतःला समर्पित केले आहे.
अखिल: प्रधानमंत्रीजी..
पंतप्रधान: हं
अखिल: आपण दिवसभर इतके व्यस्त असता तर मला कुतूहल आहे की तुम्हाला टीव्ही बघायला, सिनेमा बघायला किंवा पुस्तक वाचायला वेळ कधी मिळतो?
पंतप्रधान: हं, तसं तर मला पुस्तक वाचायला आवडायचं. सिनेमा बघायला कधीच विशेष आवडलं नाही. यात वेळेचे बंधन तर आहेच. कधी टीव्ही पण पाहू शकत नाही. खूपच कमी पाहतो. पूर्वी कधीतरी डिस्कव्हरी चॅनल पाहायचो, जिज्ञासा म्हणून. पुस्तकं देखील वाचायचो. पण आजकाल मात्र वाचायला वेळ मिळत नाही आणि दुसरे म्हणजे गुगल मुळे वाईट सवय लागली आहे की काही संदर्भ बघायचा असेल तर लगेच शॉर्टकट शोधतो. जशी सगळ्यांचीच सवय बिघडली आहे, माझी पण बिघडली आहे.
चला मित्रांनो, मला तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि मी तुमच्या माध्यमातून एनसीसीच्या सगळ्या छात्रांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो धन्यवाद.
सगळे छात्र: खुप खुप धन्यवाद सर
पंतप्रधान: धन्यवाद धन्यवाद
सगळे छात्र: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद
सगळेछात्र: जय हिंद सर
पंतप्रधान: जय हिंद जय हिंद
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण सगळ्या देशवासियांनी हे कधीच विसरून चालणार नाही कि सात डिसेंबरला सशस्त्र सेनादलाचा ध्वजदिन साजरा केला जातो. हा तोच दिवस आहे जेव्हा आम्ही आमच्या शूर सैनिकांचे, त्यांच्या पराक्रमाचे, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करतो आणि आपलेही काही योगदान देतो. फक्त सन्मानाचा भाव असून चालणार नाही, सहभाग पण हवा.
7 डिसेंबरला प्रत्येक नागरिकाने पुढे आले पाहिजे. प्रत्येकाच्या जवळ त्या दिवशी सशस्त्र सेनादलाचा ध्वज असला पाहिजे आणि प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. चला तर या प्रसंगी आपण आपल्या सशस्त्र सेनादलाच्या अदम्य साहसाच्या, शौर्याच्या आणि समर्पण भावनेच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि वीर सैनिकांचं स्मरण करूया.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, भारतातील ‘फिट इंडिया’ चळवळीशी तर आपण परिचित आहात. सीबीएससीने एक प्रशंसनीय सुरुवात केली आहे – फिट इंडिया सप्ताहाची.
सगळी विद्यालये ‘फिट इंडिया’ सप्ताह डिसेंबर महिन्यात कधीही साजरा करू शकतात. यात फिटनेस विषयी अनेक प्रकारचे आयोजन करायचे आहे. त्यात कोडी, निबंध, लेख, चित्रकला, पारंपरिक आणि स्थानिक खेळ, योगासने, नृत्य आणि क्रीडा स्पर्धा सामील आहेत. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या सोबतच त्यांचे शिक्षक आणि पालक पण सहभागी होऊ शकतात. पण हे विसरू नका, कि याचा अर्थ फक्त बुद्धीची कसरत, कागदावरची कसरत किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर किंवा मोबाइल फोनवर फिटनेस असा नाही तर घाम गाळायला पाहिजे. खाण्याच्या सवयी बदलायला पाहिजेत, जास्त लक्ष देऊन व्यायाम करायची सवय लागली पाहिजे.
मी देशातील सर्व राज्यातील स्कूल बोर्ड आणि शाळा व्यवस्थापन यांना आवाहन करतो की प्रत्येक शाळेत डिसेंबर महिन्यात सप्ताह साजरा केला जावा. यामुळे फिटनेस ची सवय आमच्या सगळ्यांच्या दैनंदिनीत सामील होईल. फिट इंडिया चळवळी मध्ये फिटनेस या विषयात शाळांच्या रँकींगची व्यवस्था केली गेली आहे. फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाइव स्टार रेटिंग दिले जाईल. हे रँकिंग मिळवणाऱ्या सगळ्या शाळा फिट इंडिया मानचिन्ह आणि ध्वजाचा वापर करू शकतील. फिट इंडिया पोर्टलवर जाऊन शाळांनी स्वतःला फिट घोषित करायचे आहे. फिट इंडिया थ्री स्टार आणि फिट इंडिया फाईव्ह स्टार अशी रेटिंगस् पण दिली जाईल. मी विनंती करतो कि सगळ्या शाळा फिट इंडिया रँकिंग मध्ये सामील व्हाव्यात आणि फिट इंडिया हा एक सहज स्वभाव बनेल, एक जनआंदोलन बनेल, ह्या विषयी जागरुकता निर्माण होईल, यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला देश इतका विशाल आहे इतक्या विविधतेने नटलेला आहे, इतका प्राचीन आहे कि अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत नाहीत आणि ते स्वाभाविक पण आहे. अशीच एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. काही दिवसांपूर्वी ‘माय गव’ वर एका कॉमेंट वर माझी नजर गेली. ही कॉमेंट आसाममधील नागावच्या रमेश शर्माजी यांनी लिहिली होती. त्यांनी लिहिलं होतं, ब्रह्मपुत्र नदीवर एक उत्सव चालू आहे. त्याचे नाव आहे ब्रह्मपुत्र पुष्कर. 4 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव होता आणि ह्या ब्रह्मपुत्र पुष्कर मध्ये सामील होण्यासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून खूप लोक तिथे आले होते. ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटले ना? हं, हीच तर विशेष गोष्ट आहे! हा इतका महत्वपूर्ण उत्सव आहे आणि आपल्या पूर्वजांनी याची अशी रचना केलेली आहे की जेव्हा संपूर्ण माहिती ऐकाल तेव्हा आपल्यालाही खूपच आश्चर्य वाटेल. पण आपले दुर्भाग्य आहे ह्याचा जितका व्यापक प्रचार व्हायला हवा, देशाच्या कानाकोपऱ्यात याची माहिती व्हायला हवी तितक्या प्रमाणात ती होत नाही. ही गोष्ट तर खरी आहे की हे पूर्ण आयोजन एकाप्रकारे ‘एक देश एक संदेश’ आणि ‘आपण सगळे एक आहोत’ हा भाव दृढ करणारे आहे. या भावनेला ताकद देणारे आहे. सर्वात आधी रमेशजी, आपल्याला खूप खूप धन्यवाद!
कारण की आपण मन की बातच्या माध्यमातून देशवासियां पर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा निश्चय केलात. आपण अशी खंत पण व्यक्त केली कि इतक्या महत्त्वाच्या गोष्टीची व्यापक चर्चा होत नाही, प्रचार होत नाही. आपली खंत मी समजू शकतो. देशातील जास्त लोकांना याविषयी माहिती नाही. हं, पण जर का कोणी याला ‘आंतरराष्ट्रीय नदी उत्सव’ असं म्हटलं असतं, खूप मोठ्या मोठ्या दिमाखदार शब्दांचा उपयोग केला असता तर कदाचित आपल्या देशातील काही लोक असे आहेत कि त्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती, प्रचार झाला असता !!
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण कधी पुष्करम, पुष्करालू, पुष्कर: हे शब्द ऐकले आहेत का? आपल्याला माहिती तरी आहे का की हे काय आहे? मी सांगतो की देशातील बारा वेगवेगळ्या नद्यांवर जे उत्सव होतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत. प्रत्येक वर्षी एका नदीवर म्हणजे प्रत्येक नदी चा नंबर बारा वर्षांनी येणार आणि हा उत्सव देशातील वेगवेगळ्या भागातील बारा नद्यांवर पाळीपाळीने होणार. बारा दिवस चालणारा हा उत्सवदेखील कुंभ सारखाच राष्ट्रीय एकता वाढवणारा आहे. “एक भारत श्रेष्ठ भारत” चे दर्शन दाखवणारा आहे पुष्करम हा एक असा उत्सव आहे, ज्यात नदीचे महात्म्य, नदीचा गौरव आयुष्यातील नदीचे महत्व अगदी सहज रूपाने स्पष्ट होते.
आमच्या पूर्वजांनी निसर्गाला, पर्यावरणाला, पाण्याला, जमिनीला, जंगलांना खूप महत्व दिले. त्यांना नद्यांचे महत्त्व समजले होते आणि समाजात नद्यांच्याविषयी सकारात्मक भावना कशी निर्माण होईल, एक संस्कार कसा होईल, नदीच्या सोबतच संस्कृतीची धारा, नदीच्या सोबतच संस्कारांची धारा, नदीच्या सोबतच समाज जोडण्याचा हा प्रयत्न निरंतर चालू होता आणि मजेची गोष्ट ही कि समाज नद्यांच्या बरोबर पण जोडला गेला आणि आपापसात पण जोडला गेला.
गेल्यावर्षी तामिळनाडूमध्ये नदीवर पुष्करम झाले होते. यावर्षी ब्रह्मपुत्रा नदीवर आयोजित झाले आणि येणाऱ्या वर्षी तुंगभद्रा नदी म्हणजेच आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात आयोजित होईल. एका प्रकारे आपण या 12 स्थळांची यात्रा एका पर्यटन साखळीच्या रूपात करू शकता. इथे मी आसामच्या लोकांचा उत्साह, त्यांचे आतिथ्य यांची प्रशंसा करू इच्छितो की ज्यांनी पूर्ण देशभरातून आलेल्या यात्रेकरूंचे स्वागत केले, सत्कार केला. आयोजकांनी स्वच्छतेकडे पण खूप लक्ष दिलं होते. प्लास्टिक फ्री झोन निश्चित केले गेले. जागोजागी बायो टॉयलेट ची पण व्यवस्था केली गेली. मला आशा आहे नद्यांच्या विषयीचा आपला आदर जागवणारा, हजारो वर्षे जुना असणारा हा उत्सव भावी पिढ्यांना पण जोडेल. निसर्ग, पर्यावरण, पाणी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पर्यटनाचा पण भाग बनतील, जीवनाचा भाग बनतील.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, ‘नमो ॲप’ वर मध्यप्रदेशातील श्वेता बेटी लिहिते आहे, तिने लिहिले आहे,” सर, मी नववीत आहे. माझ्या बोर्डाच्या परीक्षेला अजून एक वर्षाचा वेळ आहे. पण मी विद्यार्थ्यांबरोबरच्या आणि एक्झाम वॉरियर्स बरोबरच्या आपल्या चर्चा नेहमी ऐकते. मी आपल्याला यासाठी लिहिते आहे कारण की आत्तापर्यंत आपण आम्हाला हे सांगितले नाहीत की पुढची परीक्षेवरील चर्चा केव्हा असेल? कृपया लवकरात लवकर करा.शक्य असेल तर जानेवारीतच हा कार्यक्रम आयोजित करा.”
मित्रांनो, ‘मन की बात’ विषयी हीच गोष्ट मला खूप आवडते. ती म्हणजे माझे युवा मित्र ज्या अधिकाराने , ज्या प्रेमाने तक्रार करतात,आदेश देतात, सूचना देतात हे बघून मला खूप आनंद होतो. श्वेता, आपण खूपच योग्यवेळी हा विषय काढला आहे. परीक्षा येणार आहेत तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला परीक्षांवर चर्चा पण करायची आहे. आपलं म्हणणं तर खरंच आहे की हा कार्यक्रम थोडा आधी आयोजित करायची आवश्यकता आहे.
गेल्या कार्यक्रमानंतर अनेक लोकांनी हा कार्यक्रम अधिक प्रभावी व्हावा म्हणून सूचना पाठवल्या आहेत आणि तक्रार देखील केली आहे. गेल्या वेळी हा कार्यक्रम उशिरा झाला होता, परीक्षा अगदी जवळ आल्यावर झाला होता. श्वेताची सूचना योग्यच आहे. मला हा कार्यक्रम जानेवारीत करायला हवा. मनुष्य बळ विकास मंत्रालय आणि “my gov “चा संच मिळून ह्या कार्यक्रमासाठी काम करत आहेत. पण मी प्रयत्न करीन यावेळी परिक्षांवरची चर्चा जानेवारीच्या सुरुवातीला किंवा मध्यावर होईल. देशभरातल्या विद्यार्थी मित्रांजवळ दोन संधी आहेत. पहिली म्हणजे आपल्या शाळेतून त्या कार्यक्रमाचा भाग बनणे आणि दुसरी म्हणजे दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग बनणे. दिल्लीतील कार्यक्रमासाठी देशभरातल्या विद्यार्थ्यांची निवड “my gov “च्या माध्यमातून केली जाईल.
मित्रांनो आपल्या सगळ्यांना मिळून परीक्षेच्या भीतीला दूर पळवायचे आहे. माझे युवा मित्र परिक्षेच्या वेळी मनमोकळे हसताना दिसावे, पालक तणावमुक्त असावेत, शिक्षक आश्वस्त असावेत याच उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून आम्ही “मन की बात”च्या माध्यमातून परीक्षांवर चर्चा, टाऊन हॉल च्या माध्यमातून किंवा एक्झाम वॉरियर्स पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचा सतत प्रयत्न करत आहोत. या उपक्रमाला देशभरातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी गती दिली याबद्दल मी ह्या सगळ्यांचा आभारी आहे. आणि येणाऱ्या परीक्षेवर चर्चा हा कार्यक्रम आपण सगळे मिळून करूयात. आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे.
मित्रांनो गेल्यावेळच्या “मन की बात” मध्ये आपण 2010 मध्ये आयोध्या प्रकरणात आलेल्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निकाला विषयी चर्चा केली होती आणि मी त्यावेळी सांगितले होते की देशाने त्यावेळी निर्णय येण्याच्या आधीदेखील आणि निर्णय लागल्यावर देखील शांती आणि बंधुभाव कसा टिकवून ठेवला होता. यावेळी देखील 9 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा एकशे तीस कोटी भारतीयांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्यांच्यासाठी देश हितापेक्षा जास्त महत्वाचे काहीही नाही. देशातील शांती, एकता आणि सद्भावना ही मूल्ये सर्वात महत्वाची आहेत. राम मंदिराविषयीचा निर्णय जेव्हा आला तेव्हा संपूर्ण देशाने त्याचे हार्दिक स्वागत केले. अगदी सहजतेने आणि शांतीपूर्वक स्वीकार केला. आज ‘मन कि बात’च्या माध्यमातून मी देशवासीयांना साधुवाद देतो, धन्यवाद देतो. त्यांनी ज्या प्रकारे धैर्य, संयम आणि परिपक्वता दाखवली त्यासाठी मी विशेष आभार प्रगट करू इच्छितो. एकीकडे जेव्हा प्रदीर्घ कालावधीनंतर कायद्याची लढाई समाप्त झाली आहे तेव्हा दुसरीकडे न्यायव्यवस्थेविषयी असलेला देशाचा आदरभाव अजूनच वाढलेला आहे. खऱ्या अर्थाने आमच्या न्याय व्यवस्थेसाठी पण हा मैलाचा दगड ठरला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालानंतर आता देश नवीन उमेद, नवीन आकांक्षांच्या साथीने नव्या मार्गावर नवे ध्येय घेऊन वाटचाल करु लागला आहे.
नवा भारत याच भावनेला आपलेसे करून शांती, एकता आणि सद्भावनेच्या सोबत पुढे जावा अशी माझी इच्छा आहे. आपणा सर्वांची ही इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आमची परंपरा, संस्कृती आणि भाषा संपूर्ण जगाला ‘विविधतेतून एकता’ हा संदेश देतात. एकशे तीस कोटी भारतीयांचा हा तोच देश आहे जेथे म्हंटले जाते की “कोसा-कोसांवर बदलते पाणी आणि चार कोसांवर बदलते वाणी” आमची भारत भूमी शतकानुशतके अनेक भाषा जोपासत आली आहे. खरंतर आम्हाला कधीकधी याची पण चिंता वाटते कि काही भाषा, काही बोली नष्ट तर होणार नाहीत ना?
काही दिवसांपूर्वी मला उत्तराखंडमधील धारचुला ची गोष्ट वाचायला मिळाली. मला खूप आनंद झाला. ह्या गोष्टीतून समजते की कशा प्रकारे लोक आपली भाषा आणि तिच्या प्रगतीसाठी पुढे येत आहेत, काही नवे प्रयोग करत आहेत. पूर्वी मी धारचुला मध्ये प्रवासात येता-जाता थांबत असे यामुळे देखील धारचुलाच्या बातमीकडे लक्ष गेले. त्याबाजूला नेपाळ, या बाजूला कालीगंगा. तर साहजिकच धारचुला हा शब्द ऐकताच या बातमीकडे माझं लक्ष गेले. पिथौरागढच्या धारचुला मध्ये रंग समुदायाचे खूप लोक राहतात आणि “रंगलो” हि त्यांची आपापसातील व्यवहाराची बोली भाषा आहे. हे लोक असा विचार करून खूप दुःखीकष्टी व्हायचे कि ही भाषा बोलणारे लोक सतत कमी-कमी होत आहेत. मग एक दिवस या सगळ्यांनी आपल्या भाषेला वाचवण्याचा संकल्प केला. पाहता पाहता या कार्यात रंग समुदायातील अनेक लोक सामील होत गेले.
तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ह्या समुदायातील लोकांची संख्या अगदी मोजता येण्याजोगी आहे. साधारण म्हणू शकतो की बहुतेक दहा हजार असेल. पण रंग भाषा वाचवण्यासाठी प्रत्येक जण काम करू लागला. मग ते 84 वर्षांचे जेष्ठ दिवान सिंह असतील किंवा 22 वर्षांची युवा वैशाली गरब्याल. प्रोफेसर असो किंवा व्यापारी, प्रत्येक जण शक्य ते सर्व प्रयत्न करू लागला. या कार्यात सोशल मीडियाचा पण खूप वापर केला गेला. अनेक व्हाट्सअप ग्रुप बनवले गेले आणि शेकडो लोकांना त्याद्वारे जोडलं गेलं. या भाषेची काही लिपी नाहीये. फक्त बोलीभाषेत प्रचलित आहे. अलीकडे मग लोक गोष्टी कविता-गाणी पोस्ट करायला लागले. परस्परांची भाषा सुधारू लागले. एक प्रकारे व्हाट्सअप जणू शाळेचा वर्ग बनला. इथे प्रत्येक जण शिक्षक आणि प्रत्येक जणच विद्यार्थी. रंगलो भाषेला वाचवण्याची धडपड ह्या सर्व प्रयत्नात आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. पत्रिका प्रकाशित केली जाते आहे आणि यासाठी सामाजिक संस्थांची मदत पण मिळते आहे.
मित्रांनो विशेष गोष्ट ही आहे की संयुक्त राष्ट्रांनी 2019 म्हणजेच या वर्षाला ‘International Year of Indigenous Languages’- स्थानिक भाषांसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष” म्हणून घोषित केले आहे. म्हणजेच ज्या भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्या भाषांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. दीडशे वर्षांपूर्वी आधुनिक हिंदीचे जनक भारतेंदु हरिश्चंद्रजी ह्यांनी म्हटलं होतं,
“निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल,
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ||”
अर्थात मातृभाषेच्या ज्ञानाशिवाय प्रगती शक्य नाही. अशातच रंग समुदायाने काढलेला हा मार्ग पूर्ण विश्वाला मार्गदर्शक ठरला आहे.जर का आपल्यालाही या गोष्टीने प्रेरणा मिळाली असेल तर आजपासूनच आपल्या मातृभाषेचा, आपल्या बोली चा उपयोग करा. आपल्या कुटुंबाला, समाजाला प्रेरित करा. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी महाकवी सुब्रमण्यम भारती तमिळमध्ये म्हणाले होते, ते पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायक आहे.
मुप्पदु कोडी मुगमुडैयाळ
उयिर् मोइम्बुर ओंद्दुडैयाळ
इवळ सेप्पु मोळी पधिनेट्टूडैयाळ
एनिर् सिन्दनै ओंद्दुडैयाळ
(Muppadhu kodi mugamudayal, enil maipuram ondrudayal
Ival seppumozhi padhinetudayal, enil sindhanai ondrudayal)
आणि ही एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली गोष्ट आहे. त्यांनी म्हटलं होतं, भारत मातेचे तीस कोटी चेहरे आहेत पण शरीर एक आहे. इथे 18 भाषा बोलल्या जातात पण विचार एक आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, कधीकधी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला खूप मोठा संदेश देऊन जातात. आता हेच बघा ना, प्रसार माध्यमातच स्कुबा डायव्हर्सची एक गोष्ट वाचत होतो. एक अशी गोष्ट जी प्रत्येक भारतवासीयाला प्रेरणा देईल. विशाखापट्टणम मध्ये गोताखोरीचे प्रशिक्षण देणारे स्कुबा डायव्हर्स एक दिवस मंगमेरीपेटा बीचवर समुद्रातून परत येत होते तेव्हा समुद्रात तरंगणाऱ्या काही प्लास्टिकच्या बाटल्या आणि पिशव्यांशी त्यांची टक्कर होत होती. ते सगळं साफ करताना त्यांना गोष्ट मोठी गंभीर वाटली. आमचा समुद्र कशाप्रकारे कचऱ्याने भरला जातो आहे?? आता गेल्या काही दिवसांपासून हे पाणबुडे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास शंभर मीटर दूर जातात, खोल पाण्यात डुबकी मारतात आणि मग तिथे असलेला कचरा बाहेर काढतात. मला सांगितलं गेलं की तेरा दिवसातच म्हणजे दोन आठवड्यातच जवळ जवळ चार हजार किलोहून अधिक प्लास्टिकचा कचरा त्यांनी समुद्रातून बाहेर काढला आहे. या स्कुबा डायव्हर्सच्या एका छोट्याश्या सुरुवातीने एका मोठ्या चळवळीचं रूप घेतले आहे. आता त्यांना स्थानिक लोकांची मदत मिळते आहे. आसपासचे कोळी पण त्यांना सर्व प्रकारची मदत करायला लागले आहेत. जरा विचार करा या स्कुबा डायव्हर्स पासून प्रेरणा घेऊन जर आपण पण आपल्या आसपासच्या भागाला प्लास्टिकच्या कचऱ्यापासून मुक्त करायचा संकल्प केला तर मग प्लास्टिक मुक्त भारत संपूर्ण विश्वासाठी एक नवे उदाहरण ठरेल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो दोन दिवसांनंतर 26 नोव्हेंबर आहे. हा दिवस संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे. आमच्या गणतंत्रासाठी तर विशेषत्वाने महत्त्वाचा आहे कारण या दिवशी आम्ही ‘संविधान दिवस’ साजरा करतो. आणि ह्या वर्षीचा संविधान दिवस विशेष आहे कारण यावर्षी संविधानाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. याप्रसंगी संसदेत विशेष आयोजन होईल आणि मग पूर्ण वर्षभर संपूर्ण देशात वेगवेगळे कार्यक्रम होतील. चला तर, या प्रसंगी आपण आपल्या संविधान समितीच्या सर्व सदस्यांना आदरपूर्वक नमस्कार करुया. आपली श्रद्धा अर्पित करूया. भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे आणि सन्मानाचे रक्षण करते आणि हे सगळे आमच्या संविधान निर्मात्यांच्या दूरदर्शीपणा मुळेच सुनिश्चित होऊ शकले आहे. मी आशा करतो की संविधान दिवसाच्या निमित्ताने आमच्या संविधानातील आदर्शांना कायम ठेवण्याचा आणि राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देण्याचा आमचा निश्चय अधिक दृढ होईल. हेच तर स्वप्न आमच्या संविधान निर्मात्यांनी पाहिलं होतं.
माझ्या प्रिय देशवासीयांनो हिवाळा सुरू होतो आहे. गुलाबी थंडी आता अनुभवास येते आहे. हिमालयाच्या काही भागाने बर्फाची चादर ओढणे सुरू केलं आहे. पण हा ऋतू, “फिट इंडिया” चळवळीचा ऋतू आहे. आपण, आपला परिवार, आपला मित्र वर्ग, आपले सोबती ही संधी वाया जाऊ देऊ नका. फिट इंडिया चळवळ पुढे नेण्यासाठी या मोसमाचा संपूर्ण फायदा उठवा आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद!!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! आज दीपावलीचं पवित्र पर्व आहे! आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्याकडे असं म्हटलं गेलं आहे,
शुभम् करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदाम!
शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योतीर्नमोस्तुते!
किती उत्तम संदेश आहे. या श्लोकात असं म्हटले आहे-प्रकाश जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो, जो वाईट बुद्धीचा नाश करून, सद्बुद्धी दाखवतो. अशा दिव्यज्योतीला माझं नमन आहे. ही दीपावली स्मरणात ठेवण्यासाठी यापेक्षा जास्त चांगला विचार काय असू शकेल की, आपण प्रकाश सर्वत्र फैलावू, सकारात्मकतेचा प्रसार करू आणि शत्रुत्वाची भावना नष्ट करण्यासाठी प्रार्थना करू या. आजकाल जगातल्या अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष गोष्ट ही आहे की, यात केवळ भारतीय समुदाय सहभागी होतात असं नव्हे तर आता अनेक देशांची सरकारे, तिथले नागरिक, तिथल्या सामाजिक संघटना दिवाळी सण पूर्ण आनंद उत्साहात साजरे करतात. एक प्रकारे तिथं `भारत’ साकार करतात.
मित्रानो, जगात उत्सवी पर्यटनाचं स्वतःचं आकर्षण असतं. आमचा भारत, जो सणांचा देश आहे, त्यात उत्सवी पर्यटनाच्या अफाट शक्यता आहेत. होळी असो, दिवाळी असो, ओणम असो, पोंगल असो, बिहू असो, अशा प्रकारच्या सणांचा प्रसार करून सणांच्या आनंदात इतर राज्यं, इतर देशांच्या लोकांनाही सहभागी करून घेण्याचा आमचा प्रयत्न असला पाहिजे. आमच्याकडे तर प्रत्येक राज्य, प्रत्येक क्षेत्रात आपापले इतके वेगवेगळे उत्सव होतात – दुसऱ्या देशातल्या लोकांना यात खूप रस असतो. म्हणून, भारतात उत्सवी पर्यटन वाढवण्यात, देशाबाहेर राहणाऱ्या भारतीयांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या `मन की बात’मध्ये या दिवाळीत काही तरी वेगळं करायचं, असं ठरवलं होतं. मी अस म्हटलं होतं – या, आपण सर्व जण या दिवाळीला भारताची नारी शक्ती आणि तिनं साध्य केलेले उत्तुंग यश साजरं करू या, म्हणजे भारताच्या लक्ष्मीचा सन्मान! आणि पाहता पाहता, याच्यानंतर लगेचच, समाज माध्यमांमध्ये असंख्य प्रेरणादायी कथांची रास लागली. वारंगळ इथल्या कोडीपका रमेश यांनी नमो अॅपवर लिहिलं की, माझी आई माझी शक्ती आहे. 1990 मध्ये जेव्हा माझ्या वडलांचे निधन झाले, तेव्हा माझ्या आईनेच पाच मुलांची जबाबदारी उचलली. आज आम्ही पाचही भाऊ चांगल्या व्यवसायांत आहोत. माझी आई हीच माझ्यासाठी ईश्वर आहे. माझ्यासाठी ती सर्व काही आहे आणि ती खऱ्या अर्थानं भारताची लक्ष्मी आहे.
रमेशजी, आपल्या माताजींना माझे प्रणाम! ट्विटरवर सक्रीय असलेल्या गीतिका स्वामी यांचं म्हणणं असं आहे की, त्यांच्यासाठी मेजर खुशबू कंवर भारताची लक्ष्मी आहेत, ज्या एका बस वाहकाची कन्या आहेत आणि त्यांनी आसाम रायफल्सच्या सर्व महिला तुकडीचं नेतृत्व केल होतं. कविता तिवारीजी यांच्यासाठी तर भारताची लक्ष्मी त्यांची कन्या आहे, जी त्यांची शक्तीसुद्धा आहे. त्यांची कन्या उत्तम पेंटिंग करते, याचा त्यांना अभिमान आहे. तिने सीएलएटीच्या परीक्षेत खूपच चांगली श्रेणीही प्राप्त केली आहे. तर मेघा जैन यांनी लिहिलं आहे की, 92 वर्षांची एक वयोवृद्ध महिला, ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात प्रवाशांना मोफत पाणी पुरवत असते. मेघाजी या भारतातील लक्ष्मीची विनम्रता आणि करुणेच्या भावनेने खूप प्रेरित झाल्या आहेत. अशा अनेक कथा लोकांनी सांगितल्या आहेत. आपण त्या जरूर वाचा, प्रेरणा घ्या आणि स्वतःही असेच काही कार्य आपल्या आसपासच्या भागातही करा. माझं, भारताच्या या सर्व लक्ष्मींना आदरयुक्त नमन आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 17 व्या शतकातल्या सुप्रसिद्ध कवयित्री, सांची होनम्मा यांनी 17 व्या शतकात, कन्नड भाषेत एक कविता लिहिली होती. तेच भाव, ते शब्द भारताच्या प्रत्येक लक्ष्मीबद्दल आपण जे बोलत आहोत ना, असं वाटतं की, त्याचा पाया 17 व्या शतकातच रचला होता. किती सुंदर शब्द, किती सुंदर भावना आणि किती उत्तम विचार, कन्नड भाषेतल्या या कवितेत आहेत.
पैन्निदा पर्मेगोंडनु हिमावंतनु
पैन्निदा भृगु पर्चीदानु
पैन्निदा जनकरायनु जसुवलीदनू
अर्थात, हिमवंत म्हणजे पर्वताच्या राजाला आपली कन्या पार्वतीमुळे, ऋषी भृगु यांना आपली कन्या लक्ष्मी हिच्यामुळे आणि राजा जनक यास आपली कन्या सीतेमुळे प्रसिद्धी मिळाली. आमच्या कन्या, या आमचा गौरव आहेत आणि या कन्यांच्या महिम्यामुळेच, आमच्या समाजाची एक मजबूत ओळख आहे आणि त्याचं भविष्य उज्वल आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 12 नोव्हेंबर, 2019- हा तो दिवस आहे ज्या दिवशी जगभरात, श्री गुरूनानक देव यांचा 550 वा प्रकाश उत्सव साजरा केला जाईल. गुरूनानक देवजी यांचा प्रभाव भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये आमचे शीख बंधू आणि भगिनी वास्तव्य करून आहेत, जे गुरूनानक देवजी यांच्या आदर्शाप्रती संपूर्णपणे समर्पित आहेत. मी व्हँकुव्हर आणि तेहरानच्या गुरुद्वारांमधील माझी भेट कधी विसरू शकत नाही. श्री गुरूनानक देवजी यांच्याबद्दल असे खूप काही आहे, जे मी आपल्याला सांगू शकतो, पण त्यासाठी `मन की बात’चे अनेक भाग लागतील. त्यांनी, सेवाभावाला नेहमीच सर्वोच्च स्थानी ठेवलं. गुरूनानक देवजी असं मानत की, नि:स्वार्थ भावानं केलेल्या सेवाकार्याचे कोणतंच मोल होऊ शकत नाही. अस्पृष्यतेसारख्या सामाजिक दृष्ट्या वाईट प्रथेविरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. श्री गुरूनानक देवजी यांनी आपला संदेश जगात, दूर दूरवर पोहचवला. आपल्या काळातले सर्वात जास्त प्रवास करणाऱ्यांपैकी ते होते. अनेक ठिकाणी गेले आणि जिथं गेले तिथं आपला सरळ स्वभाव, विनम्रता, साधेपणा यामुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली. गुरुनानक देवजी यांनी अनेक महत्वपूर्ण धार्मिक यात्रा केल्या, ज्यांना उदासी असं म्हटलं जातं. सद्भावना आणि समानतेचा संदेश घेऊन, ते, उत्तर असो की दक्षिण, पूर्व असो की पश्चिम, प्रत्येक दिशेला गेले, प्रत्येक ठिकाणी लोकांना, संताना आणि ऋषींना भेटले. आसामचे विख्यात संत शंकरदेव यांनीसुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती, असं मानलं जातं. त्यांनी हरिद्वारच्या पवित्र भूमीची यात्रा केली. काशीमध्ये एक पवित्र ठिकाण `गुरूबाग गुरूद्वारा’ आहे, असं म्हटलं जातं की, श्री गुरूनानक देवजी तिथं उतरले होते. ते बौध्द धर्माशी जोडल्या गेलेल्या राजगिर आणि गयासारख्या धार्मिक स्थळीसुद्धा गेले. दक्षिणेत गुरूनानक देवजी यांनी श्रीलंकेपर्यंत प्रवास केला. कर्नाटकात बिदरला प्रवासाला गेले असताना, गुरूनानक देवजी यांनी, तिथल्या पाणी समस्येवर तोडगा काढला होता. बिदरमध्ये गुरूनानक जीरा साहब नावाचे एक प्रसिद्ध स्थळ आहे, जे गुरूनानक देवजी यांचं सतत आम्हाला स्मरण करून देतं, त्यांनाच ते समर्पित आहे. एका उदासीच्या दरम्यान, गुरूनानकजींनी उत्तरेत, काश्मीर आणि त्यांच्या आसपासच्या प्रदेशातही प्रवास केला. यामुळे, शीख अनुयायी आणि काश्मीरमध्ये खूप दृढ संबंध स्थापित झाले. गुरूनानक देवजी तिबेटमध्येही गेले, जिथल्या लोकांनी त्यांना गुरू मानले. उझबेकिस्तानमध्येही ते पूज्य आहेत, जिथं ते गेले होते. आपल्या एका उदासीदरम्यान, त्यांनी इस्लामी देशांचाही प्रवास केला होता, ज्यात सौदी अरेबिया, इराक आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. ते लाखो लोकांच्या मनात ठसले, ज्यांनी पूर्ण श्रद्धेनं त्यांच्या शिकवणीचं अनुसरण केलं आणि आजही करत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी, जवळपास 85 देशांचे राजदूत दिल्लीहून अमृतसरला गेले होते. तिथं त्यांनी अमृतसरच्या सुवर्णमंदिराचं दर्शन घेतलं आणि हीच घटना गुरूनानक देवजी यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाचं निमित्त ठरली. तिथं या सर्व राजदूतांनी सुवर्ण मंदिराचं दर्शन तर घेतलं, शिवाय त्यांना शीख परंपरा आणि संस्कृतीबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली. यानंतर अनेक राजदूतांनी सोशल मीडियावर तिथली छायाचित्रं टाकली. चांगल्या अनुभवांबद्दलही गौरवपूर्ण लिहिलं. गुरूनानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व त्यांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात आणण्याची अधिक प्रेरणा आम्हाला देईल, अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा मी नतमस्तक होऊन गुरूनानक देव जी यांना वंदन करतो.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, मला विश्वास आहे की, 31 ऑक्टोबर ही तारीख आपल्या सर्वाना स्मरणात निश्चित राहिली असेल. हा दिवस भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा आहे जे देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफणारे महानायक होते. एकीकडे, सरदार पटेल यांच्यामध्ये लोकांना एकत्र आणण्याची अद्भुत क्षमता होती, तर दुसरीकडे ज्यांच्याशी त्यांचे वैचारिक मतभेद होते, त्यांच्याशीही ते उत्तम मेळ बसवून घेत. सरदार पटेल लहान लहान गोष्टींकडेही अत्यंत खोलात जाऊन पहात असत, पारखून घेत. खऱ्या अर्थानं ते, तपशिलाचा आग्रह धरणारे ‘मॅन ऑफ डीटेल्स’ होते. याचबरोबर, ते संघटन कौशल्यात निपुण होते. योजना तयार करण्यात आणि रणनीती आखण्यात त्यांना प्रभुत्व मिळाले होते. सरदार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल जेव्हा आपण वाचतो, ऐकतो तेव्हा त्यांचं नियोजन किती जबरदस्त होतं, हे लक्षात येतं. 1921 मध्ये अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी देशभरातून हजारो प्रतिनिधी येणार होते. अधिवेशनाच्या सर्व व्यवस्थेची जबाबदारी सरदार पटेल यांच्यावर होती. या संधीचा उपयोग त्यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी करून घेतला. कुणालाही पाण्याची कमतरता भासणार नाही, याची निश्चिती करण्यात आली. एवढेच नाही तर, त्यांना अधिवेशन स्थळी एखाद्या प्रतिनिधीचे सामान किंवा जोडे चोरीला जाण्याची काळजी होती आणि हे लक्षात घेऊन सरदार पटेल यांनी जे केलं, ते कळल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटेल. त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधून खादीच्या पिशव्या बनवा, असा आग्रह धरला. शेतकऱ्यांनी तशा पिशव्या बनवल्या आणि प्रतिनिधींना विकल्या. या पिशव्यांमध्ये आपले जोडे घातल्यानं, आणि त्या पिशव्या आपल्याबरोबर ठेवल्यानं प्रतिनिधीच्या मनातला चपला चोरीला जाण्याचा तणाव निघून गेला. तर दुसरीकडे, खादीच्या विक्रीमध्ये खूप वाढ झाली. संविधान सभेत उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल आमचा देश, सरदार पटेल यांच्याप्रती कायम कृतज्ञ राहील. त्यांनी मूलभूत अधिकार निश्चित करण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं, ज्यामुळे, जाती आणि संप्रदायाच्या आधारावर कोणताही भेदभाव करण्याला वाव राहिला नाही.
मित्रानो, भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचं एकत्रीकरण करण्याचं, एक खूप महान भगीरथ आणि ऐतिहासिक कार्य केलं. सरदार वल्लभभाई यांचं हेच वैशिष्ट्य होतं की, प्रत्येक घटनेवर त्यांची नजर असे. एकीकडे त्यांची नजर हैदराबाद, जुनागढ आणि इतर राज्यांवर केंद्रित होती तर दुसरीकडे त्यांचं लक्ष सुदूर दक्षिणेतील लक्षद्वीपवरही होतं. वास्तविक, जेव्हा आम्ही सरदार पटेल यांच्या प्रयत्नांबद्दल बोलतो, तेव्हा देशाच्या एकीकरणात काही खास प्रांतांच्याबाबत त्यांच्या भूमिकेची चर्चा होते. लक्षद्वीपसारख्या छोट्या जागेसाठीही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ही गोष्ट लोक कमीच स्मरणात ठेवतात. आपल्याला चांगलं माहित आहे की, लक्षद्वीप हा काही बेटांचा समूह आहे. भारतातील सर्वात सुंदर प्रदेशांपैकी एक आहे. 1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर लगेचच आमच्या शेजाऱ्याची नजर लक्षद्वीपवर होती आणि त्याने आपला ध्वज घेऊन जहाज पाठवले होते. सरदार पटेल यांना जशी या घटनेची माहिती मिळाली,त्यांनी जराही वेळ न दवडता, जराही उशीर न करता, लगेच कठोर कारवाई सुरू केली. त्यांनी मुदलियार बंधू, अर्कोट रामस्वामी मुदलियार आणि अर्कोट लक्ष्मणस्वामी मुदलियार यांना सांगितलं की, त्याने त्रावणकोरच्या लोकांना घेऊन त्वरित तिकडे कूच करावं आणि तिथं तिरंगा फडकवावा. लक्षद्वीपमध्ये प्रथम तिरंगा फडकला पाहिजे. त्यांच्या आदेशानंतर लगेचच तिरंगा फडकवण्यात आला आणि लक्षद्वीपवर ताबा मिळवण्याचे शेजारी देशाचे मनसुबे पाहता पाहता उध्वस्त करण्यात आले. या घटनेनंतर सरदार पटेल यांनी मुदलियार बंधूना सांगितलं की, लक्षद्वीपला विकासासाठी प्रत्येक आवश्यक सहाय्य मिळेल, याची त्यांनी वैयक्तिक खात्री करावी. आज, लक्षद्वीप भारताच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देत आहे. हे एक आकर्षक पर्यटन स्थळसुद्धा आहे. मला आशा आहे की, आपण या सुंदर बेटांची आणि समुद्र किनाऱ्याची सैर कराल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबर, 2018 या दिवशी सरदार साहेबांच्या स्मृत्यर्थ उभारण्यात आलेला एकतेचा पुतळा देश आणि जगाला समर्पित केला गेला होता. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. अमेरिकेतल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याच्या दुप्पट त्याची उंची आहे. जगातली सर्वात उंच प्रतिमा प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भरून टाकते. प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं ताठ होते. आपल्याला आनंद होईल की, एका वर्षात, 26 लाखाहून अधिक पर्यटक, एकतेचा पुतळा पाहण्यासाठी तिथं गेले. याचा अर्थ असा आहे की, दररोज सरासरी साडेआठ हजार लोकांनी एकतेच्या पुतळ्याच्या भव्यतेचं दर्शन घेतल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल त्यांच्या हृदयात जी आस्था, श्रद्धा आहे ती त्यांनी व्यक्त केली आणि आता तर तिथं निवडुंगाची बाग, फुलपाखरू उद्यान, जंगल सफारी, मुलांसाठी पोषण आहार पार्क, एकता नर्सरी असे अनेक आकर्षण केंद्र सातत्यानं विकसित होत चालले आहेत आणि यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे आणि लोकांना रोजगाराच्या नव्या नव्या संधीसुद्धा मिळत आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन, अनेक गावातील लोक आपापल्या घरांमध्ये, होम स्टे-ची व्यवस्था अशा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. घरात मुक्कामाची सुविधा होम स्टे उपलब्ध करून देणाऱ्या लोकांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिलं जात आहे. तिथल्या लोकांनी आता ड्रॅगन फ्रुटची शेतीही सुरू केली असून लवकरच हा तिथल्या लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख स्त्रोत होईल, असा मला विश्वास आहे.
मित्रानो, देशासाठी, सर्व राज्यांसाठी, पर्यटन उद्योगासाठी, एकतेचा पुतळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. एका वर्षात एखादे ठिकाण, जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून कसं विकसित होतं, याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत. तिथं देश आणि परदेशातून लोक येतात. परिवहनाची, मुक्कामाची, गाईडची, पर्यावरण पूरक व्यवस्था, अशा अनेक व्यवस्था एकानंतर एक आपोआप विकसित होत चालल्या आहेत. खूप मोठी आर्थिक घडामोड होत आहे आणि प्रवाशांच्या गरजांनुसार लोक सुविधा निर्माण करत आहेत. सरकार आपली भूमिका निभावत आहे. मित्रांनो, गेल्या महिन्यात टाईम मासिकानं जगातल्या 100 महत्वपूर्ण पर्यटन स्थळांमध्ये एकतेचा पुतळा या स्थानाला अग्रस्थान दिलं आहे. आपण सर्व आपल्या बहुमुल्य वेळातून काही वेळ काढून एकतेचा पुतळा पाहायला तर जालच, अशी मला आशा आहे. पण माझा आग्रह आहे की, प्रत्येक भारतीय जो प्रवासाकरता वेळ काढतो, त्यानं भारतातल्या कमीत कमी 15 पर्यटन स्थळांचा प्रवास कुटुंबांसह करावा, जिथं जाईल तिथं रात्रीचा मुक्काम करावा, हा माझा आग्रह कायम राहील.
मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे, 2014 पासून प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आम्हाला कोणतीही किंमत देऊन आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेचे रक्षण करण्याचा संदेश देतो. 31 ऑक्टोबरला, दरवर्षीप्रमाणे, रन फॉर युनिटी – एकता दौडचं आयोजन केलं जात आहे. यात समाजातील प्रत्येक वर्गातील, प्रत्येक स्तरातले लोक सहभागी होतील. रन फॉर युनिटी या गोष्टीचं प्रतिक आहे की, हा देश एक आहे. एका दिशेनं चालतो आहे आणि एक लक्ष्य प्राप्त करू पाहतो आहे. एक लक्ष्य – एक भारत, श्रेष्ठ भारत!
गेल्या 5 वर्षामध्ये असं दिसलं आहे की – केवळ दिल्ली नव्हे तर भारतातल्या शेकडो शहरांमध्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये, राजधान्यांमध्ये, जिल्हा केंद्रे, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची छोट्या शहरांमध्ये सुद्धा, पुरुष, स्त्रिया, शहरातले लोक, गावातले लोक, बालक, नवतरुण, वृद्ध, दिव्यांग, सर्व लोक खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. तसंही, आजकाल पाहिलं तर लोकांमध्ये मॅराथॉनबाबत एक छंद आणि वेड दिसत आहे. रन फॉर युनिटी ही सुद्धा अशीच आगळीवेगळी तरतूद आहे. धावणं मन, मेंदू आणि शरीर सर्वांसाठी लाभदायक आहे. इथ तर धावायचंही आहे, फिट इंडियासाठी आणि त्याबरोबर एक भारत-श्रेष्ठ भारत या उद्देश्यानं आम्ही जोडले जात असतो. आणि यामुळे केवळ शरीर नाही तर मन आणि संस्कार भारताच्या एकतेसाठी, भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी धावायचं आहे. यासाठी आपण ज्या शहरात राहत असाल, तिथं आपल्या आसपास रन फॉर युनिटीच्या बाबतीत माहिती घेऊ शकता. यासाठी एक पोर्टल सुरू केलं आहे runforunity.gov.in या पोर्टलवर देशभरातल्या ज्या ठिकाणी रन फॉर युनिटीच आयोजन केलं जाणार आहे, त्या ठिकाणांची माहिती दिली आहे. आपण सर्व 31 ऑक्टोबरला निश्चित धावाल – भारताच्या एकतेसाठी, स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी सुद्धा!
माझ्या प्रिय देशवासियांनो, सरदार पटेल यांनी देशाला एकतेच्या धाग्यात बांधलं. एकतेचा हा मंत्र आमच्या जीवनात संस्काराप्रमाणे आहे आणि भारतासारख्या विविधतेनं भरलेल्या देशात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक मार्गावर, प्रत्येक वळणावर, प्रत्येक मुक्कामावर, आपल्याला एकतेच्या या मंत्राला मजबुती देत राहिलं पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाची एकता आणि आपसातील सद्भाव यांना सशक्त करण्यासाठी आमचा समाज नेहमीच अत्यंत सक्रीय आणि सतर्क राहिला आहे. आम्ही आमच्या आसपास जरी पाहिलं तरी अशी अनेक उदाहरणे मिळतील, जे आपसातील सद्भाव वाढवण्यासाठी सतत काम करत असतात, पण अनेकदा असं होतं की, त्यांचे प्रयत्न, त्यांचं योगदान आपल्या स्मृतीपटलावरून खूप लवकर निघून जात.
मित्रांनो, मला लक्षात आहे की, 2010च्या सप्टेंबरमध्ये जेव्हा राम जन्मभूमीवर अलाहाबाद उच्च न्यायालयानं आपला निकाल दिला होता. जरा ते दिवस आठवा, कसं वातावरण होतं. वेगवेगळ्या प्रकारचे किती लोक मैदानात आले होते. कसे हितसंबंधी गट त्या परिस्थितीचा आपापल्या परीनं फायदा घेण्यासाठी खेळ खेळत होते. वातावरण तापवण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा केली जात होती. भिन्न भिन्न आवाजात तिखटपणा भरण्याचा प्रयत्नसुद्धा केला जात होता. काही बोलघेवड्यांनी तर फक्त आणि फक्त चमकण्याच्या उद्देश्यानं काय काय वक्तव्यं केली होती, कशा बेजबाबदार गोष्टी केल्या होत्या, आम्हाला सर्व लक्षात आहे. पण हे सर्व पाच, सात, दहा दिवस चाललं, पण जसा निकाल आला, एक आनंददायक, आश्चर्यकारक बदल देशाला जाणवला. एकीकडे दोन आठवडे वातावरण तापवण्यासाठी सर्व काही झालं होतं, पण राम जन्मभूमीवर निकाल आला तेव्हा सरकार, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरी समाज, सर्व संप्रदायांचे प्रतिनिधी, साधू संतानी खूपच संयमी प्रतिक्रिया दिल्या. वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न. पण आजही माझ्या लक्षात तो दिवस आहे. जेव्हा तो दिवस आठवतो तेव्हा मनाला आनंद होतो. न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला गौरवपूर्णरित्या सन्मान दिला आणि कुठेही वातावरण पेटवण्यास, तणाव पैदा होऊ दिला नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या आम्हाला खूप शक्ती देतात. एकतेचा सूर, देशाला किती ताकद देतो, हे याचं उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 31 ऑक्टोबरला आमच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्याच दिवशी झाली होती. देशाला मोठा धक्का बसला होता, मी आज त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज घराघरात कोणती एक कथा दूरवर ऐकू येत असेल, प्रत्येक गावाची एक कहाणी ऐकू येत असेल, उत्तर ते दक्षिण, पूर्व ते पश्चिम, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात जी कहाणी ऐकू येत असेल तर ती आहे स्वच्छतेची. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक गावाला स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या सुखद अनुभव सांगावेसे वाटतात, कारण, स्वच्छतेचा हा प्रयत्न सव्वाशे कोटी भारतीयांचा प्रयत्न आहे. त्यांच्या परिणामांचे मालकसुद्धा सव्वाशे कोटी भारतीय आहेत. पण एक सुखद आणि मनोरंजक अनुभवसुद्धा आहे. मी ऐकला, मी विचार करतोय, तो आपल्यालाही सांगावा. आपण कल्पना करा, जगातली सर्वात उंचावरली युद्धभूमी जिथलं तापमान शून्य ते 50 ते 60 डिग्री उणे पर्यंत घसरतं. हवेत प्राणवायू नावालाच असतो. इतक्या कठीण परिस्थितीत इतक्या आव्हानांमध्ये राहणं हे सुद्धा पराक्रमापेक्षा कमी नाही. अशा बिकट परिस्थितीत आमचे बहाद्दर जवान छाती ताणून देशाच्या सीमांचं संरक्षण करत आहेतच, पण तिथं स्वच्छ सियाचीन अभियान चालवत आहेत. भारतीय लष्कराच्या या अद्भुत कटीबद्धतेसाठी मी देशवासीयांच्या वतीनं त्यांची प्रशंसा करतो. कृतज्ञता व्यक्त करतो. तिथं इतकी थंडी आहे की, काही विघटन होणंही अवघड आहे. अशा स्थितीत, कचऱ्याचे विलगीकरण आणि त्यांचे व्यवस्थापन करणे एक महत्वपूर्ण काम आहे. अशात, हिमनदी आणि तिच्या आसपासच्या भागातून 130 टन आणि त्यापेक्षा जास्त कचरा हटवणं आणि तेही अशा नाजूक पर्यावरणस्थितीत, किती मोठी ही सेवा आहे. ही एक अशी एको सिस्टीम आहे ज्यात हिमबिबट्या सारख्या दुर्मिळ प्रजातींचे घर आहे. इथं रानटी बोकड आणि तपकिरी अस्वल असे दुर्मिळ प्राणीही राहतात.आपल्या सर्वाना माहीत आहे की, सियाचीन असा भाग आहे की जो नद्या आणि स्वच्छ पाण्याचा स्त्रोत आहे. म्हणून इथं स्वच्छता अभियान चालवण्याचा अर्थ जे खालच्या भागांत राहतात त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याची सुनिश्चिती करणे असा आहे. त्याचबरोबर नुब्रा आणि श्योक अशा नद्यांच्या पाण्याचा उपयोग करतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उत्सव आपल्या सर्वांचं जीवनात एक नवीन चैतन्य जागवणारा पर्व असतो. आणि दिवाळीत तर खास करून, प्रत्येक कुटुंबात काही ना काही खरेदी, बाजारातून काही वस्तू आणणे हे होतच असते. मी एकदा म्हटल होतं की, आपण स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न करू, आमच्या गरजेची वस्तू जर गावात मिळत असेल तर तालुक्याला जायची गरज नाही. तालुक्यात मिळत असेल तर जिल्ह्यापर्यंत जायची गरज नाही. जितके जास्त आपण स्थानिक वस्तूची खरेदी करण्याचा प्रयत्न करू, तितकी ‘गांधी 150’ एक महान संधी होऊन जाईल. आणि माझा तर आग्रह असतो की, आमच्या विणकरांच्या हातानं बनवलेले, आमच्या खादीवाल्याच्या हातानं बनवलेलं काही तरी आपण खरेदी केलं पाहिजे. या दिवाळीतसुद्धा, दिवाळीच्या अगोदर आपण बरीच खरेदी केली असेल. पण असे अनेक लोक असतील जे दिवाळीनंतर गेलो तर थोडे स्वस्त मिळेल असा विचार करत असतील. असे अनेक लोक असतील ज्यांची खरेदी अजून राहिली असेल. दीपावलीच्या शुभकामना देतानाच मी आपल्याला आग्रह करेन की, या आपण स्थानिक वस्तूंच्या खरेदीसाठी आग्रही होऊ या, स्थानिक वस्तू खरेदी करू. महात्मा गांधी यांचं स्वप्न किती महत्वाची भूमिका निभावू शकते, पहा. मी पुन्हा एकदा या दीपावलीच्या पवित्र पर्वासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळीत आपण तऱ्हेतऱ्हेचे फटाके उडवतो. पण कधी कधी बेसावध राहिल्यानं आग लागते. कुठे जखम होते. माझा आपणा सर्वाना आग्रह आहे की, स्वतःला सांभाळा आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा.
माझ्या खूप खूप शुभकामना.
खूप खूप धन्यवाद!!!
माझ्या प्रिय देशवासीयांनो, नमस्कार. मित्रहो, आज ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी देशातील एका महान व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करणार आहे. मी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आपणा सर्व भारतीयांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदराची, आपुलकीची भावना आहे. त्यांच्याविषयी आदर वाटत नसेल, असा भारतीय नागरीक शोधूनही सापडणार नाही. त्या वयाने आपल्या सर्वांपेक्षा फार मोठ्या आहेत आणि देशाच्या विविध टप्प्यांच्या, विविध कालखंडांच्या त्या साक्षीदार आहेत. आपण त्यांना ‘दिदी’ म्हणतो, लता दिदी. यावर्षी, 28 सप्टेंबर रोजी त्या 90 वर्षांच्या झाल्या. परदेशी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी दिदींसोबत दूरध्वनीवरून संवाद साधण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. एखाद्या लहान भावाने आपल्या मोठ्या बहिणीशी बोलावे, अशा प्रकारचा आमच्यातला हा प्रेमळ संवाद होता. अशा प्रकारच्या वैयक्तिक संभाषणाबद्दल मी खरेतर जाहीरपणे फार बोलत नाही. पण आज मला असे वाटते की, आपणही आमच्यातला हा संवाद ऐकावा. ऐकावे की आयुष्याच्या या वळणावरसुद्धा लतादिदी देशाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी उत्सुक आहेत, तत्पर आहेत. त्यांच्या आयुष्यातील समाधानाची भावना भारताच्या प्रगतीशी जोडलेली आहे, बदलणाऱ्या भारताशी जोडलेली आहे, प्रगतीची नवी शिखरे सर करणाऱ्या भारताशी जोडलेली आहे.
मोदी जी : लतादीदी नमस्कार. मी नरेंद्र मोदी बोलतो आहे.
लता जी : नमस्कार,
मोदी जी : मी फोन केला कारण यावर्षी तुमच्या वाढदिवशी…
लता जी : हो हो
मोदी जी : मी विमान प्रवासात असेन.
लता जी : अच्छा
मोदी जी : तर मला वाटले की रवाना होण्यापूर्वी
लता जी : हो हो
मोदी जी : तुम्हाला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा द्याव्यात, असं मला वाटलं.तुमची प्रकृती चांगली राहावी, तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासोबत राहावा, हीच प्रार्थना आणि तुम्हाला प्रणाम करण्यासाठी मी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीच फोन केला.
लता जी : तुमचा फोन येणार, हे ऐकल्यावर मला फारच उत्सुकता वाटली. तुम्ही जाऊन केव्हा परत येणार.
मोदी जी : मी 28 तारखेला रात्री उशिरा किंवा 29 तारखेला पहाटे पोहोचेन. तोपर्यंत तुमचा वाढदिवस झालेला असेल.
लता जी : अच्छा, अच्छा. वाढदिवस काय साजरा करायचा. सगळी घरातलीच मंडळी असतील.
मोदी जी : दिदी बघा तर मला
लता जी : तुमचे आशीर्वाद मिळाले तर
मोदी जी : अरे तुमचे आशीर्वाद आम्ही मागतो. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात.
लता जी : वयाने मोठे तर अनेकजण असतात. पण आपल्या कामामुळे जो मोठा होतो, त्याचे आशीर्वाद मिळणे, ही फार मोठी गोष्ट असते.
मोदी जी : दीदी आपण वयानेही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि कर्तृत्वाने सुद्धा मोठ्या आहात. आणि ही जी सिद्धी आपण प्राप्त केली आहे, ती साधना आणि तपश्चर्येच्या माध्यमातूनच प्राप्त केली आहे.
लता जी : खरेतर मला वाटते की हा माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद आहे आणि श्रोत्यांचा आशीर्वाद आहे. मी खरे तर काहीच नाही.
मोदी जी : दिदी, हा जो तुमच्या स्वभावातला विनम्रपणा आहे, ही आमच्या नव्या पिढीसाठी, आमच्यासाठी फार मोठी शिकवण आहे. आमच्यासाठी फार मोठी प्रेरणा आहे. आयुष्यात इतके सगळे साध्य केल्यानंतर सुद्धा तुम्ही नेहमीच आई-वडिलांचे संस्कार आणि नम्र वागणुकीला प्राधान्य दिलं आहे.
लता जी : हो.
मोदी जी : आणि मला फार आनंद होतो, जेव्हा आपण अभिमानाने सांगता की आपल्या आई गुजराथी होत्या…
लता जी : हो
मोदी जी : आणि मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलो
लता जी : हो
मोदी जी : तुम्ही नेहमीच मला गुजराती पदार्थ खायला घातले आहेत
लता जी : हो. तुम्ही काय आहात, याची तुम्हाला स्वतःला कल्पना नाही. मला माहिती आहे की तुम्ही आल्यानंतर भारताचे चित्र बदलते आहे आणि मला त्यामुळे फार आनंद होतो, फार छान वाटते.
मोदी जी : बस दिदी, तुमचे आशीर्वाद कायम असू द्यात. संपूर्ण देशाला तुमचे आशीर्वाद कायम लाभू देत आणि आमच्यासारखे लोक, ज्यांना काही चांगले करायची इच्छा आहे. मला तुमच्याकडून नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे. तुमची पत्रे सुद्धा मला मिळत राहतात आणि तुम्ही पाठवलेल्या भेटीसुद्धा मला मिळत राहतात. ही जी आपुलकीची भावना आहे, हे जे कौटुंबिक नाते आहे, त्यातून मला एक विशेष आनंद मिळतो.
लता जी : हो, हो. मी तुम्हाला फार त्रास देऊ इच्छित नाही, कारण मी पाहते आहे, मला कल्पना आहे की तुम्ही किती कामात असता आणि तुम्हालाभरपूर काम असते, किती गोष्टींचा विचार करावा लागतो. जेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या आईचे आशीर्वाद घेतले, हे मी पाहिले तेव्हा मी सुद्धा कोणाला तरी त्यांच्याकडे पाठवून त्यांचे आशिर्वाद घेतले.
मोदी जी : हो, माझ्या आईच्या लक्षात होते आणि ती मला सांगत होती
लता जी : हो
मोदी जी : हो
लता जी : हो आणि दूरध्वनीवरून त्यांनी मला आशीर्वाद दिले, त्याचा मला फार आनंद वाटला.
मोदी जी : तुम्ही व्यक्त केलेल्या स्नेहामुळे माझ्या आईला फार आनंद झाला.
लता जी : हो, हो
मोदी जी : तुम्ही नेहमी माझ्याबद्दल काळजी करता, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा देतो.
लता जी : हो.
मोदी जी : यावेळी मुंबईत आलो तेव्हा प्रत्यक्ष भेट व्हावी, असे वाटत होते
लता जी : हो हो नक्कीच
मोदी जी : मात्र वेळ आणि काम यांचे प्रमाण इतकं व्यस्त होतं की मला येणं शक्य झालं नाही.
लता जी : हो
मोदी जी : पण मी लवकरच येईन.
लता जी : हो
मोदी जी : आणि घरी येऊन तुमच्या हातचे काही गुजराथी पदार्थ चाखणार आहे.
लता जी : हो हो, नक्की नक्की, हे माझे सौभाग्य असेल.
मोदी जी : नमस्कार, दिदी
लता जी : नमस्कार
मोदी जी : तुम्हाला अनेक शुभेच्छा
लता जी : नमस्कार
मोदी जी : नमस्कार
माझ्या प्रिय देशवासीयांनो, नवरात्रीबरोबरच आजपासून भवतालचे सगळे वातावरण पुन्हा एकदा नव्या उत्साहाने, नव्या आनंदाने, नव्या संकल्पाने पुन्हा एकदा भरून जाईल. उत्सवाचे दिवस आहेत ना. येणारे अनेक आठवडे देशभरात उत्सवांची धामधूम सुरू राहील. आपण सर्व नवरात्र, गरबा, दुर्गा पुजा, दसरा, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा आणि असे अनेक सण साजरे करू. आपणा सर्वांना येणाऱ्या या सर्व सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. सणांच्या वेळी अनेक नातेवाईक आपल्या घरी येतील. आपली घरे आनंदाने भरलेली राहतील. मात्र आपण पाहिले असेल की आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक आहेत, जे या सणांच्या आनंदापासून वंचित राहून जातात. ‘दिव्याखाली अंधार’ यालाच तर म्हणतात. बहुतेक ही म्हण केवळ काही शब्द नाहीत, तर आपल्यासाठी एक आदेश आहे, एक दर्शन आहे, एक प्रेरणा आहे. विचार करा, एकीकडे काही घरे प्रकाशाने उजळून निघतात त्याच वेळी दुसरीकडे समोर, आजूबाजूला काही घरांमध्ये केवळ अंधाराचे साम्राज्य असते. काही घरांमध्ये मिठाई खराब होऊन जाते तर काही घरांमधील लहान मुलांच्या मनात मिठाई खाण्याची इच्छा तशीच राहून जाते. काही घरांमध्ये कपडे ठेवण्यासाठी कपाटांमध्ये जागा उरत नाही, तर काही ठिकाणी शरीर झाकण्यासाठीही वस्त्र मिळत नाही. यालाच ‘दिव्याखाली अंधार’ असे म्हणतात का… हो, यालाच म्हणतात दिव्याखाली अंधार. या सणांचा खरा आनंद तेव्हाच मिळेल, जेव्हा हा अंध:कार दूर होईल. हा अंध:कार कमी व्हावा, सगळीकडे प्रकाश पसरावा. जेथे अभाव असेल तेथे आपण आनंद वाटावा, असा आपला स्वभाव असावा. आमच्या घरांमध्ये मिठाई, कपडे, भेटवस्तू जेव्हा जेव्हा येतील, तेव्हा एक क्षणभरासाठी या भेटी बाहेर जाव्यात,असाही विचार करा. किमान आपल्या घरात ज्या वस्तू आवश्यकतेपेक्षा जास्त आहेत, ज्या आता आपण वापरत नाही, अशा वस्तू तरी बाहेर गरजूंना देण्याचे काम निश्चितच करावे. अनेक शहरांमध्ये, अनेक अशासकीय संस्था युवा सहकाऱ्यांच्या स्टार्ट अप्ससोबत हे काम करतात. ते लोकांच्या घरांमधून कपडे, धान्य, जेवण अशा गरजेच्या वस्तू एकत्र करतात आणि गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत त्या वस्तू पोहोचवतात. हे काम अगदी अबोलपणे सुरु असते. यावर्षी उत्सवाच्या या काळात संपूर्ण जागरुकता आणि संकल्पासह दिव्याखालचा हा अंधार आपण दूर करू शकतो का? अनेक गरीब कुटुंबांच्या चेहर्यावर उमटलेले हसू, सणाचा आपला आनंद द्विगुणित करेल, आपल्या चेहऱ्यावर आणखी चमक येईल, आपले दिवे अधिक प्रकाशमान होतील आणि आपली दिवाळी आणखीनच उजळून जाईल.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दिवाळीमध्ये सौभाग्य आणि समृद्धीच्या रुपाने लक्ष्मी घरात येते, पारंपारिक रूपात लक्ष्मीचे स्वागत केले जाते. यावर्षी आपण एका नव्या पद्धतीने लक्ष्मीचे स्वागत करू शकतो का? आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानले गेले आहे, कारण मुली सौभाग्य आणि समृद्धी घेऊन येतात. यावर्षी आपण आपल्या समाजात, गावांमध्ये, शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो का? सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. आपल्यामध्ये अशा अनेक मुली असतील, ज्या आपल्या मेहनतीने, इच्छाशक्तीच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्वल करत असतील. यावर्षी दिवाळीमध्ये भारताच्या या लक्ष्मींच्या सन्मानार्थ आपण कार्यक्रम करू शकतो का? आपल्या आजूबाजूला अनेक मुली, अनेक सुना अशा असतील, ज्या असामान्य कार्य करत आहेत. कोणी गरीब मुलांना शिकवण्याचे काम करत असेल, कोणी स्वच्छता आणि आरोग्य या बाबत जनजागृती करण्याचे कार्य करत असेल, कोणी डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊन समाजाची सेवा करत असेल, वकील होऊन एखाद्याला न्याय देण्याच्या प्रयत्न करत असेल. आपल्या समाजाने अशा लेकींना ओळखावे, त्यांना सन्मानित करावे आणि त्यांचा अभिमान बाळगावा. अशा सन्मानाचे कार्यक्रम देशभरात व्हावे.आणखी एक काम करता येईल. या मुलींच्या यशाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी आणि ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगचा वापर करावा.‘Selfie with daughter’ ही महा मोहीम आपण राबवली होती आणि जगभरात तीचा प्रसार झाला होता, त्याच प्रकारे या वेळी आपण ‘भारत की लक्ष्मी’ही मोहीम राबवू या. भारत की लक्ष्मी या उपक्रमाला प्रोत्साहन देण्याचा अर्थ आहे, देश आणि देशवासियांच्या समृद्धीचा मार्ग सक्षम करणे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी मागेच म्हटले होते की ‘मन की बात’कार्यक्रमाचा एक फार मोठा लाभ असा असतो की मला अनेक ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संवाद करण्याचे सौभाग्य लाभते. काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधील एक विद्यार्थी अलीना तायंग यांनी मला एक छान पत्र पाठवले आहे आणि त्यांनी त्यात लिहिले आहे, मी आपल्यासमोर त्या पत्राचे वाचन करतो…
आदरणीय पंतप्रधान जी,
माझे नाव अलीना तायंग आहे. मी अरुणाचल प्रदेशातील रोइंग येथे राहतो. यावर्षी जेव्हा माझ्या परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा मला काही लोकांनी विचारले की तू एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक वाचलेस का? मी त्यांना सांगितले की हे पुस्तक मी वाचलेले नाही. पण पुन्हा जाऊन मी हे पुस्तक खरेदी केले आणि दोन-तीन वेळा वाचले. त्यानंतरचा माझा अनुभव फारच चांगला होता. मी हे पुस्तक परीक्षेपूर्वी वाचले असते तर मला त्याचा फार लाभ झाला असता, असे मला वाटले. या पुस्तकातील अनेक पैलू मला फारच आवडले, पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की विद्यार्थ्यांसाठी त्यात अनेक मंत्र आहेत, मात्र पालक आणि शिक्षकांसाठी या पुस्तकात फार काही नाही. मला असे वाटते की जर आपण या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीबाबत विचार करत असाल, तर त्यात पालक आणि शिक्षकांसाठी आणखी काही मंत्र, आणखी काही मजकूराचा नक्कीच समावेश करावा.”
बघा, माझ्या युवा सहकाऱ्यांना सुद्धा विश्वास वाटतो की देशाच्या प्रधान सेवकाला एखादे काम सांगितले तर ते नक्कीच होईल.
माझ्याछोट्या विद्यार्थी मित्रा, सर्वात आधी, हे पत्र लिहिल्याबद्दल आपले मनापासून आभार. एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक दोन-तीन वेळा वाचल्याबद्दल सुद्धा धन्यवाद आणि वाचतानाच, त्यात काय कमतरता आहेत, हे मला सांगितल्याबद्दल अनेकानेक आभार. माझ्या या छोट्याशा मित्राने माझ्यावर एक काम सुद्धा सोपवले आहे, काही करण्याचा आदेश दिला आहे. मी निश्चितच आपल्या आदेशाचे पालन करेन. आपण जे सांगितले आहे की या पुस्तकाची नवी आवृत्ती जेव्हा येईल, तेव्हा मी त्यात निश्चितच पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी काही गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करेन. परंतु मी आपणा सर्वांना आग्रह करेन की या कामी आपण सर्व मला मदत करू शकता का? रोजच्या जगण्यातले आपले अनुभव काय आहेत? देशातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मी आग्रह करतो की आपण तणावमुक्त परीक्षेशी संबंधित पैलूंबाबत आपले अनुभव मला सांगावे, आपल्या सूचना मला सांगाव्यात. मी निश्चितपणे त्यांचा अभ्यास करेन, त्यावर विचार करेन आणि त्यातून ज्या गोष्टी योग्य वाटतील, त्या मी माझ्या शब्दात, माझ्या पद्धतीने लिहिण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन आणि कदाचित आपल्या सर्वांच्या जास्त सूचना आल्या तर माझ्या पुस्तकाची नवी आवृत्ती निश्चितच येऊ शकेल. आपल्या सर्वांच्या विचारांची मी वाट बघेन. अरुणाचलमधील आमच्या या छोट्याशा मित्राचे, विद्यार्थी अलीना तायंग यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून तुम्हाला देशाच्या पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमांबाबत माहिती मिळत असते, तुम्ही त्याबाबत चर्चाही करता. पण तुम्हाला माहिती आहेच की मीसुद्धा तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य माणूस आहे, एक सर्वसामान्य नागरिक आहे आणि म्हणूनच एका सर्वसामान्य आयुष्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव दिसून येतो, तसाच प्रभाव माझ्याही आयुष्यात, माझ्याही मनावर होत असतो, कारण मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. बघा, यावर्षी युएस ओपन स्पर्धा जिंकण्याची जितकी चर्चा होती, तितकीच चर्चा उपविजेता दानील मेदवेदेव यांच्या भाषणाचीसुद्धा होती. सोशल मीडियावर सुद्धा ते गाजत होते. मग मीसुद्धा ते भाषण ऐकले आणि सामनासुद्धा पाहिला. तेवीस वर्षाचा दानील मेदवेदेव आणि त्यांचा साधेपणा, त्यांची परिपक्वता प्रत्येकाला प्रभावित करणारी होती. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाने खरोखरच भारावून गेलो. या भाषणापूर्वी अगदीच थोड्यावेळापूर्वी 19 वेळा ग्रॅन्ड स्लॅम पटकावणारे आणि टेनिस विश्वाचे सम्राट राफेल नदाल यांच्याकडून ते अंतिम फेरीत पराभूत झाले होते. अशावेळी इतर कोणी असते तर उदास आणि निराश दिसले असते, मात्र त्यांचा चेहरा उतरला नाही तर त्यांनी आपल्या भाषणाने सर्वांच्या चेहर्यावर हसू आणले. त्यांचा नम्रपणा, साधेपणा, शब्द आणि भावनेतून खऱ्या अर्थाने खिलाडू वृत्तीचे जे रूप पाहायला मिळाले, त्यामुळे प्रत्येकजण प्रभावित झाला. त्यांच्या बोलण्याचे तेथे उपस्थित प्रेक्षकांनी उत्साहात स्वागत केले.दानीलनेविजेता नदालचे सुद्धा खूप कौतुक केले, नदालने लक्षावधी युवकांना कशाप्रकारे टेनिस खेळण्यासाठी प्रेरित केले आहे, त्याबद्दल त्याने सांगितले. त्याचबरोबर त्यांच्यासोबत खेळणे किती कठीण होते हे सुद्धा त्याने सांगितले. अटीतटीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी नदालचे कौतुक करून खिलाडूवृत्तीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले. खरे तर त्याच वेळी दुसरीकडे विजेता नदाल याने सुद्धा दानीलच्या खेळाचे मनापासून कौतुक केले. एकाच सामन्यात पराभूत होणाऱ्याचा उत्साह आणि जिंकणाऱ्याचा नम्रपणा, या दोन्ही गोष्टी अभ्यासण्यासारख्या होत्या. जर आपण दानील मेदवेदेवचे भाषण ऐकले नसेल, तर मी आपणा सर्वांना, विशेषतः युवकांना सांगेन की त्यांचा हा व्हिडिओ नक्कीच बघा. यात प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक वयाच्या व्यक्तींना शिकता येईल, असे बरेच काही आहे. हे असे क्षण असतात, ते जिंकणे किंवा हरणे याच्या पलिकडचे असतात. जेव्हा विजय किंवा पराजय याला फारसा अर्थ राहत नाही. आयुष्य जिंकते आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये फार उत्तम प्रकारे हे सांगण्यात आले आहे. आपल्या पूर्वजांचे विचार खरोखरच कौतुकास्पद होते. आपल्याकडे शास्त्रांमध्ये म्हटले आहे…
विद्या विनय उपेता हरति
न चेतांसी कस्य मनुज्स्य |
मणि कांचन संयोग:
जनयति लोकस्य लोचन आनन्दम
अर्थात, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये योग्यता आणि नम्रपणा एकाच वेळी वसते, तेव्हा ती व्यक्ती कोणाचे बरे मन जिंकणार नाही? खरेतर या युवा खेळाडुने जगभरातील सर्व लोकांचे मन जिंकून घेतले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि विशेषतः माझ्या युवा मित्रांनो, मी आता जे काही सांगणार आहे, ते खरोखर आपल्या भल्यासाठी सांगणार आहेत. वाद सुरूच राहतील, पक्षांतील मतभेद कायम राहतील. मात्र काही गोष्टी वेगाने पसरण्यापूर्वी थांबवता आल्या तर त्यापासून मोठा लाभ होऊ शकेल. ज्या गोष्टी फार वेगाने वाढतात, फार पसरत जातात, त्या गोष्टी थांबवणे नंतर कठीण होत जाते. मात्र सुरुवातीलाच जर आपण जागृत होऊन त्या थांबवल्या तर बरेच काही वाचवता येऊ शकते. याच भावनेतून आज मला वाटते, विशेषतः माझ्या प्रिय युवकांशी काही बोलावेसे वाटते. आपणा सर्वांना माहिती आहे की तंबाखूचे व्यसन आरोग्यासाठी फारच हानिकारक असते. हे व्यसन सोडणेही फार कठीण होऊन जाते. तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना कर्करोग, मधुमेह, रक्तदाब अशा आजारांचा धोका जास्त असतो, असे प्रत्येकजण म्हणतो. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे त्यात नशेचे प्रमाण जास्त असते. किशोरवयात याचे सेवन केल्यामुळे मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. परंतु मी आज आपल्या सोबत एका नव्या विषयाबाबत बोलू इच्छितो. आपणास माहिती असेल की नुकतेच भारतात ई सिगारेटवर निर्बंध लागू करण्यात आले. ई सिगारेट ही नियमित सिगारेटपेक्षा वेगळे असे इलेक्ट्रॉनिक उपकरण असते. सिगारेटमध्ये निकोटिनयुक्त तरल पदार्थ गरम झाल्यामुळे एक प्रकारचा रासायनिक धूर तयार होतो, ज्याच्या माध्यमातून निकोटिनचे सेवन केले जाते. नेहमीच्या सिगरेटच्या धोक्याबद्दल आपल्याला बर्यापैकी माहिती असेल, मात्र ई सिगरेट बद्दल एक गैरसमज पसरवण्यात आला आहे की ई सिगारेटमुळे कोणताही धोका उद्भवत नाही. इतर सिगरेट प्रमाणे याची दुर्गंधी पसरू नये, यासाठी यात सुगंधी रसायनांचा वापर केला जातो. आपण आपल्या आजूबाजूला पाहिले आहे की अनेक घरांमध्ये वडील चेनस्मोकर असतात, मात्र तरीही ते घरातील इतरांना धूम्रपान करण्यापासून रोखतात, थांबवतात. त्यांना असे वाटते की आपल्या मुलांना विडी किंवा सिगारेटची सवय लागू नये. आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने धूम्रपान करू नये, असा त्यांचा प्रयत्न असतो. धुम्रपानामुळे, तंबाखूमुळे शरीराचे फार मोठे नुकसान होते, याची त्यांना कल्पना असते. सिगरेटमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल कोणताही गैरसमज नाही, ते सेवन नुकसानच करते, हे विकणाऱ्यालाही माहिती असते, सेवन करणाऱ्यालाही माहिती असते आणि पाहणाऱ्यालाही माहिती असते. ई सिगारेटची बाब वेगळी आहे. ई सिगारेटबाबत लोकांच्या मनात फार जागृती नाही, त्यापासून उद्भवणाऱ्या धोक्याबद्दल लोकांना माहिती नाही आणि अनेकदा उत्सुकतेपोटी ही सिगारेट हळूच घरात प्रवेश करते. अनेकदा जादू दाखवतो, असे सांगून लहान मुले सुद्धा एकमेकांना ती दाखवत राहतात. कुटुंबात सुद्धा आई-वडिलांच्या समोर सुद्धा, बघा, आज मी एक नवी जादू दाखवतो. बघा माझ्या तोंडातून मी धूर काढून दाखवतो. बघा, आगीशिवाय, माचिसची काडी न पेटवता मी धूर काढून दाखवतो. जादूचे प्रयोग सुरू असावेत, अशा पद्धतीने हे दाखवले जाते आणि कुटुंबातले लोक सुद्धा टाळ्या वाजवतात. त्यांना कल्पनाच नसते की एकदा घरातील किशोरवयीन आणि युवक या व्यसनात अडकले कि त्यानंतर ते हळूहळू या नशेच्या आहारी जातात, या व्यसनाच्या अधीन होतात. आमचा युवा वर्ग धन वाया घालवण्याच्या या मार्गावर चालू लागतो. अजाणतेपणी चालू लागतो. खरे तर सिगारेटमध्ये अनेक अपायकारक रसायनांचा वापर केला जातो, जी आरोग्यासाठी अपायकारक असतात. आपल्या आजूबाजूला कोणी धूम्रपान करत असेल तर आपल्याला त्याच्या वासावरूनच ते समजते. एखाद्याच्या खिशात सिगारेटचे पाकीट असेल तेव्हा सुद्धा केवळ वासावरून ते समजते. मात्र ई सिगारेट अशी गोष्ट नाही, त्यामुळे अनेक किशोरवयीन आणि युवक अजाणतेपणी आणि काही वेळा फॅशन स्टेटमेंट म्हणून फार अभिमानाने आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या दप्तरांमध्ये, आपल्या खिशांमध्ये तर कधी हातामध्ये ई सिगरेट घेऊन फिरताना दिसतात आणि नंतर व्यसनाधीन होतात. युवा पिढी हे देशाचे भवितव्य आहे. नशेचा हा प्रकार आपल्या युवकांना उध्वस्त करणारा ठरू नये, यासाठी सिगारेटवर निर्बंध लावण्यात आले आहेत. कुटुंबाची स्वप्ने उद्ध्वस्त होण्यापासून वाचवता यावीत, मुलांचे आयुष्य देशोधडीला लागू नये, व्यसनाच्याया सवयीने समाजात हातपाय पसरू नयेत, यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
मी आपणा सर्वांना आग्रह करतो की तंबाखूचे हे व्यसन सोडून द्या आणि ई सिगारेटबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. या, आपण सर्व मिळून एक आरोग्यपूर्ण भारत निर्माण करू या.
अरे हो, फिट इंडिया ची आठवण आहे ना तुम्हाला? फिट इंडियाचा अर्थ असा नाही की सकाळ-संध्याकाळ दोन दोन तास आपण जिम मध्ये जावे, तेवढे पुरे. फिट इंडियासाठी या सर्व व्यसनांपासून सुद्धा दूर राहावे लागेल. माझे हे बोलणे आपल्याला खटकले नसेल, तर पटले असेल, असा विश्वास मला वाटतो.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपला भारत देश, इतरांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य खर्ची घालणाऱ्या अशा अनेक असामान्य लोकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिला आहे, ही आपल्यासाठी खरोखरच सौभाग्याची गोष्ट आहे.
ही आमची भारत माता, हा आमचा देश बहुरत्ना वसुंधरा आहे. या मातीमधून अनेक मानव रत्ने उपजली आहेत. भारत अशा अनेक असाधारण लोकांची जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि हे असे लोक आहेत, ज्यांनी केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण केले. अशाच एका महान व्यक्तीला 13 ऑक्टोबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये सन्मानित केले जाणार आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी निश्चितपणे गर्वाची बाब आहे.पोप फ्रान्सिस येत्या 13 ऑक्टोबर रोजी मरियम थ्रेसिया यांना संत म्हणून घोषित करतील. सिस्टर मरियम थ्रेसिया यांनी केवळ पन्नास वर्षांच्या आपल्या लहानशा आयुष्यात मानवतेच्या कल्याणासाठी जे कार्य केले, ते संपूर्ण जगासाठी एक अनोखे उदाहरण आहे. समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्राबद्दल त्यांना फार आपुलकी होती. त्यांनी अनेक शाळा, वसतिगृहे आणि अनाथाश्रम उभारले. सिस्टरथ्रेसिया यांनी जे कार्य केले, ते पूर्ण निष्ठेने, मनापासून आणि समर्पणाच्या भावनेतून पूर्ण केले. त्यांनी congregation of the sisters of the holy family ची स्थापना केली, जे आज सुद्धा त्यांची जीवनमूल्ये आणि मोहीम पूर्ण करत आहे. मी पुन्हा एकदा सिस्टर मरियम थ्रेसिया यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भारतीय लोकांचे, विशेषतः आमच्या ख्रिस्ती बंधू-भगिनींचे या यशाबद्दल मनापासून अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, संपूर्ण भारतासाठी नाही तर जगभरासाठी अभिमानाची बाब आहे की आज आपण गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असतानाच130 कोटी भारतवासीयांनी सिंगल यूज प्लास्टिकपासून मुक्त होण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने भारताने जी नेतृत्वाची भूमिका घेतली आहे, ती पाहता, आज जगभरातील देशांच्या नजरा भारताकडे लागून राहिल्या आहेत. आपण सर्व 2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी होणार आहात, असा मला विश्वास वाटतो. या ठिकाणी लोक आपापल्या पद्धतीने या मोहिमेत योगदान देत आहेत, मात्र आमच्या देशातील एका युवकाने एका अनोख्या पद्धतीने एक मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या कामाकडे जेव्हा माझे लक्ष गेले, तेव्हा मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचा हा नवा प्रयोग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्याशी झालेला संवाद देशातील इतर काही लोकांनाही उपयुक्त वाटेल. श्रीयुत रीपुदमन बेल्वीजी एक अनोखा प्रयत्न करत आहेत. ते प्लॉगींग करतात. जेव्हा मी पहिल्यांदा प्लॉगींग हा शब्द ऐकला, तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा नवीन होता. परदेशात कदाचित हा शब्द वेगळ्या प्रकारे वापरला जातो. मात्र भारतात रीपुदमन बेल्वीजीयांनी याचा फार मोठा प्रसार केला आहे. या, त्यांच्याशी जरा गप्पा मारु या.
मोदी जी : हॅलो रीपुदमनजी, नमस्कार मी नरेंद्र मोदी बोलतो आहे.
रिपुदमन : हो सर नमस्कार. खूप खूप आभार सर.
मोदी जी : रिपुदमन जी
रिपुदमन : हो सर.
मोदी जी: आपण प्लॉगींग संदर्भात जे काम इतक्या समर्पित भावनेने करत आहात.
रिपुदमन : हो सर
मोदी जी: तर माझ्या मनात याबाबत उत्सुकता होती. मला वाटले की मी स्वतः फोन करून आपल्याला त्याबद्दल विचारावे.
रिपुदमन: अरे वा
मोदी जी : ही कल्पना आपल्या मनात कशी बरं आली?
रिपुदमन : हो सर
मोदी जी : हा शब्द, ही पद्धत आहे, ती कशी मनात आली
रिपुदमन : सर, आजच्या युवकांना काहीतरी कूल हवे असते, काहीतरी स्वारस्यपूर्ण हवे असते. त्यांना चालना देण्यासाठी तर मी स्वतः प्रेरित झालो. जर मला130 कोटी भारतीयांना या मोहिमेत माझ्यासोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर मला काहीतरी कूल करायचे होते, काहीतरी स्वारस्यपूर्ण करायचे होते. तर, मी स्वतः एक धावपटू आहे.सकाळी जेव्हा आम्ही धावायला जातो, तेव्हा रहदारी कमी असते, लोक कमी असतात. अशावेळी कचरा, घाण आणि प्लास्टिक सर्वात जास्त दिसते.अशा वेळी तक्रार करण्याऐवजी किंवा कटकट करण्याऐवजी मला असे वाटले की याबद्दल काही करता येईल आणि माझ्या धावपटूंच्या गटासोबत दिल्लीमध्ये सुरुवात केली आणि संपूर्ण भारतभरात ही मोहिम घेऊन गेलो. सगळीकडेच फार कौतुक झाले.
मोदी जी : आपण नक्की काय करत होता, थोडं समजावून सांगा, म्हणजे मलाही समजेल आणि मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना सुद्धा समजेल.
रिपुदमन :सर तर आम्ही‘Run & Clean-up Movement’ ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत आम्ही धावणाऱ्या गटांना त्यांच्या व्यायामानंतर त्यांच्या कुल डाऊन ऍक्टिव्हिटी मध्ये कचरा उचलायची सूचना केली. प्लास्टिक उचला, असे सांगितले. तर जेव्हा आपण सकाळी धावत असता आणि त्याच वेळी आपण स्वच्छता करत असता तेव्हा त्या माध्यमातून आणखी काही व्यायाम प्रकार करू लागता. आपण केवळ धावत नसता, तर कचरा उचलतानाsquats करता, deep squats करता, lunges करता, forward bent करता. धावताना, दिसलेला कचरा उचलत गेलात तर त्यामुळे होणारी तुमची शारीरिक हालचाल एक समग्र व्यायाम होऊन जाईल. आपल्याला ऐकून आनंद वाटेल की गेल्यावर्षी आरोग्य विषयाला समर्पित अनेक मासिकांमध्ये भारतातील टॉप फिटनेस ट्रेंड म्हणून या गमतीदार प्रकाराला चक्क नामांकन मिळाले आहे…
मोदी जी : अरे व्वा, त्याबद्दल आपले अभिनंदन.
रिपुदमन : धन्यवाद् सर|
मोदी जी: तर आता आपण 5 सप्टेंबरपासून कोच्चिहून सुरूवात केली आहे.
रिपुदमन : हो सर. या मोहिमेचे नाव आहे ‘R|Elan Run to make India Litter Free’ ज्याप्रमाणे आपणाला 2ऑक्टोबर या दिवसाला ऐतिहासिक दिवस म्हणून परिमाण द्यायचे आहे, त्याचप्रमाणे मला असे वाटते की जेव्हा देश कचरामुक्त होईल, तेव्हाच प्लास्टिक मुक्त सुद्धा होईल आणि ती एक वैयक्तिक जबाबदारी सुद्धा असेल. आणि म्हणूनच मी पन्नास शहरांमध्ये काही हजार किलोमीटर धावत आहे आणि तेवढे अंतर स्वच्छ करत आहे. सर्वांनी मला सांगितले की जगातील ही सर्वात प्रदीर्घ अशी स्वच्छता मोहीम असेल आणि त्याच बरोबर आम्ही आणखीन एक कूल गोष्ट केली. सोशल मीडियावर आम्ही PlasticUpvaas या हॅशटॅगचा वापर केला. प्लास्टिक उपवास कसा करावा, तर जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आपण आम्हाला सांगा, अशी कोणती एक वस्तू आहे, एक वस्तू, केवळ प्लास्टिक नाही तर एकदाच वापरली जाणारी अशी कोणती गोष्ट आहे, जी आपण पूर्णपणे आपल्या आयुष्यातून हद्दपार कराल?
मोदी जी: अरे वा… आपण 5 सप्टेंबर रोजी रवाना झाले आहात, तर आपला आतापर्यंतचा अनुभव काय आहे…
रिपुदमन: सर, आतापर्यंतचा अनुभव फारच चांगला आहे. गेल्या दोन वर्षात संपूर्ण भारतभरात आम्ही तीनशेच्या आसपास प्लॉगींग मोहिमा राबवल्या आहेत. जेव्हा आम्ही कोच्चीपासून सुरुवात केली, तेव्हा धावणारे गटही आमच्यासोबत आले. तेथील स्थानिक स्वच्छता करणाऱ्यांनाही मी माझ्यासोबत घेतले. कोचीननंतर मदुराई, कोयंबतूर, सालेम आणि आत्ताच आम्ही उडुपीमध्ये ही मोहीम राबवली. तेथे एका शाळेचे आमंत्रण आले, तेव्हा अगदी लहान लहान मुले, सर, इयत्ता तिसरीपासून सहावी पर्यंतची मुले. त्यांना एका कार्यशाळेसाठी बोलावले होते. अर्धा तासासाठीच्या त्या कार्यशाळेचे रूपांतर तीन तासांच्या प्लॉगिंग मोहिमेमध्ये झाले. सर, कारण मुले इतकी उत्साही होती की त्यांना हे करुन बघायचे होते आणि आपल्या घरीसुद्धा सांगायचे होते, आपल्या पालकांना सांगायचे होते, आपल्या शेजाऱ्यांना सांगायचे होते. मुले ही सर्वात मोठी प्रेरणा असतात त्यामुळे आम्हाला त्या सर्वांना पुढे घेऊन जावे लागले.
मोदी जी : रिपु जी, हे केवळ परिश्रम नाहीत तर ही एक साधना आहे. आपण खरोखरच साधना करत आहात.
रिपुदमन :हो सर
मोदी जी: मी आपले मनापासून अभिनंदन करतो.आता मला सांगा,तुम्हाला देशवासियांना तीन गोष्टी सांगायच्या असतील तर अशा कोणत्या तीन विशिष्ट गोष्टींचा संदेश आपण द्याल?
रिपुदमन : घाण मुक्त भारतासाठी, कचरामुक्त भारतासाठी मी खरे तर तीन टप्पे सांगू इच्छितो. पहिला टप्पा म्हणजे आपण कचरा कचरापेटीत टाकावा. दुसरा टप्पा म्हणजे जिथे कुठे आपल्याला कचरा दिसेल, जमिनीवर पडलेला, तो उचलावा आणि कचरापेटीत टाकावा. तिसरा टप्पा म्हणजे कचरापेटी दिसत नसेल तर कचरा आपल्या खिशात ठेवावा किंवा आपल्या गाडीमध्ये ठेवावा. घरी घेऊन जावे,कोरडा कचरा आणि ओला कचरा असे त्याचे वर्गीकरण करावे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेची गाडी येईल तेव्हा तो त्यात टाकावा. जर आपण या तीन टप्प्यांचा अवलंब केला तर आपल्याला निश्चितच कचरामुक्त भारत दिसू शकतो.
मोदी जी : बघा रिपु जी, फारच सोप्या शब्दात आणि साध्या भाषेत आपण एक प्रकारे गांधीजींचे स्वप्न उराशी बाळगून पुढे चालला आहात. त्याचबरोबर सोप्या शब्दात आपले मत मांडायची गांधीजींची जी पद्धत होती, ती सुद्धा आपण अंगिकारली आहे.
रिपुदमन : धन्यवाद
मोदी जी : आपण निश्चितच यासाठी अभिनंदनास पात्र आहात. आपल्यासोबत संवाद साधून मला खरोखर मनापासून आनंद झाला आहे. आपण एका नावीन्यपूर्ण पद्धतीने आणि विशेष म्हणजे, युवकांना आवडेल अशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम राबवत आहात. मी आपले मनापासून अभिनंदन करतो. आणि मित्रहो, यावर्षी आदरणीय बापूंच्या जयंतीनिमित्त क्रीडा मंत्रालय सुद्धा ‘Fit India Plogging Run’चे आयोजन करत आहे. दोन ऑक्टोबर रोजी दोन किलोमीटर प्लॉगिंग. संपूर्ण देशभरात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम कसा करावा,कार्यक्रमात काय असावे, हे रिपुदमन यांच्या अनुभवातून आपण ऐकले आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेत आपण सर्व दोन किलोमीटर अंतर चालणार असू तर त्या वेळात रस्त्यावर पडलेल्या प्लास्टिकचा कचरा गोळा करावा. यामुळे आपण केवळ आपल्या आरोग्याची काळजी घेणार नाही तर धरतीच्याही आरोग्याची काळजी घेऊ शकू. या मोहिमेद्वारे लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीबरोबरच स्वच्छतेबाबतची जागरूकताही वाढत आहे.130 कोटी भारतीयांनी सिंगल यूज प्लास्टीक वापरापासून मुक्त होण्याच्या दिशेनेएक पाऊल उचलले तर अवघा भारत एकाच वेळी 130 कोटी पावले पुढे जाईल असा विश्वास मला वाटतो. रिपुदमनजी, पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. आपणाला, आपल्या चमुला आणि आपल्या या कल्पकतेला माझ्या तर्फे अनेक शुभेच्छा.
धन्यवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन ऑक्टोबरच्या पूर्वतयारीमध्ये देश आणि संपूर्ण जग गुंतले आहे. मात्र आम्हाला ‘गांधी 150’ हे उद्दीष्ट कर्तव्यपथावर आणायचे होते. आपले आयुष्य देशहितार्थ अर्पण करण्यासाठी पुढे जायचे होते. एका गोष्टीबद्दल मी थोडे आगाऊ सांगू इच्छितो. खरे तर पुढच्या मन की बात कार्यक्रमात त्याबद्दल विस्ताराने नक्कीच सांगेन, मात्र आज मी जरा आधीच अशासाठी सांगतो आहे की आपल्याला तयारी करण्याची संधी मिळावी. आपल्या लक्षात असेल की 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हे आपले सर्वांचे स्वप्न आहे आणि त्याच निमित्ताने प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर रोजी आम्ही संपूर्ण देशात ‘Run for Unity’ अर्थात देशाच्या एकतेसाठी धावण्याची ही स्पर्धा आयोजित करतो. सर्वजण, आबालवृद्ध, शाळा-महाविद्यालयातील सर्वजण हजारोंच्या संख्येने भारताच्या लक्षावधी गावांमधून त्या दिवशी देशाच्या एकतेसाठी धाव घेतील. तर आपण त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करावी. याबद्दल सविस्तर पुढे बोलणारच आहे, मात्र अजून वेळ आहे. काही लोकांना सरावाला सुरुवात करता येईल, इतर काही योजनाही तयार करता येतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला आठवत असेल की 15 ऑगस्ट रोजी मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की 2022 सालापर्यंत आपण भारतातील पंधरा ठिकाणांना भेट द्यावी. किमान पंधरा ठिकाणी आणि एक-दोन रात्रींच्या मुक्कामाचा कार्यक्रम करावा. आपण भारत पाहावा, समजून घ्यावा, अनुभवावा. आपल्याकडे एवढे वैविध्य आहे. आणि जेव्हा दिवाळीच्यासणानिमित्त लोक सुट्ट्यांवर येतात, तेव्हा नक्कीच फिरायला जातात, म्हणूनच मी पुन्हा एकदा आग्रह करतो की आपण भारतातील कोणत्याही पंधरा ठिकाणी नक्कीच फिरायला जावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आता परवाच 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिवस साजरा करण्यात आला आणि जगातील काही जबाबदार संस्था पर्यटन विषयक क्रमवारी सादर करतात. पर्यटनाविषयीच्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या स्थानात सुधारणा झाली आहे, हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल. आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. विशेषतः पर्यटनाचे महत्त्व जाणून घेतल्यामुळे हे शक्य झाले आहे. स्वच्छता मोहिमेचेही यात फार मोठे योगदान आहे. आणि ही सुधारणा किती काळात झाली आहे, सांगू का? तुम्हाला हे जाणून निश्चितच आनंद होईल. आज आपण 34 व्या स्थानावर आहोत आणि पाच वर्षांपूर्वी आपण 65 व्या स्थानावर होतो. म्हणजेच आपण फार मोठी झेप घेतली आहे. जर आपण आणखी प्रयत्न केले तर स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपण जगातील मुख्य पर्यटन स्थळांमध्ये निश्चितच वरचे स्थान मिळवू शकू.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा, वैविध्याने परिपूर्ण अशा भारतातील विविध सणांनिमित्त अनेकानेक शुभेच्छा. हो. एका गोष्टीची नक्की काळजी घ्या. दिवाळीच्या या दिवसांमध्ये कुठेही फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना होऊ नयेत, कोणाही व्यक्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी आपण निश्चितच खबरदारी घ्यावी. आनंद झाला पाहिजे, उत्साह सुद्धा असला पाहिजे. आपले हे सण एकत्र येऊन साजरे केले जातात, एकत्रितपणे साजरे केले जातात, त्यामुळे या सामूहिकतेतून संस्कार सुद्धा प्राप्त होतात, सामूहिक जीवनाचे एक नवे सामर्थ्य प्राप्त होते. आणि अशा नव्या सामर्थ्याच्या साधनेला निमित्त ठरतात, ते आपले सण. या, आपण सर्व मिळून उत्साहाने, आनंदाने, नवी स्वप्ने आणि नव्या संकल्पासह हे सण साजरे करूया. पुन्हा एकदा अनेकानेक शुभेच्छा. धन्यवाद!!!
My dear countrymen, Namaskar. On the one hand, these days, our country is enjoying the feast of rains; on the other, every corner of the country is celebrating festivals and fairs. And this will go on till Diwali. Perhaps our ancestors intricately wove the annual seasonal cycle, the economy cycle and social & life systems in a way that ensured, that under no circumstances, dullness crept into society. We celebrated quite a few festivals in the days gone by. Yesterday, Krishna- Janma Mahotsav, the festival of the birth of Lord Krishna was celebrated throughout India. Can anyone even imagine the greatness of his personality, that, even after thousands of years, the festival comes along with renewed novelty, a new inspiration with fresh energy. And the noble being that he was; although millennia ago, yet it is relevant in providing solutions to problems as well as inspiration even today. Everyone can find solutions to present day problems from Shri Krishna’s life.
Despite the tremendous might that he possessed, there were times when he would immerse himself in performing the RAAS; at other times he would be in the midst of cows and cowherds; sometimes indulging in sports & games; often playing the flute. A personality brimming with diverse talents and immense capability, yet devoted to empowering society and people, a persona that embodied pioneering accomplishments, a repository, a savior of people. What qualities should the virtue of friendship possess? Who can forget the incident of Sudama? And on the battlefield? Despite his myriad facets of greatness, assuming the role of a charioteer! Or running errands such as lifting a hillock, or at other times picking up leftover leaf plates! One feels a sense of newness in whatever he does. And that’s why today, as I converse with you, my attention is drawn towards two Mohans. One is the Sudarshan Chakra bearing Mohan and the other is the Charkha bearing Mohan.
The Sudarshan Chakra bearing Mohan left the banks of the Yamuna for the sea beach of Gujarat, establishing himself in the city of Dwarika, while the Mohan born on the sea beach reached the banks of the Yamuna, breathing his last in Delhi. Sudarshan Chakra bearing Mohan, thousands of years ago, had amply used his wisdom, his sense of duty, his might, his worldview to avert war, to prevent conflict, a sign of the times then. And spinning-wheel bearing Mohan too chose a similar path, for the sake of Freedom, for preserving human values, for strengthening the basic elements of personality & character- for this he lent a certain hue to the Freedom struggle, a turn, that left the whole world awe struck, which it still remains today. The importance of selfless service, the importance of knowledge, or be it marching ahead smilingly, amidst the trials and tribulations of life, we can learn all these from Lord Krishna’s life’s message. And that is why Shri Krishna is known as Jagatguru – teacher to the world… ‘Krishnam Vande Jagadgurum’.
Today, as we discuss festivities, preparations are under way for a mega festival in India. Not just in India, it is a part of the discourse in the whole world. My dear countrymen, I’m referring to the 150th birth anniversary of Mahatma Gandhi. On the 2nd of October, 1869, at the beach of Porbandar, in Kirti Mandir as it is known today,… in that tiny abode, not just a person; an era was born, that charted the course of human history on an altogether new path, with trail blazing accomplishments on the way. One attribute has always been part & parcel of Mahatma Gandhi’s being – and that was his sense of service and the sense of duty towards it. If you view his life in entirety, you will note that he served communities in South Africa that were bearing the brunt of apartheid – in those times, it was, by no means a small feat. He served farmers in Champaran who were being discriminated against. He served millworkers who were being underpaid. He served the poor, the destitute, the weak and the hungry… he took it as life’s prime duty. There were many myths associated with leprosy then. In order to dispel them, he closely served people suffering from leprosy. He presented shining examples through the medium of service in his own life. He set examples of the sense of service for others to learn- not through words, but through deeds. Gandhiji shared an unbreakable bond with truth; he shared a similar unique bond with the spirit of service. Whoever, needed him, and wherever, Gandhiji was present to serve. He emphasized not only on the spirit of service, but also on the inner happiness it led to.
Service as a virtue is meaningful when it is performed with a sense of joy-‘Seva Parmo Dharmah’. But simultaneously, deep inner joy, the essence of ‘Swantah Sukhaayah’ is inbuilt in the spirit of service. We can understand this from Bapu’s life. Mahatma Gandhi, of course, became the voice of innumerable Indians, in the larger backdrop of upholding human values & human dignity; in a way, he had become the voice of the world. For Mahatma Gandhi, the individual and society, human beings & humanity was everything. Whether it was the Phoenix Farm or the Tolstoy Farm in Africa, the Sabarmati Ashram or Wardha, he laid special emphasis on community mobilization in his own distinct way. I have been extremely fortunate to have been blessed with the opportunity to visit a number of significant places associated with revered Mahatma Gandhi and pay my homage. I can say that Gandhi emphasized on the spirit of collectiveness through a sense of service. Community service and community mobilization are virtues which we have to imbibe into our real lives.
This would be the real way of paying true tributes to Mahatma Gandhi, the Karyanjali, the offering of deeds. Opportunities like these come often & we get associated with them. But should Gandhi 150 just come & go; will it be acceptable to us? No dear countrymen. All of us should introspect, dwell upon it, discuss it, bring it into collective discourse. Joining hands with more people of the society, from all strata, from all age groups; people from villages, cities, men, women, we should ask ourselves. As an individual, what can I add to the effort? What value addition could be there from my side? And being collective acquires its own strength. In all the programmes of Gandhi 150, let there be a sense of collectiveness, let there be a spirit of service. Why don’t we join hands and let the entire neighbourhood move together? If there is a football team, then the entire team. Of course we’ll play football, but along with it, we’ll pick up a deed to perform in conformity with one of Gandhi’s ideals of service. There could be a Ladies’ club! Routine tasks of a modern day Ladies’ club shall be taken up, but besides that, let all members of the Ladies’ club come together & perform an activity of service! We can do a lot. Collect old books, distribute them amongst the poor, spread the glow of knowledge. And I do believe that perhaps 130 crore countrymen are endowed with 130 crore ideas & there could be 130 crore endeavours. There is no limit- whatever that comes to your mind- but only with a genuine wish, a noble intention, within the realms of harmony, and with complete dedication… that too for the sake of enjoying that rare inner bliss, the core of ‘Swaantah Sukhaayah’.
My dear countrymen, a few months ago, I was in Dandi. In our Freedom struggle, the salt satyagrah at Dandi was an important turning point. There I’d inaugurated a state of the art museum dedicated to Mahatma Gandhi. I sincerely urge you to visit at least one place associated with Mahatma Gandhi in the days to come. It could be any site… such as Porbandar, Sabarmati Ashram, Champaran, the Ashram at Wardha or spots in Delhi related to Mahatma Gandhi. When you visit them, do share your photographs on social media so that others may be inspired. And do pen a couple of sentences or couplets to express your feelings. Emotions that emanate from the core of your heart will be more compelling than any great literary composition. And it is possible that in present times, from your viewpoint, the pen-picture of Gandhi sketched by you, may perhaps appear more relevant. In the times to come, many programmes, competitions & exhibitions have been planned. In this context I feel like sharing with you something very interesting. There is a famous art show called the Venice Biennale’, where people from the world over congregate. This time, in the India Pavilion at the Venice Biennale’, a very interesting exhibition based on memories of Gandhiji was organized. Of special interest were the Haripura Panels.
You may remember that in the Haripura Congress Session in Gujarat, Subhash Chandra Bose being elected as President is recorded in history. These Art Panels have a beautiful past. Before the Haripura Session, in 1937-38, Mahatma Gandhi had invited the then Principal of Shantiniketan Kala Bhavan, Nandlal Bose. It was Gandhiji’s wish that the lifestyle of the people of India be depicted through the medium of art and this artwork may be exhibited during the session. This is the same Nandlal Bose whose artwork adorns our Constitution; lends to the Constitution a new, unique identity. The very commitment & reverence of Nandlal Bose have made him, along with the Constitution, immortal. Nandlal Bose toured villages around Haripura, concluding with a few works of art canvas, depicting glimpses of life in rural India. This invaluable artwork was a high point of discourse at Venice. Once again, along with greetings on Gandhiji’s 150th birth anniversary, I express my expectations from every Indian, of one resolve or the other. One should do something for the sake of the country, society or just for someone else. This will be a good, true & genuine Karyanjali to Bapu, a tribute through a good deed.
O glorious children of Mother India, you may remember that for the last few years, we have been running a countrywide campaign ‘Swachchata Hi Sewa’, ‘the quest for cleanliness is service’, around a couple of weeks before the 2nd of October. This time around it will commence on the 11th of September. During this period, all of us will move out of home, donating toil & sweat through ‘Shramdaan’, as a ‘Karyanjali’ to Mahatma Gandhi. Home or the neighbourhood lane, street circles, crossings, or drains, schools and colleges … we have to involve ourselves in a Mega campaign of ensuring cleanliness at public places. This time our emphasis must be on plastic. On 15th August, I had urged you from the Red Fort…the way one hundred & twenty five crore countrymen ran a campaign for cleanliness with utmost enthusiasm and energy, and toiled tirelessly towards freedom from open defecation; in a similar manner, we have to join hands in curbing ‘single use plastic’. This campaign has enthused people from all strata of society. Many of my merchant brothers & sisters have put up a placard at their establishments, boldly mentioning that customers ought to carry shopping bags with them. This will result in monetary savings, as well as one would be able to contribute towards protection of the environment.
This year, on the 2nd of October, when we celebrate Bapu’s 150th birth anniversary, we shall not only dedicate to him an India that is Open Defecation Free, but also shall lay the foundation of a new revolution against plastic, by people themselves, throughout the country. I appeal to all strata of society, residents of every village, town & city, take it as a prayer with folded hands; let us celebrate Gandhi Jayanti this year as a mark of our plastic free Mother India. Let us celebrate 2nd October as a special day. Let us celebrate Mahatma Gandhi’s birth anniversary as a special ‘Shramdaan’ Festival, where everyone will donate one’s own labour. I urge all municipalities, municipal corporations, District Administration, Gram Panchayats, Government & non Governmental bodies, organizations; in fact each & every citizen to work towards ensuring adequate arrangement for collection & storage of plastic waste. I also appeal to the corporate sector to come out with ways & means proactively for appropriate disposal of all accumulated plastic. It can be recycled; it can be transformed into fuel. This way we can accomplish our task of ensuring safe disposal of plastic waste before this Diwali. All that is needed is a resolve. And for inspiration, there’s no need to look hither- tither; what can be a greater inspiration than Gandhi?
My dear countrymen, our Sanskrit Subhashit, epigrammatic verses are, in a way, gems of wisdom. We can derive from them whatever we need in life. These days I’m not in regular touch with the form… earlier it was frequent. Today I want to touch upon a very important point from a Sanskrit Subhashit. These lines were written centuries ago, but even today, carry great relevance. There is an excellent Subhashit that mentions –
“ पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |
मूढैःपाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा प्रदीयते” ||
That is, water, grain and subhashit are the three gems found on earth. Imprudent people call stones as gems. In our culture much glory has been ascribed to food. We have even converted the knowledge about food into a science. Balanced and nutritious food is essential for all of us, more so for women and the new-born, since these two categories are the foundation of the future of our society. Under the ‘Poshan Abhiyaan’ campaign, nutrition made available with the help of modern scientific methods is being converted into a mass movement all over the country. People are fighting a battle against malnutrition in innovative and interesting ways.
Once, an interesting fact was brought to my notice. The ‘Mutthi Bhar Dhaanya’ initiative has turned into a big movement in Nashik. In this novel scheme, during the harvest period, Anganwadi workers collect a handful of rice grain from the people. This grain is used to make piping hot food for children and women. In this way, the person contributing the handful of grain transmutes into a conscientious civil social worker. In the process, he gets himself dedicated to this cause and becomes a soldier of that movement. All of us have heard about the ‘Ann Praashan Sanskar’, the first solid morsel ritual for toddlers in families all across India. This ritual is performed when the toddler starts feeding on solid food for the first time; solid and not liquid food!
In 2010, Gujarat embarked upon planning to provide kids complimentary food on the occasion of 'Ann Praashan Sanskar' so that this initiative spreads awareness among the masses. This is a great initiative that can be adopted anywhere. In many states, people run meal campaigns on certain dates. If the family celebrates a birthday, certain auspicious day or observe an in- memoriam day, then the family members with self-prepared nutritious and delicious food, go to the Anganwadis and also to the schools and these family members themselves serve the children and feed them. They not only share their happiness but in the process receive happiness magnified manifold! There is a wonderful confluence of a sense of service and satisfaction.
My Friends, there are many little things that can be employed in our country’s effective fight against malnutrition. Today, due to lack of awareness, both poor and affluent families are affected by malnutrition. The month of September will be celebrated as ‘Poshan Abhiyaan’ across the country. You must get connected with it, get information about this initiative, add some new facet to ‘Poshan Abhiyaan’ by contributing to it. If you manage to save a few people from malnutrition, it would mean that we can bring the country out of the circle of malnutrition.
Srishti Ji thank you for your phone call and just like you KK Pandey ji from Sohna, Haryana, and Aishwarya Sharma from Surat and many other people have expressed a desire to know more about the 'Man vs. Wild’ television episode aired on Discovery Channel. This time when I was thinking about 'Mann ki Baat', I was sure that a lot of questions would crop up about this subject and that’s what exactly happened. In the last few weeks wherever I went and met people, 'Man vs. Wild' gets a mention! With this one episode, I have not only formed a connect with the youth around the world but I had never thought that I would find a certain place in young hearts in this way. I had never thought that the youth of our country and the world pay attention to diverse things.
I had never thought that there would be an opportunity in my life to touch the hearts of young people around the world. And look what happens? Just last week I went to Bhutan.
I have seen that whenever I have had the opportunity to go as Prime Minister, and of course credit also goes to International Yoga Day, the situation now is that wherever I go in the world or interact with someone, people invariably spend close to 5-7 minutes asking questions on yoga.
There must hardly be a major world leader who has not discussed yoga with me and this has been my experience all over the world. But these days I’m experiencing something new. Whoever I meet or wherever there is a chance to talk, the focus is on Wildlife, discussions about the environment, the Tiger, the Asiatic Lion, evolution etc. and I am amazed how interested people are in nature.
The Discovery Channel plans to broadcast this programme in 165 countries in their respective languages. Today, when there is a global churning of thought on environment, Global Warming, and Climate Change, I do hope that in such circumstances, this episode of Discovery Channel will help greatly in familiarizing the world with the message from India, the traditions of India and the empathy for nature in India's trail of glorious traditions.
It is my firm belief that people want to know the steps taken in the direction of climate justice and clean environment in India. But there is another interesting thing, some people ask me one thing albeit with some hesitation -Modi ji, you were speaking in Hindi and Bear Grylls does not know Hindi, so how did you carry on such a fast conversation between the two of you? Was this episode edited later? How many times did the shooting happen for this episode and how it happened? They ask with great curiosity.
Now, there is no secret in this. Many people have this question in their minds, so I will unravel this secret. Well, in a way it is no secret at all! The reality is that technology was used extensively in my conversation with Bear Grylls. Whenever I spoke immediately there was a simultaneous translation into English or simultaneous interpretation and Bear Grylls had a small cordless instrument in his ear. So I used to speak in Hindi but he heard it in English and because of that the communication became very easy and this is an amazing aspect about technology.
After the broadcast of this show, a large number of people have been discussing about Jim Corbett National Park. You must also visit sites associated with nature and wild life and animals. As I have said before, and I emphasize, that you must visit the north-east in your lifetime. What a glorious abundance of nature exists there. You will be left wonderstruck! Your horizon will expand. On 15th August, I urged all of you from the ramparts of the Red Fort to visit at least 15 places within a span of the next 3 years, 15 places within India and for 100% tourism, visit these 15 sites! Witness and observe. Do take the family and spend some time there.
Our country is full of diversity and this wide range of diversity will also inculcate variations within you as a teacher. Your life will be enriched. Your thinking will expand. And trust me, there are places within India from where you will come back with renewed energy, enthusiasm, zeal and inspiration, and maybe you will feel like returning to certain places again and again; your family too would feel the same.
My dear countrymen, the concern and care for the environment in India seems natural. Last month I had the privilege of releasing the tiger census in the country. Do you know how many tigers there are in India? The tiger population in India is 2967, two thousand nine hundred sixty seven.
A few years ago, we were with great difficulty at a figure half of what we have at present. The Tiger summit took place in 2010 at St. Petersburg, Russia. At this summit, a resolution was taken expressing concern about the dwindling tiger population in the world. It was resolved to double the number of tigers worldwide by 2022. But this is New India, where we accomplish goals in the quickest time possible. We doubled our tiger numbers in 2019 itself. Not only the tiger population in India was doubled, but the number of protected areas and community reserves has also increased.
At the time I was releasing the data on tigers, I also remembered the Asiatic lion of the Gir in Gujarat. I had the charge of the Chief Minister of Gujrat at a period of time when the habitat of lions in the forests of Gir was shrinking. Their number was decreasing. We took several innovative steps, one after the other in the Gir. In 2007, it was decided to deploy female guards. There were improvements in the infrastructure to increase tourism. Whenever we talk about nature and wildlife, we only talk about conservation. But, we now have to move beyond conservation and think about compassion. Our scriptures have provided great guidance with respect to this subject. Our scriptures have said centuries ago: -
निर्वनो बध्यते व्याघ्रो, निर्व्याघ्रं छिद्यते वनम |
तस्माद् व्याघ्रो वनं रक्षेत्, वनं व्याघ्रं न पालयेत् ||
That is, if there are no forests, tigers are forced to venture into the human habitat and are killed, and if there are no tigers in the forest, then man cuts the forest and destroys it, so in fact the tiger protects the forest and not that the forest protects the tiger - our forefathers explained this great truth in a befitting manner. Therefore, we need to not only conserve our forests, flora and fauna, but also create an environment wherein they can flourish properly.
My dear countrymen, who can forget the historic speech of Swami Vivekananda delivered on September 11, 1893. This young monk of India, who shook the conscience of the human race of the entire world, imparted onto this world a glorious identity of India. The enslaved India which was gazed at by the world in a much distorted manner was forced to change its way of looking at India due to the words of a great man like Swami Vivekananda on September 11, 1893. Come, let us look anew at India which Swami Vivekananda had seen and let us put in practice the inherent strength of India realized by Swami Vivekananda. We possess everything within us, let us proceed with confidence.
My dear countrymen, all of you will remember that the 29th of August is celebrated as 'National Sports Day'. On this occasion, we are going to launch the 'Fit India Movement' across the country. We have to keep ourselves fit and the nation has to be made fit. It will be a very interesting campaign for everyone - children, the elderly, the young and women and it will be your own movement. But today I am not going to reveal its specifics; you must wait for 29thAugust! I will tell you about 'Fit India Movement' in detail on 29thAugust and I am not going to forget connecting you with the movement because I want to see you fit! I want to make you aware about fitness and for a fit India, we should unite to set some goals for the country.
My dear countrymen, I will be waiting for your participation on 29th August in 'Fit India Movement', in ‘Poshan Abhiyaan’ during the month of September and especially in the 'Swachhata Abhiyan' beginning from the 11th of September to the 2nd of October. And 2nd October as a day has been totally dedicated to riddance from plastic. All of us with all our might must try to get rid of plastics from our home and everywhere outside our houses. And I know that all these campaigns will make a big splash on social media. Come, let us proceed with a new zeal, new resolve and renewed strength.
My dear countrymen, this is all that this episode of ‘Mann Ki Baat’ has in store for you today. I shall be meeting you later. I will wait for your say and your suggestions. Come, let us all march together to make the India which was dreamt of by our freedom fighters and realize Gandhi's dreams - 'Swantah: Sukhayah'. Let us proceed, enjoying our inner bliss, expressing our spirit of service.
Many many Thanks.
Namaskar
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ची नेहमी मला आणि तुम्हालाही एक प्रतीक्षा असते. याही वेळी मी पाहिलंय, खूप पत्रे, प्रतिक्रिया, फोन आले आहेत, अनेक गोष्टी आहेत, सूचना आहेत, प्रेरणा आहे-प्रत्येक जण काही ना काही करू पाहतोय, सांगू पाहतोय- एक भावना जाणवत आहे, आणि या सर्वामध्ये खूप काही असे आहे की ज्याचा मला समावेश करायचा आहे, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे सर्वाचाच समावेशही करू शकत नाही. असं वाटतय की, तुम्ही माझी परीक्षा पाहत आहात. तरीही, तुमच्याच गोष्टी या ‘मन की बात’च्या धाग्यात गुंफून पुन्हा एकदा तुमच्यातच वाटून टाकायची इच्छा आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, मागच्या वेळेस मी प्रेमचंदजी यांच्या काही गोष्टींच्या पुस्तकावर आपण चर्चा केली होती आणि जे पुस्तक वाचू, त्यातील काही गोष्टी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून सर्वाना शेअर करायच्या, असे आपण ठरवलं होतं. मला असं दिसलंय की, मोठ्या प्रमाणावर लोकांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांची माहिती परस्परांना दिली. लोक विज्ञान, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, इतिहास, संस्कृती,व्यवसाय, जीवन चरित्र अशा अनेक विषयांवर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांवर चर्चा करत आहेत, यामुळे मला छान वाटलं. काही लोकांनी तर मला असा सल्ला दिला आहे की, मी आणखी काही पुस्तकांबद्दल बोलावं. ठीक आहे, मी आणखी काही पुस्तकांबद्दल आपल्याशी नक्की चर्चा करेन. पण मला एक गोष्ट मान्य केली पाहिजे की, मी खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तक वाचण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. पण एक फायदा मात्र असा झाला आहे की, तुम्ही जे काही लिहून पाठवता, त्यावरून अनेक पुस्तकांच्या विषयांबद्दल माहिती जाणून घेण्याची संधी मला मिळते. परंतु, हा जो मागील एक महिन्याचा अनुभव आहे, त्यावरून मला असं वाटतं की, या उपक्रमाला आपण पुढे घेऊन जायला हवं. आपण नरेंद्र मोदी अॅपवर पुस्तकांचा एक कोपरा कायमस्वरूपी बनवूया आणि जेव्हा आपण एखादे नवीन पुस्तक वाचू, त्याबद्दल तिथे लिहू, चर्चा करू आणि तुम्ही या पुस्तकांच्या कोपऱ्यासाठी एखादे चांगले नावही सुचवू शकता. हा पुस्तकांचा कोपरा बुक कॉर्नर वाचक आणि लेखकांसाठी एक सक्रीय मंच बनेल, अशी माझी इच्छा आहे. तुम्ही लिहित रहा,वाचत रहा आणि मन की बात च्या सर्व सहकाऱ्यांकरता ती शेअरही करत रहा.
मित्रांनो, असं वाटतं की, जल संरक्षण- मन की बात मध्ये जेव्हा मी या विषयाला स्पर्श केला होता, पण आज असा अनुभव येत आहे की, माझ्या म्हणण्याच्या आधीच जल संरक्षण तुमच्या मनाला स्पर्शून जाणारा आणि सामान्य माणसाच्या आवडीचा विषय होता. आणि मला असा अनुभव येत आहे की, पाण्याच्या विषयावर आजकाल भारतीयांच्या मनाला हलवून सोडले आहे. जल संरक्षणासाठी देशभरात अनेक प्रभावी प्रयत्न सुरु आहेत. लोकांनी पारंपरिक पद्धतीबाबत तर माहिती शेअर केली आहे. माध्यमांनी जल संरक्षणविषयावर अनेक नाविन्यपूर्ण मोहिमा सुरु केल्या आहेत. सरकार असेल, एनजीओज् असतील, युद्धपातळीवर काही ना काही करत आहेत. सामूहिक प्रयत्नांचे हे सामर्थ्य पाहून खूप छान वाटत आहे, खूप आनंद होत आहे. जसे की, झारखंडच्या रांचीपासून थोडेसे दूर, ओरमांझी भागाच्या आरा केरम गावात, तिथल्या रहिवाशांनी जल व्यवस्थापनाच्या बाबतीत जो काही उत्साह दाखवला आहे, तो प्रत्येकासाठी एक उदाहरण ठरला आहे. ग्रामीण लोकांनी श्रमदान करून पहाडातून वाहणाऱ्या एका झऱ्याला एक निश्चित दिशा देण्याचे काम केले आहे. आणि तीही शुद्ध स्वदेशी पद्धत. यामुळे केवळ मातीची धूप आणि पिकाचे नुकसान थांबलं आहे, असं नाही तर शेतांना पाणीही मिळू लागलं आहे. ग्रामीण भागातील लोकांनी केलेलं हे श्रमदान, आता संपूर्ण गावासाठी जीवनदानापेक्षा कमी नाही. आपल्या सर्वाना हे जाणून आनंद होईल की, ईशान्येतील सुंदर असं राज्य मेघालय आपलं जल धोरण तयार करणारं देशातील असं पहिलं राज्य झालं आहे.मी त्या तिथल्या सरकारचं अभिनंदन करतो.
हरियाणामध्ये, ज्या पिकांना पाणी कमी लागतं, अशा पिकांच्या शेतीला चालना दिली जात आहे आणि शेतकऱ्यांचं काही नुकसान होत नाही.मी हरियाणा सरकारचं विशेष अभिनंदन करतो की, त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांना पारंपरिक शेतीपासून कमी पाणी लागणाऱ्या शेतीकडे वळवलं.
आता तर सणांचे दिवस आले आहेत. सणांच्या निमित्ताने अनेक जत्रा भरत असतात. जल संरक्षणासाठी या जत्रांचा का उपयोग करून घेऊ नये? जत्रांमध्ये समाजातील प्रत्येक थरातले लोक जात असतात. या जत्रांमध्ये आपण पाणी वाचवण्याचा संदेश खूप परिणामकारक रित्या देऊ शकतो, प्रदर्शनं भरवू शकतो, नुक्कड नाटक करू शकतो, उत्सवांबरोबर आपण जल संरक्षणाचा संदेश खूप सोप्या पद्धतीनं पोहचवू शकतो.
मित्रांनो, जीवनात काही गोष्टी उत्साह भरून टाकतात आणि विशेषत्वाने लहान मुलांचे यश, त्यांची कामगिरी आपणा सर्वाना नवीन उर्जा देते आणि म्हणून आज काही मुलांच्या बाबत मला बोलावं वाटत आहे आणि ही मुलं आहेत, निधी बाईपोटू, मोनीष जोशी, देवांशी रावत, तनुष जैन, हर्ष देवधरक,अनंत तिवारी, प्रीती नाग, अथर्व देशमुख, अरोन्यातेश गांगुली आणि हृतिक अला-मंदा!
मी यांच्याबद्दल जे काही सांगेन, त्यामुळे तुम्हीसुद्धा अभिमान आणि उत्साहाने भरून जाल. आपल्या सर्वाना माहितच आहे की, कर्करोग हा असा शब्द आहे की, त्याला सारं जग घाबरतं. असं वाटतं की, मृत्यू दरवाजावर उभा आहे पण या सर्व दहा मुलांनी आपल्या जीवनाच्या लढाईत,केवळ कर्करोगाला, कर्करोगासारख्या घटक रोगाला पराभूत केलं असं नाही तर आपल्या पराक्रमानं सर्व जगात भारताचं नाव उज्वल केलं आहे. क्रीडामध्ये आपण नेहमीच पाहतो की, खेळाडू स्पर्धा जिंकल्यावर किंवा पदक मिळवल्यावर विजेते बनतात, पण ही एक दुर्मिळ संधी होती की, ही मुलं स्पर्धेत भाग घेण्याअगोदरच विजेते होते आणि तेही जीवनाच्या लढाईत विजेते!
वास्तविक, या महिन्यात मॉस्कोमध्ये वर्ल्ड चिल्ड्रन विनर्स क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ही एक आगळीवेगळी अशी क्रीडास्पर्धा असते, ज्यात कर्करोगातून वाचलेल्या तरुण म्हणजे जे लोक आपल्या जीवनात कर्करोगाशी लढून बाहेर आले आहेत, तेच लोक भाग घेतात. या स्पर्धेत, नेमबाजी, बुद्धिबळ, जलतरण, धावणे, फुटबॉल आणि टेबल टेनिस अशा स्पर्धांचे आयोजन केले गेले. आमच्या देशाच्या या सर्व दहा विजेत्यांनी या स्पर्धेत पदक जिंकली. यात काही खेळाडूंनी तर एकापेक्षा अधिक पदक जिंकली आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाच्याही पलीकडे, अंतराळात, भारताच्या यशाबद्दल, चांद्रयान २ मोहिमेबद्दल तुम्हाला जरूर अभिमान वाटला असेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे.
राजस्थानमधील जोधपुरचे संजीव हरिपुरा, कोलकात्याचे महेंद्रकुमार डागा, तेलंगणाचे पी. अरविंद राव अशा अनेकांनी, देशभरातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोकांनी मला नरेंद्र मोदी अॅप आणि माय गव्हवर लिहिलं आहे आणि मन की बातमध्ये चांद्रयान-2 वर चर्चा करण्याचा आग्रह केला आहे.
वास्तविक, 2019 हे वर्ष अंतराळ प्रगतीच्या दृष्टीनं भारतासाठी खूप चांगलं राहिलं आहे.आमच्या शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये ए सॅट अवकाशात सोडला होता आणि त्यानंतर चांद्रयान-2. पण निवडणुकीच्या धामधुमीत ए सॅटसारख्या मोठ्या आणि महत्वाच्या घटनेवर जास्त चर्चा होऊ शकली नव्हती. आपण ए सॅट क्षेपणास्त्राच्या मदतीनं, केवळ तीन मिनिटात, 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह पाडण्याची क्षमता प्राप्त केली. असं यश मिळवणारा भारत जगातला चौथा देश बनला आणि आता 22 जुलैला पूर्ण देशानं, चांद्रयान-2 नं श्रीहरीकोटाहून अंतराळात आपली पावलं कशी टाकली, हे अभिमानानं पाहीलं. चांद्रयान-2 च्या उड्डाणाच्या छायाचित्रांनी देशवासियांना सन्मान आणि जोश, प्रसन्नतेने भरून टाकलं.
चांद्रयान-2, ही मोहीम अनेक अर्थानं विशेष आहे. चांद्रयान-2 चंद्राबद्दलच्या आमच्या समजुती अधिक स्पष्ट करेल. यामुळे, आम्हाला चंद्राच्या बाबतीत अधिक सविस्तर माहिती मिळू शकेल, पण जर तुम्ही मला विचाराल की, चांद्रयान-2 पासून मला काय दोन मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, तर मी सांगेन, या दोन गोष्टी आहेत, फेथ आणि फिअरलेसनेस म्हणजे विश्वास आणि निर्भयता! आपल्याला आपली प्रतिभा आणि क्षमता यावर विश्वास असला पाहिजे, आपली प्रतिभा आणि क्षमता यावर विश्वास ठेवला पाहिजे. चांद्रयान-2, संपूर्णपणे भारतीय स्वरुपात आहे, हे ऐकून आपल्याला आनंद होईल. ते हृदय आणि वृत्ती या दोन्ही बाबतीत भारतीय आहे. संपूर्ण स्वदेशी पद्धतीची मोहीम आहे. जेव्हा नव्या नव्या क्षेत्रांत काही नवीन करण्याची, नाविन्यपूर्ण उत्साहाची चर्चा होते, तेव्हा आमचे वैज्ञानिक सर्वश्रेष्ठ आहेत, जागतिक दर्जाचे आहेत, हे या मोहीमेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
दुसरा महत्वाचा धडा हा आहे की, कोणत्याही संकटानं घाबरून जाण्याची गरज नाही. ज्या पद्धतीनं आमच्या शास्त्रज्ञांनी, विक्रमी वेळेत, रात्रीचा दिवस करून, सर्व तांत्रिक प्रश्न सोडवून चांद्रयान-2 अवकाशात सोडलं, हे काम अभूतपूर्व आहे. वैज्ञानिकांची ही महान तपस्या सर्व जगानं पाहिली. याचा आपल्या सर्वाना अभिमान वाटला पाहिजे आणि अडचण येऊनही चांद्रयान पोहोचायची वेळ बदलली नाही, याचंही अनेकांना खूप आश्चर्य वाटतं. आपल्याला जीवनात अनेकदा टेम्पररी सेटबॅक तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करण्याचं सामर्थ्य आपल्यातच असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. चांद्रयान-2 मोहीम देशातल्या युवकांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रेरित करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. शेवटी, विज्ञान हाच तर विकासाचा मार्ग आहे. आता आम्हाला, सप्टेंबर महिन्याची अधिरतेने प्रतीक्षा आहे, जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर-विक्रम आणि रोव्हर-प्रज्ञान उतरेल.
आज ‘मन की बात’च्या माध्यमातून, मी, देशातल्या विद्यार्थी मित्रांना, युवक साथीदारांना, एका अत्यंत मनोरंजक स्पर्धेच्या बाबत माहिती देऊन देशाच्या युवक आणि युवतींना निमंत्रित करतो-एक क्विझ कॉम्पिटीशन! अंतराळाशी संबंधित कुतूहल, भारताची अंतराळ मोहीम आणि तंत्रज्ञान-या क्विझ कॉम्पिटीशनचे मुख्य विषय असतील, जसे की, रॉकेट अवकाशात सोडण्यासाठी काय काय करावं लागतं. उपग्रहाला कक्षेत कसं प्रस्थापित करता येतं. आणि उपग्रहापासून आपण काय काय माहिती प्राप्त करतो. ए सॅट काय असतं. खूप गोष्टी आहेत. माय गव्ह संकेतस्थळावर एक ऑगस्टला,स्पर्धेचा तपशील दिला जाईल.
मी युवा मित्र, विद्यार्थी यांना, त्यांनी या क्विझ कॉम्पिटीशनमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या सहभागानं, स्पर्धेला अधिक मनोरंजक आणि अविस्मरणीय करावे, अस आवाहन करतो. मी शाळा,पालक, उत्साहित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विशेष आग्रह करतो की, त्यांनी आपल्या शाळेला विजयी करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी.
सर्वात रोमांचक गोष्ट तर ही आहे की, प्रत्येक राज्यातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना, भारत सरकार स्वतःच्या खर्चानं, श्रीहरिकोटाला घेऊन जाईल आणि सप्टेंबरमध्ये त्यांना जेव्हा चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल,त्या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळेल.या विजयी विद्यार्थ्यांसाठी ही एक ऐतिहासिक घटना असेल,पण त्यासाठी तुम्हाला क्विझ कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा लागेल, सर्वाधिक गुण मिळवावे लागतील,आपल्याला विजयी व्हावं लागेल.
मित्रांनो, माझी ही सूचना तुम्हाला निश्चितच चांगली वाटली असणार. मजेदार संधी आहे ना? तर तुम्ही क्विझमध्ये भाग घ्यायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांना भाग घ्यायला प्रेरित करा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, तुम्ही एक निरीक्षण केलं असेल.आपल्या मन की बातनं वेळोवेळी स्वच्छता अभियानाला गती दिली आहे आणि या पद्धतीनं स्वच्छतेसाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांनाही मन की बात ला नेहमीच प्रेरणा दिली आहे. पाच वर्षापूर्वी सुरू झालेला प्रवास आज अनेकांच्या सहभागातून स्वच्छतेचे नवनवीन मानदंड प्रस्थापित करत आहे.आम्ही स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श स्थिती प्राप्त केली आहे, असं मुळीच नाही, पण ज्या पद्धतीनं हागणदारीमुक्त गावांपासून ते सार्वजनिक स्थळांपर्यंत स्वच्छतेच्या बाबतीत जे यश मिळालं आहे, ते एकशे तीस कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती आहे, पण आम्ही इथपर्यंत येऊन थांबणार नाही. हे अभियान आता स्वच्छतेकडून सौंदर्याकडे पुढे वाटचाल करत निघालं आहे. आता काही दिवसांपूर्वी मी मीडियामध्ये योगेश सैनी आणि त्यांच्या टीमची कहाणी पाहत होतो. योगेश सैनी अभियंते आहेत आणि अमेरिकेतली आपली नोकरी सोडून भारतमातेची सेवा करण्यासाठी भारतात परत आले आहेत. त्यांनी काही काळ अगोदर दिल्लीला स्वच्छच नाही तर सुंदरही बनवण्याचा विडा उचलला. त्यांनी आपल्या टीमसमवेत लोधी गार्डनमधील कचराकुंड्यांपासून सुरूवात केली. स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून, दिल्लीच्या अनेक भागांना, सुंदर पेंटिंग्जनी सजवलं. ओव्हरब्रिज आणि शाळेच्या भिंतींपासून ते झोपडपट्टीपर्यंत आपली कला त्यांनी दाखवायला सुरूवात केली तेव्हा लोकांचीही साथ मिळत गेली आणि एक प्रकारे हा सिलसिला सुरू झाला. तुम्हाला आठवत असेल की, कुंभमेळ्याच्या काळात प्रयागराजला रस्त्यावरील पेंटिंग्जनी कसं सजवण्यात आलं होतं. मला समजलं की, योगेश सैनी आणि त्यांच्या टीमनं त्यातदेखील खूप मोठी भूमिका निभावली होती. रंग आणि रेषांचा भलेही आवाज येत नसेल, पण त्यांच्यापासून बनलेल्या चित्रांनी जे इंद्रधनुष्य तयार होते, त्यांचा संदेश हजार शब्दांपेक्षा अधिक कितीतरी जास्त प्रभावी सिद्ध होतो आणि स्वच्छता अभियानाच्या सौंदर्यातही आपण त्याचा अनुभव घेत असतो. कचऱ्यापासून संपत्ती बनवण्याची संस्कृती आमच्या समाजात विकसित व्हावी, हे आमच्यासाठी फार आवश्यक आहे. एका तऱ्हेनं सांगायचं तर, कचऱ्यापासून सोनं बनवण्याच्या दिशेनं आम्हाला पुढे जायचं आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी, मी ‘माय गव्ह’वर एक खूपच मनोरंजक प्रतिक्रिया वाचली. जम्मू काश्मिरच्या शोपियाँ इथं राहणाऱ्या भाई महंमद अस्लम यांची ती प्रतिक्रिया होती.
त्यांनी लिहिलंय, ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकायला चांगला वाटतो. मला हे सांगायला आनंद वाटतो की, मी माझ्या राज्यात जम्मू-काश्मीरमध्ये कम्युनिटी मोबलायझेशन कार्यक्रमाच्या-बँक टु व्हिलेज आयोजनात सक्रीय भूमिका बजावली. जून महिन्यात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. असे कार्यक्रम दर तीन महिन्यांनी आयोजित केले गेले पाहिजेत, असं मला वाटतं. त्याचबरोबर, कार्यक्रमाच्या ऑनलाईन देखरेखीचीही व्यवस्था असली पाहिजे. माझ्या मते,हा अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात जनतेनं सरकारशी थेट संवाद साधला.
भाई महंमद अस्लमजी यांनी हा संदेश मला पाठवला आणि तो वाचल्यावर बँक टु व्हिलेज कार्यक्रमाबाबत जाणून घेण्याची माझी उत्सुकता वाढली आणि जेव्हा मी याबाबत सविस्तर माहिती घेतली तेव्हा पूर्ण देशाला याची माहिती असली पाहिजे, असं मला वाटलं. काश्मीरचे लोक विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जाण्यासाठी किती उत्सुक आहेत, किती उत्साही आहेत, याची कल्पना या कार्यक्रमाने येते. या कार्यक्रमात प्रथमच, मोठमोठे अधिकारी थेट गावांपर्यंत गेले. ज्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी कधी पाहिलंही नव्हतं, ते स्वत: त्यांच्या दारात गेले, ज्यामुळे विकासकामांमध्ये येत असलेल्या अडचणी समजून घेता येतील, समस्या दूर केल्या जाऊ शकतील. हा कार्यक्रम आठवडाभर चालला आणि राज्यातल्या सर्व सुमारे साडेचार हजार पंचायतींमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सरकारी योजना आणि कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्यापर्यंत सरकारी सेवा पोहचतात की नाही, हेही जाणून घेतलं. पंचायतींना कसं आणखी मजबूत बनवता येईल, त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल, त्यांच्या सेवा सामान्य मानवी जीवनात काय प्रभाव टाकू शकतील. ग्रामस्थांनीही मोकळेपणानं आपल्या समस्या मांडल्या. साक्षरता, लिंग गुणोत्तर, आरोग्य, स्वच्छता, जल संरक्षण, वीज, पाणी,मुलींचं शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
मित्रांनो, हा कार्यक्रम काही केवळ सरकारी औपचारिकता नव्हता की, अधिकारी दिवसभर गावामध्ये फिरून परत आले, पण या वेळेला अधिकाऱ्यांनी दोन दिवस आणि पंचायतीत एक मुक्कामही केली. यात त्यांना गावात राहण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने भेटण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विभागापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम रंजक करण्यासाठी आणखी काही गोष्टींचाही समावेश केला होता. खेलो इंडिया अंतर्गत मुलांसाठी क्रीडास्पर्धा ठेवली होती. खेळाचं साहित्य, मनरेगाची जॉब कार्ड आणि अनुसूचित जाती आणि जमातीची प्रमाणपत्रेही तिथंच वाटली. आर्थिक साक्षरता कॅम्प लावले. कृषी, फलोत्पादन अशा सरकारी विभागांकडून स्टॉल्स लावून सरकारी योजनांची माहिती दिली गेली. एक प्रकारे, हे आयोजन म्हणजे विकासोत्सव झाला, लोकसहभागाचा, जनजागृतीचा उत्सव बनला. काश्मीरचे लोक विकासाच्या या उत्सवात मोकळेपणाने सहभागी झाले. आनंदाची गोष्ट ही आहे की, ‘बँक टु व्हिलेज’ कार्यक्रमाचं आयोजन अशा दूरवरील भागांमध्ये केलं होतं की, जिथं पोहचण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना दुर्गम रस्त्यानं जाऊन, पहाड चढून कधी कधी एक दिवस तर कधी दीड दिवस पायपीट करावी लागली. हे अधिकारी अशा सीमावर्ती पंचायतींमध्येही गेले, जिथे ज्या सीमेपलिकडून गोळीबाराची सतत भीती असते. इतकंच नाही तर, शोपियाँ, पुलवामा, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील अति संवेदनशील प्रदेशातही अधिकारी निर्भयपणे गेले. काही अधिकारी तर गावात झालेल्या स्वागतानं इतके भारावून गेले की, दोन दिवसांपेक्षा अधिक काळ गावात थांबले. या प्रदेशांमध्ये ग्रामसभा होणं, त्यात मोठ्या संख्येनं लोकांनी भाग घेणं आणि आपल्यासाठी योजना तयार करणं, हे सारंच खूप सुखद आहे. नवीन संकल्प, नवा जोश आणि शानदार परिणाम असे कार्यक्रम आणि त्यात लोकांचा सहभाग हे काश्मीरच्या आमच्या बंधुभगिनीना सुशासन हवं आहे, हेच दर्शवतो. विकासाची शक्ती बॉम्ब आणि बंदुकीच्या शक्तीवर नेहमीच भारी ठरते, हेही यावरून सिद्ध होतं. लोक विकासाच्या मार्गात द्वेष निर्माण करू पाहत आहेत, अडसर पैदा करू पाहत आहेत, ते आपल्या कुटील हेतूंमध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत, हेही स्पष्ट आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित श्रीमान दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांनी आपल्या एका कवितेत श्रावण महिन्याचा महिमा असा सादर केला आहे. या कवितेत त्यांनी म्हटलं आहे, होडिगे मडिगे आग्येद लग्ना। अदराग भूमी मग्ना।
अर्थात पावसाचा शिडकावा आणि पाण्याच्या धारा यांचे बंध आगळेच आहेत आणि त्यांचं सौंदर्य पाहून पृथ्वी मग्न आहे.
संपूर्ण भारतवर्षात अलग अलग संस्कृती आणि भाषक लोक श्रावण महिना आपापल्या पद्धतीनं साजरा करतात. या मोसमात आपण जेव्हा जेव्हा आसपास पाहतो, तर असं वाटतं की, जणू पृथ्वीनं हिरवळीचा शालू परिधान केला आहे. सर्वत्र एका नव्या उर्जेचा संचार होतो. या पवित्र महिन्यात अनेक भक्त कावड यात्रा आणि अमरनाथ यात्रेला जातात, तर काही जण नियमितपणे उपवास करतात आणि जन्माष्टमी आणि नागपंचमीसारख्या सणांची उत्सुकतेनं प्रतीक्षा करतात. याच काळात, भाऊबहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला राखीपौर्णिमा सणही येतो. श्रावण महिन्याची चर्चा सुरू आहे, तर आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, यावेळी अमरनाथ यात्रेत गेल्या चार वर्षांपेक्षा सर्वात जास्त भाविक सहभागी झाले आहेत. एक जुलैपासून आतापर्यंत तीन लाखांहून अधिक तीर्थयात्रींनी पवित्र अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे. 2015 मध्ये पूर्ण 60 दिवसापर्यंत चालणाऱ्या या यात्रेत जितके भाविक सहभागी झाले होते, त्यापेक्षा जास्त भाविक यावेळी फक्त 28 दिवसात सहभागी झाले आहेत.
अमरनाथ यात्रेच्या यशाबद्दल मी खास करून जम्मू काश्मीरचे लोक आणि त्यांच्या आतिथ्यशीलतेचीही प्रशंसा करतो. जे लोक यात्रेहून परत येतात, ते राज्याच्या जनतेची प्रेमाची उब आणि आपलेपणाच्या भावनेनं भारावून जातात. या सर्व गोष्टी भविष्यात पर्यटनासाठी खूप लाभदायक सिद्ध होणार आहेत. उत्तराखंडमध्येही, यावर्षी जेव्हापासून चारधाम यात्रा सुरू झाली आहे, तेव्हापासून दीड महिन्यात 8 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथ धामचं दर्शन घेतलं आहे, असंही मला सांगण्यात आलं आहे. 2013 मध्ये आलेल्या भीषण आपत्तीनंतर, प्रथमच, इतक्या विक्रमी संख्येनं तीर्थयात्री तिथं पोहचले आहेत.
माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की, ज्या भागांमध्ये मान्सूनच्या दरम्यान नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखं असतं, अशा भागांमध्ये तुम्ही जरूर जा. आपल्या देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि आपल्या देशातल्या लोकांची भावना समजून घेण्यासाठी पर्यटन आणि तीर्थयात्रा यापेक्षा मोठा शिक्षक नाही. श्रावणाचा हा सुंदर आणि रसरशीत महिना आपल्या सर्वांमध्ये नवीन उर्जा, नवी आशा आणि नव्या उमेदीचा संचार घडवो, अशी मी आपल्या सर्वांसाठी शुभकामना करतो. याचप्रकारे, ऑगस्ट महिना भारत छोडो आंदोलनाची स्मृती घेऊन येतो. 15 ऑगस्टसाठी आपण काही विशेष तयारी करावी, अशी माझी इच्छा आहे. स्वातंत्र्याचं हे पर्व साजरं करायची नवी पद्धत शोधावी. लोकसहभाग वाढला पाहिजे. 15 ऑगस्ट लोकांचा, जनांचा उत्सव कसा होईल, याची काळजी निश्चित घ्या. दुसरीकडे, हीच वेळ आहे की, देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये देशवासी पूरानं ग्रस्त झाले आहेत. पूरामुळे अनेक प्रकारचं नुकसान सहन करावं लागतं. पूराच्या संकटात सापडलेल्या सर्व लोकांना मी आश्वासन देतो की, केंद्र, राज्य सरकारांच्या सहकार्यानं पूरग्रस्तांना हर प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय जलद गतीनं काम करत आहे. आम्ही जेव्हा टीव्ही पाहतो तेव्हा पावसाचा एकच पैलू दिसतो-सर्व बाजूनं पूर, साचलेलं पाणी, वाहतूक कोंडी, मान्सूनचं दुसरं चित्र-ज्यात आनंदी झालेला आमचा शेतकरी, कूजन करणारे पक्षी, वाहणारे झरे, हिरवाईचा शालू पांघरलेली धरती-हे पाहण्यासाठी तर आपल्याला स्वतः कुटुंबियांसह बाहेर पडावं लागेल. पाऊस, ताजेपणा आणि आनंद-म्हणजे फ्रेशनेस आणि हॅपीनेस-दोन्ही आपल्यासमवेत आणतो. हा मान्सून आपल्या सर्वांना सतत आनंदानं भरून टाको, ही माझी इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ कुठं सुरू करायची, कुठे थांबायचं, खूप अवघड काम वाटतं, पण वेळेची मर्यादा असते. एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा येईन. पुन्हा भेटेन. महिनाभरात तुम्ही मला खूप काही सांगा. मी येणाऱ्या ‘मन की बात’मध्ये त्यांचा समावेश करायचा प्रयत्न करेन आणि माझ्या युवामित्रांना पुन्हा आठवण करून देईन. क्विझ कॉम्पिटिशनची संधी सोडू नका. श्रीहरिकोटामध्ये जी संधी मिळणार आहे ती कोणत्याही परिस्थितीत हातची जाऊ देऊ नका.
आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद! नमस्कार!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार!! मधल्या दीर्घ काळानंतर आज पुन्हा एकदा आपल्यामध्ये ‘मन की बात’, जन की बात, जन-जन की बात, जन-मन की बात करण्यासाठी प्रारंभ केला जात आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये, कार्यक्रमांमध्ये मी खूप व्यस्त तर होतोच, परंतु ‘मन की बात’ची मजा काही वेगळीच आहे आणि ती या व्यस्ततेमध्ये गायब होती. काही तरी कमी आहे, असं मला सारखं जाणवत होतं. आपल्या माणसांमध्ये बसून, अगदी हलक्या-फुलक्या वातावरणामध्ये, 130 कोटी देशवासियांच्या परिवारामधल्या एका स्वजनाच्या रूपामध्ये, अनेक गोष्टी आपण ऐकत होतो, काही गोष्टी पुन्हा एकदा बोलत होतो. काही-काही वेळेस तर तुमच्याच गोष्टी, आपल्या लोकांसाठी प्रेरणा बनत होत्या. हा मधला सुट्टीचा कालखंड कसा गेला असेल, आपण कल्पना करू. शकता. रविवार, महिन्यातला शेवटचा रविवार – सकाळी 11 वाजता, आपली भेट ठरलेली! मलाही काही ना काहीतरी सुटल्यासारखं, राहून गेल्यासारखं, चुकल्यासारखं वाटत होतं. तुम्हालाही वाटत होतं ना? नक्कीच वाटत असणार. हा काही निर्जीव कार्यक्रम नव्हता. या कार्यक्रमामध्ये जिवंतपणा होता, आपलेपणा होता, त्यामध्ये मन लावलं होतं, अगदी हृदयानं जोडलेला होता, आणि म्हणूनच हा जो मधला काळ गेला, तो फारच कठिण होता, असं मला जाणवलं. मी काही तरी ‘मिस’ करतोय, असं मला प्रत्येक क्षणाला वाटत होतं. आणि ज्यावेळी मी ‘मन की बात’ करतो त्यावेळी भलेही मी एकटाच बोलत असेन, आणि ते शब्द कदाचित माझे असतील, आवाज माझा असेल, परंतु ती कथा तुमची असते, पुरुषार्थ तुमचा असतो, पराक्रम तुमचा असतो. मी तर फक्त, माझे शब्द आणि माझी वाणी यांचा वापर करत होतो. आणि या कारणामुळेच मी, या कार्यक्रमाला नाही, तर तुम्हा सर्वांना ‘मिस’ करत होतो. मनामध्ये एकदम रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. एकदा तर मनात आलं, आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळं लगेचच आपल्यामध्ये येवून चार गोष्टी बोलाव्यात. परंतु नंतर विचार केला की, नाही!! आपला तो रविवारवाला कार्यक्रम आहे आणि तो असाच सुरू राहिला पाहिजे. परंतु या रविवारनं मात्र खूपच प्रतीक्षा करायला लावली. चला, अखेर संधी मिळालीच. एका कौटुंबिक वातावरणामध्ये ‘मन की बात’ करायची आहे. लहान-लहान, अगदी साध्या-सुध्या, हलक्या-फुलक्या गोष्टीही समाजामध्ये, जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. हा एक प्रकारे त्याचाच भाग असून, हा क्रम एका नवीन ऊर्जेला, शुद्ध चैतन्याला जन्म देतो आणि एका अर्थाने नवभारताच्या चैतन्याला, ऊर्जेला सामर्थ्य देत, हा क्रम असाच सुरू ठेवून पुढे वाटचाल करायची आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक संदेश आले आहेत. त्यामध्ये असंख्य लोकांनी ‘मन की बात’ ‘मिस’ करत असल्याचं म्हटलंय. हे संदेश मी ज्यावेळी वाचतो, ऐकतो त्यावेळी मला खरंच छान वाटतं. आपलेपणाची भावना मनाला जाणवते. कधी-कधी तर मला वाटतं की, हा माझा ‘स्व’पासून सुरू झालेला ‘समष्टी’पर्यंतचा प्रवास आहे. ही माझी ‘अहम्’ ते ‘वयम्’ अशी यात्रा आहे. माझ्यासाठी तुमच्याबरोबर केलेला हा ‘मौन संवाद’ म्हणजे एकप्रकारे माझ्या ‘अध्यात्मिक यात्रेच्या अनुभूतीचाही एक अंश होता. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मी केदारनाथला का गेलो, याविषयी अनेक लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत. असे प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याची जिज्ञासाही असणार, हे मी समजू शकतो. मलाही माझ्या या भावना तुमच्यापर्यंत कधी एकदा पोहोचवाव्यात असं झालंय. परंतु आज त्या विषयावर बोलण्याचं ठरवलं तर कदाचित ‘मन की बात’चं स्वरूप बदलून जाण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीची धामधूम सुरू होती, जय-पराजयाचे अंदाज बांधले जात होते, काही ठिकाणी अजून मतदान होणार होतं आणि मी केदारनाथला निघालो. अनेक लोकांनी तर यातून राजकीय अर्थ ध्वनीत केले. माझ्यासाठी म्हणाल तर, केदारनाथची भेट म्हणजे ‘माझ्यातल्या ‘स्व’ला भेटणं होतं. आता यापेक्षा आणखी जास्त काही मी आज सांगणार नाही. एक मात्र सांगतो की, ‘मन की बात’ला दिलेल्या अल्पविरामामुळं माझ्या मनामध्ये थोडी रिक्ततेची भावना निर्माण झाली होती. केदारच्या दरी-डोंगरांमध्ये, त्या एकांत गुहेमध्ये कदाचित ही पोकळी भरून काढण्याची संधी मनाला नक्कीच मिळाली असावी, असं मला वाटतंय. आता राहिला, आपली जिज्ञासा शांत करण्याचा विषय, कधी ना कधी त्याच्यावरही चर्चा करता येईल, असा विचार मी केलाय. हां, मात्र आता ही चर्चा मी कधी करेन, हे आत्ताच सांगता येणार नाही. परंतु नक्की करेन, कारण तुम्हा सर्वांचा माझ्यावर अधिकार आहे. ज्याप्रमाणे केदार भेटीविषयी जाणून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे, तसंच एका सकारात्मक गोष्टीला बळ देण्याचा तुमचा प्रयत्न, तुमच्या बोलण्यावरून मला सातत्यानं जाणवतो. ‘मन की बात’साठी जी पत्रं येतात, जे ‘इनपूट’ मिळतं, ती रूटीन, म्हणजे दैनंदिन सरकारी कामकाजापेक्षा अगदी वेगळी असतात. कधी कधी तुम्ही पाठवलेलं पत्रही माझ्यासाठी एक प्रकारे प्रेरणा देण्याचं कारण बनतं. काहीवेळेस तर माझ्या विचार प्रक्रियेला धार देण्याचं काम तुमचे काही शब्द करतात. देश आणि समाज यांच्यासमोर असलेली आव्हाने लोकांकडून मला समजतात. त्याचबरोबर या समस्यांवर नेमके उत्तर काय आहे, हेही लोक सांगत असतात. पत्रांमध्ये लोक आपल्या समस्या मांडतात, त्याचबरोबर त्याला काय उत्तर आहे, हेही लिहितात, असं मला दिसून आलंय. प्रश्नांच्या जोडीला त्याची उत्तरं, कोणत्या- ना- कोणत्या नवीन कल्पना, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रगट करतात. जर कोणी एखादा स्वच्छतेविषयी लिहीत असेल तर अस्वच्छतेविषयी तो आपली नाराजी शब्दातून व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी चोहोबाजूंनी जो प्रयत्न सुरू आहे, त्याचं कौतुकही करतो. कोणी एखादा पर्यावरणाच्या विषयावर चर्चा करतो आणि निसर्गाच्या ऱ्हासाविषयी होत असलेली पीडा व्यक्त करतो. त्याच्याच जोडीला त्यानं पर्यावरण संरक्षणासाठी स्वतः कोणते प्रयोग केले, हेही पत्रात नमूद करतो. त्यानं इतरत्र केलेले काही प्रयोग जर पाहिले, अनुभवले असतील तर त्यांची माहिती देतो. आणि त्याच्या मनातल्या कल्पनाही तो मांडतो. याचाच अर्थ एकप्रकारे समस्यांचे समाजव्यापी निराकरण कशा पद्धतीने करणं शक्य आहे, याची झलक तुम्हा सर्वांच्या पत्रांतल्या गोष्टींमुळे वाचायला मिळते, हे मला जाणवत असतं. ‘मन की बात’ देश आणि समाज यांच्यासाठी एका आरशाप्रमाणे आहे. या आरशातलं प्रतिबिंब आपल्याला सांगतं की, देशवासियांमध्ये किती ताकद, बळकटी आहे. तसंच त्यांच्यामध्ये प्रतिभेची, उपजत कौशल्याची कोणत्याही प्रकारे कमतरता नाही, हेही या प्रतिबिंबावरून स्पष्ट होतं. आता फक्त गरज आहे ती, असलेल्या प्रचंड क्षमतेला आणि प्रतिभेला समाविष्ट करून नवीन संधी निर्माण करण्याची. त्यांच्याकडं जे काही आहे, ते कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. 130 कोटी देशवासीय मजबुतीनं आणि सक्रियतेनं देशाच्या प्रगती कार्यामध्ये सहभागी होवू इच्छितात, हे सुद्धा ‘मन की बात’ मधून दिसून येतं. आणखी एक गोष्ट मी जरूर सांगू इच्छितो की, ‘मन की बात’ साठी मला इतकी पत्रं येतात, असंख्य फोन कॉल येतात, प्रचंड संख्येनं संदेश मिळत असतात. परंतु त्यामध्ये तक्रारीचा सूर खूपच कमी असतो. त्याचबरोबर कोणी काही मागणी केलीय, स्वतःसाठी काही द्यावं अशी विनंती केलीय, असं एखादंही पत्र गेल्या पाच वर्षात पाहिल्याचं मला आठवत नाही. तुम्ही कल्पना करू शकता, देशाच्या पंतप्रधानाला कोणी एखादा पत्र लिहितोय, मात्र तो स्वतःसाठी काहीही मागत नाही. यावरून आपल्या देशाच्या कोट्यवधी लोकांची भावना किती उच्च कोटीची असेल, हे लक्षात येतं. मी ज्यावेळी या अशा सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतो, त्यावेळी माझ्या मनाला किती आनंद होतो, मला किती प्रचंड ऊर्जा मिळते, तुम्ही लोक मला चालायला लावता, तुम्हीच मला धावायला मदत करता, अगदी क्षणा-क्षणाला ऊर्जावान बनवण्याचं काम तुम्हीच करता, याची कल्पनाही तुम्हाला नसेल. आणि आपलं हेच नातं, हेच जोडले गेलेले ऋणानुबंध मी खूप ‘मिस’ करत होतो. आज माझं मन अगदी आनंदानं भरून गेलंय. मागच्यावेळी मी शेवटी म्हणालो होतो की, आता आपण तीन-चार महिन्यांनी भेटूया, त्याचाही काही लोकांनी राजकीय अर्थ काढला होता. लोक म्हणाले, अरे मोदीजींना किती आत्मविश्वास आहे, त्यांना केवढा भरवसा आहे. हा आत्मविश्वास काही मोदींचा नव्हता. तर हा विश्वास, तुमच्या विश्वासाचा पाया होता. तुम्ही सर्वांनीच तर विश्वासाचं रूप घेतलं होतं. आणि म्हणूनच अतिशय सहजपणानं मी अखेरच्या ‘मन की बात’ मध्ये म्हणालो होतो की, आता काही महिन्यांनंतर तुमच्याशी बोलायला येईन. वास्तविक, मी आलेलो नाही. तर तुम्ही लोकांनी मला आणलं आहे. तुम्हीच तर मला इथं बसवलंय. आणि तुम्हीच तर मला पुन्हा एकदा बोलण्याची संधी दिली आहे. या भावनेनेच चला तर मग ‘मन की बात’ चा क्रम पहिल्यासारखाच पुढं सुरू ठेवूया.
ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी लागू झाली, त्यावेळी त्याचा विरोध फक्त राजकीय परिघापर्यंत मर्यादित राहिला नव्हता. राजकीय नेत्यांपुरता सीमित नव्हता. कारागृहापर्यंत आंदोलन मर्यादित राहिलेलं नव्हतं. लोकांच्या मना-मनामध्ये, हृदयामध्ये आक्रोश होता. लोकशाही गमावल्यामुळं मनात एक प्रकारची तगमग जाणवत होती. ज्यावेळी वेळच्यावेळी भोजन मिळतं, त्यावेळी भूक म्हणजे काय हे समजत नसतं. अगदी त्याचप्रमाणे लोकशाहीतल्या अधिकारांचं महत्व ते कोणी हिसकावून घेतो, त्याचवेळी समजतं. आणीबाणीच्या काळात आपलं काहीतरी हिसकावून घेतलं गेलंय, असं देशातल्या प्रत्येक नागरिकाला वाटत होतं. ज्या गोष्टीचा आपण कधी वापर केला नाही अशी गोष्टसुद्धा जर कोणी हिसकावून घेतली, तरीही त्याचं दुःख होतं, त्याच्या यातना होतात. भारताच्या घटनेमध्ये काही व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळं लोकशाही इथं रूजली आहे. समाज व्यवस्था चालवण्यासाठी घटनेचीही आवश्यकता असते. कायदे, नियम यांचीही गरज असते. अधिकार आणि कर्तव्य यांचीही चर्चा होत असते. परंतु भारत गर्वानं, अभिमानानं सांगू शकतो की, आमच्यासाठी कायदा, नियम यांच्यापेक्षाही मोठे आमच्यावर झालेले लोकशाहीचे संस्कार आहेत. लोकशाही आमची संस्कृती आहे. लोकशाही आमचा वारसा, आमची परंपरा आहे. आणि हा वारसा बरोबर घेवूनच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. आणि म्हणूनच लोकशाही नसेल तर तिचा अभाव देशवासियांना जाणवतो. आणीबाणीच्या काळात आम्ही हा अनुभव घेतला होता. म्हणूनच देशानं आपल्यासाठी नाही, आपल्या हितासाठी नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी एका संपूर्ण निवडणुकीची आहुती दिली होती. कदाचित, संपूर्ण जगामधल्या कोणत्याही देशामध्ये असं घडलं नसेल की, तिथल्या जनतेने, लोकशाहीसाठी, आपल्या इतर अधिकारांची, आवश्यकतांची पर्वा न करता केवळ लोकशाहीसाठी मतदान केलं. अशी एक निवडणूक या देशानं 1977 मध्ये पाहिली आहे. अलिकडेच लोकशाहीतलं महापर्व म्हणजे सर्वात मोठा निवडणूक कार्यक्रम आपल्या देशात पार पडला. श्रीमंतापासून गरीबापर्यंत सर्व लोक या निवडणूक पर्वामध्ये आनंदानं सहभागी झाले. ते आपल्या देशाच्या भविष्याचा निर्णय करण्यासाठी तत्पर होते.
जर एखादी गोष्ट आपल्याजवळ असेल तर आपल्याला त्या गोष्टीचं फारसं महत्त्व वाटत नाही. तीचं मूल्यांकनही आपण कमीच करतो, इतकंच नाही तर त्या गोष्टीमध्ये काही आश्चर्यकारक, नवलाचे गुण आहेत, याकडंही आपण फारसं लक्ष देत नाही. आपल्याला जी बहुमूल्य लोकशाही मिळाली आहे, तिला आपण अगदी सहजतेनं ‘गृहीत’ धरलं आहे. आपली लोकशाही अतिशय महान आहे, आणि या लोकशाहीला आमच्या रक्तामध्ये स्थान मिळालं आहे. याची आपण स्वतःलाच वारंवार आठवण करून दिली पाहिजे. अनेक पिढ्यांनी केलेल्या साधनेमुळे, पिढ्यांपिढ्यांचे संस्कार घेवून एका विशाल, व्यापक मनाची अवस्था म्हणजे लोकशाही आहे. भारतामध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीत 61 कोटींपेक्षा जास्त लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. ‘सिक्स्टी वन करोड’ ही संख्या आपल्याला खूपच सामान्य, किरकोळ वाटू शकते. परंतु जर जगाचा हिशेब मांडायचा झाला तर मी सांगतो, एक चीन सोडला तर इतर कोणत्याही देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी भारतामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत जितक्या मतदारांनी मतदान केले, ती संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे, जवळपास दुप्पट आहे. संपूर्ण युरोपची जितकी लोकसंख्या आहे, त्यापेक्षाही जास्त भारतामध्ये एकूण मतदार आहेत. यावरून आपल्या लोकशाहीच्या विशालतेचा आणि व्यापकतेचा परिचय होतो. 2019च्या निवडणुका म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक होती. ही निवडणूक पार पाडण्यासाठी किती मोठ्या स्तरावर साधने आणि मनुष्य बळाची आवश्यकता असेल, याची आपण कल्पना करू शकता. लाखो शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दिवस-रात्र परिश्रम केल्यामुळे निवडणुका पार पडू शकल्या. लोकशाहीचा हा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी अर्धसैनिक दलाच्या जवळपास तीन लाख सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यांच्या 20 लाख पोलिस कर्मचाऱ्यांनीही परिश्रमाची पराकाष्ठा केली. या लोकांच्या अथक मेहनतीचे फळ म्हणजे यावेळी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जास्त मतदान झाले. मतदानासाठी संपूर्ण देशामध्ये जवळपास 10 लाख मतदान केंद्र उघडण्यात आली होती. जवळपास 40 लाखांपेक्षा जास्त ‘ईव्हीएम’ यंत्रे, 17 लाखांपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली. एकूण निवडणुकीचा किती प्रचंड व्याप होता, याची आपण कल्पना करू शकता. एकही मतदार आपल्या मताधिकारापासून वंचित राहू नये, सर्व पात्र मतदारांना आपला मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी हा सगळा आटापिटा केला होता. अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम क्षेत्रामध्ये, अगदी एका महिला मतदारासाठी मतदान केंद्र बनवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्या दुर्गम स्थानी पोहोचण्यासाठी दोन-दोन दिवस प्रवास करावा लागला होता, हे जाणून आपल्याला नवल वाटेल. हाच तर या लोकशाहीचा खरा सन्मान आहे. जगातील सर्वात उंच स्थानी मतदान केंद्र उघडण्याचं कामही भारतातचं झालं आहे. हे मतदान केंद्र हिमाचल प्रदेशातल्या लाहौल-स्फिती इथं आहे. हे ठिकाण 15 हजार फूट उंचावर आहे. याशिवाय या निवडणुकीत अभिमानानं सांगावी अशी एक गोष्ट घडली. यंदा महिलांनीही पुरूषांप्रमाणेच उत्साहानं आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या महिला आणि पुरूषांचे प्रमाण जवळ-जवळ सारखंच होतं. आणखी एक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये 78 (अठ्ठ्याहत्तर) महिला, खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. निवडणूक आयोगाला आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप-खूप शुभेच्छा देतो. आणि भारतातल्या जागरूक मतदारांना नमन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही सर्वांनी माझ्या तोंडून अनेकदा ऐकलं असेल की, ‘बुके नाही तर बुक’ असा माझा आग्रह असतो;आपण सर्वजण स्वागत-सत्कार करताना फुलांच्या ऐवजी पुस्तकं देवू शकतो. हे ऐकून आता अनेक ठिकाणी लोक पुस्तकं भेट देवून स्वागत करायला लागले आहेत. मला अलिकडेच कुणीतरी ‘प्रेमचंद की लोकप्रिय कहानियाँ’ या शीर्षकाचं पुस्तक भेट दिलंय. मला ही भेट खूप आवडली. खरंतर, मला खूप काही वेळ मिळू शकला नाही, तरीही प्रवासातल्या काळात मला त्यांच्या काही कथा पुन्हा एकदा वाचण्याची संधी मिळाली. प्रेमचंद यांनी आपल्या कथांमध्ये समाजाचं यथार्थ चित्रण केलं आहे. ते वाचताना त्या काळाचं चित्रच आपल्या डोळ्यासमोर निर्माण व्हायला लागतं. त्यांनी लिहिलेला प्रत्येक तपशील, प्रत्येक गोष्ट जीवंत होत जाते. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेल्या कथा मानवी संवेदनांची अभिव्यक्ती करणाऱ्या असल्यामुळं मनाला स्पर्श करतात. त्यांच्या कथांमध्ये समग्र भारताची मनोभावना समाविष्ट झालेली जाणवते. त्यांनी लिहिलेली ‘नशा’ नावाची कथा वाचत असताना माझं मन आपोआपच समाजात असलेल्या आर्थिक विषमतेच्या प्रश्नामागे धावलं. मला माझ्या तरूणपणातला कालखंड आठवला. समाजातल्या आर्थिक विषमतेवर आम्हा युवकांचा रात्र-रात्रभर वादविवाद होत असे. जमीनदाराचा मुलगा ईश्वरी आणि गरीब कुटुंबातला बीर यांच्या या कथेतून खूप काही शिकायला मिळतं की जर आपण सावध राहिलो नाही, तर वाईट संगतीचा परिणाम कधी आणि कसा होतो, हे लक्षातही येत नाही. दुसऱ्या कथेनं तर माझ्या मनाला अगदी खोलवर स्पर्श केला. ही कथा होती ‘ईदगाह’. यामध्ये एका बालकाची संवेदनशीलता, त्याच्या मनामध्ये आपल्या आजीविषयी असलेली अपार माया, इतक्या लहान वयामध्ये विचारांमध्ये असलेली परिपक्वता यांचं दर्शन या कथेतून होतं. 4-5 वर्षांचा हामिद ज्यावेळी जत्रेतून चिमटा घेवून आपल्या आजीकडे येतो, त्यावेळी खऱ्या अर्थाने मानवी संवेदना अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचते. या कथेमधलं शेवटचं वाक्य वाचकाला अतिशय भावुक बनवणारं आहे. कारण त्यामध्ये जीवनातलं एक खूप मोठं सत्य सांगितलं आहे. हे वाक्य असं आहे, ‘‘बच्चे हामिदने बूढे़ हामिद का पार्ट खेला था – बुढ़िया अमीना, बालिका अमीना बन गई थी।’’
अशीच एक खूप मार्मिक कथा आहे, ‘पूस की रात’! या कथेमध्ये एका गरीब शेतकऱ्याच्या जीवनाच्या चित्तरकथेच अतिशय सजीव चित्रण वाचायला मिळतं. आपलं पिकं नष्ट झाल्यानंतरही हल्दू शेतकरी यासाठी आनंदी होतो की, आता त्याला शेताची राखण करण्यासाठी म्हणून कडाक्याच्या थंडीत शेतामध्ये झोपावं लागणार नाही. वास्तविक या सगळ्या कथा जवळपास शतकापूर्वीच्या काळातल्या आहेत. परंतु त्या आजच्या काळामध्येही लागू पडतात. या कथा वाचल्यानंतर मला एका वेगळ्याच प्रकारची अनुभूती आली.
आता वाचनाची चर्चा सुरू आहे, म्हणून सांगतो. मी कुठंतरी केरळमधल्या अक्षरा ग्रंथालयाविषयी वाचलं होतं. हे ग्रंथालय इडुक्कीच्या अगदी घनदाट जंगलामध्ये वसलेल्या एका गावामध्ये आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथले प्राथमिक शिक्षक पी.के. मुरलीधरन आणि एक छोटसं चहाचं दुकान चालवणारे पी. व्ही. चिन्नाथम्पी या दोघांनी मिळून अथक परिश्रमानं हे ग्रंथालय सुरू केलं. एकेकाळी हे दोघेजण पुस्तकांचं गाठोडं बनवायचे आणि आपल्या पाठीवरून ओझं वहात जंगलातल्या आपल्या गावात पुस्तकं न्यायचे. आज हेच ग्रंथालय, इथल्या आदिवासी मुलांबरोबरच प्रत्येकाला एक नवीन दिशा दाखवण्याचं काम करत आहे.
गुजरातमध्ये ‘वांचे गुजरात’ ही मोहीम चांगली यशस्वी ठरली. या मोहिमेमध्ये सर्व वयोगटातले लाखो जण सहभागी झाले आणि त्यांनी पुस्तकं वाचली. आजच्या डिजिटल युगामध्ये, गुगल गुरूच्या काळामध्ये माझा तुम्हाला आग्रह आहे की, आपल्या दैनंदिन कामामध्ये पुस्तकं वाचण्यासाठी थोडा वेळ जरूर राखून ठेवा. तुम्ही पुस्तक वाचनातून नक्कीच खूप आनंद मिळवाल. तुम्ही जे कोणतं पुस्तक वाचाल, त्याविषयी ‘नरेंद्रमोदी अॅप’वर जरूर अभिप्राय लिहून पाठवा. म्हणजे ‘मन की बात’ च्या सर्व श्रोत्यांनाही त्या पुस्तकाविषयी माहिती मिळू शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातले लोक केवळ वर्तमान काळाचा विचार करत नाहीत, तर त्यांना भविष्यातल्या आव्हानांचाही विचार करावासा वाटतो, ही गोष्ट माझ्यासाठी आनंदाची आहे. नरेंद्रमोदी अॅप आणि ‘मायगव्ह’ यांच्यावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया मी वाचत होतो, त्यावेळी माझ्या लक्षात आलं, पाणी समस्येविषयी अनेक लोकांनी खूप काही लिहिलं आहे. बेलगावीच्या पवन गौराई, भुवनेश्वरचे सीतांशू मोहन परीदा यांच्याशिवाय यश शर्मा, शाहाब अल्ताफ आणि आणखी अनेक लोकांनी पाण्याशी संबंधित असलेल्या आव्हानांविषयी लिहिलं आहे. पाण्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्व आहे. ऋग्वेदामधल्या ‘आपः सुक्तम्’मध्ये पाण्याविषयी नमूद केलं आहे की:-
आपो हिष्ठा मयो भुवः स्था न ऊर्जे दधातन, महे रणाय चक्षसे,
यो वः शिवतमो रसः, तस्य भाजयतेह नः उषतीरिव मातरः ।
याच अर्थ असा आहे की, जल म्हणजे जीवन दायिनी शक्ती, ऊर्जेचे स्त्रोत आहे. पाणी मातेसमान असून, मातृवत आशीर्वाद मिळावेत. जलरूपी मातेची कृपा आपल्यावर कायम रहावी. पाण्याच्या कमतरतेमुळे देशाच्या अनेक भागामध्ये दरवर्षी दुष्काळ पडतो. वर्षभर जेवढा पाऊस आपल्याकडे पडतो, त्यापैकी केवळ आठ टक्के पावसाचे पाणी आपण वाचवतो, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त आणि फक्त आठ टक्के पाण्याची बचत आपण करतो, म्हणूनच आता या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. आपण सर्वांनी इतर अनेक समस्यांवर ज्याप्रमाणे जनभागीदारीतून, जनशक्तीतून उत्तर शोधून काढले, त्याचप्रमाणे पाणी समस्येवर एकशे तीस कोटी देशवासिय सर्व सामर्थ्यानिशी, सर्वांच्या सहकार्याने आणि दृढ संकल्पाने उत्तर शोधून काढतील. पाण्याचं महत्व सर्वात जास्त आहे, हे लक्षात घेवून देशामध्ये आता नवीन जलशक्ती मंत्रालय बनवण्यात आलं आहे. यामुळे पाण्याशी संबंधित असलेल्या सर्व विषयांवर वेगानं निर्णय घेणं शक्य होईल. काही दिवसांपूर्वी मी थोडं वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. देशभरातल्या सरपंचांना, ग्राम प्रधानांना मी पत्र लिहिलं. पाणी वाचवण्यासाठी, पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी, पावसाचा थेंब न थेंब वाया जावू नये, पावसाच्या पाण्याची बचत करण्यासाठी गाव प्रमुखांनी ग्रामसभा, बैठका बोलावाव्यात. गावकऱ्यांबरोबर बसून चर्चा-विनिमय करावे, असं या पत्रात मी त्यांना लिहिलं आहे. या कामामध्ये सरपंच, गाव प्रमुखांनी अतिशय उत्साह दाखवला, याचा मला खूप आनंद आहे. या महिन्याच्या 22 तारखेला देशातल्या हजारो पंचायतीमंध्ये करोडो लोकांनी श्रमदान केलं. गावां-गावांमध्ये पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा आणि पावसाच्या पाण्याची बचत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. आजच्या या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये मी आपल्याला एका सरपंचाची गोष्ट ऐकवू इच्छितो. झारखंडमधल्या हजारीबाग जिल्ह्यातल्या कटकमसांडी ब्लॉकच्या लुपुंग पंचायतीच्या सरपंचांनी आपल्या सर्वांना काय संदेश दिला आहे, ते ऐका —
‘‘माझं नाव दिलीपकुमार रविदास आहे. पाणी बचतीविषयी ज्यावेळी पंतप्रधानांनी पाठवलेले पत्र माझ्या हाती आलं, ते पाहून, आधी माझा विश्वासच बसला नाही. पंतप्रधानांनी आपल्याला पत्र लिहिलंय हे खरंच वाटत नव्हतं. आम्ही 22 तारखेला गावातल्या सर्व लोकांना एकत्रित करून पंतप्रधानांच्या पत्राचं जाहीर वाचन केलं, त्यावेळी गावातले सर्व लोक उत्साहित झाले. सर्वांनी मिळून पाणी बचतीसाठी तलावाची स्वच्छता केली आणि नवीन तलाव बनवण्यासाठी श्रमदान करण्यासाठी, प्रत्येक गावकरी या कामामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले. पावसाळा सुरू होण्याआधी हा उपाय केला तर आगामी काळात आम्हाला पाणी कमी पडणार नाही. आमच्या पंतप्रधानांनी आम्हाला अतिशय योग्य वेळी पाणी बचतीची जाणीव करून दिली हे खूप चांगलं झालं.’’
बिरसा मुंडा यांची ही भूमी आहे. निसर्गाबरोबर समतोल साधून राहणं हा इथल्या संस्कृतीचा भाग आहे. तिथले लोक, पुन्हा एकदा जल संरक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाले आहेत. पाणी वाचवण्यासाठी सर्व ग्राम प्रधानांनी, सर्व सरपंचांनी, जी सक्रियता दाखवली, त्याबद्दल माझ्यावतीने या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. देशभरातल्या अनेक संरपंचांनी जल संरक्षणाचा असाच संकल्प केला आहे. एक प्रकारे ही संपूर्ण गावालाच कार्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं गावातले लोक आता आपआपल्या गावामध्ये जणू जलमंदिर बनवण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. सामूहिक प्रयत्न केले तर खूप चांगले सकारात्मक परिणाम मिळतात, हे मी याआधीच सांगितलं आहे. तेच चित्र आता दिसत आहे. संपूर्ण देशामध्ये जलसंकटावर मात करण्यासाठी एकच विशिष्ट ‘फॉम्र्युला’ असू शकत नाही. त्यासाठी देशातल्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. परंतु सर्वांच लक्ष्य एकच आहे. आणि ते म्हणजे पाणी बचत, जल संरक्षण!!
पंजाबमध्ये ड्रेनेज लाईन्स सुधारण्याचं काम केलं जात आहे. या कामांमुळे पाणी तुंबण्याची समस्या सुटणार आहे. तेलंगणामधल्या थिमाईपल्ली इथं पाण्याच्या टाक्या तयार करण्यात येत असल्यामुळे गावातल्या लोकांचे आयुष्य बदलत आहे. राजस्थानमध्ये कबीरधाम इथं शेतांमध्ये बनवण्यात आलेल्या लहान लहान तलावांमुळे मोठे परिवर्तन घडून आले आहे. तामिळनाडूतल्या वेल्लोर इथं करण्यात आलेल्या सामूहिक प्रयत्नांविषयी मी वाचलं होतं की, तिथं नाग नदी पुनर्जीवित करण्यासाठी 20 हजार महिला एकत्रित आल्या. गढवालमधल्या महिला आपआपसात मिळून एकत्रितपणे ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’चं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करीत आहेत, असंही माझ्या वाचनात आलं. अशा प्रकारे अनेक प्रयत्न केले जात आहेत. माझा विश्वास आहे की, ज्यावेळी आपण सगळे एकजूट होवून, मजबूतपणे प्रयत्न करतो, त्यावेळी अशक्य ते शक्य होते. ज्यावेळी प्रत्येकजण या जल संरक्षणाच्या कार्यात सहभागी होईल, त्याचवेळी पाणी वाचणार आहे. आज ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी देशवासियांकडे तीन गोष्टींचा आग्रह धरणार आहे.
माझा पहिला आग्रह असणार आहे – तो म्हणजे ज्याप्रमाणे देशवासियांनी स्वच्छता मोहिमेला आंदोलनाचं रूप दिलं, त्याचप्रमाणे जल संरक्षणासाठीही एका जनआंदोलनाला प्रारंभ करावा. आपण सगळे मिळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा संकल्प करूया. आणि माझा तर विश्वास आहे की, पाणी परमेश्वरानं दिलेला प्रसाद आहे. पाणी परीसाचं रूप आहे. पूर्वी म्हणायचे की, परीसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं बनतं. मी म्हणतो की, पाणी परीस आहे, आणि परीसाच्या म्हणजेच पाण्याच्या स्पर्शानं नवजीवनाची निर्मिती होते. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी एका जागरूकता अभियानाची सुरूवात केली जावी. यामध्ये पाण्याशी संबंधित समस्यांविषयी बोललं जावं, त्याच बरोबर पाणी बचतीच्या पद्धतींचा प्रचार-प्रसार केला जावा. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवी, मान्यवर, व्यक्तींनी पाणी बचतीच्या मोहिमेचे नेतृत्व करावं. प्रसिद्ध, लोकप्रिय व्यक्तींच्या मार्फत जल संरक्षणाविषयी नवीन प्रभावी जाहिरात केली जावी, असा आग्रह मी करतो. चित्रपट क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रसार माध्यमातले आमचे सहकारी असो, कथा-कीर्तनकार असो, प्रत्येकानं आपआपल्या पद्धतीनं या आंदोलनाचं नेतृत्व करावं. समाजाला जागरूक करून, समाजाला जोडण्याचं काम करावं. असा सर्व समाजाचा सहभाग या आंदोलनामध्ये असेल तर तुमच्या डोळ्यादेखत परिवर्तन होईल.
देशवासियांना माझा दुसरा आग्रह पाण्याविषयीचाच आहे. आपल्या देशामध्ये पाणी संरक्षणासाठी अनेक पारंपरिक पद्धतींचा वापर अनेक शतकांपासून केला जातो. आपण सर्वांनी जलसंरक्षणाच्या त्या पारंपरिक पद्धतींची माहिती शेअर करावी, असा आग्रह मी करतो. आपल्यापैकी कोणाला जर पूज्य बापूजींच्या जन्मस्थानी- पोरबंदर इथं जाण्याची संधी मिळाली असेल तर त्यांनी हे स्थान पाहिलं असेल. पूज्य बापूजींच्या घराच्या मागच्या बाजूलाच आणखी एक दुसरे घर आहे. तिथं 200 वर्षांपूर्वीची एक पाण्याची साठवण टाकी आहे. विशेष म्हणजे या टाकीमध्ये आजही पाणी आहे. पडणाऱ्या पावसाचे पाणी या टाकीत रोखण्याची व्यवस्था आहे. म्हणूनच मी नेहमी सांगत असतो, जर कोणी कीर्ती मंदिरमध्ये जाणार असेल तर, त्यानं ही पाण्याची साठवण टाकी जरूर पहावी. अशा प्रकारे विविध प्रयोगांनी अनेक ठिकाणी पूर्वापार पाणी साठवण्याच्या जागा असतील. तसेच विविध पद्धतीनं पाणी साठवलं जात असेल. ती माहिती शेअर करावी.
तुम्हा सर्वांना माझा तिसरा आग्रह आहे की, जल संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती आपण शेअर करावी. अशी माहिती संकलित झाली तर पाण्यासाठी समर्पित, पाण्यासाठी सक्रिय असलेल्या संघटना, व्यक्ती, यांची सर्व माहिती संकलित होईल. पाण्यासाठी काम करणाऱ्यांचा एक ‘डाटाबेस’ तयार होईल. चला, तर मग; आपण जल संरक्षणाशी संबंधित जास्तीत जास्त पद्धतींची एक सूची बनवून लोकांना जलसंरक्षणासाठी प्रोत्साहन देवू या. आपण सर्वजण‘‘#जनशक्तीफॉरजलशक्ती’ (#JanshaktiForJalshakti) याचा उपयोग करून आपली माहिती यामध्ये ‘शेअर’ करू शकता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एका गोष्टीसाठी मला आपले आभार व्यक्त करायचे आहेत. त्याचबरोबर दुनियेतल्या लोकांचेही आभार व्यक्त करायचे आहेत. दिनांक 21 जून रोजी पुन्हा एकदा योग दिवस सक्रियतेनं, उत्साहानं, साजरा करण्यात आला, त्यासाठी हे आभार आहेत. काही ठिकाणी तर एकाच परिवारामधल्या तीन-तीन, चार-चार पिढ्यांनी एकत्रित योग दिवस साजरा केला. ‘होलिस्टिक हेल्थ केअर’ विषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस योगदिवसाचे महात्म्य वाढतच चालले आहे. जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात योग दिवस साजरा केला गेला. त्यादिवशी उगवत्या सूर्याचं स्वागत योगप्रेमींनी केलं. अगदी दिवसभर आणि सूर्य मावळेपर्यंत या दिवशी योगविषयक अनेक कार्यक्रम झाले. योगासनाशी जोडला गेला नाही, अशी व्यक्ती सापडणं आता अवघड आहे. माणूस आणि योग एकमेकांशी जोडले गेले आहेत. त्यामुळंच कदाचित ‘योग’ने इतकं मोठं, व्यापक रूप धारण केलंय. भारतामध्ये हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत, सियाचिनपासून ते पाणीबुडीपर्यंत, हवाई दलापासून ते एअर क्राफ्टकॅरियरपर्यंत, एसी जिमपासून ते राजस्थानातल्या तापलेल्या वाळवंटापर्यंत, गांवांपासून ते शहरांपर्यंत, जिथं, जिथं शक्य होते, तिथं तिथं, प्रत्येक ठिकाणी फक्त योग केला, असं नाही. तर योग दिवस सामूहिक स्वरूपात जोरदार साजरा केला गेला.
जगभरातल्या अनेक देशांच्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानांनी, मान्यवर व्यक्तींनी, सामान्य नागरिकांनी आपआपल्या देशात कशा प्रकारे योग दिवस साजरा केला, त्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मला दिली. त्या दिवशी हे संपूर्ण जग एखाद्या आनंदी, सुखी परिवारासारखं वाटत होतं.
स्वस्थ समाज निर्माणासाठी स्वस्थ आणि संवेदनशील व्यक्तींची आवश्यकता असते, हे आपण सर्वजण जाणून आहोत. आणि योग स्वस्थ समाज खात्रीनं निर्माण करू शकतो. म्हणूनच योगाचा प्रचार- प्रसार म्हणजे समाज सेवेचे एक महान कार्य आहे. मग अशी सेवा करणाऱ्यांना मान्यता देवून त्यांचा सत्कार करायला नको का? वर्ष 2019 मध्ये योगाला प्रोत्साहन देवून आणि विकासाच्या कामात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान पुरस्काराची घोषणा यंदा करण्यात आली. ही घोषणा करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. हा पुरस्कार दुनियेतल्या अशा संघटनांना दिला जात आहे की, तुम्हाला त्या संघटनेविषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती असण्याची शक्यता खूप कमी आहे. या संघटनेने योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. उदाहरणार्थ, ‘जपान योग निकेतन’. या संस्थेनं योग पूर्ण जपानमध्ये लोकप्रिय बनवला आहे. ‘जपान योग निकेतन’ तिथं अनेक इन्स्टिट्यूट चालवते आणि ट्रेनिंग कोर्सेस घेते. तसंच इटलीच्या श्रीमती अँटोनिट्टा रोझी यांचं नाव घ्या. यांनी ‘सर्व योग इंटरनॅशनल’ ची सुरवात केली आणि पूर्ण यूरोपमध्ये त्यांनीच योगाचा प्रचार आणि प्रसार केला. ही गोष्ट प्रेरक आहे. आता योग हाच विषय सुरू आहे, तर या या क्षेत्रात भारतीय काही पिछाडीवर नाहीत. बिहार योग विद्यालय, मुंगेर यांनाही सन्मानित करण्यात आले. या संस्था गेल्या काही दशकांपासून योगप्रचारासाठी समर्पित आहेत. याच प्रकारे स्वामी राजर्षि मुनी यांचाही सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी आपलं आयुष्य योग प्रसारासाठी वाहून घेतलंय. त्यांनी लाईफ मिशन आणि लकुलिश योग युनिव्हर्सिटीची स्थापना केली. योगचे व्यापक ‘सेलिब्रेशन’ आणि योगचा संदेश घराघरामध्ये पोहोचवणाऱ्या सर्वांचा सन्मान केला जात आहे. योगचा संदेश घराघरामध्ये पोचवणाऱ्यांचाही सन्मान केला पाहिजे. या सन्मानांमुळेच यंदाचा योगदिवस चांगला संस्मरणीय ठरला.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या या यात्रेला आज आरंभ होत आहे. नवीन भाव, नवीन अनुभूती, नवा संकल्प, नवे सामर्थ्य, परंतु मी आपल्या सल्ल्यांची प्रतीक्षा करत राहणार. आपल्या विचारांशी जोडलं जाणं माझ्यासाठी एक मोठी आणि महत्वपूर्ण बाब आहे. ‘मन की बात’ तर एक निमित्तमात्र आहे. चला तर मग, आपण भेटत राहू, बोलतं राहू. मी तुमच्या भावना ऐकतो, मनात जपून ठेवतो. कधी-कधी तर त्या भावना जगण्याचा प्रयत्न करतो. आपले आशीर्वाद असेच मिळत रहावेत. तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्हीच माझी ऊर्जा आहात. या, आपण सगळे मिळून एकत्रित बसू या, ‘मन की बात’चा आनंद घेवूया. त्याचबरोबर आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडूया. पुन्हा एकदा पुढच्या महिन्याच्या ‘ मन की बात’ च्या वेळी भेटूया. आपणा सर्वांना माझे खूप-खूप धन्यवाद!
नमस्कार!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार !
आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वीर सैनिकांच्या हौतात्म्यानंतर देशभरामधल्या लोकांच्या मनावर आघात झाला आहे तसंच मनामध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. शहीद झालेले वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी चोहोबाजूनं सहवेदना व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारच्या दहशतवादी हिंसेच्या विरोधामध्ये तीव्र संतापाच्या भावना आपल्या सर्वांच्या आणि माझ्या मनामध्ये आहेत, त्याच भावना प्रत्येक देशवासियाच्या मनात आणि मानवतेवर विश्वास ठेवणा-या संपूर्ण विश्वातल्या मानवतावादी समुदायांच्या मनामध्ये दडलेल्या आहेत. भारत-मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या देशाच्या सर्व वीर सुपुत्रांना, मी वंदन करतो. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या वीरांचे हौतात्म्य निरंतर प्रेरणा देत राहील. दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्याचा आमचा संकल्प, निर्धार आता अधिक मजबूत होईल. आपण सर्वांनी जातीवाद, संप्रदायवाद, क्षेत्रवाद आणि इतर सर्व मतभेदांना विसरून आज देशापुढे उभे ठाकलेल्या या आव्हानाला तोंड दिलं पाहिजे. दहशतवादाच्या विरोधात आता आपण जी पावले उचलणार आहोत, ती पूर्वीपेक्षाही अधिक दृढ, सशक्त आणि निर्णायक पावले असली पाहिजेत. आपल्या सशस्त्र दलाने नेहमीच अद्वितीय साहस आणि पराक्रम दाखवला आहे. जिथे शांती प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अदभूत क्षमता दाखवली आहे. तिथेच हल्लेखोरांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर देण्याचं काम त्यांनी केलं आहे. शंभर तासांच्या आतच कशा प्रकारे कारवाई करण्यात आली, हे आपण सर्वांनी पाहिलं असेलच. सेनेनं दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-यांचा समूळ नाश करण्याचा संकल्प, निर्धार केला आहे. वीर सैनिकांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबियांकडून जे प्रेरणादायी विचार व्यक्त केले जात आहेत ते सर्व प्रसार माध्यमांतून सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे देशातल्या जनतेच्या हिंमतीला बळ मिळत आहे.
बिहारमधल्या भागलपूरचे शहीद रतन ठाकूर यांचे पिता रामनिरंजनजी यांनी अशा दुःखद प्रसंगातही जी हिंमत दाखवली, ती आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे. शत्रूशी लढण्यासाठी आपला दुसरा मुलगाही आपण सैन्यात पाठवू आणि गरज पडली तर आपण स्वतः लढू, असं त्यांनी म्हटलं आहे. ओडिशातल्या जगतसिंहपूरचे शहीद प्रसन्ना साहू यांच्या पत्नी मीनाजी यांच्या अदम्य साहसाला संपूर्ण देश सलाम करत आहे. त्यांनी आपल्या एकुलत्या एक मुलालाही ‘सीआरपीएफ’मध्येच भर्ती करण्याचा निर्धार केला आहे. झारखंडमध्ये गुमला या गावी ज्यावेळी तिरंग्यामध्ये लपेटलेले शहीद विजय शोरेन यांचे पार्थिव पोचले, त्यावेळी त्यांच्या निष्पाप मुलाने आपणही लष्करातच भर्ती होणार असल्याचं सांगितलं. या निरागस बालकानं दाखवलेली हिंमत म्हणजे आज भारतवर्षातल्या प्रत्येक लहान-लहान बालकाचीच भावना आहे. अशीच भावना आपल्या वीर, पराक्रमी शहीदांच्या घरा- घरांमधून व्यक्त होताना दिसत आहे. आमचा एकही वीर हुतात्मा याला अपवाद नाही की त्यांचे कुटुंबीय अपवाद नाही. मग ते देवरियाचे हुतात्मा विजय मौर्य यांचे कुटुंबीय असो अथवा कांगडाचे शहीद तिलकराज यांचे माता-पिता असो किंवा कोटाचे शहीद हेमराज यांचा सहा वर्षांचा मुलगा असो. हुतात्मा जवानांच्या प्रत्येक परिवाराची कथा, प्रेरणा देणारी आहे. या कुटुंबियांनी मोठं धैर्य दाखवून ही देशप्रेमाची भावना व्यक्त केली आहे, ती आजच्या युवापिढीनं समजून- जाणून घ्यावी , असं माझं आवाहन आहे. देशभक्ती कशी असते? त्याग- तपस्या म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातल्या जुन्या घटनांकडे पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्या डोळ्यासमोरच ही चालती-बोलती उदाहरणं आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हीच उदाहरणं प्रेरणा स्त्रोत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेली अनेक वर्षे राष्ट्रीय सैनिक स्मारकाची आपण वाट पहात होतो, आता ही वाट पाहणं लवकरच संपणार आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या प्रदीर्घ कालखंडामध्ये हे काम होऊ शकलं नाही. त्यामुळे देशवासियांच्या मनामध्ये त्याविषयी जिज्ञासा, उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. ‘नरेंद्रमोदीअॅप’वर कर्नाटकातल्या उडुपीचे रहिवासी श्रीयुत ओंकार शेट्टी यांनी ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे काम पूर्ण होऊन ते तयार करण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारतामध्ये एकही राष्ट्रीय युद्ध स्मारक नाही. सैनिक स्मारक नाही, याचं मला आश्चर्यही वाटत होतं आणि मनाला यातनाही होत होत्या. राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या वीर जवानांच्या महान शौर्याची गाथा जतन करून ठेवणारं स्थान म्हणजे असे हे स्मारक असते. देशामध्ये असं प्रेरणादायी स्मारक असावं असा विचार करून ते बनवण्याचा मी निश्चय केला.
राष्ट्रीय सैनिक स्मारक उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि प्रत्यक्ष कामाला प्रारंभही करण्यात आला. विशेष म्हणजे हे स्मारक अतिशय कमी वेळेमध्ये तयारही झालं आहे, याचा मला आनंद आहे. उद्या, म्हणजेच 25 फेब्रुवारीला हे राष्ट्रीय सैनिक स्मारक, आम्ही कोट्यवधी देशवासी आमच्या लष्कराकडे सुपूर्द करणार आहोत. आपल्यावर असलेलं ऋण चुकतं करण्याचा हा अगदी अल्पसा प्रयत्न देश करणार आहे.
दिल्लीचे हृदयस्थान ज्या जागेला म्हटलं जातं, त्या इंडिया गेट आणि अमर जवान ज्योत भागाजवळच हे नवीन स्मारक बनवण्यात आलं आहे.
या राष्ट्रीय सैनिक स्मारकाला भेट देणं म्हणजे एखाद्या तीर्थस्थानी भेट देण्याइतकंच पवित्र कार्य देशवासियांच्या दृष्टीनं असणार आहे, असा मला विश्वास आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वोच्च बलिदान देणा-या सैनिकांबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणजे हे राष्ट्रीय सैनिक स्मारक आहे. या स्मारकाची रचना आमच्या अमर सैनिकांच्या अदम्य साहसाचं प्रदर्शन करणारी आहे. या राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना चार केंद्रीत चक्रांवर आधारित आहे. यामध्ये एका सैनिकाच्या जन्मापासून ते हौतात्म्यापर्यंतचं चित्रण आहे. अमर चक्राची ज्योत शहीद सैनिकाच्या अमरतेचं प्रतीक आहे. दुसरं चक्र वीरतेचं आहे. यामध्ये सैनिकांनी दाखवलेलं साहस, शौर्य यांचं प्रदर्शन आहे. या भागामध्ये एका दीर्घेमध्ये भिंतीवर सैनिकांच्या शौर्याच्या गाथा कोरण्यात आल्या आहेत. यामध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणा-या सैनिकांची नावं सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहेत. यानंतर असलेलं रक्षक चक्र सुरक्षेचं प्रतिबिंब करत आहे. या चक्रामध्ये घनदाट झाडांच्या रांगा आहेत. ही झाडं म्हणजे सैनिकांचे प्रतीक आहेत आणि देशाच्या नागरिकांना विश्वास देणारा एक संदेशही देत आहेत.प्रत्येक घडीला सैनिक सीमेवर तैनात आहे आणि देशवासी सुरक्षित आहेत,असा हा संदेश आहे. एकूण पाहिलं, तर हे राष्ट्रीय सैनिक स्मारक म्हणजे एक आगळं स्थान बनणार आहे. या स्थानी देशाच्या महान शहीदांची माहिती मिळू शकणार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येणार आहे. या वीर सैनिकांच्या शौर्याची माहिती घेण्याच्या उद्देशाने कोणी इथं येतील. त्यावेळी त्यांना देश सुरक्षित रहावा, आपण जीवंत रहावे, देशाचा विकास करावा, म्हणून आपले प्राण देशासाठी अर्पण करणा-या जवानांची माहिती मिळू शकणार आहे. देशाच्या विकासामध्ये आमचे सशस्त्र दल, पोलीस आणि अर्धसैनिक दल यांचं महान आणि अमूल्य योगदान शब्दांमध्ये व्यक्त करणं खरोखरीच शक्य नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मला राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित करण्याचं भाग्य लाभलं होतं. ते स्मारकही आपल्या विचारांचे प्रतिबिंब होते. आमच्या सुरक्षेसाठी निरंतर कार्यरत राहणारे पुरूष आणि महिला पोलिस कर्मचारी यांच्याविषयी आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असं मला वाटतं. आपण सर्वजण राष्ट्रीय सैनिक स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारक यांना जरूर भेट द्याल, अशी आशा मला आहे. आपण यापैकी कुठंही जा, मात्र ज्यावेळी जाणार, त्यावेळी समाज माध्यमांच्याद्वारे आपली छायाचित्रे जरूर ‘शेअर’ करा. त्यामुळे इतर लोकांनाही या पवित्र स्थानाला आपणही भेट दिली पाहिजे, अशी प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी उत्सुक होतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ साठी आपल्याकडून हजारों पत्र आणि प्रतिक्रिया येत असतात. वेगवेगळ्या माध्यमांमार्फतही याविषयी प्रतिक्रिया येत असतात. यावेळी जेव्हा मी आपल्याकडून आलेल्या प्रतिक्रिया वाचत होतो, त्यावेळी आतिश मुखोपाध्याय जी यांच्या अतिशय रंजक प्रतिक्रियेकडं माझं लक्ष वेधलं गेलं. त्यांनी लिहिलेलं आहे की, 3 मार्च 1900 रोजी इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना अटक केली होती. त्यावेळी त्यांचं वय केवळ 25 वर्ष होतं. आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे दिनांक 3 मार्च रोजीच जमशेदजी टाटा यांची जयंतीही आहे. मुखोपाध्यायजी यांनी पुढं लिहिलं आहे की, ही दोन्ही व्यक्तिमत्वं संपूर्णपणे भिन्न आहेत. दोघेही अगदी वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले आहेत. मात्र या दोघांनीही झारखंडची परंपरा, तिथला वारसा आणि इतिहास समृद्ध केला आहे.
‘मन की बात’ मध्ये बिरसा मुंडा आणि जमशेदजी टाटा यांना श्रद्धांजली वाहणं म्हणजे एक प्रकारे झारखंडच्या गौरवशाली इतिहासाला आणि परंपरेला वंदन करण्यासारखं आहे. आतिश जी, मी आपल्या मताशी अगदी सहमत आहे. या दोन महान विभूतींनी झारखंडचंच नाही तर संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. संपूर्ण देश त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहे. आज, आमच्या नवयुवकांना मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी व्यक्तित्व म्हणून कोणाचे नाव घेता येईल तर ते आहे भगवान ‘बिरसा मुंडा’ यांचं. इंग्रजांनी बिरसा मुंडा झोपलेले असताना अगदी लपून-छपून, अतिशय चतुराई दाखवून त्यांना पकडलं. मुंडा यांना पकडण्यासाठी असा पळपुटेपणाचा मार्ग इंग्रजांना का स्वीकारावा लागला, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण इतकं मोठं साम्राज्य निर्माण करणारे इंग्रजी मुंडा यांना घाबरत होते. भगवान ‘बिरसा मुंडा यांनी केवळ आपल्या परंपरागत धनुष्यबाणाच्या मदतीने बंदुका आणि तोफांनी सज्ज असलेल्या इंग्रज सरकारला अगदी हलवून टाकलं होतं. वास्तविक, लोकांना असे एखादे प्रेरणादायी नेतृत्व मिळाले तर मग समोरच्या शत्रूकडे असलेल्या शस्त्रांस्त्रांच्या शक्तीपेक्षाही सामूहिक इच्छाशक्ती बलवान ठरते. भगवान ‘बिरसा मुंडा’ यांनी इंग्रजांबरोबर केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला नाही, तर आदिवासींच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकारांसाठीही लढा दिला. आपल्या अल्पायुष्यामध्ये त्यांनी सगळं काही करून दाखवलं. वंचित आणि शोषितांच्या अंधःकारमय जीवनामध्ये सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश आणला. भगवान बिरसा मुंडा यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी बलिदान दिले. बिरसा मुंडा यांच्यासारखे भारत मातेचे सुपूत्र देशाच्या प्रत्येक भागात झाले आहेत. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या या लढाईमध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान दिले गेले नाही, असा या हिंदुस्तानचा एकही भाग, एकही तुकडा राहिलेला नाही. देशातल्या सर्व भागाचे, स्वातंत्र्यलढ्यात योगदान होते. परंतु दुर्भाग्य असे आहे की, या महान लोकांच्या त्यागाच्या, शौर्याच्या आणि बलिदानाच्या कथा नवीन पिढीपर्यंत पोहोचल्याच नाहीत. जर भगवान ‘बिरसा मुंडा’ यांच्यासारख्या व्यक्तित्वाने आपल्याला अस्तित्वाची जाणीव करून दिली. तर जमशेदजी टाटा यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने देशामध्ये मोठ-मोठ्या संस्था निर्माण केल्या. जमशेदजी टाटा अगदी ख-या अर्थाने ‘द्रष्टा’ होते. त्यांनी केवळ भारताचे भविष्य कसे असावे, याचा विचार केला नाही तर देशाची मजबूत पायाभरणी केली. उज्ज्वल भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग यांचे भारत हे केंद्रस्थान बनणं आवश्यक आहे, हे जमशेदजी टाटा यांना चांगलं ठाऊक होतं. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ची स्थापना करण्यात आली. याच संस्थेला आता ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ’ म्हणजेच भारतीय विज्ञान संस्था म्हणून ओळखलं जात आहे. इतकंच नाही तर त्यांनी टाटा स्टीलसारख्या अनेक विश्वस्तरीय संस्था आणि उद्योगांची स्थापना केली. जमशेदजी टाटा आणि स्वामी विवेकानंद जी यांची एकदा अमेरिकेच्या प्रवासाच्या काळात जहाजामध्ये भेट झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या प्रवासात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासारख्या महत्वपूर्ण विषयावर या दोघांमध्ये चर्चा झाली होती. या चर्चेतूनच भारतीय विज्ञान संस्थेची पायाभरणी झाली.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी रोजी झाला होता. आपल्या सर्वांना माहीत आहेच ही तारीख चार वर्षांनी एकदाच येते. साधे, शांत व्यक्तित्वाचे असणारे मोरारजीभाई, देशातल्या सर्वात शिस्तबद्ध नेत्यांपैकी एक होते. स्वतंत्र भारतामध्ये संसदेमध्ये सर्वात अधिकवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही मोरारजीभाई देसाई यांच्या नावावर आहे. ज्यावेळी देशाची लोकशाही संकटामध्ये आली होती, त्या कठीण काळामध्ये मोरारजी देसाईंनी भारताचे कुशल नेतृत्व केलं. त्यामुळे आपल्या येणा-या पिढ्याही त्यांच्या आभारी असतील. मोरारजीभाई देसाई यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं. त्याची त्यांना वृद्धापकाळामध्ये खूप मोठी किंमत मोजावी लागली होती. त्याकाळातल्या सरकारने त्यांना अटक करून तुरुंगामध्ये टाकलं होतं. 1977 मध्ये ज्यावेळी जनता पार्टीने निवडणुका जिंकल्या, त्यावेळी ते देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या कार्यकाळामध्येच 44 वी घटना दुरूस्ती करण्यात आली. ही गोष्ट महत्वपूर्ण यासाठी आहे याचे कारण म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये 42 वी घटना दुरूस्ती करण्यात आली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कमी करणे आणि इतर अशाच काही तरतुदी होत्या. या तरतुदींमुळे आपल्या लोकशाही मूल्यांचे हनन केले जात होते. या सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या आणि लोकशाही मूल्यांचं जतन करण्यात आलं. 44 व्या घटना दुरूस्तीमध्ये संसद आणि विधानसभा यांच्यामध्ये होत असलेल्या कामकाजाची माहिती वर्तमान पत्रांमध्ये प्रकाशित करण्याची तरतूद करण्यात आली. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाला काही विशेष अधिकार बहाल करण्यात आले. या घटना दुरूस्तीमध्ये आणखी एक विशेष तरतूद करण्यात आली. त्यानुसार घटनेच्या कलम 20 आणि 21 अनुसार मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे आणीबाणीच्या काळातही हनन करण्यात येणार नाही, हे स्पष्ट झालं. तसंच मंत्रिमंडळाच्या लिखित विनंतीनंतरच राष्ट्रपती आणीबाणीची घोषणा करू शकतील. त्याचबरोबर आणीबाणीचा कालावधी एका वेळेस सहा महिन्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही, अशी व्यवस्था देशात घटनेनुसार पहिल्यांदा करण्यात आली. आणीबाणी लाऊन, 1975 मध्ये ज्याप्रकारे लोकशाहीची हत्या करण्यात आली होती, तशा गोष्टीची पुनरावृत्ती भविष्यात पुन्हा कधी घडू नये, यासाठी मोरारजी भाई यांनी ही घटना दुरूस्ती केली होती. भारतीय लोकशाहीचं महत्व, महात्म्य अबाधित राखण्यासाठी मोरारजीभाई देसाई यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. येणा-या पिढ्या त्यांचं कायम स्मरण ठेवतील. आज पुन्हा एकदा या महान नेत्याला मी श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दरवर्षीप्रमाणेच यंदाही पद्म पुरस्काराविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. आज आपण एका नवभारताच्या निर्मितीच्या दिशेनं अग्रेसर आहोत. अशावेळी जे लोक अगदी तळागाळातल्या लोकांसाठी निस्वार्थी भावनेने कार्य करतात, त्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जावा, असं आपल्याला वाटतं. अनेकजण अतिशय परिश्रम घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणत आहेत. वास्तविक हे लोकच खरे कर्मयोगी आहेत. जे लोक जनसेवा, समाजसेवा आणि या सर्वांपेक्षा मोठ्या असलेल्या राष्ट्रसेवेमध्ये निःस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत, ते कर्मयोगी आहेत. आपण सर्वांनी पाहिलंच असेल की, ज्यावेळी पद्म पुरस्काराची घोषणा होते, त्यावेळी कुणाला मिळाला? हे कोण आहे? असं लोक विचारतात,त्यावेळी मला वाटतं, या पुरस्काराचं हे खूप मोठं यश आहे. कारण हे लोक कधीच दूरचित्रवाणी, नियतकालिकं किंवा वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर झळकत नाहीत. हे खरे कार्यकर्ते असून प्रसिद्धीच्या झगमगाटाच्या दुनियेपासून खूप दूर आहेत. आपलं नाव आलं किंवा आलं नाही, याची त्यांना पर्वा नसते. ते अगदी तळागळामध्ये कार्यरत आहेत. कामावर त्यांचा विश्वास आहे. ‘‘ योगः कर्मसु कौशलम्‘‘ गीतेचा हा संदेश ते एकप्रकारे प्रत्यक्ष जगत आहेत. अशाच काही लोकांविषयी मी आज आपल्याशी बोलू इच्छितो.
ओडिशाचे दैतारी नायक यांच्याविषयी आपण नक्कीच ऐकलं असेल. त्यांना ‘कॅनल मॅन ऑफ द ओडिशा’ असं काही उगाच म्हटलं जात नाही. दैतारी नायक यांनी आपल्या गावांमध्ये आपल्या हातांनी डोंगर फोडून कालव्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. आपल्या अथक परिश्रमाने कृषी सिंचन आणि पेयजलाची समस्या कायमची संपुष्टात आणली. गुजरातचे अब्दुल गफूर खत्री यांचं कार्य जाणून घ्या. त्यांनी कच्छमधल्या पारंपरिक रोगन चित्रकारीतेला पुनर्जीवित करण्याचं अद्भूत कार्य केलं आहे. खत्री ही दुर्लभ चित्रकारिता नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहेत. अब्दुल गफूर यांनी बनवलेली ‘ट्री ऑफ लाईफ‘ ही कलाकृती मी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना भेट म्हणून दिली होती. पद्म पुरस्कारांच्या मानक-यांमध्ये मराठवाड्याचे शब्बीर सैयद गोमातेचे सेवक म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्याप्रकारे आपलं संपूर्ण जीवन गोमातेच्या सेवेसाठी अर्पण केलं आहे, ते पाहून त्यांच्या कामाचं वेगळेपण दिसून येतं. मदुरै चिन्ना पिल्लई या व्यक्तिने तामिळनाडूमध्ये कलन्जियम आंदोलनाच्या माध्यमातून पीडितांना आणि शोषितांना सशक्त करण्याचं काम सर्वात प्रथम केलं. त्याचबरोबर समुदायांच्या माध्यमातून लघु वित्तीय व्यवस्थेला प्रारंभ केला. अमेरिकेच्या तावो पोर्चोन- लिंच यांच्याविषयी आपण ऐकलंत तर नक्कीच सुखद आश्चर्य वाटेल. लिंच आज ‘योगा’ची चालती-बोलती संस्था बनल्या आहेत. वयाचे शतक गाठलेले असतानाही त्या दुनियेतल्या अनेक लोकांना ‘योगा’चे प्रशिक्षण देत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी दीड हजार लोकांना ‘योगशिक्षक’ बनवलं आहे. झारखंडमध्ये लेडी टारझन या नावाने प्रसिद्ध असलेल्या जमुना टुडू यांनी टिम्बर माफिया आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याचं धाडसी काम केलं. इतकंच नाही तर 50 हेक्टर क्षेत्रातलं जंगल उजाड होण्यापासून वाचवलं. परिसरातल्या दहा हजार महिलांची एकजूट घडवून वृक्ष आणि वन्यजीवांची सुरक्षा करण्यासाठी सर्वांना प्रेरित करण्याचं काम या महिलेनं केलं. जमुनाबाईजी यांच्या परिश्रमामुळेच आता त्या भागातले गाववाले आपल्या घरातल्या प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर 18 झाडं लावतात. आणि घरामध्ये मुलीचा विवाह असेल तर नवीन 10 झाडं लावतात.
गुजरातमधल्या मुक्ताबेन पंकजकुमार दगली यांची कथा तर आपल्या सर्वांना खूप प्रेरणा देणारी आहे. मुक्ताबेन स्वतः दिव्यांग आहेत. तरीही त्यांनी दिव्यांग महिलांच्या उत्थानासाठी केलेले कार्य पाहिले की, सर्वजण अचंबित होतात. त्यांच्या सारखं उदाहरण मिळणं कठीण आहे. चक्षू महिला सेवाकुंज नावाची संस्था मुक्ताबेन यांनी स्थापन केली आणि त्या माध्यमातून नेत्रहीन मुलांना स्वावलंबी बनवण्याचे पवित्र कार्य त्या करतात. बिहारमधल्या मुजफ्फरपूरच्या किसान चाची म्हणजे राजकुमारी देवी यांचे कार्यही असेच प्रेरणादायी आहे. महिला सशक्तीकरण आणि शेती कशा पद्धतीने लाभदायक ठरू शकेल, या दिशेने त्यांनी काम केले आहे. किसान चाचीने आपल्या भागातल्या 300 महिलांना स्वयंसहायता गटाशी जोडून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी प्रेरित केलं आहे. त्यांनी गावातल्या महिलांना शेतीच्या बरोबरच रोजगाराच्या इतर साधनांचे प्रशिक्षण दिलं. विशेष गोष्ट ही आहे की, त्यांनी शेतीच्या कामाची सांगड तंत्रज्ञानाशी घातली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावर्षी जे पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यामध्ये 12 शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत. विजेते आहेत. असे कदाचित पहिल्यांदाच झाले आहे. सर्वसाधारणपणे कृषी जगताशी संबंधित असलेल्या आणि प्रत्यक्ष शेती करणा-या फार कमी लोकांचा समावेश आत्तापर्यंत पद्म पुरस्कारांच्या यादीमध्ये झाला आहे. पुरस्कार विजेत्यांच्या सूचीमध्ये झालेले हे बदल म्हणजे एक प्रकारे परिवर्तन घडत असलेल्या हिंदुस्तानची नवीन प्रतिमा आहे, असं म्हणता येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, एक हृदयाला अगदी भिडणारा अनुभव मला अलिकडेच आला तो आज आपल्याला इथं सांगणार आहे. आजकाल देशामध्ये मी जिथं जिथं जातो, तिथं माझा प्रयत्न असतो की, आयुष्मान भारत योजना ‘पीएम जेएवाय’ म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या काही लाभार्थींना भेटावं, त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळावी, असा माझा प्रयत्न असतो. यामध्ये काही लोकांशी मी संवाद साधलाही. एका एकट्या मातेला पैशाअभावी स्वतःचे औषधोपचार करता येत नव्हते. तिला लहान मुलं होती. या नवीन योजनेमधून तिच्यावर औषधोपचार होऊ शकले, ती पूर्ण बरी झाली. एका घरातला कर्ता माणूस, रोजगार, परिश्रम करून आपल्या कुटुंबाची देखभाल करत होता; त्याच व्यक्तीलाच अपघात झाला यामुळे आता तो काम करू शकत नव्हता. या योजनेचा लाभ त्याला मिळाला, तो चांगला बराही झाला. आणि नव्याने आयुष्य जगू लागला.
बंधू आणि भगिनींनो, गेल्या पाच महिन्यांमध्ये जवळपास बारा लाख गरीब कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गरीबांच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन येत आहे, असं माझ्या लक्षात आलं आहे. जर एखाद्या गरीब व्यक्तीला पैशाअभावी औषधोपचार करणं शक्य नसेल, तर त्याला या योजनेची माहिती आपण सर्वांनी जरूर द्यावी. ही योजना अशाच गरीब व्यक्तींसाठी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, शाळांमध्ये परीक्षांचा हंगाम आता सुरू होणार आहे. देशभरामध्ये वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्यावतीनं घेण्यात येणा-या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना पुढच्या काही सप्ताहांमध्ये प्रारंभ होईल. परीक्षा देणा-या सर्व विद्यार्थ्यांनात्यांच्या पालकांना आणि सर्व शिक्षकांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ अशा एका खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ‘टाऊन हॉल’कार्यक्रमाप्रमाणे त्याचं स्वरूप ठेवलं होतं. या टाऊन हॉल कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश-विदेशातले कोट्यवधी विद्यार्थी,त्यांचे पालक तसेच अनेक शिक्षक यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी मला मिळाली. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे परीक्षेशी संबंधित असलेल्या विविध विषयांवर यावेळी अगदी मनमोकळा संवाद साधता आला. यामुळे विद्यार्थ्यांना निश्चित लाभदायक ठरतील, असे पैलू यावेळी चर्चेमध्ये आले. सर्व विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, माता-पिता यू-ट्यूबवर या कार्यक्रमाचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहू शकतात. आगामी परीक्षेसाठी माझ्या सर्व ‘परीक्षा योद्ध्यांना’ खूप खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताविषयी चर्चा सुरू आहे आणि सण-उत्सवाविषयी बोलणं होत नाही, असं होऊच शकत नाही. प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्व आपल्याकडे आहेच. काही विशेष नाही, किंवा सण नाही, असा दिवस आपल्या देशात कदाचित मिळणं अवघड जाईल. यामागचं कारण म्हणजे आपल्याला लाभलेली हजारो वर्षांची जुनी संस्कृती, परंपरा आहे. आता काही दिवसांतच महाशिवरात्र येणार आहे. यंदाच्या वर्षी तर महाशिवरात्र सोमवारी येत आहे. शिवाच्या वारी म्हणजे सोमवारी येणा-या महाशिवरात्रीचं विशेष महत्व आपल्याकडे सांगितलं जातं. महाशिवरात्रीच्याया पवित्र पर्वानिमित्त आपणा सर्वांना माझ्या खूप- खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वीच मी काशीला गेलो होतो. काशीच्या या भेटीमध्ये दिव्यांग बंधू-भगिनींबरोबर काही वेळ घालवण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. त्यांचा आत्मविश्वास खरोखरीच प्रभावित करणारा होता. प्रेरणा देणारा होता. याच कार्यक्रमामध्ये त्यांच्यापैकी एका प्रज्ञाचक्षू नवयुवकाशी मी बोलत होतो. त्यावेळी त्यानं मला सांगितलं की, मी कलाकार आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये मिमिक्री म्हणजे नकला करतो. त्याला मी सहजच विचारलं, तू कुणाच्या नकला करतोस?यावर त्यानं उत्तर दिलं, ‘‘ मी पंतप्रधानांची अगदी तशीच नक्कल करतो.’’ मी म्हणालो, मग जरा करून दाखव बरं. आणि काय नवल, माझ्यासाठी त्याची नक्कल ऐकणं एक सुखद आश्चर्य होतं. त्या दिव्यांग युवकानं मी ‘मन की बात’ मध्ये ज्याप्रकारे बोलतो, अगदी त्याच पद्धतीनं नक्कल करीत बोलून दाखवलं. मला खूप छान वाटलं. याचा अर्थ लोक ‘मन की बात’ केवळ ऐकतात आणि सोडून देतात, असं नाही; तर या कार्यक्रमाचे अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने स्मरणही करतात. त्या दिव्यांग नवयुवकाच्या शक्तीने मी खरोखरीच खूप प्रभावित झालो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी जोडले जाणे हा माझ्यासाठी एक आगळा-वेगळा अनुभव आहे. रेडिओच्या माध्यमातून मी एक प्रकारे कोट्यवधी कुटुंबांबरोबर दर महिन्याला संवाद साधतो. अनेकवेळा तर आपल्या सर्वांशी बोलताना, आपण पाठवलेली पत्रं वाचताना किंवा आपण दूरध्वनीवरून व्यक्त केलेले विचार ऐकताना मला असं वाटतं की, आपण सर्वांनी मला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानलं आहे. ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय सुखद अनुभूती देणारी आहे.
मित्रांनो, निवडणुका म्हणजे लोकशाहीचा एक सर्वात मोठा उत्सव असतो. आगामी दोन महिन्यामध्ये आपण सर्वजण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यस्त असणार आहोत. मी स्वतःही या निवडणुकीत एक उमेदवार असणार आहे. सुदृढ लोकशाही परंपरेचा आदर करून यानंतरची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. याचाच अर्थ मार्च महिना, एप्रिल महिना आणि पूर्ण मे महिना असे तीन महिने जाणार आहेत. या काळातल्या आपल्या सर्व भावनांविषयी निवडणुकीच्या नंतर एका नवीन विश्वासाने त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या ताकदीच्या जोरावर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आरंभ करणार आहे आणि अनेक वर्षे आपल्याशी ‘मन की बात’ करीत राहणार आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अगदी हृदयापासून खूप- खूप धन्यवाद देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. या महिन्याच्या 21 तारखेला देशासाठी एक अत्यंत दु:खद बातमी मिळाली. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे डॉक्टर श्री श्री शिवकुमार स्वामीजी आपल्यातून निघून गेले. शिवकुमार स्वामीजीनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले. भगवान बसवेश्वर यांनी आपल्याला शिकवलं आहे- `कायकवे कैलास’ म्हणजे कठोर परिश्रम करत आपल्या जबाबदारीचे पालन करत राहणं, म्हणजे भगवान शिवजींचे निवासस्थान, कैलाशधाम मध्ये राहण्यासारखे आहे. शिवकुमार स्वामीजी याच तत्वज्ञानाचे समर्थक होते आणि त्यांनी आपल्या 111 वर्षांच्या आयुष्यकालात हजारो लोकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कार्य केलं. त्यांची ख्याती असे विद्वान म्हणून होती, ज्यांचं इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड भाषांवर अद्भुत प्रभुत्व होतं. ते एक समाज सुधारक होते. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन लोकांना भोजन, आसरा, शिक्षण आणि अध्यात्मिक ज्ञान मिळेल, यासाठी वाहिलं होतं. शेतकऱ्यांचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं, याला स्वामीजीनी आयुष्यात प्राधान्य दिलं होतं. सिद्धगंगा मठ नियमितपणे पशुधन आणि कृषी मेळाव्यांचं आयोजन करत असे. मला अनेक वेळा परमपूज्य स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करण्याचं भाग्य लाभलं आहे. 2007 मध्ये, श्री श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारंभासाठी आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम तुमकुरला गेले होते. कलाम साहेबांनी यावेळी पूज्य स्वामीजींसाठी एक कविता ऐकवली होती. त्यांनी म्हटलं होतं:
“ओह माय फेलो सिटीझन्स-इन गिव्हिंग, यु रिसीव्ह हॅपिनेस,
इन बॉडी अँड सोल-यु हॅव एव्हरीथिंग टु गिव्ह
इफ यु हॅव नॉलेज-शेअर इट
इफ यु हॅव रिसोर्सेस – शेअर देम विथ द निडी
यु, युअर माईंड अँड हार्ट
टु रिमुव्ह द पेन ऑफ द सफरिंग, अँड चीअर द सॅड हार्ट् स.
इन गिव्हिंग, यु रिसीव्ह हॅपिनेस ऑलमाईटी विल ब्लेस, ऑल युअर अॅक्शन्स’’
डॉक्टर कलाम साहेब यांची ही कविता श्री श्री श्री शिवकुमार स्वामी जी यांचे जीवन आणि सिद्धगंगा मठाचे मिशन सुंदर प्रकारे सादर करते. पुन्हा एकदा, मी अशा महापुरुषाला माझी श्रद्धासुमने अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झालं आणि त्या दिवशी आपला देश प्रजासत्ताक झाला आणि कालच आपण शानदाररित्या प्रजासत्ताक दिन साजराही केला, परंतु आज मी एक वेगळी गोष्ट सांगू इच्छितो. आपल्या देशात एक खूपच महत्वपूर्ण संस्था आहे, जी आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहेच आणि आपल्या प्रजासात्ताकाहून जुनी आहे- मी भारतीय निवडणूक आयोगाबद्दल बोलत आहे. 25 जानेवारी निवडणूक आयोगाचा स्थापना दिन होता, जो राष्ट्रीय मतदार दिन नॅशनल व्होटर्स डे म्हणून साजरा केला जातो, भारतात ज्या विशाल स्तरावर निवडणुकीचं आयोजन केलं जातं, ते पाहून जगातील लोकांना आश्चर्य वाटतं आणि आपला निवडणूक आयोग ज्या कुशलतेनं त्यांचं व्यवस्थापन करतो, ते पाहून प्रत्येक देशवासियाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या देशात भारताचा प्रत्येक नागरिक, जो एक नोंदणीकृत मतदार आहे. रजिस्टर्ड मतदार आहे, त्याला मतदान करण्याची संधी मिळेल, याची खात्री करण्यासाठी कोणतीही कसूर सोडत नाही.
हिमाचल प्रदेशमध्ये सागरी तळापासून 15,000 फुट उंचीवरील भागात सुद्धा मतदान केंद्र सुरु केलं जातं, हे आपण ऐकतो, तर अंदमान आणि निकोबार बेटांसारख्या अत्यंत दूरवरच्या बेटांवरही मतदानाची व्यवस्था केली जाते. आणि आपण गुजरात संदर्भात हे ऐकलंच असेल की, गीरच्या जंगलात, एका अत्यंत दूरवरच्या भागात, एक मतदान केंद्र आहे, जे फक्त एका मतदारासाठी आहे. कल्पना करा, फक्त एका मतदारासाठी. जेव्हा या गोष्टी ऐकतो तेव्हा निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. त्या एका मतदाराला लक्षात ठेवून, त्याला आपल्या मताधिकाराचा उपयोग करण्याची संधी मिळावी, यासाठी निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांचं पथक दूरवरच्या भागांत जातं आणि मतदानाची व्यवस्था करतं, हेच तर आमच्या लोकशाहीचं सौंदर्य आहे.
मी आपली लोकशाही मजबूत करण्याचा सतत प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाची प्रशंसा करतो. मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन स्वतंत्र आणि निष्पक्षपाती निवडणूक होईल, याची खात्री करणाऱ्या सर्व राज्यांचे निवडणूक आयोग, सर्व सुरक्षा दले, इतर कर्मचार्यांचंही मला कौतुक वाटतं.
यावर्षी आपल्या देशात लोकसभा निवडणुका होतील, आणि 21 व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी ही पहिलीच संधी असेल की ते मतदान करतील. त्यांच्यासाठी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली आहे. आता ते देशाच्या निर्णय प्रक्रियेतील एक भागीदार बनण्यास निघाले आहेत. स्वतःच्या स्वप्नांना देशाच्या स्वप्नांशी जोडण्याची वेळ आली आहे. मी युवा पिढीला आग्रहाने सांगेन की, जर ते मतदान करण्यास पात्र असतील तर त्यांनी मतदार म्हणून नोंदणी अवश्य करावी. आपल्यातल्या प्रत्येकाला याची जाणीव व्हावयास हवी की, देशात मतदार होणं, मताधिकार प्राप्त करणं हे आयुष्यातल्या महत्वपूर्ण यशातील एक महत्वपूर्ण थांबा आहे.त्याचबरोबर, मतदान करणं हे माझं कर्तव्य आहे-ही भावना आपल्यात रुजली पाहिजे. आयुष्यात कधी कोणत्या कारणपरत्वे, मतदान करू शकला नाहीत तर खूप वेदना झाल्या पाहिजेत. कधी देशात कुठे चुकीचं होताना पाहीलं तरी दु:ख झालं पाहिजे. हो. मी त्या दिवशी मतदान केलं नव्हतं, त्या दिवशी मी मतदान करायला गेलो नव्हतो, त्याचाच परिणाम आज माझ्या देशाला भोगावा लागतोय. आपल्याला या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. ही आमची वृत्ती, आमची प्रवृत्ती, बनली पाहिजे. हे आमचे संस्कार असले पाहिजेत. मी देशातल्या नामवंत व्यक्तीना आवाहन करतो की, आपण सर्वांनी मिळून मतदार नोंदणी व्हावी, किंवा लोकांनी मतदान करावं, यासाठी मोहीम चालवून लोकांना जागरूक करावं. मोठ्या प्रमाणात युवा मतदार म्हणून नोंदणीकृत होतील आणि आपल्या सहभागातून आपली लोकशाहीला आणखी मजबूत बनवतील, अशी मला आशा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या या महान भूमीनं अनेक महापुरूषांना जन्म दिला आहे आणि त्या महापुरूषांनी मानवतेसाठी काही अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केलं आहे. आमचा देश बहुरत्न वसुंधरा आहे. अशाच महापुरुषांपैकी एक होते, नेताजी सुभाषचंद्र बोस. 23 जानेवारीला पूर्ण देशानं एका वेगळ्याच पद्धतीनं त्यांची जयंती साजरी केली. नेताजींच्या जयंतीच्या दिवशी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या वीरांना समर्पित संग्रहालयाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं.आपल्याया माहित आहे की, लाल किल्ल्यात स्वातंत्र्यापासून आजपर्यंत अनेक खोल्या, इमारती बंद होत्या. लाल किल्ल्यातल्या बंद खोल्यांचं रुपांतर आता अत्यंत सुंदर संग्रहालयात केलं आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नॅशनल आर्मी यांना समर्पित संग्रहालय; `याद-ए-जलियां’ आणि 1857 एटीन फिफ्टी सेवन,इंडिया’ज फर्स्ट वॉर ऑफ इंडीपेंडन्स ला समर्पित संग्रहालय आणि हा संपूर्ण परिसर क्रांती मंदिर म्हणून देशाला समर्पित केला आहे. या संग्रहालयातल्या प्रत्येक विटेमध्ये, आमच्या गौरवशाली इतिहासाचा सुगंध आहे. संग्रहालयात ठायी ठायी आमच्या स्वातंत्र्य संग्रमातल्या वीरांच्या कहाण्या सांगणाऱ्या गोष्टी, आम्हाला इतिहासात डोकावून पाहण्यास प्रेरित करतात. याच ठिकाणी, भारतमातेचे वीर सुपुत्र-कर्नल प्रेम सहगल, कर्नल गुरुबक्षसिंग धिल्लन आणि मेजर जनरल शहनवाज खान यांच्यावर ब्रिटीश राजवटीनं खटला चालवला होता.
जेव्हा मी लाल किल्ल्यातल्या, क्रांती मंदिरात, नेताजींशी जोडलेल्या आठवणींचं दर्शन घेत होतो, तेव्हा नेताजींच्या परिवारातील सदस्यांनी मला एक खूपच खास, कॅप टोपी भेट दिली. नेताजी ती टोपी परिधान करत असत. मी ती टोपी संग्रहालयातच ठेवायला दिली, ज्यामुळे तिथं येणार्या लोकानी ती टोपी पहावी आणि तिच्यापासून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. वास्तविक, आपल्या नायकांचं शौर्य आणि देशभक्ती नव्या पिढीपर्यंत वेगवेगळ्या रूपांत सतत पोहोचवण्याची गरज असते. महिन्याभरापूर्वी मी 30 डिसेंबरला अंदमान आणि निकोबार बेटांवर गेलो होतो.एका कार्यक्रमात अगदी त्याच ठिकाणी तिरंगा फडकवला गेला, जिथं नेताजी सुभाष बोस यांनी 75 वर्षांपूर्वी तिरंगा फडकवला होता. याच प्रमाणे, 2018 च्या ऑक्टोबरमध्ये लाल किल्ल्यात जेव्हा तिरंगा फडकवला गेला, तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटलं, कारण इथं तर 15 ऑगस्टची परंपरा आहे. हे निमित्त आझाद हिंद सरकारच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं होतं.
सुभाष बाबू यांचं वीर जवान आणि कुशल संघटक म्हणून नेहमी स्मरण केलं जाईल. एक असा वीर जवान ज्यानं स्वातंत्र्याच्या संग्रामात प्रमुख भूमिका बजावली. “दिल्ली चलो” “तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा” अशा अनेक तेजस्वी घोषणा देऊन नेताजींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान मिळवलं. अनेक वर्षांपासून नेताजींशी संबंधित फायली सर्वांसमोर आणाव्यात, अशी मागणी होत होती आणि मला याचा आनंद आहे की, हे काम आम्ही करू शकलो. मला नेताजींचं सारं कुटुंब पंतप्रधान निवासात आले होते, तो दिवस आठवतो. आम्ही सर्वांनी मिळून नेताजीशी संबंधित अनेक बाबींवर गप्पागोष्टी केल्या आणि नेताजी सुभाष बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारताच्या महान नायकांशी संबंधित अनेक स्थळांचा दिल्लीत विकास करण्याचे प्रयत्न झाले, याचा मला आनंद आहे. मग ते बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 26, अलीपूर रोड असो की सरदार पटेल संग्रहालय असो किंवा क्रांती मंदिर असो. आपण जर दिल्लीला आलात तर ही स्थळे जरूर पहा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज जेव्हा आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत चर्चा करत आहोत आणि ते ही `मन की बात’, तर मी आपल्याला नेताजींच्या जीवनाशी संबंधित एक किस्सा सांगू इच्छितो. मी नेहमीच रेडिओ लोकांशी जोडण्याचं एक महत्वपूर्ण माध्यम मानल आहे, त्याचप्रमाणे नेताजींचंदेखील रेडिओशी अत्यंत निकटचं नातं होतं आणि त्यांनीही देशवासियांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ हेच माध्यम निवडलं होतं.
1942 मध्ये, सुभाष बाबूंनी आझाद हिंद रेडिओ सुरु केला आणि रेडिओच्या माध्यमातून आझाद हिंद फौजेतले सैनिक आणि लोकांशी संवाद साधत असत.सुभाष बाबू यांची रेडिओवर संभाषण सुरु करण्याची एक वेगळीच शैली होती. ते संभाषण सुरु करताना सर्वात आधी असे म्हणत असत-धिस इज सुभाष चंद्र बोस स्पीकिंग टू यु ओव्हर द आझाद हिंद रेडिओ आणि इतक ऐकताच श्रोत्यांमध्ये जणू एक नवा जोश, एका नवीन उर्जेचा संचार होत असे.
मला असं सांगण्यात आलं की, हे रेडिओ स्टेशन आठवड्याच्या बातम्या प्रसारित करत असे, ज्या इंग्रजी, हिंदी, तमिळ, बांगला, मराठी, पंजाबी, पश्तू आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये दिल्या जात. हे रेडिओ स्टेशन चालवण्यात गुजरातेतले रहिवासी एम.आर.व्यास यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. आझाद हिंद रेडिओवरून प्रसारित होणारे कार्यक्रम सामान्य लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांच्या कार्यक्रमापासून आमच्या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढवय्यांना खूप मोठी शक्ती मिळाली.
याच क्रांती मंदिरात एक चित्रकला संग्रहालय उभं करण्यात आलं आहे. भारतीय कला आणि संकृती अत्यंत आकर्षक पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न इथं झाला आहे. संग्रहालयात चार ऐतिहासिक प्रदर्शनं आहेत आणि तिथं अनेक शतकं जुनी 450 हून अधिक पेंटिंग आणि कलाकृती आहेत. संग्रहालयात अमृता शेरगिल, राजा रविवर्मा, अवनिन्द्र नाथ टागोर, गगनेन्द्र नाथ टागोर, नंदलाल बोस, जेमिनी राय, सैलोज मुखर्जी यांसारख्या महान कलाकारांच्या उत्तम कलाकृतींचं सुरेख प्रदर्शन भरवलं आहे. आणि मी आपल्याला सर्वाना विशेष आग्रह करेन की, आपण तिथ जाऊन गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं कार्य जरूर पहा.
आता आपण विचार करत असाल की, इथं कलेची चर्चा सुरु आहे आणि मी आपल्याला गुरुदेव टागोर यांच्या उत्तम कलाकृती पाहण्याविषयी सांगतो आहे. आतापर्यंत आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना एक लेखक आणि संगीतकार म्हणून ओळखत असाल. परंतु मी हे सांगू इच्छितो की, गुरुदेव एक चित्रकारही होते. अनेक विषयांवर त्यांनी पेंटिंग्ज बनवली आहेत. त्यांनी पशु आणि पक्ष्यांची चित्रंही काढली आहेत, त्यांनी अनेक सुंदर निसर्गचित्रंही काढली आहेत आणि इतकच नव्हे तर त्यांनी अनेक मानवी पात्रांना कलेच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटण्याचं काम केलं आहे.आणि खास गोष्ट ही आहे की, त्यांनी आपल्या बहुतेक चित्रांना काही नाव दिलं नाही. त्यांचा असा विश्वास होता की, त्यांची पेंटिंग पाहणारा स्वतःच त्या पेंटिंगचा अर्थ समजून घेईल, पेंटिंग्जमधून त्यांनी दिलेल्या संदेशाचा अर्थ आपल्या दृष्टीकोनातून जाणून घेईल. त्यांच्या पेंटिंगचं प्रदर्शन युरोपीय देशांत, रशियात आणि अमेरिकेतही भरवण्यात आलं आहे. आपण क्रांती मंदिरात त्यांचं पेंटिंग पाहायला जरूर जाल, अशी मला आशा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत संतांची भूमी आहे. आमच्या संतांनी आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून सद्भाव, समानता आणि सामाजिक सबलीकरणाचा संदेश दिला आहे. असेच एक संत होते-संत रविदास. 19 फेब्रुवारीला रविदास जयंती आहे. संत रविदासजी यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. संत रविदासजी थोड्या ओळीतूनच मोठ्यातला मोठा संदेश देत असत. त्यांनी म्हटल होतं –
जाती-जाती में जाती है
जो केतन के पात
रैदास मनुष न जुड सके
जब तक जाती ना जात
ज्याप्रकारे केळ्याचं खोड सोललं तर पानाच्या खाली पान, नंतर पुन्हा पानाच्या खाली पान आणि शेवटी काहीच निघत नाही, परंतु पूर्ण झाड संपुष्टात येतं, अगदी त्याचप्रमाणे मनुष्याला विविध जातींत वाटलं गेलं आहे आणि मनुष्य राहिलाच नाही.ते म्हणत असत की, जर वास्तवात ईश्वर प्रत्येक माणसात असतो तर त्याला जाती, पंथ आणि अन्य सामाजिक आधारावर वाटणं योग्य नाही.
गुरु रविदासजी यांचा जन्म वाराणसीच्या पवित्र भूमीत झाला होता.संत रविदासजी यांनी आपल्या संदेशांच्या द्वारे सर्व आयुष्यभर श्रम आणि श्रमिकांचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. इथं हे सांगणं चुकीचं होणार नाही की, त्यांनी जगाला श्रमाच्या प्रतिष्ठेचा खरा अर्थ समजावून सांगितला. ते म्हणत असत-
मन चंगा तो कठौती मे गंगा
याचा अर्थ, आपलं मन आणि हृदय पवित्र असेल तर साक्षात ईश्वर आपल्या हृदयात वास करत असतो. संत रविदासजी यांच्या संदेशांनी प्रत्येक स्तरातल्या, प्रत्येक वर्गातल्या लोकांना प्रभावित केलं आहे. मग त्यात चित्तोडचे महाराजा आणि राणी असो की मीराबाई असो, सर्व त्यांचे अनुयायी होते,
मी पुन्हा एकदा संत रविदासजी यांना वंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, किरण सिदर यांनी माय गव्ह वर लिहिल आहे की, मी भारताचा अंतराळ कार्यक्रम आणि त्याच्या भविष्याशी संबंधित पैलूंवर प्रकाश टाकावा.मी विद्यार्थ्यांना अंतराळ कार्यक्रमात रस घेऊन आणि काही वेगळा विचार करून आकाशापेक्षाही पुढे जाण्याचा विचार करण्याचा आग्रह करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. किरणजी, मी आपले हे विचार आणि विशेषतः आपल्या मुलांसाठी दिलेल्या या संदेशाची प्रशंसा करतो.
काही दिवसांपूर्वी, मी अहमदाबादमध्ये होतो, जेव्हा मला डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य प्राप्त झालं. डॉक्टर विक्रम साराभाई यांचं भारताच्या अंतराळ कार्यक्रमात एक महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे.आमच्या अंतराळ कार्यक्रमात देशातल्या असंख्य युवा वैज्ञानिकांचं योगदान आहे. आज आमच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले सॅटेलाईट्स आणि साऊंडिंग रॉकेट्स अंतराळात पोहोचत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. याच 24 जानेवारीला आमच्या विद्यार्थ्यांनी बनवलेलं कलाम-सेट लॉंच केलं आहे. ओदिशामध्ये विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी बनवलेले साऊंडिंग रॉकेट्सनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून 2014 पर्यंत जितक्या अंतराळ मोहिमा झाल्या आहेत, जवळपास तितक्याच अंतराळ मोहिमांची सुरुवात गेल्या चार वर्षांत झाली आहे. आम्ही एकाच अंतराळ यानातून 104 उपग्रह अवकाशात सोडण्याचा जागतिक विक्रमही केला आहे. आम्ही लवकरच चांद्रयान-2 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर भारताची उपस्थिती दाखवणार आहोत.
आमचा देश, अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग जीवित आणि मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी उत्तम तर्हेने करत आहे. चक्रीवादळ असो की रेल्वे आणि रस्ते सुरक्षा, या सर्वांत अंतराळ तंत्रज्ञानाची चांगली मदत होत आहे. आमच्या मच्छिमार बांधवांना नेविक डिव्हाईस देण्यात आले आहेत, जे त्यांच्या सुरक्षेसह आर्थिक उन्नतीसाठीही सहाय्यक आहेत. आम्ही अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर सरकारी सेवांचं वितरण आणि उत्तरदायित्व अधिक चांगलं करण्यासाठी करत आहोत. हौसिंग फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी घरं या योजनेत जवळपास 23 राज्यांमध्ये सुमारे 40 लाख घरांना जिओ टॅग करण्यात आलं आहे. याचबरोबर, मनरेगाच्या अंतर्गत जवळपास साडेतीन कोटी मालमत्तानाही जिओ टॅग केलं गेलं आहे. आमचे सॅटेलाईट्स आज देशाच्या वाढत्या शक्तीचं प्रतिक बनले आहेत. जगातील अनेक देशांशी आमचे उत्कृष्ट संबंध होण्यात त्याचं योगदान मोठं आहे. दक्षिण आशिया सॅटेलाईट्स तर एक अद्वितीय पुढाकार राहिला आहे, ज्यामुळे आमच्या शेजारी मित्र राष्ट्रांनाही विकासाची भेट दिली आहे. आपल्या असीम स्पर्धात्मक लॉंच सेवेच्या माध्यमातून भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे तर विकसित देशांचे सॅटेलाईट्सही लॉंच करतो. मुलांसाठी आकाश आणि तारे नेहमीच मोठे आकर्षण असतात. आमचा अंतराळ कार्यक्रम मुलांनी वेगळा विचार करून आतापर्यंत ज्या मर्यादाच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं, त्याही पुढे जाण्याची संधी देतो.आमच्या मुलांनी तारे न्याहाळत राहण्याबरोबरच, नवीन नवीन तार्यांचा शोध लावण्यासाठी आणि प्रेरित करण्याचा आमचा दृष्टीकोन आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नेहमीच सांगतो की, जो खेळेल तो खुलेल आणि यंदा खेलो इंडियामध्ये खूप सारे तरुण आणि युवा खेळाडू खुलून समोर आले आहेत. जानेवारी महिन्यात पुण्यात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमध्ये सुमारे 6,000 खेळाडूंनी भाग घेतला. जेव्हा आमच्या स्पोर्ट्सची स्थानिक परिस्थिती मजबूत होईल म्हणजे जेव्हा आमचा पाया मजबूत होईल तेव्हाच आमचे युवा खेळाडू देश आणि जगात आपल्या क्षमतांचं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकतील. जेव्हा स्थानिक पातळीवर खेळाडू सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल, तेव्हाच तो जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करेल. यावेळी खेलो इंडिया मध्ये प्रत्येक राज्यातल्या खेळाडूंनी आपापल्या स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन जबरदस्त प्रेरणा देणारं आहे.
मुष्टीयुद्धात युवक खेळाडू आकाश गोरखा यानं रजत पदक जिंकलं. मी वाचलं की, आकाशचे वडील, रमेशजी, पुण्यात एका संकुलात चौकीदाराचं काम करतात. ते आपल्या कुटुंबासह एका पार्किंग शेडमध्ये राहतात. महाराष्ट्राची 21 वर्षाखालील महिला कबड्डी संघाची कप्तान सोनाली हेल्वी सातार्याची राहणारी आहे खूप लहानपणी तिचे वडील गेले आणि तिचा भाऊ आणि तिच्या आईन सोनालीच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं. नेहमीच असं पाहण्यात येतं की, कबड्डीसारख्या खेळामध्ये मुलीना इतकं प्रोत्साहन मिळत नाही. अस असूनही, सोनालीनं कबड्डीची निवड केली आणि उत्कृष्ट प्रदर्शन केलं. असनसोलच्या दहा वर्षाचा अभिनव शॉ, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा सुवर्ण पदक विजेता आहे. कर्नाटकातल्या एका शेतकर्याची मुलगी अक्षता बासवाणी कमती हिनं वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिकलं. तिनं आपल्या विजयाचं श्रेय आपल्या वडलाना दिलं. त्यांचे वडील बेळगावात शेतकरी आहेत. जेव्हा आम्ही भारत निर्माणाची गोष्ट करतो तेव्हा युवा शक्तीच्या संकल्पाचा तर नवीन भारत न्यू इंडिया आहे. न्यू इंडिया-नव्या भारताच्या निर्माणात केवळ मोठ्या शहरांच योगदान नाही तर लहान शहरं, गावं, कसब्यातून येणारे युवक, मुलं, यंग स्पोर्टिंग टॅलेंट्स, यांचंही मोठं योगदान आहे, हेच खेलो इंडियाच्या या कहाण्या सांगत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण अनेक प्रतिष्ठित ब्युटी कॉंटेस्टच्या बाबतीत ऐकलं असेल.पण आपण टॉयलेट चमकवण्याच्या स्पर्धेबद्दल कधी ऐकलं आहे का? अरे गेल्या जवळपास महिनाभरापासून सुरु असलेल्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत 50 लाखाहून अधिक शौचालयांनी भाग घेतला आहे. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचं नाव आहे स्वच्छ सुंदर शौचालय. लोक आपली शौचालयं स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्यांची रंगरंगोटी करून, काही पेंटिंग बनवून सुंदर बनवत आहेत. आपल्याला काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ ते कामरूपपर्यंत स्वच्छ सुंदर शौचालयांची छायाचित्रं सोशल मिडियावरही कितीतरी पाहायला मिळतील. मी सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांना आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन करतो. आपल्या स्वच्छ सुंदर शौचालयाचं छायाचित्र #Mylzzatghar सह सोशल मिडियावर अवश्य टाकावं.
मित्रांनो, 2 ऑक्टोबर, 2014 रोजी आपण देशाला स्वच्छ आणि उघड्यावरील शौचापासून मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून एक कायम लक्षात राहील, असा प्रवास सुरु केला. भारतातल्या प्रत्येक जणाच्या सहकार्यानं आज भारत 2 ऑक्टोबर, 2019 च्या खूप अगोदर, उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्याच्या दिशेनं अग्रेसर आहे, ज्यामुळे बापुंना त्यांच्या 150 व्या जयंतीला श्रद्धांजली अर्पण करू शकू.
स्वच्छ भारताच्या या अविस्मरणीय प्रवासात `मन की बात’ च्या श्रोत्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे आणि म्हणून तर आपण सर्वापुढे हे जाहीर करण्यात मला आनंद होत आहे की, पाच लाख पन्नास हजार गावं आणि 600 जिल्ह्यांनी स्वतःला उघड्यावरील शौचापासून मुक्त घोषित केलं आहे आणि ग्रामीण भारतात स्वच्छता कव्हरेज 98 टक्के ओलांडून पुढे गेलं आहे. आणि सुमारे 9 कोटी परिवारांसाठी शौचालयांची सुविधा प्राप्त करून देण्यात आली आहे.
माझ्या छोट्या दोस्तांनो, परीक्षांचे दिवस आता येणार आहेत. हिमाचल प्रदेशचे रहिवासी अंशुल शर्मा यांनी MyGov वर लिहिलं आहे की, मला परीक्षा आणि परीक्षा योद्ध्यांविषयी बोललं पाहिजे. अंशुल जी, हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद. अनेक परीवारांसाठी वर्षाचा पहिला भाग परीक्षांचा मोसम असतो. विद्यार्थी, त्यांच्या आईवडलांपासून ते शिक्षकांपर्यंत सर्वच लोक परीक्षांशी संबंधित कामांमध्ये व्यस्त असतात.
मी सर्व विद्यार्थी, त्यांचे आईवडील आणि शिक्षकांना शुभेच्छा देतो. मला आज या विषयावर `मन की बात’ च्या या कार्यक्रमात चर्चा करणं निश्चितच आवडलं असतं, पण आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, दोन दिवसांनंतर 29 जानेवारीला सकाळी 11 वाजता `परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी विद्यार्थ्याबरोबरच पालक आणि शिक्षकही या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. आणि यावेळी अनेक परदेशांतले विद्यार्थीही या कार्यक्रमात भाग घेतील. या `परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात परीक्षेशी संबंधित सर्व पैलू, विशेषत: stress free exam म्हणजे तणावमुक्त परीक्षेबद्दल मी आपल्या नवतरुण मित्रांशी खूप गोष्टी बोलणार आहे. यासाठी मी लोकांना इनपुट आणि आयडिया पाठवण्याचा आग्रह केला होता आणि मला आनंद आहे की, खूप मोठ्या संख्येनं MyGov वर लोक आपले विचार व्यक्त करत आहेत. यापैकी काही विचार आणि सूचना टाऊन हॉलमधल्या कार्यक्रमात मी निश्चितच आपल्या समोर ठेवणार आहे. आपण अवश्य या कार्यक्रमात भाग घ्यावा. …सोशल मीडिया आणि नमो ॲपच्या माध्यमातनं आपण त्याचं लाईव्ह प्रसारणही पाहू शकता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 30 जानेवारी पूज्य बापूंची पुण्यतिथी आहे. 11 वाजता संपूर्ण देश हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आपणही दोन मिनिटे शहीदाना श्रद्धांजली अर्पण करा.पूज्य बापूंचं पुण्यस्मरण करा आणि पूज्य बापूंचं स्वप्न साकार करणं, नव्या भारताचं निर्माण करणं,नागरिक म्हणून आपल्या कर्तव्यांचं पालन करणं-या संकल्पासह आपण पुढे जाऊ या. 2019 ची ही यात्रा यशस्वीपणे पुढे नेऊ या. माझ्या आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. वर्ष 2018 संपणार आहे. आपण 2019 मध्ये प्रवेश करणार आहोत. अशा वेळी स्वाभाविकपणे गेल्या वर्षात घडलेल्या घटनांची चर्चा केली जाते,तसेच येणाऱ्या वर्षासाठीच्या संकल्पांची देखील चर्चा होते. व्यक्तीचे जीवन असो, समाजाचे जीवन असो, राष्ट्राचे जीवन असो, प्रत्येकाला सिंहावलोकन करतानाच, भविष्यात शक्य तितकं दूरवर बघण्याचा प्रयत्न देखील करायचा असतो. आणि तेंव्हाच अनुभवांचा फायदा होतो, आणि निवड करण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण होतो. आपण असं काय करू शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात बदल घडवून येईल, त्यासोबतच समाज आणि देश पुढे नेण्यात आले योगदान देता येईल. आपणा सर्वांना 2019च्या अनेक शुभेच्छा. 2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी ठरवलंच असेल. 2018 हे वर्ष भारत एक देश म्हणून, आपल्या एकशे तीस कोटी जनतेची ताकद म्हणून कसं लक्षात ठेवलं जाईल हे देखील महत्वाचे आहे. आणि आम्हा सर्वांचा ऊर अभिमानाने भरून टाकणारे देखील आहे.
2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘आयुष्यमान भारत’ ह्या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला. देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली. जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगाने गरिबी निर्मूलनाचे काम करत आहे. देशवासीयांच्या अटळ संकल्पाने स्वच्छतेची व्याप्ती 95%च्या पुढे नेण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आझाद हिंद सरकारच्या 75व्या स्थापना दिवशी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला. देशाला एकतेच्या धाग्यात ओवणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या सन्मानार्थ जगातील सर्वात उंच पुतळा ‘Staute of Unity’ देशाला मिळाला. जगात देशाचे नाव उंचावले गेले. संयुक्त राष्ट्राचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार ‘Champion of the Earth’ देशाला देण्यात आला. सौर उर्जा आणि वातावरण बदलासाठी केलेल्या भारताच्या प्रयत्नांना जगात स्थान मिळालं. ‘जागतिक सौर आघाडी’ची पहिली बैठक भारतात झाली. आपल्या सामुहिक प्रयत्नांमुळेच भारताच्या व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व वाढ झाली. देशाची संरक्षणसज्जता अधिक मजबूत झाली. ह्याच वर्षी आपल्या देशाने आण्विक त्रिकोण यशस्वीपणे पूर्ण केला. म्हणजे आता आपण लष्कर,नौदल आणि वायुदल या तिन्ही क्षेत्रांत अण्वस्त्र सज्ज झालो आहोत. देशाच्या कन्यांनी सागर परीक्रमेद्वारे विश्व भ्रमण केले आणि देशाचा ऊर अभिमानाने भरून आला. वाराणसीमध्ये भारताच्या पहिल्या जलवाहतुकीची सुरवात झाली. ह्यामुळे जलमार्ग क्षेत्रात क्रांतीची सुरवात झाली आहे. देशातल्या सर्वात लांब रेल्वे-रस्ता पुलाचे उद्घाटन झाले. सिक्कीमच्या पहिल्या आणि देशातल्या 100व्या पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन झाले. 19 वर्षांखालील क्रिकेटचा विश्वचषक, अंध क्रिकेट विश्वचषक देखील भारताने जिंकला. ह्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने मोठ्या संख्येने पदकांची कमाई केली. पॅरा आशियाई स्पर्धेत देखील भारताने चांगली कामगिरी केली. जर मी प्रत्येक भारतीयाच्या पुरुषार्थ आपल्या सामुहिक प्रयत्नांविषयी बोलत राहिलो तर आपली ‘मन की बात’ इतकी लांबेल कि 2019 उजाडेल. हे सगळं 130 कोटी देशबांधवांच्या अथक प्रयत्नांनीच शक्य झालं आहे. मला आशा आहे कि, 2019 मध्ये देखील भारताची प्रगती आणि उन्नती अशीच सुरु राहील आणि आपला देश अधिक ताकदीने यशाची नवी शिखरं सर करेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ह्या डिसेंबरमध्ये आपण काही असामान्य भारतीयांना मुकलो आहोत. 19 डिसेंबरला चेन्नईमध्ये डॉक्टर जयाचंद्रन याचं निधन झालं. डॉक्टर जयाचंद्रन यांना लोक प्रेमाने ‘मक्कल मारुथुवर’ म्हणत असत. कारण लोकांनी त्यांना आपल्या मनात स्थान दिलं होतं. डॉक्टर जयाचंद्रन गरिबांना सगळ्यात स्वस्त उपचार देणारे म्हणून ओळखले जात. लोक सांगतात कि रुग्णसेवेसाठी ते सैद्यव तत्पर असत. त्यांच्याकडे येणाऱ्या वयस्क रुग्णांना तर ते येण्याजाण्याचा खर्च देखील देत असत. www.thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर मी त्यांच्या समाजाला प्रेरक अशा कार्याविषयी अनेक लेख वाचले आहेत.
त्याचप्रमाणे, 25 डिसेंबरला कर्नाटकातील सुलागिट्टीनरसम्मा यांचे निधन झाले. सुलागिट्टी नरसम्मा ह्या सुईण होत्या. कर्नाटकातील दुर्गम भागातील माता भगिनींना त्या प्रसूतीमध्ये मदत करत असत. ह्याच वर्षीच्या सुरवातीला त्यांना ‘पद्मश्री’ ने सन्मानित करण्यात आलं होतं. डॉ. जयचंद्रन आणि सुलागिट्टी नरसम्मा यांच्यासारख्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी समाजाच्या भल्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आपण आरोग्य सेवेविषयी बोलत आहोत, तर, उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील डॉक्टरांनी सुरु केलेल्या सामाजिक प्रयत्नांविषयी वोलायला मला आवडेल. अलीकडेच आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं कि शहरातले काही तरुण डॉक्टर शिबिरं आयोजित करून गरीब रुग्णांना मोफत उपचार देतात. इथल्या हार्ट लंग क्रिटिकल केअर तर्फे दर महिन्यात असे शिबीर घेतले जाते. ह्या शिबिरांत अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत इलाज करण्याची सोय असते. आज दर महिन्यात शेकडो गरीब रुग्ण ह्या शिबिरांचा लाभ घेतात. निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करत असलेल्या ह्या तरुण डॉक्टरांचा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आज मला हे सांगताना अभिमान वाटतो कि सामुहिक प्रयत्नामुळेच ‘स्वच्छ भारत अभियान ’ यशस्वी झालं आहे. मला काही लोकांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये जवळपास तीन लाखाहून जास्त लोकांनी स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेच्या ह्या महायज्ञात नगर पालिका, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, जबलपूरचे जनता जनार्दन, सगळ्या लोकांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला. मी आत्ताच thebetterindia.com चा उल्लेख केला. जिथे मी डॉ. जयचंद्रन यांच्याविषयी वाचलं. शक्य असेल तेंव्हा मी कटाक्षाने thebetterindia.com ह्या संकेतस्थळावर जाऊन अशा प्रेरक गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतो. मला आनंद आहे, आजकालच्या काळात असे संकेतस्थळ आहे जे अशा विलक्षण लोकांच्या प्रेरणादायी गोष्टींशी समाजाचा परिचय करून देत आहे. ज्याप्रमाणे thepositiveindia.comसमाजात सकारात्मकता पसरविण्याचे आणि समाजाला अधिक संवेदनशील बनविण्याचे काम करत आहे, त्याच प्रमाणे yourstory.com युवा संशोधक आणि उद्योजकांच्या यशोगाथा मोठ्या कौशल्याने समाजाला सांगत आहे. त्याच प्रमाणे samskritabharati.in च्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या, सहजतेने संस्कृत भाषा शिकू शकता. आपण एक काम करू शकतो का, अशा अशा संकेतस्थळांची माहिती एकमेकांना देऊन समाजात सकारात्मकता पसरवूया. मला खात्री आहे, कि ह्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या आमच्या नायाकांविषयी अधिकाधिक लोकांना माहिती मिळेल. नकारात्मकता पसरविणे सोपे असते. पण, समाजात आपल्या आजूबाजूला अनेक चांगली कामे होत आहेत. आणि हे सगळं 130 कोटी भारतीयांच्या सामुहिक प्रयत्नांनी होत आहे.
प्रत्येक समाजात खेळांचं एक महत्व आहे. जेंव्हा खेळ खेळले जातात तेंव्हा ते बघणाऱ्यांच्या मनात देखील उर्जा निर्माण होते. खेळाडूंची प्रसिद्धी, ओळख, मान-सन्मान अशा अनेक गोष्टी आपण बघत असतो. पण अनेकदा यांच्यामागे अनेक अशा गोष्टी असतात ज्या क्रीडा विश्वापेक्षा कितीतरी अधिक असतात, मोठ्या असतात. काश्मीरची कन्या हनाया निसारबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. तिने कोरियात झालेल्या कराटे अजिंक्य स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. हनाया 12 वर्षांची आहे आणि काश्मीरच्या अनंतनाग येथे राहते. हनायाने मेहनत आणि चिकाटीने कराटेचा अभ्यास आणि सराव केला. त्यातले बारकावे शिकली आणि स्वतःला सिद्ध केलं. मी सर्व देशवासीयांतर्फे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. हनायाला अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्याचप्रमाणे 16 वर्षांच्या रजनी ह्या मुलीविषयी माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली. आपण नक्कीच वाचलं असेल, रजनीने कनिष्ठ गटात मुष्ठीयुध्द स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती लगेच जवळच्या दुधाच्या एका छोट्या दुकानात गेली आणि एक प्याला दुध प्यायली. त्यानंतर रजनीने ते पदक कापडात गुंडाळलं आणि आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलं. आपण विचार करत असाल, कि रजनी एक प्याला दुध का प्यायली? तिने ते आपले पिता जसमेर सिंग यांच्यासाठी केलं. ते पानिपत येथे एका छोट्या दुकानात लस्सी विकतात. रजनीने सांगितलं, कि इथवर पोहोचण्यासाठी तिच्या वडिलांनी खूप त्याग केला आहे, खूप कष्ट केले आहेत. जसमेर सिंग रोज सकाळी रजनी आणि तिची भावंड उठण्यापूर्वी कामावर निघून जायचे. रजनीने जेंव्हा मुष्टियुद्ध शिकण्याची इच्छा व्यक्त केली, तेंव्हा वडिलांनी शक्य ती सर्व साधने गोळा केली आणि तिचा उत्साह वाढविला. रजनीला मुष्टीयुद्धाचा सराव करण्यासाठी जुने gloves वापरावे लागले कारण तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. इतके सगळे अडथळे असूनही रजनी खचून न जाता मुष्टीयुध्द शिकत राहिली. तिने सर्बियामध्ये देखील एक पदक जिंकले आहे. मी रजनीला शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि रजनीला मदत करण्यास आणि तिचा उत्साह वाढविण्यासाठी तिचे माता-पिता जसमेर सिंगजी आणि उषा राणी यांचे अभिनंदन करतो. ह्याच महिन्यात पुण्याच्या एका 20 वर्षीय कन्या, वेदांगी कुलकर्णी सायकलने जगप्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई बनली आहे. ती 159 दिवस रोज जवळजवळ 300 किलोमीटर सायकल चालवत होती. तुम्ही कल्पना करा रोज 300 किलोमीटर cycling ! सायकल चालविण्याची तिची जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. असे यश, अशा कामगिरीबद्दल ऐकून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही. विशेषकरून माझे युवा मित्र जेंव्हा अश्या घटनांबद्दल ऐकतात, तेंव्हा त्यांना देखील अडथळे पार करून काहीतरी करून दाखविण्याची प्रेरणा मिळते. जर दृढनिश्चय केला, संकल्पात शक्ती असेल तर सगळ्या समस्या आपोआप गळून पडतात. कुठलीच समस्या अडथळा बनू शकत नाही. जेंव्हा अशा उदाहरणाविषयी आपण ऐकतो, तेंव्हा आपल्याला देखील आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एक प्रेरणा मिळत असते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, जानेवारीत उत्साह आणि आनंदाचे लोहडी, पोंगल, मकर संक्रांत, उत्तरायण, माघ बिहू, माघी, यासारखे अनेक सण येणार आहेत. ह्या सर्व सणांच्या निमित्ताने सानौर्ण देशात कुठे पारंपारिक नृत्यांचा रंग दिसेल, तर कुठे सुगीच्या आनंदात लोहडी दहन केलं जाईल. कुठे आकाशात रंगी बेरंगी पतंग उडवले जातील. तर कुठे जत्रेचा आनंद असेल, तर कुठे खेळांच्या स्पर्धा होतील, तर कुठे एकमेकांना तीळ गुळ दिला जाईल. लोक एकमेकांना म्हणतील, ‘तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.’ ह्या सगळ्या सणांची नवे भलेही वेगवेगळी असतील पण सर्वांमागची भावना एकाच आहे. हे सण कुठे ना कुठे पिक आणि शेतीशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, खेड्यांशी संबंधित आहेत. शेती वाडीशी संबंधित आहेत. याच काळात सूर्याचे उत्तरायण होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. ह्यानंतर दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो आणि हिवाळ्यातील सुगीचा हंगाम सुरु होतो. आमचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना देखील अनेकानेक अनेक शुभेच्छा. आपले सण विविधतेत एकता – एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या सणांमध्ये सामावलेली आहे. आपण बघू शकतो, आपले उत्सव निसर्गाशी किती एकरूप झालेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये समाज आणि निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. येथे व्यक्ती आणि समष्टि एकच आहे. निसर्गाशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचे उत्तम उदाहरण म्हणजे – सणांवर आधारित कॅलेंडर. ह्यात वर्षभरातील सण तर असताच, त्यासोबतच ग्रह – नक्षत्रांची माहिती देखील असते. ह्या पारंपरिक कॅलेंडरमधून नैसर्गिक आणि खगोलिय घटनांशी आपला संबंध किती जुना आहे याची माहिती मिळते. चंद्र आणि सूर्याच्या गतीनुसार चंद्र आणि सूर्य कॅलेंडरनुसार सणांची तिथी निश्चित केली जाते. जो ज्या कॅलेंडरनुसार कालगणना करतो त्यावर हे अवलंबून असते.अनेक भागात नक्षत्रांच्या स्थितीनुसार देखील सण साजरे केले जातात. गुढी पाडवा, चेटीचंड, उगादि हे सर्व चंद्र कॅलेंडरनुसार साजरे केले जातात, तर तमिळ पुथांडु, विषु, वैशाख, बैसाखी, पोइला बैसाख, बिहु – हे सर्व सण पर्व सूर्य कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. आपल्या अनेक सणांमध्ये नदी आणि जल संवर्धनाला विशेष महत्व आहे. छठ हा सण नद्या, तलावांमध्ये सूर्याची उपासना करण्याचा सण आहे. मकर संक्रांतीला देखील लाखो-करोडो लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. आमचे सण आम्हाला सामाजिक मुल्यांची देखील शिकवण देतात. एकीकडे यांचे पौराणिक महत्व आहे, तर दुसरीकडे प्रत्येक सण सहजतेने सामाजिक बंधुभावाची प्रेरणा देऊन जातो. मी आपणा सर्वांना 2019 च्या अनेकानेक शुभेच्छा देतो आणि येणारे सण आपल्याला भरपूर आनंद देतील अशी इच्छा व्यक्त करतो. ह्या सणांना काढलेले फोटो सर्वांसोबत शेयर करा. म्हणजे मग भारताची विविधता आणि भारतीय संस्कृतीचे सौंदर्य प्रत्येक जण बघू शकेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत,ज्यांचा आपण अभिमान बाळगू शकतो आणि सगळ्या जगाला अभिमानाने दाखवू शकतो. आणि अशा गोष्टींपैकीच एक आहे आपला कुंभमेळा! तुम्ही कुंभमेळ्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. चित्रपटांमधून त्याची भव्यता आणि विशाल आकार याविषयी बरंच काही पाहिलंही असेल, आणि ते खरंही आहे.
कुंभमेळ्याचं स्वरुप विशाल असतं-जितके दिव्य तितकेच भव्य ! देशविदेशातून लोक तिथे येतात आणि कुंभमेळ्याशी कायमचे जोडले जातात. कुंभमेळ्यात आस्था आणि श्रद्धेचा जनसागर लोटलेला असतो. एकाच जागी, देशविदेशातील कोट्यवधी लोक एकत्र आले असतात. कुंभमेळ्याची परंपरा आपल्या महान सांस्कृतिक वारशातून साकारलेली आणि फुललेली आहे. यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे, ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेने वाट बघत असाल. कुंभ मेळ्यासाठी आतापासूनच संत-महात्मे प्रयागराज ला पोहचू लागले आहेत. गेल्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं आहे, यावरुन आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. काही दिवसांपूर्वी अनेक देशांचे राजदूत कुंभमेळ्याची तयारी बघायला आले होते. त्यावेळी तिथे एकाच वेळी अनेक देशांचे राष्ट्रध्वज फडकवले गेले. प्रयागराज मध्ये आयोजित होत असलेल्या या कुंभमेळ्यात 150 पेक्षा अधिक देशांमधील लोक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल.कुंभमेळा स्वतःचा शोध घेण्याचं प्रभावी माध्यम आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी अनुभूती होत असते. संसारतल्या व्यावहारिक गोष्टींकडे आपण आध्यात्मिक दृष्टीने बघतो-जाणून घेतो. विशेषतः युवकांसाठी हा एक खूप मोठा शैक्षणिक अनुभवच असतो. मी स्वतः काही दिवसांपूर्वीच प्रयागराजला गेलो होतो. मी तिथे पाहिलं की कुंभमेळ्याची तयारी अगदी जोमाने सुरु आहे. प्रयागराजचे लोकही कुंभमेळ्याविषयी अत्यंत उत्साहात आहेत. मी तिथे एकीकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे लोकार्पण केले. भाविकांना या केंद्रामुळे मोठ्या सुविधा मिळणार आहेत. यावर्षी कुंभमेळ्यात स्वच्छतेवर देखील भर दिला जात आहे. कुंभाच्या आयोजनात स्वच्छतेसोबतच साफसफाईकडे लक्ष दिलं गेलं, तर त्याचा चांगला संदेश दूरपर्यत पोहोचेल.यावर्षी भाविक त्रिवेणी संगमातल्या पवित्र स्नानानंतर अक्षयवटाचे पुण्यदर्शन देखील करु शकेल. भाविकांच्या आस्थेचं प्रतीक असलेला हा अक्षयवट कित्येक वर्षांपासून एका किल्यात बंद होता, त्यामुळे इच्छा असूनही भाविक त्याचे दर्शन घेऊ शकत नव्हते. मात्र आता, या अक्षयवटाच्या किल्याची दारं सर्वांसाठी खुली करण्यात आली आहेत. मी तुम्हाला आग्रह करेन की जेव्हा तुम्ही कुंभमेळ्याला जाल, तेव्हा कुंभमेळ्याचे विविध पैलू आणि रंग दाखवणारे काही फोटो सोशल मिडियावर नक्की अपलोड करा, ते फोटो बघून अधिकाधिक लोकांना या कुंभमेळ्याला जायची प्रेरणा मिळेल.
अध्यात्माचा हा कुंभ भारतीयांसाठी भारतात दर्शनांचा महाकुंभ बनो.
आस्थेचा हा कुंभ राष्ट्रीयतेचाही महाकुंभ बनो.
राष्ट्रीय एकतेचाही महाकुंभ बनो.
भाविकांचा हा कुंभ जगभरातील पर्यटकांचाही महाकुंभ बनो.
कलात्मकतेचा हा कुंभ, सृजन शक्तींचाही महाकुंभ बनो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 26 जानेवारीच्या गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाविषयी आपल्या सर्व देशबांधवांच्या मनात खूप उत्सुकता असते. त्यादिवशी आपण आपल्याला संविधानाची भेट देणाऱ्या देशातील महान विभूतींचं स्मरण करतो.
या वर्षी आपण पूज्य बापूंची 150 वी जयंती साजरी करतो आहोत.आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती श्री सिरील रामाफोसा, यावर्षी गणराज्य दिवसाचे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. पूज्य बापू आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक अतूट नातं आहे. दक्षिण आफ्रिकेतूनच’मोहन’, ‘महात्मा’ बनून आले. दक्षिण आफ्रिकेतच महात्मा गांधी यांनी आपला पहिला सत्याग्रह सुरु केला आणि वर्णभेदाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिलेत. त्यांनीच फिनिक्स आणि टॉलस्टॉय फार्म्सचीही स्थापना केली, तिथूनच संपूर्ण जगात शांती आणि न्यायासाठी आवाज उठवला गेला. 2018 हे वर्ष, नेल्सन मंडेला यांचेही जनशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यांना ‘मडीबा’ या नावानेही ओळखले जाते.
नेल्सन मंडेला, हे संपूर्ण जगात वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यातील एक आदर्श मानले जातात, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आणि मंडेला यांचे प्रेरणास्रोत कोण होते ? त्यांना इतकी वर्षे तुरुंगवास सोसण्याची सहनशक्ती आणि प्रेरणा, आदरणीय बापूंकडून मिळाली होती. मंडेला यांनी बापूंबद्दल बोलताना म्हटले होते, “महात्मा गांधी हे आमच्या इतिहासाचे अविभाज्य घटक आहेत. कारण याच ठिकाणी त्यांनी सत्याचा पहिला प्रयोग केला होता, याच ठिकाणी त्यांनी न्यायाप्रति आपला विलक्षण आग्रह सिद्ध केला होता, याच ठिकाणी त्यांनी आपल्या सत्याग्रहाचे दर्शन आणि संघर्षाच्या पद्धती विकसित केल्या.” ते बापूंना आपला आदर्श मानत होते. बापू आणि मंडेला, दोघेही संपूर्ण जगासाठी केवळ प्रेरणास्रोत नाहीत, तर त्यांचे आदर्श, आपल्याला प्रेम आणि करुणेने परिपूर्ण अशा समाजाच्या निर्मितीसाठी सदैव प्रोत्साहित करतात.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वीच गुजरातमध्ये नर्मदातटावर केवडिया येथे डीजीपी परिषद झाली. तेथे जगातील सर्वात उंच पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आहे. त्या ठिकाणी देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांसोबत साधक-बाधक चर्चा झाली.देश आणि देशवासीयांची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कशा प्रकारची पावले उचलली जावीत, याबाबत सविस्तर विचार-विनिमय करण्यात आला. त्याच दरम्यान मी राष्ट्रीय एकतेसाठी सरदार पटेल पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली. कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय एकतेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या एकतेसाठी समर्पित केले होते. ते नेहमीच भारताची अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील राहिले. येथील विविधतेमध्येच भारताची खरी ताकद एकवटली आहे, असे सरदार पटेल मानत असत. त्यांच्या त्या भावनेचा आदर करत, एकतेच्या या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 13 जानेवारी हा गुरु गोबिंद सिंह जी यांच्या जयंतीचा पवित्र दिवस आहे. गुरु गोबिंद सिंह जी यांचा जन्म पाटणा येथे झाला होता, आयुष्यातील बराच काळ उत्तर भारत ही त्यांची कर्मभूमी होती आणि महाराष्ट्रात नांदेड येथे त्यांनी अखेर प्राणत्याग केला. जन्मभूमी पाटणा, कर्मभूमी उत्तर भारत आणि जीवनाची अखेर नांदेडमध्ये. अशा प्रकारे एका अर्थाने संपूर्ण भारतवर्षाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला. त्यांच्या आयुष्यावर नजर टाकली तर त्यात संपूर्ण भारताचे प्रतिबिंब पाहायला मिळते. पिता श्री गुरू तेग बहादुर जी शहीद झाल्यानंतर गुरु गोबिंद सिंह जीं नी नऊ वर्षांच्या अल्पायुष्यात गुरुचे पद प्राप्त केले. न्यायासाठी लढा देण्याचे साहस गुरू गोविंद सिंगजी यांना गुरूंकडून वारसाच्या रूपातच मिळाले. त्यांचे व्यक्तिमत्व शांत आणि सरळ होते. मात्र जेव्हा जेव्हा गरीब आणि दुर्बलांची मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न झाले, त्यांच्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला, त्या प्रत्येक वेळी गुरुगोविंद सिंग यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी प्रखर लढा दिला आणि म्हणूनच म्हटले जाते की…
“सवा लाख से एक लड़ाऊँ,
चिड़ियों सों मैं बाज तुड़ाऊँ,
तबे गोबिंदसिंह नाम कहाऊँ |
ते म्हणत असत की दुर्बलांविरुद्ध लढाई करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करणे योग्य नाही. मानवाची दुःखे दूर करणे, ही सर्वात मोठी सेवा आहे, असे श्री गुरु गोबिंद सिंह जी मानत असत. साहस, शौर्य, त्याग आणि धर्मपरायणतेने परिपूर्ण, असे ते एक दिव्य पुरुष होते, ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे पुरेपूर ज्ञान होते. ते एक उत्तम तिरंदाज होते, त्याचबरोबर गुरुमुखी, संस्कृत, फारशी, हिंदी आणि उर्दूसह इतर अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. मी पुन्हा एकदा श्री गुरु गोबिंद सिंग यांना वंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, देशात अशा अनेक चांगल्या गोष्टी होत असतात ज्यांची व्यापक स्तरावर चर्चा होत नाही. असाच एक उपक्रम F.S.S.A.I अर्थात भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण राबवत आहे. महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच मालिकेचा एक भाग म्हणून F.S.S.A.I तर्फे आहाराच्या सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण सवयींना प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. “Eat Right India” मोहिमेअंतर्गत, स्वस्थ भारत यात्रांचे आयोजन केले जात आहे. ही मोहीम 27 जानेवारीपर्यंत सुरू राहील. अनेकदा सरकारी संघटनांचा परिचय अतिशय साचेबद्ध पद्धतीने करून दिला जातो, मात्र त्यापुढे एक पाऊल टाकत F.S.S.A.I. जनजागृती बरोबरच लोकशिक्षणाचे काम करीत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. जेव्हा भारत स्वच्छ असेल, आरोग्यपूर्ण असेल, तेव्हाच भारत समृद्ध होऊ शकेल. चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक भोजन ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. याच संदर्भात F.S.S.A.I. ने हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असा आग्रह मी आपणाला करू इच्छितो. आपणही यात सहभागी व्हावे आणि विशेष करून मुलांना या गोष्टी नक्कीच दाखवा, असे मी सांगू इच्छितो. आहाराचे महत्त्व सांगणारे शिक्षण लहानपणापासूनच मिळणे आवश्यक असते.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 2018 या वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम आहे. 2019 या वर्षात आपण पुन्हा एकदा भेटू. पुन्हा एकदा मनातील गोष्टी बोलू. आयुष्य, मग ते व्यक्तीचे असो, राष्ट्राचे असो वा समाजाचे असो, प्रेरणा ही त्या आयुष्याच्या प्रगतीचा पाया असते. अशी नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी आणि नवी उंची यांसह पुढे जाऊया, पुढे पाऊल टाकू या. स्वतःत बदल घडवू या आणि देशालाही बदलू या. अनेकानेक धन्यवाद!!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! दिनांक 3 ऑक्टोबर, 2014 रोजी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर ‘मन की बात’ या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे एका प्रवासाला प्रारंभ केला होता. या ‘मन की बात’च्या प्रवासाचे आज 50 भाग पूर्ण होत आहेत. याचाच अर्थ आजचा हा भाग म्हणजे ‘सुवर्ण महोत्सवी भाग’ आहे म्हणजेच सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा भाग आहे. विशेष म्हणजे यावेळी आपल्याकडून जी काही पत्रं आली आहेत, दूरध्वनीव्दारे संदेश आले आहेत, ते बहुतांश 50 व्या भागासंदर्भातच आहेत. ‘माय गव्ह’वर देखील दिल्लीचे अंशु कुमार, अमर कुमार आणि पाटण्याचे विकास यादव यांनी, त्याचबरोबर ‘नरेंद्रमोदीअॅप’वर दिल्लीच्या मोनिका जैन, पश्चिम बंगालमधल्या बर्दवान इथले रहिवासी प्रसेनजीत सरकार, नागपूरच्या संगीता शास्त्री या सर्व लोकांनी जवळपास एकाच प्रकारचा प्रश्न विचारला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, साधारणपणे सगळे लोक अत्याधुनिक तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि मोबाईल अॅपस् यांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जातात. परंतु आपण लोकांशी संपर्क साधण्यासाठी ‘रेडिओ’ हे माध्यम का निवडले? आपल्या सर्वांना याविषयी वाटणारी उत्सुकता अगदी स्वाभाविक आहे. आजच्या काळामध्ये, रेडिओ या माध्यमाचा जवळपास सगळ्यानांच जणू विसर पडला आहे. अशावेळी मोदी रेडिओ घेवून का बरं आले? मी आपल्याला एक घटना सांगू इच्छितो. ही 1998 ची गोष्ट आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये संघटना कार्यकर्ता म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये काम करत होतो. मे महिना होता आणि संध्याकाळच्या वेळी मी प्रवास करून एके ठिकाणी जात होतो. हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय भागामध्ये संध्याकाळच्या वेळीही हवेमध्ये गारठा जाणवू लागतो. त्यामुळं रस्त्यामध्ये एका ढाब्यावर चहा घेण्यासाठी म्हणून मी थांबलो होतो. चहाची ऑर्डरही दिली. हा ढाबा खूप लहान होता. एकच माणूस म्हणजे तो ढाबाचालक होता. तो स्वतःच चहा बनवत होता आणि विकत होता. ढाब्यावर आडोशासाठी कापड असं काहीही नव्हतं. रस्त्याच्या कडेला त्यानं अगदी छोट्या टपरीसारखा ठेला तयार केला होता. त्यानं आपल्याजवळच्या एका काचेच्या भांड्यात लाडू ठेवले होते. त्यानं एक लाडू काढला आणि मला म्हणाला, ‘‘ साहेब, चहा घेतल्यानंतर, हा लाडू खा आणि तोंड गोड करा.’’मला खूप नवल वाटलं , आश्चर्यानं मी त्याला विचारलं, ‘‘ घरात काही विशेष आनंदाचा प्रसंग आहे का, कुणाचं लग्न वगैर आहे का?‘‘ त्यावर तो चहावाला उत्तरला, ‘‘ नाही, असं काही नाही साहेब, तुम्हाला काही माहिती नाही का?’’ अगदी खूप चांगली गोष्ट घडली आणि ती आपण कुणाला तरी सांगतोय, याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरून जणू ओसंडून वाहत होता. त्याचा उत्साह पाहून मी नेमकं काय झालंय असं त्याला विचारलं. त्यावर त्यानं उत्तर दिलं, ‘‘ अरे भाई, आज भारतानं बॉम्ब फोडलाय.’’ त्याचं बोलणं मला काही समजलं नाही. म्हणून मी म्हणालो,‘‘ भारतानं बॉम्ब फोडलाय म्हणजे, मला काही समजलं नाही.’’ यावर तो म्हणाला, ‘‘ हे ऐका साहेब, रेडिओ तरी ऐका’’. त्यावेळी रेडिओवर त्याविषयीच चर्चा सुरू होती. त्यादिवशीच आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या देशाने अणूचाचणी यशस्वी केल्याची घोषणा प्रसार माध्यमासमोर केली होती. पंतप्रधानांची ती घोषणा, या चहावाल्यानं रेडिओवरून ऐकली होती. त्याचा त्याला इतका आनंद झाला होता. आता मला या सगळ्या गोष्टीचं खूपच नवल वाटत होतं. या इतक्या निर्जन क्षेत्रामध्ये, जंगलामध्ये, अशा या बर्फाळ-डोंगराळ भागामध्ये एक सामान्य माणूस चहाचा ठेला चालवण्याचं काम करतोय आणि ते करताना तो दिवसभर नक्कीच रेडिओ ऐकत असणार. त्या रेडिओवरून प्रसारित होत असलेल्या बातम्यांचा त्याच्या मनावर किती मोठा प्रभाव पडत असणार. या घटनेमुळे माझ्या मनामध्ये एका गोष्टीने अगदी कायमचं घर केलं. ती गोष्ट म्हणजे, रेडिओ अगदी जनांच्या मनामध्ये रूजला आहे आणि या माध्यमाची-रेडिओची खूप मोठी ताकद आहे. संपर्क माध्यमाचा पोहोचण्याचा आवाका, त्याची व्याप्ती याचा विचार केला, तर कदाचित रेडिओची बरोबरी कोणी करू शकत नाही, असं त्यावेळी माझ्या मनावर ठसलं गेलं आणि त्यावेळी रेडिओच्या अमर्याद क्षमतेचा अंदाज लावत मी विचार करत होतो. मग ज्यावेळी पंतप्रधान बनलो, त्यावेळी सर्वात जास्त ताकदीचे, क्षमतेचे माध्यम म्हणून रेडिओकडे माझं लक्ष जाणं अगदीच स्वाभाविक होतं. ज्यावेळी मी मे 2014 मध्ये देशाचा ‘प्रधान-सेवक’ म्हणून कार्यभार स्वीकारला, त्यावेळी माझ्या मनामध्ये इच्छा होती की, देशाची एकता, आपला महान इतिहास, देशाच्या शौर्याची गाथा, भारताची विविधता, आपली सांस्कृतिक विविधता, आपल्या समाजाच्या नसां-नसांमध्ये भरलेला चांगुलपणा, लोकांचा पुरुषार्थ, समर्पण, त्याग, तपस्या अशा सर्व गोष्टी, भारताच्या या कथा जना-जनांमध्ये पोहोचल्या पाहिजेत. देशाच्या अगदी दुर्गम भागामध्ये, अगदी टोकाच्या गावापासून ते मेट्रो शहरांपर्यंत, शेतकरी बांधवांपासून ते युवा व्यावसायिकांपर्यंत, अगदी सगळ्यांपर्यंत हे पोहोचले पाहिजे. आणि यातूनच या ‘मन की बात’च्या प्रवासाला प्रारंभ झाला. दरमहिन्याला लाखोंच्या संख्येनं येत असलेल्या पत्रांचं वाचन करणं, आलेले फोन कॉल्स ऐकणं, अॅप आणि ‘मायगव्ह’वर येणाऱ्या टिप्पणी पाहणं आणि या सगळ्यांना एका सूत्रामध्ये गुंफून, छोट्या-मोठ्या गोष्टीं करता करता 50 भागांचा हा प्रवास, आपण सर्वांनी मिळून केला आहे. अलिकडेच आकाशवाणीने ‘मन की बात’विषयी एक सर्वेक्षणही केलं आहे. त्या सर्वेक्षणामधून मिळालेले अभिप्राय मी पाहिले, काही अभिप्राय अगदी वेगळे, लक्षवेधक आहेत. ज्या लोकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यापैकी सरासरी 70 टक्के नियमितपणे ‘मन की बात’ ऐकणारे लोक आहेत. बहुतांश लोकांना समाजामध्ये सकारात्मक भावना वाढीस लावण्यामध्ये ‘मन की बात’चं मोठं योगदान आहे, असं वाटतं. ‘मन की बात’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जन आंदोलनं उभी राहण्यासाठी खूप चांगलं प्रोत्साहन मिळालं आहे. ‘‘#indiapositive’’ याविषयी खूप व्यापक चर्चाही झाली आहे. ही आपल्या देशवासियांच्या मनामध्ये वास्तव्य करत असलेल्या सकारात्मक भावनेची झलक आहे. ‘मन की बात’मुळे ‘व्हॉलंटेरिझम’ म्हणजेच स्वेच्छेनं, पुढं होवून काही करण्याची भावना वाढीस लागली आहे, असे आपले अनुभवही अनेक लोकांनी कळवले आहेत. समाजसेवेसाठी लोक आता मोठ्या उत्साहानं, स्वतःहून पुढं येत आहेत, असे परिवर्तन घडून आलं आहे. ‘मन की बात’मुळे रेडिओची आता आणखी लोकप्रियता वाढत आहे, हे पाहून मला खूप आनंद होतोय. परंतु या प्रवासामध्ये केवळ रेडिओ हे एकच माध्यम आता राहिलेलं नाही. लोक टी.व्ही., मोबाईल, इंटरनेट, फेसबुक लाइव्ह आणि पेरिस्कोपच्या बरोबरच ‘नरेंद्रमोदीअॅप’च्या माध्यमातूनही ‘मन की बात’ मध्ये सहभागी होत आहेत.
‘मन की बात’चा एक परिवार तयार झाला आहे. आणि या परिवाराचे आपण सर्वजण सदस्य आहात. या परिवाराचे भाग बनल्याबद्दल आणि सर्व सदस्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांना अगदी अंतःकरणापासून धन्यवाद देतो.
(फोन कॉल- 1)
‘‘आदरणीय पंतप्रधान जी, नमस्कार! माझं नाव शालिनी आहे आणि मी हैदराबाद इथून बोलतेय. ‘‘मन की बात’’ जनतेमध्ये खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं होतं की, हा कार्यक्रम म्हणजे एक राजकीय व्यासपीठ बनणार आणि हा कार्यक्रम एक टीकेचा विषयही बनला होता. परंतु जसं जसं हा कार्यक्रम पुढे पुढे आम्ही ऐकत गेलो, त्यावेळी लक्षात आले की, यामध्ये राजकारण नाही, तर या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू सामाजिक समस्या आणि समाजापुढे असलेली आव्हाने असा आहे. त्यामुळेच माझ्यासारखे कोट्यवधी सामान्य लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. हळू-हळू टीकेचा सूरही मावळत गेला. तर माझा प्रश्न असा आहे की, आपण या कार्यक्रमाला राजकारणापासून दूर ठेवण्यात यश कसं मिळवलं? या कार्यक्रमाचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यावा, किंवा या व्यासपीठाचा वापर करून आपल्या सरकारनं केलेल्या कामाची गणती लोकांसमोर करावी,असे आपल्या मनात कधी आलं नाही का? धन्यवाद!’’
(फोन कॉल समाप्त)
आपण फोन केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद! आपण जी शंका उपस्थित केली आहे, ती अगदी बरोबर आहे. खरंतर एखाद्या नेत्याला जर बोलायला ‘माईक’ दिला गेला आणि त्याला ऐकण्यासाठी लाखो-कोट्यवधी श्रोते असतील तर मग आणखी काय हवंय? काही तरूण मित्रांनी ‘मन की बात’ मध्ये आलेल्या सर्व विषयांवर एक अभ्यास केला आहे. त्यांनी सर्व भागांचे विश्लेषण केलं आहे. त्यामध्ये त्यांनी कोणते शब्द कितीवेळा वापरले गेले, याचा अभ्यास केला. कोणते शब्द वारंवार वापरले गेले, याचा अभ्यास केला. हा अभ्यास करणाऱ्यांनी निष्कर्ष काढला आहे की, हा कार्यक्रम राजकारणाशी संबंधित नाही, ज्यावेळी मी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला, त्याचवेळी मी निश्चित केलं होतं की, यामध्ये राजकारण नको, यामध्ये सरकारची पाठथोपटणं नको, तसंच यामध्ये कुठं मोदी नकोत. माझ्या या संकल्पाला सिद्धीस नेण्याचं मोठ्ठ काम तुम्ही केलंत,तुमच्याकडूनच तर मला ही सर्व प्रेरणा मिळाली. ‘मन की बात’च्या प्रत्येक भागाच्या आधी आलेल्या पत्रांमध्ये, ऑनलाईन टिप्पणींमध्ये, आलेल्या दूरध्वनींवरून श्रोत्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, हे स्पष्ट होते. मोदी तर काय येतील आणि जातील. परंतु हा देश अढळ राहणार आहे, आपली संस्कृती अमर राहणार आहे. 130 कोटी देशवासियांच्या या छोट्या-छोट्या गोष्टी निरंतर जीवित राहणार आहेत. या देशाला नवीन प्रेरणा देत, नव्या उत्साहानं एका नव्या उंचीवर घेवून जातील. ज्या ज्यावेळी मी मागं वळून पाहतो, त्यावेळी मला खूप मोठं आश्चर्य वाटत असतं. देशातल्या दूरवरच्या, एका कोपऱ्यातल्या ठिकाणाहून कोणी तरी पत्र लिहून मला सांगत असतो, की आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांशी, ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांशी, भाजीपाला विकणाऱ्यांशी लोकांनी खूप जास्त मोल-भाव करू नये. मी अशी पत्रे वाचतो. अशाच काहीशा भावना दुसऱ्या एखाद्या पत्रामधून व्यक्त होत असतात, या सर्वांचा मेळ मी घालतो. त्याच्या जोडीला मला आलेल्या अनुभवांच्या दोन गोष्टीही आपल्याला सांगतो. शेअर करतो. या सगळ्या गोष्टी आता सर्व घरांघरांमध्ये, कुटुंबामध्ये पोहोचतात. समाज माध्यमं आणि ‘व्हॉटस् अप’वरूनही फिरतात आणि त्यातूनच परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल होते. आपण पाठवलेल्या स्वच्छतेच्या कथा, अनुभव, सामान्य लोकांची असंख्य उदाहरणे यामुळे घरांघरांमधून स्वच्छतेचे छोटे ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणजे ‘सदिच्छा दूत’ कधी निर्माण झाले हे लक्षातच आलं नाही. आता हेच स्वच्छतेचे छोटे सदिच्छा दूत घरातल्या मोठ्या लोकांना रोखताहेत. इतकंच नाही तर कधी-कधी तर फोन कॉल करून पंतप्रधानांनाही आदेश देत आहेत. आता ‘सेल्फी विथ डॉटर’सारखी मोहीम हरियाणा राज्यातल्या एका लहानशा गावात सुरू होवून संपूर्ण देशातच नाही तर परदेशातही पसरू शकते. अशी प्रचंड ताकद कोणत्या सरकारची असणार आहे. समाजाच्या विचारांमध्ये परिवर्तनाची एक नवी आधुनिक भाषा आहे. ही भाषा आजच्या पिढीला समजते. त्यामुळे याच माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाशी, प्रत्येक वर्गाशी, सेलेब्रिटींशी जोडलं गेल्यामुळे नवीन पिढीमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. कधी कधी ‘मन की बात’विषयी टिंगलही केली जाते. परंतु माझ्या मनामध्ये नेहमीच 130 कोटी देशवासी वास्तव्य करत असतात. त्यांचं मन, हेच माझं मन आहे. ‘मन की बात’ काही सरकारी ‘बात’ नाही. ही समाजाची गोष्ट, समाजाची चर्चा आहे. ‘मन की बात’ ही अॅस्परेशनल इंडिया म्हणजेच महत्वाकांक्षी भारताची गोष्ट आहे. भारताचा मूळ-प्राण काही राजकारण नाही, भारताचे मूळ-प्राण राजशक्तीसुद्धा नाही. भारताचा मूळ-प्राण हे समाजकारण आहे आणि समाज-शक्ती आहे. समाज जीवनाचे हजारो पैलू असतात. त्यामध्येच एक पैलू राजकारण हाही आहे. सगळं काही राजकारणच झालं तर ते समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने काही चांगलं लक्षण, चांगली व्यवस्था असणार नाही. कधी कधी राजकीय घटना आणि राजकारणातले लोक, इतके वरचढ ठरतात की, समाजातले इतर प्रतिभावंत त्यापुढे दबून जातात. भारतासारख्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जन-सामान्यांच्या प्रतिभेला सुयोग्य स्थान मिळाले पाहिजे. ही आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. आणि ‘मन की बात’ म्हणजे या दिशेने केलेला एक नम्र आणि छोटासा प्रयत्न आहे.
( फोन कॉल -2 )
‘‘नमस्कार पंतप्रधान जी! मी मुंबईवरून प्रोमिता मुखर्जी बोलतेय. सर ‘मन की बात’ चा प्रत्येक भाग हा सखोल अंतर्दृष्टी दर्शवणारा, खूप माहितीपूर्ण, सकारात्मक कथांचा आणि सर्व सामान्य लोकांच्या चांगल्या कामांची दखल घेणारा असतो. त्यामुळे मी आपल्याला विचारू इच्छिते की, प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी, आपण किती तयारी करीत असता?’’
(फोन कॉल समाप्त)
या फोन कॉलसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रश्नामध्ये एक प्रकारचा आपलेपणा जाणवतो. मला असं वाटतं की, ‘मन की बात’च्या 50 भागांचं सर्वात मोठं यश हेच आहे की, आपण पंतप्रधानांना नाही तर, जणू काही आपल्या एखाद्या निकटवर्तीयाला प्रश्न विचारत आहोत, अशी आपलेपणाची भावना त्यातून जाणवते. हीच तर खरी लोकशाही आहे. आपण जो प्रश्न विचारला आहे, त्याला अगदी साध्या शब्दामध्ये सरळ उत्तर द्यायचं झालं तर सांगतो- काहीही तयारी करीत नाही. वास्तविक ‘मन की बात’ माझ्यासाठी खूप सोप्पं काम आहे. कारण प्रत्येकवेळी ‘मन की बात’च्या आधी मला लोकांकडून पत्रं येतात. ‘मायगव्ह’ आणि ‘नरेंद्रमोदीअॅप’वर लोक आपले विचार ‘शेअर’ करीत असतात. एक टोल फ्री नंबर सुद्धा आहे – 1800 11 7800. या नंबरवर कॉल करून लोक आपला संदेश आपल्या आवाजामध्ये रेकॉर्डही करतात. ‘मन की बात’च्या प्रत्येक भागाच्या आधी जास्तीत जास्त पत्रं आणि टिप्पणी आपण स्वतः वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. त्याचबरोबर मी भरपूर फोन कॉल्सही ऐकतो. ‘मन की बात’च्या प्रसारणाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसा मी प्रवासाच्या काळात, आपल्याकडून पाठवलेल्या कल्पना, आपले ‘इनपुटस्’ यांचं मी अगदी बारकाईनं, काळजीपूर्वक वाचन करतो.
प्रत्येक क्षणी माझे देशवासी, माझ्या मनातच घर करून राहिलेले असतात आणि त्यामुळेच ज्यावेळी मी एखादं पत्र वाचतो, त्यावेळी त्या पत्रलेखकाची परिस्थिती, त्याच्या मनातले भाव, हे माझ्या विचारांचा एक भाग बनून जातात. अशावेळी मग ते पत्र काही केवळ कागदाचा एक तुकडा राहत नाही. जवळपास 40-45 वर्षे मी अखंडपणे एक ‘परिव्राजक’ म्हणूनच जीवन जगलो आहे. या काळामध्ये देशातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मी गेलो आहे. देशातल्या दुर्गम-अतिदुर्गम जिल्ह्यांमध्येही मी खूप काळ व्यतीत केला आहे. आणि यामुळेच ज्यावेळी मी पत्र वाचतो, त्यावेळी ते स्थान आणि त्याचे संदर्भ यांच्याशी अगदी सहजपणे जोडले जातो. मग मी काही वास्तविक गोष्टी, म्हणजे जसं की त्या गावाचे नाव, पत्रलेखकाचं नाव, यांच्या नोंदी करून ठेवतो. खरं सांगायचं झालं तर ‘मन की बात’ मध्ये हा आवाज माझा आहे. परंतु सर्व उदाहरणे, भावना आणि प्रेरणा तर माझ्या देशवासियांचीच आहे. ‘मन की बात’मध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी धन्यवाद देवू इच्छितो. ‘मन की बात’मध्ये आजपर्यंत ज्यांचं नाव मी घेवू शकलो नाही, असे लाखो लोक आहेत. परंतु हे लोक नाराज न होता, आपली पत्रे पाठवतात. टिप्पणी पाठवतात. माझ्या दृष्टीने आपल्या विचारांना, आपल्या भावनांना खूप महत्व आहे. पहिल्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त संख्येने आपल्या सगळ्यांची मते, प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळेच ‘मन की बात’ अधिकाधिक रोचक, प्रभावी आणि उपयुक्त बनेल. ज्या पत्रांना ‘मन की बात’मध्ये स्थान मिळू शकत नाही, त्या सर्व पत्रांना आणि त्यातील सल्ल्यांविषयी संबंधित विभागांनी लक्ष द्यावं,यासाठीही प्रयत्न केला जातो. आकाशवाणी, एफ.एम. रेडिओ, दूरदर्शन, इतर दूरचित्रवाणी वाहिन्या, समाज माध्यमांचे माझे सहकारी यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या परिश्रमामुळेच तर ‘मन की बात’ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतेय. आकाशवाणीची एक टीम प्रत्येक भाग वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये प्रसारणासाठी तयार करते. काही लोक तर अगदी मोदींच्या आवाजाशी मिळता-जुळता आवाज काढून आणि तशाच ‘शैली’मध्ये बोललेल्या प्रादेशिक भाषांमध्ये ‘मन की बात’ ऐकतात. एका त-हेने ते त्या 30 मिनिटांसाठी नरेंद्र मोदीच बनतात. या लोकांकडे असलेल्या त्यांच्या हुशारीसाठी आणि ते दाखवत असलेल्या कौशल्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी हा कार्यक्रम आपल्या स्थानिक भाषेतही अवश्य ऐकावा, असा माझा आपल्या सर्वांना आग्रह आहे. ज्या वाहिन्यांवर ‘मन की बात’चे अगदी नियमित प्रसारण केले जाते, त्या सर्व वाहिन्यांना, प्रसार माध्यमातल्या माझ्या या सर्व सहकारी मंडळींना अगदी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही राजकीय व्यक्ती प्रसार माध्यमांविषयी कधीच आनंदी असत नाही. आपल्याला खूप कमी प्रसिद्धी दिली जाते, असं त्या राजकीय नेत्याला वाटत असतं. इतकंच नाही तर, आपल्याविषयी जे काही प्रसिद्ध केलं जातं, प्रसारित केलं जातं, ते नकारात्मक आहे, असंही वाटत असतं. परंतु ‘मन की बात’ मध्ये ज्या विषयांची चर्चा करण्यात आली त्यापैकी अनेक विषय प्रसार माध्यमांनीही उचलून धरले. स्वच्छता, रस्ते सुरक्षा, अंमली पदार्थमुक्त भारत, सेल्फी विथ डॉटर, यासारखे अनेक विषय आहेत, त्या विषयांवर प्रसार माध्यमांनी नवनवीन संकल्पना तयार करून त्याला एखाद्या अभियानाचे स्वरूप दिले आणि त्या क्षेत्रात पुढे भरपूर काम केले. दूरचित्रवाणी वाहिन्यांनी या कार्यक्रमाला ‘मोस्ट वॉचड् रेडिओ प्रोग्रॅम’ बनवले. प्रसार माध्यमांचे मी अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. आपल्या सहकार्याशिवाय ‘मन की बात’ चहा प्रवास अपूर्ण राहिला असता.
(फोन कॉल -3 )
‘‘नमस्कार मोदी जी! मी उत्तराखंडमधल्या मसुरी इथून निधी बहुगुणा बोलतेय. मी दोन युवा मुलांची आई आहे. सर्वसाधारणपणे युवा वयोगटातल्या मुलांनी नेमकं काय करावं, हे कोणी त्यांना सांगितलं तर ते पटत नाही आणि असं कोणी काही सांगणं त्यांना आवडतही नाही. आता सांगणाऱ्यांपैकी मग कोणी शिक्षक असतील किंवा त्यांचे माता-पिता असतील. परंतु ज्यावेळी आपण ‘मन की बात’ करता, आणि त्यामध्ये जर काही मुलांशी संबंधित आपण काही त्यामधून बोलता ती गोष्ट मात्र मुलांना अगदी छान समजते. तुम्ही बोलता तो विषय मुलांना मनापासून आवडतो, असाच विषय तुम्हीही मांडता. ज्याप्रमाणे आपण बोलता किंवा जो कोणताही विषय आपण मांडता, तो मुलांना चांगल्या पद्धतीने समजतो आणि ते त्या विचारांची अंमलबजावणीही करतात, हे विशेष आहे. मला वाटतं की, आपण यामागचं ‘सिक्रेट’सांगावं. हे गुपित आपण ‘शेअर’ करणार का? धन्यवाद!’’
( फोन कॉल समाप्त )
निधी जी, आपण फोन केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद! अगदी खरं सांगायचं तर माझ्याकडं असं कोणतंही सिक्रेट किंवा गुपित नाही. जे काही मी करतो, ते सगळ्या कुटुंबामध्येही होत असणारच. अगदी सोप्या, सरळ भाषेत सांगायचं झालं तर मी त्या युवकांच्या जागी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यामध्ये आपण आहोत, असं समजून विचार करतो. अशा वेळेस विचारांशी जुळवून घेत, सामंजस्य कसे राहील, याचा प्रयत्न करतो. आपल्या आयुष्यात भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचं ओझं आपण जर नेहमीच घेऊन जगत असू तर मात्र ती आपल्या आड येणार. म्हणून हा भार मधेमधे येणार नाही, हे आपण पाहिलं की, समोरच्या कुणालाही समजून घेणं खूप सोपं जातं. कधी-कधी आपले पूर्वग्रहसुद्धा संवाद साधण्यामध्ये खूप मोठ्या संकटासारखे उभे राहतात. स्वीकार-अस्वीकार आणि प्रतिक्रिया यांच्याशिवाय समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, ते समजून घेण्याला मी प्राधान्य देत असतो. अशावेळी समोरची व्यक्तीसुद्धा आपलं मन वळवण्यासाठी अनेक तर्क मांडून दबाव निर्माण करण्याऐवजी सामंजस्याने आपली मनं जुळवण्याचा प्रयत्न करतो, असा माझा अनुभव आहे. यामुळेच मग ‘कम्युनिकेशन गॅप’ संपुष्टात येते आणि मग पुन्हा एकप्रकारे तो विशिष्ट विचार घेऊन आपण दोघेही सहप्रवासी बनतो. अशावेळी मग दोघांनाही लक्षात येत नाही की, आपण कसा काय आणि कधी आपला विचार मागे टाकला, सोडला आणि दुसऱ्याचा स्वीकार केला. समोरच्या व्यक्तीचा विचार कधी आपला झाला, हे त्याच्या लक्षातही येत नाही. आजच्या युवकांकडे एक गुण आहे, तो म्हणजे या तरूणांचा, स्वतःचा ज्या गोष्टीवर विश्वास नाही, ती गोष्ट,ते काम ही मुलं कधीच करणार नाहीत. आणि जर एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असेल तर मग मात्र त्यासाठी सर्व काही सोडून, अगदी सर्व पणाला लावून त्याच गोष्टीच्या मागे लागतील. साधारणपणे कुटुंबामधली मोठी, वयस्क मंडळी आणि कुमार वयोगटातली मुलं, यांच्यामध्ये असलेल्या ‘कम्युनिकेशन गॅप’ याविषयी नेहमीच चर्चा होते. वास्तविक बहुतांश घरांमध्ये कुमारवयीन मुलांशी आणि मुलांविषयी चर्चा करण्याचे विषयही मर्यादित असतात. यामध्ये जास्त वेळ तर मुलांचा अभ्यास किंवा त्यांच्या सवयी तसंच त्यांचे आत्ताचे राहणीमान याविषयांवर चर्चा होते. ‘तू असं कर- असं करू नकोस’ असं बोलणं घरांमध्ये होतं. कोणत्याही अपेक्षा न ठेवता अगदी मोकळ्या मनाने घरामध्ये चर्चा होत नाही. हळू-हळू कुटुंबामध्येही असं मोकळं बोलणं कमी होत चाललं आहे, हा सुद्धा आता चिंतेचा विषय बनला आहे.
एक्सपेक्ट ऐवजी एक्सेप्ट म्हणजे अपेक्षांऐवजी स्वीकार आणि डिसमिस करण्याऐवजी डिस्कस म्हणजे रद्द करण्याऐवजी चर्चा करणे, असे धोरण ठेवलं तर संवाद प्रभावी होऊ शकेल. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून तसेच समाज माध्यमातून युवावर्गाशी सातत्याने चर्चा करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो. ते जे काही करत आहेत किंवा कशा पद्धतीने ही मुलं विचार करतात, त्यांच्याकडून वेगळं, नवं काही शिकता येईल का, यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो. युवा पिढीकडे नेहमीच नवनवीन कल्पनांचे जणू भांडार असते. ही मुलं खूप उत्साही, नवकल्पना मांडणारी आणि विशेष म्हणजे अगदी ‘फोकस्ड’ असतात. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी युवकांच्या प्रयत्नांना, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींना, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमीच एक तक्रार केली जाते की, युवक खूप सारे प्रश्न विचारतात. मला मात्र हे नवयुवक जास्त प्रश्न विचारतात ते आवडतं. याचा अर्थ असा आहे की, समोर दिसणाऱ्या सर्व गोष्टीं अगदी मुळातून समजून घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, हे चांगलं आहे, असं मला वाटतं. काही लोकांना युवकांमध्ये धैर्य नाही, असं वाटतं. परंतु मला वाटतं की, आजच्या युवकांजवळ वाया घालवण्यासाठी वेळच नाही. आजच्या नवयुवकांमधील अधीरताच अधिकाधिक नाविन्यपूर्ण कल्पनांना जन्म देतेय. कारण कोणतीही गोष्ट आजच्या मुलांना फार वेगानं करायची असते. आपल्याला वाटतं, आजचे युवक खूप, अति महत्वाकांक्षी आहेत आणि त्यांच्या डोक्यात खूप मोठमोठे विचार असतात. मला तर हे खूप छान वाटतं. मोठी स्वप्न त्यांनी पहावीत आणि खूप मोठे यश मिळवावे. अखेरीस हाच तर ‘नव भारत’ आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, युवा पिढीला एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची इच्छा असते. मी म्हणतो- यामध्ये वाईट काय आहे? ही मुलं ‘मल्टीटास्किंग’मध्ये पारंगत आहेत, त्यामुळेच ती एकाचवेळी अनेक गोष्टी करू शकतात. आपण जर सभोवताली नजर टाकली तर दिसेल की सोशल एंट्राप्रिनरशिप असेल, स्टार्ट-अप्स असेल, स्पोर्टस् असेल किंवा इतर कोणतेही क्षेत्र घ्या. समाजामध्ये खूप मोठे परिवर्तन आणणारी ही युवा मंडळीच आहेत. याच युवकांनी प्रश्न विचारण्याचे आणि मोठमोठी स्वप्न पाहण्याचे धाडस दाखवले आहे, त्याच युवकांनी हे परिवर्तन घडवून आणले आहे. जर आपण युवकांच्या विचारांना प्रत्यक्षात आणलं आणि त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी अगदी मोकळे वातावरण दिले तर हे युवक देशामध्ये सकारात्मक परिवर्तन आणू शकतात. आणि हे युवक असे बदल घडवून आणतही आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गुरुग्राम इथून विनीता जी यांनी ‘मायगव्ह’वर लिहिले आहे की, ‘मन की बात’ मध्ये उद्या म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी येणाऱ्या ‘संविधान दिन’ म्हणजे ‘राज्यघटना दिवसा’विषयी मी बोललं पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की, हा दिवस खूप विशेष आहे. कारण आपण राज्यघटनेचा स्वीकार केला त्याला आता 69 वर्ष झाली असून, 70 व्या वर्षात प्रवेश करणार आहोत.
विनीता जी, आपण सूचित केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!
खरंय, उद्या ‘संविधान दिवस’ आहे. ज्या महान लोकांनी आपली राज्यघटना तयार केली त्या महनीय व्यक्तींचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपल्या घटनेचा स्वीकार करण्यात आला. घटनेचा मसुदा करण्यासारखे ऐतिहासिक कार्य पूर्ण करण्यासाठी घटना समितीला दोन वर्ष, अकरा महिने आणि 17 दिवसांचा कालावधी लागला. कल्पना करा अवघ्या तीन वर्षांच्या आत या महान विभूतींनी आपली इतकी व्यापक आणि विस्तृत घटना तयार केली. या महान लोकांनी ज्याप्रकारे इतक्या वेगाने घटनेचा मसुदा तयार केला, हे कार्य म्हणजे आजही ‘वेळेचे व्यवस्थापन आणि उत्पादकता यांचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यावरून आपण त्याला आपल्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ‘राज्यघटना समिती’ म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता. त्यामध्ये सहभागी असलेला प्रत्येकजण भारतातले लोक सशक्त कसे बनतील, गरीबातला गरीब माणसू समर्थ कसा बनेल, याचाच विचार करून आपल्या देशासाठी घटना तयार करण्यासाठी कटिबद्ध होता.
आपल्या राज्यघटनेमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, अधिकार आणि कर्तव्य म्हणजेच राईटस् आणि ड्युटीज्, यांच्याविषयी अगदी विस्तारपूर्वक वर्णन करण्यात आले आहे. नागरिकांच्या जीवनामध्ये या दोन्हींचा ताळमेळ देशाला पुढे घेऊन जाणार आहे. जर आपण दुसऱ्यांच्या अधिकारांचा आदर, सन्मान केला तर आपल्या अधिकारांचे रक्षण आपोआपच होणार आहे. आणि याचप्रमाणे जर आपण राज्यघटनेमध्ये दिलेल्या आपल्या कर्तव्यांचे पालन केले तरीही आपल्या अधिकारांचे रक्षण आपोआप होणार आहे. भारताच्या प्रजासत्ताकाला 60 वर्ष झाली होती, त्यावेळी 2010मध्ये आम्ही गुजरातमध्ये हत्तीवर राज्यघटना ठेवून एक शानदार शोभायात्रा काढली होती, हे मला अजूनही चांगलंच आठवतंय. युवावर्गामध्ये राज्यघटनेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना राज्यघटनेतील महत्वाच्या पैलूंची माहिती व्हावी, त्यांना राज्यघटनेविषयी जोडण्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न संस्मरणीय ठरला. आता 2020 मध्ये एक स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून आपण 70 वर्ष पूर्ण करणार आहोत. आणि 2022 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होणार आहेत.
चला तर मग या, आपण सर्वजण आपल्या राज्यघटनेतल्या मूल्यांना पुढे घेऊन जाऊ या. आणि आपल्या देशामध्ये पीस, प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी म्हणजेच शांतता, प्रगतीआणि समृद्धी नांदेल हे सुनिश्चित करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, राज्यघटना समिती याविषयी ज्यावेळी चर्चा केली जाते, त्यावेळी ज्या महापुरुषाचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. ही महनीय व्यक्ती राज्यघटना समितीच्या केंद्रस्थानी होती. हे महापुरूष होते, पूजनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर. 6 डिसेंबरला त्यांचा महा-परिनिर्वाण दिवस आहे. मी सर्व देशवासियांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. ज्यांनी कोट्यवधी भारतीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. लोकशाही डॉ. बाबासाहेब यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. आणि ते म्हणायचे की, भारतामध्ये लोकशाही मूल्ये काही बाहेरून आलेली नाहीत. प्रजासत्ताक काय असते आणि संसदीय व्यवस्था कशी असते, ही भारतासाठी काही नवीन गोष्ट नाही. राज्यघटना समितीमध्ये त्यांनी एक खूपच भावूक आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते, इतक्या संघर्षानंतर आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य अमूल्य आहे. त्याचं रक्षण आपण आपल्या रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत करायचे आहे. ते आणखी असंही म्हणत होते की, आपण भारतीय भले वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहोत, हे मान्य. तरीही सर्वांनी देशहित इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वात वरचे, सर्वात महत्वाचे ठेवले पाहिजे. ‘इंडिया फर्स्ट ’हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र होता. पुन्हा एकदा पूज्य डॉ. बाबासाहेब यांना विनम्र श्रद्धांजली.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन दिवसांपूर्वीच, 23 नोव्हेंबरला आपण सर्वांनी श्री गुरूनानक देवजी यांची जयंती साजरी केली आणि पुढच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये आपण त्यांचे 550 वे प्रकाश पर्व साजरे करणार आहोत. गुरूनानक देवजी यांनी नेहमीच संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विचार केला. त्यांनी समाजाला नेहमीच सत्य, कर्म, सेवा, करूणा आणि सौहार्दाचा मार्ग दाखवला. देश पुढच्या वर्षी गुरूनानक देव जी यांचा 550 वा जयंती कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचे रंग फक्त आपल्या देशातच नाही, तर विदेशात, संपूर्ण दुनियेत रंगतील. सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांनाही हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकारे गुरूनानक देव जी यांचे 550 वे प्रकाश पर्व विश्वभरातल्या सर्व देशांमध्ये साजरे करण्यात येईल. याचबरोबर गुरूनानक जी यांच्याशी संबंधित असलेल्या पवित्र स्थानांच्या मार्गावर एक रेल्वे गाडीही सोडण्यात येणार आहे. अलिकडेच या कामाशीसंबंधित घेण्यात आलेल्या बैठकीत मी सहभागी झालो होतो. त्यावेळी मला लखपत साहिब गुरूव्दाराची आठवण झाली. गुजरातमध्ये 2001मध्ये झालेल्या भूकंपाच्या काळात या गुरूव्दाराचे खूप मोठे नुकसान झाले होते. परंतु स्थानिक लोकांच्या सहकार्याने राज्य सरकारने या गुरूव्दाराच्या जीर्णेाद्धाराचे ज्याप्रकारे कार्य केले आहे, ते आजही एक आदर्श ठरणारे आहे.
करतारपूर कॉरिडॉर बनवण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामुळे आमच्या देशातले यात्रेकरू अगदी सहजतेने पाकिस्तानमधल्या करतारपूर मध्ये गुरूनानक देव जी यांच्या त्या पवित्र स्थानाचे दर्शन करू शकतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 50 व्या भागानंतर आपण पुन्हा एकदा पुढच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत. आणि मला विश्वास आहे की आजच्या ‘मन की बात’मध्ये या कार्यक्रमामागे कोणती भावना आहे, हे आपल्यासमोर सांगण्याची पहिल्यांदाच संधी मला मिळाली. कारण आपणच आज असे प्रश्न विचारले होते, त्यांच्या उत्तरादाखल हे मला सांगता आले. परंतु आपला हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आपल्या सर्वाबरोबर जितके जास्त लोक जोडले जातील,तितका आपला प्रवास अधिक चांगला आणि प्रत्येकाला आनंद देणारा होणार आहे. कधी-कधी लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की, ‘मन की बात’मुळे मला काय मिळते? मी आज सांगू इच्छितो की, ‘मन की बात’ला जे अभिप्राय मिळतात, त्यामध्ये एक गोष्ट माझ्या मनाला खूप स्पर्श करणारी असते. बहुतांश लोकांनी हे सांगितलं आहे की, ज्यावेळी आम्ही कुटुंबातले सर्व लोक एकत्रितपणे बसून ‘मन की बात’ ऐकतो, त्यावेळी असं वाटतं की, आमच्या परिवारामधला मोठा माणूस, आमचा कुटुंबप्रमुख आमच्यामध्ये बसून, तुमच्या-आमच्या गोष्टी आपल्याबरोबर ‘शेअर’ करतोय. ही भावना अगदी व्यापक आहे, असं ज्यावेळी मला समजलं, त्यावेळी मला खरोखरीच खूप आनंद झाला. मी आपणा सर्वांचा आहे. आपल्यामधलाच आहे. आपल्यामध्ये आहे. आपण लोकांनीच मला मोठं बनवलं आहे. आणि एकाप्रकारे मी सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून ‘मन की बात’च्या माध्यमातून वरचेवर येत राहणार आहे. आपल्याशी जोडला जाणार आहे . आपली सुखं-दुःखं ही माझी सुखं-दुःखं आहेत. आपल्या आकांक्षा या माझ्या आकांक्षा आहेत. आपल्या महत्वाकांक्षा या माझ्या महत्वाकांक्षा आहेत.
या तर मग, हा प्रवास आपण असाच पुढे सुरू ठेवूया.
खूप-खूप धन्यवाद!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्वाना नमस्कार! 31 ऑक्टोबरला आपल्या सर्वांचे लाडके सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही `रन फॉर युनिटी’ साठी देशातील तरुण वर्ग ऐक्यासाठी धावण्यास सज्ज झाला आहे. आता तर हवामानही अत्यंत सुखद असते. हे हवामान `रन फॉर युनिटी’ साठीचा उत्साह वाढवणारे असते. आपण सर्व जण खूप मोठ्या संख्येने ऐक्यासाठीच्या या धावण्याच्या स्पर्धेत जरूर सहभाग घ्याच, असा माझा आग्रह आहे. स्वातंत्र्यापूर्वी जवळपास सहा महिने अगोदर, 27 जानेवारी 1947 ला जगातले प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिक `टाईम’ मासिकानं जी आवृत्ती प्रकाशित केली होती, त्याच्या मुखपृष्ठावर सरदार पटेल यांच छायाचित्र छापलं होतं. आपल्या आवरण कथेत त्यांनी भारताचा एक नकाशा छापला होता आणि तो नकाशा जसा आज आम्ही पाहतो, तसा नव्हता. हा अशा भारताचा नकाशा होता, जो अनेक भागांमध्ये खंडित झाला होता. तेव्हा 550 हून अधिक संस्थाने देशात होती. भारतातील इंग्रजांचा रस संपला होता तरीही ते या देशाला अनेक भागांत तोडून, छिन्नविच्छिन्न करून मग देश सोडून जाऊ पाहत होते. `टाईम’ मासिकानं लिहिलं होतं की, भारतावर फाळणी, हिंसाचार,अन्नधान्य टंचाई, महागाई आणि सत्तेचे राजकारण यांसारख्या धोक्याचे ढग घोंघावत आहेत. पुढे `टाईम’ मासिकानं लिहिलं की, या सर्वांमध्ये देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याची आणि जखमा भरून आणण्याची क्षमता जर कुणात असेल तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. `टाईम’ मासिकाचा हा वृत्तांत लोहपुरुषाच्या जीवनातील इतरही अनेक पैलू उघड करणारा होता. 1920 च्या दशकात अहमदाबादमध्ये आलेल्या पुरानंतर बचाव कार्याची कशी व्यवस्था त्यांनी केली, बारडोली सत्याग्रहाला त्यांनी कशी दिशा दिली. देशाप्रती त्यांचा प्रामाणिकपणा आणि कटीबद्धता अशी होती की, शेतकरी, मजुरांपासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वच जणांचा त्यांच्यावर विश्वास होता. गांधीजींनी सरदार पटेल यांना म्हटले की, राज्यांच्या समस्या इतक्या अवघड आहेत की, फक्त आपणच त्यावर तोडगा काढू शकता आणि सरदार पटेल यांनी एक एक करून सर्व समस्यांवर तोडगा काढला आणि देशाला ऐक्याच्या धाग्यात गुंफण्याचं अशक्यप्राय कार्य पूर्ण करून दाखवलं. त्यांनी सर्व संस्थानांचं भारतात विलीनीकरण घडवून आणलं. जुनागढ असो की हैदराबाद, त्रावणकोर असो की राजस्थानातील राजवटी- सरदार पटेल यांची वैचारिक परिपक्वता आणि धोरणात्मक कौशल्य यामुळेच आज आपण एकसंध भारत पाहू शकत आहोत. ऐक्याच्या बंधनात बांधल्या गेलेल्या या राष्ट्राला, आमच्या भारतमातेला पाहून आम्ही स्वाभाविकच सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुण्यस्मरण करतो. यंदाच्या 31 ऑक्टोबरला साजरी होणारी सरदार पटेल यांची जयंती तर आणखीच विशेष असेल- त्या दिवशी सरदार पटेल यांना खरीखुरी श्रद्धांजली देताना आपण ऐक्याचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी राष्ट्राला समर्पित करू. गुजरातेतल्या नर्मदा नदीच्या किनार्यावर उभारलेल्या गेलेल्या या पुतळ्याची उंची अमेरिकेतल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी पुतळ्याच्या उंचीपेक्षा दुप्पट आहे. हा पुतळा जगातला सर्वात उंच गगनचुंबी पुतळा आहे. प्रत्येक भारतीयाला आता याचा अभिमान वाटेल की, जगातला सर्वात उंच पुतळा भारतभूमीवर आहे. सरदार पटेल, ज्यांचे नाते जमिनीशी होते, ते आता आकाशाची शोभाही वाढवतील. मला आशा आहे की, देशातला प्रत्येक नागरिक भारतमातेच्या या महान यशाप्रती जगासमोर गर्वाने छाती पुढे कडून, मान ताठ करून याचे गौरवगीत गाईल आणि स्वाभाविकपणे प्रत्येक भारतीयाला स्टॅच्यु ऑफ युनिटी पहावा वाटेल. आणि मला असा विश्वास आहे की, भारताच्या प्रत्येक कानाकोपर्यातले लोक, आता या स्थानालाही एक लाडकं पर्यटन स्थळ म्हणून पसंत करतील.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, कालच आपण सर्व देशवासीयांनी इन्फंट्री डे साजरा केला. जे भारतीय सैन्याचे सदस्य आहेत, त्या सर्वाना मी वंदन करतो. मी आपल्या सैनिकांच्या परिवारातल्या सदस्यांनाही त्यांच्या धाडसाबद्दल सॅल्युट करतो, पण आपल्याला ठाऊक आहे का, आम्ही सर्व भारतीय नागरिक हा इन्फंट्री डे का मानतो? हा तोच दिवस आहे, ज्या दिवशी भारतीय सैन्यातले जवान काश्मीरच्या धरतीवर उतरले आणि घुसखोरांपासून खोर्याचे संरक्षण केले. या ऐतिहासिक घटनेचा सरदार वल्लभभाई पटेल यांच्याशी थेट संबंध आहे. मी भारताचे महान लष्करी अधिकारी सॅम माणिकशॉ यांची एक जुनी मुलाखत वाचत होतो. त्या मुलाखतीत फिल्ड मार्शल माणिकशॉ ते कर्नल असतानाच्या काळातील आठवणी सांगत होते. याच दरम्यान, 1947 च्या ऑक्टोबरमध्ये, काश्मीरमध्ये लष्करी मोहीम सुरु झाली होती. एका बैठकीत त्या वेळी काश्मिरात सैन्य पाठवायला उशीर होत असलेला पाहून पटेल कसे नाराज झाले होते, ते फिल्ड मार्शल माणिकशॉंनी सांगितलं. सरदार पटेल यांनी आपल्या खास करड्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि काश्मीरमध्ये सैन्य पाठवायला जराही उशीर केला जाऊ नये आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघाला पाहिजे, असं सांगितलं. त्यानंतरच सैनिकांनी काश्मीरसाठी उड्डाण केले आणि सेनेला कसे यश मिळाले, ते आपण पाहिलेच. 31 ऑक्टोबरला आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीही आहे. इंदिराजींना आदरपूर्वक श्रद्धांजली.
माझ्या प्रिय देशवासियांनो, खेळ कुणाला आवडत नाही? खेळांच्या जगात स्पिरीट, स्ट्रेंग्थ, स्किल, स्टॅमीना- या साऱ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या एखाद्या खेळाडूच्या यशस्वीतेच्या कसोट्या असतात आणि हेच चारही गुण एखाद्या राष्ट्राच्या निर्माणात महत्वपूर्ण असतात. ज्या देशाच्या युवकांमध्ये हे गुण असतात तो देश केवळ अर्थव्यवस्था, विज्ञान आणि टेक्नॉलॉजी यासारख्या क्षेत्रांतच प्रगती करेल असे नाही तर स्पोर्ट्समध्येही आपला झेंडा फडकवेल. नुकत्याच माझ्या आठवणीत राहतील अशा दोन भेटी झाल्या. पहिली जकार्तात झाली. आशियाई पॅरा गेम्स 2018 मध्ये सहभागी झालेल्या आमच्या पॅरा अॅथलिट्सना भेटायची संधी मिळाली. या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 72 पदकं जिंकून नवा विक्रम रचला आणि भारताचा सन्मान वाढवला. या सर्व प्रतिभाशाली पॅरा अॅथलिट्सना व्यक्तीशः भेटायचं भाग्य मला लाभलं आणि मी त्यांचं अभिनंदन केलं. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीशी लढून पुढे जाण्याची त्यांची जिद्द सर्व देशवासियांना प्रेरणा देणारी आहे. याच प्रकारे अर्जेंटिनामध्ये झालेल्या समर युथ ऑलिम्पिक्स 2018 च्या विजेत्यांना भेटायची संधी मिळाली. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की, युथ ऑलिम्पिक्स 2018 मध्ये आपल्या युवकांनी आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत आम्ही 13 पदकांशिवाय मिक्स प्रकारांमध्ये आणखी तीन पदके मिळवली. आपल्याला आठवत असेलच की, यंदाच्या आशियाई गेम्समध्येही भारताची कामगिरी उत्तम राहिली. पहा, काही मिनिटांपासून बोलताना मी किती वेळा आतापर्यंतची सर्वात चांगली, सर्वात शानदार असे शब्द वापरले. ही भारतीय खेळांची कहाणी आहे, जी दिवसेंदिवस नवनवी उंची गाठत आहे. भारत केवळ खेळांमध्येच नाही तर अशा क्षेत्रांमध्येही विक्रम रचतोय ज्यांच्या बाबत कधी विचारही केला गेला नव्हता. उदाहरण म्हणून मी आपल्याला पॅरा अॅथलिट नारायण ठाकूर यांच्याबाबतीत सांगू इच्छितो. त्यांनी 2018 च्या आशियाई पॅरा गेम्स मध्ये देशासाठी अॅथलेटीक्समध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. ते जन्मापासून दिव्यांग आहेत. ते आठ वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील वारले. नंतर आठ वर्षे एका अनाथाश्रमात काढली. अनाथाश्रम सोडल्यानंतर जीवनाची गाडी चालवण्याकरता डीटीसीच्या बसची सफाई करण्याचे आणि दिल्लीतल्या रस्त्यांवरील ढाब्यांमध्ये वेटर म्हणून काम केले. आज तेच नारायण आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकत आहेत. इतकंच नाही तर, खेळांमधील भारताच्या उत्तम कामगिरीचा वाढता आवाका पहा, भारताने जुडोमध्ये कधीही सिनियर किंवा ज्युनियर स्तरावर कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही. परंतु, तबाबी देवीने युवा ऑलिम्पिक्समध्ये जुडोत रजत पदक जिंकून इतिहास रचलाय. 16 वर्षांची युवा खेळाडू तबाबी देवी मणिपूरच्या एका गावातली राहणारी आहे. त्यांचे वडील मजूर आहेत तर आई मासे विकण्याचे काम करते. अनेक वेळा त्यांच्या कुटुंबावर अशी वेळ आली की, त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. अशा परिस्थितीतही तबाबी देवीचे मनोबल ढासळले नाही. आणि त्यांनी देशासाठी पदक जिंकून इतिहास घडवला. अशा तर असंख्य कहाण्या आहेत. प्रत्येक आयुष्य एक प्रेरणा स्त्रोत आहे. प्रत्येक युवा खेळाडू आणि त्याची जिद्द नव्या भारताची ओळख आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण 2017 मध्ये फिफा 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचं यशस्वी आयोजन केलं. संपूर्ण जगानं अत्यंत यशस्वी क्रीडास्पर्धा घेतल्याबद्दल त्याची प्रशंसा केली होती. फिफा अंडर सेव्हनटीन वर्ल्ड कपमध्ये प्रेक्षकांच्या संख्येच्या बाबतीत एक नवीन विक्रम रचला गेला होता. देशातल्या वेगवेगळ्या स्टेडीयममध्ये 12 लाखाहून अधिक लोकांनी फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटला आणि युवक खेळाडूंचा उत्साह वाढवला. यंदाच्या वर्षी भारताला भुवनेश्वरमध्ये पुरुष हॉकी कप 2018 चं आयोजन करायचं भाग्य प्राप्त झालं आहे. हॉकी वर्ल्ड कप 2018 नोव्हेंबरमध्ये सुरु होत असून 16 डिसेंबरपर्यंत चालेल. प्रत्येक भारतीय कोणताही खेळ खेळत असो किंवा कोणत्याही खेळत त्याला रस असो, हॉकी प्रती त्याच्या मनात एक आत्मीयता असतेच. हॉकीमध्ये भारताचा इतिहास सुवर्णाने लिहिण्यासारखा राहिला आहे. पूर्वी भारताला अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकं मिळाली आहेत आणि एका वेळेस तर भारत विश्व चषक विजेताही राहिला आहे. भारताने हॉकीला अनेक महान खेळाडूही दिले आहेत. जगात जेव्हा जेव्हा हॉकीची चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या महान खेळाडूंशिवाय हॉकीची कथा अपुरी राहील. हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांना तर संपूर्ण जग ओळखते. त्यांच्यानंतर बलविंदर सिंग सिनियर, लेस्ली ग्लोडीयस, मोहम्मद शाहीद, उधम सिंग यांच्यापासून ते धनराज पिल्लेपर्यंत हॉकीने मोठा प्रवास केला आहे. आजही टीम इंडियाचे खेळाडू आपले श्रम आणि निष्ठेमुळे मिळणार्या यशातून हॉकीच्या नव्या पिढीला प्रेरित करत आहेत. क्रीडा प्रेमींसाठी रोमांचक सामने पाहण्याची एक चांगली संधी आहे. भुवनेश्वरला त्यांनी जावं आणि केवळ भारतीयच नव्हे तर इतर संघांनाही प्रोत्साहन द्यावं. ओडिशा असं राज्य आहे, ज्याचा गौरवशाली इतिहास आहे, समृद्ध, सांस्कृतिक परंपरा आहे आणि तिथले लोकही उत्साहाने भरलेले असतात. क्रीडाप्रेमींसाठी ही ओडिशा दर्शनाची खूप मोठी संधी आहे. या दरम्यान तुम्ही खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच कोणार्कचे सूर्य मंदिर, पुरीमधले भगवान जगन्नाथ मंदिर आणि चिलका सरोवरासह अनेक जगप्रसिद्ध प्रेक्षणीय आणि पवित्र स्थळंही पाहू शकता. मी या स्पर्धेसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा देतो आणि सव्वाशे कोटी भारतीय त्यांच्याबरोबर आणि समर्थनासाठी उभे आहेत, अशी खात्री देतो. भारतात येणाऱ्या सर्व जगातल्या संघानाही मी खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सामाजिक कार्यासाठी ज्या प्रकारचे लोक पुढे येत आहेत, त्यासाठी स्वयंसेवा करत आहेत, ते सर्व देशवासीयांसाठी प्रेरणादायक आणि उत्साह भरणारे आहे. सेवा परमो धर्म: ही भारताची परंपरा आहे. अनेक शतकं जुनी आमची परंपरा आहे आणि समाजाच्या प्रत्येक कोपर्यात, प्रत्येक क्षेत्रात त्याचा सुगंध आपल्याला आजही जाणवतो. परंतु नव्या युगात, नव्या पद्धतीने, नवी पिढी, नव्या आशेने, नव्या उत्साहाने, नवीन स्वप्नं घेऊन हे कार्य करण्यासाठी आज पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, जिथे एक पोर्टल सुरु करण्यात आली आहे, तिचे नाव आहे सेल्फ फोर सोसायटी. ‘Mygov’ आणि देशाच्या आयटी तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योगाने आपल्या कर्मचार्यांना सामाजिक उपक्रमांसाठी उत्साहित करून त्यांना अशी संधी उपलब्ध करून द्यायला, हे पोर्टल सुरू केले आहे. या कार्यासाठी त्यांच्यात जो उत्साह आणि आत्मीयता आहे, ते पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. आयटी ते सोसायटी, मी नाही आम्ही, अहं नाही वयं, स्व ते समष्टीच्या प्रवासाचा सुगंध यात आहे. कुणी मुलांना शिकवीत आहे तर कुणी ज्येष्ठ नागरिकांना शिकवत आहे, कुणी स्वच्छतेच्या कार्यात लागला आहे तर कुणी शेतकर्यांना मदत करतोय आणि हे सर्व करण्यामागे कोणती लालसा नाही तर समर्पण आणि संकल्पाची नि:स्वार्थी भावना आहे. एक तरुणाने तर दिव्यांगांच्या व्हील चेअर बास्केटबॉल संघाला मदत करायला स्वतः व्हील चेअर बास्केटबॉल शिकला. ही जी भावना आहे, समर्पण आहे, हे विशिष्ट कार्यासाठी झपाटून केलेला उपक्रम आहे. कोणत्याही भारतीयाला याचा अभिमान वाटणार नाही काय? निश्चितच वाटणार. `मी नाही आम्ही’ ही भावना आम्हाला सर्वाना प्रेरित करेल.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, या वेळी मी जेव्हा `मन की बात’ साठी लोकांच्या आलेल्या सूचना पाहत होतो, तेव्हा मला पुद्दुचेरीहून श्री मनीष महापात्र यांची एक मनोरंजक टिप्पणी पाहायला मिळाली. त्यांनी Mygov वर लिहिलं आहे की, कृपया आपण `मन की बात’ मध्ये भारतातल्या अनेक जमातीचे रितीरिवाज आणि परंपरा निसर्गाशी असलेल्या सहअस्तित्वाचं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे, यावर बोलावं. शाश्वत विकासाकरता कशा प्रकारे आम्ही त्यांच्या परंपरा आम्ही आपल्या जीवनात स्वीकारायची गरज आहे, त्यांच्याकडून काही शिकायची आवश्यकता आहे. मनीषजी, हा विषय `मन की बात’ च्या श्रोत्यापुढे ठेवण्यासाठी मी आपले कौतुक करतो. हा असा विषय आहे की जो आम्हाला आमची गौरवशाली इतिहास आणि संस्कृतीकडे पाहायला प्रेरित करतो. आज सारे जग विशेषत: पाश्चात्त्य देश पर्यावरण संरक्षणावर चर्चा करत आहेत आणि संतुलित जीवनशैलीसाठी नवीन मार्ग शोधत आहेत. तसे आमचे भारतवर्षही या समस्येपासून सुटलेले नाही, परंतु यावर तोडगा काढायला आम्हाला केवळ आमचा अंतर्शोध घ्यायचा आहे, आमचा समृद्ध इतिहास,परंपरा पहायच्या आहेत आणि खास करून आपल्या आदिवासी समुदायांची जीवनशैली समजून घ्यायची आहे. निसर्गाशी सहकार करार करून राहणे आमच्या आदिवासी संस्कृतीचा भाग राहिला आहे. आमचे आदिवासी बंधू भगिनी वृक्षवेली आणि फुलांची पूजा देवी देवतांप्रमाणे करतात. मध्य भारतातल्या भिल आदिवासी जमातीत विशेषतः मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये लोक पिंपळ आणि अर्जुन अशा वृक्षांची श्रद्धेने पूजा करतात. राजस्थानसारख्या मरूभूमीत विश्नोई समाजाने पर्यावरण संरक्षणाचा मार्ग आम्हाला दाखवलाय. विशेष करून वृक्षांच्या संरक्षणाबाबत त्यांना आपल्या जीवनाचा त्याग करणे मान्य आहे परंतु एकही झाडाला नुकसान व्हावे, हे त्यांना मंजूर नाही. अरुणाचल प्रदेशात मिशमी वाघांशी आपले नाते असल्याचा दावा करतात. त्यांना ते भाऊ-बहिणही मानतात. नागालँड मध्ये वाघांकडे वनांचे रक्षक म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रातले वारली समुदायातले लोक वाघाला पाहुणे म्हणून मानतात आणि त्यांच्यासाठी वाघांचे अस्तित्व समृद्धी आणणारे असे असते. मध्य भारतातले कोल समुदायात अशी समजूत आहे की, त्यांचे स्वतःचे भाग्य वाघाशी जोडले आहे, वाघाला अन्न मिळाले नाही तर ग्रामस्थांना उपाशी राहावे लागेल- अशी त्यांची श्रद्धा आहे. मध्य भारतातली गोंड आदिवासी माशांच्या प्रजनन हंगामात केथान नदीच्या काही भागात मासेमारी बंद करतात. ही क्षेत्रे माशांची आश्रयस्थाने आहेत, असे ते मानतात. हीच प्रथा पाळल्याने त्यांना चांगली आणि भरपूर प्रमाणात मासळी मिळते. आदिवासी समुदाय आपली घरे नैसर्गिक साहित्याने बनवतात. ती मजबूत असतात आणि पर्यावरणाला अनुकूलही असतात. दक्षिण भारतात निलगिरी पठारावर दुर्गम भागात एक छोटा भटका समुदाय तोडा, पारंपरिक दृष्ट्या त्यांची वस्ती स्थानिक स्तरावर उपलब्ध वस्तूंनी बनवलेल्या असतात.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, हे खरं आहे की, आदिवासी समुदाय खूप शांततापूर्ण आणि आपसात मिळून मिसळून राहण्यावर भर देतात, पण कुणी त्यांच्या नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान करत असेल तर आपल्या अधिकारांसाठी ते लढायला घाबरत नाहीत. आमचे सर्वात पहिले स्वातंत्र्य सैनिक आदिवासी समुदायातले होते, यात काहीच आश्चर्य नाही. भगवान बिरसा मुंडा यांना कोण विसरू शकेल ज्यांनी आपल्या वन्य भूमीचे रक्षण करायला ब्रिटीश सरकारविरोधात जोरदार लढा दिला. मी जी नावे घेतली आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे. आदिवासी समुदायाची अशी अनेक उदाहरणे आहेत जी आम्हाला निसर्गाशी सहकार्य करून कसे राहता येते, याची शिकवण देतात आणि आज आमच्याकडे जी काही वन्य संपदा उरली आहे, त्यासाठी देश आमच्या आदिवासींचा ऋणी आहे. या. आपण त्यांच्या प्रती आदर व्यक्त करू या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातमध्ये आपण त्या व्यक्ती आणि संस्था यांच्याबाबतीत बोलतो ज्यांनी समाजासाठी काही तरी अद्वितीय कार्य केले आहे. असे कार्य किरकोळ वाटते, परंतु वास्तवात त्यांचा आमची मानसिकता बदलण्यात, समाजाची दिशा बदलण्यात फार गहन प्रभाव पडतो. काही दिवसांपूर्वी मी पंजाबातले शेतकरी भाई गुरबचन सिंग यांच्याविषयक वाचत होतो. एक सामान्य आणि कष्टाळू शेतकरी गुरबचन सिंगजी यांच्या मुलाचे लग्न होते. लग्नाच्या अगोदर गुरबचन जी यांनी वधूच्या आई वडलाना लग्न आम्ही साध्या पद्धतीने करणार आहोत, असे सांगितले होते. वरात आणि इतर गोष्टी असतील, खर्च फार जास्त करायची गरज नाही. आपल्याला हा प्रसंग साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे. परंतु त्यांनी अचानक म्हटले, परंतु माझी एक अट आहे. आजकाल लग्न प्रसंगी अटींचा विषय येतो तेव्हा साधारण असे वाटते की,समोरचा काही तरी मोठी मागणी करणार आहे. अशी काही तरी वस्तू मागेल जी वधूच्या कुटुंबियांना अवघड जाईल. परंतु आपल्याला याचे आश्चर्य वाटेल की, हे तर भाई गुरबचन सिंग होते सरळ साधे शेतकरी. त्यांनी जे म्हटले, वधूच्या वडिलांसमोर जी अट ठेवली, ती आमच्या समाजाची खरी शक्ती आहे. गुरबचन सिंगजीने त्याचा म्हटले की, आपण आपल्या शेतात पराली कधी जाळणार नाहीत, असे मला वचन द्या. यात किती मोठी सामाजिक शक्ती आहे, याची आपण कल्पना करु शकतो. गुरबचन सिंग जी यांची ही मागणी वाटते खूप किरकोळ आहे. परंतु त्यांचे व्यक्तिमत्व किती विशाल आहे हे यातून दिसते. आणि आम्ही पाहिले आहे की, आमच्या समाजात असे अनेक परिवार आहेत जे व्यक्तिगत प्रसंगाचे रुपांतर सामाजिक हिताच्या प्रसंगात करतात. श्रीमान गुरबचन सिंग जी यांच्या कुटुंबाने असेच एक उदाहरण आमच्या समोर ठेवले आहे. मी पंजाबातल्या आणखी एक गाव कल्लर माजरा बाबतीत वाचले आहे जे नाभाजवळ आहे. कल्लर माजरा यासाठी चर्चेत आहे की, धान्याची पराली जाळण्याऐवजी ते नांगरून मातीत मिसळतात आणि त्यासाठी जे तंत्रज्ञान जे वापरात आणायला हवे ते आणले जाते. भाई गुरबचन सिंग जी यांचे अभिनंदन. वातावरण स्वच्छ ठेवायला जे आपल्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत त्या सर्वाना आणि कल्लर माजराच्या लोकांचे अभिनंदन. तुम्ही सुदृढ जीवनशैलीची भारतीय परंपरा एक खर्या वारसदाराप्रमाणे पुढे नेत आहात. ज्या प्रमाणे थेंबा-थेम्बाने सागर बनतो, त्या प्रमाणे लहान लहान सक्रियता आणि जागरूकता तसेच सकारात्मक कार्य सकारात्मक वातावरण तयार करण्यात खूप मोठी भूमिका निभावतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या ग्रंथांमध्ये म्हटले आहे :-
ॐ द्यौः शान्तिः अन्तरिक्षं शान्तिः,
पृथिवी शान्तिः आपः शान्तिः औषधयः शान्तिः |
वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः,
वनस्पतयः शान्तिः विश्वेदेवाः शान्तिः ब्रह्म शान्तिः,
सर्वं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि ||
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||
याचा अर्थ असा आहे की, हे ईश्वर, तिन्ही लोकांत सर्वत्र शांतता असू दे, जलामध्ये, पृथ्वीवर, आकाशात, अंतरिक्षात, अग्नीमध्ये, वायूमध्ये, औषधीमध्ये, वनस्पतीमध्ये, उपवनात, अवचेतनात, संपूर्ण ब्रह्मांडात शांतता स्थापित करावीस. जीवात, हृदयात, माझ्यात, तुझ्यात, जगताच्या प्रत्येक कणात, प्रत्येक स्थानी शांतता स्थापित कर.
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ||
जेव्हा विश्व शांतीची चर्चा होईल तेव्हा त्यासाठी भारताचे नाव आणि योगदान सुवर्णाक्षरात झळाळताना दिसेल. भारतासाठी यंदाच्या 11 नोव्हेम्बरचे विशेष महत्व आहे कारण 11 नोव्हेंबरला आजपासून 100 वर्षांपूर्वी पहिले महायुद्ध संपले. त्या घटनेस 100 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणजे त्या काळात झालेला प्रचंड विध्वंस आणि मनुष्य हानीला एक शतक पूर्ण होईल. भारतासाठी पहिले महायुद्ध एक महत्वपूर्ण घटना होती. खर्या अर्थाने सांगायचं तर, आम्हाला त्या युद्धाशी थेट काही देणे घेणे नव्हते. तरीही आमची सैनिक शौर्याने लढले आणि खूप मोठी भूमिका बजावली, सर्वोच्च बलिदान दिले. भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिलं की, युद्ध होते तेव्हा ते कुणाच्या पेक्षा कमी नाहीत. आमच्या सैनिकांनी दुर्गम भागांमध्ये, विपरीत परिस्थितींत शौर्य दाखवलं आहे. या सर्वामागे एकच उद्देश्य होता- शांततेची पुनर्स्थापना. पहिल्या महायुद्धात जगाने सर्वनाशाचं तांडव पाहिलं. अंदाजानुसार, जवळपास एक कोटी सैनिक आणि तितक्याच नागरिकांनी जीव गमावले. यामुळे सर्व जगाने शांतीचं महत्व जाणलं. गेल्या 100 वर्षांत शांततेची व्याख्या बदलली आहे. आज शांतता आणि सौहार्द्र यांचा अर्थ केवळ युद्ध न होणे इतकाच नाही. दहशतवादापासून ते जलवायू परिवर्तन, आर्थिक विकासापासून ते सामाजिक न्याय, या सर्वासाठी जागतिक सहकार्य आणि समन्वयाने काम करायची गरज आहे. गरीबातल्या गरिब व्यक्तीचा विकास हाच शांततेचे खरे प्रतिक आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आमच्या ईशान्य भारताची गोष्ट काही वेगळीच आहे. ईशान्येतले नैसर्गिक सौंदर्य अनुपम आहे आणि इथले लोक अत्यंत प्रतिभाशाली आहेत. आमचा ईशान्य भारत सर्वोत्तम कार्यासाठी ओळखला जातो. ईशान्य भारत असे क्षेत्र आहे, ज्याने सेंद्रिय शेतीत खूप प्रगती केली आहे. काही दिवसांपूर्वी सिक्कीमने शाश्वत अन्न व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी असलेले 2018 चे फ्युचर पॉलिसी गोल्ड अवार्ड जिंकले आहे. हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांशी संलग्न अन्न आणि कृषी संघटना (एफ ए ओ) यांच्या वतीनं दिला जातो. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की, सर्वोत्कृष्ट धोरण बनवण्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार त्या क्षेत्रात ऑस्करच्या बरोबरीने आहे. इतकच नाही तर, आमच्या सिक्किमने 25 देशांच्या 51 नामांकन लाभलेल्या धोरणांना मागे टाकून हा पुरस्कार पटकावला, यासाठी मी सिक्कीमच्या लोकांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑक्टोबर संपत आला आहे. हवामानात खूप मोठा बदल होत असल्याचा अनुभव येत आहे. आता थंडीचे दिवस सुरु झाले आहेत आणि हवामान बदलण्याबरोबर सणांचा हंगाम आला आहे. धनतेरस, दिवाळी, भाऊबीज, छट.. एक प्रकारे नोव्हेंबर महिना हा सणांचा महिना आहे. सर्व देशवासियांना या सणांसाठी भरपूर शुभेच्छा.
मी आपल्याला आवाहन करतो की, या सणांच्या काळात आपली काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि समाजहिताचेही भान ठेवा. सण नव्या संकल्पाची संधी आहे, असा मला विश्वास आहे. हा सण नवे निर्णय घ्यायची संधी आहे. हा सण निर्धाराने मिशन मोडमध्ये पुढे जायची, दृढ संकल्प करायची आपल्या आयुष्यातली एक संधी व्हावी. तुमची प्रगती देशाच्या प्रगतीतला महत्वपूर्ण हिस्सा आहे. तुमची जेवढी जास्त प्रगती होईल तेवढी देशाची प्रगती होईल. माझ्या तुम्हा सर्वाना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार, आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकेल. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतेही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती,आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या सव्वाशे कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरे केले. 2016 मध्ये केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याचं आपण स्मरण केलं, जेव्हा दहशतवादाच्या आडून छुपं युद्ध छेडणाऱ्यांना, आपल्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं. देशाच्या वेगवेगळ्या भागात,आपल्या सशस्त्र बलानी, प्रदर्शने भरवली ज्यायोगे देशाचे जास्तीत जास्त नागरिक, विशेष करून युवा पिढीला आपले सामर्थ्य जाणता येईल. आपण किती सक्षम आहोत आणि आपले सैनिक प्राणाची बाजी लावून आपणा देशवासीयांचे रक्षण कसे करतात हे जाणता येईल. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचे स्मरण करून देतो आणि देशाची एकता आणि अखंडता राखण्यासाठी आपल्याला प्रेरीतही करतो. मी सुद्धा, शूरविराची भूमी राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झालो. आपल्या देशातील शांतता आणि प्रगतीचे वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देणार हे निश्चित. शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आम्ही कटीबद्ध आहोत मात्र सन्मानाशी तडजोड आणि देशाच्या सार्वभौमत्वाची किंमत चुकवून कदापि नव्हे. भारत शांततेसाठी सदैव कटीबद्ध आणि समर्पित राहिला आहे. 20 व्या शतकात दोन विश्वयुद्धात आपल्या एक लाखाहून जास्त सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान केले, आपला या युद्धाशी काही संबंध नसताना या सैनिकांनी बलिदान केले. दुसऱ्याच्या भूमीवर आम्ही कधीच नजर ठेवली नाही. शांततेप्रती आमची ती कटीबद्धता होती. काही दिवसांपूर्वीच 23 सप्टेंबरला आम्ही इस्त्रायल मध्ये हैफाच्या लढाईला 100 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लांसर्सच्या आपल्या शूर सैनिकांचे स्मरण केले ज्यांनी हैफाला आक्रमकांपासून मुक्त केले. शांततेच्या दिशेने आपल्या सैनिकांनी केलेला हा एक पराक्रम होता. आजही संयुक्त राष्ट्रांच्या वेग वेगळ्या शांती सैन्यात जास्तीत जास्त सैनिक पाठवणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. दशकांपासून आपल्या सैनिकांनी निळे हेल्मेट घालून जगभरात शांतता नांदावी यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आकाशाची गोष्टच वेगळी असते. आकाशात आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत भारतीय हवाई दलाने प्रत्येक देशवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे यात आश्चर्य नाही. आपल्याला त्यांनी सुरक्षिततेचा विश्वास दिला आहे. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात लोकांना ज्याची उत्कंठा असते त्यापैकी एक म्हणजे ‘फ्लाय पास्ट’ ज्यामध्ये आपले हवाई दल चित्त थरारक हवाई प्रात्यक्षिक करून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवतात. 8 ऑक्टोबरला आपण हवाई दल दिन साजरा करतो. 1932 मधे सहा वैमानिक आणि 19 हवाई दल सैनिकांपासून एक छोटीशी सुरवात करत आपले हवाई दल आता 21 व्या शतकातल्या सर्वात साहसी आणि सामर्थ्यवान हवाई दलापैकी एक बनले आहे. हा एक संस्मरणीय प्रवास आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. 1947 मधे पाकिस्तानी हल्लेखोरानी अप्रत्यक्ष हल्ला सुरु केला तेव्हा, श्रीनगरचा बचाव करण्यासाठी भारतीय सैनिक आणि सामग्री युद्धाच्या मैदानात वेळेवर पोहोचतील याची हवाई दलानेच खातरजमा केली. हवाई दलाने 1965 मधेही शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. 1971 मधले बांगलादेशचे स्वातंत्र्य युध्द कोण जाणत नाही ? 1999 मधे घुसखोरापासून कारगिल मुक्त करण्यातही हवाई दलाची महत्वाची भूमिका राहिली आहे. टायगर हिलवर शत्रूच्या आश्रय ठिकाणांवर अहोरात्र बॉम्ब वर्षाव करत हवाई दलाने त्यांना धूळ चारली. मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन,आपल्या हवाई दलाच्या या शूरवीरांच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ आहे. वादळ, पूर ते जंगलातल्या आगीपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याचे आणि देशवासियांना मदत करण्याचे त्यांचे कार्य अद्भुत आहे. देशात स्त्री-पुरुष समानता सुनिश्चित करण्यातही हवाई दलाने आदर्श निर्माण केला आहे, आपल्या प्रत्येक विभागाची दारे त्यांनी मुलींसाठी खुली केली आहेत. आता तर हवाई दल ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन’ बरोबरच ‘परमनंट कमिशन’चा पर्यायही देत आहे,ज्याची घोषणा याच वर्षीच्या 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून केली होती. आपल्या सशस्त्र दलात पुरुष शक्ती बरोबरच तितकेच स्त्री शक्तीचे योगदानही होत आहे असे भारत अभिमानाने सांगू शकतो. महिला सबल तर आहेतच आता सशस्त्रही होत आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या काही दिवसात नौदलाचे आपले एक अधिकारी अभिलाष टॉमी, जीवन-मरणाची झुंज देत होते. त्यांना कसे वाचवता येईल याची संपूर्ण देश चिंता करत होता. अभिलाष टॉमी एक धाडसी वीर अधिकारी आहेत हे आपणा सर्वाना माहित आहेच. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानावाचून एक छोटीशी नाव घेऊन जगाची सफर करणारे ते पहिले भारतीय अधिकारी आहेत. गेल्या 80 दिवसापासून, दक्षिण हिंदी महासागरात, गोल्डन ग्लोब रेस मधे भाग घेण्यासाठी समुद्रात आपली गती कायम राखत ते आगेकूच करत होते मात्र भयानक सागरी वादळाने त्यांच्या समोर संकट निर्माण केले मात्र भारतीय नौदलाचा हा वीर समुद्रात अनेक दिवस झुंज देत राहिला, लढत राहिला. अन्न-पाण्यावाचून,पाण्यात लढत राहिला. जीवनाकडून हार मानली नाही. साहस, संकल्प शक्ती, पराक्रम यांचे एक अद्भुत उदाहरण. काही दिवसांपूर्वी, अभिलाष यांची समुद्रातून सुखरूप सुटका करण्यात आली त्यानंतर मी दूरध्वनी वरून त्यांच्याशी संभाषण केले. याआधीही मी त्यांना भेटलो आहे. एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आल्यानंतरही त्यांचं जे मनोबल होते, उत्साह होता, पुन्हा एकदा असा पराक्रम करण्याचा त्यांचा संकल्प त्यांनी मला सांगितला तो देशाच्या युवा पिढीला प्रेरक आहे. मी अभिलाष टॉमी यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो आणि त्याचं हे साहस, त्यांचा पराक्रम, त्यांची संकल्प शक्ती आणि जिंकण्याची दुर्दम्य ताकद आपल्या देशाच्या युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर या दिवसाचे आपल्या देशासाठी काय महत्व आहे हे अगदी लहान मुलांनाही माहित आहे. या वर्षीच्या 2 ऑक्टोबरला आणखी एक विशेष महत्व आहे. आतापासून दोन वर्ष आपण महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंती निमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार आहोत. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. डॉ मार्टिन ल्युथर किंग ज्यूनिअर असोत किंवा नेल्सन मंडेला, यासारख्या महान विभूतीनी, प्रत्येकाने गांधींच्या विचारातून शक्ती प्राप्त केली आणि आपल्या लोकांना समानता आणि सन्मानाचा हक्क देण्यासाठी दीर्घ लढा देऊ शकले. आजच्या‘मन की बात’ मधून मी आपल्या पूज्य बापूंच्या एका आणखी महत्वपूर्ण कार्याची चर्चा करू इच्छितो, जे अधिकाधिक लोकांनी माहित करून घेतले पाहिजे. 1941 मधे, महात्मा गांधींनी रचनात्मक कार्यक्रमाच्या रूपाने, काही विचार लिहिणे सुरु केले. त्यानंतर 1945 मधे स्वातंत्र्य संग्रामाने जोर घेतला त्यावेळी त्यांनी या विचारांची सुधारीत प्रत तयार केली. पूज्य बापूंनी, शेतकरी, गाव, श्रमिकांच्या अधिकाराचे रक्षण, स्वच्छता, शिक्षणाचा प्रसार यासारख्या विषयावर आपले विचार देशवासियांसमोर ठेवले. याला ‘गांधी चार्टर’ असेही म्हणतात. पूज्य बापू लोक संग्रही होते. लोकांना जोडणे, त्यांच्यात मिसळणे हे बापूंचे वैशिष्ट होते, तो त्यांचा स्वभाव होता. या त्यांच्या आगळ्या वैशिष्ट्याचा प्रत्येकाने केव्हा ना केव्हा नक्कीच अनुभव घेतला होता. त्यांनी प्रत्येकाला हा अनुभव दिला की ती व्यक्ती देशासाठी सर्वात महत्वाची आणि नितांत आवश्यक आहे. स्वातंत्र्य लढ्यातलं त्याचं सर्वात मोठे योगदान हे आहे की त्यांनी या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचं स्वरूप दिलं. स्वातंत्र्य लढ्याच्या आंदोलनात महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत, समाजाच्या प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक वर्गातल्या लोकांनी स्वतःला झोकून दिलं. बापूंनी आपणा सर्वाना एक प्रेरणादायी मंत्र दिला होता. त्यात गांधीजीनी म्हटलं होते ‘मी आपल्याला एक मंत्र देतो, तुम्हाला जेव्हा कधी शंका असेल किंवा तुमच्या अहंकाराने फणा काढला असेल तर तुम्ही या कसोटीवर आजमावून पहा, तुम्ही जो गरिबातला गरीब आणि कमजोर माणूस पाहिला असेल, त्याचा चेहरा आठवून पहा आणि आपल्या हृदयाला विचारा की जे पाऊल उचलण्याचा तुम्ही विचार करत आहात, ते त्या माणसासाठी किती उपयुक्त आहे. त्यामुळे त्याला काही लाभ मिळेल का… त्यामुळे तो आपले जीवन आणि भाग्यावर काबु मिळवू शकेल का… यामुळे कोट्यावधी लोकांना स्वराज मिळू शकेल का, जे उपाशी आहेत आणि त्यांचा आत्मा अतृप्त आहे… तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमची शंका कमी होऊ लागली आहे आणि अहंकार समाप्त होऊ लागला आहे.
माझ्या प्रिय देशवासियानो, गांधीजींचा एक मंत्र आजही तितकाच महत्वाचा आहे. आज देशात मध्यम वर्ग वाढत आहे,त्यांची वाढती आर्थिक ताकद, वाढती क्रय शक्ती, काही खरेदीला जाताना आपण एक क्षण बापुजींचे स्मरण करू शकतो का… पूज्य बापूजींच्या त्या मंत्राचे स्मरण करू शकतो. खरेदी करताना आपण विचार करू शकतो का…. की मी जी गोष्ट विकत घेत आहे त्यामुळे माझ्या देशाच्या कोणत्या नागरिकाला त्याचा लाभ होणार आहे… कोणाच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे… कोण असेल तो भाग्यशाली, ज्याचा या खरेदीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे… गरीबातल्या गरिबाला लाभ झाला तर मला अधिक जास्त आनंद होईल. गांधीजींचा हा मंत्र लक्षात ठेवून आपण येत्या दिवसात काही दिवसात जी काही खरेदी करू, गांधीजींची 150 वी जयंती साजरी करत असताना आपण याकडे नक्कीच लक्ष द्या की आपल्या खरेदीमुळे कोणत्या ना कोणत्या देश बांधवाचं हित साधलं गेले पाहिजे आणि त्यातही ज्याने आपला घाम गाळला आहे, आपले पैसे, आपली प्रतिभा वापरली आहे त्या सर्वाना कोणत्या ना कोणत्या स्वरुपात लाभ झाला पाहिजे. हाच तर गांधीजींचा मंत्र आहे, हाच तर गांधीजींचा संदेश आहे आणि मला विश्वास आहे, सर्वात गरीब आणि दुर्बल व्यक्तीच्या जीवनात आपले हे छोटेसे पाऊल मोठा बदल घडवू शकते.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, गांधीजीनी म्हटले होते की स्वच्छता कराल तर स्वातंत्र्य प्राप्त होईल. कदाचित त्यानाही हे नाहीत नसेल की हे कसे होईल… पण हे साध्य झाले, भारताला स्वातंत्र्य मिळाले. याच प्रमाणे आज आपल्याला वाटू शकते की माझ्या या छोट्याश्या कार्यानेही माझ्या देशाच्या आर्थिक प्रगतीत, आर्थिक सशक्तीकरणात, गरिबाला गरिबीविरूद्ध लढण्यासाठी ताकद देण्यात माझं मोठे योगदान राहू शकते. आजच्या युगात हीच खरी देशभक्ती आहे, हीच पूज्य बापूंना कार्याजली आहे. विशेष प्रसंगी खादी आणि हातमाग उत्पादने खरेदी करण्याचा विचार केला तर त्यामुळे विणकराना मदत होईल, असे म्हणतात की लाल बहाद्दूर शास्त्री, खादीची जुनी फाटकी वस्त्रही जपून ठेवत असत कारण त्यामागे कोणाचे तरी कष्ट असतात. ते म्हणत ही सर्व खादीची वस्त्रे खूप मेहनतीने तयार केली आहेत, त्याचा प्रत्येक धागा कामी आला पाहिजे. देशाप्रती आत्मीयता आणि देशवासियांप्रति स्न्हेहाची भावना या लहानपणीच्या महामानवाच्या नसानसात भिनलेली होती. दोन दिवसांनी, पूज्य बापूजींच्या जयंती बरोबरच आपण शास्त्रीजींची जयंतीही साजरी करणार आहोत. शास्त्रीजींचे नाव उच्चारताच आपणा भारतवासीयांच्या मनात असीम श्रद्धेचा भाव फुलून येतो. त्यांचे सौम्य व्यक्तीत्व प्रत्येक देशवासीयाला सदैव अभिमानास्पद आहे.
लाल बहाद्दूर शास्त्री यांचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून ते अतिशय विनम्र दिसत असत पण मनातून ते पहाडा प्रमाणे दृढनिश्चयी होते. ‘जय जवान, जय किसान’ ही त्यांची घोषणा त्यांच्या या विराट व्यक्तीत्वाची ओळख आहे. राष्ट्राप्रती त्यांच्या निःस्वार्थ तपस्येचे हे फळ होते की सुमारे दीड वर्षाच्या अल्प कार्य काळात त्यांनी देशाचे जवान आणि शेतकऱ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा मंत्र दिला.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज आपण पूज्य बापूंचे स्मरण करत आहोत तर स्वच्छतेबाबत बोलल्याशिवाय राहणार नाही हे तर स्वाभाविकच आहे. 15 सप्टेंबर पासून ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला सुरवात झाली. कोट्यवधी लोक यात सहभागी झाले आणि दिल्लीतल्या आंबेडकर शाळेतल्या विद्यार्थ्यासमवेत श्रमदानाचे भाग्य मला लाभले. मी त्या शाळेत गेलो ज्याची पायाभरणी स्वतः पूज्य बाबासाहेबांनी केली होती. देशभरातले सर्व स्तरातले लोक या 15 तारखेला या श्रमदानात सहभागी झाले. संस्थानीही यात हिरीरीने भाग घेतला. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी,एनएसएस, युवा संघटना, प्रसार माध्यम गट, खाजगी उद्योग जगत सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वच्छता श्रमदान केलं. या सर्व स्वच्छता प्रेमीचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आता ऐकु या एक फोन कॉल –
‘नमस्कार, माझं नाव शैतान सिंह, जिल्हा बिकानेर, तालुका पुगल, राजस्थान मधून बोलत आहे, मी दृष्टीहीन आहे. माझ्या दोन्ही डोळ्यांनी मला दिसत नाही. मी सांगू इच्छितो की, मोदीजींनी, स्वच्छ भारत हे पाऊल उचलले आहे ते अतिशय उत्तम आहे. आम्हा दृष्टिहीन व्यक्तींना शौचालयात जाण्यासाठी त्रास होत असे. आता प्रत्येक घरात शौचालय झाल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला आहे. आपण उचललेले हे पाऊल अतिशय उत्तम आहे. हे काम पुढेही सुरु राहू दे’
खूप-खूप धन्यवाद. आपण मोठी गोष्ट सांगितली. प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेचे स्वतःचे महत्व आहे आणि स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपल्या घरात शौचालय बांधण्यात आले आणि आपल्याला सुविधा मिळाली, आम्हा सर्वासाठी यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते… कदाचित या अभियानाशी संबंधित लोकांनाही माहित नसेल, की प्रज्ञाचक्षु असल्यामुळे आपण पाहू शकत नाही, शौचालय नसल्यामुळे आपणाला किती अडचणींचा सामना करावा लागत होता आणि शौचालय बनल्यामुळे आपले जीवन किती सुलभ झाले, आपण हा पैलू दर्शवत फोन केला नसता तर कदाचित या स्वच्छता अभियानाशी संबंधित लोकांच्या लक्षातही हा संवेदनशील पैलू आला नसता. आपल्या फोन बद्दल मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
स्वच्छ भारत अभियान केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगात एक यशस्वी कहाणी ठरले आहे, ज्याबद्दल प्रत्येक जण बोलत आहे. या वेळी भारत, इतिहासातले सर्वात मोठे जागतिक स्वच्छता संमेलन आयोजित करत आहे. ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन’ म्हणजेच महात्मा गांधी इंटर नॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन. जगभरातले स्वच्छता मंत्री आणि या क्षेत्रातले तज्ञ एकत्र येऊन स्वच्छतेविषयी आपले प्रयोग आणि अनुभव विशद करत आहेत. महात्मा गांधी इंटर नॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शनची समाप्ती 2 ऑक्टोबर 2018 ला बापूंच्या 150 व्या जयंती समारंभाच्या प्रारंभा बरोबर होणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, संस्कृत मधे एक म्हण आहे, ‘न्यायमूलं स्वराज्यं स्यात्’ म्हणजे स्वराजाच्या मुळाशी न्याय असतो, जेव्हा न्यायाची चर्चा होते तेव्हा मानव अधिकाराची भावना त्यात समविष्ट असते. शोषित, वंचित जनाचे स्वातंत्र्य,शांतता आणि त्यांच्यासाठी न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे विशेष करून अनिवार्य आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात गरिबांच्या मूळ अधिकारांच्या रक्षणासाठी तरतूद केली गेली आहे. त्यांच्याच दृष्टीकोनातून प्रेरित होऊन 12 ऑक्टोबर 1993 मधे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनची, एनएचआरसीची स्थापना करण्यात आली. काही दिवसातच एनएचआरसीला 25 वर्ष पूर्ण होणार आहेत. एनएचआरसीने मानव अधिकारांच्या रक्षणा बरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धींगत करण्याचे कार्य केले आहे. आपले प्रिय नेते, देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी स्पष्ट केले होते की मानव अधिकार ही आमच्यासाठी परकी संकल्पना नाही. आपल्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे प्रतिक चिन्हात वैदिक काळातले “सर्वे भवन्तु सुखिनः” कोरलेले आहे. एनएचआरसीने मानव अधिकारांप्रति व्यापक जागृती निर्माण केली आहे, त्याच बरोबर त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी प्रशंसनीय भूमिकाही बजावली आहे. 25 वर्षाच्या या प्रवासात या आयोगाने देशवासीयामधे एक आशा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. एका निरोगी समाजासाठी, उत्तम लोकशाही मूल्यांसाठी ही एक आशादायक गोष्ट आहे असे मी मानतो. आज राष्ट्रीय स्तरावरच्या मानव अधिकार कार्या बरोबरच 26 राज्य मानव अधिकार आयोगही स्थापित करण्यात आले आहेत. एक समाज म्हणून मानव अधिकारांचे महत्व जाणण्याची आणि आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. हाच ‘सबका साथ,सबका विकास’ याचा आधार आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, ऑक्टोबर महिना आहे, जयप्रकाश नारायण यांची जयंती आहे, राजमाता विजयाराजे सिंदिया यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ होत आहे, ही सर्व थोर व्यक्तित्व, आपणा सर्वांना प्रेरणा देत आली आहेत, त्यांना नमन करु या, 31 ऑक्टोबर सरदार साहेब यांची जयंती आहे, पुढच्या ‘मन की बात’मधे सविस्तर बोलू इच्छितो, मात्र आज उल्लेख यासाठी करू इच्छितो, की काही वर्षांपासून सरदार साहेब यांच्या जयंती दिनी, 31 ऑक्टोबरला ‘रन फॉर युनिटी’,एकता दौड, हिंदुस्तानच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरात, गावात या ‘एकतेसाठी दौड’चे आयोजन केले जाते. या वर्षीही,आपण प्रयत्न पूर्वक आपल्या गावात, शहरात, महानगरात ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करा. एकतेसाठी दौड हाच सरदार साहेब, त्यांचे स्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे कारण त्यांनी आयुष्यभर एकतेसाठी काम केले. मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला, ‘रन फॉर युनिटी’ च्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी या सर्व पवित्र पर्वासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक अनेक-अनेक शुभेच्छा देतो.
धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात. रक्षण करण्यासाठी वचन म्हणून बांधल्या जाणाऱ्या एका ‘रक्षा सूत्रा’ने दोन वेगवेगळ्या राज्यांतल्या किंवा धर्मातल्या लोकांना या विश्वासाच्या धाग्यानं बांधून ठेवण्याचं, जोडून ठेवण्याचं काम केलं होतं, याच्या अनेक कथा देशाच्या इतिहासात आपण वाचल्या आहेत. आता लवकरच जन्माष्टमीही साजरी करण्यात येणार आहे. सगळीकडे दुमदुमणाऱ्या ‘‘हाथी, घोडा, पालकी- जय कन्हैयालाल की, गोविंदा-गोविंदा’’ अशा जयघोषानं वातावरण भारलं जाणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या रंगामध्ये रंगून जाण्याचा आनंद काही आगळा-वेगळाच असतो. देशाच्या काही भागामध्ये विशेषतः महाराष्ट्रातले आमचे युवक दही हंडीची तयारी करत असतील. सर्व देशबांधवांना रक्षाबंधन आणि जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
‘प्रधानमंत्री -महोदय! नमस्कारः. अहं चिन्मयी, बेंगलुरू -नगरे विजयभारती – विद्यालये दशम – कक्ष्यायां पठामि. महोदय अद्य संस्कृत- दिनमस्ति. संस्कृतं भाषां सरला इति सर्वे वदन्ति. संस्कृतं भाषा वयमत्र वहः वहः अत्रः सम्भाषणमअपि कुर्मः अतः संस्कृतस्य महत्वः- विषये भवतः गहः अभिप्रायः इति रुपयावदतु.’
भगिनी ! चिन्मयी!!
भवती संस्कृत- प्रश्नं पृष्टवती.
बहूत्तमम् ! बहूत्तमम्!!
अहं भवत्याः अभिनन्दनं करोमि.
संस्कृत -सप्ताह -निमित्तं देशवासिनां
सर्वेषां कृते मम हार्दिक-शुभकामनाः
संस्कृत भाषेचा विषय उपस्थित केल्याबद्दल मी चिन्मयीचे खूप खूप आभार मानतो. बंधूंनो, रक्षाबंधनाबरोबरच श्रावण पौर्णिमेचा दिवस संस्कृत दिन म्हणूनही साजरा केला जातो. संस्कृत भाषेचा महान वारसा जतन आणि संवर्धन करीत, तो जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो. प्रत्येक भाषेचं, स्वतंत्र असं वेगळं महात्म्य असतं. या विश्वातली सर्वात पुरातन भाषा तमिळ आहे, भारताला याचा अभिमान वाटतो. त्याचबरोबर वेदकाळापासून ते वर्तमानामध्ये संस्कृत भाषेनेही ज्ञानाच्या प्रचार- प्रसारामध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे, याचाही आम्हां भारतीयांना अभिमान वाटतो.
संस्कृत भाषा आणि या भाषेतल्या साहित्यामध्ये जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राविषयी ज्ञानाचं जणू भांडार आहे. मग त्यामध्ये विज्ञान असेल किंवा तंत्रज्ञान, कृषी क्षेत्र असेल किंवा आरोग्य, खगोलशास्त्र असेल किंवा स्थापत्यशास्त्र म्हणजे वास्तूकला असेल. गणित असेल किंवा व्यवस्थापन, अर्थशास्त्राची माहिती असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल. इतकंच नाही तर आजची वैश्विक समस्या असलेल्या ‘तापमान वृद्धीचे आव्हान कसं झेलायचं, या विषयाचंही सविस्तर उत्तर देणाऱ्या मंत्रांचा उल्लेख संस्कृत भाषेमध्ये आहे, असंही सांगण्यात येतं. कर्नाटक राज्यातल्या शिवमोगा जिल्ह्यातल्या मट्टूर या गावातले रहिवासी बोलण्यासाठी आजही संस्कृत भाषेचा वापर करतात, हे जाणून आपल्या सर्वांना नक्कीच आनंद वाटेल.
संस्कृत भाषेचं एक वैशिष्ट्य म्हणजे या भाषेमध्ये नवनवीन असंख्य शब्दांची निर्मिती करता येते, हे जाणून आपल्याला आश्चर्यच वाटेल. दोन हजार धातु, दोनशे प्रत्यय म्हणजे ‘सफिक्स’, 22 उपसर्ग म्हणजे ‘प्रिफिक्स’ यांच्यामुळे समाजात वापरल्या जाणाऱ्या असंख्य शब्दांची रचना या भाषेमध्ये करता येते. त्याचबरोबर अगदी सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टींचाही अचूक तपशील देत कोणत्याही विषयाची माहिती या भाषेमधून सांगता येते. आपल्या बोलण्याला एकप्रकारे वजन प्राप्त व्हावं म्हणून आपण इंग्लिशमधल्या अवतरणांचा वापर नेहमीच करत असतो. तर कधी शेर-शायरीचा उपयोग करतो. परंतु ज्या लोकांचा संस्कृतमधल्या सुभाषितांविषयी अभ्यास आहे, त्यांना चांगलं माहिती आहे की, कोणत्याही सुभाषितामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आशय स्पष्ट केला गेलेला असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे रोजच्या व्यवहारातल्या उदाहरणांनी युक्त असे हे सुभाषित आपल्या या मातीशी नाळ जोडणारं असतं, आपल्या परंपरांना बांधून ठेवणारं असतं, त्यामुळं त्याचा आशय, त्यातून मिळणारा संदेश समजणं खूप सोपं जातं.
जीवनामध्ये गुरूचं नेमकं किती महत्व आहे, हे स्पष्ट करणाऱ्या सुभाषितामध्ये म्हटलं आहे की-
एकमपि अक्षरमस्तु, गुरूः शिष्यं प्रबोधयेत् .
पृथिव्यां नास्ति तद्-द्रव्यं, यद्-दत्त्वा ह्यनृणी भवेतकृ
या सुभाषिताचा अर्थ असा आहे की, गुरूंनी आपल्या शिष्याला एका अक्षराचं जरी ज्ञान दिलं, तर आपल्या या गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या शिष्याला संपूर्ण पृथ्वीवर एखादी वस्तू किंवा धन मिळणार नाही.
आपण सर्वांनी याच भावनेनं आगामी शिक्षक दिन साजरा केला पाहिजे. ज्ञान आणि गुरू अतुल्य आहे, अमूल्य आहे, अनमोल आहे. आपल्या आईबरोबरच शिक्षकही आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मुलांच्या विचारांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी ते पेलत असतात आणि त्याचा प्रभाव मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर पडत असल्याचे दिसून येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून महान विचारवंत आणि देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न दिवंगत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जी यांचं स्मरण केलं जातं. त्यांच्या जयंतीदिनीच संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिवस साजरा केला जातो. आगामी शिक्षक दिवसानिमित्त देशातल्या सर्व शिक्षकांना मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर विज्ञान, शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याविषयी त्यांच्याठायी असलेल्या समर्पणाच्या भावनेबद्दल मी सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अपार कष्ट, परिश्रम करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी मौसमी पाऊस हा नवीन आशा आकांक्षा घेऊन येत असतो. भीषण कडक उन्हाळ्यामुळे वाळून, सुकून गेलेल्या झाडा-झुडुपांना, आटलेल्या जलाशयांना हा पाऊस वरदान ठरतो. परंतु काहीवेळेस ही अतिवृष्टी विनाशकारी, प्रलयंकारी महापूर घेऊन येते. देशात काही ठिकाणी इतर स्थानांच्या तुलनेमध्ये अति पाऊस झाला आहे. आपण सर्वांनीच ही गोष्ट पाहिली आहे. महापुरामुळे केरळमधलं संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झालं आहे. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देश केरळच्या मदतीसाठी धाऊन गेला आहे. या पुरामध्ये केरळमधल्या ज्या परिवारांना आपल्या घरातला सदस्य गमवावा लागला, त्या कुटुंबियांबद्दल आपल्याला सहानुभूती आहे. एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं होणारं नुकसान कोणत्याही गोष्टींनी भरून काढता येत नाही. तरीही शोकाकूल परिवारांना मी विश्वास देऊ इच्छितो की, सव्वाशे कोटी भारतीय दुःखाच्या या काळात तुमच्याबरोबर आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लाऊन या संकटसमयी तुम्हाला मदत करत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये जे लोक जखमी झाले आहेत, त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी प्रार्थना मी करतो. राज्यातल्या लोकांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अदम्य साहस यांच्या जोरावर केरळ लवकरच या संकटातून सावरेल आणि नव्या जोमाने उभा राहील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपत्ती आपल्यामागे ज्या प्रकारे दुःखद स्मृती ठेवून जाते, ते एकप्रकारे दुर्भाग्यच आहे, असं म्हणावं लागेल. परंतु अशा संकटाच्या काळातही मानवतेचे दर्शन आपल्याला होत असते. कच्छपासून ते कामरूपपर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर जी काही शक्य असेल ती मदत आपद्ग्रस्तांना करतोय. मग अशी आपत्ती केरळमधे असोत किंवा हिंदुस्तानमधल्या इतर कोणत्याही जिल्ह्यात, भागात असो. जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यासाठी सगळेजण हातभार लावत आहेत. सर्व वयोगटातले आणि सगळ्या क्षेत्रातले लोक आपआपल्या परीनं पूरग्रस्तांसाठी योगदान देत आहेत. केरळमधल्या लोकांवर जे संकट कोसळलं आहे, त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. केरळमध्ये सुरू असलेल्या बचाव मोहिमेचे नायक सशस्त्र दलाचे जवान आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. पुरामध्ये अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर न ठेवता अथक प्रयत्न केले. हवाई दल असो, नौदल असो, त्याचबरोबर स्थलसेनेचे जवान असो, सीमा सुरक्षा दल, सीआयएसएफ, आरएएफ, सैन्याच्या या प्रत्येक विभागांनी बचाव आणि मदतीच्या कार्यात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पराक्रमी जवानांनी केलेल्या परिश्रमाचा इथं विशेष उल्लेख करू इच्छितो. संकटाच्या या घडीला त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलं. ‘एनडीआरएफ’ची क्षमता, त्यांची समर्पणाची भावना, इतक्या कठीण प्रसंगामध्ये त्वरित, निर्णय घेऊन अतिशय तडफेने परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहिल्यानंतर प्रत्येक हिंदुस्तानीच्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळी श्रद्धा निर्माण झाली आहे. कालच ओणमचा सण होता. ओणमच्या या पवित्र काळामध्ये देशाला विशेषतः केरळला या संकटातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्याची शक्ती मिळावी आणि केरळच्या विकासयात्रेला चांगली गती मिळावी, अशी आपण प्रार्थना करूया. सर्व देशवासियांच्या वतीने मी पुन्हा एकदा केरळच्या लोकांना आणि देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे अतिवृष्टीचे संकट आले आहे, त्यांनाही विश्वास देऊ इच्छितो की, संपूर्ण देश अशा संकटसमयी आपल्याबरोबर आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी ‘मन की बात’ साठी सूचवलेले विषय कोणते आहेत, हे मी पाहत होतो. त्यावेळी लक्षात आलं, देशभरातल्या लोकांनी सर्वात जास्त जो विषय कळवला आहे तो म्हणजे ‘आपल्या सर्वांचे लाडके श्रीमान अटल बिहारी वाजपेयी’ यांचा विषय. गाझियाबादहून कीर्ती, सोनीपत इथून स्वाती वत्स, केरळमधून भाई प्रवीण, पश्चिम बंगालचे डॉक्टर स्वप्न बॅनर्जी, बिहारमधल्या कटिहारचे अखिलेश पांडे, अशा असंख्य लोकांनी ‘‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’’ आणि ‘‘मायगव्ह’’वर लिहून अटल जी यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवावेत असा आग्रह मला केला आहे. 16 ऑगस्ट रोजी अटलजींच्या निधनाची बातमी आली. या वृत्ताने संपूर्ण देश शोकसागरामध्ये बुडाला. 14 वर्षांपूर्वी पंतप्रधान पदावरून पायउतार झालेला हा महान नेता होता. गेल्या दहा वर्षांपासून तर सक्रिय राजकारणापासून ते खूपच दूर गेले होते. सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित रहात नव्हते, त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांमध्ये, बातम्यांमध्येही दिसत नव्हते. विस्मरणात जाण्यासाठी 10 वर्षांचं अंतर खूप मोठं असतं. परंतु 16 ऑगस्टनंतर देशानं आणि जगाने पाहिलं की, हिंदुस्तानमधल्या सामान्य माणसाच्या मनात या दहा वर्षांच्या कालखंडानंतरही अटलजींबद्दल अपार स्नेह कायम होता. त्यामध्ये एका क्षणाचंही अंतर राहिलेलं नव्हतं. संपूर्ण देशभरातून अटलजींबद्दल ज्या प्रकारे स्नेह, श्रद्धा आणि शोक भावना व्यक्त होत होती, त्यावरून त्यांच्या विशाल व्यक्तित्वाचे दर्शन झाले. गेल्या काही दिवसांमध्ये अटलजींमध्ये असलेले उत्तमोत्तम पैलू देशासमोर आले आहेतच. लोकांनी उत्तम संसदपटू, संवेदनशील लेखक, श्रेष्ठ वक्ते, लोकप्रिय पंतप्रधान अशा स्वरूपात त्यांचं स्मरण केलं आणि अजूनही करत आहेत. सुशासन म्हणजेच ‘गुड गर्वनन्स’ला मुख्यधारेमध्ये आणण्यासाठी हा देश अटलजींचा सदैव आभारी राहील. मी आज याठिकाणी अटलजींच्या महान व्यक्तित्वामधल्या एका वेगळ्याच पैलूला स्पर्श करू इच्छितो. अटलजींनी भारताला ज्या प्रकारे राजकीय संस्कृती दिली, राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला, या संस्कृतीला एका व्यवस्थेच्या चौकटीमध्ये बसवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे भारताला खूप मोठा लाभ झाला आहे. आगामी कालखंडामध्ये आणखीही त्याचा असाच फायदा देशाला होणार, हे निश्चित आहे. ‘’91व्या सुधारणा अधिनियम 2003’’ यासाठी भारत नेहमीच अटलजींविषयी कृतज्ञ राहील. या बदलामुळे भारताच्या राजकारणामध्ये दोन महत्वपूर्ण परिवर्तन घडून आले.
यापैकी पहिली गोष्ट म्हणजे, राज्यांच्या मंत्रिमंडळाचा आकार एकूण विधानसभा जागांच्या 15 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात आला.
दुसरी गोष्ट म्हणजे, पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत निश्चित करण्यात आलेली मर्यादा एक-तृतियांश होती, ती वाढवून दोन-तृतियांश करण्यात आली. याच्या जोडीलाच पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी स्पष्ट दिशा-निर्देशही निश्चित करण्यात आले.
अनेक वर्षांपर्यंत भारतामध्ये भरभक्कम मंत्रिमंडळ तयार करण्याची राजकीय संस्कृती होती. त्यानुसार भारंभार मंत्र्यांची संख्या असलेल्या जम्बो मंत्रिमंडळामध्ये कामाच्या विभागणीसाठी नाही तर केवळ राजकारण्यांना खुश करण्यासाठी मंत्री बनवले जात होते. अटलजींनी ही परिस्थिती बदलून टाकली. त्यांनी हे पाऊल उचलल्यामुळे देशाचा पैसा आणि साधन सामग्रीची बचत झाली. त्याचबरोबर कार्यक्षमताही वाढली. केवळ अटलजींच्या दूरदृष्टीमुळेच त्यावेळी राजकीय स्थितीमध्ये बदल होऊ शकला. आपल्या राजकीय संस्कृतीमध्ये चांगली परंपरा निर्माण झाली. अटलजी एक निष्ठावान देशभक्त होते. त्यांच्या कार्यकाळातच देशाचा अर्थसंकल्प सभागृहामध्ये मांडण्याची वेळ बदलण्यात आली. त्यापूर्वी इंग्रजांच्या परंपरेनुसार संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प मांडला जात होता. लंडनमध्ये संसदेच्या कामकाजाचा प्रारंभ होण्याची ती वेळ होती, म्हणून संध्याकाळी अंदाजपत्रक मांडले जात होते. सन 2001 मध्ये अटलजींनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी अकराची केली. अटलजींच्या काळातच आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट घडली. ‘भारतीय ध्वज संहिता’ त्यांच्या काळात बनवण्यात आली आणि 2002 मध्ये या संहितेची अंमलबजावणी झाली. या संहितेमधील काही नियमांमुळे सार्वजनिक स्थळी तिरंगा फडकवणे शक्य झाले. त्यामुळे अधिकाधिक भारतीयांना आपला राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी मिळू लागली. आपल्या प्राणप्रिय तिरंग्याला जनसामान्यांच्या जवळ आणण्याचं महान कार्य अटलजींनी केलं आहे. देशातली निवडणूक प्रक्रिया असेल आणि लोकप्रतिनिधींशी संबंधित काही अयोग्य गोष्टी असतील त्यांच्यामध्ये पायाभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी धाडसी पावलं उचलण्याचं कार्य अटलजींनी कशा पद्धतीनं केलं, हे आपल्या आता लक्षात आलं असेल. अशाच प्रकारे देशामध्ये केंद्र आणि राज्यांच्या निवडणुका एकाचवेळी करण्याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर सध्या चर्चा सुरू आहे. याबाबतीत कोणी बाजूनं तर कोणी विरोधक म्हणून, लोकं आपआपली मतं मांडत आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीनं तर हा एक शुभसंकेत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी, उत्तम लोकशाहीसाठी चांगली परंपरा विकसित करून, लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. अशाप्रकारच्या चर्चा मोकळ्या मनानं केल्या गेल्या पाहिजेत, ही एक प्रकारे अटलजींना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. त्यांनी पाहिलेलं समृद्ध आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या संकल्पाचा पुनरूच्चार करून मी आपल्या सर्वांच्या वतीनं अटलजींना श्रद्धांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल संसदेच्या कामकाजाविषयी ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी बरेचदा व्यत्यय, गोंधळ आणि कामकाज स्थगिती, यांचीच चर्चा होते. परंतु जर काही चांगलं काम झालं असेल तर मात्र त्याची फारशी चर्चा होत नाही. काही दिवसांपूर्वीच संसदेचं पावसाळी अधिवेशन संपलं. या सत्रामध्ये लोकसभेची उत्पादकता 118 टक्के आणि राज्यसभेची 74 टक्के होती, ही माहिती जाणून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. पक्षहित बाजूला सारून संसदेच्या सर्व सदस्यांनी हे पावसाळी अधिवेशन अधिकाधिक उपयुक्त बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम म्हणजे लोकसभेमध्ये 21 विधेयकं आणि राज्यसभेमध्ये 14 विधेयकं मंजूर करण्यात आली. संसदेचं हे पावसाळी अधिवेशन सामाजिक न्याय आणि युवकांच्या कल्याणाचे सत्र म्हणून कायमचे स्मरणात राहणार आहे. या अधिवेशनामध्ये युवक आणि मागास समुदायांना लाभ देऊ शकणाऱ्या अनेक महत्वपूर्ण विधेयकांना मंजुरी देण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की, अनेक दशकांपासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाप्रमाणे इतर मागासवर्गीय जाती आयोग बनवण्याची मागणी केली जात होती. मागासवर्गीयांचे अधिकार निश्चित करण्यासाठी देशाने यावेळी ‘ओबीसी आयोग’ बनवण्याचा संकल्प पूर्ण केला आणि त्याला घटनात्मक दर्जा, अधिकारही देण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाचा उद्देश अधिक सफल होण्यासाठी हे पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे अधिकार सुरक्षित राहण्यासाठी एक दुरूस्ती विधेयक मंजूर करण्याचं कामही याच अधिवेशनामध्ये झालं. हा कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील समुदायांच्या हितांना अधिक सुरक्षित ठेवणार आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना अत्याचार करण्यापासून रोखू शकणार आहे. यामुळे दलित समुदायांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकणार आहे.
देशातल्या महिलाशक्तीच्या विरोधामध्ये कोणत्याही सभ्य समाजामध्ये कसल्याही प्रकारे अन्याय सहन केला जाऊ शकत नाही. महिलांवरील अत्याचारामध्ये सहभागी असलेल्या दोषींना देश कदापि सहन करणार नाही. म्हणूनच संसदेमध्ये या अपराधाबाबतच्या कायदा दुरूस्ती विधेयकाला मान्यता देऊन, अशा गुन्ह्यातील अपराधींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या दोषींना कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये आलेली बातमी आपण वाचली असेल. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये एका न्यायालयात आलेला अज्ञान बालिकेवरच्या अत्याचाराचा खटला केवळ दोन महिने चालवून त्यासाठी अपराधी ठरलेल्या दोघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी मध्य प्रदेशातल्या कटनी इथं एका न्यायालयाने फक्त पाच दिवस सुनावणी करून दोषींना फाशीची शिक्षा दिली. राजस्थानमध्येही तिथल्या न्यायालयात अशाच पद्धतीने महिलांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांवर तातडीने निर्णय दिले आहेत. हा कायदा महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचाराची प्रकरणे रोखण्यासाठी प्रभावी भूमिका पार पाडणार आहे. सामाजिक परिवर्तनाशिवाय आर्थिक प्रगती अपूर्ण आहे. लोकसभेमध्ये तिहेरी तलाक विषयीचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मात्र या अधिवेशनामध्ये राज्यसभेमध्ये या विधेयकाला मान्यता मिळू शकली नाही. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश आपल्या पूर्ण ताकदीनिशी त्यांच्याबरोबरीने उभा आहे, असा मी विश्वास देऊ इच्छितो. ज्यावेळी आम्ही देशहिताचा विचार करू, त्याचवेळी गरीब, मागास, शोषित आणि वंचित यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणता येणार आहे. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व सदस्यांनी मिळून एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. यासाठी देशातल्या सर्व खासदारांचे सार्वजनिक पातळीवर, आज मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या कोट्यवधी भारतीयांचे लक्ष जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांकडे लागलं आहे. दररोज सकाळी वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणीच्या बातमीपत्रांकडे, समाज माध्यमांवरून लोक एक नजर टाकत असतात. कोणा भारतीय खेळाडूने पदक जिंकले, हे जाणून घेत असतात. आशियाई क्रीडा सामने, आत्ताही सुरूच आहेत. देशासाठी पदक जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करू इच्छितो. ज्या खेळाडूंच्या स्पर्धा अजून होणार आहेत, त्या सर्व क्रीडापटूंना माझ्या खूप-खूप शुभेच्छा. नेमबाजी आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडू खूप चांगली कामगिरी करीत आहेत. विशेष म्हणजे, ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारताची कामगिरी आधी फारशी चांगली नव्हती, त्यामध्येही भारतीय खेळाडूंनी पदकाची कमाई केली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. वुशू आणि रोईंग यासारख्या क्रीडाप्रकारांमध्ये भारतीयांनी दाखवलेलं कौशल्य फक्त पदक मिळवण्यापुरते नाही तर मोठ्या धाडसाने गगनाला गवसणी घालणाऱ्या भारतीय क्रीडापटूंची स्वप्ने नवीन प्रमाण सिद्ध करणारी ठरली आहेत. देशासाठी पदक जिंकणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये आमच्या कन्याही सहभागी आहेत, यातून खूप सकारात्मक संकेत मिळतोय. इतकंच नाही तर पदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये 15-16 वर्षांचे आमचे नवयुवक आहेत, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंपैकी बहुतांश लहान शहरे, छोट्या गावांमधले रहिवासी आहेत. या युवा खेळाडूंनी अतिशय कठोर परिश्रम करून हे यश संपादन केलं आहे.
येत्या 29 ऑगस्ट रोजी आपण ‘‘राष्ट्रीय क्रीडा दिन’’ साजरा करणार आहोत. यानिमित्त मी सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर हॉकीचे जादूगार, महान खेळाडू श्री. ध्यानचंद जी यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
देशातल्या सर्व नागरिकांना माझं एक निवेदन आहे की, त्यांनी जरूर कोणतातरी खेळ खेळावा. आपल्या तंदुरूस्तीकडे लक्ष द्यावं. कारण तंदुरूस्त, आरोग्य संपन्न देशच संपन्न आणि समृद्ध भारत निर्माण करू शकणार आहे. ज्यावेळी ‘इंडिया फिट’ असेल त्याचवेळी भारताचे उज्ज्वल भविष्य निर्माण होणार आहे. पुन्हा एकदा मी अशियाई क्रीडा स्पर्धेमधल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर ज्यांच्या स्पर्धा अजून व्हायच्या आहेत, ते आपलं सर्वोत्तम प्रदर्शन करतील अशी कामना करून त्यांना खूप-खूप शुभेच्छा देतो.
‘‘प्रधानमंत्रीजी नमस्कार! मी कानपूर इथून अभियांत्रिकीची विद्यार्थिनी भावना त्रिपाठी बोलतेय. प्रधानमंत्रीजी मागच्या ‘मन की बात’मध्ये आपण महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला होता. आणि त्याआधी आपण डॉक्टर, चार्टर्ड अकौंटटस् यांच्याशी संवाद साधला होता. माझी आपल्याला एक विनंती आहे की, 15 सप्टेंबर या तारखेला ‘इंजिनीअर्स डे’ साजरा केला जातो. म्हणून आगामी ‘इंजिनीअर्स डे’चं औचित्य साधून आपण माझ्यासारख्या अभियांत्रिकी शाखेच्या असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी काही बोलावे. यामुळे आमचं मनोधैर्य उंचावेल आणि आम्हाला खूप आनंद होईल. त्याचबरोबर नजिकच्या भविष्यामध्ये आपल्या देशासाठी काहीतरी करण्याचं प्रोत्साहनही आम्हाला मिळू शकेल. धन्यवाद’’!
नमस्ते भावनाजी, मी आपल्या भावनांचा आदर करतो. आपण सगळ्यांनीच दगडा-विटांचे बांधकाम करून घरे आणि इमारती उभ्या राहतात हे पाहिले आहे. परंतु जवळपास बाराशे वर्षांपूर्वी महाकाय डोंगरासारख्या फक्त एका दगडाला अतिशय उत्कृष्ट, विशाल आणि अद्भूत मंदिराचं स्वरूप दिलं गेलं होतं. खरंतर याविषयी कल्पनाही करणं खूप अवघड आहे. परंतु हे प्रत्यक्षात घडलं होतं. आणि हे मंदिर म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेरूळ इथलं कैलासनाथाचं मंदिर आहे. जर कोणी तुम्हाला सांगेल की, जवळपास एक हजार वर्षांपूर्वी ग्रॅनाईटचा 60 मीटर लांब एक मोठा स्तंभ बनवला गेला आणि त्याच्या शिखरावर ग्रॅनाईटचा जवळपास 80 टन वजनाचा एक महाकाय शिलाखंड ठेवण्यात आला होता. या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवणार का? परंतु तामिळनाडूमधल्या तंजाऊर इथं बृहदेश्वर मंदिर नावाचे एक स्थान आहे. तिथं आपल्याला स्थापत्य कला आणि अभियांत्रिकी यांचा अनोखा संगम पहायला मिळतो. गुजरातमध्ये पाटण इथं अकराव्या शतकामध्ये निर्माण केलेली ‘‘ रानी की बाव’’ आहे, ती पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत होतो. भारताची भूमी म्हणजे अभियांत्रिकीची जणू प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. भारतातल्या अनेक अभियंत्यांनी केवळ कल्पनेमध्ये शक्य आहे, असं वाटावं, अशा गोष्टी प्रत्यक्षात आणल्या. अभियांत्रिकी दुनियेतील चमत्कार म्हणता येतील, अशी उदाहरणे त्यांनी प्रस्तुत केली. महान अभियंत्यांचा वारसा सांगणाऱ्या आमच्या परंपरेमधले असेच एक रत्न आपल्याला मिळाले आहे. ज्यांचे कार्य पाहिले की आजही लोक अचंबित होतात. हे रत्न म्हणजे भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरैया. कावेरी नदीवर त्यांनी बांधलेल्या कृष्णराज सागर धरणाचा आजही लाखो शेतकरी बांधवांना आणि जनसामान्यांना लाभ मिळत आहे. ज्यांना या धरणाचा लाभ मिळतो, त्या भागात त्यांच्याबद्दल आदराची, पूजनीय भावना आहेच, परंतु उर्वरित संपूर्ण देशही त्यांच्या कार्याबद्दल सन्मानाने, आत्मीयतेने डॉ. विश्वेश्वरैया यांचे स्मरण करतो. त्यांच्या स्मरणार्थ दि. 15 सप्टेंबरला ‘‘इंजिनीअर्स डे’’ साजरा केला जातो. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आपल्या देशाच्या अभियंत्यांनी संपूर्ण विश्वामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अभियांत्रिकी जगतामधील चमत्कारांची चर्चा ज्यावेळी मी करतो, त्यावेळी 2001 मध्ये गुजरातच्या कच्छ भागात आलेल्या प्रलंयकारी भूकंपाच्या वेळी घडलेल्या एका घटनेचं मला स्मरण होतं. त्यावेळी मी एक कार्यकर्ता म्हणून त्या भागामध्ये कार्यरत होतो. एका गावामध्ये जाण्याची संधी मला त्यावेळी मिळाली.त्या गावामध्ये मला एक अतिशय वयोवृद्ध माताजी भेटल्या. त्यांचं वय 100 पेक्षा जास्त होतं. त्या आजीबाईंशी मी बोलत होतो. माताजी माझ्याकडं पाहून अगदी उपहासानं सांगत होत्या,‘‘ हे माझं घर पहा. कच्छमध्ये त्याला ‘भूंगा’ असं म्हणतात. माझ्या या घरानं 3-3 भूकंप पाहिले, अनुभवले आहेत. मी स्वतःच तीन भूकंप याच घरामध्ये अनुभवले आहेत. परंतु आत जाऊन पहा, तुम्हाला कुठंही, कसलंही नुकसान झालेलं दिसणार नाही. हे घर आमच्या पूर्वजांनी इथल्या निसर्गाला,भौगोलिक रचनेला अनुसरून, त्याचबरोबर इथल्या वातावरणाला अनुरूप बांधलं आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट त्या माताजी अतिशय अभिमानानं सांगत होत्या. ते घर पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला की, अनेक युगांच्या आधीही त्या कालखंडामधल्या अभियंत्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्याला अनुरूप कशा प्रकारे गृहरचना केली होती, ज्यायोगे जनसामान्य सुरक्षित राहू शकतील, याचा अभ्यास केला होता, तसे आपणही केले पाहिजे. आता ज्यावेळी आपण ‘इंजिनीअर्स डे’ साजरा करतो, त्यावेळी आपण भविष्याचाही विचार निश्चितच केला पाहिजे. ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. बदलत्या काळामध्ये आपला काय-काय नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी लोकांना शिकवल्या पाहिजेत? कसे जोडले पाहिजे? आजकाल आपत्ती व्यवस्थापन हे खूप मोठे कार्य झाले आहे. नैसर्गिक संकटांचा संपूर्ण विश्वाला सामना करावा लागतो आहे. अशावेळी संरचनात्मक अभियांत्रिकीचे नवे स्वरूप नेमके कसे असू शकते? त्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम कसे असतील? विद्यार्थी वर्गाला यामध्ये नेमकं काय शिकवलं गेलं पाहिजे? पर्यावरणस्नेही बांधकाम कशा पद्धतीने करता येईल? शून्य कचरा, कचऱ्याची निर्मितीच होणार नाही, याला प्राधान्य देऊन, आपण काय करू शकतो? अशा अनेक गोष्टींचा विचार ज्यावेळी ‘ इंजिनीअर्स डे’ साजरा केला जातो,त्यावेळी केला पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सण -समारंभांचे वातावरण आहे. त्याबरोबरच आता दिवाळीचीही तयारी सुरू होणार आहे. ‘मन की बात’ मध्ये आपण भेटत राहणार आणि मन की बात करत राहणार. त्याचबरोबर अगदी मनापासून आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत. या भावनेबरोबरच आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा! धन्यवाद!! पुन्हा भेटू!!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याच्या बातम्या येत आहेत. काही काही ठिकाणी, जरा जास्तच आणि सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे चिंता करण्यासारख्या बातम्याही येत आहेत. तर काही भागातले नागरिक अजूनही वरूणराजाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. भारत विशाल आहे आणि त्यामध्ये विविधताही आहे, मात्र या देशात कधी कधी वरूणराजाही आपली पसंती-नापसंतीचे रूप दाखवत असतो. परंतु आपण यामध्ये वरूणराजाला-पावसाला दोष देऊन काय उपयोग? मानवानेच तर निसर्गाकडून संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे, काही काही वेळेस हाच निसर्ग आमच्यावर चांगलाच रूसून बसतो. अशावेळी आपल्यावर सर्वात महत्वाची जबाबदारी येते, ती म्हणजे आपण सर्वांनी निसर्गप्रेमी, निसर्गाचे रक्षक, निसर्गाचे संवर्धक बनले पाहिजे. असे आपण निसर्गस्नेही बनलो तर निसर्गदत्त गोष्टींचा समतोल आपोआपच साधला जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच एका नैसर्गिक संकटाच्या घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. या घटनेनं संवेदनशील मानवी मनाचा पुरता ठाव घेतला होता. आपण सर्वांनीच ही घटना दूरचित्रवाणीवर पाहिली असेल. थायलंडमधल्या किशोरवयीन फुटबॉल खेळाडूंचा 12 जणांचा संघ आणि त्यांचे प्रशिक्षक फिरण्यासाठी म्हणून एका गुहेमध्ये गेले होते. वास्तविक, त्या गुहेमध्ये जाऊन- फिरून परत येण्यासाठी साधारणपणे काही तासांचा अवधी लागतो. परंतु त्यादिवशी या फुटबॉलपटुंच्या संघाच्या नशिबानं काही वेगळाच खेळ मांडला होता. ही मुलं गुहेमध्ये खूप आत आत गेली. आणि अचानक आलेल्या प्रचंड मुसळधार पावसामुळं गुहेच्या प्रवेशव्दारापाशी पाणी जमा झालं, या मुलांचा बाहेर येण्याचा रस्ता बंद झाला. आता बाहेरच येता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर, या मुलांनी गुहेमधल्या एका थोड्याशा उंचावर आश्रय घेतला. बरं त्यांना काही असं एक-दोन दिवस नाही तर तब्बल 18 दिवस आत थांबावं लागलं. अगदी किशोरवयात या मुलांना किती भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं. समोर प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना, कशा मानसिक अवस्थेमध्ये त्यांचा क्षण, क्षण गेला असणार, याची आता आपण कल्पना करू शकतो. एकीकडे ही मुलं संकटाशी दोन हात करीत झुंज देत होते आणि दुसरीकडे संपूर्ण विश्वामधली मानवता अगदी एकजूट होऊन ईश्वरदत्त मानवीय गुणांचं प्रकटीकरण करीत होती. अवघ्या जगातले लोक या मुलांना सुखरूप बाहेर येता यावं, यासाठी प्रार्थना करीत होते. आता मुलं कशी आहेत, कुठं आहेत, त्यांची अवस्था काय आहे, काय करताहेत, याची सर्व मार्गानं प्रत्येकजण चौकशी करीत होते. त्यांना कसं बाहेर काढता येईल, याचाच विचार सगळे करीत होते. समजा त्यांना, तातडीनं, वेळेवर मदत नाही मिळाली, मदतकार्यात थोडा जरी विलंब झाला तर या मौसमी पावसाच्या काळात त्यांना किमान काही महिने तरी बाहेर काढणं केवळ अशक्य झालं असतं. सुदैवानं चांगली बातमी आली आणि सगळ्या जगानं जणू सुटकेचा निश्वास सोडला. मुलांना गुहेतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झाला.
या संपूर्ण घटनाक्रमाकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जावं, असा विचार माझ्या मनामध्ये आला. मुलांना सोडवण्याचे कार्य कशा पद्धतीनं केलं गेलं. प्रत्येक स्तरावर, पातळीवर जबाबदारीचं सगळ्यांनी जे भान दाखवलं, ते पाहिलं की आश्चर्य वाटतं. यामध्ये सगळ्यांनी, म्हणजे मग त्यामध्ये सरकार असेल, या मुलांचे पालक, माता-पिता असतील, त्यांचे नातेवाईक असतील, प्रसार माध्यमे असतील, देशाचे नागरिक असतील, प्रत्येकाने अतिशय शांतपणे आणि धैर्याने या परिस्थितीला तोंड दिले. हे एक नवलच म्हणावं लागेल. सगळेच्या-सगळेजण एक समूह बनून या अभियानाच्या यशस्वीतेसाठी झटत होते. विशेष म्हणजे प्रत्येकाचा अतिशय संयमी व्यवहार पाहिल्यानंतर मला वाटतं की, हा एक शिकण्यासारखा, समजून-जाणून घेण्यासारखा गुण आहे. ज्यांची मुलं आत अडकली होती, त्यांच्या माता-पित्यांना दुःख होत नव्हतं असं नाही किंवा आईला दुःखातिरेकाने अश्रूधारा लागल्या नाहीत असंही नाही. परंतु धैर्य, संयम ठेवून संपूर्ण समाजाने केलेला शांतचित्त व्यवहार, ही एक अतिशय महत्वाची, आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. या मदतकार्याच्या संपूर्ण मोहिमेमध्ये थायलंडच्या नौसेनेच्या एका जवानाला आपले प्राण गमवावे लागले. संपूर्ण पाण्याने आणि अंधाराने भरलेल्या, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गुहेत अडकलेल्यांसाठी मोठ्या धाडसाने, धैर्याने मदतकार्य करण्याची बहादुरी या जवानांनी दाखवली, हे संपूर्ण विश्वानं पाहिलं आणि त्याचं नवलही केलं. इतक्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी आशा सोडली नव्हती, हेही यामध्ये विशेष आहे. या घटनेने दाखवून दिलं की, मानवता ज्यावेळी एकजूट होते, त्यावेळी अशा अद्भुत गोष्टी घडतात. मात्र त्यासाठी फक्त आपण शांत आणि स्थिर मनानं काम करण्याची आणि ज्यासाठी आपण काम करत आहोत, त्या लक्ष्यावर ध्यान केंद्रीत करण्याची गरज असते.
काही दिवसांपूर्वी आपल्या देशातले प्रिय कवी नीरज जी आपल्याला कायमचं सोडून गेले. नीरज जी यांचं एक वैशिष्ट्य होतं. आशा, विश्वास, दृढसंकल्प, याबरोबरच स्वतःवर त्यांचा खूप विश्वास होता. सर्व हिंदुस्तानींनाही नीरज जी यांची प्रत्येक गोष्ट खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारी ठरू शकते. त्यांनी लिहिले आहे की-
अँधियार ढलकर ही रहेगा,
आँधियाँ चाहे उठाओ,
बिजलियाँ चाहे गिराओ,
जल गया है दीप, तो अँधियार ढलकर ही रहेगा !
नीरज जी यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.
प्रधानमंत्री जी नमस्कार, माझं नाव सत्यम आहे. मी याचवर्षी दिल्ली विद्यापीठामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतलाय. आमच्या शाळेच्या बोर्ड परीक्षेच्यावेळी आम्ही परीक्षेचा तणाव कसा झेलायचा आणि शिक्षण याविषयी आपण चर्चा केली होती. आता माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देणार आहात?
तसं पाहिलं तर जुलै आणि ऑगस्ट हे महिने शेतकरी बंधू आणि सर्व नवयुवकांसाठी खूप महत्वाचे असतात. कारण याच काळामध्ये महाविद्यालयांच्या प्रवेशाची गडबड असते. सत्यमसारखे लाखो युवक शालेय जीवनातून बाहेर पडून महाविद्यालयामध्ये प्रवेश करत असतात. फेब्रुवारी आणि मार्च हे दोन महिने परीक्षा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका यांच्यामध्ये व्यतीत होतात तर एप्रिल आणि मे हे दोन महिने सुट्टीतल्या मौज मस्तीमध्ये निघून जातात. त्याच्या जोडीला परीक्षांचे निकाल, जीवनाच्या भविष्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी म्हणजेच करिअर निवडीसाठी हा काळ महत्वाचा असतो. जुलै महिना युवकांच्या दृष्टीने वेगळाच असतो. युवावर्ग आयुष्यातल्या एका नव्या मार्गावर पाऊल टाकत असतो. अशावेळी आपला फोकस प्रश्नावरून दूर होऊन ‘कट-ऑफ’ वर येतो. विद्यार्थ्याचे लक्ष घरामधून आता वसतिगृहाकडे लागते. विद्यार्थी आपल्या पालकांच्या छत्र – छायेतून बाहेर पडून प्राध्यापकांच्या छत्राखाली आलेले असतात. माझे युवामित्र महाविद्यालयीन जीवनाच्या प्रारंभाविषयी अतिशय उत्साही असतील, आनंदी असतील, याची मला अगदी खात्री आहे. पहिल्यांदाच आपलं घर सोडून बाहेर रहायला जायचं, आपलं गाव सोडून दुसरीकडे जायचं, एका सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून स्वतःलाच आपला सारथी व्हावं लागणार आहे. कितीतरी युवक आपल्या जीवनाला एक वेगळी, नवी दिशा देण्यासाठी पहिल्यांदाच आपलं घर सोडून असं बाहेर पडणारे असतात. एव्हाना काही युवकांचं नवीन महाविद्यालय सुरूही झालं असेल. काहीजण महाविद्यालयामध्ये जाण्याची तयारी करीत असतील. आपल्या सर्वांना मी इतकंच सांगू इच्छितो की, शांतचित्त रहा आणि या जीवनाचा आनंद घ्या. आपल्या अंतर्मनाचा असा आवाज असतो, त्याचं ऐकून भरपूर आनंद तुम्ही घ्या. अभ्यासाच्या पुस्तकांशिवाय तर आपलं पानही हलणार नाही. अभ्यास तर करावाच लागणार आहे. परंतु शिकतानाच नवनवीन गोष्टी शोधून काढण्याची नैसर्गिक उत्सुकता तुमच्यामध्ये कायम राहिली पाहिजे. जुन्या मित्रांचं एक विशेष मोल आहे. बालपणीच्या मित्रांचा हा ठेवा अमूल्य आहे. त्याचबरोबर नवे मित्र निवडणे, मैत्री करणे आणि ती कायम टिकवणे या सगळ्या गोष्टींसाठी एकप्रकारचा समुजतदारपणा आपल्याकडे असला पाहिजे. काहीतरी नवीन जरूर शिका. नवनवीन कौशल्ये विकसित करून घ्या. नव्या भाषा शिका. जे युवक आपल्या घरापासून दूर, बाहेर अन्य शहरांमध्ये शिकायला जाणार आहेत, त्यांनी त्या नव्या ठिकाणची वेगवेगळी स्थळे शोधावीत. त्यांच्याविषयी माहिती घ्यावी. तिथल्या लोकांविषयी माहिती घ्यावी, तिथली भाषा, संस्कृती जाणून घ्यावी. त्या परिसरातल्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन, त्यांची माहिती घ्यावी.
आयुष्यातल्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ करत असलेल्या सर्व नवयुवकांना माझ्या शुभेच्छा आहेत. आत्ता ज्यावेळी महाविद्यालयांच्या जीवनाविषयी चर्चा सुरू होती, त्यावेळी मी बातम्या पहात होतो. मध्यप्रदेशातल्या एका अतिशय गरीब कुटुंबामधला आशाराम चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्याने जीवनात अनेक संकटांशी सामना करीत कसे शैक्षणिक यश मिळवले, याची बातमी मी पाहत होतो. आशाराम जोधपूरच्या ‘एम्स’साठी असलेली एमबीबीएसची प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील कचरा वेचून आपल्या कुटुंबाचं पालन-पोषण करतात. या यशाबद्दल मी आशारामचे अभिनंदन करतो. गरीब कुटुंबांमधले असे कितीतरी गुणवंत विद्यार्थी आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी खूप काही करून दाखवलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मग तो दिल्लीचा प्रिन्स कुमार असो, त्याचे वडील ‘डीटीसी’मध्ये बसचालक आहेत, किंवा मग कोलकाताचा अभय गुप्ता असो. या विद्यार्थ्याने पदपथावर असलेल्या दिव्याखालच्या प्रकाशामध्ये आपला अभ्यास केला. अहमदाबादची कन्या आफरीन शेख़ आहे, तिचे वडील ऑटो रिक्षा चालवतात. नागपूरची कन्या खुशी असेल, तिचेही वडील शाळेच्या बसचे चालक आहेत किंवा मग हरियाणाचा कार्तिक असेल, त्याचे वडील चौकीदारीचे काम करतात, झारखंडच्या रमेश साहूचे वडील विटभट्टीवर श्रमिक आहेत. स्वतः रमेशही जत्रा-मेळाव्यांमध्ये खेळणी विकण्याचं काम करत होता. तसंच गुडगावची दिव्यांग कन्या अनुष्का पांडा, ही जन्मतःच ‘स्पायनल मस्क्युलर अॅट्रोफी’नावाच्या एका अनुवंशिक आजाराने त्रस्त आहे. या सर्वांनी आपल्या दृढसंकल्पाने आणि चिकाटीने येत असलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करून संपूर्ण जगाने पहात रहावं, अशी कामगिरी केली आहे. आपण सभोवती नजर टाकली तर आपल्याला अशी अनेक उदाहरणे दिसून येतील.
देशाच्या कोणत्याही भागात, अगदी कानाकोपऱ्यात घडलेली एखादी चांगली घटना, माझ्या मनाला ऊर्जा देत असते. प्रेरणा देत असते. आणि ही घटना जर अशा नवयुवकांशी संबंधित असेल तर अशावेळी नीरज जी यांच्या एका गोष्टीचं मला स्मरण होतं. माझ्या मते, आपल्या जीवनाचं ध्येय हेच तर असतं. नीरज जी म्हणतात –
गीत आकाश को धरती का सुनाना है मुझे,
हर अँधेरे को उजाले में बुलाना है मुझे,
फूल की गंध से तलवार को सर करना है,
और गा-गा के पहाड़ों को जगाना है मुझे !
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी माझी नजर एका बातमीवर पडली, त्यामध्ये लिहिले होते, ‘‘ दोन युवकांनी मोदी यांचं स्वप्न साकार केलं!’’ बातमी पूर्ण वाचल्यावर समजलं की, आज आमचे युवक तंत्रज्ञानाचा उपयोग स्मार्ट आणि सर्जनशीलतेनं कसा करतात आणि सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न कसा करतात, याची ती बातमी होती. घटना अशी होती की, अमेरिकेतल्या सॅन जोस शहराला ‘तंत्रज्ञानाचं केंद्रस्थान’ मानलं जातं. एकदा मी तिथल्या भारतीय युवकांशी चर्चा करत होतो. त्यावेळी मी त्यांना आवाहन केलं की, तुम्ही आपल्याकडे असलेल्या बुद्धिमत्तेचा, हुशारीचा आपल्या भारतासाठी कसा वापर करू शकता, यावर विचार करा आणि मुद्दाम थोडा वेळ काढून काहीतरी नवीन करा. ‘ब्रेन- ड्रेन’च्या समस्येला ‘ब्रेन-गेन’चे उत्तर मिळू शकेल, यासाठी मी हे आवाहन केलं होतं. रायबरेलीचे दोन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले व्यावसायिक, योगेश साहू जी आणि रजनीश वाजपेयी जी यांनी माझं हे आवाहन स्वीकारून एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. आपल्या व्यावसायिक कौशल्याचा उपयोग करून योगेश जी आणि रजनीश जी यांनी मिळून एक ‘स्मार्टगांव अॅप’ तयार केलं आहे. हे अॅप केवळ गावातल्या लोकांना संपूर्ण जगाशी जोडतेय असं नाही तर या अॅपच्या माध्यमातून कोणतीही माहिती आणि सूचना आपल्या मोबाईलवरच मिळू शकते. रायबरेलीमधल्या तौधकपूर गावचे रहिवासी, ग्राम प्रमुख-सरपंच, जिल्हा दंडाधिकारी, मुख्य जिल्हा अधिकारी, या सर्वांनी या अॅपचा उपयोग करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. हे नवं अॅप एक प्रकारे गावामध्ये डिजिटल क्रांती आणण्याचं काम करत आहे. गावामध्ये जे जे विकास कार्य केलं जातं , त्याची माहिती या अॅपच्या माध्यमातून नोंदवली जाते. कामाविषयी माहिती घेणं , कामावर लक्ष ठेवणं ही कामं आता अॅपमुळं अगदी सोपी, सुकर झाली आहेत.
या अॅपमध्ये गावातल्या सर्वांच्या दूरध्वनी क्रमांकाची माहिती आहे, बातम्यांचा विभाग आहे, होत असलेल्या, होणाऱ्या कार्यक्रमांची सूची आहे, आरोग्य केंद्र आणि माहिती केंद्राचा तपशील यामध्ये आहे. विशेष म्हणजे हे अॅप शेतकरी बंधूंसाठीही खूप लाभदायक आहे. शेतकरी वर्गासाठी त्यांच्या उत्पादनाला नेमके किती बाजारमूल्य कधी मिळणार आहे, याची नेमकी माहिती अॅपच्या माध्यमातून मिळते, म्हणजे याचा अर्थ शेतकऱ्यांसाठी हे अॅप ‘बाजारपेठे’सारखं काम करत आहे.
या गोष्टीकडे आपण जर अगदी काळजीपूर्वक विचार करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, हे युवक अमेरिकेत वास्तव्य करतात. त्यांचं आता तिथल्याप्रमाणे राहणीमान आहे आणि विचारही ते तसाच करतात. हे युवक काही वर्षांपूर्वी भारत सोडून परदेशी गेले आहेत. तरीही त्यांना आपल्या गावातल्या अगदी बारीक-सारीक गोष्टीही चांगल्या ठाऊक आहेत. आपल्या देशातल्या समस्या त्यांना माहीत आहेत आणि आपल्या गावाशी असलेलं भावनिक नातं, या युवकांचं आजही कायम आहे. म्हणूनच कदाचित आपल्या गावाला नेमकं काय हवं आहे, याची जाणीव त्यांना आहे आणि त्याला अनुसरून त्यांनी हे अॅप बनवलंय. आपलं गावं, आपली पाळंमुळं यांच्याशी असलेली त्यांची नाळ अद्याप तुटलेली नाही. त्याचबरोबर आपल्या मायभूमीसाठी काहीतरी करण्याची आंतरिक इच्छा प्रत्येक हिंदुस्तानींच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असतेच परंतु कधी कधी वेळेअभावी तर कधी अतिदूरच्या अंतरामुळे, तर कधी परिस्थितीमुळे किंवा इतर कारणांमुळे त्यावर अगदी पातळ पापुद्र्याप्रमाणे जणू राख बसलेली असते. मात्र एखाद्या लहानशा ठिणगीमुळेही मनातले भाव प्रगट होण्यास मदत मिळते. ठिणगीच्या हलक्याशा स्पर्शानेही सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सामोऱ्या येतात आणि त्या भूतकाळातल्या दिवसांकडे जणू आपल्याला अगदी खेचून नेतात. असं काही आपल्याबाबतीत कधी ना कधी घडलं असेल काय, ते आपणही सर्वांनी आठवावं. कोणत्याही स्थितीमुळे, परिस्थितीमुळे किंवा लांबच्या अंतरामुळे आपणही कोणापासून तरी पूर्णपणे वेगळं झालो आहोत की, आपल्या नात्यांवर असाच हलकासा पापुद्रा निर्माण झाला आहे, याचा आपण जरूर विचार करावा.
‘‘आदरणीय प्रधानमंत्री जी नमस्कार, मी संतोष काकडे, महाराष्ट्रातल्या कोल्हापूर या गावातून बोलतोय. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची खूप जुनी परंपरा आहे. दरवर्षी खूप उत्साहामध्ये आणि भक्तीभावाने वारी साजरी केली जाते. जवळपास 7 ते 8 लाख वारकरी यामध्ये सहभागी होत असतात. वारीसारख्या अतिशय आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची माहिती देशातल्या इतर जनतेलाही मिळावी, यासाठी आपण वारीविषयी जास्त माहिती द्यावी.’’
संतोष जी आपण फोन केलात, त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद!
अगदी खरंय तुमचं म्हणणं, पंढरपूरची वारी म्हणजे ही एक अद्भूत यात्रा आहे. मित्रांनो, यावर्षी आषाढी एकादशी 23 जुलै रोजी होती. या दिवशी पंढरपूरला खूप प्रचंड प्रमाणावर वारीचा उत्सव भक्तीभावाने साजरा केला जातो. पंढरपूर हे महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातलं एक पवित्र शहर आहे. आषाढी एकादशीच्या जवळपास 15-20 दिवस आधीच वारकरी म्हणजे तीर्थयात्री पालख्यांसमवेत पंढरपूरची यात्रा करण्यासाठी चालत निघतात. या यात्रेला ‘वारी’ असं म्हणतात आणि त्यामध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासारख्या महान संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेऊन विठ्ठल नामाचा गजर करत, टाळ मृदुंग वाजवत पंढरपूरच्या दिशेने वारकरी पायी निघतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धा यांचा त्रिवेणी संगम आहे. विठ्ठल, ज्याला विठोबा अथवा पांडुरंग असेही म्हणतात, त्यांच्या दर्शनासाठी तिर्थयात्री पंढरपूरला पोहोचतात. विठ्ठल गरीब, वंचित, पीडित यांच्या हिताचं रक्षण करणारा देव आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातल्या लोकांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयी अपार श्रद्धा, भक्ती आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये जावं आणि तिथला महिमा, सौंदर्य यांचं वर्णन करावं. तिथं गेल्यानंतर मिळणारा आध्यात्मिक आनंद हा एक वेगळीच अनुभूती आहे. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना माझा आग्रह आहे की, तुम्हाला कधी संधी मिळालीच तर तुम्ही एकदा तरी जरूर पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम…. अशा अगणित संतांची शिकवण आजही महाराष्ट्रातल्या जन-सामान्यांना दिली जात आहे. ही शिकवण अंधश्रद्धेच्या विरोधात लढण्याचं बळं देत आहे. आणि हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हीच संत परंपरा प्रेरणा देत आली आहे. मग त्यासाठी भारूडाचे माध्यम वापरले असेल अथवा अभंग असतील. या संतांच्या साहित्यामधून सद्भावना, प्रेम आणि बंधुभाव यांचा महत्वपूर्ण संदेश दिला गेला आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात समाजाला लढण्याची ताकद देण्याचा मंत्र या संतांनी दिला. समाज विघातक गोष्टी ज्या ज्यावेळी होत असत, त्या त्यावेळी समाजाला रोखण्याचे, समाजाला जाब विचारण्याचे इतकंच नाही तर समाजाला आरसा दाखवण्याचं काम या संतांनी केलं. आणि जुन्या कुप्रथांचे समाजातून कायमचं उच्चाटन करण्याचं सत्कार्यही त्यांनी केलं. लोकांच्या मनावर करुणा, समानता आणि शूचितेचा संस्कार बिंबवला. आपली भारत भूमी बहुरत्ना वसुंधरा आहे. ज्याप्रमाणे आपल्या संतांची एक महान परंपरा आहे, त्याचप्रमाणे सामर्थ्यवान माता-भारतीला समर्पित महापुरूषांनी या भूमीसाठी आपल्या जीवनाची आहुती दिली आहे. आपलं अवघं जीवन मातृभूमीसाठी समर्पित करणारे महापुरूष या भूमीचे पूत्र आहेत. असेच एक महापुरूष म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. त्यांनी अनेक भारतीयांच्या मनावर आपल्या कार्याने अमिट ठसा उमटवला आहे. 23 जुलै रोजी टिळक यांची जयंती आणि दिनांक 1 ऑगस्ट रोजी त्यांची पुण्यतिथी असते, यानिमित्त आपण त्यांचं पुण्यस्मरण करूया. लोकमान्य टिळक म्हणजे साहस आणि आत्मविश्वास यांचा जणू सागर होते. ब्रिटिश शासनाला त्यांच्या चुकांचा आरसा दाखवण्याची शक्ती आणि बुद्धिमत्ता टिळक यांच्याकडेच होती. इंग्रज लोकमान्य टिळकांना अतिशय घाबरत होते. त्यांच्यावर 20 वर्षांमध्ये तीनवेळा राजद्रोहाचा खटला चालवून आरोप सिद्ध करण्याचा इंग्रजांनी अटोकाट प्रयत्न केला. ही काही साधीसुधी गोष्ट नाही. लोकमान्य टिळक आणि अहमदाबाद इथंल्या त्यांच्या पुतळ्याविषयी घडलेली एक रंजक घटना आज मी देशवासियांना सांगू इच्छितो.
ऑक्टोबर, 1916 मध्ये लोकमान्य टिळक जी अहमदाबादमध्ये आले होते. म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वीची ही घटना आहे. त्या काळात अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी 40 हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. त्यांच्या या भेटीमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल यांना टिळक यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. या भेटीत सरदार वल्लभ भाई पटेल, लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वामुळे, विचारांमुळे अतिशय प्रभावित झाले होते. 1 ऑगस्ट, 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा देहांत झाला, त्यानंतर पटेल यांनी निर्णय घेतला की, अहमदाबादमध्ये टिळक यांचं स्मारक बनवावं. त्यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल अहमदाबाद नगर पालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यांनी ताबडतोब लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी शहरातल्या व्हिक्टोरिया गार्डनचं स्थान निश्चित केलं. या स्थानाला ब्रिटनच्या महाराणीचं नाव होतं. त्यामुळं स्वाभाविकपणे ब्रिटिश नाराज झाले. जिल्हाधिकारीही टिळक यांचं स्मारक व्हिक्टोरिया गार्डनमध्ये करण्यासाठी सातत्यानं मनाई करू लागले. परंतु ते सरदार साहेब होते. ते नमणारे थोडेच होते. टिळकांच्या स्मारकासाठी निवडलेल्या जागेसाठी ते ठाम राहिले. सरदार पटेलांनी निक्षून सांगितलं, मला आपल्या पदाचा त्याग करावा लागेल, तरी हरकत नाही, परंतु काही झालं तरी लोकमान्य टिळकांचा पुतळा, स्मारक म्हणून इथं उभा करण्यात येणारच.
अखेरीस टिळकांचा पुतळा बनून तयार झाला आणि सरदार साहेबांनी दिनांक 28 फेब्रुवारी, 1929 रोजी, इतर कोणाकडून नाही तर, महात्मा गांधी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन करवून घेतलं. या उद्घाटन समारंभामध्ये पूज्य बापू आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘सरदार पटेल आल्यापासून अहमदाबाद नगर पालिकेला केवळ एक व्यक्ती मिळाली नाही तर एक हिंम्मत मिळाली आहे. त्यांच्या धाडसामुळेच आज टिळक यांच्या पुतळ्याचे-स्मारकाचे निर्माणकार्य होवू शकले आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एक सांगतो, हा पुतळाही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तसाच दुर्मिळ आहे. लोकमान्य टिळक एका खुर्चीवर बसले आहेत, टिळक यांच्या बरोबर खालच्या बाजूला ‘‘स्वराज हमारा जन्मसिद्ध अधिकार है’’ असं लिहिलं आहे. मी आपल्याला हे सगळं सांगतोय तो कालखंड इंग्रजांच्या सत्तेचा होता, हे इथं महत्वाचं आहे. लोकमान्य टिळक जी यांच्या प्रयत्नांमुळेच तर सार्वजनिक गणेश उत्सवाची परंपरा सुरू झाली. सार्वजनिक गणेश उत्सव परंपरागत श्रद्धा आणि भक्तीबरोबरच समाज जागृतीचे, सामूहिक कार्याचं, लोकांमध्ये समरसता आणि समानतेचा भाव निर्माण करण्याचं एक प्रभावी माध्यम बनलं होतं. तसं पाहिलं तर त्या विशिष्ट कालखंडामध्ये इंग्रजांविरूद्ध एकजूट होऊन लढण्याची आवश्यकता होती. आणि टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवांमुळे समाजातल्या जाती आणि संप्रदायांच्या भिंती तोडून सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं. काळाच्या ओघामध्ये या सर्व उत्सवांच्या आयोजनाची लोकप्रियता वाढत गेली यावरूनच लक्षात येतं की, आपल्या प्राचीन परंपरा आणि इतिहासांमधल्या वीर नायकांबद्दल आजच्या युवा पिढीमध्येही खूप आकर्षण आहे. आज अनेक शहरांमध्ये तर जवळपास प्रत्येक गल्ली-बोळांमध्ये गणेश उत्सवांचे मंडप उभारलेले दिसून येतात. गल्लीतले सर्व परिवार मिळून गणपती उत्सवाचे आयोजन करतात. एक समूह, गट या रूपात सगळे मिळून काम करतात. इथंही आपल्या युवकांना चांगली संधी मिळते, त्यांचे नेतृत्वगुण, उत्सव संयोजक, कार्यक्रम आयोजक, समन्वयक म्हणून त्यांच्यामधले गुण विकसित होऊ शकतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो ! गेल्या वेळेस तर मी आग्रह केला होताच आता लोकमान्य टिळक यांचं आपण स्मरण करत आहोत, त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा आग्रहाने आपल्याला सांगतो की, आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात, आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. अगदी मनापासून सगळे कार्यक्रम करावेत. परंतु सर्वांनी ‘इको-फ्रेंडली’ म्हणजेच पर्यावरण स्नेही गणेश उत्सव साजरा करावा, असाही माझा आग्रह असणार आहे. गणेशजींच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या सामानापर्यंत सगळं काही पर्यावरण स्नेही असावे. आणि मला तर वाटतं की, प्रत्येक शहरामध्ये ‘पर्यावरण स्नेही- इको फ्रेंडली’ गणेश उत्सवाची एक वेगळीच स्पर्धा घेतली जावी. त्यामधल्या विजेत्यांना चांगली पारितोषिकं देण्यात यावीत. मला तर वाटतं की, ‘मायगव्ह’ आणि ‘नरेंद्र मोदी अॅप’ यांच्यावरही पर्यावरण स्नेही गणेश -उत्सवाविषयी अनेक गोष्टींचा व्यापक प्रचार करता येवू शकेल. आपली गोष्ट मी नक्कीच सर्व लोकांपर्यत पोहोचवेन. लोकमान्य टिळक यांनी देशवासियांमध्ये आत्मविश्वास जागृत करणारी घोषणा दिली होती. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’’. आज प्रत्येक भारतीयाला सुशासन आणि विकासकार्याचे चांगले परिणाम मिळण्याची आवश्यकता आहे. हीच गोष्ट नवभारताच्या निर्माणाचे कार्य करणार आहे. टिळक यांच्या जन्मानंतर 50वर्षांनी अगदी त्याच दिवशी म्हणजे दिनांक 23 जुलै रोजी भारत मातेच्या आणखी एका सुपुत्राचा जन्म झाला. त्या पुत्रानं आपल्या आयुष्याचं बलिदान या भूमीसाठी दिलं. देशवासियांना स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्वास घेता यावा, यासाठी या सुपुत्रानं बलिदान दिलं. मी चंद्रशेखर आजाद यांच्याविषयी बोलतोय. या ओळी कानावर पडल्यानंतर देशभक्तीची प्रेरणा मिळणार नाही, असा भारतामध्ये एकही नवयुवक सापडणार नाही.
‘‘सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है’’
या ओळींनी अशफाक़ उल्लाह खान, भगत सिंह, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या अनेक नवयुवकांना त्यावेळी प्रेरित केलं होतं. चंद्रशेखर आझाद यांची बहादुरी आणि स्वातंत्र्यासाठी त्यांच्याकडे असलेली धडाडी अनेक युवकांना प्रेरणादायी ठरली आहे. आझाद यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, परंतु ते कधीच विदेशी शासनापुढे झुकले नाहीत. चंद्रशेखर आझाद यांचं गाव मध्यप्रदेशातल्या अलीराजपूर हे आहे. मला या गावाला भेट देण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य मानतो. अलाहाबादच्या चंद्रशेखर आझाद पार्कमध्येही श्रद्धासुमन अर्पित करण्याची संधी मला मिळाली. विदेशींच्या गोळीने मरण्याची इच्छाही चंद्रशेखर आझाद या वीराची नव्हती, स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढत राहणार आणि बलिदान द्यावं लागलं तरी स्वातंत्र्य मिळवूनच बलिदान देणार, अशी या वीरानं जणू प्रतिज्ञा केली होती. हे त्यांचे एक वैशिष्ट्य होतं. पुन्हा एकदा भारत मातेच्या या दोन्ही महान सुपुत्रांना – लोकमान्य टिळक जी आणि चंद्रशेखर आझादजी यांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो.
अलिकडेच काही दिवसांपूर्वी फिनलँडमध्ये झालेल्या ज्युनियर अंडर -20 विश्व अॅथेलेटिक्स विजेतेपदाच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये भारताची पराक्रमी कन्या आणि एका भूमीपुत्राची कन्या हिमा दास हिने सुवर्ण पदक जिंकून एक नवा इतिहास घडवला आहे.
देशाची आणखी एक कन्या एकता भयान हिने माझ्या पत्राला उत्तर म्हणून इंडोनेशियामधून मला ई-मेल पाठवला आहे. सध्या एकता तिथं एशियन क्रीडा स्पर्धेची तयारी करत आहे. आपल्या ई-मेल मध्ये एकतानं लिहिलं आहे की, कोणाही अॅथलीटच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा क्षण असतो, तो म्हणजे, ज्यावेळी तो खेळाडू हातामध्ये तिरंगा पकडतो तो क्षण. आणि मी हाती तिरंगा पकडला, त्याचा मला अभिमान वाटतो. मी करून दाखवलं, याचा अभिमान वाटतो.’’ एकता, आम्हा सर्वांनाही तुझा अभिमान वाटतो. आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल आम्हाला तुझ्याविषयी अभिमान वाटतो. ट्युनिशियामध्ये विश्व पॅरा अॅथलेटिक्स ग्रॅंड प्रिक्स 2018 मध्ये एकतानं सुवर्ण आणि कांस्य पदकं जिंकली आहेत. तिच्या या यशाचं विशेष कौतुक यासाठी आहे की, एकतानं आपल्यापुढं असलेल्या आव्हानांनाच यशाचं माध्यम बनवलं. एकता भयान या देशाच्या सुकन्येला 2003 मध्ये रस्त्यावर झालेल्या एका अपघातामध्ये खूप जबरदस्त दुखापत झाली. अपघातानंतर तिच्या शरीराचा अर्धा भाग काम करेनासा झाला. तरीही ती हिंम्मत हरवून बसली नाही. तिनं स्वतःला इतकं मजबूत बनवलं आणि आज हे यश मिळवून दाखवलं. आणखी एक दिव्यांग योगेश कठुनिया जी यांनी बर्लिन पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये थाळीफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकून नवीन जागतिक विक्रम नोंदवला. त्यांच्याच बरोबर सुंदर सिंह गुर्जर यांनी ही भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. एकता भयान जी, योगेश कठुनिया जी आणि सुंदर सिंह जी यांनी दाखवलेल्या अतुल्य धाडसाचे आणि आव्हानांना सामोरं जाऊन जिंकण्याच्या निर्धाराचे मी खूप कौतुक करतो. आपल्या या निर्धाराला सलाम करतो. आपल्या सर्वांचे अभिनंदनही करतो. आपण अशीच पुढे वाटचाल करावी, खेळत रहा, विकसित होत रहा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यात अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर विविध उत्सवही या महिन्यात येतात. परंतु पावसाळी हवामानामुळं काही वेळेस घरामध्ये आजारपणाचा प्रवेशही होत असतो. आपल्या सर्वांच्या उत्तम स्वास्थाची मी कामना करतो. देशभक्तीची प्रेरणा जागृत करत असलेल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक युगांपासून चालत आलेल्या अनेक उत्सवांसाठी आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ‘मन की बात’ मध्ये नक्की भेटूया. जरूर भेटूया!
खूप-खूप धन्यवाद!!
नमस्कार! माझ्या प्रिय देशवासियांनो! ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याबरोबर संवाद साधण्याचं भाग्य मला आज पुन्हा एकदा मिळालं आहे. अलिकडेच काही दिवसांपूर्वी बेंगलुरूमध्ये क्रिकेटचा एक ऐतिहासिक सामना झाला. आपल्याही अगदी लगेचच लक्षात आलं असेल, मी भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या क्रिकेट कसोटीविषयी बोलतोय. ही अफगाणिस्तानची पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी होती. अफगाणिस्तानने त्यांचा हा पहिला ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना भारताबरोबर खेळला ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी खूप चांगल्या खेळाचं दर्शन घडवले. अफगाणिस्तानचे एक गोलंदाज राशिद खान यांनी तर यावर्षी ‘आयपीएल’मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. याविषयी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी मला टॅग करून आपल्या व्टिटरवर व्यक्त केलेलं मनोगत माझ्या स्मरणात आहे. त्यांनी लिहिलं होतं - ‘‘ अफगाणिस्तानच्या जनतेला आपला ‘क्रिकेटपटू नायक’ म्हणून राशिद खान याच्याविषयी अभिमान वाटतो. आमच्या क्रीडापटूंना त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, याबद्दल मी आपल्या भारतीय मित्रांचे आभार मानतो. अफगाणिस्तानमध्ये जे काही उत्तम, सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं प्रतिनिधित्व राशिद करतोय. तो म्हणजे क्रिकेट विश्वाची संपत्ती आहे आणि या बरोबरच पुढं, त्यांनी थोडं गंमतीशीर लिहिलं होतं की, आम्ही काही त्याला कुणाला देणार नाही.’’ हा सामना आपल्या सर्वांच्याच कायम स्मरणात राहणार आहे. अर्थात, हा पहिला सामना होता, त्यामुळं तो लक्षात राहणार, हे तर स्वाभाविकच आहे. भारतीय संघाने या सामन्याच्यावेळी दाखवलेलं औदार्य संपूर्ण विश्वासाठी आदर्श ठरणारं आहे. भारतीय संघाने करंडक घेताना एक विजेता संघ काय करू शकतो- हे त्यांनी दाखवून दिलं. भारतीय संघाने विजयी चषक घेताना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघालाही बोलावलं आणि दोन्ही संघांनी संयुक्तपणे छायाचित्र काढून तो ऐतिहासिक क्षण टिपून ठेवला. खिलाडू वृत्ती म्हणजे नेमकं काय, खिलाडूपणा कसा असतो, याचा अनुभव या एका घटनेनं आपल्याला आला. खेळ समाजाला एकजूट करण्यासाठी आणि आपल्या युवकांमधले कौशल्य, प्रतिभा दाखवण्यासाठी एक खूप चांगले माध्यम आहे. भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांना माझ्या खूप शुभेच्छा. यापुढेही आपण अशाच प्रकारे खिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करीत एकमेकांशी खेळत राहू आणि विकसितही होत राहू, अशी मला आशा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो! या 21 जून रोजी म्हणजे चौथ्या ‘योग दिनी’एक वेगळेच दृष्य होते. संपूर्ण विश्व एकजूट असल्याचं दृष्य दिसत होतं. जगभरामध्ये लोकांनी अतिशय उत्साहानं आणि उल्ल्हासानं योगाभ्यास केला. युरोपियन संसद असेल, संयुक्त राष्ट्राचं न्यू यॉर्कमधलं मुख्यालय असेल अथवा जपानी नौसेनेचे लढावू जहाज असेल, सगळीकडे लोक योग करताना दिसत होते. सऊदी अरबमध्ये पहिल्यांदाच योगविषयक ऐतिहासिक कार्यक्रम झाला आणि मला माहिती मिळाली की यावेळी अनेक आसनं करण्यासाठी मार्गदर्शनाचं कार्य महिलांनी केलं. लडाखमध्ये अतिउंचावरील बर्फाळ पर्वतशिखरावर भारत आणि चीनच्या सैनिकांनी संयुक्तपणे योगाभ्यास केला. सीमांची बंधने तोडून सर्वांना जोडण्याचं काम करत आहे. शेकडो देशांतल्या हजारो उत्साही लोकांनी जाती, धर्म, क्षेत्र, रंग अथवा लिंग अशा प्रकारच्या भेदांच्या पलिकडे जाऊन योग दिनाचा एक खूप मोठा उत्सव केला आहे. जर केला संपूर्ण जगभरातले लोक इतक्या उत्साहानं ‘योग दिवसा’च्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होते, तर मग अशावेळी भारतामध्ये त्याच्या कैकपट उत्साह का बरं असणार नाही?
आमच्या देशाच्या सुरक्षा दलाचे जवान, पायदळ,नौदल,हवाईदल अशा तीनही ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला. काही वीर सैनिकांनी पाणबुडीवर योगासने केली. तर काही सैनिकांनी सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावर योगाभ्यास केला. आमच्या वायुसेनेच्या योद्धांनी योद्धा जवान यांनी तर जमिनीपासून 15 हजार फूट उंचीवर आकाशामध्ये योगासने करून सगळ्यांनीना अचंबित केलं. यामध्ये सांगण्यासारखे विशेष म्हणजे त्यांनी विमानामध्ये बसून योगाभ्यास केला असं नाही, तर हवेमध्ये तरंगत योगाभ्यास केला. शाळा असो, महाविद्यालय असो, कार्यालय असो, उद्यान असो, उंच इमारत असो अथवा क्रीडा मैदान, सगळीकडे योगाभ्यास केला गेला. अहमदाबादचे एक दृश्य सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारे होते. तिथं एकाच ठिकाणी जवळपास 750 दिव्यांग बंधू-भगिनींनी एकत्रित योगाभ्यास केला आणि जगामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जाती, पंथ आणि भौगोलिक सीमा पार करून संपूर्ण जगभरातल्या लोकांना एकजूट करण्याचं काम योगाभ्यासाने केलं आहे. आपण प्राचीन काळापासून ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही भावना मनात ठेवून जगत आलो आहे. आपले ऋषी, मुनी, संत यांनी नेहमी याच विचारावर भर दिला आहे. आज ‘योग’ ते योग्य प्रकारे सिद्ध करून साधनेने दाखवलं आहे. आज ‘वेलनेस’ हा विचार क्रांतीसारखं काम करत आहे, असं मला वाटतं. ‘वेलनेस’ची जी मोहीम सुरू झाली आहे, ती ‘योगा’मुळे अधिक पुढे जाईल. जास्तीत जास्त लोक ‘योग’ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवतील, अशी मला आशा वाटते.
माझ्या प्रिय देशवासियांनो! ‘माय गव्ह’ आणि ‘नरेंद्रमोदीअॅप’ यावर काही लोकांनी मला लिहिलं आहे की, मी यावेळच्या ‘मन की बात’मध्ये 1 जुलैला साजरा होणाऱ्या ‘डॉक्टर्स डे’विषयी काही बोलावं. आजाराचं संकट ओढवलं की त्यावेळीच आपल्याला डॉक्टरांची आठवण येते, हे अगदी खरं आहे. परंतु 1 जुलै या एका दिवशी आपल्या देशातल्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला जातो. समाजासाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल, त्यांच्या समर्पणाच्या भावनेबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद दिले जातात. आपण मातेला देवाच्या रूपात पाहतो, माता आपल्याला जन्म देते म्हणून तिला आपण देवासमान मानतो. ही आपली संस्कृती आहे. काहीवेळा तर डॉक्टर आपल्याला पुनर्जन्म देतात. डॉक्टरांची भूमिका केवळ औषधोपचारापुरती मर्यादित असत नाही. बरेचवेळा डॉक्टर कुटुंबाच्या मित्रासारखे असतात. आपल्यासाठी हे डॉक्टरमित्र जीवनाचे मार्गदर्शकच असतात.
“They not only cure but also heal” (दे नॉट ओन्ली क्युअर बट ऑल्सो हील) डॉक्टरांकडे वैद्यकीय ज्ञान तर असतेच त्याचबरोबर त्यांना आपली जीवनशैली कशी असावी, सध्या कोणत्या ‘शैली’चा प्रभाव वाढतोय आणि त्याचा आपल्या आरोग्यावर नेमका कोणता, कसा परिणाम होतो आहे, याच्याविषयी चांगला, सखोल अनुभव असतो. भारतीय डॉक्टरांनी आपल्या अमर्याद क्षमता आणि कौशल्य यांचं दर्शन घडवून संपूर्ण विश्वामध्ये आपली वेगळी, स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये पारंगत होतानाच कठोर परिश्रम करून आमचे डॉक्टर अतिशय गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या सोडवण्यात तज्ज्ञ आहेत. अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून मी सर्व देशवासियांच्यावतीनं आमच्या सर्व डॉक्टर सहकारी मंडळींना आगामी 1 जुलैच्या ‘डॉक्टर्स डे’च्या खूप खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आपले भाग्य थोर आहे, म्हणून आपल्याला या भारतभूमीवर जन्म मिळाला आहे. भारताला एक समृद्ध इतिहास आहे. आपल्याकडे ऐतिहासिक घटना घडली नाही, असा एखादा महिना किंवा दिवस शोधूनही सापडणार नाही. तुम्ही पर्यटन करायला निघाला तर दिसून येईल की, भारतात प्रत्येक ठिकाणी कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा वारसा आहे. त्या विशिष्ट स्थानाशी नातं सांगणारा कोणी संत असतो, एखादा महापुरूष असेल, कोणी प्रसिद्ध व्यक्ती असेल, प्रत्येकानं आपल्यापरीने योगदान दिलेलं असतं. प्रत्येकाचं असं महात्म्य असतं.
‘‘प्रधानमंत्री जी नमस्कार! मी डॉ. सुरेंद्र मिश्र बोलतोय. आपण 28 जून रोजी मगहर इथं येणार आहात, असं मला समजलं. मी मगहरला अगदी लागून असलेल्या गोरखपूर जिल्हयातल्या टडवा या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. मगहर या गावात कबीर यांचं समाधीस्थळ आहे. आणि कबीर म्हणजे इथल्या लोकांमध्ये सामाजिक समरसता साधणारा धागा आहे. इथं कबीर यांच्या विचारांवर प्रत्येक पातळीवर चर्चा होत असते. आपण जी कार्ययोजना आखली आहे, त्यामुळे समाजातल्या सर्व स्तरावर खूप चांगला परिणाम होणार आहे. भारत सरकारची ही नेमकी काय कार्ययोजना आहे, याची माहिती आपण द्यावी, अशी माझी विनंती आहे.’’
आपण दूरध्वनी केल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. मी 28 तारखेला मगहर इथं येणार आहे, हे खरं आहे. गुजरातचा कबीरवड आपल्याला चांगलाच ठाऊक असणार. ज्यावेळी मी गुजरातमध्ये होतो, तिथं काम करत होतो, त्यावेळी संत कबीर यांच्या परंपरेतल्या लोकांचं एक मोठं राष्ट्रीय अधिवेशन भरवलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये पूर्व भागात मगहर या गावी संत कबीरदास यांनी समाधी घेतली होती, हे सगळ्यांनीनाच माहीत आहे. परंतु कबीरदास जी यांनी समाधी घेण्यासाठी मगहर हेच स्थान का बरं निवडलं, हे आपल्याला ठाऊक आहे का? त्याकाळी असं मानत होते की, ज्याचा मृत्यू मगहर इथं होतो, त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही. आणि याउलट जो काशीमध्ये देहत्याग करतो, तो स्वर्गात जातो. मगहरला अपवित्र स्थान मानले जात होते. परंतु संत कबीरदास यांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. त्याकाळात प्रचलित असलेल्या अशा वाईट आणि अंधविश्वासानं चालत आलेल्या परंपरा तोडण्यासाठी ते मगहर इथं गेले आणि तिथंच समाधी घेतली. संत कबीरदास जी यांनी साखिया आणि दोह्यांच्या माध्यमातून सामाजिक समानता, शांतता आणि बंधुभाव यावर भर दिला. हेच त्यांचे आदर्श होते. त्यांच्या रचनांमधून आपल्याला हेच आदर्श दिसून येतात. विशेष म्हणजे आजच्या काळातही कबीर जींच्या रचना तितक्याच प्रेरक आहेत. त्यांचा एक दोहा आहे:-
‘‘कबीर सोई पीर है, जो जाने पर पीर!
जो पर पीर न जानही, सो का पीर में पीर !!’’
याचा अर्थ असा आहे की, जो दुसऱ्याची पीडा समजतो तोच खरा फकीर, संत असतो. आणि जो कोणी दुसऱ्याचे दुःख जाणून घेत नाही, ते निष्ठूर असतात. कबीरदासजी यांनी सामाजिक समरसतेवर विशेष भर दिला होता. ते काळाच्या पुढे जाऊन विचार करीत होते. ज्याकाळात संपूर्ण विश्वामध्ये अधोगती आणि संघर्षाचा काळ सुरू होता, त्यावेळी त्यांनी शांती आणि सद्भावाचा संदेश दिला आणि सर्वांनी मतभेद दूर सारून लोकमानस कशा पद्धतीने एकजूट होऊ शकेल, यासाठी कार्य केले.
‘‘जग में बैरी कोई नही, जो मन शीतल होय!
यह आपा तो डाल दे, दया करे सब कोय !!’’
आणखी एका दोह्यामध्ये कबीरजी लिहितात -
‘‘जहां दया तहं धर्म है, जहां लोभ तहं पाप!
जहां क्रोध तहं काल है, जहां क्षमा तहं आप !!’’
त्यांनी म्हटलं आहे की -
जाति न पूछो साधू की, पूछ लीजिये ज्ञान !
अशा शब्दातून त्यांनी लोकांना आवाहन केलं की, धर्म आणि जात यांना बाजूला सारून, त्या पलिकडे जावून त्यांनी विचार करावा. लोकांकडे असलेले ज्ञान हा आधार मानला जावा. त्यांचा सन्मान करावा. आज इतका काळ लोटला तरीही कबीर यांनी सांगितलेल्या गोष्टी तितक्याच प्रभावी आहेत. आज कबीरजींच्या गोष्टीं वाचल्या, ऐकल्या तर वाटत की, हे तर आजच्या ज्ञानयुगातल्या गोष्टीच आपल्याला सांगत आहेत. त्यांचे विचार आजच्या काळाशीही सुसंगत आहेत, हे आपल्याला जाणवतं.
आता आपण संत कबीरदास जी यांच्याविषयी बोलतोच आहोत, अशावेळी मला त्यांच्या एका दोह्याचं स्मरण होतंय. त्यामध्ये ते म्हणतात:-
‘‘गुरू गोविंद दोऊ खडे, काके लागूं पांय!
बलिहारी गुरू आपने, गोविंद दियो बताय!!’’
गुरू असा महान असतो. असेच एक महान गुरू आहेत, जगतगुरू - गुरू नानकदेव. त्यांनी कोट्यवधी लोकांना सन्मार्ग दाखवला. अनेक पिढ्यांपासून ते प्रेरणा देत आले आहेत. गुरू नानकदेवजी यांनी समाजातला जातीपातीमध्ये असलेला भेदभाव संपुष्टात आणून संपूर्ण मानवजातीला एक मानून सगळ्यांनी एकमेकांना जवळ करून आपलेसे करण्याची शिकवण दिली. गुरू नानकदेव सांगायचे की, गरीब आणि गरजू यांची सेवा करणं म्हणजेच देवाची सेवा केल्यासारखं आहे. ते जिथं जिथं गेले, तिथं तिथं त्यांनी समाजाच्या भल्यासाठी कार्य केलं. सामाजिक भेदभावमुक्त स्वयंपाकघराची व्यवस्था त्यांनी आणली. अशा स्वयंपाकघरामधे कोणत्याही जाती-पंथाची, धर्माची, संप्रदायाची व्यक्ती येऊन भोजन करु शकते. गुरू नानकदेव यांनीच तर ‘लंगर’ची पद्धत सुरू केली. 2019 मध्ये गुरू नानकदेवजी यांचं 550 वे प्रकाशपर्व साजरं करण्यात येणार आहे. आपण सगळ्यांनीनी उत्साहानं आणि उल्हासानं या पर्वामध्ये सहभागी व्हावं. गुरू नानकदेवजी यांचं 550 वं प्रकाशपर्व संपूर्ण विश्वभरामध्ये साजरं करण्यात यावं, असं मला वाटतं. ते कशा पद्धतीने, नवनवीन कल्पनांनी हे पर्व संस्मरणीय ठरेल, याचा विचार आपण सर्वांनी करावा. त्यासाठी तयारी करावी, असा माझा आग्रह आहे. हे पर्व साजरं करणं आपल्यासाठी अतिशय गौरवाची गोष्ट ठरणार आहे. आपण सगळ्यांनीनी या प्रकाशपर्वाला ‘प्रेरण पर्व’चे स्वरुप द्यावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो ! भारताला स्वातंत्र्यासाठी खूप दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. हा संघर्ष व्यापक आहे. अगणित लोकांना त्यासाठी हौतात्म्य पत्करावं लागलं. पंजाबमधल्या एका घटनेमागे इतिहास आहे. जालियनवाला बाग इथं घडलेल्या भयकारी घटनेला 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. ही घटना संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी होती.
13 एप्रिल,1919 हा काळा दिवस कोण विसरू शकेल? सत्तेचा दुरूपयोग करून क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून निर्दोष, निशस्त्र आणि निष्पाप, निरपराध लोकांवर गोळ्यांनीचा वर्षाव करण्यात आला. या दुःखद घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेचं स्मरण आपण कशा पद्धतीनं करणार आहोत, याच्यावरही विचार करू शकतो. या घटनेनं जो अमर संदेश दिला आहे, तो आपण कायमस्वरूपी स्मरणात ठेवला पाहिजे. कोणत्याही समस्येला हिंसा आणि क्रूरता हे उत्तर कधीच असू शकत नाही. शांती आणि अहिंसा, त्याग आणि बलिदान यांचाच नेहमी विजय होत असतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! दिल्लीतल्या रोहिणी इथल्या श्रीमान रमण कुमार यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’वर लिहिलं आहे की, येत्या 6 जुलैला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती आहे आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये मी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी देशवासियांशी बोलावं, अशी त्यांची इच्छा आहे. रमण जी सर्वात प्रथम तर मी आपल्याला खूप-खूप धन्यवाद देतो. भारताच्या इतिहासामध्ये आपण इतकी रुची घेताय, हे पाहून खूप बरं वाटलं. आपल्याला ठाऊक असेलच कालच म्हणजे 23 जूनला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी होती. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अनेक क्षेत्रांमध्ये कार्य केलं परंतु त्यांना शिक्षण, प्रशासन आणि संसदीय व्यवहार या क्षेत्राविषयी आत्मीयता वाटायची. ते कोलकाता विद्यापीठाचे सर्वात कमी वयाचे कुलगुरू होते, ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहीत असेल. ज्यावेळी ते कुलगुरू झाले, त्यावेळी डॉ. मुखर्जी यांचं वय फक्त 33 वर्ष होतं. 1937 मध्ये कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी श्री.गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांना आमंत्रित केलं होतं आणि या पदवीदान सोहळ्यामध्ये त्यांनी बांगला भाषेत मार्गदर्शनपर भाषण केलं होतं, ही गोष्टही फारच कमी लोकांना माहीत असणार. विशेष म्हणजे त्यावेळी देशात इंग्रजांची राजवट असतानाही कोलकाता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये एखाद्यानं बांगला भाषेत भाषण करणं, या गोष्टीला खूप महत्व आहे. 1947 ते 1950 या कालावधीमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी भारताचे पहिले उद्योग मंत्री होते.एका अर्थाने त्यांनी भारताची आणि औद्योगिक विकासाची मजबूत पायाभरणी केली होती. तो एक प्रकारे भारताच्या विकासाची पायाभरणी होती, असं म्हणता येईल. 1948 मध्ये भारताचे पहिले औद्योगिक धोरण तयार करण्यात आलं. त्यावर डॉ. मुखर्जी यांच्या कल्पना आणि दूरदृष्टी यांचा अमिट ठसा होता. भारतानं प्रत्येक क्षेत्रामध्ये औद्योगिकरूपाने स्वावलंबी व्हावं, कुशल आणि समृद्ध व्हावं, असं डॉ. मुखर्जी यांचं स्वप्न होतं. भारतामध्ये मोठमोठ्या उद्योगांची उभारणी व्हावी, विकास व्हावा, त्याचबरोबर एमएसएमई, हातमाग, वस्त्र आणि कुटीरोद्योग यावरही संपूर्ण लक्ष दिलं जावं. कुटीर आणि लघु उद्योगांचा चांगल्या पद्धतीनं विकास व्हावा, यासाठी त्यांना वित्त पुरवठा आणि त्याचबरोबर संस्थात्मक पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे, असं त्यांचं मत होतं. 1948 ते 1950 या काळामध्ये अखिल भारतीय हस्तकला मंडळ, अखिल भारतीय हातमाग मंडळ, खादी आणि ग्रामोद्योग मंडळ यांची स्थापना करण्यात आली होती. देशासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण सामुग्रीचे उत्पादन स्वदेशातच व्हावं, यावर डॉ. मुखर्जी यांचा भर होता. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स फॅक्टरी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरीचा खत कारखाना आणि दामोदर घाटी निगम या चार सर्वात मोठ्या आणि यशस्वी प्रकल्पांची स्थापना त्यांनी केली. त्याचबरोबर रिव्हर व्हॅली प्रकल्पाची स्थापना करण्यामध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं खूप मोठं योगदान होतं. पश्चिम बंगालच्या विकासासाठी अतिशय उत्साही आणि समर्पित होते. प्रत्येक कार्यात त्यांची असलेली सक्रियता, त्यांच्याकडे असलेली विवेकबुद्धी यामुळेच बंगालचा एक भाग आपण वाचवू शकलो. आजही तो भाग भारतात आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या दृष्टीने भारताची अखंडता आणि एकता सर्वात महत्वाची गोष्ट होती. आणि त्यासाठी वयाच्या अवघ्या 52 व्या वर्षी त्यांना आपले प्राण गमवावे लागले. चला तर मग, आपण सगळेजण डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या एकतेच्या संदेशाचं कायम स्मरण करू या. सद्भाव आणि बंधुभावनेनं सर्वांच्या सहकार्याने भारताच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो! गेल्या काही आठवड्यामध्ये मला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्याची संधी मिळाली. फायलींच्या पलिकडे जावून लोकांच्या जीवनामध्ये येत असलेल्या परिवर्तनाविषयी त्यांच्याचकडून जाणून घेण्याची संधी मिळाली, असं म्हणता येईल. लोकांनी आपले संकल्प, आपली सुख-दुःख, आपण गाठलेलं ध्येय यांच्याविषयी सांगितलं. माझ्या दृष्टीनं हा काही केवळ सरकारी कार्यक्रम होता, असं अजिबात नाही. तर एक वेगळा खूप काही शिकवणारा अनुभव होता. त्यांच्याशी बोलताना त्या लोकांच्या चेहऱ्यांवर जो आनंद दिसत होता, त्याचाही मी अनुभव घेत होतो. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसणे, त्यापेक्षा आनंदाची, समाधानाची इतर कोणतीच गोष्ट असू शकत नाही. सामान्य व्यक्तीकडून त्याच्या यशाची, त्याच्या स्वप्नपूर्तीची कथा ऐकणं, त्याच्या निष्पाप, साध्या, सच्च्या शब्दातून त्याचा अनुभव ऐकणं, ही गोष्ट खरोखरीच हृदयस्पर्शी आहे. दुर्गम-अतिदुर्गम गांवामध्ये युवती ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’च्या माध्यमातून गावांमधल्या वयोवृद्धांच्या निवृत्ती वेतनापासून पारपत्र बनवण्यापर्यंत सेवा-सुविधा उपलब्ध करून देत आहेत. छत्तीसगढमध्ये एक भगिनी सीताफळ गोळा करून त्याचे आईसक्रिम बनवण्याचा व्यवसाय करतेय. झारखंडमध्ये अंजन प्रकाश यांच्याप्रमाणे देशातले लाखो युवक जन औषधी केंद्र चालवण्याबरोबरच जवळपासच्या वाड्या-वस्त्या-गावांमध्ये जावून स्वस्त दरामध्ये औषधं उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधला कोणी एक युवक दोन-तीन वर्षांपूर्वी नोकरी शोधत होता, तोच आता केवळ आपला व्यवसाय यशस्वीपणानं चालवतोय असं नाही तर इतर आणखी दहा-पंधरा लोकांनाही रोजगार देत आहे. इकडे तामिळनाडू, पंजाब,गोवा या राज्यातले शालेय विद्यार्थी अगदी लहान वयातच आपल्या शाळेच्या ‘टिंकरिंग लॅब’मध्ये कचरा व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर काम करीत आहेत. अशी कितीतरी, असंख्य उदाहरणं देता येतील. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सरकारच्या यशापेक्षा जास्त, सामान्य माणसाच्या यशाची गोष्ट समोर येते, या कारणासाठी मला सगळ्यात जास्त आनंद होतो! सामान्य माणसाचे यश हीच या देशाची खरी शक्ती आहे. नवभारताच्या स्वप्नांची ही शक्ती आहे. नवभारताच्या संकल्पाची ही शक्ती आहे. त्याचा अनुभव मी घेत होतो. समाजामध्ये वेगवेगळे लोक असतात. काहीजण जोपर्यंत निराशाजनक बोलत नाहीत, हताश स्वर काढत नाहीत, अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, जोडण्याऐवजी तोडण्याची भाषा करून तशी कृती करीत नाहीत, तोपर्यंत त्यांना चैनच पडत नाही. अशा निराशाजनक वातावरणामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये पल्लवीत झालेली आशा, नवीन उत्साह आणि आपल्या जीवनात घडत असलेल्या घटनांची माहिती तो आपल्याला देतो, अशावेळी त्याचे श्रेय सरकारला देता येणार नाही. दुर्गम-अतिदुर्गम क्षेत्रातल्या एका छोट्याशा गावातल्या लहानग्या बालिकेची घटनाही सव्वाशे कोटी देशवासियांना प्रेरणा देणारी ठरते. माझ्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने, व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून लाभार्थींशी संवाद साधून, त्यांच्या समवेत व्यतीत केलेला एक क्षणही खूप सुखद, अतिशय प्रेरक ठरला आहे. आणि यामुळे कार्य केल्याचा आनंद मिळतो त्याचबरोबर अधिक जोमानं कार्य करण्यासाठी उत्साहही येतो. गरीबातल्या गरीब व्यक्तींसाठी आयुष्य कारणी लावताना आणखी एका पद्धतीने नवा आनंद, नवा उत्साह, नवी प्रेरणा प्राप्त होते. मी देशवासियांचा खूप आभारी आहे. 40-40, 50-50 लाख लोक या व्हिडिओ ब्रिजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी मला नवीन बळ देण्याचं काम केलं. यासाठी मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करू इच्छितो.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आपण जर आपल्या आजू-बाजूला पाहिलं तर काहीना काही, कुठं ना कुठ खूप काही चांगलं घडत असतं, असा अनुभव मी नेहमीच घेत असतो. चांगलं काम करणारे लोक आपल्या सभोवती असतात. अशा चांगुलपणाचा परिमल येत असतो. या सुगंधाचा आपणही अनुभव घेऊ शकतो. काही दिवसांपूर्वी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. हे एक वेगळंच समिकरण आहे. एकीकडे व्यावसायिक आणि तंत्रज्ञ आहेत तर दुसरीकडे शेतामध्ये काम करणारे आमचे शेतकरी बंधू-भगिनी आहेत. आता आपणही विचार करत असणार की, शेती आणि तंत्रज्ञान हे दोन तर अगदीच वेगवेगळे व्यवसाय आहेत. त्यांचा काय संबंध? परंतु बेंगलुरूमध्ये कॉर्पोरेट व्यावसायिक आणि आय.टी. इंजिनीअर्स एकत्र आले. त्यांनी मिळून एक सहज समृद्धी न्यास बनवला आणि त्यांनी शेतकरी बंधूंचे उत्पन्न दुप्पट कसे होऊ शकेल, यासाठी या न्यासामार्फत कार्य सुरू केलं. शेतकरी बंधूंना सहभागी करून घेण्यास सुरूवात केली. योजना तयार केल्या जावू लागल्या आणि शेतकरी बांधवांचं उत्पन्न वाढवण्यात त्यांचे यशस्वी प्रयत्न सुरू झाले. शेती कशा पद्धतीनं केली जावी, त्यासाठी नवंनवे प्रयोग ते शिकवू लागले. त्याच्या जोडीला जैविक शेती कशी केली जाते? शेतामध्ये आंतरपिकाच्या माध्यमातून एकाच वेळी जास्त पिकं कशी घेता येतात? याचं प्रशिक्षण व्यावसायिक, इंजिनीअर, तंत्रज्ञ शेतकरी बांधवांना देत आहेत. याआधी शेतकरी बंधू आपल्या शेतात पिकत असलेल्या एकाच पिकावर अवलंबून असे. त्याला पिकही फार चांगले मिळत नव्हते आणि नफाही तर अजिबातच मिळत नसायचा. आज तोच शेतकरी बंधू केवळ भाज्या पिकवतोय असं नाही तर आपल्या शेतातल्या भाज्यांचे मार्केटिंग म्हणजे विपणन या न्यासाच्या माध्यमातून करत आहे आणि त्याला खूप चांगली किंमत मिळत आहे. अन्नधान्य उत्पादन करणारे शेतकरीही या योजनेमध्ये सहभागी झाले आहेत. एकीकडे पिकाच्या उत्पादनापासून ते त्याच्या विपणनापर्यंत एक साखळी तयार केली आहे, त्यामध्ये शेतकरी बांधवाची भूमिका महत्वाची आहे तर दुसरीकडे मिळत असलेल्या नफ्यामध्येही शेतकरी वर्गाची भागीदारी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे. पिक चांगलं यावं, यासाठी चांगल्या वाणाचं, उच्च दर्जाचं, बियाणं वापरलं पाहिजे. यासाठी एक स्वतंत्र ‘बीज बँक’ तयार करण्यात आली आहे. या बीज बँकेचं कामकाज महिला पाहतात. महिलांनाही विविध कृषी कामामध्ये सहभागी करून घेतलं आहे. या अभिनव प्रयोगाबद्दल मी या युवकांचे खूप खूप अभिनंदन करतो. आत्तापर्यंत व्यावसायिक, तंत्रज्ञ, इंजिनीअरिंग यांच्या दुनियेशी जोडले गेलेल्या नवयुवकांनी आपल्या कक्षेतून बाहेर येऊन शेतकरी बांधवांसाठी कार्य करणं, ग्रामीण भागाशी जोडून, शेती आणि शिवाराशी आपलं नाते तयार करण्याचा रस्ता स्वीकारला आहे, याचा मला जास्त आनंद होत आहे. मित्रांनो! आपण तरूणपणात केलेलं हे काम खरोखरीच नवयुवकांना प्रेरणा देणारं आहे. देशाच्या इतर नवतरूणांनी या प्रकल्पाच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी केलेल्या कामाची बारकाईनं माहिती घ्यावी आणि आपल्या परिसरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशाप्रकारे नेमके काय आणि कसे काम करता येईल, याचा विचार करता येईल, अशी प्रेरणा बेंगलुरूच्या या प्रकल्पाकडून जरूर घेतील. देशाच्या नवीन युवा- पिढीच्या या अभिनव प्रयोगाबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. हा नवीन प्रयोग नेमका कसा कार्यरत आहे याविषयी कदाचित मला फारसं ठाऊक नाही. फारच थोडी माहिती मी जाणून घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. देशात निरंतर कोट्यवधी लोक काही-ना-काही चांगलं कार्य करत असतात. त्या सगळ्यांनीना माझ्यावतीने खूप-खूप शुभेच्छा.
माझ्या प्रिय देशवासियांनो! जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करप्रणाली लागू होऊन आता एक वर्ष पूर्ण होत आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’ हे देशाच्या लोकांचे स्वप्न होते. ते आता प्रत्यक्षात आलं आहे. ‘वन नेशन, वन टॅक्स’ सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वात जास्त श्रेय द्यायचे असेल तर ते मी राज्यांना देईन. ‘जीएसटी कोऑपरेटिव्ह फेडरॅलिझम’ हे एक खूप चांगले उदाहरण आहे. यामध्ये सर्व राज्यांनी मिळून देशहितासाठी निर्णय घेतला आणि त्यानंतरच देशामध्ये इतक्या व्यापक स्तरावर कर सुधारणा करणं शक्य झालं. आतापर्यंत जीएसटी परिषदेच्या 27 बैठका झाल्या आहेत आणि या बैठकीला वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असलेले लोक एकत्र येतात. भिन्न-भिन्न राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे लोक येतात. प्रत्येक राज्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. तरीही जीएसटी परिषदेमध्ये आत्तापर्यंत जितके निर्णय झाले, ते सगळे सर्वांच्या सहमतीनंच घेतले गेले आहेत. जीएसटीच्या आधी देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 17 करप्रणाली अस्तित्वात होत्या. परंतु आता नवीन व्यवस्थेमध्ये संपूर्ण देशामध्ये एकच करप्रणाली लागू झाली आहे. जीएसटी म्हणजे प्रामाणिकपणाचा विजय आहे आणि प्रामाणिकपणाचा तो एक उत्सवही आहे. याआधी अनेकवेळा कर प्रकरणांमध्ये ‘इंस्पेक्टरराज’ विषयी तक्रारी येत होत्या. जीएसटीमध्ये इंस्पेक्टरची जागा आता ‘आयटी’ म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाने घेतली आहे. विवरणपत्रापासून ते परताव्यापर्यंत सगळी कामं ऑनलाईन, म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहेत. जीएसटी आल्यामुळे तपास नाक्यांचं अस्तित्व आता संपुष्टात आलं आहे आणि सामानमालाची वाहतूक वेगानं होत आहे. यामुळे केवळ वेळेची बचत होते असं नाही तर लॉजिस्टिक्स क्षेत्रामध्येही त्याचा चांगला लाभ मिळत आहे. जीएसटी, कदाचित, जगातली सर्वात मोठी कर सुधारणा असेल. भारतामध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर करसुधारणा यशस्वी झाली, याला कारण म्हणजे देशातल्या लोकांनीच ही सुधारणा स्वीकारली. जनशक्तीमुळे जीएसटीचं यश सुनिश्चित होवू शकलं. सर्वसामान्यपणे इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतकी प्रचंड लोकसंसख्या असताना सुधारणा करण्यासाठी आणि संपूर्ण योजना पूर्ण स्वरूपामध्ये स्थिर होण्यासाठी 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकला असता. परंतु देशाच्या प्रामाणिक लोकांचा उत्साह, देशाच्या प्रामाणिकपणाचा उत्सव, जन-शक्तीची भागीदारी याचा सुपरिणाम म्हणजे एक वर्षाच्या आतच ही नवीन करप्रणाली बहुतांश भागात चांगल्या प्रकारे लागू झाली आहे. या नवीन व्यवस्थेला आता स्थिरता मिळाली आहे. आता आवश्यकतेनुसार अंतर्गत व्यवस्थेनुरूप त्यामध्ये सुधारणाही केल्या जात आहेत. हे एकप्रकारे खूप मोठे यश सव्वाशे कोटी देशवासियांनी मिळवले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो! आत्ता ‘मन की बात’ पूर्ण करतानाच पुढच्या ‘मन की बात’ ची प्रतीक्षा मी करतोय. या माध्यमातून आपली भेट घेण्याची, आपल्याशी संवाद साधण्याची प्रतीक्षा मी करतोय. आपल्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा !
खूप-खूप धन्यवाद!!
Namaskar. Through ‘Mann Ki Baat’, I once again have been blessed with the opportunity to be face-to-face with you. I am sure you distinctly remember that for the last many months, a naval team comprising six women Commanders was on a voyage. I want to tell you something about the ‘Naavika Saagar Parikrama’. These six illustrious daughters of India circumnavigated the globe for over more than 250 days on board the INSV Tarini, returning home on the 21st of May. The entire country welcomed them with open arms, with high spirits. They traversed a multitude of oceans, many a sea, over a distance of almost twenty two thousand nautical miles. This was a first of its kind event in the entire world. Last Wednesday, I got an opportunity to meet these daughters and listen to their experiences. Once again, I congratulate these daughters and their spirit of adventure for bringing laurels to the country, for raising the glory of the Navy and significantly so, for conveying to the world that India’s daughters are no less. Who does not know of the sense of adventure? If you view the journey of human evolution, you will notice that breakthroughs in progress have taken birth in the womb of some adventure or the other. There is an umbilical link between development and adventure; the resolve to achieve something, the burning desire to do something unparalleled, the sentiment proclaiming “I too can do it”. The number of such people may be miniscule, but they turn out to be sources of inspiration for millions of others, spanning an array of eras. Recently, you must have come across quite a few notable happenings pertaining to mountaineers attempting to scale Mount Everest. For centuries, Everest has been throwing the gauntlet at humankind. And for long, brave hearts have been responding to the challenge.
On the 16th of May, a team comprising five tribal students of an Ashram School in Chandrapur, Maharashtra- Maneesha Dhurve, Pramesh Ale, Umakant Madhavi, Kavidas Katmode and Vikas Soyam- scaled the world’s highest peak. These Ashram School students began training in August, 2017, covering Wardha, Hyderabad, Darjeeling and Leh-Ladakh. These young boys & girls had been selected under ‘Mission Shaurya’. True to its name, they brought glory to the country with their brave deed of conquering the Everest. I congratulate these young friends and members of the school in Chandrapur, from the core of my heart. Just a while ago, 16 year old Shivangi Pathak became the youngest Indian woman to scale Everest from the Nepal side. Heartiest congratulations, Beti Shivangi.
Ajit Bajaj and his daughter became the first ever father-daughter duo to ascend Everest. And it’s not that only the young are climbing Everest. On the 19th of May, Sangeeta Bahal, aged more than 50, scaled the Everest. There are some mountaineers who have shown that apart from possessing skills, they are sensitive too.
A few days ago, under the ‘Clean Ganga Campaign’, a group from the BSF Scaled the Everest and while returning, removed loads of trash littered there and brought it down. This deed is commendable indeed; it also displays their commitment towards cleanliness and the environment. People have been ascending the Everest for years & many have managed to reach the peak successfully. I congratulate these daredevils, especially the daughters from the core of my heart.
My dear countrymen, especially my young friends, just a couple of months ago, when I mentioned ‘Fit India’, I did not think it would draw such a good response; that a large number of people would come forward to support it. When I say ‘Fit India’, I believe that the more we play, the more we will inspire the country to come out & play. People are sharing videos of Fitness Challenge on social media; they are tagging each other to spread the challenge. Everybody is now getting connected with this Fit India Campaign. People from the film fraternity, from the world of Sports, common citizens of the country, members of the armed forces, school teachers or even those toiling in fields and farms, their rising notes are building up a crescendo ‘Hum Fit toh India Fit’… ‘If we are fit, India is fit’. For me, it’s heartwarming that the captain of the Indian Cricket team Virat Kohli ji has included me in his challenge… and I too have accepted his challenge. I believe this is gainful and this kind of a challenge will inspire us to be fit along with others, as well.
My dear countrymen, many a time in ‘Mann Ki Baat’, you must have heard me mention a thing or two about sports & sportspersons. And in the last episode, our heroes of the Commonwealth Games shared with us their ‘Mann Ki Baat’, matters close to their hearts through this programme.
Chhavi Yadav ji, thank you very much for your phone call. It is true that sports & games that were once a part & parcel of every child’s life, in every lane in the neighbourhood, are fading into oblivion. These games used to be a special feature of summer holidays. Sometimes in scorching afternoons; at times after dinner, children used to play with exuberant abandon for hours together, leaving all worries behind. Some games saw the participation of the whole family. Aiming the ball at the crooked column of stone slats- Pitthoo, playing marbles, testing one’s agility in Kho kho, spinning the top, Lattoo, or applying skills in swiftly flicking the tapered- edged wooden peg and hitting it aloft-Gilli-Danda, innumerable games were an inseparable part of each & every child’s life from Kashmir to Kanyakumari, from Kutch to Kamrup. Of course, those games were known by different names, depending on the place. Pitthoo is one such game. Some called it Lagori, at other places it was Satoriya, Saat Pathar, Dikori, Satodiya… one game with many names! Traditional sports and games comprise both varieties… outdoor and indoor as well. The unity, intrinsic to our country’s diversity can be witnessed in these games. A single game is known by distinct names at different places. I am from Gujarat. I known of a game played in Gujarat called Chomal Isto. It is played with cowries or tamarind seeds or dice on an eight by eight square board. It used to be played in almost every state. Known as Chowkabara in Karnataka, Attoo in Madhya Pradesh, Pakidakaali in Kerala, Champal in Maharashtra, Daayaam and Thaayaam in Tamilnadu, Changaa Po in Rajasthan, it had innumerable names. One realizes after playing, despite not knowing the language of a particular state, “Oh! We used to play this game in our state as well!” Who amongst us would not have enjoyed playing Gilli-Danda in our childhood? This is a game that is played across villages and cities. It is also known by different names. In Andhra Pradesh it is called Gotibilla or Karrabilla. In Odisha it’s called Gulibadi and in Maharashtra, Vittidaaloo. Some games are seasonal. There is a season for flying kites. While flying a kite or playing a game, one freely expresses one’s inherent unique qualities. You must have seen many a child, shy by nature, leap up with zest, the moment a game begins. Even children with a seemingly serious countenance start expressing themselves; while playing, the innate child within them comes to the fore. Traditional sports and games are structured in such a manner that along with physical ability, they enhance our logical thinking, concentration, alertness and energy levels. Games are not just games; they teach us values in life, such as, setting targets, building up determination, developing team spirit and fostering mutual co-operation. I recently noticed in a training programme in Business Management, our traditional sports and games being used for improving overall personality development and interpersonal skills. These games are proving to be handy in overall development. And then, there is no prescribed age limit for participating in them. From tiny tots to Grandfather-Grandmother, when we all play these games together then the term ‘Generation Gap’ disappears on its own. At the same time, we also come to know about our culture and traditions. Many games also make us aware about our society, environment and other spheres.
It is a matter of concern, whether these sports & games will fade away to the point of extinction. It will not just be a loss of a game; it will be the loss of the spirit of childhood, something that will exist only in the verses of poetry.
Ye daulat bhi le lo
Ye shohrat bhi le lo
Bhale chheen lo mujhse meri jawani
Magar mujhko lauta do bachpan ka sawan
Wo kagaz ki kashti, wo baarish ka paani
Take away all my riches
Bereave me of all this fame
Snuff out my youth if you so wish
But do return the monsoon that drenched me as a child
The puddles & my paper boats, the magic of my rains.
And we will be forever reduced to listening to this song, hence we must keep our traditional sports alive. It is crucial that today schools, neighbourhoods and youth congregations should come forward and promote these games. Through crowd sourcing we can create a very large archive of our traditional games. The Videos of these games can be shot, outlining the way to play these games along with the mandatory rules and regulations. Animation films can also be made so that our young generations for whom these games played in our streets are something to marvel about, can see, play for themselves and thus bloom.
My dear countrymen, on the 5th of June, our nation, India will officially host the World Environment Day Celebrations. This is a very important achievement for India and it is also an acknowledgement as well as recognition of India's growing leadership in the direction of tackling climate change.
This time the theme is 'Beat Plastic Pollution'. I appeal to all of you, that while trying to understand the importance of this theme, we should all ensure that we do not use low grade polythene and low grade plastics and try to curb the negative impact of plastic pollution on our environment, on our wild life and our health. Let us all visit the World Environment Day website ‘wed-india 2018’ and try to imbibe and inculcate the many interesting suggestions given there into our everyday life.
Whenever we face a torrid summer, or floods, incessant rains or unbearable cold, everybody becomes an expert, analyzing global warming and climate change. But does empty talk bring about any solutions? Being sensitive towards nature, protecting nature, should come naturally to us; these virtues should be embedded in our sanskar.
In the past few weeks, we all witnessed that there were dust storms in the different regions of the country, along with heavy winds and unseasonal heavy rains. There was also loss of life and property. These calamities are basically the result of the change in weather patterns. Our culture, our traditions have never taught us to be at loggerheads with nature.
We have to live in harmony and in synchronicity with nature, we have to stay in touch with nature. Mahatma Gandhi had advocated this wisdom at every step of his life. Today when India speaks of climate justice or plays a major role in the Cop21 and Paris agreements or when we unite the whole world through the medium of International Solar Alliance, they all are rooted in fulfilling that very dream of Mahatma Gandhi.
On this environment day, let all of us give it a good thought as to what can we do to make our planet cleaner and greener? How can we progress in this direction? What innovative things can we do? The rainy season is fast approaching; we can set a target of achieving record plantation of trees this time and not only plant trees but also nurture and maintain the saplings till they grow.
My dear countrymen and especially my young friends, you do remember the 21st of June now; not only you and I, June 21st remains a part of the entire world’s collective consciousness. The 21st of June has been mandated and is celebrated as the International Yoga Day in the entire world and people start preparing for it months in advance. The news being received these days is that there are preparations afoot in the whole world to celebrate 21st June as International Yoga Day.
Yoga for unity and a harmonious society conveys a message that has permeated the world over. Centuries ago, the great Sanskrit Poet Bhartahari had written in his ‘Shataktrayam’.
धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शान्तिश्चिरं गेहिनी
सत्यं सूनुरयं दया च भगिनी भ्राता मनः संयमः।
शय्या भूमितलं दिशोSपि वसनं ज्ञानामृतं भोजनं
एते यस्य कुटिम्बिनः वद सखे कस्माद् भयं योगिनः।।
[A man whose father is patience, mother is forgiveness and peace as consort, Truth as his friend, compassion as his sister and restraint for brother as family members and whose bed is the great earth, is clothed by the great sky and whose food is only knowledge. Is indeed a Yogi who won't know any fear.]
This observation expressed centuries ago, straightaway implies that practicing yogic exercises on a regular basis leads to imbibing benefic attributes which stand by our side like relatives and friends. The practice of yoga leads to building up of courage, which always protects us like a father. The practice of yoga leads to germination of a sense of forgiveness in the same manner as a mother has for her children and mental peace becomes our permanent friend. Bhartahari has said that with regular yogic exercise, truth becomes our child, mercy becomes our sister, self restraint our brother, earth turns in to our bed and knowledge satiates our hunger. When so many attributes become one's partner, then that yogi conquers all forms of fear. Once again, I appeal to all the citizens to adopt their legacy of yoga and create a healthy, happy and harmonious nation.
My dear countrymen, today is the 27th of May, the death anniversary of the first Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru ji. I render my pranam to Pandit ji. Memories of this month are also linked with Veer Savarkar. This was the very month, the month of May 1857, when Indians had displayed their strength against the British. In many parts of the country, our youth and farmers demonstrated their bravery whilst standing up against the injustice. It is indeed sad that we kept on calling the events of 1857 only as a rebellion or a soldiers’ mutiny for a very long time.
In fact, May 1857 was not only evaluated as a minor historical incident but was also an attempt to dent our self-respect. It was Veer Savarkar who boldly expostulated by writing that whatever happened in 1857 was not a revolt but was indeed the First War of Independence. Savarkar along with his band of brave hearts celebrated the 50th anniversary of the First War of Independence with great fanfare at India house in London. It is also an amazing coincidence that the month which witnessed the First Struggle for Independence was the month in which Veer Savarkar ji was born. Savarkar ji’s personality was full of special qualities; he was a worshipper of both weapons or shashtra and Knowledge or shaashtras.
Generally Veer Savarkar is renowned for his bravery and his struggle against the British Raj. But besides these sterling qualities, he was also a striking poet and a social reformer who always emphasized on goodwill and unity. A wonderful account about Savarkarji has been given by our dear honorable Atal Bihari Vajpayee Ji. Atal ji had said - Savarkar means brilliance, Savarkar means sacrifice, Savarkar means penance, Savarkar means substance, Savarkar means logic, Savarkar means youth, Savarkar means an arrow, and Savarkar means a Sword! Behold! What an accurate depiction of Savarkar by Atal ji! Savarkar marched along with both poetry and revolution. Besides being a sensitive poet, he was also a courageous revolutionary.
My dear brothers and sisters, I was watching a story on TV about our underprivileged daughters of certain slums in Sikar, Rajasthan. Our daughters, who were forced to sift through garbage and beg from home to home in order to earn a living - today they are learning sewing and stitching clothes to cover the impoverished. This is an example where the daughters are stitching ordinary to good quality clothes for themselves and other families. Along with this, they are undergoing a training course in skill development.
These daughters have become self-reliant today and are living their lives with respect and have become a strong support to their families. I wish all these daughters, brimming with hope and trust, a very bright future. They have demonstrated that if you have the desire to do something and if you are determined towards that goal then success can be achieved despite all odds! And this is not only about Sikar, but in every corner of India, you will witness something akin to this. If you observe in your neighbourhood, then you will witness for yourselves how people overcome the difficulties in their lives!
You must have realized that whenever we go to a tea shop, and enjoy tea there, a discussion with some of the customers automatically ensues. These discussions are also political and social in nature, can be about movies, sports and sportspersons or can focus even on the problems of the country – any problem with probable solutions are discussed at length – but often the problems and their solutions remain limited to such animated discussions only.
But there are some people who go ahead with their work, to bring about a change through their hard work and dedication; they make it a reality. Such is the story of D. Prakash Rao, living in the slums of Cuttack, Orissa, who gave up everything of his in order to adopt and realize the dreams of others! Just yesterday I’ve had the good fortune of meeting D. Prakash Rao.
Shriman D. Prakash Rao has been a tea vendor in the city of Cuttack for the past five decades. A meagre tea vendor; today you will be surprised to know that the lives of more than 70 children are being illuminated through education due to his efforts. He has opened a school named 'Asha Ashvaasan', spending 50% of his income for children living in slums and hutments. He ensures education, health and meals for all the children coming to this school. I congratulate D. Prakash Rao for his hard work, his persistence and for providing a new direction to the lives of those poor children attending his school. He has banished the darkness from their lives. Who amongst us does not know the Vedic shloka 'Tamso Ma Jyotirgamaya'! However, it has been put into practice by D. Prakash Rao. His life is an inspiration to us, our society and the whole country. Your surroundings too must be full of such inspiring happenings. There must be innumerable incidents. Come, let us take positivity forward.
The month of June is so hot that people anxiously wait for the rains, gazing towards the sky for the clouds to appear. People will wait for the moon in a few days from now onwards. Witnessing the moon means that the festival of Eid can be celebrated. After an entire month of fasting during Ramzan, the festival of Eid is a harbinger of celebrations.
I hope and believe that everyone will celebrate Eid with gaiety and fervor and on this occasion children will specially get a grand ‘Eidi’. I hope that the festival of Eid will further strengthen the bonds of harmony in our society. Heartiest felicitations to all of you. My dear countrymen, many thanks to you all. We shall meet once again in another episode of ‘Mann Ki Baat’ next month.
Namaskar
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! नमस्कार
अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल. हा असा काळ होता जेव्हा देशभरातील लोकं विचार करायची की, आज कोण कोणते खेळाडू खेळणार आहेत. भारताची कामगिरी कशी असेल, आपण किती पदकं जिंकू आणि हे सगळे खूप स्वाभाविक देखील होते. आपल्या खेळाडूंनी देखील देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करत चांगली कामगिरी केली आणि एका पाठोपाठ एक पदक जिंकले. मग ते नेमबाजी असो, कुस्ती असो, भारोत्तलन असो, टेबल टेनिस असो किंवा बॅडमिंटन भारताने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 26 सुवर्ण, 20 रजत, 20 कांस्य – भारताने एकूण 66 पदकांची कमाई केली आहे. या यशामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. पदक जिंकण ही प्रत्येक खेळाडूसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असते. सर्व देशासाठी, सर्व देशवासीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असतो. सामना संपल्यानंतर जेव्हा भारताचे प्रतिनिधित्व करत भारताचे खेळाडू पदकासोबत उभे असतात. तिरंगा त्यांच्या भोवती असतो, राष्ट्रगीत सुरु असते आणि तेव्हा जी समाधान आणि आनंदाची, गौरवाची, मान सन्मानाची भावना प्रत्येकामध्ये असते ती अत्यंत विशेष असते. तन-मन हेलावून सोडणारी असते. उत्साह आणि जोशपूर्ण असते. त्या भावना व्यक्त करायला कदाचित माझ्याकडील शब्द कमी पडतील. परंतु ह्या खेळाडूंकडून जे मी ऐकले आहे ते मी तुम्हाला ऐकवू इच्छितो. मला तर अभिमान वाटतो, तुम्हाल देखील अभिमान वाटेल.
#
मी मनिका बत्रा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 4 पदकांची कमाई केली आहे. 2 सुवर्ण, 1 रजत, 1 कांस्य. ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मी सांगू इच्छिते की, मी खूप आनंदी आहे कारण भारतात पहिल्यांदाच टेबल टेनिस, इतका लोकप्रिय होत आहे. होय, मी माझे सर्वोत्तम टेबल टेनिस खेळली असेल. माझ्या संपूर्ण आयुष्यातील उत्तम टेबल टेनिस खेळली असेल. मी या आधि जो सराव केला आहे त्याच्याविषयी मी सांगते, माझे प्रशिक्षक संदीप सर यांच्यासोबत मी खूप सराव केला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आधि आमचे कॅंम्प पोर्तुगालला होते, क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने आम्हाला तिथे पाठवले होते. मी सरकारचे आभार मानू इच्छिते कारण त्यांनी अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी दाखवायची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. तरुण पिढीला मी इतकाच संदेश देईन कधी हार मानू नका. स्वतःचा शोध घ्या.
#
मी पी. गुरुराज ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकणाऱ्यांना ही गोष्ट सांगू इच्छितो. 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणे हे माझे स्वप्न होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला मी पहिले पदक मिळवून दिल्यामुळे मी खूप आनंदी आहे. हे पदक मी माझे गाव कुंदापुरा आणि माझे राज्य कर्नाटक आणि माझ्या देशाला समर्पित करतो.
#
मीराबाई चानू
21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मी भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. त्यामुळे यातच मला खूप आनंद झाला होता. माझे एक स्वप्न होते भारतासाठी आणि मणिपूरसाठी एक उत्तम खेळाडू बनायचे, जसे सगळ्या चित्रपटांमध्ये दाखवतात. जशी मणिपूरची माझी दीदी आणि ते सर्व पाहिल्यानंतर मी देखील असा विचार केला की, भारतासाठी, मणिपूरसाठी एक उत्तम खेळाडू बनू इच्छिते. माझी शिस्त, माझा प्रामाणिकपणा, समर्पण आणि कठोर परिश्रम हे देखील माझ्या यशाचे कारण आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती, तसेच ती विशेष देखील होती. विशेष यासाठी कारण यावेळी अशा अनेक गोष्टी होत्या ज्या पहिल्यांदाच घडल्या. तुम्हाला माहित आहे का? यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे जितके कुस्तीपटू खेळले त्या सर्वांनी पदकांची कमाई केली आहे. मनिका बत्राने जितक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या सर्वांमध्ये पदक जिंकली. ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे जिने, वैयक्तिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक जिंकून दिले. भारताला सर्वाधिक पदक नेमबाजीत मिळाली. 15 वर्षीय भारतीय नेमबाज अनीश भंवर हा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा सर्वांत तरुण खेळाडू ठरला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा सचिन चौधरी हा एकमेव भारतीय पॅरा पॉवर लिफ्टर आहे. यावेळेची क्रीडा स्पर्धा विशेष देखील होती कारण, बहुतांश पदक विजेत्या ह्या महिला खेळाडू होत्या. स्क्वॅश असो, बॉक्सिंग असो, वेटलिफ्टिंग असो, नेमबाजी असो – महिला खेळाडूंनी उत्तम कामगिरीचे प्रदर्शन केले. बॅडमिंटनमध्ये तर अंतिम सामना दोन्ही भारतीय खेळाडू, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूच्या दरम्यान खेळला गेला. सगळे या लढतीबद्दल उत्सुक होते, दोन्ही पदकं भारतालाच मिळणार होती – सर्वांनी हा सामना पाहिला. मला देखील हा सामना खूप आवडला. स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू देशाच्या विविध भागांमधून, छोट्या छोट्या शहरांमधून आले होते. अनेक संकट, समस्यांवर मात करत ते इथवर पोहोचले आहेत आणि आज त्यांनी जे स्थान मिळवले आहे, ते ज्या लक्ष्यापर्यंत पोहोचले आहेत, त्यांच्या ह्या जीवन यात्रेत त्यांचे आई वडील असो, त्यांचे पालक असो, प्रशिक्षक असो, सपोर्ट स्टाफ असो, शाळेतील शिक्षक असो, शालेय वातावरण असो – सर्वांचे योगदान आहे. त्यांच्या मित्रांचेही योगदान आहे, ज्यांनी प्रत्येक परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य उंचावले. मी त्या सर्व खेळाडूंसह त्या सर्वांचे अभिनंदन करतो.
मागील महिन्यात ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना विशेषतः आपल्या युवकांना फिट इंडियाचे आवाहन केले होते आणि मी प्रत्येकाला आमंत्रण दिले होते. या ! फिट इंडिया मध्ये सहभागी व्हा, ‘फिट इंडिया’चे प्रतिनिधित्व करा. आणि मला खूप आनंद होत आहे की, मोठ्या उत्साहाने लोकं यात सहभागी होत आहेत. बऱ्याच लोकांनी पत्र लिहून आपला पाठिंबा दर्शविला आहे, पत्र पाठविली आहेत, सोशल मिडीयावर आपला आरोग्याचा मंत्र – फिट इंडिया गाथा शेअर केल्या आहेत.
एक गृहस्थ शशिकांत भोसले यांनी जलतरण तलावातील आपले छायचित्र शेअर करत लिहिले आहे –
“My weapon is my body, my element is water, My world is swimming.”
रुमा देवनाथ यांनी लिहिले आहे – मॉर्निंग वॉकमुळे मला आनंदी आणि निरोगी वाटते. आणि त्या अजून पुढे सांगतात – “For me – fitness comes with a smiles and we should smile, when we are happy.” देवनाथजी यात काहीच शंका नाही की, आनंदातच आरोग्य आहे.
धवल प्रजापती यांनी गिर्यारोहणाचे आपले छायाचित्र शेअर करताना लिहिले की – ‘माझ्यासाठी प्रवास आणि गिर्यारोहण हेच फिट इंडिया आहे’. अनेक प्रसिद्ध व्यक्ती अत्यंत आकर्षक पद्धतीने आपल्या तरुणांना फिट इंडियासाठी प्रोत्साहित करत आहेत हे पाहून मला खूप चांगले वाटते. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मी तो पहिला आहे तुम्ही देखील बघा; यात तो लाकडी मण्यांसोबत व्यायाम करताना दिसतो आणि त्याने सांगितले आहे की, हा व्यायाम पाठ आणि पोटाच्या स्नायूंसाठी खूप लाभदायक आहे. त्याचा अजून एक व्हिडिओ देखील लोकप्रिय झाला आहे ज्यात तो लोकांसोबत वॉलीबॉल खेळत आहे. अजून बऱ्याच युवकांनी फिट इंडियामध्ये सहभागी होत आपले अनुभव शेअर केले आहेत. मला असे वाटते की, अशा चळवळी आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण देशासाठी अत्यंत फायद्याच्या आहेत. अजून एक गोष्ट मी नक्की सांगेन – कोणतेही पैसे खर्च न करता फिट इंडिया चळवळीचे नाव आहे ‘योग’. फिट इंडिया अभियानात योग चे विशेष महत्व आहे आणि तुम्ही सगळ्यांनी देखील तयारी सुरु केली असेल. 21 जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाचे’ महत्व तर आता संपूर्ण जगाने स्विकारले आहे. तुम्ही देखील आतापासूनच तयारीला लागा. एकट्याने नाही – तुमचे शहर, तुमचे गाव, तुमचा विभाग, तुमची शाळा, तुमचे महाविद्यालय प्रत्येक व्यक्ती कोणत्याही वयाची – पुरुष असो, स्त्री असो योग मध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संपूर्ण शारीरिक विकासासाठी, मानसिक विकासासाठी, मानसिक संतुलनासाठी योगचा काय उपयोग आहे, आता भारतात आणि जगभरात सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपण पाहिले असेल की मला एक अॅनिमेटेड व्हिडिओ दाखविला गेला आहे, जो सध्या खूप लोकप्रिय होत आहे. एक शिक्षक जितक्या बारकाईने जे काम करू शकतो ते अॅनिमेशनने साध्य होत आहे, अॅनिमेशनच्या लोकांचे मी यासाठी देखील अभिनंदन करतो. तुम्हाला देखील त्याचा लाभ मिळेल.
माझ्या तरुण मित्रांनो ! आता तर तुम्ही परीक्षा, परीक्षा, परीक्षेतून बाहेर पडून सुट्यांची काळजी करत असाल. सुट्टी कशी घालवायची, कुठे जायचे याचा विचार करत असाल. तुम्हाला एका नविन कामासाठी आमंत्रित करण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलू इच्छितो आणि मी पाहिले आहे की, अनेक तरुण यावेळी नवीन काहीतरी शिकत असतात. समर इंटर्नशिपचे महत्व वाढत आहे आणि तरुण वर्ग देखील ते शोधत आहेत, आणि असेही इंटर्नशिपमध्ये एक नवीन अनुभव मिळतो. माझ्या तरुण मित्रांनो, एका विशेष इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्याची मी तुम्हाला विनंती करतो. भारत सरकारची तीन मंत्रालये क्रीडा असो, मनुष्यबळ विकास असो, पेयजल विभाग असो – सरकारच्या तीन-चार मंत्रालयांनी एकत्र येवून ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशिप 2018’ उपक्रम सुरु केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसीचे तरुण, एनएसएसचे तरुण, नेहरू युवा केंद्रातील तरुण, जे काही करू इच्छितात, समाजात बदल घडवून आणण्यासाठी जे सहभागी होऊ इच्छितात, निमित्त बनू इच्छितात; एक सकारात्मक उर्जा घेऊन समाजामध्ये काहीतरी करण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांसाठी एक संधी आहे आणि यामुळे स्वच्छतेला देखील बळकटी मिळेल आणि जेव्हा आपण 2 ऑक्टोंबर पासून महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी करू, त्याआधी आपण काहीतरी केले याचा आपला आनंद मिळेल आणि मी हे देखील सांगतो की जे सर्वोत्तम प्रशिक्षुक असतील, ज्यांनी महाविद्यालयात उत्तम काम केले असेल, विद्यापीठांमध्ये केले असेल – अशा सर्वांना राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. ही इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षुकाला ‘स्वच्छ भारत मिशन’ द्वारे एक प्रशस्तीपत्र दिले जाईल. एवढेच नाही तर जे प्रशिक्षुक हे पूर्ण करतील त्यांना युजीसी दोन क्रेडीट पॉईंट देखील देणार आहे. मी विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना आणि तरुणांना पुन्हा एकदा या इंटर्नशिपचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. तुम्ही मायगोव्ह वर ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ साठी नोंदणी करू शकता. मला आशा आहे की, आपले तरुण स्वच्छतेच्या या आंदोलनाला नक्की यशस्वी करतील. मी आपल्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे आपण आपली माहिती पाठवा, कथा पाठवा , फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा. चला ! एक नवीन अनुभव घेण्यासाठी या सुट्ट्यांचा एक संधी म्हणून उपयोग करूया.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! जेव्हा संधी मिळते तेव्हा मी दूरदर्शनवरील ‘गुड न्यूज इंडिया’ हा कार्यक्रम नक्की पाहतो आणि मी देशवासियांनाही आवाहन करीन की तुम्हीपण ‘गुड न्यूज इंडिया’ पहावे. आपल्या देशातल्या कोणत्या कानाकोपऱ्यात किती लोकं अनेक प्रयत्न करून चांगले काम करत आहेत, चांगल्या गोष्टी घडत आहेत याची आपल्याला माहिती मिळते.
मी मागे पहिले की, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या तरुणांची गोष्ट यात दाखवत होते. तरुणांच्या या समूहाने रस्त्यावरील आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी एक मोठे अभियान सुरु केले आहे. सुरवातीला रस्त्यावर भिक मागणाऱ्या किंवा छोटे मोठे काम करणाऱ्या मुलांच्या परिस्थितीने त्यांना इतके हेलावून सोडले की त्यांनी या कामात स्वतःला संपूर्णपणे झोकून दिले. दिल्लीतल्या गीता कॉलनी जवळील झोपडपट्टीतील 15 मुलांपासून सुरू झालेली ही मोहीम आता राजधानीतल्या 12 ठिकाणच्या 2 हजार मुलांपर्यंत पोहोचली आहे. या मोहिमेशी निगडीत तरुण, शिक्षक आपल्या व्यस्त दिनचर्येतून दोन तासाचा वेळ काढून सामाजिक बदल घडवण्याच्या या भगीरथ प्रयत्नांत सहभागी झाले आहेत.
बंधू-भगिनींनो, त्याचप्रमाणे उत्तराखंडच्या डोंगराळ प्रदेशातील काही शेतकरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. एकत्रित प्रयत्नांमधून त्यांनी केवळ स्वतःचेच नाहीतर आपल्या क्षेत्राचेही भाग्य बदलले आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर इथे मुख्यत्वे मांडवा, चौलाईत मका किंवा जवाचे पिकं घेतले जाते. डोंगराळ प्रदेशामुळे, शेतक-यांना योग्य किंमत मिळत नव्हती, परंतु कापकोट तालुक्यातील शेतक-यांनी ही पिके थेट बाजारात विकून तोटा सहन करण्याऐवजी, त्यांनी मूल्यवर्धित मार्ग अवलंबला. त्यांनी काय केलं – शेतातील या पिकापासून बिस्किटे बनवायला सुरुवात केली आणि ती बिस्किटे विकायला सुरुवात केली. हा भाग लोह समृद्ध आहे असा मजबूत विश्वास आहे. आणि लोहयुक्त बिस्किटे गर्भवती महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहेत. या शेतक-यांनी मुन्नार गावात एक सहकारी संस्था स्थापन केली आहे आणि तिथे बिस्किटे तयार करण्यासाठी कारखाना उघडला आहे. शेतकऱ्यांच्या धैर्याची दखल घेत प्रशासनानेही याला राष्ट्रीय उपजीविका अभियानाशी जोडले आहे. ही बिस्किटे आता फक्त बागेश्वर जिल्ह्यातील जवळजवळ पन्नास आंगणवाडी केंद्रातच नव्हे तर अल्मोडा आणि कौसणी पर्यंत वितरित केली जात आहेत. शेतक-यांच्या कठोर परिश्रमामुळे संस्थेची वार्षिक उलाढाल केवळ 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत पोहचली नाही, तर 900 पेक्षा जास्त कुटुंबांना रोजगाराची संधी मिळाल्यामुळे जिल्ह्यातून होणारे पलायन देखील कमी झाले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो ! जेव्हा आपण ऐकतो की भविष्यात जगामध्ये पाण्यासाठी युद्ध होतील. प्रत्येकजण ही गोष्ट बोलतो परंतु आपली कोणतीच जबाबदारी नाही का? जलसंवर्धन ही सामाजिक जबाबदारी असावी असं आपल्याला वाटत नाही का? प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असली पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब आपण कसा वाचवू शकतो आणि आम्हाला माहित आहे की भारतीयांसाठी जल संवर्धन हा नवीन विषय नाही, तो पुस्तकांचा विषय नाही, हा भाषेचा विषय नाही. शतकानुशतके आपल्या पूर्वजांनी हे करून दाखवले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी त्यांनी नवीन नवीन उपाय शोधले आहेत. तुमच्यापैकी ज्यांना तमिळनाडूला जाण्याची संधी मिळाली आहे त्यांनी कदाचित पहिले असेल की तमिळनाडूतील काही मंदिरात सिंचन पध्दती, जलसंवर्धन व्यवस्था, दुष्काळ व्यवस्थापन यासंदर्भात मंदिरांमध्ये मोठेमोठे शिलालेख लिहिलेले आहेत. मनारकोविल, चिरण महादेवी, कोविलपट्टी किंवा पुडुकोट्टई असो, तुम्हाला सर्वत्र मोठेमोठे शिलालेख दिसतील. आजही, विविध विहिरी पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय आहेत परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की आपल्या पूर्वजांच्या जल संवर्धन अभियानाचे हे जिवंत पुरावे देखील आहेत. गुजरातमध्ये अडलाज आणि पाटणच्या राणीची विहीर ही युनेस्को जागतिक वारसा आहेत, त्यांची भव्यता पाहण्याजोगी आहे. विहिरी ह्या एकप्रकारे जलमंदिरच तर असतात. तुम्ही राजस्थानला गेलात तर जोधपूरमध्ये चांद विहीर पाहायला नक्की जा. ही भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध विहीर आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागात पाण्याची कमतरता आहे तिथे ही आहे. एप्रिल, मे, जून, जुलै कालावधी असतो ज्यावेळी पावसाचे पाणी साठवण्याची उत्तम संधी असते आणि जर आम्ही अगोदरच तयार केली तर आपल्याला तितका जास्त लाभ मिळेल. या जल संरक्षणाच्या कामात मनरेगाच्या निधीचा देखील उपयोग होतो. गेल्या तीन वर्षांत प्रत्येकाने जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाच्या दिशेने स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. प्रत्येक वर्षी मनरेगाच्या निधी व्यतिरिक्त सरासरी 32 हजार कोटी रुपये जलसंधारण आणि जल व्यवस्थापनावर खर्च झाला आहे. 2017-18 विषयी बोलायचे झाले तर, 64 हजार कोटींच्या एकूण खर्चापैकी 55% खर्च म्हणजे अंदाजे 35 हजार कोटी रुपये जलसंधारण सारख्या कामासाठी खर्च करण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत जवळजवळ अशा जलसंधारण आणि जलव्यवस्थापन उपाययोजनांमुळे अंदाजे 150 लाख हेक्टर जमिनीला याचा फायदा झाला आहे. मनरेगाद्वारे जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापन यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो काही लोकांनी त्याचा फायदा घेतला आहे. केरळमधील कुट्टूमपेरूर नदीवर मनरेगाचे काम करणाऱ्या 7 हजार लोकांनी 70 दिवस काम केले आणि त्या नदीला पुनरुज्जीवीत केले. गंगा आणि यमुना नदीमध्ये पाणी आहे परंतु उत्तरप्रदेशात असे अजून अनेक प्रदेश आहेत; जसे फतेपूर जिल्ह्यातील ससुर खदेरी या दोन्ही नद्या कोरड्या झाल्या आहेत. मनरेगा अंतर्गत जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जमिनीची आणि जलसंवर्धनची जबाबदारी उचलली आहे. सुमारे 40 ते 45 गावातील लोकांच्या मदतीने ससुर खदेरी या सुखालेल्या नद्यांना पुनरुजीवीत केले आहे.पशु असो, पक्षी असो, शेतकरी असो, शेती असो, गाव असो,हे एक मोठे यश आहे. मी असे म्हणेन की पुन्हा एकदा एप्रिल, मे, जून, जुलै आपल्या समोर आहेत, आपण पाणी संचय, जलसंवर्धनसाठी आपण देखील काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, आपणही काही योजना तयार केल्या पाहिजेत, आपण देखील काहीतरीही करून दाखवू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! जेव्हा ‘मन की बात’ असते, तेव्हा चोहूबाजूंनी मला संदेश येतात, पत्र येतात, फोन येतात. पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील देवितोला गावातील आयन कुमार बॅनर्जी यांनी मायगोव्हवर लिहिले आहे की, “आपण दरवर्षी रवींद्र जयंती साजरी करतो परंतु अनेकांना नोबेल विजेत्या रवींद्रनाथ टागोरांचे शांततेने, सुंदर आणि सचोटीने जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान माहित नाही. कृपया ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये या विषयावर चर्चा करा म्हणजे लोकांना याविषयी माहिती मिळेल”.
मी आयनजीचे आभार मानतो की त्यांनी ‘मन की बात’च्या सर्व सोबत्यांचे लक्ष याकडे आकर्षित केले. गुरुदेव टागोर हे ज्ञान आणि विवेकबुद्धीने परिपूर्ण व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या लेखणीने सर्वांवर एक ठसा उमटविला आहे. रवींद्रनाथ हे एक प्रतिभावान, बहुआयामी व्यक्ती होते, परंतु त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणी एक शिक्षक असायचा. त्यांनी गीतांजली मध्ये लिहिले आहे- ‘He, who has the knowledge has the responsibility to impart it to the students.’अर्थात ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ते जिज्ञासू लोकांना दिले पाहिजे ही त्याची जबाबदारी आहे.
मला बंगाली भाषा तर येत नाही, पण जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी फारच लवकर उठायचो – बालपणापासून आणि पूर्व भारतात रेडिओ लवकर सुरु होतो, पश्चिम भारतात उशीरा सुरू होतो, मला अंधुकसे आठवत आहे ; कदाचित सकाळी 5.30 वाजता रेडिओवर रबींद्र संगीत सुरू व्हायचे आणि मला त्याची सवय झाली होती. भाषा तर येत नव्हती, सकाळी लवकर उठून रेडिओवर रवींद्र संगीत ऐकायची मला सवय झाली होती आणि जेव्हा आनंदलोके आणि आगुनेर, पोरोशमनी – या कविता ऐकायची संधी मिळायची तेव्हा मनाला एक नवचेतना मिळायची. तुम्हाला देखील रवींद्र संगीत, त्यांच्या कवितांनी नक्कीच प्रभवित केले असेल. मी रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण करतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! काही दिवसातच रमजानचा पवित्र महिना सुरु होणार आहे. संपूर्ण जगभर रमजान महिना संपूर्ण श्रद्धेने आणि आदराने साजरा केला जातो. रोज्याचा सामुहिक उद्देश हा आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती स्वत: उपाशी असते तेव्हा त्याला इतरांच्या भुकेची देखील जाणीव होते. जेव्हा त्याला स्वतःला तहान लागते, तेव्हा त्याला इतरांच्या तहानेची जाणीव होते.पैगंबर मोहम्मद यांची शिकवण आणि संदेश लक्षात ठेवण्याची ही एक संधी आहे. त्यांच्यासारखे समानता आणि बंधुभावाच्या मार्गावर चालणे ही आपली जबाबदारी आहे. एकदा एका व्यक्तीने पैगंबरांना विचारले – “इस्लाममध्ये कोणते काम उत्तम आहे?” पैगंबर साहेब म्हणाले, “गरीब आणि गरजूंना अन्न देणे आणि प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे,मग तुम्ही त्यांना ओळखत असाल किंवा नाही.” प्रेषित मोहम्मद यांचा ज्ञान आणि करुणेवर विश्वास होता. त्यांना कोणत्याच गोष्टीचा अहंकार नव्हता. ते सांगायचे की अहंकाराच ज्ञानाला पराभूत करते. प्रेषित मोहम्मद यांचा असा विश्वास होता की जर तुमच्याकडे गरजेपेक्षा अधिक असेल तर ते गरजू व्यक्तीला द्या, म्हणूनच रमजानमध्ये दान करण्याला देखील खूप महत्व आहे. लोक या पवित्र महिन्यामध्ये गरजूंना दान देतात. प्रेषित मोहम्मद यांचा विश्वास होता की एखादी व्यक्ती ही संपत्तीमुळे नाही तर तिच्या पवित्र आत्म्यामुळे श्रीमंत असते. मी सर्व नागरिकांना रमजान महिन्याचा शुभेच्छा देतो आणि मला आशा आहे की ही संधी लोकांना शांततेचा आणि सद्भावनेचा संदेश पाळण्यास प्रवृत्त करेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो ! बुद्ध पोर्णिमा प्रत्येक भारतीय साठी एक विशेष दिवस आहे. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की भारत ही करुणा, सेवा आणि त्याग करण्याची शक्ती दर्शविणाऱ्या भगवान बुद्धांची भूमी आहे , ज्यांनी जगभरातील लाखो लोकांना मार्गदर्शन केले. ही बुद्ध पोर्णिमा भगवान बुद्धांचे स्मरण करत, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून त्याचे अनुसरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करून देते. भगवान बुद्ध समता, शांती, एकता आणि बंधुता यांची प्रेरणा शक्ती आहेत. ही अशी मानवी मुल्ये आहेत, ज्यांची आजच्या जगात सर्वाधिक आवशक्यता आहे. बाबासाहेब डॉ. आंबेडकर जोर देवून सांगायचे की, त्यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानात भगवान बुद्धांचे खूप मोठे प्रेरणास्थान आहे. त्यांनी सांगितले होते – “My Social philosophy may be said to be enshrined in three words; liberty, equality and fraternity. My Philosophy has roots in religion and not in political science. I have derived them from the teaching of my master, The Buddha.”
बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून दलित असो, पीडीत असो, शोषित असो, वंचित असो करोडो लोकांना सक्षम केले. करुणेचे याहून मोठे उदाहरण असूच शकत नाही. लोकांचे दुःख समजून घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या महान गुणांपैकी करुणा हा एक गुण होता. असे म्हटले जाते की बौद्ध भिक्षुकांनी वेगवेगळ्या देशांत प्रवास केला. ते त्यांच्यासोबत भगवान बुद्धांचे समृद्ध विचार घेऊन जात आणि असे नेहमीच होत असते. संपूर्ण आशियामध्ये भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा वारसा मिळाला आहे. अनेक आशियाई देश जसे चीन, जपान, कोरिया, थायलंड, कंबोडिया, म्यानमारसारख्या अनेक देशांमध्ये अनेक बौद्ध परंपरा आणि बौद्ध शिकवण खोलवर रुजली आहे आणि याच कारणास्तव आम्ही बौद्ध पर्यटनासाठी पायाभूत सुविधा विकसित करत आहोत, ज्यामुळे दक्षिणपूर्व आशियातील महत्वाची बौद्ध ठिकाणे भारतातील महत्वाच्या बौद्ध स्थळांशी जोडली जातील. मला खूप आनंद होत आहे की भारत सरकार अनेक बौद्ध मंदिरे पुनरुज्जीवीत करण्याच्या कामात भागीदार आहे. यात शेकडो वर्षांपूर्वीचे म्यानमारमधील बागान येथील सुंदर आनंद मंदिर देखील समाविष्ट आहे. आज, जगात सर्वत्र संघर्ष आणि मानवी दु: ख पहायला मिळते. भगवान बुद्धांची शिकवणूक द्वेषाला दयेने संपवण्याचा मार्ग दाखवते. मी जगभरातील भगवान बुद्धांवर श्रद्धा असणाऱ्या, करुणेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवणाऱ्या – सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देतो. संपूर्ण जगासाठी भगवान बुद्धांकडे आशीर्वाद मागतो, जेणेकरून आपण त्यांच्या शिकवणुकीवर आधारित एक शांतीपूर्ण आणि दयाळू जगाच्या निर्मितीची आपली जबादारी पूर्ण करू शकू. आज जेव्हा आपण भगवान बुद्धांचे स्मरण करतो. तुम्ही लाफिंग बुद्धाच्या मुर्तींबद्दल ऐकलेच असेल, अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धा चांगले भाग्य घेऊन येते, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की स्मायलिंग बुद्धा हे भारताच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेशी देखील संबंधित आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की स्मायलिंग बुद्ध आणि भारताची सैन्य शक्ती यांच्यात काय संबंध आहे? 20 वर्षांपूर्वी 11 मे 1998 रोजी संध्याकाळी भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला संबोधित करताना सांगिलते होते, त्यांच्या शब्दांनी संपूर्ण देशाला गौरव,पराक्रम आणि आनंदाच्या क्षणांनी भरले. संपूर्ण जगभरात पसरलेल्या भारतीय समुदायामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला होता. तो दिवस होता बुद्ध पौर्णिमेचा. 11 मे 1998 रोजी राजस्थानातील पोखरण येथे परमाणु चाचणी घेण्यात आली. त्या घटनेला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि भगवान बुद्धांच्या आशीर्वादांसह बुद्ध पौर्णिमेला ही चाचणी केली गेली. भारताची चाचणी यशस्वी झाली आणि अशा प्रकारे भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपली ताकद दाखवून दिली. आम्ही असे म्हणू शकतो की तो दिवस भारताच्या इतिहासात त्याच्या लष्करी ताकदीच्या रुपात चिन्हांकित केला आहे. भगवान बुद्धांनी जगाला दाखवून दिले आहे की – शांततेसाठी आंतरिक शक्ती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, जेव्हा एक देश म्हणून आपण बलवान होत असतो तेव्हा आपण प्रत्येकासोबत शांततापूर्ण मार्गाने वागतो. मे 1998 या महिन्यामध्ये आण्विक चाचण्या घेण्यात आल्या म्हणून केवळ हा महिना देशासाठी महत्त्वपूर्ण नाही, परंतु ज्याप्रकारे ह्या चाचण्या केल्या गेल्या हे महत्त्वाचे आहे. य घटनेने संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की भारताची भूमी ही महान शास्त्रज्ञांची भूमी आहे आणि कणखर नेतृत्वासह भारत नवीन उंची प्राप्त करू शकतो. अटलबिहारी वाजपेयीजी यांनी “जय-जवान जय-किसान, जय-विज्ञान” हा मंत्र दिला होता. आपण 11 मे 1998 या दिवसाचा 20 वा वर्धापनदिन साजरा करणार आहोत, तेव्हा भारताच्या शक्तीसाठी अटलजींनी आपल्याला जो,’जय विज्ञान’चा मंत्र दिला होता, त्याला आत्मसात करत आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी, शक्तिशाली भारत निर्माण करण्यासाठी, सक्षम भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक युवकाने योगदान देण्याचा संकल्प करावा. आपल्या शक्तीला भारताच्या शक्तीमध्ये सहभागी करा. जो प्रवास अटलजींनी सुरु केला होता, त्याला पुढे घेऊन जाण्याचा एक नवीन आनंद, नवीन समाधान आपण देखील प्राप्त करू शकू.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढील ‘मन की बात’ कार्यक्रमात भेटूया आणि अजून गप्पा मारुया.
खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार! आज रामनवमीचा पवित्र उत्सव आहे. रामनवमीच्या या पावन पर्वानिमित्त सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा! पूजनीय बापूंच्या आयुष्यात ‘राम नामाचे किती महत्त्व होते, हे आपण त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी पहिले आहे. काही दिवसांपूर्वी 26 जानेवारीला जेव्हा आसियान राष्ट्रातले सगळे प्रमुख इथे आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्या देशातली कला पथकंही इथे आली होती. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे, त्यांच्यातल्या बहुतांश देशांनी आमच्यासमोर रामायणच सादर केलं. म्हणजे राम आणि रामायण केवळ भारतातच नाही तर जगातल्या या भूमीवर, आसियान राष्ट्रांमध्ये आजही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो नेहमीप्रमाणेच यावेळीही मला तुम्हा सर्वांची पत्रे, ईमेल, फोन कॉल आणि प्रतिक्रिया मोठ्या संख्येने मिळाल्या आहेत. कोमल ठक्कर यांनी ‘माय-गोव्ह’वर संस्कृतचे ऑनलाईन वर्ग सुरु करण्याबद्दल जे लिहिलं आहे, ते मी वाचलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना तुमचं संस्कृतवरचं प्रेम बघून मला खूप बरं वाटलं. याबाबत संबंधित विभागांकडून जे प्रयत्न सुरु आहेत, त्याची माहिती तुमच्यापर्यत पोचवायला मी सांगितलं आहे. ‘मन की बात’चे जे श्रोते संस्कृत संदर्भात काम करताहेत, त्यानांही माझी विनंती आहे, की कोमलजींची कल्पना प्रत्यक्षात कशी साकार करता येईल, यावर विचार करावा.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या बराकर गावचे श्रीयुत धनश्याम कुमारजी यांनी नरेंद्र मोदी app वर लिहिलेली प्रतिक्रिया मी वाचली. जमिनीच्या घटत्या जलपातळीवर तुम्ही जी चिंता व्यक्त केली आहे, ती निश्चितच खूप महत्त्वाची आहे.
कर्नाटकच्या श्रीयुत शकल शास्त्रीजी यांनी शब्दांचा अतिशय चपखल वापर करत असे लिहिले की ‘आयुष्मान भारत’ तेव्हाच शक्य आहे जेव्हा ‘आयुष्मान भूमी’ असेल. आणि ‘आयुष्मान भूमी’ तेव्हाच होईल जेव्हा आपण या भूमीवरच्या प्रत्येक प्राण्याची काळजी करू. येत्या उन्हाळ्यात सर्व पशु-पक्ष्यांसाठी बाहेर पाणी ठेवण्याचा आग्रह तुम्ही सर्वांना केला आहे, श्रीयुत शकल शास्त्रीजी, तुमच्या भावना मी सर्व श्रोत्यांपर्यत पोचवल्या आहेत.
श्रीयुत योगेश भद्रेशाजी यांचे म्हणणे आहे की मी यावेळी युवकांच्या आरोग्याविषयी बोलावे. त्यांच्या मते आपण जर इतर आशियाई देशांशी तुलना केली, तर भारतीय युवक शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. योगेशजी, मी विचार केला की यावेळी मी आरोग्याच्या विषयावर सर्वांशी विस्ताराने चर्चा करेन- सुदृढ भारतावर चर्चा करेन. आणि तुमच्यासारखे काही युवक एकत्र येऊन सुदृढ भारतासाठी मोहीमही हाती घेऊ शकता.
काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतीनीं काशी इथे भेट दिली. वाराणसीच्या श्रीयुत प्रशांत कुमार यांनी लिहीले आहे की त्या दौऱ्यातल्या भेटींची सगळी दृश्य मनाला स्पर्श करणारी होती, प्रभाव पाडणारी होती. आणि त्यांनी आग्रह केला की ते सगळे फोटो, सगळे व्हिडीओ, सोशल मिडीयावर टाकायला हवेत. प्रशांतजी भारत सरकारने ते सगळे फोटो आणि विडीओ त्याच दिवशी सोशल मिडीया आणि नरेंद्रमोदी app वर शेअर केले होते. आता तुम्ही ते फोटो लाईक करा आणि रिट्वीट करा आणि आपल्या मित्रांपर्यत पोचवा.
चेन्नईहून अनघा, जयेश आणि इतर खूप मुलांनी ‘एक्झाम वॉरियर’ पुस्तकाच्या मागे जी कृतज्ञता कार्डे दिली आहेत, त्यावर त्यांनी त्यांच्या मनात जे जे विचार आले ते मला लिहून कळवले आहे. अनघा, जयेश आणि इतर सगळ्या मुलांनो, मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या या पत्रांमुळे माझा दिवसभराचा थकवा पळून जातो. इतकी पत्रे,इतके फोन कॉल्स, प्रतिक्रिया, या सगळ्यातले जे काही मला वाचायला मिळालं, जे ऐकायला मिळालं, त्यातल्या अनेक गोष्टी माझ्या मनाला भिडल्या. आज जरी मी तेवढ्याच गोष्टी सांगायच्या ठरवल्या तरी महिनो न महिने मला सतत तेच सांगावे लागेल.
यावेळी जास्तीत जास्त पत्र मुलांनी पाठवली आहेत, त्यांनी परीक्षेबद्दल लिहीले आहे. सुट्टीतले आपले प्लान्स मला सांगितले आहेत. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पाणी मिळत नाही, त्याची चिंता केली आहे. शेतकरी मेळावे आणि शेतीसंबधी ज्या ज्या गोष्टी देशात घडताहेत, त्यांच्याबद्दल शेतकरी बंधू-भगिनींनी पत्र पाठवली आहेत. जलसंवर्धनाविषयी काही जागृत नागरिकांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. जेव्हापासून आपण एकमेकांशी रेडियोच्या माध्यमातून ही ‘मन की बात’ सुरु केली आहे, तेव्हापासून मी एक पद्धत अनुभवतो आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पत्र उन्हाळ्याशी संबधित विषयांवर येतात. परीक्षेच्या आधी विद्यार्थ्याची परीक्षेच्या काळजीविषयीची पत्र येतात. सणासुदीच्या काळात आपले सणवार,आपली संस्कृती, परंपरा यांच्याविषयीची पत्रे येतात. म्हणजेच मनातल्या गोष्टी ऋतुमानानुसार बदलतात आणि कदाचित हे ही खरं आहे की आपल्या मनातल्या या गोष्टी इतर कोणाच्यातरी आयुष्यातला ऋतूही बदलवतात आणि का बदलवणार नाही? तुमच्या या गोष्टींमध्ये, उदाहरणामध्ये, इतकी प्रेरणा, इतकी उर्जा, इतकी आपुलकी आणि देशासाठी काहीतरी करण्याची दृढ भावना असते! ह्या गोष्टींमध्ये तर पूर्ण देशाचा मूड बदलण्याची ताकद आहे. जेव्हा तुमच्या पत्रात मला वाचायला मिळत की कसे आसामच्या करीमगंज इथले रिक्षाचालक अहमद अली यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर गरीब मुलांसाठी नऊ शाळा बनवल्या आहेत – तेव्हा मला त्यात आपल्या देशाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन होते. जेव्हा मला कानपूरच्या डॉ अजित मोहन चौधरी यांची गोष्ट ऐकायला मिळाली, ते फुटपाथवर जाऊन गरिबांना अन्न देतात आणि मोफत औषधोपचारही करतात – तेव्हा त्या गोष्टीतून मला देशातला बंधूभाव अनुभवण्याची संधी मिळते. 13 वर्षांपूर्वी, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कोलकात्याचे टैक्सीचालक सैदुल लस्कर यांच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला – त्यानंतर उपचाराअभावी पुन्हा कोणत्याही गरीबाचा मृत्यू होऊ नये या निश्चयातून त्यांनी रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आपला हा निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यानी घरातले दागिने विकले, दान मागून पैसे जमा केले. त्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी खूप मदत केली. एका इंजीनीयर मुलीने तर आपला पहिला संपूर्ण पगारच दिला. अशा तऱ्हेने, 12 वर्षे पैसे जमा केल्यानंतर अखेर सैदूल लस्कर यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आलं. आज त्यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्या कठोर मेहनतीमुळे,कोलकात्याजवळ पुनरी गावात त्यानी सुमारे 30 खाटांची व्यवस्था असलेले रुग्णालय बनवले आहे. हीच आहे नव्या भारताची ताकद! जेव्हा उत्तरप्रदेशातील एक महिला अनेक संघर्षांचा सामना करुनही 125 शौचालये बांधते आणि महिलांना त्यांचा हक्क मिळवून देते, त्यांना त्यासाठी प्रेरित करते, तेव्हा देशातल्या मातृशक्तीचे दर्शन होते. असे अनके प्रेरणा पुंज माझ्या देशाची ओळख बनले आहेत. आज संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज जेंव्हा भारताचे नाव मोठ्या गौरवाने घेतले जाते, तेव्हा त्यामागे, भारतमातेच्या या पुत्र आणि कन्यांचा पुरुषार्थ लपला आहे! आज देशभरात युवकांमध्ये, महिलांमध्ये, मागास, गरीब लोकांमध्ये, मध्यमवर्गात, सर्व वर्गातल्या लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की आम्ही पुढे जाऊ शकतो, आमचा देश पुढे जाऊ शकतो. आशा – अपेक्षांनी भारलेले, आत्मविश्वासाचे एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहेत. हाच आत्मविश्वास, हीच सकारात्मकता, नव-भारताचा आपला संकल्प साकार करेल.
माझ्या प्रिय देशबांधवानो, पुढचे काही महिने, आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच, मला शेतीशी संबधित खूप पत्र आली आहेत. यावेळी मी दूरदर्शनच्या डीडी किसान वाहिनीवर शेतकऱ्यांसोबत जी चर्चा होते, त्या कार्यक्रमाचे विडीओ मागवून पाहिलेत. आणि मला असं सांगावसं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने या वाहिनीवरच्या चर्चा पहायला हव्यात आणि तसे प्रयोग आपल्या शेतातही केले पाहिजेत. महात्मा गांधींपासून ते शास्त्रीजी असोत, लोहियाजी असोत, चौधरी चरणसिंगजी असोत किंवा मग चौधरी देवीलालजी असोत, सर्वानीच शेती आणि शेतकरी या दोहोंना देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि सर्वसामान्य जीवनाचा अविभाज्य घटक मानलं. माती, शेती आणि शेतकरी यांच्यावर महात्मा गांधी यांचेही खूप प्रेम होते, त्यांच्या या भावना त्यांच्या या वाक्यातून आपल्याला कळतात, ते म्हणाले होते-
‘To forget how to dig the earth and to tend the soil, is to forget ourselves.’
म्हणजेच, माती खोदणे आणि मातीची निगा राखणे जर आपण विसरलो, तर त्याचा अर्थ, आपण स्वतःलाच विसरलो, असा होईल! तसेच, लालबहादूर शास्त्रीही झाडे, रोपं आणि वनस्पतींच्या रक्षणावर आणि उत्तम कृषी संरचनेवर भर देत असत. डॉ राममनोहर लोहिया यांनी तर आपल्या शेतकऱ्याना चांगले उत्पन्न, उत्तम सिंचन सुविधा आणि त्याचं आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी, तसेच अन्न आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा आग्रह धरला होता. 1979 साली, आपल्या भाषणात, चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान वापरण्याचा, नवे संशोधन करण्याचा, ते वापरण्याचा आग्रह केला होता. त्याच्या गरजेवर भर दिला. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत झालेल्या कृषी उन्नती मेळाव्याला गेलो होतो. तिथे शेतकरी बांधव आणि शास्त्रज्ञांशी माझी चर्चा झाली. शेतीशी संबंधित अनेक अनुभव जाणून घेणे, समजणे, शेतीशी संबधित नवी संशोधने समजून घेणे – हा सगळा माझ्यासाठी एक सुखद अनुभव तर होताच, पण ज्या गोष्टीने मी सर्वाधिक प्रभावित झालो, ती गोष्ट म्हणजे, मेघालय आणि तिथल्या शेतकऱ्यांची मेहनत! खूप कमी क्षेत्रफळ असलेल्या या राज्याने मोठी कामगिरी केली आहे. मेघालयच्या आपल्या शेतकऱ्यानी वर्ष 2015- 16 दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विक्रमी उत्पादन घेतले आहे. जेव्हा उद्दिष्ट निश्चित असेल, दृढ संकल्प असतील, ते साकार करण्याची इच्छाशक्ती असेल, तर ते पूर्ण करता येतात हे त्यांनी आपल्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलं आहे. आज शेतकऱ्यांच्या श्रमाला तंत्रज्ञानाची जोड मिळते आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकाना मोठं बळ मिळालं आहे. मला जी पत्र आली आहेत, त्यात अनेक शेतकऱ्यांनी पिकाच्या किमान आधारभूत मूल्याविषयी म्हणजेच हमीभावाविषयी लिहिलं आहे, आणि त्यांची इच्छा होती की मी यावर विस्ताराने बोलावं.
बंधू-भगिनीनो, यंदाच्या अर्थसंकल्पात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निश्चित करण्यात आले आहे की अधिसूचीत पिकांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट जास्त हमीभाव दिला जाईल. सविस्तर सांगायचं झाल्यास, हमीभावासाठी जो उत्पादन खर्च लक्षात घेतला जाईल,त्यात शेतावर जे मजूर काम करतात, त्यांची मजुरी, पशूंची मेहनत आणि खर्च, भाड्याने घेतलेली यंत्र, उपकरणं किंवा जनावरं, बियाणांची किंमत, वापरलेल्या सर्व प्रकारच्या खतांची किंमत, राज्य सरकारला दिलेला भू महसूल, भांडवलावर दिलेले व्याज, शेतजमीन भाडेपट्यावर असेल तर त्याचे भाडे आणि एवढेच नाही, तर शेतकरी स्वतः जी मेहनत करतो किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी जर शेतात काम करत असेल, तर त्याच्या श्रमाचे मूल्यही उत्पादन खर्चात जोडले जाईल.
त्याशिवाय, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी देशभरात, कृषी बाजाीरात सुधारणा करण्याचे कामही व्यापक स्तरावर चालू आहे. गावातल्या स्थानिक मंड्या, घाऊक बाजार आणि मग जागतिक बाजारपेठ एकत्र याव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी फार दूर जावे लागू नये यासाठी, देशातल्या 22 हजार ग्रामीण बाजारांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवून त्यांना अत्याधुनिक केले जात आहे. त्यानंतर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ई-नाम प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. म्हणजेच, शेतीला देशातल्या कोणत्याही बाजारपेठेशी जोडण्याची व्यवस्था तयार केली जात आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावर्षी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्ष महोत्सवाची सुरुवात होते आहे. ही आपल्यासाठी एक ऐतिहासिक संधी आहे. देशाने हा महोत्सव कसा साजरा करायला हवा? स्वच्छ भारत हा आपला संकल्प तर आहेच, त्याशिवाय, आपण सव्वाशे कोटी नागरिक एकत्र येऊन गांधीजीना उत्तमात उत्तम श्रध्दांजली कशी वाहू शकतील? काय नवे कार्यक्रम हाती घेतले जाऊ शकतात? काय नवनव्या पद्धती, कल्पना राबवल्या जाऊ शकतात? माझी तुम्हा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ‘माय गोव्ह’च्या माध्यमातून तुमचे विचार सर्वांपर्यत पोचवा. “गांधी 150”या संकल्पनेचा लोगो कसा असावा? घोषवाक्य काय असावे? याविषयी आपल्या कल्पना सांगा. आपण सगळ्यांनी मिळून बापूंना एक स्मरणीय श्रद्धांजली वाहू या. आणि बापूंचे स्मरण करून, त्याच्यापासून प्रेरणा घेत, आपल्या देशाला एका नव्या उंचीवर पोचवायचे आहे.
“नमस्कार, आदरणीय पंतप्रधान महोदय, मी गुरगावहून प्रीती चतुर्वेदी बोलते आहे. पंतप्रधान महोदय, आपण ‘स्वच्छ भारत अभियानाला’ आपण जसे यशस्वी केले आहे, तसेच आता देशात, निरोगी भारत अभियान राबवण्याची वेळ आली आहे. हे अभियानही यशस्वी करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही जनता, सरकार आणि विविध संस्थांना कसे एकत्र आणत आहात? त्याविषयी आम्हाला काही माहिती द्या….. धन्यवाद!
धन्यवाद! तुम्ही योग्यच सांगत आहात आणि मी समजतो की ‘स्वच्छ भारत’ आणि ‘निरोगी भारत’ ही दोन्ही अभियान परस्परांना पूरक आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात आज देश पारंपरिक दृष्टीकोनाच्या पुढे गेला आहे. देशात आरोग्याशी संबंधित सगळी कामं करण्याची जबाबदारी पूर्वी केवळ आरोग्य मंत्रालयाची आहे असं समजलं जात असे. मात्र आता सगळी मंत्रालये आणि विभाग, मग, ते स्वच्छता मंत्रालय असो, आयुष मंत्रालय असो, रसायन आणि खते विभाग, ग्राहक मंत्रालय असो किंवा मग महिला आणि बालविकास मंत्रालय असो, किंवा राज्य सरकारं असोत, सगळे विभाग एकत्र येऊन निरोगी भारतासाठी काम करत आहेत. आरोग्याच्या प्रतिबंधात्मक उपायांसह, परवडणाऱ्या आरोग्य सुविधांवर भर दिला जात आहे. आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी हा सगळ्यात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जितके अधिक जागृत असू तितके जास्त लाभ व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला मिळतील. आयुष्य निरोगी बनवण्यासाठी पहिली आवश्यकता आहे – स्वच्छतेची! आपण सर्वानी एक देश म्हणून गेल्या चार वर्षात स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की गेल्या चार वर्षात सार्वजनिक स्वच्छतेचे क्षेत्र दुपटीने वाढून 80 टक्क्यांवर पोचले आहे. त्यशिवाय देशभरात आरोग्य सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने व्यापक स्तरावर काम सुरु आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य निगा राखण्याच्या क्षेत्रात योगाभ्यासाने आज जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. योगामुळे शरीर निरोगी राहते आणि सुदृढही! आपल्या सगळ्यांच्या योगाविषयाच्या कटीबद्धतेमुळेच योग आज एक जनचळवळ बनले आहे, घराघरात पोचले आहे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला – म्हणजेच 21 जूनला अजून 100 दिवस शिल्लक आहेत. गेल्या तीन वर्षात, प्रत्येक आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात देश आणि जगातल्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.
यावर्षीही, आपण स्वतः योग करू आणि आपले पूर्ण कुटुंब, मित्रपरिवार आणि इतर सर्वांना योग करण्यासाठी प्रेरित करू, असा आपण निश्चय करुया. नव्या, आकर्षक पद्धतीनी योग मुले, युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरीकांपर्यत तसेच प्रत्येक वयोगटातल्या महिला आणि पुरुषांपर्यंत पोचवून त्याला अधिकाधिक लोकप्रिय करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तसे तर देशातल्या दूरचित्रवाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं वर्षभर योगविषयक विविध कार्यक्रम करत असतातच. पण आजपासून योगदिवसापर्यत एक अभियान म्हणून योगाविषयी जागृती निर्माण करणारे काही कार्यक्रम केले जाऊ शकतात का?
माझ्या प्रिय देशबांधवानो, मी योगशिक्षक तर नाही, हो, मात्र योगाभ्यासी नक्कीच आहे. मात्र काही लोकांनी आपली कल्पकता वापरून मला योगशिक्षकही बनवले आहे. माझे योग करतानाचे काही थ्रीडी ऍनिमेटेड व्हिडिओ बनवले आहेत. मी तुम्हा सगळ्यांपर्यत हे व्हिडीओ पोचवेन म्हणजे आपण एकत्र आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करू शकू. आरोग्य सुविधा सर्वांना सहज उपलब्ध असाव्यात आणि स्वस्तही! त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात, सुलभ असाव्यात यासाठीही व्यापक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
आज देशभरात, 3 हजारपेक्षा जास्त जनऔषधी केंद्र उघडली गेली आहेत. तिथे 800 पेक्षाही अधिक औषधं अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. आणखी नवी केंद्रे सुरु करण्याचे कामही सुरु आहे. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या जनऔषधी केंद्रांची माहिती गरजू लोकांपर्यत नक्की पोहोचवावी, म्हणजे त्यांचा औषधांचा खर्च खूप कमी होईल, त्यांची खूप मोठी सेवा होईल. हृदयरोग्यांसाठी आवश्यक स्टेंटची किंमत 85 टक्क्यापर्यत कमी करण्यात आली आहे. गुडघेरोपण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांची किंमत नियंत्रित करून 50 ते 70 टक्क्यांपर्यत कमी केली आहे. ‘आयुष्मान भारत”योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबे म्हणजे, सुमारे 50 कोटी नागरिकांच्या उपचारांसाठी एका वर्षात पाच लाख रुपये भारत सरकार आणि विमा कंपन्या मिळून देणार आहेत. देशात सध्या असलेल्या 479 वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण जागांची संख्या वाढवून 68 हजार करण्यात आली आहे. देशभरातल्या लोकांना उत्तम उपचार आणि आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी, विविध राज्यांमध्ये, नवी एम्स रुग्णालये उघडली जात आहेत. प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक नवे वैद्यकिय महाविद्यालय सुरु केले जाईल. संपूर्ण देशाला 2025 पर्यत क्षयरोगमुक्त करण्याचं आमचं लक्ष्य आहे.
हे खूप मोठं काम आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यत यासाठी जागृती करण्याची गरज असून त्यासाठी तुमची मदत हवी आहे. क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या सर्वाना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अनेक वर्षांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात औद्योगीकरणाची गरज व्यक्त केली होती. उद्योगांमुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील रोजगार उपलब्ध करून देता येईल, असे त्यांचे मत होते. आज देशात ‘मेक इन इंडिया’ अभियान यशस्वीपणे सुरु आहे. अशावेळी, डॉ आंबेडकरांनी भारत औद्योगिक महाशक्ती बनण्याचे जे स्वप्न बघितले होते, तेच आम्हाला प्रेरणा देत आहे. भारत देश आज जगाच्या अर्थव्यवस्थेत तेजस्वी तारा म्हणून नावारूपाला आला आहे. जगात सर्वात जास्त थेट परदेशी गुंतवणूक आज भारतात होत आहे. सगळं जग गुंतवणूक, संशोधन आणि विकासाचं केंद्र म्हणून भारताकडे बघत आहे. औद्योगिक विकास शहरातच शक्य आहे असा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता आणि म्हणूनच त्यांनी शहरीकरणावर भर दिला. त्यांच्या ह्याच विचारांना पुढे नेत आज देशातल्या मोठ्या शहरांत आणि छोट्या शहरांत चांगले रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, डिजिटल जोडणी या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्मार्ट सिटी अभियान’ आणि नागरी अभियानाची सुरवात करण्यात आली. बाबासाहेबांचा स्वयंपुर्णतेवर दृढ विश्वास होता. एखाद्याने दारिद्र्यातच आयुष्य काढावे हे त्यांना मान्य नव्हते. याबरोबरच, गरिबांना काहीतरी थातुरमातुर सुविधा देऊन किवा मदत देऊन त्यांची गरिबी दूर होणार नाही, असेही त्यांचे मत होते. आज “मुद्रा योजना”, ‘स्टार्ट अप इंडिया”, “स्टँड अप इंडिया’ यासारखे उपक्रम देशात युवा संशोधक आणि युवा उद्योजक घडवत आहेत.
भारतात 1930 आणि 1940 च्या दशकात जेंव्हा फक्त रस्ते आणि रेल्वे यांचीच चर्चा होत होती तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बंदरे आणि जलमार्गांची चर्चा सुरु केली होती. त्यांनीच जलशक्ती ही राष्ट्र शक्तीच्या रुपात बघितली होती. देशाच्या विकासात जलमार्गांचं महत्व ओळखून त्यावर भर दिला होता. अनेक नदी खोरे प्राधिकरण, पाण्याशी संबंधित वेगवेगळे आयोग स्थापन करणे ही बाबासाहेबांचीच दूरदृष्टी होती. आज देशात जलमार्ग आणि बंदरे विकसित करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न होत आहेत. भारताच्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर बंदरे विकसित होत आहेत आणि जुन्या बंदरांमधल्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत.
चाळीसच्या दशकात चर्चेचे मुख्य मुद्दे असायचे, दुसरं महायुद्ध, शीतयुध्द आणि फाळणी. त्यावेळी, डॉ आंबेडकरांनी एक प्रकारे ‘टीम इंडिया’ या भावनेचा पाया रचला. त्यांनी संघराज्य व्यवस्थेचं महत्व यावर चर्चा केली आणि देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला. आज आम्ही शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये सहकारी संघराज्य व्यवस्था, तसेच त्याच्याही पुढे जाऊन, स्पर्धात्मक सहकारी संघराज्य व्यवस्था हा मंत्र घेतला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या करोडो मागासवर्गीयांचे प्रेरणास्थान आहेत. जीवनात पुढे जाण्यासाठी श्रीमंत किंवा प्रतिष्ठित कुटुंबातच जन्म घेण्याची गरज नाही, तर भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारे देखील मोठी स्वप्ने बघू शकतात, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु शकतात आणि त्यात यशस्वी देखील होऊ शकतात, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.
अनेकदा अनेक लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची हेटाळणी केली. त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले. गरीब आणि मागास कुटुंबातला हा मुलगा जीवनात पुढे जाणार नाही, काही बनू शकणार नाही, जीवनात यशस्वी होणार नाही यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण नव-भारताचे चित्र वेगळे आहे. हा असा भारत आहे जो आंबेडकरांचा आहे, गरीबांचा आहे, मागासवर्गीय लोकांचा आहे. डॉ आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ते 5 मे याकाळात ‘ग्राम-स्वराज्य अभियान’ आयोजित केलं जाणार आहे. यात देशभर ग्रामविकास, गरिबांचं कल्याण आणि सामाजिक न्याय या विषयांवर वेगवेगळे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा, अशी माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे’.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, येत्या काही दिवसांत भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, ईस्टर, बैसाखी सारखे अनेक सण येत आहेत. भगवान महावीर जयंती म्हणजे त्यांचा त्याग आणि तपश्चर्या यातून शिकवण घेण्याचा दिवस आहे. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांचे जीवन आणि शिकवण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व देशबांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा ! ईस्टर म्हटला की प्रभू येशूचे प्रेरणादायी उपदेश आठवतात. त्यांनी मानवजातीला शांती, सद्भावना, न्याय, दया आणि करुणा हा संदेश दिला. एप्रिलमध्ये पंजाब आणि पश्चिम भारतात बैसाखीचा उत्सव साजरा केला जातो. त्याचकाळात बिहारमध्ये जुडशीतल आणि सातुवाईन, आसाम मध्ये बिहू, तर पश्चिम बंगालमध्ये पोईला वैशाखची धूम असेल. हे सगळे सण कुठल्या ना कुठल्या रुपात आपल्या शेती आणि बळीराजाशी संबंधित आहेत. हे सण म्हणजे आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या निसर्गाचे आभार मानण्याचे माध्यम आहेत. पुन्हा एकदा, येणाऱ्या सणांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद!
माझ्या प्रिय देश बांधवानो, नमस्कार,
आज मन की बात ची सुरवातच एका दूरध्वनीने करूया,
फोन
आदरणीय पंतप्रधानजी,मी कोमल त्रिपाठी मेरठ हून बोलत आहे, 28 तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे,भारताची प्रगती आणि देशाचा विकास विज्ञानाशी जोडला गेला आहे,विज्ञानात आपण जेवढे संशोधन करू नाविन्याचा शोध घेऊ तेवढी आपण प्रगती करू, भरभराट करू.आम्हा युवा वर्गाला प्रेरित करण्यासाठी, आमच्या विचारांना वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगत विचारांना प्रवृत्त करण्यासाठी ज्यामुळे देशाचीही प्रगती होईल यासाठी आपण काही सांगू शकाल का? धन्यवाद!
आपण फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विज्ञानाबाबत माझ्या युवा मित्रांनी अनेक प्रश्न मला विचारले आहेत, काही ना काही लिहिले आहे. आपण पहिले आहे की समुद्राचा रंग निळा दिसतो मात्र दैनंदिन जीवनात आपण अनुभवतो की पाणी रंगहीन असते, त्याला रंग नसतो. नदी असू दे, समुद्र असू दे, त्यातल्या पाण्याला रंग का दिसतो,याचा आपण कधी विचार केलाय? 1920च्या दशकामध्ये एका युवकाच्या मनात हा प्रश्न आला. याच प्रश्नाने आधुनिक भारताचा एक महान वैज्ञानिक उदयाला आला. आप जेव्हा विज्ञानाबाबत बोलतो तेव्हा सर्व प्रथम मनात नाव येतं ते म्हणजे भारत रत्न सर, सी व्ही रामन यांचे. त्यांना लाइट स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश प्रकीर्णनावरच्या उत्कृष्ट कार्यासाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. रामन इफेक्ट या नावाने त्यांचा शोध प्रसिध्द आहे. 28 फेब्रुवारी या दिवशी रामन यांनी लाइट स्कॅटरिंगचा शोध लावला होता असे मानले जाते म्हणून आपण दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता.
या देशानं विज्ञानाच्या क्षेत्रात अनेक महान वैज्ञानिक दिले.एकीकडे महान गणितज्ञ बोधायन, भास्कर, ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट यांची परंपरा राहिली तर दुसरीकडे आरोग्य चिकित्सेमध्ये सुश्रुत आणि चरक आपल्या गौरवाचे स्थान आहेत. सर जगदीश चंद्र बोस आणि हर गोविंद खुराना यांच्यापासून ते सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे वैज्ञानिक म्हणजे भारताचा गौरव आहेत. सत्येंद्र नाथ बोस यांच्या नावाने तर प्रसिध्द बोसोन कण असे नावही दिले गेले आहे.
नुकताच मुंबईत वाधवानी कृत्रिम बुद्धिमत्ता संस्थेच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला लाभली. विज्ञान क्षेत्रातल्या चमत्काराविषयी जाणून घेणे मोठे रंजक होतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून रोबो, आणि विशिष्ठ काम करणारी यंत्र तयार करण्यासाठी मदत मिळते. आजकाल यंत्र स्व अध्यनातून स्वतःच्या बुद्धिमत्तेला आणखी स्मार्ट करत आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग गरीब, वंचित आणि गरजुचे जीवन सुकर करण्यासाठी होऊ शकतो. कृत्रिम बुद्दीमत्तेच्या या कार्यक्रमात मी वैज्ञानिक समुदायाला आवाहन केलं होतं की दिव्यांग बंधु-भगिनींचे जीवन सुकर बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल?
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण नैसर्गिक आपत्तीबाबत अंदाज करू शकतो का? शेतकऱ्यांना पीक घेण्यासाठी काही मदत करू शकतो का? आरोग्य सेवा पोहोचण्यासाठी सुलभ व्हाव्यात आणि आजाराचा आधुनिक पद्धतीने उपचार व्हावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता मदतिची ठरू शकते का ?
काही दिवसांपूर्वी इस्त्रायलच्या पंतप्रधानांसमवेत गुजरातमध्ये अहमदाबाद मध्ये आय क्रिएट च्या उद्घाटनाला जाण्याची संधी मिळाली. तिथे एका युवकाने एक असे डीजीटल उपकरण विकसित केले होते की बोलता येत नाही अशा मूक व्यक्तीने आपले म्हणणे लिहिले की त्याचे आवाजात रुपांतर होते आणि आपण एखाद्या व्यक्तीशी बोलून ज्याप्रमाणे संवाद साधतो त्या प्रमाणे या व्यक्तीशीही संवाद साधू शकतो. अशा अनेक ठिकाणी आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करू शकतो असं मला वाटते.
विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना स्वतःचे मुल्य नसते.आपल्या इच्छेप्रमाणे यंत्र काम करते.मात्र आपण यंत्राकडून काय काम करवून घेऊ इच्छितो ते आपल्यावर अवलंबून असते. इथे मानवी उद्देश महत्वाचा ठरतो. विज्ञानाचा मानव कल्याणासाठी उपयोग, मानवी जीवनाची सर्वोच्च उंची गाठण्यासाठी विज्ञानाचा उपयोग.
विजेच्या दिव्याचा शोध लावणारे थॉमस अल्वा एडिसन यांना आपल्या अनेक प्रयोगात अनेकदा अपयश आलं. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की विजेचे दिवे कसे बनवू नयेत याच्या दहा हजार पद्धती मी शोधल्या आहेत, म्हणजेच एडिसन यांनी आपल्या अपयशालाच आपली ताकद बनवली. योगायोगाने आज मी महर्षी अरविंद यांची कर्मभूमी ऑरोविले इथे आहे.एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी ब्रिटीश शासनाला आव्हान दिलं, त्यांच्या विरोधात लढा दिला, त्यांच्या शासनाप्रती जबाब मागितला. एक महान ऋषी म्हणून त्यांनी जीवनातल्या प्रत्येक पैलू बाबत प्रश्न उपस्थित केला. त्याचे उत्तर शोधून मानवतेला मार्ग दाखवला. सत्य जाणण्यासाठी वारंवार प्रश्न विचारण्याची भावना महत्वाची आहे. वैज्ञानिक शोधाच्या मागे ही खरी खुरी प्रेरणाही असते. का, काय आणि कसे या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसता कामा नये. राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त आपले वैज्ञानिक,विज्ञान क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या सर्वाना मी शुभेच्छा देतो. आपली युवा पिढी सत्य आणि ज्ञानाच्या शोधासाठी प्रेरित होवो, विज्ञानाच्या मदतीने समाजाची सेवा करण्यासाठी प्रेरित होवो, यासाठी माझ्या अनेक अनेक शुभेच्छा.
मित्रहो, पेच प्रसंगाच्या, संकटाच्या वेळी, सुरक्षितता, आपत्ती या विषयावर मला अनेक संदेश येतात, लोक काही ना काही लिहित असतात.पुण्याहुन रवींद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर आपल्या प्रतिक्रियेत व्यावसायिक सुरक्षितते विषयी लिहिले आहे. ते लिहितात की आपल्या देशात कारखाने आणि बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा तितकासा चांगला नाही. येत्या ४ मार्चला भारताचा राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे त्या निमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात सुरक्षितता हा विषय घ्यावा, ज्यामुळे लोकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढेल. सार्वजनिक सुरक्षितते विषयी आपण बोलत असतो त्यावेळी दोन गोष्टी महत्वाच्या असतात, तत्परता आणि तयारी. सुरक्षितता दोन प्रकारची असते एक जी आपत्तीच्या वेळी आवश्यक असते आणि दुसरी दैनंदिन जीवनात आवश्यक असते ती सुरक्षितता. दैनंदिन जीवनात आपण सुरक्षिततेविषयी जागरूक राहिलो नाही तर आपत्तीच्या वेळी सुरक्षितता मिळवणे कठीण होते.आपण सर्व जण अनेकदा रस्त्यावर लिहिलेली पाटी वाचतो,
– “सतर्कता हटी-दुर्घटना घटी”,
– “एक भूल करे नुकसान, छीने खुशियाँ और मुस्कान”,
– “इतनी जल्दी न दुनिया छोड़ो, सुरक्षा से अब नाता जोड़ो”
– “सुरक्षा से न करो कोई मस्ती, वर्ना ज़िंदगी होगी सस्ती”
त्याच्या पुढे आपल्या जीवनात या वाक्यांचा आपण आपल्या जीवनात काही उपयोग करत नाही. नैसर्गिक आपत्ती बाजूला ठेवली तर बऱ्याच दुर्घटना आपल्या कोणत्या ना कोणत्या चुकीचा परिणाम असतात.आपण सतर्क राहिलो, आवश्यक नियमांचे पालन केलं तर आपण आपल्या जीवाचे रक्षण करण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेपासून आपल्या समाजालाही वाचवू शकतो. आपण पाहतो की कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबत अनेक बाबी लिहिलेल्या असतात मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही. ज्यांच्याकडे अग्नीशमन गाड्या असतात अशा महानगरपालिका, नगरपालिकांनी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा वेग वेगळ्या शाळात जाऊन विद्यार्थ्यांसमोर मॉक ड्रील करायला हवं. याचे दोन फायदे होतील, अग्नीशमन दलालाही सतर्क राहण्याची सवय राहील आणि नव्या पिढीलाही याबाबत शिक्षण मिळेल आणि त्यासाठी वेगळा खर्च करण्याची आवश्यकता उरत नाही, एका प्रकारे शिक्षणाचा हा एक भाग बनतो आणि यासाठी मी नेहमीच आग्रही आहे. आपत्ती आणि संकटाबाबत बोलायचं झालं तर भारत भौगोलिकदृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. या देशाने काही नैसर्गिक, मानवनिर्मित, आपत्ती आणि रासायनिक तसेच औद्योगिक दुर्घटना झेलल्या आहेत. एनडीएमए म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, देशाच्या आपत्ती व्यवस्थापनेकडे लक्ष पुरवते. भूकंप, पूर, वादळे, भूस्खलन यासारख्या आपत्तीत एनडीएमए तातडीने धाव घेते. त्यांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली असून त्याच बरोबरीने क्षमता वृद्धी आणि प्रशिक्षणासाठी त्यांचे अखंड काम सुरु असते. पूर, वादळ प्रवण जिल्ह्यात आपदा मित्र म्हणून उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रशिक्षण आणि जागरूकता यांची महत्वाची भूमिका आहे. दोन-तीन वर्षापूर्वी उष्णतेच्या लाटेत दरवर्षी हजारो लोकांना प्राण गममावे लागत होते, त्यानंतर एनडीएमएने यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभियान हाती घेतले, कार्यशाळा आयोजित केल्या. हवामान विभागाने अचूक अंदाज वर्तवले या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे चांगला परिणाम जाणवला. 2017 मध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत घट होऊन ही संख्या 220 पर्यंत आली. यावरून लक्षात येते की आपण सुरक्षिततेला प्राधान्य दिलं तर आपण सुरक्षितता प्राप्त करू शकतो. समाजात असं काम करणारे असंख्य लोक असतील,सामाजिक संघटना असतील, जागरूक नागरिक असतील, जे कुठेही संकट आले तरी क्षणात मदत आणि बचाव कार्यात स्वतःला झोकून देतात, मी या सर्वांची प्रशंसा करू इच्छितो. अशा प्रकाश झोतापासून दूर राहिलेले असंख्य नायक आहेत. अग्नीशमन सेवा, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, सशस्त्र दल, अर्ध सैनिक बलाचे बहादूर जवान संकट काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता, जनतेची मदत करतात. एनसीसी आणि स्काउटही या कार्यात मदत करतात, प्रशिक्षण ही देतात. गेल्या काही दिवसात आम्ही एक प्रयत्न केला आहे, जगात अनेक देशांच्या संयुक्त लष्करी कवायती होतात तर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही असा संयुक्त सराव का असू नये? भारताने याबाबत पुढाकार घेतला आहे. बीमस्टेक, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, भूतान, नेपाळ या देशांचा संयुक्त आपत्ती व्यवस्थापन सरावही झाला, हा पहिला आणि व्यापक प्रयत्न होता. आपण, धोक्याबाबत सतर्क आणि जागरूक असलेला समाज बनायला हवे. आपल्या संस्कृतीत आपण मुल्यांचे रक्षण, मूल्य सुरक्षा याबाबत अनेकदा बोलतो, मात्र सुरक्षिततेचे मोल आपण जाणले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. ही मुल्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजेत. आपण विमानाने प्रवास करताना विमानात सुरवातीला हवाई सुंदरी, सुरक्षिततेबाबत सूचना आणि माहिती देत असते. आपण शंभर वेळा या सूचना ऐकल्या असतील पण आज आपल्याला कोणी विमानात नेले आणि विचारले की सांगा कोणती गोष्ट कुठे आहे, जीवन रक्षक जाकेट कुठे आहे, त्याचा उपयोग कसा करायचा? मी खात्रीने सांगतो की आपल्यापैकी कोणीही नाही सांगू शकणार. माहिती देण्याची व्यवस्था होती का? तर होती. प्रत्यक्ष त्या बाजूला पाहण्याची शक्यता होती का? तर होती. मात्र आम्ही केले नाही कारण आमचा स्वभाव जाणीवपूर्वक ऐकण्याचा नाही म्हणूनच विमानात बसल्यानंतर आमचे कान ऐकतात, मात्र ही सूचना आपल्यासाठी आहे असं आपल्या पैकी कोणाला वाटत नाही. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आपला असाच अनुभव आहे. आपण असा विचार करता कामा नये की सुरक्षितता कोणा दुसऱ्यासाठी आहे, आपण सर्वजण आपल्या सुरक्षितते प्रती जागरूक राहिलो, तर त्यात समाजाची सुरक्षितताही आपोआपच येते.
माझ्या प्रिय देश बांधवानो, या वेळच्या अर्थ संकल्पात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत गावासाठी बायोगॅसच्या माध्यमातून टाकाऊतून संपत्ती आणि टाकाऊतून उर्जा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी उपक्रम सुरु करण्यात आला असून त्याला गोबर धन असे नाव देण्यात आलं आहे. गाल्व्हनायझिंग ऑरगानिक बायो अग्रो रिसोर्सेस. गावे स्वच्छ ठेवणे आणि पशुधनाचे शेण, शेतातली पिकांची धाटे, यापासून कंपोस्ट खत आणि त्याचे बायोगॅसमध्ये रुपांतर करून त्यातून धन आणि उर्जा निर्मिती करणे. संपूर्ण जगात, भारतात पशुधनाची संख्या सर्वात जास्त आहे. भारतात साधारणपणे 30 कोटी पशुधन आहे आणि शेणाचे उत्पादन प्रती दिन 30 लाख टन आहे. काही युरोपीय देशात आणि चीन मध्ये शेण आणि जैविक उर्वरित भागापासून उर्जा उत्पन्न केली जाते मात्र भारतात याचा पूर्ण क्षमतेने उपयोग केला जात नव्हता. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आपण या दिशेने आगेकूच करत आहोत.
पशुधनाचे शेण, शेतातला राहणारा कचरा, स्वयंपाक घरातला कचरा या सर्वांचा बायोगॅसवर आधारित उर्जा निर्मितीसाठी उपयोग करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गोबर धन योजने अंतर्गत ग्रामीण भारतातल्या शेतकऱ्याला, बंधू-भगिनींना प्रोत्साहित केलं जाईल की शेण आणि कचऱ्याकडे केवळ टाकाऊ म्हणून पाहू नका तर उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून पहा. गोबर धन योजनेतून ग्रामीण भागाला अनेक लाभ होतील. गावं स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल. पशु धनाची निगा राखली जाईल आणि उत्पादकता वाढेल, बायोगॅसने स्वयंपाक केल्याने उर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णता वाढेल. शेतकरी आणि पशु पालन करणाऱ्यांना उत्पन्न वाढीला मदत होईल. कचरा गोळा करणे, त्याची वाहतूक, बायोगॅसची विक्री यातून रोजगाराच्या संधी वाढतील. गोबर धन योजनेच्या सुयोग्य अंमलबजावणी साठी एक ऑन लाईन मंच तयार करण्यात येईल ज्या द्वारे शेतकऱ्यांना ग्राहकाशी जोडले जाईल आणि त्याला शेणाला आणि कृषी टाकाऊ मालाला योग्य भाव मिळेल.मी उद्योजकांना विशेषतः ग्रामीण भारतात राहणाऱ्या भगिनींना आवाहन करतो की आपण पुढाकार घ्या. बचत गट तयार करून, सहकारी समित्या तयार करून, या संधीचा लाभ घ्या. स्वच्छ उर्जा आणि हरित रोजगार यासाठीच्या या चळवळीचा भागीदार बनण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो. आपल्या गावातल्या टाकाऊ चे संपत्तीत रुपांतर करण्यासाठी आणि शेणाचे धनात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घ्या.
माझ्या प्रिय देश बांधवानो,
आतापर्यंत आपण संगीत महोत्सव, खाद्य महोत्सव,चित्रपट महोत्सव अशा अनेक प्रकारच्या महोत्सवाबद्दल ऐकले आहे, मात्र छत्तीसगड मधल्या रायपुर मध्ये एक आगळाच प्रयत्न करत राज्याचा पहिला कचरा महोत्सव आयोजित केला गेला. स्वच्छतेप्रती जागरूकता हा यामागचा उद्देश होता.शहरातल्या टाकाऊचा कल्पक उपयोग करणे आणि कचऱ्याचा पुन्हा वापर करण्यासाठी वेग वेगळ्या पर्याया बाबत जागरूकता निर्माण करणे. या महोत्सवात अनेक उपक्रम झाले त्यादरम्यान विद्यार्थ्यापासून प्रौढापर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. कचऱ्याचा उपयोग करून वेग वेगळ्या कला कृती तयार केल्या गेल्या. कचरा व्यवस्थापनाच्या सर्व पैलूंविषयी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्य शाळा आयोजित केल्या गेल्या. स्वच्छता या संकल्पनेवर संगीतमय कार्यक्रमही झाला. कलाकृती निर्माण केल्या गेल्या. रायपूरपासून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही वेगवेगळ्या प्रकारचे कचरा महोत्सव झाले. प्रत्येकाने स्वच्छते बाबत कल्पक विचार मांडले,चर्चा केल्या, कविता सादर केल्या. स्वच्छतेबाबत एक उत्सवी वातावरण निर्माण झाले. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी यात चढाओढीने भाग घेतला. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेप्रती ज्या अभिनव पद्धतीने हा महोत्सव भरवला गेला त्याबद्दल मी रायपूर महानगर पालिका, छत्तीसगडची जनता इथले सरकार आणि प्रशासनाचे अभिनंदन करतो.
दर वर्षी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशात आणि जगभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या दिवशी गौरव केला जातो. आज देश महिला विकासाच्या पुढे जाऊन महिला नेतृत्वाखाली विकास या दिशेने वाटचाल करत आहे. या क्षणाला मला स्वामी विवेकानंद यांचे विचार आठवतात, त्यांनी म्हटले होते, आदर्श नारी संकल्पना म्हणजे परिपूर्ण स्वातंत्र्य. सव्वाशे वर्षापूर्वी स्वामीजीचा विचार भारतीय संस्कृतीतला नारी शक्तीबाबतचे चिंतन व्यक्त करतो. आज सामजिक, आर्थिक जीवनात प्रत्येक क्षेत्रात महिलांना समान भागीदारी सुनिश्चित करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपण अशा परंपरेचा भाग आहोत जिथे महिलांमुळे पुरुषांची ओळख केली जाते. यशोदा पुत्र, कौशल्य पुत्र, गांधारी पुत्र अशीच ओळख असायची मुलाची. आज आपल्या स्त्री शक्तीने आपल्या कार्यातून आपले आत्मबल आणि आत्मविश्वास यांची प्रचिती दिली आहे. स्वतःला आत्मनिर्भर केले आहे. स्वतःबरोबरच देश आणि समाजाला पुढे नेऊन नव्या उंचीवर नेण्याचे काम केले आहे. महिला सशक्त आहेत, सबल आहेत, देशाच्या विकासात समान भागीदार आहेत हेच तर नव भारताचे स्वप्न आहे. गेल्या काही दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला एक चांगली गोष्ट सुचवली होती त्यांनी सांगितले की 8 मार्चला महिला दिनी अनेक कार्यक्रम होतात. प्रत्येक गावात आणि शहरात 100 वर्षे पूर्ण केलेल्या माताभगिनींचा सत्कार आयोजित केला जाऊ शकतो का? त्यांच्या जीवनाची प्रदीर्घ कहाणी जाणून घेता येऊ शकते का, मला हा विचार चांगला वाटला म्हणून आपल्या पर्यंत पोहोचवत आहे. स्त्री शक्ती जाणीव करून देणारी आपल्याला अनेक उदाहरणे मिळतील
आपल्या आजूबाजूला अनेक उदाहरणे आपल्याला प्रेरणा देतील आताच झारखंडमधून मला माहिती मिळाली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत झारखंडच्या सुमारे 15 लाख, हा आकडा लहान नाही या महिलांनी संघटीत होऊन एक महिना स्वच्छता अभियान चालवले 26 जानेवारी 2018 पासून सुरु झालेल्या या अभियाना अंतर्गत 20 दिवसात या महिलांनी 1 लाख 70 हजार शौचालय निर्माण करून नवे उदाहरण ठेवले, यामध्ये 1 लाख महिला मंडळाचा समावेश आहे. 14 लाख महिला, 2 हजार महिला पंचायत प्रतिनिधी, 10 हजार महिला स्वच्छाग्रही 50 हजार राज मिस्त्री. आपण कल्पना करू शकता केवढी मोठी घटना आहे. झारखंडच्या महिलांनी दाखवून दिले आहे की नारी शक्ती, स्वच्छ भारत अभियांनाची एक अशी शक्ती आहे जी सामान्य जीवनात स्वच्छता अभियानाला स्वच्छतेच्या संस्काराला जनमानसाचा स्वभाव म्हणून परावर्तीत करेल.
बंधू-भगिनीनो, दोन दिवसापूर्वी मी बातमी पहिली की एलिफंटा बेटावर तीन गावात स्वातंत्र्याला 70 वर्षे झाल्यानंतर वीज पोहोचली, त्यानंतर तिथे लोकामध्ये आनंद पसरला.आपण जाणताच की हे बेट मुंबईपासून 10 किलोमीटर दूर आहे. हे पर्यटनाचे केंद्र आहे. एलिफंटा गुहा युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केले आहे. दरदिवशी तिथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. एक महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. मुंबईपासून इतक्या जवळ असून पर्यटनाचे केंद्र असून इतक्या वर्षात तिथे वीज पोहोचली नव्हती हे जाणून मला आश्चर्य वाटले. 70 वर्षे एलिफंटामध्ये तीन गावात राजबंदर, मोरबंदर, सेट बंदर इथल्या लोकांच्या जीवनात अंधार पसरला होता तो जाऊन आता त्यांचे जीवन उजळले आहे.
मी तिथल्या प्रशासन आणि जनतेला शुभेच्छा देतो.मला आनंद आहे की एलिफंटा गाव आणि गुहा आता उजळून निघाली आहेत. हि केवळ वीज नव्हे तर नवी सुरवात आहे.देशवासीयांचे जीवन उजळून निघावे, त्यांच्या जीवनात आनंद यावा यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते.
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आताच आपण महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला. मार्च महिना सळसळत्या पिकांचा, आम्र मंजिरीची पुलकित करणारी शोभा हे या महिन्याचे वैशिष्ट्य आहे. होळीच्या सणासाठी आपल्याला हा महिना प्रिय आहे. 2 मार्चला देशभरात होळी उत्साहात साजरी केली जाईल. होळीला रंगाचे महत्व आहे तितकेच होलिका दह्नालाही महत्व आहे दुष्ट प्रवृतीचे दहन करण्याचा हा दिवस आहे. सारे मत भेद विसरून एकत्र येऊन एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा शुभ दिवस आहे. प्रेम आणि एकता आणि बंधुत्वाचा संदेश हा सण देतो. आपणा सर्वाना होळी आणि रंगोत्स्वाच्या खूप शुभेच्छा. हे पर्व आपल्या जीवनात आनंदाची मुक्त उधळण करणारे ठरो ही शुभेच्छा. हे पर्व आपल्या देशवासीयांच्या जीवनात आनंददायी राहो, या शुभेच्छा. माझ्या प्रिय देश बांधवांनो खूप खूप धन्यवाद, नमस्कार!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 2018 या वर्षामध्ये ‘मन की बात’च्या माध्यमातून आज पहिल्यांदाच आपल्याशी संवाद साधतोय. दोन दिवसांपूर्वींच आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. या कार्यक्रमाला दहा देशांचे प्रमुख सन्माननीय अतिथी उपस्थित होते, असं इतिहासात यंदा प्रथमच घडलं.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज प्रकाश त्रिपाठी यांच्या पत्राचा उल्लेख करणार आहे. त्यांनी ‘नरेंद्रमोदीअॅप’वर एक लांबलचक पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या पत्रातल्या सर्व विषयांना स्पर्श करावा, असं खूप आग्रहानं सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 1 फेब्रुवारी रोजी अंतराळामध्ये जाणाऱ्या कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. कोलंबिया अंतराळ यान दुर्घटनेमध्ये कल्पना चावला आपल्या सर्वांना कायमचं सोडून गेली. मात्र अवघ्या दुनियेतल्या लाखो युवकांना एक आगळी प्रेरणा तिनं दिली. आपल्या दीर्घपत्राचा प्रारंभ प्रकाश भाईंनी कल्पना चावलाच्या स्मरणानं केला, याबद्दल मी, भाई प्रकाशजींचा आभारी आहे. कल्पना चावला या अंतराळ कन्येला आपण फार लवकर गमावलं, ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप दुःखद गोष्ट आहे. परंतु कल्पना चावलानं संपूर्ण विश्वाला विशेषतः भारतामधल्या हजारो कन्यांना एक महान संदेश दिला की, स्त्री-शक्तीसाठी कोणतीही मर्यादा असू शकत नाही. इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प असेल, विशेष काही करून दाखवण्याचा मनाचा पक्का निर्धार, निश्चय असेल तर काहीही अशक्य नाही. भारतामध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वेगानं प्रगती करीत आहेत, पुढं जात आहेत आणि देशाची मान उंचावत आहेत, हे पाहिल्यानंतर खूप आनंद होतोय.
प्राचीन काळापासून आपल्या देशातल्या महिलांना दिला जाणारा सन्मान, त्यांचं समाजातलं स्थान आणि त्यांनी दिलेलं योगदान, ही संपूर्ण दुनियेच्या दृष्टीने खूप मोठी, नवलाची गोष्ट आहे. भारतामध्ये महान विदुषींची एक मोठी परंपरा आहे. वेदांमधील ऋचांची निर्मिती करण्यामध्ये भारतातल्या अनेक विदुषींचे महत्वपूर्ण योगदान आहे. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशी न जाणो कित्येक नावं घेता येतील. आज ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असं आपण म्हणतो, परंतु प्राचीन काळी रचलेल्या आमच्या शास्त्रांमध्ये, स्कंद-पुराणांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की:---
दशपुत्र, समाकन्या, दशपुत्रान प्रवर्धयन्!
यत् फलं लभतेमर्त्य, तत् लभ्यं कन्यकैकया!!
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एक कन्या दहा मुलांच्या बरोबरीची असते. दहा पुत्रांमुळे जितके पुण्य मिळेल, तेवढेच पुण्य एका कन्येकडून मिळणार आहे. या श्लोकावरून आपल्या समाजात महिलेला असलेलं महत्व दिसून येतं. आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये स्त्रियांना ‘शक्ती’ असं मानलं जातं, तसा दर्जा दिला जातो. ही स्त्री शक्ती संपूर्ण देशाला, संपूर्ण समाजाला, आपल्या कुटुंबाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवत असते. मग वैदिक काळातल्या लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांच्या सारख्या महान विद्वत्ता असलेल्या विदुषी असो की, अक्का महादेवी आणि मीराबाईसारख्या महान ज्ञानी आणि भक्ती मार्गातल्या संत असो, किंवा अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या शासन व्यवस्था पाहणाऱ्या असो अथवा राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी शूर रणरागिणी असो, स्त्री शक्ती नेहमीच आपल्याला प्रेरणा देत आहे. त्याचबरोबर देशाचा मान-सन्मान वृध्दिंगत करत आहे.
प्रकाश त्रिपाठी यांनी आपल्या पत्रामध्ये अनेक उदाहरणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, आपल्या धाडसी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘सुखोई-30’ या लढावू विमानातून केलेला प्रवास त्यांना प्रेरणा देणारा वाटतो. वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी ‘आय.एन.एस.व्ही.-तारिणी’ च्या माध्यमातून संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे, त्याचाही उल्लेख त्रिपाठी यांनी पत्रामध्ये केला आहे. भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तीन धाडसी महिला लढावू वैमानिक बनल्या आहेत. त्या आता ‘सुखोई -30’ मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. क्षमता वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला कर्मचाऱ्यांनी दिल्ली ते अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिसकोपर्यंत आणि पुन्हा दिल्लीपर्यंत एअर इंडियाचे प्रवासी विमान नेले होते. विशेष म्हणजे या विमानामध्ये सर्वच्या सर्व महिला कर्मचारी होत्या. त्रिपाठी, आपण म्हणता आहात ते अगदी खरंच आहे. आज सर्व क्षेत्रात फक्त महिला आहेत असं नाही किंवा त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत असंही नाही तर, त्या नेतृत्व करत आहेत. आज अशी अनेक क्षेत्रं आहेत, की त्यामध्ये आमच्या महिलांनीच सर्वप्रथम काही विशेष कामगिरी करून दाखवली आहे. अशी कामगिरी करून आमच्या महिला, मैलाचा एक दगड स्थापन करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय राष्ट्रपतींनी एका नवीन गोष्टीचा प्रारंभ केला.
ज्या महिलांनी आपआपल्या क्षेत्रात अगदी पहिल्यांदा वेगळं काही केलं आहे, अशा असामान्य कामगिरी करणाऱ्या महिलांच्या एका समुहाची राष्ट्रपतीजींनी भेट घेतली. या समुहामध्ये कोण कोण होतं तर, पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन, पहिली महिला अग्निशामक, पहली महिला बसचालक, अंटार्टिकामध्ये पोहोचणारी पहिली महिला, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकणाऱ्या पहिल्या महिला होत्या. आमच्या महिला शक्तीने समाजातील रूढीप्रियतेच्या शृंखला तोडण्याचं असामान्य कार्य केलं आणि एक नवे कीर्तिमान स्थापित केले. त्यांनी दाखवून दिलं की, कठोर परिश्रम, अथक प्रयास केला आणि संकल्प दृढ असेल तर कितीही संकटं आली, कोणतेही अडथळे निर्माण झाले, तरी त्यांना पार करून, बाजूला सारून एक नवा मार्ग तयार करता येवू शकतो. आता हा मार्ग आपल्या केवळ समकालीन लोकांनाच नाही, तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असतो. नवीन पिढीमध्ये एक नवा उत्साह आणि जोश भरण्याचं कार्य करतो. या जिद्दी पहिल्या महिलांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तकही तयार करण्यात आलं आहे. या पुस्तकामुळं असामान्य स्त्री शक्तीची माहिती संपूर्ण देशाला मिळू शकणार आहे. त्यांच्या जीवनावरून आणि त्यांनी केलेल्या कार्यावरून प्रेरणा घेता येणार आहे. हे पुस्तक ‘नरेंद्र मोदी वेबसाईट’ वरसु़द्धा ‘ई-बूक’ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.
आज देश आणि समाजामध्ये होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनामध्ये या देशातल्या महिला शक्तीने खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. आज ज्यावेळी आपण महिला सशक्तीकरणाविषयी चर्चा करीत आहोत, त्यावेळी मी एका रेल्वे स्थानकाचा इथे उल्लेख करू इच्छितो. आता एक रेल्वे स्थानक आणि महिला सशक्तीकरण या दोन्ही गोष्टींचा नेमका काय संबंध आहे, असा विचार आपल्या मनात आला असेल. ज्या रेल्वे स्थानकामध्ये सर्व महिला कर्मचारीवर्ग आहे, असं भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक म्हणजे मुंबईमधलं माटुंगा रेल्वेस्थानक आहे. या स्थानकामध्ये सर्व विभागांमध्ये महिला कर्मचारी आहेत. मग व्यावसायिक विभाग असो, रेल्वे पोलिस असेल, तिकीट तपासनीस असेल किंवा उद्घोषणा असेल. ‘पॉईंट पर्सन’ म्हणूनही महिलाच कार्यरत आहेत. माटुंगा रेल्वे स्थानकामध्ये 40 पेक्षा जास्त महिला कर्मचारी वर्ग आहे. प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन पाहिल्यानंतर व्टिटर आणि इतर समाज माध्यमावर अनेक जणांनी लिहिले की, संचलनामध्ये लक्षवेधी गोष्ट म्हणजे ‘बीएसएफ बायकर कॉंटिनजेंट’मध्ये सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. या महिला अतिशय साहसी प्रयोग करीत होत्या आणि या दृष्यांनी परदेशातून आलेल्या पाहुण्यांनाही अचंभित केलं. त्यांना ही दृष्ये नवलपूर्ण वाटली. सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता या दोन्ही शब्द एकच आहेत. आज आमच्या महिला नेतृत्व करीत आहेत. तसेच त्या आत्मनिर्भर बनत आहेत. अशाच प्रकारच्या एका गोष्टीचे मला आज इथं स्मरण होत आहे. छत्तीसगढच्या आमच्या आदिवासी महिलांनीही खूप कमाल करून दाखवली आहे. त्यांनी एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. आदिवासी महिलांविषयी ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी सर्वांच्या मनामध्ये एक विशिष्ट चित्र निर्माण होत असतं. त्यामध्ये जंगल असतं, पायऱ्या-पायऱ्यांची डोंगर-दरीतली वाट असते. त्यावरून जळावू सरपणाचा भारा आपल्या डोक्यावर घेवून जाणाऱ्या महिला असतात. परंतु छत्तीसगढच्या आमच्या या आदिवासी महिलांनी, स्त्री-शक्तीने देशासमोर एक नवे चित्र निर्माण केले आहे. छत्तीसगढमधला दंतेवाडा जिल्ह्याचा परिसर माओवादाच्या प्रभावाखाली आहे. हिंसाचार, अत्याचार, बॉम्ब, बंदुका, पिस्तूल यांच्या जोरावर, आणि धाकावर माओवाद्यांनी इथं अतिशय भीतिदायक वातावरण निर्माण केलं आहे. अशा धोकादायक क्षेत्रामध्ये आदिवासी महिला ‘ई-रिक्षा’ चालवून आत्मनिर्भर बनत आहेत. अतिशय कमी कालावधीमध्ये ई-रिक्षा चालवण्याच्या कार्यामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या या चांगल्या कृतीमुळे तीन लाभ होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंरोजगारामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे काम होत आहे. महिलांच्या पुढाकारामुळे माओवादी प्रभावित क्षेत्राचा कायापालट होत आहे आणि त्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाच्या कामालाही खूप चांगलं बळ मिळत आहे. या कार्यामध्ये पुढाकार घेत असलेल्या दंतेवाडा जिल्हा प्रशासनाचे खूप कौतुक आहे. या कार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यापासून ते महिलांना ई-रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यापर्यंत कार्य प्रशासनानं केलं. महिलांच्या यशामध्ये जिल्हा प्रशासनानं खपू महत्वाची भूमिका पार पाडली.
काही गोष्टींचा अमिट ठसा आपण उठवतो, असं काही लोक बोलतात, असं आपण वारंवार ऐकत आलो आहोत. आता ही वेगळी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे, ‘फ्लेक्झिबिलिटी’ म्हणजेच ‘लवचिकता’, परिवर्तन. जे काही कालबाह्य आहे, ते सोडून दिलं पाहिजे. जिथं आवश्यक आहे, तिथं सुधारणा करून त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि आपल्या समाजाचे एक विशेषत्व म्हणजे आत्मसुधारणा करण्याचा अव्याहत प्रयत्न, स्वतःमध्ये बदल, सुधारणा घडवून आणणे ही भारतीय परंपरा आहे. ही संस्कृती आपल्याला वारसा म्हणून मिळाली आहे. कोणत्याही समाज जीवनाचा परिचय हा, त्याच्यातील स्वतःहून केलेला बदल, सुधारणा घडवण्याचे तंत्र विकसित झाले आहे की नाही, यावरून होत असतो. सामाजिक कुप्रथा, आणि वाईट चालीरिती, पद्धती यांच्या विरूद्ध आपल्या देशामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अलिकडेच काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये एक चांगला प्रयत्न केला गेला. सामाजिक कुप्रथांना अगदी मुळासकट नष्ट करण्यासाठी राज्यामध्ये 13 हजार किलोमिटरपेक्षा जास्त लांब मानवी शृंखला बनवण्यात आली. ही विश्वातली सर्वात लांब मानवी साखळी होती. या मोहिमेमध्ये लोकांनी बालविवाह, हुंडा देणे यासारख्या वाईट प्रथांच्या विरोधात समाजात जागरूकता निर्माण केली. हुंडा आणि बालविवाह यांच्यासारख्या कुप्रथांच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प संपूर्ण राज्याने केला. अबालवृद्ध या मोहिमेमध्ये अतिशय उत्साहामध्ये सहभागी झाले होते. युवावर्ग, माता, भगिनी सगळेजण या मोहिमेमध्ये सहभागी झाले. पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानापासून प्रारंभ झालेली ही मानवी शृंखला राज्याच्या सीमेपर्यंत अतूट राहून जोडली गेली. समाजातल्या सर्व लोकांना विकासाचा खऱ्या अर्थाने लाभ मिळण्याची आवश्यकता आहे, यासाठी आपला समाज अशा कुप्रथांपासून मुक्त झाला पाहिजे. चला तर मग, आपण सगळेजण मिळून अशा कुप्रथांना समाजातून समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेवू या आणि एक नव भारत, एक सशक्त आणि समर्थ भारत निर्माण करू या. मी बिहारच्या जनतेचे, राज्याचे मुख्यमंत्री, तिथले प्रशासन आणि मानवी शृंखलेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक करतो. या लोकांनी समाजाला कल्याणाच्या दिशेने नेण्यासाठी इतक्या व्यापक प्रमाणावर विशेष प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, कर्नाटकमधल्या म्हैसूरच्या एका सद्गृहस्थांनी ‘मायगव्ह’वर लिहिलेले आहे की, त्यांच्या पित्यासाठी दरमहिन्याला सहा हजार रूपये त्यांना खर्च करावे लागत होते. परंतु जन-औषधी केंद्राविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिथूनच औषधांची खरेदी करायला सुरूवात केली आहे. आता त्यांचा वडिलांच्या औषधाचा खर्च 75 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांची अशी इच्छा आहे की, ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये मी आपल्याशी यावर बोलावं, जेणेकरून जन-औषधीविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती समजली पाहिजे. आणि जनतेला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांनी याविषयावर मला आपलं मनोगत लिहून कळवले आहे. बरेचजण सांगतही असतात. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा अनेक लोकांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मी सुद्धा पाहिले आहेत आणि खरंच सांगतो, अशी माहिती मिळाली की, खूप आनंद होतो. मनामध्ये खोलवर संतुष्टीचा भाव निर्माण होतो. आणि आणखी एक मला खूप चांगलं वाटलं ते इथं नमूद करतो, ते म्हणजे श्रीयुत दर्शन यांच्या मनात आलेला विचार. आपल्याला जसा लाभ झाला, तसाच तो इतरांनाही झाला पाहिजे, असा विचार त्यांनी केला, हे विशेष आहे. या योजनेमागचा उद्देश आहे की, आरोग्य सुविधा सर्वांना परवडणारी असली पाहिजे. आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग‘यासाठी सर्वांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशही आहे. जन-औषधी केंद्रांमध्ये मिळणारी औषधं ही बाजारामध्ये विकली जाणाऱ्या ब्रँडेड औषधांपेक्षा जवळपास 50 ते 90 टक्के स्वस्त असतात. त्यामुळे जनसामान्य, विशेषतः रोज औषधं घेणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना खूप मोठी आर्थिक मदत मिळते. त्यांची मोठी बचत होते. यामध्ये खरेदी केली जाणारी ‘जेनरिक’ औषधं ही जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलेल्या मानकांप्रमाणे असतात. याच कारणामुळे चांगल्या दर्जाची औषधं स्वस्त दरामध्ये उपलब्ध होवू शकत आहेत. आज देशभरामध्ये तीन हजारापेक्षा जास्त जन-औषधी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे केवळ औषधं स्वस्त मिळत आहेत असं नाही, तर वैयक्तिक उद्योजकांनाही रोजगाराची एक नवी संधी निर्माण होत आहे. स्वस्त औषधं प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी केंद्रांमध्ये आणि रूग्णालयांच्या ‘अमृत स्टोअर्स’मध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्या योजनेमागे एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे, देशातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. त्यामुळे एक स्वस्थ आणि समृद्ध भारताचे नाते निर्माण करता येणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, महाराष्ट्रमधून श्रीयुत मंगेश यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’वर एक छायाचित्र पाठवलं आहे. या छायाचित्राच्या वेगळेपणामुळं माझं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. या छायाचित्रामध्ये एक नातू आपल्या आजोबांच्या बरोबर ‘क्लिन मोरणा नदी’ या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. मला माहिती मिळाली की, अकोल्याच्या नागरिकांनी स्वच्छ भारत मोहिमेमध्ये ‘मोरणा नदी’ स्वच्छ करण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे. काही वर्षांपूर्वी मोरणा नदी अगदी बारमाही वाहत होती. परंतु नंतर मात्र ती हंगामी, ‘पावसाळी-बरसाती’ झाली. आणखी एक त्रासदायक गोष्ट म्हणजे नदीच्या पात्रामध्ये जंगली गवत, जलपर्णी फोफावली होती. नदी आणि तिच्या काठांवरही मोठ्या प्रमाणावर कचरा, घाण फेकला जात होता. गावकरीवर्गाने एक कृती आराखडा तयार केला आणि मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस, 13 जानेवारी रोजी ‘स्वच्छ मोरणा मोहीम’ तयार केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये चार किलोमीटर क्षेत्रामध्ये चौदा स्थानांवर मोरणा नदीच्या दोन्ही काठांची स्वच्छता करण्यात आली. ‘स्वच्छ मोरणा मोहीम’ या चांगल्या कामामध्ये अकोल्यातले सहा हजारांपेक्षा जास्त नागरिक आणि शंभरपेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुले, वृद्ध, महिला, भगिनी, माता अशा सर्वजण सहभागी झाले होते. 20 जानेवारीलाही अशाच प्रकारे मोरणा स्वच्छतेची ही मोहीम सुरू ठेवली होती. आता जोपर्यंत मोरणा नदी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत अकोलेकर दर शनिवारी सकाळी ही मोहीम अशीच सुरू ठेवणार आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. यावरून एक दिसून येतं की, जर माणसानं काही करायचंच, असा निर्धार केला, तर काही अशक्य आहे, असं अजिबात काही नाही. जन-आंदोलनाच्या माध्यमातून मोठमोठी कार्य करून परिवर्तन घडवून आणता येवू शकते. अकोल्याच्या जनतेचं, तिथल्या जिल्हा आणि नगरपालिका प्रशासनाचं आणि या कामाला जन-आंदोलनाचं स्वरूप देवून त्या कामामध्ये सहभागी होत असलेल्या सर्व नागरिकांचं, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण करीत असलेला प्रयत्न देशाच्या अन्य भागातल्या लोकांनाही एक नवी प्रेरणा देण्याचं काम करणार आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या पद्म पुरस्कारांविषयी खूप चर्चा सुरू आहे, आपणही नक्कीच ती ऐकत असणार. याविषयी वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चेने लक्ष वेधलं जातं. या पुरस्काराच्या सूचीकडे आपण थोडं काळजीपूर्वक पाहिलं, तर आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल. आपल्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे किती महान लोक आहेत, हे पाहून अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आज आपल्या देशामध्ये सामान्य व्यक्ती कोणाच्याही, कसल्याही शिफारसीशिवाय एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येक वर्षी पद्म पुरस्कार देण्याची परंपरा आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे. आता कोणीही नागरिक या पुरस्कारासाठी कुणाचंही नाव सुचवू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आली आहे. आपल्याही आता लक्षात आलं असेल की, खूप सामान्य वाटत असलेल्या परंतु असामान्य कार्य करणाऱ्या लोकांना पद्म पुरस्कार मिळत आहेत. जे लोक सर्वसामान्यपणे मोठ-मोठ्या शहरांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर, किंवा कोणत्याच समारंभांमध्ये दिसत नाहीत, अशा लोकांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. आता पुरस्कार देण्यासाठी त्या व्यक्तीच्या ओळखीपेक्षा त्या व्यक्तीने केलेल्या कामाचं महत्व लक्षात घेतलं जात आहे आणि त्याचा परिचय करून दिला जात आहे. आपण सर्वांनी ऐकलंही असेल, अरविंद गुप्ताजी यांचं कार्य जाणून आपल्याला खरंच आनंद होईल. आय आय टी कानपूरचे विद्यार्थी असलेल्या अरविंदजींनी लहान मुलांसाठी खेळणी तयार करण्याच्या कामामध्ये त्यांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. गेली चार दशके, ते कचऱ्यामधून खेळणी तयार करतात. मुलांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. बेकार, फेकून दिलेल्या वस्तूंमधून मुलांनी शास्त्रीय प्रयोग करावेत, त्यामागचे विज्ञान जाणून घ्यावे, यासाठी ते निरंतर प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी देशभरातल्या तीन हजार शाळांमध्ये जावून वेगवेगळ्या 18 भाषांमध्ये बनवलेली चित्रफीत त्यांनी दाखवली आणि मुलांना प्रेरणा दिली. त्यांची विज्ञान जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न केला. किती अद्भूत, असामान्य कार्य त्यांनी केलं आहे. एखाद्या गोष्टीसाठी किती समर्पण केलं आहे. अशीच गोष्ट कर्नाटकच्या सीताव्वा जोद्दती यांची आहे. त्यांना ‘महिला सशक्तीकरणाची देवी’ असं उगाच नाही संबोधल्या जात. गेल्या तीन दशकांपासून बेलागवीमधल्या असंख्य महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात सीताव्वाचे मोठे योगदान आहे. वयाच्या सातव्या वर्षी देवदासी म्हणून त्यांनी स्वत:ला ‘समर्पित’ केलं होतं. परंतु सीताव्वांनी आपलं संपूर्ण आयुष्य देवदासींच्या कल्याणासाठी खर्च केलं. इतकंच नाही, तर त्यांनी दलित महिलांच्या कल्याणासाठीही महान कार्य केलं आहे. आपण मध्य प्रदेशातल्या भज्जू श्याम यांच्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. भज्जू श्याम यांचा जन्म एका अतिशय गरीब, आदिवासी कुटुंबामध्ये झाला होता. पोटापाण्यासाठी म्हणून ते एक साधी नोकरी करीत होते. परंतु त्यांना पारंपरिक आदिवासी चित्रकला, रंगकाम करण्याचा छंद होता. या छंदामुळेच त्यांना केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये सन्मान मिळाला आहे. नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, इटली यासारख्या अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आली आहेत. परदेशामध्ये भारताचे नाव गाजवणाऱ्या भज्जू श्यामजी यांची प्रतिभा ओळखून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. केरळच्या आदिवासी महिला लक्ष्मीकुट्टी यांची गोष्ट ऐकून तर आपल्याला सुखद आश्चर्य वाटेल. लक्ष्मीकुट्टी या कल्लार इथं शिक्षिका आहेत. आणि आत्तासुद्धा त्या अगदी घनदाट जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये ताडांच्या पानांपासून बनवलेल्या झोपडीमध्ये वास्तव्य करतात. त्यांनी आपल्या स्मरणनोंदींच्या आधारे पाचशेपेक्षा जास्त वनौषधी बनवल्या आहेत. जंगलातल्या अनेक जडी-बुटींच्या मदतीनं त्यांनी औषधं बनवली आहेत. सर्पदंशावर अगदी रामबाण उपाय ठरणारे औषध त्यांनी तयार केलं आहे. लक्ष्मीजी आपल्याला असलेल्या वनौषधीच्या ज्ञानाच्या मदतीने अथक समाजसेवा करत आहे. अशा या प्रसिद्धी परांङ्मुख व्यक्तींना शोधून काढून त्यांनी केलेल्या समाज कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आज इथं आणखी एका नावाचा उल्लेख करण्याचा मोह मला होतोय. पश्चिम बंगालमधल्या 75 वर्षांच्या सुभाषिनी मिस्त्री यांचीही पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुभाषिनी मिस्त्री या महिलेने रूग्णालय बांधण्यासाठी दुसऱ्यांच्या घरांमध्ये भांडी घासली, भाजी विकली. सुभाषिनीजी ज्यावेळी 23 वर्षांच्या होत्या, त्यावेळी औषधोपचार मिळू शकले नाहीत, या कारणामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. आयुष्यात आलेल्या या संकटामुळे त्यांना गरीबांसाठी रूग्णालय निर्माण करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आज त्यांच्या अथक परिश्रमांद्वारे निर्मित रूग्णालयामध्ये हजारो गरीबांवर मोफत औषधोपचार केले जात आहेत. आपल्या या बहुरत्ना वसुंधरेवर असे अनेक नर-रत्न आहेत, अनेक नारी-रत्न आहेत. परंतु त्यांना कोणीसुद्धा ओळखत नाही, त्यांचा कुणालाही परिचय नाही, अशी माझी पूर्ण खात्री आहे. अशा व्यक्तींना सन्मान दिला नाही, किंवा त्यांचा परिचय करून दिला नाही तर आपल्याच समाजाचे नुकसान होते. पद्म पुरस्कार हे एक माध्यम आहे. मी देशवासियांना सांगू इच्छितो की, आपल्या आजूबाजूला समाजासाठी कार्यरत असणारे, समाजासाठीच जगणारे, आपलं आयुष्य समर्पित करणारे, काही ना काही तरी विशेष ध्येय उराशी बाळगून जीवनभर कार्य करणारे लक्षावधी लोक आहेत. कधीना कधी त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे. असे लोक मान-सन्मानासाठी अजिबात काम करत नाहीत. परंतु त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देणारं असतं, कधी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये अशा लोकांना बोलावून त्यांचे अनुभव आपण ऐकले पाहिजेत. पुरस्कारापेक्षा पुढे जावून समाजामध्येंही त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न केले गेले पाहिजेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दरवर्षी 9 जानेवारी रोजी आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो. पूज्य महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून दिनांक 9 जानेवारी रोजी भारतात परतले होते. या दिवशी आपण भारत आणि जगभरामध्ये वास्तव्य करीत असलेल्या भारतीयांमध्ये अतूट बंधन आहे, त्याबद्दल जणू उत्सव साजरा करत असतो. यावर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आपण एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी विश्वभरामध्ये असलेल्या भारतीय वंशाच्या सर्व लोकप्रतिनिधी, महापौर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मलेशिया, न्यूझिलंड, स्वित्झर्लंड, पोर्तूगाल, मॉरिशस, फिजी, टांझानिया, केनिया, कॅनडा, ब्रिटन, सुरिनॅम, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका तसेच आणखीही अनेक देशांमधून भारतीय वंशाचे महापौर, खासदार-लोक प्रतिनिधी सहभागी झाले होते, हे जाणून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांमध्ये वास्तव्य करणारे मूळ भारतीय वंशाचे हे लोक जिथं आहेत, तिथं त्या देशांची सेवा तर करीत आहेतच, त्याचबरोबर ही मंडळी आपल्या देशाशी-भारताशी असणारे संबंधही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. यावेळी युरोपीय संघ, युरोपियन युनियन यांनी मला एक दिनदर्शिका पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी युरोपमधल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वास्तव्य करत असलेल्या भारतीयांनी विविध क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने नोंदवले आहे. आमचे मूळ भारतीय वंशाचे जे असंख्य लोक विभिन्न देशांमध्ये वास्तव्य करत ते वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कोणी सायबर सुरक्षा क्षेत्रात आहेत, तर कोणी आयुर्वेद क्षेत्रात काम करत आहेत. काहीजण आपल्या सुमधूर संगीताने समाजाचे मनोरंजन करून दाद मिळवत आहे. तर काहीजण आपल्या कवितांनी लोकांची करमणूक करीत आहेत. काहीजण हवामान बदल याविषयावर संशोधन करत आहे. काहीजण भारतीय ग्रंथांवर काम करत आहेत. कोणी एकानं मालमोटार चालवून तिथं गुरूव्दारा निर्माण केले आहे. तर कोणी मशिद बांधली आहे. याचाच अर्थ जिथं कुठं आपले लोक आहेत, तिथं त्यांनी या भूमीला कोणत्या ना कोणत्या प्रकारानं सुसज्जित केले आहे. युरोपियन युनियनने एक उल्लेखनीय कार्य करून, मूळ भारतीय वंशाच्या लोकांची ओळख निर्माण केल्याबद्दल आणि दिनदर्शिकेच्या माध्यमातून संपूर्ण दुनियेतील लोकांना ही माहिती दिल्याबद्दल मी युरोपीय युनियनला धन्यवाद देवू इच्छितो.
ज्यांनी आपल्या सर्वांना एक नवा मार्ग दाखवला, त्या पूज्य बापूजींची दिनांक 30 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. हा दिवस आपण ‘शहीद दिवस‘ म्हणून पाळतो. या दिवशी आपण देशाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या महान शहीदांना 11 वाजता श्रद्धांजली अर्पण करतो. शांती आणि अहिंसेचा मार्ग हाच बापूंचा मार्ग, मग भारत असो अथवा दुनिया, व्यक्ती असो अथवा कुटुंब किंवा समाज. पूज्य बापू ज्या आदर्शांचे पालन करत जगले, पूज्य बापूंनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्या आजच्या काळाच्या कसोटीवर योग्य ठरतात. त्या गोष्टी काही फक्त निव्वळ सिद्धांत नव्हत्या. आजच्या वर्तमानातही पावलो पावली त्या गोष्टी किती योग्य होत्या ते आपल्याला जाणवतं. अशावेळी आपण जर बापूंच्या मार्गावरून पुढे जाण्याचा संकल्प केला, जितकं शक्य आहे, तितकी, तशी, मार्गक्रमणा केली तर यापेक्षा मोठी श्रद्धांजली कोणती होवू शकते?
माझ्या प्रिय देशवासियांनो ! आपणा सर्वांना नववर्ष 2018च्या शुभेच्छा देवून मी आपल्या वाणीला विराम देतो.
खूप खूप धन्यवाद!
नमस्कार !
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’चा हा या वर्षामधला शेवटचा कार्यक्रम आहे आणि योगायोग पहा, आज 2017 या वर्षाचाही शेवटचा दिवस आहे. या संपूर्ण वर्षभरामध्ये आपण मिळून अनेक गोष्टींवर बोललो आणि भरपूर गोष्टी ‘शेअर’ही केल्या. ‘मन की बात’साठी आपल्याकडून येणारी असंख्य पत्रं, प्रतिक्रिया, त्यामधून विचारांचं होणारं आदान-प्रदान, हे सगळं काही माझ्यासाठी नेहमीच नवीन ऊर्जा देणारं असतं. आता अवघ्या काही तासांनी हे वर्ष बदलणार आहे. परंतु आपल्या या गोष्टी, बोलणं, आपला संवाद यांची मालिका अशीच सुरू राहणार आहे. आगामी वर्षामध्येही आपण आणखी नवनव्या विषयांवर संवाद साधणार आहोत, नवे अनुभव ‘शेअर’ करणार आहोत. आपल्या सर्वांना 2018 साठी अनेक-अनेक सदिच्छा. आत्ताच, काही दिवसांपूर्वी 25 डिसेंबरला संपूर्ण विश्वभरामध्ये ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला. भारतामध्येही लोकांनी भरपूर उत्साहात हा सण साजरा केला. ख्रिसमसच्या काळात आपण सगळे ईसा मसीहच्या महान शिकवणुकीचे स्मरण करतो आणि ईसा मसीहने सर्वात जास्त भर कोणत्या गोष्टीवर दिला असेल तर, तो म्हणजे – ‘‘सेवा-भाव’’ या गोष्टीवर आहे. बायबलमध्येही सेवेच्या भावनेचे सार आपल्याला दिसून येते.
द सन ऑफ मॅन हॅज कम, नॉट टू बी सर्व्हड् ,
बट टू सर्व्ह ,
अॅंड टू गिव्ह हिज लाईफ, अॅज ब्लेसिंग
टू ऑल ह्युमनकाइंड.
या वाक्यांमध्ये सेवेचं नेमकं महत्व, महात्म्य काय आहे, हे दिसून येते. या विश्वामध्ये असलेली कोणतीही जात असेल, धर्म असेल, परंपरा असेल, वर्ण असेल परंतु मानवतेच्या अमूल्य रूपाचा परिचय हा ‘सेवाभाव’यामधून होत असतो. आपल्या देशामध्ये ‘निष्काम कर्म’ याविषयी बोललं जातं. निष्काम कर्म म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता, सेवा करणे. आपल्याकडे तर ‘‘सेवा परमो धर्माः’’ असंही म्हटलं जातं. ‘जीव-सेवा हीच शिव-सेवा’ आणि गुरूदेव रामकृष्ण परमहंस यांनी तर म्हटलं आहे की, ‘शिव-भावनेने जीव-सेवा’ करावी. याचाच अर्थ संपूर्ण विश्वामध्ये अशी एकसारखीच मानवतेची मूल्ये सांगितली आहेत. चला तर, आपण या महापुरूषांचे स्मरण करून, त्याचबरोबर पावन दिवसांचं स्मरण करून आपल्या या महान मूल्य परंपरेला एक नवं चैतन्य देऊ या आणि आपणही या मूल्यानुसार जगण्याचा प्रयत्न करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हे वर्ष गुरूगोविंद सिंहजींचे 350 वे प्रकाश पर्व वर्ष होते. गुरूगोविंद सिंहजींचे शौर्य आणि त्याग यांनी भरलेले असामान्य आयुष्य आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. गुरूगोविंद सिंहजींनी महान जीवनमूल्यांचा उपदेश दिला आणि त्याच मूल्यांच्या आधारे ते स्वतःही जगले. एक गुरू, कवी, दार्शनिक-तत्ववेत्ता, महान योद्धा, अशा सर्व भूमिकांमधून गुरूगोविंद सिंहजी यांनी लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं. अत्याचार आणि अन्याय यांच्याविरूद्ध ते लढले. जाती आणि धर्माची बंधनं झुगारून देण्याची शिकवण त्यांनी लोकांना दिली. या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांना वैयक्तिक पातळीवर खूप काही सोसावं लागलं. परंतु त्यांनी मनामध्ये व्देषभावनेला कधीच थारा दिला नाही. आयुष्यात प्रत्येक क्षणी ते प्रेम, त्याग आणि शांतीचा संदेश देत राहिले. त्यांचं व्यक्तिमत्व किती महान आणि वैशिष्ट्यपूर्ण होतं, हे यावरून दिसून येतं. गुरूगोविंद सिंहजींच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त पटनासाहिब इथं आयोजित केलेल्या प्रकाश उत्सव कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हे मी माझं भाग्य मानतो. चला तर मग, आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. गुरूगोविंद सिंहजी यांची महान शिकवण आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनानुसार आचरण करण्याचा आपणही प्रयत्न करूया.
एक जानेवारी, 2018. म्हणजे उद्या, माझ्या मते हा दिवस एक विशेष दिवस, अगदी खास आहे. आपल्यालाही आश्चर्य वाटेल, नवीन वर्ष तर येत असतंच. एक जानेवारीही प्रत्येक वर्षी येतेच. परंतु ज्यावेळी ‘विशेष’ असं मी म्हणतो, त्यावेळी खरोखरीच ती गोष्ट खास असते. जे लोक सन 2000 या वर्षी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत, म्हणजेच 21व्या शतकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, ती मुले एक जानेवारी, 2018 पासून ‘पात्र मतदार’ बनण्यास प्रारंभ होणार आहे. भारतीय लोकशाहीचे 21व्या शतकातले मतदार हे ‘नव भारताचे मतदार’ असणार आहेत, त्यांचं मी स्वागत करतो. या नवीन, युवपिढीला मी शुभेच्छा देतो. आणि सर्वांना आग्रह करतो की, आपण सर्वांनी मतदार म्हणून आपली नावं नोंदवावीत. संपूर्ण हिंदुस्तान आपले 21 व्या शतकातले मतदार म्हणून स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. 21 व्या शतकातले मतदार बनताना, आपणही एखादा सन्मान मिळत असल्याचा अनुभव करत असणार. आपले मत हे ‘नव भारता’चा आधार असणार आहे. लोकशाहीमध्ये मताची ताकद, ही सर्वात मोठी शक्ती आहे. लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘मत’ हे सर्वात प्रभावी साधन आहे. आपल्याला फक्त मत देण्याचा अधिकार मिळतो, असं नाही. तर आपण 21 व्या शतकामध्ये भारत कसा असावा? 21 व्या शतकातल्या भारतामध्ये आपली स्वप्नं कोणती असावीत? आपण सुद्धा 21व्या शतकातील भारताचे निर्माता बनू शकणार आहात आणि त्याचाच प्रारंभ एक जानेवारीपासून विशेषत्वाने होणार आहे. आणि आज आपल्या या ‘मन की बात’ मध्ये विविध संकल्प करत असलेल्या आणि ज्यांची ऊर्जा ओसंडून वाहत आहे, अशा 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या यशस्वी युवावर्गाशी मी बोलू इच्छित आहे. माझ्या मते हेच खरे ‘नव भारत युवा ’ आहेत. ‘नव भारत युवा’ याचा अर्थ आहे की- आनंद, उत्साह आणि ऊर्जा. या ऊर्जावान युवावर्गाकडे असलेल्या कौशल्याच्या जोरावर आपले ‘नव भारता’चे स्वप्न साकार होणार आहे, असा माझा विश्वास आहे. ज्यावेळी आपण नव भारताविषयी बोलतो, त्यावेळी हा नवा भारत जातीवाद, संप्रदायांमधील वाद, दहशतवाद, भ्रष्टाचार यांसारख्या विषवल्लींपासून तो मुक्त असला पाहिजे. अस्वच्छता आणि गरीबी यांच्यापासून तो मुक्त असला पाहिजे. ‘नव भारता’मध्ये सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत. आणि तिथं सर्वांच्या आशा- आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. नव भारतामध्ये शांती, एकता आणि सद्भावना आमच्या मार्गदर्शक शक्ती असल्या पाहिजेत. नव भारतातील युवकांनी पुढं यावं आणि नवा भारत कसा असावा, यावर विचारमंथन करावं. त्यांनीही आपल्यासाठी एक मार्ग निश्चित करावा. जे याच्याशी जोडले गेले आहेत, त्यांचा एक असाच मोठा समूह होत जाईल. आपणही पुढे मार्गक्रमण करीत रहावं, त्यामुळं देशही असाच पुढे जाईल. आत्ता आपल्याशी संवाद साधत असतानाच माझ्या मनात एक विचार आला की, आपण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक ‘मॉक पार्लमेंट’ म्हणजे ‘प्रतिरूप संसद’ आयोजित करू शकतो का? या उपक्रमामध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातल्या युवकांनी एकत्रित येवून ‘नव भारत’ याविषयावर विचार मंथन करून, विविध मार्ग शोधून, त्याप्रमाणे योजना, हे युवक बनवू शकतील का? सन 2022च्या आधीच आपण आपले संकल्प कशा पद्धतीने सिद्धीस नेवू शकणार आहे? आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी पाहिलेल्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो? महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीला एका जन आंदोलनाचं स्वरूप दिलं होतं. माझ्या नवयुवा सहकाऱ्यांनो, आज काळाची गरज आहे की, आपणही 21व्या शतकामध्ये भव्य -दिव्य भारतासाठी एक जन-आंदोलन उभं केलं पाहिजे. विकासाचं जन-आंदोलन. प्रगतीचं जन-आंदोलन. सामर्थ्यवान, शक्तीशाली भारत निर्माण करण्यासाठी जन-आंदोलन. मला असं वाटतं की, 15 ऑगस्टच्या जवळपास दिल्लीमध्ये एका ‘मॉक पार्लमेंट’चं, म्हणजेच ‘प्रतिरूप संसदेचं’ आयोजन करण्यात यावं. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एका युवकाला निवडून सहभागी करून घेतलं जावं. युवकांच्या या संसदेमध्ये आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण करण्यासाठी नेमकं काय आणि कसं केलं पाहिजे, यावर चर्चा घडवून आणली जावी, असंही मला वाटतं.आगामी पाच वर्षांमध्ये एका नवीन भारताचे निर्माण कसे केले जावू शकते ? संकल्प कशापद्धतीने सिद्धीस नेला जावू शकतो ? आज युवावर्गासाठी असंख्य नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. कौशल्य विकसनापासून ते नवसंकल्पनांपर्यंत आणि उद्योजकतेमध्ये आमचे युवक पुढे येत आहेत आणि यशस्वीही होत आहेत. मला वाटतं की, या सर्व योजनांची माहिती या ‘नव भारता’तील युवावर्गाला एकाच स्थानी कशा पद्धतीनं मिळू शकेल, याचा विचार करून एक स्वतंत्र मजबूत व्यवस्था निर्माण केली जावी. त्यामुळे 18 वर्षे होताच युवावर्गाला या नवनवीन व्यवसायाच्या विश्वाची माहिती अगदी सहजपणानं मिळू शकेल आणि आवश्यकता भासेल त्यावेळी तो एकत्रित माहितीचा लाभही घेवू शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मागच्यावेळी ‘मन की बात’ मध्ये मी आपल्याला ‘सकारात्मक’तेचं महत्व किती आहे, याविषयी सांगितलं होतं. संस्कृतमधल्या एका श्लोकाचं स्मरण आज मला झालं आहे.
उत्साहो बलवानार्य, नास्त्युत्साहात्परं बलम् ।
सोत्साहस्य च लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ।।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, ज्या व्यक्तीकडे उदंड उत्साह आहे, ती व्यक्ती अत्यंत बलशाली असते. कारण उत्साह असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. सकारात्मकता आणि उत्साह ज्या व्यक्तींकडे आहे, त्यांच्या दृष्टीने कोणतेही काम सहज साध्य, शक्य असते. इंग्लिशमध्ये लोक असं म्हणतात की, –
‘पेसिमिझम लिडस् टू वीकनेस, ऑप्टीमिझम टू पॉवर’
मागच्या वेळच्या ‘मन की बात’ मध्ये मी देशवासियांना आवाहन केलं होतं की, 2017 या वर्षामध्ये आपण जे सकारात्मक क्षण अनुभवले, त्यांची माहिती ‘शेअर’ करावी आणि 2018चं स्वागत अशाच सकारात्मक वातावरणामध्ये करावं. लोकांनी समाज माध्यमांच्या व्दारे, ‘माय गव्ह’ आणि ‘नरेंद्र मोदी अॅप’ वर खूप मोठ्या संख्येनं अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपले अनुभव ‘शेअर’ केले आहेत. माझ्या आवाहनाला दिलेला हा चांगला प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला. ‘‘पॉझिटिव्ह इंडिया हॅशटॅग’’ वर लाखो व्टिटस् आल्या आहेत. त्या जवळपास दीडशे कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. यामुळे एकप्रकारे सकारात्मतेचे वातावरण भारतात निर्माण झालं आहे, आणि आता त्याचा प्रसार संपूर्ण विश्वामध्ये होत आहे. व्टिटस् आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर सगळं काही खरोखरीच खूप उत्साहवर्धक आहे. तोही एक सुखद अनुभव मिळाला आहे. काही देशवासियांनी यावर्षातल्या ज्या घटनेने त्यांच्या मनाचा ठाव घेतला, अशा विशेष परिणामकारी घटनांचा अनुभवही कथित केला आहे. काही लोकांनी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात काही विशेष कामगिरी केली, त्याची माहितीही ‘शेअर’ केली आहे.
साऊंड बाईट्स
— माझं नाव मीनू भाटिया आहे. मी मयूर विहार, पॉकेट-वन, फेज वन, दिल्ली इथं राहते. माझ्या कन्येला एम.बी.ए. करण्याची इच्छा होती. तिच्यासाठी मला बँकेकडून कर्ज हवं होतं. हे कर्ज मला खूपच सहजतेनं मिळालं आणि माझ्या मुलीचं शिक्षण सुरू राहू शकलं.
— माझं नाव ज्योती राजेंद्र वाडे आहे. मी बोडल इथून बोलतेय. दरमहा एक रूपया भरून विमा काढण्यात येतो, त्या योजनेतून माझ्या पतीने विमा उतरवला होता. आणि त्यांचं अकस्मात अपघातामध्ये निधन झालं. आता आमच्यावर किती मोठं संकट कोसळलं, हे आमचं आम्हालाच ठाऊक आहे. परंतु अशा कठीण समयी सरकारच्या विम्याची मदत आम्हाला मिळाली आणि त्यामुळं परिस्थितीची दाहकता थोडी कमी झाली.
— माझं नाव संतोष जाधव आहे. आमच्या भिन्नर या गावातून 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं आहे. त्यामुळे आमच्या इथं आता रस्ते खूप चांगले झाले आहेत आणि व्यवसाय तेजीत येतोय.
— माझं नाव दीपांशु आहुजा आहे. मी उत्तर प्रदेशमधल्या सहारणपूर जिल्ह्यातल्या मोहल्ला सादतगंज मध्ये वास्तव्य करतो. आपल्या भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाच्या दोन घटना मला फार प्रभावी वाटतात. एक- पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक. यामुळं दहशतवादासाठी वापरण्यात येणारे ‘लाँचिंग पॅडस्’ उद्ध्वस्त झाले आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय सैनिकांनी डोकलाममध्ये जो पराक्रम दाखवला तो अतुलनीय आहे.
— माझं नाव सतीश बेवानी आहे. आमच्या भागामध्ये पाण्याची खूप गंभीर समस्या होती. गेली 40 वर्षे आम्ही आर्मीच्या जलवाहिनीवर अवलंबून होतो. आता आमच्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी झाली आहे. स्वातंत्र्यानंतर आमचं हे सर्वात मोठं यश आहे, ते 2017मध्ये आम्हाला मिळालं.
असे अनेक लोक आहेत, जे आपआपल्या स्तरावर कार्यरत आहेत. आणि त्यामुळं अनेक लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर हाच खरा ‘नव भारत’ आहे. या नवीन भारताची निर्मिती आपण सगळे मिळून करीत आहोत. चला तर मग, अशाच लहान- लहान गोष्टींतून मिळत असलेल्या आनंदासह आपण नववर्षामध्ये प्रवेश करूया, नव-वर्षाच्या प्रारंभाला ‘सकारात्मक भारता’कडून ‘प्रगतिशील भारता’च्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी निर्धारपूर्वक, ठोस पावलं टाकूया. आता आपण सगळेच सकारात्मकतेविषयी चर्चा करत आहोत, म्हणून मलाही एक गोष्ट इथं सांगण्याचा मोह होत आहे. अलिकडेच मला काश्मीरमध्ये प्रशासकीय सेवा परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवलेल्या अंजुम बशीर खान खट्टक याच्याविषयीची मिळालेली माहिती अतिशय प्रोत्साहन देणारी आहे. दहशतवाद आणि कमालीचा व्देष या वातावरणातून बाहेर पडून काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षेत त्यानं सर्वात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 1990मध्ये दहशतवाद्यांनी त्याच्या वडिलांचं घर जाळून टाकलं होतं, हे समजल्यावर, तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. एका लहानग्या मुलासाठी चोहोबाजूला असलेलं हिंसाचाराचं वातावरण त्याच्या मनामध्ये कडवटपणा निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं. अंजुम जिथं वास्तव्य करीत होता, त्या परिसरामध्ये दहशतवाद आणि हिंसक कारवाया इतक्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या की, त्याच्या कुटुंबियांना आपली वाड-वडिलांकडून मिळालेली जमीन सोडून बाहेर पडावं लागलं. आता एखाद्या लहान मुलाच्या सभोवती जर सातत्यानं हिंसाचार होत असेल तर त्याच्या मनात नकारात्मक विचार येणारच, त्याचबरोबर व्देषाचं कडवट बीजही रूजणार, अशी परिस्थिती होती. परंतु अंजुमने असं अजिबात होऊ दिलं नाही. त्यानं आशा कधीच सोडली नाही. त्यानं आपल्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला. जनतेची सेवा करण्याचा मार्ग निवडला. सगळ्या विपरित परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी स्वतःच प्रयत्न केले. यशस्वीतेची कथा त्यानं आपल्याच हातानं लिहिली. आज अंजुम केवळ जम्मू आणि काश्मीरच्याच नाही तर संपूर्ण देशातल्या युवा वर्गासाठी प्रेरणास्थान बनला आहे. परिस्थिती कितीही वाईट असली तरी सकारात्मक कार्याच्या माध्यमातून निराशेचे मळभ, नाहीसे करता येतात, हे अंजुमनं सिद्ध करून दाखवलं आहे.
अलिकडे, गेल्याच आठवड्यात मला जम्मू- काश्मीरच्या काही कन्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्यामध्ये जी इच्छाशक्ती होती, जो उत्साह होता, त्यांची जी स्वप्ने होती यांची माहिती मी घेत होतो. आयुष्यात कोण कोणत्या क्षेत्रात त्यांना प्रगती करण्याची इच्छा आहे, हे त्या भरभरून सांगत होत्या. मनात प्रचंड आशा ठेवून जगणारी ही सगळी मंडळी होती. त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होतं, यांच्यामध्ये निराशेचं तर नामोनिशाण नाही. त्यांच्यामध्ये उत्साह होता, आनंद, उल्हास होता, प्रचंड ऊर्जा होती, मोठी स्वप्ने होती, संकल्प होते. या काश्मीरी कन्यांबरोबर मी जितका वेळ घालवला, त्या काळात त्यांच्याकडून मलाही खूप प्रेरणा मिळाली. आणि मला वाटतं, हीच या देशाची खरी ताकद आहे. हाच तर माझा आजचा युवावर्ग आहे. हेच तर माझ्या देशाचं भविष्य आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातल्याच नाही, तर संपूर्ण जगभरातल्या प्रसिद्ध धार्मिक स्थानांविषयी चर्चा होते, त्यावेळी केरळच्या सबरीमाला मंदिराविषयी बोललं जाणं स्वाभाविक आहे. या जगप्रसिद्ध मंदिरामध्ये भगवान अय्यप्पा स्वामी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी भाविक येत असतात. आता ज्याठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने भाविक येत असतात, आणि ज्या स्थानाचे इतके महात्म्य आहे, अशा ठिकाणी कायम स्वच्छता राखणे किती मोठे आव्हानात्मक कार्य होऊ शकते? विशेष म्हणजे असं महत्वाचं धार्मिक स्थान, उंच डोंगरावर आणि घनदाट अरण्यात असेल तर तिथं स्वच्छता राखण्याचं काम एक मोठे दिव्यच ठरते. परंतु या अवघड कामाचे संस्कारामध्ये परिवर्तन केले जाऊ शकते. या समस्येतून मार्ग कशा पद्धतीने काढला जाऊ शकतो, आणि लोकांच्या सहभागाची शक्ती किती मोठी असते. याचे एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सबरीमाला मंदिर आहे, असं म्हणता येईल. पी.विजयन नावाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने ‘पुण्यम पुन्कवाणम’ असा एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ऐच्छिक मोहीम सुरू केली आहे. आणि एक परंपरा बनवली आहे. जो कोणी यात्रेकरू तिथं येतो, त्यानं त्याची यात्रा पूर्ण करण्यासाठी स्वच्छता कार्यक्रमात सहभागी होऊन काही ना काही शारीरिक श्रम करण्याची पद्धत सुरू केली आहे. या अभियानामध्ये कोणीही मोठा नाही की, कोणी लहान नाही. प्रत्येक यात्रेकरू देवाच्या पूजेचाच एक भाग समजून, काही ना काही तरी स्वच्छतेचं काम करतात. अस्वच्छ जागा झाडून, साफ करण्याचं काम करतात. रोज सकाळी सफाई काम सुरू असताना फार वेगळं, अद्भूत दृष्य इथं दिसतं. गावात दर्शनासाठी आलेले सगळे यात्रेकरू स्वच्छतेचं काम करतात. आता यामध्ये कोणी कितीही मोठी सेलेब्रिटी असेल, कोणी कितीही मोठा धनिक असेल, किंवा मोठ्या पदावर कार्यरत अधिकारी असेल, प्रत्येकजण सामान्य यात्रेकरूप्रमाणे या ‘पुण्यम पुन्कवाणम’ कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. स्वच्छतेचं काम करूनच पुढे जातात. आपल्या देशवासियांसाठी अशी अनेक उदाहरणे आहेत. सबरीमालामध्ये स्वच्छतेचं अभियान खूप पुढं गेलं आहे. त्यामध्येही आता ‘पुण्यम पुन्कवाणम’मुळे प्रत्येक यात्रेकरू स्वच्छता अभियानाचा भाग बनत आहे. तिथं कठोर व्रत साधनेबरोबरच स्वच्छतेचा कठोर संकल्पही घेतला जातो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 ऑक्टोबर 2014 पूज्य बापूंच्या जयंती दिनी आपण सर्वांनी मिळून ‘स्वच्छ -भारत’, ‘अस्वच्छतेपासून मुक्त-भारत’ करण्याचा एक संकल्प केला आहे. आपण सर्वांनी मिळून निश्चित केलंय की, ज्यावेळी पूज्य बापू यांची 150वी जयंती असेल, त्यावेळेपर्यंत आपण त्यांच्या स्वप्नातला ‘स्वच्छ भारत’ साकार करण्यासाठी त्या दिशेने काही ना काही करायचं आहे. स्वच्छतेच्या दिशेने देशभरामध्ये व्यापक स्तरावर प्रयत्न होत आहेत. ग्रामीण तसंच शहरी क्षेत्रांमध्ये व्यापक पातळीवर लोकांच्या सहभागामुळेही आता परिवर्तन दिसून येत आहे. शहरी भागामध्ये स्वच्छतेचा स्तर किती आहे, स्वच्छता मोहिमेला किती यश मिळत आहे, याची पाहणी करण्यासाठी आगामी 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या काळामध्ये जगातील सर्वात मोठे ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ करण्यात येणार आहे. असे सर्वेक्षण देशातल्या चार हजार पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि जवळपास 40 कोटी लोकसंख्येमध्ये करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये पाहणी केली जाणारी क्षेत्रंही निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शहरांमध्ये उघड्यावर शौचापासून मुक्ती, त्याचबरोबर कचरा जमा करणे, कचरा घेऊन जाण्यासाठी असलेली वाहन व्यवस्था, शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन केले जाते की नाही, लोकांच्या सवयी बदलण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, या कामामध्ये लोकांचा सहभाग किती आहे, क्षमता निर्माण करण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी काही नवसंकल्पनांचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, हे तपासले जाणार आहे. या सर्वेक्षणाच्या काळामध्ये वेगवेगळी पथके शहरांची तपासणी करणार आहेत. तसंच नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. ‘स्वच्छता अॅप’चा उपयोग कसा केला जातो. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या सेवास्थानांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये आणखीही गोष्टींची पाहणी केली जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे हा जनतेचा स्थायीभाव बनला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी काही तरी केलं पाहिजे. स्वच्छता तिथल्या प्रत्येक शहरवासियाचा स्थायीभाव बनला पाहिजे, यासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था त्या शहरांनी बनवली आहे की नाही, हेही पाहिलं जाणार आहे. स्वच्छता ठेवणे हे काम फक्त सरकारचं आहे, असं अजिबात नाही. तर प्रत्येक नागरिक आणि नागरिक संघटनांचीसुद्धा स्वच्छता राखण्यात मोठी जबाबदारी आहे. आणि माझा प्रत्येक नागरिकाला आग्रह आहे की, सर्वांनी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. आणि आपलं शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागं पडू नये, आपली गल्ली-रस्ता, आपली सोसायटी मागे पडू नये यासाठी संकल्प करा. घरामधला सुका कचरा, ओला कचरा यांचे वर्गीकरण करण्याची सवय आता एव्हाना तुम्हाला नक्कीच लागली असेल आणि कचरा टाकताना निळी आणि हिरवी अशा वेगळ्या कचरा टोपल्या तुम्ही वापरत असणार, असा मला विश्वास आहे. कचऱ्यासाठी ‘रिड्यूस, रियूज आणि रि-सायकल’ हा सिद्धांत अतिशय प्रभावी ठरतो. स्वच्छ शहरांची क्रमवारी या सर्वेक्षणाच्या आधारे करण्यात येणार आहे. जर आपल्या शहराची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त असेल तर संपूर्ण देशाच्या क्रमवारीत आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर मग क्षे़त्रीय क्रमवारीमध्ये सर्वाधिक वरचा क्रमांक मिळवला पाहिजे, असे आपले स्वप्न असले पाहिजे. आणि तसे प्रयत्नही आपण केले पाहिजेत. 4 जानेवारी ते 10 मार्च 2018 या कालावधीत होत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये, स्वच्छतेच्या या आरोग्यदायी स्पर्धेमध्ये आपण मागे पडता कामा नये, असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. हा गावामध्ये, नगरामध्ये एक सार्वजनिक चर्चेचा विषय बनला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांचे स्वप्न असले पाहिजे की, ‘‘आपले शहर- आपला प्रयत्न’’, ‘‘ आमची प्रगती-देशाची प्रगती’’.
चला तर मग, असा संकल्प करून आपण पुन्हा एकदा पूज्य बापूंजींचे स्मरण करून स्वच्छ भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही गोष्टी अशा असतात की, त्या दिसायला खूप लहान वाटतात परंतु एक समाज म्हणून त्याकडे पाहिलं तर आमची ओळख बनतात. आणि त्याचा खूप मोठा प्रभावही पडत राहतो. आज ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याशी अशीच एक गोष्ट ‘शेअर’ करू इच्छितो. मला गोष्ट समजली की, जर एखादी मुस्लिम महिला हजऱ्यात्रेला जाऊ इच्छित असेल तर ती फक्त ‘महरम’ अथवा आपल्या ‘पुरूष पालकाविना जाऊ शकत नाही. ज्यावेळी याविषयी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी मी विचार केला की, असं कसं असू शकतं? हा नियम कोणी बनवला असेल? आणि असा भेद का? आणि मग मी याविषयी सखोल माहिती मिळवली. मला जे काही समजलं त्यामुळं मला आश्चर्य वाटले. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतरही आपल्याकडे असे निर्बंध लावणारे आपणच लोक आहोत. मुस्लिम महिलांवर अशाप्रकारेही अनेक दशकांपासून अन्याय होत आहे. परंतु त्याची चर्चा, साधी वाच्यताही कोणी करत नाही. विशेष म्हणजे, अशी बंधने, नियम तर इस्लामी देशांमध्येही नाहीत. परंतु भारतात मात्र मुस्लिम महिलेला हा अधिकार मिळालेला नव्हता. आणि मला इथं नमूद करायला खूप आनंद होतो आहे, की आमच्या सरकारनं या गोष्टीमध्ये लक्ष घातलं. आमच्या अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाने आवश्यक ती पावलं उचलून ही 70 वर्षे चालत आलेली परंपरा नष्ट केली. मुस्लिम महिलेवर हजऱ्यात्रेला जाण्यासाठी असलेले हे बंधने काढून टाकण्यात आले. आज मुस्लिम महिला ‘महरम’शिवाय हज यात्रेला जाऊ शकतात. मला आणखी एका गोष्टीचा आनंद वाटतो की, यावर्षी जवळपास तेराशे मुस्लिम महिलांनी ‘महरम’विना हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज केले आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या अगदी केरळपासून ते उत्तरेपर्यंतच्या महिलांनी मोठ्या उत्साहाने हज यात्रा करण्याची इच्छा जाहीर केली आहे. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाला तर मी सल्ला दिला आहे की, ज्या महिला एकट्याने हज यात्रा करण्यास इच्छुक आहेत, आणि अर्ज करत आहेत, त्या सर्व महिलांना हजला जाण्याची परवानगी देण्यात यावी. सर्वसाधारणपणे हज यात्रेकरूंसाठी लॉटरी पद्धती आहे. परंतु माझी इच्छा आहे की, एकट्या हज यात्रा करू इच्छित असलेल्या महिलांना लॉटरी पद्धतीतून वगळावे आणि त्यांना विशेष श्रेणीमध्ये संधी द्यावी. माझा पूर्ण विश्वास आहे, आणि माझी दृढ मान्यता आहे की, भारताच्या विकासाचा प्रवास हा आमच्या स्त्री-शक्तीच्या बळावर, त्यांच्यामधील प्रतिभेच्या विश्वासावर पुढे जात राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्या महिलांनाही पुरूषांच्या बरोबरीने समान अधिकार, समान संधी मिळाल्या पाहिजेत, यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असले पाहिजेत आणि प्रगतीच्या मार्गावर महिला आणि पुरूष बरोबरीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी आपल्यासाठी एक ऐतिहासिक पर्व आहे. यावर्षी 26 जानेवारी 2018 हा दिवस विशेषत्वाने स्मरणात राहणार आहे. यावर्षी प्रजासत्ताक दिन समारंभाला सर्व दहा आसियान देशांचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला एक नाही तर दहा मुख्य अतिथी असणार आहेत. असं भारताच्या इतिहासात याआधी कधीच घडलं नाही. पहिल्यांदाच दहा पाहुणे प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाला येणार आहेत. 2017 हे वर्ष ‘आसियान’चे देश आणि भारत , अशा दोघांच्या दृष्टीने विशेष ठरले. ‘आसियान’ने 2017मध्ये आपली 50 वर्षे पूर्ण केली. आणि 2017मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाली. 26 जानेवारीला जगातल्या 10 देशांच्या या महान नेत्यांबरोबर सहभागी होणे आपल्या सर्व भारतीयांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे.
प्रिय देशवासियांनो, सध्या सण-उत्सवांचे दिवस सुरू आहेत. तसं पाहिलं तर आपला देश एकप्रकारे उत्सवांचा देश आहे. कदाचित असा एखादाही दिवस सांगता येणार नाही की, त्या दिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. आत्ताच आपण सर्वांनी ख्रिसमसचा सण साजरा केला. आणि आता नवं वर्ष येणार आहे. येणारे नवे वर्ष आपल्या सगळ्यांना खूप खूप आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन यावे. आपण सगळे नव्या जोशात, नव्या उत्साहात, नव्या आनंदात आणि नव्या संकल्पासह पुढे जाऊया. आणि देशालाही असेच पुढे नेऊया. जानेवारी महिन्यात सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होणार आहे. या महिन्यात मकर संक्रांत साजरी केली जाते. हा सण निसर्गाशी जोडला आहे. तसं पाहिलं गेलं तर आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या या अद्भूत घटनांना वेग-वेगळ्या रूपांमध्ये साजरे करण्याची प्रथा आहे. पंजाब आणि उत्तर भारतामध्ये लोहडीचा आनंद साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेश-बिहारमध्ये खिचडी आणि तिळ-संक्रांतीची प्रतीक्षा सुरू असते. राजस्थानमध्ये संक्रांत म्हणतात, तर आसाममध्ये माघ-बिहू, तर तामिळनाडूमध्ये पोंगल आहे. या सर्व सणांचे आप- आपले असे विशेष महत्व आहे. हे सगळे सण साधारणपणे 13ते 17 जानेवारी या काळात साजरे केले जातात. या सर्व सणांची नावे वेगवेगळी आहेत. परंतु यांचे मूळ तत्व एकच आहे. ते म्हणजे निसर्ग आणि कृषी यांच्याशी जोडले जाणे.
सर्व देशवासियांना या सण-उत्सवांच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना नव-वर्ष 2018 च्या अनेक-अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद, प्रिय देशवासियांनो. आता आपण 2018 मध्ये पुन्हा असेच बोलणार आहे.
धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली. टाईम्स ग्रुपच्या ‘विजय कर्नाटका’ वर्तमानपत्राने एक उपक्रम राबवला, ज्यात त्यांनी बालकांना, पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचा आग्रह केला. त्यापैकी काही निवडक पत्रे छापण्यात आली. ती पत्रे वाचल्यानंतर मला फार बरे वाटले. या अगदी लहान मुलांनाही देशातील समस्यांची जाण आहे, देशात सुरू असलेल्या चर्चाही त्यांना माहिती आहेत. अनेक विषयांवर या बालकांनी लिहिले आहे. उत्तर कन्नड मधील किर्ती हेगडे हिने, डिजीटल इंडिया आणि स्मार्ट शहर योजनांचे कौतुक करत, आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज असल्याचे नमूद केले. हल्लीच्या मुलांना वर्गात बसून वाचन करणे आवडत नाही, त्यांना निसर्गाबद्दल जाणून घ्यायला आवडते. जर मुलांना निसर्गाबाबत अधिक माहिती दिली तर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ते भविष्यात उपयुक्त ठरेल, असेही तिने लिहिले आहे.
लक्ष्मेश्वरा येथील रीडा नदाफ़ नावाच्या मुलीने लिहिले आहे की ती लष्करातल्या एका जवानाची मुलगी आहे आणि तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो. लष्करातल्या जवानाचा अभिमान कोणत्या भारतीयाला वाटणार नाही? आणि तुम्ही तर त्या जवानाची कन्या आहात, तुम्हाला अभिमान वाटणे अगदी स्वाभाविक आहे. कलबुर्गीहून इरफ़ाना बेग़म यांनी म्हटले आहे की त्यांची शाळा त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघावे लागते आणि घरी परतायलाही उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रमंडळींसोबत जास्त वेळ खेळता येत नाही. त्यांच्या घराजवळ शाळा असावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. देशवासियांनो, एका वर्तमानपत्राने पुढाकार घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला आणि त्यामुळे ही पत्रे माझ्यापर्यंत पोहोचू शकली, ती वाचायची संधी मला मिळाली. माझ्यासाठी सुध्दा हा फार चांगला अनुभव होता.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 26/11 आहे. 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिवस आहे. 1949 साली आजच्याच दिवशी संविधान सभेने भारताची घटना स्वीकारली होती. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारताची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस हा संविधान सभेच्या सदस्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संविधानाची रचना करण्यासाठी त्यांनी सुमारे तीन वर्षे कठोर मेहनत घेतली. त्यावर झालेल्या चर्चा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. देशाला समर्पित विचार म्हणजे काय, हे त्यावरून समजते. वैविध्याने समृद्ध असलेल्या आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली असेल, याची कल्पना आहे तुम्हाला? योग्य समज आणि दूरदर्शी विचार केला असेल त्यांनी. आणि ते सुद्धा अशा वेळी, जेव्हा देश पारतंत्र्याच्या बेड्यांमधून मुक्त होत होता, तेव्हा. याच संविधानाच्या प्रकाशात, घटनेची रचना करणाऱ्यांच्या विचारांच्या प्रकाशात नव भारताची निर्मिती करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपली राज्यघटना व्यापक आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र, निसर्गातील कोणताही विषय त्यात वगळलेला नाही. सर्वांसाठी समानता आणि सर्वांप्रती संवेदनशीलता, ही आपल्या राज्यघटनेची ओळख आहे. आपली राज्यघटना, देशातील गरीब, दलित, मागास, वंचित, आदिवासी, महिला अशा सर्व स्तरांतील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करते आणि त्यांचे हित अबाधित राखते. आपल्या राज्यघटनेचे अक्षरश: पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. नागरिक असो वा प्रशासक, प्रत्येकाने संविधानाला अनुसरूनच वर्तन केले पाहिजे. कोणाचेही, कशाही प्रकारचे नुकसान होऊ नये, हाच राज्यघटनेचा संदेश आहे. आज, संविधान दिनाच्या प्रसंगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येणेही स्वाभाविक आहे. या संविधान सभेत महत्वपूर्ण विषयांसंदर्भात 17 स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात आली होती. यातील मसुदा समिती ही एक सर्वात महत्वाची समिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. फार मोठी भूमिका ते निभावत होते. आज ज्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतो, त्याच्या निर्मितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाचा अमिट ठसा आहे. समाजातील प्रत्येक वर्गाचे कल्याण होईल, याची खातरजमा त्यांनी केली. 6 डिसेंबर रोजी, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांचे स्मरण करतो, त्यांना वंदन करतो. देशाला समृद्ध आणि सशक्त करण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. 15 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतीथी आहे. शेतकऱ्याचा सुपुत्र ते लोह पुरूष अशी ओळख निर्माण करणारे सरदार पटेल यांनीही देशाला एका समान सूत्रात बांधण्याचे असामान्य कार्य केले. सरदार पटेल सुद्धा संविधान सभेचे सदस्य होते. ते मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्या साठीच्या सल्लागार समितीचेही अध्यक्ष होते.
26/11 हा आपला संविधान दिवस आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, हे सुद्धा देश विसरू शकत नाही. आजच्या दिवशी ज्या शूर नागरिकांनी, पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आपले प्राण गमावले होते, त्यांना देश वंदन करतो आहे, त्यांचे स्मरण करतो आहे. त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. दहशतवादाने आज, जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आणि एका अर्थाने, जवळ-जवळ रोजच होणाऱ्या घटनेचे रूप धारण केले आहे. आपण, म्हणजेच भारत तर गेली 40 वर्षे दहशतवादामुळे बरेच काही सोसत आहे. आमच्या हजारों निर्दोष नागरिकांनी आपले प्राण गमावले. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत दहशतवादाबाबत जगासमोर चर्चा करत असे, दहशतवादाच्या भयंकर संकटाबाबत चर्चा करत असे, तेव्हा जगातील अनेक लोकांना त्याचे गांभिर्य वाटत नव्हते. मात्र आज, दहशतवादाने त्याच देशांमध्ये थैमान घालायला सुरूवात केल्यानंतर जगातील प्रत्येक सरकार, खरे तर मानवतेवर, लोकशाहीवर विश्वास असणारी सर्वच सरकारे दहशतवादाकडे एक मोठे आव्हान म्हणून पाहत आहेत. दहशतवादाने जगातील मानवतेलाच आव्हान दिले आहे. मानवी शक्ती नष्ट करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आणि म्हणूनच केवळ भारतानेच नाही तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत केले पाहिजे. या भूमीवर जन्मलेले भगवान बुध्द, भगवान महावीर, गुरु नानक, महात्मा गांधी यांनीच जगाला अहिंसा आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. दहशतवाद आणि उग्रवाद आमच्या सामाजिक रचनेला कमकुवत करून, ती उध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच मानवतावादी शक्तींनी अधिक जागरूक राहावे, ही काळाची गरज आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 4 डिसेंबर रोजी आपण नौदल दिवस साजरा करू. भारतीय नौदल आपल्या सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करते. नौदलाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. नद्यांच्या किनारी परिसरातच आपल्या संस्कृती विकसित झाल्या आहेत, हे आपणास माहिती असेलच. सिंधु नदी असो, गंगा नदी असो, यमुना असो किंवा सरस्वती असो. आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिक, अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे आहेत. संपूर्ण जगासाठीची ही प्रवेशद्वारे आहेत. या देशाचा, आपल्या या भूमीचा महासागरांशी अतूट संबंध आहे. जेव्हा आपण इतिहासावर नजर टाकतो, तेव्हा 800-900 वर्षांपूर्वी चोळ वंशाच्या काळात सर्वात समर्थ नौदलांमध्ये चोळ राजाच्या नौदलाची गणना केली जात असे. चोळ साम्राज्याच्या विस्तारात, साम्राज्याला त्या काळी आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांच्या नौदलाचा सिंहाचा वाटा होता. चोळ नौदलाच्या मोहिमा, संशोधन यात्रांची अनेक उदाहरणे, संगम साहित्यात आजही उपलब्ध आहेत. जगभरातील बहुतेक नौदलांमध्ये फार नंतरच्या काळात महिलांच्या समावेशाला परवानगी देण्यात आली, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. मात्र चोळ नौदलात, आणि ते सुद्धा 800-900 वर्षांपूर्वी महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अगदी युद्धातही या महिला सहभागी झाल्या होत्या. चोळ शासकांकडे जहाज बांधणीचे अद्ययावत ज्ञान होते. नौदलाचा उल्लेख होत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नौदलाचे सामर्थ्यही कसे विसरता येईल? सागरी वर्चस्व असणारा कोकणचा भूभाग शिवाजी महाराजांच्या राज्यात समाविष्ट होता. शिवाजी महाराजांशी संबंधित सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा, स्वर्णदुर्ग असे अनेक किल्ले तर समुद्र किनारी भागात होते किंवा मग समुद्रातच उभे होते. मराठ्यांचे नौदल या किल्ल्यांचे संरक्षण करत होते. मराठ्यांच्या या आरमारात मोठ्या आणि लहान नौकांचा समावेश होता. त्यांचे नौसैनिक कोणत्याही शत्रुवर हल्ला करण्यास आणि हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यात पारंगत होते. मराठा आरमाराची चर्चा व्हावी आणि कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख नसावा, हे तर केवळ अशक्य. त्यांनी मराठ्यांच्या आरमाराला नवे वैभव मिळवून दिले आणि अनेक ठिकाणी मराठा सैनिकांचे तळ उभारले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतीय नौदलाने अनेकदा पराक्रम गाजवला. गोवा मुक्ती संग्राम असो किंवा १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध असो. जेव्हा नौदलाचा उल्लेख होतो तेव्हा केवळ युद्धच नजरेसमोर येते. मात्र भारतीय नौदलाने मानवतेसाठीही मोलाचे काम केले आहे. याच वर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारवर मोरा चक्रीवादळाचे संकट ओढवले होते. आपल्या नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने तातडीने बचावासाठी मदत केली आणि अनेक मच्छिमारांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून बांग्लादेशकडे सुपूर्द केले. याच वर्षी मे-जून महिन्यात श्रीलंकेमध्ये मोठा पूर आला तेव्हा आमच्या नौदलाच्या तीन नौका तातडीने तेथे पोहोचल्या आणि त्यांनी तेथील सरकार आणि जनतेचे सहाय्य केले. बांग्लादेशमध्ये रोहिंग्यांसंदर्भात आपल्या नौदलाच्या आयएनएस घडियाल या युद्ध नौकेने मानवी सहाय्य केले होते. जून महिन्यात पापुआ न्यू गिनी सरकारने आम्हाला SOS संदेश दिला आणि त्यांच्या मच्छिमारी नौकेवरच्या मच्छिमारांना वाचवण्यासाठी आपल्या नौदलाने मदत केली. 21 नोव्हेंबर रोजी पश्चिम गल्फमध्ये एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळीसुद्धा आपल्या नौदलाची आयएनएस त्रिकांड ही युद्ध नौका मदतीसाठी धावून गेली. फिजीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे असो, तातडीची मदत करायची असो किंवा शेजारी देशांना मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करायची असो, प्रत्येक वेळी भारतीय नौदलाने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. आपण सर्व भारतीय, आपल्या या संरक्षण दलांबद्दल नेहमीच गौरव आणि आदराची भावना बाळगतो. लष्कर असो, नौदल असो किंवा वायुसेना असो, आपण सर्व देशवासी आपल्या जवानांचे शौर्य, धाडस, पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करतो. सव्वाशे कोटी भारतीयांना शांततेने, सुखाने जगता यावे, यासाठी हे जवान आपले तारूण्य, आपले आयुष्य देशावरून ओवाळून टाकतात. दर वर्षी 7 डिसेंबर रोजी सुरक्षा दले ध्वज दिन साजरा करतात. देशाच्या सुरक्षा दलांप्रती अभिमान आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. या वर्षी संरक्षण मंत्रालयाने 1 ते 7 डिसेंबर दरम्यान एक विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील नागरिकांपर्यत पोहोचून त्यांना सुरक्षा दलांबाबत माहिती दिली जाणार आहे, त्यांच्या कामाबाबत जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण आठवडाभर लहान मुले, मोठी माणसे, सर्वांनी राष्ट्रध्वज लावा. देशभरात सैन्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक आंदोलन व्हावे. या प्रसंगी आपण लष्करी दलाचे ध्वज वितरीत करू शकतो. आपल्या अवती-भवती, आपल्या परिचयातील कोणीही सैन्यदलाशी संबंधित असतील तर त्यांचे अनुभव, त्यांच्या धाडसी कारवाया, त्यांच्याशी संबंधित चित्रफिती आणि छायाचित्रे #armedforcesflagday (hashtag armedforcesflagday) येथे पोस्ट करू शकतात. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सैन्यातील लोकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून सैन्याच्या कामाबाबत अधिक माहिती घेता येईल. आपल्या नव्या पिढीला सैन्याबाबत अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ही फार मोठी संधी आहे. आपल्या संरक्षण दलातील सर्व जवानांच्या कल्याणासाठी धन संकलित करण्याचीही हीच संधी आहे. सैनिक कल्याण मंडळामार्फत युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी, जखमी सैनिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. आर्थिक योगदान देण्यासाठी ksb.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. आपण यासाठी रोखरहित पेमेंटसुद्धा करू शकता. या, आज या प्रसंगी आपल्या सशस्त्र सैन्यदलाचे मनोबल उंचावण्यासाठी आपणही योगदान देऊ या. त्यांच्या कल्याणासाठी आपणही हातभार लावू या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस आहे. माझ्या शेतकरी बंधु-भगिनींनाही मी काही सांगू इच्छितो. मृदा अर्थात माती हा पृथ्वीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. आपण जे काही खातो, ते सर्व काही या मातीशी संबंधित आहे. एका प्रकारे संपूर्ण अन्नसाखळीच मातीशी जोडलेली आहे. कल्पना करा, जर जगात पोषक मातीच नसेल तर काय होईल? कल्पना सुद्धा भितीदायक वाटते ना. माती नसली तर झाडे-झुडुपे उगवणार नाहीत, मग मानवी आयुष्याची तर कल्पनाच करायला नको. सजीव कसे तग धरणार? आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वी याबाबत विचार करण्यात आला आणि त्याचमुळे मातीच्या महत्वाबाबत आपण फार पूर्वीपासून, अगदी प्राचिन काळापासून सजग आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये एकीकडे शेतीप्रती, मातीप्रती भक्ती आणि आदराची भावना लोकांच्या मनात अगदी स्वाभाविकपणे असेल, याचे सहज प्रयत्न होत राहिले आणि त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक पद्धतींच्या वापरामुळे मातीचे पोषणही होत राहिले. या देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात दोन बाबींना फार महत्व आहे, आपल्या मातीविषयी भक्तीभाव आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोनातून तिची योग्य देखभाल. आपल्या देशातील शेतकरी परंपरांशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाप्रतीही सजग आहेत, त्याचा शेतीमध्ये वापर करतात, याचा आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील टोहू गाव, भोरंज ब्लॉक आणि तेथील शेतकऱ्यांबद्दल मी ऐकले आहे. तेथील शेतकरी पूर्वी असंतुलीत पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करत होते, त्यामुळे तेथील मातीचा दर्जा खालावला होता. उत्पादन घटत गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आणि मातीची उत्पादकताही कमी होत गेली. गावातील काही जागरूक शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले आणि त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण केले. जेवढी खते, पोषक तत्वे आणि जैविक खते वापरण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला, तो त्यांनी मान्य केला. परिणाम ऐकून आपणा सर्वांनाही आश्चर्य वाटेल की मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी माहिती देण्यात आली, जे मार्गदर्शन मिळाले, त्याच्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. रब्बी 2016-17 मध्ये गव्हाच्या उत्पादनात एकरी तीन ते चार पटीने वाढ झाली आणि उत्पन्नातही एकरी चार ते सहा हजार रूपये इतकी वाढ झाली. त्याचबरोबर मातीचा दर्जाही सुधारला. खतांचा कमी वापर झाल्यामुळे आर्थिक बचतही झाली. माझे शेतकरी बांधव मृदा आरोग्य कार्डवर दिलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आले, हे पाहून मला मनापासून आनंद झाला आहे. सकारात्मक परिणाम पाहून या शेतकऱ्यांचा उत्साहही वाढत आहे. पिकाबद्दल काळजी वाटत असेल तर मातीची काळजी घेतली पाहिजे. आपण या जमिनीची, धरणी मातेची काळजी घेतली तर ती सुद्धा आपली काळजी घेईल, हे आता शेतकऱ्यांनाही पटू लागले आहे. आपल्या मातीची अधिक चांगली माहिती मिळावी आणि त्यानुसार पिक घेता यावे, यासाठी देशभरातल्या 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य कार्ड तयार करून घेतली आहेत. आपण धरणी मातेची भक्ती करतो मात्र युरीयासारखी खते या धरणीमातेच्या आरोग्यासाठी किती अपायकारक आहेत, याचा विचार आपण केला का? आवश्यकतेपेक्षा जास्त युरीयामुळे जमिनीची हानी होते, हे अनेक वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. शेतकरी तर या धरणी मातेचा सुपुत्र आहे. मग तो आपल्या मातेला आजारी कसे पडू देईल? माता आणि पुत्राचे हे संबंध पुनरूज्जीवीत करणे ही काळाची गरज आहे. 2022 सालापर्यंत, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होतील, तोपर्यंत आपल्या शेतीसाठीच्या युरीयाचा वापर निम्म्यावर आणण्याचा संकल्प आमचे शेतकरी करू शकतील का? एकदा धरणी मातेच्या सुपुत्रांनी, शेतकऱ्यांनी हा संकल्प केला की धरणीच्या, जमिनीच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होईल, उत्पादनातही वाढ होईल. शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येईल.
जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, हे आता आपण अनुभवू लागलो आहोत. एक काळ असा होता, जेव्हा दिवाळीपूर्वी थंडी सुरू होत असे. आता डिसेंबर येऊन ठेपला आहे आणि अगदी सावकाश थंडी सुरू होते आहे. थंडी सुरू झाली की अंथरूणातून बाहेर पडावेसे वाटत नाही, हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मात्र अशा ऋतूतही जागरूक असणारे लोक परिणामकारक काम करतात आणि त्यांची उदाहरणे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की मध्य प्रदेशमधील तुषार या अवघ्या ८ वर्षांच्या दिव्यांग बालकाने आपले गाव शौचमुक्त करण्याचा निर्धार केला. इतक्या मोठ्या स्तरावरचे काम आणि एवढा लहानसा मुलगा. मात्र निर्धार आणि संकल्प या सर्वांपेक्षा मोठा होता, सशक्त होता. आठ वर्षांचा मुलगा बोलू शकत नव्हता, पण त्याने शिट्टीचा आधार घेतला. सकाळी 5 वाजता उठून हा मुलगा गावातील घराघरात जाऊन हातवारे करून उघड्यावर शौच न करण्याबद्दल सांगत होता. रोज किमान 30-40 घरांमध्ये जाऊन स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या या बालकाच्या प्रयत्नांमुळे हे कुम्हारी गाव उघड्यावरील शौचमुक्त झाले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी या लहानशा बालकाने खरोखरच प्रेरणादायी काम केले. स्वच्छतेच्या आग्रहाला वय नसते, मर्यादा नसते, हे यावरून दिसून येते. लहान असो किंवा मोठे, स्त्री असो वा पुरूष, स्वच्छता प्रत्येकासाठी महत्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमचे दिव्यांग बंधु-भगिनी दृढ-निश्चयी आहेत, समर्थ आहेत, धाडसी आहेत आणि संकल्पाचे पक्के आहेत. प्रत्येक क्षणी काही नवे शिकायला मिळते. आज ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. खेळ असो, स्पर्धा असो, सामाजिक उपक्रम असो, आमचे दिव्यांग कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. आपणा सर्वांना आठवत असेल, रियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दिव्यांग खेळाडूंनी उत्तम खेळ करत 4 पदकांची कमाई केली होती आणि अंधांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटचा विश्वचषकही त्यांनी पटकावला. देशभरात अनेक प्रकारच्या स्पर्धा सुरू असतात. काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे 17 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध भागांमधून आलेले दिव्यांग बंधू-भगिनी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यात गुजरातमधील 19 वर्षांचे जीगर ठक्कर यांचाही समावेश होता. त्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीत, मात्र त्यांचे धाडस, संकल्प आणि मेहनत बघा. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले 19 वर्षांचे जीगर ठक्कर, त्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीत आणि त्यांनी 11 पदके जिंकली. 70 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या याच कौशल्यामुळे 20-20 पॅरालिम्पीकसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांची निवड केली. 32 पॅरा जलतरणपटूंमध्ये त्यांचा समावेश आहे आणि या सर्वांना गुजरातमधील उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवा जीगर ठक्कर यांच्या या धाडसाला मी अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज दिव्यांगांसाठीच्या उपलब्धतेवर आणि त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त असावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका समावेशक समाजाची निर्मिती व्हावी. ‘सम’ आणि ‘मम’ भावनेतून समाजातील समरसता वाढावी आणि सर्वांनी एकत्रितपणे पुढे चालत राहावे.
काही दिवसांनंतर ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ साजरी केली जाईल. या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब, यांचा जन्म झाला होता. मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईदचा हा सण समाजात शांतता आणि सद्भावना वाढविण्यासाठी आपल्या सर्वांना नवी प्रेरणा देईल, नवी उर्जा देईल, नवा संकल्प करण्याचे सामर्थ्य देईल, अशी आशा मला वाटते.
(फोन-कॉल)
‘नमस्कार प्रधानमंत्री जी , मी कानपुरहून नीरजा सिंग बोलते आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही वर्षभरात ‘मन की बात’च्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातील सर्वात चांगल्या दहा गोष्टी पुन्हा एकदा आम्हाला सांगा. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी पुन्हा आठवतील आणि आम्हाला आणखी काही नवे शिकता येईल. धन्यवाद.
(फोन-कॉल समाप्त)
आपण योग्य तेच बोलताय. 2017 वर्ष संपते आहे, 2018 ची चाहूल लागली आहे. आपण फारच चांगली सूचना केली आहे. आपले बोलणे ऐकल्यानंतर मला त्यात आणखी भर घालावीशी वाटते, बदल करावासा वाटतो. आपल्याकडे गावात जी जुनी-जाणती माणसे असतात, ती नेहमी सांगतात, दु:ख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. दु:ख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. मला वाटते, आपण या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे. आपणही 2018 मध्ये शुभ गोष्टींचे स्मरण करत शुभ संकल्प करत प्रवेश करावा. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे, कदाचित जगभरातही वर्षाच्या अखेरीस सर्व जण आढावा घेतात, चिंतन-मनन करतात, मंथन करतात आणि पुढच्या वर्षासाठी योजना तयार केल्या जातात. आपल्याकडे प्रसार माध्यमे तर वर्षभरातील स्मरणीय घटनांच्या आठवणी नव्याने ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मकही असतात. मात्र 2018 मध्ये प्रवेश करताना आपण चांगल्या गोष्टी आठवत, चांगले करण्याचा विचार करावा, असे तुम्हाला वाटत नाही का? मी आपणा सर्वांना एक सल्ला देतो. ज्या काही 5-10 चांगल्या सकारात्मक बाबी आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील आणि ज्या जाणून घेतल्यावर लोकांच्या मनातही शुभ भावना जागतील. आपण यात योगदान देणार का? या वर्षी आपण आपल्या आयुष्यातील 5 सकारात्मक अनुभव आम्हाला सांगू शकता का? मग ते छायाचित्र असो, लहानसा किस्सा असो, गोष्ट असो किंवा लहानशी ध्वनीचित्रफीत असो. मी निमंत्रित करतो की 2018 चे स्वागत आपल्याला शुभ वातावरणात करायचे आहे, शुभ आठवणींसोबत करायचे आहे. सकारात्मक विचारांसह करायचे आहे. सकारात्मक गोष्टींना उजाळा देऊन करायचे आहे.
या, NarendraModi App वर, MyGov वर किंवा social media वर #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) सह सकारात्मक बाबी शेअर करा. इतरांना प्रेरणा देणाऱ्या घटनांना उजाळा द्या. चांगल्या गोष्टी कराल तर चांगले करावे, असे मनातून वाटेल. चांगल्या गोष्टींमधून अधिक चांगले करण्याची उर्जा मिळते. शुभ-भावना, शुभ-संकल्पांची प्रेरणा देतात. शुभ-संकल्प, शुभ-परिणाम प्रदान करतात.
या, या वेळी #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) पहा. बघा, या वर्षी आपण सगळे मिळून एक जबरदस्त सकारात्मक वातावरण निर्माण करून नव वर्षाचे स्वागत करू. या एकत्रित प्रयत्नांची ताकत आणि त्याचा प्रभाव आपण सगळे मिळून पाहू. मी निश्चितच ‘मन की बात’ च्या पुढच्या अध्यायात#PositiveIndia (हॅशटॅग Positive India) वर आलेले अनुभव देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, पुढच्या महिन्यात, ‘मन की बात’ साठी पुन्हा एकदा आपणा सर्वांशी संवाद साधेन. अनेक गोष्टी बोलायची संधी मिळेल. अनेकानेक आभार!!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! दीपावलीनंतर सहा दिवसांनी साजरा केला जाणारा छठपर्व, आपल्या देशातल्या निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक आहे! ज्यामध्ये आहारापासून वेशभूषेपर्यंत पारंपारिक नियमांचं यामध्ये पालन केलं जातं. छठपूजेचं अनुपम पर्व निसर्ग आणि निसर्गाच्या उपासनेशी पूर्णपणे जोडलं गेलं आहे. सूर्य आणि जल, हे महापर्व छठ उपासनेच्या केंद्रस्थानी आहेत, तर बांबू आणि मातीपासून बनवलेली भांडी आणि कंदमुळं, या पूजाविधीत उपयुक्त ठरणारी सामग्री आहे.आस्थेच्या या महापर्वात उगवत्या सूऱ्याची उपासना आणि मावळत्या सूऱ्याच्या पूजेतून दिला जाणारा संदेश अद्वितीय संस्कारांनं परिपूर्ण आहे. दुनिया तर उगवत्याची पूजा करते, परंतु छठपुजेत आपल्याला त्यांची आराधना करण्याचाही संस्कार देते की, ज्यांचं मावळणं निश्चित आहे. आपल्या जीवनातल्या स्वच्छतेचं महत्वही या सणात सामावलं आहे. छठपुजेपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता, त्याचबरोबर, नदी, तलाव, किनारे, पूजास्थळ असलेल्या घाटांची स्वच्छता सर्व लोक मोठ्या उत्साहानं करतात. सूर्यवंदना अथवा छठपूजा – पऱ्यावरण संरक्षण, रोग निवारण आणि अनुशासनाचं पर्व आहे.
सर्वसामान्यपणे काही मागून खाणं, हे कमीपणाचं, हीन भावाचं समजलं जातं; परंतु छठपुजेत सकाळच्या अर्ध्यानंतर प्रसाद मागून खाणं, ही एक विशेष परंपरा आहे. प्रसाद मागून खाण्याच्यामागे हे कारण सांगितलं जातं की, त्यामुळे अहंकार नष्ट होतो. अहंकार ही एक अशी भावना आहे की, जी व्यक्तीच्या प्रगती मधला अडसर ठरते. भारताच्या या महान परंपरेचा लोकांना अभिमान असणं, हे अत्यंत स्वाभाविक आहे. प्रिय देशबांधवांनो, मन की बात ची प्रशंसा होते, त्यावर टीकाही होत राहिली. परंतु मी जेव्हा ‘मन की बात’ च्या प्रभावाकडे पाहतो, तेव्हा माझा विश्वास दृढ होतो की, देशाच्या जनमानसाबरोबर ‘मन की बात’ शंभर टक्के ॠणानुबंधात बांधली गेली आहे. खादी आणि हातमागाचं उदाहरणं घ्या. गांधी जयंतीला मी नेहमी हातमाग, खादीसाठी आग्रह करतो आणि त्याचा परिणाम काय आहे, हे जाणून आपल्याला आनंदच होईल. मला सांगितलं गेलंय की या महिन्यातल्या 17 ऑक्टोबरला, धनत्रयोदशीच्या दिवशी, दिल्लीच्या खादी ग्रामोद्योग भवन स्टोअरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या विक्रमी विक्रीची नोंद झाली. खादी आणि हातमागाची, एकाच स्टोअरमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणं, हे ऐकून आपल्याला आनंद झाला असेल, संतोष झाला असेल. दीपावली दरम्यान, खादीच्या ‘गिफ्ट कुपन’ मधल्या विक्रीत जवळ जवळ 680 टक्के वाढ झाली आहे. खादी आणि हँडीक्राफ्ट-हस्तकला वस्तूंच्या विक्रीमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी जवळपास 90 टक्के वाढ झाल्याचं दिसतं. आज युवक, वयस्कर, महिला, प्रत्येक वयोगटातले लोक खादी आणि हातमागाला पसंती देतात, हे चित्र पाहायला मिळतं. मी कल्पना करू शकतो की, या व्यवसायातून किती विणकर परिवारांना, गरीब परिवारांना, हातमागावर काम करणाऱ्या कुटुंबाना किती लाभ झाला असेल. पूर्वी ‘खादी फॉर नेशन’ होतं, आणि आम्ही ‘खादी फॉर फॅशन’ विषयी सांगितलं. परंतु, मागच्या काही काळापासूनच्या अनुभवातून मी म्हणू शकतो की, ‘खादी फॉर नेशन’ आणि ‘खादी फॉर फॅशन’ नंतर आता ‘खादी फॉर ट्रान्सफर्मेशन’ ची जागा खादीनं घेतली आहे. खादी गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात, हातमाग गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात, परिवर्तन साधून, त्यांना सक्षम, सशक्त, शक्तिशाली होण्यासाठीचं ते साधन बनते आहे. ग्रामोद्योगासाठी ही मोठी भूमिका आहे.
श्रीमान राजन भट्ट यांनी नरेंद्र मोदी अॅपवर लिहिलंय की, ते माझ्या सुरक्षा दलाबरोबरच्या दीपावलीतल्या अनुभवाविषयी जाणून घेऊ इच्छितात. आणि त्यांना हे ही जाणून घ्यायचं आहे, आमची सुरक्षा दलं दिवाळी कशी साजरी करतात. श्रीमान तेजस गायकवाड यांनीही नरेंद्र मोदी अॅपवर विचारलं आहे की, आमच्याकडची मिठाई सुरक्षा दलापर्यंत पोचवण्याची व्यवस्था होऊ शकते का? आम्हालाही आमच्या वीर सुरक्षा बलाची आठवण येते. आम्हाला वाटतं की, आमच्या घरची मिठाई देशाच्या जवानांपर्यंत पोचायला पाहिजे. दीपावली आपण सर्वांनी खूप उत्साहात साजरी केली असेल. माझ्यासाठीही ही दिवाळी, यावेळी एक विशेष अनुभव घेऊन आली. मला पुन्हा एकदा सीमेवर तैनात शूर सुरक्षा बलांसमवेत दिवाळी साजरी करता आली. यावेळी, जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा बलांसमवेत दीपावली साजरी करणं, माझ्यासाठी अविस्मरणीय राहिलं.
सीमेवर ज्या, कठीण आणि विषम परिस्थितीशी सामना करत, आपलं सुरक्षा बल देशाचं रक्षण करतं, तो संघर्ष, समर्पण आणि त्यागासाठी सर्व देशवासियांसह मी सुरक्षा बलाच्या प्रत्येक जवानाचा आदर करतो. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, निमित्त मिळेल, त्यावेळी जवानांचे अनुभव जाणून घेतले पाहिजे, त्यांची गौरवगाथा श्रवण केली पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल की, आपले जवान केवळ आपल्या सीमेचं रक्षण करत नाहीत, तर विश्वशांतीसाठी महत्वाची भूमिका सांभाळत आहेत. यूएन पीसकीपर म्हणून संपूर्ण जगात ते हिंदुस्थानचं नाव उज्वल करत आहेत. काही दिवसांपूर्वी 24 ऑक्टोबरला जगभरात यूएन डे – संयुक्त राष्ट्र दिवस साजरा झाला. संपूर्ण विश्वात शांतता स्थापित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना, त्यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत सर्वाना माहिती आहे. आणि आपण तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच हे विश्वच माझा परिवार, असं मानणारे आहोत. या विश्वासामुळेच सुरुवातीपासूनच यूएनच्या विविध पुढाकारात, भारत सक्रीय आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहेच की, भारताच्या घटनेची प्रस्तावना आणि यूएन चार्टरची प्रस्तावना या दोन्हीत ‘वुई द पिपल’ या शब्दांनी सुरु होते. भारतानं नारी समानतेवर नेहमीच जोर दिला आहे आणि मानवी हक्काबाबत यूएनचं घोषणापत्र हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्याच्या इनिशियल फ्रेममध्ये जे प्रपोज करण्यात आलं ते म्हणजे ‘‘ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल’’ भारताच्या प्रतिनिधी हंसा मेहता यांच्या प्रयत्नांनी त्यात बदल करण्यात आला आणि नंतर ‘‘ऑल ह्युमन बिईंग्ज आर बॉर्न फ्री अँड इक्वल’’ याचा स्वीकार झाला. तसं पहायला गेलं तर हा छोटासा बदल, परंतु एका सशक्त विचाराचं दर्शन त्यामधून होतं. यू एन अम्ब्रेलाच्या माध्यमातून भारतानं जे महत्वाचं योगदान दिलं ते म्हणजे यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये असलेली भारताची भूमिका! संयुक्त राष्ट्रांच्या शांती-रक्षा मिशनमध्ये, भारतानं नेहमीच सक्रीय भूमिका बजावली आहे. आपल्यापैकी बहुतेकांना बहुधा ही माहिती पहिल्यांदाच मिळाली असेल.
अठरा हजाराहून अधिक भारतीय सुरक्षा बलांनी यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये आपली सेवा दिली आहे. सद्यस्थितीत साधारणपणे सात हजार सैनिक ‘‘यू एन पीसकीपिंग’’ मध्ये जोडले गेलेत आणि संपूर्ण जगात हा तिसरा उच्चांकी क्रमांक आहे. 2017 च्या ऑगस्टपर्यंत, भारतीय जवानांनी, 71 पीसकीपिंग मधल्या किमान 50 ऑपरेशन्समध्ये सेवा रुजू केली आहे. हे शांतीचे प्रयत्न कोरिया, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, काँगो, सायप्रस, लीब्रिया, लेबनॉन, सुदान या काही देशांमधून झाले. काँगो आणि दक्षिण सुदानमध्ये, भारतीय सेनेच्या हॉस्पिटलमध्ये 20 हजार रुग्णांवर उपचार झाले आणि अगणित लोकांना वाचवलं गेलं. भारतीय सुरक्षा बलानी, विविध देशातल्या लोकांची केवळ सुरक्षा केली नाही तर त्या लोकांची मनंही जिंकली. भारतीय महिलांनीही शांतता निर्माण करण्यात महत्वाची, अग्रणी भूमिका निभावली आहे. भारत हा एकमेव देश असा आहे की लीब्रियात शांती-अभियान मिशनमध्ये, भारतानं महिला पोलीस युनिट पाठवलं, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
आणि भारताचं हे पाऊल जगातल्या देशांसाठी प्रेरणा देणारं ठरलं. यानंतर सर्व देशांनी आपली महिला पोलीस युनिट पाठवणं सुरु केलं. भारताची भूमिका केवळ शांती अभियानापुरती संबंधित नाही, तर 85 देशांत शांती-अभियानाचं प्रशिक्षण भारत देतो आहे, हे ऐकून आपल्याला अभिमान वाटेल. महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या या भूमीतून आपल्या बहादूर शांतीरक्षकांनी विश्वभर शांती आणि सद्भावाचा संदेश दिला आहे. शांती-अभियान, हे सोपं काम नाही. आपल्या सुरक्षा रक्षकांना दुर्गम भागात जाऊन हे कार्य करावं लागतं. वेगळ्या-वेगळ्या लोकांच्या सहवासात राहावं लागतं. भिन्न परिस्थिती आणि संस्कृती समजावून घ्यायला लागते. त्यांना तिथल्या आवश्यकता, वातावरणाशी सांभाळून घ्यावं लागतं. आज जेव्हा आमचे बहादूर, यू एन पीसकीपर्सच्या आठवणी काढतात, तेव्हा ते कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना कसे विसरतील? ज्यांनी आफ्रिकेतल्या काँगो इथं शांततेसाठी लढताना आपलं सर्वस्व समर्पित केलं होतं. त्यांच्या स्मृतीनं प्रत्येक देशवासियाची छाती गौरवानं फुलून जाते. ते एकमेव यू एन पीसकीपर होते, वीर पुरुष होते, ज्यांना परमवीर चक्रानं गौरवण्यात आलं. लेफ्टनंट जनरल प्रेमचंदजी यांनी सायप्रसमध्ये विशिष्ट ओळख निर्माण केली. 1989 मध्ये, 72व्या वर्षी त्यांना नामिबियात, ऑपरेशनसाठी फोर्स कमांडर म्हणून नियुक्त केलं आणि त्यांनी, त्या देशाचं स्वातंत्र्य निश्चित करण्यासाठी आपली सेवा दिली. जनरल थिमय्या, जे भारतीय सेनाप्रमुख होते, त्यांनीही सायप्रसमध्ये यू एन पीसकीपिंग फोर्सचं नेतृत्व केलं आणि शांती काऱ्यात सर्वस्व झोकून दिलं. शांती दूताच्या रूपातून नेहमीच भारतानं शांती, एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला. आमचा विश्वास आहे की, प्रत्येकानं शांती, सद्भावानं जगावं आणि अधिक चांगल्या, तसंच शांतीपूर्ण भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं पुढे वाटचाल करावी.
माझ्या प्रिय देशबांधवानो, आपली पुण्यभूमी, अशा महान व्यक्तिमत्वांनी सुशोभित झाली आहे, ज्यांनी निस्वार्थ भावनेनं मानवतेची सेवा केली आहे. सिस्टर निवेदिता, ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो, त्याही या असामान्य लोकांपैकी एक आहेत. त्या आयर्लंडमध्ये मार्गारेट एलिझाबेथ नोबेल म्हणून जन्मल्या. परंतु, स्वामी विवेकानंद यांनी त्यांना निवेदिता हे नाव दिलं. निवेदिताचा अर्थ आहे, पूर्ण रुपात समर्पित! नंतर, त्यांनी नावाला अनुरूप असं कार्य करून स्वतःला सिद्ध केलं. काल सिस्टर निवेदिता यांची दीडशेवी जयंती झाली. स्वामी विवेकानंद यांच्या काऱ्यानं त्या इतक्या प्रभावित झाल्या की, आपल्या सुखी जीवनाचा त्याग केला आणि आपलं जीवन गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केलं. सिस्टर निवेदिता, ब्रिटीश राजमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी खूप व्यथित झाल्या. इंग्रजांनी केवळ आपल्या देशाला गुलाम बनवलं नाही तर त्यांनी आपल्याला मानसिकरित्याही गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीला कमी लेखुन हीन-भावना निर्माण करणं, हे नेहमी चालत आलं होतं. भगिनी निवेदिताजी यांनी भारतीय संस्कृतीच्या गौरवाला पुनर्स्थापित केलं. राष्ट्रीय चेतना जागृत करून लोकांना एकसंध ठेवायचं काम त्यांनी केलं. त्यांनी जगभरातल्या विविध देशात जाऊन सनातन धर्म आणि दर्शनाबाबत होणाऱ्या विरोधी प्रचाराविरुद्ध आवाज उठवला.
प्रसिद्ध राष्ट्रवादी आणि तमिळ कवी सुब्रमण्यम भारती, आपली क्रांती कविता पुदुमर्इ पेन्न, न्यू वूमन आणि महिला सशक्तीकरणासाठी विख्यात आहेत. असं मानलं जातं की, त्यांची प्रेरणा भगिनी निवेदिता या होत्या. भगिनी निवेदिताजी यांनी महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू यांनाही सहाय्य केलं. आपल्या लेख आणि संमेलनाच्या माध्यमातून बसू यांचं संशोधन आणि प्रचारात सहाय्य केलं. भारताची हीच एक सुंदर विशेषता आहे की, आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्मिकता आणि विज्ञान एकमेकांना सहाय्यकारी आहेत. सिस्टर निवेदिता आणि वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू याचं उत्तम उदाहरण आहे. 1899 मध्ये कोलकात्यात भीषण प्लेग झाला. पाहता पाहता शेकडो लोक गतप्राण झाले. सिस्टर निवेदिता यांनी स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता नाले, आणि रस्त्यांच्या सफाईचं काम सुरु केलं. त्या एक अशा महिला होत्या की, आरामशीर जीवन जगू शकत होत्या, मात्र त्या गरिबांच्या सेवेशी जोडल्या गेल्या. लोकांनी, त्यांच्या या त्यागातून प्रेरणा घेऊन सेवा काऱ्यात त्यांना सहाय्य केलं. त्यांनी आपल्या काऱ्यातून लोकांना स्वच्छता आणि सेवेची शिकवण दिली. त्यांच्या समाधीवर लिहिलंय की, ‘‘हियर रिपोजेस सिस्टर निवेदिता हू गेव्ह हर ऑल टू इंडिया’’ – इथं सिस्टर निवेदिता विश्रांती घेत आहेत, ज्यांनी आपलं सर्वस्व भारताला दिलं.’’ निःसंशय, त्यांनी हेच केलं आहे. प्रत्येक भारतीयानं भगिनी निवेदिता यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतः, त्या सेवा-मार्गावर चालायचा प्रयत्न करावा, यासारखी, अशा महान व्यक्तित्वाला, यापेक्षा अधिक उपयुक्त, योग्य अशी श्रद्धांजली असू शकत नाही.
फोन कॉल : माननीय पंतप्रधानजी, माझं नाव डॉक्टर पार्थ शाह आहे. 14 नोव्हेंबर आम्ही बालदिन म्हणून साजरा करतो, कारण हा प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस…या दिवशी जागतिक मधुमेह दिन पाळला जातो. मधुमेह हा केवळ मोठ्यांचा आजार नाही तर बहुतांशी मुलांनाही होतो. या आव्हानासंदर्भात आपण काय करू शकतो?
आपल्या फोन कॉलबद्दल आभार. सर्वप्रथम, आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाच्या सर्व बालकांना खूप शुभेच्छा! मुलं ही नव्या भारत निर्माणाचे हिरो आहेत. पूर्वी आजार मोठ्या वयात व्हायचे, ही आपली चिंता रास्त आहे. आजार जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात यायचे- ते आता लहान मुलांमध्येही दिसत आहेत. मुलांना मधुमेह होतो, हे ऐकून आश्चर्य वाटतं. पूर्वीच्या काळी अशा आजारांना राज-रोग म्हटलं जायचं. राज-रोग म्हणजे असे आजार की, की संपन्न, सुखवस्तू – आरामशीर जीवन जगणाऱ्याना व्हायचे. युवकांमध्येही असे आजार अपवादानेच असायचे. मात्र, आता आमची जीवन शैली बदलली आहे. अशा आजारांना आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून ओळखलं जातं. युवावस्थेत अशा प्रकारचे आजार होणं म्हणजे शारीरिक कृती कमी आणि आहार-विहाराच्या पद्धतीत होणारे बदल! समाज आणि कुटुंबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, ही आवश्यकता आहे. जेव्हा आपण यावर विचार कराल तेव्हा लक्षात येईल की, काहीही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. फक्त आवश्यकता आहे, ‘छोट्या मोठ्या गोष्टी योग्य पद्धतीनं, नियमित करत आपल्या सवयी बदलण्याची, आपला स्वभाव बदलण्याची!
मी तर असं म्हणेन की, कुटुंबांनी असा प्रयत्न जागरूकतेनं करावा की, मुलांना मोकळ्या मैदानात खेळायची सवय लागेल. परिवारातल्या मोठ्या लोकांनीही मुलांशी शक्यतो खेळायचा प्रयत्न करावा. मुलांना उदवाहनानं म्हणजेच लिफ्टनं जाण्यायेण्याऐवजी, जिना चढून जाण्याची सवय लावावी. रात्री भोजनानंतर, पूर्ण परिवारानं मुलांसमवेत चालायला जायचा प्रयत्न करावा. योगा फॉर यंग इंडिया! हा योग, विशेषत: आमच्या युवक मित्रांना निरामय जीवनशैली आत्मसात करायला आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरपासून बचाव करण्यात साह्यकारी होईल. शाळेपूर्वी 30 मिनिटे योग, याची विशेषता ही आहे की, योग सहज आणि सर्वसुलभ आहे. आणि मी हे एवढ्यासाठी सांगतो की, योग, कोणत्याही वयोगटातली व्यक्ती सहजगत्या करू शकते. सहज एवढ्यासाठी की, सोप्या पद्धतीनं शिकता येतो आणि सर्वसुलभ एवढ्यासाठी की, कुठंही तो करता येतो. त्यासाठी विशेष साधन-साहित्याची, मैदानाची आवश्यकता नाही. मधुमेह नियंत्रणासाठी योग, किती उपयुक्त आहे, यावर संशोधन सुरु आहे.
AAIMS मध्येही यावर अभ्यास सुरु आहे. आणि आतापर्यंत आलेले निष्कर्ष बरेच उत्साहवर्धक आहेत. आयुर्वेद आणि योग याकडे केवळ उपचाराच्या माध्यमातून न पाहता, ते आपल्या जीवनात अंगीकारावं.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, खास करून माझ्या युवा मित्रांनो, क्रीडा क्षेत्रात मागच्या काही दिवसात चांगल्या बातम्या आल्यात. विविध क्षेत्रात आपल्या क्रीडापटूंनी देशाचं नाव उज्वल केलं आहे. हॉकीत भारतानं शानदार खेळी करत एशिया कप हॉकी ट्रॉफी जिंकली. आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं आणि याच बळावर भारत दहा वर्षानंतर एशिया कपचा चँम्पियन झाला. यापूर्वी 2003 आणि 2007 मध्ये भारत एशिया कप चँम्पियन झाला होता. या हॉकी चमूला आणि त्यांच्या पथकातल्या साऱ्यांना, देशबांधवांकडून खूप खूप शुभेच्छा!
हॉकीनंतर बॅडमिंटनमध्येही चांगलं वृत्त आहे. बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतनं उत्कृष्ट खेळ करत डेन्मार्क ओपन ट्रॉफी जिंकून देशाच्या गौरवात भर घातली. इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपननंतर त्यांचा हा तिसरा सुपर सिरीज प्रीमियर पुरस्कार आहे. या युवासाथीच्या योगदानाबद्दल आणि भारताचा सन्मान वाढवल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. अभिनंदन करतो.
मित्र हो, या महिन्यात फिफा अंडर सेव्हंटीन वर्ल्ड कपचं आयोजन झालं. जगभरातले अनेक संघ भारतात आले आणि फुटबॉल मैदानावर त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं. मलाही एक सामना पहायची संधी मिळाली. खेळाडू-प्रेक्षकांत प्रचंड उत्साह होता. वर्ल्ड कपचा हा मोठा इव्हेंट, पूर्ण विश्व आपल्याला पाहत होतं. एवढा मोठा सामना आणि युवा क्रीडापटूंची उर्जा, उत्साह, काहीही करण्याची उर्मी हे सर्व पाहून मी मुग्ध झालो. वर्ल्ड कपचं आयोजन यशस्वी झालं आणि सर्व संघांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. भलेही भारताला चषक नाही मिळाला, मात्र भारतीय खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली. भारतासह सर्व जगानं खेळाचा हा महोत्सव एन्जॉय केला आणि ही पूर्ण स्पर्धा फुटबॉल प्रेमींसाठी रोमांचक आणि मनोरंजक झाली… फुटबॉलचं भविष्य उज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंचं, त्यांच्या सहकार्यांचं आणि सर्व क्रीडाप्रेमींचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो, स्वच्छ भारत या विषयावर मला जितके लोक लिहितात, त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी मला ‘मन की बात’ हा कार्यक्रम रोज करावा लागेल आणि केवळ स्वच्छता या विषयावरच मन की बात समर्पित करावा लागेल. काही लहान मुलं त्यांच्या प्रयत्नांचे फोटो पाठवतात तर युवा वर्गाचा एखादा किस्सा त्यामध्ये असतो. कुठे स्वच्छतेबाबतच्या नवीन उपक्रमाची कथा असते तर एखाद्या अधिकाऱ्याच्या जोशामुळे झालेलं परिवर्तनाची बातमी असते. काही दिवसापूर्वीच मला विस्तृत अहवाल प्राप्त झाला, ज्यात महाराष्ट्रातल्या चंद्रपूर किल्ल्यामधल्या कायापालटाची कहाणी आहे. तिथं इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूर किल्ल्यात स्वच्छता अभियान केलं. दोनशे दिवस चाललेल्या या अभियानात लोकांनी न थांबता, न थकता, एका संघभावनेनं किल्ल्याच्या स्वच्छतेचं काम केलं. सलग दोनशे दिवस! आधीचे आणि आताचे असे दोन्ही फोटो त्यांनी मला पाठवले. फोटो पाहताना मी मंत्रमुग्ध झालो आणि जो कुणी हे फोटो पाहिल, ज्याच्या मनात आसपासच्या अस्वच्छतेनं निराशा आली असेल, त्यालाही कधी वाटलं असेल की स्वच्छतेचं स्वप्न कसं पूर्ण होईल- तर माझं लोकांना सांगणं आहे की, इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या युवकांची, त्यांनी घेतलेल्या कष्टांची, उमेदीची, त्यांच्या संकल्पाची जिवंत प्रतिमा या फोटोतून तुम्ही पाहू शकता. ते पाहून आपल्यातली निराशा विश्वासात बदलेल. स्वच्छतेचे हे भगीरथ प्रयत्न, सौंदर्य, सांघिकता आणि सातत्याचं अद्भुत उदाहरण आहे. किल्ला हे तर आमच्या वैभवाचं प्रतीक! ऐतिहासिक वारश्यांची, वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासीयांची आहे. मी इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या सर्व टीमला आणि चंद्रपूरवासीयाना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशबांधवानो, आगामी चार नोव्हेंबरला आपण सर्व गुरु नानक जयंती साजरी करू. गुरु नानक देवजी, शिखांचे पहिले गुरूच नाहीत तर ते जगद्गुरू आहेत. त्यांनी संपूर्ण मानवता कल्याणाचा विचार केला, त्यांनी सर्व जातींना एकसमान संबोधलं. महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानावर त्यांनी भर दिला. गुरु नानक देवजी यांनी 28 हजार किलोमीटर्सची यात्रा केली आणि या प्रवासादरम्यान, त्यांनी सत्य मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांशी संवाद साधला, त्यांनी सत्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवला! सामाजिक समतेचा संदेश दिला आणि ही शिकवण केवळ बोलून दाखवली नाही तर आपल्या काऱ्यातून दाखवली. त्यांनी लंगर सुरु केला, त्यातून लोकांमध्ये सेवा-भाव निर्माण झाला. एकत्र बसून भोजन ग्रहण केल्यामुळे लोकांमध्ये एकता आणि समानतेचा भाव जागृत झाला. गुरु नानक देवजींनी सार्थक जीवनाचे तीन संदेश दिले- परमात्म्याचं नामस्मरण करा, श्रम करा, काम करा, आणि गरजवंताना सहाय्य करा. आपली तत्वं सांगण्यासाठी गुरु नानक देवजींनी ‘गुरबाणी’ ची रचना केली. येणाऱ्या 2019 मध्ये आपण गुरु नानक देवजी यांचं साडेपाचशेवं प्रकाश वर्ष साजरं करणार आहोत. चला तर मग, आपण त्यांच्या संदेश आणि शिकवणीच्या मार्गावर वाटचालीचा प्रयत्न करूयात.
माझ्या प्रिय देशबांधवानो, दोन दिवसांनी म्हणजे 31 ऑक्टोबरला आपण सरदार वल्लभभाई पटेलजींची जन्म-जयंती साजरी करू. आपल्याला माहिती आहे की, अखंड आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचला होता. भारतमातेच्या या महान संतानाच्या जीवनातून आपण आज खूप काही शिकू शकतो. 31 ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधीही जग सोडून गेल्या. सरदार वल्लभभाई पटेल यांची विशेषता म्हणजे, ते केवळ परिवर्तनवादी विचार देत नसत, तर ते साध्य करण्यासाठी जटील समस्येतून व्यावहारिक उपाय शोधण्यात ते वाकबगार होते. विचारांना साकार करणं यात ते कुशल निपुण होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एका सूत्रात गुंफण्याचं कार्य केलं. हे सुनिश्चित केलं की, कोट्यवधी भारतीयांना एक राष्ट्र आणि एक संविधान यांच्या छत्रछायेत आणता येईल. त्यांच्या निर्णयक्षमतेनं सर्व अडचणींना पार करण्याचं सामर्थ्य त्यांनी दिलं. जिथं सन्मान करण्याची आवश्यकता होती, तिथं सन्मान केला. जिथं बळाचा प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली, तिथं त्यांनी बळाचा वापर केला. त्यांनी एक उद्दिष्ट निश्चित केलं आणि त्या उद्दिष्टाबरोबर दृढनिश्चयानं ते मार्गस्थ झाले. देशाला एकत्रित ठेवायचं कार्य केवळ तेच करू शकत होते. त्यांनी अशा एका राष्ट्राचं स्वप्न पाहिलं की, जिथले सर्व लोग समान असतील. मला असं वाटतं की, सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार सदा सर्वदा प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी म्हटलं होतं, ‘‘जाती-पंथाचा कोणताही भेद आम्हाला थांबवू शकत नाही, सर्व भारताची मुलं-मुली आहेत, आपण देशावर प्रेम केलं पाहिजे आणि परस्पर प्रेम-सद्भावनेवर भविष्य घडवलं पाहिजे. सरदार साहेबांचे हे विचार आजही आमच्या न्यू इंडियाच्या व्हीजनसाठी प्रेरक आहेत, समयोचित आहेत. आणि त्यांचा जन्मदिवस ‘‘राष्ट्रीय एकता दिवस’’ म्हणून साजरा होतो. देशाला अखंड राष्ट्राचं स्वरूप देण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्तानं, 31 ऑक्टोबरला देशभर ‘‘रन फॉर युनिटी’’ चं आयोजन केलं जाईल, ज्यामध्ये देशभरातून बालक, युवा, महिला, सर्व वयोगटातले नागरिक सहभागी होतील. माझा सर्वांना आग्रह आहे की, आपणही रन फॉर युनिटी – आपल्या सद्भावनेच्या या उत्सवात सहभागी व्हावं.
प्रिय देशबांधवानो, दिवाळी सुट्टीनंतर, नव्या संकल्पासह, नव्या निश्चयासह, आपण सर्व दैनंदिन जीवनात आला असाल. माझ्या वतीनं देशबांधवाना त्यांची सर्व स्वप्नं साकार होवो, अशी शुभकामना! खूप खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार! आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात‘ करता-करता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आज हा 36वा भाग आहे. ‘मन की बात’ एकप्रकारे भारताची सकारात्मक शक्ती आहे, देशाच्या कानाकोप-यामध्ये जी भावना आहे, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, कुठे-कुठे तक्रारीही आहेत; लोकांच्या मनात जो भावतरंग निर्माण होतो, ‘मन की बात’ मुळे त्या सर्व भावनांशी मला जोडण्याची एक मोठी, अद्भूत संधी मिळाली आणि ही गोष्ट माझ्या मनाची आहे, असे मी कधी म्हणालो नाही. ही ‘मन की बात‘ देशवासियांच्या मनाशी जोडली गेली आहे. त्यांच्या भावनांशी जोडली आहे, त्यांच्या आशा-अपेक्षांशी जोडली गेली आहे आणि ज्यावेळी ‘मन की बात’ मध्ये मी काही सांगतो, त्यावेळी देशाच्या प्रत्येक भागातून लोक मला आपली गोष्ट पाठवतात, त्यापैकी आपल्याला कदाचित मी खूपच कमी सांगू शकतो, परंतु मला तरी खूप मोठा खजिना मिळतो. मग ई-मेल ने असो, दूरध्वनीच्या माध्यमातून असो, ‘मायगव्ह’वर असो, नरेंद्र मोदी अॅपवर असो, इतक्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यापैकी बहुतांश तर मला प्रेरणा देणाऱ्याव असतात. खूप गोष्टी, सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी असतात. काही व्यक्तिगत तक्रारीही असतात. तर काही सामुहिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी केल्या जातात आणि मी तर महिन्यातून एकदा अर्धा तास आपला घेतो, परंतु लोक तीस दिवस ‘मन की बात’ वर आपल्या गोष्टी पाठवत असतात. त्याचा परिणाम असा झाला आहे की, सरकारमध्येही संवेदनशीलता आली आहे. समाजाच्या सर्व स्तरामध्ये दुर्लक्षित झालेल्या क्षमतेकडे आता लक्ष जात आहे, असा सहज अनुभव येत आहे आणि म्हणून ‘मन की बात’चा हा तीन वर्षांचा प्रवास देशवासियांच्या भावनांचा, अनुभूतीचा एक आगळा प्रवास आहे. कदाचित इतक्या कमी कालावधीत देशाच्या सामान्य माणसांच्या भावनांना समजून-जाणून घेण्याची संधी मला प्राप्त झाली आहे आणि त्यासाठी मी देशवासियांचा खूप आभारी आहे. ‘मन की बात’मध्ये मी नेहमीच आचार्य विनोबा भावे यांच्या एका गोष्टीचे स्मरण ठेवले आहे. आचार्य विनोबा नेहमी म्हणायचे, ‘ अ-सरकारी, असरकारी’ म्हशणजे परिणाम करणारे. मी सुद्धा ‘मन की बात’ ला या देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय रंगापासून ही गोष्ट दूर ठेवली आहे. त्या त्यावेळी जो विषय पेटलेला आहे, ज्याविषयी आक्रोश आहे, त्यामध्ये वाहून जाण्याऐवजी एका स्थिर मनाने, आपल्याशी संलग्न राहण्याचा, जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आता तीन वर्षानंतर, समाज संशोधक, विद्यापीठे, संशोधक बुद्धिजीवी, माध्यम तज्ज्ञ नक्कीच याचे विश्लेषण करतील, हे मला माहिती आहे. अधिक- उणे अशा प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करतील आणि माझा विश्वास आहे की, असा साकल्याने केलेला विचारच भविष्यात ‘मन की बात’ साठी अधिक उपयोगी ठरेल. त्यामधून नवे चैतन्य, नवी ऊर्जा मिळेल. मी एकदा ‘मन की बात’ मध्ये सांगितले होते की, आपण भोजन करताना ते वाया जाऊ नये म्हणून जितके आवश्यक आहे, तितकेच घ्यावे, अन्न वाया जात आहे, याविषयी चिंता करण्याची गरज आहे. यानंतर मी पाहिले की, देशाच्या कानाकोपऱ्याततून मला खूप मोठ्या संख्येने पत्रे आली. अनेक सामाजिक संघटना, अनेक नवयुवक याविषयी आधीपासूनच काम करत आहेत. जे अन्न ताटामध्ये टाकून दिले जाते, ते एकत्र करून त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करता येईल, यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत, हे माझ्या लक्षात आले. मला आनंद झाला. खूप खूप आनंद झाला.
एकदा मी ‘मन की बात’मध्ये महाराष्ट्राचे एक सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान् चंद्रकांत कुलकर्णी यांच्याविषयी बोललो होतो. त्यांना सोळा हजार रूपये निवृत्ती वेतन मिळते. आपल्या या निवृत्ती वेतनामधून, त्यांनी पाच हजार रुपयांचे 51 पोस्ट डेटेड चेक स्वच्छता कार्यासाठी दान म्हणून दिले होते. आता यानंतर स्वच्छतेसाठी, अशा प्रकारे काम करण्यासाठी कितीतरी लोक पुढे आले आहेत, हे मी पाहतो आहे.
एकदा मी हरियाणाच्या एका सरपंचाची ‘सेल्फी विथ डॉटर’ ही गोष्ट पाहिली आणि मी ‘मन की बात’मध्ये हे सगळ्यांना सांगितले. पाहता पाहता, फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये ‘सेल्फी विथ डॉटर’ अशी मोठी मोहीमच सुरू झाली. हा फक्त समाज माध्यमाचा मुद्दा नाही. प्रत्येक कन्येला एक नवीन आत्मविश्वास, नवा अभिमान निर्माण करणारी ही घटना बनली. प्रत्येक माता-पित्याला आपल्या कन्येबरोबर सेल्फी काढावासा वाटू लागला. प्रत्येक कन्येला माझेही महात्म्य आहे, मलाही काही महत्व आहे, असे वाटू लागले.
काही दिवसांपूर्वी मी भारत सरकारच्या पर्यटन विभागाबरोबर चर्चा करत होतो. मी बाहेर फिरायला जाणाऱ्याी लोकांना सांगितले, तुम्ही ‘अतुलनीय भारत’ या विषयावर जिथे कुठे जाणार, तिथली छायाचित्रे पाठवा. लाखों छायाचित्रे आली. भारताच्या प्रत्येक कोनाकोपऱ्याेतून आली. ही एकप्रकारे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांासाठी एक खूप मोठी ठवे आहे. एक छोटीशी घटना किती मोठी चळवळ निर्माण करू शकते, याचा या ‘मन की बात’मुळे मी अनुभव घेतला. ‘मन की बात’ सुरू होऊन तीन वर्षे झाली, याविषयी आज मी विचार करीत होतो, त्यावेळी गत तीन वर्षातल्या अनेक घटना माझ्या मनाला स्पर्शून गेल्या. देश योग्य मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विचार केला जात आहे. देशाचा प्रत्येक नागरिक दुसऱ्यामच्या भल्यासाठी, समाजातील चांगल्या गोष्टींसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, काही ना काहीतरी करू इच्छितो. माझ्या या तीन वर्षांच्या ‘मन की बात‘च्या अभियानामध्ये मी देशवासियांना समजून घेतले आहे, जाणून घेतले, त्यांच्याकडून शिकलो आहे. कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी संपत्ती असते. एक खूप मोठी ताकद असते. मी देशवासियांना अगदी हृदयापासून नमन करतो.
मी एकदा ‘मन की बात‘ मध्ये खादीविषयी चर्चा केली होती. खादी एक वस्त्र नाही तर, विचार आहे, असे म्हणालो होतो. मी पाहिले की, अलिकडच्या दिवसांमध्ये खादीविषयी रूची वाढली आहे. मी अगदी स्वाभाविकपणे सांगितले होते की, कोणी खादीधारी बनावे, म्हणून मी काही हे सांगत नाही. परंतु अनेकानेक प्रकारचे कापड असते. त्यामध्ये खादी एक का असू नये? घरामध्ये चादर असेल, रूमाल असेल, पडदे असतील. अनुभव असा आहे की, तरूण पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढले आहे. खादीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याचा संबंध गरीब कुटुंबाना थेट रोजगार मिळण्याशी आहे. 2 ऑक्टोबरपासून खादीला सवलत दिली जाते. खूप चांगली, भरपूर सवलत दिली जाते. मी पुन्हा एकदा आग्रह करू इच्छितो की, खादीचे जे अभियान सुरू झाले आहे, ते आपण असेच यापुढेही सुरू ठेवावे. खादीची खरेदी आपण केली तर गरीबाच्या घरामध्ये दीपावलीचा दीपक उजळणार आहे, या भावनेतून आपण काम केले पाहिजे. या कार्यामधून आपल्या देशातल्या गरीबाला ताकद मिळणार आहे आणि म्हणूनच हे काम आपल्याला केले पाहिजे. या खादीविषयी आकर्षण वाढल्यामुळे खादी क्षेत्रामध्ये काम करणारे, तसेच भारत सरकारमधील खादीशी संबंधित असणाऱ्या लोकांमध्ये एका नव्या पद्धतीने विचार करण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. नवे तंत्रज्ञान कसे आणता येईल, उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, सौर ऊर्जेवर हातमाग कसे आणता येईल? जुनी 20 -20, 25-25, 30-30 वर्षांपासून बंद पडलेली पद्धती आहे, ती आता पुनर्जीवित कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे.
उत्तर प्रदेशात वाराणसी सेवापूरमध्ये आता सेवापुरीचा खादी आश्रम 26 वर्षांपासून बंद पडला होता. परंतु आता तो पुनर्जीवित केला गेला आहे. त्यााच्यालशी अनेक संघटनांना जोडण्यात आले आहे. अनेक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. काश्मीरमधल्या पंपोर इथे खादी आणि ग्रामोद्योगने बंद पडलेले आपले प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू केले आणि काश्मीरकडे तर या क्षे़त्रामध्ये योगदान देण्यासाठी खूप काही आहे. आता हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्यामुळे नवीन पिढीला आधुनिक पद्धतीने निर्मिती करणे, कापड विणणे, नव्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. मला यामुळे खूप चांगले वाटते की, मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊस ज्यावेळी भेटवस्तू देतात, त्यावेळी त्यांनी अलिकडे खादीच्या वस्तू देण्यास प्रारंभ केला आहे. लोकांनीही एकमेकांना भेट देताना खादीच्या वस्तू द्यायला सुरूवात केली आहे. अगदी सहजपणाने एखादी गोष्ट कशी पुढे जाऊ शकते, याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या महिन्यात ‘मन की बात‘ मध्ये आपण सगळ्यांनी एक संकल्प केला होता आणि आपण ठरवले होते की, गांधी जयंतीच्या आधी 15 दिवस देशभरामध्ये स्वच्छता उत्सव साजरा करणार. स्वच्छतेने जन-मनाला जोडणार. आपल्याव आदरणीय राष्ट्रपतीजींनी या कार्याला प्रारंभ केला आणि संपूर्ण देश त्याजमध्येज सहभागी झाला. अबाल-वृद्ध, पुरूष असो की महिला, शहर असो की खेडेगाव, प्रत्येकजण आज या स्वच्छता मोहिमेचा भाग बनले आहेत. मी ज्यावेळी म्हणतो की, ‘संकल्प से सिद्धी’ आता ही स्वच्छता मोहीम एक संकल्प-सिद्धीच्या दिशेने कशी पुढे जात आहे, हे आपण सगळे पाहत आहोत. प्रत्येकजण या आंदोलनाचा स्वीकार करतोय, सहकार्य करतोय आणि साकार करण्यासाठी काही ना काहीतरी आपले योगदान देत आहे. मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आभार मानतो. परंतु त्याबरोबरच देशाच्या प्रत्येक वर्गाने याला आपले काम मानले आहे. प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे. मग ती व्यक्ती क्रीडा क्षेत्रातली असेल, की सिनेजगतामधले लोक असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, शाळां असेल, महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, बळीराजा असेल, श्रमजिवी असेल, अधिकारी असेल, लिपिक असेल, पोलीस असेल, लष्करी जवान असेल, प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी एकप्रकारे दबाव निर्माण झाला आहे; इतका की, आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असेल तर लोक थेट विचारतात. तिथे काम करणाऱ्यांकमध्ये आता दबाव जाणवू लागला आहे. मी अशा गोष्टींना चांगले मानतो आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये पहिल्या केवळ चारच दिवसांमध्ये जवळपास 75 लाखांपेक्षा जास्त लोक, 40 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रमांमधून सहभागी झाले आणि असे मी पाहिले आहे की, काही लोक तर सातत्याने काम करीत आहेत, योग्य तो परिणाम येईपर्यंत काम करतच राहणार असा निर्धार या लोकांनी केला आहे. यावेळी आणखी एक गोष्ट पाहिली. एक गोष्ट असते की, आपण कुठेतरी स्वच्छता करायची, दुसरी गोष्ट असते की, आपण जागरूक राहून अस्वच्छता नाही करायची, परंतु स्वच्छता जर स्वभाव बनवायचा असेल तर एका वैचारिक आंदोलनाचीही आवश्यकता असते. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’च्या अभियानाच्याह जोडीने अनेक स्पर्धा झाल्या. अडीच कोटींपेक्षा जास्त मुलांनी स्वच्छता या विषयावरच्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. हजारो मुलांनी चित्रे काढली. आपल्या कल्पनांचा वापर करून स्वच्छता विषयावर चित्रे काढली. अनेक लोकांनी कविता लिहिल्या आणि या दिवसांमध्ये मी तर आपल्या बालसाथीदारांनी, लहान-लहान बालकांनी जी चित्रे पाठवली आहेत, ती समाज माध्यमांमध्ये पोस्ट करतोय. त्यांचा गौरव करीत आहे. ज्यावेळी स्वच्छतेचा विषयी येतो, त्यावेळी मी प्रसार माध्यमातल्या लोकांचे आभार मानणे कधीही विसरत नाही. या लोकांनी हे आंदोलन खूप चांगल्या भावनेने पुढे नेले आहे. आपापल्या पद्धतीने तेही या स्वच्छता आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. आमच्या देशातली इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, मुद्रित प्रसार माध्यमे देशाची किती मोठी सेवा करू शकतात, हे या ‘स्वच्छता ही सेवा’ आंदोलनामध्ये आपण पाहू शकतो. अलिकडेच काही दिवसांपूर्वी माझे कोणीतरी श्रीनगरचा 18 वर्षाचा नवयुवक बिलाल डार याच्याविषयी माहिती देवून लक्ष वेधून घेतले. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की, श्रीनगरच्या नगरपालिकेने बिलाल डार या तरूणाला स्वच्छतेसाठी आपला ‘सदिच्छा दूत’ म्हणून बनवले आहे. आता ज्यावेळी ‘सदिच्छा दूत’ याविषयी बोलले जाते, त्यावेळी आपल्याला वाटते, की कदाचित हा युवक चित्रपट कलाकार असेल किंवा कदाचित तो क्रीडाजगताचा नायक असेल. नाही, असे काहीही नाही. बिलाल डार आपल्या वयाच्या 12-13 व्या वर्षापासून गेली पाच-सहा वर्षे स्वच्छतेचे काम करतोय. आशियातला सर्वात मोठा तलाव श्रीनगरजवळ आहे, या तलावामध्ये प्लॅस्टिक असेल, पॉलिथीन असेल, वापरलेल्या बाटल्या असतील, कचरा, घाण असेल तो सगळे काही काढून तलाव स्वच्छ करतोय. त्यातून थोडीफार कमाईही करतो. कारण त्याच्या वडिलांचा फारच लवकर कर्करोगाने मृत्यू झाला आहे. परंतु बिलालने जगण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे साधन शोधतानाच त्याची सांगड स्वच्छतेशी घातली आहे. बिलाल दरवर्षी 12 हजार किलोपेक्षा जास्त कचरा साफ करतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. श्रीनगर नगरपालिकेचेही मी अभिनंदन करतो. स्वच्छतेविषयी बिलालसारख्यास श्रमजीवी युवकाला सदिच्छा दूत बनवण्याची कल्पना पुढे आणून त्यांनी हे पाऊल उचलले हे विशेष आहे. श्रीनगर हे पर्यटनाचे केंद्र आहे. हिंदुस्तानच्या प्रत्येक नागरिकाला श्रीनगरला जावे, असे मनात असते आणि तिथेच स्वच्छतेचे इतके मोठे काम व्हावे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आनंद आहे की, त्यांनी बिलाल याला फक्त सदिच्छा दूत बनवले असे नाही. स्वच्छतेचे काम करणाऱ्या बिलाल याला यावेळी एक गाडी दिली आहे, गणवेश दिला आहे आणि तो इतर ठिकाणी जावूनही लोकांना स्वच्छतेविषयी शिक्षित करतो. स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्याच्या शिकवण्याचा परिणाम दिसून येईपर्यंत तो पाठपुरावा करीत राहतो. बिलाल डार हा वयाने लहान आहे, परंतु स्वच्छतेची आवड असणाऱ्याा प्रत्येकाच्या दृष्टीने तो प्रेरणा बनला आहे. मी बिलाल डार याचे खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ही गोष्ट आपण स्वीकार केली पाहिजे की, भावी इतिहास हा इतिहासाच्या गर्भातून जन्म घेत असतो आणि ज्यावेळी इतिहासाचा विषय निघतो, त्यावेळी महापुरूषांचे स्मरण होणे तर अतिशय स्वाभाविक आहे. हा ऑक्टोबर महिना आपल्या अनेक महापुरूषांचे स्मरण करण्याचा महिना आहे. महात्मा गांधी यांच्यापासून ते सरदार पटेल यांच्यापर्यंत या ऑक्टोबरमध्ये इतके महापुरूष आमच्यासमोर आहेत. या महापुरूषांनी 20 व्या आणि 21 व्या शतकामध्ये आम्हा लोकांना दिशा दाखवली. आमचे नेतृत्व केले. आम्हाला मार्गदर्शन केले आणि देशासाठी त्यांनी खूप कष्ट झेलले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. 11 ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे आणि 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. नानाजी आणि दीनदयाळजी यांचे तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या सगळ्या महापुरूषांचा एक केंद्र-बिंदू कोणता होता? त्यां च्याळमध्येा एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देशासाठी जगायचे, देशासाठी काहीतरी करायचे आहे, केवळ उपदेश द्यायचा नाही. आपल्या जगण्यातून, आयुष्याद्वारे काही करून दाखवायचे. गांधीजी, जयप्रकाशजी, दीनदयाळजी ही मंडळी असेच महापुरूष आहेत. ते सत्तास्थानांपासून कैक कोस दूर राहिले आहेत. परंतु जन-जीवनाबरोबर मात्र क्षणोक्षणी जगत राहिले. संघर्ष करत राहिले आणि ‘सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय’ असे काही ना काहीतरी करत राहिले. नानाजी देशमुख राजकीय जीवन सोडून ग्रामोदयच्या कार्यात मग्न राहिले आणि ज्यावेळी आज त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे, त्यावेळी त्यांच्या ग्रामोदयाच्या कामाबद्दल आदर वाटणे खूप स्वाभाविक आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती श्रीमान अब्दुल कलामजी ज्यावेळी नवयुवकांशी संवाद साधत होते, त्यावेळी नेहमीच नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाविषयी बोलत असत. मोठ्या आदराने ते नानाजींचा, त्यांीच्याय कामाचा उल्लेख करीत असत आणि ते स्वतःसुद्धा नानाजींचे कार्य पाहण्यासाठी गावांमध्ये गेले होते.
दीनदयाळ उपाध्यायजी हे महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या माणसाविषयी बोलत होते. दीनदयाळजी ही समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गरीब, पीडित, शोषित, वंचित यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बोलायचे; हा बदल मग – शिक्षणाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणता येवू शकते, याची चर्चा करीत होते. या सर्व महापुरूषांचे स्मरण करणे म्हणजे उपकार नाही. या महापुरूषांचे स्मरण आपण यासाठी केले पाहिजे की, आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. पुढे जाण्याची दिशा मिळाली पाहिजे.
यापुढच्या ‘मन की बात‘मध्ये मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जरूर बोलणार आहे. मात्र 31 ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये ‘रन फॉर युनिटी’ म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना राबवली पाहिजे. देशाच्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने ‘रन फॉर युनिटी’चे कार्यक्रम झाले पाहिजेत. ऋतूही असा आहे की, धावताना मोठी मौज वाटणार आहे. सरदारसाहेबांसारखी लोहाची शक्ती मिळवण्यासाठी हेही आवश्यक आहे. सरदारसाहेबांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले होते. आता आपणही एकतेसाठी धावून एकतेचा मंत्र पुढे नेला पाहिजे.
आपण लोक खूपच सहजपणाने, स्वाभाविकपणे म्हणतो, ‘विविधतेमध्ये एकता-भारताची विशेषता’. विविधतेचा आपण गौरव करतो, परंतु आपण कधी या विविधतेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे का? मी हिंदुस्तानच्या माझ्या या देशवासियांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की, विशेष करून माझ्या या युवापिढीला सांगू इच्छितो की, आपण एका जागृत अवस्थेमध्ये आहोत. या भारताच्या विविधतेचा अनुभव घ्या. त्या विविधतेला स्पर्श करा, त्याचा सुगंध अनुभवा, आपल्या लक्षात येईल, आपल्या आतमध्ये दडलेल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपल्या देशामधली ही विविधता एक खूप मोठी शाळा म्हणून काम करते. उन्हाळी सुट्टी आहे, दिवाळीचे दिवस आहेत, आपल्या देशात कुठे ना कुठे बाहेर जाण्याचे ठरतेच. लोक पर्यटक म्हणून बाहेरगावी जातातच आणि ते खूप स्वाभाविक आहे. परंतु कधी कधी चिंतेचा विषय वाटतो की, आपले लोक तर आपला देश पहातच नाहीत. देशातली विविधता जाणून घेतच नाहीत. देश समजून घेत नाहीत. मात्र चकचकाटाच्या प्रभावाखाली येऊन परदेशवारी करणे त्यांना जास्त आवडते. तुम्ही बाहेरच्या देशात जरूर जा, माझा त्याला विरोध नाही. परंतु कधीतरी आपल्या देशातली ठिकाणेही पाहावीत की! उत्तर भारतातल्या व्यक्तीला दक्षिण-भारत कसा आहे, हे माहिती आहे का? पश्चिम भारतातल्या व्यक्तीला पूर्व-भारतामध्ये काय आहे हे माहिती आहे का? आमचा देश किती विविधतेने नटलेला आहे.
महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या आयुष्याचकडे पाहिले तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात येते ती म्हणजे, या सगळ्यांनी ज्यावेळी भारत भ्रमण केले, त्यावेळी त्यांना भारत पाहून-समजून घेता आला आणि त्याचवेळी त्यांना या भारतासाठीच जगायचे आणि या देशासाठीच प्राण अर्पण करायचे अशी एक नवी प्रेरणा मिळाली. या सर्व महापुरूषांनी भारताचे व्यापक भ्रमण केले होते. आपल्या कार्याच्या प्रारंभीच त्यांनी भारत जाणून, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्यामध्येच भारत जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कधी आपण आपल्या देशाच्या विविध राज्यांना, विविध समाजांना, समुदायांना, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, यांच्याकडे एक विद्यार्थी म्हणून पाहून त्या शिकण्याचा, समजून घेण्याचा, तसे जगण्याचा प्रयत्न करू शकतो का ?
पर्यटनामध्ये मूल्यवर्धन अशाचवेळी होईल की, ज्यावेळी आपण फक्त मुलाखतकर्ता म्हणून परमुलुखात न जाता, एक विद्यार्थी म्हणून जावू आणि त्यांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला हिंदुस्तानातल्या पाचशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमधे जाण्याची संधी मिळाली असेल. साडेचारशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये तर मला रात्रीचा मुक्काम करण्याचीही संधी मिळाली आहे आणि आज ज्यावेळी मी भारतामध्ये ही मोठी जबाबदारी सांभाळतोय, त्यावेळी केलेल्या भ्रमंतीचा अनुभव मला खूप कामी येत आहे. कोणतीही गोष्ट समजण्यासाठी मला खूप सोपे जाते. अजिबात वेळ लागत नाही. तुम्हा सगळ्यांना माझा आग्रह आहे की, या विशाल भारतामध्ये ‘‘विविधतेमध्ये एकता’’ अशी फक्त घोषणा नाही, आपल्या अपरंपार शक्तीचे भंडार आहे. या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्या. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ याचे स्वप्न यामध्येच दडलेले आहे. आपल्याकडे खाण्या-पिण्याचे कितीतरी प्रकार आहेत. पूर्ण आयुष्यभर रोज एक नवनवा पदार्थ आपण खात राहिलो तरी इतके असंख्य प्रकार आहेत की पुन्हा पहिला पदार्थ येणार नाही. आता, ही आमच्या पर्यटनाची एक मोठी ताकद आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की, या सुट्टीमध्ये घराबाहेर जायचे म्हणून नाही, फक्त एक बदल पाहिजे, म्हणून घराबाहेर जायचे असे नाही, तर काही जाणून घेण्यासाठी, काही समजून घेण्यासाठी म्हणून बाहेर पडा. भारताला आपल्या आतमध्ये सामावून घ्या. कोटी कोटी जणांच्याक विविधतेला आपल्या आतमध्ये जागा द्या, अगदी आत्मसात करा. या अनुभवांमुळे आपले जीवन समृद्ध होईल. आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारतील आणि अनुभवापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोण असू शकतो? सामान्यपणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत असते. लोक बाहेर पडतात. मला विश्वास आहे की, यावेळीही तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर माझ्या त्या पहिल्या् अभियानाला पुढे घेवून जाणार आहात. तुम्ही कुठेही जा, आपला अनुभव ‘शेअर’ करा. फोटो ‘शेअर’ करा. ‘हॅश टॅग इनक्रेडिबलइंडिया’ यावर तुम्ही छायाचित्रे जरूर पाठवा. तिथल्या लोकांशी तुमचे भेटणे झाले, तर त्यांची छायाचित्रे पाठवा. फक्त इमारतींची छायाचित्रे नाहीत, फक्त नैसर्गिक सौदर्यांची छायाचित्रे नाहीत तर तिथल्या जनजीवनाविषयी काही विशेष गोष्टी तुम्ही लिहा. आपल्या प्रवासाविषयी चांगले निबंध लिहून काढा. ‘मायगव्ह’वर पाठवून द्या. नरेंद्र मोदी अॅपवर पाठवून द्या. माझ्या मनात एक विचार येत आहे की, आपण भारतामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या राज्यातली सात उत्तमातील उत्तम पर्यटन स्थाने कोणती होऊ शकतात. प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्यातल्या त्या सात विशेष स्थानांविषयी माहिती असली पाहिजे. शक्य झालं तर त्या सातही स्थानी गेले पाहिजे. आपण या स्थानांविषयी काही माहिती देवू शकतो का? नरेंद्र मोदी अॅपवर ही माहिती आपण उपलब्ध करू शकतो का? हॅशटॅग इंनक्रेडिबलइंडिया यावर ही माहिती आपण देवू शकतो का? तुम्ही विचार करा, एका राज्यातले सगळे लोक अशी चांगली माहिती देवू लागले तर मी सरकारमध्ये सांगेन की, आलेल्या माहितीची छाननी करावी आणि समान कोणत्या सात गोष्टी प्रत्येक राज्यातून आल्या आहेत, त्याविषयी प्रचार साहित्य तयार करावे. याचा अर्थ एक प्रकारे जनतेच्या अभिप्रायांमधूनच पर्यटन स्थानांना प्रोत्साहन कसे देता येईल ? याचा विचार होईल. अगदी याचप्रमाणे देशभरामधील आपण ज्या ज्या गोष्ट पाहिल्या आहेत, त्यापैकी आपल्याला सर्वात चांगल्या वाटलेल्या सात गोष्टी निवडायच्या आहेत. त्या सर्वोकृष्ट सात चांगल्या गोष्टी इतरांनीही पहाव्यात, त्याविषयी माहिती जाणून घ्यावी, असे तुम्हाला वाटत असलेल्या, तुमच्या पसंतीच्या त्या सात विशेष गोष्टींची माहितीही ‘मायगव्ह’ वर, नरेंद्र मोदी अॅपवर जरूर पाठवा. भारत सरकार त्यावर काम करेल. तशीच उत्तम स्थाने असतील तर त्यावर माहितीपट बनवणे, चित्रफीत बनवणे, प्रचार साहित्य तयार करणे, यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. आपण निवडलेल्या स्थानाचा, गोष्टीचा सरकार स्वीकार करेल. या, माझ्याबरोबर जोडले जा. या ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीचा उपयोग देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हीही एक मोठे, महत्वपूर्ण भागिदार बनू शकता. त्यासाठी मी आपल्याला आमंत्रण देत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, एक माणूस म्हणून अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात. माझ्या मनात तरंग उठवतात. माझ्या मनावर काही गोष्टी अमिट ठसा उमटवून जातात. शेवटी मी आपल्याप्रमाणेच एक माणूस आहे. काही दिवसांपूर्वीची घटना आहे. कदाचित आपल्याही लक्षात ही गोष्ट आली असेल. महिला-शक्ती आणि देशभक्ती यांचे अनोखे उदाहरण आपण देशवासियांनी पाहिले आहे. भारतीय लष्कराला लेफ्टनंट स्वाती आणि निधी यांच्या रूपाने दोन वीरांगना मिळाल्या आहेत. या दोघीही असामान्य वीरांगना आहेत. असामान्य यासाठी की, स्वाती आणि निधी या दोघींचेही पती भारतमातेची सेवा करता करता शहीद झाले होते. आपण कल्पना करू शकतो की, इतक्या लहान वयामध्ये संसार उद्ध्वस्त झाला तर मनःस्थिती कशी असेल? परंतु शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी या कठीण परिस्थितीला सामोरे जातानाच मनात ठाम निर्धार केला आणि त्या भारतीय सेनेमध्ये भर्ती झाल्या. 11 महिने कठोर परिश्रम करून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. याचप्रमाणे निधी दुबे, यांचे पती मुकेश दुबे लष्करामध्ये नायक म्हणून कार्यरत होते आणि मातृभूमीसाठी शहीद झाले. तर त्यांची पत्नी निधी यांनी निर्धार केला की आपण सेनेत भर्ती व्हायचे आणि त्यांनी निर्धार पूर्ण केला. प्रत्येक देशवासियाला आपल्या या मातृ-शक्ती विषयी, आपल्या या वीरांगनांविषयी आदर वाटणे स्वाभाविक आहे. मी या दोन्ही भगिनींचे अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. या दोघींनीही देशाच्या कोटी कोटी जणांना एक नवी प्रेरणा दिली आहे. एक नवचैतन्य जागे केले आहे. या दोन्ही भगिनींचे खूप खूप अभिनंदन.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्राचा उत्सव आणि दिवाळीचा सण या मधल्या काळामध्ये देशातल्या युवापिढीसाठी एक मोठी संधी आली आहे. 17 वर्षाखालील फिफा विश्व चषक स्पर्धा यावर्षी आपल्या देशात होत आहे. मला विश्वास आहे की, चहुबाजूंनी फुटबॉलचा घोष ऐकू येवू लागणार आहे. प्रत्येक वयोगटातल्या पिढीला फुटबॉलविषयी आवड वाढीस लागेल. हिंदुस्तानातल्या शाळांच्या, महाविद्यालयांच्या मैदानांमध्ये आपले नवयुवक खेळताना दिसले नाहीत, असे होऊच शकणार नाही. चला, हे संपूर्ण जग भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी येत आहेत, मग आपणही खेळाला आपल्या जीवनाचा भाग बनवू या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्रीचे पर्व सुरू आहे. माता दुर्गाच्या पूजेचा काळ आहे. संपूर्ण वातावरण कसे पवित्र सुगंधाने भारले गेले आहे. चारही दिशांना आध्यात्मिक वातावरण, उत्सवाचे वातावरण, भक्तीचे वातावरण आहे आणि हे संपूर्ण पर्व शक्तीच्या साधनेचे पर्व मानले जाते. शारदीय नवरात्र म्हणून हे पर्व साजरे केले जाते. याच काळात शरद ऋतुला प्रारंभ होणार आहे. नवरात्राच्या या पवित्र पर्वात मी देशवासियांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. माता शक्तीला प्रार्थना करतो की, देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि आमच्या देशाने नवीन उंची गाठावी. प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यह या देशामध्ये यावे. देश तेजगतीने पुढे जावा आणि दोन हजार बावीस (2022) मध्ये स्वातंत्र्याच्याा 75व्या वर्षी ‘स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हातवा. सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प, अथक परिश्रम, अथक पुरूषार्थ आणि संकल्पाला साकार करण्यासाठी पाच वर्षाचा पथदर्शक कार्यक्रम बनवून आपण पुढे वाटचाल करायची आहे. यासाठी माता शक्तीने आपल्याला आशिर्वाद द्यावा, आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सण, उत्सव साजरे करा आणि उत्साहही वाढवा.
खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासीयांनो, सादर नमस्कार. एकीकडे संपूर्ण देश उत्सव मनवत असतांना दुसरीकडे भारताच्या कुठल्या तरी भागातून हिंसेची बातमी येते तेंव्हा देशाची चिंता होणे स्वाभाविक आहे. हा आपला देश बुद्ध आणि गांधींचा देश आहे. देशाच्या ऐक्यासाठी आपले प्राणपणाला लावणाऱ्या सरदार पटेलांचा देश आहे. पिढ्यानपिढ्या आमच्या पूर्वजांनी सार्वजनिक जीवन मूल्यांना, अहिंसेला, समान आदराने स्वीकार केले आहे आमच्या नसानसात ते भिनले आहे. 'अहिंसा परमो धर्मा' हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मी लाल किल्यावरून सुद्धा सांगितले होते की आस्थेच्या नावावर हिंसा खपून घेतली जाणार नाही. जरी ती सांप्रदायिक आस्था असेल किंवा राजनैतिक विचारधारेबद्दल आस्था असेल, जरी व्यक्तीबद्दल आस्था असेल, जरी परंपरेबद्दल आस्था असेल, आस्थेच्या नावावर कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे संविधान दिले आहे त्यात प्रत्येकाला न्याय मिळवण्याची व्यवस्था आहे .
मी देशवासीयांना विश्वास देऊ इच्छितो की कायदा हातात घेणारे, हिंसेच्या मार्गानी दमण करणाऱ्या जरी त्या व्यक्ती असतील किंवा समूह असतील हा देश कधीच सहन करणार नाही आणि कोणतेही सरकार सहन करणार नाही . प्रत्येकाला कायद्या समोर झुकावेच लागेल. कायदा त्याची दखल घेईल आणि दोषींना सजा निश्चित देईल.
माझ्या प्रिय देशबांधवानो, आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि या विविधता खानपान, राहणीमान, परिधान इथपर्यंत मर्यादित नाहीत, तर जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपल्याला विविधता दिसते, इथपर्यंत की आपले सण सुद्धा विविधतेने नटलेले आहेत. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा असल्या कारणांने सांस्कृतिक परंपरा, सामाजिक परंपरा बघा, ऐतिहासिक घटना घडामोडी पहाल तर कदाचित ३६५ दिवसात एक ही दिवस शिल्लक राहत नसावा की जो सणाशिवाय राहत असेल. आता आपण हे ही पाहिले असेल की आपले सण निसर्ग चक्रानुसार चालत असतात. निसर्गाशी सरळ-सरळ संबंध असतो. आपले बहुतेक सण तर शेतकऱ्यांशी जोडलेले असतातात. मच्छीमारांशी संबंधित असतात.
आज मी सणासंदर्भात बोलतो आहे. तर सर्वप्रथम मी आपल्याला ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणू इच्छितो. जैन समाजात काल संवत्सरीचा सण साजरा करण्यात आला. जैन समाजात भाद्रमासात पर्युषण पर्व साजारा केला जातो. पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी संवत्सरीचा दिवस असतो. ही खरच एक विलक्षण परंपरा आहे. संवात्सारीचा दिवस, क्षमा, अहिंसा आणि मैत्रीचे प्रतिक आहे. ह्याला एका प्रकारे क्षमा-वाणी दिवस सुद्धा म्हंटल जात आणि ह्या दिवशी एकमेकांना मिच्छामी दुक्कडम म्हणण्याची परंपरा आहे. तसे ही आपल्या शास्त्रात ‘क्षमा वीरस्य भूषणं’ म्हणजे क्षमा वीरांचे भूषण आहे. क्षमा करणारा वीर असतो. ही चर्चा तर आपण ऐकत आलो आहोत आणि महात्मा गांधी तर नेहमी म्हणत असत - क्षमा करणे ही बलवान मनुष्याची विशेषता आहे.
शेक्सपीयरने आपल्या नाटकात ‘The Marchant of Venice’ मध्ये क्षमा भावाचे महत्व समजावतांना लिहिले आहे ‘Marcy is twice blest, it blesseth him that gives and him that takes’ म्हणजे क्षमा करणारा आणि ज्याला क्षमा केली गेली असा तो, दोघेही ईश्वराच्या आशिर्वादाला प्राप्त होतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाच्या काना-कोपऱ्यात गणेश-चतुर्थी मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येत आहे. गणेश-चतुर्थी विषय येतो तेंव्हा सार्वजनिक गणेशोत्सवावर बोलणे स्वाभाविक आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १२५ वर्षांपुर्वी ह्या परंपरेला जन्म दिला. मागील १२५ वर्षे स्वातंत्र्याच्या पूर्वी ते स्वतंत्र आंदोलनाचे प्रतिक बनले आहे आणि स्वातंत्र्यानंतरही समाज-शिक्षण, सामाजिक चेतना जागविण्याचे प्रतिक बनले आहे. गणेश-चतुर्थीचा सण दहा दिवस चालतो. या महासणाला एकता, समता आणि शुचितेचे प्रतिक मानले जाते. सर्व देश बांधवांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
नुकताच केरळमध्ये ‘ओणम’ हा सण साजरा करण्यात आला. भारतातील विविधरंगी सणामधील एक ‘ओणम’ केरळचा प्रमुख सण आहे. हा सण आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक महत्वामुळे ओळखला जातो. ओणम सण केरळची समृद्ध सांस्कृतिक परंपरा प्रदर्शित करत असतो. हा सण समाजात प्रेम, नवा विश्वास जागृत करत असतो. सध्या हे आमचे सण ही पर्यटनाच्या आकर्षणाचे कारण होताना दिसत आहेत. मी तर देशवासियांना सांगेन की जसे गुजरातमध्ये नवरात्रीचा सण किंवा बंगालमध्ये दुर्गा उत्सव हे एका प्रकारे पर्यटनाचे आकर्षण बनले आहे. तसेच आपले इतरही सण विदेशीयांना आकर्षित करण्याची एक संधी आहेत. त्या दिशेनी आपण काय करू शकतो, याचा विचार करावा लागेल.
या सणांच्या श्रृंखलेत कांहीच दिवसांनी संपूर्ण देशात ‘ईद-उल-जुहा ’ हा सण ही साजरा केला जाईल. सर्व देशवासीयांना ‘ईद-उल-जुहा’च्या हार्दिक शुभेच्छा. सण आपल्यासाठी आस्था आणि विश्वासाचे प्रतिक तर आहेतच. आपल्या नव्या भारताच्या सणानां स्वच्छतेचे प्रतिक बनवायचे आहे. कौटुंबिक जीवनात तर सण स्वच्छतेशी जोडले आहेत. सणाच्या तयारीचा अर्थ आहे -स्वच्छता ही आपल्यासाठी कांही नवीन गोष्ट नाही. परंतु हा सामाजिक स्वभाव होण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक रूपात स्वच्छतेचा आग्रह फक्त घरात नाही, संपूर्ण गावात, संपूर्ण नगरात, संपूर्ण शहरात, आपल्या राज्यात, आपल्या देशात-स्वच्छता ही सणांसोबत एक अतूट भाग बनायला हवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आधुनिक होण्याची व्याख्या बदलत चालली आहे. सध्या एक नवीन दृष्टीकोन एक नवीन मापदंड की आपण किती संस्कारी आहोत, किती आधुनिक आहोत, आपली वैचारिक क्षमता प्रक्रिया किती आधुनिक आहे हे जाणून घेण्यासाठी एका तराजूचा वापर होत आहे आणि तो आहे इको मैत्रित्वाचा, पर्यावरणस्नेही व्यवहाराचा, जो याच्या विरोधात आहे, समाजात जर कोणी याच्या विरोधात असेल तर आज वाईट मानल जात. ‘इको फ्रेंडली गणपती’ असे मोठे अभियान उभे केले आहे. जर तुम्ही यु टयुब पहाल तर प्रत्येक घरातील मुल गणपती बनवत आहे. माती आणून गणपती बनवले जात आहेत. त्याला रंगरंगोटी केली जात आहे. कोणी भाज्यांचे रंगकाम करत आहेत, कोणी कागदाचे तुकडे चीटकवत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग प्रत्येक कुटुंबात होत आहेत. एका प्रकारे पर्यावरण जागरुकतेचे इतके व्यापक प्रशिक्षण या गणशोत्सावात बघायला मिळतात. कदाचित यापूर्वी मिळालेही नसेल. माध्यम गृहे सुद्धा मोठ्या संखेत इको फ्रेंडली गणेश-मूर्तींसाठी लोकांना प्रशिक्षित करत आहेत. प्रेरित करीत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. बघा किती मोठा बदल झाला आहे आणि हा सुखद बदल आहे. जसे मी म्हणालो देश करोडो-करोडो तेजस्वी बुद्धी ने भरलेला आहे. आणि बर वाटत जेंव्हा नव-नवीन प्रयोग जाणतो. मला कोणीतरी सांगितले की कोण्या एका गृहस्थाने आहेत ते स्वतः इंजिनियर आहेत. त्यांनी एक विशिष्ठ प्रकारची माती एकत्र करून त्याला आकारबद्ध करून गणेश जी बनवायचे प्रशिक्षण लोकांना दिले. त्यानंतर एक छोट्या बादलीत गणेश विसर्जन होते, तर ते त्यात ठेवल्यावर लगेच मिसळुन जात असते आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यात एक तुळशीचे झाड लावले. तीन वर्षांपूर्वी जेंव्हा स्वच्छता अभियान सुरू केले होते, 2 ऑक्टोबरला तीन वर्ष होतील. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. शौचालय सक्ती 39 टक्क्यांवरून जवळ-जवळ 67टक्क्यांवर पोहचला आहे. 2 लाख 30 हजारांपेक्षा ही अधिक गावे उघड्यावर शौचापासून स्वतःला मुक्त घोषित केली आहेत.
काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भयंकर पूर आला. बरेच लोक आपले प्राण गमवून बसले परंतु पुराचे पाणी जेंव्हा कमी झाले तेंव्हा प्रत्येक ठिकाणी जागो-जागी घाण पसरली होती. अश्या वेळी गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील धानेरामध्ये जमियात उलेमा-ए-हिंदच्या कार्यकर्त्यांनी पुरानी प्रभावित 22 मंदिरे आणि 3 मस्जिदिची क्रमबद्ध पद्धतीने साफ-सफाई केली. स्वत:चा घाम गाळला, सगळे लोक निघाले. स्वच्छतेसाठी एकतेचे उत्तम उदाहरण, प्रत्येकाला प्रेरणा देणारे उदाहरण, जमियात उलेमा-ए-हिंदच्या सर्व कार्यकर्त्यांनी दिला. स्वच्छतेसाठी समर्पण भावनेने प्रयत्न केले. जर हा आमचा स्थायी भाव बनला तर आपला देश कुठच्या कुठे जाऊ शकेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आपणा सर्वांना एक आव्हान करतो की पुन्हा एक वेळ 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या 15-20 दिवसापूर्वी 'स्वच्छता ही सेवा' जसे आधी म्हणत होतो 'जल सेवा ही प्रभू सेवा', ' स्वच्छता ही सेवा' ही मोहीम चालवू. पूर्ण देशात स्वच्छतेचे वातावरण बनवावे. जशी संधी मिळेल, जेंव्हा मिळेल, आपण संधी शोधली पाहिजे. परंतु आपण सर्व एकत्र येऊ. याला एका प्रकारे दिवाळीची तयारी मानू, याला एक प्रकारची नवरात्रची तयारी मानू, दुर्गा पूजेची तयारी मानू, श्रमदान करू. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी एकत्र येऊ आणि एकत्र काम करू. आजू बाजूच्या वस्त्यांमध्ये जाऊ पण एका आंदोलनाप्रणाने काम करू. मी सर्व NGOsनां, शाळांना, कॉलेजांना, सामाजिक, सांस्कृतिक राजनैतिक नेतृत्वांना सरकारी अधिकाऱ्यांना, कलेक्टरांना, सरपंचांना प्रत्येकाला आग्रह करतो की 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या अगोदर 15 दिवस आपण एक अश्या स्वच्छतेचे वातावरण बनऊ. अशी स्वच्छता उभी करू की खरच गांधींच्या स्वप्नातील 2 ऑक्टोंबर होईल. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, MyGov.in वर एक विभाग बनवला आहे जिथे शौचालय निर्माणानंतर आपले नाव आणि त्या कुटुंबाचे नाव लिहू शकता, ज्याची आपण मदत केली आहे. माझे सोशल मिडीयाचे मित्र काही रचनात्मक अभियान चालवू शकतात आणि वास्तव जगाच्या धर्तीवर काम होईल त्याची प्रेरणा बनू शकतात. स्वच्छ-संकल्पनेतील स्वच्छ-सिद्धी स्पर्धा, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालया द्वारे हे अभियान ज्यात निबंध स्पर्धा, लघु फिल्म बनविण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यात आपण विविध भाषेत निबंध लिहू शकता आणि त्यात काही वयाचे बंधन नाही. काही वयोमर्यादा नाही. आपण लघुचित्रपट बनवू शकता आपल्या मोबाईने बनवू शकता. 2-3 मिनिटांची फिल्म बनूव शकता की जी स्वच्छतेसाठी प्रेरणा देईल. ती कोणत्याही भाषेत असू शकते. ती अबोल सुद्धा असू शकते. जे या स्पर्धेत भाग घेतील त्यातील तीन लोक निवडले जातील जिल्हा पातळीवर तीन असतील राज्य पातळीवर तीन असतील त्यांना पुरस्कार देण्यात येतील. मी तर प्रत्येकाला निमंत्रण देतो की या स्वच्छता मोहिमेशी जोडले जा.
मी पुन्हा एकवार सांगू इच्छितो की यावेळी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला ' स्वच्छ 2 ऑक्टोबर' साजरा करण्याचा संकल्प करा आणि यासाठी 15 सप्टेंबर पासूनच स्वच्छता ही सेवा हा मंत्र घर-घरात पोहचवा. स्वच्छतेसाठी काही-न-काही तरी पावले उचलला. स्वतः परिश्रम करून याचा भाग व्हा. तुम्ही पहा गांधी जयंतीला ही 2 ऑक्टोबर संकल्पना कशी चमकेल. तुम्ही कल्पना करू शकता 15 दिवसाच्या या स्वच्छता अभियानंतर स्वच्छता ही सेवा नंतर 2 ऑक्टोबरला जेंव्हा गांधी जयंती साजरी करू तेंव्हा खऱ्या अर्थानी पूज्य बापूंना श्रद्धांजली देतानां आपल्याला सुखद आनंद होईल.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी आज विशेष रूपाने आपले आपले ऋण स्वीकारु इच्छितो. हृदयाच्या खोलातून मी आपले आभार व्यक्त करतो, यासाठी नाही की आपण फार काळापासून ‘मन की बात’शी जोडले गेले आहोत. मी यासाठी आभार व्यक्त करू इच्छितो, ऋण स्वीकार करू इच्छितो की ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील करोडोंच्या संख्येने लॉग जोडले जात आहेत. ऐकणाऱ्यांची संख्या करोडो आहे. परंतु लाखो लोक मला पत्र लिहीत आहेत, कधी निरोप देतात, कधी फोनवर संदेश येतात माझ्यासाठी हा मोठा खजाना आहे. देशातील जनतेच्या मनातील भावना मला समजून घेण्याची संधी मिळते आहे. तुम्ही जितकी आतुरतेने ‘मन की बात’ची वाट पाहता तितकीच मी आपल्या संदेशाची वाट पाहत असतो. मी आतुर असतो कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीतून मला काही शिकायला मिळते. मी जे काही करतो आहे ते कसोटीवर खरे उतरते की नाही हे पाहण्याची संधी मिळते. बऱ्याच गोष्टीबद्दल नव्याने विचार करण्यासाठी आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी कामाला येतात आणि म्हणून मी आपल्या योगदानाबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आपले ऋण स्वीकारतो. माझा जास्तीत जास्त असा प्रयत्न असतो की, कमाल गोष्टी पाहून वाचून समजू शकू. आपण आपल्या मोबाईल फोनला सहसंबंधित करीत असाल. आपण अशा चुकीच्या सवयींचा एक भाग बनून जातो.
“प्रधानमंत्री जी ,मी पुण्यावरून अपर्णा बोलते. मी माझ्या मैत्रिणीबद्दल सांगू इच्छिते ती नेहमी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न पण तिची एक सवय पाहून मी थक्क झाले. मी एकदा तिच्यासोबत शॉपिंग मॉल मध्ये गेले होते. एका साडीवर तिने दोन हजार रुपये आरामात खर्च केले आणि 450 रुपये पिझ्यावर पण त्यापूर्वी जेंव्हा तिने मॉलमध्ये जाण्यासाठी रिक्षा केली आणि बराच वेळ पाच रुपयासाठी रिक्षावाल्याशी वाद घालत होती. तसेच मॉलमधून परत येत असताना भाजीवाल्याशी भाव करत होती अस करून 4-5 रुपये तिने वाचवले मला फार वाईट वाटले. आपण मोठ्या ठिकाणी काहीही भाव न करता पेमेंट करतो, पण आपल्या कष्टकरी बांधवांशी भांडण करतो त्यांच्यावर अविश्वास दर्शवतो. आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमातून या विषयावर अवश्य बोलावे.”
आता असा फोन कॉल ऐकल्यावर मला नक्की विश्वास आहे की आपण आश्चर्य चकित झाला असाल सतर्क सुद्धा झाला असाल असे ही होऊ शकते?
काय आपल्याला असे वाटत नाही की आपल्या घराजवळ, आस पास फेरीवाले काही सामान विकणारे, छोटे दुकानदार, भाजी विकणारे यांच्याशी नेहमी संबंध येतो कधी ओटो रिक्षावाल्यांशी संबंध येतो. जेंव्हा कष्ट करणाऱ्यांशी आपला संबध येतो, तेव्हा आपण त्याच्याशी मालाचा भाव करतो. इतकेच नाही दोन पाच रुपये कमी करावयास सांगतो आणि आपणच असतो मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो की बिल सुद्धा पाहत नाही पैसे देऊन टाकतो. इतकेच नाही शोरुम मध्ये साडी विकत घेताना कधीच भाव करत नाही. गरीबाच्या मनाला काय वाटत असेल याचा कधी विचार केला आहे? त्याच्यासाठी प्रश्न रुपया रुपायाचा नाही त्यांच्या हृदयाला किती यातना होत असतील. तो गरीब आहे म्हणून त्याच्या इमानदारीवर शंका घेतली दोन-पाच रुपयांनी तुमच्या जीवनात फरक पडत नसेल पण आपली ही छोटीशी सवय त्याला किती मोठा धक्का देत असेल कधी विचार केला? मैडम मी आपला आभारी आहे आपण हृदयाला स्पर्श करणारा फोन कॉल करून मला एक संदेश दिला आहे. मला विश्वास आहे माझे देशावासी सुद्धा गरिबांशी असा व्यवहार करणे सोडून देतील.
माझ्या प्रिय नवजवान मित्रांनो, २९ ऑगस्टला पूर्ण देश राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा करीत असतो. हा महान हॉकी खेळाडू आणि हॉकीचा जादुगार मेजर ध्यानचंदजीचा जन्म दिवस आहे. हॉकीसाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. मी या गोष्टीचे स्मरण यासाठी ही करू इच्छितो की, मला वाटते की आपल्या देशातील नवी पिढी खेळांशी जोडली जावी. खेळ आमच्या जीवनाचा अंग बनले पाहिजे. जर आम्ही जगातील युवा देश आहोत, तर आमच्या देशातील तरुणाई खेळाच्या मैदानात दिसली पाहिजे. क्रीडा म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती, बौद्धिक तत्परता, भावनिक सहसंबंधत्व. मी समजतो याच्या पेक्षा अधिक काय पाहिजे? खेळ एक प्रकारे हृदयाला जोडणारी जडीबुटी आहे. आमची युवा पिढी खेळाच्या क्षेत्रात पुढे यावी, आज संगणकाच्या युगात मी आपल्याला खेळ स्थानकांपेक्षा क्रीडा क्षेत्र महत्वाचे आहे हे सांगु इच्छितो. कम्प्युटरवर फिफा खेळ खेळा पण बाहेरच्या मैदानावर काही तरी कामगिरी करुन दाखवा. कम्प्युटरवरील क्रिकेटपेक्षा मोकळ्या मैदानातील क्रिकेटचा खेळण्याचा आनंद काही वेगळाच आहे. एक वेळ होती कुटुंबातील मुले बाहेर जात होती तर आई विचारायची तू घरी कधी येशील. आज स्थिती अशी आहे की मुले घरी येताच कोपऱ्यात बसुन मोबाईलवर गेम्स किंवा कार्टून फिल्म्स पाहातात तेंव्हा आईला ओरडून विचारावे लागते की तू बाहेर कधी जाशील?
तो ही एक काळ होता जेंव्हा आई मुलाला म्हणायची तू कधी येशील आज अशी वेळ आली आहे की बाळा तू बाहेर कधी जाशील ?
तरुण मित्रांनो, खेळ मंत्रालयाने खेळ प्रतिभेचा शोध आणि त्याला फुलविण्यासाठी म्हणून क्रीडा बौद्धिक संशोधन पोर्टल बनविले आहे जिथे देशातील कोणतीही मुले ज्याने खेळात प्राविण्य मिळवले आहे, ज्याच्यात talent आहे तो या पोर्टलवर आपली माहिती किंवा व्हिडीओ अपलोड करू शकतो. निवडक विकसनशिल खेळाडूंना खेळ मंत्रालय प्रशिक्षण देईल आणि मंत्रालय उद्याच पोर्टलचे उद्घाटन करेल. आपल्या तरुणांना आनंदाची बातमी आहे की ६ ते २८ ऑक्टोबरमध्ये 17 वर्षाखालील फिफा जागतिक कपचे आयोजन करण्यात येत आहे. जगभरातील २४ चमु भारतात येत आहेत.
या, जगभरातून येणाऱ्या आपल्या तरुण पाहुण्याचे, खेळ उत्सवासोबत स्वागत करु या, खेळ enjoy करू, देशात एक वातावरण बनु या. आज मी खेळाबद्दल बोलत असतांना मागील आठवड्यात मनाला स्पर्शुन जाणारी घटना घडली जी मी नागरिकांना सांगू इच्छितो. मला एका छोट्या वयाच्या मुलींना भेटण्याची संधी मिळाली त्यात काही हिमालयात जन्मल्या होत्या. समुद्राशी ज्यांचे कधीच नाते नव्हते, अश्या आपल्या देशातील सहा मुली ज्या नौदलात काम करत होत्या त्यांची हिम्मत आणि आत्मविश्वास सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. या सहा मुली छोटी बोट घेऊन INS तारिणी त्या समुद्र ओलांडण्यासाठी निघाल्या या अभियानाला नाव देण्यात आले ‘नाविका सागर परिक्रमा ’आणि त्या पूर्ण जगाचे भ्रमण करून काही महिन्यांनी भारतात परतल्या. कधी एकावेळी ४०-४० दिवस पाण्यात घालवले.कधी ३०-३० दिवस पाण्यात घालवले. समुद्राच्या लाटांमध्ये हिंमतीने या सहा मुली. ही जगभरातील पहिलीच घटना असेल. कोण भारतीय असेल ज्याला अश्या मुलींचा गर्व वाटणार नाही! मी या मुलींच्या हिंमतीला सलाम करतो आणि मी त्यांना म्हाणालो त्यांनी हा अनुभव सर्व देशवासियांना सांगावा. मी पण नरेंद्र मोदी ॲपवर त्यांच्या अनुभावासाठी एक वेगळी जागा उपलब्ध करून देणार आहे. कारण त्यांचे अनुभव आपण जरूर वाचावेत कारण ती एकाप्रकारची साहस कथा आहे, स्वानुभवाची कथा आहे आणि मला आनंद होईल या मुलींची गोष्ट आपल्यापर्यंत पोहचविल्यास, माझ्या या मुलींना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो ५ सप्टेबरला आपण सगळे शिक्षक दिवस साजरा करतो. आपल्या देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ राधाकृष्णनजींचा जन्म दिवस आहे. ते राष्ट्रपती होते पण जीवनभर ते एक शिक्षक म्हणून स्वत:ला प्रस्तुत करीत असत. ते नेहमी शिक्षकाच्या रुपात जगणे पसंत करीत होते. ते शिक्षणासाठी समर्पित होते. एक अभ्यासू, एक राजनैतिक भारताचे राष्ट्रपती पण प्रत्येक क्षणी ते शिक्षक होते. मी त्यांना नमन करतो.
महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्सटीन म्हाणाले होते It is the supreme art of the teacher of awaken joy in creative expression and knowledge. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक भाव आणि ज्ञानाचा आनंद जागविणे हा शिक्षकाचा महत्वाचा गुण आहे. यावेळी जेंव्हा आपण शिक्षक दिवस साजरा करू तेंव्हा आपण मिळून एक संकल्प करू शकतो? कालबद्धरितीने अभियान आपण चालू या का? परिवर्तनासाठी शिकवा प्रोत्साहनात्मक शिक्षण द्या आणि नेतृत्वासाठी शिका, या संकल्पासोबत ही गोष्ट पुढे नेऊ शकतो का? प्रत्येकाला पाच वर्षासाठी एका संकल्पाशी बांधू या, त्याला सिद्ध करण्याचा मार्ग दाखवू या आणि पाच वर्षांनी आपण संकल्प पूर्तीचा आनंद घेऊन जीवन सफल होण्याचा आनंद होऊ शकेल. असा आनंद आपल्या शाळेत, कॉलेजात आमचे शिक्षक, आमच्या शिक्षण संस्था करू शकतात आणि जेंव्हा आम्ही आपल्या देशात परिवर्तनाबद्दल बोलू तेंव्हा जसे आपल्या कुटुंबात आईची आठवण येते तशी आपल्या शिक्षकाची आठवण यावी. परिवर्तनामध्ये शिक्षकाची मोठी भूमिका असते. प्रत्येक शिक्षकाच्या जीवनात अशी एखादी घटना आहे की त्याच्या प्रयत्नांनी कोणाच्या तरी जीवनात परिवर्तनामुळे बदल झाला असेल. जर आपण सामुहिक प्रयत्न केला तर राष्ट्राच्या परिवर्तनामध्ये मोठी भूमिका बजावू शकतो. चला परिवर्तनासाठी शिकण्याचा मंत्र घेऊन पुढे जाऊ या .
“प्रधानमंत्रीजी माझे नाव डॉक्टर अन्यन्या अवस्थी आहे. मी मुंबईत राहते हार्वर्ड विद्यापीठाच्या भारतीय संशोधन केंद्रासाठी काम करते. एक संशोधक म्हणून वित्तीय समावेश या विषयात आवड आहे ज्याला आपण वित्तीय अंर्तभूतता म्हणतो त्याच्याशी संबधित सामाजिक योजनांच्या संबंधी माझा प्रश्न आहे की, २०१४ मध्ये जी जन धन योजना काढली होती ती आज तीन वर्षांनी आर्थिक रुपात जास्त सशक्त आणि महिलांना शेतकऱ्यांना मजुरांना गावा गावात मिळाली आहे का? धन्यवाद.”
माझ्या प्रिय देशवासियांनो! प्रधानमंत्री जन धन योजना आर्थिक अंर्तभूतता ही केवळ भारताचीच नाही तर पूर्ण जगातील आर्थिक जगतातील पंडितांच्या चर्चेचा विषय आहे. २८ ऑगस्ट २०१४ ला मनामध्ये एक स्वप्न घेऊन ही योजना सुरु केली होती. उद्या या योजनेला ३ वर्ष पूर्ण होत आहेत. ३० करोड नवीन कुटुंबाना जोडले गेले आहे, बँक खाते काढण्यात आली आहेत. आज मला आनंद होत आहे की समाजातील गरिबांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा हिस्सा बनवण्यात आले आहे. त्याच्या सवयी बदलल्या आहेत तो बँकेत जाऊ लागला आहे तो पैसे बचत करू लागला आहे. कधी पैसे हाताशी असतात, खिशात असतात तर खर्च करावेसे वाटतात. तो पैश्यांमुळे सुरक्षित अनुभव करतो आहे. आता एक संयमाचे वातावरण बनले आहे. त्याला ही वाटते की पैसे मुलांच्या कामी येतील. येणाऱ्या काळात काही चांगले काम करता येईल. इतकेच नाही तर जो गरीब आपल्या खिशात RuPay Card पाहतो तर श्रीमंतासारखा अनुभव करतो. त्याच्या खिशात ही क्रेडिट कार्ड आहे, माझ्या खिश्यात RuPay कार्ड आहे. तो एक सम्मानित अनुभव करतो. प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत ६५ हजार करोड रुपये बँकेत जमा आहेत, ही एका प्रकारे गरिबांची बचत आहे. येणाऱ्या काळात हीच त्यांची ताकद आहे आणि प्रधानमंत्री जनधन योजनेत ज्याचे खाते उघडण्यात आले आहे, त्याचा विमा सुद्धा उतरवण्यात आला आहे. 'प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना' एक रुपया, तीस रुपये, या मामुली हप्त्यामुळे आज गरिबांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला आहे. कितीतरी परिवारात एक रुपायाच्या विम्यामुळे कुटुंबातील मुख्य आधाराला काही झाले तर त्याच्या परिवाराला 2 लाख रुपये मिळतील.
प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टार्ट अप योजना, स्टँड अप, दलित असो या आदिवासी असो महिला असो किंवा शिकून नुकताच बाहेर पडलेले युवक, करोडो करोडो युवकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन बँकेतून कसल्याही प्रकारचे तारण न ठेवता पैसे मिळतील आणि ते स्वत:च्या पायावर उभे राहतील इतकेच नव्हे तर प्रत्येकाने एकदा दुसऱ्याला नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न करावा. काही दिवसांपूवी बँकेतील लोक मला भेटले जन धन योजनेमुळे विम्याच्या कारणांनी, RUpay card मुळे प्रधानमंत्री योजनेमुळे सामान्य लोकांना कसा लाभ झाला आहे त्याचा त्यांनी सर्वेक्षण केले आणि फार प्रेरक घटना मिळाल्या. आज इतका वेळ नाही की परंतु मी बँकेच्या लोकांना सांगेन की My Gov.in वर अपलोड करावे. लोक वाचतील तर त्यांना प्रेरणा मिळेल की कोणती योजना व्यक्तीच्या जीवनात कसे परिवर्तन आणू शकते. कशी नवी ऊर्जा आहे, कसा नवा विश्वास उत्पन्न होत आहे, याचे शेकडो उदाहरणे माझ्या समोर आली आहेत.
आपल्या पर्यंत पोहचवण्याचा पूर्ण मी प्रयत्न करीन आणि अश्या प्रेरक घटना आहे की मीडियाचे लोक सुद्धा त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतात ते ही अश्या लोकांच्या मुलाखती घेऊन नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा आपल्याला मिच्छामी दुक्कडम. खूप-खूप आभार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. माणसाचे मन असे असते की वर्षाकाळ त्याला मोठा मनमोहक वाटतो. पशू,पक्षी, झाडे, निसर्ग - सगळेच पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित होऊन जातात. मात्र हाच पाऊस कधी कधी विक्राळ रूप धारण करतो आणि तेव्हा जाणीव होते की पाण्यामध्ये विनाश घडवून आणण्याचीही केवढी मोठी ताकद आहे. निसर्ग आपल्याला जीवन देतो, आपले पालनपोषण करतो, पण कधीकधी पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये दिसणारे त्याचे भीषण रूप भयंकर विनाशकारी ठरते. बदलणारे ऋतूचक्र आणि पर्यावरणात जे काही बदल घडून येत आहेत त्यांचा खूपच मोठा नकारात्मक परिणामही होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या काही भागांमध्ये विशेषत: आसाम, ईशान्येकडील राज्ये, गुजरात, राजस्थान, बंगालचा काही भाग अतिवृष्टीमुळे नैसर्गिक संकटांना सामोरा जात आहे. पूरग्रस्त क्षेत्रांवर संपूर्ण देखरेख ठेवली जात आहे. व्यापक स्तरावर बचावकार्य केले जात आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मंत्रिमंडळातील माझे सहकारीही पोहोचत आहेत. राज्यांची सरकारेसुद्धा आपापल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारच्या वतीने सेनेतील जवान असोत, वायूसेनेचे लोक असोत, एनडीआरएफचे लोक असोत, निमलष्करी दल असो, सगळेच अशा काळात आपत्तीग्रस्तांच्या सेवेत स्वत:ला झोकून देतात. पूरामुळे जनजीवन बरेच विस्कळीत होऊन जाते. शेते, पशूधन, पायाभूत सुविधा, रस्ते, वीजवितरण, संपर्काची साधने सगळ्यावरच त्याचा परिणाम होतो. विशेषत: आमच्या शेतकरी बांधवांना याची मोठीच झळ बसते. त्यांच्या पिकांचे, शेतांचे जे नुकसान होते ते लक्षात घेता या काळात आम्ही विमा कंपन्यांना आणि विशेषत: पिकविमा कंपन्यांनाही अधिक कार्यतत्पर बनविण्याच्या दृष्टीने योजना बनवली आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे दावे त्वरीत मंजूर व्हावेत आणि पूरपरिस्थितीचे निवारण करण्यासाठी 24X7 कंट्रोल रूम हेल्पलाइन नंबर 1078 सतत काम करीत आहे. लोक आपल्या अडचणी सांगतही आहेत. पावसाळ्याच्या आधी बहुतांश जागांवर मॉक ड्रील करून संपूर्ण सरकारी प्रणाली तयार केली गेली आहे. एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली. जागोजागी 'आपदा मित्र' तयार करणे, 'आपदा मित्रां'ना do & don'ts चे प्रशिक्षण देणे, स्वयंसेवक म्हणून कोण कोण काम करेल हे निश्चित करणे, एक लोकसंघटन उभे करत अशा परिस्थितीमध्ये काम करणे हा त्या तयारीचा भाग आहे. या दिवसांत हवामानाचा जो अंदाज व्यक्त केला जातो त्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रगती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. अंतराळ विज्ञानाचाही त्यात मोठा वाटा राहिला आहे व या साऱ्यामुळे हे अंदाज बऱ्यापैकी अचूक असतात. हळुहळू आपण सारेसुद्धा हवामानाच्या अंदाजानुसार आपल्या कामकाजाचे वेळापत्रक तयार करू शकतो. यातून संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल. जेव्हा मी 'मन की बात' ची तयारी करतो तेव्हा माझ्यापेक्षा देशाचे नागरिक याची अधिक तयारी करताना मला दिसतात. यावेळी तर जीएसटीच्या विषयावर मला खूप पत्रे आली, खूप सारे फोनकॉल्स आले आहेत आणि अजूनही लोक जीएसटीविषयी आनंद व्यक्त करत आहेत, त्याचबरोबर कुतुहलही व्यक्त करत आहेत. त्यातला एक फोनकॉल तुम्हालाही ऐकवतो :-
'नमस्कार, पंतप्रधान जी, मी गुडगाववरून नीतू गर्ग बोलतेय. मी तुमचे सनदी लेखाकार दिनाचे भाषण ऐकले आणि खूप प्रभावित झाले. अशाच प्रकारे आपल्या देशात गेल्या महिन्याच्या याच तारखेला वस्तू आणि सेवा कर – जीएसटीची सुरुवात झाली. या निर्णयाबाबत सरकारने जशी अपेक्षा केली होती तसेच परिणाम एका महिन्यानंतर मिळत आहेत किंवा नाही हे आपण सांगू शकाल काय? मला याबाबतचे तुमचे विचार ऐकण्याची इच्छा आहे. धन्यवाद.
जीएसटी लागू होऊन जवळजवळ एक महिना झाला आहे आणि त्याचे फायदेही दिसू लागले आहेत. जीएसटीमुळे गरीबाच्या गरजेच्या वस्तूंच्या किंमती कशा कमी झाल्या आहेत, वस्तू कशा स्वस्त झाल्या आहेत याबद्दल एखादी गरीब व्यक्ती मला पत्र लिहिते तेव्हा मला खूप समाधान मिळते, आनंद वाटतो. जीएसटी हे काय प्रकरण हे माहीतच नसल्याने सुरुवातीला भीती वाटत होती, पण आता त्याबद्दल शिकतोय-समजून घेतोय तसतसे काम आधीपेक्षा सोप झाल्यासारखे वाटतेय असे पत्र इशान्येच्या दुर्गम डोंगरांत, जंगलांत राहणारी एखादी व्यक्ती लिहिते. व्यापार अधिक सोपा झाला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा व्यापारीवर्गावरचा विश्वास वाढीस लागला आहे. वाहतूक आणि मालाच्या ने-आणीचे काम करणाऱ्या लॉजिस्टिक्स क्षेत्रावर जीएसटीचा काय परिणाम झालाय हे मी आताच पहात होतो. कशाप्रकारे ट्रक्सची ये-जा वाढली आहे, अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कसा कमी होत आहे, महामार्ग मोकळे झाले आहेत, ट्रक्सचा वेग वाढल्यामुळे प्रदूषणही कमी झाले आहे, सामान वेगाने योग्य स्थळी पोहोचत आहे हे दिसून येत आहे. या सर्व सुविधा तर आहेतच, पण त्याचबोरबर आर्थिक गती साधण्यासाठीही याचे पाठबळ मिळत आहे. याआधी वेगवेगळ्या कररचना असल्याने वाहतूक आणि मालवाहतूक क्षेत्राची बहुतांश संसाधने कागदपत्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरली जायची आणि त्यांना प्रत्येक राज्यामध्ये आपापली नवी नवी गोदामे बनवावी लागायची. जीएसटी ज्याला मी good and simple tax म्हणतो, खरोखरीच या कराने आपल्या अर्थव्यवस्थेवर एक खूपच सकारात्मक प्रभाव टाकला आहे आणि हे खूप कमी वेळात साधले गेलेय. ज्या वेगाने हा बदल सुरळीतपणे घडून आलाय, ज्या वेगाने हे स्थानांतर झाले आहे, नव्याने नोंदणी झाल्या आहे त्याने संपूर्ण देशात विश्वासाचे वातावरण तयार केले आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील विद्वान, व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील विद्वान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विद्वान संशोधन करून भारताच्या जीएसटीच्या प्रयोगाला एका आदर्श व्यवस्थेच्या रूपात कधी ना कधी जगासमोर मांडतीलच. जगातील अनेक विद्यापीठांसाठी हे एक अभ्यासावे असे उदाहरण, एक केस-स्टडी बनेल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतका मोठा बदल घडून आला आहे आणि इतक्या करोड लोकांच्या सहभागाने इतक्या विशाल देशामध्ये हा कर लागू करणे, त्याला यशस्वीपणे पुढे नेणे ही यशस्वीतेची एक मोठी झेप आहे. सारे विश्व याचा नक्कीच अभ्यास करेल आणि जीएसटी लागू करण्यामध्ये सर्व राज्यांची भागीदारी आहे. सर्व राज्यांची ती जबाबदारी आहे. सारे निर्णय राज्यांनी आणि केंद्राने मिळून, सर्वसंमतीने घेतले आहेत. परिणामी प्रत्येक सरकारने प्राधान्याने अपेक्षा मांडली, की जीएसटीमुळे गरीबाच्या अन्नधान्याच्या खर्चावर काही अतिरीक्त भार पडू नये. एखाद्या वस्तूची जीएसटीच्या आधी काय किंमत होती, नव्या परिस्थितीमध्ये काय किंमत असेल याची सर्व माहिती मोबाइलवरील GST App वर उपलब्ध आहे हे तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे. एक देश-एक कर : One nation-one tax. किती मोठे स्वप्ने पूर्ण झालेय. जीएसटीच्या बाबतीत मी पाहिले आहे की ज्याप्रकारे तालुक्यापासून ते भारतसरकारपर्यंत सगळ्या स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांनी जे परिश्रम घेतले आहेत, ज्या समर्पित भावनेने काम केले आहे, त्यातून सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये, सरकार आणि ग्राहकांमध्ये एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या कामाने विश्वास वृद्धिंगत करण्याच्या कामी खूप मोठी भूमिका निभावली आहे. मी या कार्यासाठी सर्व मंत्रालयांचे, सर्व विभागांचे, केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. जीएसटी म्हणजे भारताच्या सामूहिक शक्तींच्या विजयाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा एक नवा ऐतिहासिक विजय आहे. आणि ही केवळ एक करसुधारणा नाही, तर एका नव्या प्रामाणिक संस्कृतीला बळ देणारी व्यवस्था आहे. एकप्रकारे सामाजिक सुधारणेची मोहिमही आहे. इतके मोठे काम सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल मी पुन्हा एकदा कोटी कोटी देशवासियांना कोटी-कोटी वंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असतो. लहानपणी सहजच या गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या असतात. या महिन्याला क्रांतीचा महिना म्हणून संबोधले जाते याचे कारण 1920 सालच्या ऑगस्ट महिन्यात 'असहकार आंदोलन' सुरू झाले होते. 9 ऑगस्ट 1942 रोजी 'भारत छोडो आंदोलना'ला सुरुवात झाली होती ज्याला ऑगस्ट क्रांतीच्या नावाने ओळखले जाते आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. एकप्रकारे ऑगस्ट महिन्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी विशेषत्वाने जोडलेल्या आहेत. यावर्षी आपण 'भारत छोडो' 'Quit India Movement' या आंदोलनाचे 75 वे वर्ष साजरे करणार आहोत. मात्र खूप कमी लोकांना या गोष्टीची माहिती असेल की 'भारत छोडो' हा नारा डॉ. युसूफ मेहर अली यांनी दिला होता. 9 ऑगस्ट 1942 या दिवशी काय झाले होते हे आपल्या नव्या पिढीने जाणून घ्यायला हवे. 1857 पासून ते 1942 पर्यंत स्वातंत्र्याच्या ध्यासाने देशवासी संघटित होत राहिले, संघर्ष करीत राहिले, सहन करत राहिले, इतिहासाची ही पाने म्हणजे भव्य भारताच्या निर्मितीसाठीचे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. आमच्या स्वातंत्र्यवीरांनी त्याग, तपस्या, बलिदान दिले आहे. याहून मोठी प्रेरणा कोणती असू शकेल? 'भारत छोडो आंदोलन' भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण संघर्ष होता. याच आंदोलनाने संपूर्ण देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याचा संकल्प घेण्यास तयार केले होते. हा तोच काळ होता, जेव्हा इंग्रजांच्या राजवटीविरोधात भारतीय जनमानस, हिंदुस्थानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, गावे असोत, शहरे असोत, सुशिक्षित असोत, अशिक्षित असोत, गरीब असोत, श्रीमंत असोत, प्रत्येक जण खांद्याला खांदा भिडवून भारत छोटो आंदोलनाचा भाग बनले होते. जनतेचा आक्रोश टिपेला पोहोचला होता. महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो भारतीय 'करो या मरो' हा मंत्र घेऊन आपले आयुष्य संघर्षात झोकून देत होते. देशाच्या लाखो नवयुवकांनी आपले शिक्षण सोडून दिले होते, पुस्तके बाजूला सारली होती. आजादीचा बिगुल वाजला आणि ते सारे निघाले. 9 ऑगस्ट, 'भारत छोडो आंदोलनाचे' आवाहन महात्मा गांधींनी केले तर खरे, पण सर्व मोठ्या नेत्यांना इंग्रज राजवटीने तुरुंगात टाकले आणि हाच तो काळ होता जेव्हा देशाच्या दुसऱ्या पिढीतील नेतृत्वाने - डॉ.लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या महापुरुषांनी प्रमुख भूमिका निभावली होती.
'असहकार आंदोलन' आणि 'भारत छोडो आंदोलन' – 1920 आणि 1942 – या दोन्ही घटनांमध्ये गांधीजींची दोन वेगवेगळी रूपे दिसतात. 'असहकार आंदोलन' चे रूप-रंग वेगळे होते आणि 42 साली अशी परिस्थिती आली, तीव्रता इतकी वाढली की महात्मा गांधींसारख्या महापुरुषाने 'करो या मरो' चा मंत्र दिला. या सर्व यशाच्या मागे जन-समर्थन होते, जन-सामर्थ्य होते, जन-संकल्प होता, जन-संघर्ष होता. सारा देश एक होऊन लढत होता. कधी कधी मला वाटते, इतिहासाच्या पानांना थोडे जोडून पाहिले तर भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा 1857 साली उभारला गेला. 1857 पासून सुरू झालेला स्वातंत्र्याचा हा लढा 1942 पर्यंत प्रत्येक क्षणी देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात चालू होता. या लांबलचक कालखंडाने देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल उत्कट भावना जागवली. प्रत्येक जण त्या दिशेने काही ना काही करण्यासाठी कटिबद्ध झाला. पिढ्या बदलल्या, पण संकल्प ढळला नाही. लोक येत गेले, जोडले जात गेले, निघून जात राहिले, नवे लोक येत गेले आणि इंग्रजांच्या राजवटीला उलथवून टाकण्यासाठी देश हरक्षणी प्रयत्न करत होता. 1857 पासून 1942 पर्यंत चाललेल्या या परिश्रमांनी या आंदोलनासाठी अशी परिस्थिती तयार केली की 1942 साली त्याचा कळस गाठला गेला आणि 'भारत छोडो' चा बिगुल असा वाजला की पाच वर्षांच्या आतच 1947 साली इंग्रजांना इथून जावे लागले 1942 ते 1947 – पाच वर्षं, एक अशी लोकभावना तयार झाली होती की स्वातंत्र्याच्या संकल्पपूर्तीच्या त्या पाच निर्णायक वर्षांच्या रूपात संपूर्ण देश यशस्वीपणे स्वातंत्र्य प्राप्त करण्यास कारणीभूत ठरला. ही पाच वर्षं निर्णायक होती. आता मी तुम्हाला या गणिताशी जोडून घेऊ इच्छितो. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. आज 2017 साल चालू आहे. त्या घटनेला जवळजवळ 70 वर्षं झाली. दरम्यानच्या काळात सरकारे आली-गेली. व्यवस्था बनल्या, बदलल्या, बहरल्या, वाढल्या. देशाला समस्यामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले. देशात रोजगार वाढावा यासाठी, गरीबी दूर व्हावी यासाठी, विकास साध्य व्हावा यासाठी प्रयत्न झाले. आपापल्या पद्धतीने त्यासाठी कष्टही उपसले गेले. यशही मिळाले. अपेक्षाही उंचावल्या. जसे 1942 ते 1947 हे संकल्पसिद्धीचे पाच वर्ष होते. त्याच प्रकारे 2017 ते 2022 हा संकल्प सिद्धीच्या प्रवासातील पाच वर्षांचा कालखंड आता आपल्यासमोर असल्याचे मी पाहतोय. 2017 चा हा 15 ऑगस्ट आपण संकल्प पर्वाच्या रूपात साजरा करावा आणि 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षं पूर्ण होतील तेव्हा तो संकल्प आपण पूर्णत्वास नेऊ. देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनाचे स्मरण करावे आणि येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक भारतवासीयाने असा संकल्प करावा की एक व्यक्ती म्हणून, एक नागरीक म्हणून या देशासाठी मी अमुक इतके काम करेन, कुटुंबाचा भाग म्हणून अमुक काम करेन, समाजाचा भाग म्हणून अमुक जबाबदारी उचलेन, गाव आणि शहराचा भाग म्हणून असे असे करेन, सरकारी विभागाचा भाग म्हणून हे प्रयत्न करेन, सरकारचा भाग म्हणून अमुक काम करेन. करोडो करोडो संकल्प केले जावेत. करोडो संकल्प पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न व्हावा. मग मी म्हटल्याप्रमाणे जशी 1945 ते 1947 ही पाच वर्षं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी निर्णायक ठरली त्याचप्रमाणे 2017 ते 2022 ही पाच वर्षं भारताचे भविष्य घडविण्याच्या कामी निर्णायक बनू शकतील आणि आपल्याला बनवायची आहेत. पाच वर्षांनंतर देश स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षं साजरी करेल. तेव्हा आज आपण सर्वांनी हा दृढ संकल्प करूया. 2017 साल आपण संकल्प वर्ष बनवूया. याच ऑगस्ट महिन्यात आपण हा संकल्प करू, या संकल्पाशी स्वत:ला जोडून घेऊ. अस्वच्छता- भारत छोडो, गरीबी – भारत छोडो, भ्रष्टाचार- भारत छोडो, आतंकवाद – भारत छोडो, जातीयवाद – भारत छोडो, संप्रदायवाद – भारत छोडो. आज 'करेंगे या मरेंगे' या घोषणेची नव्हे तर नव्या भारताच्या या संकल्पाशी जोडून घेण्याची, या कामाला जुंपून घेण्याची, तनामनाने झटून यश मिळवण्याची आहे. या संकल्पाला उरी बाळगतच जगायचे आहे, लढायचे आहे. या, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्टला संकल्पापासून त्याच्या सिद्धतेपर्यंतचे एक महाअभियान चालवू. प्रत्येक भारतवासी, सामाजिक संस्था, स्थानिक यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संघटना – नवभारतासाठी प्रत्येकाने काही ना काही नवा संकल्प करू या. एक असा संकल्प जो पुढील पाच वर्षांत आपण सिद्ध करून दाखवू. युवकांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था इत्यादी सामूहिक चर्चांचे आयोजन करू शकतात. नव्या नव्या कल्पना पुढे मांडू शकतात. एक राष्ट्र म्हणून आपल्याला कुठे पोहोचायचे आहे? एक व्यक्ती या नात्याने त्यात माझे काय योगदान असू शकते? आपण या संकल्प पर्वाचा भाग बनू.
आजकाल आपण आणखी कुठे असू वा नसू ऑनलाइन नक्कीच असतो. म्हणूनच मी आज विशेषत: ऑनलाइन जगात वावरणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना हे आमंत्रण देतोय की नव्या भारताच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण पद्धतीने योगदान देण्यासाठी पुढे यावे. तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ, पोस्ट, ब्लॉग, आलेख, नवनव्या संकल्पना अशा सर्व गोष्टी घेऊन यावे. या मोहिमेला एका जन-आंदोलनाचे रूप द्यावे. NarendraModiApp वरही तरुण मित्रांसाठी 'Quit India Quiz' सुरू केले जाणार आहे. भारत छोडो विषयावरील ही प्रश्नावली हा देशाच्या युवकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाशी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या नायकांशी त्यांचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न आहे. तुम्ही याचा व्यापक स्तरावर प्रचार आणि प्रसार कराल असे मी मानतो. माझ्या प्रिय देशवासीयांनो, 15 ऑगस्ट, देशाच्या प्रधान सेवकाच्या रूपाने मला लाल किल्ल्यावरून देशाशी संवाद साधण्याची संधी मिळते. मी तर केवळ निमित्त-मात्र आहे. तिथे केवळ ती एक व्यक्ती बोलत नसते. लाल किल्लावरून सव्वाशे कोटी देशवासीयांचा आवाज गुंजतो. त्यांच्या स्वप्नांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न होतो आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की गेली सलग तीन वर्षे 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्या दिवशी मी काय बोलावे, कोणत्या मुद्यांचा आपल्या भाषणात समावेश करावा यासंदर्भातील सूचना देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून माझ्यापर्यंत पोहोचतात. MyGov वर किंवा NarendraModiApp वर आपले विचार नक्की पाठवा. मी स्वत: ते वाचतो आणि 15 ऑगस्टला जितका वेळ मला मिळतो त्यात हे विचार मांडण्याचा प्रयत्न करेन.
गेल्या तिन्ही वेळेला मला माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणांच्याबाबतीत एक तक्रार सतत ऐकू आली की माझे भाषण जरा लांबते. यावर्षी ते थोडे छोटे व्हावे अशी कल्पना मी मनोमन तरी केली आहे. जास्तीत जास्त 40-45-50 मिनिटांत मी ते पूर्ण करेन. हा स्वत:साठीच नियम बनवण्याचा प्रयत्न आहे, माहीत नाही तो मला पाळता येईल की नाही. पण यावेळी माझे भाषण छोटे कसे करता येईल यादृष्टीने प्रयत्न करून बघणार आहे. पाहू या त्यात यश मिळतेय की नाही ते.
देशवासीयांनो आज मला आणखी एका विषयावर बोलायचे आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक सामाजिक अर्थशास्त्र आहे. आणि त्या अर्थशास्त्राला कधीही कमी लेखून चालणार नाही. आपले सण, उत्सव म्हणजे काही फक्त आनंद-उत्फुल्लतेचे प्रसंग असतात असे नाही. आपले उत्सव, आपले सण म्हणजे सामाजिक सुधारणेचे माध्यमही असतात. पण त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सणाचा गरीबातील गरीबाच्या आर्थिक जगण्याशी थेट संबंध असतो. काही दिवसांतच रक्षाबंधन, जन्माष्टमी, त्यानंतर गणेशोत्सव, त्यानंतर चौथ चंद्र, त्यानंतर अनंत चतुर्दशी, दुर्गा पूजा, दिवाळी असे एकामागून एक, एकामागून एक सण येणार आहेत आणि हीच वेळ आहे जेव्हा गरीबांना आपल्या अर्थार्जनाला जोड देण्याची संधी मिळते. आणि या सणांमध्ये एक सहज स्वाभाविक आनंदही मिसळतो. सणांमुळे नात्यांत गोडवा योतो, कुटुंबातील स्नेह वाढतो, समाजात बंधुभाव जागा होतो. व्यक्तीपासून सर्वांपर्यंत एक सहज प्रवास होतो. 'अहम् पासून वयम्' च्या दिशेने जाण्याची संधी तयार होते. आणि अर्थव्यवस्थेबद्दल सांगायचे झाले तर राखीच्या सणाच्या कित्येक महिने आधीपासून शेकडो कुटुंबं छोट्या छोट्या घरगुती उद्योगांच्या माध्यमातून राख्या बनवायला सुरुवात करतात. खादीपासून ते रेशमी धाग्यांपर्यंत न जाणो किती प्रकारच्या राख्या तयार होतात आणि आजकाल तर लोक होममेड, घरच्या घरी बनवलेल्या राख्यांना जास्त पसंती देऊ लागले आहेत. राख्या बनवणारे, राख्या विकणारे, मिठाईवाले, हजारो-शेकडो लोकांचा व्यवसाय या सणाशी जोडला जातो. आमच्या गरीब बंधू-भगिनींची कुटुंब यावरच तर चालतात. आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो. ते केवळ प्रकाशाचे पर्व आहे, केवळ एक सण आहे, घराच्या सजावटीपुरतेच या दिव्यांचे महत्त्व आहे असे नाही. त्याचा थेट संबंध मातीचे छोटे छोटे दिवे बनविणाऱ्या त्या गरीब कुटुंबाशी आहे. पण आज सण आणि सणांशी जोडलेल्या गरीबांच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतानाच मी पर्यावरणाचा मुद्दाही मांडू इच्छितो.
कधी कधी मला वाटते की देशवासी माझ्याहूनही अधिक जागरुक, अधिक सक्रीय आहेत. गेल्या एका महिन्यापासून पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या नागरिकांकडून मला सतत पत्रे येत आहेत. आणि त्यांनी मला आग्रह केला आहे की गणेशोत्सवाच्या संदर्भात पर्यावरणस्नेही म्हणजेच इको-फ्रेंडली गणेशामूर्तींबद्दल मी वेळेआधीच बोलावे जेणेकरून लोक आतापासूनच मातीच्या मूर्तीची निवड करण्याचा बेत आखू शकतील. मी सर्वप्रथम या जागरुक नागरिकांचा आभारी आहे. त्यांनीच मला आग्रह केला की मी आधीच हा विषय मांडावा. यावर्षीच्या सार्वजनिक गणेशात्सवाचे एक विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी या महान परंपरेची सुरुवात केली होती. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125वे वर्ष आहे. सव्वाशे वर्षं आणि सव्वाशे कोटी नागरिक – लोकमान्य टिळकांनी ज्या मूळ हेतूने समाजाच्या एकतेसाठी आणि समाजात जागृती आणण्यासाठी, सामूहिकतेचे संस्कार जागविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला होता, त्याच हेतूला अनुसरून यावर्षीसुद्धा पुन्हा एकदा आपण निबंध स्पर्धांचे आयोजन करू या, चर्चेसाठीच्या सभा भरवू या, लोकमान्य टिळकांच्या योगदानाची आठवण जागवू या. आणि पुन्हा टिळकांची जी भावना होती त्या दिशेने या गणेशोत्सवाला कसे घेऊन जाता येईल हे पाहू या. त्या भावनेला नव्याने कसे जागवता येईल याचा विचार करतानाच पर्यावरणाच्या रक्षणासाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्ती, मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती घरी आणण्याचा संकल्प पाळला जावा. आणि ही गोष्ट मी खूप आधीपासून सांगतोय, तेव्हा तुम्ही सगळे या संकल्पाशी जोडले जाल याची मला खात्री आहे. आणि यातून या मूर्ती बनविणाऱ्या गरीब कारागीरांना, गरीब कलाकारांना रोजगार मिळेल, गरीबांचे पोट भरेल. या, आपण आपल्या उत्सवांना गरीबांशी जोडून घेऊ या, गरीबांच्या अर्थव्यवस्थेशी जोडूया, आपल्या सणांचा आनंद गरीबांच्या घरचा आर्थिक लाभाचा सण बनावा, अर्थप्राप्तीचा आनंद या सणातून त्यांना मिळावा यादृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मी सर्व देशवासियांना येणाऱ्या अनेक सणांसाठी, उत्सवांसाठी खूप-खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण सतत हे पाहत आहोत की शिक्षणाचे क्षेत्र असो की आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र असो वा क्रीडा क्षेत्र असो – आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. नवी नवी उंची गाठत आहेत. आम्हा देशवासीयांना आपल्या या मुलींबद्दल गर्व वाटत आहे, अभिमान वाटत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच आमच्या मुलींनी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यांत आपल्या खेळाचे दिमाखदार प्रदर्शन केले. मला याच आठवड्यात त्या सर्व खेळाडूंना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी बोलून खूप चांगले वाटले, पण मला हे ही जाणवले की विश्वचषक जिंकता न आल्याचे खूप दडपण त्यांच्या मनावर होते. त्यांच्या चेहऱ्यावर हे दडपण, त्याचा ताण दिसत होता. मी माझे एक वेगळे विश्लेषण त्यांना सांगितले. मी म्हटले, 'हे पहा, आजकाल प्रसिद्धीमाध्यमांचा असा काळ आहे की त्यात अपेक्षा वाढवल्या जातात. इतक्या वाढवल्या जातात की जेव्हा यश मिळत नाही तेव्हा त्याच आकांक्षा आक्रोशात बदलतात. आपण असे अनेक खेळ पाहिले आहेत ज्यात भारताचे खेळाडू जर अपयशी झाले तर देशाचा राग त्या खेळाडूंवर व्यक्त होतो. काही लोक आपली मर्यादा सोडून अशा गोष्टी बोलतात, अशा गोष्टी लिहितात ज्या खूप वेदनादायी असतात. पण असे पहिल्यांदाच झालेय की आमच्या मुलींना विश्वचषक जिंकता आला नाही तरीही देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनी त्या पराजयाचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. त्याचा जरासाही भार या मुलींवर पडू दिला नाही. इतकेच नाही तर त्या मुलींनी जे काम केले त्याचे कौतुक केले, गौरव केला. मला हा एक सुखद बदल वाटला आणि मी या मुलींना सांगितले की असे सौभाग्य फक्त तुमच्याच वाट्याला आले आहे. तुम्ही आपला पराजय मनातून काढून टाका. तुम्ही सामना जिंकला असेल किंवा नसेल पण तुम्ही सव्वाशे कोटी देशवासियांना जरूर जिंकून घेतले आहे. खरोखरीच आपल्या देशाची तरुण पिढी, विशेषत: आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खूप काही करत आहेत. मी पुन्हा एकदा देशाच्या तरुण पिढीचे, विशेषत: आपल्या मुलींचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी पुन्हा एकदा स्मरण करतोय ऑगस्ट क्रांतीचे, पुन्हा एकदा स्मरण करतोय 9 ऑगस्टचे, पुन्हा एकदा स्मरण करतोय 15 ऑगस्टचे आणि पुन्हा एकदा स्मरण करतोय 2022 सालाचे जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. प्रत्येक देशवासीयाने संकल्प करावा आणि प्रत्येक देशवासीयाने पुढील पाच वर्षांत तो संकल्प सिद्ध करण्यासाठीचा आराखडा आखावा. आपल्या सगळ्यांना देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे, घेऊन जायचे आहे आणि घेऊन जायचेच आहे. या, आपण एकत्र येऊन पुढील वाट चालू या, काही ना काही करत राहू या. देशाचे भाग्य, भविष्य उत्तम बनणारच या विश्वासाने पुढे जाऊ या. खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद !
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ऋतूपालट होत आहे. यावर्षी उन्हाळा देखील खूप तीव्र होता. मात्र, बरं झालं, मौसमी पाऊस वेळेवर दाखल झाला आणि त्याची पुढील वाटचाल सुरळीत सुरु आहे. देशातल्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे आल्हाददायक वातावरण आहे. पावसांनंतर गार वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसातल्या उन्हाच्या काहिलीपासून दिलासा मिळाला आहे. आणि आपण सर्वानी पाहिलं आहे कि, आयुष्यात कितीही धावपळ असो, कितीही तणाव असो, वैयक्तिक जीवन असो, सार्वजनिक जीवन असो, पावसाचं आगमन आपली मनःस्थिती बदलवून टाकतं.
भगवान जगन्नाथाची रथयात्रा आज देशातल्या अनेक भागांमध्ये खूपच श्रद्धापूर्वक आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आतातर जगातल्या काही भागांमध्येही भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचा उत्सव साजरा केला जातो. भगवान जगन्नाथजी यांच्याशी देशातला गरीब जोडलेला आहे. ज्या लोकांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांनी पाहिलं असेल कि भगवान जगन्नाथजी यांचं मंदिर आणि त्यांच्या परंपरांची ते खूप प्रशंसा करायचे, कारण त्यामध्ये सामाजिक न्याय, सामाजिक समरसता अंतर्निहित होते. भगवान जगन्नाथ गरीबांचे दैवत आहे हे खूप कमी लोकांना माहित असेल , इंग्रजीत एक शब्द आहे जगरनॉट, आणि त्याचा अर्थ आहे, एक असा भव्य रथ जो कुणीही अडवू शकत नाही आणि या जगरनॉटच्या शब्दकोशातील अर्थात देखील असं आढळून येतं कि जगन्नाथाच्या रथाबरोबरच या शब्दाची उत्पत्ती झाली आहे आणि म्हणूनच आपण समजू शकतो कि जगानं देखील जगन्नाथाच्या या यात्रेला आपापल्या पद्धतीनं कशा प्रकारे याचं महत्व स्वीकारलं आहे. भगवान जगन्नाथजी यांच्या यात्रेनिमित्त मी सर्व देशबांधवांना शुभेच्छा देतो. आणि भगवान जगन्नाथ यांच्या श्रीचरणी वंदनही करतो.
भारताचं वैविध्य हे त्याचं वैशिष्ट्य देखील आहे, भारताचं वैविध्य ही भारताची ताकद देखील आहे. रमजानचा पवित्र महिना सर्वदूर श्रद्धेनं पवित्र भावनेसह साजरा करण्यात आला. आता ईदचा सण आहे. ईद-उल-फितरह निमित्त माझ्याकडून सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. रमजान महिना पुण्य दान करण्याचा महिना आहे., आनंद वाटण्याचा महिना आहे आणि जेवढा आनंद वाटाल तेवढाच आनंदही वाढतो. चला, आपण सर्वानी मिळून, या पवित्र सणांपासून प्रेरणा घेऊन आनंदाचा खजिना वाटत जाऊ या, देशाला पुढे नेऊ या. रमजानच्या या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथील मुबारकपूर गावाची अतिशय प्रेरक घटना माझ्यासमोर आली. आपल्या सुमारे साडे तीन हजार मुसलमान बंधू-भगिनींची कुटुंबं त्या छोट्याशा गावात राहतात, एक प्रकारे, आपल्या मुस्लिम कुटुंबांतील बंधू-भगिनींची लोकसंख्या तिथे जास्त आहे. या रमजानच्या काळात गावकऱ्यांनी एकत्रितपणे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
या वैयक्तिक शौचालयासाठी सरकारकडूनही सहाय्य्यता मिळते आणि या सहाय्यांतर्गत अंदाजे १७ लाख रुपये त्यांना देण्यात आले. तुम्हाला ऐकून सुखद आश्चर्यही वाटेल, आनंद होईल. रमजानच्या या पवित्र महिन्यात तिथल्या आपल्या सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी सरकारकडे ते १७ लाख रुपये परत केले. आणि असं सांगितलं कि आम्ही आमचं शौचालय आमच्या मेहनतीने, आमच्या पैशानी बांधू. हे १७ लाख रुपये तुम्ही गावातल्या अन्य सुविधांसाठी खर्च करा. या पवित्र दिनाचं समाजाच्या कल्याणाच्या संधीत रूपांतर केल्याबद्दल मी मुबारकपूरच्या सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करतो. त्यांची एक-एक गोष्ट देखील खूप प्रेरणादायी आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मुबारकपूरला हागणदारी मुक्त केलं. आपल्याला माहित आहे कि आपल्या देशात सिक्कीम, हिमाचल आणि केरळ हे तीन प्रदेश यापूर्वीच हागणदारीमुक्त घोषित झाले आहेत. या आठवड्यात उत्तराखंड आणि हरियाणा देखील हागणदारीमुक्त घोषित होतील. मी या पाच राज्यांच्या प्रशासनाचे, सरकारचे आणि जनतेचे हे कार्य पूर्ण केल्याबद्दल विशेष आभार मानतो .
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात, समाजाच्या जीवनात काही चांगलं करायचं असेल तर खूप मेहनत करावी लागते हे आपण सगळेच जाणतो. जर आपलं हस्ताक्षर खराब आहे, आणि ते सुधारायचं आहे, तर बराच काळ अतिशय जागरूक राहून प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे शरीराच्या, मनाच्या ते अंगवळणी पडतं. स्वच्छतेचा विषयही असाच आहे. या वाईट सवयी आपल्या स्वभावाचा भाग बनल्या आहेत. आपल्या सवयींचा भाग बनल्या आहेत. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला नियमितपणे प्रयत्न करावेच लागतील. प्रत्येकाचं लक्ष वेधून घ्यावंच लागेल. चांगल्या प्रेरणादायी घटनांचं पुन्हा-पुन्हा स्मरण करावंच लागेल. आणि मला आनंद वाटतो कि, आता स्वच्छता हा सरकारी कार्यक्रम राहिलेला नाही. ती समाजाची, सामान्य माणसाची चळवळ बनत चालली आहे. आणि सरकारमध्ये बसलेले लोक देखील लोकसहभागातून हे कार्य पुढे नेतात, तेव्हा त्याची ताकद कित्येक पटीनं वाढते.
अलिकडेच एक अतिशय उत्तम घटना माझ्या ध्यानात आली, जी मी तुम्हाला अवश्य सांगू इच्छितो. हि घटना आहे आंध्र प्रदेशातल्या विजयनगरम जिल्ह्यातील. तिथल्या प्रशासनाने लोकसहभागातून एक मोठं काम हाती घेतलं. १० मार्चला सकाळी ६ वाजल्यापासून १४ मार्चला सकाळी १० वाजेपर्यंत. १०० तासांचं अथक अभियान. आणि उद्दिष्ट काय होत ? १०० तासांमध्ये ७१ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार घरांमध्ये शौचालये बांधणं. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे ऐकून आनंद होईल कि जनतेनं आणि प्रशासनानं मिळून १०० तासांमध्ये १० हजार शौचालये बांधण्याचं काम यशस्वीपणे पूर्ण केलं. ७१ गावं हागणदारीमुक्त झाली. मी सरकारमध्ये बसलेल्या लोकांचं, सरकारी अधिकाऱ्यांचं आणि विजयनगरम जिल्ह्यातल्या त्या गावच्या नागरिकांचं खूप-खूप अभिनंदन करतो, त्यांनी अथक परिश्रमांनी एक अतिशय प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवलं आहे.
गेले काही दिवस 'मन कि बात' साठी जनतेकडून नियमितपणे सूचना येत असतात, NarendraModiApp वर येतात, MyGov.in वर येतात. पत्रांच्या माध्यमातून येतात, आकाशवाणीकडे येतात.
श्रीयुत प्रकाश त्रिपाठी यांनी आणीबाणीची आठवण काढताना लिहिलं आहे कि २५ जून हा लोकशाहीच्या इतिहासातला एक काळा कालखंड आहे. प्रकाश त्रिपाठी यांची लोकशाही प्रति हि जागरूकता कौतुकास्पद आहे. आणि लोकशाही हि एक व्यवस्था आहे असं नाही तर तो एक संस्कार देखील आहे. अंतर्मनातील सजगता हि मुक्तीची किंमत आहे. लोकशाहीप्रती नियमित जागरूकता आवश्यक असते आणि म्हणूनच लोकशाहीवर आघात करणाऱ्या बाबींचेही स्मरण करायचं असतं आणि लोकशाहीच्या चांगल्या बाबींच्या दिशेनं पुढे मार्गक्रमण करायचं असतं. १९७५-२५ जून ती अशी काळरात्र होती, जी कोणताही लोकशाही प्रेमी विसरू शकणार नाही. कोणताही भारतवासी विसरू शकणार नाही. एक प्रकारे देशाचं रूपांतर तुरुंगांमध्ये करण्यात आलं होतं.
विरोधी सूर दाबण्यात आला होता. जयप्रकाश नारायण यांच्यासह देशातल्या गणमान्य नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होत. न्यायव्यवस्था देखील संकटकाळाच्या त्या भयावह सावलीपासून वाचू शकली नव्हती. वृत्तपत्रांना तर पूर्णपणे बेरोजगार बनवण्यात आलं होतं. आजचे पत्रकारिता जगातले विद्यार्थी, लोकशाहीत काम करणारे लोक त्या काळ्या कालखंडाचा वारंवार स्मरण करून लोकशाहीप्रती जागरूकता वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत आणि करत राहायला हवं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी देखील तुरुंगात होते. जेव्हा आणीबाणीला एक वर्ष पूर्ण झालं, तेव्हा अटलजींनी एक कविता लिहिली होती आणि त्यांनी त्यावेळच्या मनस्थितीचं वर्णन आपल्या कवितेत केले आहे.
झुलसाता जेठ मास,
शरद चाँदनी उदास,
झुलसाता जेठ मास,
शरद चाँदनी उदास,
सिसकी भरते सावन का,
अंतर्घट रीत गया,
एक बरस बीत गया,
एक बरस बीत गया ||
सीखचों में सिमटा जग,
किंतु विकल प्राण विहग,
सीखचों में सिमटा जग,
किंतु विकल प्राण विहग,
धरती से अम्बर तक,
धरती से अम्बर तक,
गूंज मुक्ति गीत गया,
एक बरस बीत गया,
एक बरस बीत गया ||
पथ निहारते नयन,
गिनते दिन पल-छिन,
पथ निहारते नयन,
गिनते दिन पल-छिन,
लौट कभी आएगा,
लौट कभी आएगा,
मन का जो मीत गया,
एक बरस बीत गया ||
लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांनी मोठी लढाई लढली आणि भारतासारखा देश, एवढा मोठा विशाल देश, जेव्हा संधी मिळाली तेव्हा भारताच्या जनतेच्या नसानसात लोकशाही कशी भिनली आहे, त्या ताकदीचे दर्शन निवडणुकांच्या माध्यमातून घडवलं. जनतेच्या नसानसात भिनलेली लोकशाहीची ही भावना आपला अमर ठेवा आहे. हा वारसा आपल्याला अधिक सशक्त करायचा आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, प्रत्येक भारतीयाची मान आज जगात अभिमानानं उंचावली आहे. २१ जून २०१७- संपूर्ण जग योगमय झालं होतं. समुद्रापासून पर्वतापर्यंत लोकांनी सकाळी-सकाळी सूर्याच्या किरणांचं स्वागत योगच्या माध्यमातून केलं. असं कुठला भारतीय असेल ज्याला याचा अभिमान वाटला नसेल. असं नाही कि पूर्वी योगाभ्यास नव्हता, मात्र आज जेव्हा योगच्या धाग्यात बांधले गेले आहोत, योग जगाला जोडण्याचं कारण बनला आहे. जगातील बहुतांश सर्व देशांनी योगची हि संधी आपली संधी बनवली. चीनमधील ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ इथं लोकांनी योगाभ्यास केला, तर पेरू इथं माचू-पिच्चू या जागतिक वारसा स्थळी समुद्र सपाटी पासून २४०० मीटर उंचीवर लोकांनी योगासने केली. फ्रान्समध्ये आयफेल टॉवरच्या छायेत लोकांनी योगाभ्यास केला. यूएई मध्ये अबुधाबी इथं ४ हजारांहून अधिक लोकांनी सामूहिक योगाभ्यास केला.
संयुक्त अरब एमिरात येथील अबुधाबी मध्ये जवळपास ४००० पेक्षा अधिक लोकांनी सामूहिक योगाभ्यास केला. अफगाणिस्तान मध्ये, हेरत येथे , भारत अफगाण मैत्री डॅम अर्थात सलमा बांध वर योगाभ्यास करून भारताच्या मैत्रीला एक वेगळा आयाम दिला. सिंगापूर सारख्या छोट्या शहरात ७०स्थानावर कार्यक्रम घेण्यात आलीत . त्यांनी आठवडाभर तेथे अभियान चालवले. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग्य दिवसा निमित्त १० पोस्टल सेवा स्टॅम्प्स काढलेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात योग मास्तरांबरोबर योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्राचे कर्मचारी, जगातील प्रथित यश राजतज्ञ या मध्ये समाविष्ट झाले होते.
यावर्षीही पुन्हा एकदा योगाने जागतिक विक्रम नोंदवण्याचं काम केलं. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं जवळपास ५५ हजार लोकांनी एकाच वेळी योगासने करून एक नवीन जागतिक विक्रम नोंदवला. मलाही लखनौ इथं योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि पहिल्यांदाच मला पावसात योगासने करण्याचं सौभाग्य लाभलं. आपल्या जवानांनी जिथे उणे २०, २५, ४० अंश तापमान असतं त्या सियाचीन मधेही योगाभ्यास केला. आपले सशस्त्र दल असेल, सीमा सुरक्षा दल असेल, आयटीबीपी असेल, सीआरपीएफ असेल, प्रत्येकाने आपल्या कामाबरोबर योगासनांना आपला हिस्सा बनवलं आहे.
या योग दिनी मी म्हटलं होत कि तीन पिढ्या, कारण हा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, म्हणून मी म्हटलं होत कि कुटुंबातील तीन पिढ्या एकत्रितपणे योग करत असतानाचे त्यांचं छायाचित्र मला पाठवा. काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. मला या संबंधी अनेक छायाचित्रे आली, त्यातील काही निवडक छायाचित्रे NarendraModiApp वर संग्रहित करण्यात आली आहेत. ज्याप्रकारे संपूर्ण जगभरात योगाची चर्चा होत आहे, त्यात एक गोष्ट समोर आली कि आजचा जो आरोग्याप्रती दक्ष समाज आहे, तो तंदुरुस्तीकडून वेलनेसच्या दिशेने पावलं टाकत आहे, आणि त्यांना कळून चुकलं आहे कि तंदुरुस्तीचे महत्व तर आहेच परंतु शांती मिळवण्यासाठी योग एक उत्तम मार्ग आहे.
(साउंड बाइट #)
आदरणीय पंतप्रधान, मी, अहमदाबाद वरून डॉक्टर अनिल सोनारा बोलतोय , सर माझा एक प्रश्न आहे कि, केरळ मध्ये आपण देत असलेल्या भाषणाच्या वेळी आम्ही आपल्याला ऐकत होतो तेंव्हा विविध ठिकाणी आपण भेट वस्तू च्या स्वरूपात पुस्तक देत होता ती पद्धत आता बंद का केली? हि पद्धत आपण गुजरात मध्ये आपल्या कार्यालय पासून अवलंबिली होती परंतु येत्या काही दिवसात पुस्तक भेट म्हणून देण्याची पद्धत आढळून येत नाही. काय आपण यावर काही तोडगा काढू शकत नाही का? ज्या द्वारे पुन्हा पुस्तक भेट देण्याची चांगली बाब देशव्यापी होऊ शकेल ?
काही दिवसांपूर्वी मला माझ्या अतिशय आवडत्या कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली. केरळ मध्ये गेली काही वर्षे पी.एन. पनीकर प्रतिष्ठानातर्फे एक चांगला कार्यक्रम आयोजित केला जातो, आणि लोकांना पुस्तके वाचण्याची सवय लागावी, लोक पुस्तक वाचनाप्रति जागरूक व्हावे यासाठी वाचन दिन, वाचन महिना साजरा केला जातो. तर मला त्याच्या उदघाटनाला जाण्याची संधी मिळाली. आणि मला तिथे हे देखील सांगण्यात आलं कि आम्ही बुके नाही तर बुक देतो. मला बरं वाटलं. आता मलाही जी गोष्ट माझ्या ध्यानातून निसटली होती, तिचे पुन्हा स्मरण झालं. कारण जेव्हा मी गुजरात मध्ये होतो, तेव्हा मी सरकारमध्ये एक परंपरा बनवली होती कि आपण पुष्पगुच्छ द्यायचा नाही , तर पुस्तक द्यायचं किंवा हातरुमाल देऊन त्यानेच स्वागत करायचं. तो देखील खादीचा हातरुमाल, जेणेकरून खादीला चालना मिळेल. जोवर मी गुजरातमध्ये होतो, आम्हा सर्वांची सवय बनली होती मात्र इथे आल्यानंतर माझी ती सवय सुटली होती.
मात्र केरळला गेलो, आणि पुन्हा एकदा ती सवय जागरूक झाली. आणि मी तर आता सरकारमध्ये पुन्हा खालच्या लोकांना सूचना द्यायला सुरुवात केली आहे. आपण देखील हळू-हळू स्वभाव बनवू शकतो. पुष्पगुच्छांचे आयुष्य खूप कमी असतं. एकदा हातात घेतला कि मग ठेवून देतो. मात्र जर पुस्तक दिलं तर एक प्रकारे घराचा भाग बनतं , कुटुंबाचा भाग बनतं. खादीचा रुमाल देऊनही स्वागत केलं तर किती गरीब लोकांना मदत होईल. खर्च देखील कमी होतो आणि योग्य प्रकारे त्याचा उपयोगही होतो. जेव्हा मी हि गोष्ट सांगत आहे, तर अशा गोष्टींचं किती ऐतिहासिक मूल्य असतं . गेल्या वर्षी मी जेव्हा इंग्लंडला गेलो होतो, तेव्हा लंडनमध्ये ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनी मला भोजनासाठी निमंत्रित केलं होतं.
एक मातृसुलभ वातावरण होतं. अतिशय प्रेमाने त्यांनी मला जेवू घातलं, मात्र नंतर त्यांनी मला अतिशय आदराने भावात्मक स्वरात एक छोटासा खादीचा आणि धाग्यांनी विणलेला एक रुमाल दाखवला आणि त्यांच्या डोळ्यांत चमक होती, त्या म्हणाल्या कि जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा महात्मा गांधी यांनी मला हा रुमाल भेट म्हणून दिला होता, लग्नाच्या शुभेच्छा म्हणून. किती वर्ष लोटली, मात्र राणी एलिझाबेथ यांनी महात्मा गांधी यांनी दिलेला रुमाल सांभाळून ठेवला आहे. आणि मी गेलो तेव्हा अतिशय आनंदाने, त्या मला दाखवत होत्या. आणि जेव्हा मी पाहत होतो, तेव्हा त्यांचा आग्रह होता कि मी त्याला स्पर्श करून तो पहावा. महात्मा गांधी यांची एक छोटीशी भेट त्यांच्या आयुष्याचा भाग बनली, त्यांच्या इतिहासाचा भाग बनली. मला खात्री आहे कि या सवयी रातोरात बदलत नाहीत, आणि जेव्हा कधी असे म्हणतो तेव्हा टीकेचा धनी व्हावे लागते. मात्र तरीही अशा गोष्टी सांगायला हव्यात, प्रयत्न करत राहायला हवं. आता मी असं तर नाही म्हणू शकत कि मी कुठे गेलो आणि कुणी मला पुष्पगुच्छ भेट दिला तर मी त्याला नकार देईन. असं तर नाही करू शकणार. मात्र तरीही टीका होईल, मात्र बोलत राहिलं तर हळू-हळू सुधारणा देखील होतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, पंतप्रधान या नात्याने अनेक प्रकारची कामे असतात. फायलींमध्ये गुंतलेलो असतो, मात्र मी माझ्यासाठी एक सवय विकसित केली आहे की मला जी पत्रे येतात, त्यातली काही पत्रे मी रोज वाचतो आणि त्यामुळे मला सामान्य माणसाशी जुळून घेण्याची संधी मिळते. वेग-वेगळ्या प्रकारची पत्रे येतात, वेग-वेगळ्या प्रकारची माणसे पत्रे लिहितात. अलीकडेच मला एक असं पत्र वाचायला मिळालं, मला वाटतं की त्या बाबत मी तुम्हाला अवश्य सांगायला हवं. दूर दक्षिण भारतातल्या तामिळ नाडू मधील मदुराई इथल्या एक गृहिणी अरुलमोझी सर्वनन यांनी मला एक पत्र पाठवलं. आणि पत्र काय होत, तर त्यांनी लिहिलं होत की त्यांनी त्यांच्या कुटुंबात मुलांचं शिक्षण वगैरे लक्षात घेऊन काही ना काही आर्थिक उपक्रम हाती घेण्याचा विचार केला, जेणेकरून कुटुंबाला थोडी आर्थिक मदत होईल.
मी मुद्रा योजनेअंतर्गत बँकेतून पैसे घेतले आणि बाजारातून काही सामान आणून त्याचा पुरवठा करण्याच्या दिशेने काम सुरु केले. तेवढ्यात माझ्या लक्षात आले की भारत सरकार ने ई-बाजारपेठ नावाची एक यंत्रणा उभारली आहे. तर मी शोधलं, हे काय आहे? काही लोकांना विचारले, मी स्वतः त्यावर नोंदणी केली आहे , मी देश वासियांना सांगू इच्छितो की, तुम्हाला सुद्धा अशी संधी मिळाली पाहिजे यासाठी इंटरनेट वर ई. जी
ई एम ला भेट द्या , एक नव्या प्रकारची व्यवस्था आहे. जो सरकारला माल पुरवठा करू इच्छितो , झाडू विक्री करू इच्छितो , खुर्ची विकू इच्छितो , टेबल पाठवू इच्छितो , तो आपले नाव त्यावर नोंदणी करू शकतो.
कुठल्या दर्जाचा माल त्याच्या जवळ आहे हे तो लिहून पाठवू शकतो तसेच विक्री किंमत तो लिहू शकतो . सरकारी विभागांना सक्तीचे आहे कि त्यांनी या पोर्टलला भेट द्यावी , जाणून घ्यायला पाहिजे की कोणते पुरवठादार असे आहेत जे वस्तू दर्जाशी तडजोड न करता स्वस्त दर अवलंबितो. त्याला आदेश द्यायला हवे यामुळे अभिकर्ते पद्धत बंद झाली . पूर्ण पारदर्शकता आली. ढवळाढवळ होत नाही , तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे सर्व व्यवहार होतात. ईईजीएम च्या अंतर्गत जे लोक नोंदणी करतात, सरकारचे सर्व विभाग ते बघतात. ऐजन्ट्स नसल्याने बऱ्याच वस्तू स्वस्त मिळतात.
या अरुलमोझी मॅडमनी सरकारच्या या संकेतस्थळावर त्या ज्या-ज्या वस्तू पुरवू शकतात त्याची नोंदणी केली. आणि गम्मत अशी कि त्यांनी मला जे पत्रं लिहिलं आहे ते खूप रोचक आहे. त्यांनी लिहिलं आहे की एक तर त्यांना मुद्रा योजनेअंतर्गत पैसे मिळाले, त्यांचा व्यवसाय सुरु झाला, E-GEM वर मी काय पुरवू शकते, याची यादी मी लिहिली आणि मला पंतप्रधान कार्यालयाकडून ऑर्डर मिळाली. माझ्यासाठी हि नवीन बातमी होती की पंतप्रधान कार्यालयाने काय मागवल असेल. तर त्यांनी लिहिलं आहे की पंतप्रधान कार्यालयाने माझ्याकडून दोन थर्मोस विकत घेतले आणि १,६०० रुपयये मला पाठवण्यात आले. हे आहे सक्षमीकरण. हि आहे उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्याची संधी. जर अरुलमोझी यांनी मला पत्रं लिहिलं नसत तर बहुदा माझ्याही ध्यानात आलं नसतं की E-GEM व्यवस्थेत दूरवर एक गृहिणी छोटंसं काम करत आहे, तिचा माल पंतप्रधान कार्यालयाकडून खरेदी केला जाऊ शकतो. हीच देशाची ताकद आहे. यामध्ये पारदर्शकता आहे, यामध्ये सक्षमीकरण देखील आहे, यामध्ये उद्यमशीलताही आहे,. सरकारी ई-बाजारपेठ-जीईएम. माझी इच्छा आहे कि ज्याला कुणाला अशा प्रकारे सरकारला आपला माल विकायचा आहे त्यांनी यात स्वतःला अधिकाधिक जोडून घ्यावं. मला वाटते कि किमान सरकार आणि कमाल प्रशासन याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि याचं उद्दिष्ट काय आहे- किमान किंमत आणि कमाल सुलभता, कार्यक्षमता आणि पारदर्शकता.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, एकीकडे आपण योगाबाबत अभिमान बाळगतो, तर दुसरीकडे अंतराळ विज्ञानात आपले जे यश आहे त्याचाही अभिमान बाळगू शकतो. आणि हेच तर भारताचे वैशिष्ट्य आहे कि जर आपले पाय योगसाधनेसाठी जमिनीवर आहेत तर आपली स्वप्नं दूर आकाशातली क्षितिजे पार करण्यासाठी देखील आहेत. काही दिवसांपूर्वी क्रीडा क्षेत्रातही आणि विज्ञानातही भारताने खूप काही करून दाखवलं आहे. भारत आज केवळ जमिनीवरच नव्हे तर अंतराळातही आपली पताका फडकवत आहे. दोनच दिवसांपूर्वी इसरोने कार्टोसात-२ मालिकेतल्या उपग्रहासह ३० लघु उपग्रह प्रक्षेपित केले. आणि या उपग्रहांमध्ये भारताव्यतिरिक्त फ्रांस, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका अशा जवळपास १४ देशांचे उपग्रह समाविष्ट होते. आणि भारताच्या या लघु उपग्रह अभियानामुळे कृषी क्षेत्रात शेतीच्या कामात, नैसर्गिक आपत्तीच्या संदर्भात बरीच मदत होईल. काही दिवसांपूर्वीची हि गोष्ट आपणा सर्वांच्या लक्षात असेल, इसरोने ‘GSAT-19’ चे यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. आणि आतापर्यंत भारताने जे उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यामध्ये हे सर्वात वजनदार उपग्रह होते. आणि आपल्या देशातल्या वृत्तपत्रांनी तर हत्तीच्या वजनाशी त्याची तुलना केली होती. तर तुम्ही कल्पना करू शकता कि आपल्या वैज्ञानिकांनी अंतराळ क्षेत्रात किती मोठं काम केलं आहे.
१९ जूनला मंगळ मोहिमेला १ हजार दिवस पूर्ण झाले. तुम्हा सर्वाना माहित असेल कि जेव्हा मंगळ मोहिमेसाठी आपण यशस्वीपणे कक्षेत स्थान मिळवलं होत तेव्हा हि संपूर्ण मोहीम ६ महिन्याच्या कालावधीसाठी होती. त्याचे आयुष्य सहा महिन्याचं होतं. मात्र मला आनंद वाटतो कि आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांची ताकद आहे कि ६ महिने तर पार केलेच , पण १ हजार दिवसांनंतरही आपलं हे मंगळयान अभियान काम करत आहे. छायाचित्रे पाठवत आहे, माहिती देत आहे, वैज्ञानिक माहिती मिळत आहे, तर निर्धारित आयुष्यापेक्षा अधिक काळ काम करत आहे. एक हजार दिवस पूर्ण होणं आपल्या वैज्ञानिक प्रवासासाठी आपल्या अंतराळ प्रवासासाठी महत्वाची बाब आहे.
सध्या क्रीडा क्षेत्रातही आपण पाहत आहोत कि आपल्या युवकांची कामगिरी उंचावत आहे. शिक्षणाबरोबरच खेळांमध्येही आपल्या तरुण पिढीला भवितव्य दिसत असल्याचं जाणवत आहे, आणि आपल्या खेळाडूंमुळे, त्यांच्या पराक्रमामुळे, त्यांच्या कामगिरीमुळे देशाचे नाव उज्वल होत आहे. नुकतंच भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत यांनी इंडोनेशिया खुल्या स्पर्धेत विजय मिळवून देशाचा गौरव वाढवला. या विजयाबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वी मला धावपटू पी.टी. उषा यांच्या उषा स्कुल ऑफ ऍथलेटिक्स च्या सिंथेटिक ट्रॅकच्या उदघाटन समारंभात सहभागी होण्याची संधी मिळाली. आपण खेळांना जितके प्रोत्साहन देऊ, खेळभावनाही त्याबरोबर येईल. व्यक्तिमत्व विकासात खेळ महत्वाची भूमिका पार पाडतो. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात खेळाचे महत्व अन्यसाधारण आहे. देशात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. जर आपल्या कुटुंबातील मुलांना खेळात रस असेल, तर त्यांना संधी द्यायला हवी. त्यांना मैदानातून उचलून खोलीत बंद करून , अभ्यासासाठी प्रवृत्त केले जाऊ नये. त्यांनी अभ्यासही करावा, त्यातही ते चमकदार कामगिरी दाखवू शकत असतील तर दाखवावी, मात्र जर खेळात त्याचे प्राविण्य आहे, आवड आहे, तर शाळा, महाविद्यालय, कुटुंब, आसपासचे लोक प्रत्येकानी त्याला बळ द्यायला हवं, प्रोत्साहन द्यायला हवं. पुढल्या ऑलिम्पिकसाठी प्रत्येकाने स्वप्नं बाळगायला हवीत.
पुन्हा एकदा माझ्या प्रिय देशबांधवांनो, पावसाळी ऋतू, लागोपाठ येणारे सण, एक प्रकारे या कालखंडाची अनुभूतीच नवीन असते. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो. पुढल्या ‘मन कि बात’ च्या वेळी पुन्हा काही नवीन गोष्टी सांगेन.. नमस्कार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. या वर्षीच्या उन्हाळ्याचा विसर पडणे कठीण आहे. मात्र पावसाची वाट पाहिली जातेय. आज, मी आपल्याशी ही बातचित करत असताना रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्याच्या आगमनाप्रित्यर्थ मी भारतातील व विश्वभरातील लोकांना, विशेषत: मुस्लिम समुदायाला या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रमजानमध्ये प्रार्थना, अध्यात्म आणि दानधर्म यांना खूप महत्त्व दिले जाते. आपण हिंदुस्तानी खूप भाग्यवान आहोत, की आपल्या पूर्वजांनी अशा परंपरा निर्माण केल्या आणि आज भारत या गोष्टीचा गर्व करू शकतो, आपण सव्वाशे कोटी देशावासी या गोष्टीचा गर्व करू शकतात की जगातले सर्व संप्रदाय भारतात आहेत. हा एक असा देश आहे जिथे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोकही आहेत आणि ईश्वराला नाकारणारे लोकही आहेत. मूर्तीपूजा करणारे लोकही आहेत आणि मूर्तीपूजेला विरोध करणारे लोकही आहेत. इथे प्रत्येक प्रकारची विचारधारा, प्रत्येक प्रकारची पूजापद्धती, प्रत्येक प्रकारची परंपरा इथे आहे. आपण एकमेकांसोबत जगण्याची कला आत्मसात केली आहे. आणि शेवटी धर्म असो, संप्रदाय असो, विचारधारा असो की परंपरा असो, या साऱ्या गोष्टी आपल्याला एकच संदेश देतात – शांती, एकता आणि सद्भावनेचा. रमजानचा हा पवित्र महिना शांती, एकता आणि सद्भावनेचा हा मार्ग पुढे नेण्याच्या कामी नक्कीच सहाय्यभूत ठरेल. मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो.
गेल्या वेळी जेव्हा मी 'मन की बात' सांगत होतो तेव्हा मी एक शब्द वापरला होता. विशेषत: तरुणांना मी सांगितले होते, की त्यांनी काहीतरी नवे करावे, comfort zone मधून बाहेर पडावे, नवे अनुभव घ्यावेत आणि आयुष्य अशा तऱ्हेने जगण्याचे, थोडी जोखिम पत्करण्याचे, संकटांना हाक घालण्याचे हेच तर वय असते. मला हे सांगायला खूप आनंद होतो आहे की बऱ्याच लोकांनी मला यावरील प्रतिक्रिया दिल्या. वैयक्तिक स्वरूपात मला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा उत्साह सगळ्यांनी दाखवला. मला प्रत्येक गोष्ट तर वाचता आलेली नाही, प्रत्येकाचा संदेश ऐकता आलेला नाही, इतक्या भरपूर गोष्टी आल्या आहेत. पण या संदेशांवर वरवर नजर टाकल्यावर जे काही दिसले त्यानुसार काहींनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला आहे, कुणी नव्या वाद्यांवर हात बसवण्याचा प्रयत्न करतेय, काही लोक youtube चा वापर करून नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत, नवी भाषा शिकत आहेत. काही लोक पाककला शिकत आहेत, काही नृत्य शिकत आहेत, कुणी नाट्यशिक्षण घेत आहे. काही लोकांनी तर लिहिले आहे की आम्ही आता कविता लिहिणे सुरू केले आहे. निसर्गाला समजून घेणे, निसर्गासोबत जगणे यादृष्टीने काही लोक प्रयत्न करीत आहे. या गोष्टींचा मला खूपच आनंद झाला आहे. मी एक फोन कॉल तुम्हालाही ऐकवू इच्छितो.
"मी दीक्षा कात्याल बोलतेय. माझी वाचनाची सवय जवळजवळ सुटलीच होती म्हणूनच या सुट्ट्यांमध्ये मी वाचण्याचा निश्चय केला. जेव्हा मी स्वातंत्र्य लढ्याविषयी वाचायाला लागले तेव्हा मी अनुभवले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे, किती बलिदान द्यावे लागले, किती स्वातंत्र्य सैनिकांनी तुरुंगात वर्षं कंठली आहेत. भगत सिंग, ज्यांनी कमी वयात खूप काही मिळवले त्यांच्यापासून मी खूप प्रेरित झाले. म्हणूनच माझी तुम्हाला विनंती आहे की याविषयी तुम्ही नव्या पिढीला काही संदेश द्या."
मला आनंद वाटतो की तरुण पिढीला आपल्या इतिहासाविषयी, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांविषयी, या देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांविषयी जाणून घेण्यात रस आहे. अगणित महापुरुषांनी स्वातंत्र्यासाठी आपले तारुण्य तुरुंगात घालवले, अनेक तरुण फाशीच्या तख्तावर चढले. काय नाही झेलले त्यांनी आणि म्हणूनच तर आज आपण स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेतोय. आपण एक गोष्ट पाहिली असेल की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी तुरुंगात काळ कंठला त्यांनी लिखाणाचे, अध्ययनाचे मोठे काम केले आणि त्यांच्या लिखाणानेसुद्धा भारताच्या स्वातंत्र्याला बळ दिले.
बऱ्याच वर्षांपूर्वी मी अंदमान निकोबारला गेलो होतो. तिथले सेल्युलर जेल बघायलाही गेलो होतो. आज वीर सावरकर यांची जयंती आहे. वीर सावरकरांनी तुरुंगामध्ये 'माझी जन्मठेप' हे पुस्तक लिहिले. ते कविता लिहायचे, भिंतींवर लिहायचे. छोट्याशा कोठडीत त्यांना बंद करण्यात आले होते. स्वातंत्र्याचे वेड घेतलेल्यांनी कशा यातना सोसल्या असतील. जेव्हा मी सावरकरांचे 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचले तेव्हा त्यातूनच मला सेल्युलर जेल पाहण्याची प्रेरणा मिळाली. तिथे एक ध्वनीप्रकाश कार्यक्रमही सादर केला जातो जो खूपच प्रेरणादायी आहे. हिंदुस्थानातले असे एकही राज्य नसेल, हिंदुस्तानातील एकही भाषासमूह असा नसेल ज्यातील कुणी न कुणी स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगत अंदमानच्या तुरुंगात, त्या सेल्युलर तुरुंगात आपले तारुण्य घालवले नसेल. प्रत्येक भाषा बोलणाऱ्या, प्रत्येक प्रांताच्या, प्रत्येक पिढीच्या लोकांनी या यातना सहन केल्या आहेत.
आज वीर सावरकर यांची जयंती आहे. मी देशाच्या तरुण पिढीला नक्की सांगेन की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यासाठी लोकांनी कितीतरी यातना सोसल्या, कितीतरी कष्ट झेलले. आपण जाऊन सेल्युलर जेल पाहिलेत तर त्याला काळं पाणी का म्हणायचे हे समजते. तिथे जाऊनच ते समजते. तुम्हालाही संधी मिळाली तर जरूर तिथे जा. एकप्रकारे आपल्या स्वातंत्र्याच्या लढाईचे तीर्थक्षेत्र आहे ते. तिथे जरूर जायला हवे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 5 जून हा महिन्याचा पहिला सोमवार आहे. बाकी तर काही विशेष नाही, पण 5 जून हा एक विशेष दिवस आहे कारण हा दिवस 'विश्व पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने या दिनासाठी निश्चित केलेला विषय आहे – connecting people to nature, लोकांना निसर्गाशी जोडणे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर back to basics किंवा मूळाकडे परतणे आणि निसर्गाशी जोडून घेणे म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने याचा अर्थ आहे, स्वत:शी जोडले जाणे, आपले आपल्याशीच नाते जोडणे. निसर्गाशी जोडले जाण्याचा अर्थ आहे आपल्या ग्रहाचे अधिक चांगले संवर्धन करणे. आणि ही गोष्ट महात्मा गांधींपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने कोण सांगू शकेल? महात्मा गांधी अनेकदा म्हणायचे – one must care about a world one will not see.' आपण जे जग पहायला असणार नाही त्याचीही चिंता करणे, त्याचीही काळजी वाहणे हे आपले कर्तव्य आहे. आणि निसर्गाची एक ताकद असते, तुम्हीच कधीतरी हे अनुभवले असेल की खूप थकून घरी आला असाल आणि एक ग्लासभर पाणी तोंडावर मारले की कसे ताजेतवाने वाटते. खूप दमून आला असाल तर खोलीच्या खिडक्या उघडून टाका, दरवाजा उघडा, ताज्या हवेत श्वास घ्या. एक नवे चैतन्य मिळते. ज्या पंचमहाभूतांपासून आपले शरीर बनलेय त्या पंचमहाभूतांशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा आपल्या शरीरात एक नवे चैतन्य जागे होते, एक नवी ऊर्जा प्रकट होते. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेले आहे, पण आपण कधी त्याची दखल घेत नाही, आपण त्याला एका धाग्यामध्ये, एका सूत्रामध्ये बांधत नाही. यापुढे तुम्ही जरूर पहा की जेव्हा जेव्हा आपला नैसर्गिक अवस्थेशी संपर्क येईल, आपल्या आत एक नवे चैतन्य निर्माण होईल. आणि म्हणून 5 जूनची निसर्गाशी जोडून घेण्याची वैश्विक मोहीम आपली स्वत:ची मोहीम बनायला हवी. आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचे रक्षण केले त्याचा काही लाभ आपल्याला मिळत आहे. आता आपण पर्यावरणाचे रक्षण केले तर येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा मिळेल. वेदांमध्ये पृथ्वी आणि पर्यावरण यांना शक्तीचे मूळ मानले गेलेय. आपल्या वेदांमध्ये याचे वर्णन सापडते. आणि अथर्ववेद तर एकाअर्थी पाहिले तर पूर्णपणे पर्यावरणाचा सगळ्यात मोठा दिशादर्शक ग्रंथ आहे आणि तो हजारो वर्ष आधी लिहिला गेलाय. 'माता भूमि: पुत्रो अहम् पृथिव्या:' असे आपल्याकडे म्हटले गेलेय. वेदांमध्ये असे म्हटलेय की आपल्यामध्ये जी शुद्धता आहे ती पृथ्वीमुळे आहे. धरती आपली माता आहे आणि आपण तिचे पुत्र आहोत. आपण भगवान बुद्धांची आठवण काढली तर एक गोष्ट नक्कीच ठळकपणे दिसून येते की महात्मा बुद्ध यांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही घटना झाडाखाली घडल्या. आपल्या देशातही अनेक असे सण, अनेक अशा पूजापद्धती आहेत. सुशिक्षित लोक असोत, अशिक्षित असोत, शहरी असोत, ग्रामीण असोत, आदिवासी समाज असो, निसर्गाची पूजा, निसर्गाबद्दलचे प्रेम हे सहजपणे समाजजीवनाचा एक भाग बनलेले दिसते. पण त्याला आधुनिक शब्दांमध्ये, आधुनिक तर्कांच्या साथीने जोपासण्याची गरज आहे.
अलीकडे राज्यांमधून माझ्यापर्यंत बातम्या पोहोचत असतात. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये वृक्षारोपणाची एक खूप मोठी मोहीम चालू आहे. करोडोंच्या संख्येने वृक्ष लावले जात आहेत. यात शाळेच्या मुलांनाही सहभागी करून घेतले जातेय, सामाजिक संघटना यात सहभागी होत आहेत, स्वयंसेवी संघटना सहभागी होत आहेत, सरकार स्वत: पुढाकार घेत आहे. आपणही या वेळी, या पावसाळ्यात वृक्षारोपणाच्या या कामाला प्रोत्साहन द्यावे, आपले योगदान द्यावे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 21 जून, आता जगासाठी 21 जून हा ओळखीचा दिवस बनला आहे. विश्वभरात हा दिवस 'जागतिक योग दिन' म्हणून ओळखला जातो. खूप कमी काळामध्ये 21 जूनचा हा 'जागतिक योग दिवस' जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरला आहे, लोकांना एकत्र आणत आहे. एका बाजूला विश्वभरात दुही फैलवणाऱ्या अनेक शक्ती आपला विकृत चेहरा दाखवित आहेत. अशा काळात जगाला भारताकडून मिळालेली ही एक खूप मोठी देणगी आहे. योगाच्या माध्यमातून आपण विश्वाला एका सूत्रामध्ये जोडले आहे. ज्याप्रमाणे योग हा शरीर, मन, बुद्धि आणि आत्मा यांना जोडतो, त्याचप्रकारे तो आज एकत्र आणत आहे. आजच्या जीवनशैलीमुळे, धावपळीमुळे, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे तणावरहीत आयुष्य जगणे कठीण होत चालले आहे. अगदी लहान वयापासूनही या तणावपूर्ण मन:स्थितीची लागण झाल्याचे आढळून येत आहे. वाटेल ती औषधे घेत जायची आणि दिवस ढकलत रहायचे अशा या काळात तणाव-मुक्त आयुष्य जगण्यात योगाची भूमिका महत्त्वाची आहे. योग म्हणजे स्वास्थ्य आणि सुदृढता मिळवण्याचा खात्रीचा मार्ग आहे. योग हा फक्त व्यायाम नाही. शरीर-मन, विचार-आचारांतील स्वास्थ्यासह एक अंतरयात्रा चालणे, त्या अंतरर्यात्रेचा अनुभव घ्यायचा असेल तर तो योगाच्या माध्यमातून शक्य आहे. आता दोनच दिवसांपूर्वी मी जगभरातील सरकारांना, सर्व नेत्यांना पत्र लिहिले आहे.
गेल्यावर्षी मी योगाशी संबंधित काही स्पर्धांची घोषणा केली आहे, काही बक्षिसांची घोषणा केली आहे. हळुहळू त्या दिशेने काम पुढे जाईल. मला एक सूचना आली आहे आणि ही मौल्यवान कल्पना सुचिवणाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. मोठीच मनोवेधक सूचना आहे. त्यांनी असे म्हटलेय की यंदाचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्यानिमित्त तुम्ही असे आवाहन करा की या दिवशी कुटुंबातील तीन पिढ्यांनी एकत्र योगासने करावीत. आजी-आजोबा, आई-बाबा, मुलगा-मुलगी- तिन्ही पिढ्यांनी एकत्र योगासने करावीत व त्याचे छायाचित्र अपलोड करावे. काल, आज आणि उद्या यांचा एक असा सुंदर मिलाफ होईल की ज्यातून योगाला एक नवा पैलू मिळेल. ही कल्पना सुचवल्याबद्दल मी आभारी आहे आणि मलाही असे वाटते की ज्याप्रकारे आपण selfie with daughter ची मोहीम चालवली होती आणि एक मोठाच रोचक अनुभव मिळाला होता त्याचप्रमाणे ही तीन पिढ्या एकत्र योगासने करतानाची छायाचित्रे देशात व जगभरात कौतुक जागवेल. जिथे जिथे तीन पिढ्या योगसाधना करीत आहेत, तिथल्या त्या तिन्ही पिढीच्या लोकांचे एकत्रित छायाचित्र तुम्ही NarendraModiApp, MyGov वर नक्की पाठवा. काल, आज आणि उद्याचे ते छायाचित्र असेल, जे सोनेरी भविष्यकाळाची खात्री देईल. मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला अजूनही तीन आठवड्यांचा अवकाश आहे. आजच सरावाला लागा. मी 01 जूनपासून 21 जूनपर्यंत दररोज twitter वर योगासंबंधी काही ना काही पोस्ट टाकत जाईन, तुमच्याशी शेअर करेन. तुम्ही या तीन आठवड्यामध्ये सतत योग या विषयाचा प्राचार करा, प्रसार करा, यात लोकांना सहभागी करून घ्या. एका प्रकारे हे रोगप्रतिकारक आरोग्य संवर्धनासाठीचे आंदोलनच आहे. मी तुम्हा सर्वांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे.
जेव्हा तुम्ही लोकांनी मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी सोपवलीत, जेव्हा माझ्या कार्यकाळातल्या पहिल्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून प्रथमच बोलण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी मी स्वच्छतेबद्दल बोललो होतो. तेव्हापासून आजपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या भागांतून माझा प्रवास चालू आहे आणि मोदी काय करत आहेत, मोदी कुठे जात आहेत, मोदींनी काय काय केले यावर बारीक नजर ठेवून आहेत असे माझ्या लक्षात आले आहे. याचे कारण मला एक खूपच लक्षवेधी दूरध्वनी आला आणि त्यांनी जे सांगितले त्याप्रकारे मी क्वचितच कधी विचार केला असेल. पण ही गोष्ट ध्यानात आणल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हा दूरध्वनी तुम्हीही ऐका.
"नमस्कार मोदी जी, मी मुंबईहून नैना बोलत आहे. मोदी जी टीव्हीवर आणि सोशल मीडियावर मी नेहमी बघते की तुम्ही जिथे जिथे जाता तिथे साफ-सफाईवर खूपच भर दिला जातो. मुंबई असो की सूरत, तुमच्या आवाहनानुसार लोकांनी सामूहिक स्वरूपात स्वच्छतेला एक मिशन म्हणून हाती घेतलेय. मोठे तर यात सहभागी आहेतच पण मुलांमध्येही स्वच्छतेबाबत जागरुकता आली आहे. लहान मुले मोठ्या माणसांना रस्ते घाण करण्यापासून रोखताना अनेकदा दिसतात. काशीच्या घाटांवरून तुम्ही जी स्वच्छता मोहीम सुरू केली होती तिने तुमच्या प्रेरणेने एका आंदोलनाचे रूप घेतलेय."
तुमचे म्हणणे खरे आहे की मी जिथे जिथे जातो, तिथे सरकारी यंत्रणा तर स्वच्छतेचे काम करतेच पण अलीकडे समाजातही स्वच्छतेचा उत्सव साजरा होताना दिसतो. मी तिथे पोहोचण्याच्या पाच दिवस आधी, सात दिवस आधी, दहा दिवस आधी खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता कार्यक्रम हाती घेतले जातात. प्रसारमाध्यमांतूनही या प्रयत्नांना प्राधान्याने प्रसिद्धी दिली जाते. आता काही दिवसांपूर्वीच मी गुजरातमधल्या कच्छ येथे गेलो होतो. तिथे खूप मोठी स्वच्छता मोहीम चालू आहे. पण या दोन गोष्टींचा परस्परसंबंध मला जाणवला नव्हता. पण हा दूरध्वनी आल्यानंतर मी विचार केला की हो, ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट लक्षात आल्याने मला किती आनंद झाला असेल याची कल्पना आपण करू शकता आणि देशही या गोष्टींची किती छान प्रकारे दखल घेत आहे. स्वच्छतेचा संबंध माझ्या दौऱ्यांशीही जोडला जातोय याहून आनंदाची गोष्ट माझ्यासाठी दुसरी कोणती असेल? पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बाकीची तयारी करण्याची सवय असतेच, पण स्वच्छता ही त्यातली प्रमुख गोष्ट बनली आहे. स्वच्छतेवर प्रेम करणाऱ्या कुणासाठीही ही गोष्ट आनंददायक आहे, प्रेरणादायी आहे. या स्वच्छतेच्या कामाला बळ पुरविणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. कुणीतरी आणखी एक सूचना केली आहे. तशी तर ती खूपच थट्टेच्या सुरात केलेली सूचना आहे. मी हे करू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण त्यांनी म्हटलेय की, मोदी जी तुम्ही आपले दौरे ठरवताना, ज्या लोकांनी तुम्हाला आमंत्रण दिलेय त्यांना स्वच्छतेसंबंधी काही प्रश्न विचारा. मला बोलवायचे असेल तर तुमच्याकडे स्वच्छतेची स्थिती कशी असेल? तुम्ही किती टन कचरा मला भेट करणार? हे विचारा आणि या आधारावरच तुम्ही आपला दौरा नक्की करा. कल्पना खूप चांगली आहे, पण मला यावर विचार करावा लागेल. मात्र हे आंदोलन उभे रहायला हवे हे तर खरे आहे आणि काहीतरी वस्तू, स्मृतीचिन्ह भेटीदाखल देण्याऐवजी स्वच्छता मोहीमेतून निघालेला अमुक टन कचरा भेटी दाखल दिला जावा ही चांगलीच गोष्ट आहे. केवढे मोठे मानवतेचे काम होईल ते. एक गोष्ट मी नक्की सांगेन, की या कचऱ्याला टाकाऊ मानू नये, ती संपत्ती आहे, एक स्त्रोत आहे. एकदा का आपण या कचऱ्याला संपत्ती मानणे सुरू केले की कचरा व्यवस्थापनाच्या कित्येक नवनव्या पद्धती आपल्यासमोर येतील. 'स्टार्ट अप' शी जोडले गेलेले युवकही नवनव्या योजना घेऊन येतील. नवनवी साधने घेऊन येतील. भारत सरकारने राज्यांतील सरकारांच्या मदतीने, शहरांच्या लोकप्रतिनिधींच्या मदतीने कचरा व्यवस्थापनाची एक मोठी मोहीम उघडण्याचे निश्चित केले आहे. 5 जून, जागतिक पर्यावरण दिनी सुमारे चार हजार शहरांमध्ये घन कचरा, द्रवरूप कचरा गोळा करण्यासाठी तशा प्रकारची साधने उपलब्ध होणार आहेत. दोन प्रकारच्या कचरापेट्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यापैकी एक हिरव्या रंगाची व दुसरी निळ्या रंगाची असेल. दोन प्रकारचा कचरा तयार होत असतो - एक ओला कचरा आणि दुसरा सुका कचरा. चार हजार शहरांमध्ये या कचरापेट्या ठेवल्या जाणार आहेत. आपण शिस्तीचे पालन करीत सुका कचरा निळ्या कचराकुंडीत आणि ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत टाकावा. उदाहरणार्थ स्वयंपाकघरातून जो कचरा निघतो, मग त्यात भाज्यांची साले असतील, उरलेले अन्न असेल, अंड्याचे कवच असेल, पालापाचोळा असेल, हा सगळा ओला कचरा आहे आणि तो हिरव्या रंगाच्या कचरापेटीत टाकावा. या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्यांचा शेतामध्ये उपयोग होतो. आणि शेताचा रंग हिरवा असतो इतके जरी लक्षात ठेवलेत तरीही ओला कचरा हिरव्या कचराकुंडीत टाकायचा आहे हे लक्षात राहील. दुसऱ्या प्रकारच्या कचऱ्यामध्ये रद्दी कागद, पुठे, लोखंड, काच, कापड, प्लास्टिक, पॉलिथिन, तुटलेले डबे, रबर, धातू अशा खूप गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे सुका कचरा आहे. जो यंत्रामध्ये टाकून रिसायकल करावा लागतो. म्हणजे त्याची पुननिर्मिती करावी लागते. एरवी तो कधी उपयोगात आणला जाऊ शकत नाही. असा कचरा निळ्या कचराकुंडीत टाकायचा आहे. मला खात्री आहे की आपण अशी एक संस्कृती विकसित करू. स्वच्छतेच्या दिशेने आपल्याला प्रत्येक वेळी नवे पाऊल टाकतच जायचे आहे तेव्हा कुठे गांधीजींनी पाहिलेले स्वच्छतेबद्दलचे स्वप्न आपण पूर्ण करू शकू. आज मला एका गोष्टीचा उल्लेख गर्वाने करायचा आहे की केवळ एका व्यक्तीने जरी मनाशी ठाम निर्धार केला तरीही तो मोठे जनआंदोलन उभारू शकतो. स्वच्छता हे असेच एक काम आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या कानावर एक गोष्ट आली असेल. मुंबईतला सर्वात घाण समजला जाणाला वर्सोवा किनारा आज स्वच्छ, सुंदर वर्सोवा किनारा बनला आहे. हे अचानक घडलेले नाही. नागरिकांनी जवळजवळ 80-90 आठवडे सतत कष्ट करून वर्सोवा समुद्रकिनाऱ्याचा कायापालट करून टाकला. हजारो टन कचरा वेचला गेला आणि तेव्हा कुठे आज वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर बनला. या कामाची संपूर्ण जबाबदारी Versova Residence Volunteer ( VRV) ने उचलली होती. श्री. अफरोज शाह नावाच्या सद्गृहस्थांनी 2015 पासून प्राणपणाने या कामाला जुंपून घेतले होते. हळुहळू काम विस्तारत गेले. त्याचे जन-आंदोलन बनले. आणि याच कामासाठी श्री. अफरोज शाह यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमांतर्गत खूप मोठा पुरस्कार दिला गेला. Champions Of the Earth नावाचा हा पुरस्कार मिळविणारे ते पहिले भारतीय बनले. श्री. अफरोज शाह यांचे मी अभिनंदन करतो, या आंदोलनाचे अभिनंदन करतो. ज्या प्रकारे लोक-संग्रह केल्याप्रमाणे त्यांनी संपूर्ण परिसरातील लोकांना या कामाशी जोडून घेतलं आणि त्याला जनआंदोलनाचे रूप दिले ते एक प्रेरणादायी उदाहरण आहे.
बंधू भगिनिंनो आज तुम्हाला आणखी एक गोष्ट मोठ्या आनंदाने सांगायची आहे. मला असे सांगण्यात आलेय की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जम्मू-काश्मीरमधील 'रियासी ब्लॉक' हा भाग हगणदरीमुक्त झाला आहे. मी रियासी ब्लॉकच्या सर्व नागरिकांचे, तिथल्या प्रशासकांचे, जम्मू-काश्मीरने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे, यासाठी त्यांचे अभिनंदन करतो. आणि मला असेही सांगण्यात आले आहे की या संपूर्ण चळवळीच्या अग्रभागी जम्मू-काश्मीरमधील त्या परिसरात राहणाऱ्या महिला होत्या. त्यांनी जाणीवजागृतीसाठी तिथे मशाल मोर्चे काढले. घराघरांत, गल्ल्यागल्ल्यांतून जाऊन त्यांनी लोकांना प्रेरित केले. त्या माता-भगिनींचे मी मनापासून अभिनंदन करतो, तिथल्या प्रशासकांचे अभिनंदन करतो, ज्यांनी जम्मू-काश्मीरच्या भूमीवरील एक ब्लॉक हगणदरीमुक्त बनवून उत्तम सुरुवात केली आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या महीना-पंधरा दिवसांपासून वर्तमानपत्रांतून, टीव्ही चॅनल्सवरून, सोशल मीडियावरून, विद्यमान सरकारच्या 3 वर्षांचा कामगिरीचा लेखाजोखा घेतला जातोय. 3 वर्षांपूर्वी तुम्ही मला आपल्या प्रमुख सेवकाची जबाबदारी दिली होती. खूप सारी सर्वेक्षणे केली गेली आहेत, खूप साऱ्या जनमत चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. या सर्व प्रक्रियेला मी खूपच सकारात्मक चिन्ह म्हणून पाहतो. या तीन वर्षांच्या कार्यकाळाला प्रत्येक कसोटीवर पारखले गेले आहे. समाजाच्या प्रत्येक गटातील लोकांनी त्याचे विश्लेषण केले आहे. लोकशाहीमधील ही एक उत्तम प्रक्रिया आहे आणि माझे असे स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये सरकारांनी उत्तरदायी असायला हवे, जनता-जनार्दनाला आपल्या कामाचा हिशेब द्यायला हवा. ज्यांनी वेळ काढून आमच्या कामाची सखोल चिकित्सा केली, त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यात कुठे कौतुक केलं गेलंय, कुणी पाठिंबा दिला आहे, कुठे काही त्रुटी नोंदवल्या आहेत. मी या सर्वच गोष्टी महत्वाच्या मानतो. ज्यांनी टीकात्मक आणि महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत अशा लोकांचेही मी आभार मानतो. त्रुटींवर, कमतरतांवर प्रकाश टाकला गेला तर त्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. गोष्ट चांगली असू दे, बरी असू दे, वाईट असू दे, जे काही आहे त्यातूनच शिकायचे आणि त्याच्याच आधारे पुढे जायचे आहे. विधायक टीका लोकशाहीला बळ पुरवते. एका जागरुक राष्ट्रासाठी, एका चैतन्यपूर्ण राष्ट्रासाठी ही घुसळण खूप आवश्यक असते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच एक सामान्य नागरिक आहे आणि एक चांगल्या-वाईट प्रत्येक गोष्टीचा प्रभाव माझ्यावरही अगदी तसाच होतो जसा तो कोणत्याही सामान्य नागरिकाच्या मनावर होईल. 'मन की बात' ला कुणी एकतर्फी संवाद म्हणून पाहते, काही लोक यावर राजकीय दृष्टिकोनातूनही टिपण्णी करतात. पण इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर मला एक गोष्ट जाणवतेय. मी जेव्हा 'मन की बात' सुरू केली तेव्हा या गोष्टीचा मी विचार केला नव्हता. ती गोष्ट म्हणजे, 'मन की बात' या कार्यक्रमामुळे मी हिंदुस्तानातील प्रत्येक परिवाराचा सदस्य बनलो आहे. असे वाटते जणू काही मी घरीच, कुटुंबामध्ये बसून घरच्याच गोष्टींबद्दल हितगूज करत आहे. आणि अशी शेकडो कुटुंबे आहेत ज्यांनी मला ही गोष्ट लिहून कळवली आहे. आणि मी मगाशीच म्हणालो त्याप्रमाणे एक सामान्य माणूस म्हणून माझ्या मनावर या गोष्टीचा प्रभाव पडतो. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रपती भवनात, माननीय राष्ट्रपती, माननीय उपराष्ट्रपती, माननीय लोकसभा अध्यक्ष महोदया या साऱ्यांनी 'मन की बात' वरील एका विश्लेषणात्मक पुस्तकाचे प्रकाशन केले. एक व्यक्ती म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून ही घटना माझ्या उत्साहात भर टाकणारी आहे. मी राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपतीजी आणि अध्यक्ष महोदया यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तींनी वेळात वेळ काढून 'मन की बात' ला हे महत्व दिले. एका तऱ्हेने 'मन की बात' ला एक नवा पैलू दिला. आमचे काही मित्र जेव्हा या 'मन की बात' पुस्तकावर काम करत होते तेव्हा त्यांनी कधीतरी माझ्याशीही चर्चा केली होती आणि नवलाची बाब म्हणजे काही काळापूर्वी जेव्हा या पुस्तकाबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा अबुधाबीस्थित अकबर साहेब नावाच्या एका कलाकाराने स्वत:हून असा प्रस्ताव ठेवला की 'मन की बात' मध्ये ज्या विषयांवर चर्चा आहे, त्याबद्दलची रेखाचित्रे ते आपल्या कलेच्या माध्यमातून बनवून देतील. या कामासाठी एक पैसाही न घेता, केवळ आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी अकबर साहेब यांनी 'मन की बात'ला कलेचे रूप दिले. मी अकबर साहेब यांचा आभारी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पुन्हा भेटू तोवर देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्या पाऊस पोहोचला असेल, ऋतू बदललेला असेल, परीक्षांचे निकाल आलेले असतील, नव्याने विद्यार्थी जीवनाची सुरुवात होणार असेल आणि पावसाच्या आगमनाबरोबरच येईल एक नवा आनंद, नवा सुगंध. चला, आपण सगळ्यांनी अशा वातावरणात निसर्गावर प्रेम करीत पुढे जाऊ या. माझ्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! प्रत्येक 'मन की बात' भागाच्या पूर्वी देशातल्या कानाकोपऱ्यातून, प्रत्येक वयोगटातल्या लोकांकडून, 'मन की बात' संबंधी अनेक सूचना येतात. आकाशवाणीवर येतात, NarendraModiApp वर येतात, मायगव्हच्या माध्यमातून येतात, दूरध्वनीद्वारे येतात, ध्वनिमुद्रित संदेशांच्या माध्यमातून येतात आणि जेव्हा कधी-कधी मी वेळ काढून पाहतो तेव्हा माझ्यासाठी तो एक सुखद अनुभव असतो. एवढी वैविध्यपूर्ण माहिती मिळते. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात शक्तीचे भांडार आहे. साधकाप्रमाणे समाजासाठी झटलेल्या लोकांचे अगणित योगदान, दुसरीकडे बहुधा सरकारची नजरच जात नसावी, अशा समस्यांचे भांडार देखील नजरेस पडते. बहुधा यंत्रणेलाही सवय झाली असावी, लोकं देखील सरावली असतील आणि मला आढळून आले कि मुलांचे कुतूहल, तरुणांची महत्वाकांक्षा, थोरा-मोठ्यांच्या अनुभवाची शिदोरी, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर येतात. दरवेळी जेवढ्या सूचना 'मन की बात' साठी येतात, सरकारमध्ये त्यांचे सविस्तर विश्लेषण होते. सूचना कशा प्रकारच्या आहेत, तक्रारी काय आहेत, लोकांचे अनुभव काय आहेत. साधारणपणे असे आढळून आले आहे कि मनुष्याचा स्वभाव असतो दुसऱ्यांना सल्ला देण्याचा. रेल्वेमध्ये, बसमध्ये जाताना, कुणाला खोकला आला तर लगेच दुसरा येऊन सांगतो कि असे करा. सल्ला देणे, सूचना देणे, हे जणू काही आपल्याकडे स्वभावातच आहे. सुरुवातीला 'मन की बात' संबंधी जेव्हा सूचना यायच्या, सल्लारूपी शब्द ऐकू येत होते, वाचायला मिळत होते, त्यामुळे आमच्या टीमलाही असेच वाटायचे कि अनेक लोकांना बहुधा ही सवय असावी, मात्र जेव्हा आम्ही त्याकडे बारकाईने पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी खरोखरच भारावून गेलो. बहुतांश सूचना देणारे ते लोक आहेत, माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे ते लोक आहेत, जे खरोखरच आपल्या आयुष्यात काही-ना-काही करतात. काही तरी चांगले व्हावे यासाठी ते आपली बुद्धी, शक्ती, सामर्थ्य, परिस्थिती नुसार प्रयत्न करत असतात आणि या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या, तेव्हा मला वाटले कि या सामान्य सूचना नाहीत. हे अनुभवाचे बोल आहेत. काही लोक सूचना अशासाठीही करतात कारण त्यांना वाटते जर हेच विचार तिथे, जिथे काम करत आहेत, ते विचार जर अन्य लोकांनी ऐकले आणि त्याला एक व्यापक स्वरूप मिळाले तर अनेक लोकांना लाभ होऊ शकतो. आणि म्हणूनच, त्यांची स्वाभाविक इच्छा असते कि 'मन की बात' मध्ये याचा उल्लेख व्हावा. या सर्व गोष्टी माझ्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहेत. मी सर्वप्रथम, बहुतांश सूचना ज्या कर्मयोग्यांच्या आहेत, समाजासाठी काही-ना-काही तरी करणाऱ्या लोकांच्या आहेत, त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो. एवढेच नाही, एखाद्या गोष्टीचा मी जेव्हा उल्लेख करतो, तेव्हा अशा काही गोष्टी लक्षात येतात, तेव्हा खूपच आनंद होतो. गेल्या वेळी 'मन की बात' मध्ये काही लोकांनी मला सूचना केली होती, अन्न वाया जात आहे, त्यासंबंधी चिंता व्यक्त केली होती, आणि मी त्याचा उल्लेख केला होता. आणि जेव्हा उल्लेख केला, त्यांनंतर NarendraModiApp वर, माय गव्ह वर देशातल्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकांनी, वाया जाणारे अन्न टाळण्यासाठी अभिनव कल्पनांसह काय-काय प्रयोग केले. मी देखील कधी विचार केला नव्हता, आज आपल्या देशात विशेषतः तरुण पिढी अनेक वर्षांपासून हे काम करत आहे. काही सामाजिक संस्था करत आहेत, हे तर आपण गेली काही वर्षं ऐकून आहोत, मात्र माझ्या देशातले तरुण या कामात सहभागी आहेत, हे तर मला नंतर समजले. अनेकांनी मला विडिओ पाठवले आहेत. अनेक ठिकाणे आहेत जिथे पोळ्यांची बँक सुरु आहे. या पोळ्यांच्या बँकेत लोक आपल्याकडच्या पोळ्या जमा करतात, भाजी जमा करतात आणि जे गरजू लोक आहेत ते तिथून घेऊन जातात. देणाऱ्यालाही समाधान मिळते, घेणाऱ्यालाही अपमानित वाटत नाही. समाजाच्या सहकार्याने कशी कामे होतात, त्याचे हे उदाहरण आहे.
आज एप्रिल महिना पूर्ण होत आहे, शेवटचा दिवस आहे. 1 मे रोजी गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा स्थापना दिन आहे. या निमित्त दोन्ही राज्यांच्या नागरिकांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. दोन्ही राज्यांनी विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये महापुरुषांची अखंड मालिका आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देत राहते आणि या महापुरुषांचे स्मरण करतानाच राज्याच्या स्थापना दिनी, 2022, स्वातंत्र्याची 75 वर्षं, आपण आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या समाजाला, आपल्या शहराला, आपल्या कुटुंबाला कुठवर घेऊन जाणार याचा संकल्प करायला हवा. तो संकल्प तडीस नेण्यासाठी योजना बनवायला हव्यात आणि सर्व नागरिकांच्या सहभागाने पुढे जायला हवे. माझ्या या दोन्ही राज्यांना खूप-खूप शुभेच्छा.
एक काळ होता, जेव्हा हवामान बदल हा शैक्षणिक जगताचा विषय असायचा, चर्चासत्राचा विषय असायचा. मात्र आज, आपणा लोकांच्या दैनंदिन आयुष्यात, आपण अनुभवही घेतो, आश्चर्यही व्यक्त करतो. निसर्गानेही खेळाचे सर्व नियम बदलून टाकले आहेत. आपल्या देशात मे-जून मध्ये जो उन्हाळा असतो, तो यंदा मार्च-एप्रिल मध्ये अनुभवण्याची नामुष्की ओढवली आहे. आणि मला 'मन की बात' वर जेव्हा मी लोकांच्या सूचना घेत होतो, तर बहुतांश सूचना या उन्हाळ्याच्या दिवसांत काय करायला हवे, याबाबत लोकांनी सूचना केल्या आहेत. तसे या सर्व गोष्टी प्रचलित आहेत. नवीन काही नसते, मात्र तरीही त्यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करणे खूप उपयोगी पडते.
श्रीयुत प्रशांत कुमार मिश्र, टी .एस. कार्तिक अशा अनेक मित्रांनी पक्ष्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे कि व्हरांड्यात, गच्चीवर, पाणी ठेवायला हवे आणि मी पाहिले आहे कि कुटुंबातली लहान-लहान मुले हे काम आवडीने करतात. एकदा का त्यांना कळले कि हे पाणी का भरायचे कि ते दिवसभरात 10 वेळा डोकावून पाहतात कि जे भांडे ठेवलेले आहे त्यात पाणी आहे कि नाही आणि पाहत राहतात कि पक्षी आले कि नाही. आपल्याला वाटते कि हा त्यांचा खेळ चालला आहे, मात्र खरोखरच लहान मुलांच्या मनात या संवेदना जागवण्याचा एक अदभुत अनुभव असतो. तुम्ही देखील कधी बघा पशु-पक्ष्यांचा थोडासा लळा एका नव्या आनंदाची अनुभूती करून देतो.
काही दिवसांपूर्वी मला गुजरात इथून श्रीयुत जगत भाई यांनी एक पुस्तक पाठवले आहे, 'Save The Sparrows’ आणि यात त्यांनी चिमण्यांची संख्या जी कमी होत आहे त्याबाबत चिंता तर व्यक्त केली आहेच, मात्र त्यांनी स्वतः अभियान स्वरूपात त्यांच्या संरक्षणासाठी काय प्रयोग केले, काय प्रयत्न केले, खूप छान वर्णन या पुस्तकात केले आहे. तसे आपल्या देशात, पशु-पक्षी, निसर्ग त्यांच्यासोबत सह-जीवन या रंगाने आपण रंगलेलो आहोत, मात्र तरीही हे आवश्यक आहे कि सामूहिकपणे अशा प्रयत्नांना बळ द्यायला हवे. जेव्हा मी गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा 'दाऊदी बोहरा समाज'चे धर्मगुरू सैय्यदना साहेब यांना शंभर वर्ष पूर्ण झाली होती. ते 103 वर्ष जगले. आणि त्यांच्या शंभरीनिमित्त बोहरा समाजाने बुरहानी प्रतिष्ठानद्वारा चिमण्या वाचवण्यासाठी एक खूप मोठे अभियान राबवले होते. त्याचा शुभारंभ करण्याची मला संधी मिळाली होती. सुमारे 52 हजार बर्ड फीडर्स त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यात वितरित केली होती. जागतिक विक्रमांच्या गिनीज बुकमध्ये त्याला स्थान मिळाले आहे. कधी-कधी आपण इतके व्यस्त असतो, वृत्तपत्र टाकणारा, दूध देणारा, भाजीवाला, पोस्टमन, कुणीही आपल्या घराच्या दारी येते, मात्र आपण विसरून जातो कि उन्हाळ्याचे दिवस आहेत, जरा त्याला पाणी हवे का ते विचारू या. तरुण मित्रांनो, तुमच्याबरोबर देखील मला काही गप्पा मारायच्या आहेत. मला कधी-कधी काळजी वाटते कि आपल्या तरुण पिढीतल्या अनेकांना आरामदायी आयुष्य व्यतीत करायला मजा वाटते. आई-वडीलही एका बचावात्मक अवस्थेत त्यांचे संगोपन करत असतात. अन्य काही दुसऱ्या टोकाचेही असतात, मात्र बहुतांश आरामदायी अवस्था वाले नजरेस पडतात. आता परीक्षा संपल्या आहेत. सुटीची मजा घेण्याच्या योजना बनल्या असतील. उन्हाळी सुट्टी, उष्मा असूनही जरा बरे वाटते. मात्र मी एक मित्र या नात्याने तुमची सुट्टी कशी जावी, यासंबंधी काही बोलायचे आहे. मला खात्री आहे काही लोक नक्की प्रयोग करतील आणि मला सांगतिलही. तुम्ही या सुट्टीचा उपयोग, मी तीन प्रस्ताव देतो, त्यापैकी तिन्ही केलेत तर खूपच चांगली गोष्ट आहे, मात्र तीनापैकी एखादा करण्याचा प्रयत्न करा. हे पहा कि नवा अनुभव असेल, प्रयत्न करा कि नवीन कौशल्याची संधी साधा, प्रयत्न करा कि ज्या विषयाबाबत ना कधी ऐकले आहे, ना पाहिले आहे, ना कधी विचार केला आहे, ना माहिती आहे, मात्र तरीही तिथे जाण्याची इच्छा आहे आणि जा तिथे. नवीन जागा, नवा अनुभव, नवीन कौशल्य. कधी-कधी एखादी गोष्ट टीव्हीवर पाहणे किंवा पुस्तकात वाचणे किंवा परिचितांकडून ऐकणे आणि ती गोष्ट स्वतः अनुभवणे, दोन्हींमध्ये जमीन-आस्मानाचा फरक आहे. मी तुम्हाला विनंती करेन कि या सुट्टीत तुम्हाला जे काही कुतूहल आहे त्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करा, नवीन प्रयोग करा. प्रयोग सकारात्मक असावा, आरामदायी वृत्तीच्या बाहेर नेणारा असावा. आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत, सुखी कुटुंबातले आहोत. काय मित्रांनो, कधी इच्छा होते का आरक्षणाशिवाय रेल्वेच्या द्वितीय श्रेणीतून तिकीट काढून चढण्याची, किमान 24 तासांचा प्रवास करण्याची, काय अनुभव येतो. त्या प्रवाशांच्या गप्पा काय आहेत, ते स्थानकावर उतरल्यावर काय करतात, बहुधा वर्षभर जे शिकू शकणार नाही ते 24 तासांच्या आरक्षणाशिवाय, गर्दीने तुडुंब भरलेल्या गाडीत झोपायलाही न मिळणे, उभ्या-उभ्या प्रवास करणे. कधी तरी अनुभव घ्या. मी असे नाही म्हणत पुन्हा पुन्हा करा, एकदा तर करा. संध्याकाळची वेळ, आपला फुटबॉल घेऊन, व्हॉलीबॉल घेऊन किंवा कोणतेही खेळाचे साहित्य घेऊन तद्दन गरीब वस्तीत जा. त्या गरीब मुलांबरोबर स्वतः खेळा, तुम्ही बघा, बहुधा आयुष्यात खेळाचा आनंद यापूर्वी कधी मिळाला नसेल, असा तुम्हाला मिळेल. समाजात अशा प्रकारचे आयुष्य जगणाऱ्या मुलांना जेव्हा तुमच्याबरोबर खेळण्याची संधी मिळेल, तुम्ही कधी विचार केला आहे, त्यांच्या आयुष्यात किती मोठा बदल होईल. आणि मला खात्री आहे एकदा गेलात, पुन्हा-पुन्हा जावंसे वाटेल. हा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवेल. अनेक स्वयंसेवी संस्था सेवादायी काम करत असतात. तुम्ही तर गुगल गुरूशी जोडलेले आहात, त्यावर शोधा. अशाच एखाद्या संघटनेबरोबर 15 दिवस, 20 दिवसांसाठी सहभागी व्हा, जा, जंगलांमध्ये जा. कधी-कधी खूप उन्हाळी शिबिरे असतात. व्यक्तिमत्व विकासाची असतात, अनेक प्रकारच्या विकासाची असतात, त्यात सहभागी होऊ शकता. मात्र त्याचबरोबर कधी तुम्हाला वाटते कि तुम्ही असे उन्हाळी शिबीर केले आहे, व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यासक्रम केला आहे. तुम्ही कोणताही मोबदला न घेता समाजातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना अशी संधी मिळाली नाही आणि जे तुम्ही शिकला आहात, त्यांना शिकवा. कसे करायचे असते, तुम्ही त्यांना शिकवू शकता. मला या गोष्टींचीही चिंता सतावतेय कि तंत्रज्ञान अंतर कमी करण्यासाठी आले, तंत्रज्ञान सीमा संपवण्यासाठी आले. मात्र त्याचा दुष्परिणाम असा झाला आहे कि एकाच घरात सहा लोक एकाच खोलीत बसलेले आहेत मात्र अंतर इतके कि कल्पनाच करू शकत नाही. का? प्रत्येक जण तंत्रज्ञानामुळे दुसरीकडे व्यस्त झाला आहे. सामूहिकता हा देखील एक संस्कार आहे. सामूहिकता एक शक्ती आहे. दुसरे मी म्हटले कि कौशल्य. तुम्हाला वाटत नाही का कि नवीन काहीतरी शिकावे. आज स्पर्धेचं युग आहे. परीक्षेमध्ये एवढे बुडालेले असता. जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मेहनत करता, गुंतून जाता. सुट्ट्यांमध्येही कुठला ना कुठला प्रशिक्षण वर्ग सुरूच असतो, पुढच्या परीक्षेची चिंता असते. कधी-कधी भीती वाटते कि आपली तरुण पिढी रोबो तर होत नाही ना. यंत्राप्रमाणे तर जगत नाही ना.
मित्रांनो, आयुष्यात खूप-काही बनण्याचे स्वप्न, चांगली गोष्ट आहे, काही तरी करून दाखवण्याचा विचार चांगली गोष्ट आहे, आणि करायलाही हवे. मात्र हे देखील पहा कि आपल्या आत जो मानवी घटक आहे, तो कुठे कंटाळत तर नाही ना, आपण मानवी गुणांपासून कुठे दूर तर जात नाही ना. कौशल्य विकासात या पैलूवर थोडा भर देता येऊ शकेल का. तंत्रज्ञानापासून दूर, स्वतःबरोबर वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न. संगीतातले एखादे वाद्य शिका, कुठल्या नवीन भाषेतली 5-50 वाक्य शिका, तामिळ असेल, तेलगू असेल, आसामी असेल, बांगला असेल, मल्याळम असेल, गुजराती असेल, मराठी असेल, पंजाबी असेल. किती वैविध्याने नटलेला देश आहे आणि नीट पाहिले तर आपल्याच आजूबाजूला कुणी ना कुणी शिकवणारा मिळू शकतो. पोहता येत नसेल तर पोहणे शिका, चित्रे काढा, भले उत्तम चित्र येणार नाही मात्र काहीतरी कागदावर उमटवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आत जी संवेदना आहे ती प्रकट व्हायला लागेल. कधी कधी छोटी छोटी कामे ज्याला आपण म्हणतो- आपल्याला, का नाही इच्छा होत, आपण शिकायचे. तुम्हाला गाडी चालवायला शिकावंस वाटते. कधी ऑटो रिक्षा शिकावी असे वाटते का. तुम्ही सायकल तर चालवता, मात्र तीन चाकी सायकल जी लोकांना घेऊन जाते- कधी चालवायचा प्रयत्न केला आहे का. तुम्ही बघा हे सर्व नवीन प्रयोग, हे कौशल्य असे आहे तुम्हाला आनंदही देईल आणि आयुष्याला एका चौकटीत जे बांधले आहे ना त्यातून तुम्हाला बाहेर काढेल. चाकोरीबाहेरचे काहीतरी करा मित्रांनो. आयुष्य बनवायची हीच तर संधी असते. आणि तुम्ही विचार करत असाल कि सर्व परीक्षा संपल्या, कारकीर्दीच्या नव्या वळणावर जाईन तेव्हा शिकेन तर ती संधी तर येणार नाही. मग तुम्ही दुसऱ्या गडबडीत अडकाल आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जादू शिकण्याचा छंद आहे तर पत्त्यांची जादू शिका. आपल्या मित्र-मंडळींना जादू दाखवत राहा. काही ना काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुमच्या आतील मानवी शक्तीला चेतना मिळेल. विकासासाठी खूप चांगली संधी बनेल. मी माझ्या अनुभवातून सांगतो जगाकडे पाहून जितके आपल्याला शिकायला समजून घ्यायला मिळते ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. नवीन नवीन जागा, नवनवीन शहरे, नवनवीन नगर, नवीन गावे, नवीन परिसर. मात्र जाण्यापूर्वी कुठे जात आहात त्याचा अभ्यास आणि गेल्यानंतर एखाद्या जिज्ञासूप्रमाणे ते पाहणे, समजून घेणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विचारणे हे जर प्रयत्न केले तर ते पाहण्याचा आनंद काही वेगळाच असेल. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि ठरवा, प्रवास जास्त करू नका. एका ठिकाणी गेल्यांनंतर तीन दिवस, चार दिवस राहा. नंतर दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तीन दिवस, चार दिवस राहा. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. तुम्ही जेव्हा जाल तेव्हा मला नक्की तिथला फोटो पाठवा. काय नवीन पाहिले? कुठे गेला होतात? तुम्ही हॅश टॅग इनक्रेडिबल इंडिया याचा वापर करून आपले अनुभव सांगू शकता.
मित्रांनो, यावेळी भारत सरकारनेही तुमच्यासाठी खूप छान संधी दिली आहे. नवीन पिढी तर रोख व्यवहारांतून जवळजवळ मुक्त होत आहे. त्यांना रोखीची गरज नाही. ते डिजिटल चलनावर विश्वास ठेवू लागले आहेत. तुम्हीही करता मात्र या योजनेतून तुम्ही कमाई देखील करू शकता- तुम्ही विचार केला आहे. भारत सरकारची एक योजना आहे. जर भीम ऍप जे तुम्ही डाऊनलोड करत असाल, तुम्ही वापरत देखील असाल. मात्र दुसऱ्या कुणालातरी वापरायला सांगा. दुसऱ्या कुणालाही याच्याशी जोडा आणि त्या नवीन व्यक्तीने जर तीन व्यवहार केले, आर्थिक व्यवहार तीन वेळा केले, तर हे काम केल्याबद्दल तुम्हाला 10 रुपये मिळू शकतात. तुमच्या खात्यात सरकारकडून 10 रुपये जमा होतील. जर दिवसभरात तुम्ही 20 लोकांकडून करवून घेतले तर संध्याकाळपर्यंत 200 रुपये कमवू शकता. व्यापाऱ्यांचीही कमाई होऊ शकते, विद्यार्थ्यांचीही कमाई होऊ शकते. आणि ही योजना 14 ऑक्टोबरपर्यंत आहे. डिजिटल भारत घडवण्यात तुमचे योगदान असेल. नवीन भारताचे तुम्ही एक पहारेकरी बनाल, तर सुट्टीही आणि त्याचबरोबर कमाई देखील. रिफर अँड अर्न.
सर्वसाधारणपणे आपल्या देशात व्हीआयपी संस्कृतीप्रति एक तिरस्काराचे वातावरण आहे मात्र ते इतके खोलवर आहे-हे मला अलिकडेच अनुभवायला मिळाले. जेव्हा सरकारने ठरवले कि आता भारतात कितीही मोठी व्यक्ती का असेना, ती आपल्या गाडीवर लाल दिवा लावून फिरणार नाही. ते एक प्रकारे व्हीआयपी संस्कृतीचे प्रतीक बनले होते, मात्र अनुभव हे सांगत होता कि लाल दिवा तर वाहनावर लागत होता, गाडीवर लागत होता, मात्र हळूहळू तो डोक्यात घुसायचा आणि डोक्यात ही व्हीआयपी संस्कृती खोलवर रुजली आहे. आता केवळ लाल दिवाच गेला आहे, त्यामुळे कुणी हा दावा करू शकणार नाही कि डोक्यात जो लाल दिवा घुसला आहे तो बाहेर आला असेल. मला एक खूप रोचक दूरध्वनी आला आहे. या दूरध्वनीत त्यांनी धास्तीदेखील व्यक्त केली आहे मात्र यावेळी या दूरध्वनीतून एवढा अंदाज येतो कि सामान्य माणसाला या गोष्टी आवडत नाहीत. त्याला यात एक प्रकारचा अलिप्तपणा वाटतो.
"नमस्कार पंतप्रधानजी, मी शिवा चौबे बोलते आहे, जबलपूर मध्य प्रदेश इथून. मला सरकारच्या लाल दिव्यावरील बंदीबाबत थोडे बोलायचे आहे. मी वृत्तपत्रात एक ओळ वाचली, ज्यात लिहिले होत “every Indian is a VIP on a road” हे ऐकून मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला कि आज माझा वेळ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मला वाहतूक कोंडीत अडकायचे नाही आणि मला कुणासाठी थांबायचेही नाही. म्हणून या निर्णयासाठी मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. आणि हे जे तुम्ही स्वच्छ भारत अभियान राबवले आहे, यातून आपला देशच केवळ स्वच्छ होत नाहीये तर आपल्या रस्त्यावरून अतिमहत्वाच्या व्यक्तींची दादागिरीही नाहीशी होत आहे-यासाठी धन्यवाद."
सरकारी निर्णयाद्वारे लाल दिव्याचे जाणे हा तर व्यवस्थेचा एक भाग आहे. मात्र मनातूनही आपल्याला प्रयत्नपूर्वक ते काढून टाकायचे आहे. आपण सर्वानी मिळून जागरूक प्रयत्न केले तर काढता येईल. नवीन भारताची आपली संकल्पना हीच आहे कि देशात व्हीआयपीच्या ऐवजी ईपीआयचे महत्व वाढावे आणि जेव्हा मी व्हीआयपीच्या जागी ईपीआय म्हणतो तेव्हा माझी भावना स्पष्ट आहे- एव्हरी पर्सन इज इम्पॉर्टन्ट. प्रत्येक व्यक्तीचे महत्व आहे, प्रत्येक व्यक्तीचे माहात्म्य आहे. सव्वाशे कोटी देशबांधवांचे महत्व स्वीकारले, सव्वाशे कोटी देशबांधवांचे माहात्म्य आपण स्वीकारले तर महान स्वप्ने पूर्ण करण्यासाठी किती मोठी शक्ती एकवटेल. आपण सर्वानी मिळून करायचे आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो कि आपण इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे. त्यातून आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. यावर्षी आपण सव्वाशे कोटी देशबांधव संत रामानुजाचार्य यांची एक हजारावी जयंती साजरी करत आहोत. काही ना काही कारणामुळे आपण इतके अडकले गेलो, एवढे छोटे झालो कि जास्तीत जास्त शताब्दीपर्यंतचाच विचार करत राहिलो. जगभरातल्या अन्य देशांसाठी तर शताब्दीचे खूप महत्व असेल. मात्र भारत इतका प्राचीन देश आहे कि त्याच्या नशिबात हजार वर्ष आणि हजार वर्षांहूनही जुन्या आठवणी साजऱ्या करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. एक हजार वर्षांपूर्वीचा समाज कसा होता? त्यांची विचारसरणी कशी होती? थोडी कल्पना तर करा. आजही सामाजिक रूढी प्रथा तोडायच्या म्हटले तर किती अडचणी येतात. एक हजार वर्षांपूर्वी कसे होत असेल? खूप कमी लोकांना माहित असेल कि रामानुजाचार्यजी यांनी समाजात ज्या कुप्रथा होत्या, उच्च-नीच असा भेदभाव होता, स्पृश्य-अस्पृश्यचा भेदभाव होता, जातीवादाची भावना होती त्याविरोधात खूप मोठा लढा दिला होता. स्वतः त्यांनी आपल्या आचरणातून समाज ज्यांना अस्पृश्य मानायचा त्यांना आपलेसे केले होते. हजार वर्षांपूर्वी त्यांच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी आंदोलन केले होते आणि यशस्वीपणे मंदिर प्रवेश करवला होता. आपण किती भाग्यवान आहोत कि प्रत्येक युगात आपल्या समाजातल्या वाईट चालीरीती नष्ट करण्यासाठी आपल्या समाजातूनच महापुरुष जन्माला आले आहेत. संत रामानुजाचार्यजी यांची एक हजारावी जयंती साजरी करत असताना, सामाजिक ऐक्यासाठी, संघटनेत ताकद आहे- ही भावना जागवण्यासाठी त्यांच्याकडून आपण प्रेरणा घ्यावी.
भारत सरकार देखील 1 मे रोजी संत रामानुजाचार्य यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपालतिकीट प्रकाशित करणार आहे. मी संत रामानुजाचार्यजी यांना आदरपूर्वक वंदन करतो, आदरांजली वाहतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, उद्याच्या 1 मे चे आणखी एक महत्व आहे. जगभरातल्या अनेक भागांमध्ये तो कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. आणि जेव्हा कामगार दिनाचा विषय निघतो, श्रमाची चर्चा होते, कामगारांची चर्चा होते, तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येणे अगदी स्वाभाविक आहे. आणि खूप कमी लोकांना माहित असेल कि आज कामगारांना ज्या सवलती मिळाल्या आहेत, जो आदर मिळाला आहे, त्यासाठी आपण बाबासाहेबांचे आभारी आहोत. कामगारांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. आज जेव्हा मी बाबासाहेब यांच्याबद्दल बोलतोय, संत रामानुजाचार्यजी यांच्याबाबत बोलतोय, तर 12व्या शतकातले कर्नाटकचे महान संत आणि सामाजिक सुधारक जगत गुरु बस्वेश्वरजी यांचीही आठवण येते. कालच मला एका समारंभात जायची संधी मिळाली. त्यांच्या वचनामृत संग्रहाचे लोकार्पण करण्याचा कार्यक्रम होता. 12व्या शतकात कन्नड भाषेत त्यांनी श्रम, श्रमिक यावर सखोल विचार मांडले आहेत. कन्नड भाषेत त्यांनी म्हटले होते - "काय कवे कैलास", त्याचा अर्थ असा आहे- तुम्ही तुमच्या मेहनतीनेच भगवान शंकराच्या घराची कैलाशची प्राप्ती करू शकता, म्हणजेच कर्म केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर श्रम हेच शिव आहे. मी पुन्हा-पुन्हा 'श्रमेव जयते' बाबत बोलत असतो. श्रम प्रतिष्ठेबाबत बोलतो. मला चांगले आठवतेय भारतीय मजदूर संघाचे जनक आणि चिंतक ज्यांनी कामगारांसाठी खूप चिंतन केले असे श्रीयुत दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे - एकीकडे माओवादाने प्रेरित विचार होते कि जगातल्या मजुरांनी एक व्हावे. आणि दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे कामगारांनो या, जगाला एकत्र आणा. एका बाजूला म्हटले जात होते - जगातल्या कामगारांनी एकत्र यायला हवे. भारतीय चिंतनातून निघालेल्या विचारप्रवाहाला अनुसरून दत्तोपंत ठेंगडी म्हणायचे- कामगारांनो जगाला एक करा. आज जेव्हा कामगारांबद्दल बोलतो, तेव्हा दत्तोपंत ठेंगडी यांची आठवण येणे खूप स्वाभाविक आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांनंतर आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करू. जगभरात भगवान बुद्ध यांच्याशी जोडलेले लोक उत्सव साजरा करतात. जग आज ज्या समस्यांचा सामना करत आहे, हिंसा, युद्ध, विनाश, शस्त्रांची स्पर्धा, जेव्हा असे वातावरण पाहतो तेव्हा बुद्धांचे विचार खूपच प्रासंगिक वाटतात. आणि भारतात तर अशोकचे जीवन युद्ध ते बुद्ध या प्रवासाचे उत्तम प्रतीक आहे. माझे सौभाग्य आहे कि बुद्ध पौर्णिमेच्या या महान पर्वानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने वेसक दिन साजरा केला जातो. यावर्षी तो श्रीलंकेत साजरा होणार आहे. या पवित्र पर्वानिमित्त मला श्रीलंकेत भगवान बुद्ध यांना आदरांजली वाहण्याची एक संधी मिळेल. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी मिळेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतात नेहमी 'सबका साथ-सबका विकास' हा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा आम्ही 'सबका साथ-सबका विकास' म्हणतो तेव्हा तो केवळ भारतात नाही जागतिक संदर्भातही असतो. अनेक प्रकल्प सुरु असतात. 5 मे रोजी भारत दक्षिण-आशिया उपग्रह प्रक्षेपित करेल. या उपग्रहाची क्षमता आणि त्याच्याशी संबंधित सुविधा दक्षिण आशियाचे आर्थिक तसेच विकास विषयक प्राधान्यक्रम पूर्ण करण्यात खूप सहाय्य्यभूत ठरतील. मग ते नैसर्गिक साधनसंपत्तीचं मॅपिंग करणे असेल, दूर-औषध क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल किंवा अधिक सखोल माहिती तंत्रज्ञान जोडणी असेल, लोकांमधील संपर्काचा प्रयत्न असेल. दक्षिण आशियाच्या या उपग्रहामुळे आपल्या संपूर्ण प्रदेशाला पुढे जाण्यासाठी मदत होईल. संपूर्ण दक्षिण आशियाबरोबर सहकार्य वाढवण्यासाठी भारताचे एक महत्वपूर्ण पाऊल आहे - अमूल्य भेट आहे. दक्षिण अशियाप्रती आपल्या कटिबद्धतेचे हे एक उपयुक्त उदाहरण आहे. दक्षिण आशियाई देश, जे या दक्षिण आशिया उपग्रहाशी जोडलेले आहेत त्या सर्वांचे या महत्वपूर्ण प्रयत्नासाठी स्वागत करतो, शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, उष्मा खूप वाढला आहे, आपल्या माणसांनाही जपा, स्वतःलाही जपा. खूप-खूप शुभेच्छा, धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार. देशाच्या बहुतेक भागात बरीच कुटुंब आपल्या मुलांच्या परीक्षेत व्यस्त असतील. ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत, तिथे थोडे तणावमुक्त वातावरण असेल आणि ज्यांच्या परीक्षा अजूनही सुरू आहेत, त्या घरांमध्ये थोडा-फार तणाव असेलच, असेल. पण यावेळी मी हेच सांगेन, की मागच्या वेळी मी ‘मन की बात’ मधून विद्यार्थ्यांना जे सांगितले होते, ते पुन्हा ऐका. परीक्षेच्या वेळी त्या गोष्टी नक्कीच आपल्याला उपयोगी पडतील.
आज २६ मार्च आहे. २६ मार्च हा बांगलादेशाचा स्वातंत्र्यदिन आहे. अन्यायाविरुद्ध एक ऐतिहासिक लढाई, वंग-बंधुंच्या नेतृत्वात बांगलादेशातील जनतेचा अभुतपूर्व विजय. आजच्या या महत्वपूर्ण दिवशी, मी बांगलादेशातील नागरिक बंधु-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या अनेक-अनेक शुभेच्छा देतो आणि अशी इच्छा करतो की, बांगलादेशाची प्रगती व्हावी, विकास व्हावा, बांगलादेशवासियांना मी विश्वास देतो, की भारत, बांगलादेशाचा एक समर्थ सहकारी आहे. एक चांगला मित्र आहे आणि आम्ही खांद्याला खांदा लावून या संपूर्ण विभागात शांतता, सुरक्षा आणि विकासात आपला सहभाग देत राहू.
आम्हा सर्वांना या गोष्टीचा अभिमान आहे की, रविंद्रनाथ टागोर, त्यांच्या आठवणी हा आपला एक सामायिक वारसा आहे. बांगलादेशाचे राष्ट्रगीत ही देखील गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची रचना आहे. गुरुदेव टागोरांच्याबाबतीत एक रोचक गोष्ट अशीही आहे की, १९१३ मध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले अशियाई व्यक्तीच नव्हते, तर इंग्रजांनी त्यांना ‘नाईटहूड’ हा किताबही दिला होता. जेव्हा १९१९मध्ये जालियनवाला बागेत इंग्रजांनी नागरिकांची मोठ्या प्रमाणात निर्घृण हत्या केली, तेव्हा रविंद्रनाथ टागोर त्या महापुरुषांपैकी होते, ज्यांनी या घटनेविरुद्ध आपला आवाज बुलंद केला होता. हा तोच कालखंड होता, जेव्हा १२ वर्ष वयाच्या एका मुलाच्या मनावर या घटनेचा विलक्षण परिणाम झाला होता. किशोरावस्थेत शेतात, मळ्यात हसणाऱ्या, बागडणाऱ्या त्या मुलाला जालियनवाला बागेतील नृशंस नरसंहाराने, जीवनाची एक नवी प्रेरणा दिली होती. १९१९ मध्ये १२ वर्षे वयाचा तो बालक भगत, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान शहीद भगतसिंग. आजपासून तीन दिवसांपूर्वी २३ मार्च या तारखेला भगतसिंगजी, त्यांचे सहकारी सुखदेव आणि राजगुरु यांना इंग्रजांनी फासावर चढवले होते आणि २३ मार्चच्या त्या घटनेबद्दल आपण सारे जाणतो. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या चेहेऱ्यावर त्यावेळी भारत मातेच्या सेवेचे समाधान होते, मरणाचे भय नव्हते. आयुष्याच्या साऱ्या स्वप्नांचा त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला होता. हे तीन वीर आजही आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदानाच्या गाथेला शब्दांचे अलंकार अपुरे पडतील. सारे ब्रिटीश साम्राज्य या तिघांना घाबरत असे, ते तुरुंगात होते, फाशी होणार हे निश्चित होते, तरीही या तिघांचे काय करायचे ह्याची चिंता इंग्रजांना सतावत असे आणि म्हणूनच २४ मार्च ही फाशीची तारीख ठरलेली असताना, २३ मार्च रोजी त्यांना फासावर चढवले गेले. लपून-छपून हे करण्यात आले, उघडपणे करणे अशक्य होते आणि नंतर त्यांचे मृतदेह, आज आपण ज्याला पंजाब प्रांत म्हणून ओळखतो, तिथे आणून गुप्तपणे दहन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्या जागी जाण्याची संधी मला मिळाली, त्या भूमीत विशिष्ट स्पंदने आहेत असा मला अनुभव आला आणि देशातल्या तरुणांना मी सांगेन की, जेव्हा संधी मिळेल, जेव्हा पंजाबला जाल, तेव्हा भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, भगतसिंग यांच्या मातोश्री आणि बटुकेश्वर दत्त यांच्या समाधीस्थळी आपण अवश्य जा.
हा तोच काळ होता, जेव्हा स्वातंत्र्याची आस, त्याची तीव्रता, त्याचा व्याप वाढतच चालला होता. एकीकडे भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यासारख्या वीरांनी सशस्त्र क्रांतीसाठी युवकांना प्रेरणा दिली होती. तर आजपासून बरोबर शंभर वर्षांपूर्वी १० एप्रिल १९१७, महात्मा गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. चंपारण्य सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, गांधी विचार, गांधी शैली यांचे प्रकट रूप चंपारण्य सत्याग्रहाच्यावेळी पहायला मिळाले. स्वातंत्र्यलढ्याच्या संपूर्ण प्रवासात हे एक महत्वाचे वळण होते, विशेषत: संघर्षाच्या पद्धतीच्या नजरेतून. हाच तो काळ होता, चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, अहमदाबाद इथल्या मिल कामगारांचा संप आणि या सर्वात महात्मा गांधीजींचे विचार तसेच कार्यशैली यांचा खोलवर परिणाम झाल्याचे दिसून येते. १९१५ साली गांधीजी परदेशातून परत आले आणि १९१७ साली बिहारमधल्या एका छोट्या गावात जाऊन त्यांनी देशाला नवी प्रेरणा दिली. आज आपल्या मनात गांधीजींची जी प्रतिमा आहे, त्या प्रतिमेच्या आधारे आपण चंपारण्य सत्याग्रहाचे मूल्यांकन करू शकत नाही. कल्पना करा एक व्यक्ती १९१५ साली भारतात परत येते आणि केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ. देश त्यांना ओळखत नव्हता, त्यांचा प्रभावही नव्हता, ही तर केवळ सुरुवात होती. त्यावेळी त्यांना किती कष्ट सोसावे लागले असतील, किती परिश्रम घ्यावे लागले असतील, याची आपण कल्पना करू शकतो. चंपारण्य सत्याग्रह म्हणजे अशी घटना होती ज्यात महात्मा गांधीजींचे संघटन कौशल्य, महात्मा गांधीजींची भारतीय समाजाची नाडी ओळखण्याची शक्ती, महात्मा गांधीजींचे आपल्या वागण्यातून ब्रिटीश राजवटीविरुद्ध गरीबातल्या गरीब, अशिक्षित व्यक्तीला संघर्ष करण्यासाठी संघटित करणे, प्रेरित करणे, लढण्यासाठी मैदानात आणणे, हे सारे अद्भुत शक्तीचे दर्शन घडवते आणि म्हणूनच अशा रुपात आपल्याला महात्मा गांधीजींच्या विराटतेचा अनुभव येतो. पण शंभर वर्षांपूर्वीच्या गांधीजींबद्दल आपण विचार करू लागलो, त्या चंपारण्य सत्याग्रह करणाऱ्या गांधीजींबद्दल, तर आपल्या असे लक्षात येईल की, सार्वजनिक जीवनाची सुरुवात करणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी चंपारण्य सत्याग्रह हा एक निश्चितच अभ्यासाचा विषय आहे. सार्वजनिक जीवनाचा कसा आरंभ करावा? स्वत: किती कष्ट करावे लागतात? आणि गांधीजींनी हे कसे केले होते? हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो आणि तो काळ असा होता की ज्या ज्या मोठ्या नेत्यांची नावे आपण ऐकतो, गांधीजींनी, त्यावेळी राजेंद्रबाबू असोत, की आचार्य कृपलानी सर्वांना खेड्यात पाठवले होते. लोकांमध्ये मिसळून, लोक जे काम करत आहेत, त्याला स्वातंत्र्याच्या रंगात कसे रंगवता येईल? हे शिकवले. आणि इंग्रज हे ओळखू शकले नाहीत की गांधीजींच्या कामाची पद्धत काय आहे? संघर्षही होत होता आणि नव-निर्मितीही होत होती. दोन्ही एकाच वेळी सुरु होते. जणू गांधीजींनी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू केल्या होत्या. एक बाजू होती संघर्ष आणि दुसरी निर्मिती. एकीकडे कारावास पत्करायचा आणि दुसरीकडे रचनात्मक कार्यात स्वत:ला झोकून द्यायचे. एक विलक्षण समतोल गांधीजींच्या कार्यशैलीत होता. सत्याग्रह म्हणजे काय? असहमती म्हणजे काय? इतक्या मोठ्या राजवटीपुढे असहकार म्हणजे काय? एक पूर्णत: नवा अनुभव गांधीजींनी शब्दातून नव्हे, तर एका यशस्वी प्रयोगातून सिद्ध करून दाखवला होता.
आज ज्यावेळी देश चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी साजरी करत आहे, त्यावेळी भारतातल्या सामान्य माणसाची शक्ती किती अपार आहे? या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरतानाच, सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती, परिश्रमाची पराकाष्ठा, ‘स्वजन हिताय - स्वजन सुखाय’ हा मूलमंत्र घेऊन, देशासाठी, समाजासाठी, काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुति देणाऱ्या महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करेल.
आज आपण २१व्या शतकात जगत आहोत. अशा वेळी कोण भारतीय असा असेल बरे,जो भारताला बदलू इच्छित नाही? देशात होत असलेल्या बदलांचा भागीदार होऊ इच्छित नाही? सव्वाशे कोटी देशवसियांची बदल घडवण्याची इच्छा, बदल घडवण्याचा प्रयत्न, यामुळेच तर नव्या भारताचा, न्यू इंडियाचा पाया घातला जाणार आहे. न्यू इंडिया हा काही सरकारी कार्यक्रम नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा नाही. न्यू इंडिया हे सव्वाशे कोटी देशवासियांना केलेले आवाहन आहे. सव्वाशे कोटी भारतीय मिळून भव्य भारताची उभारणी कशी करता येईल? हा त्या मागचा भाव आहे, उद्देश आहे. सव्व्वाशे कोटी देशवासियांच्या मनातली एक आशा आहे, एक उत्साह आहे, एक संकल्प आहे, एक इच्छा आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जर आपण आपल्या वैयक्तीक आयुष्यातून बाजूला होऊन, संवेदनापूर्ण नजरेने समाजाकडे आपल्या आजूबाजूला काय घडतेय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर लक्षावधी लोक नि:स्वार्थ भावनेने, त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलिकडे जाऊन, समाजासाठी, शोषितांसाठी, पिडीतांसाठी, गरीबांसाठी काही-ना-काही करतांना दिसतात, हे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. एखाद्या मूक सेवकाप्रमाणे जणू तपस्या करावी, साधना करावी, त्याप्रमाणे काम करतात. अनेक जण असे असतात जे नेहमी रुग्णालयात जातात, रुग्णांची सेवा करतात, अनेक जण असे असतात जे गरज लागताच रक्तदानासाठी धावून जातात. अनेक जण भुकेल्या लोकांच्या पोटाची चिंता करतात. आपला देश बहुरत्ना वसुंधरा आहे. जनसेवा म्हणजेच प्रभुसेवा हे आमच्या नसांमध्ये भिनले आहे. जर आपण त्याकडे सामुहिक रुपात पाहिले, संघटित रूपात पाहिले तर ही केवढी महान शक्ती आहे. जेव्हा न्यू इंडियाचा मुद्दा निघेल तेव्हा त्यावर टीका होईल, वेगळ्या नजरेने त्याकडे बघितले जाईल, हे साहजिकच आहे आणि लोकशाहीत ते आवश्यकही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की सव्वाशे कोटी देशवासीयांनी जर संकल्प केला आणि संकल्प सिद्ध करण्यासाठी मार्ग तयार करायचा असे ठरवले, एका मागून एक पावले उचलली, तर न्यू इंडिया सव्वाशे कोटी देशवासियांचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार होऊ शकेल. प्रत्येक गोष्ट सरकारी अंदाजपत्रकातूनच झाली पहिजे, सरकारी प्रकल्पातूनच झाली पाहिजे, सरकारच्या पैशानेच झाली पाहिजे असे नाही. जर प्रत्येक नागरिकाने संकल्प केला की, मी वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवले की माझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेन, जर प्रत्येक नागरिकाने ठरवले की, आठवड्यातून एक दिवस मी पेट्रोल-डिझेल वापरणार नाही, दिसायला गोष्टी तशा लहान दिसतात. आपण बघाल, या देशाचे, न्यू इंडियाचे स्वप्न, सव्वाशे कोटी देशवासी पहात आहेत, ते आपल्या डोळ्यांसमोर पूर्ण होईल. सांगण्याचे तात्पर्य हे की, प्रत्येक नागरिकाने आपल्या नागरिक धर्माचे पालन करावे, कर्तव्याचे पालन करावे. हीच ‘न्यू इंडियाची’ चांगली सुरुवात ठरेल.
या २०२२ भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांचे स्मरण करु या, चंपारण्य सत्याग्रहाचे स्मरण करु या. स्वराज्य ते सुराज्य या प्रवासात आपले जीवन शिस्तबद्ध रितीने, संकल्पपूर्वक आपण का बरे जोडू नये? या! मी आपल्याला आमंत्रण देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज आपले आभार व्यक्त करू इच्छितो. गेल्या काही दिवसात आपल्या देशात असे एक वातावरण तयार झाले आहे की डिजिटल पेमेंट, डिजिधन आंदोलन यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. रोख रक्क्कम न वापरता देवाण-घेवाण कशी करता येते? या बद्दल कुतूहल वाढले आहे. गरीबातला गरीबही शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. हळूहळू रोकड-रहित व्यवहारांकडे वळत आहेत. विमुद्रीकरणानंतर डिजिटल पेमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारात वाढ झाल्याचे पहायला मिळाले. ‘भीम ॲप’ सुरु होऊन फक्त दोन-अडीच महिनेच झाले आहेत, पण आतापर्यंत जवळजवळ दीड कोटी लोकांनी ते डाऊनलोड केले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काळा पैसा आणि भ्रष्टाचार याविरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. सव्वाशे कोटी देशवासी या एका वर्षात अडीच हजार कोटी डिजिटल देवाण-घेवाण करण्याचा संकल्प करतील का? आम्ही अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. सव्वाशे कोटी देशवासियांसाठी हे काम जर त्यांनी मनावर घेतले तर, एक वर्ष वाट पहायची गरज नाही. सहा महिन्यात हे काम होऊ शकेल. अडीच हजार कोटी डिजिटल व्यवहार, आपण शाळेत फी भरणार असू तर रोखीत न भरता, डिजिटल पद्धतीने भरू. रेल्वे प्रवासात, विमान प्रवासात डिजिटल पेमेंट करू. औषधे खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू. आपण स्वस्त धान्य दुकान चालवत असाल तर, डिजिटल व्यवस्था उपयोगात आणू. रोजच्या जीवनात हे आपण करू शकतो. आपल्याला कल्पना नसेल पण या माध्यमातून आपण देशाची फार मोठी सेवा करू शकता. काळा पैसा, भ्रष्टाचार याविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आपण शूर सैनिक बनू शकता. गेल्या काही दिवसात लोक शिक्षणासाठी, लोक-जागृतीसाठी अनेक डिजिधन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. देशभरात १०० कार्यक्रम करण्याचा संकल्प आहे. ८०-८५ कार्यक्रम झाले आहेत. त्यात बक्षीस योजना सुद्धा होती. जवळजवळ साडेबारा लाख लोकांना भाग्यवान ग्राहक योजनेत बक्षीस मिळाले आहे. ७० हजार व्यापाऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेले बक्षिस मिळवले आहे. प्रत्येकाने हे काम पुढे नेण्याचा संकल्पही केला आहे. १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि फार आधी ठरल्याप्रमाणे १४ एप्रिल रोजी ह्या डिजि मेळाव्याची सांगता होईल. शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेवटी एक मोठा कार्यक्रम होणार आहे. मोठ्या सोडतीची त्यात व्यवस्था आहे. मला विश्वास आहे की बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जितके दिवस अजून आपल्या हातात आहेत, त्यात आपण भीम ॲपचा प्रचार करू. रोख रक्क्कम कमी कशी वापरता येईल, नोटांचा वापर कमी कसा करता येईल, यासाठी आपण सहभागी होऊ या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मला हे सांगताना आनंद होतो की प्रत्येक वेळी जेव्हा ‘मन की बात’साठी मी जनतेकडून सूचना मागवतो, तेव्हा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना येतात, पण मी बघितले आहे की स्वच्छता याविषयी प्रत्येक वेळी सूचना असतातच. डेहराडूनच्या गायत्री नावाच्या इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या मुलीने दूरध्वनीवर बोलल्यानंतर एक संदेश पाठवला आहे.
मला देहरादूनमधून एका गायत्री नावाच्या मुलीने जी अकरावीची विद्यार्थिनी आहे, फोन करुन एक संदेश पाठवला - त्यात ती म्हणते..
“आदरणीय पंतप्रधान, माझा नमस्कार, सर्व प्रथम मी तुमचे अभिनंदन करते की, आपण या निवडणुकांमध्ये मोठ्या मतांनी विजय प्राप्त केला. मी आपल्याला माझ्या मनातील गोष्ट सांगू इच्छिते. मला असे म्हणायचे आहे की, लोकांना स्वत:ला स्वच्छतेची आवश्यकता समजायला हवी. मी रोज त्या नदीवरुन जाते जिथे बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात कचरा टाकून नदीला दुषित करतात. ही नदी ‘रिस्पना’ पुलाच्या तिथून वाहून येत, माझ्या घरापर्यंतही येते. या नदीसाठी आम्ही विविध वस्त्यांमध्ये जाऊन जनजागृती रॅली काढली, लोकांशी चर्चाही केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. मला असे म्हणायचे आहे की, आपण एखादा समुह किंवा न्युज पेपरच्या माध्यमातून या गोष्टीला उजेडात आणावे. धन्यवाद!”
हे बघा बंधु-भगिनींनो, अकरावीत शिकणाऱ्या मुलीला किती त्रास होतो आहे. नदीत केर-कचरा पाहून तिला किती राग येतो आहे. मी हे एक चांगले लक्षण मानतो. मला हेच तर हवे आहे, सव्वाशे कोटी देशवासियांच्या मनात घाणीविषयी तिरस्कार निर्माण व्हायला हवा. एकदा राग निर्माण झाला, त्याबद्दल रोष निर्माण झाला की, आपण अस्वच्छतेविरुद्ध काही-ना-काही करू. आणि हे चांगले आहे की गायत्री स्वत: तिचा राग व्यक्त करते आहे. मला सूचना पाठवते आहे, पण त्याचवेळी तिने स्वत: खूप प्रयत्न केले हे ही ती सांगते आहे, पण यश मिळाले नाही. जेव्हापासून स्वच्छता आंदोलनाला सुरुवात झाली आहे, लोकांमध्ये जागरुकता आली आहे. प्रत्येक जण सकारात्मकरीतीने यात जोडला गेला आहे. आता या मोहीमेने एका आंदोलनाचे रूप घेतले आहे. अस्वच्छतेविषयी तिरस्कार वाढतो आहे. जागृती व्हावी, सक्रीय सहभाग वाढावा, याला एक वेगळेच महत्व आहे. पण स्वच्छता ही गोष्ट चळवळीपेक्षा सवयीशी अधिक संबंधीत आहे. ही चळवळ सवयी बदलण्याची चळवळ आहे. स्वच्छतेची सवय निर्माण करण्यासाठी ही चळवळ आहे. हे आंदोलन सामुहिक रूपात होऊ शकते. काम कठीण आहे, पण करायचे आहे. मला विश्वास वाटतो की, देशाची नवी पिढी, मुले, विद्यार्थी, युवक यांच्यात जी भावना जागृत झाली आहे, ती स्वत: चांगल्या परिणामांचे संकेत देणारी आहे. आज ‘मन की बात’मधून गायत्रीने सांगितलेली व्यथा जे ऐकत आहेत, त्या साऱ्या देशवासियांना मी सांगेन की गायत्रीचा संदेश हा आपल्या प्रत्येकाचा संदेश व्हायला हवा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हापासून मी हा ‘मन की बात’ कार्यक्रम करतो आहे, मला सुरुवातीपासूनच एका विषयावर खूप लोकांनी सूचना पाठवल्या. अनेक जणांनी चिंता व्यक्त केली तो विषय म्हणजे अन्नाची नासाडी. आपल्याला हे माहीत आहे की घरी किंवा सामूहिक भोजन समारंभात आपण गरजेपेक्षा जास्त अन्न वाढून घेतो. ज्या गोष्टी समोर दिसतील त्या सर्व ताटात घेतो. पण ते सगळेच पदार्थ आपण खात नाही. जितके प्लेटमध्ये वाढून घेतो, त्याच्या अर्ध अन्न सुद्धा आपण पोटात घालत नाही. ते तसेच टाकून निघून जातो. आपण कधी विचार केला आहे का, की हे खरकटे अन्न जे आपण टाकून देतो, त्यात आपण किती नासाडी करतो. कधी असा विचार केला आहे का की, हे असे खरकटे टाकले नाही, अन्न वाया घालवले नाही तर किती गरीबांचे पोट त्यात भरू शकते. हा असा विषय नाही जो समजावून द्यावा लागेल. आपल्या घरी जेव्हा आई मुलाला अन्न वाढते तेव्हा ती म्हणते की मुला, जेवढे हवे आहे, तेवढेच घे. काही-ना-काही प्रयत्न होतच असतात. पण याबद्दल असणारी उदासिनता एक समाजद्रोह आहे. गरीबांवर हा अन्याय आहे. दुसरा मुद्दा असा की बचत झाली, तर कुटूंबाचा आर्थिक फायदा होईल. समाजासाठी विचार केला तर नक्कीच एक चांगली बाब आहे. पण हा विषय असा आहे की ज्यात कुटुंबाचाही फायदा आहे. याविषयी मला जास्त काही बोलायचे नाही, पण जागरुकता वाढायला हवी असे मला वाटते. असे काही युवक मला माहीत आहेत जे अशा प्रकारची मोहीम चालवतात. त्यांनी मोबाइल ॲप तयार केले आहे. जिथे असे अन्न वाया जाते किंवा उरते तिथे ते इतर लोकांना बोलावून घेतात आणि त्या अन्नाचा सदुपयोग करतात. आमच्या देशातील युवक अशी मेहनत करत आहेत. हिन्दुस्तानातल्या प्रत्येक राज्यात असे लोक आपल्याला आढळतील. त्यांच जीवनही आपल्याला प्रेरणा देते, की अन्न वाया घालवू नका, जेवढे हवे आहे तेवढेच अन्न वाढून घ्या.
बघा बदल होण्यासाठी मार्ग असतातच. जे लोक आरोग्याच्या बाबतीत जागरुक असतात ते नेहमी सांगतात की पोट थोडे रिकामे ठेवा. ताटेही थोडे रिकामे ठेवा. आता आरोग्याचा विषय निघालाच आहे, तर 7 एप्रिल या दिवशी ‘जागतिक आरोग्य दिन’ आहे. संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंत ‘युनिवर्सल हेल्थ कव्हरेज’, म्हणजे ‘सर्वांना आरोग्य’ हे ध्येय निश्चित केले आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रांनी 7 एप्रिल या जागतिक आरोग्य दिनानिमित्त डिप्रेशन म्हणजे उदासीनता यावर लक्ष केंद्रीत केले. उदासीनता हीच यावेळची संकल्पना आहे. आपणही हा विषय जाणता, पण शाब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर काही जण त्याला विषाद, शक्तीपात असेही म्हणतात. एका अंदाजानुसार जगभरात 35 कोटीपेक्षा अधिक लोक या आजाराने, मानसिक विकाराने पिडीत आहेत. समस्या ही आहे की, आपल्या आजूबाजूला ही गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि यावर बोलणे आपण टाळतो. जो स्वत: या आजाराने त्रस्त आहे, तो सुद्धा काही बोलत नाही, कारण त्याला काहीसा संकोच वाटत असतो.
मी देशवासियांना सांगेन, उदासीनता असाध्य विकार नाही. एक मानसशास्त्रीय वातावरण निर्माण करावे लागते आणि मग उपचारांना सुरुवात होते. त्याचा पहिला मंत्र आहे उदासीनता दाबून टाकण्याऐवजी प्रगट व्हा, मोकळे व्हा. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, आई-वडीलांना, भावांना, शिक्षकांना मोकळेपणाने सांगा, तुम्हाला काय होतेय ते. कधी कधी एकटेपणाचा त्रास हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक होतो. आपल्या देशाचे हे भाग्य म्हणावे लागेल की आपण एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो, मोठे कुटुंब असते, सारे मिळून मिसळून राहतात. त्यामुळे उदासीनता येण्याची शक्यता नष्ट होते. पण तरीही मी आई-वडिलांना सांगू इच्छितो की, घरात तुमचा मुलगा, मुलगी किंवा कुटुंबातील अन्य कोणी सदस्य, पूर्वी सगळ्यांबरोबर जेवायला बसत असे पण आता तो म्हणतो, नको, मी नंतर जेवेन. तो जेवणाच्या टेबलापाशी येत नाही. घरातले सगळे लोक जेव्हा बाहेर जायला निघतात तेव्हा तो म्हणतो की मी नाही येणार आज. त्याला एकटे रहायला आवडते. तो असे का करतो याकडे आपले लक्ष गेले आहे का कधी? उदासीनतेच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे हे आपण ओळखा. जर तो साऱ्या परिवाराबरोबर राहणे टाळत असेल, एकटाच कोपऱ्यात जात असेल तर हे होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. ज्यांच्याबरोबर तो मोकळेपणाने वागतो अशा लोकांच्या संगतीत तो राहील हे पहा. हास्यविनोद करून, त्याला व्यक्त होण्यासाठी प्रेरित करा. त्याच्या मनात कुठे गाठ बसली आहे ती मोकळी करा. हा उत्त्तम उपाय आहे. उदासीनता, मानसिक आणि शारीरिक आजारांचे कारण ठरू शकते. ज्याप्रमाणे मधुमेह सर्व रोगांना आमंत्रण देतो त्याप्रमाणे लढण्याच्या, साहस करण्याच्या, निर्णय घेण्याच्या क्षमतेवर उदासीनता हल्ला करते आणि या क्षमता नष्ट करते. तुमचे मित्र, तुमचा परिवार, तुमचे वातावरण हे सगळे तुम्हाला उदासिनता येण्यापासून दूर ठेवू शकतात. आपण उदास झाला असाल तर त्या मनोवृत्तीमधून तुम्हाला बाहेरही काढू शकतात. अजून एक उपाय आहे. जर आपल्या जवळच्या माणसांजवळ आपण मोकळे होऊ शकत नसाल तर, एक काम करा, आजूबाजूला जिथे सेवा-भावाने मदतीचे काम चालते, अशा ठिकाणी जा. मदत करा. मन लावून मदत करा. त्यांची सुखे, दुःखे वाटून घ्या. तुम्ही बघाल, तुमच्या मनातले दुःख आपोआप नष्ट होईल. त्यांच दुःख समजून घेण्याचा आपण जर सेवा-भावाने प्रयत्न केलात, तर आपल्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. इतरांशी जुळवून घेतल्याने, कुणाची तरी सेवा केल्याने आणि निस्वार्थ भावनेने सेवा केल्याने मनावरचा ताण सहज हलका होतो.
तसे पाहिले तर योग हा सुद्धा मन निरोगी ठेवण्याचा चांगला मार्ग आहे. तणावापासून मुक्ती, दबावापासून मुक्ती, प्रसन्न चित्त यासाठी योगसाधनेचा खूप उपयोग होतो. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. तिसरे वर्ष आहे. आपणही आत्तापासून तयारी करा आणि लाखोंच्या संख्येत सामुहिक योग उत्सव साजरा करा. योग दिनाबद्दल आपल्याला काही सूचना करायच्या असतील, तर आपण माझ्या मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवा, मार्गदर्शन करा. योग याविषयी आपण गीत, कविता तयार करू शकता, असे करायला हवे, जेणेकरून हा विषय लोकांपर्यंत सहज पोहचू शकेल.
माता आणि भगिनींशी आज मी मुद्दाम बोलू इच्छितो. कारण आज आरोग्याची चर्चा खूप झाली, त्याबद्दलच जास्त बोलले गेले. तर गेल्या काही दिवसात भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशात काम करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पण महिलांवर काही विशेष जबाबदाऱ्या सुद्धा असतात. कुटुंबाची जबाबदारी ती सांभाळते, घराच्या आर्थिक जबाबदारीतही तिचा हात असतो. यामुळे कधीकधी नवजात अर्भकावर अन्याय होतो. भारत सरकारने याबद्दल एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्रसूतीच्या वेळी, गरोदरपणाच्या काळात मातृत्व रजा, जी याआधी १२ आठवडे मिळत असे, ती आता २६ आठवडे दिली जाईल. याबाबतीत जगात दोन किंवा तीनच देश आपल्या पुढे आहेत. भारताने एक महत्वाचा निर्णय आपल्या या भगिनींसाठी घेतला आहे. त्याचा मूळ उद्देश त्या नवजात बाळाची देखभाल व्हावी, जो या भारताचा भावी नागरिक आहे. शिशु अवस्थेत त्याची नीट काळजी घेतली गेली, त्याला मातेचे प्रेम मिळाले, तर उद्या हीच बालके देशाचे वैभव ठरतील. यामुळे मातांचे आरोग्यही चांगले राहील आणि म्हणून या महत्वपूर्ण निर्णयाचा फायदा जवळजवळ १८ लाख महिलांना होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ५ एप्रिल रोजी रामनवमीचा पवित्र दिवस आहे. ९ एप्रिल रोजी महावीर जयंती आहे. १४ एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या सर्व महापुरुषांच्या जीवनापासून आपल्याला प्रेरणा मिळत राहो, न्यू इंडियासाठी संकल्प करण्याची शक्ती मिळो. दोन दिवसानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, वर्ष प्रतिपदा, नव संवत्सर, या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा. वसंत ऋतुनंतर पीक तयार व्हायला सुरुवात आणि शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचे फळ हाती येण्याची वेळ आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागात नववर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. महाराष्ट्रात गुढीपाडवा, आंध्र आणि कर्नाटकात उगादी, सिन्धी चेटी-चान्द, कश्मीरी नवरेह, अवध प्रांतात संवत्सर पूजा, बिहारमधल्या मिथिला प्रांतात जुड-शीतल, मगध प्रांतात सतुवानी असे नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. भारत हा अगणित विविधतेने नटलेला देश आहे. आपणा सर्वांना या नववर्षाच्या माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा.
अनेक अनेक धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. हिवाळा आता संपतो आहे. वसंत ऋतूने आपल्या सर्वांच्या जीवनात प्रवेश केला आहे. पानगळीनंतर झाडांना नवी पालवी फुटते, फूले फुलतात, बागा बहरून येतात, पक्षांचा किलबिलाट मन मोहून टाकतो, उन्हामुळे केवळ फूलेच नव्हे तर फळेसुद्धा झाडांच्या फांद्यांवर चमकताना दिसतात. ग्रीष्म ऋतूचे फळ असणाऱ्या आंब्याचा मोहोर वसंतातच दिसू लागतो. त्याचवेळी शेतात मोहोरीची पिवळी फुले, शेतकऱ्यांच्या मनाला नवी उभारी देतात. पळसाची वाळलेली फूले होळी आल्याचा संकेत देतात. निसर्गात होणाऱ्या या बदलाच्या क्षणाचे अमिर खुसरो यांनी मोठे मजेदार वर्णन केले आहे. अमीर खुसरो लिहितात,
"फूल रही सरसों सकल बन,
अंबवा फूटे, टेसू फूले,
कोयल बोले, डार-डार."
जेव्हा निसर्ग प्रसन्न असतो, वातावरण आनंदी असते, तेव्हा मनुष्यही या ऋतूचा पूर्ण आनंद घेतो. वसंत पंचमी, महाशिवरात्र आणि होळीचा सण मानवी जीवनात आनंदाचे रंग भरतो. प्रेम, बंधुभाव आणि मानवता यांनी ओतप्रोत भरलेल्या वातावरणात आपण फाल्गुन या शेवटच्या महिन्याला निरोप देणार आहोत आणि येणाऱ्या चैत्र महिन्याच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत. वसंत ऋतू म्हणजे या दोन महिन्यांचा संगम आहे.
सर्वात आधी मी देशातील लाखो नागरिकांचे यासाठी आभार मानतो की, 'मन की बात' आधी जेव्हा मी आपल्याकडून मते मागवतो, सूचना मागवतो, तेव्हा माझ्याकडे मोठ्या प्रमाणात सूचना येतात. नरेंद्र मोदी ऍप वर, ट्विटरवर, फेसबुकवर, पोस्टाने येतात. यासाठी मी सर्वांचा आभारी आहे.
शोभा जालान यांनी नरेंद्र मोदी ऍपवर मला असे लिहून पाठवले आहे की, बहुतांश जनता इस्रोने केलेल्या कामगिरीबद्दल अनभिज्ञ आहे आणि म्हणून त्या म्हणतात की, १०४ उपग्रह आणि लक्ष्यवेधी वेगवान क्षेपणास्त्र याबद्दल मी माहिती द्यावी. शोभाजी, भारताच्या या अभिमानस्पद कामगिरीचे आपण स्मरण केले, याबद्दल आपले आभार. गरिबीनिर्मूलन असो, रोगांपासून बचाव असो, जगाबरोबर जोडून घेणे असो, ज्ञान, माहिती पोचवणे असो. तंत्रज्ञानाने, विज्ञानाने आपले महत्व अधोरेखित केले आहे. १५ फेब्रुवारी २०१७, भारताच्या जीवनातला गौरवास्पद दिवस आहे. आपल्या वैज्ञानिकांनी साऱ्या जगासमोर भारताचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे आणि आपल्या सर्वांना माहित आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये इस्रोने अनेक मोहीमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. मंगळ ग्रहावर मार्स मिशनअंतर्गत मंगळयान पाठवण्याच्या यशस्वी कामगिरीनंतर, गेल्या काही दिवसात इस्रोने अंतराळ क्षेत्रात एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. इस्रोने ह्या मेगा मिशनच्या माध्यमातून एकाच वेळी वेगवेगळ्या देशांचे, ज्यात अमेरिका, इस्राईल, कझागिस्तान, नेदरलँड, स्वित्झरलँड, यू.ए.ई. आणि भारताचाही समावेश आहे, या देशांचे १०४ उपग्रह अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. एकाच वेळी १०४ उपग्रह अंतराळात पाठवून इतिहास रचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे आणि ही सुद्धा आनंदाची बाब आहे की हे ३८वं यशस्वी PSLV प्रक्षेपण आहे. हे यश केवळ इस्रोसाठी नव्हे तर साऱ्या देशासाठी ऐतिहासिक म्हणावे लागेल. इस्रोचा हा कॉस्ट इफेक्टिव्ह इफिशियंट स्पेस प्रोग्राम साऱ्या जगासाठी एक आश्चर्य ठरला आहे आणि जगानेही मोकळ्या मनाने भारतीय वैज्ञानिकांच्या या यशाचे कौतुक केले आहे.
बंधु आणि भगिनींनो, ह्या १०४ उपग्रहांमध्ये एक अत्यंत महत्वाचा आहे कार्टोसॅट २ डी, हा भारताचा उपग्रह आहे आणि ह्या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या छायाचित्रांचा, माहितीचा, मॅपिंग, पायाभूत विकास सुविधा, विकासाची माहिती, नागरी विकास नियोजन ह्यासाठी मोलाचा उपयोग होणार आहे. विशेषतः माझ्या शेतकरी बंधु भगिनींना, देशभरात जेवढे जलस्रोत आहेत, ते किती आहेत? त्यांचा उपयोग कसा करता येईल? कशा-कशावर लक्ष द्यावं लागेल? ह्या साऱ्या बाबींमध्ये आपला हा नवा उपग्रह कार्टोसॅट २ डी मोलाची मदत करेल. आपल्या ह्या उपग्रहाने तिथे पोचताच काही छायाचित्रे पाठवली आहेत. त्याने त्याचे काम सुरु केले आहे. आपल्यासाठी ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे की ह्या साऱ्या मोहिमेचे नेतृत्व आपले तरुण वैज्ञानिक, आपल्या महिला वैज्ञानिक ह्यांनी केले. तरुण आणि महिलांचा इतका मोठा सहभाग हा इस्रोच्या यशातील एक मोठ्या गौरवाचा पैलू आहे. साऱ्या देशवासीयांच्या वतीने मी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. सामान्य जनतेसाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी अंतराळ विज्ञान वापरण्याचा हेतू ह्या वैज्ञानिकांनी कायम ठेवला आहे आणि नव-नव्या विक्रमांची ते नोंद करत आहेत. आपल्या ह्या वैज्ञानिकांचे, त्यांच्या साऱ्या चमूचे आपण कितीही अभिनंदन केले तरीही ते कमीच ठरेल.
शोभाजींनी आणखीही एक प्रश्न विचारला आहे आणि तो आहे भारताच्या संरक्षणाबाबत, भारताने एक मोठे यश मिळवले आहे, त्याबाबत अजून फार चर्चा झाली नाही, पण शोभाजीचे लक्ष ह्या महत्वाच्या विषयाकडे गेले आहे. भारताने संरक्षण क्षेत्रातसुद्धा बॅलेस्टिक इंटरसेप्टर मिसाईल म्हणजे बॅलेस्टिक लक्ष्यवेधी प्रक्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. लक्ष्यवेधी तंत्रज्ञान असणाऱ्या ह्या क्षेपणास्त्राने चाचणीच्या काळात जमिनीपासून सुमारे शंभर किलोमीटर उंचीवर असलेल्या शत्रू राष्ट्राच्या क्षेपणास्त्राचा अचूक वेध घेण्यात यश मिळवले आहे. संरक्षण क्षेत्रात हा एक मोलाचा शोध आहे आणि आपल्याला हे ऐकून आनंद होईल की, जगभरात केवळ चार किंवा पाच देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे. भारताच्या वैज्ञानिकांनी हे करून दाखवले आहे. ह्या क्षेपणास्त्राची क्षमता अशी आहे की, २००० किलोमीटर दूरुनही, भारतावर आक्रमण करण्यासाठी एखादे क्षेपणास्त्र आले, तरी आपले हे क्षेपणास्त्र त्याला अंतराळातच नष्ट करेल.
जेव्हा आपण एखादे नवीन तंत्रज्ञान बघतो, एखादा नवा वैज्ञानिक शोध लागतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो. मानवी उत्क्रान्तीच्या प्रवासात कुतूहल, जिज्ञासा यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे आणि ज्यांना बुद्धीमत्तेचे वरदान मिळाले आहे, ते कुतूहल, जिज्ञासा यांना त्याच अवस्थेत न ठेवता, त्यात नवीन प्रश्न निर्माण करतात, नवे कुतूहल निर्माण करतात. आणि हीच जिज्ञासा नव्या शोधाचे कारण ठरते. जोवर त्याच उत्तर मिळत नाही, तोवर ते स्वस्थ बसत नाहीत. आणि हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रान्तीच्या प्रवासाचे आपण अवलोकन केले, तर आपण हे सांगू शकतो की, ह्या विकास यात्रेला कुठेही पूर्णविराम नाही. पूर्णविराम अशक्य आहे, ब्रह्मांडाला, सृष्टीच्या नियमांना, मानवी मनाला जाणून घेण्याचा प्रयत्न सतत सुरु असतो. नवीन विज्ञान, नवीन तंत्रज्ञान त्यातूनच निर्माण होते आणि प्रत्येक तंत्रज्ञान, प्रत्येक नव्या विज्ञानाचे रूप, एका नव्या युगाला जन्म देतात.
माझ्या प्रिय युवकांनो, जेव्हा आपण विज्ञान आणि वैज्ञानिकांच्या कठीण परिश्रमाबद्दल बोलतो, तेव्हा अनेक वेळा मी 'मन की बात' मधून हे सांगितले आहे की आपल्या तरुण पिढीला विज्ञानाबद्दलचे आकर्षण वाढायला हवे. देशाला अनेक वैज्ञानिकांची आवश्यकता आहे. आजचा वैज्ञानिक आगामी काळातील येणाऱ्या पिढ्यांच्या जीवनात एका शाश्वत बदलाचे कारण ठरू शकतो.
महात्मा गांधीजी म्हणत,"नो सायन्स हॅज ड्रॉप्ड फ्रॉम द स्काईज इन अ पर्फेक्ट फॉर्म. ऑल सायन्सेस डेव्हलप अँड आर बिल्ट अप थ्रू एक्सपिरीअन्सेस". म्हणजे,"कोणतेही विज्ञान किंवा शास्त्र परिपूर्ण अवस्थेत आकाशातून पडलेले नाही. सर्व शास्त्रांची प्रगती आणि बांधणी अनुभवातूनच झाली आहे."
पूज्य बापूं असेही म्हणत असत,"आय हॅव्ह नथिंग बट प्रेज फॉर द झील, इंडस्ट्री अँड सक्रिफाईस दॅट हॅव्ह ऍनिमेटेड द मॉडर्न सायन्टीस्ट्स इन द परसूट आफ्टर ट्रूथ." म्हणजे,"सत्याच्या शोधासाठी, सातत्य, परिश्रम आणि त्याग यातून आकाराला आलेल्या आधुनिक वैज्ञानिकांचा मी गौरवच करतो."
सामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेऊन विज्ञानातील सिद्धांतांचा सोपा वापर कसा करता येईल? त्यासाठी माध्यम कोणते असावे? तंत्रज्ञान कोणते असावे? कारण सामान्य माणसासाठी तेच विज्ञानाचे बहुमूल्य योगदान मानले जाते. काही दिवसांपूर्वी नीती आयोग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने १४ व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या वेळी एक मोठी वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित केली होती. समाज उपयोगी शोधांना आमंत्रित केले गेले. अशा शोधांना ओळखणे, प्रदर्शित करणे, लोकांना माहिती देणे आणि असे शोध सामान्य जनतेसाठी कसे वापरता येतील? मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे घेता येईल? त्याचा व्यावसायिक वापर कसा करता येईल? आणि जेव्हा मी हे बघितले, तेव्हा मी पाहिले की, किती मोठी अनेक महत्वपूर्ण कामे करण्यात आली आहेत. एक नवे तंत्र मी पाहिले, जे आपल्या गरीब मच्छीमार बांधवांसाठी तयार करण्यात आले आहे. एक सामान्य मोबाईल ऍप तयार केले गेले आहे. पण त्याची शक्ती अशी आहे की, मच्छीमार जेव्हा मासेमारीसाठी जातात, तेव्हा कुठे जावे, सर्वात जास्त मत्स्य क्षेत्र कुठे आहे, वाऱ्याची दिशा कोणती आहे, वेग किती आहे, लाटांची उंची किती आहे, म्हणजे एका मोबाईल ऍपवर सगळी माहिती उपलब्ध आणि यामुळे आपले मच्छीमार बांधव, जिथे अधिक प्रमाणात मासे आहेत, तिथे अत्यंत कमी वेळात पोहोचतील आणि चांगली कमाई करू शकतील.
कधी कधी उत्तर शोधण्यासाठी, समस्याच विज्ञानाचे महत्व अधोरेखित करते. मुंबईत २००५ साली अतिवृष्टी झाली, महापूर आला, समुद्रातही भरती आली आणि अनेक अडचणी निर्माण झाल्या. जेव्हा कोणतेही नैसर्गिक संकट येते, तेव्हा सर्वात पाहिले संकट येते ते गरीबांवर. दोन जणांनी अगदी मन लावून याबद्दल काम केले आणि घरबांधणीची अशी पध्दत विकसित केली, जी अशा संकटाच्या वेळी घर वाचवेल, घरात राहणाऱ्यांना वाचवेल, पाणी घरात येण्यापासून वाचवेल आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवेल. असो, अनेक नवे शोध होते.
सांगण्याचे तात्पर्य हे की समाजात, देशात अशा प्रकारची भूमिका असणारे अनेक लोक असतात आणि आपला समाजही टेक्नॉलॉजी ड्रिव्हन, म्हणजे तंत्रचलित होत आहे. यंत्रणाही तंत्रचलित होत आहेत. एका प्रकारे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होत आहे. गेल्या काही दिवसात डीजी-धन वर जोर वाढल्याचे दिसत आहे. हळूहळू लोक रोख व्यवहारांकडून डिजिटल चलनाकडे जात आहेत. भारतातही डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहे. विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या मोबाईल फोनवरून डिजिटल पेमेंट करण्याची सवय लागते आहे. हे चांगले लक्षण आहे असे मी मानतो.
आपल्या देशात गेल्या काही दिवसात 'भाग्यवान ग्राहक योजना', 'डिजि-धन व्यापारी योजना' यांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. जवळजवळ दोन महिने झाले, दर दिवशी १५ हजार लोकांना, एक हजार रुपये बक्षीस मिळत आहे. या दोन योजनांच्या माध्यमातून भारतात डिजिटल पद्धतीने पैसे देण्याच्या पद्धतीला लोकचळवळ बनवण्याच्या उद्दिष्टाचे साऱ्या देशभरात स्वागत झाले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे की, आजवर डीजी-धन योजनेअंतर्गत दहा लाख लोकांना बक्षीस मिळाले आहे, पन्नास हजारापेक्षा अधिक व्यापाऱ्यांना पारितोषिक मिळाले आहे आणि जवळ-जवळ दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बक्षीसाच्या रूपात, हे महान कार्य पुढे नेणाऱ्या लोकांना मिळाली आहे. या योजनेत शंभराहून अधिक ग्राहक असे आहेत, ज्यांना एक-एक लाख रुपये पारितोषिकाच्या स्वरूपात मिळाले आहेत. चार हजारावर असे व्यापारी आहेत ज्यांना पन्नास-पन्नास हजार रुपये बक्षीस मिळाले आहेत. शेतकरी असो, व्यापारी असो, लघुउद्योजक असो, व्यावसायिक असो, गृहिणी असोत, विद्यार्थी असोत, प्रत्येक जण यात चढाओढीने भाग घेत आहेत. त्याचे फायदे त्यांना मिळत आहेत. त्यांचे पृथक्करण करण्यासाठी जेव्हा मी विचारले की पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये फक्त तरुणच आहेत की मोठ्या वयाचे लोकही आहेत? तेव्हा हे कळल्यावर मला आनंद झाला की हे पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये १५ वर्षाचे युवकही आहेत आणि पासष्ट-सत्तर वयाचे ज्येष्ठ नागरिकही आहेत.
मैसूरहून श्रीमान संतोष यांनी आनंद व्यक्त करत नरेंद्र मोदी ऍपवर लिहिले आहे की त्यांना भाग्यवान ग्राहक योजनेत एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. पण एक महत्वाची गोष्ट त्यांनी लिहिली आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी असे मला वाटते. त्यांनी लिहिले आहे कि एक हजार रुपयांचे बक्षीस त्यांना मिळाले, त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की एका गरीब महिलेच्या घराला आग लागली होती आणि त्या आगीत सगळे सामान जळून गेले. तेव्हा मला असे वाटले की जे ईनाम मला मिळाले आहे त्यावर बहुधा ह्या गरीब वृद्ध आईचा अधिकार आहे. मी ते हजार रुपये तिला दिले. मला फार संतोष वाटला. संतोषजी, आपले नांव आणि आपले काम आम्हाला सगळ्यांना संतोष देत आहे. आपण एक फार मोठे प्रेरक काम केले आहे.
दिल्लीतले बावीस वर्षाचे कारचालक भाई सबीर, नोटबंदीनंतर आता ते डिजिटल व्यवहाराशी जोडले गेले आहेत. सरकारची जी भाग्यवान ग्राहक योजना होती, त्यात त्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. आता आज ते कार चालवतात. पण एका प्रकारे ह्या योजनेचे ते अम्बॅसेडर झाले आहेत. सर्व प्रवाशांना सर्वकाळ ते डिजिटल ज्ञान देत असतात. अशा उत्साहाने सांगतात आणि इतरांनाही प्रेरणा देतात.
महाराष्ट्रातली एक युवा विद्यार्थिनी पूजा नेमाडे, पदव्युत्तर अभ्यासक्रम करते आहे. त्याही रूपेकार्ड, ई-वॉलेट यांचा वापर त्यांच्या कुटुंबात कसा होतो आहे आणि तो करण्यात किती आनंद मिळतो याबद्दलचे अनुभव इतरांपर्यंत पोचवत असतात. एक लाख रुपयांचा पुरस्कार त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे, पण हे काम एक व्रत म्हणून त्यांनी हातात घेतले आहे आणि इतरांनाही याच्याशी त्या जोडून घेत आहेत.
मी देशवासियांना, विशेषतः देशातले युवकांना ज्यांना ह्या भाग्यवान ग्राहक योजनेत किंवा डिजिधन व्यापार योजनेत बक्षीस मिळाले आहे, त्याने मी विनंती करेन की आपण स्वतः ह्या योजनेचे अम्बॅसेडर व्हा. ह्या चळवळीचे आपण नेतृत्व करा. ही चळवळ पुढे न्या, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्ध जी लढाई आहे त्यात याची फार मोलाची भूमिका आहे. ह्या कामाशी जोडला गेलेला प्रत्येक जण, माझ्या दृष्टीने, देशातील अँटी करप्शन कॅडर, भ्रष्टाचार विरोधी पथक आहे. एका प्रकारे आपण शुचितेचे सैनिक आहात. आपल्याला ठाऊक आहे की, भाग्यवान ग्राहक योजना या मोहिमेला जेव्हा शंभर दिवस पूर्ण होतील, त्या दिवशी १४ एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. स्मरणीय दिवस आहे. १४ एप्रिल रोजी एक मोठी, कोटी रुपयांची बक्षीसे असणारी सोडत काढली जाईल. अजून सुमारे चाळीस-पंचेचाळीस दिवस शिल्लक आहेत. बाबासाहेबांचे स्मरण ठेवून आपण एक काम कराल का? नुकतीच बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती झाली. त्यांचे स्मरण करून आपण किमान १२५ जणांना भीम ऍप डाउनलोड करायला शिकवा. त्यातून देवाण-घेवाण कशी होते हे शिकवा. विशेषतः आपल्या आजूबाजूला जे छोटे, किरकोळ व्यापारी असतील त्यांना शिकवा. यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि भीम ऍप, ह्याला विशेष महत्व द्या. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेला पाया आपल्याला भक्कम करायचा आहे. घरोघरी जाऊन, सर्वांना जोडून घेऊन, १२५ करोड हातांपर्यंत भीम ऍप पोचवायचं आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून, ही जी चळवळ सुरु झाली आहे, त्याचा परिणाम असा झाला आहे की, अनेक नागरी वस्त्या, अनेक खेडी आणि अनेक शहरांमध्ये भरपूर यश मिळाले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुळाशी कृषी क्षेत्राचे फार मोठे योगदान आहे. गावाची आर्थिक शक्ती, देशाच्या आर्थिक गतीला बळ देते. मी आज एक अत्यंत आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या शेतकरी बंधु-भगिनींनी, कठोर मेहनत करून धान्याची गोदामे भरली आहेत. आपल्या देशातल्या शेतकऱ्यांच्या कष्टामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन झालं आहे. साऱ्या नोंदी हेच सांगत आहेत की आपल्या शेतकऱ्यांनी सगळे आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. शेतात ह्या वर्षी असे पीक आले आहे की, रोजच असे वाटतेय की पोंगल आणि बैसाखी आजच साजरी केली आहे. यावर्षी देशात जवळजवळ दोन हजार, सातशे लाख टनापेक्षा अधिक अन्नधान्याचे उत्पादन झाले आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या आधीच्या विक्रमापेक्षा हे आठ टक्यांनी अधिक आहे. हे स्वतः एक अभूतपूर्व यश आहे. मी खास करून देशातल्या शेतकऱ्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठीही देतो की परंपरागत पिकांबरोबरच देशातल्या गरीबाचा विचार करून डाळीचे उत्पादन घ्यावे. कारण डाळीतूनच सर्वाधिक प्रथिने गरीबांना मिळतात. मला आनंद झाला की माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी गरीबांचा आवाज ऐकला आणि जवळजवळ दोनशे नव्वद लाख हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या डाळींची लागवड केली. हे केवळ डाळीचे उत्पादन नाही, शेतकऱ्यांनी केलेली माझ्या देशातल्या गरीबाची फार मोठी सेवा आहे. माझी एक विनंती आहे, एक प्रार्थना आहे, माझ्या शेतकऱ्यांनी ज्या प्रकारे काबाडकष्ट केले आणि डाळीचे विक्रमी उत्पादन घेतले, त्यासाठी माझे शेतकरी बंधु-भगिनी विशेष धन्यवादासाठी पात्र आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या आपल्या देशात, सरकारकडून समाजाकडून, संस्थांकडून, संघटनांकडून, प्रत्येकाकडून स्वच्छतेच्या बाबतीत काहीना काही उपक्रम सुरु असतातच. एका प्रकारे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसत आहे. सरकारही सतत प्रयत्न करीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जल आणि मलनिःसारण ह्या विभागाचे आपल्या भारत सरकारचे जे पेयजल आणि स्वच्छता खातं आहे आपल्या सचिवांच्या नेतृत्वाखाली २३ राज्य सरकारांच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांचा एक कार्यक्रम तेलंगण इथे झाला. तेलंगण राज्याच्या वारंगळ इथे बंद खोलीत परिसंवाद नाही तर, प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाचे महत्व काय आहे? त्याबद्दल प्रयोग करून १७ आणि १८ फेब्रुवारीला हैदराबादमध्ये टॉयलेट पिट एम्पटिंग एक्सरसाइजचे आयोजन केले गेले. सहा घरांची टॉयलेट पिट्स रिकामी करून त्यांची स्वच्छता केली गेली आणि अधिकाऱ्यांनी स्वतः हे दाखवले की, ट्वीन पिट टॉयलेटच्या वापरल्या गेलेल्या खड्ड्याला, रिकामे करून त्याचा पुन्हा वापर करता येतो. त्यांनी हेही दाखवले की ह्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेली शौचालये किती सुविधाजनक आहेत आणि ती रिकामी करताना स्वच्छतेच्या बाबतीत काहीही अडचण येत नाही, संकोच वाटत नाही. मानसिकदृष्ट्या असणारा अडथळा सुद्धा आड येत नाही. आपण जशी इतर सफाई करतो तसेच एक शौचालयाचा खड्डा साफ करू शकतो. या प्रयत्नाचा परिणाम झाला. देशातल्या माध्यमांनी ह्या गोष्टीला भरपूर प्रसिद्धी दिली, महत्व दिले. आणि हे साहजिकच आहे की जेव्हा एक आय.ए.एस. अधिकारी स्वतः शौचालयाचा खड्डा साफ करतो, तेव्हा देशाचे लक्ष त्याकडे जाणारच. आणि ही शौचालयाच्या खड्ड्याची स्वच्छता आहे त्यात आपण ज्याला केरकचरा मानतो, ते खत म्हणून बघितले तर एक प्रकारे काळे सोने आहे. वेस्ट टू वेल्थ म्हणजे कचऱ्यातून संपत्ती कशी निर्माण होते, हे आपण बघू शकतो आणि हे सिद्ध झाले आहे. सहा जणांच्या कुटुंबासाठी एक स्टॅंडर्ड ट्वीन पिट टॉयलेट. हे मॉडेल जवळजवळ पाच वर्षात भरते. त्यानंतर त्या कचऱ्याला सहजगत्या दूर करून, दुसऱ्या खड्ड्यात सोडता येते. सहा ते बारा महिन्यात खड्ड्यात जमा झालेल्या कचऱ्याचे विघटन होते. आणि हा विघटन झालेला कचरा हाताळण्यासाठी अत्यंत सुरक्षित असतो. खताच्या नजरेतून अत्यंत महत्वाचे खत म्हणजे NPK. आपल्या शेतकऱ्यांना NPK म्हणजे काय हे चांगलेच माहीत आहे. नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅशियम- हे पोषक तत्वांनी परिपूर्ण असते आणि हे शेती क्षेत्रात फारच उत्तम खत मानले जाते.
ज्या प्रकारे सरकारने हा पुढाकार घेतला आहे, इतरांनीही पुढाकार घेऊन असे प्रयोग केले आहेत. आता तर दूरदर्शनवर स्वच्छता वार्तापत्र हा विशेष कार्यक्रम सुरु झाला आहे. त्यात अशा गोष्टी जेवढ्या प्रसारित होतील, तेवढा त्याचा लाभ मिळेल. सरकारचे वेगवेगळे विभाग स्वच्छता पंधरवडा नियमितपणे आयोजित करतात. मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात महिला आणि बालविकास मंत्रालय, त्याच्या जोडीला आदिवासी विकास मंत्रालय. हे विभाग स्वच्छता अभियानाला शक्ती देणार आहेत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात नौवहन मंत्रालय आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, हे आणखी दोन विभाग स्वच्छता अभियान पुढे नेणार आहेत.
आपल्याला ठाऊक आहे की आपल्या देशातील कुणीही नागरिक जेव्हा काही चांगले करतो, तेव्हा सारा देश एका नव्या ऊर्जेचा अनुभव घेतो, आत्मविश्वास वाढीला लागतो. रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये आपल्या दिव्यांग खेळाडूंनी जी कामगिरी केली, त्याचे आपण स्वागत केले. याच महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या अंध खेळाडूंच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत, सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरत देशाचा गौरव वाढवला. मी पुन्हा एकदा या संघातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो. या दिव्यांग सहकाऱ्यांच्या यशाबद्दल देशाला त्यांचा अभिमान वाटतो. मी नेहमी हे मानतो की दिव्यांग बंधु-भगिनी सामर्थ्यवान असतात, दृढनिश्चयी असतात, धाडसी असतात, संकल्पवान असतात. प्रत्येक क्षणी आपल्याला त्यांच्याकडून काही-ना-काही शिकायला मिळू शकते.
मुद्दा खेळाचा असो की अंतराळ विज्ञानाचा, आपल्या देशातील महिला कुणाच्याही मागे नाहीत. पावलाशी पाऊल जोडत त्या पुढे चालल्या आहेत आणि आपल्या यशाने देशाचे नाव उज्वल करत आहेत, काही दिवसांपूर्वीच आशियाई रग्बी सेव्हन्स ट्रॉफी स्पर्धेत आपल्या महिला संघाने रजत पदक पटकावले. या सगळ्या खेळाडूंना मी अनेक शुभेच्छा देतो.
8 मार्च साऱ्या जगात महिला दिन साजरा केला जातो. भारतातही मुलींना महत्व देण्याबद्दल, कुटुंबात आणि समाजात त्यांच्याविषयी जागरूकता वाढायला हवी, संवेदनशीलता वाढायला हवी. 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' ही मोहीम वेगाने पुढे जात आहे. आज हा केवळ सरकारी कार्यक्रम राहिला नाही. सामाजिक संवेदना आणि लोकशिक्षणाची एक चळवळ असे आज त्याचे रूप झाले आहे. गेल्या दोन वर्षात ह्या उपक्रमाशी सामान्य माणूस जोडला गेला आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात ह्या ज्वलंत मुद्याविषयी विचार करायला या उपक्रमाने भाग पाडले आहे. वर्षानुवर्षं चालत आलेल्या जुन्या रिती-रिवाजांबद्दल लोकांच्या विचारात बदल घडवून आणला आहे. मुलीच्या जन्मानंतर उत्सव साजरा केला गेला अशी बातमी जेव्हा मिळते, तेव्हा फार आनंद होतो. एका प्रकारे मुलींबद्दल सकारात्मक विचार सामाजिक स्वीकृतीचे कारण ठरत आहे. मी असे ऐकले आहे की, तामिळनाडू राज्यात कुड्डलोर जिल्ह्याने एका विशेष अभियानांर्तगत बालविवाह प्रथेवर बंदी आणली. आतापर्यंत सुमारे एकशे पंचाहत्तर पेक्षा अधिक बालविवाह थांबवण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सुकन्या समृद्धी योजनेत जवळजवळ पंचावन्न ते साठ हजार बँक खाती उघडण्यात आली आहेत. जम्मू काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात कन्व्हर्जन्स मॉडेल अंतर्गत सगळ्या विभागांना 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' योजनेशी जोडण्यात आले आहे. ग्राम सभांच्या आयोजनाबरोबरच अनाथ मुलींना दत्तक घेणे, त्यांना शिक्षण मिळेल याची खात्री करणे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न होत आहेत. मध्य प्रदेशात 'हर घर दस्तक' ह्या उपक्रमात, गावागावात, घरो-घरी मुलींसाठी शिक्षण मोहीम सुरु आहे. राजस्थानात 'अपना बच्चा, अपना विद्यालय' अभियान चालवून शाळा सोडून गेलेल्या मुलींना पुन्हा शाळेत आणण्यासाठी, शिक्षणासाठी प्रेरित करण्यासाठी उपक्रम सुरु आहे. सांगायचे तात्पर्य हे की 'मुलगी वाचवा-मुलगी शिकवा' ह्या चळवळीने आता अनेक वेगळी रूपे घेतली आहेत. ही चळवळ आता लोकचळवळ झाली आहे. नव्या नव्या कल्पना त्याच्याशी जोडल्या जात आहेत. स्थानिक गरजेनुसार त्यात बदल झाले आहेत. मी हे एक चांगले लक्षण मानतो. जेव्हा आपण 8 मार्च या दिवशी महिला दिवस साजरा करू तेव्हा आमची एकच भावना असेल-
"महिला, वो शक्ती हैं, सशक्तहैं, वो भारत की नारी हैं,
न ज्यादा में, न काम में, वो सब में बरोबर की अधिकारी हैं"
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना मन की बात मधून काहीना काही संवाद साधण्याची संधी मिळते. आपणही सक्रियपणे सहभागी होत असता. आपल्याकडून मला खूप माहिती करून घेता येते. जमीनीवर काय चालले आहे? गावात, गरिबाच्या मनात काय चालले आहे? ते माझ्यापर्यंत पोचत असते. आपल्या सहभागासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. अनेक अनेक धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सार्यांना नमस्कार. 26 जानेवारी, आपला ‘प्रजासत्ताक दिवस’ आपण देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला. भारताची राज्यघटना, नागरिकांचे कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणार्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे. पण आपल्या देशात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यासंदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी, जितक्या व्यापक रूपात चर्चा व्हायला हवी तितकी अजूनही होत नाहीये. मी आशा करतो की प्रत्येक स्तरावर, जितकं महत्त्व अधिकारांना दिलं जातं तितकंच महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. अधिकार आणि कर्तव्य या दोन रूळांवरच भारताच्या लोकशाहीची गाडी वेगाने पुढे मार्गक्रमण करू शकते.
उद्या 30 जानेवारी आहे. आपल्या पूजनीय बापूजींच पुण्यतिथी. या दिवशी सकाळी 11 वाजता आपण दोन मिनिटांचे मौन पाळून, देशासाठी प्राण अर्पण करणार्या शहीदांना श्रद्धांजली देतो. 30 जानेवारीच्या दिवशी 11 वाजता हे दोन मिनिटांचे मौन पाळलं जाणं हा समाज म्हणून, एक देश म्हणून आपला सहज स्वभाव बनायला हवा. 2 मिनिटांसाठीच का होईना पण त्या मौनातून आपली सामूहिकता, आपला संकल्प आणि शहीदांच्या बद्दलचही आपली श्रद्धा अभिव्यक्त होत असते.
आपल्या देशामध्ये सैन्याबद्दल, सुरक्षा दलांबद्दल स्वाभाविकपणे आदरभाव व्यक्त होत असतो. या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला ज्या वीर जवानांना वेगवेगळ्या वीरता पुरस्कारांनी सन्मानित केले गेले त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमध्ये ‘कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा अनेक श्रेणी आहेत. माझा विशेषत: देशाच्या तरुणांना एक आग्रह आहे. तुम्ही social media वर खूप active आहात. तुम्ही एक काम करू शकता का? या वेळी ज्या ज्या वीरांना हा सन्मान मिळाला आहे त्यांची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधा आणि त्यांच्याबद्दल दोन चांगले शब्द लिहून ते आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. जेव्हा आपण या वीरांच्या साहसाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल खोलात जाऊन माहिती करून घेतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं, अभिमान वाटतो आणि प्रेरणाही मिळते.
एकीकडे आपण 26 जानेवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाल्याच्या बातम्या वाचून आनंदीत होत होतो त्याचवेळी काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या कामी तैनात सैनिकांना हिमस्खलनामुळे आपले प्राण गमवावे लागले. मी त्या सर्व वीर सैनिकांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो, त्यांना वंदन करतो.
माझ्या युवा साथींनो, तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की मी आपली ‘मन की बात’ तुम्हाला सतत सांगत असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळेच महिने म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये मोठा कसोटीचा काळ असतो. जवळजवळ प्रत्येक घरात एक-दोन मुलांची परीक्षा असते पण सगळं कुटुंब त्या परीक्षेच्या ओझ्याखाली दबून गेलेलं असतं. तेव्हा वाटलं की माझ्या विद्यार्थी मित्रांशी, त्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी हा काळ उचित आहे. कारण अनेक वर्षांपासून मी जिथे जिथे जातो, ज्यांना ज्यांना भेटतो तिथे तिथे मुलांची परीक्षा हे खूप मोठं काळजीचं कारण बनलेलं दिसतं. कुटुंब चिंतेत आहे, विद्य़ार्थी काळजीत आहे, शिक्षक विवंचनेत आहेत अशी एक मोठी विचित्र मानसिक स्थिती प्रत्येक घरात तयार झालेली दिसते. आणि मला नेहमीच असं वाटतं की या मनस्थितीमधून बाहेर पडण्याची गरज आहे. म्हणूनच आज मला माझ्या तरुण मित्रांना काही गोष्टी थोड्या विस्ताराने सांगाव्याशा वाटताहेत. मी या विषयावर बोलणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा अनेक शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी मला मेसेज पाठवले, प्रश्न पाठवले, काही सूचना पाठवल्या, आपल्याला होणारा त्रास, अडचणी यांचाही उल्लेख त्यात होता. ते सारं वाचून माझ्या मनात जे विचार आले ते मी आज आपल्याजवळ व्यक्त करू इच्छितो. मला सृष्टीचा एक टेलिफोन संदेश मिळाला. सृष्टी काय म्हणतेय ते तुम्हीली ऐका...
“सर, मला तुम्हाला सांगायचंय की परीक्षेच्या दिवसांत आमच्या घरी, शेजारी-पाजारी, आमच्या सोसायटीमध्ये खूपच भीतीदायक वातावरण तयार होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनांना उभारी मिळणं तर होत नाहीच उलट आम्ही उदास होऊन जातो. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की हे वातावारण आनंदी बनू शकत नाही का?”
प्रश्न सृष्टीने विचारलाय खरा पण तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उमटत असणार. परीक्षा हा खरं तर आनंदाचा काळ असायला हवा. वर्षभर किती मेहनत केली ते दाखवून देण्याची संधी आता मिळतेय या गोष्टीचा उत्साह या काळामध्ये वाटला पाहिजे. खूप कमी जणं अशी असतात ज्यांना परीक्षेमध्ये असं pleasure दिसतं. बहुतेकांसाठी परीक्षा म्हणजे pressure असतं. ती खरंच pressure आहे की pleasure याचा निर्णय तुम्हालाच करायचा आहे. जो pleasure, आनंद मानून या परीक्षेला सामोरं जाईल त्याला त्याचं चांगलं फळ मिळेल आणि जो pressure अर्थात दडपण घेईल त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ येईल. म्हणूनच माझं मत आहे की तुम्ही परीक्षांना असं सामोरं जा, जणू काही तो एखादा सणच असावा. आणि जेव्हा सण असतो, उत्सवी वातावरण असतं तेव्हा आपल्यातलं जे जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआपच वाट मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्ये, उत्सवांमध्येही समाजातील ताकदीचा अनुभव येत असतो, जे उत्तमातील उत्तम आहे ते प्रकट होताना दिसतं. सर्वसाधारणपणे आपला समाज बेशिस्त असल्याचं म्हटलं जातं पण 40-45 दिवस चालणार्या कुंभ मेळ्यांच व्यवस्था पाहिली तर लक्षात येतं की तात्पुरत्या व्यवस्था उभारण्याचं कसब आणि किती शिस्त लोकांमध्य आहे. ही उत्सवाची ताकद आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या काळामध्येही संपूर्ण कुटुंबात, मित्रपरिवारामध्ये, शेजार्या पाजार्यांमध्ये एक उत्सवी वातावारण बनायला हवं. मग तुम्ही पहा pressure, pleasure मध्ये कसं बदलून जातं ते. उत्सवी वातावरणामुळे परिक्षेच्या दडपणातून मुक्तता मिळेल. मला मुलांच्या आई-वडिलांना विशेष आग्रहाने सांगायचं आहे की या तीन-चार महिन्यांमध्ये वातावरण उत्सवी उत्साही ठेवां. संपूर्ण परिवाराने हा उत्सव पूर्णत्वाला नेण्याच्या कामी आपापली भूमिका उत्साहाने पार पाडावी. पाहता पाहता चित्र बदलून जाईल. कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून ते कामरूपपर्यंत, अमरेलीपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडे या तीन चार महिन्यांमध्ये परिक्षाच परीक्षा असतात. या तीन चार महिन्यांना आपापल्या पद्धतीने, आपापल्या परंपरांना अनुसरून, आपापल्या कुटुंबातील वातावरणाला अनुसरून उत्सवाच्या काळामध्ये परिवर्तित करावे. आणि म्हणूनच मी तर तुम्हाला सांगेन, ‘smile more, score more.’ जितक्या आनंदात हा काळ घालवाल तितके जास्त गुण तुम्हाला मिळतील. फक्त हे करून पहा. आणि तुम्ही हे पाहिलंच असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता, हसत असता तेव्हा आपोआपच निश्चिंत होता. आणि असं निश्चिंत असाताना वर्षभरातलं सगळं काही सहजपणे आठवतं. वर्षभरापूर्वी शिक्षकांनी वर्गात काय सांगितलं होतं वगैरे सारं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहीजे की आपल्या स्मृतींच उजळणी करण्याचं कसब स्थिरचित्ताने अधिक चांगलं साधतं. तणावपूर्ण मनस्थितीमध्ये सगळे दरवाजे बंद होतात. बाहेरून काही आत जाऊ शकत नाही आणि आतलं बाहेर येऊ शकत नाही. विचार प्रक्रिया जणू थांबून जाते आणि या गोष्टीचं ओझं होऊन बसतं. परीक्षेतही तुम्ही बघितलं असेल की सारं काही आठवत असतं. पुस्तक आठवत असतं, धडा आठवत असतो, पानाचा क्रमांक आठवत असतो, हवा असलेला मुद्दा पानच्या वरच्या भागात लिहिला होता की खालच्या भागात इथपर्यंतही सगळं काही आठवत असतं पण तो विशिष्ट शब्द काही केल्या आठवत नाही. पण पेपर देऊन वर्गातून बाहेर पडून चार पावलं चाललं की अचानक आठवतं. ‘अरे हा तोच शब्द होता. आत असताना का नाही आठवला?’ दडपण होतं. मग बाहेर पडल्यावर कसा काय आठवला ? तुमच्याच तर डोक्यात होता तो, कुणी सांगितला तर नाही. पण तो आत असलेला चटकन बाहेर आला. तो बाहेर आला कारण परीक्षागृहाच्या बाहेर पडताच मनावरच दडपण दूर झालं. तुम्ही शांत झालात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी स्वस्थ मन हे सगळ्यात गुणकारी औषध आहे. आणि हे मी तुम्हाला स्वानुभवातून सांगू शकतो की जर दडपण असेल तर विस्मरण होतं आणि स्वस्थ असताना अशा गोष्टी आठवतात ज्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि तुमच्याकडे ज्ञान नाही, माहितीची कमतरता आहे, मेहनत कमी पडतेय असं कुठे आहे? पण ताण असेल तेव्हा तुमचं ज्ञान, तुमच्याकडे असलेली माहिती त्याखाली दबून जाते आणि ताणच त्यावर स्वार होतो. ‘A happy mind is the secret for a good mark-sheet’ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी असं वाटतं की आपण परीक्षेकडे योग्य दृष्टीकोनातून बघत नाही. तो जणू काही जगण्या-मरण्याचा प्रश्न असावा अशी आपली मानसिकता असते. तुम्ही वर्षभरात जो काही अभ्यास केला आहे फक्त तेवढ्याबद्दलची ही परीक्षा असणार आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्याची कसोटी तिथे लागणार नाहीये. तुम्ही कसं आयुष्य जगत आला आहेत, कसं जगत आहात, पुढे कोणत्या प्रकारचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे या सार्या गोष्टींबद्दलची ही परीक्षा नव्हे. वर्गामध्ये, वह्यापुस्तकं घेऊन दिलेल्या परीक्षेच्या व्यतिरिक्त अनेक कसोटीच्या प्रसंगांतून तुम्ही गेला असाल. शाळेतल्या परीक्षेचं प्रत्यक्ष आयुष्यातील यश-अपयशाशी काहीच देणं-घेणं नसतं. तेव्हा अशा दडपणांतून मुक्त व्हा. आपल्या सगळ्यांसमोर देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं मोठं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांना हवाईदलामध्ये भरती व्हायचं होतं. पण ते नापास झाले. समजा त्या अपयशामुळे ते निराश झाले असते, आयुष्याकडून हार पत्करली असती तर भारताला इतके मोठे वैज्ञानिक मिळाले असते का, इतके मोठे राष्ट्रपती मिळाले असते का? कुणी ऋचा आनंद यांनी मला एक प्रश्न पाठवला आहे.
‘ आजच्या काळामध्ये शिक्षणासमोर जे सर्वात मोठं आव्हान मला दिसतंय ते म्हणजे शिक्षण परिक्षाकेंद्री होऊन गेलं आहे. मार्कांना खूप जास्त महत्त्व मिळत आहे. त्यामुळे स्पर्धा तर वाढली आहेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण खूप वाढला आहे. शिक्षणपद्धतीच्या सध्याच्या या वाटचालीबद्दलचे आणि तिच्या भविष्यासंबंधीचे तुमचे विचार मला जाणून घ्यायचे आहेत.’
खरं तर आपल्या प्रश्नातच त्यांनी उत्तर देऊन टाकलं आहे पण ऋचा यांची इच्छा आहे की मी या विषयावर माझं काही मत सांगावं. गुण आणि गुणपत्रिका यांचा एक मर्यादित उपयोग आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सारं काही गुणपत्रिकेतील गुणांबरहुकूम चालत नाही. तिथे तर मिळवलेलं ज्ञान तुम्ही जगण्यात किती उतरवलंत हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तुमचा sense of mission, आणि sence of ambition अर्थात तुमच्या मनातील ध्येयपूर्तीची संकल्पना आणि महत्त्वाकांक्षा यात काही ताळमेळ आहे की नाही ही गोष्ट आयुष्यात महत्त्वाची ठरते. जर तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवाल तर मार्क आपणहूनच मागे येतील, तुम्हाला त्यांच्या मागून धावाधाव करण्याची कधीच गरज पडणार नाही. आयुष्यात तुम्हाला ज्ञानाचा उपयोग होणार आहे, तुमचं कसब तुमच्या उपयोगी पडणार आहे, आत्मविश्वासाचा, निर्धाराचा उपयोग होणार आहे. तुम्हीच मला सांगा, तुमचे कुणीतरी फॅमिली डॉक्टर नक्कीच असतील. घरातले सगळे जण उपचारांसाठी त्यांच्याकडेच जात असतील. पण त्यांना परीक्षांमध्ये किती मार्क मिळाले हे त्यांना कुणीही विचारलं नसेल. तुम्ही इतकंच बघत असणार की ही व्यक्ती डॉक्टर म्हणून चांगली आहे, त्यांच्या औषधांमुळे लोक बरे होत आहे. आपला मोठ्यात मोठा खटला लढवण्यासाठी तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाता तेव्हा त्याची ‘मार्क शीट’ बघता का? त्याचा अनुभव, ज्ञान आणि वकिलीच्या क्षेत्रातला यशस्वी प्रवास याच गोष्टी तिथे पाहिल्या जातात. म्हणूनच मार्कांचं हे दडपण कधी कधी आपल्याला योग्य दिशेने जाण्यापासून थांबवतो. याचा अर्थ तुम्ही शिकूच नका असं मी सांगणार नाही. आपलं ज्ञान कसाला लावण्यासाठी परीक्षेचा उपयोग नक्कीच आहे. आपल्या जगण्याकडे बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला जाणवेल; कधी कधी असंही होतं जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट शोधता, नेमकेच मुद्दे निवडता, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करता. पण तुम्ही निवडलेले ते ठराविक मुद्दे, ठराविक प्रश्न यांच्याबाहेरचं काही आलं तर मार्कांचं गणित एकदम कोलमडतं. त्याऐवजी तुम्ही ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केलंत तर जास्तीत जास्त गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता. तुम्ही फक्त मार्कांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा हळूहळू तुम्ही स्वत:ला आक्रसून घेता, एका विशिष्ट भागापुरतंच पाहू लागता. केवळ मार्क मिळवण्यापुरता विचार करू लागता. मग परीक्षेमध्ये खूपच हुशार विद्यार्थी असूनही प्रत्यक्ष आयुष्यात अपयश सामोरं येऊ शकतं.
ऋचाजींनी इतरांशी सतत चाललेल्या स्पर्धेचा मुद्दाही मांडला आहे. ही एक खूप मोठी मानसिक लढाई आहे. खरोखरीच आयुष्यात पुढे जाण्यासाठी इतरांशा नाही तर स्वत:शी केलेली स्पर्धा उपयोगी ठरते. माझ्या घडून गेलेल्या ‘काल’पेक्षा येणारा ‘उद्या’ अधिक चांगला कसा असेल, काल घडलेल्या गोष्टींच्या परिणामांपेक्षा उद्या मला मिळणार्या संधी अधिक चांगल्या कशा असतील याचा विचार आपण करायला हवा. तुम्ही क्रीडाक्षेत्रात हे घडताना पाहिलं असेल. खेळाशी संबंधित उदाहरणं समजायला सोपी असतात म्हणून मी तीच सांगतो. बहुतांश यशस्वी खेळाडूंचं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांची स्पर्धा स्वत:शी असते. आपण सचिन तेंडूलकर यांचंच उदाहरण घेऊ या. वीस वर्षं सतत आपलेच विक्रम मोडत जाणं, स्वत:लाच पराजित करत पुढे जात जाणं असा त्यांचा प्रवास राहीला आहे. तो मोठा अद्भूत म्हणायला हवा कारण त्यांनी इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धेचा मार्ग अनुसरला.
आय़ुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अगदी अभ्यासाच्या बाबतीतही हेच प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा. मी आधी दोन तास शांतपणे अभ्यास करू शकत होतो, आता तीन तास अभ्यास करणं मला जमतंय का? आधी सकाळी उठायला उशीर व्हायचा, आता लवकर उठणं जमतंय का? आधी परीक्षेच्या ताणामुळे झोप यायची नाही, आता येते का? तुमच्या आपणच लक्षात येईल की इतरांशी केलेली स्पर्धा पराजय, निराशा आणि ईर्ष्येला जन्म देते तर स्वत:शी केलेली स्पर्धा आत्ममंथन, आत्मचिंतनाचे कारण बनते, आपला निर्धार दृढ बनवते आणि जेव्हा आपणच आपल्याला हरवतो तेव्हा आणखी पुढे जाण्याचा उत्साह आपोआपच वाटू लागतो. बाहेरून अधिकचा उत्साह आणण्याची गरज उरत नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा तुम्ही इतरांशी स्पर्धा करता तेव्हा तीन शक्यता ठळकपणे दिसतात. एक, आपण इतरांपेक्षा सरस आहोत. दुसरी आपली कामगिरी इतरांच्या तुलनेत खूपच वाईट आहे किंवा आपणही इतरांसारखेच आहोत. सरस असाल तर तुम्ही निष्काळजी बनाल. स्वत:वर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकाल. आपण वाईट आहोत असं वाटत असेल तर तुम्ही निराश व्हाला आणि इतरांबद्दल तुमच्या मनात इर्ष्या निर्माण होईल. आतल्या आत कष्टत रहाल. तिसरी शक्यता, म्हणजे इतरांइतकंच हुशार असणं पुरेसं आहे असं मानून चाललात तर सुधारणेला काही वावच उरणार नाही. चाललंय तसं चालू दे असं म्हणून तुम्ही शिथिल रहाल. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही स्वत:शी स्पर्धा करा. आधी मी जे काही केलं त्यापेक्षा यापुढे चांगलं कसं करू शकेन याचा विचार कराल. बस, याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करा. मग पहा. तुम्हाला स्वत:मध्ये बदल झालेला जाणवेल.
श्री. एस. सुंदर यांनी पालकांच्या भूमिकेसंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यांनी पुढे म्हटलं आहे, ‘माझी आई खूप शिकलेली नव्हती. तरीही ती माझ्याजवळ बसायची आणि माझ्याकडून गणितं सोडवून घ्यायची. उत्तरं काढायची आणि अशाप्रकारे मला मदत करायची. माझ्या चुका सुधारायची. माझ्या आईने दहावीची परीक्षाही पास केली नव्हती पण तिच्या मदतीशिवाय मला माझी सी.बी. एस. सी. ची परीक्षा पास करणं अशक्य होतं.’
सुंदरजी, तुमचं म्हणणं खरं आहे आणि आजही आपण पाहिलं असेल की प्रश्न विचारण्यांमध्ये, सूचना करणार्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. कारण मुलांच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या माता सतत सजग असतात, सक्रिय असतात आणि अनेक गोष्टी त्यांच्यामुळे सोप्या होऊन जातात. मी पालकांना फक्त इतकंच सांगेन की त्यांनी तीन गोष्टींवर भर द्यावा. स्वीकार करणं, शिकवणं आणि वेळ देणं. आपलं पाल्य जसं आहे, तसा त्याचा स्वीकार करा. तुमच्याजवळ जितकी क्षमता आहे ती त्याला शिकवण्यासाठी वापरा आणि आपापल्या कामांत कितीही व्यग्र असलात तरीही त्यांच्यासाठी वेळ काढा. एकदा स्वीकार करणं जमलं की बर्याचशा समस्या तिथेच संपून जातील. पालकांना अनुभव असेल की त्यांच्या, शिक्षकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षाच अनेक समस्यांच्या मूळाशी असतात. स्वीकारातून या समस्या सोडविण्याचा मार्ग दिसू लागतो. अपेक्षांमुळे मार्ग खडतर बनतो तर स्वीकार नव्या वाटा शोधण्याची संधी देतो आणि म्हणूनच मूल जसं आहे तसं स्वीकाराल. तुमच्यावरचं ओझंही दूर होईल. आपण मुलांच्या पाठीवरच्या दप्तरांच्या ओझ्यांची चर्चा करतो पण कधी कधी मला वाटतं की पालकांच्या अपेक्षा, आशा-आकांक्षाचं ओझं त्या दप्तरांपेक्षा भारी असतं.
खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आमच्या ओळखीचे एक व्यक्ती हृदयविकाराने आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश दादा मावळणकर आणि त्यांचे एकेकाळचे खासदार पुत्र पुरुषोत्तम मावळणकर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो आणि मी पाहिलं की त्यांनी त्या रुग्ण व्यक्तीच्या तब्येतीसंबंधी एकही प्रश्न विचारला नही. आल्या आल्या त्यांनी विनोदी चुटके ऐकवायला सुरुवात केली. चार-पाच मिनिटांतच वातावारणातला सगळा तणार सैल झाला. एरवी रुग्णाला भेटायला जाणारे आजाराबद्दल बोलून त्यांना घाबरवूनच टाकत असतात. पालकांना मला हेच सांगायचं आहे. कधी कधी मुलांबरोबर आपण नेमकं असंच वागत असतो. परीक्षेच्या काळात मुलांना आनंदी, हसरं-खेळतं वातावरण द्यावं असा विचार आपण कधी केलाय का? तो करून पहा, वातावरण बदलून जाईल.
मला आणखी एक मोठा कमालीचा फोनकॉल आला आहे. त्या सद्गृहस्थांना आपलं नाव सांगायचं नाहीये. त्यांचं बोलणं ऐकून याचं कारण तुमच्या लक्षात येईलच. ते म्हणतात, ‘नमस्कार पंतप्रधान महोदय, मी स्वत:चं नाव तर सांगू शकत नाही कारण माझ्या लहानपणी मी कामच तसं केलंय. लहानपणी एकदा मी कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी खूप तयारीही सुरू केली होती. कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात माझा भरपूर वेळ वाया गेला. तेवढा वेळ अभ्यास करण्यासाठी वापरला असता तर चांगले मार्क मिळाले असते. आणि जेव्हा प्रत्यक्ष कॉपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातही पकडला गेला. माझ्यामुळे माझ्या जवळपासच्या अनेक मित्रांना खूप त्रास झाला.”
तुमचं म्हणणं खरं आहे. हे जे short-cut चे रस्ते आहेत ते कॉपी करण्यासाठीचं कारण बनून जातात. कधी कधी स्वत:वर विश्वास नसतो तेव्हा शेजारच्या मुलाचं उत्तर पहावं आणि खात्री करून घ्यावी असं वाटून जातं. कधी कधी आपलंच उत्तर बरोबर असतं आणि शेजार्याचं चुकलेलं असतं. पण ते चुकीचं उत्तर आपण खरं मानून बसतो आणि घात होतो. त्यामुळे कॉपीचा फायदा कधीच होत नाही. To cheat is cheap, so please, do not cheat.’ नक्कल करणं तुम्हाला वाईट व्यक्ती बनवतं, त्यामुळे कृपया कॉपी नक्कल करू नका. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मीही पुन्हा तेच सांगेन. कोणत्याही प्रकारे पाहिलं तरीही कॉपी करण्याचे दुष्परिणामच दिसतील. समजा कॉपी करताना पकडले गेलात तर सारं काही तिथेच संपून जाईल आणि पकडले गेला नाहीत तरीही आयुष्यभर मनावर आपल्या त्या कृत्याचा भार वागवत रहावं लागेल. आपल्या मुलांना कॉपी न करण्याबद्दल समजावताना त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवणं तुम्हाला कठीण जाईल आणि एकदा का कॉपी करण्याची सवय लागली की त्यानंतर आयुष्यात काही शिकण्याची इच्छाच उरणार नाही. मग तर तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे तर आपल्याच रस्त्यांना खड्ड्यांनी भरून टाकण्यासारखं आहे. मी काही असे लोकही पाहिले आहेत जे कॉपी करण्याचे इतके प्रकार शोधून काढतात की त्यांची सगळी सर्जनशीलता या एका कामातच वापरली जाते. तीच सर्जनशीलता, तोच वेळ ती परीक्षेतल्या मुद्द्यावर खर्च कराल तर कदाचित कॉपी करण्याची गरजही पडणार नाही. आपल्या स्वत:च्या मेहनतीतून जे यश मिळवाल ते तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तो अद्भूत असेल.
एक फोनकॉल मला आला आहे, त्या म्हणतात,
‘नमस्कार पंतप्रधान महोदय, माझं नाव मोनिका आहे. मी बारावीची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मला बोर्डाच्या परीक्षांशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. माझा पहिला प्रश्न या परिक्षांच्या काळात वाढणार्या तणावासंबंधीचा आहे. तो कमी कसा करता येईल? दुसरं म्हणजे परीक्षा म्हणजे ‘all work and no play’ असं का असतं?’
परीक्षेच्या दिवसांमध्ये मी खेळण्या-बागडण्याबद्दल बोललो तर तुमचे शिक्षक, तुमचे पालक माझ्यावर रागावतील. परीक्षेच्या काळात मुलांना खेळायला सांगणारे असे कसे पंतप्रधान आहेत असं म्हणत नाराज होतील. कारण खेळांमध्ये लक्ष गेले की अभ्यासावरील लक्ष कमी होतं असा आपल्याकडे सर्वसाधारण समज आहे. ही विचारसरणीच मूळात चुकीची आहे. समस्येचं मूळ तिथेच आहे. मुलांचा सर्वांगिण विकास आवश्यक आहे. तो व्हायचा तर पुस्तकांच्या पानांबाहेरचं एक मोठं विशाल जग आहे तेही पहायला हवं. जगायला शिकण्याचंही हेच तर वय असतं. आधी सगळ्या परीक्षा देतो आणि मग खेळतो, मग बाकीच्या गोष्टी करतो असं कुणी म्हटलं तर ते शक्य नाही. माणसाच्या जडणघडणीचा काळ हाच असतो. त्यालाच तर संगोपन म्हणतात. माझ्या दृष्टीने परीक्षेमध्ये तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. योग्य प्रमाणात आराम, शरीरासाठी गरजेची आहे तितकी झोप आणि तिसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक कार्याव्यतिरिक्तही शरीराच्या इतर भागांचंही चलनवलन योग्य पद्धतीने होणं. शरीरालाही काही व्यायाम मिळायला हवा. आपल्या अभ्यासातून दोन क्षण बाहेर पडून थोडं आकाश पहावं, अवतीभोवतीची झाडं पाहावीत, मन थोडं हलकं करावं आणि पुन्हा आपल्या खोलीत अभ्यासाला बसावं. एक नवा ताजेपणा तुम्हाला तुमच्या कामात जाणवेल. तुम्ही जे काही काम करता आहात त्यातून थोडा विसावा घ्या. उठा, बाहेर जा, किचनमध्ये जा, आपल्या आवडीचं एखादं बिस्किट तोंडात टाका, थोडे हास्यविनोद करा. पाच मिनिटांसाठी का होईना पण हा विश्रांतीचा काळ स्वत:ला द्या. तुम्हाला दिसेल की काम आणखी चांगलं होतंय. सगळ्यांनाच हे आवडेल की नाही माहीत नाही, पण माझा अनुभव मला हेच सांगतो. अशा वेळी थोडं दीर्घश्वसन केल्यास खूप फायदा होईल. त्यासाठी खोलीत बसून राहण्याची गरज नाही. जरा मोकळ्या आभाळाखाली उभं रहा, गच्चीवर जा, पाच मिनिटं दीर्घ श्वसन करा आणि मग अभ्यासाला बसा. तुम्ही पहाल की तुमचं शरीर अगदी तणावरहीत झालं आहे आणि ही अवस्था तुमच्या मेंदूलाही मिळालेली आहे. काही लोकांचा समज असतो की रात्री खूप उशीरा जागलं तर खूप जास्त अभ्यास होईल. पण नाही. शरीराला जितकी झोप आवश्यक आहे तितकी जरूर घ्या. त्यातून तुमचा अभ्यासाचा वेळ फुकट जाणार नाही. उलट अभ्यास करण्यासाठी जास्त उत्साह मिळेल, एकाग्रता वाढेल, ताजेपणा वाटेल. तुमच्या कार्यक्षमतेमध्ये एकूणच वाढ होईल. मी निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांसाठी जातो तेव्हा काही वेळा माझा आवाज बसलेला असतो. अशाच एका सभेच्या वेळी मला एक लोकगायक भेटायला आले होते. त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही किती तास झोपता?’ मी म्हणालो, ‘ का बरं, तुम्ही डॉक्टर आहात का?’ म्हणाले, ‘नाही नाही. भाषणं देता देता तुमचा आवाज बिघडतो त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. तुम्ही पूर्ण झोप घ्याल तर तुमच्या स्वरयंत्राला आराम मिळेल. माझी झोप, भाषणं आणि आवाज यांच्याबद्दल मी असा विचार कधी केला नव्हता. त्यांनी मला जणू काही एक जडी बूटीच दिली. तुम्हीही या गोष्टीचं महत्त्वं ओळखा. पण याचा अर्थ असा नाही की सतत झोपून रहावं. असं केलंत तर तुमच्या घरातली माणसं माझ्यावर रागावतील. मग तुमची ‘मार्क-शिट’ हातात आल्यावर त्यांना तुम्ही नव्हे तर मीच दोषी दिसेन. तेव्हा असं करू नका. आणि म्हणूनच मी तर म्हणेन की ‘p for prepared and p for play.’ ‘ जो खेले वो खिले’. ‘the peson who plays, shines.’ मन, बुद्धी, शरीर यांना सजग ठेवण्यासाठी हे एक खूप मोठं औषध आहे.
असो, युवा मित्रांनो, तुम्ही परीक्षांच्या तयारीत गुंतलेले आहात आणि मी माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये अडकून बसलोय. कुणास ठाऊक, कदाचित माझं हे बोलणंच तुमच्या मनावरचा तणाव दूर करण्यासाठी मदत करेल. पण त्याचबरोबर मी हे सुद्धा म्हणेन की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं दडपण मनावर घेऊ नका. जमत असेल तर करा, नाहीतर नका करू. नाहीतर त्याचंही एक ओझं बनून बसेल. मुलांवर अपेक्षांची ओझी लादू नका ही तुमच्या पालकांना सांगितलेली गोष्ट मलासुद्धा लागू आहेच. आपण केलेला निर्धार मनाशी जपत, स्वत:वर विश्वास ठेवून परीक्षांना सामोरे जा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. प्रत्येक कसोटी पार कऱण्यासाठी त्या कसोटीलाच उत्सवाचं रूप द्या. मग कोणतीही परीक्षा ही परीक्षा राहणार नाही. हाच मंत्र घेऊन तुम्ही पुढे जा.
प्रिय देशवासियांनो, 1 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय तटरक्षक दलाची चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगी मी तटरक्षक दलाचे सर्व अधिकारी आणि जवानांनी केलेल्या देशसेवेसाठी त्यांचे आभार मानतो. स्वनिर्मित 126 जहाजं आणि 62 विमानं यांच्यासह भारतीय तटरक्षक दल विश्वातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल असण्याचा मान राखून आहे. ‘वयम् रक्षाम:’ हा आपल्या तटरक्षक दलाचा मंत्र आहे. आपल्या या आदर्श वाक्यानुसार मार्गक्रमण करीत देशाच्या समुद्री सीमा आणि समुद्री क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी तटरक्षक दलाचे जवान अहोरात्र तत्पर असतात. गेल्या वर्षी तटरक्षक दलाच्या लोकांनी आपल्या जबाबदार्यांच्या सोबतच आपल्या देशाचा समुद्र किनारा स्वच्छ बनविण्याचं अभिमानास्पद कार्य केलं. हजारो लोक यात सहभागी झाले होते. समुद्री किनार्यांच्या सुरक्षेबरोबरच या किनार्यांच्या स्वच्छेतेची काळजी त्यांनी वाहिली यासाठी ते खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की आपल्या देशाच्या तटरक्षक दलात फक्त पुरुष नसून महिलासुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच तयारीने आपल्या जबाबदार्या पार पाडत आहेत आणि यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. तटरक्षक दलातील आमच्या महिला अधिकारी वैमानिक आहेत, निरीक्षक आहेत, हॉवरक्राफ्टची जबाबदारीही सांभाळत आहेत. आज जागतिक पातळीवर किनारपट्टीची सुरक्षा हा ऐरणीवरचा प्रश्न बनलेला असताना भारताचे किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी झटणार्या भारतीय तटरक्षक दलाचं त्यांच्या 40 व्या वर्धापनदिनी मी अभिष्टचिंतन करतो.
1 फेब्रुवारीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जाईल. वसंत ऋतू हा सर्वश्रेष्ठ ऋतू मानला जातो. तो ऋतुराज आहे. आपल्या देशात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजेचा मोठा सण साजरा होतो. तो विद्येच्या आराधनेचा काल मानला जातो. इतकेच नाही तर वीरांसाठी प्रेरणादायी असा हा काळ असतो. ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गीतामध्ये तीच प्रेरणा दिसून येते. या वसंत पंचमीच्या पवित्र सणानिमित्त मी माझ्या सर्व देशवासियांना खूप सार्या शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ प्रसारीत करताना आकाशवाणीसुद्धा आपल्या कल्पकतेने त्यात नवनवे रंग भरत असते. गेल्या महिन्यापासूनच त्यांनी माझी ‘मन की बात’ पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याचा प्रादेशिक भाषांतील अनुवाद प्रसारीत करणं सुरू केलं आहे. याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे. दूर दूरहून लोक पत्रं पाठवू लागले आहे. आकाशवाणीने स्वयंप्रेरणेने केलेल्या या कामासाठी त्यांचं अभिनंदन करतो. देशवासियांनो, मी तुमचंही खूप अभिनंदन करतो. ‘मन की बात’ तुमच्याशी जोडलं जाण्याची एक खूप मोठी संधी देते. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
नमस्कार. आपणा सर्वांना नाताळच्या अनेक शुभेच्छा. आजचा दिवस सेवा, त्याग आणि करूणेला आपल्या आयुष्यात महत्व देण्याचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, गरीबांना आमचे उपकार नको तर आमचा स्वीकार हवा आहे. सेंट ल्यूक याने गाँस्पेलमध्ये लिहिले आहे, येशूने केवळ गरीबांची सेवा केली नाही तर गरीबांनी केलेल्या सेवेचे कौतुकही केले आहे आणि खऱ्या अर्थाने हेच सक्षमीकरण आहे. याच्याशी संबंधित एक कथा चांगलीच प्रचलित आहे. त्या कथेत म्हटले आहे की येशू एका मंदिराच्या खजिन्याजवळ उभे होते. अनेक श्रीमंत लोक आले आणि त्यांनी भरपूर दानधर्म केला. त्यानंतर एक गरीब विधवा आली आणि तिने त्यात दोन तांब्याची नाणी ठेवली. आता तसे पाहायला गेले तर दोन तांब्याच्या नाण्यांचे मोल ते काय? तेथे उभ्या भक्तांच्या मनात आश्चर्य दाटून आले. तेव्हा येशूने सांगितले की त्या विधवा महिलेने सर्वात जास्त दान केले आहे. इतरांनी बरेच काही दिले हे खरे, पण या महिलेने तर आपल्याकडे असलेले सर्व काही दान केले.
आज 25 डिसेंबर, महामहिम मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. भारतीय जनमानसात संकल्प आणि आत्मविश्वास जागविणाऱ्या मालवीयजींनी आधुनिक शिक्षणाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांनाही जयंतीदिनी भावपूर्ण श्रध्दांजली. नुकतेच दोन दिवसांपूर्वी मालवीयजींची तपोभूमी असणाऱ्या वाराणसीमध्ये मला अनेक विकास कामांच्या शुभारंभाची संधी लाभली. मी वाराणसीमध्ये भू(BHU)येथे महामहिम मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राची पायाभरणी केली. या संपूर्ण क्षेत्रात हे एक कर्करोग केंद्र तयार होते आहे. हे केंद्र पूर्व उत्तर प्रदेशसह झारखंड-बिहारमधील जनतेसाठीही वरदान ठरेल.
आज भारतरत्न आणि माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. आपला देश अटलजींनी केलेले योगदान कधीही विसरु शकणार नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली अणु ऊर्जेच्या क्षेत्रातही देशाची मान अभिमानाने उंचावली. पक्ष नेता असो, संसद सदस्य असो, मंत्री असो किंवा पंतप्रधान, अटलजींनी प्रत्येक भूमिकेत एक आदर्श निर्माण केला. अटलजींच्या जन्मदिनी मी त्यांना वंदन करतो आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक कार्यकर्ता या नात्याने मला अटलजींसोबत काम करण्याचे भाग्य लाभले. अनेक आठवणी आज माझ्या डोळयांसमोर जाग्या होतात. आज सकाळी जेव्हा मी ट्विट केले तेव्हा एक जुनी चित्रफितही मी त्यावर शेअर केली. एका लहान कार्यकर्त्याच्या रुपात अटलजींचा स्नेह कशाप्रकारे लाभत असे हे ती चित्रफीत पाहून निश्चितच समजेल.
आज नाताळच्या दिवशी भेट म्हणून देशातील नागरिकांना दोन योजनांचा लाभ मिळणार आहे. एका अर्थाने दोन नवीनतम योजनांचा शुभारंभ होत आहे. संपूर्ण देशात, गाव असो वा शहरात, साक्षर असो वा निरक्षर, सर्वांनाच रोखरहित म्हणजे काय, रोखरहित व्यवहार कसे चालू शकतात, रोख पैशाशिवाय खरेदी कशी करता येईल असे प्रश्न पडले आहेत. सगळीकडे उत्कंठेचे वातावरण आहे. प्रत्येकाला परस्परांकडून शिकायचे आहे, समजून घ्यायचे आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी, या प्रक्रियेला मोबाईल बँकींगची ताकद मिळावी यासाठी, ई-पेमेंटची सवय व्हावी यासाठी ग्राहकांसाठीच्या आणि लहान व्यापाऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या प्रोत्साहक योजनेला आजपासून शुभारंभ होत आहे. “भाग्यवान ग्राहक योजना” ही ग्राहकांना प्रोत्साहन देणारी योजना आहे तर “डिजी धन व्यापार योजना” ही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे.
आज 25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी भेट म्हणून 15,000 लोकांना सोडतीद्वारे बक्षिस मिळणार आहे. 15,000 नागरिकांना, प्रत्येकाच्या खात्यात प्रत्येकी 1,000 रुपयांचे बक्षिस जमा केले जाईल. हे केवळ आजच्याच दिवसासाठी नाही. ही योजना आजपासून सुरु होईल आणि पुढचे 100 दिवस सुरु राहिल. प्रत्येक दिवशी 15,000 लोकांना प्रत्येकी 1,000 रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. 100 दिवसांत लाखो कुटुंबांना कोट्यवधी रुपयांचे बक्षिस मिळणार आहे. मात्र जेव्हा आपण मोबाईल बँकींग, ई-बँकींग, रुपे कार्ड, यूपीआय, यूएसएसडी अशा डिजिटल माध्यमांचा वापर करुन रक्कम प्रदान कराल, तेव्हा त्या व्यवहारांच्या आधारे बक्षिसांसाठी सोडत काढली जाईल आणि विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर अशा ग्राहकांसाठी आठवडयातून एक दिवस मोठी सोडत असेल, ज्यात लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातील. तीन महिन्यांनंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यादिवशी एक महासोडत असेल ज्यात कोट्यवधी रुपयांची बक्षिसे दिली जातील. “डिजी धन व्यापारी योजना” ही प्रामुख्याने व्यापाऱ्यांसाठी आहे. व्यापाऱ्यांनी स्वत: या योजनेत सहभागी व्हावे आणि आपले व्यवहार रोखरहित करण्यासाठी ग्राहकांनाही त्यात समाविष्ट करावे. अशा व्यापाऱ्यांसाठीही स्वतंत्र बक्षिसे दिली जातील आणि ही बक्षिसेही हजारोंच्या संख्येत असतील. व्यापाऱ्यांचा स्वत:चा व्यापारही चालत राहील आणि त्याचबरोबर त्यांना बक्षिस जिंकण्याची संधीही मिळेल. 50 रुपयांपेक्षा जास्त आणि 3,000 रुपयांपेक्षा कमी रकमेची खरेदी करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. समाजातील सर्व वर्गांना, विशेषत: गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना तयार करण्यात आली आहे. 3,000 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करणाऱ्यांना या बक्षिसांचा लाभ मिळणार नाही. गरीबातील गरीब नागरिकही यूएसएसडीचा वापर करुन फिचर फोन किंवा साधारण फोनच्या माध्यमातून सामानाची खरेदीही करु शकतात, सामानाची विक्रीही करु शकतात, पैसेही प्रदान करु शकतात आणि ते सर्व या बक्षिस योजनेचे लाभार्थी होऊ शकतात. ग्रामीण क्षेत्रातही एईपीएसच्या माध्यमातून खरेदी-विक्री करु शकतात आणि बक्षिसेही जिंकू शकतात. अनेकांना आश्चर्य वाटेल की भारतात आज सुमारे 30 कोटी रुपे कार्ड आहेत ज्यापैकी 20 कोटी कार्ड जन धन योजनेंतर्गंत खाते उघडणाऱ्या गरीब लोकांकडे आहेत. 30 कोटी नागरिक लगेचच या बक्षिस योजनेत सहभागी होऊ शकतात. देशातील सर्व नागरिकांना या योजनेत स्वारस्य वाटेल असा मला विश्वास वाटतो. आपल्या अवतीभवती जे युवा आहेत त्यांना निश्चितच या बाबींबद्दल माहिती असेल, आपण त्यांना विचारले तर ते नक्कीच सांगतील. आपल्या कुटुंबातही 10वी-12वीत शिकणारी मुले असतील तर ती सुध्दा आपल्याला या गोष्टी सहज शिकवतील. हे फारच सोपे आहे, आपण व्हॉटसॲपवरुन जितक्या सहजतेने संदेश पाठवता तितकेच हे सोपे आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, ई-पेमेंट कसे करावे, ऑनलाईन पेमेंट कसे करावे, याबाबतची जागरुकता वेगाने वाढते आहे हे पाहून मला मनापासून आनंद होतो. गेल्या काही दिवसात रोखरहित व्यवहार 200 ते 300 टक्क्यांनी वाढले आहेत. याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने एक फार मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय किती मोठा आहे याचा अंदाज व्यापाऱ्यांना निश्चितच करता येईल. जे व्यापारी डिजिटल मार्गांने देवाणघेवाण करतील, आपल्या कारभारात रोख रकमेऐवजी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन देतील, अशा व्यापाऱ्यांना आयकरातून सूट देण्यात आली आहे.
मी देशातील सर्व राज्यांचेही अभिंनदन करतो. सर्व केंद्रशासित प्रदेशांचेही अभिनंदन करतो. सर्वांनी आपापल्या परीने हे अभियान पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आंध्रचे मुख्यमंत्री श्री. चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती यासाठीच्या अनेक योजनांवर विचार करते आहे. त्याचबरोबर मी पाहिले आहे की, राज्य सरकारांनीसुध्दा आपापल्या परीने अनेक योजना सुरु केल्या आहेत, त्यांच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. कोणीतरी मला सांगितले की, आसाम सरकारने मालमत्ता कर आणि व्यापार अनुज्ञपती शुल्काचा भरणा डिजिटल माध्यमातून केल्यास 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण बँकांच्या ज्या शाखा आपल्या 75 टक्के ग्राहकांद्वारे जानेवारी ते मार्च या अवधीत किमान दोन डिजिटल व्यवहार करुन घेतील, त्यांना सरकारतर्फे 50,000 रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत. 31 मार्च 2017 पर्यंत 100 टक्के डिजिटल व्यवहार करणाऱ्या गावांना सरकारतर्फे “डिजी व्यवहारांसाठी उत्तम पंचायत” अंतर्गंत पाच लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. आसाम सरकारने शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषक शिरोमणी योजनेंतर्गंत बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी पूर्णपणे डिजिटल माध्यमातून भरणा करणाऱ्या पहिल्या दहा शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. मी आसाम सरकारचे अभिंनदन करतो आणि अशाप्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या सर्वच सरकाराचे अभिनंदन करतो.
अनेक संघटनांनीसुध्दा गावांमधील गरीब शेतकऱ्यांमध्ये डिजिटल देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. मला कोणीतरी सांगितले की गुजरात नर्मदा खोरे, खते आणि रसायन मर्यादित या खतनिर्मितीशी संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ज्याठिकाणी खतांची विक्री केली जाते त्याठिकाणी POS मशिन लावले आहेत. अगदी थोडया दिवसांमध्ये तब्बल 35,000 शेतकऱ्यांनी खताच्या पाच लाख गोण्या डिजिटल मार्गाने भरणा करुन खरेदी केल्या आणि हे सगळे केवळ दोन आठवडयात झाले. गंमतीची गोष्ट अशी की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कंपनीच्या खत विक्रीत 27 टक्के वाढ झाली आहे.
बंधू आणि भगिनींनो, आपल्या अर्थव्यवस्थेत, आपल्या जीवन व्यवस्थेत अनौपचारिक क्षेत्राची व्याप्ती वाढली आहे आणि बहुतेकदा या लोकांना मजूरीचे पैसे, कामाचे पैसे किंवा वेतन रोखीने दिले जाते, रोख पगार दिला जातो आणि त्यामुळे मजूरांचे शोषण होत राहते, हे आपल्याला माहिती आहे. जिथे 100 रुपये मिळाले पाहिजेत, तिथे 80 रुपये मिळतात. 80 रुपये मिळाले पाहिजेत, तिथे 50 रुपये मिळतात आणि आरोग्याच्या दृष्टीने विम्यासारख्या इतर अनेक सुविधांपासूनही हे मजूर वंचित राहतात. आता रोखरहित वेतन दिले जात आहे. मजूरांचे पैसेही थेट बँकेत जमा होत आहेत. एका अर्थाने अनौपचारिक क्षेत्राचे औपचारिक परिवर्तन होत आहे, शोषण थांबते आहे. हिस्सा द्यावा लागत असे तोही बंद होत आहे. मजूरांना, कारागिरांना, गरीबांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणे आता शक्य होते आहे. त्याचबरोबर जे इतर लाभ असतात, त्या लाभांचेही ते अधिकारी होत आहेत.
आपला देश सर्वात जास्त युवा शक्ती असणारा देश आहे. तंत्रज्ञान आम्हाला सहज साध्य आहे. भारतासारख्या देशाने तर या क्षेत्रात सर्वात पुढे असले पाहिजे. आमच्या युवकांनी स्टार्ट अपच्या क्षेत्रातही खूप प्रगती केली आहे. डिजिटल चळवळीतील हे सोनेरी दिवस आहेत. आमचे युवा नव्या कल्पनांसह, नव्या तंत्रज्ञानासह, नव्या पध्दतींसह या क्षेत्राला सर्वतोपरी सक्षम करु शकतात, त्यांनी हे केले पाहिजे. त्याचबरोबर देशाला काळया पैशापासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याच्या मोहिमेतही आपण सर्वांनी पूर्ण ताकतीनिशी सहभागी झाले पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी प्रत्येक महिन्यात “मन की बात” पूर्वी लोकांना त्यांचे सल्ले देण्याचे, त्यांचे विचार सांगण्याचे आवाहन करतो. यावेळी माय गव्ह आणि नरेंद्र मोदी ॲपवर जे सल्ले आले आहेत त्यातील 80 ते 90 टक्के सल्ले भ्रष्टाचार आणि काळया पैशाच्या विरोधातील लढ्यासंदर्भात आहेत, नोटबंदी संदर्भात आहेत. हे सर्व जेव्हा मी पाहिले तेव्हा ढोबळ मनाने तीन भागात मी त्यांची विभागणी केली. काही लोकांनी मला जे सल्ले दिले आहेत, त्यात नागरिकांना कशाप्रकारच्या अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागतो, याबाबत सविस्तर लिहिले आहे. देशाच्या कल्याणासाठी इतके चांगले काम, इतके पवित्र काम सुरु असतानांही, कोणकोणत्या ठिकाणी गैरव्यवहार होत आहे, फसवणूकीचे नवे मार्ग कशाप्रकारे शोधले जात आहेत, हे दुसऱ्या प्रकारातील लोकांनी लिहिले आहे. जे झाले त्याचे समर्थन करीत ही लढाई पुढे सुरुच राहावी असे तिसऱ्या प्रकारातील लोकांनी आवर्जुन लिहिले आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास कठोर पावलेही उचलली जावीत असे आग्रहाने सांगणाऱ्या नागरिकांची संख्याही लक्षणीय आहे.
मला अशाप्रकारे भरपूर पत्रे पाठवून मदत करणाऱ्या सर्व देशवासियांचे मी आभार मानतो. काळया पैशांचे व्यवहार पूर्णपणे थांबविण्यासाठी उचलेले हे पाऊल कौतुकास पात्र आहे असे श्री.गुरुमणी केवल यांनी माय गव्हवर नमूद केले आहे. आम्हा नागरिकांना त्रास होतो आहे. मात्र आपण सगळेच भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहोत आणि या लढयात आम्हांला जे सहकार्य देणे शक्य आहे ते देण्यात आम्हाला आनंदच वाटतो आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा या विरोधात आम्ही लष्करी बलांप्रमाणेच लढा देतो आहोत. गुरुमणी केवल यांनी व्यक्त केलेल्या या भावना देशातील कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आपण सगळेच याचा अनुभव घेतो आहोत. जेव्हा जनतेला त्रास होतो, कष्ट होतात, तेव्हा प्रत्येकालाच दु:ख होते हे खरे. जेवढा त्रास आपणा सर्वांना होतो, तेवढेच दु:ख मलाही होते. मात्र जेव्हा एका उदात्त ध्येयासाठी, एका उच्च विचारासह निर्धार पूर्ण करण्यासाठी स्वच्छ मनाने काम केले जाते, तेव्हा दु:ख असतानाही, त्रास होत असतानाही, देशातील सर्व नागरिक ठामपणे उभे राहतात. हेच लोक खऱ्या अर्थाने “बदलाचे दूत” आहेत. मी आणखी एका कारणासाठी सर्वांचे आभार मानतो. या नागरिकांनी केवळ त्रास सहन केला नाही तर जनतेला चुकीच्या मार्गावर नेऊ इच्छिणाऱ्या निवडक लोकांनाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. या काळात अनेक अफवा पसरल्या. भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरुध्दच्या लढयाला सांप्रदायिकतेचे रंग देण्याचेही अनेकांनी प्रयत्न केले. नोटांवर लिहिलेले शब्द चुकीचे आहेत, मिठाचे दर वाढले आहेत, दोन हजारांची नोटही रद्द होणार आहे, 500 आणि 100 रुपयांची नोटसुध्दा रद्द होणार आहे, अशा अनेक अफवा अनेकांनी पसरवल्या. मात्र या सगळया अफवा ऐकून या देशातील नागरिकांचे मन ठाम राहिले. इतकेच नाही तर अनेक लोक मैदानात उतरले, त्यांनी आपल्या कुशलतेने, बुध्दीचा वापर करुन अफवा पसरवणाऱ्या लोकांचा खरा चेहरा समोर आणला, अफवा चुकीच्या असल्याचे सिध्द केले आणि सत्य सर्वांसमोर आणले. जनतेच्या या सामर्थ्यालाही माझे शतश: प्रणाम.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी अनुभवतो आहे की, जेव्हा सव्वाशे कोटी देशवासी आपल्या सोबत उभे असतील तेव्हा काहीच अशक्य नसते. जनता जर्नादन हे ईश्वराचेच रुप असते आणि जनतेचे आशिर्वाद हे ईश्वराचेच आशिर्वाद असतात. भ्रष्टाचार आणि काळया पैशाविरुध्दच्या या महायज्ञात देशातील नागरिकांनी संपूर्ण उत्साहाने सहभाग नोंदवला, याबद्दल मी देशातील जनतेचे आभार मानतो. भ्रष्टाचार आणि काळया धनाविरुध्द जी लढाई सुरु आहे, यासंदर्भात सदनात व्यापक चर्चा व्हावी, असे मला वाटत होते. सदनाचे कामकाज झाले असते तर नक्कीच चांगली चर्चा झाली असती. राजकीय पक्षांना सर्व प्रकारच्या सवलती असल्याच्या अफवा काही लोक पसरवत आहे, त्या पूर्ण चुकीच्या आहेत. कायदा सर्वांसाठी सारखा असतो. व्यक्ती असो, संघटना असो किंवा राजकीय पक्ष असो, प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे आणि प्रत्येकाला ते करावेच लागते. जे लोक उघडपणे भ्रष्टाचार आणि काळया पैशाचे समर्थन करु शकत नाहीत ते सरकारच्या त्रुटी शोधण्यात वेळ घालवतात.
वारंवार नियम का बदलावेत, असाही एक प्रश्न उपस्थित होतो. हे सरकार जनतेसाठी आहे. सरकार जनतेच्या अभिप्रायाला जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कोणते नियम त्रासदायक ठरत आहेत, त्याचे समाधान कशाप्रकारे करता येईल याचा सरकार विचार करते. संवेदनशील असणारे हे सरकार प्रत्येक क्षणी जनतेच्या सोयी लक्षात घेत नियमांमध्ये शक्य ते बदल करते. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी हे बदल करावे लागतात. मी पहिल्याच दिवशी 8 तारखेला सांगितले होते की, हा लढा असामान्य आहे. 70 वर्षांपासून बेईमानी आणि भ्रष्टाचाराच्या या काळया व्यवहारात कोणत्या शक्ती सहभागी आहे, त्यांची ताकद किती असेल ? जेव्हा अशा लोकांशी लढा देण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा त्यांनीसुध्दा सरकारला पराभूत करण्यासाठी रोज नवे प्रयत्न सुरु केले. जेव्हा त्यांनी नवे मार्ग शोधले तेव्हा त्यांचा नायनाट करण्यासाठी आम्हालाही नवे मार्ग शोधावे लागले. भ्रष्टाचार करणाऱ्यांना, गैर व्यवहार करणाऱ्यांना आणि काळया पैशाला संपविण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
त्याचवेळी दुसरीकडे अनेक नागरिकांनी सुरु असलेल्या गैर व्यवहारांबाबत तसेच वेगवेगळया पळवाटांबाबत चर्चा करणारी पत्रेही लिहिली आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आणखी एका गोष्टीबद्दल मला आपले सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करावेसे वाटते. आपण दूरचित्रवाणीवर, वर्तमान पत्रांमध्ये पाहात असाल. रोज नवनवीन लोकांना पकडले जात आहे. नोटा जप्त केल्या जात आहेत, छापे टाकले जात आहेत. भलेभले लोक पकडले जात आहेत. हे कसे शक्य झाले ? मी गुपित सांगतो. यामागचे गुपित असे की, मला लोकांकडूनच याबाबतची माहिती मिळते आहे. सरकारी व्यवस्थेतून येणाऱ्या माहितीपेक्षा कितीतरी जास्त पट माहिती सर्वसामान्य नागरिक देत आहे. आम्हाला मिळणारे यश सर्वसामान्य नागरिकांच्या जागरुकतेमुळे मिळते आहे. माझ्या देशाचा जागरुक नागरिक अशा तत्वांचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी फार मोठा धोका पत्करतो आहे आणि मला मिळणारी बहुतेक माहिती अधिकाधिक यश मिळवून देणारी आहे. अशा प्रकारची माहिती देण्यासाठी सरकारने एक ई-मेल पत्ता तयार केला आहे. त्यावर ही माहिती पाठवता येते. माय गव्हवर सुध्दा अशी माहिती देता येते. अशाप्रकारच्या सर्व दुष्ट शक्तींविरोधात लढा देण्याप्रती सरकार वचनबध्द आहे आणि आपले सहकार्य असल्यामुळे हा लढा सोपा झाला आहे.
तिसऱ्या प्रकारातील पत्र लेखकांचा गट फार मोठा आहे. ते म्हणतात, मोदींजी थकू नकात, थांबू नकात, आवश्यक ती सर्व कठोर पावले उचला, मात्र आता ज्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहे त्याचे ध्येय गाठायचेच आहे. अशी पत्र लिहिणाऱ्या सर्वांचे मी विशेष आभार मानतो. त्यांच्या पत्रांमध्ये विश्वास आहे आणि आशिर्वाद सुध्दा आहे. हा पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे. हा लढा जिंकायचा. थकण्याचा प्रश्नच नाही, थांबण्याचाही प्रश्न नाही आणि ज्या कामासाठी सव्वाशे कोटी नागरिकांचा आशिर्वाद लाभतो त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपल्या देशात “बेनामी संपत्ती” संदर्भात एक कायदा आहे, हे आपल्याला माहिती असेलच. 1988 साली हा कायदा तयार झाला होता. तेव्हापासून त्याचे नियमही तयार झाले नव्हते आणि तो अधिसूचितही झाला नव्हता. तो बासनात गुंडाळून ठेवला होता. आम्ही त्याला बाहेर काढले आणि प्रभावी “बेनामी संपत्ती” कायदा अंमलात आणला. येत्या काही दिवसात हा कायदा आपला प्रभाव दाखवू लागेल. देशहितासाठी, जनहितासाठी जे करावे लागेल ते करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्यावेळी मन की बात मध्ये मी सांगितले होते की, अनेक समस्या असतानांही आपल्या शेतकऱ्यांनी अथक श्रम करुन पेरणीचे गेल्या वर्षाचे विक्रम मोडले. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने हे शुभसंकेत आहेत. या देशाचा मजूर असो, या देशाचा शेतकरी असो किंवा या देशाचा नागरिक असो, या सर्वांच्या कष्टांचे आज सार्थक होते आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जगाच्या वित्तीय मंचावर भारताने अनेक क्षेत्रांमध्ये आपले नाव अभिमानाने उंचावले आहे. विविध निर्देशांकांच्या माध्यमातून भारताच्या जागतिक क्रमवारीत होणारी सुधारणा, हा आमच्या देशातील नागरिकांच्या निरंतर प्रयत्नांचा परिणाम आहे. जागतिक बँकेच्या उद्योग करण्यासंदर्भातील अहवालात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. भारताला उद्योग करण्यासंदर्भात जगातील सर्वोत्तम स्थान बनविण्याच्या दृष्टीने वेगाने प्रयत्न करीत आहोत आणि त्यात यशही मिळते आहे. यू.एन.सी.टी.ए.डी.च्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार “2016-18 साठी सर्वोच्च उज्ज्वल अर्थव्यवस्थां”साठीच्या सूचित भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या जागतिक स्पर्धात्मकता अहवालात भारताने 32 स्थानांची झेप घेतली आहे. जागतिक नाविन्यता निर्देशांक 2016 मध्ये आपण 16 स्थानांची झेप घेतली आहे आणि जागतिक बँकेच्या देशांतर्गंत कामगिरी निर्देशांकांत 2016 मध्ये 19 स्थानांची झेप घेतली आहे. अनेक अहवालांचे मूल्यमापन अशा प्रकारचे दिशानिर्देश करत आहे की भारत वेगाने पुढे जात आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी संसदेच्या अधिवेशनाने देशातील नागरिक नाराज झाले. सगळीकडून संसदेच्या कामकाजाच्या अनुषंगाने रोषाची भावना व्यक्त झाली. राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींनीही उघडपणे त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र अशा परिस्थितीतही काही वेळा काही चांगल्या गोष्टी होतात आणि मनाला समाधान लाभते. संसदेत सुरु असलेल्या गदारोळातच एक चांगले काम झाले, मात्र त्याकडे देशाचे लक्ष गेले नाही. बंधू भगिनींनो, दिव्यांगांसाठी जी मोहिम घेऊन माझे सरकार पुढे चालले आहे, त्याच्याशी संबंधित एक विधेयक संसदेत संमत झाले आहे, हे सांगताना मला अभिमान आणि आनंद वाटतो आहे. त्यासाठी मी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार मानतो, देशातील कोट्यवधी दिव्यांगांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. दिव्यांगांप्रतीही आमचे सरकार वचनबध्द आहे. मी व्यक्तिश: सुध्दा या मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न केला आहे. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांचा योग्य तो सन्मान मिळावा अशी माझी इच्छा होती. पॅरालिम्पिकमध्ये चार पदके जिंकून आमच्या दिव्यांग बंधू भगिनींनी, आमचे प्रयत्न आणि विश्वासाला नवी उभारी दिली. आपल्या विजयामुळे त्यांनी देशाची मान उंचावली आणि त्याचबरोबर आपल्या क्षमतेने जनतेला चकीतही केले. आमचे दिव्यांग बंधू भगिनींसुध्दा देशातील प्रत्येक नागरिकांप्रमाणेच एक अनमोल वारसा आहेत, शक्ती आहेत. दिव्यांगांच्या हितासाठी हे विधेयक संमत झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या जास्त संधी प्राप्त होतील, त्यामुळे मला आनंद झाला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्येही आरक्षणाची मर्यादा वाढवून 4 टक्के करण्यात आली आहे. या कायद्याच्या माध्यमातून दिव्यांगांचे शिक्षण, सुविधा आणि तक्रारींसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत दिव्यांगांसाठी 4,350 शिबिरांचे आयोजन केले, यावरुन हे सरकार दिव्यांगांप्रती किती संवेदनशील आहे, याची कल्पना करता येईल. 352 कोटी रुपये खर्च करुन 5,80,000 दिव्यांग बंधू भगिनींना उपकरणांचे वितरण केले. सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचारानुरुप नवा कायदा संमत केला आहे. यापूर्वी दिव्यांगांच्या सात प्रकारच्या श्रेणी होत्या, मात्र आता कायद्यान्वये या श्रेणींमध्ये 21 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात 14 श्रेणींची भर घालण्यात आली आहे. अनेक श्रेणींचा पहिल्यांदाच दिव्यांग म्हणून समावेश करण्यात आला आहे. थॅलेसेमिया, पार्किंसन्स तसेच खुजेपणालाही या श्रेणींमध्ये समाविष्ट केले आहे.
माझ्या युवा सहकाऱ्यांनो, गेल्या काही आठवडयांमध्ये खेळाच्या मैदानांवरही आपल्याला अभिमान वाटेल अशी कामगिरी घडली आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या विरुध्द सुरु असलेली मालिका 4-0 अशी जिंकली. यात काही युवा खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. करुण नायर या आमच्या युवा खेळाडूने त्रिशतक केले तर के.एल. राहूलने 199 धावांची खेळी केली. कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने चांगली फलंदाजी करतानाच संघाचे चांगले नेतृत्वही केले. भारतीय क्रिकेट संघांचा ऑफ स्पिनर गोलंदाज आर. अश्विनला आयसीसीने 2016 वर्षातील “क्रिकेटर ऑफ द इअर” आणि “सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू” म्हणून घोषित केले. या सर्वांचे माझ्याकडून मन:पूर्वक अभिनंदन. हॉकीच्या क्षेत्रातही तब्बल 15 वर्षांनंतर एक चांगली बातमी आली आहे, उत्तम बातमी आली आहे. ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषक जिंकला आहे. तब्बल 15 वर्षानंतर ज्युनिअर हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल युवा खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन. ही कामगिरी भारतीय हॉकी संघाच्या भविष्याच्या दृष्टीने शुभसंकेत आहे. गेल्या महिन्यात आमच्या महिला खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली. भारतीय महिलांच्या हॉकी संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि अलिकडेच काही दिवसांपूर्वी 18 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघांने कांस्य पदकाची कमाई केली. मी क्रिकेट आणि हॉकी संघातील सर्व खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, येणारे 2017 हे वर्ष नव्या आनंद आणि उत्साहाचे वर्ष असावे, आपले सर्व संकल्प पूर्ण व्हावे आणि विकासाची नवी शिखरे आपण गाठावी. हे नवे वर्ष गरिबातील गरीबालाही सुखाचे आयुष्य जगण्याची संधी देणारे असावे. 2017 या वर्षासाठी माझ्याकडून सर्व देशवासियांना अनेकानेक शुभेच्छा. खूप-खूप आभार
माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार,
गेल्या महिन्यात आपण दिवाळी साजरी केली. दर वर्षीप्रमाणे यावेळीही दिवाळी आपल्या भारतीय जवानांबरोबर साजरी करण्यासाठी मी भारत-चीन सिमेवर गेलो होतो.
आयटीबीपीचे सैनिक, सैन्य दलाचे जवान, या सर्वांबरोबर हिमालयाच्या उंच भागात मी दिवाळी साजरी केली. दरवेळी जातो, पण या दिवाळीचा अनुभव काही वेगळाच होता. देशातल्या सव्वाशे कोटी नागरिकांनी, ज्या अनोख्या प्रकारे ही दिवाळी सैन्यादलातील जवानांना अर्पण केली, सुरक्षा दलांना अर्पण केली, त्याचं प्रतिबिंब त्या प्रत्येक जवानाच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. भावना त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या दिसत होत्या. इतकच नाही, तर देशवासियांनी जे शुभेच्छा संदेश पाठवले, आपल्या आनंदात सुरक्षा दलांना सहभागी करून घेतलं, विलक्षण प्रतिसाद दिला आणि आपल्या नागरिकांनी केवळ संदेशच नाही पाठवले, ते मनानेही जवानांशी जोडले गेले होते. कुणी कविता केली, कुणी चित्र काढलं, कुणी कार्टून काढलं, काही जणांनी व्हिडिओ तयार केला. म्हणजे प्रत्येक घर जण काही सैन्याची चौकीच झालं होतं, आणि जेव्हा ही पत्रं मी वाचली, तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. किती ही कल्पकता? भावनांनी भरलेली आहेत ही पत्रं. त्याचवेळी ‘माय गोव्ह’ वर एक सूचना आली की, त्यातल्या निवडक गोष्टी एकत्र करून त्याचं कॉफी टेबल बुक बनवता येईल का? ते काम सुरू आहे. आपणा सर्वांचं योगदान, देशाच्या सैन्यदलाच्या जवानांसाठी आपण व्यक्त केलेल्या भावना, आपली कल्पकता हे सगळं त्यात संकलित केलं जाईल. आपल्या सैन्य दलातील एका जवानाने मला लिहिलं, पंतप्रधानजी, आम्हा सैनिकांचा होळी, दिवाळी, प्रत्येक सण हा सीमेवरच असतो. देशाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. पण हो, सणाच्या दिवशी घरची आठवण येतेच. पण खरं सांगू, यावेळी असं वाटलं नाही. असं वाटलं की, जणू आपण सव्वाशे कोटी भारतीयांबरोबर दिवाळी साजरी करीत आहोत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, या दिवाळीत आपल्या सैन्य दलाबद्दल आपण व्यक्त केलेल्या भावना, केवळ काही प्रसंगांपुरत्याच मर्यादित राहून कशा चालतील. मी आपल्याला विनंती करतो की, एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, आपण ही सवय आपल्याला लावून घेऊ या. कोणताही सण असो, उत्सव असो, आपल्या देशाच्या सैनिकांना आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे लक्षात ठेवू या. जेव्हा सारं राष्ट्र सैन्यदलाबरोबर उभं राहतं, तेव्हा आपल्या सेनेची शक्ती सव्वाशे कोटी पटीनं वाढते. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर राज्यातले सरपंच मला भेटायला आले होते. ‘जम्मू-काश्मीर पंचायत परिषदे’चे ते सदस्य होते. काश्मीर खोऱ्याच्या वेगवेगळ्या भागातून ते आले होते. सुमारे 40-50 जण होते. बराच वेळ त्यांच्याशी बोलण्याची संधी मला मिळाली. आपल्या गावाच्या विकासाबाबत मुद्दे घेऊन ते आले होते. त्यांच्या काही मागण्या होत्या आणि जेव्हा आमचा संवाद सुरू झाला तेव्हा, साहजिकच काश्मीर खोऱ्यातले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था स्थिती, मुलांचं भवितव्य हे मुद्दे निघाले. साहजिकच होतं ते. आणि इतक्या प्रेमाने, मोकळेपणाने या सरपंचानी संवाद साधला. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करणारी होती. काश्मीरात शाळांना आगी लावल्या जातात, त्याची चर्चा बोलण्याच्या ओघात झाली आणि मी बघितलं, की आपल्या सर्व देशवासियांना जितकं दु:ख होतं, तितकाच त्रास त्यांनाही याचा होतो. ते म्हणतात की, शाळा नव्हे तर मुलांचं भवितव्य जाळलं गेलं आहे. आपण या मुलांच्या भवितव्याकडे लक्ष द्या अशी मी त्यांना विनंती केली. आणि मला सांगायला आनंद होतो की, या सर्व सरपंचांनी मला दिलेला शब्द पाळला, गावागावात जाऊन तिथल्या लोकांना जागृत केलं. काही दिवसांपूर्वीच तिथे बोर्डाच्या परीक्षा झाल्या. काश्मीरच्या मुलांनी आणि मुलींनी, जवळजवळ 95 टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ही बोर्डाची परीक्षा दिली. बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं, म्हणजे जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी, शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्यासाठी वचनबद्ध आहेत. ह्याचंच लक्षण मानावं लागेल. त्यांनी दाखवलेल्या या उत्साहासाठी मी त्यांचं अभिनंदन तर करेनच, पण त्यांचे आई-वडील, नातेवाईक आणि त्यांचे शिक्षक आणि सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच या सगळ्यांना मी अंत:करणापासून धन्यवाद देतो.
प्रिय बंधू आणि भगिनींनो,
यावेळी जेव्हा ‘मन की बात’ साठी मी आपल्याकडून सूचना मागवल्या, तेव्हा मी सांगू शकतो की, एकाच विषयावर सर्वांनी सूचना पाठवल्या. सगळ्यांचं सांगणं होतं की, 500 आणि 1000 च्या नोटांबद्दल सविस्तर बोलावं. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण करताना देशात सुधारणा घडवून आणण्यासाठी एक महाअभियान सुरू करण्याचा मुद्दा मी मांडला होता. ज्यावेळी मी हा निर्णय घेतला. आणि आपल्यासमोर ठेवला. त्याचवेळी मी सर्वांच्यासमोर सांगितलं होतं की, हा निर्णय साधा नाही. अडचणींनी भरलेला आहे. पण निर्णय घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो अंमलात आणणं सुध्दा महत्त्वाचं आहे. मलाही या गोष्टीचा अंदाज होता की, आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या नव्यानव्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागेल. तेव्हाही मी सांगितलं होतं की हा निर्णय इतका मोठा आहे की, त्याच्या परिणामातून बाहेर पाडण्यासाठी आपल्याला 50 दिवस लागतीलच. आणि त्यानंतर सुरळीत स्थितीकडे आपण पाऊल टाकू शकू.
70 वर्षांपासून ज्या आजाराला आपण तोंड देत होतो, त्यापासून सुटका करून घेण्याचा मार्ग सुलभ असू शकत नाही. आपल्याला होणाऱ्या अडचणी मी समजू शकतो. पण जेव्हा या निर्णयाला आपण दिलेला पाठिंबा बघतो, आपण देत असलेलं सहकार्य बघतो, आपल्याला संभ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असूनही कधी कधी मन विचलित करणाऱ्या घटना समोर घडूनही आपण सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला आहे. देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे.
पाचशे आणि हजारच्या नोटा आणि इतका मोठा देश, इतक्या चलनाचा भडीमार, अब्जावधी नोटा आणि हा निर्णय. सारं जग बारकाईनं बघत आहे, प्रत्येक अर्थतज्ञ याचं सखोल विश्लेषण करतोय. मुल्यमापन करतोय, पूर्ण जग हे बघतंय की, हिंदुस्तानातील सव्वाशे कोटी नागरिक अडचणी सोसूनही सफलता मिळवतील का? जगाच्या मनात कदाचित प्रश्नचिन्ह असू शकेल. भारताला, भारताच्या सव्वाशे कोटी देशवासियांबद्दल केवळ श्रद्धा आणि श्रद्धाच आहे, विश्वास आणि विश्वासच आहे की, सव्वाशे कोटी देशवासी हा संकल्प पूर्ण करतीलच आणि आपला देश, सोन्याप्रमाणे या आगीतून तावून सुलाखून निघेल त्याचं कारण आपण आहात, यशाचा हा मार्ग चालणं आपल्यामुळेच शक्य झालं आहे.
पूर्ण देशात केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे विभाग, एक लाख तीस हजार बँक शाखा, लाखो बँक कर्मचारी, दीड लाखाहून जास्त पोस्ट कार्यालये, एक लाखापेक्षा जास्त बँक, मित्र, दिवसरात्र हे काम करत आहेत. समर्पणाच्या भावनेतून जोडले गेले आहेत. अनेक प्रकारचे तणाव असूनही हे सर्व अत्यंत शांत मनाने, या कामाला देशसेवेचा एक यज्ञ मानून एक महापरिवर्तनाचा प्रयत्न मानून कार्यरत आहेत. सकाळी सुरू करतात, रात्री केव्हा पूर्ण होईल? हे माहितही नसतं, पण सगळे करत आहेत आणि त्याचं कारण आहे की भारत यात यशस्वी होणार हे स्पष्ट दिसत आहे. मी बघितलं आहे की, इतक्या समस्या असूनही बँकेतले, पोस्ट ऑफिसमधले सर्व लोक काम करत आहेत आणि जेव्हा मानवतेचा विषय निघतो, तेव्हा ते दोन पावलं पुढे असल्याचं दिसतं. कुणीतरी मला सांगितलं की, खंडव्यात एका ज्येष्ठ नागरिकाला अपघात झाला. अचानक पैशाची गरज भासली. तिथल्या स्थानिक बँक कर्मचाऱ्याला हे कळलं आणि त्याने स्वत: त्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी जाऊन पैसे पोचवले जेणेकरून उपचारासाठी मदत होईल. हे मला समजलं आणि मला आनंद वाटला. अशा अनेक घटना रोज टीव्ही, वर्तमानपत्र, चर्चा यातून समोर येतात. या महायज्ञात परिश्रम करणाऱ्या, पुरुषार्थ सिद्ध करणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सामर्थ्याची ओळख तेव्हाच होते, जेव्हा कसोटीनंतर यश हाती येतं. मला चांगलं आठवतं, जेव्हा ‘पंतप्रधान जन-धन योजना’ सुरू झाली होती आणि बँक कर्मचाऱ्यांनी त्याचा भार आपल्या खांद्यावर घेतला होता आणि जे काम 70 वर्षात झालं नव्हतं, त्यांनी करून दाखवलं होतं. आज पुन्हा एकदा ते आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे आणि मला विश्वास आहे की, सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प, सर्वांचा सामूहिक पुरुषार्थ, या राष्ट्राला एक नवीन ताकद देऊन प्रशस्त करेल. परंतु वाईट सवयी इतक्या पसरल्या आहेत की, आजही अनेकांची त्या वाईट सवयी जात नाहीत. अजूनही काही लोकांना वाटतं की, हे भ्रष्टाचाराचे पैसे, हे काळे धन, हे बेहिशोबी पैसे, बेनामी पैसे, काहींना काही रस्ता शोधून व्यवस्थेत पुन्हा आणू. ते आपले पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात अवैध मार्ग शोधत आहेत. दु:ख याचं आहे की यात त्यांनी गरिबांचा वापर करण्याचा मार्ग निवडला आहे. गरिबांना भ्रमीत करून मोह किंवा प्रलोभन दाखवून त्यांच्या खात्यात पैसे भरून किंवा त्यांच्याकडून काही काम करवून घेऊन, पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अशा लोकांना आज सांगू इच्छितो, सुधारणे किंवा न सुधारणे आपली मर्जी, कायद्याचं पालन करणं न करणं आपली मर्जी, ते कायदा बघेल काय करायचं? पण मेहेरबानी करून तुम्ही गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका. तुम्ही असं काहीही करू नका की, नोंदीत गरीबाचं नाव येईल आणि नंतर जेव्हा चौकशी होईल, तेव्हा माझा प्रिय गरीब नागरिक, तुमच्या पापामुळे अडचणीत सापडेल आणि बेनामी संपत्तीबदृदलचा कायदा अतिशय कडक झाला आहे, तो यात गोवला जाईल, किती कठीण परिस्थिती येईल? आणि सरकारला हे नको आहे की आपले देशवासी अडचणीत येतील.
पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करून भ्रष्टाचार आणि काळे धन याविरुद्ध सुरू केलेल्या लढाईबद्दल मध्य प्रदेश येथील श्रीमान आशिष यांना दूरध्वनी केला या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणतात, ‘सर नमस्ते, माझं नाव आशिष पारे आहे. मी तिराली गाव, तालुका तिराली, जि. हदरा, मध्य प्रदेश इथला एक सामान्य नागरिक आहे. आपण पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्या, हे नक्कीच प्रशंसनीय आहे. माझी इच्छा आहे की मन की बातमधून अशी अनेक उदाहरणे लोकांसमोर आणा की लोकांनी गैरसोय सोसूनही राष्ट्र उन्नतीसाठी या कठोर पावलाचं स्वागत केलं. त्यामुळे लेाक उत्साहवर्धित होतील आणि राष्ट्र निर्मितीसाठी कॅशलेस व्यवस्था अत्यंत आवश्यक आहे आणि मी साऱ्या देशासमवेत आहे. आपण पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्या याचा मला फार आनंद झाला आहे.’ तसंच मला एक फोन कर्नाटकातून श्रीमान येलप्पा वेलांतर यांनी केला. मोदीजी नमस्ते, मी कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातून येलप्पा वेलांकर बोलतो आहे, मी आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. कारण आपण म्हणाला होतात की, चांगले दिवस येतील, पण आपण इतकं मोठं पाऊल उचलाल, असं कुणालाच वाटलं नव्हतं. पाचशे आणि हजारच्या नोटा, हे सर्व पाहून काळा पैसा आणि भ्रष्टाचारी लोकांना चांगलाच धडा मिळाला आहे. प्रत्येक भारतीयांसाठी याहून चांगले दिवस कधी येणार नाहीत. या कामासाठी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो.
काही गोष्टी प्रसारमाध्यमांमधून, लोकांच्या माध्यमातून, सरकारी सूत्रांच्या माध्यमातून समजतात. तेव्हा काम करण्याचा उत्साहसुध्दा खूप वाढतो. इतका आनंद होतो, इतका अभिमान वाटतो की माझ्या देशातल्या सामान्य माणसाचं काय विलक्षण सामर्थ्य आहे.
महाराष्ट्रामध्ये अकोला इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच 6 आहे. तिथे एक रेस्टॉरंट आहे. त्यांनी एक मोठा फलक लावला आहे. जर तुमच्याकडे जुन्या नोटा आहेत आणि तुम्हाला खायचं आहे, तर तुम्ही पैशांची चिंता करू नका. इथून उपाशी जाऊ नका, खाऊनच जा आणि जर पुन्हा कधी इकडे येण्याची संधी मिळाली तर अवश्य पैसे देऊन जा. लोक तिथे जातात, खातात आणि 2-4-6 दिवसांनंतर जेव्हा पुन्हा तिथून जातात, तेव्हा पैसे देऊन जातात. ही आहे माझ्या देशाची ताकद, ज्यात सेवा-भाव, त्याग-भाव आहे आणि प्रामाणिकपणाही आहे.
निवडणुकीच्या वेळी मी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम राबवला होता आणि साऱ्या जगभर ही गोष्ट पोचली होती. जगातल्या अनेक देशांमधले लोक ‘चाय पे चर्चा’ हा शब्द बोलायला शिकले. पण मला हे माहित नव्हतं की, ‘चाय पे चर्चा’ मध्ये लग्न जुळवली जातात. गुजरातमध्ये सुरत इथे एका मुलीने तिच्या लग्नात आलेल्या लोकांना फक्त चहा पाजला. कोणताही समारंभ नाही की मेजवानी नाही. काहीही नाही. कारण नोटाबंदीमुळे पैशाचा प्रश्न निर्माण झाला होता. वऱ्हाडी मंडळी त्यालाच आपला मान समजली. सुरतचे भरत मारू आणि दक्ष परमान, भ्रष्टाचाराविरुद्ध काळ्या धनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत त्यांच्या लग्नाच्या माध्यमातून योगदान दिलं. हे प्रेरणादायक आहे. नवपरिणीत भरत आणि दक्षा यांना मी अनेक आशीर्वाद देतो आणि लग्नाच्या या सोहळ्याचं रुपांतर या महान यज्ञात केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि जेव्हा अशी संकटं येतात, तेव्हा लोक नवे, सुंदर मार्ग शोधून काढतात.
मी एकदा टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये बघितलं, रात्री उशिरा आलो तेव्हा बघत होतो. आसाममध्ये धेकीयाजुली या नावाचं एक छोटं गाव आहे. चहाच्या मळ्यात काम करणारे कामगार तिथे राहतात. त्यांना आठवड्यातून एकदा मजुरी मिळते. आता जेव्हा 2000 रुपयांची नोट मिळाली, तेव्हा त्यांनी काय केलं? आजूबाजूच्या, शेजारच्या चार महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बाजारात जाऊन एकत्र खरेदी केली आणि 2000 रुपयांची नोट वापरुन पैसे दिले. त्यांना लहान रकमेची गरजच भासली नाही. कारण चौघींनी मिळून खरेदी केली आणि ठरवलं की पुढच्या आठवड्यात भेटू, तेव्हा एकत्र बसून हिशोब करू, लोक आपआपल्या पद्धतीने मार्ग काढत आहेत. त्यातून झालेला बदलसुध्दा बघा, आसामच्या चहामळ्यातले लोक तिथे एटीएम यंत्र बसवण्याची मागणी करत आहेत. पहा, खेड्यातल्या जीवनातसुद्धा कसे बदल घडून येत आहेत. या मोहिमेचा काही लोकांना लगेच फायदा झाला. देशाला तर येणाऱ्या दिवसात फायदा मिळेल, पण काही जणांना तात्काळ लाभ मिळाला. थोडा हिशोब विचारला. काय झालंय, तेव्हा मला छोट्या छोट्या शहरातली माहिती मिळाली. जवळपास 40-50 शहरांमधून अशी माहिती मिळाली की, या नोटा बंद केल्यामुळे त्यांचं जे जुनं येणं बाकीहोतं, लोक पैसे देत नव्हते. कराचे, पाणीपट्टीचे, विजेचे बिलाचे पैसे भरतच नव्हते आणि आपल्याला तर चांगलं माहिती आहे की, गरीब माणसं दोन दिवस आधीच जाऊन पै न पैसे फेडतात. हे जे मोठे लोक असतात ना, ज्यांच्या ओळखी असतात, ज्यांना माहिती असतं की त्यांना कुणीच कधी विचारणार नाही, ते पैसे देत नाहीत आणि त्यामुळे खूप थकबाकी राहते. प्रत्येक नगरपालिकेला कराच्या पैशातले जेमतेम 50 टक्के जमा होतात. पण यावेळी 8 तारखेच्या निर्णयामुळे सगळेजण त्यांच्या जुन्या नोटा जमा करायला धावत सुटले. मागच्या वर्षी 47 नागरी विभागात जवळपास तीन-साडेतीन हजार कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल, या एका आठवड्यात त्यांच्याकडे 13 हजार कोटी रुपये जमा झालेत. कुठे तीन-साडेतीन हजार आणि कुठे 13 हजार. तेही समोरून येऊन. आता त्या नगरपालिकांकडे जवळपास चौपट पैसा जमा झाला आहे. आता गरीब वस्त्यांमध्ये गटार बांधल्या जातील, पाण्याची व्यवस्था केली जाईल, अंगणवाडीची सोय होईल, अशी अनेक उदाहरणे सापडत आहेत ज्यात थेट फायदा दिसू लागला आहे.
बंधु आणि भगिनींनो, आपलं गाव, आपला शेतकरी हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक मजबूत आधारस्तंभ आहे. एकीकडे अर्थव्यवस्थेतील या नव्या बदलामुळे कठीण परिस्थिती आहे. प्रत्येक नागरिक, स्वत:ला जुळवून घेत आहे. पण माझ्या देशातल्या शेतकऱ्याचं मी आज विशेष अभिनंदन करतो. या हंगामातल्या पीक उत्पादनाची मी नुकतीच आकडेवारी घेत होतो. मला आनंद झाला, गहू असो, डाळी असोत, तेलबिया असोत, नोव्हेंबरच्या 20 तारखेपर्यंतचा माझा हिशोब होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पीक उत्पादनात चांगली वाढ झाली आहे. अडचणी येऊनही शेतकऱ्यांनी मार्ग शोधला आहे. सरकारनेही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात शेतकरी आणि गावांना प्राधान्य दिलं गेलं आहे. तरीही अडचणी आहेतच. पण मला खात्री आहे की, जो शेतकरी आपल्या प्रत्येक समस्येचा नैसर्गिक समस्येला सामोरे जाऊन कठीण प्रसंगाशी नेहमी कसून सामना करतो यावेळीही तो पाय रोवून उभा आहे. आमच्या देशातील छोटे व्यापारी रोजगार पाठवतात तसेच आर्थिकस्थिती वाढविण्यासाठी मदत करतात. मागच्या अर्थसंकल्पात आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मोठमोठ्या मॉलप्रमाणेच आता गावातील छोटे छोटे दुकानदारसुद्धा 24 तास आपला व्यवसाय करू शकतील. कोणताही कायदा त्यांना अडवणार नाही, माझं मत असं होतं की, मोठमोठ्या मॉलना 24 तास मिळतात, मग गावातल्या गरिबांना का नको? मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कर्ज देण्यासाठी पुढाकार घेतला गेला. लाखो करोडो रुपये मुद्रा योजनेतून अशा छोट्या छोट्या लोकांना दिले. कारण हा छोटा व्यवसाय करणारे करोंडोंच्या संख्येत आहेत. आणि अब्जावधी रुपयांच्या व्यापाराला ते गती देतात. पण या निर्णयामुळे त्यांनाही समस्या येणे स्वाभाविक होतं. मी बघितलं आहे की, आपले छोटे छोटे व्यापारी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून, मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून, क्रेडिट कार्डसच्या माध्यमातून आपआपल्या पध्दतीने ग्राहकांची सेवा करत आहेत. विश्वासाच्या आधारावर करत आहेत. मी आपल्या छोट्या बंधु-भगिनींना सांगू इच्छितो की, संधी आहे आपणही डिजिटल जगात प्रवेश करा. आपणही आपल्या मोबाईल फोनवर बँकांची ॲप डाऊनलोड करा, आपणही क्रेडिट कार्डसाठी पीओएस मशीन ठेवा. नोटा न वापरता व्यापार कसा होऊ शकतो हे आपण शिकून घ्या. आपण बघा, मोठमोठे मॉल, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपला व्यापार वाढवतात, एक छोटा व्यापारीसुध्दा या साधारण ‘युजर फ्रेंडली टेक्नॉलॉजी’मुळे आपला व्यापार वाढवू शकतो. काही बिघडेल अशी शक्यताच नाही. वाढवण्याची संधी आहे. मी आपल्याला आमंत्रण देतो की, कॅशलेस सोसायटी अर्थात रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण फार मोठं योगदान देऊ शकता. आपण आपला व्यापार वाढवण्यासाठी मोबाईल फोनवर पूर्ण बँकिंग व्यवस्था उभी करू शकता आणि आज नोटांव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत. ज्यातून आपण व्यवसाय चालवू शकतो. तंत्रज्ञानाचे रस्ते आहेत, सुरक्षित आहेत, भरवशाचे आहेत आणि जलद आहेत. माझी अशी इच्छा आहे की, हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपण मला मदत करावी. इतकंच नाही तर बदलाचं नेतृत्वही आपण करावं. मला खात्री आहे आपण या बदलाचं नेतृत्व करू शकाल. आपण गावाचा संपूर्ण कारभार या तंत्रज्ञानाच्या आधाराने करू शकता. मला विश्वास आहे, मी श्रमिक, कष्टकरी बंधु-भगिनींना सुध्दा सांगू इच्छितो की, आपलं फार शोषण झालं आहे. कागदावर पगाराचा आकडा एक असतो आणि हातात मिळणारी रक्कम दुसरी असते. कधी हातात पूर्ण पगार मिळतो परंतु बाहेर कुणीतरी उभा असतो. त्याला हिस्सा द्यावा लागतो. या शोषणाचा नाईलाजाने आपण एक भाग बनतो. या नव्या व्यवस्थेत आमची इच्छा आहे की, बँकेत आपलं खातं असावं, पगाराचे पैसे बँकेत जमा व्हावेत. किमान ज्यामुळे वेतन तरतुदींचं पालन केलं जाईल. आपल्याला पूर्ण पैसे मिळतील. कुणी त्यातला हिस्सा मागणार नाही, शोषण होणार नाही. एकदा का आपल्या खात्यात पैसे आले की आपण आपल्या छोट्या मोबाईल फोनचा त्यासाठी स्मार्ट फोनची गरज नाही. आपण ई पाकिटासारखा वापर करू शकता. त्याच मोबाईलचा उपयोग करून आपण जवळपासच्या छोट्यामोठ्या दुकानांतून खरेदी करू शकाल. म्हणून कष्टकरी बंधु-भगिनींना मी या योजनेत सहभागी होण्यासाठी विशेष आग्रह करेन. कारण अंतिमत: इतका मोठा निर्णय मी देशातल्या गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वंचितांसाठी घेतला आहे त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे.
भारत असा देश आहे जिथे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षाच्या आतली आहे. मला माहिती आहे, माझा निर्णय तुम्हाला पटला असून या गोष्टीला सकारात्मकतेने पुढे नेण्यासाठी योगदान देत आहात. पण मित्रहो, आपण माझे सच्चे सैनिक, सवंगडी आहात. भारत मातेची सेवा करण्याची एक विलक्षण संधी आपल्यासमोर आहे. देशाला आर्थिक शिखरावर नेण्याची संधी आली आहे. माझ्या तरुण मित्रांनो तुम्ही मला मदत कराल का? मला साथ द्याल का? आपल्याला जितका अनुभव आहे तितक्या जुन्या पिढीला या जगाचा नाही. ॲप काय असतं हे आधीच्या पिढीला माहिती नाही, हे आपण जाणता. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन तिकिट बुकिंग या कशा होतात हे आपण जाणता. त्यात विशेष काही नाही. परंतु आज देश जे महान कार्य करू इच्छितो, जे आपलं स्वप्न आहे, कॅशलेस सोसायटी, हे खरं आहे की, 100 टक्के आपण यशस्वी होणार नाही पण सुरुवातच केली नाही असं नको. आपण जर कॅशलेस सोसायटीचा आरंभ केला तर ध्येय दूर नाही. मला यात आपला प्रत्यक्ष सहभाग हवा आहे. स्वत:चा वेळ हवा आहे, स्वत:चा संकल्प हवा आहे. माझी खात्री आहे की, हिंदुस्थानातच्या गरिबांचं जीवन बदलावं अशी इच्छा असणारे आपण आपोआप कॅशलेस सोसायटीसाठी, बँकिंगसाठी आणि मोबाईल बँकिंगसाठी पुढे आलेल्या या संधीचा फायदा घ्याल. प्रत्येक बँकेचा आपला मोबाईल ॲप आहे. वॉलेट आहे. वॉलेट म्हणजे ई पाकिट. अनेक प्रकारचे कार्डस उपलब्ध आहेत. जन-धन योजनेअंतर्गत भारतातील कोटीकोटी गरीब कुटुंबांकडे रुपे कार्ड आहे. ज्या रुपे कार्डचा फारच कमी उपयोग होत आहे. परंतु 8 तारखेनंतर गरिबांनीही रुपे कार्ड वापरायला सुरुवात केली असून त्याचा वापर जवळजवळ 300 टक्क्यांनी वाढला आहे. ज्याप्रमाणे मोबाईल फोनसाठी प्रिपेड कार्ड मिळतं तसेच बँक खात्यातील पैसे खर्च करण्यासाठी प्रिपेड कार्ड मिळतं. हे काम इतकं सोपं आहे की, ज्याप्रमाणे आपण व्हॉटसॲप पाठवतो तसंच. अगदी अशिक्षित माणसाला सुध्दा व्हॉटसॲप कसं फॉरवर्ड करायचं हे माहीत आहे. एवढंच नाही तर तंत्रज्ञान इतकं सोपं होत आहे की या कामासाठी स्मार्ट फोनची सुध्दा गरज नाही. धोबी असो, भाजी विकणारा असो, दूध विकणारा असो, किंवा वर्तमान पत्र किंवा चहा विकणारा असो. सर्वजण याचा वापर करू शकतात. मी सुध्दा या व्यवस्थेला अधिक सोपं करण्यासाठी जोर लावला आहे. सर्व बँका यावर काम करत आहेत. आणि आतातर ऑनलाईन अधिभार सुध्दा रद्द केला आहे. अशा प्रकारची कार्ड वापरताना जो अधिभार लागायचा तोसुध्दा काढून टाकल्याचं गेल्या दोन-चार दिवसातल्या वर्तमान पत्रात आपण वाचलं असेल. त्यामुळे कॅशलेस सोसायटीच्या चळवळीला गती मिळेल. व्हॉटसवरील मॅसेज, किस्से, नव्या नव्या कल्पना, कविता, घोषवाक्य हे सर्व मी वाचत असतो, बघत असतो. आव्हानांचा सामना करतांना आपल्या तरुण पिढीकडे जी नवनिर्मितीची शक्ती आहे त्यावरुन असं वाटतं की, भारतभूमीचं हे वैशिष्ट्य आहे. कोणा एकेकाळी युद्धाच्या मैदानात गीतेचा जन्म झाला. त्याचप्रमाणे आज मोठ्या परिवर्तनाच्या एका कालखंडातून आपण जात आहोत. त्याचवेळी आपल्यातील मौलिक सर्जनशीलता प्रगट होत आहे. ऑनलाईन खर्च करण्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असेल. एवढंच नाही तर दररोज अर्धा तास, दोन तास वेळ काढून कमीत कमी दहा कुटुंबांना आपण हे सांगा की, तंत्रज्ञान काय आहे, तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो? आपल्या बँकेचं ॲप कसं डाऊनलोड करता येतं? स्वत:च्या खात्यातील शिल्लक पैसे कसे वापरता येतात? दुकानदाराला पैसे कसे देता येतील? दुकानदारालाही शिकवा की हे वापरून व्यापार कसा करता येतो? आपल्याला स्वच्छेने ही कॅशलेस सोसायटी नोटांच्या जंजाळातून बाहेर काढण्याचं महाअभियान देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं अभियान, काळा पैशातून मुक्त करण्याचं अभियान, लोकांना अडचणींपासून, समस्यांपासून मुक्ती देण्याचं अभियान याचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे. सामान्य नागरिकांना ही व्यवस्था शिकवाल तर कदाचित त्याला कार्य चिंतपासून मुक्ती मिळेल आणि या कामात हिंदुस्थानातल्या साऱ्या युवकांनी स्वत:ला झोकवून दिलं तर फार वेळ लागणार नाही, असं मला वाटतं. एका महिन्याच्या आत आपण जगात आधुनिक हिंदुस्थान म्हणून उभे राहू शकू. आणि आपण हे काम मोबाईल फोनच्या माध्यमातून करू शकता. रोज दहा घरी जाऊन करू शकता. रोज दहा घरांना यात सहभागी करू शकता. आपल्या मी निमंत्रण देतो, या, केवळ समर्थन देऊन थांबू नका, परिवर्तनाचे आपण सेनानी होऊ आणि परिवर्तन घडवून दाखवू. देशाला भ्रष्टाचार आणि काळ्या पैशापासून मुक्त करण्यासाठी ही लढाई आपण पुढे नेऊया. आणि जगात असे अनेक देश आहेत जिथे तिथल्या नव युवकांनी राष्ट्राचं जीवन बदलून दाखवलं आहे. क्रांती होते ती तरुणांकडूनच. केनिया या देशानं निरधार केला एम-पेसा ही एक मोबाईल व्यवस्था उभी केली. तंत्रज्ञानाचा वापर केला, एम-पेसा हे नाव दिलं. आणि आता आफ्रिकेच्या सर्व भागात केनियातील व्यवहार परिवर्तीत होण्याच्या तयारीत आहेत. एक मोठी क्रांती घडवून आणली आहे या देशानं.
माझ्या युवकांनो, मी पुन्हा आग्रह करतो की, हे अभियान पुढे न्या. शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठ, एनसीसी, एनएसएस, सामूहिक रुपाने, व्यक्तिगत रुपाने हे काम करण्यासाठी मी आपल्याला निमंत्रण देतो.
प्रिय बंधू-भगिनींनो,
आपल्या देशाचे महान कवी श्रीमान हरिवंशराय बच्चन यांची आज जयंती आहे. आणि आज हरिवंशराय यांच्या जयंतीदिनी अमिताभ बच्चन यांनी स्वच्छता अभियानाची घोषणा केली आहे. या शतकातील सर्वात लोकप्रिय कलाकार अमिताभजी स्वच्छता मोहिमेला मन लावून पुढे नेत आहेत. असं वाटतंय की, स्वच्छता त्यांच्या नसानसात भिनली आहे. आणि म्हणूनच आपल्या वडिलांच्या जयंती दिनी त्यांना स्वच्छतेचं काम आठवलं. ते लिहितात हरिवंशरायजींची एक कविता, त्यातील एक ओळ,
मिट्टी का तन, मस्ती का मन
क्षणभर जीवन, मेरा परिचय – हरिवंशराय
हरिवंशराय या माध्यमातून आपली स्वत:ची ओळख देत असतात. अमिताभजींनी स्वत: हरिवंशरायजींच्या मिट्टी का तन, मस्ती का मन, क्षणभर जीवन, मेरा परिचय या ओळींचा वापर करत मला एक छान पत्र लिहून पाठवलं. मी हरिवंशरायजींना आदरपूर्वक नमन करतो आणि अशा प्रकारे मन की बातमध्ये सहभागी झाल्याबद्दल स्वच्छता अभियान पुढे नेण्यासाठी श्रीमान अमिताभजींना धन्यवाद देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आता तर मन की बातच्या माध्यमातून आपले विचार, आपल्या भावना, पत्रांमधून, माय गव्ह वर, नरेंद्र मोदी ॲपवर मी आपल्याशी कायमचा जोडला गेलो आहे. 11 वाजता ‘मन की बात कार्यक्रम प्रसारित होतो पण प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद लगेचच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे जिथे हिंदी भाषा प्रचलित नाही तिथल्याही देशवासियांना यात सहभागी होण्याची संधी आवश्यक मिळेल. या नवीन उपक्रमाबद्दल मी आकाशवाणीला धन्यवाद देतो. आपण सर्वांना अनेक अनेक धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळीचा सण आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारत एक असा देश आहे, जेथे वर्षातील 365 दिवस देशात कुठे ना कुठे, कोणता ना कोणता सण साजरा केला जातो. उत्सव हेच भारतीयांच्या आयुष्याचे दुसरे नाव आहे, असे दुरुन पाहणाऱ्या कोणालाही वाटेल आणि ते स्वाभाविक आहे. वेद काळापासून आजपर्यंत भारतातील उत्सवांची परंपरा ही काळानुरुप बदलत गेली आहे. कालबाहय उत्सवांची परंपरा संपविण्याची धमक आम्ही दाखविली आहे. काळ आणि समाजाच्या मागण्यानुसार उत्सवांमध्ये होणारे बदलही आम्ही सहजपणे स्वीकारले आहेत. मात्र या सर्व प्रवासात एक गोष्ट लक्षात येते की, भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचा हा संपूर्ण प्रवास, त्याची व्याप्ती, त्याची सखोलता, जनमानसावरील त्याचा प्रभाव “स्व ला समष्टीपर्यंत घेऊन जाणे” या एका मूलमंत्राने जोडला गेला आहे. व्यक्ती आणि व्यक्तीमत्वाचा विस्तार व्हावा, आपल्या मर्यादित विचारांच्या परिघाला समाजापासून ब्रम्हांडांपर्यंत विस्तारण्याचा प्रयास व्हावा आणि उत्सवाच्या माध्यमातून हे सर्व साध्य करावे हा या मागचा मूळ उद्देश आहे. भारतात साजऱ्या होणाऱ्या उत्सवांमध्ये समाविष्ट आहार विचारात घेतला तर त्यातही हवामान कसे आहे, कोणत्या हवामानात कसा आहार घेतला पाहिजे, शेतकरी कोणते पिक घेतात, ते पिक घेण्याचे दिवस उत्सवांमध्ये कशाप्रकारे सामावून घेतले जातील, आरोग्याच्या दृष्टीने कशाप्रकारचे संस्कार असावेत, या सर्व बाबी आमच्या पूर्वजांनी वैज्ञानिक पध्दतीने उत्सवांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. आज संपूर्ण जग पर्यावरणाबद्दल चर्चा करते आहे. निसर्गाचा विनाश ही काळजीची बाब बनली आहे. भारतातील उत्सवाची परंपरा मात्र निसर्गाप्रती प्रेमभावना वाढवणारी, लहान बालकांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाला संस्कार देणारी आहे. वृक्ष असो, रोपटी असो, नदी असो, पशु असो, पर्वत असो अथवा पक्षी असो, प्रत्येकाच्या प्रती दायित्वाची भावना निर्माण करणारे उत्सव आपण साजरे करतो. हल्ली आपण रविवारी सुट्टी घेतो, मात्र जुन्या पिढीतील मजूरी करणारा वर्ग, कोळी बांधव हे सर्व अमावस्या आणि पोर्णिमेच्या दिवशी सुट्टी घेत असत. पौर्णिमा आणि अमावस्येला समुद्रातील पाण्यात कशाप्रकारे बदल घडून येतात आणि निसर्गावर कोणकोणत्या बाबींचा प्रभाव होतो हे आज विज्ञानाने सिध्द केले आहे. मानवी मनावरही तसाच प्रभाव दिसून येतो. म्हणजेच आपल्या पूर्वजांनी सुट्टीचे दिवससुध्दा ब्रम्हांड आणि विज्ञानाशी संबंधित घडामोडी लक्षात घेऊन निर्धारित केले होते हे लक्षात येते. आज आपण दिवाळीचा उत्सव साजरा करतो आहोत. आपला प्रत्येक उत्सव शिकवण देणारा असतो, बोधदायक असतो, दिवाळीचा हा सण “तमसो मा ज्योतिर्गमय” अर्थात अंधकारापासून प्रकाशाच्या दिशेला जाण्याचा एक संदेश देतो. हा अंधार म्हणजे प्रकाशाच्या अभावाने येणारा अंधार नाही, तर तो अंधश्रध्देचाही अंध:कार आहे. अशिक्षित असण्याचा अंध:कार आहे, दारिद्रयाचा ही अंध:कार आहे, समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा अंध:कार आहे. दिपावलीनिमित्त दिवे उजळून समाजातील दोषरुपी अंध:कार, व्यक्तींतील दोषरुपी अंध:कार दूर करण्याचा आणि त्याच विचाराने दिपावलीनिमित्त दिवे उजळून सकारात्मकतेचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्याचा हा प्रयास आहे.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की दिवाळीच्या दिवसांमध्ये भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात श्रीमंताच्या हवेलीत किंवा गरीबाच्या झोपडीत प्रत्येक घरात स्वच्छतेची मोहिम राबविली जाते. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता केली जाते. गरीबांच्या घरी मातीची भांडी असली, तरी ती सुध्दा दिवाळीच्या दिवसांमध्ये स्वच्छ घासलेली, चमकलेली दिसतात. त्यादृष्टीने दिवाळीसुध्दा एक स्वच्छतेची मोहिम आहे. मात्र केवळ घरातच नाही तर संपूर्ण परिसरातील स्वच्छता, गल्ल्यांमधील स्वच्छता, संपूर्ण गावाची स्वच्छता ही आजच्या काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण स्वच्छतेची ही पंरपरा विस्तारली पाहिजे. दिवाळीचा हा उत्सव आता केवळ भारताच्या सीमांपर्यंत मर्यादित राहिलेला नाही. जगातील सर्व देशांमध्ये दिवाळीचा सण वेगवेगळया प्रकारे साजरा केला जातो. जगभरातील अनेक सरकारे, तेथील संसदा आणि प्रशासक दिवाळीच्या उत्सवात सहभागी होऊ इच्छितात. पूर्वेकडचे देश असो वा पश्चिमेकडचे, विकसित देश असो वा विकसनशील देश असो, आफ्रिका असो वा आयलंड. सगळीकडेच दिवाळीचा उत्साह दिसून येतो. अमेरिकेच्या टपाल सेवेने यावर्षी दिपावलीनिमित्त टपाल तिकीट जारी केले, हे कदाचित तुम्हाला माहिती असेल. कॅनडाच्या पंतप्रधानांनीही दिवाळीच्या निमित्त दिवे उजळतांनाचे आपले छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी लंडनमध्ये दिवाळीनिमित्त सर्व समाजांना एकत्र करणारा एक शानदार कार्यक्रम आयोजित केला आणि त्यात ते स्वत:ही सहभागी झाले. मोठया उत्साहाने दिवाळी साजरी केली जात नसेल, असे एकही शहर ब्रिटनमध्ये नाही. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर जे छायाचित्र ठेवले आहे आणि संपूर्ण जगासोबत अभिमानाने शेअर केले आहे, त्या छायाचित्रात काय आहे ? तर सिंगापूर संसदेच्या 16 महिला खासदार भारतीय साडया नेसून संसदेच्या बाहेर उभ्या आहेत. हे छायाचित्र चांगलेच प्रसिध्द झाले आहे आणि दिवाळीनिमित्त हे उपक्रम राबविण्यात आले आहे. सिंगापूरमध्ये तर प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी भारतीय समुदायाला दिपावलीच्या शुभकामना देतानाच ऑस्ट्रेलियाच्या विविध शहरांमध्ये सर्व समाजांनी दिवाळीचा उत्सव साजरा करावा असे आवाहनही केले आहे. न्यूझिलंडचे पंतप्रधान नुकतेच येथे आले होते, आपल्याला दिवाळीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी न्यूझिलंडला लवकर परत जायचे आहे, असे त्यांनी मला सांगितले. दिपावलीचा हा प्रकाशाचा उत्सव, जागतिक समुदायालाही अंध:कारापासून प्रकाशाकडे नेणारा एक प्रेरणेचा उत्सव होत आहे, असे मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते.
दिवाळीच्या उत्सवात नवे कपडे आणि विविध चवीच्या खाद्य पदार्थांबरोबरच फटाकेसुध्दा मोठया आवडीने वाजवले जातात. लहान मुले आणि युवकांना फटाके उडविणे मनापासून आवडते. लहान मुले मात्र कधी-कधी उत्साहाच्या भरात नको ते धाडस करुन जातात, अनेक फटाके एकत्र करुन एकाच वेळी मोठा आवाज करण्याचा प्रयत्न करुन ते अनेकदा मोठया संकटाला आमंत्रण देतात. आपल्या आजूबाजुला कोणत्या गोष्टी आहेत, आग लागण्याची शक्यता आहे का, हे अनेकदा लक्षात येत नाही. दिवाळीच्या दिवसांमध्ये अशाप्रकारच्या अपघातांच्या बातम्या, आगीच्या बातम्या, अपमृत्यूच्या बातम्या हा काळजीचा विषय आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक डॉक्टरसुध्दा आपल्या कुटुंबांसह दिवाळी साजरी करण्यात मश्गुल असतात. त्यामुळे डॉक्टरांचा अभाव ही आणखी एक समस्या निर्माण होते. आई-वडिलांना, पालकांना माझी एक कळकळीची विनंती आहे की, मुले फटाके वाजवत असतांना, तुम्ही त्यांच्यासोबत राहा, कोणतीही चूक होऊ नये आणि अपघात होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घ्या. आपल्या देशात दिवाळीचा उत्सव दीर्घ काळ चालतो. हा सण एका दिवसाचा नसतो. गोवर्धन पूजा, भाऊबीज, लाभपंचमी आणि कार्तिक पौर्णिमा अर्थात तुलसी विवाहापर्यंत दीर्घ काळ हा उत्सव साजरा केला जातो. दिपावलीचा उत्सव साजरा करतांना आपण छठपूजेचीही तयारी करतो. भारताच्या पूर्व भागात छठपूजेचा उत्सव फार मोठा सण असतो, महाउत्सव मानला जाणारा हा सण चार दिवस चालतो. हा उत्सवसुध्दा समाजाला एक फार मोठा अर्थपूर्ण संदेश देतो. सुर्यदेवता आपल्याला जे काही देते त्यापासूनच आपल्याला सर्व काही प्राप्त होते. प्रत्यक्ष आणि परोक्ष सुर्यदेवतेपासून आपल्याला जे प्राप्त होते त्याचा हिशोब करणे कठीण आहे. छठ पूजा हा सुर्याच्या उपासनेचा उत्सव आहे. जगात लोक उगवत्या सुर्याची पूजा करतात, अशी म्हण आहे. मात्र छठपूजा हा असा उत्सव आहे, ज्यात मावळत्या सुर्याचीही पूजा केली जाते. त्या माध्यमातूनही एक मोठा सामाजिक संदेश दिला जातो.
सण दिवाळीचा असो, छठपूजेचा असो, आजचा प्रसंग आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देण्याचा आहे. मात्र त्याचबरोबर माझ्यासाठी देशवासियांचे आभार मानण्याचा हा प्रसंग आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत आणि आपल्या सुखासाठी आपल्या सैन्यातील जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे, ते आपण सर्वच जाणतो. माझ्या भावविश्वात सैन्यातील जवानांचा सुरक्षा बलातील जवानांचा हा त्याग, तपस्या आणि परिश्रम याबद्दल कायम कृतज्ञतेची भावना असते आणि त्याच भावनेतून माझ्या मनात आले की यंदाची दिवाळी या सुरक्षा बलांना समर्पित असावी. मी देशवासियांना संदेश टू सोल्जर्स या मोहिमेसाठी निमंत्रित केले. देशाच्या जवांनाप्रती अतीव प्रेम, गौरव आणि आदराची भावना नसेल, अशी व्यक्ती भारतात सापडणार नाही, असे मी आज नतमस्तक होऊन सांगू इच्छितो. ज्याप्रकारे ही भावना अभिव्यक्त झाली आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला एका वेगळया शक्तीचा प्रत्यय आला आहे. आपल्या सर्वांच्या संदेशांच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा बलाच्या जवानांना नवे धैर्य, नवी उभारी मिळाली आहे. आपल्या देशाच्या जवानांसाठी दिवा लावला नसेल, संदेश दिला नसेल, असे कोणीच नसेल, शाळा असो, महाविद्यालय असो, विद्यार्थी असो, गाव असो, गरीब असो, व्यापारी असो, दुकानदार असो, राजकीय नेता असो, खेळाडू असो, अभिनेता असो, या सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसार माध्यमांनीसुध्दा या दिपोत्सवाला सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी मानले आहे. बीएसएफ असो, सीआरपीएफ असो, भारत तिबेटीयन पोलिस असो, आसाम रायफल असो, नौसेना असो, लष्कर असो, वायूसेना असो, तटरक्षक दल असो, असे अनेक सैनिक आहेत, सैन्यदले आहेत ज्यांचा सर्वांचा उल्लेखही मी केला नाही. त्या बलांमध्ये आमचे जवान कर्तव्य बजावतांना कष्ट सोसत आहे. आज आम्ही दिवाळी साजरी करतो त्याचवेळी कोणी जवान वाळवंटात उभा आहे, कोणी हिमालयाच्या शिखरांवर आहे, कोणी उद्योगांचे रक्षण करीत आहे तर कोणी विमानतळाची सुरक्षा पाहत आहे. हे सर्व जवान असंख्य जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. उत्सव साजरे करण्याच्या मन:स्थितीत आपण या सर्वांचे स्मरण केले तर त्या स्मरणाला एक नवी ताकत लाभते, एका संदेशातून फार मोठे सामर्थ्य व्यक्त होते आणि हे काम संपूर्ण देशाने शक्य करुन दाखवले आहे. मी खरोखर मनापासून देशवासियांचे आभार मानतो. अनेकांनी आपल्याकडे असलेल्या कलेच्या माध्यमातून, काहींनी चित्रांच्या माध्यमातून, काहींनी रांगोळीच्या माध्यमातून, काहींनी कार्टूनच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. सरस्वतीची कृपा असणाऱ्यांनी कविता केल्या. तर काहींनी खूप चांगली घोषवाक्ये तयार केली. माझे नरेंद्र मोदी ॲप असो, किंवा माय गव्ह असो, या मंचांवर शब्दांच्या रुपात, रंगाच्या रुपात, लेखणीच्या रुपात, विविध प्रकारच्या भावनांचा महासागर उसळतो आहे, असे मला वाटू लागले आहे. माझ्या देशातील जवानांसाठी हा किती अभिमानाचा क्षण असेल, याची मी कल्पना करु शकतो. “संदेश टू सोल्जर्स” या हॅशटॅगवर प्रतिकात्मक स्वरुपात असंख्य भावना व्यक्त झाल्या आहेत.
अश्विनीकुमार चौहान यांनी एक कविता पाठविली आहे, ती मला यावेळी वाचून दाखवाविशी वाटते.
अश्विनीजी म्हणतात
“मैं त्योहार मनाता हूँ, ख़ुश होता हूँ, मुस्कुराता हूँ,
मैं त्योहार मनाता हूँ, ख़ुश होता हूँ, मुस्कुराता हूँ,
ये सब है, क्योंकि, तुम हो, ये तुमको आज बताता हूँ |
मेरी आज़ादी का कारण तुम, ख़ुशियों की सौगात हो,
मैं चैन से सोता हूँ, क्योंकि,
मैं चैन से सोता हूँ, क्योंकि तुम सरहद पर तैनात हो,
शीश झुकाएँ पर्वत अम्बर और भारत का चमन तुम्हें,
शीश झुकाएँ पर्वत अम्बर और भारत का चमन तुम्हें,
उसी तरह सेनानी मेरा भी है शत-शत नमन तुम्हें,
उसी तरह सेनानी मेरा भी है शत-शत नमन तुम्हें ||”
माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यांच्या माहेरी आणि सासरच्या कुटुंबांत जवानांचा भरणा आहे, अशा शिवानी नावाच्या एका बहिणीने मला एक दूरध्वनी संदेश पाठविला आहे. जवानांचे हे कुटुंब म्हणते,
“नमस्कार, पंतप्रधान महोदय. मी शिवानी मोहन बोलते आहे. या दिवाळीनिमित्त आपण सुरु केलेल्या “संदेश टू सोल्जर्स” या मोहिमेने आमच्या फौजी बांधवांना मोठे प्रोत्साहन मिळते आहे. माझे कुटुंब एक लष्करी कुटुंब आहे. माझे पती सैन्यात अधिकारी आहेत. माझे वडिल आणि सासरे दोघेही सैन्यात अधिकारी होते. आमचे संपूर्ण कुटुंबच सैन्यातील जवानांनी भरलेले आहे. देशाच्या सीमेवर आर्मी सर्कलमध्ये आमचे अनेक अधिकारी आहेत, ज्यांना खूप चांगले संदेश मिळत आहेत आणि त्याद्वारे त्यांना मोठे प्रोत्साहन मिळते आहे. सैन्यातील अधिकारी आणि जवानांच्या बरोबरीने त्यांचे संपूर्ण कुटुंब, त्यांच्या पत्नीही खूप मोठा त्याग करतात, हे मला आवर्जुन सांगावेसे वाटते. आपल्या संदेशांच्या माध्यमातून संपूर्ण सैन्य समुदायाला खूप चांगला संदेश मिळत आहे आणि मी तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद.”
माझ्या प्रिय देशवासियांनो, सैन्यातील जवान केवळ सीमेवरच नाही तर आयुष्यात प्रत्येक आघाडीवर सज्ज असल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्ती असो, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात निर्माण झालेल्या समस्या असो, शत्रूशी दोन हात करायचे असो किंवा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या युवकांना परत आणण्यासाठीच्या धाडसी कारवाया असो – आमचे जवान आयुष्याच्या प्रत्येक आघाडीवर राष्ट्र भावनेने प्रेरित होऊन कार्यरत राहतात.
एका घटनेबद्दल मला सांगण्यात आले, ती मी तुम्हालाही सांगू इच्छितो. यश साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टी प्रेरणा देऊ शकतात, हे मला याद्वारे सांगावेसे वाटते. हिमाचल प्रदेश हे राज्य उघडयावरील शौचमुक्त झाले आहे. सर्वप्रथम सिक्कीम उघडयावरील शौचमुक्त झाले, त्यानंतर हिमाचल आणि आता 1 नोव्हेंबर रोजी केरळसुध्दा उघडयावरील शौचमुक्त राज्य होत आहे. या यशामागचे कारण काय ? मी सांगतो. सुरक्षा बलांमध्ये आमचा एक आयटीबीपीचा जवान आहे, विकास ठाकूर. तो हिमाचलच्या सिरमौर जिल्हयातील एका छोटयाशा गावचा रहिवासी आहे. त्याच्या गावाचे नाव बधाना असे आहे. आमचा हा आयटीबीपीचा जवान सुट्टीमध्ये आपल्या गावी गेला होता. तो गावात असतांना त्याचवेळी गावात ग्रामसभा होणार होती, त्या सभेत तो पोहोचला. या ग्रामसभेत शौचालये बांधण्याबाबत चर्चा सुरु होती. काही कुटुंबे पैशाअभावी शौचालये बांधू शकत नाहीत, असे यावेळी स्पष्ट झाले. देशभक्तीने भारलेला विकास ठाकूर हा आमचा आयटीबीपीचा जवान हे ऐकून अस्वस्थ झाला. आपल्या गावावरचा हा कलंक दूर झाला पाहिजे, असे त्याला मनापासून वाटले. त्याची देशभक्ती पहा, केवळ शत्रूवर गोळीबार करण्यापुरतीच त्याची देशभक्ती मर्यादित राहिली नाही. त्याने धनादेश बाहेर काढला, त्यावर 57,000 रुपयांची रक्कम नोंदवली आणि हा धनादेश गावातील पंचायत प्रधानाकडे सोपवला. गावातील ज्या 57 घरांना बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधणे शक्य नाही, त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये दया, 57 शौचालये बांधून घ्या आणि आपल्या बंधाना गावाला उघडयावरील शौचमुक्त करुन दाखवा, असे त्यांनी सांगितले. विकास ठाकूरने हे उपयुक्त पाऊल उचलले. 57 कुटुंबांना आपल्या खिशातून प्रत्येकी 1,000 रुपये देऊन स्वच्छता अभियानाला एक नवी ताकद दिली. त्याचमुळे हिमाचल प्रदेश खऱ्या अर्थाने उघडयावरील शौचमुक्त राज्य ठरु शकले. केरळमध्ये सुध्दा तरुणांनी अशाच प्रकारे काम केले. या तरुणांचेही मी मनापासून आभार मानू इच्छितो. केरळमध्ये दुर्गम भागात इडमालाकुडी नावाची पंचायत आहे, जिथे पोहोचण्यासाठी कोणताही रस्ता नाही. संपूर्ण दिवसभर पायपीट केल्यानंतर मोठया मुश्किलिने त्या गावी पोहचता येते. फार कमी लोक त्या गावी जातात. या ठिकाणी शौचालय नसल्याचे त्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या शहरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. एनसीसीचे छात्र, एनएसएसचे सदस्य आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या गावात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. शौचालय बांधण्यासाठी लागणारे सर्व सामान, विटा, सिमेंट आणि इतर सर्व आवश्यक बाबी या युवकांनी आपल्या खांद्यावर वाहून, संपूर्ण दिवस पायपीट करुन त्या गावापर्यंत नेल्या. स्वत: परिश्रम करुन त्या गावात शौचालय बांधले आणि या युवकांनी जंगलातल्या दुर्गम भागातील एक छोटेसे गाव उघडयावरील शौचमुक्त करुन दाखवले. त्याचमुळे केरळसुध्दा लवकरच उघडयावरील शौचमुक्त राज्य ठरणार आहे. गुजरातने सुध्दा सर्व नगरपालिका-महानगरपालिका, बहुतेक 150 पेक्षा जास्त ठिकाणे उघडयावरील शौचमुक्त असल्याचे घोषित केले आहे. 10 जिल्हे उघडयावरील शौचमुक्त करण्यात आले आहेत. हरियाणामधून सुध्दा आनंदाची बातमी येत आहे. 1 नोव्हेंबर रोजी हरियाणा आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे आणि त्यांनी काही महिन्यातच आपले राज्य उघडयावरील शौचमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत तेथील 7 जिल्हे उघडयावरील शौचमुक्त झाले आहेत. सर्वच राज्यांमध्ये वेगाने काम सुरु आहे. मी केवळ काही राज्यांचाच उल्लेख केला आहे. या सर्व राज्यांमध्ये नागरिकांनी या अभियानात सहभागी झाल्याबद्दल आणि देशातील अस्वच्छतेच्या रुपातील अंध:कार दूर करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकारच्या अनेक योजना असतात. पहिल्या योजनेनंतर त्याला अनुरुप अशी दुसरी योजना सादर केल्यानंतर पहिली योजना थांबवावी लागते. मात्र सर्वसाधारणपणे या गोष्टींकडे फार कोणाचे लक्ष जात नाही. जुनी योजना सुरु राहाते, नवी योजनाही सुरु राहाते, येणाऱ्या योजनेची प्रतिक्षा केली जाते आणि असे सतत चालत राहाते. आमच्या देशात ज्या घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो, ज्या घरांमध्ये वीज असते, त्या घरांना केरोसिनची गरज नसते. मात्र अशा घरांना केरोसिनसुध्दा दिले जाते, गॅससुध्दा दिला जातो, वीजसुध्दा मिळत राहाते आणि मध्यस्थांना, दलालांना आयते चराऊ कुरण उपलब्ध होते. या संदर्भात हरियाणा प्रदेशचे मी मनापासून अभिनंदन करु इच्छितो. त्यांनी हरियाणा प्रदेशला केरोसिन मुक्त करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो, वीज आहे, ती आधार क्रमाकांच्या आधारे पडताळण्यात आली आणि माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 8 जिल्हे केरोसिनमुक्त करण्यात आले. ज्याप्रकारे त्यांनी हे काम हाती घेतले आहे, ते पाहता हरियाणा लवकरच केरोसिन मुक्त होईल असा विश्वास मला वाटतो. चोरी ही थांबेल, पर्यावरणाचे रक्षणही होईल, परकीय विनिमयाची बचत होईल आणि लोकांना सुविधाही मिळेल. हे चांगले परिणाम निश्चितच घडून येतील. फक्त मध्यस्थांना आणि दलालांना याचा फटका बसेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, महात्मा गांधींजी आपल्या सर्वांसाठीच कायम मार्गदर्शक राहिले आहेत. देशभरात कुठे गेले पाहिजे, कशाप्रकारे गेले पाहिजे, यासाठीचे सर्व मापदंड त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून दिसून येतात. गांधीजी म्हणत. आपण जेव्हा एखादी योजना तयार कराल, तेव्हा सर्वप्रथम गरीब आणि दुर्बलांचा चेहरा आठवा आणि आपण जे करु इच्छिता. त्यामुळे त्या गरीबाला लाभ होणार किंवा नाही याचा विचार करा. त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. या मापदंडाच्या आधारे आपण आपले निर्णय घ्या. देशातील गरीबांच्या मनात ज्या महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या आहेत त्याकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे. संकंटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकामागून एक पाऊल उचलावेच लागेल. आपली जुनी विचारसरणी काहीही असली तरी समाजात मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव नष्ट झालाच पाहिजे. शाळांमध्ये सुध्दा आता मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन गृहे आहेत. आमच्या मुलींना भेदभावमुक्त भारताचा अनुभव देण्याची हीच संधी आहे.
केंद्र सरकारतर्फे लसीकरण केले जाते, मात्र तरीसुध्दा लाखो मुले लसीकरणापासून वंचित राहतात. आजारांना बळी पडतात. “मिशन इंद्रधनुष” या अभियानाच्या माध्यमातून अशा वंचित बालकांना शोधून गंभीर आजारांना बळी पडण्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातात. एकविसावे शतक उजाडल्यानंतरसुध्दा गावात अंधारच पसरलेला असावा, हे योग्य नाही. अशा गावांना लवकरात लवकर अंधारमुक्त करण्यासाठी तिथे वीज पोहचविण्यासाठीची मोहिम यशस्वीपणे राबविली जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेली अनेक वर्षे गरीब आई, चुलीवर जेवण करुन शरीरात 400 सिगरेट जाळल्यानंतर होईल, इतका धूर शरीरात शोषून घेत असेल, तर तिच्या आरोग्याचे काय होईल ? अशा पाच कोटी कुटुंबांना धूरमुक्त आयुष्य देण्यासाठी यशस्वी प्रयत्न सुरु आहेत.
लहान व्यापारी, उद्योजक, भाजी विकणारा, दूध विकणारा, न्हाव्याचे दुकान चालवणारा असे सर्व लोक सावकारी व्याजाच्या दुष्ट चक्रात अडकून पडलेले असत. मुद्रा योजना, स्टॅण्ड अप योजना, जनधन खाते या मोहिमांद्वारे व्याजखोरीच्या या दुष्ट चक्रातून अनेकांना मुक्ती मिळाली आहे. आधारच्या माध्यमातून बँकांमध्ये थेट पैसे जमा केले जातात, त्यामुळे खऱ्या लाभार्थीपर्यंत ते थेट पोहचतात. मध्यस्थ आणि दलालांपासून सर्वसामान्य माणसांचे आयुष्य मुक्त करण्याची ही एक संधी आहे. ज्यात सुधारणा आणि परिवर्तनाबरोबरच समस्येचे पूर्णपणे निराकरण करता येईल, असे अभियान राबवायचे आहे आणि त्या दिशेने सफल प्रयत्न सुरु आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या 31 ऑक्टोबर आहे. ज्यांनी भारताच्या एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित केले असे या देशाचे महापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची उद्या जयंती आहे. 31 ऑक्टोबर, एकीकडे एकतेचे प्रतिक असणाऱ्या सरदार पटेल यांची जयंती आहे, तर दुसरीकडे श्रीमती गांधी यांची पुण्यतिथी सुध्दा आहे. महापुरुषांचे पुण्य स्मरण आपण करतो आणि केले पाहिजे. मात्र पंजाबच्या एका सद्गृहस्थांचा मला फोन आला आणि त्यांची वेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली –
“पंतप्रधानजी नमस्कार. सर, मी पंजाबमधून जसदीप बोलतो आहे. 31 तारखेला सरदार पटेल यांची जयंती आहे, हे आपणांस ठाऊक असेल. सरदार पटेल यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला जोडण्यासाठी वाहून घेतले आणि ते आपल्या मोहिमेत यशस्वी सुध्दा झाले, त्यांनी सर्वांनाच एकत्र आणले. त्याचवेळी दुर्देव असे की, त्याच दिवशी इंदिरा गांधींजी यांची हत्यासुध्दा झाली. त्यांच्या हत्येनंतर देशात ज्या घटना घडल्या, त्या आपण सर्वच जाणतो. सर, मला असे विचारावेसे वाटते की, अशा दुर्देवी घटना रोखण्यासाठी काय करता येईल ?”
माझ्या प्रिय देशवासियांनो, हे केवळ एका व्यक्तीचे दु:ख नाही. चाणक्यानंतर देशाला एक करण्याचे भगिरथ प्रयत्नांचे मोठे कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले, याची साक्ष इतिहास देतो आहे. स्वतंत्र भारताला एकाच ध्वजाखाली आणण्याचे यशस्वी प्रयत्न करणाऱ्या त्या महापुरुषाला शतश: वंदन. मात्र सरदार साहेबांनी ज्या एकतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, एकतेसाठी लढा दिला, एकतेला प्राधान्य दिल्याबद्दल अनेकांचा रोष ओढावून घेतला, पण एकतेचा मार्ग सोडला नाही, त्याच सरदारांच्या जयंती दिनी हजारो सरदारांना, हजारो सरदारांच्या कुटुंबांना श्रीमती गांधींजी यांच्या हत्येनंतर यमसदनी धाडण्यात आले. एकतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या त्या महापुरुषाच्या जन्मदिनीच, सरदारजींच्या जन्मदिनीच सरदारांवर झालेला हा अन्याय, इतिहासातले हे काळेकुट्ट पान आपल्या सर्वांसाठीच वेदनादायक आहे.
मात्र ही सर्व संकटे लक्षात घेऊ.न एकतेचा मंत्र जपत आपल्याला पुढे जायचे आहे. विविधतेतील एकता, हीच देशाची ताकत आहे. अनेक भाषा असोत, अनेक जाती असोत, अनेक पेहराव असोत, अनेक प्रकारचे आहार असोत, मात्र विविधतेतील एकता हीच भारताची ताकत आहे, भारताचे वैशिष्टय आहे, प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एकता प्रस्थापित करण्याच्या संधी शोधणे आणि एकता प्रस्थापित करणे ही प्रत्येक सरकारची जबाबदारी आहे. फुटीरता पसरवणाऱ्या विचारांपासून, प्रवृत्तीपासून आपण वाचावे आणि देशालाही वाचवावे हे महत्त्वाचे आहे. सरदार साहेबांनी आपल्याला एक भारत दिला आहे, त्याला श्रेष्ठ भारत बनवणे ही आपली जबाबदारी आहे. एकतेचा मूलमंत्रच श्रेष्ठ भारताची मजबूत पायाभरणी करतो.
शेतकऱ्यांचा संघर्ष पाहत सरदार साहेबांच्या आयुष्याला सुरुवात झाली होती. ते शेतकऱ्यांचे अपत्य होते. शेतकऱ्यांपर्यंत स्वातंत्र्य लढा पोहोचविण्यात सरदार साहेबांची भूमिका महत्त्वाची होती. गावात स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाला ताकत देण्याचे काम सरदार साहेबांनी यशस्वीरित्या केले. उत्तम संघटन आणि कौशल्याचा तो परिणाम होता. मात्र सरदार साहेबांनी केवळ संघर्षासाठीच नाही तर रचनात्मक कार्यासाठीही पुढाकार घेतला. अनेकदा आपण “अमूल”चे नाव ऐकतो, अमूलची अनेक उत्पादने आज भारतात आणि भारताच्या बाहेरही सुपरिचित आहे. मात्र सहकारी दूध उत्पादकांच्या संघटनेची संकल्पना सरदार पटेलांची होती, हे फार कमी लोकांना माहिती असेल. 1942 साली केरा जिल्हा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खेडा जिल्हयात सरदार साहेबांनी हे विचार रुजवले आणि अमूलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखसमृध्दी प्रदान करणाऱ्या रचनात्मक विचारांचे जिवंत उदाहरण आज आपल्याला दिसते आहे. मी सरदार साहेबांना आदरपूर्वक श्रध्दांजली अर्पण करतो आणि या एकता दिनी 31 ऑक्टोबर रोजी आपण जिथे असू तिथे त्यांचे स्मरण करावे, एकतेचा संकल्प करावा, असे आवाहन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दिवाळीच्या या शृंखलेमध्ये कार्तिक पौर्णिमा हा प्रकाशाचा उत्सव आहे. गुरु नानक देव आणि त्यांची शिकवण-दिक्षा संपूर्ण मानवजातीसाठी, केवळ भारतातीलच नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे. सेवा, खरेपणा आणि “सरबत दा भला”, हा गुरुनानक देव यांचा संदेश होता. शांती एकता आणि सद्भावना हा त्यांचा मूलमंत्र होता. गुरुनानक देव यांच्या प्रत्येक शिकवणीमधून भेदभाव, अंधविश्वास आणि कुप्रथांपासून समाजाला मुक्त करण्याची मोहिम राबवली गेली. ज्यावेळी आपल्याकडे स्पृश्य-अस्पृश्य, जाती प्रथा, उच्च-नीच अशा विकृती चरम सीमेला पोहचल्या होत्या, त्यावेळी गुरुनानक देव यांनी भाई लालो यांना आपले सहकारी म्हणून निवडले. या, आपण सुध्दा गुरुनानक देवजींप्रमाणेच ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आणि भेदभाव सोडण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, भेदभावाविरोधात कार्य करण्याचे आदेश देणाऱ्या “सबका साथ, सबका विकास” या मंत्राला सोबत घेऊन पुढे जाऊ या. या कामी गुरुनानक देवच आपल्यासाठी खरे मार्गदर्शक ठरतील. या प्रकाश उत्सवात गुरुनानक देव यांना सुध्दा मी अंत:करणापासून अभिवादन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा देशातील जवानांच्या नावे समर्पित या दिवाळीनिमित्त आपणा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. आपली स्वप्ने, आपले संकल्प पूर्णत्वास जावोत, आपले आयुष्य आनंदात, सुखा-समाधानात व्यतीत व्हावे, याच माझ्या आपणा सर्वांना शुभेच्छा. मन:पूर्वक आभार.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार. जम्मू काश्मीरच्या उरी विभागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाच्या अठरा वीरांना आपण गमावले. ह्या सर्व शूरवीरांना मी नमन करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो. ह्या भ्याड हल्ल्यामुळे साऱ्या देशाला धक्का बसला. देशभर शोक आहे, आणि आक्रोशही आहे. आणि हे नुकसान केवळ त्या कुटुंबाचे नाही, ज्यांनी आपला मुलगा गमावला, पती गमावला, हे नुकसान पूर्ण देशाचे आहे आणि म्हणून मी देशवासियांना आज इतकेच सांगेन, जे मी त्या दिवशी सांगितले होते, मी आज त्याचा पुनरुच्चार करतो, की अपराध्यांना शिक्षा होणारच.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सैन्यदलावर आपला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रत्येक कटाचा ते बिमोड करतील, आणि देशातील सव्वाशे कोटी लोकांना सुखाने जगता यावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. असे शूरवीर आहेत ते. आपल्या सैन्यदलाचा आपल्याला अभिमान आहे. आपल्या सारख्या नागरिकांना, राजकीय नेत्यांना बोलण्यासाठी खूप संधी मिळते. पण सैन्यदल बोलत नाही. ते पराक्रम गाजवतात.
आज मी काश्मीरच्या नागरिकांशी विशेषत्वाने बोलू इच्छितो. देशविरोधी शक्तींना आता काश्मीरचे नागरिक चांगलेच ओळखू लागले आहेत. आणि जसे जसे सत्य त्यांना कळू लागले आहे, ते अशा विचारांपासून स्वतःला वेगळे करून शांततेच्या मार्गावर वाटचाल करू लागले आहेत. शाळा आणि महाविद्यालये पुन्हा लवकरात लवकर कार्यरत व्हावीत असे प्रत्येक आई-वडिलांना वाटतंय. शेतात तयार झालेला माल, फळं भारताभरातल्या बाजारपेठांमध्ये जावे असे शेतकऱ्यांना वाटतेय. आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत असे वाटतेय. आणि गेल्या काही दिवसांपासून हे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवातही झाली आहे. शांतता,एकता आणि सद्भावना हाच आपल्या समस्यांवर समाधान मिळवून देणारा मार्ग आहे, हे आपण सारेजण जाणतो. हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे, आपल्या विकासाचाही मार्ग आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी विकासाची नवी शिखरं आपल्याला गाठायची आहेत. प्रत्येक समस्येवरचा उपाय आपण एकत्र बसून शोधू शकतो, मार्ग काढू शकतो आणि काश्मीरच्या भावी पिढीसाठी उत्तम मार्ग प्रशस्त करू शकतो, असा मला विश्वास आहे. काश्मीरमधल्या नागरिकांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला काही पावले उचलावी लागतात. मी आपल्या सुरक्षा दलांनाही सांगतो, की आपल्याकडे असलेले बळ, सामर्थ्य, आपले कायदे-नियम आहेत. ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत. काश्मिरमधल्या सामान्य नागरिकांना सुखाने जगता यावे यासाठी आहेत, आणि आपण त्याचे कसोशीने पालन करूया. कधी कधी आपण विचार करतो, त्यापेक्षा वेगळा विचार, नवा विचार काही जण मांडतात. सोशल मिडियाच्या माध्यमातून हल्ली बरेच जाणून घेण्याची संधी मला मिळते. हिंदुस्तानातल्या प्रत्येक भागातल्या, प्रत्येक प्रकारच्या लोकांच्या भाव-भावना समजून घेण्याची, जाणून घेण्याची संधी मिळते. आणि यामुळे लोकशाहीला बळकटी मिळते. अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या हर्षवर्धन नावाच्या तरुणाने नुकताच एक वेगळा विचार माझ्यासमोर मांडला. तो लिहितो, की उरी इथे झालेल्या हल्ल्यानंतर मी फार अस्वस्थ झालो होतो. काहीतरी करावे अशी मनात तीव्र इच्छा होती. पण काय करावे ते कळत नव्हते. आणि माझ्यासारखा एक छोटासा विद्यार्थी काय करू शकतो? मग माझ्या मनात विचार आला, की देशहितासाठी मी काय करू शकतो? मग मी संकल्प केला की मी रोज तीन तास जास्त अभ्यास करीन. देशाला उपयोगी पडेन असा नागरिक होईन.
हर्षवर्धन भाऊ, वातावरणात उद्विग्नता असताना, एवढ्या लहान वयात तुम्ही शांत मनाने असा विचार करू शकता, याचा मला आनंद वाटतो. पण हर्षवर्धन, मी हेही सांगू इच्छितो की, देशभरातल्या नागरिकांच्या मनात जी उद्विग्नता आहे, त्याला फार मोठी किंमत आहे. राष्ट्राच्या चेतनेचे ते प्रतिक आहे. ही उद्विग्नता काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय दर्शवते. हा, तुम्ही एका रचनात्मक दृष्टीकोनातून ते मांडलात. पण आपल्याला माहिती असेल, जेव्हा 1965 साली लढाई झाली, तेव्हा लालबहादूर शास्त्री आपले नेतृत्व करत होते. पूर्ण देशभर असेच वातावरण तयार झाले होते. आक्रोश होता, देशभक्तीच्या भावनेला भरती आली होती. काहीतरी घडावं असे प्रत्येकाला वाटत होते, काहीतरी करावे असे प्रत्येकाला वाटते होते. त्यावेळी लालबहादूर शास्त्री यांनी एका अत्यंत उत्तम पद्धतीने देशाच्या ह्या भावविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. आणि जय जवान-जय किसान हा मंत्र देऊन, देशातल्या सामान्य माणसाला देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. बॉम्ब आणि बंदुकांच्या आवाजातही देशभक्ती प्रकट करण्याचा आणखी एक मार्ग प्रत्येक नागरिकाकडे असतो. तो लालबहादूर शास्त्रींनी दाखवला. महात्मा गांधीजी जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढत होते, आणि आंदोलन जेव्हा ऐन टोकाला पोहचत असे आणि थोडावेळ थांबण्याची वेळ येत असे, तेव्हा आंदोलनाच्या ह्या तीव्रतेचा उपयोग समाजात रचनात्मक कामांना प्रेरणा देण्यात कसा होईल ? याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. आपल्या सैन्याने त्याचे कर्तव्य पार पाडावे, शासनात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावे, आणि आपण देशवासी, प्रत्येक नागरिक देशभक्तीच्या भावनेतून, काहीतरी रचनात्मक योगदान देऊ. असे झाले तर, देश निश्चितच नवी शिखरं गाठेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, श्रीमान टी.एस.कार्तिक ह्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलं आहे की, पॅरालिम्पिक्स स्पर्धेसाठी गेलेल्या आपल्या ॲथलीटनी इतिहास रचला, आणि त्यांनी दाखवलेला खेळ म्हणजे मानवी चेतनेचा विजय आहे. श्रीमान वरूण विश्वनाथन ह्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिले आहे की आपल्या ॲथलीटनी खूपच चांगले काम केले आहे. ह्याचा उल्लेख आपण ‘मन की बात’मध्ये केला पाहिजे. केवळ आपण दोघेच नाही, तर देशातली प्रत्येक व्यक्ती पॅरालिम्पिक्स मधल्या आपल्या खेळाडूंबरोबर एका भावनिक नात्याने जोडली गेली आहे. खेळाच्याही पुढे जाऊन, ह्या पॅरालिम्पिक्सने आणि आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने मानवतेच्या दृष्टीकोनात, दिव्यागांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात पूर्ण बदल घडवला आहे. आणि मी, आपली विजयी भगिनी दीपा मलिक हिनं सांगितलेली गोष्ट विसरूच शकत नाही. जेव्हा तिने पदक जिकले, तेव्हा ती म्हणाली, की ह्या पदकाने मी अपंगत्वालाच पराभूत केले आहे. ह्या वाक्यात फार मोठी ताकत आहे. ह्या वेळी पॅरालिम्पिक्स स्पर्धेत आपल्या देशातल्या तीन महिलांबरोबर १९ अॅथलिट सहभागी झाले होते. इतर खेळांच्या तुलनेत, जेव्हा दिव्यांग खेळतात, तेव्हा शारीरिक क्षमता, खेळातील कौशल्य, ह्यापेक्षाही मोठी गोष्ट असते टी इच्छाशक्ती, संकल्पशक्ती.
आपल्याला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटेल, की आपल्या खेळाडूंनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत, चार पदके मिळवली. दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्य पदक अशी कमाई केली. सुवर्ण पदक मिळवणाऱ्या देवेंद्र झाझरीया याने भालाफेकीत दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावले. बारा वर्षांनी पुन्हा मिळवले. बारा वर्षात वय वाढतं. एकदा सुवर्णपदक मिळाल्यानंतर उत्साह थोडा कमी होतो. पण देवेंद्रने दाखवून दिले, की शरीराची अवस्था, वाढणारे वय, ह्याचा त्याच्या संकल्पावर कोणताही परिणाम झाला नाही. आणि बारा वर्षांनी त्याने पुन्हा सुवर्णपदक जिंकले. आणि तो काही जन्मताच अपंग नव्हता, विजेचा झटका लागल्यामुळे त्याला एक हात गमवावा लागला. आपण विचार करा, जो माणूस वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिले सुवर्णपदक जिंकतो, आणि पस्तिसाव्या वर्षी दुसरं सुवर्णपदक मिळवतो,त्याने आयुष्यात किती साधना केली असेल? मरीयप्पन थंगवेलू याने उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. आणि ह्या थंगवेलूला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी आपला उजवा पाय गमवावा लागला. त्याच्या संकल्पाच्या आड त्याची गरिबी त्याने येऊ दिली नाही. तो काही मोठ्या शहरात राहणारा नाही, किंवा मध्यमवर्गीय श्रीमंत घरातलाही नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी, कष्टप्रद आयुष्य सोसून शारीरिक अडचणी असूनही संकल्पाच्या सामर्थ्यावर त्याने देशाला पदक मिळवून दिलं. ॲथलीट दीपा मलिकने तर विजयध्वज फडकवण्यात कमालच केली.
वरूण सी.भाटी याने उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकले. पॅरालिम्पिक्स पदकांचे हेच तर महत्व आहे, आपल्या देशात, आपल्या समाजात,आपल्या आजूबाजूला, आपले जे दिव्यांग बंधू-भगिनी आहेत, त्यांच्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनात या पदकांनी फार मोठा बदल घडवून आणला आहे. आपल्या संवेदना जाग्या केल्या आहेत.फार कमी लोकांना हे माहिती असेल, की या वेळी पॅरालिम्पिक्स स्पर्धेत या दिव्यांग जनांनी कोणता पराक्रम केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच जागी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विक्रम ह्या दिव्यांग खेळाडूंनी मोडले. या वेळी असे झाले आहे. ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या धावपटूने जी विक्रमी वेळ नोंदवली, त्या पेक्षा 1.7 सेकंद कमी वेळ नोंदवून दिव्यांग स्पर्धेतल्या अल्जिरियाच्या अब्दुल लतीफ बाकरने 1500 मीटर शर्यतीत नवा विक्रम स्थापन केला.एवढंच नाही, मला आश्चर्य तेव्हा वाटले जेव्हा मला हे कळले की दिव्यांग खेळाडूंमध्ये धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला पदक मिळालं नाही, पण सबल धावपटूंच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूपेक्षा कमी वेळेत त्याने शर्यत पूर्ण केली. मी ह्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करतो, आणि आगामी काळात पॅरालिम्पिक्ससाठी, त्याच्या विकासासाठी एक सुलभ योजना तयार करण्याच्या दिशेने भारत पुढे जात आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या आठवड्यात मला गुजरातच्या नवसारीत अनेक आश्चर्यकारक अनुभव आले. मोठा भावनिक क्षण होता तो माझ्यासाठी. भारत सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी एका महाशिबिराचे आयोजन केले होते. आणि अनेक विश्वविक्रम त्यावेळी नोंदले गेले. तिथे मला एक छोटी मुलगी भेटली. जी हे जग पाहू शकत नाही. गौरी शार्दूल आणि ती नांग जिल्ह्यातल्या दुर्गम जंगलातून आली होती. संपूर्ण रामायण काव्य रुपात तिला मुखोद्गत आहे. तिने मला त्यातला थोडासा भाग ऐकवला. आणि तिथल्या जमलेल्या लोकांनाही मी ते ऐकवले. तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. त्या दिवशी एका पुस्तकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातल्या यशोकथा त्यात संकलीत केल्या होत्या. फार प्रेरक गोष्टी त्यात होत्या. भारत सरकारने नवसारीच्या भूमीवर विश्वविक्रम नोंदवला. ही गोष्ट मी अत्यंत महत्वाची मानतो. केवळ आठ तासात सहाशे दिव्यांग, जे ऐकू शकत नाहीत, त्यांना श्रवणयंत्र देण्याचा यशस्वी प्रयोग तिथे झाला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ह्या प्रयोगाची नोंद झाली.एकाच दिवशी दिव्यांग व्यक्तींकडून तीन-तीन विश्वविक्रम होणे ही आपल्या सर्व देशवासियांकरता गौरवाची गोष्ट आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन वर्षांपूर्वी दोन ऑक्टोबरला पूज्य बापूजींच्या जयंतीदिनी आपण स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता.आणि त्याच दिवशी मी सांगितले होते की स्वच्छता ही सवय व्हायला हवी. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य व्हायला हवं, अस्वच्छतेबद्दल तिरस्काराचे वातावरण तयार व्हायला हवे. आता दोन ऑक्टोबरला जेव्हा दोन वर्षं पूर्ण होतील, तेव्हा मी विश्वासाने सांगू शकतो, की सव्वाशे कोटी देशवासियांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली आहे.आणि मी म्हटले होते-एक पाऊल स्वच्छतेकडे. आणि आज आपण सर्व जण सांगू शकतो, की प्रत्येकाने एक पाउल पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. याचाच अर्थ देश सव्वाशे पावले स्वच्छतेकडे पुढे गेला आहे. आणि हेही नक्की झाले आहे, दिशा योग्य आहे, फळे किती मधुर असतात, थोड्याशा प्रयत्नांनी केवढं साध्य होऊ शकते, हे सुद्धा समजले. आणि म्हणूनच प्रत्येक जण, मग तो सामान्य नागरिक असो, शासक असो, सरकारी कार्यालय असो किंवा रस्ता, बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन, शाळा किंवा कॉलेज, धार्मिक स्थळ किंवा रुग्णालय, लहान मुलांपासून,ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, ग्रामीण गरीब, शेतकरी महिला, प्रत्येक जण स्वच्छतेसाठी काहीनाकाहीतरी योगदान देत आहे. माध्यमातील मित्रांनी देखील एक सकारात्मक भूमिका पार पाडली आहे. माझी इच्छा आहे की आपण अजून पुढे जायला हवं. पण सुरुवात चांगली झाली आहे. प्रयत्न भरपूर झाले आहेत. आणि आपण यशस्वी होऊ असा विश्वास निर्माण झाला आहे. हे सुद्धा आवश्यक आहे, आणि म्हणूनच ग्रामीण भारताबद्दल सांगायचे झाले तर, आजपर्यंत दोन कोटी अडतीस लाख, म्हणजे जवळ जवळ अडीच कोटी शौचालये बांधली गेली आहेत. आणि येत्या दीड वर्षात आणखी दीड कोटी शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सन्मानासाठी, विशेषतः माता-भगिनींच्या सन्मानासाठी, उघड्यावर शौचाला जाण्याची सवय बंद व्हायला हवी. आणि यासाठी हागणदारी मुक्त गाव अभियान सुरु झाले आहे. राज्या-राज्यांमध्ये, जिल्ह्या-जिल्ह्यामध्ये, गावा-गावात एक निकोप स्पर्धा सुरु झाली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, आणि केरळ हागणदारी मुक्त गाव अभियानात पूर्ण यश मिळवतील. मी नुकताच गुजरातला गेलो होतो. तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितले की महात्मा गांधीजींचे जन्मस्थान पोरबंदर, येत्या दोन ऑक्टोबरला हागणदारी मुक्त गाव अभियान पूर्णपणे यशस्वी करणार आहे. ह्या करता ज्यांनी काम केले, त्यांचे अभिनंदन, आणि जे यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना शुभेच्छा. आणि देशवासियांना मी आग्रहाने सांगेन की, माता-भगिनींच्या सन्मानासाठी, लहान मुलांच्या आरोग्यासाठी, ह्या समस्येपासून आपण देशाला मुक्त करायचे आहे. या आपण हा संकल्प घेऊन पुढे जाऊ. विशेषतः माझे तरुण मित्र, जे हल्ली तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करतात, त्यांच्यासाठी मी एक योजना सादर करू इच्छितो. स्वच्छता मोहिमेची आपल्या शहरात काय परिस्थिती आहे? हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून भारत सरकारने यासाठी एक दूरध्वनी क्रमांक सुरु केला आहे 1969. आपल्याला माहित आहे की गांधीजींचा जन्म 1969 साली झाला होता. 1969 मध्ये आपण महात्मा गांधी जन्मशताब्दी साजरी केली. आणि 2019 मध्ये आपण त्यांची दीडशेवी जयंती साजरी करणार आहोत. ह्या 1969क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शहरातील शौचालय बांधण्याची स्थिती तर जाणून घेऊ शकालच, त्याचबरोबर शौचालय बांधण्यासाठी अर्ज सुद्धा करू शकाल. आपण याचा अवश्य फायदा घ्या. एवढेच नाही तर, साफ-सफाई बाबत आपल्या तक्रारी आणि त्या तक्रारींचे निराकरण याबद्दल जाणून घेण्यासाठी एक स्वच्छता ॲप सुरु करण्यात आले आहे. आपण याचा भरपूर लाभ घ्या, विशेषत्वाने तरुण पिढीने याचा फायदा घ्यायला हवा. भारत सरकारने कॉर्पोरेट क्षेत्राला सुद्धा पुढे येण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छतेसाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुण व्यावसायिकांना त्यांनी प्रायोजकत्व द्यावे. स्वच्छ भारत मोहिमेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्यात पाठवता येईल.
हे स्वच्छता अभियान केवळ संस्कारापुरतेच मर्यादित राहून चालणार नाही. स्वच्छता ही सवय होऊनही काम पूर्ण होणार नाही. आजच्या जगात स्वच्छता ही आरोग्याशी जशी जोडली गेली आहे, त्याप्रमाणे स्वच्छतेशी आर्थिक उत्पन्नाचा मार्ग देखील जोडला गेला पाहिजे. वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून संपती हा सुद्धा त्याचा एक भाग व्हायला हवा. आणि म्हणून वेस्ट टू कंपोस्ट, कचऱ्यापासून खत या दिशेने आपण पुढे जायला हवे. घनकचऱ्यावर प्रक्रिया व्हायला हवी, त्याचे रुपांतर खतात होण्यासाठी काम व्हायला हवे. आणि यासाठी सरकारच्यावतीने धोरण आखणीची सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून जे खत तयार होईल ते खरेदी करा, असे खत उत्पादक कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात, त्यांना ते खत उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आले आहे. ज्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारायचे आहे, धरतीच्या आरोग्याबद्दल ज्यांना काळजी वाटते, रासायनिक खतांच्या वापरामुळे ज्यांचं नुकसान झाले आहे, त्यांना आवश्यकतेप्रमाणे हे खत उपलब्ध करून द्यावे असे सांगण्यात आले आहे. आणि श्रीमान अमिताभ बच्चनजी सदिच्छा दूत म्हणून ह्या कामात विशेष योगदान देत आहेत. वेस्ट टू वेल्थ,कचऱ्यापासून संपत्ती या क्षेत्रात नवीन स्टार्ट अप सुरु करण्यासाठी मी युवकांना आमंत्रित करत आहे. त्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री विकसित करा, तंत्रज्ञान विकसित करा. कमी खर्चात त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्या. हे नक्कीच करण्यासारखे काम आहे. रोजगार निर्मितीला यात मोठा वाव आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची संधी आहे. आणि कचऱ्यापासून संपत्ती निर्माण हे यशस्वी करता येतं. ह्या वर्षी 25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत एका विशेष कार्यक्रमाचं इन्डोसन, इंडिअन सॅनिटेशन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात येत आहे. देशभरातील मंत्री, मुख्यमंत्री, महानगरांचे महापौर, आयुक्त एकत्र भेटून केवळ स्वच्छता आणि फक्त स्वच्छता यावर गहन विचार-विनिमय करणार आहेत. तंत्रज्ञान काय असू शकेल? आर्थिक धोरण काय असू शकेल? लोक-सहभाग कसा मिळवता येईल? यात रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील? या सर्व विषयांवर चर्चा होणार आहे.मी पाहतो आहे, स्वच्छतेबाबत नव्या नव्या बातम्या सतत येत आहेत. नुकतेच मी वर्तमानपत्रात वाचले की गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी एकशे सात गावांमध्ये जाऊन, शौचालय निर्मितीबाबत जागरुकता अभियान चालवलं. स्वतः कष्ट केले आणि जवळ जवळ 900 शौचालयं बांधण्यासाठी त्यांनी योगदान दिले. नुकतेच आपण हेही बघितले असेल की, विंग कमांडर परमवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गंगेच्या पात्रात देवप्रयागपासून ते गंगासागर हे 2800 किलोमीटर अंतर पोहून गेले आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी आपली दिनदर्शिका तयार केली आहे. प्रत्येक विभाग पंधरा दिवस, ठरवून स्वच्छतेकडे लक्ष देतो. येत्या ऑक्टोबर महिन्यात पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पंचायत राज्य विभाग, ग्रामीण विकास विभाग हे एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात स्वच्छतेविषयी आराखडा तयार करणार आहेत. आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये, 16 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, अन्न प्रक्रिया विभाग, आणि ग्राहक कल्याण मंत्रालय हे तीन विभाग त्यांच्याशी संबधित क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवणार आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो, की यापैकी ज्या विभागाशी कामानिमित्त आपला संबंध येतो, तिथे आपणही यात सहभागी व्हा. आपण पाहिले असेल की हल्ली स्वच्छता विषयक सर्वेक्षण केले जाते. आधी 73 शहरांमध्ये सर्वेक्षण करून तिथे स्वच्छतेबाबत काय परिस्थिती आहे हे देशातल्या जनतेसमोर मांडले गेले. आता एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या जवळ जवळ 500 शहरात हे काम होईल. कारण प्रत्येक शहरातील नागरिकांना असे वाटत असते की आपण या बाबतीत मागे आहोत, आता काहीतरी चांगले करून दाखवू. स्वच्छतेसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झाले आहे. आपण सर्व नागरिक यात आपले योगदान द्याल अशी मला आशा आहे. येत्या दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. गांधी जयंती पासून दिवाळीपर्यंत आपण खादी खरेदी करावी यासाठी मी आग्रह करत असतोच. या वेळीही माझे सांगणे आहे की आपल्या कुटुंबात खादीची एक तरी वस्तू असायलाच हवी. ज्यामुळे गरीबाच्या घरात दिवाळीचा दिवा लागू शकेल. या दोन ऑक्टोबरला रविवार आहे. एक नागरिक या नात्याने आपण स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकाल का? दोन तास, चार तास, आपण सफाईच्या कामात प्रत्यक्ष भाग घ्या, आणि मी आपल्याला सांगेन की त्याचा एक फोटो, एक छायाचित्र काढून नरेंद्र मोदी ॲपवर ते शेअर करा. व्हिडीओ असेल तर व्हिडीओ शेअर करा. बघा आपल्या प्रयत्नांमुळे देशभरात या मोहिमेला नवी शक्ती मिळेल, नवी गती मिळेल. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचे पुन्हा स्मरण करून आपण देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जीवनात देण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कुणी त्याची नोंद घेवो किंवा न घेवो. देण्यातला आनंद काही वेगळाच असतो. आणि मी पाहिले आहे, मागील दिवसांमध्ये गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून देण्याविषयी मी देशवासियांना सांगितले. आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला, तो भारताच्या राष्ट्रीय जीवनात एक फार मोठी प्रेरक घटना म्हणता येईल. आपल्या देशातील अनेक तरुण, लहान-मोठ्या संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक, विद्यार्थी,स्वयंसेवी संघटना सारे मिळून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळात देशातल्या अनेक शहरांमध्ये जॉय ऑफ गिव्हिंग विक, साजरा करणार आहेत. खाद्य पदार्थ, कपडे हे सारे एकत्र करून गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याची ही त्याची मोहीम आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो,तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते गल्ली-गल्लीत फिरून ज्या कुटुंबांकडे जुनी खेळणी असतील, ती दान म्हणून मागत असू. आणि गरीब वस्तीतल्या आंगणवाडीत जाऊन ती देत असू. त्या गरीब मुलांच्या चेहेऱ्यावर ती खेळणी पाहून असा काही आनंद उमटत असे की वा ! ज्या शहरांमध्ये हा जॉय ऑफ गिव्हिंग, विक साजरा होणार आहे, त्या तरुणांना आपण प्रोत्साहन द्यायला हवे, त्यांना मदत करायला हवी असे मला वाटते. एक प्रकारे हा दानोत्सव आहे. जे तरुण हे काम करत आहेत, त्यांना मी हृदयापासून शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 25 सप्टेंबर, पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती. आणि आजच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ज्या राजकीय विचारधारेला घेऊन काम करत आहेत, त्या राजकीय विचारधारेला व्याख्या देण्याचे काम त्यांनी केले. भारताच्या मुळाशी जोडलेल्या राजानितीची बाजू त्यांनी मांडली. भारताच्या सांस्कृतिक परंपरेला पाठींबा देणारी विचारप्रणाली त्यांनी दिली. एकात्म मानरव दर्शन दिले, अशा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज आरंभ होत आहे. सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय हा अन्त्योदयाचा सिद्धांत ही त्यांची देणगी आहे. महात्मा गांधी देखील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताबद्दल बोलत. विकासाची फळे गरीबाताल्या गरीब व्यक्तीपर्यंत कशी पोहचतील? प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी, ह्या दोन शब्दात सारा आर्थिक आराखडा त्यांनी सादर केला. देशभरात त्यांची जन्मशताब्दी गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरी होईल. विकासाचे फायदे गरिबांना कसे मिळतील? यावर समाजाचे,सरकारचे,लक्ष केंद्रित झालं तरच, देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल. पंतप्रधान निवासस्थान असलेला भाग आजवर रेसकोर्स रोड या ब्रिटीशकालीन नावाने ओळखला जात असे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्या रस्त्याचं नामकरण लोककल्याण मार्ग असे करण्यात आले आहे. शताब्दी वर्षातल्या “गरीब कल्याण वर्ष” ह्या संकल्पनेचे ते एक प्रतीकात्मक रूप आहे. प्रेरणा पुरुष आणि आम्हाला वैचारिक परंपरा देणारे श्रध्देय दीनदयाळ उपाध्याय यांना मी आदरपूर्वक नमन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,विजयादशमीच्या दिवशी, आजपासून दोन वर्षांपूर्वी, मन की बात याची मी सुरुवात केली. या विजयादशमीला दोन वर्षं पूर्ण होतील. सरकारी कामांचे गुणवर्णन करणारा हा कार्यक्रम नसावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. राजकीय टीका टिप्पणी, मन की बात मध्ये नसावी. मन कि बात हा आरोप-प्रत्यारोप यांचा कार्यक्रम नसावा. या दोन वर्षात दबाव आणणारे अनेक प्रसंग आले, नाराजी उघडपणे प्रगट करावी असेही कधीकधी वाटले. पण आपणा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी मन की बात त्यापासून दूर ठेवून, सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न केला. या देशातला सामान्य माणूस मला कशी प्रेरणा देऊ शकेल? त्याच्या अशा आकांक्षा काय आहेत? माझ्या मनात आणि विचारात कायम हा सामान्य माणूसच केंद्रस्थानी राहिला. मन की बात मधून तेच प्रकट होत राहिले. देशवासीयांसाठी मन की बात म्हणजे काही जाणून घेण्याची संधी असते, माझ्यासाठी मात्र मन की बात म्हणजे सव्वाशे कोटी देशवासियांच्या शक्तीचा अनुभव घेणे, माझ्या देशातल्या सव्वाशे कोटी लोकांच्या शक्तीचं पुन्हा पुन्हा स्मरण करणे, आणि त्यातून कामासाठी प्रेरणा घेणे आहे. दोन वर्षं पूर्ण होत असताना आपण ज्याप्रकारे ह्या कार्याक्रमाचे कौतुक केलं, आशीर्वाद दिले, त्यासाठी मी सर्व श्रोत्यांचे हृदयापासून आभार मानतो. आकाशवाणीचेही मी आभार मानतो, कारण मन की बात त्यांनी केवळ प्रसारित केली नाही, तर सर्व प्रादेशिक भाषांमधून श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी परिश्रम घेतले. ज्या श्रोत्यांनी मन की बात झाल्यावर पत्र लिहून सरकारचे दरवाजे ठोठावले, सरकारच्या कामातील त्रुटी दाखवल्या, त्यांचेही मी आभार मानतो. आकाशवाणीने अशा पत्रांची दखल घेऊन, सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. त्यामुळे मन की बात हा केवळ पंधरा-वीस मिनिटांचा संवाद न राहता, समाज परिवर्तनाची संधी ठरला. कुणासाठीही यापेक्षा मोठी आनंद देणारी कोणती गोष्ट असू शकते. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या आठवड्यात नवरात्र आणि दुर्गा पूजेचा उत्सव आहे. विजयादशमीचा सण आहे. मग दिवाळीची तयारी सुरु होईल. साऱ्या देशात एक वेगळे वातावरण तयार होईल. शक्तीची उपासना करण्याचा हा सण आहे. समाजाची एकजूट हीच देशाची शक्ती असते.नवरात्र असो की दुर्गापूजा. शक्तीची उपासना करण्याचा हा सण, समाजाच्या एकतेची उपासना करणारा कसा होईल? माणसा-माणसाला जोडणारा उत्सव कसा होईल? आणि तीच शक्ती खऱ्या शक्तीची साधना ठरेल. आणि मग आपण सारे एकत्र येऊन विजयाचा उत्सव साजरा करू. या शक्तीची साधना करुया,एकतेचा मंत्र घेऊन चालूया. राष्ट्राला नव्या शिखरावर नेण्यासाठी शांतता, एकता, सद्भावना यासह नवरात्री आणि दुर्गापूजेचा सण साजरा करूया, विजयादशमीचा विजय साजरा करुया.
अनेक अनेक धन्यवाद.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
उद्या 29 ऑगस्टला हॉकीचा जादूगार ध्यानचंद यांची जन्मदिन आहे. हा दिवस देशभरात “राष्ट्रीय क्रीडा दिन” म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंदजी यांना मी श्रध्दांजली अर्पण करतो आणि यानिमित्ताने, त्यांनी केलेल्या योगदानाचे स्मरणही करु इच्छितो. त्यांनी 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिंम्पिक खेळात भारताला हॉकीतले सुवर्ण पदक मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. आपणा सर्व क्रिकेटप्रेमींना “ब्रॅडमन” यांचे नाव माहिती आहे. त्यांनी ध्यानचंद यांच्याबाबत असे म्हटले होते की, ‘He scores goals like runs’. ते धावांप्रमाणे गोल करतात. ध्यानचंदजी म्हणजे खेळातले चैतन्य आणि देशभक्तीचे उत्कृष्ट उदाहरण आहेत, आदर्श आहेत. एकदा कोलकाता येथे हॉकी सामन्याच्या दरम्यान, प्रतिस्पर्धी खेळाडूने ध्यानचंदजींच्या डोक्यावर हॉकी स्टीक मारली. सामना संपायला केवळ दहा मिनिटे बाकी होती आणि त्या शेवटच्या दहा मिनिटात, ध्यानचंद यांनी तीन गोल केले आणि म्हणाले दुखापतीचे उत्तर गोल करुन दिले.
माझ्या देशबांधवांनो, जशी जशी “मन की बात”ची वेळ जवळ येवू लागते, तशा तशा माय गव्हवर अथवा नरेंद्र मोदी ॲपवर अनेकांच्याळ सूचना येऊ लागतात. विविध सूचना असतात. पंरतु यावेळी मला जाणवले की, बहुतांश लोकांनी मला आग्रह केला की, रिओ ऑलिंम्पिक संबंधात काही बोलावे, सर्वसामान्य नागरिकांचे रिओ ऑलिंम्पिकच्या प्रति इतके प्रेम, एवढी जागरुकता आणि यावर बोलण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्याकडे आग्रह, याकडे मी खूप सकारात्मक दृष्टीने पाहतो. क्रिकेटशिवायही भारतीयांमध्ये इतर खेळांप्रतिसुध्दा एवढी आपुलकी आहे, एवढी जागरुकता, एवढी माहिती आहे. माझ्यासाठी हा संदेश देणे, याकरता ते एक प्रेरणा स्रोत ठरले. कारण ठरले. अजित सिंह यांनी नरेंद्र मोदी ॲपवर असे लिहिलेय की, कृपया मन की बातमध्ये मुलींचे शिक्षण आणि खेळातल्या त्यांच्या सहभागाबद्दल जरुर बोलावे. कारण रिओ ऑलिम्पिंकमध्ये त्यांनी पदके मिळवून देशाचा गौरव केलाय. सचिन म्हणतात, या वेळच्या मन की बातमध्ये सिंधु, साक्षी आणि दीपा कर्माकर यांच्याविषयी जरुर बोलावे. आपल्याला जी पदके मिळाली, ती मुलींनी मिळवून दिली. आपल्या मुलींनी हेच सिध्द करुन दाखवले की, आम्ही कुणापेक्षाही कमी नाहीत.
या मुलींमध्ये एक, उत्तर भारतातून आहे, एक दक्षिण भारताची, तर कोणी पूर्व भारताची तर कोणी हिंदुस्तानच्या आणखी एका भागाची आहे. त्यामुळे असे वाटते की, जसे संपूर्ण देशाच्या या मुलींनी भारताचे नाव उज्ज्वल करायचा जणू विडाच उचलला आहे. माय गव्हवर शिखर ठाकूर लिहितात की, आपण ऑलिम्पिमध्ये यापेक्षा चांगली कामगिरी करु शकलो असतो. ते म्हणतात, आदरणीय मोदी सर सर्वप्रथम रिओमध्ये दोन पदके मिळविल्याबद्दल अभिनंदन ! परंतु मी याकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो की, खरेच आपली कामगिरी चांगली होती का ? आणि उत्तर आहे, नाही ! आपल्याला क्रीडा क्षेत्रात लांबचा पल्ला गाठायची आवश्यकता आहे. आमचे आई-वडिल आजसुध्दा अभ्यासावरच भर देतात. समाजही असेच मानतो की खेळ म्हणजे वेळेची नासाडी ! समाजाला प्रोत्साहनाची गरज आहे. हािविचार बदलण्याची आवश्यकता आहे आणि हे काम आपल्याशिवाय जास्त चांगले कोण करु शकेल ?
सत्यप्रकाश मेहरा नरेंद्र मोदी ॲपवर म्हणतात, मन की बातमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांवर भर द्यायची आवश्यकता आहे, खास करुन मुले आणि युवकांच्या खेळांबाबत ! या मुद्यांबाबत, हजारो लोकांनी लिहिले आहे. हा भाव व्यक्त केला आहे. आपल्या अपेक्षेनुसार आपण कामगिरी करु शकलो नाही, याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. काही गोष्टीत असे झाले आहे की, जे खेळाडू भारतात चांगली कामगिरी करत होते, येथील खेळात जी कामगिरी करत होते, ते तिथे दाखवू शकले नाही आणि पदक तालिकेत केवळ दोन पदके मिळाली. आणखी एक गोष्ट खरी आहे की, पदके मिळाली नाहीत तरी नीट पाहिले तर जाणवेल की, पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी बऱ्याच खेळात काहीसे चांगले कर्तृत्व दाखवले आहे. आत हेच बघा, नेमबाजीमध्ये आपले अभिनव बिंद्राजी चौथ्या स्थानावर राहिले, आणि फार कमी फरकाने पदक हुकले. ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टिमध्ये दीपा कर्माकरने तर कमाल केली. ती चौथ्या स्थानावर राहिली. थोडक्यात पदक निसटले. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेली ती पहिली भारतीय महिला ठरली, हे आपण विसरु शकत नाही. अशीच गोष्ट टेनिसमध्ये, सनिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा जोडीची झाली. ॲथलेटीक्समध्ये आपण चांगली कामगिरी केली. पी. टी. उषानंतर, 32 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ललिता बाबरने ट्रॅक फिल्डच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरली… 36 वर्षांनंतर महिला हॉकी टीम ऑलिंम्पिकपर्यंत पोहोचली, हे बघून आपल्याला निश्चितच आनंद होईल. मागच्या 36 वर्षात, पहिल्यांदाच पुरुषांच्या हॉकी संघाला नॉक आऊट फेरीपर्यंत पोहचण्यात सफलता मिळाली. आपला संघ मजबूत आहे आणि गमंतीचा भाग असा की, अर्जेंटीना – ज्यांनी सुवर्णपदक मिळवले, त्यांनी संपूर्ण स्पर्धेत एकच सामना गमावला, त्यांना पराभूत करणारे कोण होते ? भारतीय खेळाडूच होते. आता येणारा काळ निश्चितच आपल्यासाठी चांगला असेल.
मुष्टि युध्दात विकास कृष्ण यादव उपउपांत्य फेरीपर्यंत पोहोचले, मात्र कांस्य पदक मिळू शकले नाही. काही खेळाडूंची कामगिरी चांगली होती, उदाहरणार्थ आदिती अशोक, दत्तू भोकनळ, अतनु दास… माझ्या देशबांधवांनो, आपल्याला बरेच काही करायचे आहे पण आतापर्यंत जे काही करत आलोत, तसेच काही करत राहिलो तर पुन्हा आपल्या पदरी निराशा येईल… मी एका समितीची घोषणा केली आहे. भारत सरकारची ही समिती सखोल अभ्यास करेल. जगभरात खेळांबाबत काय काय केले जाते, याचा अभ्यास समिती करेल. आपण काय चांगले करु शकतो, या बाबतचा आराखडा समिती तयार करेल. 2020, 2024, 2028 आपल्याला दूरदृष्टीने योजना बनवायची आहे. राज्य शासनांनाही माझा आग्रह आहे की त्यांनीही अशा समित्या स्थापन कराव्यात, क्रीडा क्षेत्रात आपण काय करु शकतो, आपले एकेक राज्य काय करु शकते, राज्यांनी एक, दोन खेळ पसंत करावेत आणि त्या खेळात आपण किती ताकद दाखवू शकतो, याचा विचार करावा.
माझा खेळ जगतातल्या संघटनांनाही आग्रह आहे की, त्यांयनीही नि:पक्षपणाने चिंतन करावे आणि हिंदुस्तानच्या नागरिकांनाही आवाहन आहे, ज्यांना त्यात आवड आहे, त्यांनी नरेंद्र मोदी ॲपवर सूचना द्याव्यात…. संघटनांनी चर्चा करुन निवेदने सरकारकडे पाठवावी. राज्यशासनांनी सखोल चर्चा करुन आपल्या सूचना पाठवाव्या. आपण संपूर्ण तयारी करु आणि मला विश्वास आहे की, आपण सव्वाशे कोटी देशवासीय 65 टक्के युवक लोकसंख्या असलेला देश, आपण मिळून, क्रीडा जगतात उत्तम स्थिती प्राप्ता करुया… या संकल्पाने पुढची वाटचाल करायची आहे.
देशबांधवांनो, पाच सप्टेंबर शिक्षक दिन ! काही वर्षांपासून शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी विद्यार्थ्यांबरोबर वेळ देतो आहे आणि त्यांच्यातीलच एक विद्यार्थी होऊन मी वेळ घालवत होतो. मी या विद्यार्थ्यांकडूनही बरेच काही शिकत होतो. माझ्यासाठी 5 सप्टेंबर हा “शिक्षक दिन” ही होता आणि “शिक्षण दिनही”! परंतु यावेळेस जी-20 शिखर परिषदेसाठी मला जावे लागत आहे…..त्यामुळे मनात असा विचार आहे की, याविषयी मन की बातमध्ये माझ्या भावना व्यक्त कराव्यात…
जीवनात “आईचे” जे स्थान आहे तेच स्थान “शिक्षकांचेही” आहे. असेही शिक्षक मी पाहिलेत की “स्वत:पेक्षाही ज्यांना आपल्या माणसांची चिंताच अधिक असते. ते आपल्या शिष्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, आपले आयुष्य वेचतात. सध्या रिओ ऑलिंम्पिकनंतर, सगळीकडे पुल्लेला गोपीचंद यांची चर्चा आहे. ते क्रीडापटू तर आहेतच, परंतु उत्कृष्ट शिक्षक कसा असतो, याचे उदाहरणच त्यांनी सादर केले आहे. मी गोपीचंदजी यांना आज खेळाडू व्यतिरिक्त शिक्षकाच्या रुपात पाहतो आहे आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुल्लेला गोपीचंदजी यांना त्यांची तपस्या, खेळाप्रती त्यांचे समर्पण आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आनंद मानण्याच्या त्यांच्या वृत्तीला, मी सलाम करतो. आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे योगदान नेहमीच जाणवते. 5 सप्टेंबर, भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, आणि संपूर्ण देश या दिवसाला शिक्षक दिन म्हणून मानतो. ते जीवनात कोणत्याही स्थानावर पोहोचले तरीही, त्यांनी स्वत: शिक्षकाच्या भूमिकेतच जगण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर, ते म्हणायचे, “चांगला शिक्षक तोच, की ज्याच्यातला विद्यार्थी कधी संपत नाही”. राष्ट्रपती पदावर असूनही, आपल्यातला विद्यार्थी जागृत ठेवणे, शिक्षकांचे मन जागते ठेवणे असे अद्भूत जीवन डॉ. राधाकृष्णजी यांनी आपल्यासमोर ठेवले आहे.
मी कधी कधी विचार करतो तेव्हा मला माझ्या शिक्षकांच्या बऱ्याच गोष्टी आठवतात कारण आमच्या छोटया गावातले तेच तर आमचे नायक होते-हिरो होते. पण आज मी आनंदाने सांगतोय, की माझ्या एका शिक्षकाचे वय नव्वदीचे आहे. आजही प्रत्येक महिन्याला त्यांचे पत्र मला येते. हाताने लिहिलेली चिठ्ठी येते. महिन्याभरात त्यांनी कोणती पुस्तके वाचली, त्याचा विचार असतो, विशेष नोंदी असतात. महिन्याभरात मी काय केले, त्यांच्या दृष्टीने ते चांगले होते की नाही… जसे आजही ते वर्गात येऊन शिकवत आहेत. आजही दुरस्थ पध्दतीचे शिक्षणच जणू ते देत आहेत. आज नव्वदीतही, त्यांचे जे हस्ताक्षर आहे, त्याने मी चकित होतो….की, इतक्या सुंदर हस्ताक्षरात लिहितात आणि माझे स्वत:चे अक्षर खूपच खराब आहे. त्यामुळे कोणाचे चांगले हस्ताक्षर दिसले, की माझ्या मनात आदरभाव वाढतो. आपल्या शिक्षकांमुळे, आपल्या जीवनात जे काही चांगले घडले, हे जर आपण इतरांना सांगितले तर शिक्षकांच्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात परिवर्तन येईल. गौरव होईल. समाजात शिक्षकांचा गौरव वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण नरेंद्र मोदी ॲपवर आपल्या शिक्षकांसह फोटो असेल, चांगली आठवण असेल, प्रेरक गोष्ट असेल, तर आपण जरुर शेअर करा…लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या नजरेतून शिक्षकांचे योगदान पाहणे, आपल्यासाठी मौल्यवान असेल.
देशबांधवांनो, काही दिवसातच गणेशोत्सव येईल. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. आपल्या सगळयांना असे वाटते की आपला देश, आपला समाज, आपला परिवार, प्रत्येक व्यक्ती, त्यांचे जीवन निर्विघ्न असावे. जेव्हा गणेशोत्सवाचा आपण विचार करतो, तेव्हा लोकमान्य टिळक यांची आठवणे येणे, स्वाभाविक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा हे लोकमान्य टिळकांचे देणे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाद्वारा, या धार्मिक निमित्ताला त्यांनी राष्ट्र जागृतीचे पर्व बनवले. सामाजिक संस्काराचे पर्व बनवले. या माध्यमातून समाज जीवनाला स्पर्श करणाऱ्या विषयांवर चर्चा व्हायला हवी. कार्यक्रमांची रचना अशी हवी की, समाजाला नवी प्रेरणा, नवे तेज मिळावे, याबरोबरच त्यांनी दिलेला “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” हा मंत्र केंद्रस्थानी असावा की. आजसुध्दा केवळ महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सव होऊ लागलाय. सगळे युवक या उत्सवासाठी जय्यत तयारीही करतात. प्रचंड उत्साह असतो. आतापर्यंत काही लोकांनी लोकमान्य टिळकांनी जी भावना ठेवली होती, त्याचे अनुकरण करायचा खूपसा प्रयत्नही केला आहे. सार्वजनिक विषयांवर चर्चा केली जाते, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा भरवल्या जातात. त्या मधूनसुध्दा कलात्मक ढंगातून सामाजिक विषयांना स्पर्श केला जातो. एक प्रकारच्या लोकशिक्षणाचे अभियानच जणू गणेश उत्सवाच्या माध्यमातून सुरु असते, लोकमान्य टिळकांनी आपल्याला स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे, हा प्रेरक मंत्र दिला. आता आपण स्वतंत्र हिंदुस्थानात आहोत. आता आपण सुराज आमचा हक्क आहे, सुराजाच्या दिशेने वाटचाल करुया, सुराजाला आमचे प्राधान्य आहे या मंत्राचा संदेश आपण सार्वजनिक गणेश उत्सवातून नाही देऊ शकत का ? मी आपल्याला निमंत्रण करत आहे.
ही गोष्ट खरी आहे की, उत्सव ही समाजाची शक्ती असते. उत्सवामुळे व्यक्ती आणि समाजात नवचैतन्य येते. उत्सवाशिवाय जीवन अशक्य आहे. परंतु काळाच्या मागणीप्रमाणे त्यात बदल होणे अपेक्षित आहे.
यावेळी माझ्या असे लक्षात आले आहे की, काही लोकांनी, विशेष करुन गणेशोत्सव, दूर्गापूजा यावर बरेच लिहिलेय आणि त्यांना चिंता आहे, पर्यावरणाची ! शंकर नारायण प्रशांत लिहितात-त्यांनी आग्रहाने म्हटलेय की, मोदी जी, मन की बातच्या माध्यमातून लोकांना सांगा की प्लॅस्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या मूर्ति वापरु नका. गावच्या तलावातल्या मातीतून तयार झालेल्या गणेश मूर्तीचा उपयोग करा. पीओपी मधून बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला अनुकूल नाहीत. ही वेदना तीव्रपणाने जशी त्यांनी मांडली तशी इतरांनीही ती सांगितली आहे. माझी आपणा सर्वांना प्रार्थना आहे की, पुरातन काळासारखे शाडूच्या गणेश आणि दुर्गामातेच्या मूर्तीचा उपयोग करावा आणि आपल्या जुन्या परंपरा का अनुसरु नयेत. पर्यारणाचे रक्षण, आपल्या नदी तलावाचे संरक्षण, प्रदूषणापासून छोटया छोटया जीवांचे रक्षण ही सुध्दा एक प्रकारे ईश्वर सेवाच आहे. गणेशजी विघ्नहर्ता आहेत. म्हणूनच आपल्याला अशा गणेशमूर्ती नकोत की ज्यातून विघ्न निर्माण होईल. माझ्या या मुद्दयांना आपण कोणत्या भावनेतून घ्याल, याची मला माहिती नाही, मात्र मी एकटाच हे सांगत नाही तर अनेकांचे हेच मत आहे. काहींच्या मतातून असे जाणवले की पुण्याचे मूर्तिकार अभिजीत धोंडफळे, कोल्हापूरच्या संस्था-निसर्ग मित्र, विज्ञान प्रबोधिनी! विदर्भातला निसर्ग कट्टा, पुण्याची ज्ञान प्रबोधिनी, मुंबईतला गिरगावचा राजा, अशा अनेक संस्था शाडूच्या गणपतींसाठी खूप कष्ट घेतात. प्रचार करतात. पर्यावरण स्नेही गणेशोत्सव- ही देखील एक समाजसेवाच आहे. दूर्गापूजेला बराच वेळ आहे. जे जुने परिवार – जे अशा मूर्ती तयार करतात त्यांनाही रोजगार मिळेल, ज्या तलावाच्या मातीतून मूर्ति बनतील, त्या पुन्हा तिथेच जातील. यातून पर्यावरणाचे संरक्षणही होईल. आपल्या सर्वांना गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारत रत्न मदर तेरेसा यांना 4 सप्टेंबरला संत उपाधीने विभूषित केले जाईल. मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण जीवन भारतातल्या गरीबांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. त्यांचा जन्म तर अल्बानी यामध्ये झाला होता. त्यांची भाषाही इंग्रजी नव्हती. पण त्यांनी आपले जीवन वेचले, गरीबांच्या सेवेयोग्य बनण्यासाठी खूप प्रयत्न केले. ज्यांनी आयुष्यभर भारतातल्या गरीबांची सेवा केली, अशा मदर तेरेसा यांना संत उपाधी मिळते, तेव्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. 4 सप्टेंबरला हा समारंभ होईल, त्यात सव्वाशे कोटी भारतीयांच्या वतीने भारत सरकार, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ तिथे पावेल. संत, ऋषि-मुनी यांच्याकडून प्रत्येक क्षणी आपल्याला काही न काही शिकवण मिळते. आपल्याला काही न काही प्राप्त होते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, विकास जेव्हा जन आंदोलन बनते, तेव्हा मोठे परिवर्तन होते. जनशक्ति हे ईश्वराचे रुप. भारत सरकारने मागच्या काही दिवसात, पाच राज्य सरकारच्या सहकार्याने स्वच्छ गंगा, गंगेच्या स्वच्छतेसाठी लोकांना एकत्र आणायचा यशस्वी प्रयत्न केला. या महिन्याच्या वीस तारखेला अलाहाबाद इथे गंगा किनाऱ्यावरच्या गावप्रमुखांना निमंत्रित केले गेले. पुरुषही होते; महिलाही होत्या. ते सर्वजण गंगेच्या किनाऱ्यावर आले आणि गावप्रमुखांनी गंगामातेच्या साक्षीने प्रतिज्ञा केली की, गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या गावात उघड्यावर शौचाला जाणे, तात्काळ बंद करतील. ते शौचालय बनवायचे अभियान चालवतील आणि गंगा सफाईसाठी संपूर्ण गाव योगदान देईल. गंगेतही घाण होवू देणार नाही. या संकल्पासाठी अलाहाबाद इथे आल्याबद्दल या सर्व प्रमुखांना – कोणी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहारहून कोणी आले तर कोणी झारखंड, पश्चिम बंगालमधून आले, त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी भारत सरकारच्या सर्व मंत्रालयांचे, मंत्र्यांचे अभिनंदन करतो – ज्यांनी ही कल्पना साकार केली. मी त्या सर्व पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन करतो कि, त्यांनी जनशक्तिला एकत्र आणून गंगेच्या स्वच्छता मोहिमेत एक निश्चित पाऊल उचलले आहे.
देशबांधवांनो, काही काही गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात, भावतात, ज्यांना याची कल्पना येते त्यांच्याप्रति माझ्या मनात एक विशेष प्रकारचा आदरही आहे. पंधरा जुलै रोजी छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यातल्या सतराशे शाळातल्या सुमारे सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना चिठ्ठी लिहिली. कोणी इंग्रजीतून तर कोणी हिंदीतून लिहिली; तर कोणी छत्तीसगढीतून लिहिले की, आपल्या घरात शौचालय असायला हवे. शौचालय बनवण्याची मागणी त्यांनी केली. काही मुलांनी तर असे लिहिले की यावर्षी माझा वाढदिवस साजरा झाला नाही तरी चालेल, पण शौचालय जरुर बनवून घ्या. सात ते सतरा वर्षांच्या या मुलांनी हे काम केले. याचा एवढा प्रभाव पडला आणि भावनिक परिणाम झाला की, दुसऱ्या दिवशी शाळेला जाताना, शिक्षकांना देण्यासाठी आई-वडिलांनी चिठ्ठी लिहून दिली आणि त्या चिठ्ठीत आश्वासन होते की, अमूक एक तारखेपर्यंत घरात आम्ही शौचालय बनवून घेवू. ज्यांनी ही कल्पना मांडली त्यांचेही अभिनंदन, ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, त्या विद्यार्थ्यांचेही अभिनंदन आणि पालकांचे विशेष अभिनंदन की त्यांनी मुलांची चिठ्ठी गांभीर्याने मनावर घेवून शौचालय बनवायचे काम करायचा निर्णय घेतला. अशा गोष्टीतूनच आम्हाला प्रेरणा मिळते.
कर्नाटकचा कोप्पाल जिल्हा. या जिल्ह्यातली सोळा वर्षाची एक कन्या- मल्लमा – या कन्येने तर आपल्या कुटुंबाविरोधातच सत्याग्रह पुकारला. सत्याग्रहाला ती बसली. असे सांगितले गेले की, तिने अन्नपाणी वर्ज्य केले. हे सर्व स्वत:साठी काही मागण्यासाठी नाही, चांगल्या कपडे मिळावे यासाठी नाही, मिठाईसाठी नाही तर या मुलीची जिद्द अशी की, आपल्या घरात शौचालय पाहिजे. त्या कुटुंबाची आर्थिक पत तेवढी नव्हती, पण ती मुलगी जिद्दीला पेटली होती. आपला सत्याग्रह सोडायला तयार नव्हती. गाव प्रमुख मोहम्मद शफींना ही गोष्ट समजली की मल्लमाने शौचालयासाठी सत्याग्रह केला. या गावप्रमुख मोहम्मद शफींची वैशिष्ट्य बघा; त्यांनी अठरा हजार रुपये जमा केले आणि आठवड्याच्या आत शौचालय बनवले. ही मल्लमाच्या जिद्दीची ताकत आहे, आणि गावप्रमुख मोहम्मद शफीची ताकत आहे. समस्या निवारणासाठी कसे मार्ग उपलब्ध होतात, हीच जनशक्ती आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्छ भारत हे तर प्रत्येक भारतीयांचे स्वप्न झाले आहे. काही भारतीयांचा तो संकल्प आहे. काही भारतीयांनी तर आपले उद्दिष्ट बनवले आहे. परंतु, प्रत्येक जण या ना त्या रुपात जोडला गेला आहे, प्रत्येक जण कोणते ना कोणते योगदान देतो आहे. रोज बातम्या येत असतात – कोण काय काय प्रयत्न करतात! भारत सरकारने विचार मांडला, लोकांना आवाहन केले की, आपण दोन-तीन मिनिटांची स्वच्छतेवरची फिल्म बनवा. हा लघुपट भारत सरकारकडे पाठवा. संकेतस्थळावर ही माहिती मिळेल. त्यासाठी स्पर्धा होईल आणि विजेत्यांना 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला बक्षीस दिले जाईल. मी तर टीव्ही वाहिन्यांना सांगेन की आपणही अशा स्पर्धा भरवा. नवनिर्मितीच्या कल्पना सुद्धा स्वच्छता अभियानाला ताकत देऊ शकतात. नवी घोषवाक्य मिळतील. नवीन तंत्र समजेल, नवी प्रेरणा मिळेल आणि हे सुद्धा जनता जनार्दनाच्या सहभागातून, सर्वसामान्य कलाकारांकडून आणि हे गरजेचे नाही की, मोठा स्टुडीओ पाहिजे – मोठा कॅमेरा पाहिजे, अरे, आजकाल तर आपण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्याने फिल्म बनवू शकतो. चला, पुढे या… आपल्याला माझे निमंत्रण आहे.
देशबांधवांनो, भारताचे नेहमीच शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध असावेत, अशी नेहमीच इच्छा राहिली आहे. एक महत्त्वाची गोष्ट गेल्या काही दिवसात घडली; आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोलकातामध्ये एका नव्या कार्यक्रमाची सुरुवात केली – “आकाशवाणी मैत्री चॅनल” आता लोकांना असे वाटेल की, राष्ट्रपतींनी आता काय रेडियोच्या चॅनेलच उद्घाटन करावे का? मात्र, हे सामान्य रेडियोचे चॅनेल नाही. एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या शेजारी बांगलादेश आहे. बांगलादेश आणि पश्चिमबंगाल आज एकाच सांस्कृतिक परंपरेने जोडलेले आहे, हे आपल्याला माहिती आहे. इकडे आकाशवाणी मैत्री तर तिकडे “बांगलादेश बेतार! ते आपापसात संपर्क करतील आणि कल्पनांची देवाणघेवाण करतील. दोन्हीकडचे बांगलाभाषी लोक आकाशवाणीचा आनंद घेतील. ‘लोकांचा लोकांशी संपर्क’ ह्याबाबत आकाशवाणीचे मोठे योगदान आहे. राष्ट्रपतींनी हे चॅनलचे उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर राहून काम केले, त्याबद्दल बांगलादेशचे आभार! मी आकाशवाणीच्या सर्व मित्रांनाही शुभेच्छा देतो की, परराष्ट्र धोरणातही ते आपले योगदान देत आहेत.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण माझ्याकडे भले पंतप्रधान पदाची धुरा सोपवली मात्र, शेवटी मी आपल्यासारखाच एक माणूस आहे. कधी कधी भावूक घटना मला जास्तच स्पर्शून जातात. अशा काही भावूक घटना नवीन शक्तिही देतात, प्रेरणाही देतात आणि यातून भारतीय लोकांसाठी काही ना काही करण्याची मलाही प्रेरणा मिळते. काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळाले. ते पत्र माझ्या मनाला स्पर्शून गेले. एक 84 वर्षाची आई-जी निवृत्त शिक्षक आहे – त्यांनी मला पत्र लिहिले. माझे नाव घोषित करु नये, असे जरी मला सांगितले असले तरी त्यांचे नाव सांगावे, असे मनाला वाटत आहे. चिठ्ठीत त्यांनी असे म्हटलेय की, गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन आपण केले, त्याचवेळी अनुदान सोडून दिले. नंतर मी हे विसरुन गेले. मात्र, काही दिवसांपूर्वी आपला कोणी एक माणूस आला आणि त्याने एक पत्र दिले. त्यात Give it up साठी मला धन्यवाद दिले. माझ्यासाठी भारताच्या पंतप्रधानांचे हे पत्र, पद्मश्रीपेक्षा कमी नाही.
देशवासीयांनो, ज्यांनी स्वयंपाकाच्या गॅसवरची सबसिडी सोडून दिली, त्यांना एक पत्र द्यावे, याचा प्रयत्न केला. कोणी ना कोणी माझा प्रतिनिधी ते पत्र देईल. एक कोटीपेक्षा अधिक लोकांना पत्र द्यायचा माझा प्रयत्न आहे. त्या योजनेतूनच ते पत्र त्या आईला मिळाले. त्यांनी मला लिहिलेय की, तुम्ही चांगले काम करत आहात. गरीब मातांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करायचे आपले अभियान आणि मी एक निवृत्त शिक्षिका, काही वर्षातच माझे वय नव्वद होईल. मी पन्नास हजार रुपयांचे देणगी पाठवत आहे, ज्यातून चुलीच्या धुरातून गरीब मातांची सुटका होईल, त्यासाठी ते उपयोगात आणावे. आपल्याला माहिती आहे की, एका सामान्य शिक्षकांच्या निवृत्ती वेतनातून उदरनिर्वाह करणारी एक आई, जेव्हा 50 हजार रुपये गरीब मातांच्या गॅस जोडणीसाठी देते. प्रश्न पन्नास हजार रुपयांचा नाही. प्रश्न त्या मातेच्या भावनेचा आहे. अशा कोटी कोटी माता-भगिनींचे हे आशिर्वादच आहेत, ज्यातून माझा देशाच्या भविष्यावरचा विश्वास दृढ होत जातो. त्यांनी ही चिठ्ठी मला पंतप्रधान या नात्याने लिहिली नाही तर साधेसुधे पत्र लिहिले – मोदी भैय्या! अशा मातेला मी प्रणाम करतो. अशा कोटी कोटी मातांनाही माझा प्रणाम! की जे स्वत: श्रम करुन इतरांचे भले करण्यासाठी झटतात.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
गेल्या वर्षी दुष्काळामुळे आपण त्रस्त होतो. मात्र, या ऑगस्ट महिन्यात सातत्याने पूरस्थिती उद्भवते आहे. देशाच्या काही भागात वारंवार पूर परिस्थिती आली. राज्य शासनाने, केंद्र शासनाने, स्थानिक स्वराज्य संस्थांनी, सामाजिक संस्थांनी – नागरिकांनी जेवढे सहाय्य करता येईल तेवढे केले. प्रयत्न केले. परंतु, पूरपरिस्थितीच्या बातम्यांमधे काही बातम्या अशा आहेत की त्याचे स्मरण करणे आवश्यक होते. एकतेची ताकद काय असते, बरोबरीने साथीने वाटचाल केली तर किती मोठा परिणाम साधू शकतो, यासाठी हा ऑगस्ट महिना लक्षात राहील. ऑगस्ट 2016 मध्ये राजकीय विरोध असणारे पक्ष, एकमेकांविरुद्ध एकही संधी न दवडणारे पक्ष, या सर्व राजकीय पक्षांनी मिळून जीएसटी विधेयक मंजूर केली. याचे श्रेय सर्व राजकीय पक्षांना जाते आणि सर्व पक्ष मिळून एकत्र वाटचाल करु लागले तर केवढे मोठे काम होते; याचे हे उदाहरण आहे. अशा प्रकारे, काश्मीरमध्ये जे काही झाले, त्या स्थितीच्या संबंधाने, देशाच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे एका स्वरात मुद्दा लावून धरला. जगाला संदेश दिला, फुटीरतावादी दलांनाही संदेश दिला आणि काश्मीरी नागरिकांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या आणि काश्मीरप्रश्नी सर्व पक्षांबरोबर माझी जी चर्चा झाली, त्यातून एक विचार जागृत होत होता. थोडक्यात सांगायचे तर मी सांगेन की एकता आणि ममता या दोन गोष्टी मूलमंत्र होत्या. आपल्या सर्वांचे हे मत आहे, सव्वाशेकोटी देशबांधवांचे हे मत आहे. गावप्रमुखांपासून पंतप्रधानांपर्यंत मत आहे की, काश्मीरमध्ये जर कोणाला प्राणाला मुकावे लागले, मग तो युवक असो किंवा सैनिक, हे नुकसान आपलेच आहे, आपल्या देशाचे आहे. जे लोक या छोट्या छोट्या मुलांना पुढे करुन अशांतता निर्माण करायचा प्रयत्न करतात, पुढे जाऊन त्यांना कधी ना कधी निर्दोष बालकांना याची उत्तरे द्यावी लागतील.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, देश मोठा आहे. विविधतेने नटलेला आहे. विविधतेने नटलेल्या या देशाला एकतेच्या बंधनात बांधून, नागरिक या नात्याने, समाज या नात्याने, सरकार या नात्याने सर्वांचे हे दायित्व आहे की, एकतेला बळ देणाऱ्या गोष्टींना आपण ताकत देऊ आणि तेव्हाच देशाच भविष्य उज्ज्वल होईल. माझा सव्वाशे कोटी जनतेच्या शक्तिवर माझा पूर्ण विश्वास आहे.
बस, आज इतकेच! खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज सकाळी सकाळी दिल्लीमधील तरुणांबरोबर काही काळ राहण्याची संधी मला मिळाली आणि मी असे मानतो की येणाऱ्या पुढील दिवसात संपूर्ण देशात खेळाचा रंग, प्रत्येक तरुणाला उत्साह आणि आशेच्या रंगात रंगवून टाकेल. आपल्या सर्वांना माहित आहे की काही दिवसातच संपूर्ण जगात सगळयात मोठा खेळाचा महाकुंभ होणार आहे. “रिओ” हे नाव आमच्या कानात वारंवार गुंजणार आहे. संपूर्ण दुनिया खेळणार आहे, या दुनियेतील प्रत्येक देश आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवत असेल, तुम्हीही लक्ष ठेवाल. आपल्या आशा अपेक्षा खूपच असतील, पंरतु रिओमध्ये जे खेळायला गेले आहेत, त्या खेळाडूंचा आत्मविश्वास उत्तुंग करण्याचे काम देशामधील सव्वाशे कोटी जनतेचे आहे. आज दिल्लीमध्ये भारत सरकारने “रन फॉर रिओ”, “खेळा आणि जगा”, “खेळा आणि आनंदी व्हा” याचे आयोजन केले आहे. आपणही येत्या काही दिवसात जिथे असू तिथून, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काही ना काहीतरी केले पाहिजे. ऑलिम्पिकपर्यंत जो खेळाडू पोहचतो, तो कठोर परिश्रम केल्यानंतरच तिथे पोहचतो. ही एक प्रकारची कठोर तपश्चर्या आहे. खाण्याची कितीही आवड असो, पण त्याला सर्व सोडावे लागते. थंडीमध्ये झोप घेण्याची इच्छा असेल, तरीही अंथरुण सोडून धावावे लागते आणि नुसते खेळाडू नाही, त्यांचे आई-वडिल देखील. त्यांच्या मनशक्तीमुळेच मुलांना पाठबळ मिळते त्यासाठी ते आपली ताकद खर्च करतात. खेळाडू एका रात्रीत बनत नाहीत, एका मोठया तपश्चर्येनंतर बनतात. जिंकणे आणि हरणे महत्वपूर्ण आहेत, परंतु त्याचबरोबर त्या खेळापर्यंत पोहचणे, हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्चपूर्ण आहे, आणि म्हणून आपण सर्व देशवासी रिओ ऑलम्पिकसाठी गेलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा, शुभकामना देऊ. आपल्यातर्फे मी देखील हे काम करायला तयार आहे, या खेळाडूंना तुमचा संदेश पोहचवण्यासाठी हा देशाचा पंतप्रधान पोस्टमन बनायला तयार आहे.
तुम्ही मला “नरेंद्र मोदी ॲप”वर खेळाडूंची नावे शुभेच्छा पाठवा, मी आपल्या शुभेच्छा त्यांना पोहचवीन मी पण सव्वाशे कोटी नागरिकांप्रमाणे एक नागरिक आहे, देशवासी आहे, एक नागरिक या नात्याने या खेळांडूचे मनोधैर्य उत्साह वाढविण्यासाठी आपल्याबरोबर आहे. चला, आपण सर्व येणाऱ्या दिवसात एकेका खेळाडूचा प्रत्येक खेळाडूचा गौरव करु शकतो, त्यांच्या प्रयत्नांना दाद देवू शकतो. ते अवश्य करुया. आज मी हे रिओ ऑलिम्पिकबद्दल बोलत आहे, एक कविता प्रेमी – पंजाब केंद्रीय विश्वविद्यालयातील विद्यार्थी सुरज प्रकाश उपाध्याय याने एक कविता पाठवली आहे. आपल्यापैकी अनेकजण कवि असतील, ज्यांनी कविता लिहिलेल्या असतील, कदाचित कविता लिहितीलही, काही लोक त्या स्वरबध्दही करतील, प्रत्येक भाषेत करतील, परंतु सुरजने जी कविता मला पाठवली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे.
“खेळाची ललकार सुरु झाली,
खेळाची ललकार सुरु झाली, स्पर्धेलाही बहार आली,
खेळाच्या या महाकुंभामध्ये, रिओच्या तालामध्ये,
खेळाच्या या महाकुंभात, रिओच्या तालामध्ये,
भारताची अशी सुरुवात होऊ दे,
भारताची अशी सुरुवात होऊ दे, सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची बरसात होऊ दे.
भारताची अशी सुरुवात होऊ दे, सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची बरसात होऊ दे
आता आम्हाला संधी आहे, तशीच आमची तयारी असू दे.
आमची दृष्टी, सुवर्ण पदकावर असू दे, मात्र पदक हुकले तरी
पदक हुकले तरी तुम्ही निराश होऊ नका.
कोटयावधी हृदयाची तुम्ही “शान” आहात, आपल्या खेळाची देखील “जान” आहात.
असे किर्तीमान व्हा, रिओमध्ये आपला ध्वज फडकवा,
रिओ मध्ये ध्वज फडकवा !
सूरजजी, आपल्या भावना मी आपल्या सर्व खेळाडूंना अर्पित करतो आणि माझ्यातर्फे, सव्वाशे कोटी देशवासियांतर्फे रिओमध्ये हिंदुस्थानचा झेंडा फडकवण्यासाठी खूप खूप शुभकामना, देत आहे.
अंकित या तरुणाने मला माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करुन दिले आहे. संपूर्ण देशाने आणि जगाने त्यांना श्रध्दांजली वाहिली, परंतु जेव्हा जेव्हा अब्दुल कलामजींचे नाव येते तेव्हा सायन्स, टेक्नॉलॉजी, मिसाईल हे शब्द येतात आणि भावी समर्थ भारताचे चित्र डोळयासमोर येते आणि म्हणून अंकित यांनी लिहिले आहे की तुमचे सरकार अब्दुल कलामजीचे स्वप्न साकार करण्यासाठी काय करत आहे ? तुमचे म्हणणे बरोबर आहे अंकीतजी ! येणारे युग हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे आणि टेक्नॉलॉजी सगळयात जास्त चंचल आहे. दररोज टेक्नॉलॉजी बदलत आहे, प्रत्येक दिवशी ती नवे रुप धारण करते, प्रत्येक दिवशी नवीन प्रभाव, सामर्थ्य निर्माण करत आहे, ती सतत बदलत राहाते. आपण टेक्नॉलॉजीला बंदिस्त करु शकत नाही, पकडू शकत नाही. तुम्ही तिला पकडायला जाल, तर दुसरीकडे दूर कुठेतरी वेगळया रंग रुपात ती सजलेली दिसते. आणि आम्हाला तिच्याबरोबर जायचे आहे किंवा तिच्याही पुढे जायचे असेल, तर आपल्याला रिसर्च म्हणजे संशोधन आणि इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती केली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी टेक्नॉलॉजीचा प्राण आहेत आत्मा आहेत. जर संशोधन, नवनिर्मिती नसतील तर ज्याप्रमाणे साचलेले पाणी दुर्गंधी निर्माण करते त्याचप्रमाणे तंत्रज्ञान देखील एक ओझे बनून राहाते. जर आपण संशोधन, नवनिर्मितीशिवाय जुन्या तंत्रज्ञानाच्या भरवशावर जगत राहिलो तर आपण या दुनियेत, बदलत्या युगात कालबाहय होऊन जाऊ यासाठी नवीन पिढीमध्ये विज्ञानाचे आकर्षण, टेक्नॉलॉजीसाठी संशोधन आणि नवनिर्मिती याची गोडी निर्माण करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत आणि म्हणून मी म्हणतो let us aim to innovate म्हणजे नवनिर्मितीचे ध्येय ठेवा. आणि मी let us aim to innovate म्हणतो, तर माझ्या AIM चा अर्थ आहे. ‘Atal Innovation Mission’ला प्राधान्य दिले जात आहे, प्रोत्साहन दिले जात आहे. अशीही एक इच्छा आहे की AIM तर्फे ‘Atal Innovation Mission’ तर्फे संपूर्ण देशात एक “इको-सिस्टिम” तयार झाली पाहिजे, संशोधन प्रयोगशीलता, उद्योजकता असे चक्र सुरु व्हायला हवे. त्यामुळे नवीन रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल, नवीन रोजगार निर्माण होतील. आपल्या देशामधील मुलांना याबरोबर जोडण्याची आवश्यकता आहे, आणि यासाठी भारत सरकारने “अटल टिंकरिंग लॅब्ज (‘Atal Tinkering Labs) चे आयोजन केले आहे. ज्या ज्या शाळेत अशी “टिंकरिंग लॅब निर्माण होईल. त्यांना 10 लाख रुपये दिले जातील आणि पाच वर्षापर्यंत त्याची काळजी घेण्याकरिता म्हणून 10 लाख रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे नवनिर्मितीबरोबर इनक्युबेशन सेंटर म्हणजे नवनिर्मिती करणाऱ्यांना मदत करणारी संस्था हयांचा सगळयांशी सहज संबंध येतो. आमच्याकडे सशक्त आणि समृध्द इनक्युबेशन सेंटर म्हणजे नवनिर्मिती करणाऱ्यांना मदत करणारी संस्था असेल तर नवनिर्मितीसाठी Start up साठी, प्रयोग करण्यासाठी त्याला उत्तम स्थितीत आणण्यासाठी एक व्यवस्था तयार होईल. नवीन इनक्युबेशन सेंटर निर्माण करण्याची पण आवश्यकता आहे आणि जुन्या सेंटर्सनाही बळ देण्याची आवश्यकता आहे. आणि मी त्या Atal Incubation Centre विषयी सांगतो आहे त्यासाठी सुध्दा 10 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देण्या सरकारचा विचार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारत अनेक समस्यांशी झुंज देत आहे. रोजच्या जीवनात आपल्याला समस्या, अडचणी दिसून येतात. आता आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित उत्तर शोधावी लागतील.
आम्ही “अटल ग्रॅन्ड चॅलेजेस”तर्फे देशाच्या तरुण पिढीला आवाहन केले आहे की आपल्याला समस्या, अडचण दिसली, तर त्यासाठी टेक्नॉलॉजीच्या मार्गाने त्याचा शोध घ्या, संशोधन करा, नवनिर्मिती करा आणि आमच्याकडे घेऊन या. भारत सरकार समस्यांवर, अडचणीवर मात करणाऱ्या संशोधन केलेल्या टेक्नॉलॉजीला विशेष पुरस्कार देऊन तुम्हाला प्रोत्साहन देऊ पहात आहे आणि मला आनंद होत आहे की, लोकांना याची आवड आहे हे आम्हाला कळले ज्यावेळी आम्ही Tinkering Labs बद्दल सांगितले. जवळजवळ 13 हजारहून अधिक शाळांनी अर्ज पाठवले आणि जेव्हा Incubation Centre बद्दल सांगितले तेव्हा शैक्षणिक, अशैक्षणिक 4 हजाराहून जास्त संस्था Incubation Centre साठी पुढे आल्या. मला विश्वास आहे की अब्दुल कलामजीना खरी श्रध्दांजली संशोधन, नवनिर्मिती हीच असेल की ज्यामुळे रोजचे जीवन, त्यातील समस्यांचे निराकरण आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी हाच समस्यांतून मुक्त होण्याचा मला विश्वास आहे की अब्दुल कलामजीना खरी श्रध्दांजली संशोधन, नवनिर्मिती हीच असेल की ज्यामुळे रोजचे जीवन, त्यातील समस्यांचे निराकरण आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी हाच समस्यांतून मुक्त होण्याचा सरळ मार्ग आहे. त्यावर आमची नवीन पिढी काम करेल, त्यांचे योगदान 21 या शतकात आधुनिक भारतासाठी महत्त्वाचे असेल आणि हीच अब्दुल कलामजींना खरी श्रध्दांजली ठरेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसापूर्वी आम्ही दुष्काळाची चिंता करत होतो या दिवसात पावसाचा आनंद उपभोगत आहोत, तर पुरांच्या बातम्याही येत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुरग्रस्त पिडीतांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून खूप काम करत आहेत.
पावसामुळे काही अडचणी असून देखील प्रत्येकाचे मन प्रसन्न होते, मानवी मन आनंदित होते, कारण आमच्या संपूर्ण आर्थिक उलाढालीचा केंद्र बिंदू पाऊस आहे आणि त्यावर चालणारी शेती आहे.
कधी कधी असे आजार येतात की आम्हाला जन्मभर पश्चाताप करावा लागतो. पण जर आपण जागरुक राहिलो, सतर्क राहिलो, प्रयत्नशील राहिलो तर त्यातून वाचण्याचे मार्ग सोपे होतात. आता डेंग्युचे उदाहरण घेऊ. डेंग्यूपासून बचाव करता येतो. थोडे स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले, थोडे जागरुक, सतर्क राहिलो आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि आता असा विचार करु नका की, गरीबांच्या वस्तीतच आजार होतात. डेंग्यु सुखी-समाधानी भागात पहिल्यांदा येतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण टी.व्ही.वर जाहिराती बघता, परंतु आपण कधी कधी कृतीच्या संदर्भात थोडे उदासिन असतो. सरकार, हॉस्पिटल, डॉक्टर, हे तर आपले काम करतीलच, परंतु आपण पण आपल्या घरात, आपल्या विभागात, आपल्या परिवारात डेंग्युचा प्रवेश होऊ नये, यासाठी, पाण्यापासून कोणताही आजार न होण्यासाठी, जागरुक राहिले पाहिजे, अशी मी आपल्याला विनंती करतो.
आणखी एका संकटाकडे प्रिय देशवासीयांनो, आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो. आज जीवन खूप वेगवान झाले आहे, सतत धावपळीचे झाल्यामुळे आम्हाला आमच्या बद्दल, स्वत:बद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. आजारी पडलो, तर वाटते लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यासाठी ॲन्टीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक घेतली जातात. तुम्हाला त्यामुळे तात्पुरते बरे वाटेल, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय येता-जाता ॲन्टीबायोटिक घेण्याची सवय खूप गंभीर संकट निर्माण करु शकेल, अशी ॲन्टीबायोटिक घेणे बंद करा. डॉक्टर जोपर्यंत लिहून देत नाहीत तोपर्यंत ती घेणे टाळा. आपण शॉर्टकटच्या मार्गाने चालू नये. कारण ह्यामुळे नवीन संकटे निर्माण होतात. कोणतीही वाट्टेल ती ॲन्टीबायोटिक वापरल्यावर रुग्णाला थोडा, क्षणिक फायदा होईल, परंतु आपल्या शरीराला ह्या औषधाची सवय लागेल आणि मग शरीरामधील जीवाणूंना ह्याची सवय लागून ती औषधे पुढे निरुपयोगी ठरतील, बेकार होतील आणि मग त्याच्या विरुद्ध परत संघर्ष करावा लागेल, नवीन आजारांना तोंड द्यावे लागेल. मग त्यासाठी नवीन औषधे बनवणे, शोध लावणे, ह्यामध्ये अनेक वर्षे जातील आणि तोपर्यंत हे नवीन आजार नवीन अडचणी निर्माण करतील ह्यासाठी जागरुक रहाणे आवश्यक आहे.
डॉक्टरने सांगितले पंधरा गोळ्या घ्या, पाच दिवसात घ्यायच्या आहेत, मी आग्रहाने सांगतो डॉक्टरांनी जितके दिवस गोळ्या घ्यायला सांगितल्या तितके दिवस घ्या. त्या गोळ्यांचा कोर्स पूरा करा. अर्धवट सोडला तरी सुद्धा त्या जीवाणूंना फायदा होईल, आवश्यकतेपेक्षा जास्त घेतला तरीसुद्धा जीवाणूंना फायदा होईल म्हणून जितक्या दिवसात गोळ्या घेण्याचा कोर्स ठरला आहे. तो पुरा करणे जरुरी आहे, तब्येत ठीक झाली, तरी पण तो कोर्स पूर्ण करणे जरुरीचे आहे. आता तब्येत ठीक झाली आता गोळ्यांची गरज नाही, जर आपण असे केले, तर जीवाणू ताकदवान होतील. जे जीवाणू टी.बी. आणि मलेरिया पसरवतात, त्यांच्यामध्ये वेगाने असे काही बदल होत आहेत की, त्यावर औषधांचा परिणामच होत नाही. डॉक्टरी भाषेत त्याला ॲन्टीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात, ॲन्टीबायोटिकचा कसा उपयोग करायचा, त्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सरकार ॲन्टीबायोटिक रेझिस्टन्स रोखण्यासाठी तयार आहे आणि आपण बघितले असेल, हल्ली ॲन्टीबायोटिक जी औषधे विकली जातात, त्याच्यावर जो पत्ता असतो, त्यावर एक लाल रेघेने आपल्याला सावध केले जाते, जागरुक केले जाते, त्यावर तुम्ही जरुर लक्ष द्या.
आता आरोग्याचा विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात गर्भावस्थेत ज्या माता आहेत त्यांच्या आयुष्याची चिंता कधी-कधी खूप सतावते. आपल्या देशात दरवर्षी जवळ जवळ तीन कोटी महिला गर्भवती होतात, परंतु काही महिला प्रसुतीच्या वेळी मरण पावतात, कधी आईचा मृत्यू होतो, तर कधी बालकाचा आणि काही वेळेला आई आणि बालक दोघेही दगावतात.
मागील दशकात मातेच्या अकस्मात मृत्युदरात घट झाली आहे, परंतु आजही खूप मोठ्या प्रमाणात गर्भवती मातांचा जीव वाचू शकत नाही. गर्भावस्था असताना रक्ताचे प्रमाण कमी असणे, प्रसुतीच्या वेळी होणारे संक्रमण, उच्च रक्तदाब, न जाणो कोणकोणत्या अडचणी त्यांचे जीवन उध्वस्त करतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवून भारत सरकारने नवीन अभियान सुरु केले आहे. त्याचे नाव आहे “प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान”. ह्या अभियानाद्वारे दर महिन्याच्या नऊ तारखेला गर्भवती महिलेची सरकारी आरोग्य केंद्रात नि:शुल्क तपासणी केली जाईल. एकही पैसा खर्च न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये नऊ तारखेला हे काम केले जाईल. मी प्रत्येक गरीब कुटुंबाला आग्रह करत आहे की सर्व गर्भवती मातांनी नऊ तारखेला या सेवेचा लाभ घ्यावा, त्यामुळे नवव्या महिन्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही अडचण आली, तर सुरुवातीलाच त्यावर उपाय करता येईल. आई आणि बालक या दोघांचे आयुष्य वाचण्यासाठी मी स्त्री रोग तज्ञांना आवाहन केले की तुम्ही 9 तारखेला गरीब मातांसाठी मोफत सेवा देऊ शकत नाही का? माझे डॉक्टर बंधू-भगिनी एका वर्षातले बारा दिवस गरीबांसाठी देऊ शकत नाहीत का? हजारो असे डॉक्टर्स आहेत, त्यांनी माझ्या सांगण्याला, आवाहनाला मान देऊन काम पुढे नेले तशी पत्रे लिहिली. हजारो असे डॉक्टर्स असे आहेत की, ज्यांनी माझे म्हणणे मानले. परंतु भारत इतका मोठा देश आहे, लाखो डॉक्टर या अभियानात जोडले गेले पाहिजेत, मला विश्वास आहे, जरुर जोडले जातील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण यांची चिंता संपूर्ण जग आज करत आहे. देशात आणि जगात सामुहिक स्वरुपात याची चर्चा होत आहे. भारताने फार पुर्वीपासून ह्या गोष्टीला महत्त्व दिले आहे. कुरुक्षेत्रातील युद्धात भगवान श्रीकृष्ण वृक्षासंबंधी चर्चा करतात, युद्धाच्या मैदानात देखील झाडांबद्दल चर्चा, चिंतन करणे याचा अर्थ ह्याचे महात्म्य किती मोठे आहे, ह्याचा आपण अंदाज करु शकता. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
‘अश्वत्थ: सर्व वृक्षाणां’ म्हणजे सर्व वृक्षात मी पिंपळ आहे. शुक्राचार्य नीतीत म्हटले आहे – ‘नास्ति मूलं अनौषधं’- अशी कोणतीही वनस्पती नाही, ज्यात औषधी गुण नाही. महाभारतातील अनुशासन पर्वात – त्यामध्ये तर मोठी सविस्तर चर्चा केली आहे आणि महाभारतातील अनुशासन पर्वात सांगितले गेले आहे – ‘जो वृक्ष लावतो, त्याच्यासाठी वृक्ष अपत्याप्रमाणे असतो, ह्यात संशय नाही. जो वृक्षाचे दान करतो, त्याला वृक्ष अपत्याप्रमाणे परलोकात देखील सांभाळतात’. ह्यासाठी आपल्या कल्याणाची इच्छा असलेल्या माता-पित्यांनी चांगले वृक्ष लावावे आणि त्यांचा अपत्याप्रमाणे सांभाळ करावा. आमच्या शास्त्रात, गीता असो, शुक्राचार्य नीती असो, महाभारतातील अनुशासन पर्व असो हेच सांगितलेले आहे. परंतु आजच्या पिढीतही असे काही लोक असतात जे या आदर्शांचे पालन करतात, आचरणात आणतात. काही दिवसापूर्वी पुण्यामधील एक मुलगी सोनलचे उदाहरण माझ्या लक्षात आले आणि ते उदाहरण माझ्या मनाला स्पर्श करुन गेले. महाभारतातील अनुशासन पर्वात सांगितले आहे की, वृक्ष परलोकात देखील मुलाची जबाबदारी पार पाडतात. सोनलने जणू फक्त आपल्या आई-वडिलांची नाही, तर संपूर्ण समाजाची इच्छा पूर्ण करण्याचा जणू विडा उचलला आहे.
महाराष्ट्रातील पुण्यातील जुन्नर तालुक्यात नारायणपूर गावातील एक शेतकरी खंडू मारुती महात्रे ह्यांनी आपली नात सोनलचे लग्न वेगळ्या प्रेरणादायी प्रकाराने केले. महात्रेजींनी काय केले, सोनलच्या लग्नात आलेले सर्व नातेवाईक, पाहुणे आले होते, ह्या सर्वांना ‘केसर आंब्याचं’ रोपटं भेटीच्या स्वरुपात दिले आणि सोशल मिडियावर त्याचा फोटो पाहिल्यावर, मी चकित झालो, लग्नात वऱ्हाडी दिसत नसून झाडेच झाडे दिसत होती. मनाला स्पर्श करणारे दृश्य त्या फोटोत होते. सोनल स्वत: शेतीविषयक पदवीधर आहे, ही कल्पना तिला सुचली आणि लग्नात आंब्यांची रोपं भेट देणे, निसर्गा विषयीचे प्रेम यामध्ये उत्तमपणे प्रकट झाले आहे.
सोनलचे लग्न जणू निसर्गप्रेमाची अमरगाथा बनलंय. मी सोनल आणि म्हात्रे यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांचे अभिनंदन करतो आणि असे प्रयोग अनेकजण करतात. मला आठवतय मी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा अंबामातेच्या मंदिरात भाद्रपद महिन्यात मोठया प्रमाणात पदयात्री येतात, तेव्हा एका समाजसेवी संघटनेने ठरवले की जे मंदिरात येतील त्यांना प्रसाद म्हणून एक रोप दयायचे आणि सांगायचे हा माताजीचा प्रसाद आहे, या झाडालाआपल्या गावात घरी गेल्यावर लावा. वाढवा, त्याची काळजी घ्या माता तुम्हाला आशिर्वाद देईल, लाखे पदयात्री आले, लाखो झाडे वाटली गेली त्यावर्षी ! मंदिरांनी सुध्दा वर्षा ऋतूत रोपे वाटण्याची परंपरा सुरु करावी. वृक्षारोपण हे सहजपणे जनआंदोलन बनू शकते.
मी शेतकरी बंधूना सतत सांगतो की, आपण आपल्या शेताच्या किनाऱ्यावर बांध घातल्यामुळे जमिनीचे नुकसान करतो, त्या जागी बांधाच्या ऐवजी आपण टिम्बर म्हणजे लाकडाची शेती करु शकतो का ? आज भारतात घर बनवण्यासाठी, लाकडी सामान बनवण्यासाठी कित्येक करोडो रुपयाचे इमारती, लाकूड परदेशातून आणावे लागते. जर आपण आपल्या शेताभोवती, कडेला असे वृक्ष लावले जे लाकडी सामान आणि घराच्या कामासाठी उपयोगी होतील, पंधरा-वीस वर्षानंतर सरकारच्या परवानगीने त्याला कापून विकूही शकतो, आपल्याला उत्पन्नाचे नवीन साधन यामुळे मिळू शकते, आणि भारताला लाकूड आयात करण्यापासून आपण वाचवू शकता. गेल्या काही दिवसात अनेक राज्यात वातावरणाचा ऋतुमानाचा उपयोग करुन खूप मोहिमा राबवल्या गेल्या, भारत सरकारने एक CAMPA (कॅम्पा) कायदा नुकताच संमत केला आहे, जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वृक्षारोपणासाठी राज्यांकडे जाणार आहे. मला सांगितले गेले की महाराष्ट्र सरकारने एक जुलैला संपूर्ण राज्यात सव्वा दोन कोटी झाडे लावली आणि पुढच्यावर्षी तीन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. सरकारने एक मोठे जन आंदोलन उभे केले आहे. राजस्थान, मरु-भूमि मोठा वन-महोत्सव केला आणि पंचवीस लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानात पंचवीस लाख झाडे ही लहान गोष्ट नाही. ज्यांना राजस्थानची भूमी माहीत आहे, त्यांना हे कळू शकते की, किती मोठा विडा उचलला आहे त्यांनी ! आंध्रप्रदेशानेही 2029 पर्यंत 50 टक्के हरितक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जे ‘Green India Mission’ सुरु केले आहे “हरित भारत संकल्प” सुरु केला आहे त्यात रेल्वेने देखील हे काम सुरु केले आहे. गुजरातमध्येसुध्दा वन महोत्सवाची उज्वल परंपरा आहे. यावर्षी गुजरातमध्ये “आम्रवन, एकता वन, शहीद वन असे अनेक प्रकल्प वनमहोत्सवाअंतर्गंत हाती घेतले आणि कोटयावधी वृक्ष लावण्याचे अभियान चालवले आहे. मी सर्वच राज्यांचा उल्लेख करु शकत नाही पण सर्वजण प्रशंसेस पात्र आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी मला दक्षिण आफ्रिकेला जाण्याची संधी मिळाली. हा माझा तिथला पहिला प्रवास होता. जेव्हा परदेश दौरा असतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय धोरण व्यापाराबद्दल बोलणी होतात सुरक्षेसंबंधी चर्चा होते, काही सामंजस्य करार हे तर होणारच असतात. परंतु माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास जणू एक प्रकारे तीर्थयात्राच होती. दक्षिण आफ्रिका म्हटले की महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांची आठवण होणे स्वाभाविकच आहे. जगात अहिंसा, प्रेम, क्षमा हे शब्द कानावर पडतात तेव्हा गांधी आणि मंडेला हयांचे चेहरे आमच्या समोर येतात. माझ्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासा दरम्यान फिनिक्स सेटलमेंट येथे गेलो होतो, महात्मा गांधीचे निवासस्थान सर्वोदयच्या रुपात ओळखले जाते. महात्मा गांधींनी ज्या गाडीने प्रवास केला होता. जो प्रवास म्हणजे मोहनदास ते महात्मा गांधी अशा रुपांतराचे बीजारोपण होते. त्या रेल्वे प्रवासाचे सद्भाग्य मला प्राप्त झाले. परंतु मी जी गोष्ट सांगू इच्छितो की मला यावेळी अशा महान व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली ज्यांनी समानता, समान संधी यासाठी आले तारुण्य समाजासाठी खर्च होते नेल्सन मंडेलांच्या खांदाला खांदा कथाडा, लालू चिबा, जॉर्ज बेजोस, रोनी कासरिल्स ह्या महान व्यक्तींचे दर्शन घेण्याचा योग आला. मूळ भारतीय परंतु जिथे गेले, तिथलेच झाले. ज्यांच्यात रहात होते, त्यांच्यासाठी प्राणांचे मोल द्यायला तयार झाले. किती मोठी ताकद! जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांचे तुरुंगातील अनुभव ऐकत होतो, तेव्हा कुणाबद्दल कटुता नाही, द्वेष नाही, त्यांच्या चेहऱ्यावर इतकी मोठी तपश्चर्या केल्यानंतरही देणे-घेणे-बनणे कोणताही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. एक प्रकारे कर्तव्यभाव, गीतेमध्ये कर्तव्य लक्षण दाखवले आहे. तो भाव साक्षात रुपात त्यांच्यामध्ये दिसत होता. त्यांची भेट सदैव माझ्या स्मरणात राहील. ‘समानता आणि समान संधी’ कोणताही समाज आणि सरकार यांच्यासाठी इतका मोठा मंत्र नाही. समभाव आणि ममभाव हे दोन मार्ग आपल्याला उज्वल भवितव्याकडे घेऊन जातात. आपण सर्व चांगल्या आयुष्याची आशा करतो, मुलांचे चांगले भविष्य इच्छितो, प्रत्येकाच्या गरजा भिन्नभिन्न असतात, अग्रक्रम वेगवेगळे असतात, परंतु रस्ता एकच असतो आणि तो आहे विकासाचा, समानतेचा, समान संधीचा, समभाव, ममभाव याचा! या, आपण ह्या भारतीयांबद्दल अभिमान बाळगू या, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत जीवनाचा हा मूलमंत्र आपल्या जगण्यातून दाखवला.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी शिल्पी वर्माचा आभारी आहे. त्यांनी मला संदेश दिला आहे आणि त्यांनी व्यक्त केलेली चिंता स्वाभाविक आहे. त्यांनी मला एका घटनेची माहिती दिली.
“पंतप्रधानजी, मी बंगलूरुहून शिल्पी वर्मा बोलत आहे. मी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता की, एका महिलेने फसवून आणि खोट्या ई-मेलमुळे अकरा लाख रुपये गमावले आणि आत्महत्या केली. एक महिला म्हणून मला ह्याचे फार दु:ख झाले. मला याबाबत तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की, आपल्या मोबाईलवर, ई-मेलवर आपल्याला मोह पाडणाऱ्या गोष्टी कळतात, तर मोह पाडणारे संदेश येतात की, तुम्हाला इतक्या रकमेचे बक्षीस लागले आहे, तुम्ही इतके पैसे द्या आणि इतके रुपये घेऊन जा. काही लोक मोहात पडून तर, काही लोभाने फसवले जातात. हे तंत्रज्ञानाद्वारे फसवणुकीचे प्रकार जगभर पसरत आहेत. तंत्रज्ञानाचे अर्थव्यवस्थेत फार मोठे योगदान आहे, तेव्हा त्याचे दुरुपयोग करणारेही या मैदानात उतरले आहेत. एक निवृत्त व्यक्ती, ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे होते आणि घरपण बांधायचे होते. एके दिवशी त्याला एसएमएस आला की, परदेशातून त्यांच्यासाठी एक किमती भेटवस्तू आली आहे, ती घेण्यासाठी, कस्टम ड्युटीच्या रुपाने 2 लाख रुपये एका बँकेच्या खात्यात भरावे लागतील. ह्या सज्जन माणसाने कोणताही विचार न करता आपली आयुष्यभराची कमाई, आपल्या कष्टाच्या कमाईतले 2 लाख रुपये त्या अनोळखी माणसाला पाठवले, नुसता एसएमएस आल्यावर आणि काही क्षणात त्यांना कळले आपण फसवले गेलो आहोत. आपणही कधीकधी मोहात पडतो. इतक्या आकर्षक पद्धतीने पत्र लिहिले जाते की, आपल्याला वाटते ते खरे पत्र आहे. कुठले तरी खोटे लेटर पॅड बनवून पत्र पाठवले जाते. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर, डेबिट कार्ड नंबर मिळवतात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचे बँकेतले खाते लुटले जाते. ही नव्या पद्धतीची फसवणूक, डिजिटल फसवणूक आहे. मला असे वाटते की, आपण ह्या मोहापासून सावध राहिले पाहिजे, जागरुक राहिले पाहिजे, जर अशी खोटी बातमी आली, तर आपल्या मित्र-मंडळात सांगितली पाहिजे, त्यांना थोडे जागरुक केले पाहिजे. शिल्पी वर्मा यांनी एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. असे अनुभव तुम्हा सर्वांना येत असतील, पण कदाचित तुम्ही इतक्या गंभीरतेने बघत नसाल. परंतु मला वाटते याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या संसदेचे सत्र चालू आहे, त्या संसद सत्राच्या दरम्यान मला अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. आपले खासदार महोदय आपआपल्या विभागातून लोकांना आणतात, भेटवतात, आपल्या विषयी ते सांगतात, आपल्या अडचणी सांगतात. परंतु मला या दिवसात एक सुखद अनुभव आला. अलिगडचे काही विद्यार्थी माझ्याकडे आले. मुला-मुलींचा उत्साह बघण्यासारखा होता, स्वत: बरोबर एक मोठा अल्बम घेऊन आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. अलिगडचे खासदार त्यांना घेऊन आले होते. त्यांनी मला काही फोटो दाखवले. त्यांनी अलिगड रेल्वे स्टेशनचे सुशोभिकरण केले आहे. स्टेशनवर कलात्मक चित्रे काढली आहेत, रंगवली आहेत. इतकेच नव्हे गावात ज्या प्लॅस्टीकच्या बाटल्या, तेलाचे डबे जे कचऱ्यात सापडतात त्यांना शोधून-शोधून एकत्र केले आणि त्यात माती भरुन त्यात झाडे लावली आणि बगीचा फुलवला आणि रेल्वे स्टेशनवर प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे ‘व्हर्टीकल गार्डन’ बनवून त्याला वेगळे रुप दिले. तुम्ही अलिगडला जरुर जा आणि हे स्टेशन जरुर बघा. हिंदुस्थानातून कित्येक स्टेशनवरुन माझ्याकडे अनेक बातम्या येत आहेत की, स्थानिक लोकांनी रेल्वे स्टेशनच्या भिंतींवर आपल्या विभागाची ओळख दाखवणारी चित्रे काढली आहेत, एक नवेपणा त्यामध्ये जाणवतो. लोकांच्या सहभागामुळे बदल घडवून आणता येतो, ह्याचे हे उदाहरण आहे. देशात अशाप्रकारे काम करणाऱ्या सर्वांना धन्यवाद, अलिगडच्या माझ्या साथीदारांचे विशेष अभिनंदन.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वर्षाऋतुबरोबर आपल्या देशात सणांचाही ऋतू असतो. मेळे लागतील, मंदिरात, तीर्थक्षेत्रांमध्ये उत्सव साजरे केले जातात. तुम्ही सुद्धा घरात आणि घराबाहेर या उत्सवांशी जोडले जात असाल. रक्षाबंधन आपल्या कडचा विशेष महत्त्वाचा सण आहे. मागील वर्षाप्रमाणे ह्यावर्षीही रक्षाबंधनच्या सणाला आपल्या देशाच्या माता-भगिनींना आपण ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ किंवा ‘जीवन ज्योती विमा योजना’ भेट म्हणून देऊ शकत नाही का? विचार करा, बहिणीला अशी भेट द्या की, ज्यामुळे तिच्या आयुष्याला खरीखुरी सुरक्षितता मिळेल. इतकेच नव्हे तर, आपल्या घरात जेवण बनवणारी महिला असेल, आपल्या घराची साफसफाई करणारी कोणी महिला असेल, गरीब आईची मुलगी असेल, त्यांना या रक्षाबंधनाच्या सणाला ‘सुरक्षा विमा योजना’ किंवा ‘जीवन ज्योती विमा योजना’ आपण भेट देऊ शकता. हीच तर सामाजिक सुरक्षा असून, हाच रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपल्या पैकी खूप लोक असे आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यांनंतर झाला आणि मी या देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याचा जन्म स्वतंत्र हिंदुस्थानात झाला आहे. 8 ऑगस्ट ‘भारत छोडो चळवळीला’ प्रारंभा झाला. हिंद छोडो, भारत छोडो ह्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्याला 70 वर्षे होत आहेत. आपण स्वातंत्र्याचा आनंद, तर घेतच आहोत. स्वतंत्र नागरिक होण्याचा अभिमानही बाळगत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूरांचे स्मरण करण्याची वेळ आहे. हिंद छोडोला 75 वर्षे आणि भारताच्या स्वातंत्र्याची होणारी 70 वर्षे आपल्याला नवीन प्रेरणा देऊ शकतात, नवीन उत्साह, आशा निर्माण करु शकतात, देशासाठी काही तरी करण्याच्या संकल्पासाठी ही संधी असू शकते. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या रंगात रंगून जाईल. चारही बाजूंनी स्वातंत्र्यांचा गंध पुन्हा एकदा जाणवायला लागेल, असे वातावरण आपण सर्वजण निर्माण करु. स्वातंत्र्याचे पर्व हा काही सरकारी कार्यक्रम नाही, तो देशवासीयांचा झाला पाहिजे. दिवाळीप्रमाणे हा आपला उत्सव झाला पाहिजे. मी अशी आशा व्यक्त करतो, आपणही देशभक्तीच्या प्रेरणेशी जोडणारे, काहीतरी चांगले कार्य कराल. त्याचा फोटो ‘नरेंद्र मोदी ॲप’वर जरुर पाठवा, देशात एक वेगळे वातावरण बनवा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन मला देशातील जनतेशी संवाद साधण्याचे सद्भाग्य मिळते. ही एक परंपरा आहे. तुमच्या मनातही काही गोष्टी असतील, तुमची अशी इच्छा असेल, त्या गोष्टी लाल किल्ल्यावरुन प्रखरतेने मांडल्या जाव्यात. मी आपल्याला निमंत्रण देतो. तुमच्या मनात जे विचार येत असतील, आपल्याला वाटत असेल की, आपला प्रतिनिधी या नात्याने, आपल्या प्रधान सेवकाच्या रुपाने मला लाल किल्ल्यावरुन ते सांगितले पाहिजे, तर तुम्ही मला जरुर लिहून पाठवा, काही सुचवा, सल्ला द्या नवीन विचार द्या. मी तुमचे मनोगत, देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माझी अशी ही इच्छा नाही की लाल किल्ल्यावरुन जे बोलले जाईल ते फक्त पंतप्रधानांचे असावे, तर लाल किल्ल्यावरुन जे बोलले जाईल ते सव्वाशे कोटी देशवासीयांच्या मनातले असेल. तुम्ही जरुर मला काही-ना-काही पाठवा. तुम्ही ‘नरेंद्र मोदी ॲप’ वर पाठवू शकता किंवा ‘mygov.in’वर पाठवू शकता. सध्या तंत्रज्ञानाच्या मार्गाने हे इतके सहज आहे की, जे काही पाठवायचे आहे ते थेट माझ्याकडे पाठवू शकता. मी आपल्याला निमंत्रण देतो आहे. चला या, स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या वीरांचे पुण्यस्मरण करुया, भारतासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांना आठवू या आणि देशासाठी काही करण्याचा संकल्प करुन पुढे जाऊ या.
खूप-खूप शुभेच्छा.
खूप-खूप-धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज सकाळी सकाळी दिल्लीमधील तरुणांबरोबर काही काळ राहण्याची संधी मला मिळाली आणि मी असे मानतो की येणाऱ्या पुढील दिवसात संपूर्ण देशात खेळाचा रंग, प्रत्येक तरुणाला उत्साह आणि आशेच्या रंगात रंगवून टाकेल. आपल्या सर्वांना माहित आहे की काही दिवसातच संपूर्ण जगात सगळयात मोठा खेळाचा महाकुंभ होणार आहे. “रिओ” हे नाव आमच्या कानात वारंवार गुंजणार आहे. संपूर्ण दुनिया खेळणार आहे, या दुनियेतील प्रत्येक देश आपल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवत असेल, तुम्हीही लक्ष ठेवाल. आपल्या आशा अपेक्षा खूपच असतील, पंरतु रिओमध्ये जे खेळायला गेले आहेत, त्या खेळाडूंचा आत्मविश्वास उत्तुंग करण्याचे काम देशामधील सव्वाशे कोटी जनतेचे आहे. आज दिल्लीमध्ये भारत सरकारने “रन फॉर रिओ”, “खेळा आणि जगा”, “खेळा आणि आनंदी व्हा” याचे आयोजन केले आहे. आपणही येत्या काही दिवसात जिथे असू तिथून, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी काही ना काहीतरी केले पाहिजे. ऑलिम्पिकपर्यंत जो खेळाडू पोहचतो, तो कठोर परिश्रम केल्यानंतरच तिथे पोहचतो. ही एक प्रकारची कठोर तपश्चर्या आहे. खाण्याची कितीही आवड असो, पण त्याला सर्व सोडावे लागते. थंडीमध्ये झोप घेण्याची इच्छा असेल, तरीही अंथरुण सोडून धावावे लागते आणि नुसते खेळाडू नाही, त्यांचे आई-वडिल देखील. त्यांच्या मनशक्तीमुळेच मुलांना पाठबळ मिळते त्यासाठी ते आपली ताकद खर्च करतात. खेळाडू एका रात्रीत बनत नाहीत, एका मोठया तपश्चर्येनंतर बनतात. जिंकणे आणि हरणे महत्वपूर्ण आहेत, परंतु त्याचबरोबर त्या खेळापर्यंत पोहचणे, हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्चपूर्ण आहे, आणि म्हणून आपण सर्व देशवासी रिओ ऑलम्पिकसाठी गेलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा, शुभकामना देऊ. आपल्यातर्फे मी देखील हे काम करायला तयार आहे, या खेळाडूंना तुमचा संदेश पोहचवण्यासाठी हा देशाचा पंतप्रधान पोस्टमन बनायला तयार आहे.
तुम्ही मला “नरेंद्र मोदी ॲप”वर खेळाडूंची नावे शुभेच्छा पाठवा, मी आपल्या शुभेच्छा त्यांना पोहचवीन मी पण सव्वाशे कोटी नागरिकांप्रमाणे एक नागरिक आहे, देशवासी आहे, एक नागरिक या नात्याने या खेळांडूचे मनोधैर्य उत्साह वाढविण्यासाठी आपल्याबरोबर आहे. चला, आपण सर्व येणाऱ्या दिवसात एकेका खेळाडूचा प्रत्येक खेळाडूचा गौरव करु शकतो, त्यांच्या प्रयत्नांना दाद देवू शकतो. ते अवश्य करुया. आज मी हे रिओ ऑलिम्पिकबद्दल बोलत आहे, एक कविता प्रेमी – पंजाब केंद्रीय विश्वविद्यालयातील विद्यार्थी सुरज प्रकाश उपाध्याय याने एक कविता पाठवली आहे. आपल्यापैकी अनेकजण कवि असतील, ज्यांनी कविता लिहिलेल्या असतील, कदाचित कविता लिहितीलही, काही लोक त्या स्वरबध्दही करतील, प्रत्येक भाषेत करतील, परंतु सुरजने जी कविता मला पाठवली आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे.
“खेळाची ललकार सुरु झाली,
खेळाची ललकार सुरु झाली, स्पर्धेलाही बहार आली,
खेळाच्या या महाकुंभामध्ये, रिओच्या तालामध्ये,
खेळाच्या या महाकुंभात, रिओच्या तालामध्ये,
भारताची अशी सुरुवात होऊ दे,
भारताची अशी सुरुवात होऊ दे, सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची बरसात होऊ दे.
भारताची अशी सुरुवात होऊ दे, सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची बरसात होऊ दे
आता आम्हाला संधी आहे, तशीच आमची तयारी असू दे.
आमची दृष्टी, सुवर्ण पदकावर असू दे, मात्र पदक हुकले तरी
पदक हुकले तरी तुम्ही निराश होऊ नका.
कोटयावधी हृदयाची तुम्ही “शान” आहात, आपल्या खेळाची देखील “जान” आहात.
असे किर्तीमान व्हा, रिओमध्ये आपला ध्वज फडकवा,
रिओ मध्ये ध्वज फडकवा !
सूरजजी, आपल्या भावना मी आपल्या सर्व खेळाडूंना अर्पित करतो आणि माझ्यातर्फे, सव्वाशे कोटी देशवासियांतर्फे रिओमध्ये हिंदुस्थानचा झेंडा फडकवण्यासाठी खूप खूप शुभकामना, देत आहे.
अंकित या तरुणाने मला माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करुन दिले आहे. संपूर्ण देशाने आणि जगाने त्यांना श्रध्दांजली वाहिली, परंतु जेव्हा जेव्हा अब्दुल कलामजींचे नाव येते तेव्हा सायन्स, टेक्नॉलॉजी, मिसाईल हे शब्द येतात आणि भावी समर्थ भारताचे चित्र डोळयासमोर येते आणि म्हणून अंकित यांनी लिहिले आहे की तुमचे सरकार अब्दुल कलामजीचे स्वप्न साकार करण्यासाठी काय करत आहे ? तुमचे म्हणणे बरोबर आहे अंकीतजी ! येणारे युग हे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे आणि टेक्नॉलॉजी सगळयात जास्त चंचल आहे. दररोज टेक्नॉलॉजी बदलत आहे, प्रत्येक दिवशी ती नवे रुप धारण करते, प्रत्येक दिवशी नवीन प्रभाव, सामर्थ्य निर्माण करत आहे, ती सतत बदलत राहाते. आपण टेक्नॉलॉजीला बंदिस्त करु शकत नाही, पकडू शकत नाही. तुम्ही तिला पकडायला जाल, तर दुसरीकडे दूर कुठेतरी वेगळया रंग रुपात ती सजलेली दिसते. आणि आम्हाला तिच्याबरोबर जायचे आहे किंवा तिच्याही पुढे जायचे असेल, तर आपल्याला रिसर्च म्हणजे संशोधन आणि इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती केली पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी टेक्नॉलॉजीचा प्राण आहेत आत्मा आहेत. जर संशोधन, नवनिर्मिती नसतील तर ज्याप्रमाणे साचलेले पाणी दुर्गंधी निर्माण करते त्याचप्रमाणे तंत्रज्ञान देखील एक ओझे बनून राहाते. जर आपण संशोधन, नवनिर्मितीशिवाय जुन्या तंत्रज्ञानाच्या भरवशावर जगत राहिलो तर आपण या दुनियेत, बदलत्या युगात कालबाहय होऊन जाऊ यासाठी नवीन पिढीमध्ये विज्ञानाचे आकर्षण, टेक्नॉलॉजीसाठी संशोधन आणि नवनिर्मिती याची गोडी निर्माण करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत आणि म्हणून मी म्हणतो let us aim to innovate म्हणजे नवनिर्मितीचे ध्येय ठेवा. आणि मी let us aim to innovate म्हणतो, तर माझ्या AIM चा अर्थ आहे. ‘Atal Innovation Mission’ला प्राधान्य दिले जात आहे, प्रोत्साहन दिले जात आहे. अशीही एक इच्छा आहे की AIM तर्फे ‘Atal Innovation Mission’ तर्फे संपूर्ण देशात एक “इको-सिस्टिम” तयार झाली पाहिजे, संशोधन प्रयोगशीलता, उद्योजकता असे चक्र सुरु व्हायला हवे. त्यामुळे नवीन रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल, नवीन रोजगार निर्माण होतील. आपल्या देशामधील मुलांना याबरोबर जोडण्याची आवश्यकता आहे, आणि यासाठी भारत सरकारने “अटल टिंकरिंग लॅब्ज (‘Atal Tinkering Labs) चे आयोजन केले आहे. ज्या ज्या शाळेत अशी “टिंकरिंग लॅब निर्माण होईल. त्यांना 10 लाख रुपये दिले जातील आणि पाच वर्षापर्यंत त्याची काळजी घेण्याकरिता म्हणून 10 लाख रुपये दिले जातील. त्याचप्रमाणे नवनिर्मितीबरोबर इनक्युबेशन सेंटर म्हणजे नवनिर्मिती करणाऱ्यांना मदत करणारी संस्था हयांचा सगळयांशी सहज संबंध येतो. आमच्याकडे सशक्त आणि समृध्द इनक्युबेशन सेंटर म्हणजे नवनिर्मिती करणाऱ्यांना मदत करणारी संस्था असेल तर नवनिर्मितीसाठी Start up साठी, प्रयोग करण्यासाठी त्याला उत्तम स्थितीत आणण्यासाठी एक व्यवस्था तयार होईल. नवीन इनक्युबेशन सेंटर निर्माण करण्याची पण आवश्यकता आहे आणि जुन्या सेंटर्सनाही बळ देण्याची आवश्यकता आहे. आणि मी त्या Atal Incubation Centre विषयी सांगतो आहे त्यासाठी सुध्दा 10 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम देण्या सरकारचा विचार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारत अनेक समस्यांशी झुंज देत आहे. रोजच्या जीवनात आपल्याला समस्या, अडचणी दिसून येतात. आता आपल्याला तंत्रज्ञानावर आधारित उत्तर शोधावी लागतील.
आम्ही “अटल ग्रॅन्ड चॅलेजेस”तर्फे देशाच्या तरुण पिढीला आवाहन केले आहे की आपल्याला समस्या, अडचण दिसली, तर त्यासाठी टेक्नॉलॉजीच्या मार्गाने त्याचा शोध घ्या, संशोधन करा, नवनिर्मिती करा आणि आमच्याकडे घेऊन या. भारत सरकार समस्यांवर, अडचणीवर मात करणाऱ्या संशोधन केलेल्या टेक्नॉलॉजीला विशेष पुरस्कार देऊन तुम्हाला प्रोत्साहन देऊ पहात आहे आणि मला आनंद होत आहे की, लोकांना याची आवड आहे हे आम्हाला कळले ज्यावेळी आम्ही Tinkering Labs बद्दल सांगितले. जवळजवळ 13 हजारहून अधिक शाळांनी अर्ज पाठवले आणि जेव्हा Incubation Centre बद्दल सांगितले तेव्हा शैक्षणिक, अशैक्षणिक 4 हजाराहून जास्त संस्था Incubation Centre साठी पुढे आल्या. मला विश्वास आहे की अब्दुल कलामजीना खरी श्रध्दांजली संशोधन, नवनिर्मिती हीच असेल की ज्यामुळे रोजचे जीवन, त्यातील समस्यांचे निराकरण आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी हाच समस्यांतून मुक्त होण्याचा मला विश्वास आहे की अब्दुल कलामजीना खरी श्रध्दांजली संशोधन, नवनिर्मिती हीच असेल की ज्यामुळे रोजचे जीवन, त्यातील समस्यांचे निराकरण आणि त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी हाच समस्यांतून मुक्त होण्याचा सरळ मार्ग आहे. त्यावर आमची नवीन पिढी काम करेल, त्यांचे योगदान 21 या शतकात आधुनिक भारतासाठी महत्त्वाचे असेल आणि हीच अब्दुल कलामजींना खरी श्रध्दांजली ठरेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसापूर्वी आम्ही दुष्काळाची चिंता करत होतो या दिवसात पावसाचा आनंद उपभोगत आहोत, तर पुरांच्या बातम्याही येत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार पुरग्रस्त पिडीतांच्या मदतीसाठी खांद्याला खांदा लावून खूप काम करत आहेत.
पावसामुळे काही अडचणी असून देखील प्रत्येकाचे मन प्रसन्न होते, मानवी मन आनंदित होते, कारण आमच्या संपूर्ण आर्थिक उलाढालीचा केंद्र बिंदू पाऊस आहे आणि त्यावर चालणारी शेती आहे.
कधी कधी असे आजार येतात की आम्हाला जन्मभर पश्चाताप करावा लागतो. पण जर आपण जागरुक राहिलो, सतर्क राहिलो, प्रयत्नशील राहिलो तर त्यातून वाचण्याचे मार्ग सोपे होतात. आता डेंग्युचे उदाहरण घेऊ. डेंग्यूपासून बचाव करता येतो. थोडे स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले, थोडे जागरुक, सतर्क राहिलो आणि सुरक्षित राहण्याचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि आता असा विचार करु नका की, गरीबांच्या वस्तीतच आजार होतात. डेंग्यु सुखी-समाधानी भागात पहिल्यांदा येतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण टी.व्ही.वर जाहिराती बघता, परंतु आपण कधी कधी कृतीच्या संदर्भात थोडे उदासिन असतो. सरकार, हॉस्पिटल, डॉक्टर, हे तर आपले काम करतीलच, परंतु आपण पण आपल्या घरात, आपल्या विभागात, आपल्या परिवारात डेंग्युचा प्रवेश होऊ नये, यासाठी, पाण्यापासून कोणताही आजार न होण्यासाठी, जागरुक राहिले पाहिजे, अशी मी आपल्याला विनंती करतो.
आणखी एका संकटाकडे प्रिय देशवासीयांनो, आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो. आज जीवन खूप वेगवान झाले आहे, सतत धावपळीचे झाल्यामुळे आम्हाला आमच्या बद्दल, स्वत:बद्दल विचार करायला वेळच मिळत नाही. आजारी पडलो, तर वाटते लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यासाठी ॲन्टीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक घेतली जातात. तुम्हाला त्यामुळे तात्पुरते बरे वाटेल, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय येता-जाता ॲन्टीबायोटिक घेण्याची सवय खूप गंभीर संकट निर्माण करु शकेल, अशी ॲन्टीबायोटिक घेणे बंद करा. डॉक्टर जोपर्यंत लिहून देत नाहीत तोपर्यंत ती घेणे टाळा. आपण शॉर्टकटच्या मार्गाने चालू नये. कारण ह्यामुळे नवीन संकटे निर्माण होतात. कोणतीही वाट्टेल ती ॲन्टीबायोटिक वापरल्यावर रुग्णाला थोडा, क्षणिक फायदा होईल, परंतु आपल्या शरीराला ह्या औषधाची सवय लागेल आणि मग शरीरामधील जीवाणूंना ह्याची सवय लागून ती औषधे पुढे निरुपयोगी ठरतील, बेकार होतील आणि मग त्याच्या विरुद्ध परत संघर्ष करावा लागेल, नवीन आजारांना तोंड द्यावे लागेल. मग त्यासाठी नवीन औषधे बनवणे, शोध लावणे, ह्यामध्ये अनेक वर्षे जातील आणि तोपर्यंत हे नवीन आजार नवीन अडचणी निर्माण करतील ह्यासाठी जागरुक रहाणे आवश्यक आहे.
डॉक्टरने सांगितले पंधरा गोळ्या घ्या, पाच दिवसात घ्यायच्या आहेत, मी आग्रहाने सांगतो डॉक्टरांनी जितके दिवस गोळ्या घ्यायला सांगितल्या तितके दिवस घ्या. त्या गोळ्यांचा कोर्स पूरा करा. अर्धवट सोडला तरी सुद्धा त्या जीवाणूंना फायदा होईल, आवश्यकतेपेक्षा जास्त घेतला तरीसुद्धा जीवाणूंना फायदा होईल म्हणून जितक्या दिवसात गोळ्या घेण्याचा कोर्स ठरला आहे. तो पुरा करणे जरुरी आहे, तब्येत ठीक झाली, तरी पण तो कोर्स पूर्ण करणे जरुरीचे आहे. आता तब्येत ठीक झाली आता गोळ्यांची गरज नाही, जर आपण असे केले, तर जीवाणू ताकदवान होतील. जे जीवाणू टी.बी. आणि मलेरिया पसरवतात, त्यांच्यामध्ये वेगाने असे काही बदल होत आहेत की, त्यावर औषधांचा परिणामच होत नाही. डॉक्टरी भाषेत त्याला ॲन्टीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात, ॲन्टीबायोटिकचा कसा उपयोग करायचा, त्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे. सरकार ॲन्टीबायोटिक रेझिस्टन्स रोखण्यासाठी तयार आहे आणि आपण बघितले असेल, हल्ली ॲन्टीबायोटिक जी औषधे विकली जातात, त्याच्यावर जो पत्ता असतो, त्यावर एक लाल रेघेने आपल्याला सावध केले जाते, जागरुक केले जाते, त्यावर तुम्ही जरुर लक्ष द्या.
आता आरोग्याचा विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात गर्भावस्थेत ज्या माता आहेत त्यांच्या आयुष्याची चिंता कधी-कधी खूप सतावते. आपल्या देशात दरवर्षी जवळ जवळ तीन कोटी महिला गर्भवती होतात, परंतु काही महिला प्रसुतीच्या वेळी मरण पावतात, कधी आईचा मृत्यू होतो, तर कधी बालकाचा आणि काही वेळेला आई आणि बालक दोघेही दगावतात.
मागील दशकात मातेच्या अकस्मात मृत्युदरात घट झाली आहे, परंतु आजही खूप मोठ्या प्रमाणात गर्भवती मातांचा जीव वाचू शकत नाही. गर्भावस्था असताना रक्ताचे प्रमाण कमी असणे, प्रसुतीच्या वेळी होणारे संक्रमण, उच्च रक्तदाब, न जाणो कोणकोणत्या अडचणी त्यांचे जीवन उध्वस्त करतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवून भारत सरकारने नवीन अभियान सुरु केले आहे. त्याचे नाव आहे “प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान”. ह्या अभियानाद्वारे दर महिन्याच्या नऊ तारखेला गर्भवती महिलेची सरकारी आरोग्य केंद्रात नि:शुल्क तपासणी केली जाईल. एकही पैसा खर्च न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये नऊ तारखेला हे काम केले जाईल. मी प्रत्येक गरीब कुटुंबाला आग्रह करत आहे की सर्व गर्भवती मातांनी नऊ तारखेला या सेवेचा लाभ घ्यावा, त्यामुळे नवव्या महिन्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही अडचण आली, तर सुरुवातीलाच त्यावर उपाय करता येईल. आई आणि बालक या दोघांचे आयुष्य वाचण्यासाठी मी स्त्री रोग तज्ञांना आवाहन केले की तुम्ही 9 तारखेला गरीब मातांसाठी मोफत सेवा देऊ शकत नाही का? माझे डॉक्टर बंधू-भगिनी एका वर्षातले बारा दिवस गरीबांसाठी देऊ शकत नाहीत का? हजारो असे डॉक्टर्स आहेत, त्यांनी माझ्या सांगण्याला, आवाहनाला मान देऊन काम पुढे नेले तशी पत्रे लिहिली. हजारो असे डॉक्टर्स असे आहेत की, ज्यांनी माझे म्हणणे मानले. परंतु भारत इतका मोठा देश आहे, लाखो डॉक्टर या अभियानात जोडले गेले पाहिजेत, मला विश्वास आहे, जरुर जोडले जातील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण यांची चिंता संपूर्ण जग आज करत आहे. देशात आणि जगात सामुहिक स्वरुपात याची चर्चा होत आहे. भारताने फार पुर्वीपासून ह्या गोष्टीला महत्त्व दिले आहे. कुरुक्षेत्रातील युद्धात भगवान श्रीकृष्ण वृक्षासंबंधी चर्चा करतात, युद्धाच्या मैदानात देखील झाडांबद्दल चर्चा, चिंतन करणे याचा अर्थ ह्याचे महात्म्य किती मोठे आहे, ह्याचा आपण अंदाज करु शकता. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात.
‘अश्वत्थ: सर्व वृक्षाणां’ म्हणजे सर्व वृक्षात मी पिंपळ आहे. शुक्राचार्य नीतीत म्हटले आहे – ‘नास्ति मूलं अनौषधं’- अशी कोणतीही वनस्पती नाही, ज्यात औषधी गुण नाही. महाभारतातील अनुशासन पर्वात – त्यामध्ये तर मोठी सविस्तर चर्चा केली आहे आणि महाभारतातील अनुशासन पर्वात सांगितले गेले आहे – ‘जो वृक्ष लावतो, त्याच्यासाठी वृक्ष अपत्याप्रमाणे असतो, ह्यात संशय नाही. जो वृक्षाचे दान करतो, त्याला वृक्ष अपत्याप्रमाणे परलोकात देखील सांभाळतात’. ह्यासाठी आपल्या कल्याणाची इच्छा असलेल्या माता-पित्यांनी चांगले वृक्ष लावावे आणि त्यांचा अपत्याप्रमाणे सांभाळ करावा. आमच्या शास्त्रात, गीता असो, शुक्राचार्य नीती असो, महाभारतातील अनुशासन पर्व असो हेच सांगितलेले आहे. परंतु आजच्या पिढीतही असे काही लोक असतात जे या आदर्शांचे पालन करतात, आचरणात आणतात. काही दिवसापूर्वी पुण्यामधील एक मुलगी सोनलचे उदाहरण माझ्या लक्षात आले आणि ते उदाहरण माझ्या मनाला स्पर्श करुन गेले. महाभारतातील अनुशासन पर्वात सांगितले आहे की, वृक्ष परलोकात देखील मुलाची जबाबदारी पार पाडतात. सोनलने जणू फक्त आपल्या आई-वडिलांची नाही, तर संपूर्ण समाजाची इच्छा पूर्ण करण्याचा जणू विडा उचलला आहे.
महाराष्ट्रातील पुण्यातील जुन्नर तालुक्यात नारायणपूर गावातील एक शेतकरी खंडू मारुती महात्रे ह्यांनी आपली नात सोनलचे लग्न वेगळ्या प्रेरणादायी प्रकाराने केले. महात्रेजींनी काय केले, सोनलच्या लग्नात आलेले सर्व नातेवाईक, पाहुणे आले होते, ह्या सर्वांना ‘केसर आंब्याचं’ रोपटं भेटीच्या स्वरुपात दिले आणि सोशल मिडियावर त्याचा फोटो पाहिल्यावर, मी चकित झालो, लग्नात वऱ्हाडी दिसत नसून झाडेच झाडे दिसत होती. मनाला स्पर्श करणारे दृश्य त्या फोटोत होते. सोनल स्वत: शेतीविषयक पदवीधर आहे, ही कल्पना तिला सुचली आणि लग्नात आंब्यांची रोपं भेट देणे, निसर्गा विषयीचे प्रेम यामध्ये उत्तमपणे प्रकट झाले आहे.
सोनलचे लग्न जणू निसर्गप्रेमाची अमरगाथा बनलंय. मी सोनल आणि म्हात्रे यांच्या अभिनव प्रयोगासाठी त्यांचे अभिनंदन करतो आणि असे प्रयोग अनेकजण करतात. मला आठवतय मी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो, तेव्हा अंबामातेच्या मंदिरात भाद्रपद महिन्यात मोठया प्रमाणात पदयात्री येतात, तेव्हा एका समाजसेवी संघटनेने ठरवले की जे मंदिरात येतील त्यांना प्रसाद म्हणून एक रोप दयायचे आणि सांगायचे हा माताजीचा प्रसाद आहे, या झाडालाआपल्या गावात घरी गेल्यावर लावा. वाढवा, त्याची काळजी घ्या माता तुम्हाला आशिर्वाद देईल, लाखे पदयात्री आले, लाखो झाडे वाटली गेली त्यावर्षी ! मंदिरांनी सुध्दा वर्षा ऋतूत रोपे वाटण्याची परंपरा सुरु करावी. वृक्षारोपण हे सहजपणे जनआंदोलन बनू शकते.
मी शेतकरी बंधूना सतत सांगतो की, आपण आपल्या शेताच्या किनाऱ्यावर बांध घातल्यामुळे जमिनीचे नुकसान करतो, त्या जागी बांधाच्या ऐवजी आपण टिम्बर म्हणजे लाकडाची शेती करु शकतो का ? आज भारतात घर बनवण्यासाठी, लाकडी सामान बनवण्यासाठी कित्येक करोडो रुपयाचे इमारती, लाकूड परदेशातून आणावे लागते. जर आपण आपल्या शेताभोवती, कडेला असे वृक्ष लावले जे लाकडी सामान आणि घराच्या कामासाठी उपयोगी होतील, पंधरा-वीस वर्षानंतर सरकारच्या परवानगीने त्याला कापून विकूही शकतो, आपल्याला उत्पन्नाचे नवीन साधन यामुळे मिळू शकते, आणि भारताला लाकूड आयात करण्यापासून आपण वाचवू शकता. गेल्या काही दिवसात अनेक राज्यात वातावरणाचा ऋतुमानाचा उपयोग करुन खूप मोहिमा राबवल्या गेल्या, भारत सरकारने एक CAMPA (कॅम्पा) कायदा नुकताच संमत केला आहे, जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वृक्षारोपणासाठी राज्यांकडे जाणार आहे. मला सांगितले गेले की महाराष्ट्र सरकारने एक जुलैला संपूर्ण राज्यात सव्वा दोन कोटी झाडे लावली आणि पुढच्यावर्षी तीन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. सरकारने एक मोठे जन आंदोलन उभे केले आहे. राजस्थान, मरु-भूमि मोठा वन-महोत्सव केला आणि पंचवीस लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानात पंचवीस लाख झाडे ही लहान गोष्ट नाही. ज्यांना राजस्थानची भूमी माहीत आहे, त्यांना हे कळू शकते की, किती मोठा विडा उचलला आहे त्यांनी ! आंध्रप्रदेशानेही 2029 पर्यंत 50 टक्के हरितक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जे ‘Green India Mission’ सुरु केले आहे “हरित भारत संकल्प” सुरु केला आहे त्यात रेल्वेने देखील हे काम सुरु केले आहे. गुजरातमध्येसुध्दा वन महोत्सवाची उज्वल परंपरा आहे. यावर्षी गुजरातमध्ये “आम्रवन, एकता वन, शहीद वन असे अनेक प्रकल्प वनमहोत्सवाअंतर्गंत हाती घेतले आणि कोटयावधी वृक्ष लावण्याचे अभियान चालवले आहे. मी सर्वच राज्यांचा उल्लेख करु शकत नाही पण सर्वजण प्रशंसेस पात्र आहेत.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी मला दक्षिण आफ्रिकेला जाण्याची संधी मिळाली. हा माझा तिथला पहिला प्रवास होता. जेव्हा परदेश दौरा असतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय धोरण व्यापाराबद्दल बोलणी होतात सुरक्षेसंबंधी चर्चा होते, काही सामंजस्य करार हे तर होणारच असतात. परंतु माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा प्रवास जणू एक प्रकारे तीर्थयात्राच होती. दक्षिण आफ्रिका म्हटले की महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांची आठवण होणे स्वाभाविकच आहे. जगात अहिंसा, प्रेम, क्षमा हे शब्द कानावर पडतात तेव्हा गांधी आणि मंडेला हयांचे चेहरे आमच्या समोर येतात. माझ्या दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासा दरम्यान फिनिक्स सेटलमेंट येथे गेलो होतो, महात्मा गांधीचे निवासस्थान सर्वोदयच्या रुपात ओळखले जाते. महात्मा गांधींनी ज्या गाडीने प्रवास केला होता. जो प्रवास म्हणजे मोहनदास ते महात्मा गांधी अशा रुपांतराचे बीजारोपण होते. त्या रेल्वे प्रवासाचे सद्भाग्य मला प्राप्त झाले. परंतु मी जी गोष्ट सांगू इच्छितो की मला यावेळी अशा महान व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली ज्यांनी समानता, समान संधी यासाठी आले तारुण्य समाजासाठी खर्च होते नेल्सन मंडेलांच्या खांदाला खांदा कथाडा, लालू चिबा, जॉर्ज बेजोस, रोनी कासरिल्स ह्या महान व्यक्तींचे दर्शन घेण्याचा योग आला. मूळ भारतीय परंतु जिथे गेले, तिथलेच झाले. ज्यांच्यात रहात होते, त्यांच्यासाठी प्राणांचे मोल द्यायला तयार झाले. किती मोठी ताकद! जेव्हा मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांचे तुरुंगातील अनुभव ऐकत होतो, तेव्हा कुणाबद्दल कटुता नाही, द्वेष नाही, त्यांच्या चेहऱ्यावर इतकी मोठी तपश्चर्या केल्यानंतरही देणे-घेणे-बनणे कोणताही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. एक प्रकारे कर्तव्यभाव, गीतेमध्ये कर्तव्य लक्षण दाखवले आहे. तो भाव साक्षात रुपात त्यांच्यामध्ये दिसत होता. त्यांची भेट सदैव माझ्या स्मरणात राहील. ‘समानता आणि समान संधी’ कोणताही समाज आणि सरकार यांच्यासाठी इतका मोठा मंत्र नाही. समभाव आणि ममभाव हे दोन मार्ग आपल्याला उज्वल भवितव्याकडे घेऊन जातात. आपण सर्व चांगल्या आयुष्याची आशा करतो, मुलांचे चांगले भविष्य इच्छितो, प्रत्येकाच्या गरजा भिन्नभिन्न असतात, अग्रक्रम वेगवेगळे असतात, परंतु रस्ता एकच असतो आणि तो आहे विकासाचा, समानतेचा, समान संधीचा, समभाव, ममभाव याचा! या, आपण ह्या भारतीयांबद्दल अभिमान बाळगू या, ज्यांनी दक्षिण आफ्रिकेत जीवनाचा हा मूलमंत्र आपल्या जगण्यातून दाखवला.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी शिल्पी वर्माचा आभारी आहे. त्यांनी मला संदेश दिला आहे आणि त्यांनी व्यक्त केलेली चिंता स्वाभाविक आहे. त्यांनी मला एका घटनेची माहिती दिली.
“पंतप्रधानजी, मी बंगलूरुहून शिल्पी वर्मा बोलत आहे. मी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता की, एका महिलेने फसवून आणि खोट्या ई-मेलमुळे अकरा लाख रुपये गमावले आणि आत्महत्या केली. एक महिला म्हणून मला ह्याचे फार दु:ख झाले. मला याबाबत तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की, आपल्या मोबाईलवर, ई-मेलवर आपल्याला मोह पाडणाऱ्या गोष्टी कळतात, तर मोह पाडणारे संदेश येतात की, तुम्हाला इतक्या रकमेचे बक्षीस लागले आहे, तुम्ही इतके पैसे द्या आणि इतके रुपये घेऊन जा. काही लोक मोहात पडून तर, काही लोभाने फसवले जातात. हे तंत्रज्ञानाद्वारे फसवणुकीचे प्रकार जगभर पसरत आहेत. तंत्रज्ञानाचे अर्थव्यवस्थेत फार मोठे योगदान आहे, तेव्हा त्याचे दुरुपयोग करणारेही या मैदानात उतरले आहेत. एक निवृत्त व्यक्ती, ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे होते आणि घरपण बांधायचे होते. एके दिवशी त्याला एसएमएस आला की, परदेशातून त्यांच्यासाठी एक किमती भेटवस्तू आली आहे, ती घेण्यासाठी, कस्टम ड्युटीच्या रुपाने 2 लाख रुपये एका बँकेच्या खात्यात भरावे लागतील. ह्या सज्जन माणसाने कोणताही विचार न करता आपली आयुष्यभराची कमाई, आपल्या कष्टाच्या कमाईतले 2 लाख रुपये त्या अनोळखी माणसाला पाठवले, नुसता एसएमएस आल्यावर आणि काही क्षणात त्यांना कळले आपण फसवले गेलो आहोत. आपणही कधीकधी मोहात पडतो. इतक्या आकर्षक पद्धतीने पत्र लिहिले जाते की, आपल्याला वाटते ते खरे पत्र आहे. कुठले तरी खोटे लेटर पॅड बनवून पत्र पाठवले जाते. तुमचा क्रेडिट कार्ड नंबर, डेबिट कार्ड नंबर मिळवतात आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमचे बँकेतले खाते लुटले जाते. ही नव्या पद्धतीची फसवणूक, डिजिटल फसवणूक आहे. मला असे वाटते की, आपण ह्या मोहापासून सावध राहिले पाहिजे, जागरुक राहिले पाहिजे, जर अशी खोटी बातमी आली, तर आपल्या मित्र-मंडळात सांगितली पाहिजे, त्यांना थोडे जागरुक केले पाहिजे. शिल्पी वर्मा यांनी एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. असे अनुभव तुम्हा सर्वांना येत असतील, पण कदाचित तुम्ही इतक्या गंभीरतेने बघत नसाल. परंतु मला वाटते याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या संसदेचे सत्र चालू आहे, त्या संसद सत्राच्या दरम्यान मला अनेक लोकांना भेटण्याची संधी मिळाली. आपले खासदार महोदय आपआपल्या विभागातून लोकांना आणतात, भेटवतात, आपल्या विषयी ते सांगतात, आपल्या अडचणी सांगतात. परंतु मला या दिवसात एक सुखद अनुभव आला. अलिगडचे काही विद्यार्थी माझ्याकडे आले. मुला-मुलींचा उत्साह बघण्यासारखा होता, स्वत: बरोबर एक मोठा अल्बम घेऊन आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. अलिगडचे खासदार त्यांना घेऊन आले होते. त्यांनी मला काही फोटो दाखवले. त्यांनी अलिगड रेल्वे स्टेशनचे सुशोभिकरण केले आहे. स्टेशनवर कलात्मक चित्रे काढली आहेत, रंगवली आहेत. इतकेच नव्हे गावात ज्या प्लॅस्टीकच्या बाटल्या, तेलाचे डबे जे कचऱ्यात सापडतात त्यांना शोधून-शोधून एकत्र केले आणि त्यात माती भरुन त्यात झाडे लावली आणि बगीचा फुलवला आणि रेल्वे स्टेशनवर प्लॅस्टीकच्या बाटल्यांचे ‘व्हर्टीकल गार्डन’ बनवून त्याला वेगळे रुप दिले. तुम्ही अलिगडला जरुर जा आणि हे स्टेशन जरुर बघा. हिंदुस्थानातून कित्येक स्टेशनवरुन माझ्याकडे अनेक बातम्या येत आहेत की, स्थानिक लोकांनी रेल्वे स्टेशनच्या भिंतींवर आपल्या विभागाची ओळख दाखवणारी चित्रे काढली आहेत, एक नवेपणा त्यामध्ये जाणवतो. लोकांच्या सहभागामुळे बदल घडवून आणता येतो, ह्याचे हे उदाहरण आहे. देशात अशाप्रकारे काम करणाऱ्या सर्वांना धन्यवाद, अलिगडच्या माझ्या साथीदारांचे विशेष अभिनंदन.
माझ्या प्रिय देशवासियांनो, वर्षाऋतुबरोबर आपल्या देशात सणांचाही ऋतू असतो. मेळे लागतील, मंदिरात, तीर्थक्षेत्रांमध्ये उत्सव साजरे केले जातात. तुम्ही सुद्धा घरात आणि घराबाहेर या उत्सवांशी जोडले जात असाल. रक्षाबंधन आपल्या कडचा विशेष महत्त्वाचा सण आहे. मागील वर्षाप्रमाणे ह्यावर्षीही रक्षाबंधनच्या सणाला आपल्या देशाच्या माता-भगिनींना आपण ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ किंवा ‘जीवन ज्योती विमा योजना’ भेट म्हणून देऊ शकत नाही का? विचार करा, बहिणीला अशी भेट द्या की, ज्यामुळे तिच्या आयुष्याला खरीखुरी सुरक्षितता मिळेल. इतकेच नव्हे तर, आपल्या घरात जेवण बनवणारी महिला असेल, आपल्या घराची साफसफाई करणारी कोणी महिला असेल, गरीब आईची मुलगी असेल, त्यांना या रक्षाबंधनाच्या सणाला ‘सुरक्षा विमा योजना’ किंवा ‘जीवन ज्योती विमा योजना’ आपण भेट देऊ शकता. हीच तर सामाजिक सुरक्षा असून, हाच रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपल्या पैकी खूप लोक असे आहेत, ज्यांचा जन्म स्वातंत्र्यांनंतर झाला आणि मी या देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याचा जन्म स्वतंत्र हिंदुस्थानात झाला आहे. 8 ऑगस्ट ‘भारत छोडो चळवळीला’ प्रारंभा झाला. हिंद छोडो, भारत छोडो ह्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्याला 70 वर्षे होत आहेत. आपण स्वातंत्र्याचा आनंद, तर घेतच आहोत. स्वतंत्र नागरिक होण्याचा अभिमानही बाळगत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूरांचे स्मरण करण्याची वेळ आहे. हिंद छोडोला 75 वर्षे आणि भारताच्या स्वातंत्र्याची होणारी 70 वर्षे आपल्याला नवीन प्रेरणा देऊ शकतात, नवीन उत्साह, आशा निर्माण करु शकतात, देशासाठी काही तरी करण्याच्या संकल्पासाठी ही संधी असू शकते. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या रंगात रंगून जाईल. चारही बाजूंनी स्वातंत्र्यांचा गंध पुन्हा एकदा जाणवायला लागेल, असे वातावरण आपण सर्वजण निर्माण करु. स्वातंत्र्याचे पर्व हा काही सरकारी कार्यक्रम नाही, तो देशवासीयांचा झाला पाहिजे. दिवाळीप्रमाणे हा आपला उत्सव झाला पाहिजे. मी अशी आशा व्यक्त करतो, आपणही देशभक्तीच्या प्रेरणेशी जोडणारे, काहीतरी चांगले कार्य कराल. त्याचा फोटो ‘नरेंद्र मोदी ॲप’वर जरुर पाठवा, देशात एक वेगळे वातावरण बनवा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन मला देशातील जनतेशी संवाद साधण्याचे सद्भाग्य मिळते. ही एक परंपरा आहे. तुमच्या मनातही काही गोष्टी असतील, तुमची अशी इच्छा असेल, त्या गोष्टी लाल किल्ल्यावरुन प्रखरतेने मांडल्या जाव्यात. मी आपल्याला निमंत्रण देतो. तुमच्या मनात जे विचार येत असतील, आपल्याला वाटत असेल की, आपला प्रतिनिधी या नात्याने, आपल्या प्रधान सेवकाच्या रुपाने मला लाल किल्ल्यावरुन ते सांगितले पाहिजे, तर तुम्ही मला जरुर लिहून पाठवा, काही सुचवा, सल्ला द्या नवीन विचार द्या. मी तुमचे मनोगत, देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माझी अशी ही इच्छा नाही की लाल किल्ल्यावरुन जे बोलले जाईल ते फक्त पंतप्रधानांचे असावे, तर लाल किल्ल्यावरुन जे बोलले जाईल ते सव्वाशे कोटी देशवासीयांच्या मनातले असेल. तुम्ही जरुर मला काही-ना-काही पाठवा. तुम्ही ‘नरेंद्र मोदी ॲप’ वर पाठवू शकता किंवा ‘mygov.in’वर पाठवू शकता. सध्या तंत्रज्ञानाच्या मार्गाने हे इतके सहज आहे की, जे काही पाठवायचे आहे ते थेट माझ्याकडे पाठवू शकता. मी आपल्याला निमंत्रण देतो आहे. चला या, स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या वीरांचे पुण्यस्मरण करुया, भारतासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांना आठवू या आणि देशासाठी काही करण्याचा संकल्प करुन पुढे जाऊ या.
खूप-खूप शुभेच्छा.
खूप-खूप-धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्का. पुन्हा एकदा “मन की बात” करण्याची संधी मला मिळाली आहे. माझ्यासाठी मन की बात म्हणजे काही कर्मकांड नाही. मी स्वत: आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतो. आणि हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील, देशाच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत “मन की बात” च्या माध्यमातून मी पोहचू शकतो याचा मला आनंद वाटतो. “मन की बात”चा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री आठ वाजता प्रसारित करण्याचा आकाशवाणीने जो यशस्वी प्रयत्न केला आहे, त्यासाठी मी आकाशवाणीचे आभार मानतो. आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की, जे नागरिक माझा मन की बात कार्यक्रम ऐकतात, ते कार्यक्रमानंतर पत्राद्वारे दूरध्वनीच्या माध्यमातून तसेच “माय गोव्ह” या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी ॲपद्वारे त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहचवतात. आपण पाठवलेले सुचवलेले मुद्दे सरकार चालवतांना मला उपयोगी पडतात. लोक कल्याणासाठी शासन किती सक्रीय असायला हवे ? लोक कल्याणाच्या कामांना किती प्राधान्य दयायला हवे ? यासाठी, आपल्याबरोबर होणारा माझ संवाद, हे नाते फार महत्त्वाचे आहे. आपण अधिक सक्रीय होऊन, जनसहभागातून लोकशाही व्यवस्था कशी चालेल यावर अवश्य भर द्याल अशी मी अपेक्षा करतो.
उन्हाळा वाढतच चालला आहे. असे वाटले होते की, त्यापासून थोडी सुटका होईल, पण तापमान वाढतच आहे. नैऋत्य मौसमी पाऊस बहुधा एक आठवडा उशीराने येईल अशी बातमीही मध्यंतरी आली. त्यामुळे चिंता अधिकच वाढली. देशाचा बराचसा भूभाग उष्णतेच्या लाटेने होरपळून निघतो आहे. तापमापकातील पारा जणू आकाशाला भिडला आहे. प्राणी असोत की पक्षी असोत, की माणसे सारेच या उन्हाळयाने त्रस्त आहेत. पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळेच या समस्या वाढत चालल्या आहे. जंगले कमी झाली, वृक्षतोड होत गेली आणि निसर्गाचा विध्वंस करुन जणू काही माणसाने आपल्याच विनाशाला, आत्मनाशाला वाट मोकळी करुन दिली.
5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. जगभरात पर्यावरण या विषयावर चर्चा होतात, काळजी व्यक्त केली जाते. यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली आहे ती आहे “झिरो टॉलरन्स फॉर इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड” म्हणजे वन्यजीवांच्या व्यापाराला पूर्णपणे आळा” याबद्दल तर चर्चा होईलच पण आपल्याला झाडाबद्दलही बोलले पाहिजे, पाण्याबद्दल बोलले पाहिजे. जंगले कशी वाढतील याकडे लक्ष दिले पाहिजे.
याचे कारण म्हणजे आपण हे पाहिले असेल की, उत्तराखंड,हिमाचल, जम्मू-काश्मिर या भागातील हिमालय पायथ्याजवळच्या जंगलांमध्ये नुकताच भीषण वणवा लागला होता. या भीषण अग्नी प्रलयाचे मूळ कारण होते ते म्हणजे वाळलेला पालापाचोळा आणि थोडेसे दुर्लक्ष. परिणाम विनाशकारी वणवा. म्हणून जंगले वाचवणे, पाण्याची बचत करणे हे आपल्या सगळयांचे कर्तव्य ठरते, जबाबदारी ठरते.
दुष्काळाची तीव्र झळ बसलेल्या 11 राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी काही दिवसांपूर्वीच सविस्तर चर्चा करण्याची संधी मला मिळाली. उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा ही ती राज्ये. तसे पाहल्या गेले तर शासकीय परंपरेप्रमाणे या सर्व राज्यांना एकत्रित मी घेऊ शकलो असतो. पण मी तसे केले नाही, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतंत्र भेटलो. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुमारे दोन-अडीच तास चर्चा केली. त्यांना काय सांगायचे आहे हे बारकाईने ऐकले. सर्वसाधारण पध्दतीनुसार भारत सरकारने, केंद्रशासनाने किती निधी दिला ? आणि किती खर्च झाला ? यापलिकडे फारशी चर्चा होत नाही. फार लक्ष दिले जात नाही.
दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक राज्यांनी केलेले उत्तम प्रयत्न पाहून केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना अाश्चर्य वाटले. पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, दुष्काळावर उपाययोजना, पशुधनाचे रक्षण, दुष्काळबाधित नागरिकांना आधार या सर्व मुद्दयांवर संपूर्ण देशभर त्या राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, या समस्येवर मात करण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाय कोणते आखता येतील ? याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे असे लक्षात आले. एक प्रकारे हा अनुभव मला काही शिकवणारा होता. ज्या आदर्श उपाययोजना असतील, जी आदर्श धोरणे असतील त्यांची सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणी कशी करता येईल ? याकडे विशेष लक्ष द्यायला मी निती आयोगाला सांगितले आहे.
काही राज्यांनी विशेषत: आंध्र प्रदेश, गुजरात यांनी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. राज्य सरकारांनी केलेल्या या यशस्वी उपाययोजना निती आयोगाच्या माध्यमातून देशाच्या इतर राज्यांमध्येही आपण पोहोचवायला हव्यात. अशा समस्यांवर मात करण्यासाठी लोकसहभाग हे यशाचे मुख्य कारण ठरते, मुख्य आधार ठरतो. आणि त्यात अचूक नियोजन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि निश्चित कालमर्यादेत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात असा मला भरवसा वाटतो.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी कारण पाणी म्हणजे परमेश्वराचा प्रसाद आहे, असे मी मानतो. आपण देवळात जातो, कोणीतरी आपल्या हातावर प्रसाद ठेवतो, त्या प्रसादातला थोडासा जरी आपल्या हातून सांडला तरी आपल्याला वाईट वाटते, तो पडलेला प्रसाद आपण उचलतो आणि परमेश्वराकडे क्षमा याचना करतो.
पाणी म्हणजे ईश्वराचा प्रसादच आहे. एक थेंब जरी वाया गेला तरी आपल्याला दु:ख झाले पाहिजे. आणि म्हणून जलसंचय हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाण साठवण्याबरोबरच त्याचे संरक्षण करणे, ते वाचवणे महत्वाचे आहे आणि जलसिंचन हेही महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच पर ड्रॉप मोअर क्रॉप – प्रत्येक थेंब – अधिक उत्पादन, मायक्रो इरिगेशन – सूक्ष्म सिंचन, कमी पाण्यावर तयार होणारी पिके. अनेक राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आता ठिंबक सिंचनाचा, सूक्ष्म सिंचनाचा वापर करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. काहीजण तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. वेगवेगळया राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मी घेतली तेव्हा मला समजले की काही राज्यांनी भात शेतीसाठी तांदूळ पिकवण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे आणि त्यामुळे त्यांना उत्पादनही अधिक मिळाले. पाण्याची बचत झाली आणि मजूरीचा खर्चही कमी आला. त्यांच्याकडून मला हेही कळले की बऱ्याच राज्यांसमोर मोठी उद्दिष्टे आहेत, विशेषत: महाराष्ट्र, आंध्र आणि गुजरात या तीन राज्यांनी ठिंबक सिंचनाच्या बाबतीत फार मोठे काम केले आहे. त्यांचा प्रयत्न आहे की, दरवर्षी, दोन-दोन, तीन-तीन लाख हेक्टर जमिन सूक्ष्म सिंचनाखाली आणायची. ही मोहिम सर्व राज्यांमध्ये राबवली गेली तर, शेतीला मोठा फायदा तर होईलच शिवाय पाण्याचे साठेही वाढतील. तेलंगणातील आमच्या बंधूनी मिशन भागिरथी या प्रकल्पाद्वारे गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या पाण्याचा वापर उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशात निरु प्रगती मिशनच्या माध्यमातून, तंत्रज्ञानांच्या मदतीने भूजल पुनर्भरणाचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात जी लोकचळवळ उभी राहिली आहेत, त्यात लोक श्रमदानाबरोबरच आर्थिक मदतही देत आहे. “जलयुक्त शिवार अभियान” खरोखरच ही चळवळ महाराष्ट्राला भविष्यकालीन जलसंकटांपासून वाचवण्यासाठी उपयोगी पडेल असे मला निश्चितपणे वाटते आहे. छत्तीसगड राज्याने लोकसुराज्य-जलसुराज्य मोहिम हाती घेतली आहे. मध्यप्रदेशात बलराम तालाब योजना या उपक्रमातून 22,000 तळयांचे बांधकाम झाले आहे. ही संख्या लहान नाही. यावर काम सुरु आहे. त्यांची कपिलधारा कूपयोजना. उत्तरप्रदेशातले मुख्यमंत्री जलबचाव अभियान, कर्नाटकात कल्याणी योजनेतून विहीरी पुनरुज्जीवीत करण्याचे काम सुरु आहे. राजस्थन आणि गुजरात जिथे पुरातन कालव्यातल्या विहीरी आहेत त्या विहीरींना जलमंदिराच्या रुपाने पुनर्जिवीत करण्याचे मोठे अभियान हाती घेण्यात आले आहे.
राजस्थानात मुख्यमंत्री जलस्वावलंबन मोहिम चालवली जात आहे. झारखंड हा वन्य प्रदेश. मात्र त्या राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. तिथे चेकहॅम, छोटे बंधारे बांधून एक मोठे काम केले जात आहे. पाणी अडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही राज्यांमध्ये नदयांच्या पात्रातच छोटे छोटे बांध घालून दहा-दहा, वीस-वीस किलोमीटर क्षेत्रात पाणी अडवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. हा खरोखरच सुखद अनुभव आहे.
मी देशवासिंयाना आवाहन करेन की येत्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये, पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही असा आपण निर्धार करुया. आतापासूनच त्यासाठी व्यवस्था करुया. कुठे पाणी वाचवता येईल ? कुठे पाणी साठवता येईल ? हे ठरवूया, देव तर आपल्या गरजेप्रमाणे पाणी देतोच. निसर्ग आमच्या गरजा पूर्ण करतो. पण भरपूर पाणी आहे म्हणून आम्ही निष्काळजी रहिलो आणि पावसाळा संपल्यावर पाणी नाही म्हणून त्रस्त झालो तर हे कसे चालेल ? आणि पाणी हा विषय केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही. गाव, गरीब, मजूर, शेतकरी, शहरी, ग्रामीण, श्रीमंत-गरीब या सगळयांशी संबंधित हा विषय आहे. म्हणूनच आता पावसाळा येणार आहे तेव्हा पाणी हा आमचा प्राधान्याचा मुद्दा असायला हवा आणि यंदा जेव्हा आपण दिवाळी साजरी करु, त्यावेळी यंदाच्या पावसाळयात आपण किती पाणी वाचवले ? किती पाणी अडवले ? याचाही आनंद साजरा करु. आपण पहाल, आपला आनंद अनेकपटीने वाढेल. पाण्यात एक विलक्षण शक्ती आहे. आपण कितीही थकून आलो असलो आणि थोडेसेच पाणी चेहऱ्यावर शिंपडले तर किती ताजेतवाने वाटते. आपण कितीही दमलो असलो तरी विस्तीर्ण सरोवर, विस्तीर्ण समुद्र पाहून कसा विराटतेचा अनुभव आपल्याला येतो. परमात्म्याने दिलेला किती अनमोल खजिना आहे हा.
आपले मन त्याच्याशी थोडे जुळवून घेऊन त्याचे संरक्षण करु. पाण्याचे संवर्धन करु आणि पाण्याचा साठाही करु. जलसिंचनाच्या बाबतीत आधुनिक होऊन. ही गोष्ट आज मी आपल्याला आवर्जुन सांगतो आहे. यंदाचा हंगाम हातून जाऊ देऊ नका. येणाऱ्या चार महिन्यांमध्ये प्रत्येक थेंब पाणी वाचवण्यासाठी अभियान हाती घ्यायचे आहे. आणि हे केवळ सरकारचे नाही, राजकीय नेत्याचे नाही, तर सर्वसामान्य माणसाचे काम आहे. पाणी संकंटाच्या बातम्या गेल्या काही दिवसात माध्यमातून विस्ताराने येत आहेत. पाणी वाचवण्यासाठी, मोहिम हाती घेण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत आणि जलदुर्भिक्षापासून कायमची मुक्ती मिळवण्याच्या बाबतीत ही माध्यमे नागरिकांना मार्गदर्शन करतील आणि त्यांनी याकामी भागिदार व्हावे म्हणून मी माध्यमांना आमंत्रित करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्याला आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे. आपला भारत पारदर्शी घडवायचा आहे. अशा अनेक योजना, प्रणाली आहे. ज्या भारताच्या एका टोकापासून, दुसऱ्या टोकापर्यंत सारख्याच पध्दतीने पोहोचवायच्या आहेत. हे करण्यासाठी आपल्या जुन्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. आज मी अशा एका विषयाला स्पर्श करु इच्छितो. ज्याबाबतीत आपण मला मदत केलीत तर त्या दिशेकडे आपण यशस्वीपणे जाऊ शकतो. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आपण शाळेत हे शिकलो आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाणी नव्हती, चलनी नोटा नव्हत्या. तेव्हा वस्तू विनिमय पध्दत होती, बार्टर सिस्टीम. तुम्हाला भाजी हवी असेल, तर त्याबदल्यात इतके गहू दया, तुम्हाला मीठ हवे असेल तर त्यासाठी इतकी भाजी द्या. वस्तूविनिमयातून व्यवहार होत असत.
हळूहळू नाणी वापरात आली. चलन वापरात आले. नोटा वापरात आल्या. पण आता काळ बदलला आहे. सारे जग कॅशलेस सोसायटी म्हणजे रोकडविरहीत व्यवस्थेच्या दिशेने जात आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण पैसे मिळवू शकतो आणि पैसे पाठवूही शकतो. वस्तूची खरेदी करु शकतो. देयक म्हणजे बिल चुकती करु शकतो. यात तुमच्या खिशातले पाकिट चोरीला जाण्याची भितीही उद्भवत नाही, हिशेब ठेवण्याची चिंता ही नाही. तो आपोआप नोंदवला जाईल. ही पध्दत वापरणे सुरुवातीला थोडे कठीण वाटेल मात्र एकदा सवयीचे झाल्यानंतर ही व्यवस्था सुलभ होईल. हे यासाठी शक्य आहे कारण गेल्या काही दिवसात आम्ही जी प्रधानमंत्री जनधन योजना राबविली, त्यात देशातील जवळजवळ सर्व कुटुंबांची बँक खाती उघडली गेली. दुसरीकडे आधार क्रमांकही मिळाला आणि मोबाईल तर आता भारतात जवळजवळ प्रत्येक भारतीयांच्या हातात आला आहे. म्हणूनच जनधन, आधार-मोबाईल-जॅम (जे.ए.एम.) यांचा ताळमेळ घालून आपण रोकडविरहित व्यवस्था, कॅशलेस सोसायटीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. आपण हे बघितले असेल की, जनधन खात्यासोबत रुपेकार्ड देण्यात आले आहे. येत्या काळात ते कार्ड क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही वापरांसाठी उपयोगी ठरेल. आणि हल्ली तर एक लहानसे यंत्रही उपलब्ध झाले आहे. ज्याला पी.ओ.एस. पाँईट ऑफ सेल असे म्हटले जाते. या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही आधार क्रमांक, रुपे कार्ड वापरुन इतरांची देणी देऊ शकता. खिशात रक्कम बाळगण्याची ती मोजायची आवश्यकताच नाही. भारत सरकारने जे उपक्रम हाती घेतले आहे त्यापैकी एक आहे पीओएसच्या माध्यमातून पैसे कसे देता येतील ?
दुसरा उपक्रम आम्ही हातात घेतला आहे तो बँक ऑन मोबाईल. युर्निवर्सल पेमेंट इंटर फेस बँकिंग ट्रान्झॅक्शन. “युपीआय” पध्दत बदलणारी ही व्यवस्था ठरेल. तुमच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून पैशाची देवाण-घेवाण करणे फार सोपे होऊन जाईल. आनंदाची गोष्ट म्हणजे एनपीसीआय आणि बँका ही व्यवस्था मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत आहे. आणि हे प्रत्यक्षात आले तर कदाचित रुपे कार्डसुध्दा जवळ बाळगण्याची आवश्यकता उरणार नाही. देशभरात सुमारे सव्वालाख तरुणांना बँक प्रतिनिधी म्हणून भरती करण्यात आले आहे. एकाप्रकारे बँक आपल्या दारी या दिशेने उचलले हे पाऊल आहे. पोस्टाच्या कार्यालयातही बँकेच्या सेवा मिळतील यासाठी हालचाली सुरु आहेत.
या पध्दतीचा व्यवहारात वापर करायला आपण शिकलो, त्याची सवय केली तर प्रत्यक्ष चलनाची गरजच उरणार नाही, रक्कम खिशात घेण्याची गरजच उरणार नाही. व्यवहार आपोआप होत राहतील आणि त्यामुळे पारदर्शकता येईल. बेहिशेबी व्यवहार, दोन नंबरचे व्यवहार बंद होतील. काळया पैशाचा परिणामही कमी होईल. म्हणून मी देशवासियांना आवर्जुन सांगेन की, आपण याची सुरुवात करुया. आपण बघा, एकदा ही व्यवस्था सुरु झाली की, सहजसुलभ पध्दतीने आपण पुढे जाऊ. आजपासून वीस वर्षांपूर्वी कोणाला वाटले तरी होते का ? की, इतके मोबाईल आमच्या हातात असतील म्हणून. हळूहळू सवय झाली आता त्याच्याशिवाय राहणे शक्य नाही. हे शक्य आहे की, रोकडविरहीत व्यवस्था (कॅशलेस सोसायटी ) हळूहळू तशीच आकाराला येईल. पण हे कमी कालावधीत प्रत्यक्षात आले तर अधिक चांगले होईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरु होता तेव्हा आपण विचार करु लागतो की, सुवर्णपदकांच्या कमाईत आपण किती मागे राहिलो ? रौप्य पदक मिळाले की नाही मिळाले ? कास्य पदकावर समाधान मानावे की मानू नये ?हे खरे आहे की क्रीडा क्षेत्रात अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत पण देशभरात एक वातावरण निर्मिती व्हायला हवी. रिओ ऑलिम्पिंकमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांचा आत्मविश्वास वाढायला हवा. आप-आपल्या पध्दतीने आपण हे करायला हवे. कुणी गाणे लिहावे, कुणी चित्र काढावे, कुणी शुभेच्छापर संदेश द्यावा, कुणी एखाद्या खेळाला प्रोत्साहित करावे, पण साऱ्या देशभरात असे सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे ज्यातून आमच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल. स्पर्धेचा निकाल काहीही लागो खेळ हा खेळ आहे. विजय मिळतोच तसाच पराभवही वाटयाला येतो. पदके हाती लागतात तशीच हातातून जातातही. पण आत्मविश्वास कमी पडता कामा नये. आम्ही हे आपल्याला सांगत असतांना आपले क्रीडा मंत्री श्रीमान सर्बानंद सोनोवाल यांनी केलेले एक काम माझ्या अंत:करणाला स्पर्श करुन गेले ते आपल्यापर्यंत पोहोचवतो.
विधानसभा निवडणूकीचे निकाल काय असतील ? आसाममध्ये मतमोजणीचे आकडे काय असतील ? या विचारात आम्ही गेल्या आठवडयात होतो आणि श्रीमान सर्बानंद स्वत: आसाममधल्या निवडणूक मोहिमेचे प्रमुख होते. मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. पण ते भारत सरकारचे मंत्रीही त्याचवेळी होते. आणि ही घटना मला जेव्हा समजली तेव्हा मला फार आनंद झाला. ती घटना अशी की आसाम विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्यापूर्वी ते कुणालाही कळू न देता पटियाळा येथे पोहोचल. पंजाबमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या आमच्या खेळाडूंचे प्रशिक्षण तिथे होते. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्टर्स (एनआयएस), तिथे ते अचानक गेले. खेळाडूनांही आश्चर्य वाटले आणि क्रीडा क्षेत्रासाठी सुध्दा ही नवलाची गोष्ट होती की, एखादा मंत्री इतकी चिंता करतो खेळाडूंची काय व्यवस्था आहे ? त्यांच्या जेवणाची काय सोय आहे ? आवश्यकतेनुसार पोषक अन्न त्यांना मिळतेय की नाही ? त्यांच्या शारिरीक तंदुरुस्तीसाठी जे प्रशिक्षक असायला हवेत ते आहेत की नाही ? प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रसामुग्री कार्यरत आहे की नाही ? प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने बघितली आहे. प्रत्येक खेळाडूच्या खोलीची त्यांनी पाहणी केली आहे. खेळाडूंबरोबर, प्रशिक्षकांबरोबर त्यांनी संवाद साधला आहे. व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांशी ते बोलले आहेत. सर्व खेळाडूंबरोबर ते स्वत: जेवले आहेत.
निवडणूकीचे निकाल लागणार असोत, मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी सांगण्याची शक्यता असो माझे एक सहकारी अशा वातावरणातही क्रीडा मंत्री म्हणून आपल्या कामाबद्दल इतके जागृक आहेत हे पाहून मला आनंद झाला. आणि याचप्रकारे आपण खेळाचे महत्त्व समजून घेऊ असा मला विश्वास वाटतो. क्रीडा विश्वाला प्रोत्साहन देऊ या. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊ या. जेव्हा सव्वाशेकोटी देशवासी आपल्यासोबत उभे आहेत हा विश्वास आमच्या खेळाडूंना वाटतो तेव्हा ही मोठी शक्ती ठरते आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावतो.
मागच्यावेळी मी फिफा अंडर सेव्हनटीन वर्ल्ड कपचा विषय काढला होता. देशभरातून मला त्याबद्दल सूचना प्रतिक्रिया आल्या आणि या काळात मला दिसतेय की, साऱ्या देशभरात फूटबॉलचे वातावरण तयार होऊ लागले आहे. अनेकजण पुढाकार घेऊन आपआपले संघ तयार करत आहे. नरेंद्र मोदी ॲपवर याबाबतीत अनेक सूचना मला मिळाल्या आहेत. हे शक्य आहे की, त्यांच्यापैकी अनेकजण खेळत नसतील, पण देशातल्या हजारो लाखो तरुणांच्या मनात खेळाबद्दल असलेली आवड हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. क्रिकेट आणि भारत यांच्यात असणारे नाते आपल्याला ठाऊक आहे. पण मी पाहिले की, फूटबॉलबद्दल इतकी आवड इतकी आस्था ? हे लक्षण भविष्यकाळातील सुखद संकेत म्हणावे लागेल. चला तर, रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता एक चैतन्यमय वातावरण येणाऱ्या काळात तयार करुया. प्रत्येक गोष्ट विजय आणि पराजय अशा तराजूत मोजता कामा नये. खेळाडू वृत्तीसह भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी. क्रीडा क्षेत्रासाठी संबंधित आपल्या सहकाऱ्यांसाठी उत्साहाचे चैतन्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपणही काही करुया, असे आवाहन मी देशवासियांना करतो.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कुठून ना कुठून तरी नवे नवे निकाल येत आहे. मी निवडणूक निकालांबद्दल बोलत नाही आहे, मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांनी वर्षभर नेटाने अभ्यास करुन परिक्षा दिली. दहावी-बारावीचे निकाल एकामागोमाग एक येणे सुरु झाले आहे आणि आमच्या मुली पराक्रम गाजवत आहे हे तर आता स्पष्ट झाले आहे. आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना या परिक्षांमध्ये यश मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे अनुत्तीर्ण झाले, त्यांना सांगू इच्छितो की, आयुष्यात करण्यासारखे खूप काही असते आपल्या अपेक्षेनुसार निकाल लागला नाही म्हणून आयुष्य थांबत नाही विश्वासबरोबर घेऊन जगायला हवे. विश्वासाने पुढे जायला हवे.
पण मला वेगळया नव्या प्रकारचा प्रश्न समोर आला आहे. आणि याबद्दल मी कधीसुध्दा विचार केला नव्हता. माझ्या “माय गोव्ह”वर एक ई-मेल आला तेव्हा त्याकडे माझे लक्ष गेले.
मध्यप्रदेशात राहणारे श्रीमान गौरव पटेल यांनी त्यांची फार मोठी समस्या माझ्यासमोर मांडली आहे. ते म्हणतात की, मध्यप्रदेश बोर्डाच्या परिक्षेत त्यांना 89.33 टक्के गुण मिळाले. हे वाचून मला फार छान वाटले. आनंदाची बातमी आहे पण पुढे त्यांनी त्यांचे दु:ख मांडले आहे. ते म्हणतात, की, 89.33 टक्के मार्क मिळवून मी घरी गेलो तेव्हा मला वाटले होते की, चारही बाजूनी माझे कौतुक होईल, अभिनंदाचा वर्षाव होईल पण झाले भलतेच घरातले मला म्हणाले की, अरे चार गुण जास्त मिळाले असते तर 90 टक्के झाले असते. माझे कुटुंब माझे मित्र, माझे शिक्षक कुणालाही माझ्या 89.33 टक्के गुणांमुळे आनंद झाला नव्हता. आता ही परिस्थिती मी कशी हाताळू, हे मला समजत नाही. हे म्हणजेच सर्व आयुष्य आहे का ? मला जे गुण मिळाले ते चांगले नाही आहेत का ? मी कुठे कमी पडलो का कळत नाही ? पण माझ्या मनावर दडपण आल्यासारखे वाटते.
गौरव, तुमचे पत्र मी बारकाईने वाचले मला वाटते की, ही वेदना तुमच्या एकटयाची नाही तर तुमच्यासारख्या लाखो-करोडो विद्यार्थ्यांची असू शकते. कारण वातावरणच असे तयार झाले आहे की, जे मिळाले त्यात आनंद मानण्यापेक्षा त्रुटी शोधायच्या. नकारात्मक वृत्तीचे हे दुसरे रुप आहे. प्रत्येक गोष्टीत उणीवा काढल्या समाधान मानलेच नाही तर समाजाला कधीच समाधानाच्या दिशेने नेऊ शकत नाही. तुमच्या कुटुंबियांनी, सहकाऱ्यांनी, मित्रांनी तुम्हाला मिळालेल्या उत्कृष्ट गुणांचे कौतुक करायला हवे होते म्हणजे आणखी काही करण्याचे बळ तुम्हाला मिळाले असते. मी आजूबाजुच्या लोकांना, पालकांना आवर्जुन सांगू इच्छितो की, तुमची मुले जो निकाल घेऊन येतील त्याचा स्विकार करा, स्वागत करा. त्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. अन्यथा असाही एक दिवस येईल की, तुम्हाला 100 टक्के गुण मिळतील आणि तरीही कुणी म्हणेल की, तुला शंभर टक्के गुण मिळाले हे खरे आहे पण तू अमूक-अमूक केले असते तर आणखी चांगले झाले असते. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असणे आवश्यक आहे.
जोधपूरच्या संतोष गिरी गोस्वामी यांनीही अशाच अर्थाचे पत्र लिहिले आहे. ते म्हणतात की, त्यांच्या जवळचे लोक त्यांचा निकाल स्विकारायला तयार नाहीत. त्यांचे म्हणणे हेच की, आणखी काहीतरी चांगले करता आले असते, आणखी काहीतरी चांगले करता आले असते.
मला ती कविता पूर्ण आठवत नाहीय पण खूप काळापूर्वी मी ती वाचली होती. कुण्या कविने लिहिले होते की, जीवनाच्या पटावर मी वेदनेचे चित्र काढले आणि त्याचे प्रदर्शन मांडले तेव्हा बघणारे म्हणाले यात सुधारणा हवी. कुणी म्हणाले निळयाऐवजी पिवळा वापरला असता तर बरे झाले असते. कुणी म्हणाले ही रेष इथे असती तर बरे झाले असते. अरे, अरे, माझ्या या वेदनेच्या चित्राला पाहून किमान एकाने तरी आसवे ढाळली असती तर ? असे त्या कवितेचे शब्द होते. मला आता नीट आठवत नाही. खूप आधीच्या काळात वाचलेली कविता. पण त्याचा अर्थ असाच होता. त्या चित्रातली वेदना कुणालाच कळली नाही. प्रत्येकजण सुधारणेबद्दल बोलत होता. संतोष गिरीजी तुम्ही व्यक्त केलेली चिंता अशीच आहे, जशी गौरव यांची आहे, तशीच आपल्या सारख्या करोडो विद्यार्थ्यांची असेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे म्हणजे तुमच्यासाठी ओझे ठरु शकते.
मी तर आपल्याला इतकेच सांगेन की, अशा अवस्थेत तुम्ही स्वत:चे संतुलन ढळू देऊ नका. प्रत्येकजण अपेक्षा व्यक्त करतो, ऐकून घ्या. आपल्या आपल्या निश्चियावर ठाम राहा आणि काही अधिक चांगले करण्याचा प्रयत्नही करीत राहा. पण जे प्राप्त झाले आहे त्यावर समाधान मानले नाही तर नवीन वास्तू कधीच उभारु शकणार नाही. यशाचा भक्कम पायाच, मोठया यशाचा आधार ठरतो. यशातून जन्माला येणारा असमाधानाचा भाव यशाकडे जाण्याची शिडी बनू शकत नाही. उलट अपयशाची ही हमी ठरते. आणि म्हणून मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगेन की, जेवढे यश मिळाले आहे, त्या यशाचे गाणे गा. त्यातून नव्या यशाचे नवे मार्ग खुले होतील. हा मुद्दा मी शेजारी, आईवडिल आणि मित्रांना मुद्दाम सांगू इच्छितो की, तुमच्या अपेक्षा तुमच्या मुलांवर कृपया लादू नका आणि मित्रांनो, जीवनात कधी अपयश आले तर जीवन थांबते का ? ज्याला परिक्षेत चांगले गुण मिळत नाहीत तो खेळात पुढे जातो, संगीत क्षेत्रात पुढे जातो, कलाकुसरीच्या प्रांतात पुढे जातो, व्यापार व्यवसायात पुढे जातो. ईश्वराने प्रत्येकाला काहीना काही कौशल्य दिले आहे. बस्स तुम्ही तुमचे आंतरिक सामर्थ्य ओळखा, त्यावर भर द्या, जीवनात तुम्ही प्रगती कराल. आणि जीवन जगताना हा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो. संतुरवाद्याची आपल्याला माहिती असेल. एक काळ असा होता की, संतुर वाद्य काश्मिर खोऱ्यातील लोकसंगीताचे अभिन्न अंग होते. पण पंडित शिवकुमार ज्यांनी या वाद्याला हात लावला आणि आज जागतिक संगीत क्षेत्रात ते एक महत्त्वाचे वाद्य बनले. सनई – भारतीय संगीत क्षेत्रात सनई या वाद्याला मर्यादित वाव होता. राजा-महाराजांच्या काळात दरबाराच्या प्रवेशद्वारांपाशी सनईची जागा होती. पण उस्ताद बिसिमिल्ला खान यांनी हे वाद्य हातात घेतले आणि जगातील एक उत्तम वाद्य या उंचीवर सनईला नेऊन ठेवले. सनईची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. म्हणून तुमच्यापाशी काय आहे ? कसे आहे ? याची चिंता करु नका ? जे आहे त्यावर एकाग्र व्हा, एकचित्त व्हा. त्याचे फळ हे मिळाल्याशिवाय राहणार नाही.
माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी-कधी माझ्या लक्षात येते की, आपल्या देशातील गरीब कुटुंबांत औषधांवर होणारा खर्च त्या कुटुंबाचा आर्थिक गाडा घसरणीला लावणारा ठरतो. आणि हे खरे आहे की, आजारी न पडण्यासाठी खर्च खूप कमी येतो. पण आजारी पडल्यानंतर पुन्हा आरोग्य पहिल्यासारखे व्हायला मात्र खूप खर्च येतो. आपण आपली जीवनशैली अशी का ठेऊ नये की, आपल्याला आजार शिवणारच नाही. कुटुंबांवर त्याचा आर्थिक भार पडणारच नाही. एक म्हणजे, स्वच्छता राखणे हा आजारापासून दूर राहण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, आधार आहे. गरीबांची सर्वात मोठी सेवा कोणी करु शकत असेल ? तर ती आहे स्वच्छता. आणि दुसरे म्हणजे ज्यासाठी मी सतत आग्रह धरतो तो विषय म्हणजे योग. काहीजण त्याला योगा असेही म्हणतात. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. संपूर्ण जगभर योगाविषयी एक आकर्षण आहे, श्रध्दा आहे आणि जगाने त्याचा स्विकार केला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही अनमोल भेट आहे, जी आपण जगाला दिली आहे. तणावग्रस्त जगाला संतुलित जीवन जगण्याचे बळ योगातून मिळते. प्रिव्हेनशन इज बेटर दॅन क्युअर, आजारी पडल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काळजी घेणे उत्तम. योग विद्येशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींसाठी निरोगी राहणे, संतुलित असणे, ठाम इच्छाशक्ती मनात निर्माण होणे, प्रत्येक कामात एकाग्रता साधणे या गोष्टी सहज शक्य होतात. 21 जून – योगदिन हा काही केवळ एक कार्यक्रम सोहळा नाही. योगाचा विस्तार व्हावा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचे स्थान असावे, प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील 20 मिनिटे, 25 मिनिटे, 30 मिनिटे योगसाधनेसाठी देईल, यासाठी 21 जून हा योग दिन आम्हाला प्रेरणा देतो. आणि कधी कधी सामूहिक वातावरणामुळे व्यक्तीच्या जीवनात बदल घडू शकतो. मला आशा आहे येत्या 21 जूनला आपण याबाबतीत नक्की काहीतरी कराल. तुम्हाला पुढाकार घेण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. आपण भारत सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या, योग विद्येचा या वेळचा अभ्यासक्रम कोणता ? कोण-कोणती आसने करायची आहेत ? ती कशी करायची ? याची संपूर्ण माहिती त्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ती माहिती पहा, आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या शहरात त्याप्रमाणे करवून घ्या. आपल्या शाळेत, संस्थेत, अगदी कार्यालयातसुध्दा. अजुन एक महिना आपल्या हातात आहे. सुरुवात करा आणि पहा. 21 जून रोजी या उपक्रमाचा तुम्ही एक भाग व्हाल. मी अनेकदा वाचले आहे की, बऱ्याच कार्यालयांमध्ये रोज सकाळी नियमितपणे योगसाधाना केली जाते. सामूहिक प्राणायाम केला जातो. त्यामुळे संपूर्ण कार्यालयाची कार्यकुशलता वाढते. पूर्ण कार्यालयाची संस्कृती बदलते आणि वातावरणही बदलते. 21 जून या दिवसाचा उपयोग आपण आपल्या जीवनात योगविद्या यासाठी करु शकतो का ? आपल्या सामाजिक जीवनात योगशास्त्र असावे यासाठी करु शकतो का ? आपल्या अवतीभवती योगविद्येचा प्रसार व्हावा यासाठी करु शकतो का ? मी यावेळी चंदीगड येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 21 जून रोजी चंदीगडच्या नागरिकांबरोबर मी योगासन करणार आहे. आपणही त्यादिवशी सहभागी व्हा. सारे जग त्या दिवशी योगासने करणार आहे. आपण मागे राहू नका अशी माझी विनंती आहे. आपण निरोगी असणे हे भारताला निरोगी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, “मन की बात” माध्यमातून मी सतत तुमच्याशी जोडला जातो. अनेक दिवसांपूर्वी मी आपल्याला एक मोबाईल क्रमांक दिला होता. त्यावर मिस्ड कॉल देऊन आपण “मन की बात” ऐकू शकत होता. पण आता हे आणखी सोपे करण्यात आले आहे. आता “मन की बात” ऐकण्यासाठी फक्त चार आकडी क्रमाकांवर मिस्ड कॉल द्या. तो चार आकडी क्रमांक आहे एक नऊ दोन दोन, एकोणीसशे बावीस, वन नाईन टू टू. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन “मन की बात” केव्हाही, कधीही, आपल्याला हव्या त्या भाषेत आपण ऐकू शकाल.
माझ्या देशवासियांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. पाण्याबद्दल मी सांगितलेले विसरु नका. लक्षात ठेवाल ना ? ठिक आहे. धन्यवाद. नमस्ते.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपणा सर्वांना नमस्कार. सुट्ट्यांच्या काळात अनेक गोष्टी करायचे आपण ठरवतो. कार्यक्रम आखतो आणि ह्या सुट्ट्यांच्या काळात हंगाम असतो आंब्याचा म्हणून मनात येते की, आंब्याचा आस्वाद घ्यावा, असेही वाटते की दुपारी थोडी वामकुक्षी करता आली, तर बरं होईल. पण यावेळी कडक उन्हाळ्याने चहूकडे हा आनंद हिरावून घेतला आहे. देशभरात काळजीचे वातावरण असणे हे स्वाभाविक आहे. आणि त्यातही जेव्हा सतत दुष्काळ पडतो तेव्हा जलसाठे आटतात. कधी कधी अतिक्रमणामुळे, कधी मार्ग अरुंद झाल्यामुळे, अडथळे आल्यामुळे येणाऱ्या जलप्रवाहात बाधा आल्यामुळे जलाशयात क्षमतेपेक्षा कमी जलसंचय होतो. आणि वर्षांनुवर्ष हेच होत राहिल्याने जलधारण क्षमता कमी होते. दुष्काळावर मात करण्यासाठी, पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी राज्य सरकारे आपल्या पातळीवर प्रयत्न करतात. हे असले तरीही मी पाहिले आहे की नागरिकही यासाठी खूप चांगले प्रयत्न करतात. अनेक गावांमध्ये याबद्दल जागरुकता दिसते आणि पाण्याची खरी किंमत तेच जाणतात ज्यांनी जलदुर्भिक्षाच्या संकटाचा सामना केला आहे. आणि अशा ठिकाणी पाणी वाचवण्याबद्दल संवेदनशीलता असते, आणि त्याबद्दल काही करण्याची सक्रीयताही असते. काही दिवसांपूर्वीच मला सांगण्यात आले की महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायत आणि तिथल्या गावकऱ्यांनी पाणी हा विषय अत्यंत संवेदनशील रितीने हाताळला आहे. पाणी साठवण्याची इच्छा असणारी अनेक गावं सापडतील, पण त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पूर्ण पीक पद्धतीत बदल केला. अशी पिकं, ज्यांना अधिक पाणी लागते, उस असो, केळी असोत, अशा पिकांची लागवड न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे ऐकायला फार सोपे वाटते पण वाटते तितके हे सोपे नाही. सर्वांनी मिळून केवढा मोठा संकल्प केला असेल? एखाद्या कारखान्यात पाण्याचा वापर अधिक होत असेल, तर त्या कारखानदाराला तुझा उद्योग बंद कर कारण त्याला जास्त पाणी लागते, असे सांगितले तर त्याचा काय परिणाम होईल? हे आपण जाणता. पण हे माझे शेतकरी बांधव, पहा त्यांना वाटले, उसाला खूप पाणी लागते, मग ऊसाची लागवड करु नका, त्यांनी लागवड बंद केली आणि अशी फळे, भाज्या ज्यांना कमी पाणी लागते, त्यांची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तुषार सिंचन, ठिबक सिंचन, जलसंधारण, जलपुनर्भरण याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आज हे गाव स्वबळावर उभे राहिले आहे. बरोबर आहे, की मी तुम्हाला हिवरेबाजार या छोट्याशा गावाबद्दल सांगतो आहे, पण अशी अनेक गावं असतील, अशा सर्व गावकऱ्यांचे, त्यांच्या या उत्तम कामाबद्दल मी कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
मला कुणीतरी सांगितले की, मध्य प्रदेशात देवास जिल्ह्यात गोरवा ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीने प्रयत्नपूर्वक अभियान हाती घेतले ते शेततळ्यांच्या निर्मितीचे. सुमारे सत्तावीस शेततळी त्यांनी बांधली. परिणामी भूजल पातळी वाढली, पाण्याचा स्तर वर आला. जेव्हा पिकांना पाण्याची गरज भासली तेव्हा पाणी मिळाले आणि मोठमोठाले आकडे त्यांनी सांगितले. शेतीपासून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात वीस टक्क्यांची वाढ झाली. पाण्याची बचत तर झालीच शिवाय पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होते. आणि जगभर असे सांगितले जाते की पिण्याचे शुद्ध पाणी ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीचे कारण ठरते. आरोग्यही त्यामुळे उत्तम राहाते. कधी कधी असे वाटते की, जेव्हा भारत सरकार लातूरला रेल्वेने पाणी पोचवते, तेव्हा जगासाठी ती एक बातमी होते. हे खरे आहे की, ज्या वेगाने रेल्वेने हे काम केले त्याबद्दल रेल्वेचे अभिनंदन करायला हवे, पण ते गावकरीही अभिनंदनासाठी पात्र आहेत, मी तर म्हणेन की त्यांचे विशेष अभिनंदन करायला हवे. पण असे अनेक उपक्रम नागरिकांकडून राबवले जातात, जे कधी समोर येत नाहीत. सरकारने एखादी चांगली मोहीम राबवली तर कधी कधी त्याला प्रसिद्धी मिळतेही पण आपल्या आजूबाजूला आपण पाहिले, तर लक्षात येईल की दुष्काळावर मात करण्यासाठी कशाप्रकारे नवनवीन उपाययोजनांमधून लोक या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करतात. कितीही संकटे येवोत पण एखादी चांगली गोष्ट कळली तर सारं संकट दूर झाल्याची भावना मनात निर्माण होते हा मनुष्य स्वभाव आहे. यंदाच्या पावसाळ्यात 106 ते 110 टक्के पाऊसमान असेल, ही शक्यता सर्वत्र कळली आणि ह्या बातमीने जणू एखादा शांती संदेशच सर्वांना मिळाला. पाऊस यायला अजून वेळ आहे पण चांगला पाऊस होणार ही बातमी चैतन्य घेऊन आली.
पण माझ्या प्रिय देशवासीयांनो, यंदा पाऊस चांगला पडणार ही बातमी आपल्यासाठी जितकी आनंद देणारी आहे तितकीच आपल्या सगळ्यांसाठी एक संधी निर्माण करणारी आहे. एक आव्हान निर्माण करणारी आहे. गावागावात पाणी वाचवण्यासाठी एखादी मोहीम आत्तापासूनच आपण हातात घेऊ शकतो का? शेतकऱ्यांना मातीची गरज असते. शेतात पिकांसाठी ती उपयोगी ठरते. मग गावातल्या तळ्यातला गाळ काढून तो आम्ही शेतात टाकला तर? शेतीसाठी फायदा होईलच त्याचबरोबर तळ्यात पाणी साठण्याची क्षमता वाढेल. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमधून, खताच्या रिकाम्या पोत्यांमधून दगड आणि माती भरुन आपण ते पाणी वाहून जाण्याच्या मार्गावर टाकले तर? पाणी अडवता येईल का? पाणी पाच दिवस साठेल, सात दिवस साठेल, ते पाणी जमिनीत मुरेल. जमिनीतली पाण्याची पातळी वाढेल. आमच्या विहींरींमध्ये पाणी येईल. जेवढे पाणी अडवता येईल, तेवढे अडवायला हवे. पावसाचे पाणी, गावात पडणारे पाणी गावात राहील. साऱ्यांनी मिळून संकल्प केला, तर सामुहिक प्रयत्नांमधून हे शक्य आहे. आज आपल्यापुढे पाण्याचे संकट आहे. दुष्काळाची स्थिती आहे पण येणारा महिना-दीड महिन्याचा काळ आपल्या हातात आहे. आणि मी तर नेहमी सांगतो की, कधी आपण पोरबंदर, महात्मा गांधीजींच्या जन्म स्थानी गेलो, तर वेगवेगळी ठिकाणे आपण बघतो. पण तिथे बघण्यासारखी आणखी एक महत्त्वाची जागा आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी घराखाली कशा टाक्या बांधल्या आहेत. या दोनशे वर्ष जुन्या आहेत आणि त्यात साठणारे पाणी किती शुद्ध राहते हे बघण्यासारखे आहे.
श्रीमान कुमार कृष्णा यांनी MyGov वर एक मुद्दा मांडला आहे आणि एका अर्थाने कुतूहल प्रगट केले आहे. ते म्हणतात की, आमच्या हयातीत गंगास्वच्छता मोहिम पूर्ण होणे शक्य आहे का? त्यांना वाटणारी चिंता साहाजिक आहे कारण जवळजवळ गेल्या तीस वर्षांपासूनच हे काम सुरु आहे. अनेक सरकारे आली, अनेक योजना आखण्यात आल्या, यासाठी खूप पैसाही खर्च झाला. आणि म्हणून कुमार कृष्णा यांच्या प्रमाणेच देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहाजिक आहे धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी गंगा मोक्षदायिनी आहे. गंगेचे हे महात्म्य मला मान्य आहेच पण त्याही पेक्षा गंगा जीवनदायिनी आहे, असे मी मानतो. गंगा आम्हाला भाकरी देते. गंगा आम्हाला रोजगार देते, गंगेकडून आम्हाला जगण्यासाठी नवी शक्ती मिळते. गंगा जशी वाहते तशी देशाच्या आर्थिक घडामोडींना एक नवी गती देते. एका भगीरथाने आपल्याला गंगा आणून दिली. पण तिला वाचवण्यासाठी कोट्यवधी भगीरथांची आज गरज आहे. लोक सहभागाशिवाय ही मोहिम कधीही यशस्वी होणार नाही. आणि म्हणून गंगेच्या स्वच्छतेसाठी आपण सर्वांनी बदल घडवणारे चेंज एजंट व्हायला हवे. पुन्हा पुन्हा, वारंवार हे सांगावे लागेल. सरकारी पातळीवर याबाबतीत अनेक प्रयत्न सुरु आहेत. गंगेकाठी असणाऱ्या राज्यांकडून यासाठी सहकार्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. सामाजिक तसेच स्वयंसेवी संघटनांना त्यात सहभागी करण्याचे प्रयत्न होत आहेत. गंगेचा प्रवाह, गंगेचा पृष्ठभाग स्वच्छ ठेवण्यासाठी आणि गंगेच्या पाण्यात होणारे औद्योगिक प्रदूषण थांबवण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. गंगेच्या पात्रात, नाल्यांमधून रोज घनकचरा मोठ्या प्रमाणात वाहात येतो. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी वाराणसी, अलाहाबाद, कानपूर, पटणा अशा जागी पाण्यावर तरंगणारा कचरा स्वच्छ करण्याचे काम ट्रॅश स्कीमर मदतीने केले जाते. सर्व स्थानिक प्रशासन संस्थांना हे उपलब्ध करुन देण्यात आले आहे आणि त्यांनी त्याचा वापर करुन कचरा साफ करावा, असे आवर्जून सांगितले गेले आहे. आणि नुकतेच मला सांगण्यात आले की, जिथे चांगल्या पद्धतीने हे प्रयत्न होत आहेत, त्याठिकाणी रोज तीन टन ते अकरा टन कचरा काढला जातो. म्हणजेच हे खरे आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर, होणारी घाण वाढण्यापासून थांबली आहे. येत्या काळात आणखी काही ठिकाणी ट्रॅश स्कीमर बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. गंगेच्या आणि यमुनेच्या काठावर राहणाऱ्या लोकांना लवकरच त्याचा अनुभव येईल.
औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, कागद-लगदा उद्योग, मद्यनिर्मिती करणारे कारखाने आणि साखर कारखाने यांच्याबरोबर एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात सुरु झाली आहे. त्याचे चांगले परिणाम होतील, असे आज तरी मला वाटतेय.
मला हे ऐकून आनंद झाला की, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील मद्यनिर्मिती कारखान्यांनी शून्य द्रव विसर्ग, (zero liquid discharge) याबाबतीत यश मिळवले आहे. काही अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात ही माहिती मला दिली. कागद कारखान्यांमधून पडणारा टाकाऊ द्रव्यांचा विसर्ग आता जवळजवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. आपण योग्य दिशेने पावले टाकत आहोत, याचेच हे लक्षण आहे आणि एक प्रकारे जागरुकताही वाढली आहे. आणि मी बघितले आहे की, केवळ गंगेच्या काठावर राहणारीच नव्हे, तर दूरवरच्या दक्षिण भागातली एखादी व्यक्ती मला भेटते तेव्हा ती अवश्य म्हणते साहेब, गंगा स्वच्छ होईल ना! सर्वसामान्य लोकांचा हाच विश्वास, गंगा स्वच्छतेच्या मोहिमेला यश मिळवून देईल. गंगा स्वच्छ करण्याच्या कामात नागरिक दान देत आहेत. एका उत्तम रितीने हे काम सुरु आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो. आज 24 एप्रिल. हा दिवस भारतात पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. याच तारखेला आमच्या देशात पंचायत राजव्यवस्थेला सुरुवात झाली होती. आणि हळूहळू पूर्ण देशभर पसरलेली पंचायत राज प्रणाली, आमच्या लोकशाही शासन यंत्रणेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आज यशस्वी रितीने काम करीत आहे.
14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आपण साजरी केली आणि आज 24 एप्रिल रोजी पंचायत राज दिवस साजरा करत आहोत. हा एक सुंदर योग आहे. ज्या महापुरुषाने
भारताला संविधान दिले, त्या महामानवाच्या जयंतीपासून आज 24 एप्रिल पर्यंत आमच्या संविधानातील महत्वाचा भाग असणाऱ्या गाव या घटकाला जोडण्याची प्रेरणा मिळण्यासाठी केंद्र शासनाने राज्य शासनाच्या सहकार्याने 14 एप्रिल ते 24 एप्रिल पर्यंत दहा दिवसांच्या काळात ग्रामोदय ते भारतउदय हे अभियान राबवले. 14 एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, त्यांचे जन्मस्थळ असणाऱ्या महू या ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली हे मी माझे सुदैव मानतो. त्या पवित्र भूमीला नमन करण्याची संधी मिळाली आणि आज 24 तारखेला मी झारखंड राज्यात, जिथे सर्वाधिक संख्येने आमचे आदिवासी बंधु भगिनी राहतात, त्या राज्यात मी पंचायत राज दिवस साजरा करणार आहे. आणि दुपारी तीन वाजता देशभरातील सर्व पंचायत संस्थांशी संवाद साधला. या अभियानानं जागरुकता निर्माण करण्याचे एक मोठे काम केले आहे. हिंदुस्थानातील कानाकोपऱ्यात गाव पातळीवर लोकशाही संस्था कशा सशक्त होतील? गाव स्वयंपूर्ण कसं होईल? गाव स्वत: आपल्या विकासाच्या योजना कशा बनवेल? मूलभूत सोयी –सुविधा महत्वाच्या असतील, सामाजिक सोयी सुविधा महत्त्वाच्या असतील, शाळेतून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. ‘मुलगी वाचवा-मुलगी शिकवा’ मोहीम यशस्वीरित्या राबवली जाईल. मुलीचा वाढदिवस साऱ्या गावाचा उत्सव व्हायला हवा. अशा अनेक योजना आहेत.काही गावांमध्ये अन्नदानाचा उपक्रम हाती घेतला गेला. हिंदुस्थानातल्या इतक्या गावांमधून इतके विविध कार्यक्रम दहा दिवस चालणारे, बहुधा असं फार कमी वेळा होतं. मी सर्व राज्य सरकारांचं, सरपंचांचं अभिनंदन करतो, त्यांनी फार मौलिक पध्दतीने नाविन्य पूर्ण मार्गाने गावाच्या हितासाठी, गावाच्या विकासासाठी, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी ही मोहिम मला सुसंधीत परिवर्तित केली. गावांमधून जी जागरुकता आली आहे, तीच भारत-उदय याची शाश्वती आहे. भारत-उदय चा आधार ग्राम उदय हाच आहे. म्हणूनच ग्राम उदय यावर भर दिला तर इच्छित परिणाम आपण मिळवल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईहून शर्मिला घारपुरे यांनी फोन केला आणि त्यांच्या मनातली चिंता व्यक्त केली.
“माननीय पंतप्रधान नमस्कार. मी मुंबईहून शर्मिला घारपुरे बोलत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणाबाबत माझा प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुधारणांची गरज आहे. योग्य शाळा किंवा कॉलेज उपलब्ध नसणे किंवा शिक्षणाचा दर्जा नसणे. मुलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्यांना अनेक मुलभूत गोष्टी माहित नसतात. यामुळे जगात आपली मुलं मागे राहतात. याबाबत आपले विचार काय आहेत? आणि या क्षेत्रात कोणत्याप्रकारे आपण सुधारणा आणू इच्छिता याबाबत कृपा करुन सांगा. धन्यवाद.”
ही अशी काळजी वाटणं साहजिक आहे. आज प्रत्येक कुटुंबात आई वडीलांचे सर्वात मोठं स्वप्न असते ते म्हणजे मुलांचं शिक्षण. घर, गाडी या गोष्टी त्यानंतर आणि भारतासारख्या देशात नागरिकांच्या मनात अशी भावना असणे ही फार मोठी शक्ती आहे. मुलांना शिकवायचे, सुशिक्षित करायचे, चांगले शिक्षण कसे मिळेल याची चिंता पालकांना वाटावी याचे प्रमाण वाढले पाहिजे आणि मी असे मानतो की, ज्या कुटुंबांमध्ये ही जागरुकतेची जाणीव असते, त्याचा परिणाम शाळेवर पडलेला दिसतो. शिक्षकांवर पडलेला दिसतो आणि त्या मुलांमध्येही ही जाणीव निर्माण होते की हे ध्येय गाठण्यासाठी मी शाळेत जातोय आणि यासाठी मी सर्व पालकांना, माता-पित्यांना आवर्जून सांगेन की आपल्या मुलाच्या शालेय घडामोडींकडे लक्ष द्या, वेळ काढून त्याबद्दल मुलाशी बोला आणि जर एखादी गोष्ट जाणवली तर स्वत: शाळेत जा आणि शिक्षकांशी बोला. ही तुमची दक्षता, आपल्या शालेय व्यवस्थेतील काही त्रुटी कमी करु शकेल आणि लोक सहभागामुळे हे होईलच.
आपल्या देशात प्रत्येक सरकारने शिक्षण या मुद्यावर भर दिला आहे. प्रत्येक सरकारने आपापल्या पध्दतीने त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. आणि हेही खरं आहे की बराच काळ आमचे लक्ष या गोष्टीवर राहिले की शिक्षण संस्था उभ्या रहाव्यात, शिक्षण व्यवस्थेचा विस्तार व्हावा, शाळा तयार व्हाव्यात, महाविद्यालयं तयार व्हावीत, शिक्षकांची भरती व्हावी, अधिकाधिक मुले शाळेत यावीत. चहूबाजूला शिक्षणाचा प्रसार करण्याला आम्ही प्राधान्य दिले आणि ते आवश्यकही होते. पण आता जेवढे महत्व विस्ताराचे आहे त्यापेक्षा अधिक ते आमच्या शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांचे आहे. विस्ताराचे एक फार मोठे काम आपण केले आहे. आता आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. साक्षरता मोहिमेकडून दर्जेदार शिक्षण हे आता आमचे प्राधान्य असायला हवे. आजवर मोजणी झाली आराखड्याची आता लक्ष द्यायचे आहे परिणामावर. शाळेत किती मुले आली हे आजवर प्राधान्यानं पाहिले गेले. आता साक्षरतेपेक्षा, शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. मुलांची पट नोंदणी करा, पट नोंदणी करा, ह्या मंत्राचा आजवर उच्चार केला गेला. आता जी मुले शाळेल आली आहेत, त्यांना चांगले शिक्षण, योग्य शिक्षण मिळेल यावर आम्हाला लक्ष केंद्रीत करावं लागेल. या सरकारच्या अर्थसंकल्पातही आपण पाहिले असेल, चांगले शिक्षण देण्यावर भर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फार मोठा पल्ला गाठायचा आहे, हे खरे आहे पण, शर्मिलाजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आमच्यात आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे.
आपण पाहिले असेल की यावेळच्या अर्थसंकल्पात वेगळा मार्ग निवडण्याचे काम झाले आहे. दहा सरकारी विश्वविद्यालये आणि दहा खाजगी विश्वविद्यालये यांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करुन आव्हानात्मक, स्पर्धात्मक स्तरावर येण्याबद्दल सांगण्यात आल्याचं या अर्थसंकल्पात आपल्याला दिसेल. सर्वोत्कृष्ट विश्वविद्यालये, सर्वोत्कृष्ट विद्यापीठे होण्यासाठी आपण काम करु इच्छिता? सांगा. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने ही योजना आणली गेली आहे. भारतीय विद्यापीठे जागतिक पातळीवर स्पर्धा करणारी विद्यापीठे होऊ शकतात. व्हायलाच हवीत. त्याबरोबरच शिक्षणाला जितके महत्त्व आहे. तितकेच कौशल्याला सुद्धा आहे. त्यासाठी आता शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरेल. दूरशिक्षण तंत्रज्ञान प्रणाली आमच्या शिक्षण व्यवस्थेला सुलभ करेल आणि लवकरच नजिकच्या भविष्यकाळात त्याचे परिणाम आपल्याला दिसतील असा मला विश्वास आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून एका मुद्याबद्दल नागरिक मला विचारत आहेत. वेब पोर्टल MyGovवर ते लिहितात, काही जण माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर लिहितात, आणि यात बहुसंख्य युवावर्ग लिहीत असतो.
“माननीय पंतप्रधान नमस्कार, मी बिजनोरहून मोना कर्णवाल बोलत आहे. आजच्या काळातल्या युवकांसाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राचंही मोठं महत्त्व आहे. त्यांच्यात संघभावना असायला हवी, चांगले नेतृत्वगुण असायला हवेत, ज्यामुळे त्यांचा सर्वांगिण विकासही होईल. मी हे स्वानुभवावरुन बोलत आहे. कारण मी स्वत: भारत स्काऊटस् आणि गाईडमधे होतो आणि त्याचा माझ्या जीवनावर खूपच चांगला परिणाम झाला. आपण जास्तीत जास्त युवकांना प्रोत्साहित करावे अशी माझी इच्छा आहे आणि सरकारनेही एनसीसी, एनएसएस आणि भारत स्काऊटस् अँड गाईडस्ला प्रोत्साहन द्यावे.”
आपण मला इतक्या सूचना पाठवल्यात. एक दिवस माझ्या मनात आले की, आपल्याशी बोलण्याआधी यासर्व मंडळींशी बोलून घ्यावे. यासाठी तुमचाच दबाव होता, तुमच्याच सूचना होत्या त्याचा परिणाम असा झाला की नुकतीच एक बैठक मी बोलावली होती. त्या बैठकीत एनसीसी, एनएसएस यांचे प्रमुख, स्काऊट आणि गाईडचे प्रमुख, रेड क्रॉस आणि नेहरु युवा केंद्राचे प्रमुख यांना बोलावले होते. आणि जेव्हा मी त्यांना विचारले की याआधी आपली अशी बैठक कधी झाली होती? त्यावर त्यांचे उत्तर होते की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवर अशा प्रकारची ही पहिलीच बैठक आहे. म्हणूनच या साऱ्या कामांच्या संदर्भात ज्या युवा वर्गाने, युवा मित्रांनी माझ्याकडे आग्रह धरला त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्या सूचनांचा परिणाम म्हणून ही बैठक मी बोलावली आणि या अधिकाऱ्यांना मी भेटलो हे फार चांगले झाले, असे मला वाटते. यात मोठ्या प्रमाणावर समन्वयाची गरज आहे हे मला जाणवले. आपाआपल्या पातळीवर खूप कामं होत आहेत, पण सामुहिक स्वरुपात, संघटित स्वरुपात आमच्या संघटनांनी काम केले, तर त्याचा किती मोठा परिणाम मिळून शकतो. आणि केवढा विस्तार आहे त्यांचा, किती कुटुंबांपर्यंत त्या गेल्या आहेत, पोहचल्या आहेत. यांचा आवाका, परीघ बघून मला फार समाधान वाटले. आणि त्यांच्यातही उत्साह दांडगा दिसला, काही तरी करण्याचा. आता हे खरे आहे की मी स्वत: एनसीसी म्हणजे राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट होतो. त्यामुळे मला हे ठाऊक आहे की, अशा संघटनांमुळे एक नवी दृष्टी मिळते, प्रेरणा मिळते. एक राष्ट्रीय दृष्टीकोन वाढीला लागतो. मला लहानपणी त्याचा लाभ मिळाला आणि हेही मी मानतो की अशा संघटनांमध्ये नवी चेतना भरली पाहिजे. नवी शक्ती भरली पाहिजे. या बैठकीत काही मुद्दे मी त्यांच्या समोर मांडले. मी त्यांना सुचवले की या हंगामात जलसंचय, पाणी साठवण्याचे काम आपल्या तरुणांनी, संघटनांनी का करु नये? कितीतरी प्रभाग कितीतरी जिल्हे आपण हागणदारी मुक्त करण्यात प्रयत्नपूर्वक यश मिळवले. लोकांना शौचासाठी उघड्यावर जाण्यापासून थांबवले. देश जोडण्यासाठी कोणते कार्यक्रम आखू शकतो? आमच्या सर्व संघटनांचे मिळून एक, समान युवा-गीत कोणते असेल? अनेक गोष्टींवर त्यांच्याशी बोलणे झाले.
मी आज आपल्याला आवर्जून सांगेन, आपणही मला सांगा, अगदी नेमके उपाय, नेमक्या सूचना पाठवा. आपल्याकडे अनेक युवा संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यपद्धतीत, कार्यक्रमांमध्ये काय नाविन्य आणता येईल? माझ्या नरेंद्र मोदी ॲपवर आपण हे लिहीलंत, तर ते योग्य जागी मी पोचवेन आणि मला वाटते की या बैठकीनंतर या सर्व गोष्टींना एक गती मिळेल. हे मला वाटते आणि या सर्वांबरोबर स्वत:ला समाविष्ट करावे, असे आपल्याही मनात येईल, असे होईलच.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना विचार करायला भाग पाडेल अशी एक गोष्ट मला सांगायची आहे. आम्हा सर्वांना जागृत करणारी ही गोष्ट आहे, असे मला वाटते. आपण पाहिले असेल की आपल्या देशाची राजकीय अवस्था अशी आहे की मागच्या अनेक निवडणुकांच्या वेळी कोणता पक्ष किती गॅस सिलेंडर देईल? यावर चर्चा होत असे. 12 सिलेंडर की 9? निवडणुकीच्या काळात हा एक महत्त्वाचा, मोठा विषय ठरत असे. आणि प्रत्येक राजकीय पक्षाला असे वाटायचे की मध्यमवर्गीय लोकांपर्यंत निवडणुकीच्या वाटेने पोचायचे असेल, तर गॅस सिलेंडर हा मोठा महत्त्वाचा विषय आहे. दुसऱ्या बाजूला अर्थतज्ञांचा आग्रह असायचा की अनुदानात कपात करा. त्यासाठी अनेक समित्या स्थापन झाल्या. गॅस सिलेंडरवरचे अनुदान कमी करण्यासाठी या समित्यांसमोर अनेक प्रस्ताव येत असत. सूचना येत असत. या समित्यांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असत, मात्र मूळ मुद्दा तसाच राहात असे. हा सार्वत्रिक अनुभव आहे. पण या चौकटीच्या बाहेर जाऊन कधी विचार केला गेला नाही. आज, माझ्या देशवासियांनो, आपल्यासमोर माझा हिशोब मांडताना मला आनंद होतो आहे. मी वेगळाच मार्ग निवडला, आणि तो मार्ग होता जनता जनार्दनावर विश्वास टाकण्याचा. कधी कधी आम्ही राजकीय नेत्यांनी स्वत:वर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या लोकांवर अधिक विश्वास ठेवायला हवा. मी जनता जनार्दनावर विश्वास ठेवून एकदा असेच म्हणालो होतो की, वर्षभरात 1500, 2000 रुपयांचा वाढीव खर्च आपण सहन करु शकतो, तर मग गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान आपण का सोडून देत नाही? ते अनुदान एखाद्या गरीबाला उपयोगी पडेल. हे मी असेच बोललो होतो पण आज मी अत्यंत अभिमानपूर्वक आपल्याला सांगू शकतो. माझ्या देशवासियांबद्दल मला अभिमान वाटतो.
एक कोटी कुटुंबांनी स्वेच्छेने, गॅस अनुदान घ्यायचे नाकारले आहे. आणि हे अनुदान सोडणारे कुणी श्रीमंत, निवृत्त लिपीक, कुणी शेतकरी, कुणी किरकोळ दुकानदार, असे मध्यमवर्गातले, निम्न-मध्यम वर्गातले लोक, ज्यांनी गॅस सिलेंडरवर मिळणारे अनुदान सोडून दिले आहे. आणखी एक वैशिष्ट्य बघा, हे अनुदान सोडण्यासाठी मोबाईल फोनवरच्या ॲपचा वापर करणे शक्य होते, दूरध्वनीवरुन मिस्ड कॉल देऊन करणे शक्य होते, अनेक मार्ग होते. पण याचा धांडोळा घेतला गेला तेव्हा असे लक्षात आले की, या एक कोटी लोकांपैकी 80 टक्के नागरिक असे होते की जे त्यांच्या वितरकाकडे स्वत: गेले, रांगेत उभे राहीले आणि आपले गॅस सिलेंडरवरचे अनुदान त्यांनी लेखी स्वरुपात परत केले.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ही काही लहान गोष्ट नाही. सरकारने एखाद्या करात थोडी सवलत दिली, तर आठवडाभर दूरचित्रवाणी आणि वर्तमानपत्रातून त्या सरकारची प्रशंसा ऐकू येते. एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडून दिले. आमच्या देशात अनुदान म्हणजे अधिकार असे समीकरण असताना अनुदान नाकारले. त्या एक कोटी कुटुंबांना मी सर्वप्रथम वंदन करतो, त्यांचे आभार मानतो, कारण एक नवा, एक वेगळा विचार करायला त्यांनी राजकीय नेत्यांना भाग पाडलं आहे. या एका घटनेने देशातील अर्थतज्ञांना नव्या पद्धतीने विचार करायला भाग पाडले आहे. आणि जगभरचे अर्थतज्ञ जे असे झाले, तर असे होईल, हे केले तर ते मिळेल, अशी आर्थिक समीकरणे मांडत असतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या विचार करण्याच्या कक्षेच्या बाहेरची ही घटना म्हणावी लागेल. यावर कधी ना कधी विचार करावाच लागेल. एक कोटी कुटुंबांनी गॅस अनुदान सोडणे आणि त्याबदल्यात कोट्यवधी गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडर मिळणे. एक कोटी कुटुंबांनी अनुदान सोडल्यामुळे काही रुपये वाचणे हे वरवर पाहता तसे महत्त्वाचे वाटत नाही. महत्त्वाचे हे आहे की जनतेवर विश्वास ठेवला, तर हाती केवढे मोठे यश लागू शकते. मी विशेषत: सर्व राजकीय वर्गाला आज आवर्जून सांगेन की प्रत्येक ठिकाणी, लोकांवर विश्वास ठेवण्याची किमान एक तरी गोष्ट आपण करु या. आपण कधी विचारही केला नसेल, असा परिणाम आम्हाला मिळेल. या दिशेला आपण जायला हवे. आणि मला तर नेहमी वाटते की जसे माझ्या मनात आले की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकरीसाठी मुलाखत का घ्यावी? ज्यांनी परीक्षा देऊन, गुण मिळवले आहेत, ते पाठवले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी मला असेही वाटते की असे आपण घोषित करु या, की रेल्वेच्या ह्या एका मार्गावर कुणीही तिकीट तपासनीस नसेल. बघूया तर, ठेवूया विश्वास देशातील जनतेवर असे अनेक प्रयोग करता येतील. एकदा या देशातल्या जनतेवर विश्वास ठेवा, बघा अप्रतिम परिणाम मिळतील. असो. हे माझ्या मनात येते, हे काही सरकारी नियम नाही होऊ शकत. पण विश्वासाचं वातावरण तर तयार करु शकतो. आणि हे वातावरण तयार करणारे कुणी राजकीय नेते नाहीत, देशातील एक करोड कुटुंबांनी ते तयार केले आहे.
रवी नामक सद्गृहस्थांनी मला पत्र लिहिले आहे “Good News Every day”, रोज शुभवर्तमान. ते लिहीतात की कृपया आपल्या अधिकाऱ्यांना सांगा की रोज एखाद्या चांगल्या घटनेबद्दल त्यांनी माहिती द्यावी. प्रत्येक वर्तमानपत्रात आणि वृत्त वाहिनीवर प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, त्रासदायक असते. शंभर-सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशात, आमच्या आजूबाजूला काही चांगले घडतच नाही का? कृपया ही परिस्थिती बदला. रविजींनी त्यांचा तीव्र संताप व्यक्त केला आहे. पण मला वाटते की हा राग माझ्यावरचा नसून भोवतालच्या परिस्थितीवरचा आहे. आपल्याला आठवत असेल, आपले माजी राष्ट्रपती डॉ. A.P.J अब्दुल कलाम नेहमी सांगत असत, की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर केवळ सकारात्मक बातम्या छापा. ते सतत ही गोष्ट सांगत राहीले. काही दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्रानं मला पत्र लिहून कळवलं होतं की त्यांनी असं ठरवलं आहे की प्रत्येक सोमवारी एकही नकारात्मक बातमी ते छापणार नाहीत, सकारात्मक बातम्याच देणार.
हल्ली मी बघितले आहे की काही दूरचित्रवाणी वाहिन्या सकारात्मक बातम्या विशिष्ट वेळ ठरवून देतात. आजच्या काळात सकारात्मक बातम्यांचं वातावरण तयार होत आहे. अचूक बातमी, चांगली बातमी लोकांना मिळावी असे प्रत्येकाला वाटतंय. हे खरं आहे की मोठ्यात मोठी व्यक्ती, चांगल्यातली चांगली गोष्ट, उत्तमोत्तम शब्दांचा वापर करुन, चांगल्यातल्या चांगल्या पध्दतीने सांगितली जाईल, तेव्हा त्याचा जेवढा परिणाम होतो त्याहीपेक्षा अधिक परिणाम सकारात्मक बातमीचा चांगल्या बातमीचा होतो. हे खरं आहे की भलेपणावर अधिक भर दिला तर आपल्यात वाईट गोष्टींसाठी फार जागा उरणार नाही. दीप पेटवला तर अंध:कार दूर होईल, होईलच होईल. आणि म्हणूनच आपल्याला हे कदाचित ठावूक असेल की ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या नावाची वेबसाईट सरकारने सुरु केली आहे. एक संकेतस्थळ सुरु केले आहे, या संकेतस्थळावर सकारात्मक बातम्या असतात. केवळ सरकारच्याच नाही, नागरिकांच्या सुध्दा असतात. आणि हे असं पोर्टल आहे ज्यावर आपण, आपल्याकडची, एखादी चांगली बातमी पाठवू शकता. योगदान देवू शकता. रवीजी तुम्ही चांगली सूचना मांडली आहे, पण कृपया माझ्यावर रागावू नका. आपण सारे मिळून सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करुया. सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करुया. सकारात्मक पोचवण्याचा प्रयत्न करुया.
कुंभमेळा हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे. कुंभमेळा हे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण केंद्र बनू शकते. जगातल्या फार कमी जणांना हे माहीत असतं की इतका दीर्घकाळ, नदी काठावर कोट्यवधी लोक येतात. शांत चित्त आणि शांततापूर्ण वातावरणात सोहळा साजरा होतो. अशा घटना आयोजनाच्या दृष्टीने, कार्यक्रम व्यवस्थापनाच्या दृष्टीने, लोक सहभागाच्या दृष्टीने, नवे मापदंड स्थापन करणाऱ्या ठरतात. गेल्या दोन दिवसापासून मी पाहतो आहे, अनेक जण कुंभमेळ्याची छायाचित्रे अपलोड करीत आहेत. मला वाटते की भारत सरकारच्या पर्यटन विभागाने राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने, अशा छायाचित्रांची स्पर्धा घ्यावी आणि लोकांना आवाहन करावे की उत्तमोत्तम छायाचित्र काढून Upload करा. पहा, एकदम वातावरण निर्मिती होईल आणि लोकांनाही कळेल की कुंभमेळ्यात किती विविधतेने भरलेल्या गोष्टी सुरु आहेत. हे अवश्य करता येईल.
मध्यंतरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मला भेटले होते. स्वच्छतेवर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले. केवळ तिथेच स्वच्छता असावी असे नाही तर तिथून परतणारे लोक हा स्वच्छतेचा संदेश घेऊन जातील. मला असं वाटते की कुंभमेळा हा धार्मिक, अध्यात्मिक मेळावा आहे पण आपण त्याचे रुपांतर एका सामाजिक सोहळ्यात करु शकतो. संस्कार करण्याची सुसंधी असणारा सोहळा करु शकतो. तिथून परतताना चांगले संकल्प, चांगल्या सवयी घेऊन त्या गावागावात पोचवण्याचे एक निमित्त ठरू शकतो कुंभमेळा. पाण्याविषयी वाटणारा स्नेह, कसा वाढेल? पाण्याविषयी वाटणारी कळकळ कशी वाढेल? पाणी साठवण्याचा संदेश देता येईल यासाठी या कुंभमेळ्याचा उपयोग व्हायला हवा, आम्ही तो तसा करायला हवा.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, पंचायत राज दिनाच्या या महत्वपूर्ण दिवशी आज संध्याकाळी मी पुन्हा भेटेनच. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. नेहमीप्रमाणेच आपल्या मनातल्या गोष्टीने माझ्या मनातल्या गोष्टीशी एक अतूट नाते जोडले आहे, याचा मला आनंद वाटतो, पुन्हा एकदा अनेक अनेक धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो.. आपणा सर्वांना नमस्कार, आज जगभरातील ख्रिस्ती बांधव ईस्टरचा सण साजरा करीत आहेत. मी सर्वांना इस्टरच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो.
माझ्या युवा मित्रांनो, आपण परीक्षेमध्ये व्यग्र असाल. काहींच्या परीक्षा झाल्या असतील. आणि काही जणांची दुहेरी परीक्षा असेल. कारण एकीकडे परीक्षा अभ्यास, आणि दुसरीकडे टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा. आज आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याची बहुधा प्रतिक्षा करत असाल. भारताने पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्याविरुध्द झालेले सामने जिंकले आहेत. आशादायक वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना होईल. दोन्ही संघातील खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. आपल्या देशाची 65 टक्के लोकसंख्या तरुण आहे. क्रीडा जगतात आम्ही हरवून गेलो आहोत, हे काही मनाला पटत नाही. या क्रीडा जगतात नवीन क्रांती घडवण्याची वेळ आली आहे. आणि आपण बघतोय की भारतात क्रिकेट प्रमाणेच फुटबॉल, हॉकी, टेनिस, कबड्डी यासाठीही पोषक वातावरण तयार होत आहे.
माझ्या तरुण मित्रांना आज एक आनंदाची बातमी मी देणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून काही अपेक्षाही करणार आहे. तुम्हाला कदाचित हे कळले असेल की पुढील वर्षी 2017 मध्ये होणाऱ्या 17 वर्षाखालील एफआयएफए अर्थात फिफा म्हणजेच जागतिक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. जगभरातील 24 संघ भारतात खेळण्यासाठी येणार आहेत. 1951, आणि 1962 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. आणि 1956 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताला चौथे स्थान मिळाले. परंतु दुर्देवाने गेल्या काही दशकांमध्ये आपली कामगिरी घसरत गेली. आपण मागे पडलो, पिछाडीवर गेलो, मागेच राहिलो. आज फिफा मध्ये आपले स्थान कुठे आहे ? आपण कितव्या क्रमांकावर आहोत. हे सांगण्याचे धाडस मी करु शकत नाही. आणि त्याचवेळी दुसरीकडे मी बघतोय की युवा वर्गात फुटबॉलचे आकर्षण वाढत चालले आहे. ईपीएल असो, स्पॅनिश लिग असो, किंवा इंडियन सुपरलिगचे सामने असोत. या सामन्यांविषयी जाणून घेण्यासाठी, ते सामने दूरचित्रवाणीवर पाहण्यासाठी तरुण मित्र वेळ काढतात. सांगण्याचे तात्पर्य हे की फुटबॉलची आवड वाढत आहे. पण फुटबॉलचा हा महोत्सव आमच्या देशात होत असताना आम्ही केवळ यजमानपद भूषवून आपली जबाबदारी पार पाडावी का ? या पूर्ण वर्षभर सारे वातावरण फुटबॉलमय करु या. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, हिंदुस्थानच्या कोपऱ्या कोपऱ्यात आमचे युवक, शाळेतील बालके घामाने चिंब भिजले आहे आणि फुटबॉल खेळला जात आहे. सर्वत्र असे वातावरण निर्माण करुया. आणि असे केले तर यजमानपदाचा आनंद अधिक वाढेल आणि म्हणून फुटबॉल गावा-गावात, प्रत्येक गल्लीत कसा पोहचवता येईल ? यासाठी प्रयत्न करु या.
“2017 फिफा अन्डर 17” विश्वचषक ही यासाठी मला एक संधी आहे. या वर्षभरात सर्वत्र तरुणांमध्ये फुटबॉलविषयी नवा जोम, नवा जोश, नवा उत्साह आपण निर्मााण करुया. हे यजमानपद भारताकडे आल्याचा एक फायदा निश्चितच होणार आहे. आमच्या देशाला त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तयार होतील. खेळासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले जाईल. आपल्या देशातील प्रत्येक तरुण जेव्हा फुटबॉलशी जोडला जाईल तेव्हा मला याचा खरा आनंद होईल.
मित्रहो, आपल्याकडून मला एक अपेक्षा आहे. 2017 चे हे यजमानपद आपण कशा प्रकारे भूषवतो ? वर्षभर फुटबॉलचे वातावरण असावे यासाठी काय करता येईल ? फुटबॉलचा प्रचार कसा करावा ? सोयीसुविधांमध्ये सुधारणा कशा करता येईल ? या विश्वचषकामुळे, भारतातील तरुणांमध्ये खेळाविषयी आवड कशी वाढवता येईल ? शासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना यांच्यात खेळाशी स्वत:ला जोडून घेण्याची स्पर्धा कशी उभी राहिल ?
क्रिकेटच्या बाबतीत हे सर्व झाल्याचे आपण पाहतो. पण हेच वातावरण इतर खेळांच्या बाबतीतही आपल्याला तयार करायचे आहे. फुटबॉल एक संधी आहे. आपण मला आपल्या सूचना पाठवाल का ? तुमचे याबद्दलचे विचार पोहचवाल का ? जगभरात भारताचे Branding करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे असे मी मानतो. सामन्यात आपण काय कमावले ? काय गमावले ? अशा अर्थाने मला हे म्हणायचे नाही.
या स्पर्धेच्या आयोजकपदाच्या निमित्ताने आपण आपल्यातील शक्ती एकत्र आणू शकतो, त्या शक्तीचे प्रकटीकरण करु शकतो आणि भारताचे Branding ही करु शकतो.
याबद्दलचे तुमचे विचार, तुमचे प्रस्ताव आपण मला नरेंद्र मोदी ॲपवर पाठवाल का ? या स्पर्धेचे बोधचिन्ह कसे असावे ? घोषवाक्य काय असावे ? भारतात हे सर्व कशाप्रकारे पोहचवता येईल ? स्पर्धेचे गीत कोणते असावे ? स्मृतीचिन्हाविषयी आपल्या मनात कोणती कल्पना आहे ?
मित्रहो यावर विचार करा आणि माझी अशी इच्छा आहे की, माझ्या देशातील प्रत्येक तरुण या FIFA Under 17 विश्वचषक स्पर्धेचा सदिच्छादूत असेल. या आपणही यात सहभागी व्हा. भारताची ओळख करुन देण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, या सुट्टीच्या दिवसांमध्ये फिरायला जाण्याविषयी, पर्यटनाविषयी आपण ठरवले असेलच. परदेशी जाणारे फार कमी, त्यांच्या तुलनेत आपल्याच राज्यांमध्ये पाच दिवस, सात दिवस अशा कालावधीसाठी बरेच जण जातात. काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्येही जातात.
आपण पर्यटनासाठी जिथे जाल तिथून छायाचित्र म्हणजेच Photo मला पाठवा, Upload करा असे मी आपल्याला मागच्यावेळी आवर्जुन सांगितले होते. आणि माझ्या लक्षात आले की, आपण जे काम आमच्या पर्यटन विभागाला जमले नाही, आमच्या सांस्कृतिक विभागाला शक्य झाले नाही, जे राज्य सरकारे करु शकली नाहीत आणि भारत सरकारलाही करता आले नाही, ते काम देशातील कोटयावधी पर्यटकांनी केले. त्यांनी अशा काही स्थळांची छायाचित्रे पाठवली, Photo Upload केले की ते बघताना खरोखर आनंद होतो.
हे कार्य आता आपल्याला पुढे न्यायाचे आहे. याहीवेळी अशी छायाचित्रे पाठवा. पण त्याचबरोबर काही लिहून पाठवा. केवळ छायाचित्र पाठवू नका, आपल्यातील सर्जनशीलतेच्या प्रकटीकरणाला वाव दया, नवनव्या ठिकाणांना भेटी दिल्यामुळे, वेगवेगळया ठिकाणी गेल्यामुळे खूप शिकायला मिळते. ज्या गोष्टी शाळेच्या वर्गात आपण शिकू शकत नाही, आपल्या कुटुंबात आपल्याला शिकायला मिळत नाहीत आणि ज्या गोष्टी आपल्या मित्र-मंडळींमध्ये सुध्दा शिकायची संधी आपल्याला मिळत नाही अशा गोष्टी बऱ्याचदा पर्यटनातून जाणून घेण्याची, शिकण्याची सुसंधी आपल्याला मिळते. नवनव्या ठिकाणांचा नवेपणा, अनुभवता येतो. लोक, भाषा, खाद्यपदार्थ, तिथल्या चालीरिती, अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. आणि कुणीसे म्हटलेच आहे ‘A traveller without observation. is a bird without wings’निरीक्षण, अवलोकन याचा अभाव असणारा पर्यटक म्हणजे जणू पंखहीन पक्षीच होय. “शौक-ए-दीदार है अगर, तो नजर पैदा कर” काही बघण्याची आस मनात असेल तर ते बघण्याची दृष्टी आधी निर्माण करुया. भारत विविधतेने भरला आहे. तो पाहण्यासाठी एकदा बाहेर पडा, आयुष्यभर बघत रहाल, पहात रहाल, मन कधी भरणारच नाही. आणि याबाबतीत मी सुदैवी आहे. अनेक ठिकाणी जाण्याची, फिरण्याची संधी मला मिळाली.
जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो, पंतप्रधान नव्हतो, तेव्हा आपल्याप्रमाणेच बालवयात मी खूप फिरलो. कदाचित हिंदुस्थानात असा एकही जिल्हा नसेल की जिथे मी गेलो नाही.
आयुष्य घडविण्यासाठी मोठे बळ मिळते. या प्रवासातून आणि आता भारतीय तरुणांमध्ये धाडसी पर्यटनाची आवड वाढू लागली आहे. नवे जाणून घेण्याची ओढ निर्माण होऊ लागली आहे. त्याच त्या, जुन्या मळलेल्या वाटा सोडून, काही नवीन करण्याची नवीन बघण्याची आकांक्षा त्यांच्या मनात आहे. हे चांगले लक्षण आहे असे मी मानतो. आमचे तरुण धाडसी वृत्तीचे असावेत. ज्याजागी यापूर्वी कुणीही गेले नाही, त्याजागी पोहचण्याची त्यांची इच्छा असावी.
कोल इंडियाचे मी विशेष अभिनंदन करतो. वेस्टर्न कोल फिल्डस् लिमिटेड, नागपूरजवळचे सावनेर ठिकाण, येथे कोळशाच्या खाणी आहेत. या कोळशाच्या खाणींपासून दूरच रहावे असे आमचे एक सर्वसाधारण मत असते. खाणीत काम करणाऱ्यांची छायाचित्र बघितल्यावर मनात प्रश्न येतोच की तिथे कसे वातावरण असेल ? आणि “कोळशाने हात झाले काळे, जग दूर पळे” अशा अर्थाची एक म्हणसुध्दा आहे.
पण याच कोळशाला, कोळशाच्या खाणीला या मंडळींनी पर्यटन क्षेत्र बनवले आहे. नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि जवळ जवळ दहा हजार नागरिकांनी नागपूरजवळच्या सावनेरच्या कोळसा खाणीला पर्यटक म्हणून भेट दिली आहे याचा मला आनंद होत वाटतो.
या सुट्टयांमध्ये आपण फिरायला जाल, प्रवासाला जाल, तेव्हा स्वच्छता मोहिमेत आपला वाटा उचलाल अशी मी आशा करतो. हल्ली एक गोष्ट लक्षात येते, प्रमाण कमी असेल, त्यावर टीका करायचली असेल तर संधी आहे पण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता असेल यासाठी प्रयत्न होतांना दिसतात. पर्यटक आणि पर्यटनस्थळी राहणारे अशा दोघांकडूनही काही प्रयत्न होतांना दिसत आहेत. सगळेच प्रयत्न अगदी शास्त्रशुध्द पध्दतीचे नसतीलही पण होत मात्र आहेत. या नात्याने आपणही विशेष लक्ष दयाल का ? मला खात्री आहे, या कामात माझे तरुण मित्र मला नक्की मदत करतील. आणि हे खरे आहे पर्यटन क्षेत्र हे सर्वाधिक रोजगार मिळवून देणारे क्षेत्र आहे. गरीबातील गरीब व्यक्तीसुध्दा कमावू शकते. जेव्हा पर्यटनस्थळी लोक जातात तेव्हा ते काहीना काही खरेदी करतात, खर्च करतात. तो गरीब असेल तरीही काहीतरी घेईल, तो श्रीमंत असेल तर तो अधिक खर्च करेल. पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून विपुल रोजगार निर्मिती शक्य आहे. पर्यटनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारत खूप मागे आहे. पण जर आपण सव्वाशे कोटी भारतीयांनी पर्यटन क्षेत्रावर जोर दयायचे ठरवले तर जगाला आपण भारताकडे आकर्षित करु शकतो. जगभराच्या पर्यटन क्षेत्रातील मोठा हिस्सा आपल्या देशाकडे आकर्षित करुन आमच्या देशातील कोटयावधी युवकांना रोजगार संधी निर्माण करुन देऊ शकतो. शासन असो, संस्था असोत, समाज असो वा नागरिक, आपण सगळयांनी मिळून हे काम करायचे आहे. या, हे करण्याच्या दिशेने प्रयत्न करुया.
माझ्या तरुण मित्रांनो, सुट्टया आल्या आणि अशाच गेल्या हे काही मला योग्य वाटत नाही. आपणही याबद्दल विचार करा. आपल्या सुट्टया आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष आणि त्यातला बहुमूल्य वेळ असाच जाऊ दयायचा का ? विचार करण्यासाठी एक मुद्दा मी आपल्यासमोर मांडतो. या सुट्टयांमध्ये एखादी नवी कला, एखाद्ये कौशल्य आपल्या व्यक्तिमत्वात एखाद्या नव्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण संकल्प कराल का ? तुम्हाला पोहता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये पोहायला शिकायचे तुम्ही ठरवा. सायकल चालवता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये सायकल चालवता येत नसेल तर या सुट्टयांमध्ये सायकल शिका. आजही संगणकावर कंप्युटरवर टायपिंग करताना मी दोन बोटांनी करतो, मी सफाईदार टायपिंग करायला का शिकू नये ? आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक कौशल्याचा गोष्टी आहेत. त्या आपण का शिकू नयेत ? आपल्यातील त्रुटी का दूर करु नयेत ? आपले बळ का वाढवू नये ? जरा विचार करा.
आणि हे सगळे करण्यासाठी मोठमोठे प्रशिक्षण वर्ग हवेत, प्रशिक्षक हवेत, भरमसाठ शुल्क हवे, खर्चाची मोठी तयारी हवी अशातला भाग नाहीये. आपल्या आजूबाजूला, समजा आपण ठरवले की मी कचऱ्यातून कला निर्माण करीन, टाकाऊतून टिकाऊ बनवीन तर ते करायला सुरुवात करा. त्यातून आपल्याला आनंद मिळेल. संध्याकाळ होईपर्यंत बघा, त्या कचऱ्यातून तुम्ही काय निर्माण केले आहे ? तुम्हाला चित्र रंगवायला आवडते ? पण येत नाही ? अरे मग सुरुवात तर करु, येईलच.
व्यक्तिमत्व विकासासाठी, नवी कला शिकण्यासाठी, कौशल्य वाढण्यासाठी सुट्टीचा उपयोग अवश्य करा. अगणित क्षेत्र आहेत. मी सांगितलेल्या क्षेत्रांपेक्षाही अधिक संधी आहे. आपण जे क्षेत्र निवडाल, जे शिकाल त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होईल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. इतका वाढेल की तुम्ही बघाल सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्यानंतर, महाविद्यालय सुरु झाल्यावर तुम्ही परत तिथे जाल आणि तुमच्या मित्राला सांगेल की दोस्ता, या सुट्टीत मी हे शिकलो.
तो जर काहीच शिकला नसेल तर म्हणेल अरे. माझा वेळ वाया गेला. तू मात्र नवीन शिकून आलास. मित्रांमध्ये यावर आपसूक चर्चा होईल. तर या सुट्टयांमध्ये आपण काही नवीन कराल, नवीन शिकल आणि मला सांगाल असा मला भरवसा आहे. सांगाल ना ?
यावेळी मन की बातमध्ये mygov वर अनेक सूचना आल्या आहेत.
माझे नाव अभी चतुर्वेदी आहे.
नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. उन्हाळयाच्या मागच्या सुट्टीत आपण सांगितले होते की चिमण्यांनाही उन्हाळयाचा त्रास होतो त्यासाठी आपल्या बाल्कनीत किंवा गच्चीवर एका भांडयात पाणी भरुन चिमण्यांसाठी ठेवा. मी त्याप्रमाणे केले आणि मला सांगायला आनंद होतो की यामुळे चिमण्यांशी माझी मैत्रीच झाली. मन की बातमध्ये याबाबत तुम्ही पुन्हा एकदा सांगावे अशी माझी आपल्याला विनंती आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अभि चतुर्वेदी या मुलाचे मी आभार मानतो. त्याने फोन करुन मला एका चांगल्या कामाची आठवण करुन दिली. गेल्या वेळी माझ्या लक्षात होते आणि मी सांगितले होते की, उन्हाळयाच्या काळात पक्षांसाठी आपल्या दाराबाहेर मातीच्या भांडयात पाणी भरुन ठेवा. अभिने मला सांगितले की संपूर्ण वर्षभर तो हे करतोय आणि अनेक चिमण्यांशी त्याची मैत्री झाली आहे. हिंदी साहित्य क्षेत्रातील महान कवियत्री महादेवी वर्मा, पक्ष्यांवर त्यांचे खूप प्रेम होते. त्यांनी आपल्या कवितेत लिहिले होते. “तुझको दूर न जाने देंगे, दानों से आंगन भर देंगे और होद में भर देंगे हम मीठा-मीठा ठंडा पानी.” या महादेवीजींनी सांगितलेली ही गोष्ट आपणही करुया. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल अभिचे मी अभिनंदन करतो आणि आभारही मानतो.
म्हैसूरच्या शिल्पा कुके यांनी एक संवेदनशील मुद्दा आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. त्या म्हणतात. दूध विकणारे, वर्तमानपत्र विकणारे, पोस्टमन, आपल्या घरापाशी येतात. भांडी विकणारे, कपडे विकणारे घरासमोरुन जातात. उन्हाळयाच्या दिवसात यांना आपण कधी पाणी देऊ केले आहे का ?शिल्पा, मी आपले खूप खूप आभार मानतो. एका संवेदनशील विषयाला फार सोप्या पध्दतीने तुम्ही मांडले आहे. तुमचे म्हणणे बरोबर आहे. तसे पहायला गेले तर ही किरकोळ गोष्ट आहे. पण या कडाक्याच्या उन्हात आपल्या घरी येणाऱ्या पोस्टमनला आपण पाणी दिले तर त्यांना किती बरे वाटेल. असो, भारतात तर ही सवयच आहे. पण शिल्पा ही गोष्ट बारकाईने बघितल्याबद्दल मी आपले आभार मानतो.
माझ्या प्रिय शेतकरी बंधु-भगिनींनो, डिजिटल इंडिया – डिजिटल इंडिया असे आपण खूप ऐकले असेल. काही जणांना वाटते की डिजिटल इंडिया म्हणजे केवळ शहरातल्या युवकांचे जग आहे. पण असे नाही. आपल्याला ऐकून आनंद वाटेल की एक किसान सुविधा ॲप आपल्या सेवेसाठी तयार करण्यात आले आहे. आपल्या मोबाईल फोनमध्ये किसान सुविधा ॲप डाऊनलोड करुन घेतले तर त्याच्या माध्यमातून शेती, हवामान याविषयी बरीच माहिती अगदी सहज आपल्या हाती येईल. बाजारात काय चालले आहे ? भाजी मंडईत काय घडते आहे ? या दिवसात चांगल्या पिकाबद्दल काय माहिती उपलब्ध आहे ? कोणती औषधे उपयोगी आहेत ? अनेक विषय या ॲपवर आहेत. एवढेच नाही तर या ॲपमध्ये एक बटण असे आहे की त्याच्या माध्यमातून कृषिशास्त्रज्ञ, कृषीतज्ञ, यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. तुमचा एखादा प्रश्न त्यांना विचारलात तर ते त्याचे उत्तर देतात, आपल्याला समजावून सांगात. माझे किसान बंधुभगिनी हे किसान सुविधा ॲप त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घेतील अशी मला आशा आहे. आणि एकदा वापरुन तर बघा. त्यात आपल्या उपयोगी पडणारे काय आहे? आणि तरीही काही उणिवा वाटल्या तर आपण माझ्याकडे त्याची तक्रार करा.
माझ्या शेतकरी बंधु भगिनींनो, इतरांसाठी उन्हाळा म्हणजे सुट्टीचा काळ. पण शेतकऱ्यांसाठी उन्हाळा म्हणजे घाम गाळण्याचा काळ. तो पावसाची प्रतिक्षा करतो. आणि प्रतिक्षेआधि जीव लावून शेताची मशागत करतो. जमीन तयार करतो जेणेकरुन पावसाचा एक थेंबही वाया जाणार नाही. शेतीचा प्रत्यक्ष हंगाम सुरु होण्यापूर्वीचा काळ शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा असतो. पण आम्हा देशवासियांनीही विचार केला पाहिजे की, पाण्यावाचून आपले काय होईल. तलाव, पाणी वाहून नेणारे नाले, तलावात पाणी येण्याचे मार्ग, जिथे काही कचरा साठला असेल, किंवा काही अतिक्रमण झाले असेल, तर पाणी येणे बंद आणि त्याचा परिणाम म्हणून जलसाठा हळूहळू कमी होत जातो. पाणी येण्याचे मार्ग, नाले, तलाव या काळात स्वच्छ करुन अधिक पाणी साठवण्यासाठी आपण प्रयत्न करुया का? जास्तीत जास्त पाणी वाचवू या. पहिल्याच पावसात पाणी वाचवले, तलाव भरले, नदी नाले भरले, तर नंतर जरी पाऊस पडला नाही, तर आपले कमी नुकसान होईल.
यावेळी आपण बघितले असेल, पाच लाख शेततळी तयार करण्याचा निर्धार केला आहे. मनरेगाच्या माध्यमातून पाणी साठवण्यासाठी जलसंपत्ती तयार करण्यासाठी जोर देण्यात आला आहे. गावा-गावात पाणी वाचवू या. येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचा थेंब न थेंब कसा वाचवता येईल? गावातले पाणी गावातच कसे राहील? ही योजना कशी कार्यान्वित होईल? यावर विचार करा. आपण योजना तयार करा, शासकीय योजनेशी त्याचा मेळ घाला, जेणेकरुन एक असे जनआंदोलन उभे राहील, ज्यातून पाण्याचे महत्व सर्वांना पटेल आणि पाणी वाचवण्याच्या प्रयत्नात सगळे सहभागी होतील. देशभरात अशी कितीतरी गावं असतील, कितीतरी प्रगतीशील शेतकरी असतील, कितीतरी जागरुक नागरिक असतील, ज्यांनी हे काम केले असेल. पण तरीही आज आणखी काम करण्याची गरज आहे.
माझ्या शेतकरी बंधु भगिनींनो, एक गोष्ट आज मी आपल्याला पुन्हा सांगणार आहे. भारत सरकारने नुकतेच एक शेतीविषयक भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात मी पाहिले की कसे आधुनिक तंत्रज्ञान शेतीत आले आहे. पण प्रत्यक्ष शेतापर्यंत ते पोचणे अजून बाकी आहे. खताचा वापर कमी करायला हवा, असे आता शेतकरीही म्हणून लागले आहेत. या विचाराचे मी स्वागत करतो. खतांच्या अतिरेकी वापरामुळे आपल्या भूमातेला आपण आजारी पाडले आहे. आपण या भूमातेचे पुत्र आहोत. ती आजारी पडणे आपण कसे बरे बघू शकू? उत्तम मसाल्यांचा वापर केला तर अन्नपदार्थ किती रुचकर होतो. पण उत्तमातले उत्तम मसाले बेसुमार वापरले तर तो अन्नपदार्थ खायची इच्छा होईल का? तेच जेवण आवडणार नाही. खतांचेही असेच आहे. ती खते कितीही उत्तम का असेना, गरजेपेक्षा अधिक वापरली तर ते विनाशाचे कारण ठरेल. प्रत्येक गोष्ट संतुलीत असायला हवी. त्यामुळे खर्चातही बचत होईल. आपले पैसे वाचतील आणि आमचे म्हणणे आहे कमी खर्च अधिक उत्पादन, कमी गुंतवणूक अधिक उत्पन्न. या मंत्राचे आचरण करायला हवे, शास्त्रीय पद्धतीचा वापर करुन आपले कृषी क्षेत्र पुढे न्यायला हवे. पाणी वाचविण्यासाठी पाणी साठवण्यासाठी जी आवश्यक कामे आहेत ती आपल्या हाती असणाऱ्या एक-दोन महिन्यात आपण निर्धाराने पूर्ण कराल अशी मला आशा आहे. जितके पाणी वाचेल, तितका शेतकऱ्याला अधिक फायदा होईल. जीवन तितके अधिक वाचेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. मधुमेहावर विजय हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवणे ही मध्यवर्ती संकल्पना आहे. मधुमेह हा एक असा यजमान आहे जो इतर रोगांचे स्वागत करण्यासाठी आतुर असतो. एकदा हा मधुमेह आपल्या शरीरात घुसला की त्या पाठोपाठ अनेक आजार व्याधी आपल्या शरीरात आल्याच म्हणून समजा.
असे सांगितले जाते की, 2014 मधे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संस्था साडेसहा कोटी इतकी होती.
मृत्यूच्या कारणांमधे 3 टक्के मृत्यूचे कारण मधुमेह असल्याचे आढळले. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप-1 आणि टाईप-2
टाईप-1 मधुमेह वंशपरंपरागत आहे. आई-वडिलांकडून तो मुलांकडे जातो.
टाईप-2 मधुमेहाची कारणे आहेत सवयी, वय, स्थूलपणा. या मधुमेहाला आपण जणू आमंत्रण देऊन बोलावतो. सारे जग मधुमेहामुळे चिंतीत आहे. म्हणूनच सात एप्रिल, जागतिक आरोग्य दिनानिमित्त मधुमेहावर विजय ही संकल्पना ठरवण्यात आली आहे. आपली जीवनशैली टाईप-2 मधुमेहाचे मुख्य कारण आहे हे आपण सारे जाणतो.
शारिरीक श्रम कमी होऊ लागले आहेत. घामाचा थेंबही नाही. चालणे फिरणे बंद. खेळ खेळले तरी ONLINE, खेळले जातात. OFFLINE काहीच होत नाही. 7 तारखेपासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात मधुमेहाला पराभूत करण्यासाठी काही करु शकतो का? आपल्याला योगासने आवडत असतील, तर योगासने करा. नाही तर किमान चालणे, धावणे हा व्यायाम तरी करा. जर माझ्या देशातला प्रत्येक नागरिक निरोगी असेल, तर माझा भारतही निरोगी असेल.
आरोग्य विषयक तपासण्या करण्याचा आम्हाला कधी कधी संकोच वाटतो. आणि तब्येत फारच बिघडल्यावर लक्षात येते की, मधुमेहाने फार पूर्वीच आपल्या शरीरात शिरकाव केला आहे. तपासणी करायला काय जातय? किमान एवढे तरी करु. आता अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तपासण्या सहज करता येतात. आपण त्याकडे लक्ष द्या.
24 मार्च रोजी जगभर क्षयरोग निवारण दिन पाळला गेला. मी लहान होतो, तेव्हा क्षयरोग या नुसत्या नावानेही भिती वाटायचे, असे वाटायचे की “आता मरण आलेच”. पण आता क्षयरोगाची भिती वाटत नाही. कारण सर्वांना माहित आहे की क्षयरोगावर उपचार होतात आणि सहज होतात. कोणे एकेकाळी क्षयरोग म्हणजेच मृत्यू हे समीकरण होते, त्याकाळी आम्हाला त्याची भिती वाटत असे. पण आज क्षयरोगाच्या बाबतीत आम्ही निष्काळजी झाली आहोत. जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात क्षयरोग्यांनी संख्या अधिक आहे. क्षयरोगापासून सुटका करुन घ्यायची असेल, तर अचूक उपचार आवश्यक आहेत आणि आवश्यक आहेत पूर्ण उपचार. योग्य उपचार आणि पूर्ण उपचार. उपचार अर्धवट सोडून दिले तर नव्या संकटाला निमंत्रण मिळते. बरं, एखाद्याला क्षयरोग झाला आहे हे त्याच्या शेजाऱ्यांनाही सहज कळू शकते. अरे भाऊ तपासणी करुन घे, क्षयरोग झाला असेल. सतत खोकला येत असेल. ताप येत असेल, वजन कमी होत असेल, तर शेजारच्या लोकांनाही कळते की हा क्षयरोग तर नसेल? याचा अर्थ असा की हा असा आजार आहे, ज्याची त्वरीत तपासणी करता येणे शक्य आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, याबद्दल आपल्याकडे खूप काम होत आहे. 13 हजार 500 पेक्षा अधिक मायक्रोस्कोपिक सेंटर्स कार्यरत आहेत. चार लाखापेक्षा अधिक DOT Provider आहेत. अनेक अत्याधुनिक प्रयोगशाळा, तपासणी केंद्र आहेत. तुम्ही एकदा तपासून तर घ्या. आणि या आजाराचे पूर्णपणे निर्मूलन करता येते.
बस योग्य उपचार आणि आजार नष्ट होईपर्यंत पूर्ण उपचार करणे आवश्यक आहे. क्षयरोग असो किंवा मधुमेह, त्याचे पूर्ण उच्चाटन आपण करुया असे मी आपल्याला आवर्जून सांगेन. भारताची या आजारांपासून सुटका करायची आहे. पण केवळ शासन, डॉक्टर आणि औषधे यातून हे साध्य होणार नाही. आपला सक्रीय सहभाग आवश्यक आहे. आणि म्हणून मधुमेहावर विजय मिळवण्यासाठी क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी मी आपण सर्व देशवासियांना आग्रह करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, एप्रिल महिन्यात अनेक महत्वाचे दिन विशेष आहेत. विशेषत: 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांची एकशेपंचवीसावी जयंती साऱ्या देशभर साजरी केली गेली. एक पंचतीर्थ- महू येथील त्यांचे जन्मस्थळ. लंडन-जिथे त्यांनी उच्चशिक्षण घेतले, नागपूर- जिथे त्यांनी दीक्षा घेतली. 26 अलीपूर मार्ग दिल्ली जिथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि मुंबईत जिथे त्यांच्यावर प्रयत्न करत आहोत. यावर्षी 14 एप्रिल रोजी पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर महू इथे जाण्याचे परमभाग्य मला मिळत आहे. एक उत्तम नागरिक होण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करुन, एक उत्तम नागरिक होऊन आपण त्यांना फार मोठी श्रद्धांजली अर्पण करु शकतो.
गेल्या काही दिवसात, विक्रम संवत्सराला सुरुवात होईल, नवीन विक्रम संवत्सर येईल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या पद्घतीने साजरे केले जाते. कुणी त्याला नव संवत्सर म्हणतात, कुणी गुढीपाडवा म्हणतात, कुणी वर्ष प्रतिपदा म्हणतात, तर कुणी उगादि म्हणतात. पण हिंदुस्तानातील जवळजवळ सर्वच प्रांतांमध्ये त्याचे महात्म्य आहे.
नववर्षानिमित्त सर्वांना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा.
आपल्याला माहित आहे की, मागच्या वेळी मी आपल्याला “मन की बात” ऐकण्याविषयी कधीही ऐकण्याविषयी सांगितले होते. सुमारे 20 भाषांमधे आपण मन की बात ऐकू शकता. तुमच्या वेळेनुसार ऐकू शकता. आपल्या मोबाईल फोनवर ऐकू शकता. बस आपण फक्त एक मिस्ड कॉल द्यायचा आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या सेवेचा लाभ, ती सुरु होऊन जेमतेम महिना झालाय, पण 35 लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आपणही क्रमांक टिपून घ्या 81908-81908, मी पुन्हा सांगतो 81908-81908. आपण मिस्ड कॉल करा. तुमच्या सोयीनुसार करा.
मन की बात चा आधीचा कार्यक्रम आपल्याला ऐकायचा असेल, तर ते ही आपण ऐकू शकता. आपल्या भाषेत ऐकू शकता. या माध्यमातून आपल्याबरोबर रहायला मला आनंद वाटेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार, आपण रेडिओवरुन माझी “मन की बात” ऐकत आहात. पण मनात मात्र काही वेगळेच सुरु आहे. मुलांच्या परिक्षा आता सुरु होतील, काही जणांच्या दहावी-बारावीच्या परीक्षा बहुधा 1 मार्च पासूनच सुरु होतील. तुमच्या मनात आता परीक्षेचेच विचार सुरु असतील. या तुमच्या प्रवासात मीही तुमच्याबरोबर सहभागी होऊ इच्छितो. तुम्हाला तुमच्या मुलांच्या परीक्षेबद्दल जेवढी काळजी वाटते, तितकीच मलाही वाटते आहे. पण परीक्षेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला तर आपण चिंतामुक्त होऊ शकतो. माझ्या मन की बात कार्यक्रमाच्या मागच्या भागात मी आपल्याला सांगितले होते की तुमचे अनुभव, तुमच्या सूचना नरेंद्र मोदी ॲपवर मला पाठवा. शिक्षकांनी, जीवनात उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी, समाजाच्या हितचिंतकांनी अनेक गोष्टी या ॲपवर लिहून माझ्याकडे पाठवल्या, याचा मला आनंद वाटतो. यात दोन मुद्दे मला विशेषत्वाने जाणवले. एक म्हणजे सूचना पाठवणाऱ्यांनी, अनुभव लिहिणाऱ्यांनी विषयाला धरुन, मुद्दा न सोडता लिहिले, आणि दुसरे म्हणजे हजारोंच्या संख्येने सूचना आणि अनुभव या ॲपवर नागरिकांनी पाठवले. मला वाटते हाच यातला महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाचा षयक आहे. पण झाले असे की परीक्षा हा विषय, आपली शाळा, कुटुंब किंवा विद्यार्थी या पुरताच मर्यादित ठेवला आहे. माझ्या ॲपवर जया सूचना आल्या त्यावरुन वाटतंय की, हा महत्त्वाचा विषय आहे, पूर्ण देशभर विद्यार्थ्यांशी संबंधित या मुद्दयांची चर्चा सातत्याने व्हायला हवी.
आज माझ्या मन की बात कार्यक्रमातून खास करुन पालकांशी, विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी मला बोलायचे आहे. मी जे ऐकले आहे, जे वाचले आहे, मला जे सांगितले गेले , त्यातल्या काही गोष्टी मी सांगेन, मला स्वत:ला जे वाटते तेही सांगेन. पण जे विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत, त्यांना माझा हा 25-30 मिनिटांचा संवाद निश्चित उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो.
माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याशी काही बोलण्याच्या आधी, आजच्या “मन की बात”ची सुरुवात, जगातील एका विख्यात ओपनरकडून केली तर ? जीवनात यशाची शिखरे गाठताना, त्यांना काय काय उपयोगी पडेल ? त्यांचे अनुभव तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. भारतभरातील तरुण वर्गाला ज्यांच्याबद्दल अभिमान वाटतो त्या भारतरत्न श्रीमान सचिन तेंडुलकर यांनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलाय, तो मी तुम्हाला ऐकवतो.
“नमस्कार, मी सचिन तेंडूलकर बोलतो आहे. काहीच दिवसात परीक्षा सुरु होणार आहेत, हे मला माहित आहे. आपल्यापैकी काही जण तणावाखाली असतील. माझा एकच संदेश आहे. तुम्हाला, तुमचे आई वडिल तुमच्याकडून अपेक्षा ठेवतील, तुमचे शिक्षक ठेवतील, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य ठेवतील, तुमचे मित्रही ठेवतील. तुम्ही कुठेही गेलात, तरी सर्व विचारतील तुमची तयारी कशी सुरु आहे ? तुम्ही किती टक्के गुण मिळवाल ? मला हेच सांगायचे की तुम्ही स्वत:च स्वत:साठी एक ध्येय निश्चित करा, दुसऱ्या कोणाच्या अपेक्षांच्या दबावाखाली येऊ नका. तुम्ही जरुर मेहनत करा, पण एक वास्तववादी, साध्य होण्याजोगे ध्येय सवत:साठी निश्चित करा आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. मी जेव्हा क्रिकेट खेळत होतो, तेव्हा माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. गेल्या 24 वर्षात अनेक कठीण क्षण आले आणि अनेकदा चांगले क्षणही आले. पण लोकांच्या अपेक्षा नेहमीच असत आणि त्या वाढतच गेल्या, जसजसा काळ पुढे जात राहिला, तसतशा अपेक्षाही वाढत गेल्या. आणि त्यासाठी मला एक उपाय शोधणे गरजेचे होते. तेव्हा मी असा विचार केला की मी स्वत: माझ्या अपेक्षा ठेवीन आणि स्वत:च स्वत:चे ध्येय निश्चित करीन. जर का मी स्वत:च स्वत:चे ध्येय निश्चित करत असेन, आणि ते साध्य करु शकत असेन, तर मी देशासाठी नक्कीच काही ना काही चांगले करु शकतो आहे. आणि मग तेच ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रयत्न करत असे. माझे लक्ष चेंडूवर केंद्रीत असायचे आणि मग आपणहूनच सर्व ध्येय साध्य होत गेली. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की, तुम्ही, आणि तमुचे विचार सकारात्मक असणे अत्यंत गरजेचे आहे. सकारात्मक विचारांपाठोपाठ सकारात्मक परिणाम येतील. त्यामुळे तुम्ही निश्चित सकारात्मक रहा आणि ईश्वर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम देईल याची मला पूर्ण आशा आहे आणि मी तुम्हाला परिक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. तणावमुक्त होऊन पेपर लिहा आणि चांगला निकाल मिळवा शुभेच्छा.
पाहिलंत मित्रांनो, तेंडुलकरजी काय सांगत होते ? अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. तुमचे भवितव्य तुम्हाला घडवायचे आहे. तुमचे उद्दिष्ट तुम्हीच ठरवा, तुमचे ध्येय तुम्हीच ठरता, मुक्त मनाने, मुक्त विचाराने आणि मुक्त सामर्थ्याने सचिनजींनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील असा मला विश्वास आहे. आणि हे ही तितकेच खरे आहे की, प्रतिस्पर्धा कशासाठी ? अनुस्पर्धा, स्वयंस्पर्धा का नसावी ? इतरांशी स्पर्धा करण्यात आपला वेळ का वाया घालवावा ? आपण आपल्या स्वत:शी स्पर्धा का करु नये ? आपणच याआधी गाठलेली यशाची शिखरे ओलांडून नवी शिखरे पादाक्रांत करायचा, निश्चिय का करु नये ? तुम्ही बघाल की, कुणीही तुम्हाला पुढे जायला रोखू शकणार नाही, आणि याआधी मिळवलेल्या यशापेक्षाही अधिक यश तुम्ही मिळवाल, तेव्हा आनंद मिळवण्यासाठी, समाधान मिळवण्यासाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही. आत्मसमाधानाचा अनुभव घ्याल.
मित्रांनो, परीक्षा म्हणजे गुणांचा, आकडयांचा खेळ मानू नका. कुठे पोचलो, किती मिळवले ? या हिशोबात अडकू नका. एखाद्या महान उद्देशासाठी जगण्याला जोडून घ्या. मनात स्वप्न घेऊन चालायला हवे, संकल्पबध्द असायला हवे. आपण योग्य पध्दतीने पुढे चाललोय का ? हे या परीक्षांमधून कळते, आपली गति योग्य आहे का ? हे या परीक्षांमधून समजते. आणि म्हणून तुमची स्वप्न विराट, विशाल असतील तर परीक्षा म्हणजे आपोआपच आनंदाचा उत्सव होईल. तुम्ही ठरवलेल्या महान उद्देशाची पूर्तता करण्यासाठी, परीक्षा म्हणजे एक पाऊल ठरेल. तुम्हाला मिळणारे प्रत्येक यश म्हणजे ते महान-उद्दिष्ट साध्य करण्याची जणू किल्ली ठरेल. आणि म्हणूनच यावर्षी काय होईल ? या परिक्षेत काय होईल ? एवढयावरच स्वत:ला मर्यादित ठेवू नका. डोळयासमोर एक महान ध्येय ठेवून वाटचाल करा, आणि त्यातही अपेक्षापेक्षा कमी यश मिळाले तरी निराशा वाटणार नाही, अधिक जोमाने, अधिक ताकदीने, अधिक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.
हजारो नागरिकांनी माझ्या ॲपवर, त्यांच्या मोबाईलमधून छोटे छोटे मुद्दे लिहून पाठवले आहेत. निरोगी शरीरातच निरोगी मन असते या मुद्दयावर श्रेय गुप्ता यांनी भर दिला आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर, स्वत:च्या आरोग्यकडेही लक्ष द्यायला हवे. त्यामुळे परीक्षेच्या काळात अडचणी येणार नाहीत. आता अगदी शेवटच्या दिवशी, आयत्यावेळी मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही जोर-बैठका काढा, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर धावायला जा, पण परीक्षेच्या काळात आपली दिनचर्या कशी असावी ? हे महत्त्वाचे आहे. खरे तर पूर्ण वर्षभर, 365 दिवस, आपली दिनचर्या, आपल्या स्वप्नांना आणि संकल्पनांना अनुकूल असायला हवी. श्रीमान प्रभाकर रेड्डी यांनी मांडलेला एक मुद्दा मला पटला. वेळेवर झोपलो आणि पहाटे लवकर उठून अभ्यासाची उजळणी करणे याबद्दल ते आग्रहाने लिहितात. प्रवेशपत्र आणि अन्य आवश्यक गोष्टींसह परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचयला हवे असे प्रभाकर रेड्डी म्हणतात. हे सांगायचे धाडस मी कदाचित केले नसते, कारण झोपेच्या बाबतीत मी फारसा गंभीर नाहीये. आणि मी पुरेशी झोप घेत नाही अशी माझ्या बऱ्याच मित्रांची तक्रार असते. हे माझ्यातील न्यून काढून टाकण्याचा मी प्रयत्न करीन. पण हा मुद्दा मला पटला. झोपण्याची निश्चित वेळ, गाढ झोप हे तितकेच महत्त्वाचे आहे जितक्या आपल्या दिवसभरातील अन्य गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी नशीबवान आहे. माझी झोप कमी आहे पण गाढ मात्र आहे आणि तेवढी मला पुरते. पण तुम्हाला मात्र मी आवर्जून सांगेन. नाहीतर काही लोकांना सवय असते, झोपण्यापूर्वी दूरध्वनीवर बराच वेळ बोलत राहायचे. आता तेच विचार मनात असतील तर झोप कशी येणार ? आणि झोपण्याबद्दल मी सांगतोय तेव्हा असे मानू नका समजू की परीक्षेसाठी झोपण्याबद्दल मी सांगतोय. गैरसमज नका करुन घेऊ. परीक्षेच्या काळात, तुम्ही तणावमुक्त अवस्थेत परीक्षा द्यावी यासाठी मी झोपेबद्दल बोलतोय. झोपून रहा असे मला म्हणायचे नाही. नाहीतर असे नको व्हायला की परीक्षेत कमी गुण मिळाले, आणि आईने कारण विचारले तर सांगाल, की मोदीजींनी, झोपायला सांगितले होते, म्हणून मी झोपलो. तुम्ही असे नाही ना करणार ? मला खात्री आहे, नाही करणार.
जीवनात शिस्त असणे हा यशाचा पाया भक्कम असण्याचे महत्त्वाचे कारण आहे. हा भक्कम पाया शिस्तीमुळेच असू शकतो. आणि जे विस्कळीत असतात, बेशिस्त असतात, सकाळी करायचे काम संध्याकाळी करतात, दुपारी करायचे काम रात्री उशिरापर्यंत करतात, त्यांना असे वाटते की काम झाले पण त्यात त्यांची खूप ऊर्जा वाया जाते आणि क्षणोक्षणी ते तणावाखाली असतात. आपल्या शरीराचा एखादा अवयव थोडा दुखत असेल तर आपण अस्वस्थ असतो हे तुम्ही अनुभवले असेल. एवढेच नाही तर दिनचर्याही त्यामुळे बिघडते. आणि म्हणून कोणतीही गोष्ट लहान, किरकोळ समजू नका. तुम्ही बघा, तुम्ही जे साध्य करायचे ठरवले आहे, त्याच्या बाबतीत तडजोड करण्याची सवय लावून घेऊ नका. ठरवा, करुन बघा.
मित्रांनो, मी असेही काही वेळा बघितले आहे की परीक्षा दयायला जे विद्यार्थी जातात. त्यांच्यात दोन प्रकार असतात. आपण काय वाचले आहे ? काय शिकलो ? आपली बलस्थाने कोणती ? या विषयावर लक्ष केंद्रीत करणारे काही विद्यार्थी असतात आणि दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी, कोण जाणे काय प्रश्न असतील ? कुणाला माहित कसे प्रश्न असतील ? माहित नाही सोडवायला जमेल की नाही ? प्रश्नपत्रिका कठीण असेल की सोपी ? या विवंचनेत असतात. या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आपण बघितले असतील. प्रश्नपत्रिका कशी असेल ? या ताणाखाली जे असतात, त्या ताणाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या निकालावर पडतो. आणि जो अभ्यास मी केला आहे त्या बळावर मी कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवेन अशा आत्मविश्वासाने जे जातात ते कशीही प्रश्नपत्रिका आली तर निर्धाराने सोडवतात. याबाबतीत माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पध्दतीने तुम्हाला कुणी सांगू शकत असेल तर ते आहेत, काटशह, देण्यात ज्यांचे प्रभूत्व आहे आणि जगभरातील भल्या-भल्यांना ज्यांनी काटशह दिला आहे ते जगविख्यात बुध्दीबळपटू विश्वनाथन् आनंद. 64 चौकडयांच्या राजाने अनुभव सांगितले आहेत. या परिक्षेला काटशह देऊन यश मिळविण्याचा मार्ग आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या.
नमस्कार मी विश्वनाथन आनंद. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन मला सुरुवात करु द्या. मी माझ्या परीक्षेसाठी कसा जायचो आणि त्याबाबतचा माझा अनुभव मी आता सांगणार आहे. परीक्षा, हया तुमच्या असण्यात नंतर येणाऱ्या समस्यांप्रमाणेच असतात, हे मला जाणवले. तुम्ही व्यवस्थित आराम केला पाहिजे, रात्रीची शांत झोप घेतली पाहिजे, तुम्ही पोटभर खाल्ले पाहिजे, तुम्ही नक्कीच भुके राहता कामा नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही शांत राहिले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही शांत राहिले पाहिजे. हे सर्व बुध्दीबळाच्या डावाप्रमाणेच आहे. जेव्हा तुम्ही खेळत असता, तेव्हा तुम्हाला माहिती नसते, कोणते प्यादे समोर येणार आहे, त्याचप्रमाणे वर्गातही तुम्हाला माहित नसते, की परीक्षेत कोणता प्रश्न येणार आहे ? म्हणूनच तुम्ही जर शांत राहिलात आणि तुम्ही पोटभर खाल्ले असेल, तुमची नीट झोप झालेली असेल तर तुम्हाला कळेल की तुमच्या मेंदूला योग्य वेळी योग्य उत्तर आठवते. त्यामुळे शांत रहा. स्वत:ला जास्त ताण देऊ नका, अति अपेक्षा ठेवू नका. हे महत्वपूर्ण आहे, याकडे एक आव्हान म्हणून पहा – वर्षभरात मला जे शिकवले ते मला आवठतेय का, मी हे प्रश्न सोडवू शकतो का ? अगदी शेवटच्या क्षणी सर्वात महत्त्वाच्या गोष्टीची पुन्हा उजळणी करा, ज्या गोष्टी आठवत नाही त्या आठवून पहा, तुम्ही परीक्षा देत असताना तुम्हाला कदाचित शिक्षकांबरोबरचे किंवा विद्यार्थ्यांबरोबरचे काही प्रसंग आठवतील आणि यामुळे तुम्हाला त्या विषयाबाबतचे बरेच काही आठवायला मदत होईल. जर का तुम्ही कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची उजळणी केली तर तुम्हाला असे लक्षात येईल की ते तुमच्यासाठी नवीनच प्रश्न आहेत आणि मग जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल तेव्हा तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे सोडवू शकाल. त्यामुळे शांत रहा. रात्रीची चांगली झोप घ्या, अति आत्मविश्वास दाखवू नका पण त्याचवेळी निराशावादीही राहू नका. मला नेहमीच असे आढळून आले आहे की तुम्हाला भीती वाटत होती त्यापेक्षा या परीक्षा अधिक चांगल्या जातात. त्यामुळे आत्मविश्वासपूर्ण रहा. आणि तुम्हाला खूप खूप शभेच्छा.
विश्वनाथन् आनंद यांनी खरोरखरच महत्त्वाची गोष्ट सांगितली. आणि आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ सामना खेळताना तुम्हीही त्यांना पाहिले असेल, की ते कसे ठामपणे बसतात. एकाग्र होऊन बसतात, त्यांची नजरसुध्दा किंचित विचलित होत नाही हे तुम्ही बघितले असेल. अर्जुन आणि पक्षाचा डोळा ही गोष्ट आपण ऐकली आहे. अर्जुनाची दृष्टी जशी त्या पक्षाच्या डोळयावरच खिळली होती, त्याप्रमाणेच विश्वनाथन् आनंद यांची दृष्टी केवळ ध्येयाकडेच केंद्रीत झालेली असते आणि स्वत:मधील शांतीची ती अभिव्यक्ती असते, प्रगटीकरण असते. आता जर कोणी असे म्हणेल की यामुळे आतील शांतीवस्था येणारच. तर असे सांगणे कठीण आहे हे खरे आहे. पण प्रयत्न केले पाहिजेत. ते हसत हसत का करु नयेत ? तुम्ही बघा, हसत रहा अगदी परीक्षेच्या काळातही हास्य विनोदाचा मनमोकळा आनंद घ्याल, तर हा शांततेचा अनुभव तुम्हाला आपोआप येईल.
तुम्ही मित्रांशी बोलत नाही, एकटेच जाता, कोमेजून गेल्यासारखे राहता, शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तक धुंडाळत राहता तर मग तुमचे मन शांत राहणार नाही. हसा, खळखळून हसा, मित्रांबरोबर विनोद, गंमती यांची देवाण घेवाण करा. आणि मग बघा शांत वातावरण कसे आपोआपच निर्माण होते ते.
एक छोटी गोष्ट मी तुम्हाला समजावून सांगतो. अशी कल्पना करा, की तुम्ही एका तलावाच्या काठावर उभे आहात, आणि नितळ, पारदर्शक पाण्यामधून, पाण्याखालच्या गोष्टी स्वच्छ दिसत आहेत. पण अचानक त्या पाण्यात कुणीतरी दगड टाकला, तर पाणी डचमळू लागेल. आणि पाण्याखालच्या गोष्टी ज्या स्वच्छ दिसत होत्या, त्या आता दिसतील का ?
जर पाणी शांत असेल तर अगदी खोलवरच्या गोष्टीही दिसतात पण पाण्याचा पृष्ठभाग विचलित झाला तर खालचे काहीच दिसत नाही. तुमच्याजवळ खूप काही आहे. वर्षभर तुम्ही केलेल्या मेहनतीचे संचित तुमच्यापाशी आहे. पण तुमचे मन शांत नसेल तर हे संचित गवसणार नाही. आणि मन स्थिर असेल तर, या साऱ्या मेहनतीचे फलित स्पष्टपणे तुमच्यासमोर येईल आणि तुम्ही परीक्षा सहज, निर्विघ्न देऊ शकाल.
माझ्या बाबतीतली एक गोष्टी मी तुम्हाला सांगतो. कधी कधी मी एखादे व्याख्यान ऐकायला जातो किंवा सरकार चालवताना असे काही मुद्दे, विषय समोर येतात ज्याबद्दल मला माहित नसते, आणि मला अधिक एकाग्रतेने त्याकडे पहावे लागते, कधी कधी विशेष लक्ष देऊन विषय समजून घेण्याचा प्रयत्न मी करतो. त्यावेळी अनुभव येतो आतल्या ताणाचा. मग मला वाटते की थोडा आराम केला तर बरे वाटेल. त्यासाठी मी स्वत:च एक तंत्र विकसित केले आहे. मी दीर्घ श्वसन करतो, खोलवर श्वास घेतो, तीन वेळा, पाच वेळा खोल श्वास घेतो. या सगळयासाठी 30 सेकंद, 40 सेकंद किंवा 50 सेकंद लागतात, पण हे केल्यानंतर माझे मन शांत होते आणि विषय समजून घेण्यासाठी मनाची तयारी होते. हा माझा अनुभव तुम्हालाही उपयोगी पडेल असेही शक्य आहे.
रजत अग्रवाल यांनी एक चांगली गोष्ट सांगितली आहे. माझ्या ॲपवर जे लिहितात, “ रोज कमीत कमी अर्धातास तरी आपण आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबियांवर आनंदात वेळ घालवायला हवा. त्यांच्याशी गप्पा मारायला हव्यात.
ही एक महत्त्वाची गोष्ट रजतजींनी सांगितली कारण आपण अनुभवले असेल की, जेव्हा आपण परीक्षा देऊन घरी येतो. तेव्हा काय लिहिले? किती सोडवले? याचा धांडोळा घ्यायला बसतो. किती चुकले? काय बरोबर लिहिले? हे तपासायला लागतो. घरात आईवडील शिकलेले असतील आणि त्यातही ते शिक्षक असतील, तर पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला पुन्हा सोडवायला लावतात. सांग, काय लिहिलेस? काय आले? आणि मग गुणांची बेरीज करुन दाखवतात. बघ तुला 40 मिळतील की 80 की 90 गुण. ज्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही आलात. त्याच विषयात तुमचे मन गुंतून राहते. आणि तुम्ही काय करता? मित्रांना फोन करुन विचारता अरे तू काय लिहिलेस? तो विषय तुला कसा गेला? काय वाटतेय तुला? अरे मी गडबड केली, माझे चुकलेच, मित्रा काय करु मला माहित होते पण आठवलेच नाही रे, आपण यातच अडकून जातो.
मित्रांनो, असे करु नका. उत्तरपत्रिकेत जे लिहिले ते लिहिले, आता इतर विषयांवर घरातल्यांशी बोला. जुने आनंदाचे क्षण आठवा. आई-वडीलांबरोबर एखाद्या ठिकाणी कधी गेला असाल तर ते क्षण आठवा, अभ्यास, परीक्षा यातून बाहेर पडून किमान अर्धा तास यासाठी द्या. रजतजींनी सांगितलेला मुद्दा समजून घ्यावा असाच आहे.
मित्रहो, “शांती” या विषयावर मी काय तुम्हाला सांगणार? आज तुम्ही परीक्षा द्यायला जायच्या आधी, अशा एका व्यक्तीने तुमच्याकरता संदेश पाठवला आहे की जे मूळात शिक्षक आहेत आणि आज एका अर्थानं संस्कार शिक्षक झाले आहेत. रामचरित मानस या महान ग्रंथाला वर्तमानकाळाशी जोडून घेऊन देशभर आणि जगभर हा संस्कारांचा ओघ पोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्या पूज्य मुरारी बापू यांनी विद्यार्थ्यांकरता एक क्लुप्ती सांगितली आहे. ते शिक्षक आहेत आणि चिंतनही करतात. या संदेशात या दोन्ही गोष्टींचं प्रत्यंतर येईल.
मी मुरारी बापू बोलतोय. मी विद्यार्थी बंधू-भगिनींना हेच सांगू इच्छितो की परीक्षेच्या वेळी मनावर कोणताही ताण न ठेवता, विचारपूर्वक निर्णय घेऊन आणि एकाग्र चित्ताने परीक्षा द्या आणि जी परिस्थिती समोर आली आहे तिचा स्विकार करा. माझा अनुभव आहे की परिस्थितीचा स्विकार केला तर आपण खूप प्रसन्न आणि आनंदी राहू शकतो. तुमच्या परीक्षेत तुम्ही निर्भर होऊन आणि प्रसन्नचित्ताने पुढे गेलात तर जरुर यश मिळेल आणि जर कदाचित यश नाही मिळाले तरीही “नापास” झाल्याचे दु:ख होणार नाही आणि यशस्वी झाल्याचा अभिमानही वाटेल. एक शेर सांगून मी माझा संदेश आणि शुभेच्छा देतो. लाजिम नही कि हर कोई हो कामयाब ही, जीना भी सिखिए नाकामियों मे साथ | आपल्या आदरणीय पंतप्रधानांचा हा जो मन की बात कार्यक्रम आहे त्याचे मी खूप स्वागत करतो. सर्वांना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा | धन्यवाद.
एक मार्गदर्शक, मूल्यवान संदेश पाठवल्याबद्दल मी पूज्य मुरारी बापू यांचे आभार मानतो. मित्रहो आज आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. यावेळी नागरिकांनी, त्यांचे जे अनुभव माझ्यापर्यंत पोचवले त्यात योग विषयाची चर्चा केली आहे. हे माझ्या लक्षात आले. आणि मला याचा आनंद वाटतो की, जगभरात मी जिथे जातो, तिथे मला भेटणाऱ्या व्यक्ति थोडा वेळ का होईना, योग या विषयावर बोलतात. ती व्यक्ती परदेशी असो, भारतीय असो, योगाबद्दल लोकांच्या मनात आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. याचा मला आनंद वाटतो. नागरिकांना या विषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे हेच बघा ना, श्री. अतनु मंडल, श्री. के. जी. आनंद, श्री. अभिजीत कुलकर्णी आणि असे खूप जण, ज्यांनी ध्यानधारणेबद्दल, लिहिलेय माझ्या ॲपवर, योग यावर त्यांनी भर दिला आहे. असो, मित्रहो, तुम्ही उद्यापासून योगसाधना करायला लागा, असे मी आज आपल्याला सांगितले. तर ते काही योग्य नाही. पण जे विद्यार्थी नियमितपणे योगासने करतात त्यांनी आज परीक्षा आहे म्हणून योगासने केली नाही, असे करु नये. मात्र एक गोष्ट निश्चित. विद्यार्थीदशा असो की आयुष्याचा उत्तरार्ध अंतर्मनाचा विकास साधण्याच्या प्रवासात योगसाधना ही जणू गुरुकिल्ली आहे. यावर तुम्ही वश्य लक्ष द्या. आपल्या आसपास योगसाधना करणारे, योगविद्या जाणणारे कुणी असतील, तर त्यांना अवश्य भेटा. जरी यापूर्वी तुम्ही कधीही योगविद्येचा अभ्यास केला नसेल, तरीही योगसाधनेतल्या अशा काही सोप्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील, ज्या चार ते पाच मिनिटात तुम्ही करु शकाल. बघा, तुम्हाला शक्य आहे का? माझा मात्र त्यावर पूर्ण विश्वास आहे.
माझ्या तरुण मित्रांनो, परीक्षा केंद्रात जाण्याची तुम्हाला फार घाई असते. पटापट जावे आणि आपल्या बाकावर बसावे, असे वाटते ना? हे सगळे घाईगडबडीत का करायचे? आपल्या पूर्ण दिवसाचे नियोजन असे का नसावे की रस्त्यात वाहनांच्या वर्दळीमुळे आपल्याला थांबावे लागले तरीही परीक्षा केंद्रावर आपण वेळेतच पोहचू. अन्यथा त्यामुळे मनात तणाव निर्माण होतो.
आणखी एक गोष्ट, प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आपल्यासाठी काही सूचना असतात. आपण त्या वाचत बसलो, तर वेळ जाईल, असे आपल्याला वाटते. पण असे नाही मित्रांनो, त्या सूचना लक्षपूर्वक वाचा, दोन मिनिटे, तीन, पाच मिनिटे लागतील, काही बिघडत नाही. त्या सूचना बारकाईने वाचल्यामुळे, तुम्हाला हे कळेल की उत्तरपत्रिका कशी लिहायची आहे. त्या सूचना समजून घेतल्यात तर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले आहे, हे प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर कळते, असेही मी बघितले आहे. अशावेळी या सूचना वाचून, समजून घेतल्या तर, बदललेल्या स्वरुपाशी आपण स्वत:ला जुळवून घेऊ शकतो. भले यासाठी तुमची पाच मिनिटे जातील, पण हे करा असे मी आपल्याला आवर्जून सांगेन.
श्रीमान यश नागर यांनी त्यांचा अनुभव मोबाईल अपॅवर लिहून पाठवला आहे. ते लिहितात की, प्रश्नपत्रिका पहिल्यांदा नजरेखालून घातली तेव्हा ती फारच अवघड वाटली. पण तीच प्रश्नपत्रिका दुसऱ्यांदा वाचली आत्मविश्वासाने, तेव्हा लक्षात आले की आता हीच प्रश्नपत्रिका माझ्यासमारे आहे. आता कोणताही नवीन प्रश्न येणार नाही. यात आहेत, तेवढेच प्रश्न मला सोडवायचे आहेत. आणि मी पुन्हा विचार केला. पुढे यश नागर लिहितात की आता ही प्रश्नपत्रिका मला नीट समजली. पहिल्यांदा वाचली तेव्हा वाटले की आपल्याला यातले काहीच सोडवता येणार नाही. पण दुसऱ्यांदा वाचल्यावर लक्षात आले की, प्रश्न तेच आहेत, फक्त मांडणी वेगळ्या पद्धतीने केली आहे आणि त्याची उत्तरे मला माहित आहेत. प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसे न केल्याने ते फार कठीण आहेत, असे आपल्याला वाटते. तुम्ही प्रश्न दोनदा, तीनदा, चार वेळा वाचा आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाशी ते ताडून पहा. हा यश नागर यांनी मांडलेला मुद्दा आपण लक्षात घ्यावा, असे मी आपल्याला सुचवेन. आणि मग तुम्ही बघाल की किचकट वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी सहज लिहिता येतात ते.
भारतरत्न आणि ज्येष्ठ वैज्ञानिक सी. एन. आर. राव यांनी त्यांच्या संदेशात धैर्य हा मुद्दा अधोरेखित केला आहे. याचा मला आज आनंद होतो आहे. किमान शब्दांमध्ये पण कमालीचा सुंदर संदेश राव साहेबांनी पाठवला आहे, आपण तो ऐकूया-
“बंगळूरहून मी सी. एन. आर. राव बोलतोय. परीक्षांमुळे त्यातही स्पर्धात्मक परीक्षांमुळे अस्वस्थता येते हे मला पूर्ण माहित आहे. काळजी करु नका. तुमचे सर्वोत्तम द्या, हेच मी माझ्या सर्व तरुण मित्रांनो सांगतो. पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवा की या देशात इतर अनेक संधी उपलब्ध आहे. आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा आणि ते सोडू नका, तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही या विश्वाची लेकरे आहात हे विसरु नका, झाडे आणि डोंगरांप्रमाणेच तुम्हालाही इथे राहायचा हक्क आहे. तुम्हाला गरज आहे ती निग्रहाची, समर्पणाची आणि चिकाटीची. या गुणांमुळे तुम्ही सर्व परीक्षा आणि इतर प्रयत्नांमधे यशस्वी व्हाल. तुम्हाला जे जे काही करायचे आहे, त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. अनेक आशिर्वाद.”
पाहिलेत, मुद्दा सांगण्याची एखाद्या वैज्ञानिकाची पद्धत कशी असते? जे सांगायला मला अर्धा तास लागतो, तेच ते तीन मिनिटात सांगतात. हीच तर विज्ञानाची शक्ती आहे आणि हीच वैज्ञानिकमनाची शक्ती आहे. देशभरातील मुलांना प्रेरणा दिल्याबद्दल मी राव साहेबांचा मी खूप आभारी आहे. दृढता, निष्ठा, तप याबद्दल ते बोलले. dedication, determination, diligence याबद्दल ते बोलले. ठामपणे उभे रहा मित्रांनो ठाम रहा. जर तुम्ही ठामपणाने उभे राहिलात तर, भितीलाही भिती वाटेल. आणि तुमच्या हातून सत्कृत्य व्हावे यासाठी सोनेरी भविष्यकाळ तुमची प्रतिक्षा करेल.
रूचिका डाबस यांनी माझ्या ॲपवर संदेश पाठवला आहे. परीक्षेबद्दलचा त्यांचा अनुभव रुचिका यांनी सांगितला आहे. त्या म्हणतात की, परीक्षेच्या काळात घरामध्ये सकारात्मक वातावरण असावे, याकडे त्यांचे कुटुंबिय लक्ष देतात, अशीच चर्चा, असेच वातावरण शेजारच्या घरांमध्येही असते. सर्वत्र सकारात्मकता. आणि हे खरे आहे, सचिनजींनीही सांगितले, सकारात्मक दृष्टीकोन, मनाची सकारात्मक अवस्था यातून निर्माण होते, सकारात्मक ऊर्जा.
आपल्याला प्रेरणा देतील अशा खूप गोष्टी कधी कधी घडतात. असा विचार करु नका की प्रेरणा फक्त विद्यार्थ्यांनाच मिळते. जगण्याच्या कोणत्याही क्षणी, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, उत्तम उदारणे, सत्य घटना फार मोठी प्रेरणा आपल्यालाही देतात, मोठं सामर्थ्य देतात आणि संकटाच्या वेळी याच प्रेरणेच्या बळावर नवा मार्ग सापडू शकतो.
वीजेच्या दिव्याचे जनक थॉमस अल्वा एडीसन यांच्याबद्दलची माहिती अभ्यासक्रमात आपण वाचतो. पण मित्रांनो, कधी याचा विचार केलात का, की ह्या शोधासाठी किती वर्ष त्यांनी घालवली? अनेकदा अपयश सोसावे लागले, वेळ गेला, पैसेही खूप खर्च झाले. यश न मिळाल्याने किती उद्विग्न झाले असतील ते? पण त्यांनी जन्माला घातलेला तो वीजेचा दिवा आज आपल्या सगळ्यांचे आयुष्य प्रकाशमान करणारा ठरला. म्हणूनच तर म्हणतात अपयशाच्या पोटात यशाच्या शक्ता दडलेल्या असतात.
श्रीनिवास रामानुजन हे नाव सर्वांना ठाऊक आहे. आधुनिक काळातील महान गणिततज्ञांमधले एक, भारतीय गणिततज्ञ.
गणित या विषयाचे काही विशेष शिक्षण त्यांनी घेतले नव्हते, तरीही गणितीय वर्गीकरण, अंकसिद्धांत यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये रामानुजन यांनी मोलाची भर घातली. अत्यंत हलाखीचं, कष्टप्रद जीवन त्यांच्या वाट्याला आले, तरीही या जगासाठी महान देणगी ते देऊन गेले.
कुणालाही, कधीही यश मिळू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जे. के. रॉलिंग. हॅरी पॉटर ही त्यांची मालिका जगभर लोकप्रिय झाली. पण सुरुवातीचा काळ वेगळा होता, अनेक संकटांचा सामना त्यांना करावा लागला, अनेकदा निराशा वाट्याला आली. मात्र अशा परिस्थितीतही चिकाटीने त्यांची सारी शक्ती त्यांनी कामाला लावली, असे जे. के. रॉलिंग यांनी स्वत: सांगितले होते, हीच शक्ती त्यांच्यासाठी महत्त्वाची होती.
आजच्या काळात परिक्षा ही फक्त विद्यार्थ्यांची नसते, सगळ्या कुटुंबाची, शाळेची, शिक्षकांची असते. पण पालक आणि शिक्षक यांचा पाठिंबा नसलेला विद्यार्थी असणे काही चांगले नाही. शिक्षक असोत, पालक असोत, वरच्या वर्गातले विद्यार्थी असोत, या सगळ्यांनी एकत्र येऊन, समान विचाराने विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला तर विद्यार्थ्यांना परीक्षेची भिती वाटणार नाही.
श्रीमान केशव वैष्णव यांनी माझ्या ॲपवर लिहिले आहे. अधिक गुण मिळवावे असा दबाव पालकांनी मुलांवर टाकू नये असे त्यांचे मत आहे. फक्त अभ्यासाच्या तयारीसाठी पालकांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुले चिंतामुक्त कशी राहतील, याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे.
आपल्या अपेक्षांचे ओझे पालकांनी मुलांवर लादू नये असे मत मांडले आहे विजय जिंदल यांनी. जेवढे शक्य असेल, तेवढे मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचा विश्वास टिकून राहील, यासाठी मदत करावी. जिंदल यांचा मुद्दा बरोबर आहे. मी आज पालकांना जास्त काही नाही सांगणार. कृपया, तुमच्या मुलांवर दबाव टाकू नका, तो त्याच्या मित्राशी बोलत असेल तर त्याला अडवू नका. एक हसतंखेळतं, सकारात्मक वातावरण तयार करा. आणि मग बघा, तुमचा मुलगा, तुमची मुलगी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील. हा आत्मविश्वास तुम्हालाही जाणवेल.
मित्रहो, एक मात्र निश्चित आहे, विशेषत: माझ्या तरुण मित्रांना मी सांगू इच्छितो. आपल्या आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत आपल्या जीवनात खूपच बदल झाले आहेत. नवीन संशोधन, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान यांची नवनवी रुप क्षणोक्षणी पहायला मिळत आहेत. आणि हे पाहून आपण केवळ दिपून जातो, असे नाही, तर त्या साऱ्याशी हात मिळवायला, आपल्याला आवडते. विज्ञानाच्या वेगाने आपणही प्रगती करावी, असे आपल्याला वाटते. हे मी सांगतोय याचे कारण म्हणजे आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. विज्ञानाचा हा महोत्सव दरवर्षी साऱ्या देशभर आपण साजरा करतो, 28 फेब्रुवारी रोजी. 28 फेब्रुवारी 1928, सर. सी. व्ही. रमन यांनी रमन परिणाम याची घोषणा केली होती. याच शोधासाठी ते नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले.
आणि त्याचे स्मरण म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून आपण साऱ्या देशभर साजरा करतो. जिज्ञासा ही विज्ञानाची जननी आहे. प्रत्येक मनात वैज्ञानिक विचार रुजावेत, विज्ञानाचे प्रत्येकाला आकर्षण वाटावे, नवीन संशोधनावर प्रत्येक पिढीला लक्ष द्यावे लागते. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सहभागाशिवाय नवीन संशोधन शक्य नाही. आज राष्ट्रीय विज्ञान दिनी साऱ्या देशभर नवीन संशोधनाला चालना मिळाली पाहिजे.
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या गोष्टी आमच्या विकास यात्रेचा सहज भाग व्हायला हव्यात आणि यावेळच्या राष्ट्रय विज्ञान दिनाची संकल्पना आहे, “मेक इन इंडिया सायन्स अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इनोव्हेशन्स.” मी सर सी.व्ही. रमन यांना प्रणाम करतो आणि आपण सर्वांनी विज्ञानाच्या क्षेत्रात अधिक रस घ्यावा असे आवर्जून सांगतो.
मित्रहो, कधी कधी यश मिळण्यासाठी फार वेळ लागतो. आणि जेव्हा यश मिळते तेव्हा जगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. तुम्ही परीक्षेच्या तयारीत मग्न असाल, कदाचित काही बातम्या तुमच्यापर्यंत पोहचल्या नसतील किंवा तुम्ही त्याकडे लक्ष दिले नसेल. पण देशवासियांना मी ही गोष्ट पुन्हा सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसात विज्ञान जगतात एक मोठा आणि महत्वाचा शोध लागला आहे हे आपण ऐकले असेल. जगभरातील वैज्ञानिकांनी मेहनत केली, अनेक पिढया आल्या, काही ना काही भर त्यांनी घातली. आणि जवळ जवळ शंभर वर्षानंतर एक यश गवसले. ग्रॅव्हीटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल, आमच्या वैज्ञानिकांच्या कठोर परिश्रमांमधून त्याचा शोध लागला. हे विज्ञानाचे मोठे यश मानावे लागेल. ज्याचा भविष्यकाळावर परिणाम होणार आहे. गेल्या शतकातील महान शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्या सिध्दांताला या शोधामुळे पुष्टी मिळाली. एवढेच नव्हे तर भौतिक शास्त्राच्या क्षेत्रातला हा एक महान शोध ठरला. साऱ्या मानवसमाजाला , साऱ्या विश्वाला लाभदायक ठरेल अशी गोष्ट आहे. या साऱ्या शोध प्रक्रियेत आमच्या देशातील सुपुत्र, आमच्या देशातील कुशल शास्त्रज्ञ यांचाही वाटा होता याचा भारतीय म्हणून आपल्याला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या साऱ्या शास्त्रज्ञांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे अभिनंदन करतो. येत्या काळात या नव्या शोधाला आणखी पुढे नेण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ प्रयत्न करतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रयत्नांचा भारत एक भाग असेल. आणि माझ्या देशवासियांनो नुकताच यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे. या शोधाची पुढची पायरी गाठण्यासाठी लेसर इंटरफेमीटर ग्रॅव्हीटेशनल वेव्ह ऑबझर्व्हेटरी म्हणजेच एलआयजीओ भारतात स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. जगात या प्रकारची दोन केंद्रे आहेत, तिसरे भारतात राहील. भारताच्या सहभागामुळे या प्रक्रियेला नवी शक्ती, नवी गति मिळेल.
मर्यादित साधनसामुग्रीच्या जोरावर भारत मानव कल्याणाच्या या महान वैज्ञानिक शोधात सक्रीय सहभागी होणार आहे. सर्व शास्त्रज्ञांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो एक क्रमांक मी आपल्याला सांगतो, तो टिपून घ्या. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही उद्यापासून मन की बात ऐकू शकाल. आपल्या मातृभाषेतही ऐकू शकाल. मिस्ड कॉल देण्यासाठी क्रमांक आहे 81908 81908 मी पुन्हा सांगतो 81908 81908. मित्रांनो तुमच्या परीक्षा सुरु होत आहेत, मलाही उद्या परीक्षा दयायची आहे. सव्वाशे कोटी देशवासी माझी परीक्षा घेणार आहेत. ठाऊक आहे ना, उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. 29 फेब्रुवारी, लिप वर्ष. पण तुम्ही पाहिलं असेल, माझे बोलणे ऐकल्यावर तुम्हाला वाटेले असेल, की माझी तब्येत ठणठणीत आहे, आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. बस, उद्या माझी परीक्षा झाली की परवा तुमची सुरु होईल. आणि आपण सर्व यशस्वी होऊ, तेव्हाच देश यशस्वी होईल. तेव्हा, मित्रहो आपल्याला अनेकानेक शुभेच्छा. यश-अपयश याच्या तणावातून मुक्त होऊन, मुक्त मनाने पुढे जा, ठाम रहा. धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 2016 सालातील ही पहिलीच “मन की बात” आहे. “मन की बात” ने असे धरुन ठेवले आहे, असे धरुन ठेवले आहे की, कोणतीही गोष्ट दृष्टीस पडली, कोणताही विचार आला की तो तुम्हाला सांगण्याची इच्छा होते. काल मी पूज्य बापूना श्रध्दांजली वाहण्यासाठी राजघाटावर गेलो होतो. शहिदांना नमन करण्यासाठी हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. ठिक 11 वाजता 2 मिनिटांसाठी मौन पाळून, देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या, प्राणसर्वस्व अर्पिणाऱ्या महापुरुषांसाठी, वीर पुरुषांसाठी, तेजस्वी तपस्वी लोकांसाठी श्रध्दा व्यक्त करण्याची ही एक संधी असते. परंतु जर आपण पाहिले, आमच्यापैकी काही लोक आहेत, ज्यांनी हे केलेले नाही. तुम्हाला नाही वाटत की हा स्वभाव बनला पाहिजे, या गोष्टीला आम्ही आपले राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवे ? मला याची जाणीव आहे की माझ्या “मन की बात” ने हे होणार नाही.
परंतु जे मी काल अनुभवले, वाटले की ते तुमच्याशीसुध्दा बोलावे आणि हीच गोष्ट आहे जी देशासाठी आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. आपण कल्पना तर करु शकाल, प्रत्येक वर्षी 30 जानेवारी रोजी ठिक 11 वाजता सव्वाशे कोटी देशवासी 2 मिनिटांसाठी मौन पाळतात. तुम्ही कल्पना करु शकता की या घटनेत किती मोठी ताकद असू शकेल ? आणि ही गोष्ट खरीच आहे की, आमच्या शास्त्राातही म्हटले की –
“संगच्छध्वं संवदध्वं सं वो मनांसि जानताम”
“आम्ही सर्व एकत्र चालावे, एकत्र बोलावे, आमची वने एक होवोत”, हीच राष्ट्राची खरी ताकद आहे आणि या शक्तीला प्राण देण्याचे काम अशा संघटना करतात.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी सरदार पटेलांचे विचार वाचत होतो. त्यावेळी काही गोष्टींकडे माझे लक्ष गेले आणि त्यांची एक गोष्ट मला खूपच आवडली. खादीच्या संदर्भात सरदार पटेलांनी म्हटले आहे की हिंदुस्थानचे स्वातंत्र्य खादीमध्येच आहे, हिंदुस्थानची परंपराही खादीचीच. हिंदुस्थानात जिला आम्ही परम धर्म मानतो, ती अहिंसा खादी मध्येच आहे आणि हिंदुस्थानातील शेतकरी, ज्यांच्यासाठी आपण इतकी भावना दर्शवितो, त्यांचे कल्याणसुध्दा खादीमध्येच आहे. सरदार साहेब सरळ भाषेत साधी गोष्ट मुख्यत्वाने सांगत असत.
त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे खादीचे माहात्म्य सांगितले आहे. मी काल 30 जानेवारीला पूज्य बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त देशात जेवढया खादी आणि ग्रामोद्योगाशी जोडलेल्या लोकांपर्यंत पोहचू शकतो, त्यांना पत्र लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर पूज्य बापू विज्ञानाची बाजू मांडणारे होते, त्यासाठी मी सुध्दा तंत्रज्ञानाचाच उपयोग केला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाखो अशा बंधु-भगिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. खादी, आता एक प्रतीक (सिम्बॉल) बनले आहे, एक वेगळी ओळख बनले आहे. आता खादी हे युवा पिढीचेही आकर्षण केंद्र बनत आहे. आणि विशेष म्हणजे “होलिस्टिक हेल्थ केअर” आणि “ऑरगॅनिक”कडे जे लोक वळलेले आहेत, त्यांच्यासाठी तर हा एक नवा उत्तम उपाय बनलेला आहे. फॅशन”च्या रुपातही आता खादीने आपली जागा घेतलेली आहे आणि खादीशी जोडल्या गेलेल्या लोकांचे अभिनंदन करतो की त्यांनी खादीमध्ये हे नवे स्वरुप आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अर्थव्यवस्थेतील बाजारातही तिचे आपले एक महत्त्व आहे खादीनेसुध्दा, भावनात्मक गोष्टींबरोबर बाजारातसुध्दा आपली जागा बनविणे जरुरीचे झाले आहे. जेव्हा मी लोकांना सांगितले की अनेक प्रकारची फॅब्रिक्स आपल्या जवळ उपलब्ध असली तरी खादीचा प्रसार लोक कल्याणसाठी झाला पाहिजे. ही गोष्ट लोकांच्या गळी उतरु लागली आहे की हा भाई, खादीधारी तर नाही बनू शकत, परंतु जर दहा प्रकारचे कपडे आपल्याजवळ आहेत तर आणि एक खादीचा होऊन जाऊ दे. पण त्याबरोबरच मी जे सांगतोय त्याबद्दल सरकारी पातळीवरसुध्दा एक सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. पुष्कळ वर्षांपूर्वी सरकारमध्ये खादीचा पुष्कळ उपयोग होत होता. पण हळु हळु आधुनिकतेच्या नावाखाली हे सगळे नाहीसे होत गेले आणि खादीशी जोडले गेलेले आमची गरीब लोक बेरोजगार होत गेले. खादीमध्ये कोटयावधी लोकांना रोजगार देण्याची ताकद आहे. मागील काही दिवसात रेल्वे मंत्रालय, पोलिस विभाग, भारतीय नौदल, उत्तराखंडचा टपाल विभाग अशा काही सरकारी संस्थांनी खादीच्या वापरास उत्तेजन देण्यासाठी काही चांगले उपक्रम (इनिशिएटिव्ह) घेतले. आणि मला सांगितले गेले आहे की सरकारी विभागांच्या अशा प्रयत्नांमुळे खादीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि सरकारच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, अतिरिक्त 18 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होईल. 18 लाख मनुष्य दिवस ही एक पुष्कळ मोठी उडी घेतलेली असेल. पूज्य बापूही नेहमीच तंत्रज्ञानाच्या (अप-ग्रेडशनसाठी) अद्यावततेसाठी पुष्कळच जागृत होते आणि आग्रहीसुध्दा होते. आणि तेव्हाच तर आमचा चरखा विकसित होत होत येथपर्यंत पोहोचला आहे. अलिकडे सौर ऊर्जेचा वापर करीत चरखा चालवणे, ती चरख्याशी जोडण्याचा पुष्कळच यशस्वी प्रयोग होत आहे. यामुळे मेहनत कमी होऊन उत्पादन वाढले आणि गुणात्मक परिवर्तनसुध्दा आले. विशेषत: सौर चरख्यासाठी लोक मला पुष्कळच पत्रे पाठवत असतात. राजस्थानातील दौसा येथील गीता देवी, कोमलदेवी आणि बिहारमधील नवादा जिल्हयातील साधना देवी यांनी मला पत्र लिहून सांगितले आहे की, सोलार चरख्यामुळे त्यांच्या जीवनात पुष्कळच परिवर्तन आले आहे. आमचे उत्पन्न दुप्पट झाले आणि आमचे जे सूत आहे, त्यांच्याबाबतीतसुध्दा आकर्षण वाढले आहे. या साऱ्या गोष्टी एक नवा उत्साह वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. आणि 30 जानेवारीला, पूज्य बापूंचे आपण जेव्हा स्मरण करतो, तेव्हा मी पुन्हा एकदा सांगेन की एवढे तर अवश्य करा की आपल्या सर्व कपडयांमध्ये एखादा खादीचासुध्दा असू दे. त्याचा आग्रह धरा.
प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण पुष्कळच उमेदीने आणि उत्साहात आम्ही सर्वांनी साजरा केला. चारही बाजूने, दहशतवादी काय करतील, या चिंतेबरोबरच नागरिकांनी हिंमत दाखवली, उत्साह दाखवला आणि (शानदाररित्या) सर्वांनी प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण साजरा केला. परंतु काही लोकांनी नेहमीपेक्षा वेगळया काही गोष्टी केल्या, आणि मला असे वाटते की या गोष्टींकडे लक्ष देण्यासारख्या आहेत, विशेषत: हरियाणा आणि गुजरात, या दोन राज्यांनी एक मोठा अनोखा प्रयोग केला. यावर्षी त्यांनी, प्रत्येक गावात जी सरकारी शाळा आहे, ध्वजवंदनासाठी त्या गावातील जी सर्वात शिकलेली मुलगी आहे, तिची निवड केली. हरियाणा आणि गुजरातने मुलींचे माहात्म्य वाढविले. शिकलेल्या मुलीला विशेष महत्त्व दिले. “मुली वाचवा – मुली शिकवा” हा एक उत्तम संदेश देण्याचा त्यांनी प्रयास केला. मी दोन्ही राज्यांच्या या कल्पनाशक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आणि सर्व मुलींना शुभेच्छा देतो. त्यांना ध्वजवंदन, ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. हरियाणात आणखीही एक गोष्ट झाली की, गेल्या एक वर्षात ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे, अशा कुटुंबांना 26 जानेवारीच्या निमित्ताने विशेष निमंत्रित केले गेले आणि व्हीआयपींमध्ये पहिल्या रांगेत त्यांाना स्थान देण्यात आले. हा आपोआपच एक मोठा गौरवाचा क्षण होता. मला या गोष्टींचा आनंद आहे की, मी माझ्या “मुली वाचवा – मुली शिकवा” या योजनेचा प्रारंभ हरियाणातून केला. कारण हरियाणात मुलगे आणि मुलींच्या प्रमाणात पुष्कळच गोंधळाची अवस्था होती. एक हजार मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर पुष्कळच कमी होत गेलेला होता. चिंतेची गोष्ट होती. सामाजिक संतुलन बिघडलेले होते आणि जेव्हा मी हरियाणाची निवड केली तेव्हा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, नाही, नाही साहेब, तेथे करु नका तेथे तर मोठेच नकारात्मक वातारवरण आहे. परंतु मी काम केले आणि मी आज हरियाणाचे हार्दिक अभिनंदन करतो की, त्यांनी या गोष्टीला आपलीच गोष्ट मानली आणि आज मुलींची जन्मसंख्या पुष्कळच मोठया प्रमाणात वाढत आहे. मी खरोखरच तेथील सामाजिक जीवनातील जो बदल घडून आला आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
मागील खेपेस “मन की बात” मध्ये मी दोन गोष्टी सांगितल्या. पहिली म्हणजे एक नागरिक या नात्याने आपण महापुरुषांच्या पुतळयांची स्वच्छता उभारण्यासाठी तर आम्ही मोठे भावुक होतो, परंतु नंतर मात्र आम्ही बेपर्वाई दाखवतो. दुसरी गोष्ट मी सांगितली होती, की प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे तेव्हा आम्ही आमच्या कर्तव्यांबद्दलही जोर लावला पाहिजे, कर्तव्य करत राहायला पाहिजे, कर्तव्याबद्दलही चर्चा होणे आवश्यक आहे ! मला आनंद याचा आहे की, देशातील काही भागातील नागरिकांनी पुढकार घेतला, काही सामाजिक संस्था पुढे आल्या, काही शैक्षणिक संस्था पुढे आल्या, काही संत महात्मे पुढे आले आणि सर्वांनी जेथे जेथे पुतळे आहेत, प्रतिमा आहेत. तेथे त्यांची स्वच्छता केली, परिसराची सफाई केली. एक चांगली सुरुवात झाली, आणि हे फक्त स्वच्छता अभियान नवहे, तर हे एक सन्मान अभियानही आहे. मी प्रत्येकाचा काही उल्लेख करीत नाहीय, पण ज्या बातम्या मिळाल्या आहेत, त्या अतिशय आनंददायी आहेत. काही लोक संकोचाने बातम्या देतही नाहीत. मी त्यां ना आग्रह करतोय की माय गव्हर्मेंट या पोटर्लवर आपण केलेल्या पुतळयांच्या स्वच्छतेबद्दलचे छायाचित्र जरुर पाठवा. जगातील अनेक लोक ते पाहतात आणि त्यांना अभिमान वाटतो त्याेचप्रमाणे 26 जानेवारीला “कर्तव्य आणि अधिकार” याबद्दल मी लोकांचे विचार मागवले होते आणि मला आनंद आहे की हजारो माझ्या प्रिय देशबांधवांनो, एका कामासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि मला विश्वास आहे की, आपण ती कराल. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावावर पुष्कळ काही बोलले जाते, असो. मी त्या वादात पडू इच्छित नाही. पण शेतकऱ्यांवरचे सर्वात मोठे संकट आहे. नैसर्गिक आपत्ती. त्यात त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाते. त्यांचे वर्ष फुकट जाते. त्यांना सुरक्षा देण्यासाठी एक उपायसुध्दा आता लक्षात येऊ लागलाय आणि मी ती भेट शेतकऱ्यांना दिली आहे. ती म्हणजे, पंतप्रधान पीक विमा योजना. या योजनेची तरफदारी व्हावी वाहवा व्हावी, पंतप्रधानांना अभिनंदनपर शुभेच्छा मिळाव्यात यासाठी ही योजना नाहीय. इतकी वर्ष पीक विमा योजनेची चर्चा होतेय पण देशात 20-25 टक्क्यांहून अधिक शेतकरी तिचे लाभार्थी झालेले नाहीत. तिच्याशी जोडले गेलेले नाहीत. येणाऱ्या एक-दोन वर्षात आम्ही देशात 50 टक्के शेतकऱ्यांना पिक विमा योजनेशी जोडून घेऊ? असा संकल्प करु शकतो काय ? होय. फक्त मला यासाठी आपली मदत हवीय. कारण एकदा का शेतकरी पीक विम्याशी जोडले गेले तर संकट काळात त्यांना मोठी मदत मिळू शकेल आणि म्हणूनच पंतप्रधान पीक विमा योजनेस इतकी मान्यता मिळत आहे. कारण ही योजना व्यापक तंत्रज्ञानयुक्त आणि सोपी बनवली गेली आहे, केवळ इतकेच नाही, पीक कापल्यानंतरसुध्दा, 15 दिवसातही काही झाले, तरीसुध्दा मदतीचे आश्वासन यामध्ये दिलेले आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन, त्याची गती अधिक वेगवान कशी होईल, विम्याचे पैसे मिळाल्यास विलंबही होऊ नये या सर्व गोष्टींवर लक्ष दिले गेले आहे. आता सर्वात मोठी गोष्ट/पीक विमा योजनेचे “प्रिमियम” दर/इतके खाली करण्यात आलेले आहेत की, ज्याचा कोणी विचारही केला नसेल! नव्या विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रिमियमची अधिकतम मर्यादा खरीपांच्या पिकांसाठी 2 टक्के आणि रब्बी पिकांसाठी दीड टक्के असेल. आता मला सांगा, माझा कोणताही शेतकरी बंधु या गोष्टीपासून वंचित राहता कामा नये. तो वंचित राहिल्यास नुकसान होणार की नाही? नाही होणार! तुम्ही शेतकरी नसालही. परंतु माझी “मन की बात” ऐकत आहात ना? आपण शेतकऱ्यांपर्यंत माझी गोष्ट पोहचवाल? आणि यासाठीच माझी अशी इच्छा आहे की याचा अधिकाधिक प्रचार करावा यासाठी यावेळी मी आपल्यासाठी नवी योजनाही आणली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि ही गोष्ट खरी आहे की टी.व्ही.वर रेडियोवर माझी “मन की बात” तुम्ही ऐकत असाल. परंतु नंतर ऐकायचे असेल तर काय ? आता मी आपल्याला एक नवी भेट देणार आहे. काय आपण आपल्या मोबाईल फोनवरसुध्दा माझी “मन की बात” ऐकू शकता आणि केव्हाही. ती ऐकू शकता ? होय फक्त आपल्याला एवढेच करायचे आहे. एक “मिस कॉल” करा आपला मोबाईल फोनवरुन “मन की बात” साठी मोबाईल फोनचा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे. 8190881908 (आठ एका नऊ शून्य आठ आठ एक नऊ शून्य आठ) आपण मिस कॉल केलात तर त्याच्या प्रसारणा नंतरही “मन की बात” ऐकू शकता. सध्या तर हे हिंदीत आहे परंतु आता लवकरच आपल्या मातृभाषेत “मन की बात” ऐकण्याची संधी मिळेल यासाठी सुध्दा माझी खटपट सुरु आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपण तर कमाल केलीत. जेव्हा स्टार्ट अपचा कार्यक्रम 16 जानेवारीला झाला, साऱ्या देशातील तरुणांमध्ये नवी ऊर्जा नवी चेतना, नवा अंदाज, नवा उत्साह संचारल्याचा मी अनुभव घेतला. लाखोंच्या संख्येने लोकांनी या कार्यक्रमास येण्यासाठी नोंदणी केली परंतु इतकी जागा नसल्यामुळे, शेवटी विज्ञान भवनात हा कार्यक्रम झाला. आपण पोहचू शकला नाहीत, पण आपण संपूर्ण वेळ ऑनलाईन यात सहभागी झालात. क्वचितच असा कार्यक्रम आणि इतका वेळ लाखोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते, असे हे पुष्कळच दुर्मिळ असते परंतु झाले ! आणि मी हे पाहत होतो की “स्टार्ट अप” साठी किती उत्साह आहे. हा सामान्यांचा विचार आहे. स्टार्ट अप म्हणजे आयटीशी संबंधित असलेल्या त्यां च्याशी संबंधित होणाऱ्या गोष्टी पुष्कळच “सॉफिस्टीकेटेड” कारभार ! स्टार्ट अपच्या या इव्हेंट नंतर हा भ्रम दूर झाला. आयटीच्या जवळचा स्टार्ट अप तर एक लहानसा हिस्सा आहे. जीवन विशाल आहे, गरजा अनंत आहेत. (काळ अनंत आहे) स्टार्ट अपसुध्दा आता अगणित संधी घेऊन येत आहे.
मी काही दिवसांपूर्वी सिक्कीमला गेलो होतो. सिक्कीम आता देशाचा ऑरगॅनिक स्टेट बनलेला आहे आणि देशभरातील कृषी मंत्री आणि कृषी सचिव यांना मी तिथे निमंत्रित केले होते. मला तिथे दोन युवकांना भेटण्याची संधी मिळाली. आयआयएम शिकून ते आलेले आहेत. एक आहे अनुराग अग्रवाल आणि दुसरी आहे सिध्दी कर्नाणी त्यांनी “स्टार्ट अप”पर्यंत मजल घेतली आणि ते मला सिक्कीम मध्ये मिळाले. ते ईशान्य भारतात काम करीत आहेत, आणि हर्बल पिकवत आहेत. ऑरगॅनिक पिकवत आहेत, याचे “ग्लोबल मार्केटिंग” करीत आहेत आहे की नाही कमाल! मागील वेळेस मी माझ्या स्टार्ट अपशी जोडल्या गेलेल्या लोकांना सांगितले की नरेंद्र मोदी ॲपवर आपले अनुभव पाठवावेत. काहींनी पाठवले आहेत. परंतु आणखी जास्त आले तर मला आनंदच होईल. परंतु जे आले आहेत ते सुध्दा खरोखर प्रेरक आहेत कोणी विश्वास द्विवेदी नावाचे युवक आहेत, त्यांनी ऑनलाईन किचन “स्टार्टअप” केले आहे आणि अशा प्रकारचे मध्यमवर्गीय लोक जे रोजी-रोटी मिळवण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी ते ऑनलाईन नेटवर्कींगद्वारे जेवणाचे डबे पोहचवण्याचे काम करतात. कोणी मिस्टर दिनेश पाठक म्हणून आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेषत: जनावरांसाठी जो आहार असतो, ते पशुखाद्य निर्मिती करण्याची मनाची तयारी केली आहे. आपल्या देशातील पशुंना जर चांगला आहार मिळाला तर आपल्याला चांगले दूध मिळेल, आपल्याला चांगले दूध मिळाले, तर आमच्या देशातील युवक ताकदवान होईल ! मनोज गिल्दा, निखिलजी, त्यांनी ॲग्रो-स्टोरेजचे स्टाट्र अप सुरु केले आहे ते सायंटिफिक फ्रूट्स स्टोरेज सिस्टिम बरोबरच कृषी उतपादनांसाठी बल्क स्टोरेज सिस्टिम विकसित करत आहेत. असे पुष्कळ प्रकारचे प्रस्ताव आले आहेत. आपण अजूनही पाठवा, मला बरेच वाटेल आणि मला वेळोवेळी “मन की बात” मध्ये किंवा स्टार्टअपची गोष्ट करावी लागेल, ज्याप्रमाणे मी स्वच्छतेची गोष्ट करतो तशी स्टार्ट अपची गोष्टही.
माझ्या प्रिय देशबांधवानो, स्वच्छतेबरोबर च आता सौंदर्यही जोडले जात आहे. पुष्कळ वर्ष घाणीविरुध्द नाराजी व्यक्त करीत आहोत परंतु घाण काही हटली नाही आता देशवासियांमध्ये घाणीची चर्चा सोडून “स्वच्छतेबाबतची चर्चा” सुरु झाली आहे, आणि स्वच्छतेचे काम कोठे ना कोठे चालतच राहील. परंतु आता एक पाऊल नागरिकांनी पुढे टाकले आहे. त्यांनी स्वच्छतेबरोबर सौंदर्यही जोडले आहे. एक प्रकारे दूधात साखर आणि ही गोष्ट विशेषत्वाने दृष्टीस पडत आहे रेल्वे स्टेशनवर, मी पाहत आहे की, आता देशातील काही रेल्वे स्थानके जिथे तेथील स्थानिक नागरिक, स्थानिक कलाकार, विद्यार्थी हे आपापले शहर, रेल्वे स्थानके सजवण्याच्या कामास लागले आहेत. स्थानिक कला केंद्रांशी जोडून भिंतीवर पेंटिग ठेवणे, साईन बोर्ड चांगल्या स्वरुपात बनविणे, कलात्मक रुप देणे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी काही गोष्टीही यासाठी करायला हव्यात, न जाणे काय करत आहेत ? मला सांगितले गेले की, काहींना हजारीबाग स्टेशनवर, आदिवासी महिलांनी तेथील गोहराई हे स्थानक आणि कोहबर आर्टचे डिझाईन काढून पूर्ण रेल्वे स्टेशन सजविण्यात आले आहे. ठाणे जिल्हयातील 300 हून अधिक स्वयंसेवकांनी (कॉलेरिंयर्सनी) किंग सर्कल स्टेशन सजवले, माटुंगा, बोरिवली, खार येथून, राजस्थानातूनही पुष्कळ बातम्या येत आहेत. सवाई माधोपूर, कोटा, असे वाटू लागले आहे की आमची रेल्वे स्टेशन आपल्या परंपरेची ओळख दर्शवू लागली आहेत. आता कोणी खिडकीतून चहा भज्यांच्या गाडीला नाही शोधणार, गाडीत बसून भिंतीवर पाहून येथील वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहतील आणि हा काही रेल्वेचा (इनिशिएटिव्ह) उपक्रम नव्हता की नरेंद्र मोदींचा हा नागरिकांचा उपक्रम होता. पाहा नागरिक करतात ते कसे? हे मी पाहतो. मला काही प्रतिमाही मिळाल्या आहेत. परंतु माझ्या मनाला वाटत आहे की, आणखी काही प्रतिमा पाहाव्यात, काय आपण, रेल्वे स्थानकाबरोबरच इतर ठिकाणी स्वच्छतेबरोबरच सौदर्यासाठीही प्रयास केले आहेत? काय आपण मला पाठवू शकाल?
जरुर पाठवा. मी तर पाहिनच, बस स्थानकांवर असून शकतात, रुग्णालयात असू शकतात, चर्चच्या आसपास असून शकतात, बाग बगीच्यातही असू शकतात. किती तरी ठिकाणी असू शकतात? ज्यांच्या मनात हा विचार आला आणि ज्यांनी हा उपक्रम सुरु केला आणि ज्यांनी या गोष्टीस पुढे नेलं, त्या सर्वांच अभिनंदन. परंतु हो, आपण मला छायाचित्रे जरुर पाठवावित, मी आपण काय केलेलं आहे ते मी पाहु इच्छितो.
माझ्या प्रिय देशबंधु-भगिनींनो, आपल्यासाठी अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगायची म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपला भारत देश एक मोठा समारंभ आयोजित करतो आहे. संपूर्ण दुनिया आपला पाहुणचार घ्यायला येणार आहे. जगातील कित्येक देशांचे युद्धपोत, नौसेनेची जहाजं, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणच्या समुद्र किनाऱ्यावर एकत्र येत आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय नौका ताफा पाहणी (International Fleet Review) भारताच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. जगाची सैन्यशक्ती आणि आपली सैन्य शक्ती यांचा ताळमेळ घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. एक संयुक्त प्रयोग आहे. मोठी नामी संधी आहे ही. येणाऱ्या काही दिवसात टीव्ही आणि प्रसारमाध्यमांच्या द्वारे याबद्दलची माहिती आपणा सर्वांना मिळत जाणार आहे. कारण जेव्हा एखादा खूपच मोठा कार्यक्रम असतो तेव्हा त्याला सारेच पाठिंबा देतात. भारतासारख्या देशासाठी हा समारंभ महत्वपूर्ण आहे. भारताचा सामुद्रिक इतिहास सोनेरी राहिला आहे. संस्कृतमधे समुद्राला उदधि किंवा सागर म्हटले जाते. याचा अर्थ आहे अथांगता. सीमा आम्हाला वेगवेगळे ठेवत असतील, जमीन एकमेकांपासून विलग करत असेल. पण पाणी आपल्याला जोडत असतं, समुद्र आपल्याला एकमेकांशी जोडून देतो, आपण आपल्याला समुद्राशी जोडून घेऊ शकतो, कुणाशीही जोडून घेऊ शकतो. आमच्या पूर्वजांनी शतकांपूर्वी विश्वभ्रमण करुन जगाशी व्यापार करुन आपल्या या शक्तीचा परिचय करुन दिलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्रज्य असो किवा चौल साम्राज्य. चौल साम्राज्यात सामुद्रिक शक्तीमच्या बाबतीत त्यांनी आपली म्हणून स्वत:ची एक नवीन ओळख बनवली होती. आपल्या देशात आजही अशी काही राज्ये आहेत की, जिथे समुद्राशी संबंधित अशा अनेक परंपरा जिवंत आहेत. त्या उत्सवांच्या रुपात साजऱ्या केल्या जातात. जेव्हा जग हे भारताचे पाहुणे म्हणून येणार आहे. तेव्हा आपल्या नौदलाच्या शक्तीची ओळख साऱ्यांना होणार आहे. एक चांगली संधी आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे.
भारताच्या पूर्वेकडील गुवाहाटीमधेही क्रीडा स्पर्धांचे समारंभ होणार आहे. सार्क देशांचा क्रीडा समारंभ, सार्क देशांमधील हजारो खेळाडू गुवाहाटीच्या भूमीत येत आहेत. खेळांचा माहोल आणि खेळांचा जल्लोष सार्क देशांच्या नव्या पिढीचा गुवाहाटीत होत असलेला हा क्रीडा उत्सव म्हणजे सार्क देशांनी परस्परांशी नातेसंबंध दृढ करण्याची एक चांगली संधी आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझ्या मनात जे येतं, जे माझ्या मनात उमटतं ते खुले पणानं मी तुमच्याशी बोलत असतो, हे मी पहिल्यांदाच सांगून ठेवलंय. लवरकच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतील. मागच्या वेळी “मन की बात” मधे मी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी काही गोष्टी बोललो होतो. यावेळी माझी इच्छा आहे की, जे विद्यार्थी यापूर्वी परीक्षांमधे यशस्वी झालेत, त्यांनी तणावमुक्त परीक्षांच्या दिवसांसाठी काय काय केलं? त्यांच्या कुटुंबात कसं वातावरण होतं? त्यांच्या शिक्षकांनी काय भूमिका निभावली? स्वत: त्यांनी कोणते प्रयत्न केले? त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना काय काय सांगितलं? आणि त्यांनी स्वत: काय काय केलं? हे सगळे अनुभव मला पाठवावेत यावेळी अशा विद्यर्थ्यांनी आपले अनुभव मला “नरेंद्र मोदी ॲप”वर पाठवावेत. आणि मी प्रसार माध्यमांनाही विनंती करेन की, या अनुभवांमधल्या चांगल्या गोष्टी येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये माध्यमांमधून प्रसारित कराव्यात. जेणे करुन देशभरातील विद्यार्थी त्या वाचतील, टीव्हीवर पाहतील आणि त्यांनाही तणावमुक्त परीक्षा कशा द्याव्यात? हसत-खेळत परीक्षा कशा दिल्या जातात? ह्याची एक औषधीच आपल्या हाती मिळेल. प्रसार माध्यमांचे मित्र ह्यासाठी नक्की मदत करतील, असा मला विश्वास आहे. हां – पण ते तेव्हाच मदत करतील, जेव्हा तुम्ही मला सर्व अनुभव पाठवाल.
पाठवणार ना? जरुर पाठवा.
खूप खूप धन्यवाद मित्रांनो ! पुन्हा एकदा पुढच्या “मन की बात” मधे अवश्य भेटूया.
खूप धन्यवाद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार, 2015 या वर्षातला “मन की बात”चा हा शेवटचा भाग. यानंतर “मन की बात”मध्ये आपण भेटणार आहोत 2016 मध्ये. नुकताच आपण ख्रिसमसचा सण साजरा केला आणि आता नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु केली आहे. भारत विविधतेने नटला आहे. सण उत्सवांची रेलचेल असते. एक सण साजरा होतो न होतो तोच दुसरा येतो, साजरा होणारा प्रत्येक सण, पुढच्या सणाची वाट पाहायला लावणारा ठरतो. कधी कधी वाटते की भारत असा देश आहे जिथली अर्थव्यवस्था सणांवर आधारित आहे. समाजातील गरीब घटकासाठी आर्थिक घडामोडींचे निमित्त म्हणजे सण असतात.
साऱ्या देशवासियांना ख्रिसमच्या आणि 2016 या नवीन वर्षांच्या माझ्याकडून अनेक शुभेच्छा. 2016 हे नववर्ष आपणा सर्वांसाठी आनंददायी ठरावे, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी प्रेरण आपल्याला यशाच्या नव्या शिखरावर नेणारे ठरोत. सारे जग संकटमुक्त व्हावे, दहशतवाद असो, जागतिक तापमान वाढ असो, नैसर्गिक संकट असोत किंवा मानवनिर्मित, सारी मानवजात सुखाने आणि शांततेत राहावी यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ? मी तंत्रज्ञानाचा पुष्कळ वापर करतो हे आपल्याला माहित आहे त्यातून विविध विषयांची विपुल माहिती मला मिळते. ‘MyGov.’ हे पोर्टल मी नेहमी बघतो. पुण्याहून श्रीमान गणेश व्ही. सावलेशवारकर यांनी लिहिलंय की हा हंगाम पर्यटनाचा आहे, या काळात देशी आणि परदेशी पर्यटकही येतात. ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी लोक वेगवेगळया ठिकाणी जातात. पर्यटन क्षेत्रात पर्यटकांना सर्व सोयी सुविधा मिळतील याकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र सावलेशवारकर म्हणतात की जिथे जिथे पर्यटनस्थळे आहेत, धर्मशाळा आहेत, धार्मिक ठिकाणे आहेत तिथे स्वच्छतेच्या बाबतीत विशेष लक्ष दयायला हवे. अधिक लक्ष द्यायला हवे. आमची पर्यटन स्थळे जितकी स्वच्छ आणि नीटनेटकी असतील तितकी आमच्या देशाची प्रतिमा जगभर उजळेल. गणेशजींच्या विचारांचे मी स्वागत करतो. गणेशजींचे विचार मी देशवासियांपर्यंत पोहच आणि नीटनेटकी असतील तितकी आमच्या देशाची प्रतिमा जगभर उजळेल. गणेशजींच्या विचारांचे मी स्वागत करतो. गणेशजींचे विचार मी देशवासियापर्यंत पोहचवत आहे. आणि तसेही “अतिथी देवो भव” असे आपण म्हणतोच की आपल्या घरी पाहुणे येणार असतात त्यावेळी आपण घराची साफसफाई करतो, घर सजवतो. म्हणून आमची पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे या ठिकाणी स्वच्छता राखण्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला हवे. देशभरातून स्वच्छता राखण्याबद्दल आपण विशेष लक्ष द्यायला हवे. देशभरातून स्वच्छता मोहिमेबद्दल नेहमी बातम्या येतात याचा मला आनंद वाटतो. या बातम्या देणाऱ्या माध्यमांमधल्या मित्रांचे मी विशेष आभार मानतो. कारण अशा छोटया छोटया गोष्टी शोधून ते लोकांसमोर हे मध्यकर्मी आणतात.
एका वर्तमानपत्रात मी नुकतीच एक बातमी वाचली, ती तुमच्यापर्यंत पोहोचावी असे मला वाटते. मध्य प्रदेशातल्या सिहोर जिल्हयात भोजपुरा गावात दिलीपसिंह मालविया हे एक वयाने ज्येष्ठ कारागीर राहतात. तसे पाहिले तर गंवडीकाम करणारे, मजुरी करणारे एक साधे कारागीर आहेत ते. त्यांनी असे एक आगळे वेगळे काम केले की त्याची बातमी वर्तमानपत्रातून छापून आली. माझ्या वाचण्यात ती आली आणि तुमच्यापर्यंत पोहचावी असे मला वाटले. छोटयाश्या गावात राहणाऱ्या दिलीप सिंह मालविया यांनी ठरवले की गावात शौचालय बांधण्यासाठी लागणारे सामान जर कुणी उपलब्ध करुन दिले तर बांधकामाची मजुरी ते घेणार नाहीत, शौचालयाचे बांधकाम ते विनामूल्य करुन देतील. शौचालयाचे बांधकाम हे एक पवित्र काम आहे असे मानून भोजपुरा गावात दिलीपसिंह यांनी शंभर शौचालये बांधून दिली. दिलीपसिंह मालवीया यांचे मी अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. नैराश्य आणणाऱ्या बातम्या कधी कधी कानावर येतात परंतु आपल्या देशात आजही असे अनेक दिलीप सिंह आहेत जे आपआपल्या परीने काही ना काही चांगले काम करत आहेत. हीच तर आपल्या देशाची शक्ती आहे, हीच तर आपल्या देशाची आशा आहे, याच तर गोष्टींमुळे आपला देश पुढे जातो आणि म्हणूनच “मन की बात”मधून दिलीप सिंह यांच्याबद्दल अभिमानाने सांगणे, त्यांचा गौरव करणे हे मला साहजिकच वाटते. अनेक जणांच्या अविश्रांत परिश्रमांमुळेच हा देश वेगाने प्रगती करतो आहे. पावलाला पाऊल जोडून सव्वाशे कोटी देशवासिय एक एक पाऊल स्वत: तर पुढे जात आहेतच, आणि देशालाही पुढे नेत आहेत. उत्तम शिक्षण, उत्तम कौशल्य आणि रोजगाराच्या नवनव्या संधी. नागरिकांना विमा संरक्षण देण्यापासून बँकिंग सुविधा पुरवणे, जागतिक पातळीवर व्यवसाय सुलभीकरणासाठी सुधारणा, व्यापार आणि नवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा देणे, सर्वसामान्य कुटुंबातील लोक जे बँकेच्या दारापर्यंतही पोहचु शकत नव्हते, त्यांच्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून सुलभ रितीने कर्ज उपलब्ध करुन देणे.
प्रत्येक भारतीयाला जेव्हा हे कळते की सारे जण “योग” या गोष्टीकडे आकर्षित झाले आहे, आणि साऱ्या जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला आणि सारे जग जोडले गेले तेव्हा आमच्या मनात विश्वास निर्माण होतो की हाच आमचा “हिंदुस्थान”. जेव्हा आपल्याला विराट रुपाचे दर्शन होते तेव्हाच तर हा विश्वास, हा भाव आपल्या मनात निर्माण होतो. यशोदा माता आणि कृष्णाची ती कथा कोण बरे विसरेल जेव्हा बालकृष्णाने तोंड उघडले आणि यशोदामातेला त्यात साऱ्या ब्रम्हांडाचे दर्शन घडवले तेव्हा यशोदेला कृष्णाच्या सामर्थ्यांचा प्रत्यय आला. योगदिनाच्या निमित्ताने हाच प्रत्यय भारताला आला आहे. स्वच्छतेचा विषय आता घरोघरी एक प्रकारे चर्चिला जातोय. त्यांच्यातला नागरिकांचा सहभाग वाढतोय. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षांनी जेव्हा एखाद्या गावात विजेचे खांब उभे राहतात. काळोख संपतो तेव्हा त्या गावकऱ्यांना होणारा आनंद, त्यांना वाटणारा उत्साह कसा अमर्याद असतो याची आपल्यासारख्या शहरी भागात राहणाऱ्यांना विजेचा वापर करणाऱ्यांना कल्पानाही येणार नाही.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांचे ऊर्जा विभाग हे काम यापूर्वीही करत होते. पण गावागावात एक हजार दिवसात वीज पोहचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आज या गावात वीज पोहचली, आज त्या गावात पोहचली अशा बातम्या येतात तेव्हा त्यात असतो आनंद आणि उत्साह.
या घटनेची प्रसार माध्यमांमध्ये म्हणावी तशी चर्चा होताना अजून दिसत नाही. पण मला खात्री आहे, वीज पोहचलेल्या या गावांपर्यंत प्रसार माध्यमे पोहचतील आणि तिथल्या उत्साहाने भरलेले वातावरण, वीज आल्यामुळे त्या गावकऱ्यांना झालेला आनंद या गोष्टी ही प्रसार माध्यमे साऱ्या देशातील जनतेपर्यंत पोहचवतील. याचा सगळयात मोठा फायदा म्हणजे जे सरकारी कर्मचारी गावागावात वीज पोहचवण्याचे हे काम करताहेत त्यांना समाधान मिळेल, एखाद्या गावाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकण्याचे काम त्यांनी केलेय यांची दखल प्रसार माध्यमे घेत आहेत याचा त्यांना आनंद मिळेल शेतकरी असो, गरीब असो, महिला असोत, व तरुण या सगळयांपर्यंत या गोष्टी पोहचवायला हव्यात हे नक्की ? कोणत्या सरकारने कोणते काम केले आणि कोणत्या सरकाने कोणते काम नाही केले यासाठी हे पोहचायला नको तर त्या गोष्टी मिळणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांनी गमावू नये यासाठी पोहचायला हवे. योग्य गोष्टी, चांगल्या गोष्टी, सामान्य माणसाच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहचत आहेत आणि पोहचतील यासाठी आपण सगळयांनी प्रयत्न करायला हवेत. असे करणे म्हणजे एक प्रकारे सेवाच आहे. माझ्या परीने हा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. मी एकटा हे सारे करु शकत नाही, पण जेव्हा मी सांगतो तेव्हा मला काहीतरी केलेच पाहिजे ना.
आपल्या मोबाईल फोनवर नरेंद्र मोदी ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपच्या माध्यमातून सामान्य नागरिक माझ्यापर्यंत पोहचू शकतो. अनेक छोटया छोटया गोष्टी मी ॲपद्वारे आपल्यापर्यंत पोहचवत असतो, लोकसुध्दा अनेक गोष्टी त्याच ॲपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचवत असतात याचा मला आनंद होतो. तुम्ही सुध्दा या प्रयत्नात सहभागी व्हा. सव्वाशे कोटी देशवासियांपर्यंत आपल्याला पोहचायचे आहे. तुमच्या मदतीशिवाय मी कसा पोहोचणार ? सामान्य माणसाच्या भाषेत आपण त्यांच्यापर्यंत पोहचवूया आणि त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना मिळतील यासाठी त्यांना प्रेरित करु.
माझ्या तरुण मित्रांनो, 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मी स्टार्ट अप इंडिया स्टॅण्ड अप इंडिया या संकल्पनेबद्दल प्राथमिक चर्चा केली होती. त्यानंतर सरकारच्या प्रत्येक खात्यात, प्रत्येक विभागात ते काम सुरु झाले. “स्टार्ट अप या बाबतीत भारत जागतिक राजधानी होऊ शकतो का ? नवनव्या प्रकारे, नव्या संशोधनासह स्टार्ट अप म्हणजे आमच्या राज्यांमधल्या युवकांसाठी एक उत्तम संधी ठरेल. उत्पादन क्षेत्र असो, सेवा क्षेत्र असो, शेती क्षेत्र असो. प्रत्येक बाबतीत नवीन विचार, नवीन प्रयोग, नवीन प्रयत्न नवीन शोध यांची गरज आहे, त्याशिवाय जग पुढे जाणार नाही. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया योजना आमच्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. माझ्या युवा मित्रांनो, 16 जानेवारी या दिवशी स्टार्ट अप इंडिया स्टॅण्ड अप इंडया या योजनेचा पूर्ण कृती आराखडा भारत सरकार सादर करणार आहे. कसे होणार, काय होणार ? या सगळयाचे एक प्रारुप आपल्यासमोर मांडले जाईल. आणि या कार्यक्रमात देशभरातील आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ, एनआयटी, जिथे जिथे तरुण पिढी आहे त्या सर्वांना थेट संपर्क, लाइव्ह कनेक्टीव्हीटीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जाईल.
स्टार्ट अपच्या बाबतीत आमच्याकडे एक धारणा तयार झाली आहे. जसे की डिजीटल क्षेत्र किंवा आयटी क्षेत्र, यांच्यासाठीच स्टार्टअप आहे.
पण असे अजिबात नाही. भारताच्या गरजेप्रमाणे आपल्याला त्यात बदल करायचे आहेत. एखादी गरीब व्यक्ती मोलमजुरी करते, अंगमेहनत करते, या व्यक्तीचे श्रम हलके व्हावेत, कष्ट कमी व्हावेत असा एखादा शोध आमच्या तरुण मित्राने लावावा अशी अपेक्षा आहे. यालाही मी स्टार्ट अपच मानतो असे काम करणाऱ्या तरुणाला मदत करावी असे मी बँकेला सुचवेन. धैर्याने पुढे जा, बाजारपेठ मिळेल असे मी या तरुणाला सुचवेन. केवळ शहरी भागातच आमच्या युवा पिढीची बुध्दीमत्ता एकवटली आहे हा गैरसमज आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक भागातल्या तरुणाकडे प्रतिभा आहे. त्यांना गरज आहे ती संधी मिळण्याची. स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया ही योजना केवळ काही शहरांपुरती मर्यादित राहता कामा नये, हिंदुस्थानच्या कोना-कोपऱ्यापर्यंत पोहोचायला हवी. राज्य सरकारांनीही या बाबतीत पुढाकार घ्यावा असा मी त्यांना आग्रह करतो. या विषयावर 16 जानेवारीला मी आपल्याशी अधिक सविस्तर बोलेन. तुमच्या सूचनांचे मी नेहमीच स्वागत करेन.
प्रिय युवा मित्रांनो, 12 जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. माझ्याप्रमाणेच या देशातल्या कोटयावधी लोकांनी स्वामी विवेकानंदापासून प्रेरणा घेतली आहे. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा उत्सवाच्या स्वरुपात 12 जानेवारी 1995 पासून साजरी केली जाते. यावर्षी हा कार्यक्रम छत्तीसगडमध्ये रायपूर येथे होणार आहे. विशिष्ट संकल्पनेवर आधारित हा युवा महोत्सव. मला असे कळतेय की यंदाची संकल्पना आहे “इंडियन यूथ ऑफ डेव्हलपमेन्ट, स्किल अँड हार्मोनी. सर्व राज्यांमधून हिंदुस्थानातील प्रत्येक भागातून दहा हजारांहून अधिक युवक तिथे जमणार आहेत अशी मला माहिती मिळाली आहे. जणू काही एक लघुभारत तिथे अवतरणार आहे. युवा भारताचे दृश्य अवतरणार आहे. जणू काही स्वप्नांचा, आशा,आकांक्षांचा महापूर लोटणार आहे. संकल्पाची प्रचिती येणार आहे. या राष्ट्रीय युवा महोत्सवाबद्दल तुमच्या सूचना, तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहचवाल का ? विशेषत: माझ्या तरुण मित्रांना मी सुचवेन की “नरेंद्र मोदी ॲप”च्या माध्यमातून तुमचे विचार थेट माझ्यापर्यंत पोहचवा. तुमच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे. ते विचार या युवा महोत्सवात प्रकट व्हावेत, प्रतिबिंबित व्हावेत असे मला वाटते. त्यासाठी आवश्क त्या सूचना आवश्यक सल्ला मी सरकारी विभागांना देईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाविषयी नरेंद्र मोदी ॲप वरुन तुमची मते जाणून घ्यायला, तुमचे विचार जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.
गुजरातच्या अहमदाबादचे दिलीप चौहान, दृष्टीहीन शिक्षक आहेत ते. त्यांच्या शाळेत एक्सेसेबल इंडिया डे, सुलभसंचार भारत दिवस साजरा केला. दूरध्वनीवरुन त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
दिलीपजी तुमवे मी मन:पूर्वक आभार मानतो तुम्ही स्वत: या क्षेत्रात काम करत आहात, यात येणाऱ्या अडचणींचा तुम्ही सामना केला आहे. समाजात काम करणाऱ्या अशा व्यक्तींना भेटण्याचा योग जेव्हा येतो, तेव्हा मनात अनेक विचार येतात. आपल्या विचारसरणीप्रमाणे आपला त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काही जणांना अवयव गमवावे लागतात, काही जणांमध्ये जन्मत:च काही त्रुटी असते आणि अशा व्यक्तींकरता आजवर पूर्ण जगभरात अनेकविध शब्दप्रयोग, संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. या संज्ञांविषयी, शब्द प्रयोगांविषयी विचार विनिमय होत असतो. प्रत्येकवेळी असे मत मांडले गेले की अशा व्यक्तींकरता या शब्दाचा वापर, उल्लेख योग्य नाही, सन्मान व्यक्त करणारा नाही. आपण हे पाहिले असेल की अनेक शब्द प्रचलित झाले आहेत. कधी अपंग , कधी विकलांग, तर कधी “भिन्न रुपाने सक्षम”असे शब्द येत राहिले. आता हे खरं आहे की प्रत्येक शब्दाचे आपले असे वेगळे महत्त्व आहे. भारत सरकारने यावर्षी सुगम्य भारत अभियान सुरु केले त्या कार्यक्रमाला मी जाणार होतो पण तामिळनाडूत काही जिल्हयांमध्ये विशेषत: चेन्नईत आलेल्या महापुरामुळे मी तिकडे गेलो त्यामुळे सुगम्य भारत अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही. पण त्या कार्यक्रमाला जायचे म्हणून माझ्या मनात विचार येत होते. त्यावेळी मला असे वाटले की परमात्म्यानेने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात काही उणीव ठेवली आहे, त्रुटी आहे, त्या व्यक्तीचा एखादा अवयव सक्षम नाही अशा व्यक्तींना आपण विकलांग म्हणतो, अपंग म्हणतो पण त्यांच्या जवळ गेल्यावर लक्षात येते की आपल्याला केवळ त्या व्यक्तीमधल्या उणीवा दिसल्या. मात्र परमेश्वराने त्या व्यक्तीला विशेष शक्ती बहाल केली आहे. परमात्म्याने प्रदान केलेली ही देणगी आपण बघू शकत नाही. पण जेव्हा या व्यक्ती काम करतात, स्वत:ला सिध्द करतात तेव्हा आपले लक्ष जाते आणि मनात प्रश्न येतो अरे वा, हा कसे करत असेल हे ? आणि मग माझ्या, मनात विचार आला की तो विकलांग आहे हे दिसते पण त्याच्या जवळ असणारी असाधारण क्षमता अनुभवाने कळते. म्हणून मला असे वाटले की आपल्या देशात विकलांग या शब्दाऐवजी “दिव्यांग” या संज्ञेचा वापर करावा. या अशा व्यक्ती आहेत ज्यांच्यापाशी मात्र किंवा त्याहून अधिक असे भाग आहेत ज्यात दिव्यता आहे, दिव्यशक्तीचा संचार आहे जो आपल्या सारख्या धडधाकट लोकांपाशी नाही. मला हा शब्द फार आवडला. माझ्या देशातले नागरिक आता “विकलांग” ऐवजी “दिव्यांग” हा शब्द प्रचलित करतील काय ? मला आशा आहे की, हा विचार आपण पुढे न्याल.
सुगम्य भारत अभियानाची आम्ही त्या दिवशी सुरुवात केली आहे. आवश्यक त्या पायाभूत सुधारणा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही, अंमलात आणून या दिव्यांग लोकांसाठी सुगम्य परिसर प्रत्यक्षात घडवूया. शाळा, रुग्णालय, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्थानकात रॅम्प असावेत, सुलभ पार्किंग, सुलभ उद्वाहन, ब्रेललिपी, कितीतरी गोष्टी आहेत. या साऱ्या गोष्टी सुगम्य बनवण्यासाठी नवीन संशोधन हवे, तंत्रज्ञाने हवे, संवेदनशीलता हवी, व्यवस्था हवी. हे करायचे असा आम्ही निर्धार केला आहे. लोकांचा सहभाग वाढतो आहे. त्यांना हे आवडले आहे. आपणही आपल्या पध्दतीने यात सहभागी व्हा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, सरकारी योजना सतत येत असतात, चालत राहतात पण या योजना केवळ कृत्रिम नकोत, त्यात चेतना हवी. शेवटच्या घटकापर्यंत ती चांगल्या रुपात पोहचायला हवी. फाईलींमध्ये त्यांचा श्वास गुदमरता कामा नये. कारण या योजना आखल्या जातात सामान्य माणसाकरता, गरीब माणसा करता खऱ्या आणि गरजू व्यक्तीपर्यंत योजनेचे लाभ पोहोचवण्यासाठी काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक प्रयत्न केला. आपल्या देशात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला अनुदान दिले जाते. ही रक्कम कोटी रुपयांची असते, पण लाभार्थ्यांपर्यंत योग्य वेळेत ती पोहोचली नाही याची खातरजमा करणारी यंत्रणा आपल्याकडे नव्हती. सरकारने त्यात थोडा बदल केला. जनधन बँक खाते, आधार कार्ड यांच्या सहाय्याने जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्कीम थेट लाभ हस्तांतरण योजना राबवली गेली आणि अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली. जगातील सर्वात मोठी आणि यशस्वी ठरलेली थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणून या उपक्रमाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे हे आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो. “पहल” या नावाने ही योजना ओळखली जाते. नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत जवळ जवळ पंधरा कोटी एलपीजीधारक “पहल” योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. 15 कोटी लोकांच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा होऊ लागले आहे. दलाल नाही, कोणाच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही, भ्रष्टाचाराची शक्यता नाही. एकीकडे आधार कार्ड, दुसरीकडे जनधन खाते उघडणे आणि तिसऱ्या बाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांना आधार क्रमांक आणि खाते क्रमांकाशी जोडणे हा उपक्रम सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी मनरेगा ज्याद्वारे गावात रोजगाराच्या संधी उपलबध होतात. त्याबद्दल अनेक तक्रारी येत होत्या. पण आता अनेक ठिकाणी मजुरी करणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात पैसे थेट जमा होतात विद्यार्यिांना स्कॉलरशिपमध्येही अनेक अडचणी येत होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्याही आता दूर होत आहेत. भविष्यात त्याबाबत आणखी प्रगती होईल. आतापर्यंत सुमारे 40 हजार कोटी रुपये विविध योजनांच्या माध्यमातून थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जवळपास 35 ते 40 योजना आता “डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर” अंतर्गत समाविष्ट करण्यात येत आहेत, असा माझा ढोबळ मनाने अंदाज आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, 26 जानेवारी हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे एक सोनेरी क्षण आहे. योगायोगाने यंदाचे वर्ष आपल्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. संसदेत यानिमित्ताने संविधानावर दोन दिवस विशेष चर्चा ठेवण्यात आली होती आणि ती अतिशय उत्तम प्रकारे झाली. सर्व पक्षांनी सर्व खासदारांनी घटनेचे पावित्र्य, घटनेचे महत्त्व, घटनेचा मूळ गाभा समजणे याविषयी खूप चांगली चर्चा केली हा उपक्रम आपण पुढे ही चालू ठेवायला हवा. जनतेला सत्तेसोबत आणि सत्तेला जनतेसोबत जोडण्याचे काम प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करता येईल काय ? घटनेने आपल्याला खूप अधिकार दिले आहेत त्याबद्दल नेहमी चर्चा होते आणि झाली ही पाहिजे. त्याचे महत्त्व आहे परंतु घटनेने काही कर्तव्यांवरही भर दिलेला आहे. त्याची चर्चा मात्र फार कमी होते असे दिसून येते. निवडणूकांच्या वेळेला चहुबाजूला जाहिराती होतात, भिंतींवर लिहिले जाते मोठ मोठे फलक लागतात की, “मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.” मतदानाच्या वेळी आपल्या कर्तव्याची जशी चर्चा होते तशी नेहमीच्या जीवनात का होत नाही ? बाबासाहेब आंबेडकरांचे 125 वे जयंती वर्ष साजरे करत असताना 26 जानेवारीच्या निमित्ताने शाळा, कॉलेज, गावोगावी तसेच शहरातल्या सोसायटया संस्थांमध्ये “कर्तव्य” या विषयावर निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा, तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करायला काय हरकत आहे. सव्वाशे कोटी भारतीयांनी कर्तव्य भावनेने एका पाठोपाठ एक पाऊल उचलत पुढे वाटचाल केली तर मोठा इतिहास घडू शकेल. पण कुठेतरी सुरुवात करायला हवी माझ्या मनात एक विचार आलाय आपण 26 जानेवारीच्या आत आपले कर्तव्य-डयूटी याबद्दल आपल्या मातृभाषेत किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत लिहायचे असेल, तर इंग्रजीत “कर्तव्य”या विषयावर कविता किंवा निबंध असेल, तो लिहून माझ्याकडे पाठवू शकाल का ? मला तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत. आपले लेखन ‘MyGov.’ या माझ्या पोर्टलवर पाठवा. माझ्या देशातील युवा पिढी कर्तव्यांबद्दल काय विचार करते हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे.
एक छोटा प्रस्ताव द्यावासा वाटतो. 26 जानेवारीला जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन साजरा करणार तेव्हा आपल्या शहरात महापुरुषांचे जे पुतळे उभारलेले आहेत त्यांची स्वच्छता. त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण, आपल्या नागरिकांद्वारे, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांद्वारे करता येईल का ? आणि मी हे सरकारी पातळीवरुन बोलत नाहीये. महापुरुषांचे पुतळे उभारतांना आपण मोठया श्रध्देने ते उभारतो पण नंतर त्यांची देखभाल करण्याच्या बाबतीत मात्र आपण कमालीची उदासीन असतो. समाजासाठी, देशासाठी आपण हे सहजतेने करु शकतो का येत्या 26 जानेवारीनिमित्त आपण सर्वांनी मिळून या महापुरुषांच्या प्रतिमांची स्वच्छता, तिथल्या परिसराची स्वच्छता जनता जर्नादनाद्वारे नागरिकांद्वारे करुन त्यांच्या प्रति आदर व्यक्त करु शकतो.
प्रिय देशवासियांनो, पुन्हा एकदा आपल्याला 2016 या नववर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा ! धन्यवाद ! ! !
प्रिय देशबांधवांनो,
नमस्कार,
दिवाळीच्या सुट्टया तुम्ही खूप छान पध्दतीने घालवल्या असतील कुठे बाहेर गावीही गेला असाल नव्या उत्साहात व्यापार आणि रोजगार सुरू झाले असतील. दुसरीकडे नाताळची तयारी देखील सुरू झाली असेल. समाजात उत्सवांचे स्वत:चे एक महत्त्व आहे. कधी हे उत्सव दु:खावर फुंकर घालतात तर कधी नवीन उभारी देतात. परंतु कधी कधी या उत्सवांदरम्यान जर एखादे संकट आले तर ते खूपच वेदनादायक असते. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सतत नैसर्गिक आपत्तीच्या बातम्या येत आहेत. आपण कधी ऐकले नसेल किंवा विचार केला नसेल अशा नैसर्गिक संकटांच्या बातम्या येत आहेत. हवामान बदलाचा प्रभाव किती वेगाने होत आहे याचा अनुभव आता आपण घेत आहोत. आपल्याच देशात मागील काही दिवसांमध्ये ज्याप्रकारे अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस होत आहे आणि तामिळनाडूमध्ये ज्याप्रकारे नुकसान झाले आहे आणि इतर राज्यांवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू झाला. मी या संकटाच्या घडीला त्या सर्व परिवारांच्या दु:खात सहभागी आहे. राज्य सरकारे संपूर्ण ताकदीसह मदत आणि बचाव कार्य करतात. केंद्र सरकार देखील नेहमी खांद्याला खांदा लावून काम करते. सध्या भारत सरकारचे एक दल तामिळनाडूमध्ये गेले आहे. मला विश्वास आहे की, तामिळनाडूवर कोसळलेल्या या संकटानंतरही तो पुन्हा एकदा विश्वासाने पुढे मार्गक्रमण करायला सुरुवात करेल आणि देशाच्या विकासात त्याची जी भूमिका आहे तो ती पार पडेल.
परंतु जेव्हा आपण चहुबाजूंनी संकट बघतो तेव्हा यामध्ये अनेक बदल करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. 15 वर्षांपूर्वी नैसर्गिक आपत्ती हा कृषी विभागाचा भाग होता कारण त्यावेळी नैसर्गिक आपत्ती म्हणजे दुष्काळ येथपर्यंतच मर्यादित होते. आज तर याचे रुपच बदलते आहे. प्रत्येक पातळीवर आपल्याला आपली क्षमता वृध्दींगत करणे अनिवार्य झाले आहे. त्यासाठी सरकार, समाज, नागरिक, सर्व छोट्या-मोठ्या संस्था यांना विज्ञानाच्या दृष्टीकोनातून काम करावे लागेल. नेपाळच्या भूकंपानंतर मी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना एक सुचवले की आपण सार्क देशांनी एकत्र येऊन आपत्तीचा सामना करण्याच्या तयारीसाठी एक संयुक्त अभ्यास करायला हवा. मला आनंद आहे की सार्कच्या देशांची चर्चासत्र आणि उत्तम उपाययोजनांसंदर्भातील कार्यशाळा दिल्लीत झाली. एक चांगली सुरुवात झाली आहे.
मला आज पंजाबच्या जालंधर येथून लखविंदर सिंह यांनी दूरध्वनी केला. ‘मी लखविंदर सिंह, पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातून बोलत आहे. आम्ही येथे सेंद्रिय शेती करतो आणि अनेकांना या शेतीबाबत मार्गदर्शन पण करतो. माझा एक प्रश्न आहे की जे लोक शेतात पेंढ्याला किंवा गव्हाच्या रोपांना आग लावतात त्यांना हे लक्षात येत नाही की यामुळे भूमीतील सूक्ष्म जीवाणू मरतात, याबाबत त्यांना कसे मार्गदर्शन करता येईल आणि दिल्ली, हरियाणा, पंजाबमध्ये होणाऱ्या प्रदूषणापासून कशी सुटका होईल? लखविंदर सिंह तुमचा प्रश्न ऐकून मला खूप आनंद झाला. आनंद व्हायचं पहिलं कारण म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहात आणि तुम्ही स्वत: केवळ सेंद्रिय शेतीच करत नाहीत तर शेतकऱ्यांच्या समस्या देखील तुम्ही उत्तम प्रकारे जाणता. तुमची चिंता रास्त आहे परंतु हे फक्त पंजाब, हरियाणामध्येच घडत आहे असे नाही. संपूर्ण भारतातल्या लोकांची ही सवय आहे आणि पारंपरिक पध्दतीने आपण अशाच प्रकारे पिकांचे उरलेले अवशेष जाळतो. एक तर सर्वात आधी यामुळे होणाऱ्या नुकसानाचा कोणाला अंदाज नव्हता. सगळे करतात म्हणून आम्ही करायचे ही सवय झाली होती. दुसरा काही पर्याय आहे का याबद्दल काही माहिती नव्हती आणि त्यामुळेच हे पूर्वापार पध्दतीने सुरूच राहिले आणि जे हवामान बदलाचे संकट आहे त्यामध्ये ते अंतर्भूत झाले आणि जेव्हा या संकटाचा परिणाम शहरांवर दिसू लागला तेव्हा कुठे हळूहळू यावर चर्चा होऊ लागली. परंतु तुम्ही जी वेदना व्यक्त केली आहे ती योग्यच आहे. यावर सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आपल्या शेतकरी बंधु-भगिनींना यासंदर्भात प्रशिक्षित करून त्यांना सत्यपरिस्थिती समजावून सांगायला हवी की पिकांचे उरलेले अवशेष जाळले तर वेळ, मेहनत वाचत असेल पुढील पिकांसाठी शेत तयार होत असेल. मात्र हे सत्य नाही. पिकांचे उर्वरित अवशेष देखील मौल्यवान असतात. हे अवशेष स्वत:मध्येच एक सेंद्रिय खत आहे. आपण ते नष्ट करतो मात्र जर या अवशेषांचे आपण छोटे छोटे तुकडे केले तर प्राण्यांसाठी हा सुका चारा होईल. दुसरे म्हणजे हे जाळल्यानंतर जमिनीच्या वरील स्तर जळतो.
माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो, थोड्या वेळासाठी जरा हा विचार करा की आपली हाडे मजबूत असावी, आपले हृदय मजबूत असावे, मूत्रपिंड चांगले असावे. सर्वकाही व्यवस्थित असावे पण शरीरावरील त्वचाच जर जळाली तर काय होईल? आपण जिवंत राहू का? हृदय व्यवस्थित असेल तरीही आपण जिवंत राहू शकत नाही. ज्याप्रकारे आपल्या शरीराची त्वचा जळाली तर आपण जिवंत राहणे कठीण आहे त्याचप्रकारे पिकांचे खूंट जाळल्यावर फक्त खुंटच जळत नाही तर धरणी मातेची त्वचा देखील जळते. आपल्या जमिनीच्यावरील स्तर जळतो आहे आणि आपली भूमी विनाशाच्या दिशेने जात आहे आणि म्हणूनच याकरिता सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत या खुंटांना जर पुन्हा जमिनीत गाडलं तर त्याचे खत बनेल किंवा एखादा खड्डा करून त्यामध्ये गांडूळं सोडून थोडे पाणी टाकले तर त्यापासून उत्तम सेंद्रिय खत तयार होईल. प्राण्यांना चारा म्हणून उपयोगात तर येईलच, आपली जमीन वाचते इतकेच नाही तर त्या जमिनीत तयार झालेले खत त्याच जमिनीत टाकले तर दुहेरी फायदा होतो.
मला एकदा केळीची शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत संवाद साधायची संधी मिळाली होती आणि त्यांनी मला खूप चांगला अनुभव सांगितला होता. पूर्वी जेव्हा ते केळ्याची शेती करायचे आणि केळीचे पिक घेऊन झाल्यानंतर जे खूंट रहायचे ते साफ करण्यासाठी त्यांना प्रति हेक्टर कधी 5 हजार, 10 हजार, 15 हजार इतका खर्च यायचा आणि जोपर्यंत ते सर्व वाहून नेणारे लोक ट्रॅक्टर किंवा इतर वाहन घेऊन यायचे नाहीत तोपर्यंत ते सर्व असेच उभे असायचे. परंतु काही शेतकऱ्यांनी हे सिध्द केले की या खुंटाचे जर 6-6 किंवा 8-8 इंचाचे तुकडे करून जमिनीत पुरले तर ज्या ठिकाणी हे खुंट पुरले आहेत तिथे जर एखादे झाड, एखादे पिक असेल तर या खुंटांमधील पाण्यामुळे त्यांना तीन महिन्यांपर्यंत बाहेरून पाणी देण्याची गरज भासत नाही असा अनुभव आला आहे. त्या खुंटांमधील पाणीच त्या पिकासाठी पुरेसे असते आणि आज तर त्यांच्या खुंटांना देखील मोल प्राप्त झाले आहे. या खुंटांपासून देखील त्यांना आता उत्पन्न मिळू लागले आहे. पूर्वी ज्या खुंटांच्या स्वच्छतेसाठी खर्च करावा लागत होता आज ते खुंट देखील उत्पन्नाचे साधन झाले असून त्याची मागणी वाढत आहे. एक छोटासा प्रयोग देखील किती फायदेशीर ठरू शकतो. आपले शेतकरी मित्र देखील कोणत्या वैज्ञानिकापेक्षा कमी नाहीत.
प्रिय देशबांधवांनो, आगामी 3 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय विकलांग दिन’ म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जाणार आहे. मागील मन की बात कार्यक्रमात मी अवयव दानावर चर्चा केली होती. अवयव दानासाठी मी नोटोच्या हेल्पलाईन बद्दलही बोललो होतो आणि मला नंतर सांगितले गेले की मन की बातच्या त्या कार्यक्रमानंतर दूरध्वनींमध्ये अंदाजे 7 पटीने वाढ झाली आहे आणि संकेत स्थळाला भेट देणाऱ्यांमध्ये अडीच पटीने वाढ झाली आहे. 27 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय अवयव दान दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. समाजातील अनेक प्रसिध्द व्यक्ती यात सहभागी झाल्या. चित्रपट अभिनेत्री रविना टंडनसह अनेक प्रसिध्द व्यक्ती यात सहभागी झाल्या. अवयव दानामुळे अनेक मौल्यवान आयुष्य वाचू शकतात. अवयवदान हे एक प्रकारे अमरत्व प्रदान करते. एका शरीरातून एखादा अवयव जेव्हा दुसऱ्या शरीरात जातो तेव्हा त्या अवयवाला तर नवीन जीवन मिळतेच परंतु त्या व्यक्तीलाही नवीन आयुष्य मिळते. याहून श्रेष्ठदान काय असू शकते? प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांनो, अवयव दात्यांनो, अवयव प्रत्यारोपणासंदर्भातील एक राष्ट्रीय नोंदणी 27 नोव्हेंबरला सुरू करण्यात आली आहे. नोटो चे बोधचिन्ह, दाता कार्ड आणि घोषवाक्याची रुपरेखा तयार करण्यासाठी mygov.in च्या माध्यमातून एका राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला आश्चर्य वाटले. सर्वांनी नाविन्यपूर्ण मार्गाने आणि संवेदनापूर्वक गोष्टी सांगितल्या. मला विश्वास आहे की, या क्षेत्रात देखील व्यापक रुपात जागरुकता होईल आणि खऱ्या अर्थाने गरजवंताला सर्वोत्तम मदत मिळेल कारण ही मदत जोपर्यंत कोणी अवयव दान करत नाही तोपर्यंत मिळू शकत नाही.
जसे मी आधी सांगितले, 3 डिसेंबर हा दिवस ‘विकलांग दिन’ म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक रुपाने अपंग व्यक्ती देखील साहसी आणि सामर्थ्यवान असतात. जेव्हा अशा व्यक्तींची अवहेलना केली जाते तेव्हा यातना होतात. कधी कधी त्यांच्यावर दया दाखविली जाते. परंतु जर आपण त्यांच्याकडेच पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तर आपल्याला कळेल की हे लोक आपल्याला आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊ शकतात. काहीतरी करण्याची प्रेरणा देऊ शकतात. आपल्यावर एखादे छोटेसे संकट आले तर आपण रडत बसतो. तेव्हा आपल्या लक्षात येते की, माझ्यावरचे संकट तर खूप छोटे आहे. हे आपले आयुष्य कसे जगत असतील? कामे कशी करतात? आणि म्हणूनच हे सर्व आपल्यासाठी प्रेरणास्थाने आहेत. त्यांची संकल्प शक्ती, आयुष्य जगण्याची त्यांची पध्दत आणि संकटाला देखील सामर्थ्याने पलटवून लावण्याची ताकद ही दाद देण्याजोगीच आहे.
जावेद अहमद, मी आज त्यांची गोष्ट सांगू इच्छितो, 40-42 वर्षांचे आहे ते. 1996 मध्ये जावेद अहमद यांना दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये गोळी घातली होती. ते दहशतवाद्यांची शिकार झाले होते पण वाचले. मात्र दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळे त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले. जठर आणि आतड्याचा एक हिस्साही गमावला. मणक्याला गंभीर स्वरुपाची इजाही झाली. आपल्या पायांवर उभे राहण्याची शक्ती त्यांनी कायमची गमावली. मात्र जावेद अहमद यांनी हार मानली नाही. दहशतवादाची जखम त्यांना चितपट करू शकली नाही. पण सर्वात मोठी गोष्ट ही आहे की एका निर्दोष व्यक्तीला विनाकारण मोठं संकट झेलावं लागलं. तारुण्य धोक्याच्या सावटाखाली गेलं. मात्र कोणताही आक्रोश नाही, ना कोणतीही तक्रार नाही. जावेद अहमद यांनी या संकटालाही संवेदनशीलतेत बदलले. त्यांनी आपले जीवन समाजसेवेला समर्पित केले. शरीर साथ देत नसले तरी गेली 20 वर्ष त्यांनी स्वत:ला मुलांच्या शिक्षणासाठी वाहून घेतले आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींसाठी पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा कशा करता येतील? सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयात विकलांगांसाठी सुविधा कशा विकसित करता येतील? या बाबींवर ते काम करत आहेत. त्यांनी याच दिशेने आपला अभ्यास सुरू केला आहे. त्यांनी समाज सेवेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे आणि एका समाजसेवकाच्या रुपात एक जागरुक नागरिक म्हणून विकलांगांचे देवदूत बनून ते आज नि:शब्द क्रांती करत आहेत. जावेद यांचे जीवन देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रेरणादायी ठरण्यासाठी पुरेसे नाही का? मी जावेद अहमद यांच्या जीवन कार्याचं, त्यांच्या तपस्येचं आणि त्यांच्या समर्पणाचं 3 डिसेंबर रोजी विशेष स्मरण करतो. वेळ कमी असल्यानं मी केवळ जावेद यांचाच उल्लेख करत असलो तरी देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असे अनेक प्रेरणा दीप तेवत आहेत. जीवन जगण्याचा नव प्रकाश देत आहेत, नवीन मार्ग दाखवत आहेत. 3 डिसेंबर ही अशा प्रत्येकाचे स्मरण करण्याची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची संधी आहे.
आमचा देश इतका विशाल आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत आपण सरकारवर अवलंबून असतो. मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब, दलित, पिडीत, शोषित वंचित व्यक्ती असो त्यांचा सरकार आणि सरकारी व्यवस्थेसोबत सातत्याने संबंध येत असतो आणि एक नागरिक या नात्यानं कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या तरी सरकारी कर्मचाऱ्यांचा वाईट अनुभव आलेला असतो आणि तो एखादाच वाईट अनुभव संपूर्ण जीवनभर सरकारी व्यवस्थेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनच बदलून टाकतो. यात तथ्य देखील आहे पण याच सरकारमधील लाखो लोक सेवा आणि समर्पित वृत्तीने असे उत्तम काम करतात जे कधी आपल्या नजरेसही पडत नाही. कधी आम्हाला हे माहितही नसते का कुठली सरकारी व्यवस्था, कुठला सरकारी नोकर इतक्या सहजतेने असे काम करत असतो.
आपल्या संपूर्ण देशात `आशा’ कार्यकर्त्यांचे जाळे आहे आम्हा भारतीयांच्यात कधी आशा कार्यकर्त्यांबाबतची चर्चा ना मी ऐकली आहे ना तुम्ही. गेल्यावर्षी बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स या दोघांना आम्ही संयुक्त पद्मविभूषण प्रदान केले होते. ते भारतात खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करतात. त्यांनी आपला निवृत्तीनंतरचा वेळ आणि आयुष्याभर जे काही कमावले आहे ते गरिबांसाठी कार्य करण्यात खर्च करत आहेत. ते जेव्हा जेव्हा भारतात येतात तेव्हा त्यांना ज्या आशा कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांची एवढी प्रशंसा करतात आणि सांगतात की या आशा कार्यकर्त्या किती समर्पित आहेत आणि कष्ट करतात.
नवनवीन शिकण्यासाठी त्यांच्यात किती उत्साह असतो, या सर्व गोष्टी ते सांगतात. काही दिवसांपूर्वी ओदिशा सरकारने एका आशा कार्यकर्तीचा स्वातंत्र्य दिनी विशेष सन्मान केला. ओदिशामधल्या बालासोर जिल्ह्यातील तेदागांव या छोट्याशा गावातील एक आशा कार्यकर्ती आणि तिथली सर्व लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. अनुसूचित जाती-जमातीतील लोक आहेत तिथे, गरीबी आहे आणि मलेरिया प्रभावित क्षेत्र आहे. आणि या गावातील एक आशा कार्यकर्ती ‘जमुना मणिसिंह’ यांनी निश्चय केला, की मी आता तेदागाव मधल्या कोणाचाही मलेरियामुळे मृत्यू होऊ देणार नाही. त्यांचे प्रत्येक घराघरात जाणे, थोडासा ताप आल्याचे कळले तरी तिथे पोहोचणे. त्यांना जे प्रथमोपचार शिकवले गेलेत त्यांच्या आधारावर उपचार करायला सुरुवात करणे, प्रत्येक घरात किटकनाशके, मच्छरदाणीच्या उपयोगावर भर देणे, जसे काही आपले मूल नीट झोपतेय ना आणि जेवढी काळजी घ्यायला पाहिजे, तशीच आशा कार्यकर्ती जमुना मणिसिंह, पूर्ण गांव डासांपासून सुरक्षित रहावे म्हणून समर्पित भावनेने काम करत राहिली आहे आणि तिने मलेरियाशी झुंज दिली आणि संपूर्ण गावाला झुंज द्यायला तयार केले. अशा आणखी कितीतरी ‘जमुना मणी’ असतील. लाखो लोक असतील, जे आमच्या आजूबाजूला असतील. आपण त्यांच्याकडे थोड्या आदर भावनेने पाहुया. असे लोक आपल्या देशाची किती मोठी ताकद बनतात. समाजाच्या सुख-दु:खाचे कसे मोठे भागीदार बनतात. मी अशा सर्व आशा कार्यकर्त्यांचे ‘जमुना मणी’च्या माध्यमातून गौरवगान करतो.
माझ्या प्रिय नवयुवक मित्रांनो, मी खास करून तरुण पिढीसाठी जे इंटरनेट आणि सोशल मिडियावर सक्रीय आहेत. मायजीओव्हीवर मी 3 ई-बुक ठेवली आहेत. एक ई-बुक ‘स्वच्छ भारत’च्या प्रेरक घटनांबद्दल आहे, एक खासदारांच्या ‘आदर्श गाव’ संबंधी आणि एक आरोग्य क्षेत्रासंबंधी आहे, मी आपल्याला आग्रह करतो, की आपण ते पहा. केवळ एवढेच नाही, ते इतरांनाही दाखवा, ते वाचा आणि असे होऊ शकते की, यात कोणतीतरी गोष्ट जोडण्याचे आपल्या मनात येईल. मग आपण जरुर ती mygov.inला पाठवा. काही गोष्टी अशा असतात की, ज्या खूप लवकर आपल्या ध्यानात येत नाहीत, पण समाजाची ती खरी-खुरी ताकद असते. सकारात्मक शक्ती ही सर्वात मोठी ऊर्जा असते. तुम्ही पण चांगल्या घटना इतरांना सांगा. या ई-बुक्सबद्दलही इतरांना सांगा. ई-बुक्सवर चर्चा करा आणि जर कोणी उत्साही नवयुवक याच ‘ई-बुक्स’ना बरोबर घेऊन, आजूबाजूच्या शाळांमध्ये जाऊन आठवी, नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सांगेल की, पहा इथे असे झालेय, तिथे तसे झालेय, तर आपण खऱ्या अर्थाने एक समाज शिक्षक बनू शकता. या राष्ट्र निर्माणात आपण पण सहभागी व्हा, असे निमंत्रण मी आपल्याला देतो.
माझ्या, प्रिय देशबांधवांनो, पूर्ण जग हवामान बदलामुळे चिंतीत आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यांची जागो-जागी चर्चा पण होते आहे, काळजी पण आहे आणि प्रत्येक काम आता करण्यापूर्वी एका मानकाच्या रुपात, त्याला स्वीकृती मिळू लागली आहे. पृथ्वीचे तापमान आता आणखी वाढता कामा नये. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि काळजी पण आहे. आणि तापमानवाढीपासून वाचण्यासाठी सर्वात पहिला मार्ग आहे ऊर्जा बचतीचा. 14 डिसेंबर ‘राष्ट्रीय ऊर्जा बचत दिन’ आहे. सरकारतर्फे अनेक योजना राबवल्या जात आहेत. एलईडी बल्बची योजना सुरू आहे. मी एकदा म्हटले होते, की पौर्णिमेच्या रात्री, रस्त्यावरील दिवे बंद करून अंधार करून तास भर पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात राहिले पाहिजे. त्या चंद्राच्या प्रकाशाचा अनुभव घेतला पाहिजे. कोण्या एका मित्राने मला एक लिंक बघायला पाठवली होती आणि मला ती पाहण्याची संधी मिळाली, तेव्हा मला वाटले की आपल्यालाही ही गोष्ट सांगावी. तसे पाहिले तर याचे श्रेय ‘झी न्यूज’ ला जाते. कारण ती लिंक झी न्यूजची होती. कानपूरमध्ये नूरजहाँ नावाच्या महिलेला टीव्ही वर पाहिल्यावर असे वाटत होते की तिला खूप शिक्षण घेण्याची संधी मिळालेली नाही. पण ती असे काम करत आहे, की ज्या बद्दल कदाचित कोणी विचारही केला नसेल. ती सौर ऊर्जेचा वापर करून गरीबांचे आयुष्य उजळवून टाकत आहे. ती अंधाराशी लढाई लढत आहे आणि आपले नांव ऊजळवून टाकत आहे. तिने महिलांची एक समिती तयार केली आहे आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कंदीलांचा एक कारखाना सुरू केलाय आणि ती महिन्याला 100 रुपये भाड्याने कंदील देते. लोक संध्याकाळी कंदिल घेऊन जातात आणि सकाळी येऊन चार्जिंग करण्यासाठी देऊन जातात आणि हे खूप मोठ्या प्रमाणावर होते, मी ऐकलंय की, 500 घरातले लोक कंदिल घेऊन जाण्यासाठी येतात. रोजचा साधारण 3 ते 4 रुपये खर्च होतो, पण संपूर्ण घर ऊजळून निघते आणि नूरजहाँ त्या कारखान्यात सौर-ऊर्जेतून हे कंदिल रिचार्ज करण्याचे काम दिवसभर करत राहते. आता पहा, की हवामान बदलाबाबत जगातील थोरथोर लोक काय करत असतील पण एक नूरजहाँ कदाचित कोणाला प्रेरणादायी ठरेल, असे काम करत आहे आणि तसेही नूरजहाँचा अर्थ आहे जगाला ऊजळवून टाकणे. या कामातून सगळीकडे उजेड फैलावतोय. मी नूरजहाँचे अभिनंदन करतो आणि झी टीव्हीचंही अभिनंदन करतो, कारण त्यांनी कानपूरच्या एका छोट्या कोपऱ्यात चाललेले हे काम देश आणि जगासमोर आणले. खूप-खूप अभिनंदन.
मला उत्तर प्रदेशातल्या अभिषेक कुमार पांडे यांनी दूरध्वनी केला. नमस्कार, मी अभिषेक कुमार पांडे बोलतोय गोरखपूर वरून, मी इथे उद्योजक म्हणून काम करतो आहे, मी पंतप्रधानांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी एक कार्यक्रम सुरू केलाय. ‘मुद्रा बँक.’ आम्हाला पंतप्रधानांकडून जाणून घ्यायला आवडेल की, जे कोणी ही मुद्रा बँक चालवत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या उद्योजकांना कशा प्रकारचे सहाय्य केले जात आहे? अभिषेकजी धन्यवाद. आपण गोरखपूरवरून माझ्याशी जो संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. प्रधानमंत्री मुद्रा योजना-ज्यांना निधी मिळत नाही, त्यांना निधी उपलब्ध होऊ द्या आणि याचा उद्देश आहे जो मी सरळभाषेत समजावून सांगितला तर तो 3 ‘ई’ आहे. उद्योग, कमाई, समक्षमीकरण. मुद्रा, उद्योगांना प्रोत्साहन देत आहे, मुद्रा रोजगाराच्या संधी निर्माण करत आहे आणि मुद्रा खऱ्याखुऱ्या अर्थाने सक्षम करत आहे. छोट्या छोट्या उद्योजकांना मदत करण्यासाठी ही मुद्रा योजना चालविली जात आहे. खरंतर मला ज्या गतीने जायचे आहे, ती गती येणे अद्याप बाकी आहे. पण सुरुवात तर चांगली झाली आहे. इतक्या थोड्या कालावधीत जवळजवळ 66 लाख लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 42 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. वृत्तपत्र विक्रेता असो वा दूध विक्रेता वा इतर. छोटे छोटे उद्योग करणारे लोक आणि मला तर या गोष्टीचा आनंद झाला आहे की 66 लाखांपैकी 24 लाख महिला आहेत आणि मदत मिळालेल्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय लोक आहेत, जे स्वत: आपल्या पायांवर उभे राहून कष्ट करून सन्मानाने आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अभिषेकने तर स्वत:च आपल्या उत्साहाची गोष्ट सांगितली आहे. माझ्याकडे पण अनेक बातम्या येत असतात. मला आत्ताच कुणीतरी सांगितले की मुंबईत कोणी शैलेश भोसले म्हणून आहे. मुद्रा योजनेअंतर्गत त्यांना बँकेकडून साडेआठ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्यांनी सफाई कामगारांसाठी कपडे आणि स्वच्छता उद्योग सुरू केला. मी माझ्या स्वच्छता मोहिमेच्यावेळी सांगितले होते की स्वच्छता मोहीम अशी आहे की ज्यातून नवे उद्योजक निर्माण होतील आणि शैलेश भोसलेने ते करून दाखवले. त्यांनी एक टँकर आणलाय, आणि ते हे काम करत आहेत. आणि मला सांगण्यात आलंय की एवढ्या थोड्या काळात त्यांनी बँकेला दोन लाख रुपये परतही केले आहेत. शेवटी मुद्रा योजनेअंतर्गत आमचे हेच तर उद्दिष्ट आहे. मला भोपाळमधल्या ममता शर्मा बद्दलही कुणीतरी सांगितलं की तिला या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत बँकेकडून 40 हजार रुपये मिळाले. ती बटवे तयार करण्याचे काम करत आहे. बटवे तयार करते, पण यापूर्वी ती जास्त व्याजाने पैसे घेत असे आणि मोठ्या मुश्कीलीने तिचा व्यवसाय चालवत असे. आता एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रुपये हातात आल्याने ती आपले काम अधिक चांगल्या प्रकारे करत आहे. आणि पहिल्यांदा अतिरिक्त व्याजामुळे तिचा जो अधिक खर्च व्हायचा, त्याऐवजी हे पैसे तिच्या हातात आल्याने तिची दर महिन्याला जवळजवळ एक हजार रुपयांहून अधिक बचत होऊ लागली आहे आणि तिच्या कुटुंबालाही एक चांगला व्यवसाय मिळाला आहे. पण या योजनेचा आणखी प्रसार व्हायला हवा, असे मला वाटते. आपल्या सर्व बँका अधिक संवेदनशील व्हाव्यात आणि त्यांनी गरीबांना जास्तीत जास्त मदत करावी. खरोखरच देशाची अर्थव्यवस्था हेच लोक चालवतात. छोटे-छोटे उद्योग करणारे लोकच देशाच्या अर्थव्यवस्थेची आर्थिक शक्ती असतात. आम्हाला त्यालाच आणखी बळ द्यायचे आहे. चांगलं झालंय, पण आणखी चांगले करायचे आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, 31 ऑक्टोबर या सरदार पटेल यांच्या जयंती दिनी मी ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची चर्चा केली होती. या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे सामाजिक जीवनात निरंतर जागरुकता कायम राहिली पाहिजे. ‘राष्ट्रयाम जाग्रयाम व्यम-अंतर्गत दक्षता हा स्वातंत्र्याचा पुरस्कार आहे. देशाच्या एकात्मतेची, ही संस्कारसरिता कायम वाहती राहिली पाहिजे.’ एक भारत-श्रेष्ठ भारत’ याला मी एका योजनेचे स्वरुप देऊ इच्छितो. Mygov.in वर मी याबाबत सूचना मागवल्या होत्या. कार्यक्रमाचा आराखडा कसा असावा? बोधचिन्ह काय असावं? लोक सहभाग कसा वाढावा? अशा सूचना पाठवण्याबद्दल मी सांगितले होते. मला सांगण्यात आले, की खूप सूचना आल्या. पण मला अधिक सूचना अपेक्षित आहेत. मी खूप विशिष्ट योजनेची अपेक्षा करतो. आणि मला सांगण्यात आलंय की यात सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. अनेक मोठी-मोठी बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहेत. आपण पण आपल्या कल्पना वापरा. एकता आणि अखंडतेच्या या मंत्राला ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ मंत्राला आपण प्रत्येक भारतीयाला जोडणारा मंत्र कसा बनवू शकतो. कशी योजना असावी, कसा कार्यक्रम असावा जो सर्वोत्तम असावा, चैतन्यदायी असावा आणि प्रत्येकाला जोडून घेईल, एवढा सोपा असावा, सरकार काय करणार? समाज काय करणार? अशा खूप गोष्टी होऊ शकतात. मला विश्वास आहे की, आपल्या सूचना नक्कीच उपयोगी पडतील.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, थंडीचा ऋतू सुरू होत आहे, आणि या ऋतूत खाणे खाण्याची मजा तर येतेच येते. कपडे घालण्याचीही मजा असते. पण आपण व्यायाम करावा, असा माझा आग्रह राहील. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी या उत्तम ऋतूच्या काही वेळेचा उपयोग व्यायाम-योग यासाठी जरुर करा. आणि कुटूंबातही असे वातावरण तयार करा, हा कुटूंबाचा एक असा उत्सव असला पाहिजे, की एक तास सर्वांनी मिळून व्यायाम करायचा आहे. कसे चैतन्य येते ते तुम्हीच पहाल आणि पूर्ण दिवसभर शरीर तुमची कशी साथ देते तेही अनुभवाल. तर मग छान ऋतू आहे, तर छान सवयीही अंगी बाणवूया. माझ्या देशवासियांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
जयहिंद..!
माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा “मन की बात”द्वारे तुम्हाला परत भेटत आहे. भारत विरुध्द-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील पाचवा एक दिवसीय क्रिकेटचा सामना खेळला जात आहे. या क्रिकेट मालिकेचे नाव “गांधी-मंडेला” सिरिज असे आहे. ही संपूर्ण क्रिकेट मालिका रोमांचक स्थितीत आहे. दोन्ही संघाने प्रत्येकी दोन-दोन सामने जिंकेले आहेत, आणि म्हणून हया शेवटच्या सामन्याचे महत्व निश्चित वाढले आहे. माझ्या सर्व खेळाडूंना खूप-खूप शुभेच्छा.
आज मी कन्नूर आकाशवाणीच्या मित्राना शुभेच्छा देऊ इच्छितो. शुभेच्छा यासाठी देऊ इच्छितो की, मी जेव्हा मन की बातला सुरुवात केली तेव्हा अनेक लोक भेटत गेले त्यामध्ये केरळमधील बारावीची विद्यार्थींनी श्रध्दा थामबन देखील या कार्यक्रमाशी जोडली गेली. कन्नूर केंद्राने नंतर तिला बोलावले आणि एक समारंभ आयोजित केला गेला सगळीकडून आम्हाला प्रतिसाद मिळाला. एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. एक आपलेपणाची भावना निर्माण झाली. आणखी एका बारावी इयत्ता शिकणारीची प्रशंसा केली. तिला पुरस्कार दिला. कन्नूर आकाशवाणी केंद्रामुळे मला ही प्रेरणा मिळाली आणि माझी इच्छा की, देशभरामधील आकाशवाणी केंद्रानी अशा प्रकारे आपल्या विभागातील जागरुक आणि सक्रीय लोकांकडे लक्ष दिले तर लोकांच्या भागीदाराने , सहाय्याने देश चालवण्याची जी इच्छा आहे त्याला एक वेगळीच ताकद मिळेल, आणि म्हणून कन्नूर आकाशवाणी केंद्राच्या सर्व साथीदारांचे मी मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो. मला पुन्हा एकदा केरळबद्दल बोलायचे आहे. केरळमधील कोच्चिया चित्तूरच्या सेंट मेरी अप्पर प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मला एक पत्र पाठवले आहे. पत्र अनेक अंगाने विशेष आहे, महत्त्वाचे आहे. या लहान मुलांनी आपल्या अंगठयाच्या खुणांनी भारतमातेचे चित्र काढले आहे ते फार मोठया कापडावर भारतमातेचे, भारताच्या नकाशाचे चित्र त्यांनी मला पाठवले आहे. सुरुवातीला मला समजले नाही, जरा हैराण झालो की या मुलांनी मला अंगठयाच्या खुणांनी भारताचा नकाशा का बनवला. जेव्हा मी त्यांचे पत्र वाचले तेव्हा मला समजले की, त्यांनी किती मोठा सिम्बॉलिक संदेश दिला आहे. त्यांनी फक्त प्रधान मंत्र्यांनाच जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे, असे नाही तर त्यांच्या क्षेत्रातील लोकांना देखील जागरुक करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे एक वेगळे मिशन आहे, ते म्हणजे “अवयवदान” शरीरामधील अवयवदानाविषयी जन-जागरुकता अभियान त्यांनी चालवले आहे. ते जिथे राहतात तिथल्या अनेक ठिकाणी त्यांनी त्याविषयी लहान नाटके सादर करुन लोकांना अवयवदानाविषयी जागरुकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न केले आहेत. जेणेकरुन अवयवदान ही वृत्ती आणि प्रवृत्ती बनावी. त्या मुलींनी चिठ्ठी लिहून मला लिहिले आहे की, आपल्या “मन की बात” कार्यक्रमामधून अवयव दानाविषयी लोकांना आव्हान करा. महाराष्ट्रामधील 80 वर्षाचे वसंतराव सुडके गुरुजी त्यांनी सतत एक चळवळ चालू केली आहे. ते म्हणतात अवयवदान हा एक उत्सव झाला पाहिजे. हल्ली मला दूरध्वनीवरुन देखील खूप संदेश येतात. दिल्लीमधील देवेश यांनीसुध्दा मला एक संदेश दिला आहे. “ I am very happy with the government intiative on the organ donation and step towards creating a policy on the same. The country really needs support in these tongues where people need to go our and help each other and the ambitious target of one per million organ donation in a very producitve steps taken by the government. हे खूप महत्त्वपूर्ण आहे असे मला वाटते. आपल्या देशात दरवर्षी दीड लाखाहून अधिक जणांना किडणी, हृदय आणि लीवर यांची गरज आहे. परंतु सव्वाशे करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात फक्त पाच हजार ट्रान्सप्लांट म्हणजे अवयव प्रत्यारोपणांच्या शस्त्रक्रिया होतात.
दरवर्षी एक लाख डोळयांची गरज असते परंतु फक्त 25,000 जणांना डोळे मिळतात. जेव्हा चार डोळयांची गरज असते तेव्हा आपण फक्त एक डोळा देवू शकतो. रस्त्यामधील अपघातात मृत्यू झाला, तर शरीरातील अवयव दान केले जाऊ शकतील. अर्थात काही कायदेशीर अडचणीही त्यात आहेत. राज्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. काही राज्यांनी कागदी कारवाई कमी करुन हया अवयवदानाच्या प्रयत्नाला गती देण्याचे चांगले काम केले आहे. चांगला प्रयत्न केला गेला आहे. आज मी सांगू शकतो की अवयवदानामध्ये तामिळनाडू वरच्या स्थानावर आहे. खूप सामाजिक संस्था, खूप “एनजीओं” नी चांगले काम करुन एक वेगळी दिशा दिली आहे. अवयव प्रत्यारोपण म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटला महत्व देण्यासाठी “नॅशनल ऑर्गन अँड टिशु ट्रांन्सप्लांट ऑर्गनायझेशन”, नोटोची स्थापना केली गेली आहे. ही सेवा चोवीस तास हेल्पलाईल 1800 114 770 या क्रमाकांवर उपलब्ध आहे. आमच्या येथे असे म्हटले गेले आहे. “तेन त्यक्तेन भुंजीथा” म्हणजे त्याग करण्यात जो आनंद होतो तो सर्वोत्तम आहे. मागील महिन्यात आम्ही सर्वांनी टीव्हीवर पाहिले होते की, दिल्लीच्या जी.बी. पन्त हॉस्पिटलमध्ये एक गरीब ठेलेवाला, फेरीवाल्याच्या पत्नीचे लीवर ट्रान्सप्लांट केले गेले. लीवर लखनऊमधून दिल्लीला आणण्यात आले, आणि हे ऑपरेशन सफल झाले, यशस्वी झाले. एक जीव वाचला. “अवयव दान महादान” या विचाराने “तेन त्यक्तेन भुंजीथा” या भावाने आम्ही काम केले पाहिजे आणि या गोष्टीवर आम्ही विशेष जोर दिला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे.
प्रिय देशबांधवांनो आता आम्ही नवरात्री आणि विजयादशमीचा सण साजरा केला. काही दिवसानंतर दिवाळीपण साजरी करणार आहोत. ईद साजरी केली, गणेश चतुर्थी साजरी केली. परंतु या सर्वांमध्ये आणखी एक उत्सव साजरा करणार आहोत त्याचा आम्हा देशवासियांना अभिमान वाटेल, त्यामुळे देशाचा गौरव होईल. येत्या 26 ते 29 ऑक्टोबरला भारताची राजधानी नवी दिल्लीत “इंडिया-आफ्रिका फॉरेन समेटचे” आयोजन केले जाणार आहे. भारतभूमीवर पहिल्यांदा इतके मोठे आयोजन होणार आहे. 54 आफ्रिकी देश आणि युनियन लीडर्सना आमंत्रित केले गेले आहे. आफ्रिकेबाहेर आफ्रिकन देशांचे सगळयात मोठे संम्मेलन होणार आहे. त्यामुळे भारत आणि आफ्रिका या देशांमधील संबंध आणखी दृढ होतील. जितकी लोकसंख्या भारताची आहे तितकीच लोकसंख्या आफ्रिकन लोकांची आहे. जर दोन्ही लोकसंख्या एकत्र केल्या तर जगाच्या एक तृतीयांश ही लोकसंख्या होईल. आणि असे सांगितले जाते की, लाखो वर्षांपूवी या दोन्ही देशांचा भूभाग एकत्र होता. नंतर हिंद महासागरामुळे या भागाचे विभाजन होऊन दोन भाग झाले. भारताची जीव-सृष्टी आणि आफ्रिकेची जीव-सृष्टी एकमेकांशी मिळती-जुळती आहे. प्राकृतिक संसाधनाच्या दृष्टीनेदेखील दोन्ही देशांशी जवळीक आहे, निकटता आहे आणि भारताचे जवळजवळ 27 लाख लोक फार पूर्वीपासून जिथे स्थायिक झालेले आहेत. भारताचे आफ्रिकन देशांशी अनेक आर्थिक संबंध आहेत. सांस्कृतिक संबंध आहेत, राजनैतीक संबंध आहेत परंतु सर्वात जास्ती आफ्रिकन देशांमधील युवा पिढीला प्रशिक्षित करण्यामध्ये भारत मोठी भूमिका निभावत आहे. हयूमन रिसोर्सेस डेव्हल्पमेंट, कॅपेसिटी बिल्डिंगमध्ये 25,000 हून अधिक आफ्रिकन विद्यार्थी शिक्षीत झाले आहेत आणि आज आफ्रिकेमधील खूप देशांचे नेते भारतामधून शिक्षण घेऊन गेले आहेत, इतके आमचे दृढ नाते आहे या दृष्टीने ही परिषद खूप महत्वपूर्ण आहे. नेहमी जेव्हा समिट होते तेव्हा भिन्न भिन्न देशांचे प्रमुख भेटतात तशीच सर्व प्रमुखांची समिटमध्ये मिटींग होणार आहे. आणि बघा आमचा असा प्रयत्न आहे की, जनतेचे देखील मिलन झाले पाहिजे, एकत्र आले पाहिजे. यावेळी भारत सरकारने मुद्दामच एचआरडी मिनिस्ट्रीने एक मोठा कार्यक्रम केला आहे. सीबीएसईच्या जितक्या अफिलिएटेड शाळा आहेत त्या शाळांमधील मुलांमध्ये एक निबंध स्पर्धा घेण्यात आली, कविता लिहिण्यांचा कार्यक्रम केला गेला, त्या सर्वांचा सहभाग वाढवण्याचा कार्यक्रम केला. अंदाजे 1600 शाळांनी भाग घेतला. त्यामध्ये भारत आणि भारताच्या बाहेरील शाळांचा समावेश होता आणि हजारो शाळकरी मुलांनी भारत-आफ्रिका संबंध बळकट करण्याची इच्छा करण्याबद्दल लिहिले होते. दुसऱ्या बाजूला महात्मा गांधीची जन्मभूमी पोरबंदरहून “मेमरीज ऑफ महात्मा” हे प्रदर्शन जे मोबाईल प्रदर्शन आहे म्हणजे फिरते प्रदर्शन आहे ते पोरबंदरहून उत्तरी राज्यातून भ्रमण करुन 29 ऑक्टोबरला दिल्लीत पोहचत आहे. लाखो शाळकरी मुलांनी हे प्रदर्शन बघितले तसेच गावागावांमधील लोकांनीदेखील हे प्रदर्शन बघितले. आफ्रिका आणि भारताचा देशांमधील संबंधांबाबत महात्मा गांधीची किती महान भूमिका होती, महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव या दोन भू-भागावर किती होता हे लोकांनी जाणून घेतले, ओळखले. ही जी स्पर्धा घेतली त्यामध्ये उत्तम प्रकारच्या रचना आल्या.
आमच्या छोटया छोटया ठिकाणची मुले किती होनहार आहेत, त्यांची दृष्टी किती व्यापक आहे, ते किती सखोल विचार करतात याचे दर्शन त्यामध्ये होते. मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश मधील गरिमा गुप्ताने एक कविता लिहिली आहे, खूप चांगली लिहिली आहे, तिने लिहिले आहे –
अफ्रीका में नील नदी, सागर का नाम है ‘लाल’।
महाद्वीप विशाल है, प्रवासी भारतीय ख़ुशहाल।।
जैसे सिन्धु घाटी की सभ्यता, है भारत की पहचान।
नील नदी और कार्थेज हैं, अफ्रीकी सभ्यता में महान।।
गाँधी जी ने शुरू किया, अफ्रीका से आन्दोलन।
ऐसा चलाया जादू सब पर, जीत लिया सबका मन।।
जोहान्सबर्ग हो या किंग्स्टन, जिम्बाब्वे हो या चाड।
सब अफ्रीकी देशों में, मिलती है हमारी आलू-चाट।।
लिखने को तो लिख डालूँ, पंक्ति कई हज़ार।
अफ्रीका के जंगलों से, करती हूँ मैं प्यार।।
तरी ही कविता खूप मोठी आहे, परंतु मी काहीच ओळी तुम्हाला ऐकवल्या. तसे पाहिले तर इंडो-आफ्रिका समिट आहे परंतू लोकांना जोडण्याची ही संधी असते असे मला दिसून येते. गरिमाला, आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांनाे, 1600 पेक्षा अधिक शाळा आणि एचआरडी मिनिस्ट्रीचे खूप खूप अभिनंदन करतो. मी मागील 15 ऑगस्टला आदर्श ग्राम योजनांच्या संदर्भात एक प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर खूप साऱ्या माझ्या सांसद मित्रांनी हे काम साकार केले, अगदी मनापासून केले. मागील महिन्यात भोपाळमध्ये एक कार्यशाळा झाली ज्यामध्ये जिथे आदर्श ग्राम होत आहेत, तेथील प्रमुख, तेथील कलेक्टर, तेथील काही सांसद, भारत सरकार, राज्य सरकार सगळयांनी मिळून आदर्श ग्राम योजनेवर सखोल चर्चा केली. कोणत्या प्रकारे नव नवीन गोष्टी लक्षात आल्या, काही उत्साहवर्धक गोष्टी लक्षात आल्या. त्यातील काही गोष्टी लक्षात आणू इच्छितो.. झारखंड हा खूप मोठा प्रदेश, आदिवासी विभाग.. दुर्देवाने माओवाद, उग्रपंथ, बॉम्बबंदूक, रक्तरंजीत धरती अशा गोष्टी झारखंडचा विषय काढला की ऐकू येतात. या वामपंथी उग्रवादीच्या प्रभावामुळे तेथील खूप प्रदेश बरबाद झाले. परंतु तेथील आमचे सांसद, तसे पाहिले तर ते वरिष्ठ आहेत, पूर्वी संसदेत डेप्युटी-स्पीकरही होते, श्रीयुत करिया मुंडाजी... ज्यांनी आदिवासी करता आपले आयुष्य खपवले आहे. त्यांनी झारखंडमधील कुंती जिल्हयामधील परसी ग्राम पंचायतीला आदर्श ग्राम करण्यासाठी निवड केली आहे. जिथे उग्रवादी, वामपंथीचे राज्य चालले होते जेथे सरकारी कर्मचाऱ्यांनादेखील जाणे कठीण होते, डॉक्टरदेखील जाऊ शकत नव्हते, त्यांनी स्वत: येणे जाणे सुरु केले, लोकांमध्ये विश्वास निर्माण केला, सरकारी व्यवस्थेत प्राण भरण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना येण्यासाठी प्रोत्साहीत केले जिथे खूप काळापासून उदासिनता होती, तिथे काहीतरी करण्याची इच्छा निर्माण केली. आदर्श ग्राममध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि व्यवस्था यांच्याबरोबर जन-चेतना करण्याचा सफल प्रयत्न झारखंडच्या या परसी गावात झाला. मी आदरणीय सांसद श्रीयुत करिया मुंडांजीचे अभिनंदन करतो.
तशी मला आंध्रमधून एक बातमी मिळाली. आंध्रचे सांसद अशोक गजपती राजूजी आदर्श ग्राम योजनेत खूप खपले आणि त्यांनी आंध्रप्रदेशमधील विजयानगर जिल्हयातील द्वारापुडी ग्राम पंचायतला आदर्श ग्राम म्हणून निवडले. इतर व्यवस्था हाेतेच आहे. परंतु त्यांनी एक विशेष इनोवेटिव काम केले. शाळेमध्ये जी मुले शिकत त्यांना एक काम दिले कारण गावातील नवीन पिढी शिक्षणाच्या बाबतीत भाग्यशाली आहे परंतु गावातील जुनी पिढी निरक्षर आहे तेव्हा त्यांनी मोठया वयाची मुले होती त्यांना सांगितले की, दररोज तुमचा आई-वडिलांना या वर्गात शिकवायचे मुले शिकायची आणि संध्याकाळी तीच मुले शिक्षक व्हायची जेणेकरुन शिक्षकही निर्माण होतील. जवळ जवळ 550 प्रौढ निरक्षरांना त्या मुलांनी शिकवले, त्यांना साक्षर केले. बघा समाजात कोणते बजेट नाही, कोणते सर्क्युलर नाही, कोणती खास व्यवस्था नाही, परंतु इच्छाशक्तीमुळे किती मोठे परिवर्तन आणले जाते ते ग्रामपंचायतीमुळे बघण्यास मिळत आहे. तसे आमची आदरणी सांसद श्रीयुत सी.एल. रुवाला, हे मिझोरमचे सांसद आहेत. नॉर्थ-ईस्ट...त्यांनी ख्वालाहीलंग गावाला आदर्श ग्राम म्हणून निवडले आहे त्यांनी एक विशेष काम केले. हा गाव ऊसाच्या उत्पादनासाठी तसेच गुळासाठी खूप प्रसिध्द आहे. श्रीयुत रुवालाजींने गावात 11 मार्च रोजी, “कुर्तायी कुट सुगरकेन फेस्टिव्हल” सुरु केला. त्यामध्ये सर्व क्षेत्रामधील लोक एकत्र आले. जुने सार्वजनिक जीवन व्यतीत करणारे तिथून बाहेर पडलेले सरकारी अधिकारीही आले होते ऊसाच्या उत्पादनांची विक्री वाढण्यासाठी एक प्रदर्शनही लावले गेले. गावाला आर्थिक दृष्टया केंद्र कसे बनवले जाऊ शकते, गावातील उत्पादनाचे मार्केट कसे करायचे. आदर्श गावाबरोबर एक आत्मनिर्भर गाव बनवण्याचा प्रयत्न करणारे रुवालाजी हे अभिनंदनास पात्र आहेत.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, “मन की बात” आहे आणि स्वच्छतेची गोष्ट न होणे असे कधी होईल का ? मला मुंबईहून सविता राय यांनी एका दूरध्वनीद्वारे संदेश पाठवला आहे, त्या म्हणतात, “दिवाली की तैयारी के लिए हर साल हम अपने घरों को साफ़ करते हैं। इस दिवाली को हम अपने घरों के साथ-साथ अपने बाहर के वातावरण को भी स्वच्छ बनायें और उसे दिवाली के बाद भी स्वच्छ बनाये रखें।” त्यांनी खऱ्या गोष्टींवर लक्ष वेधून घेतले आहे. मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो माझ्या प्रिय-देशवासियांनो, गेल्यावर्षी दिवाळीच्या सणानंतर मिडियाने एक विशेष मोहिम चालवली होती, दिवाळीनंतर जिथे जिथे फटाके पडले होते त्या साऱ्या गोष्टी जनसामान्यांना चॅनेलवरुन दाखवल्या होत्या. जागृतीचे एक अभियान मिडियाने चालवले होते आणि त्याचा परिणाम असा झाला लगेच एक अभियान आपोआप सुरु झाले. तुमचे म्हणणे खरे आहे. सणाच्या आधी आपण जशी अपघात होऊ नये म्हणून चिंता करतो, तरी सणानंतरही केली पाहिजे. आणि यासाठी मी विशेषत्वाने हिंदुस्थानच्या मिडिया जगताचे अभिनंदन करु इच्छितो.
गेल्या 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या वेळी स्वच्छ भारत अभियानाला एक वर्ष झाल्याबद्दल मला इंडिया टुडे ग्रुपद्वारे “स्वच्छता संमेलना”मध्ये सहभागी होण्याचा योग आला. त्यांनी Clean India Awards दिलेत मीपण बघत होतो कोणकोणत्या प्रकारे प्रयत्न चालू आहेत ते. कसे कसे लोक आहेत जे यासाठी “वन लाईफ, वन मिशन” प्रमाणे काम करत आहेत. आमच्या देशात कशी-कशी ठिकाणे आहेत जी इतकी स्वच्छ ठेवली गेली आहेत. या सर्व गोष्टी प्रकाशात आल्या आणि मी त्यावेळी इंडिया टी.व्ही. ग्रुपचे त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल अभिनंदन दिली. जेव्हापासून स्वच्छता अभियानाचे मिशन सुरु झाले, मी बघितले आहे आंध्र तेलंगनाच्या ई-नाडू आणि खास करुन श्रीयुत रामुजी राव, ते वयाने खूप मोठे आहेत परंतु त्यांचा उत्साह कुठल्याही तरुणाला लाजवणारा आहे, तरुणापेक्षा कमी नाही. त्यांनी स्वच्छता आणि स्वच्छतेला एक पर्सनल प्रोग्रॅम बनवले आहे, मिशन बनवले आहे. ई-टीव्हीच्या माध्यमातून मागील एक वर्षापासून ते स्वच्छतेच्या कामाला प्रमोट करत आहेत, त्यांच्या वृत्तपत्राांमधून त्यासंबंधी बातम्या असतात आणि सकारात्मक बातम्यांवर ते भर देत आहेत.
त्यांनी जवळजवळ 55-56 शाळांमधील 51 लाख मुलांना आंध्र आणि तेलंगणामध्ये जोडले आहे. कुठलेही सार्वजनिक स्थळ असो, स्टेशन असो, धार्मिक स्थळ असो, पार्क असो. कितीतरी जागांवर स्वच्छतेसंबंधी मोठे अभियान चालवले आहे. आता या बातम्या स्वत:च स्व्च्छ भारत या स्वप्नाला साकार करण्याच्या ताकदीचे दर्शन घडवते.
एबीपी न्यूजने “ये भारत देश है मेरा” नावाने कार्यक्रम सुरु केला आणि लोकांमध्ये सफाईसंबंधी जागरुकता आली आणि त्याला हायलाईट करुन देशवासीयांना प्रशिक्षित करण्याचे काम केले.
एनडीटीव्हीने “बनेगा स्वच्छ इंडिया” नावाने मोहिम चालवली. दैनिक जागरण, त्यांनी देखील सतत हे अभियान पुढे चालू ठेवले आहे. झी परिवारने इंडिया टीव्हीचे “मिशन क्लीन इंडिया” आमच्या देशामध्ये शेकडो चॅनेल, हजारो वृत्तपत्रे आहेत प्रत्येकाने, मी वेळेअभावी सगळयाची नावे घेऊ शकत नाही परंतु हे अभियान चालवले आहे आणि सविता रायजीने सुचवले आहे की आज संपूर्ण देश या कामामध्ये सन्मान राखून हे काम पुढे चालवित आहे.
मेघालयमध्ये जेथे आमचे राज्यपाल श्रीयुत षण्मुख नाथन, त्यांनी मला चिठ्ठी लिहून मेघालयातील मावल्लयननोंग या गावाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की गेली काही वर्षे या गावाने स्वच्छतेचा विडा उचलेला आहे. जवळजवळ प्रत्येक पिढी या स्वच्छतेच्या बाबतीत समर्पित आहे असे सांगितले जाते की, काही वर्षांपूर्वी त्यांना एशियामधील क्लीनेस्ट व्हिलेजचा पुरस्कार मिळाला होता. हे ऐकून मला खूप आनंद झाला की, आमच्या देशात खूप दूर असलेल्या नॉर्थ इस्टंटच्या मेघालयात हे असे गाव आहे जे सफाईच्या क्षेत्रात खूप वर्षापूर्वीपासून कार्यरत आहे. तेथील नागरिकांचा स्वच्छता हा स्वभाव आणि संस्कार बनला आहे. हेच महत्त्वाचे आहे, आम्हाला सर्वांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे की आमचा देश जरुर स्वच्छ होईल आणि तो देशवासीयांच्या प्रयत्नाने होईल, 2019 मध्ये महात्मा गांधीची 150 वी जयंती आपण साजरी करु तेव्हा अभिमानाने, गौरवाने 100 करोड देशवासी सांगू शकतील, बघा आमच्या धरतीमातेला आम्ही घाणीपासून मुक्त केले.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन हे सांगितले होते, काही गोष्टी आहेत तेथे भ्रष्टाचाराने ठाण मांडले आहे, घर केले आहे. गरीब माणूस जेव्हा छोटया छोटया नोकरीसाठी जातो, कोणकोणत्या शिफारशीसाठी त्याला कोणकोणते कष्ट करावे लागतात, आणि दलालांची टोळकी कसे-कसे त्यांचे पैसे हडप करते. नोकरी मिळाली तरी रुपये जातात, नाही मिळाली तरी जातात. या सर्व बातम्या आम्ही ऐकतो आणि यामुळेच माझ्या मनात विचार आला की, छोटया छोटया नोकऱ्यांसाठी इंटरव्हयूची काय गरज आहे. मी कधी असे ऐकले नाही या दुनियेत असा मनौवैज्ञानिक आहे जो एक-दोन मिनिटात घेऊन एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखू शकेल ? आणि या विचाराने मी घोषणा केली होती आम्ही या छोटया नोकऱ्यासाठी मुलाखतीची परंपरा खंडणी बंद करु.
माझ्या प्रिय युवक मित्रांनो, मी आज अभिमानाने सांगू इच्छितो की सरकारने या साऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत आणि केंद्र सरकारच्या ग्रुप डी, ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या पदांवर आता भरतीच्यावेळी मुलाखती होणार नाहीत. 1 जानेवारी 2016 पासून हा नियम लागू होईल आणि जेथे भरतीची प्रक्रिया चालू आहे तेथे आम्ही व्यत्यय आणणार नाही, परंतु 1 जानेवारी 2016 पासून ही पध्दत लागू होईल. तर माझ्या सर्व युवा-मित्रांना माझ्या शुभकामना आहेत.
मी मागील बजेटमध्ये एक महत्त्वूपर्ण योजना घोषित केली होती. आमच्या देशात सोने हे सामाजिक जीवनात महत्त्वाचा हिस्सा बनले आहे. आर्थिक सुरक्षेचे माध्यम बनले आहे. संकटाच्या वेळची महत्त्वाची किल्ली म्हणून सोन्याकडे बघितले जाते. आता ही समाजात पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. सोन्यावरचे प्रेम, मी नाही मानत कोणी कमी करु शकेल. परंतु सोने डेड मनीच्या रुपात ठेवून देणे हे आजच्या युगात शोभा देत नाही. सोने शक्ती बनू शकते, सोने आर्थिक शक्ती बनू शकते. आणि प्रत्येक भारतीयाने यामध्ये योगदान देणे आवश्यक आहे. मला आज आनंद वाटतो की, बजेटमध्ये मी तुम्हाला जे वचन दिले होते, या दिवाळीच्या सणामध्ये विशेषत: धनतेरस म्हणजे धनोत्रयोदशीच्या दिवशी लोक खासकरुन सोने खरेदी करतात, त्यापूर्वीच आम्ही एक महत्त्वपूर्ण योजना सुरु करत आहोत. आम्ही “गोल्ड मोनिटाईझेशन स्कीम” आणत आहोत. या अंतर्गत आपण आपले सोने गोल्ड बँकेत जमा करु शकता आणि बँक तुम्हाला त्यावर व्याज देईल ज्याप्रमाणे तुम्ही आपले पैसे जमा करुन व्याज मिळवता. पूर्वी सोने लॉकरमध्ये ठेवायचे आणि लॉकरचे भाडेदेखील द्यायला लागायचे. आता गोल्ड बँकेत ठेवा आणि बँक तुम्हाला व्याज देईल. आता देशवासियांनो, सोने सपंत्ती बनू शकते नाही? सोने डेड मनीपासून एक जीवन ताकदीत परावर्तीत होऊ शकते, होऊ शकते ना ? बस्स.. हेच काम आम्हाला करायचे आहे. तुम्ही मला साथ द्या. आता सोने घरात ठेवू नका, त्याची सुरक्षा आणि व्याज डबल फायदा. दुसरी गोष्ट आहे “सोव्हरजीन गोल्ड बाँड”मध्ये हा बॉन्ड म्हणजे एक कागद, परंतु त्या कागदाचे मूल्य सोन्या इतकेच आहे. ज्यादिवशी हा कागद परत कराल, परत करण्याच्या दिवशी सोन्याचे जे मूल्य, किंमत असेल तितके पैसे तुम्हाला परत मिळतील. समजा आज तुम्ही 1000 रुपयाचे सोन्याच्या भावाने, हिशेबाने हा स्वर्णिय बॉड घेतला आणि 5 वर्षानंतर तुम्ही बॉड परत करायला गेलात त्यावेळी सोन्याची किंमत 1500 रुपये आहे तर तुम्हाला त्या कागदपत्राच्या बदल्यात दीड हजार रुपये मिळतील आम्ही याची सुरुवात करत आहोत त्यामुळे आम्हाला सोने खरेदी करण्याची जरुरत पडणार नाही, सोने संभाळण्याची जरुरी नाही. सोने कोठे ठेवावे ही चिंता राहणार नाही, आणि कागद कुणी चोरी करायला येणार नाही.
तर मी सुरक्षेची हमी असलेली योजना, स्कीम येत्या आठवडयात देशवासीयांसमोर ठेवणार आहे. मला हे सांगायला आनंद होत आहे की, आम्ही गोल्ड क्वाईन आणत आहोत. अशोक चक्र आणणारे गोल्ड क्वाईन स्वातंत्र्य मिळून जवळ जवळ 70 वर्षे झाली, परंतु आजपर्यंत आम्ही फॉरेन गोल्ड क्वाईनचाच उपयोग करत आलो आहोत. गोल्ड बिलीयन बॉण्ड्स हे पण परदेशात वापरले जातात. आम्हीही येणाऱ्या आठवडयांमध्ये धनतेरसच्या पूर्वी सामान्य माणसाला ते उपलब्ध करुन देणार आहोत.
पाच ग्रॅम आणि दहा ग्रॅमचे अशोकचक्र असणारी सोन्याची नाणी आम्ही सुरु करत आहोत. त्याबरोबर 20 ग्रॅमची गोल्ड नाणेपण लोकांसाठी उपलब्ध होईल. मला विश्वास आहे की नवी योजना आर्थिक विकासाच्या दिशेने नवीन परिवर्तन आणेल यामध्ये मला आपला सहयोग मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो 31 ऑक्टोबरला लोह-पुरुष वल्लभभाई पटेल यांची जन्मजयंती आहे. एक भारत-श्रेष्ठ भारत सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण आली की भारताचे मानचित्र समोर येते.
भारताच्या एकतेमध्ये या महापुरुषाने खूप मोठे योगदान दिले आहे. लोहपुरुषच्या रुपाने आपल्या सामर्थ्याचा परिचय दिलेला आहे. सरदार साहेबांना आम्ही श्रध्दांजली देणारच देणार, परंतु भारताला एक करणे हे त्यांचे स्वप्न होते, भौगोलिक स्वरुपात त्यांनी ते करुन दाखवले, परंतु एकतेच्या मंत्र हा सतत चिंतनाचा, व्यवहाराचा, अभिव्यक्तीचा माध्यम झाला पाहिजे. भारत विविधतेने भरलेला आहे. अनेक पंथ, अनेक संप्रदाय, अनेक बोली, अनेक जाती, अनेक परिवेश, कितीतरी विविधतेने भारत देश भरलेला आहे आणि ही विविधताच आमची शोभा आहे, सौंदर्य आहे. ही जर विविधता नसती तर या शोभेचा, सौदर्यांचा आम्ही गर्व, अभिमान करु शकलो नसतो. म्हणून विविधतेचा एकतेचा मंत्र आहे. शांती, सद्भावना, एकता हीच तर विकासाची खरी जडी-बुटी आहे.
गेली काही वर्षे, 31 ऑक्टोबरला देशाच्या काना-कोपऱ्यात “रॅन-फॉर-युनिटी” चे कार्यक्रम होतात. “एकता की दौड” मलाही यामध्ये सामील होण्याचे भाग्य लाभले आहे.
मी ऐकले आहे चारही बाजूंनी याच्या योजना बनत आहेत, लोक उत्साहात “एकता दौड” ची तयारी करत आहेत. “एकता की दौड”ही खऱ्या अर्थाने विकासाची दौड आहे. सरदार साहेबांना श्रध्दांजली द्या. एकतेच्या मंत्राला आपण पुढे नेऊ या.
प्रिय बंधू भगिनींनो, आता तुम्ही दिवाळीच्या तयारीला लागले असाल, घरात साफ-सफाई होईल. नवीन गोष्टी खरेदी करत असाल. दिवाळीचे पर्व आमच्या देशामध्ये वेगवेगळया रुपात साजरे केले जाते. दिवाळीच्या पावन पर्वासाठी मी तुम्हाला लाख-लाख शुभेच्छा देत आहे. परंतु दिवाळीच्या दिवसात काही अपघातही आठवतात. फटाके फोडण्यामुळे आगी लागतात, फटाक्यांमुळे मुलांचे खूप नुकसान होते. मी प्रत्येक आई-वडिलांना सांगेन की दिवाळीचा आनंद लुटा पण अपघात होऊ देवू नका, आमच्या परिवारातील मुलाचे नुकसान होऊ नये आणि तुम्ही तो विचार करालच आणि सफाई तर करायची आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मी ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी यावेळी ब्रिटनच्या मेरी यात्रेसाठी खूप रोमांचित झालो आहे. त्याचे एक विशेष कारण आहे. काही आठवडयांपूर्वी मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीजवळ भव्य स्मारकाचा शिलान्यास करायला गेलो होतो आणि लंडनमध्ये, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात रहात हाते ते घर आहे जे आता भारताची संपत्ती आहे. सव्वाशे कोटी भारतीयांचे ते प्रेरणास्थान बनले आहे, त्याचे विधिपूर्वक उद्घाटन करण्यासाठी जात आहे. दलित असतील, पिडीत असतील, शोषित असतील, वंचित असतील, मागास असतील, संघर्षमयी जीवन जगणाऱ्या कुणाही भारतीय माणसासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे हे घर प्रेरणा देते. जर इच्छा शक्ती प्रबळ असेल तर संकटावर मात करुन आपले जीवन समृध्द करु शकतो, शिक्षण घेतले जाते आणि हेच जीवन आहे. ज्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांनी बसून तपश्चर्या केली होती. भारत सरकार आणि राज्य सरकार समाजातील या वर्गातील दलित असतील, आदिवासी असतील, मागास असतील, अशा सद्गुणी मुलांना स्कॉलरशीप देते, जी परदेशात अभ्यासासाठी जातात. भारत सरकार सद्गुणी दलित युवक युवतींना प्रोत्साहन देते. मला विश्वास आहे ब्रिटनमध्ये आमची मुले शिकयला जातील, तेव्हा बाबासाहेबांचे स्थान हे प्रेरणाभूमी बनेल आयुष्यात काही शिका देशासाठी जगा, हा संदेश बाबासाहेबांनी दिला, यासाठी मी सांगत आहे माझ्या ब्रिटनच्या यात्रेमुळे मी रोमांचित झालो आहे, किती तरी वर्षे हा विषय तसाच होता. आता ते भवन सव्वाशे कोटी देशवासियांची संपत्ती बनतेय बाबासाहेब आंबेडकरांचे नाव जोडले गेल्यामुळे माझ्यासारख्या लोकांना किती आनंद होईल याचा तुम्ही अंदाज लावू शकता.
मला लंडनमध्ये आणखी एक संधी मिळणार आहे. भगवान विश्वेश्वरांनी यांच्या प्रतिमेचे अनावरण करायचे आहे. अनेक वर्षापूर्वी भगवान विश्वेश्वरांनी लोकतंत्रासाठी, एम्पावरमेंट ऑफ वूमनच्या साठी जे काम केले होते त्याचे तमाम दुनियेने त्याचे अध्ययन करण्याची गरज आहे.
लंडनच्या भूमीवर भगवान विश्वेश्वर यांच्या प्रतिमेचे लोकार्पण म्हणजे अनेक वर्षांपूर्वी भारतामधील महापुरुष कसे विचार करत, दूरदृष्टी ठेवून विचार करत याचे उत्तम उदाहरण आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो “मन की बात”च्या बरोबर तुम्ही जोडले गेलात. टेलिफोनद्वारे MyGov.in द्वारे मला सूचना मिळत राहतात. तुमच्या पत्रांची चर्चा आकाशवाणीवरपण होते. सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा होते. काही लोक आपल्या समस्या लिहितात, समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न होतो. भारतासारख्या देशात आम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. काही भाषा शिकण्याची मला संधी मिळाली, परंतु इतक्या भाषा आहेत त्या मी कशा शिकू शकेन ? परंतु मी आकाशवाणीचे आभारी आहे की या मन की बातचे रात्री 8 वाजता प्रत्येक राज्यात त्यांच्या प्रादेशिक भाषेत प्रसारण करतात. भले आवाज कुणाचाही असेल. परंतु गोष्ट माझ्या मनातली असते. तुमच्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी रात्री 8 वाजता जरुर प्रयत्न करेन. एक चांगले नाते आमच्यात निर्माण झाले आहे. मागच्यावेळी एक वर्ष पुरे करत होतो, आज आम्ही नव्या वर्षात प्रवेश करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांना पुन्हा एकदा खूप-खूप शुभकामना.
जय हिंद.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार माझा, “मन की बात” चा हा बारावा भाग. या हिशोबाने पाहिलं तर एक वर्षपूर्ण झालं. गेल्यावर्षी 3 ऑक्टोबर रोजी, पहिल्यांदा मन की बात करण्याचं भाग्य मला मिळालं. मला माहित नाही की तुम्हाला काय मिळालं ? पण हे मात्र मी अवश्य सांगू शकतो, की मला खूप काही मिळालं. लोकशाहीत जनशक्तीचं अपार महत्व आहे. माझ्या जीवनात एक मूलभूत विचार आहे आणि त्यामुळे जनशक्तीवर माझा नितांत विश्वास आहे. परंतु मन की बात मधून मी जे शिकलो, जे समजलं जे अनुभवलं, त्यातून मी हे सांगू शकतो की, आपल्याला वाटतं त्याहीपेक्षा जनशक्ती अपरंपार आहे. आपले पूर्वज सांगायचे की जनता जर्नादन हा ईश्वराचा अंश आहे. मन की बातमधून आलेल्या अनुभवातून मी सांगू शकतो की, आमच्या पूर्वजांच्या विचारांमध्ये एक मोठी शक्ती आहे, एक सत्य आहे कारण मी हा अनुभव घेतला आहे. मन की बात साठी मी जनतेकडून सूचना मागवायचो. केवळ दोन किंवा चार सूचना मी बघायचो. पण लाखोंच्या संख्येत लोकांनी सक्रीय होऊन सूचना पाठवल्या. ही एक मोठी ताकद आहे. कारण पंतप्रधानांकडे सूचना पाठवल्या, mygov.in वर लिहिलं पण एकदाही त्यांना संधी मिळाली नाही, उल्लेख झाला नाही तर कोणीही व्यक्ती निराश होईल, पण मला असं वाटत नाही. हा या लाखो पत्रांद्वारे, मला एक धडा शिकायला मिळाला. सरकारशी संबंधित अनेक छोटया अडचणीच्या विषयांची माहिती मला यातून मिळाली. मी आकाशवाणीचंही अभिनंदन करतो कारण या आलेल्या सूचनांकडे त्यांनी केवळ कागद म्हणून पाहिलं नाही. ते जनसामान्यांच्या आकांक्षेचे प्रतिक मानले, आकाशवाणीने त्यावर कार्यक्रम प्रसारित केले. सरकारच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांना आकाशवाणीत बोलावलं आणि जनता जर्नादनाचं जे म्हणणं होतं, ते, त्यांच्यासमोर मांडलं. काही समस्यांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. सरकारमधल्या विविध विभागांनी, लोकांनी लिहिलेल्या या पत्रांचे विश्लेषण केले. त्यात धोरणात्मक गोष्टी कोणत्या ? व्यक्तिगत कारणामुळे काय अडचण झाली आहे ? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सरकारच्या लक्षातच आल्या नाहीत ? हे शोधलं. समाजाच्या अगदी मूलभूत स्तरापासून, बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे सरकारकडे येऊ लागले प्रशासनाचा एक पायाभूत सिध्दांत असा आहे की माहिती खालून वर गेली पाहिजे आणि मार्गदर्शन वरुन खाली जायला हवं. मन की बात म्हणजे अशा प्रकारचा माहितीचा एक स्रोत आहे. आणि त्याचप्रमाणे मन की बात मुळे समाज शक्तीला व्यक्त होण्यासाठी एक संधी मिळाली. मी एकदा असंच म्हटल होते “सेल्फी विथ डॉटर” आणि सारं जग आश्चर्यचकित झालं. जवळ जवळ प्रत्येक देशातून, लाखोंच्या संख्येने लोकांनी सेल्फी विथ डॉटर, आपल्या मुलींबरोबर स्वत:चं छायाचित्र काढलं आणि त्यातून मुलींना प्रतिष्ठा मिळाली, गौरव मिळाला, महत्त्व मिळालं जेव्हा ते सेल्फी विथ डॉटर काढत होते तेव्हा ते त्यांच्या मुलींचा आत्मविश्वास तर वाढवत होतेच, त्याचबरोबर आपल्या स्वत:मध्ये एक निर्धार उत्पन्न करत होते. जेव्हा लोक हे पाहात होते तेव्हा त्यांनाही वाटत होतं की मुलींबद्दल वाटणारी उदासीनतेची, दुय्यमपणाची भावना आता बदलावी लागेल. ही एक मूक क्रांती होती.
भारतातलं पर्यटन डोळयासमोर ठेवून मी नागरिकांना सांगितलं, “Incredible India”, अतुल्य भारत. तुम्ही पर्यटनाला गेल्यावर तुम्ही काढलेलं एखादं चांगलं छायाचित्र माझ्याकडे पाठवा, मी ते बघेन. हे मी असंच जाता जाता म्हटलं होतं, पण लाख नवलं घडलं. हिंदुस्थानच्या प्रत्येक भागातून लोकांनी लाखोंच्या संख्येत छायाचित्र पाठवली. भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या पर्यटन विभागांनाही कधी वाटलं नसेल की आमच्यापाशी इतका समृध्द वारसा आहे. एका मंचावर साऱ्या गोष्टी आल्या आणि यात सरकारचा एकही रुपया खर्च झाला नाही. लोकांनीच हे सगळं केलं.
मला त्यावेळी फार आनंद झाला, जेव्हा मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मन की बात च्या पहिल्या भागात मी गांधी जयंतीचा उल्लेख केला होता आणि लोकांना विनंती केली होती की 2 ऑक्टोबरला आपण गांधी जयंती साजरी करणार आहोत.
एक काळ असा होता की खादी फॉर नेशन असं मानल जायचं, पण आपल्याला असं वाटत नाही का ? की आता “खादी फॉर फॅशन” ही काळाची गरज आहे ? आणि मी लोकांना खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी आग्रह केला. विनंती केली. थोडीतरी खादीच्या कपडयांची खरेदी करा. आज मी अत्यंत आनंदाने, समाधानाने सांगू शकतो की मागच्या एका वर्षात खादीची विक्री दुप्पट झाली. आता हे काही सरकारी जाहिरातीमुळे नाही झालं. लााखे रुपये खर्च करुन नाही झालं. केवळ जनशक्तीच्या अनुभूतिमुळे निश्चयामुळे आणि निर्धारातून, अनुभवातून झा.लं मन की बात मधून बोलताना मी एकदा सांगितलं होतं, गरीबाच्या घरात चूल पेटलेली असते, मुलं रडत असतात, त्यांची गरीब आई असे आपण चित्र बघतो. त्यांना गॅस सिलेंडर मिळायला नको का ? मी श्रीमंत लोकांना विनंती केली होती की, गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान तुम्ही सोडू शकाल का ? लक्षात घ्या आणि आज अत्यंत आनंदानं मी सांगू इच्छितो की देशभरातल्या 30 लाख मध्यमवर्गीय कुटुंबांनी गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान सोडून दिलं आहे. आणि हे काही श्रीमंत लोक नाहीत. मी एका दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहिलं की निवृत्त शिक्षक, विधवा महिला रांगेत थांबले होते, अनुदान सोडण्यासाठी . समाजातील सामान्य नागरिक, मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्ग ज्यांच्यासाठी हे अनुदान सोडून देणं खरोखरच कठीण काम आहे, पण त्यांनीही अनुदान सोडलं, ही मूक क्रांती नव्हे काय ? हे जनशक्तीचं दर्शन नव्हे काय ? सरकारला ही ध्यानात घ्यावं लागेल, शिकावं लागेल की सरकारी चौकटीत राहून जे काम होतं, त्या चौकटी पलिकडे जाऊन, एक फार मोठा जनशक्ती असलेला, एक सामर्थ्यशाली, ऊर्जाशाली आणि संकल्पशाली समाज आहे. जर सरकारने या समाजाच्या हातात हात घालून काम केलं तर समाज परिवर्तनासाठी एका उत्प्रेरकाच्या रुपात सरकारला अधिक चांगलं काम करता येईल.
ज्या गोष्टींवर माझा विश्वास होता, तो विश्वास मन की बातमुळे अढळ झाला आहे, श्रध्देत रुपांतरित झाला आहे. आणि म्हणून या जनशक्तीला आज मी वंदन करु इच्छितो, प्रणाम करु इच्छितो. प्रत्येक लहान गोष्ट छोटा मुद्दा आपला मानला आणि देशकल्याणासाठी स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो ?
मन की बात मध्ये एक नवीन प्रयोग करायचं मी ठरवलं. देशातल्या नागरिकांना विनंती केली की तुमचे प्रश्न, तुमच्या सूचना, तुमचे प्रस्ताव दूरध्वनीवरुन माझ्यापर्यंत पोहचवा. मन की बात मध्ये मी त्यावर लक्ष देईल. मला आनंद वाटतो की, देशभरातून जवळ जवळ पंचावन्न हजारांपेक्षा अधिक दूरध्वनी आले. सियाचिन असो, कच्छ असो, कामरुप असो, काश्मीर असो किंवा कन्याकुमारी. हिंदुस्थानातला असा एकही प्रदेश नसेल, जिथून नागरिकांनी दूरध्वनी केला नाही. एक प्रकारचा सुखद अनुभव आहे हा. सर्व वयोगटातल्या नागरिकांनी त्यांचं म्हणणं मांडलं, विचार मांडले. त्यातले काही मी स्वत: ऐकले, मला बरं वाटलं बाकीच्या मुद्दयांवर प्रस्तावांवर माझी चमू काम करते. हा दूरध्वनी करण्यासाठी तुम्हाला एक-दोन मिनिटं लागली असतील, पण माझ्यासाठी यातून मिळालेले प्रसताव, विचार आणि मुद्दे महत्त्वाचे आहेत. यावर पूर्ण सरकार अवश्य काम करेल.
एका गोष्टीमुळे मला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. आपल्याला वाटतं की चहूकडे निराशा पसरली आहे पण मला वेगळाच अनुभव आला. या पंचावन्नहजार नागरिकांनी त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं म्हणणं मांडायचं होतं, कोणत्याही अडथळयाविना, ते मुक्तपणे त्यांचे बोलणं माझ्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्वतंत्र होते. पण या साऱ्या गोष्टी, सारे विचार. सारे मुद्दे म्हणजे जणू काही “मन की बात” च्या प्रभावाखाली व्यक्त केल्याप्रमाणे आहेत हे पाहून मी स्तिमित झालो. पूर्णपणे सकारात्मक, सृजनात्मक असे हे विचार म्हणजे पहा, देशातला सामान्य नागरिक असा सकारात्मक विचार करत असेल तर हे देशाचं मोठं धन म्हणावं लागेल, संपत्ती मानावी लागेल. केवळ एक दोन टक्केच असे दूरध्वनी आले की, ज्यांनी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या. 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी ऊर्जा देणारे आनंद देणारे विचार मांडले. प्रस्ताव सुचवले.
आणखी एक माझ्या लक्षात आले, विशेष क्षमता असणारे नागरिक आणि त्यातही विशेषत: आपले अंध बांधव, त्यांचे दूरध्वनी मोठया प्रमाणात आले. त्याचं हे कारण असू शकेल की, ते टीव्ही पाहू शकत नाहीत, ते रेडिओ मात्र अवश्य ऐकतात. अशा अंध व्यक्तींसाठी रेडिओचं काय महत्व आहे ? हे मला यातून लक्षात आलं आहे. एका नव्या दृष्टीकोनातून मी पाहतो आहे आणि त्यांनी सांगितलेल्या अनेक अनेक चांगल्या गोष्टी, चांगले मुद्दे, सरकारला संवेदनशील होण्यासाठी पुरेसे आहेत.
अलवर, राजस्थान येथून पवन आचार्य यांनी दूरध्वनी केला. त्यांनी सांगितलेला मुद्दा साऱ्या देशाने ऐकावा आणि विचार करावा असाच आहे. ते म्हणतात. “माझं नाव पवन आचार्य मी अलवर, राजस्थान येथे राहतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुचवू इच्छितो की, यावेळच्या मन की बात मधून भारताच्या जनतेला असं आवाहन करा की दिवाळीत मातीच्या पणत्यांचा जास्तीत जास्त वापर करा. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण तर होईलच, शिवाय आपल्या कुंभार बांधवांना रोजगाराची संधी मिळेल, धन्यवाद”
पवन, मला खात्री आहे की तुमचा हा विचार, तुमची ही भावना, हिंदुस्तानातल्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहचेल, पसरेल चांगला प्रस्ताव आहे हा आणि मातीचं कुणी मोल करु शकत का ? म्हणूनच मातीपासून बनवलेल्या पणत्या अनमोल असतात. पर्यावरणाच्या दृष्टीनेही या गोष्टीला महत्व आहे. मातीचे हे दिवे ज्या गरीबांच्या घरात तयार होतात, त्या गरीबांचं पोट त्यावरच अवलंबून असतं. आणि मी देशवासीयांना सांगू इच्छितो की पवन आचार्य यांनी मांडलेल्या प्रस्तावावर आपण कृती केली तर दिवा आपल्या घरात पेटेल, पण त्याचा प्रकाश पडेल गरीबाच्या घरात.
माझ्या प्रिय देशवासियांनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी सैन्यदलातील जवानांबरोबर दोन-तीन तास राहण्याची संधी मला मिळाली. जल, भूमी आणि आकाश यांचं रक्षण करणारी नौसेना स्थलसेना आणि वायुसेना. पाकिस्तानबरोबर 1965 साली झालेल्या युध्दाला पन्नास वर्ष पूर्ण झाली. त्या अनुषंगाने दिल्लीत इंडिया गेटजवळ शौर्यांजली प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. मी उत्साहानं आणि उत्सुकतेने प्रदर्शन पाहात राहिलो. अर्धा तास वेळ दयायचा असं ठरवून मी गेलो होतो पण प्रदर्शन पाहून बाहेर पडलो तेव्हा अडीच तास झाले होते आणि तरीही मन भरलं नव्हतं, काहीतरी राहून गेलं आहे असे वाटत होतं. काय नाहीये त्या प्रदर्शनात, जणू इतिहासच सजीव रुपात मांडला आहे. कलात्मक दृष्टया पाहिलं तरी उत्तम, इतिहासाच्या नजरेतून पाहिलं तर बरंच काही शिकवणारं, आणि जीवनात प्रेरणा मिळावी म्हणून पाहिलं तर, मातृभूमीची सेवा करण्यासाठी याहून उत्तम प्रेरणा असूच शकत नाही.
युध्दकाळातले ते गौरवाचे, अभिमानाचे क्षण, प्रसंग, आपल्या सैनिकांचे साहस, बलिदान या विषयी आपण केवळ ऐकून होतो, त्यावेळी छायाचित्रण, चलत्चित्रण हे तंत्रही फारसं उपलब्ध नव्हतं, पण तरीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्या अभियानाच्या क्षणांची, जवानांच्या बलिदानाची अनुभूति अवश्य येते. मग ती लढाई हाजीफीरची असेा, असल उत्तरची असो किंवा चामिडाची असो, हाजीपीर पासजवळ मिळवलेल्या विजयाची दृश्य पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात आणि भारतीय सैन्याबद्दल वाटणारा अभिमान मनात दाटून येतो. प्रत्यक्ष लढलेल्या वीरांना, धारातिर्थी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांना मी भेटलो. ते सारे आता आयुष्याच्या उत्तरार्धात आहेत, तेही आले होते. त्यांच्याशी हस्तांदोलन करताना एक ऊर्जा, एक प्रेरणा जाणवत होती. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर त्यातील लहान लहान मुद्दे सुध्दा समजून घ्यावे लागतील. इतिहासामुळे, आपल्या मुलांशी आपले बंध टिकून राहतात. इतिहासाशी असलेलं नातं तुटलं तर इतिहास घडवण्याच्या शक्यतेला पूर्ण विराम मिळतो. या प्रदर्शनातून त्या इतिहासाची अनुभूती मिळते आणि त्यातूनच नवा इतिहास घडवण्याची बीजं रोवली जाऊ शकतील.
अजून काही दिवस हे प्रदर्शन खुलं राहील, मी आपल्याला आपल्या कुटुंबियांना सांगेन की, दिल्लीजवळ असाल तर हे प्रदर्शन अवश्य पहा. आणि माझ्यासारखी घाई करु नका, मी अडीच तासात परतलो पण तुम्हाला तीन-चार तास नक्की लागतील, नक्की बघा लोकशाहीचं सामर्थ्य बघा. एका छोटया मुलानं, पंतप्रधानांना एक आदेश दिला आहे. पण घाईघाईत तो मुलगा स्वत:चे नाव सांगायला विसरला. त्याचं नाव तर मला ठाऊक नाही पण त्यांनी मांडलेला मुद्दा पंतप्रधानांनी लक्षात घ्यावा असाच आहे, किंबहुना साऱ्या देशानं लक्षात घ्यावा असा आहे. ऐका तो मुलगा काय म्हणतो ? तो म्हणतो पंतप्रधान मोदीजी, मी आपल्याला सुचवू इच्छितो, की आपण जे स्वच्छता अभियान राबवत आहात त्यासाठी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गल्लीत कचरापेटी बसवावी.
या मुलाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी आणि स्वच्छता राहावी म्हणून तशी व्यवस्था, सोयी हे ही आवश्यक आहे. या मुलाने सुचवलेल्या प्रस्तावामुळे मला अतीव समाधान मिळालं. समाधान यासाठी मिळालं की, दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारताच्या संदर्भात अभियानाची मी घोषणा केली, आणि मी आपल्याला हे सांगू शकतो की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच संसदेत, स्वच्छता या विषयावर तसान्तास चर्चा होत आहे.
आमच्या सरकारवर टीका देखील होते. मलाही खूप काही ऐकावं लागतं की, स्वच्छतेबद्दल मोदीजी मोठमोठया गोष्टी सांगत होते पण काय झालं ? हे ऐकून मला वाईट वाटत नाही, उलट यातून मला एक चांगली गोष्ट दिसते की, देशाच्या संसदेत भारताच्या स्वच्छतेबद्दल चर्चा घडते आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघा, एकीकडे संसद आणि दुसरीकडे देशातला हा लहान मुलगा जेव्हा दोघेही स्वच्छतेबद्दल बोलतात, तेव्हा देशासाठी याहून भाग्याची अशी कोणतीही गोष्ट असू शकत नाही. ही चळवळ सुरु आहे विचारांची, अस्वच्छतेविषयी तिटकारा आणि स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होतांना दिसत आहे. यामुळे शासनाला देखील कार्यप्रवृत्त व्हावं लागेल, काम करणं, कृती करणे अपरिहार्य ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्था, मग पंचायत असो की नगर पंचायत, नगरपालिका असो की महानगरपालिका राज्य शासन असो की केंद्र सरकार प्रत्येकाला यावर काम करावंच लागेल. ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे, त्रुटी असतील तरीही पुढे न्यायची आहे. वर्ष 2019 मध्ये जेव्हा आपण भारतात महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साजरी करु त्यासाठी आतापासून महात्मा गांधीजींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्या दिशेने आपण काम करुया. आपल्याला ठाऊक आहे, महात्मा गांधी काय सांगत ? एका ठिकाणी तर ते म्हणतात की, स्वातंत्र्य आणि स्वच्छता या दोनपैकी एक निवडण्याची वेळ आली तर मी स्वच्छतेला प्राधान्य देईल, स्वातंत्र्यानंतर गांधीजींसाठी स्वच्छता ही स्वातंत्र्याहून अधिक महत्त्वाची गोष्ट होती. या आपण सारे महात्मा गांधीजींच्या विचारांचं अनुकरण करुया आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करुया.
दिल्लीहून गुलशन अरोडा यांनी mygov.in वर लिहिलं आहे. दीनदयाळ यांच्या जन्मशताब्दीबद्दल त्यांना माहिती हवी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, महापुरुषांच्या जीवनातून आपल्याला निरंतर प्रेरणा मिळते. हे महापुरुष कोणती विचारधारा मानणारे होते याचं मूल्यांकन करणं हे आपलं काम नव्हे. देशासाठी जगणारे आणि देशासाठी मरणारे सारेच आम्हाला प्रेरणा देणारे आहेत. हे दिवस या साऱ्या महापुरुषांचं स्मरण करण्याची संधी देणारे आहेत. 25 सप्टेंबरला पंडीत दीनदयाळ उपाध्याय, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, 11 ऑक्टोबरला जयप्रकाश नारायणजी, 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल अशी अगणित नावं सांगता येतील, मीही खूप सांगतोय कारण हा देश बहुरत्ना वसुंधरा आहे. तुम्ही कोणतीही तारीख घ्या, इतिहासाच्या नजरेतून कोणा न कोणा महापुरुषांच नाव त्या तारखेशी जोडलेलं आढळेल. येणाऱ्या काळात या सर्व महापुरुषांचं आपण स्मरण करुया. त्यांच्या जीवनातून मिळालेल्या संदेशाला घराघरात पोहचवूया, आणि आपणही त्यांच्याकडून काहीना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करु या.
विशेषत: 2 ऑक्टोबरसाठी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. 2 ऑक्टोबरला पूज्य बापूजी महात्मा गांधीजींची जयंती आहे. मी गेल्यावर्षी सांगितलं होतं की तुमच्याकडे वेगवेगळया फॅशनचे कपडे असतील, अनेक गोष्टी असतील, त्यात खादीला स्थान मिळायला हवं मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, 2 ऑक्टोबरपासून महिनाभर खादी वस्तूंवर सवलत दिली जाते, खादी मोठया प्रमाणावर खरेदी करा. खादीबरोबरच हातमागालाही महत्व मिळायला हवं आपले विणकर बांधव इतकी मेहनत करतात. आपण सव्वाशे कोटी देशवासी, आपण पाच रुपये, दहा रुपये, 50 रुपये किंमतीचं हातमागावर तयार झालेलं वस्त्र किंवा खादी उत्पादन खरेदी केलं तर पर्यायानं ते पैसे त्या गरीब विणकराच्या घरात जातील, खादीच्या वस्तु तयार करणाऱ्या गरीब विधवा स्त्रीच्या घरात जातील आणि म्हणून या दिवाळीत खादी उत्पादन, खादी वस्त्रं यांची खरेदी करा. केवळ खादीचेच कपडे वापरा असं माझं आपल्याला सांगणं नाही, पण किमान थोडे तरी, एवढंच म्हणणं माझं. पहा, मागील वेळी विक्री दुप्पट झाली, किती गरीबांना त्याचा लाभ झाला. मोठा खर्च करुन जाहिराती देऊन जे काम सरकार करु शकत नाही ते तुमच्या एका छोटया कृतीमुळे, मदतीमुळे झालं. हीच तर आहे जनशक्ती. आणि म्हणून हे काम आपण करा अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. प्रिय देशवासियांनो, माझं मन, एका गोष्टीमुळे आनंदाने भरु गेलं आहे. वाटतंय की तुम्हाला ही त्या आनंदात सहभागी करुन घ्यावं. मे महिन्यात मी कोलकत्याला गेलो होतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कुटुंबिय मला भेटायला आले होते. सुभाष बाबूंच्या पुतण्याने चंद्रा बोस यांनी सर्व व्यवस्था केली होती. मी सुभाषबाबूंच्या सर्व नातलगांना पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित केले. चंदा बोस आणि त्यांचे कुटुंबिय यांनी हे काम मनावर घेतलं आणि गेल्याचं आठवडयात पक्की बातमी मिळाली की सुभाषबाबूंचे पन्नासहू अधिक नातलग, कुटुंबिय पंतप्रधान निवासस्थानी येणार आहेत. तुम्ही कल्पना करा की, माझ्यासाठी तो किती आनंदाचा क्षण असेल. नेताजींचे नातलग, बहुधा प्रथमच सारे मिळून, एकत्र, पंतप्रधान निवासाला भेट देणार आहेत, अशी संधी त्यांना मिळणार आहे. पण त्याहून अधिक आनंद मला झाला आहे कारण पंतप्रधानांच्या निवासस्थानी असा पाहुणचार यापूर्वी कधीही झाला नसेल, जो करण्याचं भाग्य मला ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे.
सुभाषबाबूंचे 50 हून अधिक नातलग, कुटुंबिय, काही वेगवेगळया देशात राहणारे, सारे मुद्दाम आवर्जून येणार आहेत. माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण असेल तो. त्यांच्या स्वागतासाठी मी उत्सुक आहे. अतीव आनंदी आहे. या अतीव आनंदाचा अनुभव मी घेतो आहे.
भार्गवी कानडे यांचा दूरध्वनी आला होता. त्यांची बोलण्याची पध्दत आणि आवाज यावरुन त्या स्वत: नेता असतील असं वाटतं किंवा नेतृत्व करतील असं वाटतं, त्या म्हणतात, “माझं नाव भार्गवी कानडे आहे. मी पंतप्रधानांना विनंती करु इच्छिते की, मतदार नोंदणीबद्दल युवा पिढीला तुम्ही जागृत करा, ज्यामुळे येणाऱ्या काळात युवापिढीचा सहभाग वाढेल. आणि भविष्यकाळात सरकार निवडण्यासाठी आणि चालवण्यासाठी युवा पिढी महत्वूपर्ण सहकार्य करु शकेल. धन्यवाद.”
मतदार यादीत नाव नोंदवणं आणि मतदान करणं याबद्दल भार्गवी यांनी सुचवलं आहे. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदार, देशाचा भाग्यविधाता असतो आणि ही जाणीव आता हळूहळू वाढते आहे मतदानाचं प्रमाण, त्याची टक्केवारी वाढते आहे. आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाचं मी विशेष अभिनंदन करतो.
निवडणूक आयोग म्हणजे केवळ एक नियंत्रण असं चित्र काही वर्षांपूर्वी होतं पण गेल्या काही वर्षात त्यात अनेक बदल झाले आहेत. आज भारतीय निवडणूक आयोग केवळ नियंत्रक राहीला नसून सुविधा प्रदाता झाला आहे. मतदार स्नेही झाला आहे. आयोगाच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक योजनेत केंद्रस्थानी असतो. पण केवळ निवडणूक आयोग कार्यरत राहून चालणार नाही. आपल्यालाही शाळा, महाविद्यालयात, आपला परिसर याठिकाणी याविषयी जागरुकतेचे वातावरण निर्माण करावं लागेल. जेव्हा निवडणुका असतील तेव्हाच जागरुकता असं चालणार नाही. मतदार यादी अद्ययावत असायला हवी, हे आपणही पाहिलं पाहिजे. मला मिळालेला अमूल्य अधिकार सुरक्षित आहे की नाही, मी त्याचा वापर करतो की नाही हे जाणून घेण्याची सवय सर्वांनी बाणवायला हवी. ज्या तरुणांनी अजून आपली नावं मतदार यादी नोंदवली नसतील ते नोंदवतील आणि मतदानही अवश्य करतील अशी मी आशा करतो. आणि निवडणुकीच्या काळात तर मी जाहीरपणे सांगतो की आधी मतदान, नंतर चहापान, इतकं पवित्र कार्य आहे हे, प्रत्येकाने करायला हवं परवाच मी काशीला जाऊन आलो. अनेक जणांना भेटलो, अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. खूपजण भेटले, पण त्यातही दोन मुलं लक्षात राहिली. त्यांच्याबद्दल आपल्याला सांगतो. क्षितिज पांडे हा सातवीतला विद्यार्थी मला भेटला अनारस हिंदू विद्यापीठात, केंद्रीय विद्यालयात इयत्ता सातवीत तो शिकतो, तसा हुशार आहे. त्याच्यापाशी दांडगा आत्मविश्वास आहे. या लहान वयात भौतिकशास्त्रातील त्याची आवड मी पाहिली मला वाटलं तो खूप वाचत असेल. इंटरनेटसर्फिंग करत असेल. रेल्वेचे अपघात कसे रोखता येतील ? कोणतं तंत्रज्ञान असावं ? ऊर्जानिर्मितीचा खर्च कमी करता येईल ? यंत्रमानवलाही भावना कशा निर्माण करता येतील ? अनेक अनेक विषयांवर तो बोलत होता, कमला आहे त्या मुलाची. त्याच्या बोलण्यातला सारा तपशील मला जाणून नाही घेता आला पण त्याचा अफाट आत्मविश्वास आणि आवड पाहून, देशातल्या मुलांनी विज्ञानात रस घ्यावा, विज्ञानाची गोडी वाढवावी असं मला नक्की वाटलं. मुलांच्या मनात सतत प्रश्न निर्माण व्हायला हवेत, का? कधी, कसं ? हे बालमनांनी विचारायला हवं.
तशीच एक मुलगी. नऊ वर्षांची. सोनम पटेल भेटली. वाराणसीत सुंदरपूर येथे राहणाऱ्या सदावृत्त पटेल यांची मुलगी. एका अत्यंत गरीब कुटुंबातली मुलगी. या मुलीला संपूर्ण भगवद्गीता पाठ आहे हे पाहून मी स्तंभित झालो. त्यातही महत्वाची गोष्ट मला ही जाणवली की मी विचारल्यावर तिने श्लोक तर सांगितलाच, तत्काल त्याचा इंग्रजीत अर्थ तिने सांगितला. हिंदीत सांगितला. तिच्या वडिलांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून ही विद्या तिला अवगत आहे. मी विचारलं, कुठे शिकली ? तर म्हणाले आम्हालाही ठाऊक नाही. त्यावर मी विचारलं, अभ्यासाचं काय ? केवळ गीताच वाचते की आणखीही काही करते ? त्यावर तिचे वडील म्हणाले की, तसं नाही, तिनं गणिताचं पुस्तक हातात घेतलं तर संध्याकाळ पर्यन्त सारं तोंडपाठ, इतिहासाचं उघडलं तर संध्याकाळी सारं मुखोद्गत करते ती. आम्हाला सगळया कुटुंबियांना याचं आश्चर्य वाटतं
खरोखर मी फारच प्रभावित झालो. कधीकधी अशा मुलांना प्रसिध्दीची हाव सुटते, पण सोनमच्या बाबतीत असं काही मला जाणवलं नाही. देवानं एक शक्ती दिली आहे असं मला वाटलं. माझ्या काशी यात्रेत हया दोन मुलांना भेटण्याचा योग आला. ते पोचवावं असं मला वाटलं दूरचित्रवाणीवर आपण बघतो व वर्तमानपत्रात वाचतो, त्याशिवाय अनेक गोष्टी आपण करतो आणि कधी कधी अशा कामातून आनंदही मिळतो. त्याचप्रमाणे या दोन मुलांची झालेली भेट माझ्या लक्षात राहणारी ठरली.
मन की बातच्या माध्यमातून अनेक जण माझ्याकरता नवीन काम सुचवत असतात. हेच बघाना, हरियाणाचे संदीप काय म्हणातात ? संदीप हरियाणा, सर मन की बात तुम्ही महिन्यातून एकदा करता, तुम्ही प्रत्येक आठवडयाला करा कारण तुमचं बोलणं ऐकून खूप प्रेरणा मिळते.
संदीपजी, तुम्ही काय काय करुन घ्याला माझ्याकडून ? महिन्यातून एकदा मला करतानाही फार कसरत करावी लागते, वेळेचं नियोजन करावं लागतं. कधी कधी तर आकाशवाणीतले आमचे सहकारी अर्धा-अर्धा, पाऊण-पाऊण तास माझी वाट बघत बसतात. पण तरीही तुमच्या भावनेचा मी आदर करतो तुमच्या सूचनेबद्दल आभार. सध्यातरी महिन्यातून एकदा ठिक आहे. मन की बातच एक प्रकारे एक वर्ष पूर्ण झालं. आपल्याला माहित आहे, सुभाषबाबू रेडिओचा किती वापर करायचे ? जर्मनीतून त्यांनी, त्यांचं रेडियो केंद्र सुरु केलं होतं आणि स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल हिंदुस्थानातल्या नागरिकांना या रेडियो केंद्रावरुन ते नेहमी माहिती द्यायचे. आझाद हिंद रेडियोची सुरुवात एका साप्ताहिक बातमीपत्रानं त्यांनी केली होती. इंग्रजी, हिंदी, बंगाली, मराठी, पंजाबी, पारशी ऊर्दू साऱ्या भाषांमधून हे रेडिओ प्रसारण ते चालवत असत.
मलाही आता आकाशवाणीवरुन मन की बात करता करता एक वर्ष झालं आहे. माझी मन की बात केवळ आपल्यामुळे खऱ्या अर्थाने तुमची मन की बात झाली आहे. तुमचं म्हणणं मी ऐकतो. तुमच्यासाठी विचार करतो. तुमच्या सूचना, तुमचे प्रस्ताव बघतो. त्यातून माझ्या विचारांना एक गती मिळते, जी आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते. बोलणारा मी असतो पण गोष्ट तुमची असते. आणि हाच माझा आनंद आहे. पुढच्या महिन्यात मन की बात करण्यासाठी पुन्हा भेटू. तुमच्या सूचना, विचार, प्रस्ताव पाठवत रहा. त्यातून सरकारलाही लाभ होतो. सुधारणांची सुरुवात होते. तुमचं योगदान, तुमचा सहभाग माझ्याकरता बहुमूल्य आहे, अनमोल आहे.
पुन्हा एकदा आपणा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद !
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांना नमस्कार,
मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मला मिळाली आहे. दक्षिण भारतातील नागरिक ओणमच्या सणात रंगले आहेत आणि कालच साऱ्या देशानं रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. सामाजिक सुरक्षा हा मुद्दा लक्षात घेऊन भारत सरकारनं सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत. अगदी अल्पावधीतच सर्वांनी या योजना स्वीकारल्या याचा मला आनंद वाटतो. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या भगिनींना या सुरक्षा योजनांची भेट आपण द्यावी अशी विनंती मी केली होती. या योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत 11 कोटी कुटूंब त्यांच्याशी जोडली गेल्याची माहिती मला मिळाली आहे आणि या योजनांचा जवळजवळ निम्मा लाभ माता-भगिनींना मिळाला आहे असंही मला सांगण्यात आलं. मी सर्व माता-भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभ पर्वाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो. आज मी आपल्याशी बोलत असताना जनधन योजना मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याला एक वर्ष झालं आहे. ते काम साठ वर्षात झालं नाही ते इतक्या कमी कालावधीत होणार का? अनेक प्रश्न होते पण हे सांगताना मला आनंद होतो की सरकारच्या सर्व संबंधित विभागांनी, बँकांच्या विभागांनी या कामात त्यांचं सर्व बळ लावलं आणि यश मिळालं. माझ्या माहितीनुसार सुमारे पावणे अठरा कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. 17 कोटी 74 लाख गरीबांची श्रीमंतीही मी पाहिली. शून्य शिलकीवर खातं उघडायचं होतं. पण गरीब नागरिकांनी बचत करून 22 हजार कोटी रुपये जमा केले. अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग बँकिंग क्षेत्रही आहे आणि ही व्यवस्था गरीबाच्या घरापर्यंत पोहचावी म्हणून बँक मित्र योजनेलाही बळकटी देण्यात आली आहे. आज सव्वा लाखाहून अधिक बँक मित्र देशभरात काम करत आहेत. तरुणांना रोजगारही मिळाला आहे. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की या एका वर्षात बँकिंग क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि गरीब माणूस यांना जोडण्यासाठी 1 लाख 31 हजार आर्थिक साक्षरता शिबिरांचं आयोजन केलं गेलं. फक्त खातं उघडून थांबायचं नाहीये. आता तर हजारो नागरिक या जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेकरता पात्र आहेत आणि त्यांनी ती सुविधा घेतलीही आहे. गरीबांना बँकेतून पैसे मिळू शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि बँकेत खातं उघडणाऱ्या सर्वांना, गरीबातल्या गरीब बंधू-भगिनींना आवर्जून सांगू इच्छितो की तुमचं बँकेशी असलेलं नातं अतूट ठेवा. ही बँक तुमची आहे, आता तुम्ही तिला सोडू नका. मी बँक तुमच्यापर्यंत आणली आहे, आता तिला धरुन ठेवणं हे तुमचं काम आहे. आपल्या सगळ्यांची बँक खाती सक्रीय राहतील, हे तुम्ही कराल याचा मला विश्वास आहे.
नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या घटनांमुळे, हिंसेच्या तांडवामुळे सारा देश अस्वस्थ झाला आणि हे साहजिकच आहे की गांधीजी आणि सरदार यांच्या भूमीत काही घडलं तर साऱ्या देशाला त्याचा धक्का सर्वात आधी बसतो. त्रास होतो. परंतु अत्यंत कमी वेळात गुजरातमधल्या माझ्या सर्व सुजाण बंधुभगिनींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परिस्थिती बिघडणार नाही याकरता सक्रीय भूमिका बजावली आणि पुन्हा एकदा गुजरात शांतीच्या मार्गावर चालू लागला. शांती, एकता आणि बंधुभाव हाच योग्य मार्ग आणि आणि विकासाच्या वाटेवर चालताना खांद्याला खांदा लावून चालायचं आहे. विकास हेच आमच्या समस्यांवर उत्तर आहे.
सुफी संप्रदायातील विद्वान व्यक्तींना भेटण्याची संधी नुकतीच मला मिळाली. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला खरं सांगतो, जणू काही संगीत ऐकू यावं असा अनुभव त्यांच्या बोलण्यातून मला जाणवला. त्यांची शब्दांची निवड, बोलण्याची पध्दत, म्हणजे सूफी परंपरेत असणारी उदारता, सौम्यपणा, ज्यात संगीताची एक लय आहे, त्या साऱ्याचा प्रत्यय या विद्वानांशी बोलताना मला आला. मला खूप छान वाटलं. बहुधा इस्लामचं खरं स्वरुप जगापर्यंत पोचवायची खरी गरज आहे. सुफी संप्रदाय जो प्रेम, औदार्य यांच्याशी जोडला गेला आहे, तो हा संदेश दूरवर पोचवेल, ज्याने मानव समाजाचं भलं होईल, इस्लामचंही भलं होईल आणि मी इतरांनाही सांगतो की आपण कोणत्याही संप्रदायाचे असा, सुफी संप्रदाय, सुफी परंपरा समजून घ्या.
येत्या काही दिवसांत आणखी एक संधी मिळणार आहे. आणि हे निमंत्रण मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. जगभरातल्या अनेक देशांमधून बौध्द परंपरेतील विद्वान भारतात, बोधगया इथे येणार आहेत. मानवसमूहाच्या भल्याविषयी, कल्याणाविषयी, वैश्विक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे, बोधगया इथे येण्याचं निमंत्रण मिळाल्याबद्दल मी आनंद आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू बोधगया इथे गेले होते. जगभरातल्या अशा विद्वान व्यक्तींबरोबर बोधगया इथे जाण्याची संधी मला मिळणार आहे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
माझ्या प्रिय शेतकरी बंधू भगिनींनो, आज मी पुन्हा एकदा आपल्याला माझ्या मनातली गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. मन की बातमधून यापूर्वीही हा विषय मी मांडला होता. तुम्ही ऐकलं असेल, संसदेत माझ्या भाषणात, सार्वजनिक सभांमधून, मन की बात मधून मला ऐकलं असेल. प्रत्येकवेळी मी हेच सांगत आलो की ज्या भूमी अधिग्रहण कायद्याविषयी वाद सुरू आहे, त्या बाबतीत भारत सरकारचं मन खुलं आहे. शेतकऱ्यांच्या भल्याच्या कोणत्याही सूचना स्वीकारायची माझी तयारी आहे, हे मी वारंवार सांगत आलोय. पण आज मला माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना हे सांगायचं आहे की भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा राज्यांकडून सुचवल्या गेल्या आहेत. आग्रहपूर्वक सुचवल्या गेल्या आणि सर्वांना वाटत होतं की गावाचं, गरीब शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, शेतापर्यंत पाणी पोचण्यासाठी कालवे बांधायचे असतील, गावात वीज येण्यासाठी खांब उभारायाचे असतील, रस्ता तयार करायचा असेल, गावातल्या गरीबांसाठी घरं बांधायची असतील, गावातल्या गरीब तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर नोकरशहांच्या तावडीतून हा कायदा मोकळा करावा लागेल म्हणून या सुधारणांचा प्रस्ताव आला. पण मी बघितलं. खूप गैरसमज पसरवले गेले, शेतकऱ्यांना घाबरवलं गेलं. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, माझ्या शेतकऱ्याच्या मनात शंका तर नकोच आणि भीती तर नकोच नको. शेतकऱ्यांनी शंका घ्यावी, त्यांनी घाबरावं अशी वेळच मी येऊ देणार नाही. माझ्या देशात प्रत्येकाच्या बोलण्याला, आवाजाला महत्व आहे आणि शेतकऱ्यांच्या बोलण्याला, आवाजाला तर विशेष महत्व आहे. आम्ही एक अध्यादेश जारी केला होता, उद्या 31 ऑगस्ट रोजी त्या अध्यादेशाची कालमर्यादा संपेल आणि मी ठरवलंय की ती संपून द्यायची. याचा अर्थ असा की माझ सरकार स्थापन होण्याआधी जी स्थिती होती, ती आता पुन्हा स्थापित झाली आहे. पण त्यात एक काम अपूर्ण राहिलं होतं, ते म्हणजे 13 अशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या, असे मुद्दे होते, जे एका वर्षात पूर्ण करायचे होते, आणि म्हणून हा अध्यादेश आम्ही जारी केला होता. पण या सगळ्या वादात तो मुद्दा बाजूलाच पडला तो प्रश्न सुटलाच नाही. त्या अध्यादेशाची कालमर्यादा संपते आहे, पण ज्यामुळे शेतकऱ्यांना सरल लाभ मिळणार आहे, त्यांचा आर्थिक फायदा ज्याच्याशी थेट जोडला गेला आहे त्या 13 मुद्यांना, नियमांमध्ये बसवून आजच आम्ही अंमलात आणतो आहेात. जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही आणि म्हणून ज्या 13 मुद्यांची अंमलबजावणी याआधीच्या कायद्यात होत नव्हती ती आज आम्ही करत आहोत. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, मी खात्री देऊ इच्छितो की जय जवान जय किसान ही आमच्यासाठी केवळ घोषणा नाही. तो मंत्र आहे गावाचं, गरीबांचं, शेतकऱ्यांचं कल्याण. म्हणूनच 15 ऑगस्टला आम्ही सांगितलं होतं की केवळ कृषी विभागाची नाही तर कृषी आणि किसान कल्याण विभागाची स्थापना केली जाईल. या निर्णयाची आम्ही तातडीनं अंमलबजावणी करतो आहेात. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आता कोणतीही शंका मनात ठेवू नका आणि कुणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही घाबरू नका.
आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे. 1965 च्या युध्दाला, दोन दिवसांपूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली आणि जेव्हा 1965 च्या युध्दाचा विषय निघतो तेव्हा साहजिकच लालबहादूर शास्त्रीजींचं स्मरण होतं. जय जवान-जय किसान या मंत्राचंही स्मरण साहजिक होतं आणि भारताच्या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरणही साहजिकच होतं. 65 च्या युध्दात भारताला ज्यांच्यामुळे विजय मिळाला, त्या सर्वांना मी प्रणाम करतो, वीरांना प्रणाम करतो. इतिहासातील अशा घटनांपासून आम्हाला सदैव प्रेरणा मिळेल.
ज्याप्रमाणे गेल्या आठवड्यात सुफी संप्रदायाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मला मिळाली, तसाच एक सुखद अनुभव मला आला. देशभरातील नामवंत शास्त्रज्ञांना भेटण्याची, तासन्तास त्यांच्याबरोबर बोलायची संधी मला मिळाली. त्यांचं बोलणं ऐकण्याची संधी मिळाली आणि भारत विज्ञानाच्या क्षेत्रात, अनेक दिशांनी उत्तम प्रकारची कामं करत आहे हे जाणून मला आनंद वाटला. आमचे वैज्ञानिक खरोखच उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांच्या संशोधनाला लोकांपर्यंत कसं पोचवता येईल? यासाठी आता आम्हाला संधी मिळाली आहे. मंत्राला यंत्रात कसं रुपांतरीत करता येईल? प्रयोगशाळा आणि शेती यांची सांगड कशी घातली जाईल? एक संधी म्हणून हे पुढं न्यायला हवं. खूप नवी माहिती मला मिळाली. मी म्हणू शकतो की माझ्यासाठी हे प्रेरणादायी तर होतंच त्याचबरोबर नवं काही शिकवणारं सुध्दा होतं. आणि मी बघितलं, अनेक तरुण वैज्ञानिक किती उत्साहानं बोलत होते. कितीतरी स्वप्नं त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मन की बातमधून मागच्यावेळी मी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. या बैठकीनंतर मला वाटतंय की खूप संधी आहेत. अनेक शक्यता आहेत. मी पुन्हा सांगू इच्छितो की माझ्या तरुण मित्रांनी विज्ञानाकडे आवडीनं पहावं, आमच्या शैक्षणिक संस्थांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावं.
नागरिकांकडून अनेक पत्रं मला येतात. ठाण्याहून श्रीमान परिमल शाह यांनी शैक्षणिक सुधारणांविषयी माय जीओव्ही डॉट इन वर लिहिलं आहे. कौशल्य विकासाबद्दल लिहिलं आहे. तामिळनाडूतील चिदंबरमच्या श्रीमान प्रकाश यांनी प्राथमिक शिक्षणासाठी चांगल्या शिक्षकांच्या गरजांवर भर दिला आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांवर भर दिला आहे.
विशेषत: माझ्या तरुण मित्रांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं की खालच्या पातळीवरील नोकरीसाठी ही मुलाखत, हा इंटरव्ह्यू कशासाठी? आणि जेव्हा मुलाखतीसाठी पत्रं येतं तेव्हा प्रत्येक गरीब कुटूंब, विधवा आई या चिंतेत पडतात की कोणाची शिफारस मिळेल? कुणाच्या मदतीनं ही नोकरी मिळेल? कुणाचा वशिला लावावा लागेल? माहित नाही, काय काय शब्द वापरले जातात? सर्वांची धावाधाव होते आणि कदाचित खालच्या पातळीवरील भ्रष्टाचाराचं हेही एक कारण असावं. या खालच्या पातळीवरील निवडीसाठी तरी मुलाखतीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागू नये असं मी माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलं होतं आणि मला सांगायला आनंद होतो की इतक्या कमी कालावधीत केवळ 15 दिवस झाले आहेत, याबाबतीत सरकारनं फार वेगानं पावलं उचलली आहेत. सूचना पाठवल्या जात आहेत आणि लहान लहान पदांसाठी मुलाखतीची अट ठेवू नये या निर्णयाची आता जवळजवळ अंमलबजावणी होणार आहे. कुणाची शिफारस मिळवण्यासाठी गरीबांना धावपळ करावी लागणार नाही. शोषण होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही.
सध्या भारतात जगभरातल्या अनेक देशांमधून पाहुणे आले आहेत. आरोग्यासाठी, विशेषत: माता मृत्युदर आणि शिशू मृत्युदर कमी व्हावा यासाठी, कॉल टू ॲक्शन या शीर्षकाखाली जगातल्या 24 देशांनी मिळून भारताच्या भूमीवर विचारमंथन केलं. अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशात पहिल्यांदा अशी बैठक झाली. आपल्या देशात प्रत्येक वर्षी जवळजवळ 50 हजार माता आणि 13 लाख बालकं, प्रसूतीवेळी आणि प्रसूतीनंतर लगेच मृत्युमुखी पडतात हे दुर्दैवानं वास्तव आहे. हे चिंताजनक आणि भयावह आहे. तसं पाहिलं तर याबाबतीत बरीच सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यासाठी भारताची प्रशंसा होत आहे. पण ही संख्या काही छोटी नाही. ज्याप्रमाणे आम्ही पोलिओचं निर्मूलन केलं. जननी-शिशू यांना होणाऱ्या धनुर्वाताचं उच्चाटन केलं, ते जगानं मान्य केलं. पण आता आपल्या मातांना, नवजात अर्भकांना आपल्याला वाचवायचं आहे.
बंधू-भगिनींनो, डेंग्यूबद्दलच्या बातम्या हल्ली येत आहेत. हे खरं आहे की डेंग्यू हा प्राणघातक आहे पण त्यापासून वाचणंही सहज शक्य आहे आणि स्वछ भारत मोहिमेविषयी मी सांगतो ना त्या मोहिमेशी त्याचा थेट संबंध आहे. दूरचित्रवाणीवर आपण जाहिरात पाहतो पण लक्ष देत नाही, वर्तमानपत्रांमधून जाहिराती छापून येतात पण आम्ही बघत नाही. शुध्द पाण्याबरोबरच घरात लहान लहान वस्तू स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्याबाबतीत मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण होत आहे पण त्याकडे आमचं लक्ष जात नाही आणि कधी कधी वाटतं की आपण फार चांगल्या घरात राहतोय, सर्वत्र स्वच्छता आहे पण आपल्याच घरात, घरापाशी कुठेतरी पाणी साठलंय आणि आपणच डेंग्यूला निमंत्रण देतोय हे लक्षात येत नाही. मरण इतकं स्वस्त करू नका असं मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. जीवन अत्यंत मूल्यवान आहे. अशुध्द पाण्याकडे दुर्लक्ष, स्वच्छतेबद्दल उदासीनता ही मृत्यूची कारणं ठरावीत हे योग्य नाही. संपूर्ण देशात सुमारे 514 केंद्रांवर डेंग्यूची तपासणी विनामूल्य केली जाते. वेळेवर त्याची तपासणी करून घेतं, जीव वाचवण्यासाठी आवश्यक आहे आणि यात आपण सगळ्यांनी सहकार्य करणंही आवश्यक आहे. स्वच्छतेकडे कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे.
रक्षाबंधन ते दिवाळी हा काळ म्हणजे आपल्या देशात अनेक उत्सवांचा काळ. आमच्या प्रत्येक उत्सवाची स्वच्छतेशी सांगड घालूया, बघा हा स्वच्छतेचा गुण तुमच्या स्वभावात आपोआप येईल.
माझ्या प्रिय देशवासियांनो. आनंदाची एक बातमी आज मी आपल्याला देणार आहे. देशाकरीता प्राण अर्पण करण्याचं भाग्य आता आपल्याला मिळणार नाही पण देशासाठी जगण्याचं भाग्य मात्र निश्चित मिळालं आहे असं मी नेहमी म्हणतो.
आपल्या देशातील दोन तरुण, दोन भाऊ, महाराष्ट्राच्या नाशिकचे डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या हृदयात आदिवासींची सेवा हीच प्रबळ इच्छा आहे, त्या दोन भावांनी भारताची शान वाढवली आहे. रेस ॲक्रॉस अमेरिका ही सायकल शर्यत, अत्यंत कठीण, सुमारे 4800 किलोमीटर अंतराची अमेरिकेतली शर्यत या दोन भावांनी जिंकली. भारताचा मान वाढवला. या दोघांचं मी अभिनंदन करतो, या दोन भावांना अनेक शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे हे संगळं, टीम इंडिया-व्हिजन फॉर ट्रायबल, आदिवासींकरीता काही करून दाखविण्याच्या उद्देशानं, हे दोघं करत आहेत याचा मला विशेष आनंद वाटला बघा. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं कसे प्रयत्न करत आहे आणि हेच तर आहे-जे ऐकून उर अभिमानानं भरुन येतो.
कधीकधी समजून घेण्यात कमी पडल्यामुळे आपल्या तरुणांवर आपण अन्याय करतो. नव्या पिढीला काही कळत नाही हा जुन्या पिढीचा समज असतो. भारतात हे अनेक वर्ष सुरू आहे. पण युवकांच्या बाबतीत माझा अनुभव वेगळा आहे. त्यांच्याशी बोलून कधी कधी नव्या गोष्टी आपल्याला कळतात, शिकायला मिळतात. संडे ऑन सायकल हे व्रत मी घेतलं आहे, असं सांगणारे अनेक युवक मला भेटले. आठवड्यातून एक दिवस सायकल-डे असा काहींचा निश्चय आहे. आरोग्य, पर्यावरण यासाठी उत्तम आणि तरुण असण्याचा आनंद सगळचं साधलं जातं असं त्यांचं म्हणणं. आपल्या देशात हल्ली अनेक घरांमध्ये सायकल वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. त्यासाठी अनेक जण प्रोत्साहन देतात. पर्यावरण वाचवण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी हे चांगले प्रयत्न आहेत आणि आज माझ्या देशाच्या दोन तरुणांनी अमेरिकेत भारताचा झेंडा फडकवला, म्हणून भारतातले युवक याहीबाबतीत विचारशील आहेत याचा उल्लेख करताना मला आनंद झाला.
महाराष्ट्र शासनाचं आज मी विशेष अभिनंदन करतो. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक स्थापन व्हावं हा अनेक वर्ष रेंगाळलेला विषय महाराष्ट्रातल्या नव्या शासनानं निकाली काढला. त्या जागी आता डॉ. आंबेडकरांचं भव्य-दिव्य स्मारक उभं राहील. दलित, शोषित, पीडित, वंचित यांच्याकरता कार्य करण्याची प्रेरणा ते स्मारक आम्हाला देईल.
त्याचबरोबर लंडनमध्ये 10 किंग हेनरी रोड जिथे डॉ. आंबेडकरांचं वास्तव्य होतं तेही घर महाराष्ट्र शासनानं खरेदी केलं आहे. तिथे एक स्मारक उभं केलं जाईल. जगभरात पर्यटनासाठी जाणारे भारतीय जेव्हा लंडनला जातील तेव्हा ते स्मारक त्यांना प्रेरणा देईल. डॉ. आंबेडकरांचा गौरव करणाऱ्या या दोन्ही उपक्रमांसाठी मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, यानंतरच्या मन की बात पूर्वी तुमचे विचार माझ्यापर्यंत आवश्क पोचवा. लोकशाही, लोकांच्या सहभागातून आकाराला येते यावर माझा विश्वास आहे. खांद्याला खांदा लावून देशाला पुढे नेता येईल. आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार यंदा पावसाळयाची सुरुवात चांगली झाली. आपल्या शेतकरी बंधु, भगिनींना खरीपाच्या पेरणीसाठी याची नक्कीच मदत होईल. मनाला आनंद वाटावा अशी आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि आनंदही झाला. कडधान्ये आणि तेलबियांचा आपल्या देशात नेहमीच तुटवडा राहीला. गरीब माणसाला कडधान्ये लागतात, जेवणात, भाजीसाठी थोड तेल लागते. यावर्षी जे धान्य हाती आले आहे त्यात कडधान्य उत्पादनात 50 टक्के आणि तेलबियांच्या उत्पादनात जवळ जवळ 33 टक्के वाढ झाली याचा मला आनंद झाला. यासाठी माझ्या शेतकरी बंधु-भगिनींचे मी अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो 26 जुलै ही तारीख आपल्या देशाच्या इतिहासात नोंदली गेली आहे विजय दिवस म्हणून. या देशाच्या जमिनीशी जे नाते शेतकऱ्यांचे आहे, तेच सैनिकांचेही आहे. कारगिल युध्दात आमचा एक-एक जवान, शंभर शत्रुसैनिकांवर तुटून पडला. शत्रूची कट कारस्थाने उधळून लावताना आपल्या शूर सैनिकांनी स्वत:च्या प्राणाचीही पर्वा केली नाही. त्या सर्व सैनिकांना मी वंदन करतो.
कारगिलचे युध्द हे केवळ सीमेवर लढले गेलेले युध्द नव्हते, भारतातल्या प्रत्येक शहराचा, प्रत्येक गावाचा त्यात सहभाग होता. ज्यांचा तरुण मुलगा, भाऊ कारगिलमध्ये शत्रूशी लढत होता, त्या मातांसाठी, बहिणीसाठी ही लढाई झाली. लग्नासाठी हातावर काढलेली मेंदी अजून वाळलीही नव्हती अशा तरुणींनी हे युध्द केले, आपल्या धाडसी तरुण मुलाकडे पाहून, ज्यांना पुन्हा तरुण झाल्यासारखे वाटले अशा वडिलांनी ही लढाई केली, आपल्या वडिलांचे बोट धरुन ज्याने अजून चालणे शिकले नव्हते अशा मुलांनी ही लढाई केली. या सर्वांच्या बलिदानामुळेच आज भारत जगासमोर ताठ मानेने बोलू शकतो. म्हणूनच आजच्या या कारगिल विजय दिनी मी या सर्व सेनानींना प्रणाम करतो.
माझ्यासाठी 26 जुलै या तारखेचे आणखीही एक वेगळे महत्त्व आहे. 2014 मध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच 26 जुलैच्या दिवशी MyGov मोहिमेची आम्ही सुरुवात केली. प्रत्येक नागरिकाला विकास कामात जोडण्यासाठी, लोकशाहीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हे संकेतस्थळ आम्ही सुरु केले. आणि आज एक वर्षानंतर, मला हे सांगायला आनंद होतो की, जवळजवळ दोन कोटी नागरिकांनी मायजीओव्ही या संकेतस्थळाला भेट दिली. सुमारे साडेपाच लाख नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या, आणि विशेष म्हणजे पन्नास हजारापेक्षा अधिक नागरिकांनी PMO APPLICATIONS वर सूचना नोंदवल्या, त्यासाठी त्यांनी वेळ काढला, हे काम महत्त्वाचे मानले. मनापासून काही गोष्टी सुचवल्या याचा मला विशेष आनंद होतो.
किती महत्त्वाचे मुद्दे या नागरिकांनी मांडले. कानपूरच्या अखिलेश वाजपेयी यांनी सुचवले की, अपंग व्यक्तींसाठी रेल्वेच्या IRCTC संकेतस्थळाच्या माध्यमातून वेगळी तिकीटे का दिली जाऊ नयेत ? अशा व्यक्तींना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी त्रास होतो हे योग्य आहे का ? तसे पाहिले तर ही गोष्ट वरवर छोटी दिसते, पण सरकारला ही गोष्ट लक्षातच आली नव्हती, यावर कुणी विचारच केला नव्हता. पण अखिलेश यांनी मांडलेल्या मुद्दयावर सरकारने गांभीर्याने विचार केला आणि आज आपल्या अपंग बधु-भगिनींसाठी, तिकीट आरक्षणासाठी वेगळी व्यवस्था अंमलात आली आहे. हल्ली नवीन लोगो तयार होतात, टू लाइन तयार होतात, कार्यक्रम धोरणे यांची आखणी होते. मायजीओव्ही वर खूप सकारात्क सूचना येतात. शासनव्यवस्थेत नवे वारे वाहत आहेत याचा अनुभव येतो आहे. एका नव्या चेतनेची जाणीव होत आहे. येत्या पंधरा ऑगस्ट रोजी माझ्या भाषणात मी कोणते मुद्दे मांडावेत यासाठी MyGov सूचना यायला सुरुवात झाली आहे.
चेन्नईहून सुमित्रा राघवचारी यांनी बऱ्याच गोष्टी सुचवल्या आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ यावर बोला, निर्मल गंगा, स्वच्छ भारत यावर बोला. यातून माझ्या मनात एक विचार आला. या पंधरा ऑगस्ट रोजी माझ्या भाषणात काय असावे हे तुम्ही मला सुचवाल का? MyGov या संकेतस्थळावर सुचवा, आकाशवाणीकडे पत्र पाठवा, पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र पाठवा. 15 ऑगस्टच्या माझ्या भाषणात काय असावे ? यासाठी देशातल्या नागरिकांनी मुद्दे सुचवावेत हा एक चांगला विचार आहे असे मी मानतो. तुम्ही नक्कीच चांगल्या सूचना कराल असा मला विश्वास आहे.
एका गोष्टीची मला काळजी वाटते, ती तुमच्यापर्यंत पोचवितो. मला काही कोणाला उपदेश करायचा नाही, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यावर असलेल्या जबाबदारीतून पळवाट काढण्याचा माझा उद्देश नाही.
नुकतेच दोन दिवसांपूर्वी दिल्लीतल्या एका अपघाताचे दृश्य मी पाहिले व अपघातानंतर तो स्कूटर चालक सुमारे दहा मिनिटे, जखमी अवस्थेत विव्हळत होता. त्याला काहीच मदत मिळाली नाही. मलाही अनेक जण सुचवतात की रस्ता सुरक्षा, वाहतूक सुरक्षा यावर तुम्ही बोला. नागरिकांना जागृत करा. बेंगलूरुच्या होशाकोटे अक्षय यांनी, पुण्याच्या अमेय जोशींनी, कर्नाटकातल्या मुरबिदरीच्या प्रसन्ना काकुंजे यांनी आणखी बऱ्याच जणांनी याच मुद्दयावर त्यांना वाटणारी चिंता व्यक्त केली आहे. आणि या सगळयांना वाटणारी काळजी रास्त आहे योग्य आहे. रस्ता अपघातात जीव गमावणाऱ्यांची आकडेवारी पाहिली तर काळीज हेलावते. रस्ता अपघातात प्रत्येक चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतोय. यात चिंता वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे या मृत्यू पावणाऱ्यांमध्ये एक तृतीयांश व्यक्ती या 15 ते 25 या वयोगटातल्या असतात. मृत्यूचा हा आघात पूर्ण कुटुंब उध्वस्त करतो. याबद्दल शासनाने जे काम करायला हवे ते केलेच पाहिजे. पण पालकांना मी एक विनंती करतो. आपल्या मुलांना मग ते दुचाकी चालवत असोत की चारचाकी, सुरक्षा खबरदारी या सगळयाची शिकवण या मुलांना घरातूनच मिळेल, कुटुंबाकडून मिळेल त्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. “बाबा लवकर घरी” या असे ऑटो रिक्षामागे लिहिलेले आपण बघतो ते वाचल्यावर थेट मनाला, हृदयाला जाऊन भिडते. यासाठी मी हे सांगतो आहे. याबाबतीत सरकारने बरीच नवी धोरणे आखली आहेत, पुढाकार घेतला आहे. रस्ता सुरक्षेबद्दल नागरिकांना प्रशिक्षित करणे, रस्ते आखणीचे तंत्र असो किंवा अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याचा मुद्दा असो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वाहतूक आणि सुरक्षा विधेयक आम्ही मांडणार आहोत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा धोरण, आणि रस्ता सुरक्षा कृती आराखडा यांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले येत्या दिवसात उचलण्याचा आमचा विचार आहे.
आणखी एक योजना आम्ही आणतोय, नंतर त्याचा विस्तार होईल. ती योजना म्हणजे कॅशलेस ट्रीटमेंट. गुडगाव, जयपूर, बडोदा, येथपासून अगदी मुंबई, रांची, रणगांव, मोंडीया येथील महामार्गांसाठी ही कॅशलेस ट्रीटमेंट. त्याचा अर्थ असा की अपघातात जखमी झालेल्यांना अपघातानंतरच्या 50 तासांमध्ये तात्काळ वैद्यकीय मदत कशी मिळेल, याकडे तातडीने लक्ष देणे जवळ पैसे आहेत की नाहीत, बिल कोण भरेल ही सर्व काळजी बाजूला सारुन अपघातग्रस्तांना उपचार मिळणे याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. अपघाताची माहिती देण्यासाठी 1033 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक पूर्ण देशभरात, रुग्णवाहिकेची सोय या सगळया गोष्टी यात असतील. पण हे सगळे अपघात झाल्यानंतर. मुळात अपघात घडणारच नाही याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण एक एक जीव तसेच प्रत्येकाचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे.
कधी कधी मी सांगतो, की कर्मचाऱ्याने कर्मयोगी व्हावे. गेल्या काही दिवसात काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्याबद्दल आपल्याशी बोलावे असे मला वाटले. कधी कधी होते असे की नोकरी करता करता व्यक्ती थकते, आणि फार थोडया दिवसांचा प्रश्न असेल तर पगार मिळतोय ना मग करु काम, अशी भावना असते. पण नुकतीच मला रेल्वेतल्या एका कर्मचाऱ्याबद्दल माहिती मिळाली. नागपूर विभागात विजय बिस्वाल या नावाचे एक तिकीट तपासनीस आहेत. चित्रं काढणे हा त्यांचा छंद. वेगवेगळया ठिकाणी जाऊन त्यांना चित्रे काढता आली असती आपण बिस्वाल यांनी रेल्वेलाच आपले आराध्य मानले आणि रेल्वेशी संबंधित गोष्टींची चित्रे काढली. यामुळे होते काय त्यांना आनंद तर मिळतोच शिवाय काम करण्याची आवड निर्माण होते. बिस्वाल यांचे उदाहरण पाहून मला आनंद झाला . पण हाती घेतलेल्या कामात चैतन्य कसे आणायचे ? आपली आवड, कला क्षमता यांचा आपल्या कामाशी कसा मेळ घालयचा हे विजय बिस्वाल यांनी दाखवले आहे. त्यांच्या चित्राबद्दल आता बोलले जाईल अशी शक्यता आहे.
आणखी एका गोष्टीची माहिती मला मिळाली. मध्य प्रदेशमधल्या, हरदा जिल्हयातल्या सरकारी अधिकाऱ्यांच्या पूर्ण गटाने, संघाने सुरु केलेले एक वेगळे काम, वेगळी मोहिम माझ्या मनाला स्पर्शून गेली. त्यांचे हे काम मला आवडले. या अधिकाऱ्यांनी सुरु केली मोहिम “ऑपरेशन मलयुध्द” हे ऐकताना आपल्याला वाटेल की काहीतरी वेगळी गोष्ट आहे. पण स्वच्छ भारत अभियानाला एक नवे वळण त्यांनी दिलेय, ही त्यातली खरी महत्त्वाची बाब आहे. ब्रदर नंबर वन या नावाची मोहिम या अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हयात राबवली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जो भाऊ आपल्या बहिणीला शौचालय बांधून देईल तो सर्वोत्तम भाऊ अशी ती मोहीम आहे. अधिकाधिक नागरिकांना प्रेरित करुन ही मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार या गटाने केला आहे. संपूर्ण जिल्हयात कुठेही माता भगिनींना शौचासाठी उघडयावर जायला लागू नये हा त्यातला मूळ उद्देश. रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून हे काम ते करत आहेत. पहा रक्षाबंधन या संज्ञेचा अर्थ कसा बदलला ते. हरदा जिल्हयातल्या या सरकारी अधिकाऱ्यांच्या चमूचे मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो.
नुकतीच एक बातमी मी ऐकली. कधी कधी अशा छोटया गोष्टी माझ्या मनाला सुखावून जातात, म्हणून तुमच्यापर्यंत ते पोचवतोय. छत्तीसगडच्या, राजनंदगावजवळ केश्ला नावाचे एक खेडे आहे. या गावातल्या लोकांनी प्रयत्नपूर्वक मोहिम राबवून शौचालये बांधली. आता या गावातील कुणीही व्यक्ती शौचविधीसाठी उघडयावर जात नाही आणि जेव्हा शौचालय बांधण्याचे काम पूर्ण झाले, तेव्हा एखादा सण साजरा करावा तसा केश्ला गावाने आनंदोत्सव साजरा केला. समाजजीवनातील मूल्यांमध्ये कसा बदल होतोय, लोकांची मानसिकत कशी बदलते आहे, आणि देशाचे नागरिक देशाला प्रगतीपथावर कसे नेत आहेत याची ही उत्तम उदाहरणे माझ्यासमोर येत आहेत.
गुवाहाटीहून भावेश डेका यांनी पूर्वोत्तर प्रांताशी निगडीत प्रश्नांबद्दल लिहिले आहे. तसे पाहिले तर पूर्वोत्तर प्रांतातले लोक सक्रीय असतात. ते अनेक गोष्टींबद्दल लिहितात. चांगली गोष्ट आहे ही आज एक आनंदाची बातमी या भागातील नागरिकांना मी देणार आहे. पूर्वोत्तर प्रांतासाठी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात एका वेगळया मंत्रालयाची स्थापना करण्यात आली होती. डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्ट रिजन डोनर असे त्याचे नाव. या डोनर मंत्रालयाबाबत एक महत्त्वाचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. या भागाचा विकास करायचा असेल तर दिल्लीत बसून कसा होणार ? म्हणून सर्वांनी मिळून ठरवले की भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी पूर्वोत्तर प्रांतात जायचे. नागालँड असो, मणिपूर असो, अरुणाचल असो, त्रिपुरा असो, आसाम असो वा सिक्कीम, हे अधिकारी तिथे जातील आणि सात दिवस तिथेच राहतील. जिल्हा मुख्यालयांमध्ये जातील. गावागावात जातील, तेथील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलतील, लोक प्रतिनिधी, नागरिक यांच्याशी हे अधिकारी बोलतील. त्यांच्या अडचणी जाणून घेतील या अडचणी सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडून जे करणे शक्य आहे,ते करतील. या प्रयत्नांचे चांगले परिणाम नजीकच्या काळात दिसतील आणि जे अधिकारी तिथे जाऊन येतील त्यांनाही जाणवेल की अशा सुंदर प्रदेशासाठी, चांगल्या लोकांसाठी, विकास प्रक्रिया राबवलीच पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवल्याच पाहिजेत. हा निश्चिय करुन हे अधिकारी दिल्लीत परततील तेव्हा पूर्वोत्तर प्रांताच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणे त्यांच्यासाठी सोपे होईल. एक चांगला प्रयत्न, दिल्लीहून दूर पूर्वेकडे जाण्याचा प्रयत्न, ॲक्ट ईस्ट पॉलिसी असे जे मी म्हणतो ना ते हेच.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मंगल मोहिमेचे यश ही आपल्या सर्वांना अभिमान आणि आनंद वाटावा अशी गोष्ट. नुकतेच भारताने पीएसएलव्ही-28 मधून इंग्लंडचे पाच उपग्रह आकाशात सोडले. भारताने आजवर अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमध्ये हे सर्वाधिक वजनाचे उपग्रह होते. ही बातमी आपल्याला कळते पण तिच्याकडे आपले लक्ष जात नाही. पण आपल्यासाठी ही एक मोठी ध्येयप्राप्ती आहे. पण कधी कधी माझ्या मनात असाही विचार येतो की आजच्या तरुणांना आपण विचारले की, भविष्यात काय व्हायचे त्यांनी ठरवले आहे? तर शंभरात एखाद दुसरा विद्यार्थीच म्हणेल की त्याला वैज्ञानिक व्हायचे आहे. विज्ञानाविषयी वाटणारी अनास्था ही निश्चितच काळजीत टाकरणारी आहे, चिंता वाटावी अशीच आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे विकास प्रक्रियेचा गाभा. नव्या पिढीने वैज्ञानिक होण्याची स्वप्न पाहावी, संशोधनात रस घ्यावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळायला हवे. त्यांच्या क्षमतेचा वापर होणे ही आजची मोठी गरज आहे. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी आरंभ केलेले राष्ट्रीय अविष्कार अभियान भारत सरकारने आणले आहे. ज्या मुलांना वैज्ञानिक होण्याची इच्छा आहे, त्या मुलांना आयआयटी, एनआयटी, केंद्रीय आणि राज्य पातळीवरील विद्यापीठांमधून मार्गदर्शन या अभियानाअंतर्गत मिळेल, प्रोत्साहन दिले जाईल, त्याकडे लक्ष दिले जाईल. शासनामधल्या आयएएस अधिकाऱ्यांनी, आठवडयात दोन चार तास जवळच्या एखाद्या शाळेत, महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधावा असे मी या अधिकाऱ्यांना नेहमी सांगतो. त्यांचा अनुभव, शक्ती या नव्या पिढीला उपयोगी पडेल.
एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आम्ही सुरु करायचे ठरवले आहे. या देशातल्या प्रत्येक गावात 24 तास वीज मिळायला हवी की नको ? हे काम कठीण आहे, पण करायचे आहे. आम्ही याची सुरुवात केली आहे. येत्या काही वर्षात सगळया गावांमध्ये 24 तास वीज उपलब्ध असेल. परीक्षेच्या काळात वीज नाही म्हणून मुलांच्या अभ्यासात खंड पडायला नको. गावात एखादा लहान मोठा व्यवसाय, उद्योग सुरु करायचा असेल तर वीज असेल. काही ठिकाणी, मोबाईल चार्ज करण्यासाठी, दुसऱ्या गावात जावे लागते. जे फायदे शहरवासीयांना मिळतात ते गावातल्या लोकांना मिळायला हवेत. गरीबांच्या घरापर्यंत पोहोचायला हवेत आणि म्हणूनच आम्ही सुरु केला आहे “दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती कार्यक्रम” देश विशाल आहे. त्यात लाखो खेडी आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचे आहे. दुर्गम भागात पोहचायचे आहे, घरा-घरापर्यंत पोहोचायचे आहे. हे कठीण आहे हे मला माहित आहे. तरी त्या गरीबांसाठी करायचे आहे. आम्ही हे करु, त्याची सुरुवात केली आहे, हे नक्की करु.
आज “मन की बात”मधून वेगवेगळया विषयांवर आपल्याशी बोलावे असे मला वाटले. तसे पहायला गेले तर आपल्या देशात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक सण, उत्सव साजरे होतात. आपणा सर्वांना त्यासाठी माझ्या शुभेच्छा. 15 ऑगस्टसाठी आपल्या सूचना, नवीन कल्पना अवश्य पाठवा, मला त्या निश्चितच उपयोगी पडतील.
अनेक अनेक धन्यवाद.
Namaskar, My Dear Countrymen!
Last time in Mann ki Baat I had requested you to send me memorable pictures if you go out on a vacation anywhere in India and if you happen to find them, kindly post them under the ‘Incredible India’ hashtag. When Isaid that, I had never imagined that it would get such an immense response. Lakhs of people have posted photos on Twitter, Facebook and Instagram. I can say that India is full of diversities and I was able to witness so many magnificent scenes in those pictures; be it of architecture, art, nature, waterfalls, mountains, rivers or seas. Government of India had never thought that in terms of tourism you all could contribute in such a massive way. I liked some pictures so much that I re-tweeted them. And as I understand, if some one would not have posted the picture of Belum caves in Andhra Pradesh many people would have never come to know that something like that exists in our country. Madhya Pradesh’s Orcha Fort is another example of that. We assume Rajasthan to be a state with scarcity of water, but when someone sends a photo of Menal waterfall, it is a matter of great surprise. Really, a tremendous work has been done. We will promote and also continue doing such work and the entire world will watch it, entire nation will watch it and our new generation will also watch it.
My beloved countrymen, though you have elected me as the Prime Minister of the country but at times, the human in me shuns all posts and prestige associated with it and submerges oneself within it. I can say that 21st June, the International Yoga Day affected me in the same manner. At that time, when I proposed the International Yoga Day, it was just an idea. But the scene that was witnessed on 21st June was such that wherever the sun dawned, wherever its rays reached, there was not a single landmass wherein it was not welcomed by way of Yoga. We can say with conviction that the sun never sets in the world of Yoga practitioners.
The way Yoga was received and was welcomed with open arms around the world, there would not be any Indian who would not be proud of it. I too got delighted. And when the people of France chose River Seine and Eiffel Tower in which they take pride to do Yoga, they gave an equal status to it as River Siene and Eifel Tower. In New York people did yoga at Times Square. If we think about Sydney, Australia then the picture of Opera House comes to our mind. The citizens of Australia gave equal respect to yoga and did yoga at the Opera House. Whether it is North America, Silicon Valley or Milan’s Duomo Cathedral it is a matter of great pride for us. On 21st June when I saw Mr. Ban Ki-Moon, UN Secretary General doing yoga at UN Headquarters, I was really delighted. Similarly, UN Peace Keeping Force did a spectacular display of Yoga. In India, our soldiers too were doing yoga in Siachen on white sheet of snow and on sea too, wherever our naval ships are posted, the yoga program was being carried out by Indian Navy. Delhi made it to the Guinness Book of World Records . Rajpath turned into the Yogpath that day. I am thankful to India and the rest of the world and can say that the International Yoga Day was not for namesake. It seemed as if that from every corner of the world, there was a new inquisitiveness, new joy, new hope and new connection.
Few days back, when I tweeted a photo of a Vietnamese child doing yoga, it was such a sweet photo that it got a lot of attention from the entire world. Everybody, be it men-women, old-young, village-city, developed or developing countries, everybody got connected with it. Yoga in true terms, became the core reason to connect the entire world. I do not know how the intellectual class, elites of the world would analyze this event. But I can feel and every Indian can experience that the whole world is very curious to know more about India. Curiosity towards India has increased. The world wants to know about the values, the rituals and the heritage of India. It is our responsibility that without any artificiality we share our legacy and introduce ourselves to the world. We can only do this when we ourselves are proud of our traditions.
At times, we are so familiar with our values that we don’t feel there is anything new in them but we ourselves do not know that our family values are considered to be a big thing in the entire world. Why don’t we familiarize the outside world with our family values? The world would be very surprised to know about them. I am sure, they would be intrigued. There are many things that our forefathers have given to us which are the best and the entire world also has the right on those things. The success of International Yoga day has brought in a new responsibility along with it. It is our responsibility that we gift supreme Yoga teachers to the world. It is our responsibility that we can see the entire tradition of Yoga on one platform from the Universe.
I request the youngsters, especially the IT professionals, that all of you should come together to create an Online Yoga Activity program. We all should come to know about all the Yoga organizations, Yoga teachers and all the necessary information about the Yoga from this online program. One database must be prepared and I believe you can do it. One must start from somewhere and it would surely turn out to be a great power. I have seen and learnt from the perspective of recent occurrences that a government that works and the government that is action-oriented can bring in results if the targets are set. We should not forget that the only voice that could be heard one year ago was that nothing happens, nothing happens, nothing happens.
Can you imagine that there is a department under Government named Ayush. Nobody has paid attention towards this department. The only mention Ayush in some corner of the newspaper being a small department is once in 2 to 5 years. But it led on the International Yoga Day. It was this small department that organized this event in the entire world. Therefore, this is an example that if there is an aim then even a small department can do a supreme job.
In the last few days, the world saw how we saved people from Yemen to Afghanistan. In a few hours-, we reached Nepal and helped people over there. When people wanted to open an bank account under the Government’s new scheme of Jan Dhan Yojana, how the people working in bank helped them to do so and connected millions of Indians to the bank.
On 15th August last year, when I appealed from the Red Fort for toilets in schools, I had said that by next 15th August we have to complete this task. The work which could not be completed in last 60 years was promised to be completed by the end of one year. The promise was really daring. Almost four and half lakh toilets were to be built but I can say it with satisfaction that though 15th August is still far off, the work of constructing toilets by the people is on the verge of completion.
This means that the Government, people and Government workers, all want to work for the country. If we pledge to work in an unselfish manner “Welfare for All, Happiness for All” then the Government will also work efficiently. The people who are a part of the government will also work efficiently and the people of the nation will welcome them with open arms.
I have experienced this. This is the true strength that drives a nation forward. Last month, we had launched three Insurance schemes. I had launched them from Kolkata and it has received such a commendable response in such a short span of time. There have been very few steps which have been taken from the perspective of social security but by way of these three schemes we are taking a big leap. In such a short time span more than 10 crore people have become a part of these schemes but we have to take it further. I have a thought which I want to put forth before you. Rakshabandhan comes in the month of August. Can’t we start a massive movement before this festival and make every women, be it our mother or sister, a part of this, thereby giving benefit to them under this Insurance program. Be it a sister who is a domestic help in your home or your own sister why can’t we gift them a Rs. 12 or Rs. 330 scheme on Rakshabandhan for their entire life. This can be a big gift for a sister from their brother. Why can’t we set the eve of rakshabandhan as a target and in a number of 2 crore, 5 crore, 7 crore and 10 crore … try to reach the sisters so that they can reap the benefit of this scheme. Let’s come together and try to work together towards the completion of this pledge.
Whenever I hold a Mann ki Baat session, many people send me suggestions. This time many people have suggested that I say something about the monsoons. Yogesh Dandekar from Nagpur, Harshvardhan ji from Mysore, Praveen Nadkarni ji, Divyanshu Gupta ji have all asked me to say something about the monsoon in this session of Mann ki Baat. They have sent in some really good suggestions. And this is a season of happiness. And each one of us, whatever the age is… definitely tempted to enjoy the first showers of the monsoon. I am sure, you too might be enjoying the rains with bhajiyas, pakoras, corn and a hot cup of tea. Just as the rays of the sun give us life, similarly rainfall provide us life and sustenance. Every drop of water is precious. As a responsible citizen and as a member of the society, we will have to cultivate the habit of conserving every drop of water. It should be our pledge that water from the villages stays in the villages and water for the cities remains available for them. If the rain water does not flow away, it goes into the earth , then the aquifers get recharged and the year long water woes get resolved. Rain water harvesting is not a new concept. It is being practiced over the centuries. Be it check dams, watershed development, small lakes or the small ponds in fields, we need to save the precious waters everywhere. I always tell people, that if you go to Porbander, the birth place of Mahatma Gandhi, you will be able to see a two hundred year old underground water tank which got directly recharged with the rain water. You can still see it. If you ever go there, do visit the place. And you will find that even after two hundred years it is still functional, brimming with water and the water does not even stagnate. Porbander is a coastal city, so potable water was collected through the rains for the entire year. Even in those times such a lot of care was taken. We can too do the same. This should in fact become a mass movement. Each and every village should have the facilities for rain water harvesting.
Similarly, we find greenery so pleasing to our eyes. We all like greener surroundings. Gardens and trees bring in an element of freshness in our lives. This monsoon season, there should be mass plant sowing campaigns conducted by youth and social organizations. And I can take a leaf from my personal experience and offer you a suggestion which has been very successful. This is an intensely rural technology. Whenever you sow a plant, place an earthen pot near it. You just need to fill it once or twice in a month. You will see how fast the plant grows into a lush green tree. I have even been telling the farmers to plant trees on the boundaries of their fields instead of putting barricades. These will become your biggest asset in the long run.
It is true that rains are enjoyable and bring in a lot of fun at the same time. It is also true that rains also bring in many diseases. Doctors get to see so many patients that they hardly get the time to breathe. We all know that rains cause many water borne diseases. Increased moisture in the environment leads to bacterial growth and so, keeping the environment clean becomes important. Cleanliness is very important in monsoons. It is often requested to consume safe drinking water. Most of the people boil and drink water during this season. It has its own benefits. And this is true that the more care we take, healthier we would be. We need monsoons and we need water but we also need to stay healthy.
Dear citizens, we have recently launched three schemes for the people in the cities. We have around 500 small cities. Our policy is ‘Waste to Wealth’. We can earn from waste too. Garbage can be recycled to make fertilizers, bricks and even electricity. Contaminated water can be recycled to make it clent and be used for irrigation in the fields. We have to take this movement forward.
In the Amrut scheme, we have launched a massive campaign and taken up initiatives to improve the quality of life in our cities. We should become a country which is able to match the living standards of the world. We should have smart cities, comparable to world standards. And yet at the same time, the poorest of poor person should have an accommodation of his own and that too complete with water, electricity, sanitation and access to a school. In 2022 when India celebrates its 75 years of Independence, we wish that every Indian has a house of his own. Keeping all this in mind, we have launched three major schemes. I am positive that these schemes will bring about a qualitative difference in the lives of the urban people.
I am myself connected to you via the social media. I keep getting many new suggestions and new ideas and also good and bad information about our government. And sometimes it so happens that a small comment from an individual in some remote village in India conveys something that just touches our hearts. You are aware that the government has launched “Beti Bachao Beti Padhao” programme. But you can’t imagine the force that is lent to the programme when a village or a society adopts it. A few days back a Sarpanch in a small remote village of Haryana, Sri Sunil Jaglan ji launched ‘Selfie with Daughter’ campaign. Such an environment was created that every father wished to click a selfie of himself with his daughter and post it on the social media.
I liked this idea, and that too for a special reason. In Haryana, the number of girls in comparison to boys is dismally low. Around another 100 districts in the country have a similar dismal situation of skewed sex ratio. But it is the worst in Haryana. In that very same Haryana, if a Sarpanch of a small indistinct village lends this meaning to the “Beti Bachao Beti Padhao” programme, then I certainly get overwhelmed. It makes me so happy and it gives me a new hope and I do express my happiness. I request you all to take a selfie with your daughter and post it on #selfie with daughter. And do not forget to post a tagline around the theme of “Beti Bachao Beti Padhao” with it, whatever be the language it can be in Hindi, English, your mother tongue or your native language. And I promise to re-tweet the most inspirational tagline with you and your daughter’s selfie. We can turn “Beti Bachao Beti Padhao” into a mass movement. I urge you all to take forward the programme launched by Sri Sunil in Bibipur village of Haryana. I request you all to post on #selfie with daughter. Lets us all enjoy the rising honour and prestige of our daughters and see how joyful this entire experience of “Beti Bachao Beti Padhao” becomes. Let us all rid ourselves of this bad name that we have for not respecting our daughters.
So my best wishes to you for the coming monsoon season. May all of you enjoy the rains. Make our country clean and green. And remember, the International Yoga day was not a single day initiative. Continue practicing Yoga, then see what difference it makes to you and your life. And I say this from my experience. Please take this forward. Make Yoga a part of your life. And that initiative regarding Incredible India, do keep posting a picture of whichever part of the country you go to. The country and the world will awaken to our diversity. I felt that the handicrafts did not receive due attention. Do make it a point to post the handicrafts of the local region you visit. There are so many things that people around you might be making, the poor as well as the skilled might be creating. Do keep posting their pictures regularly. We have to expand our reach to the world and make India known to the world. We have an easy medium at our disposal and so we will all do it.
My dear countrymen, that is all for today. I shall meet you again in the next edition of Mann ki Baat. Many people expect me to announce some huge schemes during this programme. But I am working day and night towards those. This is my time for some light conversation with you all. This gives me immense pleasure.
Thank You Very Much!
मेरे प्यारे देशवासियो, पिछली बार जब मैंने आपसे मन की बात की थी, तब भूकंप की भयंकर घटना ने मुझे बहुत विचलित कर दिया था। मन बात करना नहीं चाहता था फिर भी मन की बात की थी। आज जब मैं मन की बात कर रहा हूँ, तो चारों तरफ भयंकर गर्म हवा, गर्मी, परेशानियां उसकी ख़बरें आ रही हैं। मेरी आप सब से प्रार्थना है कि इस गर्मी के समय हम अपना तो ख़याल रखें... हमें हर कोई कहता होगा बहुत ज़्यादा पानी पियें,शरीर को ढक कर के रखें... लेकिन मैं आप से कहता हूँ, हम अपने अगल-बगल में पशु-पक्षी की भी दरकार करें। ये अवसर होता है परिवार में बच्चों को एक काम दिया जाये कि वो घर के बाहर किसी बर्तन में पक्षियों को पीने के लिए पानी रखें, और ये भी देखें वो गर्म ना हो जाये। आप देखना परिवार में बच्चों के अच्छे संस्कार हो जायेंगें। और इस भयंकर गर्मी में पशु-पक्षियों की भी रक्षा हो जाएगी।
ये मौसम एक तरफ़ गर्मी का भी है, तो कहीं ख़ुशी कहीं ग़म का भी है। एग्ज़ाम देने के बाद जब तक नतीजे नहीं आते तब तक मन चैन से नहीं बैठता है। अब सी.बी.एस.ई., अलग-अलग बोर्ड एग्ज़ाम और दूसरे एग्ज़ाम पास करने वाले विद्यार्थी मित्रों को अपने नतीजे मिल गये हैं। मैं उन सब को बधाई देता हूँ। बहुत बहुत बधाई। मेरे मन की बात की सार्थकता मुझे उस बात से लगी कि जब मुझे कई विद्यार्थियों ने ये जानकारी दी, नतीजे आने के बाद कि एग्ज़ाम के पहले आपके मन की बात में जो कुछ भी सुना था, एग्ज़ाम के समय मैंने उसका पूरी तरह पालन किया था और उससे मुझे लाभ मिला। ख़ैर, दोस्तो आपने मुझे ये लिखा मुझे अच्छा लगा। लेकिन आपकी सफलता का कारण कोई मेरी एक मन की बात नहीं है... आपकी सफलता का कारण आपने साल भर कड़ी मेहनत की है, पूरे परिवार ने आपके साथ जुड़ करके इस मेहनत में हिस्सेदारी की है। आपके स्कूल,आपके टीचर, हर किसी ने प्रयास किया है। लेकिन आपने अपने आप को हर किसी की अपेक्षा के अनुरूप ढाला है। मन की बात, परीक्षा में जाते-जाते समय जो टिप मिलती है न, वो प्रकार की थी। लेकिन मुझे आनंद इस बात का आया कि हाँ, आज मन की बात का कैसा उपयोग है, कितनी सार्थकता है। मुझे ख़ुशी हुई। मैं जब कह रहा हूँ कहीं ग़म, कहीं ख़ुशी... बहुत सारे मित्र हैं जो बहुत ही अच्छे मार्क्स से पास हुए होंगे। कुछ मेरे युवा मित्र पास तो हुए होंगे, लेकिन हो सकता है मार्क्स कम आये होंगे। और कुछ ऐसे भी होंगे कि जो विफल हो गये होंगे। जो उत्तीर्ण हुए हैं उनके लिए मेरा इतना ही सुझाव है कि आप उस मोड़ पर हैं जहाँ से आप अपने करियर का रास्ता चुन रहे हैं। अब आपको तय करना है आगे का रास्ता कौन सा होगा। और वो भी, किस प्रकार के आगे भी इच्छा का मार्ग आप चुनते हैं उसपर निर्भर करेगा। आम तौर पर ज़्यादातर विद्यार्थियों को पता भी नहीं होता है क्या पढ़ना है, क्यों पढ़ना है, कहाँ जाना है, लक्ष्य क्या है। ज़्यादातर अपने सराउंन्डिंग में जो बातें होती हैं, मित्रों में, परिवारों में, यार-दोस्तों में, या अपने माँ-बाप की जो कामनायें रहती हैं, उसके आस-पास निर्णय होते हैं। अब जगत बहुत बड़ा हो चुका है। विषयों की भी सीमायें नहीं हैं, अवसरों की भी सीमायें नहीं हैं। आप ज़रा साहस के साथ आपकी रूचि, प्रकृति, प्रवृत्ति के हिसाब से रास्ता चुनिए। प्रचलित मार्गों पर ही जाकर के अपने को खींचते क्यों हो? कोशिश कीजिये। और आप ख़ुद को जानिए और जानकर के आपके भीतर जो उत्तम चीज़ें हैं, उसको सँवारने का अवसर मिले, ऐसी पढ़ाई के क्षेत्र क्यों न चुनें? लेकिन कभी ये भी सोचना चाहिये, कि मैं जो कुछ भी बनूँगा, जो कुछ भी सीखूंगा, मेरे देश के लिए उसमें काम आये ऐसा क्या होगा?
बहुत सी जगहें ऐसी हैं... आपको हैरानी होगी... विश्व में जितने म्यूज़ियम बनते हैं, उसकी तुलना में भारत में म्यूज़ियम बहुत कम बनते हैं। और कभी कभी इस म्यूज़ियम के लिए योग्य व्यक्तियों को ढूंढना भी बड़ा मुश्किल हो जाता है। क्योंकि परंपरागत रूप से बहुत पॉपुलर क्षेत्र नहीं है। ख़ैर, मैं कोई, कोई एक बात पर आपको खींचना नहीं चाहता हूँ। लेकिन, कहने का तात्पर्य है कि देश को उत्तम शिक्षकों की ज़रूरत है तो उत्तम सैनिकों की भी ज़रूरत है, उत्तम वैज्ञानिकों की ज़रूरत है तो उत्तम कलाकार और संगीतकारों की भी आवश्यकता है। खेल-कूद कितना बड़ा क्षेत्र है, और खिलाडियों के सिवाय भी खेल कूद जगत के लिए कितने उत्तम ह्यूमन रिसोर्स की आवश्यकता होती है। यानि इतने सारे क्षेत्र हैं, इतनी विविधताओं से भरा हुआ विश्व है। हम ज़रूर प्रयास करें, साहस करें। आपकी शक्ति, आपका सामर्थ्य, आपके सपने देश के सपनों से भी मेलजोल वाले होने चाहिये। ये मौक़ा है आपको अपनी राह चुनने का।
जो विफल हुए हैं, उनसे मैं यही कहूँगा कि ज़िन्दगी में सफलता विफलता स्वाभाविक है। जो विफलता को एक अवसर मानता है, वो सफलता का शिलान्यास भी करता है। जो विफलता से खुद को विफल बना देता है, वो कभी जीवन में सफल नहीं होता है। हम विफलता से भी बहुत कुछ सीख सकते हैं। और कभी हम ये क्यों न मानें, कि आज की आप की विफलता आपको पहचानने का एक अवसर भी बन सकती है, आपकी शक्तियों को जानने का अवसर बन सकती है? और हो सकता है कि आप अपनी शक्तियों को जान करके, अपनी ऊर्जा को जान करके एक नया रास्ता भी चुन लें।
मुझे हमारे देश के पूर्व राष्ट्रपति श्रीमान ए.पी.जे. अब्दुल कलाम जी की याद आती है। उन्होंने अपनी किताब‘माई जर्नी – ट्रांस्फोर्मिंग ड्रीम्स इनटू एक्शन’, उसमें अपने जीवन का एक प्रसंग लिखा है। उन्होंने कहा है कि मुझे पायलट बनने की इच्छा थी, बहुत सपना था, मैं पायलट बनूँ। लेकिन जब मैं पायलट बनने गया तो मैं फ़ेल हो गया, मैं विफल हो गया, नापास हो गया। अब आप देखिये, उनका नापास होना, उनका विफल होना भी कितना बड़ा अवसर बन गया। वो देश के महान वैज्ञानिक बन गये। राष्ट्रपति बने। और देश की आण्विक शक्ति के लिए उनका बहुत बड़ा योगदान रहा। और इसलिये मैं कहता हूँ दोस्तो, कि विफलता के बोझ में दबना मत। विफलता भी एक अवसर होती है। विफलता को ऐसे मत जाने दीजिये। विफलता को भी पकड़कर रखिये। ढूंढिए। विफलता के बीच भी आशा का अवसर समाहित होता है। और मेरी ख़ास आग्रहपूर्वक विनती है मेरे इन नौजवान दोस्तों को, और ख़ास करके उनके परिवारजनों को, कि बेटा अगर विफल हो गया तो माहौल ऐसा मत बनाइये की वो ज़िन्दगी में ही सारी आशाएं खो दे। कभी-कभी संतान की विफलता माँ-बाप के सपनों के साथ जुड़ जाती है और उसमें संकट पैदा हो जाते हैं। ऐसा नहीं होना चाहिये। विफलता को पचाने की ताक़त भी तो ज़िन्दगी जीने की ताक़त देती है। मैं फिर एक बार सभी मेरे सफल युवा मित्रों को शुभकामनाएं देता हूँ। और विफल मित्रों को अवसर ढूँढने का मौक़ा मिला है, इसलिए भी मैं इसे शुभकामनाएं ही देता हूँ। आगे बढ़ने का, विश्वास जगाने का प्रयास कीजिये।
पिछली मन की बात और आज जब मैं आपके बीच बात कर रहा हूँ, इस बीच बहुत सारी बातें हो गईं। मेरी सरकार का एक साल हुआ, पूरे देश ने उसका बारीकी से विश्लेषण किया, आलोचना की और बहुत सारे लोगों ने हमें डिस्टिंक्शन मार्क्स भी दे दिए। वैसे लोकतंत्र में ये मंथन बहुत आवश्यक होता है, पक्ष-विपक्ष आवश्यक होता है। क्या कमियां रहीं, उसको भी जानना बहुत ज़रूरी होता है। क्या अच्छाइयां रहीं, उसका भी अपना एक लाभ होता है।
लेकिन मेरे लिए इससे भी ज़्यादा गत महीने की दो बातें मेरे मन को आनंद देती हैं। हमारे देश में ग़रीबों के लिए कुछ न कुछ करने की मेरे दिल में हमेशा एक तड़प रहती है। नई-नई चीज़ें सोचता हूँ, सुझाव आये तो उसको स्वीकार करता हूँ। हमने गत मास प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना, अटल पेंशन योजना - सामाजिक सुरक्षा की तीन योजनाओं को लॉन्च किया। उन योजनाओं को अभी तो बीस दिन नहीं हुए हैं, लेकिन आज मैं गर्व के साथ कहता हूँ... शायद ही हमारे देश में, सरकार पर भरोसा करके, सरकार की योजनाओं पर भरोसा करके, इतनी बड़ी मात्रा में सामान्य मानवी उससे जुड़ जाये... मुझे ये बताते हुए ख़ुशी होती है कि सिर्फ़ बीस दिन के अल्प समय में आठ करोड़, बावन लाख से अधिक लोगों ने इन योजनाओं में अपना नामांकन करवा दिया, योजनाओं में शरीक हो गये। सामाजिक सुरक्षा की दिशा में ये हमारा बहुत अहम क़दम है। और उसका बहुत लाभ आने वाले दिनों में मिलने वाला है।
जिनके पास अब तक ये बात न पहुँची हो उनसे मेरा आग्रह है कि आप फ़ायदा उठाइये। कोई सोच सकता है क्या, महीने का एक रुपया, बारह महीने के सिर्फ़ बारह रूपये, और आप को सुरक्षा बीमा योजना मिल जाये। जीवन ज्योति बीमा योजना - रोज़ का एक रूपये से भी कम, यानि साल का तीन सौ तीस रूपये। मैं इसीलिए कहता हूँ कि ग़रीबों को औरों पर आश्रित न रहना पड़े। ग़रीब स्वयं सशक्त बने। उस दिशा में हम एक के बाद एक क़दम उठा रहे हैं। और मैं तो एक ऐसी फौज बनाना चाहता हूँ, और फौज भी मैं ग़रीबों में से ही चुनना चाहता हूँ। और ग़रीबों में से बनी हुई मेरी ये फौज, ग़रीबी के खिलाफ लड़ाई लड़ेगी, ग़रीबी को परास्त करेगी। और देश में कई वर्षों का हमारे सर पर ये बोझ है, उस ग़रीबी से मुक्ति पाने का हम निरंतर प्रयास करते रहेंगे और सफलता पायेंगे।
दूसरी एक महत्वपूर्ण बात जिससे मुझे आनंद आ रहा है, वो है किसान टीवी चैनल । वैसे तो देश में टीवी चैनेलों की भरमार है, क्या नहीं है, कार्टून की भी चैनलें चलती हैं, स्पोर्ट्स की चैनल चलती हैं, न्यूज़ की चलती है, एंटरटेनमेंट की चलती हैं। बहुत सारी चलती हैं। लेकिन मेरे लिए किसान चैनल महत्वपूर्ण इसलिए है कि मैं इससे भविष्य को बहुत भली भांति देख पाता हूँ।
मेरी दृष्टि में किसान चैनल एक खेत खलियान वाली ओपन यूनिवर्सिटी है। और ऐसी चैनल है, जिसका विद्यार्थी भी किसान है, और जिसका शिक्षक भी किसान है। उत्तम अनुभवों से सीखना, परम्परागत कृषि से आधुनिक कृषि की तरफ आगे बढ़ना, छोटे-छोटे ज़मीन के टुकड़े बचे हैं। परिवार बड़े होते गए, ज़मीन का हिस्सा छोटा होता गया, और तब हमारी ज़मीन की उत्पादकता कैसे बढ़े, फसल में किस प्रकार से परिवर्तन लाया जाए - इन बातों को सीखना-समझना ज़रूरी है। अब तो मौसम को भी पहले से जाना जा सकता है। ये सारी बातें लेकर के,ये टी० वी० चैनल काम करने वाली है और मेरे किसान भाइयों-बहिनों, इसमें हर जिले में किसान मोनिटरिंग की व्यवस्था की गयी है। आप उसको संपर्क ज़रूर करें।
मेरे मछुवारे भाई-बहनों को भी मैं कहना चाहूँगा, मछली पकड़ने के काम में जुड़े हुए लोग, उनके लिए भी इस किसान चैनल में बहुत कुछ है, पशुपालन भारत के ग्रामीण जीवन का परम्परागत काम है और कृषि में एक प्रकार से सहायक होने वाला क्षेत्र है, लेकिन दुनिया का अगर हिसाब देखें, तो दुनिया में पशुओं की संख्या की तुलना में जितना दूध उत्पादन होता है, भारत उसमें बहुत पीछे है। पशुओ की संख्या की तुलना में जितना दूध उत्पादन होना चाहिए, उतना हमारे देश में नहीं होता है। प्रति पशु अधिक दूध उत्पादन कैसे हो, पशु की देखभाल कैसे हो, उसका लालन-पालन कैसे हो, उसका खान पान क्या हो - परम्परागत रूप से तो हम बहुत कुछ करते हैं,लेकिन वैज्ञानिक तौर तरीकों से आगे बढ़ना बहुत ज़रूरी है और तभी जा करके कृषि के साथ पशुपालन भी आर्थिक रूप से हमें मजबूती दे सकता है, किसान को मजबूती दे सकता है, पशु पालक को मजबूती दे सकता है। हम किस प्रकार से इस क्षेत्र में आगे बढें, किस प्रकार से हम सफल हो, उस दिशा में वैज्ञानिक मार्गदर्शन आपको मिले।
मेरे प्यारे देश वासियों! याद है 21 जून? वैसे हमारे इस भू-भाग में 21 जून को इसलिए याद रखा जाता है कि ये सबसे लंबा दिवस होता है। लेकिन 21 जून अब विश्व के लिए एक नई पहचान बन गया है। गत सितम्बर महीने में यूनाइटेड नेशन्स में संबोधन करते हुए मैंने एक विषय रखा था और एक प्रस्ताव रखा था कि 21 जून को अंतरराष्ट्रीय योग-दिवस के रूप में मनाना चाहिए। और सारे विश्व को अचरज हो गया, आप को भी अचरज होगा, सौ दिन के भीतर भीतर एक सौ सतत्तर देशो के समर्थन से ये प्रस्ताव पारित हो गया, इस प्रकार के प्रस्ताव ऐसा यूनाइटेड नेशन्स के इतिहास में, सबसे ज्यादा देशों का समर्थन मिला, सबसे कम समय में प्रस्ताव पारित हुआ, और विश्व के सभी भू-भाग, इसमें शरीक हुए, किसी भी भारतीय के लिए, ये बहुत बड़ी गौरवपूर्ण घटना है।
लेकिन अब जिम्मेवारी हमारी बनती है। क्या कभी सोचा था हमने कि योग विश्व को भी जोड़ने का एक माध्यम बन सकता है? वसुधैव कुटुम्बकम की हमारे पूर्वजों ने जो कल्पना की थी, उसमें योग एक कैटलिटिक एजेंट के रूप में विश्व को जोड़ने का माध्यम बन रहा है। कितने बड़े गर्व की, ख़ुशी की बात है। लेकिन इसकी ताक़त तो तब बनेगी जब हम सब बहुत बड़ी मात्रा में योग के सही स्वरुप को, योग की सही शक्ति को, विश्व के सामने प्रस्तुत करें। योग दिल और दिमाग को जोड़ता है, योग रोगमुक्ति का भी माध्यम है, तो योग भोगमुक्ति का भी माध्यम है और अब तो में देख रहा हूँ, योग शरीर मन बुद्धि को ही जोड़ने का काम करे, उससे आगे विश्व को भी जोड़ने का काम कर सकता है।
हम क्यों न इसके एम्बेसेडर बने! हम क्यों न इस मानव कल्याण के लिए काम आने वाली, इस महत्वपूर्ण विद्या को सहज उपलब्ध कराएं। हिन्दुस्तान के हर कोने में 21 जून को योग दिवस मनाया जाए। आपके रिश्तेदार दुनिया के किसी भी हिस्से में रहते हों, आपके मित्र परिवार जन कहीं रहते हो, आप उनको भी टेलीफ़ोन करके बताएं कि वे भी वहाँ लोगो को इकट्ठा करके योग दिवस मनायें। अगर उनको योग का कोई ज्ञान नहीं है तो कोई किताब लेकर के, लेकिन पढ़कर के भी सबको समझाए कि योग क्या होता है। एक पत्र पढ़ लें, लेकिन मैं मानता हूँ कि हमने योग दिवस को सचमुच में विश्व कल्याण के लिए एक महत्वपूर्ण क़दम के रूप में, मानव जाति के कल्याण के रूप में और तनाव से ज़िन्दगी से गुजर रहा मानव समूह, कठिनाइयों के बीच हताश निराश बैठे हुए मानव को, नई चेतना, ऊर्जा देने का सामर्थ योग में है।
मैं चाहूँगा कि विश्व ने जिसको स्वीकार किया है, विश्व ने जिसे सम्मानित किया है, विश्व को भारत ने जिसे दिया है, ये योग हम सबके लिए गर्व का विषय बनना चाहिए। अभी तीन सप्ताह बाकी है आप ज़रूर प्रयास करें,ज़रूर जुड़ें और औरों को भी जोडें, ये मैं आग्रह करूंगा।
मैं एक बात और कहना चाहूँगा खास करके मेरे सेना के जवानों को, जो आज देश की सुरक्षा में जुटे हुए उनको भी और जो आज सेना से निवृत्त हो करके अपना जीवन यापन कर रहे, देश के लिए त्याग तपस्या करने वाले जवानों को, और मैं ये बात एक प्रधानमन्त्री के तौर पर नहीं कर रहा हूँ। मेरे भीतर का इंसान, दिल की सच्चाई से, मन की गहराई से, मेरे देश के सैनिकों से मैं आज बात करना चाहता हूँ।
वन-रैंक, वन-पेंशन, क्या ये सच्चाई नहीं हैं कि चालीस साल से सवाल उलझा हुआ है? क्या ये सच्चाई नहीं हैं कि इसके पूर्व की सभी सरकारों ने इसकी बातें की, किया कुछ नहीं? मैं आपको विश्वास दिलाता हूँ। मैंने निवृत्त सेना के जवानों के बीच में वादा किया है कि मेरी सरकार वन-रैंक, वन-पेंशन लागू करेगी। हम जिम्मेवारी से हटते नहीं हैं और सरकार बनने के बाद, भिन्न-भिन्न विभाग इस पर काम भी कर रहे हैं। मैं जितना मानता था उतना सरल विषय नहीं हैं, पेचीदा है, और चालीस साल से उसमें समस्याओं को जोड़ा गया है। मैंने इसको सरल बनाने की दिशा में, सर्वस्वीकृत बनाने की दिशा में, सरकार में बैठे हुए सबको रास्ते खोज़ने पर लगाया हुआ है। पल-पल की ख़बरें मीडिया में देना ज़रूरी नहीं होता है। इसकी कोई रनिंग कमेंट्री नहीं होती है। मैं आपको विश्वास दिलाता हूँ यही सरकार, मैं फिर से कहता हूँ - यही सरकार आपका वन-रैंक, वन-पेंशन का मसला, सोल्यूशन लाकर के रहेगी - और जिस विचारधारा में पलकर हम आए हैं , जिन आदर्शो को लेकर हम आगे बढ़ें हैं, उसमें आपके जीवन का महत्व बहुत है।
मेरे लिए आपके जीवन के साथ जुड़ना आपकी चिंता करना ये सिर्फ़ न कोई सरकारी कार्यक्रम है, न ही कोई राजनितिक कार्यक्रम है, मेरे राष्ट्रभक्ति का ही प्रकटीकरण है। मैं फिर एक बार मेरे देश के सभी सेना के जवानों को आग्रह करूंगा कि राजनैतिक रोटी सेंकने वाले लोग चालीस साल तक आपके साथ खेल खेलते रहे हैं। मुझे वो मार्ग मंज़ूर नहीं है, और न ही मैं कोई ऐसे क़दम उठाना चाहता हूँ, जो समस्याओं को जटिल बना दे। आप मुझ पर भरोसा रखिये, बाक़ी जिनको बातें उछालनी होंगी, विवाद करने होंगे, अपनी राजनीति करनी होगी, उनको मुबारक। मुझे देश के लिए जीने मरने वालों के लिए जो कर सकता हूँ करना है - ये ही मेरे इरादे हैं, और मुझे विश्वास है कि मेरे मन की बात जिसमें सिवाय सच्चाई के कुछ नहीं है, आपके दिलों तक पहुंचेगी। चालीस साल तक आपने धैर्य रखा है - मुझे कुछ समय दीजिये, काम करने का अवसर दीजिये, और हम मिल बैठकर के समस्याओं का समाधान करेंगे। ये मैं फिर से एक बार देशवासियों को विश्वास देता हूँ।
छुट्टियों के दिनों में सब लोग कहीं न कहीं तो गए होंगे। भारत के अलग-अलग कोनों में गए होंगे। हो सकता है कुछ लोग अब जाने का कार्यक्रम बनाते होंगे। स्वाभाविक है ‘सीईंग इज़ बिलीविंग’ - जब हम भ्रमण करते हैं,कभी रिश्तेदारों के घर जाते हैं, कहीं पर्यटन के स्थान पर पहुंचते हैं। दुनिया को समझना, देखने का अलग अवसर मिलता है। जिसने अपने गाँव का तालाब देखा है, और पहली बार जब वह समुन्दर देखता है, तो पता नहीं वो मन के भाव कैसे होते हैं, वो वर्णन ही नहीं कर सकता है कि अपने गाँव वापस जाकर बता ही नहीं सकता है कि समुन्दर कितना बड़ा होता है। देखने से एक अलग अनुभूति होती है।
आप छुट्टियों के दिनों में अपने यार दोस्तों के साथ, परिवार के साथ कहीं न कहीं ज़रूर गए होंगे, या जाने वाले होंगे। मुझे मालूम नहीं है आप जब भ्रमण करने जाते हैं, तब डायरी लिखने की आदत है कि नहीं है। लिखनी चाहिए, अनुभवों को लिखना चाहिए, नए-नए लोगों से मिलतें हैं तो उनकी बातें सुनकर के लिखना चाहिए, जो चीज़ें देखी हैं, उसका वर्णन लिखना चाहिए, एक प्रकार से अन्दर, अपने भीतर उसको समावेश कर लेना चाहिए। ऐसी सरसरी नज़र से देखकर के आगे चले जाएं ऐसा नहीं करना चाहिए। क्योंकि ये भ्रमण अपने आप में एक शिक्षा है। हर किसी को हिमालय में जाने का अवसर नहीं मिलता है, लेकिन जिन लोगों ने हिमालय का भ्रमण किया है और किताबें लिखी हैं उनको पढ़ोगे तो पता चलेगा कि क्या आनन्ददायक यात्राओं का वर्णन उन्होंने किया है।
मैं ये तो नहीं कहता हूँ कि आप लेखक बनें! लेकिन भ्रमण की ख़ातिर भ्रमण ऐसा न होते हुए हम उसमें से कुछ सीखने का प्रयास करें, इस देश को समझने का प्रयास करें, देश को जानने का प्रयास करें, उसकी विविधताओं को समझें। वहां के खान पान कों, पहनावे, बोलचाल, रीतिरिवाज, उनके सपने, उनकी आकांक्षाएँ,उनकी कठिनाइयाँ, इतना बड़ा विशाल देश है, पूरे देश को जानना समझना है - एक जनम कम पड़ जाता है,आप ज़रूर कहीं न कहीं गए होंगे, लेकिन मेरी एक इच्छा है, इस बार आप यात्रा में गए होंगे या जाने वाले होंगे। क्या आप अपने अनुभव को मेरे साथ शेयर कर सकते हैं क्या? सचमुच में मुझे आनंद आएगा। मैं आपसे आग्रह करता हूँ कि आप इन्क्रेडिबल इंडिया हैश टैग, इसके साथ मुझे अपनी फोटो, अपने अनुभव ज़रूर भेजिए और उसमें से कुछ चीज़ें जो मुझे पसंद आएंगी मैं उसे आगे औरों के साथ शेयर करूँगा।
देखें तो सही आपके अनुभवों को, मैं भी अनुभव करूँ, आपने जो देखा है, मैं उसको मैं दूर बैठकर के देखूं। जिस प्रकार से आप समुद्रतट पर जा करके अकेले जा कर टहल सकते हैं, मैं तो नहीं कर पाता अभी, लेकिन मैं चाहूँगा आपके अनुभव जानना और आपके उत्तम अनुभवों को, मैं सबके साथ शेयर करूँगा।
अच्छा लगा आज एक बार फिर गर्मी की याद दिला देता हूँ, मैं यही चाहूँगा कि आप अपने को संभालिए, बीमार मत होना, गर्मी से अपने आपको बचाने के रास्ते होतें हैं, लेकिन उन पशु पक्षियों का भी ख़याल करना। यही मन की बात आज बहुत हो गयी, ऐसे मन में जो विचार आते गए, मैं बोलता गया। अगली बार फिर मिलूँगा, फिर बाते करूँगा, आपको बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद।
मेरे प्यारे देशवासियो,
नमस्कार,
मन की बात करने का मन नहीं हो रहा था आज। बोझ अनुभव कर रहा हूँ, कुछ व्यथित सा मन है। पिछले महीने जब बात कर रहा था आपसे, तो ओले गिरने की खबरें, बेमौसमी बरसात, किसानों की तबाही। अभी कुछ दिन पहले बिहार में अचानक तेज हवा चली। काफी लोग मारे गए। काफी कुछ नुकसान हुआ। और शनिवार को भयंकर भूकंप ने पूरे विश्व को हिला दिया है। ऐसा लगता है मानो प्राकृतिक आपदा का सिलसिला चल पड़ा है। नेपाल में भयंकर भूकंप की आपदा। हिंदुस्तान में भी भूकंप ने अलग-अलग राज्यों में कई लोगों की जान ली है। संपत्ति का भी नुकसान किया है। लेकिन नेपाल का नुकसान बहुत भयंकर है।
मैंने 2001, 26 जनवरी, कच्छ के भूकंप को निकट से देखा है। ये आपदा कितनी भयानक होती है, उसकी मैं कल्पना भली-भांति कर सकता हूँ। नेपाल पर क्या बीतती होगी, उन परिवारों पर क्या बीतती होगी, उसकी मैं कल्पना कर सकता हूँ।
लेकिन मेरे प्यारे नेपाल के भाइयो-बहनो, हिन्दुस्तान आपके दुःख में आपके साथ है। तत्काल मदद के लिए चाहे हिंदुस्तान के जिस कोने में मुसीबत आयी है वहां भी, और नेपाल में भी सहाय पहुंचाना प्रारंभ कर दिया है। सबसे पहला काम है रेस्क्यू ऑपरेशन, लोगों को बचाना। अभी भी मलबे में दबे हुए कुछ लोग जीवित होंगे, उनको जिन्दा निकालना हैं। एक्सपर्ट लोगों की टीम भेजी है, साथ में, इस काम के लिए जिनको विशेष रूप से ट्रेन किया गया है ऐसे स्निफ़र डॉग्स को भी भेजा गया है। स्निफर डॉग्स ढूंढ पाते हैं कि कहीं मलबे के नीचे कोई इंसान जिन्दा हो। कोशिश हमारी पूरी रहेगी अधिकतम लोगों को जिन्दा बचाएं। रेस्क्यू ऑपरेशन के बाद रिलीफ का काम भी चलाना है। रिहैबिलिटेशन का काम भी तो बहुत लम्बा चलेगा।
लेकिन मानवता की अपनी एक ताकत होती है। सवा-सौ करोड़ देश वासियों के लिए नेपाल अपना है। उन लोगों का दुःख भी हमारा दुःख है। भारत पूरी कोशिश करेगा इस आपदा के समय हर नेपाली के आंसू भी पोंछेंगे, उनका हाथ भी पकड़ेंगे, उनको साथ भी देंगे। पिछले दिनों यमन में, हमारे हजारों भारतीय भाई बहन फंसे हुए थे। युद्ध की भयंकर विभीषिका के बीच, बम बन्दूक के तनाव के बीच, गोलाबारी के बीच भारतीयों को निकालना, जीवित निकालना, एक बहुत बड़ा कठिन काम था। लेकिन हम कर पाए। इतना ही नहीं, एक सप्ताह की उम्र की एक बच्ची को जब बचा करके लाये तो ऐसा लग रहा था कि आखिर मानवता की भी कितनी बड़ी ताकत होती है। बम-बन्दूक की वर्षा चलती हो, मौत का साया हो, और एक सप्ताह की बच्ची अपनी जिन्दगी बचा सके तब एक मन को संतोष होता है।
मैं पिछले दिनों विदेश में जहाँ भी गया, एक बात के लिए बहुत बधाइयाँ मिली, और वो था यमन में हमने दुनिया के करीब 48 देशों के नागरिकों को बचाया था। चाहे अमेरिका हो, यू.के. हो, फ्रांस हो, रशिया हो, जर्मनी हो, जापान हो, हर देश के नागरिक को हमने मदद की थी। और उसके कारण दुनिया में भारत का ये “सेवा परमो धर्मः”, इसकी अनुभूति विश्व ने की है। हमारा विदेश मंत्रालय, हमारी वायु सेना, हमारी नौसेना इतने धैर्य के साथ, इतनी जिम्मेवारी के साथ, इस काम को किया है, दुनिया में इसकी अमिट छाप रहेगी आने वाले दिनों में, ऐसा मैं विश्वास करता हूँ। और मुझे खुशी है कि कोई भी नुकसान के बिना, सब लोग बचकर के बाहर आये। वैसे भी भारत का एक गुण, भारत के संस्कार बहुत पुराने हैं।
अभी मैं जब फ्रांस गया था तो फ्रांस में, मैं प्रथम विश्व युद्ध के एक स्मारक पर गया था। उसका एक कारण भी था, कि प्रथम विश्व युद्ध की शताब्दी तो है, लेकिन साथ-साथ भारत की पराक्रम का भी वो शताब्दी वर्ष हैI भारत के वीरों की बलिदानी की शताब्दी का वर्ष है और “सेवा परमो-धर्मः” इस आदर्श को कैसे चरितार्थ करता रहा हमारा देश , उसकी भी शताब्दी का यह वर्ष है, मैं यह इसलिए कह रहा हूँ कि 1914 में और 1918 तक प्रथम विश्व युद्ध चला और बहुत कम लोगों को मालूम होगा करीब-करीब 15 लाख भारतीय सैनिकों ने इस युद्ध में अपनी जान की बाजी लगा दी थी और भारत के जवान अपने लिए नहीं मर रहे थेI हिंदुस्तान को, किसी देश को कब्जा नहीं करना था, न हिन्दुस्तान को किसी की जमीन लेनी थी लेकिन भारतीयों ने एक अदभुत पराक्रम करके दिखाया थाI बहुत कम लोगों को मालूम होगा इस प्रथम विश्व युद्ध में हमारे करीब-करीब 74 हजार जवानों ने शहादत की थी, ये भी गर्व की बात है कि इस पर करीब 9 हजार 2 सौ हमारे सैनिकों को गैलेंट्री अवार्ड से डेकोरेट किया गया थाI इतना ही नहीं, 11 ऐसे पराक्रमी लोग थे जिनको सर्वश्रेष्ठ सम्मान विक्टोरिया क्रॉस मिला थाI खासकर कि फ्रांस में विश्व युद्ध के दरमियान मार्च 1915 में करीब 4 हजार 7 सौ हमारे हिनदुस्तानियों ने बलिदान दिया था। उनके सम्मान में फ्रांस ने वहां एक स्मारक बनाया है। मैं वहाँ नमन करने गया था, हमारे पूर्वजों के पराक्रम के प्रति श्रध्दा व्यक्त करने गया था।
ये सारी घटनायें हम देखें तो हम दुनिया को कह सकते हैं कि ये देश ऐसा है जो दुनिया की शांति के लिए, दुनिया के सुख के लिए, विश्व के कल्याण के लिए सोचता है। कुछ न कुछ करता है और ज़रूरत पड़े तो जान की बाज़ी भी लगा देता है। यूनाइटेड नेशन्स में भी पीसकीपिंग फ़ोर्स में सर्वाधिक योगदान देने वालों में भारत का भी नाम प्रथम पंक्ति में है। यही तो हम लोगों के लिए गर्व की बात है।
पिछले दिनों दो महत्वपूर्ण काम करने का मुझे अवसर मिला। हम पूज्य बाबा साहेब अम्बेडकर की 125 वीं जयन्ती का वर्ष मना रहे हैं। कई वर्षों से मुंबई में उनके स्मारक बनाने का जमीन का विवाद चल रहा था। मुझे आज इस बात का संतोष है कि भारत सरकार ने वो जमीन बाबा साहेब अम्बेडकर के स्मारक बनाने के लिए देने का निर्णय कर लिया। उसी प्रकार से दिल्ली में बाबा साहेब अम्बेडकर के नाम से एक इंटरनेशनल सेंटर बने, पूरा विश्व इस मनीषी को जाने, उनके विचारों को जाने, उनके काम को जाने। ये भी वर्षों से लटका पड़ा विषय था, इसको भी पूरा किया, शिलान्यास किया, और 20 साल से जो काम नहीं हुआ था वो 20 महीनों में पूरा करने का संकल्प किया। और साथ-साथ मेरे मन में एक विचार भी आया है और हम लगे हैं, आज भी हमारे देश में कुछ परिवार हैं जिनको सर पे मैला ढ़ोने के लिए मजबूर होना पड़ता है।
क्या हमें शोभा देता है कि आज भी हमारे देश में कुछ परिवारों को सर पर मैला ढोना पड़े? मैंने सरकार में बड़े आग्रह से कहा है कि बाबा साहेब अम्बेडकर जी के पुण्य स्मरण करते हुए 125 वीं जयन्ती के वर्ष में, हम इस कलंक से मुक्ति पाएं। अब हमारे देश में किसी गरीब को सर पर मैला ढोना पड़े, ये परिस्थति हम सहन नहीं करेंगे। समाज का भी साथ चाहिये। सरकार ने भी अपना दायित्व निभाना चाहिये। मुझे जनता का भी सहयोग चाहिये, इस काम को हमें करना है।
बाबा साहेब अम्बेडकर जीवन भर शिक्षित बनो ये कहते रहते थे। आज भी हमारे कई दलित, पीड़ित, शोषित, वंचित समाज में, ख़ास करके बेटियों में, शिक्षा अभी पहुँची नहीं है। बाबा साहेब अम्बेडकर के 125 वीं जयन्ती के पर्व पर, हम भी संकल्प करें। हमारे गाँव में, नगर में, मोहल्ले में गरीब से गरीब की बेटी या बेटा, अनपढ़ न रहे। सरकार अपना कर्त्तव्य करे, समाज का उसमें साथ मिले तो हम जरुर संतोष की अनुभूति करते हैं। मुझे एक आनंद की बात शेयर करने का मन करता है और एक पीड़ा भी बताने का मन करता है।
मुझे इस बात का गर्व होता है कि भारत की दो बेटियों ने देश के नाम को रौशन किया। एक बेटी साईना नेहवाल बैडमिंटन में दुनिया में नंबर एक बनी, और दूसरी बेटी सानिया मिर्जा टेनिस डबल्स में दुनिया में नंबर एक बनी। दोनों को बधाई, और देश की सारी बेटियों को भी बधाई। गर्व होता है अपनों के पुरुषार्थ और पराक्रम को लेकर के। लेकिन कभी-कभी हम भी आपा खो बैठते हैं। जब क्रिकेट का वर्ल्ड कप चल रहा था और सेमी-फाइनल में हम ऑस्ट्रेलिया से हार गए, कुछ लोगों ने हमारे खिलाड़ियों के लिए जिस प्रकार के शब्दों का प्रयोग किया, जो व्यवहार किया, मेरे देशवासियो, ये अच्छा नहीं है। ऐसा कैसा खेल हो जिसमें कभी पराजय ही न हो अरे जय और पराजय तो जिन्दगी के हिस्से होते हैं। अगर हमारे देश के खिलाड़ी कभी हार गए हैं तो संकट की घड़ी में उनका हौसला बुलंद करना चाहिये। उनका नया विश्वास पैदा करने का माहौल बनाना चाहिये। मुझे विश्वास है आगे से हम पराजय से भी सीखेंगे और देश के सम्मान के साथ जो बातें जुड़ी हुई हैं, उसमें पल भर में ही संतुलन खो करके, क्रिया-प्रतिक्रिया में नहीं उलझ जायेंगे। और मुझे कभी-कभी चिंता हो रही है। मैं जब कभी देखता हूँ कि कहीं अकस्मात् हो गया, तो भीड़ इकट्ठी होती है और गाड़ी को जला देती है। और हम टीवी पर इन चीजों को देखते भी हैं। एक्सीडेंट नहीं होना चाहिये। सरकार ने भी हर प्रकार की कोशिश करनी चाहिये। लेकिन मेरे देशवासियो बताइये कि इस प्रकार से गुस्सा प्रकट करके हम ट्रक को जला दें, गाड़ी को जला दें.... मरा हुआ तो वापस आता नहीं है। क्या हम अपने मन के भावों को संतुलित रखके कानून को कानून का काम नहीं करने दे सकते हैं? सोचना चाहिये।
खैर, आज मेरा मन इन घटनाओं के कारण बड़ा व्यथित है, ख़ास करके प्राकृतिक आपदाओं के कारण, लेकिन इसके बीच भी धैर्य के साथ, आत्मविश्वास के साथ देश को भी आगे ले जायेंगे, इस देश का कोई भी व्यक्ति...दलित हो, पीड़ित हो, शोषित हो, वंचित हो, आदिवासी हो, गाँव का हो, गरीब हो, किसान हो, छोटा व्यापारी हो, कोई भी हो, हर एक के कल्याण के मार्ग पर, हम संकल्प के साथ आगे बढ़ते रहेंगे।
विद्यार्थियों की परीक्षायें पूर्ण हुई हैं, ख़ास कर के 10 वीं और 12 वीं के विद्यार्थियों ने छुट्टी मनाने के कार्यक्रम बनाए होंगे, मेरी आप सबको शुभकामनाएं हैं। आपका वेकेशन बहुत ही अच्छा रहे, जीवन में कुछ नया सीखने का, नया जानने का अवसर मिले, और साल भर आपने मेहनत की है तो कुछ पल परिवार के साथ उमंग और उत्साह के साथ बीते यही मेरी शुभकामना है।
आप सबको मेरा नमस्कार।
धन्यवाद।
मेरे प्यारे किसान भाइयो और बहनो, आप सबको नमस्कार!
ये मेरा सौभाग्य है कि आज मुझे देश के दूर सुदूर गाँव में रहने वाले मेरे किसान भाइयों और बहनों से बात करने का अवसर मिला है। और जब मैं किसान से बात करता हूँ तो एक प्रकार से मैं गाँव से बात करता हूँ, गाँव वालों से बात करता हूँ, खेत मजदूर से भी बात कर रहा हूँ। उन खेत में काम करने वाली माताओं बहनों से भी बात कर रहा हूँ। और इस अर्थ में मैं कहूं तो अब तक की मेरी सभी मन की बातें जो हुई हैं, उससे शायद एक कुछ एक अलग प्रकार का अनुभव है।
जब मैंने किसानों के साथ मन की बात करने के लिए सोचा, तो मुझे कल्पना नहीं थी कि दूर दूर गावों में बसने वाले लोग मुझे इतने सारे सवाल पूछेंगे, इतनी सारी जानकारियां देंगे, आपके ढेर सारे पत्र, ढेर सारे सवाल, ये देखकर के मैं हैरान हो गया। आप कितने जागरूक हैं, आप कितने सक्रिय हैं, और शायद आप तड़पते हैं कि कोई आपको सुने। मैं सबसे पहले आपको प्रणाम करता हूँ कि आपकी चिट्ठियाँ पढ़कर के उसमें दर्द जो मैंने देखा है, जो मुसीबतें देखी हैं, इतना सहन करने के बावजूद भी, पता नहीं क्या-क्या आपने झेला होगा।
आपने मुझे तो चौंका दिया है, लेकिन मैं इस मन की बात का, मेरे लिए एक प्रशिक्षण का, एक एजुकेशन का अवसर मानता हूँ। और मेरे किसान भाइयो और बहनो, मैं आपको विश्वास दिलाता हूँ, कि आपने जितनी बातें उठाई हैं, जितने सवाल पूछे हैं, जितने भिन्न-भिन्न पहलुओं पर आपने बातें की हैं, मैं उन सबके विषय में, पूरी सरकार में जागरूकता लाऊँगा, संवेदना लाऊँगा, मेरा गाँव, मेरा गरीब, मेरा किसान भाई, ऐसी स्थिति में उसको रहने के लिए मजबूर नहीं किया जा सकता। मैं तो हैरान हूँ, किसानों ने खेती से संबधित तो बातें लिखीं हैं। लेकिन, और भी कई विषय उन्होंने कहे हैं, गाँव के दबंगों से कितनी परेशानियाँ हैं, माफियाओं से कितनी परेशानियाँ हैं, उसकी भी चर्चा की है, प्राकृतिक आपदा से आने वाली मुसीबतें तो ठीक हैं, लेकिन आस-पास के छोटे मोटे व्यापारियों से भी मुसीबतें झेलनी पड़ रही हैं।
किसी ने गाँव में गन्दा पानी पीना पड़ रहा है उसकी चर्चा की है, किसी ने गाँव में अपने पशुओं को रखने के लिए व्यवस्था की चिंता की है, किसी ने यहाँ तक कहा है कि पशु मर जाता है तो उसको हटाने का ही कोई प्रबंध नहीं होता, बीमारी फैल जाती है। यानि कितनी उपेक्षा हुई है, और आज मन की बात से शासन में बैठे हुए लोगों को एक कड़ा सन्देश इससे मिल रहा है। हमें राज करने का अधिकार तब है जब हम इन छोटी छोटी बातों को भी ध्यान दें। ये सब पढ़ कर के तो मुझे कभी कभी शर्मिन्दगी महसूस होती थी, कि हम लोगों ने क्या किया है! मेरे पास जवाब नहीं है, क्या किया है? हाँ, मेरे दिल को आपकी बातें छू गयी हैं। मैं जरूर बदलाव के लिए, प्रामाणिकता से प्रयास करूंगा, और उसके सभी पहलुओं पर सरकार को, जगाऊँगा, चेताऊंगा, दौडाऊंगा, मेरी कोशिश रहेगी, ये मैं विश्वास दिलाता हूँ।
मैं ये भी जानता हूँ कि पिछले वर्ष बारिश कम हुई तो परेशानी तो थी ही थी। इस बार बेमौसमी बरसात हो गयी, ओले गिरे, एक प्रकार से महाराष्ट्र से ऊपर, सभी राज्यों में, ये मुसीबत आयी। और हर कोने में किसान परेशान हो गया। छोटा किसान जो बेचारा, इतनी कड़ी मेहनत करके साल भर अपनी जिन्दगी गुजारा करता है, उसका तो सब कुछ तबाह हो गया है। मैं इस संकट की घड़ी में आपके साथ हूँ। सरकार के मेरे सभी विभाग राज्यों के संपर्क में रह करके स्थिति का बारीकी से अध्ययन कर रहे हैं, मेरे मंत्री भी निकले हैं, हर राज्य की स्थिति का जायजा लेंगे, राज्य सरकारों को भी मैंने कहा है कि केंद्र और राज्य मिल करके, इन मुसीबत में फंसे हुए सभी किसान भाइयों-बहनों को जितनी ज्यादा मदद कर सकते हैं, करें। में आपको विश्वास दिलाता हूँ कि सरकार पूरी संवेदना के साथ, आपकी इस संकट की घड़ी में, आपको पूरी तत्परता से मदद करेगी। जितना हो सकता है, उसको पूरा करने का प्रयास किया जायेगा।
गाँव के लोगों ने, किसानों ने कई मुददे उठाये हैं। सिंचाई की चिंता व्यापक नजर आती है। गाँव में सड़क नहीं है उसका भी आक्रोश है। खाद की कीमतें बढ़ रही हैं, उस पर भी किसान की नाराजगी है। बिजली नहीं मिल रही है। किसानों को यह भी चिंता है कि बच्चों को पढ़ाना है, अच्छी नौकरी मिले ये भी उनकी इच्छा है, उसकी भी शिकायतें हैं। माताओं बहनों की भी, गाँव में कहीं नशा-खोरी हो रही है उस पर अपना आक्रोश जताया है। कुछ ने तो अपने पति को तम्बाकू खाने की आदत है उस पर भी अपना रोष मुझे व्यक्त करके भेजा है। आपके दर्द को मैं समझ सकता हूँ। किसान का ये भी कहना है की सरकार की योजनायें तो बहुत सुनने को मिलती हैं, लेकिन हम तक पहुँचती नहीं हैं। किसान ये भी कहता है कि हम इतनी मेहनत करते हैं, लोगों का तो पेट भरते हैं लेकिन हमारा जेब नहीं भरता है, हमें पूरा पैसा नहीं मिलता है। जब माल बेचने जाते हैं, तो लेने वाला नहीं होता है। कम दाम में बेच देना पड़ता है। ज्यादा पैदावार करें तो भी मरते हैं, कम पैदावार करें तो भी मरते हैं। यानि किसानों ने अपने मन की बात मेरे सामने रखी है। मैं मेरे किसान भाइयों-बहनों को विश्वास दिलाता हूँ, कि मैं राज्य सरकारों को भी, और भारत सरकार के भी हमारे सभी विभागों को भी और अधिक सक्रिय करूंगा। तेज गति से इन समस्याओं के समाधान के रास्ते खोजने के लिए प्रेरित करूँगा। मुझे लग रहा है कि आपका धैर्य कम हो रहा है। बहुत स्वाभाविक है, साठ साल आपने इन्तजार किया है, मैं प्रामाणिकता से प्रयास करूँगा।
किसान भाइयो, ये आपके ढेर सारे सवालों के बीच में, मैंने देखा है कि करीब–करीब सभी राज्यों से वर्तमान जो भूमि अधिग्रहण बिल की चर्चा है, उसका प्रभाव ज्यादा दिखता है, और मैं हैरान हूँ कि कैसे-कैसे भ्रम फैलाए गए हैं। अच्छा हुआ, आपने छोटे–छोटे सवाल मुझे पूछे हैं। मैं कोशिश करूंगा कि सत्य आप तक पहुचाऊं। आप जानते हैं भूमि-अधिग्रहण का कानून 120 साल पहले आया था। देश आज़ाद होने के बाद भी 60-65 साल वही कानून चला और जो लोग आज किसानों के हमदर्द बन कर के आंदोलन चला रहे हैं, उन्होंने भी इसी कानून के तहत देश को चलाया, राज किया और किसानों का जो होना था हुआ। सब लोग मानते थे कि कानून में परिवर्तन होना चाहिए, हम भी मानते थे। हम विपक्ष में थे, हम भी मानते थे।
2013 में बहुत आनन-फानन के साथ एक नया कानून लाया गया। हमने भी उस समय कंधे से कन्धा मिलाकर के साथ दिया। किसान का भला होता है, तो साथ कौन नहीं देगा, हमने भी दिया। लेकिन कानून लागू होने के बाद, कुछ बातें हमारे ज़हन में आयीं। हमें लगा शायद इसके साथ तो हम किसान के साथ धोखा कर रहे हैं। हमें किसान के साथ धोखा करने का अधिकार नहीं है। दूसरी तरफ जब हमारी सरकार बनी, तब राज्यों की तरफ से बहुत बड़ी आवाज़ उठी। इस कानून को बदलना चाहिए, कानून में सुधार करना चाहिए, कानून में कुछ कमियां हैं, उसको पूरा करना चाहिए। दूसरी तरफ हमने देखा कि एक साल हो गया, कोई कानून लागू करने को तैयार ही नहीं कोई राज्य और लागू किया तो उन्होंने क्या किया? महाराष्ट्र सरकार ने लागू किया था, हरियाणा ने किया था जहां पर कांग्रेस की सरकारें थीं और जो किसान हितैषी होने का दावा करते हैं उन्होंने इस अध्यादेश में जो मुआवजा देने का तय किया था उसे आधा कर दिया। अब ये है किसानों के साथ न्याय? तो ये सारी बातें देख कर के हमें भी लगा कि भई इसका थोडा पुनर्विचार होना ज़रूरी है। आनन–फानन में कुछ कमियां रह जाती हैं। शायद इरादा ग़लत न हो, लेकिन कमियाँ हैं, तो उसको तो ठीक करनी चाहिए।…और हमारा कोई आरोप नहीं है कि पुरानी सरकार क्या चाहती थी, क्या नहीं चाहती थी? हमारा इरादा यही है कि किसानों का भला हो, किसानों की संतानों का भी भला हो, गाँव का भी भला हो और इसीलिए कानून में अगर कोई कमियां हैं, तो दूर करनी चाहिए। तो हमारा एक प्रामाणिक प्रयास कमियों को दूर करना है।
अब एक सबसे बड़ी कमी मैं बताऊँ, आपको भी जानकर के हैरानी होगी कि जितने लोग किसान हितैषी बन कर के इतनी बड़ी भाषणबाज़ी कर रहें हैं, एक जवाब नहीं दे रहे हैं। आपको मालूम है, अलग-अलग प्रकार के हिंदुस्तान में 13 कानून ऐसे हैं जिसमें सबसे ज्यादा जमीन संपादित की जाती है, जैसे रेलवे, नेशनल हाईवे, खदान के काम। आपको मालूम है, पिछली सरकार के कानून में इन 13 चीज़ों को बाहर रखा गया है। बाहर रखने का मतलब ये है कि इन 13 प्रकार के कामों के लिए जो कि सबसे ज्यादा जमीन ली जाती है, उसमें किसानों को वही मुआवजा मिलेगा जो पहले वाले कानून से मिलता था। मुझे बताइए, ये कमी थी कि नहीं? ग़लती थी कि नहीं? हमने इसको ठीक किया और हमने कहा कि भई इन 13 में भी भले सरकार को जमीन लेने कि हो, भले रेलवे के लिए हो, भले हाईवे बनाने के लिए हो, लेकिन उसका मुआवजा भी किसान को चार गुना तक मिलना चाहिए। हमने सुधार किया। कोई मुझे कहे, क्या ये सुधार किसान विरोधी है क्या? हमें इसीलिए तो अध्यादेश लाना पड़ा। अगर हम अध्यादेश न लाते तो किसान की तो जमीन वो पुराने वाले कानून से जाती रहती, उसको कोई पैसा नहीं मिलता। जब ये कानून बना तब भी सरकार में बैठे लोगों में कईयों ने इसका विरोधी स्वर निकला था। स्वयं जो कानून बनाने वाले लोग थे, जब कानून का रूप बना, तो उन्होंने तो बड़े नाराज हो कर के कह दिया, कि ये कानून न किसानों की भलाई के लिए है, न गाँव की भलाई के लिए है, न देश की भलाई के लिए है। ये कानून तो सिर्फ अफसरों कि तिजोरी भरने के लिए है, अफसरों को मौज करने के लिए, अफ़सरशाही को बढ़ावा देने के लिए है। यहाँ तक कहा गया था। अगर ये सब सच्चाई थी तो क्या सुधार होना चाहिए कि नहीं होना चाहिए? ..और इसलिए हमने कमियों को दूर कर के किसानों का भला करने कि दिशा में प्रयास किये हैं। सबसे पहले हमने काम किया, 13 कानून जो कि भूमि अधिग्रहण कानून के बाहर थे और जिसके कारण किसान को सबसे ज्यादा नुकसान होने वाला था, उसको हम इस नए कानून के दायरे में ले आये ताकि किसान को पूरा मुआवजा मिले और उसको सारे हक़ प्राप्त हों। अब एक हवा ऐसी फैलाई गई कि मोदी ऐसा कानून ला रहें हैं कि किसानों को अब मुआवजा पूरा नहीं मिलेगा, कम मिलेगा।
मेरे किसान भाइयो-बहनो, मैं ऐसा पाप सोच भी नहीं सकता हूँ। 2013 के पिछली सरकार के समय बने कानून में जो मुआवजा तय हुआ है, उस में रत्ती भर भी फर्क नहीं किया गया है। चार गुना मुआवजा तक की बात को हमने स्वीकारा हुआ है। इतना ही नहीं, जो तेरह योजनाओं में नहीं था, उसको भी हमने जोड़ दिया है। इतना ही नहीं, शहरीकरण के लिए जो भूमि का अधिग्रहण होगा, उसमें विकसित भूमि, बीस प्रतिशत उस भूमि मालिक को मिलेगी ताकि उसको आर्थिक रूप से हमेशा लाभ मिले, ये भी हमने जारी रखा है। परिवार के युवक को नौकरी मिले। खेत मजदूर की संतान को भी नौकरी मिलनी चाहिए, ये भी हमने जारी रखा है। इतना ही नहीं, हमने तो एक नयी चीज़ जोड़ी है। नयी चीज़ ये जोड़ी है, जिला के जो अधिकारी हैं, उसको इसने घोषित करना पड़ेगा कि उसमें नौकरी किसको मिलेगी, किसमें नौकरी मिलेगी, कहाँ पर काम मिलेगा, ये सरकार को लिखित रूप से घोषित करना पड़ेगा। ये नयी चीज़ हमने जोड़ करके सरकार कि जिम्मेवारी को Fix किया है।
मेरे किसान भाइयो-बहनो, हम इस बात पर agree हैं, कि सबसे पहले सरकारी जमीन का उपयोग हो। उसके बाद बंजर भूमि का उपयोग हो, फिर आखिर में अनिवार्य हो तब जाकर के उपजाऊ जमीन को हाथ लगाया जाये, और इसीलिए बंजर भूमि का तुरंत सर्वे करने के लिए भी कहा गया है, जिसके कारण वो पहली priority वो बने।
एक हमारे किसानों की शिकायत सही है कि आवश्यकता से अधिक जमीन हड़प ली जाती है। इस नए कानून के माध्यम से मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूँ कि अब जमीन कितनी लेनी, उसकी पहले जांच पड़ताल होगी, उसके बाद तय होगा कि आवश्यकता से अधिक जमीन हड़प न की जाए। कभी-कभी तो कुछ होने वाला है, कुछ होने वाला है, इसकी चिंता में बहुत नुकसान होता है। ये Social Impact Assessment (SIA) के नाम पर अगर प्रक्रिया सालों तक चलती रहे, सुनवाई चलती रहे, मुझे बताइए, ऐसी स्थिति में कोई किसान अपने फैसले कर पायेगा? फसल बोनी है तो वो सोचेगा नहीं-नहीं यार, पता नहीं, वो निर्णय आ जाएगा तो, क्या करूँगा? और उसके 2-2, 4-4, साल खराब हो जाएगा और अफसरशाही में चीजें फसी रहेंगी। प्रक्रियाएं लम्बी, जटिल और एक प्रकार से किसान बेचारा अफसरों के पैर पकड़ने जाने के लिए मजबूर हो जाएगा कि साहब ये लिखो, ये मत लिखों, वो लिखो, वो मत लिखो, ये सब होने वाला है। क्या मैं मेरे अपने किसानों को इस अफसरसाही के चुंगल में फिर एक बार फ़सा दूं? मुझे लगता है वो ठीक नहीं होगा। प्रक्रिया लम्बी थी, जटिल थी। उसको सरल करने का मैंने प्रयास किया है।
मेरे किसान भाइयो-बहनो 2014 में कानून बना है, लेकिन राज्यों ने उसको स्वीकार नहीं किया है। किसान तो वहीं का वहीं रह गया। राज्यों ने विरोध किया। मुझे बताइए क्या मैं राज्यों की बात सुनूं या न सुनूं? क्या मैं राज्यों पर भरोसा करूँ या न करूँ? इतना बड़ा देश, राज्यों पर अविश्वास करके चल सकता है क्या? और इसलिए मेरा मत है कि हमें राज्यों पर भरोसा करना चाहिये, भारत सरकार में विशेष करना चाहिये तो, एक तो मैं भरोसा करना चाहता हूँ, दूसरी बात है, ये जो कानून में सुधार हम कर रहे हैं, कमियाँ दूर कर रहे हैं, किसान की भलाई के लिए जो हम कदम उठा रहे हैं, उसके बावजूद भी अगर किसी राज्य को ये नहीं मानना है, तो वे स्वतंत्र हैं और इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ कि ये जो सारे भ्रम फैलाए जा रहे हैं, वो सरासर किसान विरोधी के भ्रम हैं। किसान को गरीब रखने के षड्यन्त्र का ही हिस्सा हैं। देश को आगे न ले जाने के जो षडयंत्र चले हैं उसी का हिस्सा है। उससे बचना है, देश को भी बचाना है, किसान को भी बचाना है।
अब गाँव में भी किसान को पूछो कि भाई तीन बेटे हैं बताओ क्या सोच रहे हो? तो वो कहता है कि भाई एक बेटा तो खेती करेगा, लेकिन दो को कहीं-कहीं नौकरी में लगाना है। अब गाँव के किसान के बेटों को भी नौकरी चाहिये। उसको भी तो कहीं जाकर रोजगार कमाना है। तो उसके लिए क्या व्यवस्था करनी पड़ेगी। तो हमने सोचा कि जो गाँव की भलाई के लिए आवश्यक है, किसान की भलाई के लिये आवश्यक है, किसान के बच्चों के रोजगार के लिए आवश्यक है, ऐसी कई चीजों को जोड़ दिया जाए। उसी प्रकार से हम तो जय-जवान, जय-किसान वाले हैं। जय-जवान का मतलब है देश की रक्षा। देश की रक्षा के विषय में हिंदुस्तान का किसान कभी पीछे हटता नहीं है। अगर सुरक्षा के क्षेत्र में कोई आवश्कता हो तो वह जमीन किसानों से मांगनी पड़ेगी।..और मुझे विश्वास है, वो किसान देगा। तो हमने इन कामों के लिए जमीन लेने की बात को इसमें जोड़ा है। कोई भी मुझे गाँव का आदमी बताए कि गाँव में सड़क चाहिये कि नहीं चाहिये। अगर खेत में पानी चाहिये तो नहर करनी पड़ेगी कि नहीं करनी पड़ेगी। गाँव में आज भी गरीब हैं, जिसके पास रहने को घर नहीं है। घर बनाने के लिए जमीन चाहिये की नहीं चाहिये? कोई मुझे बताये कि यह उद्योगपतियों के लिए है क्या? यह धन्ना सेठों के लिए है क्या? सत्य को समझने की कोशिश कीजिये।
हाँ, मैं एक डंके की चोट पर आपको कहना चाहता हूँ, नए अध्यादेश में भी, कोई भी निजी उद्योगकार को, निजी कारखाने वाले को, निजी व्यवसाय करने वाले को, जमीन अधिग्रहण करने के समय 2013 में जो कानून बना था, जितने नियम हैं, वो सारे नियम उनको लागू होंगे। यह कॉर्पोरेट के लिए कानून 2013 के वैसे के वैसे लागू रहने वाले हैं। तो फिर यह झूठ क्यों फैलाया जाता है। मेरे किसान भाइयो-बहनो, एक भ्रम फैलाया जाता है कि आपको कानूनी हक नहीं मिलेगा, आप कोर्ट में नहीं जा सकते, ये सरासर झूठ है। हिंदुस्तान में कोई भी सरकार आपके कानूनी हक़ को छीन नहीं सकती है। बाबा साहेब अम्बेडकर ने हमें जो संविधान दिया है, इस संविधान के तहत आप हिंदुस्तान के किसी भी कोर्ट में जा करके दरवाजे खटखटा सकते हैं। तो ये झूठ फैलाया गया है। हाँ, हमने एक व्यवस्था को आपके दरवाजे तक लाने का प्रयास किया है।
एक Authority बनायी है, अब वो Authority जिले तक काम करेगी और आपके जिले के किसानों की समस्याओं का समाधान उसी Authority में जिले में ही हो जायेगा।..और वहां अगर आपको संतोष नहीं होता तो आप ऊपर के कोर्ट में जा सकते हैं। तो ये व्यवस्था हमने की है।
एक यह भी बताया जाता है कि भूमि अधिग्रहित की गयी तो वो पांच साल में वापिस करने वाले कानून को हटा दिया गया है। जी नहीं, मेरे किसान भाइयो-बहनो हमने कहा है कि जब भी Project बनाओगे, तो यह पक्का करो कि कितने सालों में आप इसको पूरा करोगे। और उस सालों में अगर पूरा नहीं करते हैं तो वही होगा जो किसान चाहेगा। और उसको तो समय-सीमा हमने बाँध दी है। आज क्या होता है, 40-40 साल पहले जमीने ली गयी, लेकिन अभी तक सरकार ने कुछ किया नहीं। तो यह तो नहीं चल सकता। तो हमने सरकार को सीमा में बांधना तय किया है। हाँ, कुछ Projects ऐसे होते हैं जो 20 साल में पूरे होते हैं, अगर मान लीजिये 500 किलोमीटर लम्बी रेलवे लाइन डालनी है, तो समय जाएगा। तो पहले से कागज़ पर लिखो कि भाई कितने समय में पूरा करोगे। तो हमने सरकार को बाँधा है। सरकार की जिम्मेवारी को Fix किया है।
मैं और एक बात बताऊं किसान-भाइयो, कभी-कभी ये एयरकंडीशन कमरे में बैठ करके जो कानून बनाते हैं न, उनको गाँव के लोगों की सच्ची स्थिति का पता तक नहीं होता है। अब आप देखिये जब डैम बनता है, जलाशय बनता है, तो उसका नियम यह है कि 100 साल में सबसे ज्यादा पानी की सम्भावना हो उस हिसाब से जमीन प्राप्त करने का नियम है। अब 100 साल में एक बार पानी भरता है। 99 साल तक पानी नहीं भरता है। फिर भी जमीन सरकार के पास चली जाती है, तो आज सभी राज्यों में क्या हो रहा है की भले जमीन कागज़ पर ले ली हो, पैसे भी दे दिए हों। लेकिन फिर भी वो जमीन पर किसान खेती करता है। क्योंकि 100 साल में एक बार जब पानी भर जाएगा तो एक साल के लिए वो हट जाएगा। ये नया कानून 2013 का ऐसा था कि आप खेती नहीं कर सकते थे। हम चाहते हैं कि अगर जमीन डूब में नहीं जाती है तो फिर किसान को खेती करने का अवसर मिलना चाहिये।..और इसीलिये वो जमीन किसान से कब्ज़ा नहीं करनी चाहिये। ये लचीलापन आवश्यक था। ताकि किसान को जमीन देने के बावजूद भी जमीन का लाभ मिलता रहे और जमीन देने के बदले में रुपया भी मिलता रहे। तो किसान को डबल फायदा हो। ये व्यवस्था करना भी जरूरी है, और व्यावहारिक व्यवस्था है, और उस व्यावहारिक व्यवस्था को हमने सोचा है।
एक भ्रम ऐसा फैलाया जाता है कि ‘सहमति’ की जरुरत नहीं हैं। मेरे किसान भाइयो-बहनो ये राजनीतिक कारणों से जो बाते की जाती हैं, मेहरबानी करके उससे बचिये! 2013 में जो कानून बना उसमे भी सरकार नें जिन योजनाओं के लिए जमीन माँगी है, उसमें सहमती का क़ानून नहीं है।...और इसीलिए सहमति के नाम पर लोगों को भ्रमित किया जाता है। सरकार के लिए सहमति की बात पहले भी नही थी, आज भी नहीं है।..और इसीलिये मेरे किसान भाइयों-बहनो पहले बहुत अच्छा था और हमने बुरा कर दिया, ये बिलकुल सरासर आपको गुमराह करने का दुर्भाग्यपूर्ण प्रयास है। मैं आज भी कहता हूँ कि निजी उद्योग के लिए, कॉर्पोरेट के लिए, प्राइवेट कारखानों के लिए ये ‘सहमति’ का कानून चालू है, है...है।
...और एक बात मैं कहना चाहता हूँ, कुछ लोग कहतें है, PPP मॉडल! मेरे किसान भाइयो-बहनो, मान लीजिये 100 करोड रुपए का एक रोड बनाना है। क्या रोड किसी उद्योगकार उठा कर ले जाने वाला है क्या? रोड तो सरकार के मालिकी का ही रहता है। जमीन सरकार की मालिकी की ही रहती है। बनाने वाला दूसरा होता है। बनाने वाला इसीलिए दूसरा होता है, क्योंकि सरकार के पास आज पैसे नहीं होते हैं। क्योंकि सरकार चाहती है कि गाँव में स्कूल बने, गाँव में हॉस्पिटल बने, गरीब का बच्चा पढ़े, इसके लिए पैसा लगे। रोड बनाने का काम प्राइवेट करे, लेकिन वो प्राइवेट वाला भी रोड अपना नहीं बनाता है। न अपने घर ले जाता है, रोड सरकार का बनाता है। एक प्रकार से अपनी पूंजी लगता है। इसका मतलब ये हुआ कि सरकार का जो प्रोजेक्ट होगा जिसमें पूंजी किसी की भी लगे, जिसको लोग PPP मॉडल कहतें हैं। लेकिन अगर उसका मालिकाना हक़ सरकार का रहता है, उसका स्वामित्व सरकार का रहता है, सरकार का मतलब आप सबका रहता है, देश की सवा सौ करोड़ जनता का रहता है तो उसमें ही हमने ये कहा है कि सहमति की आवश्यकता नहीं है और इसीलिये ये PPP मॉडल को लेकर के जो भ्रम फैलाये जातें हैं उसकी मुझे आपको स्पष्टता करना बहुत ही जरुरी है।
कभी-कभार हम जिन बातों के लिए कह रहे हैं कि भई उसमें ‘सहमति’ की प्रक्रिया एक प्रकार से अफसरशाही और तानाशाही को बल देगी। आप मुझे बताईये, एक गावं है, उस गॉव तक रोड बन गया है, अब दूसरे गॉव के लिए रोड बनाना है, आगे वाले गॉव के लिए, 5 किलोमीटर की दूरी पर वह गॉव है। इस गॉव तक रोड बन गया है, लेकिन इन गॉव वालों की ज़मीन उस गॉव की तरफ है। मुझे बताईये उस गॉव के लोगों के लिए, रोड बनाने के लिए, ये गॉव वाले ज़मीन देंगे क्या? क्या ‘सहमति’ देंगे क्या? तो क्या पीछे जो गॉव है उसका क्या गुनाह है भई? उसको रोड मिलना चाहिए कि नहीं, मिलना चाहिये? उसी प्रकार से मैं नहर बना रहा हूँ। इस गॉव वालो को पानी मिल गया, नहर बन गयी। लेकिन आगे वाले गॉव को पानी पहुंचाना है तो ज़मीन तो इसी गावंवालों के बीच में पड़ती है। तो वो तो कह देंगे कि भई नहीं, हम तो ज़मीन नहीं देंगे। हमें तो पानी मिल गया है। तो आगे वाले गावं को नहर मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए?
मेरे भाइयो-बहनो, ये व्यावहारिक विषय है। और इसलिए जिस काम के लिए इतनी लम्बी प्रक्रिया न हो, हक और किसान के लिए, ये उद्योग के लिए नहीं है, व्यापार के लिए नहीं है, गावं की भलाई के लिए है, किसान की भलाई के लिए है, उसके बच्चों की भलाई के लिए है।
एक और बात आ रही है। ये बात मैंने पहले भी कही है। हर घर में किसान चाहता है कि एक बेटा भले खेती में रहे, लेकिन बाकी सब संतान रोज़ी–रोटी कमाने के लिए बाहर जाये क्योंकि उसे मालूम है, कि आज समय की मांग है कि घर में घर चलाने के लिए अलग-अलग प्रयास करने पड़ते हैं। अगर हम कोई रोड बनाते है और रोड के बगल में सरकार Industrial Corridor बनाती है, प्राइवेट नहीं। मैं एक बार फिर कहता हूँ प्राइवेट नहीं, पूंजीपति नहीं, धन्ना सेठ नहीं, सरकार बनाती है ताकि जब Corridor बनता है पचास किलोमीटर लम्बा, 100 किलोमीटर लम्बा तो जो रोड बनेगा, रोड के एक किलोमीटर बाएं, एक किलोमीटर दायें वहां पर अगर सरकार Corridor बनाती है ताकि नजदीक में जितने गाँव आयेंगे 50 गाँव, 100 गाँव, 200 गाँव उनको वहां कोई न कोई, वहां रोजी रोटी का अवसर मिल जाए, उनके बच्चों को रोजगार मिल जाए।
मुझे बताइये, भाइयों-बहनो क्या हम चाहतें हैं, कि हमारे गाँव के किसानों के बच्चे दिल्ली और मुंबई की झुग्गी झोपड़ियों में जिन्दगी बसर करने के लिए मजबूर हो जाएँ? क्या उनके घर और गाँव के 20-25 किलोमीटर की दूरी पर एक छोटा सा भी कारखाना लग जाता है और उसको रोजगार मिल जाता है, तो मिलना चाहिये की नहीं मिलना चाहिये? और ये Corridor प्राइवेट नही है, ये सरकार बनाएगी। सरकार बनाकर के उस इलाके के लोगों को रोजगार देने का प्रबंध करेगी। ..और इसीलिए जिसकी मालिकी सरकार की है, और जो गाँव की भलाई के लिए है, गाँव के किसानो की भलाई के लिए है, जो किसानों की भावी पीड़ी की भलाई के लिए हैं, जो गाँव के गरीबों की भलाई के लिए हैं, जो गाँव के किसान को बिजली पानी मोहैया कराने के लिए उनके लिए हैं, उनके लिए इस भूमि अधिग्रहण बिल में कमियाँ थी, उस कमियों को दूर करने का हमारे प्रामाणिक प्रयास हैं।...और फिर भी मैंने Parliament में कहा था की अभी भी किसी को लगता है कोई कमी हैं, तो हम उसको सुधार करने के लिए तैयार हैं।
जब हमने लोकसभा में रखा, कुछ किसान नेताओं ने आ करके दो चार बातें बताईं, हमने जोड़ दी। हम तो अभी भी कहतें कि भाई भूमि अधिग्रहण किसानों की भलाई के लिए ही होना चाहिये। ..और ये हमारी प्रतिबद्धता है, जितने झूठ फैलाये जाते हैं, कृपा करके मैं मेरे किसान भाइयों से आग्रह करता हूँ कि आप इन झूठ के सहारे निर्णय मत करें, भ्रमित होने की जरुरत नहीं है। आवश्यकता यह है की हमारा किसान ताकतवर कैसे बने, हमारा गाँव ताकतवर कैसे बने, हमारा किसान जो मेहनत करता है, उसको सही पैसे कैसे मिले, उसको अच्छा बाज़ार कैसे मिले, जो पैदा करता है उसके रखरखाव के लिए अच्छा स्टोरेज कैसे मिले, हमारी कोशिश है कि गाँव की भलाई, किसान की भलाई के लिए सही दिशा में काम उठाएं।
मेरे किसान भाइयो-बहनो, हमारी कोशिश है कि देश ऐसे आगे बढ़े कि आपकी जमीन पर पैदावार बढ़े, और इसीलिए हमने कोशिश की है, Soil Health Card. जैसे मनुष्य बीमार हो जाता है तो उसकी तबीयत के लिए लेबोरेटरी में टेस्ट होता हैं। जैसा इंसान का होता है न, वैसा अपनी भारत-माता का भी होता हैं, अपनी धरती- माता का भी होता है। और इसीलिए हम आपकी धरती बचे इतना ही नहीं, आपकी धरती तन्दुरूस्त हो उसकी भी चिंता कर रहे हैं।
....और इसलिये भूमि अधिग्रहण नहीं, आपकी भूमि अधिक ताकतवर बने ये भी हमारा काम है। और इसीलिए “Soil Health Card” की बात लेकर के आये हैं। हर किसान को इसका लाभ मिलने वाला है, आपके उर्वरक का जो फालतू खर्चा होता है उससे बच जाएगा। आपकी फसल बढ़ेगी। आपको फसल का पूरा पैसा मिले, उसके लिए भी तो अच्छी मंडियां हों, अच्छी कानून व्यवस्था हो, किसान का शोषण न हो, उस पर हम काम कर रहे हैं और आप देखना मेरे किसान भाइयो, मुझे याद है, मैं जब गुजरात में मुख्यमंत्री था इस दिशा में मैंने बहुत काम किया था। हमारे गुजरात में तो किसान की हालत बहुत ख़राब थी, लेकिन पानी पर काम किया, बहुत बड़ा परिवर्तन आया। गुजरात के विकास में किसान का बहुत बड़ा योगदान बन गया जो कभी सोच नही सकता था। गाँव के गाँव खाली हो जाते थे। बदलाव आया, हम पूरे देश में ये बदलाव चाहते हैं जिसके कारण हमारा किसान सुखी हो।
...और इसलिए मेरे किसान भाइयो और बहनो, आज मुझे आपके साथ बात करने का मौका मिला। लेकिन इन दिनों अध्यादेश की चर्चा ज्यादा होने के कारण मैंने ज़रा ज्यादा समय उसके लिए ले लिया। लेकिन मेरे किसान भाइयो बहनो मैं प्रयास करूंगा, फिर एक बार कभी न कभी आपके साथ दुबारा बात करूंगा, और विषयों की चर्चा करूँगा, लेकिन मैं इतना विश्वास दिलाता हूँ कि आपने जो मुझे लिख करके भेजा है, पूरी सरकार को मैं हिलाऊँगा, सरकार को लगाऊंगा कि क्या हो रहा है। अच्छा हुआ आपने जी भरके बहुत सी चीजें बतायी हैं और मैं मानता हूँ आपका मुझ पर भरोसा है, तभी तो बताई है न! मैं ये भरोसे को टूटने नहीं दूंगा, ये मैं आपको विश्वास दिलाता हूँ।
आपका प्यार बना रहे, आपके आशीर्वाद बने रहे। और आप तो जगत के तात हैं, वो कभी किसी का बुरा सोचता, वो तो खुद का नुकसान करके भी देश का भला करता है। ये उसकी परंपरा रही है। उस किसान का नुकसान न हो, इसकी चिंता ये सरकार करेगी। ये मैं आपको विश्वास दिलाता हूँ लेकिन आज मेरी मन की बातें सुनने के बाद आपके मन में बहुत से विचार और आ सकते हैं। आप जरुर मुझे आकाशवाणी के पते पर लिखिये। मैं आगे फिर कभी बातें करूँगा। या आपके पत्रों के आधार पर सरकार में जो गलतियाँ जो ठीक करनी होंगी तो गलतियाँ ठीक करूँगा। काम में तेजी लाने की जरुरत है, तो तेजी लाऊंगा और और किसी को अन्याय हो रहा है तो न्याय दिलाने के लिए पूरा प्रयास करूँगा।
नवरात्रि का पावन पर्व चल रहा है। मेरी आपको बहुत-बहुत शुभकामनाएं।
नमस्ते, युवा दोस्तो। आज तो पूरा दिन भर शायद आपका मन क्रिकेट मैच में लगा होगा, एक तरफ परीक्षा की चिंता और दूसरी तरफ वर्ल्ड कप हो सकता है आप छोटी बहन को कहते होंगे कि बीच - बीच में आकर स्कोर बता दे। कभी आपको ये भी लगता होगा, चलो यार छोड़ो, कुछ दिन के बाद होली आ रही है और फिर सर पर हाथ पटककर बैठे होंगे कि देखिये होली भी बेकार गयी, क्यों? एग्जाम आ गयी। होता है न! बिलकुल होता होगा, मैं जानता हूँ। खैर दोस्तो, आपकी मुसीबत के समय मैं आपके साथ आया हूँ। आपके लिए एक महत्वपूर्ण अवसर है। उस समय मैं आया हूँ। और मैं आपको कोई उपदेश देने नहीं आया हूँ। ऐसे ही हलकी - फुलकी बातें करने आया हूँ।
बहुत पढ़ लिया न, बहुत थक गए न! और माँ डांटती है, पापा डांटते है, टीचर डांटते हैं, पता नहीं क्या क्या सुनना पड़ता है। टेलीफोन रख दो, टीवी बंद कर दो, कंप्यूटर पर बैठे रहते हो, छोड़ो सबकुछ, चलो पढ़ो यही चलता है न घर में? साल भर यही सुना होगा, दसवीं में हो या बारहवीं में। और आप भी सोचते होंगे कि जल्द एग्जाम खत्म हो जाए तो अच्छा होगा, यही सोचते हो न? मैं जानता हूँ आपके मन की स्थिति को और इसीलिये मैं आपसे आज ‘मन की बात’ करने आया हूँ। वैसे ये विषय थोड़ा कठिन है।
आज के विषय पर माँ बाप चाहते होंगे कि मैं उन बातों को करूं, जो अपने बेटे को या बेटी को कह नहीं पाते हैं। आपके टीचर चाहते होंगे कि मैं वो बातें करूँ, ताकि उनके विद्यार्थी को वो सही बात पहुँच जाए और विद्यार्थी चाहता होगा कि मैं कुछ ऐसी बातें करूँ कि मेरे घर में जो प्रेशर है, वो प्रेशर कम हो जाए। मैं नहीं जानता हूँ, मेरी बातें किसको कितनी काम आयेंगी, लेकिन मुझे संतोष होगा कि चलिये मेरे युवा दोस्तों के जीवन के महत्वपूर्ण पल पर मैं उनके बीच था. अपने मन की बातें उनके साथ गुनगुना रहा था। बस इतना सा ही मेरा इरादा है और वैसे भी मुझे ये तो अधिकार नहीं है कि मैं आपको अच्छे एग्जाम कैसे जाएँ, पेपर कैसे लिखें, पेपर लिखने का तरीका क्या हो? ज्यादा से ज्यादा मार्क्स पाने की लिए कौन - कौन सी तरकीबें होती हैं? क्योंकि मैं इसमें एक प्रकार से बहुत ही सामान्य स्तर का विद्यार्थी हूँ। क्योंकि मैंने मेरे जीवन में किसी भी एग्जाम में अच्छे परिणाम प्राप्त नहीं किये थे। ऐसे ही मामूली जैसे लोग पढ़ते हैं वैसे ही मैं था और ऊपर से मेरी तो हैण्डराइटिंग भी बहुत ख़राब थी। तो शायद कभी - कभी तो मैं इसलिए भी पास हो जाता था, क्योंकि मेरे टीचर मेरा पेपर पढ़ ही नहीं पाते होंगे। खैर वो तो अलग बातें हो गयी, हलकी - फुलकी बातें हैं।
लेकिन मैं आज एक बात जरुर आपसे कहना चाहूँगा कि आप परीक्षा को कैसे लेते हैं, इस पर आपकी परीक्षा कैसी जायेगी, ये निर्भर करती है। अधिकतम लोगों को मैंने देखा है कि वो इसे अपने जीवन की एक बहुत बड़ी महत्वपूर्ण घटना मानते हैं और उनको लगता है कि नहीं, ये गया तो सारी दुनिया डूब जायेगी। दोस्तो, दुनिया ऐसी नहीं है। और इसलिए कभी भी इतना तनाव मत पालिये। हाँ, अच्छा परिणाम लाने का इरादा होना चाहिये। पक्का इरादा होना चाहिये, हौसला भी बुलंद होना चाहिये। लेकिन परीक्षा बोझ नहीं होनी चाहिये, और न ही परीक्षा कोई आपके जीवन की कसौटी कर रही है। ऐसा सोचने की जरुरत नहीं है।
कभी-कभार ऐसा नहीं लगता कि हम ही परीक्षा को एक बोझ बना देते हैं घर में और बोझ बनाने का एक कारण जो होता है, ये होता है कि हमारे जो रिश्तेदार हैं, हमारे जो यार - दोस्त हैं, उनका बेटा या बेटी हमारे बेटे की बराबरी में पढ़ते हैं, अगर आपका बेटा दसवीं में है, और आपके रिश्तेदारों का बेटा दसवीं में है तो आपका मन हमेशा इस बात को कम्पेयर करता रहता है कि मेरा बेटा उनसे आगे जाना चाहिये, आपके दोस्त के बेटे से आगे होना चाहिये। बस यही आपके मन में जो कीड़ा है न, वो आपके बेटे पर प्रेशर पैदा करवा देता है। आपको लगता है कि मेरे अपनों के बीच में मेरे बेटे का नाम रोशन हो जाये और बेटे का नाम तो ठीक है, आप खुद का नाम रोशन करना चाहते हैं। क्या आपको नहीं लगता है कि आपके बेटे को इस सामान्य स्पर्धा में लाकर के आपने खड़ा कर दिया है? जिंदगी की एक बहुत बड़ी ऊँचाई, जीवन की बहुत बड़ी व्यापकता, क्या उसके साथ नहीं जोड़ सकते हैं? अड़ोस - पड़ोस के यार दोस्तों के बच्चों की बराबरी वो कैसी करता है! और यही क्या आपका संतोष होगा क्या? आप सोचिये? एक बार दिमाग में से ये बराबरी के लोगों के साथ मुकाबला और उसी के कारण अपने ही बेटे की जिंदगी को छोटी बना देना, ये कितना उचित है? बच्चों से बातें करें तो भव्य सपनों की बातें करें। ऊंची उड़ान की बातें करें। आप देखिये, बदलाव शुरू हो जाएगा।
दोस्तों एक बात है जो हमें बहुत परेशान करती है। हम हमेशा अपनी प्रगति किसी और की तुलना में ही नापने के आदी होते हैं। हमारी पूरी शक्ति प्रतिस्पर्धा में खप जाती है। जीवन के बहुत क्षेत्र होंगे, जिनमें शायद प्रतिस्पर्धा जरूरी होगी, लेकिन स्वयं के विकास के लिए तो प्रतिस्पर्धा उतनी प्रेरणा नहीं देती है, जितनी कि खुद के साथ हर दिन स्पर्धा करते रहना। खुद के साथ ही स्पर्धा कीजिये, अच्छा करने की स्पर्धा, तेज गति से करने की स्पर्धा, और ज्यादा करने की स्पर्धा, और नयी ऊंचाईयों पर पहुँचने की स्पर्धा आप खुद से कीजिये, बीते हुए कल से आज ज्यादा अच्छा हो इस पर मन लगाइए। और आप देखिये ये स्पर्धा की ताकत आपको इतना संतोष देगी, इतना आनंद देगी जिसकी आप कल्पना नहीं कर सकते। हम लोग बड़े गर्व के साथ एथलीट सेरगेई बूबका का स्मरण करते हैं। इस एथलीट ने पैंतीस बार खुद का ही रिकॉर्ड तोड़ा था। वह खुद ही अपने एग्जाम लेता था। खुद ही अपने आप को कसौटी पर कसता था और नए संकल्पों को सिद्ध करता था। आप भी उसी लिहाज से आगे बढें तो आप देखिये आपको प्रगति के रास्ते पर कोई नहीं रोक सकता है।
युवा दोस्तो, विद्यार्थियों में भी कई प्रकार होते हैं। कुछ लोग कितनी ही परीक्षाएं क्यों न भाए बड़े ही बिंदास होते हैं। उनको कोई परवाह ही नहीं होती और कुछ होते हैं जो परीक्षा के बोझ में दब जाते हैं। और कुछ लोग मुह छुपा करके घर के कोने में किताबों में फंसे रहते हैं। इन सबके बावजूद भी परीक्षा परीक्षा है और परीक्षा में सफल होना भी बहुत आवश्यक है और में भी चाहता हूँ कि आप भी सफल हों लेकिन कभी- कभी आपने देखा होगा कि हम बाहरी कारण बहुत ढूँढ़ते हैं। ये बाहरी कारण हम तब ढूँढ़ते हैं, जब खुद ही कन्फ्यूज्ड हों। खुद पर भरोसा न हो, जैसे जीवन में पहली बार परीक्षा दे रहे हों। घर में कोई टीवी जोर से चालू कर देगा, आवाज आएगी, तो भी हम चिड़चिड़ापन करते होंगे, माँ खाने पर बुलाती होगी तो भी चिड़चिड़ापन करते होंगे। दूसरी तरफ अपने किसी यार-दोस्त का फ़ोन आ गया तो घंटे भर बातें भी करते होंगें । आप को नहीं लगता है आप स्वयं ही अपने विषय में ही कन्फ्यूज्ड हैं।
दोस्तो खुद को पहचानना ही बहुत जरुरी होता है। आप एक काम किजीये बहुत दूर का देखने की जरुरत नहीं है। आपकी अगर कोई बहन हो, या आपके मित्र की बहन हो जिसने दसवीं या बारहवी के एग्जाम दे रही हो, या देने वाली हो। आपने देखा होगा, दसवीं के एग्जाम हों बारहवीं के एग्जाम हों तो भी घर में लड़कियां माँ को मदद करती ही हैं। कभी सोचा है, उनके अंदर ये कौन सी ऐसी ताकत है कि वे माँ के साथ घर काम में मदद भी करती हैं और परीक्षा में लड़कों से लड़कियां आजकल बहुत आगे निकल जाती हैं। थोड़ा आप ओबजर्व कीजिये अपने अगल-बगल में। आपको ध्यान में आ जाएगा कि बाहरी कारणों से परेशान होने की जरुरत नहीं है। कभी-कभी कारण भीतर का होता है. खुद पर अविश्वास होता है न तो फिर आत्मविश्वास क्या काम करेगा? और इसलिए मैं हमेशा कहता हूँ जैसे-जैसे आत्मविश्वास का अभाव होता है, वैसे वैसे अंधविश्वास का प्रभाव बढ़ जाता है। और फिर हम अन्धविश्वास में बाहरी कारण ढूंढते रहते हैं। बाहरी कारणों के रास्ते खोजते रहते हैं. कुछ तो विद्यार्थी ऐसे होते हैं जिनके लिए हम कहते हैं आरम्म्भीशुरा। हर दिन एक नया विचार, हर दिन एक नई इच्छा, हर दिन एक नया संकल्प और फिर उस संकल्प की बाल मृत्यु हो जाता है, और हम वहीं के वहीं रह जाते हैं। मेरा तो साफ़ मानना है दोस्तो बदलती हुई इच्छाओं को लोग तरंग कहते हैं। हमारे साथी यार- दोस्त, अड़ोसी-पड़ोसी, माता-पिता मजाक उड़ाते हैं और इसलिए मैं कहूँगा, इच्छाएं स्थिर होनी चाहिये और जब इच्छाएं स्थिर होती हैं, तभी तो संकल्प बनती हैं और संकल्प बाँझ नहीं हो सकते। संकल्प के साथ पुरुषार्थ जुड़ता है. और जब पुरुषार्थ जुड़ता है तब संकल्प सिद्दी बन जाता है. और इसीलिए तो मैं कहता हूँ कि इच्छा प्लस स्थिरता इज-इक्वल टू संकल्प। संकल्प प्लस पुरुषार्थ इज-इक्वल टू सिद्धि। मुझे विश्वास है कि आपके जीवन यात्रा में भी सिद्दी आपके चरण चूमने आ जायेगी। अपने आप को खपा दीजिये। अपने संकल्प के लिए खपा दीजिये और संकल्प सकारात्मक रखिये। किसी से आगे जाने की मत सोचिये। खुद जहां थे वहां से आगे जाने के लिए सोचिये। और इसलिए रोज अपनी जिंदगी को कसौटी पर कसता रहता है उसके लिए कितनी ही बड़ी कसौटी क्यों न आ जाए कभी कोई संकट नहीं आता है और दोस्तों कोई अपनी कसौटी क्यों करे? कोई हमारे एग्जाम क्यों ले? आदत डालो न। हम खुद ही हमारे एग्जाम लेंगें। हर दिन हमारी परीक्षा लेंगे। देखेंगे मैं कल था वहां से आज आगे गया कि नहीं गया। मैं कल था वहां से आज ऊपर गया कि नहीं। मैंने कल जो पाया था उससे ज्यादा आज पाया कि नहीं पाया। हर दिन हर पल अपने आपको कसौटी पर कसते रहिये। फिर कभी जिन्दगी में कसौटी, कसौटी लगेगी ही नहीं। हर कसौटी आपको खुद को कसने का अवसर बन जायेगी और जो खुद को कसना जानता वो कसौटियों को भी पार कर जाता है और इसलिए जो जिन्दगी की परीक्षा से जुड़ता है उसके लिए क्लासरूम की परीक्षा बहुत मामूली होती है।
कभी आपने भी कल्पना नहीं की होगी की इतने अच्छे अच्छे काम कर दिए होंगें। जरा उसको याद करो, अपने आप विश्वास पैदा हो जाएगा। अरे वाह! आपने वो भी किया था, ये भी किया था? पिछले साल बीमार थी तब भी इतने अच्छे मार्क्स लाये थे। पिछली बार मामा के घर में शादी थी, वहां सप्ताह भर ख़राब हो गया था, तब भी इतने अच्छे मार्क्स लाये थे। अरे पहले तो आप छः घंटे सोते थे और पिछली साल आपने तय किया था कि नहीं नहीं अब की बार पांच घंटे सोऊंगा और आपने कर के दिखाया था। अरे यही तो है मोदी आपको क्या उपदेश देगा। आप अपने मार्गदर्शक बन जाइए। और भगवान् बुद्ध तो कहते थे अंतःदीपो भव:।
मैं मानता हूँ, आपके भीतर जो प्रकाश है न उसको पहचानिए आपके भीतर जो सामर्थ्य है, उसको पहचानिए और जो खुद को बार-बार कसौटी पर कसता है वो नई-नई ऊंचाइयों को पार करता ही जाता है। दूसरा कभी- कभी हम बहुत दूर का सोचते रहते हैं। कभी-कभी भूतकाल में सोये रहते हैं। दोस्तो परीक्षा के समय ऐसा मत कीजिये। परीक्षा समय तो आप वर्तमान में ही जीना अच्छा रहेगा। क्या कोई बैट्समैन पिछली बार कितनी बार जीरो में आऊट हो गया, इसके गीत गुनगुनाता है क्या? या ये पूरी सीरीज जीतूँगा या नहीं जीतूँगा, यही सोचता है क्या? मैच में उतरने के बाद बैटिंग करते समय सेंचुरी करके ही बाहर आऊँगा कि नहीं आऊँगा, ये सोचता है क्या? जी नहीं, मेरा मत है, अच्छा बैट्समैन उस बॉल पर ही ध्यान केन्द्रित करता है, जो बॉल उसके सामने आ रहा है। वो न अगले बॉल की सोचता है, न पूरे मैच की सोचता है, न पूरी सीरीज की सोचता है। आप भी अपना मन वर्तमान से लगा दीजिये। जीतना है तो उसकी एक ही जड़ी-बूटी है। वर्तमान में जियें, वर्तमान से जुड़ें, वर्तमान से जूझें। जीत आपके साथ साथ चलेगी।
मेरे युवा दोस्तो, क्या आप ये सोचते हैं कि परीक्षा आपकी क्षमता का प्रदर्शन करने के लिए होती हैं। अगर ये आपकी सोच है तो गलत है। आपको किसको अपनी क्षमता दिखानी है? ये प्रदर्शन किसके सामने करना है? अगर आप ये सोचें कि परीक्षा क्षमता प्रदर्शन के लिए नहीं, खुद की क्षमता पहचानने के लिए है। जिस पल आप अपने मन्त्र मानने लग जायेंगे आप पकड़ लेंगें न, आपके भीतर का विश्वास बढ़ता चला जाएगा और एक बार आपने खुद को जाना, अपनी ताकत को जाना तो आप हमेशा अपनी ताकत को ही खाद पानी डालते रहेंगे और वो ताकत एक नए सामर्थ्य में परिवर्तित हो जायेगी और इसलिए परीक्षा को आप दुनिया को दिखाने के लिए एक चुनौती के रूप में मत लीजिये, उसे एक अवसर के रूप में लीजिये। खुद को जानने का, खुद को पह्चानने का, खुद के साथ जीने का यह एक अवसर है। जी लीजिये न दोस्तो।
दोस्तो मैंने देखा है कि बहुत विद्यार्थी ऐसे होते हैं जो परीक्षाओं के दिनों में नर्वस हो जाते हैं। कुछ लोगों का तो कथन इस बात का होता है कि देखो मेरी आज एग्जाम थी और मामा ने मुझे विश नहीं किया. चाचा ने विश नहीं किया, बड़े भाई ने विश नहीं किया। और पता नहीं उसका घंटा दो घंटा परिवार में यही डिबेट होता है, देखो उसने विश किया, उसका फ़ोन आया क्या, उसने बताया क्या, उसने गुलदस्ता भेजा क्या? दोस्तो इससे परे हो जाइए, इन सारी चीजों में मत उलझिए। ये सारा परीक्षा के बाद सोचना किसने विश किये किसने नहीं किया। अपने आप पर विश्वास होगा न तो ये सारी चीजें आयेंगी ही नहीं। दोस्तों मैंने देखा है की ज्यादातर विद्यार्थी नर्वस हो जाते हैं। मैं मानता हूँ की नर्वस होना कुछ लोगों के स्वभाव में होता है। कुछ परिवार का वातावरण ही ऐसा है। नर्वस होने का मूल कारण होता है अपने आप पर भरोसा नहीं है। ये अपने आप पर भरोसा कब होगा, एक अगर विषय पर आपकी अच्छी पकड़ होगी, हर प्रकार से मेहनत की होगी, बार-बार रिवीजन किया होगा। आपको पूरा विश्वास है हाँ हाँ इस विषय में तो मेरी मास्टरी है और आपने भी देखा होगा, पांच और सात सब्जेक्ट्स में दो तीन तो एजेंडा तो ऐसे होंगे जिसमें आपको कभी चिंता नहीं रहती होगी। नर्वसनेस कभी एक आध दो में आती होगी। अगर विषय में आपकी मास्टरी है तो नर्वसनेस कभी नहीं आयेगी।
आपने साल भर जो मेहनत की है न, उन किताबों को वो रात-रात आपने पढाई की है आप विश्वाश कीजिये वो बेकार नहीं जायेगी। वो आपके दिल-दिमाग में कहीं न कहीं बैठी है, परीक्षा की टेबल पर पहुँचते ही वो आयेगी। आप अपने ज्ञान पर भरोसा करो, अपनी जानकारियों पर भरोसा करो, आप विश्वास रखो कि आपने जो मेहनत की है वो रंग लायेगी और दूसरी बात है आप अपनी क्षमताओं के बारे में बड़े कॉंफिडेंट होने चाहिये। आपको पूरी क्षमता होनी चाहिये कि वो पेपर कितना ही कठिन क्यों न हो मैं तो अच्छा कर लूँगा। आपको कॉन्फिडेंस होना चाहिये कि पेपर कितना ही लम्बा क्यों न होगा में तो सफल रहूँगा या रहूँगी। कॉन्फिडेंस रहना चाहिये कि में तीन घंटे का समय है तो तीन घंटे में, दो घंटे का समय है तो दो घंटे में, समय से पहले मैं अपना काम कर लूँगा और हमें तो याद है शायद आपको भी बताते होंगे हम तो छोटे थे तो हमारी टीचर बताते थे जो सरल क्वेश्चन है उसको सबसे पहले ले लीजिये, कठिन को आखिर में लीजिये। आपको भी किसी न किसी ने बताया होगा और मैं मानता हूँ इसको तो आप जरुर पालन करते होंगे।
दोस्तो माई गोव पर मुझे कई सुझाव, कई अनुभव आए हैं । वो सारे तो मैं शिक्षा विभाग को दे दूंगा, लेकिन कुछ बातों का मैं उल्लेख करना चाहता हूँ!
मुंबई महाराष्ट्र के अर्णव मोहता ने लिखा है कि कुछ लोग परीक्षा को जीवन मरण का इशू बना देते हैं अगर परीक्षा में फेल हो गए तो जैसे दुनिया डूब गयी हैं। तो वाराणसी से विनीता तिवारी जी, उन्होंने लिखा है कि जब परिणाम आते है और कुछ बच्चे आत्महत्या कर देते हैं, तो मुझे बहुत पीड़ा होती है, ये बातें तो सब दूर आपके कान में आती होंगी, लेकिन इसका एक अच्छा जवाब मुझे किसी और एक सज्जन ने लिखा है। तमिलनाडु से मिस्टर आर. कामत, उन्होंने बहुत अच्छे दो शब्द दिए है, उन्होंने कहा है कि स्टूडेंट्स worrier मत बनिए, warrior बनिए, चिंता में डूबने वाले नहीं, समरांगन में जूझने वाले होने चाहिए, मैं समझता हूँ कि सचमुच मैं हम चिंता में न डूबे, विजय का संकल्प ले करके आगे बढ़ना और ये बात सही है, जिंदगी बहुत लम्बी होती है, उतार चढाव आते रहते है, इससे कोई डूब नहीं जाता है, कभी कभी अनेच्छिक परिणाम भी आगे बढ़ने का संकेत भी देते हैं, नयी ताकत जगाने का अवसर भी देते है!
एक चीज़ मैंने देखी हैं कि कुछ विद्यार्थी परीक्षा खंड से बाहर निकलते ही हिसाब लगाना शुरू कर देते है कि पेपर कैसा गया, यार, दोस्त, माँ बाप जो भी मिलते है वो भी पूछते है भई आज का पेपर कैसा गया? मैं समझता हूँ कि आज का पेपर कैसा गया! बीत गयी सो बात गई, प्लीज उसे भूल जाइए, मैं उन माँ बाप को भी प्रार्थना करता हूँ प्लीज अपने बच्चे को पेपर कैसा गया ऐसा मत पूछिए, बाहर आते ही उसको कह दे वाह! तेरे चेहरे पर चमक दिख रही है, लगता है बहुत अच्छा पेपर गया? वाह शाबाश, चलो चलो कल के लिए तैयारी करते है! ये मूड बनाइये और दोस्तों मैं आपको भी कहता हूँ, मान लीजिये आपने हिसाब किताब लगाया, और फिर आपको लगा यार ये दो चीज़े तो मैंने गलत कर दी, छः मार्क कम आ जायेंगे, मुझे बताइए इसका विपरीत प्रभाव, आपके दूसरे दिन के पेपर पर पड़ेगा कि नहीं पड़ेगा? तो क्यों इसमें समय बर्बाद करते हो? क्यों दिमाग खपाते हो? सारी एग्जाम समाप्त होने के बाद, जो भी हिसाब लगाना है, लगा लीजिये! कितने मार्क्स आएंगे, कितने नहीं आएंगे, सब बाद में कीजिये, परीक्षा के समय, पेपर समाप्त होने के बाद, अगले दिन पर ही मन केन्द्रित कीजिए, उस बात को भूल जाइए, आप देखिये आपका बीस पच्चीस प्रतिशत बर्डन यूं ही कम हो जाएगा
मेरे मन मे कुछ और भी विचार आते चले जाते हैं खैर मै नहीं जानता कि अब तो परीक्षा का समय आ गया तो अभी वो काम आएगा। लेकिन मै शिक्षक मित्रों से कहना चाहता हूँ, स्कूल मित्रों से कहना चाहता हूँ कि क्या हम साल में दो बार हर टर्म में एक वीक का परीक्षा उत्सव नहीं मना सकते हैं, जिसमें परीक्षा पर व्यंग्य काव्यों का कवि सम्मलेन हो. कभी एसा नहीं हो सकता परीक्षा पर कार्टून स्पर्धा हो परीक्षा के ऊपर निबंध स्पर्धा हो परीक्षा पर वक्तोतव प्रतिस्पर्धा हो, परीक्षा के मनोवैज्ञानिक परिणामों पर कोई आकरके हमें लेक्चर दे, डिबेट हो, ये परीक्षा का हव्वा अपने आप ख़तम हो जाएगा। एक उत्सव का रूप बन जाएगा और फिर जब परीक्षा देने जाएगा विद्यार्थी तो उसको आखिरी मोमेंट से जैसे मुझे आज आपका समय लेना पड़ रहा है वो लेना नहीं पड़ता, वो अपने आप आ जाता और आप भी अपने आप में परीक्षा के विषय में बहुत ही और कभी कभी तो मुझे लगता है कि सिलेबस में ही परीक्षा विषय क्या होता हैं समझाने का क्लास होना चाहिये। क्योंकि ये तनावपूर्ण अवस्था ठीक नहीं है
दोस्तो मैं जो कह रहा हूँ, इससे भी ज्यादा आपको कईयों ने कहा होगा! माँ बाप ने बहुत सुनाया होगा, मास्टर जी ने सुनाया होगा, अगर टयूशन क्लासेज में जाते होंगे तो उन्होंने सुनाया होगा, मैं भी अपनी बाते ज्यादा कह करके आपको फिर इसमें उलझने के लिए मजबूर नहीं करना चाहता, मैं इतना विश्वास दिलाता हूँ, कि इस देश का हर बेटा, हर बेटी, जो परीक्षा के लिए जा रहे हैं, वे प्रसन्न रहे, आनंदमय रहे, हसंते खेलते परीक्षा के लिए जाए!
आपकी ख़ुशी के लिए मैंने आपसे बातें की हैं, आप अच्छा परिणाम लाने ही वाले है, आप सफल होने ही वाले है, परीक्षा को उत्सव बना दीजिए, ऐसा मौज मस्ती से परीक्षा दीजिए, और हर दिन अचीवमेंट का आनंद लीजिए, पूरा माहौल बदल दीजिये। माँ बाप, शिक्षक, स्कूल, क्लासरूम सब मिल करके करिए, देखिये, कसौटी को भी कसने का कैसा आनंद आता है, चुनौती को चुनौती देने का कैसा आनंद आता है, हर पल को अवसर में पलटने का क्या मजा होता है, और देखिये दुनिया में हर कोई हर किसी को खुश नहीं कर सकता है!
मुझे पहले कविताएं लिखने का शौक था, गुजराती में मैंने एक कविता लिखी थी, पूरी कविता तो याद नहीं, लेकिन मैंने उसमे लिखा था, सफल हुए तो ईर्ष्या पात्र, विफल हुए तो टिका पात्र, तो ये तो दुनिया का चक्र है, चलता रहता है, सफल हो, किसी को पराजित करने के लिए नहीं, सफल हो, अपने संकल्पों को पार करने के लिए, सफल हो अपने खुद के आनंद के लिए, सफल हो अपने लिए जो लोग जी रहे है, उनके जीवन में खुशियाँ भरने के लिए, ये ख़ुशी को ही केंद्र में रख करके आप आगे बढ़ेंगे, मुझे विश्वास है दोस्तो! बहुत अच्छी सफलता मिलेगी, और फिर कभी, होली का त्यौहार मनाया कि नहीं मनाया, मामा के घर शादी में जा पाया कि नहीं जा पाया, दोस्तों कि बर्थडे पार्टी में इस बार रह पाया कि नहीं रह पाया, क्रिकेट वर्ल्ड कप देख पाया कि नहीं देख पाया, सारी बाते बेकार हो जाएँगी , आप और एक नए आनंद को नयी खुशियों में जुड़ जायेंगे, मेरी आपको बहुत शुभकामना हैं, और आपका भविष्य जितना उज्जवल होगा, देश का भविष्य भी उतना ही उज्जवल होगा, भारत का भाग्य, भारत की युवा पीढ़ी बनाने वाली है, आप बनाने वाले हैं, बेटा हो या बेटी दोनों कंधे से कन्धा मिला करके आगे बढ़ने वाले हैं!
आइये, परीक्षा के उत्सव को आनंद उत्सव में परिवर्तित कीजिए, बहुत बहुत शुभकामनाएं!
(Hon’ble Shri Narendra Modi):
Today, Shri Barack Obama, President of the United States, joins us in a special programme of Mann Ki Baat. For the last few months, I have been sharing my "Mann Ki Baat" with you. But today, people from various parts of the country have asked questions.
But most of the questions are connected to politics, foreign policy, economic policy. However, some questions touch the heart. And I believe if we touch those questions today, we shall be able to reach out to the common man in different parts of the country. And therefore, the questions asked in press conferences, or discussed in meetings – instead of those – if we discuss what comes from the heart, and repeat it, hum it, we get a new energy. And therefore, in my opinion, those questions are more important. Some people wonder, what does "Barack" mean? I was searching for the meaning of Barack. In Swahili language, which is spoken in parts of Africa, Barack means, one who is blessed. I believe, along with a name, his family gave him a big gift.
African countries have lived by the ancient idea of ‘Ubuntu’, which alludes to the ‘oneness in humanity’. They say – “I am, because we are”. Despite the gap in centuries and borders, there is the same spirit of Vasudhaiva Kutumbakam, which speak of in India. This is the great shared heritage of humanity. This unites us. When we discuss Mahatma Gandhi, we remember Henry Thoreau, from whom Mahatma Gandhi learnt disobedience. When we talk about Martin Luther King or Obama, we hear from their lips, respect for Mahatma Gandhi. These are the things that unite the world.
Today, Barack Obama is with us. I will first request him to share his thoughts. Then, I and Barack will both answer the questions that have been addressed to us.
I request President Barack Obama to say a few words.
(Hon’ble Shri Barack Obama):
Namaste! Thank you Prime Minister Modi for your kind words and for the incredible hospitality you have shown me and my wife Michelle on this visit and let me say to the people of India how honoured I am to be the first American President to join you for Republic Day; and I’m told that this is also the first ever Radio address by an Indian Prime Minister and an American President together, so we’re making a lot of history in a short time. Now to the people of India listening all across this great nation. It’s wonderful to be able to speak you directly. We just come from discussions in which we affirmed that India and the United States are natural partners, because we have so much in common. We are two great democracies, two innovative economies, two diverse societies dedicated to empowering individuals. We are linked together by millions of proud Indian Americans who still have family and carry on traditions from India. And I want to say to the Prime Minister how much I appreciate your strong personal commitment to strengthening the relationship between these two countries.
People are very excited in the United States about the energy that Prime Minister Modi is bringing to efforts in this country to reduce extreme poverty and lift people up, to empower women, to provide access to electricity, and clean energy and invest in infrastructure, and the education system. And on all these issues, we want to be partners. Because many of the efforts that I am promoting inside the United States to make sure that the young people get the best education possible, to make sure that the ordinary people are properly compensated for their labour, and paid fair wages, and have job security and health care. These are the same kinds of issues that Prime Minister Modi, I know cares so deeply about here. And I think there’s a common theme in these issues. It gives us a chance to reaffirm what Gandhi ji reminded us, should be a central aim of our lives. And that is, we should endeavour to seek God through service of humanity because God is in everyone. So these shared values, these convictions, are a large part of why I am so committed to this relationship. I believe that if the United States and India join together on the world stage around these values, then not only will our peoples be better off, but I think the world will be more prosperous and more peaceful and more secure for the future. So thank you so much Mr. Prime Minister, for giving me this opportunity to be with you here today.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Barack the first question comes from Raj from Mumbai
His question is, the whole world knows about your love for your daughters. How will you tell your daughters about youre experience of India? Do you plan to do some shopping for them?
(Hon’ble Shri Barack Obama):
Well first of all they very much wanted to come. They are fascinated by India, Unfortunately each time that I have taken a trip here, they had school and they couldn’t leave school. And in fact, Malia, my older daughter, had exams just recently. They are fascinated by the culture, and the history of India, in part because of my influence I think, they are deeply moved by India’s movement to Independence, and the role that Gandhi played, in not only the non-violent strategies here in India, but how those ended up influencing the non-violent Civil Rights Movement in the United States. So when I go back I am going to tell them that India is as magnificent as they imagined. And I am quite sure that they are going to insist that I bring them back the next time I visit. It may not be during my Presidency, but afterwards they will definitely want to come and visit.
And I will definitely do some shopping for them. Although I can’t go to the stores myself, so I have to have my team do the shopping for me. And I’ll get some advice from Michelle, because she probably has a better sense of what they would like.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Barack said he will come with his daughters. I extend an invitation to you. Whether you come as President, or thereafter, India looks forward to welcoming you and your daughters.
Sanika Diwan from Pune, Maharashtra has asked me a question. She asks me, whether I have sought assistance from President Obama for the Beti Bachao, Beti Padhao Mission
Sanika you have asked a good question. There is a lot of worry because of the sex ratio in India. For every 1000 boys, the number of girls is less. And the main reason for this is that, there is a defect in our attitudes towards boys and girls.
Whether or not I seek help from President Obama, his life is in itself an inspiration. The way he has brought up his two daughters, the way he is proud of his two daughters.
In our country too, I meet many families who have only daughters. And they bring up their daughters with such pride, give them such respect, that is the biggest inspiration. I believe that inspiration is our strength. And in response to your question, I would like to say, to save the girl child, to educate the girl child, this is our social duty, cultural duty, and humanitarian responsibility. We should honour it.
Barack, there is a question for you. The second question for President Obama comes through e-mail: Dr. Kamlesh Upadhyay, a Doctor based in Ahmedabad, Gujarat - Your wife is doing extensive work on tackling modern health challenges like obesity and diabetes. These are increasingly being faced in India as well. Would you and the First Lady like to return to India to work on these issues after your Presidency, just like Bill and Melinda Gates?
(Hon’ble Barack Obama):
Well, we very much look forward to partnering with organizations, and the government and non-governmental organizations here in India, around broader Public Health issues including the issue of obesity. I am very proud of the work that Michelle has done on this issue. We’re seeing a world-wide epidemic of obesity, in many cases starting at a very young age. And a part of it has to do with increase in processed foods, not naturally prepared. Part of it is a lack of activity for too many children. And once they are on this path, it can lead to a life time of health challenges. This is an issue that we would like to work on internationally, including here in India. And it is a part of a broader set of issues around global health that we need to address. The Prime Minister and I have discussed, for example, how we can do a better job in dealing with issues like pandemic. And making sure that we have good alert systems so that if a disease like Ebola, or a deadly flu virus, or Polio appears, it is detected quickly and then treated quickly so that it doesn’t spread. The public health infrastructure around the world needs to be improved. I think the Prime Minister is doing a great job in focusing on these issues here in India. And India has a lot to teach many other countries who may not be advancing as rapidly in improving this public health sector. But it has an impact on everything, because if children are sick they can’t concentrate in school and they fall behind. It has a huge economic impact on the countries involved and so we think that there is a lot of progress to be made here and I am very excited about the possibilities of considering this work even after I leave office.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Mr. Arjun asks me a question. An interesting question. He says he has seen an old photo of me as a tourist outside the White House. He asks me what touched me when I went there last September.
It is true that when I first went to America, I was not lucky enough to visit the White House. There is an iron fence far from the White House. We stood outside the fence and took a photograph. White House is visible in the background. Now that I have become Prime Minister, that photo too has become popular. But at that time, I had never thought that sometime in my life, I would get a chance to visit the White House. But when I visited the White House, one thing touched my heart. I can never forget that. Barack gave me a book, a book that he had located after considerable effort. That book had become famous in 1894. Swami Vivekananda, the inspiration of my life, had gone to Chicago to participate in the World Religions Conference. And this book was a compilation of the speeches delivered at the World Religions Conference. That touched my heart. And not just this. He turned the pages of the book, and showed me what was written there. He had gone through the entire book! And he told me with pride, I come from the Chicago where Swami Vivekananda had come. These words touched my heart a lot. And I will treasure this throughout my life. So once, standing far from the White House and taking a photo, and then, to visit the White House, and to receive a book on someone whom I respect. You can imagine, how it would have touched my heart.
Barack there is a question for you. Himani from Ludhiana, Punjab. Question is for you ……:
(Hon’ble Shri Barack Obama):
Well the question is “Did you both imagine you would reach the positions that you’ve reached today?”
And it is interesting, Mr. Prime Minister, your talking about the first time you visited White House and being outside that iron fence. The same is true for me. When I first went to the White House, I stood outside that same fence, and looked in, and I certainly did not imagine that I would ever be visiting there, much less living there. You know, I think both of us have been blessed with an extraordinary opportunity, coming from relatively humble beginnings. And when I think about what’s best in America and what’s best in India, the notion that a tea seller or somebody who’s born to a single mother like me, could end up leading our countries, is an extraordinary example of the opportunities that exist within our countries. Now I think, a part of what motivates both you and I, is the belief that there are millions of children out there who have the same potential but may not have the same education, may not be getting exposed to opportunities in the same way, and so a part of our job, a part of government’s job is that young people who have talent, and who have drive and are willing to work for, are able to succeed. And that’s why we are emphasizing school, higher education. Making sure that children are healthy and making sure those opportunities are available to children of all backgrounds, girls and boys, people of all religious faiths and of all races in the United States is so important. Because you never know who might be the next Prime Minister of India, or who might be the next President of United States. They might not always look the part right off the bat. And they might just surprise you if you give them the chance.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Thank you Barack.
Himani from Ludhiana has also asked me this question – did I ever imagine I would reach this high office?
No. I never imagined it. Because, as Barack said, I come from a very ordinary family. But for a long time, I have been telling everyone, never dream of becoming something. If you wish to dream, dream of doing something. When we do something, we get satisfaction, and also get inspiration to do something new. If we only dream of becoming something, and cannot fulfil the dream, then we only get disappointed. And therefore, I never dreamt of becoming something. Even today, I have no dream of becoming something. But I do dream of doing something. Serving Mother India, serving 125 crore Indians, there can be no greater dream than this. That is what I have to do. I am thankful to Himani.
There is a question for Barack from Omprakash. Omprakash is studying Sanskrit at JNU. He belongs to Jhunjunu, Rajasthan. Om Prakash is convener of special centre for Sanskrit Studies in JNU.
(Hon’ble Shri Barack Obama):
Well this is a very interesting question. His question is, the youth of the new generation is a global citizen. He is not limited by time or boundaries. In such a situation what should be the approach by our leadership, governments as well as societies at large.
I think this is a very important question. When I look at this generation that is coming up, they are exposed to the world in ways that you and I could hardly imagine. They have the world at their fingertips, literally. They can, using their mobile phone, get information and images from all around the world and that’s extraordinarily powerful. And what that means, I think is that, governments and leaders cannot simply try to govern, or rule, by a top-down strategy. But rather have to reach out to people in an inclusive way, and an open way, and a transparent way. And engage in a dialogue with citizens, about the direction of their country. And one of the great things about India and the United States is that we are both open societies. And we have confidence and faith that when citizens have information, and there is a vigorous debate, that over time even though sometimes democracy is frustrating, the best decisions and the most stable societies emerge and the most prosperous societies emerge. And new ideas are constantly being exchanged. And technology today I think facilitates that, not just within countries, but across countries. And so, I have much greater faith in India and the United States, countries that are open information societies, in being able to succeed and thrive in this New Information Age; than closed societies that try to control the information that citizens receive. Because ultimately that’s no longer possible. Information will flow inevitably, one way or the other, and we want to make sure we are fostering a healthy debate and a good conversation between all peoples.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Omprakash wants me too, to answer the question that has been asked to Barack.
Barack has given a very good answer. It is inspiring. I will only say, that once upon a time, there were people inspired primarily by the Communist ideology. They gave a call: Workers of the world, Unite. This slogan lasted for several decades. I believe, looking at the strength and reach of today's youth, I would say, Youth, Unite the world. I believe they have the strength and they can do it.
The next question is from CA Pikashoo Mutha from Mumbai, and he asks me, which American leader has inspired you
When I was young, I used to see Kennedy's pictures in Indian newspapers. His personality was very impressive. But your question is, who has inspired me. I liked reading as a child. And I got an opportunity to read the biography of Benjamin Franklin. He lived in the eighteenth century. And he was not an American President. But his biography is so inspiring – how a person can intelligently try to change his life.
If we feel excessively sleepy, how can we reduce that?
If we feel like eating too much, how can we work towards eating less?
If people get upset with you that cannot meet them, because of the pressure of work, then how to solve this problem?
He has addressed such issues in his biography. And I tell everyone, we should read Benjamin Franklin's biography. Even today, it inspires me. And Benjamin Franklin had a multi-dimensional personality. He was a politician, he was a political scientist, he was a social worker, he was a diplomat. And he came from an ordinary family. He could not even complete his education. But till today, his thoughts have an impact on American life. I find his life truly inspiring. And I tell you too, if you read his biography, you will find ways to transform your life too. And he has talked about simple things. So I feel you will be inspired as much as I have been.
There is a question for Barack, from Monika Bhatia.
(Hon’ble Shri Barack Obama):
Well the question is “As leaders of two major economies, what inspires you and makes you smile at the end of a bad day at work?”
And that is a very good question. I say sometimes, that the only problems that come to my desk are the ones that nobody else solves. If they were easy questions, then somebody else would have solved them before they reached me. So there are days when it’s tough and frustrating. And that’s true in Foreign Affairs. That is true in Domestic Affairs. But I tell you what inspires me, and I don’t know Mr. Prime Minister if you share this view - almost every day I meet somebody who tells me, “You made a difference in my life.”
So they’ll say, “The Health-Care law that you passed, saved my child who didn’t have health insurance.” And they were able to get an examination from a Physician, and they caught an early tumour, and now he is doing fine.
Or they will say “You helped me save my home during the economic crisis.”
Or they’ll say, “I couldn’t afford college, and the program you set up has allowed me to go to the university.”
And sometimes they are thanking you for things that you did four or five years ago. Sometimes they are thanking you for things you don’t even remember, or you’re not thinking about that day. But it is a reminder of what you said earlier, which is, if you focus on getting things done as opposed to just occupying an office or maintaining power, then the satisfaction that you get is unmatched. And the good thing about service is that anybody can do it. If you are helping somebody else, the satisfaction that you can get from that, I think, exceeds anything else that you can do. And that’s usually what makes me inspired to do more, and helps get through the challenges and difficulties that we all have. Because obviously we are not the only people with bad days at work. I think everybody knows what it is like to have a bad day at work. You just have to keep on working through it. Eventually you make a difference.
(Hon’ble Shri Narendra Modi):
Indeed Barack has spoken words from the heart (Mann Ki Baat). Whatever position we may hold, we are human too. Simple things can inspire us. I also wish to narrate an experience. For many years, I was like an ascetic. I got food at other people's homes. Whoever invited me, used to feed me as well. Once a family invited me over for a meal, repeatedly. I would not go, because I felt they are too poor, and if I go to eat at their place, I will become a burden on them. But eventually, I had to bow to their request and love. And I went to eat a meal at their home. It was a small hut, where we sat down to eat. They offered me roti made of bajra (millet), and mik. Their young child was looking at the milk. I felt, the child has never even seen milk. So I gave that small bowl of milk to the child. And he drank it within seconds. His family members were angry with him. And I felt that perhaps that child has never had any milk, apart from his mother's milk. And maybe, they had bought milk so that I could have a good meal. This incident inspired me a lot. A poor person living in a hut could think so much about my well-being. So I should devote my life to their service. So these are the things that serve as inspiration. And Barack has also spoken about what can touch the heart.
I am thankful to Barack, he has given so much time. And I am thankful to my countrymen for listening to Mann Ki Baat. I know radio reaches every home and every lane of India. And this Mann Ki Baat, this special Mann Ki Baat will echo forever.
I have an idea. I share it with you. There should be an e-book made of the talk between Barack and me today. I hope the organizers of Mann Ki Baat will release this e-book. And to you all, who have listened to Mann Ki Baat, I also say, do participate in this. And the best hundred thoughts that emerge out of this, will also be added to this e-book. And I want you to write to us on Twitter, on Facebook, or online, using the hashtag #YesWeCan.
• Eliminate Poverty - #YesWeCan • Quality Healthcare to All - #YesWeCan • Youth empowered with Education - #YesWeCan • Jobs for All - #YesWeCan • End to Terrorism - #YesWeCan • Global Peace and Progress - #YesWeCan
I want you to send your thoughts, experiences and feelings after listening to Mann Ki Baat. From them, we will select the best hundred, and we will add them to the book containing the talk that Barack and I have had. And I believe, this will truly become, the Mann Ki Baat of us all.
Once again, a big thank you to Barack. And to all of you. Barack's visit to India on this pious occasion of 26th January, is a matter of pride for me and for the country.
Thank you very much.
My Dear Fellow Countrymen,
Today I have this great opportunity of interacting with you again. You must be wondering why a Prime Minister should be interacting the way I am doing it. Well, first and foremost, I am a less of your Prime Minister and more of a Pradhan Sewak (serving the people). Since childhood I have been hearing that by sharing, our intensity of pain become less while the intensity of our joys grow manifold. Well I think, this is the guiding thought behind Mann ki Baat. It is an opportunity for me to sometimes share my concern and sometimes my joy. Sharing my deepest concerns with you makes me feel light hearted and sharing my joy just doubles my happiness.
Last time, I mentioned my concern about the youth of the country. It is not because you chose me as the Prime Minister but because I feel concerned as an individual. Sons and daughters of many families are caught in the trap of drugs. It just does not destroy the person involved, but his entire family, the society and the Nation at large. Drug is such a grave menace which destroys the most powerful individuals.
While serving as the Chief Minister of Gujarat, my officers with good records would often come to ask for leave. Initially they would hesitate to spell out the reasons, however on insisting they revealed that their child had fallen into the drug trap and they now need to spend time with their kids and rehabilitate them. I could see the bravest of my officers struggling to control their tears. I met suffering mothers too. In Punjab I had the chance to meet some mothers who were very angry and yet concerned about their children who had fallen into the trap of drugs.
We have to work together as a society to tackle this menace. I understand that the youth who fall into this drug trap are often blamed. We blame these youth as being careless and irresponsible. We perceive that the victims are bad but the fact is that the drugs are bad. The youth are not wrong; it is this addiction which is wrong. Let us not blame and wrong our kids. Let us get rid of this habit of addiction and not victimize our kids. Blaming the kids would push them further into addiction. This is in fact a psycho-socio-medical issue and let us treat it as such a problem. This menace needs to be handled carefully as its solution is not limited to medical intervention only. The individual concerned, his family, friends, the society, the government and the legal system all have to work in tandem to tackle this menace. Each one of us have to contribute to get rid of this menace.
A few days ago, I had organized a DGP level conference in Assam. I expressed my concern over this issue and my displeasure at the non-serious attitude of the people concerned. I have asked the police department to seriously discuss this issue and come out with relevant solutions. I have suggested the department to launch a toll free helpline. The families often feel ashamed to come out in open about the addiction problem of their children. They have no one to confide in. Parents from any part, any corner of the country can freely approach the police if their children have fallen a victim to addiction. The department has taken this suggestion seriously and working towards its fulfillment.
The drug menace brings about the Three D’s. These Three D’s are not the ones related to entertainment but I am talking about the Three D’s related to the three vices.
First D is Darkness, the second D is Destruction and the third D is Devastation.
Drugs lead a person to a blind path of destruction. There is nothing left in its trail but devastation. This is a topic of great concern and demands total attention.
I had mentioned this topic in my last address in Mann ki Baat. We received more than 7000 letters on our Akashvani address. Some letters were received in the government offices. We received responses on government portal, Mygov.in, online and through e-mails. Lakhs of comments were received on twitter and facebook. Hence, a deep rooted concern in the society’s psyche has found a voice.
I am especially thankful to the media of our country for carrying this concern forward. Many channels conducted hour long programs. These programs were not just meant to criticize the government. They were forums for open discussion, a concern and an effort to come out with workable solutions. These initiatives created background for healthy discussions. The government was also sensitized to its responsibilities in this direction. The government can no longer remain neutral to these concerns.
There is a question I want to ask these youth caught in the drug trap. I want to ask these youth that when for three or four hours they are in a state of intoxication, they might be feeling free of all concerns, free of all tensions and in a different world altogether. But have you ever lent a thought to the fact that when you buy drugs where does this money go to? Have you ever thought about it? Just make a guess. What if this drug money goes to the terrorists? What if this money is spent by the terrorists to procure weapons? And with this weapon the very same terrorist might be pumping bullets in the heart of my soldiers. The soldier of my country gets martyred. Have you ever thought about our soldiers- a soldier who is so dear to his mother, the treasured son of Mother India, the brave son of the soil is hit by a bullet probably funded by the money spent on purchasing drugs. I know and firmly believe that you too love your motherland and have tremendous respect for our soldiers. Then how can you support a habit which funds drug mafia and the terrorists.
Some people feel that when a person is in despair, faces failures and when he is directionless, he is an easy prey to drugs. But I feel that people who lack ambition, do not have any set goals and targets, who have a deep vacuum in their lives, are the ones where drugs will have an easy access. If you want to avoid drugs and save your children from this menace then foster ambition in them, give them dreams to pursue and make them individuals with a desire to achieve something in life. Then you will see that they will not be easily distracted. Their aim then will be to achieve something in life.
Have you ever followed a sportsman’s life? A sportsman is motivated forever. In the bleak winters everyone feels like sleeping in the warmth of a quilt but a sportsman will still rise at 4 or 5 and go for his workouts. Why? because the goal is set. Similarly, if your child would be aimless, there are chances of him/her to fall prey to menace like drugs.
I remember the words of Vivekananda. These words are very apt for all the young people. Just keep repeating this thought over and over again. “Take a thought, make it your life. Ponder on it and dream about it. Make it an integral part of your dreams. Make it a part of your mind, brain, veins and each and every part of your body and forget everything else”.
This thought of Vivekananda is apt for every young person and that is why I say that each person should have an ambition in life. Having an ambition does not allow your focus on unnecessary things.
Some take it under peer pressure because it looks “cool”, some consider it as a style statement. So sometimes the youth inadvertently fall into this serious trap, due to the wrong mental perception. Addiction is neither cool nor a style statement. In reality, it is a precursor to destruction. So whenever your friends boast about their drug habits, do not applaud and enjoy such conversation. Do not be a mute spectator to such absurdities. Have the courage to stand against such conversations and say NO. Have the guts to despise such a conversation, reject such a conversation and have the guts to tell the person that he is wrong.
I would like to share some views with the parents too. These days none of us have time. All of us are running against time to earn our livelihood. We are racing against time to improve the quality of our lives. But in this blind race, do we have the time to spare for our kids. Do we ever work for our kid’s spiritual progress and discuss it with them, rather we discuss only material progress. How are they doing in their studies, what has been their progress in exam, what to eat and what not to eat, where to go and where not to go – majorly these topics form the core of the entire interactions. Do we share such a relationship that our children can bare their hearts to us? I request all of you to do this. If your children share a frank relationship then you can very well know what is going on in their life. Children do not take to bad habits suddenly. It happens gradually and it also impacts the home. Observe the changes that are happening in your home. If you observe closely then I believe that you may be successful in detecting the problem at the very beginning. Be aware of your child’s friend circle and don’t keep your conversations focused just about progress. Your concern should extend to their inner depths, their thoughts, their logic, their books, their friends and their mobiles - how and where are they spending their time. These need to be taken care of. I believe that no one else can do what a parent can for their kids. Our ancestors have left us certain pearls of wisdom and that is why they are known as statesmen. A saying goes like this:
Paanch Varsh Laaw Lijiye
Dass Laaw Tadan dei
Paanch Varsh Laaw Lijiye
Dass Laaw Tadan dei
Sut Hi Solah Varsh Mein
Mitra Sarij Gani Dei
This means that till 5 years of age a child should grow in the loving and tender care of his parents, by the time he is 10 the values of discipline should be inculcated in him. Sometimes we see that an intelligent mother gets angry and does not speak with her child throughout the day. This is a big punishment for the child. The mother punishes herself but the child too gets punished in turn. The mother just has to say that I will not talk and the 10 year old will remain worried the whole day long. He changes his habit and by the time he is of 16 years then the relationship should turn like a friend towards him. There should be an open conversation with him. This is a brilliant advice which has been passed on by our ancestors. I would like to see this inculcated in our family life.
Another thing brought to our notice is the role of the pharmacists. Some of the medicines lead to addiction. So such medicines should not be distributed without a doctor’s prescription. Sometimes a simple thing like a cough syrup can trigger addiction. It becomes the starting point for addiction. There are quite a few things that I would not like to raise from this platform. But we will have to follow and accept this discipline.
These days many children from villages go to city for higher education and start living in a hostel or a boarding school. I have heard that sometimes these avenues become the entry point of such addiction. For this the education system, the society and the security force will have to act as a vigilante. Each one will have to fulfill their roles and responsibilities. The government will fulfill the responsibilities on its end. We should constantly strive to fulfill our obligations.
I would also like to mention about the letters we have received. Some of them are interesting, some are filled with grief and some are inspiring. I cannot mention all, but I would like to mention one. There was a certain Mr. Dutt. He was deep into addiction .He was also jailed where he had several restrictions. Then later his life changed. He studied in jail and then his life was transformed. His story is very famous. He was in Yerawada Jail. There might be many such inspiring stories. Many people have been victorious in their fight against addiction. We too can come out of such habits and so we should definitely try. We should make efforts for de-addiction and rehabilitation. I would ask celebrities to be a part of this initiative - be it from the field of cinema, sports or someone concerned with public life. Be it the cultural or spiritual world, we should use every possible platform to create awareness. There should be constant messages in public interest. They will certainly have an effect. Those active on the social media, I would request them to create a continuous online movement by joining #DrugsFreeIndia hash-tag. This is more relevant because most of the addicted youth are a part of the social media. If we take this #DrugsFreeIndia hash-tag movement forward then we will do a great service for public awareness and education.
I want to take this concern forward. I would request all those who have successfully come out of this addiction to share their stories. I touched this topic because like I said in the beginning grief becomes less on sharing. This is a topic of national concern and I am not here to sermonize. And neither am I entitled to preach. I am just sharing my grief with you. Those families who are suffering from this menace, I want to share their pain as well. I want to create a responsible environment. There can be difference of opinions but let us make a beginning somewhere.
Like I mentioned before, I want to share happiness. Last week I had the opportunity to meet the Blind Cricket Team. They had won the world cup. What joy and excitement, they were exuding great self confidence. God has given us everything, eyes, hands, legs i.e. we are totally capable yet we lack this kind of determination and passion which I could see in the blind cricketers. What zeal and enthusiasm, really it was contagious. I felt super charged after meeting them. Such incidents bring great pleasure in life.
In the past few days there was yet another important news. The cricket team from Kashmir defeated Mumbai on their home ground. I do not view it as a matter of someone’s victory and other’s loss. I view it differently. All the stadiums in Kashmir have been inundated after the floods. Kashmir is passing through a tough phase. The circumstances have been extremely grim with these boys not standing any chance to practice. But the Team Spirit shown by these boys, their conviction and determination is awe inspiring. These boys have shown us that one can overcome the most trying and testing circumstances if one remains focused on our goals. This news gave me immense pleasure and I take this opportunity to congratulate all these players on their victory.
Two days back, the United Nations has decided to celebrate June 21st as International Yoga Day. It is a matter of great pride and honour for India. Our ancestors developed a beautiful tradition and today the entire world is associated with it. It does not merely benefit one personally but it has the potential to bring all the people together globally. The entire world came together on the issue of Yoga in the UN and a unanimous resolution was passed just two days back. 177 countries became the co-sponsors. In the past when it was decided to celebrate the birthday Mr. Nelson Mandela, 165 countries became co-sponsors. Before that efforts were on for International Toilet Day and 122 nations became co-sponsors to that initiative too. For celebrating Oct 2nd as Non Violence Day 140 Countries became co-sponsors, before that. But 177 countries co- sponsoring Yoga is a world record of sorts. I am thankful to all the countries that have come out in support and have honored the sentiments of the Indians and decided to observe World Yoga Day. It is now our duty that Yoga reaches out to the masses in its true essence.
Last week I had the chance to have a meeting with the Chief Ministers of all the states. This tradition has been going on for the past 50-60 years. This time it was organized at the Prime Minister’s residence. We started it as a retreat program with no papers, no files and no officers. It was a simple interaction where the Prime Minister and Chief Minister were all the same, seated together like friends. For an hour or two, matters of national concern were seriously discussed in a friendly atmosphere. Everyone just poured their hearts out. There was no political agenda involved. This too was a memorable experience that I wanted to share with you.
Last week I had the chance to travel to the North East. I had been there for three days. Many a times youth express their desire to see the Taj, Singapore or Dubai. But I would urge all the nature lovers, all who want to experience the divinity in nature, to take a tour of the North East. I had gone earlier too. This time when I went as the Prime Minister, I tried to explore its potential. Our North east has tremendous potential and possibilities. It’s a land of beautiful people and beautiful surroundings. I was filled with immense joy visiting that place. Sometimes people ask Modi ji don’t you get tired? I want to say that whatever little fatigue I had, well the North East took it away completely, I am thoroughly rejuvenated. Such is the pleasure that I derived from that visit. The love and respect accorded by the people there is something that will stay with me forever. The kinship and affinity showed by the people of the North East touched me deeply. I will also tell you, it is not a joy for only Modi to enjoy, it is there for you to enjoy too. So do travel to the North East and enjoy.
The next edition of Mann Ki Baat will happen in 2015. This is probably my last program in 2014. I wish you all a Merry Christmas. I would like to wish all the very best of New Year hes in advance. It gives me immense pleasure to know that this program Mann Ki Baat is broadcast in regional languages by the Local Radio stations that same night at 8 pm. And it is surprising to know some of the regional voice-over artists also speak in the voice very similar to me. I am surprised at the brilliant work being done by the artists associated at Akashvani and I would like to congratulate them. I consider this as an effective medium to connect to the masses. We have had tremendous response. Seeing the response Akashvani has devised a new method. They have taken a new Post Box number. So now if you wish to write into me you can write on this Post Box number.
Mann Ki Baat
Post Box no 111, Akashvani
New Delhi.
I will be awaiting your letters. You do not realize that your letters become my inspiration. Some suggestions penned down can do good to the entire nation. I am thankful to you all. We will meet next in 2015 and on some Sunday morning we will again have our own Mann Ki Baat.
Thank you very much.
My dear fellow countrymen,
I am with you again almost after a month. A month is quite a long time. Lots of things keep happening in the world. You all have recently celebrated the festival of Diwali with great fervour and joy. It is these festivals which bring happiness in our daily lives from time to time. Be it poor or rich, people from village or from urban areas, festivals hold a different significance in everyone’s lives. This is my first meeting after Diwali, so I convey my very warm wishes to you all.
Last time we had some general conversation. But then I came to some new realizations after that conversation. Sometimes we think leave it… nothing is going to change, people are indifferent, they will not do anything, our country is like this. From my last conversation in Mann Ki Baat to this one, I would urge you all to change this mindset. Neither is our country is like this nor our people indifferent. Sometimes I feel the Nation is way ahead and the government is lacking behind. And from my personal experience I will say that the governments too needs to change their mindsets. And I say that because I can see tremendous sense of commitment in the Indian youth. They are very eager to do their bit and are just seeking an opportunity where they can do their bit. And they are making efforts at their own end. Last time I had asked them to buy at least one khadi outfit. I had not asked anyone to be Khadidhari, But the feedback I got from Khadi stores was that in a week’s time the sales had jumped up by 125%. In this way, as compared to last year the sales this year is more than double in the week following 2nd Oct. This means, the people of our country is many times more than we think of. I salute all my fellow Indians.
Cleanliness……….. Can anyone imagine that cleanliness will become a such a huge public movement. The expectations are high and they should be so. I can see some good results, cleanliness can now be witnessed in two parts. One is those huge garbage piles which keep lying in the city; well the people in the government will work to remove those. It is a big challenge but you cannot run away from your responsibilities. All state governments and all municipalities will now have to take concrete actions due to the rising public pressure. Media is playing a very positive role in this. But there is the second aspect which gives me immense pleasure, happiness and a sense of satisfaction that the general public has started feeling that leave what happened in the past, now they will not dirty their surroundings. We will not add to the existing dirt. A gentleman Mr Bharat Gupta has sent me a mail on mygov.in from Satna, Madhya Pradesh. He has related his personal experience during his tour of the railways. He said that people eat on trains and usually litter around. He continues to say that he has been touring from the past many years but it is this time around no one was littering, rather they were looking for dustbins to throw their trash. When they could not see any arrangements they collected all their litter in a corner. He says that it was a very gratifying experience for me. I thank Bharat ji for sharing this experience with me.
What I am seeing is that this campaign has had a great influence on kids. Many families mention that now whenever kids eat a chocolate they themselves pick the wrapper and disposes it. I was seeing a message on the social media. Someone had posted a picture with the Title “My hero of the Day”. This picture was that of a little kid who, picks up trash, wherever he goes, even when going to school. He is himself motivated to do this. Just see…people now feel it is their country and they will not make it dirty. We will not add to the existing dirt pile. And those do litter feel ashamed for someone is around to point it out to them. I consider all these to be good omens.
Another thing is that many people come to meet me who are from all the sections of the society. They can be government officers, from film world, sports world, industrialists, scientists ……. All of them, whenever they interact with me, in ten minutes discussion, about four to five minutes the discussion is on social issues. Someone talks about cleanliness, while some others talk about education, while someone talks about social reforms. Some people discuss the ruining of family life. I initially thought if a businessman comes, he will definitely talk of things of his personal interest. But I am seeing a major change.
They talk less about their interest and more about taking on some or the other social responsibility. When I add up all these small incidents I see a larger picture and I realize that we are moving in the right direction. It is true that unhealthy environment leads to diseases and sickness, but where does sickness strike first. It first strikes the poor household. When we work towards cleanliness, we make a major effort in the direction of helping the poor. If the poor families are saved from diseases, then they will be saved from a lot of financial problems. If a person is healthy, then he will work hard, earn for the family and help in running the family smoothly. And so this cleanliness drive is directly related to the health and welfare of my poor brethren. We may not be able to do something to help the poor, but even keeping the environs clean helps the poor in a big way. Let us view it from this perspective; it will be very beneficial.
I receive different kinds of letters. Last time I had mentioned about our specially abled children. Whom God has given some kind of deficiencies; I had expressed my feelings regarding those people. I see that people who work in this field are sending me their success stories. But I came to know about two things from my people in the government. The people from the HRD ministry after hearing my talk, felt the need to do something. And the officers came together to work out an action plan. This is an example of how changes are coming about in governance. One they have decided that those specially abled who want to pursue technical education, a thousand of them who are good will be selected for Special Scholarships, and a plan has been made. I congratulate the officials who could think in those lines. Another important decision is that all the Kendriya Vidyalaya’s and all Central Universities will have a special infrastructure for the specially abled, for example if they can’t climb stairs then there will be provision for ramps to facilitate movement by wheel chair. They need different kinds of toilets. The HRD ministry has decided to allocate an additional Lakh rupees to the Kendriya Vidyalays and Central universities. This fund will be used by these institutions to create infrastructure for the specially abled. This is an auspicious beginning……………these things will lead us to change.
I had the chance to visit Siachin a few days back. I spent Diwali with the Jawans who are ready to lay down their lives for the nation. When the nation was celebrating Diwali I was at Siachin. It is because of them that we were able to celebrate Diwali, so I wanted to be with them. I experienced the difficulties in which they spent their time there. I salute all my Jawans. But I want to share another matter of great pride with you. Our Jawans work in the field of security. In calamities, they risk their lives to save our life. They also fetch medals for us in sporting events. You will be glad to know that these Jawans have won a gold medal in a very prestigious event in Britain called Cambrian Patrol, defeating contestants from 140 nations. I offer these Jawans my heartiest congratulations.
I also got an opportunity to meet, the young and dynamic students, boys and girls over tea who had won medals in Sports. They give me renewed energy. I was seeing their zeal and enthusiasm. The facilities in our country are quite less as compared to other nations, but instead of complaining they were just sharing their joy and excitement. For me, this tea programme for these players was very inspiring, and I felt really good.
I would like to tell you something more and that too from my heart. I truly believe that people of my country trust my words and my intentions. But, today one more time, I want to reiterate my commitment. As far as black money is concerned, my people, please trust your Prime Servant, for me this is the Article of Faith. This is my commitment that the hard-earned money of the poor people stashed abroad, every penny of that should be brought back. The ways and means to be followed can be different. And this is very obvious in a democratic country, but on the basis of as much I understand and as much I know, I assure you that we are on the right track. Today, nobody, neither me, nor the government, nor you, nor even the previous government knew how much money is stashed abroad. Everyone gives estimate calculated in his/her own way. I don’t want to get lost in some such figures and estimates, Its my commitment that, be it 2 rupees, or 5 rupees, or millions or even billions, this is the hard-earned money of the poor people of my country and it has to come back. And I assure you that I will keep trying till the end. No efforts will be spared. I want your blessings to be always with me. I assure you that I will do whatever and whenever something is required to be done for you. I give my commitment to you.
I have received a letter. It has been sent by Sri Abhishek Pareekh. The same sentiments were expressed to me by many mothers and sisters when I was not even the Prime Minister. Some doctor friends had also expressed their concern and I too have expressed my views on this issue a number of times in the past. Mr. Parikh has drawn my attention towards the increase of drug addiction that is fast catching up with our young generation. He has asked me to discuss this topic in “Mann ki Baat.” I agree with his concern and I will definitely include this topic, in my next edition of Mann Ki Baat. I will discuss the topic of drugs, drug addiction and drug mafia and how they are a threat to our country’s youth. If you have some experience, any information in this regard, if you have ever rescued any child from this drug addiction, if you know of any ways and means to help, if any government official has played a good role, if you give me any such information, I will convey such efforts to the public and together we will try to create an environment in each family that no child ever thinks of choosing this vice out of sheer frustration. I will definitely discuss this in detail in the next edition.
I know I am choosing those topics which put the government in the dock. But how long will we keep these things hiding? How long will we brush these important concerns under the carpet? Some day or the other we need to take a call, follow our instincts and for grand intentions tough calls are equally important. I am mustering the courage to do so because your love inspires me to do so. And I will continue to do such things because of your love.
Some people told me “ Modi ji you asked us to send you suggestions on Facebook, twitter or email. But a large section of the social class does not have access to these facilities, so what can they do. Your point is very valid. Everyone does not have this facility. Well then, if you have something to say related to Mann Ki Baat, that you hear on the radio even in the villages then do write into me on the following address
Mann Ki Baat
Akashvani
Sansad Marg
New Delhi.
Even if you send some suggestions through letters they will definitely reach me. And I will take them seriously as active citizens are the biggest asset for development. You write one letter, it indicates that you are very active. When you give your opinion, it means that you are concerned with national issues and this is strength of the nation. I welcome you.
For my Mann Ki Baat, your mann ki baat sould also reach me. Maybe you will definitely write a letter. I will try and interact with you again next month. I will try, that whenever I talk, it is Sunday, around 11 am. So I am getting closer to you.
The weather is changing. Winters are slowly setting in. This is a good month for health. Some find it a good season for eating. Some find it good for wearing nice clothes. Besides food and clothes it is a good season for health. Don’t let it go waste. Make the most of it.
Thank You.
My Dear Countrymen,
Today is the holy festival of Vijay Dashami. My heartiest greetings on this occasion of Vijay Dashami to one and all.
Through the medium of radio, I would like to share few heartfelt thoughts with you today. And, I hope that not only today, this series of conversation may be carried out regularly in future. I will try my best, if possible, to take out time twice a month or even once to speak with you. In future, I have also decided that whenever I will speak to you, it would be on Sunday morning at 11am. It would be convenient for you too and I will be content to have shared my thoughts with you.
We are celebrating the festival of Vijaya Dashami today, which is a symbol of victory of Good over Evil. A gentleman named Ganesh Venkatadari, a native of Mumbai, has sent me a mail writing that we must take a vow to eliminate ten bad habits from within ourselves on the occasion of Vijaya Dashami. I express my gratitude to him for this suggestion. As individuals, all of us must be thinking to put an end to our bad habits and win over them. For the sake of our nation, I believe all of us should come together and take a vow in getting rid of the dirt and filth from our country. On the occasion of Vijaya Dashami, we must take a vow to eliminate dirt and filth and we can do so.
Yesterday, on 2nd October on the eve of Mahatma Gandhi’s birth anniversary, more than 1.25 crore countrymen have started the ‘Swachh Bharat’ movement. I had shared one thought yesterday that I will nominate nine people and they need to upload their videos of cleaning the nation on social media websites, and nominating nine more people to do the same. I want you all to join me, clean up the nation, and nominate nine more people in this drive. Eventually, the entire nation will be filled with this atmosphere. I strongly believe that all of you will join hands with me to carry this movement forward.
Whenever we think of Mahatma Gandhi, we are reminded of Khaadi. You may be wearing variety of clothes with different fabrics and company brands in your family. But is it not possible to include Khaadi too? I am not telling you to use only Khaadi products. I am just insisting to use, at least one Khaadi product, like handkerchief, or a bath towel, a bed sheet, a pillow cover, a curtain or anything of that kind. If you have an inclination for all kinds of fabrics and clothes in your family, you can also buy Khaadi products on a regular basis. I am saying this as when you buy Khaadi products, it helps poor people to light lamps on Diwali. Also, you can avail a special discount on Khaadi products from 2nd October for a month. It is a very small thing, but has a very big impact which binds you with the poor. How you see this as a success. When I speak of 1.25 crore countrymen and assess the outcome, we might assume that government will take care of everything and as individuals we stand nowhere. We have seen that if we intend to move ahead, we need to identify our potential, understand our strengths and I can swear that we form the incomparable souls of this world. You all know that our own scientists have been successful in reaching Mars, with least expenditure. We do not lack in our strengths, but have forgotten our fortes. We have forgotten ourselves. We have become hopeless. My dear Brothers and Sisters I cannot let this happen. I always remember one of the sayings by Swami Vivekananda Ji as he always used to emphasize on one thought and possibly, he might have shared this thought with many others.
Vivekananda ii used to say, once a lioness was carrying her two cubs on the way and came upon a flock of sheep from a distance. She got a desire to prey upon them and started running towards the flock. Seeing her running, one of the cub too, joined her. The other cub was left behind and the lioness moved on, post preying upon the flock. One of the cub went with the lioness but the other cub was left behind, and was brought up by a mother sheep. He grew among the sheep, started speaking their language and adapted their ways of life. He used to sit, laugh and enjoy with them. The cub who went with the lioness, was a grown-up now. Once, he happened to meet his brother and was shocked to see him. He thought in his mind,” He is a lion and is playing with sheep, talking like sheep. What is wrong with him? “He felt that his ego was at stake and went to talk to his brother. He said,” What are you doing, brother? You are a lion.” He gets a reply from his brother, “No, I am a sheep. I grew up with them. They have brought me up. Listen to my voice and the way I talk.” He said, “Come, I will show you, who you really are.” He took his brother to a well and told him to look in the water his own reflection, and asked him, if both of them had similar faces. “I am a lion, you, too, are a lion.” His brother’s self-esteem got awakened; he attained self-realization through this and even a lion brought up among sheep started roaring like a lion. His inner soul was awakened. Swami Vivekananda Ji used to say the same. My countrymen, 1.25 crore Indians have infinite strength and capabilities. We need to understand ourselves. We need to identify our inner strengths and like Swami Ji always used to say, we need to carry our self-respect, identify ourselves and move forward in life and be successful, which in turn, make our nation a winning and successful country. I believe, all our countrymen with a population of 1.25 crores are efficient, strong and can stand against any odds with confidence.
These days, I have been getting many letters through social media websites, like Facebook, from my friends. One of them, Mr. Gautam Pal, has addressed an issue regarding the specially-abled children. He has floated the idea of a separate Municipality, Municipal Corporation or councils for them. We need to plan something for them and extend moral support. I liked his suggestion and I have experienced this during my tenure as the Chief Minister of Gujarat. A Special Olympics was held in Athens in 2011. After the Olympics, I invited all the participants and winners of specially abled category from Gujarat to my home. I spent two hours with them, and it was the most emotional and inspiring incident in my life. As I believe, a specially-abled child in not only the responsibility of the parents in a family, it is the responsibility of the entire society. God has chosen this family to support a specially abled child, but a child is a responsibility of the entire nation. After this incident, I got so emotionally attached with them, that I started organizing separate Olympics for them in Gujarat. Thousands of children with their parents used to come and attend, I, too, used to attend the Olympics. There was an atmosphere of trust and, this is the reason, I liked the suggestion given by Mr. Gautam Pal and felt like sharing it with you.
It reminds me of another story. Once, a traveller was sitting at the corner of a road, and was asking everyone the way to a specific place. He continued asking the route from many people. A man, sitting beside him was observing. The traveller stood up and started asking passers-by again. He stood up and said,” The way to your destination is here.” The traveller, then, said,” Brother, you were sitting next to me for so long, saw me asking the route from everyone. If you knew the route, why didn’t you tell me before?” The man answered,” I was waiting to verify if you really intend to reach your destination or you are asking people just for your knowledge. But, when you stood up, I was assured that you truly wish to reach your destination, and decided to give confirm the address”.
My countrymen, till the time we do not decide to walk, stand on our own, we will also not get the guidance from others in our journey. We will not get the people to hold our fingers and help us in walking. We need to take the initiative in walking and I trust all my 1.25 crore Indians, who are capable of walking on their own and will keep moving.
For the past few days, I have been getting very interesting suggestions from people. I am aware, when to adapt to these suggestions. But, I want everyone to actively participate in these suggestions as we all belong to our nation, the nation does not only belong to any Government. We are the citizens of our Nation and we all need to unite without any exceptions. Some of you have suggested simplifying the registration process for Small Scale Industries. I will definitely put this under government’s notice. Some of you have written to me to incorporate skills development courses in the school curriculum from 5th standard. This will help the students to learn various skills and crafts. I loved this idea. They have also suggested that even the adults should learn skills development courses along with their studies. One of the suggestions given was to keep a dustbin at every 100 meters and a putting in place a cleaning system.
Some of you have written to me, to abolish the use of plastic bags. I am receiving numerous suggestions from people. I have always been telling you, to write to me and narrate a true incident, which is positive and inspiring to me and our Countrymen, along with the evidence. If you do this, I can promise this to you, that I will share all those heartfelt thoughts or suggestions with all our Countrymen, through Mann ki Baat.
I have only one intention in speaking with you all,” Come, let us serve our Mother India. Let us all take our nation to the new heights. Let us all take a step forward. If you take one step, our nation takes 1.25 crore steps to move forward, and for this purpose, on this auspicious occasion of Vijaya Dashami, we all need to defeat all of our inner evils and pledge to do something good for the nation. A beginning has been made today. I will be sharing my heartfelt thoughts with one and all. Today, I have shared all the thoughts coming directly from my heart. I will meet you all next at 11 am on Sundays, but I trust our journey shall never end and will continue receiving love and suggestions from you.
After listening to my thoughts, please do not hesitate in sharing your thoughts or advice to me, I will appreciate that your suggestions keep flowing coming. I am glad to talk with you through this simple medium of Radio, which serves each and every corner of the nation. I can reach the poorest homes, as mine, my nation’s strength lies within the hut of Poor, within the villages; my nation’s strength lies with the Mothers, Sisters and Youths; my nation’s strength lies with the Farmers. Nation will only progress, if you believe in it. I am expressing my trust towards the nation. I believe in your strength, hence, I believe in our nation’s future.
I would once again, like to thank one and all for taking out time and listening to me. Thank you all!