‘इंडियाफर्स्टहाआवाजजगाच्याकोना
सार्वजनिकपातळीवरअन्नधान्याचासा
‘इंडियाफर्स्टहाआवाजजगाच्याकोना
सार्वजनिकपातळीवरअन्नधान्याचासा
5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले.
दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत प्रक्षेपित झाल्यामुळे दक्षिण आशियाई देशांचे सहकार्य अंतराळात पोचले.
या इतिहासाची निर्मिती बघण्यासाठी, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंकेच्या नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमादरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशिया उपग्रहाची संपूर्ण क्षमता सादर केली.
ते म्हणाले की, हा उपग्रह उत्तम प्रशासन, प्रभावी संभाषण, दुर्गम भागामध्ये चांगले बँकिंग आणि शिक्षणाची खात्री देतील, योग्य हवामान अंदाजपत्रक तसेच टेली-मेडिसिन द्वारे लोकांना जोडून उत्तम उपचार प्रदान करेल.
श्री मोदी यांनी स्पष्ट केले की जेव्हा आम्ही एकत्रित रित्या काम करतो तेव्हा ज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाची फळे आम्ही आदानप्रदान करू शकतो, आम्ही आमचा विकास आणि प्रगती वेगवान करू शकतो.