PM greets people on Subah ke Arghya of Chhath

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या प्रभातकालच्या  अर्ध्यदानाच्या पवित्र पूजेच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महापर्व छठपूजेच्या निमित्ताने चार दिवस चालणारे विधी नागरिकांना नवीन उर्जा आणि उत्साह देतात,असे नमूद केले.

पंतप्रधानांनी  आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे;

"महापर्व छठपूजेच्या चार दिवसांच्या निमित्ताने यातून दिसणारे निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन देशवासियांना नवीन ऊर्जा आणि उत्साहाने संपन्न करणार आहे. सर्व देशवासियांना प्रभातकालच्या  अर्ध्यदानानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा."