अनुक्रमांक |
स्वाक्षरीकृत सामंजस्य करार |
सामंजस्य कराराची व्याप्ती |
1 |
हायड्रोकार्बन्स क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार |
या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे. |
2 |
कृषी आणि संलग्न क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य करार |
कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये संयुक्त व्यवहार, वैज्ञानिक सामग्री, माहिती आणि कर्मचारी यांच्या देवाणघेवाणीद्वारे सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी. |
3 |
सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम(2024-27) |
भारत आणि गयाना यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाण आणि नाट्य, संगीत, ललित कला, साहित्य, ग्रंथालय आणि संग्रहालय व्यवहार या क्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासह त्यांच्यातील सांस्कृतिक सहकार्याला बळकटी देण्याचे उद्दिष्ट आहे. |
4 |
भारतीय फार्माकोपिया नियमनाची मान्यता भारतीय फार्माकोपिया आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय, गयाना यांच्यात भारतीय फार्माकोपियाच्या मान्यतेसाठी सामंजस्य करार |
औषधांच्या नियमनाच्या क्षेत्रात त्यांच्याशी संबंधित कायदे आणि नियमन यांच्या अनुषंगाने घनिष्ठ सहकार्य विकसित करण्याचे महत्त्व विचारात घेण्याचे उद्दिष्ट |
5 |
मेसर्स एचएलएल लाईफकेअर लि. आणि गयानाचे आरोग्य मंत्रालय यांच्यात जनौषधी योजनेच्या(पीएमबीजेपी) अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार. |
कॅरीकॉम देशांच्या सार्वजनिक खरेदी संस्थांना पीएमबीजेपी कार्यक्रमांतर्गत परवडणाऱ्या दरांमध्ये औषधांचा पुरवठा करणे. |
6 |
सीडीएससीओ आणि गयानाचे आरोग्य मंत्रालय यांच्यात वैद्यकीय उत्पादनांच्या क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार |
फार्मास्युटिकल वापरासाठीचा कच्चा माल, जीवशास्त्रीय उत्पादने,वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधाने यांच्यासह फार्मास्युटिकल्स संदर्भात वैद्यकीय उत्पादन नियमन संवाद आणि सहकार्य चौकट स्थापन करण्याचे उद्दिष्ट |
7 |
डिजिटल परिवर्तनासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अंमलात आणलेल्या यशस्वी डिजिटल सोल्यूशन्स सामायिक करण्याच्या क्षेत्रातील सहकार्यावर भारत स्टॅक सामंजस्य करार |
क्षमता उभारणी, प्रशिक्षण कार्यक्रम, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सार्वजनिक अधिकारी आणि तज्ञांची देवाणघेवाण, पायलट किंवा डेमो सोल्यूशन्सचा विकास इत्यादींच्या माध्यमातून डिजिटल परिवर्तनाच्या क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित करणे. |
8 |
एनपीसीएल इंटरनॅशनल पेमेंट्स लि. आणि गयानाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्यात गयानामध्ये यूपीआय सारखी प्रणाली सुरू करण्यासाठी सामंजस्य करार |
गयानामध्ये यूपीआय सारखी रिअल टाइम पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या शक्यतेसाठी एकमेकांमध्ये प्रवेश करण्याची इच्छा समजून घेणे हा सामंजस्य कराराचा उद्देश आहे. |
9 |
प्रसारण क्षेत्रात प्रसार भारती आणि गयानाचे नॅशनल कम्युनिकेशन नेटवर्क यांच्यात सहकार्य आणि संयुक्त सहभाग याविषयी सामंजस्य करार |
संस्कृती, शिक्षण, विज्ञान, मनोरंजन, क्रीडा, बातम्या या क्षेत्रांतील कार्यक्रमांची देवाणघेवाण करणे |
10 |
नॅशनल डिफेन्स इन्स्टिट्युट, गयाना आणि आरआरयू (राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी) यांच्यात सामंजस्य करार |
या सामंजस्य कराराचे उद्दिष्ट राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण अभ्यासांमध्ये संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सहयोगात्मक चौकट स्थापन करणे आहे. |