या भेटीदरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार तसेच इतर करार
अनुक्रमांक |
सामंजस्य करार/इतर कराराचे नाव |
टांझानियातर्फे उपस्थित प्रतिनिधी |
भारतातर्फे उपस्थित प्रतिनिधी |
|
भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या दरम्यान डिजिटल स्थित्यंतरासाठी सार्वत्रिकपणे लागू करण्यात आलेल्या यशस्वी डिजिटल सुविधांच्या सामायीकीकरण क्षेत्रातील सहकार्यविषयक सामंजस्य करार |
टांझानियाचे माहिती, दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री नापे एम. नोआये |
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर |
|
भारतीय नौदल आणि टांझानियाच्या नौवहन संस्था महामंडळादरम्यान धवल नौवहन माहितीच्या सामायीकीकरणाबाबत तंत्रज्ञान करार |
टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा |
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर |
|
भारत आणि टांझानिया यांच्या सरकारांमध्ये वर्ष 2023 ते 2027 या काळातील सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमासंदर्भातील करार |
टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा |
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर |
|
टांझानियाचे राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यात क्रीडा क्षेत्रविषयक सामंजस्य करार |
टांझानियाचे परराष्ट्र व्यवहार आणि पूर्व आफ्रिकी सहकार्य मंत्री जानुअरी वाय.मकांबा |
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर |
|
टांझानियामध्ये औद्योगिक पार्कच्या उभारणीसंदर्भात केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि टांझानिया गुंतवणूक केंद्र यांच्या दरम्यान सामंजस्य करार |
टांझानियाचे नियोजन आणि गुंतवणूक मंत्री प्रा.कितीला ए. एमकुंबो |
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस.जयशंकर |
|
कोचीन शिपयार्ड मर्या. आणि मरीन सर्व्हिसेस कंपनी मर्या. यांच्यादरम्यान सागरी उद्योगाबाबत सामंजस्य करार |
भारतासाठीचे टांझानियाच्या उच्चायुक्त, राजदूत अनिसा के. एमबेगा |
टांझानियासाठीचे भारतीय उच्चायुक्त बिनया श्रीकांत प्रधान |