अ.क्र. |
दस्तावेज |
भारताकडून |
व्हिएतनामकडून |
1 |
शांतता,समृद्धी आणि जनतेसाठी भारत- व्हिएतनाम संयुक्त दृष्टीकोन उद्देश :दीर्घकालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध, सामायिक मुल्ये आणि हित, परस्पर धोरणात्मक विश्वास आणि उभय देशातले सामंजस्य यांच्या पायावर भारत- व्हिएतनाम सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक विकसित करण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता |
भारताच्यावतीने पंतप्रधानांकडून स्वीकार
|
|
2 |
सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पुढील अंमलबजावणीसाठी 2021-2023 या काळासाठी कृती आराखडा उद्देश : शांतता,समृद्धी आणि जनता यांच्यासाठी संयुक्त दृष्टीकोनाच्या अंमलबजावणीसाठी 2021-2023 या काळात उभय बाजूंनी प्रस्तावीत ठोस प्रस्तावित कृती |
डॉ. एस जयशंकर, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
फाम बिन्ह मिन्ह, उप पंतप्रधान, परराष्ट्र व्यवहार मंत्री
|
3 |
भारताच्या संरक्षण मंत्रालया अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग, आणि व्हिएतनामच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालया अंतर्गत संरक्षण उद्योगाचा जनरल विभाग यांच्यात संरक्षण उद्योग सहकार्याची अंमलबजावणी व्यवस्था उद्देश :दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगात सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरिता आराखडा पुरवण्यासाठी |
सुरेंद्र प्रसाद यादव, सह सचिव (नौदल प्रणाली )
|
मेजर जनरल लुओंग थान्ह चुओंग, उपाध्यक्ष
|
4 |
व्हिएतनामच्या न्हा त्रांगमध्ये राष्ट्रीय टेलीकम्युनिकेशन विद्यापीठात आर्मी सॉफ्टवेअर पार्कसाठी भारताकडून 5 दशलक्ष डॉलर्सच्या सहाय्यासाठी, भारतीय दूतावास, हनोई, आणि टेलीकम्युनिकेशन विद्यापीठ, व्हिएतनाम राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात करार उद्देश : न्हा त्रांगमध्ये टेलीकम्युनिकेशन विद्यापीठात आर्मी सॉफ्टवेअर पार्कसाठी माहिती तंत्रज्ञान सुविधा उभारण्यासाठी, सॉफ्टवेअर एप्लिकेशन क्षेत्रात प्रशिक्षण आणि सेवा पुरवण्याच्या तरतुदीसह |
प्रणय वर्मा, भारताचे व्हिएतनाममधले राजदूत
|
कर्नल ली हंग, रेक्टर
|
5 |
संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत सहकार्याकरिता संयुक्त राष्ट्र शांती सेना संचालन, भारत आणि व्हिएतनाम शांती सेना संचालन यांच्यात अंमलबजावणी व्यवस्था उद्देश : संयुक्त राष्ट्र शांतीसेनेत सहकार्य विकासासाठी विशिष्ट उपक्रम निश्चित करण्यासाठी |
मेजर जनरल अनिल काशीद,अतिरिक्त महासंचालक (आयसी )
|
मेजर जनरल होएंग किम फुंग, संचालक
|
6 |
‘भारताचे अणुऊर्जा नियामक मंडळ (AERB)आणि व्हिएतनामच्या किरणोत्सर्ग आणि अणुसुरक्षा यंत्रणा (VARANS) यांच्यात सामंजस्य करार उद्देश- किरणोत्सर्ग संरक्षण आणि अणुसुरक्षा या क्षेत्रांत, दोन्ही देशांच्या नियामक मंडळादरम्यान परस्पर सहकार्य वाढण्यास प्रोत्साहन |
श्री जी नागेश्वर राव, अध्यक्ष, (AERB) |
गुयेन युआन खाई, महासंचालक |
7 |
CSIR- भारतीय पेट्रोलियम आणि व्हिएतनाम पेट्रोलियम संस्था यांच्यात सामंजस्य करार उद्देश – पेट्रोलियम संशोधन आणि प्रशिक्षण यांच्यात सहकार्याला प्रोत्साहन देणे |
डॉ अंजान रे, संचालक |
गुयेन आह डूओ |
8 |
टाटा मेमोरियल सेंटर ऑफ इंडिया आणि व्हिएतनाम नैशनल कॅन्सर हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार.. उद्देश : वैज्ञानिक संशोधन, आरोग्य सुविधा सेवा यांच्यात समन्वय आणि सहकार्याला प्रोत्साहन, कर्करोगाच्या रुग्णांसाठी निदान आणि उपचार याबाबत सहकार्य |
डॉ राजेंद्र अ बडवे, संचालक, |
श्री ली वैन क़्वान्ग, संचालक |
9 |
भारतीय राष्ट्रीय सौर महासंघ आणि व्हिएतनाम स्वच्छ ऊर्जा संघटना यांच्यात सामंजस्य करार.. उद्देश : ज्ञान, उत्तम पद्धती यांच्यातील देवघेवीला प्रोत्साहन, भारत आणि व्हिएतमान मधील सौर उर्जा उद्योगांमध्ये सहकार्य वाढवणे, आणि दोन्ही देशात सौर उर्जेच्या व्यावसायिक संधींचा शोध घेणे |
श्री प्रणव आर मेहता, अध्यक्ष |
श्री दावो दु द्युओंग , अध्यक्ष |
यावेळी खालील घोषणा करण्यात आल्या :
- भारत सरकारनेव्हिएतनामला दिलेल्या 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या कर्जाअंतर्गत, व्हिएतनामच्या बॉर्डर गार्ड कमांडसाठी हाय स्पीड गार्ड बोर्ड निर्मिती प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची घोषणा; व्हिएतनाममध्ये तयार होणाऱ्या सात एचएसजीबी चा पाया घालण्याची घोषणा
- व्हिएतनामच्या निन्ह थुआन प्रदेशातीलस्थानिक समुदायासाठी भारताने 1.5 दशलक्ष डॉलर्सची मदतदेऊ केली आहे. हे विकास प्रकल्प पूर्ण करुन ते व्हिएतनामला सोपवणे.
- वार्षिक जलद गती प्रकल्पांची संख्यावाढवणे. सध्या ही संख्या पाच असून आर्थिक वर्ष 2021-2022 पर्यंत ही संख्या दहापर्यंत वाढवणे.
- व्हिएतनामच्या वारसा स्थळ संवर्धनासाठीचे तीन विकास प्रकल्प भागीदारीतपूर्ण केले जाणार असून त्यांच्या कामांची घोषणा आज करण्यात आली. यात- माय सन येथील मंदिराचा एफ ब्लॉक, क्वांग नाम प्रदेशातील डॉंग डूयोंग बौद्ध प्रार्थनास्थळ/मठ आणि फू येन प्रदेशांतील हंचाम टॉवर या स्थळांचा समावेश
- भारत-व्हिएतनाम नागरी आणि सांस्कृतिक संबंधांविषयीचा विश्वकोश तयारकरण्याच्या द्विपक्षीय प्रकल्पाची घोषणा.