अनु. |
कराराचे नांव |
भारतातर्फे स्वाक्षरीकर्ता |
कोरियातर्फे स्वाक्षरीकर्ता |
उद्दिष्टे |
1. |
सुधारित सर्वसमावेशक वित्तीय भागीदारी करार (सीईपीए) अंतर्गत“अर्ली हार्वेस्ट” अर्थात त्वरित कापणी पॅकेजविषयी संयुक्त निवेदन |
सुरेश प्रभू, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री |
किम-ह्यून-चोंग, व्यापार आणि उद्योग मंत्री, दक्षिण कोरिया |
भारत आणि कोरिया दरम्यान सीईपीए सुधारणेअंतर्गत व्यापार उदारीकरणासाठी महत्वाच्या क्षेत्रांविषयी वाटाघाटी करण्याची व्यवस्था (कोळंबी, मॉल्युसेस आणि प्रक्रियाकृत मासे) यांचा समावेश |
2. |
व्यापार उपाय योजनांवरील सामंजस्य करार |
सुरेश प्रभू, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री |
किम-ह्यून-चोंग, व्यापार आणि उद्योग मंत्री, दक्षिण कोरिया |
व्यापाराशी संबंधित काही क्षेत्रे जसे डंपिंग प्रतिबंध, अनुदान, समान पातळीवरील व्यापार आणि उपाययोजना करण्यासाठी चर्चा तसेच सल्लामसलत करण्याच्या दृष्टीने सहकार्य समितीची स्थापना या समितीत सरकारी अधिकारी आणि तज्ञ असतील. |
3. |
भविष्यातील कुटनितीक गटांसाठी सामजंस्य करार |
सुरेश प्रभू, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि डॉ. हर्षवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री |
किम-ह्यून-चोंग, व्यापार आणि उद्योग मंत्री, दक्षिण कोरिया आणि यु-यंग, विज्ञान आणि आयसीटी मंत्री, कोरिया |
चौथ्या औद्योगिक क्रांतीचे लाभ घेण्यासाठी छोट्या तंत्रज्ञानांच्या विकासासाठी सहकार्य करणे यात इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, स्मार्ट फॅक्टरी, थ्री-डी पेंटिंग, इलेक्ट्रिक वाहने, अत्याधुनिक साधने आणि वृद्ध आणि दिव्यांगांसाठी स्वस्थ आरोग्य सुविधा यांचा समावेश |
4. |
वर्ष 2018 ते 2022 या काळासाठी सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम |
रघुवेंद्र सिंग, सचिव सांस्कृतिक विभाग, भारत सरकार |
शिन बोंग किल, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत |
संगीत, नृत्य, नाटक, कला प्रदर्शन, आर्काइव्ज, मानववंश शास्त्र, जनसंवाद कार्यक्रम आणि वास्तू संग्रहालय प्रदर्शन अशा क्षेत्रात संस्थात्मक सहकार्य निर्माण करुन सांस्कृतिक आणि जनतेतील संबंध दृढ करणे |
5. |
वैद्यानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) तसेच राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद यांच्यात वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक संशोधनासाठीचा सहकार्य करार |
डॉ. गिरीश सहानी, महासंचालक (सीएसआयआर) |
डॉ. वॉह्न वांग युन, अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद |
वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवणे यात स्वस्त पेयजल शुद्धीकरण तंत्रज्ञान, आधुनिक दळणवळण व्यवस्था, नवी/पर्यायी उत्पादने, पारंपारिक आणि देशी औषधे तसेच तंत्रज्ञान पॅकेजिंग आणि व्यावसायिकरण अपेक्षित |
6. |
संशोधन रेखाटन आणि प्रमाणीकरण संस्था (आरडीएसओ) आणि कोरिया रेल रोड संशोधन संस्था (केआरआरआय) यांच्यात सामंजस्य करार |
एम. हुसैन, महासंचालक, आरडीएसओ |
ना हीस्युंग, अध्यक्ष केआरआरआय |
रेल्वे संशोधन, रेल्वेशी संबंधित प्रयोग आणि रेल्वे उद्योगांचा विकास यात सहकार्य वाढवणे, संशोधन प्रकल्प ज्यात रेल्वेसाठी भारतात आधुनिक संशोधन आणि विकास सुविधा उपलब्ध करणे यासाठी दोन्ही देश संयुक्त प्रकल्प राबवतील. |
7. |
जैव तंत्रज्ञान आणि जैव अर्थशास्त्र या क्षेत्रात सामंजस्य करार |
डॉ. हर्षवर्धन, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री |
यु-यंग मिन, विज्ञान आणि आयसीटी मंत्री, कोरिया |
आरोग्य, औषधीशास्त्र, कृषी-मत्स्य उत्पादने, डिजिटल आरोग्य सुविधा, नेमकी उपचार पद्धती, मष्तिष्क संशोधन आणि अत्याधुनिक वैद्यकीय साधने या क्षेत्रात जैव तंत्रज्ञान आणि जैव बिग डेटाचा अवलंब करण्यासाठी सहकार्य |
8. |
आयसीटी आणि दूरसंवाद क्षेत्रात सहकार्याबद्दलचा सामंजस्य करार |
मनोज सिन्हा, दूरसंवाद राज्यमंत्री, भारत सरकार |
यु-यंग मिन, विज्ञान आणि आयसीटी मंत्री, कोरिया |
दूरसंवाद आणि आयसीटी सेवांचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण करण्यासाठी सहकार्य करार या अंतर्गत 5-जी, क्लाऊड कम्पुटिंग, बिग डेटा, आयओटी इत्यादी सेवा तसेच आपत्ती व्यवस्थापन, आकस्मिक प्रतिसाद आणि सायबर सुरक्षा क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य अपेक्षित |
9. |
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सहकार्य करार (नोडल एजन्सी- एनएसआयसी आणि एसबीसी) |
रविंद्रनाथ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राष्ट्रीय लघु उद्योग संघटना (एनएसआयसी) |
ली सांग जीक, अध्यक्ष, लघु आणि मध्यम व्यापार संघटना, कोरिया |
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी दोन्ही देशांत सहकार्य वाढवणे आणि जागतिक बाजारात स्पर्धात्मकता वाढवणे या संदर्भात भारत-कोरिया तंत्रज्ञान आदानप्रदान केंद्र सुरु करण्याच्या शक्यतेवर दोन्ही देश विचार करतील |
10. |
गुजरात सरकार आणि कोरिया व्यापार प्रोत्साहन संस्था,(केओटीआरए) |
एम.के.दास, प्रधान सचिव, उद्योग आणि खनिज विभाग, गुजरात सरकार |
वॉन-प्युंग-ओह, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(केओटीआरए) |
दक्षिण कोरियाच्या कंपन्या आणि गुजरात सरकार यांच्यात औद्योगिक आणि गुंतवणूक संबंध वाढवणे यात नागरी पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया, कृषी आधारित उद्योग, स्टार्ट अप, कौशल्य विकास आणि प्रशिक्षण आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात सहकार्य अपेक्षितकेओटीआरएअहमदाबाद येथे आपले कार्यालय सुरु करणार असून व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद आयोजित करण्यात भागीदारी करेल |
11. |
राणी सुरीरत्ना स्मृती प्रकल्पासंदर्भातला सामंजस्य करार |
अग्निष कुमार अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि महासंचालक, पर्यटन विभाग, उत्तर प्रदेश |
शिन बोंग किल, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत |
अयोध्येची राजकन्या सुरीरत्ना (राणी हुर-वांग-ओके) इ.पूर्व 48 साली कोरियाचे राजे किम सुरो यांच्याशी विवाहबद्ध झाली. तिच्या स्मृती प्रित्यर्थ अयोध्येत स्मृती स्थळ विकसित करण्यात येणार आहे. दरवर्षी अनेक कोरियन पर्यटक या स्मृतीस्थळाला भेट देत असून भारत आणि कोरिया दरम्यानच्या दीर्घ मैत्रीचे हे प्रतिक आहे. |