अनु. क्र. |
सामंजस्य कराराचे नाव |
तपशील |
1. |
संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार |
प्रशिक्षण, संरक्षण उद्योग, दहशतवाद विरोध, लष्करी अभ्यास, सायबर सुरक्षा, लष्करी वैद्यकीय सेवा, शांतता, आदी क्षेत्रात सहकार्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करण्यासाठी आणि अशा सहकार्याची व्याप्ती परिभाषित करुन संरक्षण क्षेत्रात भारत आणि जॉर्डन दरम्यान सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा हेतू आहे. |
2. |
राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांसाठी व्हिसा सवलत |
भारत आणि जॉर्डनच्या राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना परस्परांच्या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी देणारी तरतूद या करारात आहे. |
3. |
सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम (सीईपी) |
2018 ते 2022 या कालावधीसाठीच्या या कार्यक्रमात भारत आणि जॉर्डनदरम्यान संगीत आणि नृत्य, नाटक, प्रदर्शन, चर्चासत्र आणि परिषद, पुरातत्व, ग्रंथालय, संग्रहालय, साहित्य, संशोधन आणि दस्तावेजीकरण, विज्ञान संग्रहालय, उत्सव, प्रसार माध्यमे आणि युवा कार्यक्रमांच्या क्षेत्रात आदान-प्रदानाची तरतूद आहे. |
4. |
मनुष्यबळ सहकार्य करार |
जॉर्डनमधील भारतीय नागरीकांच्या कंत्राटी रोजगारातील प्रशासनात सर्वोत्तम पद्धतींच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने भारत आणि जॉर्डन दरम्यान सहकार्याची तरतूद या करारात आहे. |
5. |
भारत आणि जॉर्डन दरम्यान आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार |
भारत आणि जॉर्डनच्या संबंधित नियमांनुसार समानता आणि परस्पर हितांच्या आधारे आरोग्य, वैद्यकीय शास्त्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. परस्पर सहकार्याच्या विविध मान्यता प्राप्त क्षेत्रांमध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवा, आरोग्य क्षेत्रातील सेवा आणि माहिती तंत्रज्ञान, आरोग्य संशोधन, राष्ट्रीय आरोग्य सांख्यिकी, क्षय रोगाचे निदान, उपचार आणि औषधे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचे नियमन यांचा समावेश आहे. |
6. |
जॉर्डनमध्ये नवीन पिढीचे सर्वोत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी सामंजस्य करार |
आगामी पाच वर्षात जॉर्डनच्या किमान तीन हजार माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी नवीन पिढीचे सर्वोत्कृष्ट केंद्र स्थापन करणे आणि भारतात संसाधन केंद्र स्थापन करणे हा याचा उद्देश आहे. |
7. |
रॉक फॉस्फेट आणि खते/एनपीकेच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी सामंजस्य करार |
जॉर्डनमध्ये फॉस्फरीक ॲसिड/डीएपी/एनपीके खते यासाठी उत्पादन सुविधा उभारणे आणि रॉक फॉस्फेटचे खाणकाम आणि लाभ हा या कराराचा उद्देश आहे. या करारामुळे भारताला रॉक फॉस्फेटचा दीर्घकालीन आणि शाश्वत पुरवठा होईल. |
8. |
सीमा शुल्क परस्पर सहकार्य करार |
सीमा शुल्क, कर, शुल्क आणि सीमा शुल्क प्रशासनाद्वारे आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांच्या सुरळीत आकारणीसाठी आणि सीमा शुल्क संबंधित गुन्हे रोखण्यासाठी दोन्ही देशांमधील सीमा शुल्क कायद्यांच्या योग्य वापरासाठी भारत आणि जॉर्डन दरम्यान परस्पर सहकार्याची तरतूद या करारात आहे. |
9. |
आग्रा आणि पेट्रा (जॉर्डन) दरम्यान ट्वीनिंग करार |
पर्यटन, संस्कृती, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्रातील परस्पर क्षेत्रातील परस्पर सहकार्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आग्रा आणि पेट्राच्या दोन महापालिका एकत्रितपणे काम करणार. |
10. |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) आणि जॉर्डन मिडिया इन्स्टिट्यूट (JMI) दरम्यान सहकार्य |
दोन संस्थांमधील संयुक्त प्रकल्पांचा विकास, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची संयुक्त संघटना आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि समान हिताच्या सामुग्रीचे आदान-प्रदान हा या कराराचा उद्देश आहे. |
11. |
प्रसार भारती आणि जॉर्डन टीव्ही यांच्यात सामंजस्य करार |
प्रसार भारती आणि जॉर्डन रेडियो आणि टीव्ही कॉर्पोरेशन दरम्यान कार्यक्रमांचे आदान-प्रदान आणि सहनिर्मिती, कर्मचारी प्रशिक्षण आणि अन्य समन्वय क्षेत्रात सहकार्याची तरतूद या करारात आहे. |
12. |
युनिर्व्हसिटी ऑफ जॉर्डन (UJ) आणि ICCR दरम्यान विद्यापीठात हिंदी चेअर स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार |
जॉर्डन विद्यापीठात हिंदी भाषेसाठी ICCR विभाग स्थापन करण्यासाठी ICCR आणि UJ यांच्यात सहकार्यासाठी या कराराने आधार आणि अन्य अटी आखून दिल्या आहेत. |