अ.क्र. | सामंजस्य कराराचे नांव | सामंजस्य कराराचा तपशील | भारताकडून | इराणकडून |
1. | दुहेरी कर टाळणे आणि प्राप्ती करासंदर्भात वित्तीय कर चुकवेगिरी रोखण्यासाठी करार | गुंतवणूक आणि सेवांचा ओघ वाढावा यासाठी दोन्ही देशांदरम्यान दुहेरी कराधानाचा बोजा टाळणे | सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री | डॉ. मसूद कर्बासियन, आर्थिक व्यवहार आणि अर्थमंत्री |
2. | राजनैतिक पारपत्रधारकांसाठी व्हिसा प्रक्रियेतून सूट देण्याबाबत करार | दोन्ही देशांमधील राजनैतिक पारपत्रधारकांच्या प्रवासासाठी व्हिसातून सूट | सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री | डॉ. मोहम्मद जावेद झरीफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
3. | प्रत्यार्पण कराराच्या मान्यतेबाबतचा करार | भारत आणि इराण दरम्यान 2008 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या प्रत्यार्पण कराराची अंमलबजावणी | सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री | डॉ. मोहम्मद जावेद झरीफ, परराष्ट्र व्यवहार मंत्री |
4. | इराणची बंदर आणि सागरी संघटना आणि इंडिया पोर्टस ग्लोबल लि. दरम्यान अंतरिम कालावधीत चाबहार बंदराच्या शहीद बेहश्ती बंदराच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेपट्टा करार | सध्याच्या बंदर सुविधांच्या परिचालनासाठी दीड सौर वर्षासाठी (18 महिने) बहुउद्देशीय टर्मिनलचा काही भाग भाडेपट्टयावर देणे | नितीन गडकरी, नौवहन मंत्रालय | डॉ. अब्बास अखुंदी, रस्ते आणि शहर विकास मंत्रालय |
5. | पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार | पारंपरिक औषध प्रणाली क्षेत्रात सहकार्य दृढ आणि मजबूत करणे, यात शिक्षण नियमन, औषधे आणि औषध विरहित थेरपी, सर्व वैद्यकीय सामुग्रींचा पुरवठा, तज्ञांची देवाण-घेवाण, शैक्षणिक आणि प्रशिक्षण कार्यक्रम शिष्यवृत्तींची तरतूद यांचा समावेश आहे. | विजय गोखले, परराष्ट्र सचिव | घोलमरेजा अन्सारी, इराणचे राजपूत |
6. | परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तज्ञ गटाची स्थापना करण्याबाबत करार | व्यापार सुविधा क्षेत्रात सहकार्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट | रिटा तिओशिया, सचिव (वाणिज्य) | डॉ. मोहम्मद खजाई, आर्थिक व्यवहार आणि वित्त उपमंत्री |
7. | कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याबाबत करार | संयुक्त उपक्रम, कार्यक्रम, माहिती आणि कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान, शेतपीक क्षेत्रात सहकार्य, फलोत्पादन, पीक कापणी तंत्रज्ञान, कर्जपुरवठा, मृदा संवर्धन, बियाणे तंत्रज्ञान, दुग्धविकास यांसारह कृषी आणि संबंधित क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य | एस. के. पटनायक, सचिव (कृषी) | डॉ. मोहम्मद खजाई, आर्थिक व्यवहार आणि वित्त उपमंत्री |
8. | आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्याबाबत करार | तांत्रिक, वैज्ञानिक, आर्थिक आणि मानवी संसाधनांचा समावेश असलेल्या उभय देशांमधील व्यापक आंतरमंत्रालयीन आणि आंतरसंस्थात्मक सहकार्य प्रस्थापित करणे, आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात पायाभूत संसाधने, संशोधन आणि प्रशिक्षण, डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी अनुभवाची देवाण-घेवाण, मनुष्यबळ विकासात सहकार्य, औषधे, वैद्यकीय उपकरणांचे नियमन, वैद्यकीय संशोधनात सहकार्य, सार्वजनिक आरोग्य, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि आंतरराष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात सहकार्य | विजय गोखले, परराष्ट्र सचिव | धोलाभरेझा अन्सारी, इराणचे राजदूत |
9. | टपाल सहकार्याबाबत करार | ई-कॉमर्स/लॉजिस्टिक्स सेवांमधील अनुभव, ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान, तज्ञ कृती गटाची स्थापना, दोन्ही देशांच्या हवाई आणि भूपृष्ठ वाहतुकीच्या वापरासंबंधी व्यवहार्यता तपासणी यासह दोन्ही टपाल संस्थांमध्ये सहकार्य | अनंत नारायण नंदा, सचिव (टपाल विभाग) | धोलाभरेझा अन्सारी, इराणचे राजदूत |
या दौऱ्यादरम्यान व्यापार संघटनांमध्ये पुढील सामंजस्य करार करण्यात आले-
- ईईपीसी आणि इराणच्या व्यापार प्रोत्साहन संघटनेदरम्यान सामंजस्य करार
- फिक्की आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार
- असोचॅम आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार
- पीएचडीसीसीआय आणि आयसीसीआयएमए दरम्यान सामंजस्य करार