क्र. |
करार/सामंजस्य करार/उद्देश |
भारतीय आणि कंबोडियाच्या वतीनं कराराचं आदान-प्रदान करणाऱ्या मंत्र्यांचे/अधिकाऱ्यांचे नाव |
1. |
2018-22 साठी कंबोडियासमवेत सांस्कृतिक कार्यक्रमांची देवाण-घेवाण. भारत आणि कंबोडिया यांच्यातल्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीला प्रोत्साहन देण्याबरोबरच उभय देशातले मैत्रीचे संबंध अधिक दृढ करण्याचा उद्देश |
भारताच्या वतीनं केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. महेश शर्मा
कंबोडियाच्या वतीनं कंबोडियाचे सांस्कृतिक आणि फाईन आर्टस मंत्री फोरुग्य सॅकोना |
2. |
36.92 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सच्या स्टंग स्वा हब वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट प्रकल्पासाठी पतपुरवठा करायला भारतातली एक्झीम बँक आणि कंबोडिया सरकार यांच्यातला पत विषयक करार |
भारत: परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरन
कंबोडिया : वित्त मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी फानफल्ला |
3. |
गुन्हेगारीविषयक प्रकरणात परस्पर संमतीने कायदेविषयक सहाय्य. या सहाय्याद्वारे दोन्ही देशात गुन्हेगारी रोखणे, तपास आणि खटले दाखल करण्यासंदर्भात अधिक प्रभावकारी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश |
भारत: परराष्ट्र व्यवहार सचिव प्रीती सरन
कंबोडिया : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संदर्भात सरकारचे सल्लागार सिंग लाप्रसी |
4. |
मानवी तस्करी रोखण्यासंदर्भात सहकार्यविषयक सामंजस्य करार. मानवी तस्करी रोखणे, सुटका यासंदर्भात द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्याचा उद्देश |
भारत: परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सचिव प्रीती सरन
कंबोडिया : मानवी तस्करी प्रतिबंध विभागाच्या सचिव चाऊ बून |