अनु.क्र.

सामंजस्य करार/करार

भारताकडून

फ्रान्सकडून

हेतु

1

अमली पदार्थ, मादक द्रव्य आणि रासायनिक संयुगे यांचा अवैध वापर आणि अवैध वाहतूक कमी करण्यासाठी तसेच संबंधित गुन्हे रोखण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान करार.

राजनाथ सिंग, गृहमंत्री

जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि वापर रोखण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य या कराराद्वारे अपेक्षित असून, दहशतवादाच्या वित्त पुरवठ्यावरही याचा परिणाम होईल.

2

भारत-फ्रान्स स्थलांतरण आणि गतीशीलता भागिदारी करार

सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहार मंत्री

जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री

या करारामुळे गतीशीलतेवर आधारीत तात्पुरते स्थलांतरण आणि मुळ देशाकडे कौशल्य परत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

3

शैक्षणिक पात्रतेला सामाईक मान्यता देण्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये करार

प्रकाश जावडेकर, मनुष्यबळ विकास मंत्री

फ्रेडरीक विदाल, उच्च शिक्षण, संशोधन आणि नव संशोधन मंत्री

शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देणे हा या कराराचा हेतु आहे.

4

रेल्वे मंत्रालय आणि फ्रान्सच्या एस.एन.सी.एफ मोटिव्हीटीज्‌ यांच्यात रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार

पियुष गोयल, रेल्वे मंत्री

जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री

परस्पर सहकार्य वृद्धिंगत करणे आणि अतिजलद रेल्वे मार्गावर विशेष लक्ष केंद्रीत करणे, स्थानकाचे नुतनीकरण, पायाभूत सुविधांचे आणि उपनगरीय गाड्यांचे आधुनिकीकरण करणे हा या कराराचा हेतु आहे.

5

कायम स्वरुपी भारत-फ्रान्स रेल्वे फोरम निर्माण करण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान स्वारस्य पत्रे

पियुष गोयल, रेल्वे मंत्री

जिन-वेस-ली ड्रियन, युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री

भारत-फ्रान्स कायम स्वरुपी रेल्वे फोरम निर्माण करुन सध्याचे सहकार्य वृद्धिंगत करणे हा या स्वारस्य पत्राचा उद्देश आहे.

6

भारत आणि फ्रान्सच्या सशस्त्र दलांदरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्याच्या तरतुदींसंदर्भात करार

निर्मला सितारामन, संरक्षण मंत्री

फ्लॉरेन्स पार्ली, सशस्त्र दल मंत्री

उभय देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान अधिकृत बंदर दौरे, संयुक्त सराव, संयुक्त प्रशिक्षण, मानवी सहकार्य आणि आपत्ती बचाव कार्यादरम्यान परस्पर लॉजिस्टिक सहकार्य पुरवठा आणि सेवांची तरतूद या करारात आहे.

7

पर्यावरण क्षेत्रात भारत आणि फ्रान्स दरम्यान सामंजस्य करार

डॉ.महेश शर्मा, पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री

ब्रुन पोइरसन, पर्यावरण आणि सर्वसमावेशक परिवर्तन राज्यमंत्री

पर्यावरण आणि हवामान बदल क्षेत्रात उभय देशांच्या सरकार आणि तांत्रिक तज्ञां दरम्यान माहितीच्या आदान-प्रदानासाठी पाया तयार करणे हा या कराराचा उद्देश आहे.

8

शाश्वत शहरी विकास क्षेत्रात सहकार्याबाबत भारत आणि फ्रान्स दरम्यान करार

हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

ब्रुन पोइरसन, पर्यावरण आणि सर्वसमावेशक परिवर्तन राज्यमंत्री

स्मार्ट शहर विकास, शहरी वाहतूक प्रणालीचा विकास, शहरी गृहनिर्माण आणि सुविधा याबाबतीत माहितीचे आदान-प्रदान या करारामुळे शक्य होईल.

9

वर्गीकृत किंवा संरक्षित माहितीच्या आदान-प्रदान आणि परस्पर संरक्षणाबाबत भारत आणि फ्रान्सदरम्यान करार

अजित डोवल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

फिलीप इटीएनी, फ्रान्सच्या अध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार

वर्गीकृत आणि संरक्षित माहितीच्या कोणत्याही आदान-प्रदानाला लागू असणारे समान सुरक्षा नियम या करारात नमूद करण्यात आले आहेत.

10

मेरीटाईम अवेयरनेस मिशनच्या अभ्यासासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि सीएनईएस दरम्यान व्यवस्था

के.सिवान, सचिव, अंतराळ विभाग आणि इस्रोचे अध्यक्ष

जिन-वेस ली गॉल, अध्यक्ष सीएनईएस

फ्रान्स आणि भारताच्या स्वारस्य क्षेत्रातील जहाजांचा शोध, ओळख आणि देखरेखीबाबत तोडगा काढण्यासाठी हा करार.

11

भारतीय अणु ऊर्जा महामंडळ आणि ईडीएफ, फ्रान्स दरम्यान औद्योगिक करार

शेखर बासू, सचिव, अणु ऊर्जा विभाग

जिन-बर्नार्ड लेव्ही, सीईओ, ईडीएफ

जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मार्ग आखण्याची तरतूद या करारात आहे.

12

हायड्रोग्राफी आणि मेरीटाईम कार्टोग्राफी बाबत सहकार्यावर भारत आणि फ्रान्स दरम्यान द्विपक्षीय करार

विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत

अलेक्झांडर झिग्लर, फ्रान्सचे राजदूत

हायड्रोग्राफी नॉटीकल डॉक्युमेंटेशन आणि मेरीटाईम सुरक्षा माहिती क्षेत्रात उभय देशांदरम्यान सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा करार.

13

स्मार्ट शहरांना अर्थसहाय्य करण्यासाठी भारत आणि फ्रान्स दरम्यान 100 दशलक्ष युरोच्या कर्ज सुविधेबाबत करार

विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत

अलेक्झांडर झिग्लर, फ्रान्सचे राजदूत

स्मार्ट शहर अभियानांतर्गत दिला जाणारा निधी आणि केंद्र आणि राज्य सरकारांकडून दिला जाणारा निधी यातील तफावत भरुन काढण्यासाठी या कराराची मदत होईल.

14

राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (एनआयएसई) आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (आयएनईस) फ्रान्स दरम्यान सामंजस्य करार

विनय क्वाट्रा, भारताचे राजदूत

डॅनियल वर्वार्डे, प्रशासक, अणु आणि पर्यायी ऊर्जा आयोग (सीईए)

तंत्रज्ञान हस्तांतरण आणि एकत्रित उपक्रमांच्या माध्यमातून सौर ऊर्जा क्षेत्रात आयएसए सदस्य देशांमधील प्रकल्पांवर उभय देश या करारामुळे काम करु शकतील.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government