आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या संस्थांनी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’सरकारच्या कार्याची प्रशंसा केली आहे. या सरकारच्या धोरणांमुळे भारतामध्ये परिवर्तन घडून येत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताचा विकास अभूतपूर्व वेगाने होईल, अशी जागतिक बॅंकेने आशा व्यक्त केली आहे. सन 2014-15 मध्ये भारताने 5.6 टक्के वृद्धी केली होती. आता 2015-16 मध्ये भारत 6.4 टक्के इतका विकासाचा नवा टप्पा गाठू श्शकेल, अशी अपेक्षा जागतिक बॅंकेने व्यक्त केली आहे. याला बॅंकेने ‘मोदी लाभांश’ असे नाव दिले आहे. सरकारची नवी धोरणे आणि तेलाच्या किंमतींमध्ये होणारी घसरण याचा लाभ देशाला मिळेल, असेही म्हटले आहे
भारतामध्ये राबवण्यात आलेल्या ‘जन धन’ योजनेबद्दल सर्वत्र कौतुक झाले आहे. ‘‘आर्थिक प्रवाहात सर्वांचा समावेश व्हावा यासाठी सरकारने घेतलेल्या परिश्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्टी असणारे नेते आहेत, हे स्पष्ट होते’’ असे उद्गार जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम यॉंग किम यांनी काढले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि तेलाच्या दरातील घसरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने विकास साधेल आणि चीनला मागे टाकू शकेल, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने व्यक्त केले आहे. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास पाहता नाणेनिधीच्या या मताचा संबंधही नक्कीच जोडला जावू शकतो.
भारतातील आर्थिक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत, शाश्वत बनत असून विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहे, असे मत ‘द ऑरगनाझेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंट’ या संघटनेने व्यक्त केले आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुधारणा कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
जागतिक स्तरावर प्रतिष्ठीत ठरलेल्या ‘मूडीज्’ने भारताचे मानांकन ‘स्थिर’ वरून ‘सकारात्मक’ असे वाढवले आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्यांनी राबवलेला सुधारणा कार्यक्रम, यामुळे गुंतवणुकीला चांगले प्रोत्साहन मिळत आहे. असे यावरूनही स्पष्ट होते.
संयुक्त राष्ट्राने जागतिक आर्थिक परिस्थितीसंदर्भात अर्धवार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये भारताच्या आर्थिक वृद्धीबाबत अतिशय आशावादी चित्र स्पष्ट केले आहे. यंदा आणि पुढच्या वर्षी भारताचा वृद्धीदर 7टक्क्यांपेक्षा जास्त असेल, असा अंदाज वर्तवला आहे.
पंतप्रधानांनी ज्या आवेशाने, उत्साहाने सुधारणा कार्यक्रमाचा धडाका लावला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. सर्वत्र देशाचे कौतुक होत असून भारतीय अर्थव्यवस्थेचे आशावादी चित्र निर्माण झाले आहे