कॅनडाच्या पुराणमतवादी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अँड्र्यू शिअर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
2015 मधील कॅनडा दौऱ्यादरम्यान उभय देशांमधील संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य बळकट करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
उभय देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध विकसित करण्याबाबत शिअर यांनी आपले विचार मांडले. शिअर यांचा 7 ते 13 ऑक्टोबरपर्यंतचा भारत दौरा सुखद राहील, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.