पीएम-किसान योजनेला सुरुवात होऊन एक वर्ष पूर्ण होताच पंतप्रधान मोदी यांनी पीएम—किसान योजनेच्या सर्व लाभार्थींना किसान क्रेडिट कार्डांचे(KCC) वितरण करण्याच्या मोहिमेचा प्रारंभ केला. या मोहिमेचा एक भाग म्हणून देशभरातील पीएम किसानच्या 25 लाखांहून अधिक लाभार्थीना KCC उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पी लागवडीसाठी येणाऱ्या मोठ्या खर्चाची सोय व्हावी यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून संस्थात्मक पतपुरवठा होण्यास मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने KCC योजनेखाली मोहीम हाती घेतली आहे.
ग्रामीण भागातील 2000 हून अधिक बँक शाखांना शेतकऱ्यांना KCC चे वितरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे 4% व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यतचे कर्ज मिळू शकेल. KCC धारकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सरकारने 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.