काशी तमिळ संगमम् मंच हा भारताच्या एकतेचे आणि विविधतेचे प्रतीक असून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला बळकटी देणारा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
काशी पुन्हा एकदा काशी तमिळ संगमम् मध्ये येणाऱ्या लोकांचे, समृद्ध संस्कृतींच्या उत्सवात स्वागत करण्याची तयारी करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
काशी तमिळ संगमम् वाराणसी येथे 17 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
काशी तमिळ संगममम् च्या X समाजमाध्यमावरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले;
समृद्ध संस्कृतींचा उत्सव असलेल्या @KTSangamam मध्ये लोकांचे स्वागत करण्यासाठी काशी पुन्हा एकदा प्रचंड उत्साहाने सज्ज होत आहे. हा मंच भारताच्या एकतेचे आणि विविधतेचे प्रतीक असून तो ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला बळ देतो.”
There is immense enthusiasm as Kashi once again prepares to welcome people for @KTSangamam, a celebration of rich cultures. This forum is a testament to the unity and diversity of India, strengthening the spirit of ‘Ek Bharat Shreshtha Bharat.' https://t.co/dAzKPGbpA2
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2023
காசி மீண்டும் ஒருமுறை பழமையான கலாச்சாரங்களின் கொண்டாட்டமான @KTSangamam திற்கு மக்களை உற்சாகமாக வரவேற்க தயாராகிறது. இந்நிகழ்வு இந்தியாவின் ஒற்றுமை மற்றும் பன்முகத்தன்மைக்கு ஒரு சான்றாகவும் 'ஒரே பாரதம் உன்னத பாரதம்' உணர்வையும் வலுப்படுத்துகிறது. https://t.co/dAzKPGbpA2
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2023