पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनाथ उदया, म्हणजेच 20 जानेवारी 2022 रोजी आभासी माध्यमातून संयुक्तपणे मॉरिशसमधील भारत-सहाय्यित सोशल हाऊसिंग युनिट्स प्रकल्पाचे उद्घाटन करतील. उभय नेते मॉरिशसमधील नागरी सेवा महाविद्यालय आणि 8 मेगावॅटच्या सौर पीव्ही फार्म प्रकल्पांचाही आरंभ करतील. हे प्रकल्प भारताच्या विकास पाठबळाने उभारले जात आहेत.
मेट्रो एक्सप्रेस प्रकल्प आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भारताकडून मॉरिशसला दिलेल्या 190 दशलक्ष डॉलर्स कर्जाची रक्कम वाढवण्याबाबतचा करार आणि लघु विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भातील सामंजस्य करारही यावेळी होणार आहे.