राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज आयोजित केलेल्या अफगाणिस्थानशी संबंधित दिल्ली प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रासाठी आलेल्या सात देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रमुखांनी चर्चासत्रानंतर एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांशी बोलताना इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे चर्चासत्र आयोजित करण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराची तसेच या बैठकीत झालेल्या विधायक चर्चेबाबत प्रशंसा केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत आपापल्या राष्ट्रांचा दृष्टिकोनही त्यांनी विशद केला.

महामारीने अनेक आव्हाने निर्माण केली असताना देखील वरिष्ठ स्तरावरील मान्यवरांनी दिल्ली येथे चर्चासत्रात घेतलेल्या सहभागाबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

या प्रदेशातील राष्ट्रांनी अफगाणिस्तानच्या संदर्भात सर्वसमावेशक शासन , अफगाणिस्तानच्या सीमांचा दहशतवाद्यांकडून वाढत्या वापराबाबत शून्य सहनशीलता धोरण, अमली पदार्थांच्या चोरट्या वाहतुकीला तसेच अफगाणिस्तान मार्फत होणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीला अटकाव, आणि अफगाणिस्तानमधील मानवी हक्काच्या परिस्थितीची दखल ही चार उद्दिष्टे लक्षात ठेवणे आवश्यक आहे असे ते म्हणाले,

प्रादेशिक सुरक्षा चर्चासत्रामुळे मध्य आशियातील संयमी आणि  प्रगतीशील संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल आणि कट्टरवादी प्रवृत्तींना आळा बसेल अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

 

  • SHRI NIVAS MISHRA January 23, 2022

    यही सच्चाई है, भले कुछलोग इससे आंखे मुद ले। यदि आंखे खुली नही रखेंगे तो सही में हवाई जहाज का पहिया पकड़ कर भागना पड़ेगा।
  • G.shankar Srivastav January 03, 2022

    जय हो
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
How The Indian Auto Sector Is Driving $5 Trillion Economy Dream

Media Coverage

How The Indian Auto Sector Is Driving $5 Trillion Economy Dream
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 जून 2025
June 29, 2025

Celebrating Changemakers PM Modi’s Mann Ki Baat Lights the Path to a Healthier Bharat

From Space to Bullet Trains - PM Modi’s Vision Propels India to Global Height