Quoteपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दरभंगा, बिहार इथल्या विकसित भारताच्या लाभार्थी गृहिणी, प्रियंका देवी यांच्याशी संवाद
Quoteकोणतीही योजना यशस्वी व्हायची असेल, तर त्यासाठी ती प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. सध्या देशभरात, केंद्र सरकारच्या योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योग्य वेळेत त्यांची संपूर्ण अंमलबजवणी सुनिश्चित करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा राबवली जात आहे.

बिहारमध्ये दरभंगा येथील गृहिणी आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थी प्रियंका देवी यांनी पंतप्रधानांना सांगितले की त्यांचे पती मुंबईत रोजंदारीवर काम करणारे श्रमिक आहेत आणि त्यांना ‘एक देश एक शिधापत्रिका’ योजनेचा लाभ मिळतो आहे. तसेच पीएम जी के ए वाय आणि जन धन योजना अशा योजनांचाही लाभ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: कोविड’च्या काळात किंवा इतर संकट काळात आर्थिक चणचण असताना या योजनांमुळे मोठी मदत झाली असे त्यांनी सांगितले.

मोदी की गारंटी या वाहनाबद्दल लोकांमधे अत्यंत उत्साह आहे, असे त्यांनी सांगितले. मिथिला भागात पारंपरिक पद्धतीने या वाहनाचे स्वागत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या योजनांमुळे त्यांना त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेता येते आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी प्रियंका यांना त्यांच्या गावात सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आणि ‘मोदी की गारंटी’ वाहन देशातील प्रत्येक गावात पोहोचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.  ‘मोदी की गारंटी’ वाहनाच्या माध्यमातून, सरकार स्वत: पोहोचू न शकलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत, महिलांच्या मनात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने फुटीरतावादी राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला.  महिलांना अखंड पाठिंबा देण्याची ग्वाही देतानाच, “आमच्यासाठी महिला ही एकच जात आहे, त्यात कोणतीही विभागणी नाही, भेदभाव नाही. ही जात इतकी मोठी आहे की त्या एकत्र कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतात”,  असे पंतप्रधान म्हणाले.

  • Indrajit Das February 13, 2024

    joy Modiji
  • MANOJ kr ORAON February 12, 2024

    🙏
  • Abhishek Wakhare February 11, 2024

    फिर एक बार मोदी सरकार
  • Dhajendra Khari February 10, 2024

    Modi sarkar fir ek baar
  • Dhajendra Khari February 10, 2024

    Modi sarkar fir ek baar
  • Dipak Dwebedi February 07, 2024

    राम हमारे गौरव के प्रतिमान हैं राम हमारे भारत की पहचान हैं राम हमारे घट-घट के भगवान हैं राम हमारी पूजा हैं अरमान हैं राम हमारे अंतरमन के प्राण हैं

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
How PM Modi made Buddhism an instrument of India’s foreign policy for global harmony

Media Coverage

How PM Modi made Buddhism an instrument of India’s foreign policy for global harmony
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Share your ideas and suggestions for 'Mann Ki Baat' now!
April 05, 2025

Prime Minister Narendra Modi will share 'Mann Ki Baat' on Sunday, April 27th. If you have innovative ideas and suggestions, here is an opportunity to directly share it with the PM. Some of the suggestions would be referred by the Prime Minister during his address.

Share your inputs in the comments section below.