माननीय अध्यक्ष,

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात, भारताच्या उत्तर देण्याच्या अधिकाराचा मी उपयोग करू इच्छिते.

2 या सन्माननीय सदनाच्या पटलावर उच्चारल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला ऐतिहासिक महत्व आहे असे मानले जाते. दुर्दैवाने, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून आम्ही जे ऐकले ते दुटप्पीपणाचे कटू चित्र आहे. आम्ही आणि ते, गरीब आणि श्रीमंत, उत्तर आणि दक्षिण, विकसित आणि विकसनशील, मुस्लीम आणि इतर. या संदर्भात जे मांडले गेले ते संयुक्त राष्ट्रामधील दुहीला खतपाणी घालणारे आहे. मतभेद वाढवणाऱ्या आणि द्वेष निर्माण करणाऱ्या या भाषणाची संभावना द्वेषमुलक भाषण अशी करता येईल.

3 अभिव्यक्तीचा असा दुरुपयोग किंबहुना दुर्व्यवहार आमसभेने क्वचितच पाहिला असेल. राजनैतिक क्षेत्रात शब्दांना महत्व असते. बरबाद, रक्तरंजित, जातीय श्रेष्ठता, बंदूक हाती घेणे, अंतिम श्वासापर्यंत लढणे असे शब्द 21 व्या नव्हे तर मध्य युगातली मानसिकता व्यक्त करतात.

4 पंतप्रधान इम्रान खान यांची आण्विक विनाशाची धमकी म्हणजे राजकीय सुज्ञपणा नव्हे तर अपरिपक्वतेचे दर्शन घडवते.

5 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दहशतवादाच्या उद्योगाला पोसणाऱ्या देशाचे नेते असून त्यांनी दहशतवादाचे केलेले समर्थन निर्लज्य आणि क्षोभक आहे.

6 सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटचा खेळ एके काळी खेळणारी व्यक्ती, त्यांचे भाषण म्हणजे असंस्कृतपणाचा कळस आहे.

7 पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना नाही याची तपासणी करण्यासाठी, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या पर्यवेक्षकांना आमंत्रित केले आहे, ते आपले वचन पूर्ण करतील अशी जगाला आशा आहे.

8 इथे काही प्रश्न आहेत, ज्यांची पाकिस्तानने प्रस्तावित पडताळणीचे अग्रदूत बनून उत्तरे द्यावीत-

आज मितीला संयुक्त राष्ट्रांच्या यादीतल्या 130 दहशतवाद्यांनी आणि 25 दहशतवादी संघटनानी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे याची पुष्टी पाकिस्तान करत आहे का?

– संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या अल कायदा आणि दाएशच्या सुचीमधल्या एका व्यक्तीला पेन्शन देणारे आपण जगातले एकमेव सरकार आहोत ही बाब पाकिस्तान स्वीकारत आहे का?

– दहशतवादाला आर्थिक मदत केल्याबद्दल करोडो रुपयांचा दंड लावल्यामुळे पाकिस्तानला, न्यूयॉर्क मधली हबीब बँक ही आपली प्रमुख बँक बंद करायला लागली याबाबत पाकिस्तान स्पष्टीकरण देईल का?

– 27 पैकी 20 पेक्षा जास्त मापदंडांचे उल्लंघन केल्याबद्दल वित्तीय कारवाई कृती दलाने नोटीस जारी केल्याची बाब पाकिस्तान नाकारू शकत आहे का?

आणि

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नाकारू शकतात का की,ओसामा बिन लादेनला ते उघडपणे संरक्षण देत होते.

अध्यक्षमहोदय,

9 दहशतवाद आणि द्वेषमूलक भाषणांनंतर स्वतःला मानवाधिकाराचे रक्षक म्हणून दाखवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे.

10 हा एक असा देश आहे जिथे अल्पसंख्याक समुदायाचा टक्का 1947 मधल्या 23 टक्क्यांवरून कमी होऊन आता केवळ तीन टक्के राहिला आहे. शीख,अहमदिया, ख्रिश्चन, हिंदू,शिया, पश्तून, सिंधी, बलुचीना ब्लास्फेमी कायदा, छळ यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना धर्मांतरण करण्यासाठी भाग पडले जाते.

11 मानवाधिकारांचा कळवळा दाखवण्याचा त्यांचा नवा डाव म्हणजे दुर्मिळ होत असलेले पहाडी बकरे मारखोरच्या शिकारीत पदक मिळवण्याच्या प्र्यत्नासारखे आहे.

12 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नियामी यांनी इतिहासाची आपली समज व्यापक करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. 1971 मधे पाकिस्तानने आपल्याच लोकांचा केलेला भीषण नरसंहार आणि लेफ्टनंट जनरल नियाझी यांची भूमिका विसरु नका. बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी आज दुपारी आमसभेत या बाबीचा केलेला उल्लेख याचा ठोस पुरावा आहे.

अध्यक्ष महोदय,

13 जम्मू काश्मीर मध्ये विकासाला अडथळा ठरणारे एक अस्थायी कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानची विखारी प्रतिक्रिया म्हणजे ज्यांना संघर्षच हवा आहे त्यांना कधी शांतता आवडणार नाही याचे प्रतीकच आहे.

14 जम्मू काश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाहात भारत आणत असताना पाकिस्तान एकीकडे मोठ्या प्रमाणात दहशतवादाला खतपाणी घालत आहे तर दुसरीकडे द्वेषपूर्ण वक्तव्य करत तळाची पातळी गाठत आहे.

15 भारताची विविधांगी लोकशाही व्यवस्था,संपन्न आणि वैविध्यपूर्ण बहुलतावाद आणि प्राचीन वारसा यांच्याशी जम्मू-काश्मीर आणि लडाख जोडण्याची प्रक्रिया अपरिवर्तनीय आहे.

16 भारतीय नागरिकांना त्यांच्या वतीने बोलण्यासाठी कोणाची गरज नाही, ज्यांनी दहशतवादाला पोसलाय अशांकडून तर नक्कीच नाही.

मी आभारी आहे, अध्यक्ष महोदय.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi

Media Coverage

Double engine govt becoming symbol of good governance, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 डिसेंबर 2024
December 17, 2024

Unstoppable Progress: India Continues to Grow Across Diverse Sectors with the Modi Government