भारतासाठी असलेल्या आशादायी चित्रामागच्या कारणांचे विवेचन करणारे मनीकंट्रोल या वेबसाईट वरील लेख आणि इन्फोग्राफीक’चे संकलन यावरील ट्वीटला प्रतिसाद देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूत वृद्धीविषयी आणि संकटकाळातही चिवटपणे उभे राहण्याऱ्या वृत्तीविषयी पुन्हा एका निर्धार व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
"जगातील आव्हानात्मक परिस्थितीत भारताची अर्थव्यवस्था आशेच्या किरणासमान चमकत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची मजबूत वृद्धी आणि चिवट वृत्ती, यामुळे, आपले भविष्य उज्ज्वल दिसते आहे. ही गती पुढेही कायम ठेवूया आणि 140 कोटी भारतीयांची समृद्धी सुनिश्चित करूया.”
India's economy shines as a beacon of hope in these challenging times. With robust growth and resilient spirit, the future looks promising. Let us keep this momentum and ensure prosperity for 140 crore Indians! https://t.co/MnR4IXZuwm
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2023