77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेबरोबर आहे. तेथील समस्या शांततेच्या मार्गाने सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मणिपूरमध्ये अशांतता आणि हिंसाचार सुरु आहे आणि महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत असे ते म्हणाले. मणिपूरचे लोक काही काळ शांतता राखत आहेत आणि शांततेची प्रक्रिया पुढे सुरु रहावी असे त्यांनाही वाटत असलयाचे त्यांनी नमूद केले. “तिथल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील” असे ते म्हणाले.
— PMO India (@PMOIndia) August 15, 2023