भारत, “ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
तुर्कस्तान मध्ये आलेल्या भूकंपात, मदतकार्यात भारतीय चमू करत असलेल्या प्रयत्नांबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देतांना, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत आमच्या चमू दिवसरात्र काम करत आहेत. या संकटात जास्तीत जास्त जीव वाचावेत आणि मालमत्तेचे रक्षण व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करतच राहू. या संकटकाळात भारत तुर्कस्थानसोबत भक्कमपणे उभा आहे.”
Our teams are working day and night as a part of ‘Operation Dost.’ They will keep giving their best to ensure maximum lives and property are saved. In this critical time, India stands firmly with the people of Türkiye. https://t.co/FJT9ve4TYj
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2023