77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आज देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारताला मिळालेल्या जी-20 अध्यक्षपदामुळे, देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या क्षमता जगासमोर कशा आल्यात हे सविस्तर सांगितले. भारताच्या क्षमता आणि देशात उपलब्ध असलेल्या संधी - नवी ऊंची ओलांडणार असून, या वाढलेल्या आत्मविश्वासातून आणखी नव्या संधी निर्माण होतील, हे निश्चित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “भारताच्या जी-20 अध्यक्षपदामुळे, भारताच्या सर्वसामान्य लोकांची ताकद जगाला कळली आहे. आज भारताला जी-20 परिषदेचे यजमानपद भूषवण्याची जबाबदारी मिळाली आहे. आणि गेल्या वर्षभरापासून, ज्या प्रकारे जी-20 च्या अनेक बैठका देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक शहरात आयोजित केल्या जात आहेत, त्यामुळे सगळ्या जगाला देशातील सर्वसामान्य माणसाची क्षमता आणि ताकद कळली आहे.”
भारताने आपली विविधता जगासमोर आणली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “जग भारतातील विविधतेकडे मोठ्या नवलाईने बघत आहे आणि त्यामुळेच, भारताविषयीचे आकर्षणही वाढले आहे. भारताला जाणून आणि समजून घेण्याची इच्छा वाढते आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
जी-20 बैठकीसाठी इंडोनेशियात बाली इथे केलेल्या दौऱ्याचे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्मरण केले. त्या बैठकीत, जागतिक नेते, भारतातील डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेविषयी जाणून घेण्यास उत्सुक होते, असे त्यांनी सांगितले. “प्रत्येकजण डिजिटल इंडिया विषयी जाणून घेण्यास उत्सुक होता आणि मग मी त्यांना सांगितले, या अभियानात भारताने जे आश्चर्यकारक यश मिळवले आहे, ते केवळ दिल्ली, मुंबई किंवा चेन्नईसारख्या महानगरांपर्यंत मर्यादित नाही; तर माझ्या द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचे युवा देखील, या यशाचे तेवढेच भागीदार आहेत.”
“भारताचे युवा देशाच्या भाग्याला आकार देत आहेत.”
देशाचे युवा आज भारताच्या भागधेयाला आकार देत आहेत. “ माझे युवक, छोट्या शहरातील आहेत. आणि मी अत्यंत आत्मविश्वासाने सांगतो आहे, की आज जेव्हा देशाच्या या नवनव्या क्षमता समोर येत आहेत, ह्या आपल्या छोट्या शहरात, गावात- ते कदाचित लोकसंख्या आणि आकारमानाच्या दृष्टीने पुढे असतील, मात्र आशा आणि आकांक्षा, प्रयत्न आणि प्रभाव, यात ते कुठेही दुय्यम नाहीत. त्यांच्यातही तेवढीच क्षमता आहे. पंतप्रधान यावेळी युवकांनी नवे अॅप्स, नव्या उपाय योजना आणि तंत्रज्ञान विषयक उपकरणे यांची माहिती घेतली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात नागरिकांना, देशबांधवांना क्रीडाविश्वाकडे बघण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. “जे लोक आज अगदी झोपडपट्टी सारख्या प्रदेशातून आले आहे, ते आज जगाला क्रीडा क्षेत्रातली आपली ताकद दाखवत आहेत. छोट्या गावातील, छोट्या खेड्यातील युवा, आपली मुले आणि मुली आज अत्यंत कौतुकास्पद काम करुन दाखवत आहेत.” असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, आज देशात 100 शाळा आहेत जिथे मुले उपग्रह बनवत आहेत आणि ते सोडण्याची तयारी करत आहेत. “आज हजारो टिंकरिंग लॅब नवीन शास्त्रज्ञांना जन्म देत आहेत. आज हजारो टिंकरिंग लॅब लाखो मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रेरित करत आहेत.”
आज देशात संधींची कमतरता नसल्याचे आश्वासन पंतप्रधानांनी युवकांना दिले. "तुम्हाला पाहिजे तितक्या संधी आहेत, हा देश तुम्हाला आकाशापेक्षाही जास्त संधी देण्यास सक्षम आहे."
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, महिला नेतृत्व प्रणित विकासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि देशाला पुढे नेण्यासाठी ते कसे आवश्यक आहे, हे ही सांगितले. जी 20 मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मुद्दा आपण पुढे नेला आहे आणि जी 20 देशांनीही तो विचार स्वीकारला असून त्याचे महत्त्वही त्यांनी ओळखले आहे.”
“आज आपल्या तत्वज्ञानात, जग आपल्याला साथ देत आहे, आम्ही जागतिक हवामान बदलावर मांत करण्यासाठी उपाययोजना दाखवत आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले, की भारताने यशस्वीपणे आपले तत्वज्ञान जगासमोर मांडले आहेत, आपल्या या तत्वज्ञानात, सगळे जग देखील साथ देत आहे. “आपण, एक सूर्य, एक जग, एक ग्रिड’ अशी घोषणा दिली. अक्षय ऊर्जा निर्मितीबाबत आपण जाहीर केलेले वचन अत्यंत मोठे,व्यापक आहे. आज जग आपल्याला स्वीकारत आहे. कोविड -19 नंतर, आपण जगाला ‘एक पृथ्वी, एक आरोग्य” असा दृष्टिकोन दिला आहे.
We have presented philosophies and the world is now connecting with India over them. For renewable energy sector, we said 'One Sun, One World, One Grid'. After #COVID, we told the world that our approach should be of 'One Earth, One Health'.
— PIB India (@PIB_India) August 15, 2023
For the #G20 Summit, we should focus… pic.twitter.com/LrE6bZWUV8
आजारपणात मानव, प्राणी आणि वनस्पती यांना समान वागवले जाईल, तेव्हाच जगासमोरच्या समस्या सुटतील, असे भारताने सांगितले होते, त्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. “आम्ही जी-20 शिखर परिषदेसाठी जगासमोर एक जग, एक कुटुंब, एक भविष्य असे म्हटले आहे आणि हा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्ही जगाला तोंड देत असलेल्या हवामान संकटाचा मार्ग दाखवला आहे आणि आम्ही पर्यावरणासाठी मिशन जीवनशैली सुरू केली आहे.”
We paved the way to fight climate change by launching Mission #LiFE-'Lifestyle for the Environment' and made International Solar Alliance and many countries have become part of it: PM @narendramodi#IndependenceDay #NewIndia#IndependenceDay2023 #RedFort pic.twitter.com/gmileuidZ4
— PIB India (@PIB_India) August 15, 2023
पंतप्रधान म्हणाले की, आम्ही एकत्रितपणे जगासमोर आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याची स्थापना केली आणि आज जगातील अनेक देश आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याचा भाग बनत आहेत. “जैवविविधतेचे महत्त्व पाहून आम्ही बिग कॅट अलायन्सची व्यवस्था पुढे नेली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दूरगामी व्यवस्था आपल्याला हवी आहे.आणि म्हणूनच, आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. आणि म्हणूनच, आपत्ती व्यवस्थापनविषयक पायाभूत सुविधा सहकार्य, सीडीआरआय ने जगाला एक उपाययोजना दिली आहे.” पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज जग समुद्रांना संघर्षाचे केंद्र बनवत आहे, ज्यावर उत्तर म्हणून आम्ही जगाला महासागरांचे व्यासपीठ दिले आहे, ज्यातून जागतिक सागरी शांततेची हमी मिळू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
पारंपरिक औषध पद्धतीवर भर देऊन भारताने भारतात WHO चे जागतिक स्तरावरील केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने काम केले आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “आम्ही योग आणि आयुषच्या माध्यमातून जागतिक कल्याण आणि जागतिक आरोग्यासाठी काम केले आहे. आज भारत जागतिक मंगळावर भक्कम पाया रचत आहे. हा मजबूत पाया पुढे नेणे हे आपल्या सर्वांचे काम आहे. ती आपली समान जबाबदारी आहे.” असं पंतप्रधान म्हणाले.