भारत-रशिया: बदलत्या विश्वातली स्थायी भागीदारी

1 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची 19 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी, 4-5 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे भेट घेतली. भारत आणि रशिया यांच्यात 1971 मधे झालेला शांतता, मैत्री आणि सहकार्य करार,भारत-रशिया दरम्यान 1993मधे झालेला मैत्री आणि सहकार्य करार,भारत आणि रशिया यांच्यातल्या 2000 मधल्या धोरणात्मक भागीदारीविषयक करार,उभय देशा दरम्यानच्या भागीदारीला, विशेष सन्मानीत धोरणात्मक भागीदारी हा नवा आयाम देणारे 2010 चे संयुक्त निवेदन यांच्या भक्कम पायावर, भारत –रशिया संबंध आधारलेले आहेत.भारत आणि रशिया यांच्यात अनेक क्षेत्रात सहकार्य आहे आणि राजकीय आणि धोरणात्मक सहकार्य,लष्करी आणि सुरक्षा सहकार्य,आर्थिक, उर्जा,उद्योग,विज्ञान आणि तंत्रज्ञान,सांस्कृतिक आणि मानवता सहकार्य या पायाभूत स्तंभावर हे सहकार्य आधारलेले आहे.

2 भारत आणि रशियाने सोची इथे 21 मे 2018 मधे झालेल्या अनौपचारिक शिखर बैठकीचे समकालीन महत्वाचे मुल्यांकन केले. ही शिखर बैठक आंतरराष्ट्रीय राजनीतीमधली,अनोखी बैठक होती आणि या शिखर बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात विश्वास दिसून आला. परस्पर हिताच्या बाबीत नियमित संपर्क आणि निरंतर विचार विमर्श कायम ठेवण्याची इच्छा दोन्‍ही देशांनी व्यक्त केली आणि महत्वाच्या सर्व मुद्यांवर परस्पर सहकार्य वृद्धिगत केले. सोची शिखर बैठकीत बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्यात भारत आणि रशिया यांच्यात संवाद आणि सहकार्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.अशा अनौपचारिक बैठका नियमित सुरु ठेवण्याला आणि सर्व स्तरावर धोरणात्मक संपर्क कायम राखण्याला या बैठकीत संमती देण्यात आली.

3 भारत आणि रशिया यांच्यातल्या खास आणि विशेष धोरणात्मक भागीदारी प्रती दोन्ही बाजूंनी आपली कटिबद्धता दृढ केली.जागतिक शांतता आणि स्थैर्य या दृष्टीने हे संबंध महत्वाचे आहेत. जागतिक शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी सामायिक जबाबदारीसह महत्वाच्या सत्ता म्हणून परस्परांच्या भूमिकेची प्रशंसा केली.

4 उभय देशातले संबंध परिपक्व आणि विश्वास पूर्ण आहेत यावर उभय पक्षांनी सहमती दर्शवली.हे संबंध सर्व क्षेत्रात व्यापले असून प्रगाढ विश्वास, परस्पर सन्मान आणि परस्पराचे स्थान यांचे घनिष्ट आकलन याचे उदाहरण आहे. बहु सांस्कृतिक, बहु भाषक आणि बहू धर्मी समाज असूनही आधुनिक काळातली आव्हाने पेलण्यासाठी भारत आणि रशिया यांनी सांस्कृतिक विद्वत्ता आणली आहे याचा दोनही बाजूनी पुनरुच्चार करण्यात आला. आपसात अधिक संपर्क असणारे विशाल विश्व निर्माण करण्यात दोन्ही देश पहिल्यापेक्षा अधिक आपले योगदान देत आहेत.

5. दोन्ही देशांनी जागतिक तणाव कमी करण्याचे आणि सहिष्णुता, सहकार्य आणि पारदर्शकता यांना प्रोत्साहन देण्याचे आणि आंतर राज्य संबंधात खुलेपणाने काम करण्याचे आवाहन सर्व देशांना केले. जगातल्या मोठ्या भागात जलद आणि पर्यावरण दृष्ट्या शाश्वत आर्थिक विकास, दारिद्रय निर्मुलन, देशांमधली असमानता दूर करणे आणि प्राथमिक आरोग्य सुविधा प्रदान करणे ही प्राथमिक आव्हाने आहेत यावर दोनही देशांनी भर दिला. या बाबतची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी परस्पर सहकार्याचा संकल्प भारत आणि रशियाने व्यक्त केला.

6. दोनही देशांनी, उभय देशातल्या सर्व क्षेत्रात संबंधातल्या उत्कटतेबाबत समाधान व्यक्त केले. मंत्री स्तरीय 50 पेक्षा जास्त दौऱ्यामुळे या संबंधाना नवी उर्जा मिळाली आहे. 2017-18 या काळासाठी, विदेश कार्यालय विचार विमर्श याबाबतचा शिष्टाचार यशस्वीरित्या लागू केल्यानंतर, दोनही बाजूनी याचा कालावधी आणखी पाच वर्षानी(2019-2023) वाढवण्यासाठी संमती दिली आणि त्यावर स्वाक्षऱ्या केल्या. इकाटेरिनबर्ग आणि आस्‍त्राखान इथे भारताच्या मानद महा वाणिज्य दूतांच्या नियुक्तीचे रशियाने स्वागत केले. यामुळे दोनही देशातल्या जनतेत अधिक घनिष्ट संबंध स्थापन होण्यासाठी मदत होणार आहे.

7 दोनही बाजूनी, अंतर्गत सुरक्षा, अंमली पदार्थांची तस्करी रोखणे, आपत्ती व्यवस्थापन या संबंधात सहकार्यासाठी, नोव्हेंबर 2017 मध्ये झालेल्या कराराचे स्वागत केले. या करारात 2018-2020 या काळासाठी, भारताच्या गृह मंत्रालयाचा अमली पदार्थ नियंत्रण आणि रशियाच्या संबंधित मंत्रालय यांच्यातल्या संयुक्त कृती आराखड्याचा समावेश आहे. भारताने, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात,रशियाची तंत्रविषयक निपुणता जाणून प्रशिक्षकांना प्रशिक्षण आणि आपात्कालीन प्रतिसाद यंत्रणा विकसीत करण्याबाबत सहमती व्यक्त केली.

8 भारत आणि रशिया यांच्यातल्या 70 व्या वार्षिक राजनैतिक संबंधाच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रसंगी दोनही देशांनी सांगितले की, उभय देशांच्या जनतेत उत्साह दिसून आला आणि यामुळे दोनही देशातल्या लोकांमधील संबंध अधिक दृढ झाले. दोन्ही बाजूंनी, 2017 मध्ये स्वाक्षऱ्या झालेल्या 2017-2019 यासाठी सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबत समाधान व्यक्त करण्यात आले. भारतातल्या वार्षिक रशियन महोत्सवाचे आणि रशियातल्या वार्षिक भारतीय महोत्सवाचे त्यांनी स्वागत केले. युवा आणि लेखक आदानप्रदान कार्यक्रमाची प्रशंसा केली.दोन्ही देशांनी,गेल्या दोन वर्षात पर्यटन क्षेत्रातल्या परस्पर विकासाचे स्वागत केले आणि या सकारात्मक पैलूला प्रोत्साहन देण्यावर सहमती व्यक्त केली.2018 च्या फिफा विश्व चषकाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताने, रशियाची प्रशंसा केली.भारत आणि रशिया यांच्यातल्या अनेक दशकांच्या संबंधाना प्रोत्साहन देण्यात रशिया विज्ञान अकादमीच्या प्राच्य अभ्यास संस्थेच्या योगदानाची दखल घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,संस्थेच्या 200 व्या स्थापना समारंभात, भारताचे योगदान अधोरेखित केले.

अर्थव्यवस्था

9 व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य याबाबतच्या भारत-रशिया आंतर सरकारी आयोगाच्या, मॉस्कोमधील 14 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि रशियाचे उप पंतप्रधान युरी आय बोरीसोव यांच्यासह अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतल्या फलीताचे दोन्ही पक्षांनी स्वागत केले.

10 दोनही बाजूंनी, 2025 पर्यंत दोन्ही देशातली गुंतवणुक 30 अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्या संदर्भातल्या प्रगतीचा आढावा घेतला.दोन्ही देश हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या मार्गावर असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.2017 मधे द्विपक्षीय व्यापारात 20 % पेक्षा जास्त वाढ झाली याची दखल घेत यात अधिक वाढ आणि वैविध्य आण्यासाठी संमती झाली.राष्ट्रीय चलनात द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रोत्साहन दर्शवले.

11 भारताचा नीती आयोग आणि रशियाचे आर्थिक विकास मंत्रालय यांच्यातला पहिला धोरणात्मक आर्थिक संवाद 2018 मधे यानंतर रशियात होणार आहे असे दोन्ही बाजूनी सांगितले.

12 मुक्त व्यापार करारा बाबत युरेशियन आर्थिक संघटना आणि या संघटनेचे सदस्य यांच्यात एका बाजूला तसेच दुसऱ्या बाजूला भारत यांच्यात चर्चा सुरु झाल्याबद्दल दोन्ही बाजूनी त्याचे स्वागत केले. या चर्चेला वेग देण्याच्या कल्पनेला पाठींबा व्यक्त करण्यात आला.

13 उभय देशात व्यापार आणि आर्थिक संबंध,गुंतवणूक सहकार्य विकासासाठी, संयुक्त कृती धोरण आखण्यासाठी, संयुक्त अभ्यास करण्यात येत असल्याबद्दल उभय देशांनी, प्रशंसा केली आणि ही प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्याची दखल घेतली.यासाठी भारताने, भारतीय विदेश व्यापार संस्था तर रशियाने अखिल रशियन विदेश व्यापार अकादमीची निवड केली आहे.

14 रशियाच्या गुंतवणूकदारांना भारतात सुलभ गुंतवणूक करण्यासाठी, ‘इन्वेस्ट इंडिया’च्या कामाची आणि रशियात भारतीय कंपन्यांच्या सुलभ कारभारासाठी रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालयाकडून सुरु करण्यात येणाऱ्या एक खिडकी सेवा प्रस्तावाची प्रशंसा करण्यात आली.

15 नवी दिल्लीत 4-5 ऑक्टोबर 2018 ला होत असलेल्या 19 व्या वार्षिक शिखर परिषदे दरम्यान भारत-रशिया व्यापार शिखर परिषद घेण्याचे आणि त्यात द्विपक्षीय सहकार्याच्या महत्वाच्या क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश असणारे दोन्ही देशांचे मोठे प्रतिनिधी मंडळ सहभागी झाल्याबद्दल दोन्ही बाजूनी त्याचे स्वागत केले.यातून दोनही देशातल्या व्यापारी क्षेत्रातली आर्थिक,व्यापारी आणि गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याची इच्छा आणि क्षमता प्रतिबिंबित होत आहे.

16 खाण, धातू, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, रेल्वे, औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान, रसायने, पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, हवाई वाहतूक, अंतराळ, जहाज बांधणी आणि विविध साधनांचे उत्पादन या क्षेत्रात प्राधान्य गुंतवणूक प्रकल्प राबवण्याच्या प्रगतीचा दोन्ही बाजूनी आढावा घेतला. रशियात एडव्हान्स फार्मा कंपनीने औषध निर्माण कारखाना उभारल्याचे यावेळी सांगण्यात आले. रशियातून खतांची आयात वाढवण्याचा मानस भारताने व्यक्त केला. अल्युमिनियम क्षेत्रातल्या सहकार्य वृद्धीचे महत्व दोनही देशांनी अधोरेखित केले.

17 भारतीय लघुउद्योग महामंडळ आणि रशियन लघु आणि मध्यम व्यापार महामंडळ यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्याचे स्वागत करण्यात आले.

18 पायाभूत विकासाला दोनही देशांचे महत्वाचे राष्ट्रीय प्राधान्य असून या क्षेत्रात सहकार्याच्या अपार संधी आहेत यावर दोन्ही बाजूनी भर दिला. भारतात औद्योगिक कॉरीडॉर विकासात रशियाने सहभागी होण्याचे निमंत्रण भारताने दिले यामध्ये रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा,स्मार्ट सिटी, रेल्वे डबे, संयुक्त वाहतूक लॉजीस्टिक कंपनी निर्मितीचा समावेश आहे.

वर नमूद करण्यात आलेल्या औद्योगिक कॉरीडॉरचा ढाचा तयार करण्यासह भारतातले संयुक्त प्रकल्प लक्षात घेऊन उपग्रह आधारित कर संकलनात तज्ञ मदत देऊ केली.

भारताचे रेल्वे मंत्रालय, रेल्वेची गती वाढवण्याच्या प्रकल्पाबाबत जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आंतरराष्ट्रीय बोली प्रक्रीयेत सहभागी होण्यातले स्वारस्य रशियाने व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय वाहतूक कॉरीडॉरच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक शिक्षण, कार्मिक प्रशिक्षण, आणि वैज्ञानिक मदत या क्षेत्रात सहकार्याचे महत्व दोनही बाजूनी अधोरेखित केले. यासाठी वडोदऱ्याच्या राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संघटना आणि रशियन वाहतूक विद्यापीठ यांच्यात सहकार्य कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.

19 दोनही पक्षांनी परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला.त्यांनी,द्विपक्षीय आणि अन्य भागीदार देशासमवेत वित्तीय सुविधा,रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा आणि सीमा शुल्क संबंधी प्रलंबित मुद्यांचा निपटारा करण्याच्या प्रयत्नात वेग आणून आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरीडॉर विकासाचे आवाहन केले. इराणमार्गे रशियात, भारताची मालवाहतूक यासंदर्भात, मॉंस्को मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वाहतूक सप्ताह-2018 च्या पार्श्वभूमीवर भारत, रशिया आणि इराण यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित त्रिपक्षीय बैठकीचे स्वागत करण्यात आले. टीआयआर कार्नेट अंतर्गत माल वाहतूक सीमा शुल्क संमेलनात आपल्या नेतृत्वाबाबत भारताने रशियाला माहिती दिली. आयएनएसटीसी मंत्री स्तरीय आणि सहकार्य बैठक प्राधान्याने आयोजित करण्याबाबत दोनही पक्षांनी सहमती दर्शवली.

20. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी, कोणत्याही उत्पादनाच्या आयात/निर्यातीच्या वेळी आवश्यक तपासणी/नियमावलीचे पालन याबाबत सर्व प्रयत्न परस्परांना माहित करून देण्यात येतील, यामुळे या अंतर्गत करण्यात येणाऱ्या तपासणीचा विलंब कमी करता येईल.

21 दोनही देशातल्या व्यापारी प्रदर्शने आणि मेळे तसेच निर्यात संवर्धन परिषद आणि अन्य निर्यात संबंधी संस्थांची यादी याची परस्परांना माहिती देण्याला सहमती व्यक्त करण्यात आली. यातून दोनही देशातल्या आयात आणि निर्यातदारांना यासंदर्भात माहिती मिळून ते संबंधीतांशी संवाद साधू शकतील.

22 भारत आणि रशिया यांच्यात होणाऱ्या माल वाहतुकीच्या संदर्भात सीमाशुल्क कार्यवाही सुलभ राहण्याच्या दृष्टीने हरित कॉरिडॉर प्रकल्प लवकर सुरु करण्याला पाठिंबा व्यक्त करण्यात आला.परस्पर व्यापार वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हे एक महत्वाचे पाऊल आहे. प्रकल्प सुरु झाल्यावर दोन्ही देशाचे सीमाशुल्क प्रशासन याचा विस्तार करण्यासाठी कटीबद्ध राहतील.

23 भारतीय राज्ये आणि रशियाचे प्रांत यांच्यातले सहकार्य मजबूत करण्याच्या आणि त्यांना संस्थात्मक रूप देण्याच्या प्रयत्नांची उभय देशांनी प्रशंसा केली. भारतातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि रशियातले प्रांत यांच्यातल्या सहकार्याची गती वाढवण्यासाठी दोन्ही देशातला व्यापार, उद्योगपती आणि सरकारी संस्था यांच्यातल्या थेट संपर्कात अधिक गती आणण्याचे निर्देश उभय देशांनी दिले. दोनही पक्षांनी आसाम आणि स्खालीन , हरियाणा आणि बाश्कोर्तोस्तान, गोवा आणि कालीनिनग्राड, ओदिशा आणि इर्कुस्तुक, विशाखापट्टणम आणि व्लादिवोस्तोक यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या करण्याच्या प्रयत्नाचे उभय पक्षांनी स्वागत केले. सेंट पिटसबर्ग आंतरराष्ट्रीय आर्थिक फोरम, पूर्वेकडील आर्थिक फोरम, भागीदारी/गुंतवणूक शिखर परिषदा यासारख्या प्रमुख घडामोडीत प्रादेशिक प्रतिनिधी मंडळाना प्रोत्साहन देण्यावर उभय देशांनी सहमती दर्शवली. भारत-रशिया आंतर क्षेत्रीय मंच आयोजनाचे स्वागत करण्यात आले.

24 दोन्ही पक्षांनी परस्परांच्या देशातल्या नैसर्गिक संसाधनाच्या उत्पादक, प्रभावी आणि किफायतशीर वापरासाठी संयुक्त प्रकल्पाच्या सुयोग्य तंत्रज्ञानाद्वारे संधी आजमावण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली.कृषी क्षेत्र, सहकार्यासाठी एक महत्वाचे क्षेत्र असल्याचे दोनही पक्षांनी मान्य केले आणि व्यापारातले अडथळे दूर करण्यासाठी, अधिक उत्पादन आणि कृषी उत्पादन व्यापारासाठी कटीबद्धता व्यक्त केली.

25 दोन्ही पक्षांनी हिरा क्षेत्रात साधलेल्या सहकार्य स्तराची प्रशंसा केली. ज्यामध्ये भारतीय कंपन्यांना पीजेएससी अलरोसा द्वारा पैलू न पडलेले हिरे पुरवण्याबाबतच्या दीर्घकालीन करारावर स्वाक्षऱ्या, मुंबईत अलरोसाचे कार्यालय सुरु करणे, भारतासहित देशी हिऱ्यांच्या विपणनासाठीच्या कार्यक्रमासंबंधी आंतरराष्ट्रीय हिरा उत्पादक संघाच्या भारतीय रत्न आणि आभूषण निर्यात संवर्धन परिषद आणि अल रोसा द्वारे संयुक्त आर्थिक पाठबळ यांचा समावेश आहे. रशियाच्या अति पुर्वेकडच्या हिरा निर्मिती क्षेत्रात भारताने नुकत्याच केलेल्या गुंतवणुकीची दखल यावेळी घेण्यात आली. दोन्ही पक्षांनी, संयुक्त गुंतवणूक, उत्पादन, प्रक्रिया आणि कुशल कामगार यामार्फत मौल्यवान धातू, खनिजे, नैसर्गिक संसाधने, लाकूड यासहीत वन्य उत्पादनात संयुक्त संधीचा शोध घेण्यासाठी सहमती दिली.

26 रशियाच्या अती पूर्वेकडच्या प्रांतात गुंतवणूक करण्यासाठी रशियाने भारताला निमंत्रित केले. मुंबईत अतिपूर्वेकडच्या एजन्सीचे कार्यालय उघडण्याच्या निर्णयाचे भारताने स्वागत केले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, व्लादीवोस्तोक इथे सप्टेंबर 2018 मधे झालेल्या पूर्वेकडच्या आर्थिक फोरम मधे सहभागी झाले. अति पूर्वेकडच्या भागात भारताने गुंतवणूक करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि रोड शो करण्यासाठी रशियाचे उच्च स्तरीय शिष्टमंडळ भारताला भेट देणार आहे.

27 तंत्रज्ञान आणि संसाधना संबंधात जिथे दोन देशात सामंजस्य असेल तिथे रेल्वे,उर्जा आणि इतर क्षेत्रात तिसऱ्या देशात संयुक्त प्रकल्पांना सक्रीय प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान

28 विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात उभय देशात सहकार्य अधिक वाढवण्याच्या गरजेची दखल दोन्ही बाजूनी घेतली. फेब्रुवारी 2018 मधे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावरच्या 10व्या भारत-रशिया कार्यकारी गटाच्या सफल आयोजना बद्दल स्वागत करण्यात आले. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि रशियाचे विज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्रालय यांनी संयुक्तपणे याचे संचालन केले होते.

29 दोनही देशांनी भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि रशियाचे मूलभूत संशोधन फाऊंडेशन यांच्यातल्या यशस्वी सहयोगाचा आढावा घेतला. जून 2017 मधे मुलभूत आणि उपयोजित विज्ञान क्षेत्रात संयुक्त संशोधनाची 10 वर्ष साजरी करण्यात आली होती. भारताचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि रशियाचे विज्ञान फाऊंडेशन यांच्यातल्या सहकार्याबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले. परस्पर प्राधान्य असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विविध प्रयोगशाळा, शैक्षणिक, विद्यापीठे, संस्था आणि संघटना यांच्यातल्या पुढील सहकार्यासाठी पथदर्शी आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने, भारत आणि रशिया यांच्यात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता या क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या एकीकृत दीर्घकालीन कार्यक्रमांतर्गत सहकार्य पुन्हा स्थापित करण्याला सहमती देण्यात आली.

30 दोनही पक्षांनी माहिती आणि संपर्क क्षेत्रात विशेषत: इलेक्ट्रोनिक यंत्रणा आरेखन आणि उत्पादन, सॉफ्टवेअर विकास, सुपर कॉम्प्युटर, ई सरकार, जन सेवा प्रदान, नेटवर्क सुरक्षा, माहिती आणि संचार तंत्रज्ञान, फिन टेक, प्रमाणीकरण, रेडियो नियंत्रण आणि रेडियो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम नियमन, यामध्ये आपला सहयोग वाढवण्यावर सहमती दर्शवली. ब्रिक्स आणि आयटीयूसह विविध मंचावर परस्पर सहकार्य आणि समन्वय कायम राखण्यासाठी दोनही देशांनी कटीबद्धता दर्शवली.

31 दोन्ही पक्षांनी मार्च 2018 मधे नवी दिल्लीत वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि रशियाचे आर्थिक विकास मंत्री मॅक्झिम ओरेश्कीन द्वारा ‘भारत-रशिया आर्थिक सहकार्य : भावी दिशा’ या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याबद्दल स्वागत केले. भारतीय उद्योग महासंघ आणि स्कोल्कोवो फाऊंडेशन द्वारा डिसेंबर 2018 मधे प्रथमच भारत-रशिया स्टार्ट अप शिखर बैठक आयोजित करण्याच्या निर्णयाची प्रशंसा करण्यात आली. ऑनलाईन पोर्टल सुरु करण्याच्या विचाराचे दोन्ही बाजूनी स्वागत करण्यात आले. यामुळे उभय देशांचे स्टार्ट अप, गुंतवणूकदार, महत्वाकांक्षी उद्योगपतींना मदत होणार आहे आणि जगभरात स्टार्ट अपचा प्रसार होण्याच्या दृष्टीने आवश्यक संसाधने उपलब्ध होतील

32 दोन्ही पक्षांनी अंतराळात दीर्घ काळापासून कायम असलेल्या आणि परस्परांना उपयुक्त भारत रशिया सहकार्याच्या महत्वावर भर दिला.भारतात स्थापित भारतीय प्रादेशिक नौवहन उपग्रह प्रणाली नेव्ह आय सी आणि रशिया मधे स्थापित रशियन नौवहन उपग्रह प्रणाली गलॉनऐस मधे डाटा संग्रह विषयक ग्राउंड स्टेशन घडामोडीबाबत स्वागत केले. अंतरिक्षाचा शांततापूर्ण उद्देशासाठी वापर करण्याच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर दोन्ही पक्षांनी सहमती व्यक्त केली. यामध्ये मानवी अंतराळ कार्यक्रम, वैज्ञानिक प्रकल्प यांचा समावेश आहे. याशिवाय ब्रिक्स दूर संवेदी उपग्रह सहयोग विकास सुरु ठेवण्याला उभय देशांनी मान्यता दर्शवली.

33 दोनही देशांनी आर्कटिक आणि अन्य क्षेत्रांसाहित संयुक्त वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात परस्पर लाभदायक सहकार्य विकासा प्रती स्वारस्य व्यक्त केले. अंटार्क्टिकामध्ये भारतीय आणि रशियाच्या वैज्ञानिकांमधल्या दीर्घ काळाच्या सहकार्याबद्दल उभय बाजूनी समाधान व्यक्त केले.

34 दोनही पक्षांनी विद्यापीठांच्या भारत-रशिया नेटवर्कच्या घडामोडींद्वारे शक्य होणाऱ्या दोन्ही देशांच्या उच्च शिक्षण संस्था मधल्या संपर्काचा आढावा घेतला, 2015 मध्ये स्थापना झाल्यानंतर ज्याच्या तीन बैठका झाल्या आहेत आणि ज्याची सदस्य संख्या 42 पर्यंत पोहोचली आहे. दोनही पक्षानी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले शैक्षणिक आदान प्रदान आणि संयुक्त वैज्ञानिक आणि शैक्षणिक प्रकल्पाबाबत रुची व्यक्त केली.

ऊर्जा

35 रशिया मधल्या नैसर्गिक वायूसह ऊर्जा संसाधनात तसेच नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत क्षेत्रात संभाव्य संयुक्त प्रकल्प अंमलबजावणीत भारताने दाखवलेली रुची लक्षात घेऊन, भारत आणि रशिया यांच्यातले ऊर्जा सहकार्य आणखी विस्तृत करण्याचे महत्व दोनही बाजूनी अधोरेखित केले.

36 ऊर्जा क्षेत्रात परस्पर लाभकारी सहकार्याच्या शक्यतांचा स्वीकार दोन्ही पक्षांनी केला आणि दीर्घकालीन करार, जॉइंट व्हेंचर आणि दोनही देशांसह तिसऱ्या देशातही ऊर्जा संपत्तीबाबत सहयोगाच्या अपार शक्यतांचा विचार करण्याबाबत आपल्या कंपन्यांना प्रोत्साहित केले.

37 भारत आणि रशिया यांच्या ऊर्जा कंपन्यामधल्या सध्याच्या सहकार्याचे उभय बाजूंनी स्वागत केले. यात रशियाच्या वानकॉर्नेफ्ट आणि तास-युर्याखनेफ्टगैजोडोबायचामध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक आणि एस्सार ऑईल कॅपिटलमध्ये पीजेएससी रोजनेफ्ट तेल कंपनीच्या भागीदारीचा समावेश आहे. कंपन्यांच्या बाजूने सर्वंकष सहकार्य विकसित करण्याबाबतच्या प्रगतीचे दोन्ही पक्षांनी स्वागत केले आणि वांकर क्लस्टरबाबत चर्चा लवकरच पूर्णत्वाला जाईल अशी आशा व्यक्त केली.

38 एलएनजी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या भारत आणि रशियाच्या कंपन्यांची रुची उभय पक्षांनी जाणली. गाझ्प्रोम ग्रुप आणि गेल इंडिया यांच्यात दीर्घकालीन करारा अंतर्गत एलएनजी पुरवठा सुरु झाल्याबद्दल यावेळी स्वागत करण्यात आले.

39 पीजेएससी नोव्हाटेक आणि भारतातल्या ऊर्जा कंपन्या यांच्यातल्या चर्चेचा विस्तार सुरूच ठेवण्याला दोनही बाजूनी पाठींबा दर्शवला तसेच एलएनजी क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याच्या संयुक्त उद्देशाचे स्वागत करण्यात आले.

40 दोन्ही देशांच्या कंपन्यांचे सहकार्य विकसित करण्याला आणि रशियाच्या आर्कटिक पट्टीसह रशिया मधल्या तेल क्षेत्राचा संयुक्त विकास आणि पेचोरा आणि ओखोटस्क समुद्र पट्टीवर प्रकल्पांच्या संयुक्त विकास करण्याच्या संधीचा शोध घेण्यासाठी आपला पाठींबा दर्शवला.

41 रशिया आणि इतर देशाद्वारे भारतात गॅस पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन संदर्भात संयुक्त अभ्यासाचे स्वागत करत, दोनही पक्षांनी भारतापर्यंत गॅस पाईप लाईन निर्मितीबाबत शक्यता आजमावण्यासाठी भारत आणि रशिया यांच्या मंत्रालयात सुरु असलेल्या चर्चेची दखल घेतली आणि या मंत्रालयामधल्या सामंजस्य कराराच्या संभाव्य निष्कर्षाबाबत परस्परांशी चर्चा सुरु ठेवण्याला सहमती दर्शवली.

42 भारत आणि रशिया यांच्यातले नागरी अणू सहकार्य हा भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला योगदान देणारा धोरणात्मक भागीदारीचा महत्वाचा घटक आहे, हवामान बदलासंदर्भातल्या पॅरीस कराराअंतर्गत याची कटीबद्धता आहे. कुडानकुलम एनपीपीच्या उर्वरित सहा ऊर्जा युनिट निर्मितीतल्या प्रगतीची चर्चा उभय पक्षांनी केली. भारतात, रशियाने आखलेल्या रचनेनुसार नव्या एनपीपी आणि आण्विक उपकरणाच्या संयुक्त निर्मितीबाबत चर्चे सहित तिसऱ्या देशाच्या सहयोगाचे स्वागत उभय पक्षांनी केले.

बांगलादेशाच्या रुप्पूर अणू उर्जा प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्रिपक्षीय सहकार्याबाबतच्या समझोता कराराच्या पूर्णत्वासाठीची प्रगती दोनही पक्षांनी अधोरेखित केली. दोन्ही पक्षांनी, संयुक्तपणे अणू क्षेत्रात निश्चित केलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याला आणि त्याच्या अंमलबजावणी साठीच्या कृती आराखड्यावर स्वाक्षऱ्या करण्याबाबत समाधान व्यक्त केले.

43 दोनही पक्षांनी हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी जल आणि नविकरणीय उर्जा स्त्रोत, ऊर्जा क्षमता याबाबत सहकार्य अधिक वाढवण्यासाठीच्या संधींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

लष्कर-सहकार्य

44. उभय देशांमधील लष्कर आणि लष्कर-तांत्रिक सहकार्य त्यांच्या धोरणात्मक भागीदारीचा एक महत्वपूर्ण स्तंभ असल्याचे दोन्ही देशांनी नमूद केले. डिसेंबर 2018 मध्ये लष्कर-तांत्रिक सहकार्याबाबत होणाऱ्या भारत-रशिया आंतरसरकारी आयोगाच्या आगामी बैठकीचे त्यांनी स्वागत केले. लष्कर सहकार्याच्या आराखड्याने जवानांचे प्रशिक्षण, लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदान-प्रदान आणि सरावासह दोन्ही देशांच्या लष्करांमधील अधिक सुसंवादाचा मार्ग सुकर केला आहे. आर्मी गेम्स 2018, आर्मी 2018 आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवरील मॉस्को परिषदेतील भारताच्या सहभागाचे रशियाने सकारात्मकरित्या मूल्यांकन केले आहे. दोन्ही देशांनी इंद्रा 2017 हा ट्राय -सर्विसेज सराव यशस्वीपणे पार पडल्याबद्दल प्रशंसा केली आणि 2018 मध्ये इंद्रा ननेव्ही, इंद्रा आर्मी आणि एविया इंद्रा हे संयुक्त लष्करी सराव सुरु ठेवण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली.

45. भारताला जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस-400 क्षेपणास्त्र व्यवस्था पुरवण्याचे कंत्राट पूर्ण झाल्याचे दोन्ही देशांनी स्वागत केले. भारत आणि रशियादरम्यान परस्पर विश्वास आणि परस्पर हिताचा प्रदीर्घ इतिहास असलेले लष्कर तांत्रिक सहकार्य वाढवण्याबाबत कटिबध्दतेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला. लष्कर तांत्रिक सहकार्य संबंधी सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांमधील लक्षणीय प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आणि उभय देशांदरम्यान संयुक्त संशोधन आणि तांत्रिक उपकरणांच्या संयुक्त उत्पादनाप्रति सकारात्मक बदलाची नोंद केली. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्वपूर्ण यंत्रणा म्हणून लष्कर औद्योगिक परिषद प्रक्रियेचे मूल्यांकन केले. उच्च तंत्रज्ञानांतील सहकार्याबाबत नोव्हेंबर 2017 मध्ये स्थापन उच्च स्तरीय समितीच्या बैठकीचे उभय देशांनी सकारात्मकपणे मूल्यांकन केले . संयुक्त संशोधन आणि विकासासाठी परस्पर हिताच्या क्षेत्रात ठोस प्रकल्पांची निवड यात करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय मुद्दे

46. “संयुक्त राष्ट्र चार्टर आणि त्यानुसार देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध आणि सह्कार्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांवरील 1970 च्या घोषणापत्रात प्रतिबिंबित झालेल्या समानता, परस्पर सन्मान आणि गैर -हस्तक्षेप हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निकष असल्याचा ” पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला.

47. जुलै 2018 मध्ये दक्षिण अफ्रीकेत पार पडलेल्या 10 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या फलिताचा उल्लेख करताना आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्र चार्टरच्या चौकटीत राहून स्वच्छ, निष्पक्ष आणि एक बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्राथमिकताचे रक्षण करणे आणि संघटनेमध्ये धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी फलितात्मक संवाद सुरु ठेवण्याच्या भारत आणि रशियाच्या विचारांची त्यांनी दखल घेतली.

48. अफगाणिस्तानप्रणित राष्ट्रीय शांतता सामंजस्य प्रक्रियेच्या दिशेने अफगाण सरकारच्या प्रयत्नांना समर्थन देण्याची घोषणा दोन्ही देशांनी केली. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला तीव्र हिंसाचार, खालावलेली सुरक्षा व्यवस्था आणि त्याचा आसपासच्या भागात पडत असलेला प्रभाव यामुळे चिंतित दोन्ही पक्षांनी तिथे प्रदीर्घ काळ सुरु असलेला संघर्ष, दहशतवाद, दहशतवाद्यांचे सुरक्षित अड्डे आणि अंमली पदार्थांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मॉस्को आराखडा, अफगाणिस्तानवरील एससीओ संपर्क गट आणि अन्य मान्यताप्राप्त उपाययोजनांवर भर दिला. दोन्ही देशांनी अफगाणिस्तानमध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तसेच शांतता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी, स्थिर, सुरक्षित, एकत्रित, समृद्ध आणि स्वतंत्र अफगाणिस्तानचा आर्थिक आणि राजकीय विकास करण्यासाठी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपपाचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला केले. अफगाणिस्तानमध्ये संयुक्त विकास आणि क्षमता निर्मिती प्रकल्प सुरु करण्याच्या दिशेने उभय देश प्रयत्न करतील.

49. दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद संकल्प 2254 (2015)अंतर्गत सीरियाचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करणाऱ्या सीरिया प्रणित सर्वसमावेशक राजकीय प्रक्रियेद्वारे सीरियामधील संघर्षावर राजकीय तोडगा काढण्याबाबत भारत आणि रशियाची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. त्यांनी जिनिव्हा प्रक्रियेसाठी आणि संयुक्त राष्ट्राने प्रस्तावित केलेल्या मध्यस्थीसाठी तसेच अस्थाना प्रक्रियेसाठी समर्थनाचा पुनरुच्चार केला आणि दोन्ही पुढाकारांच्या पूरकतेवर भर दिला. दोन्ही देशांनी सर्व हितधारकांना एक शांत, स्थिर आणि सार्वभौम सीरियन राष्ट्र तयार करण्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आणि आंतर-सीरियन संवादास पूर्व-अटी किंवा बाह्य हस्तक्षेपाशिवाय समर्थन देण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांनी सीरियन लोकांच्या दीर्घकाळ सुरु असलेल्या यातना संपुष्ठात आणण्यासाठी, त्वरित पुनर्निर्माण आवश्यकता लक्षात घेऊन आणि शरणार्थी आणि अंतर्गत विस्थापीत व्यक्तींना परत आणण्यासाठी आवश्यक मानवतावादी मदत पुरविण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले.

50. अण्वस्त्र प्रसार विरोधी व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि इराणबरोबर सामान्य आर्थिक सहकार्य विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला समर्थन देण्यासाठी इराणच्या आण्विक कार्यक्रमावर संयुक्त व्यापक कृती योजनेच्या (जेसीपीओए) पूर्ण आणि प्रभावी अंमलबजावणीचे महत्त्व दोन्ही देशांनी अधोरेखित केले. इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित सर्व समस्या शांततेने आणि संवादाद्वारे सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

51. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपमधील सकारात्मक घडामोडींचे स्वागत केले आणि कूटनीति आणि संवाद यांच्याद्वारे या उप-प्रदेशात स्थायी शांतता आणि स्थिरता आणण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांचे समर्थन व्यक्त केले. दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली की कोरियन द्वीपांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कार्यप्रणाली तयार करताना आण्विक प्रसारांशी संबंधित चिंतेचा विचार करणे आवश्यक आहे.

52. दोन्ही देशांनी बाह्य क्षेत्रामध्ये शस्त्रास्त्रांची शक्यता आणि त्याचा लष्करी कारवायांसाठी वापर होण्याच्या शक्यतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी बाह्य अंतराळातील (पीआरओएस) शस्त्रास्त्र स्पर्धेला आळा घातल्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला असलेला गंभीर धोका टळेल याचा पुनरुच्चार केला. बाह्य अंतराळात शस्त्रास्त्र ठेवायला प्रतिबंध करण्याबाबत पीआरओएसवर कायदेशीरपणे बंधनकारक संभाव्य घटकांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरकारी तज्ञांच्या पहिल्या सत्रातील चर्चेचे त्यांनी स्वागत केले. त्यांनी यावर भर दिला की व्यावहारिक पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करण्याचे उपाय पीआरओएसच्या हेतूत देखील योगदान देऊ शकेल.

53. रासायनिक शस्त्रांचा विकास, उत्पादन, साठवण आणि ती वापरण्यावरील निषेधाबाबत आयोजित परिषदेच्या भूमिकेचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांचे आणि पुढाकारांचे समर्थन करण्यासाठी आणि त्यांचा संघटनांच्या कार्याचे राजकीयकरण रोखण्याच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी उभय देशांनी दृढनिश्चय पुन्हा व्यक्त केला. रासायनिक शस्त्रसाठा निर्धारित वेळेपूर्वी नष्ट केल्याबद्दल भारताने रशियन महासंघाचे अभिनंदन केले. रासायनिक शस्त्रांपासून मुक्त जगाचे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान यातून दिसून येते.

54. उभय देशांनी सर्व प्रकारचा दहशतवाद आणि त्याच्या प्रचाराची निंदा केली आणि कुठल्याही दुहेरी मापदंडाशिवाय निर्णायक आणि सामूहिक प्रतिसादासह आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा सामना करण्याच्या गरजेवर भर दिला. उभय देशांनी दहशतवादाचे जाळे , त्यांचे आर्थिक मदतीचे स्रोत , शस्त्रास्त्रे आणि युद्धसामुग्रीचा पुरवठा करणारे स्रोत यांचे निर्मूलन आणि दहशतवादी विचारसरणी, प्रचार आणि भर्ती रोखण्यासाठी आपले प्रयत्न वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली. सीमेवरील दहशतवाद आणि आणि दहशतवाद्यांना सुरक्षित आसरा देण्यासह त्यांना विविध प्रकारची मदत देणाऱ्या देशांचा उभय देशांनी निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रलंबित आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक जाहीरनामा स्वीकारण्याचे महत्व ओळखून उभय देशांनी त्याची त्वरित पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन आंतराराष्ट्रीय समुदायाला केले. रासायनिक आणि जैविक दहशतवादाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी उभय देशांनी रासायनिक आणि जैविक दहशतवादी कृत्ये रोखण्यासाठी निरस्त्रीकरणावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बहु-पक्षीय वाटाघाटी सुरु करण्याच्या गरजेवर भर दिला.

55. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याची तत्वे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेप्रति कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. जेव्हा स्वच्छ मनाने साधरणपणे मान्यताप्राप्त तत्वे आणि आंतराराष्ट्रीय कायद्याच्या नियमांची अंमलबाजवणी केली जाते तेव्हा दुहेरी मानके लागू करणे अथवा काही देशांकडून आपल्या इच्छा अन्य देशांवर लादण्याला वाव नसतो असे मत दोन्ही देशांनी व्यक्त केले. आंतराराष्ट्रीय कायद्याचे पालन न करता एकतर्फी दबाव टाकणाऱ्या उपाययोजना लागू करणे अशा प्रकारच्या कार्यपद्धतीचे हे स्पष्ट उदाहरण आहे. परंतु दोन्ही देश जागतिक आणि समान हितांवर आधारित लोकशाही जागतिक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी यापुढेही एकत्रितपणे काम करत राहतील.

56. सध्याच्या जागतिक व्यवस्थेला उत्तमरीत्या प्रतिबिंबित करण्यासाठी आणि नवनवीन जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याच्या गरजेचा दोन्ही देशांनी पुनरुच्चार केला. रशियाने विस्तारित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताला निरंतर मदतीचा पुनरुच्चार केला. उभय देशांनी क्षेत्रीय आणि जागतिक अशा दोन्ही स्तरावर शांतता, सुरक्षा आणि न्यायसंगत विकास सुनिश्चित करण्यासाठी समन्वय राखण्याचा आणि जागतिक व्यवस्थेच्या स्थैर्यात येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.

57. शाश्वत विकासासाठी 2030 कार्यक्रमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला. संतुलित आणि एकात्मिक पद्धतीने आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा तिन्ही आयामांमध्ये शाश्वत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान, खुल्या, सर्वंकष, संशोधन-आधारित आणि सर्वसमावेशक विकासासाठी दोन्ही देश काम करतील. 2030 कार्यक्रमाच्या जागतिक अंमलबजावणीच्या समन्वयासह आढावा घेण्यासाठी शाश्वत विकासावरील उच्चस्तरीय राजकीय मंचासह संयुक्त राष्ट्राचीही प्रमुख भूमिका असल्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला. 2030 कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सदस्य देशांना सहभागी करण्याबाबत क्षमता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास प्रणालीत सुधारणा करण्याच्या गरजेवर उभय देशांची सहमती झाली. विकसित देशांनी वेळेवर आणि पूर्ण आपली अधिकृत विकास मदत देण्याची कटिबद्धता पूर्ण करण्याबरोबरच विकसनशील देशांना अधिक विकास निधी पुरवण्याचे आवाहन दोन्ही देशांनी केले.

58. शाश्वत विकास आणि दारिद्र्य निर्मूलन संदर्भात हरित विकास आणि कमी कार्बन उत्सर्जनवाल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दोन्ही देशांनी सांगितले. त्यांनी सर्व देशांना समान मात्र विविध जबाबदाऱ्या आणि संबंधित क्षमतांच्या तत्वांसह हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र आराखडा परिषदेच्या तत्वांतर्गत पॅरिस कराराची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. प्रदूषण कमी करणे आणि अनुपालनातील क्षमता वाढवण्यासाठी विकसनशील देशांना आर्थिक, तंत्रज्ञानविषयक आणि क्षमता निर्मितीसाठी मदत देण्याचे आवाहन त्यांनी विकसित देशांना केले.

59. जागतिक अण्वस्त्र प्रसारबंदी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार दोन्ही देशांनी केला. अणुपुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळावे यासाठी रशियाने आपले समर्थन व्यक्त केले.

60. माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (आईसीटी) च्या वापरात विविध देशांच्या जबाबदार वृत्तीचे नियम, निकष आणि तत्वे लवकर स्विकारण्याच्या गरजेवर दोन्ही देशांनी भर दिला. त्याचबरोबर उभय देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा व्यवस्था विकसित करून गुन्हेगारी उद्देशांसाठी आयसीटीचा वापर करण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. यासंदर्भात संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 73 व्या बैठकीदरम्यान प्रासंगिक प्रस्ताव स्वीकारण्याचे महत्व दोन्ही देशांनी अधोरेखित केले. आईसीटीच्या वापरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्याची चौकट स्थापन करण्याची गरज उभय देशांनी व्यक्त केली. त्याचबरोबर याबाबत सहकार्य संबंधी ब्रिक्स आंतर-सरकारी कराराची कक्षा वाढवण्याच्या दिशेने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

61. दोन्ही देशांनी आयसीटी वापरात सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सामायिक दृष्टिकोन अवलंबण्याची गरज अधोरेखित केली. आणि त्याचबरोबर त्यांनी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापरात सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या क्षेत्रात सहकार्यासंबंधी आंतर-सरकारी कराराला आणखी पुढे वाढवण्यासाठी द्विपक्षीय आंतर -संस्था व्यावहारिक संवाद दृढ करण्याची आपली इच्छा व्यक्त केली.

62 दोन्ही देशांनी एक अशी प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था स्थापन करण्याच्या विचाराचे समर्थन केले जे आशिया-प्रशांत क्षेत्रातील सर्व देशांना आणि हिंदी महासागरातील सर्व देशांना समान आणि अविभाज्य सुरक्षा प्रदान करेल. पूर्व आशिया शिक्षणे परिषद आणि इतर प्रादेशिक मंचांच्या चौकटीत या विषयावरील बहुपक्षीय संवाद सुरू ठेवण्याच्या महत्वावर उभय देशांनी विशेष भर दिला. दोन्ही बाजूंनी मान्य केले की प्रादेशिक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने सर्व नवीन उपक्रम बहुपक्षीयवाद, पारदर्शकता, समावेश, परस्पर सन्मान आणि प्रगती आणि समृद्धीच्या सामायिक प्रयत्नांमधील परस्पर आदर आणि एकतेच्या तत्त्वावर आधारित असावेत. तसेच हे कोणत्याही देशाविरुद्ध नसावेत. उभय देशांनी संदर्भात, रशियन महासंघाचे उप -परराष्ट्र मंत्री इगोर मॉर्गुलोव आणि भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या दरम्यान 24 ऑगस्ट 2018 रोजी मॉस्को येथे केलेल्या रचनात्मक सल्लामसलतांचे स्वागत केले.

63. ब्रिक्स, जी-20, एससीओ आणि पूर्व आशिया शिखर परिषद यांसारख्या प्रादेशिक बहुपक्षीय मंचावर परस्पर प्रयत्नांमध्ये सामंजस्य आणि समन्वय वाढविण्याच्या आपल्या दृढ संकल्पाचा पुनरुच्चार केला.भारताने यूरेशियन इकोनॉमिक यूनियन अंतर्गत सहकार्याची व्याप्ती वाढवण्याची इच्छा व्यक्त केली.

64. जून, 2018 मध्ये क्विंगडाओ इथे आयोजित एससीओ राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा सहभाग एक पूर्णकालीन सदस्य म्हणून या संघटनेच्या कामकाजात भारताचा यशस्वी सहभाग दर्शवतो असे दोन्ही देशांनी नमूद केले. एससीओ चार्टर, आंतरराष्ट्रीय कायद्याची तत्वे आणि निकष याप्रति उभय देशांनी आपली कटिबद्धता व्यक्त करत यापुढेही सर्व दिशांनी या संघटनेच्या क्षमतांचा आणखी उपयोग करण्यासाठी समन्वित प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.

दहशतवाद, अंमली पदार्थांची अवैध तस्करी आणि संघटित गुन्ह्यांसह सुरक्षा आणि स्थैर्याशी संबंधित मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले जाईल. यामुळे एससीओ च्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचनेअंतर्गत सहकार्य अधिक प्रभावी होईल.

रशियाने दहशतवाद -विरोधी अभ्यास ‘शांति मिशन-2018’ मध्ये भारताच्या सहभागाचे स्वागत केले आहे. दोन्ही देश एससीओचा एक आर्थिक घटक विकसित करण्याच्या उद्दिष्टाला अत्यंत महत्वपूर्ण मानतात ज्यामध्ये त्या वाहतूक आणि पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा समावेश आहे . याचा उद्देश एससीओ अंतर्गत आंतर -संपर्क सुनिश्चित करण्याबरोबरच पर्यवेक्षक, भागीदार देश आणि इच्छुक देशांबरोबर उत्तम संपर्क देणे हा आहे. उभय देशांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर एससीओच्या भूमिकेची व्याप्ती वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. दोन्ही देश संयुक्त राष्ट आणि त्यांच्या संघटना आणि अन्य आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांबरोबर एससीओ चा संपर्क आणि सहकार्य वाढवणे आवश्यक मानतात. दोन्ही देशांनी एससीओ अंतर्गत सांस्कृतिक आणि मानवीसम्बन्ध दृढ करण्याबाबत सहमती व्यक्त केली.

65. दोन्ही देशांनी खुल्या, सर्वसमावेशक, पारदर्शक, भेदभावरहित आणि नियम आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणाली मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांचे विभाजन आणि सर्व प्रकारातील व्यापार संरक्षणवाद रोखण्यावर विशेष भर दिला.

66. भारताने एक मोठी यूरेशियन भागीदारी सुनिश्चित करण्याच्या दिशेने रशियाने उचललेल्या पावलाचे स्वागत केले आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा आणि समानता तसेच परस्पर सन्मानाच्या तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच एकमेकांचे राष्ट्रीय दृष्टिकोन लक्षात घेऊन रचनात्मक सहकार्याचा प्रभावी मंच बनवण्यासाठी राष्ट्रीय विकास धोरणे आणि बहुपक्षीय एकीकरण प्रकल्पांचे संयोजन करण्याचा उल्लेख केला आहे.

67. दोन्ही देशांनी भारत-रशिया संबंधांच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर आपले हित तसेच समान स्थिती सांगितली आणि दोन्ही देशांच्या परस्पर समृद्धीसाठी भारत आणि रशियाची विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी घनिष्ट सहकार्य, समन्वय आणि लाभांचे सुदृढ़ीकरण यापुढेही सुरु ठेवण्याबाबत सहमती वर्तवली.

68. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शानदार आदरातिथ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि वर्ष 2019 मध्ये होणाऱ्या 20 व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना रशियाला येण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi govt created 17.19 crore jobs in 10 years compared to UPA's 2.9 crore

Media Coverage

PM Modi govt created 17.19 crore jobs in 10 years compared to UPA's 2.9 crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets on the occasion of Urs of Khwaja Moinuddin Chishti
January 02, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi today greeted on the occasion of Urs of Khwaja Moinuddin Chishti.

Responding to a post by Shri Kiren Rijiju on X, Shri Modi wrote:

“Greetings on the Urs of Khwaja Moinuddin Chishti. May this occasion bring happiness and peace into everyone’s lives.