पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लक्झमबर्गचे पंतप्रधान झेवियर बिटेल यांच्या दरम्यान 19 नोव्हेंबर 2020 रोजी आभासी परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
भारत आणि लक्झमबर्ग दरम्यान होणारी गेल्या दोन दशकातील ही पहिलीच परिषद आहे. या बैठकीच्या विषयपत्रिकेत द्वीपक्षीय संबंध आणि कोविडनंतरच्या परिस्थितीत भारत-लक्झमबर्ग संबंध बळकट करणे यांचाही समावेश आहे. दोन्ही नेते परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.
भारत आणि लक्झमबर्ग दरम्यान गेल्या काही वर्षांत उच्चस्तरीय देवघेव झाली आहे. या आधी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची तीन वेळा भेट झाली आहे.