आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल तरच तो चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम गेब्रेयेसस यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदींनी लिहिले:
“प्रिय तुलसी भाई,
निरोगी ग्रह हा चांगला ग्रह असतो. भारत या क्षेत्रात सक्रियपणे काम करत आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला समाकलनाला मोठे महत्त्व देत आहोत. त्याच्या बरोबरीनेच आम्ही जागतिक प्रयत्नांना सुद्धा बळकटी देऊ. @DrTedros
Dear Tulsi Bhai,
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2024
A healthy planet is a better planet. India is working actively in this sector. We are attaching great priority to integrating technology too. At the same time, we will strengthen global efforts in this regard. @DrTedros https://t.co/yipGKox1uV