आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) केलेल्या विकासाच्या भाकिताबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, भारत म्हणजे जागतिक पातळीवर तेजाने तळपणारा देश आहे, विकास आणि नवोन्मेषाचे ऊर्जाकेंद्र आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. आपल्या जनतेचे सामर्थ्य आणि कौशल्यामुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

समृद्ध भारताच्या दिशेने होणारा आमचा प्रवास आम्ही सुधारणांच्या कक्षांना आणखी चालना देत बळकट करणे सुरू ठेवू, या वचनबद्धतेचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला आहे.

आयएमएफच्या ‘एक्स’ वर प्रसिद्ध झालेल्या माहितीच्या मालिकेवर(थ्रेड्स) प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले

“आपल्या देशाच्या जनतेचे सामर्थ्य आणि कौशल्य यांच्या बळावर भारत हा जागतिक पातळीवरील एक तेजस्वी स्थान आहे, विकास आणि नवोन्मेषाचे ऊर्जाकेंद्र आहे. समृद्ध भारताच्या दिशेने होणारा आमचा प्रवास आम्ही सुधारणांच्या कक्षांना आणखी चालना देत बळकट करणे सुरू ठेवणार आहोत.”