"आम्ही, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशांचे प्रमुख आपल्या सामायिक विश्वासाठी उपाय योजण्याच्या उद्देशाने जी-20 ला आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्यविषयक प्रमुख मंचाचा रुपात घडवण्याप्रती आमच्या सामायिक कटिबद्धतेची पुन्हा एकदा ग्वाही देण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित जी-20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत.
जी-20 समूहाचा विद्यमान अध्यक्ष आणि आगामी तीन वर्षांसाठीचे नियोजित अध्यक्ष देश म्हणून आम्ही सर्व नेते जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताच्या जी-20 अध्यक्षतेत झालेल्या ऐतिहासिक प्रगतीला अनुसरून हे कार्य पुढे सुरु ठेवू. आम्ही याच प्रेरणेसह, जागतिक बँकेच्या अध्यक्षांसह, आम्ही अधिक उत्तम दर्जाच्या, अधिक मोठ्या आणि अधिक परिणामकारक कार्य करणाऱ्या बहुपक्षीय विकास बँकांच्या उभारणीप्रती जी-20 समूहाच्या कटिबद्धतेचे स्वागत करतो. ही कटिबद्धता आपल्या लोकांसाठी अधिक चांगले भविष्य घडवण्याला आधार देण्यासाठी जी-20 समूहाच्या माध्यमातून एकत्रितपणे कार्य करून आम्ही काय करू शकतो ते दाखवून देते."