अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन दिवसीय औपचारिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत तुमच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहे, डोनाल्ड ट्रम्प’ अशा शब्दांत त्यांना आमंत्रण देत स्वागत केले आहे.
ट्विटरवर दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की, ‘आपली भारत भेट निश्चितच दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ करणारी ठरेल, लवकरच अहमदाबादमध्ये भेटू.’
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज अहमदाबाद येथे येणार असून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम येथे ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते साबरमती आश्रमालाही भेट देतील.
संध्याकाळी ट्रम्प दिल्लीला जाणार आहेत. या भेटीदरम्यान ट्रम्प यांची पंतप्रधान मोदींसोबत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे.
India awaits your arrival @POTUS @realDonaldTrump!
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2020
Your visit is definitely going to further strengthen the friendship between our nations.
See you very soon in Ahmedabad. https://t.co/dNPInPg03i