भारताने जिंकलेल्या ऐतिहासिक पदकांनी आपली अंतःकरणे आनंदाने भरून आली आहेत : पंतप्रधान
अनन्यसाधारण आदरातिथ्यासाठी जपान सरकार आणि नागरिकांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारतीय क्रीडा इतिहासात, टोक्यो पॅरालिम्पिकला नेहमीच एक विशेष स्थान असेल. पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेला आपल्या चमूचा प्रत्येक सदस्य हा विजेता आणि प्रेरणास्त्रोत आहे.

खेळाडूंना सतत पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्या खेळाडूंचे प्रशिक्षक, सहाय्यक आणि कुटुंबांचे कौतुक केले. अनन्यसाधारण आदरातिथ्याबद्दल, तपशीलवार आयोजनासाठी आणि  या ऑलिम्पिकच्या माध्यमातून चिकाटी आणि बंधुत्वाच्या  भावनेचा अत्यंत आवश्यक संदेश पसरविल्याबद्दल  पंतप्रधानांनी जपानच्या लोकांची  विशेषतः टोक्यो आणि जपानी सरकार यांची प्रशंसा केली.

 

ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

''भारतीय क्रीडा इतिहासात, टोक्यो पॅरालिम्पिकला नेहमीच एक विशेष स्थान असेल. ही क्रीडा स्पर्धा प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात कायम राहील आणि खेळाडूंच्या पुढील पिढ्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करेल. आपल्या चमुचा प्रत्येक सदस्य हा विजेता आणि प्रेरणास्त्रोत आहे.

भारताने जिंकलेल्या ऐतिहासिक पदकांनी आमची अंतःकरणे आनंदाने भरली आहेत. खेळाडूंना सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी आपल्या  खेळाडूंचे प्रशिक्षक, सहाय्यक आणि कुटुंबियांचे कौतुक करू इच्छितो. खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे आपले यश नक्कीच लाभदायी ठरेल अशी आपण आशा व्यक्त करूया.

मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे,  अनन्यसाधारण आदरातिथ्याबद्दल, तपशीलवार आयोजनासाठी आणि या ऑलिम्पिकच्या माध्यमातून चिकाटी आणि बंधुत्वाच्या भावनेचा अत्यंत आवश्यक संदेश पसरविण्यासाठी जपानच्या विशेषतः टोक्योच्या नागरिकांचे आणि जपान सरकार यांची प्रशंसा केली पाहिजे''.

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024

Media Coverage

Mutual fund industry on a high, asset surges Rs 17 trillion in 2024
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Chief Minister of Andhra Pradesh meets Prime Minister
December 25, 2024

Chief Minister of Andhra Pradesh, Shri N Chandrababu Naidu met Prime Minister, Shri Narendra Modi today in New Delhi.

The Prime Minister's Office posted on X:

"Chief Minister of Andhra Pradesh, Shri @ncbn, met Prime Minister @narendramodi

@AndhraPradeshCM"