पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या मन की बात कार्यक्रमात म्हणाले की, आत्मनिर्भर भारत ॲप निर्माण प्रतियोगितेअंतर्गत युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. दोन तृतीयांश प्रवेशिका श्रेणी-II आणि श्रेणी-III शहरांमधून आल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. विविध प्रवर्गातील 24 पेक्षा अधिक ॲप्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले, श्रोत्यांनी या ॲपचा वापर करावा, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी यापैकी बऱ्याच ॲपविषयी सांगितले, कुटूकी कीडस लर्निंग ॲप -हा ॲप बालकांच्या शिक्षणासाठी संवादात्मक ॲप आहे, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील कु कू कू , चिंगारी ॲप हे युवावर्गात लोकप्रिय होत आहेत. शासकीय योजनांच्या माहितीसाठी ‘आस्क सरकार’ नावाचा ॲप आहे, स्टेप सेट गो, हा शारिरीक तंदुरुस्तीसंदर्भातील ॲप आहे.
पंतप्रधान म्हणाले, आजचे लहान-लहान स्टार्टअप्स उद्या मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये रुपांतरीत होतील आणि जगामध्ये भारताची वेगळी ओळख बनेल. आज जगातील मोठ्या कंपन्या, एकेकाळी स्टार्ट अप्स होत्या, असे ते म्हणाले.