उत्तर गुजरात मधील मेहसाणा जिल्ह्यातील वाडनगर या एका छोट्या आणि साधारण गावातील गल्ली बोळात नरेंद्र मोदी यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. भारताला स्वातंत्र्य मिळून ३ वर्ष झाल्यानंतर दामोरदास मोदी आणि हिराबा मोदी यांच्या सहा अपत्यांपैकी १७ सप्टेंबर १९५० रोजी तिसरे अपत्य म्हणून नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला. वाडनगर हे इतिहासाशी जोडले गेलेले शहर आहे. परातत्व खात्याच्या उत्खननानुसार वाडनगर हे ज्ञान आणि अध्यात्मासाठीचे प्रमुख केंद्र होते. चीनी प्रवासी ह्युएन त्सांग याने वाडनगरला भेट दिली होती. वाडनगरला समृद्ध बौद्ध इतिहास देखील आहे, शेकडो वर्षांपूर्वी दहा हजारांहून अधिक भिक्कुंचे वास्तव्य या शहरात होते.
वाडनगरस्टेशन, जेथेनरेंद्रमोदीयांच्यावडिलांचाचहाचास्टॉलहोता , तिथेचनरेंद्रमोदीसुद्धाचहाविकतअसत
नरेंद्र मोदींचे बालपण हे काही परीकथेप्रमाणे गेले नाही. त्यांचे कुटुंब हे समाजातील सर्वसाधारण वर्गातले निगडीत होते आणि आपला चरितार्थ चालवण्यासाठी त्यांना खूप झगडावे लागत होते. त्याचे संपूर्ण कुटुंब हे लहान एकमजली घरात रहात होते ( अंदाजे ४० फुट बाय १२ फुट). त्यांचे वडील रेल्वे स्थानकावर चहा विकायचे. सुरवातीच्या काळात, नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या वडिलांना त्यांच्या चहा विक्रीच्या व्यवसायात मदत केली.
या जडणघडणीच्या काळाने नरेंद्र मोदींवर एक खोल ठसा उमटवला आहे. बालपणी नरेंद्र मोदींनी आपला अभ्यास, बिगर शैक्षणिक आयुष्य आणि त्यांच्या कौटुंबिक चहाचा व्यवसाय यामध्ये त्यांनी उत्तम समतोल साधला होता. वादविवाद आणि वाचनाची आवड असणाऱ्या नरेंद्रची त्याचे शालेय मित्र मेहनती विद्यार्थी म्हणून त्यांची आठवण काढतात. तो शाळेच्या वाचनालयात तासन्तास वाचत बसायचा. पोहणे हा त्याचा आवडता क्रीडा प्रकार. सर्व समाजातले त्याचे मित्र होते. लहानपणी त्यांच्या शेजारी त्यांचे बरेच मुस्लीम मित्र असल्याने ते हिंदू आणि मुस्लीम दोन्ही सण साजरे करायचे.
लहानपणीनरेंद्रमोदीयांनीसैन्यातभरती होण्याचे स्वप्न पहिले होते परंतु विधिलिखित वेगळचहोतं
तरीही, शाळेच्या वर्गापासून सुरु होणारे आणि एखाद्या कार्यालयात संपणाऱ्या साचेबद्ध आयुष्याच्या पलीकडे त्यांचे विचार आणि स्वप्ने होती. त्यांना चौकटी बाहेर जाऊन एक वेगळा समाज घडवायचा होता. शोषितांचे अश्रू पुसायचे होते. तरुणपणीच त्यांचा कल त्याग आणि वैराग्याकडे विकसित झाला होता. त्यांनी मीठ, तिखट, तेल आणि गुळ खाणे सोडून दिले. स्वामी विवेकानंदांच्या कार्याविषयी वाचन करताना नरेंद्र मोदींचा अध्यात्माकडे ओढा वाढत होता. भारताला जगत गुरु बनवण्याचे स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्या दिशेने ते कार्य करू लागले.
नरेंद्र मोदींच्या बालपणाचे वर्णन जर एका शब्दात करायचे असेल आणि जे शब्द उर्वरित आयुष्यात देखील त्यांच्या सोबत राहिले आहेत तो आहे ‘सेवा’. जेव्हा तापी नदीला पूर येवून प्रलय स्थिती निर्माण झाली होती तेव्हा ९ वर्षाचा नरेंद्र आणि त्याच्या मित्राने जेवणाचा स्टॉल सुरु केला आणि मदत कार्यात योगदान दिले. जेव्हा पाकिस्तान सोबतचे युद्ध सुरु होते तेव्हा ते रेल्वे स्थानकावर बसायचे आणि सीमेवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या जवानांना ते चहा द्यायचे. हे खूप छोटे पाऊल होते पण भारतमातेच्या हाकेला धावून जायची तत्परता यातून दिसून येते आणि ती देखील कोवळ्या वयात.
बालपणी नरेंद्र मोदींचे एक स्वप्न होते – भारतीय लष्करात दाखल व्हायचे. मातेची सेवा करणे म्हणजे सैन्यात भर्ती होणे, अशी त्यावेळच्या तरुणांची धारणा होती. परंतु त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या या कल्पनेला तीव्र विरोध केला. नरेंद्र मोदींची जामनगर जवळील सैनिक शाळेत शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु जेव्हा शाळेची फी भरायची वेळ आली तेव्हा त्यांच्या कुटुंबाकडे पैसे नव्हते. नरेंद्रची तेव्हा नक्कीच निराशा झाली. परंतु, सैनिकी गणवेष घालू न शकल्यामुळे निराश झालेल्या या तरुण मुलासाठी नियतीने काहीतरी वेगळेच योजून ठेवले होते. मानवतेची सेवा करण्याचे मोठे ध्येय उराशी बाळगून वर्षानुवर्षे चोखाळलेल्या वाटेने त्यांना भारत भ्रमण घडवले.
त्यांच्याआईचाआशीर्वादघेऊन …..