बुंदेलखंड एक्सप्रेस-वे मुळे उत्तरप्रदेशातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, याशिवाय स्थानिक लोकांना दिल्लीसह इतर मोठ्या शहरांसोबत जोडण्यासही मदत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी युपीतील चित्रकूट येथे 296 किलोमीटर्स लांबीच्या बुंदेलखंड एक्सप्रेस-वेच्या कामाचा शिलान्यास केला.
या एक्सप्रेस- वे मुळे बुंदेलखंड हा भाग राजधानी दिल्लीशी आग्रा- लखनौ एक्सप्रेस- वे आणि यमुना एक्सप्रेस- वे मार्फत जोडला जाणार असून बुंदेलखंड भागाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. युपी डिफेन्स कॉरिडॉर आणि हा एक्सप्रेस-वे या दोन्हीमुळे बुंदेलखंडचे सामाजिक-आर्थिक चित्र पालटणार असून संरक्षणविषयक हार्डवेअरची निर्यात करण्यासाठी सुविधा निर्माण होणार असल्याने तिथे गुंतवणुकीला चालना मिळण्याबरोबरच, भविष्यात ते ‘मेक इन इंडिया’ चे मुख्य केंद्र बनू शकते