महात्मा गांधी यांचे विचार त्यांच्या जीवनकाळात जितके उपयुक्त होते तितकेच ते आजही लागू पडतात-नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाचा कार्यभार सांभाळल्यापासून महात्मा गांधी यांचे आदर्श तत्वे आणि शिकवण केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेच्या स्मरणार्थ दांडी येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा आणि ऊर्जा या स्मारकातून जीवंत होते. महात्मा गांधी यांनी त्यांच्या 80 सत्याग्रहींसह केलेल्या मीठ सत्याग्रहाची प्रतिकृती या स्मारकात करण्यात आली आहे.

मीठ सत्याग्रहासह महात्मा गांधींच्या अनेक वारशांचे जतन करण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे.

पंतप्रधानांचे प्रिय अभियान स्वच्छ भारत महात्मा गांधींपासूनच प्रेरणा घेऊन सुरु करण्यात आले आहे. 2 ऑक्टोबर 2014 रोजी हे अभियान सुरु करण्यात आले होते. यावेळी हे अभियान म्हणजे महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दीनिमित्त देशाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल असे मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातूनच स्वच्छता ही आज जन चळवळ झाली आहे. गेल्या चार वर्षात या अभियानामुळे भारताच्या कान्याकोपऱ्यात परिवर्तन होत आहे. समाजामध्ये जागृती निर्माण होत आहे. अनेक राज्यांनी हागणदारीमुक्त होण्याच्या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत उदिृष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच भारताचा ग्रामीण भाग 100 टक्के हागणदारी मुक्त होईल.https://twitter.com/narendramodi/status/973583560308293632

 

स्वातंत्र्यलढ्यादरम्यान जनतेच्या मनात स्वदेशीची भावना जागृत करण्यासाठी महात्मा गांधी यांनी खादीचा मंत्र दिला होता. तेंव्हापासूनच खादीला भारतात महत्व मिळाले मात्र गेल्या काही काळात त्याचा वापर कमी झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी आपली भाषणे आणि ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेला खादी वापरण्याचे आवाहन केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे भारतात खादी आणि सुती कपड्यांचा वापर वाढला आणि या उद्योगांना चालना मिळाली.

 

 

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मशताब्दीचा महोत्सव दोन वर्षे देशभरात साजरा केला जाणार आहे. या निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जगभरात महात्मा गांधींचे विचार पोहोचवण्यासाठी 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या काळात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषद नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती.

 

महात्मा गांधीचे आवडते भजन ‘वैष्णव जन तो’ जगभरातल्या 124 देशातल्या गायकांनी सादर केले. यामुळे जगभरात हे भजन लोकप्रिय झाले.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीन पिंग, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू, जपानचे पंतप्रधान शिंझो ॲबे या सर्व परदेशी पाहुण्यांना पंतप्रधान साबरमती आश्रम येथे घेऊन गेले. ज्यामुळे जागतिक राजनैतिक पटलावर साबरमती आणि गांधीजींच्या विचाराचे महत्व अधोरेखित झाले.

 

|
|
|
|

 

 

जगभरातल्या अनेक ठिकाणी महात्मा गांधींचे पुतळे उभारण्यात आले. राजकोट येथे महात्मा गांधी संग्रहालयाचे उद्‌घाटन झाले.

https://twitter.com/narendramodi/status/533948745717526528

महात्मा गांधी यांची मूल्ये आणि विचार आजही जागृत राहावेत यासाठी ते आचरणात आणण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. कोणतीही चळवळ जनतेला सोबत घेऊनच यशस्वी होत असते हा गांधीजींचा मंत्र त्यांनी आचरणात आणला.

महात्मा गांधी यांच्याविषयी पंतप्रधानांनी 2 ऑक्टोबर 2018 रोजी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, “ भारत ही विविधतांची भूमी आहे. या देशाला आणि देशातल्या लोकांना आपापसातले मतभेद विसरुन साम्राज्यवादाशी एकत्रित लढा देण्यासाठी कोणी एकत्र आणले असेल तर ती व्यक्ती म्हणजे केवळ महात्मा गांधी. त्यांनी भारताची प्रतिमा जगभरात उचांवली होती. आज आपण 130 कोटी भारतीय बापूजींचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध आहोत”.

|
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
FSSAI trained over 3 lakh street food vendors, and 405 hubs received certification

Media Coverage

FSSAI trained over 3 lakh street food vendors, and 405 hubs received certification
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2025
August 11, 2025

Appreciation by Citizens Celebrating PM Modi’s Vision for New India Powering Progress, Prosperity, and Pride