पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ म्हणजेच ‘ घरोघरी तिरंगा ‘मोहिमेबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, हर घर तिरंगा ही चळवळ आता संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहे. ही मोहीम तिरंग्याबद्दल 140 कोटी भारतीयांच्या मनातील आदर दर्शवते.
एक समाज माध्यम ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये, अमृत महोत्सव हँडलने तामिळनाडूमधील रामेश्वरमजवळील मंडपम येथील भारतीय तटरक्षक दलाच्या तळावर हर घर तिरंगा चळवळीच्या उत्सवाची झलक शेअर केली आहे.
अमृत महोत्सवाच्या एक्स पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे की,
"#हरघर तिरंगा संपूर्ण भारतभर लोकप्रिय झाला आहे, ही मोहीम 140 कोटी भारतीयांना तिरंग्याबद्दल असलेला आदर दर्शवते."
#HarGharTiranga has become popular all across India, indicating the deep respect 140 crore Indians have for the Tricolour. https://t.co/9bvZp5QKAg
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2024