केनियाचे माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते राईला ओडींगा यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सुमारे दहा वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केनियाचा दौरा केल्याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली. ओडींगा यांनीही 2009 आणि 2012 मधील भारत दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या.
उभय नेत्यांनी अलिकडच्या काळातली भारत-केनिया संबंधातील प्रगती तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.