अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हवामानविषयक विशेष दूत सन्माननीय जॉन केरी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या वतीने जॉन केरी यांनी पंतप्रधानांना अभिवादन केले. क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान बायडेन यांच्याशी झालेल्या अलिकडच्या संभाषणाविषयीच्या चांगल्या आठवणी पंतप्रधानांनी यावेळी सांगितल्या आणि त्यांच्या शुभेच्छा राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली.
भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या फलदायी चर्चेबद्दल जॉन केरी यांनी पंतप्रधानांना थोडक्यात माहिती दिली. त्याचबरोबर महत्वाकांक्षी नवीकरणीय उूर्जा योजनांसह भारताच्या हवामानविषयक सकारात्मक कृतींची नोंदही घेतली. त्यांनी 22 आणि 23 एप्रिल 2021 रोजी होणार्या हवामान विषयावरील शिखर परिषदेची पंतप्रधानांना माहिती दिली.
पंतप्रधानांनी नमूद केले की पॅरिस कराराअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या योगदानाची पूर्तता करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काही देशांनीही हेच केले आहे. जॉन केरी यावेळी सांगितले की हरित तंत्रज्ञान आणि आवश्यक वित्तपुरवठ्यासाठी परवडणा-या आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून देवून अमेरिका भारताच्या हवामानविषयक योजनांचे समर्थन करेल. भारत आणि अमेरिका यांच्यात विशेषत: अर्थिक नवसंकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांची शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी करण्याबाबत सहकार्य करण्यासाठी पंतप्रधानांनी सहमती दर्शविली तसेच त्याचा इतर देशांवर प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये सकारात्मक परिणाम होईल असेही मत व्यक्त केले.