नवी दिल्ली विविध क्षेत्रात प्रशासनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सचिवांच्या समुहांकडून वेगवेगळया कल्पना जाणून घेण्याचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून या प्रयोगाची दुसरी फेरी सुरू झाली आहे. अशाच प्रकारचा प्रयोग गेल्या वर्षी (जानेवारी 2016) पहिल्यांदा केला होता. या वर्षी “वाहतूक आणि संचार” या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रशासनात कोणते परिवर्तन करणे आवश्यक आहे, याविषयी सचिवांच्या गटाची मते जाणून घेतली जात आहेत.
केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे अधिकारी सचिवांच्या कल्पना, योजना जाणून घेत आहेत.
Met a group of secretaries, who shared insightful presentations on transport & communication sectors. https://t.co/D6SQU8sQfD
— Narendra Modi (@narendramodi) January 3, 2017