देशाच्या पंतप्रधानपदाचा तिसऱ्यांदा कार्यभार स्वीकारल्यानंतर आलेल्या अभिनंदनाच्या संदेशांबद्दल आणि दूरध्वनीवरून संपर्काबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत. मोदी यांनी या संदेशांना एक्स या समाजमाध्यवावर प्रतिसाद दिला आहे.
क्युबा प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष मिगुएल डायझ-कॅनेल बर्मुडेझ यांच्या संदेशाला पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद ;
“अध्यक्ष डायझ-कॅनेल तुम्ही मनापासून दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी कृतज्ञ आहे. क्युबासोबतचे द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, या संबंधाचे मूळ अनेक शतके जुन्या उभय देशांमधील लोकांमधील थेट संवादाने जोडले गेले आहे.”
Grateful for your warm wishes President @DiazCanelB. We remain committed to enhance our bilateral ties with Cuba that are rooted in age-old people-to-people connect. https://t.co/13EFeYd3OZ
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2024
पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेना यांच्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“अध्यक्ष सँटियागो पेना तुमच्या शुभेच्छांचे मी स्वागत करतो.लोकांच्या हितासाठी आम्ही भारत-पॅराग्वे संबंध यापुढेही वृद्धिंगत करू .”
Appreciate your greetings President Santiago Pena. We will continue to advance India-Paraguay relations for the benefit of our people. @PresidenciaPy https://t.co/Jc6w2fzjLy
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2024
पनामाचे अध्यक्ष लॉरेंटिनो कॉर्टिझो यांना उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
Thank you President @NitoCortizo. Panama is a key partner. We will work together for strengthening our mutually beneficial partnership in all its dimensions. https://t.co/edySqtGx3w
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2024
“धन्यवाद अध्यक्ष निटो कॉर्टिझो.पनामा हा प्रमुख भागीदार आहे. परस्पर हिताची भागीदारी सर्व बाजूंनी अधिक मजबूत करण्यासाठी आपण एकत्र काम करू.”
बल्गेरियाचे अध्यक्ष रुमेन रादेव यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“धन्यवाद अध्यक्ष रुमेन रादेव.भारत आणि बल्गेरिया यांच्यातील भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करत राहू.”
Thank you President Rumen Radev. We will continue to work together to deepen partnership between India and Bulgaria. @PresidentOfBg https://t.co/UfxVA1FyGT
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2024
ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या संवादाबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले;
“ओमानचे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद.त्यांच्या हार्दिक शुभेच्छा आणि मैत्रीच्या शब्दांचे मनापासून कौतुक.शतकानुशतके असलेले भारत-ओमान यांच्यातील धोरणात्मक संबंध नक्कीच नवीन उंचीवर पोहचतील. ”
Thank His Majesty Sultan Haitham bin Tarik of the Sultanate of Oman for his call and deeply appreciate his warm felicitations and words of friendship. The centuries-old India-Oman strategic ties are destined to scale new heights.
— Narendra Modi (@narendramodi) June 11, 2024