अनेक सरकारी योजनांमुळे, प्रत्येक घर दिवाळीत आनंदात असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, आयुष्मान भारत योजना, यूपीआय डिजिटल पेमेंट्स, स्टार्ट अप इंडिया इत्यादी योजनांच्या लाभांसंबंधी मायगव्हइंडियाच्या हॅंन्डलवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे
मायगव्हइंडियाच्या X पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्ट वर म्हटले आहे;
"लोककल्याणाच्या अनेक सरकारी योजनांमुळे, दिवाळीत प्रत्येक घरात सणाचा आनंद दिसत आहे याचे समाधान आहे. #VocalForLocal”
मुझे बहुत संतोष है कि दीपावली के त्योहार पर जनकल्याण की हमारी योजनाओं से आज देश का हर घर रोशन है। #VocalForLocal https://t.co/yZFJDP5m58
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2023