व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल निगो झुआन लिच यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधला.
पंतप्रधानांनी यावेळी सप्टेंबर 2016 मधील त्यांच्या व्हिएतनाम दौऱ्याच्या आठवणींना उजाळा दिला. या दौऱ्यादरम्यान, द्विपक्षीय संबंध अद्ययावत करुन त्यांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या स्तरावर नेण्यात आले. भारताच्या “ॲक्ट ईस्ट” योजनेचा व्हिएतनाम हा एक महत्त्वपूर्ण स्तंभ असल्याचे ते यावेळी म्हणाले.
जनरल निगो झुआन लिच यांनी यावेळी पंतप्रधानांना द्विपक्षीय संरक्षण सहकार्यातील प्रगतीचा आढावा दिला. भारत आणि व्हिएतनामचे संरक्षण क्षेत्रातील संबंध दिर्घकालीन आणि परस्पर हिताचे असतील तसेच संरक्षण बंध मजबूत करण्यासाठी भारत नेहमी प्रयत्नशील राहील याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
सर्व क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम दरम्यानच्या सहकार्यामुळे संपूर्ण प्रदेशात स्थैर्य, सुरक्षा आणि भरभराट व्हायला सहकार्य मिळेल.