चीनचे संरक्षणमंत्री जनरल वे फेंगे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारत आणि चीन यांच्यात संरक्षण आणि लष्करी आदान-प्रदान यासह इतर क्षेत्रात उच्चस्तरीय संपर्क वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
भारत-चीन सीमेवर शांतता कायम राखणे म्हणजे उभय देश आपसातले मतभेद संवेदनशीलतेने आणि परिपक्वतेने हाताळत असल्याचे द्योतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.
कहान, जोहान्सबर्ग आणि क्विंदाओ येथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत झालेल्या नुकत्याच भेटीचे स्मरण पंतप्रधानांनी केले.