युरोप आणि फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन वेस ली ड्रियान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या जून 2017 मधील फ्रान्स दौऱ्याचा पाठपुरावा म्हणून त्यांनी द्विपक्षीय संबंधातील अलिकडच्या घडामोडींबाबत पंतप्रधानांना माहिती दिली.
संबंधांबद्दल, तसेच फ्रान्सचे संरक्षण मंत्री म्हणून यापूर्वी पार पाडलेली भूमिका आणि सध्याची मंत्री पदाची भूमिका पार पाडताना ली ड्रियान यांनी दिलेल्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधान म्हणाले की, भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचे महत्व केवळ द्विपक्षीय संदर्भापूरतेच मर्यादित नाही तर प्रादेशिक आणि जागतिक संदर्भातही शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी महत्वपूर्ण आहे.
पंतप्रधान म्हणाले अध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत दौऱ्याबाबत आपण उत्सुक आहोत.