बिहारमधील आरा येथील विद्युत ग्रीड उपकेंद्राच्या विस्तार कार्यासाठी पायाभरणी झाल्यामुळे बिहारमधील आरा,भोजपूर, बक्सर आणि रोहतास या जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतील लोकांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्रीय ऊर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जामंत्री आर.के.सिंग यांच्या ट्विट संदेशावर पाठवलेल्या प्रतिसादात्मक ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“ऊर्जा क्षेत्रातील या विस्तार कार्यामुळे औद्योगिक विकास तसेच रोजगार निर्मितीसोबत इतर अनेक लाभ होणार आहेत. या शिवाय, हे काम पूर्ण झाल्यावर आरा,भोजपूर, बक्सर आणि रोहतास या जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतील लोकांचे जीवन अधिक सुलभ होणार आहे.”
ऊर्जा के क्षेत्र में इस विस्तार से औद्योगिक विकास और रोजगार सृजन के अलावा कई और फायदे हैं। इसके साथ ही यह बिहार के आरा, भोजपुर, बक्सर और रोहतास सहित कई और जिलों के लोगों के जीवन को आसान बनाएगा। https://t.co/t8q1DZ869D
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2023