माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
त्यांनी स्वर्गीय चौधरी चरण सिंह यांची प्रशंसा करताना सांगितले की त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी समर्पित केले.
पंतप्रधान संदेशात म्हणाले:
“देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले जात आहे, हे आमच्या सरकारचे सौभाग्य आहे. हा सन्मान देशासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद असो किंवा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू - भगिनींप्रती त्यांचे समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती त्यांची बांधिलकी संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे.”
हमारी सरकार का यह सौभाग्य है कि देश के पूर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह जी को भारत रत्न से सम्मानित किया जा रहा है। यह सम्मान देश के लिए उनके अतुलनीय योगदान को समर्पित है। उन्होंने किसानों के अधिकार और उनके कल्याण के लिए अपना पूरा जीवन समर्पित कर दिया था। उत्तर प्रदेश के… pic.twitter.com/gB5LhaRkIv
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024